आज जवळपास वर्षे पूर्ण झालं आणि अचानक तीच्या वाढदिवसाच्या दिवशीच कॉल आला.मोबाईलच्या स्क्रीनवर तीने नजर टाकली आणि अनेक भावना उंचबळून आल्या.भिती, हुरहुर, ओढ, धसका.आयुष्यातील हा भुतकाळ तीने मनातून पुसायचा प्रयत्न केला तरी त्याचा नंबर अजूनही सेव्ह करुन ठेवला होता.का, याचे उत्तर नव्हते.नाव स्क्रीनवर ब्लिंक होत होते तरी फोन घ्यायचा तीचा धीर होत नव्हता. फोन घेतला आणि अनेक वर्षानी बोलताना बांध फुटला तर ?नुसते बोलावे तरी ती आता घरी होती . त्याला भेटायला घरी बोलावायचे तर सांगणार काय? घरचे काय किंवा बाहेरचे काय, हे नाते स्विकारतील ? कि आरोपाचे बाण आधीच घायाळ झालेल्या मनाला आणखी डागण्या देतील.आपण एकट्या हे सर्व सहन करु शकु का ? एकदा तोडून टाकलेले हे बंध पुन्हा जोडणे खरोखर आवश्यक आहे ? जे नाते कदाचित फक्त ओझेच होणार आहे ,ते पुन्हा बांधायचे कशाला ? अनेक प्रश्न पिंगा घालत होते. मनाची घालमेल उलगडत नव्हती वरवर भुतकाळ विसरला असे वाटले तरी दुखर्या आठवणी पाण्यातून चेंडू बाहेर उसळावा, तश्या मनात तरंग उमटवीत होत्या.
सगळे कसे अचानक झाले.तीचे मन अलगद गतकाळच्या फुलपाखरी दिवसात गेले. अनामिक हुरहुर लावणारे , नवी नाती जोडू पहाणारे , निसर्गाने निर्माण केलेले आकर्षणामुळे सर्व बंध तोडू पहाणारे ते दिवस. आयुष्यात एक अकल्पित वळण आले. तिच्या पेक्षा दहा वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडलेली ती! हे घडायला कारण ठरला करियरमधील एक टप्पा. कंपनीने प्रमोशन देउन मुंबईवरुन दिल्लीला जाण्यास सांगितले.घरापासून दूर, सगळे व्याप्,मोह,बंध सोडुन तीला जायचे नव्हते, अगदी प्रमोशन नाकारायची तयारी होती, पण घरच्यांचा आग्रह पडला "आता तरी तु तुझा विचार कर ,इतकी वर्षे लोटली घरच्यांचे करता करता. आता कुटुंबातील लोक आणि त्यांचा विचार नको करू. ही संधी घे आई "दाटावत मुलांनी सांगितलं आणि ती ऐकटी निघाली. अशी ती घर सोडून, मुलं सोडून प्रथमच एकटी जाणार होती. दडपण तर खूप होत मनावर.
खरतर मुंबई काय किंवा दिल्ली काय, दोन्ही मेट्रो सिटीच ! तरीही मनावर ऐक दडपण होतेच.रहायचा कोठे, हा महत्वाचा प्रश्न तरी अलगद सुटला, तीच्या ऑफिसची सहकारी मेघाकडे काही दिवस राहणार येणार होते,थोडे रुळले की नवीन जागा शोधता येणार होती.झालही तसचं ! मेघा एकटीच राहत होती ,एक आठवडा तिच्याकडे राहून थोडी शोधाशोध केल्यावर भाड्याने फ्लॅट मिळाला. पण याच दरम्यान मेघाच्या फ्लॅटवर तीला मेघाचा भाचा भेटला, गौतम आणि आयुष्यात एक नवीन वादळ आले. खरतर आता लगेच कोणा पुरुषाकडे आकर्षीत व्हायला ती काही नवथर तरुणी नव्हती, पण जणु हे नकोसे वळण आयुष्यात यायचेच होते. कोणत्यातरी बेसावध क्षणी ती गौतमकडे ओढली गेली. कुटूंब सोडून पहिल्यांदा एकट्याने राहायचा प्रसंग तीच्यावर आला होता. रितेपणा आणि कदाचित आलेले मनात आलेली उदासी तिला गौतमच्या अजुन जवळ नेत होते.घट्ट नात्यातील निर्माण झालेला दुरावा या नवीन नात्यांला जागा करून देत होता.मग सुरू झाला एक जीवघेणा खेळ! मर्यादांचे बंध तटातटा तुटले आणि ओढाळ मन सैरावैरा उधळले. फक्त वीकएंडला भेटणारे ते दोघे आता रोज भेटू लागले .कधी त्याच्या रूमवर कधी तिच्या रूमवर , अकल्पित एक क्षण आला, त्यावेळी तिने दिलेली कबुली आणि मग त्यानंतर सुरु झाली न थांबवता येणारी घसरण !
वयाचेही भान राहिले नाही तिला! अशी गुंतली गेली त्याच्यात त्यांनी तिला जणू नवयौवना केलं होत..तो upsc ची परिक्षा देत होता.तो राजेंद्र नगरमध्ये तर ती करोल बाग रहात होती .पुर्ण अठवडाभर ती फक्त शनिवारची वाट बघत राही. आधी समजलंच नाही हे नक्की काय चालू आहे, पण मग तेही सार तिला हवहवस वाटु लागलं.कधी आपण प्रेमात पडलो आणि कसे इतक्या पुढे वहात गेलो हे समजलेच नाही. त्याला फोटोग्राफीची आवड होती. तिचे तळ हात हातात घेऊन त्याने असंख्य फोटो काढले. त्याच्या सकाळच्या मेसेजने तिचा दिवस सुरू होई. त्याचा कॅमेरा घेऊन तो एडजेस्ट करुन कधी कधी ती ही त्याच्या गळ्यावरील तीळाचे फोटो काढे तर कधी त्याच्या उघड्या पाठीवर तिचे नाव गिरवत राही.त्याच नक्की काय आवडलं होत हे सांगता येत नव्हते पण मनातून पुर्णपणे गुंतली होती ती. त्याच्या गोऱ्यापान मानेवर असणारा तीळ तिला भारीच आवडे . शॉपिंग मॉलच्या बाहेरचे कट्टे हा त्यांचा अड्डा.कधी त्याच्या बाईकवर बसून त्याचा शर्ट ओढ़त दिल्ली दर्शन होइ तर कधी त्याच्या केसात हात फिरवत विचारात बुडून जाइ.अर्थात प्रेम म्हणजे रुसवेफुगवे आलेच. कधी कधी कडाक्याचे भांडण झाले कि मग मध्यरात्री कॉल करून तो गप्पा मारत मारत तिला गुंगवून टाके आणि तिचंच कसे चुकले हे पटवून देइ.तीही ते मान्य करे.एखाद्या शाळकरी पोरी सारखी तिची अवस्था झाली होती. त्यानं जणु तीला संमोहित केल होते. तिला नजरेतून तो वाचत राहिला तिच्या प्रणयाची,अनुरागाची, मौनाची भाषा ,ती रडत राहिली,आक्रंद करत राहिली पण थांबली नाही . मुक्त भिजत राहिली अगदी पाऊस अंगात मुरेतोवर.
मात्र बातम्यांना पंख फुटतात, तसे या प्रकरणाचे वारे मुंबईच्या ऑफिसपर्यंत पोहचले आणि चक्रे फिरली.एक सुज्ञ निर्णय घेतला गेला तिची बदली तडकाफडकी पुन्हा मुंबईला झाली. नोटीस नाही,काही नाही. एक कॉल आणि खेळ खल्लास.तिला एका दिवसाची नोटीस बजावण्यात आली .लगेच रुजू व्हायला सांगितलं आणि तिच्याकडे वेळच उरला नाही. निरोप कसा घेणार होती ती ? बाहेर एन डिसेंबरची दिल्लीतील कडाक्याची थंडी.किती प्लॅन केले होते त्यांनी. सार सारं संपलं होत.
मात्र बातम्यांना पंख फुटतात, तसे या प्रकरणाचे वारे मुंबईच्या ऑफिसपर्यंत पोहचले आणि चक्रे फिरली.एक सुज्ञ निर्णय घेतला गेला तिची बदली तडकाफडकी पुन्हा मुंबईला झाली. नोटीस नाही,काही नाही. एक कॉल आणि खेळ खल्लास.तिला एका दिवसाची नोटीस बजावण्यात आली .लगेच रुजू व्हायला सांगितलं आणि तिच्याकडे वेळच उरला नाही. निरोप कसा घेणार होती ती ? बाहेर एन डिसेंबरची दिल्लीतील कडाक्याची थंडी.किती प्लॅन केले होते त्यांनी. सार सारं संपलं होत.
अखेर मनाचा हिय्या करुन निरोप न घेता शेवटी ती निघाली ,कारण निरोप घेण्या इतकं अजुन अवघड काहीच नव्हतं. निदान तिच्यासाठी तरी.गौतमबरोबर घालविलेल्या प्रत्येक क्षणाची स्मृती मनाच्या कपाटात खोल टाकून, सर्व पुसून ती फ्लाईट घेऊन काहीही न सांगता निघुन गेली. कारण आता तिला वास्तवाचे भान आल होत आणि अजुन तिला तिच्या आब्रूचे वाभाडे निघायला नको होते .तिने मनोमन ठरवलं की त्याचा नंबर ही ठेवायचा नाही.नशीब तिचं थोर की घरी समजलं नव्हतं ऑफिसने ते परस्पर निभावलं आणि तिला सावरायला वेळ मिळाला. तिने आधी नंबर ब्लॉक केला आणि एक ओझं उतरून टाकलं मनातून! पण आज त्याचा कॉल निराळ्या नंबरवरून होता त्यामुळे घेतला गेला आणि तिने आवाज ही फक्त एका हॅल्लो मध्ये ओळखला . खूप बोलायचं होत तिला पण अनपेक्षितपणे आलेल्या कॉलवर बोलता येत कुठे ? जुजबी गप्पा झाल्या आणि कॉल बंद झाला .पण तिचा दिवस मात्र कासासाच गेला . संध्याकाळी मुलांनी सरप्राइज पार्टी ठेवली त्यात खूप पाहुणे होते त्यात ती गौतमच दुःख विसरून गेली , केक कटिंग होत पण तो केक काही वेळेवर येत नव्हता त्यात वेळ वाया जात होता आणि बऱ्याच वेळाने केक आला. तिचे बंद डोळे फक्त आवाज टिपत होते , सरप्राइजच्या नावाखाली तिला गांधारी केलं हो.त पण त्या साऱ्या आवाजात एक अजुन आवाज आला "हॅप्पी बर्थ डे मॅम!". पक्की ओळख असलेला आवाज एकून पटकन डोळे उघडले.आजुबाजुला सगळे घरचे होतेच, पण ---- पण समोर गौतम उभा होता.
अचानक सारे विसरुन त्याच्या कुशीत शिरावं असे तीव्रतेने वाटले ,पण ! हा पण आड येत होता. सामाजिक भान, प्रत्येक नात्यात एक वेगळा धागा असतो आणि प्रेम तर रेशमी धाग्यात येत. कश्यात तरी दडून येते प्रेमाची चाहूल त्या सगळ्या गडबडीत त्याच्या बरोबर बोलणं राहून गेलं तिचं . कोकरासारखी सैरभैर होती ती . फक्त तिच्या मनात त्यावेळी ही येऊन गेलं खूप उशीर केलास रे खूप उशीर!!! त्याच वास्तव तिचा वर्तमान झाकोळून टाकणारं होत. मग तिने ही ते बंद ओठा आड केलं कठोरपणे !!! त्याच्या बरोबर च्या त्या क्षणात तीनं युग अनुभवलं होतं ते चार क्षण तीचे होते फक्त तीचे . संसारातील गदारोळ आणि तो एक अविरत अल्लड वर्षाव .तिचं हे ययाती होण कदाचित समाजमान्य नसेल पण तिचा ऐकांत प्रकाशमान होता आणि तिच्या प्रेमाचा सुगंध तिच्या डोळ्यांत दिसत होता .प्रेम सुंदर करतं जगणं फक्त त्याला हे चौकट घालून घुसमट नका करू आसं आणि इतकचं तिला त्या क्षणी सांगायचं होत जगाला पण ती मुकी होती ती त्यावेळी फक्त रिती होती ती त्यावेळी फक्त रति होती आणि त्याच्या शिवाय आता कदाचित ती रिती होती आगदी रिती होती !!!
आज जवळपास वर्षे पूर्ण
झालं आणि call आला तीला वाढदिवसाच्या निमित्ताने .खूप बोलता आले असते पण
ती घरी होती . तीला त्याला घरी बोलावायच होते पण घरी काय सांगितले असते??
तोंडाला कुलूप आणि डोळ्यात खूप काही दाटून आलेल ,कारण लोक जरी ऐकून घेतात
तरी ही तेच समजून घेततात जे त्यांना हवं आहे. शब्दांचे पक्षी झाले की मग
आरोपा चे बाण झेलून सावरण्यासाठी ऐकटेच उरता तुम्ही अनेक अर्थपूर्ण नात्या
सकट शून्य होवून !!
तिच्या आवर्तना तून तिच्या
भावनाचे अनुलोम विलोम उमटत राहतात आजही त्याच्या तिच्या मनातील सावल्या
उमटवत आहेत एक भाससीमा आणि घरंगळत जातो एक एक श्वास सामाजिक जाणिवांच्या
पल्याड . दाही दिशांना तिच्या त्याच्या प्रेमाचा कंप उरला आहे पण कंप गात्र
फुलवत नाही तो फक्त भावनांचा कल्लोळ देतो आणि सामाजिक जाणिवांचे ओझे बस
!!!
तिला तिच्या मर्यादा माहीत होत्या पण तिच्यावर
मात करत होते ते तिचं मन . तिच्या त्या घसरलेल्या पावलांना ची गोष्ट. एका
ययाती ची गोष्ट !!! या तील नायिका पण तरुण होते पण प्रेमात तिचं वय तिला
तरुण करून टाकत तिच्या पेक्षा 10 वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडलेली ती
बहरलेली तगर होते तो कॉलेज मध्ये जाणारा आणि तिची मुलं आता कॉलेज मध्ये
असणारी पण प्रेम एक वेगळाच आयाम आखत राहत ना ???
मुंबई
वरुन काम साठी दिल्ली ला तीऐकटीच जाणार होती ,घरा पासून दूर , तीला नको
होते प्रमोशन पण घरी सगळे ओरडत होते "आता तरी तु तुझा विचार कर ,इतकी वर्षे
लोटली आता कुटुंबातील लोक आणि त्यांचा विचार नको करू ही संधी घे आई " आसं
दाटावत मुलांनी सांगितलं आणि ती ऐकटी निघाली. अशी प्रथमच जाणार होती ती घर
सोडून मुलं सोडून एकटी. दडपण होत खूप मनावर खरतर मुंबई आणि दिल्ली
दोन्ही मेट्रो सिटी तरीही ऐक दडपण . तीच्या office ची सहकारी होती मेघा
तिच्या कडे काही दिवस राहणार होती , मग रुळली की नवीन जागा बघून राहणार
होती तसचं झालं मेघा एकटीच राहत होती ,त्यामुळे 1 आठवडा तिच्या कडे राहून
मग तीने फ्लॅट घेतला भाड्याने पण त्या तिच्या मेघा च्या फ्लॅट वर तीला
मेघा चा भाचा भेटला गौतम, आणि सुरू झाली एक नवीन गोष्ट ,ती आणि तो आता
सतत बरोबर असायचे शनिवारी ,रविवारी तर एकत्र राहायचे ही !!
ती
कुटूंब सोडून पहिल्यांदा एकटी राहात होती एकटेपणा आणि कदाचित आलेले मनात
साचलेल खूप काही तिला गौतम च्य आजुन जवळ नेत होते . तिच्या ही नकळत
.नात्यातील रिकाम्या जागा इतर नात्यांना जागा करून देतात , आणि मग सुरू
होतो एक जीवघेणा खेळ .मर्यादा आणि घरंगळत जाणार मन!! फक्त वीकएंड ला
भेटणारे ते दोघे आता रोज भेटू लागले . कधी त्याच्या रूम वर कधी तिच्या
रूम वर , अकल्पित एक क्षण आणि त्यावेळी तिने दिलेली कबुली आणि मग
त्यानंतर दाटलेली हुरहूर !!!
वयाचे भान ही राहिले
नाही तिला अशी गुंतली गेली त्याच्यात त्यांनी तिला जणू ययाती केलं होत
.ती परत तरुण झाली होती .तो upsc च्या exam देत होता ,राजेंद्र नगर मध्ये
तो राहत होता,ती करोल बाग . रोज मी फक्त शनिवार ची वाट बघत राही. आधी
समजलंच नाही हे नक्की काय चालू आहे पण मग ते सार तिला ही हरवून टाकणारं
होत . तिला नाही माहिती की ह्याची नक्की कुठे सुरवात झाली पण ते प्रेमात
पडले आणि समजण्याच्या ही आधी त्यांनी गुंतवून टाकलं त्याला फोटोग्राफी ची
आवड होती तो तिचे तळ हात हातात घेऊन न जाने किती फोटो काढे ,त्याच्या
सकाळच्या msg ने तिचा दिवस सुरू होई. त्याचा कॅमेरा घेऊन तो एडजेस्ट
करुन कधी कधी ती ही त्याच्या गळ्या वरील तीळाचे फोटो काढे , कधी त्याच्या
उघड्या पाठीवर त्याचे तिचे नाव गिरवले रही ती . नक्की काय आवडलं होत त्याच
हे नाही सांगता येत होत तिला पण अडकली होते ती . त्याच्या गोऱ्या पान
मानेवर असणारा तीळ तिला भारीच आवडे . शॉपिंग मॉल च्या बाहेर च्या चबूतरे
त्यांचा अड्डा होते त्यावेळी.त्याच्या बाईक वर बसून त्याचा शर्ट ओढ़त सगळे
त्याला दाखवत असे ती त्याच्या केसात हात फिरवत असे ,कधी कधी तर भांडण ही
होई मग मध्य रात्रि कॉल करून तो गप्पा मारत मारत तिला गुंतवून टाके आणि
तिचं कशी चुकली हे पटवून देइ आसे. ती ते मान्य करे शाळकरी पोरी सारखी तिची
ती अवस्था . त्यानं कोंडीत पकडले होते तिला नजरेतून तो वाचत राहिला
तिच्या प्रणयाची,अनुरागाची, मौनाची भाषा ,ती रडत राहिली , आक्रंद करत
राहिली पण थांबली नाही . मुक्त भिजत राहिली अगदी पाऊस अंगात मुरेस तोवर आणि
मग तिच्या आत सजलेला गाव बहरू लागला आणि सुगंध दरवळला पार मुंबईत गेले
वारे आणि सुरंग लागला तिच्या स्वप्नांना ऑफिस मध्ये समजलं आणि ऐक सुज्ञ
निर्णय घेतला गेला तिची बदली तडकाफडकी झाली नोटीस नाही काही नाही. एक कॉल
आणि गेम झाला ,तिला एका दिवसाची नोटीस बजावण्यात आली .लगेच रुजू राहायला
सांगितलं आणि तिच्या कडे वेळच उरला नाही निरोप कसा घेणार होती ती ??
आलिकडे देल्ही थंड होत होती डिसेंबर चालू होता .किती प्लॅन केले होते
त्यांनी सार सारं संपलं होत . तिकडे आता बाईक वर फिराताना त्याच्या बरोबर
हात आजून च थंड होत तिचे मग तो हळूहळू माझे हात त्याच्या जर्किन मध्ये
अडकवे तो उबदार स्पर्श हवा हवा ही होता आणि नकोसा ही तिला !!!
तिच्या चेहऱ्यावर ना कोणती तृष्णा ना त्याच्या चेहऱ्यावर कोणते तरंग !!
कधी
कधी कही तरी टोचत राही उगाच दूखत राही ,पण तिने ओठ शिवले होते एक अजब
समाधान होत त्यात . तो चिड़ायचा,उगाच हसायचा,मग अमानुष सवयीने
विझविण्यासाठी मनातील धग खूप धडपड करायचा , कापरागत उडून जाणार chat
मधील प्रेम त्याला माहित होते पण त्याला तिच्या कड़े असणार सांस्कृतिक संकरा
च आख्यान कदाचित नव होत. कारण त्याच्या कडे होत मूर्तिमंत बालिशपण
त्याच्या इतकचं निरागस , त्याच वय. वय शेवटी आड़ येते च ना ???
भरगच क्लाउड मध्ये उपलोड डिलीट करत राहणारा तो आधुनिक आणि ती होती पत्रात आसनारी हुरहुर !!
[ ] ह्या नवीन माध्यमात विरघळून जाणारा तो आणि आजुनही रित्या सांसारिक रूढ़ी मध्ये घट्ट धरून मनावर अधिराज्य गाजवत रहनारी ती !!
तो
पहाट वारा ना धड चढत होता ना उतरत !! निरोप न घेता शेवटी निघाली ,कारण
निरोप घेण्या इतकं आजुन अवघड काहीच नव्हतं निदान तिच्या साठी तरी .ओंजळीत
त्याच्या माझ्या आठवणीतील अधिरे स्पंदन ओठात तिच्या शब्दचे पण क्रमिक अंतर
,ती फ्लाईट घेऊन काहीही न सांगता निघुन गेली कारण आता तिला वास्तवाचे भान
आल होत आणि आजुन तिला तिच्या आब्रू चे वाभाडे निघायला नको होते .तिने
मनोमन ठरवलं की त्याचा नंबर ही ठेवायचा नाही .नशीब तिचं थोर की घरी समजलं
नव्हतं ऑफिस ने ते परस्पर निभावलं आणि तिला सावरायला वेळ मिळाला. तिने
आधी नंबर ब्लॉक केला आणि एक ओझं उतरून टाकलं मनातून पण आज त्याचा कॉल
निराळ्या नंबर वरून होता त्यामुळे घेतला गेला आणि तिने आवाज ही फक्त एका
हॅल्लो मध्ये ओळखला . खूप बोलायचं होत तिला पण अनपेक्षितपणे आलेल्या कॉल वर
बोलता येत कुठे ?? जुजबी गप्पा झाल्या आणि कॉल बंद झाला .पण तिचा दिवस
मात्र कासासाच गेला . संध्याकाळी मुलांनी सरप्राइज पार्टी ठेवली त्यात खूप
पाहुणे होते त्यात ती गौतम च दुःख विसरून गेली , केक कटिंग होत पण तो केक
काही वेळेवर येत नव्हता त्यात वेळ वाया जात होता , आणि बऱ्याच वेळाने केक
आला तिचे बंद डोळे फक्त आवाज टिपत होते , सरप्राइज च्या नावा खाली तिला
गांधारी केलं होत पण त्या साऱ्या आवाजात एक आजुन आवाज आला happy birthday
maam "तिला तो ओळखता ही आला पटकन डोळे उघडले पण सगळे होते आणि समोर गौतम ही
होता .इच्छा ही तिला सार विसरून कुशीत शिरावं पण पण आड येत होत सामाजिक
भान, प्रत्येक नात्यात एक वेगळा धागा असतो आणि प्रेम तर रेशमी धाग्यात येत.
कश्यात तरी दडून येते प्रेमाची चाहूल त्या सगळ्या गडबडीत त्याच्या बरोबर
बोलणं राहून गेलं तिचं . कोकरा सारखी सैरभैर होती ती . फक्त तिच्या मनात
त्यावेळी ही येऊन गेलं खूप उशीर केलास रे खूप उशीर!!! त्याच वास्तव तिचा
वर्तमान झाकुळून टाकणारं होत मग तिने ही ते बंद ओठा आड केलं कठोरपणे !!!
त्याच्या बरोबर च्या त्या क्षणात तीनं युग अनुभवलं होतं ते चार क्षण तीचे
होते फक्त तीचे . संसारातील गदारोळ आणि तो एक अविरत अल्लड वर्षाव .तिचं हे
ययाती होण कदाचित समाजमान्य नसेल पण तिचा ऐकांत प्रकाशमान होता आणि तिच्या
प्रेमाचा सुगंध तिच्या डोळ्यांत दिसत होता .प्रेम सुंदर करतं जगणं फक्त
त्याला हे चौकट घालून घुसमट नका करू आसं आणि इतकचं तिला त्या क्षणी
सांगायचं होत जगाला पण ती मुकी होती ती त्यावेळी फक्त रिती होती ती
त्यावेळी फक्त रति होती आणि त्याच्या शिवाय आता कदाचित ती रिती होती आगदी
रिती होती !!!
दीपा सामंत
No comments:
Post a Comment