Saturday, February 12, 2022

मावळ म्हणजे काय?

 


       छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात शुन्यातुन स्वराज्य उभं केलं. मराठेशाहीचा पायाच त्यांनी इतका मजबूत घातला होता की ते पूर्णपणे लयास जाण्यासाठी पुढची तब्बल दोनशे वर्षे जावी लागली. अशा स्वराज्याचा पाया घालण्यापासून ते त्याचा विस्तार करण्यापर्यंत पुण्याच्या आसपास असणाऱ्या मावळातल्या देशमुख-देशपांडेंची त्यांना अत्यंत मोलाची साथ लाभली. मोगल सरदार 'शास्ताखान' प्रकरण असो किंवा सिध्दी जौहरच्या वेळचे 'पन्हाळगड ते विशाळगड' असो, काटक असणाऱ्या मावळ्यांची साथ त्यांना कायमच लाभली. अफजलखान प्रकरणात मावळातल्याच कान्होजी जेध्यांनी त्यांच्या सगळ्या वतनावर पाणी सोडल्याचं तर सर्वश्रूतच आहे. अत्यंत काटक, शुर, कर्तबगार आणि विश्वासू मावळे ज्या भागातील असत ते "मावळ" म्हणजे काय? तेथील कर पध्दती, असणारे किल्ले त्याचा हा थोडक्यात लेखाजोखा.

       मावळ म्हणजे नेमकं काय हे पाहण्याआधी 'मावळ' या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे पाहणंही मोठं रंजक ठरेल. स. आ. जोगळेकरांच्या सह्याद्री ग्रंथात मावळ प्रांताच्या उत्पत्तीचे अतिशय सुरेख वर्णन दिले आहे. त्या ग्रंथात जोगळेकर म्हणतात...

       'मावळ या शब्दाची व्युत्पत्ती अनेक प्रकारे लावण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन शिलालेखात मामलाहार असा प्रादेशिक उल्लेख आढळतो. महाबळेश्वराचे जुने नाव मामलेश्वर असे आहे. मनुस्मृतीत मल्ल नावाच्या संकरजन्य जमातीचे नाव आहे. मल्ल किंवा तत्सम शब्द अंतर्भूत असलेली ग्रामनामे विशेषतः नगर, पुणे व सातारा या जिल्ह्यात आढळतात. या साधनांवरून श्री आबा चांदोरकर यांनी सिद्धांत मांडला आहे की मावळ म्हणजे 'मल्लराष्ट्र', किंवा महामल्ले - मामल्ल - मावळ = 'अत्युच्चपर्वतवेष्टीत' प्रदेश. ज्या प्रदेशातील अरण्यात महामल्ल, अस्वले पुष्कळ असतात तो प्रदेश'.
बारा मावळ :-
    सह्याद्रीच्या मुख्य रांगेला अनेक लहान लहान उपशाखा फुटल्या आहेत. अशा दर दोन उपशाखांच्या मधून सामान्यतः एक छोटीशी नदी उगम पावते अशा नद्यांच्या खोऱ्यांना मावळे किंवा खोरे म्हणतात.
उदाहरणार्थ: नाणे मावळ, पवन मावळ, मोसे खोरे, वेळवंड खोरे इत्यादी
     जुन्या कागदपत्रांमध्ये बारा मावळे असा वाक्यप्रयोग कधी कधी येतो. परंतु ज्यांना मावळे किंवा खोरी म्हणतात असे प्रदेश बाराहून अधिक आहेत. तेव्हा बारा मावळ एक वाक्यप्रयोग असून विशिष्ट बारा मावळे असे अर्थ त्यात अभिप्रेत नाही अशी एक शक्यता आहे आणि विशिष्ट बारा मावळांना,अनुलक्षून बारा मावळे वाक्यप्रयोग वापरला जाई अशी दुसरी शक्यता आहे.
     यापैकी दुसरी शक्यता गृहीत धरली तर ही बारा मावळे कोणती असा प्रश्न उदभवतो. अशा बारा मावळांची एखादी जुनी यादी अद्याप तरी उजेडात आलेली नाही. पण इतिहास संशोधकांनी ही बारा मावळे कोणती ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ४ च्या प्रस्तावनेत (पृ. ७८-७९) या बारा मावळांची जी यादी दिली आहे ती अशी आहे- (१)आंदर मावळ (२)नाणे मावळ (३)पवन मावळ (४)घोटण मावळ (५)पौड खोरे (६)मोसे मावळ (७)मुठे मावळ (८)गुंजण मावळ (९)वेळवंड मावळ (१०)भोर खोरे (११)शिवतर खोरे (१२)हिरडस मावळ
         बारा मावळ या वाक्यप्रयोगात हीच बारा मावळे अपेक्षित होती असा पुरावा काही राजवाडेंनी दिला नाही आणि आपण ही बारा मावळ का निवडली याचे काही कारण सांगितलेले नाही त्यांनी दिलेल्या यादीत कानद खोरे नाही. कानद खोरे गुंजण मावळ आणि मोसे खोरे या दोन मावळांच्या मध्ये आहे आणि हे मधलेच मावळ यादीतून का वगळले हे सांगितले नाही. भोर खोरे हे त्यांनी स्वतंत्र मावळ गणले आहे. वास्तविक भोर आणि उतरोली या रोहिडखोऱ्याच्या दोन तरफा आहेत, तु स्वतंत्र मावळे किंवा खोरी नाहीत. शिवथर नावाचे खोरे होते पण ते कोकणात होते. बाकीची खोरी किंवा मावळे देशावरची घेतली असताना एकच खोरे कोकणातले का घेतले ते राजवाड्यांनी सांगितलेले नाही.
         रियासतकार सरदेसायांनी रोहिडखोरे, वेलवंड, मुसे, मुठे, जोर, कानद, शिवथर, मुरुम, पौड, गुंजण, भोर व पवन ही पुण्याखालची मावळे समजतात असे म्हटले आहे. त्यांच्या विधानाला काही आधार दिलेला नाही. जोर खोरे वाई परगण्याच्या मुऱ्हे समतेत मोडत असे. जर जोर खोरे या यादीत घेतले तर जांभुळ खोरे का घेतले नाही याचे कारण सरदेसायांनी दिलेले नाही. भोर वेगळे मावळ नव्हते ती रोहिडखोऱ्याचीच एक तरफ होती. पवन मावळाला लागून असलेले नाणे मावळ आणि रोहिडखोऱ्याला लागून असलेले हिरडस मावळ ही मावळे ह्या यादीतून वगळली ते सरदेसायांनी सांगितलेले नाही. गुंजण मावळालाच मुरूम खोरे असेही म्हणत. सरदेसायांनी ती दोन वेगळी गणली आहेत.
              श्री विजय देशमुख यांनी त्यांच्या शककर्ते शिवराय (पूर्वार्ध) या ग्रंथात (पृ. २००-२०१) दिलेली बारा मावळांची यादी अशी आहे- (१)आंदर मावळ (२)नाणे मावळ (३)पवन मावळ (४)घोटण मावळ (५)मोसे मावळ (६)मुठे मावळ (७)गुंजण मावळ (८)वेळवंड मावळ (९)कर्यात मावळ (१०)जुने मावळ (११)हिरडस मावळ (१२)शिरवळ मावळ.
            या यादीला त्यांनी काही आधार दिलेला नाही. जुने मावळ व शिरवळ मावळ या नावांची मावळे कधीही नव्हती. मुठे खोरे व पवन मावळ यांच्यामध्ये असलेले पौड खोरे, मोसे खोरे व गुंजण मावळ यांच्यामध्ये असलेले कानद खोरं, आणि हिरडस मावळाला लागून असलेले रोहिड खोरे ही मावळे किंवा खोरी यादीत का घेतली नाहीत ते श्री. देशमुख सांगिलेले नाही.
           मावळे जरी अनेक असली तरी शिवकालाच्या पूर्वी थोडासा काळ वगळता त्यासर्वांचा किंवा त्यांपैकी काहींचा परगण्यासारख्या एखाद्या मोठ्या प्रशासकीय विभागात समावेश केलेला नसे, कारभाराच्या दृष्टीने बहुतेक मावळांचि वेगवेगळे विभाग म्हणून विचार केला जाई, असे दिसते. निजाम शाही अमलात इ.स. १६०८ पासून किंवा त्याच्याही आधीपासून राईर नावाचा मामला होता. त्यात कोकणातील मुलखाचा काही समावेश असेल. इ.स. १६१७ मध्ये किंवा तत्पूर्वी सहा मावळांचाही समावेश राईर मामल्यात करण्यात आला. हिरडस मावळ, कानद खोरे व गुंजण मावळ ही तीन मावळे त्यात होती.व असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. इ.स. १६३६ मध्ये निजामशाही कायमची बुडाली आणि तिचा मुलूख मुघल साम्राज्य आणि आदिलशाही सल्तनत यांनी आपआपसांत वाटून घेतला. त्यानंतर राईर मामला अस्तित्वात होता, पण त्यात मावळांचा समावेश नव्हता.
यानंतर कारभाराच्या दृष्टीने अनेक मावळे प्रशासकीय विभागात समाविष्ट करण्याचा उपक्रम शिवाजीच्या कारकीर्दीत झाला. शिवाजीच्या राज्यात 'प्रांत मावळे' नावाचा वेगळा प्रशासकीय विभाग असल्याचे काही कागदपत्रांवरून दिसून येते. त्या विभागाचा उल्लेख असलेले जुन्यातले जुने पत्र २७ अॉक्टोबर १६६७ या तारखेचे आहे. अर्थात तत्पूर्वी केव्हातरी हा विभाग निर्माण केला गेला असला पाहिजे. त्यात किती व कोणती मावळे समाविष्ट केली होती हे ज्यांतून समजेल अशी शिवकालीन कागदपत्रे मिळालेली नाहीत. पण शिरवळ परगणा आणि रोहिडखोरे, गुंजण मावळ, मोसे खोरे, मुठे खोरे, व पुणे परगण्यातील कर्यात मावळ ही पाच मावळे असे निदान सहा उपविभाग तरी शिवकालीन मावळे प्रांतात होते असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. पवन मावळ व नाणे मावळ ही दोन मावळे त्या सुभ्यात नसून जुन्नर सुभ्यात होती असेही एका शिवकालीन पत्रावरून उपलब्ध आहे. तिच्यात पुढील तेरा नावे मावळे सुभ्याचे उपविभाग म्हणून आली आहेत- (१)कर्यात मावळ (२)खेडेबारे (३)हिरडस मावळ (४)रोहिडखोरे (५)वेळवंड खोरे (६)कानद खोरे (७)गुंजण मावळ (८)मोसे खोरे (९)मुठे खोरे (१०)पौड खोरे (११)पवन मावळ (१२)नाणे मावळ (१३)शिरवळ
यांपैकी शिरवळ परगणा हे मावळ नव्हे. तरीही त्याचा समावेश मावळ सुभ्यात का केला गेला ते समजण्यास काही साधन नाही. कदाचित, शिरवळ हा फार लहान परगणा असल्यामुळे तो वेगळा ठेवणे अव्यवहार्य वाटून शिवाजीने तो शेजारच्याच मावळे सुभ्याला जोडून टाकला असेल. खेडेबाऱ्याला मावळ किंवा खोरे अशी उपाधी लावल्याचे आढळत नसले तरी खेडेबाऱ्याचा मुलूख मावळसदृश आहे. म्हणून त्याचाही समावेश मावळांमध्ये करता येईल, म्हणजे मावळे सुभ्याच्या तेरा उपविभागांपैकी शिरवळ वगळून बाकीचे बारा उपविभाग मावळांमध्ये मोडतात.  

अ) भौगोलिक क्षेत्र

अ- १) डोंगररांगा

       सह्याद्रीची मुख्य रांग तापी नदीच्या खोऱ्यापासून सुरू होऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिलारी नदीपर्यंत 'दक्षिणोत्तर' पसरलेली आहे. तिला 'पुर्व-पश्चिम' काही उपरांगा जोडलेल्या आहेत. अशा या बहूतांशी रांगांना नावे आहेत. ज्यावर आपला सिंहगड आहे अशी भुलेश्वर रांग, सर्वात मोठी उपरांग असणारी महादेव रांग, बाळेश्वर, शैलबारी-डौलबारी, अजिंठा-सातमाळ इत्यादी. या पुर्व-पश्चिम उपरांगांना कोकणात माथेरान आणि महिपतगड रांग तर घाटमाथ्यावर दातेगड रांग आणि भाडळी-कुंडल ही महादेव उपरांगेची उपउपरांग या फक्त चार रांगांचे अपवाद सांगता येतील ज्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर म्हणजे दक्षिणोत्तर धावतात. यापैकी सह्याद्रीची मुख्य रांग आणि दातेगड रांगेदरम्यान कोयना धरणाचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र येतं.
       अजून सोपं करून सांगायचं झालं तर आपल्या अभ्यासाच्या वहीचं पान असतं हे त्याप्रमाणेच आहे. समासाची उभी रेघ म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग, त्याच्या उजव्या बाजूच्या रेघा म्हणजे ज्यावर आपण लिहितो त्या उपरांगा आणि समासाच्या डाव्या बाजूच्या रेघा म्हणजे कोकणात उतरलेले दांड किंवा नाळा आहेत ज्या वरून अनेक घाटवाटा कोकणात उतरत जातात. झालं कि नाही सोप्पं?
मातृशक्तीचं चिरंतन पीठ मावळ....
आदिम संस्कृतीच्या मळलेल्या पायवाटा आजहि कुठल्या गुलालाने आणि भंडारा उधळून लाल होतात.प्राचीन भारतीय संस्कृती मातृप्रधान होती .लाल मातीत रुजलेल्या रहाळात एकदा झाडांना पालवी फुटायला लागली कि भगताच्या अंगात देव घुमू लागतात.धरणीमातेच्या पुतांमध्ये जत्रेच्या काठ्या हलगी आणि ढोलाच्या टिपरावर ताल धरतात.गोडी जत्रा संपायची घाईच मोठी.ठेवणीतला सत्तूर आदल्या रात्रीचं पाणी पाजून तिखटाच्या जत्रेला तयार.
हा उत्सव फक्त देवतेचा नसतो.हा उत्सव गावच्या सहजीवनाच्या सृजनशक्तीचा असतो .कुठल्या हि पांढरीचा "बाप"भैरवनाथ असला तरी गावाला कौतुक असते ते आईच्या सोहळ्या चे.माहेरवाशिण वयाने कितीहि थोर झाली तरी तिच्या अल्लड होण्याचा तो हक्काचा दिवस असतो..
अशा अनेक "आईंचं "कौतुक माझ्या मावळाला लईच.मग कड्यातली " वाघजाई" वा ओढ्यातली " मावलाई.झाडीतली "रानजाई" कळाकाच्या बेटातल्या काळकाई सवे राखण करते."सोमजाई" "झोलाई" सालपाई"जनाई" ह्या अनवट तांदळ्या अंतर्धान पावलेल्या देवता अंगात येऊन मानासाठी रुसुन बसतात..बरं हा मान म्हणजे" एका खांबावर मंदिर बांधून द्या " असला दमवणारा नसतो..देवी कोंबड्या ,बोकाडाच्या आनंदात रहाळात रमून जाते...
मावळातल्या ह्या मातृशक्ती चौसोपी चौथरा धरुन गावच्या हद्दित रहातच नाहीत..कुठे सह्याद्रीच्या शिखरांवर वटारलेल्या डोळ्यांनी सुर्यगोलांना अव्हाने देत सिंहासना रेलून कारभार करतात .तर कुठे पत्थरी घळईमध्ये गर्द सावलीला झाडाची बैठक धरुन निवदाचा स्विकार करतात ....
गावाकडची वाट चुकलेला एखादा "म्हमयवाला" नाहीतर "पुणंवाला" बाजिंद्या कारभारणीला खास म्होरं घालुन जत्रेला येतो ..गावच्या शिवेची हरवलेल्या जीवाशी गाठ पडते...आठवणींचे पदर अलगद का होईना सैल होता."आपली माणसं"उराउरी भेटतात.सुख दुखांच्या क्षणांची देवाण घेवाण होते....आणि ह्याचा रहाळाचा लेक पालखीला खांदा देत ललकारतो."आईच्या नावानं चांगभलं !!
तेव्हा मात्र घुमटीतला तांदळा मुखवट्यात मावळी लकेरीत हसत असतो...

अ - २) नद्यांची खोरी

       पुण्याहून नाशिककडे जाताना आळेफाटा लागतो. या आळेफाट्यावरून डावीकडे वळलं की माळशेज घाटातुन कल्याणला जाता येतं. माळशेज घाटाच्या थोडं अलिकडं उजव्या बाजूला पिंपळगावजोगे धरण आहे, जे पुष्पावती नदीवर आहे. त्याच्या मागच्या बाजूला जी रांग दिसते तिला हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग म्हणतात. या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या उत्तरेकडील म्हणजे साधारणपणे नाशिक भागातील सर्व नद्या गोदावरीला मिळतात तर...
       ...तर पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना शिरवळच्या पुढे खंबाटकी घाट लागतो. हा घाट महादेव रांगेवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब असणारी ही रांग रायरेश्वरापासून सुरू होऊन शिखरशिंगणापुर जवळ संपते. या रांगेच्या अलिकडच्या म्हणजे हरिश्चंद्र-बालाघाट आणि महादेव रांगेदरम्यानच्या सगळ्या नद्या नद्या भीमेस मिळतात...
       ...आणि महादेव रांगेच्या दक्षिणेकडे असणाऱ्या म्हणजे कोल्हापूर जवळच्या सर्व नद्या कृष्णेला.
       महाराष्ट्रात गोदावरी, भीमा आणि कृष्णा या तीन नद्यांची खोरी आहेत. परंतु भीमा नदी पुढे जाऊन कृष्णेलाच मिळत असल्याने मुख्य नद्या दोनच आहेत, एक त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी आणि दुसरी महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा. कारण या दोनच नद्या अशा आहेत कि त्या उगम ज्या नावाने पावतात त्याच नावाने समुद्राला जाऊन मिळतात.

ब) ऐन मावळात

       सर्वसाधारणपणे भीमेच्या खोऱ्यात असणारा म्हणजे हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या दक्षिणेकडील आणि महादेव रांगेच्या उत्तरेकडील भाग म्हणजे मावळ. थोडक्यात सांगायचं झालं तर भीमेच्या खोऱ्यात येणाऱ्या भागाला मावळ म्हणतात.
       मावळ हे पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन पश्चिमेकडील काही भागात पसरलेलं आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन उपरांगा संपेपर्यंत असणारा प्रदेश हा मावळात मोडतो. ज्या दोन उपरांगांदरम्यान असणाऱ्या नदीच्या क्षेत्रात नाचणी, वरई, भात इत्यादी पावसाळी पिकं पिकवली जातात अशा प्रदेशाला 'मावळ', 'खोरं' किंवा 'नेरं' अशा संज्ञा आहेत.

क) मावळांची नावं

       अशा मावळांना तिथून वाहणाऱ्या नदीच्या किंवा त्या भागात असणाऱ्या मुख्य गावाच्या नावाला साधर्म्य सांगणारी नावं आहेत. किंवा असं म्हणा हवंतर कि मावळांची नावं तिथं असलेल्या नदीच्या वा गावाच्या नावावरूनच आली आहेत. जसं पवनेचं 'पवन मावळ', पौड गाव असणारं 'पौड खोरं' तर भीमेचं भीमनेर, भामाचं भामनेर इत्यादी.

ड) प्रशासकीय व्यवस्था

       सध्याच्या काळात जिल्ह्याचा मुख्य जसा जिल्हाधिकारी असतो तसा त्याकाळी मावळांचा मुख्याधिकारी असे 'देशमुख'. जणु त्या मावळाचा राजाच. देशमुख त्याच्या भागातला सरकारने ठरवून दिलेला शेतसारा गोळा करीत असे आणि त्यातील काही हिस्सा त्या भागाच्या संरक्षण व विकास यासाठी स्वतःकडे ठेवून, बाकी सरकारजमा करत असे. या कामासाठी देशमुखाकडे प्रशासकीय लोक असत. देशपांडे, कुळकर्णी, पाटील इत्यादी प्रशासकीय पदे त्या त्या कामासाठी नेमलेली असत.(कालांतराने हीच पदे आडनावं म्हणून रूढ झाली) चांगलं काम करणाऱ्या देशमुख घराण्याला राजाकडून किताब दिला जाई. जसं पासलकरांना 'यशवंतराव', जेधेंना 'सर्जेराव'.

इ) सैन्य आणि करवसुली

       मावळाच्या आजूबाजूला असणाऱ्या डोंगररांगांवर किल्ले असत आणि ते या देशमुखांच्या ताब्यात असत. त्याच्या संरक्षणासाठी ते स्वतःचे सैन्य वा पागा (घोडदळ) बाळगत असत. त्यामुळं त्यांचा तिथं राहण्याऱ्या लोकांवर दरारा असे. जे शेतकरी शेतसारा देत नसत त्यांच्याकडून तो वसुल करावा लागे आणि अशी कामे बहुतांशी 'देशपांडे' मंडळी करत असत. 'देशपांडे' लढवय्ये असल्याची दोन उदाहरणे आपल्या सर्वांना माहिती आहेतच. बांदलांकडील बाजीप्रभू आणि मोऱ्यांकडचे मुरारबाजी.

फ) एकुण मावळं

       भीमेच्या खोऱ्यात पुणे हे साधारण मध्यात आहे त्यामुळं पुणे हे मुख्य मावळ (कर्यात* मावळ) असं समजलं तर त्याच्या पश्चिमेकडे म्हणजे मावळतीकडचा भाग म्हणजे मावळ असं सर्वसाधारणपणे समजलं जातं परंतु मावळांची ठिकाणं जाणून घेतल्यानंतर हा सिद्धांत चुकीचा ठरतो. एकूणच काय तर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन उपरांगा संपेपर्यंत असणाऱ्या प्रदेश म्हणजे मावळच पण त्याला म्हणताना बाकी 'मावळ', 'खोरं' किंवा 'नेरं' असं म्हटलं जातं. इंद्रायणी नदी ते नीरा नदीदरम्यान खोऱ्यांच्या आणि मावळांच्या नावात सरमिसळ आहे पण पुण्याहून जुन्नरकडे जाताना फक्त 'नेरं'च आहेत. भामनेर, भीमनेर, घोडनेर, मिन्नेर, कुकडनेर, जुन्नेर?, संगमनेर?, सिन्नेर? अंमळनेर?.
       'सह्याद्री'कार स. आ. जोगळेकर म्हणतात नेर म्हणजे नहर. पाण्याच्या प्रवाहाला नहर म्हणतात. कुकडी नदीकाठी असलेलं जुन्नर हे अगदी प्राचीन शहर म्हणून त्याला जुने-नेर = जुन्नेर संज्ञा असावी. संगमनेरमधून प्रवरा आणि सिन्नेरमधून सरस्वती नद्या वाहतात ज्या पुढे गोदावरीला मिळतात तर अंमळनेरमधून वाहणारी बोरी नदी पुढे जाऊन तापीला मिळते. त्यामुळं एखाद्या 'नहर' शेजारी असणाऱ्या मोठ्या गावापुढे बहुधा 'नेर' लावलं जात असावं. अकोलनेर, पारनेर, जामनेर पिंपळनेर ही सुध्दा काही गावाच्या नावात 'नेर' असलेली उदाहरणं सांगता येतील.
       पुण्याखालची बारा मावळं आणि जुन्नर (जुने-नेर) खालील बारा, अशी चोवीस मावळं आहेत असं तुलशीदास शाहीराच्या पोवाड्यात आहे. पण असं वाटतं की ती एकूण बावीस आणि थोडं वेगळ्या भागात असलेलं एक शिवतर अशी एकूण तेवीस आहेत आणि ती पुढे दिलेली आहेत.

       प्रथमतः खोऱ्याचे/मावळाचे/नेऱ्याचे नाव नंतर तिथे वाहणारी नदी, त्यात येणारे मुख्य गाव, असणारा किल्ला, देवस्थान, तेथील देशमुख आणि शेवटी त्याचा किताब या क्रमाने ती वाचावीत.

१) मढनेर - पुष्पावती नदी/ मांडवी नदी - मढ/ ओतुर - सिंदोळा - हटकेश्वर, हरिश्चंद्रगड व शिंदोला किल्ल्यांमधील पुष्पावती नदीचे खोरे (पिंपळगाव जोगा धरण) (मढ नावाच्या गावावरून मढ -नेर असे नाव पडले)
 २) कुकडनेर - कुकडी नदी - घाटघर/ जुन्नर - शिवनेरी/ चावंड - कुकडेश्वर,  कुकडी नदीचे खोरे (माणिकडोह धरण)
३) मिन्नेर - नारायणगाव जवळील मीना नदी चे खोरे (वडज धरण), मिना नदी - नारायणगाव - नारायणगड
४) घोडनेर - घोड नदी - घोडेगाव/ मंचर - भीमाशंकर, घोड नदीचे खोरे (डिंभे धरण)
५) भीमनेर - भीमा नदी - राजगुरूनगर - भोरगिरी - भीमाशंकर
६) भामनेर - भामा नदी - चाकण - संग्रामदुर्ग
७) अंदरमाळ (आंद्रा) - आंद्रा - सावळे - वडेश्वर - हांडे देशमुख
८) नाणे मावळ - इंद्रायणी - नाणे/ लोणावळे - लोहगड - कोंडेश्वर/ कुंडेश्वर/ कुंडलेश्वर - गरूड देशमुख
९) पवन मावळ - पवना - पवनाळे/ चिंचवड - तुंग-तिकोना - वाघेश्वर
१०) कोरबारसे - आंबवडे
११) पौड खोरे - मुळा नदी - मुळशी - कैलासगड/ कोरीगड - बलकवडे देशमुख/ ढमाले देशमुख (राऊतराव)
१२) मुठे खोरे - मुठा नदी - मुठे - म्हसोबा(खारवडे) - मारणे (गंभीरराव)
१३) मोसे खोरे - मोसी नदी - मोसे - कुर्डुगड - पासलकर (यशवंतराव)
१४) आंबी खोरे - आंबी नदी - पानशेत
१५) कानंद मावळ - कानंदी नदी - वेल्हे - तोरणा - मरळ देशमुख (झुंजारराव)
१६) गुंजन मावळ - गुंजवणी नदी - गुंजवणे - राजगड - अमृतेश्वर - शिळीमकर देशमुख (हैबतराव)
१७) खेडेबारे खोरे - शिवगंगा  नदी - खेड शिवापुर - बनेश्वर - कोंडे देशमुख (नाईक)
१८) वेळवंड खोरे - वेळवंडी नदी - भाटगर - ढोर देशमुख (अढळराव)
१९) हिरडस मावळ - नीरा नदी - हिरडोशी - कासलोटगड/ रोहीडा - बांदल देशमुख (नाईक)
२०) भोर खोरे - नीरा नदी - भोर - रायरेश्वर - जेधे देशमुख (सर्जेराव)/ खोपडे देशमुख
२१) कर्यात मावळ - मुठा नदी - पुणे - सिंहगड - पायगुडे देशमुख (रवीराव)/ शितोळे देशमुख
२२) घोटण खोरे - घारे देशमुख
२३) शिवतर खोरे - कोयना नदी - जावळी - प्रतापगड - मोरे देशमुख (चंद्रराव)
   पुणे शहराच्या पश्चिमेकडे (कोकण आणि पुणे या मधील भागाला) म्हणजेच बोली भाषेत मावळती कडे असलेल्या प्रदेशाला मावळतीचा प्रदेश अथवा मावळ असे संबोधले जाते.काही अभ्यासकांच्या मते  या मावळ प्रदेशाचे १८ विभाग असून त्यातील बहुतेकांना तेथे वाहणाऱ्या नद्या, उपनद्यांच्या नावावरून अथवा त्या प्रदेशातील एखाद्या गावाच्या नावावरून ओळखले जाते. हा मावळ प्रदेश पुणे आणि जावळी ह्या  दोन परगण्यांमध्ये समावेश होतो. ह्या मावळ प्रदेशाच्या उत्तर - दक्षिण सीमांना अनुक्रमे भीमा नदी आणि कृष्णा नदी आहे. त्याची यादी ते अशी देतात.
१. आंदर मावळ - आंध्र नदी चे खोरे (जुन्नर परगणा चा प्रदेश)
आंदर मावळ भागात कुसूर घाट व कुसूर पठार, ढाक किल्ला, ठोकरवाडी धरण / आंध्र जलाशय इत्यादींचा समावेश होतो. 
२. नाणे मावळ - इंद्रायणी नदीचे खोरे 
नाणे मावळ भागात हिंदोळा घाट, पायरा घाट, बोर घाट, कुरवंडा घाट, लोणावळा, लोहगड, विसापूर किल्ल्यांचा प्रदेश इत्यादींचा समावेश होतो. 
३. पवन मावळ - पवना नदीचे खोरे 
पवन मावळात तुंग व तिकोना किल्ल्यांजवळ असलेल्या पवना नदीच्या खोऱ्याचा समावेश होतो. 
४. कर्यात मावळ - पुणे कर्यात. 
आदिलशाही व निजामशाही च्या काळात व त्यानंतर स्वराज्यात देखील गावांची रचना करताना सुभा / परगणा / मामला यांच्या देखरेखी खाली टाप, तर्फ, कर्यात व सम्मत आणि त्यांच्या देखरेखी खाली मौजा, माजरा, कसबा अशी आकाराने लहान गावे येत. पुणे कसबा च्या आजूबाजूचा प्रदेश कर्यात मावळ मध्ये समाविष्ट होतो. 
 * - कर्यात - (स्त्री) [अ. कर्यत + गाव]
      तालूका, दहा-बारा गावांचा पेटा/समुह
       मुळ अरबी भाषेत असलेल्या 'कर्यत' शब्दास गाव जोडून फार्सी भाषेत कर्यात हा शब्द आला आहे. कर्यात म्हणजे तालूका किंवा दहा-बारा गावांचा पेटा/ समुह.
५. गुंजण मावळ - गुंजवणी नदीचे खोरे 
गुंजण मावळात तोरणा व राजगडकिल्ले, या किल्ल्यांजवळून वाहणारी गुंजवणी नदी च्या खोऱ्यातील भागाचा, पाबे, वेल्हे अशी गावे इत्यादींचा समावेश होतो. 
६. हिरडस मावळ - नीरा नदीचे खोरे 
हिरडस मावळात भोर जवळील हिरडोशी गाव व नीरा नदीच्या उगमाकडील प्रदेशाचा समावेश होतो. 
७. मुठे खोरे - मुठा नदीच्या उगमा जवळील खोरे 
मुठे खोऱ्यात मुठा नदीचा उगमस्थान असलेले ठिकाण - टेमघर जलाशयाचा भाग, खडकवासला जलाशय इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो. 
८. पौड खोरे - मुठा नदीचे खोरे (पौड गावाजवळील)
पौड खोऱ्यात सव घाट, वाघजाई घाट, सवाष्णी घाट, गाढवलोट घाट, लेंडी घाट, ताम्हिणी घाट इत्यादींचा समावेश होतो. (ह्याच भागाला कोरबारसे मावळ असे देखील संबोधतात ??)
९. मोसे खोरे - मोसी नदीचे खोरे 
मोसे खोऱ्यात देव घाट, कुम्भे घाट, कावळ्या घाट, कोकणदिवा किल्ला, धामणहोळ, वरसगाव चा जलाशय इत्यादींचा समावेश होतो. 
१०. ताम्हन खोरे - पौड तर्फ चा प्रदेश 
पुराणकाळातील मुळशी
    प्राचीन काळी मुळशी भागात दंडकारण्य असल्याचा उल्लेख आढळतो. ग्रीक लोकांनी व पुराणकारांनी या भागाला दक्षिणापथ म्हटलेले आहे. पाचव्या शतकातील चीनी प्रवासी ङ्गा हियान याने मुळशीला दक्षिण भाग म्हटलेले आहे. हा सर्व डोंगराळ व घनदाट जंगलाचा प्रदेश होता. डोंगराच्या वरच्या भागास मुर्‍हे, मधल्या भागास खोरे व अडचणीच्या भागास दरी म्हणतात. त्यामुळे हा दराखोर्‍यांचा भूभाग त्यास मावळ भाग असे म्हटले जावू लागले. हा भाग अरण्याच्या गाभातला होता. उगवत व मावळत बाजूवरून पच्छिमेचा भाग म्हणजे मावळ असे नाव पडले असावे.
           पुराण काळातील उल्लेख:- शके ६०९ मधील कृष्णराज राष्ट्रकुटाच्या ताम्रपटात पुनकविषयाना : पति ‘असा पुणे प्रांताचा उल्लेख आहे. अभिमानाची व आनंदाची गोष्ट ही की, ताम्रपटातील ३० व्या ओळीत ‘मुईल नद्या’, असा उल्लेख असून तो मुळा नदीचा आहे. यावरून १३०० वर्षापूर्वीच्या इतिहासात आपल्या मुळशी तालुक्याच्या इतिहासाचा उल्लेख आहे हे पाहून सर्वांनाच आनंद वाटेल. या नदीवरूनच मुळशी पेटा असे नाव पडले. या भागात लांडग्यांचे प्रमाण मोठे होते. त्यांना मारून माणसांनी वसाहत केली असाही उल्लेख इतिहासात आढळतो. त्यानंतरच्या काळात या भागात आग्री समाजाचीही वसाहत होती असा उल्लेख आढळतो.
मोगलाई काळातील उल्लेख:- तेराव्या शतकापासून बारा मावळ्यांचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील अद्य राजा म्हणजे शालीवाहन होय. शके १५० वर्षापर्यंत त्यांची कारकीर्द आहे. महाराष्ट्रातील अद्य राजा म्हणजे शालीवाहन होय. शके १५० वर्षापर्यंत त्यांची कारकीर्द होती. त्यानंतर राष्ट्रकुटांची सत्ता सातव्या शतकाच्या पूर्वार्धात होती. शके ६०९ मधील ताम्रपटात या भागाचा उल्लेख आहेच. शालीवाहन राजा आंध्रकुल होता. मराठ्यांनी त्याच्या ताब्यातील जुन्नर हा प्रांत सोडविला जुन्नरपासून वाईपर्यंतचा मुलूख मावळामध्ये त्यावेळी मोडत असे. १५० व्या शतकापर्यंत या मावळात २४ मावळे गणली जात असे. सातव्या शतकापासून चालुक्य पुन्हा राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य ह्या वंशातील राजांनी शके ११११ पर्यंत राज्य केले. त्यानंतर वैभव संपन्न अशा प्रताप चक्रवर्ती ‘महाराजाधीराज’ यादव वंशातील राजांची सत्ता महाराष्ट्रावर सुरू झाली. यापैकी सिंहराज राजाने आपल्या दुसर्‍या स्वारीत (शके ११३२) आपला भाग सत्ते खाली आणला. १२४० मध्ये त्यांची सत्ता लयास जाऊन मुसलमानांच्या सत्तेने महाराष्ट्रात व या भागात सत्तेस प्रारंभ केला. मुस्लिम सत्तेचा हिंदुस्थानमध्ये सर्वात शेवटी प्रारंभ महाराष्ट्रात झाला. यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर हसन गंगूची इमामाही सुरू झाली. त्यावेळी हा मावळ प्रांत शिर्के, यादव, मोरे, जाधव, भोज, मोहिते, महाडिक आदी मराठ्यांकडे होता. त्यानंतर निजामशाही आली. त्यावेळी या भागावर सरदेशमुखांचे वर्चस्व प्राप्त झाले.
         शके १५२५ (सन १६०३) मध्ये निजामाने मालोजी भोसले यांना राजे ही पदवी दिली. ते शूर व कर्तबगार होते. पुणे, सुपे, चाकण, चौर्‍याऐंशी व इंदापूर हा मुलूख दिला. त्यांनी १५ वर्ष राज्य केले. १६१९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा शहाजी भोसले जबर महत्वाकांक्षी, उमदा लढवया, साहसी व सदा ङ्गौजबंद व अचाट मसली तीचा मुत्सद्दी होता. निजामशहाकडे ते सरदार होते. पण दिल्लीचा मोगल बादशहा व विजापूरचा आदिलशहा निजामशहावर टपलेले होते. त्याची राजवट नष्ट करून ती दोघांनी वाटून घेतली. पुढे शहाजी भोसले आदिलशहाकडे सरदार म्हणून गेले. त्यांना मिळालेला प्रांत त्यांच्याकडेच राहिला. ह्या प्रांताचे वारसदार म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांनी या मावळ्यांना एकत्र करून विश्‍ववंद्य कारकीर्दीने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. या सर्व घटनांमध्ये मुळशी भागाचा समावेश होता.
११. कानद खोरे - कानंदी नदीचे खोरे 
कानद खोऱ्यात तोरणा व राजगड ह्या दोन किल्ल्यांच्या पायथ्याचे वाजेघर, साखर, मार्गासनी तसेच ह्या किल्ल्यांच्या भागात वाहणारी कानंदी नदी च्या खोऱ्याचा समावेश होतो. 
१२. खेडेबारे खोरे - शिवगंगा नदीचे खोरे 
खेडेबारे खोऱ्यात सिंहगड व पुरंदर या किल्ल्यांच्या डोंगर रांगांमधील खेड शिवापूर, कापूरहोळ व तेथून वाहणारया शिवगंगा नदी चे खोरे यांचा समावेश होतो. शिवगंगा नदी ही  गुंजवणी नदीची उपनदी आहे. 
१३. वेळवंड खोरे - वेळवंडी नदीचे खोरे 
वेळवंड खोऱ्यात तोरणा आणि राजगड किल्ल्यांच्या दक्षिणेकडील वेळवंडी नदीचे खोरे, भाटघर जलाशय इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो. वेळवंडी नदी ही गुंजवणी नदीची उपनदी आहे. 
१४. रोहीड खोरे - नीरा नदीचे खोरे (रोहिडा किल्ल्याचा प्रदेश)
रोहीड खोऱ्यात नीरा नदीच्या जवळचा रायरेश्वर, रोहीडा किल्ला इत्यादी भागाचा समावेश होतो. 
१५. शिवथर खोरे - शिवथर घळ जवळील खोरे 
शिवथर खोरे हे एकच खोरे असे आहे की ते पूर्णपणे कोकणात आहे. त्यात रामदास स्वामींची प्रसिद्ध शिवथर घळ, वरंधा घाटाचा परिसर (कदाचित रायगड देखील) समाविष्ट होतो. 
१६. कान्दाट खोरे - कान्दाट नदीचे खोरे (जावळी चा प्रदेश)
कान्दट खोऱ्यात चकदेव, पर्वत, महिमंडण गड असा जावळी चा प्रदेश येतो. 
१७. जोर खोरे - जोर गाव (जावळी चा प्रदेश)
जोर खोऱ्यात कोळेश्वर पठार आणि महाबळेश्वर या मधील प्रदेश, जोर गाव व कृष्णा नदीच्या खोऱ्याचा उगमाकडील भाग समाविष्ट होतो. 
१८. जांभूळ खोरे - जांभळी गाव (जावळी चा प्रदेश)
जांभूळ खोऱ्यात रायरेश्वर आणि कोळेश्वर पठारा दरम्यानचे जांभळी गाव, कमळगड, केंजळगड, धोम जलाशय  असा प्रदेश येतो. 
     शाहजी राजे यांना जेव्हा पुण्याची जहागिरी मिळाली त्यावेळेस त्यांना पाच परगणे आणि बारा मावळ एव्हडा प्रदेश मिळाला असे कळते. शाहजी राजांच्या जहागिरीतील पाच परगणे - पुणे, इंदापूर, चाकण, शिरवळ, सुपे 
शाहजी राजांच्या जहागिरीतील मावळ प्रदेश - गुंजण मावळ, हिरडस मावळ, कर्यात मावळ, वेळवंड खोरे, खेडेबारे खोरे, कानद खोरे, पौड खोरे, मोसे खोरे, मुठे खोरे. नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळ तसेच जावळी चे खोरे हे त्यांच्या जहागिरी चा भाग नव्हते. 
  शिवकाळातील ५ परगणे....
१. पुणे
२. चाकण
३. इंद्रापुर
४. सुपे
५. शिरवळ

शिवकाळातील १२ मावंळ आणि किल्ले
१.   नाणे मावळ ( ढाकचा किल्ला )
२.   पवन मावळ (कठिणगड उर्फ तुंग, वितंडगड उर्फ तिकोना)
३.   पौंड खोरे
४.   मुठे खोरे
५.   मोसे खोरे
६.   कानंद खोरे (प्रचंडगड उर्फ तोरणा)
७.   गुंजण मावळ (राजगड)
८.   वेळवंड खोरे
९.   हिरडस मावळ
१०. रोहिड खोरे (रोहिडा)
११. खेडेबारे
१२. कर्यात मावळ (सिंहगड)
       खरंतर मावळातल्या बहुतांशी लोकांचं मुळचं कुलदैवत हे महादेवच. त्यामुळं प्रत्येक मावळांत एखादं तरी पुरातन शिवालय नक्कीच असतं. मोहरीचा अमृतेश्वर, नसरापूरचा बनेश्वर अशी काही उदाहरणं सहजपणे सांगता येतील. त्यातच मावळचा भाग हा धरणं बांधण्यासाठी नैसर्गिकरित्या अतिशय परिपूर्ण असल्यामुळं सगळ्याच मावळांत हल्ली धरणं बांधली गेली आहेत. बऱ्याच मावळांतली नदीकाठी असलेली शिवालयं ही धरणं बांधल्यामुळं त्यांच्या पाणलोट क्षेत्रात कायमच बुडलेली असतात. उन्हाळ्यात ज्यावेळी धरणातली पाणी पातळी कमी होते त्यावेळी अशा मंदीरांचे अवशेष दिसू लागतात. एवढंच नाही तर कायम पाण्यात असल्यामुळं काही मंदिरं तर पूर्णपणे नामशेष झाली आहेत. सदर लेखात जेवढ्या शिवालयांची नावं समजली तेवढीच लिहिली आहेत. बऱ्याच ठिकाणची नावं अजूनही सापडलेली नाहीत. वाचक या माहितीत नक्कीच भर घालू शकतात.
       माझ्या या लेखात दिलेली माहिती परिपूर्ण नक्कीच नाही. खरंतर वर नमुद केलेल्या प्रत्येक मुद्यावर एकएक पुस्तक लिहिता येईल. केवळ विस्तारभयावह येथे देण्याचे टाळले आहे. याशिवाय हे देखील सांगू इच्छितो कि या प्रस्तुत लेखात असणारी माहिती शंभर टक्के खरी आहे असंही मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या जुजबी ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा राहून गेल्या असण्याची नक्कीच शक्यता आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून, जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकून, माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पुर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही ||

संदर्भ -

१) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
२) सह्याद्रीतील रत्नभांडार - प्रमोद मांडे
३) फार्सी-मराठी कोश - प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन 
४) जेधे शकावली - करीना

फोटो स्त्रोत -

१) गुगल
२) सह्याद्री - स. आ. जोगळेकर

बारा मावळ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
ह्या वर्षदीडवर्षाच्या अवधींत शिवाजीनें बारा मावळें काबीज करण्याचा उपक्रम केला, ती कशी काबीज केलीं ह्याचा खुलासा सभासदानें व मल्हार रामरावानें केला आहे. “मावळे देशमुख बांधून, दस्त करून, पुंड होते त्यांस मारिलें,” असा सभासदाचा खुलासा आहे. “मावळें सरदारांस मसलतींत घेऊन, त्यांस अनुकूल करून घ्यावें, त्यांस पत्रे लिहावीं व भेटावें, असें करूं लागलें,” म्हणून मल्हार रामराव लिहितो (पृष्ठ ३०) मावळांतील जे देशमूख शिवाजीला अनुकूल झाले त्यांस त्यानें बांधिलें म्हणजे आपल्याला बांधून घेतलें, जे प्रतिकूल होते त्यांस नरम केले, व जे केवळ पुंडाई करून होते त्यांस जिवें मारिलें. बारा मावळें काबीज करण्याचा हा असा प्रकार होता. देशमुखांना अनुकूल करून घेण्यांत ज्या राजकार्यकुशल मुत्सद्याचा उपयोग झाला, त्याला डबीरीचा हुद्दा देणें अवश्य झालें. ज्या हुद्देदारानें त्यांस दस्त केलें त्यास मुख्य प्रधानकी मिळाली; आणि ज्या लहानशा सैन्याच्या जोरवर पुंडांना जमीनदोस्त केलें त्या सैन्याची व्यवस्था ठेवण्याकरितां एक सबनीस नेमावा लागला. येणेंप्रमाणें बारा मावळें काबीज करतांना, हे हुद्देदार साहजिकपणेंच अस्तित्वांत आले. हीं बारा मावळें काबीज करण्याचें काम शके १५६० च्या अखेरीस सुरूं झालें. तें चाललें असतांना, शिवाजी शके १५६३ त विजापुरास गेला व तेथें असतांना पातशहाशीं उद्दामपणाची बालिश वर्तणूक त्याच्या हातून झाली. शके १५६० त जें उद्दाम कृत्य मावळांत सुरूं झालें होतें, त्याचीच दर्शक ही विजापुरांतील शिवाजीची वर्तणूक होती, हें मनुष्यस्वभावाच्या व विशेषतः बालस्वभावाच्या अनुरूपच होतें. मुख्य प्रधान, अमात्य, युक्त्याभिज्ञ व सेनालेखक ह्या चार हुद्देदारांचा दर्जा केवळ लष्करी होता हें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. मुलकी व न्यायखात्यांतील हुद्दे उत्पन्न करण्याची आवश्यकता शिवाजीला शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत भासली नाहीं. तसेंच किल्ल्यांवरील नामजाद लोक ठेवण्याचीहि जरूरी अद्यापपर्यंत पडली नव्हती. कारण, शिवाजीच्या ताब्यांत हा काळपर्यंत एकहि किल्ला आला नव्हता. किल्ल्यांखेरीज करून बाकीचा बारा मावळांतील बहुतेक प्रांत शिवाजीनें काबीज केलाः-
काबीज केला म्हणजे बारा मावळांतील देशमुखांना कांही अटीनें बांधून घेतलें. आतां ही बारी मावळें कोणतीं हें नीट समजून घेतल्यानें ह्या विवेचनावर जास्त प्रकाश पडणार आहे. “बारा मावळ पुण्याखालीं, बारा मावळ जुन्नरखालीं” असें तानाजी मालुस-याच्या पवाड्यांत म्हटलें आहे. हिरडस मावळांतील बांदल देशमुखांच्या शके १५३६ तील एका सनदपत्रांत बारा मावळें हे दोन शब्द मी भोर येथें रा. रा. भाऊराव भिडे यांच्या येथें वाचले आहेत. ह्यावरून जुनरापासून चाकणापर्यंत बारा मावळें व पुण्यापासून शिरवळपर्यंत बारा मावळें अशीं एकंदर चोवीस मावळें छत्रपती शिवरायांच्या वेळीं प्रसिद्ध होतीं असें दिसतें. *जुन्नरापासून चाकणापर्यंत असलेलीं १ शिवनेरी, २ जुनेर, ३ मिननेर, ४ घोडनेर, ५ भीमनेर, ६ भामनेर, ७ जामनेर, ८ पिंपळनेर, ९ पारनेर, १० सिन्नर, ११ संगमनेर, १२ अकोळनेर,*
*अशीं बारा नेरे, नहरे किंवा मावळें प्रसिद्ध आहेत.*
येथे जुन्नर ह्या नावांसंबंधानें संक्षिप्त उल्लेख करणें जरूर आहे. दक्षिणच्या इतिहासांत डॉ. भांडारकर म्हणतात की जुन्नर हा शब्द जुन्नर, जुननरे, जूर्णनगर व जीर्णनगर, अशा परंपरेनें जीर्णनगर म्हणजे जुनें नगर ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा. माइया मतें जुन्नर, हा शब्द शिवनेर, भीमनेर वगैरे शब्दाप्रमाणें जुन्नर, जुन्नेर, व जीवनीर अशा परंपरेनें जीवनीर ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा. जीव हें जुन्नराजवळील एका ओढ्याचें नांव असावें. जुन्नराच्या पश्चिमेस व नाणे घाटाच्या दक्षिणेस जीवधन नांवाचा एक किल्ला आहेच. जीवधन हा किल्ला व जीवनीर हें गांव ह्यांना जीव नदीपासून नामाभिधान प्राप्त झालें असावें. वर दिलेलीं नावें जुन्नराखालीं मोडणा-या बारा मावळांचीं होत. पुण्याखालील बारा मावळें म्हटली म्हणजे *१ अंदरमावळ, २ नाणेमावळ, ३ पवनमावळ, ४ घोटणमावळ, ५ पौड खोरें, ६ मोसेंमावळ, ७ मुठेंमावळ, ८ गुंजणमावळ, ९ वेळवंडमावळ, १० भोरखोरें, ११ शिवतरखोरें, १२ हिरडसमावळ. हीं बारा होत.*
हीं बारा मावळें म्हणजे उत्तरेस राजमाची व चाकण ह्या स्थानांपासून दक्षणेस रायरेश्वराचा डोंगर, अंबेडखिंड खांबटकीचा घाट, ह्या स्थानांपर्यंतचा मुलूख होय. ह्या मुलखापैकीं राजमाचीचा किल्ला कल्याणभिवंडीं येथील मुलाणा अहमदाकडे होता; लोहगडावरून बिलाल हपशी अंदर, नाणें व पवन ह्या मावळांचा बंदोबस्त ठेवी; चाकण किल्ला फिरंगोजी नरसाळ्याकडे होता; घोटणमावळ, पौडखोरें मोसेमावळ व मुठेंमावळ त्या त्या देमुखांच्या ताब्यांत होतीं, गुंजणमावळ तोरण्यावरील किल्लेदाराच्या देखरेखीखालीं होतें; वेळवंड व भोर हीं तेथील देशमुखांच्या अधिकारांत होती; हिरडसमावळांत बांदल देशमुख नांदत होते; व शिवतरखोरें बाबाजी कोंडदेवाच्या ताब्यांत होतें. (चित्रगुप्त ५). मावळांच्या पूर्वेकडील मुलुखांत पुणें व सिंहगड दादोजी कोंडदेवाकडे होतें; पुरंदर किल्ला निळो निळकंठ नाइकवाडी यांच्या ताब्यांत होता व सुपें प्रांतावर शहाजीचा मेहुणा संभाजी मोहिता होता. येणेंप्रमाणें शके १५६० च्या सुमारास राजमाची, लोहगड, चाकण, पुरंदर, तोरणा व रोहिडा ह्या किल्ल्यांच्या मध्यें पुणें प्रांतांत शिवाजीची स्थापना झाली होती. पुणें प्रांताची हद्द उत्तरेस इंद्रायणी, दक्षिणेस बनेश्वर, कापूरहोळ, व पाद्माघाट, पूर्वेस सुपें प्रांत व पश्चिमेस लोहगड व तुंग तिकोना अशी होती. ह्या लहानशा मध्य प्रांतांत राहून शिवाजीला, अथवा खरें म्हटलें असतां, त्याच्या मुत्सद्यांना बाहेरच्या लगत्याच्या प्रांतांत आपला अंमल बसवावयाचा व पसरावयाचा होता. ह्या खटपटीचा उपक्रम शके १५६० पासून शके १५६८ पर्यंतच्या अवधीत बारा मावळांतील देशमुखांना दस्त करून व बांधून ह्या मुत्सद्यांनीं केला. हा उपक्रम चालू असतांना शिवाजीच्या मुत्सद्यांनीं शहाजीच्या जहागिरींत दोन प्रकारची राज्यव्यवस्था ठेविली होती असें म्हणण्यास आधार आहे. विजापूरच्या पातशाहीखाली शहाजीची जहागीर असल्यामुळें सदर जहागिरींत अंमलदार लोक शिवाजीच्या मुत्सद्यांनी निराळे ठेविले व शिवाजीच्या नांवाने नवीन उपस्थित केलेल्या सत्तेच्या दिमतीनें अधिकार मिळालेले अंमलदार निराळे ठेविलें. म्हणजे पुणें प्रांतांतील सुभेदार, काजी, मुजुमदार, हवालदार, मोकदम वगैरे पातशाही अंमलदार अगदीं भिन्न असून, नवीन राज्य संपादण्याच्या कामीं मेहनत करणारे मुजुमदार, सबनीस. डबीर, पेशवे वगैरे अधिकारीहि भिन्न होते. काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील दादोजी कोंडदेवाचा एक महजर माझ्याजवळ आहे. हा महजर शके १५६८ व्ययनाम संवत्सरे सु।। सबा आबैन व अलफ छ २५ रबिलाखर म्हणजे ज्येष्ठ व॥ १२ स लिहिलेला आहे. सदर मितीस भरलेल्या पुणें येथील हुजूर हजीर मजालसींत खालील पातशाही अम्मलदार होतेः- १ काजी अबदुला बिन काजी इस्मायल नख काजी, प्रांत पुणें; २ राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार नामजाद, किल्ले कोंढाणा, महालनिहाय, प्रांत पुणें; ३ गोमाजी हवालदार, प्रांत पुणें; ४ नारो सुंदर मुजुमदार, प्रांत पुणें; ५ म्हालोजी झांबरा, मोकदम कसबे पुणें; ६ मालोजी नरसिंगराव व विठाजी नाईक शितोळे देशमुख, प्रांत पुणें. शहाजीचा मुख्य प्रधान अथवा सुभेदार दादोजी कोंडदेव होता; शिवाजीचा मुख्य प्रधान शामराव नीळकंठ होता. शहाजीचा मुजुमदार नारो सुंदर होता; शिवाजीचें बाळकृष्णपंत व निळो सोनदेव हे होते. शहाजीचा म्हणजे पातशहाच्या तर्फेचा हवालदार म्हणजे प्रांतांतील सैन्याचा अधिकारी गोमाजी होता; शिवाजीचा सेनापती खुद्द शिवाजीच होता, स्वतंत्र असा कोणीच अद्याप नव्हता. येणेंप्रमाणें पातशहाचें व शिवाजीचें अधिकारी अगदीं निरनिराळे होते. पातशाही सुभेदार दादोजी कोंडदेव ह्याचा संबंध शिवाजीच्या नवीन राज्यव्यवस्थेशीं वरकरणी बिलकुल नव्हता. बाकी अंतस्थ रीतीनें शिवाजीच्या नवीन राज्याची उभारणी पुणें प्रांतांत दादोजीच करीत असला पाहिजे हें उघड आहे. शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत होऊं घातलेल्या ह्या नवीन राज्याचें स्वरूप विचार करण्यासारखें आहे. राज्याचें लक्षण म्हटलें म्हणजे त्याला विशिष्ट देश, विशिष्ट प्रजा व विशिष्ट राजा अशीं तीन अंगे अवश्य हवीं. परंतु शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत होऊं घातलेल्या शिवाजीच्या राज्याला पहिलीं दोन अंगे मुळींच नव्हती. चाकणापासून रोहिड्यापर्यंतच्या देशमुखांना शिवाजींनें बांधून घेतलें होतें. खरें; परंतु त्या प्रदेशांतील एक हातभरहि जागा पातशहाची नसून केवळ शिवाजीची अशी म्हणण्यासारखी नव्हती. शिवाजीची सत्ता देशमुखांच्या हृदयांत दहशतीच्या रूपानें व देशमुखांच्या प्रजेच्या मनांत प्रीतीच्या रूपानें वसत होती.

मावळाचे मानकरी
*पायगुडे देशमुख (मांडवी)*
मावळातली बरीच घराणी हि मूळची विस्थापित.प्रत्येक मावळातील देशमुख हे जुन्या सामंतशाहीच्या खुणा काल परवा पर्यंत टिकवून होते.मावळातील सगळ्यात मोठे कुळ शिंद्यांचे .गुंजण मावळातले शिळिमकर ,कर्यात मावळचे पायगुडे तर पवन मावळातले शिंदे हे तिघेही एकाच सेंद्रक कुळातले ह्यांच्यात बेटी व्यवहार निषिद्ध पैकी पवनमावळातल्या शिळिंब ह्या गावातूनच पुढे शिंदे कुलीन शिळकर व पायगुडे बाहेर पडले .तिघांचे हि देवक समुद्रवेल .जिथे ज्यांची प्राचीन वस्ती नांदत होती तिथे विपुल प्रमाणात आढळणारी वस्तू अथवा वनस्पती हे देवक मानण्याचा समाजमान्य संकेत आहे.ह्या संकेतान्वये हे कुळ समुद्राच्या जवळचे असावे असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे.
रा चिं ढेरे ह्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे हे समुद्रामार्गेच रत्नागिरी बंदरातून घाटावर आले व ज्योतिबाच्या डोंगराला त्यांनी रत्नागिरी असे नाव दिले.ह्या स्थलांतराअगोदर किनारपट्टीवर सेंद्रक कुळाची बराच काळ वस्ती असावी कारण आजही दैवतांच्या मूलस्थानाबाबतीत हे कूळ कोकण भूमीवर अवलंबून आहे.ज्योतिबा हे दैवत लिंग मूळ लिंग स्वरूप ती आठवण सेंद्रक कुळाच्या शिळिमकर शाखेने अमृतेश्वर हे मोहरी येथील कुलदैवत मानून राखली.
आळतेकरांच्या मावळ भूमितील सिद्धांताची पार्श्वभूमी मनोरंजक आहे आणि विचार करायला लावणारी सुद्धा .मावळची सगळ्यात जुनी वस्ती हि पवन व नाणे मावळातली ह्या मावळांना लागून असलेले सर्वात प्राचीन शहर म्हणजे जुन्नर तथा जीर्णनगर एका अपूर्ण ताम्रपटात आदित्यवर्मा नामक सिंदवंशी राजाचा जुन्नर येथे इ स ९६५ सालचा उल्लेख येतो.हा आदित्यवर्मा स्वतःला महासामंत म्हणवून घ्यायचा .श्री स आ जोगळेकर नद्यांच्या नावावरून सातवाहनांच्या वंशाचे प्राचीनत्व ठरवतात.मुळा व मुठा हि समान नावे असल्याच्या दोन नद्या ज्ञात आहेत.त्याचप्रमाणे शिंदे कुळाची प्राचीन वस्ती मांडवी ह्या तळकोकणातील नदीच्या बाजूस असली पाहिजे त्याची आठवण म्हणून कर्यात मावळच्या पायगुड्यांच्या मूळ गावाचे नाव मांडवी ठेवले असावे.अर्थात जोगळेकर सुद्धा हि मांडणी तार्किक करतात .
शिवपूर्वकाल,शिवकाल,पेशवाई ह्या तिन्ही सत्ताकाळात राजकारणात हे कुळ उठून दिसते व आजही आपले मान मरातब राखून आहे...
बारामावळा पैकी "कर्यात मावळ" हे पायगुडे-देशमुखांची ही पिढीजात वतनदारी, ह्या बारामावळातील देशमुखांचा इतिहास हा अगदी राष्ट्रकूट,यादव,शिलाहार,अनेक राजवटी पर्यंत लागतो ह्या भागातील राजसत्ता बदल्या पण हितल्या भुभागावरील "अधिसत्ता" बदल्या नाहीत. तो बदलण्याचा प्रयत्न ही कुठल्याही राजसत्तेनी केला नाही. अगदी छत्रपतींनी त्यांच्या वेळी नव्याने वतने, जाहागिरी देणे हे अगदी बंद केले. पण मावळातील देशमुखांचे अधिकार जैसे थे ठेवले. ह्या बारामावळातील प्रत्येक परगण्यात कामकाज, कारभार पाहण्याचे एक मुख्य गाव असायचे. त्याला "तर्फ" बोलत...
"कर्यात मावळातील" पायगुडे-देशमुखांचा मुख्य गाव हे. "मांडवी" वर उल्लेख केल्या प्रमाणे मराठयांची स्थलांतरे मराठवाडा ते कोकण परत वर घाटावर मावळभुमी मध्ये.... मराठे स्थलांतरित झाले त्यावेळी त्यांनी आपल्या कुलाची उपास्य देवता ही बरोबर नेल्या, उदा- आमच्या "पायगुडे-देशमुख" घराण्याची कुलदेवता खाली कोकण भूमी ( रोहा ) पासून हिकडे मावळ भूमी (रांजणे खामगाव ) मध्ये तिची ठाणी आहेत....
ज्यावेळी ही मराठा घराणी खालील कोकण भुमी सोडुन वर घाटावर मावलभुमी मध्ये स्थिरावली त्यावेळी तिथल्या नदी, भूभागाच नाव हिकडे मावळात आपल्या वस्थी स्थानांना दिली त्या पैकी पायगुडे-देशमुखांच्या पूर्वजानी कोकण भूमितील आपली वस्थी ज्या नदी किनारी होती. त्या कोकणातील "मांडवी" नदी वरण आपल्या कर्यात मावळातील मुख्य गावाला "मांडवी" हे नाव दिलेले असावे....
पायगुडे-देशमुखांचे कर्यात मावळातील "मांडवी" हे मुख्य देशमुखी शिक्केकऱ्याचे गाव होते. पुढे काही कारणांनी मांडवी गावातील देशमुखीचा शिक्का हा "कुडजेकर" पायगुडे कडे गेला... ह्याची एक थोडीसी नोंद जेधे करण्यात आलेली आहे. ती खालील प्रमाणे आहे.....
#मांडवीकर पायगुडे-देशमुख तर्फ कर्यात मावळ--
#मुळ_पुरुष_बहिरजी_रविराव.त्यांचे पुत्र गोविंदराव अरजोजीराव (कुडजेकर) भिवाजीराव ( आगळंबेकर ) वगैर गोविंदरावाचे हैबतराव. हे खडकवाडीस होते. त्यांनी खेचरे, बेलवडे हे गाव मारिले तेंव्हा ढमाले-देशमुख आडवे पडले त्यांनी हैबतराव याचा पुत्र सर्ज्याराऊ खडकवाडीस मारिला त्याची "आई अनसवा" सिके गळ्यात घालून बसली अरजोजी,भिवाजी यांनी त्यास अग्नि दिला सर्ज्यारावांचा मुलगा सयाजीराव "अनसाबा" बताबा ( अरजोजीरावाची बायको )यांची सिक्या बद्दल कटकट झाली पुढे अनसावा मेली "रायारावास" कुडजेकरांनी मारेकरी घातले त्याची आई "नायेकाबा" मुलं घेऊन कसबे सुपे येथे माहेरीस गेली तेथे २० वर्ष होती. कोणी वाद सांगावायासी नाही, तो राजश्री-छत्रपतींचे राज्य जाले राजश्री दादा पंत यांनी तमाम मुलकास कॊल दिला तेंव्हा "नायकोबा" दादाजी पंताजवळ सिक्याचा कजियाबद्दल उभी राहिली त्यांनी उत्तर तुंमची मनसुभी आणू त्यास ते मुलुकगिरीस गेले. पुढे धामधुम जाली.......
हा उल्लेख "करीना" मध्ये येतो..
ह्या सर्व अभ्यासातुन कर्यात मावळातील "मांडवी" हे पायगुडे-देशमुखांचे देशमुखीचे मुख्य गाव होते...
पुढील अभ्यासास अनुमती असावी__
नवनाथ पायगुडे-देशमुख...


वतन*
एखाद्याचा देश किंवा राहण्याची जागा असा ' वतन ' या शब्दाचा मूळ अर्थ होतो . या शब्दाचा वापर महाराष्ट्रात जेव्हापासून मुस्लिम अंमल सुरु झाला तेव्हापासून सुरु झाला . मराठी मुलखात वतन या शब्दाचा अर्थ " समाजाला रुजू केलेल्या सेवेबद्दल एखाद्याला दिलेली करमाफ किंवा नाममात्र कर देणारी जमीन किंवा जमीन काही हक्क व अवांतर प्राप्ती असा सर्वसाधारणपणे होत असे , दाश्तन् या फारशी शब्दाचा अर्थ धारण करणे किंवा ताब्यात असणे म्हणजेच मालक असणे , वतन धारण करणारा किंवा वतनाचा मालक असणारा तो वतनदार किंवा अशा वतनाचा उपभोग घेणारा अशा अधिकाऱ्याला वतनदार म्हटले जात असे वतन म्हणजे वंशपरंपरागत शाश्वत उपभोगावयाची सत्ता होती . जोपर्यंत एखादा वतनदार गावाचे काम पाहत असे तोपर्यंत त्याला मिळालेली जमीन ही वतनदाराकडेच राहत असे . वतनदाराचे पालनपोषण गावाकडून होत होते . गावकऱ्यांकडून वतनदाराला वस्तु आणि रोखस्वरूपात निश्चित उत्पन्न मिळत असे . या वस्तू अथवा रक्कम निश्चित केलेली होती आणि तिची वसूली वतनदार कायदेशीररित्या करित होते . अशा कायदेशीर हक्कांना हक्कलजिमा म्हटले जात होते . महाराष्ट्रातील ग्रामसंस्थेमध्ये वतनदार हा महत्वाचा वर्ग होता . वतनदारीची पध्दत पूर्वपरंपरेने आलेली दिसते . वतनदारी ही त्यावेळी महत्वाची व प्रतिष्ठेची होती . व्यापार व उद्योगधंदयापेक्षा चरितार्थासाठी वतनदारी महत्वाची होती . ग्रामसंस्थेचे वतनदाराकडे सारा वसूली , शेतीचा विकास , गावाचे संरक्षण , सुव्यवस्था राखणे , न्यायदान अशी महत्त्वाची कामे होती . खेडेगावात पाटील , कुलकर्णी , महार , चौगुला चौधरी रामोशी , देशमुख , देशपांडे , शेटे , महाजन मिरासदार बलुतेदार , अलूतेदार , उपरी यांचा समावेश म्हणजेच गावगाडयातील प्रत्येकाला काही ना काही काम होते आणि त्याचा मोबदला अथवा हक्कलजिमा होता . फरक इतकाच की वतनदारांचे हक्कलजिमे मोठे होते व त्यांना गावात प्रतिष्ठाही अधिक होती इतरांना हक्कही कमी व प्रतिष्ठाही कमी या वतनदारांची कामे त्यांना असणारे अधिकार त्यांना मिळणारे हक्कलजिमे यांची सविस्तर माहिती शिवकाळातील समाजव्यवस्थेत आढळून येते . शिवकालापूर्वी ग्रामव्यवस्थेत वतनदारांना वंशपरंपरेने वतने दिली होती . खेडयातील समाज अर्थव्यवस्थेचा ते अविभाज्य भाग होते . यापैकी देसाई , देशकुलकर्णी , देशपांडे हे मोठे वतनदार होते . या वतनदारांची वतने सारामुक्त होती किंवा नाममात्र सारा द्यावा लागत होता . या वतनदारांनी आपल्या हक्काचा उपयोग रयतेवर जुलूम करण्यासाठी केलेला काही वेळेला दिसून येतो . हे वतनदार पैशाच्या व अधिकाराच्या बळावर सामर्थ्यशाली झालेले होते . त्यांच्या गावाचे ते जणू काही राजे होते . याच सामर्थ्याच्या जोरावर काही वेळेला केंद्रिय सत्तेला सुध्दा शह देत असत . त्यांच्या जवळ असणारे सैन्य त्यांची गावातील सामाजिक प्रतिष्ठा राजाचा त्यांचावर असणारा विश्वास आणि त्यांच्याकडील संपत्ती यामुळे ते कोणाचीही परवा करित नसत , हेच वतनदार मध्यकाळात सरदार बनले होते . आणि स्वतंत्रपणे वागत होते . शिवकाळातही असे वतनदार , सरदार होते , ज्यांना स्वतंत्रपणे राहायचे होते . *यामध्ये जुन्नरचे हांडे , पुण्याचे शितोळे शिवापूरचे कोंडे , अंबाडयाचे खोपडे , वाईचे पिसाळ , जावळीचे मोरे , बधपाचेगावचे धारगे , फलटणचे निंबाळकर , याशिवाय माने , जाधव घोरपडें , जगदाळे , हेही वतनदारांचे सरदार झाले होते* आणि स्वतंत्र राहू इच्छित होते . यापैकी बऱ्याच वतनदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या वेळी विरोध केला होता त्यांचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सामंजस्याने तर कधी बळाचा वापर करून मोडून काढला . यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाची आखणी अशी केली की त्यामुळे वतनदारांचे प्रशासकीय अधिकार कमी झाले . छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वीची चालत आलेली वतने बंद केली नाहीत अथवा काढूनही घेतली नाहीत पण नव्याने वतने देणे बंद केले . वतनदारांना सामंजस्यांनी बोलून त्यांना रोख रक्कम देऊन काही वतनदारांची वतने बंद केली हे वतनदार मोठ्या गढया बांधून राहत आणि राजांविरूध्द बंड करीत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही वतनदारांच्या गढया पाडून टाकल्या . वतनदारांकडे असणान्या सैन्याच्या बळावर त्यांचा गावकऱ्यांवर वचक असे आणि ते काही वेळेला केंद्रिय सत्तेलासुध्दा शह देत असत . म्हणूनच वतनदारांचे सैन्य कमी झाले वतनदारांकडे असणाऱ्या बऱ्याचशा जमीनींवर शेतसारा माफ असे . छत्रपती शिवाजी महाराजांनी हे धोरण बदलून वतन जमीनींवरही सारा वसूलीचे धोरण अवलंबिले . एवढेच नव्हे तर अन्य अधिकान्याप्रमाणे वतनदारांचा जमाखर्च तपासण्यास सुरूवात केली . आज्ञापत्राचा अभ्यास केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे वतनदारांबद्दलचे धोरण स्पष्ट होते . यामध्ये मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात , प्रचलित वतने चालू ठेवावीत , परंतु वतनदारांचा रयतेवरील हक्क काढून घ्यावा . यात रयतेचीही काळजी केलेली दिसते . नूतन वृत्ती देऊ नये या धोरणाला अनुसरून छत्रपती शिवाजी राजांनी अपवादात्मक उदाहरणे वगळता नवीन वतने दिली नाहीत , उलट परंपरागत वतनांना संरक्षण न देता वतनदारांचे राजकीय व सामाजिक वर्चस्व कमी केलेले दिसून येते

मनसब आणि जहागीर*
मनसब हा मूळचा अरबी शब्द आहे . मनसब चा अर्थ स्थान किंवा हुद्दा असा होतो . मुघल काळात राज्याती नागरी किंवा लष्करी नोकरांच्या हुद्याचे प्रतिष्ठेचे मोजमाप मनसबीवरुन होत होते . मनसब धारण करणारा किंवा ज्याच्याकडे मनसब आहे अशा अधिकाऱ्याला मनसबदार असे म्हणत . मूळची ही संकल्पना पर्शियन आहे भारतामध्ये मुघल कालखंडात व विशेषत : अकबराच्या काळात मनसबदारी पध्दत सर्व व्यापक केली . मनसबदाराचा हुद्या , त्याचे दरबारातील स्थान राजदरबारातील त्याचे कार्य हे सर्व निश्चित केलेले होत . थोडक्यात मनसबदार उच्चपद ग्रहण करणारा अधिकारी वर्ग , लष्करी मनसबदारी पध्दतीमध्ये मुलकी आणि लष्करी यात फरक केला जात नव्हता.
मनसबदार पध्दतीचा आढावा
१. मनसबदाराचा दर्जा मनसब १० पासून १० हजारापर्यंत दिली जात होती . या संख्येनुसार मनसबदाराचा दर्जा ठरत होता .
२. मनसबदाराचे वेतन
मनसबदारांना वर्षांचे वेतन दिले जात होते . हे वेतन त्याच्या मनसबीच्या म्हणजे किती सैन्य आहे याच्यानुसार ठरविले जात होते .
३. मनसबदाराचा खर्च
राजाकडून मिळालेल्या वेतनातून मनसबदार सैन्याचा पगार व सैन्यव्यवस्थेचा इतर खर्च करीत असे , पण हा खर्च करुनही मोठी रक्कम शिल्लक राहत असे .
४. युध्दाचेवेळी मदत
राजाला युध्द करण्याचे वेळी मनसबदारांकडील सैन्य उपलब्ध होत होते . राजाने प्रत्यक्ष सैन्य न बाळगता मोठे सैन्य या पध्दतीमुळे उपलब्ध होत होते . अकबराच्या काळात असे सुमारे तीन लाखापेक्षा अधिक सैन्य उपलब्ध होते .
५. मुलकी व लष्करी सेवा
प्रत्येक मनसबदाराला सैन्य बाळगून युध्दाचे वेळी ते उपलब्ध करुन द्यावे लागत . दरबारात सर्वांना मनसब दिली जात होती . न्यायाधीश वगळता सर्वांना युध्दावर जावे लागत होते .
६. वंशपरंपरा नाही
मनसबदारी ही त्या व्यक्तीची योग्यता पाहूनच दिली जात असे . वंशपरंपरागत मनसबदारी देण्याची पध्दत नव्हती . त्यामुळे वडील व मुलगा दोघेही मनसबदार असू शकत किंवा दोघांपैकी एकजण ही मनसबदार असे .
*शिवकालीन मनसबदारी*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी अनेक शूर मराठा पराणी उदयाला आली होती . त्यांच्या शूरत्वाचा उपयोग येथील मुस्लिम सत्तांना होत होता . मनसबदारी मिळणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती . यातच हे सरदार धन्यता मान होते . छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे हे निजामशाहीतील मनसबदार होते आणि आपण बादशाही मनसबदार आहोत याचा त्यांना अभिमानही होता . हा अभिमान तत्कालीन कागदपत्रांतून दिसतो . लखुजी जाधव यांच्या खुनानंतर शहाजी राजेंना पाच हजारी मनसब मिळाली . शहाजी राजे यामध्ये समाधानी नव्हते . थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत मनसबदारी होती पण मराठेशाहीत मनसबदारी नव्हती . मरादेशाहीच्या काळातही अनेक मराठा सरदार मुस्लिम बादशहांकडे मनसबदार म्हणून चाकरी करीत होते . पुरंदरच्या तहाचेवेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुघलांनी ज्या मागण्या मांडल्या त्यामध्ये मनसबदारी स्वीकारण्याची एक मागणी होतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः मनसबदारी स्वीकारली नाही . कारण बादशहाची मनसबदारी म्हणजे त्याची चाकरी छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य नव्हती . पण त्यांनी संभाजी राजेंना पंचहजारी मनसबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली होती . याच मनसबदारीच्या अनुषंगाने त्यांना संभाजी राजेसह आग्रा येथे भेट द्यावी लागली . अर्थात आग्रा भेटीची अनेक कारणे होती . हे त्यामधील एक कारण होते . जहागीर जहागीर म्हणजे एक ठरावीक जमिनीचा भाग . आपल्या कर्तबगार सरदारांना राज्याच्या सेवेचा मोबदला म्हणून हा जमिनीचा भाग किंवा प्रदेश दिला जात असे . राज्याच्या प्रशासकीय गरजेतून ही पध्दती निर्माण झाली होती . सरदाराला दिलेला प्रदेश म्हणजे जहागिरी अणि ही जहागीर धारण करणारा तो जहागिरदार . या प्रदेशातील महसूल जहागीरदारांना मिळत असे आणि या मोबदल्यात ते राज्याची लष्करी व मुलकी कामगिरी पार पाडत असत . ही जहागीर देताना शक्यतो एकाच ठिकाणची दिली जात असे . संपूर्ण खेडे किंवा खेडयाचा काही भाग विशिष्ट कर पट्टी वगैरे जहागीर म्हणून दिल्या जात असत . आपल्या वाटणीचा महसूल कर , पट्टया यांचे उत्पन्न गोळा करण्याची व्यवस्था जहागीरदाराला स्वत : लाच करावी . लागत होती . काळाच्या ओघात असा मालकी हक्क असणारा एक वर्गच तयार झाला . लहानमोठ्या जहागिरदारांनी आपल्या स्वतःच्या जहागिरी जमिनींवर वर्चस्व निर्माण केले . या जहागिरीच्या रक्षणासाठी स्वतःचे सैन्यही उभे केले . केंद्रिय शासनाचे काही वर्चस्व वगळता हे जहागीरदार म्हणजे जणू काही आपापल्या जहागिरींचे स्वतंत्र राज्यकर्तेच झाले . जहागिरदारी पध्दत ही मध्ययुगीन भारताच्या समाजरचेनेचेही एक वैशिष्ट्य म्हणून पाहिली जाते . संपूर्ण उत्तर भारतात जहागिरी पध्दत प्रस्थापित झालेली होती .
*शिवकाळातील जहागीरदारी*
मोगल बादशहा , अदिलशहा , निजामशहा यांच्याकडून अनेक मराठा सरदारांना जहागिन्या देण्यात आल्या होत्या . स्वराज्य निर्मितीच्या वेळी मराठी मुलुखात असे अनेक जहागिरदार आपापल्या जहागिरीतील राजेच झाले होते . सोळाव्या शतकाच्या अखेरीला अशी पदे भूषवणायामशाहीतील जहागीरदारांचा आला आहे . परकीय मुसलमानांना शह देण्यासाठी येथील स्थानिय मुसलमान राज्यकर्त्यांनी मराठ्यांचे सहकार्य घेतले होते . त्यांना जहागिऱ्या देऊन आपले राज्य सुरक्षित ठेवण्याचा व वाढवण्याचा प्रयत्न केला होता . राजमाता जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव हे निजामशहाकडील एक बलाढ्य मराठा जहागीरदार होते . भोसले घराण्यातील बाबाजी भोसले यांना त्यांच्या कर्तबगारीमुळे दौंड जवळील पेडगावची जहागीर मिळालेली होती . निजामशहाप्रमाणेच आदिलशहाने देखील मराठा सरदारांना जहागीर दिली होती असे अनेक मराठा सरदार उदयाला आले आणि प्रसिद्धी पावले , हे मराठा सरदार आपापल्या जहागिऱ्या मध्ये राजे म्हणूनच काम करीत होते . यामध्ये फलटणचे निंबाळकर जावळीचे चंद्रराव मोरे झुंजारराव पाटगे , इस्लामपूरचे माने , मुधोळचे मोरपडे , जतचे डफळे कुडाळन्ने सावंत यांचा सामवेश होतो . छत्रपती शिवाजीराजांचे वडील शहाजी भोसले हे सुध्दा आदिलशहाचे जहागीरदार होते त्यांच्याकडे असणारी पुण्याची जहागीर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे सोपवली होती . जहागीरदार बंडखोर होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पाहिले होते . राज्याचा उगम व संरक्षणाचे मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बारकाईने तपासले होते . यावरून त्यांची खात्री झाली होती की राज्य सुरळीत चालवायचे असेल तर जमिनीची मालकी कोणाकडेही देणे राज्यासाठी घातक ठरते , म्हणून जमीन कोणालाही द्यावयाची नाही हा नियम त्यांनी कडकपणाने अंमलात आणला . कोणालाही जहागीर दिली नाही . ज्यांना अशा जमिनी दिलेल्या होत्या त्या स्वराज्यातील जमिनी खालसा केल्या . पूर्वीच्या जहागीरदारांनी जे मजबूत वाडे , हुडे , कोट , किल्ले वगैरे बांधले होते ते शिवाजी महाराजांनी पाडून टाकले . प्रत्येक काम | करणाऱ्या ला त्याच्या कामानुसार रोख पगार दिला व तो पगार वेळच्या वेळी मिळण्याची तरतूद केली . जे जहागीरदार स्वराज्य कार्यात सामील झाले . त्यांनाही केंद्रिय सत्तेच्या नियंत्रणाखाली आणले , जहागिरी पध्दतच नामशेष करण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता .




मावळ व नेर

पुणे शहराच्या पश्चिमेकडे (कोकण आणि पुणे या मधील भागाला) म्हणजेच बोली भाषेत मावळती कडे असलेल्या प्रदेशाला मावळतीचा प्रदेश अथवा मावळ असे संबोधले जाते. या मावळ प्रदेशाचे १८ विभाग असून त्यातील बहुतेकांना तेथे वाहणाऱ्या नद्या, उपनद्यांच्या नावावरून अथवा त्या प्रदेशातील एखाद्या गावाच्या नावावरून ओळखले जाते. हा मावळ प्रदेश पुणे आणि जावळी ह्या  दोन परगण्यांमध्ये समावेश होतो. ह्या मावळ प्रदेशाच्या उत्तर - दक्षिण सीमांना अनुक्रमे भीमा नदी आणि कृष्णा नदी आहे.


१. आंदर मावळ - आंध्र नदी चे खोरे (जुन्नर परगणा चा प्रदेश)
आंदर मावळ भागात कुसूर घाट व कुसूर पठार, ढाक किल्ला, ठोकरवाडी धरण / आंध्र जलाशय इत्यादींचा समावेश होतो.
(आंध्र नदी ही इंद्रायणी नदीची उपनदी आहे का ?)


२. नाणे मावळ - इंद्रायणी नदीचे खोरे
नाणे मावळ भागात हिंदोळा घाट, पायरा घाट, बोर घाट, कुरवंडा घाट, लोणावळा, लोहगड, विसापूर किल्ल्यांचा प्रदेश इत्यादींचा समावेश होतो.


३. पवन मावळ - पवना नदीचे खोरे
पवन मावळात तुंग व तिकोना किल्ल्यांजवळ असलेल्या पवना नदीच्या खोऱ्याचा समावेश होतो.


४. कर्यात मावळ - पुणे कर्यात.
आदिलशाही व निजामशाही च्या काळात व त्यानंतर स्वराज्यात देखील गावांची रचना करताना सुभा / परगणा / मामला यांच्या देखरेखी खाली टाप, तर्फ, कर्यात व सम्मत आणि त्यांच्या देखरेखी खाली मौजा, माजरा, कसबा अशी आकाराने लहान गावे येत. पुणे कसबा च्या आजूबाजूचा प्रदेश कर्यात मावळ मध्ये समाविष्ट होतो.


५. गुंजण मावळ - गुंजवणी नदीचे खोरे
गुंजण मावळात तोरणा व राजगडकिल्ले, या किल्ल्यांजवळून वाहणारी गुंजवणी नदी च्या खोऱ्यातील भागाचा, पाबे, वेल्हे अशी गावे इत्यादींचा समावेश होतो.


६. हिरडस मावळ - नीरा नदीचे खोरे
हिरडस मावळात भोर जवळील हिरडोशी गाव व नीरा नदीच्या उगमाकडील प्रदेशाचा समावेश होतो.


७. मुठे खोरे - मुठा नदीच्या उगमा जवळील खोरे
मुठे खोऱ्यात मुठा नदीचा उगमस्थान असलेले ठिकाण - टेमघर जलाशयाचा भाग, खडकवासला जलाशय इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो.


८. पौड खोरे - मुठा नदीचे खोरे (पौड गावाजवळील)
पौड खोऱ्यात सव घाट, वाघजाई घाट, सवाष्णी घाट, गाढवलोट घाट, लेंडी घाट, ताम्हिणी घाट इत्यादींचा समावेश होतो. (ह्याच भागाला कोरबारसे मावळ असे देखील संबोधतात ??)


९. मोसे खोरे - मोसी नदीचे खोरे
मोसे खोऱ्यात देव घाट, कुम्भे घाट, कावळ्या घाट, कोकणदिवा किल्ला, धामणहोळ, वरसगाव चा जलाशय इत्यादींचा समावेश होतो.


१०. ताम्हन खोरे - पौड तर्फ चा प्रदेश


११. कानद खोरे - कानंदी नदीचे खोरे
कानद खोऱ्यात तोरणा व राजगड ह्या दोन किल्ल्यांच्या पायथ्याचे वाजेघर, साखर, मार्गासनी तसेच ह्या किल्ल्यांच्या भागात वाहणारी कानंदी नदी च्या खोऱ्याचा समावेश होतो.


१२. खेडेबारे खोरे - शिवगंगा नदीचे खोरे
खेडेबारे खोऱ्यात सिंहगड व पुरंदर या किल्ल्यांच्या डोंगर रांगांमधील खेड शिवापूर, कापूरहोळ व तेथून वाहणारया शिवगंगा नदी चे खोरे यांचा समावेश होतो. शिवगंगा नदी ही  गुंजवणी नदीची उपनदी आहे.


१३. वेळवंड खोरे - वेळवंडी नदीचे खोरे
वेळवंड खोऱ्यात तोरणा आणि राजगड किल्ल्यांच्या दक्षिणेकडील वेळवंडी नदीचे खोरे, भाटघर जलाशय इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो. वेळवंडी नदी ही गुंजवणी नदीची उपनदी आहे.


१४. रोहीड खोरे - नीरा नदीचे खोरे (रोहिडा किल्ल्याचा प्रदेश)
रोहीड खोऱ्यात नीरा नदीच्या जवळचा रायरेश्वर, रोहीडा किल्ला इत्यादी भागाचा समावेश होतो.


१५. शिवथर खोरे - शिवथर घळ जवळील खोरे
शिवथर खोरे हे एकच खोरे असे आहे की ते पूर्णपणे कोकणात आहे. त्यात रामदास स्वामींची प्रसिद्ध शिवथर घळ, वरंधा घाटाचा परिसर (कदाचित रायगड देखील) समाविष्ट होतो.


१६. कान्दाट खोरे - कान्दाट नदीचे खोरे (जावळी चा प्रदेश)
कान्दट खोऱ्यात चकदेव, पर्वत, महिमंडण गड असा जावळी चा प्रदेश येतो.


१७. जोर खोरे - जोर गाव (जावळी चा प्रदेश)
जोर खोऱ्यात कोळेश्वर पठार आणि महाबळेश्वर या मधील प्रदेश, जोर गाव व कृष्णा नदीच्या खोऱ्याचा उगमाकडील भाग समाविष्ट होतो.


१८. जांभूळ खोरे - जांभळी गाव (जावळी चा प्रदेश)
जांभूळ खोऱ्यात रायरेश्वर आणि कोळेश्वर पठारा दरम्यानचे जांभळी गाव, कमळगड, केंजळगड, धोम जलाशय  असा प्रदेश येतो.


शाहजी राजे यांना जेव्हा पुण्याची जहागिरी मिळाली त्यावेळेस त्यांना पाच परगणे आणि बारा मावळ एव्हडा प्रदेश मिळाला असे कळते.


शाहजी राजांच्या जहागिरीतील पाच परगणे - पुणे, इंदापूर, चाकण, शिरवळ, सुपे
शाहजी राजांच्या जहागिरीतील मावळ प्रदेश - गुंजण मावळ, हिरडस मावळ, कर्यात मावळ, वेळवंड खोरे, खेडेबारे खोरे, कानद खोरे, पौड खोरे, मोसे खोरे, मुठे खोरे.
नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळ तसेच जावळी चे खोरे हे त्यांच्या जहागिरी चा भाग नव्हते.


जसे मावळ प्रदेश तसेच बारा नेर - पुणे आणि जुन्नर ह्यामधील नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश


१. मिन्नेर - नारायणगाव जवळील मीना नदी चे खोरे (वडज धरण)
२. कोकडनेर - कुकडी नदीचे खोरे (माणिकडोह धरण)
३. भामनेर - भामा नदीचे खोरे
४. भिमानेर - भीमा नदीचे खोरे
५. मढनेर - हरिश्चंद्रगड व शिंदोला किल्ल्यांमधील पुष्पावती नदीचे खोरे (पिंपळगाव जोगा धरण)
(मढ नावाच्या गावावरून मढ -नेर असे नाव पडले)
६. घोड्नेर - घोड नदीचे खोरे (डिंभे धरण)



लोहगडवाडी बौद्ध लेणी

पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतात लोणावळा मध्ये ऐतिहासिक भाजे बुद्ध लेणी च्या जवळ असलेला ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर असलेल्या प्राचीन बुद्ध लेण्यांचा समूह आपणास पाहायला मिळतो. साधारण पणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात ह्या लेण्यांची  निर्मिती केली असावी. इथे सापडलेल्या शिलालेखावरून व  लेणी च्या बांधकामावरून या लेण्यांचा कालखंड सांगता येतो.
लोहगडवाडी लेणीचा इतिहास : 
      प्राचीन काळात महाराष्ट्रात सातवाहन सम्राटांचे आधिपत्य आपणास पाहायला मिळते. जवळच असलेल्या विसापूर किल्ल्यावर वाशिष्टीपुत्र पुळूमावी यांच्या राज्यवर्षात  कोसिकीपुत्र वेन्हूदत्त याने पाण्याचे टाके दान दिल्याचा उल्लेख सापडतो. हा कोसिकी पुत्र वेन्हुदत्त वाशिष्टीपुत्र पुळूमावी याचा महारठी म्हणून काम करत असल्याचे समजून येते. तसेच भाजे लेणी मध्ये देखील त्याचा उल्लेख सापडतो त्याच बरोबर कार्ला बुद्ध लेणी मध्ये हि वाशिष्टीपुत्र पुळूमावी याचा शिलालेख आढळून येतो तर गौतमीपुत्र सातकर्णी याचा शिलालेख देखील कार्ला बुद्ध लेणी मध्ये सापडतो एकूणच मावळ प्रांताचे प्राचीन नावाचा उल्लेख हि याच ठिकाणी आपणास पाहायला मिळतो प्राचीन काळातील मामाडे आहार  म्हणजे आजचे  मावळ आणि याचा अधिकारी अमात्य असतो  प्राचीन काळी जनपद हे राजा राहत असलेले ठिकाण असे तर राष्ट हा नंतरचा विभाग आहे ज्यामध्ये अधिकारी हा राष्ट्रीक असे हा प्रदेश मोठा असल्याने भौगोलिकदृष्ट्या या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नियुक्त केले जात असत यामध्ये राष्ट्रीक हा अधिकारी असे अशी रचना  हि सातवाहन   कालीन विभागीय प्रशासन  मध्ये पाहायला मिळते( सातवाहन कालीन महाराष्ट्र, मोरवंचीकर ) सातवाहन यांचा कालखंड इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० असा एकूण ४६० वर्षाचा कालखंड आहे. यामध्ये सातवाहनांचे ३० सम्राट होवून गेले आहेत. सातवाहन यांच्या प्रशासनातून  महाराष्ट्राचा एक नवा इतिहास शिलालेखांच्या माध्यमातून उजेडात  येतो. मावळ प्रांतात सातवाहन काळात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याचे स्पष्ट दिसून येते मावळ प्रांतात असलेल्या लेण्या आणि अनेक  प्राचीन अवशेष आपणास सहज माहिती  होवून जातील असे आहेत. मावळचे आज तीन भाग आहेत आंदर मावळ नाणे मावळ आणि पवन मावळ यामध्ये आपणास जवळपास ३० पेक्षा जास्त लेणीचे  समूह सापडतात काही समूह मोठे आहेत तर काही अगदीच छोटे समूह आहेत परंतु मावळातील या खोऱ्यात बौद्ध धम्माचा प्रभाव किती मोठा होता याचे हे उत्तम उदाहरणे आहेत. भाजे लेणी च्या जवळ असलेला हा लोहगड  या किल्ल्यावर लेणी व पाण्याची टाकी निर्माण केल्याचे सर्वप्रथम आपणास पाहायला मिळते. लोहगड वाडी येथील हि लेणी बौद्ध काळात निर्माण झाल्याचे उदाहरण आहे. सातवाहन सम्राटांनी या महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी  बौद्ध भिक्खुना एक सुविधा निर्माण करून दिल्या वर्षावासासाठी बौद्ध भिक्खुंच्या राहण्याची व्यवस्था म्हणजे  या लेण्या आहेत. पुढे लेण्यांचा वापर व्यापारी मार्गावर असल्याने व्यापारी लोकांच्या निवासासाठी देखील केला जावू लागला व  बौद्ध अध्ययनाचे केद्र देखील तयार झाले. लोहगड येथील लेणी हि याच काळातील लेणी आहेत. 
          लोहगडाच्या पोटात असणार्‍या या लोहगडवाडीच्या लेण्याचा शोध तसा अलीकडेच लागला.मात्र लोहगडाला भेट देणारे दुर्गप्रेमी आणि पर्यटक इकडे क्वचितच फिरकतात.कधीतरी एखाद्या अभ्यासकाचे पाउल इकडे वळते.मात्र हि लेणी सापडली यावरुन अजुनही काही प्राचीन ठेवा उजेडात यायचा राहीला आहे हे नक्की. वस्तुत लोहगड हा निश्चितच प्राचीन गड आहे,हे त्याच्या नजीक असलेल्या साधारण २२०० वर्ष जुन्या भाजे लेण्यावरुन सहज समजते. खुद्द लोहगडाच्या कड्यात कोरलेली हि लेणी शोधली ती १८८५ मध्ये जेम्स बर्जेसने. त्याने त्याचा उल्लेख Lists of the Antiquarian Remains in the Bombay Presidency या ग्रंथात केला. जेव्हा यासंदर्भात आणखी संशोधन झाले तेव्हा या लेण्यांचे दोन गट असल्याचे लक्षात आले.
 
 
 
 
एक गट लोहगडाच्या पुर्व कड्यात आहे तर एक लेणी समुह लोहगडाच्या विंचुकाटा माचीच्या खालच्या बाजुस उत्तर कड्यात आहे. अर्थात लोहगडाच्या माथ्यावरही लक्ष्मी कोठी आणि खजिनदाराची कोठी म्हणून ओळखली जाणारी ठिकाणे हि लेणीच आहेत. 
 
लोहगडवाडी लेण्यांचे स्थान दाखविणरा नकाशा.

   लोहगडवाडी लेण्यांपैकी पुर्व बाजुच्या लेण्यांना सहज पोहचता येते. लोहगडवाडीकडुन पायरी मार्गाने गडाकडे जाताना गणेश दरवाज्याच्या आधी मुख्य वाट उजवीकडे वळते तर डावीकडे जाणारी वाट एका कातळकड्याला लगटून साधारण ५० मीटर गेले कि हा लेणी समुह नजरेला पडतो.
या लेणी समुहात सात गुंफा असून त्या कड्यात विवीध उंचीवर कोरलेल्या आहेत.या लेण्यांच्या आत भिक्षुच्या निवासासाठी खोल्या म्हणजेच विहार खोदण्यात आले असून काही पाण्याची टाकी म्हणजेच पोढी पहायला मिळतात. सद्या आपण कड्याच्या पायथ्याशी असणार्‍या लेण्यांतच जाउ शकतो.

लोहगडवाडी पुर्व बाजुच्या लेणीसमुहाचा नकाशा
 
 

 
 

लेणे क्र. १:-
  हि गुंफा सर्वात मोठी आहे. सध्या तरी या एकाच गुंफेत जाता येते.मधोमध सभागृह आणि भिंतीत विहार अशी याची रचना आहे. वरचा कातळ कोसळ्याने लेण्याचा दर्शनी भाग उध्द्वस्त झाला आहे.भिक्षुंच्या खोल्यात दगडी शयनओटे बघायला मिळतात्,तसेच लाकडी दरवाजा बसविण्यासाठी छिद्र दिसतात.मधोमध असलेल्या सभागृहात दगड आणि विटांची भिंत बांधलेली दिसते.हे बांधकाम मात्र मध्ययुगीन कालखंडातील असावे.अर्थात पर्यटकांनी इथेच कचरा करुन आपल्या बेशिस्तीचे प्रदर्शन घडविले आहे.
यापुढची लेणी क्र. २ आणि ३ कड्याच्या वरच्या पातळीत आहेत.मध्ये असलेल्या झाडीझुडूपामुळे तिथे जाणे अवघड होते.
लेणे क्र. २:-
  हि गुंफा या लेणीसमुहातील सर्वात छोटी मानता येईल.हि सर्वात दक्षिण बाजुची गुंफा आहे.मात्र बहुधा दगडाची झीज आणि पडझड झालेली जाणवते.सध्या अस्तित्वात असलेल्या गुंफेचा आकार २ X  १.५ मीटर इतकाच आहे.
लेणी क्र. ३:-
   लेणी क्र. २ च्या वरच्या बाजुला लेणी क्रमांक ३ आहे.इथे जाण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या आहेत्,मात्र या पायर्‍यांची झीज झाली आहे.हि गुंफा दोन थराची आहे.वरच्या गुहेचे तोंड चौकोनी असून त्याचा आकार ०.८ मीटर X ०.४ मीटर असा आहे.या गुहेच्या मुखावर लाकडी आच्छादन बसविण्यासाठीची सोय दिसते.अर्थात हि सोय गुहा कोरली तेव्हाची आहे कि नंतर हि सुधारणा झाली हे सांगणे अवघड आहे. कदाचित वरच्या गुंफेत रहाणार्‍या व्यक्ती खालच्या गुहेचा उपयोग साठवणुकीसाठी करत असतील. वरच्या फोटोत देखील हि रचना आपण पाहु शकता.
लेणी क्र. ४:-
   या लेणीसमुहातील सर्वात वरच्या बाजुला असणारे हे लेणे. या गुंफेत समोर आणि बाजुला साभागृह असून त्याला जोडून खोल्या व पाण्याचे टाके आहे.पुढच्या सभागृहाच्या मागच्या आणि बाजुच्या भिंतीला चिकटून बसण्यासाठी दगडी बाक कोरले आहेत.या गुंफेतून ईतर गुंफेत जाणार्‍या पायर्‍या खुप झीजल्या आहेत.याचा अर्थ इथे बर्‍यापैकी वर्दळ असणार.
लेणी क्र. ५:-
या समुहातील एक छोटे लेणे.या लेण्याचे काम बरेचसे ओबडधोबड आणि अपुर्ण वाटते.
लेणी क्र. ६:-
  लेणी क्र. ५ च्या उत्तर बाजुला मधल्या स्तरात साधारण ५ मीटर अंतरावर कोरले आहे.हे लेणे तुलनेने साधे असून यात पाण्याची पोढी किंवा टाके कोरले आहे.या लेण्याचा आकार ९ मीटर X ४.५० मीटर असून मागच्या बाजुला स्तंभ कोरले आहेत.स्तंभ असलेले हे या लेणीसमुहातील एकमेव लेणे आहे.

लेणे क्र. ७:-
  हे लेणे या समुहातील सर्वात उत्तरेकडील लेणे.कड्यावर साधारण मधल्या स्तरात जमीनीपासून ८ मीटर उंचीवर हे लेणे आहे.या लेण्यात देखील पाण्याचे टाके आहे.लाकडी दरवाजे लावण्यासाठी बिजागरी अडकावायला भिंतीत सोय केलेली दिसते.या लेण्याचे प्रवेशद्बार ढासळल्याने इथे दगडांची भिंत बांधलेली दिसते.हे सर्व निश्चितच नंतरच्या काळात केले अस्णार. कदाचित मध्ययुगीन कालखंडात हि बांधकाम झाली असतील.
या लेणी क्रमांक सातचे महत्वाचे वैशीष्ट्य म्हणजे या लेण्याच्या दरवाज्यावर कोरलेला शिलालेख. सपाट कोरलेल्या दगडावर हा शिलालेख दिसतो, जो अद्याप सुस्थितीत आहे,विशेष म्हणजे हा शिलालेख अगदी अलीकडे म्हणजे २०१९ मध्ये उजेडात आला.विवेक काळे,साईप्रकाश बेलसरे,निनाद बारटक्के, अजय ढमढेरे, अमेय जोशी,अभिनव कुरकुटे या दुर्गभ्रमंती करणार्‍या अभ्यासकांनी हा शिलालेख शोधला.
  हि शिलालेखाची भाषा संस्कृतच्या प्रभावाखाली असणार्‍या प्राकृत भाषेत असून लिपी मात्र ब्राम्ही आहे.या शिलालेखाची भाषा आणी अक्षरशैली नाणेघाटातील गुहेत अस्णार्‍या ब्राम्ही शिलालेखाशी साम्य साधते.तसेच या या शिलालेखाचे लोहगडाच्या उत्तरेला केवळ १५ कि.मी.वर अस्णार्‍या पाले लेण्यातील शिलालेखाशी साम्य आहे.या शिलालेखाचा शोध १९६९ मध्ये श्री. आर.एल भिडे यांनी लावला व इ.स.पुर्व पहिल्या किंवा दुसर्‍या शतकातील या शिलालेखाचे वाचन केले.
 या शिलालेखाचे वाचन असे होते
नमो अरहतानं भयम
ता इधारखिता पोढी
[पे] [थे] [का] पाथो दोअसाना
[नि] वेयीका का कारपिता
[सा][हा] केहीसाह [अ]गोसाले
---- [नी] कातोन [म]

शिलालेखांचे लिप्यांतर

प्राकृत पाली भाषा :
नमो अरहंतानं भयं
त इदरखितेन पोढि
पेठिका पथो दो आसना
नि वेयिका च कारापिता
सातकेहि सहा गोसाले
.. म का नि कतोनि

मराठी भाषांतर
अर्हताना नमन करून भदंत इंद्ररक्षित यांनी गोसाले यांच्या सोबत पाण्याचे टाके रस्ता व दोन आसान पेडिका यांचे निर्माण करण्याचे काम केलेले आहे.
     वरील शिलालेखांचे शब्द पाहता नमो अरहंताना म्हणजे थेट जैन तीर्थकर यांच्यासाठीच याचा उल्लेख आहे असा अर्थ काढला जातो. यासाठी पाले लेणी मधील Sankalia आणि शोभना गोखले यांनी २९ .९ . १९६९ मध्ये सदर केलेल्या The Brahmi Inscription from pale यामध्ये त्यांनी पाले लेणी मधील शिलालेख हा जैन शिलालेख म्हणून नमूद केलेला आहे. केवळ सुरुवातीचा शब्द हा नमो अरहंताण आहे म्हणून यापलीकडे शिलालेखाची कोणती बाजू तपासून पाहिलेली त्या भागात पाहायला मिळत नाही याची माहिती त्यांनी एफिग्रफिका व्हल्युम ३८ मध्ये पेज नं १६७ /६८ वर केलेलं आहे हे सांगताना त्यांनी नमो हा शब्द केवळ जैन धर्मामध्ये वापरला जातो असे म्हटलेले आहे परंतु भारुत च्या स्तुपावर देखील नमो हा शब्द प्रयोग आलेला आहे. जैन लोकांनी स्वीकारलेले नमो अरिहंताण असायला हवे नमो अरहंताण असे नको परंतु अनेक ठिकाणी नमो अरहंताण हा शब्द प्रयोग जैनांच्या काळात झालेला आहे. मुळात अर्हंत हि एक बौद्ध धम्मातील ज्ञानाची अवस्था आहे कान्हेरी येथील निर्वाणभूमी मध्ये सापडलेल्या बौद्ध भिक्खुंच्या अस्थी स्तुपावर जे शिलालेख सापडले त्यात अनेक अरहंताण शब्दांचा उल्लेख आलेला आहे हे शोभना गोखले यांनी त्यांच्या Kanheri Inscription या पुस्तकात त्यांनी च लिहिलेले आहे. इथे मात्र एका शब्दामुळे थेट जैन शिलालेख याचा उल्लेख केला गेलाय जैन शिलालेखात भदंत हा शब्दाचा उल्लेख येत नाही कारण जैनांमध्ये भन्ते नसतात. इथे उल्लेख आलेला शब्द हा भयंत असा आहे भयंत चा अर्थ भदंत असा होतो आणि हे बौद्ध भिक्खू साठी वापरण्यात आलेला शब्द आहे असे अनेक शब्द बौद्ध लेण्यातील शिलालेखात स्पष्ट पणे वाचायला मिळतात कान्हेरी येथील अनेक शिलाकेहात त्याचा उल्लेख आहे लेणी क्रमांक ३ मधील स्तंभावर असलेल्या शिलालेखात भदंत गहला भदंत अचल भदंत विजयमित्र भदंत धम्मपाला असे अनेक उल्लेख आलेले आपणास पाहायला मिळतात. अश्यावेळी वरील शिलालेखात उल्लेख झालेला शिलालेख हा जैन शिलालेख कसा काय होवू शकता हा प्रश्न निर्माण करणारा आहे. प्राचीन काळात या ठिकाणी जैनांचे कोणते हि अस्तित्व पाहायला मिळत नाही अश्यावेळी जैन शिलालेख निर्माण होण्याचे कारणच नव्हते. अभ्यासकांनी यामध्ये जो संभ्रम केला आहे तो स्पष्ट आहे कि स्पष्ट शब्दात या ठिकाणी आलेले उल्लेख हे बौद्ध भिक्खू ने दान दिल्याचा असताना जैन शिलालेख म्हणून याचा उल्लेख होणे चुकीचे आहे.
       त्याच प्रमाणे Indian Archaeology 1984-85 A Review यामध्ये विसापूर किल्ल्यावर सापडलेल्या शिलालेखांचा उल्लेख या पुस्तकात पाहायला मिळतो पान क्रमांक १३४ वर विसापूर किल्ल्यावरील शिलालेखाची नोंद आहे. एकूण इथल्या परिसरात कुठे हि जैन शिल्पकला नाही. जैन स्थापत्यकला नाही. जैन धर्माचा ऐतिहासिक पुरावा नाही 
      तसेच शिलालेखात नमो हा शब्द नाणेघाट येथील लेण्यातील शिलालेखात हि उल्लेख झालेला आहे आणि शब्द रचना त्याच काळातील आहे आणि हा काळ म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचे प्रगतीचा कालखंड आहे. इथे कुठे हि जैन प्रभाव पाहायला मिळत नाही. सातवाहन हे जैन मताचे नव्हते सातवाहन यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसाराची काम केलेली आपणास पाहायला मिळतात याचे उदाहरण द्यायचे झाले तर कार्ला लेणी मधील शिलालेख जो गौतमीपुत्र सातकर्णी याचा राज आदेश आहे भिक्खुणा दिलेल्या दानाच्या जमिनीत अर्थात त्या भिक्खूहलामध्ये कोणत्या हि अधिकाऱ्याने पाय ठेवू नये शिवाय कोणता हि कर बसूल करू नये कारण ती जागा बौद्ध भिक्खुंच्या उदरनिर्वाहासाठी दिलेली आहे एवढी मोठी घोषणा बौद्ध धम्माचे अनुयायी असल्याशिवाय देणे शक्य नाही त्यामुळे अनेक पुरावे हे बौद्ध धम्माशी संबधीत आहेत.पाले लेण्या प्रमाणे लोहगड येथील हा शिलालेलेख आहे. पाले लेणी मध्ये ज्या व्यक्तीने दान दिले आहे त्यांनीच इथे हि दान दिल्याचा उल्लेख आहे
लोहगड वाडी लेणी हि ऐतिहासिक प्राचीन ठेवा आहे. आणि त्याचे जतन करणे तेवढेच महत्वाचे आहे.
संदर्भः-
१) 
२) https://abcprindia.com/lohagadwadi-buddhist-leni/
३) kevinstandagephotography.wordpress.com

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...