Wednesday, October 13, 2021

अनघाई

 सह्याद्रीच्या रांगेत दुर्ग उभारणी करताना दुर्गविशारदांनी या परिसराची नैसर्गिक भुरचना  ध्यानी घेतलेली पहायला मिळते.एखाद्या डोंगरावर किल्ला उभा करायचा तर गडाला असणारे नैसर्गिक संरक्षण म्हणजे चारही बाजुने असणारे कातळकडे, गडाकडे चढणारी वाट्,पाण्याची उपलब्घता वगैरे निकष लावलेले पहायला मिळतात.मात्र काही दुर्ग हे केवळ त्यांचे स्थान लक्षात घेउन अगदी कठीण सुळक्यावर उभारलेले पहायला मिळतात. गोरखगड्,लिंगाणा, मोरोशीचा भैरवगड हि अश्या सुळक्यावर दुर्ग उभारणी झाल्याची उदाहरणे.याच पंक्तीतील आणखी एक नाव म्हणजे पालीजवळचा अनघाई.

   पाली हे अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वरामुळे पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीने गजबजलेले गाव. सुधागड्,सरसगडामुळे इथे ट्रेकर्सची पावले वळतात, तर ठाणाळे,खडसांबळे, गोमाशी लेण्यामुळे अभ्यासकांची इथे ये जा असते.याच परिसरात असलेल्या मृगगड आणि अनघाई या दोन अनवट गडांना मात्र फार कमीजण भेट देतात.यातील अनघाईची ओळख आज करुन घेउया. 
कळंब गावातून अनघाई
      प्रत्येक किल्ल्याचे स्वतचे असे काही न काही वेगळेपण असते आणी त्याच्या या वेगळे पणामुळे तो किल्ला कायमचा आपल्या लक्षात राहतो.रायगड जिल्ह्यात जांभूळपाड्या जवळ मृगगड आणि अनघाई हे दोन किल्ले आहेत. या भागातून सव आणि निसणी या दोन घाटवाटा जातात. या घाटवाटांवर आणि अंबा नदीच्या खोर्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी मृगगड आणि अणघई या दोन किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. हे टेहळणीचे किल्ले असल्याने त्यावर फ़ारसे अवशेष नाहीत.

अनघाई किल्ल्याचे पायथ्याचे गाव कळंब हे रायगड जिल्ह्यात येत असले तरी अणघई किल्ला आणि डोंगररांग मात्र पुणे जिल्ह्यात येत. कळंब व आजूबाजूच्या गावातले काही माणसे ही डोंगरांग ओलांडून लोणावळा भागात नोकरीसाठी जातात. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात अनघाई मोडतो. वेगळेपणा जपणारा हा अपरीचीत किल्ला आपल्या लक्षात रहातो तो त्याच्यावर चढाईसाठी पार कराव्या लागणाऱ्या घळीच्या वाटेमुळे. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला तब्बल २०० ते २५० फुट उंच तीव्र चढाई असलेली घळ चढुन जावे लागते  या किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४ कातळटप्पे चढून जावे लागतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत गिर्यारोहणाचे साहित्य, रोप इत्यादी असणे आवश्यक आहे.

        मुंबई पुण्याहुन जवळ असलेला हा किल्ला आजही अनेक दुर्गप्रेमीना अपरीचीत असुन हा किल्ला उजेडात आणण्याचे श्रेय आनंद पाळंदे यांना जाते. स्थानिक लोक या किल्ल्यास अनघाई देवीचा किल्ला म्हणुन ओळखत असले तरी त्यांचा देखील या किल्ल्यावर फारसा वावर नाही. विशेष म्हणजे आपण या गडाचा उल्लेख 'अनघाई' किंवा 'अणघाई' करित असलो तरी गावकरी याचा उल्लेख 'अनगाई' असा करतात.
      सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि ‘डोंगरयात्रा’ कार ‘श्री. आनंद पाळंदे’ यांना या सरकारी नोंदीत नसलेल्या, अनोळखी अशा किल्ल्याचा शोध कसा लागला याची हकीकत रंजक आहे. एकदा सह्याद्रीतल्या जुन्या घाटवाटा शोधताना पाळंदेकाका नि उष:प्रभा पागे यांना कोरीगडाजवळच्या ‘अनघाई’ अन् ‘कोराई’ या अनगड जुन्या घाटवाटांजवळ एका लक्षवेधी सुळक्यानं साद घातली. सुळका दिसायला चांगलाच बेलाग, पण घाटांजवळ मोक्याच्या जागी. म्हणून सुळक्यावर एखादा ‘टेहळणी नाका’ असू शकेल, असं वाटलं. पायथ्याच्या कळंब गावच्या लोकांनी सांगितलं, ‘हा तर अनघाई देवीचा किल्ला.’ म्हणून खरंच वर काही किल्ला आहे काय, हे बघण्यासाठी  ‘अनघाई डोंगरा’वर चढाई केल्यावर त्यांना दुर्गवैशिष्ट्य दिसली आणि या सुळक्याच्या दुर्गपणावर शिक्कामोर्तब झाले.
अनघाई किल्ला व कळंब गाव

                       अनघाई किल्ला
अनघाईकडे उतरणाऱ्या घाटवाटा

              कळंब हे गाव मुंबईहुन १०० कि.मी.वर तर पुण्याहुन ११० कि.मी.अंतरावर आहे. भौगोलिकदृष्टया हा किल्ला जरी पुणे जिल्ह्यात असला तरी यावर जाणारी वाट मात्र रायगड जिल्ह्यातील खोपोली-पाली रस्त्यावरील जांभूळपाडा जवळ असलेल्या कळंब गावातुन जाते.खोपोली-पाली रस्त्यावरील जांभूळपाडा गावात शिरल्यावर रेस्ट इन फोरेस्ट या हॉटेलकडून डावीकडील वाट भेलीव या मृगगड पायथ्याशी असलेल्या गावात जाते तर उजवीकडील वाट सह्याद्रीच्या पुर्व पायथ्याशी ५ कि.मी. वर असलेल्या कळंब गावात जाते. 


कळंब गावातीलउध्वस्त शंकराचे मंदिर
कळंब गावातून गडाकडे निघाल्यावर आपल्याला हे उध्वस्त शिवमंदिर दिसते.या मंदिराच्या बांधणीवरुन हे प्राचीन असले पाहिजे.आजची अवस्था बघून आपण केवळ हळहळ व्यक्त करु शकतो.
            
 
कळंब गावातुन समोर पाहीले असता सह्याद्रीच्या रांगेपासून सुटावलेले तीन सुळके दिसुन येतात. यातील डावीकडील सुळका म्हणजे अनघाई किल्ला असुन हा किल्ला व त्याला लागुन असलेला डोंगर यामधील घळीतून किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. 
समोरील तीन डोंगरापैकी डावीकडील अनघाई किल्ला
 
एकदा का गावकऱ्याकडून वाट समजुन घेतल्यावर हि घळ डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास चुकण्याची शक्यताच उरत नाही.
त्यातूनही वाटाड्याची गरज भासल्यास  संपर्क क्रमांक इथे देतो.
   श्री. गौरव गोधने 9158515982
श्री. राजेश तळेकर:- 9145321058)
अनघाई किल्ला -कळंब के लिए फोन नंबर 098225 99708 है।


कळंब गावाच्या मागे असलेल्या डोंगररांगेत ३ शिखरे दिसतात. त्यापैकी डाव्या बाजूचे बाहेर आलेले शिखर म्हणजे अणघई किल्ला. मागच्या बाजुला असलेला डोंगर म्हणजे पाणडोंगर.त्याच्या पुढे अनघाईगड अगदीच चिंटूक दिसतो. या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून बाहेर पडल्यावर पायवाटेने शेतातून, बांधावरुन चालत १५ मिनिटात आपण अंबा नदीवरील पूला पर्यंत पोहोचतो. 
या पुलाच्या डाव्या बाजूला एक डोह आहे त्याला बुरुना डोह या नावाने गावकरी ओळखतात. पूल पार केल्यावर समोर एक झाडीने भरलेला डोंगर लागतो. त्या डोंगरावर ५ मिनिटे चढून गेल्यावर एक आमराई आणि त्यामध्ये बांधलेले घर दिसते. या घरा समोरुन जाणारी पायवाट अनघईचे शिखर व त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराचे शिखर याच्या मधील घळीतून वर जाते.  या वाटेची खुण म्हणजे हि वाट दोन नारळांच्या झाडाकडून जाते 
Markings on stone to guide us on the way
 शिवाय या वाटेवर सफेद रंगाने दगडांवर , झाडांवर बाणाच्या खुणा दर्शविल्या आहेत. या बाणाच्या खुणा आपल्याला घळीच्या वाटेखाली असलेल्या पठारापर्यंत आणुन सोडतात.आमराईच्या पुढे सागाचे दाट जंगल आहे. ते १५ मिनिटे चढून पार केल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. चालता चालता आपण मोकळवनात पोहचतो. समोर तीव्र उठावला असतो ‘अनघाई’चा काळाकभिन्न सुळका. समोर उभा ठाकलेला हा बेडर आणि उन्मत्त सुळका आपल्याकरीता एक आव्हान  असते.




येथून पठार पार केल्यावर वाट परत दाट जंगलात शिरते. पण तेथुन पुढे घळीच्या तोंडापर्यंत जाण्यासाठी खुणा नसल्याने व अनेक ढोरवाटा असल्याने घळ नजरेसमोर ठेवत आपला मार्ग आपणच काढावा लागतो.अनघाईगडाच्या कळंब बाजूने दोन नाळा खाली उतरतात पैकी डावीकडची पकडायची. 
अनघाईगडाच्या मागचे अनघाई खोरं

 पलीकडच्या बाजूला असलेली दुसरी मोठी नैसर्गिक गुहा…
      
    आपण अनघई किल्ल्याच्या घळीच्या पायथ्याशी पोहोचलो कि या ठिकाणी साधारणपणे १५ फ़ूट उंच कातळ भिंत आहे. भिंतीवर चढण्यासाठी होल्ड आहेत. त्याच्या आधारे भिंत चढून जाता येते. दुसरा पर्याय म्हणजे भिंत संपेपर्यंत उजव्या बाजूला जावे.
चढाई


 अवघड टप्पा चढताना

 या ठिकाणी चढाई करण्यासाठी होल्ड आहेत आणि बाजूच्या झाडांचा आधारही घेता येतो. हा कातळटप्पा चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक नैसर्गिक गुहा आहे. एकदा का रानातुन घळीच्या पायथ्याला आलो कि पुन्हा बाणाच्या खुणा दिसण्यास सुरवात होते. येथुन पुढे जाणारी वाट दाट जंगलात शिरते व पाचोळ्यातून वाटचाल करत अर्ध्या तासात आपल्याला नाळेच्या सुरवातीस असलेल्या एका नैसर्गिक गुहेपाशी आणून सोडते. गावातुन इथवर येण्यास दीड तास लागतो. 





 येथुन किल्ल्याचा माथा दिसण्यास सुरवात होते. अनघाईच्या सुळक्याच्या उजवीकडील (दक्षिणेकडील) खिंडीतून सुळक्यावर वाट आहे. तेव्हा त्याच खिंडीतून उतरलेल्या ओढ्याच्या घळीतून वाट जात होती. 
पहिली नैसर्गिक गुहा … 

गुहेच्या वर लागणाऱ्या पायऱ्या 

अनघाईगड चढताना … 

या गुहेच्या वरील बाजुस असलेल्या घळीतून किल्ल्यावर जाणारी वाट असुन वाटेच्या सुरवातीला काही पायऱ्या व त्याशेजारी बांबु रोवण्यासाठी खळगा पहायला मिळतो. हि वाट अरुंद अशा नाळेतून ६०-७० अंशात असलेल्या कातळ-शिळा चढत अर्ध्या तासात आपल्याला किल्ला व त्याशेजारी असलेला डोंगर या मधील खिंडीत आणुन सोडते. खरं तर, वाट ती कसली? अरुंद नाळेतून, कधी कातळ-शिळा, तर कधी अरुंद, चिंचोळ्या चिमणीतून (छोटी भेग) ६०-७० अंशात चढत, नाळ पार करावी लागते. खिंडीच्या थोडं आधी कातळात खोदलेली, कोरलेली चौकोनी जागा दिसते. हे असणार मेट किंवा चौकीची जागा! गडाच्या थोड्या खालच्या उंचीवर वाटेजवळ टेहेळणीकरता अशी मेटं उभारली जात. मेट हे ‘गड’पणाचं एक लक्षणंच असतं.
खिंडीत ढासळलेली तटबंदी … 
         खिंड म्हणजे थोडी सपाटी आणि पुढे दरी आहे. दरीपलीकडे सहयधारेजवळचे कातळटप्पे अन् दाट रानाचं दर्शन घडते आणि डावीकडे अनघाईच्या सुळका भय घालत असतो. या खिंडीत अनघाई किल्ल्याच्या कातळात ५-६ फुट उंचीवर वर चढण्यासाठी खाचा केलेल्या असुन २०-३० फुटांचा खोबण्या असलेला हा भाग कातळारोहण करत सावधपणे पार केल्यावर खोदीव पायऱ्या लागतात. 
पहिला २५ फुटांचा कातळटप्पा … 

खोदीव पावटे … 
गडावरची पाण्याची टाकी : क्रमांक  १ 

पावसाळ्यात हा कातळ चढणे धोकादायक आहे.या खिंडीच्या दोन्ही बाजुला रचीव दगडांची तटबंदी बांधलेली आहे. या खिंडीत अनघाई किल्ल्याच्या कातळात ५-६ फुट उंचीवर वर चढण्यासाठी खाचा केलेल्या आहेत.ऐन कातळात ६-७ फूट उंचीवर खोदलेली एक मनुष्यनिर्मित आधारखाच हीच सुळक्याच्या कातळकोरीव वाटेची सुरुवात. चाचपणी केल्यावर थोड्या वर दुसरी खाच लागते. कातळारोहणाचं कर्म वाटलं तेव्हड कठीण नाही. हळूहळू खिंड खोल जाते. 
अवघड टप्पा

अवघड टप्पा
आता कातळपथ डावीकडून आडवा वर सरकतो. या ट्रॅव्हर्सच्या वर खोदीव पायऱ्या लागल्या. २०-३० फुटांचा खोबण्या असलेला हा भाग कातळारोहण करत सावधपणे पार केल्यावर खोदीव पायऱ्या लागतात. पावसाळ्यात हा कातळ चढणे धोकादायक आहे. कातळातल्या सुमारे १० खोदीव पावट्या बघून आश्चर्य वाटते. मध्येच खांब किंवा उखळ रोवण्यासाठी (मंडप उभारणीसाठी)  Post Holes (खड्डे) खोदलेले दिसतात. 

नाळेच्या तोंडापाशी पोचल्यावर अजून १५-२० पावट्या लागतात. एके ठिकाणी 'चिमणी - क्लाइंब' मारून गेल्यावर मोकळ्या कातळावर पुन्हा ५-७ खोदीव पावट्या दिसतात. चढताना काही ठिकाणी आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत.सुरवातीला हि वाट उजवीकडे जात नंतर डावीकडे वळते. थोडं वर गेलो अन समोर काहीतरी रचलेलं दिसते.एकावर एक दगड रचलेली ती रचना बहुधा ‘प्राकाराची-तटाची’ असावी. 



या वाटेवर आपल्याला कातळात खोदलेले एक लहान गोलाकार टाके पहायला मिळते.  थोडं वर एकावर एक अश्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. पण वापरात नसल्यानं पाणी पिवळसर होतं. चढावरून येणारं चिखलपाणी थेट टाक्यात पडू नये, याकरता टाक्यावर पन्हळ होती. हे टाके पार करून आपला गडावर प्रवेश होतो. 'हे सर्व कोरीवकाम कोणी केले ?' हा प्रश्न गावकर्‍यांना विचारला तर अगदी अपेक्षित उत्तर - ‘अनघाई देवीनं’!!!
 माथा अगदीच आटोपशीर. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच झाडं. या ठिकाणी डोंगर उतारावर दोन टाकी खोदलेली असुन यातील एक टाके अर्धवट खोदलेले आहे. 

वाटेच्या पुढील भागात उघडयावर असलेली अनघाई देवीची अनगड मुर्ती पहायला मिळते. दस-याला येणा-या ४-२ स्थानिक कातकरी भाविकांखेरीज एरवी कोणीच फिरकत नसावं. (भगवान चिलेसरांच्या मते अलिकडच्या काळात गावकऱ्यांनी गडावरची अनघाई देवीची प्रतिमा हलवून गडाखाली स्थापना केली आहे. गडावर आता गणेशमूर्ती आहे.)गोलाकार आकाराचा किल्ल्याचा परीसर साधारण दीड एकरवर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची १२१० फुट आहे. 
पाण्याच्या खोदीव टाक्या : क्रमांक  २ आणि ३  आणि त्याच्यावरचे  खोदलेले 'चर' … 



श्री. अनघाई देवी चे मोडकळीस आलेले मंदिर 
गडाच्या वर असलेल्या तीन खोदीव पाण्याच्या टाक्या : क्रमांक  ४, ५, ६
गडावरची क्रमांक  ७ : पाण्याची टाकी 
गडावरची क्रमांक  ८ : पाण्याची टाकी 
गडावरची असंख्य Post Holes … 

किल्ल्याच्या माचीवर सुरवातीची तीन टाकी वगळता अजून पाच टाकी पहायला मिळतात. यातील दोन टाकी अर्धवट बुजलेली असुन उर्वरित तीन टाक्यांचा समुह आहे. यातील एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. पण ते केवळ मार्च महीन्यापर्यंत टिकत असावे. उत्तरेकडे पाणी वाहून जाण्याकरता चर दिसतात. काही हौद, उखळ, खांब रोवण्याकरता वापरात असलेले खड्डे सापडतात. कदाचित या खड्ड्यांमध्ये खांब रोवून, मग आसरा निर्माण करत असावेत. पश्चिमेला किल्ल्याच्या पठारावर खडक फोडण्यासाठी केलेले खळगे तसेच एका घराचा कातळावर कोरलेला पाया पहायला मिळतो.
         टेहाळणीसाठी बांधलेले आणि फारसे बांधकाम नसलेल्या अनघाईगड आणि मृगगडावर काही समान गोष्टी बघायला मिळतात जसे कि :पाण्याच्या टाक्यांना खोदलेले 'चर', भरपूर पाण्याची टाकी, भरपूर खोदीव पावट्या आणि पायऱ्या, आधारासाठी खोदलेल्या खोबण्या, भरपूर Post Holes आणि अर्थातच चिमणी क्लाइंब.
           ह्या साऱ्या गोष्टी या सुळक्यावर का? त्यांचे प्रयोजन काय? या गोष्टी आज तरी माहीत नाहीत. मात्र कोकण दफ्तरात, जुन्या एखाद्या कागदपत्रावर या डोंगराचा ‘दुर्ग’ असा उल्लेख मिळाला, तरच हा डोंगर केवळ ‘डोंगर’ नसून ‘दुर्ग’ असल्याचे सिद्ध होईल. अन्यथा अनघाई अन् कोराई घाटाचा मोक्याच्या जागचा टेहेळणी नाका असं ग्राह्य धरता येईल.
       किल्ल्याचा छोटेखानी आकार पहाता अनघाई किल्ल्याचा वापर कोरीगड आणि खोपोली, पाली परिसरावर टेहळणीसाठी होत असावा. किल्ला फिरण्यास १५ मिनिटे पुरेसी होतात. किल्ल्यावर जाऊन परत गावात येण्यासाठी साडेचार तास लागतात. 
   गडमाथ्यावरुन विस्तृत प्रदेश दिसतो. उत्तरेला नागफणी आणि घोडेजीन घाटाचे सुळकेवजा डोंगर लक्षवेधी होते, तर पायमोडी घाटातला मोराडीचा सुळका डोंगरगर्दीत लपलेला. पश्चिमेला जांभूळपाडा परिसरातली शेतं-शिवारं. तर, पूर्वेला सह्याद्रीच्या भिंतीपासून असंख्य झाडीभरले दांड एकमेकांना बिलगून कोकणात उतरत होते.
गडावरून पूर्वेला कोराईगड तर दूरवर ईशान्येला मोरगिरी किल्ल्याचा सुळका दिसतो. खाली उत्तरेला कळंब गावाचे खोरं दिसते. ईशान्येला काठी / कोराई घाट दिसतो.  वातावरण स्वच्छ असते तर वायव्येला माणिकगड आणि कर्नाळा किल्ला सुद्धा दिसतो. पश्चिमेला अनघाई किल्ल्याच्या जुळ्या डोंगरावरचे विस्तीर्ण पठार दिसते .दक्षिणेला पलीकडे घोड्याच्या नाळेच्या (Horse Shoe) आकारासारखे अनघाईचे विलक्षण सुंदर खोरं दिसत असते.
       गिर्यारोहण म्हणले कि अपघात आलेच.त्यातून प्रस्तरारोहण असेल तर धोका आणखी वाढतो. या अनघाई किल्ल्यावरही एक अपघात झालेला आहे. डोंबिवलीत राहणारे कृष्णा मनोहर पार्टे (३५) हे एका ग्रुपसह जांभुळपाडा नजीकच्या अनघाई किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी 21 जानेवारी २०२० रोजी आले होते. तेव्हा काही काळानंतर कृष्णा पार्टे हे बेशुद्ध अवस्थेत असलेले त्यांच्या सहकाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर वेळ न घालवता डॉक्टर, कृष्णाचे नातेवाईक व राहुल मेश्राम हे कृष्णाला ऍम्ब्युलन्समध्ये घेऊन हॉस्पिटलसाठी रवाना झाले. पण दुर्दैवाने जांभुळपाडा येथील आरोग्य केंद्र बंद होते व परळी गावातील प्रायव्हेट डॉक्टर तपासणीसाठी तयार नव्हते. शेवटी खोपोली येथे नेल्यास म्युनिसिपल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तपासणीनंतर कृष्णा पार्टे यास मृत घोषित केले. यामध्ये प्राथमिक रिपोर्टनुसार कृष्णा पार्टेचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाले असल्याचे समजले आहे. हि घटना दुर्दैवी आहे.थेट डोंगराने इथे काही धोका दिलेला नसला तरी गडावर जाणार्‍या ट्रेकर्सनी पुर्ण काळजी घेणे गरजेचे असते हेच इथे अधोरेखीत होते.
            खरे तर या अनवट गडावर फार अवशेष नाहीत.तिथे जायचे तर जीवही धोक्यात घालावा लागेल अशी परिस्थिती.मग अशा ठिकाणी जायचेच कशाला ? पण त्याचेही लॉजिकल उत्तर नसले तरी सह्यवेड्यांना हे प्रश्न पडत नाहीत. सह्याद्रीच्या कुशीत  निवांत पहुडलो, की काय अपार समाधान मिळते. याचकरता आपण सह्याद्रीत, डोंगर-किल्ल्यांवर जातो नाही का ? रोजच्या जगण्यातली सारी कटुता, तणाव विसरून हरवून जायचं - त्या गच्च वनश्रीत, तांबड्या-लाल मातीच्या पाऊलवाटांवर, थंडगार-अमृतमय पाण्याच्या टाक्यांजवळ, पाखरांच्या किलबिलाटात, झर्यांच्या खळखळाटात, वार्याच्या ओंकारात दबून जायचं... खोल-खोल दऱ्या पाहून, रौद्र-भीषण कातळकडे नि सुळके पाहून रोमांचित व्हावं... हे सारं सारं करायचं ते ‘आपल्या’ सह्याद्रीला सांभाळूनच!
Leave Nothing But Foot Prints, Take Nothing But Memories.

 अनघाई ट्रेकसाठी काही महत्वाच्या नोंदी:
*वेळेच्या योग्य नियोजनात अनघाई आणि मृगगड हे दोन्ही किल्ले एका दिवसात होवू शकतील.
*अनघाईवर पाण्याची व्यवस्था नसल्याने पुरेसा पाण्याचा साठा सोबत ठेवावा.
*पांढऱ्या रंगात रंगवलेले मोठे दिशादर्शक बाण असले तरी वाट ठीकठाक नसल्याने ते मध्ये मध्ये गायब होतात. आणि हे बाण नैसर्गिक गुहेपर्यंतच आहेत. वाट त्या गुहेच्या बरोबर माथ्यावरून जाते.
*चढाईसाठी लागणारा वेळ: कळंब गावापासून अनघाई माथा - अडीच तास.
*भर पावसात हा ट्रेक टाळावा.
*मुरलेल्या ट्रेकरला वाटाड्याची फारशी गरज नाही.
*खिंडीपासूनच ४० फुटांचा रॉक पॅच अवघड असल्याने जपून चढवा. हा पॅच संपतो अस वाटताना डावीकडे वळून पुन्हा माथ्याकडे चढतो तिथेच पिंपळाच्या झाडाखाली पाण्याचे एक टाके आहे. इमर्जन्सी काळात हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो.
 अनघाई हा फक्त ट्रेकर्स आणि अभ्यासकांकरता. कातळकड्यामुळे हौशी पर्यटकांनी टाळलेला बरा.
  छटाक-भर भासले तरी उन्हाळ्यात अनघाईगड आणि मृगगड चांगलाच दम काढतात.
संदर्भ –
 १)डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू – आनंद पाळंदे प्रफुल्लता प्रकाशन-पुणे 
२) चढाई उतराई सह्याद्रीतील घाटांची -आनंद पाळंदे, उत्कर्ष प्रकाशन-पुणे 
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४) www.trekshitiz.com हि वेबसाईट
५) www.durgbharari.in हि वेबसाईट
६)  http://unadbhatkantee.blogspot.com, https://anandshodh.wordpress.com, https://www.discoversahyadri.in  ,https://www.bankapure.com/ हे ब्लॉग

संदर्भ –
आनंद पाळंदे लिखित १)डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू – प्रफुल्लता प्रकाशन-पुणे /
२) चढाई उतराई सह्याद्रीतील घाटांची -उत्कर्ष प्रकाशन-पुणे #
https://anandshodh.wordpress.com/2015/06/15/anaghai-fort-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA/

http://unadbhatkantee.blogspot.com/2017/06/blog-post_21.html

https://www.yinbuzz.com/anghai-devi-fort-masterpiece-sculptures-4614
अनघाई किल्ला -कळंब के लिए फ़ोन नंबर क्या है?
अनघाई किल्ला -कळंब के लिए फोन नंबर 098225 99708 है।

https://www.discoversahyadri.in/1996/05/Anaghaigad-DiscoveringNewFort.html

https://lokmat.news18.com/maharashtra/another-climber-dies-dombivlikar-youth-dead-in-anghai-fort-mhss-430352.html

https://salilmahadik.wordpress.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/

http://ahireyogesh.blogspot.com/2019/03/

https://www.bankapure.com/2021/02/GavlanGhaat-KoraaiGhaat.html

https://sudhirkhutwad.blogspot.com/

https://treklikevaibhavsachin.blogspot.com/

https://maharashtratimes.com/travel-news/-/articleshow/23918423.cms

https://royalbhatka.blogspot.com/2020/07/blog-post_28.html

http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2018/11/blog-post_5.html

https://www.marathibuzz.com/ancient-trade-importance-of-konkan

http://abc.vibgyorled.com/2017/02/durlashit-gumtara-fort.html

http://sagarsatishmehta.blogspot.com/2015/12/blog-post.html

https://prasaddanve.blogspot.com/2021/01/blog-post.html
https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4964653216298478943&title=School%20Kit%20Distribution%20In%20Tribal%20Area&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2&TagName=Kalamb%20Thakurwadi

http://durgsanvardhanmaharashtra.blogspot.com/2018/09/blog-post_4.html



..

....या  स्मृती फारच अनोख्या आहेत, कारण भाग्य लाभलं श्री आनंद पाळंदे यांच्याबरोबर दुर्ग संशोधन मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे!!!!

-------------------------------------

मित्रवर्य मयुर कडू यांच्या अनघाई दुर्गभेटीचे अप्रतिम फोटू:





अनघाई घाटवाटेवरील पाण्याचे टाके - कोकणात घाटपायथ्याशी आहे. अनघाई गड चढताना लागत नाही.


























-------------------------------------
महत्वाच्या नोंदी:
१. कृतज्ञता: गुरुवर्य आनंद पाळंदेकाका, त्यांच्यासोबत अप्रकाशित दुर्ग ट्रेकची संधी दिल्याबद्दल
२. भटकंतीचा हा अनुभव मे १९९६ सालचा आहे. छायाचित्रे माझ्याकडे उपलब्ध नाहीत.
३. अनघाई हा फक्त ट्रेकर्स आणि अभ्यासकांकरता. कातळकड्यामुळे हौशी पर्यटकांनी टाळलेला बरा.
४. Coordinates: 18°36'41"N 73°20'10"E
५. कृतज्ञता: मित्रवर्य मयूर कडू यांचे. सुरेख फोटू ब्लॉगवर समाविष्ट करण्याची अनुमती दिल्याबद्दल.

अनघाईगड : 
               लहानपणी एखाद्या काडी ला छोटी करायची असेल तर तिच्या शेजारी मोठी काडी ठेवावी लागायची… Theory of Relativity… तद्वत पाणडोंगर च्या पुढे अनघाईगड अगदीच चिंटूक दिसत होता… एका विहिरीच्या बाजूने चालत नदीवरच्या एका पुलापाशी पोचलो… पुलाखाली अजून हि बक्कळ पाणी होते… ढगाळ वातावरणात चढायला सुरवात केल्यावर १० मिनिटांत एका पडक्या घरापाशी पोचलो… ओसाड… वाळलेल्या पानगळीतून आणि जाळलेल्या रानातून मार्ग काढीत १५ मिनिटांत अनघाईगडाच्या पदरात आल्यावर… गडावर जाण्याच्या रस्त्याची शोध मोहीम सुरु झाली… सर्वात पुढे सिंघ काका आणि निनादराव पलीकडे जागा शोधायला गेले… अलीकडून शार्दुल पदरातल्या जंगलातून वर चढत गेला… तोपर्यंत श्री. साईप्रकाश बेलसरे, श्री. सचिन जोशी, श्री. प्रसाद परदेशी आणि प्रख्यात डोंगरयात्राकार श्री. आनंद पाळंदे… अश्या अनेक दिग्गजांना वाट शोधण्यासाठी फोन करण्यात आले… शेवटी प्रसाद परदेशी नेचं योग्य वाट सांगितल्यावर क्षणभर विचार केला… ह्या असल्या अवघड वाटेने वर चढायचंय ?!?!?!? अनघाईगडाच्या कळंब बाजूने दोन नाळा खाली उतरतात… पैकी डावीकडची पकडायची…

               पदरातल्या रानातून वाट तुडवत ५ मिनिटांत एका नैसर्गिक गुहेपाशी पोचलो… तिकडेच सगळ्यांना बोलावून घेतले… तोपर्यंत निनादराव आणि सिंघकाका पलीकडून आले… दोघांनीही अजून एका नैसर्गिक गुहेचा शोध लावला… गुहेच्या वरूनच डावीकडे वाट फुटते… कातळातल्या सुमारे १० खोदीव पावट्या बघून आश्चर्यचकित झालो… मध्येच खांब किंवा उखळ रोवण्यासाठी (मंडप उभारणीसाठी)  Post Holes (खड्डे) खोदलेले सापडले… नाळेच्या तोंडापाशी पोचल्यावर अजून १५-२० पावट्या लागल्या… एके ठिकाणी 'चिमणी - क्लाइंब' मारून गेल्यावर मोकळ्या कातळावर पुन्हा ५-७ खोदीव पावट्या सापडल्या… चढताना काही ठिकाणी आधारासाठी खोबण्या सापडल्या… अरे वाह… इथेचं  इतकी सुंदर कलाकुसर आहे तर गडावर अजून काय दंगा असेल… ह्या कल्पनेनेचं मनात उ'ख'ळ्या फुटल्या… मोकळ्या कातळावरून चढून गेल्यावर एका झाडापाशी पोचलो… पानगळीतून चढत असताना मंदिरावरचे तुटलेले पत्र्याचे छप्पर सापडले… १० मिनिटांत खिंडीत पोचलो…                               खिंडीतचं तटबंदीचे काही अवशेष सापडले… डावीकडे आधारासाठी खोबण्या आणि खोदलेल्या पावट्या सापडल्या… सुमारे १२० फुटांचा कातळटप्पा चढून वर जायचं होतं… खोबण्यांच्या आधारे २५ फुटांचा पहिला कातळटप्पा पार केल्यावर… खोदीव पावट्यांवरून चढत… वाट डावीकडे वळते… एका वेळेला एकंच माणूस जाऊ शकेल एवढ्याच वाटेवरून चालत पलीकडे पोचलो… डावीकडे एक पाण्याने भरलेली खोदीव टाकी आहे… हिरवट पाणी नक्कीच पिण्यायोग्य "नाहीये"… काही Post Holes आहेत… पुन्हा ५ खोदीव पावट्या चढून वर गेल्यावर…  कोरड्या खोदीव पाण्याच्या दोन टाक्या लागतात… पाण्याच्या टाक्यांवरून एक छोटासा चर खोदला आहे… उतारावरून पाणी थेट टाक्यांमध्ये पडावे अशी रचना केलेली दिसते… स्थापत्यशास्त्रेचा एक अप्रतिम नमुना…

            डावीकडे श्री.अनघाई देवी चे मोडकळीस आलेले मंदीर आहे… स्थानिक गावकऱ्यांनी पत्र्याच्या  छप्परावर दगड ठेवला आहे… वर पठारावर पोचल्यावर तर आणखीन तीन खोदीव पाण्याच्या टाक्या सापडल्या… पहिल्या टाकीत कचरा आणि गाळ सापडला… टाक्यांच्या शेजारी एक झाड आहे… अखंड कातळाच्या पठारावर अनेक ठिकाणी Post Holes (खांब / उखळ रोवून मंडपउभारणीसाठीचे  खड्डे) सापडले… डाव्या बाजूला आणखी एक बुजलेले पाण्याचे टाके आहे… पुढे असेच गेल्यावर शेवटचे पाण्याचे टाके सापडले…सगळी मिळून आठ - ८ पाण्याची टाकी सापडली… उत्तर दिशेला तटबंदी चे मोजकेचं अवशेष सापडले… एकंदरीत हा किल्ला टेहळणी साठीचं बांधला असावा…
वेळ सकाळची १०:४५ AM…

    

महत्वाच्या नोंदी: 
*वेळेच्या योग्य नियोजनात अनघाई आणि मृगगड हे दोन्ही किल्ले एका दिवसात होवू शकतील. 
*अनघाईवर पाण्याची व्यवस्था नसल्याने पुरेसा पाण्याचा साठा सोबत ठेवावा. 
*पांढऱ्या रंगात रंगवलेले मोठे दिशादर्शक बाण असले तरी वाट ठीकठाक नसल्याने ते मध्ये मध्ये गायब होतात. आणि हे बाण नैसर्गिक गुहेपर्यंतच आहेत. वाट त्या गुहेच्या बरोबर माथ्यावरून जाते. 
*चढाईसाठी लागणारा वेळ: कळंब गावापासून अनघाई माथा - अडीच तास. 
*भर पावसात हा ट्रेक टाळावा. 
*मुरलेल्या ट्रेकरला वाटाड्याची फारशी गरज नाही. 
*खिंडीपासूनच ४० फुटांचा रॉक पॅच अवघड असल्याने जपून चढवा. हा पॅच संपतो अस वाटताना डावीकडे वळून पुन्हा माथ्याकडे चढतो तिथेच पिंपळाच्या झाडाखाली पाण्याचे एक टाके आहे. इमर्जन्सी काळात हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. 
*खर्च प्रत्येकी रु. ४००/-
ओम शांती शांती....





Anaghai Fort on Republic Day 2011

On the event of 26th Jan 2011 (Republic Day 2011), Me, Amar and Chaitanya planned for visit to one of the offbeat fort in Sahyadri range i.e. Mruggad and Anaghai fort. These forts situated in Raigad district. One has to approach towards Khopoli. Then on Khopoli-Pali road, you need to take left turn towards Jambhulpada phata. From Jambhulpada, you can take approach to base villages of both of the forts. But we decided to go for Anaghai first as i have visited Mruggad in recent times http://picasaweb.google.com/prasadpardeshi23/MruggadBallaleshwarGanapatiPaliVillage#


The base village of Anaghai fort is "Kalamb" which is 5kms from Jambhulpada. The road is in good condition. One can see three mountains in a row when we reach near Kalamb. The leftmost mountain (Thumb like structure) is the Anaghai fort. See the snap below.


To go on top of the fort, one has to go in the colony (First left colony) between Anaghai fort and mountain adjecent to it. Do not go in Second colony as this is wrong approach. First you will encounter bridge within 5 minutes of walk. See the snap below.
 Then one need to go to extreme left colony but we did mistake, we climbed second colony and went on top of the mountain which is adjacent to the fort which was difficult and time consuming. See the snaps below


We clicked one snap of topmost part of Anaghai fort from the adjecent mountain. One can see, there is small temple and few water cisterns on top.
  Now the big question was, how to go on top of the fort and where is that actual route? Then we decided to descend this mountain on half, traverse the mountain and reach the correct colony between fort and this mountain. We proceeded further. We had a tough time to implement this. We had a few scratches on our hand. But taking lot of efforts, finally we reached in the colony. Now the big question ahead of us was, How to climb rest of the patch exposed to valley having 50-60 ft? But, anyhow we need to do that also. Fortunately, there were some footholds made by villagers in order to climb this patch. See the snaps below.




 One need to take extreme precaution on last 20 ft as the footholds present there were eroded due to rains and there was hardly any place to take a hold / grip and proceed further. Finally we reached on top. On top of the fort, one can see small temple of Anaghai mata, series of water cisterns.










 We filled our water bottle took a rest under one and only one tree on top for 30 minutes and started descending the fort. Descending part was quite difficult. But we managed somehow.
Then we started descending the fort via proper route. It took us 2 hours to descend up to the river bridge. The descending part is through the same col.








Then we enjoyed in river for half an hour. See some snaps.




Then we moved towards Khopoli. We had uttapa at Khopoli naaka. Then we proceeded towards Pune. We reached Pune at 9:15 P.M.


Note: This trek is not at all easy. Please carry one 80 ft rope to climb final patch. Please carry ample amount of water with you. If you have any confusion, take villager with you up to the top from Kalamb village.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...