Wednesday, October 13, 2021

मृगगड / भेलीवचा किल्ला

 एखादा गड आपण बघायला जातो तेव्हा, गडाच्या रुपाकडे लांबून बघताना आपण काही ठोकताळे बांधतो.रायगडाकडे जाताना त्याचे सरळ उभे कातळक्डे छाती दडपून टाकतात, तर राजगडाच्या मस्तकावर निसर्गानेच बसवलेला बालेकिल्ल्याचा मुकूट नजरेत भरतो, तोरण्याची उंची दडपून टाकते तर सिंहगडाच्या खांदकड्याचा पायर्‍यासारखा आकार लक्षवेधी आहे.या गडांची उंची पाहूनच साधारण चढाईला किती वेळ लागेल याचा अंदाज बांधून आपण आपली कंबर कसून सुरवात करतो.मात्र काही गड त्याच्या प्रथमदर्शनाने आणि रुपावरुन काही ठोकताळे बांधले तर चांगलाच चकवा देतात.असाच एक किल्ला म्हणजे बल्लाळेश्वराच्या पालीगावाजवळचा मृगगड.



     खोपोलीकडून पालीकडे निघालो कि जांभुळपाडा गाव लागते.१९९६ च्या वेळी अंबा नदीला आलेल्या पुरात हे गाव वाहून गेले होते.आता मात्र इथे आता सेकंड होम झालेली दिसतात.पाली परिसरातील किल्ले म्हणले कि बहुतेकांना सरसगड, सुधागड हेच डोळ्यासमोर येतात.मात्र याच परिसरात मृगगड्,अनघाई असे दोन अनवट गड आहेत.आज यातील मृगगडाची माहिती घ्यायची आहे.
    खंडाळा - लोणावळा घाट परिसर प्रसिध्द आहे तेथील वातावरणामुळे, पावसाळ्यात येथे पर्यटकांची झुंबड उडालेली असते. भुशी डॅम हा येथील सर्वात प्रसिध्द स्थळ. या भुशी धरणाकडे जातांना उजवीकडे एक दरी लागते, याला ‘टायगर व्हॅली’ असे म्हणतात. या ‘टायगर व्हॅली’ मध्ये एक अनोखे दुर्गरत्न आहे. त्याचे नाव ‘मृगगड.’ पण इथे जाण्यासाठी ‘बोरघाटा’ च्या अलीकडे असलेल्या खोपोलीच्या जवळून वाट आहे.
 
 


  

 

 वाघदरी व समोर कोसळणारे धबधबे 
  मृगगड  मोरडी सुळका  पायमोडी घाट  आणि मागे वर लोणावळ्याचा Lions Point 
 
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली असुन सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून सह्याद्रीच्या कडेकपारीत दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या अनेक घाटवाटा आढळतात.देशातून कोकणात वाहतुकीसाठी उतरणारे अनेक घाट महाराष्ट्रात इतिहासकालापासून अस्तित्वात आहेत. यातील काही घाटवाटा आजही वापरात असुन काही घाटवाटा वापर बंद झाल्याने काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. या घाटवाटांबरोबर त्यांच्या रक्षणासाठी असलेले दुर्गही विस्मृतीत गेले आहेत. नाणेघाटासारख्या प्रसिद्ध घाटवाटेबरोबरच सवाष्णी, नाणदांड, बोराटयाची नाळ, कावळया घाट या घाटांची नावंही चटकन डोळयांसमोर येतात.
    लोणावळयाच्या ‘टायगर्स लीप’ पॉइंटपासून एक सरळसोट घाट कोकणातल्या भेलीव गावात उतरतो. कोकणातुन मावळ प्रांतात जाणारा एक घाट म्हणजे सवघाट.भेलीवमधले स्थानिक ग्रामस्थ जरी या घाटाला ‘पायमोडी’ घाट म्हणत असले तरी इतिहासात हा मार्ग ‘सव घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. या घाटाचा पहारेकरी म्हणुन कोकणातील बाजुला मृगगड तर घाटावर पवना नदीच्या खोऱ्यात तुंग व मोरगीरी हे किल्ले बांधले गेले. मावळातुन या घाटात उतरणारी वाट आजही निसणीची वाट म्हणुन ओळखली जाते. ब्रिटीश काळात बांधलेल्या बोरघाटामुळे या घाटाचा वापर पुर्णपणे थांबला व या घाटाचा पहारेकरी असलेला मृगगड देखील विस्मरणात गेला. किल्ल्याखाली असलेल्या भेलीव गावामुळे या किल्ल्याला भेलीवचा किल्ला अशी नवी ओळख मिळाली. 
 

    पुणे-मुंबई वरून एका दिवसात सहज भेट देता येईल असा हा किल्ला रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात आहे. भेलीव हे मृगगडच्या पायथ्याशी असलेले गाव मुंबईहुन ९२ कि.मी.वर तर पुण्याहुन ११५ कि.मी. अंतरावर आहे. पाली - खोपोली रस्त्यावर खोपोली पासून २० किमी वर परळी नावाचे गाव आहे. या ‘परळी’ गावातून सहा आसनी रिक्षेने ‘भेलिव’ नावाच्या गावात जायचे. भेलीव हेच पायथ्याचे गाव आहे.खोपोली-पाली रस्त्यावरील परळी गावानंतर अंबा नदीवरील पुल ओलांडल्यावर डावीकडील कमानीतुन आत शिरणारा रस्ता जांभूळपाडा गावात जातो. गावात शिरल्यावर रेस्ट इन फोरेस्ट या हॉटेलकडून डावीकडील रस्ता १२ कि.मी.वर सह्याद्रीच्या पुर्व पायथ्याशी असलेल्या भेलीव गावात जातो तर उजवीकडील रस्ता कळंब या अनघाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात जातो.

 मृगगड तसा आकाराने छोटा किल्ला आहे. सवघाटावर लक्ष ठेवण्यासाठी याची उभारणी केली असावी असं वाचायला मिळतं. भेलीव गावाच्या अलीकडे अंबा नदीवरील पुल पार केल्यावर पूर्वेकडे पसरलेली सहयाद्रीची रांग व त्यापासुन सुटावलेले चार-पाच सुळके नजरेस पडतात. यातील दूरवरचा मोठा सुळका म्हणजे मोराडीचा सुळका असुन गावामागे असलेल्या पाच सुळक्यापैकी सुरवातीचे दोन सुळके वगळता पुढील तीन सुळक्यावर मृगगड वसला आहे. ( समुद्रसपाटीपासून उंची : ९४० फुट ) मोराडीचा सुळका  हा शिवलिंगासारखा अजस्त्र सुळका विलक्षण आहे. त्याच्याच ओळीत पण जवळ एक छोटेखानी डोंगर दिसतो तो मृगगड. तीन उंचवट्यांनी बनलेला हा डोंगर आहे. त्याच्या दुस-या आणि तिस-या उंचवट्यामधल्या घळीतून वर जायचा मार्ग आहे.
 
 मृगगडचा नकाशा
 
 दुर्गवीर प्रतिष्ठान मृगगडावर श्रमदान मोहिमा राबवत असल्याने किल्ल्यावरील अवशेष सुस्थितीत असुन त्यांनी किल्ल्यावर जाणारी संपुर्ण वाट बाणाने दर्शविली आहे. गावातून गड बघताना एकदम सोपा वाटला तरी 'दिसते तसे नसते म्हणून जग फसते' हि म्हण या गडासाठी बनवलेली असावी अशी शंका यावी इतपत या गडावर जाणे चकवा देणारे आहे. जर गावातून वाटाड्या पाहिजे असेल तर एक संपर्क क्रमांक श्री. अनंत दळवी (8793840090) यांचा आहे.पण बरेच अण इथे वाट चुकले आहेत हे लक्षात ठेवावे.काही वेळा नेमका फाटा लक्षात न आल्याने ट्रेकर्स पुढे जातात किंवा चुकीच्या घळीतून वर चढतात.

गावातील शाळेसमोर एक मंदिर असुन या मंदिराच्या वरील बाजुने किल्ल्यावर जाणारी वाट आहे. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने गावातुन पुरेसे पाणी घेऊनच किल्ला चढण्यास सुरवात करावी.

 
 
भेलीव गावातून जाणारी पायवाट
     भेलीव गावं म्हंटलं तर गावात किमान आठ दहाच घर असतील. मृगगड किल्ला जरी छोटा असला तरी त्याच्या आजूबाजूची डोंगररांग जास्त आकर्षक आहे पावसाळ्यात इथे आल्यास भल्या उंचीवरून कोसळणारे धबधब्यांचे जणु संमेलन भरलेले असते. ह्या लक्षवेधी डोंगरारांगेला म्हणतात "गीतकडा"
गीतकडा

  या गीतकड्याला उजव्या हाताला ठेवून आपली मृगगडाकडे वाटचाल सुरू असते. जागोजागी फलक लावल्याकरणाने चुकण्याची सुतराम ही शक्यता नाही. सुरवातीचा पहिला फलक सोडला कि आपण थेट जंगलात प्रवेश करतो. जंगलसुद्धा साधं नाही तर घनदाट. फारसा मानवी वावर नसल्याने जंगल एकदम शांत असते. शांततेचा आवाज ऐकणं म्हणजे काय ते इथे अनुभवावे.












घनदाट जंगलातील काही पैलू

      उन्हाळ्यात इथे आल्यास पदरातल्या जंगलातून चालताना दमट वातावरणाचा त्रास होऊ शकतो.मात्र पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आल्यास सुरवातीची व शेवटची काही वाट वगळता उर्वरित वाट घनदाट जंगलातुन जात असल्याने गड चढण्याचा थकवा जाणवत नाही. किल्ल्याखाली असलेल्या शेवटच्या दोन सुळक्यातील पुर्वेकडील घळीतुन किल्ल्यावर जाणारी वाट आहे. गावातुन किल्ला चढायला सुरवात केल्यावर साधारण अर्ध्या तासात आपण या घळीखाली येतो. 
चिमणी क्लाइंब…      
  हा रॉक पॅच अतिशय अरुंद, चिंचोळा.एकावेळी एकच जण जाऊ शकेल असा.  या टप्प्याचे वर्णन करायचं झालं तर दोन्ही बाजूला कातळ आणि दोघांच्या मध्ये फक्त एक फूट जागा, त्यातून फक्त चालायचं नाही तर वर चढायचं. थोड तिरकं होऊन त्या पॅचमधे घुसावं लागते. पाठीवरची पिशवी कडेच्या दगडांवर घासते होती. पॅच काही हलणाऱ्या दगडांनी तर काही मातीत घट्ट रुतून बसलेल्या दगडांनी बनलेला . पावसाळ्यात आल्यास आणखी अडचणीचा ! कडेच्या दगडांचा आधार घ्यावा तर काही भाग ओलसर-शेवाळाने साचलेला. त्यावर हाताची पकड बसत नाही आणि हात सटकतात. ह्या वाटेतल्या खडतर टप्प्याजवळ बघूनच कळते कि किल्ला आहे छोटेखानी पण कसरत करायला लावणार एवढं नक्की.  

एकमेव खडतर टप्पा
खोदीव गुहा
गुहेच्या आत मधली खोली … 
गुहेतून बाहेरचं दर्शन…  
      तिकडून डावीकडे १० मिनिटांत छाताडावरची चढाई मारून वर एका कोरीव गुहेपाशी पोहचतो. घळीच्या उजव्या बाजुला असलेल्या डोंगरात ३ x ३ फुट आकाराचे लहान चौकोनी तोंड असलेली गुहा पहायला मिळते. हि गुहा साधारण ३० फुट आत असुन गुहेच्या आत दोन वळणे आहेत. उजवीकडे 'L' आकारात १५ फुट वळते. पुढे साधारण २ फुटावर खाली एक पायरी आहे. तिकडून डावीकडे ५ फुट आत वळते आणि मग समोर येते मोठी खोदीव खोली. गुहेच्या आतील टोकाला १०x१२ फुट आकाराची मोठी गुहा आहे. आतमध्ये वटवाघळंचा फडफड आवाज ऐकू येत असतो. गुहेत कुजलेला दमट वास येतो. या गुहा मुक्कामासाठी योग्य नाहीत.तसेही हा गड बघणे जेमतेम तीन्,चार तासाचे काम.अगदी मुक्काम करण्याची वेळ आली तर खाली भेलीव गावात केलेला चांगला.ह्या असल्या अवघड ठिकाण ह्या गुहा कश्यासाठी खोदल्या असतील? मात्र मृगगडाचे ऐतिहासिक अस्तित्व या गुहांमुळे सिध्द होते. गडाच्या अगदी सुरवातीला अशाच कोरीव गुंफा या परिसरातील सरसगड व अनघाईला देखील पहायला मिळतात.यावरुन हे गड एकाच काळात उभारले हे नक्की.हा गड सन १६५६-५७ मध्ये शिवाजी महाराजांनी घेतला. 

   गुहा पाहुन घळीतील वाटेने किल्ल्याकडे निघावे. घळीत असलेली वाट नष्ट झाल्याने सोपे प्रस्तरारोहण करून पुढे डावीकडे कातळात खोदलेल्या पाय-यांवरून आपण किल्ल्याच्या शिखराखाली असलेल्या लहान पठारावर पोहोचतो. 
   पठाराच्या उजव्या बाजुस लहान उंचवटा असुन या उंचवट्यावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात. दुर्गवीर प्रतिष्ठानने या ठिकाणी किल्ल्याचा नकाशा लावला असल्याने किल्ला पहाणे सोपे झाले आहे.
फल्याण बाजूची गुहा आणि एका वेळेस एकंच माणूस जाईल एवढी वाट …  
  
  पठाराच्या डाव्या बाजुस डोंगरात किल्ल्यावर जाण्यासाठी खडकात पायऱ्या खोदल्या असुन याच कातळात उजव्या बाजुला कोरलेल्या लहान लहान पायऱ्या आपल्याला कातळात खोदलेल्या गुहा टाक्याकडे घेऊन जातात.
पहिली गुहा / पाण्याची टाकी  आणि माठ ठेवायला चुन्याची चुंबळी  
 
 खिंडीतून फल्याण गावाच्या दिशेला २० एक खोदिव पावट्या ओलांडून गेलो कि दोन मोठ्या खोदीव गुहा लागतात. पहिल्या गुहेपाशी माठ / मटका ठेवण्यासाठी चुन्यामध्ये तिवईसारखे (चुंबळी) तीन खोलगट खड्डे केलेले आहेत. आज हे टाके कोरडे पडलेले आहे.नेहमीप्रमाणे आचरट लोकांनी तिकडे 'आपली' नावं चुन्याने कोरून ठेवली आहेत.
शेजारची दुसरी  नैसर्गिक गुहा  
 

 ही वाट अतिशय लहान असल्याने पावसाळयात या वाटेवरून गुहा पहाण्याचा धोका पत्करू नये. 








     इथून डाव्या हाताला गेल्यावर लागतो तो गडाचा सर्वोच्च माथा. वरती पोहोचण्यासाठी कातळात गोलाकार पायऱ्या खोदलेल्या आहेत आजही त्या भक्कम स्थितीत आहे चढताना उजव्या बाजूला असलेल्या खोल दरीमुळे डाव्याबाजूला दगडात खाचे मारून पकडण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. या पायऱ्या खिंडीपासूनचं खोदल्या आहेत, तब्बल ८८ पायऱ्या चढून गेल्यावर माथ्यावर पोहचतो. पायऱ्यांच्या मध्ये काही ठिकाणी १०-१५ पॉट होल्स दिसतात. 

 चढण्यासाठी कातळात केलेल्या जागा
 
 
 
 
 
टाके पाहुन मागे फिरल्यावर कातळात खोदलेल्या पाय-यांवरून दहा मिनिटांत आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.


 
वाटेत भाग्नावास्थेतला जीर्ण झालेला गणपती
 पायऱ्यावर उजवीकडे कातळात कोरलेली गणेशमुर्ती पहायला मिळते. 

गडावर जायला खोदीव पायऱ्या … 
खोदीव पायऱ्यांवर असलेले पॉट होल्स
पायऱ्या संपल्यावर लागणारी तटबंदी … 
   या ठिकाणी दरीच्या काठावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात तसेच किल्ल्याची रचीव दगडांनी बांधलेली तटबंदी पहायला मिळते. 
गडावरील एकमेव देवीची मूर्ती
पडके वाडे

Courtesy @ अमित सावंत : शेंदूर लावलेली रेड्यावरची देवी , शिवलिंग, अजून एक देवी, शिळा, पेशवेकालीन विटा … 
वरील छायाचित्र श्री. अमित सावंत (आमचे सह्यमित्र) ह्यांच्याकडून उचलले आहे… त्याबद्दल अमित ला त्रिवार धनुर्वाद…
 
हा टप्पा पार केल्यावर आपण थेट गडाच्या माथ्यावर पोहोचतो. पायऱ्या संपल्यावर उजव्या बाजूला एका रेड्यावर शेंदूर लावलेली महिषासुरमर्दिनीची  उभी असलेली मूर्ती आहे, शिवपिंड आहे, अजून एक देवीची मूर्ती आहे, एक छोटीशी शिळा आहे, तसेच एक मोठा दगडी दिवा पहायला मिळतो.उघड्यावर असलेल्या मूर्तींना गावकऱ्यांनी दगड-विटांचा तट उभारला आहे. या विटा पेशवेकालीन वाटतात. देवीसमोर नतमस्तक होऊन डाव्या बाजूने पुढची वाटचाल सुरू ठेवायची. या मुर्तीसमोर एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. पुढील शिखराकडे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस वाड्याचे जोते पहायला मिळते. या शिखरावर काही प्रमाणात झाडी असुन अजुन काही वास्तु अवशेष दिसतात पण त्यांची ओळख पटत नाही.
उध्वस्त वाड्याचा चौथरा / जोतं… क्रमांक # १ 
उध्वस्त वाड्याचा चौथरा / जोतं  … क्रमांक # २ 
उध्वस्त वाड्याचा चौथरा / जोतं  … पेशवेकालीन विटा …  क्रमांक # ३

उध्वस्त वाड्याचा चौथरा / जोतं  … क्रमांक # ४
उध्वस्त वाड्याचा चौथरा / जोतं  … क्रमांक # ५

 गडाच्या माथ्यावर पोचल्यावर लागलीच डाव्या हाताला प्रशस्त चौसोपी वाड्याचा फक्त चौथरा शिल्लक आहे. उजवीकडे असेच आणखी चार छोटे चौथरे सापडतात. एका चौथऱ्यावर पेशवेकालीन विटा दिसतात.
गडावरील पाण्याची टाकी
पाण्याच्या दोन टाक्या… क्रमांक # २ आणि ३
क्रमांक # ३ च्या टाक्यात उतरण्यासाठीच्या पायऱ्या…  
 


 



 
या शिखरावर डावीकडे पाण्याची तीन कोरडी पडलेली टाकी असून यातील एका टाक्यात दगडी भिंत बांधुन त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत तर दुसऱ्या टाक्यात उतरण्यासाठी काही पायऱ्या कोरल्या आहेत. 


जोत्याच्या उजवीकडे असलेला उतार उतरून गेल्यावर कातळात खोदलेलं पण कोरडे असलेले खांबटाकं पहायला मिळते. या शिखरावरून लहान उतार पार करून आपण किल्ल्याच्या पश्चिमेकडील शेवटच्या शिखरावर पोहोचतो. 


 
 
पाण्याच्या टाक्या … क्रमांक #  ४ आणि ५ 
            अजून थोडे पुढे गेल्यावर छोटासा १५ फुटांचा उतार संपल्यावर … समोर लागतो भव्य कातळाचा सपाट प्रदेश… त्याच्या उजव्या बाजूला पाण्याच्या दोन कोरीव मोठ्या टाक्या आहेत… सुमारे २५ Post Holes सापडले…पैकी ५ चौकोनी आकाराचे आहेत… उरलेले सगळे गोल आहेत… इथे सुध्दा कातळामध्ये सलग चर खोदलेले आहेत… साधारण सभामंडपाची रचना वाटते … एकंदरीत अनघाईगड आणि मृगगडाची रचना अगदी सारखी वाटली… वाघदरी, उंबरखिंड, सव घाट, पायमोडी घाट… ह्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता हा एक टेहळणी किल्ला असावा…
गोल Post Holes आणि चर  

गोल Post Hole आणि  चर 

चौकोनी Post Hole आणि चर … 

चौकोनी Post Holes  आणि चर … 

 
या शिखरावर कोरडी पडलेली दोन मोठी आयताकृती टाकी असुन या शिखरावर खडकातुन चिरे वेगळे करण्यासाठी मोठया प्रमाणात केलेले खळगे पहायला मिळतात. या भागात ध्वजस्तंभ असुन खडकावर काही प्रमाणात सपाटी पहायला मिळते.
'सव' घाट आणि तीन सुळके… 
 
पाताळगंगा नदी व भेलीव गाव 
360 DEGREE VIEW
 
येथुन कुरवंड घाट,उंबरखिंड परिसर तसेच पुर्वेला असलेला सरसगड सहजपणे नजरेस पडतो. पूर्वेला मागे मोरडीचा भव्य सुळका पाठीवर उभा दिसतो. वर लोणावळ्याचा Lions Point दिसतो. लोणावळा - Sahara Amby Valley  (पेठ शहापूर) रस्त्यावरचे एखाद- दुसरे वाहन जाताना दिसते. त्याच्याखाली 'पायमोडी' घाट दिसतो… दक्षिणेला 'सव' घाट आणि त्याच्याखाली तीन छोटे सुळके दिसतात. समोर उत्तरेला INS SHIVAJI च्या खाली 'वाघदरी' दिसते, खाली फल्याण गाव आहे. समोर पश्चिमेला आंबा नदीचे खोरे दिसते.लोणावळ्याची टायगर हिल आणि उंबर खिंड परिसर,सह्याद्रीची प्रचंड मोठी कातळभिंत समोर दिसत राहाते.
     किल्ल्याचे स्थान,त्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी होत असावा. मृगगडाचा माथा लहान असल्याने आपली गडफेरी पूर्ण करण्यासाठी एक तास पुरेसा होतो. भेलीव गावातुन निघाल्यापासून तीन तासांत संपूर्ण किल्ला पाहुन आपण गावात परत येतो. या किल्ल्याच्या परिसरात शिवाजी महाराजांची कारतलब खानाबरोबर घडलेली उंबरखिंड लढाई इतिहासप्रसिद्ध असली तरी मृगगड किल्ल्याचा उल्लेख मात्र या लढाईत येत नाही. 
 
संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
३) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
४) www.trekshitiz.com हि वेबसाईट
५) www.durgbharari.co.in हि वेबसाईट
६) http://www.savitakanade.com/2018/07/blog-post.html,  http://www.apurvaoka.com/2014/03/mrugagad-umbarkhind-trek.html,   https://www.bankapure.com/2014/04/Anghaaigad-Mrugagad.html, https://trekadventure365.blogspot.com/2019/08/mrugagad-fort.html  हे ब्लॉग

 

 













Mrugagad is a small fort that is on the lower end of the mountain ridge that has the Lonavala Tiger Point at the top. The fort can be accessed from the base village called Bheliv, which is accessible from Jambhulpada junction on the Khopoli-Pali road.

At Bheliv, ask for Anant Dalvi (87938-40090) who can accompany you to as a guide to show you the trekking route. Though the route is fairly simple, some sections are tricky and dangerous for novice trekkers. It is best to take a guide along. The total duration of the trek should be around 2.5 hours.

At about half way up the climb, there is a small detour to visit a cave. Do venture into the cave. You have to crouch and crawl into it, but it is worth the experience!


This 3D model of the cave was created by Ashish Patankar and Aniruddh Madav, and shows the interesting pathway of the cave.

  • The first section from the entrance leads straight inwards, and then turns right
  • The small lateral section then ends with a step down a short vertical section
  • The vertical section leads to another lateral section, that ends in the chamber
  • The chamber is large enough for 2-3 people to sit and sleep comfortably

Though the cave is habitable, it is avoidable to actually stay here, as the cave is not properly ventilated.

The climb then continues through a chimney to reach the small plateau between the shorter peak and the main peak of Mrugagad. From this plateau, you can access the second cave. Though there are steps cut into the rock, this is a tricky section that needs careful steps. The view from the second cave is fabulous!

The next section of the climb starts back from the plateau, up the steep rock face that has steps cut into it, to reach the top of the main peak, where you are greeted by the altar to the Goddess Mahishasura Mardini - an avatar of Goddess Durga for destroying the demon Mahishasura.

You can then walk along the top of the hill to the other end, where a flag flutters in the wind. Along the way, you can see several water tanks, with ridges cut into the rock for water harvesting.

The entire trek can be completed in about 2.5 hours including the two detours to the two caves.

And just for fun, here is an animated Google Earth Video of the trek route:

Music credits: "The Truth Is Changing", featuring Will Young & Amapondo








ढासळलेल्या पायऱ्या … 



            ठळक वैशिष्ठ्ये :
  1. दिग्गजांना फोन करून अनघाई गडाच्या वाटेची काढलेली माहिती… 
  2. अनघाईगडाच्या पोटातला अनवट आणि विस्तीर्ण अश्या नैसर्गिक गुहे चा शोध… 
  3. छटाक-भर भासणारे पण उन्हाळ्यात चांगलाच दम काढणारे अनघाईगड आणि मृगगड… 
  4. मृगगडाच्या बाजूला असलेली अनवट, कोरीव आणि खोदीव गुहा… 
  5. टेहाळणी साठी बांधलेले आणि भरपूर Fortification असलेले अनघाईगड आणि मृगगडावर…  समान गोष्टी बघायला मिळाल्या… जसे कि :
    • पाण्याच्या टाक्यांना खोदलेले 'चर' … 
    • भरपूर पाण्याची टाकी… ७ + ५
    • भरपूर खोदीव पावट्या आणि पायऱ्या… आधारासाठी खोदलेल्या खोबण्या… 
    • भरपूर Post Holes… 
    • चिमणी क्लाइंब … 

किल्ले मृगगड

    

             

              उंचीवर असल्याकारणाने तुफान वारा होता उजवीकडे भेलीव गाव, मागे गीतकडा, डाव्याबाजूस पाताळगंगा नदी असं अप्रतिम दृश्य नजरेसमोर होते ह्याचं औचित्य साधून आम्ही आठवत पेटपूजा करण्याचा निर्णय घेतला.


    






इथल्या प्लॅटूवर एका बाजूला मृगगडाची माहिती देणारा फलक, एकीकडे गुहेकडे जाणारा रस्ता, एकीकडे गडावर जाणाऱ्या दगडी पायऱ्या तर एकीकडे खाली दिसणारे भेलीव गाव. मनमोहून टाकणारा परिसर! 

 

 


गडावर जाणाऱ्या दगडी खोदीव पायऱ्या थोड्या काळजीपूर्वक चढले. कारण त्यांची उंची जास्त होती आणि एका बाजूला खोल दरी! वरच्या पायऱ्या चढण्यासाठी दगडात खोबण्या होत्या ज्यांच्या आधाराने पायऱ्या चढून जाणे तितकेसे अवघड गेले नाही. पायऱ्या संपल्या. पुन्हा एक प्लॅटू; वाऱ्यावर डोलणाऱ्या गवतांनी फुललेला. 

अजून काही पायऱ्या चढून गडाच्या शिखरावर आलो. पुन्हा एक मोठा  प्लॅटू. तिथे होत्या पाण्याच्या टाक्या आणि खूप सारे काही गोलाकार तर काही चौकोनी छोटे खोदीव खड्डे. 





गडाच्या शिखरावर ....अगदी टोकाला! 



मृगगड तसा छोटा. साधारण एका तासाची चढाई. 

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर लिखित "गड किल्ले महाराष्ट्राचे" या ग्रंथातील मृगगड किल्ल्याविषयीची  ही माहिती....




मृगगड ट्रेक मला भलताच आवडला. अरुंद रॉक पॅच, दगडी पायऱ्या, आधारासाठी खोबण्या, गुहा, पाण्याच्या टाक्या, दगडात कोरलेला गणपती.. 

गड आवडला म्हणून खुश मी होतेच पण खुशीच अजून एक कारण की वयाच्या ५१ व्या वर्षातील हा माझा पहिला ट्रेक! FYOWs टीम, निखील आणि तृष्णा तसेच अन्य ट्रेक सहकारी यांनी माझा ५० वा वाढदिवस साजरा केला हे ही कारण खुशिचेच! 




असो. 

गडाचे महत्व काय? हा प्रश्न सतावत होता. मृगगडावर लिहिलेले ब्लॉग वाचताना गडाचा उल्लेख "घाटवाटा रक्षक" म्हणून केलेला आढळला. 'प्रहार' या मराठी दैनिकात 21 डिसेंबर 2016 रोजी विवेक तवटे यांच्या घाटरक्षक मृगगड या लेखात  त्यांनी लिहीलय, "पुणे-मुंबईवरून एका दिवसात आणि कोणत्याही ऋतूत सहज भेट देता येईल असा एक सदाबहार किल्ला म्हणजेच रायगड जिल्ह्यातला ‘मृगगड’ ऊर्फ ‘भेलीवचा किल्ला".
तर असा हा घाटरक्षक मृगगड! 

गडावर दुपारचे जेवण करून गड उतरलो तेव्हा साधारण २.३०-३ वाजले असतील. लगोलग उंबरखिंड गाठली. ह्या स्मारकाला भेट देण्याची इच्छा आज सफल झाली. 




छत्रपती शिवरायांनी काळाच्या पुढे विचार करून वापरलेल्या युद्धनीतीसाठी आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याच्या सक्षमतेसाठी हि लढाई प्रसिद्ध आहे. आजूबाजूची भौगोलिक रचना, उंबरखिंडीच्या सभोवती असणारे सह्याद्रीचे अजिंक्य कडे, नदी, घाटवाटा, जंगल, उंच झाडी इ. चा अतिशय बारकाईने विचार करून शत्रूला आपल्या हालचालींचा जरासाही सुगावा लागू न देता, मोक्याच्या ठिकाणी शत्रूला  बेसावध पकडून, चारही बाजूंनी त्याच्यावर  जोरदार आक्रमण करून गाफील अवस्थेत त्याला पकडायचे आणि आपल्या सैन्याचे कमीत कमी किंवा अजिबातच नुकसान न होऊ देता शत्रूसैन्याचे  जास्तीत जास्त नुकसान करायचे अशी ती काळाच्या पुढे जाऊन वापरात आणलेली युद्धनीती. छत्रपती शिवाजी महारांजांचे बुद्धिचातुर्य चा अभिमान वाटावी अशी ही लढाई आणि स्मरणात उभारलेले स्मारक!


उंबरखिंडीचा इतिहास नदीकाठावर शांत बसून अभिमानाने समोर बघत राहण्याचा अनुभव गाठीशी हवाच! 

असो. 

उंबरखिंड स्मारक पाहून परत येताना शेजारच्या चावणी गावचे एक जोडपे भेटले. आजूबाजूला मला फुले-पाने शोधताना पाहून थांबले. एक वेगळ्याच प्रकारचे पान दिसले आणि कुतुहलाने मी ते न्याहाळत होते. जोडपे थांबले आणि म्हणे, " ते लोथ आहे. त्याची भाजी बनवतात. अळूसारखे ते खाजरे असते म्हणून समोर ते झाड दिसत ना ते "नाना बोंडयाच".त्याची "बोक" म्हणजे देठ तोडून लोथाच्या पानात मिसळून भाजी बनवतात. खूप भारी लागते भाजी. शेवाली ची भाजी असते. पण त्याची पाने इथे दिसत नाहीत नाहीतर दाखवली असती"




भाजी ट्रेकला गेले की  तिथले पाने, फुले इ. ची स्थानिक नावे माहित करून घ्यायची इच्छा नेहमीच पूर्ण होते असं नाही. ह्यावेळी ती पूर्ण झाली ह्याच्या ख़ुशीने ट्रेकच्या पूर्णत्वाचे समाधान मिळाले. 

असो.


मृगगड किल्ला मृगसदृश भासला नाही . "मृगगड" नाव का दिले? माहिती तर सापडली नाही. पण गुगल वर गडाविषयी सर्च करताना एक सुंदर गजल समोर आली. विजय कुमार सिंघल यांची ही गजल....


जंगल जंगल ढूँँढ रहा है मृग अपनी कस्तुरी को
कितना मुश्कील है तय करना खुद से खुद की दुरी को||

  


ह्या सुरेख गजलचा भावार्थ शोधत परत भेटूच......लवकरच!


☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝
फोटो आभार: ट्रेक टीम

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...