| किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: लोणावळा |
| जिल्हा : रायगड | |
| महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे अनेक किल्ले आहेत. एक रायगड जिल्ह्यात नागोठाणे जवळचा सोनगिरी तर दुसरा धुळ्या जवळचा सोनगिरी आणि पुणे जिल्ह्यातील कर्जत जवळचा सोनगिरी. गडकिल्ल्यांचा अभ्यास करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे स्थान. गडकिल्ले साधारणत: घाटाच्या पायथ्याशी, घाटाच्या माथ्यावर बांधलेले आढळतात. पुणे जिल्ह्यातील हा सोनगिरीचा किल्ला सुध्दा ऐन बोरघाटाच्या पायथ्याशीच आहे. या किल्ल्याला ‘आवळसचा किल्ला’ असे ही म्हणतात. | |
| पहाण्याची ठिकाणे : | |
| गडावर
जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याच्या
दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य
दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून
घेत असतात. | |
| पोहोचण्याच्या वाटा : | |
| १) पळसदरी मार्गे :- पळसदरी हे खंडाळा घाटाच्या पायथ्याचे रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच एक छोटेसे धरण आहे. मुंबईहून रेल्वेने कर्जतच्या पुढे ३ किमी अंतरावर असणार्या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरायचे. पळसदरी रेल्वे स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो. पळसदरी मधून १५ मिनिटाच्या अंतरावर ‘आवळस ’ गावात पोहोचायचे. आवळसपासून पुढे १५ मिनिटाच्या अंतरावर असणार्या ‘नावली’ गावात पोहोचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना दोन टेकाडं ओलांडावी लागतात. साधारणत: एक ते सव्वा तासात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा. २) जामरूंग मार्गे :- कर्जत - खोपोली रेल्वेमार्गावर पळसदरीच्या पुढे जामरूंग स्टेशन आहे. येथे उतरून मुंबईच्या दिशेला चालत येतांना वाटेत रेल्वेचा बोगदा लागतो. या बोगद्याच्यावर जाणारी वाट पकडून वर गेल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरून किल्ल्यावर जाता येते. पुढे या वाटेला पळसदरी मार्गे येणारी वाट मिळते. | |
| राहाण्याची सोय : | |
| गडावर राहण्याची सोय नाही. | |
| जेवणाची सोय : | |
| गडावर जेवणाची सोय नाही. | |
| पाण्याची सोय : | |
| गडावर पिण्याचे पाणी नाही. | |
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | |
| नावली मार्गे २ ते ३ तास लागतात. जामरूंग मार्गे २ तास लागतात. |
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : १५१० फुट
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रात सोनगड/सोनगीर अथवा सोनगिरी या नावाने एकुण पाच किल्ले आहेत. यातील पहिला सोनगीरी धुळ्याचा दुसरा सोनगिरी नाशिकचा, तिसरा सोनगड उर्फ सोनगिरी सिंधुदुर्गचा व उर्वरित दोन रायगड जिल्ह्यात पेण तालुका व कर्जत तालुक्यात आहेत. यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळ असणारा सोनगीरी किल्ला इतिहासाबाबत पुर्णपणे अबोल असुन पायथ्या जवळ असलेल्या आवळस गावामुळे तो आवळसचा किल्ला म्हणुन देखील ओळखला जातो. सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेवर बोरघाटाच्या तोंडाशी असलेला हा किल्ला त्याची भौगोलिक रचना पहाता बहुदा टेहळणीसाठी वापरला केला जात असावा. मुंबई-पुण्याहुन जवळ असलेला हा किल्ला एका दिवसात सहजपणे पहाता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी कर्जत स्थानकापुढील पळसदरी व जामरुंग या दोन रेल्वे स्थानकातून मार्ग आहे. जामरुंग येथुन जाणारी वाट फारशी वापरात नसल्याने तसेच या वाटेवर अनेक फसव्या ढोरवाटा आहेत शिवाय या वाटेवर गडावर जाण्यासाठी वाटाड्या देखील भेटत नाही. त्यामानाने पळसदरी-आवळस-नेवाली या मार्गाने किल्ल्यावर जाणे जास्त सोयीचे आहे. मुंबई- पळसदरी- नेवाली हे अंतर ६७ कि.मी. असुन कर्जतपासुन नेवाली हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव फक्त ७ कि.मी.वर आहे. कर्जत रेल्वे स्थानक पुर्व येथुन तेथे जाण्यासाठी खाजगी रिक्षा आहेत. नेवाली गावातुन समोरच किल्ला नजरेस पडतो. गावकरी या किल्ल्याखालील पठारावर त्यांची गुरे चरायला नेत असल्याने वाट पुर्णपणे मळलेली आहे तरीही गावकऱ्याकडून वाट नीट समजुन घ्यावी. किल्ल्यावर जाणारी वाट थेट किल्ल्यावर न जाता बाजुच्या टेकडावर चढत किल्ल्याच्या पायथ्याशी जाते व तेथुन किल्ल्याच्या टेकाडाला वळसा घालत मागील बाजुने वर चढत जाते. किल्ल्याच्या टेकाडाखाली आल्यावर दोन वाटा लागतात. यातील डावीकडची वाट अस्पष्ट व दाट काटेरी झुडुपांमधून थेट किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट किल्ल्याच्या टेकाडाला वळसा घालत जाते. हि वाट काही ठिकाणी घसाऱ्याची असुन एका बाजुला किल्ल्याचा डोंगर तर दुसऱ्या बाजुस दरी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी हिच योग्य वाट आहे. किल्ल्याखालील पठारावर आल्यावर तेथुन किल्ल्यावर जाण्यासाठी मार्गदर्शक बाण दाखवले आहेत. या वाटेने आपण किल्ला व त्याच्या सोंडेमधील लहानशा खाचेत येतो. हि खाच मानवनिर्मित असुन सोंडेपासुन किल्ला वेगळा करण्यासाठी हि खाच खोदली गेली आहे. नावली गावातुन इथवर येण्यास एक तास पुरेसा होतो. येथे किल्ल्याचा नामशेष झालेला बुरुज असुन या बुरूजा शेजारील उध्वस्त तटबंदीतुन आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १४१० फुट असुन किल्ल्याचा परीसर साधारण १ एकर आहे. किल्ल्याच्या टेकडावर कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी व काही वास्तुचे तुरळक अवशेष आहेत. गडमाथा फारच चिंचोळा असल्याने गडफेरीस १० मिनिटे पुरेसी होतात. किल्ल्यावरून बोरघाट, इरशाळगड, माथेरान,प्रबळगड, राजमाची,ढाकबहिरी,भिवगड,उल्हासनदी व पळसदरी तलावाचं सुंदर दर्शन होते. सोनगिरी किल्ल्याचा फारसा कुठे उल्लेख येत नसल्याने फारच कमी गिरीमित्र या किल्ल्यास भेट देतात. अपरीचीत अशा या किल्ल्याची इतिहासात कोठेही नोंद आढळत नाही.
नोव्हेंबर मधील राजमाचीच्या मोहिमेनंतर पुढचे दोन महिने इकडे जाऊ
तिकडे जाऊ म्हणत गेले. चाचणी परीक्षा झाली होती आणि सत्र परीक्षेला खूप वेळ
असल्याने सह्याद्रीत भटकण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. वेगवेगळी ठिकाणे
google search करून मागील वेळेस अर्धवट राहिलेल्या कर्जत जवळच्या सोनगिरीवर
जाण्याचे निश्चित झाले. नेहमीच्या सदस्यांना फोनाफोनी केली. काही जण busy
असल्याने व काहींनी मागील वेळेचा धसका घेतल्याने शेवटी कमलेश, मी आणि दिपक
सोनगिरीसाठी सज्ज झालो.
सोनगिरी(आधीच्या मोहीमेतील छायाचित्र)

“सोनगिरी” कर्जत जवळचा मुंबई-पुणे लोहमार्गावरील छोटासा(फक्त म्हणण्यापुरता) किल्ला. सोनगिरीला जायच्या अनेक वाटा आहेत. त्यापैकी एक वाट लोहमार्गाच्या बाजूने जाते तर दुसरी वाट पायथ्याच्या नेवळीगावातून जाते. दोन्ही वाटांवरून जाण्यासाठी सर्वप्रथम मुंबई-खोपोली मार्गावरील पळसदरी गाठावे. पळसदरी स्थानकात उतरल्यावर समोरच सोनगिरी उभा ठाकलेला दिसतो.

पळसदरीला उतरून लोहमार्गाजवळची वाट न पकडता आम्ही सरळ नेवाळी गावची वाट पकडली. कारण मागील वेळेस लोहमार्गाजवळच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला असता अनेक छोट्या फसव्या वाटांमुळे वाट चुकून समोर गड दिसूनसुद्धा अर्ध्यावरून परतावे लागले होते. तो trek ऐवजी आमचा track track खेळ झाला होता. म्हणून यावेळी नेवाळी गावातून जायचा निर्णय घेतला. नेवळी गावाकडे जाताना वाटेत आवळस गाव लागते. याच गावामुळे सोनगीरीला आवळसचा किल्ला असेही म्हणतात. गावात शिवजयंती(तारखेप्रमाणे) निमित्त ध्वनिक्षेपकावर मस्त गाणी लावली होती. गावात नेवळीची वाट विचारून मार्गस्थ झालो. थोड्याच वेळात डांबरी सडकेवरून नेवाळी गावात पोहोचलो. सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि उल्हास नदीच्या काठावर वसलेले नेवाळी गाव एक छोटंसं गाव आहे. गावात थेट गाडी रस्ता पोहोचला आहे. गावातील लोक मुंबई, खोपोली, कर्जतकडे शिक्षण, नोकरी निमित्त जात असल्याने त्याचा थोडा प्रभाव गावावर आहे.
आम्ही गडावर जायला आलेले पाहून “काय ठेवलंय त्या वरच्या सुकलेल्या रानात, कशाला जातायत काय माहित” असा एका काकींचा टोमणा ऐकू आला. अर्थात त्याचे वाईट न वाटता हसत हसत आम्ही पुढे गेलो. एका काकांना वर जायचा रस्ता विचारला नि गावातील घरांच्या मागून डोंगरवाटेला लागलो. सकाळी ९.०० वाजता आमची डोंगरयात्रा सुरुवात झाली. दमट हवामान जाणवू लागले होते. साधारण १० मिनिटांमध्ये थोड्या उंचीवर जाऊन पोहोचलो. तिथून पश्चिमेला पळसदरी धरण, स्थानक तिथून जाणाऱ्या आगगाड्या तर पूर्वेला सह्याद्री रांग, उल्हास नदी व तिच्या काठावर वसलेली छोटी गावे, ढाकचा किल्ला व त्याचा कळकराय सुळका असे नयनरम्य दृश दिसत होते.
दूरवर ढाकचा किल्ला व त्याचा कळकराय सुळका

नंतर थोडा वेळ खड्या चढाईमुळे व गरमीने घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यामुळे सावलीत बसून थोडा फलाहार केला व त्याच फळांच्या फायद्यांवर चर्चा :p … यावेळी चुकू नये म्हणून पुढची योग्य दिशा ठरवली आणि पुन्हा मार्गस्थ झालो. पुढचा मार्ग डोंगराच्या सावलीतून जात होता. त्यामुळे प्रवास सुखाचा चालू होता. डोंगर उतारावर उतरत पुन्हा वर चढत मोठ्या वृक्षांच्या छायेतून सुकलेल्या धबधब्यातून, डोंगराच्या कडेने चालत अखेर एका सुकलेल्या धबधब्याच्या वाटेसमोर येऊन उभे राहिलो. आता सोनगिरी जवळ आला असे वाटू लागले होते. पण खरा प्रश्न होता तो पुढील मार्गक्रमणाचा… धबधब्याच्या वाटेवर छोटे-मोठे दगड पडले होते आणि गच्च रान माजले होते. शेवटी पाण्याचे दोन-चार घोट घेतले आणि याच वाटेने पुढे जायचे ठरवले. कारण आता मागे फिरून पुन्हा वाट शोधणे वेळ खाऊपणाचे होते.
धबधब्याची वाट

सकाळचे १०.३० वाजले होते. ऊन जाणवू लागलं होतं. धबधब्याच्या वाटेवरून निघालो. जागोजागी पडलेल्या छोट्या-मोठ्या दगडांवरून वाट काढत, रानफुलं पाहत सोनगिरी जवळ करत होतो. झाडांच्या गर्दीमुळे ऊन लागत नव्हते.
रानटी अबोली

पण दमट हवामानामुळे आणि वाऱ्याचाकाहीच पत्ता नसल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. काटेरी झाडांमधून वाट काढत अंतर कापत होतो. काही वेळानंतर समोर झाडांची दाटी वाढल्यामुळे काहीच दिसत नव्हते.

उजव्या बाजूला डोंगराचा कडा आणि डाव्या बाजूला डोंगराची आडवी धार दिसत होती. धारेकडचा मार्ग सोपा वाटला म्हणून त्या बाजूला वळलो. बाभळीच्या काट्याची टोचण सहन करत, सोपे climbing करत सोंडेवर आलो.

बाजूलाच असलेल्या वाटेने पुढे गेलो पण ही वाट पुन्हा धबधब्याच्या वाटेतच उतरत होती. त्यामुळे माघारी फिरलो आणि पठारावर आलो. खूप वेळानंतर सोनगिरीचा माथा दिसू लागला होता.

थोडे पुढे जाऊन खाली उतरलो नि समोर असलेल्या छोट्या टेकाडावर गेलो. तेथे आडव्या (न)असलेल्या पायवाटेवर चालू लागलो. सुकलेली पाने, गवत आणि भुसभुशीत मातीची टेकड्याच्या कडेची वाट पुन्हा धोकादायक वळणावर नेऊन थांबली. म्हणून पुन्हा मागे फिरलो. ऊन आता खूप तापू लागले होते. वर एक कपार दिसत होती.कसाबसा तिथे गेलो.खूप वेळानंतर वाऱ्याची थंड झुळूक अनुभवली. थोडा आराम केल्यावर पुढे कसं जायचे हा यक्ष प्रश्न होता. यावेळी मोहीम फत्ते झाल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असे ठरवल्यामुळे विचाराअंती सुलतानढवा करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्यच ठरला. तापलेल्या कातळावरून केलेल्या सुलतानढव्यामुळे थंड गर्द रानात दाखल झालो आणि समोरच सोनगिरीवर जाणारी ठळक वाट दिसू लागली होती. हा! खूप काही मोठं मिळाल्याचा आनंद तिघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जणू याचसाठी केला होता सुलतानढवा..
याच वाटेवरून पुढे निघालो. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून एका काटेरी झाडाच्या सावलीत बसून जेवण उरकले आणि थोडा वेळ तिथेच पडून आराम केला.(कमलेशने एक झोप पण काढली :p ). दोन वाजत आले होते. गड पण टप्प्यात आला होता आणि वाटही सुस्पष्ट होती. त्यामुळे वेळ न दवडता सोनगिरीकडे कूच केली. खड्या चढणीची वाट जंगलातून जात होती. मधेच काही प्रमाणात मुरमाड माती होती. थोड्या पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. त्यापैकी डावीकडची वाट अस्पष्ट, थोडी कठीण, प्रचंड घसारा व दाट काटेरी झुडुपांमधून जात होती. त्याऐवजी आम्ही उजवीकडची स्पष्ट आणि गडाच्या कातळकड्याला लागून असलेली वाट धरली. एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरळसोट दरी असलेल्या वाटेवर एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो व तेही अतिशय सावधपणे जावे लागते. या वाटेवरून आम्ही अर्धवट पार केलेली. धबधब्याची वाट आणि पळसदरी परिसर दिसत होता.
वाटेवरून दिसणारा परिसर

पुढची वाट चांगली होती व पुन्हा जंगलातील पालापाचोळ्यातून चढून उजाड जागी आलो. इथून गडाची तटबंदी दिसू लागली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या अंगात बळ संचारले आणि छोटे दगड, घसारा, किल्ल्याच्या मातीखाली गाडलेल्या उद्ध्वस्त पायऱ्यांचालत गड जवळ केला. गडाचे दोन भाग आहेत. गडप्रवेश करण्याआधी गडाच्या कोपऱ्यात असलेल्या एका दगडावर विसावा घेत थंडगार वाऱ्याचा आनंद लुटला.
अखेर पोहोचलो…

गड्प्रवेशाच्या सुरुवातीला तटबंदी शिल्लक आहे. तटबंदीच्या बाजूच्या वाटेने सावधपणे चढून गडप्रवेश केला. इथेही तुरळक तटबंदी आहे. बाकी गडाच्या कातळकड्यामुळे गडाला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे.
शिल्लक तटबंदी

थोड्या अंतरावर एक पाण्याचे टाके आहे. त्यात थोडेफार पाणी होते. पण खूप गाळ साठून चिखल झाल्याने पाणी पिण्यास अयोग्य होते.

तिथून पुढे वाटचाल करत गडाच्या उत्तर टोकाकडे गेलो. हा गडाचा सर्वोच्च भाग. इथून फार दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. त्यामुळेच येथे गडाची निर्मिती केली गेली असावी. या टोकावरून थोड्या खालील बाजूस असलेला बुरुज दिसतो. पण तिथे पोहोचण्याची वाट नाही.

आता माघारी फिरून माथ्यावरील अर्ध्या वाटेवरून डाव्या बाजूला जाणाऱ्या वाटेला लागलो. थोड्या अंतरावर इथे पाण्याचे टाके लागते. पण हे पाण्याचे पूर्णपणे सुकलेले होते व त्यात गवत वाढीस लागले होते. आल्या वाटेने पुन्हा पिछेमूड करत गडाच्या दुसऱ्या भागाकडे निघालो. इथे कोणत्याही अवशेषाच्या खुणा दिसट नाहीत. पण एके ठिकाणी दगडात एक Hole दिसला. असे holes गडावर अजून दोन ठिकाणी होते व ते नैसर्गिक वाटत नाहीत.

या दुसऱ्या भागातील वाट उताराकडे जाते.वातावरण अस्वच्छ असल्याने दूरवर राजमाची पण अस्पष्ट दिसत होता. दरवेळी पुण्याला जाताना सोनगिरी विविध बाजूने दर्शन द्यायचा पण यावेळी लोहमार्गाचे विविध बाजूने दर्शन होत होते. दुपारचे ३ वाजले होते. आता परतायची वाट जवळ करायला सुरु केली. माघारी येऊन दोन्ही भागांमधील खिंडीत आलो. आलेल्या वाटेने न उतरता दुसऱ्या बाजूच्या वाटेने उतरू लागलो. काटाकुटयांनी भरलेली, दगड धोंड्यांची वाट खूपच त्रासदायक ठरली. थोड्याच वेळात काटाकुटयांमधून वाट काढत पठारावर आलो नि समोर असलेल्या पायवाटेने गावाकडे निघालो.
थोडे अंतर पार केल्यानंतर समोर पाहतो तर जंगलात आग पेटली होती. मोठी झाडे वगळता सुकलेले गवत आणि छोटी झुडूपे जळत होती व आग पसरतच चालली होती. पुढे जाण्याच प्रयत्न केला पण आगीच्या गरमीमुळे व प्रचंड धुरामुळे पुढे जाणे शक्य नव्हते. आग थोडी कमी झाली तेव्हा तोंडाला रुमाल बांधत आगीचा दाह सहन करत धवत धावत वाट पार केली.

आग लागलेल्या जंगलातून पुन्हा सपाटीवर आल्याने जीवात जीव आला. पुन्हा पुढची वाट वाटचाल करत उतरायला लागलो. तर पुन्हा इथेही आग लागली होती. मग पुन्हा ही वाट धावत उतरत पार करावी लागली.
आगीचा धूर नि त्या मागे सोनगिरी

तहान लागली होती व पाणी आधीच संपले होते. पण वाट सोपी असल्याने पटापट उतरू लागलो. पहिल्याच ट्रेकमध्ये न पडल्याची खंत कमलेशच्या मनात होती पण सह्याद्रीने त्याची इच्छा पूर्ण करत दोनदा त्याची विकेट पाडली. थोड्याच वेळात गावातील एका घराजवळ आलो पाणी प्यालो. समोरच उल्हास नदी खुणावत होती. मग काय आपोआप मोहित होऊन उल्हासात खेचलो गेलो….
दिवसभर बुटांमध्ये जखडलेले पाय मुक्त केले आणि अतिउल्हासात “उल्हासात” प्रवेश केला. नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच दिवसभराचा सर्व क्षीण निघून गेला. थोडा वेळ पाण्यात बसून राहिलो. photoshoot वगैरे पार पाडले आणि नेहमीप्रमाणे पुस्तकांची अदलाबदल केली(आम्ही ट्रेक याचसाठी करतो) नि पळसदरी रेल्वे स्थानकाकडे निघालो. सूर्यराव मावळतीला चालले होते. पाखरे आणि चाकरमानी घराकडे परतत होते.
मन प्रसन्न करणारे दृश्य

पळसदरी स्थानकात पोहोचल्यावर कळले की कर्जतकडे जाणारी ट्रेन १ तासाने होती. ट्रेनची वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता. मग काय तिथल्या मराठी भैय्याकडून भेळ घेतली अन् पायगाडीने रेल्वे मार्गावरून चालत चालत अंधारात कर्जत स्थानक जवळ केले. पुन्हा नव्या भटकंतीची आश्वासने देऊन दिपक लोणावळ्याकडे नि आम्ही छ.शि.ट.कडे मार्गस्थ झालो.
– अमित म्हाडेश्वर
दुर्गेतिहास मित्र
सोनगिरी किल्ला
सोनगिरि आणी गुळपोळी
साधारण १२ ते १५ वर्षांपूर्वीची घटना असेल. एका शनिवारच्या संध्याकाळी मी आणि सुम्या नाक्यावर बसलो होतो. पण मन काही रमत नव्हतं दोघेही गप्प होतो. कारण ही तसंच होतं, आमचे झुंजारचे पाच मित्र नळीच्या वाटेने हरिश्चंद्र मोहिमेला गेले होते याची काळजी आणि आम्ही दोघं काही अपरिहार्य कारणामुळे गेलो नाही यांची नाराजी. वैतागून मी सुम्याला म्हंटले मित्रा कुठेतरी जाऊया. सुमंत म्हणाला ठीक आहे, फोन करतो. तसा रात्री साडेनऊ दहाच्या दरम्यान सुमंतचा फोन आला मनात आनंदाची लहर आली आणि तडक सुम्याच्या घरी पोहोचलो. सुम्या म्हणाला उद्या सकाळी कर्जत जवळील एका गड वजा माचीवर किल्ला आहे सोनगिरीचा जायचे का? मी म्हटलं चालेल यार चल जाउया !
पहाटेच्या पहिल्या ट्रेननी कर्जतला पोहोचलो आणि दिवाडकरांचा वडापाव खाऊन तृप्त झालो. वातावरणातल्या थंडाव्यानी गडावर पोहोचण्याची ऊर्जा मिळाली, टमटमने अर्धा तास प्रवास करून तमनाथ नावाचा गाव वजा पाडयापाशी म्हणजेच गडाच्या पायथ्याशी पोहचलो. आम्ही गडाची तटबंदी बुरुज बालेकिल्ला अशी चिन्ह शोधु लागलो पण काही चिन्हं दिसेनात पण पाडयातल्या एका तोफेने आमचं स्वागत केलं . गावकरी आमच्या येण्यानी तर आश्चर्यचकितच दिसत होते कारण ही स्वाभाविक होतं या गड माचीवर येणारया ट्रेकरची संख्या फारच कमी म्हणूनच की काय दुर्लक्षित गड होता, पण या गडाला ऐतिहासिक बाजू होती ही गोष्ट आम्ही गडावर पोहोचल्यावर अनुभवली.
पण गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले आणि गडावर जाण्याचा मार्ग दाखवला. गावकरी म्हणाले तुम्ही तर फक्त अर्धा ते पाऊण तासात गडावर पोहोचाल. म्हणूनच आम्ही खाण्यापिण्याचे पदार्थ घेण्याची तसदी घेतली नाही आणि वाटेवर चालते झालो, विचार केला गावात येऊनच खाऊ.
साधारण अर्धा तासाची पायवाट चढत आम्ही उंच अशा एका पठारावर पोहोचलो इथुन गडाची उत्तम अशी तटबंदी दिसायला लागली होती आणि एक बुरूजही. आता गडावर जाण्यासाठी प्रशस्त वाट दिसू लागली पण आडमार्गानेच (साहसी मार्गाने)गड बघायचा आमचा हातखंडा असल्यामुळे की काय आम्ही धबधब्यांची वाट पकडली. सुंमत मागून नीट येत आहे ना हे पाहात मी धबधबा चढायला सुरुवात केली, थोड्यांचं वेळात छान उंचीवर पोहोचून उत्तुंग अशा सह्याद्रीचं दर्शन झाले. सुम्या म्हणाला "सत्या अजून किती चढायचं रे फार भूक लागली", मी माझ्या कॅमेरात सह्याद्रीचे नॅचरल स्केप्स कॅप्चर करू लागलो होतो तो सुम्याच्या हाकेने भानावर आलो. पंधरा मिनिटांची चढाई करून गडमाथ्यावर पोहोचलो सुद्धा आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला कारण गावकऱ्यांनी सांगितलं होतं गडावर फारसं बघण्यासारखं नाहीये. कारणं गडावर पोहचताच आम्हाला भग्न तटबंदी दर्शन झाले, मग भग्न बुरूज , भग्न वाड्याच्या जोत्याचे अवशेष, सुकलेल्या पाण्याच्या टाकी, तुटलेल्या भग्न तोफांचे अवशेष पाहून आमची गडभ्रमंती थांबवली. एव्हाना सूर्य डोक्यावर आला होता आणि आग ओकत होता, सुम्या म्हणाला सत्या सपाटून भूक लागलीय मी म्हटले माझी पण तीच परिस्थिती आहे पण आपण करणार काय? सुम्या म्हणाला सत्या सावली शोध पण आमचं दुर्दैव गडावर एकही सावली देणारं झाड नव्हतं. सुम्यानी सॅकमधली गुळपोळी काढली आणि मला आश्चर्याचा धक्का दिला! मग आम्ही एका निवडुंगाच्या जाळीच्या खाली आम्ही जमिनीवर झोपलो आणि त्या भर उन्हात पण निवडुंगाच्या सावलीत गूळपोळीचाआस्वाद घेतला. पाणी नाहिये सत्या असे सुम्या बोलला आणि माझ्या सॅक मधून रिझव्हॉयर पाण्याची बाटली सुम्याला देत त्याला आश्चर्याचा धक्का दिला.
मनमुराद गप्पा मारत गूळपोळीचा आस्वाद घेत आम्ही तसेच पडून राहीलो ना ऊनाची फिकीर ना वेळेची तमा! सुमंतने तिथूनच आमच्या मोहिमेला निघालेल्या मित्रांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो लागला नाही. गड उतरायला चालू केले अन् सुमंतचा फोन वाजला, सुम्याच्या चेहऱयावरचा आनंद मला सांगत होता की तो आमच्या मित्रांचाच फोन आहे कि त्यांची मोहीम फत्ते झाली आणि आमच्या या गड मोहिमेबद्दल ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले. दोघेही मनोमन आनंदित होऊन सुखद अनुभव घेऊन आमच्या मोटो जीपी स्टाइलने पंधरा मिनिटांत गड उतरून गावात पोहोचलो.
परत येताना सोनगिरी किल्ल्याच्या पोटात असलेलं पळसदरी स्टेशन गाठलं आणि ट्रेन ने कर्जत आणि तेथून ठाणे असा प्रवास केला. तो मनात सोनगिरीच्या सुखद आठवणी घेऊनच.
दुर्लक्षित गड बघणे आणि त्याची ऐतिहासिक बाजू पाहणे ही नेहमी झुंजारची आग्रही भूमिका राहिली आहे म्हणूनच झुंजारायण यांसारखे उपक्रम अस्तित्वात आले.
म्हणूनच की काय सोनगिरी आणी मित्राबरोबर खाल्लेली गुळपोळी यांच्या आठवणी माझ्या हृदयावर अशाच खोलवर जागृत आहेत.
सतीश चांदिवडे, कळवा .
झुंजार हायकर्स.
खोपोली-कर्जत आणि मग दहिवली रस्त्याने श्रीराम पुलावरून उल्हास नदी ओलांडून अवळस, नेवाली गावात आलो. खरं तर पुढे मोहिली गावात येऊन पोचलो होतो, तिथे मोहिली मिडो रेसोर्ट जवळूनही एक वाट सोनगिरी किल्ल्यावर जाते. ह्या किल्ल्यावर तसे पळसधरी रेल्वे स्टेशन वर उतरून बोगद्याच्या बाजूने केबिन जवळूनही जाता येते. पण गडाच्या पायथ्याचे गाव “नेवाली” आहे. रस्त्यांची माहिती गावकऱ्यांना विचारावी म्हणून थांबलो. एका गोठ्यातून शेण-गोठा करून गावकरी डोकावत होता त्याला माहिती विचारल्यावर “तुम्ही जाणार? किल्ल्यावर? इतक्या लांब? जमेल का जायला?” असे ४-५ प्रश्न तोंडावर फेकून त्याने रेसोर्टजवळून जाणाऱ्या रस्त्यपेक्षा नेवाली गावातून जवळ पडेल असे सांगितलेन. आम्ही वरपर्यंत जाणार हे त्याच्या पचनी पडतच नव्हते हे त्याने ज्या रीतीने हातातला शेणाचा पो गोठ्यात आपटलान त्यावरून लक्षात आले. “करतो प्रयत्न जायचा” असे त्याला सांगून हिय्या करून आम्ही नेवाली गावातून गडाकडे जायला निघालो.
संततधार पाऊस, वाढलेले गवत अश्यातून गावकऱ्यांनी ४ वेळा वाट दाखवलनी. “नक्की कोणती वाट” असे विचारत जरी होतो तरी मुळात एकही वाट दिसत नसल्याने “कोणती वाट धरायची” हा प्रश्नच चुकीचा ठरत होता. ९:३० वाजले होते तरी पूर्ण धुकं, त्यात २० फुटावरचंही काही दिसेना. वर गडाकडे लक्ष ठेऊन चालत रहायचं म्हटलं तरी किल्लाच काय, वर काहीच दिसत नव्हतं. पायवाटे सदृश काही दिसत होतं त्यावरून चढाईला सुरुवात केली तर दर १० फुटांवर कबरीसाठी खणतात तेवढ्या आकाराचा खड्डा लागत होता. तरीही तीच वाट धरून निघालो. वाटेत खेकडेच खेकडे होते. पाण्याच्या बाटल्या फक्त बरोबर घेतल्या होत्या पण पाण्याची गरजच भासत नव्हती जास्त. पाऊस चालूच होता, आम्ही भिजत होतो, तहान लागतच नव्हती. मातीचा रंग लालसर दिसत होता, तो रंगच मला सुखावत होता. कोकणातली लाल माती! रत्नागिरी एवढी लाल आणि तशी नसली तरी ही चिकणमाती नक्कीच नव्हती. त्यामुळे चिखलाने पाय भरायची भीती नव्हती, पण बुटात केव्हाच पाणी शिरले होते आणि वजन पाव-पाव किलोने वाढले होते. जागोजागी सायाची (सागवान) झाडं दिसत होती, पायाशी टाकळा, आघाडा आणि पावसाळी फुलझाडं घुटमळत होती. काढलेल्या माहितीवरून २ टेकड्या पार करून एक पठार आणि मग तास-सव्वा तासात कातळकडा लागणे अपेक्षित होते. पण पठार लागायलाच तास होऊन गेला होता.
![]() |
| पठार लागायलाच तास होऊन गेला होता. (फोटो: आशिष) |
![]() |
| कातळ उजवीकडे ठेवून कडेने घळीतून जाणारी वाट |
| बेचक्यातून उजवीकडे गड-माथ्यावर जाणारी वाट |
Songiri Fort a.k.a Palasdari Fort (किल्ले सोनगिरी उर्फ पळसदरीचा किल्ला)
Palasdari fort is standing just in front of station.
To begin climbing, one needs to go towards Palasdari tunnel. There is one lineman cabin near tunnel. Behind the cabin, there is way which go towards top of fort.
We started ascending the fort and soon we realised that, this climb will become challenging as the forest on the way becoming very dense and we are struggling to locate the proper route. Look at the dense forest in below snaps.
Fortunately for us, we are on the right path till now and after climbing for an hour, we encountered one rockpatch which is not that difficult but bit challenging.
Entire Bor ghat region looking spectacular after climbing the rock patch and we reached on one huge plain plateau.
Still, we had covered only half distance. Songiri fort is like kept on this huge plateau.
We decided to have some light breakfast now
Now, to go further, one has to search for "Forest department compund" and with that compound one has to climb up to go on top of the fort. These compounds leads you to the another plateau on top in jungle and then you can use you judgement to climb last 15-20 minutes of way.
Soon, we reached near bastion of the fort.
View of surrounding area from top of the fort is spectacular. We rested here for 10-15 minutes looking at beauty of the nature.
One can also see one water cistern on the fort. This water is not much portable but in case if you are running out of water on top of the fort, you can use that.
We took then some lovely snaps of greenary and surroundings. Here are few of them.
We then decided to descend the fort as we need to catch the local to karjat. Descending was quite risky.
While descending, we saw small water flow flowing. so we filled our water bottles there.
1) Jungle is quite dense on the way. we saw "wild boar" and also heard the roar of "leopard". So, please be extra careful. One thing is very imporatnt "Be in the group and Be with the group".
2) Remember last local from Palasdari to Karjat is 6:30. Schedule your time accordingly as it may take 3 hours to go on top and 2 hours for descending.
On Saturday morning of 5th September 2015 we started our trek to Palasdari Fort also known as Songiri Fort, situated near Palasdari village in Karjat. We all are started from Pune Balgandharv stop at 7:00 AM in private bus. We were total 29 trekkers on that day to enjoy the life in nature, while travelling towards base village, we had small BREAK FAST of IDLI & CHUTNEY. Then did small round of introduction, at last during the journey we played ANTAKSHRI. Around 9:00 AM we reached the base village, then we started the actual trek.
Then we all started descending & at one big tree we all rested & we found one strongly injured OX there, few group members were scared & that OX also scared he left in the forest. Then we started again and at 2:30 PM we reached the place where we left few members from group. There we got to know that they went down. By this time we all were heavily heating by sun rays & as well as we don't have single sip of drinking water with us.
गोष्टी झाल्यावर आशिष साहेब आजारी पडले. ट्रेकला जायचं असलं की अश्यावेळी घरचे जेवढी
काळजी करत नाहीत तेवढी गृप मधली इतर मंडळी करतात. पण सगळ्यांवर मात करत शुक्रवारी रात्री
११ नंतर प्लान नक्की झाला आणि ठरल्याप्रमाणे आशिषकडे सकाळी सव्वापाचला पोचलो.
रव्या, अनुप, केतकी ६ पर्यंत पोचले आणि वाटेत मृण्मयीला घेऊन संजुभाईकडे आकुर्डीला
पोचलो. सफारी आमची वाटच बघत होती. समान रचले आणि जुन्या पुणे-मुंबई हायवेला लागलो.
गाडीलाही आता सवय झाली आहे, परंपरा असल्याप्रमाणे उडुपी हॉटेल शेजारी गाडी
मंदावते. पोटातून आवाज यायला सुरुवात होते. भूका भागवण्याबरोबर लोकांना फोटोही
काढल्याशिवाय चैन पडत नाही किंबहुना फोटोशिवाय खाणे किमान शनिवार-रविवारचे तरी होत
नाही ह्याची आता तिथल्या वाढप्यांना सवय लागून गेली असेल कारण चहा घेऊन ट्रे तसाच
हातात धरून तोंडावर छद्मी हास्य घेऊन तो वाढपी तसाच फोटो काढून व्हायची वाट बघत
थांबला होता. आमच्या विचित्र मागण्या त्याने बरोबर लक्षात ठेऊन ईडली, मेदुवडा
बरोबर पुढ्यात आणून ठेवलेन. कपमधून ते अमृत पोटात गेल्यावर सफारी पुन्हा खोपोली
रस्त्याला लागली. पुण्यातून निघायला उशीर झाल्याची चुटपुट मनात होतीच. पावसाळा
असल्याने उन्हाची काळजी तरी नव्हती. खोपोली-कर्जत आणि मग दहिवली रस्त्याने श्रीराम
पुलावरून उल्हास नदी ओलांडून अवळस, नेवाली गावात आलो. खरं तर पुढे मोहिली गावात
येऊन पोचलो होतो, तिथे मोहिली मिडो रेसोर्ट जवळूनही एक वाट सोनगिरी किल्ल्यावर
जाते. ह्या किल्ल्यावर तसे पळसधरी रेल्वे स्टेशन वर उतरून बोगद्याच्या बाजूने
केबिन जवळूनही जाता येते. पण गडाच्या पायथ्याचे गाव “नेवाली” आहे. रस्त्यांची
माहिती गावकऱ्यांना विचारावी म्हणून थांबलो. एका गोठ्यातून शेण-गोठा करून गावकरी
डोकावत होता त्याला माहिती विचारल्यावर “तुम्ही जाणार? किल्ल्यावर? इतक्या लांब?
जमेल का जायला?” असे ४-५ प्रश्न तोंडावर फेकून त्याने रेसोर्टजवळून जाणाऱ्या
रस्त्यपेक्षा नेवाली गावातून जवळ पडेल असे सांगितलेन. आम्ही वरपर्यंत जाणार हे
त्याच्या पचनी पडतच नव्हते हे त्याने ज्या रीतीने हातातला शेणाचा पो गोठ्यात
आपटलान त्यावरून लक्षात आले. “करतो प्रयत्न जायचा” असे त्याला सांगून हिय्या करून
आम्ही नेवाली गावातून गडाकडे जायला निघालो.
कोणती वाट” असे विचारत जरी होतो तरी मुळात एकही वाट दिसत नसल्याने “कोणती वाट
धरायची” हा प्रश्नच चुकीचा ठरत होता. ९:३० वाजले होते तरी पूर्ण धुकं, त्यात २० फुटावरचंही
काही दिसेना. वर गडाकडे लक्ष ठेऊन चालत रहायचं म्हटलं तरी किल्लाच काय, वर काहीच
दिसत नव्हतं. पायवाटे सदृश काही दिसत होतं त्यावरून चढाईला सुरुवात केली तर दर १०
फुटांवर कबरीसाठी खणतात तेवढ्या आकाराचा खड्डा लागत होता. तरीही तीच वाट धरून
निघालो. वाटेत खेकडेच खेकडे होते. पाण्याच्या बाटल्या फक्त बरोबर घेतल्या होत्या पण
पाण्याची गरजच भासत नव्हती जास्त. पाऊस चालूच होता, आम्ही भिजत होतो, तहान लागतच
नव्हती. मातीचा रंग लालसर दिसत होता, तो रंगच मला सुखावत होता. कोकणातली लाल माती!
रत्नागिरी एवढी लाल आणि तशी नसली तरी ही चिकणमाती नक्कीच नव्हती. त्यामुळे चिखलाने
पाय भरायची भीती नव्हती, पण बुटात केव्हाच पाणी शिरले होते आणि वजन पाव-पाव किलोने
वाढले होते. जागोजागी सायाची (सागवान) झाडं दिसत होती, पायाशी टाकळा, आघाडा आणि
पावसाळी फुलझाडं घुटमळत होती. काढलेल्या माहितीवरून २ टेकड्या पार करून एक पठार
आणि मग तास-सव्वा तासात कातळकडा लागणे अपेक्षित होते. पण पठार लागायलाच तास होऊन
गेला होता.
![]() |
| पठार लागायलाच तास होऊन गेला होता. (फोटो: आशिष) |
होते, दिशा तरी बरोबर होती. पायवाट तिकडेच घेऊन जात
होती. लहान लहान ओहोळ आमचे पाय धुवून जात होते. बूट पाण्याने भरत होते परत मातीत
जात होते. कचऱ्याची फुलं आता खूप दिसायला लागली. हे झाड अगदी हळदी सारखे दिसते,
फुल सुद्धा!
![]() |
| कातळ उजवीकडे ठेवून कडेने घळीतून जाणारी वाट |
होत्या आणि कोणती वाट कुठे जाते ह्याचा काहीच अंदाज लागत नव्हता. साधारण वरच्या
बाजूला नेणारी वाट पकडून जात होतो आणि अचानक एक कातळ समोर आला. डावीकडे आणि
उजवीकडे, दोन्हीकडे वाट दिसत होती. उजवीकडची वाट जास्त ठळक दिसत होती पण वाचून
आल्या प्रमाणे कातळकडा उजवीकडे ठेऊन डावीकडची वाट धरली. आता घळीतून वर जायचे होते
म्हणजे डोंगर आणि गडाच्या बेचक्यात पोचणार होतो. पावणे २ तास झाले होते. ५
मिनिटातच “Y” वाय आकाराचा रस्ता लागला वाय च्या उजवीकडे एक कडा दिसत होता, चढता
येईल असं वाटत असल्यानं मी आणि रव्या तिकडे प्रयत्न करायला गेलो. बाकीच्यांना
थांबवून ठेवलं होतं. मी ८०% कडा चढून गेलो आणि डावीकडच्या हाताने धरलेलं गवत उपटलं
गेलं, पाय घसरला, अजून वर शक्य नाही हे लक्षात घेऊन खाली उतरू लागलो. वाय च्या
डावीकडे मृण्मयीला जाऊन बघायला सांगितले आणि रव्या, आशिष उजवीकडे असलेल्या कड्यावर
प्रयत्न करू लागले. ते थोडे चढून गेलेही पण पुढे रस्ताच नसल्याचे पक्के समजले.
मृण्मयीही डाव्या बाजूला थोडी वाट आहे पण पुढे दगड पडून रस्ता संपलाय असे सांगत
आली. आशिष आणि रव्या यांनी खाली उतरायचे ठरवले आणि मी डावीकडे परत एकदा बघायला गेलो कारण दुसरा
पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. डावीकडे वाट सापडायलाच हवी होती. पडलेले दगड
ओलांडून पलीकडे गेलो. असलीच तर वरच्या बाजूला एक वाट असू शकते असे दिसत होते, पण
खात्री नव्हती. वर जाऊनच खात्री करायला पाहिजे होती पण आवाजाच्या अंतरावर
बाकीच्यांना बोलावणे गरजेचे होते. कोणी एकाने येऊन ह्या जागी थांबून चालणार होते
पण त्यांना वाट सापडली असे पुसटसे ऐकू गेल्याने सगळेच आले. हळू हळू आवाजाच्या
अंतरावर सगळ्यांनी रहात वर चढू लागलो. कित्येक दिवसांत कोणी फिरकले नसावे, गवत
वाढले होते, बाजुलाही सारलेले दिसत नव्हते त्यामुळे अजूनही वाट आहे की नाही ह्याची
खात्री नव्हती. नुसताच अंदाज बांधत पुढे जात होतो. एका क्षणी “सापडली वाट” तर लगेच
“संपली, ही वाट नव्हतीच बहुतेक” अशी परिस्तिथी होत होती. एक थर्माकोलची पांढरी डिश
दिसली आणि नेहमी ज्या गोष्टीचा राग येतो त्या कोणाच्या तरी कचरा फेकण्याच्या
प्रवृत्तीचा थोडासा फायदा झाल्याचा आनंदही झाला. पण तरीही डिश त्या ठिकाणी वरून
हवेतून उडूनही आलेली असू शकते म्हणून वाट नक्की होत नव्हती. समोर बेचके असल्याचे
वाटत होते पण आता चक्क मला कंटाळा आला होता. एक उंच पायरी असावी असा दगड होता. मला
२ ढांगा लागल्या असत्या तो पार करायला, पण सरळ मला कंटाळा आल्याचे सांगून आशिष जरा
उंच असल्याने त्याला जायला सांगितले. अंदाज खरा ठरला होता. तो बेचक्यात पोचला
होता. वाट सापडली होती, खात्रीची. पण खूप निसरड्या वाटेवरून सावकाश एकेकाला मी
थांबलेल्या जागेपर्यंत येऊ दिले. १२ वाजले होते. घड्याळात! आमचे तसे आधीच वाजले
होते म्हणायला हरकत नव्हती. पण खरे तीन-तेरा तर नंतर वाजायचे होते ह्याची काही
कल्पनाच नव्हती. डावीकडे डोंगराकडे जाणारी वाट आणि उजवीकडे चक्क पायऱ्या (म्हणजे
पायऱ्या सदृश वाट) बघून आनंद झाला होता.
| बेचक्यातून उजवीकडे गड-माथ्यावर जाणारी वाट |
गड-माथ्यावर जाण्यासाठी निघालो. एक टाकं दिसलं, पाणी पिण्यायोग्य दिसत नव्हतं. वाट
मात्र चांगली मळलेली दिसत होती. उंच गवतातून जाणारी ती वाट आम्हाला ध्वजाकडे घेऊन
गेली. गडावर बघायला एवढेच दिसत होते, अजून जागाच नव्हती आणि वाटही. अडीच तास चढून
फक्त एक ध्वज आणि १-२ टाकी दिसली होती. इथे असणारे वाड्यांचे चौथरे गवतात बुडून
गेले होते. इथून बोरघाटाचे दृश्य आम्ही फक्त कल्पनेत बघत होतो. राजमाची, ढाक,
भिवगड, प्रबळगड दिसतात हे फक्त वाचले होते, दिसत होते ते फक्त धुके. फोटो काढणार
तरी कशाचे... परत उतरून बेचक्यात आलो. पलीकडच्या डोंगरावर चढूनही गेलो, पण बरेच
अंतर जाऊनही दिसला झाडावर बांधलेला एक ध्वज आणि धुक्यातून हरवणारी एक वाट!!
दिसत होती. आणि असलीच तरी ती दुसऱ्याच गावात उतरणारीही असू शकत होती. किंवा पळसदरी
वरून वर येणाऱ्या वाटेलाही मिळण्याची शक्यता होती. परत आल्या वाटेनेच उतरायचे
ठरवले. येताना मुद्दामच वाटेतली झाडे बाजूला दाबून ठेवत, गवत मोडत आलो होतो त्याने
जाताना वाट सापडायला अडचण आली नाही. कातळकड्यापर्यंत येऊन पोचलोही. माणसांचा आवाज
ऐकू यायला लागला म्हणून कानोसा घेतला तर कातळकड्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या
वाटेकडून २ जण आले. ते मुंबईहून पळसदरीवरून आले होते. २ तास चालत येऊन इथे पोचले
होते. आम्ही गवत बाजूला सारून साफ केलेल्या वाटेचा त्यांना फायदा होणार होता, तसंच
त्यांना वाटही नीट समजावून सांगितली. आल्या वाटेने आम्ही उतरायला चालू केले. खुणा
सापडत होत्या. अचानक एके ठिकाणी २ वाटा दिसल्या. एक वाट यु टर्न घेऊन उजवीकडे जात
होती आणि एक सरळ. दोन्ही ओळखीच्या वाटत नव्हत्या. सरळ वाटेने जायचे ठरवले. पुढे एक
धबधबा लागला जो अजिबातच ओळखीचा वाटत नव्हता. परत फिरलो. यु टर्न जवळ येऊन दुसऱ्या
वाटेला लागलो. आता अजून २ वाटा फुटल्या. डावीकडच्या वाटेला लागलो तर एक खड्डा आणि
वाट संपली. परत फिरून उजवीकडच्या वाटेला लागलो. ही वाट खालच्या बाजूला जात होती पण
गाव काही दिसत नव्हते, खड्डे दिसत होते पण ओळखीचे वाटत नव्हते. रेल्वेचे रूळ
दिसायला लागले, बोगदाही दिसला. वाट नक्कीच गावाकडे न जाता गेलीच तर रुळांकडे घेऊन
जाणार होती. खाली एक पूल दिसला तिथे २-४ पोरही दिसली पण आवाज ऐकू जाणे शक्य
नव्हते, प्रयत्न करून बघितल्यावर तो सोडून दिला. रस्ता चुकल्याचे केव्हाच नक्की
झाले होते. उजवीकडे एक गाव दिसत होते, कोणते ते कळायला मार्ग नव्हता. वाट तर अगदी
संपलीच होती, ना रुळाकडे घेऊन जात होती ना कोणत्याही गावाकडे. वाटा फक्त खड्डे
खणायला तात्पुरत्या केल्या असाव्यात असे दिसत होते. आता कोणत्याही गावात का होईना
पण पोचले पाहिजे हे लक्षात आले. सव्वादोन वाजून गेले होते. असंख्य वाटा दिसत
होत्या. पण त्या खड्डयापर्यंत नेऊन गायब होत होत्या. चढताना खुण म्हणून चांगले
वाटणारे खड्डे आता चांगलेच त्रासदायक ठरायला लागले होते. फक्त वाटा, खड्डे आणि
काहीच नाही अशी अवस्था आल्यावर चांगलेच अडकल्याचे कळत होते. परत फिरायचे हे नक्की
झाले, पर्यायच नव्हता. सरळ सगळे एके ठिकाणी येऊन दिशांचा अंदाज घ्यायला लागलो.
अनुभवी डोकी विचार करायला लागली. उलटे फिरलोच होतो, डावीकडची दिशा पकडायची हे
नक्की झाले. पण आता blindly जाऊन चालणार नव्हते. दर १० फुटांवर २ वाटा फुटत
होत्या. काहीही ओळखीच्या खुणा दिसत नव्हत्या. पण वाट नक्की होती, कुठे जाणार होती ते
पुढे गेल्याशिवाय समजणार नव्हते. वाट खाली उतरू लागली. कोणत्यातरी गावात पोचणार हे
नक्की झाले. सव्वा तीन वाजले होते अजून सोंडाई करायचा होता. पोटातली ईडली केव्हाच
जिरली होती पण लक्ष पोटापेक्षा घड्याळाकडे होते.
चक्क जिथून चढायला सुरुवात केली तिकडेच उतरणार असल्याचे नक्की लक्षात आले. मागे
वळून बघितल्यावर आम्ही चांगलेच चुकून दुसऱ्याच डोंगरावर गेल्याचे पण वेळेवर परत फिरून
जागेवर आल्याचे लक्षात आले. अखेर ओळखीची दारं, खिडक्या, वाट आणि पांढरी सफारी
दिसली. आता पाणी प्यायले. इथे आदिवासी, कातकरी समाजाचे लोक राहतात.
फक्त पांढरे धुके येणार फोटोत. कॅमेरासकट नखशिखांत भिजलो होतो. बूट काढलेच नाहीत
तसंच गाडीत बसून सोंडाईच्या वाटेला लागलो. भूका जाणवत होत्याच पण भरल्या पोटाने
सोंडाई कसा पटापट होणार म्हणून जेवायची तयारी नव्हती. खाकरा बाहेर काढला, वास्तविक
खाकऱ्याचा सगळ्यांनाच कंटाळा होता, प्रत्येक ट्रेक ला खाकरा घरी परत जातो असा
अनुभव होता, पण आज सगळा खाकरा संपला. बाकरवड्या पुरवून खाल्ल्या. सोंडेवाडी १८
किमी होते सोनगिरीपासून गुगल बाबांच्या सांगण्यानुसार.
किल्ले सोनगिरी (TREK TO SONGIRI)
बरेच जण नवीन होते त्यांच्यासाठी हा एक थरारक अनुभव होता पण थरार नाही तर मजा काय??? म्हणून तो एक पट्टा पार केला आणि गडाच्या वरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर जाऊन पोहोचलो. संपूर्ण गडावरची खडतर वाट कोणती म्हणावं तर हीच. सुमारे ८० अंशाच्या कोनातली ही वाट थेट गडावर घेऊन जाते. सावकाश पण खंबीरपणे ही वाट पार करून आम्ही गडावर पोहोचलो. समोरच एक पाण्याचं टाकं नजरेस पडलं आजमितीस तेच एक पाण्याचं टाकं शिल्लक आहे
ट्रेक चुकीच्या वाटेने जरी झाला तरी तो बरोबर झाला त्यामुळे त्यात आलेली मजा काही औरच होती...
























No comments:
Post a Comment