Wednesday, October 13, 2021

सोंडाई

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
मुंबई - पुणे मार्गावरील कर्जत हे अनेक भटक्यांचे (ट्रेकर्सचे) आवडते गाव आहे. या गावाच्या आजूबाजूच्या असलेल्या राजमाची, पेठ, सोनगिर, पेब, भिवगड, ढाक आणि भिमाशंकर या किल्ल्यांवर भटकून अनेक जणांनी आपल्या भटकंतीची सुरवात केलेली आहे. याच कर्जतच्या जवळ "सोंडाई" नावाचा एक छोटा अपरीचित किल्ला आहे. या किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.

Sondai
पहाण्याची ठिकाणे :
सोंडेवाडी व वावर्ले ही दोन किल्ल्याच्या पायथ्याची गाव आहेत. सोंडेवाडी गाव किल्ल्याच्या पाव (१/४) उंचीवर वसलेल आहे. या गावातून मळलेली वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने १५ मिनिटात आपण एका पठारावर पोहोचतो. या ठिकाणी वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळते. येथून गडमाथ्यावर दोन झेंडे लावलेले दिसतात.(त्यापैकी कातळकड्याच्या टोकाला लावलेल्या झेंड्याच्या खाली गडमाथ्यावर जाण्यासाठी शिडी आहे हि गोष्ट ध्यानात ठेवावी.) पुढे वाटेत कातळात खोदलेल्या काही पायर्‍या लागतात. किल्ल्याचा डोंगर प्रथंम उजव्या बाजूला व नंतर डाव्या बाजूला ठेवत आपण डोंगरसोंडे वरून दुसर्‍या पठारावर पोहोचतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी सोंडेवाडीतून पाऊण तास लागतो. येथे कातळात खोदलेली दोन पाण्याची जोडटाकं आहेत. या टाक्यांत १२ महीने पाणी असते. उन्हाळ्यात मात्र टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोरी लागते. या ठिकाणाहून सोंडाईच्या शेजारील गव्हारी/ गवारी नावाचा सोंडाई पेक्षा उंच डोंगर दिसतो. या डोंगरावर मुख्य डोंगरापासून वेगळा उभा असलेला खडक आपले लक्ष वेधून घेतो.

पठाराच्या वरच्या बाजूस कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. त्या चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहे, तर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. येथून पुढचा टप्पा चढतांना आपली पादत्राणे काढून वर जावे लागते. (गडावर सोंडाई देवीचे स्थान असल्यामूळे हा गावकर्‍यांच्या श्रध्देचा भाग आहे आणि आपण याचा मान ठेवावा.) या ठिकाणी कातळटप्पा चढण्यासाठी कातळात व्यवस्थित खोबणी बनवलेल्या आहेत. त्यांचा वापर करून किंवा शिडीने हा १५ फूटी कातळकडा सहज चढता येतो. कातळकडा चढून वर आल्यावर उजव्या बाजूस २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील पहिल टाक मोठ असून त्यात २ दगडी खांब कोरलेले आहेत. या खांबटाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दुसर टाक लहान आहे. गडमाथा छोटासा आहे. येथे एका झाडाखाली दोन दगडात कोरलेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मुर्ती सोंडाई देवीची आहे. गडमाथ्यावरून माथेरानचा डोंगर, मोरबे धरण, वावर्ले धरण व आजूबाजूचा विस्तिर्ण परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
१) सोंडेवाडी मार्गे :- कर्जत रेल्वे स्थानकावर उतरून कल्याणच्या दिशेने जाऊन पूर्वेला बाहेर पडावे. येथून रिक्षाने ९ किमी वरील सोंडेवाडीला जाता येते. (रिक्षाने सोंडेवाडीस जाण्यासाठी 3००/- रुपये लागतात.) किंवा कर्जत -चौक मार्गावर धावणार्‍या सहा आसनी रिक्षा, एसटीने ६ किमीवरील बोरगाव फाट्यावर उतरावे. येथून मोरबे धरणाच्या जलाशयाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याने ४ किमी वरील सोंडेवाडी पर्यंत चालत जावे. सोंडेवाडीतून गडावर जाण्यासाठीच्या रस्त्याचे वर्णन वर दिल्या प्रमाणे आहे. सोंडेवाडीतून गडावर जाण्यास १ ते १.५ तास लागतो.

२) वावर्ले मार्गे :- कर्जत रेल्वे स्थानकावर उतरून कल्याणच्या दिशेने जाऊन पूर्वेला बाहेर पडावे. येथून रिक्षाने ४ किमी वरील वावर्ले गावाच्या फाट्या पर्यंत जाण्यासाठी कर्जत -चौक मार्गावर धावणार्‍या सहा आसनी रिक्षा, एसटी आहेत. फाट्यावर असलेल्या कमानी खालून जाणारा रस्ता गावातून, गावामागील वावर्ले धरणापर्यंत जातो. येथे पोहोचण्यास अर्धा तास लागतो. धरणा जवळून समोर सोंडाई किल्ला दिसतो. धरणाच्या भिंतीच्या उजव्या बाजूने जाणारी पायवाट टेकडी वरील वावर्ले ठाकरवाडीत जाते. ठाकरवाडी ओलांडून टेकडी उतरल्यावर एक छोटा ओढा पार करावा लागतो. ओढ्याच्या पुढे सोंडाई किल्ल्याच्या चढाला सुरुवात होते. साधारणत: १५ मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथे सोंडेवाडीतून गडावर जाणारी वाट येऊन मिळते. पुढे गडावर जाण्यासाठीच्या रस्त्याचे वर्णन वर दिल्या प्रमाणे आहे.

या वाटेने नोव्हेबर - डिसेंबर नंतर गडावर जातांना वावर्ले धरणापासून ठाकरवाडीची टेकडी न चढता धरणाच्या जलाशयाच्या मागे असलेल्या ओढ्यातून चालत जावे. त्यामूळे टेकडी चढण्या - उतरण्याचा वेळ वाचतो. वावर्ले गावातून गडावर जाण्यास २ ते ३ तास लागतात.
वावर्ले गावातून जाणारी वाट ही सोंडेवाडीतून गडावर येणार्‍या वाटेपेक्षा कठीण व वेळ खाणारी आहे.

स्वत:च्या वहानाने येणार्‍यांनी मुंबई - पनवेल मार्गे चौक गाठावे. चौक - कर्जत मार्गावर बोरगाव फाटा चौक पासून ६ किमी अंतरावर तर वावर्ले फाटा ८ किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, पण वावर्ले ठाकरवाडीतील व सोंडेवाडीतील शाळेत रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, पण कर्जत गावात जेवणाची सोय होऊ शकेल.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोंडेवाडीतून गडावर जाण्यास १ तास लागतो. वावर्ले गावातून गडावर जाण्यास २ ते ३ तास लागतात.
सूचना :
१)उन्हाळ्यात टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोर सोवत बाळगावा.
३) गडावर चढतांना सोंडेवाडीतून चढावे, तर उतरतांना वावर्ले मार्गे उतरावे. कारण गडावरून वावर्ले गाव व आजूबाजूचा परीसर दिसतो, त्यामूळे वाटेचा अंदाज येतो व वाट चुकण्याची शक्यता कमी होते.

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : १६०० फुट

श्रेणी : मध्यम

मुंबई -पुणे मार्गावरील कर्जत हे भटक्यांचे आवडते गाव आहे. या गावाच्या आजूबाजूच्या असलेल्या राजमाची, पेठ, सोनगिर, पेब, भिवगड, ढाक आणि भिमाशंकर या किल्ल्यांवर भटकून अनेक जणांनी आपल्या भटकंतीची सुरवात केलेली आहे. कर्जत-चौक रस्त्यावरून दिसणाऱ्या माथेरानच्या डोंगरासमोरील टेकडीवर सोंडाई देवीचे स्थान म्हणजेच सोंडाई किल्ला. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ उभ्या असणा-या सोंडाईला येण्यासाठी पनवेलवरून चौक गाव सोयीचं. चौक-कर्जत रस्त्यात बोरगाव फाट्यावरून आत गेल्यावर मोरबे धरणाच्या जलाशयाच्या बाजूने जाणारा रस्ता सोंडाईवाडीपाशी संपतो. सोंडेवाडी व वावर्ले ही दोन किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत. यातील सोंडेवाडी गाव वावर्ले गावापेक्षा उंचीवर वसलेले आहे. स्थानिकांच्या भाषेत सोंडाईगडाला ‘सोंडाई देवीचा डोंगर असे म्हटले जाते. त्यामुळेच गडावर जायचे आहे असे म्हणण्यापेक्षा सोंडाई देवीच्या दर्शनाला जायचे आहे असे म्हटले की स्थानिकांना पटकन समजते. आपल्याला वाट दाखवायला देखील ते तयार होतात. सोंडेवाडीतूनच गड चढायला सुरुवात होते. गावातून मळलेली वाट किल्ल्यावर जाते पण या वाटेवरूनच एक वाट चांगेवाडीला जाते. ही डाव्या बाजूची वाट टाळून उजव्या बाजूच्या वाटेने चालत आपण १५ मिनिटात एका पठारावर येतो. या वाटेला एका ठिकाणी वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळते. येथुन उजव्या बाजूला निमुळत्या होत गेलेल्या डोंगराच्या माथ्यावर झेंडा फडकताना दिसतो. सोंडाईगडाला जाण्यासाठी हीच खूण पुरेशी ठरते. पुढे वाटेत कातळात खोदलेल्या काही पायऱ्या लागतात. किल्ल्याचा डोंगर प्रथंम उजव्या बाजूला व नंतर डाव्या बाजूला ठेवत आपण डोंगरसोंडेवरून दुसऱ्या पठारावर पोहोचतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी सोंडेवाडीतून पाऊण तास लागतो. येथे कातळात खोदलेली दोन पाण्याची जोडटाकं आहेत. या टाक्यांत १२ महीने पाणी असते. उन्हाळ्यात मात्र टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोरी लागते. या ठिकाणाहून सोंडाईच्या शेजारील गव्हारी नावाचा सोंडाईपेक्षा उंच डोंगर दिसतो. या डोंगरावर मुख्य डोंगरापासून वेगळा उभा असलेला खडक आपले लक्ष वेधून घेतो. पठाराच्या वरच्या बाजूस कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहे तर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडीची सोय आहे. या ठिकाणी कातळटप्पा चढण्यासाठी कातळात व्यवस्थित खोबणी बनवलेल्या आहेत. थोडंसं साहस करायचं असेल आणि झेपणार असेल तर त्यांचा वापर करून नाहीतर शिडीने हा १५ फूटी कातळकडा सहज चढता येतो. या प्रस्तरारोहणात या किल्ल्याचं प्राचीनत्व पटवणा-या कातळकोरीव पाय-या आपल्याला सुखावून सोडतात. कातळकडा चढून वर आल्यावर एक लेणी सदृश्य खोदकाम आढळते. उजव्या बाजूस २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील पहिल टाक मोठ असून त्यात २ दगडी खांब कोरलेले आहेत. या खांबटाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दुसर टाक लहान आहे यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गडमाथा फारच छोटासा आहे. येथे एका झाडाखाली दोन दगडात कोरलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती सोंडाई देवीची आहे. सोंडाईदेवीची दगडी मूर्ती म्हणजेच तांदळा असून ती रात्रंदिवस उघडयावरच ऊन, वारा, पाऊस या सा-या अडचणींविरुद्ध तोंड देत कशीबशी उभी आहे. उघडयावरच गावकरी या देवीची मनोभावे पूजा करतात . या देवीच्या समोर माथा टेकवून घ्यायचा. तटबंदी, बुरुज यासारखे किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत पण येथील निसर्ग सौंदर्यामूळे हा ट्रेक आल्हाददायक व किल्ल्यावरील १५ फूटाच्या कातळ टप्प्यामूळे थरारक होतो. माथ्यावरून पश्चिमेला दिसतो तो इरशाळगड आणि शेजारीच माथेरानचं विस्तीर्ण पठार! गडमाथ्यावरून मोरबे धरण, वावर्ले धरण व आजूबाजूचा विस्तिर्ण परिसर दिसतो. या किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.      

 सोंडेवाडी गवत पोचलो. सोनगिरी उतरण्यातच सगळा वेळ निघून गेला होता त्यामुळे अंधार पडायला थोडाच वेळ शिल्लक होता. तसाही सकाळपासून सूर्य दिसलाच नव्हता. सोंडाई खूप लहान असल्याने तासाभरात वर पोचणे अपेक्षित होते. पण आता वाट चुकणे परवडणारे नव्हते. माहिती वाचलेली असली तरी रिस्क नको म्हणून वाटाड्या घ्यावे असे सर्वांच्याच मनात होते. त्यातून सोंडेवाडीत एकूणच कोणी वाट सांगेल असे वाटत नव्हते. कारण वाटाड्या पाहिजे का असे विचारत एक म्हतारबुआ आले. दारूचा वास येतंच होता. त्यांचा मुलगाही तेच विचारत आला, दारूचा भपकारा घेऊनच. त्याचा १०-१२ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरही तोच प्रश्न दिसत होता, मात्र त्याने प्यायलेली दिसत नव्हती एवढंच.. तेवढ्यात एक गृप गडावरून खाली येताना दिसला, तेही सगळे भिजले होते. त्यांच्यातल्या मुलींना कपडे बदलायला जागा देण्याचेही ते म्हातारा आणि मुलगा पैसे मागत होते. एकंदरीतच गावकरी पैसे काढू दिसत होते. गाडीवर लक्ष ठेवण्याचेही ते पैसे मागू लागले. त्या गृपने वर वाट चुकण्याची जराशी शक्यता असल्याचे संगीतलनी. सव्वा चार झालेच होते. नाईलाज होता, वाटाड्या म्हणून त्या माणसाला बरोबर घ्यावे लागले. त्याचा १०-१२ वर्षाचा पोरगाही बरोबर आला.

कातळात खोदलेली २ पाण्याची जोडटाकं
गावातून जी धोपटवाट गडाकडे जाण्यासाठी निघते, ती वाट तशीच पुढे चांगेवाडीला जाते. तिथे एका ठिकाणी गडाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते... चुकण्याची ही पहिली आणि सुरुवात केल्यापासून ५ मिनिटावरची जागा. तिथून उजवीकडे वळल्यावर १० मिनिटांत समोर, उजवी आणि डावीकडे परत वाटा लागतात. धोपट वाट सरळ जाते, पण गडाकडे जाण्यासाठी डावीकडे वळावे. तिथे एका झाडावर तसा बोर्डही आहे. ही चुकण्याची दुसरी जागा. गावापासून जेमतेम १० मिनिटात ह्या दोन्ही जागांवर न चुकता गडाकडे लागले की पुढे मात्र चुकण्यासारख्या जागा नाहीत. वाट रुळलेली आहे. गावाची सोंडाई देवीच गडावर असल्याने गावकरी नेमाने जात असावेत. दसऱ्याच्या दरम्याने उत्सवही असतो वरती. वर एक पठार लागले जिथे वावर्ली गावातून येणारा रस्ता मिळतो. इथून वर जाणाऱ्या पायऱ्या दुसऱ्या पठाराकडे घेऊन जातात. इथे कातळात खोदलेली २ पाण्याची जोडटाकं आहेत. शेजारूनच वर जाणाऱ्या पायऱ्याही लागल्या. त्या चढून गेल्यावर रॉकपॅच आहे. त्यात चढण्यासाठी व्यवस्थित खोबणी आहेत, त्याला शेंदुरही लागलेला आहे. इथून पुढे चप्पल/बूट काढून पुढे जावे, गावकऱ्यांची तशी श्रद्धा आहे. दारू डोक्यात असूनही त्याने ते न विसरता सांगितलेन. तो पॅच चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहेतर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. पूर्वी हाही रॉकपॅच चढून जावे लागत असे परंतु नंतर तो ढासळला आणि शिडी इथे बसवली गेली. शिडी चढल्यावर उजव्या बाजूला पाण्याचं टाकं आहे, त्यात कोरलेले २ दगडी खांबही आहेत. ह्या सगळ्या टप्प्यात आमचे काही गडी सावकाशपणे आले, उंचीचीही भीती होती आणि थोडे नाही म्हटलं तरी थकलेलेही होतोच. पण सुरक्षा महत्वाची होती.
रॉकपॅच
लोखंडी शिडी
पाण्याच्या टाक्यावरून पुढे चढून आले की लगेच सोंडाई देवीच्या मूर्ती आहेत. घंटा, समई वगैरेही आहेच. गडमाथा आला होता. बाकी ह्याही गडावर काही नाही. पलीकडे एक दरवाजा आहे पण पावसाळ्यात तिथे जाता येणार नव्हते. प्रयत्न करून पहावा तर तसेही पायात चपला/बूट काहीही नव्हते म्हणून परत फिरलो. देवीला नमस्कार करून दारू पिऊन इथे कोणी येणे चांगले नाहीहे आडून सुचवल्यावर आमची देवी चांगली आहे, पिऊन आलेले चालतेहे उत्तर आले :D मुकाट्याने शिडी, रॉकपॅच परत सावधपणे, इथे पाय ठेव, तिकडे जोर देऊ नको वगैरे करत उतरलो. बुटातले पाणी काढून टाकले, मोजेही पिळून घेतले, ते पायांत सरकवून उतरणीला लागलो. लहान धबधबे आमचे पाय धूत होते. वाट सोपी होती. खुणा लक्षात ठेवत पायथ्याशी आलो. संजुभाई गाडीजवळच थांबले होते. आम्हाला बघून त्यांना हायसं वाटलं कारण म्हातारा-म्हातारीने त्यांना चांगलंच सतावलं होतं. गाडीकडे लक्ष ठेवण्याचे पैसे मागत वर गाडी फोडण्याचीही भाषा त्यांच्या तोंडी होती. संजूभाईचे आकारमान बघता प्रत्यक्षात ते शक्य झाले नसते पण तरीही ही भाषा तोंडी असणे चांगले हिमतीचे होते, कदाचित दारू ती हिम्मत देत असावी. पैशासाठी गावकरी किती सरावलेले आहेत हे दिसत होते. कदाचित सगळे तसे नसतीलही पण ह्या कुटुंबाला आवरायला मात्र कोणीच येत नव्हते. त्यामुळे गावच बदनाम झाले. ह्या किल्ल्यावर वाटाड्याची काहीच गरज नाही पण पहिल्या २ चुका होण्याच्या जागा लक्षात ठेवाव्यात.

Sondai_Sondewadi_Karjat (10-07-2010)









Travelogue by Sambhaji Chopdekar and Sulekh Baikar
Wow, the monsoon is in full swing and we are fully geared up to enjoy each and every weekend in the Sahyadris that gives us immense pleasure and joyful memories to cherish for long.

This weekend, as usual, after few calls and online chat by Friday midnight, we decided to visit Sondai near Karjat. Surprisingly, there is hardly any reference of this hill in the usual trekking books except the Maharashtra Gazetteer and a book by Suresh Paranjape*. Besides, an article on it from Maharashtra Times few years back was also informative. It was enough for us.

Sondai is easily accessible from Sondewadi, the base village, which is about 5 km away from the Borgaon phata on the Karjat- Chowk road. One can reach here on bikes also as the tar road is well-constructed and the surroundings are too beautiful due to monsoon.

However, we decided to choose Wavarle as our starting point as described in Paranjape’s book. It’s a small village just before the Borgaon phata from Karjat. When we reached there some of the villagers, out of concern, advised us to go to Sondewadi as the route to Sondai from Wavarle goes through thick jungle due to monsoon and they felt we might get lost there as the path is not so well-guided. Nevertheless, we politely refused their advice assuring them that we would not take unnecessary risks on the way.
Wavarle is really heaven! The villagers have built a small dam that confines the waters coming from the Sondai and adjacent hills in the monsoon and thus have made their lives wonderful. Our decision to go via Wavarle proved right as the atmosphere was superb and on our way, we came across a beautiful waterfall which is formed due to the overflow from the dam. We had our breakfast there and continued our journey further.
Sondai can be easily located from here and the route goes from the left side of the dam. This is best known as the route from the ‘Vagishwaracha dongar’. This route takes us to the pass to Sondewadi. However, we did exactly the opposite. We kept on walking keeping the dam to the left and reached a well-built well for the Thakurwadi. Some boys were busy fishing in the flowing springs. 

Soon we reached the edge of the valley from where the path literally descends in the valley. We did the same and crossed the same stream that is the backbone of the Wavarle dam. However, this option may not be viable during the peak of the monsoon as the stream may be in full swing.

From here, Sondai looks amazing! The route is quite clear – one should try to reach that pass to Sondewadi from here. After enjoying the waters in the stream, we resumed our journey. It was a pleasant walk through the jungle. We had to cross the stream twice and came across one more equally beautiful waterfall. Soon, we reached a plateau from where the Wavarle dam and the surrounding jungle inclusive of Irshalgad look simply gorgeous.

So far, it was just drizzling in between, but after reaching the plateau, it started raining heavily. Sondai and its adjacent hills along with ‘Gavhari’ ** disappeared in the thick clouds and it made our task a bit difficult as it was not easy to locate the direction to the Sondewadi pass. But fortunately, we came across a 'katkari fellow’ who confirmed that we had taken the right route and guided us to go straight through the jungle till we reach to a mango tree from where we should traverse to the right and climb the main mountain of Sondai.

We entered the jungle and kept moving ahead as the rain-God kept himself busy showering heavily. It was quite a dense forest that we negotiated for about 15 minutes and then came out midway. It was still raining and that made our task difficult as the cliff of Sondai was not visible.

Soon we reached the big mango tree mentioned by that Katkari. The track from the Vagishwaracha dongar meets here which we realized later on when we reached the top. From this mango tree, the route descends through that pass to reach Sondewadi that we utilized while returning while the route to Sondai goes to the right from here. 

However, due to heavy rains, we couldn’t realize it and kept on moving down the pass ahead in search of a traverse to the right. That was really a mistake. We were helplessly looking at the slightly visible Sondai cliff in search of the traverse mentioned in the book. We saw some farmers working in rice-field at Sondewadi who were kind enough to offer their help.

After understanding the approach and a warning about not trying the final climb from them, we recommenced negotiating the jungle and a gentle climb. We were delighted to find some paavtya (small carved out steps) on the way and thanked the villagers for the advice. Now the skies became slightly clear and it was heartening to find out the beautiful track that we had followed from Wavarle.

The cliff of Sondai was clearly visible and by now, it had become clear in our mind the next route – We were heading toward the Southern end by taking the traverse to the right. 

But to our misfortune, the traverse was blocked by a herd of cows at one point. To avoid them, we took a different approach descending slightly. However, we reached a path which we felt was leading us to the deep valley. We were clueless what to do next when suddenly, two members of the herd appeared in the upper part of the traverse. We waited until they joined their family members. Now, everything was crystal-clear, we breathed again and reached that part.

We then had the final traverse and reached the Southern part of the Sondai cliff. We were welcomed by two water cisterns and that was it, we had reached on the fort. 
The view was awesome surrounded by Wavarle dam, Morbe dam, Irshalgad, Matheran range, and deep valley. Sahyadri is simply superb! We were of-course delighted.

The book mentions the existence of a small cave after traversing more and climbing from the Eastside. We tried the same and entered a wonderful col from the Eastern side but it seemed no way upward. 

We returned back to the Southern part again and had our lunch on rock dining enjoying the beautiful valleys and the small pinnacle to the Eastern side, better known as Sondai’s brother or Gavhaari.
The rains had stopped and the paavtya on the Southern cliff seemed to be inviting us. Someone has requested to abandon the footwear at the base as it’s the abode of the Goddess, Sondai. We did respect the feeling however, it was not possible to climb up barefooted as it involves risky rock-climbing. The farmers had already warned us not to go for it as it would be slippery.

After reviewing the paavtya, we resumed and moved up a bit. There was a reward waiting for us - one more water tank! One more bonus point in this wonderful hike!! But when we traversed a little bit ahead, we realized the gravity of the warning given by the villagers. The path to the top seemed narrow and full of scree and hence dangerous. We took the right decision not to take any unnecessary risk further and returned back, keeping in mind – we can come back here again!!


References:
*Sahali Ek Divasaachya, Aaspaas Mumbaichya Suresh Paranjpe, Snehal Prakashan, page 193-194
** Gavhari – a small pinnacle, known as Sondai’s brother


Time to reach the top: One hour
History: Not much information is available about this fort. Like Prabalgad, Irshalgad forts it must have been ruled by Yadav, Bahamani, Nizamshahi, Adilshahi, Mughals, Marathas and later Britishers. Like most of the other forts, path/steps leading to this fort have been destroyed. Area on top is very small hence it must have been used as a watchtower to keep an eye on nearby forts.
Sondai is a small fort in Khalapur Taluka of Raigad district. It lies on Chowk to Karjat Road 6 kilometers away from Karjat. On the way we can see beautiful Morbe Dam. The base village of this Fort is Sondewadi. We can start the trek from village or we can go little ahead.
20190216_091530
On the way to Changewadi village there is a mango tree. A saffron flag can be seen from here on the peak. We parked our bikes there and started the trek.
20190216_092604
A walk of 10 minutes led us to a place where the route coming from Sondewadi village meets. From here we can clearly see the fort.
20190216_094034
On the tree trunk, there are signboards indicating the directions to the fort.
20190216_093632
Moving ahead, we spotted the first step of the fort. There was a garland kept on it. After this, there are no steps at all till the top.
20190216_094342
There is an unpaved road ahead which could become tricky in rainy season.
sondai1
We came across a rocky patch which has some holds that assist in climbing up. It it not that risky but some care has to be taken to avoid slipping.
sondai2
After walking for half an hour, we reached to a point from where we could see couple of ladders on the peak.
20190216_101612
As we went further, we saw couple of water tanks carved out from the rock. The water inside is not potable.
sondai320190216_102157
Going ahead, we can see the ladder installed. We can also walk around the perimeter of the peak. The path here is very narrow, so one has to be cautious. It takes some 15 minutes to circle back.
20190216_103112
Climbing up the ladder is very easy and safe. On the left side, there is a shallow water tank which was dried up.
sondai4
Second ladder is bigger than the first one.
20190216_104956
On the right side, there is a water tank and a small cave. The path is extremely risky as there is a deep valley on its one side. One needs to be vigilant here. It takes us to the water tank which is supported on two columns made within the rock itself. Here also the water is not potable.
sondai5
Just beside the tank, there is a small cave. Though it is adjacent to water tank, there is no water inside the cave.
sondai6
Ahead there is a beautiful viewpoint which gives a scenic view of surrounding villages, Morbe dam, Irshalgad fort, Prabalgad fort and the vast Matheran range.
sondai7
Last ladder is the smallest one. We can view two saffron flags flying high.
20190216_105047
The summit has very small circumference. There is Sondai devi temple. The idol has been carved out from rock and there are other idols of god. There are bells kept above the idols also there is a donation box. Apart from this and some water tanks, there are no reminiscences of the fort.
sondai8
There are monkeys in nearby forest. So keep an eye on your belongings. We fed them with some of our snacks.
sondai9
On the way we visited Morbe dam. It was tranquil. Irshalgad fort was looking majestic from here. Spent some quality time here before heading back.
20190216_124243
You can also watch the vlog below.
Leave only your footprints, Take back only pleasant memories.

किल्ले 'सोंडाईगड' (Offbit - 'Sondai Fort')

                
             सुरक्षित आणि कमी कालावधीतला ट्रेक करायचा तर किल्ले 'सोंडाईगड' करावा. धोका कमी त्यामुळं जास्त थरार नाही आणि सकाळी लवकर सुरुवात केल्यास दुपारी जेवण जेवण्यास परत सोंडाईवाडीत येऊ शकतो. 
कातळात कोरलेल्या टाक्या,  पलीकडे आडवा माथेरान (Sondai Fort) 

         कर्जत कडून सुरुवात केल्यास माथेरान डोंगर, चंदेरी, विकटगड, प्रबळ, ईरशाळ यांच्याच पंगतीत बसणारा हा धाकटा बंधु 'सोंडाईगड'. सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेतील हा १२०० फुट उंचीचा 'सोंडाई' तासभरच्या चढाईत दमवतो. गडमाथ्यावरून दिसणारा परिसर सुखाऊन जातो. सह्याद्रीतले गडकिल्ले ही महाराष्ट्राला देणगीच आहे आणि त्यात शिवछत्रपतींनी त्याला वेगळीच धार चढवली.. 

             'सोंडाई'साठी मुंबईहून जुन्या हायवेनं पुण्यास जाताना मध्ये 'चौक' ला डावं वळण घ्यावं. डावीकडं दिसणारं मोर्बे जलाशय ओलांडल्यावर चार किलोमीटरवर लगेच 'बोरगाव' तिठयावर पुन्हा डावं वळण घेऊन वेडीवाकडी वळणं घेत जलाशयाच्या काठानं रस्ता थेट सोंडाईवाडीत घेऊन जातो. 'बोरगाव' तिठयापुढेच दीड किलोमीटरवर 'वावर्ले' तिठयावरूनही डावं वळून सोंडाईला जाऊ शकतो पण वावर्ले गावातून गडावर जाण्यास जंगलातून अडीज तीन तासाची चाल आहे. सोंडाईवाडीतून गडमाथा तासाभरात गाठू शकतो. त्यामुळं बरेच ट्रेकर्स सोंडाईवाडीला प्राधान्य देताना दिसतात. किंवा मध्य रेल्वेचं कर्जत स्टेशनहून ९ किमीवरील 'बोरगांव' तिठयावर बसनं येऊ शकतो. स्वतःच वाहन असेल तर 'पनवेल-चौक' मार्गे सोंडाईवाडी सोईस्कर आहे. 

             सोंडाईवाडी हे गड पायथ्याचं छोटं गांव आहे. गावात टुमदार कौलारू घरं असून, प्रत्येक घरासमोर प्रशस्त अंगणं दिसतात. गावात काही आदिवाशी घरं सोडल्यास, अंगणात दिसणारी वाहनं आणि सुखसुविधांमुळ गांव सधन वाटतं. आजूबाजू आणि परिसरात पाऊस मुबलक पडत असल्यानं भातशेतीची वावरं दिसतात. याच भातशेतीच्या वावरात काही आदिवाशी गडभेटीस येणाऱ्यांना पार्किंग ची सोय करतात. तर काही गडावर जावून परत येण्यापूर्वी जेवणाची सोयही करून देतात.

दुसऱ्या पठारावरून 

             सोंडाईवाडीतून गडावर जाणारी पायवाट मळलेली आहे. सुरवातीची गावाबाहेरून जाणारी वाट ही ओढ्याच्या दगडधोंडयातून जात असून पंधरा मिनिटात एका पठारावर पोहचते. या पठारावरून दूर उंचावर गडसुळक्याचं दर्शन होतं. सुळक्यावरचे दोन भगवे दिसतात. इथपर्यंत येताना सुरवातीला  लिंबूपाणी, काकडी,कलिंगड विकण्याच्या दोन तीन टपऱ्या दिसतात. पुढील पायवाट तुरळक जंगलातून चढत जाते. गड डावीकडं ठेवत उजव्या बाजुनं वळसा मारत तीव्र चढत जाते. इथपर्यंत येताना कातळचे दोन तीन टप्पे सांभाळून चढावे लागतात. पावसाळ्यात शेवाळ आणि पाण्यामुळं या टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. पुढची पाऊलवाट मात्र दमछाक करते. 

मोर्बे जलाशय आणि उजवीकडं ईरशाळ 

Rock Pach 

             





             


                      या उतारावरून मागे विस्तृत मोर्बे जलाशय, वावर्ले धरण, ईरशाळ, प्रबळगड आणि समोर माथेरानचा अजश्र आडवा डोंगर दिसतो. 

           गडचढाई पश्चिमेकडून असल्यानं सकाळी लवकर सुरुवात केल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो. उन्हाळ्यात सकाळी आकरा नंतर मात्र कस लागतो. तीव्र चढ घेत सरासरी एक तासात तिसऱ्या सपाटीवर येतो. इथून गडसुळका स्पष्ट दिसून दूरवर सुळक्यावर जाण्यासाठी लावलेल्या दोन शिड्याही दिसतात. 

समोर माथेरान डोंगर 


सोंडाई सुळका (Sondai Fort)



             सुळक्याच्या पायथ्यालाच डावीकडं कातळच्या उतारावर कोरलेल्या पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या आहेत. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्या बघून लोखंडी शिडी चढून वर उजवीकडं वळसा मारून दुसरी शिडी लागते. दुसरी शिडी चढून गेल्यास समोर कातळात कोरलेल्या आणखी दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील पहिली टाकी मोठी प्रशस्त असून आत टाकीत कातळाच्या छताला आधार देणारे दोन दगडी खांब आहेत. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. आम्ही वर पोहचलो त्या वेळी आदल्या रात्री वर कॅम्प करून राहिलेला एक ग्रुप त्यातील पाणी वापरताना दिसत होते. या टाकीला लागूनच दुसरी पाण्याची टाकी दिसते. दुसरी टाकी लहान असून कातळच्या धोकादायक उतारावर असल्यानं तिथपर्यंत जाता आलं नाही. पुढे डावीकडं असलेली छोटी तिसरी शिडी ओलांडली की आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचतो.

खांबटाकी (Sondai Fort)
समोर मोठी आणि पलीकडं दुसरी टाकी 

              गडमाथा अगदी लहान आहे. माथ्यावर झाडाखाली सोंडाई देवीची मूर्ती असून बाजूलाच शेंदूर लावून ओळीनं ठेवलेल्या इतर देवतांच्या पाच मुर्त्या दिसतात. सगळ्या मुर्त्या उघड्यावर असून झाड हेच त्यांचं आधार दिसतं. आश्विन कृष्ण चथुर्दशी म्हणजेच दिवाळी लक्ष्मी पूजणाच्या दिवशी गडावर देवीचा उत्सव भरतो. 

श्री सोंडाई देवी (Sondai Devi) 
 
पहिल्या शिडीवरून लोणावळा डोंगररांग 



               





                          आधी या सुळक्यावर चढाई करण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि खोबणींचा वापर केला जायचा. त्यावेळचा थरार औरच असावा. सध्या तिथल्या शिडींमुळं धोका पूर्ण संपला आहे.                

                सोंडाई गडमाथ्यावरून बाजूचा मुरुंब डोंगर दिसतो. या डोंगरावर गौळदेवाची एक प्रचंड मोठी शिळा अधांतरी आणि अगदी चमत्कारीकरित्या स्थिरावलेली दिसते. आधी कधीतरी स्थानिकांनी ती शिळा खाली आणण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी ती शिळा हलवण्यासाठी जमिनीत पहार मारली, त्यावेळी जमिनीतून रक्ताचे ओघळ बाहेर आले. हा दैवी चमत्कार समजून त्यांनी तो नाद सोडून दिला. या गौळदेवाच्या शिळेकडं जाण्यासाठी, सोंडाईचा सुळका उतरून पुन्हा पहिल्या शिडीखाली यावं लागतं. या शिडीला उजवीकडून वळसा मारून वाट सोंडाईच्या मुख्य कातळालगत दरीकाठानं जाते. वाट काट्याकुट्यांची, दगडांतून अडचणीची आहे. दहा मिनिटं चालल्यावर वाट सोंडाई आणि मुरुंब डोंगराच्या चिंचोळ्या घळीतून वर चढते. घळ पार करून वर आल्यास पलीकडील दरी दिसते. पुढे वाट बंद दिसते. पण उजव्या बाजूचा अंदाजे दहा फूट उभा कातळ चढल्यास वाट वर मुरुंब डोंगराच्या माथ्यावर जाताना दिसते.हा कातळ, त्यानंतर वर तीव्र उभ्या चढणीची डोंगराच्या माथ्यावर जाणारी वाट आणि खाली दरी हे सगळं खूप धोकादायक वाटलं. त्यामुळं पुढचा प्रयत्न आम्ही सोडून दिला. 

मुरुंब - सोंडाई मधील घळ 


 



मुरुंब डोंगरावरील गौळदेव शिळा 

मुरुंब डोंगर 

            



                                           

                 या अपरिचित 'सोंडाई'चा इतिहासात फारसा उल्लेख नाही, पण मे १६६६ मध्ये शिवछत्रपतींनी कल्याण,रायरी,भिवंडी परिसर ताब्यात घेतल्यावर तो स्वराज्यात सामील झाला. गडावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाकींमुळे हा गड टेहळणीसाठी उपयोगात आणला असावा. 

डावीकडं वावर्ले धरण आणि उजवीकडं मोर्बे जलाशय 

समोर लोणावळा डोंगररांग (Sondai Fort) 
   


सोंडाई गडमाथा (Sondai Fort)

             गडमाथ्यावरून मागे पश्चिमेला विस्तृत मोर्बे जलाशय, त्या बाजूलाच वावर्ले धरण, मोर्बे जलाशयाच्या बाजूला बेलाग ईरशाळ आणि प्रबळगड दिसतात. समोर माथेरानचा 'वन ट्री हिल पॉइंट' तर अगदी जवळून दिसतो. तर पूर्वेला सोनगड, दक्षिणेला किल्ले राजमाची आणि लोणावळ्याची डोंगररांग दिसते. पावसाळ्यात हे सगळं दृश्य मोठं दुर्मिळ आणि विहिंगम दिसत असावं. आणि त्यामुळं हा ट्रेक पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच करावा.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...