कर्जतवरुन खांडपे वा कोंदीवडे बस.कोंदीवड्यावरुन राजमाचीच्या वाटेने डोंगर चढणे, एकुण ८ लेणी असून हीनयानपंथीय आहेत.स्तुपासहीत एक चैत्य, ७ विहार,२ साध्या गुंफा.
इ.स. पुर्व २ रे शतक ते इ.स.१ शतक असा काळ आहे.
शिल्पकला प्राथमिक अवस्थेत असतानाच्या काळातील हि लेणी ( भाजेप्रमाणे ) पहिल्या प्रचंड मोठ्या गुहेत ( ७०' *३०'*३०) १० फुटी व्यासाचा स्तुप.अष्टकोनी स्तंभावर आधारीत चैत्य्,अष्टकोनी स्तंभ म्हणजे साधारण इ.स.पुर्व शिल्पाचे निदर्शक मानतात.स्त्री,पुरुषांच्या नृत्य अविष्कारातील प्रतिमा .चैत्याच्या दर्शनी भागातील लाकडी फासळ्या अजूनही आहेत.
हा लयनसमुह भाज्याच्या पुढचा टप्पा असल्यामुळे महत्वाचा आहे.येथील चैत्यगृहाची कमान अधिक नेमकी आणि भक्कम आहे.मात्र चैत्यमुखावर भाजे येथील चैत्यमुखावर दिसतात तशी खिळ्याकरीता असलेली छिद्रे दिसून येत नाहीत.पुराभिलेखदृष्ट्या येथील शिलालेख भाजे लेण्याच्या नंतरच्या काळातील आहे.हे चैत्यगृह ८.०७ मीटर रुंद, २२.२ मीटर खोल आणि ८.५३ मीटर उंच आहे.शिल्पदृष्ट्याही हे चैत्यगृह महत्वाचे आहे.कारण चैत्यमुखावर यक्षमुर्ती कोरली आहे.( आजमितीस या मुर्तीचे फक्त डोकेच शिल्लक आहे) जवळच कोरलेल्या शिलालेखात चैत्यगृह कोरणार्या व्यक्तीचे नाव व माहिती दिली आहे.त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे चैत्यमुखावर नर्तक मिथुन कोरली आहेत.या सर्व वैशिष्ट्यावरुन कोंढाणे हे सोपारा ते शेलारवाडीला जाणार्या व्यापारी मार्गावरील बोरघाटातील महत्वाचे बौध्द केंद्र असल्याचे सुचित करते.
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) इये महाराष्ट्र देशी-प्र.के.घाणेकर
३) स्थापत्य व कला-महाराष्ट्र गॅझेटीयर
४) Archeological Survey of western India-James Burgges
हा लेणीसमुह उल्हास नदीच्या उत्तर किनार्यावर व राजमाची किल्ल्याच्या खालील बाजुस डोंगराच्या पोटात आहे.प्राचीन काळी कल्याण व सोपारा बंदरापासून निघून बोरघाट मार्गे भाजे,कार्ले व पुढे तेरपर्यंत जाणार्या प्राचीन व्यापारी मार्गावर हि लेणी आहेत.कोंडाणे लेण्याच्या स्थानावरुन हा मार्ग उल्हास नदीच्या किनार्यावरुन जात असावा असा आपण अंदाज करु शकतो.कोंडाणे लेणी पुर्व बौध्दकालीन मालिकेतील ( इ.स.पुर्व २५० ते इ.स. १०० ) आहेत.नंतरच्या महायानकाळातही त्या अबाधीत राहील्या. या सर्व गुंफा दुर्लक्षित राहील्या असल्या त री येथील दोन लेणी आपल्याला भव्यतेची साक्ष देतात.कोंडाणे लेण्याचे वैशिष्ट्य असे कि चैत्यगुंफेच्या बाजुस यक्ष कोरणारा कान्हा याचा शिष्य बलुक या कलावंताचा स्पष्ट उल्लेख आहे.परंतु हा शिलालेख पुसट झाला आहे.शिल्पी म्हणून कान्हा याचा उल्लेख पितळखोर्याच्या यक्षावरील शिलालेखात देखील आहे.पितळखोर्याचा हा यक्ष आता दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आहे.स्वत निर्माण केलेल्या शिल्पाकृतीवर स्वताचा नामोल्लेख कोरून ठेवण्याचा हा प्रकार अंत्यत दुर्मिळ आहे.कोंडाणे लेण्यातील यक्ष कोरून ठेवणार्या बलुकाचा गुरु कान्हा व पितळखोर्यातील यक्ष कोरणारा कान्हा एकच व्यक्ती असल्यास असे अनुमान काढता येईल कि एकाच शिल्पी संघातील किंवा घराण्यातील कलाकार दुरदुर पसरलेल्या भागात कार्यरत होते.
कोंडाणे लेणीसमुहातील सर्व लेणी पश्चिमाभिमुख असून दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमांक दिलेली आहेत.
कोंडाणा लेणी (Kondana Caves)
कर्जत मधल्या कोंडिवडे गावात या बोध्दकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेल्या आहेत. राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच आपणाला या लेणी लागतात. कोंडाणे लेण्यात एक चैत्यगृह, सात विहार आणि दोन गुहा आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात. अंदाजे नऊ मीटर उंचीचे चैत्यगृह येथे आहे. पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे कोरलेले दिसते. यापटातील काही नृत्यकलाकारांच्या हाती धनुष्य-बाण आदी आयुधे आहेत. या शिल्पांवर वस्त्रप्रावरणे, अलंकारही आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते. दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटांच्याखालीच दोन्हीकडे यक्षांची भव्य शिल्पे कोरलेली असावीत. परंतु ती आता भग्नावस्थेत आहेत. या भग्न यक्षाच्या डाव्या खांद्यावर प्राचीन ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ‘कन्हस अंतेबासिन बलकेन कतं’ या लेखाचा अर्थ असा की, ‘कन्हाचा अंतेवासी (शिष्य) बालुक याने (हे काम) केले’. कलते खांब, झुकत्या भिंती आणि खोदकामात केलेला अर्ध उठावाचा वापर येथे दिसतो. या गृहास आधार म्हणून मूळ दगडातील २८ खांब येथे कोरलेले होते. अत्यंत प्रमाणबद्ध असलेले हे अष्टकोनी खांब इतिहासात आक्रमकांच्या हल्ल्यात तोडले गेलेले दिसून येतात. चैत्यगृहाच्या मध्यभागी दहा फूट व्यासाचा स्तूप आहे. या स्तूपाचा विध्वंस झालेला दिसतो. गजपृष्ठाकृती छत असलेल्या या चैत्यगृहात छताला अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहेत. कार्ले, भाजे येथील लेण्यातही असे वासे दिसून येतात.
भटकंती सुरु केली तेव्हा फक्त जास्तीतजास्त किल्ले बघायचे हे ठरवून चाललो होतो. नुसती निरर्थक भटकंती होती. हळूहळू पुस्तक मिळत गेली, नवीन माहिती मिळू लागली आणि भटकंती निरर्थक न राहता अभ्यासपूर्ण होऊ लागली. किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती चालू असताना का कुणास ठाऊक मन किल्ल्यांपासून लांब जात होते. असे वाटत होते आपण फक्त किल्ल्यांसाठी भटकंती करत नाही आहोत. काय बघण्यासाठी आपण भटकंती करत आहोत हेच कळत नव्हते. मनाची अशी द्विधावस्था असतानाच राजमाची किल्ल्यावरून येताना वाटेत असलेल्या कोंढाणे लेण्यांना भेट दिली. वेळ कमी असल्यामुळे लेण्यांना धावती भेट दिली. भेट धावती असली तरी लेण्यांबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. दरवर्षी नवरात्रात जुन्नरला कुलदेवी असल्यामुळे जाणे व्हायचे. त्यावेळेला शिवनेरी व लेण्याद्री येथील लेण्यांचे दर्शन व्हायचे, पण त्यांच्याबद्दल आकर्षण असे वाटले नव्हते. परंतु कोंढाणे लेण्यांबद्दल निर्माण झालेल्या आकर्षणामुळे मनांत सारखा लेण्यांचा विचार चालू होता.
निर्माण झालेल्या आकर्षणामुळे कोंढाणे लेण्यांना लवकरात लवकर भेट द्यायची हे ठरवून टाकले. आतापर्यंत एकट्याने बरेच ट्रेक केलेले असल्यामुळे आणि ह्या भागाची बऱ्यापैकी माहिती झालेली असल्यामुळे घरातून बाहेर पडणे कठीण गेले नाही. ठरल्याप्रमाणे कोंडीवडे गावात पोचलो. कोंढाणे लेण्यांपर्यंत जाण्यासाठी एकच मार्ग अशी माहिती पुस्तकातून मिळाली होती, पहिल्या मार्गापेक्षा सोपा आणि कमी दमछाक करणारा दुसरा मार्ग अपघाताने मिळाला. लेण्यांकडे जायला कोंडीवडे गावाच्या पुढे असलेल्या वस्तीतून वाट आहे आणि वाटेच्या सुरुवातीला विहीर आहे सांगितले होते. त्याप्रमाणे खुणेची विहीर दिसली आणि विहिरीच्या शेजारून जाणारी वाटसुध्दा मिळाली.
लेण्यांकडे जाणारी पायवाट रुळलेली असल्यामुळे चुकायचा प्रश्नच नव्हता. विहीर सोडल्यानंतर साधारणपणे २०-२५ मिनिटांनी ४-५ जणांचा लेण्यांकडे जाणारा दुसरा ग्रुप भेटला. त्यांचीसुध्दा लेण्यांकडे जाण्याची पहिलीच वेळ होती. त्यांचा पिकनिक हा हेतू आणि माझी लेण्यांबद्दल निर्माण झालेली उत्सुकता असे दोन वेगवेगळ्या विचारांचे आम्ही लेण्यांकडे जात होतो. मार्गक्रमण करीत असताना ज्यांच्या नुसत्या फोटोने धडकी भरते अश्या सर्पकुलोत्पन्न नागमहाराजांनी दर्शन दिले. आयुष्यात दुसऱ्यांदा नागाला एवढ्या जवळून बघत होतो. नागाला बघितल्यानंतर सर्वांना एवढी धडकी भरली होती की विचारायची सोय नाही. पण थोड्या वेळाने तो नाग जंगलात निघून गेल्यानंतर हायसे वाटले. नागाचे एवढ्या जवळून दर्शन झालेले असल्यामुळे लेणी येईपर्यंत सगळे गप्प होतो. शेवटी एकदाचे राजमाची ट्रेकच्या वेळी जिथून लेण्यांचे दर्शन घडले होते त्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो.
पायऱ्यांच्या इथून लेणी बघितली आणि एक अदृश्य शक्ती मला त्या लेण्यांकडे ओढून नेत आहे असे वाटत होते. जसजसा लेण्यांच्या जवळ जात होतो, तसतसा थोडासा अस्वस्थपणा वाढत होता. त्या लेण्यांमध्ये असे काय होते हे मला कळतच नव्हते. साधारणपणे १० मिनिटांमध्ये पायऱ्या चढून लेण्यांसमोर उभे राहिल्यानंतर मनात असलेली द्विधावस्था पूर्णपणे निघून गेली. आजपर्यंत काय शोधत होतो, त्याचे उत्तर क्षणार्धात मिळाले होते. त्यावेळी कोंढाणे लेण्यांची किंवा लेणीकलेची काहीच माहिती नव्हती.
चैत्यगृहासमोर उभा राहिल्यानंतर त्याच्यावरील पिंपळपानाकृती कमान, कोरीवकाम, छज्जे, स्त्री-पुरुष युगुले, उध्वस्त स्तूप, स्तंभ, गजपृष्ठाकार छत, लाकडी वासे, दर्शनी भागात असलेली लाकडी कमान इ. सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. दर्शनी भागात असलेल्या यक्षमूर्तीने व त्याच्या शेजारी असलेल्या ब्राह्मी लिपीतील शिलालेखाने एवढे वेड लावले की विचारायची सोय नाही. त्यावेळी ब्राह्मी लिपीची माहिती नसल्यामुळे तो लेख वाचता आला नाही. ही लिपी आणि लेणी स्थापत्यकला यांचा अभ्यास हेच आपले उद्दिष्ट हे मनोमन ठरवून टाकले.
चैत्यगृह बघून झाल्यानंतर पावले शेजारी असलेल्या विहाराकडे वळली. विहारात बौध्द भिक्षुकांसाठी असलेल्या १८ खोल्या, खोलीत झोपण्यासाठी दगडी बाक, खोलीच्या दर्शनी भागात असलेली छोटीशी पिंपळपान कमान, विहाराजवळ असलेला अर्धउठावातील स्तूप, विहाराच्या दर्शनी भागात पण उंचावर असलेल्या पिंपळपान कमानी व स्तूप यांचा सजावटीसाठी केलेला उपयोग हे सगळेच विस्मयकारक होते.
२००० वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या ज्वालामुखीजन्य दगडात फक्त छिन्नी आणि हातोडा यांच्या सहाय्याने एवढे मोठे काम कसे केले असेल. एवढे मोठे लेणे खोदायला किती वर्ष आणि किती शिल्पकार काम करत असतील. कोणत्या राजसत्तेने लेणी खोदायला अर्थसहाय्य केले असेल. ह्यापैकी एकाही प्रश्नांचे उत्तरे माझ्याकडे नव्हते. हे प्रश्न कोणाला विचारू पण शकत नव्हतो. कारण लेण्यांवर चांगली पुस्तकेच उपलब्ध नव्हती. तसेच लेणीक्षेत्रातील जाणकारांशी ओळख नव्हती. तेव्हाच ठरवले आपण स्वतःहून लेण्यांचा अभ्यास करायचा. जसजसा महाराष्ट्रातील लेणी भटकू लागलो तेव्हा हळूहळू लेण्यांविषयी माहिती मिळू लागली. लेणीसंदर्भातील विविध संज्ञांची ओळख झाली. स्तूप म्हणजे काय? विहार कश्याला म्हणतात? छताचा आकार गजपृष्ठाकार का? पिंपळपान आणि लेण्यांचा काय संबंध? लेण्यांचा मुख्य उपयोग काय? इ. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायला सुरुवात झाली.
लेणी बघत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे ब्राह्मी लिपी शिकणे गरजेचे आहे. जोपर्यंत ब्राह्मी लिपी वाचता येणार नाही तोपर्यंत एकही शिलालेख वाचता येणार नाही. शिलालेख वाचता येणार नाही तोपर्यंत लेण्यांविषयी, त्यांच्या निर्माणकर्त्याविषयी, काळाविषयी, दानाविषयी काहीही समजणार नाही. पण ब्राह्मी लिपी शिकवणार कोण? ब्राह्मी येत नव्हती म्हणून लेण्यांचा अभ्यास थांबवला नाही. तो चालूच होता. योग्य वेळ आल्यानंतर ब्राम्हीचे आकलन होईल ही मनाने दिलेली समजूत होती. ब्राह्मी लिपी शिकण्याच्या योग्य वेळेसाठी एक-दोन वर्षं नाही तर तब्बल १५ वर्ष वाट बघायला लागली. मधल्या काळात डॉ. शोभना गोखले यांचे कान्हेरी शिलालेखांवर आधारित पुस्तक मिळाले. त्यातून ब्राम्हीची तोंडओळख झाली. डॉ. रुपाली मोकाशी आणि डॉ. मंजिरी भालेराव ह्यांच्याशी झालेली ओळख आणि त्यांचा ब्राम्ही लिपीचा असलेला अभ्यास ह्यामुळे मनांत ब्राम्ही शिकायला मिळणार ह्याच्या आशा पल्लवित झाल्या. डॉ. मोकाशी आणि डॉ. भालेराव यांनी माझ्याकडून ब्राम्हीचा चांगला अभ्यास करून घेतला. ह्यांच्याशी ओळख झाली नसती तर ब्राम्ही शिकण्यासाठी किती वाट बघायला लागली असती हे सांगता येणे कठीण आहे.
लेणीकलेविषयी जेवढे शिकू तेवढे कमी हेच हळूहळू जाणवायला लागले. बुध्दधर्मीय लेण्यांनंतर जैन आणि हिंदू (ब्राम्हणी) लेणी खोदायला सुरुवात झाली. जैन आणि हिंदू लेणी बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे ह्या लेण्यात असलेला शिलालेखांचा अभाव. जैन आणि ब्राम्हणी लेण्यांमध्ये फार कमी शिलालेख बघायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यास करताना काळजी घ्यावी लागते. निरीक्षणामधून आणि त्यांच्या मूर्तीकलेतून त्यांचा काळ समजायला मदत होते.
महाराष्ट्रात ७००-८०० ज्ञात लेणी असून अजूनही बऱ्याच लेणी अज्ञात आहेत. ह्या अज्ञात लेणी वाट बघत आहेत अभ्यासकांची. परंतु, सध्या फक्त किल्ल्यांना जास्त महत्त्व असल्यामुळे लेण्यांकडे कोणीही जात नाही. लेण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अज्ञात लेण्यांचे मंदिरात रुपांतर होते, मूर्तीना शेंदूर लावले जाते, शिलालेख नष्ट केले जातात. अश्या प्रकारच्या विद्रुपीकरण्यामुळे वारसास्थळांना धोका पोचत आहे हे कधी कळणार. भविष्यात असे प्रकार थांबवायचे असतील तर लेणीकलेचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
पहिल्या भेटीनंतर कोंढाणे लेण्यांना कधी मानसिक शांतीसाठी, कधी त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेकवेळा भेट दिली आणि प्रत्येकवेळी काहीतरी नवीन समोर येत होते. ते नवीन काय पुन्हा कधीतरी फुरसतीमध्ये…..
लेणीचे नाव :कोंडाणे बुद्ध लेणी लेण्यांची उंची :
लेणीचा प्रकार : दुर्लक्षित लेणी डोंगररांग : सह्याद्री
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
तालुका : कर्जत
गाव : कोंडाणे

लेणीचा इतिहास : कोंडाणे बुद्ध लेणी हि हीनयान पंथीय
बुद्ध लेणी असून यांची निर्मिती इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात सातवाहन
सम्राटांच्या काळात झाली. कोकणातून बोरघाट मार्गे घाटाकडे जाणाऱ्या
रस्त्यावर हि लेणी आहेत . तसेच सोपाऱ्याहून कल्याण मार्गे नाणेघाटातून
जुन्नर वरून पैठण ला जाणारा प्राचीन व्यापारी मार्गामुळे जागोजागी लेण्या
कोरण्यात आल्या यामुळे बौद्ध भिक्खूना राहण्याची व्यवस्था होत असे
कोंडाणे
बुद्ध लेणी हि भाजे व पितळखोरा या लेण्यांच्या समकालीन लेणी आहेत या
लेण्यातील शिलालेखात आलेला उल्लेख पुढील प्रमाणे '' कण्हस अंतेवासींना
बलकेन कतं म्हणजे कन्हशिष्य बलक याने हे लेणे निर्माण केले लिपीचा
आधारावर हि अशोकालीन लिपी असल्याने ती अशोकाच्या काही वर्षांनंतर च
कोरण्यात आली असावी असा निष्कर्ष काढता येतो विद्या दहेज यांनी ह्या
लेण्यांची निर्मिती बिहार येथील बाराबार लेणी व भाजे लेण्यांच्या मधल्या
काळात झाली असावी असे मत व्यक्त केले आहे सातवाहन राजा च्या काळात या
लेणीची निर्मिती झाली असावी असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे
या लेण्या बौद्ध भिक्खुंच्या वास्तव्यासाठी असल्याने या ठिकाणी सुदंर चैत्यगृहाची निर्मिती करण्यात आली.
पाहण्याच्या गोष्टी : कोंडाणे बुद्ध लेणी दोन हजार
दोनशे वर्षांपूर्वी निर्माण केलेला हा ऐतिहासिक ठेवा आहे या याठिकाणी दोन
हजार वर्षांपुवीची कलेचा उत्तम नमुना आपणास पाहायला मिळतो
कोंडाणे लेणी वर असणारी चैत्य गृहाची रचना अप्रतिम असून कलेने त्याला अलंकृत केलेलं आहे
या
लेण्यांचा दर्शनी भाग हा जणू काही नव्या नवरीच्या शालू पांघरावा असा आहे
वृक्षवल्लीने नटलेली हि लेणी अप्रतिम सौंदर्याचे उत्तम असे ठिकाण आहे
शांतिमय ठिकाण असून निसर्गाने या ठिकाणाला नटलेले आहे
कोंडाणे
गावातून वरती जंगलातून वरती आल्यावर जवळ गेल्याशिवाय लेण्यांचे दर्शन होत
नाही जवळ जवळ गेल्यावर लेण्यांचे दर्शन होते समोरील असणारी चैत्याची कमान
मनाला मोहून टाकणारी आहे
चैत्याच्या दर्शनी कमानीवर अनेक नक्षीकामाने अलंकृत केलेलं आहे
कोंडाणे
बुद्ध लेण्यांमध्ये एकूण ८ विहार आणि चैत्यगृह आहे या मधील विहार हे
सर्वात जुने आहेत हि लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत
चैत्यगृह
: या लेण्यातील जे चैत्यगृह आहे त्याच्या दर्शनी भाग हे पिंपळाच्या
पानाच्या वातायान असून छत हे गजपृष्ठाकार आहे या चैत्यगृहांची लांबी २२
मीटर लांब असून ८ मीटर रुंद व ८.५ मीटर उंच आहे स्तूपाचा परीघ हा २.९
मीटर आहे सध्याचा स्तूप हा तोडून फोडून टाकलेल्या अवस्थेत आहे चैत्याला
लाकडाची कमान होती जवळपास २००० वर्षे जुनी सागवान लाकडाची कमान आज हि आपणास
पाहायला मिळते चैत्याला स्तंभाचे वलय होते यातील स्तंभ हे अष्टकोनी
असून स्तंभावर चिन्ह अंकित आहेत आज ते स्तंभ भग्न अवस्थेत पडलेले आहेत
चैत्याच्या
दर्शनी भागावर वेदिका पट्ट्यांचे नक्षीकाम आहे तसेच छज्जे आपणास पाहायला
मिळतात सुंदर असे युगलपट देखील आपणास पाहायला मिळतात या युगल पटतील पुरुष
हे योद्धे असावे कारण त्यांच्या हातात शस्त्र पाहायला मिळतात त्याच्या
खाली वेदिका पट्टी व चैत्य कमानीचे शिल्प प्रत्येक छज्जे वर कोरलेले आपणास
दिसतात
चैत्यगृहाच्या अगदी डाव्या बाजूला च एक यक्षाची भग्न अवस्थेत
असणारी मूर्ती आपणास पाहायला मिळते त्या मूर्तीच्या डोक्यावरील फेट्यावरील
नक्षीकाम पाहून त्यावेळचे कलेचे वैभव काय आहे हे आपणास कळते फेट्यावरुन हे
शिल्प किती सुंदर असू शकते याचा विचार केला असता बुद्ध लेण्यातील हे वैभव
आपणास पाहायला मिळते
विहार : चैत्यगृहाच्या बाजूला एक विहार आहे जवळपास आयताकृती हे विहार
असून याचा दर्शनी भाग कोसळला आहे आतमध्ये प्रत्येक बाजूस सहा असे एकूण
अठरा भिक्षु निवास आहेत भिक्षु निवासाच्या दरवाजावर चैत्य गवाक्ष कोरलेले
आहेत त्याशिवाय दरवाजे असल्याच्या खुणा देखील आहेत संभामंड्प हा ११ मीटर
लांब आहे तर ९.५ मीटर रुंद आहे छतावर असलेल्या अवशेषांवरून या ठिकाणी १५
स्तंभांची मांडणी असावी असे निदर्शनास येते
छताला रंगकाम असल्याचे अवशेष
पाहायला मिळतात सभागृहाच्या बाहेर च्या भागात भिंतीला चैत्य कमानीप्रमाणे
पिंपळाच्या पानाची कमानीत अर्धउठावदार स्तूप कोरलेले आहे वेदिका पट्टीची
नक्षीकाम आहे समोरील भाग कोसळल्या मुळे समोरील दर्शनी भागाची पडझड झाली
असून तिथले अवशेष नष्ट झाले आहेत
तसेच याच विहाराच्या समोरील भागावर एक शिलालेख कोरलेला आहे जो सहज लक्षात येत नाही
या
ठिकाणी असणाऱ्या विहाराची रचना दोन मजली इमारती सारखी असावी असे आहे इथे
असणाऱ्या सुंदर वास्तुकलेचा अविष्कार आपणास पाहायला मिळतो
ह्या
लेण्यांची शिल्पकला कोरीव काम अप्रतिम व उच्च दर्जाचे आहे लेणी मध्ये
असलेली भिक्षु निवास व लेण्यातील असणारे पाण्याचे व्यवस्थापन हे लेणी तिथे
पाणी हि संकल्पना आपणास पाहायला मिळते
कोंडाणे लेणी मध्ये असणारी भिक्षु
निवास हे इथे राहणाऱ्या बौद्ध भिक्षु साठी कोरण्यात आली प्राचीन काळी या
ठिकाणी ऐतिहासिक अशी ओळख असणारी लेणी सध्या भग्न अवस्थेत आहेतलेणी लेणी
मध्ये असणारी विहार हि भिक्षु च्या राहण्यासाठी चे भिक्षु निवास स्थळ आहेत
पाण्याची टाकी : ऐतिहासिक अश्या प्राचीन बौद्ध लेण्यात जल व्यवस्थापन हे
अतिशय सुंदर आणि बारा हि महिने पाणी लेण्यात खेळते राहील याची केलेलि
व्यवस्था म्हणजे बौद्ध लेण्यातील पाण्याचे टाके हे टाके वर्षभर भरलेले असते
या मधील पाणी हे अतिशय थंडगार आणि शुद्ध असून पिण्यासाठी योग्य मानले जाते
पाणी आणि लेणी हे समीकरण जवळपास सर्व च लेण्यावर आपणास पाहायला मिळते
लेणी वर पोहोचण्याच्या वाटा
मुंबई मार्गे व पुणे
मार्गे कर्जत या रेल्वे स्थानकात उतरून कर्जत येथील मुख्य रस्त्यावर ब्रिज
वर कोंढाने लेणी वर जाण्यासाठी खाजगी वाहने असतात खाजगी रिक्षा ३०० रुपये
घेतात तर कोंदिवडे पर्यंत ३० रुपये प्रत्येक सीट ने जाणारे खाजगी वाहने
देखील आहेत
लेणी वर पाण्याची व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था खाली गावात होते
लेणी वर राहण्याची व्यवस्था आहे लेणीत असणाऱ्या विहारात ५० एक माणसे राहू शकतील अशी जागा आहे
मधमाश्यांचे पोळे असल्याने सुगंधी द्रव्ये मारून जाणे टाळावे शिवाय कोणते हि सुगंधी वस्तू सोबत घेवू नयेत
ऐतिहासिक पाऊलखुणांचे कर्जत – कोंडाणे लेणी
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका ऐतिहासिक आहे कारण दहिवली गावातील विठ्ठल मंदिर पंचायतन, कडाव गावातील बालदिंगबर व वैजनाथचे शिवशंकर हि पेशवेकालीन मंदिरं साक्ष देतात आणि आजही ग्रामस्थांची श्रद्धास्थानं आहेत परंतु थेट दोन हजार वर्षे जुनी लेणी जेव्हा उल्हास नदीच्या काठी राजमाचीच्या घेऱ्यात कोरली गेली तेव्हा मात्र कर्जतचा इतिहास प्राचीन ठरला. ह्याच कोंडाणे लेणी विषयी प्रस्तुत लेखात आपल्याला आढावा घ्यायचा आहे.

कर्जत गावापासून साधारणतः १० किमी अंतरावर कोंदिवडे गाव आहे आणि ह्या गावात जाण्यासाठी संपूर्ण रस्ता आजही उल्हास नदीच्या काठावरून गेलेला आहे. तिथे जाताना डाव्या बाजूला ढाक बहिरीचा गड दर्शन देतो तर समोर किल्ले राजमाची दिसायला सुरुवात होते. कोंदिवडे गाव सोडले कि, कोंडाणे गाव आपले स्वागत करते आणि आपण सह्याद्रीच्या पायथ्याला पोहचतो. इथूनच सुरुवात होते त्या आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची ! इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात हा आविष्कार साकारण्यात आला. सह्याद्रीत कोरलेली भाजे व कोंडाणे ह्या दोन्ही लेणी समकालीन असू शकतात, असा अंदाज अभ्यासकांचा आहे. ह्या लेणीतील चैत्यगृहाची कमान पिंपळाकृती कोरलेली असून दोन्ही बाजूला शिल्पपट आहेत. हि लेणी हीनयानपंथीय आहे. चैत्यगृहातील स्तूप काही प्रमाणात भग्न झाला असून त्या काळातील खांबसुद्धा पूर्णतः पडून गेले आहेत. पुरातत्वाने आता नवीन खांब लावलेले आहेत. गजपृष्ठाकार छत आपले लक्ष वेधून घेते. एकेकाळी लाकडी कोरीव कामाने ह्या भिंती झाकल्या असतील, त्याला जवनिका म्हणतात कारण त्याची साक्ष द्यायला भिंतीत एक रांगेत खोबण्या केलेल्या आढळतात. संपूर्ण चैत्यगृहात अगदी स्तूपाभोवती चापाकार असे त्या काळातील अष्ठकोनी खांबांच्या खुणा इथे आजही पाहता येतात. प्रवेशद्वार कमानीच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिल्पपटातील युगुले त्यांची वस्त्रप्रावरणे व आयुधे पाहताना नजर खिळून राहते. ह्या शिल्पपटातील स्त्रिया नर्तकी असून त्या योद्धाबरोबर नृत्य करताना दाखवलेल्या आहेत. त्यांची केशभूषा, अलंकार आणि शस्त्र पाहताना त्या काळातील बऱ्याच गोष्टींचा अभ्यास इथे करता येतो तसेच चैत्यकमानीत सागवानी लाकूड आजही सुस्थितीत असून ते सुद्धा किमान दोन हजार वर्षे जुने आहे, भन्नाट आहे हे सर्व !

ह्या चैत्यगृहाच्या अगदी बाहेच्या बाजूला एक रेखीव असा यक्ष कोरलेला आहे. त्याच्या बाजूला तो तयार करून घेणाऱ्याचा ब्राम्ही लिपीतील शिलालेख आजही ठसठशीत आहे. “कन्हस अंतेवासिना बलकेन कतम” असा लेख असून त्याचा अर्थ “कन्हाचा शिष्य बालुक याने हे काम केले” असा होतो. (फोटोत लाल चौकडीत दाखवलेले आहे.) आज त्या यक्षाचे मुख भग्न झाले आहे. त्याचे शिरोभूषण व केशभूषा पाहता ग्रीक आणि रोमन शैलीचा प्रभाव त्यावर जाणवतो. अतिशय देखणा असेल हा यक्ष ! हे तिथे प्रत्यक्ष पाहताना वाटते. अलंकृत लेणीवर गवाक्ष, वेदिकापट्टी आणि अतिशय बारीक नक्षी कोरलेली आहे, इथे मेहनत घेणाऱ्या अनामिक हातांना मनोमन वंदन करावेसे वाटते. ह्या चैत्यगृहाच्या पुढे अनेक विहार व त्यात कक्षसुद्धा आहेत. कक्षात दगडी सोपे असून संपूर्ण विहाराला एकेकाळी व्हरांडा होता जो आज भग्न झाला आहे. पहिल्याच विहारात भिंतीवर स्तूप कोरलेला आहे, ह्यावरून चैत्यगृहातील स्तूप कसा असेल ह्याची जाणीव होते. खालील फोटोत पाहू शकता. शेवटी पाण्याच्या दोन टाक्या आहेत व तिथे कोरलेला विहार हे भोजनगृह असावे, असे वाटते. पहिल्या विहाराच्या दर्शनी बाजूवर दोन ओळींचा पुसटसा ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे जो विहार कोरण्यासाठी मदत देणाऱ्याच्या नावाने आहे. “सिधं बरकस हमयस कुचिकापुतस पाठे” असा असलेल्या शिलालेखाचा अर्थ बरकस येथे राहणारा कुचिकाचा पुत्र हमयक्ष याने विहारासाठी दान दिले, असा होतो. बहुधा बरकस म्हणजे गुजरात मधील भडोच असावे, असा अंदाज इथे करता येतो.

हि लेणी राजमाचीच्या घेऱ्यात आहे. “लेण्यांच्या परिसरात गड व गडाच्या परिसरात लेण्या” हे सूत्र इथे सुद्धा आहे. कल्याणच्या बंदरात उतरलेला माल घाटावर घेऊन जाण्यासाठी कर्जतच्या परिसरात अनेक घाटवाटा निर्माण करण्यात आल्या. त्यातील प्रसिद्ध असा कुसूरचा घाट इथेच असून त्याच्या पायथ्याकडून प्राचीन काळी ढाक बहिरीच्या परिसरातून कोंडाणे लेणीकडे जाता येत असे. इथूनच पुढे ‘कोकण दरवाजा’ म्हणून ओळख असलेला किल्ले राजमाची काही तासांच्या अंतरावर आहे. तिथून वळवण लेणी व पुढे कार्ले – भाजे लेण्यांच्या जोडीकडे जाता येते. ह्याचा अर्थ हा मार्ग अगदी पुरातन होता आणि ह्याच मार्गावर असलेल्या लेण्या म्हणजे विश्रांतीचे थांबे होते. पावसाळ्यात बौद्ध भिक्षु ह्याच लेणीत विसावत असत आणि म्हणून लेण्यांना “वर्षावास” असे सुद्धा म्हणतात. कोंडाणे लेणी सह्याद्रीतील पहिली लेणी असल्यामुळे दगड खराब असल्याचे ज्ञान बहुतेक त्यावेळी झाले नसेल व प्रचंड पावसाच्या माऱ्याने झीज होऊन सरते शेवटी हि लेणी अर्धवट सोडलेली काही ठिकाणी दिसून येते. तरी सुद्धा शंकेची पाल चुकचुकते आणि मनांत विचार येतो की, आक्रमकांकडून स्तूप भग्न केला गेला कि पावसाने झिजला ? ह्याचा अंदाज येत नाही परंतु जे आज शिल्लक आहे ते मात्र अद्भुत आहे. खालील फोटोत पाहू शकता. ह्याच व्यापारी मार्गावरील घाटावर असलेली कार्ला लेणी प्रसिद्ध आहेच व ह्या लेणीत एका शिलालेखात नहपानचा जावई उषवदत ह्याने भिक्षुसंघाला मामल विषयातील “करजिक” नावाच्या गावाचे दान दिले असा उल्लेख आहे. ह्यातील करजिक म्हणजे कर्जत आहे आणि म्हणूनच पुरातन मार्गावरील हे कर्जत नक्कीच ऐतिहासिक ठरत आहे.

प्राचीन व्यापाराचा विचार करता, कर्जतच्या जवळच कल्याण बंदर होते आणि ह्याच परिसरातून घाटावर जायला विविध घाटवाटा इथे होत्या. ह्याच ऐतिहासिक कर्जत मधून भीमाशंकरला जायला पायवाट आहे आणि आजही वर्षभर तिथूनच ह्या श्रद्धास्थानाला भेट द्यायला लोक ये-जा करत असतात. कर्जत ऐतिहासिक आहे आणि ते जाणून घेण्यासाठी मी फेसबुकवर ऐतिहासिक पाऊलखुणांचे कर्जत हे पेज सुरु केले. ज्यावर बऱ्याच पाऊलखुणांची माहिती अगदी फोटोंसकट देत आहे म्हणूनच ह्या पेजला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

असे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतची ओळख आज फार्महाऊस सिटी होत चाललेली आहे, ज्याची मुळातच खंत वाटते आणि ह्या पाऊलखुणा आज सर्वांना माहीत व्हाव्यात म्हणून हा लेख प्रपंच !
माझा हा लेख मुंबई आवृत्तीतील तरुण भारत ह्या वृत्तपत्रात दिनांक ५ मे २०१९ ला होता, खालील लिंकवर तुम्ही पाहू शकता.
http://epaper.mahamtb.com/index.php?edition=Mpage&date=2019-05-05&page=8
लेख कसा वाटला हे sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
Kondana Caves

Excavated out of solid rock some 2,100 years ago, Kondana Caves are a group of 16 Buddhist caves situated 33 km north of Lonavala and 16 km northwest of Karla Caves.
The location of these caves is on the same hill as Rajmachi Fort. The easiest point of access is to head south out of Karjat, through Kondivade village and on to Thakurwadi village. Parking is on the left in an open clearing with a single shack/stall that I imagine is in operation during the monsoon season.
Having parked up it’s a 30 minute easy hike up the side of the hill to reach the caves. The pathway is relatively clear, but for a few rupees you may be able to get one of the local children to show you the way.



During my visit in early 2017 it was clear that some work has been undertaken to start renovating the caves and their access. Pillars inside the Chaitya has been reinstated (not from original stonework), and strewn across the floor inside and outside the Chaitya were stone slabs which apparently will be used to create a new floor for the caves and to help repair some of the path.





The local boys told us that nothing much has happened in the last year, so for now all of this masonry acts as a bit of a hazard as you try and explore the caves on foot.





That aside, it’s a wonderfully atmospheric and beautiful setting, and all the better for being less known about compared to the nearby caves of Karla, Bedse, and Bhaja. The chances are if you visit Kondana Caves out of monsoon season you will have the place to yourself.





Right outside the Chaitya is a damaged carving of Yaksha, guardian of Kondana Caves. They are mythical creatures hence the pixie-like ears. There is an inscription to the right of his head mentioning Baluka , disciple of Kanha.

Immediately to the left of Yaksha and the Chaitya, at a higher level, is a very spacious monastery.






If you’re wondering why the caves seem to be so damaged and are being restored, an earthquake in the early 1900s destroyed the floor, many stupas, and the front entrance of the caves. I really hope all this repair and restoration work will be completed soon, although as progress seems to have halted I’m not holding my breath on that one.






My thanks must go to :
- Amar Reddy – for accompanying me on my visit to Kondana Caves
- Saili Palande-Datar – for helping explain the pixie/spock-like ears of Yaksha



Please ‘Like’ or add a comment if you enjoyed this blog post. If you’d like to be notified of any new content, just sign up by clicking the ‘Follow’ button.
If you’re interested in using any of my photography or articles please get in touch. I’m also available for any freelance work worldwide, my duffel bag is always packed ready to go…
KevinStandage1@googlemail.com
कोंडाणे लेण्यांचा दर्शनी भाग कूठे आहे?
रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळची कोंडाणे लेणी अती प्राचीन असून भंग झालेला त्याचा बराचसा भाग पाहून देखील एकेकाळी ही लेणी भव्य, रेखीव व कलाकुसरीने नटलेली असावीत हे ध्यानी येते. थेरवादी परंपरेच्या या लेण्या राजमाची किल्ल्याच्या उत्तर कडयाच्या खाली येतात. लेण्यांचा हा परिसर पावसाळ्यात अलौकिक सौंदर्याने नटलेला दिसतो.
हिरवीगार वृक्षवल्ली, जागोजागी वाहणारे ओहोळ व मध्येच फेसाळत वाहणारे ओढे यांचे दर्शन पावसाळ्यात नेहमी होते. कोंडाणे समूहात एक चैत्य व ७ विहार आहेत. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात ती खोदली गेली आहेत. दर्शनी भागात टिकून राहिलेली चैत्याची कलाकुसर श्रेष्ठ दर्जाची असून पिंपळ पानाच्या आकाराची आहे. या चैत्याच्या उत्तर बाजूकडील विहारांसमोर पावसाळ्यात मोठा पाण्याचा लोट कोसळत असतो. या डोंगरात ठिकठिकाणी असलेले धबधबे कोसळताना पाहून नयनरम्य दृश्य पाहिल्याचा आनंद मिळतो. त्यात कोंडाण्याच्या या आखीवरेखीव पण क्षती पोहोचलेल्या लेण्या पाहताना मन संमिश्र भावनांनी भरून जाते.
इतका सुंदर चैत्याचा दर्शनी भाग असलेले लेणे पूर्ण अवस्थेत असतेतर भारतातील उत्कृष्ट लेण्यांमध्ये त्याची गणना झाली असती. असे काय झाले असेल की या लेण्यातील चैत्याचा खालील दर्शनी भाग तुटून गेला असेल. येथे पूर्वी लढाई झाल्याची सुद्धा नोंद नाही. त्यामुळे तोफांच्या माऱ्यात लेण्यांचा खालील दर्शनी भाग तुटण्याची शक्यता कमी वाटते. ऊन-पाऊस यांच्या माऱ्याने देखील खडकांना भेगा पडतात. पण तसे कोंडाणे येथे झाले असेल असे वाटत नाही. एकेकाळी तुटून खाली गडगडत गेलेले भाग आज जमिनीत गाडले गेलेले आहेत. वेदीकापट्टीची कलाकुसर केलेले चैत्याच्या पाषाणाचे भाग आजही तेथील जमिनीत घुसलेले दृष्टीस पडतात. लेण्यांचा दर्शनी भाग कोणत्या काळात तुटून पडला याबाबत काहीच माहिती ज्ञात होत नाही.

याबाबत संशोधन केले असता आश्चर्यकारक माहिती प्राप्त झाली. आपल्या महाराष्ट्राला भूकंपाची परंपरा आहे. आजच्या पिढीला फक्त १९६७ सालचा कोयनेचा भूकंप व १९९३ सालचा लातूरचा भूकंप माहित आहे. त्या अगोदरच्या भूकंपाच्या नोंदी अठराव्या शतकापासून नियमित घेतलेल्या आढळतात. पण अठराव्या शतकापूर्वी झालेल्या भूकंपाच्या काही थोड्याच ठराविक नोंदी उपलब्ध आहेत. प्राप्त झालेल्या भूकंपाच्या डेटानुसार खालील प्रमाणे भूकंपाच्या नोंदी आढळतात.
१) इ.स.१५२४ मध्ये दाभोळला सुनामी आली होती.
२) इ.स.१५९४ मध्ये माथेरान परिसरात भूकंप झाला होता.
३)
त्यानंतर २६ मे १६१८ मध्ये मुंबई इलाख्यात प्रचंड मोठा भूकंप झाल्याची
नोंद आहे. मुंबई किल्ला ते पुणे पर्यंतचा भाग या भूकंपाने हादरला होता. दोन
हजार माणसे दगावली होती. याचा अर्थ त्या भूकंपाची तीव्रता खूपच होती.
सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक भूभाग वरखाली झाले असावेत. जमिनीला
मोठमोठ्या भेगा पडल्या. या भूकंपात कोंडाणे लेण्यांचा खालील दर्शनी भाग
तुटून खाली पडला असावा अशी शक्यता वाटते.
४) इ.स.१६७८ मध्ये माथेरान-कर्जत भागात मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी सुद्धा लेण्यांची, डोंगरकड्यांची पडझड झाली असावी.
५)
पुढे ९ डिसेंबर १७५१ मध्ये पुन्हा वांगणी-माथेरान भागात भूकंप झाल्याची
नोंद आहे. त्यावेळी देखील लेण्यांची व किल्ल्यावर बांधलेल्या अनेक
बुरुजांची हानी झाली असावी.
६) पुन्हा ५ जानेवारी १७५२ मध्ये बदलापूर- नेरळ भागात भूकंपाचा हादरा बसला.
७) एक महिन्यांनी म्हणजे ५ फेब्रुवारी १७५२ मध्ये परत लोहगड-लोणावळा परिसरात मोठा भूकंप झाल्याची नोंद आहे.
त्यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र आहे असे दिसून येते. व भूमंडळ अनेकदा येथे डळमळले होते हे कळते. इ.स.१६१८ मधील भूकंपाने निर्माण झालेली चिपळूण भेग ही मुंबई बेट पासून संगमेश्वर पर्यंत आहे. पश्चिम किनारपट्टी भेग ही ठाणे खाडी ते पारसिक हिल (बेलापूर-वाशी भूभाग ) पर्यंत आहे. घोड नदी भेग ही जवाहर पासून पुणे जिल्ह्यातील भिगवण पर्यंत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा हे झोन चारमध्ये मोडतात. थोडक्यात भूकंपाने अनेक लेण्यांची आणि किल्ल्यांची हानी झालेली आहे.

यास्तव १७-१८ व्या शतकात बदलापूर कर्जत, माथेरान, लोणावळा, वांगणी येथे वारंवार झालेल्या या चार भूकंपामुळे लेण्यांची व पुरातन ऐतिहासिक वास्तूंची अपरिमित हानी झाली असावी असे स्पष्ट दिसते. तसेच कोंडाणे लेण्यांचा दर्शनी भाग याच दरम्यान तुटून खाली पडला असावा यास पुष्टी मिळते. त्याचमुळे आज आपल्याला कोंडाणे लेण्यांतील चैत्य व इतर विहारांचा कलाकुसर केलेला दर्शनी भाग आढळून येत नाही. तिथला यक्ष दिसत नाही. जेव्हा कधी तेथील जागेत उत्खनन होईल आणि जमिनीत गाडले गेलेले कलाकुसर केलेले तुटलेले भाग बाहेर काढले जातील, तसेच घरंगळत गेलेले अवशेष मिळतील तेंव्हाच कोंडाणे लेण्याचे खरे सौंदर्य जगापुढे येईल.
( डेटा प्राप्त – A सेस्मिक सेंटर, पुणे )
लेण्यांचा जगात -कोंडाणा लेणी / Kondane Caves
![]() |
| पिपळाच्या पानाच्या आकाराची कमानी |
![]() |
| पहिल्या गुहेंत असलेलं स्तूप |
![]() |
| नक्षीकाम |
![]() |
| विरहाराच्या भिंतीवर कोरलेलं स्तूप |
![]() |
| विहार |
जाण्याचा मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत ट्रेन ने प्रवास पुढे , श्रीराम ब्रिज ते कोंदिवडेगाव रिक्षाने जावे
जेवणाची सोय- गावामध्ये जेवणाची सोय होते ,पाणी स्वतः घेऊन जावे .
बघण्यासारखे - कोंडाणे धबधबा , सह्यन्द्रीचे सोंदर्य , प्राचीन बौद्धिक लेणी , लेण्यांचा अप्रतिम रेखीव कोरीव काम
व्हिडीओ स्वरूपात बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की भेट द्या ,आणि चॅनेल subscribe करायला विसरू नका
धन्यवाद . !
अंकुश सावंत .
कोंडाणा लेणी (Kondana Caves)
कर्जत मधल्या कोंडिवडे गावात या बोध्दकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेल्या आहेत. राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच आपणाला या लेणी लागतात. कोंडाणे लेण्यात एक चैत्यगृह, सात विहार आणि दोन गुहा आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात. अंदाजे नऊ मीटर उंचीचे चैत्यगृह येथे आहे. पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे कोरलेले दिसते. यापटातील काही नृत्यकलाकारांच्या हाती धनुष्य-बाण आदी आयुधे आहेत. या शिल्पांवर वस्त्रप्रावरणे, अलंकारही आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते. दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटांच्याखालीच दोन्हीकडे यक्षांची भव्य शिल्पे कोरलेली असावीत. परंतु ती आता भग्नावस्थेत आहेत. या भग्न यक्षाच्या डाव्या खांद्यावर प्राचीन ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ‘कन्हस अंतेबासिन बलकेन कतं’ या लेखाचा अर्थ असा की, ‘कन्हाचा अंतेवासी (शिष्य) बालुक याने (हे काम) केले’. कलते खांब, झुकत्या भिंती आणि खोदकामात केलेला अर्ध उठावाचा वापर येथे दिसतो. या गृहास आधार म्हणून मूळ दगडातील २८ खांब येथे कोरलेले होते. अत्यंत प्रमाणबद्ध असलेले हे अष्टकोनी खांब इतिहासात आक्रमकांच्या हल्ल्यात तोडले गेलेले दिसून येतात. चैत्यगृहाच्या मध्यभागी दहा फूट व्यासाचा स्तूप आहे. या स्तूपाचा विध्वंस झालेला दिसतो. गजपृष्ठाकृती छत असलेल्या या चैत्यगृहात छताला अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहेत. कार्ले, भाजे येथील लेण्यातही असे वासे दिसून येतात.
खुणावतोय कोंढाण्याचा धबधबा!
नेरळ – कर्जत तालुक्यात कोंढाणे लेणी असून तिथे एक मनमोहक धबधबा फेसाळतो. वर्षासहलीसाठी येत अनेक पर्यटक या कोंढाणे धबधब्याचा मनमोहक आस्वाद घेतात. कर्जत रेल्वे स्टेशनवरून १२ किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या कुशीत आणि राजमाची किल्याच्या पायथ्याशी असणारे हे नितांत सुंदर ठिकाण आहे.
कर्जत (आमराई) येथून दर पंधरा मिनिटांनी सुटणा-या मिनीडोअर रिक्षाने २० मिनिटांत आपण कोंढाणे गावात पोहचतो. तेथून जंगल आणि थोडासा डोंगर असे साधारणपणे दीड किलोमीटर अंतर चढत असताना विविध आयुर्वेदीक औषधी वनस्पती, कधीही न पाहिलेले पक्षी यांचे निरीक्षण करीत आपण सम्राट अशोककालीन बौद्धलेण्यांपर्यंत कधी पोहोचतो तेच कळत नाही. येथे पोहचल्यावर लेणी पाहून मन प्रचंड उल्हासित होते, येथील १६ लेण्यांचा समूह, चैत्य विहार आणि स्तूप पाहिल्या नंतर डोळ्यांचे पारणेच फिटते. पावसाळ्यात येथील डोंगरावरून लेण्यांना कवेत घेऊन कोसळणा-या धबधब्याचे जे सौंदर्य आहे ते तर अप्रतिमच असते.
पाण्याचे ते तुषार अंगावर घेत येथे जो एकदा भिजला तो पुन्हा पुन्हा येथे येणारच. धबधबा पाहायला जाताना कोंढाणे येथील क्षीरसागर आणि कदम यांचेकडे जेवणाची ऑर्डर दिल्यास परत भिजून आल्यानंतर मिळणारे सुग्रास आणि गरमागरम जेवणाची लज्जत तर खूपच छान आहे. तर मग चला निघा कोंढाणा धबधब्यावर मज्जा करायला.
गेल्या चार वर्षापासून रखडलेला ट्रेक अखेर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी
पूर्ण झाला. माझ्या Estimate Trek च्या List मधला हा राजमाची ट्रेक आता My
Treks च्या Done List मध्ये गेला होता. खुप आनंदी होतो.
लोणावळ्यावरुन परत येण्यासाठी रेल्वेचं आरक्षण सुध्दा झालं होतं.
सगळी तयारी झाली होती. आणि तो दिवस उजाडला. पहाटे ३:४५ ला उठून भरभर सगळं
आवरुन मलुंड स्टेशन गाठलं. स्वप्नेश घाटकोपरवरुन ४:५८ च्या खोपोली ट्रेन
मध्ये बसला. मी पण त्याच ट्रेन मध्ये ५:१४ ला बसलो. मोबाईल, पाॅवरबॅंक,
चार्जर, पैशाचं पाकीट वगैरे सामान पावसाने ओलं होऊ नये म्हणून
प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गाठ बांधून सेफमध्ये ठस केलं. तेव्हा आठवलं की
महाराष्ट्र राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली आहे, म्हणूनच मला पिशव्या
सापडत नव्हत्या. पण मग आता दुसरा पर्याय पण नव्हता माझ्याकडे. मग ७:४३ ला
कर्जत स्टे. ला पोहोचलो. घरुन चपात्या बांधून आणल्या होत्या. ट्रेन पकडायला
उशीर नको म्हणून घरुन काहीच खाऊन निघालो नाही. इथे पोहोचल्यावर नाष्टा
केला आणि पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर पडलो. श्रीराम पूल पर्यंत चालत जायचं
होतं. वाटेत शाळेची मुले गणवेशात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी जात असलेली
दिसली. त्यांना पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. पुढे एक फुगेवाला
तिरंगी रंगाचे फुगे घेउन उभा असलेली दिसला.
| डावीकडे स्वप्नेश आणि मी |
तर या वाटेने चालत आम्ही कोंढाणे लेणी नावाच्या पाटीजवळ येऊन पोहोचलो. इथून एक मळलेली पायवाट डावीकडे जाताना दिसली. त्या वाटेने चालू लागलो..
३ ते ४ तास लागतात राजमाची पर्यंत पोहोचायला असं ऐकून होतो. पण आम्हाला ३ तासातच पूर्ण करायचा होता. कारण लोणावळ्यावरुन ७:२५ ची परतीची ट्रेन पकडायची होती. बोलता बोलता पहिल्या टेकडीवर येऊन पोहोचलो. इथून पुढे सपाट जमीन होती. समोरचा धुक्यात लपलेला डोंगर आणि पायाखालून वाहणारे झरे मनाला आनंद देणारे होते.
एक तासाची पायपीट केल्यानंतर लांबूनच घनदाट कीर्र् झाडीत लपलेली कोंढाणे लेणी दिसून आली.
| कोंढाणे लेणी |
| कोंढाणे लेणी |
कोंढाणे लेणीत एक चैत्यगृह आणि आठ विहार आहेत. एक अर्धाकृती स्तूप आहे. ही लेणी इ.स.पू. दुसऱ्या शतकात हीनयान पंथीयांनी कोरली असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे येथील काही भागाचे डागडुजीचे काम चालू आहे. या लेणीत आल्यानंतर आजुबाजुचा परिसर फार सुंदर आणि मनमोहक दिसतो. प्रथमदर्शनी आपल्याला वेधून घेतो तो या लेणीवरुन कोसळणारा धबधबा. त्याखाली भिजण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही..
| छोटी चैत्यगवाक्षे आणि छज्जे व त्याबाजुला असलेले विहार |
| चैत्यगृहाची मजबूत कमान |
| चैत्यगृहाची दर्शनी बाजू |
| विहारातून घेतलेले धबधब्याचे सुंदर दृश्य |
| विहारातील भग्न झालेले स्तंभ |
| विहारातील कक्ष |
| विहारातील कक्ष |
कोंढाणे लेणीचं अद्भुत दृश्य पाहून पुढच्या प्रवासाला निघालो. इथपर्यंत आम्हाला एक तास लागला. अजुन आम्हाला दोन तासाची चढाई करायची होती.
| खडी चढण पार करुन घेतलेली विश्रांती |
| पुन्हा पठार पुन्हा जंगल |
Kondhane caves is located about 15 kms further south from Karjat, a popular holiday destination just 50 kms south from Sion along the Mumbai Pune National Highway 4. The caves are in the Sahyadri hills, and overlook the Ulhas river very close to its origin, in a valley north of the Rajmachi hills formed by mountain streams draining the northern slope of those hills.
The idea of visiting the caves was initially based on revisiting Rajmachi, where we had done some great mountain biking a few years back. One of the routes to climb up to Rajmachi fort is from Kondhane caves. But I wanted to cycle there all the way and avoid driving to the base like we did previously. Hence I planned to only visit the caves after cycling to the base village of Kondhivde. This was in September, and it was still raining, with the last few days of the monsoon. The weather was great and I did not want to miss a chance at a monsoon ride.
I
cycled along NH4 till Chowk, from where I turned on to SH 79 towards
Karjat. However, on the map I noticed a road that leads to the south, to
the right from SH 79 just about a kilometer from Chowk junction. This
is the road that leads to Bhilavle dam.
I
reached Bhilavle dam, with the road over the dam leading to across to
the other side. Bhilavle is a great place for a picnic if you want to
avoid the crowds at Karjat, and is close to the highway
I
stopped for a while to admire the beautiful though artificial lake. The
monsoon clouds cast their dark reflection in the reservoir, while the
cold wind blew across the waters.
On
the other end of the dam, the road slopes downwards, and is lined with
thick bamboo trees on either side, creating a green arched tunnel under
them. But I had a surprise waiting at the end of this green tunnel!
As
I came out from the bamboo tunnel, I was regaled by the sight and sound
of this gushing water fall created by the overflow of the water in the
lake!
I
went closer to the waterfall and stood admiring the water and the
beautiful house located so perfectly next to it. I wonder who is the
lucky owner of that place!
After
Bhilavle, the tar road ends, but continues north towards Palasdari as
this mud road. This was an unexpected bonus of an off-road ride for me. I
met this bunch of kids returning home from their school (half day on
Saturday)
The
road winds through open meadows with some large mango trees like this
one marking their territory. Thankfully it was cool and cloudy and not
at all hot. And though the clouds were loaded and dark, they were
holding back the rain.
The
mud road joins the Karjat Khopoli road. The road surface of this one
was even worse than the Chowk-Karjat SH 79, and in fact worse than the
mud road! But it was lined on both sides with thick bushes of wild
flowers
At Palasdari, I turned off the Karjat Khopoli road towards Palasdari station. Again this was a beautiful tree-lined mud road.
When
I arrived at the railway line, I asked a few village kids directions to
cross to the other side, and they told me to go left to the station and
cross the tracks. However, on the map I could see that there was a path
leading to the right that seemed to pass under the tracks through a
tunnel similar to the one in this picture. I decided to explore that
route and avoid crossing the tracks with my cycle.
And
sure enough, the path did lead me to a railway crossing. I crossed it
hoping that the road would continue beyond and join the tar road on the
southern banks of the Ulhas river, leading up to Kondhivde
But that was not to be. The road ended abruptly at this stream that was flowing through a tunnel under a second set of tracks!
Having
ventured so far and confident that Google maps cant be that bad, I
hoped this was just a temporary flooding of the road that the map
confidently showed leading to the other side. I got my shoes off, tied
them to the handle and waded through the water. The water was waist deep
in the tunnel, and I hoped it got back on to a proper road on the other
side.
But what I encountered on the other side was lush green rice fields with a small path leading through them.
I
continued riding through but soon had to get off and walk because the
mud was slushy and my tires dug into it over 6 inches deep
But
I managed to get out of the muddy road onto the tar road eventually,
and my adventure paid off. I warmed myself with a hot cup of tea and
covered the last few kilometers to Kondhivde
Kondhivde is a small village with a few houses, with hens, cows and kids loitering on the road
I
parked my cycle in between two of the houses, requesting the owner to
keep an eye on it. The path to the caves is just a few meters away from
the houses and leads uphill through thick forest cover
The
first sight of the caves is dramatic! The caves are cut into this rock
face, with a waterfall easing its way down from the cliff above. There
are steps cut into the rocks that lead up to the caves.
As
you reach the actual caves they are even more breathtaking! The water
cascading down fills the air with its gushing sound, drowning out the
other sounds of chirping birds in the forest. The caves are just
beautiful, and the main Chaitya hall (chaityagriha) is close to where
the steps end
Kondhane
caves were first discovered by Vishnu Shastri in 1850. Kondhane, Bhaja
and Karla are caves that are located around Lonavale. In fact, Dr. D. J
Wilson in his writings mentions that the name Lonavala may be corruption
of Lenavali – or the grove of caves! (ref)
The
caves face north-west, and the first excavation to the south-west is a
chaityagriha, a large prayer hall 26ft8in wide, 26ft5in high to the
crown of the arch. The nave in front of the dagoba (stupa) is 49ft in
lendth by 14ft8in, and the dagoba is 9.5ft in diameter. There are seven
pillars on either side of the hall, though these are not the original.
On the left side is a fragment of a sculpture – part of the head of a
single figure whose features are destroyed but the details of the
head-dress show the most careful attention to finish of detail. Over the
left shoulder is an inscription in one line in Mauryan characters
dating to the second century BC or slightly later, which reads “Kanhasa
antevashina Balakena katam” which translates to “Made by Balakena, the
pupil of Kanha (Krishna)” (ref).
There are markings on the side of the roof that indicate that there
were wooden ribs set into them, similar to the ones found in the Bhaja
caves chaityagriha. The facade has a large horseshoe-shaped arch,
supported by curved wooden beams.
The
dagoba or stupa inside the chaityagriha is 9.5 feet in diameter, with a
capital on top representing two coffers, one above the other, with
carvings on the sides with the Buddhist rail pattern (ref).
The stupa is in a damaged condition, and one can see large rock pieces
on the floor that could have been part of the roof. A large part of this
damage is presumably due to severe earthquakes in the Pune region that
occurred between 1752 to 1812 (ref)
The
whole portico-area is carved to imitate a multi storeyed building with
balconies and windows and sculptured men and women who observed the
scene below. This created the appearance of an ancient Indian mansion (ref)
The
lower portion of this structure is carved with the Buddhist rail
pattern, the central portion is divided into seven compartments, filled
alternately, three with a lattice pattern and five with human figures –
one male in the first, a male and female in each of the third and fifth,
and a male with a bow and two females in the seventh. Over these is a
band with the representations of the ends of tie-beams or bars
projecting through it, and then four fillets, each projecting over the
one below, and the upper half of the last is serrated (ref)
The
carvings are truly exquisite, with clearly visible features such as the
garments, weapons and ornaments they wore, as well as peaceful happy
expressions on their faces. Of particular interest is how the female
figures or Yakshinis are depicted. The female form, as a heirophany and
locus of magical forces, is emphasized by depicting the figures as nude
or minimally clothed with the barest hint of a diaphanous garment and
perhaps a sash whose draping reveals rather than conceals. The broad,
ornamental girdle (mekhala) around the waist is endowed with magical
powers. A hymn in the Atharva veda praises the hip girdle for conferring
long life, vigor, wisdom, intelligence and victory. The Yakshinis also
serve as protectors of the monument itself. They guard the gates and the
perimeter of the sacred precinct (ref).
Men
and women in the Mauryan and Sunga period wore three unstitched
garments, as in Vedic times. The main garment was the antariya of white
cotton, linen or flowered muslin, sometimes embroidered in gold and
precious stones. For men, it was an unstitched length of cloth draped
around the hips and between the legs in the kachcha style, extending
from the waist to the calf or ankles or worn even shorter by peasants
and commoners. The antariya was secured at the waist by a sash or
kayabandh, often tied in a looped knot at the center front of the waist.
The kayabandh could be simple sash, vethaka; one with drum-headed knot
at the ends, muraja; a very elaborate band of embroidery, flat and
ribbon-shaped, pattika; or a many-stringed one, kalabuka. The third item
of clothing called uttariya was another length of material, usually
fine cotton, very rarely silk, which was utilized as a long scarf to
drape the top half of the body (ref)
At
a slightly higher level to the north-east of the Chaitya is a Vihara –
or the living quarters. The hall inside is 23 ft wide and 29 ft deep,
and 8ft3in high. It has 15 pillars arranged about 3 feet apart and 3.5
feet from the side and back walls, but none across the front. The upper
portions of these pillars are square, but about 1.5 feet from the top
they are octogonal. The bases are all gone, but they were probably
square as well. The roof is paneled in the imitation of a structural
hall with beams running through the heads of the pillars, and the spaces
between divided by smaller false rafters (ref)
There
are three wide doors into the hall, though most of the front wall is
broken away. There also was a verandah in front that is all destroyed
now except for a small bit at the left end (ref).
This
small remaining bit of the verandah has a raised recess, and under a
chaitya arch is a small dagoba in half relief – probably the only object
of worship when these caves were being excavated (ref). It is sad to see how visitors are defacing these sacred sites.
The
view from the cave is of the Bhor ghats on the opposite side of the
Ulhas river valley, and if you’re lucky you could see the train chugging
along the tracks.
A
last look at the caves, with the dramatic waterfall and caves full of
stories of an age when Lonavala was Lenavali – the grove of caves!
But before I left, I did not miss the chance to get under the waterfall,
and cleanse myself of the sweat and grime after cycling over 90 kms
from Mumbai and through an exciting off-road section full of mud.
On
the way back, I stopped to enjoy the view of these rain water
harvesting lakes, dug into the ground while thoughtfully leaving clumps
where trees grew. Their reflection in the water, with the monsoon clouds
above was a sight that could keep you mesmerized, staring for hours.
Back
in Kondhivade, I spent some time chatting with this family. The women
and children were enjoying a break from their daily chores, while the
men were out working in the farms.
This
little boy was so full of energy! He had made stilts out of two sticks,
and was running at full speed all around me. I managed to capture this
picture when he took a rare break in his stride.
On
the way back, it was already 5:30 pm as I had spent over 3 hours at the
caves. I thought I would catch the train from Karjat and reach early.
However, the station master just would not allow me to get on to the
station with the cycle – let alone giving me a ticket. In a huff, I
decided I’m going to cycle back home – and that too by taking a longer
route via Ambernath and Shil Phata. Well I did reach home, but it was
already dark, raining, and my lights were not really prepared for that
long ride in the dark. I reached home late, exhausted after a total of
over 192 km of cycling and a short trek – but completely satisfied at
having spent a day full of adventure and fun!
https://bijoor.me/2014/12/27/cycling-to-kondhane-kondane-caves/







No comments:
Post a Comment