Thursday, August 17, 2023

गोंदेश्वर पंचायतन सिन्नर

   भारतीय स्थापत्यशैलीचा ज्ञात इतिहास सुमारे सात हजार वर्षांपूर्वींचा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची मोहेंजोदडो आणि हडप्पा ही देशातली आद्यसंस्कृती समजली जाते. त्या काळातही भारतीय वास्तुकला उच्चकोटीची असल्याचं, पुरातत्त्व खात्यानं केलेल्या उत्खननात आढळून आलं आहे. नंतरच्या काळात वास्तूशैलीमध्ये अधिकाधिक विकास होत गेला. ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात तत्कालीन मगध (सध्याचं बिहार) साम्राज्याचा विकास झाला. राजगृह या राजधानीच्या नगरात वास्तुकलेचे विविध प्रकार उदयास आले. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात याच प्रदेशात मौर्यांचं साम्राज्य उदयास आलं. कपिलवस्तू, कुशीनगर, उरुबिल्व अशी मोठी नगरं उदयास आली. वास्तुकलेला राजाश्रय मिळाल्यानं अनेक स्तूप, चैत्य, विहार, स्तंभ आणि गुहामंदिरांची निर्मिती झाली. आधी दगड, नंतर भाजलेल्या विटा आणि नंतर बांधकामामध्ये लाकडाचाही वापर होऊ लागला.मगधमधल्या वास्तुशैलीचा विस्तार थेट महाराष्ट्रातल्या कण्हेरी (मुंबई) जुन्नर (पुणे जिल्हा), अजिंठा आणि वेरूळ (औरंगाबाद) आणि गांधारपर्यंत (सध्याचं कंदाहार, अफगाणिस्तान) झाला होता. राजमहाल आणि धनिकांचे महाल, समाधी, गिरीदुर्ग आणि भुईकोट, कलात्मकतेनं सजलेल्या विहिरी (बावडी) आणि नद्यांवरच्या घाटांमध्ये ही वास्तुशैली दिसत होती. उत्तरेत एक विशिष्ट शैली प्रमाण मानली जाऊ लागली, तर दक्षिणेत वेगळ्या पद्धतीच्या गोपुर या वास्तुशैलीचा विकास झाला होता. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासूनच मंदिरांवरच्या शिखरांना महत्त्व प्राप्त झालं. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव सम्राटांपैकी रामचंद्रदेवराय यांच्या कारकिर्दीत हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हे १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान होते. ते उत्तम वास्तुशिल्पकारही होते. दख्खनच्या पठारावर त्यांनी विकसित केलेल्या शैलीत अनेक मंदिरांची उभारणी झाली. अशी मंदिरं हेमाडपंती म्हणून प्रसिद्ध झाली.





   हेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना म्हणजे वेरुळचं घृष्णेश्‍वर मंदिर आणि औंढा नागनाथ मंदिर. दगडी बांधकाम करताना चुन्यामध्ये विविध प्रकारची घटकद्रव्यं वापरून तयार केलेल्या दर्जाचा वापर केला जात असे. हेमाडपंती पद्धत सर्वस्वी वेगळी होती. यात चुन्याचा वापर करण्यात येत नव्हता. दगडांना खाचा आणि खुंट्या करून, ते एकमेकांत गुंतवले जात. पायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकांत गुंफले जात आणि एकसंध रचना उभी राहत असे. या पद्धतीमुळं संपूर्ण बांधकाम भक्कम आणि टिकाऊ बनतं. आजही अशी मंदिरं पाहता आणि अभ्यासता येतात. 
   नाशिकमध्ये दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे. यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर एक. यादव काळातील हे मंदिर नाशिकचं सौंदर्य आहे.पुणे -नाशिक हमरस्त्यावरील सिन्नर हे एक महत्वपुर्ण आणि प्राचीन वारसा असणारे शहर. प्राचीन काळी सिन्नरचे नाव होते 'गिगणापुर'. पुढे बाणासुर राक्षसाने हि नगरी उचलून पालथी केली म्हणून आजही येथे थोडे उकरले तरी बरेच प्राचीन अवशेष सापडतात.  इ. स. १०२५ च्या सुमारास भिल्लम तिसरा यांचे राज्य चालुक्यांच्या अधिपत्याखाली होते.सिन्नरचे पुढील काळात नाव पडले सिंंधिन्गर उर्फ सेनुनापुर कारण त्याची स्थापना सिंगुनी या गवळी राजाने केली. त्याचाच उत्तराधिकारी असणार्या त्याचा मुलगा रावगोविंदराजा नावाच्या यादवराज पुत्रावरुन या मंदिरास गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे. या राजावरूनच मंदिराचे नाव हे मंदिर इ. स. ११६० साली बांधले असावे, असा अंदाज अभ्यासक लावतात. सेउना’ म्हणजेच यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा. ‘सेउनाचंद्र’ या राजाने वसविलेले ‘सेउनापुरा’ म्हणजेच सिन्नर. सेऊणचंद्राने 'सेऊणपुरा' या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वस्ती निर्माण केली असे काही ताम्रपटात म्हटल्याचे दिसते.खिलजीच्या आक्रमणामुळे ह्या राजवटीची वाताहत झाली.
हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे.

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. लोक म्हणतात की उत्तम शिल्पकला पाहावयाची असेल तर दक्षिणेत जावे असे म्हटले जाते, पण दक्षिणेतील शिल्पकलेची तुलना करता येईल, असा शिल्पकलेचा नमुना सिन्नरमध्ये हेमाडपंथी गोंदेश्वर मंदिराच्या रुपाने नांदतो आहे.  हे मंदिर १२५ फूट लांब आणि ९५ फूट रुंद आहे. प्राकारात एकूण पाच मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैवपंचायतन असं म्हटलं जातं.पंचायतन म्हणजे पाच मंदिरांचा समूह जेथे मुख्य मंदिर हे श्री शिव शंकराचे असून, सभोवतालची इतर चार मंदिरे ही जगदंबा म्हणजेच पार्वती, श्री विश्वेश्वर म्हणजे श्री विष्णु, श्री विनायक म्हणजे गणपती, आणी ग्रहां मध्ये सर्व श्रेष्ठ असे सूर्य नारायण म्हणजेच सूर्य असे आहे. ही मंदिरे मुख्य मंदिराच्या चार कोपर्‍यावर स्थापित आहेत.हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वेला असून दक्षिण व उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहे. तलविन्यासानुसार हे मुख्य मंदीर अंबरनाथ येथील मंदीरासारखे आहे. फरक केवळ अर्धमंडपाच्या रचनेत आहे. या मंदीरात अर्धमंडप अधीक विस्तृत असून त्यांच्या भोवतीच्या भिंतीमु़ळे येथे कक्षासन उपलब्ध झाले आहे. अंबरनाथ मंदीरात मात्र असे कक्षासन नाही. 

मंदिराची संरचना  स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. मंदिराला विस्तृत आवार आहे.इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. मंदिरात जाण्यासाठी अजून काही पायर्‍या आहेत. हे भव्य दरवाजा आणी त्यावर असलेला कळसाचा डोलारा याचे वजन झेलण्यासाठी येथे दरवाज्याच्या मध्यभागी एक खांब उभारण्यात आला आहे.

     मंदिरात जाण्यासाठी प्रथम सिन्नर गाठावे. सिन्नर -शिर्डी रोडवर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डावीकडील वाट धरावी. पाचच मिनिटात आपण मंदिर परिसरात येवून पोहोचतो.  नाशिक शिर्डी रस्त्यावर असलेल्या सिन्नर गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे.हा मंदिरसमुह सिन्नर गावातच पोलिस स्टेशन / कोर्टाच्या मागच्या बाजुला आहे, सिन्नर एस्टिस्टँडपासुन रिक्षाने ४० रुपये खर्च होतो, चालत गेल्यास २० मिनिटांचा रस्ता आहे.

 सिन्नर गाव हे नाशिक - पुणे हमरस्त्यावर नाशिकच्या आधी ३० किमी अंतरावर आहे, पुण्याहुन जाणा-या सर्व एसटी या ठिकाणी थांबतातच, मुंबईहुन नाशिकला येउन मग पुण्याच्या बाजुला यावं लागेल,अहमदनगरकडुन येताना सुद्धा सिन्नर नाशिकच्या आधीच आहे, प्रवासाची सोय रात्री १० पर्यंत उत्तम आहे.सिन्नरचं एस.टी. स्टँड हे निदान बाहेरुन तरी एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं दिसतं .नाशिक ते सिन्नर अशी बस सेवा उपलब्ध आहे. 
मुंबई - घोटी - सिन्नर हे अंतर १८५ किमी आहे. मुंबई ते घोटी मुंबई आग्रा हायवेने येऊन घोटी येथे हायवे सोडून (नाशिक बायपास) रस्त्याने सिन्नर गाठावे. याच रस्त्याने पुढे शिर्डीला जाता येते.
जेवणखाण - सिन्नर औद्योगिक शहर असल्यानं इथं सर्व प्रकारचं, जेवण खाण उपलब्ध आहे, स्टँडसमोरचं पंचवटी गुजराथी थाळी ही  जेवणाची सोय.
    सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर हे एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ आहे. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं.



मंदिरा समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. गोंदेश्वराचं आवार विस्तीर्ण. भलं प्रशस्त. तटबंदीयुक्त. तटबंदीतच यात्रेकरुंसाठी देवड्या बांधलेल्या. तटबंदीच्या आत पटांगण, इतकं मोठं की क्रिकेटची मॅच सहज खेळता यावी. पटांगण मोकळं ठेवूनही मध्यभागी भलं थोरलं अधिष्ठान. त्या चौथर्‍याच्याही मध्यभागी एक प्रचंड मंदिर. इतकं उंच भूमिज मंदिर महाराष्ट्रात दुसरं नसावं. भूमी म्हणजे मजला. मंदिराचा शिखरभाग मुख्य शिखराच्या लहान लहान प्रतीकृतींनी जोडत जोडत जाऊन थेट कळसास पोहोचलेला. त्या शिखरप्रतीकृतींच्या मधूनच जाणारी सरळसोट जीवा. हीच ती भूमिज शैली. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंना चार लहान आयतनं. मुख्य मंदिर भूमिज पण त्याच्या बाजूची उप आयतनं मात्र नागर शैलीतली, मधूनच एखादं वेस्सर शिखर. ह्या विभिन्न शैलींमुळे मुख्य आयतनाला येथे कमालीचा उठाव मिळालाय. मुख्य मंदिर शिवाचे त्यामुळे हे शिवपंचायतन. मंदिराचे हे प्रवेशद्वार मात्र आडबाजूचे. मंदिरात येणारा मुख्य रस्ता ह्याच मार्गाने आल्यामुळे, मूळचे मुख्य प्रवेशद्वार मात्र पूर्वाभिमुख, नदीच्या बाजूने. पाण्याच्या स्त्रोताच्या बाजूनेच मुख्य द्वार हवे किंवा त्याबाजूने एकतरी द्वार हवे हा नियम येथेही पाळला गेल्याचे दिसतो.मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.





सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ आहे. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं. 
मंदिरा समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. या मंदिराचे आवार १२५ फुट Χ ९५ फुट आहे. 

a

a

 मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते पूर्व बाजूनं. येथेही एक आश्चर्य दडलेले आहे. खिद्रापूरच्याच स्वर्गमंडपाची लहानशी पुनरावृत्ती ह्या प्रवेशद्वाराच्या छतावर केलेली आढळते. खिद्रापूरचा स्वर्गमंडप हा तर अतिशय सुंदर आणि तो सभामंडपाच्या अगोदर, त्याला अगदी लागूनच. त्यामानाने गोंदेश्वरचा स्वर्गमंडप हा प्रवेशद्वारावर, मंदिरापासून थोडासा लांबच. पण ह्याचेही सौदर्य अजिबात उणावत नाही. आकाशाची निळाई काय खुलून दिसते येथून. भन्नाट

  मंदिराचा आवार तसा मोठा आहे. मुख्य मंदिराभोवती सुर्य, पार्वती, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत. या चारही मंदिरांची रचना जवळपास समान आहे पण जवळून पाहिल्यास फरक लक्षात येतो. प्रमुख मंदिरा भवती असलेल्या इतर मंदिरासुद्धा अप्रतिम कोरीवकाम आहे.मुख्य मंदिरा समोर नंदी आहे. हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. मुख्य मंदीर शिवाचे असून त्याच्या गर्भगृहावरती भुमिज शिखर आहे. मुख्य मंदीरासमोर असलेल्या नंदी मंड्पावर चौकोनी शंखाकृती द्रविड शिखर आहे. उरलेल्या चार आयतनावर ( बाजुच्या मंदीरावर ) नागर शिखरे आहेत. यातील एका शिखराचे प्रकाशचित्र हेन्री कझेन्स लिखीत 'मेडीव्हियल टेम्पल्स ऑफ डेक्कन' या पुस्तकात छापले आहे. शिल्पसंहितेच्या भाषेत याला लतिन नागर शिखर म्हणतात. उंच आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे.या मंदीर समुहाला असलेला अंगकोर वटसारखा उंच चौथरा किंवा जगती आणि ओडीशातील भुवनेश्वरमधील मार्केंडेय मंदिरासारखी रचना लक्षात घेण्यासारखी आहे.








    हे मंदीर एका ३७.५ मीटर X २७.६ मीटर जगतीवर उभे असून त्याला आडवे थर आहेत. शिवाय पायर्यांचीही योजना आहे.महाराष्ट्रातील वास्तुकलेत हे मंदीर म्हणजे मैलाचा दगड आहे. कारण भुमिज ( परमार ) शैलीचे सर्वात परिपुर्ण आणि विकसित रुप येथे पहायला मिळते. अंबरनाथ मंदीराप्रमाणे येथे लहान आणि मोठे असे दोन चतुरस्त्र चौकोन असून त्यांचे एकेक कोन एकमेकाला मिळतात. हे मंदिर सप्तरथ प्रकारातील आहे. 
 मुख्य मंदीराच्या काही पायर्या चढून गेल्यावर कक्षासनयुक्त अर्धखुला मुखमंडप त्याच्यामागे अंतराळ आणि अंतराळाच्या मागे गर्भगृह असा तलविन्यास आहे. मंदीराच्या मंडोवरावर म्हणजे बाह्यभिंतीवर तीन भद्रभागावर मुर्ती आढळतात. शिखराच्या वक्र निमुळत्या भागावर पट्ट किंवा लता येतात. हे पट्ट चैत्य गवाक्षांनी अलंकृत केले आहेत. मंदीराच्या मुखभागावरील शिखराच्या पट्टावर शुकनास आहे.उरलेल्या तीन पट्टावर चैत्यगवाक्षे अधिक चांगल्या उठावात कोरली आहेत. त्यामुळे याला 'पंचाडक लतिन' प्रकारचे शिखर म्हण्तात. बहुतेकवेळा शुकनासाच्या बाजुवर छोटी मंदीरे दाखवली असून त्यात देवदेवता दाखविल्या असतात. या मंदीरावर मात्र या छोट्या मंदीराएवजी त्या जागी उभ्या चौकटीची नक्षी असलेले पट्ट व त्यावर गवाक्षे दाखवली आहेत. अशाच प्रकारची गवाक्षे मुख्य शिखराच्या तळाशी आढळली आहेत. अर्धमंडपावर चौकोनी शंक्वाकृती द्रविड शिखर आहे. मुख्य कळसाच्या खालच्या बाजुस अमलसार आणि कलशाला पेलणारी चार बाजुंना चार किर्तीमुखे आहेत. ती चैत्य प्रकारची प्रतिकृती भासतात.





हे मुख्य मंदिराचं शिखर
येथील शिखर बलसाने येथील मंदीर क्र. १ सारखेच आहे. शिखराच्या चार बाजुस मध्यभागी सुक्ष्मपणे कोरीवकाम असलेले रहपग ( उभे पट्टे ) हे अंबरनाथ किंवा बलसाने येथील उदाहरणापेक्षा अधिक अरुंद आहेत. येथे त्यांच्यावर कीर्तिमुख आहेत. शिवाय छोट्या शिखरांना आधार देणारे स्तंभाच्या आकारातील घट्क उंचीला कमी आहेत. शिखरावरचा कलश मात्र मुळचा नाही. आता दिसतो तो नंतरचा आहे, म्हणून तो विशोभित आहे. या शिखराचे झोडगे आणि कोकमठाणच्या मंदीराशी साम्य आहे. 
    बहुधा दगडाच्या क्वालिटिमुळं देखील इथलं नक्षिकाम पुर्ण होउन अपुर्ण वाटतंय, निसर्गाचा परिणाम जास्त जाणवतोय...

सोंड तुटलेल्या हत्तीचे नमुने 

  गर्भगृह आणि मंड्पाच्या बाहेरच्या बाजुला देखणे खुर, पल्ल, भरदार कणी, पुन्हा भद्र, गजथर असे आडवे थर आहेत.
रत्नाकृतीच्या एका पट्ट्याने मंडोवर सुरु होते, त्यानंतर उपान आणि कर्ण हे आडवे पट्टे येतात. उपानावर कुमुद , पट्टी असून त्याच्यावर पद्म पट्टी आहे. 
  


  
 मंदिराच्या चहूबाजूला हत्तीची शिल्प आहेत. मंदिराच्या चहूबाजूला असलेल्या ह्या हत्तीच्या शिल्पातील एका हत्तीच्या सोंडेत एकदा एका चोराला हिरा सापडला म्हणून त्याने लालसेपोटी चहूबाजूला असलेल्या सर्व हत्तीची सोंड नष्ट केली अशी आख्यायिका आहे.
   मुख्य मंदीर २१ मीटर लांब आणि ५० मीटर रुंद आहे. सर्वात खाली गजथर मग भौमितीक नक्षी, नंतर बर्याच मुर्ती असणारे दोन थर, त्यावर शिखर, उपशिखरांचा भव्य कळस, अर्थात सध्या या शिखरावरचा आमलक आणि कलश नाहीसा झाला आहे. मंदीराच्या मंडोवरावर म्हणजे बाह्य भिंतीवर बरेच कोन साधले गेल्यामुळे छायाप्रकाशाचा खेळ बघायला मिळतो. शिखरावर वेलबुट्टीची आकर्षक नक्षी आहे. तसेच तांडवशिव सारख्या काही मुर्ती कोरल्या आहेत.




गर्भगृहाच्या भोवतीचे म्हणजे जंघा भागातील तीन देवकोष्ट आता रिकामे आहेत. बाहेरच्या भिंतीमध्ये उत्क्षिप्त असे चढ-उतार तयार झाले असून ते अगदी शिखरापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे छाया प्रकाशाचा सुखद खेळ बघायला मिळतो. 








 सभामंडपाचे वितान संवरण प्रकारचे आहे. गर्भगृहाचे वक्राकृती शिखर आणि मंडपाच्या संवरण दरम्यान एक शुकनास असून ते म्हणजे अंतराळाचे वितान आहे. त्यांना एकावर एक दोन देवकोष्टे असून त्यात प्रतिमा आहेत.  
 मंदीराच्या बाह्य अंगावर अनेक देवदेवता कोरल्या आहेत. त्यात ब्रम्ही, हंसावरील सरस्वती, गजलक्ष्मी अशी नामांकित शिल्प आहेत.
a
 नंदीमंडपाच्या भिंतीवरील मैथुनशिल्पे
 
मंदिरात अशी काम शिल्प का आहेत ? असा प्रश्न पडला तर त्याच्या मागचा तर्क कदाचित असा असेल कि तत्कालीन सामाजिक परिस्थितीतचं दर्शनच अशा शिल्पांद्वारे होत असतं पण ही शिल्पे आहेत म्हणून तेव्हाच्या समाजात मोकळीक, स्वैराचार असा काही होता का तर उत्तर नाही हे आहे. अर्थात तेव्हाही गणिका होत्याच. तत्कालीन साहित्यातून तसे उल्लेखही आलेले आहेत. चंद्रगुप्ताच्या पदरी अनेक विषकन्या होत्या परंतु सर्वसाधारण महिलांना आचारविचारांचं मुक्त स्वातंत्र्य होतं का तर नाही, त्यांचे जीवनही चार भिंतींंआडच व्यतीत होत असावे. तरीही ही शिल्पं का?
   तर ह्याची काही कारणे असावीत.
पुरुष- प्रकृतीचे मिलन म्हणजे मोक्ष. हे बऱ्याचदा शिवपार्वती क्रिडेच्या रुपात आपणास दिसते. उपनिषदांतही पुरुष- प्रकृति मिलनाबाबतचे श्लोक आलेले आहेत. पण शिव पार्वती क्रिडा सोडून इतरही युग्मशिल्पे दिसतात त्याचे काय आणि मंदिरांच्याच भिंतींवर का असावीत?
साधकाने अशा विचलित करणाऱ्या शिल्पांकडे पाहूनही विचलित न होता आपली साधना पूर्ण करावी व योगस्थिती प्राप्त करून घ्यावी हां तर उद्देश नसेल?
सर्वात जास्त वाटते ती चार पुरुषार्थांची शक्यता. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अर्थात ह्या चारही अर्थांचे पालन मनुष्याने आपल्या जीवनात पूर्णांषाने करावे. एक धार्मिक व दोन ऐहिक अर्थांचे पालन करून शेवटी मोक्षाप्रत पोचावे. म्हणूनच ह्या चार पुरुषार्थांची प्रतिके असलेली ही शिल्पे मंदिरांत असावीत अशी शक्यता प्रकर्षाने वाटते.
 a

हे रामायणातील काही प्रसंग
a

ह्या सुरसुंदरी, त्यात कुणी पुत्रवल्लभा, कुणी दर्पणा, कुणी मर्कटलीलांनी त्रस्त झालेली अभिसारिका

 या कमनीय बांध्याच्या सुरसुंदरी नर्तिका पाहताना मनात कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितेच्या काही ओळी मनात आठवतात

‘केशी तुझिया फुले उगवतील तुला कशाला वेणी?
चांदण्यास शृंगार  कशाला बसशील तेथे लेणी ‘
a

तर मध्येच विष्णूचे अवतार, वराह, नरसिंह

a

इतकी सारी शिल्पं बघत बघतच नंदीमंडपाला फेरी मारत निघावी आणि मुख्य आयतनात यावं. द्वाराच्या शेजारीच एक भयप्रद व्याल आपलं स्वागत करतो. इतके मोठे व्याल इकडील मंदिरांत तसे दुर्मिळच. दक्षिणेत मात्र अगदी विपुल.
प्रवेशद्वाराची चौकट येथेही व्यालांनी, वादकांनी, प्रतिहारींनी, द्वारपालांनी सजलेली आहे. प्रवेशद्वार हे मुखमंडपात आहे. मुखमंडपाचं छतही कमळासारख्या फुलांच्या आकृतीने नक्षीदार कोरलेले आहे.
आतील बाजुस तीन मीटर उंचीचे उत्तम नक्षीकामाचे खांब आहेत. त्यापैकी काहीवर रतीशिल्प आहेत. इतरही काही ठिकाणी अशी कामशिल्प दिसतात. तसेच समुद्र मंथन, रामायण, महाभारत यातील काही प्रसंग या मंदीरावर कोरलेले आढळतात. 

अर्धमंड्पाच्या छतावर वरील बाजुस लहान होत जाणारी वर्तुळे आहेत.त्यामुळे हे उस्क्षिप्त प्रकारचे शिखर असून त्याच्या केंद्रभागी लोलक आहे. 

a

गोंदेश्वराचा सभामंडप अंधारी, इथे छायाचित्रं काढणं तसं जिकिरीचं काम. इथला सभामंडपही भरजरी स्तंभांवर तोललेल्या आहे. स्तंभांवर असंख्य शिल्पं आहेत.सभामंडपात रंगशिळा आहे 

a

ही पुत्रवल्लभा, आपल्या लहानग्या बाळाला हातांवर तोलत ही त्याचे कौतुक करीत आहे.

a

ही दर्पणा, सतत आरशातच बघत असते :)

a

ही आपल्या सेवकाच्या पाठीवर पाय ठेवून स्वतःची केशरचना करीत आहे
a

हे बहुधा शिवाचे तांडवनृत्य. नंदी आणि भृंगी शेजारी असावेत.

 a

हे मैथुनशिल्प. असा उघडा शृंगार चाललेला पाहून एका सेविकेने चक्क पाठ फिरवलीय तर दुसर्‍या सेविकेने लाजून आपले डोळेच झाकून घेतलेले आहेत. :)


a

मध्येच काही ठिकाणी द्वंद्व कोरलेले आहे

 a

तर इथे एक मर्कट शिंकाळ्यातले दही चोरते आहे.

a

एका स्तंभावर उग्र नरसिंह हिरण्यकश्यपूला अंकावर घेऊन आपल्या नख्यांनी त्याचे पोट फाडतोय तर प्रल्हाद भक्तीभावाने प्रार्थना करतोय, गरुडही वरच्या बाजूस हात जोडून नम्रतेने उभा आहे.

a

नंतर बळीराजा (हा प्रल्हादाचा नातूच. वैरोचनी) हा वामनाला तीन पावले जमिनीचे दान हातांवर पाणी सोडून देतोय. दान देताच वामन त्रिविक्रमरुप प्रकट करुन पृथ्वी आणि आकाश व्यापून तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी सज्ज झालाय.

a

ही अजून एक पुत्रवल्लभा

a

मग विषकन्या दिसतेय. तिच्या एका हाती सर्प तर दुसर्‍या हाती मुंगूस असून ती दोघांनाही भिडवतेय. जणू तुम्हा दोघांवरही माझेच वर्चस्व आहे असेच ती जाणवून देतेय.

  अशी एक ना एक असंख्य शिल्पे आहे सभामंडपात. गर्भगृहाच्या दारावर देखील नेहमीप्रमाणेच दासी, प्रतिहारी, शैव द्वारपाल आहेत. आतले शिवलिंग मात्र साधेसे.



या मंदीरातील गर्भगृह साधे असून त्याची सपाटी मंडपाच्या जमीनीच्या पातळीत आहे. गर्भगृहाचे द्वार पंचशाखा प्रकारचे आहे. त्यामुळे नंदीनी प्रकारातील मध्यद्वार आहे. त्याच्या द्वारशाखावर मोठ्या प्रमाणात कोरीवकाम आहे आणि मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी त्याचे साधर्म्य आहे. अंतराळ साधे आहे व त्याच्या दोन्ही बाजुनी रिकामी देवकोष्टे आहेत. 







येथील मंडप गुढमंडप आहे. मोठ्या प्रमाणात कोरीवकाम असलेले चार स्तंभ ( २.८५ मिटर्‍ उंच) हे रंगशीळेच्या चार कोपर्यावर असून वितानाच्या मध्यवर्ती ते करोटकाला आधार देतात. अर्धमंडपातील स्तंभावर नक्षीची सजावट केलेले हस्त असून त्यावर स्त्रीशिल्पे आहेत आणि व्याल असलेले अर्धस्तंभ आहेत. यातील अनेक आता नाहीसे झाले आहेत.




 सर्व भिंती, छत, प्रत्येक स्तंभ कोरीवकामाने नखशिखांत लगडलेले दिसतात. मंदिराची द्वारशाखा, स्तंभ शाखा, वेलबुट्टी शाखा अशा विविध शाखांनी नटलेली आहे.
 आता मंदिराला फेरी मारण्यास निघावे. मंदिराच्या अधिष्ठानावर गजथर, त्यावरील जंघेवर नरथर आणि त्यावर देवकोष्ठ आहेत. सुरसुंदरी इथे मोठ्या संख्येने दिसत नाहीत तरीही त्या मंदिरांच्या भिंतींवर काही प्रमाणात आहेत. अर्धमंडपांच्या बाहेर रामायणातील बरेच प्रसंग कोरलेले आहेत. देवकोष्ठात आज मूर्ती अभावानेच दिसतात, किंबहुना त्या नाहीतच. अशी देवकोष्ठं रिकामी असलेली बरीच मंदिरे पाहिलेली आहेत. मूर्तीभंजकांमुळे भग्न झालेली असावीत किंवा कसे, पण आज ती बर्‍याच ठिकाणी नाहीत. कित्येकदा ती मंदिरांच्या आवारातच इतस्ततः भग्नावस्थेत विखुरलेली दिसतात.
इथली भिंतीवरील रामायणपटांत विविध प्रसंग कोरलेले आहेत.

 a

ही रावणानुग्रहशिवमूर्ती. वेरूळच्या कैलास लेण्यांत ह्याचं अतिभव्य असं स्वरुप आहे. अक्षरशः डोळे दिपवणारं. येथे मात्र हाच प्रसंग मिनिएचर रुपात मांडला गेलाय.

a    a

मारुती इथे अशोकवनाचा विध्वंस करताना दिसतो तर त्याच्याच पुढच्या पटात तो रावणकुमार अक्षाचा वध करताना दिसतो.

a

कधी रावणाचा दरबार दिसतो तर कधी राक्षसींनी वेढलेली सीता दिसते.

a

मधूनच सेतूबंधनाचा देखावा दिसतो तर रावणाच्या दरबारात चाललेली वानरशिष्टाई

     असेच काही रामायणातील प्रसंग वेरूळ, लोणी भापकर, किकली येथील मंदिरांतही आहेत. प्रसंग तसे भिन्न भिन्न, शैलीही भिन्न मात्र शिल्पांची रंजकता तीच. खरंच सांगतो. हे शिल्पपट, त्यातल्या मूर्ती, त्यातले प्रसंग ओळखायला खूप मजा येतं. काही वेळा काही प्रसंग अनाकलनीयच राहतात. किकलीच्या मंदिरातला गरूड आणि हनुमानात झालेली एका फळावरुन झालेली जुगलबंदी हा प्रसंग असाच अनाकलनीय. कोडं काही वेळा सुटतं, काही वेळा नाही, पण न सुटल्याची काही खंत अशी नसते.

a

 

a

a

    भिंतींच्या उपांगांवर मधूनच काही सुरसुंदर्‍या दिसत जातात, कुणी आरश्यात पाहून नटण्या मुरडण्यात वेळ घालवतेय तर कुणी वृक्षांचा आधार घेऊन उभी आहे, कुणी नुसतीच मुग्ध आहे तर कोणी हाती कमंडलू घेऊन उभी आहे. कुणी पोराला हाती घेऊन उभी आहे तर कुणाची नुसतीच लगबग चालू आहे.

a

मधूनच देवकोष्ठात चामुंडा प्रकटलेली दिसते. भयप्रद चेहरा, तोंडातून बाहेर आलेल्या कराल दाढा, हाडांचा सापळा, लोंबलेले स्तन, पोटात विंचू, प्रेतवाहना अशी ती सहज ओळखू येत असते. ही चामुंडा शीळ देखील वाजवती आहे. अशाच व्हिसलींग चामुंडा  पिंपरी दुमाला, खिद्रापूर येथेही दिसतात. भुलेश्वरला चामुंडेचं एक अप्रतिम शिल्प आहे. 

a

   चामुंडा म्हटल्यावर भैरव आलाच. येथे एक भैरवाची अष्टभुज मूर्ती आहे आणि ती देखील बैठी. अष्टभुज शिव बैठ्या अवस्थेत  फक्त येथेच दिसतो.
या मंदिराचं हे एक वैशिष्ट्य म्हणजे मकरप्रणाल. मकर हे गंगेचे वाहन असल्यामुळे इथे अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची रचना आहे. 

a

गाभार्‍यातील शिवपिंडीच्या शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची योजना केलेली आहे. त्या मकरावर शंख, चक्र, गदाधारी विष्णूची योजना केलेली आहे. त्या मकराचे बंद होत असलेले मुख कोणी एक आकृती आपल्या हातांच्या आधारे उघडून ठेवत आहे.

 

 

 

 


 मंदिराच्या बाह्यांगांवर मूर्तींची संख्या तशी कमीच. गोंदेश्वर हे भूमिज शैलीतले तुलनेने उशिरा निर्माण झालेले (१२/१३ वे शतक) मंदिर असल्याने येथे मूर्तीकामाचा थोडा अभाव जाणवतो, त्याची जागा येथे नक्षीकामाने घेतलेली आढळते.

Ancient Gondeshwar temple lit by thousands of lamps | हजारो दिव्यांनी उजळले पुरातन गोंदेश्वर मंदिर

 हल्ली  गोंदेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून सायंकाळी सूर्यास्तानंतर गोंदेश्वर सेवा संघ व इतर सेवाभावी संघटनां मिळून मंदिरात दीपोत्सव साजरा करतात. याआधी काही सेवाभावी संस्थांमार्फत गोंदेश्वर मंदिरात छोटेखानी दीपदानाचा कार्यक्रम करून पणती पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात होता. तथापि, गेल्या तीन वर्षांपासून गोंदेश्वर सेवा संघाच्यावतीने भव्य अशा दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी श्री गोंदेश्वर महादेव यांची हरिहर स्वरूपात शृंगारपूजा करण्यात येते. मंदिर परिसरात एक हजारपेक्षा अधिक दीप पेटवून हर्षोल्हासात हा दीपोत्सव साजरा केला जातो. पर्यटनाच्या दृष्टीने व परिसराचा विकास व्हावा, या उद्देशाने गोंदेश्वर सेवा संघासह विविध सेवाभावी संस्था उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्य मंदीरातून बाहेर आले कि समोरच आपल्याला नंदी मंडप दिसतो.


मुख्य मंदीरासमोर नंदी मंडप आहे. या देवळाचे भूमिज शिखर साप्तभौम पद्धतीचे आहे. पूर्ण मंदिर भूमिज वेसर पद्धतीत बांधलेले आहे. मंदिराच्या पूर्वदिशेला नंदीमंडप आहे, तोही अनेक पौराणिक शिल्पे, फुले पाने वेलबुट्टी याने सुशोभित आहे.
 


 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 


चार ही कोपर्यात पंचायतनातील देवतांची मंदीरे आहेत. आधीच सांगितल्याप्रमाणे हे पंचायतन आहे. मुख्य मंदिर हे शिवाचे असल्याने हे शिवपंचायतन. गोंदेश्वराचे शिवपंचायतन महाराष्ट्रात सर्वात प्रचंड. ह्या इतर चार उप आयतनांत अनुक्रमे विष्णू, गणेश, दुर्गा आणि सूर्य अशा मूर्ती आहेत. 
मुख्य मंदीराच्या चारही कोपर्यात असणार्या उप मंदीरातील दोन पुर्व आणि दोन पश्चिमाभिमुख आहेत. पुराणामध्ये सांगितलेल्या विष्णु आणि सुर्य यांच्या स्र्थानाची येथे आदलाबदल झालेली पहायला मिळते. येथे विष्णुला ईशान्ये एवजी आग्नेयेकडील देवकुळात तर सहाजिकच सुर्याला ईशान्य गाभार्यात स्थान दिलेले दिसते. मात्र देवी पार्वती आणि गणेश यांचे अनुक्रमे वायव्य आणि नैऋत्येकडील उपगर्भगृहात योग्य जागी स्थानापन्न दिसतात. 
  या गर्भगृहाच्या शिखरामध्ये एक वेगळाच प्रकार दिसून येतो. दक्षिणेत तो अन्यत्र कोठेही दिसून येत नाही. हि वक्राकृती शिखर असून येथे भिंतीवर प्रक्षेप जवळपास शिखरापर्यंत जातात. मधोमध चार पट्ट्याच्या कीर्तिमुख आहे. थोडक्यात हि शिखरे नागर पध्दतीची आहेत.  





ह्यातल्या काही मूर्ती मला जास्त प्राचीन वाटत नाहीत. कदाचित मूळच्या मूर्ती भंग पावल्या असाव्यात.




a

a

a

उत्तुंग पोहोचलेली शिखरं स्थापत्यशैलीचा अद्भूत आविष्कार दाखवतात.

a

a

a

ली.
ही चार उपायतने देखील विलक्षण सुंदर आहेत. गोंदेश्वर मंदिराभोवती फेरी मारताना विविध कोनांतून हे पंचायतन विलक्षण सुंदर दिसते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रकाशामुळे ह्यांच्यावरील रंग सतत बदलत असतात. मावळतीला तर हे झळाळून निघत असते.
 सन १९७७ मध्ये मंदिराच्या भोवतालच्या कोटामधील जागेचे उत्खनन झाले. त्यावेळी देव-देवतांच्या पुरातन मूर्ती सापडल्या. या मंदीराच्या आवारात पश्चिम दिशेकडे तोंड करुन उभारल्यावर औंढा, आड्, पट्टा हे गिरीदुर्ग दर्शन देतात. मंदीराजवळ प्रशस्त तळे आहे.त्याचा गाळ काढून त्यात वर्षभर पाणी राहील अशी व्यवस्था करुन मंदिर परिसराची शोभा वाढवता येईल. या पाण्याचा वापर करुन मंदीर परिसरात उत्तम बाग करता येईल. सिन्नर गावात सापडलेले सर्व अवशेष एकत्र करुन वस्तुसंग्रहालय उभारता येईल. तसेच सिन्नर परिसरातील सर्व मंदीरांची आणि इतर वास्तुंची माहिती देणारी पुस्तिका निघायला हवी. 
हि मंदिरे पाहिल्यावर आजही कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्या कलाकारांचे खरंच धन्यवाद ज्यामुळे आज आपल्याला अशी वास्तु पाहावयास मिळत आहे.  हे मंदिर नक्कीच खास जाऊन भेट देण्यासारखं आहे. रथसप्तमीला सूर्यपूजा थाटामाटात साजरी होते अशी माहिती मिळाली. महाशिवरात्री व श्रावण महिन्यात मंदिरावर रोषणाई केली जाते. सिन्नरकरांचे गोंदेश्वर मंदिर हे एक अभिमानाचे स्थान आहे. ह्या मंदिरा  जवळच असलेलं अर्येश्वर मंदिर आणि गारगोटी म्युझियम हे देखील नक्की बघा
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
१) गारगोटी म्युझियम , सिन्नर.
२) नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य २५ किमी.
३) नाशिक शहर ३० किमी.

संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर
३) श्री. सागर बोरकर यांचे लिखाण
४) स्थापत्य  -महाराष्ट्र शासन
५) https://questraveler.com
६) वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
७) http://harshad-gaaanikha.blogspot.com
८) www.discovermaharashtra.com




































Gondeshwar Temple, Sinnar – Lost in the history!


December 2016:: One Sunday, we were in Bedse Caves clicking a lot of photographs there. One of the enthusiasts and travel-lover came up to us and after a couple of minutes of conversation, he quickly guessed our interest in off-beat and historic places and suggested us – Gondeshwar Temple, Sinnar, Nashik.

Gondeshwar Temple, Sinnar, On the way

The place is around 185 km (3.5 hours) from Pune and 26 km from Nashik. It was the only location to see there in Sinnar, Nashik. But, would that stop us from visiting? The answer was a big “NO”. We could not stop ourselves and drove to Gondeshwar Temple the next Sunday. After some readings and research, we were ready to explore the ancient temple.

Gondeshwar Temple other side, Sinnar
Gondeshwar Temple, Sinnar
Perspective of carved temple

What is so significant about this place?

  • Gondeshwar Temple is an 11th-12th Century old Hindu Temple constructed by the Yadavas and their feudatories.
  • It features the Panchayatana plan in which the main temple of Shiva is in the center with other four shrines on the corners of Lord Vishnu, Lord Surya, Lord Parvati, and Lord Ganesha. Wow! so fascinating.
  • Gondeshwar temple is built in the Bhumija and Hemadpanti style of architecture with the locally available Black Basalt Stone.

    It was so mesmerising to sit in the Gondeshwar Temple and travel back in history.

The entrance is a stone structure with some carvings and just in the middle of the premises is the Gondeshwar temple. The structure is known as Shaiva Panchayatan or a group of five temples with a large enclosure. All the five shrines in the premises are perfectly proportionate. The temple complex is built on the raised platform which provides a nice view of the sculptures around the complex.

Gondeshwar Temple Entrance, Sinnar
Gondeshwar Temple Entrance, Sinnar
Carved Stone Elephants

The Shiva linga is enshrined by a towering ceiling and was well maintained. The pillars, walls, roofs of the temple were beautifully, intricately carved. The pillared hall has a carved turtle, a form of Vishnu Avatar, which is small yet elegant. The Nandi (Lord Shiva’s mount) is facing the main entrance.

Shivlinga
Nanchi, Gondeshwar Temple, Sinnar
Detailed Carvings

I can behold that beauty the whole day. Each carving had a different story to tell from the times of ancient epic Ramayana. Gondeshwar temple is a marvelous example of the medieval temples of the Deccan and Indo-Aryan style.

Gondeshwar Temple, Sinnar, Ganpati and Carvings

The shrines on the corners were damaged and only some of the idols could be seen. The Gondeshwar Temple, Sinnar is listed as heritage site and Archaeological Survey of India (ASI) has done a great job in reviving the hidden treasure. Not many people venture there which is an added advantage that keeps the place neat, safe and intact.

Tip:: There were not many eateries on the way. Carry your food and water but please do not litter. Carry the umbrellas to keep away the heat as there is no shade.

Gondeshwar Temple, Sinnar, Intricate carvings on the pillar

Timings: Sunrise to Sunset
Entry: Free
Parking: Available

Gondeshwar Temple is a magnificent piece of our rich Indian history. Cherish it.

Gondeshwar Temple view, Sinnar
https://nanchi.blog/2020/04/08/gondeshwar-temple-sinnar-nashik/


 सिन्नर बस डेपो पासून २ किमी अंतरावर असलेले हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला "शैवपंचायतन" म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे.

नाशिक शिर्डी रस्त्यावर असलेल्या सिन्नर गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे. गावातून जायला रस्ता आहे म्हणून गाडी घेउन आत शिरलो पण रविवारी बाजाराचा दिवस असतो आणि हे माहित नसल्याने भरपूर वेळ इकडून तिकडून फिरलो आणि परत हायवे वर आलो कारण रस्त्यांनवर इतकी दुकानं मांडली होती की कार ने मंदिरापर्यंत पोचण शक्यच नव्हत. मग चौकशी आणि गुगल काकांच्या मार्गदर्शना प्रमाणे गावाला वळसा घालून मंदिरा जवळ पोचलो. मंदिरात ७-८ मुलं मंदिरातील शांततेच फायदा घेत अभ्यास करत बसली होती 

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर हे एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ होता. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं.

मंदिरा समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून ह्या मंदिराकडे बोट दाखवता येईल 


मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. उंच आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. प्रमुख मंदिरा भवती असलेली इतर मंदिरं सुद्धा अप्रतिम कोरीवकाम दर्शवतात. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे. आणि गाभाऱ्यातच्या दारावर अतिशय बारीक आणि सुबक नक्षीकाम केलेलं आहे . 

शिल्पकलेचा एक अद्भुत आविष्कार म्हणावे लागेल इतके सुंदर सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिर आहे. मंदिरात मनाला एक वेगळी शांती मिळते.  विशेषतः पहाटे आणि दुपारच्या वेळी मंदिरात राबता कमी असतो. हि मंदिराला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे असे माझे मत आहे.
मंदिरात जाण्यासाठी प्रथम सिन्नर गाठावे. सिन्नर -शिर्डी रोडवर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डावीकडील वाट धरावी. पाचच मिनिटात आपण मंदिर परिसरात येवून पोहोचतो.

मंदिराचा आवार तसा मोठा आहे. मुख्य मंदिराभोवती सुर्य, पार्वती, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत. या चारही मंदिरांची रचना जवळपास समान आहे पण जवळून पाहिल्यास फरक लक्षात येतो. मुख्य मंदिरा समोर नंदी आहे.  हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. असा हा मंदिराचा विशाल विस्तार आहे.
सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराला ३ प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या प्रकाशामुळे कोरीवकाम केलेल्या भिंती व खांबांच्या वेगवेगळ्या छटा पाहण्याजोग्या आहेत.
हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे.
संरक्षित स्मारक असूनही मंदिराकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटत राहते. गाभाऱ्याची दुर्दशा,  सभोवतीची अस्वच्छता , पालापाचोळा मंदिराच्या आवारातच जाळणे, रिकामटेकड्यांचा हैदोस यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आहे.


नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणना होते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. 

हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्‍या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.


anandgodse.blogspot.com

गोंदेश्वर मंदिर


गोंदेश्वर मंदिर

शिल्पकलेचा एक अद्भुत आविष्कार म्हणावे लागेल इतके सुंदर सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिर आहे. मंदिरात मनाला एक वेगळी शांती मिळते.  विशेषतः पहाटे आणि दुपारच्या वेळी मंदिरात राबता कमी असतो. हि मंदिराला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे असे माझे मत आहे.

मंदिरात जाण्यासाठी प्रथम सिन्नर गाठावे. सिन्नर -शिर्डी रोडवर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डावीकडील वाट धरावी. पाचच मिनिटात आपण मंदिर परिसरात येवून पोहोचतो.

मंदिराचा आवार तसा मोठा आहे. मुख्य मंदिराभोवती सुर्य, पार्वती, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत. या चारही मंदिरांची रचना जवळपास समान आहे पण जवळून पाहिल्यास फरक लक्षात येतो. मुख्य मंदिरा समोर नंदी आहे.  हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. असा हा मंदिराचा विशाल विस्तार आहे.

सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराला ३ प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या प्रकाशामुळे कोरीवकाम केलेल्या भिंती व खांबांच्या वेगवेगळ्या छटा पाहण्याजोग्या आहेत.

हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे.

संरक्षित स्मारक असूनही मंदिराकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटत राहते. गाभाऱ्याची दुर्दशा,  सभोवतीची अस्वच्छता , पालापाचोळा मंदिराच्या आवारातच जाळणे, रिकामटेकड्यांचा हैदोस यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आहे.

esakal.com

Sinnar History: कामगारांचे ‘सिन्नर’ आता उद्योजकांचे

सकाळ वृत्तसेवा

Updated on: 

9 लेख बाकी

प्रशांत कोतकर, saptrang@esakal.com

सिन्नर शहरात नगरपालिकेची स्थापना १८६० मध्ये झाली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेले शहर हे पूर्व बिडी कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात असे. त्यालाही एक पार्श्वभूमी आहे. शहरातील नामवंत अशा वाजे घराण्यातील बालाजी गणपत वाजे यांना फी नसल्याने शाळेतून काढून टाकले. आपल्याजवळ फी भरण्यासाठी पैसे नसल्याची खंत मनात बोचत असल्याने बालाजी रावांनी शहर सोडून फिरत फिरत भिवंडी शहर गाठले. त्या ठिकाणी त्यांच्या नजरेस बिडी व्यवसाय दिसून आला. त्यांनी त्या ठिकाणी बिडी व्यवसायाचे धडे घेतले. व्यवसायाचे धडे घेतल्यानंतर गावात परतले. गावात बिडी व्यवसायाची मुहूर्तमेढ केली.

व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल इतर प्रांतातून आणला. शिवाजी, शिलेदार अशा नावाखाली बिडीचा ब्रॅण्ड बाजारात आणला. गावातील व्यक्तींना बिडी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. सुरवातीला एकाच ठिकाणी सुरू झालेल्या व्यवसायाने आपली पाळेमुळे रोवली. या व्यवसायामुळे गावात सामाजिक एकोपा जपला जाऊ लागला. वाजे यांच्या सोबतच काही दिवसातच चांडक परिवाराचा कोंबडा, सारडा परिवाराचा कॅमल, चोथवे परिवाराचा गाय छाप, भिकुसा बिडी असे विविध ब्रँण्ड जिल्ह्यातच नव्हे देशभरात नावारूपास आले.

१९७२ साली आलेल्या दुष्काळाने गावाची लयच बिघडवली. आजही या दुष्काळाच्या झळांची चिन्हे गावात दिसतात. शहराचा पूर्व भाग दुष्काळी तर पश्‍चिम व्यवस्थित आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कामगार कायदा, गुटखा बंदी, कच्च्या मालाचा वाढलेला भाव अन्य कारणाने बिडी व्यवसायाला घरघर लागली अन्‌ बेरोजगारी वाढली.

दुष्काळाने होरपळलेल्या या शहराला नवसंजीवनी मिळाली ती १९८२ मध्ये. तत्कालीन आमदार सूर्यभान गडाख यांनी शासनाकडे औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न केले मात्र, त्यात यश आले नाही. आमदार गडाख व अन्य मंडळींनी एकत्रित येत सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची स्थापना केली. सुरुवातीला दीडशे एकरवर सुरू झालेली ही वसाहत आज चारशे दहा एकरवर विस्तारली गेली आहे.

सन १९८४ मध्ये आमदार सूर्यभान गडाख यांचा पराभव झाल्यानंतर आमदार दिघोळे यांनी सन १९८८ मध्ये शासकीय औद्योगिक वसाहत शहरात आणली. आज सिन्नर शहरातील मुसळगाव वसाहतीत इंजिनीअरिंग, केमिकल, फार्मास्यिुटिकल, प्लास्टिक, फुड पॅकेजिंग आदी ३९८ कंपनींचा तर माळेगाव शासकीय औद्योगिक वसाहतीच्या १४०० एकरवर ७२५ विविध कंपनीचा औद्योगिक व्यवसाय जोमाने सुरू असून तब्बल २५ हजार ५०० कामगारांची उपजीविका या शहरात सुरू आहे.

या वसाहतींमुळे आज शहरातील विविध व्यवसायांनाही हातभार लागला असून आर्थिक स्रोत निर्माण होऊन शहराची पतही वाढली आहे. दरम्यान, शहराचा बदलता चेहरा पाहता सन २००४-०५ मध्ये अडीच हजार एकरचा सेज मिळाला. यातील एक हजार एकरवर थर्मल पॉवर तर ८८ एकर वर सिमेंटची कंपनी उभारण्यात आली आहे.

मात्र या कंपनीना १७ वर्षांपासून घरघर लागली आहे. ती पुनर्जीवित करण्याचे काम खासदार राजाभाऊ वाजे यांनी हाती घेतले आहे. गावाच्या विकासात पाणीटंचाईला लागलेला शिक्का पुसण्याचे काम लोकप्रतिनिधी करीत आहेत. कोनांबे-भोजापूर प्रकल्प झाले. सरदवाडीचे सर्वेक्षण झाले आहे.

सिन्नरचा पूर्व इतिहास

नाशिक जिल्ह्यातील एक मोठे शहर व त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. त्याचा सिंदिनगर, सिंदिनेर, सेऊणपूर, श्रीनगर वगैरे नावांनी उल्लेख आढळतो. मध्ययुगात नगराभोवती मातीची तटबंदी होती पण ती आता जवळजवळ नामशेष झाली आहे. सिन्नरचा उल्लेख १०६९ च्या ताम्रपटात सिंदिनेर असा आढळतो. गवळी राजा राव शिंगुणी याने हे नगर वसविले, अशी एक परंपरागत कथा आहे. तोच ताम्रपटातील सेऊनेन्डू असावा. याचा अंतर्भाव सेऊण देशात होत असल्यामुळे त्यावर यादव (सेऊण) वंशाची (११८५-१३१८) सत्ता होती व बाराव्या शतकापर्यंत सिन्नर (श्रीनगर) हे यादवांच्या राजधानीचे स्थळ होते.

सतराव्या शतकात मोगलांची सत्ता या नगरावर होती व त्यांच्या चौदा ठाण्यांपैकी हे एक लष्करी ठाणे होते. अमृतराव देशमुख हा त्यांचा मुख्य सरदार होता आणि त्यानेच ही मातीची तटबंदी बांधली व नदीला धरण बांधले. त्याच्या वाड्याचे अवशेष अद्यापि शिल्लक आहेत. मराठ्यांनी त्यावर १७९० मध्ये वर्चस्व मिळविले. पेशवाईच्या अवनतीनंतर (१८१८) ते इंग्रजी अमलाखाली स्वातंत्र्यपूर्वकाळात होते.

शिव आणि सरस्वती या नद्यांमुळे शहराच्या आसमंतातील जमीन ओलिताखाली आली आहे. या दोन नद्यांचा संगम जवळच आहे. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गहू , बाजरी, तंबाखू, ऊस, भुईमूग ही काही प्रमुख पिके होत. याशिवाय विड्याची पाने व भात यांचे उत्पादन घेतले जाते. नगरपालिकेची स्थापना (१८६०) झाल्यानंतर शहरात आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिःसारण वगैरे बाबींबरोबर प्राथमिक शाळा व नगरपालिकेमार्फत चालविले जाणारे रुग्णालय इ. सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भूमिगत जलनिःसारण योजना येथे कार्यान्वित आहे. शहरात लहानमोठी काही मंदिरे असून त्यांपैकी दोन मंदिरे प्रेक्षणीय आहेत आणि एक भव्य गणपतीची मूर्ती आहे.

या मंदिरांपैकी गोंडेश्वराचे मंदिर हे शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून त्याला तीन द्वारे आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. मंदिर नागरशैलीत विशेषतः माळव्यात प्रचलित असणाऱ्या ‘भूमिज’ या उपशैलीत बांधले आहे. ही शैली मूळ नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून तीत स्थानिक वैशिष्ट्ये डोकावतात.



मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...