It is by far the the most extensive and elaborate rock-cut temple in India, and the most interesting as well as the most magnificent of all the architectural objects which that country possess.-- J.as. Burgess
एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं
यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: |
एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री-
र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति |
भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने-
रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् |
कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी
तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा |
विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही.
प्रस्तुत उल्लेख बडोदे येथे सापडलेल्या राष्ट्रकूटवंशीय राजा कर्क (दुसरा) याच्या शके ७३४ मधल्या ताम्रपटातील आहे. याच ताम्रपटात दंतिदुर्गानंतर आलेल्या कृष्णराजाने (पहिला) हे लेणे कोरविले तसेच यातील शिवलिंग हिरे-माणकांनी सजविले असाही उल्लेख आहे.पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर इ. खोदण्यात आली.राष्ट्रकूटांच्या नंतरच्या पिढीतील अकालवर्ष कृष्ण (तिसरा) याच्या ताम्रपटांतही कैलासचे कर्तृत्व कुष्णराजालाच दिलेले आहे. या ताम्रपटांत म्हटलेले आहे की कृष्णराजाने अशी देवालये बांधली की ज्यामुळे पृथ्वी अनेक कैलासांनी सुशोभित केल्याप्रमाणे शोभायमान दिसते.
कैलास लेण्यांच्या प्रवेशद्वारी दोन्ही बाजूंस सुबक शिल्पे आहेत. त्यांना पौराणिक पाश्र्वभूमी आहे. त्यातील शंखनिधी आणि पद्मनिधी हे द्वारपाल आपले लक्ष्य वेधतात. जोडीला महाकाय हत्ती आणि उंच ध्वजस्तंभ, कीर्तिस्तंभांनी या शिल्पाचे सौंदर्य खुलवले आहे. एकाच प्रस्तरातून निर्माण झालेले हे कैलास लेणे इ.स. ८ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा कृष्णराज याच्या औदार्य, प्रोत्साहनाने निर्माण झाले. त्याच्यानंतर सत्तेवरील राज्यकर्त्यांनीही प्रोत्साहन देण्याचे धोरण कायम ठेवले. रामायण-महाभारतातील प्रमुख प्रसंग या लेण्यांत अप्रतिमपणे कोरले गेल्याने या दोन्ही काळांतील सचित्र इतिहासाचे सादरीकरण करण्यात शिल्पकारांनी आपली जान ओतली आहे. त्यातील महाभारत कथासार, श्रीकृष्ण जन्म, महाभारत युद्ध, भरताचे राज्यारोहण, राम-हनुमान भेट हे प्रमुख प्रसंग खूपच सजीव-बोलके वाटतात.
आज आपण जेव्हा या लेण्यांना भेट देतो तेव्हा मनात प्रश्न येतो कि आज जर दुसर कैलास मंदिर उभ करायचं ठरवलं तर किती प्रंचड साधनसामग्री, मनुष्यबळ आणि पैसा लागेल ? त्यासाठी जगातील हाय टेक कॉम्प्यूटर आणि अत्याधुनिक थ्री डी सोफ्टवेअर त्याच सगळ डिझाईन बनवाव लागेल..अर्थात ह्यातून फक्त अंदाज घेता येईल कि ते उभ केल्यावर कस दिसेल? त्यातील स्थापत्यकला साकारण्यासाठी कारागिरांना कुठे जागा सोडायची? कोणत्या बाजूने काम सुरु करायचं? आतल्या बाजुच बांधकाम कस करायचं? त्यातल गणित ह्या सगळ्याची गोळाबेरीज करावी लागेल. ह्याशिवाय अजून शेकडो निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तर आधी शोधावी लागतील. ह्याची उत्तर शोधण्यासाठीच शेकडो ग्राफिक कलाकार आणि इंजिनियर ह्यांची गरज लागेल ते हि सर्वोत्कृष्ठ. हे सगळ करून सुद्धा नुसत डिझाईन बनवायला कित्येक महिने किंवा कित्येक वर्षाचा कालावधी लागेल.
नुसत डिझाईन करताना आपल्याला घाम फुटेल. त्यापुढे सगळ्यात चांगले आर्किटेक्ट ज्यांना वास्तू, वेदिक सायन्स आणि मंदिराचा मूळ आत्मा ह्याला धक्का न लावता प्लानिंग कराव लागेल. एक चूक आणि पूर्ण खडक निकामी. म्हणजे अजून एका तश्याच डोंगराचा किंवा दगडाचा शोध. ह्या शिवाय एक प्रोजेक्ट लीडर कि ज्याच्या डोक्यात मंदिर तयार असेल अगदी बारीक डीटेल्ससह आणि एक लीडर जो हजारो कारागीर, अभियंते ह्यांच्यावर लक्ष ठेवेल. कैलास मंदिरातील शिल्प ज्या सुबकतेने, ज्या कलात्मकतेने तयार केली गेली आहेत. त्याच्या आसपास पण फिरकणाऱ्या मशीन मानव अजून बनवू शकलेला नाही. हाताने ह्या गोष्टी तश्याच एका दगडातून फोडून मंदिर उभ करत कोरण्यासाठी १०,००० पेक्षा जास्त कारागिरांची गरज लागेल. हे सर्व संपायला किती वर्ष लागतील ह्याचा अंदाज हि आज आपण लावू शकत नाही. हे सगळ करून कैलासाच्या तोडीस तोड मंदिर निर्माण करण आजही अशक्य गोष्ट आहे अस जगातील बऱ्याच संशोधक आणि वैद्नानिकांच मत आहे. कारण मानवाच्या इतिहासामध्ये आजवर कैलासा शिवाय कोणत्याच मंदीराच इतक्या प्रचंड मोठ्या दगडातून निर्माण झालेल नाही आहे.
जगातील सगळ्यात मोठा क्यान्टीलिवर रॉक सिलिंग ब्रिज आजही इकडे मोठ्या दिमाखात इतके वर्षानंतर उभा आहे. कोणतीही उपकरण नसताना ह्यातले सगळे खांब हे एका लाईन मध्ये तंतोतत बनवले गेले आहेत. ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग ची योजना केली आहे. अतिशय नजाकत, सौंदर्य, आणि अदभूत शक्तींनी वसलेल्या ह्या मंदिराच्या मजबुती बद्दल अस बोलल जाते कि १६८२ मध्ये औरंगजेबाने आपल्या हजारो सैनिकांना हे मंदिर नष्ट करण्याचा आदेश दिला. तब्बल ३ वर्ष हजारो सैनिक मंदिर नष्ट करण्यासाठी झटत होते. पण नष्ट तर सोडाच पण काही शिल्पानपलीकडे मंदिराला कोणताही धक्का पोहचवू शकले नाहीत. शेवटी औरंगजेबाने हे मंदिर तोडण्याचा नाद सोडून दिला.
आणखी दुर्दैव असे वेरुळ लेण्याला म्हणजेच या कैलास मंदीराला अक्षरशः लाखो लोक भेट देउन सुध्दा फार कमी अभ्यासक सोडले तर या वास्तुचा विवीध अंगानी कोणी बारकाईने विचार करुन पहात नाही.केवळ भेट दिल्याचे समाधान आणि फोटो काढून धावतपळत एकदा लेणी उरकली कि बहुतेकांचा उत्साह संपतो. अभ्यासपुर्ण नजरेने काही निरखावे सोबत्यांना त्याची ओळख करुन द्यावी, यापेक्षा सोशल मेडीयावरील फोटो इतकेच महत्व इथे येणार्या पर्यटकांना वाटते याची खंत वाटते.
सन 1993 मध्ये, युनेस्कोने एलोरा लेण्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले. याचे छायाचित्र भारतीय 20 रुपये या नोटावर आहे.


अर्थात ज्या मंदीरापासून स्फुर्ती घेउन हे लेणे इथे कोरण्यास सुरवात झाली त्याची तंतोतंत नक्कल करताना काही घटकांचे प्रमाण सांभाळता आलेले नाही. मुळात खुदाईचा व्याप शक्य तितका कमी करण्यासाठी हे मंदीर टेकडीच्या पश्चिम उतारावर खोदले गेले. यामुळे गोपुर, नंदीमंडप, सभामंडप ,शिखर यांची उंचीचे प्रमाण सांभाळता आलेले नाही. मंदीराच्या गर्भगृहाच्या ( म्हणजे गाभार्याच्या ) आणि सभामंडपाच्या अधिष्ठाणाची ( plinth )उंची वाजवीपेक्षा जास्त आहे.कदाचित याच कारणामुळे इथे गजथर मोठ्या हत्तींचा आणि महाकाय व्याल दाखवले आहेत.प्रांगणाचा पुढचा आणी मागचा भाग वेगवेगळ्या उंचीवर असल्यामुळे नंदीमंडपाचे बाह्यांग साधेच ठेवले आहे. हे पीठ अक्षरश: एका मजल्याएवढे उंच आहे.

गोपुर, गोपुराला जोडूनच मुख्य मंदीराच्या तिन्ही बाजुला असलेली तटबंदी,मुखमंडप्,नंदीमंडप, दोन्ही बाजुला दोन असे प्रत्येकी एक असे दोन अर्धमंडप असलेला सभामंडप, त्यामागे अंतराळ आणि सर्वात मागे गर्भगृह अशी कैलास मंदीराची रचना आहे.मंडपात जाण्यासाठी समोरुन एक आणि दोन्ही बाजुने प्रत्येकी एक असे एकुण तीन मार्ग आहेत. सध्या बाजुचे दोन्ही मार्ग वापरता येत नाहीत.मंडपाच्या मागील भिंतीत दोन्ही बाजुस प्रत्येकी एक अशी दोन द्वारे आहेत.हे दरवाजे गर्भगृहाभोवती असलेल्या प्रदक्षीणा मार्गात उघडतात.या प्रदक्षिणा मार्गाच्या तीन भिंतीत तीन आणि चार कोपर्यात चार अशी एकुण सात उप गर्भगृहे किंवा उप मंदीरे आहेत. त्यामुळे या लेणी मंदीराचे वर्णन 'अष्ट परिवार शिवालय' असे केले जाते.एकंदरीत इथे उत्तरेकडील भिंतीत कोरलेल्या लंकेश्वर लेणे, दक्षिणेकडील भिंतीतील यज्ञशाळा आणि तीच्या पुर्वेकडील भागात असलेला दुसरा मजलाही एकाच स्थापत्ययोजनेचा भाग वाटतो. कैलासाच्या रचनेपेक्षाही इथे असलेल्या मूर्ती कमालीच्या रोचक आहेत. चला तर मग कैलासाची परिक्रमा करायला.

डाव्या बाजूच्या देवकोष्टातील मूर्ती
उर्ध्वशिवतांडव, चतुर्मुखी ब्रह्मदेव, आणि दिक्पाल
मयुरारूढ स्कंद, बोकडावर स्वार झालेला अग्नी, हरीण हे वाहन असलेला वायु आणि मकर हेच वाहन असलेला कुबेर तर गोपुराच्या उजव्या बाजूला विष्णूचे काही अवतार, नागराज आणि त्रिविक्रम आणि शिवतांडव मूर्ती आहेत.
वराहावतार
नरसिंह अवतार आणि शिवतांडव
नागराज, बहुधा इंद्र आणि यम ( हे दिक्पाल भग्न झाल्यामुळे नीटसे ओळखू शकलो नाही)
महिषासुरमर्दिनी
गोपुरातून आत दोन्ही बाजूंना दोन दालने कोरलेली आहेत. त्याच्या पुढे गेल्यावर दोन्ही बाजूंना विविध प्रतिमा बघायला मिळतात. त्यापैकी एक आहे महिषासुरमर्दिनेची सिंहारूढ दुर्गेने आपला त्रिशुळ क्रोधाने महिषासुराच्या छातीत खुपसलेला आहे. महिषाचे मुंडके उडाल्यामुळे आतला असुर आपल्या मूळ रूपात बाहेर यायचा प्रयत्न करतो आहे पण देवीने त्याला एकाच वेळी त्रिशुळाने तर एक पाय त्याच्या कमरेवर घट्ट रोवून त्याला रोधून धरल्यामुळे तो तशाच अवस्थेत गतप्राण होत आहे. तर महिषासुराच्या एका साथीदारावर देवीच्या सिंहाने हल्ला केला आहे.
महिषासुरमर्दिनी
गजान्तलक्ष्मी
महिषासुरमर्दिनेच्या अतिशय आवेशपूर्ण शिल्पाच्या समोरच शांत, संयत असे गजान्तलक्ष्मीचे शिल्प आहे.
सरोवरातील कमलासनावर लक्ष्मी बसलेली असून तिच्या दोन्ही बाजूस असलेले गजराज आपल्या सोंडेने पाण्याच्या कळश्या भरून ते वरच्या बाजूस असलेल्या हत्तींकडे देत आहेत आणि ते हत्ती त्या कळश्या उपड्या करून लक्ष्मीच्या मस्तकी त्या पाण्याचा अभिषेक करत आहेत.हे चार हत्ती म्हणजे चार दिशांचे प्रतिक मानले जातात. त्याच्या वर हा सोहळा देव गंधर्व मोठ्या कौतुकाने बघत आहेत.सरोवरातील पाणी, मधूनच डोकावणारी कमलपुष्पे आणि सरोवरातील पक्षी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत. शिवाय दोन्ही बाजूंना दोन भव्य द्वारपाल आहेत.तीच्या समोरचे सरोवर त्रिमितीत कोरल्यामुळे अधीक उठून दिसते.गजलक्ष्मिचा अभिषेक करताना हत्ती. पण लक्ष्मिचे हात तिच्या स्तनावर का दाखविले असतील ?
गजान्तलक्ष्मी
हे शिल्प बघून आता कैलास लेण्याच्या आतल्या पटांगणात आपला प्रवेश होतो. येथे डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंना प्रचंड मोठे पण आता भग्नावस्थेतील हत्ती झुलत आहेत. तर ह्या हत्तीच्या बाजूंनाच उंचच उंच असे दोन स्तंभ आहेत.

हत्ती आणि स्तंभ
सरितादेवतांचे मंदिर
आता मंदिराच्या डाव्या बाजूने परिक्रमेस सुरुवात करुया.ह्याच डावीकडच्या हत्तीच्या बाजूच्या भिंतीत आहे ते गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या नद्यांचे मंदिर. हे एक स्वतंत्र लेणेच असून आतमध्ये ह्या तीनही नद्या मूर्तस्वरूपात तीन कोनाड्यांमध्ये कोरलेल्या आहेत.मध्यभागी आहे ती गंगा व तिच्या दोन्ही बाजूंना यमुना आणि सरस्वती आहेत.
गंगा
मकरावर आरूढ गंगेची ही मूर्ती पहा. या देवता कमनीय बांध्याच्या,यवनावस्थेत आहेत आणि विशेष म्हणजे समचरणावस्थेत उभ्या असलेल्या मकरस्थित गंगेच्या एका बाजुला गंगेकडे झुकलेल्या त्रिभंगावस्थेतील सरस्वती आहे तर डावीकडे तशाच स्थितीतील कुर्मावर आरुढ झालेली यमुना आहे.पहाणार्याच्या पुढे प्रयागचा त्रिवेणी संगम साक्षात उभा आहे.अतिशय सुडौल आणि प्रमाणबद्ध अशा ह्या मूर्तीच्या दोन्ही बाजवांस लहानसे स्तंभ कोरलेले आहेत. त्या स्तंभावंर पुन्हा मकर कोरलेले असून मकराच्या मुखांतून निघालेल्या नक्षीने गंगेच्या मस्तकी एक कमानच तयार केली आहे. त्या कमानीचे नाव मकर. आज आपण ज्या देवांच्या सभोवती असलेल्या नक्षीदार कमानीला मखर म्हणतो ते हे मखराचे मूळरूप. मगराच्या मुखातून निघालेले ते मखर.
ह्याच त्रिवेणी लेणीच्या डावीकडे (ही बाजू म्हणजे प्रवेशद्वाराबाजूकडील देवकोष्ठाचा आतील भाग) विविध मूर्ती कोरलेल्या आहेत त्यापैकी एक आगळेवेगळे शिल्प आहे ते महिषासुरमर्दिनीचे
महिषासुरमर्दिनी (परत एकदा)
यात दुर्गाभवानी सिंहावर बसून महिषासुराचा नि:पात करायला जात आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे महिषासुर हा त्याच्या महिष रूपातच न दाखवता मूळ असुर रूपातच दाखवला आहे. महिषाचे प्रतिक म्हणून त्याच्या आसुरी मस्तकावर दोन शिंगे कोरलेली आहे. हातातील गदा मोठ्या त्वेषाने उगारून तो दुर्गेवर आघात करण्यासाठी सरसावत आहे. तर देवीनेही हाती शस्त्रे धारण करून धनुष्याची प्रत्यंचा आकर्ण खेचलेली आहे. तिच्या धनुष्यातून सुटलेले बाण महिषासुराच्या शरीरात घुसलेले आहेत. तर त्याच्या साहाय्यक असुरावर सिंह त्वेषाने झडप घालत आहे. महिषासुरवधाचे हे अनुपम कृत्य आकाशातून देव गंधर्व मोठ्या नवलाने पाहात आहेत.

महिषासुरमर्दिनी
ह्या शिल्पपटाच्या शेजारी उजव्या बाजूला गोवर्धन गिरीधारी, श्रीकृष्ण रूक्मिणी आणि रती मदन आणि गरूढारूढ श्रीविष्णू अशी शिल्पे आहेत.
शिल्पपट
कृष्णाने इन्द्राच्या कोपापासून वाचण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून धरीला आहे. बाजूलाच गोकुळातील खिल्लारे दाखवली आहेत.
गोवर्धन गिरीधारी
मदन रती
श्रीकॄष्ण रूक्मिणी शिल्पाच्या शेजारीच रती मदनाचे शिल्प आहे. ही दोन अतिशय सुरेख शिल्पे आहेत. मदनाचा मकरध्वज त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस उंचावलेला असून मदन व रती ह्या दोघांच्याही मध्ये उस (इक्षुदंड) कोरलेला आहे. जणू दोघांमधल्या प्रेमाच्या गोडीचे प्रतिकच उसाद्वारे दाखविले गेले आहे.
मदन - रती
या शिल्पपटाच्या पुढेच सुरु होते ते कैलासातील डाव्या बाजूच्या भिंतीत खोलवर कोरत नेलेले उपलेणे, लंकेश्वर
लंकेश्वर
गंगा, यमुना, सरस्वती लेणी मंदिराच्याच शेजारी असलेल्या एका ओसरीतून लंकेश्वर गुंफेत जायचा मार्ग आहे. उंच उंच अशा पायर्या अंधारातच चढत आपला प्रवेश लंकेश्वर लेणीमध्ये होतो.कैलास लेण्याच्या उत्तरकडील भिंतीत कोरलेले सांधार प्रकारचे हे लेणे आहे. नंदीमंडप, बाहेरच्या बाजूस असलेली लांबलचक ओसरी, प्रशस्त सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि प्रदक्षिणापथ अशी याची रचना.मंडपाच्या चारही बाजुला चार स्तंभ आणि एक अर्धस्तंभ असून दुसर्या बाजुला पाच स्तंभ आणि एक चतुर्थक स्तंभ आहे. उत्तरेकडील भिंतीत शैवकथा असलेले शिल्पपट कोरले आहेत. लंकेश्वर लेणीतील सभामंडपातील कलाकुसर बरीचशी जैन लेणीतील स्तंभांसारखी आहे त्यामुळे याचे बांधकाम त्या सुमारास झाले असावे असे वाटते.गर्भगृहाच्या एका बाजुला गंगेची आणि दुसर्या बाजुला यमुनेची मुर्ती आहे. गर्भगृहात घारापुरीच्या लेण्यात आहे तशी महेश मुर्ती आहे. उत्तरेकडील मुर्तीत मध्यभागी ब्रम्हा ,विष्णु, महेश मुर्ती दाखवल्या आहेत. तर देवकोष्ट आणि स्तंभाच्या पृष्टभागावर शैव, वैष्णव आणि देवी संप्रदायातील अर्धउठावातील शिल्प कोरली आहेत. या लेण्यातील स्तंभाची रचना, देवकोष्ठावरील तोरणे आणि शिल्पशैली लक्षात घेता हे लेणे नवव्या शतकात कोरले असावे.याच्या सभामंडपात उंच जोडे घातलेला सुर्य, ब्रम्हाविष्णुमहेश्,चंद्र इत्यादी तर डाव्या बाजुला म्हणजे दक्षिणेकडे नटराज शिवाची बेभान नृत्य करत असलेली मुर्ती, गंगावतरण इत्यादी मुर्ती आहेत.
लंकेश्वर लेणीचा बाह्यभाग
लंकेश्वराची ओसरी आणि त्यातले स्तंभ
आतमध्ये बराच अंधार आहे तसेच वटवाघुळांचा प्रचंड बुजबुजाट त्यामुळे इथे जास्त वेळ काढणे तसे त्रासदायकच ठरते. अंधारामुळे बर्याच मूर्ती दिसतही नाहीत.तरी त्यातल्यात्यात पुढील काही मूर्तींची ओळख करुन घेउ.
हिरण्यकश्यपूचा वध करतांना नरसिंह
ब्रह्मदेव, महेश आणि विष्णू हे तीन प्रमुख देव
एका बाजूच्या कोपर्यात त्रिमुखी शिवाची भव्य प्रतिमा कोरलेली आहे.
इथेच एका बाजूला भूवराहाची मूर्ती कोरलेली आहे. समुद्रात बुडालेल्या स्त्रीरूपी पृथ्वीला याने आपल्या दंतांच्या साहाय्याने बाहेर काढले असून पृथ्वी त्याला नमस्कार करत आहे. त्याच वेळेस वराहाने आपला पायाने असुर दाबून धरीले आहेत.
भूवराह
याच्या जवळच शिवाची तांडव नृत्य करत असलेली अत्यंत देखणी मूर्ती आहे. शिवमूर्ती सालंकृत असून नृत्यमुद्रेद्वारे तांडव विलक्षणपणे रेखाटले आहे. नाग, त्रिशुळ धारण करून त्यांसहित तो नृत्य करत आहे.
शिवतांडव
सभामंडपातील स्तंभ
सभामंडपाच्या छतावर कमल कोरलेले असून त्यात नटराज शिवाची नृत्यमग्न मूर्ती आहे.
ह्याशिवायही लंकेश्वरात देवी, शिव, विष्णू, चंद्र, सूर्य, द्वारपालादिकांच्या कित्येक मूर्ती कोरलेल्या आहेत पण त्या पुरेशा सुस्पष्टतेअभावी आणि विस्तारभयास्तव येथे देता येत नाहीत.
प्रदक्षिणापथ
लंकेश्वर बघून परत आल्या मार्गाने प्रांगणात उतरायचे आणि पुढेच असलेल्या कैलासाच्या डाव्या बाजूस असलेल्या भिंतीतील दालनांकडे जाउया.ही दालने म्हणजे वेरूळ लेण्यांच्या कडेच्या भिंतीत कोरलेला एक दोन्ही बाजूंनी काटकोनात असलेला एक प्रदक्षिणापथच आहे. या प्रदक्षिणापथात समान अंतरावर खण अथवा कोनाडे खोदलेले असून यात शैव आणि वैष्णव अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती अथवा पौराणिक कथांतील प्रसंग येथे कोरलेले आहेत.
प्रदक्षिणापथाच्या उत्तरेकडच्या भागात असणारी शिल्प अशी आहेत, मार्केंडेय अनुग्रह, धनुष्यबाण घेतलेला व्याध आणि शिव, चौसर खेळणारे शिव-पार्वती, शिव-पार्वती आणि रावण ,मात्र हे शिल्प अपुर्ण आहे, मुचकुंद ऋषी , त्यांनी डाव्या खांद्यावर थैली घेतलेली आहे, एकमेकांकडे पहाणारे शिव-पार्वती, गळ्यात सर्प आणि नंदीसहीत शिव, शिवाच्या डाव्या मांडीवर बसलेली पार्वती आणि खाली एक शिल्प, शिवलींगाभोवती रावणाची नउ शिर. या बाजुची लांबी १२० फुट आहे.
प्रदक्षिणा पथाच्या दक्षिण दिशेला जी शिल्प आहेत ती अशी, चार हात असणारी आणि हातात पात्र घेतलेली आणि केसांच्या जटा बांधलेली अन्नपुर्णा, बालाजी शिव, कालियामर्दन करणारा कृष्ण, सापाला पायदळी तुडवून सुळ्यावर पृथ्वी धारण करणारा वराह, गरुडावर बसलेला विष्णू, शेषनारायण, नरसिंह, तीन डोक्याचे आणि चार हात असलेले आणि शिवलिंग ओढणारे शिल्प, नंदीसहीत चार हात असणारा शिव, अर्धनारीश्वर. हा प्रदक्षिणापथ ११८ फुट लांब आहे.
यानंतर पुर्व बाजुचा प्रदक्षिणापथा हा १८९ फुट लांब असून त्यातील शिल्प अशी आहेत. पार्वतीसह, चार हाताचा आणि त्रिशुळ धारण केलेला कालभैरव शिव, कमळासनात बसलेला देव,याच्या हातात एक देवता दाखवलेली आहे. पुन्हा एकदा शिव, त्रिशुळ धारण केलेला आणि गंधर्वासहीत शिव, त्रिशुळ धारण केलेला आणि एका यक्षावर नृत्य करणारा शिव, चंड किंवा भुपाळ्भैरवाची मुर्ती, त्याच्या डाव्या खांद्यावर त्रिशुळ,डाव्या हातात भिक्षापात्र, उजव्या हातात डमरु आणि सोबत पार्वती, नाग्,नंदी आणि पार्वतीसह शंकर, शिव आणि न्ण्दी, ब्रम्हदेव, नाग आणि नंदीसहीत शिव, शंख,पद्म धारण केलेला विष्णु, सर्प धारण केलेला शिव, मस्तकी गंगा, डाव्या हाताला पार्वती आणि उजव्या हाताला गजराज, वर ब्रम्हदेव आणि गंधर्व, वराह आणि ब्रम्हदेवासह शिवलिंग, डमरु,बेल, त्रिशुळासह शिव, नंदीसह शिव, त्रिपुरासुराचा वध करणारा शिव, यात त्रिशुळ, धनुष्यबाण, वेदांचे चार घोडे अस्णारा सुर्याचा रथ दाखवला आहे, सहा हातांचा आणि हातात त्रिशुळ्,डमरु धारण केलेला आणि रत्नासुराचा वध करताना वीरभद्र दाखवला आहे.यात सोबत पार्वती आणि काली आहेत. अशी शिल्प दिसतात.
प्रदक्षिणापथ
प्रदक्षिणापथ आणि त्यातील खणांतील मूर्ती
या प्रदक्षिणा पथात आपल्याला अनेक मुर्ती पहायला मिळतात. त्यामध्ये गणपती, लांडग्यावर स्वार झालेली देवता, इंद्राणी, बालकासह पार्वती, मात्र बालकाचे शिल्प भग्न असल्याने ओळख पटत नाही, गरुडासह वैष्णवी, एका रांगत्या बाळाने साप धरलेला आणि त्याच्या सोबत मोरासहीत असलेली कार्तिकेयी, बैलासह आणि त्रिशुळ धारण केलेली माहेश्वरी, सरस्वती आणि हातात कुंभ असलेली चार हातांची एक देवता अशी शिल्प पहायला मिळतात.
रावण शिरकमलार्पण
पहिल्या खणामध्ये शिवपिंड कोरलेली असून तिच्या भोवताली नऊ मुंडकी आहेत. तर पिंडीच्या खालच्या बाजूला रावण आपले उरलेले शेवटचे मस्तक कापण्याच्या तयारीत असून शिवाला प्रसन्न करण्यासाठी तो हे दिव्य करण्यास सज्ज झाला आहे. रावणाच्या ह्या घोर भक्तीने शंकर प्रसन्न होऊन रावणाला वरदान देतो अशी पौराणिक कथा.
रावण शिरकमलार्पण
पुढिल एका शिल्पपटामध्ये शिव पार्वतीसह अर्धालिंगनावस्थेत बसला असून खालच्या बाजूस एक शिवगण आहे तर बहुधा रावण शंकराची प्रार्थना करण्यासाठी आल्याचा प्रसंग कोरलेला आहे.
यानंतरच्या शिल्पपटामध्ये शिवपार्वती कैलासावर शिवलिंग मध्ये घेऊन बसल्याचे दाखवले आहे तर शंकराचा एक पाय नंदीच्या मस्तकी आहे. जणू नंदीला तो आशिर्वाद देतो आहे.आपल्या हातातील शिवलिंग शिव पार्वतीकडे देताना दाखवले आहे.हे मिराकार ब्रम्हाचे प्रतिक आहे.ते दुंभगले कि त्यातून प्रकृती आणि पुरुष निर्माण व्हायचे असतात. त्यातुन संपुर्ण मानवसृष्टी उत्पन्न व्हायची असते. पण मानवी व्यवहाराप्रमाणे त्यासाठी विवाह व्हावा लागतो. आणी हेच साकारले आहे कल्याण सुंदर मुर्तीद्वारे.
कल्याण सुंदर मुर्तीमध्ये शिवपार्वती हातात हात गुंफून उभे आहेत. पार्वती नववधुला शोभेल अश्या पध्दतीने उभी आहे.अधोवदना,सविनया, सलज्जिता अशी आणि शिव मात्र मवाळ दाखविला आहे.कारण सुकुमार शैलजेचे तो पाणिग्रहण करतो आहे. कवि कुलगुरु कालिदास या प्रसंगाचे वर्णन करतो 'तस्या करं शैलगुरुपनीतं जग्राह ताम्रड:गुली षष्टमुर्ती ||' या शब्दात.एखादा प्रसंग जिवंत करणे म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर हे शिल्प जरुर पहावे.
यानंतर काही खणांमध्ये शिवपार्वतीच्या अक्षक्रीडा, रावणानुग्रह, रावण कैलास उत्थापन वगैरे प्रसंगाच्या मूर्ती आहेत. इथून पुढे एका खणात मार्कंडेयानुग्रहाचा प्रसंग कोरलेला आहे.
मार्कंडेयानुग्रह
पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव असेही म्हटले जाते.

मार्कंडेयानुग्रहमूर्ती (कालारी शिव)
अंधकासुरवध
इथून पुढे गेल्यावर एका खणात परत अंधकासुरवधाची मूर्ती सामोरी येते. याचे सविस्तर वर्णन वेरूळ लेणीवरील आधीच्या भागात केलेच आहे. इथेही ती मूर्ती थोड्याफार फरकाने तशीच असून त्रिशुळावर अंधकासुराला लटकवला असून त्याचे रक्त जमिनीवर पडून त्यापांसून असुर निर्माण होऊ नयेत म्हणून त्याखाली दुसर्या हाताने वाडगा धरलेला आहे. ह्या शिल्पातील शिवाच्या चेहर्यावरील भाव मात्र तुलनेने सौम्यच भासतात. इथे मात्र अंधकासुराच्या खालच्या बाजूला उग्र चेहर्याची भयानक कालीची मूर्ती आहे. जणू हा अंधकासुराचा मृत्युच.
अंधकासुर वध
त्रिपुरातंक
यापुढच्या शिल्पपटात त्रिपुरांतक शिवाची मूर्ती आहे.शिवाने आपल्या हाताने धनुष्याची प्रत्यंचा आकर्ण तानून धरलेली असून एका हाताने तो विष्णूरूपी बाण धनुष्याला जोडण्याच्या तयारीत आहे. एका हातात नंदीध्वज असून मागच्या हाताने त्याने त्रिशुळ धरीला आहे.
त्रिपुरांतक शिव
पुढे एका खणांत शिवतांडव कोरलेले आहे.
शिवतांडव
इथून पुढच्या शिल्पपटांतही पौराणिक कथांमधील काही शिल्पपट कोरलेले आहेत. इथून पुढे जाता आता कोनाड्यात शिवमूर्तींबरोबरच वैष्णव मूर्ती सुद्धा कोरलेल्या दिसून येतात.
शंख व चक्र धारण करणार्या विष्णूचे विनयशाली रूप
कोनाड्यांतील शिल्पपट
रावण गर्वहरण
पुढील एका शिल्पपटात गोकर्ण महाबळेश्वराची कथा कोरलेली आहे. रावण शिवलिंग उचलण्याच्या प्रयत्न करतो आहे पण ते न उचलेले जाता अधिकाधिकच मोठे होऊन रावणाचे गर्वहरण होते.
रावणगर्वहरण
त्यापुढे एका खणात विष्णूचा नरसिंहावतार कोरलेला आहे. अगदी दक्षिण भारतीय शैलीतील ही मूर्ती आहे.
नरसिंहावतार
यानंतरच्या एका शिल्पपटात शेषशायी विष्णूच्या नाभीतून उमललेल्या कमलावर झालेला ब्रह्मदेवाचा जन्म कोरलेला आहे.
शेषशायी विष्णू
त्रिविक्रम
यापुढे एका शिल्पपटात गोवर्धन गिरीधारी दाखवला असून त्यापुढील खणात विष्णूची देखणी त्रिविक्रम मूर्ती आहे. अर्थात वामनावतार.खालच्या बाजूला बटूरूपातील वामन उभा असून त्याच्या हातावर उदक सोडून तीन पावले मावतील इतकी भूमी देणार्या बळीराजाची ऊर्ती कोरलेली आहे तर त्याच्या बाजूला दैत्यगुरु शुक्राचार्य उभा असून तो बळीला त्यापासून परावृत्त करतो आहे. पण बळीने अखेर दानाचे उदक सोडल्यावर विष्णूने आपले त्रिविक्रमाचे मूळ रूप प्रकट केले. एक पाय अतिशय उंच करून त्याने जणू स्वर्गच पादाक्रांत केला आहे तर दुसर्या पायाने त्याने सर्व पृथ्वी व्यापून टाकिली आहे आता जणू तो बळीला तिसरा पाय कुठे ठेऊ असे विचारत आहे.
त्रिविक्रम मूर्ती (वामनावतार)
यानंतरच्या शिल्पपटात गरूढारूढ विष्णू दाखविला आहे.
यानंतरच्या शिल्पपटात वराहवतार कोरलेला आहे. वराहाने आपल्या दंतांवर पृथ्वी तोलून धरलेली असून तो हिरण्याक्षाचा वध करताना दाखविला आहे.
वराहावतार
याच्या शेजारी आहे कालियामर्दन. इथे कालियानाग मनुष्यरूपात दाखवला असून विष्णू त्याचे मर्दन करत आहे. ही बहुधा कालियामर्दनाची मूर्ती नसूही शकेल. कदाचित विष्णू दुसर्याच एका नागाचे दमन करताना कोरलेला असेल.
कालियामर्दन
यानंतरच्या शिल्पपटात विष्णूची मूर्ती कोरलेली असून उजव्या हातात कौमोदकी गदा येथे स्त्रीरूपात दाखवली आहे. अर्थात गदेवर स्त्रीमूर्ती कोरलेली आहे. एक हात अभयमुद्रेत असून तिसर्या व चौथ्या हातांत अनुक्रमे चक्र व शंख कोरलेले आहेत.
विष्णू आयुधमूर्ती
ह्या प्रदक्षिणापटाच्या शेवटच्या खणांत अन्नपूर्णेची मूर्ती आहे. तिच्या एका हातात कमंडलू तर दुसर्या हातात धान्याचे कणीस असून तिसर्या हाती जपमाला तर चौथा हात अभयमुद्रेत आहे.
कलेच्या दृष्टीने हि शिल्प साधारण म्हणावी अशीच आहेत.
अन्नपूर्णा
प्रदक्षिणापथ
कैलास एकाश्म मंदिराच्या डाव्या बाजूकडून, पाठीमागून व उजवीकडच्या अशा एकसलग असलेल्या प्रदक्षिणापथामधून आपण आता बाहेर येतो. याच बाजूला भिंतीत आतल्या बाजूस कोरलेले आहे एक दुमजली लेणे अर्थात यज्ञशाळा.
यज्ञशाळा
दालनाच्या डाव्या बाजूला भिंतींसमोर तीन स्त्रियांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यात मध्यभागी असलेल्या एका स्त्रीला दोन्ही बाजूंच्या दासी चवर्या ढाळतांना दाखवल्या आहेत. ही मधली स्त्री कोण याचा उलगडा होत नाही. एका दासीला टेकून एक बटू बसला आहे.
यज्ञशाळेतील डावीकडील शिल्प
सप्तमातृका
तर यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेल्या आहेत त्या सप्तमातृका, वीरभद्र शिव आणि गणेश
या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या ह्या सप्तमातृका. या आहेत ब्रम्हा,शिव्,कार्तिकेय्,विष्णु,वराह, इंद्र आणि रुद्र यांच्या शक्ति ( पत्नी नव्हे ) या सर्व देवतांची मुख उत्तरेकडे तोंड करुन आहेत.मात्र पश्चिमेकडे तोंड करुन दोन चवर्या ढाळणार्या सेविकांच्या मध्ये राष्ट्रकुट राजाची राणी महिषी बसली आहे.यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. हि बालके खोडकर आहेत.कोणी आईच्या मांडीवरुन घरंगळतोय, तर कोणी तीच्या कर्णकुंडलाशी खेळतोय इत्यादी.ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतिकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. प्रत्येक मूर्तीच्या खाली तीचे वाहन कोरलेले आहे. हंस, नंदी, मोर, गरूड, घुबड, हत्ती आणि कोल्हा अशी ती वाहने. सप्तमातृकांची वाहने पुरांणांमध्ये भिन्न भिन्न अशी दाखवलेली आहेत.
सप्तमातृका शिल्प
सप्तमातृकांची वाहने
सप्तमातृकांची वाहने
काल, काली आणि दुर्गा
सप्तमातृकांच्याच उजवया बाजूच्या भिंतीत कोरल्या आहेत तीन मूर्ती. त्यातली एक मूर्ती आहे सर्वभक्षक कालाची अर्थात साक्षात मृत्युची. जराजर्जर, अस्थिपंजर अशा ह्या मूर्तीच्या मांडीवर एक प्रेत आहे. मृत्यु जणू त्या प्रेताला आधार देत आहे. तर दुसरा पाय अजून एकाच्या मस्तकी ठेवलेला आहे. कालाच्या शेजारीच डावीकडे त्याचा एक सहाय्यक गण कोरलेला आहे. या मूर्तीवरील कालाच्या चेहर्यावरील भाव भयानक न रेखाटता अतिशय निर्विकार रेखाटले आहेत. जणू मृत्यु हे एक अटळ्सत्य असल्याचे तो दाखवून देत आहेत.
कालाच्याच शेजारी उजवीकडे एक स्त्रीमूर्ती दाखवली आहे ती कोण याचा उलगडा होत नाही बहुधा कालीची ती प्रतिमा असावी तर सर्वात शेवटी उजवीकडे दुर्गाभवानीची मूर्ती कोरलेली आहे. सिंहारूढ आणि हाती त्रिशुळ धारण करणारी ही मूर्ती कमालीची देखणी आहे.
एकाच ठिकाणी सप्तमातृका आणि काल, काली मूर्ती म्हणजे जीवन आणि मृत्युचे प्रतिकच.काहींच्या मते या शिवकाली, भद्रकाली आणि महाकाली आहेत.
खालील तीन फोटो एकाच सभेतील आहे. सगळ्या स्त्रिया कडेने बसलेल्या आहेत. मधेच गणपती फक्त सभ्य पणे दिसतो.
आणि शेवटी ह्या स्त्रियांनी पुरुषांना आपल्या पायाखाली चेंगरले आहे. चेंगरलेले पुरुष नग्न आहेत. उजवीकडे विद्रूप तोंडाची आणि आपल्या फासळ्या बाहेर आलेली स्त्री कोण असेल ? आणि तिने दोन तीन पुरुषांना आपल्या पायाखाली,कमरेखाली दाबून का ठेवले असेल ?
काल, काली आणि दुर्गा
कालाच्या पायाशी एकावर एक पडलेले दोन नग्न देह आहेत.याचा अर्थ मृत्यु पिढ्यानपिढ्या रिचवतो तरी त्याची भुक शमत नाही, असा घेता येइल.काळाच्या चेहर्यावर जे करुण भाव आहेत, ते यासाठी आहेत कि हि मर्त्य मंडळी मृत्युला का घाबरतात ? 'जातस्य हि ध्रुवो मृत्युध्रुवं जन्म मृत्यस्य च'. अशी स्थिती असल्यामुळे या मर्त्यांना रोगजर्जर झाल्यावर, वय उलटून गेल्यावर हा मृत्युच नवा जन्म देणार आहे,खरे तर त्यांनी म्हणायला हवे 'सुंदर मी होणार, नव्या तनुचे ,नव्या शक्तिचे पंख मला फुटणार'. या शिल्पाचे असे एक सांगणे आहे कि यातून मृत्युची ओळख करुन घ्या. पुनर्जन्माची कल्पना आणि देहाचे नश्वरत्व लक्षात यावे.येथे मध्यात द्रोणचिती यज्ञकुंड आहे म्हणून या दालनाला म्हणायचे यज्ञ.
यज्ञशाळा बाहेरील बाजूने
यज्ञशाळेचा जिना उतरून परत खालच्या प्रांगणात यावे.
ध्वजस्तंभ :-
नंदीमंड्पाच्या दोन्ही बाजुला प्रचंड मोठी गजशिल्प दिसतात आणि त्याचबरोबर दोन स्तंभ दिसतात. हे ध्वजस्तंभ ४५ फुट उंचीचे असून मंदीराला एक डौल निर्माण करतात. वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे हे स्तंभ. हे शिवमंदीर असल्यामुळे या ध्वजस्तंभावर त्रिशुळ कोरले असावे जे तोडलेले आहे. हे स्तंभ द्रविड शैलीचे आहेत.यात स्तंभ मधेच निमुळता होउन पुन्हा विस्तृत आकाराचा होतो.
आता इथे परत दुसर्या बाजूचा स्तंभ आणि गजराज आहे तर समोरीला बाजूस भितींवर काही प्रसंग कोरलेले आहेत.
आता वेरूळच्या कैलास एकाश्म मंदिरातील बाहेरील भिंतीकडील बाजूची प्रदक्षिणा आता पूर्ण झाली. कैलास लेणीच्या ह्या भागात असंख्य शिल्पाकृती आहेत, इतक्या की त्यांची मोजदाद करणेही जवळपास अशक्य आहे, तरिही जितक्या मूर्ती इथे देणे शक्य आहे तितक्याची माहिती आपण घेतली.
आता आपला प्रवेश होईल तो कैलास शिवमंदिरात.
यादवकाळापर्यंत वेरूळ लेणींमध्ये शिल्पकाम चालूच होते. जैन लेणींमधला एक देवनागरी शिलालेख त्याचा पुरावाच. रामदेवराय यादव पण कैलास लेण्यातील महादेवाच्या दर्शनाला यायचा असे उल्लेख आहेत. शहाजीराजांचे पिता मालोजीराजे ह्यांचे वडील बाबाजी भोसले वेरूळ गावचे पाटील होते. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार तर खुद्द मालोजीराजांनीच केला. साहजिकच वेरूळची लेणी पूर्णकाळ ज्ञात होतीच. वेरूळ लेण्याचा पहिला विध्वंस अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याच्या कारकिर्दीत झाला असावा. तर नंतर औरंगजेबानेही वेरूळ लेणी बरीच भग्न केली. औरंगजेबानंतर मात्र ही वेरूळची लेणी बेवसाऊ झाली. जेम्स फर्ग्युसनच्या १८४५ साली 'रॉक कट टेम्पल्स ऑफ इंडिया' ह्या पुस्तकात वेरूळ लेण्यांची तत्कालीन छायाचित्रे आहेत त्यात त्यांची बरीच पडझड झाल्याचे दिसते.
आपण कैलास लेणीमधल्या बाह्यभागातील भित्तीशिल्पे, लंकेश्वर गुहा तसेच यज्ञशाळा आदी भागाची सफर केली आता चला मुख्य कैलास मंदिरात.
मंदिर रचना
मुख्य मंदीराच्या शिखराला तीन थर असून त्यावर अष्टकोनी स्तूपिका आहे. त्यावरील कलश किंवा कळस भाग आज शिल्लक नाही. थरांवर शालाशिखरे असून टोकाशी कुटशिखरे आहेत. चोल काळात असणार्या द्रविड शैलीत उभारलेल्या मंदीराचे एक वैशिष्ट्य इथे दिसून येते ते म्हणजे अंतराळावर असणारा शुकनास. शुकतासिकेच्या पुढ्यात कमानीत दक्षिणामुर्ती शिवाची मुर्ती आहे.सभामंडपाच्या छतावर आरोळी ठोकून पहारा करणारे चार दिशेला तोंड करुन असणारे चार सिंह आहेत.या मंदीरसंकुलात आणखीही काही छोटी मंदीरे आहेत.उदा. नैऋत्य कोपर्यात असणार्या तीन पवित्र नद्यांचा मंडप.
कैलासाची रचना (त्यावरील डोंगरावरून)
ही झाली कैलासाची थोडक्यात रचना. त्याचे सविस्तर वर्णन करणे आवाक्याबाहेरचे आहे त्यामुळे इथे थांबून आपण आता कैलासाच्या मुख्य अश्ममंदिरावरील काही प्रमुख शिल्पे पाहूयात.
महायोगी शिव
हे शिल्प नंदीमंडप आणि सभामंडप यांना जोडणार्या सेतूच्या खालील दालनात आहे.कमलासनावर बसलेली योगमुद्रेतील ही भव्य शिवप्रतिमा. हे कमलासन तीन सिंह कोरलेल्या एका सिंहासनावर अधिष्ठित आहे. अष्टभुज शिवाच्या एका हाती कमळ असून मांडीवरील एक हात अभयमुद्रेत आहे. शिवाच्या दोन्ही बाजूंना वादक कोरलेले असून शिवगण बसलेले दाखवले आहेत तर वरील बाजूस इंद्र, यम, वायु, वरूणादिक अष्टदिक्पाल आपल्या हत्ती, रेडा, हरीण, एडका अशा वाहनांवर महायोगी शिवाच्या दर्शनास आलेले आहेत.
महायोगी शिवाची ही प्रतिमा बरीचशी कमलासनावर बसलेल्या बुद्धप्रतिमेसारखीच आहे. बौद्ध लेण्यांकडून ब्राह्मणी लेण्यांकडे स्थित्यंतर होत असताही मूळ शैली तशीच कायम राहिली असल्याचे हे उदाहरणच. एकाच वेळी गजासुराचा वध करणारे रौद्ररुप तर त्याचेच सौम्य , शांतरुप दोन्हीही सारख्याच कौशल्याने कोरणारा शिल्पी आपल्याला येथे भेटतो.
महायोगी शिव
ह्या सौम्य मूर्तीच्या अगदी समोरच आहे एक शिवाचे रौद्र स्वरूप दाखवणारे एक भव्य शिल्प, गजासुरवध.
गजासुरवध
दशभुज शिवाच्या उजव्या कोपर्यात एक हत्ती दाखवला आहे. एक शिवाने त्याचा एक दात उपटून आपल्या हाती घेतला आहे. तर त्याला संपूर्ण आडवा फाडून त्याच्या कातड्याचेच गजपृष्ठाकार छत शिवाने मस्तकी लावले आहे. गळ्यात नागबंध आणि नरमुंडमाला धारण करणारा शिव एक पाय जमिनीवर तर दुसरा पाय असुरांच्या मस्तकी ठेवून उभा आहे. शिवाच्या पायांच्या बाजूलाच सप्तमातृका बसलेल्या आहेत. त्यांची मस्तके जरी भग्न झालेली असली तरी शेवटची चामुंडा तिच्या भयप्रद चेहर्यामुळे सहजच ओळखू येते आहे. शिवाच्या दोन पायांच्या मध्ये भृंगी शिवगणांसह नृत्य करत आहे. तर बाजूलच एक भेदरलेला शिवगण शिवाच्या शेल्याखाली लपून बसला आहे. तर शिवाच्या डाव्या कोपर्यात कमलासनावर बसलेल्या पार्वतीच्या हनुवटीवर शिव आपला एक हात टेकवून तिला धीर देत आहे. पार्वतीच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका हातावर शिवाने वाडगा धारण केला आहे. जणू काही गजासुरवधानंतर तो आता अंधकासुराच्या वधाची तयारी करत आहे.
गजासुरवध
आता ह्या दालनातून बाहेर पडून आपण मंदिराच्या डाव्या बाजूस फेरी मारण्यासाठी निघायचे. त्याआधी तिथे सभामंडपाकडे जाणार्या जिन्याच्या अगदी शेजारीच आहे रावणानुग्रहशिवमूर्ती. ह्या मूर्तीचे वर्णन आपण आधीही पाहिलेले आहेच शिवाय परत पुढे अजून एक सर्वांगसुंदर रावणानुग्रहमूर्तीचे वर्णन येणारच आहे त्यामुळे इथे त्याची माहिती न देता फक्त चित्र देतो. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल कोरलेले आहेत.
रावणानुग्रहशिवमूर्ती
नंदीमंडपाला लागून असलेल्या डाव्या बाजूच्या भिंतीवर आहे नटराज शिवाची मूर्ती
नटराज शिव
हाती त्रिशूळ, अग्नीज्वाळा, डमरू, वाडगा, नाग आदी धारण केलेला दशभुज शिव नृत्यमुद्रेत आहे. शिवाचे हे दिलखेचच नृत्य पार्वती अगदी मन लावून पाहात आहे. दोन्ही बाजूंना गंधर्वयुगुले हे नृत्य बघायला आलेली आहेत.
नटराज शिव
आता मंदिराच्या डावीकडून फेरी मारताना येतो एक भव्य शिल्पपट, महाभारत शिल्पपट
महाभारत शिल्पपट
ह्या शिल्पपटावर विविध थरांत महाभारतातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. ह्या शिल्पपटात एकून सात पट असून प्रत्येक थरांत वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत.
संपूर्ण महाभारत शिल्पपट
सर्वात खालच्या दोन पट्ट्यांवरर कृष्णाच्या जीवनातले प्रसंग कोरलेले आहेत. गोकुळातील कृष्ण त्याच्या दोस्तांबरोबर गुरांसहित वृक्षांवर क्रिडा करताना दाखवला आहे, दह्याची टांगलेली हंडी फोडताना, शकटासूर, कंसवध असे विविध प्रसंग येथे कोरलेले आहेत.
कृष्णचरित्रातले प्रसंग
नंतरच्या काही थरांमध्ये महाभारतातील काही प्रसंग आहेत. यातील बरेचसे प्रसंग भारतीय युद्धावरचे आहेत. यातील प्रत्येक पटाचे वर्णन करणे खरोखर अशक्य आहे.
महाभारतीय युद्धातील प्रसंग
एका थरात अभिमन्युवधाचे दृश्य कोरलेले आहे.सहा महारथ्यांकडून रथहीन, शस्त्रहीन झालेला अभिमन्यु आता रथाचे चाकच उचलून हल्ला करण्याच्या पवित्र्यात आहे. त्याच्या शरीरात सर्व बाजूंनी बाण घुसलेले आहेत. त्याच्या अगदी शेजारीच खङग आणि ढाल घेऊन दौश्शासनी त्याच्यासवे द्वंद्व करत आहे.
अभिमन्युवध
मंदीराच्या बाह्यभिंतीवर असणारी मैथुन शिल्प
हि अलिंगनमग्न जोडपी पाहून ज्ञानेश्वरीतील ओवी आठवते, 'तिथे अलिंगनमेळी | आपोआप होय कवळी | जेथ जल जसे ज़ळी | वेगळेची न दिसे'
मार्कंडेयानुग्रह
ह्याच्या अगदी जवळच मार्कंडेयानुग्रहाचे भव्य शिल्प आहे. मागच्या भागात हे शिल्प एकदा भेटीस आलेच होते. हे पण जवळपास तसेच पण त्यापेक्षा मोठ्या आकाराचे आणि किंचित वेगळे असे आहे.
पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. शिवलिंगाला कवटाळून बसलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. आपल्या लाडक्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो, तसेच एका हाताने आपला त्रिशुळ त्याच्या छातीत खुपसतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव असेही म्हटले जाते. ह्या शिल्पातला शंकराचा चेहरा किंचित बायकी वळणाचा वाटतो. कदाचित शिवपार्वतीचे एकत्र प्रतिक म्हणून अशी मूर्ती कोरली असावी.
मार्कंडेयानुग्रह
गजपट्ट
यानंतर आता मंदिराला फेरी मारताना मंदिराच्या सर्व बाजूंना हत्ती, शिंह आदि पशू कोरलेले दिसतात इथून दिसणारी कळसांची रचना अतिशय लक्षवेधी दिसते तसेच मधून मधून काही आगळ्या मूर्ती भेटीस येतात.

गजपट्ट
सिंहाचा प्रतिकार करणारे हत्ती
कैलाश मंदिराचा पाया म्हणजे कल्पनाशक्तीचा कळस. हे पूर्ण मंदिर अनेक हत्तींनी मिळुन आपल्या पाठीवर पेललेले आहे हि कल्पना. संपूर्ण मंदिरामध्ये हत्ती आणि सिंह या प्राण्यांना दिले गेलेले महत्व ह्या प्राण्याचे भारतीय संस्कृतीत असलेले महत्व दर्शवते.
कैलाश मंदिरावर चित्रांच्या आणि मूर्त्यांच्या माध्यमातून पुराणातील अनेक कथा साकारण्यात आल्या आहेत.
शिखरांची मनोवेधी रचना
भव्य शिखरे
छत तोलून धरणार्या भारवाहक यक्ष प्रतिमा
आता मंदिराला फेरी मारत आपण पलीकडच्या बाजूला येतो. ही बाजू म्हणजे यज्ञशाळा अथवा सप्तमातॄकागुहेसमोरील मंदिराची बाजू. इथे एक सर्वांगसुंदर आणि तितकेच भव्य असे शिल्प आहे ते म्हणजे रावणानुग्रहाचे.
रावणानुग्रहशिवमूर्ती
रावणानुग्रहशिवमूर्ती वेरूळच्या इतरही बर्याच लेणींत खोदलेली आहे. खुद्द इथल्या कैलास एकाश्ममंदिरातही ह्या एकापेक्षा अधिक मूर्ती आहेत. पण इथली मूर्ती सर्वात देखणी आहे.
कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास आला आहे. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो आहे. इथे रावण दशमुखी आणि वीस हातांचा दाखवला आहे.त्याने कैलासाच्या तळास जाऊन आपल्या दहा हातांनी कैलास त्याने उचललेला आहे .कैलासाला हादरे बसत आहेत म्हणून पार्वती घाबरुन शिवाच्या आसर्याला जाते. तर विस्मयमुद्रेत शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरत आहेत. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावणाला जाणीव होते की अहंकार सोडून शरण जायला हवे आणि तो प्राणांची भीक मागून शिवतांडव स्त्रोत्र गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो.
शिल्पपटात कैलास पर्वत उठावात कोरलेला आहे तर त्याच्या खालच्या भागात खोबणी करून त्यात रावणाचे शिल्प कोरलेले आहे. रावणाची मस्तके सुटी आहेत. कैलास उचलताना रावणाने एक पाय गुडघ्यात मुडपून दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोविला आहे. आपल्या वीस हातांनी सर्व शक्ती पणास लावून त्याने कैलास अर्धवट उचललेला आहे. इतकी प्रचंड ताकत पणास लावताना साहजिकच रावणाची मान तिरकी झालेली असून कानातले एक कुंडल खांद्यावर टेकलेले आहे तर दुसरे कुंडल हवेत झुलत आहे. कैलास पर्वतावरील घनदाट वनराजी त्यावर झाडे आणि त्यावरील भयभीत मर्कटे कोरून दाखवली आहे. वृक्षराजीच्या वर भयभीत शिवगण तर शेजारी दोन द्वारपाल कोरलेले आहेत. पार्वतीच्या शेजारी असलेली एक दासी पाठमोरी होऊन पळून जात आहे. तर भयभीत पार्वतीला निर्विकार शंकर धीर देत असून एका पायाने कैलास दाबून धरत आहे. आकाशात अष्टदिक्पाल रावणाचे हे गर्वहरण पाहावयास जमले आहेत.
या शिल्परचनेद्वारे शिल्पीने एक संपुर्ण पाषाणकाव्य उलगडून दाखवले आहे.रावणाचा आवेश वीररसाची कल्पना देतो. पार्वतीजवळ असलेली आणि घाबरलेली सखी भयरस दाखवते.पार्वातीच्या शिवाला बिलगण्यातून शृंगाररस जाणवतो. तर अविचल शिवाकडे पाहून शांतरस दिसतो.नवरसापैकी चार-पाच रसांचा प्रत्यय देणारे हे शिल्प जगातील सर्वश्रेष्ट शिल्पापैकी एक मानावे लागेल. पण दुर्दैवाने ना आपल्याला ना आपल्या सरकारी अधिकार्याना त्याची जाणिव.
रावणानुग्रहशिवमूर्ती किंवा कैलासोत्थापन
रावणाची अचाट ताकत दाखवणारा मुद्राभिनय
हे शिल्प पाहून थोडे पुढे जाताच आपण अजून एका भव्य शिल्पपटापाशी येतो. रामायण शिल्पपट
रामायण शिल्पपट
हा शिल्पपट महाभारत शिल्पपटाच्या बरोबर विरूद्ध बाजूस आहे. म्हणजे कैलास मंदिराच्या डाव्या अंगाला महाभारतपट तर उजव्या अंगाला रामायणपट.
रामायणासंबधीत खालील श्लोक लक्षात घेतला कि त्यातील प्रसंग आकारबध्द केले आहेत असे वाटते.
आदौ राम तपोवनादि गमनम | हत्वा मृगं काच्चनम |
वैदेही हरणं जटायु मरणं | सुग्रीव संभाषणम |
वाली निर्दलम समुद्रतरणम | सुग्रीव संभाषणम |
पाश्चात रावण कुंभकर्ण हननम | एतापि रामायणम |
या शिल्पपटात एकूण आठ थरांत रामायणातील विविध प्रसंग कोरून काढलेले आहेत. हा शिल्पपट उजवीकडून डावीकडे असा सुरु होतो व पुढील थरात तो उजवीकडून डावीकडे विस्तार पावतो व परत तसेच त्यामुळे ह्या शिल्पपटाला एकप्रकारे सलगता आलेली आहे.
रामायणाचा संपूर्ण शिल्पपट
आता यातील थर आपण विस्ताराने पाहू
यातील पहिल्या थरांत सीतास्वयंवर ते राम, लक्ष्मण, सीता वनवासाला जातात इथपर्यंतचा कथाभाग आलेला आहे तर अगदी शेवटी निषादराज गुह्यकाच्या नौकेने ते नदी पार करताना दाखवले आहेत. दुसर्या थरात रामाशी विवाह करण्याच्या अभिलाषेने आलेल्या शूर्पणखेचे नाक कापतांना लक्ष्मण दाखविला असून नंतर शूर्पणखेने आपले राक्षसी रूप प्रकट केले आहे. त्यापुढे खर-दूषणादी राक्षसांचा वध करतांना दाखविले आहेत. तिसर्या थरांत सुवर्णमृग कोरलेला असून त्याशेजारी बसलेली सीता रामाला सुवर्णमृगाचे कातडे आणण्यासाठी पाठवीत आहे. रामाने केलेला सुवर्णमृगाचा वध आणि त्याने रामाच्या आवाजात फोडलेली किंकाळी पाहून लक्ष्मण रामाच्या शोधात निघालेला आहे हे पाहून रावण सीतेला बळजबरीने पळवून नेत आहे. त्यापुढे रथारूढ रावण खाली उतरून जटायूशी युद्ध करतांना दाखवला आहे तर त्याच्या पुढच्या शिल्पामध्ये हनुमानाची राम-लक्ष्मणाबरोबर झालेली पहिली भेट दर्शविली आहे.
पहिले तीन थर
ह्या पुढच्या चौथ्या थरात रामाच्या सामर्थ्याविषयी शंकित सुग्रीवाला राम आपले अमोघ बाणसामर्थ्य दाखवतो आहे. सात प्रचंड सालवृक्षांच्या खोडातून एकच बाण तो आरपार मारीतो आहे. ह्याच्या पुढे वाली सुग्रीवाचे द्वंद्वयुद्ध सुरु असून राम पाठीमागून वालीचा वध करतांना दाखवला आहे. राज्यप्राप्तीमुळे संतुष्ट सुग्रीव आता वानरांना सीतेच्या शोधाची आज्ञा देत आहे. ह्या पुढच्या पाचव्या थरांत सीतेच्या शोधात निघालेले वानर दाखवले आहेत. तिथे हनुमान एका योद्ध्याशी युद्ध करताना दाखविला आहे. त्याच्या धारदार नाकावरून हा बहुधा जटायूचा भाऊ संपाती असावा. गैरसमजाचे निराकरण झाल्यावर स्वसामर्थ्याची जाणीव झालेला हनुमान महेन्द्र पर्वतावरून उड्डाण करून समुद्रोल्लंघन करायच्या तयारीत आहे तर त्यापुढे सिंहिका राक्षसीने सावली अडवून पकडलेला हनुमान मोठ्या उशिराने तिचा वध करून पुढे निसटून जात आहे.
चौथा व पाचवा थर
यानंतरच्या पाचव्या पट्टीत अशोकवनातील सीता आणि हनुमानाची भेट चित्रित केली आहे व त्यापुढे हनुमान अशोकवाटिकेचा विद्ध्वंस करतांना दाखवला आहे. नंतर हनुमान अआणि इंद्रजिताचे युद्ध आणि त्यानंतर हनुमाना ब्रह्मास्त्राद्वारे बंदिस्त करून रावणापुढे सादर करणे. इथे पुढे मात्र शिल्पकाराने प्रसंग कोरण्यात थोडी गल्लत केलीय. इथे हनुमान रावणापुढे शेपटीच्या वेटोळ्यांनीच आसन तयार करून रावणापुढे बसलेला दाखवलाय वास्तविक हनुमानास येथे बंदीवान केलेले असते. समुद्रपार करून लंकेच्या तीरावर प्रवेश केल्यावर समेटाचा शेवटचा प्रयत्न करून म्हणून राम अंगदाला दूत म्हणून पाठवतो व तिथे दूताला साजेसे आसन न मिळाल्याने अंगद स्वत:च्याच शेपटीचे वेटॉळे करून आसन म्हणून त्याचा उपयोग करतो तो हा मूळ प्रसंग. याच्या पुढे हनुमान लंकेच्या प्रासादांवरून उड्या मारत लंकादहन करताना दाखवला आहे.
यानंतरच्या सहाव्या थरात हनुमान लंका भेटीचा वृत्तांत आणि सीतेचे कुशल श्रीरामाला कथन करताना दाखवला आहे. व त्यापुढे सेतूबंधनाचा प्रसंग कोरलेला आहे. प्रचंड खडक वानरसैनिक वाहोन आणत आहेत. त्यांछ्या भाराने ते वाकलेले आहेत. वाहताना होणारे कष्ट त्यांच्या देहबोलीत पुरेपूर जाणवत आहेत. थकलेल्या वानरांकडून पुढे दगड उचलायला नव्या ताज्या दमाचे वानर थांबलेले आहेत व ते दगड पुढे वाहून समुद्रात टाकत आहेत. समुद्राच्या पुढ्यातच श्रीराम बसलेले आहेत. लाटांचा आभास करून कोरलेला समुद्र अगदी खराखुरा वाटत आहे.
पाचवा आणि सहावा थर
यानंतरच्या शेवटच्या थरात उजवीकडून डावीकडे जाता सुरुवातीला कुंभकर्णवधाचा प्रसंग कोरलेला आहे. नंतर वानरसैनिकांचे युद्ध, हनुमंतहस्ते (बहुधा) प्रहस्ताचा वध किंवा रावण- हनुमान द्वंद्व असा प्रसंग साकारला आहे. नंतर बहुधा सीता-श्रीरामाचे मिलन आहे. यात रावणवधाचा प्रसंग मात्र दिसत नाही. या शेवटच्या थरातील मूर्ती बहुतांशी भग्न असल्याने प्रसंग नीटसे ओळखता आले नाहीत. हाच थर डावीकडून उजवीकडे असा पाहिल्यास वानरसैनिकांचे युद्ध, हनुमानाची लढाई व शेवटी रामहस्ते रावणवध असाही वाचता येईल किंबहुना असाच वाचता आल्यावरच ही सर्व प्रसंगमालिका बरोबर जुळते पण मला तरी उजव्या कोपर्यातील राक्षसाची मूर्ती तिच्या भव्यतेमुळे कुंभकर्णाचीच अधिक वाटली.
शेवटचा सातवा थर
आपण वेरूळच्या मुख्य कैलास मंदिराला फेरी मारून रामायणाच्या शिल्पपटापर्यंत आलो होतो. तर चला आता आता त्यापुढील काही शिल्पांचा आस्वाद घेत घेत सभामंडपात प्रवेश करूयात.
रामायणाच्या शिल्पपटाच्या पुढेच पद्मासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाचे एक शिल्प आहे.
जटायूवध
रामायणाच्या शिल्पपटाच्या थोड्या वरील बाजूस रावण आणि जटायू यांच्या युद्धाचा प्रसग कोरलेला आहे.
सीतेला आकाशागामी रथातून पळवून नेत असलेल्या रावणाला पाहून जटायू त्याच्यावर त्वेषाने हल्ला चढवत आहे. रावणाचे शरीर एका दिशेला तर रथाचे घोडे तो रथ विरुद्ध दिशेस वाहून नेत आहेत. चावे घेत असलेया जटायूचा वध करण्यासाठी एका हाताने रथाचे चक्र तर दुसर्या हातात शक्ती धारण केली आहे.
जटायूवध
ह्याच जटायूवधाच्या पुढील बाजूस वाली सुग्रीव युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे.
वालीवध
हा शिल्पपट दोन भागामध्ये विभागला गेलाय. वरच्या भागामध्ये वाली आणि सुग्रीव एकमेकांशी द्वंद्वयुद्ध करताना दाखवले आहेत. तर खालच्या भागामध्ये वालीचे मृत शरीर कवटाळून सुग्रीव दु:ख करीत बसला आहे तर वालीपत्नी तारा धाय मोकलून रडत आहे. तर बाजूला राम लक्ष्मण त्यांचे सांत्वन करायला आलेले दर्शविले आहे. रामाच्या हातून कपटाने वालीवध होण्याचा प्रसंग मात्र येथे कोरलेला नाही हे विशेष.
वालीवध
लकुलीश शिव
या शिल्पपटाच्या थोड्या वरील बाजूस उर्ध्वरेता अवस्थेतील लकुलीश शिवाची मूर्ती आहे. चार हस्त असलेली ही मूर्ती उभ्या अवस्थेत आहे. डावा हात अभयमुद्रेत असून उजव्या हाती त्याने लगूड धारण केले आहे.
लकुलीश शिव
ब्रह्मदेव
लकुलीशाच्या थोडे पुढेच ब्रह्मदेवाची अजून एक मूर्ती आहे. ह्याची दाढी अगदी इजिप्शियन फेरोंसारखी निमुळती आणि लांब आहे.
नरसिंह
ह्या भिंतींवरच नरसिंहाची दोन आगळीवेगळी शिल्पे आहेत. सर्वसाधारणपणे हिरण्यकश्यपूचे विदारण करणार्या नरसिंहाचे शिल्प सर्रास दिसते, तशी येथेही आहेतच तथापि ही शिल्पे विदारण करण्याआधी झालेल्या द्वंद्वाची आहेत.
नरसिंह-हिरण्यकश्यपू द्वंद्व.
-
ह्याच्या पुढील भागात गजेन्द्रमोक्षाचा प्रसंग कोरलेला आहे.
गजेंद्रमोक्ष
विष्णूचा परमभक्त इंद्रद्युम्न राजा पर्वतावर विष्णूचरणी लीन होण्यासाठी कठोर तप करत असता तिथे अगत्स्य ऋषी येतात. तपात मग्न झालेल्या राजाचे अगत्स्यांकडे लक्ष जात नाही तेव्हा संतापलेले अगत्स्यमुनी राजास पुढील जन्मी हत्ती होशील असा शाप देतात. पुढील जन्मी हत्ती झालेला गजेंद्र इतर हत्तींसोबत सरोवरात जलक्रीडा करण्यासाठी उतरला असता एक मगर त्याचा पाय धरून सरोवरात त्याला ओढू लागते. आपल्या पूर्वजन्माचे स्मरण असलेला गजेन्द्र त्याही अवस्थेत विष्णूची मदतीसाठी स्तोत्रगायन करून प्रार्थना करतो. तेव्हा विष्णू गरूडावरून बसून थेथे येऊन मगरीच्या तावडीतून गजेन्द्राची सुटका करून त्याला मोक्ष प्रदान करतात अशी ही कथा.
गजेन्द्रमोक्ष
अंधकासुर-गजासुर वध
गजेन्द्रमोक्षाच्या शेजारीच अंधकासुरवधाचे शिल्प पुन्हा एकदा आपल्यासमोर येते. हे शिल्प मात्र काहीसे आगळे आहे. नीलासुर, गजासुर आणि अंधकासुर अशा ती असुरांचा वध एकाच वेळी शिव करत असल्याचे येथे दाखविले आहे.या शिल्पपटाच्या उजव्या कोपर्यात हत्ती दाखवला आहे.त्याचा एक दात उपटून शिवाने हाती घेतला आहे.त्याचे कातडे सोलून शिवामे छत्रासारखे डोक्यावर धारण केले आहे. हि शिवमुर्ती सुमारे तीन मीटरची असून डावा पाय जमीनीवर रोवला आहे.शिवाचा आवेश पहाता 'डमडमत डमरु ये | खणखणत शुल ये' या कवी भा.रा.तांबेच्या ओळी आठवतात. शंकराने आपला एक पाय नीलासुराच्या मस्तकी दाबून धरलेला आहे. तर गजासुराला फाडल्यामुळे आपले हत्तीचे रूप त्यागून गजासुर आपल्या मूळ राक्षरूपात प्रकट झाला असून त्याचा चेहरा वेदनांमुळे भयानकरीत्या वाकडातिकडा झालेला आहे. तर वरील बाजूस शिवाने आपला त्रिशुळ अंधकासुराच्या छातीत खुपसून त्याला त्रिशुळावरच तोलून धरले आहे आणि एका हाता वाडगा धरून त्याच्या शरीरातले रक्त तो त्यात गोळा करत आहे. वाडग्यातून चुकून निसटलेले रक्त खाली पडून त्यापासून अजून रा़क्षस निर्माण होऊ नये म्हणून सप्तमातृकांतील एकीनेही अजून एक वाडगा उंच धरीला आहे. तर तिच्या शेजारी पार्वती प्रसन्नमुद्रेत बसून आपल्या पतीचा पराक्रम निरखीत आहे.
राक्षसवध
ही शिल्प बघून आता सोपान चढून सभामंडपात जाण्यासाठी निघालो.सभामंडपात प्रवेशद्वाराशेजारील भिंतीवर आहे लिंगोद्भव शिवाची मूर्ती.
लिंगोद्भव
एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.
ह्या शिल्पपटात खालील बाजूस वराहरूपी विष्णू स्तंभाचा तळ शोधत असताना दाखविले आहेत तर वरील बाजूस उजवीकडे चतुर्मुखी ब्रह्मदेव स्तंभाचा वरील भाग शोधत आहेत. आदी अंताचा कसलाही थांग न लागल्याने शेवटी ते लिंगरूपी स्तंभातून प्रकट झालेल्या शिवाला शरण गेलेले आहेत.
लिंगोद्भव शिवप्रतिमा
गंगाधर शिव :-
हा शिल्पपट मंदिराच्या उत्तर भिंतीवर कोरला आहे.यात शिव अभंग अवस्थेत एका बाजुला उभे दाखवले आहेत तर कमलासनावरील पार्वतीने शंकराच्या डाव्या हातात आपला उजवा हात दिला असून ती दोन पायाची अढी घालून उभी आहे. शंकराने जटेत गंगा धारण केलेली दाखवली आहे, तर आपल्या अधिकार क्षेत्रात सवतीचा प्रवेश झाल्यामुळे नाराज झालेली पार्वती दिसते.
नंदीमंडप
आता मंदिराच्या बाह्यभागावरची शिल्पे पाहून नंदीमंडपात जाऊन एक छोटासा फेरफटका मारायलाच हवा.
सभामंडपाच्या पुढ्यातल्या सेतूवरून पुढे जाताच नंदीमंडप लागतो. मंडपात नंदीची भग्न मूर्ती आहे. मंडपाचे शिखर द्राविडि पद्धतीचेच असून शिखराच्या गोपुरावर यक्ष वाद्ये वाजवत असल्याचे दृश्य कोरले आहे. जणू हा नंदीमंडपाच्या सुरुवातीस असलेला वाद्यमंडपच आहे असे ते सुचित करत आहेत. नंदीमंडपातन वेरूळच्या दोन्ही स्तंभांचे सुरेख दर्शन होते.
नंदीमंडपाच्या गोपुरावरील वाद्ये वाजवणारे यक्ष
नंदीमंडपातून दिसणार्या वेरूळ लेणीतील बाह्य भिंतींवर कोरलेल्या इतर मूर्ती
आता परत फिरून चला आता सभामंडपात
सभामंडप
कैलास लेणीमंदिरातील सभामंडपाच्या दाराच्या दोन्ही बाजुला एकेक दांडगा द्वारपाल उभा आहे.विशेष म्हणजे एक आतून येणार्यावर लक्ष ठेवून आहे तर दुसरा आत प्रवेश करणार्याची तीक्ष्ण नजरेने झडती घेत आहे.सभामंडप एकूण १६ स्तंभावर तोललेला असून प्रत्येक स्तंभ सालंकृत असून त्यावर देवीदेवतांची शिल्पे, पौराणिक कथांमधील प्रसंग शिवाय अगदी मैथुनशिल्पेही कोरलेली आहेत. पण सभामंडपातील सर्वात मोठे आकर्षण आहे ते इथल्या छतावरील चित्रांचे. अर्थात सभामंडप अंधारी असल्याने चित्रे पाहण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. किंचित अजिंठा शैलीतली ही चित्रकला यानंतर नामशेष झाली. या खेरीज सभामंडपाच्या छतावर बरोबर मध्यभागी नटराज शिवाचे एक अप्रतिम शिल्प कोरलेले आहे.
-
-
सभामंडपातील स्तंभावरील शिल्पे
-
-
सभामंडपातील स्तंभावरील शिल्पे
सभामंडपाच्या वितानावर आठव्या शतकात केलेले चित्रकाम आहे.त्याच्यावर वरचा थर आहे, दहाव्या शतकातील.पुन्हा एकदा हे मंदीर रंगवले होते हे कडेच्या बाराव्या शतकातील रंगकामावरुन कळते.भोज राजाने केलेल्या स्वारीचे चित्रण तेथे आहेच.शिवाय स्चतिश्री भोजराज अशी रंगीत अक्षरेही आहेत.थोडक्यात कैलास अनेकवेळा रंगवला होता.अहिल्यादेवी होळकरांच्या ताब्यात असतानाही तो रंगवला होता.या रंगवलेल्या चित्रांमुळे या लेण्याला रंगमहाल असे ही नाव मिळाले.
छतावरील नृत्यांगना
छतावरील नृत्यांगना
अंतराल
येथून पुढे जाताच लागतो तो अंतराल, म्हणजेच सभामंडप आणि गर्भगृह यांमधील चिंचोळा भाग. कैलास लेण्यानंतर बांधल्या गेलेल्या मंदीरांच्या अंतराळावर दोन्ही बाजुना देवकोष्ठे असतात. येथे अंतराळाच्या एका भिंतीवर नंदीवर बसलेल्या गौरीशंकराचे शिल्प आहे त्याच्या खालच्या बाजूस शिवपार्वती अक्षक्रीडेचा भग्नावस्थेतील देखावा आहे.धाटणीवरुन हि शिल्पाकृती आकर्षक आणि सुंदर होती असे लक्षात येते.मात्र नृंशस आक्रमकांनी पार्वतीचे मुंडके नाहीसे केले आणि शिवाची संपुर्ण मुर्तीच फोडून टाकली.तर दुसर्या भिंतीवर नंदीवर बसलेल्या शिवाचे शिल्प होते.इथेही आक्रमकांनी पार्वतीचे मुंडके तोडून टाकले.शिवाच्या मांडीवर चिमुकला स्कंद आहे.हि झाली सोमस्कंदशिवमुर्ती. अंतराळाच्या वितानावर ( म्हणजे छतावर ) वरील बाजूस कमंडलू घेतलेली अन्नपूर्णा व तिच्या डावी-उजवीकडे ब्रह्मा आणि विष्णू आहेत.गाभार्याच्या प्रवेशद्वाराच्या एकीकडे आहे मकरस्थित गंगा आणि दुसरीकडे आहे कुर्मस्थित जमुना. या असतात पवित्र आणि भक्तिचे प्रतिक.देवदर्शनाला जायचे तर या दोहोंची आवश्यकता असतेच.
गौरीशंकर
गर्भगृह
अंतराळातून आपला प्रवेश होतो ते थेट गर्भगृहात. गाभार्याचा आकार ४.५७ मीटर ४.५७ मीटर असा आहे.मोठ्या अधिष्ठाणावर आहे प्रचंड शिवलिंग. ते एकेकाळी हिरेमाणकांनी जडवलेले लखलखते शिवलिंग. ज्याची पूजा एकेकाळी राष्ट्रकूट आणि तदनंतर यादवांच्या वैभवशाली सत्ताधीशांद्वारे.मंदीरावर कलश कोरुन झाल्यावर राष्ट्रकुट नृपती प्रथम आपल्या राणीसह तेथे उपस्थित झाला आणि ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात त्याने शिवलिंगावर हिरे माणकांचा अभिषेक केला.
कैलास शिवलिंग दर्शन
गाभार्याच्या भोवती प्रदक्षिणापथ आहे.त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजुला दोन्हीकडे दोन-दोन छोटी देवळे आहेत आणि पुर्वेकडे तीन आहेत.यातील देवमुर्ती आता नाहीत.मात्र दक्षिणेकडे मध्यात जे देउळ होते त्यात सप्तमातृकांचा पट असावा हे कळते. गाभार्याच्या बाह्यभिंतीवर शिवाच्या अर्धनारीश्वर्,तांडव, इत्यादी मुर्ती आहेत.
सभामंडपात पुन्हा परत आलो कि आपल्या उजव्या आणि डाव्या अंगास एकेक अलिंदन म्हणजे अर्धमंडप आहे.त्याच्या बाहेरच्या बाजुस अंधकासुर, गजेंद्रमोक्ष, बालिवध, सीताहरण असे प्रसंग शिल्पबध्द केले आहेत.
उपमंदिरे
दर्शन घेऊन परत सभामंडपात आलो. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना अर्धमंडप आहेत. तिकडे जाण्यासाठी सभामंडपातूनच दरवाजे कोरलेले आहेत. ह्याच प्रवेशद्वारांतून बाहेर पडून आपण पाच लहान उपमंदिरांपाशी येतो. अर्धमंडपातील स्तंभ अतिशय देखणे असून त्यांजवरही कित्येक प्रसंग कोरलेले आहेत.
अर्धमंडपातील स्तंभ
अर्धमंडपातून बाहेर पडून उपमंदिरांपाशी यावे. या एकाही उपमंदिरात सध्या मूर्ती नाहीत. पण ह्यांची शिखरे अतिशय सुरेख कोरलेली आहेत तसेच उपमंदिरांवर बाहेरील भागात तसेच त्याच्या भोवतीच्या मुख्य मंदिराच्या भिंतीवर काही अप्रतिम भित्तीशिल्पे आहेत.
असुरावर पाय देऊन उभा असलेली शिवमूर्ती
एका हाती नाग तर दुसर्या हाती त्रिशुळावर नरमुंड धारण केलेला भैरव शिव
ही बहुधा रूमा आणि सुग्रीवाची युगुलमूर्ती असावी.
भिंतीवरील ही विद्याधर मूर्ती
उपमंदिराची रचना
मंदिराच्या ह्या भागात इतकी देखणी शिल्पकला आहे की येथेली सर्वच चित्रे येथे देणे आवाक्याबाहेरचेच आहे तरी वर दिलेल्या शिल्पाकृतींमधून इकडील सौंदर्याची पुरेशी कल्पना यावी.
सर्वप्रथम कैलास लेणीतील काही चित्रे पाहूयात.
येथे नृत्यप्रसंग रंगवलेला आहे.
ह्याच चित्रपट्टीकेतील ही अजून एक नृत्यमुद्रा
अजून एक
ही सलग अशी चित्रपट्टीका
वरील तीन्ही चित्रे कैलासाच्या सभामंडपातील अंतराळाअलीकडील बाजूच्या छतावर आहेत.ह्या खेरीज नंदीमंडपातील भिंतींवर छतानजीक काही चित्रे आहेत ती पुढीलप्रमाणे
ह्या प्रसंगाचा अजिबातच उलगडा होत नाही.
हा बहुधा रेड्यावर आरूढ यम असावा.
हा एक बटू दिसतोय.
नंदीमंडपातील छतावरील नक्षीकामाचे उरलेले अवशेष
ह्याखेरीज इतरही काही चित्रे येथे आहेत पण बहुतेक सर्वच ओळखण्यापलीकडची आहेत.
ही सर्व शिल्पे बघत बघतच दुसर्या बाजूने सभामंडपात आलो व तेथून बाहेर पडून सोपान उतरून परत कैलास मंदिराच्या प्रांगणात आपण येतो. पण कैलास लेणे बघणे येथेच संपत नाही. त्याचे आतापर्यंत लपलेले सौंदर्य बघण्यासाठी आपल्याला लेणीमंदिराच्या पूर्ण बाहेर जाऊन त्याच्या बाजूच्या डोंगरावर जावे लागते.
डोंगरावर
मंदिर बघूनच बाहेर आलो. उजव्या बाजूस असलेल्या पायर्या चढून डोंगरावर आलो. येथेच उजवीकडे एक लहानसे लेणे खोदलेले आहे. मला तरी ते वेरूळचे मुख्य लेणे खोदण्याआधी केलेले त्याचे एक प्रारूपच वाटले.
कैलासाचेच एक उपलेणे
डोंगरावरून वेरूळ लेणीचे अप्रतिम दर्शन होते.
नंदीमंडप व त्यावरील सभामंडपाला सांधणारा सेतू
येथून पुढे नजर जाताच आपल्याला सभामंडपाचे छत दिसते. खालच्या बाजूने कधी न दिसून येणारा हा भाग. मध्यभागी कमळपुष्पासारखी नक्षी असलेल्या भागावर चार अतिशय देखणे सिंह कोरलेले आहेत. जणू त्यांनी छतावर फेर धरलेला आहे.
सभामंडपाचे छत
सिंह अधिक जवळून
सभामंडपाच्या छतावरून पुधे नजर फिरवताच येतो तो गर्भगृहाचा कळस. हा मात्र शिखरयुक्त असून यावर अतिशय देखणे नकसकाम केलेले आहे.
गाभार्यावरील कळस
कैलास एकाश्ममंदिराची संपूर्ण रचना
नुसते कैलास मंदिर संपूर्णपणे व्यवस्थित बघायला किमान तीन दिवस हवेत. कैलासनाथमंदिराची ही मूळ वास्तूच इतकी देखणी, प्रमाणबद्ध आणि भव्य आहे की, मंदिराच्या बाह्य भिंतीवर एकही शिल्प कोरलेलं नसतं तरी या मंदिराच्या भव्यतेनं आपण दिपूनच गेलो असतो; पण आपले पूर्वज कलेच्या बाबतीत इतके अल्पसंतुष्ट नव्हते म्हणून त्यांनी मुळातच सुंदर असलेल्या मंदिराला उत्कृष्ट शिल्पकलेचा साज चढवलेला आहे.
वेरुळ लेण्यासंदर्भात आणखी काही रोचक गोष्टी माहिती करुन घेउया.

वेरूळ लेण्यातला किरणोत्सव
कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात अथवा प्रतापगड येथील श्री तुळजाभवानी मंदिरात होणारा किरणोत्सव आपण अनेकदा पाहिला, अनुभवला असेल. सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या देवतांच्या मूर्तीवरील चेहऱ्यांना कशी उजळवतात, ते पहाणे खरोखरच रंजक आणि रोमांचित करणारा अनुभव असतो.
अशाच प्रकारचा किरणोत्सव ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ येथील दहा नंबरच्या लेण्यातील बुद्ध मूर्तीवर अनुभवायला मिळतो. हा क्षण अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दीही होते. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण ३४ लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणात जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती बुधवारी आली.
गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली (पिंपळ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलविण्याची प्रथा होती.
दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात..साधारण पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येतो. गेली अनेक वर्षे अनेक पर्यटक केवळ हा किरणोत्सव अनुभवण्यासाठी या विशिष्ट काळात वेरूळला भेट देतात, हे विशेष.
वेरूळ – संपात बिंदूंचे भान ठेवून निर्मिती
वेरूळ हा भारतीय कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना. वेरूळमध्ये जैन, बौद्ध आणि हिंदू असे तिन्ही धर्म गुण्यागोविंदाने नांदताना आढळतात. प्राचीन कलाकारांनी तेथे एकूण चौतीस गुंफांची निर्मिती केली. तिन्ही धर्मीयांचे अनुयायी उपासना करण्यासाठी तेथे येत असत. कातळ वरून खाली कोरत येऊन बनवलेली शिल्पे अजरामर ठरली आहेत. जैन, बौद्ध आणि हिंदू गुंफा एकमेकांच्या “खांद्याला खांदा’ लावून उभ्या आहेत. त्यांतील प्रचंड कैलास लेणे तर सर्व गुणांचा मुकुटमणी आहे. त्याची निर्मिती संपात बिंदूचे भान ठेवून केलेली आहे. तेथे शिवाची भलीमोठी पिंडी असून, भाविक तिचे पूजन करतात. जवळच ‘छोटा कैलास’ ही जैन गुंफा स्थापत्याचा उत्कृष्ट आविष्कार मानली जाते. गुंफा संपात बिंदूंशी समांतर बांधलेली आहे. त्यावर “शुकनासिका’ नावाचे छोटेखानी; पण सुंदर मंदिर आहे. सूर्य वसंत संपात किंवा शरद संपात बिंदूशी आला, की त्यातील प्रतिमेला आपल्या किरणांनी स्नान घालतो. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांत सूर्य, चंद्र आणि तारे यांना विशेष स्थान आहे. त्यामुळे आपल्या तत्त्वज्ञानात त्यांचा सतत संदर्भ येत राहतो. जगातील बहुतेक सर्व धर्मांना ती गोष्ट लागू होते. अर्थातच मग प्राचीन स्थापत्यकारांनी धर्म, पंथ आणि खगोलशास्त्र यांची सांगड घातली नसती तरच नवल! त्या काळी खगोलशास्त्राचा उल्लेख ‘ज्योतिःशास्त्र’ म्हणजे तेजःपुंज अवकाशस्थ ज्योतींचे विज्ञान असा केला जात असे. आता सामान्यतः प्रश्न असा पडू शकेल, की हे सर्व कशासाठी करायचे, काय गवसणार इतके प्रयत्न करून? सामान्यांना त्याचा काय फायदा? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपला समाज प्रगत होत आहे. विज्ञानाची कास धरून अनेक विषयांत प्रगती करत आहे. त्याच वेळी ‘पुराणातील वांगी पुराणात बरी’ अशी काहींची धारणा होणे शक्य आहे; पण ती तितकीशी बरोबर नाही, कारण प्राचीन काळी सामान्यांना समजेल, उमजेल आणि पचेल अशा शब्दांत कथांच्या स्वरूपात विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, नैतिकता अशा अनेक महत्त्वाच्या आणि विविध पैलूंवर पुराणांनी भाष्य केले. त्यांनी ग्रहणात राहू आणि केतू यांचे महत्त्व सांगितले. त्या बिंदूंना राक्षसांची उपमा दिली, ती त्या ठिकाणी सूर्यबिंबाचा र्हास होतो, हे सर्वसामान्यांना समजावून सांगण्यासाठी. भारतीयांना ग्रहणाचे विज्ञान पाचव्या शतकापूर्वी ज्ञात होते. पुराणांत, ब्राह्मणांत, उपनिषदांत अनेक चित्र-विचित्र गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. एकट्या मत्स्यपुराणात चौदा हजार ऋचा आहेत. त्यातील विज्ञानाला अनुसरून किती आहेत, हे शोधून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी असे संशोधन प्रयत्न आपण केलेच पाहिजेत.
संपात बिंदू आणि विष्टंभ बिंदू म्हणजे काय?
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते, त्या वर्तुळाचा अक्ष आणि तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष एकमेकांशी 23.5 अंशांचा कोन करतात. जमिनीवरून पाहता सूर्य पृथ्वीभोवती फिरताना भासतो. तो ज्या मार्गावरून फिरतो, त्याला ‘आयनिक वृत्त’ असे म्हणतात. ते वृत्त आपल्या विषुववृत्ताशी 23.2 अंशांचा कोन करते. ती दोन वृत्ते परस्परांना फक्त दोन बिंदूंत छेदतात. त्या बिंदूंना ‘संपात बिंदू’ असे म्हणतात. त्या बिंदूंवर वर्षातून दोनदा सूर्य येतो, मग त्या दिवशी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते. ते दोन 21 मार्च आणि 21 सप्टेंबर, असे दिवस असतात. त्या दिवशी सूर्य अचूक पूर्वेला उगवतो आणि अचूक पश्चिमेला मावळतो. जगातील सर्व धर्मांमध्ये या दोन बिंदूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील अनेक प्राचीन वास्तू यांच्या अनुषंगाने बांधल्या आहेत. त्याला भारतही अपवाद नाही.
त्याशिवाय आणखी दोन बिंदू आपणास माहीत हवेत. आयनिक वृत्तावर फिरता फिरता सूर्य कधी जास्तीत जास्त उत्तेरकडे जातो, तर कधी जास्तीत जास्त दक्षिणेकडे. पहिला दिवस येतो 21 जून रोजी आणि दुसरा येतो 22 डिसेंबर रोजी. 21 जून रोजी असते ‘उत्तरायण’ आणि दिवस सर्वांत मोठा, तर 22 डिसेंबर रोजी असते ‘दक्षिणायन’, तेव्हा दिवस असतो सर्वांत लहान आणि रात्र मात्र सर्वांत मोठी. ‘विष्टंभ’ आणि ‘अवष्टंभ’ बिंदू म्हणतात ते हेच. ते दोन दिवस सूर्याच्या सीमा दर्शवतात. आपल्या पुराणात आणि प्राचीन वाङ्मयात त्यांना फार महत्त्व आहे. त्यांचाही विचार पूर्वीच्या वास्तुरचनाकारांनी केला होता आणि त्याप्रमाणे आपले तंत्रज्ञान विकसित केले होते.
खगोलशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, स्थापत्यविशारद आणि अभियंते यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अनेक विषयांतील तज्ज्ञ एकत्र आल्याशिवाय असे संशोधन शक्य नाही. मग संगणक, जीपीएस उपक्रम आणि आधुनिक लेसर उपकरणांच्या मदतीने सुरू झालेला शोध येत्या दशकात आपल्या ज्ञानात खूपच भर घालेल यात शंका नाही. आधुनिकतेमध्ये ‘प्राचीनता’ आणि प्राचीनतेमध्ये “आधुनिकता’ यांचा जागरूकपणे समन्वय साधणे आवश्यक होऊन बसले आहे. असा समन्वय भविष्यातील आपल्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ असणार आहे.
मुंबई, पुणे, अहमदाबाद, नाशिक, इंदूर, धुळे, जळगाव इ. शहरांतून औरंगाबादसाठी बसच्या सुविधा उपलब्ध आहेत. सोमवार सोडून आपण कधीही अजिंठा एलोराला जाऊ शकता. औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून दिल्ली व मुंबईसाठी ट्रेनची सुविधा आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्र पर्यटन विभागाचे हॉटेल आहे.
* जर गरमीच्या मोसमात जात असाल, तर सकाळी लवकर पोहोचा. सोबत पाणी, हॅट आणि सनग्लासेस घ्यायला विसरू नका. अर्थात, इथे पर्यटनासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वात उत्तम काळ आहे.
* गुंफांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चढावाचा मार्ग निवडावा लागेल. नंतरचा मार्ग सरळ आणि सोईस्कर आहे. म्हणूनच इथे जाताना आरामदायक चप्पल घाला.
वेरूळ लेणी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत पर्यटकांना भेट देण्यासाठी खुली असतात.
वेरुळ लेण्याच्य आवारात प्रवेश केल्यावर उजवीकडून डावीकडे असा क्रम योग्य ठरतो.
* वानरांपासून सावध राहा.
* युनेस्कोचा वारसा असलेले हे ठिकाण संपूर्ण पाहण्यासाठी आपल्याला ३ ते ४ तास पुरेसे असतात. तसेही संपूर्ण दिवसभरासाठी ही ट्रीप तुम्हाला आनंद देऊन जाईल.
* जेवणासाठी एमटीडीसीची रेस्टॉरंट खूप चांगली आहेत.
* तिकीट विभागाजवळ फिरणाऱ्या फेरीवाल्यांपासून सावध राहा. ते खूप त्रास देतात.
आवश्यक गोष्टी
आपल्या ओळखीच्या दुकानांवर घेऊन जाणाऱ्या गाइड्सपासून सावध राहा. तिथे त्यांचे कमिशन ठरलेले असते. त्यामुळे त्या दुकानांत मिळणाऱ्या वस्तू महाग असतात.
वयोवृद्धांसाठी इथे जाणे थकवा आणणारे ठरू शकते. म्हणूनच जे प्रकृतीने स्वस्थ असतील, त्यांनीच इथे जावे. इथे जाण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे थंडीचा मोसम.
सकाळी लवकरात लवकर गुंफांपर्यंत पोहोचा आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पुन्हा औरंगाबादला परता. जेणेकरून तुम्हाला बीबी का मकबरा, पंचकी, सिद्धार्थ गार्डन व प्राणिसंग्रहालय यांसारख्या पर्यटनस्थळांचाही आनंद घेता येईल.
जायचे कसे-
वेरूळला जाण्यासाठी आपल्याला प्रथम औरंगाबाद गाठावे लागते. औरंगाबादवरून वेरूळ अवघे ३० किमी आहे. वेरूळला जाण्यासाठी सतत बसेस उपलब्ध आहेत तसेच रिक्षा आणि एस्टी महामंडळाच्या विशेष गाड्याही उपलब्ध असतात.
जर नेहमीच्या लाल डब्ब्याने जायचे असेल तर गौताळा अभयारण्याला जाणारी गाडी पकडून वेरूळ येथे उतरणे.
१) संभाजीनगरपासून ३० कि.मी.
२) अजिंठा लेण्यांपासून १०० कि.मी.
३) मुंबईपासून ३०० कि.मी.
४) पुणे शहरापासून २५६ कि.मी.
जवळची प्रक्षणीय ठिकाणे–
१) महाराष्ट्र शासन गॅझेटीयर
२) महाराष्ट्राची लेणी- दाउद दळवी
३) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
४) टिपरे, राधिका, वेरूळचे शिल्पवैभव, पुणे, २००६.
५) मराठी विश्वकोश
६) श्री.गो.ब.देगलुरकर, डॉ. कामाजी डक, डॉ. दुलारी कुरेशी, सागर बोरकर, यांचे लिखाण
८) www.paragmahajani.com, https://www.talesofanomad.com
1. Berkson, C. Ellora : Concept and Style, New Delhi, 1993.
2. Fergusson, James Burgess, James, The Cave Temples of India, Delhi, 1969.
3. Gupte, R. S. Mahajan, B. D. Ajanta, Ellora and Aurangabad Caves, Bombay, 1962.
4. Kannal, Deepak, Ellora : An Enigma in Sculptural Styles, New Delhi, 1996.
5. Parimoo, Ratan Kannal, Deepak Panikker, Shivaji, Eds. Ellora Caves : Sculpture and Architecture, New Delhi, 1988.
6. Pathy, T. V. Elura : Art and Culture, New Delhi, 1980.
7. Soundara Rajan, K. V. Cave Temples of the Deccan, New Delhi, 1981.
८.
९. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.
१०. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.
प्रचि ३०
प्रचि ३१
वेरुळच्या कैलाश मंदिरावर अशोक स्तंभावर असलेल्या चार सिंहाच्या मूर्ती आपल्याला चक्रावून टाकतात.
त्याकाळी सुद्धा गणपतीचे अस्तित्व होतेच.
वेरूळची लेणी सुद्धा रंगीत होती. आता संगाचे फक्त अस्तित्व जाणवते.
देव आणि राजेलोकांच्या गर्दीत खूपच अपवादात्मक सामान्य लोकांच्या प्रतिकृती दिसतात. दोन्ही बाजूला फेटेधारी लोकांनी माझे लक्ष वेधून घेतले.
कैलाश मंदिराच्या छतावरील नक्षिकाम.
Sex was not a bad word, it seems
काही रोम्यांटिक क्षण.
रामायण
https://merwynsrucksack.blogspot.com/2014/04/ellora-caves.html

Cave 28 is located under the cliff over which the stream falls. It has many cells and a vestibule and a shrine having dwarapalas and Vaishnava at each side of the door. Inside the cave, the front wall is equipped with an eight-armed Devi with attendants.
https://indiaheritagesites.wordpress.com/2013/07/31/about-ellora-caves/
f the 12 Buddhist caves at Ellora, the most famous and impressive is cave 10. This is a chaitya hall, known as ‘Vishvakarma Cave’ or ‘Carpenters Cave’. At the far end of the hall is a large statue of Buddha sitting in his preaching pose, whilst towering above you is the cathedral like ceiling carved to give the impression of wooden beams.Every time I’ve visited cave 10 at Ellora there’s been an attendant at the entrance armed with a makeshift mirror, sending a beam of sunlight through the hall to cast a glow onto Buddha himself. He seems to spend most of his day doing this, and on occasions also heading into the cave to show off the impressive acoustics.
If you have time at cave 10, there can be a treat that awaits you. When the number of visitors slows down considerably, as it seems to do around lunchtime, head up the stairs immediately outside the cave entrance to a second level balcony. Here you will find a locked wooden door, which if you are lucky will be opened by the attendant, now free from his mirror duties. The door leads to an internal balcony that overlooks the inside of the hall, and offers a unique view of Buddha down below and of course a chance admire the sheer effort involved in creating such a structure.
All the time you have to keep reminding yourself that this was fashioned out of solid rock. Please give the attendant a few Rs for his services.
Most of the caves at Ellora consist of viharas, or monasteries. These are large multi-storeyed buildings with separate areas for living and sleeping, eating, kitchens etc. Many of these monasteries also include detailed carvings of saints, deities, and Buddha.
KevinStandage1@googlemail.com
Notes:
[1] Lisa N. Owen, “Relationships between Art, Architecture, and Devotional Practices at Ellora,” in Pia Brancaccio, ed. Living Rock: Buddhist, Hindu, and Jain Cave Temples in the Western Deccan (Mumbai: Marg Publications, 2013), pp. 126-137.
[2] For the relative chronology of these early caves see Walter Spink, “Ellora’s Earliest Phase,” Bulletin of the American Academy of Benares I (1967), pp. 11-22.
[3] Vidya Dehejia and Peter Rockwell, The Unfinished: Stone Carvers at Work on the Indian Subcontinent (Delhi: Roli Books, 2016), pp. 67-73.
[4] Spink, “Ellora’s Earliest Phase,” pp. 17-20.
[5] Geri H. Malandra, Unfolding a Mandala: The Buddhist Cave Temples at Ellora (Albany: State University of New York Press, 1993).
[6] S.K. Dikshit, “Ellora Plates of Dantidurga: Saka 663,” Epigraphia Indica XXV (1940), pp. 25-31.
[7] James Burgess, Report on the Elura Cave Temples and the Brahmanical and Jaina Caves in Western India, Archaeological Survey of Western India 5, 1877-80 (London: Trubner & Co., 1883; reprint, Varanasi: Indological Book House, 1970), pp. 87-89.
[8] R.G. Bhandarkar, “The Rashtrakuta King Krishnaraja I and Elapura,” Indian Antiquary vol. 12 (1883), pp. 228-30.
[9] For a re-assessment of Rashtrakuta patronage at Ellora, see Lisa N. Owen, Carving Devotion in the Jain Caves at Ellora (Leiden: Brill, 2012), pp. 131-137.
[10] Owen, Carving Devotion, pp. 16-24 and 137-163.
[11] Owen, “Relationships between Art, Architecture, and Devotional Practices at Ellora,” pp. 130-32.
[12] Owen, Carving Devotion, pp. 28-36.- पी लिंक
अजिंठा – खगोलीय दृष्टिकोनातून निरीक्षणे
अजिंठा हा एकूण तीस बौद्ध गुंफांचा समुदाय आहे. त्या सर्व गुंफा दगडातून वरून खाली कोरून काढल्या आहेत. वरून पाहता तो समुदाय घोड्याच्या प्रचंड नालाप्रमाणे दिसतो. त्यापैकी पहिल्या दोन गुंफांमध्ये मुख्य मूर्तीशिवाय अनेक भित्तिचित्रे आहेत. पद्मपाणी आणि वज्रपाणी ही केवळ अप्रतिम समजली जाणारी रंगीत चित्रे तेथे पाहता येतात. अजिंठामधील ते प्रसिद्ध विहार आहेत. त्याउलट सव्वीस क्रमांकाची गुंफा प्रसिद्ध चैत्य आहे. त्या दोन गुंफा समोरासमोर आहेत. आमचे निरीक्षण तेथून सुरू झाले. “गंमत म्हणजे पहिली गुंफा 21 जूनच्या सूर्योदय रेषेशी जवळजवळ समांतर आहे, हे आमच्या ताबडतोब लक्षात आले. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी जेव्हा ती कोरली गेली तेव्हा असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी ती शून्य अंशाचा कोन करत असावी. त्याउलट तिच्या विरुद्ध दिशेत असलेले चैत्य 22 डिसेंबरच्या सूर्योदयरेषेशी खूपच समांतर आहे. हे चैत्य त्या सुमारास असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी शून्य अंशात असावे असे नवीन निरीक्षण पुढे आले. त्यामुळे मग पौर्णिमेला उगवत्या चंद्राचा प्रकाश बुद्धप्रतिमेवर पडत असावा. बौद्ध धर्मात चंद्राच्या पौर्णिमांना महत्त्व असल्यामुळे कदाचित प्राचीन भिख्खूंनी गुहांची रचना अशा प्रकारे केली असेल काय?
अजिंठाची निर्मिती करण्यास सुमारे सातशे वर्षे लागली आणि ती ख्रिस्तानंतर सुमारे पाच शतके सुरू होती. वाकाटक राजांच्या काळात तेथे कलेचे सर्वांत उंच शिखर गाठले गेले होते. जर आमची ही निरीक्षणे प्रस्थापित झाली, तर त्या काळच्या विज्ञानावर उत्तम प्रकाश पडू शकेल. तेव्हाची भूमिती, गणित, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या शाखांचा किती विकास झाला होता, याचा नवीन अंदाज आपल्याला येऊ शकेल. अजिंठाच्या सर्व गुंफांची खगोलीय दृष्टिकोनातून बारकाईने निरीक्षणे सुरू आहेत. त्यावरून पूर्ण अनुमाने निघायला एखादे वर्ष जाईल.
































































