आडवाटा हिंडायचा छंद जडला, की अनेकदा नियोजित ठिकाणी जाताना वाटेतच एखादे स्थळ आपले पाय रोखून धरते. पिंपरी-दुमाला नामक एका छोटय़ा गावातील सोमेश्वराचे मंदिर पाहिल्यावरही असेच झाले.




मंदिराच्या पुढ्यातला नंदीमंडप
मंदिराच्या पुढ्यात नंदीमंडप आहे
मंदिराचे मुख्यद्वार जरा निरखून पाहिले कि दरवाज्यावरील शेंदूर अर्चित गणेश प्रतिमा उठून दिसते. गणेशपट्टीवर कोरीव नक्षी..जणू मंगल तोरण!

द्वारशाखेच्या पायथ्याला लयबध्द अवस्थेतील, प्रसन्न, स्वागतोत्सुक शिवगण! प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस प्रतिहारी तसेच सेवक कोरलेले आहेत. सभामंडप नक्षीदार स्तंभांवर कोरलेला असून स्तंभांच्या जंघ्यांवर विविध प्रकारची शिल्पे, किर्तीमुखे आणि नक्षी इत्यादी कोरलेली आहेत.
प्रवेशद्वारातून दिसणारा स्तंभ युक्त सभामंडप. स्तंभ रंगवलेले.
सभामंडप नक्षीदार स्तभांनी सजलेला आहे. स्तंभावर काही प्रसंग कोरलेले आहेत..
वाली-सुग्रीव युध्द प्रसंग.. मंदिरावर कोणते प्रसंग कोरायचे, तेच प्रसंग का कोरले यासारखे प्रश्न डोक्यात येतात..
एका शिल्पामध्ये तीन पुरुष दाखवले आहेत आणि चार पाय दाखवले आहेत...एक काल्पनिक शिल्प. मधल्या शिल्पाचे दोन्ही पाय दाखवले आहेत तर बाजूच्या शिल्पांचा एक पाय. एक अद्भुत शिल्प. काय विचार असेल
?

स्तंभावर डावीकडे काही वादक दिसत आहे. एकाच्या हातात मृदंग आहे.

अंतराळात प्रवेश करण्यापूर्वीचे हे देखणे कोरीव स्तंभ.
गर्भगृहाची सुशोभित कोरीव द्वारशाखा...
द्वारशाखावर दोन्ही बाजूला खाली काही शिवगण कोरले आहेत..डावीकडील द्वारशाखा...
उजवीकडील द्वारशाखा..


सोमेश्वर महादेव
आवारात एका बाजूला यज्ञवराह आणि मत्स्याची मूर्ती आहे. यज्ञवराह म्हणाजे विष्णूचा तिसरा अवतार-वराहवतार. हा जेव्हा वराहाच्या पूर्ण रूपात दाखवला जातो तेव्हा तो यज्ञवराह म्हणवला जातो तर जेव्हा शिर वराहाचे आणि धड विष्णूचे अशी मूर्ती असेल तेव्हा तो नरवराह म्हणू ओळखला जातो. यज्ञवराहाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर विष्णूच्या लहानलहान असंख्य मूर्ती कोरलेल्या असतात तर सुळ्यांवर पृथ्वी धारण केलेली असते आणि पायातळी नाग असतो जे पाताळाचे प्रतिक मानले जाते. वराहाच्या अंगावरील झुलीतील प्रत्येक चौकटीत पुन्हा विष्णूची एकेक छोटी मूर्ती कोरलेली आहे. तर मत्स्य अवतार मूर्ती कोरताना तिला आडव्या शिवपिंडीची बैठक दिलेली आहे. याशिवाय अन्यत्रही विष्णूच्या काही मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. या साऱ्या महत्त्वाच्या शिल्पांवरून इथे पूर्वी एखादे विष्णूचे मंदिर असावे असे वाटते. तसेच या सर्व शिल्पांची सुबक शैली पाहता या मूर्ती व तत्कालिन मंदिर प्राचीन असावे असे वाटते.पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी यज्ञवराहाच्या मूर्ती आहेत- लोणी भापकर, पिंपरी दुमाला आणि चाकणचे चक्रेश्वर मंदिर.

यज्ञवराह


मत्स्य आणि वराह
आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात. पण तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवलेली एक विष्णूमूर्ती बघूयात.

विष्णूमूर्ती
चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात.
मंदिरांच्या बाह्यभागावर सुरसुंदरी, वादक, ऋषी, भैरव, चामुंडा, विष्णू, गणेश, महावीर तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीही येथे आहेत. इथल्या मूर्ती तशा देखण्या नाहीत. बहुधा १३/१४ व्या शतकात यादव राजवट संपता संपता हे मंदिर बांधले गेले असावे. साहजिकच मूळच्या शैलीतली वैशिट्ये कायम राहूनही देखणेपणाचा मात्र येथे लोप झालेला दिसतो.

बाह्यभिंतींवरील सुरसुंदरी.

सुरसुंदरींच्या मध्ये मधेच वीरगळ चिणलेले दिसतात.

येथे काही मैथुनशिल्पे सुद्धा आहेत.
इथल्या एका भिंतीवर खूप आगळीवेगळी शिल्पे आहेत. कावड घेतलेला पुरुष, मोठे वृषण असलेला पुरुष, बाळाला जन्म देत असलेली स्त्री.

आगळीवेगळी शिल्पपट्टीका
बाळाला जन्म देणार्या स्त्रीची प्रतिमा मी लोणी भापकर येथील मंदिरावर पण पाहिलेली आहे. अशा शिल्पांचा उद्देश काय असेल ते कळात नाहीत पण बहुधा सृजनाचे प्रतिक म्हणून अशी शिल्पे कोरली जात असावी.डावीकडून पहिल्या तीन आणि शेवटच्या दोन सूरसुंदरी वाटत आहेत. चौथी शिल्प कावड घेतलेल्या पुरुषाचे आहे. पाचवे बाळाला जन्म देत असलेली स्त्री अर्थात लज्जागौरी चे अप्रतिम शिल्प.

पिंपरी दुमाला येथील जन्मदात्र्या आईची प्रतिमा



भिंतीत चिणलेले वीरगळ येथे ठायी ठायी दिसत राहतात. इथल्या वीरगळाअंचे वैशिष्ट्य म्हणाजे हे वीरगळ त्रिस्तरीय आहेत. सहसा वीरगळ ४ स्तरांचे असतात. सर्वात वरचा थर शिवपिंड व नमस्कार करणारा वीर, दुसरा थर वीराला अप्सरा कैलासास घेऊन जाताना. तिसरा लढाईचा थर तर चौथा धारातीर्थी पडलेला वीर. येथे मात्र अप्सरांच्या थराचा अभाव दिसतो.

शिल्पपट्टीकेच्या शेजारीच ऋषी, जैन साधक अशा काही प्रतिमा आहेत.
सभामंडपाचा भाग संपवऊन आपण आता गर्भगृहाच्या बाह्यभागाशी येतो. येथे मंदिराचा मूळाचा भाग कायम राहिलेला दिसतो. इथल्या भिंतीवर जागोजागी विविध मूर्ती आहेत. इथल्या कोष्ठांमध्ये तसेच त्यांच्या आजूबाजूला देखील मूर्ती कोरलेल्या दिसतात.

तप करणारा ऋषी

ऋषी, गोमटेश्वर, अनुयायी आणि गणेश
इथल्या देवकोष्ठात भैरवाची मूर्टी देखील आहे. हाती कपाल आणि खट्वांग, डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात नरमुंड आणि संपूर्ण नग्न अशी ही भैरवाची प्रतिमा

भैरव
भैरवाच्याच जोडीला येथे नंदीवर बसलेल्या शिवाची मूर्ती देखील आहे.

शिव
मंदिराचा पार्श्वभाग
इथल्या भिंतींवर मातृशक्तीचे प्रतिक असलेल्या काही मूर्ती आहेत.( मातृका नव्हेत) पैकी एकीच्या एका हाती आंब्याचा घोस तर दुसरे हाती बीजापूरक धारण केलेले दिसते. तिच्याच बाजूला दर्पणसुंदरी आहे. तर दोघींच्या मध्ये एका सुंदरीने हाती नाग पकडलेला आहे.

बीजापूरक धारण केलेली स्त्री आणि दर्पणसुंदरी
त्याच्याच जवळपास विषकन्येची एक मूर्ती आहे. विषकन्येसोबतच असितांग भैरव आणि सुरसुंदरी आहेत.

विषकन्या जवळून
सुरसुंदॠ अभिसारिका प्रियकराला भेटायला नटूनथटून चालली आहे तर तिला एक मर्कट त्रास देते आहे. ती त्या मर्कटला एक थप्पड देते आहे. तिच्याच शेजारी डावीकडे एक घंटानाद करणारी पुरुषमूर्ती आहे.

सुरसुंदरी अभिसारिका
चामुंडेची एक अतिशय देखणी मूर्ती येथे आहे. अस्थिपंजर शरीर, खोबणीतून बाहेर आलेले डोळे, विचकलेल्या दाढा, लांबट स्तन, गळ्यात विंचू आणि नरमुंडमाला, हाती डमरू अआणि त्रिशुळावर नरमुंड आणि पायातळी प्रेत ही चामुंडेची वैशिष्ट्ये येथेही आहेत. ही चामुंडा ओठांमध्ये बोट ठेऊन शीळ घालत आहे.

चामुंडा
चंड म्हणजे क्रुद्ध. चंडिका हे दुर्गेचे क्रोधित रूप आहे. तर चामुंडा ही मातृकांपैकी एक आहे. दोघीही शाक्त परंपरेतल्याच. चंडीकेची लक्षणे सामान्यतळ दुर्गेप्रमाणेच असतात तर चामुंडा ही सापळ्यासारखी, भयप्रद, पोटात विंचू, हाती कपाल आणि प्रेतवाहन असणारी.. चामुंडेच्या शेजारी वेताळगण आणि सुरसुंदरी पुत्रवल्लभा आहे. पुत्रवल्लभा म्हणजे कडेवर लहान बाळ घेतलेली स्त्री.छातीशी बाळाला धरून उभी सुंदरी. हे शिल्प खास वाटते ते सुंदरीच्या /मातेच्या चेहऱ्यावरील हावभावा मुळे. किती वात्स्ल्यपुर्ती स्वरूप हावभाव आहेत. बाळाच्या डोके हनुवटीवर टेकून बाळाच्या माथ्याचा पापा घेणारे हे प्रेमळ हावभाव!

सुरसुंदरी पुत्रवल्लभा
ह्या मूर्तीशेजारीच नटराज शिव आहे.

मंदिराचे बाह्यांग
एके ठिकाणी भिंतीत कठोर तप करणारा ऋषी आणि नागप्रतिमा आहे.
परत येथे जैन साधक किंवा महावीर आणि नागप्रतिमा दिसते.
सुरसुंदरी आणि वादक

अतिशय देखणी पुष्कर्णी आहे ही. पूर्णपणे बांधीव. खोलवर उतरत गेलेली.
या मंदिर परिसरातच पुष्करणीची रचना आहे. पण त्यातले पाणी या जलवास्तूवर रुसलेले आहे. याशिवाय मंदिर परिसरात आणखी काही कोरीव शिल्पंही दिसतात.
मंदिराच्या उत्तर अंगास असलेली शेषशायीची मूर्तीही अशीच लक्षवेधी. शेषावर पहुडलेले विष्णू आणि त्याचे पाय चुरणारी लक्ष्मी अशा या शिल्पाच्या माथ्यावरही दशावताराचा पट कोरलेला आहे.

रामेश्वर मंदिर
ही दोन्ही मंदिरे आणि परिसर गावक ऱ्यांनी स्वच्छ-नीटनेटका राखला आहे. जुन्या वटवृक्षांनी तो फुलवला आहे. या वृक्षांवरील असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आणि इथले मंदिरांचे शिल्पवैभव पाहताना दिवस कसा संपतो हे अंधारून आल्यावरच कळते.
संदर्भ :-
२) श्री सागर बोरकर, सविता कानडे यांचे लिखाण
३) http://travelzunlimited.blogspot.com/ हा ब्लॉग
४) लोकसत्तामधील लिखाण
रामेश्वर पाहिल्यावर तिथून निघालो तर रांजणगाव ७ किमी अशी पाटी दिसली. अतिशय चांगला रस्ता. ह्या रस्त्याने रांजणगावच गणपती, मंदिराचे आवारातील सतीशिळा आणि वीरगळ पाहून घरी परतलो.
काही टिपलेले क्षण
भुलेश्वरला चंडिका नाही, मात्र महिषासुरमर्दिनी आहे, चामुंडा आणि विषकन्या ह्या सुद्धा आहेत. विषकन्या मात्र देवी नसून नायिका आहे.
पिंपरी दुमाला! लिहिताना किंचित थबकले!
मागे १९९४-९५ सालात गेले. कामानिमित्ताने खूप वेळा या गावी गेलेले.
"पिंपरी धुमाळ"! पांढऱ्या रंगाच्या फलकावर काळ्या अक्षरात लिहिलेली
गावाच्या नावाची पाटी अजूनही डोळ्यासमोर आहे. ह्या पिंपरी गावात 'धुमाळ'
आडनावाचे जास्तीत जास्त लोकं वास्तव्यास आहेत म्हणून गावाचे नाव
पिंपरी धुमाळ! संशोधन कामानिमित्ताने कितीतरी वेळा आणि कितीतरी लोकांच्या
पूर्ण नावात आडनाव धुमाळ लिहिल्याचे आजही स्मरणात आहे.
आज २०१९ साली गावात गेले. गावच नाव
झालय "पिंपरी दुमाला"! सोमेश्वर मंदिराच्या कमानीवर हेच नाव पाहिलं आणि
पुन्हा थबकले! काय असेल हा नाव बदलाचा प्रवास? कितीतरी कारणे डोक्यात चमकून
गेली. धुमाळ नावाच्या इंग्लिश स्पेलिंग आणि उच्चाराची तर ही कमाल नाही?
.कारणांचा आज मी फक्त अंदाजच बांधू शकते. महत्वाचं हे की नाव
लिहिण्यातील बदल लोकांनी स्वीकारला आहे. गुगुल महाराजांनी सुध्दा
स्वीकारला आहे. धुमाळ हे नाव कुठेतरी लुप्त झाल आहे. ९४-९५ साली
कागदोपत्रावर पिंपरी धुमाळ असं लिहिणारे लोकं आज पिंपरी दुमाला लिहित
असतील....अक्षर/नाव/उच्चारबदलाचा हा प्रवास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
....तूर्तास इतकेच!
श्री. क्षेत्र रांजणगाव गणपती गावापासून आता हे गाव आहे अगदी हाकेच्या अंतरावर! ३-४ किमी अंतरावर. श्री. क्षेत्र रांजणगाव येथे आहे "महागणपती देवस्थान"! श्री. क्षेत्र पिंपरी दुमाला इथे आहे "सोमेश्वर देवस्थान"! नजर स्थिरावणाऱ्या असंख्य शिल्पांनी नटलेले शिवमंदिर...
९४-९५ साली गावात दिवसा गेलो तर उंबरे बंद . सर्व लोकं शेतात कामाला गेलेले. काही वृद्ध आणि लहानगे दिसले तर दिसले. आमच्या कामाचा टाईम मग संध्याकाळी सात नंतर. रात्री कामाशिवाय अवांतर बोलायला वेळ नसायचा की काही बघायला. जो थोडाफार संवाद व्हायचा त्यात ह्या प्राचीन मंदिराचा कधी उल्लेख आला नाही. एका शिवमंदिरापेक्षा मंदिराच्या शिल्पसमृद्धतेची ओळख रहिवाशी लोकांना कितपत असेल आता सांगता येत नाही.
श्री. क्षेत्र रांजणगाव चा महागणपती अष्टविनायकापैकी एक म्हणून त्याची महती पंचक्रोशीतच काय पूर्ण महाराष्ट्रात!
पिंपरी धुमाळ चे पिंपरी दुमाला जसे झाले तसेच "श्री क्षेत्र" पिंपरी दुमाला कधी झाले हा प्रवास नक्कीच रुचीपूर्ण असेल. जाणून घेईल नक्कीच केव्हातरी!
तूर्तास ह्या मंदिराची शिल्पकला पाहण्याची उत्सुकता कमानीतून आत घेऊन जात आहे....
कमानीतून आत गेल्यावर मंदिरावर कोरलेली शिल्प अधिक ठळक झाली..शिल्प पाहण्याची, ओळखण्याची उत्सुकता अधिक वाढली.......
नंदींमंडपातील दोन नंदी शिल्प पाहून तर मी चकितच झाले. ...
फोटो फ्रेम मधे काय याव आणि ती कशी सुरेख दिसू शकते हे आता किंचित जमू लागल्याने मंदिराच्या अंतराळातून नंदी मंडप क्लिक केला. (अर्थात गर्भगृहातून बाहेर आल्यावर)
मंदिराचे मुख्यद्वार जरा निरखून पाहू लागले. दरवाज्यावरील शेंदूर अर्चित गणेश प्रतिमा उठून दिसली.
गणेशपट्टीवर कोरीव नक्षी..जणू मंगल तोरण! जणू देवकोष्ठ कोरलेले!
द्वारशाखेच्या पायथ्याला लयबध्द अवस्थेतील, प्रसन्न, स्वागतोत्सुक शिवगण!
प्रवेशद्वारातून दिसणारा स्तंभ युक्त सभामंडप. स्तंभ रंगवलेले.
सभामंडप नक्षीदार स्तभांनी सजलेला आहे. स्तंभावर काही प्रसंग कोरलेले आहेत..
वाली-सुग्रीव युध्द प्रसंग.. मंदिरावर कोणते प्रसंग कोरायचे, तेच प्रसंग का कोरले यासारखे प्रश्न डोक्यात आलेच.
एका शिल्पामध्ये तीन पुरुष दाखवले आहेत आणि चार पाय दाखवले आहेत...एक काल्पनिक शिल्प. मधल्या शिल्पाचे दोन्ही पाय दाखवले आहेत तर बाजूच्या शिल्पांचा एक पाय. एक अद्भुत शिल्प. काय विचार असेल , काय कल्पना असेल ह्याचा मी फक्त विचार करू शकते.
स्तंभावर डावीकडे काही वादक दिसत आहे. एकाच्या हातात मृदंग आहे.
अंतराळात प्रवेश करण्यापूर्वीचे हे देखणे कोरीव स्तंभ.
गर्भगृहाची सुशोभित कोरीव द्वारशाखा...
द्वारशाखावर दोन्ही बाजूला खाली काही शिवगण कोरले आहेत..डावीकडील द्वारशाखा...
उजवीकडील द्वारशाखा..
द्वारशाखेच्या पट्टीवरील नक्षीकाम..
डावीकडील..
उजवीकडील
गर्भगृहातील सोमेश्वर..
अंतराळातील गणेश आणि विष्णू प्रतिमा ..
दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या बाह्यभागावरील शिल्पे..
डाव्या बाजूकडील ..
ह्या भागावर नर्तिका, ऋषी, गणेश, महावीर , विष्णू यांच्या प्रतिमा आहेत.
उजव्या बाजूकडील..
इथे सूरसुंदरी असून मधेच वीरगळ बसवलेला दिसतोय.
मंदिराला डावीकडून प्रदक्षिणा घालत असताना दिसलेली काही शिल्पे/शिल्पपट
डावीकडून पहिल्या तीन आणि शेवटच्या दोन सूरसुंदरी वाटत आहेत. चौथी शिल्प कावड घेतलेल्या पुरुषाचे आहे. पाचवे बाळाला जन्म देत असलेली स्त्री अर्थात लज्जागौरी चे अप्रतिम शिल्प.
भैरव शिल्प.
नंदीवर बसलेला शिव
दर्पणसुंदरी
वरील फोटोत उजवीकडून दुसरी दर्पण सुंदरी आहे. तिच्या शेजारील शिल्पात सुंदरी ने हातात नाग पकडला आहे. त्याच्या शेजारील सुंदरीच्या (मधली) एका हातात आंब्याच्या मोहरा तद्वत काहीतरी असून दुसऱ्या हातात एखादे बीज असल्यासारखे दिसत आहे.
घंटा वाजवणारा पुरूष आणि मर्कट - सुंदरी
डावीकडून दुसरे शिल्प घंटी वाजवणाऱ्या पुरुषाचे असून चौथ्या शिल्पात सुंदरी ला छळणारा मर्कट दिसत आहे. सुंदरीचा अविर्भाव मर्कटाला चापट देण्यासारखा आहे.
चामुंडा अवतार शिल्प
प्रेतावर उभी चामुंडा. शरीराचा सापळा झालेला...हातात कवटी..गळ्यात कवट्यांची माळ....
छातीशी बाळाला धरून उभी सुंदरी. हे शिल्प मला खास आवडले ते सुंदरीच्या /मातेच्या चेहऱ्यावरील हावभावा मुळे. किती वात्स्ल्यपुर्ती स्वरूप हावभाव आहेत. बाळाच्या डोके हनुवटीवर टेकून बाळाच्या माथ्याचा पापा घेणारे हे प्रेमळ हावभाव!
गणेश, नागप्रतिमा आणि साधक
मंदिराच्या मागे विष्णू, वराह आणि मत्स्य शिल्प ठेवली आहेत.
मंदिराच्या मागील बाजूस असणारी पुष्करिणी..
लज्जागौरी, चामुंडा, साधक-ऋषी, भैरव, नंदीवर बसलेला शिव इ. आगळ्या वेगळ्या एकत्रित शिल्पकृतींनी सजलेले सोमेश्वर मंदिर....तेराव्या किंवा चौदाव्या शतकात यादवकालीन राजवट संपुष्टात येत असताना हे मंदिर बांधले असावे असा कयास बांधला जातो.
१९९४ आणि २०१९ सालातील स्मृतीवर हिंदोळा भावनिक स्थित्यंतरे समाधानासोबत किंचित सल देऊन गेली. गाव पाहण्याची इच्छा वेळेअभावी राहून गेली, ९४ साली मंदिर पाहता आल नाही इ. इ. आज मंदिर नावारूपाला येण्याचा आणि मंदिर आणि शिल्पकला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहीचत गेली असेल ह्या प्रवासाची ही उत्सुकता परतीच्या प्रवासात साथीला आली.
ह्या वारसा सहलीच्या निमित्ताने मन ९४-९५ सालात गेले.१९९४ साली निसटून गेलेले काही शिल्पक्षण आणि अनुभूती २०१९ साली ह्या सहलीच्या निमित्ताने ओंजळीत आले हे ही नसे थोडके!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे तर्फे दिनांक २८ जुलै रोजी ही वारसा सहल आयोजित केली.
खास आभार: शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य
Visit to the Somnath Temple , Pimpri dumala & Ranjangaon Mahaganpati Temple : A Photo Travelogue
The temple also has several minor temples dedicated to different deities.
Shiva also blessed the Asura with invincibility stating that no one besides himself can defeat him in battle and as long as his three cities are intact, no harm shall befall him. After this boon the Asura came to be known as Tripurasura or the ‘master of three cities’.
http://travelzunlimited.blogspot.com/2010/11/visit-to-somnath-temple-pimpri-dumala.html
सोमेश्वरचे कोरीव शिल्प
आडवाटा हिंडायचा छंद जडला, की अनेकदा नियोजित ठिकाणी जाताना वाटेतच एखादे स्थळ आपले पाय रोखून धरते. पिंपरी-दुमाला नामक एका छोटय़ा गावातील सोमेश्वराचे मंदिर पाहिल्यावरही असेच झाले. पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव गणपती येथून या पिंपरी-दुमाल्यात जाण्यासाठी रस्ता आहे.
आडवाटा हिंडायचा
छंद जडला, की अनेकदा नियोजित ठिकाणी जाताना वाटेतच एखादे स्थळ आपले पाय
रोखून धरते. पिंपरी-दुमाला नामक एका छोटय़ा गावातील सोमेश्वराचे मंदिर
पाहिल्यावरही असेच झाले.
पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव गणपती येथून या
पिंपरी-दुमाल्यात जाण्यासाठी रस्ता आहे. पुण्याहून िपपरी-दुमाल्याचे अंतर
भरते अंदाजे पन्नास किलोमीटर. गावापर्यंत थेट एस.टी.ची सुविधा नसल्याने
स्वत:चे वाहन घेऊनच इथे यावे लागते. अन्यथा रांजणगावला उतरून महागणपतीचे
दर्शन घेत उरलेल्या पाच किलोमीटरसाठी ‘विनोबा एक्स्प्रेस’ पकडावी!
गावात
शिरल्याबरोबर वड-पिंपळासारख्या अनेक जुन्या मोठाल्या वृक्षांच्या सावलीने
सुखावून जायला होते. या वृक्षांच्या कमानीतूनच त्या कोरीव सोमेश्वर
मंदिराचे दर्शन घडते. इथे आडबाजूला असलेले हे ‘लेणे’ पाहून प्रथम थक्क
व्हायला होते.
सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असलेल्या या
मंदिराच्या बाह्य़ व अंतर्गत दोन्ही भागांवर मुक्तहस्ते कोरीव काम केले आहे.
आत शिरण्यापूर्वी बाह्य़ भागावरील शिल्पांकनाकडे लक्ष जाते. विविध
देवतांच्या ध्यानमुद्रा आणि सूरसुंदरींची सौंदर्यशिल्पं पाहताना एखाद्या
लेण्यात फिरत असल्याचा भास होतो. दर्पणाधारी, मृदंगवादक, बासरीवादक,
नर्तिका, फळांचा घोस हातात घेतलेली, पायातील काटा काढणारी, स्वत:चे सौंदर्य
न्याहाळणारी अशा अनेक सूरसुंदरींची शिल्पं या मंदिरावर स्थिरावली आहेत.
युगुल, मातृशिल्प, नागकन्या आणि कावडधारी, छत्रधारी पुरुषमूर्तीही यामध्ये
दिसतात. या दरम्यानच नंदीवर स्वार महादेव, चामुंडा, भैरव, गणेश, ब्रह्मदेव
आदी देवतांची कोष्टके आहेत. अनेक घडय़ांच्या या बाह्य़भिंतीवर या
शिल्पकामाबरोबर कीर्तिमुखांचा नक्षीपटही कोरलेला आहे. राष्ट्रकूट, चालुक्य
आणि यादवकालीन अनेक मंदिरांवर असे शिल्पांकन दिसते. पण ‘सोमेश्वर’मधील
शिल्पांमध्ये सौष्ठवता आणि प्रमाणबद्धतेचा अभाव दिसतो.
हे सारे पाहत
मंदिरात शिरावे. मंदिराला पूर्व, उत्तर व दक्षिण अशा तीन बाजूंनी सालंकृत
प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांवर विविध निसर्ग रूपकांच्या शाखांची
रचना आहे. तळाशी शिवगण कोरलेले आहेत. मंदिराचा सभामंडप सालंकृत अशा बारा
स्तंभांवर उभारला आहे. विविध भौमितिक आकारातील या स्तंभांवर काही शिल्पंही
कोरली आहेत. यात चार पायांवर बेतलेले तीन शरीरांचे एक शिल्प अवश्य पाहावे.
गर्भगृहाचे
प्रवेशद्वारही अत्यंत कोरीव आहे. गणेशपट्टीभोवती हार घेतलेल्या अप्सरांची
मोठी शंृखला आहे. त्या भोवतीची कमान पाने, फुले, पक्षी आदी निसर्गरूपकांनी
सजवली आहे. तळाशी पुन्हा शिवगण दिसतात. गाभाऱ्यात या मंदिराला साजेसे असेच
कोरीव शिवलिंग आहे.
या मंदिर परिसरातच पुष्करणीची रचना आहे. पण त्यातले
पाणी या जलवास्तूवर रुसलेले आहे. याशिवाय मंदिर परिसरात आणखी काही कोरीव
शिल्पंही दिसतात. यामध्ये मंदिराच्या दर्शनी भिंतीलगत एका कोरीव आसनावर
ठेवलेल्या सालंकृत विष्णू मूर्तीकडे प्रथम लक्ष जाते. शंख, चक्र, गदा आणि
पद्म ही आयुधे घेतलेल्या या विष्णूच्या पायाशी गरुड, लक्ष्मी आणि त्यापाठी
सेवक-सेविका दिसतात. विष्णूभोवतीच्या नक्षीदार प्रभावळीत दशावतारांची रचना
आहे. या प्रभावळीतच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची शिल्पं आहेत.
मंदिराच्या
उत्तर अंगास असलेली शेषशायीची मूर्तीही अशीच लक्षवेधी. शेषावर पहुडलेले
विष्णू आणि त्याचे पाय चुरणारी लक्ष्मी अशा या शिल्पाच्या माथ्यावरही
दशावताराचा पट कोरलेला आहे. मंदिराच्या पुढय़ातील यज्ञवराह आणि मत्स्य
अवताराची शिल्पं तर विलक्षण आहेत. वराहाच्या अंगावरील झुलीतील प्रत्येक
चौकटीत पुन्हा विष्णूची एकेक छोटी मूर्ती कोरलेली आहे. तर मत्स्य अवतार
मूर्ती कोरताना तिला आडव्या शिवपिंडीची बैठक दिलेली आहे. याशिवाय अन्यत्रही
विष्णूच्या काही मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. या साऱ्या
महत्त्वाच्या शिल्पांवरून इथे पूर्वी एखादे विष्णूचे मंदिर असावे असे
वाटते. तसेच या सर्व शिल्पांची सुबक शैली पाहता या मूर्ती व तत्कालिन
मंदिर प्राचीन असावे असे वाटते.
सोमेश्वर मंदिराच्या काही भागास
नुकतीच रंगरंगोटी केली आहे. खरे तर या अशा प्राचीन मंदिरांना असे
तांबडे-निळे रंग फासून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व नष्ट करू नये. अशा
जीर्णोद्धाराच्या वेळी गावक ऱ्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे साहाय्य
जरूर घ्यावे.
सोमेश्वर मंदिर पाहिले, की हे इतके देखणे मंदिर कोणी
निर्माण केले असेल असा प्रश्न पडतो. पण याबाबतीत कुठलाच ठोस पुरावा मिळत
नाही. इथले गावकरीही मग नेहमीप्रमाणे या निर्मितीचे श्रेय पांडवांना देतात.
पण या मंदिराची रचना, बांधणी त्यावरील कोरीव काम पाहिले, की ते सात-आठशे
वर्षे जुने असावे असे वाटते.
या सोमेश्वर मंदिराशेजारीच रामेश्वराचेही
प्राचीन मंदिर आहे. या मंदिरासमोर एक विस्तीर्ण पुष्करणी आहे. ही दोन्ही
मंदिरे आणि परिसर गावक ऱ्यांनी स्वच्छ-नीटनेटका राखला आहे. जुन्या
वटवृक्षांनी तो फुलवला आहे. या वृक्षांवरील असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत
आणि इथले मंदिरांचे शिल्पवैभव पाहताना दिवस कसा संपतो हे अंधारून आल्यावरच
कळते.
https://www.loksatta.com/trekit/someshwar-temple-in-pimpri-dumala-village-1027591/




























