



गुहांपासून पुढे आल्यानंतर किल्ल्याचं प्रमुख आकर्षण असणा-या सुंदर अशा खोदीव आणि उभ्या चढाईच्या पाय-या सुरु झाल्या पण गुहेकडे जाणारा मार्ग काहीसा अवघड आहे. येथुन कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत काही पावले गेल्यावर आपण एका लेणीवजा गुहेपाशी पोहोचतो. हि गुहा दगडी खांबावर तोललेली असुन उजव्या बाजुस उंचवट्यावर अजून दोन दालने कोरलेली आहेत. प्रसंगी या गुहेत रहाता येईल पण पाण्याची मात्र सोय नाही. पहिली गुहा आकाराने मोठी असून आत छोट्या आकाराचे दोन दालन आहेत. गुहेच्या प्रवेशद्वाराला दरवाजा अडकविण्यासाठी खटक्यांसारखे कोरीवकाम केलेले आहे. गुहेला लगटून कड्याला डावीकडे ठेवत अगदी थोडं पुढे जायचं. इथेही काही गुहा कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.


गडमाथ्यावरून शेजारी असलेल्या रायगडापर्यंतचे सर्व शिखरं अगदी जवळून न्याहाळता येतात. तिकडे देवळाली मिलिटरीचा निर्मनुष्य परिसर जैवविविधता, गर्द झाडोरा आणि नैसर्गिक संपत्ती सांभाळत असलेला दिसतो. देवळालीच्या पलिकडे औंढा आणि पट्टा खूणावत असतात. पांडवलेणी आणि त्याच्या शेजारील दोन प्रमुख डोंगर, कावनई, अंजनेरी, नवरानवरी, आठवा डोंगर, आधुली, डांग्या सुळका, घरगड, त्र्यंबकगडाचे पंचलिंग असे कितीतरी पर्वत विहंगम दिसतात. हा सर्व नजारा बघतांना डोळ्यांचं पारणं फिटतं.बितनगड, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग,कळसूबाई, वायव्येला गडगडा उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी इतके किल्ले एका ठिकाणाहुन पहायला मिळतात.तसेच इगतपुरीचा पसारा, ईशान्येला त्रिरश्मी डोंगर अन् विस्तारत चाललेलं नाशिक पहायला मिळतं. गौळाणेतील वीट भट्ट्या अन् महापालिकेचा खत प्रकल्प आकाशात ढग तयार करतानाही दिसतो.
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर२) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
३) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा -सतिश अक्कलकोट
४) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgbharai.in हि वेबसाईट
७) http://www.onkaroak.com/2013/10/blog-post_20.html,https://www.discovermh.com/bahula-fort-nashik/ , https://indiadarpanlive.com/bhatkuya-anande-article-bahula-fort-sudarshan-kulathe/, https://www.thefreebird.net/treks/bahulagad-trek-blog हा ब्लॉग
जिल्हा : नाशिक
उंची : २९८० फुट
श्रेणी : अत्यंत कठीण
सह्याद्रीच्या गिरीशिखरांवर वसलेले गडकिल्ले अनेक कारणामुळे दुर्गम बनले आहेत. काही किल्ले त्याच्या कठीण वाटांमुळे दुर्गमतेसाठी प्रसिध्द आहेत तर काही किल्ले इंग्रजांनी त्याचा मार्ग तोडल्याने दुर्गम बनले आहेत पण काही किल्ले मात्र लष्कराच्या ताब्यात असल्याने दुर्गभटक्यांसाठी दुर्गम बनले आहेत. आंबेबहुला हा लष्कराच्या ताब्यात असलेला असाच एक किल्ला. हा किल्ला लष्कराच्या तोफखान्याच्या सराव क्षेत्राचा भाग असल्याने किल्ल्यावर जायला बंदी आहे. रविवारी हा सराव बंद असल्याने काही दुर्गप्रेमी या किल्ल्यावर जातात मात्र तोफांचे जिंवत गोळे या परीसरात पसरले असल्याने तेथे जाणे काही प्रमाणात धोक्याचे आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रविवार हा एकमेव दिवस असला तरी काही वेळा रविवारी देखील तोफखान्याच्या सराव सुरु असतो त्यामुळे पुर्ण माहीती घेऊनच किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घ्यावा. बहुला किल्ल्यावर जाण्यासाठी आंबेबहुला हे किल्ल्याजवळील गाव असुन गावातील काहीजण रविवारी भंगार वेचण्यासाठी किल्ल्यावर जातात त्यामुळे किल्ला पहाण्यासाठी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांची मदत घ्यावी. बहुला किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी फाटा पार केल्यावर २४ कि.मी. अंतरावर उजवीकडे तर नाशिकहुन १४ कि.मी.अंतरावर डावीकडे विहोळी गावात जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरून दोन कि.मी. आत आंबेबहुला गाव वसले आहे. मुळ बहुला गाव हे किल्ल्याच्या पायथ्याशी वसले होते पण १९४४ दरम्यान लष्करांने देवळाली कॅम्प वसविल्यावर फायरिंग रेंजसाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या यात आंबेबहुला गावाचा सामावेश होता. त्यामुळे वालदेवी नदीपलीकडे बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आंबेबहुला गाव नदी ओलांडून आताच्या जागेत वसले आहे. गावातुन एक कच्चा रस्ता गावाबाहेर १ कि.मी.वर असलेल्या बंधाऱ्याच्या दिशेने जातो. हा बंधारा पार करून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. पावसाळ्यात हा बंधारा पाण्याखाली जात असल्याने किल्ल्यावर जाता येत नाही. येथुन किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी ४ कि.मी.ची पायपीट करावी लागते. या वाटेवरून किल्ल्याकडे पहिले असता उजवीकडे दिसतो तो रायगड डोंगर तर डावीकडे दिसणारा टोपीच्या आकाराचा डोंगर म्हणजे बहुला किल्ला. बहुला किल्ला असलेल्या डोंगराची सोंड व त्याच्या डावीकडचा डोंगर यामधील खिंडीतून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. हि खिंड नजरेसमोर ठेवुनच आपण चालायला सुरवात करायची. बंधाऱ्यापासुन सुरवातीला खुरट्या काटेरी झुडुपातून,बाभळीच्या जंगलातुन व पुढे गवताळ माळरानावरून तासभर चालल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या ठिकाणी खडकात कोरलेले एक मोठे टाके आहे. या टाक्यात पाणगवत वाढले असुन पिण्यायोग्य पाणी वर्षभर उपलब्ध असते. यानंतर गडावर कोठेही पिण्यायोग्य पाणी नसल्याने येथुनच पुरेसे पाणी सोबत घ्यावे. येथुन अर्ध्या पाउण तासाचा चढ चढुन आपण उजवीकडे किल्ला व डावीकडील डोंगराच्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीतुन उजवीकडील वाटेने वर चढत पाच मिनिटे चालल्यावर आपण एका लहानशा उंचवट्याखाली येतो. बुरुजासारखा दिसणारा हा उंचवटा सोपे प्रस्तरारोहण करून चढल्यावर याच्या माथ्यावर कातळात कोरलेली चौकोनी आकाराची अनेक छिद्रे दिसुन येतात. हि छिद्रे हा कातळ फोडण्यासाठी अथवा या ठिकाणी बुरुजाचा पाया बांधण्यासाठी कोरली असावीत. येथुन डोंगरसोंडेवरून किल्ल्यावर जाणारी पायवाट सुरु होते. या वाटेने जाताना ठिकठिकाणी तोफगोळ्यांच्या माऱ्याने जमिनीला पडलेले खड्डे व तोफगोळ्याचे निकामी अवशेष पहायला मिळतात. येथे पडलेल्या वस्तुंना हात लावणे व त्यांचे छायाचित्र काढणे टाळावे. या वाटेने १० मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. या कातळकड्यात वरील बाजुस एक लहानशी गुहा दिसुन येते. या गुहेत स्थानिकांनी भैरवाची स्थापना केली आहे पण गुहेकडे जाणारा मार्ग काहीसा अवघड आहे. येथुन कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत काही पावले गेल्यावर आपण एका लेणीवजा गुहेपाशी पोहोचतो. हि गुहा दगडी खांबावर तोललेली असुन उजव्या बाजुस उंचवट्यावर अजून दोन दालने कोरलेली आहेत. प्रसंगी या गुहेत रहाता येईल पण पाण्याची मात्र सोय नाही. या गुहेकडून कड्याला लागुन असलेल्या वाटेने काही अंतर पार केल्यावर आपण गडावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायरी मार्गाजवळ पोहोचतो. माथ्यावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या वाटेवर अतिशय सुंदर असा हा पायरीमार्ग ६५ अंशाच्या कोनात कोरलेला असुन याला एक ते दीड फुट उंचीच्या ९० पायऱ्या आहेत. शिडीसारखा असणारा हा पायरीमार्ग चढताना सुरवातीस डाव्या बाजुला आधारासाठी कातळात खोबणी कोरलेल्या आहेत. पुर्णपणे कातळात कोरून काढलेल्या या मार्गाने वर आल्यावर टोकावर किल्ल्याचा ढासळलेला पश्चिमाभिमुख दरवाजा व त्याशेजारी ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. या दरवाजातुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. त्रिकोणी आकाराचा किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर ३.५ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २९८० फुट उंचावर आहे. माथ्यावर आल्यावर तटाच्या काठावरून दक्षिण दिशेने गडफेरीस सुरवात केल्यावर दक्षिण टोकावर काही प्रमाणात सपाटी दिसुन येते. या सपाटीवर उतरण्यासाठी कातळात काही पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्या शेजारील कपारीत पाण्याचे टाके कोरलेले असुन यातील पाणी वापरात नसल्याने त्यात शेवाळ जमा झाले आहे. सपाटीवर कातळात कोरलेला एक खोल खळगा असुन हि बहुदा झेंड्याची जागा असावी. बुरुजासारखा दिसणारा हा भाग खालील बाजुने दगड तासुन वर चढण्यासाठी कठीण करण्यात आला आहे. टाक्याकडून दरीकाठाने पुढे आल्यावर पाण्याचे दुसरे टाके पहायला मिळते. या टाक्यात मोठया प्रमाणात गाळ जमा झाला आहे. हे टाके पाहुन वर आल्यावर माथ्यावर अजून एक माती भरून बुजलेले टाके पहायला मिळते. याशिवाय गडमाथा फिरताना अनेक वास्तुचे चौथरे तसेच घडीव दगड वापरून बांधलेला मोठा वाड्याचा चौथरा पहायला मिळतो. किल्ल्याच्या दरी काठावरून फिरताना तोफगोळ्यांच्या माराने ठिकठिकाणी मोठया प्रमाणात ढासळलेली तटबंदी दिसुन येते. दरी काठावरून फिरत दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरीस अर्धा तास पुरेसा होतो. गडाचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी होत असावा. गडमाथ्यावरून औंढा, पट्टा, बितनगड, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, वायव्येला गडगडा उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी इतके किल्ले एका ठिकाणाहुन पहायला मिळतात. किल्ला पाहुन गुहेकडून खाली उतरताना कडा उजव्या बाजुस ठेवुन दरीकाठाने काही अंतर पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन टाकी पहायला मिळतात.यातील एक टाके बुजलेले असून दुसऱ्या टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. गुहेकडून आंबेबहुला गावात जाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. किल्ल्यावरील लेणी व कातळात कोरलेला पायरीमार्ग पहाता या किल्ल्याची निर्मीती प्राचीन काळात झाल्याचे कळते. शिवकाळात मराठयांची या भागावर असलेली सत्ता पहाता हा किल्ला देखील स्वराज्यात असावा असा अंदाज करता येतो. इ.स.१८१८ साली पेशवाईच्या अस्तानंतर कॅप्टन जॉन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने बहुला किल्ल्याचा ताबा घेतला व त्याचे नुकसान केल्याची नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते.
© Suresh Nimbalkar
एखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या
क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या
त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टींग होती. सकाळी साडेपाच वाजता आम्ही
झोपलेल्या मंदिरात आंबे बहुलामधला कोणी भाबडा भक्त पंढरीच्या विठ्ठलाच्याही
कानठळ्या बसतील इतक्या मोठया आवाजात कुठलसं भजन गात होता. त्याच्या
भजनाच्या पहिल्या तीन - चार सेकंदातच आम्ही खाड्कन उठून बसलो आणि त्यानंतर
पुन्हा झोपायची हिम्मतच होईना. का कुणास ठाउक पण त्या तीन - चार सेकंदात
आंबे बहुलामधल्या विठ्ठलासकट जगातल्या सगळ्या विठ्ठल मूर्तींनी आपापले
कमरेवरचे हात काढून कानावर ठेवलेत असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर अवतरलं !!!
आम्ही त्या भक्तापासून ऊर्ध्व दिशेला अवघ्या काही फुटांवरच होतो. पण जिथे
ते सावळं परब्रम्ह नाही बचावलं तिथे आम्हा पामरांची काय कथा !! त्याचं भजन
सुमारे वीसेक मिनिटांनंतर संपलं आणि त्यानंतरच आमची खाली जायची हिम्मत
झाली. एव्हाना उजाडू लागलं होतं. प्रमोदला आम्ही झोपेतून जागे झालोय याचं
बहुदा स्वप्न पडलं असावं कारण आम्हाला दिवसातलं पहिलं दर्शन त्याचंच झालं.
सकाळची कामं उरकली आणि सॅक प्रमोदच्या दुकानात आणून ठेवल्या. "चला
माझ्याबरोबर. ताजं दूध बनवलंय तुमच्यासाठी." कालच्या सेनेपैकी कुणाच्यातरी
घरी प्रमोद आम्हाला घेऊन जाऊ लागला. इतक्यात काहीतरी आठवून मी विनयला
म्हणालो "अरे आपल्याकडे ते नाश्त्यासाठी रेडी पदार्थ आहेत. ते घेऊन जाऊ.
नाश्ता करूनच किल्ल्यावर निघू."
"दादा….आईला सकाळीच पोहे बनवून ठेवायला सांगितलेत. दूध घेऊन झालं की आमच्या घरी जायचंय नाश्ता करायला… !!"
आम्ही प्रमोदकडे बघतच बसलो. कोण कुठले आम्ही…रात्री न मागता अंथरूण -
पांघरूण काय येतं… सकाळी ताजं दूध आणि त्यानंतर नाश्ता ?? सह्याद्रीत का
फिरावं याचं क्षणार्धात उत्तर मिळालेला हा प्रसंग. (मला आठवतंय.
यावर्षीच्या कोकण ट्रीपमध्ये गुहागरला ज्यांच्या घरी मुक्काम होता त्यांनी
सकाळी पोह्यांच्या पहिल्या डिशनंतर अजून एकदा घासभर घेतलेल्या पोह्यांचे आठ
रुपये बिलमध्ये लावले. याला म्हणतात खरं "आदरातिथ्य" !!!). प्रमोदच्या
मित्राच्या घरी पंजाबी लोक लस्सी पितात तेवढया आकाराच्या ग्लासमध्ये
गरमागरम आलंयुक्त दूध समोर आलं. कमालीची तरतरी आली. नंतर प्रमोदच्या घरी
पोह्यांचा कार्यक्रम झाला (इथे पहिल्या डिशचेही पैसे द्यायला लागत नाहीत
बरं का !!). सात वाजत आले होते.आवश्यक सामान बरोबर घेऊन प्रमोद आणि
त्याच्या मंडळाबरोबर बहुल्याच्या दिशेने आता पावलं पडू लागली.
आंबे बहुला पासून पायी चार किलोमीटर अंतर कापलं की बहुला किल्ल्याचा
खरा पायथा येतो. बहुला किल्ल्याच्या मागच्या बाजूला देवळालीचा मिलिटरी
कॅम्प असून रणगाड्याच्या तोफांच्या मारगिरीचा (फायरिंगचा) सराव करण्यासाठी
त्यांनी बहुला किल्ल्याला निवडलं आहे. त्यामुळे बहुला किल्ल्याची निम्मी
तटबंदी त्या बॉम्बगोळ्यांमुळे ढासळली आहे. सोमवार ते शनिवार हा सराव सुरु
असल्याने किल्ल्यावर जायला परवानगी नाही. रविवारी हा सराव बंद असल्याने
किल्ला बघता येतो. पण आठवड्याच्या इतर दिवशी किंवा शनिवारी चुकून जरी
तुम्ही समजा किल्ल्यावर सापडलात तरी आर्मीच्या कायद्याचं उल्लंघन
केल्याबद्दल तुम्हाला "लंबे के लिये" "चक्की पिसिंग And पिसिंग" करावं
लागेल अशी माहिती प्रमोदने पुरवली. अभिमानाची गोष्ट म्हणजे आंबे बहुलामधले
अनेक तरुण आज आर्मीमध्ये भरती आहेत. आमच्याबरोबर असलेला तुकाराम ढगे हाही
आम्ही गेलो त्यावेळेस आर्मीच्या शारीरिक चाचणीसाठीची तयारी करत होता.
साहजिकच त्या तरुणाईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आमचीही मान क्षणभर
उंचावली.
बहुला किल्ल्याचा नकाशा. सौजन्य : Trekshitiz.com
सिन्नर - घोटी रस्त्यावरून उजवीकडे बहुला किल्ला व डावीकडे रायगड डोंगर. याच्या पायथ्याला देवळालीचा आर्मी कॅम्प असून पलीकडच्या बाजूला आंबे बहुला गाव आहे. किल्ला अपरिचित असल्याने या रस्त्यावरून जाताना त्याच्याकडे आपले लक्ष जात नाही. पण आता मात्र आठवणीने एक कटाक्ष बहुल्याकडे टाकला जाईलच.
बहुलाच्या वाटेवर ही सुंदर सकाळ उजळलेली दिसली.
पायथ्याला पोचताना गडाचा विस्तार नजरेत भरला होता.
बहुला शेजारच्या रायगड डोंगराचा पणतीसारखा दिसणारा आकार.कॅमेराचा झूम मर्यादित असल्याने फोटोमध्ये Noise आला आहे.
आंबे बहुलातून कमरेएवढया गवतातून तासाभराच्या आडव्या चालीनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. उजवीकडचा किल्ला आणि त्याच्या डावीकडचा डोंगर यांचा खिंडीत नेणारी अर्ध्या पाउण तासाची चढणही घाम काढून गेली. खिंडीतून बहुला किल्ला अप्रतिम दिसत होता.
अर्ध्या तासानंतर किल्ल्याच्या कातळाच्या सावलीत येउन विसावलो.
किल्ल्यावर तुरळक तटबंदी,पाण्याची टाकी आणि थोडेफार उध्वस्त अवशेष
सोडले तर बाकी विशेष बघण्यासारखं फार काही नाही. पण माथ्यावरून चौफेर
अप्रतिम दृश्य मिळालं. साधारण पूर्वेला औंढा,पट्टा,बितनगड,शेणीत
सुळका,महांकाळ डोंगर,पश्चिमेला कळसूबाई,अलंग - मदन - कुलंग,वायव्येला रायगड
डोंगर, गडगडा,डांग्या सुळका,इगतपुरीचा प्रदेश,उत्तरेला रांजणगिरी आणि
अंजनेरी,ईशान्येला पांडवलेणी आणि विस्तीर्ण असं नाशिक शहर !!! अत्यंत
अपरिचित असूनही बहुलाने एक अफलातून अनुभव दिला होता.
आम्ही बहुलावर गेलो तेव्हा माझ्या ओळखीत बहुला किल्ला पाहिलेला असा
फक्त मीच होतो. तृप्त झालेलं मन घेऊन खाली उतरलो. गुहांपाशी आल्यावर
विश्रांती भागच होती. तुकारामने तर दिवाळी नुकतीच होऊन गेल्याने चिवडा,चकली
आणि शेवेचा संपूर्ण डबाच त्याच्याकडच्या पिशवीत भरून आणला होता. किल्ला
चढताना अनेकदा विचारूनही त्याने त्या पिशवीत काय आहे याचं उत्तर द्यायचं
टाळलं होतं. "आधीच सांगितलं असतं तर मंग त्यात काय मजा राहिली असती." असं
म्हणून त्याने नैवेद्य ठेवावा तशी ती अख्खी पिशवीच आमच्यासमोर ठेवली
(माणुसकीचे अंश जर कुठे असतील…तर ते खेडयात !!!). साडेअकराच्या सुमारास
आम्ही गावात परतलो. प्रमोदने तर कमालच केली होती. "आईला सकाळीच जेवायचं
करून ठेवायला सांगितलंय. जेवल्याशिवाय गेलात तर बघा." असा दम देऊन त्याने
आमची बोलतीच बंद केली.काही केल्या तो आणि बाकीचं मंडळ ऐकेचना. पण कितीही
म्हणलं तरी तो प्रेमळ आग्रह स्वीकारता येणार नव्हता. कारण आता इथून
नाशिकमार्गे संगमनेर गाठून आणि पुढे पेमगिरी किल्ला बघून रात्री अकरा
पर्यंततरी पुणं गाठणं भागच होतं. मोठया मुश्किलीने त्याची समजूत काढली तीही
पुन्हा फक्त बहुलाला यायच्या अटीवर !! भाबडया प्रेमाचा आणि मूर्तिमंत
माणुसकीचा अविष्कार आंबे बहुलामध्ये अनुभवायला मिळाला. ना कुठली
जन्मोजन्मीची ओळख ना कुठलीरक्ताची नाती…पण आपण
माणसं आहोत ही जाणीवच पुरेशी असते. एका परिपूर्ण दुर्गयात्रेचं समाधान
लाभलं होतं. भरून आलेली मनं घेऊन आंबे बहुला सोडलं. (मला त्यावेळी प्रमोदचा
किंवा तुकारामचा फोन नंबर आणणं शक्य झालं नाही. पण हा ब्लॉग वाचून जर
आपल्यातलं कोणी बहुला किल्ल्यावर गेलं तर कृपया माझ्यासाठी गावातल्या
विठ्ठल मंदिरासमोरच्या किराणा मालाच्या दुकानदाराचं नाव आणि नंबर घेऊन या
ही कळकळीची आणि नम्र विनंती).
बहुला (Bahula) किल्ल्याची ऊंची : 3180
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: नाशिक
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
बहुला हा किल्ला लष्कराच्या तोफ़गोळा सरावाच्या टप्प्यात असल्याने हा किल्ला आणि परिसर लष्कराच्या ताब्यात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी लष्कराची परवानगी आवश्यक आहे. परवानगी न घेता किल्ल्यावर किंवा या परिसरात गेल्यास कारवाई होऊ शकते.
11 Photos available for this fort
Bahula
Bahula
Bahula
पहाण्याची ठिकाणे :
बहुला किल्ला चढाईच्या शेवटच्या भागात सोपा कातळटप्पा पार करून आपण किल्ल्याच्या उत्तरकड्यापाशी पोहोचतो. उत्तर कड्याच्या मध्यभागी एक गुहा आहे, यात ग्रामदैवत भैरोबाची मूर्ती आहे . भैरोबाचे दर्शन घेऊन कडा डाव्या हाताला ठेवून, उजवीकडची वाटेने पुढे गेल्यावर आपण कातळकड्यात कोरलेल्या गुहांपाशी येऊन पोहोचतो. यांपैकी पहिली गुहा आकाराने मोठी असून, तिच्या आतील भागात आणखी दोन दालने आहेत. गुहेच्या पुढून जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या पश्चिमेला एका कड्यापाशी थेट आणून सोडते.. या कड्याच्या घळीत कातळकोरीव पायऱ्या आहेत. पहिल्या पंचवीस पायऱ्यांची पडझड झाली असल्याने त्या चढण्यासाठी डावीकडच्या कातळात कोरलेल्या खोबण्यांचा आधार घ्यावा लागतो. अंदाजे ४० ते ४५ पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या उध्वस्त पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
गडमाथा छोटासाच आहे . गडमाथ्यावर दक्षिण दिशेला पाण्याचे एक फुटलेले टाके आहे. या टाक्याच्या उजवीकडे चालत गेल्यावर, अर्धवट अवस्थेत कातळकड्यात खोदलेले पाण्याचे टाके आहे. टाक्यांच्या समोरच एक घळ आहे. या घळीतून कोणी वर येऊ नये म्हणून त्याच्या वाटेत एक बुरूज बांधलेला आहे.
गडमाथ्यावरुन घरगड (गडगडा) , रांजणगिरी, मग अंजनेरीचा हे किल्ले दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई-नाशिक रस्त्यावर घोटी सोडल्यानंतर १५ कि.मी. वर मुख्य रस्त्याला दोन फाटे फुटतात डावीकडचा फाटा जातेगाव-मुळेगावमार्गे अंजनेरी किल्ल्याकडे जातो, तर दुसरा उजवीकडचा फाटा 'आंबे बहुला' या गावाकडे जातो. गावातून बाहेर पडल्यावर ओढ्यावर बांधलेला एक मोठा बंधारा लागतो. बंधाऱ्यावरून चालत बहुला किल्ल्याचा पायथा गाठायला पाऊण तास लागतो. डोंगरावर तिरक्या रेषेत चढणारी वाट वीस मिनिटांत बहुला आणि त्याच्या समोरच्या डोंगरामुळे निर्माण झालेल्या खिंडीत आणून सोडते. खिंडीतून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची, थोड्या अंतरावरील एक सोपा कातळटप्पा पार करून आपण किल्ल्याच्या उत्तरकड्यापाशी पोहोचतो.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
जेवणाची सोय मुंबई - नाशिक महामार्गावर आहे
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही
बहुल्याचे आंबे बहुला
गौळाणेतूनच आंबे बहुला गावात रस्ता जातो. अगदी तीन किलोमीटरवर हे गाव लागतं. वालदेवीच्या किनारी एखाद्या घरांचा पुंजका वसावा असे हे गाव वसलेलं आहे. असं वाटण्यामागे एक विशेष कारणही आहे. लष्करांने देवळाली कॅम्प वसविले अन् १९४४ दरम्यान फायरिंग रेंजसाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या. यात आंबे बहुला हे गावही गेले. त्यामुळे नदीपलीकडे बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आंबे बहुला हे गाव नदी ओलांडून आताच्या जागेत वसले आहे. याला आता ६०-७० वर्ष झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे गावात जुनं अस काहीच नाही. जी काही मंदिरे आहेत ती नंतर ग्रामस्थांनी नव्याने उभारलेली आहेत. यात मारूती, सप्तशृंगी, भैरवनाथ, राम, भवानी मंदिराचा समावेश होतो. आंबे बहुलेकरांची ग्रामदैवत म्हणजे भैरोबा.
भैरोबाचे जुन्या मंदिर आधीच्या गावातही आहे. ते तसेच असल्याचे सुरेश शिर्के व शशीकला गवारी सांगतात. नदीपलीकडे जुन्या गावात पूर्वी आंब्याची खुप झाडे होती म्हणून गावाला आंबे अन् बहुला किल्ल्याच्या पायथ्याचे हे गाव असल्याने गावाला आंबे बहुला असे नाव पडले. एस. पी. परमहंस यांच्या महाभारत शब्दकोशात बहुलाचा उल्लेख नदी म्हणून आला आहे. तर बहुला हे गणेशव्रत म्हणूनही ओळखले जाते. यामुळे बहुला या नावाभवतीचे गूढ उलगडत नाही. मात्र बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी वालदेवी नदी वाहत असल्याने या नदीच्या सहवासात किल्ला असल्याने किल्ल्याला बहुला म्हटले गेले हेही उलगडत नाही. गावात आदिवासी लोकवस्ती जास्त आहे.
मूळच्या आंबे बहुल्यातून देशमुख मंडळी मोठ्या प्रमाणात भगूर, आडगाव, वडनेर, सुकेणे, नाशिकरोड भागात स्थलांतरीत झाली आहेत. ही मंडळीही किल्ल्यामुळे पायथ्याच्या या गावात वसली असावी. गावातील ग्रामस्थांच्या जमिनी लष्करासाठी घ्याव्या लागल्याने सर्वच अल्पभूधारक झाले आहेत. अजूनही त्या जमिनींचा मोबदला मिळाला नसल्याने गाव मोबदल्यासाठी लढताना दिसते, असे राजू देशमुख सांगतात. सध्याच्या गावाभवती वन विभागाची जमीन असल्याने गावचा पुरेसा विकासही होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु आजही आंबे बहुल्याचे मुख्य आकर्षण आहे ते बहुला किल्ला. बहुला किल्ल्याच्या इतिहासात फारशा नोंदी मिळत नाहीत. मात्र बहुला किल्ल्याचे आकर्षण भल्याभल्यांना सोडवित नाही. अर्थात बहुला किल्ल्यावर जायला बंदी आहे. कारण हा किल्ला लष्कराच्या फायरिंग रेंजचा एक भाग आहे. रविवारी फायरिंग बंद असल्याने गिर्यारोहक किल्ल्यावर जातात; मात्र तोफांचे जिंवत गोळे इतरत्र पसरले असल्याने आंबे बहुल्यातील ग्रामस्थ तेथे जाणे धोक्याचे असल्याचे सांगतात. बहुला किल्ल्याची उंची ९६५ मीटर आहे. हा किल्ला सुरूवातीला मोगलांकडे असावा व मोगलांकडून मराठ्यांच्या ताब्यात आला असावा अशा काही नोंदी मिळतात. १८१८ नंतर पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज कॅप्टन जॉन ब्रिग्जने बहुला किल्ल्याचा ताबा घेतला व त्याचे नुकसान केले, अशी नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते. बहुला किल्ल्याची तटबंदी आता बऱ्यापैकी ढासळली आहे; मात्र तोफांपासून किल्ल्यांचे संरक्षण व्हावे, अशी किल्ल्याची तटबंदी असल्याचा उल्लेख कॅ. ब्रिग्ज करतो. त्यामुळे दररोज तोफांचे वार सोसूनही हा किल्ला आजही उभा आहे, अशी माहिती गिर्यारोहक सुदर्शन कुलथे देतात.
बहुला किल्लाचे उद्धवस्त झालेले प्रवेशद्वार व कातळात कोरलेल्या उभट पायऱ्या, पाण्याचे चार टाके, अश्मवर्तुळासारखी समाधी, काताळातील चौकोनी छिद्रांचे रिंगण हे बुरजाचा पाया असावे, उद्धवस्त झालेल्या दोन वास्तूंचे अवशेष व लहानसा बहुल्याचा माथा पाहिला की नवलं वाटतं. बहुल्याचा वापरही त्रिंगलवाडी सारखा वाटेवर नजर ठेवण्यासाठी झाला असावा. खरेतर हा किल्ला नाशिक शहरात प्रवेशद्वारावरच असल्याने बहुलाचे महत्त्व मोठे आहे. मात्र तो लष्कराच्या ताब्यात असल्याने तो नियमित पाहता येत नाही. अन्यथा तोही रामशेज सारखा ठरला असता, असे मतही कुलथे व्यक्त करतात. बहुल्याच्या माथ्यावरून महांकाळ डोंगर, औंढा, पट्टा, बितनगड, शेणीत सुळका, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, कळसूबाई, वायव्येला गडगडा, रायगड डोंगर, डांग्या सुळका, इगतपुरीचा पसारा, उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी, ईशान्येला त्रिरश्मी डोंगर अन् विस्तारत चाललेलं नाशिक पहायला मिळतं. गौळाणेतील वीट भट्ट्या अन् महापालिकेचा खत प्रकल्प आकाशात ढग तयार करतानाही दिसतो.
शिंगवे बहुला, नांदूर बहुला, अस्वली बहुला, राजूर बहुला व आंबे बहुला या गावांवर बहुला किल्ल्याचा ठसा दिसतो तर पांडवलेणीच्या अवतीभवतीची गावे व त्या गावातील व्यवसाय पांडवलेणीच्या उद्देशांशी जोडली गेली असल्याचे पहायला मिळते. ही गावे भटकतांना त्या काळच्या जीवनशैलीचा स्पर्श आपल्याला होताना अनुभवायला मिळतो. म्हणूनच शहराच्या अगदी जवळची अन् इतिहासाच्या पैलूतून निर्माण झालेली ही गावे नक्कीच पहायला हवीत. कारण अजून काही वर्षांनी या गावांतील खाणाखुणांची जागा शहरातील उंच उंच इमारती घेताना दिसली तर नवलं वाटायला नको.
बहुला किल्ला, नाशिक | Discover Maharashtra
बहुला किल्ला, नाशिक –
बहुला किल्ला (नाशिक), काल जाऊन आलो. आजवरच्या माझ्या बेस्ट दुर्गभटकंतींपैकी एक. या किल्ल्याच्या चढाईबरोबरच किल्ल्यापर्यंत जाणे, पोहोचणेच अवघड आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूला देवळाली आर्मी कॅम्प आहे. त्यांच्या तोफखान्याचा सराव या भागात केला जातो. बॉम्ब, तोफगोळे वापरले जातात. रविवार सोडून इतर सहाही दिवशी ही फायरिंग होते त्यामुळे या किल्ल्यावर रविवारीच जाता येतं. या भागात आर्मीचे फार कडक निर्बंध आहेत. इतर दिवशी दिसलेत तर पकडून काहीही न बघता अक्षरशः फटके देतात किंवा इतर कोणतीही शिक्षा होऊ शकते. गाड्यांच्या चाव्या किंवा गाड्याच जप्त करतात. काहीवेळा रविवारी सुद्धा जाऊ देत नाहीत. अर्थात सगळं नशिबावर. या सगळ्यामुळे गाडी लावायला फार अडचण होते आणि या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते.
गाडी मुंबई हायवेवर किंवा गौळाणे गावात लावलेलं आणि तिथून चालत गेलेलं बरं. या भागात जो डांबरी रस्ता आहे तो मिलिटरीचा असल्यामुळे त्यावर गाडी नेता येत नाही. आंबेबहुला गावात गाडी लावता येते असंही ऐकलं; पण तिथे गेल्यावरच परिस्थितीनुसार योग्य तसं करावं लागतं. या किल्ल्यावर जायचं असेल तर स्थानिकांना तर विचाराच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आधी जाऊन आलेल्या दुर्गभटक्यांचा सल्ला घ्या.
आम्ही गाड्या रायगडनगरजवळ मुंबई हायवेवरच लावल्या आणि तिथून चालत गेलो. संततधार पाऊस, धुकं आणि नेमकी माहिती नसल्यामुळे आमची प्रचंड पायपीट झाली. त्यात आमचं दुपारी ठरलं त्यामुळे आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला सुमारे चारला पोहोचलो. पावसामुळे पूर्ण ओले झालेलो, माझ्या चष्म्यावर पाणी आणि पुसायला कोरडं असं काहीच नाही, पोटात भुकेमुळे खड्डा पडलेला आणि सोबत खायला काहीच नाही, मळलेली वाट नसल्यामुळे प्रचंड चिखल, ज्यात पाय फसत होता, माझ्या सँडलचा बंद तुटलेला आणि अशा अवस्थेत जाम तंगडतोड. त्यात उशीर झालेला त्यामुळे अंधाराचं टेन्शन कारण अंधार पडला तर या रानात फार अवघड झालं असतं आणि मुख्य म्हणजे आर्मीवाल्यांचं सतत दडपण. पण खूप मजा आली. अर्थात सोबतच्यांनी चिवटपणा दाखवला. नाहीतर गेल्या दोन वर्षात अनेक किल्ल्यांपाशी जाऊनही सोबत्यांमुळे वर जाता नाही आले. बहुला किल्ला तसा फार उंच नाही पण दोनतीन ठिकाणी चढायला जरा अवघड आहे. मस्त किल्ला आहे.
देवळाली आर्मी कॅम्पच्या सरावामुळे या भागात आणि बहुला किल्ल्यावरही बऱ्याचदा तोफगोळ्यांचे अवशेष सापडतात. फायरिंगमुळे या किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. तरीही किल्ला अनेक दुर्गावशेष सांभाळत उभा आहे. आर्मीच्या निर्बंधामुळे सध्याच्या काळात या दुर्गाचे दुर्गपण बऱ्यापैकी जपलं गेलंय असेही वाटून गेले. बहुलाच्या पायऱ्या तर अद्भुत, जबरदस्त. हरिहरगडाच्या पायऱ्या देखण्या असल्या तरी बहुला किल्ल्याच्या पायऱ्या अधिक थरारक आणि अवघड आहे यात दोन्ही किल्ले पाहिलेल्या कोणत्याही दुर्गभटक्याचे दुमत नसेल. सुमारे ७५-८० अंशाच्या, मध्ये तुटल्या आहेत त्यामुळे एकाच बाजूला धरायला, शिवाय धरायला खोबण्याही कमी, खाली डायरेक्ट उतार, काही पायऱ्या झिजून पूर्ण गुळगुळीत झाल्या आहेत, त्यात काल पावसामुळे सगळं ओलं, सटकाळं. अवघड आहे पण हा थरार अनुभवायला मजा येते.
किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी, जोत्यांचे, तटबंदीचे अवशेष. पायऱ्यांव्यतिरिक्त बहुला किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पायऱ्यांच्या अलीकडेच वाटेवर कातळकड्याच्या पोटात असलेली एक सुस्थितीतील प्राचीन लेणी. लेणीच्या स्थापत्यावरून आणि जवळच्याच पांडवलेणी (त्रिरश्मी लेणी) यावरून ही लेणी सातवाहनकालीन म्हणजे अठराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीची असू शकते. या भागात सातवाहनकाळाच्या अनेक खुणा आहेत. हा किल्ला महाराजांच्या काळात मराठ्यांनी घेतला असावा. १८१८मध्ये कॅप्टन ब्रिग्जने घेतला आणि इंग्रजांनी किल्ल्याचे नुकसान केले. असा हा इतिहास आणि अवशेष लाभलेला छोटासा बहुला किल्ला.
आमची काल ओरिजिनल ट्रेकिंग झाली. किल्ल्याच्या पायथ्याला गाव, रस्ता नाही. पूर्वी जसं किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचायलाच प्रचंड पायपीट करावी लागायची तसं बहुला किल्ल्याच्या बाबतीत आहे. काल आम्ही खरोखरच पंधराहून अधिक किलोमीटर चाललो असू. बढाई बिलकुल नाही. कोणाला वाटत असेल तर या तिथे जाऊन दाखवतो. आमची जरी जरा जास्त पायपीट झाली असली तरी बहुला किल्ल्यावर जाण्यासाठी प्रत्येकालाच एक तास किंवा अधिकच पायपीट करावी लागते. आज फार थोडे किल्ले असे राहिलेले आहेत ज्यांवर आधुनिक खुणा नाहीत; बहुला अशा किल्ल्यांपैकी आहे. मला तर लहानपणी आठ-दहा-बारा वर्षांपूर्वी दुर्गभटकंती करताना जसा फील यायचा, त्याची आठवण काल झाली.
प्रणव कुलकर्णी.
https://www.discovermh.com/bahula-fort-nashik/
संरक्षित क्षेत्रातला दुर्ग बहुला
लष्कराच्या संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या बहुला परिसरातील दुर्ग बहुलाची माहिती आज आपण घेणार आहोत. फारसा परिचित नसलेला आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा दुर्ग एकदा तरी बघायलाच हवा…

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
देवळाली कॅम्प भाग भारतीय सैन्याचे संरक्षित क्षेत्र आहे. साधारण एकोणिसाव्या शतकापासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळात देवळालीच्या भागाचा सैन्यदलासाठी वापर सुरु झाला. ‘तोफखाना केंद्र’ तर भारत-पाकिस्तान फाळणी नंतर पूर्णपणे देवळाली कॅम्प भागात सामाविष्ठ झाले. त्यावेळी संपूर्ण भारताचा सर्व्हे करून तोफखाना प्रशिक्षणासाठी हे ठिकाण निवडले गेले.
देशभरातील सैन्यातील गोलंदाज येथे तोफा चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आणि सरावासाठी येत असतात. बोफोर्ससकट विविध प्रकारच्या आधुनिक तोफा चालविण्याचा नियमित सराव येथे केला जातो. त्यासाठी त्यांचे टारगेट असते ते म्हणजे ‘बहुला’. बहुला हा तसा प्राचीन किल्ला पण दररोज त्याला अनेक तोफगोळे येऊन धडकतात.
मिलिटरी एरीयात असल्याने अर्थातच त्यावर नागरीकांना जाण्यासाठी बंदी आहे. परंतु संरक्षण खात्याकडून विशेष परवानगी काढून आपण तेथे जाऊ शकतो. रविवारच्या दिवशी तोफांच्या गोळीबाराला विश्रांती असते. बहुला दुर्गाच्या पायथ्याशी सर्वांत जवळ असलेले पायथ्याचे गाव म्हणजे आंबेबहुला. नाशिकपासून अगदी १४ कि.मी. अंतरावरचे हे गाव. गोळीबार बंद असतो त्यादिवशी काही लोक बहुला किल्ल्याच्या परिसरात ये-जा करत असतात. पण हा अधिकृत मार्ग नाही.
बर्याच वर्षांपासून खटपट करून आम्ही विशेष परवानगी घेऊन बहुला परिसरात दाखल झालो. आंबेबहुला गावातून समुद्रसपाटीपासून ९६५ मीटर (३१८० फूट) उंचीचा बहुला उठून दिसतो. गावातून बहुला किल्ल्याच्या दिशेने निघाल्यावर गावाच्या एका बाजुला असलेल्या ओढ्यावर बांधलेला बंधारा लागतो. बंधार्याच्या अलिकडे मोठ्या वडाच्या झाडाखाली देवीचे स्थान आहे. या प्राचीन देवतांचे दर्शन घेऊन बंधार्याची भिंत पार करत बहुल्याच्या दिशेने कुच करायची.

थोडं पुढे गेलं की एक डांबरी सडक लागते. ही फक्त मिलिटरीच्या वहिवाटीची आहे. डांबरी रस्ता ओलांडून पुढे स्पष्ट-अस्पष्ट होत जाणार्या पायवाटा बहुल्याच्या दिशेने गेलेल्या दिसतात. चुकण्याचा तसा प्रश्न नाही कारण, या भूभागात उंच झाडी नाही. खुरट्या झूडूपांचे चांगले जंगल आणि बाकी निर्जन गवताळ माळ आहे. बहुल्याच्या अलिकडे असणारा डोंगर त्याच्या माथ्यावरील विविध आकारातल्या उभ्या खडकांमुळे आकर्षक दिसतो. हा डोंगर आणि बहुला यांच्यातील खिंड मात्र लांबूनच दिसत असते. तेच आपले टारगेट.
करवंद, बाभूळ, काटेसावर अशा अनेक प्रकारची झुडूपं आणि पवन्या, हेम्टा आणि कुसळ प्रजातीचं गवत यांचं निरीक्षण करत ती खिंड गाठायची. मानवाचा हस्तक्षेप नसल्याने गवताळमाळावरचे अनेक पक्षी इथे निर्भयपणे वास्तव्यास असलेले दिसतात.
खिंडीच्या अलिकडे भले मोठे कातळकोरीव पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाण्याच्या टाकीत संपूर्ण गाळ भरलेला आहे. टाक्याच्या वरच्या भागात चौकीसारखे जोते आहे. इथून थोडं वर गेलं की खिंडीतून पूर्वेकडील संपूर्ण सखल दरी आणि निश्चल जंगल मोहून टाकते. गोळाबार बंद असतो म्हणून बरं नाहीतर या दरीच्या पलिकडून तोफगोळे बहुल्यावर येऊन धडकत असतात.
खिंडीतून उजव्या हाताला म्हणजेच दक्षिणेकडे वर जाणारी पायवाट आहे. फार चढण नसली तरी थोडी नागमोडी फिरत जाऊन वर दिसणार्या खड्या कातळपायथ्याशी जाऊन भिडते. खिंडीपासून कातळकड्यापर्यंतच्या वाटेवर साधारण मध्यावर गोलाकार आकारात असलेल्या बुरूजाचे जोते आहे.
आता त्याच्या सर्व चिरे पडून फक्त त्याच्या पायथ्याशी असलेल्या दगड बसविण्याच्या खाचा तेवढ्या दिसतात. वर कातळकड्याच्या पोटात पश्चिमाभिमुख म्हणजे मुंबई महामार्गाकडे तोंडकरून असलेल्या गुहा आहेत. एकसंध कोरलेल्या या गुहा खांबांनी तोलून धरलेल्या आहेत. पहिली गुहा आकाराने मोठी असून आत छोट्या आकाराचे दोन दालन आहेत. गुहेच्या प्रवेशद्वाराला दरवाजा अडकविण्यासाठी खटक्यांसारखे कोरीवकाम केलेले आहे. गुहेला लगटून कड्याला डावीकडे ठेवत अगदी थोडं पुढे जायचं. इथेही काही गुहा कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.
उभ्या कातळकड्याला गेलेल्या उभ्या नैसर्गिक भेगेचा आधार घेत साधारण सत्तर-पंच्याहत्तर पायर्यांचा उभा सोपान कोरलेला आहे. जिन्याव्यतिरिक्त अन्य मार्गाने वर चढू नये म्हणून उभा कातळ तासून काढलेला आहे. प्राचीन काळी ज्यांनी कुणी हा मार्ग बनविला असेल त्या अनामिकांना मनोमन नमस्कार केल्यावाचून राहत नाही. अंगावर येणार्या उभ्या जिन्याच्या पहिल्या पायर्यांची रूंदी दीड-दोन फूटांची आहे तर जसजसे वर जावे तशी खिंड आणि पायर्यांची रूंदी सहा फूटांपर्यंत वाढत जाते.
बहुला किल्ला बघायला यावं फक्त या पायर्यांची अनोखी रचना अनुभवण्यासाठी! पायर्या जिथे संपतात तिथे प्रवेशद्वार आहे. आता हे संपुर्णपणे ढासळलंय पण बाजूच्या तटबंदीमुळे ओळखू येतं. आपण गडमाथ्यावर आलेलो असतो. वापरात नसल्याने माथ्यावर विविध दिशांना असलेली चार ते पाच पाण्याची टाकी पूर्णतः बुजली आहेत तरी देखील ओळखू येतात. पण माथ्यावर दक्षिणदिशेला असलेली कपारीतली पाण्याची टाकी मात्र चांगल्या अवस्थेत आहे.
मध्यभागी काही जोती आणि बांधकामावशेष दिसतात. माथ्यावर गडफेरी करत असतांना कड्याच्या काही भागांवर तटबंदी दिसून येते. बाकी शेजारी असलेल्या रायगडापर्यंतचे सर्व शिखरं अगदी जवळून न्याहाळता येतात. तिकडे देवळाली मिलिटरीचा निर्मनुष्य परिसर जैवविविधता, गर्द झाडोरा आणि नैसर्गिक संपत्ती सांभाळत असलेला दिसतो. देवळालीच्या पलिकडे औंढा आणि पट्टा खूणावत असतात. पांडवलेणी आणि त्याच्या शेजारील दोन प्रमुख डोंगर, कावनई, अंजनेरी, नवरानवरी, आठवा डोंगर, आधुली, डांग्या सुळका, घरगड, त्र्यंबकगडाचे पंचलिंग असे कितीतरी पर्वत विहंगम दिसतात. हा सर्व नजारा बघतांना डोळ्यांचं पारणं फिटतं.
कविवर्य गोविंदाग्रजांच्या ‘राकट देशा, कणखर देखा, दगडांच्या देशा…’ या ओळी सह्याद्रीच्या कुशीत राहणार्या प्रत्येकाच्या ओठी असतात. ही ‘राकटता आणि कणखरता’ आपल्याला बहुला दुर्गवारीत अनुभवायला मिळते. कारण, साधारण दोनशे वर्षांपासून बहुल्यावर अत्युच्च श्रेणीचा तोफगोळ्यांचा मारा होत आलेला आहे आणि आजही चालू आहे. पण किल्ल्यावर कुठे तडे गेले आहेत किंवा गोळा लागून इथला दगड चूर्ण झाला आहे अशा एकही खूण नाही.
https://indiadarpanlive.com/bhatkuya-anande-article-bahula-fort-sudarshan-kulathe/
Bahulagad Trek Blog - Secret Fort no one visits -
From the moment I decided to go for Bahulagad trek I started to find information about it. Even google didn’t have any information related to bahulagad. I hope this Bahulagad trek blog will clarify most of your doubts. 2018 New Year Resolution– 20 Sahyadri Treks & 2 Himalayan Treks. After the first trek of 2018 in January at Padargad (which was pretty exciting with Chimney Climbing patch) I succumbed to a knee injury which took me out of action for the first half of the year. Having recovered and strengthened my knee I was waiting to be back again in the wilderness. Onset of monsoon triggered that enthusiasm with the Bahulagad Trek

Disclaimer
- This Fort lies besides the military firing range at Devlali Artillery Camp. Hence getting entry here requires government clearance.
- Since Sunday is the only off day for the firing range, it can only be safe on a Sunday (local source).
- If you are found by security personnel without any permission near the area strict action will be taken. Read thrashings by wooden & plastic rods (“That hurts a lot” – locals). Beatings are for all irrespective of caste, sex & age. Just the way life should be – No discrimination here.
- After taking hits from the military Howitzer guns (Read Bofors) for many years, the rocks are very loose on the fort. Rock falls in monsoon are common. I experienced one myself when a rock size of a small car fell down just minutes after we had passed it.
Why did I do it – “Cause I was not aware till after the trek”. Dont Try This
How to reach Bahulagad
If you are driving from Kasara towards Nashik this fort will lie on your right side. There are two ways to get here:
- From RaigadNagar (besides the highway): There is a Hanuman temple in the village here where we stayed for the night after taking permissions from the Sarpanch. 10-15 people can easily stay.
- Another route from AmbeBahula
History of Bahulagad fort
Not much info is available regarding the fort. But this triangular plateaued fort located at 956 m above sea level was ruled by Marathas during 1670-71.
Things to See at Bahulagad fort
- Harihar-esque rock cut stairs. Almost 92 stairs available ( North west of the fort)
- 4 water tanks – almost hidden under mud & stones
- Some fortification is visible on the fort ( prominently towards west side)
Things to See around Bahulagad fort
- Little ahead after the stairs is a cave in good condition (north of fort)
- Further ahead from the stairs is a temple & one more water cistern ( North)
- While descending towards the north you will also find a remains of horse stable. Descending further you will find another water tank ( north east of the fort)
- Huge natural shivling besides the fort ( South of the fort) – Seen from far off – Can be used to identify the fort from far off distance
Forts Visible
- Towards east of the fort is Gadgada / Ghargad
- Towards North lies the Pandavleni & the Nashik concrete jungle
Availability of water
Nil – since all the tanks are almost reclaimed by mother earth
What should I carry on this trek ?
I prefer Ghar ka khana, fruits, dry fruits, lemon juice & lots of water. I DONT recommend maida products like biscuits &breads and carbonated drinks. I do carry 1 ₹ chocolates for quick energy boost.
My normal attire includes full sleeved clothes , cap & proper trek shoes ( No flip-flops) Good goggles i.e anti-glares are must for summer treks. I also carry safety gadgets like fire starter, waterproof torch, whistle, first-aid just in case.
TheFreeBird’s Story – Bahulagad Trek Blog
As has always been the format for any Nashik side trek, we took the local to Kasara ( Rs 50 Return ticket) & then took the easily available trax / cab towards the base village of Raigadnagar ( Rs 150 per seat ). We reached there by around midnight & started to look for places to crash for the night. Entire village was fast asleep. The dogs, cows & the one horse made sure that everyone new that we had arrived. A quick discussion with villagers lead us to the Hanuman mandir where we stayed for the night.
After the on & off sleepy moments, finally got up around 0500 hrs. The village was still mostly dreaming & we made way to the river near by to lay down some land mines
Back at the temple, we made some new friends with energetic local children who agreed to take us to the fort. With our rucksacks packed we left for the Bahulagad Trek.
This route started from the main highway ( from Raigadnagar) – from the left of an almost dry well – over a small hill ( through what appeared as an abandoned road)- towards the fort in line of sight. ( Image for google map of route is at the start of the blog)
From far off the forts were crowned in clouds and could not be differentiated.
However on the return we could easily spot the natural shivling & the route we had taken.

The vast expanse of empty land dotted with scarce vegetation made for a very surreal appearance. This reminded me of Jaisalmer desert in Monsoon.
We continued to walk towards the hills with the wind getting increasingly soothing & clouds getting darker. Soon it started to rain. Even though I had my raincoat, I decided to get drenched in this first monsoon trek. Wore it half-heartedly to protect my camera charger.

Before any one could look around and enjoy the beauty , clouds came into play.

We continued to walk to reach the top of the rocky hill from where we just had to walk on a flat ridge to reach Bahulagad hill. We walked from left of the huge rocky wall (Rock Hill 1) to cross the connecting hill to reach our destination.

As we moved away from the rock hill we could see Bahulagad wreathed in clouds making up for a dramatic entrance.

We moved ahead through the sticky & slippery route to reach this rocky behemoth. And continued further north to reach the grand entrance. The main entrance consists of stairs like Harihar rock cut stairs (more like Durgabhandar stairs).
These 92 stairs are not in the best of the conditions. With years of neglect, scree & rain water climbing it was definitely an excellent adventure.
The holds in the rock walls & stairs were too far off & had become blunt over the years. Major efforts are required to handle the camera. (Checkout my Bahulagad youtube video, Here is my Youtube Channel).
Once at the top it was a huge anti climax due to the Clouds. Nothing was visible. There are four water tanks. Two of them in the centre of this small fort completely taken over by nature and other two on the forts periphery. We used one to hide from the rain and finish our food.
Once done we moved around a bit and tried to look over the fortifications. But nothing much was visible. Finally started descend over the tricky Bahulagad stairs.
Getting down from the fort instead of taking the same route we decided to go a bit north and descend to meet the starting route. A bit ahead we found a cave.
The cave is in a good condition and contains 3 windows & an entrance door. A Crowd of 15 people can easily stay here (not permitted though). Moving further ahead there is a temple & another water cistern.
Further north are the remains of a horse stable. These were the luckiest horses to get such a brilliant view. Further down is another water tank probably for the horses. There are whole lot of ConkerBerry/ karvanda available here.
Back to Raigadnagar, we had lunch at a villager’s home. Tastiest food you will ever get.
Bags packed. Trax to Kasara and into the local to Mumbai. Weekend well spent.
Here is proper vlog, I am sure you will like the video
The Bahulagad trek is short & sweet and can be done in about 4-5 hours. However there is a huge risk factor involved since it lies in the firing range. Years of firing has loosened many rocks which fall down during monsoon. So unless you have the proper permission & safety please don’t visit the fort. I am not sure on where we get permission. I did the Bahulagad trek because I was not aware of the regulation.
how to travel full time ?
Hope you enjoyed reading about Bahulagad trek. If you have been trekking in Sahyadris for a long time you might consider graduating from trekking to mountaineering. Here are few other treks you may like:
Monsoon Waterfall Special
- KP falls – The Railway bridge waterfall always seen from Lonavala- Karjat train
- Devkund Waterfall– If paradise was real
- 400 ft Kataldhar Waterfall –Closest thing to Waterfalls in Bahubali movie
- Kumbhe Waterfall – Out of this world
- Nanemachi Waterfall – 400 ft or 500 ft secret waterfall
WEEKENDS near Mumbai & Pune ?
- Karnala Fort– Perfect Beginner Trek
- Sondai fort – Easy Trek & The View !
- Songiri Fort – A very confusing trek with a beautiful view
- Kalavantin Durg- Beauty of the world famous vertical stairs
- Rajmachi – The Must Do thing in Lonavla
- Manikgad -A confusing trek got easier with new roads
- Irshalgad – An easy winter trek
- Bhivgad – Shortest trek in Sahyadris
- Kondana Caves – Simple trek for family
- NathBaba Caves– Peaceful, silent & away from the crowd
- Is Heaven Real ? – Kothaligad / Peth Trek
- I tried chimney Climbing at Padargad Fort.
Matheran Trek Routes ?
- The Must Do thing in Matheran –Peb Trek
- Trek to Matheran – From Garbett Point
- Trek to Matheran – From Rambaug Point
- Trek to Matheran – From One Tree Hill Point
- Trek to Matheran – From Sunset point Trek
- Trek to Matheran – Form Hashyachi Patti
- Trek to Matheran – From Pisarnath Ladder
- Trek to Matheran – From Beatrice Cliff
WEEKENDS near Kasara & Nashik ?
- Vertical Stairs at Harihar Fort-Its not that scary as marketed
- Crawling through huge rocks at Bhandardurg / Brahmagiri trek
- Offbeat Basgad / Bhaskargad Trek, the views are terrific
- Bahula Gad Trek – This trek is closed now
- Mordhan fort – Offbeat Kasara Trek with beautiful views
Konkan Sea Forts ?
- The undefeated Arabian sea fort – Murud Janjira
Risky ( Experience Required)
- I tried chimney Climbing at Padargad Fort.
- A very risky trek at Bhairavgad Moroshi
Offbeat
- Pandavgad Trek & Bollywood’s favourite shooting place
- Vairatgad Trek & submerged temples of Wai
- Rajapuri Caves & lovely rains in Panchgani…free milk shakes
Out of Maharashtra
- Backpacking in the Blue city of Jodhpur ( 2 days under 1000 Rs)
- 2 Days around the India-Pak Desert border (Jaisalmer)
- 2 Days in Andhra: Exploring the beautiful Gorge at Gandikota & the underground Belum Caves
Weekend Adventure + +
" Well begun is half done "
TheFreeBird recommends proper equipments for your weekend adventure
Here is a list of all my adventures
I am always in search of offbeat adventures. You can follow my adventures on Facebook , Instagram and YouTube . I prepare ambience videos on YouTube which doesn’t have any artificial sound just natures music . Make sure to subscribe to my channel
Do follow me on Instagram as I share my latest adventures over there.
To get regular updates on upcoming blogs please join my email list by entering your E-mail address in the Newsletter below.
https://www.thefreebird.net/treks/bahulagad-trek-blog
आंबे बहुला पासून पायी चार किलोमीटर अंतर कापलं की बहुला किल्ल्याचा खरा पायथा येतो. बहुला किल्ल्याच्या मागच्या बाजूला देवळालीचा मिलिटरी कॅम्प असून रणगाड्याच्या तोफांच्या मारगिरीचा (फायरिंगचा) सराव करण्यासाठी त्यांनी बहुला किल्ल्याला निवडलं आहे. त्यामुळे बहुला किल्ल्याची निम्मी तटबंदी त्या बॉम्बगोळ्यांमुळे ढासळली आहे. सोमवार ते शनिवार हा सराव सुरु असल्याने किल्ल्यावर जायला परवानगी नाही. रविवारी हा सराव बंद असल्याने किल्ला बघता येतो. पण आठवड्याच्या इतर दिवशी किंवा शनिवारी चुकून जरी तुम्ही समजा किल्ल्यावर सापडलात तरी आर्मीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला "लंबे के लिये" "चक्की पिसिंग And पिसिंग" करावं लागेल अशी माहिती प्रमोदने पुरवली. अभिमानाची गोष्ट म्हणजे आंबे बहुलामधले अनेक तरुण आज आर्मीमध्ये भरती आहेत. आमच्याबरोबर असलेला तुकाराम ढगे हाही आम्ही गेलो त्यावेळेस आर्मीच्या शारीरिक चाचणीसाठीची तयारी करत होता. साहजिकच त्या तरुणाईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आमचीही मान क्षणभर उंचावली.
बहुला किल्ल्याचा नकाशा. सौजन्य : Trekshitiz.com
सिन्नर - घोटी रस्त्यावरून उजवीकडे बहुला किल्ला व डावीकडे रायगड डोंगर. याच्या पायथ्याला देवळालीचा आर्मी कॅम्प असून पलीकडच्या बाजूला आंबे बहुला गाव आहे. किल्ला अपरिचित असल्याने या रस्त्यावरून जाताना त्याच्याकडे आपले लक्ष जात नाही. पण आता मात्र आठवणीने एक कटाक्ष बहुल्याकडे टाकला जाईलच.
बहुलाच्या वाटेवर ही सुंदर सकाळ उजळलेली दिसली.
बहुलाच्या मार्गावरून उजवीकडे दिसणारा गडगडा / घरगड किल्ला,अघेरा डोंगर आणि डांग्या सुळका
पायथ्याला पोचताना गडाचा विस्तार नजरेत भरला होता.
बहुला शेजारच्या रायगड डोंगराचा पणतीसारखा दिसणारा आकार.कॅमेराचा झूम मर्यादित असल्याने फोटोमध्ये Noise आला आहे.
आंबे बहुलातून कमरेएवढया गवतातून तासाभराच्या आडव्या चालीनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. उजवीकडचा किल्ला आणि त्याच्या डावीकडचा डोंगर यांचा खिंडीत नेणारी अर्ध्या पाउण तासाची चढणही घाम काढून गेली. खिंडीतून बहुला किल्ला अप्रतिम दिसत होता.
बहुला क्लोजअप. समोर दिसणा-या या छोटया उंचावट्याच्या मधोमध एक खाच दिसतीये. तिथे एक छोटासा सोपा रॉकपॅच चढावा लागतो.
खिंडीतून बहुलाच्या डावीकडील डोंगर व मागे पांडवलेण्यांची टेकडी
किल्ल्याच्या वाटेवर हे एक भुयारासारखं काहीतरी दिसलं. स्थानिक लोकांच्या मते "चोरवाट"
रॉकपॅच चढून आल्यावर त्याच कातळावर काही पोस्ट होल्स दिसले
किल्ल्याचा अभेद्य कातळमाथा उन्हं सोसत उभा होता. त्याच्या बरोब्बर मध्ये जी एक छोटी घळ दिसतीये त्यात पाय-या आहेत
अर्ध्या तासानंतर किल्ल्याच्या कातळाच्या सावलीत येउन विसावलो. डावीकडे ह्या खोदीव गुहा दिसल्या. स्थानिक लोकांच्या मते ही घोड्याची पागा आहे.
गुहेमधून दिसणारा आंबे बहुलाचा प्रदेश
गुहांपासून पुढे आल्यानंतर किल्ल्याचं प्रमुख आकर्षण असणा-या सुंदर अशा खोदीव आणि उभ्या चढाईच्या पाय-या सुरु झाल्या
किल्ल्यावरील पाण्याची खोदीव टाकी.हे टाके रायगड डोंगराच्या दिशेला म्हणजेच पश्चिमेकडे आहे
किल्ल्यावरील अजून एक खोदीव टाके.
बहुला किल्ल्याची पश्चिमेकडील तटबंदी. मागे रायगड डोंगर
किल्ल्यावर तुरळक तटबंदी,पाण्याची टाकी आणि थोडेफार उध्वस्त अवशेष
सोडले तर बाकी विशेष बघण्यासारखं फार काही नाही. पण माथ्यावरून चौफेर
अप्रतिम दृश्य मिळालं. साधारण पूर्वेला औंढा,पट्टा,बितनगड,शेणीत
सुळका,महांकाळ डोंगर,पश्चिमेला कळसूबाई,अलंग - मदन - कुलंग,वायव्येला रायगड
डोंगर, गडगडा,डांग्या सुळका,इगतपुरीचा प्रदेश,उत्तरेला रांजणगिरी आणि
अंजनेरी,ईशान्येला पांडवलेणी आणि विस्तीर्ण असं नाशिक शहर !!! अत्यंत
अपरिचित असूनही बहुलाने एक अफलातून अनुभव दिला होता.
आम्ही बहुलावर गेलो तेव्हा माझ्या ओळखीत बहुला किल्ला पाहिलेला असा
फक्त मीच होतो. तृप्त झालेलं मन घेऊन खाली उतरलो. गुहांपाशी आल्यावर
विश्रांती भागच होती. तुकारामने तर दिवाळी नुकतीच होऊन गेल्याने चिवडा,चकली
आणि शेवेचा संपूर्ण डबाच त्याच्याकडच्या पिशवीत भरून आणला होता. किल्ला
चढताना अनेकदा विचारूनही त्याने त्या पिशवीत काय आहे याचं उत्तर द्यायचं
टाळलं होतं. "आधीच सांगितलं असतं तर मंग त्यात काय मजा राहिली असती." असं
म्हणून त्याने नैवेद्य ठेवावा तशी ती अख्खी पिशवीच आमच्यासमोर ठेवली
(माणुसकीचे अंश जर कुठे असतील…तर ते खेडयात !!!). साडेअकराच्या सुमारास
आम्ही गावात परतलो. प्रमोदने तर कमालच केली होती. "आईला सकाळीच जेवायचं
करून ठेवायला सांगितलंय. जेवल्याशिवाय गेलात तर बघा." असा दम देऊन त्याने
आमची बोलतीच बंद केली.काही केल्या तो आणि बाकीचं मंडळ ऐकेचना. पण कितीही
म्हणलं तरी तो प्रेमळ आग्रह स्वीकारता येणार नव्हता. कारण आता इथून
नाशिकमार्गे संगमनेर गाठून आणि पुढे पेमगिरी किल्ला बघून रात्री अकरा
पर्यंततरी पुणं गाठणं भागच होतं. मोठया मुश्किलीने त्याची समजूत काढली तीही
पुन्हा फक्त बहुलाला यायच्या अटीवर !! भाबडया प्रेमाचा आणि मूर्तिमंत
माणुसकीचा अविष्कार आंबे बहुलामध्ये अनुभवायला मिळाला. ना कुठली
जन्मोजन्मीची ओळख ना कुठलीरक्ताची नाती…पण आपण
माणसं आहोत ही जाणीवच पुरेशी असते. एका परिपूर्ण दुर्गयात्रेचं समाधान
लाभलं होतं. भरून आलेली मनं घेऊन आंबे बहुला सोडलं. (मला त्यावेळी प्रमोदचा
किंवा तुकारामचा फोन नंबर आणणं शक्य झालं नाही. पण हा ब्लॉग वाचून जर
आपल्यातलं कोणी बहुला किल्ल्यावर गेलं तर कृपया माझ्यासाठी गावातल्या
विठ्ठल मंदिरासमोरच्या किराणा मालाच्या दुकानदाराचं नाव आणि नंबर घेऊन या
ही कळकळीची आणि नम्र विनंती).
http://www.onkaroak.com/2013/10/blog-post_20.html







































