Friday, April 22, 2022

सांधण दरी-एक निसर्गनवल

   “महाराष्ट्रात गड-किलल्यांवर चढाई करणं जितकं साहसी आणि थरारक तितकच इथल्या दर्‍या-खोर्‍यां मध्ये भटकण्याचा अनुभव स्मरणीय आणि हो अ‍ॅडव्हेंचरस सुध्दा!ट्रेक करायला आवडत असेल आणि या नव्या वर्षी ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर नगर जिल्ह्यातील ‘सांदण दरी’ तुमच्यासाठी आहे बेस्ट ठिकाणं. ट्रेकच्या दृष्टिकोनातून याची पातळी थोडी कठीण असली तरी देखील अशक्य मुळीच नाही. अफलातून निसर्गाचे वरदान या व्हॅलीला लाभले आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रेक केला नाही तर तुम्ही आयुष्यात एक साहस राहून गेले, असे तुम्हाला कायम वाटेल. सांदण दरीला भेट प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आणि मोबाईल सोशल मीडियापासून साधारण दोन दिवस दूर गेल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती या ठिकाणी मिळाली. आयुष्य हे सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी एकदा तरी सांदण व्हॅली करायलाच हवी. निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण दरी’ हे आश्चर्य आजही कित्येकांना माहित नाही.
  अकोले तालुक्यातील व नगर जिल्ह्याचा अतिशय दुर्गम भाग म्हणजे साम्रद गाव , या साम्रद गावाजवळ असलेली आणि रतनगड, कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन या किल्ल्यांचा शेजार व नैसर्गिक सौंदर्य लाभलेली सांदन दरी अनेक वर्ष उपेक्षित होती. पण भटक्यांच्या माध्यमातून ज्यावेळी ही दरी लोकांना माहिती पडली आणि ज्यांनी ह्या दरीची थरारकता अनुभवली ते लोक वारंवार येथे भेट देऊ लागले आणि अशा तऱ्हेने अज्ञात असलेली दरी लोकांना ज्ञात झाली. व ती प्रकाश झोतात आली 
    एकिकडे भांडारदरा धरणाचे अलौकिक दृष्य तर दुसरीकडे सह्याद्रीचे ब्रम्ह रूप . हा सह्याद्री म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच म्हणावे लागेल. या सह्याद्रीत विविध ठिकाणे असून त्याचे रंग बदलणार्‍या सरड्याप्रमाणे विविध प्रकारची रूपे पहावयास मिळतात.   सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती असत. परंतु नंतरच्या काळात अनेक भटक्यांचा ओघ वाढला मग खरेतर गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि मग इतके दिवस अज्ञात असलेली विविध ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहित होण्यास सुरुवात झाली. यातुनच पर्यटनाला खरी चालना मिळाली व त्या ठिकाणी पर्यटकांचे लोंढे वाढू लागले. याच ठिकाणां पैकी असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी. की जिचे महत्व व ख्याती आशियातील सर्वात मोठी लांब घळ म्हणुन करण्यात येते. इथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटक, गिर्यारोहक, प्रस्तरारोहक येण्यासाठी आणि तिथला अनुभव घेण्यासाठी खुप आतूर असतात.ओमान देशात पण अशीच एक पण जरा रुंद दरी आहे. त्या भागाचे नाव नाखल. त्यातून एक नदी वाहते. त्या अरुंद दरीतून इजिप्शियन लोक फटाक्यातले बाण सोडत असत. मस्त आवाज घुमायचा त्याचा. तिथे त्या सरकारने चांगल्या सोयी केल्या आहेत.
         एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. असच एक सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी…..सह्याद्रीच्या या रुपापुढे फक्त नतमस्तक व्हायच….आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या ,निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते. सांदण दरीचे वैशिष्ठ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.
     अहमदनगर जिलह्यातल्या सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणं घेत जाणारी ही दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात. सांधण दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. ही वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणं तुम्हाला त्या मानाने सोप्पं वाटतं. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. सांधण दरीला यायचं तर निदान दोन दिवस तरी काढायला हवेत. उन्हाळ्यातल्या एखाद्या वीकेंडला इथे येउन धमाल करायचा विचार असेल, तर चालू शकेल. कारण मुंबईसह महाराष्ट्रातच कडक उन्हाळा असताना इथे मात्र थंड वातावरण असतं. शनिवारी सकाळी मुंबई-पुण्याहून निघून इगतपुरी गाठायचं. तिथून शेंडी या गावाला जायला थेट जीप किंवा रिक्षा मिळतात. तिथून पुढे सामरदला जायलाही तशीच सोय तिथून होते. प्रवास करत दुपारी सामरदला पोहोचलात की गावातल्या एखाद्या घरात तुमची जेवणाची व्यवस्था सहज होऊ शकते. चुलीवर बनवलेलं स्वादिष्ट जेवण पोटात गेलं की आत्मा शांत होतो. थोडा वेळ आराम करून पुढच्या प्रवासाला सज्ज व्हायचं. सांधण दरीचा सुरक्षितपणे आनंद घ्यायचा तर एखादा गाईड सोबत हवाच. तो तुम्हाला गावात मिळू शकेल. तुमच्या जेवण्या-खाण्याची, रात्री झोपण्यासाठी तंबूची आणि साहसी उपक्रमांसाठी आवश्यक त्या साहित्याची सोय तो तुम्हाला हमखास करू देऊ शकतो. अर्थात त्यासाठी थोडा खिसा मोकळा करण्याची तयारी हवी. दरी गावाला खेटूनच असल्याने गावापासून दरीपर्यंत पोहोचण्यासाठी फारसा प्रवास करावा लागत नाही. पण प्रत्यक्ष दरीत गेल्यापासून तुमचा खरा प्रवास सुरू होतो. कारण दरीतून चालण्याचा अनुभव म्हणजे एका दगडावरुन दुसर्‍या खडकावर, आणि मार्ग थेट उतराईचा असल्यामुळे ‘रॅपलिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स’ म्हणजे काय ते कळतं;सांधण व्हलीतून ट्रेक करताना हे सारं काही अपल्या गाठीशी असतं; गडमाथ्यावरुन घाटातून पाहिलेली दरी प्रत्यक्षात मात्र पार करताना कशी असू शकते हे सांधण व्हॅली पार केल्यावरच कळून चुकतं,अश्या या विशालदरीचा वेध…” 

***वरील छायाचित्र हे गुगल मॅप द्वारे घेतलेले आहे, तरीही अगदी स्पष्ट दिसत आहे यावरुनच सांधन दरीची भव्यता दिसून येते.


 कसे जायचे :

पुणे कडून :-

१) संगमनेरमार्गे :-

पुणे-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजुर-रंधा धबधबा ( पावसाळा संपताना ) -रतनवाडी फाटा- शेंडी-  इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी). जर रतनगडाच्या पायथ्याल्या असलेल्या रतनवाडीच्या शिल्पसमृद्ध श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घ्यावयाचे असल्यास रतनवाडीच्या मार्गाने जावे. 

किंवा भंडारदरा-पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( पहिला मार्ग ) ( एकुण अंतर -२४८ कि.मी.)

२) बोटामार्गे :-

   पुण्यातून शिवाजीनगर, खडकी, नारायणगाव, आळेफाटा-बोटा-ब्राम्हणवाडा-कोतुळ-कोतुळ फाटा-राजुर-रंधा धबधबा-रतनवाडी फाटा-शेंडी-भंडारदरा -पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -२०० कि.मी.)

३) ओतुरमार्गे :-

   पुण्यातून शिवाजीनगर, खडकी, नारायणगाव, आळेफाटा-ओतुर-ब्राम्हणवाडा-कोतुळ-कोतुळ फाटा-राजुर-रंधा धबधबा-रतनवाडी फाटा-शेंडी-भंडारदरा -पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -२०० कि.मी.)

  अर्थात दोन आणि तीन क्रमांकाच्या मार्गाने शक्यतो दिवसा प्रवास करणे योग्य.हा रस्ता एकेरी असून विशेष सोयी नाहीत.मात्र हे दोन्ही मार्ग जवळचे आहेत.

मुंबई वरुन :-

 मुंबईमधून स्वतःच्या गाडीने जायचे झाल्यास मुंबई भिवंडी, ईगतपुरी, भंडारदरा मार्गे सामराद गावी पोहचून सांधन दरीला जाता येते. येथे यायचे झाल्यास खाजगी गाडीनेच येणे सोयीस्कर आहे, नाहीतर बर्‍याच गाड्या बदलून बदलून येण्यातच वेळ जाईल.

१) इगतपुरी,बाहुलीमार्गे :-

    कल्याण- शहापुर-कसारा-इगतपुरी-भावली-आंबेवाडी-वासाली फाटा-वारघुशी फाटा- शेंडी-भंडारदरा- पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -१८१ कि.मी.)

२) घोटी-भंडारदरा मार्गे :-

 कल्याण- शहापुर-कसारा-इगतपुरी-घोटी ( घोटी-भंडारदरा रोड ) वासाली फाटा-वारघुशी फाटा- शेंडी-भंडारदरा- पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -१९९ कि.मी.)

नाशिककडून :-

  नाशिक-वाडीविर्हे- घोटी ( घोटी-भंडारदरा रोड ) वासाली फाटा-वारघुशी फाटा- शेंडी-भंडारदरा- पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -९३ कि.मी.)

  

जर सर्व परिसर फिरायचा असेल तर वर्तुळाकार मार्गे असा आहे.

  रतनवाडी फाटा-शेंडी-भंडारदरा -पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद -रतनवाडी-रतनवाडी फाटा- शेंडी-भंडारदरा- 

     शनिवारी सकाळी मुंबई-पुण्याहून निघून इगतपुरी गाठायचं. तिथून शेंडी या गावाला जायला थेट जीप किंवा रिक्षा मिळतात. तिथून पुढे सामरदला जायलाही तशीच सोय तिथून होते.

 प्रवास करत दुपारी सामरदला पोहोचलात की गावातल्या एखाद्या घरात तुमची जेवणाची व्यवस्था सहज होऊ शकते. चुलीवर बनवलेलं स्वादिष्ट जेवण पोटात गेलं की आत्मा शांत होतो. थोडा वेळ आराम करून पुढच्या प्रवासाला सज्ज व्हायचं. सांधण दरीचा सुरक्षितपणे आनंद घ्यायचा तर एखादा गाईड सोबत हवाच. तो तुम्हाला गावात मिळू शकेल. तुमच्या जेवण्या-खाण्याची, रात्री झोपण्यासाठी तंबूची आणि साहसी उपक्रमांसाठी आवश्यक त्या साहित्याची सोय तो तुम्हाला हमखास करू देऊ शकतो. अर्थात त्यासाठी थोडा खिसा मोकळा करण्याची तयारी हवी. दरी गावाला खेटूनच असल्याने गावापासून दरीपर्यंत पोहोचण्यासाठी फारसा प्रवास करावा लागत नाही. पण प्रत्यक्ष दरीत गेल्यापासून तुमचा खरा प्रवास सुरू होतो. 














 
BHNDARDARA परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती घेण्यासाठी आजच भेट द्या ...
AV Camping Murashet Bhandardara
9545742181 / 9422174502
 
भंडारदरा परिसरातील सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात दुथडी भरुन वाहू लागेले आहेत, एकमेव व लोकप्रीय प्रेक्षणीय स्थळ सादंण दरी,कोकणकडा, अमृतेश्वर मंदीर रतनवाडी, रंधा धबधबा, घोरपडाआई मंदीर, कळसुबाई असे इ. सर्व ठिकाणाचे महत्व पटवुन सांगणारे व मार्गदर्शन करणारे संकेत बांगर मो नं :- 9545742181 यांना नक्की भेट द्या ...  
 
साम्रद हे गाव अतिशय निसर्गरम्य परिसराने वेढलेले आहे.एका बाजुला महाराष्ट्रातील आणि सह्याद्रीतील सर्वोच्च शिखरे असणारी अलंग्,कुलंग,मदन आणि शिखर साम्राज्ञी कळसुबाईची रांग, एका बाजुला पाताळवेरी गेलेला कोकणकडा, पाठीशी रतनगड आणि खुट्टा हा भेदक सुळका. हा नजारा बघण्यासाठी दोन डोळे अपुरे पडतात. 



 

 

 

 

 

 

 

 

 अलंग,कुलंग्,मदन्,साकिरा,किर्डा आणि महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शैल कळसुबाईची देख्णी रांग

 

 घाटघर धरण

घाटघर्‍ धरण.इथे दोन धरणे बांधली आहेत.एका धरणातून पाणी दुसर्‍या धरणात सोडले जाते आणि त्यावर वीज निर्मिती केली जाते.


 

 

 

    भंडारदर्‍यावरुन दिसणारा रतनगडाच्या मागचा सुर्यास्त


कधी जायचे :
सांधण व्हॅलीला जाण्यासाठी जुनचा मघ्य ते सप्टेंबर हा पुर्णपणे अयोग्य काळ. या काळात सांदण व्हॅलीत मोठ्या प्रमाणात पाणी वहात असते.त्यामुळे दरीत प्रवेश शक्य नसतो.काहीवेळा या काळातही पर्यटक इथे येतात्,मात्र दरीच्या सुरवातीच्या भागात पाण्यात स्नानाचा आनंद घेतात.मात्र या भागात पडणारा पाउस आणि पाण्याला असलेली ओढ विचारात घेता हे प्राणघातक ठरु शकते.मात्र या काळात येण्याचा एक फायदा म्हणजे इथे असणारे मोठ्या प्रमाणात धबधबे आणि दरीतून येणार्‍या जोराच्या वार्यामुळे उलट उडणारे पाण्याचे तुषार्,हे पहाण्याचा आनंद घेता येतो. 

पुढेही ऑक्टोबर महिन्यात पाणी वेगाने वहात असते,त्याकाळातही परिस्थिती बघून निर्णय घेणे योग्य. शक्यतो टाळलेले चांगले. नोव्हेंबर ते मार्च हा काळ तुलनेने थोडासा कठीण म्हणता येईल.नोव्हेंबर आणि डिसेंबर याकाळात पाण्याची पातळी एका डबक्यात २ ते ३ फुट असते तर दुसर्‍या डबक्यात जवळपास ४ ते ६ फुट असते. तर जानेवारी ते फेब्रुवारी या काळात हिच पातळी १ ते २ फुटाने खाली जाते. 
 मार्च ते मे :-
   सांदण दरीत जाण्यासाठी हाच सर्वाधिक योग्य काळ.या काळात पाण्याची पातळी अगदी आरामात पार करता येईल इतकी कमी असते.
सांदण आणि करोली घाट ट्रेक :-
 जर केवळ सांदण दरी न बघता रॅपलींग करुन खाली उतरुन करोली घाटमार्गे ट्रेक पुर्ण करायचा असेल तर अर्थातच जुन ते ऑक्टोबर हा काळ पुर्णपणे अयोग्य. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात हा पुर्ण ट्रेक केलेला चांगला.


   सांदण दरीची थरारक वाटचाल :-

   सामरद गावाच्या पुढे साधारण १५.२० मि. चालल कि एक वाडी लागते 

इथल्या पठारावर गाड्या पार्क केल्या जातात.वाडीहुन आणखी १० मि पुढे गेलो कि सांधण घळीच्या मुख्य वाटेला लागतो.साम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)यांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडतात. 

साम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)

साम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)


    साम्रद या आदिवासी पाड्यापासून साधारणपणे 10- 15 मिनिटांमध्ये रुळलेल्या पायवाटेने आपण घळीच्या तोंडापाशी येतो.अगदी एका ओढ्यात आपण उतरावे एवढा सोपा मार्ग या दरीच्या तोंडाशी दिसून येतो. दरी अशी वरून दिसुन येत नाही कारण दरीच्या आसपास खुप झाडी पसरलेली आहे. त्या झाडीतुन पुढे गेल्यावर पाण्याची एक वाट दिसते. या वाटेवर दगडधोंड्याच साम्राज्य आहे. दगडी खडकाळ वाट पायदळी तुडवत आपण दरीच्या मुखाशी येऊन उभे ठाकतो. दरीच्या सुरुवातीला एक दिशादर्शक दगड आहे. इथपर्यंत न चुकता आलात तर पुढं चुकायची संधीच नाही. फक्त एकच रस्ता एकच दिशा. रस्ता जमिनिच्या पोटात खोल खोल उतरत जाणारा.

घळीकडे घेऊन जाणारी वाट

काही क्षणातच घळीजवळ दाखल होतो

इथे हौशी पर्यट्कांनी घळीच्या तोंडाशीच गर्दी केलेली दिसते

   सांदण दरी जमीन पातळीच्या खाली असल्यामुळे दरीत शिरण्यासाठी थोडेसे खाली उतरायला लागते. दरीच्या सुरुवातीला दोन ओढे एकत्र मिळतात व याच ओढ्यावर जिवंत पाण्याचा झरा आहे. झरा दगडांनी बंदिस्त झालेला असल्यामुळे झऱ्याला वर्षभर पाणी असते. पुढे हे पाणी या उतरत्या ठिकाणी वाहत जाते.झऱ्याचे पाणी दगडांमधून वाहत असल्यामुळे थंडगार असते.अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून उल्हासित होउन पुढे निघायचे.

हि गर्दी बाजुला ठेवून सांदण दरीच्या मुखातून आत शिरायचे.

 ह्या झऱ्याच्या पुढे असलेला सोप्पा कातळटप्पा उतरून गेल्यानंतर आपण नाळेच्या घळीत प्रवेश करतो. ह्या ठिकाणावरून दरीचे अक्राळविक्राळ रुप समोर येते. नाळ काही ठिकाणी 15 - 20 फूट आहे, तर काही ठिकाणी अगदीच 2-3 फूट आहे. दरी जमिनीच्या खाली असल्यामुळे दोन्ही बाजूला कातळाची उंचच उंच भिंत आहे. या उंचीमुळे एन उन्हाळ्यातही इथले वातावरण थंडगार असते. दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांधण दरी साधारण चारशे फुट खोल आणि सुमारे २ कि.मी. लांब आहे. दरीचा प्रवास एकदम खडतर असा खडकाळ आहे. थेडे पुढे गेल्यावर दोन पाण्याचे पडाव लागतात त्यातील पहिला पडावात पाणी दोन ते चार फुट खोल तर दुसर्‍या पडावात साधारण ४ ते ६ फुट खोल पाणी असते. येथे यायचे झाले तर शक्यतो एप्रिल, मे महिण्यात यावे जेणेकरून येथील पाण्याची पातळी कमी झालेली असते. जरी उन्हाळा असला तरी येथील वातावरण थंडच असते. दरी पार करताना काही ठिकाणी ३ फुट इतकी निमुळती वाट होते. कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीवर पोचतसुध्दा नाही, त्यामुळे येथे चढ आणि उतर सांभाळून करा.

आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.








पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठा आपला मार्ग अडवतो. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून  कौशल्याने मार्ग काडून पलीकडे जायचे. 

       सुरुवातीच्या पॅचच्या वेळी मोठ मोठे दगड दिसू लागतात त्यांच्यावरुन चालताना थोडी गंमत वाटते. पण जसं जसा व्हॅलीमध्ये प्रवेश होतो.त्यानंतर फक्त मोठंमोठे दगड दिसू लागतात. साधारण १५ मिनिटं चालल्यानंतर  पहिला कातळटप्पा पार केल्यानंतर पहिला पाण्याचा पॅच येतो. पाणी स्वच्छ असले तरी तळ फारसा दिसत नाही.  १४-१५ फूट लांब आणि ३ ते ४ फूट खोल पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. कुंडात असलेले दगड पाण्यात असल्यामुळे त्यांच्यावर शेवाळ जमलेले असते, त्यामुळे सांभाळून पाय ठेवत हे कुंड पार करावे लागते.




 हे कुंड ओलांडल्यानंतर तीव्र उतार सुरु होऊन नाळ अरुंद होण्यास सुरुवात होते. दरीमध्ये लहानमोठे दगड, मोठमोठ्या दरडी यांचा खच पडलेला असल्यामुळे सपाट भाग कुठेच आढळुन येत नाही. 



ह्या दगडांमधूनच वाटचाल करीत आपण पाण्याच्या दुसऱ्या नैसर्गिक कुंडाजवळ पोचतो. ह्या कुंड साधारणपणे  ४ - ५ फूट खोल आणि १५-२० फूट लांब आहे. ह्या कुंडापर्यंत सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे कुंडात वर्षभर थंडगार पाणी असते. हे कुंड पार करताना उडणारी तारांबळ आणि थरार ज्यांनी अनुभवला आहे ते सर्वजण ह्या दरीच्या प्रेमात नक्कीच पडले असतील. जवळपास छातीला लागेल एवढे पाणी येथे पार करून पुढे जावे लागते. खाली-वर दगड असल्याने काही ठिकाणी पाणी इतके खोल जाते की, पूर्ण बुडायला होते. अर्थात उन्हाळ्यात मात्र जेमतेम गुढग्या इतके पाणी असते. पण या व्हॅलीत अनेक ट्रेकर्स ग्रुप आलेले असतात जे आपल्याला वेळोवेळी यातून जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे इतरांचे ऐकणे या ठिकाणी फार महत्वाचे असते. हा वॉटर पॅच सुरुवातीला छान रिसोर्टमध्ये गेल्याचा अनुभव देतो. पण नंतर मात्र तो कठीण होत जातो आणि थोडी भिती वाटायला लागते. या ठिकाणी बॅग डोक्यावर घेतल्याशिवाय काहीही पर्याय नसतो.अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा.
   ट्रेक हे नेहमी कमीत कमी सामानात करणे गरजेचे असते. सांदण दरीत तुम्हाला याचा अनुभव चांगलाच येईल. खडकातून उतरताना पाठिवर योग्य वजन असेल तर तुम्हाला थकवा येत नाही. त्यामुळे या दरीत उतरताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला असे कपडे घालायचे आहेत. जे भिजल्यानंतर पटकन वाळतील.  कारण व्हॅलीमध्ये असे पाण्याचे पॅच आहेत जिथे चक्क 4 फुटांपर्यंत पाणी आहे. अशावेळी बॅग डोक्यावर घेऊन तुम्हाला खडकाळ पाण्यातून मार्ग काढावा लागतो. या शिवाय रॅपलिंग आणि कडे कपार उतरताना जड बॅग ही अडथळा होऊ शकते. त्यामुळे कमीत कमी आणि योग्य इतकेच सामान स्वत:सोबत ठेवा. या बॅगमध्ये मुव्ह स्प्रे (कारण पाय मांड्या, पोटऱ्या सगळं काही इतकं दुखतं की विचारता सोय नाही). ट्रेकसाठी उत्तम दर्जाचे स्पोर्टस शूज आणि कपडे वापरा म्हणजे ते फाटण्याची आणि तुटण्याची शक्यता नाही. 
         हा एक टप्पा पार झाला की, अशाच ओल्या कपड्यात पुढे जावे लागते.कारण कपडे बदलणे, वाळवणे असे इथे काहीही होऊ शकत नाही. थंडगार पाणी आणि ओले कपडे काही वेळासाठी थंडीचा अनुभव देतात. पण तुम्ही जसं चालतं राहता तसं तुम्हाला ते अगदी सवयीचं होऊन जातं. आता व्हॅली अर्थात दरी म्हणजे या दरीत उतरुन तुम्हाला पुढे जायचं असतं. ही दरी एखाद्या मृगजळाप्रमाणे वाटते.  कारण आता संपेल आता संपेल असे वाटत राहते. पण तसे मुळीच होत नाही.


.


अजूनही आपला नाळेतूनच प्रवास सुरु असतो. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.

शेवटी आपण नाळेच्या टोकाशी पोहचतो. इथून सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसतो. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात सर्वसामान्य पर्यटक त्याच्या वाटेला जात नाही.



  नाळ १.५  किमी लांब आहे. पण वाटेवर पडलेल्या दगडांचा खचामुळे दरीच्या टोकापर्यंत जाण्यासाठी  ५०-५५  मिनिटे लागतात. हे अंतर पार करीत असताना मोठमोठ्या दरडी, दोन्ही बाजुला असलेल्या कातळभिंती आणि मधूनच दिसणारे नभ या पलिकडे दुसरे काहीही नजरेस पडत नाही. 






    नळीच्या टोकाला पोचल्यानंतर सह्याद्रीचे घडणारे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष येथे अप्सराच अवतरली की काय? असा भास होतो.  शेकडो फूट खोल सरळ तुटलेले कडे पाहिल्यानंतर थरार म्हणजे काय ह्याची अनुभूती येते. इथूनच खाली जाणारी वाट पुढे करोली घाटातून डेहणे गांवात जाते. परतीच्या मार्गाला पुन्हा साम्रद गांवात पोचण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे पुन्हा माघारी फिरत दगडांच्या खाचखळग्यातून मार्गक्रमण, दोन्ही थंड पाण्याची कुंड पार करत आणि सुरुवातीला लागलेला कातळटप्पा चढून याव लागते.

    या भागातून साधारणत: ३० मिनिटे प्रवास केल्यावर आपण दरीच्या टोकावर येतो. येथून पुढे दूर पर्यंत अजस्त्र खडकांची रास पडलेली दिसते. आता वाट एका पातळित आहे असं वाटत असताना पुन्हा काही मोठे मोठे दगड ओलांडुन पुढच्या उतारावरुन खाली जातो. इथे एक प्रचंड शिलाखंड दोन छोट्याश्या दगडांच्या आधारानं उभा आहे. जिथे नजर जाईल तेथे कातळच कातळ आहे. येथे थोड खाली एक छोटासा रॉक पॅच उतरुन जाव लागत. सांदण दरीपर्यंतचा ट्रेक हा येथेच संपतो. या खडकांवरून उतरत आपण साधारणत: १ ते १.५ तासात पहिल्या कातळटप्प्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४५ फूटाचा उभा कातळकडा आहे.

शेवटी आपण  रॅपलींग स्पॉटला आलो. 


४० फुटी रॅपलिंगची सुरवात

पहिला रॉक पॅच उतरुन गेलो कि दुसरा रॉक पॅच आपली परिक्षा बघायला तयार असतो.


रॅपलिंग तंत्राचा वापर करून हा कातळटप्पा पार करावा लागतो. कातळटप्पा ओलांडल्यावर पुन्हा अजस्त्र खडकांची रास आपली वाट पहात असते त्यातून मार्ग काढून उतरतांना २ ठिकाणी ८ ते १० फूटांचे अजस्त्र खडक उतरावे लागतात. पुढे गेल्यावर एके ठिकाणी अजस्त्र खडकांच्या आडव्या भिंतीने आपली वाट अडवलेली दिसते.या कड्याला हाताने पकडण्यासाठी पुरेशा खोबणी नाहीत. इथे डाव्या हाताला आपल्याला एक भगदाड दिसते. त्यातून जाउन आपण पार होउ शकतो. इथुन पुढच्या बाजुला सात फुटाचा दुसरा पॅच आहे.दगडाला चिकटून इथून उतरता येते.  या ठिकाणी या दगडांच्या भिंतीवर चढून न जाता दगड एकमेकांवर पडून तयार झालेल्या पोकळीतून उतरत ही भिंत पार करावी लागते. या दगडांमधील पोकळीत एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, सॅक मात्र दोरीने खाली सोडाव्या लागतात.  

याच्या पुढे पुन्हा एक १५ फूटाचा कातळटप्पा आहे. तो नुसती दोरी लावून उतरता येतो. हा कातळटप्पा पार केल्यावर १० मिनीटात आपण सपाट पृष्ठभागावर येतो. ४-५ तास सतत दगडांच्या राशीतून चालल्यावर सपाट पृष्ठभागावर चालण्याचा आनंद काही वेगळाच. 

  प्रस्तरारोहणाची साधनसामुग्री असेल तरच करोली घाट उतरून डेहणे गांवात जाणे शक्य होत, अन्यथा करोली घाट उतरण्याच्या प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करुन पुर्ण दरी पार करण्यासाठी ८ ते ९ तास लागतात. या प्रवासात तीन पॅचमध्ये तुम्हाला रॅपलिंग (Rapling) करावे लागते. पहिली रॅपलिंग ही साधारण 30 फूट खोल आहे. त्यानंतर पुढे पुढे त्या कमी होत जातात. पण रॅपलिंगचा जर पहिला अनुभव असेल तर थोडा त्रास होतो. कारण शरीराचा संपूर्ण भार पायांवर झेलावा लागतो. जे करताना खूप दमछाक होते.
  ही सगळी व्हॅली पार केल्यानंतर तुम्हाला लगेच गाव लागत नाही किंवा खाण्याची काहीही सोय नसते. त्यामुळे खाण्याच्या गोष्टी सोबत ठेवणे फारच गरजेचे आहे. पाण्याच्या बाटल्या, एनर्जी पावडर, केक, बिस्कीट अशा गोष्टी सोबत ठेवल्या तर त्याचा आधार मिळतो. दरी एका दमात पार करता येत नाही. त्यासाठी थोडा थोडा ब्रेक घ्यावाच लागतो. पण एकट्याने ही दरी उतरायला जाऊ नका. एखाद्या ग्रुपसोबत जाल तर जास्त फायदा होतो.
       

 अजून थोडे पुढे गेल्यावर दरीच्या शेवटाकडे जाताना दोनदा रॅपलिंगच्या सहाय्याने खाली उतरावे लागते. तेथेच एक पठार सदृश्य जागेवर शिबिराची किंवा रात्री वास्तव्याची सोय असते.


पुढे एक वळण घेतल्यावर नदी एका खोल डोहात कोसळते. या ठिकाणी असलेल्या सपाट कातळावर रात्रीचा मुक्काम करतात. येथे रात्री जेवणकरुन चांदण्यात उघड्यावर झोपण्यात मजा काही औरच,
 जर सोबत कोणी खगोल निरिक्षक असेल तर तुम्हाला मस्त तार्‍यांची महिती, फोटो घेत आकाशदर्शन करत रात्र कशी जाईल ते कळणारसुध्दा नाही. दरीच्या पार्श्वभूमीवर जर तार्‍यांचे फोटो मिळाले तर क्या बात.

बाण सुळका

येथून मागच्या बाजूला बाण सूळका दिसतो. डोहात जाण्यासाठी डोंगर उतरून खाली जावे लागते. 



ही वाट हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी आहे. या नळीच्या वाटेने आपण खाली कोकणात उतरु शकतो. ही वाट पुढे आजोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या डेहणे गावापाशी घेऊन जाते. 
     
समोर प्रचंड असा “आजोबागड” दिसतो.

तेथुन आसनगावला जाता येते. नाहीतर पुन्हा सांदण दरीच्या पायथ्यापासुन करोली घाटातुन ट्रेक करत साम्रद गावापाशी येता येते. जातिवंत ट्रेकर्स सांदण दरी – करोली घाट असा ट्रेक करतात. करोली घाटमार्गे पुन्हा साम्रदला पोहचायला तीन-चार तास लागतात. 


 करोली घाटानेच पुन्हा आम्हाला साम्रदला जायचे असेल तर डोहाच्या ऊजव्या बाजुने पाण्याच्या वाटेने निघायचे, पण करोले घाटाची वाट सापडायला थोडी अवघड आहे या वाटेवर काही ठिकाणि बाणाचे मार्क आहेत त्याने वाटेची खात्रीच करायची. 



याच वाटेवर आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची छोटी आवृत्ती असावा असा तसाच अर्धवर्तुळाकार अंतर्वक्र कडा दिसतो.अर्थात हा हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्या इतका प्रचंड नाहॉ तरी त्याची छोटी प्रतिकृती म्हणता येईल. 
रतनगड आणि खुटा



यानंतर आपण साम्रद गावाच्या पठारावर येतो.इथून पुन्हा एकदा आपल्याला रतनगड,अलंग्,मदन्,कुलंगची रांग दर्शन देते.
तसेच इथून आपण सांदण दरीचे वरच्या बाजुने दर्शन घेउ शकतो.
 सांदण दरीकडे पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या, दारूच्या बाटल्या, प्रातविर्धी इ. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत असेल असे चित्र येथे परीसर फिरून पाहील्यावर कळते . त्यामुळे ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन ते कसे कमी होईल याकडे पर्यटकांबरोबर, ग्रामस्थ यांनी सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे.

  पावसाळ्यातील सांदण दरी :-

  वास्तविक सांदण दरी पावसाळ्यात ओढ्याच्या प्रंचड वेगवान आणि रौद्र अश्या ओघाने भरुन गेलेली असते.सहाजिकच त्या काळात सांदण दरीचा ट्रेक करणे अशक्य असले तरी सांदण दरीचा परिसर निसर्गसौंदर्याने बहरलेला असतो.या काळात या उधाणलेल्या निसर्गाचा नक्कीच आस्वाद घेता येतो.



 सह्याद्रीच्या डोंगरावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याला वार्‍यासोबत स्पर्धा करावी लागते...खट्याळ वारा त्यांना मागे ढकलतो...पुन्हे ते पूर्ण ताकदीने पुढे सरसावतात...वारा त्यांना तसाच्या तसा मागे फेकून देतो...जमिनीवर पडूच देत नाही...याला म्हणता गुरूत्वशक्ती विरोधी चमत्कार...उलटा धबधबा...रिव्हर्स  वॉटरफॉल. साम्रदच्या कोकणकड्यावरचा धबधबा असाच जमिनीला स्पर्ष न करता माघारी फिरतो...पुन्हा नव्या जोमाने तो जमिनीकडे झेपेवतो...वारा त्याला पुर्णच्या पूर्ण मागे ढकलतो...आसमंतात पाऊस सुरू असतो...त्याच्या अनेक ओहळी पाण्याचे लोट होऊन दरीच्या दिशेने झेपावतात...वारा किती वेळ आपला भार सहन करणार? तेही मोठे होत जातात...शेवटी वारा म्हणतो, गड्यांनो तुमची जागा हवेत नाहीच...तुम्हाला तर नदी बनून जायचेय...त्या भेटीला...निघा पुढे बापुड्यांनो! मग पुढच्या ओहळींना वारा असाच खेळवतो. साम्रदच्या कोकणकड्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पाण्याचे तुषार उडतात... साम्रदचा रिव्हर्स वॉटर फॉल...


पाऊस जोरदार असला आणि दोन एक दिवसांची संततधार असली की सांदणदरीत पाण्याचे रौद्र भिषण रूप असते ही महाकाय भेग पाण्याने भरून जाते, तेव्हा तिथे जाण्याचे मार्ग गांवकरी बंद करून टाकतात. परंतु पावसाळी पर्यटन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय, तो जितका गरजेचा तितकाच सुरक्षितही हवा.लोकांनीही त्याचे पालन केले तर पावसाळ्यातही पाण्याने दुथडी भरुन गेली असतानाही किमान सांदण दरीच्या मुखाशी तरी जाता येते. काही थोडेच जण मद्यधुंद होऊन, वेडीवाकडी मस्ती करताना दिसतात, याला आळा घातला पाहीजे,पावसाळी पर्यटनातील धोक्यांची लोकांना प्रसिद्दी माध्यमातून व सामाजिक माध्यमातून दिल्या जाणार्‍या माहितीचा दिली तर योग्य संदेश पोहचेल.  

    या काळात सांदण दरीत काही अंतर काही साहसी लोक जातात.पाण्याचा वेग इतका की त्याच्याशी आपण स्पर्धाच करू शकणार नाही. तेव्हा त्याचा मान राखूनच त्यातून जायचे.  एके ठिकाणी खडकांची नैसर्गिक कमान तयार झालेली, त्यातूनही मोठा प्रवाह धावत जात असतो. हे फारच सुंदर दृष्य. या धबाबा कोसळणार्‍या पाण्याततुन चिंचोळ्या वाटेने खाली उतरायचे तर दगडावर डावीउजवीकडे पायांना व हातांना आधार शोधायचे व खाचेत पाय रोवून खाली उतरायचे, पाण्यात सरळ झेपावलो तर चांगले छातीभर पाणी...वर चढून मग सोबतच्या सगळ्यांना एक एक करून खाली घेतली. सांदण दरी काय चीज आहे याची  एव्हाना कल्पना येते. 
   एक भली मोठी शिळा पार करून  सांदणच्या महाकाय भेगेत उतरायला सुरवात करायची. एका ठिकाणी निम्मे अधिक पाणी गोळा होऊन वळण घेते व खाली बारा पंधरा फुटावरून खळखळत झेपावते. त्यातुन उतरायचे असते. हा भन्नाट प्रकार आहे.



इथून पुढे धातीभर पाण्यातून दोन ठिकाणी जाऊन महाकाय शिळांच्या राशीजवळ येऊन पोहोचतो. इथून पुढे जाणे धोकादायक, म्हणून सांदणदरीचा मनमूराद आनंद घेऊन  परतीचा निर्णय घेतलेला बरा.परतताना त्या धबधब्यातून वर चढून जाणे म्हणजे एक दिव्यच !

    सांदण दरीतील जायंट स्विंग :-

दोन्ही बाजूला उंचच उंच पाषाणकडे, खाली खोल दरी आणि मध्यभागी लावलेल्या दोरावर जमिनीपासून साधारण हजार फूट उंचीवर लटकलेल्या अवस्थेत झोका घेणं, ही कल्पनाच हृदयाचा ठोका चुकवणारी आहे. ही कल्पना, हे साहस प्रत्यक्षात उतरवलं होते, ते प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत यांच्या 'प्रोबोसिस ट्रेकिंग अँड अ‍ॅडव्हेंचर' या संस्थेनं. नैसर्गिक सेट-अपमध्ये 'जायंट स्विंग' ही अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी आयोजिण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न आहे.
सांदण व्हॅलीत ही अ‍ॅक्टिव्हिटी घेतली जाते. परदेशांमध्ये कृत्रिम सेट-अपमध्ये मोठा झोका घेतला जातो. मात्र, संपूर्णपणे नैसर्गिक सेट-अपमध्ये हे साहस अजमावता यावं, याबाबत सावंत गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होते. त्यासाठी अनुकूल भौगोलिक स्थिती सांदण व्हॅलीत त्यांना मिळाली. प्रायोगिक तत्वावर ही अ‍ॅक्टिव्हिटी घेतल्यानंतर  ती सगळ्यांसाठी खुली करण्यात आली. 
सांदण व्हॅलीतील समोरासमोरच्या दोन कड्यांवरील झाडांना आडवी दोरी बांधली जाते. तिच्या मधोमध दुसऱ्या दोरीचं एक टोक बांधलेलं असतं, तर दुसरं टोक आपल्या कंबरेला आधुनिक यंत्रणेच्या साहाय्यानं बांधलेलं असतं. समोरील कड्यावरून काही फूट खाली रॅपलिंग करत जावं लागतं आणि त्यानंतर दरीत आपल्याला सोडून दिलं जातं. गुरुत्वाकर्षणामुळे काही क्षणात खाली खेचले जाताना अनुभवास येणारा थरार तीच व्यक्ती जाणे. साधारण हजार फूट उंचीवर लटकत आपण झोका घेत राहातो. झोका थांबला, की दरीत न सोडता 'रिलीज' केलं तिथूनच त्या व्यक्तीला पुन्हा वर ओढून घेतलं जातं.
सुरक्षेचे उपाय
    सुरक्षेबाबत जी काळजी घेतली जाते त्यात 'लटकलेल्या व्यक्तीचा भार उचलणारे दोरखंड साधेसुधे नसून, प्रत्येकी तीन टन क्षमतेचे तीन दोरखंड यासाठी वापरण्यात आले आहेत. म्हणजेच जिथं सरासरी ६०-७० किलो वजनाच्या व्यक्तीला पेलण्याचा प्रश्न आहे, तिथं जवळपास ९ हजार किलो वजन ते दोरखंड पेलू शकतात. दोरखंड दोन्ही बाजूंना तीन झाडांना बांधलेला आहे. त्यामुळे वजन विभागलं जातं. या झाडांची मजबूती तपासलेली असून, सगळी बॅक-अप यंत्रणाही सक्षम आणि सज्ज ठेवली जाते. मानसिक कमकुवतपणा, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह असणारे तसेच गर्भवती स्त्रिया यात सहभागी होऊ शकत नाहीत.

सांदण परिसरातील इतर आकर्षण :-

१) गड,किल्ले-
 अलंग,   मदन,  कुलंग, रतनगड, आजोबा, पाबरगड, भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, कुंजरगड / कोंबडा किल्ला,  औंढ, म्हसोबा, चन्नागिरी,आड, पट्टागड / विश्रामगड,  बितनगड, मोरधन किल्ला
२) इतर गिरीशिखरे :-
    कळसूबाई शिखर (५४०० फुट उंची,महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर), घनचक्कर,( सप्टेंबर ते ऑक्टोबर याकाळात भेट देण्यास उत्तम ) कात्राबाईचा कडा
३) इतर पर्यटन आकर्षणे :-
 रंधा धबधबा,भंडारदरा धरण, अमृतेश्वर मंदीर, रतनवाडी ,कोकणकडा, खिरेश्वर 


https://marathi.popxo.com/article/sanadan-valley-trek-information-in-marathi/

http://www.misalpav.com/node/12184

https://ratanwadi.blogspot.com/p/blog-page_81.html

 https://www.khabarbat.in/2019/12/tourist-attraction.html?m=0


 
















 

ता.क. : श्री. निवॄत्ती - सामरद गाव - संपर्क - ०९५५२०६२१८४


 




 





भंडारदरा धरणाचा परिसर म्हणजे किल्ल्याची पंढरीच जणू. अलंग,मदन,कुलन,रतनगड,आजोबागड सगळे किल्ले इथेच. तसेच सह्यद्री पर्वतरांगांतील सर्वात उंच असे “कळसुबाई” शिखर हि इथेच.
 
 
 
 

संधान valley ला जताना वाटेत पांडवकालीन “अमृतेश्वर मंदिर” लागते.मंदिराचे कोरिवकाम अत्यंत विलोभनीय आहे.  

अमृतेश्वरच्या बाजूला रतनगड आहे.
  दुपारी २:३० वाजता आम्ही साम्रदला पोहचलो. या गावातून संधान valley ला सुरवात होते. साम्रद गावातून गाईड तुकाराम बरोबर घेतला आणि बरोबर दुपारी ३:०० वाजता valley उतरायला सुरवात केली.

नाव : तुकाराम बांडे
मो:९६८९४०९०९२,९३७२६८५६६०
संधान valley ला जायचे असल्यास शक्यतो आधी फोन करून जा.म्हणजे त्याला तुमची योग्य व्यवस्था करता येयील.

Happy Journey.

 






 

 

 

 

 

 

 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...