Thursday, May 6, 2021

होळकर घराण्याशी संबंधित ठिकाणे

 छत्रीबाग, कृष्णापुरा होळकरांची समाध्या 

होळकरशाहीत भव्य समाधी मंदिरे बांधण्याची सुरुवात १८ व्या शतकात झाली. सन १७५४ ला खंडेराव होळकर यांना कुंभेरी युद्धात वीर मरण प्राप्त झाल्यानंतर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी पुत्र खंडेरावांचे समाधी मंदिर बांधले.

इंदोर राज्य संस्थापक, महाप्रतापी
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

मात्र राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या शासनकाळात होळकरकालीन स्थपत्यशास्त्राचा विकास झाला. त्यांनी आपल्या काळात कुंभेरीला खंडेराव होळकर यांची नवीन मूर्ती स्थापन केली ती आजही बघायला मिळते.

११ आणि १२ व्या शतकात माळवा प्रांतात परमार राजांचे राज्य होते आणि त्यांचे कला व स्थपत्यशास्त्राचे प्रमुख ठिकाण होते किल्ले हिंग्लजगढ आणि १८ व्या शतकात किल्ले हिंग्लजगढ होळकरशाहीतील प्रमुख किल्ला होता. किल्ल्यावर आजही परमार कालीन आनेक मुर्त्या बघायला मिळतात.

११ आणि १२ व्या शतकात माळवा प्रांतात परमार राजांचे राज्य होते आणि त्यांचे कला व स्थपत्यशास्त्राचे प्रमुख ठिकाण होते किल्ले हिंग्लजगढ आणि १८ व्या शतकात किल्ले हिंग्लजगढ होळकरशाहीतील प्रमुख किल्ला होता. किल्ल्यावर आजही परमार कालीन आनेक मुर्त्या बघायला मिळतात.

होळकरशाहीतील दुर्ग किल्ले हिंग्लजगड, भानपुरा(म.प्र)

१८ व्या शतकात होळकरांनी जे किल्ले बांधले त्यामध्ये मराठा व मुघल पद्धतीची बांधणी बघायला मिळते, अशीच बांधणी हिंग्लजगडा वर हि बघायला मिळते तर ज्या वास्तू निर्माण केल्या त्यामध्ये रजपूत, मराठा, गुजराती, दक्षिण भारतीय व मुघल शैली नजरेस पडते. होळकरांच्या ताफ्यात अनेक रजपूत कारागीर होते त्यामुळे येणाऱ्या काळात रजपूत शैलीचा जास्त प्रभाव दिसू लागला.

राणी अहिल्यादेवींच्या काळातील स्थापत्यशास्त्र प्रामुख्याने तीन प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते,

  • गडदुर्ग, भुईकोट व समाधी वास्तूंचा निर्माण,
  • धार्मिक मंदिरे, मस्जित व दर्गाचां निर्माण, आणि
  • बारवा, पाणपोई, नदीघाट, धर्मशाळांचा निर्माण.
गंगाजल निर्मळ राणी अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात होळकरशाहीची किल्ले महेश्वर हि राजधानी होती. या राजधानीची नियुक्ती त्यांनीच सन १७६७ ला केली होती. देशभरात जी सर्व कामे चालत असत त्यांचा अंतिम लेखा जोखा हा महेश्वरच्या राजदरबारातून होत असे व त्यावरील जो खर्च केला जात असे तो अहिल्यादेवींच्या खासगी जहागिरीतून केला जात असे.

या खासगी जहागिरीचे सर्व कारभार त्यांचे खासगी दिवाण गोविंदपंत गानू हे पहात असत. मात्र सन १७६७ च्या अदोगर होळकरशाहीची राजधानी हि इंदोर होती ज्याची निवड सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केली होती.

इंदोर शहरात होळकरांच्या भव्य समाधी स्थळांचा निर्माण हा रानी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळापासूनच सुरु झाला. उत्तरेत “समाधी” या शब्दा ऐवजी “छत्री” हा शब्द प्रचलित आहे कारण या वास्तू स्थापत्यशास्त्रात मराठा, रजपूत व मुगल या शैलीचा प्रभाव दिसून येतो म्हणून इंदोरमध्ये “होळकरांची समाधी” ऐवजी “होळकरांची छत्री” असे ऐकायला भेटते.

इंदोर शहरातील होळकरांची समाधी स्थळे किंवा छत्री प्रामुख्याने तीन भागात विभागलेली आहे. ति खालील प्रमाणे,

  1. छत्रीबाग समाधीस्थळ समूह,
  2. छत्रीबाग, गणगोर घाट(हरिराव महाराज समाधी समूह), Hari Rao Holkar Chatri
  3. कृष्णापूर समाधीस्थळ समूह. Krishna Pura Chhatri

१. छत्रीबाग समाधीस्थळ समूह:

छत्रीबाग समाधीस्थळ समूहाच प्रवेशद्वार

हे समाधीस्थळांचं ठिकाण सर्वात जुने असून त्या भोवती भव्य तटबंदी आहे. हि तटबंदी दोन भागात विभागलेली आहे. पहिला भाग हा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात पूर्ण झाला असावा तर दुसरा नंतर महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या काळात बांधला असावा.

या समाधीसमूहात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे. हा समाधीसमूह खान(कान्हा) नदीच्या तटावर असून नदीच्या बाजूला घाट हि आहे. खालील नकाशा वरून व्यवस्थित लक्षात येईल.

छत्रीबाग समाधीस्थळ समूह नकाशा

या समाधी समूहात प्रामुख्याने पुढील समाधीस्थळे आहेत.
A.श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर,
B.श्रीमंत सरदार खंडेराव होळकर,
C.श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर,
D.श्रीमंत राजकुमारी स्नेहलतराजे होळकर,
E.श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(१),
F.श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर(२),
G.श्रीमंत महाराणी गौतमाबाई होळकर(ताईसाहेब),
H.श्रीमंत महाराणी इंद्राबाई होळकर.

A. श्रीमंत सुभेदार मल्हरराव होळकर(पहिले) –

सुभेदार मल्हारराव होळकर हे होळकरशाहीचे संस्थापक. होळकरशाहीची पहिली राजधानी इंदोर या शहराची निवड त्यांनीच केली होती. मराठी साम्राज्याचे सुभेदार होण्याचा त्यांना मान मिळाला. पानिपत नंतर मराठा साम्राज्याची घडी पुन्हा उत्तरेत बसवण्यासाठी पेशव्यांनी त्यांना “येखतियारी” दिला होता.

आलमपूर येथील सुभेदार मल्हारराव होळकर यांची मुख्य समाधी आलमपूर, ता.लहार जि.भिंड(म.प्र)

आपल्या हयातीत चार पेशवे पाहिलेले मल्हारबा स्वराज्याच्या मोहिमेवर असताना सन १७६६ ला आलमपूर येथे मृत्यमुखी पडले. तिथे त्यांची मुख्य समाधी आहे. मात्र सुरुवातीला इंदोर या पहिल्याराजधानीच्या ठिकाणी त्यांची समाधी नव्हती.

सन १७८४ ला इंदोर येथे सुभेदार मल्हारराव होळकरांची प्रति समाधी राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधून पूर्ण झाली आणि येथूनच इंदोर मध्ये होळकरांची समाधी स्थळे बांधण्याची सुरुवात झाली. उंच चोथऱ्यवर हि समाधी असून असंख्य शिल्प कोरलेली आहेत. या समाधीवर दोन गोल घुमट असून मुख्य गाभारा आयताकृती असून त्यावरील घुमट आकाराने मोठा आहे.

इंदोर येथील सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांची प्रति समाधी
इंदोर येथील सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांची प्रति समाधी
इंदोर येथील सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांची प्रति समाधी

दोन्ही घुमटावरील नक्षी आकर्षक आहेत. समाधीमध्ये एकूण दुहेरी बारा खांब असून त्यावर हि नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. या समाधीच्या कामामध्ये जयपूर शैलीचा प्रभाव दिसून येतो.

समाधी मध्ये सुभेदार मल्हारराव व राणी गौतमाबाई होळकर-बारगळ यांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत. सुभेदारांच्या उजव्या हातामध्ये तलवार असून ती खांद्यावर ठेवलेल्या छबीमध्ये आहे. संपूर्ण समाधीचे बांधकाम हे लाल दगडामध्ये आहे.

इंदोर येथील प्रतिसमाधी मधील सुभेदार मल्हारराव(१) व पत्नी गौतमाबाई यांच्या मुर्त्या

B. श्रीमंत सरदार खंडेराव होळकर –

सरदार खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र व राणी अहिल्यादेवी होळकर यांचे पती होय. त्यांचा मृत्यू सन १७५४ ला राजस्थान येथील कुंभेरी युद्धात झाला होता. गागरसोल येथे त्यांची मुख्य समाधी आहे.

इंदोर येथील सरदार खंडेराव होळकर यांची प्रति समाधी सन १७८४ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले. हि समाधी सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांच्यासमाधीच्या डाव्या बाजूला आहे.

सरदार खंडेराव होळकर यांची गागरसोल, ता.कुंभेरी जि.भरतपूर(राजस्थान) येथील मुख्य समाधी

सरदार खंडेराव होळकर यांची समाधी मल्हारराव व मालेराव यांच्या समाधीच्या मधोमध आहे. हि समाधी पण उंच चोथऱ्यावर असून त्याला गर्भगृह व सभामंडप आहे. गर्भगृवर शिखर असून सभामंडपावर आकर्षक घुमट आहे. शिखरावर व घुमटावर होळकर कालीन दगडी नक्षीकाम पाहण्यासारखं आहे.

समाधीवर अनेक सरदार खंडेराव यांच्या आयुष्यातील लढाईचे प्रसंग कोरलेले दिसतात. त्यावर अनेक घोडे, हत्ती याबरोबरच उंटावरून लढाई केलेलं प्रसंग कोरलेले दिसतात. यासमाधी बांधकामामध्ये मराठा राजपूत शैली नजरेस पडते.

इंदोर येथील सरदार खंडेराव होळकर(१) यांचे प्रति समाधी

समाधीच्या गर्भगृहात खंडेराव व त्यांच्या सती गेलेल्या बायकांच्या मुर्त्या आहेत. खंडेराव होळकर यांच्या डाव्या-उजव्या-बाजूला व खाली बायकांच्या मुर्त्या आहेत. तसेच खंडेराव यांच्या डाव्या बाजूला चोथऱ्यावर अजून एक मूर्ती नजरेस पडते. सरदार खंडेराव होळकर यांची राणी अहिल्यादेवी होळकर या प्रथम पत्नी होत्या व त्यांच्या व्यतिरिक्त खंडेरावांना ११ पत्नी होत्या व त्या सर्व सती गेल्या होत्या. खंडेराव यांच्या सती गेलेल्या ११ पत्नींची नावे पुढील प्रमाणे पार्वतीबाई गावडयाची कन्या, सुरत कुंबरबाई आलीमोहन राजाकडील, पोपाबाई, राजकुंबरबाई, प्रेमकुंबरबाई, रामकुंबरबाई, सुंदरबाई, गंगाबाई, कुंबारवाई, कुंवरबाई रमजानीबाई(मुसलमान), नाखूबाई दिल्लीची. हि वरील सर्व नावे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग – १ या संदर्भ पुस्तकात आहेत मात्र समाधीत ११ ऐवजी १० च सती मूर्ती दिसतात.

इंदोर येथील प्रतिसमाधी मधील सरदार खंडेराव व त्यांच्या नऊ पत्नींच्या मुर्त्या

यामध्ये राणी अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती नाही कारण त्यांना मल्हारराव होळकर यांनी सती जाऊ दिले नव्हते. काही काळानंतर होळकरांच्या वंशजांकडून गर्भगृहातील उजव्या देवळीत राणी अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती बसवण्यात अली.

उजव्या देवळीतील अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती

सरदार खंडेराव होळकर यांच्या प्रति समाधीच्या सभामंडपामध्ये काळ्या पाषाणात नंदी बघायला मिळतो आणि या नंदीचे विशेष म्हणजे अशाच प्रकारचा नंदी राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या महेश्वर येथील समाधीमध्ये बघायला मिळतो.

इंदोर येथील सरदार खंडेराव होळकर प्रति समाधीमधील नंदीचे शिल्प
महेश्वर येथील राणी अहिल्यादेवी होळकर समाधीमधील नंदीचे शिल्प

नंदीने आपले धड एका खांबावर ठेवले असून त्या खांबावर हात जोडलेली स्त्रीचे शिल्प कोरलेले दिसून येते. होळकरशाहीत वेगवेगळ्या छबी असलेले नंदीचे शिल्प बघायला मिळतात. त्यावर हि उत्तम संशोधन होऊ शकतो.

महेश्वर येथील राणी अहिल्यादेवी होळकर समाधीमधील नंदीचे शिल्प, त्यावरील हात जोडलेले स्त्रीचे शिल्प

C. श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर –

सुभेदार मालेराव होळकर हे अहिल्यादेवींचे एकुलते एक पुत्र होते. होळकरशाहीचे ते २ रे राजे असून कमी राज्यकाळ केलेल्या प्रशासकांमध्ये ते येतात. त्यांनी २० मे १७६६ ते १३ मार्च १७६७ असे राज्यशासन केले. त्यांच्या मृत्यू विषयी अनेक कथा प्रसिद्ध आहे मात्र त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे पुराव्यानिशी अजूनही कोणीही सांगू शकले नाही. त्यांचा मृत्यू इंदोर येथेच झाला. हे स्मारक त्यांची मुख्य समाधी समाधी आहे.

इंदोर येथील सुभेदार मालेराव होळकर यांची मुख्य समाधी

हि समाधीही एक भव्य चोथऱ्यावर असून त्याची हि स्थापत्य शैली हे रजपूत शैली दिसून येते व आकार घुमटी पद्धतीचा. या समाधीवर असंख्य देव देवदेवतांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या समाधीला सभामंडप नसून फक्त गर्भगृह असून त्यावर एक दुहेरी पद्धतीचा घुमट आहे. त्यावर हि असंख्य होल्करकालीन नक्षीकाम कोरलेले आहे. समाधीचा गाभारा आतून अष्टकोनी आहे.

समाधीमधील सुभेदार मालेराव व पत्नी प्रिताबाई व मैनाबाई यांच्या मुर्त्या

समाधीच्या आत मधोमध मालेराव यांची मूर्ती असून त्यांचा उजव्या व डाव्या बाजूला त्यांच्या पत्नी प्रिताबाई व मैनाबाई यांच्या मुर्त्या आहेत. गर्भगृहात उजव्या कोपऱ्यात त्यांच्या प्रति अजून एक हत्तीवरील मूर्ती आहे. हत्तीवर हि मालेराव व त्यांच्या दोन्ही बाजूला दोन्ही पत्नीची मूर्ती आहे. या समाधीचा निर्माण सन १७८४ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शनाखालीच झाला. हि समाधी पण संपूर्ण लाल दगडात बांधलेली आहे.

उजव्या कोपऱ्यात हत्तीवर सुभेदार मालेराव व त्यांच्या पत्नी प्रिताबाई व मैनाबाई यांच्या मुर्त्या.

सुभेदार मालेराव होळकर यांना हत्तीचा शौक होता म्हणून हि वरील मूर्ती बनवली आहे. खान(कान्हा) नदीत त्यांनी हत्तीच्या स्नानासाठी एक बंधारा हि उभारला होता त्याला “हाथीपाला” असे म्हटले जायचे तसेच त्यांची पहिली पत्नी प्रिताबाई हि सरदार संताजी वाघ यांची कन्या आहे. पानिपतच्या लढाईत होळकरांचे सरदार संताजी वाघ धारातीर्थ पडल्यानंतर त्यांची मुलगी राणी अहिल्यादेवींची सून बनली व त्यांच्या घराण्याला काही जहागिरी दिली. महाराष्ट्रातील काठापूरचा वाडा देण्यात आला होता. मैनाबाई हि बहाड घराण्यातील आहे.

D. श्रीमंत राजकुमारी स्नेहलताराजे होळकर –

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मारकाच्या थेट समोर स्नेहलताराजे होळकर यांचे स्मारक आहे. हि त्यांची मुख्य समाधी आहे. त्या होळकरशाहीचे १३ वे राजे श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर(३) यांच्या कन्या आहेत.

राजकुमारी स्नेहलताराजे होळकर समाधी

या समाधीचे संपूर्ण बांधकाम मार्बल मध्ये असून सभामंडप व गर्भगृह अशी समाधीची रचना आहे. समाधीला शिखर आहे. स्नेहलताराजे यांचा मृत्यू वयाच्या ११ व्या वर्षी दिवाळीत फटाकेच्या स्फोटामुळे झाला होता. त्यांच्या आईचे नाव महाराणी इंदिराबाई होळकर होते. या समाधीच्या पाठीमागे तिन छोटे शिवपिंड व त्या समोर नंदीचे शिल्प दिसून येतात. हे नक्की काय असावे हे समजत नाही मात्र ते राजे महाराजांचे अपत्ये, जे जन्मानंतर अल्पवधिच मरण पावले असतील त्यांचे दहन स्थळ असावेत.

समाधीच्या पाठीमागे तिन छोटे शिवपिंड व त्या समोर नंदीचे शिल्प दिसून येतात.

E. श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(पहिले) –

राणी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात तब्ब्ल २९ वर्ष होळकरशाहीच्या लष्करी विभागाचे प्रमुख सुभेदार तुकोजीराव होळकर(१) होते. ते होळकरशाहीचे ४ थे राजे आहेत. उत्तरेत महादजी शिंदे यांच्या बरोबर मराठा साम्राज्याच्या सीमा वाढवण्यात तुकोजीबाबांचा सिंहाचा वाटा आहे. सन १७९५ ला दक्षिण भारतात असताना महाराष्ट्रमध्ये पुणे जवळील खडकी येथे त्यांचा मृत्यू झाला. खडकी येथे त्यांची मुख्य समाधी आहे. होळकरशाहीचे पहिले महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांनी इंदोर येथील छत्रीबागेत तुकोजीराव होळकरांची प्रति समाधी बांधून आपल्या घराण्याची परंपरा पुढे सुरु ठेवली. परंतु त्या समाधीचे बांधकाम हे महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

सुभेदार तुकोजीराव होळकर(१) यांची खडकी-पिपरीचिंचवड, जि.पुणे(महाराष्ट्र) येथील मुख्यसमाधी

इंदोर येथील समाधी छत्री मंदिर हे एका चोथऱ्यावर बांधण्यात आले असून समाधीचे गर्भगृह आणि सभामंडप असे भाग पडतात. शिखर हे महेरपी शैलीचे असून त्यावर असंख्य शिल्प कोरलेली आहेत. समाधीवर रक्षक, द्वारपाल, शिकारीची शिल्प, हत्ती, घोडे यांच्या प्रतिमा कोरून हि समाधी अतिशय सुंदर सजवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात होळकरशाहीच्या लष्करी छावणीचे ते प्रमुख होते आणि त्याला अनुसरूनच हि समाधी उभारण्यात आली आहे.

इंदोर येथील सुभेदार तुकोजीराव होळकर(१) यांची प्रतिसमाधी

समाधीमधील द्वारपालांचे कपडे हे आधुनिक स्वरूपाचे वाटतात, त्यावरून आपल्याला हे समजून येते के इंदोरमध्ये ब्रिटिशांच्या प्रभाव त्यांच्या मृत्यूनंतर काही काळातच सुरु झाला होता. समाधीच्या गर्भगृहाच्या बाहेरील दक्षिणेकडील बाजूस हिंदु देव आणि देवीच्या प्रतिमा सुंदरपणे रेखाटले आहेत. अर्ध-नारिश्वर यांच्यासह भगवान शिव यांच्या स्मारकांनीही हि समाधी अतिशय आकर्षित सजवलेली आहे.

समाधीच्या गर्भगृहावरील होळकरकालीन शिल्प

सभामंडपातील खांब खूप मोठे असून समाधीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या खांबावर सजावट अतिशय सुंदर आहे. या समाधीमध्ये मराठा-मुघल शैलीचा जास्त प्रभाव दिसून येतो. या छत्रीबागेतील जे दोन मोठ्या समाध्या आहेत त्यातील हि एक समाधी. समाधीच्या गर्भगृहाच्या मध्यभागी एक संगमरवरी शिवलिंग असून त्याला चारही बाजूला मुखवटे आहेत.

समाधीमधील चार मुखवटे असलेले शिवलिंग

हे शिवलिंग एक वेगळ्याच प्रकारे घडवले आहे. शिल्पप्रेमींना हे शिवलिंग एक वेगळीच भुरळ घालते. शिवलिंगाच्या पाठीमागील बाजूस मेघडंबरीमध्ये सुभेदार तुकोजीराव होळकर व त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या दोन बायकांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्यातील त्यांच्या एका पत्नीचे नाव रखमाबाई व दुसरीचे यमुनाबाई उर्फ राधाबाई होते.

समाधीमधील सुभेदार तुकोजीराव(१) व पत्नी रखमाबाई व यमुनाबाई त्यांच्या मुर्त्या.

F. श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर(द्वितीय) –

महाराजा मल्हारराव होळकर(२) हे महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांचे पुत्र असून ते होळकरशाहीचे ७ वे राजे होते. १८१७ ची महिंदपुरची होळकर-इंग्रज लढाई यांच्याच राज्यशासन काळात होऊन होळकर राज्याचे एक छोट्या होळकर संस्थानात रूपांतर झाले होते. या लढाईत महाराणी तुळसाबाई साहिब होळकर, सरदार तात्या जोग, महाराजा हरिराव होळकर(लढाईच्या वेळेला ते सरदार होते), सरदार गफुरखान, सरदार भाऊसाहेब होळकर, राजकुमारी भीमाबाई व कराराच्या वेळेला महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

महाराजा मल्हारराव होळकर(२) यांची हि मुख्य समाधी असून समाधीचे गर्भगृह व सभामंडप अशी विभागणी आहे. गर्भगृहावर शिखर असून सभामंडपावर दोन शिखर आहे. या शिखरांमध्ये मराठा, रजपूत आणि मुघल शैली दिसून येते. समाधीचा आकार भव्य असून छत्रीबागेतील जे दोन मोठे स्मारक आहेत त्यातील हे एक.

महाराजा मल्हारराव होळकर(२) यांची समाधी

समाधीच्या गर्भगृहात मेघडंबरी असून त्यामध्ये मल्हारराव व त्यांच्या नऊ बायकांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत. या सर्व मुर्त्यांमध्ये वेगळे पण आहे. सर्व मुर्त्या वेग वेगळ्या हावभाव करताना बनवल्या आहेत. या समाधीवर जास्त नक्षी काम दिसून येत नाही.

समाधीमधील महाराजा मल्हारराव(२) व त्यांच्या सती गेलेल्या नऊ पत्नीच्या मुर्त्या

G. श्रीमंत महाराणी गौतमाबाई होळकर(ताई साहेब) –

महाराणी गौतमाबाई होळकर-गाढवे या महाराजा मल्हरराव होळकर(द्वितीय) यांच्या पत्नी असून त्यांचा मृत्यू सन १८५९ ला झाला. १८ व्या व १९ व्या शतकातील स्त्रियांची समाधी या त्यांच्या पतीच्या समाधी बरोबर सामायिक असत मात्र हि एकमेव अशी छत्रीबागेतील स्वतंत्र समाधी आहे जी केवळ स्त्रीसाठी उभारलेली आहे. यावरून त्यांचे व्यक्तिमत्त्व कळते. त्यांना लोक आदराने ताईसाहेब म्हणत असत. यांच्या वर अजूनही जास्त संशोधन झालेले दिसून येत नाही. हि समाधी महाराजा मल्हारराव होळकर(द्वितीय) यांच्या समाधीच्या समोर आहे.

महाराणी गौतमाबाई होळकर यांची समाधी

या समाधीचा निर्माण सन १८७४ ला झाला असून आकार छोटा आहे. समाधीवर शिखर व पुढे सदर आहे. शिखरावर व सदरेवर शिखर असून समाधीचे संपूर्ण बांधकाम दगडात व मराठा शैलीत आहे. समाधीच्या गर्भगृहात ताईसाहेबांची संगमरवरी सुंदर मुर्ती आहे.

समाधीमधील महाराणी गौतमाबाई होळकर यांची मूर्ती

त्यांच्या उजव्या हातात गणपतीची मूर्ती असून दोन्ही हातांनी समोरील शिवपिंडीवर पाणी घालत असलेले छबी कोरलेली आहे. समोरील शिवपिंड संयुक्त पाषाणात कोरलेली असून तिच्या पुढे छोटी व सुरेख अशी संगमरवरी नंदीची मूर्ती आहे.

महाराणी गौतमाबाई यांच्या कडेला गणपती व शिवपिंडावर पाणी घालत असलेली सुरेख संगमरवरी मूर्ती

गैरसमज – होळकरशाहीचे संस्थापक, १ ले राजे सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांच्या पत्नीचे नाव पण गौतमाबाई आहे व होळकरशाहीचे ७ वे राजे महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या पत्नीचे पण नाव गौतमाबाई(ताईसाहेब) आहे. त्यामुळे अनेक जणांचा गैरसमज होतो. १ ले राजे सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांची पत्नी गौतमाबाई या बारगळ घराण्यातील आहेत तर ७ वे राजे महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या पत्नी गौतमाबाई(ताईसाहेब) या गाढवे घराण्यातील आहे.

H. श्रीमंत महाराणी इंदिरासाहिब होळकर –

या होळकरशाहीचे १३ वे राजे श्रीमंत तुकोजीराव होळकर(तृतीय) यांच्या पत्नी आहेत. हि वास्तू ज्या जागेवर निर्माण केली ज्या जागेवर त्यांचे दहन करण्यात आले होते. हि वास्तू पुर्नपणे संगमरवरी दगडात असून मधोमध छोटीशी शिवपंड व नंदी आहे. हि वास्तू महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला आहे.

महाराणी इंदिरासाहिब होळकर यांची समाधी

पहिला छत्रीबाग समूह यांचा Video पहा

कधी इंदोरला आला तर या समाधीवास्तू नक्की पहा. खाली Google Map दिला आहे.

२. छत्रीबाग समाधीस्थळ समूह(हरिराव महाराज छत्री):

हे समाधीस्थळांचं ठिकाण गणगोर घाटावर आहे. या समाधीस्थळाला भव्य तटबंदी असून प्रवेश करण्यासाठी भव्य द्वार आहे. इंदोरमधील हे होळकरांच्या समाधीस्थळाचं दुसरं ठिकाण आहे. या समाधिस्थळात पुढील समाधी आहेत.
A.श्रीमंत महाराजा हरिराव होळकर,
B.राजा श्रीमंत सर काशिरावदादा होळकर(K.C.S.I),
C.श्रीमंत सरदार भाऊसाहेब होळकर,
D.श्रीमंत सरदार तात्या जोग(विठ्ठलराव किब),
E.श्रीमंत महाराजा खंडेराव होळकर,
F.श्रीमंत जिजीबाई साहेब होळकर,
G.डाव्या बाजूची अज्ञात समाधी ,
H.श्रीमंत महाराजा तुकोजीराव(दुसरे) यांच्या मुलीची समाधी,
I.श्रीमंत रक्माबाई होळकर समाधी,
J.श्रीमंत लक्ष्मीबाई होळकर,
K.उजव्या बाजूच्या अज्ञात समाध्या या वास्तू आहेत.

गणगोर घाट येथील छत्रीबाग समाधी समूह(हरिराव महाराज समाधी)

A. श्रीमंत महाराजा हरिराव होळकर –

महाराज हरिराव होळकर हे होळकरशाहीचे ९ वे राजे होय. ते विठोजीराव होळकरांचे पुत्र होय. विठोजी होळकरांची पुणे शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायदळी देऊन हत्या करण्यात आली होती. सन १८१७ च्या महिंदपुरच्या लढाईत महाराज हरिराव एक तुकडीचे प्रमुख होते. ते सन १८३४ ला होळकरांच्या गादीवर आले. त्यांचा हि इतिहास खूप रंजक आहे. हे त्यांच्या समाधीच्या स्वरुपावरूनच समजते. येथील समाधी समूहातील हि समाधी सर्वात मोठी असून मधोमध आहे. अदोगर फक्त या समाधीच्या संरक्षणासाठीच भव्य तटबंदी उभारण्यात अली होती. या समाधीचे बांधकाम महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या राज्यकाळात पूर्ण झाले.

गणगोर घाटावरील छत्रीबाग समाधीस्थळाचे मुख्यद्वार

हि समाधी महाराजा हरिराव होळकर यांची मुख्य समाधी होय. एका चोथऱ्यावर हि समाधी बांधण्यात आली असून असंख्य कथापट या समाधीच्या भिंतीवर कोरण्यात आले आहे. ज्यावर देव, देवी, आदर्श पुरुष आणि नर्तिका, गंधर्व या कल्पित कथा देखील कोरल्या गेलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि श्री राम यांच्याशी संबंधित असेलला घटना, द्रौपदी स्वामीवरची कथा देखील यावर कोरलेली आहे. समाधीच्या पाठीमागील बाजूला भव्य बारव आहे.

महाराजा हरिराव यांच्या समाधीच्या मागील बाजूस असलेली बारव
महाराजा हरिराव यांच्या समाधीची मागील बाजू, बारव व डाव्या बाजूला भाऊ होळकर यांची समाधी

समाधीचा चोथरा उंच असून त्यावरही चार बाजूने असंख्य शिल्प कोरल्यामुळे तो अतिशय शोभिवंत आणि सुंदर दिसत आहे. समाधीचा सभामंडळ सुरेख असून त्यामधील खांबावरील नक्षीकाम समाधीची शोभा वाढवताना दिसून येते. या खांबावर भगवान विष्णू आणि इतर हिंदू देव आणि देवीच्या मूर्ती कोरल्या आहेत. आदर्श राज पुरुष यांचे वर्णन करणारे सुरेखा शिल्प हि नजरेस पडते. समाधीच्या प्रवेशद्वारावर दोन भव्य द्वारपालही कोरले आहेत.

महाराजा हरिराव होळकर यांची समाधी

आपुन जेव्हा समाधीमध्ये प्रवेश करतो, एका बाजूला गरुडाचे शिल्प आहे आणि दुसर्‍या बाजूला वेणू गोपाळचे शिल्प सुंदर पाषाणावर कोरलेली आहे, त्यामुळे सभामंडपाची अजूनही शोभा वाढताना दिसून येते. समाधीच्या गर्भगृहाच्या आत मधोमध शिवपंड असून त्याच्या पाठीमागे महाराजा हरिराव होळकर व बाजूला त्यांच्या तीन बायकांची व समोर त्यांचे दत्तक पुत्र महाराजा खंडेराव होळकर यांची मूर्ती स्थापित केली आहे. समाधीचे शिखर मराठा शैलीच्या मंदिरासारखे आहे ज्याचा आकार रथसारखा दिसतो.

महाराजा हरिराव होळकर व त्यांच्या तीन पत्नी आणि समोर दत्तकपुत्र महाराजा खंडेराव यांच्या मूर्ती

शिखरावर सुंदर काम देखील केले आहे, संत आणि पवित्र व्यक्तींच्या बर्‍याच प्रतिमा समाधीवर कोरलेल्या आहेत. समाधीचे वरील बांधकाम द्रविड शैलीत असून उर्वरित बांधकाम नागर शैलीत आहे. समाधीच्या दुसऱ्या मजल्यावर शिखराशेजारी जाण्यासाठी प्रवेशद्वारापासून आतील बाजूने मार्ग आहेत. समाधी समोरील होळकरकालीन दगडी कारंजा व दीपमाळ हि आकर्षित आहे.

समाधीसमोरील होळकरकालीन कारंजा

B. राजा श्रीमंत सर काशीरावदादासाहेब होळकर(K.C.S.I) –

आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत येतो तेव्हा डाव्या बाजूला कोपऱ्यात तिन तुळशी वृंदावन नजरेस पडते. हि समाधी सरदार काशिरावदादा यांची आहे. या समाधीच्या बांधणीमध्ये मराठा शैली नजरेस पडते. एका चोथऱ्याच्या मधोमध तिन तुळशी वृंदावन आहेत.

सर सरदार काशीरावदादा होळकर((K.C.S.I)) समाधी

या समाधीच्या पुढील बाजूस सर सरदार काशीरावदादा होळकर यांचे दहनस्थान आहे. त्या ठिकाणी एक चोथरा निर्माण केला आहे. सर सरदार काशीरावदादा होळकर हे होळकरशाहीचे ११ वे राजे महाराजा तुकोजीराव होळकर(द्वितीय) यांचे थोरले बंधू आहेत. त्यांनी इंदोर मध्ये सन १८६० ला पहिल्या खंडोबा मंदिराचा(मार्तंडबाग) निर्माण केला होता व १९ व्या शतकात ते “व्हाईस ऑफ कॉन्सिलचे” व्हाईस प्रेसिडेंट होते.

सर सरदार काशीरावदादा होळकर((K.C.S.I)) दहनस्थळ

C. श्रीमंत सरदार भाऊसाहेब होळकर –

सरदार भाऊसाहेब होळकर हे होळकरशाहीचे ११ वे राजे श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचे वडील आहेत. सन १८१७ च्या महिंदपुर लढाईत सरदार भाऊसाहेब होळकर हि सामील होते. त्या लढाईत त्यांनी हि महत्त्वाची भूमिका बजावली होती. या समाधीचा निर्माण सर सरदार काशीराव दादा होळकर यांनी सन १८७४ च्या दरम्यान केला. या समाधीच्या बांधणीसाठी त्या काळी रुपये १०००० खर्च आला होता असा उल्लेख मिळतो.

सरदार भाऊसाहेब होळकर समाधी

सरदार भाऊसाहेब होळकर यांची समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सर सरदार काशिरावदादा यांच्या दहनस्थळाच्या पुढे आहे. या समाधीचे बांधकाम चोथऱ्यावर असून वेगवेगळी शिल्प हि बघायला मिळतात. समाधीची बांधणी मध्यम स्वरूपाची, मराठा शैलीप्रमाणे असून समाधीवर शिखर, पुढे सभामंडप आहे. समाधीमध्ये त्यांची मूर्ती व शिवपिंड आहे.

D. दिवाण तात्या जोग(विठ्ठलराव किबे) –

तात्या जोग हे होळकरांच्या घराण्यातील व्यक्ती नसून ते होळकरांचे दिवाण होते. हि एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांचे समाधीस्थळ होळकरांच्या समाधीस्थळात आहे. त्याला कारण हि तसेच आहे. त्यांनी होळकरशाहीला जे योगदान दिले त्याबद्दल हा त्यांचा सन्मान असावा असे म्हटले चालेल. त्यांचे महत्त्वाचे पराक्रम आपल्याला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासात वाचायला मिळतात. जेव्हा सन १८०१-१८०२ ला होळकर-शिंदे वाद उफाळला होता, शिंद्यांनी इंदोर वर आक्रमण केले होते. त्यावेळी महाराजा यशवंतराव होळकर(१) उत्तरेत होते तेव्हा इंदोरला शिंद्यांच्या फोजेपासून सरदार तात्या जोग यांनी वाचवले होते. तसेच १८१७ च्या महिंदपुर युद्धात हि त्यांची भूमिका महत्त्वाची होती व त्यांनतर १८१८ मध्ये झालेल्या होळकर-इंग्रज करारावेळी हि ते उपस्थित होते. त्यांच्या स्मरणार्थ इंदोर शहरातील एका भागाला नाव हि देण्यात आले आहे.

सरदार तात्या जोग समाधी

तात्या जोग यांची समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सरदार भाऊसाहेब होळकर यांच्या समाधीच्या पुढे आहे. या समाधीची बांधणी मराठा शैलीप्रमाणे असून समाधीवर शिखर व पुढे सभामंडप दिसतो. समाधीची बांधणी हि सरदार भाऊसाहेब होळकर यांच्या समाधीपेक्षा थोड्या छोट्या स्वरूपाची आहे व त्यामध्ये फक्त शिवपिंड आहे.

भाऊसाहेव होळकर, तात्या जोग, खंडेराव महाराज व बाजूची अनोळखी समाधी चोथरा

E. श्रीमंत महाराजा खंडेराव होळकर –

महाराजा खंडेराव होळकर हे होळकरशाहीचे १० वे राजे होते. त्यांचा हि राजकाल १ वर्ष असा अल्पवधीचा होता. त्यांचे ज्या ठिकाणी दहन करण्यात आले त्याठिकाणी हि वास्तू उभारण्यात आली. हि वास्तू हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सरदार तात्या जोग यांच्या समाधीच्या पुढे आहे.

महाराजा खंडेराव होळकर दहनस्थळ व समाधी

काही कालावधीनंतर महाराजा खंडेराव होळकर यांची मूर्ती महाराजा हरिराव होळकर यांच्या समाधीमध्ये स्थापन करण्यात आली. महाराजा खंडेराव होळकर यांना महाराज हरिराव यांनी दत्तक घेतल्यामुळे पित्यासमोर मुलाची मूर्ती बसवण्यात आली.

महाराजा खंडेराव होळकर दहनस्थळासमोर तात्या जोग व बाजूला मोठी हरिराव महाराजांची समाधी

F. श्रीमंत महाराजा हरिराव व जिजीबाई साहेब होळकर दहनस्थळ –

हि दहनस्थळे महाराजा हरिराव यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सरदार तात्या जोग यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला आहे. हे दोन दगडी चोथरे महाराजा हरिराव होळकर व श्रीमंत जिजीसाहेब होळकर यांचे दहनस्थळ आहे. सरदार तात्या जोग यांच्या समाधी कडील चोथरा हा श्रीमंत जिजीसाहेब यांचे दहनस्थळ असून त्या बाजूचा चोथरा महाराजा हरिराव होळकर यांचे दहनस्थळ आहे. श्रीमंत जिजीसाहेब यांची अजून हि ओळख पटली नाही. जर आपल्याला माहित असेल तर आम्हला संपर्क करावा.

महाराजा हरिराव व श्रीमंत जिजीसाहेब होळकर यांचे दहनस्थळ

G. डाव्या बाजूची अनोळखी समाधी –

हि समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून महाराजा खंडेराव होळकर यांच्या समाधीच्या बाजूला आहे. हि कोणाची समाधी आहे याची ओळख पटली नाही मात्र हि समाधी होळकर घराण्यातील एखाद्या महाराणीची असावी. प्रथम दर्शनी हा एक दगडी चोथरा असून, जर तुम्हला या बद्दल माहिती असेल तर आम्हाला कळवावे.

डाव्या बाजूची अनोळखी समाधी

H. श्रीमंत महाराजा तुकोजीराव(२) यांच्या मुलीची समाधी –

आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत येतो तेव्हा उजव्या बाजूला हि समाधी दिसून येते. हि समाधी होळकरशाहीचे ११ वे राजे महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांच्या मुलीची आहे. हि समाधी नक्की कोणत्या मुलीची आहे त्याचे अजून हि उल्लेख मिळत नाही. एका दगडी चोथऱ्यावर छोटस पण देखणी वास्तू निर्मण केली आहे. चोथऱ्यावरील नंदी व शिखरावरील नक्षीकाम सुंदर आहे.

महाराजा तुकोजीराव(२) यांच्या मुलीची समाधी

I. श्रीमंत रक्माबाई होळकर –

हि समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला असून महाराजा तुकोजीराव(२) यांच्या मुलीच्या समाधीच्या पुढील बाजूस आहे. श्रीमंत रक्माबाई होळकर यांची अजून हि ओळख पटली नाही. जर आपल्याला माहित असेल तर आम्हला संपर्क करावा. एका चोथऱ्यावर हि अष्टकोनी घुमटी शैलीची समाधी असून त्यावर आठ शिल्प व शिल्पपट आहे. आठही शिल्पांची छबी एकप्रकारे आहे. शिखराचा आकार कमळाकृती आहे.

श्रीमंत रक्माबाई होळकर समाधी

J. श्रीमंत लक्ष्मीबाई होळकर –

हि समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला असून श्रीमंत रक्माबाई होळकर यांच्या समाधीच्या पुढील बाजूस आहे. श्रीमंत लक्ष्मीबाई होळकर या सर सरदार काशिरावदादा होळकर यांच्या पत्नी आहेत. एक छोटासा दगडी चोथरा उभारण्यात आला आहे.

K. उजव्या बाजूच्या अनोळखी समाध्या –

या समाध्या हरिराव महाराज यांच्या समाधीच्या उजव्या दिशेच्या पुढील बाजूस आहेत. या ठिकाणी एक तुळशीवृदांवन असून दोन दगडी चोथरे आहेत. त्यावर शिवपिंड व नंदीचे छोटेसे शिल्प नजरेस पडते. या वास्तू कोणाच्या आहेत याची अजूनही ओळख पटली नाही मात्र या हि वास्तू होळकर घराण्यातील स्त्रियांचीच असावीत.

उजव्या बाजूच्या अनोळखी समाध्या

अलीकडच्या काळात हरिराव महाराज छत्री समुहाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. अचानक होत असलेल्या विकास कामांमुळे हा छत्री परिसर विकला कि काय अशा अफवा पसरू लागल्या होत्या मात्र तसे काहीही नव्हते. मध्यप्रदेश व राजस्थान शासन तेथील राजघराण्याला आपल्या मालकीच्या ऐतिहासिक वास्तू विकण्याची परवानगी देते. त्यांचे काय कारण आहे हे वाचण्यासाठी Heritage Properites India व उत्तरेतील चालू घडामोडी वाचण्यासाठी Vision IAS Current Affairs या Website ला भेट द्या.

महाराजा हरिराव समाधीस्थळ समूहाची पाठीमागील बाजूची तटबंदी, प्रवेशद्वार व गणगोर नदीघाट

कधी इंदोरला आला तर या समाधीवास्तू नक्की पहा. खाली Google Map दिला आहे.

३. कृष्णापूरा छत्री समाधीसमूह :

कृष्णपुरा छत्रीबाग हा होळकर राजघराण्याचा तिसरा समाधी समूह असून कान्हा व सरस्वती नदीच्या संगमावर या समाध्या उभारण्यात आल्या आहेत. सुरेख समाध्या व भव्य नदीघाट यामुळे या परिसरात खूप वर्दळ दिसून येते. या समाधी समूहात पुढील समाधी आहेत, A.श्रीमंत महाराणी कृष्णाबाई होळकर,
B.श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर(२),
C.श्रीमंत महाराजा शिवाजीराव होळकर,
D.श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(२),
E.श्रीमंत राजकुमारी मनोरमाराजे होळकर.

कृष्णापूरा छत्री समाधीसमूह

कृष्णपुरा छत्रीबाग हा होळकर राजघराण्याचा तिसरा समाधी समूह असून कान्हा व सरस्वती नदीच्या संगमावर या समाध्या उभारण्यात आल्या आहेत. सुरेख समाध्या व भव्य नदीघाट यामुळे या परिसरात खूप वर्दळ दिसून येते. या समाधी समूहात पुढील समाधी आहेत, A.श्रीमंत महाराणी कृष्णाबाई होळकर, B.श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर(२), C.श्रीमंत महाराजा शिवाजीराव होळकर, D.श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(२), E.श्रीमंत राजकुमारी मनोरमाराजे होळकर.

कृष्णापूरा छत्री समाधीसमूह

A. श्रीमंत महाराणी कृष्णाबाई होळकर – 

महाराणी कृष्णाबाई होळकर यांची समाधी सर्वप्रथम येथे निर्माण केली गेली त्यामुळे या भागाला “कृष्णापूरा छत्री” असे म्हणतात. महाराणी कृष्णाबाई होळकर उर्फ केसरबाई होळकर या महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांच्या पत्नी आहेत. १८१८ नंतर होळकरशाही कोणामुळे अस्तित्वात राहिली असेल तर फक्त एकच नाव समोर येते ते म्हणजे महाराणी कृष्णाबाई होळकर. त्यांना दुसरी अहिल्या पण म्हटलं जाते. १९ व्या शतकात त्यांना होळकरशाहीच्या खाजगी जहागिरीचे अधिकार प्राप्त झाले होते.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी

या समाधीचा निर्माण श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी सन १८४९ च्या दरम्यान केला होता. महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय यांना महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी दत्तक घेतले होते.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

महाराणी कृष्णाबाई होळकर यांची समाधी एका उंच चोथऱ्यावर असून त्याची उंची साधारण ६ ते ८ फूट आहे. या समाधीच्या बांधकाम शैलीत मुघल, मराठा आणि राजपूत शैलीचे मिश्रण दिसते. समाधी छत्रीच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर दगडी नक्षीकाम असून गणेशाच्या शिल्पासह अनेक संगमरवरी मुर्त्या बघायला मिळतात.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

हे सर्व नक्षीकामाची शैली हि मराठा बांधणीची आहे. समाधीच्या चोथऱ्यावर चोहूबाजूने द्वारपाल, भगवान कृष्ण आणि गायींच्या शिल्प आहेत. त्याच्या अवतीभोवती असलेले कोरीव काम हि उत्कृष्ट आहे. समाधी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांचे शिल्प कोरलेले असून त्यांनी मराठा ठेवीचे कपडे परिधान केले आहे.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

जेव्हा आपुन मध्यभागी प्रवेश करतो तेव्हा आपल्याला नंदी नजरेस पडतो. नंदीवरील कोरीव काम हे सुरेख असून पूर्ण बांधकाम हे संगमरवरी मध्ये आहे तसेच दुहेरी खांब कमानीसह जोडलेले दिसतात.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी मधील नंदी

समाधीचे शिखर, गर्भगृह व सभामंडप असे भाग पडतात. त्यापैकी शिखर, गर्भगृह व सभामंडपाच्या बाह्य बाजूने असंख्य हिंदू देव देवतेच्या शिल्प पाहावयास मिळतात. तसेच सभामंड्प हा अष्टकोनी असून त्यामध्ये दुहेरी बांधणीचे ३६ खांब आहेत. सभामंडपाच्या आतील बाजूस हि काही शिल्प बघायला मिळतात ज्यामध्ये अर्धनारीश्वर, लक्ष्मी आणि महालक्ष्मी यांचे शिल्प भिंतींवर कोरलेले आहेत.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

या समाधीच्या बांधकामात थोडेफार ओरिसाच्या मंदिरांच्या स्थापत्य शैलीचे प्रतिबिंब दिसून येते. समाधीच्या गर्भगृहापासून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग आहे. त्या मार्गे एका वेळी एकच व्यक्ती समाधीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकतो. महाराणी कृष्णाबाई यांनीही अनेक लोक कल्याणकारी कार्य केली आहेत. होळकर राजवाड्याच्या बाजूलाच तेवढ्या आकाराचा त्यांनी बांधलेला गोपाल वाडा व मंदिर यावरून त्यांचे व्यक्तिमत्व समजून येते. सन १८१८ ते १८४९ पर्यंत त्यांनी राणी अहिल्यादेवींप्रमाणे रिजंट महाराणी म्हणून राज्यकारभार पहिला तसेच त्यांचा स्वतःचा शिक्का होता. त्यावर खालील उल्लेख आहे.

श्री म्हाळसाकांत चरणीतत्पर अहिल्याबाई कारकीर्द, कृष्णाबाई होळकर.

B. श्रीमंत तुकोजीराव(दुसरे) व शिवाजीराव होळकर –

महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला आपल्याला हि जोड समाधी पहावयास मिळते. मात्र सुरुवातीला महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांची समाधी होती. जिचा निर्माण महाराजा शिवाजीराव होळकर यांनी सन १८८६ च्या दरम्यान केला होता. ते तुकोजीराव(दुसरे) यांचे पुत्र होते. पुढे सन १९०३ च्या दरम्यान महाराजा शिवाजीराव होळकर यांच्या समाधीचा निर्माण करण्यात आला. जिचा निर्माण महाराजा तुकोजीराव(तिसरे) यांनी केला. ते शिवाजीराव महाराज यांचे पुत्र होय. अशाप्रकारे हि पिता पुत्राची समाधी एकसंध बांधण्यात आली याचे कारण त्या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम.

महाराजा तुकोजीराव(२) व महाराजा शिवाजीराव होळकर संयुक्त समाधी

या संयुक्त समाधीच्या दोन्ही गर्भगृहात अनुक्रमे महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) व महाराजा शिवाजीराव होळकर यांच्या मूर्ती आहेत. महाराजा तुकोजीराव(२) यांची मूर्ती एका चोथऱ्यावर असून त्या समोर महाराणी कृष्णाबाईंची दोन्ही हातांनी पाणी शिवपिंडावर वाहत आहेत अशा स्वरूपात सुंदर छबीतील संगमरवरी मूर्ती आहे. हि सर्व स्थपणा महाराजा शिवाजीराव होळकर यांनी केली होती.

महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) व समोर महाराणी कृष्णाबाई यांची मूर्ती

हि संयुक्त समाधी एका उंच अशा चोथऱ्यावर असून पूर्ण काम हे लाल दगडात आहे. या समाधीचा सभामंडप खूप मोठा असून दोन्ही समाधीच्या शिखरांवर असंख्य मुर्त्या कोरलेल्या दिसून येतात.

महाराजा तुकोजीराव(२) व महाराजा शिवाजीराव समाधीतील सभामंडप

दोन्ही समाधीच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस असलेले द्वारपालांचे शिल्प लक्ष वेधून घेते. या समाधी मधील द्वारपालांची उंची साधारण ५ फूट एवढी आहे. त्यांच्या डोळ्यांची कलाकृती खूप आकर्षित कोरलेली आहे.

समाधीतील द्वारपालाचे भव्य शिल्प

दोन्ही समाधीच्या गर्भगृहा समोर संगमरवरी नंदी बघायला मिळतो. नंदीच्या शिल्पावरील नक्षीकाम व घंटा आकर्षित आहे.

समाधीमधील नंदी

होळकरशाहीचे ८ वे राजे महाराजा मार्तंडराव होळकर यांना अवघ्या १ वर्षाच्या कालावधीनंतर सन १८३४ ला होळकरशाहीच्या गादीवरून पायउतार व्हावे लागले होते तेव्हा त्यांना सन १८३५ ला इंदोरहुन पुण्याकडे कायमचे रवाना करण्यात आले होते. त्यांना पुण्याला सोडण्यासाठी इंदोरहून काही सरदार मंडळी त्यांच्याबरोबर आली होती त्यामध्ये सरदार भाऊसाहेब होळकर पण होते. या सर्वांचा मुक्काम ३ ते ४ महिने करंजी(खुर्द) या होळकरांच्या खाजगी वतन असलेल्या गावी पडला होता तेव्हा प्रवासात ३ जून १८३५ ला महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचा जन्म करंजी(खुर्द), ता.निफाड जि.नाशिक येथे झाला. पुढे काही दिवसांनी महाराजा मार्तंडराव होळकर यांना पुण्याला पोहच करण्यात आले. त्यांचे उर्वरित सर्व आयुष्य पुण्यातील होळकर वाड्यात गेले तेथेच ते सन १८३९ ला निपुत्रिक वारले. त्यांची समाधी अद्यापही भेटत नसून त्यांना मरेपर्यंत होळकर स्टेट कडून ५०० रु. पेन्शन मिळत होती.

होळकरशाहीचे ११ वे राजे
महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे)

२७ जून १८४४ ला सरदार भाऊ होळकर यांचे पुत्र मल्हारी यास महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी दत्तक घेऊन होळकरशीचे ११ वे महाराजा म्हणून घोषित केले व तेव्हा पासून ते महाराजा तुकोजीराव होळकर(द्वितीय) या नावाने ओळखले जाऊ लागले. महाराणी कृष्णाबाई यांनी हे नाव आपले सासरे सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांच्या समरणार्थ ठेवले होते.

महाराजा तुकोजीराव होळकर(द्वितीय) यांच्या काळातच होळकरशाहीच्या भरभराटीला पुन्हा सुरुवात झाली. त्यांना आपुन आधुनिक इंदोरचे जनक म्हणू शकतो. यांनीच ब्रिटिशांना रेल्वेसाठी कर्ज दिले होते. यांच्याच काळात इंदोर संस्थानात रेल्वे बांधकाम पूर्ण झाले, अनेक कपड्यांच्या गिरणी सुरु करण्यात आल्या तसेच त्यांनी “अकरा पंच संस्थेला” पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले. यांच्या राज्यकाळात इंदोर संस्थानानेही सन १८५७ च्या उठावात भाग घेतला होता. अधिक माहितीसाठी खालील विडिओ नक्की पहा. त्यांचा मृत्यू १७ जून १८८६ ला महेश्वर येथे झाला.

महाराजा शिवाजीराव होळकर हे होळकरशाहीचे १२ वे राजे होते. त्यांनी आपल्या पित्याची परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांचा ब्रिटिशांना असलेला उघडपणे विरोध हे सर्वांना माहित आहे. “फुटीकोठी” या सारख्या लष्करी वास्तूवरुन त्यांचा ब्रिटिश विरोध आपल्याला समजून येतो.

होळकरशाहीचे १२ वे राजे
महाराजा शिवाजीराव होळकर

फुटीकोठी बांधून पूर्ण झाली असते तर आज भारतातील सर्वांत उंच वास्तू ती बनली असती मात्र ब्रिटिशांनी फुटीकोठीचे काम पहिल्याच टप्यावर थांबवले. खरे तर महाराजा शिवाजीराव होळकर हे संस्थानाचे शेवटचे राजे होते. महेश्वर येथे त्यांच मृत्यू सन १९०३ ला झाल्यांनतर इंग्रज रेसिडेन्सी यांच्या अध्यक्षतेखाली इंदोर संस्थानात कॉन्सिल ऑफ रेसिडेन्सीची नियुक्ती झाली.

C. श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) –

महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) यांची समाधी आहे. ते होळकरशाहीचे १४ वे म्हणजे शेवटचे राजे होते.

महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) समाधी

महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे) यांची समाधी आकाराने लहान असून संपूर्ण बांधकाम लाल दगडात आहे. समाधीचे खांब लहान असून त्यावरील नक्षीकाम व त्याचे दुहेरी एकसंध बांधणीमुळे खूप आकर्षित वाटतात. समाधीवर शिखर असून गर्भगृहात महाराजा यशवंतराव यांची मूर्ती असून पुढे शिवलिंग आहे. हि समाधी एका चोथऱ्यावर असून चोथरा लहान आहे.

महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) यांची मूर्ती

महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे) यांच्या बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर यांच्या काळात होळकर संस्थान भारतात विलीन झाले. जो धनगर राजकुमार व मराठा राजकुमारीचा आंतरजातीय विवाह सांगितला जातो त्यातील धनगर राजकुमार म्हणजेच महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) होय.

होळकरशाहीचे १४ वे राजे
महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे)

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर हा अविस्मरणीय आंतरजातीय विवाह सोहळा पार पाडण्याची जबाबदारी त्यांचे वडील, होळकरशाहीचे १३ वे राजे महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) यांनी जिकरीने पार पाडली होती. हा विवाह खरं तर साटेलोटे विवाह होता. महाराजा तुकोजीरावांनी(तिसरे) आपली मुलगी पण त्यावेळेस घाटगे घराण्यात सून म्हणून दिली होती. महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) यांचा मृत्यू सन १९७८ ला प्रदेशात झाला व त्यांनतर त्यांचे दहन छत्रीबाग पहिल्या समूहात केले गेले. त्यांची समाधी बांधण्यात आली नाही.

होळकरशाहीचे १३ वे राजे
महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे)

D. श्रीमंत राजकुमारी मनोरमाराजे होळकर –

राजकुमारी मनोरमाराजे होळकर या महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) यांची कन्या आहे. या समाधीचा निर्माण त्यांचे बंधू महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे) यांनी सन १९५४ ला केला. समाधीचे संपूर्ण बांधकाम हे संगमरवरी मध्ये असून तिचा आकार छोटासा आहे. समाधीला शिखर, गर्भगृह व सभामंडप आहे. समाधीमध्ये त्यांची मूर्ती व शिवपिंड आहे.

राजकुमारी मनोरमाराजे होळकर समाधी
राजकुमारी मनोरमाराजे होळकर यांची मूर्ती

कधी इंदोरला आला तर या समाधीवास्तू नक्की पहा.

इंदोर मधील अन्य समाधीस्थळे :

सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे –

या व्यतिरिक्त होळकरशाहीतील जे महत्त्वाचे सरंजाम सरदार होते त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे “बुळे घराणे” उर्फ “बोलीया सरकार”. बुळे घराण्यातील एक भव्य समाधी इंदोर मध्ये बघायला मिळते. हि समाधी होळकरशाहीचे सरंजाम सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे यांची असून ती कृष्णपुरा छत्रीच्या विरूद्ध दिशेला नदीच्या पलीकडच्या काठावर आहे. शहरीकरणामध्ये हि समाधी सध्या हारऊन गेली आहे.

सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे समाधी

पूर्वी समाधीला मजबूत कोट व भव्य दुमजली प्रवेशदार होते. मात्र सध्या समाधी कोटाची अवस्था बिकट असून प्रवेशद्वार साबूत आहे. सन २०१८ पासून, इंदोर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत या समाधीचा विकास मोठयाप्रमाणात सुरु असून समाधीमध्ये चिमणाजी बुळे व त्यांच्या दोन बायकांची मूर्ती आहेत.

बुळे समाधीच्या तटबंदीचे प्रवेशद्वार

समाधीच्या बांधकामात राजपूत शैली दिसून येते तर असंख्य शिल्पा कृती कोरलेली आहे. समाधीचा आकार घुमटा प्रमाणे असून उंचीला सर्वात मोठी समाधी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे हे महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांचे नातू व भीमाबाई होळकर-बुळे याचे पुत्र होते. या समाधीचा निर्माण सरदार नारायणराव बुळे यांनी सन १८५८ रोजी केला.

श्रीमंत गौतमाबाई होळकर-बारगळ –

श्रीमंत गौतमाबाई होळकर-बारगळ या होळकरशाही संस्थापक श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर यांच्या पत्नी असून त्यांचा मृत्यू सन १७६१ च्या दरम्यान झाला होता. त्यांची समाधी इंदोर मधील पिपलीया तलावाच्या शेजारी आहे. समाधी साधेसुधी असून एखाद्या मंदिराप्रमाणे आहे. समाधीमध्ये एक शिवपिंड आहे.

एक विशेष गोष्ट म्हणजे होळकरशाहीतील १८ व्या व १९ व्या शतकात ज्या महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांची मुख्य समाधी या इंदोर शहरात नसून इतर ठिकाणी आहेत. ते खालीलप्रमाणे,
  • सरदार खंडेराव होळकर – गांगरसोली, ता.कुंभेर जि.भरतपूर(राजस्थान),
  • सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) – आलमपूर, ता.लहार जि.भिंड(मध्यप्रदेश),
  • सुभेदार तुकोजीराव होळकर(पहिले) – खडकी-पिपरी चिंचवड जि.पुणे(महाराष्ट्र),
  • महाराणी अहिल्यादेवी होळकर – महेश्वर, जि.खरगोण (मध्यप्रदेश),
  • महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) – भानपुरा, जि.,मंदसोर(मध्यप्रदेश),
  • महाराणी तुळसाबाई साहिबा होळकर – महिंदपुर, जि.उज्जेन(मध्यप्रदेश),
  • वीरांगना भीमाबाई बुळे-होळकर – समाधी शोध चालू आहे.
आभार व संदर्भ
श्रीमंत भूषणसिंह महाराज होळकर,
होळकरशाहीचा इतिहास भाग -१, लेखक – व. वा. ठाकूर

राणी अहिल्यादेवी होळकर यांचे दहनस्थळ

ahilyabai-holkar
अहिल्यादेवींचे दहनस्थळ

किल्ले महेश्वर जि.खरगोण(मध्यप्रदेश):  होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर(Maheshwar Fort) येथे १३ ऑगस्ट १७९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर(Ahilyabai Holkar) यांचे निधन झाले.
 किल्ल्याच्या(Fort) पायथ्याशी ज्या ठिकाणी त्यांचे दहन(अग्नी देणे) करण्यात आले त्या ठिकाणी या दहन वास्तूचा निर्माण करण्यात आला व त्यानंतर किल्ल्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधीकार्य पार पडले त्या ठिकाणी त्यांच्या समाधीचा निर्माण करण्यात आला.

दहनस्थळाचे आणखी काही छायाचित्रे

अहिल्याबाई-होळकर-यांची-माहिती
१३ ऑगस्ट १७९५ ला अहिल्यादेवींचे निधन झाले.
किल्ल्याच्या पायथ्यशी असलेले दहनस्थळ
ahilyabai-holkar
अहिल्यादेवींचे दहनस्थळ

अहिल्यादेवींच्या दहनस्थळाचा Video

राणी अहिल्यादेवी होळकर यांचे समाधीस्थळ

ahilyabai-holkar

राणी अहिल्यादेवी होळकर
यांच्या “भैरव” हत्तीची उपेक्षित समाधी

 त्यांची समाधी “अहिल्येश्वर छत्री मंदिर“ यानावाने सुप्रसिद्ध आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधीकार्य श्रीमंत संताजी होळकर यांनी पार पाडले, ते श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे धाकटे बंधू होय.
  किल्ल्यावरील राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधी वास्तूचा निर्माण श्रीमंत तुळसाराणी साहिब होळकर यांनी केला. त्या महाराजाधिराज थोरले यशवंतराव होळकर यांच्या धर्मपत्नी होय.
अहिल्यादेवी होळकर यांच्या हत्तीची समाधी मांडवगण, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर(महाराष्ट्र) :-
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांच्या मृत्यूनंतर होळकर साम्राज्याची(२१ जिल्हे) जबाबदारी हि विरांगना राणी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आली. एवढया विशाल साम्राज्याचा कारभार हि एक स्त्री करत आहे, हे पाहून अनेक आक्रमणे होळकर साम्राज्यावर झाली व ती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी हत्तीवर स्वार होऊन परतावून लावली.

ahilyabai-holkarराणी अहिल्यादेवी होळकर
यांच्या “भैरव” हत्तीची उपेक्षित समाधी

मांडवगण, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील किल्ले सदृश्य होळकर वाड्यात राणी अहिल्यादेवी होळकर मुक्कामी असताना त्यांचा हत्ती मरण पावला. हि हत्तीची समाधी होळकर वाड्याच्या पाठीमागील बाजूस स्थित असून उपेक्षित अवस्थेत आहे.

हि समाधी येथील काही लोकांचा थिलर पार्टीचा अड्डा आहे. एका भव्य चौथऱ्यावर मधोमध हत्तीची अखंड शिळेमध्ये मूर्ती बसवलेली आहे. येथील काही सुज्ञान नागरिकांनाच माहित आहे कि, हि राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हत्तीची समाधी आहे.

चौथऱ्याच्या एका बाजूला शिलालेख होता व त्यावर हत्तीची निधन तारीख व अन्य माहिती मोडी लिपीमध्ये होती मात्र हि समाधी दुर्लीक्षित असल्यामुळे हा शिलालेख नष्ट झाला आहे.

पुरात्तव खाते व समाजातील जबाबदार व्यक्तींनी या समाधीच्या सुरक्षेतेसाठी विशेष पुढाकार घेऊन या ठिकाणी एकदातरी अवश्य भेट दिली पाहिजे, नाही तर येणाऱ्या काळात हि होळकर कालीन वास्तू नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही.

हत्तीच्या समाधीचा चोथरा 
चोथऱ्यावर असलेली हत्तीची मूर्ती 

तसेच या वाड्याचे थोडक्यात विशेष सांगायचे म्हटले तर या वाड्याच्या प्रमुख प्रवेशद्वारालाच दोन्ही बाजूला दोन हत्ती साखळीने बांधले जायचे व त्या साखळ्या आजही प्रवेशद्वारामध्ये दोन्ही बाजूला आहेत.

हत्ती बांधले जाणारे साखळदंड
होळकरशाहीत या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारालाच
दोन्ही बाजूला दोन हत्ती साखळीने बांधले जायचे

श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) उत्तरेत असताना सन १७८८ ला निजाम सेण्याचा मांडवगण वर आक्रमण झाले होते आणि राणी अहिल्यादेवी होळकर मांडवगणला येईपर्यंत तेथील होळकरांचे सरदार देशमुख यांनी निजाम सेण्याला लढवत ठेवले होते, आणि राणी अहिल्यादेवी महेश्वरहून मांडवगणला आल्या आणि निजामाचा हल्ला परतावून लावला. होळकर सेनेचा विजय झाला. अशी माहिती सांगण्यात आली.

राणी अहिल्यादेवी होळकर मांडवगणला येईपर्यंत मुघल सेन्याने वाड्याच्या प्रमुख प्रवेश्द्वारच्या दोन्ही बुरुजाचे व उजवीकडील तटबंदीचे नुकसान केले होते ते आज हि पहावयास मिळते. मांडवगण ला श्री. सिद्धेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान असून येथेच मांडवऋषींची समाधी आहे. हा वाडा सध्या ९९ वर्षच्या करारावर शाळेस दान दिला आहे.

मांडवगण येथील होळकर वाड्याची भक्कम तटबंदी

या स्थळाची माहिती येथील स्थानिक श्री. विशाल वाघ यांनी दिली असून राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मांडवगणमधील इतिहासाची माहिती हि मांडवगणमधील होळकरांचे सरदार देशमुख यांच्या घरातील वंशज पोपटराव देशमुख यांनी दिली आहे. इतिहासात त्यांच्या घराण्याची सोयरीक फलटणच्या नाईक-निबांळकर घराण्याशी हि झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मांडवगण येथील होळकर वाड्याचे प्रवेशद्वार
मांडवगण येथील होळकर वाड्याचे प्रवेशद्वार

इतिहास अभ्यासक श्री.रामभाऊ लांडे यांनी या हत्तीचे नाव “भैरव” असल्याचे सांगितले असून स्थनिक लोक या समाधीस “हत्तोबा” असे म्हणतात. लहान मुलं जर रडत असेल किंवा त्याला त्वचेचा काही आजार झाले तर या समाधीची श्रद्धेपोटी पूजा केली जाते. सन २०१८-१९ या कालावधीत श्री. सिद्धेश्वर देवस्थानच्या परिसरात झालेल्या विकास कामांमुळे या समाधीस काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.

मांडवगन येथील होळकर वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वराचे खूप नुकसान झाले आहे मात्र इतिहासात या वाड्याचे प्रवेशद्वार कसे असावे? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा शिंदे सरकारांच्या जामगाव(ता.पारनेर) वाड्याचे प्रवेशद्वार डोळ्यासमोर उभे राहते. दोन्ही ठिकाणांना नक्की भेट द्या.

शिंदे सरकार वाडा, जामगाव

रत्नेश्वर महादेव मंदिर वाराणसी(उत्तर प्रदेश)

इतिहास:

राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७९१ ला वाराणसी(काशी) येथे गंगा नदीवर मणिकर्णिका घाट बांधून काढला व त्याच वेळी या घाटाच्या खालील बाजूला असलेले रत्नेश्वर महादेव मंदिर बांधले. हे मंदिर अहिल्यादेवींनी आपली दासी “रत्नाबाई” हिच्या ईच्छेवरून बांधले म्हणून या मंदिराचे नामकरण “रत्नेश्वर महादेव मंदिर” पडले असे सांगितले जाते.

रत्नेश्वर महादेव मंदिर

अजून एक दंतकथा प्रसिद्ध आहे ती अशी कि, राणी अहिल्यादेवी यांनी रत्नाबाईला सांगितले कि या मंदिराचे नामकरण स्वताच्या नावाने न करता दुसरे नाव द्यावे. परंतु रत्नाबाईनी अहिल्यादेवींच्या म्हणण्याकडे कानाडोळा केला व अहिल्यादेवींनी रागाच्या भरात शाप दिला त्यामुळे हे मंदिर वर्षेच्या ९ महिने पाण्यात असते. या मंदिरात फक्त ३ महिनेच देवपूजा होते.

नऊ महिने हे मंदिर पाण्यात असते
नऊ महिने हे मंदिर पाण्यात असते

रत्नेश्वर मंदिर व मणिकर्णिका नदीघाटा व्यतिरिक्त राणी अहिल्यादेवी यांनी वाराणसीत(काशी) अनेक कल्याणकारी कार्य केली त्यामध्ये प्रामुख्याने काशीविश्वेश्वर ज्यीतीर्लिंग मंदिराचा पुनर्निर्माण, हजारा दीपमाळ, गंगा मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिराचा निर्माण व शहरात अन्य ६ मंदिराचा निर्माण (होळकरांची खाजगी संपत्ती) केला. अहिल्याबाई नदीघाट, शीतल नदीघाट, दशवमेध नदीघाट बांधले. हे सर्व नदीघाट होळकरांची खाजगी संपत्ती आहे. रामेश्वर धर्मशाळा, कपिलधारा धर्मशाळा, उत्तर काशी धर्मशाळा, ब्रम्हपुरी धर्मशाळा, लोलार्क जलकुंड, दुर्ग जलकुंड, अहिल्याबाई नदीघाटावर भव्य होळकर वाडा व शहरात अन्य ८ वाडे (होळकरांची खाजगी संपत्ती) बांधले आणि नदीघाटावर तीन मंदिरे (होळकरांची खाजगी संपत्ती) त्यातीलच एक रत्नेश्वर मंदिर. संदर्भ : व.वा.ठाकूर लिखित – अहिल्यादेवींचे कार्य व जीवन पुस्तक.

महत्त्वाचा मुद्दा:

सध्याच्या काळात हे मंदिर त्याच्या एका खास वैशिष्ट्यामुळे प्रसिद्धीस आले आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा एका बाजूला असलेला तिरकसपणा किंवा झुकाव. मंदिराच्या या वौशिष्टाची बरोबरी लोक जागतिक वारसा स्थळ असलेले पिसाच्या झुलत्या मनोऱ्याशी करत आहे. लोकांचा हा प्रश्न पण चुकीचा नाही व या प्रश्नाचे उत्तर अनेक प्रसार माध्यमांनी पण शोधला व तेथे लोकांचे म्हणणेच खरे ठरले.

Mems हि बनत आहेत

पिसाच्या मनोऱ्याची उंची १८३ मीटर असून रत्नेश्वर महादेव मंदिराची उंची ४० मीटर आहे व पिसाचा मनोरा फक्त ५’ डिग्रीच झुकलेला असून रत्नेश्वर महादेव मंदिर ९’ डिग्री झुकलेले आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न असून या सर्व गोष्टी खऱ्याही आहेत. पण रत्नेश्वर मंदिराचे दूदैव्ह इतकं कि जागतिक वारसा तर सोडाच पण अजून ऐतिहासिक वास्तू म्हणून साधी नोंद पण नाही. हे मंदिर होळकरांची खाजगी संपत्ती असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत व्हत्या मात्र हि नोंद लवकर होईल असे पुरातत्व खात्याने स्पष्ट केले आहे.

तुलना

सध्या या मंदिराचा हा मुद्दा गाजत असल्यामुळे मंदिराच्या निर्माण काळाविषयी अनेक दंतकथा जन्म घेऊ लागल्या आहेत मात्र हे मंदिर राणी अहिल्यादेवींच्या खाजगी जहागिरीतून बांधले आहे याचे पुरावे उपलब्ध असून व.वा. ठाकूर यांनी अहिल्यादेवींचे कार्य व जीवन या पुस्तकात हे तत्कालीन संदर्भ दिले आहेत. तसेच हे मंदिर ज्या घाटावर आहे तो मणिकर्णिका नदीघाट होळकर घराण्याची खाजगी संपत्ती आहे.

मंदिर स्थापत्य:

हे मंदिर वर्षाच्या नऊ महिने गंगा नदीच्या पाण्यात असून वर्षातील तीनच महिने पाण्याबाहेर येते. त्यामुळे या मंदिरात तिनचं महिने पूजा होते. या मंदिराचे बांधकाम नागरशैली प्रमाणे असून मंदिर प्रामुख्याने “गर्भगृह” व “सभागृह” या दोन भागात विभागले आहे.

पाण्याच्या बाहेर आल्यावर अर्ध्या मंदिरात गाळ साचतो.

दोन्ही गर्भगृहावर शिखरे आहेत. गर्भगृहावरील शिखर मोठं असून सभागृहावरील शिखर लहान आहे. दोन्ही शिखर तेवढेच कोरीव व श्रीमंत आहेत.

गर्भगृहावरील शिखर

दोन्ही शिखरांवर पुन्हा त्याच शिखरांच्या रचनेनुसार एकावर एक अशा छोट्या छोट्या शिखरांची प्रतिकृतींची रचना केले असल्यामुळे मंदिरांचे दोन्ही शिखर शिल्पकलेचा उत्तम नमूना आहे. गर्भगृहावरील शिखर हे मोठे आहे तर सभागृहावरील शिखर गोल आहे. गोल शिखरावरील नक्षीचे थोडेफार नुकसान झालेले दिसते.

सभागृहावरील शिखर

मंदिराच्या गर्भगृहामध्ये मधोमध पाच शिवलिंगाचा एक समूह नजरेस पडतो व त्याच्या पाठीमागील देवळ्यातही एक शिवलिंग आहे. गर्भगृहात एकूण ३ देवळ्या असून थोडीफार नक्षी हि पाहावयास मिळते.

गर्भगृहातील शिवलिंगाचा समूह

मंदिराला एकूण १० खांब असून सर्व खांब नक्षीदार व कोरीव आहेत. भिंतीवरील मुर्तीकाम, छतावरील शिल्पपट सुंदर आहे. गर्भगृहाच्या दारी सुंदर वेली व वेगवेगळी आकर्षक दगडी शील्प हि कोरलेली आहेत.

खांबावरील दगडी नक्षीकाम
खांबावरील दगडी नक्षीकाम
गर्भगृहावरील दगडी नक्षीकाम
गर्भगृहावरील दगडी नक्षीकाम

हे मंदिर असे तिरके का? असा प्रश्न अनुभवी स्थपत्यशस्त्रांना विचारला असता त्याचे म्हणणे आहे कि, हे मंदिर वास्तविक नदीच्या पात्रात बांधण्यात आले व अधिककाळ ते पाण्यात असल्यामुळे नदीच्या प्रवाहाचा त्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून असे तिरके बांधले असावे तसेच पुरापरिस्थितीच्या वेळेस नदीच्या पाण्याची उंची समजावी म्हणून अशी अनेक मंदिरे अहिल्यादेवींनी नदीत बांधलेली आढळतात.

रामेश्वर पंचायतन मंदिर
कळंबस्ते, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी(महाराष्ट्र)

इतिहास :

गोविंद पंत गानू हे राणी अहिल्यादेवी होळकर(Ahilyabai Holkar) यांच्या शासनकाळात होळकरशाहीच्या खासगी जहागिरीचे प्रमुख दिवाण होते. गोविंदपंतांनी आपल्या कारकिर्दीत होळकरशाची प्रामाणिक पणे सेवा केली त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी वेळोवेळी त्यांचा सन्मान हि केला हे आपल्याला नोंदीमधून समजते.

रामेश्वर पंचायतन मंदिर

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७६ ला महेश्वर प्रांतामध्ये गोविंदपंताना काही जमीन व त्यावेळेसचे ५००० रु. उत्पन्न असलेल्या बंगारडा गावाची जहागिरी हि भाल केली होती. तसेच त्यांचा सन्मान म्हणून महेश्वर शहरात त्यांच्या नावाने “गोविंदपूरा” हि पेठ हि वसवली आहे. कळंबस्ते हे गोविंदपंत पंत गानू यांचे मूळ गाव असून त्या गावातही त्यांचा सन्मान म्हणून या पंचायतन मंदिराचा निर्माण लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला.

खाजगी जहागिरीचे नियोजन करताना अहिल्यादेवी व गोविंदपंत गानू यांचे काल्पनिक चित्र.
आभार – श्री.भूषणसिंह महाराज होळकर

होळकरांच्या खाजगी जहागिरी बद्दल थोडक्यात माहिती पाहू. राणी अहिल्यादेवींचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपली पत्नी गौतमाबाई होळकर यांच्या नावे खाजगी जहागिरी मिळावी म्हणुन सन १७३४ मध्ये पेशव्यांकडे मागणी केली. सातारचे चौथे छत्रपती शाहु महाराजांकडून २० जानेवारी १७३४ ला गौतमाबाई होळकरांच्या नावे सनद मंजुर झाली व सुभेदार मल्हाररावांनी कळंबस्ते गावचे रघुनाथ कृष्णा गानू यांची खाजगी जहागिरीच्या प्रमुख दिवाण पदी नेमणूक केली.

सुभेदर मल्हारराव होळकर(पहिले)

सन १७६१ ला गौतमाबाई होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर खाजगी जहागिरीचे अधिकार राणी अहिल्यादेवींच्या कडे आले. त्यांनतर सन १७६६ ला रघुनाथ कृष्णा गानू यांचे पुत्र गोविंदपंत गानू हे खाजगी जहागिरीच्या प्रमुख दिवाण पदी नेमले गेले. त्यांनी सन १७९० पर्यंत आपले कार्य बजावले. त्यांनतर त्यांचा मुलगा गोपाळराव बाबा गानू हे दिवाण झाले.

मातोश्री अहिल्यादेवी होळकर

इंदोरचे होळकर संस्थान भारतात विलीन होईपर्यंत जातीने कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण असलेल्या “गानू” घराण्याने होळकर संस्थाना मार्फत हिंदवी स्वराज्याची सेवा केली. दोनशे-सव्वादोनशे वर्षे या घराण्याने सुभेदार मल्हारराव,अहिल्यादेवी, यशवंतराव, हरिराव, तुकोजीराव(२) यांचे सेवेत निष्ठेने दिवाणगिरी सांभाळली व वेळोवेळी त्यांचा सन्मानही करण्यात आला.

सर्वात महत्तवाची गोष्ट म्हणजे हिंदवी स्वराज्यात खासगीचा मान फक्त होळकरांनाच होता. होळकरांपुर्वी व नंतर जे सरदार झाले कोणालाही खासगीचा मान मिळाला नाही. अगदी शिंदे, गायकवाड, पवारांना सुद्धा. आज भारतात जे अहिल्यादेवी होळकरांनी उभे केलेल वैभव आहे(हजारो मंदिरे ,घाट, अन्नछत्रे इत्यादी. ) ते सारे खाजगी जहागिरीतूनच. होळकरांच्या सरकारी जहागिरीला हात न लावता.

माहिती :

विविध प्रकारच्या पुरातन ठेव्यांसाठी कोकण समृध्द आहे. आठव्या-नवव्या शतकापासून थेट पेशवेकालीन राजवटीपर्यंत आणि त्यानंतर ब्रिटिश राजवटीमधील असंख्य पुरातन खुणा आजही गतकालीन वैभवाची साथ देत आहेत. शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून कळंबस्ते येथे उभारलेले “रामेश्वर पंचायतन” हे एक दुर्मिळ ठिकाण. पंचायतन म्हणजे पाच मंदिरांचा समूह. येथील संगमरवरी मूर्ती अप्रतिम आहेत पाहता क्षणी नजरेत भरतात.

चालुक्य राजवटीतील अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिध्द असलेली शिवमंदिरे आणि या मंदिरांमध्ये कोरले गेलेले विविध प्रसंग त्या काळातील प्रगत शिल्पकलेची साथ देत असतानाच, हिंदवी स्वराज्यातील गड – किल्ले शौर्याची गाथा सांगत आहेत. यानंतरच्या पेशवाईतील आणि ब्रिटीश राजवटीतील धान्य साठविण्याच्या वखारी, वाडे, पुल गतवैभवाची साथ देत उभे आहेत.

यातच थेट मध्यप्रदेशातून अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळील कळंबस्ते या गावी उभारण्यात आलेले रामेश्वर पंचायतन हे मंदिर ठिकाण, याची महती लक्षात घेता राज्य संरक्षित स्मारक होणे आवश्यक आहे. पंचायतनाची ठिकाणं दुर्मिळ असतात.

पंचायतन मंदिरामध्ये गणपती, सूर्यनारायण, विष्णू, अष्टदुर्गा आणि मध्यभागी शिवलिंग असते. कळंबस्ते येथील गानू नामक व्यक्ती अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. त्यांच्या विनंतीवरूनच अहिल्याबाईंनी कळंबस्ते येथे ‘रामेश्वर पंचायतन’ उभारण्यास शिवधन दिल्याचा उल्लेख आहे, असे येथील ग्रामस्थ सांगतात.

रामेश्वर पंचायतनाची मंदिरे जांभ्या दगडातील असून सभोवताली जांभ्या दगडाची भव्य तटबंदी आहे. मंदिरासमोर उंच दोन दगडी दीपमाळा असून त्यांचं एक वेगळच पण आहे. अशा दीपमाळा सहसा कोठेही बघायला मिळत नाहीत. या पंचायतन मंदिरांच्या समूहात मध्यभागी एक शिवमंदिर असून तटबंदीच्या चारही कोपऱ्यात चार छोटी मंदिरे असून त्यांचे बांधकाम एकसमान व जांभ्या दगडात आहे.

मुख्य प्रवेशद्वार व दीपमाळा
अशाप्रकारे चार कोपऱ्यात चार मंदिरे आहेत.

मध्यभागी असलेल्या शिवमंदिरात भव्य शिवलिंग आहे. येथील शिवलिंग हे मोठे असून कमळाच्या पाकळ्यांमुळे अजूनच आकर्षित दिसते. संपूर्ण शिवलिंग हे एकाच पाषाणात घडवले असल्यामुळे त्याची लकाकी लक्ष वेधून घेते. शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे संगमरवरातील अष्टदुर्गेची मूर्ती विराजमान आहे.

शिवमंदिरातील शिवलिंग
शिवमंदिरातील शिवलिंग
शिवमंदिरातील अष्टदुर्गेची मूर्ती

या शिवमंदिराच्या पुढे भव्य नंदी असून त्याचे होळकरकालीन दगडी कोरीवकाम अप्रतिम आहे. नंदीच्या गळ्यातील घंटा व त्यावरील कोरलेले अलंकृत नक्षीकाम हि लक्ष्य वेधून घेते. अलंकृत असणारा हा नंदि एका बाजूला रेलल्यासारखा भासतो. शिवमंदिराच्या पाठीमागे   एक पाण्याचे तळेही उभारण्यात आले आहे. त्यांचे बांधकाम हि चिरेच्या दगडात असून त्यातील पाण्याचा उपयोग मंदिरातील पूजाअर्चासाठी केला जात असावा.

शिवमंदिरा समोरील नंदी
शिवमंदिरा समोरील नंदी
शिवमंदिराच्या पाठीमागील कुंड

तटबंदीच्या चारही कोपऱ्यात जी चार छोटी मंदिरे आहेत ती प्रामुख्यने गणपती, विष्णू, अष्टदुर्गा आणि सूर्यनारायण मंदिर मिळून हे रामेश्वर पंचायतन तयार झाले आहे. या मंदीरातील सर्व मुर्त्या संगमरवरी असून त्यामधील शिल्पकला अप्रतिम, अत्यंत सुबक, रेखीव आणि भावनाप्रधान आहेत. पिवळसर झाक असलेल्या संगमरवरात या मुर्त्या थेट मध्य प्रदेशातून घोड्यांवरून आणल्याचे सांगितले जाते.

विष्णू मंदिरातील मूर्ती
सूर्यनारायण मंदिरातील मूर्ती

यातील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असल्याने या मूर्तीला मोठे महत्त्व आहे. सूर्यनारायण, अष्टदुर्गा यांच्या मूर्ती सहसा कोठे पाहायला मिळत नाहीत. मात्र त्या कळंबस्ते येथे असल्याने हे ठिकाण महत्त्वाचे असले तरीही दुर्लक्षित आहे. या सर्व मूर्ती मुख्य मंदिराच्या चार बाजूंना उभारलेल्या छोटेखानी मंदिरात आहेत. सर्व मूर्ती दीड ते दोन फुट उंचीच्या आहेत.

गणपती मंदिरातील मूर्ती
अष्टदुर्गा मंदिरातील मूर्ती

या पवित्र ठिकाणाचं महत्त्व आणि येथील मूर्तीचं मोल लक्षात घेता अहिल्याबाईंच्या शिवधनातील हा ठेवा राज्य संरक्षित स्मारक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरातत्व विभागानं दोन वर्षांपूर्वी या मंदिराला भेट देऊन पाहणी केली; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे उदासीन असलेल्या पुरातत्व खात्याच्या मदतीची वाट न बघता स्वता या मंदिराजी डागडुजी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

येथे काही वीरगळ व शिल्प पाहावयास मिळतात.

सन २०१८-२०२० या काळात येथील ग्रामस्थांनी या मंदिराला जीवनदान दिले. त्यांचा उद्देश प्रामाणिक होता मात्र नवीन दिल्या गेलेल्या रंगामुळे मंदिराने मात्र जुने रूप गमावले. या गावात “गानू” आडनावाची लोकही आज वास्तव्यास आहेत. लोकांना रामेश्वर पंचायतन ठिकाणाला भेट द्यायची असेल त्यांनी संगमेश्वर ते कसबा येथून पुढे फणसवणे येथे गेल्यानंतर डावीकडील पूलाकडे न जाता सरळ उमरे मार्गावर जायचे.

रंगकाम केलेले नवीन रूप
रंगकाम केलेले नवीन रूप

तेथून कळंबस्ते हायस्कूल जवळून पुढे गेल्यानंतर एक छोटा पूल लागतो त्याच्या पुढे उजव्या हाताला वळल्यानंतर तो रस्ता साटलेवाडी येथील रामेश्वर पंचायतन मंदिराकडे जातो . रस्त्यावरुन थोडेसे अंतर चालावे लागते . मात्र कोणाला त्रास होवू नये म्हणून ग्रामस्थांनी छान पायवाट बांधली आहे. संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तेथे राहण्याची सोय होऊ शकते.

संदर्भ व आभार:
इंदोर स्टेट गॅझेट भाग -१
अहिल्यादेवींचे जीवन व कार्य
जे. डी. पराडकर

अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी गड, ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)

इतिहास :

श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेजुरी गडाचा विकास अनेक राजघराण्यानी केला मात्र सिंहाचा वाटा तो फक्त इंदोर (मध्यप्रदेश) येथील श्रीमंत होळकर राजघरण्याचाच. या Post मध्ये आपण फक्त जेजुरीगडाच्या विकासासाठी राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्याची माहिती पाहणार आहोत.

जेजुरीचा खंडोबा हे होळकर राजघराण्याचे कुलदेवत होय. खंडोबा यांचे मंदिर सन १६०८ रोजी बांधण्यात आले. त्यानंतर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७३५ मध्ये जेजुरी गडाच्या पुननिर्माणाचे कार्य चालू केले.

सन १७३९ ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर (प्रथम) व चिमाजी आप्पा यांनी पोर्तीगीजवर विजय मिळवल्यानंतर काही पोर्तीगीज घंटा खंडोबाच्या चरणी अर्पण केल्या.

जेजुरीगडावरील पोर्तीगीज घंटा

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७४२ ला गडावरील दगडी कमानीचे आणि नंतर सन १७५८ ला गडावरील नगारखाण्याचे काम पूर्ण केले. नगारखाण्यावर एकाच आशयाचे दोन होळकर कालीन शिलालेख आहे.

जेजुरगडाचे होळकरकालीन मुख्य द्वार
जेजुरीगडावरील होळकर कालीन नगारखाना
नगारखान्यावरील होळकर कालीन शिलालेख

वरील शिलालेखाचा आशेय खालीलप्रमाणे,

श्री शके १६७८ धाता
नाम स्वंछर श्री मा
र्तंड भैरव चरणी
खंडोजी सुत मल्हार
जी होळकर णीरंतर

सभोवारच्या सभामंडप, ओवऱ्या व इतर वास्तू श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी बांधल्या. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात सन १७७० च्या सुमारास जेजुरी गडाच्या किल्लेसदृष्य तटबंदीचा निर्माण पूर्ण झाला. पश्चिमेला म्हाळसाबाई मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूला, उत्तरेला नगारखान्याच्या डाव्या व उजव्या बाजूला व पूर्वेला चोथऱ्याशेजारील तटबंदीवर तुकोजीराव होळकरांच्या नावाचा शिलालेख आढळतात.

म्हाळसाबाई मंदिराशेजारील होळकर कालीन शिलालेख

वरील शिलालेखाचा आशेय खालीलप्रमाणे,

श्री शके १६६४ दुदु
भी नाम सवत्सरे
श्री मार्तंड भैरव
चरणी खंडोजी सु
त मल्हारजी होळकर

चोथऱ्याशेजारील तुकोजीराव होळकरांचा शिलालेख

वरील शिलालेखाचा आशेय खालीलप्रमाणे,

श्री मार्तंड चरणी तत्पर
मल्हारजी सुत तुको
जी होळकर नीरंतर श
के१६९२ वीकृती नाम
संवछरे श्रावण सुध्द
प्रतीपदा सोमवार का
 कारखाना कोलावंन लेप
लफात शामजीना
रायेन राजापूरक
र परगणे दिजे

तथापि म्हाळसाबाई मंदिराच्या व नगारखान्याच्या डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या शिलालेखावरील अशेय सारखाच आहे. अशाप्रकारे जेजुरीगडावर होळकरकालीन तीन आशयाचे पाच शिलालेख आहे. खालील चित्रावरून तुम्हाला शिलालेखांचे निश्चित स्थान लक्षात येईल. जेजुरीगडावर जवळपास एकूण २३ शिलालेख आढळतात. निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे.

जेजुरीगडावरील होळकरकालीन शिलालेखांचे स्थान

खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

वर्तमान काळात आपल्याला दिसत असलेले
गडकोटासारखे भक्कम तटबंदीचे बांधकाम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातीलच.

जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत. देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे.

होळकर कालीन ओवऱ्या

गडावर चोथरा जिथे आहे त्याच्या खाली तळघरात शिव मंदिर बांधले गेले आहे हे सन २०१८ स्पष्ट झाले. तसेच या गडाच्या तटबंदीसाठी जो दगड वापरला गेला तो पणदरे(ता.बारामती) येथील खिंडीतून आणण्यात आला. पणदरे ते जेजुरी या मार्गावर गडाच्या बांधकामासाठी दगडाची वाहतूक केली जात होती म्हणून राणी अहिल्यादेवी होळकर यांनी काही पायविहिरींचा हि निर्माण केला.

गैरसमज :

तटबंदीवर सुभेदार मल्हारराव होळकर व सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या नावाचे शिलालेख असताना सुध्दा इतिहासकार, मल्हारराव व अहिल्यादेवी यांनी तटबंदीचा निर्माण केला असे सांगतात. तुकोजीराव होळकर यांच नाव असून हि त्यांचे नाव का घेतले जात नाही? याला कारण आहे होळकरांची दुहेरी राज्यव्यवस्था! सुभेदार मल्हारराव यांच्या मृत्यू नंतर होळकरशाहीत दुहेरी राज्यव्यवस्था सुरु झाली. दुहेरी राज्यव्यवस्था अधिक माहिती वाचण्यासाठी खालील link ला भेट द्या.

दुहेरी राज्यव्यवस्था बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे प्रशासकीय गोष्टीवर अहिल्यादेवी नियंत्रण ठेवत असत तर लष्करी कारवायात तुकोजीबाबा प्रत्यक्ष भाग घेत असत. राणी अहिल्यादेवी होळकर या प्रत्यक्षात सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या काळात(१७६७-१७९५) होळकरशाहीच्या रिजंट महाराणी होत्या.

म्हणजेच जे राजकीय काम होती किंवा जेथे राजकीय खर्च होत असत तेथे सरकारी शिक्का वापरला जात असत व सुभेदार पदावर तुकोजीराव असल्यामुळे त्यांचे नाव शिक्क्यावर असतं. सरकारी कामे असो किंवा खासगी कामे असो सर्वांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अहिल्यादेवींचे नियंत्रण असतं. त्यामुळे या तटबंदीचा निर्माण मल्हारराव यांच्या नंतर अहिल्यादेवीनि केला असे म्हणायला काहीही हरकत नाही व उपलब्ध पुराव्यावरून असे समजते कि, सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनुक्रमे तटबंदीचे व ओवऱ्यांचे बांधकाम शके १६६४ ते १६९९ म्हणजेच इ.स. १७४२ ते १७७७ पर्यंत पूर्ण केले.

हि तटबंदी सन १७७० ला पूर्ण झाली व यावेळेस सुभेदार तुकोजीराव उत्तरेत दिल्लीस्वारीत महादजी शिंदे यांच्या बरोबर होळकर सेन्याचे नेतृत्व करत होते. भारतभरात होळकरशाहीतर्फे सरकारी खर्चातून किंवा खाजगी खर्चातून चालत असलेल्या कामावर राणी अहिल्यादेवी होळकर स्वता लक्ष घालत असत.

अहिल्यादेवी होळकर कामांचे स्वता निरीक्षण करत असतानाचे काल्पनिक चित्र.

माहिती :

खंडेराय-म्हाळसाई मंदिराच्या म्हणजे जेजुरीगडाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पायऱ्या चढून वर येताना दोन कमानी (दरवाजे) चढून वर आल्यावर बानूबाईचे मंदिर लागते. तिथेच शेजारी क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे. अजून एक दरवाजा ओलांडून काटकोनातून वर आले, की छोट्या छोट्या आकारातील अकरा दीपमाळी आणि अष्टकोनी टेहेळणी बुरूज नजरेस पडतात. या दीपमाळी आणि अष्टकोनी टेहेळणी बुरूज आपल्या (भक्तांच्या) स्वागतालाच उभ्या आहेत, की काय असा भास होतो. या टेहेळणी बुरुजाकडे बारकाईने पाहिल्यास त्यावर वराह शिल्पे कोरलेेली दिसतात.

या ठिकाणावरून मंदिराचा मुख्य दरवाजा एकदम समीप आल्याचे वाटते; मात्र या दरवाजाकडे जातांना पायऱ्याची चढण (ठेवण) उंच आणि मोठी झालेली दिसते. मुख्य दगडी दरवाजाच्या उंबऱ्यावर कीर्तीमुख कोरलेले दिसते. मुख्य दरवाजा आणि त्याच्या इतर तीन कमानी चढून वर गेल्यावर आपला मंदिराच्या तटबंदी आतील आवारात प्रवेश होतो. यासाठी आपल्याला जेजूरगडाच्या तब्बल ३८५ पायऱ्या चढून वरती जावे लागते. मुख्य दरवाजातून आतील मंदिर आवारात गेल्यावर पाठीमागे दरवाजाकडे ओळून पाहिले, की दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी वराह शिल्प कोरलेले दिसून येते.

मंदिराच्या तटबंदी आतील आवारात जाताच खंडेराय-म्हाळसाईच्या मंदिरासमोरील भव्य दीपमाळा आपले चटकन लक्ष वेधून घेतील अशाच आहेत. या दीपमाळा पाषाण दगडाने सुंदर आणि रेखीव अशा बनविल्याने, त्या लक्ष वेधून घेतील अशाच आहेत. या दीपमाळावर वेगवेगळी चिन्ह कोरलेली आहेत.

मंदिरासमोर लहानमोठ्या मिळून दहा दीपमाळा आणि एक अष्टकोनी टेहेळणी बुरूज असून, या बुरुजावर सुद्धा वेगवेगळी शिल्पे कोरलेली असल्याचे दृष्टीस पडतात. टेहेळणी बुरूजाच्या आतून सुंदर घडीव दगडी पायऱ्या असून, या पायऱ्यावरून टेहेळणी बुरूजावर जाता येते. खंडेरायांच्या मंदिरासमोर तटबंदिला चिकटून मल्ल(दैत्य) राजाची प्रतिकृती उभी केलेली आहे.

मल्ल(दैत्य) राजाची प्रतिकृती

खंडेराय-म्हाळसाईच्या मंदिरासमोरच्या आवारातील दीपमाळांना वळसे घालतच, आपण देवाच्या गाडी बगाड आणि नंदी घरासमोर येवून पोहोचतो. या दोन्ही ठिकाणी नतमस्तक होत होतच तिथून आपला जेजुरी येथील खंडेराय-म्हाळसाई देवाच्या मंदिरात प्रवेश होतो. तत्पूर्वी मंदिरात प्रवेश करताना भले मोठे पहुडलेले कच्छप (कासव) आणि मंदिराच्या सदरेला ओलांडूनच आपल्याला मंदिर प्रवेश करावा लागतो. मंदिरातील प्रवेश सर्वप्रथम छोटेखानी सभागृहात होतो. हे सभागृह आठ दगडी खांबावर टेकलेले असून, ते तीन छोट्या घुमटाचे बनलेले आहे. या सभागृहातील प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला गणेशपट्टी कोरलेली आहे.

मंदिरासमोरील दीपमाळा

तीन घुमटाच्या छोटेखानी सभामंडपातून आपला प्रवेश मंदिराच्या मुख्य सभागृहात होतो. मंदिराचा मुख्य सभामंडप हा सोळा दगडी खांबावर टेकलेला असून, हा सभामंडप छोट्या छोट्या आकारातील नऊ घुमटांचा बनलेला आहे. सभामंडपात धातूचा तसेच दगडावरील देवाचा आश्वारुढ पुतळा नजरेस पडतो. तिथूनच समोर असलेले देवाचे गर्भगृह आपल्या दृष्टीस पड़ते. गर्भगृहाच्या दरवाजाच्या वरील उंबऱ्यावर स्थापत्य शैलिनुसार गणेशपट्टी कोरलेली असून, गणेशपट्टीच्या दोन्ही बाजूला वराह शिल्प कोरलेले आहे. तसेच दरवाजाच्या डाव्या बाजूच्या खाम्बावर गणेश मूर्ती कोरलेली असून, उजव्या खाम्बावर संगमरवराची यक्षमूर्ती बसवलेली आहे.

देवालयाच्या प्रशस्त सभामंडपातून गर्भगृहाच्या दगडी दरवाजातून आपला खंडेराय-म्हाळसाई मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो. देवाचे गर्भगृह प्रशस्त असेच असून, ते चार दगडी खाम्बावर टेकलेले आहे. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मात्र देवाच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. मंदिराच्या गर्भगृहात देवाचा भला मोठा असा देव्हारा असून, त्यात खंडेराय, म्हाळसाई, बानाई, इत्यादि असे मुखवटे ठेवलेले आहेत. त्याखाली खंडेराय-म्हाळसाई, बानाई यांचे लिंग असून, सदरील लिंग हे उत्तराभिमुख असेच आहे. देवाच्या अभिषेकाचे तीर्थ बाहेर जाण्यासाठी चाळुक्यांनी मंदिराच्या बाहेरून उत्तर बाजुला गोमूखतीर्थ बसवलेले आहे. गर्भगृहात भिंतितिल मोठ्या देवळीच्या कोनाडयामध्ये सोनारी, ता. परान्डा येथील श्री.सिद्धनाथ काळ भैरवनाथांची बैठी मूर्ती ठेवलेली आहे.

खंडोबा, म्हाळसा व बानुबाई यांच्या मूर्ती

मंदिराच्या मागच्या भिंतीला एका सुंदर दगडी डिझाइन केलेल्या देवळीमध्ये एक बैठी पाषाण मूर्ती बसवलेली आहे. या मूर्तिवर भंडाऱ्याचे लोट तयार झाल्याने, ही मूर्ती काळ भैरवाची की कार्तीकाची! हे समजने मुश्किल आहे. मंदिराच्या लगोलग मागे तुळजाभवानी देवीचे मंदिर असून, देवी मंदिराच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजुला प्रत्येकी दोन दीपमाळा आहेत. देवी मंदिराच्या शेजारी भूलेश्वराचे (महादेव) मंदिर आहे. भूलेश्वराच्या अगदी मंदिरा शेजारीच उत्तरेकडून पंचलिंग महादेव मंदिर असून, या मंदिरातील भगवान शिवाच्या एका साळुंखीमधे मल्हार, काशी, मातापूर, निलाद्रि आणि हरिद्वार असे पाच लिंग असल्याचे सांगितले जाते. महादेवाच्या एका साळुंखीमधे पाच शिवलिंग असण्यामागे सुद्धा काहीतरी ऋषी आख्यायिका सांगण्यात येते.

ज्यांच कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या नवीन जोडप्याला पहिल्या दर्शनावेळी गडाच्या काही पायऱ्या चढताना वराला वधूला असे उचलून घ्यावे लागते. हि एक प्रसिद्ध प्रथाच आहे.

पंचलिंग महादेव मंदिराचे उत्तरेकडून शेजारीच देवाचे ओवऱ्या स्टाईलचे कमानीचे भांडारगृह आहे. हे भांडारगृह देवाच्या मुख्य मंदिर सभामंडपा प्रमाणेच सोळा खाम्बावर टेकलेले आहे. हे भांडारगृह देखील देवाच्या मंदिराप्रमानेच नऊ घुमटांचे बनलेले असून, या भांडारगृहामध्ये देवाचे शेजघर आहे. शेजघरा शेजारी देवाचे भांडारगृह असून, त्या शेजारी काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. हे भांडारगृह देखील स्थापत्य शैलीचा एक दर्जेदार नमुना आहे. सोमवती अमावस्या आणि दसऱ्याच्या दिवशी देवाची यात्रा असते, या यात्रेनिमित्ताने इथूनच देवाची पालखी निघते. तिची उत्सवमूर्ती याच भांडारगृहात ठेवली जाते.

मंदिर आवारात तटबंदिच्या आत उजव्या बाजुला बावीस ओवऱ्या असून, मंदिराच्या डाव्या बाजुला दरवाजा सोडून सत्तावीस ओवऱ्या आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस प्रवेशद्वार धरून चार ओवऱ्या आहेत. तर मंदिराच्या समोर प्रवेशद्वार धरून अकरा ओवऱ्या आहेत. मंदिराच्या चारही बाजूंनी मिळून अशा एकूण मंदिरात ६५ ओवऱ्या असल्याचे दिसून येते. शिवाय या ओवऱ्याच्या वरती मंदिरात चौफेर दगडी भोवऱ्या बसवलेल्या आहेत. मंदिरातील ओवऱ्यावरील बसवलेल्या भोवऱ्यांची संख्या साडेतीनशे पेक्षा जास्त आहे. दक्षिणेकडील काही ओवऱ्यामधे देवस्थानने पर्यायी खोल्यांची (रहिवास) व्यवस्था केलेली असून, यातून मंदिराचे व्यवहार चालत असल्याची माहिती मिळते.

जेजुरी मंदिराच्या सबंध तटबंदिला उत्तर, पूर्व आणि पश्चिम अशा तीन बाजूंनी दरवाजे आहेत. मात्र मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवरूनच भक्तांचा जास्तीचा रातबा आहे. पूर्व आणि पश्चिम दरवाज्या बाहेरील पायऱ्या अपूर्णावस्थेत असल्याने या दोन्ही मार्गावरील भक्तांची संख्या रोडावलेली दिसते. मंदिराच्या तटबंदीचा जिर्णोद्धार झालेला असून, तो पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांनी केलेला आहे व या मंदिरातील ओवऱ्या आणि त्यावरील संख्येने साडेतीनशे पेक्षा जास्त असलेल्या भोवऱ्यांची स्थापत्य शैली ही होळकरकालीन स्थापत्य शैलीची आठवण करून देणारी आहे. मंदिराला भेट दिल्यावर हा इतिहास नक्की आठवा.

संदर्भ:
जेजुरी येथील होळकर कालीन शिलालेख,
इंदोर स्टेट गॅझेट भाग – १,
भारतीय लोकदैवत “खंडोबा” विषयाचा चिकित्सक अभ्यास हा शोधप्रबंध.

श्री खंडोबा देवस्थान, जेजुरी जि.पुणे(महाराष्ट्र):

जेजुरी, ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र) : श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेजुरी गडाचा विकास अनेक राजघराण्यानी केला मात्र सिंहाचा वाटा तो फक्त इंदोर (मध्यप्रदेश) येथील श्रीमंत होळकर राजघरण्याचाच.

जेजुरी गडाच्या या तटबंदीचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला.

जेजुरीचा खंडोबा हे होळकर राजघराण्याचे कुलदेवत होय. खंडोबा यांचे मंदिर सन १६०८ रोजी बांधण्यात आले. त्यानंतर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७३५ मध्ये जेजुरी गडाच्या पुननिर्माणाचे कार्य चालू केले. सन १७३९ ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर (प्रथम) व चिमाजी आप्पा यांनी पोर्तीगीजवर विजय मिळवल्यानंतर दोन पोर्तीगीज घंटा खंडोबाच्या चरणी अर्पण केल्या. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७४२ ला गडावरील दगडी कमानीचे आणि नंतर सन १७५८ ला गडावरील नगारखाण्याचे काम पूर्ण केले.

सभोवारच्या सभामंडप, ओवऱ्या व इतर वास्तू श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी बांधल्या. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० ला जेजुरी गडाच्या किल्लेसदृष्य तटबंदीचा निर्माण केला. पश्चिम, उत्तर व पूर्वेकडील तटबंदीवर होळकरांचे शिलालेख आढळतात. निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे.

Ahilyabai-holkar-jejuri
सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या काळात निर्माण केलेले प्रमुख प्रवेशद्वार
Photo : Google
सन १७५८ ला मल्हारराव होळकर यांनी निर्माण केलेला नगारखाना.
Photo : Rahul
नगारखान्यावरील होळकर कालीन शिलालेख
Photo : Rahul

खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे.

संक्षिप्त स्वरूपात वाचण्यासाठी भेट द्या – अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी गड

होळकर वाडा, जेजुरी:

श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांनी सन १७६८ मध्ये पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाखाली या वाड्याचे काम पूर्ण केले. सध्या या वाड्या मध्ये राणी अहिल्यादेवी यांचे स्मारक असून होळकर कालीन दुहेरी बांधकाम पहावयास मिळते. त्याच बरोबर होळकर कालीन असलेले दगडी व लाकडी कलाकसुरीचे हि दर्शन होते. वाड्यामध्ये सभागृह पहावयास मिळते. वाड्याच्या बाहेर व आत तुलसी वृंदावन असून वाड्यात दत्त मंदिर हि आहे .हे दत्त मंदिर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या वाड्याबरोबरच निर्माण केले. या वाड्याचा निम्मा भाग हा महाराजा यशवंतराव होळकर प्राथमिक शाळेस सन.१९९६ रोजी देण्यात आलेले आहे.

वाड्याच्या प्रवेशद्वारा पासून ते शेवटच्या भिंती पर्यंत होळकर वस्तूकलेचे दर्शन होते. त्या काळी केले जाणारे बांधकाम पाहून जीव थक होतो. या वाड्यावर खासगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंदोर(मध्यप्रदेश) यांचे नियंत्रण असते. या वाड्याच्या समोर होळकर कालीन विठ्ठल मंदिर आहे. हे विठ्ठल मंदिर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या वाड्याबरोबरच निर्माण केले.

ahilyabai-holkar-wada-jejuri
जेजुरी येथील होळकर वाडा. भविष्यात या वाड्यात Lodging सुरु होणार आहे.
ahilyabai-holkar-smark-jejuri-holkar-wada
वाड्याच्या आतील अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक.
Photo : Rahul

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) प्रतिसमाधी, जेजुरी:

इ. स. १७९० च्या सुमारास या समाधीची उभारणी पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. हि समाधी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते. पूर्वाभिमुख असलेल्या छत्री मंदिराचे बांधकाम अतिशय प्रमाणबद्ध व रेखीव असून मंदिराचे मंडप व गर्भगृह असे दोन प्राकार आहेत पैकी मंडपाचे छत घुमटाकार आहे व त्यावर आतील बाजूने चित्रे रंगविली आहेत. मंडपामध्ये वातानुविजनासाठी सुरेख कोरीव काम केलेल्या दगडी खिडक्या आहेत. गर्भगृहात लाकडी मेघडंबरीमध्ये खालील बाजूस संगमरवरी शिवलिंग असून मागील कट्ट्यावर मध्यभागी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची(प्रथम) संगमरवरी बैठी मूर्ती आहे, तर त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी गौतमाबाई व बनाबाई यांच्या मूर्ती आहेत.

मंदिरासमोर चौथ-यावर कोरीव नंदीचे भव्य शिल्प आहे, नंदीच्या गळ्यातील घंटा, साखळी व झुलीवरील नक्षी सुबकरित्या कोरलेली असून मंदिराच्या बाजूला द्वारकाबाई व बनाबाई यांच्या दोन स्मारक घुमटी आहेत. या स्मारक घुमटी अनुक्रमे सन १७७२ व सन १७७३ ला निर्माण केली आहेत.

malharrao-holkar-tomb-samadhi-jejuri
मल्हारराव होळकर यांची जेजुरी येथिल प्रतिसमाधी(मल्हारगौतमेश्वर छत्री मंदिर)
malhar-rao-holkar
गर्भगृहात असलेले सुभेदार मल्हारराव होळकर, गौतमाबाई व बनाबाई यांच्या संगमरवरी मूर्ती.
Photo : Rahul
ahilyabai-holkar-yanchi-marathi-mahiti
छत्री मंदिरासमोरील असलेले नंदीचे शिल्प.
Photo : Rahul
ahilyabai-dwarkabai-banbai-holkar-jejuri
छत्री मंदिराच्या बाजूला असलेले द्वारकाबाई व बनाबाई यांच्या घुमटी.
ahilyadevi-holkar-photo
छत्री मंदिराचा संपूर्ण फोटो.
Photo : Jejuri.net

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव, जेजुरी:

पाण्याने तुडुंब भरलेला तलाव, मावळतीला निघालेला सूर्य आणि पश्चिमेकडून येणा-या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेला जेजुरगड, पक्षांचा किलबिलाट असे मनाला प्रसन्नता देणारे विहंगम दृश्य मनाचा थकवा नाहीसा करते. भाविक आणि पर्यटकांच्या दृष्टीने जेजुरीतील सायंकाळ निवांत घालविण्यासाठी अतिशय रमणीय ठिकाण म्हणून ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलावाचा. श्री क्षेत्र जेजुरी नगररचनेचा, जल व्यवस्थापनेतील महत्वाचा दुवा म्हणजे १८ एकर क्षेत्रावर व्यापलेला होळकर तलाव, हा जलसाठा म्हणजे जेजुरी गावाच्या दृष्टीने अमृतकुंभच आहे. टेकडीच्या सोंडेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या तलावावर जेजुरी गावाचा पाणी पुरवठा वर्षानुवर्षे अवलंबून होता, आणि आजही या तलावातून झीरपणा-या पाण्यावर परिसरातील विहिरी व कूपनलिकांना पाण्याची कमतरता कधीच भासत नाही.

जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव व जननी तीर्थ बांधले, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली ज्याचा उपयोग यात्रा काळातील भाविकांच्या निवा-यासाठी होतो. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी आहेत.तलावाच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचे नियंत्रण करणा-या दटट्याची व्यवस्था आहे, तलावाचे पाणी भूमिगत नळाद्वारे गावातील तीन हौदाना व गायमुखाला(जननी तीर्थ) पुरविले जात होते.

ahilyabai-holkar-talaw-jejuri
जेजुरी येथील होळकर तलाव.
Photo : Rahul

जननी जलकुंड (गायमुख किवा चिलावती कुंड):

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलावाच्या बाजूला हे जलकुंड स्थित होते.या जलकुंडाचा पुननिर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर तलाव्या बरोबरच सन १७७० रोजी केला.होळकर तालाव्यातील पाणी भूमिगत नळाद्वारे या जलकुंडामध्ये जात असत. या जलकुंडामध्ये संगमरवरी चार गोमुखातून पाणी पडत असत म्हणून या कुंडाला गायमुख म्हणत असत.

बहुकोनी असलेल्या या जलकुंडास दोनी बाजूने प्रवेशद्वारे होती. त्याच बरोबर या जलकुंडात उतरण्यासाठी चारी बाजूने पायऱ्या होत्या.या जलकुंडाच्या चारी बाजूने संगमरवरी गोमुखे होती,या गोमुखातून जलकुंडात पाणी पडत असत . होळकर तालाव्यातील दट्ययाद्वारे या पाण्याचे भूमिगत नळांद्वारे नियंत्रण केले जात असत.हा एक अभियात्रीकेचा भाग होता. हे जलकुंडा नष्ट करून या जागी जेजुरी नगरपालिकेने सध्या भाविक निवास बांधलेले आहे.

पिटकेश्वर, ता.इंदापूर जि.पुणे

अहिल्यादेवी होळकर यांनी पिटकेश्वर येथे १८ व्या शतकात बांधलेल्या दगडी शिवलिंगाच्या आकाराच्या विहिरीचा आजही तेथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वापर करत आहेत. तेव्हापासून आतापर्यंतच्या अनेक दुष्काळात या ऐतिहासिक विहिरीने ग्रामस्थ, पशु पक्षांना कधीही पाणी कमी पडू दिले नाही.

पिटकेश्वर : अहिल्यादेवी बारव

१८ व्या शतकात अहिल्यादेवींनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला, नदीवर घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या व महत्त्वाच्या ठिकाणी शिवलिंग आकाराच्या विहिरी बांधल्या. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग पिटकेश्वर गावावरून होता. त्यामुळे अहिल्यादेवींनी याठिकाणी विहीर बांधली.

पिटकेश्वर : अहिल्यादेवी बारव

साधारण ५० फूट खोल असलेली हि विहीर दगडी कामात आखीव व रेखीव बांधलेली आहे. विहिरीच्या वरच्या बाजूला घोड्यांना तसेच जनावरांना पाणी पिण्यासाठी बांधलेला दगडी हौद व दगडी पाण्याचा पाट आजही सुरक्षित आहे.

दगडी हौद
दगडी पाण्याचा पाट

या बारवेचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणयुक्त अशा दगडात आहे. बारवेत उतरण्यासाठी एकाच बाजूने सोय आहे. बारवेत उतरताना दोन्ही बाजूला देवळ्या नजरेस पडतात. देवळ्यात शिवलिंग व नंदीची मूर्ती आहे.

देवळ्यात शिवलिंग व नंदीची मूर्ती

बारवेत पाण्याचे झरे अजूनही जिवंत आहेत. बारवेतील पाणी शेतीच्या उपयोगासाठी यावे म्हणून मोटेची सोया केलेली दिसते. या बारवेची दगडी कामात आखीव व रेखीव बांधलेली आहे.

हि बारव सध्या प्रसिद्धीस आली आहे ते तेथील दोन होळकरकालीन शिलालेखांमुळे. शिलालेख खालीलप्रमाणे,

शिलालेख क्रं.१ :

शिलालेखावरील उल्लेख खालीलप्रमाणे,

।।श्री।।
।।पिटकेश्वर येथील स्थ
ला वर वीहीर केली शालि
वाहन शके १७१० कीलक नाम
संवत्सर ।। श्री मल्लारि चरणी
तत्पर अहिल्याबाई होळकर नि
रंतर ।।

शिलालेख क्रं.२ :

शिलालेखावरील उल्लेख खालीलप्रमाणे,

।। श्री पिटकेश्वर चरणी तत्पर
अहिल्याबाई होळकर
निरंतर ।। श्री हरहार ।

यातील पहिल्या शिलालेखाच्या काळाचा उल्लेख आहे पण त्याची झीज झालेली असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. त्यातील पहिले दोन अंक दिसतात मात्र शेवटचे दिसत नाहीत. त्यातील पहिले दोन अंक दिसतात मात्र शेवटचे दिसत नाहीत. मात्र संवत्सराचे स्पष्ट्पणे कीलक नाम संवत्सर असे येत असल्याने कालगणनाचा विचार करता कीलक नाम हे शके १७१० ला येते म्हणजेच सन १७८८ च्या दरम्यान या बारवेचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे अस्पष्ट दिसणाऱ्या लेखातही ते असावा असा अंदाज बांधता येतो.

बारवेच्या कडेने सुरक्षित जाळी

दुसरा लेख कालविहीन असला तरी तोही त्याच काळात कोरला गेला असावा हे स्पष्ट होते. होळकरांचे आजवर उजेडात न आलेल्या शिलालेखांपैकी हे दोन कोरीव शिलालेख आहेत. तसेच ग्रामस्थ मंडळींनी काही दिवासांपूर्वी या बारवेच्या कडेने सुरक्षित जाळी उभारली आहे.

आभार : श्री. श्रीकांत करे


खंडोबा बिल्केश्वर मंदिर, अंबड, ता.अंबड जि.जालना

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

अंबड, ता.अंबड जि.जालना(महा.): अंबड हे पन्नास हजार लोकसंख्येचे शहर.या शहराचे पुनर्निर्माण गौतमाबाईसाहेब होळकर यांनी केलेले आहे. हे शहर खाजगी च्या जहागिरीसाठी पहिले बाजीराव पेशवे यांनी गौतमाबाईसाहेबांना दिलेले शहर. त्यांनी या छोट्याशा खेड्याचे शहरात रूपांतर केले. त्यांच्यानंतर या शहराच्या विकासाचे कार्य अहिल्यादेवींच्या हाती आले, त्यांनी लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी या शहरात छोट्या-मोठ्या मिळून ४० बारवा बांधल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी १७६१-१७६७ पर्यंत खंडोबा बिल्केश्वर या मंदिराचे निर्माण केले व सुभेदार तुकोजी होळकरांनी(पहिले) या मंदिरास बळकट केले.

या गावात या मंदिराला प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जात परंतु या मंदिराला नावलौकिक मिळालेला नसल्याने भाविक भक्तापासुन हे मंदिर वंचित राहीलेले दिसते या मंदिराच्या वास्तुस्थापत्य हेमाडपंथी असुन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे आपल्याला पाहता येईल.

मंदिरात खंडोबाच्या मूर्ती समोर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, या शिवलिंगावर केलेल्या अभिषेकाचे जल बाहेर नेण्यासाठी भुयारी मार्ग तयार केलेला आहे व ते जल गोमुखातुन बाहेर येते.

khandoba temple ambad
मंदिरातील देवाची मूर्ती
मंदिरातील शिवलिंग
जल बाहेर जाण्यासाठी असलेला आतील मार्ग

या मंदिराला वेगवेगळ्या शैलीचे छोटे-मोठे ७ कळस पाहण्याजोगे आहेत. या मंदिरात सूर्यनारायनाची, रेणुकादेवीची, चित्रगुप्ताची मूर्ती आहे. या मंदिरात कुठेही न पहायला मिळणारी गणपती आणि हनुमानाची सोबतच आहे. या मंदिरात सुभेदार तुकोजीराव होळकरांचे वैयक्तिक चंदनाचे देवघर आहे. या मंदिरात तिन्ही मुर्त्याच्या अभिषेकाचे पाणी एकाच गोमुखातून निघण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे संत मानिकदास यांची समाधी आपल्यास पाहायला मिळते.

मंदिराचे कळस
मंदिरातील सूर्यनारायन
renuka murti khandoba temple ambad
रेणुकामाता मंदिर
चित्रगुप्ताची मूर्ती

मंदिर सुबक आणि आकर्षक आहे छतावर जाण्यासाठी चार दिशेला चार रस्ते आहेत तर मंदिराच्या खालुन एक भुयार आणि दगडी लादणी तर पाण्यासाठी जमीनीखाली दगडाचा गोल हौद व त्याव दगडाचे गोल झाकन आहे. मंदिरात अंतर्गत पाणी व्यवस्थापन केलेले आहे तर दोन दिपमाळ आणि देवीचे वाहन मंदिराचे आकर्षण आहे.

दगडी हौद
दीपमाळ

तर मंदिराच्या समोर असलेल्या महालाबद्दल ऐतिहासिक पत्र उपलब्ध असुन तो महाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पतीस कुंभेरी येथे युध्दात वीरगती मिळाल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने पुत्र युवराज मालेराव होळकर यासं अंबडचा महाल दिल्याची नोंद संदर्भिय पत्रात उपलब्ध आहे.

देवीचे वाहन व्याल

मराठी फौजेचे सेनापती सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव शुरवीर खंडेराव होळकर दि. ८ जानेवारी १७५४ रोजी दिल्लीच्या बादशहाचा निरोप घेऊन निघाले होते तर दुसरीकडे खंडणीच्या वसुलीसाठी मराठ्यांच्या फौजांनी दि. २० जानेवारी १७५४ कुम्भेरीचा (जि भरतपुर राजस्थान ) जाटराजा महाराज सुरजमल जाटच्या किल्ल्याला वेढा घातला होता पंरतु कुंभेरीचा राजा एक कोटी रुपयाची खंडणी देण्यास तयार होत नसल्याने बाहेरुन किल्ल्यावर जाणारी रसद मराठी फौजेचे सेनापती सुभेदार मल्हारराव होळकर यांनी रोखली होती.

nandi
मेघडंबरीमधील नंदी

मार्च महिना उजाडुन दोन आठवडे उलटले तरी महाराज सुरजमल जाट तयार होत नव्हता शेवटी किल्ल्यावरील धान्यसाठा संपल्याने त्यांनी युध्दाचा निर्णय घेतला आणि मराठे जाट युध्द सुरु झाले युध्दाची बातमी शुरवीर खंडेराव महाराज यांना समजल्यानंतर ते मथुरेहुन १५ व १६ मार्च रोजी कुंभेरीकडे निघाले.

gvaksh
दुसऱ्या मजल्यावरील गवाक्ष

१७ मार्च १७५४ ला ते कुंभेरीला जवळ होळकरांची छावणी असलेल्या गांगरसोली या ठिकाणी पोहचले होते छावणीत येताच पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी त्यांना जेवायचे ताट वाढले ते घास तोडांत घालणार ऐवढ्यात एक दासी शामीयान्यात धावत आली तिने महाराज खंडेरावांना मुजरा करीत कुंभेरीच्या युध्दभुमीत सुभेदारांना शत्रुनी वेढा घातला असल्याची माहिती दिली वेळ दुपारची होती हातातल्या घासाचे व भरल्या ताटाचे दर्शन घेतले आणि अहिल्यादेवीकडुन समशेर घेत रणमैदानावर दिल्लीच्या बादशहाने दिलेली अफगाणी तलवार अशा दोन्ही तलवार घेवुन महाराज खंडेराव पोहचले होते.

पुढे सुभेदार मल्हारबाबा शत्रुच्या वेढ्यात हातातल्या भाल्याने लढत होते पुढे होवुन खंडेरावांनी वेढा सोडला आणि शत्रु सैन्याला हाततल्या दोन्ही तलवारीच्या घावाने कापन सुरु केले होते यामुळे सुभेदारांच्या भोवतालचा वेढा सुटला होता महाराज खंडेरावांनी आपले वडील सुभेदार मल्हारबाबांच्या जवळ जावुन त्यांच्या पायाला हात लावुन घोड्यावरुनच दर्शन घेतले आणि दोघेही लढु लागले.

कधीही युध्दात न हारलेल्या माझ्या पित्याला वेढा घालुन मारण्याआधी मला पराजित करा असे ओरडुन महाराज खंडेराव होळकर किल्ल्याच्या दिशेने शत्रुंची फौज कापीत निघाले त्यांच्या या आवेशाने शत्रुत घबराट निर्माण झाली होती किल्ल्याचे रक्षण करणा-या लोकात खंडेरावांच्या तलवारीची जरब बसली होती.

हातातल्या तलवारीने मारीत किल्ल्याच्या दिशेने येणा-या खंडेरावांकडे किल्ल्यावर असलेल्या महाराज सुरजमल जाटाचे लक्ष गेले आणि किल्ल्या वरील तोफदांजांना तो म्हणाला कि खंडेरावाला थांबवा पंरतु तोफगोळ्याच्या मधुन खंडेराव पुढे पुढे येत असल्याचे पाहुन सुरजमल जाटांनी आपल्या तोफंदाजांना खडसावले अरे ह्या तोफा आहेत का चिलमी तीनही तोफांचा मारा करा खंडेराव थांबवा वरुन किल्ल्यावरून तीन ही तोफा खंडेरांवांच्या दिशेने आग ओकु लागल्या शेवटी घात झाला एक तोफगोळा महाराज खंडेराव होळकरांच्या छातीला लागला आणि महाराज खंडेराव तिथेच कामी आले.

गागरसोल, ता.कुंभेरी जि.भरतपूर(राजस्थान)
येथील खंडेराव होळकर यांची मुख्य समाधी.

त्यांचा मृत्यु झाला होता खंडेरावाचा झालेला मृत्यु पाहुन सुरजमलाने युध्द थांबवले व तो किल्ला सोडुन पळुन गेला खंडेरावांच्या मृत्युची बातमी छावणीत जाताच एकच आक्रोश झाला रडारड सुरु झाली आयुष्याच्या शेवटपर्यत अनेक दुख भोगलेला सुभेदार पिता त्या युध्दभुमीवर एकुलत्या एक मुलगा व होळकर दौलतीच्या वारशाचे पडलेले पार्थीव मांडीवर घेवुन लहान मुला सारखा ढसा ढसा रडत होता छावणीत पुण्यश्लोक अहील्यादेवी व नऊ सवती रडत होत्या आक्रोश करीत होत्या तर महाराज खंडेराव अहिल्यादेवींचे दोन मुल छोटा मालेराव व मुक्ता तो आक्रोश पाहुन रडत बसली होती.

शुरवीर शहीद खंडेराव महारांजाचे पार्थिव गांगरसौली येथील छावणीत आणले सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली होती. अहिल्यादेवीसह इतर नऊ बायका सती जाण्यासाठी पांढरे वस्त्र धारण करु लागल्या सजलेले पार्थिव चंदनाच्या लाकडाने रचलेल्या चितेवर ठेवले आणि अहिल्यादेवी सती निघाल्याचे पाहुन सुभेदारांना अती दुख झाले ते पुढं झाले आणि सती जाणा-या अहिल्यादेवीना विनंती करु लागले कि पोरी मी पिकलेलं पान आहे कधीही गळुन पडेल.

मंदिराचा दुसरा मजला

ही छोटी निरागस मालेराव व मुक्ता बघ पंरतु रितीरिवाजाचे पालन झालेच पाहीजे म्हणुन अहिल्यादेवी निश्चयावर ठाम राहत मुक्ता व मालेरावांने पायाला घातलेली मिठी सोडवीत चितेकडे निघाल्या शेवटी मल्हारबाबा आडवे झाले आणि त्यांनी अहिल्यादेवींना सांगीतले की ह्या होळकर गादीचा वारस गेला आहे पंरतु या रणमैदानावर माझा खंडु मेला नसुन माझी अहिल्या मेली असे समजतो आणि तुझ्यात माझा खंडु आहे असे समजतो हा कारभार तुला सांभाळायचा आहे या दौलतीला आणि इंदौरला तुझी गरज आहे म्हणुन सती जावु नको असं शेवटचं सागुंन ढसा ढसा रडणा-या त्या पितृतुल्य सास-यांची अवस्था बघुन अहिल्यादेवीनी सती जाण्याचा निश्चय रद्द केला.

त्यांच्याऐवजी कुवंर साहब रमजानी सह इतर बायका महाराज खंडेराव होळकरासोबत सती गेल्या त्यांची चिता पेटल्यानंतर महाराज खंडेराव होळकर यांचे इमानी श्वान गुलबदन त्या पेटलेल्या चितेत उडी घेवुन स्वतःला अग्नीच्या हवाली केले.

मंदिराचे प्रवेशद्वार

ह्या घटनेची माहिती दिल्लीचा बालशहा यास समजल्यानंतर त्यास दुःख झाले व त्यांच्या क्षेत्रात महाराज खंडेरावांचा युध्दात मृत्यु झाल्याने चोळी बांगडीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वेरुळ घृष्णेश्वर चा परगणा देवुन पुत्र मालेराव यास अंबडचा महाल (खंडोबा मंदिरा समोरची होळकर हवेली)दि. १६ जुन १७५४ रोजी दिली व या महालाच्या देखभाल दुरुस्तीसाठी (अंबड, वाघलखेडा, एकलहेरा) आदी गावात १०० एकर जमीन इनाम दिली तर पुणे येथुन श्रीमंत पेशवे यांनी खंडेरावांच्या उत्तर क्रियेकरिता एक लक्ष रुपये दिले व सुरजमल जाटाने कुंभेरी येथे खंडेरावांच्या छत्रीकरीता गांगरसोली, तमरेल, सहत वगैरे १५४२७ उत्पन्नाची गावे व मिठागर ही खर्चाकरिता लावुन दिल्या.

anya mandire
मंदिरातील अन्य मंदिरे

दिल्लीच्या बादशहाने सुभेदार मल्हारराव होळकर यांना झालेल्या पुत्रवियोगाचे दुःख सांत्वन पर पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की शुरवीर खंडेराव पराक्रमी होते त्यांच्यात मराठी अस्मितेचे प्रचंड तेज होते त्यांच्या स्वाभिमानापुढे दिल्लीचे तख्त हे सन्मानाने झुकले होते त्यांच्या मुत्सदीपणा आम्ही अनुभवला असुन अशा लढवय्या पुत्राचा मला अभिमान असुन त्याच्या निधनाचे मला दुःख झालेआहे या दुःखातुन तुम्हाला सावरण्याची इश्वर शक्ती देवो तसेच माझ्या क्षेत्रात त्यास विरमरण आल्याने त्यांच्या साहसाचे आदर करीत वेरुळचा परगणा वअंबड महाल दिला आहे.

असा इतिहास अंबडच्या होळकर महालाचा असुन त्याचे उत्पन्न मोठे होते तो महाल होळकरांना मिळाल्यावर उत्पन्नात वाढ झाली होती वर्षानुवर्ष या महालातुन मोठे उत्पन्न होळकरांना मिळत होते अशा या महालाची प्रचंड दुरावस्था आज झाली असुन तो दिव्य मालेरावांचा महाल शेवटची घटका मोजीत आहे त्याची शासन दरबारी सिटी सर्वे क्रमांक १३६० क्षेत्र ४६५.५ अशी नोंद असली तरी त्यावर होळकर ऐवजी इतरा लोकांचे नाव आहे तो महाल जरी इतिहासात होळकरांचा असला तरी त्यावर अवैध कब्जा झालेला असुन पडलेल्या त्या महालाच्या दगडी भिंती, बुरुज ,स्वागत कमान इतिहासाची आज ही साक्ष देतात.

या महालाच्या देखभालीसाठी भागोजी पाटील गवारे यांना नियुक्त केले होते मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यास शासन केल्याचा उल्लेख पत्रात मिळतो. पत्र क्र.१० – सदनाजी भगोरे यांचा अर्ज की भागोजी गवारे कैलासवासी मालेराव बाबांचे खिदमतगार होते त्यांचा काळ जाहल्यावर ते न पुसता गेले यावर अंतर पडले .धरमपुरी मुक्कामी साहेबांनी धरुन शासन केले त्यात आता अंतर पडणार नाही जामीनाविषयी आज्ञा झाली त्यास मी जामीनदार जाहलो आता वावगी वर्तणुक करनार नाही.

वरिल मजकुराचे पत्र भागोजी गवारे यांचे वतीशे सन १७८५ ला सदनाजी भगोरे यांनी महाराज तुकोजीराजे होळकर यांना लिहले आहे. या पत्राचा आपन असा अर्थ घेवु शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पती महाराज खंडेराव वारल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने त्यांचे पुत्र युवराज मालेरावबाबा यांना अंबड चा महाल दिला होता.

सदरील महालाचे खिदमतगार अंबड येथील भागोजी पाटील गवारे हे होते. युवराज मालेराव होळकर यांच्या मृत्युनंतर भागोजी गवारे यांनी होळकर सरकारला महालाची माहिती न देता त्याकडे दुर्लक्ष केल्याने धरमपुरी अर्थात पैठण येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मुक्कामी असता त्यांनी भागोजी गवारे यांना त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा दिली होती पंरतु पुन्हा असे दुर्लक्ष होणार नाही याची हमी घेवुन मी भागोजी गवारे यांचा जामीनदार झालो असल्याबाबतचे सदनाजी भगोरे यांनी पत्रात म्हटले आहे. सदरील पत्राचा उल्लेख होळकर शाहीचा इतिहास या पुस्तकात आहे. अशा या मंदिर व महालाचे होळकरांच्या राजवैभवात मोठे महत्व आहे.

अशी हि होळकरकालीन वस्तू आयुष्यात नक्की पहिली पाहिजे. अंबड हे तालुक्याचे ठिकाण असल्यामूळे तेथे मुक्कामाची व जेवणाची सोय सहज होऊ शकते.

राणी अहिल्यादेवी व सांगलीकरांचे ऋणानूबंध 

मधुकर हाक्के इतिहास व लोकसाहित्य संशोधक,सांगली. MSW(Masters in Social Work)

सांगली म्हणलं की प्रथम डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कृष्णामाईचा घाट, आयर्विन पुल आणि कृष्णा तीरावर वसलेले संपूर्ण सांगलीकरांच्या जिव्हाळ्याच ठिकाण म्हणजे श्री गणपती मंदिर. पटवर्धन सरकार यांच्या काळात बांधलेले हे मंदिर सांगलीकरांच्या मनात एक वेगळेच घर करून आहे.

जेवढे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे तितकेच त्याचा इतिहास ही रंजक असाच आहे. इस सन १८११ मध्ये थोरले चिंतामणराव म्हणजेच आप्पासाहेब पटवर्धन यांनी मंदिर बांधण्यास सुरवात केली व इ.स. १८४३ मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले.

परंतु हे मंदिर पूर्ण होण्यासाठी सर्वात महत्वाचे योगदान आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे. त्याला कारण असे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे रेवाडेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले होते. अतिशय सुंदर असे हे मंदिर अहिल्या देवी यांनी बांधले असून तेथे अहिल्यादेवी होळकर यांनी अन्नछत्र देखील चालु केले होते.

आज ही हे मंदिर सुस्थितीमध्ये असून पाहण्यासारखे आहे. तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरापैकी काही संगमरवरी दगड शिल्लक होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पश्चात त्या काही शिल्लक दगडांपैकी एक दगड श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांनी मिळवला व स्थानिक पाथरवट भिमाण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांनी त्या दगडापासून सुबक अश्या गणपती व रिध्दि सिध्दी च्या मूर्ती बनवून घेतल्या.

संगमरवरी दगडापासून बनवलेल्या गणपती व रिद्धी-सिद्धीच्या मुर्त्या

आज ज्या सुबक व सुंदर मूर्ती आपण पाहतो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची देण आहे असे म्हणलं तरी काही वावगे ठरणार नाही.

संदर्भ
1.सांगली संस्थान चे संस्थापक थोरले अप्पासाहेब यांच चरित्र – गोविंद कुंटे
2.तन्वी श्यामा – वि का राजवाडे
3.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य

होळकरकालीन राजराजेश्वर मंदिर - वाफगाव 

ahilyabai-holkar
होळकरकालीन श्री राजराजेश्वर महादेव मंदिर, वाफगाव. 

वाफगाव येथील होळकरकालीन किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीचे भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे.

ahilyabai-holkar
दगडी मेघडबरीमध्ये असलेले नंदीचे भव्य शिल्प
ahilyabai-holkar
हेमाडपंथी राजराजेश्वराचे मंदिर

हे मंदिर बंदिस्त स्वरुपात आहे. हे मंदिर पाहिल्यावर आपणास होळकर कालीन रेखीव व सुरेख दगडी कामाचा बोध होतो. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते.

ahilyabai-holkar
मंदिराच्या चारही बाजूने असलेला भक्कम कोट, फोटो : साकेत भाटे

मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर “तुकोजी होळ” अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपी पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते.

ahilyabai-holkar
मंदिरातील कलशावर असलेले “तुकोजी होळ” अक्षर
ahilyabai-holkar
मंदिरातील शिवपिंड





होळकर वाडा : पंढरपूर 

भारतामधील महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. सोलापूरपासून पश्चिमेस ७१ कि. मी अंतरावर भीमा नदीच्या (चंद्रभागा) उजव्या तीरावर पंढरपूर वसले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. पंढरपूरला पंढरी असेही म्हटले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात.

श्रीमंत होळकर सरकार वाडा, पंढरपूर

क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालीवाहन वंशातल्या प्रतिष्ठित राजाने या देवळाचा इ.स. ८३ मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूलत: शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय त्यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात. अशा या प्राचीन इतिहास असलेल्या पंढरपुरात अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आहे. त्या वाड्याला श्रीमंत होळकर सरकार वाडा म्हणून ओळखले जाते. आज त्यालाच देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट म्हटले जाते.

अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्री शिक्षण फारसे प्रचिलत नसतानाही त्यांच्या वडिलांनी लिहण्या वाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचा एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे सुभेदार होते. ते पुण्यास जाताना चौंडी येथे थांबले होते.

आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वत:चा
मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार पहात असत. मल्हारराव होळकरांनी मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींना सती जावू दिले नाही. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्यादेवीनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५ म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणी नदीघाट बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक तीर्थक्षेत्र, धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्यादेवी वारंवार तीर्थक्षेत्र पंढरपूरला भेट देत असत. त्यावेळी त्यांनी बांधलेला राजवाडा अजूनही त्यांच्या पुण्याईची साक्ष देतो आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपूर येथे जो टोलेजंग वाडा बांधला तो अजूनही सुस्थितित आहे. होळकरांचा हा वाडा साधारणपणे दोन एकर जागेमध्ये बांधलेला आहे. होळकर वाडा हा दुमजली असून सध्या वरच्या मजल्यावरील काही भाग ढासळलेला असला तरी बाकी बांधकाम सुस्थितीत आहे. या वाड्याची समोरील बाजू साधारणपणे ६०० फूट लांब तर रुंदी ३०० फूट इतकी आहे.

इतिहास :

सन १७५४ मध्ये या वाड्याच्या पायाभरणीला प्रारंभ झाला. १३ वर्ष या वाड्याचे बांधकाम सुरु होते. वाड्यासाठी लागणारे सागाचे लाकूड मध्यप्रदेश राज्यातील जंगलामधून पंढरपूर येथे आणली होती. हि लाकडे नर्मदा नदीत टाकून नंतर ती गुजरात जवळच्या समुद्रात येत होती, नंतर रत्नागिरी समुद्राजवळ पोहचलेली हि लाकडे पाण्यातून बाहेर काढून हत्तीच्या पाठीवर टाकून पंढरपूर येथे आणली गेली. वाड्याच्या बांधकामासाठी चुना वापरला आहे. चुना तयार करीत असताना भोकरीचे बी, पिंपळाचा डिंक, बिब्याचे द्रावण, कापूस इ. साहित्य त्यामध्ये घातले जात होते. चुना चांगल्या प्रतीचा तयार व्हावा म्ह्णून घोटला जात होता. चुना चांगल्या प्रतीचा तयार झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पद्धत वापरली जात असत. मोठ्या लोंखडी कायली मध्ये पाणी भरून त्यात उंचावरून चुन्याचा गोळा टाकला जात असे. तो फुटला नाही तर पक्का चुना तयार झाला आहे असे मानले जात होते.

वाड्याचा वास्तूशांती समारंभ कार्यक्रम चेत्र शुद्ध प्रतिपदा(पाडवा), सन १७६७ ला झाला. सदरचा वाडा दोन मजली आहे . तळातील मजल्यात ११ व वरच्या मजल्यावर ५ अशा एकूण १६ खोल्या आहेत. वाड्यात भव्य तळघर हि आहे. या वाड्यामध्ये दक्षिणेला राममंदिर स्थापन केले आहे. या मंदिरातील शिवपिंडीभोवती ११ छोटे शिवलिंग व गरुड आहेत. बारकाईने हा वाडा पहिला तर तो एक किल्ल्याप्रमाणे दिसतो. वाड्याला भव्य, उंच आणि दणकट अशी तटबंदी आहे. तो काळ लढाईच्या घामघुमीचा असल्याने वाड्याच्या संरक्षणासाठी सेन्य मुक्काम ठोकून होते. विठ्ठल दर्शनासाठी आल्यावर उतरण्याची व्यवस्था चांगली व्हावी व आपल्या मुक्कामा व्यतिरिक्त वारकरी लोकांची राहण्याची सोया व्हावी म्हणून हा वाडा राणी अहिल्यादेवी यांनी बांधला.

वाड्यामधील असलेले अहिल्यादेवींचे स्मारक

सन १७६७ ते १९६६ पर्यंत या वाड्यात अन्नधर्म व दानधर्म चालत होता. त्याचा खर्च संस्थान देत होते. अन्नछत्रात गोसावी, बेरागी, आंधळे, पांगळे व गरीब लोक जेवण करीत होते. या वाडयाच्या वास्तूशांतीच्या वेळी राणी अहिल्यादेवी होळकर स्वतः पंढरपूरमध्ये होत्या. या समारंभास अनेक सरदार व छत्रपतीही उपस्थित होते. आजही चंद्रभागा नदीच्या तीरावर पूर्वीचे वैभव, दानधर्म व सांस्कृतिक समन्वयाचे ठिकाण म्हणून हा वाडा सुस्थितीत उभा आहे. येथील वाड्याची व्यवस्था होळकर संस्थानचे वतीने बडवे यांचे नातेवाईक पाहतात.

येथील रुक्मिणी मंदिरास राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सोन्याचा कमर पट्टा व अनेक हिऱ्या मोत्याचे दागीने, चांदीची भांडी दान केली. त्या भांड्यावर “सर्व सुख विठ्ठलापायी जाणे होळकर अहिल्याबाई” असे लिहिले आहे. विठ्ठल मंदिरच्या पाठीमागील बाजूस वारकर्यांची पाण्याची सोया व्हावी म्हणुन बारवेचा निर्माण केला ती बारव पेशवा बारव म्हणून ओळखली जाते तसेच आषाडी वारीमध्ये वारकर्यांची पाण्याची सोया व्हावी म्हणून आळंदी, देहू ते पंढरपूर मार्गावर अनेक बारावा निर्माण केल्या.

वाखारी येथे सर्व पालख्या एकत्र येतात व तेथे सर्व संतांच्या पादुकांना तेथील बारवेच्या पाण्याने स्नान घातले जाते व त्या बारवेचा निर्माण पण राणी अहिल्यादेवी यांनीच केला. ती बारव पहिले बाजीराव पेशवा यांच्या समरणार्थ राणी अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केली होती म्हणून त्या बारवेला बाजीराव बारव असे ओळखले जाते. याप्रमाने वारकरी संप्रदायाच्या उद्धारासाठी राणी अहिल्यादेवी यांनी कार्य केले.

प्रवेशद्वार :

होळकरांच्या वाड्याला एकूण चार प्रवेशद्वारे आहेत. पश्चिम दिशेला वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असून ते २० ते २५ फूट उंचीचे आहे. या प्रवेशद्वाराचे बांधकाम दगड व विटांचे आकर्षक डिझाईन करुन ते डौलदार बनविले आहे. या प्रवेशद्वाराचे १५ फुटा पर्यंतच्या बांधकामात दगडी स्तंभ एकामागे एक आल्याने दगडी कप्पे तयार झाले आहेत व वरती आडव्या पद्धतीने विटांचे बांधकाम करून त्यावर कोनाकृती वीटांची नक्षी तयार केलेली आहे. प्रवेशद्वाराचा चौकट व दरवाजा लाकडी स्वरुपाचा असून चौकटीवर सुंदर लाकडामधील बेलबुट्टीचे नक्षीकाम पहायला मिळते. दरवाजाला एकात एक अशा तीन चौकटी दिसून येतात. त्यामुळे तो आणखी मजबूत वाटतो. मधली चौकट सपाट असून बाहेरील व आतल्या चौकटीच्या वरील भागात नक्षीकाम केलेले आहे.

होळकर वाड्याचे मुख्य द्वार
होळकर वाड्याचे मुख्य द्वार

वाड्याचे दूसरे प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पूर्वेला असून ते मुख्य प्रवेशद्वारापेक्षा लहान आहे. या प्रवेशद्वारातून पाहिले असता पुढे चंद्रभागा नदीचे दर्शन होते. या प्रवेशद्वाराची उंची साधारणपणे ७ फुट आहे.

वाड्याचे दूसरे प्रवेशद्वार

अहिल्याबाई होळकर यांनी ज्यावेळेस वाड्याचे बांधकाम सुरू केले त्यावेळी वाड्यामध्ये शिवाचे मंदिर बांधण्याचे ठरविले होते. परंतु खोदकामावेळी श्री हनुमानाची हात जोडलेली स्वयंभू मूर्ती सापडल्याने अहिल्यादेवींनी वाड्यात राममंदिर बांधले. या राम मंदिरासाठी दक्षिणेला बाहेरून प्रवेशद्वार ठेवण्यात आले.

नदीमार्गावरील, वाड्याचे तिसरे प्रवेशद्वार

मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला खोल्या आहेत. बाहेरील बाजूंनी पहिल्या मजल्यावरील विटांच्या बांधकामात बांधलेले झरोके खिडक्या दिसून येतात. त्याची कमानयुक्त नक्षीकाम लक्ष वेधून घेते.

वाड्यातील अंतर्गत रचना :

मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रवेशद्वाराच्या आतून आगळ लावण्याची जागा आहे. दोन्ही बाजूस(उत्तर व दक्षिण बाजूस) ढाळज असून याचे मोजमाप १० फूट रुंद आणि २५ फूट लांब आहे. या ढाळजेला लागूनच दक्षिणेला राम मंदिराची भिंत येते तर उत्तरेला खोल्या आहेत. त्याला बैठकीची खोली म्हणतात. ढाळजेच्या जोत्याची उंची तीन फूट आहे. पुढे कमान आहे व एक मोठा चौक आहे. कमानीतून आत आल्यावर समोर पूर्व बाजूस आणखी एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस १०€*१० (लांबी * रुंदी) च्या दोन-दोन खोल्या आहेत तर आतील बाजूस दगडी कमान आहे. या प्रवेशद्वाराचे जोते देखील तीन फूट इतके उंचीचे आहे.

मधल्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर प्रवेशद्वाराच्या समोर ३५ फूट लांब (उत्तर-दक्षिण) व २५ फूट रुंदी (पूर्व-पश्चिम) असलेला आयताकार चौक लागतो. या चौकाच्या तळमजल्याचा भाग फारसबंदी आहे. चौकाच्या चारी बाजूंनी तीन फूट उंचीचा चौथरा आहे. या दोन्हीच्या मध्ये खालील चौकात दगडी भुयारी गटारांची व्यवस्था केलेली आहे. या चौकात पश्चिम बाजूस मागील प्रवेशद्वाराजवळ स्नानगृह व शौचालय बांधलेले आहे. या मध्यभागी असणाऱ्या चौकाच्या चारी बाजूंनी जो चौथरा आहे या चौथऱ्याच्या बांधकामात पूर्ण लाकडी स्तंभाचा वापर केलेला दिसतो. हा वाद दोन माजली आहे.

वाड्याच्या आत असलेला आयताकार चौक
दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग
वाड्याचा दुसरा मजला

होळकर वाड्यातील काष्ठशिल्पाचे स्थापत्य शास्त्रीय बारकावे :

लाकडाचा वापर हा जगभरात केला जातो. यामुळे मानवाच्या सांस्कृतिक जडणघडण संबंधीचे अनेक धागेदोरे मिळतात. लाकडाचा वापर माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता तेव्हा पासून ते आजतागायत होत आहे. मध्ययुगीन काळात मोठाल्या इमारतीमुळे लाकडी कामास खूप वाव मिळाला. या निवासी इमारतीत विविध विभाग असत, त्यात कचेरी, दिवाणखाना, नौबतखाना, खलबतखाना, हमामखाना व दौलतखाना असे अनेक विविध भाग असत. लाकूड हे सजावटीचे बनू लागले. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर उच्चप्रतीचे लाकडी कोरीव काम होवू लागले. या लाकडी कोरीव कामाच्या प्रतीवर एखाद्या वाड्याच्या मालकांची (वतनदारांची, सरदारांची, सावकारांची) इभ्रत समाजात ठरू लागली.

होळकर वाड्यातील काष्ठशिल्प

पंढरपूर येथील होळकर वाड्याच्या सजावटीमध्ये काष्ठशिल्पाचा उपयोग केला आहे. स्तंभ(खांब), हस्त, दरवाजे व चौकटी यावरती लाकडी कोरीव काम केलेले दिसून येते.

दरवाजे / दाराच्या चौकटी :

वाड्याचा दर्शनी भाग उठावदार व इतर भागापेक्षा जास्त आकर्षक आहे. प्रवेशद्वाराचा मुख्य दरवाजा मोठा व मजबूत आहे. प्रवेशद्वार हे सपाट लाकडी फळ्या व त्यावर लाकडी चौकोनी तुकडे वापरून केलेले चौकोन हे आकर्षक तर दिसतातच परंतु त्यामुळे दरवाजाला आणखी भक्कमपणा प्राप्त झालेला दिसून येतो. वाड्याच्या आतील खोल्यांचे दरवाजे देखील अशाच प्रकारचे तयार केलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला तीन लाकडी चौकटी बसविलेल्या आहेत. या लाकडी चौकटींच्या ललाटाचा भागात काष्ठशिल्पे कोरलेली असल्याने ते सुंदर दिसतात. आतील खोल्यांच्या चौकटींच्या ललाटावर काष्ठशिल्पांबरोबरच गणेशमूर्ती देखील कोरलेल्या आहेत.

खिडक्या :

सर्वसाधारणपणे मध्ययुगीन वाड्यामध्ये खिडक्यांची रचना नसे, फक्त लहान झरोखे प्रकाश हवेसाठी सोडले जात. याच्या रचनेमागचा हेतू म्हणजे सुरक्षितता होय. तळमजल्याचा विचार करता एकही खिडकी या मजल्यावर सोडल्या जात नसे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती साधारणपणे खिडक्या सोडल्या जात असत, त्यास झरोखा दर्शन असे म्हटले जात. होळकरांच्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वरचा भाग पडलेला आहे. परंतु त्या जागेत झरोखा दर्शन होते. तसेच त्यालगत या वाड्याच्या ज्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीतून एक-एक झरोखा दर्शन / खिडक्या आहेत. या खिडक्या बाहेरील बाजूने आकर्षक दिसतात.
खिडक्यांच्या दोन्ही बाजूने दोन मातीचे स्तंभ व त्यावर कमान आहे. अशाच प्रकारच्या खिडक्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर पूर्व-पश्चिम व दक्षिणेला दिसून येतात.

वाड्यात असलेले खांब

खांब (स्तंभ) :

होळकर वाड्यात प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला ढाळज व पुढे चौक आहे, ढाळजे मध्ये मजबूत खांबाच्या योजना केलेली आहे. परंतु सध्या हे खांब बांधकामात झाकले गेले आहेत. खांब हे दोन प्रकारचे असतात. गुजराती किंवा मुघल किंवा दिल्ली (मुसलमानी पद्धती) गुजराती शैलीचे खांब चौकोनी आकाराचे असतात. हा चौकोनी खांब खालून मध्यापर्यंत जवळपास साधा असतो. अनेक पारंपरिक फुला-पानांच्या कोरीव कामाने ही खांबे मध्यापासून वर पर्यंत सजविलेले असतात. वर चढत जाणारी वेल व त्याचा शेवट हा मोराच्या रचनेने केलेला असतो. यानंतर स्तंभशीर्ष येते, या स्तंभशीर्षावर अतिशय सुंदर मोर, फुले किंवा भौमतिकी आकृत्या सुबकपणे कोरलेल्या आढळतात. होळकरांच्या वाड्यातील स्तंभशीर्षावर वेलबट्टी, मण्यांची माळ, फुले फारच कौशल्याने कोरलेले आहेत. या स्तंभावरूनही त्यांची सौंदर्यदृष्टी व वास्तूंचा शैली प्रकार ठरविण्यास मदत होते.

दिल्ली शैलीतील गोलाकार खांब खालून फुगीर व वरती थोडे कमी फुगीर अशी असते. यावर अनेक टोकदार झाडांच्या पानाची रचना कोरलेली असते. खांबाच्या खालच्या बाजूस एखाद्या कुंड्याची रचना तयार केलेली असते(कोरलेली असते). यात दोन कमळे आतील बाजूंना झुकल्यासारखी दर्शविली जातात. वरील बारीक होत जाणारा खांब शक्यतो साधा ठेवलेला असतो. दिल्ली शैली ही सुरू किंवा सायप्रस या नावाने ओळखली जाते. हे सुरुदार खांब प्रामुख्याने दगडी नक्षीदार तळखड्यावर बसविलेले असतात. या तळखड्यावर वेलपल्ली, कमल पुष्प, कमलकालीका असतात. दिल्ली शैलीतील स्तंभांचा प्रभाव या वाड्यातील झरोखा दर्शन/खिडक्याच्या बाहेरील रचनेत तयार केलेल्या स्तंभावर दिसून येते.

सर :

सर हे भार सहन करणारे मुख्य घटक आहेत. म्हणून त्यांच्यावर कोरीव काम केले जात नाही, जर केले तर ते खूप कमी
प्रमाणात केले जाते. सर्वसाधारणपणे जी काही सजावट केली जाते ती लांबट पद्धतीमध्ये पाना-फुलांच्या वेलबुट्टीसहित केले जाते.
काही ठिकाणी या वेलींना आंबे लटकावलेले दाखविलेले असतात. होळकर वाड्यातील सर अतिशय साधे असून त्यावर कोणतेही नक्षीकाम केलेले नाही.

होळकर वाड्यातील सर
होळकर वाड्यातील सर

हस्त :

साध्या खांबासोबत येणारे हस्तही साधेच चौकोनी ठोकळे असतात. तर गुजराती खांबाबरोबर येणारे हस्त तरंगाचे असून त्यामध्ये
उलट-सुलट कमल पुष्पे व त्यावर शृंखला कोरलेली असते. हा हस्ताचा सर्वसामान्य प्रकार होय. होळकर वाड्याच्या स्तंभावरील हस्त एखाद्या कलात्मक पानाचा अर्ध्या भागाप्रमाणे कोरलेले आहेत. या सोबत झुंबर अडकविण्यासाठी गोल लोखंडी कड्याही
काही ठिकाणी दिसतात.

होळकर वाड्यातील हस्त

स्तंभशीर्ष :

स्तंभ व हस्त यांना जोडणारा भाग म्हणजे स्तंभशीर्ष होय. होळकर वाड्यातील स्तंभशीर्षावर अतिशय कलात्मक मण्यांची माळ, कमळाचे फुले, पाने कोरलेली आहेत. त्यामुळे स्तंभाचा, छतांचा भाग आकर्षक दिसतो.

तळखडे :

गुजराती शैलीतील तळखडे आणि दिल्ली शैलीतील स्तंभांचे तळखडे हे वेगवेगळे दिसून येतात. सर्वसाधारणपणे लाकडी स्तंभाचे तळखडे दगडी घडीव स्वरुपाचे असतात. अशाच प्रकारचे दगडी घडीव तळखडे होळकरांच्या वाड्यातील सर्व स्तंभाखाली आहेत.

छत :

छत हे अतिरिक्त फळीचा भाग असून फार मोठा भाग छताने व्यापलेला असतो. हे फार वेगवेगळ्या पद्धतीने कोरलेले असतात. छताचा भार सरावर असतो. सराच्या वर कडे असतात. त्या कड्या दोन सरावर टेकलेले (आधारलेले) असतात. त्या कड्यावर छतावरील मातीचा भाग सहन करण्यासाठी तक्ता (दोन कड्यामधील पूर्ण फळी) किंवा फळ्यांचे छोटे छोटे तुकडे करुन
टाकले जातात. यालाच लोखंडाच्या किंवा तांब्याच्या हलकड्या लावल्या जातात आणि त्या तुकड्यावर किल्चन (लाकडाचे छिलके) टाकले जातात आणि त्यावर नंतर अर्धा किंवा एक इंच पांढऱ्या मातीचा थर व त्यावर पांढऱ्या मातीच्या विटाचा थर टाकला जातो. (त्याला माळवद असे म्हटले जाते.) ही पांढरी माती उन्हाळ्यात उष्णता रोधकाचे काम करते किंवा त्यामुळे उन्हाळ्यात माळवद थंड राहते. होळकर वाड्याचे छत विचारात घेता ते खुप साधे आहे. छताच्या पुढे आलेल्या सज्जाच्या लाकडी भागाला पानपट्टी नक्षी कोरलेली आहे.

वाड्यात असणारी मंदिरे :

वाड्याचा पाया खोदत असताना हनुमानाची हात जोडलेली(नमस्कार स्थितीत) किंवा विठ्ठल रूपातील स्वयंभू मूर्ती सापडल्याने अहिल्याबाई होळकरांनी वाड्यात राममंदिर स्थापन केले. राम, लक्ष्मण आणि सीता अशा संगमरवरी सुंदर मूर्ती या मंदिरात आहेत. वाड्याच्या दक्षिण बाजूस हे मंदिर आहे.

राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती
बाजूला असलेली अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती
राम मंदिरातील होळकर कालीन पितळी पत्र्यावरचा कोरीव लेख

या मंदिराची पूर्व-पश्चिम लांबी २०० फूट पर्यंत असून पूर्वेला रामाचे मंदिर आणि त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला रामाच्या समोर हनुमान मंदिर पश्चिमेस स्थापन केलेले आहे आणि त्या मंदिरात हनुमानाची स्वयंभू एक पाषाणी मूर्ती जी वाड्याचे काम चालू असताना मिळाली. त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. अहिल्याबाई होळकर या शिवभक्त होत्या. त्यांनी वाड्यात शिव मंदिर स्थापन करण्यासाठी जी शिवपिंड व नंदी तयार केले होते ते राम मंदिरासमोर उजव्या बाजूला एका कट्ट्यावर ठेवलेले आहेत.

हनुमानाची हात जोडलेली किंवा
विठ्ठल रूपातील स्वयंभू मूर्ती
नंदी व महादेवाची पिंड

वाड्यातील भुयारी गटारांची योजना :

मानवी वस्ती म्हटले की, सांडपाण्याची व्यवस्था महत्त्वाची असते. होळकर वाड्यामध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी दगडी गटारांची योजना उत्तम स्वरुपाची आजही कार्यरत आहे. स्वयंपाकघरातून तसेच मंदिरातून भुयारी दगडी गटारातून पाणी वाहून मागील चौकात येते आणि मागील प्रवेशद्वाराखालून बाहेर पर्यंत दगडी गटारे आहेत. वाड्यात पाणीपुरवठा हा चंद्रभागेतून केला जात होता. पश्चिमेला असलेल्या मागील दरवाजा समोरच चंद्रभागा वाहते. अर्थातच त्यामुळे हा परिसरही रमणीय आहे.

होळकर वाड्यातील भुयारी गटारी मार्ग

वाड्याचा मागील भाग :

वाड्याचा मागील भाग म्हणजे पश्चिमेकडील जेथून चंद्रभागा नदीचे विशाल पात्र दिसते. या प्रवेशद्वाराला दिंडी दरवाजाही आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक लोखंडी कलात्मकरित्या तयार केलेला जिना आहे. पायऱ्यांचा हा जिना नागमोडी वळणे घेत वरच्या मजल्यावर जातो. या पायऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या जिन्याची प्रत्येक पायरी वेगळी करता येते. एकात एक हुक अडकविल्याप्रमाणे या पायऱ्या बसविलेल्या आहेत. वाड्याची पश्चिमेकडील तटबंदी नाहीशी झालेली आहे.

होळकर वाड्याचा मागील भाग
होळकर वाड्याचा मागील जिना

वाड्यातील तळघरे व भुयारी मार्ग :

मध्ययुगीन काळातील वाड्यांना तळघरे पहायला मिळतात. काही तळघरांचा अजूनही वापर होताना दिसतो. या तळघरातून भुयारी मार्ग देखील असतात. होळकर वाड्यात दोन तळघरे आहेत. ही तळघरे वाड्याचा दुसरा चौक जो पाठीमागील पश्चिमेकडील प्रवेशद्वारा अगोदर लागतो. त्या चौकाखाली दोन तळघरे आहेत, त्याचे छोटेसे प्रवेशद्वारही तिथे आहे आणि सध्या अडगळीचे
सामान ठेवण्यासाठी त्या तळघरांचा वापर केला जातो. या तळघरातूनच अहिल्याबाइंर्नी पांडुरंग दर्शनासाठी एक भुयारी मार्ग तयार केलेला होता. साधारणपणे ४०० मीटर पर्यंत लांब हा भुयारी मार्ग आहे, परंतु सध्या तो बंद आहे.

होळकर वाड्यातील तळघरे
वाड्यात असलेला होळकर कालीन शिलालेख

चैत्र महिन्यात दहा दिवस इथे कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम होतात. रामनवमीस मोठा उत्सव होतो. या वाडयात लग्न-मुंजीचे व अन्य धार्मिक कार्यक्रमही होतात.

संदर्भ :
सोलापूर जिल्यातील मध्ययुगीन काळातील वाडे(शोधप्रबंध)
पंढरपूरमधील ऐतिहासिक वास्तू व धर्मशाळा(शोधप्रबंध)

होळकर वाड्यातील श्रीराम मंदिर :- 

जनोद्धारासाटी जीवनात येवून दानधर्म करावा, गोरगरिबांसाठी मदतकार्य करावे यासाठी हिंदुस्थानात राजे महाराजे सम्राट अशा अनेकांनी मोठमोठी कार्ये केली आहेत. अशा पुण्यवान व्यक्तिंमधे इंदूरच्या साध्वी अहिल्यादेवी होळकरांचे नाव सर्वात वरचे स्थानी आहे. त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे वैशिष्ट्यपूर्ण नामाभिदान प्राप्त झाले, जे राजा युधिष्ठिराला होते. अन मोजक्याच मान्यवरांना पुण्यश्लोक म्हटले जाते. त्यात बहुधा अहिल्यादेवी एकच महिला असतील.

सन १७२५ च्या ३१ मे ला महाराष्ट्रातील चौंडी गावी जन्म झाला. पुढे त्यांची चमक डोळ्यात भरल्याने आपली सून म्हणून मल्हाररावांनी त्यांची निवड केली. ती निवड सार्थ ठरवत परिस्तितीवश आहिल्यादेवींनी सन १७६६ ते १७९५ या कालात इंदूरचे शासन राज्यकर्ती म्हणून चालविले. तेही विरक्त वृत्तीने. त्या कधी ही विलासी वृत्तीने राहिल्या नाहीत. राजघराण्यातील असून अन राज्यकर्ती असूनही त्यांनी पाण्यातल्या कमलपत्राप्रमाने शरिराला, मनाला राजेपदाचा स्पर्श होवू दिला नाही. पवित्र महासतिसारके जीवन त्यांनी व्यतिथ केले. त्यांच्या दानधर्माबरोबरच राज्यकारभाराचे कामही आजच्याही शासनकर्त्याने शिकण्यासारखे आहे. परखड तर इतक्या की छत्रपतिंना आणि पेशव्यांनाही त्या प्रसंगी रागे भरत. त्यांना यामुळेच छत्रपति महाराजही आईसाहेब म्हणत. मातेचा मान देत. अहिल्यादेवींच्या दानधर्माने सारा भारतवर्ष गाजत होता. काशी पासुन ते रामेेश्वरा पर्यंत असे एकही तीर्थ, क्षेत्र, वा देवस्थान नाही कि जिथे त्यांनी काहि लोकोपयोगी कार्य केले नाही.

पंढरपूर तर समस्त महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवताचे, मोठ्या वर्दळीचे तीर्थक्षेत्र. येथे सदैव वारकऱ्याचा वावर. तिथे जनसुविधेला, वारकऱ्यांना आपुलकीने पहायला कमी पडतील त्या अहिल्यादेवी कशा. त्यामुळेच पंढरीच्या भक्तांवर त्यांनी आपले मायेच छत्र धरले ते वाडारूपाने. आईसाहेबांनी पंढरीक्षेत्री देवदर्शनार्थ स्वत: आलेवर वास्तव्यासाठी म्हणून वाड्याचे काम करायचे ठरविले. आपले आधी तिथे देव असावा या भावनेने त्यांनी सर्वत्र प्रमाणे इथेही सन १७५४ ला महादेव मंदिरासाठी बांधकाम सुरू केले. इकडे महादेव पिंडीही करण्यास प्रारंभ झाला. आणि एक गंमत घडली. पंढरीत देवमंदिराचे साठी पाया खोदताना मातीत मारूती सापडला. तोही नमस्कार मुद्रेतला वा दास मारूती म्हणतात तो. मोठा गाजावाजा झाला. वार्ता इंदूरास आईसाहेबांपर्यंत गेली. त्यांनी चौकशी केली आणि काम थांबविले. म्हणजे महादेव मंदिराचे काम थांबले आणि नियोजनात बदल करून तिथेच जणू देवाने कौल देवून राममंदिर बांधायला सांगितले अशा विचाराने भव्य श्रीराम मंदिर बांधले.

तेच हे श्रीराम मंदिर. अहिल्यादेवी परम महादेव भक्त असताना पंढरीत मात्र राम मंदिर का उभारले? असा प्रश्न सर्वाना पडतो. पण त्याचे उत्तर वर आहे. पण तरिही नियोजनात मंदिरासाठी निर्मिलेला महादेवही याच मंदिरात स्थापण्यात आला. ज्याचे दर्शनाने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते कारण या महादेवावर १२ ज्योतिर्लिंग कोरलेली आहेत. जो आजही राम मंदिरात पुजेत आहे. त्याशिवाय या मंदिरात एकमुखी दत्तमुर्तीही आहे. पंढरीची क्षेत्र परिक्रमा, द्वार परिक्रमा वा अर्धकोशी परिक्रमा करताना या रामरायाला विश्वेश्वर महादेवाला अन् दत्ताला नमन करूनच परिक्रमारंभ करतात.

सुमारे १३ वर्षे या राम मंदिर अन् वाड्याचे बांधकाम चालू होते. ते १७६७ ला संपले. अन् मोठ्या थाटात अहिल्यादेवींनी चैत्र शु ||१ म्हणजेच गुढी पाडव्याचे शुमुहुर्तावर पंढरीतील या वास्तूची वास्तूशांत केली. अहिल्यादेवी स्वत: त्यासाठी इथे वास्तव्य करून होत्या. त्यांनी मोठा दानधर्म केला. जेवणावळी घडल्या. त्या समारंभासाठी मराठी साम्राज्याचे मानकरी असणारे अनेक सरदार दरकदार आमंत्रित होते. अन् तेही मोठ्या आनंदाने वास्तू:शांती साठी पंढरीत आवर्जून उपस्तित होते. अहिल्यादेवीचे आग्रहावरून खासे छत्रपतीही सातारहून या कार्यी पंढरीत आल्याचे जुने लोकांकडून सांगितले जाते.

चंद्रभागेच काठी विठ्ठल मंदिराकडून नदिला जाताना ऐन मध्यावर असणाऱ्या महाद्वार घाटाचे उत्तरेकडे हे मंदिर आणि भव्य वाड्याचे स्थान आहे. सुमारे २ एकराहून अधिक जागेत या वाड्याचे दणकट बांधकाम आहे. इतके दणकट की नवीन पाहणारास हा वाडा म्हणजे एखादा कोट वा गढीत वाटावी. महाद्वार घाट ते कुंभार घाट एवढ्या विशाल परिसरात त्याकाळी होळकरांची वसती होती. पैकी काही भाग पुढे दशनाम गोसावी साधुंसाठी, तर काही अध्यात्मिक अधिकार संपन्न स्वामींचे पायी दान केला गेला आहे. अन्य भागात होळकरांचे दिवाण पळशीकराचे वास्तव्य होते तसेच अन्य संबंधित कर्मचारी वा मानकरी यांचेहि वसतिस्थान होते.

मोठमोठाल्या २ चौकांचा चौसोपी खाश्या मराठेशाही शैलितला साधारणत: ६०० फूट लांब अन् ३०० फूट रूंद असा भव्य सुमारे १२५ खणांचा लाडकूड काम केलेला एकमजली क्वचित एक बाजूला २ मजले असलेला वाडा म्हणजे पंढरपूरातील मराठेशाहीतल्या सरदारांच्या श्रीमंतीच्या खुणा आहेत. यासाठी लाकडाचा भरपूर वापर करण्यात येवून वाडा दगड, वीटा अन चुन्याचा वापर करण्यात आला आहे. चुनाही भोकर बी, पिंपळाचा डिंक, बिबा द्रावण बेलफळ, बारिक वाळू आदी पासून तयार करून त्याची योग्यायोग्यतेची तपातणी करून वापरण्यात आला आहे. लाकूड नदीपात्रातून आणताना पेशव्यांनीही मंदिरासाठी बांधकाम करीत असल्याने त्यासाठी वाहतूकीची संमती देवून त्यावरचा सरकारी कर माफ केला होता. केवळ स्वत:च्या वास्तव्यासाठी नाही तर येणाऱ्या पांथस्थांसाठी निवाऱ्याची सोय म्हणून या वाड्याचे त्याकाळी महत्व होते. केवळ निवासच नाही तर येणाऱ्याला भोजनाची व्यवस्थाही इथे होळकरांनी केली होती. ती व्यवस्था वास्तूशांती पासून सन १९६६ पावेतो चालू होती. संस्थाने खालसा झाल्यावर या व्यवस्तेला गळती लागली.

या वाड्याला पुर्वेला असणारे प्रवेशद्वार नदिकाठाकडे जाते. तर पश्चिमेकडील भव्य दारातून आत प्रवेश करता आपण पहिल्या प्रथम चारी बाजूंनी २ ओढीचे लाकडी खणांचे बांधकामाचे चौकात प्रवेशतो. त्यातून पुढे जाता तशाच भव्य अशा दुसरे चौकात जाता येते. या दोन्ही चौकातील पाणी वाहून जाण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण भूयारी गटारांची रचना, त्यामागे पुर्वेकडील दाराने नदिकडे जाता येते तिथेच मोठी बाग असे वाड्याचे स्वरूप.

पश्चिमेकडील प्रवेशद्वार

मुख्य प्रवेशद्वार सुमारे २२-२५ फुट उंचीचे दगडी बांधकामाचे वरचे बाजूला मराठी पद्धतीतील विटांचे नक्षीकाम मोठ्या जाडीचे सागवानी चौकटी त्याही एकात एक ३ अन् मोठे लाकडी द्वार. आत दो बाजू देवड्या. मोठाला अडणा, दारवर होळकरांचे बांडे निशाण लावन्याची व्यवस्था असलेली दिसते. पूर्वी तेथे निशाण असायचे हल्ली मात्र दिसत नाही. वाड्यात पैस दिवाणघराची गाद्या तक्क्यांची बैठक गरजेनुसारच्या लहानमोठ्या खोल्या, प्रशस्त स्वयंपाकघर, मोठाली तळघरे, गोशाळा, सदावर्त, घोड्याची पागा, बग्गी, पालखी अशा साऱ्या गोष्टी होत्या. शिवाय विठोबा आणि रामासाठी म्हणून तुळशीची आवश्यकता असल्याने आईसाहेबांचे आज्ञेने पंचमुखी मारूती जवळ तुळशीबागहि उभारली होती.

वाड्याचा मुख्य सोपा

वाड्याचे दक्षिणेला दगडी २ मंडपांचे राममंदिर. पुर्वेला लाकडी १८ खांबावर उभारलेला ६० x २८ चा भव्य मंडप ज्यात इथेच सापडलेला सुमारे २|| फुटी दास हनुमान ६ x ४ चे लहान दगडी गाभाऱ्यात हात जोडून उभा आहे तो रामाकडे मुख करून. जणू रामाज्ञेची वाट पहात असल्यासारखा. हा मारूतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण त्याला कानाकाली खांद्यावर टेकलेले विठोबासारखे मत्स्य आहेत. त्यामुळेच या मारूतीला विठ्ठलावतारी हनुमंत म्हणतात. त्यानंतर पश्चिम बाजूला लहानसा नगारखाना. त्याचे पश्चिमेला उंच कमानदार असा ४० x १८ चा दगडी मंडप त्यातच पश्चिम बाजूला उंच जोत्यावर असणारे सिंहासनावर राम, लक्ष्मण आणि सीतामाईंच्या उत्तर हिंदुस्थानी शैलितील संगमरवरी मुर्ति ज्या पुर्वाभिमुख उभ्या आहेत. या गाभाऱ्याला प्रदक्षिणा सुविधाही आहे. रामरायाचे गाभाऱ्यावर विटकामाचे दोन स्तराचे साधेसे शिखर त्यावर लाकडी कळस. खरं तर सोन्या चांदीचे कळस बसवायची ऐपत आणि दानात असतानाही इथे लाकडी कळस का हे एक कोडेच आहे.

विठ्ठलावतारी हनुमान

सबंध हिंदुस्थानात बहुधा कोठेही नसणारी माता अहिल्यादेवींची संगमरवरी मुर्ती इथे रामासमोर बसविलेली आहे. ती होळकरांचे पुढचे वारस काशीराव दादा होळकर यांनी स्थापिली आहे. शके १७८५ मधे काशीरावांनी रामचरणी पितळी महिरपीचा चौरीडोल वाहिला त्यावेळीच आईसाहेबांची हि प्रसन्नवदन मुर्ती स्थापिली. ती सोबतचे प्रकाशचित्रात दिसत आहे.

राममंदिरातील अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती

या मंदिरात सहा हाताचा एकमुकी दत्त, गरूड आणि महादेव पुजले जातात. केवळ मंदिर बांधुन न थांबता त्याचे उत्सव, नित्यपुजा याचीही उत्तम व्यवस्थाही करण्यात आली होती. देवाला लागणारी विविध उपकरणे, चांदी – सोन्याचे अलंकार, पालखी, छत्र, अब्दागीरी, चांदीचे चवऱ्या आदिची व्यवस्था करण्यात आली. रामनवमी ला चैत्र पाडव्या पासून रामनवमी पावेतो नित्य विशेषाभिषेक, रामापुढे कीर्तन, वैदिक ब्राह्मणाचे वेदपठण, नित्यभोजन, नवमीला जन्मोत्सव, सायं पालखी परिक्रमा, दुसरे दिना पारण्याला २०० ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा असा जंगी कार्यक्रम असायचा. हनुमान जन्मदिनही कथा, कीर्तन, दिवसभर प्रसाद भोजनादी कार्यक्रमाने रंगून जायचा. वर्षभर नित्य २५ ब्राह्मणांना आणि अन्य पांथस्थांना भोजनाची सुविधाही होती.

सहा हाताचा एकमुकी दत्त

एवढे करून थांबतिल त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कशा त्यांनी परमात्मा विठोबालाही नित्य पुजा पाठासाठी वर्षासने दिली. जडावाचे दागदागिने अर्पिले. त्यांनी माता रूक्मिणीला सोन्याचा कमरपट्टा अन् जडावाची चोळी वाहिल्याची नोंदही आहे. सोबत उत्पात मंडळींना या वस्तू आईससाहेबांचे उपभोगासाठी दिल्याबाबतचे पत्रही उपलब्ध आहे. त्याशिवाय आपले तिर्थाचे उपाद्धे म्हणून संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशात वर्षासनही दिले होते. त्याबाबतच्या सनदा आमचे घरी असून त्याचे पूर्वजांनी जतन केले आहे. ज्याचे प्रकाशचित्र खाली जोडले आहे.

पंढरपुरातील होळकरकालीन पत्र

असे हे राम मंदिर आणि श्रीमंत होळकर सरकार वाडा म्हणजे पंढरपूरकरांचे आनंदस्थान कारण कित्येकांची उपनयनादी, विवाहाची आनंददायी स्मरणे या वाड्याशी जोडलेलि आहेत. महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक सेतु माधवराव पगडी यांचीही मुंज या ऐतिहासिक वाड्यातच झाली आहे. जणु त्यामुळेच त्यांची इतिहासाशी नाळ जुळली असावी.

समस्त गावकऱ्यांचे घरातले चोळी, बारसे, जावळ, एकसष्टि, सहस्त्रचंद्रदर्शनादी सगळीच शुभकार्ये या वाड्यातच घडायची. आता काळ बदलला. नवीन मंगल कार्यालये निघाली सुविधांपोटी लोकमानस तिकडे वळाले. तरी आपल्या या संपन्न सांस्कृतिक ठेव्याकडे, एेतिहासिक वारसास्थळाकडे आशेने पाहणारे कित्येक जण पंढरीत आहेत आणि बाहेरूनही कैकजण अभ्यासार्थ इथे सतत येत असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे पंढरीतील जिते जागते स्मारक म्हणूनही याकडे पाहिले जावे हिच औचित्याने अपेक्षा.

लेखन सौजन्य :- आशुतोष बडवे पाटील वकील, पंढरपूर.

वाघाचावाडा : काठापूर(बुद्रुक)

विशाल करंडेपत्रकार, आंबेगाव.
काठापूर वाघ - होळकर वाडा

काठापूर(बुद्रुक) ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र): सन १७५० च्या दरम्यान या वाड्याचा निर्माण सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांच्या राज्यकाळात (१७२८-१७६६) झाला. ज्यावेळेस सुभेदार मल्हारराव होळकर यांना सातारच्या छत्रपतीं कडून पेशव्यांच्या मार्फत जुन्नर प्रांतातील वाफगावची जहागिरी मिळाली, तेव्हा सुभेदारांनी या भागात एकाच वेळीस ६ ठिकाणी ६ किल्ले सदृश्य वाड्यांचे बांधकाम सुरु केले होते. त्यातीलच एक काठापूरचा होळकर वाडा किंवा वाघ वाडा व उर्वरित ५ वाडे म्हणजे खडकी-पिंपळगाव(ता आंबेगाव), वाफगाव(ता.खेड), अवसरी, व मंचर(ता.आंबेगाव) व काठापूर(खुर्द)(.ता.शिरुर).

सध्या स्थितीला खडकी-पिंपळगावचा वाडा ९५% नष्ट झाला आहे, वाफगावचा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान दिला आहे तेथे सध्या शाळा भरते, काठापूरचा(खुर्द) वाडा पूर्णपणे नष्ट झालेला आहे, मंचरचा वाडा खाजगी मालकीचा आहे (मला पुर्ण माहिती नाही कुणाच्या ताब्यात आहे), अवसरीच्या वाड्याची काही ही माहित मिळत नाही व काठापूरचा (बुद्रुक) वाडा हि खाजगी मालकी होता. पण सध्या सरकारची मालकी आहे. गेले काही वर्षे याबाबद वाद सुरु होता.

सन १७६१ ला पानिपतच्या युद्धात हिंदवी स्वराज्यासाठी अनेक सरदार धारातीर्थ पडले. त्यामध्ये होळकरशाहीचे सरदार संताजी वासुजी वाघ हि होते. सरदार संताजी वाघ हे वाघ घराण्याचे जेष्ठ पुरुष होय. सरदार संताजी वाघ यांचा प्रथम उल्लेख हा सन १७६१ च्या दरम्यानच भेटतो. पुढे सन १७६५ ला होळकर राजघराण्याकडून कडून सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना मध्यप्रदेशातील महिंदपूर परगणा व अन्य काही गावे आणि महाराष्ट्रातील काठापूर(बुद्रुक), काठापूर(खुर्द), अवसरी(बुद्रुक) या गावांची जहागिरी देण्यात आली. वाफगाव होळकरांकडे तर पिंपळगाव खडकिचा वाडा मल्हाररावांची कन्या उदाबाई वाघमारे यांना देण्यात आला.

तेव्हा पासून हा काठापूरचा वाडा “वाघ वाडा” झाला. तर खडकिचा वाघमारे वाडा झाला. तसेच संताजी वाघ यांची कन्या प्रिताबाई हिचा विवाह सुभेदार मालेराव होळकर यांच्याशी लावून देण्यात आला होता. सुभेदार मालेराव होळकर हे अहिल्यादेवींचे पुत्र व सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नातू होय.

महिंदपूर परगणा हा होळकरशाहीतील सर्वात मोठा परगणा होता, त्याचे उत्पन्न हि सर्वात जास्त होते आणि वाघ घराण्याने या परगण्याची जहागिरी एकदम चोख संभाळली होती म्हणून तेथील स्थानिक लोक त्यांना “वाघ राजा” संबोधत असत ते आजपर्यत. पुढे तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धातील दुसरी लढाई म्हणजेच होळकर-इंग्रज लढाई हि सन २६ नोव्हेंबर १८१७ ला महिंदपुर येथेच झाली होती.

ahilyadevi-holkar
किल्ले महिंदपुर (मध्यप्रदेश)

त्यांनतर होळकर-इंग्रज यांच्यातील मंदसोर तहानुसार महिंदपुरची हि जहागिरी सन १८१८ ला पुन्हा होळकर राजघराण्याच्या ताब्यात आली. त्यानंतर सन १८३४ ला महाराजा हरिराव होळकर (१८३४-१८४३) यांनी पुन्हा वाघ घराण्याला महिंदपुरची जहागिरी कायमची बहाल केली. सन १८१७ च्या होळकर-इंग्रज लढाईत महाराजा हरिराव होळकर हे सरदाराच्या भूमिकेत एका तुकडीचे नेतृत्व करत होते. त्या लढाईत त्यांचा घोडा मारला गेला होता त्याची समाधी आजही महिंदपुर येथे आहे.

काठापूर(बु), ता.आंबेगाव हे गाव घोडनदीच्या उजव्या काठावर वसलेले आहे व नदीच्या पलीकडे डाव्या बाजूला दुसरे काठापूर आहे, ते काठापूर(खुर्द) असून शिरूर तालुक्यात येते. या दोन्ही ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात (१७२८-१७६६) वाडे बांधून काढले होते.

पूर्वी या गावाला संपूर्ण तटबंदी होती व या तटबंदीमध्ये सध्याचा जो दिसतो तो राजवाडा होता. काठापूर गावाच्या तटबंदी मध्ये एकूण सात वेसी होत्या मात्र आज तटबंदी गायब झाली असून एक वेस नजरेस पडते. हि वेस व राजवाड्याचे प्रवेशद्वार पाहताच क्षणी नजरेत भरते. राजवाड्याच्या प्रवेशद्वार बघितल्यावरच या वाड्याचे वौभव लक्षात येते.

information-about-ahilyabai-holkar-in-marathi
स्थानिक लोक राजवाडा असे म्हणतात
आहिल्याबाई-होळकर
सध्या अस्तित्वात असलेली वेस

या वाड्यांना एका भुयारी मार्गाने जोडले होते. भुयारी मार्ग नदीच्या पात्राखालून जात होता, असे सांगितले जाते. एकेकाळी हे दोन्ही वाडे होळकरांच्या मालकीचे होते, त्यापैकी काठापूर(खुर्द), ता.शिरूर येथील वाडा पूर्णपणे जमीन दोस्त झाला असून काठापूर(बुद्रुक) येथील वाडा खाजगी मालकीत होता.

पण सन २०२० मध्ये पुन्हा तो सरकारी मालकीत आला आहे. ग्रामपंचायत दप्तरी महाराष्ट्र शासन अशी नोंद सध्या झाली आहे. सध्या एक वेस नजरेस पडते. राजवाड्याच्या प्रवेशद्वार बघितल्यावरच या वाड्याचे वैभव लक्षात येते. गावकरी या वाड्याला वाघाचावाडा म्हणतात.

काठापूर(खु) येथून दिसणारा काठापूर(बु) येथील होळकर(वाघ) वाडा

सध्या अस्तित्वात असलेली वेस व वाड्याच्या बांधकामाचा नमुना एकूणच १८ व्या शतकातील असून त्यामध्ये मराठा रजपूत कलाकसूर दिसून येते. वाड्याचे बांधकाम हे विटा, चुना मिश्रित आहे. त्या काळातील वास्तुरचनेतील भक्कमपणा, स्थापतींचे कौशल्य, कामगारांचा प्रामाणिकपणा, सुतारांचा लाकूड कामातील बारकावेचे दर्शन होते.

आहिल्याबाई-होळकर-माहिती-मराठी
बुरुजांची झालेली पडझड
ahilya-bai
तिन मजली प्रवेशद्वार व सज्जा
ahilyabai
प्रवेशद्वारातील सज्जा व देवळ्या
rani-ahilyabai
तिसऱ्या मजल्यावरील सज्जा व नक्षीकाम
ahilyabai-holkar-story
राजवाड्याचे द्वार

मागचे दोन बुरुजांची पडझड झाली असून जमिनीपासून पंधरा फूटांपर्यंत दगडी बांधकाम तर त्यावरील पंचवीस फूटांचे बांधकाम उत्तम प्रकारच्या विटांचे चुन्यातील असे आहे .वाड्याचे प्रवेशद्वार पूर्ण घडीव दगडांचे असून भक्कम आहे. त्यावरील तीनमजली सज्जा अजून सुस्थितीत पाहायला मिळतो. बुरुजांवरील पाकळ्या त्याची शोभा वाढवतात. दरवाजावरील दोन लांबट पट्ट्यांवर व सज्जाच्या प्रत्येक गवाक्षावर उत्कृष्ट असे रेखीव नक्षीकाम आहे. आतील भाग पूर्णपणे ढासळलेला आहे. सध्या स्थितीला फक्त काही भुयारे, तळघर यांचे अवशेष नजरेत पडतात.

sant-ahilyabai-information-in-marathi
राजवाड्याच्या आतील झाडे-झुडपे
rajmata-ahilyabai-holkar-marathi
राजवाड्याच्या आतील भुयारी मार्ग
ahilyabai-holkar-mahiti-marathi
राजवाड्याच्या आतील भुयारी मार्ग
अहिल्याबाई-होळकर-यांची-माहिती
राजवाड्याच्या आतील तळघर
rajmata-ahilya
राजवाड्याच्या आतील तळघर
राजमाता-अहिल्याबाई-होळकर
राजवाड्याच्या आतील आड

वाड्याच्या आत  मातीचे ढिगारे, वीटकामाचे लबके पाहून खेद वाटतो. अतिउत्तम चुन्यातील बांधकामाचा प्रत्यय पावलोपावली जाणवल्यावाचून राहणार नाही. घोडगंगा नदीच्या तीरावर उभा असलेला हा राजवाडा नदीतीर व आसपासचा सुपीक प्रदेश व निसर्गसौंदर्य न्याहाळत आहे की काय? असे वाटते.

अस्तित्वात असलेली वेस

वाड्याच्या आत जुन्या इमारतींचे सर्वत्र पडलेले अवशेष आहे. दोन भुयारे मात्र अस्तित्व दाखवून जातात. हा राजवाडा तीन मजली असावा असे दिसून येते. मुख्य सदरेच्या खाली एकूण चार ते पाच तळघरे असावित, वाड्याची तटबंदी ढासल्यामुळे तसेच झाडा-झुडपांमुळे, तळघराचे प्रवेशद्वार बंद झाले आहेत. वाड्याच्या मुख्य सदरेच्या माघील बाजूस एक जुनं वीट बांधकाम केलेला पाण्याचा आड (विहीर) आढळते. वाड्याच्या डाव्या बाजूस तटबंदीला लागून नदीपात्रात एक विहीर आहे, तसेच तटबंदीचे दर्शनी बुरुंज सुस्थितीत आहे, तर बाजूची तटबंदी ढासळली आहे.

समोरून वाड्याचे प्रवेशद्वार

वाड्याच्या समोरील बाजूस एक समाधी आहे, परंतु ही समाधी नक्की कुणाची याबाबत फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र हि समाधी वाघ घराण्यातीलच व्यक्तीची असावी. तसेच बाजूच्या परिसरात जुनी कोरीव काम असलेली मंदिरे आढळतात.

वाड्यासमोरील समाधी
समाधीशेजारील तुळशीवृद्वांण

त्यांतील विष्णू लक्ष्मी, दत्त मंदीरे, बिरोबा, गावचे ग्रामदैवत शंभु महादेव, तसेच घोडनदिपात्रातील महादेव मंदिर, खंडोबा मंदिर, उत्तम आहे. देवीचे मंदिर बंधार्यामुळे पडले व काहि मंदिराचे दगड काढून त्यावेळी विहिर बांधली, तर हनुमान मंदिर पाडुन नविन मंदिर बांधले आहे.

अहिल्यादेवी-होळकर-यांची-माहिती
समाधी शेजारील स्मारक
ahilyabai-temple
दत्त मंदिर व विष्णू-लक्ष्मी मंदिर
राजमाता-अहिल्यादेवी-होलकर
दत्त मंदिर
holkar-wada
दत्त मंदिरावरील नक्षी काम
विष्णू व दत्त मंदिर
ग्रामदैवत शानभू महादेव मंदिर
नदीपात्रातील महादेव मंदिर
नव्या युगातील मारुती मंदिर

हनुमान व देवीचे जुणे मंदिर पाडल्याने तो ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला आहे. तर ईतर मंदिरे पाहण्यासारखी आहेत. इथे सुबक नक्षीकाम चांगल्या स्थितीत पाहावयास मिळते. या मंदिरावरील कोरीवकाम हा एक कलेचा उत्तम नमुना ठरू शकतो.

विष्णूमंदिरावरील होळकरकालीन कलाकुसर
विष्णूमंदिरावरील होळकरकालीन कलाकुसर
विष्णूमंदिरावरील होळकरकालीन कलाकुसर

पूर्वी काठापूरच्या वाड्यात दोन तोफा होत्या, त्यामधील एक तोफ तेथील शाळे समोर सिमेंट मध्ये बसवली आहे. गावात त्यावेळी पाण्यासाठी बारव खणन्यात आली. ती गावाच्या दक्षीनेला आहे.

होळकर कालीन तोफ

हि बारव सध्या करंडे कुटुंबातील लोकांच्या मालकीत आहे. वाघांची गावात मोठी शेती होती. ती सध्या करंडे कुटुंबातील लोकांच्या मालकीची आहे त्या शेतीला आजहि वाघाचवावर म्हणतात. १९५० पर्यंत येथे वाघ परीवाराचे सदस्य राहत होते पण ते पुण्यात व ईतर ठिकाणी वास्तव्यास गेले असे जुने लोक सांगतात.

होळकरकालीन बारव

घोडनदिवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा १९८० नंतर उभा राहिला व पाण्याच्या फुगवट्याने वाड्याची मोठी पडझड झाली. या वाड्याची उभारणी करताना वाड्याचा नकाशा बनवला होता तो महिदपुर येथे आहे. वाड्याच्या डाव्या बाजूने वाड्यापासुन काही अंतरावर घोड नदि वाहत होती. पण बंधाऱ्याच्या उभारणी नंतर पाण्याच्या फुगवट्याने वाड्याची पडझड झाली आहे.

बंधाऱ्यावरून दिसणारे विहंगमय दृश्य

पुर्वी काठापुर हे प्रती पंढरपूर म्हनुन विकसित करायचे होते. विष्णु मंदिर हे विठ्ठल मंदिर तर दत्त मंदिर हे रुख्मिणी मंदिर म्हणून उभारले गेले. परंतु तत्कालीन परस्थितीमुळे रूख्मिनी मंदिराचे काम अर्धवट राहिले त्यानंतर बर्याच कालावधी नंतर या मंदिराचे अर्धे काम पुरे करून दत्त व विष्णु देवतांच्या मुर्ती येथे बसवण्यात आल्या, असी माहिती जुणे ग्रामस्थ देतात. तर काहिंच्या मते विष्णु मुर्ती बसवण्याआधी तेथे सतोबाची(संतोबा)घोड्यावर बसलेली मुर्ती होती आणि हे विष्णु मंदिर पुर्वीचे सतोबा(संतोषा) मंदिर होय.

अशी हि होळकरकालीन वस्तू आयुष्यात नक्की पहिली पाहिजे. खाली Google Map दिला आहे. तुम्ही पुणे>मंचर>खडकी-पिंपळगाव>काठापूर(बु) असे सहज येऊ शकता. मंचर येथे मुक्काम करू शकता. काठापूर हे खेडे गाव आहे त्यामुळे जेवणाची व पाण्याची सोय स्वतः करून आला तर उत्तम ठरेल.

पळशीचा वाडा(नगरकोट, मंदिरे) - Holkar Dynasty | Ahilyabai Holkar


होळकरशाहीचे शिलेदार : सरदार पळशीकर
पळशीकर वाडा : पळशी, ता.पारनेर जि.अहमदनगर

इतिहास:

सन १७५० च्या दरम्यान सरदार रामजी यादव(कांबळे) पळशीकर हे होळकरशाहीत सामील झाले. सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांनी सरदार रामजी यादव यांची कनिष्ठ सरकारी दिवाण(नायब दिवाण) पदी नेमणूक केली. दिवाण पद म्हणजे आजच्या काळातील वित्त मंत्री होय. होळकर दरबारी असलेल्या २८ मंत्रिमंडळा पैकी पळशीकर घराणे हे एक प्रमुख होय.

सुभेदार मल्हारराव होळकरांच्या काळात वरिष्ठ सरकारी दिवाण म्हणून गंगाधर चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या काम पाहत होते. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर गंगोबा तात्या हे राणी अहिल्यादेवींच्या विरोधात गेले व त्यांना बडतर्फ करण्यात येऊन त्यापदी नारो गणेश रांझेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

सुभेदार मल्हाररावांनी सरदार रामजी यादव पळशीकर यांना नियुक्ती झाल्यावर मध्यप्रदेश मधील देपालपूर परगण्यातील अजंडा गाव व महाराष्ट्रातील पळशीसहीत पाच गाव इनाम दिली होती.

malharrao holkar
सुभेदार मल्हारराव होळकर

सन १७५८ ला सुभेदार मल्हाररावांनी रामजी यादव पळशीकर यांचे पुत्र सरदार आनंदराव यादव पळशीकर यांना दोआबत अलीपूर खेडा हा परगणा सरंजाम म्हणून दिला होता. पुढे सन १७६१ ला पानिपतच्या युद्धात सरदार आनंदराव यादव यांनी होळ्करांतर्फे विशेष पराक्रम केला होता.

या गावच्या तटबंदीचा निर्माण रामजी पळशीकरांचे नातू रामाराव आप्पाजी पळशीकर यांनी सन १७८७ ते १७९७ च्या दरम्यान केले, असा उल्लेख तेथील प्रवेशद्वारावरील शिलालेखावर मिळतो. तसेच त्यावर नगरदूर्ग म्हणजेच भुईकोट असा हि उल्लेख मिळतो. या भुईकोटाचा निर्माण १० वर्ष चालू होता.

प्रवेशद्वारावरील शिलालेख

नारायणराव पळशीकर यांचे पुत्र रामराव पळशीकर हे महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांच्या काळात सन १८४८ ला होळकर संस्थांचे प्रमुख सरकारी दिवाण होते. जुन्या होळकरवाड्यात किंवा आजचे मल्हारी मार्तंड मंदिरात ज्या क्षणापासून होळकरशाहीचा गणपती विराजमान होऊ लागला तेव्हा पासून जुना होळकर वाडा ते मूर्तिकार खरगोणकर यांच्या घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यावेळी होळकरशाहीतील सर्व प्रमुख सरदार त्या मिरवूणकीमध्ये सामील होतात. त्या सरदारांमध्ये पळशीकर हे हि असतात. १०० ते १२५ वर्षाची परंपरा आजही चालू आहे. पळशीकरांचे वंशज हे इंदोर(मध्यप्रदेश) येथे स्थायिक आहेत.

इंदोरचे होळकर संस्थान भारतात विलीन होईपर्यंत पळशीकर घराण्याने होळकर संस्थाना मार्फत हिंदवी स्वराज्याची सेवा केली आहे. होळकरांचे प्रमुख सरकारी दिवाण म्हणून पळशीकरांच्या पाच पिढयांनीं काम पहिले. दोनशे-सव्वादोनशे वर्षे या घराण्याने सुभेदार मल्हारराव, पुण्यश्लोक अहिल्यादेवीतुकोजीराव, काशीराव, यशवंतराव, हरिराव यांचे सेवेत निष्ठेने दिवाणगिरी सांभाळली.

माहिती:

१८ व्या शतकात मराठी सत्ता प्रबळ बनल्यावर अनेक भुईकोटांचा निर्माण करण्यात आला. काही गावांचा इतिहास जाणून घेताना आपल्याला हमखास ऐकायला मिळते कि, पूर्वी आमच्या गावाला तटबंदी होती मात्र जसा काळ होत गेला तशी तटबंदी गायब होत गेली किंवा लोकांनी गायब केली मात्र महाराष्ट्रात अजूनही अशी काही गावे आहेत कि, जी पूर्णपणे आजच्या घडीला तटबंदीच्या आत वसलेली आहे त्यातीलच एक पळशी गाव.

संपूर्ण पळशी गाव दगडी तटबंदीच्या आत असल्याने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच गावात प्रवेश करू शकतो. या तटबंदीला ऐकुन १६ बुरूज आणी ४ प्रवेशद्वार आहेत.

उत्तर दिशेचे प्रवेशद्वार
पूर्व दिशेचे प्रवेशद्वार
तिसरे प्रवेशद्वार

उत्तर व पूर्व दिशेचे प्रवेशद्वार मोठे असून त्यामधून चारचाकी आत जाऊ शकते. सध्या वापराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस पहारेकर्‍यांच्या देवड्या व शिलालेख कोरेलेले आहेत. पूर्व व पश्चिम बाजूला असलेले शिलालेख वेगवेगळे आहेत.

पश्चिम बाजूच्या शिलालेखावर खालील मजकूर आहे.
श्री अंबाचरणी तत्पर राम
राव आपाजि निरंतर शाखा
अश्वलायनगोत्र वसिष्ठ उ
पनाव कांबळे।। वृति कुळक
र्णि जाहागीरदार सा अंबल
यानि काम केले १२०७
पश्चिम बाजूचा शिलालेख
पूर्व बाजूच्या शिलालेखावर खालील मजकूर आहे.
श्री गणेशायनम:।। पळशी
चे नगरदुर्ग बांधावयास प्रारं
भ शके १७०९ ल्पवंगनाम संवत्सरे
श्रावण कृष्ण १२ त्रयोदशीस।। सो
ध्दजालि शके १७१९ ल्पवंगनाम
संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध १२ त्र्ययोदसी
पूर्व बाजूचा शिलालेख

या भव्य दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर आपणास समोरच सुंदर बांधणीचे पुरातन शिवमंदिर दृष्टीस पडते. ते काशीविश्वेश्वराचे मंदिर असून मंदिराच्या मागील भिंतीवर मारुतीचे शिल्प कोरलेले आहे. या मंदिराच्या समोरच होळकरकालीन उत्कृष्ट एक छोटेसे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाहेर एक विरगळ तर आतमध्ये पुरातन शिवलिंग व नागशिल्प आहे.

काशीविश्वेश्वर महादेव मंदिर
मंदिराच्या आतील पिंड व नंदी
मंदिराची पाठीमागील बाजू
मंदिराच्या मागील भिंतीवर मारुतीचे शिल्प
विरगळ
शिवलिंग, नंदी व नागशिल्प

काशी विश्वेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर जवळच दक्षिणेकडील गडाचे मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला पळशीकरांचा वाडा पाहायचा. हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पांच्या कलाकृतींचा एक उत्कृष्ट नमुनाच. वाड्याला भक्कम तटबंदी असून वाड्याचे बांधकाम हे विटात व दगडात आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावरूनच त्याच्या सुंदरतेची कल्पना येते.

पळशीकर वाडा
प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील नक्षीकाम
वाड्यातील काष्ठशिल्प

वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपली संस्कृती किती महान आणि व्यापक, भव्य होती याची प्रचिती येते. या वाड्यामध्ये जे लाकडी नक्षीकाम आहे त्याची तुलना कशा सोबतच नाही होऊ शकत.

वाड्याचा मुख्य भाग
वाड्यातील नक्षीकाम
वाड्यातील सर व काष्ठशिल्प
वाड्यातील काष्ठशिल्पवरील नक्षीकाम

वाड्यात बालाजी मंदिर आहे जे फारसे दाखवले जात नाही. सध्या दिसत असलेल्या या चार मजली वाडय़ाचे दोन मजले सुस्थितीत आहेत. पूर्वी चोथ्या मजल्यावर ५० पोती भरून कागदपत्रे होती. जी सध्या इतिहास संशोधक स. शि. निसळ यांनी अहमदनगर येथील जिल्हा इतिहास मंडळ यांच्याकडे दिली आहेत. या कादगपत्रात अनेक होळकरशाही, शिंदेशाही व पेशवाईची उल्लेख बघायला मिळतात.

बालाजी मंदिर

वाड्याला तळघर आहे जे सध्या बंद केलेले आहे. वाड्यामधुन २ गुप्त मार्ग आहेत. जे वाड्या मागील २ वेगवेगळ्या मंदिरात जातात. वाड्यात ऐक आड (पुर्वीची छोटी विहीर) आहे. ज्याचं पाणी मात्र खारट आहे. वाडा हा २ मुख्य चौकात विभागला आहे. आणि वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वाड्याचे सर्वात सुंदर कोरिव लाकडी खांब पाहायला मिळतात. तसेच आणखी ऐक बैठकीची जागा आहे. जिथे पुरातन काळातील चित्रे भिंतीवर काढलेली आहेत.

वाड्याचा दुसरा मजला
येथे अनेक भित्ती चित्र आहेत
अज्ञात पळशीकर सरदाराचे चित्र

विहीरीतील पाणी खारट तर आहेच सोबत त्या वाड्यामध्ये ऐक छोटीशी साधारण ५ इंच अशी वस्तु(विठ्ठलकृष्ण प्याला) आहे. ति खूप अद्भुत आहे. कारण ते ऐक पात्र किंवा प्याला आहे ज्यामध्ये २ मुर्त्या आहेत. उभी जी मुर्ती आहे ती पांडुरंगाची मुर्ती आहे आणि पांडुरंगाच्या हातामध्ये बाळकृष्णाची झोपलेली मुर्ती आहे. या पात्राचे वैशिष्ट्य असे आहे कि, त्या पात्रांमध्ये पाणी भरल्यानंतर त्याच्या खालच्या भागाला ऐक छिद्र (होल) आहे तरी सुद्धा त्यामधुन पाणी बाहेर पडत नाही. मात्र त्याच पात्राच्या बाळकृष्णाच्या पायाला पाणी लागताच पाणी लगेच त्याच छिद्रामधुन गळु लागते. वाचुन कदाचीत लक्षात नसेल आले तर, तुम्ही खालील व्हिडिओ नक्की पहा.

विठ्ठलकृष्ण प्यालाचा Video नक्की पहा

सद्यस्थितीत वाड्याचा एक मजला जरी शिल्लक असला तरी आजही त्यातील प्रत्येक खांबावर एकसंध लाकडामध्ये जे जे बारीक सारीक कोरीव काम केलेले आहे ते आपले डोळे दिपवून टाकते. पळशीकरांच्या वंशजांच्या ताब्यात सध्या हा वाडा असून वाड्याच्या देखभालीसाठी सध्या इथे एक कुटुंब राहत आहे. हा वाडा पाहून झाल्यावर आपण बाजुलाच असलेल्या पुरातन गजगौरी देवीच्या मंदिराचे दर्शन घ्यायचे, मंदिराच्या प्रवेशद्वारावर किर्तीमुख आहे.

गजगौरीमाता मंदिर
किर्तीमुख

बाजुलाच पाण्याची एक विहिर आहे. मंदिराच्या बाजूला किल्ल्याचे एक छोटेसे प्रवेशद्वार आहे, वर तटबंदीवर जाण्यासाठी येथे दगडी जिना आहे, या प्रवेशद्वारासमोरच तीन विरगळी आहेत. हे सर्व अवशेष पाहून आपण किल्ल्याचे मागील भव्य दिव्य प्रवेशद्वार गाठायचे. पहारेकरींसाठी देवडी असलेले हे प्रवेशद्वार पाहून आपण पळशी नदीच्या काठी प्रतिपंढरपूर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या विठ्ठलरुक्मिणी मंदिरात जायचे. अंदाजे २५० वर्षापूर्वी रामराव अप्पाजी पळशीकर यांनी बांधलेले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर

मंदिराच्या दिशेने गेल्यावर मंदिर परिसरातील गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले मन थक्क होऊन जाते. मंदिराची शिखरे, त्यावरील नक्षीकाम, त्यांची प्रमाणबद्धता या गोष्टी पळशीकरांच्या रसिकतेची व पांडुरंगनिष्ठेची प्रचिती आणून देतात.

कळसावरील शिल्प

मंदिराच्या महाव्दारावर गणपती, सरस्वती ही दैवते, महाव्दाराच्या चोहोबाजूस, जय, विजय, सुरया व नक्षीकाम आहे. नगार खाण्याचे रंगकाम व नक्षीकाम खास मुस्लिम पध्दतीत आहे. या विठठल मंदिरात, विठठल – रुक्मीणी व राही या तिघांचे एकत्रित मुर्त्या आहेत. असे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पळशीलाच आहे. हे आगळे वेगळे वैशिष्टय.

मंदिराचे प्रवेशद्वार व नगारखाना

सभा मंडपाच्या तीन बाजूंनी नऊ पायऱ्या नव विद्या भक्तीची प्रतिक. सभा मंडपात अठरा स्तंभ जे नउ फुट उंचीचे या स्तभांवरील कोरीव काम अप्रतिम देखणे मनात भरणार. हे अठरा खांब अठरा पुराणाचे प्रतिनिधीक स्वरुप. सभा मंडपाच्या मध्यमागी दगडी कासव आहे. कासवाच्या पाठीवर उभे राहून कर्मदृष्टीने विठठलाचे दर्शन होते.

मंदिरातील अठरा स्तंभ
तळखडे व त्यावरील सुरेख नक्षीकाम
सभा मंडपामधील दगडी कासव

सभा मंडपाचे वरच्या भागाच्या सव्वाटन वजनाची काशाची घंटा आपली नजर वेधते. सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण व गौळणीच्या रासविहाराच्या दगडीमुर्ती आहेत. श्रीकृष्ण हिंदूस्थानी कलाकारांच्या हस्त कौशल्याची उत्कृष्ट शैली आहे. वास्तु शास्त्राचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळतो. सभा मंडपातील हरणांच्या वानराच्या कोरीव मुर्ती रेखाटतानां उत्तर हिंदूस्थानी कलाकरांनी जीव ओतून काम केल्याचे दिसते.

अद्भुत नक्षीकाम

गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजुंना रिध्दी – सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती आहेत. दरवाजावर ६४ योगिनी आहेत. उंबऱ्यावर दोन किर्तीमुखे आहेत. गाभाऱ्यात पांडुरंगाची शाळीग्राम शिळेची मुर्ती आहे. मुर्तीच्या दोन्ही बाजुना राही, रुक्मीणीच्या संगमरवरी मुर्ती आहेत. पांडुरंगाच्या मुर्तीच्या प्रभावळीवर मच्छ व कच्छादी दशावतार कोरलेले आहे. डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ सवत्स धेनु, गोपाळ आहेत. मुर्तीच्या सिंहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नर, आदिंच्या कोरीव मुर्ती आहेत.

गाभाऱ्यातील मुर्त्या

मंदिराच्या शिखरावर आतील बाजुस व कोरीव कलाकसुरीची कोरीव कामे आहेत. त्यावरुन नजर दूर जात नाही. मंदिरात असणाऱ्या ओहारीतील नक्षीकाम अप्रतिम असून भूमितिय श्रेणीत केलेले काम असून प्रत्येक ओहोरीत वेगळ शिल्प, मंदिरा भोवती असणारी भक्कम तटबंदी मंदिराच्या प्रवेशव्दारा वरील असणारे दुसऱ्या मजल्यावरील कोरीव नक्षी कुठेही पहावयास मिळत नाही.

मंदिराच्या शिखरावरील सुरेख नक्षीकाम
मंदिराच्या शिखरावरील सुरेख नक्षीकाम
मंदिराच्या शिखरावरील सुरेख नक्षीकाम
मंदिराच्या पाठीमागील शिल्प
मंदिराच्या पाठीमागील शिल्प
मंदिरातील शिल्पकाम
मंदिरातील शिल्पकाम

मंदिराच्या आवारात उत्तरेला असणाऱ्या हौदात १९७२ सालीही पाणी आटले नव्हते. मंदिराच्या आवारातूनच पुर्व व उत्तर कोपऱ्यातून एक दहा पाय-या खाली उतरत गेले की आपण पुष्करणीत प्रवेश करतो. मंदिर उत्तरमुखी असुन समोरच एक तटबंदी भिंत असुन यामध्ये एक दरवाजा आपणास सटवाई मंदिराच्या आवारात घेऊन जातो.

संपूर्ण मंदिराला जवळपास १५ /२० फुट उंचीची तटबंदी बांधलेली असून ती मंदिराची सुरक्षा रक्षक अनेक वर्षे उन वारा पाऊस झेलून सुध्दा सुव्यवस्थित आहे. मंदिर ओढ्याच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असून. हा ओढा मंदिराच्या उत्तरेकडुन वाहताना दिसतो. मंदिराच्या पश्चिमेस ओढ्याच्या उत्तर किना-यावर ऐतिहासिक रामेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर व घाट पहावयास मिळतो. तर घाटावर दोन थोर व्यक्तींच्या समाध्या बांधलेल्या निदर्शनास पडतात. रामेश्वर महादेव मंदिरातील नंदीचे शिल्प हि पाहण्यासारखे आहे.

रामेश्वर महादेव मंदिर व गणेश मंदिर
घाटावरील व्यक्तींच्या समाध्या
घाटावरील व्यक्तींच्या समाध्या

पळशीचा कोट, विठ्ठलमंदीर व त्यासमोरील गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापुर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. मंदीराची शिखरे, त्यावरील काम, त्याची प्रमाणबद्धता या गोष्टी पळशीकरांच्या रसिकतेची व पांडुरंगनिष्ठेची प्रचिती आणून देतात. कोटाच्या आत असलेला पळशी गाव ,आतील पळशीकरांचा सुरेख वाडा, दोन छत्री आणि नदीकाठचे विठ्ठल आणि महादेव मंदिर पाहून मन तृप्त होते. या वास्तूंवरून या घराण्याचे ऐतिहासिक कर्तुत्व होळकरशाहीत किती प्रभावी असावे याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

येथील असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाबाबत काही जण चुकीची ऐतिहासिक माहिती देतात. जसे कि, या मंदिराचा निर्माण शिवकाळात सुरतेची लूट केल्यानंतर त्या लुटीमधील काही धनाच्या आधारे या मंदिराचा निर्माण केला. मात्र या मंदिरचा निर्माण हा तेथील नगरकोटाच्या वेळीचा आहे असे सांगितले जाते. नगरकोट हा १७८७ ते १७९७ च्या काळात बांधला व सुरतेची लूट हि सन १६६४ साली झाली. म्हणजे १०० वर्षंहून अधिक काळाचा फरक आहे तरी काही लोक हे समीकरण जुळवताना दिसतात. तर चुकीची माहिती पसरून देऊ नका.

आभार
Indore State Gazette Vol.1
श्री. सदाशिव शिवदे


होळकर कालीन बारव : वाघ्रळ 

वाघ्रळ, ता.जि.जालना(महाराष्ट्र)
ahilyabai holkar
फोटो : मा.रामभाऊ लांडे

ऐतिहासिक व पुरातन बारवा आणि त्याबद्दल संदर्भासहीत दिलेल्या माहितीचे ८ भाग सोशल मीडीयावर, अंबडचे ऐतिहासिक वैभव या सदराखाली “शोध दुर्लक्षित वास्तु व बारवांचा” या विषयाशी संबधीत लेखमाला सोशल मीडीयावर प्रसारीत केल्यानंतर आणि दै. नवाकाळ मुंबई व दै. सामना या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर मला अनेक ठिकाणाहुन बारवाबद्दल माहिती देणारे काँल येवु लागले. म्हणुन माझे मित्र श्री. जोशी सर जालना यांनी वाघ्रळ देवीचे ता.जि जालना येथील ऐतिहासिक बारवेबद्दल माहिती देवुन एकदा बारवेला भेट देण्याचा आग्रह केला. आज दि ९/५/२०१७ रोजी दुपारी ०१:३० वा ४५ सेल्सीअंश इतके उन्ह असतांना सत्यभान पा खरात यांना सोबत घेवुन वाघ्रळ गावाला भेट दिली, आणि ऐतिहासिक बारवेचा शोध घेतला.

ahilyabai holkar

बारव बघितल्यानंतर उन्हाचा लाही लाही करणारा त्रास विसरुन उन्हात आल्याचे चिज झाले असा मनात विचार करुन बारवेची व्यवस्थित पाहणी केली दगडी पाय-या उतरुन तळापाशी गेलो बारव महाकाय आहे. त्यात हत्ती, उंट त्या बारवेत उतरुन पाणी पिऊ शकतात अशी मजबुत दगडी बांधणीची विशाल बारव निट निरखुन पाहिली. बारवेच्या कमानीवर बारवबद्दलचा शिलालेख आहे. अशी ही बारव प्रथमच मराठवाड्यात पाहत असल्याने त्याविषयी कुतुहल वाटले. पंढरपुरची बाजीराव विहीर आणि करमाळ्याची विहीर या बारवेसमोर लहान वाटतात.

या बारवेला पाण्याचे सात झरे असुन जिवंत पाणीसाठा आहे काडीकचरा व गवतामुळे बारवेचे वैभव खराब झाले असले तरी बारव जशास तशी आहे शेजारी राहणारे खांडेभराड काका यांनी ही बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली असल्याचे सांगीतले तर तेथुन ये जा करणा-या वयोव्रध्दांनी बारव अहिल्याबाईची असल्याचे सांगीतले. बारवेशेजारी एक दगडी मंदिर असुन, समोर छत्रीत दगडी नंदी व खाली दोन अडीच फुटाचा कासव सोबत पाण्याचा हौद, नदांदिप व एक समाधी आणि धर्मशाळा आहे.

सभोवतालचा परिसर स्वच्छ असुन बारव पाहताच मन प्रसन्न होते. या बारवे बरोबर गावात तीन चार कमानीच्या दगडी वेशी तर दगडी चौकाचे आणि होळकर पेशवे वाड्यासारखे अनेक वाडे आहेत. या वाघ्रळ गावाला ऐतिहासिक महत्वाबरोबर शौर्य व पराक्रमाची भुमी म्हणुन ओळखले जाते. वाघ्रळ हे गाव मराठवाड्याचे जालना जिल्ह्यातील शेवटचे गाव असुन तेथुन नागपुर प्रांत म्हणजे विदर्भ सुरु होतो. मराठवाडा मुक्तीसंग्रात वाघ्रळ गावचा विस्ताराने इतिहास असुन या गावचे संशोधन होणे महत्वाचे आहे.

बारवेशेजारी असलेल्या मंदिरात पुर्वीच्या काळी जगंदबेचे ठाणे होते मात्र देवी तिथुन डोगंराकडे गेल्याने तिथे एक दगडी मंदिर बांधलेले होते. गावक-यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला असुन यामुळे वाघ्रळ गावास देवीचे वाघ्रळ म्हणुन ओळखतात. पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या धर्मशाळेपैकी वाघ्रळ ची धर्मशाळा अजुन चांगल्या स्थितीत आहे. चार भिंती चांगल्या असुन त्यावर लोखंडी पत्रे टाकल्यास ती वास्तु उपयोगी येवु शकते. पुर्वी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असावी व यात्रेकरु थांबत असावे तसेच या ठिकाणी भाविकांची गर्दी असावी म्हणुन धर्मशाळेचे बांधकाम झालेले असावे. सद्य परिस्थितीत अनेक ठिकाणच्या धर्मशाळा नष्ट झालेल्या आहेत पंरतु इतिहासाची साक्ष देणारी वाघ्रळची धर्मशाळा आजही आपले अस्तित्व टीकुन आहे.

ahilyabai-holkar
बारवेशेजारी असलेली धर्मशाळा

जालना येथील स्व. भगवानराव काळे यांच्या आपला जालना जिल्हा या ऐतिहासिक पुस्तकात वाघ्रळ बद्दल दिलेल्या माहितीचा संदर्भ महत्वाचा असुन पुढे संशोधन कामी उपयोगी ठरणारा ग्रंथ आहे. वाघ्रळ ची महाकाय बारव होळकर शाहीचे ऐतिहासिक वैभव असुन मोठ्या उंचीची चिरेबंदी दगडी बारव पाहण्यासारखी असुन जलव्यवस्थापनेचा एक चांगला नमुना आहे. जल व्यवस्थापनेचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वाघ्रळची बारव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ahilyabai-holkar
बारवेशेजारी असलेला हौद
ahilyabai-holkar
गायमुख
ahilybai-holkar
कासव शिल्प

समाधी

मंदिर

होळकरकालीन बारव - वीरगाव, जि.अहमदनगर 

वीरगाव : ता.अकोले जि.अहमदनगर (महाराष्ट्र) 

ahilyabai-holkar
वीरगाव येथील होळकरकालीन बारव.

वीरगावच्या पश्चिमेला काळ्या-तपकिरी डोंगर रागांच्या सानिध्यात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या बारवेचे बांधकाम केले. राणी अहिल्यादेवी होळकर पुण्याहून इंदोरकडे जाताना हा प्रमुख मार्ग होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी बारव बांधण्यात आल्या. परंतु कालौघात त्या नष्ट झाल्या. काही इतिहासात चिरनिद्रा घेण्याच्या मार्गावर आहेत. वीरगावच्या या बारवेचा चिरा अन् चिरा मात्र आजही शाबित आहे.  

अकोले-सिन्नर रस्त्यापासून साधारण २०० फूट आतमध्ये शेतात या बारवेचे खोदकाम झाले. बारवेची खोली ५८ फूट असून तळापर्यत जाण्यासाठी ४७ पायर्‍या आहेत. कलथा आकाराची ही बारव पुढे रुंद आणि पाठीमागे जिन्याच्या स्वरुपात आहे. बारवेसाठी वापरलेल्या दगडांचा अनेकांनी जवळपासच्या सर्व डोंगरामध्ये शोध घेतला. मात्र कोणत्याही डोंगराचा दगड बांधकामाशी जुळता मिळता नसल्याचे भागवत गंगाराम आस्वले यांनी सांगितले. यावरून त्याकाळी अनेक योजने दूर वरून हा दगड आणला असावा. जागेवर चुन्याचा घाणा करून या बारवेची निर्मिती झाल्याच्या खाणाखुणा मात्र आढळून येतात.  

बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगडही तीन प्रकारचा असून तळचा, मधला आणि वरचा दगड वेगळ्या प्रकारचा आहे. बारवेत दोन आकर्षक कमानी असून राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्तेच विराजमान झालेली गणपतीची मूर्ती दगडी भिंतीच्या कोनाड्यात स्थानापन्न आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीची घडणही संशोधनात्मक आहे व हि मूर्ती त्या कोनाड्यात इतकी घट बसवलेली आहे कि तुम्ही कितीही शक्ती वापरली तरी ती थोडीपण हालत नाही. प्रत्येक वाटसरूसाठी निवांत विसाव्याचे हे ठिकाण आहेच. शिवाय त्र्यंबकवारीला आळंदीहून निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकरी दिंड्यांच्या वास्तव्याचे हे कायमस्वरुपी तीर्थस्थान आहे. 

ahilyabai-holkar
पावसाळ्यातील बारवे मध्ये असलेले पाणी व गणपतीची मूर्ती,
फोटो आभार : रामदास अस्वले(वीरगाव). 

ऐन उन्हाळ्यात बारवेचे पाणी तळ गाठते. इतर ऋतूत मात्र निळेशार थंडगार पाणी येणार्‍या प्रत्येकाची तहान भागविते. दूरवरच्या अनेक संशोधकांनी या स्थळाला भेटी दिल्या असून सखोल परीक्षणाअंती इतिहासाचा लख्ख भूतकाळ समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच बरोबर वीरगाव मधील दिनेश वाकचौरे व रावसाहेब वाकचौरे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ या बारवेची डागडुजी करून तिच्या पाण्याचा वापर गावासाठी योग्य प्रकारे करत आहेत, त्यांच्या या कृतीचे अनुकरण इतिहासाची हेळसांड करणाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात बारवेमधील पाणी तळ गाठते
फोटो आभार : रामदास अस्वले(वीरगाव). 

आजपर्यंत(फेब. २०१७) मिळालेल्या माहितीनुसार राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अकोले तालुक्यात वाशेरे, औरंगपूर, तांभोळ, ब्राह्मणवाडा येथे बारवेचा निर्माण, लिंगदेव येथे लिंगेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व बारवेचा निर्माण, कुंभेफळ येथे शेषनारायण मंदिरचा व भव्य बारवेचा निर्माण केला आहे. शेषनारायण मंदिर भारतात फक्त दोनच ठिकाणी आहेत एक म्हणजे वाराणसी(काशी) आणि दुसरे म्हणजे कुंभेफळ. हा अकोले तालुक्याचा इतिहास लवकरच आपल्यासमोर फोटो व माहीती सहित मांडू. 

  • फोटो आभार : रामदास अस्वले(वीरगाव), जयसिंग सहाणे
  • माहिती आभार : ज्ञानेश्वर खुळे. 
  • राणी अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या बारवांचे फोटो पाहण्यासाठी Click करा

वाफगाव : होळकरकालीन बुरुजातील विहिर(अंधारी विहिर) 

वाफगाव : ता.खेड जि.पुणे(महा.)

वाफगावचा किल्ला का पाहायला जावा? याची फक्त तीनच कारणे आहेत.

  • पहिले म्हणजे भुईकोट किल्ल्यामधील दुमजली असलेला राजदरबार,
  • दुसरे म्हणजे किल्ल्याच्या बाहेरील श्री राजराजेश्वर मंदिर आणि
  • तिसरे म्हणजे या भुईकोटातील एका बुरुजामध्ये असलेली विहीर.

हि विहीर या भुईकोटातील एक प्रमुख आकर्षण असून तत्कालीन होळकर कालीन पाणी व्यवस्थापनेचा उत्तम नमुना आहे.

ahilyabai-holkar
किल्ल्याच्या बुरुजातील होळकर कालीन अंधारी विहिर.

आजही या विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असून आतापर्यंत जेवढे दुष्काळ आले तरीही या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला नाही. विहिरीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यात केर कचरा पडू नये तसेच प्राणी पडून त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्या पद्धतीच्या बांधणी असलेल्या असंख्य विहिरी तुम्ही पाहिल्या असतील मात्र या विहिरीचे या व्यतिरिक्त वेगळे पण म्हणजे परकीय शत्रू कडून पाण्यात विष मिसळले जाऊ नये म्हणून हि विहीर किल्ल्याच्या प्रमुख बुरुजात निर्माण करण्यात आली आहे व या विहिरीत जाण्यासाठी फक्त एकच मार्ग असून तो किल्ल्याच्या आतून भुयारी मार्ग प्रमाणे आहे.

ahilyabai-holkar
तटबंदी मधून बुरुजातील विहिरीकडे जाणारा मार्ग

हि विहीर म्हणजे होळकर कालीन लष्करी व्यवस्थापनेचा एक उत्तंग नमुना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या विहिरीचा निर्माण या भुईकोट किल्ल्याबरोबरच करण्यात आला. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यशासन काळात बांधण्यात आला आहे.

किल्ल्याच्या आत श्री विष्णू-लक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीमधून बुरुजाकडील विहिरीकडे जाण्याचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भुयारी मार्गात गेल्यावर डाव्या बाजूला वळून ५० मी. चालत जावे लागते. जाताना या भुयारी मार्गात खूप अंधार असतो. ५० मी. अंतर चालून गेल्यावर उजव्या बाजूला वळावे लागते व तेथून थेट खाली बुरुजातील विहिरीच्या तळापर्यन्त जाणाऱ्या ३० ते ३५ पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या मधोमध उभे राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी दोन टप्पे निर्माण केले आहेत. पायऱ्या उतरत असताना आपल्याला विहिरीचे निखळ पाणी व त्यावरील पडलेला सूर्य-प्रकाश नजरेस पडतो.  

तटबंदीतून उजव्या बाजूने वळून विहिरीकडे जाणारा मार्ग
विहिरीतील निखळ पाणी

हा सूर्य प्रकाश बुरुजाच्या वरील बाजूने असलेल्या मोकळ्या भागातून आत येण्याची व्यवस्था केली आहे. या विहिरीला “अंधारी विहीर” या नावाने हि ओळखले जाते. या बुरुजातील विहिरी बद्दल जेवढे लिहिल तेवढे कमीच आहे त्यामुळे हि मराठा कालीन वास्तू कलेचा उच्च कोटीच्या आर्किटेक्टचा अजोड नमूना असलेली हि होळकर कालीन बुरुजातील विहीर प्रत्यक्षात जाऊन पाहण्यात जी मजा आहे ती दुसरी कशात नाही.

सूर्य प्रकाश येण्यासाठी केलेली सोय
(बुरुजातून घेतलेला फोटो)
सूर्य प्रकाश येण्यासाठी केलेली सोय.
(बुरुजावरून घेतलेला फोटो)
ahilyabai-holkar
बुरुजामधील विहीर
ahilyabai-holkar
बुरुजावरून घेतलेला फोटो

जर कधी राजगुरूनगरला गेलात तर वाफगावच्या या भुईकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. राजगुरूनगर पासून वाफगाव हे १२ कि. मी. च्या अंतरावर आहे.

 

जेजुरी(Jejuri) - अहिल्यादेवी होळकर तलाव 

जेजुरी, ता.पुरंदर जि.पुणे (महा.)

जेजुरी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या कर्तुत्वाने पावन झालेली भूमी. जेजुरी(Jejuri) मधील राणी अहिल्यादेवींच्या काही कार्यामधील एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव. या तलाव्याचा निर्माण पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० केला.राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हा तलाव अभियांत्रिकेचा व पाणी व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमूना आहे.

अहिल्याबाई-होळकर-फोटो
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला भव्य तलाव

हा तलाव लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सासरे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व सासू श्रीमंत गौतमीबाई होळकर यांच्या स्मरणार्थ निर्माण केला म्हणून या तलावास “मल्हार-गौतमेश्वर तलाव” या नावाने देखील ओळखले जाते. जेजुरी गडाच्या बाजूला हा भव्य तलाव स्थित असून एकूण १८ एकर जागेमध्ये पसरलेला आहे.

हा तलाव आकाराने चोकोनी असून चारीही बाजूने मजबूत घडीच्या दगडाने बांधलेला आहे. या तलाव्याच्या एका बाजूला चिंचणीची बाग असून जेव्हा आपल्या नजरेस हा तलाव पडतो तेव्हा आपल्या डोळ्याचे प्रारणे फिटून जीव थक्क झाल्याशिवाय राहत नाही. डोंगरावरील अनेक झऱ्याचे पाणी एकत्र करून शिस्तबद्ध पदधतिने तलाव्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. डोंगरातील पाणी ज्या ठिकाणी तलाव्यात येते त्या ठिकाणी दगडांची खाली-वर या प्रकारे विशिष्ट्य पदधतीने मांडणी केलेली दिसते.

ahilyabai-holkar
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला भव्य तलाव

तलाव्यामध्ये उतरण्यासाठी पूर्व व उत्तरेच्या बाजूला पायऱ्यांची सोय केलेली आहे. त्याचप्रकारे तलाव्यातील पाणी हे शेतीसाठी वापरण्यात यावे यासाठी पूर्व, उत्तर व दक्षिण या बाजूंना दगडी मोटेची सोय केलेली दिसते. तसेच तलाव्याच्या उत्तर व दक्षिण बाजूला तलाव्याला लागुनच दोन चौकोनी आकाराच्या विहिरी आहेत.

या विहिरीचे बांधकाम दगडामध्ये असून त्यामधील दक्षिण बाजूच्या विहिरीवर शेतीसाठी पाणी उपसण्यासाठी दगडी मोटेची सोय केलेली आहे. याच विहिरीतील पाण्याचा उपयोग चिचणीच्या बागेसाठी होत असावा. तलाव्याच्या उत्तर बाजूला थोड्या अंतरावर अधुरे काम झालेले मंदिर पहावयास मिळते. या मंदिरामध्ये काही कोरीव पादुका पहावयास मिळतात तर काही कोरीव दगडी शिळा मंदिरासमोर हि बघायला मिळतात. या मंदिरासमोर एक छोटी दीपमाळ हि आहे.

अहिल्यादेवी-फोटो
तलावाच्या उत्तर बाजूला असलेली विहीर
ahilyadevi-holkar
तलावाच्या दक्षिण बाजूला असलेली विहीर(चिंचेच्या बागेशेजारी)

तलाव्याची पूर्व कडील बाजू हि तलाव्याची प्रमुख बाजू असून याच बाजूने दटयांच्या सहाय्याने तलाव्यातील पाणी हे गायमुख या जलकुंडामध्ये व जेजुरीतील तीन हौदामध्ये भूमिगत नळांद्वारे पोहचवले जात होते. त्यामुळे धुणे, अंघोळी व जनावरांसाठीचे पाणी दूरवर उपलब्ध होत होते. त्याचा वापर करून ते पुढे शेतीसाठी वापरले जात. त्यामुळे पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून, पाणी वापरल्यानंतर त्याचा पुढे शेतीसाठी पुनर्वापर व्हावा हा विचार होता.

दटयांच्या बाजूला तलाव्याच्या बंधरयावरच भूमिगत नळांद्वारे जाणाऱ्या पाण्यावरील हवेचा दाब कमी व्हावा व या भूमिगत नळांद्वारे पाण्याचा प्रवाह व्यवस्थित व्हावा यासाठी खास चौकोनी दगडात मांडणी केलेली दिसते,ती आज हि आहे. पूर्वकडील बाजूला असलेल्या दटयांची मांडणी हि आज ही पहावयास मिळते तसेच त्या दटयांमधील भूमिगत नळही नजरेस पडतात. फक्त पूर्वकडीलच बाजूने तलाव्याच्या तळापर्यंत पायऱ्यांची सोय केलेली आहे आणि याच पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर महाराजा होळकर इंदौर स्टेटचा संगमरवरी बोर्ड पहावयास मिळतो.

ahilyabai-holkar-information-in-marathi
तलावाच्या याच दटयांच्या माध्यमातून पाणी भूमिगत नळांना मिळत असे
ahilyabai-holkar-in-marathi
तलावाच्या याच दटयांच्या माध्यमातून पाणी भूमिगत नळांना मिळत असे
ahilyabai-holkar-marathi
तलाव्यामध्ये असलेला महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड

दोन ठिकाणी तलाव्यामध्ये महाराजा होळकर इंदौर स्टेटचा बोर्ड आहे. पूर्वकडील एका बाजूने आपून तलाव्यात उतरल्यावर भव्य होळकर कालीन शिवपिंड पहावयास मिळते व या शिवपिंडेच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील तटबंदीवर विविध आकाराच्या दगडांची लक्षणीय मांडणी केलेली आहे.

हि शिवपिंड राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यमानाने तयार झालेली असावी. या तलाव्याचा आजही फक्त जेजुरीच नाही तर आसपासच्या गावांना ही शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. हा तलाव तयार करताना जो नवलात या प्रकारचा दगड सापडला त्याच दगडापासून जेजुरीगडाच्या पायऱ्या होळकर काळात बनवल्या गेल्या.

ahilyabai-holkar-mahiti
तलावामध्ये असलेली पिंड
ahilyabai-holkar-history-in-marathi
तलावामधील विशिष्ट दगडी रचना
information-about-ahilyabai-holkar-in-marathi
तलावामधील दुसरा होळकर स्टेटचा शिलालेख

सन १९३९ ला या तलाव्यातील पाण्याचा उपयोग जेजुरीत पिण्यासाठी होऊ लागला. ही प्रमाणात आजही होत आहे. या तलाव्यामध्ये भव्य दगडी चौथरा पहावयास मिळतो. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या अनेक कार्यामधील एक उत्तम कार्य असलेला हा होळकर तलाव अभीयांत्रीकेचे भाग आहे.

अशाप्रकारे विविध गुणांनी नटलेला हा होळकर तलाव आज घाणीच्या साम्रज्यात अडकलेला दिसतो. जेजुरी देवस्थान यांच्या वतीने येणाऱ्या यात्रेकरूंच्या अपुऱ्या सोयीमुळे तलाव्याच्या पश्चिम बाजूला मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसते. मात्र जो पर्यंत सूर्य,चंद्र आणि वारा आहे तो पर्यंत हा होळकर तलाव आपल्याला इंदोरची राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्वाची जाणिव करून देत राहणार हे नक्कीच.आजच्या या कलयुगात हि होळकर कालीन वास्तू दिमाखात उभी आहे.

ahilyabai-holkar-information
तलावात चारही बाजूने अशा प्रकारेचे मजबूत दगडी बांधकाम बघायला मिळते.

महत्त्वाचे:

  • गायमुख या जलकुंडाचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० ला केला होत मात्र त्या गायमुखाच्या भिंतीचा वापर करून आज त्यावर भक्त निवास उभारले आहे. गायमुखाच्या पूर्वीच्या काही भिंती बाहेरील व आतील बाजूस पहावयास मिळतात.
  • चिचणीच्या बागेचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी भक्तांच्या सोयी केला होता.

रंगमहाल  चांदवड

चांदवड, ता.चांदवड जि.नाशिक(महाराष्ट्र)
ahilyabai-holkar

इतिहास:

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सन १७५० च्या सुमारास उत्तरेत केलेल्या कामगिरीमुळे दिल्लीच्या मुघल बादशहाने चांदवडची जहागिरी होळकरांना दिली व त्याला पेशव्यांनी मान्यता दिली तेव्हापासून चांदवड परगण्यावर इंदोरच्या होळकर राजघराण्याची अधिसत्ता प्रस्थापित झाली. चांदवड खरे नावारूपास आले ते होळकरांच्या काळात. सन १७५०-१७६५ या कालावधीत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राणी अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवड शहरातील किल्ले सदृश्य नवीन होळकर वाडा (रंगमहाल – Rangmahal) बांधला तसेच या वाड्याबरोबर संपूर्ण चांदवड भोवती काळी तटबंदी व सात वेशींचा हि निर्माण केला.

याच काळात काही अंतरावर असलेल्या किल्ले चांदवड वर होळकरांची टांकसाळ सुरू केली होती. होळकरशाहीत चांदवडचा चांदीचा ‘चांदोरी रुपया’ प्रसिद्ध होता. सन १८३० मध्ये चांदवडची टांकसाळ कायमची बंद झाली. आता या टांकसाळीचे अवशेष तेवढे उरले आहेत. सन १८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवड होळकरांकडून ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर सूत्रे पुन्हा होळकरांकडे आली. सन १८१८ मध्ये मराठा शाहीचा अस्त झाल्याने सर थॉमस हिस्लॉपने पुन्हा चांदवड ताब्यात घेतले.

पाहण्याची ठिकाणे:

वाड्याच्याआतील होळकर कालीन लाकडी नक्षीकाम व रंगचित्र, राणी अहिल्यादेवी होळकर यांचे २५० वर्षापूर्वीचे original चित्र पिंड व तलवार सोबत, राणी अहिल्यादेवी होळकर यांचा राजमहाल, राणी अहिल्यादेवी यांची राजगादी, चिरेबंदी दगडात बांधलेली प्रचंड मोठी बारव, किल्ले चांदवड व त्यावरील टांकसाळ, किल्ले धोडप, श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर, श्री रेणुकामाता मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्री कालिकामाता मंदिर.

माहिती:

सह्यादीच्या पर्वतरांगेत मुंबई – आग्रा महामार्गावर वसलेल्या चांदवड शहराला ऐतिहासिक वारसा असून येथेच होळकर कालिन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा किल्ले सदृश्य होळकर वाडा(Holkar Wada) म्हणजेच रंगमहाल. वाड्यामधील लाकडी कोरीव काम आजही लक्ष वेधून घेते. पूर्वीच्या काळी हा वाडा होळकर वाडा म्हणून ओळखला जात असेे, परंतु येथील दरबार हॉलमध्ये असणाऱ्या रंगीत चित्रांमुळे या वाड्याला रंगमहाल असे हि नाव पडले.

होळकर वाडा ही वास्तू चांदवडचे वैभव आहे. या महालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुरुवातीलाच मोकळा भूभाग लागतो. थोड्या अंतरावरच वाड्याच्या मुख्य इमारतीस सुरुवास होते. दर्शनी बाजूच्या दोहींकडून दोन जिने आहेत. ते दुसऱ्या मजल्यावरील दरबार सभागृहात जातात. या भव्य सभागृहात अनेक निसर्गचित्रे पशु-पक्षी, तत्कालीन महिला-पुरुष, मुले, त्यांची वेशभूषा अशी चित्रे आहेत. इतिहासकाळात न्यायदान व आस्थापनासाठी याच सभागृहाचा उपयोग केला जात असे. काळाच्या ओघात काही जुने वाडे, वेशी आणि तटबंदी पडून गाव विस्तारलेलं असलं तरीही आज दोन-तीन वेशी आपल्याला बघायला मिळतात.

rangmahala-wooden-carve
रंगमहालातील लाकडी कोरीव काम
(फोटो : प्रकाश मांजरेकर)
ahilyabai-holkar-rangmahal-wooden-carve
रंगमहालातील लाकडी कोरीव काम

चांदवड शहर पूर्वी सात वेशींमध्ये बांधलेलं होतं. दिल्ली दरवाजा, धोडंबे(धोडप) दरवाजा, बाजार वेस, जुनी सरकारी वेस, आनकाई वेस, ढोलकीची वेस(शिवाजी चौकातली), गुजरात गल्ली वेस अशा वेशींपैकी काही आज पाहावयास मिळतात तर काहींना वाढत्या गावाने फोडून टाकलं आहे. एसटी स्टॅण्ड कडून गावात जातांना आठवडे बाजार वेस आपलं स्वागत करते. या वेशीवर जरी हल्ली फ्लेक्स बोर्ड झळकत असले तरी मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना पूवीर्चे शिलालेख आढळतात. एक मराठीतला तर दूसरा फारसी भाषेत कोरलेला आहे. मराठीतला शिलालेख थोडं बारकाईने बघितला तर वाचता येतो.

इथूनच चांदवड आपल्याला त्याच्या प्राचीनत्त्वाची प्रचिती देतं. गावात काही प्रसिद्घ आणि शिल्पकलेचे अद्वितीय नमुने असलेले साखळीवाडा, तर्टेवाडा, गोखलेवाडा, वैद्यवाडा असे जुने वाडेही होते, असं म्हणावं लागतं. कारण तेही पोखरून नेस्तनाबूत झालेत. या सर्वात आजही आपलं अनोखं सौंदर्य घेऊन उभा आहे तो म्हणजे किल्ले सदृश्य होळकर वाडा म्हणजेच रंगमहाल. गावातल्या बच्चालाही विचारलं रंगमहाल कुणीकडे, तरीही लगेच तो बोट करून रस्ता दाखवतो.

holkar wada chandwad
होळकर वाडा(रंगमहालाचे) प्रवेशद्वार
chandwad rang mahal
होळकर वाडा(रंगमहालाचे) प्रवेशद्वार

आजुबाजूला दोन भव्य बुरुज, तटबंदी आणि मध्यभागी उंच असं दगडी प्रवेशद्वार. रंगमहाल इतका मोठा अगदी जवळजवळ पुण्याच्या शनिवार वाड्याएवढा असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. उत्तरेकडे तोंड असलेल्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान, छोट्या खिडक्या, आत पहारेदाराच्या खोल्या आणि वर अंबारीसारखे घुमट असलेली तटबंदी असा रंगमहालाचा रुबाबदार थाट दिसतो.

प्रवेश द्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत असून तो ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घडविलेला दिसतो. परकीय आक्रमण झाल्यास दरवाजा हत्तीच्या धडकेने तोडला जाऊ नये म्हणून त्यावर लांब व टोकदार असे लोखंडी खिळे बसविलेले दिसतात. दरवाजाच्या भव्यतेवरून आतल्या रंगमहालाचा पसारा किती असावा याचा अंदाज येतो. आत प्रवेशताच समोर मुख्य महाल नजरेत पडतो. मुख्य इमारतीत आत गेल्यावर लाकडाचे भव्य खांब त्यावरील नक्षीकाम, गोलाकार कमानी, बारीक कलाकुसरीची वेलबुट्टी, लाकडाला कोरून केलेल्या जाळीच्या भिंती असं किती बघावं नि किती नाही असं होतं.

rang mahal chandwad
दारावर असलेले लोखंडी सुळे
ahilyabai-holkar
वाड्याच्या आत असलेले भव्य लाकडी खांब

आत गेल्यावर आपण महालाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या चौकात येऊन पोहोचतो. हा जवळपास ६० बाय ६५ फूट एवढा चौक असून त्याच्या अवतीभोवती नजर फिरविल्यास लाकडावर किती बारीक आणि देखणं नक्षीकाम होऊ शकतं याचा प्रत्यय येतो. खुल्या चौकाच्या चारही बाजूंना वेगवेगळी दालनं, त्या दालनांचे लाकडी खांब आणि त्या खांबांच्या वरच्या भागावर काष्ठशिल्प, आडव्या तुळईंवरच्या बारीक वेलबुट्टी आणि असे कोरीव लाकडी खांबांचे एकावर एक तीन मजले असा हा भव्यदिव्य सेटच उभारलेला आहे.

या काष्ठशिल्पात आपल्याला अनेक वेगवेगळी फुलं, पोपट, मोर इ. पक्षी तसंच हत्ती, सिंह, वानर अशा अनेक प्राण्यांच्या कलात्मक प्रतिमा कोरलेल्या दिसतात. रंगमहालाच्या भिंतीही जुन्या विटांच्या आणि दगडी बनावटीच्या भक्कम अशा बनविलेल्या आहेत. संपूर्ण बांधकाम चुन्यात केलेलं आहे. या मध्यभागाच्या चौकात आपण या सर्व कलात्मकतेत हरवूनच जातो. इथं दर्शनी भागातल्या एका दालनात होळकरांची राजगादी ठेवलेली असून राजमाता राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर जेव्हा चांदवड येत तेव्हा याच राजगादीवरून न्यायनिवाडा करत असत तसेच होळकर वंशीयांचे जुने फोटोही याच दालनात लावलेले आहेत. हल्लीच इथं अहिल्यादेवींच छोटे स्मारक बसवून त्यासमोर कारंजा बसवून थोडं सुशोभिकरणही केलेलं आहे.

ahilyabai-holkar
तटबंदीच्या आतील मुख्य वाडा
ahilyabai-holkar-rangmhala
दरवर्षी हजारो पर्यटक हा वाडा पाहायला येतात
ahilyabai-holkar-wada
(फोटो : अमर रेड्डी)
ahilyadevi-holkar
वाड्याच्या चोथ्या मजल्यावर पाणी जाण्यासाठी केलेली सोय.
(फोटो : अमर रेड्डी)
ahilyabai-holkar
वाड्यात असलेले १८ व्या शतकातील अहिल्यादेवींचे चित्र

वाड्याच्या पाठीमागे घोड्यांची पाग व पाण्याच्या सोयीसाठी निर्माण केलेली भव्य बारव स्थित आहे. हि बारव तीन माजली खोल आहे. मुळातच चांदवड शहर हे बारावांसाठी प्रसिद्ध आहे.

ahilyabai-holkar
वाड्याच्या पाठीमागे असलेली भव्य बारव.
(फोटो : अमर रेड्डी)
ahilya-holkar
या बारवे मध्ये भुयारी मार्ग हि आहेत.
(फोटो : अमर रेड्डी)

याशिवाय चांदवड शहरात व परिसरात लोकमाता राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी काही लोककल्याणकारी कामे केली त्यामध्ये श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराचा जीर्नोधार, श्री रेणुकामाता मंदिराचा जीर्नोधार व पाण्याच्या सोयीसाठी बारव व तलावाचा निर्माण, चांदवड टेकडीवर श्री खंडोबा मंदिराचा निर्माण, श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा निर्माण, श्री कालिकामाता मंदिराचा निर्माण केला.

अशी हि होळकरकालीन वस्तू आयुष्यात नक्की पाहिली पाहिजे. खाली Google Map दिला आहे. चांदवड शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तेथे मुक्कामाची व जेवणाची सोय सहज होऊ शकते. चांदवड शहर व तालुक्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या: chandwadtaluka.com व नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अहिल्यादेवींच्या बारवा व अन्य ऐतिहासिक वास्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या: safarbaglanchi.com

होळकर वाडा  खडकी होळकर-फोटो

होळकर वाडा, खडकी-पिंपळगाव

खडकी-पिंपळगाव, ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र): हा होळकर वाडा (Holkar Wada) पाहिल्यानंतर काय बोलावे अन काय नाही हे कळणारच नाही कारण या वाड्याचे फक्त प्रवेशद्वारच स्थित आहे. या वाड्याची सर्व तटबंदी हि पडलेली आहे किंवा पाडलेली आहे. खरं काय ते इतिहासचं जाणतो. हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला असून जे शिल्लक प्रवेशद्वार आहे त्यास हत्ती दरवाजा म्हटलं जाते.

holkar-wada-khadki-pinpalgaon
हत्ती दरवाजा
ahilyabai-holkar
हत्ती दरवाजा
ahilyadevi-holkar
हत्ती दरवाजा
ahilyabai-holkar-in-marathi
हत्ती दरवाजावर जाण्याचा मार्ग
malharrao holkar
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम)

प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस दोन होळकर कालीन शिल्प हि पहावयास मिळतात. असे सांगितले जाते कि, जेव्हा सुभेदार मल्हारराव होळकर यांना वाफगाव ची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांनी ६ गावात ६ किल्ले सदृश्य वाडे एकाच वेळी बांधायला काढले होते. त्यातीलच एक हा खडकी – पिंपळगावचा होळकर वाडा. उर्वरित ५ वाडे म्हणजे काठापूरचा होळकर वाडावाफगाव, अवसरी, मंचर व काठापूर(खुर्द).

येथे पाहण्यासाठी काही होळकर कालीन वास्तू स्थित आहेत त्यामध्ये महादेव मंदिर व त्यामधील नंदी, लक्ष्मी नारायण मंदिर, काळभैरवनाथ मंदिर, बिरोबा मंदिर, राजमाता अहिल्यादेवी होळकर(Ahilyadevi Holkar) यांनी बांधलेला नदी घाट, तसेच अवचितराव वाघमारे-पाटील यांनी पितृ उध्दर्तीर्थ बांधलेली समाधी. अवचितराव वाघमारे हे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर (प्रथम) यांचे नातू असून श्रीमंत उदाबाई वाघमारे(होळकर) व सरदार बाबुराव मानाजी वाघमारे यांचे पुत्र होय. महादेव मंदिर व काळभैरवनाथ मंदिराला आजच्या काळातील रंग दिल्यामुळे त्यावरील असलेले होळकर कालीन नक्षीकाम हे इतिहास जमा झालेले आहे.

ahilyabai-holkar-mahiti
महादेव मंदिरामधील नंदी
ahilya bai information in marathi
काळभैरवनाथ मंदिरा समोरील होळकरकालीन दीपमाळ
ahilyabai holkar marathi mahiti
काळभैरवनाथ मंदिरा समोरील होळकरकालीन शिल्प

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांची मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर-वाघमारे यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे-पाटील यांच्याशी झाल्यानंतर हे खडकी गाव श्रीमंत उदाबाई यांना चोळीबांगडी म्हणून होळकर कुटुंबियांनी बक्षीस स्वरुपात दिले. श्रीमंत उदाबाई या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या होय.

उदाबाई वाघमारे – होळकर यांची समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. या समाधी नक्षी कामामध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून तीन पादुका आहेत. यावरून हि समाधी तिन लोकांच्या स्मरणार्थ बांधलेली आहे हे स्पष्ट होते. समाधीच्या गर्भगृहातील दारावर होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो. या समाधीवर झाडे झुडपे वाढताना दिसतात ते वेळेत साफ केले नाही तर येणाऱ्या काळात त्याचा समाधी मंदिरावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही. तसेच समाधीच्या बांधकामामध्ये येथील स्थानिक शेतकऱ्याने विटांचे बांधकाम करून समाधीचे विकृतीकरण केल्याचे दिसून येते व हि समाधी ज्या शेतकऱ्याच्या शेतात आहे त्या शेतकऱ्यांने या समाधीमध्ये मटका खेळणाऱ्या लोकांना मासिक भाड्यावर त्याच्या बापाची संपत्ती असल्यागत पत्ते खेळण्यास परवानगी देऊ केली आहे.

ahilyabai holkar ka itihas
बाबुराव व उदाबाई वाघमारे(होळकर) यांची समाधी
information of ahilyabai holkar in marathi
समाधी वरील होळकर कालीन सुबक नक्षीकाम
ahilyabai holkar yanchi marathi mahiti
समाधी वरील होळकर कालीन सुबक नक्षीकाम व विटांचे बांधकाम
इंदौरचे होळकर
समाधीमधील पिंड व तीन पादुका
अहिल्याबाई-होळकर-कार्य
समाधीच्या आतील होळकर कालीन शिलालेख

समाधीमधील शिलालेखावरील उल्लेख पुढील प्रमाणे :
श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे. सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द(वडील) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे.

येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो. नदीघाट पाहण्यासाठी जाताना येणाऱ्या वेशीवर अजून एक होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो. या शिलालेखावरील उल्लेख हा समाधीवरील शिलालेखाशी तंतोतंत जुळतो. अहिल्यादेवी होळकर निर्मित या नदीघाटाचा पुनर्निर्माण अवचिराव वाघमारे यांनी समाधी निर्माणाच्या वेळी सन १७९० च्या दरम्यान केला. हा नदीघाट खूपच भव्य दिव्य आहे. या नदीघाटच्या उजव्या बाजूला या वाड्याचे दुसरे द्वार दिसते. येथील हत्ती द्वारावरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. या गावातील मंदिरांचा पुनःविकास हा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात झाला.

ahilyabai information in marathi
नदीघाटाच्या वेशीवर असलेला शिलालेख
holkar-sansthan
घोडगंगा नदीवरील होळकर कालीन नदीघाट
ahilyabai holkar information marathi
नदीघाटाकडील वाड्याचे दुसरे द्वार

येथील असलेल्या या होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा “c” दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे येथील असलेल्या या वास्तूची लवकरात लवकर डागडुजी होणे आवश्यक आहे. या गावापासून काहीच अंतरावर राणी अहिल्यादेवी होळकर यांनी एक बारव बांधलेली आहे तिला स्थानिक लोक “जोगेश्वरी बारव” म्हणून ओळखतात.

अहिल्यादेवीनी बिरोबाची मंदिरे निर्माण केली हे सहसा पाहवयास मिळत नाही मात्र खडकी गाव हे त्याला अपवाद आहे. येथील बिरोबाचे मंदिर पूर्ण दगडी तोडीमध्ये आहे. तसेच येथील अमृतेश्वर महादेव मंदिर हे साधे सुधे पण त्या समोरील मेघडंबरीमधील नंदी व त्यावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. हा नंदी महादेव मंदिरातील नंदीच्या तुलनेने लहान आहे मात्र तो मेघडंबरी मध्ये असल्यामुळे त्याची शोभा वाढताना दिसते. हे मंदिर समाधी शेजारी आहे. या गावातील सर्व मंदिराचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केला आहे असे स्थानिक लोक सांगतात.

maharani ahilyabai holkar
बिरोबा मंदिरासमोरील तुळशी वृंदावन व अपरिचित स्मारक
ahilyabai holkar mahiti in marathi
अमृतेश्वर मंदिरासमोरील नंदी

मंचरहुन काही अंतरावर असलेले नारायणगावातील भट कुटूंब खडकीच्या वाघमारे-पाटील यांचे दिवाण होते. त्यांना वाघमारे-पाटील यांच्या उत्पन्नचा हिसाब किताब ठेवायचा अधिकार होता. ते कुटूंब सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांच्याकडे असलेल्या काही कागदपत्रा वरून हे समजते कि, वाघमारे कुटूंब हे जेजुरीवरून येथे स्थायिक झाले व बाबुराव वाघमारे हे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या काळात होळकरशाहीचे प्रमुख सरदार होते, त्यांना सांवेर (मध्यप्रदेश) या परगणाची जहागीरी दिली होती.

अवचितराव वाघमारे-पाटील हे उदाबाईचे दत्तक पुत्र असून त्यांनी बाबुराव वाघमारे, उदाबाई वाघमारे व त्यांची सवत या तिघांची संयुक्त समाधी निर्माण केली व समाधी निर्मतीवेळी तेथील नदीघाटाचा जीर्णोद्धार हि केला त्यामुळे एकाच आशेयाचा शिलालेख समाधी व नदीघाटावरील द्वारावर आढळतो.

पुण्यावरून येण्याचा मार्ग : पुणे – राजगुरुनगर – मंचर – पिंपळगाव(महाळूगे) – खडकी.

ऐतिहासिक संदर्भ :
इंदोर स्टेट गॅझियट भाग – १
आभार :
दैनिक भास्कर(शिलालेख मजकूर),

किल्ले लासलगाव (Lasalgaon Fort)
ता.निफाड जि.नाशिक(महाराष्ट्र)

lasalgaon fort
किल्ले लासलगाव

इतिहास :

सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांना सन १७५० च्या दरम्यान चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली त्यांनंतरच्या काळात या किल्ल्याच्या पायाभरणीला सुरवात झाली असावी पण या किल्ल्याच्या निर्माण हा होळकरकालीनच.

“लासलगाव” या नावाच्या मागे एक लोककथा आहे ती अशी कि, राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळापासूनचा लासलगावचा प्रदेश सुपीक होता व या सुपीक प्रदेशावर परकीयांचे आक्रमण होण्याचा जास्त शक्यता होती त्यामुळे राणी अहिल्यादेवी यांनी या ठिकाणी लष्करी भुईकोट निर्माण करण्याचे ठरवले व निर्माण केलाही. कालांतराने हे गाव लष्करी नियंत्रणाखालील गाव म्हणून घोषित केले त्यामुळे या गावाला लष्करी गाव म्हटले जाऊ लागले. पुढे लष्करी गावाचा ब्रिटिश काळात अप्रभ होऊन लासलगाव म्हटले जाऊ लागले.

सन १७६६ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांची कन्या मुक्ताबाईचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी झाला. त्यानंतर सरदार यशवंत फणसे यांना राणी अहिल्यादेवींनी आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नर मधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती. तराणा प्रांत हा अहिल्यादेवींच्या खाजगी जहागिरीचा होता.

yashwantrao fanse
सरदार यशवंतराव फणसे
(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

शिवाय सरदार फणसे घरण्याला शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले. नंतर १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुध्दा पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसें कडे तसेच ठेवले.

सन १७९१ ला यशवंतराव फणसे यांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई किल्ले महेश्वर येथे सती गेल्या. यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. सन १८३५ रोजी इंदूर येथील होळकरांचे तत्कालीन महाराज हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशेच्या सरदाराने बंड केले.

harirao holkar
महाराजा हरिराव होळकर
(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

होळकर महालात फणशांचे गारदी घुसले. परंतू त्यांचे नियोजन फसले आणि हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्‍या राजाभाऊ फणसे यांना हरीराव महाराजांचा वारसदार तुकोजीराव(दुसरे) यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले.

आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला अब्बड या व्यापार्‍याला पाच हजार रूपयात विकला. त्यामुळे आज हा किल्ला खाजगी मालकीची संपत्ती आहे.

सन १८४८ ला ब्रिटिशांनी नगर जिल्हा होळकरांकडून ताब्यात घेतल्यामुळे फणसे घराणे नामधारी राहिले. लासलगाव व निफाडचा पाटिलकी चा बिल्ला नाशिकच्या कलेक्टरने १९३७ ला दिला होता. नंतर भारत स्वतंत्र झाला. सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. १९५२ ला वंशपरांपरागत पाटीलकी रद्द करण्यात आली. त्यामध्ये सरदार फणसेंची ही पाटीलकी रद्द झाली.

माहिती :

पूर्वी संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते. त्या वेशी वर श्रीराम मंदिर ट्रस्ट असे लिहिलेले आहे. वेस आजही चांगल्या स्थितीत असून जांग्या व पाकळी कलाकृती वरील बाजूस बघायला मिळते. या वेशीवरून पूर्वीच्या संपूर्ण तटबंदीचा घेरा केवढा असेल याचा अंदाज येतो. तटबंदी मध्ये पाषाण व विटांचा वापर केलेला दिसतो.

ahilyabai holkar marathi information
लासलगावची वेश

लासलगावचा भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार, त्यावर लोखंडी खिळे, सदर, प्रचंड मोठे पाषाणी बुरुज, त्याकाळचे भुयारी मार्ग, बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरूज व तटबंदीमध्ये सज्जे, चौरस आकार, भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत.

मुख्य प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे आणि गजखिळे अजूनही भक्कम आणि शाबूत आहेत, त्यावरील होळकर कालीन लाकडी व लोखंडी नक्षीकाम हि वाखन्याजोगे आहे. शत्रूने हत्तीच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणजे “गजखिळे”. उत्तरेकडे तोंड असलेल्या याच दरवाज्यातून कित्येक स्वाऱ्यांसाठी होळकरांची घोडी-लष्कर भरदाव वेगाने बाहेर पडली असतील.

information about ahilyabai holkar
लासलगाव किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार
अहिल्याबाई होळकर माहिती
लासलगाव किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार
history of ahilyabai holkar in marathi
प्रमुख प्रवेशद्वारावरील लोखंडी खिळे

किल्ल्याच्या मधल्या भागात आज तसे काहीच नाही मात्र पूर्वी लाकडी महाल अस्तित्वात होता. त्याचे सर्व काम हे लाकडात असल्यामुळे त्याला लाकडी महाल किंवा राणी महाल म्हटले जात. या महालातील लाकडांवर हिरे मोती वापरून सुबक असे नक्षीकाम केले होते. काळाच्या औघात हिरे मोती गायब झाले व ९० च्या दशकात जेव्हा संपूर्ण महाल खांदून काढला तेव्हा त्यामधील लाकडात काही हिरे मिळाले होते असे सांगितले जाते.

punyashlok ahilyabai holkar ke karya
किल्ल्याचा आतील भाग
punyashlok ahilyabai holkar
किल्ल्याचा आतील भाग

हा किल्ला लष्करी दृष्टिकोन ठेऊन बांधला असल्यामुळे स्वतःच्या संरक्षणाची पण होळकरांनी खबरदारी घेतलेली दिसते. या किल्ल्यात भुयारी मार्ग नजरेस पडतात. या भुयारी मार्गाच्या अनेक शाखा आहेत त्यातील काही भुयार हे येथून २० कि.मी अंतरावर असणाऱ्या चांदवडच्या होळकर वाड्यात निघतात व काही निफाडच्या होळकर वाड्यात व काही येथून काही अंतरावर असलेल्या होळकर वस्तीवर. होळकर वस्तीवर असलेल भुयार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जिवीतास धोका असल्याचे कारण तेथील स्थानिक लोक देतात. जीवितास धोका आहे म्हणून एखादा ऐतिहासिक वारसा नष्ट करायचा हा एकमेवच पर्याय आपल्याकडे आहे का?

rajmata ahilyadevi holkar
किल्ल्याच्या आतील भुयारी मार्ग

वीटकामाची व दगडी कामाची सुंदर सज्जे असलेली तटबंदी मजबूत आहेत. सध्या किल्ल्यात खाजगी मालकाचे सहा ते सात कुटुंब राहत आहेत. काही तटबंदीवर आतल्या बाजूने अजूनही चुनेगच्ची पद्धतीची कलात्मक नक्षी शिल्लक आहे, नक्षीमध्ये चिन्हे दिसून येतात. ध्वजारोहनची जागा हि आजच्या घडीला व्यवस्थित आहे.

holkar fort
किल्ल्याचे मजबूत बुरुज व तटबंदी
ahilya fort
किल्ल्याचे मजबूत बुरुज व तटबंदी
राजमाता अहिल्यादेवी होळकर फोटो
किल्ल्याचे मजबूत बुरुज व तटबंदी

सरदार यशवंतराव फणसे व मुक्ताबाई यांचा जीवनातील बहुतेक काळ हा महेश्वरला गेला. महेश्वर दरबारी फणसे घराण्याला मानाचे स्थान होते. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी इंदोर-महेश्वर ते पंढरपूर अशी आषाडी दिंडी सुरु केली होती. त्या दिंडीची सर्व जबाबदारी हि यशवंतराव फणसे यांची असायची.

अहिल्यादेवी होळकर चे फोटो
किल्ल्याचे दुसरे द्वार
राजमाता अहिल्याबाई होळकर फोटो
या Photo वरून द्वाराची भव्यता समजून येते
दाराच्या चोकटीची भव्यता व नक्षीकाम वाखण्याजोगे आहे

यशवंतराव व मुक्ताबाई त्या दिंडीबरोबर पंढरपूर पर्यंत पायी वारी करत असत. पुन्हा ती होळकरांची दिंडी महेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली कि ते दोघे लासलगावच्या किल्ल्याला मुक्कामी येत असत. मात्र या किल्ल्याचा मुख्य वापर हा लष्करीदृष्ट्याच केलेला दिसतो. आजही होळकरांची दिंडी इंदोर ते पंढरपूर अशी वारी करते व शेवटचा मुक्काम हा पंढरपूरच्या होळकर वाड्यात असतो.

होळकरशाहीचे पहिले महाराजा यशवंतराव होळकर व इंग्रज यांच्यात हि या किल्ल्यावरून अनेक वेळा संघर्ष झालेला कागदोपत्री बघायला मिळतो. यावरून लासलगाव परिसर व किल्ला लष्करीदृष्ट्या किती महत्त्वाचा होता हे समजू शकते.

राणी अहिल्यादेवी यांनी राज्य परराज्यात जलसाठे निर्मिले मग त्याच्या कर्तृत्वातून लासलगावचा परिसर कसा सुटला असेल. या नजरेने आसपासच्या परिसरात अनेक हेमाडपंथी मंदिरे तसेच चिरेबंदी काळ्या पाषाणातल्या बारवा पाहावयास मिळतात. किल्ल्याच्या बाहेर इच्छापूर्ती गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. हे गणेश मंदिर आकाराने लहान असून प्रसिद्ध आहे. बारवेचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात असून दोन मजली आहे. बारवेत दोन कमानी असून दोन्ही बाजूला देवळ्या पाहवयास मिळतात. एकदंरीत बारवेचे बांधकाम उत्कृष्ट व मनाला भावणारे आहे.

अहिल्याबाई की फोटो
किल्ल्याच्या शेजारची बारव
अहिल्याबाई होळकर चे फोटो
किल्ल्याच्या शेजारची बारव

राणी अहिल्यादेवींच्या इतिहासात आपल्याला एक कथा अशी ऐकण्यास मिळते कि, मल्हारराव होळकरांच्या मृत्यू नंतर काही वर्षांनी निमाड प्रदेशात दरोडेखोरांचा सामान्य जनतेला त्रास होऊ लागला होता त्यामुळे राणी अहिल्यादेवीनी किल्ले महेश्वर दरबारी एक पण ठेवला होता, जो कोणी या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल, जबर बसवेल त्याच्याशी मी माझी मुलगी मुक्तबाई हीचा विवाह लावून देईल तेव्हा त्या दरबरातील एक धाडसी भिल्ल किंवा आदिवासी तरुण पुढे आला व त्याने हा पण पूर्ण केला. त्यांनतर अहिल्यादेवीनी आपली मुलगी मुक्तबाई हीचा विवाह यशवंतरावाशी लावून दिला. पण या कथेचा कोठे हि कागदोपत्री उल्लेख मिळत नाही किंवा मला तरी अद्याप मिळाला नाही.

muktabai fanse holkar
मुक्ताबाई फणसे – होळकर
(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)

याच कथेचा फायदा घेऊन काही लोकांकडून अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले असे सांगितले जाते. अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले? का नाही? हा वेगळा विषय होऊ शकतो मात्र हि कथा आंतरजातीय विवाहाचे उदाहरण होऊ शकत नाही. कारण यशवंतराव फणसेंचे सध्याचे वंशज हे जातीने धनगर आहेत. तसेच ज्या इतिहासकारांनी यशवंतराव फणसे यांचा आदिवासी असा उल्लेख केला आहे त्यांनी त्याचे तत्कालीन दाखले दिले नाहीत त्यामुळे सध्याच्या माहितीवरून आपुन असा निष्कर्ष काढू शकतो कि, यशवंतराव फणसे हे जातीने धनगर होते व अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचा विवाह हा जातीमधील तरूणाशीच लावला होता.

नानासाहेब होळकर हे सध्या फणसे घराण्याचे वंशज आहेत, असे ते सांगतात. सध्या त्यांचे वास्तव्य हे निफाडला असते. नानासाहेब होळकर हे फणसे घराण्याला दत्तक आले आहेत.

माहितीसाठी आभार :
नानासाहेब होळकर, निफाड, जि.नाशिक
फोटोसाठी आभार :
आनंद बोराअमर रेड्डीप्रशांत परदेशी















मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...