सात गावांच्या एकजुटीने प्राचीन मंदिराचा जीर्णोध्दार केलेला थेरगाव येथील मध्ययुगीन शिलालेख !!!!!
===================================
थेरगाव येथील नागेश्वर मंदिर जीर्णोधार शिलालेख .२.
उपलब्धि व स्थळ:- हे शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे थेरगाव येथील नाग नदीकाठी असलेल्या श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून ९ ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखात प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला दोन उभे दंड दिलेले आहेत .वातावरणाचा तसेच सततची रंगरंगोटी केल्याने लेखातील सर्व अक्षरे मुजली असून विद्रूप झाली आहेत.तर काही ठिकाणी अक्षरात चुना भरल्याने वाचनात प्रचंड अडचण येते. शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर अथक प्रयत्नाने वाचता येतो .
======================================
शिलालेखाचे वाचन :
१.||श्री नागनाथ प्रसन्न
२. ||माणको आनंत व पद्मोजी आनं
३. ||त व व्यंकटराव आनंत यकबोटे
४. ||कुलकर्णी व जोशी मौजे थे खांडवी मांदलीची
६. ||थिटे सांगवी रवळगाव कोकमठाण
७. ||सांगवी बा || (बुद्रुक) उपगाव प्रा.|| पांडे
८. ||पेडगाव सके १६६६रगक्ताक्षि
९. ||नाम संवछरे.
अर्थ : श्री नागनाथ देवाच्या कृपेने व आशीर्वादाने आरंभ करून शालिवाहन शकाच्या १६६६व्या वर्षी रक्ताक्षि नाम संवत्सरात म्हणजेच (इ.स. १७४४–४५) मध्ये श्री माणको अनंत, पद्मोजी अनंत आणि व्यंकटराव अनंत यकबोटे या व्यक्तींचा उल्लेख असून ते संबंधित खांडवी, मांदळी, थिटे सांगवी, रवळगाव आणि कोकमठाण , या गावांचे कुलकर्णी व जोशी होते. म्हणजेच गावच्या महसुली, लेखनिक तसेच धार्मिक आणि पंचांगविषयक कार्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तसेच सांगवी बुद्रुक हे पांडे-पेडगाव प्रांतातील एक गाव किंवा उपगाव असून या सर्व गावातील व्यक्तींनी व जोशी कुळकर्णी यानी नागेश्वर मंदिराचा जीर्णोधार केला .
=====================================
शिलालेखाचे महत्व :- या लेखात प्रारंभी केलेले "श्री नागनाथ प्रसन्न" हे मंगलाचरण त्या काळातील धार्मिक श्रद्धा, विशेषतः नागनाथ देवतेचे स्थान आणि स्थानिक समाजजीवनातील देवस्थानांचे महत्त्व दर्शविते. त्यामुळे हा शिलालेख केवळ व्यक्तींची नोंद नसून धार्मिक, सामाजिक, वतनदारी आणि प्रशासकीय इतिहासाचा मौल्यवान दस्तऐवज मानला पाहिजे.हा शिलालेख मराठाकालीन ग्रामीण प्रशासनाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यात यकबोटे घराण्यातील माणको अनंत, पद्मोजी अनंत आणि व्यंकटराव अनंत या व्यक्तींची नावे आढळतात. त्यांना कुलकर्णी आणि जोशी अशी दुहेरी पदे दिलेली दिसतात. यावरून त्या काळी गावांच्या महसुली, लेखनिक व धार्मिक व्यवहारांमध्ये काही विशिष्ट घराण्यांचे महत्त्वपूर्ण स्थान होते हे स्पष्ट होते.
या लेखात पांडे पेडगाव प्रांतातील खांडवी, मांदळी, थिटे सांगवी, रवळगाव, कोकमठाण सांगवी बुद्रुक अशा अनेक गावांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या व्यक्तींचे अधिकारक्षेत्र किंवा वतन अनेक गावांवर पसरलेले असावे, असा अंदाज व्यक्त करता येतो. यामुळे तत्कालीन गावसमूहांची प्रशासकीय रचना आणि परस्पर संबंध समजण्यास मदत होते.शिलालेखात दिलेला शके १६६६ (इ.स. १७४४-४५) रक्ताक्षि संवत्सर हा स्पष्ट कालोल्लेख असल्यामुळे लेखाचा काल निश्चित करता येतो. एकूणच नागनाथ देवतेचे स्मरण, यकबोटे घराण्याचा उल्लेख, विविध गावांची नोंद आणि कुलकर्णी-जोशी या वतनदार पदांचा संदर्भ यांमुळे हा शिलालेख मराठाकालीन ग्रामीण प्रशासन, वतनव्यवस्था, सामाजिक रचना आणि धार्मिक परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो.
======================================
गावाचे नाव :- मु पो.थेरगाव नागेश्वरमंदिर , ता कर्जत , जि.अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.७६९६७८ ,W-७४.९४४१३०
शिलालेखाचे स्थान :- श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गाभारा प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर कोरला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी मराठी भाषा
प्रयोजन :- समस्त सात गावे व कुळकर्णी जोशी यांनी एकत्रित मंदिराचा जीर्णोधार पूर्ण केल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १६६६.रक्ताक्षि नाम संवत्सरे
.काळ वर्ष :- अठरावे शतक -२५ सप्टेंबर १७४४ सोमवार-मंगळवार जोडून दिवस
कारकीर्द: छत्रपती थोरले शाहू मरज
ग्रामनाम: -, खांडवी, मांदळी, थिटे सांगवी, रवळगाव, कोकमठाण सांगवी बुद्रुक पांडे पेडगाव
ग्रामदेवता :- श्री नागेश्वर महादेव,
व्यक्तिनाम :- माणको अनंत,पद्मोजी अनंत,वेंकट अनंत एकबोटे ,कुळकर्णी व जोशी
शिलालेखाचे संशोधन :- .श्री. राजेश पोपट इंगळे
शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे
संक्षेप :- यकबोट-एकबोटे, कुलकरणी-कुळकर्णी , ,थेटे –थिटे ,माडळी-मांदळी , बु-बुद्रुक प्रा .प्रांत परगणा ,रगक्ताक्षि-रक्ताक्षी , संवछरे-संवत्सरे
संदर्भ:- .(IE VI -२९१ )
======================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
टीप :- सदर कार्यात दिगंबर भुजबळ, किरण शिंदे, कानिफनाथ उगले, अनिल शिंदे, मिनिनाथ शिंदे, रविंद्र महानवर,गोरख शिंदे, तसेच सर्व थेरगाव ग्रामस्थ या सर्वांची मदत व सहकार्य लाभले
अंगारकी चतुर्थी दिवशी बारवेचा जीर्णोध्दार पूर्ण केलेली चतुर्थी विहीर आणि १००६ रुपये खर्च करून बांधलेली सराफ विहीर यांचे कर्जत येथील दोन नवीन शिलालेख!!!!!
======================================
कर्जत येथील बारव(सराफ विहीर ) शिलालेख -१
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत शहरापासून एक कि.मी वर असलेल्या कर्जत शिंदेवाडी रस्त्यालगत उजव्या बाजूस असलेल्या एका चौकोनी आकाराच्या बारवेच्या आतील बाजूच्या भिंतीवर उंचावर कोरलेला आहे .सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सात ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने तसेच वातावरणाच्या परिणामामुळे लेखातील अक्षरे झिजली आहेत तर काही अक्षरे तुटली आहेत.त्यामुळे लेखाची पहिली ओळ व्यवस्थित लागत नाही.शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो.
======================================
शिलालेखाचे वाचन :
१.भगवंत वेंकट सत्री विहीर कासी
२.गोवीद तुकदेव कीरपेकर
३.सके १६२० बधन्य सवछर
४.पुत्र हणमंत रामाजी तु
५.कोजी करजतात वास
६.सराफ वीहीरीस खर्च
७.रूपये हाजार सहा (१००६ )
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६२० व्या वर्षी बहुधान्य नाम संवत्सरात म्हणजेच सन १६९८ या साली गोविंद तुकदेव किरपेकर यांची तीन मुले हनुमंत ,रामाजी व तुकोजी किरपेकर हे कर्जत गावी वास्तव्यास असून त्यांनी एक हजार सहा रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची सराफ विहीर बांधली .लेखाच्या सुरुवातीला भगवंत वेंकट सत्री असे नाव असून तो कारागीर असण्याची शक्यता आहे त्या पुढील मजकूर वाचता येत नाही
======================================
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख शके १६२० (इ.स. १६९८–९९) मधील असून तत्कालीन समाजजीवन, जलव्यवस्थापन, दानपरंपरा आणि आर्थिक स्थिती यांवर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा आहे. लेखात भगवंत वेंकट सत्री ?, गोविंद तुकदेव कीरपेकर, हणमंत, रामाजी आणि तुकोजी यांसारख्या व्यक्तींचा उल्लेख आढळतो. तसेच करजत येथे वास्तव्य करणाऱ्या या व्यक्तींनी एका विहिरीसाठी रुपये १००६ इतका खर्च केल्याची नोंद करण्यात आली आहे. या खर्चाची स्पष्ट नोंद असल्यामुळे हा लेख तत्कालीन आर्थिक व्यवहार, चलनव्यवस्था आणि सार्वजनिक बांधकामांच्या खर्चाचा अभ्यास करण्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरतो.
या शिलालेखाचे सर्वांत मोठे महत्त्व म्हणजे तो त्या काळातील जलव्यवस्थापनाच्या परंपरेचा पुरावा देतो. विहिरी या ग्रामीण जीवनाचा आधारस्तंभ होत्या. पिण्याचे पाणी, शेती, प्रवासी आणि जनावरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा जलस्रोतांचे मोठे महत्त्व होते. त्यामुळे विहिरीचे बांधकाम किंवा तिच्या देखभालीसाठी केलेला खर्च हा लोककल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. भारतीय धार्मिक परंपरेत जलदान हे श्रेष्ठ पुण्यकर्म समजले गेले असल्याने अशा सार्वजनिक कामांना धार्मिक अधिष्ठानही प्राप्त होते.
“सराफ विहिरीस खर्च” या उल्लेखावरून व्यापारी किंवा सराफ समाजाचा या कार्यात सहभाग होता, असे दिसते. यावरून तत्कालीन व्यापारी वर्ग समाजहिताच्या कार्यांमध्ये सक्रियपणे योगदान देत असल्याचे स्पष्ट होते. तसेच लेखातील व्यक्तींची नावे, त्यांचे संबंध आणि वास्तव्याची माहिती यांमुळे स्थानिक समाजरचना, कुटुंबव्यवस्था आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या भूमिकेचाही अभ्यास करता येतो.
मराठा कालखंडात देवळे, विहिरी, तळी, धर्मशाळा यांसारख्या सार्वजनिक उपयुक्ततेच्या वास्तू उभारण्याची परंपरा दृढ होती. हा शिलालेख त्या परंपरेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे हा लेख केवळ एका विहिरीच्या बांधकामाची नोंद नसून तत्कालीन महाराष्ट्रातील लोककल्याणाची भावना, सामाजिक जबाबदारी, आर्थिक समृद्धी आणि जलसंवर्धनाविषयीची जाणीव यांचे दर्शन घडविणारा एक मौल्यवान ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाचा ठरतो.
======================================
गावाचे नाव :- मु.पो. कर्जत ता. कर्जत जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.५६०२८६ ,E..७५.०१५१३५
शिलालेखाचे स्थान :- बारवेच्या पायऱ्या उतरल्या कि लहान दरवाज्याच्या आतील भागात वरील बाजूस कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी भाषा
प्रयोजन :- काही रक्कम खर्च करून विहीर बांधल्याची स्मृती जपणे..
.मिती / वर्ष :- शके १६२० बहुधान्य नाम संवत्सरे.
काळ वर्ष :- सतरावे शतक – - सन १६९८
राजा /कारकीर्द:- छत्रपती राजाराम महाराज
ग्राम नाम:-
देवता नामः-
व्यक्तीनाम :- , भगवंत वेंकट शास्त्री ,गोविंद तुकदेव किरपेकर ,हनुमंत रामाजी तुकोजी
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे..डॉ .शैलेंद्र भांडारे
शिलालेखाचे संशोधन :- . श्री. राजेश पोपट इंगळे
संक्षेप :-. वेंकट-व्यंकट,सत्री-शास्त्री ?,गोवीद-गोविंद ,कीरपेकर-किरपेकर ,सके-शके,बधन्य-बहुधान्य ,सवछर-संवत्सर ,हणमंत-हनुमंत ,करजतात-कर्जत , हाजार –हजार
संदर्भ १.(IE VI -१९८ )
======================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
#################################
कर्जत येथील बारव(चतुर्थी विहीर ) शिलालेख -२
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत शहरापासून एक कि.मी वर असलेल्या कर्जत शिंदेवाडी रस्त्यालगत उजव्या बाजूस असलेल्या एका चौकोनी आकाराच्या बारवेच्या उजव्या बाजूस एक चौथरा भिंतीवर दोन सुट्ट्या शिळेवर कोरलेले आहेत .सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सात ओळींचा दुसऱ्या शिळेवर तीन अशा दहा ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने तसेच वातावरणाच्या परिणामामुळे लेखातील अक्षरे झिजली आहेत तर काही अक्षरे तुटली आहेत.त्यामुळे लेखाची पहिली ओळ व्यवस्थित लागत नाही.शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो.
=====================================
शिलालेखाचे वाचन :
१.[जीरनोधार?].चतुर्थी वीही
२.र गोविंद तुकदेव
३.कीरपेकर यांचे पुत्र ध
४.र्माजी नीजें केले सके
५.१६२२ विक्रम नाम सव
६.छरे आंगारक चतुर्थी
७.तेदीन केले असे.
८.भगवंत राम
९.नरसो नागनाट
१०.सके १६२२
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६२२ व्या वर्षी विक्रम नाम संवत्सरा मधे अंगारकी चतुर्थी म्हणजेच ३ डिसेंबर सन १७०० मंगळवार या दिवशी गोविंद तुकदेव किरपेकर यांचा मुलगा धर्मोजी किरपेकर यानी चतुर्थी विहिरीचा जीर्णोधार केला या कामासाठी भगवंत राम आणि नरसो नागनाथ हे कारागीर असावेत त्यांनी शके १६२२ साली हे काम केले .
======================================
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख तत्कालीन समाजातील जलसंवर्धनाची जाणीव, सार्वजनिक वास्तूंचे जतन आणि दानपरंपरा यांचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. नवीन विहीर बांधण्याइतकेच जुन्या विहिरींचा जीर्णोद्धार करणेही आवश्यक मानले जात होते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. यावरून समाजाला जलस्रोतांचे दीर्घकालीन महत्त्व पूर्णपणे ज्ञात होते.लेखात गोविंद तुकदेव कीरपेकर यांचे पुत्र धर्माजी यांनी हा जीर्णोद्धार केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. यावरून प्रतिष्ठित कुटुंबे आणि स्थानिक दाते सार्वजनिक हिताच्या कामांमध्ये सक्रिय सहभाग घेत होते, हे दिसून येते. अशा प्रकारची कामे केवळ वैयक्तिक कीर्तीसाठी नव्हे तर समाजाच्या उपयोगासाठी केली जात असत.
शिलालेखात आंगारक चतुर्थी या शुभ दिवसाचा उल्लेख विशेष लक्षवेधी आहे. धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक कार्य पूर्ण करण्याची परंपरा त्या काळी प्रचलित होती. यावरून धार्मिक श्रद्धा आणि लोकहितकारी कार्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट होतो.
हा लेख स्थानिक इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. गोविंद तुकदेव कीरपेकर, धर्माजी, तसेच भगवंत राम आणि नरसो नागनाट यांसारख्या कारागीर व्यक्तींची नावे जतन झाल्यामुळे त्या काळातील कुटुंबे, त्यांचे सामाजिक स्थान आणि सार्वजनिक जीवनातील योगदान यांचा मागोवा घेता येतो. अशा नोंदींमुळे स्थानिक वंशावळी, सामाजिक संबंध आणि गावाच्या इतिहासाचा अभ्यास सुलभ होतो.
विशेष म्हणजे, याच परिसरातील शके १६२० च्या लेखात विहिरीच्या बांधकामासाठी खर्चाची नोंद आढळते, तर शके १६२२ च्या या लेखात तिच्या जीर्णोद्धाराची नोंद दिसते. त्यामुळे विहीर ही त्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक संपत्ती होती आणि तिची नियमित देखभाल केली जात होती, हे सिद्ध होते.
हा शिलालेख केवळ एका विहिरीच्या जीर्णोद्धाराची नोंद नसून जलसंवर्धन, सार्वजनिक बांधकामांचे जतन, दानशीलता, धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक समाजजीवन यांचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे तो अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या महाराष्ट्रातील लोकहितवादी वृत्ती आणि जलव्यवस्थापन परंपरेचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून अभ्यासनीय ठरतो.
=====================================
गावाचे नाव :- मु.पो. कर्जत ता. कर्जत जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.५६०२८६ ,E..७५.०१५१३५
शिलालेखाचे स्थान :- बारवेच्या पायऱ्या उतरताना उजव्या बाजूच्या एका दगडी चौथऱ्यावर दोन सुट्ट्या शिळेवर कोरलेले आहेत
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी भाषा
प्रयोजन :- चतुर्थी विहीरिचा शुभ मुहूर्तावर जीर्णोधार केल्याची स्मृती जपणे..
.मिती / वर्ष :- शके १६२२ विक्रम नाम बहुधान्य नाम संवत्सरे.अंगारकी चतुर्थी
काळ वर्ष :- सतरावे शतक – ३ डिसेंबर सन १७०० मंगळवार
राजा /कारकीर्द:- छत्रपती राजाराम महाराज
ग्राम नाम:-
देवता नामः- श्री गणेश ?
व्यक्तीनाम :- , ,गोविंद तुकदेव किरपेकर ,धर्मोजी भगवंत राम , नरसो नागनाथ
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे..डॉ .शैलेंद्र भांडारे
शिलालेखाचे संशोधन :- . श्री. राजेश पोपट इंगळे
संक्षेप :-. जीरनोदार –जीर्णोधार, आंगारक –अंगारकी , नागनाट –नागनाथ .सके –शके ,गोवीद-गोविंद ,कीरपेकर-किरपेकर ,सके-शके, बधन्य-बहुधान्य , सवछरे -संवत्सर
संदर्भ १.(IE VI -२०३ )
=====================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
*कर्जतच्या बारवेत दडलेला ३२५ वर्षांचा इतिहास* ☞
*https://navspandan24.com/?p=1935*
See less
सात गावांनी एकत्र मिळून प्राचीन मंदिराचा जीर्णोध्दार केलेला मराठा कालखंडातील महत्त्वाचा शिलालेख.....!!!
=====================================
थेरगाव येथील प्राचीन नागेश्वर मंदिर जीर्णोधार शिलालेख !!!!!.
उपलब्धि व स्थळ:- हे शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे थेरगाव येथील नाग नदीकाठी असलेल्या श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गाभारा प्रवेशद्वारावर तीन वेगवेगळ्या भागात कोरलेले आहेत. सदर शिलालेख हे उठाव स्वरूपाचे असून एकूण १४ ओळींचे देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेले आहेत. वातावरणाचा तसेच सततची रंगरंगोटी केल्याने लेखातील सर्व अक्षरे मुजली असून विद्रूप झाली आहेत.तर काही ठिकाणी अक्षरे तुटून गहाळ आहेत. शिलालेखाचे छाप घेतले असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने सहज वाचता येतो.
======================================
शिलालेखाचे वाचन :
१.श्री शंकर प्रसन्न
२.श्री मोरेश्वर प्रसन्न
३.सके सोळासे१६६६
४.रक्ताक्षि नाम संवत्सरे
५.अश्विन शुद्ध १प्रतिपदा
६.माणको अनंत यकबोट कुलकर
७.णी व जोशि मौजे थेरगाव तरफ मांडोग
८.ण व मौजे चांदे हे सात ७मौजे खांडवी १
९.रवळगाव १कोकणगाव १मौजे
१०.थेटे सांगवि १मौजे चिंचोली १ मौ
११.जे मांडळी येक १मौजे नागमठाणें १
१२.सदरहू गावे व जोशी व कुलकरणी
१३.यानि श्री नागनाथचे देवाळय जीर्ण
१४.उद्धार केला असे.
अर्थ : श्री शंकर भगवान व मोरेश्वर (गणपती) यांच्या कृपेने व मंगल आशीर्वादाने शालिवाहन शकाच्या १६६६ वर्षी रक्ताक्षी नाम संवत्सरामध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच २५ सप्टेंबर १७४४ सोमवार या दिवशी मांडवगण तर्फेतील माणको अनंत एकबोटे हे मौजे थेरगाव येथील कुळकर्णी व जोशी होते त्यांनी आणि त्या तर्फेतील मौजे चांदे इतर सात गावे मौजे खांडवी ,रवळगाव ,कोकणगाव ,मौजे थेटे सांगवि ,मौजे चिंचोली ,मौजे मांदळी ,मौजे नागमठाणें येथील सर्व गावकरी यानी आणि संबंधित गावांच्या जोशी-कुलकर्णी वर्गाने एकत्र येऊन श्री नागनाथ (नागेश्वर) मंदिराचा जीर्ण झालेला भाग.दुरुस्त करून जीर्णोधार केला . हा लेख तत्कालीन ग्रामीण प्रशासन, जोशी-कुलकर्णी संस्थेची धार्मिक कार्यातील भूमिका आणि मंदिरांच्या जीर्णोद्धार परंपरेचा महत्त्वाचा पुरावा आहे.
=====================================
शिलालेखाचे महत्व :- थेरगाव येथील श्री नागेश्वर (नागनाथ) मंदिरातील हा शिलालेख मराठा कालीन धार्मिक, सामाजिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा लेख केवळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची नोंद नसून तत्कालीन गावव्यवस्था, वतनदार वर्गाची भूमिका आणि लोकांच्या धार्मिक भावनेचे दर्शन घडवतो.
श्री शंकर प्रसन्न" आणि "श्री मोरेश्वर प्रसन्न" या प्रारंभीच्या उल्लेखांतून धार्मिक कार्याची सुरुवात गणेश व शंकर यांच्या स्मरणाने करण्याची तत्कालीन परंपरा दिसून येते. यामुळे त्या काळातील धार्मिक संस्कार आणि श्रद्धाविश्वाचा परिचय होतो. लेखाची सुरुवात "श्री शंकर प्रसन्न" या शब्दांनी होते आणि मंदिराचा उल्लेख "श्री नागनाथ" असा आहे. यावरून त्या प्रदेशात शैव संप्रदायाचे महत्त्व होते आणि नागनाथ देवतेची उपासना प्रचलित होती हे स्पष्ट होते.
लेखात शक १६६६, रक्ताक्षी संवत्सर, अश्विन शुद्ध प्रतिपदा अशी संपूर्ण काल नोंद दिलेली आहे. त्यामुळे जीर्णोद्धाराचे अचूक काळ स्थान निश्चित करता येते. हा काळ छत्रपती शाहू महाराजांच्या उत्तरकालीन मराठा सत्तेचा काळ असल्याने लेखाला विशेष ऐतिहासिक संदर्भ प्राप्त होतो.
माणको अनंत एकबोटे यांचा जोशी व कुलकर्णी म्हणून उल्लेख आलेला आहे. कुलकर्णी हे गावच्या महसूल व लेखन व्यवस्थेचे प्रमुख अधिकारी तर जोशी हे धार्मिक व पंचांग विषयक कार्य पाहणारे अधिकारी होते. या दोन्ही वतनदारांनी धार्मिक कार्यात पुढाकार घेतल्याचे या लेखावरून स्पष्ट होते.
शिलालेखात खांडवी, रवळगाव, कोकणगाव, थिटे सांगवी, चिंचोली, मांदळी आणि नागमठाणे अशा सात गावांचा उल्लेख आहे. यावरून एकाच जोशी-कुलकर्णी कुटुंबाचा किंवा अधिकार क्षेत्राचा संबंध अनेक गावांशी होता हे दिसून येते. त्यामुळे मराठाकालीन स्थानिक प्रशासनाच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरतो. लेखात आलेली गावे, व्यक्तींची नावे, वतनपदे आणि प्रशासकीय विभाग (तरफ) यांमुळे स्थानिक इतिहास, भूगोल, वतनदारी व्यवस्था आणि सामाजिक रचना यांचा अभ्यास करण्यासाठी हा शिलालेख एक प्राथमिक आणि विश्वासार्ह स्रोत ठरतो.
शिलालेखात स्पष्टपणे नमूद केले आहे की श्री नागनाथाचे देवालय जीर्ण झाल्यानंतर त्याचा "जीर्णोद्धार" करण्यात आला. त्यामुळे हा लेख मंदिराच्या पुनर्बांधणी किंवा दुरुस्तीचा समकालीन पुरावा ठरतो. मंदिराच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे यातून समजते.
मंदिरांच्या उभारणी, दुरुस्ती आणि देखभाली मध्ये केवळ राजसत्ता नव्हे तर स्थानिक वतनदार, अधिकारी आणि गावकरी यांचाही सहभाग होता. हा शिलालेख त्या परंपरेचा जिवंत पुरावा आहे. धार्मिक संस्थांना स्थानिक समाजाकडून मिळणाऱ्या आश्रयाचे हे उदाहरण आहे. मंदिराचा जीर्णोद्धार हा एका व्यक्तीचा नव्हे तर अनेक गावांच्या प्रतिनिधींच्या सहभागातून झालेला उपक्रम असल्याचे दिसते. त्यामुळे धार्मिक कार्यात सामूहिक जबाबदारी आणि सामाजिक एकात्मता यांचे दर्शन घडते.
======================================
गावाचे नाव :- मु पो.थेरगाव नागेश्वर मंदिर , ता कर्जत , जि.अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.७६९६७८ ,W-७४.९४४१३०
शिलालेखाचे स्थान :- श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गाभारा प्रवेशद्वाराच्या वर तीन भागात कोरला आहे
अक्षरपद्धती :- उठाव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी मराठी भाषा
प्रयोजन :- समस्त सात गावे व कुळकर्णी जोशी यांनी एकत्रित मंदिराचा जीर्णोधार पूर्ण केल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १६६६.रक्ताक्षि नाम संवत्सरे अश्विन शुद्ध १प्रतिपदा
.काळ वर्ष :- अठरावे शतक -२५ सप्टेंबर १७४४ सोमवार-मंगळवार जोडून दिवस
कारकीर्द: छत्रपती थोरले शाहू महाराज
ग्रामनाम: - थेरगाव ,मांडवगण ,मौजे चांदे ,मौजे खांडवी, रवळगाव, कोकणगाव, मौजे थिटे सांगवी, मौजे चिंचोली, मौजे मांदळी आणि नागमठाणे
ग्रामदेवता :- श्री नागेश्वर महादेव,श्री मोरेश्वर (गणपती )
व्यक्तिनाम :- माणको अनंत एकबोटे ,कुळकर्णी व जोशी
शिलालेखाचे संशोधन :- .श्री. राजेश पोपट इंगळे
शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे
संक्षेप :- सके –शके ,सोळासे-सोळाशे , यकबोट-एकबोटे, कुलकरणी-कुळकर्णी , मांडोगण –मांडवगण ,थेटे –थिटे ,माडळी-मांदळी , यक-एक
संदर्भ:- .(IE VI -२९१ )
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
======================================
टीप :- सदर कार्यात दिगंबर भुजबळ, किरण शिंदे, कानिफनाथ उगले, अनिल शिंदे, मिनिनाथ शिंदे, रविंद्र महानवर,गोरख शिंदे, या सर्वांची मदत व सहकार्य लाभले
पानिपत वीर मराठा फौजेचे दिल्लीतील सेनानी अंताजी माणकेश्वर गंधे यांचा धर्मकार्याचा एक शिलालेख आणि त्यांचे इतिहासातील योगदान व कार्य.........!!!!!!!
=====================================
राशीन येथील जगदंबा मंदिर ओवरी शिलालेख !!!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे राशीन येथील प्रसिद्ध असलेले श्री जगदंबा मंदिराच्या मागील भागात ओवऱ्या आहेत त्यावरील एका खांबावर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून सात ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने तसेच सततची रंगरंगोटी केल्याने लेखातील अक्षरे मुजुन गेली आहेत.शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो
======================================
शिलालेखाचे वाचन :
१ .श्री भवानी प्रसन्न
२ .स्वस्ति श्रीनृप शाळीवाहन श
३ .के १६७९ ईश्वर नाम संवछरे मा
४ .घ वद्य प्रतिपदा ते दिवसी श्री य
५ .माई चरणि तत्पर अंताजी माण
६ .केस्वर गंधे कुळकर्णी मौजे काम
७ .रगाव वोवऱ्या श्री भवानी श्री सार्थ
अर्थ : श्री भवानीच्या कृपेने, शालिवाहन शक १६७९, ईश्वर नाम संवत्सर, माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच २४ फेब्रुवारी १७५८ शुक्रवार या दिवशी, श्री (जगदंबा)यमाई देवीच्या चरणी समर्पित असलेल्या मौजे कामरगाव चे कुळकर्णी अंताजी माणकेश्वर गंधे यांनी श्री भवानीच्या नावाने ओवऱ्या बांधून तिचे धार्मिक समर्पण केले.
====================================
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख मराठाकालीन मंदिर स्थापत्य, शक्ती-उपासना आणि स्थानिक समाजाच्या धार्मिक योगदानाचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. अंताजी माणकेश्वर गंधे कुळकर्णी यांनी जगदंबा भवानी मंदिराची ओवरी बांधल्याचा उल्लेख असल्यामुळे त्या काळात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मंदिरांच्या जीर्णोद्धार व विस्तारासाठी आर्थिक मदत देत असल्याचे दिसून येते.
"श्री यमाई चरणी तत्पर" या उल्लेखातून लेखकर्त्याची देवीभक्ती स्पष्ट होते. त्यामुळे हे कार्य केवळ वास्तु-निर्माण नसून धार्मिक श्रद्धेतून केलेले पुण्यकर्म होते.
ओवरी हा मंदिराचा उपयुक्त भाग असल्याने येथे यात्रेकरू, भक्त, पुराणश्रवण करणारे लोक किंवा धार्मिक विधींमध्ये सहभागी होणारे ग्रामस्थ यांना आश्रय मिळत असे. त्यामुळे या बांधकामातून मंदिराच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्षेत्राचा विस्तार झाल्याचे दिसून येते.
याशिवाय, शिलालेखातील शके १६७९, ईश्वर नाम संवत्सर, माघ वद्य प्रतिपदा ही कालनोंद मराठाकालीन इतिहासाच्या कालमापनासाठी महत्त्वाची ठरते. तसेच कुळकर्णी पदाचा उल्लेख त्या काळातील ग्रामप्रशासनाची माहिती देतो.
एकंदरीत, हा शिलालेख भवानी-यमाई उपासना, मराठाकालीन मंदिर स्थापत्य, स्थानिक दानपरंपरा आणि ग्रामप्रशासन यांचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा आहे.
======================================
गावाचे नाव :- मु.पो. राशीन ता. कर्जत जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.४३६१०७,E..७४.९२१०७१
शिलालेखाचे स्थान :- राशीन येथील जगदंबा मंदिराच्या पाठीमागील ओवऱ्याच्या दगडी खांबावर वरील भागात कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी भाषा
प्रयोजन :- श्री जगदंबा चरणी तत्पर देवीच्या मंदिराच्या ओवऱ्या बांधल्याची स्मृती जपणे..
.मिती / वर्ष :- शके १६७९ईश्वर नाम संवत्सरे माघ वद्य प्रतिपदा
काळ वर्ष :- अठरावे शतक – - सन २४ फेब्रुवारी १७५८शुक्रवार
राजा /कारकीर्द:- छत्रपती रामराजे
ग्राम नाम:- कामरगाव
देवता नामः-श्री भवानी
व्यक्तीनाम :- श्री अंताजी माणकेश्वर गंधे कुलकर्णी
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे..श्री अनिकेत रजपूत
संक्षेप :- शाळीवाहन –शालिवाहन ,संवछरे-संवत्सरे , कुळकर्णी,-कुलकर्णी माणकेस्वर-माणकेश्वर,वोवऱ्या-ओवरी ,
======================================
अंताजी माणकेश्वर गंधे यांच्या लढाया.:-
१. दि. ४ मे १७२९ बुंदेलखंडात सुपे येथे दावलजी सोमवंशी आणि पिलाजी जाधवराव यांच्यासोबत अंताजींची वहम्मदखान बंगशच्या मुलाशी, कायुमखानाशी चकमक.
२. एप्रिल १७३१ अंताजींची बंगशच्या अधिपत्याखाली असलेल्या माळव्यात कौथा आणि सारंगपूर-शहाजहानपूरच्या प्रदेशात धामधूम.
३. इ.स. १७३१ च्या अखेरीस अंताजी आपल्या तुकडीसह चिमाजीअप्पांसोबत माळव्यात.
४. एप्रिल ते डिसेंबर १७३९ : आवजी कवडेंसोबत अंताजींच्या वऱ्हाडात स्वाऱ्या आणि भास्कर हरी आदींसोबत लढाया.
५. एप्रिल १७३४ गढाकोट्याला मोर्चे.
६. इ.स. १७४६ अखेर : अंताजींच्या मगरोणी आणि अंत्री येथे नरवरकरांशी लढाया, ग्वाल्हेरचा मुलुख काबीज.
७. दि. ९ आणि १० मे १७५३ : अंताजींकडून दिल्लीत वजिराच्या पक्षाच्या राजेंद्रगीर गोसाव्याच्या पराभव.
८. दि. १९ ऑगस्ट १७५३ : भद्रापूरच्या कालव्यावरील अंताजी आणि सफरजंग वजीर यांच्यातील लढाई. अंताजींचा विजय.
९. नोव्हेंबर १७५५ अखेर दीडवाणी जवळ आणि डिसेंबरमध्ये जयपूरच्या आसपासच्या प्रदेशात अनिरुद्धसिंगाच्या राजपूर फौजांचा पराभव.
१०. दि. २१ जानेवारी १७५७ : दिल्लीपासून सहा कोसांवर अंताजी आणि अब्दालीचा वजीर शहावलीखान यांच्यात लढाई. अंताजींचा माघार.
११. दि. २२ जानेवारी १७५७ : फरीदाबादेजवळ नजीब आणि अब्दालीच्या संयुक्त फौजांचा अंताजींकडून पराभव.
१२. दि. २३/२४ जानेवारी १७५७ : बारापुल्याजवळ अब्दालीचा सरदार सरवरखान आणि अंताजींची लढाई, अंताजींचा विजय.
१३. दि. ३ फेब्रवारी १७५७ फरीदाबादेजवळ अब्दालीचा मुलगा आणि वजीर यांचा अंताजींवर हल्ला. यात अंताजींच्या फौजेचे मोठे नुकसान होऊन, जवळपास एक हजार माणसं मारली जाऊनही त्यांनी हल्ला परतवून लावला.
१४. दि. १० ते १५ जुलै १७५७ : अंताजी आणि नजीबखानाचे सैन्य यांच्यात मेरठजवळ दोन लढाया. दोन्ही वेळेस अंताजींचा विजय.
१५. दि. १२ जानेवरी १७६० रोजी उद्गीरजवळ चंद्रसेन जाधवांशी अंताजींची लढाई आणि विजय.
१६. पानिपतच्या सबंध मोहिमेत अंताजी भाऊसाहेबांसोबत. शिवाय, पानिपतावर भाऊंचा उजव्या बाजूला यशवंतराव पवार आणि समशेरबहाद्दर यांच्यासोबत हुजुरातीच्या फौजेचे नेतृत्व..
=====================================
पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे आणि त्यांचे इतिहासातील योगदान -
१. पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे कामरगाव वसवले. कामाक्षिचा दृष्टांत झाला म्हणून. कारभारासाठी गढी बांधली. यांची गढी म्हणजे एक भव्य वाडा आहे.. सद्यस्थितीत गावाची वेस असलेले बुरूज, तटबंदी पहायला मिळते. आज गावात असंख्य पेशवेकालीन वाडे आहेत. त्यामध्ये गंधेंचा वाडा आहे.. गावचे आंधळे-पाटील यांचा सुस्थितीतील वाडा आहे. आंधळे हे पूर्वीपासून गावचे पाटील होते हे अंताजींनी सदाशिवभाऊना इ.स. ७/११/१७५० ला लिहिलेल्या पत्रात उल्लेख आढळतो.गढीच्या एका बुरुजावर आंधळे यांचे नाव असलेला त्यावर शिलालेख दिसून येतो.
२. अंताजी गंधे हे कर्तृत्ववान होते. सुरवातीला छत्रपती शाहूमहाराजांकडे होते नंतर चिमाजी आप्पांची मर्जी हुशारीने संपादन केली.चिमाजी अप्पांनी त्यांना माळव्यावरील स्वारीत पराक्रम दाखविण्याची संधी दिली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. बाजीराव पेशव्यांनी बुंदेलखंडाच्या स्वारीत त्यांना सामील करून घेतले. त्यांनी गोविंद बल्लाळ यांची बाजीरावांकडे कमावीसदार पदासाठी शिफारस केली. इ.स.१७३३ मध्ये त्यांच्या शिफारसीनुसार गोविंद बल्लाळ हे बुंदेलखंडाचे सर्वेसर्वा झाले. 'सागर' नावाचे शहर त्यांनी वसविले.
३. .मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी दिल्लीच्या बादशहाने इ.स. १७३० च्या सुमारास महंमदशहा बंगश याची नेमणूक केली. बुंदेलखंडाप्रमाणेच मराठ्यांचा निःपात करण्याच्या कामास तो लागला. इ.स. १९/५/१७३१ रोजी बंगश उज्जैनीस आला. त्याला अंताजी माणकेश्वर सामोरे गेले. पण त्याचा पराभव झाला.
४. अंताजींस उत्तरेकडील राजकारणात शिंदे-होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून महत्त्व प्राप्त झाले. दिल्लीला ७००० स्वारांचे ते मनसबदार होते. दिल्लीच्या राजकारणात त्यांनी फार मोठी कामगिरी केली. बादशहाकडून त्यांना इटावा व पुफुंब हे परगणे मिळाले. इ.स. १७५५ मध्ये ते दत्ताजी शिंदे यांचेकडे गेले.
५. अंताजी गंधे व हिंगणे बंधू हे लष्करी अधिकारी मराठ्यांचे दिल्ली दरबारी राजकारण सांभाळणारे अत्यंत मातब्बर असे वकील होते. हिंगणे यांचा तेथे अधिक वकूब होता. अंताजी हे लष्करी बाण्यात अत्यंत धाडसी वृत्तीचे तसेच बोलण्यात व लिहिण्यात चतुर होते.
६. ६. इ.स. १७५७ मध्ये अब्दालीला त्यांनी चांगलाच हात दाखविला.उत्तरेत ग्वाल्हेरच्या बाजून लढणारे अंताजी हे एकमेव मराठा सरदार होते. सुरजमल जाट व अंताजी या दोघांनी अब्दालीला तोंड दिले.
७. .पानिपतवर लढताना मल्हारराव, विठ्ठल शिवदेव, तानाजी गायकवाड, सटवोजी जाधव, साबाजी शिंदे, अंताजी माणकेश्वर, गंगोबा तात्या चंद्रचूड हे साठीच्या वरील वीर जखमी होऊन रणांगणातून बाहेर पडले. नंतर बाजी हरि, नाना पुरंदरे रात्री चालले असता दांडग्यांच्या हुल्लडीत फारुकाबादच्या जमीनदाराकडून बाजी हरी व अंताजी माणकेश्वर ठार झाले.
८. जदुनाथ सरकार हे बंग इतिहासकार त्यांचा गौरव करताना म्हणतात: "अंताजी माणकेश्वर हा तलवार व लेखणी दोनही कुशलतेने चालवणारा पुरुष पानिपतावर गारद झाल्यामुळे इतिहासाची हानी झाली आहे."
९.दिल्ली दरबारी एक मुत्सद्दी वकील म्हणून चमकलेल्या या वीराने आपली गावची आठवण मात्र कायम ठेवली. त्यांनी गावी कोट बांधला. त्यांच्या पत्रावर खालील मुद्रा पाहण्यास मिळते
"मुद्रषाशंभुचरणद्वद्वनिष्ठस्य सर्वदा
माणिकेश्वर संभूत अनन्तस्य विराजते"
१०.आपल्या मूळ मातीची कामरगावची व आपल्या मूळ कुलकर्णीपदाची मात्र त्यांनी आठवण जपली. राशिन येथील श्री अंबिका मंदिरात त्यांनी दीपमाळ उभारली. राशिन मंदिराच्या मागच्या ओवऱ्या या गंधेंनी बांधल्या आहेत. , अंताजी माणकेश्वर गंधे यांनी ओवरी व दीपमाळ आणि शेटे सरकार यांनी राशिनचे मंदिर बांधले. या दीपमाळेवरील शिलालेखात ते म्हणतात'अंताजी माणकेश्वर गाव कामगार कामरगावकर'
११.मराठा राज्याचे एक अधिकारी आणि प्रसिद्ध सेनानी पानिपतवीर अंताजीचा मृत्यू १७ जानेवारी १७६१ रोजी स्वराज्याची सेवा करत असताना झाला
संदर्भ
१.(IE VI -३१८ )
२.महाराष्ट्रातील वाडे व गढी –भाग १ - डाॕ सदाशिव शिवदे सर
३.सेनापती अंताजी माणकेश्वर गंधे – कौस्तुभ कस्तुरे पुष्ठ १४९-५०
======================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
*राशीनच्या जगदंबा मंदिरातील दुसरा शिलालेख उलगडतो पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांचे ऐतिहासिक योगदान* ☞
*इ.स. १७५८ मधील शिलालेखात ओवऱ्यांच्या बांधकामाची नोंद; मराठाकालीन देवीभक्ती, दानपरंपरा आणि ग्रामप्रशासनाचा महत्त्वपूर्ण पुरावा*
राशीन येथील एक महत्वपूर्ण संस्कृत शिलालेख....
======================================राशीन येथील जगदंबा मंदिर ओवरी शिलालेख !!!!!!! .
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे राशीन येथील प्रसिद्ध असलेले श्री जगदंबा मंदिराच्या मागील भागात ओवऱ्या आहेत त्यावरील एका खांबावर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून सात ओळींचा देवनागरी लिपीतील संस्कृत भाषेत कोरलेला आहे. लेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने तसेच सततची रंगरंगोटी केल्याने लेखातील अक्षरे मुजुन गेली आहेत.शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो.
======================================
शिलालेखाचे वाचन :
१. श्री रेणुका(कां)वां(बां)घ्रिसरोजयु
२. ग्मे माणिक्यसूनुरत्व लिलीन
३. भूत :॥ मत्पूर्वजारुत्वद्भजने(ऽ)प
४. याते तथा मदीयास्सततं भवे
५. यु:॥१॥ नवागभूपाः(?) किल त्रा
६. क उक्तो स ईश्वरे माघ बुधा
७. ष्ट शुक्ले॥ श्रीकामकृष्णेन नु …
८. रीमानोऽनंतय देव्यानीह मैंद्रव
९. कौ॥२॥
अर्थ : श्री रेणुकादेवीच्या चरणकमलांशी एकनिष्ठ असलेला माणिक्याचा पुत्र तिच्या भक्तीत पूर्णपणे लीन झाला होता. माझे पूर्वज जसे तिच्या भक्तीत सदैव तत्पर राहिले, त्याचप्रमाणे अनेक गुणरत्नांनी अलंकृत असलेले माझे वंशजही तिची अखंड भक्ती करीत राहोत, अशी त्याची प्रार्थना आहे. पुढे अनेक राजे, प्रभू अथवा स्थानिक अधिपती यांच्या काळात, देवाच्या कृपेने शालिवाहन शकाच्या १६७९ ईश्वर नाम संवत्सरात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी,म्हणजेच १५ फेब्रुवारी १७५८ बुधवार या शुभ तिथीला श्री कामकृष्ण यांनी हे धार्मिक कार्य संपन्न केले, असा उल्लेख आढळतो. तसेच श्रीमान अनंत यांनी रेणुकादेवीप्रती श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त करून देवीसाठी दान अर्पण केले.
====================================
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख रेणुकादेवीच्या भक्तीपरंपरेचा, कुलपरंपरागत उपासनेचा आणि संस्कृत काव्यपरंपरेचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. लेखाची सुरुवात रेणुकादेवीच्या चरणकमलांच्या स्तुतीने होत असल्यामुळे देवीला सर्वोच्च आराध्य मानण्याची भावना व्यक्त होते. "वां(बां)घ्रिसरोजयु" (चरणकमल) यांसारख्या काव्यात्मक शब्दप्रयोगांमुळे हा लेख केवळ नोंदात्मक नसून भक्तिरसपूर्ण साहित्यिक रचना असल्याचे दिसून येते.
"माणिक्यसूनु" या उल्लेखामुळे लेखकर्त्याची वंशपरंपरा समजते. तसेच "मत्पूर्वज" आणि "मदीयाः" या शब्दांमधून देवीची उपासना ही एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून पिढ्यान् पिढ्या चालत आलेली कुलपरंपरा असल्याचे स्पष्ट होते. पूर्वजांनी जपलेली भक्ती पुढील पिढ्यांनीही टिकवून ठेवावी, ही भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील सातत्याची भावना या लेखातून व्यक्त होते.
शिलालेखात माघ शुक्ल अष्टमी या तिथीचा उल्लेख असल्यामुळे देवीच्या उपासनेशी निगडित एखाद्या विशेष धार्मिक प्रसंगाची नोंद येथे असावी. माघ महिन्याला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने या दिवशी केलेले कार्य अधिक पुण्यप्रद मानले गेले असावे.
"श्रीकामकृष्ण" आणि "अनंत" या व्यक्तींच्या उल्लेखामुळे स्थानिक भक्त, दाते किंवा धार्मिक कार्याशी संबंधित व्यक्तींची माहिती मिळते. अशा उल्लेखांमुळे त्या काळातील समाजातील धार्मिक आश्रयदाते आणि त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे शक्य होते.
या लेखाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील संस्कृत भाषेचा वापर. ग्रामीण अथवा स्थानिक देवस्थानाशी संबंधित असूनही संस्कृतमध्ये श्लोकबद्ध लेखन करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील धार्मिक संस्थांवर संस्कृत परंपरेचा प्रभाव आणि विद्वत्संस्कृतीचे अस्तित्व स्पष्ट होते.
एकंदरीत हा शिलालेख रेणुकादेवीची उपासना, कुलदैवत परंपरा, पिढ्यान् पिढ्या चालत आलेली भक्ती, स्थानिक दाते व धार्मिक कार्यकर्ते, तसेच मराठाकालीन संस्कृत शिलालेख परंपरा यांचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व सांस्कृतिक पुरावा आहे. देवीभक्ती आणि वंशपरंपरेतील धार्मिक सातत्य यांचे दर्शन घडविणारा हा लेख स्थानिक इतिहासाच्या अभ्यासासाठी विशेष मौल्यवान ठरतो.
======================================
गावाचे नाव :- मु.पो. राशीन ता. कर्जत जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.४३६१०७,E..७४.९२१०७१
शिलालेखाचे स्थान :- राशीन येथील जगदंबा मंदिराच्या पाठीमागील ओवऱ्याच्या दगडी खांबावर वरील भागात कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- उठाव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , संस्कृत भाषा
प्रयोजन :- श्री जगदंबा चरणी तत्पर राहून देवीचा आशीर्वाद व देवीस दान दिल्याची स्मृती जपणे..
.मिती / वर्ष :- शके १६७९ईश्वर नाम संवत्सरे माघ शुक्ल अष्टमी
काळ वर्ष :- अठरावे शतक – - सन १५ फेब्रुवारी १७५८ बुधवार
राजा /कारकीर्द:- छत्रपती रामराजे
ग्राम नाम:-
देवता नामः-श्री भवानी
व्यक्तीनाम :- माणिक्य ,श्री कामकृष्ण ,अनंत
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे.डॉ .श्रीनंद बापट
संक्षेप :-
संदर्भ १.(IE VI -३१८ )
======================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
मुरळीने खंडोबाचे मंदिर बांधलेला अठराव्या शतकातील मोडी लिपीतील शिलालेख !!!
=======================================
चांदे बुद्रुक येथील खंडोबा मंदिर शिलालेख .!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे चांदेबुद्रुक येथील चांदे मिरजगाव रोडवरील चौकाच्या पुढे असलेल्या खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला कोरलेला आहे सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून चार ओळींचा मोडी लिपीतील कोरलेला आहे. शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे पुसट झाली आहेत तर काही अक्षरे झिजली आहेत. लेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे वाचता येतो.
======================================
शिलालेखाचे वाचन :
१. श्री
२. मार्तंडाचे सेवे
३.स भीवा दी (?) मुर
४.ली माहारीन
अर्थ :- "श्री मातड (म्हणजे मातंग/मातड देवता किंवा व्यक्ती) यांच्या सेवेसाठी भीवा नावाच्या व्यक्तीची पत्नी मुरली माहारीण हिने हे कार्य केले."
किंवा,
"श्री मातडांच्या सेवेत असणारी भीवा (किंवा भीवाची) मुरली माहारीण" असा उल्लेख असण्याची शक्यता आहे.
=====================================
शिलालेखाचे महत्व :- “श्री मार्तंडाचे सेवेस भीव दिमत …” या वाक्यांशाचे महत्त्व अनेक दृष्टींनी लक्षवेधी आहे.
प्रथम, या लेखातून मार्तंड (खंडोबा/मार्तंड भैरव) यांच्या उपासनेचा स्थानिक स्तरावरील प्रभाव दिसून येतो. “श्री मार्तंडाचे सेवेस” हा शब्दप्रयोग केवळ देवतेचा उल्लेख नसून त्या देवतेप्रती असलेली भक्ती, निष्ठा आणि समर्पण व्यक्त करतो. मराठाकालीन शिलालेखांमध्ये “चरणी तत्पर”, “सेवेस”, “दास”, “भक्त” असे शब्दप्रयोग वारंवार आढळतात.दुसरे म्हणजे, “भीव” (भिवा, भिवाजी किंवा तत्सम व्यक्ती) या नावाच्या उल्लेखामुळे देवस्थानाशी संबंधित व्यक्तींची माहिती मिळते. अशा उल्लेखांमुळे त्या काळातील स्थानिक समाजरचना, भक्तसमुदाय आणि देवस्थान व्यवस्थापनाचा अभ्यास करता येतो.“दिमत” हा शब्द फारशी दिमती (सेवक, अनुयायी, अधीनस्थ) या संज्ञेशी संबंधित असण्याची शक्यता असल्यामुळे मराठाकालीन प्रशासन व दैनंदिन व्यवहारांवर फारशी भाषेचा झालेला प्रभावही यातून स्पष्ट होतो. धार्मिक लेखनात स्थानिक मराठीबरोबर फारशी शब्दांचा वापर होत असल्याचा हा एक पुरावा मानता येईल.
माहारीण’ हा शब्द महार समाजातील स्त्रीसाठी वापरला जात असे.‘मुरली’ हे स्त्रीचे नाव असू शकते.‘शेवे’ हा शब्द ‘सेवे’, ‘सेवेस’ किंवा ‘सेवेकरी’ या अर्थाने असू शकतो.
लेख अत्यंत संक्षिप्त असल्यामुळे तो एखाद्या दानकर्त्या, सेवेकरी किंवा भक्त स्त्रीची नोंद असण्याची शक्यता अधिक आहे.
हा लेख देवसेवा, भक्तीभाव आणि व्यक्तीची धार्मिक ओळख यांचे दर्शन घडवितो. त्यामुळे तो केवळ एक नोंद नसून त्या काळातील धार्मिक जीवन, सामाजिक संबंध आणि सांस्कृतिक परंपरांचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो.
एकत्रितपणे पाहता, हा वाक्यांश मार्तंड-खंडोबा उपासनेची परंपरा, भक्ताची देवाशी असलेली निष्ठा, फारशी-प्रभावित शब्दसंपदा आणि मराठाकालीन धार्मिक-सामाजिक जीवन यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मानला जाऊ शकतो.
=====================================
गावाचे नाव :- मु पो चांदे बुद्रुक ता. कर्जत. जिल्हा- अहिल्यानगर नगर
जी.पी.एस. :- N-१८.६७५७४४ ,E..७४.९४१२२५
शिलालेखाचे स्थान :- श्री खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- मोडी – लिपी मराठी भाषा
प्रयोजन :- श्रीच्या चरणी तत्पर असल्याची स्मृती जपणे.
काळ वर्ष :- अठरावे शतक –
कारकीर्द: उत्तर मराठा कालखंड
व्यक्तिनाम :- भिवाजी
शिलालेखाचे संशोधन :- .श्री. राजेश पोपट इंगळे
शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे
======================================
@© माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
*चांदे येथील खंडोबा मंदिरातील मोडी शिलालेखातून उलगडला मराठाकालीन भक्तीचा इतिहास* ☞
*अठराव्या शतकातील शिलालेखात ‘मार्तंडाचे सेवेस’ उल्लेख; धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण पुरावा*
बहिरोबा वाडी येथील मोडी लिपीतील बारव बांधलेला शिलालेख .!!!!!
=====================================
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या बाजूने तलावाकडील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बारवेच्या पायऱ्या उतरल्या कि वरील भागाच्या कमानी पट्टीवर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून तीन ओळींचा मोडी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेखावर वातावरणाचा परिणाम झाल्याने लेखातील अक्षरे मुजुन गेली आहेत .मात्र अक्षरांचा कोरीवपणा कायम आहे .लेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे सहज वाचता येतो.
======================================
शिलालेखाचे वाचन :
१.श्री लोहोबाईची इहिर ।
२.धनाजी मतकर ।
३.सके १६८४ मध्ये
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६८४ व्या वर्षी चित्रभानु नाम संवत्सरात म्हणजेच सन १७६२ साली श्री धनाजी मतकर यानी लोहोबाईची विहीर बांधली
=====================================
शिलालेखाचे महत्व :- श्री लोहोबाईची इहिर । धनाजी मतकर । सके १६८४ मध्ये” हा अल्पाक्षरी शिलालेख असला तरी तो ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
या लेखातून गावातील जलव्यवस्थेची परंपरा स्पष्ट होते. विहीर ही त्या काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असल्यामुळे तिचे बांधकाम हे लोककल्याणाचे महत्त्वाचे कार्य मानले जात असे. त्यामुळे हा लेख तत्कालीन समाजाच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीकोनाचा पुरावा ठरतो.
लेखात विहिरीचा संबंध लोहोबाईशी जोडलेला असल्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि लोकजीवन यांचे निकट नाते दिसून येते. जलस्रोतांना देवतेच्या नावाने समर्पित करण्याची परंपरा महाराष्ट्रात प्राचीन काळापासून आढळते. यामुळे पाण्याच्या स्रोताला पावित्र्य प्राप्त होत असे आणि त्याचे जतन करण्याची सामुदायिक भावना निर्माण होत असे.
धनाजी मतकर या व्यक्तीचा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. यामुळे त्या काळातील स्थानिक दाते, गावचे प्रमुख किंवा सार्वजनिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळते. अशा उल्लेखांमुळे स्थानिक इतिहास आणि वंशपरंपरांच्या अभ्यासाला आधार मिळतो.
शिलालेखातील शके १६८४ (इ.स. १७६२–६३) ही कालनोंद लेखाचा निश्चित कालखंड ठरवते. त्यामुळे अठराव्या शतकातील ग्रामीण समाजजीवन, धार्मिक परंपरा आणि जलव्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरतो.
एकूणच, हा शिलालेख लोककल्याणकारी जलव्यवस्था, स्थानिक देवतांची उपासना, दानधर्माची परंपरा आणि अठराव्या शतकातील ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून पाहता येतो. तो त्या काळातील समाजाच्या धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक हिताच्या कार्यांविषयी मौल्यवान माहिती प्रदान करतो.
======================================
गावाचे नाव :- मु पो.बहिरोबावाडी भैरवनाथ मंदिर शेजारी , ता कर्जत , जि.अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.६०८०८० ,W-७४.९९४५५२
शिलालेखाचे स्थान :- बहिरोबावाडी येथील श्री भैरवनाथ महादेव मंदिराच्या बाजूने तलावाकडे गेलेल्या रस्त्यावरील एका बारवेच्या पायऱ्या उतरल्यावर समोरील वरील भागात कोरला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- मोडी – लिपी मराठी भाषा
प्रयोजन :- बारव बांधून पूर्ण केल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १६८४ चित्रभानु नाम संवत्सर
.काळ वर्ष :- अठरावे शतक – सन १७६२
कारकीर्द: छत्रपती रामराजे महाराज
व्यक्तिनाम :- धनाजी मतकर
शिलालेखाचे संशोधन :- .श्री. राजेश पोपट इंगळे
शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे. सौ राधिका दाते.
संक्षेप :- इहीर –विहीर
संदर्भ:- .(IE VI -३२६ )
======================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
*लोककल्याणाच्या परंपरेचा साक्षीदार बहिरोबावाडीतील २६४ वर्षांपूर्वीचा बारव शिलालेख* ☞
*लोहोबाईच्या विहिरीची स्मृती जपणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज*
भगवतगीतेतून अंतिम संदेश दिलेला महत्वपूर्ण असा मध्ययुगीन समाधी शिलालेख.!!!!!!
======================================
बेनवडी येथील हरिनारायण स्वामी मंदिर समाधी शिलालेख .!!!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे बेनवडी येथील प्रसिद्ध असलेले श्री हरिनारायण स्वामी मंदिराच्या मुख्य तटबंदी प्रवेशद्वारा समोर एकूण 5 समाधी स्थान आहेत त्यातील पहिल्या समाधी स्थानावर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून पाच ओळींचा देवनागरी लिपीतील संस्कृत भाषेत कोरलेला आहे. शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे पुसट झाली आहेत तर काही अक्षरे झिजली आहेत. लेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे वाचता येतो.
======================================
शिलालेखाचे वाचन :
१॥ श्री ॥
२.॥ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ॥
३.॥ तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥१॥
४.॥ श्री हरी नारायण समर्थ ॥
५.॥ श्री लक्ष्मी नृसिंह समाधी ॥
अर्थ : हा संपूर्ण श्लोक भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचा सार मानला जातो. या श्लोकामध्ये ज्ञान आणि कर्म, धर्म आणि पराक्रम तसेच दैवी मार्गदर्शन आणि मानवी प्रयत्न यांचा समन्वय व्यक्त झाला आहे. ज्या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्णांचे धर्माधिष्ठित मार्गदर्शन आणि अर्जुनासारखा कर्तव्यनिष्ठ, शूर व कृतीशील पुरुष असतो, त्या ठिकाणी समृद्धी, विजय, ऐश्वर्य, कल्याण आणि धर्मनिष्ठ नीती निश्चितपणे नांदते, असे संजयाचे ठाम मत आहे. त्यामुळे हा श्लोक केवळ महाभारत युद्धाच्या संदर्भापुरता मर्यादित न राहता जीवनातील यश, कर्तव्यपालन आणि धर्माचरण यांचे सार्वकालिक तत्त्व सांगणारा मानला जातो.यानंतर आलेले “श्री” हे मंगलसूचक पद भारतीय शिलालेख, हस्तलिखिते आणि धार्मिक लेखनपरंपरेतील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. “श्री” या शब्दातून शुभत्व, कल्याण, समृद्धी आणि दैवी कृपेचे आवाहन व्यक्त होते. त्यामुळे लेखाच्या प्रारंभी किंवा शेवटी त्याचा उपयोग करून धार्मिक आणि पवित्र स्वरूप अधोरेखित केले जाते.पुढील “श्री हरी नारायण समर्थ” हा उल्लेख एखाद्या संत, गुरुपुरुष किंवा समाधिस्थ महात्म्याचा निर्देश करणारा असावा. “हरी” आणि “नारायण” ही भगवान विष्णूची नावे असल्यामुळे त्या व्यक्तीचा वैष्णव भक्तीपरंपरेशी संबंध असावा असे दिसते. “समर्थ” हा शब्द त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा, सिद्धत्वाचा किंवा गुरुपदाचा निर्देश करतो. तसेच “श्री लक्ष्मी नृसिंह समाधी” या उल्लेखावरून ही समाधी लक्ष्मी-नृसिंह उपासनेशी संबंधित असल्याचे दिसून येते. लक्ष्मी-नृसिंह हे भगवान विष्णूचे भक्तरक्षक आणि धर्मसंरक्षक रूप मानले जाते. त्यामुळे समाधिस्थ संत हे नृसिंहभक्त असावेत किंवा त्या समाधीचे धार्मिक अधिष्ठान लक्ष्मी-नृसिंह परंपरेशी निगडित असावे, असा निष्कर्ष निघतो.
=====================================
शिलालेखाचे महत्व :- हा शिलालेख धार्मिक, तात्त्विक, सांप्रदायिक आणि सांस्कृतिक अशा अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. अल्प शब्दांत कोरलेला असला तरी त्यामागे भगवद्गीतेचा गूढ संदेश, वैष्णव भक्तिपरंपरा आणि संतसंप्रदायाची परंपरा प्रतिबिंबित होते.शिलालेखात उद्धृत केलेला श्लोक हा भगवत गीतेचा अंतिम श्लोक आहे. संपूर्ण गीतेचा उपसंहार या श्लोकाने होत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. धर्म, ज्ञान, भक्ती आणि कर्तव्यनिष्ठ कर्म यांच्या संयोगानेच विजय आणि कल्याण प्राप्त होते, हा गीतेचा मूलभूत सिद्धांत या एका श्लोकात व्यक्त झाला आहे. समाधीवर हा श्लोक कोरणे म्हणजे समाधिस्थ महात्म्याचे जीवन गीतेच्या तत्त्वांनुसार व्यतीत झाले, असा संदेश देणे होय.
या श्लोकात भगवान श्रीकृष्ण हे दिव्य ज्ञान, योग, धर्म आणि आध्यात्मिक मार्गदर्शन यांचे प्रतीक आहेत, तर अर्जुन हा कर्तव्यनिष्ठ कर्म, पराक्रम आणि लौकिक जीवनातील संघर्षांचे प्रतीक आहे. समाधीवरील या श्लोकामुळे समाधिस्थ संताने ज्ञान आणि कर्म यांचा समतोल साधलेला आदर्श जीवनमार्ग स्वीकारला होता, असे सूचित होते.“हरी नारायण” आणि “लक्ष्मी नृसिंह” हे दोन्ही उल्लेख विष्णूच्या उपासनेशी निगडित आहेत. यावरून हा समाधीलेख वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याचे दिसून येते. विशेषतः लक्ष्मी-नृसिंह उपासना ही संरक्षण, धर्मसंस्थापना आणि भक्तरक्षण यांचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे समाधिस्थ महात्मा नृसिंहभक्त असण्याची शक्यता बळकट होते.
“समर्थ” ही उपाधी सामान्य व्यक्तीसाठी वापरली जात नाही. ती आध्यात्मिक सामर्थ्य, सिद्धत्व, तपश्चर्या आणि गुरुपद यांचे द्योतक आहे. त्यामुळे “हरी नारायण समर्थ” हे स्थानिक संत, तपस्वी किंवा गुरुपुरुष असावेत. शिलालेख त्यांच्या स्मृतीचे जतन करतो आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रभावाची नोंद करतो.
महाराष्ट्रात संत, योगी आणि तपस्वी यांच्या समाधींना तीर्थस्वरूप मानण्याची परंपरा आहे. या लेखातील “लक्ष्मी नृसिंह समाधी” हा उल्लेख समाधी ही केवळ स्मारक नसून भक्तांसाठी पूजनीय धार्मिक केंद्र होती, हे दर्शवितो. अशा समाधीस्थळांभोवती धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन विकसित होत असे.
श्लोकात “श्री”, “विजय”, “भूति” आणि “नीती” या चार मूल्यांचा उल्लेख आहे. ही केवळ भौतिक समृद्धीची चिन्हे नसून धर्माधिष्ठित जीवनाच्या यशस्वी परिणामांची प्रतीके आहेत. समाधीवर हा श्लोक कोरून भावी पिढ्यांना धर्म, नीती, भक्ती आणि कर्तव्य यांचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा शिलालेख दाखवून देतो की भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान केवळ ग्रंथापुरते मर्यादित नव्हते, तर ते लोकजीवन, संतपरंपरा आणि स्मारक-लेखन यांमध्येही खोलवर रुजलेले होते. समाधीसारख्या स्मृतिस्थळी गीतेचा अंतिम श्लोक वापरणे हे गीतेच्या व्यापक सामाजिक प्रभावाचे द्योतक आहे.अशा प्रकारचे शिलालेख एखाद्या संताची, त्याच्या संप्रदायाची आणि स्थानिक धार्मिक परंपरेची ऐतिहासिक स्मृती जतन करतात. अनेकदा लिखित इतिहासात न आढळणाऱ्या स्थानिक संतपरंपरा अशा शिलालेखांमुळेच ज्ञात होतात. त्यामुळे हा लेख स्थानिक इतिहासाच्या अभ्यासासाठीही महत्त्वाचा स्रोत ठरतो.
हा शिलालेख केवळ समाधीची ओळख करून देणारा लेख नाही, तर भगवद्गीतेच्या अंतिम संदेशाचा, वैष्णव भक्तिपरंपरेचा, लक्ष्मी-नृसिंह उपासनेचा, संतपरंपरेच्या गौरवाचा आणि धर्मनिष्ठ जीवनमूल्यांच्या प्रचाराचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. ज्ञान, भक्ती, कर्म, विजय आणि नीती यांचा समन्वय साधणाऱ्या आध्यात्मिक जीवनदृष्टीचे हे संक्षिप्त पण प्रभावी अभिव्यक्तीस्वरूप मानता येईल.
=====================================
गावाचे नाव :- मु पो. मौजे बेनवडी ता. कर्जत. जिल्हा- अहिल्यानगर नगर
जी.पी.एस. :- N-१८.४९६०५१,E..७४.९७४९६१
शिलालेखाचे स्थान :- श्री हरी नारायण स्वामी मंदिराच्या पुढील एका समाधीवर शिलालेख कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- उठाव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी संस्कृत भाषा
प्रयोजन :- भगवद्गगीतेतील अंतिम संदेश वैष्णव परंपरेतील दस्तेवजाची (समाधीची) नोंद केल्याची स्मृती जपणे.
काळ वर्ष :- अठरावे शतक –
कारकीर्द: मराठा कालखंड
व्यक्तिनाम :- योगेश्वर कृष्ण ,पार्थ ,हरी नारायण ,लक्ष्मि ,नृसिंह
शिलालेखाचे संशोधन :- .श्री. राजेश पोपट इंगळे
शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे
संदर्भ:- भगवत गीता अठरावा अध्याय
======================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
*बेनवडीतील हरिनारायण स्वामी मंदिर परिसरात भगवद्गीतेचा श्लोक असलेला ऐतिहासिक समाधी शिलालेख उजेडात*☞
*"गीतेचे तत्त्वज्ञान दगडात कोरलेले! बेनवडीत सापडला अठराव्या शतकातील ऐतिहासिक समाधी शिलालेख"*
कर्जत तालुका शिलालेख भाग -२
तुम्ही प्राचीन मंदिरांवर दिसणारं हे भयानक मुख पाहिलं आहे का?
यालाच कीर्तिमुख म्हटलं जातं.
हे कीर्तिमुख हरिश्चंद्रेश्वर मंदिर यांच्या प्रवेशद्वारावर कोरलेलं आहे.
पुराणांनुसार, भगवान शिवांनी एका भयंकर राक्षसाची निर्मिती केली होती. त्याची भूक इतकी प्रचंड होती की त्याने स्वतःचं शरीर खायला सुरुवात केली आणि शेवटी फक्त त्याचं मुख उरलं.शिव त्याच्या समर्पणावर प्रसन्न झाले आणि त्याला ‘कीर्तिमुख’ हे नाव दिलं.
त्यानंतर मंदिरांच्या प्रवेशद्वारावर त्याला स्थान देण्यात आलं, जेणेकरून वाईट शक्तींपासून मंदिराचं रक्षण होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत मंदिराचा खांब बसवलेला शिलालेख!!!!!!!
=====================================
गुरव पिंपरी येथील नागेश्वर मंदिर स्तंभ (खांब )जीर्णोधार शिलालेख .!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे गुरव पिंपरी येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नागेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत सभामंडपातील उजव्या बाजूला दोन एकत्र खांब बसवले आहेत त्यापैकी नवीन खांबाच्या वरील भागाच्या पट्टीवर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून तीन ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेखावर वातावरणाचा परिणाम तसेच सततची रंगरंगोटी केल्याने लेखातील अक्षरे मुजुन गेली आहेत . मात्र अक्षरांचा कोरीवपणा कायम आहे .लेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे सहज वाचता येतो.
=====================================
शिलालेखाचे वाचन :
१.माणकोजी खाती याने नवा षां
२.बा बसविळा सके १५८६ जेस्ट
३.वदी पाडवा सोमवार
संहिता
१.माणकोजी खाती याने नवा खांब
२. बसविला. शके १५८६ जेष्ठ
३. वद्य प्रतिपदा (पाडवा) सोमवार
अर्थ : शालिवाहन शकाच्या १५८६ व्या वर्षी क्रोधीनाम संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध पाडवा म्हणजे १६ मे १६६४ सोमवार या दिवशी माणकोजी खाती याने नागेश्वर महादेव मंदिरातील सभामंडपाची आडवी तुळई जी जुनी होता त्यास छेद, तडा गेला .तडा गेल्यानेत्यच्या खाली आधार म्हणून तुळई खाली त्याच्या शेजारी नवा खांब बसवला.
शिलालेखाचे महत्व :- लेखात खाती" शब्दाचा अर्थसुतार होतो राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक शिलालेखांमध्ये खाती,खातीक ही कारागीरांची जात किंवा व्यवसायवाचक संज्ञा आहे.
विशेषतः लाकडी बांधकाम, खांब, मंडप, दरवाजे, छतांची रचना करणारे सुतार यांना "खाती" म्हटले जात असे.काही ठिकाणी हा शब्द स्थापत्यकार मुख्य बाधकाम करणारा किंवा गवंडी-सुतार वर्गातील कारागीर या व्यापक अर्थानेही आढळतो.
"माणकोजी खाती याने नवा खांब बसविला"
या वाक्यात "खाती" हे माणकोजी यांचे आडनाव, जातनाम किंवा व्यवसायवाचक पद असण्याची शक्यता आहे. "नवा खांब बसविला" हा उल्लेख असल्याने येथे "खाती" हा शब्द सुतार किंवा बांधकाम कारागीर या अर्थाने अधिक समर्पक वाटतो. या उल्लेखावरून मंदिर किंवा वास्तूच्या उभारणीमध्ये केवळ दातेच नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कारागिरांची नावेही नोंदविण्याची परंपरा अस्तित्वात होती, हे दिसून येते. त्यामुळे "माणकोजी खाती" हे त्या खांबाच्या निर्मितीशी किंवा स्थापनेशी संबंधित प्रमुख कारागीर असावेत
=====================================
गावाचे नाव :- मु पो.गुरव पिंपरी नागेश्वरमंदिर , ता कर्जत , जि.अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८.६९६५४४ ,W-७४.९७२४५०
शिलालेखाचे स्थान :- श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य सभामंडप प्रवेशद्वाराच्या समोर दोन खांब आहेत त्यातील आतील बाजूच्या खांबावर वरील भागात कोरला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी मराठी भाषा
प्रयोजन :- मंदिरात नवीन खांब बसवून मंदिराचा जीर्णोधार पूर्ण केल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १५८६ क्रोधीनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध पाडवा
.काळ वर्ष :- सतरावे शतक -१६ मे १६६४ सोमवार
कारकीर्द: छत्रपती शिवाजी महाराज
ग्रामनाम: -
ग्रामदेवता :-
व्यक्तिनाम :- माणकोजी खाती
शिलालेखाचे संशोधन :- .श्री. राजेश पोपट इंगळे
शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे
संक्षेप :- नवा-नवीन , षांबा-खांबा, बसविळा-बसविला , सके-शके , जेस्ट-जेष्ठ ,वदी-वद्य
संदर्भ:- .(IE VI -१३० )
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
पारनेर येथील भीमाशंकर महादेव मंदीर शिलालेख!!!!
======================================
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर येथील पूर्व वेशीजवळ मध्यवस्तीत असलेले भीमाशंकर महादेव मंदिराच्या गाभारा प्रवेशद्वाराच्या मध्यभागी वरील भागात कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून सहा ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे.शिळेवर वातावरणाचा परिणाम व मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी केल्याने तसेच सिमेंटचा थर असल्याने त्यावरील मजकूर स्पष्टपणे दिसत नाही. लेखाची शेवटची सहावी ओळ पूर्ण खराब झाली आहे लेखातील बरीच अक्षरे मुजुन गेली आहेत छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो.
======================================
शिलालेख वाचन
१.॥श्री गणेशाय नमः॥ श्री पाराशर क्षेत्रि भीमाशंकर म्ह
२.णोनि महादेव ॥ तच्चरणि तत्पर हा अवटि अनाबाई का
३.जिवाभाव ॥ १ ॥ शक सत्राशे पासट वत्सरस शोभक्रित नाम
४.सने ॥ या सालि केले हे देवालय कसबा पराशर ||२||खंडोजी
५.सुत अवजी पाटिल याने स्वताच्या पदराचे द्रव्याने केला.
अर्थ:-
गणेशाच्या मंगलस्मरणाने पाराशर क्षेत्रातील महादेवाला “भीमाशंकर” म्हणून संबोधले असून पूर्ण भक्तिभाव, दैवी निष्ठा आणि समर्पण व्यक्त करणारा आहे. या देवाच्या चरणी अखंड सेवा करणारी अनाबाई आवटी पाटील यांचा या देवाशी कौटुंबिक जिव्हाळा आहे. शालिवाहन शकाच्या १७६५ व्या वर्षी शुभकृत नाम संवत्सरात म्हणजेच सन १८४३साली कसबे पारनेर (पराशर) येथे खंडोजी सुत आवजी आवटी पाटील यांनी स्वतःच्या खाजगी संपत्तीतून स्वतःच्या खर्चाने या भीमाशंकर महादेवाचे देवालय बांधले.
======================================
शिलालेखाचे महत्व:-
हा शिलालेख मराठाकालीन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा पुराभिलेख आहे. लेखाची सुरुवात “श्री गणेशाय नमः” या मंगलाचरणाने होत असल्यामुळे तत्कालीन धार्मिक लेखनपरंपरेचे दर्शन घडते. त्यानंतर पाराशर क्षेत्रातील महादेवाला “भीमाशंकर” म्हणून संबोधण्यात आले असून यावरून त्या प्रदेशातील शैव परंपरा आणि तीर्थमहात्म्य स्पष्ट होते. “पाराशर क्षेत्र” हा उल्लेख त्या स्थळाच्या पावित्र्याची साक्ष देतो, तर भीमाशंकर या नावामुळे त्या देवस्थानाचा प्राचीन शैव उपासनेशी संबंध अधोरेखित होतो.
लेखातील “तच्चरणी तत्पर” हा शब्दप्रयोग विशेष महत्त्वाचा आहे. हा शब्द पूर्ण भक्तिभाव, दैवी निष्ठा आणि समर्पण व्यक्त करणारा असून तत्कालीन भक्तिपरंपरेचा प्रभाव दर्शवतो. देवाच्या चरणी अखंड सेवाभाव ठेवणाऱ्या अनाबाई आवटी पाटील यांचा या देवाशी असलेला जिव्हाळा आणि कौटुंबिक श्रद्धा याही या लेखातून स्पष्ट होतात. मराठाकालीन शिलालेखांमध्ये स्त्रियांचा उल्लेख तुलनेने कमी प्रमाणात आढळतो; त्यामुळे अनाबाईंचा स्पष्ट उल्लेख स्त्रियांच्या धार्मिक सहभागाचा महत्त्वपूर्ण पुरावा ठरतो.
या शिलालेखातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे देवालयनिर्मितीची स्पष्ट नोंद. शालिवाहन शक १७६५, शुभकृत नाम संवत्सरात कसबे पारनेर (पराशर) येथे खंडोजी यांचे पुत्र आवजी आवटी पाटील यांनी स्वतःच्या पदरच्या द्रव्याने भीमाशंकर महादेवाचे देवालय बांधल्याचे लेखात नमूद केले आहे. “स्वताच्या पदराचे द्रव्याने” या उल्लेखातून तत्कालीन दानपरंपरा, धार्मिक कार्यासाठी खाजगी संपत्तीचा उपयोग आणि समाजातील प्रतिष्ठित घराण्यांचा धर्मकार्यातील सहभाग स्पष्ट होतो. यावरून धार्मिक वास्तू उभारणे हे सामाजिक प्रतिष्ठा, श्रद्धा आणि लोकहित यांचे प्रतीक मानले जात होते हे दिसते.
“पाटील” या पदनामामुळे गावच्या वतनदार आणि प्रशासकीय वर्गाचा संदर्भ मिळतो. मराठाकालीन गावव्यवस्थेत पाटील हा महसूल, प्रशासन आणि सार्वजनिक कार्ये पाहणारा प्रमुख अधिकारी होता. त्यामुळे हा लेख केवळ धार्मिक नोंद न राहता ग्रामीण प्रशासन आणि सामाजिक रचनेचाही महत्त्वपूर्ण पुरावा बनतो. “कसबा पराशर” या उल्लेखामुळे त्या ठिकाणाचे प्रशासकीय व व्यापारी महत्त्वही सूचित होते.
कालनोंदीच्या दृष्टीनेही हा लेख महत्त्वाचा आहे. शके, संवत्सर आणि वर्ष यांची सविस्तर नोंद इतिहासकारांना घटनांचा अचूक काल निश्चित करण्यास मदत करते. त्याचप्रमाणे लेखातील जुनी मराठी भाषा, “तच्चरणी तत्पर”, “देवालय”, “पदराचे द्रव्य” यांसारखे शब्द आणि संक्षिप्त लेखनपद्धती मराठाकालीन भाषिक वैशिष्ट्यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरतात.
एकंदरीत हा शिलालेख पाराशर क्षेत्रातील शैवभक्ती, भीमाशंकर महादेवावरील श्रद्धा, स्त्रियांचा धार्मिक सहभाग, पाटील घराण्याची सामाजिक भूमिका, देवालयनिर्मितीची दानपरंपरा आणि मराठाकालीन ग्रामीण संस्कृती यांचे एकत्रित दर्शन घडवणारा अत्यंत मौल्यवान ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्यामुळे स्थानिक इतिहास, लोकसंस्कृती, धर्मपरंपरा आणि स्थापत्य इतिहासाच्या अभ्यासासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे.
======================================
गावाचे नाव :- पारनेर ता. पारनेर जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :N-१९.००३५४८,E..७४.४३५५८४
शिलालेखाचे स्थान : पारनेर गावातील पूर्व वेशीच्या आत मध्य वस्तीत भीमाशंकर महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी वरील भागात कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- उठाव स्वरूपाचा लेख आहे ..
लिपी व भाषा :- देवनागरी लिपी, मराठी भाषा
प्रयोजन : श्री च्या चरणी तत्पर राहून पदरचे पैसे खर्चून मंदिर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १७६५ शोभन नाम संवत्सरे
काळ वर्ष : एकोणिसावे शतक - सन१८४३
राजा /कारकीर्द:. ब्रिटिश आमदनी
ग्राम नाम:- पारनेर (पराशर)
देवता नामःश्री गणेश, श्री भीमाशंकर महादेव
व्यक्तीनामः अनाबाई , खंडोजी, आवजी आवटी पाटील
शिलालेखाचे वाचक :- श्री. अनिल किसन दुधाणे. श्री डॉ. शैलेंद्र भांडारे
संक्षेप : म्हणोनी म्हणून, का:- कौटुंबिक,
संदर्भ:- IEVII - ८८
=====================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
नागछत्रधरः श्रीमान् हलायुधधरः प्रभुः ।
कणिशैः पूरयेत् क्षेत्रं बलभद्रो दयानिधिः ॥
अर्थ :
नागाचे छत्र धारण करणारे, हलायुध धारण करणारे श्रीमान बलभद्र बलराम आपल्या कृपेने शेते धान्यकणसांनी भरून टाकतात.
फणिनाथस्वरूपश्च हलधरः कृषिवल्लभः ।
सुवर्णकणिशैः पूर्णां करोति वसुधां सदा ॥
अर्थ :
फणिनाथ (शेषनाग) स्वरूप असलेले हलधर बलराम कृषीप्रिय असून ते पृथ्वीला सुवर्णकणसांनी सदैव समृद्ध करतात.
शिल्प, मूर्तिशास्त्र आणि लोकपरंपरेत बलराम यांना अनेकदा नागफण्याखाली उभे असलेले, एका हातात नांगर (हल) आणि दुसऱ्या हातात मुसळ धारण केलेले दाखविले जाते. त्यामुळे नाग, नांगर आणि धान्यकणीस ही तीन प्रतीके बलरामांच्या कृषी-संस्कृतीशी असलेल्या नात्याचे प्रतिनिधित्व करतात.
खोलेश्वर मंदिर | बारागाव नांदूर | राहुरी | अहिल्यानगर
“अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात…
मुळा नदीच्या तिरावर वसलेलं बारागाव नांदूर गाव…
आणि याच शांत परिसरात इतिहासाच्या अनेक खुणा जपत उभं आहे एक प्राचीन शिवमंदिर…
दगडात कोरलेली अप्रतिम शिल्पकला…यादवकालीन स्थापत्यशैली…आणि काळाच्या ओघात बदलत गेलेलं त्याचं मूळ स्वरूप…
हे आहे बारागाव नांदूर येथील प्राचीन ‘खोलेश्वर मंदिर’!
स्थानिकांच्या मते, मंदिरातील शिवलिंग हे जमिनीच्या पातळीपेक्षा खोल भागात स्थापित केलेलं असल्यामुळे या मंदिराला ‘खोलेश्वर मंदिर’ असं नाव पडल्याचं सांगितलं जातं.
राहुरीपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर मुळा धरणाच्या जवळ बारागाव नांदूर हे गाव वसलं आहे.
शांत वातावरण, मोकळी हवा आणि मंदिराभोवतीचा परिसर पाहताना लगेचच एक वेगळीच ऐतिहासिक भावना मनात निर्माण होते.मंदिर थोड्या उंच जोत्यावर बांधलेलं असल्यामुळे काही पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागतो.
मंदिरासमोर भगवे ध्वज आणि दगडी बांधकाम पाहताना या मंदिराचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लगेच जाणवतं.”
मंदिराच्या जडणघडणीवरून हे मंदिर अंदाजे १४ व्या शतकातील यादवकालीन असावं असा अंदाज व्यक्त केला जातो.यादव काळात महाराष्ट्रात अनेक सुंदर दगडी मंदिरांची निर्मिती करण्यात आली होती.
खोलेश्वर मंदिरातही त्याच स्थापत्यशैलीची स्पष्ट झलक पाहायला मिळते.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी पारंपरिक रचना येथे दिसून येते.
सभामंडपातील दगडी खांब आणि त्यांची मांडणी अतिशय आकर्षक वाटते.”
“मंदिरातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे इथले सुंदर कोरीव खांब.खांबांवर विविध प्रकारच्या भूमितीय नक्षी, फुलांच्या रचना आणि दगडी पट्ट्यांमधील कलाकुसर दिसून येते.
प्रत्येक खांबाची रचना वेगळी असून त्यामध्ये त्या काळातील कलाकारांची कल्पकता स्पष्टपणे जाणवते.
काही खांबांवर घंटांसारख्या नक्षी दिसतात तर काही ठिकाणी अतिशय बारकाईने केलेली कोरीव कामं लक्ष वेधून घेतात.
मंदिराच्या छताला आधार देणारे हे दगडी खांब आजही मजबूतपणे उभे आहेत.”
“खांबांच्या वरच्या भागात कोरलेले भारवाहक यक्ष हे मंदिरातील सर्वात आकर्षक शिल्पांपैकी एक आहेत.
हे यक्ष जणू मंदिराचं संपूर्ण छत आपल्या खांद्यावर पेलून धरत आहेत असं वाटतं.
त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, शरीराची ठेवण आणि दगडावरील सूक्ष्म कोरीव काम पाहून त्या काळातील कलाकारांचं कौशल्य थक्क करून टाकतं.छतावर देखील गोलाकार पद्धतीने सुंदर नक्षीकाम करण्यात आलेलं दिसतं.मध्यभागी कोरलेली प्रतिमा आणि सभोवतालची दगडी रचना मंदिराच्या कलात्मक वैभवाची साक्ष देते.”
“मंदिराचा गाभारा साधा असून आत शिवलिंग विराजमान आहे.
हे शिवलिंग जमिनीच्या पातळीपेक्षा खोल भागात स्थापित केलेलं असल्याचं दिसून येतं.स्थानिकांच्या मते, याच कारणामुळे या मंदिराला ‘खोलेश्वर मंदिर’ असं नाव पडल्याचं सांगितलं जातं.गाभाऱ्यातील वातावरण अतिशय शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वाटतं.तसेच मंदिरासमोर शेंदूर लेप केलेली हनुमानाची मूर्ती देखील पाहायला मिळते.शिवमंदिरासमोर असलेली ही हनुमान मूर्ती मंदिराच्या धार्मिक वातावरणात आणखी भर घालते.”
बदललेलं स्वरूप आणि जतनाची गरज :
“मात्र काळाच्या ओघात या मंदिरामध्ये अनेक बदल करण्यात आलेले दिसतात.
मंदिराला आधुनिक पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आल्यामुळे मंदिराचं मूळ प्राचीनत्व काही प्रमाणात हरवल्यासारखं वाटतं.
पूर्वीचा नैसर्गिक दगडी पोत आता कमी जाणवतो.
तसेच मंदिराच्या बाह्य भिंतींवर फारसं कोरीव काम दिसून येत नाही.यामुळे मंदिराचा बाह्य भाग तुलनेने साधा वाटतो.
मंदिराचा मूळ कळस आज अस्तित्वात नसून सध्याचा कळस नव्याने बांधण्यात आलेला दिसतो.
तरीही मंदिराच्या आतील भागात असलेली प्राचीन शिल्पकला आणि दगडी स्थापत्य आजही इतिहासाची महत्त्वाची साक्ष देत उभी आहेत.”
“बारागाव नांदूर येथील हे खोलेश्वर मंदिर फक्त श्रद्धेचं स्थान नाही…
तर महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची आणि स्थापत्यकलेची एक अमूल्य ओळख आहे.
अशा दुर्लक्षित मंदिरांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.
पारनेर येथील खंडोबा मंदिर शिलालेख!!!!!
=====================================
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर येथील पूर्व वेशीजवळ मध्यवस्तीत असलेले खंडोबा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला बाजूला वरील भागात कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून सहा ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे.शिळेवर वातावरणाचा परिणाम वमोठ्या प्रमाणात रंगरंगोटी केल्याने तसेच सिमेंटचा थर असल्याने त्यावरील मजकूर स्पष्टपणे दिसत नाही. लेखातील बरीच अक्षरे मुजुन गेली आहेत छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो.
=====================================
शिलालेखाचे वाचन
१.श्री गणेशाय नमः श्री म्हाळसाकांताय न
२.मः श्री म्हाळसाकांत चरणी तत्पर आनाबा
३.ई कोम आवजी प॥अ॥ को। पारनेर मो॥ म॥
४.नीरंतर शके १७७४ परिधावी नाम संवत्सरे
५.वैशाख शुध्ध ३ गुरुवासरे मसाहाचा
६.कारखाना चालु आसे शुभ भवतु ॥ १ ॥
अर्थ:श्री गणपती व श्री म्हाळसाकांत यांना वंदन करून.श्रीम्हाळसाकांत चरणी तत्पर असलेल्या कसबे पारनेर येथील आवजी अवटी पाटील यांच्या पत्नी अनाबाई यांनी शालिवाहन शकाच्या १७७४ व्या वर्षी पारिधावी नाम
संवत्सरात वैशाख शुद्ध ३ गुरुवासरे म्हणजेच २२एप्रिल १८५२ गुरुवार या दिवशी खंडोबा मंदिराचे बांधकाम चालू किंवा पूर्ण केले. मंदिराच्या स्थापत्य कामाचा शुभारंभ झाला.सर्वांचे मंगल होवो. म्हणजेच हे कार्य सफल होवो.
======================================
शिलालेखाचे महत्व:-
“श्री गणेशाय नमः” या मंगलाचरणाने सुरू होणारा हा शिलालेख मराठाकालीन धार्मिक, सामाजिक आणि स्थापत्य परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा पुराभिलेख आहे. लेखाच्या प्रारंभी गणपतीचे स्मरण करून पुढे “श्री म्हाळसाकांताय नमः” असा उल्लेख करण्यात आला आहे. “म्हाळसाकांत” हे खंडोबाचे विशेष नाम असून म्हाळसा देवीचे पती या अर्थाने हा शब्द वापरला जातो. त्यामुळे हा लेख खंडोबा उपासनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खंडोबा हा लोकदेवता, कुलदैवत आणि ग्रामसंरक्षक देव म्हणून मानला जात असल्याने या लेखातून तत्कालीन लोकधर्म आणि भक्तिपरंपरेचे दर्शन घडते.
“श्री म्हाळसाकांत चरणी तत्पर आनाबाई” हा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. “चरणी तत्पर” हा शब्दप्रयोग पूर्ण भक्तिभाव, समर्पण आणि दैवी निष्ठा व्यक्त करणारा आहे. यावरून आनाबाई या श्री म्हाळसाकांताच्या अखंड भक्त होत्या हे स्पष्ट होते. मराठाकालीन शिलालेखांमध्ये देवाच्या चरणी समर्पित असल्याचे असे उल्लेख वारंवार आढळतात. या लेखात स्त्रीचे नाव स्पष्टपणे आलेले असल्यामुळे त्याला सामाजिक दृष्ट्याही महत्त्व प्राप्त होते. त्या काळात धार्मिक कार्य, देवस्थान व्यवस्थापन किंवा बांधकाम कार्यात स्त्रियांचाही सहभाग होता याचा हा महत्त्वपूर्ण पुरावा मानता येतो.
लेखात “कोम आवजी” तसेच “पाटील” किंवा त्याची संक्षिप्त रूपे दिसतात. यावरून संबंधित कुटुंब गावच्या प्रतिष्ठित वतनदार किंवा पाटील घराण्याशी संबंधित असावे असे दिसते. मराठाकालीन गावव्यवस्थेत पाटील हा महसूल, प्रशासन आणि गावकारभार पाहणारा प्रमुख अधिकारी होता. त्यामुळे हा लेख केवळ धार्मिक स्वरूपाचा नसून तत्कालीन सामाजिक व प्रशासकीय व्यवस्थेचाही संदर्भ देतो. “पारनेर” या स्थाननामामुळे लेखाचा भौगोलिक संदर्भ स्पष्ट होतो आणि पारनेर परिसरातील धार्मिक-सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासासाठी हा लेख उपयुक्त ठरतो.
या शिलालेखात “शके १७७४ परिधावी नाम संवत्सरे वैशाख शुद्ध ३ गुरुवासरे” अशी संपूर्ण कालनोंद दिली आहे. शके १७७४ हे साधारण इ.स. १८५२-५३ च्या सुमारास येते. संवत्सर, तिथी आणि वार यांच्या नोंदीमुळे लेखाचा अचूक काल निश्चित करता येतो. अशा प्रकारच्या कालनोंदी इतिहासलेखनासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
लेखातील “मसाहाचा कारखाना चालु आसे शुभ भवतु” ही ओळ विशेष लक्षवेधी आहे. “कारखाना” या शब्दाचा तत्कालीन अर्थ बांधकामकार्य, स्थापत्य विभाग, देवस्थान उभारणी किंवा सार्वजनिक कामाशी संबंधित असू शकतो. त्यामुळे एखाद्या धार्मिक वास्तू, देवस्थान किंवा इतर बांधकाम कार्याचा शुभारंभ झाल्याची ही नोंद असावी असे दिसते. “शुभ भवतु” या शेवटच्या शब्दांतून कार्य यशस्वी होवो अशी मंगलकामना व्यक्त करण्यात आली आहे. यावरून धार्मिक कार्याला शुभमुहूर्त, देवस्मरण आणि धार्मिक अधिष्ठान किती महत्त्वाचे होते हे स्पष्ट होते.
भाषिक दृष्ट्याही हा लेख महत्त्वाचा आहे. “आसे”, “तत्पर”, “शुध्ध” यांसारखे शब्द, तसेच “प॥”, “मो॥” अशी संक्षिप्त रूपे मराठाकालीन लेखनशैलीचे दर्शन घडवतात. त्यामुळे तत्कालीन मराठी भाषेचे स्वरूप, लिपीवैशिष्ट्ये आणि प्रशासकीय संज्ञांचा अभ्यास करण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरतो.
एकंदरीत हा शिलालेख मराठाकालीन ग्रामीण समाजजीवन, लोकदेवता उपासना, स्त्रियांचा धार्मिक सहभाग, पाटीलकी व्यवस्था, स्थापत्य परंपरा आणि कालगणना प्रणाली यांचे एकत्रित दर्शन घडवणारा अत्यंत मौल्यवान ऐतिहासिक दस्तऐवज आहे. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक वास्तव यांचा सुंदर संगम या लेखातून दिसून येतो. त्यामुळे हा शिलालेख स्थानिक इतिहास, लोकसंस्कृती आणि मराठाकालीन सामाजिक रचनेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे.
======================================
गावाचे नाव :- पारनेर ता. पारनेर जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :N-१९.००३४०३,E..७४.४३६५९०
शिलालेखाचे स्थान : पारनेर गावातील पूर्व वेशीच्या आत मध्य वस्तीत कालभैरव मंदिराच्या समोर असलेल्या खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर डाव्या बाजूला वरील भागात कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- उठाव स्वरूपाचा लेख आहे ..
लिपी व भाषा :- देवनागरी लिपी, मराठी भाषा
प्रयोजन : श्रीच्या चरणी तत्पर खंडोबाचे मंदिर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १७७४ पारिधावी नाम संवत्सरे वैशाख शुद्ध ३गुरुवासरे
काळ वर्ष : एकोणिसावे शतक - २२ एप्रिल १८५२ गुरूवार
राजा /कारकीर्द:. ब्रिटिश आमदनी
ग्राम नाम:- पारनेर (पराशर)
देवता नामःश्री गणेश, श्री म्हाळसाकांत
व्यक्तीनामः अनाबाई कोम आवजी आवटी पाटील
शिलालेखाचे वाचक :- श्री. अनिल किसन दुधाणे. श्री डॉ. शैलेंद्र भांडारे
संक्षेप : प॥ = पाटील ,अ॥ = आवटी,को। = कसबे,मो॥ = मोकदम,म॥ = मजकूर ,श्रुद्ध -शुध्द,
संदर्भ:- IEVII - १०६
=====================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे
पानिपत वीर सरदार वाबळे घराण्याचा म्हातारपिंपरी येथील पुष्करणी शिलालेख .!!!!!!!
====================================
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मौजे म्हातारपिंपरी येथील गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या पाझर तलावात एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या पायऱ्या उतरताना डाव्या बाजूला काठावर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून पाच ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. जागेअभावी लेखात अनेक ठिकाणीशब्दांची संक्षिप्त रूपे दिली असून लेखाच्या शेवटी नांगराचे चिन्ह कोरले आहे. शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने तसेच काही काळ पाण्यात असल्याने त्यावर परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे झिजली आहेत तर काही अक्षरे फुटली आहेत . लेखाचा खडूचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने सहज वाचता येतो.
======================================
शिलालेखाचे वाचन :
१.(श्रीभैरव)नाथ चरणी तत्पर दौलतराव व मुगट राव
२.व मानाजीराव व॥ जानराव को वाबळे ईबन येमाजी
३.प॥ वा॥ मो। मौजे ह्मातार पींपरी प्र॥ कर्डे यांनी हे तीर्थ
४.पुष्कर बारव बांधली असे सके १६९६ माघ सुध ७मी बी॥ सदासी
५.व व्यंकटेश कु॥णी मौजे म॥र नी॥नांगर मु॥ खंडोजी पो। दी॥ म॥र
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६९६ व्या वर्षी जय नाम संवत्सरात वैशाख शुद्ध १३ म्हणजेच ७ फेब्रुवारी १७७५ मंगळवार या दिवशी श्री भैरवनाथाच्या चरणी निष्ठा ठेवणाऱ्या दौलतराव, मुगटराव आणि मानाजीराव हे जानराव यांचे पुत्र असून ते वाबळे घराण्यातील व येमाजी यांच्या वंशातील होते. या वाबळे पाटील व मुकादमांनी मौजे म्हातार पिंपरी, प्रांत कर्डे येथे लोककल्याणार्थ हे पवित्र तीर्थरूप “पुष्कर बारव” बांधले. व हा धर्मोपयोगी उपक्रम पूर्ण झाला. या शिलालेखाच्या लेखन व नोंदणीचे कार्य सदाशिव व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले. लेखात उल्लेखिलेली “नांगर” ही मुकादमाची अधिकृत निशाणी असून, त्यावरून त्या काळातील ग्रामप्रशासन व पाटीलकीची परंपरा स्पष्ट होते. तसेच खंडोजी परगण्यातील अधिकाऱ्यांचा या कार्याशी संबंध असल्याचेही सूचित होते.
======================================
शिलालेखाचे महत्व :- लेखाच्या प्रारंभी “श्रीभैरवनाथ चरणी तत्पर” असा उल्लेख आढळतो. यावरून भैरवनाथ हे त्या परिसरातील ग्रामदैवत असावे आणि लेखातील व्यक्ती त्या देवतेचे भक्त असल्याचे स्पष्ट होते. या लेखात दौलतराव, मुगटराव, मानाजीराव, जानराव, येमाजी आणि वाबळे घराण्याचा उल्लेख आलेला आहे. “वलद” (पुत्र) आणि “ईबन” (वंशज) यांसारखे फारशी-अरबी प्रभावातील शब्द वापरून व्यक्तींची वंशपरंपरा नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा लेख केवळ धार्मिक किंवा स्थापत्य नोंद नसून त्या काळातील स्थानिक प्रतिष्ठित घराणी आणि त्यांच्या सामाजिक स्थानाची माहिती देणारा महत्त्वाचा स्रोत ठरतो.
लेखात “पाटील”, “मुकादम” आणि “कुलकर्णी” या पदांचा उल्लेख विशेष लक्षवेधी आहे. यावरून मराठाकालीन गावकारभाराची स्पष्ट रचना समोर येते. पाटील हा गावचा प्रमुख अधिकारी, मुकादम हा महसूल व कारभार पाहणारा प्रतिनिधी तर कुलकर्णी हा दप्तरी कामकाज करणारा लेखनिक अधिकारी होता. या पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून ही बारव बांधणी अधिकृत व सार्वजनिक स्वरूपाची असल्याचे दिसते. “निशाणी नांगर” हा उल्लेख विशेष महत्त्वाचा असून नांगर हे पाटीलकीचे प्रतीक मानले जात असे. त्यामुळे हा शिलालेख अधिकृत ग्रामनोंदीच्या स्वरूपात तयार करण्यात आला असावा.
या लेखातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे “तीर्थ पुष्कर बारव” बांधल्याची नोंद होय. बारव म्हणजे पायऱ्यांनी उतरणारी विहीर किंवा जलरचना. महाराष्ट्रातील जलव्यवस्थेमध्ये बारवांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. त्या केवळ पाण्याचा स्रोत नव्हत्या, तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र होत्या. यात्रेकरू, ग्रामस्थ, स्त्रिया आणि प्रवासी यांच्यासाठी या बारवा उपयुक्त ठरत. “तीर्थ” आणि “पुष्कर” या शब्दांमुळे या जलरचनेला पवित्र धार्मिक स्वरूप प्राप्त झालेले दिसते. त्यामुळे ही बांधणी लोककल्याणाबरोबरच पुण्यप्राप्तीचे कार्य मानले जात होते.
एकूणच हा शिलालेख मराठाकालीन ग्रामीण प्रशासन, जलव्यवस्था, धर्मकार्य, स्थानिक घराणी, दफ्तरी भाषा आणि सामाजिक संघटन यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ऐतिहासिक दस्तऐवज आहे. विशेषतः बारवसारख्या सार्वजनिक जलरचनांच्या निर्मितीत गावप्रमुख आणि स्थानिक समाजाचा सहभाग कसा होता, याचे हे उत्कृष्ट उदाहरण मानता येईल.
======================================
गावाचे नाव :- म्हातारपिंपरी ता. श्रीगोंदा जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :- N-१८ .६१४७ ४ ,W.७४.३८४९७०
शिलालेखाचे स्थान :- गावाच्या बाहेर असलेल्या पाझर तलावाच्या मध्यभागी चौकोनी आकाराच्या पुष्करणीच्या पायऱ्या उतरताना डावीकडील काठावर कोरलेला आहे.
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी भाषा
प्रयोजन :- श्रीच्या चरणी तत्पर राहून वाबळे कुटुंबाने पुष्करणी तलाव बांधल्याची स्मृती जपणे.
.मिती / वर्ष :- शके १६९६ जय नाम संवत्सरे माघ श्रुद्ध सप्तमी,
काळ वर्ष :- अठरावे शतक – ७ फेब्रुवारी १७७५ मंगळवार
राजा /कारकीर्द: छत्रपती रामराजे
ग्राम नाम:- म्हातारं पिंपरी, कर्डे
व्यक्तीनाम :- दौलतराव, मुगुटराव मानाजीराव, जानराव, येमाजी वाबळे पाटील सदाशिव व्यंकटेश कुलकर्णी, खंडोजी पाटील.
शिलालेखाचा संशोधक.:- श्री राजेश इंगळे
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे. डॉ. शैलेंद्र भांडारे
संक्षेप :- व॥ = वलद, प॥ = पाटील,व॥ = वाबळे, मो। = मोकासा,प्र॥क =प्रांत कर्डे बी॥ = बीज ,कु॥णी = कुळकर्णी,म॥र = मजकूर (=निर्दिष्ट),नी॥ = निशाणी ,मु॥ = मुकादम,पो। = परगणा,दी॥ = दीमत
संदर्भ:- .(IE VI -३५२ )
======================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
टीप :- सदर शिलालेख वाचन कार्यात श्री सचिन भोसले श्री नितीन वाबळे यांची विशेष मदत व सहकार्य लाभले.
पारनेर पूर्ववेशी जवळील श्री गणेश मंदिर शिलालेख....!!!
======================================
उपलब्धि व स्थळ: हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर येथील पूर्व वेशीच्या बाहेर असलेल्या श्री गणेश मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला वरील भागात कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून पाच ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखावर वातावरणाचा परिणाम तसेच रंग रंगोटी मोठ्या प्रमाणात केल्याने लेखातील अक्षरे मुजुन गेली आहेत तर काही अक्षरे पूर्ण पुसट झाली आहेत. रंग काढून लेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर अथक प्रयत्न करून वाचता येतात..
=====================================
वाचन
१.श्री गणेशायनमा:श्री गणेश चरणी तत्पर आ
२.वजी वा खंडुजी आवटी निरंतर स्वस्ति
३.श्रीनृप शालिवाहन शके १७६२ शार्वरी ना
४.म संवछरें आश्विन श्रुद्ध दशमी श्री गणे
५.श शिखरे रचिले सत्क्षेत्र पारनेर शुभ
अर्थ
श्री गणेशाला वंदन करून लेखाची सुरुवात करण्यात आली आहे. “श्री गणेश चरणी तत्पर” या वाक्यप्रयोगातून संबंधित व्यक्ती या गणेशभक्त असून त्या सदैव गणेशसेवेत समर्पित असल्याचे सूचित होते. पुढे “आवजी” वालद “खंडुजी आवटी” अशी व्यक्तिनावे आलेली असून “आवटी” हे त्यांचे आडनाव अथवा कुळनाम आहे. या व्यक्तींनी मंदिराशी संबंधित धार्मिक कार्य केल्याचे या उल्लेखावरून स्पष्ट होते. “निरंतर स्वस्ति” या शब्दांचा अर्थ सतत कल्याण, मंगल आणि शुभस्थिती राहो असा होतो.
लेखात पुढे शालिवाहन शक १७६२ अशी कालनोंद देण्यात आली असून ६ऑक्टोबर इ.स. १८४० मंगळवार असे रूपांतर होते. “शार्वरी” हे त्या वर्षाचे संवत्सरनाम आहे. तसेच आश्विन महिन्यातील शुद्ध पक्षातील दशमी तिथीचा उल्लेख आढळतो म्हणजे विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी हे कार्य झाले. हिंदू धार्मिक परंपरेनुसार ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते.
शेवटच्या भागात “श्री गणेश शिखरे रचिले” असा उल्लेख आढळतो. यावरून मंदिराचे शिखर बांधण्यात आले किंवा मंदिराच्या वास्तूचा एखादा महत्त्वपूर्ण भाग उभारण्यात आला असल्याचे स्पष्ट होते. “सत्क्षेत्र पारनेर” या उल्लेखामुळे पारनेर हे त्या काळी धार्मिक आणि पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याचे सिद्ध होते.
======================================
महत्व:-
शिलालेख महत्व:-
लेखाची सुरुवात “श्री गणेशाय नमः” अशा मंगलाचरणाने करण्यात आली असून त्यानंतर “श्री गणेश चरणी तत्पर” असा उल्लेख येतो. या वाक्यप्रयोगातून संबंधित व्यक्ती भगवान गणेशाच्या भक्तीमध्ये पूर्णपणे समर्पित असल्याचे स्पष्ट होते. गणपतीच्या चरणी निष्ठा व्यक्त करण्याची ही परंपरा मराठाकालीन धार्मिक लेखनात वारंवार आढळते. त्यामुळे या लेखातून त्या काळातील गणपत्य उपासनेचा प्रभाव आणि स्थानिक समाजातील धार्मिक श्रद्धा दिसून येतात.“आवजी” वलद “खंडुजी आवटी” अशी व्यक्तिनावे आलेली आहेत. “आवटी” हे त्यांचे आडनाव किंवा कुळनाम असावे. या व्यक्तींनी मंदिराच्या उभारणीस किंवा शिखरनिर्मितीस हातभार लावला असावा असे दिसते. मराठाकालीन ग्रामीण समाजात स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती, पाटील, व्यापारी किंवा भक्तगण मंदिरनिर्मिती व धार्मिक कार्यात पुढाकार घेत असत; त्याच परंपरेचे हे उदाहरण म्हणता येईल. “निरंतर स्वस्ति” या शब्दांमधून सर्वांचे सतत कल्याण आणि मंगल व्हावे अशी धार्मिक भावना व्यक्त करण्यात आली आहे.शिलालेखात “श्रीनृप शालिवाहन शके १७६२” अशी स्पष्ट कालनोंद दिलेली आहे. शालिवाहन शक १७६२ हे इ.स. १८४० वर्षाशी संबंधित आहे. तसेच “शार्वरी” हे त्या वर्षाचे संवत्सरनाम दिलेले आहे. अशा प्रकारे तिथी, संवत्सर आणि शक यांचा उल्लेख असल्यामुळे हा लेख कालदृष्ट्या अत्यंत विश्वसनीय ठरतो. पुढे “आश्विन शुद्ध दशमी” असा उल्लेख आढळतो. आश्विन महिन्यातील शुद्ध पक्षातील दशमी ही हिंदू धर्मपरंपरेत अत्यंत शुभ तिथी मानली जाते. अशा शुभ मुहूर्तावर मंदिराशी संबंधित कार्य आरंभ करणे किंवा पूर्ण करणे ही त्या काळातील धार्मिक परंपरा होती.लेखातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे “श्री गणेश शिखरे रचिले” हा उल्लेख होय. यावरून मंदिराचे शिखर बांधण्यात आले किंवा मंदिराच्या वास्तूचा एखादा प्रमुख भाग उभारण्यात आला असल्याचे स्पष्ट होते. शिखर हे मंदिर स्थापत्यातील अत्यंत महत्त्वाचे अंग मानले जाते. त्यामुळे हा लेख मंदिरनिर्मिती किंवा जीर्णोद्धाराच्या कार्याची अधिकृत नोंद म्हणून महत्त्वाचा ठरतो. ग्रामीण भागातील अशा शिलालेखांमुळे स्थानिक स्थापत्य परंपरा, बांधकामशैली आणि धार्मिक कार्यातील लोकसहभाग यांची माहिती मिळतेशेवटी “सत्क्षेत्र पारनेर” हा उल्लेख विशेष लक्षवेधी आहे. “सत्क्षेत्र” म्हणजे पवित्र, पुण्यप्रद धार्मिक स्थान. यावरून पारनेर हे त्या काळी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र म्हणून ओळखले जात होते असे दिसते. पारनेर परिसरात प्राचीन मंदिरे, तीर्थस्थाने आणि संतपरंपरेचे अनेक संदर्भ आढळतात; हा शिलालेख त्या धार्मिक परंपरेला पुष्टी देणारा पुरावा आहे.
एकूणच, हा शिलालेख केवळ मंदिरनिर्मितीची नोंद नसून मराठाकालीन धार्मिक श्रद्धा, गणेशभक्ती, स्थानिक दाते, ग्रामीण समाजरचना, कालगणना आणि पारनेरच्या धार्मिक महत्त्वाचा जिवंत दस्तऐवज आहे. त्यामुळे इतिहास, पुरातत्त्व, लोकसंस्कृती आणि मंदिर स्थापत्य यांच्या अभ्यासासाठी हा लेख अत्यंत उपयुक्त आणि मौल्यवान मानला जाऊ शकतो.
=====================================
गावाचे नाव :- पारनेर ता. पारनेर जिल्हा- अहिल्यानगर
जी.पी.एस. :N-१९.००४१०७,E..७४.४३३५७७
शिलालेखाचे स्थान : पारनेर गावातील पूर्व वेशीच्या बाहेर बाहेर असलेल्या गणपती मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर डाव्या बाजूला वरील भागात कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- उठाव स्वरूपाचा लेख आहे ..
लिपी व भाषा :- देवनागरी लिपी, मराठी भाषा
प्रयोजन : श्रीच्या चरणी तत्पर गणपती मंदिराचा शिखर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १७६२ शर्वरी नाम संवत्सरे आश्विन श्रुद्ध दशमी
काळ वर्ष : एकोणिसावे शतक - ६ ऑक्टोबर १८४० मंगळवार दसरा विजयादशमी
राजा /कारकीर्द:. ब्रिटिश आमदनी
ग्राम नाम:- पारनेर (पराशर)
देवता नामःश्री गणेश
व्यक्तीनामः आवजी खंडोजी आवटी पाटील
शिलालेखाचे वाचक :- श्री. अनिल किसन दुधाणे.
संक्षेप : वा -वलद, सवछरे संवत्सर, श्रुद्ध -शुध्द, सत्क्षेत्र - सतक्षेत्र
संदर्भ:- IEVII - ८३
=====================================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे
पदरचे पैसे खर्च करून हनुमंताचे मंदिर बांधलेला शिलालेख
॥ श्री हनुमान मंदिर शिलालेख पारनेर॥
=====================================
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर येथील पश्चिम वेशीजवळ असलेले मारुती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून सहा ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे.शिळेवर मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी केल्याने त्यावरील मजकूर स्पष्टपणे दिसत नाही. छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो.
=====================================
पूर्वीचे वाचन
मजकूर
१. श्री गणेशायनमः ।। श्री पाराशरक्षेत्री पूर्वद्वारी रुद्रा
२. वतार हनुमंत ।। त्याचे केले देऊळ शीद्धीशीश्वर
३. श्रीराम अर्पिता त्याचे चरणी आवजी कारवठजी
४. पाा अवढी चतुर्थ भापार्यु अल्मदुराचे द्रव्याने
५. केले सके सत्रासे सदुसष्टात । मार्गश्वर शुद्ध
६. त्रयो (दशी) शुभंभवतु । यास्यतीन करवार
. अर्थ : शालिवाहन शकाच्या १७६७ व्या वर्षी [विश्वावसुनाम संवत्सरातील) मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी या दिवशी [गुरुवारी] आवजी कारवठजी पाटील यांनी पाराशरक्षेत्री (पारनेर येथे) श्री हनुमानाचे मंदिर बांधून पूर्ण केले.
वाचक: श्री अशोक नेवासकर सर
======================================
नवीन सुधारित वाचन
१.श्री गणेशायनम ॥ श्री पाराशर क्षेत्री पुर्व द्वारी रुद्रा /
२.वतार हनुमंत ॥ त्याचे केले देउळ शीद्धी शीखर श्री /
३.राम अर्पिता ॥ त्याचे चरणी अवजी व॥ खंडुजी /
४.प्र॥ अवंठी(टी) चतुर्थ भागार्थु अ(प)ल्या पदराचे द्रव्याने /
५.केले सके सत्राशे सदुसष्टात ॥ मार्गेश्वर शुद्ध त्रयो /
६.देशी गुरुवार माध्यान अभीजात ॥ शुभ मंगळ दये कसबा /
७॥ शुभं भवतु ॥ चास्य तीन करनार
अर्थ:-“श्री गणेशाय नमः” अशा मंगलाचरणाने सुरू होणारा हा शिलालेख पाराशर क्षेत्रातील पूर्व द्वाराजवळ उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराशी संबंधित आहे. लेखात हनुमानाला “रुद्रावतार” म्हटले असून त्याच्यासाठी सुंदर देऊळ व शिखर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. हे संपूर्ण कार्य श्रीरामाला अर्पण करण्यात आले होते. अवजी वलद खंडुजी या भक्तांने स्वतःच्या पदरच्या खर्चातून मंदिरनिर्मितीस आर्थिक सहाय्य केले. मंदिराचे बांधकाम किंवा प्रतिष्ठा शालिवाहन शक १७६७ मध्ये मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, गुरुवार, (१८ नोव्हेंबर १८४५)अभिजित मुहूर्त या अत्यंत शुभवेळी पूर्ण झाल्याचे लेखात नमूद केले आहे. शेवटी “शुभं भवतु” असा मंगलाशय व्यक्त करून सर्वांच्या कल्याणाची कामना करण्यात आली आहे. हा शिलालेख तत्कालीन हनुमान उपासना, स्थानिक दानपरंपरा, धार्मिक श्रद्धा आणि गावपातळीवरील मंदिर स्थापत्य यांचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा मानला जातो.
=====================================
२. स्थान : हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कोरलेला आहे
३. अक्षरपद्धती : उठाव
४. भाषा : मराठी.
५. प्रयोजन : स्वतःच्या पदरचे पैसे खर्चून मंदिर बांधल्याची स्मृती जपणे.
६. मिती / वर्ष : शके १७६७ (विश्वावसुनाम संवत्सरे) मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, (गुरुवार).
७. इंग्रजी साल/तारीख ११ नोव्हेंबर १८४५.
८. काळ : एकोणिसावे शतक.
९. कारकीर्द : इंग्रज अमदानी.
१०. व्यक्तिनाम : आवजी खंडुजी पाटील.
११. स्थलनाम : पाराशर क्षेत्र (पारनेर).
१२. शिलालेखाचा वाचक :- डॉ. शैलेंद्र भांडारे, श्री अनिल दुधाणे
१३. प्रकाशन : पारनेर तालुक्याची ऐतिहासिक पाहणी (१९७१-७२), पृष्ठ ५४. शिलालेखाच्या विश्वात. महेश तेंडुलकर पृष्ठ ३५३
=====================================
@© श्री अनिल दुधाणे
समुद्रावरील कर आणि बंदराची व्यवस्था ठेवणारे राजापूर येथील बोरवणकर घराण्यातील धर्मकार्याचे तीन शिलालेख
====================================
कोदवली येथील शंकरेश्वर मंदिर शिलालेख!!!!!!!!
शिलालेख क्रमांक १.
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे कोदवली येथील श्री शंकरेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर डावीकडे कोरलेला आहे सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून आठ ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखाच्या शिळेवर वातावरणाचा परिणाम तसेच रंगरंगोटी केल्याने लेखातील अक्षरे झिजून पुसट झाली आहेत तर काही अक्षरे झिजली आहेत छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो.
शिलालेख वाचन:-
१.श्री शंकरेश्वर देवालयाचे काम
२.सिद्धेश्वर बाबा गोसावी यांनी ३.केले होते ते जीर्ण जाहले त्यावरून हाली जी
४.र्णोध्दार चिमणाजी हाणमाजी बोर्वणकर
५.पंतकी बंदरनिस राजापूर यांनी
६.केले. शके १७६६ क्रोधी संवत्सर मिती
७.माघ शुध्द १० रविवार नक्षत्र.३पो.
८.२२ क .१
अर्थ:-श्री शंकरेश्वर देवालयाचे मूळ बांधकाम सिद्धेश्वर बाबा गोसावी यांनी केले होते. कालांतराने ते मंदिर जीर्ण झाल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. हा जीर्णोद्धार चिमणाजी हाणमाजी बोर्वणकर यांनी केला. “पंतकी बंदर वीस राजापूर” या उल्लेखावरून त्यांचा संबंध राजापूर परिसरातील समुद्रावरील कर आणि बंदर प्रशासन पदाशी असल्याचे दिसते.
हा जीर्णोद्धार शालिवाहन शक १७६६, क्रोधी नाम संवत्सर, माघ शुद्ध दशमी, रविवार, कृत्तिका नक्षत्र, २२ पळे आणि १ कला या शुभ मुहूर्तावर करण्यात आला. ही तारीख इंग्रजी कालगणनेनुसार १६ फेब्रुवारी १८४५, रविवार अशी ठरते.
======================================
शिलालेख क्रमांक २
उपलब्धि व स्थळ:-
हा शिलालेख रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे कोदवली येथील श्री शंकरेश्वर महादेव मंदिराच्या बाह्य भागात गोमुख कुंडाच्या वारी मार्गावरील पायऱ्याच्या भिंतीवर कोरलेला आहे . सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून पाच ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखावर वातावरणाचा परिणाम तसेच रंग रंगोटी केल्याने लेखातील काही अक्षरे पुसट झाली आहेत तरी खडूचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे वाचता येतो.
शिलालेख वाचन
१.स्वस्ति श्री शालिवाहन शके १७६६क्रोधी
२.संवत्सरे मार्गशीष वद्य २ वार .५ न.८
३.जीर्णोध्दार श्री शंकरेश्वर चरणी चिमणाजी
४.हाणमाजी बोरवणकर पतकी बंदर
५.निस राजापूर
अर्थ:-शुभमंगल होवो. शालिवाहन शक १७६६, क्रोधी नाम संवत्सर, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीया, गुरुवार, पुष्य नक्षत्र या शुभ मुहूर्तावर हा लेख कोरला गेला. ही तारीख आधुनिक कालगणनेनुसार २६ डिसेंबर १८४४ गुरुवार अशी ठरते. या दिवशी श्री शंकरेश्वरांच्या चरणी समर्पित जीर्णोद्धाराचे कार्य चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांनी केले. “पतकी बंदर” हा उल्लेख त्यांच्या बंदराशी संबंधित कार्य आणि समुद्रावरील कर निगडित असावा. पुढे “ राजापूर” या उल्लेखावरून त्यांचा संबंध राजापूर परिसराशी असल्याचे दिसून येते....
=====================================
शिलालेख क्रमांक ३.
=====================
उपलब्धि व स्थळ: हा शिलालेख रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे कोदवली येथील श्री शंकरेश्वर महादेव मंदिराच्या परिसरातील प्रवेशद्वार भिंतीवर लावलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून पाच ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेखावर वातावरणाचा तसेच रंगरंगोटीचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे झिजली आहेत तर काही मुजून गेली आहेत. छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने सहज वाचता येतो.
==========================
शिलालेख वाचन:-
१.स्वस्ति श्री नृप शालिवाहन शके१७६७ वि
२.श्ववसु नाम संवत्सरे श्रावण श्रुद्ध ५ वा.६ न.
३.१३पो.२२क. १ श्री शंकरेश्वर चरणी तत्पर
४.चिमणाजी हाणमाजी बोर्वणकर पतकी बंदर राजा
५.पूर हस्ते वामनाजी आबाजी बोर्वणकर साष्टांग प्रणाम.
अर्थ:-
स्वस्तिश्री शालिवाहन शके १७६७, विश्ववसु नाम संवत्सर, श्रावण शुद्ध पंचमी, शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट १८४५ रोजी लेखामध्ये दिलेल्या कालगणनेनुसार “वा. ६” म्हणजे शुक्रवार हा वार दर्शवितो, तर “न. १३” म्हणजे तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र होय. पुढील “पो. २२” याचा अर्थ २२ पळे असा असून भारतीय कालमापन पद्धतीनुसार २२ पळे म्हणजे सुमारे ८ मिनिटे ४८ सेकंद होतात. त्यानंतर “क. १” असा उल्लेख असून “क” म्हणजे कला हे सूक्ष्म कालमापन एकक मानले जाते; एक कला साधारण ०.४ सेकंद इतकी धरली जाते. यावरून हा अत्यंत अचूक आणि शुभ मुहूर्त नोंदविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
या शुभ समयी “श्री शंकरेश्वर चरणी तत्पर” असे म्हटले आहे, म्हणजे भगवान शंकरांच्या चरणी निष्ठा व भक्तिभावाने समर्पित असलेले चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांचा येथे उल्लेख येतो. “पतकी बंदर राजा पूर” हा उल्लेख त्यांच्या कार्यक्षेत्राशी, म्हणजे समुद्रावरील कर घेऊन बंदराची व्यवस्था पाहणारा अधिकारी असावा. पुढे “ हस्ते वामनाजी आबाजी बोरवणकर साष्टांग प्रणाम” असे नमूद केले असून, वामनाजी आबाजी बोरवणकर यांनी देवासमोर साष्टांग दंडवत अर्पण केल्याची भक्तिपूर्ण नोंद यात करण्यात आलेली आहे.
==========================
शिलालेखाचे महत्व:-
शिलालेख मराठा कालखंडातील धार्मिक, सामाजिक आणि कालगणनात्मक परंपरेचा महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो. लेखाची सुरुवात “स्वस्तिश्री” या पारंपरिक मंगलारंभाने होत असून त्यात शालिवाहन शक तिथी वार नक्षत्र , आणि वेळ अशी अचूक कालनोंद दिलेली आहे. यावरून हा लेख अत्यंत शुभ आणि अचूक मुहूर्तावर कोरलेला असल्याचे दिसून येते. त्या काळातील ज्योतिषशास्त्र, पंचांगविद्या आणि कालगणना किती विकसित होती याचा हा उत्तम पुरावा आहे.
या शुभ समयी “श्री शंकरेश्वर चरणी तत्पर” असा उल्लेख करून भगवान शंकरांप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे. यामध्ये चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांचे नाव आलेले असून ते भगवान शंकरेश्वरांच्या चरणी समर्पित व भक्तिभावाने तत्पर असल्याचे नमूद केले आहे. पुढील “पतकी बंदर राजापूर” हा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. तो समुद्रावरील कर आणि बंदर प्रशासन, स्थानिक कारभार किंवा किनारी व्यापाराशी संबंधित मानद पदवी असण्याची शक्यता दिसते. यावरून त्या काळातील स्थानिक सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रशासकीय रचना यांचा अंदाज येतो.
लेखाच्या शेवटी “ हस्ते वामनाजी आबाजी बोरवणकर साष्टांग प्रणाम” अशी नोंद आहे. याचा अर्थ वामनाजी आबाजी बोरवणकर यांनी देवासमोर साष्टांग दंडवत अर्पण केला असा होतो. यातून तत्कालीन धार्मिक संस्कार, भक्तिभाव आणि देवाला साक्षी मानण्याची परंपरा स्पष्टपणे दिसून येते.
हा शिलालेख केवळ धार्मिक अभिव्यक्ती नसून मराठाकालीन समाजजीवन, कालगणना, ज्योतिषीय मुहूर्त, स्थानिक प्रशासन आणि प्रतिष्ठित घराण्यांची माहिती देणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. अशा लेखांमुळे स्थानिक इतिहासाचा विस्मृतीत गेलेला भाग प्रकाशात येतो. त्यामुळे या शिलालेखाचे जतन, अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करणे अत्यंत आवश्यक असून तो स्थानिक सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा मानावा लागेल.
==========================
गावाचे नाव :- कोदवली ता. राजापूर. जिल्हा- रत्नागिरी
जी.पी.एस. :N-१६.६७०५८७,E..७३.५२५१३८
शिलालेखाचे स्थान :- श्रीशंकरेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे ..
लिपी व भाषा :- देवनागरी लिपी, मराठी भाषा
प्रयोजन : श्रीच्या चरणी तत्पर राहून शुभ मुहूर्तावर देवास साष्टांग नमस्कार घातल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :- शके १७६७ विश्ववावसु नाम संवत्सरे श्रावण श्रुद्ध पंचमी, सहा वार तेरा नक्षत्र, पळे २२कला १
काळ वर्ष : एकोणिसावे शतक -
८ऑगस्ट १८४५शुक्रवार
राजा /कारकीर्द: ब्रिटिश आमदनी
ग्रामनाम:- राजापूर
देवता नामःश्री शंकरेश्वर
व्यक्तीनामः चिमणाजी, हाणमाजी , वामनाजी आबाजी बोरवणकर
शिलालेखाचे संशोधक: श्री विनोद मनोहर पवार
शिलालेखाचे वाचक :- श्री. अनिल किसन दुधाणे.
संक्षेप : श्रुद्ध -शुध्द, बोर्वणकर - बोरवणकर
संदर्भ:- IEVIl -९३
==========================
@©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
*कोदवलीच्या शंकरेश्वर मंदिरात आढळले ब्रिटिश काळातील तीन शिलालेख*
* जीर्णोद्धार, कालगणना आणि बंदर प्रशासनाचे ऐतिहासिक संदर्भ उजेडात
१८४४-४५ मधील नोंदींमुळे इतिहास संशोधनाला नवी दिशा
*वाचा प्रहार डिजिटल वर:* 
*आमच्या group मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा*
_________
*
प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क 
*सिंधुदुर्ग - 9130582166*
*रत्नागिरी - 9518588700*
महाराष्ट्रातील सर्वात उंच भगवान हनुमान (111 फूट उंच)
(खेडले झुंगे,निफाड,नाशिक)
"नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर, गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर 'खेडले झुंगे' हे ऐतिहासिक गाव वसलेले आहे. या ठिकाणी असलेल्या 'संतवान' समोरील नक्षत्रवनात ही १११ फूट उंच, भव्य-दिव्य 'अभयवरद म्हणजेच आशीर्वाद देणारी हनुमान मूर्ती' उभारण्यात आली आहे. २००४ मध्ये मध्यप्रदेशातील शहडोल येथील कुशल कारागिरांनी अत्यंत मेहनतीने या मूर्तीचे काम पूर्ण केले."
"खेडले झुंगे या गावाला ऐतिहासिक आणि रामायणकालीन संदर्भ असल्याचे मानले जाते. प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत हनुमानजींची ही मूर्ती भक्तांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. मूर्तीच्या समोरच एक मोठा आणि खुला परिसर म्हणजेच मंदिराचे प्रांगण आहे, जिथे होम-हवन आणि धार्मिक विधी केले जातात. दरवर्षी हनुमान जयंती आणि संतांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या वेळी येथे भाविकांची अलोट गर्दी होते."
"या मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडे आणि स्वच्छ वातावरण यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिकदृष्ट्याच नाही, तर पर्यटनासाठीही उत्तम पर्याय बनले आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेजवळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते."
येथे येण्यासाठी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे गावाकडून दक्षिणेकडे १३ किलोमीटर अंतर आहे. तसेच सिन्नर, लासलगाव आणि कोपरगाव येथूनही थेट बसेस किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते. जर तुम्ही अजून या भव्य मूर्तीचे दर्शन घेतले नसेल, तर नक्की भेट द्या!
।। पारनेर येथील पूर्वेकडील वेशीजवळची विहीर शिलालेख ।।
=====================================
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर शहरातील पूर्वेकडील वेशीच्या बाजूला एका चौकोनी आकाराच्या नंदा प्रकारच्या बारवे तील
देवळीत कोरलेला आहे. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून तो ८ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी संस्कृत भाषेत कोरलेला आहे. लेखावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे काही प्रमाणात मुजुन गेली आहेत तर काही अक्षरे पूर्णपणे तुटून गेली आहेत. लेखातील छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने वाचता येतो
=====================================
पूर्वीचे वाचन मजकूर
१.श्री गजानन प्रसन्न
२.श ..... पारनेरा व्यस्त्रमे
३.नाथ निना । श्री मोरया साह्य
४.स्वये निरोपी । लक्ष्मण महा
५.देव रचि ... ह... वापी ।। सके १६८८...
६.संवत्सर चैत्र शुद्ध १ कपि गोत्र उप
७.नाव करंदीकर
१. अर्थ : शालिवाहन शकाच्या १६८८ व्या वर्षी [व्ययनाम संवत्सरातील] चैत्र शुद्ध प्रतिपदा [गुढी पाडवा या दिवशी [गुरुवारी] कपी गोत्र असलेल्या लक्ष्मण महादेव करंदीकर यांनी ही विहीर बांधून पूर्ण केली.
शिलालेखाचे वाचक . प्रा. अशोक नेवासकर
====================================
नवीन सुधारित वाचन
१. श्री गज्यानन ॥ सत्क्षेत्र पारा
२. शर पारनेरा । तस(स्य) श्रमे मार्ग वा
३. नार्थ निरा ॥ श्री मोरया सात्त्व्य
४. स्वयें निरोपि ॥ लक्ष्मण महा
५. देव रचित वापी ॥ शके १६८६ तारण
६. संवत्सर चैत्र शुद्ध १ ॥ कपि गोत्र उप
७. नाव करंदीकर
८. दुवागीर ॥ साह हसनगीर ॥
अर्थ:-प्रस्तुत शिलालेख हा धार्मिक भावना, लोककल्याण आणि जलव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा लेख आहे. लेखाची सुरुवात “श्री गजानन” या मंगलाचरणाने होते. यावरून भगवान गणेशाचे स्मरण करून कार्यास आरंभ करण्यात आल्याचे स्पष्ट होते. पुढे “सत्क्षेत्र पारा / पारनेरा” असा उल्लेख येतो. यावरून पारनेरा हे त्या काळी पवित्र किंवा धार्मिक महत्त्व असलेले क्षेत्र मानले जात होते.
लेखात नमूद केले आहे की, या क्षेत्रातील लोक, यात्रेकरू किंवा आश्रमवासीयांच्या सोयीसाठी धर्मार्थ कार्य करण्यात आले. “मार्ग” आणि “निरा” या शब्दांच्या संदर्भातून प्रवाशांच्या उपयोगासाठी पाण्याची व्यवस्था किंवा सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यात आल्याचा अर्थ सूचित होतो. विशेषतः “वापी” या शब्दाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. वापी म्हणजे विहीर, बारव किंवा दगडी पाणवठा होय. प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्रात पाण्याच्या साठ्यासाठी वापी बांधण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. त्यामुळे हा लेख तत्कालीन जलसंस्कृतीचा एक मौल्यवान पुरावा ठरतो.
लेखात “श्री मोरया” हा उल्लेख दिसतो. हा शब्द गणपत्य भक्तीपरंपरेशी संबंधित असून मोरया गोसावी किंवा गणेशभक्त परंपरेचा प्रभाव दर्शवितो. त्यामुळे या कार्यामागे धार्मिक प्रेरणा आणि पुण्यप्राप्तीची भावना होती हे स्पष्ट होते.
या वापीचे निर्माणकार्य “लक्ष्मण महादेव” यांनी केले असल्याचे लेखात नमूद आहे. त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने हे कार्य पूर्ण केल्याचे “स्वयें निरोपि” या उल्लेखातून दिसते. पुढे “करंदीकर” हे उपनाव दिलेले आहे. त्यामुळे लक्ष्मण महादेव करंदीकर हे या दानकार्याचे प्रमुख कर्ते असावेत. त्यांचा “कपि गोत्र” असा उल्लेख आढळतो, ज्यामुळे त्यांच्या कौटुंबिक व वैदिक परंपरेची माहिती मिळते.
लेखात कालोल्लेखही स्पष्टपणे दिलेला आहे. “शके १६८६ तारण संवत्सर चैत्र शुद्ध १” असा उल्लेख असल्याने हा लेख २ एप्रिल इ.स. १७६४ सोमवार च्या सुमारास कोरला गेला असावा. मराठे कालीन महाराष्ट्रात सार्वजनिक जलव्यवस्था, धर्मशाळा, मंदिर व वापी बांधण्याची मोठी परंपरा होती; हा लेख त्या परंपरेचे उत्तम उदाहरण आहे.
शेवटी “दुवागीर” आणि “हसनगीर” अशी नावे येतात. ही व्यक्तिनावे सूफी, फकीर किंवा स्थानिक धार्मिक सेवकांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लेखातून तत्कालीन समाजातील हिंदू-मुस्लीम सांस्कृतिक समन्वयाची झलकही दिसून येते. धार्मिक कार्यात विविध समाजघटकांचा सहभाग होता, याचे हे एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणता येईल.
एकूणच, हा शिलालेख केवळ एका वापीच्या बांधकामाची नोंद नसून त्या काळातील धार्मिक श्रद्धा, समाजहिताची भावना, जलसंस्कृती, दानपरंपरा आणि सामाजिक समन्वय यांचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्यामुळे स्थानिक इतिहास, स्थापत्यपरंपरा आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने या लेखाला विशेष महत्त्व प्राप्त होते.
====================================
.२.स्थान: पूर्वेकडील वेशीजवळील विहिरीवर.
३.अक्षरपद्धती: उठाव
४.भाषा : मराठी व संस्कृत.
५.प्रयोजन : विहीर बांधल्याची स्मृती जपणे.
६.मिती / वर्ष : शके १६८६ तारण नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा), (गुरुवार).
७.इंग्रजी साल/तारीख २ एप्रिल १७६४ सोमवार
८.काळ : अठरावे शतक.
९.कारकीर्द : छत्रपती रामराजे
१०.व्यक्तिनाम : लक्ष्मण महादेव करंदीकर.
११. स्थलनाम : पारनेर,
१२. शिलालेखाचा वाचक . डॉ. श्री. शैलेंद्र भांडारे, श्री अनिल दुधाणे
१३.प्रकाशन : पारनेर तालुक्याची ऐतिहासिक पाहणी (१९७१-७२), पृष्ठ ५२.
=====================================
@©अनिल दुधाणे पुणे
नगरसूल,येवला,नाशिक येथील पुरातन मंदिराचे अवशेष व काशी विश्वनाथ मंदिर 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जावई सरदार यशवंतराव फणसे वाडा.
(निफाड,नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील निफाड हे गाव इतिहास, संस्कृती आणि परंपरेने समृद्ध मानलं जातं.
“निफाड” या नावाचा अर्थच आहे — “नि पहाड”, म्हणजे डोंगर नसलेला प्रदेश.
या भागात डोंगर कमी असल्यामुळे येथे सपाट आणि सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर आढळते.
याच निफाड गावात प्राचीन माणकेश्वर मंदिराच्या समोर उभा आहे हा ऐतिहासिक फणसे वाडा…
ज्याला होळकर वाडा म्हणूनही ओळखलं जातं.
हा वाडा सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी संबंधित आहे.
सरदार यशवंतराव फणसे हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जावई होते.
अहिल्यादेवी होळकर यांची कन्या श्रीमंत मुक्ताबाई यांचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी झाला होता.
सरदार यशवंतराव फणसे यांच्या घराण्याचा उगम नेमका कधी आणि कुठे झाला याचे स्पष्ट संदर्भ उपलब्ध नसले तरी इतिहासात त्यांचा पहिला उल्लेख मुक्ताबाई यांच्याशी विवाह झाल्यानंतर आढळतो.
त्याकाळी यशवंतराव फणसे हे सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या सैन्यातील एका तुकडीचे सरदार असावेत असे मानले जाते.
उपलब्ध पुराव्यानुसार, अहिल्यादेवी होळकर यांनी कन्या मुक्ताबाईचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी लावताना आंदण म्हणून निफाड, लासलगाव, सोनेवाडी, शिवरे-बोराहळे आणि मडकेजाम अशी पाच गावे दिली होती.
तसेच मध्यप्रदेशातील तराना परगण्याचा सरंजामही बहाल केला होता.
यासंबंधीची पत्रे आजही उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.
आषाढी वारीच्या वेळी महेश्वरहून पंढरपूरला जाणाऱ्या होळकरांच्या दिंडीला संरक्षण देण्याची जबाबदारीही सरदार यशवंतराव फणसे यांच्यावर होती.
यशवंतराव आणि मुक्ताबाई यांना “नथोबा” नावाचा पुत्र होता.
सन १७९१ मध्ये सरदार यशवंतराव फणसे यांचे निधन झाले.
त्यांच्यासोबत मुक्ताबाई आणि नयन या दोघीही सती गेल्या.
या तिघांची सामायिक समाधी मध्यप्रदेशातील महेश्वर येथे फणसे वाड्यात आहे.
आज हा परिसर मातंगेश्वर परिसर म्हणून ओळखला जातो.
तेथे आजही सरदार यशवंतराव, मुक्ताबाई आणि नयन यांच्या संगमरवरी मूर्ती पाहायला मिळतात. राणी अहिल्यादेवींनी जावाईच्या समरणार्थ महेश्वर मध्ये यशवंतपूर हि पेठ वसवली व फणसे घराण्याने नर्मदा नदीवर मातंगेशवर परिसरासमोर फणसे घाटाचा निर्माण केला.
आता पाहूया या वाड्याची रचना…
माणकेश्वर मंदिरासमोरूनच या वाड्याचं विशाल महाद्वार दिसून येतं.हा दरवाजा इतका मोठा आहे की त्यातून हत्ती सहज जाऊ शकत होता.लाकूड आणि लोखंड वापरून बनवलेलं हे महाद्वार आजही त्या काळातील भव्यतेची साक्ष देत उभं आहे.
या दरवाजाच्या वर अजून एक मजला आहे.
या खोलीमध्ये सरदार यशवंतराव फणसे यांचे दुर्मिळ फोटो आणि जुन्या पेंटिंग असल्याचं सांगितलं जातं.
मी भेट दिली तेव्हा हा मजला बंद होता.कदाचित याची चावी वाड्याच्या मालकांकडे असावी.
सध्या या महाद्वाराचा काही भाग दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचं दिसून येतं.महाद्वारातून आत गेल्यावर डावीकडे आणखी एक मोठं प्रवेशद्वार दिसतं.
या दरवाज्यावर मोठं गवाक्ष आहे.दरवाजाच्या बाजूच्या भिंती आखीव दगडांनी बांधलेल्या आहेत तर गवाक्षाची रचना विटांमध्ये करण्यात आली आहे.
पण शेजारील अनेक भिंती आता पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत आहेत.त्यानंतर आपण वाड्याच्या मध्यभागी म्हणजेच चौकात येतो.जुन्या वाड्यांमध्ये मध्यभागी मोकळी जागा असायची, तिलाच “चौक” म्हटलं जात असे.
येथे सण, पूजा, कार्यक्रम होत असत.
तसेच पावसाचं पाणी साठवण्यासाठीही व्यवस्था असायची.या रचनेमुळे वाड्यामध्ये हवा आणि प्रकाश चांगला खेळत असे.आज मात्र या चौकात सर्वत्र विखुरलेल्या विटा, माती आणि ढिगारे दिसून येतात.
भिंतींमध्ये अनेक “कोनाडे” अजूनही स्पष्ट दिसतात.
पूर्वी या कोनाड्यांमध्ये दिवे किंवा सजावटीच्या वस्तू ठेवण्यात येत असत.वाड्याच्या भिंतींवर आता वड आणि पिंपळाची मोठी झाडं उगवलेली आहेत.त्यांच्या मुळांमुळे बांधकाम कमकुवत होत असून हा वाडा हळूहळू ढासळत चालला आहे.
वाड्याच्या डाव्या बाजूची भिंत मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे.मागील बाजूस अजूनही एक मोठा बुरुज दिसून येतो.
यावरून पूर्वी या वाड्याभोवती मोठा कोट, तटबंदी आणि चार बुरुज असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो.
आज हा वाडा भग्न अवस्थेत असला तरी त्याच्या भूतकाळाचा विचार केला तर तो किती सुंदर आणि भव्य असेल याची कल्पना करता येते.
फणसे घराण्याकडे आजही दोन जुने ताम्रपट जतन करून ठेवलेले आहेत.तसेच या वाड्याच्या आठवण म्हणून दोन तलवारी आणि वाघाच्या कातड्याची पुरातन भंडारी आजही त्यांच्या कडे असल्याचं सांगितलं जातं.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जागरण-गोंधळ कार्यक्रमात तात्यासाहेब होळकर आजही परंपरेप्रमाणे भंडारी घालून लंगर तोडतात आणि ती कडी तब्बल तीस फूट उंच उडते.
फणसे हे सरदार असल्यामुळे त्यांना पाच तलवारी ठेवण्याचा अधिकार देण्यात आला होता.मात्र पुढे काही कागदपत्र हरवल्यामुळे होळकर कुटुंबाला मिळणारा अलाऊन्स बंद झाल्याचं सांगितलं जातं आणि याबाबत कोर्टात केस सुरू असल्याची माहिती नानासाहेब होळकर देतात.
आज निफाडमधील हा ऐतिहासिक वाडा शेवटच्या घटका मोजत उभा आहे.इतिहास, शौर्य आणि परंपरेची साक्ष देणाऱ्या या वास्तूचे संवर्धन होणं अत्यंत गरजेचं आहे.
“इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नसतो…
तो अशा वास्तूंमध्ये जिवंत असतो.
निफाडमधील हा फणसे वाडा म्हणजे मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा एक मूक साक्षीदार आहे.
(महेश कोते-पाटील)
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक या गावाजवळ एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. गावापासून थोड्या अंतरावर झाडाझुडपांमध्ये लपलेले हे मंदिर आजही इतिहासप्रेमींना आकर्षित करताना दिसते.
अनेकांना हे मंदिर कृष्णनाथाचे मंदिर असल्याचा समज आहे. परंतु प्रत्यक्षात हे मंदिर कृष्णनाथाचे नसून भूमिज शैलीतील शिवमंदिर आहे, याच्या खाणाखुणा संपूर्ण मंदिरभर पसरलेल्या दिसतात.
सध्या याच धरणगाव खडक गावात कामाख्या देवीचे भव्य आणि परिसरातील सर्वात मोठे मंदिर उभारण्यात आले आहे. येथे दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेतात. मात्र दुसऱ्या बाजूला इतिहासाचा अमूल्य ठेवा असलेले हे प्राचीन भूमिज शैलीतील शिवमंदिर आजही उपेक्षित आणि दुर्लक्षित अवस्थेत उभे आहे. आधुनिक मंदिराकडे भाविकांचा ओढा वाढत असताना, शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या या प्राचीन वास्तूकडे मात्र फारसे लक्ष दिले जात नाही, ही खरोखरच खंत वाटावी अशी बाब आहे.
मंदिराची रचना, दगडांवरील कोरीव काम, तसेच शिल्पकलेची शैली पाहता हे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील असल्याचे मानले जाते. यादवकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव या मंदिरावर स्पष्टपणे जाणवतो. काळ्या दगडामध्ये उभारलेली ही वास्तू त्या काळातील कलाकारांच्या अद्भुत कौशल्याची जाणीव करून देते.
आज हे मंदिर मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहे. मंदिराचा समोरचा भाग, अंतराळ आणि गर्भगृह पूर्णपणे कोसळलेले असून केवळ मंदिराचा देह, काही भिंती आणि सभामंडपाचा भाग शिल्लक आहे. तरीसुद्धा उरलेल्या अवशेषांमधून या मंदिराचे भव्य स्वरूप सहज लक्षात येते.
सभामंडपातील सुंदर कोरीव स्तंभ विशेष लक्ष वेधून घेतात. प्रत्येक स्तंभावर केलेले नक्षीकाम अत्यंत सूक्ष्म आणि आकर्षक आहे. काही ठिकाणी फुलांची नक्षी, देवदेवतांच्या प्रतिमा आणि कलात्मक रचना आजही स्पष्टपणे दिसून येतात.
मंदिराच्या आतील बाजूस असलेल्या देवळ्या आणि भिंतीवरील शिल्पांमधून त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते. बाहेरील बाजूस सूरसुंदरी आणि मैथून शिल्पांच्या काही झिजलेल्या मूर्ती दिसतात. या शिल्पांमुळे हे मंदिर शिवमंदिर असल्याची स्पष्ट जाणीव होते.
विशेष म्हणजे या मंदिराभोवती आजही अनेक दगडी अवशेष विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. अनेक कोरीव दगड, भग्न शिल्पे आणि वास्तूचे भाग परिसरात पडलेले आहेत. हे सर्व अवशेष योग्य प्रकारे संकलित करून जतन केले तर भविष्यात या मंदिराचा इतिहास अधिक स्पष्ट होऊ शकतो.
काळाच्या ओघात या मंदिराबाबत एक गैरसमज पसरला होता की मंदिराखाली बारा कढई भरून सोने दडलेले आहे. या चुकीच्या समजुतीमुळे अनेक वेळा मंदिर परिसर खोदण्यात आला. त्यामुळे या प्राचीन वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आजही मंदिर परिसरात काही ठिकाणी खोदकामाच्या खुणा दिसून येतात.
इतिहास, स्थापत्यकला आणि शिल्पकलेचा अमूल्य वारसा असलेले हे मंदिर आज उपेक्षित अवस्थेत उभे आहे. झाडाझुडपांनी वेढलेले हे मंदिर हळूहळू भग्नतेकडे वाटचाल करत आहे.
या मंदिराचे योग्य संवर्धन झाले तर भविष्यात हे ठिकाण इतिहासप्रेमी, पर्यटक आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरू शकते. स्थानिक ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन या वारशाचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे.
कारण ही केवळ दगडांची वास्तू नाही…
तर आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि प्राचीन कलेची जिवंत साक्ष आहे.
-महेश कोते-पाटील
ऐतिहासिक L आकाराची होळकर कालीन बारव
(नैताळे,निफाड,नाशिक)
छत्रपती संभाजीनगर हायवेवर, नाशिकपासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव ‘मतोबाच्या यात्रे’साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
पण याच गावात हायवेपासून फक्त २ किलोमीटर आत लपलेला आहे एक अद्भुत इतिहास…
ही आहे एक भव्य, सुंदर आणि रहस्यमय होळकरकालीन बारव — नैताळे बारव!
नैताळे गावातील ही बारव साधी विहीर नाही…
ही आहे एक भव्य पायऱ्यांची विहीर — म्हणजेच Stepwell.
पूर्वीच्या काळात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अशा बारवांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे.
लोक खाली उतरून पाणी भरत असत आणि ही ठिकाणे सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होती.
नैताळे गावातील ही बारव आजही आपल्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत उभी आहे.
नुकताच जागतिक वारसा दिनानिमित्ताने पोस्ट कार्डवरील महाराष्ट्रातील २ बारवांचे छायाचित्रे छापलेली असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील अमृत तीर्थ बारव व नैताळे येथील या बारवेला स्थान देण्यात आलेले आहे.
ही बारव मराठा कालखंडातील असून
गुढीपाडवा — ३० मार्च १७४७, सोमवार, शके १६६९ रोजी
मल्हारराव होळकर यांचे विश्वासू सेवक आणि दिवाण
गंगोबा चंद्रचूड (गंगाधर यशवंत) यांनी ही बारव बांधली.
गंगोबा चंद्रचूड हे पेशव्यांचे हिशेब खाते सांभाळण्यापासून ते माळव्यात होळकरांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अटक स्वारी आणि पानिपत युद्धाच्या काळात होळकर सैन्याचे नेतृत्व केले होते
बारवेमध्ये कोरलेल्या शिलालेखातून ही माहिती समोर येते.
शिलालेखात “प्रतापी मल्हारी” असा उल्लेख आहे,
जो मल्हारराव होळकर यांच्यासाठी वापरला गेला आहे.
धारणग्राम या गावाची देशमुखी होळकरांकडे होती
आणि गंगोबा चंद्रचूड यांच्याकडे १३० गावांची पाटीलकी वतन होती. त्या वतनाच्या मिळकतीतून त्यांनी ही भव्य बारव उभारली.यावरून त्या काळातील जलव्यवस्था, संपन्नता आणि स्थापत्यकलेची उंची लक्षात येते.
ही बारव ‘नंदा’ प्रकारातील असून
तिची रचना L-आकाराची आहे.
विशेष म्हणजे या बारवेत उतरण्यासाठी
फक्त एकाच बाजूने सुंदर दगडी पायऱ्या आहेत.
आत उतरताना दोन्ही बाजूंना मजबूत दगडी भिंती दिसतात
ज्यावर सुंदर नक्षीकाम आणि कोरीव सजावट पाहायला मिळते.प्रवेशद्वारावर कमानीचा आकार दिसतो
जो त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना आहे.
संपूर्ण बांधकाम काळ्या दगडात म्हणजेच Basalt मध्ये करण्यात आले आहे.वरून पाहिल्यावर चौकोनी रचना दिसते
आणि खाली पाण्याचा मोठा साठा ठेवण्यासाठी खोल जागा आहे.या बारवेमध्ये देवकोष्ठे, कमानीयुक्त झरोके
आणि काही दगडी खोल्या देखील आहेत.
हे सर्व पाहताना ही फक्त विहीर नसून
एक भव्य स्थापत्य वारसा असल्याची जाणीव होते.
⸻
या बारवेच्या समोरच एक सुंदर दगडी आणि कोरीव समाधी देखील आहे.ही समाधी नक्कीच एखाद्या वीरपुरुषाची
किंवा राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीची असावी
असा अंदाज इतिहास अभ्यासक व्यक्त करतात.या समाधीबाबत अजून सखोल संशोधन होणे आवश्यक आहे.
असेही सांगितले जाते की समाधीसमोर बारव असल्यास
त्या समाधीच्या स्वच्छतेसाठी आणि पूजेसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था म्हणून बारव बांधली जात असे.
म्हणूनच ही बारव आणि समाधी
एकमेकांशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेली असण्याची शक्यता आहे.
⸻
नैताळे बारवेचे महत्त्व इतके मोठे आहे की
महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत
या बारवेचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.
इतकेच नाही,
भारतीय टपाल विभागाने या बारवेच्या चित्रासह विशेष Cancellation Stamp जारी करून या वास्तूचा सन्मान केला आहे.
ही गोष्ट नैताळे बारवेच्या ऐतिहासिक महत्त्वाला
अजून अधोरेखित करते.
⸻
जतन करण्याची गरज:
आजही ही बारव वापरात आहे
आणि मराठा स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते.
परंतु अशा ऐतिहासिक वारशाची योग्य जपणूक होणे अत्यंत आवश्यक आहे.आपल्या इतिहासाचा हा अमूल्य ठेवा
आपण सर्वांनी जपला पाहिजे.
कारण अशा वास्तू फक्त दगडांच्या नसतात—
त्या आपल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या
आणि वैभवशाली इतिहासाच्या जिवंत साक्षीदार असतात.
नृसिंह जयंती :
ही जयंती नृसिंह भगवान यांच्या अवताराची आठवण म्हणून साजरी केली जाते. ते विष्णू यांचे चौथे अवतार मानले जातात.
पुराणांनुसार हिरण्यकशिपू नावाचा राक्षस राजा होता. त्याने कठोर तप करून असा वर मिळवला की त्याला कोणीही सहज मारू शकणार नाही.
त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा मोठा भक्त होता.
हिरण्यकशिपूने प्रल्हादाला खूप त्रास दिला, पण त्याची श्रद्धा ढळली नाही.
शेवटी विष्णूंनी अर्धा मनुष्य + अर्धा सिंह अशा रूपात (नृसिंह अवतार) प्रकट होऊन संध्याकाळी, उंबरठ्यावर हिरण्यकशिपूचा वध केला — कारण त्याला मिळालेल्या वरदानाला तोडण्यासाठी हेच योग्य रूप आणि वेळ होती.
श्रीराम यांच्या पाऊलखुणा असलेल्या 294 तीर्थापैकी 155 वे तीर्थ
(श्री रामेश्वर मंदिर,पाटोदा,येवला,नाशिक )
दिल्ली येथील श्रीराम संस्कृतिक शोध संस्थेने काही वर्षांपूर्वी देशभरात केलेल्या संशोधनात त्यांना वनवास काळातील श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेली २९४ तीर्थे आढळून आली. त्यामध्ये अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश आहे. या नोंदींनुसार येवला तालुक्यातील पाटोदा येथे असलेले श्री रामेश्वर मंदिर हे १५५ वे तीर्थ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवपिंडीजवळ गुप्त स्वरूपात असलेल्या गंगेचे पाणी शरीरावर आलेल्या मोसवर लावल्यास (त्वचेवर येणाऱ्या गाठी) त्यातून आराम मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीनकाळी हा परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. श्रीराम जेव्हा वनवास काळात या भागात आले तेव्हा सध्या मनमाडजवळील अनकाई किल्ल्यावर असलेल्या गुहेत अगस्ती ऋषी तपश्चर्येला बसले होते. श्रीराम अगस्ती ऋषींच्या भेटीसाठी जात असताना मार्गात त्यांनी पाटोदा येथे मुक्काम केला होता. श्रीराम दररोज जेथे जेथे मुक्काम करीत तेथे तेथे संध्याकाळी शिवपिंडीची स्थापना करून पूजा-अर्चा करत असत. त्याचप्रमाणे पाटोदा येथे त्यांनी वाळूच्या शिवलिंगाची स्थापना केली. पूजा-अर्चा सुरू असताना एक मोसग्रस्त व्यक्ती तेथे आला. श्रीरामांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून हे मोठे तपस्वी असावेत, असे त्या व्यक्तीला वाटले. तो श्रीरामांना विनंती करू लागला की, मला या मोस रोगामुळे शारीरिक पिडा होत आहे. आपण मला या रोगापासून मुक्त करावे. त्यावर श्रीरामांनी ‘तथास्तू’ म्हटल्यावर त्या व्यक्तीचे मोस त्वरित बरे होऊन त्याची त्वचा पूर्वीप्रमाणे झाली. त्यावेळी त्या व्यक्तीने श्रीरामांना भेट म्हणून आपल्याजवळची वांगी दिली होती. तेव्हापासून या मंदिरात भक्तांकडून देवाला वांगी वाहण्याची प्रथा आहे.
येवला तालुक्यातील लासलगाव-येवला रस्त्यावर पाटोदा येथे रामेश्वराचे हे प्रसिद्ध स्थान आहे. बाजारपेठेला लागूनच असलेले हे मंदिर पाटोद्याचे ग्रामदैवत समजले जाते. मुख्य रस्त्यावरील कमानीतून आत गेल्यावर पाच ते सहा पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात जाता येते. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे.

सभामंडप प्रशस्त असून त्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. सभामंडपाच्या भिंतींवर मोठ्या अक्षरांत शिवस्तुतीपर अभंग, तसेच संत तुकारामांचे अभंग लिहिलेले दिसतात. येथे असलेल्या शिलालेखावरून, शिवाजी विठ्ठल विंचूरकर यांनी शके १७९० मध्ये बांधलेल्या रामेश्वर मंदिराचा खंडेराव विठ्ठल विंचूरकर यांच्या स्मरणार्थ गिरीजाबाई शिवदेव विंचूरकर यांनी शके १८७८ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती मिळते. याशिवाय श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेल्या २९४ तीर्थांची क्रमवारीनुसार माहिती येथे देण्यात आली आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच एका चौथऱ्यावर अखंड काळ्या दगडापासून बनविलेला नंदी आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. द्वारशाखेच्या डाव्या बाजूला प्राचीन गणेशमूर्ती आहे. ही गणेशमूर्ती गावात एका बांधकामासाठी खोदकाम करताना सापडल्याचे सांगितले जाते.

या मंदिराचे गर्भगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे असलेल्या सुंदर शिवपिंडीसमोर श्रीरामांच्या संगमरवरात कोरलेल्या विशेष पादुका आहेत. या पादुकांवर काही आकृत्या कोरलेल्या असून त्याखाली ‘श्रीरामाच्या वनमार्गातील अनेक तीर्थांची पवित्र रज समन्वित श्रीराम चरणारविन्दांचे पूजन, दर्शन, विश्वाच्या समस्ततीर्थांचे पुण्य प्रदाता, शास्त्रांनी मान्य केले आहे’ असा मजकूर कोरलेला दिसतो. या पादुकांना लागूनच शिवपिंडीजवळ एक चौकोनी ६ x ६ इंचाचा व दीड फूट खोलीचा जमिनीत लहानसा खड्डा आहे. असे सांगितले जाते की, या ठिकाणी गंगा अवतरली आहे. केवळ हात जाऊ शकतो एवढ्याच आकाराच्या या खड्ड्यात गंगेचे तीर्थ असल्याचे सांगितले जाते. वर्षाचे बाराही महिने त्यात पाणी असते, ते कधीच कमी किंवा जास्त होत नाही. हे तीर्थ मोस आलेल्या व्यक्तीच्या अंगाला लावल्यास त्याचे मोस बरे होतात, तसेच रामेश्वराला वांगी अर्पण केल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यासाठी अनेक ठिकाणांहून भाविक येथे महादेवाच्या दर्शनासाठी व मोसवर उपचार करण्यासाठी येत असतात.
गर्भगृहावरील कळसावर सुंदर कलाकुसर केलेली दिसते. सुमारे ४० ते ५० फूट उंचीचा हा कळस शेकडो लहान-लहान कळसांच्या प्रतिकृतींनी बनलेला दिसतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते की मंदिराबाहेरील भिंतीत असलेल्या एका कोनाड्यात कान देऊन ऐकले असता खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येतो. चैत्र महिन्याच्या शेवटच्या सोमवारी येथे यात्रा भरते. याशिवाय रामनवमी, महाशिवरात्री व श्रावणी सोमवारीही या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. श्रीरामांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले हे स्थान असल्यामुळे हजारो भाविकांबरोबरच दरवर्षी अयोध्येतील अनेक साधू या मंदिरात आवर्जून दर्शनाला येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
मृगव्याधेश्वर मंदिर,नांदूर मध्यमेश्वर,निफाड,नाशिक
नाशिक जिल्ह्याचे ‘नंदनवन’ अशी ख्याती असलेले निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावरील ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव खऱ्या अर्थाने रामायण घडण्यास कारणीभूत ठरले. असे सांगितले जाते की, याच गावात श्रीरामांनी कांचन मृगाचे रूप घेतलेल्या मायावी मारीच राक्षसावर बाण मारून त्याचे खूर तोडले होते आणि त्याच वेळी साधू वेशात येऊन रावणाने पंचवटीतून सीतेचे हरण केले होते. या घटनेची आठवण म्हणून येथील ‘मृगव्याधेश्वर मंदिर’ प्रसिद्ध आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की आपल्या वनवासकाळात श्रीराम-लक्ष्मण-सीता नाशिक येथील पंचवटी परिसरात काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी रावणाचा मामा मारीच राक्षसाने कांचन मृगाचे रूप घेतले व तो श्रीराम-सीता-लक्ष्मण ज्या पर्णकुटीत राहत होते त्या परिसरात आला. कांचनमृगाचा दरवळणारा सुगंध, त्याची सुवर्ण कांती, लकाकणारे डोळे पाहून सीतेला त्या हरणाचा मोह झाला व तिने श्रीरामांकडे त्या हरणासाठी हट्ट धरला. श्रीरामांना ते हरीण मायावी आहे हे माहिती असूनही पत्नीहट्टासाठी त्यांनी धनुष्य व बाण घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. गोदावरीच्या तीरावरून श्रीरामांना हुलकावणी देत ते मायावी मृग ‘नांदूर मध्यमेश्वर’ गावापर्यंत गेले. मायावी मृग नजरेच्या टप्प्यात आल्यावर श्रीरामांनी त्याच्यावर बाण सोडला. तो बाण मृगाचे रूप घेलेल्या मारीच राक्षसाच्या पायाला लागून त्याचे खूर तुटले. घायाळ झालेल्या मारीच राक्षसाने रामाच्या आवाजात ‘लक्ष्मणा मला वाचव’ असा आवाज काढल्याने सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या रक्षणासाठी पाठविले व त्याचवेळी रावणाने कपटाने सीतेचे हरण केले. या घटनेमुळे पुढचे रामायण घडले व त्याची आठवण म्हणून ‘नांदूर मध्यमेश्वर’ येथे ज्या ठिकाणी मृगाचे खूर तुटले तेथे मृगव्याधेश्वर मंदिराची व जेथून श्रीरामांनी बाण मारला तेथे बाणेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मृगव्याधेश्वर मंदिराजवळच खूर तुटलेल्या मृगाचे समाधी स्थळही आहे.
सायखेडामार्गे निफाड तालुक्यातील खानगावथडीला जाता येते. तेथून पुढे नांदूर मध्यमेश्वर हे गाव लागते. हा परिसर अश्मयुगातील पुरातन लोकवस्तीचा होता, हे येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून स्पष्ट झाले आहे. खानगावथडीतून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या रस्त्यानेही नांदूर मध्यमेश्वर गावात जाता येते. पक्षी अभयारण्यामुळे प्रसिद्ध असलेल्या ‘नांदूर मध्यमेश्वरा’चा उल्लेख ‘मृगव्याधेश्वर मंदिरा’मुळे अनेक ग्रंथांमध्येही येतो.
मंदिर परिसर प्रशस्त असून मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदीमंडप आहे. मुख्यद्वारातून प्रवेश केल्यावर सभामंडपात दगडी कमानी असलेली रचना दिसते. तेथून अंतराळात प्रवेश केल्यावर हा भाग कोरीव कामांनी सजलेला दिसतो. सभागृहाच्या द्वारपट्टीवर गणेश प्रतिमा, तर खालच्या बाजूला कीर्तिमुख कोरलेले दिसते. याशिवाय येथे वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम पाहायला मिळते. अंतराळापासून काहीसे खाली असलेल्या गर्भगृहात महादेवाची शुभ्र पिंड आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर फारशी कलाकुसर नसली तरी या मंदिराचा कळस मात्र कोरीव कामांनी सजलेला दिसतो. कळसाच्या बाजूला २ मिनार असून कळसावर अनेक देवदेवता व संतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात.
नांदूर मध्यमेश्वर गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यामध्ये गोदावरीच्या पात्रात असलेले गंगा मध्यमेश्वर मंदिर, बाणेश्वर मंदिर, सिद्धेश्वर महादेव ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीला या गावामध्ये उत्सवाचे स्वरूप असते. मृगव्याधेश्वर मंदिरात यावेळी दोन दिवस जत्रा असते. याशिवाय रामनवमी व श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
-महेश कोते-पाटील
शारंगधर बालाजी मंदिर(मेहकर,बुलडाणा) या ठिकाणी असणारी श्री बालाजी यांचे मोठे बंधू केशवराज यांची अतिशय सुंदर शिल्प असणारी मूर्ती 
गंगा मध्यमेश्वर मंदिर (नांदूर मध्यमेश्वर,निफाड,नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. इथेच गोदावरी व कादवा नद्यांच्या संगमावर चक्रधर स्वामींनी वास्तव्य केलेले गंगामध्यमेश्वर शिव मंदिर आहे. नांदूर मध्यमेश्वरचे ग्रामदैवत असलेले हे मंदिर गोदावरीच्या पात्रात एका लहानशा टेकडीवर स्थानापन्न आहे. नदीपात्राच्या मधोमध मंदिर असल्याने त्याचे ‘मध्यमेश्वर’ हे नाव प्रचलित झाले.
सायखेडामार्गे निफाड तालुक्यातील खानगावथडीला जाता येते. तेथून पुढे ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे गाव लागते. हा परिसर अश्मयुगातील पुरातन लोकवस्तीचा होता, हे येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून स्पष्ट झाले आहे.
खानगावथडीतून ‘नांदूर मध्यमेश्वर’ बंधाऱ्याच्या रस्त्याने नांदूर मध्यमेश्वर गावात जाता येते. धरणाच्या बॅकवॉटर परिसरात संगमेश्वर, तर धरणाच्या खाली गोदावरी नदी तीरावर गंगामध्यमेश्वर शिव मंदिर आहे. नांदूर मध्यमेश्वर या गावातून या मंदिरात जायचे झाल्यास नदीपात्रातून जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत या नदीपात्रात ३ ते ४ फूट वाहते पाणी असते. मात्र पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी या नदीपात्रातून सहज पायी जाता येते. याशिवाय खानगावात येऊन बंधाऱ्यावर न जाता त्याखालील उजवीकडील नदीपात्रातील रस्त्याने श्री गंगामध्यमेश्वर मंदिराकडे जाता येते.
या मंदिराभोवती १५ फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी आहे. नदीच्या प्रवाहापासून मंदिराचे संरक्षण व्हावे, या हेतूने ती बांधली असावी. मंदिराच्या तटबंदीचे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. आत प्रवेश केल्यावर २५ फूट उंचीची दीपमाळ पाहायला मिळते. या दीपमाळेवर मराठी शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे नाव कसे पडले असावे, याबाबतचे कोडे उलगडतो. या शिलालेखात ‘मौजे नांदूर’ असा उल्लेख आहे. म्हणजेच गावाचे नाव पूर्वी फक्त ‘नांदूर’ असेच होते. मध्यमेश्वर मंदिरामुळे या गावाला ‘नांदूर मध्यमेश्वर’ म्हटले जाऊ लागले. मात्र, हा शिलालेख आता अस्पष्ट झाला आहे.
शिलालेखाचे वाचन :
मुळ वाचन:
१. सके १६६१
२. सीधाथी
३. णाम सवछ-
४. रे श्रावं वद १३
५. स भुगीर बा|
६. मा| मठे मोजे
७. नादुर सीस
८. नारायेन गी-
९. र नीरंजनी
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६६१ व्या वर्षी सिद्धार्थी संवत्सर मध्ये श्रावण वद्य १३ या तिथीला म्हणजेच मंगळवार २१ ऑगस्ट १७३९ या इंग्रजी तारखेला मौजे नांदूर येथे भृंगिर बाबा महाराज यांच्या मठात मध्यमेश्वर महादेव मंदिरासमोर शेष नारायण याने गिर निरंजनी म्हणजेच उंच दीपमाळ बांधली.
===================================
शिलालेखाचा आशय :-
दीपमाळ (डिकमल) महाराष्ट्रीय शिल्पप्रकार असून महाराष्ट्रातील मंदिरांसमोर तसेच देवांच्या मूर्तीसमोर दिवे लावण्यासाठी दगडी स्तंभ उभारलेले असतात.
देवळासमोर सव्वीस हात कींवा त्या पेक्षा जास्त उंचीचा दगडी स्तंभ उभारून त्यावर कापूर व ज्वालाग्राही पदार्थ जाळून आरास करावी असे पुराणात म्हटले आहे. असे स्तंभ प्राधान्याने शिवालयासमोर असत आणि ते शिवरूप समजले जातात. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दीपमाळ उभारण्याची प्रथा रूढ होती.
गावचे ग्रामदैवत गंगामध्यमेश्वर महाराजांचे मंदिर गोदापात्रात एका टेकडावर भक्कम अशा पंधरा ते वीस फूट उंच तटबंदीच्या आत उभे आहे. नदीच्या पाण्यापासून मंदिराचे संरक्षण व्हावे, हा हेतू यामागे असावा. नदी पात्रात मधोमध हे मंदिर असल्याने याला मध्यमेश्वर म्हटले गेले असावे. मंदिराच्या तटबंदीचे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याप्रमाणेच आहे. आत प्रवेश केल्यावर साधारण २०-२५ फूटी दीपमाळ आपल्या नजरेस पडते. या दीपमाळेवर मराठी शिलालेख आहे. या शिलालेखात मौजे नांदूर असा उल्लेख आहे. म्हणजेच गावाचे नाव पूर्वी फक्त नांदूर असेच होते. मध्यमेश्वर मंदिरामुळे आता नांदूरमध्यमेश्वर म्हटले जाऊ लागले. असावे.हेच या शिलालेखाचे महत्व आहे .
(शिलालेख माहिती :अनिल दुधाने)
मध्यमेश्वर मंदिरासमोर पाषाणात कोरलेला नंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक नक्षीकाम आहे.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर नक्षीदार कमान असलेले सभामंडप लागते. सभामंडपाच्या पुढे अर्धमंडप असून त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात पाषाणातील शिवलिंग असून ते पितळेच्या धातूने मढवण्यात आले आहे. या गोलाकृती शिवलिंगावर चारही बाजूने मुखवटा कोरलेला आहे. सभामंडपात चक्रधर स्वामींचे आसनस्थान आहे. असे सांगितले जाते की, या मंदिरात काही काळ चक्रधर स्वामी वास्तव्यास होते. मंदिराभोवती प्रशस्त पटांगण असून तेथे एक तुळशी वृंदावन व छोटे मंदिर आहे. मंदिराच्या आतील भागाप्रमाणेच मंदिराबाहेरील बाजूवरही फुलांची नक्षी कोरलेली पाहायला मिळते. गोदावरी नदीच्या दोन्ही तटांवर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. मात्र, हे मंदिर गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध असल्याने त्याचे वेगळेपण उठून दिसते.
मंदिर परिसरातून गोदावरी नदीचे विशाल पात्र दिसते. गंगामध्यमेश्वर मंदिराच्या आजूबाजूला लहान-लहान मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की, सुवर्णमृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा पाठलाग करताना श्रीराम हे मध्यमेश्वर शिव मंदिरात आले होते. प्रत्येक श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मंदिरात उत्सव होतो. यावेळी भाविकांची येथे गर्दी होते. सकाळी ५ ते सायंकाळी ६ या वेळेत मंदिरात जाऊन मध्यमेश्वर म्हणजेच महादेवाचे दर्शन घेता येते.
(महेश कोते-पाटील)
हिंगलाज माता मंदिर
(खेडे-उगाव),निफाड,नाशिक
आदिशक्ती भगवतीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेले हिंगलाज देवीचे शक्तिपीठ पाकिस्तान व बलुचिस्तान सीमेवर आहे. असे सांगितले जाते की, एका भाविकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवी तेथून नाशिकमधील निफाड तालुक्यातील खेडे या गावात आली. निफाडमधील हे मंदिर १३ व्या शतकातील आहे. हिंगलाज देवीची मूर्ती स्वयंभू असून हे जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की हिंगलाज मातेचे मूळ स्थान पाकिस्तान सीमेवरील हिंगला नदीकाठी हिंगला डोंगरावर आहे. तेथे देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक जात असत. त्यापैकीच एक होते डोंगरपुरी महाराज. डोंगरपुरी महाराज हिंगलाज देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जात असत. तब्बल ९५ वर्षे डोंगरपुरी महाराजांनी देवीची पायी वारी केली. वार्धक्यामुळे आता पायी वारी करणे दिवसेंदिवस त्यांना कठीण वाटू लागले. त्यासाठी त्यांनी मनोमन ठरवले की, देवीला आपण आपल्या नगरात घेऊन जायचे. निश्चय पक्का करून त्यांनी देवीची आराधना सुरू केली. हिंगलाज देवीनेही प्रसन्न होऊन डोंगरपुरी महाराजांसोबत त्यांच्या गावी जाण्याची विनंती मान्य केली. डोंगरपुरी महाराजांनी वळून मागे न पाहण्याच्या अटीवर देवी त्यांच्यासोबत मार्गक्रमण करू लागली. त्र्यंबकेश्वर, नाशिक, पिंपळगाव मार्गे कारस गावी (सध्याचे खेडे हे गाव) आले तेव्हा तेथील विनता नदीला महापूर आला होता. आता पुढचा प्रवास कसा करायचा यासंदर्भात मातेचा विचार घ्यावा, या उद्देशाने डोंगरपुरी महाराज मागे वळले आणि तेव्हाच तेथे दिव्य प्रकाश पडून देवी मूर्तीच्या रूपात स्थित झाली. देवी येथून पुढे येणार नसेल तर आपणही पुढे जायचे नाही, हा विचार करून डोंगरपुरी महाराजांनी आता जेथे मंदिर आहे तेथेच शास्त्रोक्त पद्धतीने हिंगलाज मातेच्या या स्वयंभू मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर १२२८ मध्ये स्वतः डोंगरपुरी महाराजांनी दगडी चिऱ्यांच्या साह्याने देवीचे मंदिर बांधले.

असे सांगितले जाते की देवीची काही वर्षे सेवा केल्यानंतर डोंगरपुरी महाराजांनीही या मंदिरासमोर संजीवन समाधी घेतली. समाधी स्थानाची रचनाही काळ्या चिरेबंदी दगडात हेमाडपंथी स्वरूपाची आहे. हिंगलाज देवीला स्नान घातल्यानंतर ते तीर्थ डोंगरपुरी महाराजांच्या समाधी स्थानावर जाईल, अशी रचना या मंदिरात करण्यात आली होती.
प्रशस्त परिसरात असलेले हिंगलाज माता मंदिर मोठे असले तरी साधे आहे. मुख्य मार्गाला लागून असलेल्या या मंदिर परिसरात सर्वत्र पेव्हर ब्लॉक लावल्यामुळे हा परिसर स्वच्छ व सुंदर भासतो. मंदिरासमोर दीपमाळ आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात देवीची मूर्ती कुमारिका स्वरूपात काळ्या पाषाणाची आहे. मातेच्या कपाळावर ज्योतिर्लिंग स्वरूपात तिसरा डोळा आहे. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ असा मातेचा शृंगार केला जातो. मूर्तीला चार भुजा असून त्यातील तीन हातांमध्ये आयुधे, तर एक हात आशीर्वाद देत आहे.
चैत्र नवरात्र, श्रावण शुद्ध चतुर्दशी, आश्विन नवरात्र आणि पौष पौर्णिमा हे चार उत्सव येथे साजरे होतात. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या बुधवारी येथे देवीची भव्य जत्रा असते. त्यावेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात शेकडो स्त्री-पुरुष मंदिरात घटी बसतात. असे सांगितले जाते की वर्षभरात साधारणतः ४ ते ५ लाख भाविक देवीच्या दर्शनाला येतात. राज्य शासनाने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे.
ही देवी परिसरातील दशनाम गोसावी, तेली, साळी, फुलमाळी, कुंभार, ब्रह्मक्षत्रिय (ठाकूर), कोकणस्थ ब्राह्मण, काही मराठा समाज, बेलदार, भावसाल (रंगारी), सिंधी, धनगर, रावल, पटेलीया, कुमावत, वंजारी, न्हावी, गुजराती, पांडव, कहार या समाजाची कुलस्वामिनी आहे. या मंदिरात गणेशादियाग, नवचंडी, महारुद्र, लघुरुद्र, नारायण नागबळी, कालसर्प शांती व देवी मातेचे कुलधर्म कुलाचार अशा विविध विधी व पूजा केल्या जातात.
वीरभद्र महाराज मंदिर
राहाता, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
वीरभद्र हे महादेवांचे एक रूप मानले जाते. देशभरात वीरभद्र महाराजांची अनेक मंदिरे आहेत; परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहराचे ग्रामदैवत असलेले वीरभद्र महाराज देवस्थान प्रसिद्ध आहे ते येथील बगाड यात्रेमुळे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या यात्रोत्सवात नवसपूर्तीसाठी सुमारे २००० महिला व ४०० ते ५०० पुरुष बगाडाला गळी लागतात. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही येथे मोठ्या उत्साहाने पाळली जाते.
वीरभद्र मंदिराची आख्यायिका अशी की कासार समाजातील एक महिला वीरभद्र महाराजांची निस्सीम भक्त होती. ब्रह्ममुहूर्तावर (साधारणतः पहाटे ४ ते ५.३० ही वेळ) देवाची पूजा करता यावी यासाठी ही महिला मध्यरात्री आपल्या घरातून निघत असे. सुमारे दोन तास जंगलातून पायपीट करून ती पहाटेच्या वेळी वीरभद्राचे जेथे मूळ स्थान होते (आताच्या शिर्डी शहराच्या सीमेलगत एका डोंगरात) तेथे देवाच्या दर्शनाला जात असे व मनोभावे देवाची पूजा करीत असे. अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने तिच्या सासऱ्याला तिचा संशय आला.
इतक्या रात्री सून कोठे जाते, याचा छडा लावण्याचा निश्चय त्याने केला व एके दिवशी सून घरातून निघाल्याबरोबर सासराही तिच्या नकळत मागे मागे जाऊ लागला. वीरभद्र महाराजांची पूजा सुरू असताना सासऱ्यांनी आपल्याला पाहिल्याचे लक्षात येताच ती घाबरली व तिने देवाकडे स्वतःला वाचविण्यासाठी धावा केला. देवानेही तिचा धावा ऐकून त्वरित तिला आपल्या तांदळ्यात (हात, पाय नसणारी मुखवटावजा मूर्ती) विलीन करून घेतली.
हा सर्व प्रकार तिचा सासरा पाहत होता. या घटनेमुळे तोही वीरभद्र महाराजांचा भक्त झाला आणि नित्यनेमाने देवाची उपासना करू लागला. अनेक वर्षे देवाची सेवा केल्यानंतर त्याला आता जंगलातील प्रवास करणे कठीण होऊ लागले. तेव्हा त्याने देवाकडे विनंती केली की देवा तुझ्या उपासनेत खंड पडू नये असे मला मनोमन वाटते; परंतु वयोमानामुळे आता मला तुझ्या भेटीला रोज येणे शक्य नाही. तेव्हा तूच माझ्या गावात ये, जेणेकरून मला तुझी रोज सेवा करता येईल. भक्ताची ही इच्छा वीरभद्र महाराजांनी मान्य केली. त्यानुसार आज जेथे मंदिर आहे त्या जागेवर मूर्तीरूपात देव प्रकट झाले. सुमारे ७०० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी त्या मूर्तीची तेथेच असलेल्या एका जुन्या वाड्यात प्रतिष्ठापना केली होती. तेव्हापासून वीरभद्र महाराज राहाता ग्रामस्थांचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान आहेत.
शिर्डी शहरापासून जवळ असलेल्या राहाता शहराच्या मध्यवर्ती भागात वीरभद्र महाराजांचे दाक्षिणात्य पद्धतीचे भव्य व सुंदर मंदिर आहे. अतिशय जागृत व नवसाला पावणारा देव, अशी या देवस्थानाची ख्याती आहे. पूर्वी एका वाड्यात असलेल्या या प्राचीन मंदिराचा आतापर्यंत अनेकदा जीर्णोद्धार झाला आहे. २० वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला आताचे स्वरूप आले आहे. मंदिराच्या भव्य प्रांगणात एका उंच चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्याच्या बाजूलाच सुमारे ५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे.
मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्यामध्ये एका बाजूला नागाचे वेटोळे घातलेले भव्य शिल्प असून त्या वेटोळ्यावर देवी विराजमान आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथील एका खांबावर उभे असलेले दत्त मंदिर. खालच्या बाजूला खांब, मध्यभागी
कमळपुष्प व त्यात वरील छतापर्यंत श्रीदत्ताचे मंदिर, अशी सुंदर रचना येथे केलेली दिसते. पायरी मार्गाने या दत्त मंदिरात जाता येते. या लहानशा मंदिरात प्रदक्षिणा मार्गही आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी सभामंडपात दर्शन मार्ग करण्यात आला आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या भिंतीला लागून साईबाबांचे स्थान आहे. असे सांगितले जाते की वीरभद्र मंदिराच्या सभामंडपातील या स्थानावर उपासनेसाठी साईबाबा येत असत. सभामंडपातून पुढे गेल्यावर गर्भगृहात चांदीच्या मखरात वीरभद्र महाराजांची मूर्ती स्थानापन्न आहे.
वीरभद्र महाराजांचा यात्रोत्सव हा अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांपैकी एक समजला जातो. 'बगाड यात्रा' म्हणून परिचित असलेला हा यात्रोत्सव गुढीपाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. ढोल-ताशांच्या निनादात, डफांच्या तालावर देवाच्या मुखवट्याची व मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघते. यात्रेचा खास मान हा माळी, धनगर व मराठा समाजाला दिला जातो. या मंदिरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मायंबा मंदिरात ही मिरवणूक जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात प्रदक्षिणा करून मंदिरापाशी परत येते. यात्रा कालावधीत लाखो भाविक वीरभद्र महाराजांच्या दर्शनाला येतात. गूळ- भाकर व पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखविण्याची येथे पद्धत आहे. वर्षभर केलेल्या नवसांची पूर्ती म्हणून येथे गळी लागण्याची प्रथा आहे. त्यासाठी हत्तीची प्रतिकृती तयार करून रथ बनवला जातो आणि रथाच्या आडव्या खांबावर दोन्ही बाजूला (गळवंतीला) नवसपूर्तीसाठी भाविकांना लटकवून फेरी पूर्ण केली जाते. या बगाडाला लटकणाऱ्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मोठी असते.
गळवंतीला लटकण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून राहातावासीयांनी जपली आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचाही मोठा सहभाग असतो. आजपर्यंत गळवंतीला लटकून कुठलीही इजा, अपघात वा कोणी जखमी झालेले नाही, हे येथील विशेष आहे. वीरभद्र महाराज मंदिरात आषाढ महिन्यात महालक्ष्मी उत्सव, श्रावणात महादेवाचा उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे अनेक उत्सव साजरे केले जातात.
उपयुक्त माहितीः
~राहाता बस स्थानकापासून पायी ५ मिनिटांच्या अंतरावर
~शिर्डीपासून ६ किमी, तर अहिल्यानगरपासून ७८ किमी अंतरावर
~ राहाता येथे जाण्यासाठी राज्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
~परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय.
(महेश कोते-पाटील)
नागपूरकर रघुजीराजे भोसले यांचे सरदार भवानीपंत काळू यांनी बांधलेले बालाजी मंदिर, वाशीम.
नमस्कार! महाराष्ट्राच्या विदर्भ भूमीत वसलेलं एक असं ठिकाण, जिथे साक्षात तिरुपती बालाजीचा आशीर्वाद कायम असतो. आपण बोलत आहोत वाशीम शहराच्या गौरवशाली आणि प्राचीन श्री बालाजी मंदिराबद्दल!
दक्षिण भारतात तिरुपती बालाजीला 'टेकड्यांचा साहूकार' म्हणतात, पण आपल्या वाशीमच्या या मंदिराला 'वाशीमचा जागीरदार' म्हणून ओळखले जाते.
वाशिम जिल्हयाचे पूर्वीचे नाव वत्सगुल्म असे होते. वाशिम शहर वाकाटक राज्याची राजधानी होती. वाकाटक राज्यांनी तीस-या शतकपासून सहाव्या शतकापर्यंत राज्य केले. सदर राज्य हे मध्यप्रदेश पासून बेरार आंध्रप्रदेश पर्यंत होते. विन्ध्ये- शक्ती हा प्रथम वाकाटकचा राजा होता. सर्वसेन या राजाने वत्सगुल्म (वाशिम) ला राजधानी घोषित केले होते. त्यांचा हरीविजय व गाथासप्तषदी हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अजिंठा येथील लेण्यांना वाकाटक राज्यांनीच प्रोत्सहन दिल्याचे दाखले आहेत.
............................
अडीचशे वर्षांपूर्वी 'वत्सगुल्म' म्हणजे आताच्या 'वाशीम' नगरीत एका ठिकाणी खोदकाम करत असताना काही मूर्ती सापडल्या. ही बातमी कळताच त्यावेळचे नबाब हशमत जंग बहादूर आणि स्थानिक देशमुख जमीनदार लोकांनी त्याठिकाणी भेट देऊन जमीन आणखी खणायला सांगितली. त्यानंतर आतून हल्लीची बालाजीची विष्णू मूर्ती, लक्ष्मी, गणेश, शारदा वगैरे मूर्ती निघाल्या. त्या मंडळींनी वाजत-गाजत हनुमानाच्या पारावर सर्व मूर्ती आणल्या. पुढे त्या मूर्ती हल्लीच्या मोठ्या मंदिरासमोर एक छोटे घर बांधून ठेवल्या.
त्याकाळी वत्सगुल्म भागावर तिघांची सत्ता होती. पूर्वेकडील भाग निजामाच्या ताब्यात, मधला भाग पेशव्यांच्या ताब्यात तर पश्चिमेकडील भाग नागपूरकर भोसले यांच्या ताब्यात होता. परंतु मूर्ती सापडण्याची घटना पश्चिमेकडील म्हणजे नागपूरकर भोसल्यांच्या भागात घडली होती.त्यावेळी नागपूर येथे सेनासाहेब सुभा जानोजी भोसले होते. बंगालची खंडणी न मिळाल्यामुळे ती वसूल करण्याकरिता पहिले रघुजी भोसले यांच्या कारकिर्दीतील अत्यंत निष्ठावान आणि शूर सरदार भवानीपंत काळू हे बंगालच्या स्वारीवर निघाले होते. यापूर्वी भोसल्यांनी बंगालवर अनेक स्वाऱ्या केल्या होत्या, परंतु त्यांना खंडणी वसूल करता आली नव्हती.
वत्सगुल्म येथे भोसलेंच्या भागात मुर्त्या सापडल्याची वार्ता भवानीपंत काळू यांना कळताच ते लष्करासह वत्सगुल्म येथे आले. देवतांच्या मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी विष्णू मूर्तीला असा संकल्प केला की, "जर मी बंगालच्या स्वारीत यशस्वी झालो तर तुझे भव्य देवालय येथेच वत्सगुल्म नगरीत बांधीन!"
नंतर ते तात्काळ बंगालच्या स्वारीला निघून गेले
बंगालच्या स्वारीला ते बालाजीच्या कृपेने यशस्वी झाले. स्वारीच्या वेळी भवानीपंत काळू यांच्याकडे "दिवाण व सेनापती" हा कार्यभार होता. भवानीपंत हे कसलेले योद्धा आहेत, याची खात्री सेनासाहेब यांना होती. म्हणूनच ते भोसल्यांच्या फौजेचे मुख्य सेनापती होते.
बंगालच्या स्वारीवरून परत आल्यावर वत्सगुल्मास घडलेली सर्व हकिकत व बंगालमध्ये मिळालेली सर्व संपत्ती दरबारी दिल्यानंतर त्यांनी वत्सगुल्म नगरीत श्री विष्णूच्या मूर्तीस केलेला संकल्प सेनासाहेबास कथन केला. संकल्पाप्रमाणे वाशीम शहरात श्री बालाजीचे भव्य मंदिर व त्याच्याच बाजूला असलेला 'देव तलाव' भवानीपंतांनी बांधला.
त्यानंतर देवालयाच्या बांधकामास ६ ऑगस्ट १७७८ ला सुरुवात झाली. देवालयाचे गर्भगृह व दगडी सभामंडप बांधून झाल्यावर मंदिरात श्री बालाजी व सापडलेल्या इतर सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मोठ्या समारंभपूर्वक भवानीपंत काळू यांनी श्रावण वद्य १० शके १७०५ इंग्रजी दिनांक २२ ऑगस्ट १७८३ रोज शुक्रवारला केली. श्रींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांनी नित्य पूजा अर्चा, आरती करण्यासाठी नोकर वर्ग नेमला.
..................
मंदिरातील गर्भगृहात बालाजीच्या मूर्ती समोरील भिंतीवर वरच्या बाजूला एक कोनाडावजा खिडकी आहे. मंदिर हिंदू परंपरेनुसार पूर्वाभिमुख असले तरी पश्चिम-पूर्व रेषेशी उत्तरेच्या दिशेने विशिष्ट कोनात मध्यरेषा निश्चित करून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. ह्या विशिष्ट वास्तुशास्त्रीय रचनेमुळे सूर्याने उत्तरायणात प्रवेश केल्यापासून ते दक्षिणायन सुरू होईपर्यंत म्हणजे २१ डिसेंबर ते २२ जून या काळात बालाजीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.
...................
भवानीपंत काळू यांना मिळालेले यश हे उत्तरायण काळातच मिळाले होते. उत्तरायण सुरू होताच ते नागपूर येथून निघाले आणि उत्तरायणाच्या उत्तरार्धात कटक प्रांतात पोहोचले. फारसे युद्ध किंवा रक्तपात न होता दक्षिणायन सुरू होण्यापूर्वीच तह होऊन त्यांना अकल्पित यश प्राप्त झाले. आपल्या काळातील एक संस्मरणीय कालखंड स्मरणात रहावा म्हणून त्यांनी अशी वास्तुरचना करून घेतली.
श्री बालाजी देवालय व देव तलावाचे बांधकाम पंचवीस वर्षे अविरत सुरू होते. या सर्व बांधकामासाठी श्रीमंत भवानीपंत काळू यांनी स्वतःच्या खासगी तिजोरीतून खर्च केला. बांधकामास त्यावेळी दहा लाख रुपये खर्च लागला. पुढे काही काळानंतर त्यांना जहागिरी मिळाली व त्यातून श्री बालाजी संस्थानचा कारभार सुरू झाला.
जर तुम्हाला विदर्भाच्या समृद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदातरी वाशीमच्या या 'जागीरदार' बालाजीच्या दर्शनाला यायलाच हवे.
साभार -महेश कोते-पाटील
त्यांच्या स्पर्शाने विष उतरायचे
सर्पदंश झालेल्या लोकांना ते बरे करायचे
त्यांच्या दिलेल्या विभूतीने अनेक असाध्य रोग दूर व्हायचे
री मतोबा महाराज मंदिर
(नैताळे,निफाड,नाशिक)
नवनाथ ग्रंथात असा उल्लेख येतो की मच्छिंद्रनाथ आणि इतर नवनाथ अडबंगनाथांना घेऊन जाण्यासाठी निफाड व कोपरगावच्या परिसरात आले होते.
याच दरम्यान नवनाथांची भेट तपश्चर्या करत असलेल्या श्री मतोबा महाराजांशी झाली.
ज्या ठिकाणी ही भेट झाली, त्याच ठिकाणी मतोबा महाराजांनी आपल्या अद्भुत सामर्थ्याने नऊ पवित्र कुंडांची निर्मिती केली.
त्या कुंडातील पाण्याने त्यांनी नवनाथांचे चरण धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.
महाराजांची अपार भक्ती पाहून नवनाथांनी त्यांना साबरी विद्देचे कवित्व दिले.
आणि पुढे कालांतराने या नऊ कुंडांच्या समूहावरून या क्षेत्राला “नऊ तळे” म्हणजेच “नैताळे” असे नाव पडले.
असे सांगितले जाते की मतोबा महाराज सातपुडा पर्वत ओलांडून सापुताऱ्याहून येथे आले.
नैताळे गावातील पदाजी बोरगुडे पाटील यांच्या येथे त्यांनी गुराख्याची सेवा स्वीकारली.
महाराजांना मुक्या प्राण्यांवर खूप प्रेम होते.
गाई-गुरे चारताना ते विंचूसुद्धा आपल्या अंगावर खेळवत असत.
हे अद्भुत दृश्य पाहून गावातील आणि आसपासच्या खेड्यांतील लोक आश्चर्यचकित होत.
हळूहळू त्यांच्या चमत्कारांची चर्चा दूरवर पसरली.
असे म्हणतात की
म्हणूनच लोक त्यांना अत्यंत श्रद्धेने मतोबा महाराज म्हणून पूजू लागले.
बराच काळ लोककल्याणाचे कार्य केल्यानंतर महाराजांनी
पदाजी पाटलांना सांगितले की आता मी जिवंत समाधी घेणार आहे.
हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
परंतु महाराज म्हणाले –
“या जगात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवस निघून जाणारच…
मृत्यू हेच या जगातील अंतिम सत्य आहे.
माझा कार्यकाळ संपला आहे, आता हा वारसा तुम्ही जपायचा आहे.”
आणि शेवटी पौष पौर्णिमेच्या दिवशी शेषनागाला साक्षी ठेवून त्यांनी जिवंत समाधी घेतली.
पुढे याच ठिकाणी श्री मतोबा महाराजांचे मंदिर बांधण्यात आले.
तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी पौष पौर्णिमेला येथे भव्य यात्रोत्सव भरतो.
ही यात्रा जवळपास १५ दिवस चालते.
यात्रेच्या दिवशी पहाटे महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली जाते.त्यानंतर बैलगाडीत भव्य रथ सजवला जातो आणि महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते.
विशेष म्हणजे,
खानदेशातूनसुद्धा अनेक भाविक आपल्या बैलजोड्या घेऊन येतात जेणेकरून त्यांना बाबांच्या रथाला जुंपण्याचा मान मिळावा.
या रथाला ओढण्यासाठी तब्बल २१ बैल जुंपले जातात.
रथापुढे जिल्ह्यातील नामांकित बँड पथके वाजतगाजत चालतात आणि हजारो भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.
हे भव्य दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भक्त येथे उपस्थित राहतात.
(महेश कोते-पाटील)
हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 

(111 ft उंच भगवान हनुमान)
(खेडले झुंगे,निफाड,नाशिक)
अडबंगनाथ तपशिला मंदिर
भामाठाण (भामानगर), ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
अडबंगनाथ हे नाथ संप्रदायातील एक नाथ. श्रीरामपूर तालुक्यात गोदावरीच्या तीरावर असलेले भामाठाण हे गाव अडबंगनाथांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. गुरू गोरक्षनाथांच्या सांगण्यावरून अडबंगनाथांनी या ठिकाणी १२ वर्षे तपश्चर्या केली होती. असे सांगितले जाते की त्यांनी ज्या शिळेवर बसून तपश्चर्या केली ती पवित्र शिळा (तपशिला) सीता हरणानंतर श्रीराम व लक्ष्मण एकमेकांच्या गळ्यात पडून रडले होते त्यावेळी त्यांचे अश्रू वाळूवर पडून निर्माण झालेली आहे. ‘श्री नवनाथ भक्तिसार’ ग्रंथामध्ये या क्षेत्राचा उल्लेख आहे.
भामाठाण येथे ज्या ठिकाणी आज मंदिर आहे, तेथे पूर्वी माळरानाच्या जागेवर अनेक वर्षांपासून लिंबाच्या झाडाखाली अडबंगनाथांची मूर्ती होती. पंचक्रोशीतील भाविक येथे दर्शनाला येत असत. सराला बेटाचे मठाधिपती नरायणगिरी महाराज यांचे शिष्य स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी काही काळ येथे तपश्चर्या केली होती. यावेळी त्यांना या ठिकाणी अनेक साक्षात्कार झाले. त्यांनी हे अनुभव आपले गुरू नारायणगिरी महाराज यांना सांगितल्यावर ही अडबंगनाथांची तपोभूमी असल्याचे त्यांनी दिव्यदृष्टीने जाणले. त्यानुसार शोध घेतला असता येथे श्रीराम–लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली अखंड शिळा आढळली. तोपर्यंत या स्थानाबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. नारायणगिरी महाराजांच्या आदेशानुसार स्वामी अरुणनाथगिरी यांनी येथे भव्य व सुंदर मंदिराची उभारणी केली. मंदिराची बांधणी सुरू असताना अडबंगनाथांनी त्यांच्या एका भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन या ठिकाणी विहीर असल्याचे सागितले.
त्याप्रमाणे शोध घेतला असता तपशिळेजवळ अखंड पाण्याची विहीर सापडली. मंदिराच्या गाभाऱ्याच्या खालच्या बाजूला आजही ती विहीर पाहता येते.
मंदिराची आख्यायिका अशी की वनवासकाळात श्रीराम–लक्ष्मण–सीता नाशिक येथील पंचवटी परिसरात एका पर्णकुटीत वास्तव्यास होते. त्यावेळी मारीच राक्षस कांचन मृगाचे रूप घेऊन पर्णकुटीसमोर आला. कांचन मृगाचा दरवळणारा सुगंध, त्याची सुवर्ण कांती, लकाकणारे डोळे पाहून सीतेला त्या हरणाचा मोह झाला व तिने श्रीरामांकडे त्या हरणासाठी हट्ट धरला. श्रीरामांना ते हरीण मायावी आहे हे माहिती असूनही पत्नीहट्टासाठी त्यांनी धनुष्य घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. गोदावरीच्या तीरावरून श्रीरामांना हुलकावणी देत ते मायावी मृग पुढे पुढे जात होते. मृग नजरेच्या टप्प्यात आल्यावर श्रीरामांनी त्याच्यावर बाण सोडला. तो बाण मृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाला लागला. घायाळ झालेल्या मारीच राक्षसाने रामाच्या आवाजात ‘लक्ष्मणा मला वाचव’ असा आवाज काढल्याने सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या रक्षणासाठी पाठविले. मारीच राक्षसाला मारून श्रीराम पर्णकुटीकडे येत असताना लक्ष्मण आणि त्यांची गोदावरीच्या तीरावर भेट झाली. त्यावेळी श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले तू
सीतेला एकटीला सोडून आल्यामुळे ती आता तेथे नसणार आणि ते दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. त्यांच्या अश्रूंमुळे येथे एक शिळा निर्माण झाली. असे सांगितले जाते की ते ठिकाण म्हणजे आजचे भामाठाण होय. ही शिळा भामाठाण येथील अडबंगनाथ मंदिरात आहे. या शिळेची खोली किती आहे हे मोजण्याचा प्रयत्न झाला; परंतु ते शक्य झाले नाही.
श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामधील उल्लेखानुसार, पूर्वी माणिक नावाचा शेतकरी शेतात काम करीत असताना भुकेने व्याकुळ झालेले गोरक्षनाथ तेथे आले. त्यांनी माणिकजवळ काहीतरी खाण्यास मागितले. माणिकनेही त्वरित आपली शिदोरी व पाणी त्यांना दिले. स्वतःसाठी आणलेली शिदोरी दिल्याने गोरक्षनाथ माणिकवर प्रसन्न झाले व तुला काही वर मागायचा असेल तर माग, असे म्हणाले. त्यावर माणिक म्हणाला, ‘मीच तुला माझी शिदोरी दिली, तू मला काय वर देणार? तुझे पोट भरले असेल तर आता तू येथून निघून जा.’ त्यावर गोरक्षनाथ माणिकला म्हणाले, ‘तुला जर माझ्याकडून वर नको असेल तर तूच मला वर दे.’ माणिकने त्याला संमती दिली. त्यावर गोरक्षनाथांनी सांगितले की ‘इच्छेला जे येईल ते तू करू नकोस.’ माणिकला वाटले त्यात काय असे अवघड आहे, म्हणून त्याने गोरक्षनाथांना होकार दिला.
संध्याकाळ झाल्यावर माणिकने आपले औत (नांगर) सोडले व ते डोक्यावर घेतले. त्यानंतर घराकडे जावे, अशी इच्छा त्याच्या मनात येताच त्याला गोरक्षनाथांना दिलेले शब्द आठविले. तो तसाच डोक्यावर औत घेऊन तेथेच एक तप तटस्थ उभा राहिला. १२ वर्षे एकाच जागेवर राहिल्याने माणिकच्या शरीरात त्राण उरले नव्हते. एके दिवशी गोरक्षनाथ गुरू मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथांसह येथे आले. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना माणिकबद्दल सांगितले. दिलेल्या शब्दाला माणिक जागला होता. मच्छिंद्रनाथ म्हणाले, ‘खरोखरच तू महान तपस्वी आहेस. तुझ्यासारख्यांचा गुरू करून अनुग्रह घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.’ त्यावर माणिकने स्वभावानुसार प्रत्युत्तर केले की ‘मी का गुरू होऊ तुमचा, त्याऐवजी तुम्हीच माझे गुरू व्हा.’ त्यानंतर गोरक्षनाथांनी माणिकच्या कानावर आपले मुख लावत कान फुंकताच तो सज्ञान झाला. त्यांच्या मंत्राने माणिकच्या कानात प्रवेश करताच तो ब्रहस्पतीसमान (देवांचे गुरू) विद्वान झाला. गोरक्षनाथांनी माणिकला मच्छिंद्रनाथांसमोर आणले आणि सांगितले की हा अडबंग आहे, त्यास ‘अडबंगनाथ’ असे ओळखले जावे. अडबंगनाथाला नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन निर्धारित यात्रेस गोरक्षनाथ आपल्यासोबत घेऊन गेले. पुढे तीर्थयात्रा करताना अडबंगनाथांनी सर्व विद्या संपादित केल्या. त्यांनी अनेक ठिकाणी तपश्चर्या केली. त्यापैकी भामाठाण हे महत्त्वाचे स्थान मानले जाते.
भामाठाण (भामानगर) या स्थानाबद्दल श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या अध्याय ३३ मध्ये पुढील उल्लेख आहे –
यापरी गोरक्षनाथ। मही भ्रमता नाणीतिर्थ।।
ते गोदातटी अकस्मात। येऊनिया पोहोचला।।
तो गोदातटी भामानगर। तया अरण्यात गौरकुमर।।
परम झाला क्षुधादूर। जठरानले करोनिया।।
२००५ मध्ये सराला मठाचे मठाधिपती नारायणगिरी महाराज यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन झाले. मंदिर परिसरात सर्वत्र फरसबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे श्रीदत्त व डावीकडे गणपती यांची मंदिरे आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून तेथील सर्व भिंतींवर नवनाथांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारी अनेक मूर्तीचित्रे माहितीसह लावली आहेत. गर्भगृहात एका चौथऱ्यावर सुमारे पाच फूट उंचीची अडबंगनाथांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या उजवीकडून असलेल्या पायरी मार्गाने उतरून अडबंगनाथांच्या समाधीस्थळाकडे जाता येते. तेथे त्यांची तप करण्याची जागा, विठ्ठल–रुक्मिणीच्या मूर्ती, लहानशी विहीर व अश्रू शिळा आहे. संपूर्ण मंदिरावर उत्तम कलाकुसर असून कळसावरील कोरीवर काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिर परिसरात गुरुकुल इमारत असून तेथे काही विद्यार्थी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण घेतात.
श्री अडबंगनाथ यांची तपोभूमी असलेले हे स्थान नाथ संप्रदायात विशेष प्रिय समजले जाते. माघ शुद्ध द्वितीया या दिवशी येथे धर्मबीज उत्सव साजरा केला जातो. (या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती, त्यामुळे नाथपंथात या तिथीला महत्त्व आहे.) नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात राज्यातील अनेक नामवंत कीर्तनाकारांचे कीर्तन होते. उत्सव काळात हजारो नाथपंथीय व भाविक येथे दर्शनासाठी येतात. अडबंगनाथ (माणिक शेतकरी) यांनी गोरक्षनाथांना अन्नदान केले होते. त्यामुळे आजही या मंदिरात आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात येते. अडबंगनाथ चिरंजीव आहेत, जो भाविक अडबंगनाथांना प्रार्थना करून येथे अन्नदान करतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
उपयुक्त माहिती:
श्रीरामपूरपासून १७ किमी, तर नेवासापासून २३ किमी अंतरावर
मंदिर परिसरात निवासाची सुविधा नाही
नेवासे, श्रीरामपूर येथून एसटीची सुविधा
खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
-
महेश कोते-पाटील
































































































































































































































No comments:
Post a Comment