सम्राट
अशोकाच्या आज्ञापत्नात अपरान्तचा ऐतिहासिक उल्लेख प्रथम आला. अपरान्त
म्हणजे कोकण असे आता इतिहासकारांनी मान्य केले आहे. अपरान्त भागात
उत्खननांचा अथवा संशोधनाचा अभाव असला तरी एक महत्त्वाचा पुरावा येथे उपलब्ध
झाला आहे. घारापुरी (एलिफन्टा) जवळील बुचर बेटावर हातकुन्हाडी व रापीसारखी
अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडल्याने या प्रदेशात किमान एक-दीड लाख
वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे. शिवाय
पाचाड व हातखंबे येथील गुहांमध्ये मिळालेल्या गारगोटीच्या उपकरणांवरून
कोकणातील वीस ते चाळीस हजार वर्षांपूवींच्या मध्य-पुराश्मयुगीन मानवाचे
अस्तित्व सिध्द होते. रायगड जिल्ह्याचा लोहयुगापासूनचा इतिहास या प्रकरणात
दिलेला आहे. या भूप्रदेशावर मौर्य, सातवाहन, क्षत्तप, वैकूटक, कलचुरी,
कोकणचे मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, बहमनी, गुजरातचे
सुलतान, अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सीदी, मराठे, मुघल, आंगरे व
ब्रिटिशांनी राज्य केले. रायगड जिल्ह्यातील पुरावशेषांवरून स्पष्ट होते की,
येथे बौद्ध संस्कृतीची बीजे खोलवर रुजली होती. येथील बौध्द लेण्यांवरून
असेही दिसून येते की, या लेण्या एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर
खोदलेल्या आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून ब्रिटिश राजवटीमुळे
निर्माण झालेल्या नव्या संस्कारांचा व क्रिया-प्रतिक्रियांचा आविष्कार सुरू
झाला. याच काळापासून नजीकच्या मुंबईमध्ये नवीन विचारांचे प्रवर्तन सुरू
झाले. म्हणूनच एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर जिल्ह्याचा आधुनिक कालखंड
सुरू झाला असे म्हणता येईल. या जिल्ह्यात सामाजिक अभिसरण आणि राजकीय
जागृतीचा प्रारंभ विसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच झाला. जिल्ह्याने
स्वातंत्र्य आंदोलनात देखील महत्त्वाचे योगदान दिले. त्याचा इतिहास या
प्रकरणात दिलेला आहे. कुलाबा जिल्ह्याचे १९८१ पासून रायगड असे नामांतर
करण्यात आले. जिल्ह्याच्या इतिहासाचे पुढीलप्रमाणे कालखंड कल्पिले
आहेत- (१) प्राचीन काळ, (२) मध्ययुगीन काळ, आणि (३) आधुनिक काळ.'
प्राचीन काळ
काही
तज्ञांच्या मते पाचशे वर्षांपूर्वी रायगडास जेव्हा गडाचे स्वरूप नव्हते व
तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास "तणस" व "रासविटा" अशी दोन नावे होती.
इसवी सनाच्या बाराव्या शतकात रायरी गाव एका मराठा पाळेगाराचे निवासस्थान
होते. चौदाव्या शतकात
' प्राचीन काळ यावरील लेखन डॉ. एल. बी. केणी, प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ, यांनी केलेले आहे.
मध्ययुगीन काळ यावरील लेखन डॉ. वि. गो. खोबरेकर, सेवानिवृत्त संचालक, पुराभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन, यांचे आहे.
* आधुनिक काळ यावरील लेखन डॉ. कि. का. चौधरी, कार्यकारी संपादक व सचिव,
महाराष्ट्र गॅझेटिअर, यांनी केलेले आहे.
शां. वि. आवळसकर, रायगडची जीवनकथा, पृ. १०
रायरीच्या पाळेगाराने आनेगोंदी तथा विजयनगरच्या सम्राटाचे मांडलिकत्व पत्करले. इ. स. १४३६ मध्ये अलाउद्दिनशाह बहमनी दुसरा याने रायरीवरील अधिकाऱ्यास आपले स्वामित्व मान्य करावयास लावले. इ. स. १४७९ मध्ये रायरी गाव अहमदनगरच्या अधिपतीकडे गेले. परंतु १५४० मध्ये रायरीचा उल्लेख किल्ला म्हणून प्रथमच करण्यात आला. आसदखान जेव्हा मध्य कोकणातील संगमेश्वर येथे इलाखाधिपती होता तेव्हा उरलेला कोकण प्रदेश दोन सुभेदारीमध्ये विभागला गेलेला असून वैतरणा ते नागोठणे ही पहिली कल्याणची सुभेदारी एका मुसलमान अधिकाप्याकडे होती व दुसरी दक्षिणेकडील सावित्रीपर्यंत जंजिन्याच्या हवशी अधिकाऱ्याकडे सोपविली होती. उत्तरेकडील सुभेदारीमध्ये तळा, घोसाळ व रायरी या तीन किल्ल्यांचा समावेश होता असे काही इतिहासकार लिहितात." रायरीचे पुढे रायगड असे नामांतर करून १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तेथे आपली राजधानी स्थलांतरित केली.' केळदिनृपविजयम या ऐतिहासिक कानडी काव्यात कबी लिगण्णा सुमारे १७७० मध्ये रायगडबद्दल लिहितो "भूतळांत आश्चर्यकारक म्हणून गणला गेलेला राहिरी हा विख्यात गड" शिवाजीने पराक्रमाने जिंकून घेतला.
अरबी समुद्र व
सह्याद्री या दरम्यान असलेला उत्तरेकडील दमणपासून दक्षिणेकडील
गोव्यापर्यंतचा किनारपट्टीचा, अंदाजे ८५ ते ९० किलोमीटर रुंद व ५००
किलोमीटर लांब, उतरणीचा प्रदेश प्राचीन काळापासून कोकण या नावाने ओळखला
जातो. कालांतराने त्याचे उत्तर व दक्षिण कोकण असे भाग पडले. सुरत
जिल्ह्याच्या दक्षिणेपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेपर्यतचा प्रदेश
उत्तर कोकणात मोडतो. रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग व कारवार जिल्ह्याचा
दक्षिण भाग यामधील प्रदेशास दक्षिण कोकण असे संबोधिले जाते. म्हणजे रायगड
जिल्ह्याचा प्राचीन इतिहास हा उत्तर कोकणचा इतिहास होय. उत्तर कोकणास
अपरान्त (पश्चिमेकडील शेवटचे टोक) असे ऐतिहासिक नाव आहे. महा महोपाध्याय
मिराशींच्या मते सम्राट अशोकाच्या आज्ञापत्रांत (Edict) अपरान्तचा ऐतिहासिक
उल्लेख सर्वप्रथम आला. अपरान्त म्हणजे कोकण असे शेजवलकरांनीही मान्य केले
आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते तल, रसातल, महितल, पाताल इत्यादी
सप्तपाताले म्हणजेच समुद्रकाठचा कोकण. म्हणजे प्राचीन काळी एक सलग कोकण
नव्हताच. तेथे पूर्वी अनेक राज्ये होती व नंतरही ती अनेक वर्षे राहिली.
तथापि कोकण या प्रदेशास अतिप्राचीन काळी अपरान्त म्हणून संबोधिले जात असे
ही गोष्ट राजवाड्यांच्या लक्षात आली नसावी. कोकण हा किनाऱ्याचा प्रान्त
असल्यामुळे सप्तपाताले ही बहुधा सप्तबंदरे असावीत. कालिदासाच्या रघुवंशा
तील अपरान्ताचा उल्लेख करताना टीकाकार वल्लभत्यास "कोकण" असे दुसरे नाव
देतो. आरंभी येथे नाग लोकांची वस्ती होती, आणि कुंकण नावाच्या एका
नागकुलाने आपले अधिराज्य प्रस्थापिल्यामुळे या प्रदेशाला सप्तपातालऐवजी
सप्तकुंकण म्हणजे कोकण हे नाव प्राप्त झाले. गुजरातमधील नागर ब्राह्मण
स्वतःला आजही कुंकण ब्राह्मण म्हणवितात. प्राचीन ग्रंथात इ. स. पू. चौथ्या
शतकापासून कोकणचा उल्लेख आढळतो. महाभारत, हरिवंश, विष्णुपुराण,
बृहत्संहिता, राजतरंगिणी, पेरिप्लस इ. ग्रंथ, चालुक्यांचे शिलालेख, प्लिनी,
टॉलेमी, स्ट्रेंबो, हचुएन त्सँग, इब्न बतूता, अल्-बीरुनी यांचे
वृत्तांतांत कोकणचा उल्लेख आहे. टॉलेमीने गुजरात व उत्तर कोकण यांस
* ग्रँट डफ, हिस्टरी ऑफ दि मराठाज, पृ. ६३; जेम्हींस, जिऑग्रॅफिकल अॅड
स्टॅटिस्टिकल सेमॉयर ऑफ दि कोंकण, पृ. ९०.
* मान्न निश्चित तारखेवावत इतिहासकारांचे मतैक्य नाही.
प्राचीन काळ
९५
"लारिका"
व दक्षिण कोकणास "आरिका" म्हटले आहे. इ. स. पू. पाचव्या शतकापासून
बॅबिलोन, रोम इत्यादींशी भडोच, चौल, वनवासी, नवसारी, सोपारा, बालेयपट्टण,
चंद्रपूर, कल्याण या व्यापारी केंद्रांचा संबंध होता. कोकण हे नाव कसे पडले
याविषयी अनेक मते आहेत. परशुरामाची माता कुंकणा यावरून कोकण नाव पडले
असावे असेही एक मत आहे.
आर्यपूर्व अनार्य नागकुलांचे कुंकण नाव
गुजरातमधील नागर ब्राह्मणांनी स्वीकारण्याचे कारण म्हणजे या प्रदेशात
झालेला आर्य संस्कृतीचा प्रसार हेच असावे. गुजरातमधील 'भृगुकच्छ' या भडोच
बंदराच्या प्राचीन नावावरून देखील समुद्र किनाऱ्यावरील आद्यबसाहती
भार्गवांनी केल्या, व भुगुकुळातील परशुरामाने समुद्र हटवून कोकण निर्माण
केला ही दन्तकथा आर्य संस्कृतीच्या विस्तारामुळेच प्रचलित झाली असावी. याचा
परिणाम पुढे "कोकणचा इतिहास म्हणजे आर्य लोक व आर्यभाषा यांच्या त्या
प्रदेशातील प्रवेशापासूनचा इतिहास" आणि "कोकणचा राजा झिम्मा खेळतो" या
लोकगीतातील ओळीचे स्पष्टीकरण "सामान्यपणे आर्यभाषेतील साहित्यातूनच हा
इतिहास हुडकून काढून निश्चित केला पाहिजे,"" अशा विधानांत आढळतो. याचा अर्थ
आर्य लोक कोकणात येण्यापूर्वी तो प्रदेश निर्मनुष्य होता असा भास होतो.
परंतु तेथील आदिवासी नागलोकांच्या भाषा, त्यांची लोकगीते, नृत्य, रीतीरिवाज
वगैरे साधनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास झाल्याशिवाय कोकणचा प्राचीन इतिहास
अपूर्णच राहील.
अश्मयुगीन कोकण : भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास
सध्याच्या कोकण समुद्र किनाऱ्या-पासून अंदाजे अर्धा ते दोन किलोमीटर आत,
तसेच समुद्रात दोन ते चार किलोमीटर आत असलेले "करळ" म्हणजे खडकासारखे घट्ट
झालेले वाळूचे अवशेष यावरून कोकण किनाऱ्याची अवस्था गेल्या चार हजार
वर्षांत किती बदलली असेल हे दिसते.'
कोकण प्रदेशात उत्खननांचा किवा
शोधकार्याचा अभाव असतानाही प्रस्तुत लेखकाला घारापुरी जवळील एलिफन्टा बुचर
बेटावर हातकुन्हाडी व रापीसारखी आदि-अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडल्याने
किमान एक ते दीड लाख वर्षांपूर्वीच्या" या प्रदेशातील मानवाच्या.
अस्तित्वाची कल्पना येते. त्याचप्रमाणे कोकणातील पाचाड व हातखंबे येथील
गुहांमध्ये सापडलेल्या काही गारगोटीच्या उपकरणांवरून " या प्रदेशातील वीस
ते चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या मध्य-पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सिध्द
होते.
उत्तर कोकण व लोहयुग : लोहाचे आगमन कोठून झाले व त्याचे मूळ स्थान
कोणते याबद्दल इतिहासकारांत एकमत नाही. काहींच्या मते लोहयुगाचे आगमन
उत्तरेकडून झाले, तर काहींच्या मते ते दक्षिणेकडून झाले असावे." साधारणपणे
इ. स. पूर्व १००० च्या अखेरीस
* ह. वि. मोटे (संपादक), व्यंबक शंकर शेजवलकर निवडक लेखसंग्रह, पृ. १९५०
कित्ता, पृ. १९६.
* आर. व्ही. जोशी, "स्टोन एज महाराष्ट्र," डॉन ऑफ सिव्हिलिझेशन इन महाराष्ट्र,
पृ. १४.
१० ह. धी. सांकलिया, महाराष्ट्र अश्मयुग ते लोहयुग, पृ. ४.
आर. व्ही. जोशी, पूर्वोक्त, पृ. १४.
१२ सांकलिया, पूर्वोक्त, पू. ११.
* एस. बी. देव, "आयर्न एज (मेगॅलीथिक) महाराष्ट्र," डॉन ऑफ सिव्हिलिझेशन इन महाराष्ट्र, पृ. १८.
९६
इतिहास
महाराष्ट्रात
पोहोचलेली लोहयुगीन संस्कृती इ. स. पूर्व १००० च्या प्रारंभी दक्षिणेत
स्थापित आली होती. दक्षिणेत केरळ, तामिळनाडू, आंध्र व कर्नाटक आणि
महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, पुणे व धुळे जिल्ह्यांत या
संस्कृतीचे शेकडो अवशेप, मोठमोठे दगड, सहा ते एकवीस मीटर व्यास असणाऱ्या
वर्तुळाकारात मांडून मधोमध पुरलेले मृतदेह लोखंडी तलवारी, खंजीर, शूल,
छिन्या, खिळे, कुन्हाडी, करवती, वाणांची टोके, भाले-बरच्यांची टोके, शेती
नांगरण्याची उपकरणे, उलथणी, पळधा, अंगठ्या याबरोबर तांबे व लोहाच्या पातळ
तुकड्यांचा साज घातलेला घोडा यासह पुरलेले आढळतात. काही सांगाड्यांबरोबर
तांबड्या-काळचा रंगाची गुळगुळीत चकाकी असलेली गुळगुळीत मातीची भांडी व
सोन्याच्या तारेने बनविलेली सुंदर व नाजूक कर्णभूषणेही सापडली आहेत. परंतु
चमत्कारिक गोष्ट म्हणजे उत्कृष्ट तंत्रज्ञ व धातुबिद्येत कुशल असणाऱ्या या
लोकांच्या स्थायी वसाहती कोठेच मागडत नाहीत. ते भटक्या वृत्तीचे असल्यामुळे
बहुतेक त्यांच्या वसाहतीचे अवशेष नसावेत. मृतांबरोबर पुरलेल्या अनेक
वस्तूंवरूनच त्यांच्या संस्कृतीची कल्पना येते.
धोडे व लोहाची हत्यारे व
उपकरणे वापरणारे हे लोक बहुधा भारताच्या पश्चिम किनाऱ्याने उत्तरेकडून
दक्षिणेत इ. स. पूर्व १००० च्या पूर्वी किंवा त्या शतकाच्या प्रारंभी
पोहचले. पुढे इ. स. पूर्व ८००-७०० च्या सुमारास ते खुप्कीच्या व्यापारी
मार्गाने महाराष्ट्रात आले, असे शास्त्रीय पध्दतीने अभ्यासिलेल्या
त्यांच्या दगडी वर्तुळाकार थडग्यांच्या काल-मानानुसार अनुमान करण्यास हरकत
नाही. हे लोक पश्चिमेकडील भूमध्य समुद्र (मेडिटेरियन) प्रांतातून आले
असावेत अशी शक्यताही नाकारता येत नाही." तथापि प्राचीन कुलावा (रायगड)
जिल्ह्यात हे लोक नेमके कधी पोहोचले याचा पुरावा उपलब्ध नाही.
लोखंडी
छिन्यांसारख्या उपकरणांच्या सहाय्याने सह्याद्रीच्या कुशीत कोरलेली भव्य
बौद्ध लेणी आजही तत्कालीन पाथरवट कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतात.
कान्हेरी, कुडा, महाड, चौल, कोल, पाले, ठाणाळे येथील बौद्ध लेणी लोहयुगीन
कारागिरीचीच साक्ष देतात. उत्तर कोकणातील ही बौद्ध लेणी इतर लेण्यांपेक्षा
उशिरा (इ. स. पहिल्या ते तिसन्या जतकापर्यंत) कोरली आहेत. " या काळापर्यंत
त्या कारागिरांची भटकीवृत्ती नाहीशी होऊन ते वसाहती करून राहू लागले. जेथे
जेथे लेणी कोरण्याचे काम करावे लागे तेथे तेथे अनेक वर्षे हे कारागीर
वसाहती करून राहू लागले. कारण एका बौद्ध लेण्याचे संपूर्ण खोदकाम व कोरीव
काम करण्यास अंदाजे ६० वर्षे लागत असावीत. अनेक बौद्ध भिक्षुकडून या पाथरवट
कारागिरांना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागल्यामुळे त्यांची आर्थिक
परिस्थिती सुधारली. पुढे त्यांच्याच पैकी काहींनी संपूर्ण लेण्याचे दान
दिल्याचे उल्लेख अनेक शिलालेखांत आढळतात. कुड्याच्या एका संपूर्ण लेण्याचे
दान कराडच्या एका लोहवाणियाने दिले, व कान्हेरीचे एक संपूर्ण वौद्ध लेणे
एका लोहाराने (कम्मार) दान दिल्याचे उल्लेख शिलालेखांत आढळतात.
लोहयुगीन
संस्कृतीबरोबर जसा लोखंडी हत्यार, बौद्ध लेणी व कला यांचा प्रसार झाला
तसाच भाजलेल्या विटांची घरे, खिळे ठोकून बसविलेली त्यावरील कौले, तटबंदीची
शहरे,
* कित्ता, पृ. १८-१९.
कित्ता, पृ. १९.
** विद्या देहेजिया, अर्ली बुद्धीस्ट रॉक टेम्पल्स्, पृ. १८५०
१० कित्ता, पृ. १३७, १४१-४२.
दर्यावर्दी व्यापार व बंदरे, नाण्यांचा वापर, लेखन कला, पाटा-वरवंटा, दळणाचे जाते ब कारागिरांचे संघही उदयास आले.
मौर्य,
सातवाहन व क्षत्रप उत्तर कोकणचा प्राचीन इतिहास म्हणजे प्रामुख्याने तेथील
बंदरे, खाड्या व देशी आणि विदेशी लोकांबरोबर होत असलेल्या व्यापारी व
सांस्कृतिक संबंधांचा इतिहास होय. ठाणे व सोपारा या प्राचीन बंदरांचा
व्यापार इजिप्त, बॅबिलोन व फिनिशिया या देशांशी इ. स. पूर्व २५०० ते ५०० या
काळात जलभागनि होत होता. इ. स. पूर्व १५०० ते १००० या काळात इजिप्तच्या
राजधानीतील डेअिरेल-बहरी नावाच्या मंदिरातील शिल्पकलेवरून इजिप्तने आपल्या
गलबतांतून आणलेल्या लुटीत हस्तिदंत, सोने, मौल्यवान रत्ने, चंदन व माकड अशा
अनेक भारतीय वस्तूंचा मोठ्या प्रमाणात समावेश होता." ओल्ड टेस्टमेंट या
पाश्चिमात्य प्राचीन धर्मग्रंथात सोलोमन राजाची गलबते ओफीर (उत्तर कोकणातील
सोपारा बंदर) येथे येऊन भारतीय साग, सोने, चांदी, हस्तिदंत, मौल्यवान
रत्ने, मोर व माकड यांची आयात करीत, असा उल्लेख सापडतो. बुद्धकालीन सोपारा
(सुप्पारक, सोफिर) बंदराचे व्यापारी संबंध पश्चिम आशियाशी असल्याचे उल्लेख
पाली भाषेतील ग्रंथांमध्ये सापडतात. "वावेरु" जातकात भडोच व सोपारा येथील
व्यापारी बॅबिलोनशी समुद्रमागनि व्यापार करीत होते असा उल्लेख आढळतो. काही
कालावधीनंतर इ. स. पूर्व ५०० ते इ. स. २५०, पर्यंत कल्याण, संजान, चौल,
महाड, पुरी, बालेयपट्टणसारख्या बंदरांतूनही पशिया, ग्रीस, अरेबिया, पेमेन व
इजिप्त या देशांबरोबर आयात-निर्यात होऊ लागली.
इ. स. पूर्व तिसन्या
शतकात अशोक मौर्याच्या कारकिर्दीत सोपारा हे मौर्य साम्राज्यातील एक मोठे
बंदर होते. तेथे सापडलेल्या अशोकाच्या शिलालेखात त्याने अपरान्तात (कोकणात)
बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता धर्ममहामात्र पाठविले असा उल्लेख आहे. इ. स.
चौथ्या व पाचव्या शतकांत लिहिलेल्या दीपवंस व महावंस या पाली ग्रंथांतही
अशोकाच्या देखरेखीखाली भरलेल्या पाटणा येथील तिसऱ्या बौद्ध महासंघाच्या
सभेत ठरल्याप्रमाणे योण (यवन) धम्मरक्खित नावाच्या बौद्ध भिक्षुला
धर्मप्रसाराकरिता अपरान्तात पाठविले असे वर्णन आहे. मौर्याच्या राजकीय
धोरणामुळे उत्तर कोकणात केवळ बौद्ध धर्मप्रसारच नव्हे तर व्यापारही मोठ्या
प्रमाणात सुधारल्याचे अनेक पुरावे सापडतात. अपरान्त व इतर प्रदेशांमध्ये
बौद्ध धर्म प्रचारासाठी निघालेले धर्मप्रसारक भिक्षु हे तत्कालीन व्यापारी
मार्गावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या व्यापारी तांड्याबरोबरच जात असावेत.
अशोकाच्या शिलालेखात सिरियाचा दूसरा अँटिओक, इजिप्तचा दुसरा टॉलेमी
फिलेडेल्फस, मेसो-डोनिआचा अँतिगोन, सिरिनचा मग आणि एपिरसचा (Corinth)
सिकंदर यांच्याकडे
* ठाणे गॅझेटिअर, १९८२, पृ. ४९.
** आर. के. मुकर्जी, हिस्टरी ऑफ इंडियन शिपिंग अॅड मॅरिटाईम अॅक्टिव्हिटी फ्रॉम दि अर्लोएस्ट, पृ. ६३.
२० आर. सी. मजुमदार (संपा.), एज ऑफ इंपिरिअल युनिटी, पृ. ६१२; एस. के. दास, इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ दि डेक्कन, पू. २३५-३६.
१२५ टी. डब्ल्यू. हीस डेव्हिडस, बुध्दिस्ट इंडिया, पृ. ११६; दास, पूर्वोक्त, पू. २३७.
२२ एच. जी. रॉलिन्सन, इन्टरकोर्स बिटवीन इंडिया अॅड वि वेस्टर्न वर्ल्ड, पृ. ७.
* रोमिला थापर, अशोक अँड दि डिक्लाईन ऑफ दि मौर्याज, पृ. १३०; ए हिस्टरी ऑफ इंडिया, पृ. ७३.
वाय ३५-७
९८
इतिहासपाठविलेले बौध्द भिक्षु कोकणातील विविध बंदरांतून जाणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबरच गेले अमावेत.
सागरामुळे उत्तर कोकणचा केवळ परदेशी व्यापार व तेथील नाविक हालचालीच वाढल्या अमे नाही तर प्राचीन रायगड जिल्ह्याच्या परिसरातील प्रदेश खुष्कीच्या मार्गानेही व्यापाराकरिता जोडले गेले. सोपारा, कल्याण, ठाणे, चौल, महाड, मांदाड, राजपुरी व घोडेगाव (गोरेगाव) ही बंदरे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जुन्नर, नासिक, पैठण यांसारख्या व्यापारी केंद्रांशी नाणेघाट, बोरघाट, शेरघाट व थळघाट या मार्गानीच नव्हे तर देवस्थळी, कुंभ व शेवटचा अशा अरुंद व अडचणीच्या घाटमागांनीही जोडली गेली.
अशोक मौर्याच्या काळात उत्तर कोकणात बौध्द धर्म प्रसार व बौध्दांच्या वसाहती आल्या व पुढे त्या वाढल्या हे तेथील अनेक बौध्द लेण्यांवरून स्पष्ट होते. कान्हेरी, कोंदिवटे (महाकाली), जोगेश्वरी, मंडपेश्वर, मगठाण, चौल, पाले, कोल व कुडा या ठिकाणच्या बौध्द लेण्यांवरून तेथे मोठ्या प्रमाणात बुध्दधर्मीयांच्या वसाहती होत्या हे सिध्द होते. महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणे उत्तर कोकणातील लेणीदेखील व्यापारी मार्गावर आढळतात. यावरून व्यापार व बौध्द लेणी ही एकमेकास पूरक व पोषक असल्याचे सिध्द होते. राजपुरी खाडीवरील प्रसिध्द प्राचीन मांदाड बंदराजवळ कुडा लेणी म्हणून प्रसिध्द असलेली इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून चौथ्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील सब्बीस लेणी आहेत. महाडजवळ पाले येथील इ. सनाच्या पहिल्या शतकातील लेणी आहेत. त्यांच्याजवळ कोल गावात त्याच काळातील अनेक लेणी आहेत. अलिबाग तालुक्यातील प्राचीन प्रसिध्द चौल बंदराजवळ इ. सनाच्या दुसऱ्या गतकातील दहा लेणी आहेत. महामुंबईतील कान्हेरी येथे इ. सनाच्या दुसऱ्या शतकातील १२८ लेणी आहेत. यावरून स्पष्ट होते की, प्राचीन उत्तर कोकणात बंदरांच्या सान्निध्यात असणाऱ्या व्यापारी केंद्रांजवळ बुध्दधर्मीयांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती होत्या."
चोर किवा हिंस्र पशंपासून व्यापाऱ्यांना किंवा त्यांच्या मालाला संरक्षण देऊन मदत्त केल्याबद्दल बौध्द भिक्षुना मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून देणग्या मिळणे स्वाभाविकच होते. अनेक लेण्यांतील शिलालेखांत अशा देणग्यांचे पुष्कळ उल्लेख सापडतात. श्रीमंत झालेले भिक्षुदेखील मोठ्या प्रमाणात मिळालेल्या देणग्या व्यापारात गुंतवीत किंवा गरजू व्यापाऱ्यांना व लोकांना व्याजाने देत असावेत. परंतु कालांतराने अनेक राजकीय उलाढाली झाल्या, बाड्या गाळाने भरून अनेक प्राचीन बंदरे निरुपयोगी झाली व बौध्द वसाहतीही उजाड पडल्या.
** देहेजिया, पूर्वोक्त, पू. ३०.
कित्ता.
* डी. डी. कोसंबी, "धेनुकाकट," जर्नल ऑफ दि एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे, खंड ३०, पृ. ५१-५२.
** उदाहरणार्थ आज चौलजवळील पाण्याची खोली सहा फेंदम म्हणजे ३० फूट आहे. परंतु पूर्वी ही खोली पंधरा ते वीस फेंदम म्हणजे ९० ते १२० फूट होती : आर. बी. अशोक, "पोर्तुगीज ट्रेड इन इंडिया अॅड इटस इम्पॅक्ट ऑन चौल १५०९-१५२०,' एस. आर. राव (संपा.), मरीन आर्किऑलॉजी ऑफ इंडियन ओशन कंट्रीज : प्रोसिडिग्ज ऑफ दि फर्स्ट इंडियन कॉन्फरन्स, ऑक्टो. १९८७, पृ. १०९.
प्राचीन काळ
९९
ठाणे,
सोपारा, कल्याण, डहाणू, भाईंदर (वसई), चौल, मांदाड, म्हसळा, पाले, अंतोरे,
महाड, घोडेगाव (गोरेगाव), राजपुरी इत्यादी प्राचीन बंदरांचे इजिप्त,
अरबस्तान, इराण, ग्रीम वगैरे देशांबरोबर व्यापारी मंबंध होते अशी माहिती
प्राचीन फारमी व ग्रीक ग्रंथांत मोठ्या प्रमाणात सापडते.**
भारताचे
मौर्य व इजिप्तचे टॉलेमी या राजघराण्यांचे एकमेकांशी सलोन्याचे परराष्ट्रीय
धोरण व राजदूत पातळीवरील संबंध यामुळेच या दोन्ही देशांमधील व्यापार
नियमितपणे वृद्धिगत होत गेला. इ. सनाच्या दुसऱ्या शतकातील अथेनिअस नावाच्या
ययन अलंकार मास्त्रज्ञाने टॉलेमी दुसरा फिलेडेल्पस (इ. स. पूर्व २८५-२४७)
याच्या मिरवणुकीत भारतीय महिला, मसाले व पशू यांचा समावेश असल्याचे वर्णन
केले आहे. यावन्न इ. म. पूर्व तिसऱ्या शतकातील भारताचे इजिप्तशी असलेले
व्यापारी संबंध दिसून वेलान. टॉलमीच्या माहितीवरून पश्चिमेकडील यवन लोकांना
भारताच्या पश्चिम किनाऱ्याची इतर कोणत्याही भागापेक्षा अधिक माहिती होती
हे स्पष्ट दिसते. चौल बंदरान येणाव्या यवन व्यापाऱ्यांकडून भरपूर माहिती
मिळवून टॉलेमीने भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे 'सुराष्ट्रेने' (सौराष्ट्र
म्हणजे कच्छ, काठेवाड व उत्तर गुजरात), 'लारिके' (लाट देण म्हणजे दक्षिण
गुजरात), 'आरियेके' (मराठा देश), आणि 'दामुरिके' (दामिल म्हणजे तामिळ देश)
असे वर्णन केले आहे. आरियेकेचे त्याने 'आरियेके' (मुंबई-दख्खन), 'मदन
आरियेके' (उत्तर कोकण) व 'पिराते आरियेके' (दक्षिण कोकण) असे स्पष्टीकरण
केले आहे." यावरून टॉलेमीस 'कोकण' हे नाव अपरिचित असावे. टॉलेमीच्या
जिऑग्रॅफी ग्रंथामध्ये नवसारी, गोरे, दुगाड, भाईंदर, चौल, पाले व घोडेगाव
या प्राचीन बंदरांतून परदेशी माल आयात होत असे आणि कल्याण, सोपारा व चौल ही
व्यापारी शहरे होती असेही वर्णन केले आहे. यावरून भारताचा पश्चिम किनारा
परदेशी व्यापाऱ्यांना फार महत्त्वाचा होता हे उघड होते. ग्रीस व
अरबस्तानातील काही व्यापाऱ्यांनी आपले कायमचे वास्तव्य सोपारा व ठाणे येथे
केल्याचा उल्लेखही सदरहू ग्रंथात आढळतो. कान्हेरी व इतर लेण्यांतील
यवनांच्या देणग्यांचे उल्लेख स्थानिक यवनांचे अस्तित्व दर्शवितात." परंतु
या सर्व माहितीबरोबर टॉलेमीच्या मते चौल ते मंगलोरपर्यंतचा किनारी प्रदेश
हा चाचेगिरीचा फार मोठा धोकादायक प्रदेश होता. इजिप्तकडून येणाऱ्या
व्यापारी गलबतांना या उपद्रवाच्या बंदोबस्तासाठी धनुर्धारी सैनिकांची एक
तुकडी बरोबर आणावी लागे. टॉलेमीच्या या विधानाला पेरिप्लसने पुष्टी दिली
आहे."
सुरुवातीचा व्यापार आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याहून, तांबडा
समुद्र, एडन, अरेबिया, अलेक्झांड्रिया, पशियाचे आखात, ओमान व खंबायतचे आखात
या मागनि किनाऱ्या किनाऱ्याने
१८ (१) यवन भूगोलशास्त्रज्ञ स्ट्रेंबो
(इ. स. पू. ५४ ते इ. स. २१) लिखित जिऑग्रॅफी, (२) प्लिनी (इ. स. २३-७८)
लिखित नॅचरल हिस्टरी, (३) एका खलाशाने लिहिलेले इ. स. पहिल्या शतकातील दि
पेरिप्लस ऑफ दि एरिधियन सी. (४) ज्योतिष व खगोलशास्त्रज्ञ यवन क्लॉडिअस
टॉलेमी (इ. स. १३५-१५०)
लिखित जिऑग्रॅफी.
**रॉलिन्सन, पूर्वोक्त, पृ. ९३-९४.
** पाध्ये, हेमाद्रि ऊर्फ हेमाडपंत यांचे चरित्र पृ. २२५.
" आकिऑलॉजिकल सव्र्व्हे ऑफ बेस्टर्न इंडिया, खंड ४, पृ. ९०-९३, ११८; इंडियन कल्चर, खंड १, पृ. ३४८.
२२ ए. बोस, सोशल अॅण्ड रूरल इकॉनॉमी ऑफ नॉर्वर्न इंडिया, खंड २. पू. ३१६.
१००
इतिहास
फार
मंदगतीने होत असे. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील दुसऱ्या सोतेर टॉलेमीचा
शिक्षक आगाथाकिडेस याच्या सांगण्याप्रमाणे जरी अनेक भारतीय व्यापारी एडनला
नियमित भेट देत असत तरी इजिप्तबरोबर होणाऱ्या व्यापारामुळे अरब देशांनाच
भरपूर आर्थिक लाभहोत असे. पेरिप्लस अनुसारही भारतीय खलाशी व व्यापाऱ्यांचे
प्रतिनिधी अरेविया व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर आढळत असत. तांबड्या
समुद्राकडील भारतीयांचे वर्चस्व कमी करण्यासाठी किंवा नाहीसे करण्यासाठी
अरब व्यापारी नेहमीच प्रयत्नशील असत." परंतु अशा परिस्थितीतही सोपारा,
कल्याण, चौल, मांदाड, पाले, राजपुरी या प्राचीन बंदरांतून तांदूळ, लोणी,
तिळाचे तेल, साधे व तलम सुती कापड व साखर या भारतीय वस्तूंची निर्यात
इजिप्तकडे केली जात असे. "
या परिस्थितीत इ. स. पूर्व पहिले ते इ. म. चे
पहिले शतक या काळात मोठ्या प्रमाणात बदल झाला असे वर्णन स्ट्रॅवो व प्लिनी
यांच्या लेखनात सापडते. इ. स. पूर्व ३१ ते इ. स. १४ मध्ये इजिप्त रोमन
साम्राज्यात विलीन झाले. सम्राट ऑगस्टसने चाचेगिरीला आळा घातला व व्यापारी
मार्ग सुरक्षित बनविले. हिप्पॅलस या रोमन नाविकाने नैऋत्य मोसमी वाऱ्याचा
शोध इ. स. ४७ मध्ये लावला. स्वाभाविकच रोमहून भारताला किनाऱ्या किनाऱ्याने
येणाऱ्या जहाजांच्या दीर्घकालीन जलप्रवासाला पूर्णविराम मिळाला, व या दोन
देशांचा आपसातील थेट दर्यावर्दी व्यापार सुरू झाला. या व्यापारी हालचालीत
अरव देशांना वगळले गेले. प्लिनी आपल्या नॅचरल हिस्टरी मध्ये लिहितो की
'हिप्पॅलस' बारा (नैऋत्य वारे) जर व्यवस्थित असला तर इजिप्त ते भारत या
जलप्रवासास अवघे ४० दिवस लागत असत. साहजिकच स्ट्रॅबोने वर्णन केल्याप्रमाणे
जेथे पूर्वी सबंध इजिप्तमधून अवधी २० व्यापारी गलबते वर्षाकाठी भारताकडे
येत असत, त्याऐवजी आता फक्त मियो होर्मो या एकाच बंदरातून १२० व्यापारी
गलबते भारताच्या दिशेने दरवर्षी येताना दिसत असत.
रोम साम्राज्याकडून
भारतीय चैनीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. भारतीय आर्थिक
परिस्थितीत झपाट्याने बदल होऊ लागला. प्लिनीच्या मते भारतीय खनिज पदार्थ व
मौल्यवान रत्ने ही जगात सर्वोत्तम गणली जात होती. सूर्यकांतमणी, शिव-धातू,
माणिक, क्षीरस्फटिक, रत्ने, हिरे, याकूत यांची मागणी रोम साम्राज्यात वाढत
होती, व राजकुटुंब, राजदरवारातील श्रीमंत व विलासी स्त्रिया यांच्या
चैनीच्या गरजाही वाढत होत्या. साग, सुवासिक वनस्पती, सुंठ, मिरी, तिळाचे
तेल, साखर, धूप, जिरे, जनावरांची कातडी, सुगंधी मलम व द्रव्ये, रेशीम,
हस्तिदंत, वैडूर्यमणी, इंद्रनील, हिरे, मोती आदि वस्तू भारतातून रोमला
निर्यात केल्या जात असत आणि मद्य, पोवळे, काच, सोन्या-चांदीच्या वस्तू,
तांबे, कथील, शिसे इत्यादी वस्तूंची आयात रोमकडून केली जात असे. सुंठ, मिरी
व रेशमी कापड वजनाबर विकून त्यांची किमत सोन्यात घेतली जाई. याचा परिणाम,
प्लिनी लिहितो, " शंभर पटीने मालाची किंमत घेऊन भारत आमच्या
* एस. के.
दास, दि इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ एन्शंट इंडिया, पृ. १९८; जी. एफ. हौरानी, अरब
सीफेरिंग इन दि इंडियन ओशन इन एन्शंट अॅण्ड अलों मिडीव्हल टाईम्स, पृ. २१.
* आर. इ. एम. व्हीलर, रोम बियॉन्ड इम्पीरिअल फ्राँटिअर, पृ. १६१.
** जी. एल. अध्या, अर्को इंडियन इकॉनॉमिक्स, पृ. १४१.
* एस. के. दास, पूर्वोक्त, पू. २१६; ई. एच. वॉर्मिग्टन, कॉमर्स बिटवीन रोमन एम्पायर अॅण्ड इंडिया, पृ. ११२.
प्राचीन काळ
१०१
साम्राज्यास
वर्षाकाठी ऐंशी लाख रुपयांपर्यंत लुबाडित असे." तो पुढे लिहितो, " इतक्या
महागाईने आम्ही आमच्या चैनीकरिता व आमच्या विलासी स्त्रियांकरिता मोल देत
असू." २०
मौर्य साम्राज्यानंतर व्यापाराकरिता लागणारी राजकीय स्थिरता व
शांतता सातवाहन काळात असल्याचा पुरावा म्हणजे त्या काळातील (इ. स. पूर्व
२२५ ते इ. स. २२५) पश्चिम किनाऱ्याच्या व्यापारी मार्गावरील शेकडो बौद्ध
लेणी होत. राज्यातील स्थानिक व परदेशी व्यापारावर आपले राजकीय वर्चस्व व
संपन्नता बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे या जाणिवेनेच सातवाहनांनी त्यांच्या
पैठण राजधानीपासून जुन्नरपर्यंत व पुढे नाणेघाटातून कल्याण बंदरापर्यंत
व्यापारी मार्ग तयार केला. नाणेघाटातील एका गुहेत सातवाहन घराण्याचा
संस्थापक सिमुक व त्याचा पुत्र पहिला सातकर्णी यांच्या पूर्ण आकाराच्या
कोरीव प्रतिमा व त्यांची नावे दिसतात. यावरून नाणेघाटाचे महत्त्व त्यांना
निश्चितच उमगले असावे. याशिवाय त्यांनी बोर बाटातील अरुंद मार्गाने चौल
बंदराशी आपले व्यापारी संबंध निर्माण केले. या संदर्भात चौल ही स्थानिक पेठ
एकदम व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्धीस आल्याचा उल्लेख टॉलेमीने केला आहे.
कल्याण, चौल आणि सोपारा या सातवाहनकालीन बंदरांचे विपुल संदर्भ पेरिप्लस व
टॉलेमीने दिले आहेत. कालांतराने क्षत्रप नृपतींनीही बंदरांचे महत्त्व जाणून
ती हस्तगत केली. सातवाहन आणि क्षत्रपांचा प्रदीर्घ संघर्ष हा केवळ राजकीय
संघर्ष नव्हता. व्यापारी मार्ग आणि आंतरराष्ट्रीय बंदरे आपल्या
वर्चस्वाखाली ठेवण्यासाठीच दोघांचेही अखंड प्रयत्न होते. पश्चिम
किनाऱ्यावरील अनेक बौद्ध लेण्यांतील क्षत्रप व सातवाहनांचे शिलालेख याची
साक्ष देतात.
ऐतिहासिक दृष्ट्या प्राचीन रायगड जिल्ह्याचे पहिले ज्ञात
राज्यकर्ते सातवाहनच होत. इ. स. पूर्व पहिल्या शतकातील कलिंगाच्या खारवेल
राजाच्या हाथिगुंफा येथील शिलालेखावरून सातवाहन वंशातील तिसरा राजा पहिला
सातकर्णी याचे साम्राज्य उत्तर कोकण व काठेवाडच्या विशाल प्रदेशावर पसरले
होते हे सिद्ध होते. परंतु कालांतराने काही काळ सातवाहनांच्या सत्तेला
ओहोटी लागली व त्यांना दख्खनचा पश्चिम भाग गमवावा लागला. उत्तर कोकणचा भाग
एका सातकर्णी राजाने गमावला होता असा उल्लेख पेरिप्लस मध्ये आहे. तो
पहिल्या सातकर्णीबाबतचाच (सातवाहनांचा तिसरा) होय.
क्षत्रपांच्या
क्षहरात व कार्दमक अशा दोन शाखा होत्या. पहिल्या शाखेचे भूमक (इ. स.
१०५-११०) व नहपान (इ. स. ११०-१२४) असे दोनच राजे होते व दुसऱ्या शाखेचे २७
राजे होते. क्षत्रपांची सत्ता जरी प्रामुख्याने सौराष्ट्र व माळवा प्रदेशात
होती तरी पेरिप्लस अनुसार व नासिक आणि कान्हेरी येथील शिलालेखांवरून
त्यांची सत्ता काही काळ तरी सोपारा बंदर व पश्चिम महाराष्ट्राच्या काही
भागावर होती असे दिसते. त्यांची बहुतेक नाणी गुजरातमध्ये सापडली आहेत.
परंतु त्यांचा कुषाण सम्राटाशी कशा प्रकारचा राजकीय संबंध होता याचा बोध
होत नाही. नहपान हा कुषाण साम्राज्याच्या नैऋत्य भागाचा राजप्रतिनिधी होता.
त्याच्या नाण्यांवरील 'राजन' या उल्लेखावरून तो स्वतंत्वरीत्या सत्ता
गाजवीत होता हे सिद्ध होते. जोगलटेंबी येथे सापडलेल्या नहपानाच्या १३,२७०
रुपेरी नाण्यांपैकी ९,२७० नाण्यांवर गौतमीपुत्र सातकर्णीचे सांकेतिक चिन्ह
१० कित्ता, पृ. २०६-०७.
** वॉमिग्टन, पूर्वोक्त, पृ. ११२.
* पेरिप्लस मध्ये नहपानाचा उल्लेख 'नंबॅनस' असा केला आहे.
१०२
इतिहास
असल्यामुळे
क्षहरात राजा नहपानाचा पराजय गौतमीपुत्रानेच केला हे स्पष्ट होते. नासिक
येथील शिलालेखात त्याची आई गौतमी बलश्री हिने आपल्या पुत्त्राचे प्रशंसापर
उल्लेख 'क्षहातबंगनिवेशक", 'शकयवन पल्हव निबूदन' म्हणजे क्षहात कुलाचा
विध्वंसक, शक यवन व पल्हव यांचा नाशकर्ता असे केले आहेत. यावरून
दक्षिणेकडील कृष्णा नदीपासून उत्तरेकडील मालब व काठेवाडपर्यंत आणि
पूर्वेकडील वन्हाडपासून पश्चिमेकडे कोकण-पर्यंतच्या संपूर्ण प्रदेशावर
गौतमीपुत्र राज्य करीत होता असे दिसते.
नासिकच्या नहपानाच्या शिलालेखात
भरुकच्छ, दशपुर, गोवर्धन व सोपरिग (सोपारा) येथे विश्रांतिगृहे बांधल्याचा
उल्लेख सापडतो. त्याच्या इच्छेनुसार अनेक नद्यांच्या काठी होड्यांची सोय व
विश्रांतिगृहांत पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे वर्णन आहे. यावरून
सातवाहनांना देखील व्यापारी मार्ग व परदेशी व्यापार यांचे विलक्षण महत्त्व
पटले होते, व त्यासाठीच त्यांनी क्षहरातांशी युध्द केले. आपल्या सत्तेखालील
साम्राज्य व त्याचा उत्कर्ष या बावतीत त्यांचा परदेशाशी होणारा व्यापारच
फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता याची सातवाहनांना निश्चित जाणीव होती.
नहपानाचा जावई उपबदात यानेही सोपारा येथे चौकोनी विश्रांतिगृहाचे दान दिले असा नासिकच्या लेण्यात उल्लेख आहे.
इ.
रा. पहिल्या शतकातील सातवाहन राजा हाल (इ. स. २०-२४) याने संकलित केलेला
माहाराष्ट्री प्राकृत भाषेतील सातशे ओवींचा गाथासप्तशती हा काव्यसंग्रह
सातवाहनांकडून माहाराष्ट्री प्राकृत भाषेला मिळालेला एक अमोल ठेवा असून
महाराष्ट्राच्या मानवी जीवनाचे यथार्थ व मोहक वर्णन करणारे एक ऐतिहासिक
साधन आहे. मराठी भापेची माता असणाऱ्या माहाराष्ट्री प्राकृत भाषेत
लिहिलेल्या या काव्यसंग्रहात स्वतः हालाने ४४ पद्यांची रचना केली. पद्य ७८०
मध्ये जहाजाच्या शिडावरील पक्षी (प्राचीन पाली ग्रंथांतील 'दिशाकाळ')
आकाशात उंच उडून कोठेही भूप्रदेश न दिसल्याने परत जहाजाच्या गिडावर येऊन
बसतो असे वर्णन केले आहे. हे वर्णन त्या काळातील दूरच्या प्रदेशांशी होत
असणारा सागरी व्यापार व इतर नाविक हालचाली यांचा उत्तम पुरावा आहे. पद्य
क्रमांक ६७९ मध्ये किनाऱ्यावरील हिवाळी मध्यान्हाबाबत लिहिताना आकाशातील
पांढरे ढग जणू काय मिठाचे मोठे ढीग दिसतात असे वर्णन केले आहे. पद्य ३०८
मध्ये बौध्द वसाहतीतील लांब झगे घातलेल्या व गुडघे टेकून बुध्दाच्या पायाशी
प्रार्थना करणाऱ्या बौध्द भिक्षुचे चित्त रेखाटले आहे. बौध्द भिक्षु आणि
हिंदू पुरोहित यांचा डोंगीपणाही उघडकीस आणला आहे. होळी व गुडीपाडवा हे
लोकप्रिय सण वणिले आहेत. बैलजोडीसह शेताकडे जाणाऱ्या नांगरधारी
शेतकऱ्याच्या प्रणयकथेची माहिती दिली आहे. यावरून हे काव्य सातवाहनकालीन
माहाराष्ट्री प्राकृत भाषा बोलणाऱ्या कोकण किनाऱ्यावरील लोकांच्या
समाजजीवनाचे वर्णन तर करतेच, शिवाय परंपरागत जनजीवनही दर्शविते.
गौतमीपुत्र
सातकर्णीने इ. स. ८६ ते ११० पर्यंत राज्य केले. अंदाजे इ. स. १०० मध्ये
त्याने नहपानाचा पराभव केला. नहपानाने इ. स. ५४ ते इ. स. १०० पर्यंत राज्य
केले. मत्स्य व ब्रह्मांड पुराणांत गौतमीपुत्र सातकर्णीनंतर पुलुमावी,
शिवश्री सातकर्णी, शिवस्कंद सातकर्णी व यज्ञश्री सातकर्णी हे एकामागून एक
राज्यावर आले असे वर्णन आहे. पुलुमावी
देहेजिया, पूर्वोक्त, पू. २९.
प्राचीन काळ
१०३
हा
चष्टनाचा (क्षत्रपांच्या कार्दमक शाखेचा राजा) समकालीन होता असे टॉलेमी
लिहितो. त्याने इ. स. ११० ते १३८ पर्यंत राज्य केले. त्यानंतर इ. स. १३८ ते
१४५ दरम्यान वासिष्ठीपुत्र सातकर्णी याने राज्यकारभार चालविला.
कान्हेरीच्या एका शिलालेखात वासिष्ठीपुत्राच्या राणीने ती कार्दमकबंशीय
महाक्षत्रप रुद्रदामनची सुपुत्री होती असे वर्णन केले आहे. म्हणजे
बासिष्ठीपुत्र सातकर्णी हा रुद्रदामन्चा जावई होता असे स्पष्ट होते. परंतु
कच्छकडून एकडून येणाऱ्या रुद्रदामन्च्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात
(इ. स. १५०) त्याने दख्खनचा अधिपती सातकर्णी याचा दोनदा पराभव केला असा
उल्लेख सापडतो. तथापि त्याबरोबरच 'संबंधाविदूरतया' म्हणजे फार दूरच्या
नसलेल्या नात्यामुळे, त्याचा (सातकर्णीचा) संपूर्ण नाश केला नाही असाही
उल्लेख आहे.
गिरनारच्या शिलालेखात रुद्रदामन् यास 'महाक्षत्त्रप' असे
संबोधिले आहे. तो उदार मनाचा होता. न्याय्य जकात व खंडणी बसुलीमुळे
द्रव्यसंचय, सोने, चांदी, हिरे, मौल्यवान रत्ने आदि वस्तूंच्या संग्रहाने
त्याचा खजिना नेहमीच भरलेला असे अशीही माहिती त्या लेखात मिळते. रुद्रदामन्
महाक्षत्रपाच्या कन्येशी सातवाहन राजाचा विवाह होतो याचे थोडे आश्चर्य
वाटते, कारण आर्य धर्म, यज्ञ, चातुर्वर्ण्य या बाबतचा अभिमान व ब्रह्मणांना
दान यांची सातवाहन नेहमीच फुशारकी मारीत असत.
प्राचीन रायगडचा शेवटचा
प्रभावी सातवाहन राजा म्हणजे यज्ञश्री होय. बायुपुराणातील माहितीप्रमाणे
त्याने २९ वर्षे (इ. स. १५२-१८१) राज्य केले. अनेक ठिकाणी सापडलेल्या
त्याच्या शिलालेखांवरून व नाण्यांवरून त्याच्या विस्तीर्ण साम्राज्याची
कल्पना येते. त्याचे शिलालेख नासिक, कान्हेरी व चिन्न येथे आणि नाणी
गुजरात, सौराष्ट्र, उत्तर कोकण, अकोला, चंद्रपूर आणि कृष्णा-गोदावरी
प्रदेशात सापडली आहेत. यज्ञश्रीच्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षातील नासिक
शिलालेख आणि कान्हेरीच्या दोन लेखांपैकी एक शिलालेख आणि कृष्णा
जिल्ह्यातील चिन्न येथील एक शिलालेख त्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या
वर्षातील आहेत. नासिकच्या शिलालेखावरून अपरान्त प्रदेश यज्ञश्रीच्या
ताब्यात होता. त्यापूर्वी तो प्रदेश गिरनारच्या वास्तुलेखात
उल्लेखिल्याप्रमाणे रुद्रदामन्च्या ताब्यात होता. साहजिकच यज्ञश्रीचे
साम्राज्य अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. यामुळे
सागरी व्यापारात मोठी बाढ झाली होती. दोन शिडांचे जहाज असे चिन्ह असणारी
यज्ञश्रीची अनेक नाणी देखील याच काळातील असावीत. यावरून व्यापारी जहाजांचा व
लढाऊ गलवतांचा उपयोग सागरी व्यापार सुरक्षित ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणात
केला जात होता हे स्पष्ट होते.
यज्ञश्रीनंतर सातवाहनांच्या आपसातील
मतभेदांमुळे किंवा स्वार्थामुळे छोट्या छोट्या प्रदेशांवर सत्ता
गाजविणाऱ्या त्यांच्या अनेक शाखा तयार झाल्या व शेवटी सातबाहनांचे
साम्राज्य इ. स. २२५ च्या आसपास संपुष्टात आले. (काही इतिहासकारांच्या मते
हा काळ इ. स. २३० होता) पुराण ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञश्रीनंतर
विजय सातकर्णी, चंद्रश्री सातकर्णी व पुलुमाबी हे एकामागून एक गोदाबरी
प्रदेशात सत्ताधीण झाले. अकोला जिल्ह्यात सापडलेल्या कुंभ सातकर्णी, कृष्ण
सातकर्णी व शक सातकर्णी यांच्या नाण्यांवरून हे तेथे राज्य करीत होते हे
सिध्द होते. यांचा उल्लेख मात्र पुराण ग्रंथांत सापडत नाही."
" गोपालाचारी (संपा.), ए कॉम्प्रीहेन्सिव हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २, पृ. ३२३.
१२ जी. इ. सेन, दि पॅजन्ट ऑफ इंडियाज हिस्टरी, पृ. १७८.
** देहेजिया, पूर्वोक्त, पृ. २९.
१०४
इतिहास
राजपुरी
खाडीवरील मांदाड (टॉलेमीचे 'मंदागार' व वेरिप्लसचे 'मंदागोर') बंदराजवळील
कुडा लेण्यांतील शिलालेखांत सातवाहनांचे प्रतिनिधी 'सामंत', 'महाभोज' आणि
'महारथी' यांचे उल्लेख आहेत. यावरून सातवाहनांची उत्तर कोकणची सत्ता विलय
पावत होती है स्पष्ट होते. मांदाड गाव स्थानिक राजाचे प्रशासकीय केंद्र
होते असे दिसते. महाड जवळील पाले लेण्यांत देखील सातवाहनांच्या काणभोज
वंशीय मांडलिकाचा उल्लेख सापडतो."
सातवाहनांचा काल मानवी प्रयत्नाने
प्रत्येक क्षेत्रात केलेल्या अपूर्व प्रगतीचे उत्तम उदाहरण होय. शेती
उत्पादन, बौद्ध लेणी, बिबिध कारागिरांचे, व्यापाऱ्यांचे व धंदेवाईकांचे
संघ, शहरांना तटबंदी व परदेशी व्यापार यांची झपाट्याने वाढ झाली. रोमन
साम्राज्याशी होणाऱ्या व्यापारामुळे हस्तिदन्त, लाकूड, कातडी, औषधी
वनस्पती, सुगंधी द्रव्ये, मलमली कापड व मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होऊ
लागली, तर मद्य, चांदी, संगीत वाद्ये, काच आणि राजदरवारी गाणारी मुले-मुली
यांची आयात होऊ लागली.
बँकूटक : नाणी व लेख यावरून इन्द्रदत्त,
दन्हसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन या पाच राजांची माहिती मिळते.
बुलडाणा जिल्ह्यातील दहिगावला सापडलेल्या चांदीच्या ३६ नाण्यांपैकी २६
पश्चिम क्षत्रपांची आणि दहा नाणी दन्हसेनाची आहेत. सातारा जिल्ह्यातील
कन्हाडला सापडलेल्या नाणेसाठघात देखील एक नाणे त्रैकूटकांचे आहे. १९५३ साली
हैद्राबादेतील मास्की येथील उत्खननातही त्रैकूटकांची नाणी सापडली.
प्रत्यक्षात इन्द्रदत्ताची नाणी नाहीत. दन्हसेन व व्याघ्रसेन या दोघांचीच
नाणी सापडतात. तथापि इन्द्रदत्ताचा उल्लेख त्याचा पुत्र दन्हसेन याच्या
नाण्यावर सापडतो. दन्हसेनाच्या नाण्याच्या दर्शनी भागावर त्याच्या
अर्धचित्त्राबरोबर इन्द्रदत्ताचा उल्लेख असून मागील बाजूस तीन थरी टेकडी
असे चिन्ह आहे. वैकूटकांची नाणी म्हणजे पश्चिम क्षत्रपांच्या नाण्यांची
हुबेहुब प्रतिकृती होती. त्यांचा आकार, बजन, कसव, ब्राह्मी लिपीतील
मुद्रांकित अक्षरांची पद्धती, राजाचे अर्धचित्र व त्याच्या पित्याचे नाव ही
सर्व क्षत्रप नाण्यांची नक्कल होती.
इन्द्रदत्ताची नाणी किंवा लेख
उपलब्ध नाहीत. शेजवलकरांच्या मते 'चतुर्भाणांतील अपरान्ताधिपति
इन्द्रवर्मा' म्हणजे हा इन्द्रदत्तच होय. आणि भाणांतील वर्णनावरून 'कोकणचा
राजा इन्द्रदत्त हा काव्यगायन, नृत्य इत्यादी शास्त्रे जाणणारा', 'विट
लोकात सुप्रसिद्ध' व 'नाचणाऱ्या हत्तीवर बसून वेश्येच्या अंगणात प्रवेश
करणारा' असा होता. 'कोकणचा राजा झिम्मा खेळतो' या लोकगीतातील झिम्मा
खेळणारा राजा म्हणजे हाच इन्द्रदत्त होय असे शेजवलकर लिहितात. दहसेनाच्या
नाण्यावर २०७ व व्याघ्रसेनाच्या नाण्यावर २४१ असे आकडे आहेत. परंतु निश्चित
कालगणना दिली नसल्यामुळे
कित्ता, प. २९.
पी. एल. गुप्ता, "बेरिंग ऑफ दहिगाव होर्ड ऑन त्रैकूटक हिस्टरी", न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, ३, पृ. ४५.
जगदीश गांधी, "अन्युज्वल वेस्टर्न क्षत्रप अॅण्ड लैकूटक कॉइन्स", न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, १, पृ. २३.
** ह. वि. मोटे (संपा.), व्यंबक शंकर शेजवलकर निवडक लेखसंग्रह, पृ. २००-०१.
प्राचीन काळ
१०५
त्रैकूटकांच्या
तारखेबद्दल मतभेद आहेत." दहिगावला सापडलेल्या दन्हसेनाच्या नाण्यांवरून
त्याने विदर्भावर राज्य केले व वाकाटक नरेन्द्रसेनाचा पराजय केला हे डॉ.
मिराशींचे अनुमान" शास्त्री व गुप्ता यांच्या मते चुकीचे आहे.
त्रैकूटकांच्या
नाण्यांवरोवर त्यांचे ताम्रपट लेखही सापडले आहेत. दन्हसेनाचा पार्टी येथील
२०७ चा ताम्रपट लेख, व्याघ्रसेनाचा सुरत येथील २४१ चा लेख, निनावी
वैकूट-काचा कान्हेरी येथील २४५ चा, मध्यमसेनाचा माटवणचा (मालवणचा नव्हे)
२५६ मधील आणि विक्रमसेनाचा माटवणचा २८४ मधील लेख यांचा उल्लेख मिराशीनी
केला आहे. परंतु मिराशींच्या मते विक्रमसेनाचा लेख नकली असून तो कलचुरी
विक्रमसेनाचा आहे, त्रैकूटकांचा नव्हे." तथापि तो लेख बनावट नसून वैकूटक
विक्रमसेनाला काही राजकीय कारणामुळे कलचुरींनी दत्तक घेतल्याने त्याचा
उल्लेख तो सैकूटक असूनही कलचुरी म्हणून केला गेला असे डॉ. पी. एल.
गुप्तांचे मत आहे.
त्रैकूटकांच्या नाण्यांवर व लेखांवर निश्चित कालगणन।
नावानिशी न दिल्यामुळे लेखकों-मध्ये मतभेद झाले व त्यामुळे काहींनी
आभीर-कलचुरी-चेदी (इ. स. २५०) कालगणना स्वीकारली तर इतर काहींनी क्षत्रप-शक
(इ. स. ७८) स्वीकारली." परंतु कान्हेरीचा २४५ चा, आणि रत्नागिरीतील दापोली
तालुक्यातील माटवण गावात सापडलेले २५६ व २८४ चे लेख कलचुरी संवत कालाशी
संबंधित आहेत. माटवणच्या शिवस्वामी ब्राह्मणास मध्यमसेन व विक्रमसेन
यांजकडून ग्रामदान दिल्याचा उल्लेख या लेखांत आहे. यावरून या प्रदेशावर
लैकूटकांचे अधिराज्य होते असे दिसते. दोन्ही दानपत्रे अनिरुद्धपुर या
राजधानीतूनच देण्यात आली होती.
दन्हसेनाने अश्वमेध यज्ञ केला असे वर्णन
सुरतच्या दक्षिणेस ८० कि. मी. वर असलेल्या पार्डी येथील ताम्रपटात सापडते.
यावरून तो बलशाली राजा होता असे अनुमान करता
मिराशींच्या मते वैकूटकांनी
आभीर-कलचूरी कालगणना (इ. स. २५०) स्वीकारली ("दि वैकूटक डेट",
न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, ५, पृ. २५-३९; तर गुप्तांच्या मते त्यांनी शक
कालगणना (इ. स. ७८) स्वीकारली ("बेरिंग ऑफ दहिगाव होर्ड ऑन दि वैकूटक
हिस्टरी", न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, ३, पृ. ४४-४६.
** जे. एन. एस. आय., ३५, पृ. ११८-२२, न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, ३, पृ. ४-६.
न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, १, पृ. २५-२८, व ३, पृ. ४२.
** मिराशी, "ईरा इन दि डेट्स ऑफ दि त्रिकूटक इन्स्क्रिप्शनस", न्यूमिस्मेंटिक डायजेस्ट, ९, पृ. ७२.
५२
गुप्ता, "दि डेट ऑफ दि वैकूटकाज", न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, ६, पृ. ४८-४९.
गुप्तांचा निर्णय चुकीचा आहे हे दाखविण्यासाठी मिराशींनी दिलेले कारण
आधुनिक ऐतिहासिक निर्णय संशोधन पद्धतीला पोषक नाही. मिराशींच्या मते
गुप्तांचा निर्णय मान्य केला तर महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात यांची अनेक
विद्वानांनी अतिकष्टाने व काळजी-पूर्वक केलेली व अनेक वर्षे स्वीकारलेली
कालक्रमानुसार माहिती गोंधळात पडेल. (मिराशी, पूर्वोक्त, पृ. ७४).
गुप्ता,
पूर्वोक्त, न्यूमिस्मेंटिक डायजेस्ट, ६, पृ. ५१-५३, तळटीप ६०; बी. डी.
चट्टोपाध्याय, न्यूमिस्पॅटिक क्रॉनिकल, ९, पृ. २९१-९९; चट्टोपाध्याय,
कॉइन्स अॅन्ड करन्सी सिस्टिम इन साऊथ इंडिया, पू. २२.
५५ देव, पूर्वोक्त, पृ. ३००.
१०६
इतिहास
येते."
या ताम्रपटावरून पार्डी गाव त्याकाळी उत्तर कोकणात समाविष्ट असावे किंवा
तसे नसल्यास उत्तरेकडील लाट देशात असून दक्षिण गुजरातबरही कोकणच्या या
राजाचे राज्य असावे व तो खरोखरीच अपरान्ताधिपती म्हणजे सर्व पश्चिम किनार
प्रदेशाबा राजा होता हे स्पष्ट दिसते."
दन्हमेनाचा पुत्र व्याघ्रनसन हा
सुरतच्या त्याच्या २४१ च्या दानपत्रात अपरान्त व अन्य प्रदेशांचा
मत्ताश्रीश होता आणि आपल्या पित्याप्रमाणे वैष्णव होता असा उल्लेख सापडतो.
कान्हंगरीला सापडलेल्या २४५ च्या ताम्रपटात कान्हेरीच्या महाविहाराजवळ एक
चैत्य उभारल्याची माहिती आहे. हा ताम्रपट व्याघ्रसेनाचा असावा असे या
ताम्रपटातील लेखनातून दिसते. सन २४५ हे वर्ष त्रैकूटकांच्या सत्तेचा
कालदृष्ट्या उच्च बिंदू असावा.
लेम्ख व नाणी यावरून वैकूटकांची
राज्यसत्ता दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकण यामधील प्रदेशावर होती. उत्तर
कोकणच्या त्रिकूट या ठिकाणचे मूळ रहिवासी म्हणून वैकूटक असे नाव त्यांच्या
वंशाला मिळाले असे काही तज्ञांचे मत आहे." लाट (गुजरात) मधील त्रिकूट हेच
वैकूटकांचे मूळ स्थान आहे असे इतर विद्वानांनी सूचित केले आहे." देवांच्या
मते नासिकच्या पश्चिमेस असलेला डोंगरी भाग म्हणजे त्रिकूट होय." मध्यमसेन
आणि विक्रमसेन यांच्यानंतर इतर वैकूटांबद्दल काहीच माहिती मिळत नाही. परंतु
कलचुरी व गुर्जर यांच्या हल्ल्यामुळे व मौर्य राजांच्या उदयामुळे
त्रैकूटकांची राज्यसत्ता हळूहळू संगुष्टात आली असावी.
कलचुरी: कलचुरी हे
मूळचे जबलपूर जवळील त्रिपुरीचे रहिवासी. ते खरे उत्तरेकडील प्रतीहारांचे
मांडलिक होते. पण स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार
पश्चिम महाराष्ट्रात केला. कृष्णराज, त्याचा पुत्र शंकरगण व नातू बुध्दराज
हे तीन कलचुरी राजे त्यांच्या लेखांवरून व नाण्यांवरून प्रकाशात येतात.
नंदीचे चित्र व 'परममाहेश्वर कृष्णराज' अशी अक्षरे असलेली कृष्णराजाची
चांदीची नाणी नासिक जिल्ह्यात व उत्तर कोकणातील मुंबई, साष्टी व घारापुरी
(एलिफन्टा) बेटावर सापडली आहेत. यावरून कृष्णराज नानिकसह मुंबईच्या आसपास
मोठ्या प्रदेशावर राज्य करीत होता असे दिसते. तो पशुपतिमहेश्वराचा शिवभक्त
होता हेही स्पष्ट दिसते.
रायगडचे मौर्य मौर्य सुकेतूवर्मन याने इ. स.
चौथ्या शतकाच्या अखेरीस उत्तर कोकणात आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले,
त्यामुळे यानंतरच्या काळातील मीर्य शासक "कोकणचे मौर्य" किंवा "उत्तरकालीन
मौर्य" या नावाने इतिहासात ओळखले जातात.
मौर्य सुकेतूवर्मन याचा णके ३२२
(इ. स. ४००) मधील एक शिलालेख ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे सापडला आहे. या
शिलालेखातील सुकेतूवर्मनचे वर्णन "भोजानाम् मौर्य धर्ममहाराज" (भोजांचा
मौर्य धर्ममहाराज) असे करण्यात आले आहे. त्यामुळे काही
आर. सी. मजुमदार (संपा.), दि क्लासिकल एज, ३. पू. १९३.
" मोटे, पूर्वोक्त, पृ. २०१.
** मजुमदार (संपा.), दि क्लासिकल एज, ३, पृ. १९३.
* कित्ता, पृ. १९२; मोटे, पूर्वोक्त, पृ. २०२.
** गुप्ता, "दि डेट ऑफ दि त्रैकूटकाज", न्यूमिस्मॅटिक डायजेस्ट, ६, पृ. ४६.
१० देव, पूर्वोक्त, पृ. २४-२५; नासिक गॅझेटिअर, १९७५, पू. ५३.
प्राचीन काळ
१०७
इतिहासकारांनी
सुकेतूवर्मन हा मौर्य नमून भोज राजवंशातील होता, असे मत मांडले आहे."
परंतु काही संशोधकांनी "भोजानाम मीर्य धर्ममहाराज" असे वाचन करुन
सुकेतूवर्मन हा मौर्य वंशातील असून भोज हे त्याच्या मातेचे कुल असल्याचे
प्रतिपादन केले आहे. इसवीच्या चौथ्या शतकात गोवा आणि कर्नाटकच्या
सीमाप्रांतात भोजवंशाचे राज्य असून मौर्य हे त्यांचे उत्तरेकडील शेजारी
असल्यामुळे या दोन राजवंणाग गरीरसंबंध झाल्याचे संभवते. वैवाहिक संबंधामुळे
मुकेतूवर्मनला कोकणातील आपल्या राज्यस्थापनेत भोजांचे सक्रिय सहाय्य लाभले
असावे व त्यामुळे आपल्या कोरीव लेखात सुकेतूवर्मन याने मौर्य या आपल्या
वंशनागाबरोबर भोज या नावाचाही आवर्जुन उल्लेख केला असे दिसते." यावरून
सुकेतूवर्मन हा मौर्य वंशीय होता है स्पष्ट होते.
बाडा
शिलालेखाव्यतिरिक्त सुकेतूवर्मनच्या बाबतीत दुसरा कुठलाही ऐतिहासिक पुरावा
उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्या कारकिदींविषयी इतर माहिती नाही. परंतु
इसबीच्या चौथ्या शतकाच्या अखेरीस त्याने स्थापन केलेले कोकणातील मौयांचे
राज्य ७ व्या गतकाच्या प्रारंभापर्यंत अस्तित्वात असल्याची माहिती बदामीचा
चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याच्या इ. स. ६३४-६३५ मधील ऐहोळे
शिलालेखावरुन मिळते. पूर्वीचे सातवाहन आणि नंतरचे शिलाहार
यांच्याव्यतिरिक्त एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत कोकणबर मार्याशिवाय दुसऱ्या
कुठल्याही राजवंशाची सत्ता टिकली नाही. अशा राज्याचा संस्थापक म्हणून
सुकेतूवर्मनचे कोकणच्या मौर्याच्या इतिहासातील स्थान निश्चितच महत्त्वाचे
आहे.
सुकेतूवर्मनच्या उत्तराधिकान्यांतील चंद्रवर्मन या महत्त्वाच्या
शासकाची माहिती गोव्यात उपलब्ध झालेल्या शिवपुर किंवा गोवा ताम्रपटावरून
प्रकाशात आली. या ताम्रपटाचे प्रथम संपादक मो. ग. दीक्षित यांच्या वाचनात
"मौर्य" हे बंगनाम आले नव्हते व त्यामुळे त्यांनी चंद्रवर्मन हा गोव्यातील
कदंब राजवंशातील असावा असे मत व्यक्त केले होते. परंतु नंतरच्या संशोधकांनी
त्या ताम्रपटातील मौर्य हे वंशनाम बानल्यामुळे चंद्रवर्मन हा कोकणच्या
मौर्य राजवंशातील होता हे निश्चित झाले." लेखतलिपीच्या आधारे तो इ. स.
सहाव्या शतकाच्या प्रथमार्धात होऊन गेला असावा. त्या काळच्या
भोज-कदंबांच्या संघर्षात मौर्यानी भोजांना मदत केल्यामुळे गोवा-कारवार
प्रांत त्यांना आपल्या ताब्यात ठेवता आला व कदंबांच्या भीतीने भोजांनी
मौयांचे आधिपत्य स्वीकारले असे या दोन्ही राजवंशांच्या कोरीव लेखांवरून
दिसते.
अशाप्रकारे चंद्रवर्मनच्या काळात उत्तरेस महाराष्ट्र-गुजरात
सीमेवरील संजान (बलसाड जिल्हा) पासून दक्षिणेस कारवारपर्यतचा संपूर्ण
पश्चिम किनारा मायर्याच्या राज्यात समाविष्ट होता असे दिसते. त्यापैकी
महाराष्ट्रातील कोकणकिनारा मोर्याच्या
* पी. आर. श्रीनिवासन, जर्नल ऑफ इंडियन हिस्टरी, खंड ५७-५८, पृ. ४०.
६२ के. व्ही. रमेश, इषिग्राफिया इंडिका, खंड ४०, पृ. ५१-५४.
" हरिहर ठोसर, "कोकणचे मौर्य". संशोधक, सप्टेंबर-डिसेंबर १९८८. पू. ८.
इविग्राफिया इंडिका, खंड ६. पू. १-१२.
एम. जी. दीक्षित, न्यू इंडियन अॅटिक्वरी, खंड ४, पृ. १८१-८४.
** जी. एस. गै, इंडियन हिस्टॉरिकल क्वार्टरली, खंड ३७, पू. २४०-४२.
१० डी. सी. सरकार, दि सक्सेसर्स ऑफ दि सातवाहनाज इन दि लोअर डेक्कन, पृ. २५५-६००
१०८
इतिहास
प्रत्यक्ष नियंत्रणाखाली अगून गोवा-कारवार भागात भोजांचे शासन असून त्यावर मौयांचे नियंत्रण असावे.
मौर्याची
राजधानी पुरी म्हणजे मुंबई जवळील घारापुरी तथा एलिफंटा होय. बदामीच्या
चालुक्यांच्या आणि शिलाहारांच्या कोरीव लेखांत तिचे चंद्रपुरी किंवा
चंद्रपुर असे वर्णन आढळते. पुरीला अनेक राजवटीतील प्रमुख व्यवतींच्या
नावावरून विविध पूर्वपदे लावण्यात आली होती. चंद्र हे पूर्वपद चंद्रवर्मन
मौर्याच्या नावावरून लावले गेले असावे." कोरीव लेखाशिवाय आठव्या-नवव्या
शतकांतील अरब प्रवाशांच्या वृत्तांतातही चंद्रपुर म्हणजे कोकणातील एक अतिशय
प्रगत बंदर आणि व्यापारी पेठ म्हणून नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या
पुरुकेणीच्या ऐहोळे शिलालेखात "अपरजलधेर्लक्ष्मी" (पश्चिम सागरातील
लक्ष्मी) असे पुरीचे वर्णन करण्यात आले आहे.
बदामीच्या चालुक्यांच्या
कोरीव लेखातील वर्णनावरून पहिला कीर्तिवर्मन (इ. स. ५६७ ते ५९७), मंगलेश
(इ. स. ५९८ ते ६१०) आणि दुसरा पुलकेशी (इ. स. ६११ ते ६४२) अशा तीन
पिढद्यांतील राजांती मौर्याचे राज्य जिकण्याचा प्रयत्न केला असे सिद्ध
होते. शेवटी दुसन्या पुलकेशीला मौर्यसत्ता नामशेष करण्यात यश आले ही माहिती
त्याच्या इ. स. ६३४-६३५ मधील ऐहोळे शिलालेखावरून मिळते. यावरून
चालुक्य-मौर्य संघर्ष जवळजवळ अर्धशतक चालू होता हे स्पष्ट होते.
ऐहोळे
शिलालेखात चालुक्य कीर्तिवर्मन पहिला याचे वर्णन "मौर्याना काळरात्री समान"
असे केले आहे. यावरून त्याने मौर्याच्या राज्यावर आक्रमण करून त्यांचा
प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट होते. कीर्तिवर्मनचा
उत्तराधिकारी चालुक्य मंगलेश याने मौर्याच्या विरुद्धची मोहीम अधिक प्रखर
केली. कोकण प्रदेश सागरी असल्यामुळे मंगलेशाने आरमारावर अधिक भर दिला.
रेवतीद्वीप (चील-मुरुड-जंजिरा प्रदेश) जिकण्यासाठी मंगलेशाने सैन्य
पाठविण्यासाठी नौका सेतू बांधल्याचे वर्णन चालुक्याच्या शिलालेखात आढळते.
या मोहिमेत मंगलेशास यश लाभले. रेवतीद्वीपासह चार प्रांतांबर त्याने आपला
अंमल बसविला आणि या नवीन जिंकलेल्या प्रदेशाच्या प्रशासनासाठी ध्रुवराज
इंद्रवर्मन बप्पूर या आपल्या नातेवाईकाची नियुक्ती केल्याची माहिती
इंद्रवर्मनच्या गोवा ताम्रपटावरून मिळते." यावरून मंगलेशाने गोव्यापासून
चौल-मुरुड-जंजिऱ्यापर्यंतचा कोकणचा प्रदेश अंकित केला हे स्पष्ट होते.
त्यामुळे मौर्याच्या ताब्यात रायगड जिल्ह्याचा उर्वरित भाग आणि ठाणे-मुंबई
एवढाच प्रदेश उरला.
इ. स. ६३४-६३५ मधील ऐहोळे शिलालेखातील वर्णनावरून
कोकण विजयाचे अपूर्ण राहिलेले काम दुसऱ्या पुलकेशीने पूर्ण केले हे स्पष्ट
होते. पुरी आणि भोवतालचा प्रदेश जिंकण्यासाठी त्याने शेकडो युद्धनौकांचा
उपयोग केला आणि शेवटी मौर्याच्या या राज-धानीवर आपला ध्वज फडकावला अशी
माहिती ऐहोळे शिलालेखात आढळते.
पुलकेशीचा समकालीन मौर्य राजा कोण होता
याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु पुलकेशीचा भाऊ चालुक्य बुद्धवर्ष
याच्या संजान ताम्रपटातील वर्णनावरून तो
" ठोसर, "कोकणचे मौर्य, संशोधक, पूर्वोक्त, पृ. ४६-४८.
* जी. एस. गै, इपिग्राफिया इंडिका, खंड ३३, पृ. २९३-९६.
७० के. व्ही. रमेश, चालुक्याज ऑफ वातापी, पृ. ६५-८४.
७५ कित्ता.
प्राचीन काळ
१०९
मौर्यांचा
उत्तर कोकणचा प्रांताधिकारी असून पिनुक (पेण) येथे त्याचे मुख्यालय होते
असे दिसते. प्रस्तुतः ताम्रपटातील दान दिलेली गावेही त्याच परिसरातील होती.
बुद्धवर्ष हा पुलकेशीचा भाऊ असल्यामुळे ऐहोळे शिलालेखात दणिलेल्या
पुरीविजयानंतरच ही नेमणूक झाली असावी हे उघड आहे व पुलकेशीच्या
मौर्याविरुद्धच्या मोहिमेत बुद्धवर्षाचा सहभाग होता हे ओघाने आलेच.
संजान
ताम्रपटात बुद्धवर्षाची जी प्रशस्ती देण्यात आली आहे त्या संदर्भात त्याने
"अचल्यनगण" नामक शत्रूच्या चार सुळे असलेल्या हत्तींना ठार केल्याचे वर्णन
आले आहे. ताम्रपटाचे संपादक स्टेन कोनो यांनी "अचल्यनगण" म्हणजे "अचल्यायन
नामक शत्रूची आघाडी" असा अर्थ लावला आहे. पण याचा काहीच अर्थबोध होत नाही व
हे बहुधा बुद्धवर्षाने पराभूत केलेल्या शत्रूचे "अच्युतगण" असे नाव असले
पाहिजे व ताम्रपट कोरणाऱ्याने चुकीने "अचल्यनगण" असे कोरले असल्याची शक्यता
नाकारता येत नाही असे हरिहर ठोसर यांचे मत आहे." यावरून अच्युतगण हा
पुलकेशी आणि बुद्धवर्याने पराभूत केलेला शेवटचा मौर्य राजा होता असा
निष्कर्ष निघतो.
इ. स. ४०० मधील सुकेतूवर्मन मौर्याच्या वाडा शिलालेखात
वाटक (वाडा) येथे राजाचा तलबार सिहदत्त याने कोटेश्वर, वसिष्ठेश्वर आणि
सिद्धेश्वर इत्यादी देवालये बांधल्याची नोंद आहे. प्रस्तृत शिलालेखात
ब्रह्मा, विष्णु आणि हर (शिव) या देवांचाही उल्लेख आहे. देवालयाच्या
परिसरात तटाक म्हणजे तलाबही बांधले होते व या देवालयांच्या
नित्यपूजाअर्चेसाठी वाडा परिसरातील भूमी दान देण्यात आली होती. हिंदू
देवालये बांधल्याचा दक्षिणेतील हा सर्वात प्राचीन पुराभिलेखीय पुरावा
असल्यामुळे भारतीय स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने त्याचे फार महत्त्व आहे.
वाडा येथे आजही तलाबाचे अवशेष आहेत, परंतु एकाही मंदिराचे अवशेष सापडत
नाहीत. कोल, कुडा, महाड, पाले ब कान्हेरी येथील काही विहार आणि चैत्य
मौर्याच्या काळात कोरले गेले असावेत.
चालुक्य : चालुक्यांची राजवट
कोकणात पोहोचायला बराच अवधी लागला. चालुक्यांचा सर्वात अधिक प्रभावशाली
राजा दुसरा पुलकेशी (इ. स. ६१०-६४२) याने बस्तरचे नल, कोकणचे मौर्य,
कर्नाटकचे कदंव व महिष्मतीचे कलचुरी यांचा पराभव करून आपली राज्यसत्ता
विस्तारली. दुसन्या पुलकेशीपूर्वीही चालुक्य कीर्तिवर्मा (इ. स. ५६६-५९८)
याने कोकणच्या मीर्याशी लढा दिला होता, परंतु कोकणात त्याला पाय रोवता आले
नाहीत. दुसऱ्या पुलकेशीच्या इ. स. ६३४ च्या मेगुती देवालयातील शिलालेखातही
उत्तर कोकणावर मौर्याचे साम्राज्य सर्वाधिष्ठित राहिले होते असा उल्लेख
सापडतो. साहजिकच तदनंतर दुसऱ्या पुलकेशीने आपली सर्व शक्ती पणाला लावून व
शेकडो युद्धनौकांचे आरमार वापरून मौर्यांचा पराभव केला व त्यांची राजधानी
पुरी (बारापुरी) जिंकून घेतली," असा ऐहोळे प्रशस्ति व कवठे दानपत्रात
उल्लेख आहे. नल, मौर्य आणि कदंब यांचा विनाशकर्ता असे शूर चालुक्य
कीर्तिवर्मा याबाबत मेगुती लेखात गौरवोद्गार असले तरी त्याने फक्त
कदंवांचाच पराभव केला असावा, मौर्याचा नव्हे. कीर्तिवर्माने जर मौर्याचा
पराभव केला असता तर इ. स. ६२०-२५ मध्ये आपल्या
** स्टेन कोनो, इपिग्राफिया इंडिका, खंड १४, पृ. १४४.
** ठोसर, "कोकणचे मौर्य, संशोधक, पूर्वोक्त, पृ. १५०
कार्ल खंडाळवाला, "रॉक-कट टेंपल्स", महाराष्ट्र, पृ. २१९-२००
११०
इतिहास
राज्यसत्तेच्या
शिखरावर असणाऱ्या मौर्याना लष्करी आणि नाविक शक्तीनिशी जिकण्याचे दुसऱ्या
पुलकेशीला कारणच उरले नसते. ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील लेखात मौर्य
मुनेतुवर्मा हा कोकणचा राजा असल्याचा उल्लेख आहे." चालुक्य सम्राट दुसरा
पुलकेशी देखील म्हणतो की, आपला सेनापती चंडदंड याने मौर्यांना या
प्रदेशातून घालवून लावले." या माहितीवरून भौयांचे उत्तर कोकणचे राज्य इ.
सनाच्या सातव्या शतकापर्यंत अबाधित होते असे दिसते.
घारापुरी, जोगेश्वरी
आणि मंडपेश्वर येथील कोरीव शिवमंदिरे उत्तर कोकणचे मौर्यराजे पाशुपत होते
हे सिध्द करतात. अशा वैभवशाली कोरीव कलाकृतींचे प्रतीक इतरव प्राचीन भारतात
सापडत नाही.
धारापुरीजवळील मोरा बंदर आणि उत्तर कोकणातील मोरे हे नाव देखील या प्रदेशावरील मौर्याची प्राचीन सत्ता सुचित करतात.
मौर्याची
राजधानी पूरी असल्याचे मान्य केले तरी पुरी, म्हणजे घारापुरी, राजपुरी,
मंगलपुरी (भागठाण), सोपारा, कल्याण, ठाणे, चौल यापैकी कोणते ठिकाण होते हे
सप्रमाण सिध्द होऊ शकलेले नाही. तसेच कलचुरी राजांची या प्रदेशातील सत्ता
याबाबतही निश्चितपणे सांगता येत नाही. दुसरा पुलकेशी (चालुक्य) हा येथील
बलवान सम्राट होऊन गेला असे मानावे लागेल. जोगेश्वरीचे व घारापुरीचे गुंफा
मंदिर मौर्याचे कां कलचुरींचे याबाबतही इतिहासकारांचे एकमत नाही.
नाशिक
जिल्ह्यातील त्रिबक जवळील अंजनेरी येथील ताम्रपटात चालुक्य
विक्रमादित्याच्या आधिपत्याखाली पुरीकोकण येथे राज्य करणारा हरिश्चंद्र
वंशीय राजा भोगशक्ती याचा उल्लेख आहे. देवांच्या मते हा ताम्रपट अंदाजे इ.
स. च्या आठव्या शतकाच्या प्रथमार्धातील असावा व पुरीकोकण हे घारापुरी किंवा
राजपुरी असावे." विक्रमादित्याचा पुत्र दुसरा कीर्तिवर्मा याच्या
कारकिदींत अनेक प्रांताधिकारी मांडलिकांच्या उत्कर्षामुळे उत्तर कोकणात
मोठा गोंधळ निर्माण झाला. त्याचा फायदा घेऊन इ. सनाच्या सुमारे आठव्या
शतकाच्या मध्यावर चालुक्यांच्या अनेक मांडलिकांपैकी राष्ट्रकूटांनी त्यांचा
पराभव केला. राष्ट्रकूट दन्तिदुर्ग याने चालुक्यांचे राजकीय वर्चस्व नष्ट
केले व राष्ट्रकूट सत्तेची स्थापना केली.
राष्ट्रकूट : ठाणे, पुणे,
कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आदि ठिकाणी सापडलेल्या ताम्रपटांवरून
दन्तिदुर्गाचे उत्तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य
असल्याचे दिसते. दन्तिदुर्गानंतर त्याचा चुलता कृष्ण (प्रथम) गादीवर आला
(इ. स. ७५६), कारण दन्तिदुर्गाला पुत्र नव्हता. पश्चिम चालुक्यांचा संपूर्ण
नाश केल्यानंतर त्याने म्हैसूर नजीकच्या गंग राजाचा व पूर्वेकडील
बेंगीच्या चालुक्याचाही पराभव केला. शिलाहार रट्ट राजाच्या रत्नागिरी
जिल्ह्यातील खारेपाटण येथील ताम्रपटात शिलाहार सणफुल्ल यास
पंडित भगवानलालजींच्या मते हा लेख मौर्य राजा सुकेतुवर्मनचा असावा.
महाराष्ट्र स्टेट गॅझेटिअर हिस्टरी एन्शन्ट पिरिअड, १९६७, पृ. १४१.
" आर्किऑलॉजिकल समरी, ३, पृ. २६.
देव, पूर्वोक्त, पृ. ३७-३८.
७८ कित्ता, पृ. ३७.
प्राचीन काळ
१११
सह्य
(सह्याद्री पर्वत) व समुद्र यामधील प्रदेश कृष्ण राजाच्या कृपेने मिळाला,"
असे वर्णन केले आहे. यावरून कृष्ण (प्रथम) ची सत्ता संपूर्ण कोकणबर होती
असे दिसते. पुणे जिल्ह्यातील त्याच्या दोन ताम्रपटांत ब्राह्मणांना काही
गावे दान दिल्याचा उल्लेख आहे." यावरून त्याची या प्रदेशावरील सत्ता सिध्द
होते.
अनेक ताम्रपटांवरून गोविंद (तृतीय) हा राष्ट्रकूटांचा सर्वांत
बलशाली राजा होता हे स्पष्ट होते. संजान ताम्रपटात प्रतीहार नृपती नागभट्ट,
कोशल देशाचा पांडुवंशी चंद्रगुप्त, पाल घराण्यातील राजा धर्मपाल, कनोजचा
नृपती चक्रायुध आणि मारशिव यांचा त्याने पराभव करून त्यांना जिंकले असा
उल्लेख आहे. इ. स. ८१४ मध्ये गोविद (तृतीय) मृत्यू पावला. त्यानंतर त्याचा
पुन अमोघवर्ष (प्रथम) गादीवर बसला. त्याची दीर्घ कारकीर्द (इ. स. ८१४-८८०)
जैन धर्म, बौध्द धर्म, शांतता आणि वाङमय निर्मिती यास प्रोत्साहन देण्यात
यशस्वी ठरली. कान्हेरीच्या इ. स. ८४३-८४४ मधील अमोध-वर्षाच्या शिलाहार
मांडलिक पुल्लशक्तीच्या लेखात पुल्लशक्तीचा अमात्य विष्णुगुप्त याने
कान्हेरी येथील आचार्य संघातील भिक्षुच्या वस्त्राकरिता ५ द्रम्म,
विहाराच्या दुरुस्ती-करिता ३ द्रम्म, भिक्षुच्या पुस्तकांकरिता १ द्रम्म व
भगवान बुध्दाला प्रसन्न करण्यासाठी २० द्रम्म, अणा या २९ द्रम्मांच्या
व्याजाकरिता त्याने ४०, ४० आणि १२० द्रम्मांची कायम स्वरूपाची ठेव ठेवली."
कान्हेरी येथील अमोघवर्याच्या इ. स. ८५४ च्या दुमच्या लेखात त्याचा शिलाहार
मांडलिक कपर्दी (कर्पादन) याने गौड प्रदेशातून आलेल्या गोमिन् अधिघ्नाकर
नावाच्या व्यक्तीस ध्यान धारणेसाठी योग्य असे दालन कान्हेरी डोंगरावर
बांधून दिल्याचा व भिधुंना वस्त्रे पुरविण्यासाठी १०० द्रम्मांची कायम
देणगी दिल्याचा उल्लेख केला आहे. बरील कान्हेरीच्या दोन्ही लेखात
अमोघवर्षाचा मांडलिक शिलाहार कपर्दी हा कोकणचा अधिपती असल्याचे दर्शविले
आहे.
संजान येथील अमोघवर्षाच्या इ. स. ८७१ च्या ताम्रपटात संजान जवळील
२४ खेडयांच्या गटातील झरिवल्लिका (झरोली) हे गाव चार ब्राह्मणांना दान दिले
असे नमूद केले आहे." परंतु या लेखातील महत्त्वाची माहिती म्हणजे बरील शासन
मान्यश्वेट (राष्ट्रकूटांची राजधानी असलेले कर्नाटकातील मालखेड) येथील
राजाज्ञेने दिले गेले. यावरून कर्नाटकच्या काही भागापासून दक्षिण कोकणसह
उत्तर कोकणपर्यंत संपूर्ण प्रदेशावर अमोघवर्षाचे राज्य असावे.
ठाणे
जिल्ह्यातील चिचणी येथील इन्द्र (तृतीय) याच्या इ. स. ९२६ च्या ताम्रपटात
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कृष्णराज (द्वितीय) म्हणजे इन्द्र
(तृतीय) याचा पिता, याने मधुमति सुगतिप नावाच्या अरब ताजिक जातीच्या
मांडलिकास संपूर्ण संजान मंडलाचा अधिकारी नेमले होते. इन्द्र (तृतीय)
यानेही ती व्यवस्था पुढे चालू ठेविली."
** एपिग्राफिया इंडिका, ३, पृ. २९२; देव, पूर्वोक्त, पृ. १३२-३३.
देव, पूर्वोक्त, पृ. १८२-८३, २४९-५००
* कित्ता, पृ. ३४०.
८२ कित्ता, पृ. ६७.
* कित्ता.
* कित्ता, पृ. ३४०.
८५ कित्ता, पृ. १४८-१४९०
११२
इतिहास
या
अरब मांडलिक राजाने इन्द्राची परवानगी घेऊन संजान मंडलातील काणाडुक खेडे व
देवीहार खेडद्यातील अर्थाधुर विध्याचा विसावा भाग जमीन दशमी देवीला
नैवैद्य व पंच-गौडीय महापरिषदेशी निगडित असलेल्या नऊ व्यक्तींना भोजन
देण्यासाठी दान दिल्याचेही त्या ताम्रपटात लिहिले आहे. यावरून तिसऱ्या
इन्द्राची राज्यसत्ता उत्तर कोकणावर होती हे तर स्पष्ट होतेच, शिवाय
त्याच्या कारकिर्दीत संजान येथे अरवांचे वर्चस्व होते हेही स्पष्ट होते.
गौडवासी लोकांनाही या भागात बराच आश्रय दिला जात असावा.
उत्तर कोकणबर
राज्य करणारा शेवटचा पराक्रमी राष्ट्रकूट नृपती म्हणजे कृष्णराज (तृतीय)
होय. कन्हाड येथील ताम्रपट, कोल्हापूर येथील ताम्रपट व वर्धा जिल्ह्यातील
देवळीचा ताम्रपट यांत कृष्णराजाने पराभूत केलेले दंतिग, बप्पुग, गंग वंशीय
रच्छ्यामल्ल, चोळ राजादित्य आणि पल्लव अण्णिग या राजांचा उल्लेख केला आहे.
यावरून उत्तर आणि दक्षिण भारतातील शत्रूविरुद्ध आक्रमण करण्याची
कृष्णराजाची झेप किती मोठी होती हे स्पष्ट दिसते. दक्षिणेत रामेश्वरपर्यंत
त्याने आपली सत्ता पसरवली व उत्तरेत माळवा व बुंदेलखंडापर्यंत राज्यविस्तार
केला. परंतु राष्ट्रकूट व कनौजचे प्रतीहार यामधील दीर्घ झुंज दोघांनाही
आत्मघातकी ठरली. इ. स. ९१६ मध्ये कनौजला भेट देणारा अरब प्रवासी अल-मसूदी
त्याच्या प्रवासवर्णनात लिहितो की, कनौजचा राजा आणि दख्खनचा नृपती हे जणू
काय नैसर्गिक शत्रूच होते. दीर्घकालीन युद्धामुळे व अरबांच्या विरोधामुळे
पश्चिम भारतात त्या दोघांच्याही मांडलिकांचे वर्चस्व वाढले. प्रतीहारांचे
मांडलिक कलचुरी हे जबलपूरजवळील विपुरीला सत्ताधीश झाले, आणि राष्ट्रकूटांचे
चालुक्य मांडलिक दख्खनचे राज्यकर्ते झाले. उत्तर-चालुक्य नृपती तैल
(द्वितीय) याने राष्ट्रकूट कर्क (तृतीय) याचा पराभव करून इ. स. ९७५ च्या
सुमारास चालुक्य राजवंश पुन्हा स्थापित केला व राष्ट्रकूटांची सत्ता
संपुष्टात आणली.
सुलैमान (इ. स. ८१५), अबु झैद (९१६), अल-मसूदी (९१५)
आणि इवन हौकल (९४३-६८) यांसारख्या अरब लेखकांनी कोकणातील व्यापारी अरब
लोकवस्तीची बरीच माहिती दिली आहे. अल-मसूदी कोकण किनारी आला असताना फक्त
सैमूर (चौल) येथे १०,००० वयसिर (म्हणजे आंतरजातीय विवाहातून जन्मलेले मिश्र
किंवा नापाक मुसलमान) व सिराफ, ओमान, बसरा आणि बगदाद येथील अनेक व्यापारी
राहत होते असे तो लिहितो. संजान (सिदान) बद्दल लिहिताना देखील ते एक
उत्कृष्ट बंदर असून तेथून खंबायत (कंबाया), सोपारा (सुबर) आणि चौल (सैमूर)
या बंदरांशी नियमितपणे व्यापार चालत असल्याचे तो वर्णन करतो. या व्यापारी
शहरांत अनेक जातींचे कारागीर, शिल्पी वगैरे राहत होते, व सागरी आणि
खुष्कीच्या व्यापारी मार्गावरील हालचालीवर सावधगिरीने टेहळणी करण्यास चार
हजार उंच बुरुज (ट्रंग) होते, असा उल्लेख त्या अरब लेखकाने केला आहे."
राष्ट्रकूटांच्या
अखेरच्या काळातील उत्तर कोकणच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रमुख लक्षण म्हणजे
पौराणिक हिंदू धर्माची वाढ, हे अनेक ताम्रपटांतील उल्लेखांवरून लक्षात
येते. हिंदू प्रार्थना स्थळांना मंदिर किवा मठ-मटिका, आणि बौद्ध
धर्मकेन्द्रांना आश्रम वा विहार म्हणत
4 कित्ता.
कित्ता, पृ. ५६, ११८ व १९६.
एपिग्राफिया इंडिका, ३२, पृ. ५२, ७४.
प्राचीन काळ
११३
असत.
तेथील रहिवाशांच्या अन्न, वस्त्र वगैरे भौतिक गरजा पुरविण्यासाठी बलशाली
राजे, श्रीमंत व्यापारी व कारागीर हे देवावरील श्रध्देमुळे व कायम
स्वरूपाच्या ताम्रपटांतील आपल्या प्रसिध्दीसाठी नेहमीच उत्सुक होते. या
दानांची कायमची सनद किवा करार यांच् नोंद अधिकाऱ्यांच्या शिक्कामोर्तबासह
लवकरात लवकर मिळविण्यासाठी तत्परतेने धडपडत असणारे उपाध्याय-आचार्य यांचे
उल्लेखही ताम्रपटांद्वारे ज्ञात होतात. देणग्यांमध्ये व्यापान्यांचा फार
मोठा वाटा होता हे संजान व चिचणी येथील ताम्रपटांवरून स्पष्ट होते. उत्तर
कोकणच्या राज्यकारभारात व व्यापारात अरबांचा हस्तक्षेप राष्ट्रकूट नृपती व
कोकणातील व्यापाऱ्यांनाही लाभदायक होता. अरव प्रांताधिकारी व मुसलमान
व्यापारी यांचा संजानच्या देवीमठाशी असलेल्या संबंधावरून तेथील समाजाच्या
बऱ्याच अंगावर प्रकाश पडतो. स्थानिक कोकणवासीयांशी होणाऱ्या मिश्र
विवाहांचा अल-मसूदीच्या वर्णनातील उल्लेख या संदर्भात लक्षणीय आहे. उत्तर
कोकणात मुसलमान लोकांना स्थानिक लोकांमध्ये स्थान असल्याचे स्पष्ट होते.
देऊळ बांधणाऱ्या अन्नमैय्य नावाच्या एका मित्नाच्या विनंतीवरून, पुब्वय्य
नावाच्या ब्राह्मण अमात्याने अरब प्रांताधिकाऱ्याशी मध्यस्थी करून देवी
मठासाठी भूदान करविले. या वर्णनावरून ब्राह्मणवर्गाचे राज्यकर्त्यांशी
असलेले जवळचे संबंध सिध्द होतात."
राष्ट्रकूट कृष्ण (तृतीय) याच्या
कारकिर्दीत अरव प्रांताधिकारी जाऊन तेथे शिलाहार चामुंडराज याची नेमणूक
झाली. त्यानेही आपले संबंध न दुरावता, राजाच्या परवानगीने एक तेलघाणा
(घाणक) आणि त्यात तयार केलेली पेंड (होलिका) दान दिल्याचा उल्लेख आहे.
यावरून संजानच्या आसपास तेलबियांची लागवड होत असावी असे अनुमान करण्यास
हरकत नसावी. ताम्रपटात दिलेल्या पुढील माहितीवरून या तेलघाणा दानाच्या
महत्त्वाबाबत अधिक खुलासा होतो" जो कोणी हा तेलघाणा नष्ट करील तो महापद्य
गायीच्या दानाने देखील आपले पाप धुऊ शकणार नाही." यावरून उत्तर कोकणातील
शेतजमिनीच्या आर्थिक व्यवहारात तेलघाण्याचे महत्त्व दिसते. भगवती देवीसमोर
नंदादीप लावण्यासाठी व मंदिरातील विद्वान लोकांच्या पायाला मालिश
करण्यासाठी तेल पुरवठयाकरिता हा घाणा दान केला होता." असे वर्णनही सापडते.
शिलाहार
: आठव्या शतकापासून पश्चिम भारतावर राष्ट्रकूटांचे मांडलिक असलेल्या तीन
शिलाहार राजघराण्यांचा अंमल होता. सुमारे इ. स. ७७० ते १०२० पर्यंत दक्षिण
कोकणवर पहिल्या घराण्याने, ८०० ते १२५० पर्यंत उत्तर कोकणवर दुसऱ्या
घराण्याने आणि आठव्या ते दहाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सातारा, कन्हाड,
कोल्हापूर व बेळगाव परिसरावर तिसऱ्या घराण्याने राज्य केले. ठाणे व
कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला 'तगरपुराधीश्वर' असे बिरुद लावीत आणि गरुड हे
एकच कुलचिन्ह स्वीकारीत" ही एक अर्थपूर्ण बाब वाटते.
* कित्ता, ३५, पृ. २९१-९२.
कित्ता, ३२, पृ. ६७.
* कित्ता, पु. ६८.
कित्ता, पृ. ६६.
" ए. आर. आळतेकर, "दि शिलाहाराज ऑफ वेस्टर्न इंडिया", इंडियन कल्चर, खंड २, पृ.४०२.
** कित्ता, पृ. ३९३. तगरपूर हे पैठणच्या आग्नेयेस ७५ मैल दूर असलेले तेर होय. वाय ३५-८
११४
इतिहास
शिलाहारांची
उत्तर कोकणावरील दुसरी शाखा ठाण्याहून राज्य करीत होती. या शाखेचा
संस्थापक कपर्दी (प्रथम) (इ. स. ८०० ते ८२५) हा राष्ट्रकूट नृपती गोबिंद
(तृतीय) याच्या अनेक लढायांमधील श्रेष्ठ सेनापतींपैकी एक होता. त्याच्या
उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यास उत्तर कोकणची राजसत्ता बक्षिस म्हणून दिली
असावी. देवगड तालुक्यातील खारेपाटणच्या शिलाहार अनंतदेवाच्या ताम्रपटात
कपर्दीला शूर वीर म्हटले आहे. कपर्दी (प्रथम) चा पुत्त पुल्लशक्ती (इ. स.
८२५ ते ८५०) याच्या कान्हेरी लेण्यातील संवत् ७६५ (इ. स. ८४३-८४४) च्या
शिलालेखात " महाराजाधिराज परमेश्वर पृथ्वीवल्लभ अमोघवर्ष याच्या कारकिर्दीत
त्याच्या कृपेने ज्याला कोकणचे राज्य मिळाले होते त्या महासामंत कोकणवल्लभ
श्री कपर्दीच्या पायांचे चितन करणारा श्री पुल्लशक्ती पुरी आदिकरून समग्र
कोकणावर राज्य करीत असता असे त्याचे वर्णन केले आहे. याच लेखात
पुल्लशक्तीचा अमात्य विष्णुगुप्त याने कान्हेरीच्या बौद्धसंघाला स्मरून
पुढील देणगी जाहीर केली भगवान बुद्ध याला प्रसन्न करण्यासाठी २० द्रम्म,
विहाराच्या दुरुस्तीकरिता ३ द्रम्म, आर्य संघातील (भिक्षुच्या)
वस्त्राकरिता ५ द्रम्म आणि त्यांच्या ग्रंथांकरिता १ द्रम्म, आणि या २९
द्रम्मांच्या व्याजाकरिता त्याने ४०, ४० व १२० द्रम्मांची अक्षयनीवी (कायम
स्वरूपाची ठेव) ठेवली. यावरून बौद्ध धर्माला त्याकाळीही आश्रय मिळत होता हे
सिद्ध होते. बौद्ध भिक्षुच्या पुस्तकांकरिता नियमितपणे खर्च केला जात असे.
यावरून त्या संघातील ग्रंथालयाची कल्पना येते. परंतु २९ द्रम्मांपैकी एकच
द्रम्म ग्रंथांकरिता व २० द्रम्म बुद्धास प्रसन्न करण्याकरिता खर्च केला
जात होता. यावरून केवळ श्रद्धेकरिता संघाला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य
दिले जात होते हे दिसते. पण ही मोठी रक्कम निश्चित कशा प्रकारे उपयोगात
आणली जात असे याचा कुठेच खुलासा होत नाही. २९ द्रम्म व्याजाकरिता २००
द्रम्म कायमची ठेव ठेवली होती. यावरून व्याजाच्या उच्च दराची कल्पना येते,
परंतु भिक्षुच्या वस्त्राकरिता ५ द्रम्मांची ब्याजापोटी कायमची सोय किती
भिक्षुकरिता होती याचा उल्लेख नाही. राष्ट्रकूट अमोघवर्ष (प्रथम) च्या
कान्हेरी शिलालेखातही भिक्षुना बस्त्रे पुरविण्यासाठी १०० द्रम्मांची कायम
देणगी दिल्याचेही नमूद केले आहे. पण त्या लेखातही भिक्षुची एकूण संख्या
दिली नसल्यामुळे द्रम्मांची क्रयशक्ती समजत नाही.
पुल्लशक्तीचा पुत्र
कपर्दी (द्वितीय) (इ. स. ८५०-८८०) हा देखील राष्ट्रकूट अमोघ-वर्षाचा
मांडलिक होता हे अमोघवर्षाच्या शके ७७५ (इ. स. ८५३) व शके ७९९ (इ. स.
८७७-७८) च्या कान्हेरी येथील शिलालेखात नमूद केले आहे." कपर्दी (द्वितीय)
च्या कारकिर्दीत दक्षिण कोकणच्या शिलाहारांनी गोवा व उत्तर कोकणच्या काही
भागावर अधिपत्य मिळविले व कपदींस कलचुरी कुलातील कोक्कल याचा आश्रय घ्यावा
लागला."
कपर्दी (द्वितीय) चा पुत्र बपुवन्न (इ. स. ८८०-९१०) याच्या
कारकिर्दीत विशेष काही घडले नाही. परंतु त्याचा ज्येष्ठ पुत्र झंझ (इ. स.
९१० ते ९३०) हा चौल (सैमूर)
** कित्ता, पृ. ४०२-०३.
** देव, महाराष्ट्र व गोवे शिलालेख ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची, पृ. ६७.
कित्ता.
" कित्ता, पृ. ६७, ६८.
* कुलावा गॅझेटिअर, १९६४, पृ. ६७.
प्राचीन काळ
११५
वर
राज्य करीत होता असे अरब प्रवासी अल-मसूदी इ. स. ९१६ मध्ये लिहितो. त्याने
१२ शिवमंदिरे बांधली असे खारेपाटण ताम्रपटात म्हटले आहे. यावरून तो
शिवभक्त होता हे सिद्ध होते. दुर्दैवाने आज त्यापैकी एकही मंदिर अस्तित्वात
नाही.
यानंतर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये अवघा एकच ताम्रपट असलेला,
राष्ट्रकूट नृपती कृष्णराज (तृतीय) याचा मांडलिक शिलाहार महासामंत
छद्वैदेव गादीवर आला. परंतु या ताम्रपटात काळाचा कुठेच उल्लेख नाही.
देवांच्या मते तो ताम्रपट अंदाजे इ. स. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धातला
असावा." या ताम्रपटात छद्वै देवाने सलप्राक गावातील काही जमीन चाडदेवभट्ट
नावाच्या ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख आहे. छद्वैदेवाने अंदाजे इ. स.
९६५ ते ९७५ पर्यंत राज्य केले असावे असे अनुमान करण्यास हरकत नाही.
छद्वैदेवाचा
पुतण्या व उत्तराधिकारी अपराजित याचा एक ताम्रपट ठाणे जिल्ह्यातील भाडणे
येथे सापडला आहे. या ताम्रपटात राष्ट्रकूट राजांची सत्ता नामशेष
झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे, परंतु अपराजिताने उत्तरकालीन
चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले नाही.
खारेपाटण ताम्रपटात "त्याने
सहाय्यार्थ आलेल्या गोम्माचे रक्षण केले. ऐयपाला गादीवर स्थिरपणे बसविले
आणि भिल्लम, अम्मण, आणि मम्बुव यांना निर्भय केले, आणि अशा रीतीने तो
'बिरुदंकराम नावाने विख्यात झाला" असा त्याचा उल्लेख केला आहे. दुर्दैवाने
या ताम्रपटातील भिल्लमाखेरीज इतर राजांची ओळख पटत नाही.
अपराजिताची अनेक
प्रदेशांवरील आक्रमणे, त्याचे परमारांशी सख्य, त्याची मोठमोठी बिरुदे आणि
उत्तरकालीन चालुक्यांचे आधिपत्य स्वीकारण्यास नकार, इत्यादी कारणांमुळे
तैलपाचा पुत्र सत्याश्रय याला राग येऊन त्याने त्याच्या राज्यावर स्वारी
केली आणि त्याच्या राजधानीपर्यंतचा प्रदेश काबीज केला. अपराजिताला
राजधानीतून निसटून समुद्रात आश्रय घ्यावा लागला. तैलपाचा कन्नड राजकवी रण्ण
याने आपल्या इ. स. ९८२ मध्ये लिहिलेल्या गदायुद्ध किंवा साहसभीमविजय
काव्यात वर्णन केले आहे की, एका बाजूने समुद्र आणि दुसऱ्या बाजूने
सत्याश्रयाची सेना यांच्या कात्रीत सापडल्यामुळे दोन्ही बाजूने जळणाऱ्या
काठीवर बसलेल्या कीटकाप्रमाणे अपराजिताची अवस्था होऊन तो कापू लागला.
अपराजितानंतर
त्याचा पुत्न वज्जड (द्वितीय) गादीवर बसला. हनगल येथील कोरीव लेखावरून असे
कळते की, कदंब राजा षष्ठदेव (द्वितीय) (इ. स. १००५ ते १०५५) याची राणी
कुंडलादेवी ठाणीचा (ठाण्याचा) राजा वाच्छव्य याची कन्या होती. आळतेकरांच्या
मते वाच्छव्य हा शिलाहार नृपती वज्जड (द्वितीय) असावा. वज्जडाच्या राणीचा
उल्लेख छित्तराज आणि मुम्मुणिराज यांच्या ताम्रपटात आला आहे.
वज्जडानंतर
त्याचा धाकटा भाऊ अरिकेसरी गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीत परमार भोज
राजाने उत्तर कोकणावर स्वारी केली होती. या आक्रमणाचे कारण अज्ञात
१०० कित्ता.
*** देव, शिलालेख ताम्रपट पूर्वोक्त, पू. २७०.
१० कित्ता, पृ. २८९.
*** आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४०५, ४०६; कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ६७-६८.
*आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४०८.
१०५ कित्ता, पृ. ४०६-०७.
११६
इतिहास
असले
तरी कोकणविजयपर्वावरील त्याचे दोन ताम्रपट (इ. स. १०२०) उपलब्ध आहेत. डॉ.
आर. जी. भांडारकर यांच्या मते भोजाच्या स्वारीचा हेतू आपला चुलता मुंज
याच्या तैलपाने केलेल्या बधाचा मूड घेण्याचा असावा. परंतु मिराशीच्या मते
हे कारण संयुक्तिक नाही कारण यावेळी इ. स. ९७५ मधील मुंजाच्या वधानंतर ४४
वर्षांचा दीर्घ काळ लोटला होता. आळतेकरांच्या माहितीनुसार कदाचित
अरिकेसरीला उत्तर-कालीन चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले असावे आणि
त्याचा भोजाला राग आला असावा.
अरिकेसरीनंतर छित्तराज इ. स. १०२४ पूर्वी
थोडा आधी गादीवर आला असावा. त्याचा भोईघर ताम्रपट त्याच वर्षीचा आहे.
त्याच्याच काळचे इतर दोन ताम्रपट-एक त्याचा स्वतःचा बलिन म्युझियममधील
ताम्रपट आणि दुसरा त्याचा मांडलिक चामुण्डराज याचा चिचणी ताम्रपट- हे
दोन्ही शके ९५६ (इ. स. १०३४) चे आहेत. यावरून छित्तराजाची कारकीर्द सुमारे
१०२० पासून १०३५ पर्यंत असावी.
छित्तराजाच्या कारकिर्दीत गोव्याचा कदंब
राजा द्वितीय षष्ठदेव याने उत्तर कोकणावर स्वारी केली होती. पष्ठदेवाने
प्रथम दक्षिण कोकण जिंकून नंतर उत्तर कोकणातील कवडीद्वीपावर स्वारी केली.
त्याने आपले स्वामित्व स्वीकारण्याच्या अटीवर उत्तर कोकण छित्तराजाला परत
केले.
मागे सांगितल्याप्रमाणे पहिल्या अपराजिताने संयान (संजान) मंडल
अरब मांडलिका-कडून जिंकून घेतले होते. त्याचा पुत्र अरिकेसरी याने मोढ वंशी
विज्जराणक नावाच्या मांडलिकाची तेथे नेमणूक केली होती. त्याचा मुलगा
चामुण्डराज हा छित्तराजाच्या कारकिर्दीत त्याचा मांडलिक म्हणून तेथे राज्य
करीत होता. शके ९५६ (इ. स. १०३४) च्या त्याच्या चिचणी ताम्रपटात त्याने
आपल्या सम्राटाचा छित्तुराज असा उल्लेख केला आहे. चिचणी ताम्रपटात त्याने
'लाटप्राकारराज्यविध्वंसक' असे बिरुद स्वीकारल्यावरून त्याने लाट प्रदेशावर
(दक्षिण गुजरात) विजय मिळवला होता असे दिसते.
छित्तराजाचा विद्या व
कलांना उदार आश्रय होता. त्याने उदयसुंदरीकथा नावाच्या चंपूकाव्याचा कर्ता
सोड्डल याला राजाश्रय दिला होता. अंबरनाथ येथील सुंदर आणि भव्य शिवमंदिर
बांधण्यास त्याने आरंभ केला होता. पुढे त्याचा धाकटा भाऊ मुम्मुणिराज
याच्या कारकिर्दीत मंदिर पूर्ण झाले. हे मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा उत्तम
नमुना होय.
मुम्मुणीच्या कारकिर्दीत शिलाहारांच्या सत्तेला उतरती कळा
लागली. त्याला गोव्याच्या कदंबांचे स्वामित्व काही काळ मान्य करावे लागले.
जेव्हा षष्ठदेव द्वितीय त्याच्या भेटीसाठी आला तेव्हा मुम्मुणीने त्याचे
मोठे स्वागत केले. नरेंद्र येथील कोरीव लेखात या प्रसंगाचे पुढील वर्णन
आहे" जेव्हा छद्वैदेवाच्या समुद्रावरील वैभवयुक्त विहाराची वार्ता
मुम्मुणीला कळली तेव्हा तो त्याला सामोरा गेला आणि त्याला आपल्या प्रासादात
बोलावून त्याने त्याचे मोठ्या आदराने स्वागत केले, आणि मोठ्या समारंभाने
आपली कन्या त्याला अर्पण केली आणि जावयाला पाच लक्ष सुवर्ण नाण्यांचा अहेर
केला. १०८
१०१ कित्ता, पृ. ४०८-०९.
कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ६८.
*** आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४१००
प्राचीन काळ
११७
शिलाहारांची
सत्ता दुर्बल झाल्यावर संजानचे त्यांचे मोढ वंशी सामंत स्वतंत्र होण्याचा
प्रयत्न करू लागले आणि शिलाहारांची बिरुदे स्वतः धारण करू लागले. शके ९७५
(इ. स. १०५३) च्या चिचणी ताम्रपटात राजा विज्जल स्वतःचे 'तगरपुरपरमेश्वर'
आणि 'शरणागतवज्ज्रपंजर' असे वर्णन करतो. ही बिरुदे उत्तर कोकणच्या
शिलाहारांची होती. लवकरच मुम्मणीने या बंडखोर सामंताचा उच्छेद करून संयान
मंडल (संजान) आपल्या राज्याला जोडले असे दिसते, कारण यानंतर या सामंतांचे
लेख सापडले नाहीत.
आपल्या दोन वडीलभावांप्रमाणे मुम्मुणी विद्वानांचा
आणि कवींचा उदार आश्रयदाता होता. सोड्डल कवीने आपली उदयसुंदरीकथा राजसभेत
त्याला वाचून दाखविली. मुम्मुणीने त्या कथेची प्रशंसा करून सोड्डलाचा मोठा
सन्मान केला आणि त्याला भरपूर द्रव्य अर्पण केले. त्यानंतर सोड्डल
'लाटदेशाधिपति' वत्सराज याच्या आश्रयास गेला, तरी पण त्याने आपल्या कथेत
छित्तराज, नागार्जुन आणि मुम्मुणी या तिन्ही राजांनी दिलेल्या उदार
आश्रयाचा व सन्मानाचा कृतज्ञतेने उल्लेख केला आहे.
मुम्मुणीच्या
कारकिर्दीचा शेवट सुमारे इ. स. १०७० मध्ये झाला असावा. खारेपाटण ताम्रपटात
मुम्मुणीच्या मृत्यूनंतर उत्तर कोकणात 'दायादवैरि-व्यसन' (भाऊबंदकी)
उत्पन्न झाल्याचा उल्लेख आहे. तो ठाणे व कोल्हापूर येथील
शिलाहारांच्याबद्दल आहे.
या झगडधात गोव्याच्या कदंबांनी मुम्मुणीच्या
मुलाचा पक्ष घेतलेला दिसतो. कदंब राजा जयकेशी याने उत्तर कोकण जिंकून काही
काळ आपल्या ताब्यात ठेवला असावा. कारण काही लेखांत त्याला 'कोकणाधिपति'
म्हटले आहे. या युद्धात पश्चिम किनाऱ्यावरील अरब वसाहतीतील अधिकाऱ्याने
कदंबांना सहाय्य केले असावे. जयकेशीच्या पणजी ताम्रपटात चेमुल्य (चौल)
येथील अरब व्यापारी अलियम याच्या वसाहतीचा उल्लेख आहे. कदंबांनी काही
अरबांना आपले मंत्री नेमून त्यांना ग्रामदाने दिली होती."
अनंतपालाचा
(प्रथम अनंतदेव) एकच कोरीव लेख शके १०१६ (इ. स. १०९४) चा खारेपाटण ताम्रपट
सापडला आहे. त्यात त्याने 'पश्चिमसमुद्राधिपति' ही पदवी धारण करून स्वतःला
तो पुरीकोकणादि सबंध कोकण प्रदेशाचा अधिपती समजत होता, असे दिसते. वरील
ताम्रपटात त्याने आपल्या काही मंत्र्यांच्या जहाजांना स्थानक (ठाणे),
शूर्पारक (सोपारा), चेमुल्य (चौल) इत्यादी बंदरांतील जकातीची सूट दिली होती
असा उल्लेख आहे.
अनंतपालाच्या कारकिर्दीच्या अखेरीस शिलाहारांचा
गोव्याच्या कदंबांशी संघर्ष निर्माण झाला. कदंब राजा दुसरा जयकेशी याने
उत्तर कोकणवर स्वारी केली व त्या युध्दात अनंतपाल मरण पावला. देगावे येथील
लेखात जयकेशीला 'कवडीद्वीपांच्या नृपतिचा काळ' असे म्हटले आहे. नंतर
जयकेशीने काही काळ कोकण आपल्या ताब्यात ठेवला असावा, कारण इ. स. ११२५ व
११२६ च्या नरेंद्र शिलालेखात चालुक्य सम्राट त्रिभुवनमल्ल
(षष्ठविक्रमादित्य) याच्या काळी जयकेशी हा 'सब्बालाख कवडीद्वीपावर राज्य
करत आहे' असे म्हटले आहे. जरी नरेंद्र येथील शिलालेखात जयकेशीचा
'कवडीद्वीपाचा
*** आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४११.
*** इंडिका, इंडियन हिस्टॉरिकल रिसर्च इन्स्टिटयूट: सिल्वर जुबिली व्हॉल्यूम, पृ. ८९.
*** इंडियन अॅन्टीक्वरी, ९, पू. ३५.
११८
इतिहास
अधिपति'
असा उल्लेख आहे तरी पुढच्याच वर्षी इ. स. ११२७ मध्ये अपराकनि सबंध कोकण
प्रदेश जिंकून परत मिळविला असे त्याच्या ११२७ च्या वडवली ताम्रपटावरून
दिसते.
अपरादित्याला विक्रमादित्य व हरिपालदेव हे दोन पुत्र होते.
आपल्या निधनानंतर राज्यात बंडाळी माजू नये म्हणून त्याने उत्तर कोकण
हरिपालदेवाला व दक्षिण कोकण विक्रमादित्याला देऊन राज्याची विभागणी केली
असावी. हरिपालदेबाचे तीन लेख इ. स. ११४९, ११५० व ११५३ चे सापडले आहेत.
त्यावरून तो उत्तर कोकणात इ. स. ११३९ ते ११५५ पर्यंत राज्य करीत होता यात
शंका नाही. हरिपालदेवाच्या कारकिर्दीपासून उत्तर कोकणच्या शिलाहारांचे
शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र भाषेत आहेत.
हरिपालदेवानंतर मल्लिकार्जुन गादीवर आला. त्याचे दोन लेख रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला व ठाणे जिल्ह्यातील वसईला सापडले आहेत.
हेमचंद्राने
आपल्या कुमारपालचरित ग्रंथात चौलुक्य नृपती कुमारपाल याच्या सैन्याशी
मल्लिकार्जुनाने केलेल्या मुकाबल्याचे सविस्तर वर्णन केले आहे. तो लिहितो
की, कुमारपाल आपल्या दरबारात बसला असता त्याचा 'सांधिविग्रहिक' येऊन
कोकणावरील स्वारीचा वृत्तांत सांगू लागला. कुमारपालाची सेना कोकणच्या
राजधानीजवळ आली असता कोकणाधिपती तिचा प्रतिकार करण्याकरिता चालून आला.
राजधानीवरचा हा हल्ला अनपेक्षित होता कारण हेमचंद्राच्या वर्णनावरून
मल्लिकार्जुनाचे सैनिक विहिरीवर स्नान करण्याचे टाकून शत्रूचा प्रतिकार
करण्याकरिता धावले. मल्लिकार्जुन मोठ्या शौर्यान लढला. परंतु गुर्जरांच्या
सैन्याने एकवटून मल्लिकार्जुनाच्या हत्तीवर बाणांचा वर्षाव केला.
मल्लिकार्जुन खाली कोसळला आणि त्याच्या सैन्याची दाणादाण झाली. अशा रीतीने
कुमारपाल 'पश्चिमसमुद्राधिपति' झाला.
मल्लिकार्जुनानंतर द्वितीय
अपरादित्य गादीवर आला. त्याचे मल्लिकार्जुनाशी असलेले नाते ज्ञात नाही.
परंतु त्याचे लोनाड, ठाणे आणि परळ येथे अनुक्रमे शके ११०६, ११०७आणि ११०८ चे
शिलालेख सापडले आहेत. त्यापैकी एकाही शिलालेखात त्याने गुजरातच्या
चालुक्यांच्या सार्वभौमत्वाचा उल्लेख केलेला नाही. उलट परळच्या लेखावरून
त्याने 'महाराजाधिराज' आणि 'कोकणचक्रवर्ती' या स्वातंत्र्यनिदर्शक पदव्या
धारण केलेल्या दिसतात. त्यावरून त्याने चालुक्यांचे सार्वभौमत्व थोड्याच
वेळात झुगारून दिलेले दिसते. इ. स. ११७० ते ११९५ या काळात त्याने राज्य
केले असावे. २५
काही वर्षापूर्वी सापडलेल्या शके ११२० (इ. स. ११९८) च्या
द्वितीय अपरादित्यानंतर द्वितीय अनंतदेव गादीवर आला असावा. अपरादित्याचा
मुलगा असून त्याने अल्पकाळच राज्य केले असावे. वर्षांनी शके ११२५ मध्ये
द्वितीय केशिदेव राज्य करीत होता असे वसई शिलालेखावरून कदाचित हा अनंतदेव
कारण यानंतर पाचच दिसते. हा केशिवेब
*** आळतेकर, पूर्वोक्त, पू. ४१२.
१११ कित्ता, पृ. ४१५.
११० कित्ता, पृ. ४१६.
१९५ कित्ता.
प्राचीन काळ
११९
द्वितीय अनंतदेवाचा भाऊ असावा. केशिदेवाच्या तीन शिलालेखांपैकी दोन इ. स. १२०३ चे व तिसरा १२३८ चा आहे.
यानंतरचा
आणि उत्तर कोकणचा शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर होता. त्याचे दोन
शिलालेख-शके ११८१ (इ. स. १२५९) चा उरणजवळ रानवड येथे आणि शके ११८२ (इ. स.
१२६०) चा पनवेल तालुक्यातील चांजे येथे सापडले आहेत. दोन्हीही लेखांमध्ये
सोमेश्वराच्या दानाचा उल्लेख आहे. पहिले दान काही ब्राह्मणांना आणि दुसरे
स्थानक राजधानीतील उत्तरेश्वर देवाला दिले आहे.
सोमेश्वराच्या काळात
देवगिरीच्या यादव कृष्ण राजाने (इ. स. १२४७-१२६१) मोठी सेना देऊन आपला
सेनापती मल्ल याला उत्तर कोकणवर स्वारी करण्यास पाठवले. मल्लाने शिलाहार
राजाचा पराभव केला. परंतु त्यामुळे यादवांचा विशेष लाभ झालेला दिसत नाही.
कृष्णानंतर गादीवर आलेल्या महादेव नावाच्या त्याच्या भावाने हत्तींची मोठी
सेना घेऊन उत्तर कोकणवर स्वारी केली. सोमेश्वराचा पराभव होऊन त्याने
समुद्रात आश्रय घेतला. पण तेथेही महादेवाने त्याचा पाठलाग केल्यामुळे
सोमेश्वर समुद्रात बुडून मरण पावला. हेमाद्रीने या घटनेचे वर्णन असे केले
आहे की, सोमेश्वराने महादेवराजाच्या क्रोधाग्नीपेक्षा समुद्रातील
वडवाग्नीला तोंड देणे पसंत केले.
बृहन्मुंबईतील बोरीवली स्थानकाजवळ काही
बीरगळ शिलांवर एका सागरी युद्धाचे शिल्प आहे, ते या युद्धाचे असावे.
त्यातील काही वीरगळांवर गजयुद्धाचे व इतर काहींवर नौकायुद्धाचे शिल्प
कोरलेले आहे. त्यात जहाजांचा ताफा युद्धात गुंतलेला दिसतो. महादेव राजाच्या
सैन्यात हत्तींची मोठी संख्या होती आणि या शिल्पांच्या धाटणीवरून ती १३
व्या शतकातील दिसतात. म्हणून हे शिल्प महादेव व सोमेश्वर यांच्या युद्धाचे
असावे असे अनुमान पुरातत्त्वज्ञ कझेन्स यांनी केले आहे. ११८ ते संभवनीय
वाटते. हे युद्ध इ. स. १२६५ मध्ये झाले असावे. त्यानंतर यादवांनी उत्तर
कोकणच्या प्रशासनाकरिता अच्युत नावाच्या राज्यपालाची नेमणूक केली. त्याचा
ठाणे येथील शिलालेख इ. स. १२७२ चा आहे.
शिलाहारांच्या अनेक लेखांत त्या
काळच्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्थितीवर बराच प्रकाश पडतो. बहुतेक
शिलाहार राजे राष्ट्रकूटांचे, चालुक्यांचे, परमारांचे किंवा कदंबांचे
मांडलिक होते, तरीपण त्यांना बऱ्याच सवलती व स्वातंत्र्य होते.
शिलाहारांच्या अनेक दानपत्त्रांमध्ये त्यांच्या सार्वभौम राजांचा कुठेच
उल्लेख नाही. यावरून शिलाहार स्वतंत्रपणे करवसुली करीत होते.
शिलाहारांच्या
राज्यात हिंदू, बौद्ध व जैन धर्म मोकळेपणाने नांदत होते. कान्हेरीला बौद्ध
धर्माचे एक मुख्य केंद्र होते व त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून मदत मिळत
होती. शिलाहार प्रामुख्याने शैव पंथीय होते हे त्यांच्या अंबरनाथ येथील
शिवमंदिर व अनंतदेवाच्या खारेपाटण ताम्रपटातील शिवाचे उल्लेख यावरून दिसते.
अपरार्काच्या एका ताम्रपटात त्याने सोमनाथ मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख
आहे. रद्वराजाच्या खारेपाटण येथील लेखात शिवमंदिराबाबत जी माहिती मिळते
त्यावरून मंदिरातील शिव मूर्तीची पूजा ११६ कित्ता.
१२० कित्ता, पृ. ४१७; कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ७१.
" हेन्री कझेन्स, मेडिव्हल आर्किटेक्चर इन दि डेक्कन, पृ. २१.
१२०
इतिहास
दिवसातून
तीन वेळा केली जात होती व त्याकरिता एका ब्राह्मण कुटुंबाची नेमणूक केली
होती. एक तेली अळेश्वर मंदिराच्या नंदादीपाला लागणाऱ्या तेलाकरिता, एक माळी
दररोज पूजेला लागणाऱ्या पुष्पांकरिता, एक कुंभार मडक्याकरिता व एक धोबी
देवांची व पुरोहित वर्गाची वस्त्रे धुण्याकरिता नियुक्त केला होता.
त्यांच्या काळात सूर्य-चंद्र ग्रहणांना व ब्राह्मण भोजनाला महत्त्व दिले
जात असे.
आर्थिक बाबतीत शिलाहारांच्या लेखात अनेक वेळा श्रेणींचा उल्लेख
केला आहे. त्यांच्याकडून पैशाची देवाण-घेवाण किंवा कर्जाऊ रक्कम देणे-घेणे
असे व्यवहार केले जात असत. कायम स्वरूपात ठेवलेल्या रकमेबर सतरा टक्के
व्याज आकारल्याची माहिती काही लेखांमध्ये मिळते. खारेपाटण ताम्रपटानुसार
मंदिराची देखरेख करणाऱ्या ब्राह्मणास चार निवर्तने (अंदाजे २० एकर) जमीन
त्याच्या उपजीविकेकरिता दिली होती.
मध्ययुगीन काळ""
विजयनगरच्या
चौदाव्या शतकातील रायगड जिल्ह्याच्या इतिहासाची साधनसामग्री अपुरी असल्याने
तत्कालीन सुसंगत इतिहास लिहिणे कठीण आहे. देवगिरीच्या यादवांची राजवट
संपुष्टात आल्यावर (१३१८) मुस्लीम राजवट आली. मात्र हा प्रदेश मुस्लीम
राजवटीखाली येण्यास बराच काळ लागला. कुलाबा जिल्ह्यातील चौलसह काही बंदरे
मुसलमानांच्या ताब्यात होती. इतके मात्र खरे की, कुलाबा जिल्ह्याचा काही
भाग राजवटीखाली १३७७ पर्यंत होता. काही भाग लिगायत सत्ताधाऱ्यांकडे होता.
लिंगायत सत्ताधाऱ्यांचे मुख्यालय आनेगोंदी येथे होते. दरम्यान कोळी लोकांनी
काही भागात आपली छाप बसविली. या प्रदेशावर मुख्यत्वे स्थानिक सत्ताधारी
अधिकार चालबीत असावेत. नागोठणे येथे असेच एक अधिकार केंद्र होते. रायरी तथा
रायगडवर मराठा पाळेगारांची सत्ता असून ते विजयनगरच्या राजवटीखाली होते.
बहमनी सुलतानांनी आपली राजधानी गुलबर्याला स्थलांतरित केल्यावर चौल बंदराला
पुन्हा ब्यापारी महत्त्व प्राप्त झाले. सन १३९० च्या सुमारास बहमनींनी
कोकणातील बऱ्याच बंदरांवर ताबा मिळविला. त्यांनी कोकण किनारा १४२९ मध्ये
जिंकला. बहमनींनी १४३६ मध्ये पुन्हा चढाई करून रायरीच्या प्रमुखाकडून खंडणी
वसूल केली. तरी सुध्दा बहमनी राजे कोकणचा ताबा पूर्णपणे मिळविण्यात यशस्वी
झाले नाहीत. महमुद गावानने १४६९ मध्ये कोकणवर चढाई केली. तथापि कुलाबा
जिल्ह्याचा सर्व प्रदेश मिळविणे त्यालाही शक्य झाले नाही. मलिक अहमद
बहमनीने मात्र कोकण व घाटावरील किल्ले जिंकून घेतले व कुलाबा जिल्हा आपल्या
राज्यास जोडला. सन १४८९ मध्ये कुलाबा जिल्ह्याचा काही भाग बहमनींकडे तर
नागोठणे व चौल यासह किनाऱ्याचा भाग गुजरातच्या सुलतानाकडे होता.
पंधराव्या शतकाच्या शेवटी कुलाबा जिल्ह्याचा अंतर्गत भाग बहमनींकडून अहमद-
नगरच्या
निजामशाहीकडे गेला, आणि नागोठणे, चौल भाग गुजरातच्या सुलतानाकडे राहिला.
सन १५०९ मध्ये मात्र चौलचे स्वामित्व गुजरातच्या सुलतानाकडून
पोर्तुगिजांकडे गेले. त्यानंतर गुजरात राज्याची सागरी सीमा चौलपासून
मुंबईपर्यंत घटली. तरीसुध्दा
*** अध्ययुगीन काळ या विषयावरील लेखन डॉ. वि. गो. खोबरेकर, सेवानिवृत्त संचालक, पुराभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन, यांनी केले आहे.
मध्ययुगीन काळ
१२१
गुजरातचे
सुलतान पेणजवळील सांक्षी गडावर १५४० पर्यंत आपला ताबा टिकवून होते.
त्यावर्षी सांक्षी किल्ला निजामशाहीकडे सुपूर्द करण्यात आला.
पोर्तुगिजांचे
आगमन झाल्यावर चौलच्या इतिहासास वेगळेच वळण लागले. पोर्तुगिजांनी आपले
स्थान वळकट करून व्यापारावर ताबा मिळविला. तसेच सावकाशपणे धर्मांतर
करण्यासही सुरुवात केली. वस्तुतः चौलचे महत्त्व तेराव्या व चौदाव्या शतकात
कमी झाले होते. तथापि सोळाव्या शतकात चौलला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले.
अहमदनगरच्या निजामशाहीने चीलला आपले प्रादेशिक केंद्र निर्माण केले. चौलचे
व्यापारी महत्त्व ओळखून पोर्तुगिजांनी निजामशाहीच्या अनुमतीने चौल आणि
रेवदंडा येथे १५१६ मध्ये एका व्यापारी वखारीची स्थापना केली. हा चंचुप्रवेश
केल्यानंतर पोर्तुगिजांनी आपले स्थान आणखी बळकट केले. चौल येथून परदेशी
व्यापार पुन्हा तेजीत आला. पोर्तुगिजांनी गोवा ताब्यात घेतल्यावर आणि
गोव्याचे महत्त्व वाढल्यावर चौलचा व्यापार कालांतराने गोव्याकडे वळविण्यात
आला. सीदींनी जंजिरा आणि दंडा राजपुरीचा ताबा मिळविल्यानंतर आणि इंग्रजांनी
सुरतला आपले बस्तान बसविल्यानंतर चौलच्या भरभराटीस उतरती कळा लागली. २०
आदिलशाही आणि निजामशाहीतील बाढते वैमनस्य आणि त्यांच्या आपापसातील
नित्याच्या लढायांमुळे चौलच्या व्यापारास उतरती कळा लागली. हळूहळू साठत
गेलेल्या गाळामुळे समुद्र उथळ झाला आणि बंदरात बोटी नांगरणे व सागरी वाहतूक
करणे या दृष्टीने हे बंदर सोयीस्कर राहिले नाही.
इ. स. १५२१ मध्ये
पोर्तुगिजांनी अहमदनगरच्या सुलतानाकडून रेवदंडा येथे किल्ला बांधण्याची
परवानगी मिळविली. पोर्तुगिजांनी तेथे आपले आरमारी ठाणे वसविले व ते गुजरात
सुलतानाच्या लढाऊ जहाजांशी झुंज देऊ लागले. सन १५३३ मध्ये आणि नंतर पुन्हा
१५३८ मध्ये गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगिजांशी तह केला. सन १५४० मध्ये
अहमदनगरच्या बुरहान निजामशहाने सांक्षी किल्ला गुजरातच्या अधिकाऱ्याकडून
घेतला. गुजरातच्या अधिकाऱ्याने यावेळी पोर्तुगिजांचे सहाय्य मागितले.
पोर्तुगिजांनी त्यास मदत करून किल्ला परत घेतला, परंतु तो सांभाळण्यास कठीण
आहे हे जाणवताच त्यांनी तो अहमदनगरच्या राजास दिला. अहमदनगरचा मूर्तजा
निजामशहाने चौल आणि वसई मिळविण्याच्या आकांक्षेने प्रेरित होऊन चौलवर
सैन्यासह चढाई केली. परंतु ती निष्फळ ठरली. सन १५९४ मध्ये अहमदनगरच्या
राजाने पुन्हा एकदा चौलवर स्वारी केली आणि वसईची नासधूस करण्याकरिता
घोडेस्वारांची तुकडी पाठविली.
या समयी कोकणच्या भवितव्यावर परिणाम
करणाऱ्या आणखी एका शक्तीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. हे होते अॅबिसिनियाहून
आलेले जंजिऱ्याचे सीदी. साधारणपणे १५ व्या शतकाच्या मध्यास (१४३७)
अॅबिसिनिया आणि इतर पूर्व आफ्रिकेतील लोक मोठ्या प्रमाणावर पश्चिम भारतात
येऊ लागले. अरब-अल-हबीश येथून ईशान्य आफ्रिकेतून येणारे हे लोक "हबशी"
म्हणून ओळखले जात. त्यांना सीदी असेही म्हणत. सय्यद या नावाचा सीदी हा
अपभ्रंश असल्याचे काही म्हणतात. भारतात हबशीना गुलाम म्हणून आणण्यात आले.
तरी त्यांची निष्ठा, धैर्य आणि कार्यक्षमतेमुळे त्यांना बहमनी दरबारात
चांगला दर्जा लाभला. ओर्मच्या मतानुसार भारतात स्थिर झालेल्या
अॅबिसिनियातील
रेवदंडा आणि चौलचा सखोल इतिहास व स्थळ वर्णन या गॅझेटिअरच्या प्रकरण
१२- प्रेक्षणीय स्थळे यात दिलेले आहे.
१२२
इतिहास
लोकांनी
आपल्या देशातील खूप लोकांना आमंत्रित करून अथवा गुलाम म्हणून विकत घेऊन
सोबत आणले. तसेच आफ्रिकेतील निग्रो लोकांनाही आणले. त्यांनी भारतीयांशी
केलेल्या विवाहांमुळे आणि पुढे आंतर-विवाहांमुळे मुसलमानांपेक्षा बांधा,
वर्ण आणि व्यक्तिमत्व या बाबतीत अगदी निराळी दिसणारी एक स्वतंत्र जमात
निर्माण झाली. पुरेसे सामर्थ्य प्राप्त करून येताच त्यांनी स्वतंत्र राजवट
निर्माण केली. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी
दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून नावारूपास आले.
अहमदनगरच्या निजामशाहीच्या
कारकिर्दीत जंजिरा किल्ला आणि दंडा राजपुरी बंदराला खूपच महत्त्व प्राप्त
झाले. निजामशाहीचा पाया घालणारा मलिक अहमद (१४९० ते १५०८) याने सर्वप्रथम
जंजिऱ्याच्या जलदुर्गाचा प्रमुख म्हणून अॅविसिनियन सरदाराची नियुक्ती केली.
सुमारे इ. स. १४९० मध्ये मलिक अहमदने बराच काळ वेढा घालून दंडा राजपुरीबर
आपला अंमल प्रस्थापित केला. जंजिरा किल्ल्यातील कोळी व शिबंदीतील सैनिकांना
साखळदंडांनी बांधून त्याने समुद्रात फेकून दिले. त्याने जंजिरा किल्ला
पुनर्बाधणी करून बळकट केला आणि सीदी याकूतकडे दिला.
सन १५८४ मध्ये
अहमदनगरचा एक सरदार सलाबत खान यास काही काळ दंडा राजपुरीस कैदेत ठेवले
होते. सन १६०० मध्ये मुघलांनी अहमदनगर जिंकले. पराक्रमी मलिक अंबरने बराच
भूभाग मुघलांकडून पुन्हा जिकला तरी १६१८ पर्यंत दंडा राजपुरीचे राज्यकर्ते
मुघल अधिकारीच होते असा स्थानिक दस्तऐवजात पुरावा मिळतो. शिवाय तेव्हाही
पोर्तुगिजांच्चा रेवदंडद्यावरील ताबा कायम होता. सन १६१८ मध्ये सीदी सुरुल
खानची दंडा राजपुरीचा अधिकारी म्हणून नेमणूक झाली. सन १६२० मध्ये सीदी
याकूत हा सीदी सुरुलचा उत्तराधिकारी झाला. पुढच्या वर्षीच सीदी अंबर हा
सीदी याकृतचा उत्तराधिकारी झाला. सन १६३६ मध्ये शाहजहानने अहमदनगरची
निजामशाही नष्ट करेपर्यंत दंडा राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या राजांकडे
होता. १६३६ नंतर तो प्रदेश मुघलांच्या ताव्यात गेला. परंतु मुघलांनी या
प्रदेशाकडे इतके दुर्लक्ष केले की, दोन वर्षांच्या काळात सीदींचे वर्चस्व
असलेला दंडा राजपुरीचा परिसर वगळता हा संपूर्ण प्रदेश शहाजीराजे भोसलेच्या
अधिपत्याखाली आला. परंतु फेब्रुवारी १६३६ मध्ये शहाजीला मुघलांशी तोंड देणे
शक्य न झाल्याने शहाजीने ठाण्याजवळील माहुली किल्ल्यावर आश्रय घेतला.
शहाजीला शरणागती पत्करावी लागली. सन १६३६ मध्ये विजापूरच्या आदिलशहाने
मुघलांना खंडणी देण्याचे मान्य केल्यावर मुघलांनी कोकणचा ताबा विजापूरकडे
परत दिला. विजापूरकडे देण्यात आलेल्या प्रदेशामध्ये पनवेल, चौल, चाकण आणि
दंडा राजपुरीचा समावेश होता. विजापूरच्या सत्ताकाळात सावित्री नदी आणि बसई
दरम्यानचा भाग दोन इलाख्यात विभागला गेला. त्यापैकी भिवंडी ते नागोठणे
इलाख्याचे प्रमुख केंद्र कल्याणला होते आणि नागोठणे ते साबित्रीपर्यंतच्या
भागाचे प्रमुख केंद्र दंडा राजपुरीला होते. या दुसऱ्या भागातील सागरी
व्यापाराचे रक्षण करावे आणि मक्केच्या यात्रेकरूंची ने-आण करावी या अटींवर
जंजिन्याच्या सीदींच्या अधिकारात हा प्रदेश देण्यात आला होता. आता सीदी
विजापूरच्या आरमाराचे मुख्य अधिकारी बनले, तसेच त्यांना वजीर हा किताब
देण्यात आला. विजापूरचे वजीर म्हणून सीदी अंबर (मृत्यू १६४२), सीदी युसुफ
(मृत्यू १६५५) आणि फथखान यांचा उल्लेख सापडतो. सीदींचा विजापूरशी समेट ही
गोष्ट सोपी नव्हती. कारण दंडा राजपुरीचा प्रमुख सीदी अंबर याने
आदिलशहाविरुद्ध केलेल्या बंडाळीत त्याचा
१२१ जंजिरा किल्ल्याचा इतिहास व वर्णन प्रकरण १२- प्रेक्षणीय स्थळे यात दिलेले आहे.
मध्ययुगीन काळ
१२३
पराभव
झाला होता. आसदखानाच्या नेतृत्वाखाली विजापूरची सेना नोव्हेंबर १६४२ मध्ये
दंडा राजपुरीचे बंड मोडून काढण्याकरिता पाठविण्यात आली.
शिवाजी राजे : विद्यमान कुलाबा तथा रायगड जिल्ह्याशी शिवाजीराजांचा पहिला
संबंध
आला यशवंत तथा चंद्रराव मोरेच्या पाडावानिमित्ताने. मावळ प्रांतावर ताबा
मजबूत करण्यासाठी शिवाजीला मोरेचा बंदोबस्त करणे भाग होते. चंद्रराव हा
मोरे घराण्याचा किताव होता, नाव नव्हे. रायरीचा मजबूत गड मोरेच्या ताब्यात
असून शिवाजीला तो राजधानी करण्यास सोयीचा वाटला. इ. स. १६५५ अखेरीस
शिवाजीने केलेला हल्ला मोरेने परतवून लावला. म्हणून शिवाजीने रघुनाथ बल्लाळ
कोरडे याजबरोबर जावळीवर आणखी सेना पाठविली. या लढाईत हणमंत मोरे मारला
गेला व प्रतापराव मोरे विजापुरास पळून गेला आणि जावळी शिवाजीस मिळाली (२७
जानेवारी १६५६). लगेच स्वतः शिवाजीराजेंनी जावळीला जाऊन तेथील मुलखाची
व्यवस्था केली. लढाई झाल्यावर यशवंतराव मोरे (जावळीकर) रायरीवर जाऊन
बंदोबस्तात राहिला. रायरी हस्तगत केल्याखेरीज शिवाजीचे पुढील कार्य तडीस
जाणार नव्हते. म्हणून शिवाजीने लगेच आपली फौज रायरीवर पाठविली. मोरेने तीन
महिने किल्ला लढविला. पुढे मात्र मोरेचा नाइलाज झाल्याने बाळाजी नाईक
सिलीमकर हैबतराव याचेमार्फत त्याने शिवाजीशी तहाचे बोलणे सुरू केले.
सिलीमकराने मध्यस्थी करून यशवंतराव व त्याचे दोन पुत्र कृष्णाजी व बाजी
यांना गडाखाली शिवाजीचे भेटीस आणले. यशवंतरावला मुख्य गुन्हेगार म्हणून
शिवाजीने ठार केले व त्याच्या दोन्ही मुलांना पुण्यास नेऊन बंदिवासात
ठेवले. अशा प्रकारे मे १६५६ मध्ये रायरीचा किल्ला शिवाजीच्या ताब्यात आला.
समृद्ध जावळी व रायगड राजेंकडे आल्याने त्यांचा फार मोठा फायदा झाला. महसूल
वाढला, या भागातील शूर लोक राजेंच्या सेनेत आलेत, राज्यविस्तार करण्याची
क्षमता प्राप्त झाली व मावळ प्रांत व आजूबाजूचे सरदार त्यांच्याशी नमून
वागू लागले. रायरीची पुनर्बाधणी करून महाराजांनी त्यास रायगड असे नाव
ठेवले. रायगडाचा सुसंबद्ध इतिहास प्रकरण १२-प्रेक्षणीय स्थळे यात दिला आहे.
विजापूरच्या सत्ताधाऱ्यांनी फथखानशी सलोखा करून त्याला त्या प्रांताचा रयतदार म्हणून नियुक्त केले.
या
कालावधीतील आणखी महत्त्वाची घटना म्हणजे कल्याणच्या खजिन्याची लूट.
विजापूरच्या आदिलशहाचा कोकणवरील बंदोबस्त ढिला पडला. म्हणून शिवाजीने
गुप्तपणे हिंडून सर्व प्रांत पाहिला आणि आदिलशहाचा कल्याणचा खजिना
विजापूरकडे नेला जात असताना त्यावर एकदम छापा घालून हस्तगत केला. ही घटना
गागोदे गावाजवळच्या खिंडीत घडली. खजिन्यातील पैसा राजेंनी राजगडावर नेला.
अल्पावधीत कल्याण व भिवंडीवर विजय मिळवून शिवाजीने काही गलबते उभारून
कल्याणच्या खाड्यांमधून ती संचार करू लागली. कल्याण प्रांतातील किल्ले एका
मागून दुसरा असे. हस्तगत केलेत. दि. ८ जानेवारी १६५८ ला माहुली गड घेतला व
चौल, प्रबळगड, तळागड, घोसाळा वगैरे हस्तगत केले.
१२२ कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांसमोर आणण्यात आल्याची कथा या घटनेशी निगडित आहे. तथापि या कथेला पुरावा नाही.
१२४
इतिहास
चौलवर पोर्तुगिजांचा अंमल होता. त्यास शिवाजीचा उपद्रव लागताच त्यांनी आपल्या सरकारकडे शिवाजीबाबत कागाळी केली (५ मे १६५८).
प्रबळगडाच्या
मोहिमेबद्दल एक आख्यायिका बखरीत आहे. महाराज पालखीतून जात असताना बोरीची
काटी पालखीस लागली. तेथे महाराजांनी खणावयास लावल्यावर त्यांना वावीस घागरी
व चार कढया मोहोरा, होम, सोन्याच्या कांबींनी भरलेल्या सापडल्या.
मोरेच्या
पाडावामुळे दक्षिण कोकणबर स्वारी करणे आणि त्या भागात आपली सत्ता
प्रस्थापित करण्यास शिवाजी महाराजांचा मार्ग निविघ्न झाला. सन १६५७ च्या ३१
जुलै रोजी शिवाजीने रघुनाथ बल्लाळ कोरडे यास जंजिऱ्याच्या सीदीवर स्वारी
करण्यास पाठवले आणि ऑक्टोबर महिन्यात शिवाजी राजे स्वतः कोकणात दाखल झाले.
कुलाबा जिल्ह्यातील शिवाजीराजांच्या प्रगतीमध्ये त्यांना, मुसलमानी सत्ता
झुगारून देण्यास तयार असलेल्या, स्थानिक प्रमुखांनी मदत केली. किंबहुना
त्यांनी शिवाजी राजांची मदत मागितली होती. सुरगड, तळा, घोसाळगड, भोरप किंवा
सुधागड, कांगोरी हे सर्व किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. अशा
रीतीने कुलाब्याचा पूर्वेकडील जवळजवळ अर्धा भूभाग जंजिऱ्याच्या सीदीला
गमवावा लागला. सीदींना नामशेष करण्याच्या हेतूने शिवाजीराजांनी शामराज पंत
पेशवे याच्या नेतृत्वाखाली १६५९ मध्ये पुन्हा सैन्य पाठविले. परंतु
मराठ्यांची फथखानाशी गाठ पडली आणि बेसुमार कत्तल होऊन मराठ्यांचा पराभव
झाला. या पराभवात झालेली हानी भरून काढण्याचे प्रयत्न करून शिवाजीराजांनी
रघुनाथ कोरडेच्या नेतृत्वाखाली ताज्या दमाचे सैन्य धाडले. तरीही फथखानाने
आपले वर्चस्व कायम राखले आणि पुढील वर्षात (१६६०) त्याला भरपूर लाभही झाला.
या मोहिमेत खेम सावंत या विजापूरकरांच्या निष्ठावान सरदाराने सीदीस
सहकार्य केले. शिवाजीचा सेनाधिकारी बाजी पासलकर याने खेम सावंताशी
समोरा-समोर युध्द केले, त्यात ते दोघेही मरण पावले. १६६१ च्या पावसाळयात
शिवाजीने आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी फथखानावर स्वारी केली. खराब हवामान
असतानाही फथखानाचे सैन्य मागे हटवले. विजापूर दरवार सावरण्यापूर्वीच दंडा
राजपुरी जिंकून घेतले. बेटावर अंकुश ठेवता यावा म्हणून एक डोंगरी किल्ला
बांधला आणि बिरवाडी व लिगाणा हे किल्ले बांधून शिवाजीने सीदींना त्या
प्रदेशातून पूर्णपणे हाकलून लावले. त्यामुळे सीदींनी चालवलेल्या
विध्वंसापासून त्या प्रदेशाचे रक्षण प्रभावीपणे करता आले. जंजिरा किल्ल्यास
प्रत्युत्तर म्हणून शिवाजीराजांनी तोफखाना सुरू केला. परंतु त्याबाबत
प्रभावी कामगिरी करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यानंतर पुढील नऊ वर्षात (१६६१
ते १६७०) दर मोसमात शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले, परंतु
त्यांना फारच थोडे यश मिळाले. फथखानाने त्याचे नवे शेजारी इंग्रज
यांच्याकडे मदतीची याचना केली.
कुलाबा किनारपट्टीवरील मराठ्यांचा प्रदेश
एका प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्या प्रांताचा कारभार
पाहण्यासाठी राजप्रतिनिधी व्यंकोजी दत्तो याची पाच ते सात हजार फौजेसह
शिवाजी महाराजांनी नेमणूक केली.
सन १६६० मध्ये औरंगजेबाने शायिस्ताखानला
शिवाजीविरुद्ध मोहिमेवर पाठवले. त्याने पुण्याजवळील चाकण आणि काही
मोक्याची ठिकाणे काबीज स्वारी करून आणि शिवाजीचा प्रदेश जिंकून घेण्याचे
योजले होते. करून पुढे कोकणवर या कामी उझबेकी
मध्ययुगीन काळ
१२५
सेनाप्रमुख
करतलबखान याची निवड शायिस्ताखानने केली. त्याच्यासोबत शायिस्ताखानने
आपल्या हाताखालील रजपूत सरदार, मुस्लीम सैन्य व चव्हाण, गाढे, कोकाटे, जाधव
हे मराठी सरदार तसेच उदाजी रामची विधवा स्त्री रायबागन इत्यादीनांही
पाठवले. करतलबखान पुण्याहून लोहगडमार्गे कूच करत बोरघाटाच्या दक्षिणेस
असलेल्या उंबर खिंडीतून कोकणात उतरला. दाट अरण्यामधून कठीण अशा
डोंगरदऱ्यामधून आणि चिंचोळया रस्त्यातून वाट काढत सैन्यासह उंबर खिंडीत
(पेणच्या पूर्वेकडे २४ कि. मी.) पोहोचला. शिवाजीराजांनी गुप्तपणे आणि जलद
हालचाली करून मुघल सेनेला उंबर खिंडीत गाठले. त्यामुळे मुघलांचा मार्ग
रोखला गेला आणि त्यांची कोंडी करून माघार घ्यायला लावली. करतलबखानाला
शिवाजी महाराजांनी माघार घेण्यास व शरणागती स्वीकारायला भाग पाडले.
रत्नागिरी
जिल्ह्यातही शिवाजीराजांनी यश मिळविले. तथापि नंतर त्यांना एक मोठा पराभव
पत्करावा लागला. मे १६६१ मध्ये मुघलांनी प्रथम कल्याण आणि नंतर मुख्य
प्रादेशिक ठाणे असलेले महाड जिंकले. पुढे नऊ वर्ष ते मुघलांच्या ताब्यात
राहिले. मुघल सेनाधिकारी बुलाकी याने पेणजवळील देयरी (Deiri) किल्ल्यास
वेढा घातला. परंतु कावजी कोंढळकराच्या नेतृत्वाखाली वेढा सोडवण्याकरिता
आलेल्या सैन्याने सुमारे ४०० मुघल सैनिक ठार करून तेथून बुलाकीला हुसकावून
लावले (२१ ऑगस्ट १६६१). १६६२ मध्ये शिवाजीराजांनी पेणवर हल्ला चढवला परंतु
मुघल सेनेने निकराचा प्रतिकार केल्याने शिवाजीराजांच्या सैन्याला मोठी हार
पत्करावी लागली. त्यांचे खूप सैनिक मारले गेले. यावेळी मुघलांनी चौलचा
उत्तर भाग आणि रहिमतपूर ही ठिकाणे शिबंदीसह सज्ज ठेवली होती असे दिसून
येते. या सर्व लढायांमुळे रत्नागिरी आणि दक्षिण कुलाब्यातील काही भाग
शिवाजी महाराजांच्या ताब्यात राहिला तरी उत्तर कोकण आणि कुलाब्याचा उत्तर
भाग मुघलांच्या ताब्यात गेला.
याच सुमारास शिवाजीराजांनी सुसज्ज
आरमाराची बांधणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथम रायगड अधिक बळकट
केला. सीदींचे अनुकरण करून लढाऊ गलबतांचा एक तांडा (आरमार) सुसज्ज केला.
कुलाबा किल्ल्याची पुनर्बाधणी करून तो अधिक बळकट केला. सुवर्णदुर्ग आणि
विजयदुर्ग या सागरी दुर्गाची दुरुस्ती केली आणि युध्दनौका बांधून घेतल्या.
या वेळी कुलाबा किल्ला हेच त्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होते.
विजापूरचा
धोका टळताच शिवाजीने आपले सैन्यबळ मुघलांविरुद्ध वळविले. सन १६६३ मध्ये
सैन्याची एक तुकडी कल्याणजवळ आणि दुसरी दंडा राजपुरीजवळ जमविली. त्यावेळी
त्यांनी असे भासविले की, त्यांना वसई व चौलच्या पोर्तुगिजांवर किंवा
जंजिऱ्याच्या सीदीवर स्वारी करावयाची आहे. परंतु त्यांचा हेतू केवळ सुरत
लुटणे हा होता. तो त्यांनी ६ ते १० जानेवारी १६६४ दरम्यान साध्य केला.
सुरतच्या लुटीमधून त्यांनी रायगडची मजबूत बांधणी केली.
** ही रायबागन
औरंगजेबाची समर्थक असून माहूरच्या उदाजी राम कुलकर्णीची पत्नी होती. तिने
औरंगजेबास चांगली मदत केल्यामुळे त्याने तिला राज वाघिण (राय बागन) हा
किताब दिला. उंबर खिंडीच्या लढाईत तिने मुघलांना मदत केली. परंतु ती पराभूत
झाली.
१२६
इतिहास
या काळात शिवाजी
महाराजांची गलबते अरबी समुद्रात दूरदूरच्या प्रदेशापर्यंत ये-जा करीत.
सुरतच्या इंग्रजांनी मार्च १६६५ मध्ये लिहिलेल्या एका नोंदीप्रमाणे दिसून
येते की, दरवषीं कोकणातील सात आठ बंदरांमधून दोन ते तीन व्यापारी गलबते
पशिया, बसरा, अरेबियातील मोखा येथे जात येत असत. मराठ्यांचे वाढते व्यापारी
महत्त्व आणि आरमारी सामर्थ्य इंग्रज व्यापारी, सीदी तसेच मुघल सम्राटांना
चिता निर्माण करणारे होते. तथापि या बाबतीत इंग्रजांनी काहीच प्रतिकारात्मक
हालचाल केली नाही. मात्र मुघलांनी शिवाजीविरुद्ध मोहीम आखली.
सन १६६९
मध्ये शिवाजीराजांनी जंजिन्यावर नव्या जोमाने व संपूर्ण सामर्थ्यानिशी
हल्ला चढविला. ऑक्टोबरमध्ये शिवाजी महाराजांनी वेढा घालून सीदीस जेरीस
आणले. तेव्हा सीदीने इंग्रजांच्या मदतीची याचना केली. या वेळी जंजिरा
जिकण्याचा खटाटोप शिवाजीने सोडून द्यावा अशा आशयाचे औरंगजेबाने पत्न
लिहिले. शिवाजीने ही सूचना मानली किवा नाकारली याबाबत निश्चित सांगता येत
नाही. परंतु खरा संघर्ष त्या पुढील वर्षी उद्भवला. शिवाजीराजांनी यावेळी
आपले सर्व सामर्थ्य जंजिरा जिंकण्याकडे केंद्रित केले. वारंवार घडणाऱ्या
संघर्पाला कंटाळून व आपले बळ कमी होत असल्याचे जाणून, शिवाजीराजांनी जंजिरा
किल्ला सोडण्याची किमत म्हणून देऊ केलेले द्रव्य आणि सुयोग्य जहागीर
घेण्याचे फथखानने मान्य केले. परंतु सीदी संबळ, कासिम आणि खैरियत यांनी
शरणागती पत्करण्यास बेटावरील इतर जातीबांधवांसह विरोध केला. त्यांनी
फथखानाला कैदेत टाकले आणि सत्ता बळकावली.
कासिम आणि खैरियत या दोघा
भावांनी सीदी संबळ यास पाठिंबा देऊन आपले अधिकार सोडले. त्यामुळे सीदी
संबळचीच प्रमुख अधिकारी म्हणून नेमणूक झाली. सीदी संबळने विजापूरचा आदिलशहा
आणि मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख अधिकारी खानजहाँ यांच्याकडे मदतीची याचना
केली. आदिलशहाने फारच थोडी मदत केली तर मुघल अधिकाऱ्याने केवळ मैत्रीचा
संदेश आणि मदतीचे आश्वासन दिले. म्हणून सीदीने विजापूर दरबारचे मांडलिकत्व
सोडून मुघलांचे आरमार प्रमुख म्हणून काम करण्याचे मान्य केले. औरंगजेबाने
त्याचा वझीर हा किताब काढून टाकून याकूतखान हा किताब दिला आणि फेब्रुवारी
१६७१ मध्ये त्याला सुरतेचा महसूल म्हणून तीन लाख रुपये देऊ केले. जेव्हा
सीदी संबळ याची मुघल आरमाराचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली तेव्हा
जंजिऱ्याचा ताबा सीदी कासिमला व दंडा राजपुरीचा ताबा सीदी खैरियतला दिला
असावा. अशा प्रकारे जंजिऱ्याचा कारभार नौसेना प्रमुखाच्या अधिकाराहून वेगळा
करण्यात आला. सन १६७७ मध्ये सीदी कासिम याने सीदी संबळचे पद सांभाळले आणि
सीदी खैरियतने कासिमचा उत्तराधिकार स्वीकारला. सन १६९६ पर्यंत खैरियतने
जंजिऱ्याचे प्रमुखपद सांभाळले असे दिसते. सन १६७० मध्ये सीदीची मदत मिळवून
दक्षिणेतील मुघल अधिकारी खानजहाँ याने आपली गलबते दक्षिण किनाऱ्यावर पाठवून
दंडा राजपुरीजवळ शिवाजीच्या लढाऊ गलबतांवर हल्ला चढवला. शंभर मराठा खलाशी
मारले, गलबतांवर दगडांचा मारा केला आणि गलबतावरील सैनिकांना समुद्रात फेकून
दिले. तेव्हा शिवाजीराजांनी पुन्हा एकदा नवे आरमार सज्ज केले. खाफीखानच्या
मते सीदी कासिम अत्यंत धैर्यवान, सहृदय आणि आदरणीय असा वीर होता.
सन
१६७१ मध्ये होळीच्या सणाच्या सुमारास मराठा फौज सावध नसताना एका रात्री
कालिमने सीदी खैरियतच्या अधिपत्याखाली चार-पाचशे सैनिक दोरांच्या
शिडभांच्या
मध्ययुगीन काळ
१२७
सहाय्याने आणि आणखी एक तुकडी
जमिनीवरून दंडा राजपुरीच्या किल्ल्यावर हल्ला करण्याकरिता धाडली आणि
तीस-चाळीस गलबतांसह स्वतः समुद्रमार्गे आला. विशिष्ट इशाऱ्यासरशी मोठ्या
आरोळ्या देत जमिनीवरून किल्ल्यावर प्रचंड हल्ला चढविला. मराठ्यांनी तीव्र
प्रतिकार करूनही सीदीने तो मोडून काढला आणि त्यांनी किल्ल्यात प्रवेश केला.
किल्ल्यातील दारूच्या कोठारास आग लागली आणि त्याचा प्रचंड स्फोट झाला.
त्या आवाजाने ६४ कि. मी. दूर रायगडावर शिवाजी महाराज निद्रेतून जागे झाले
आणि "दंडा राजपुरीवर काहीतरी संकट आलेले दिसते", असे त्यांनी उद्गार काढले.
सीदीने दंडा राजपुरी जिंकून घेतली. दंडा राजपुरीच्या परिसरातील आणखी
सहा-सात किल्ले कासिमने जिंकून घेतले. कासिमने आपल्या या विजयाची खबर
मुघलांचे दक्षिणेतील प्रमुख अधिकारी शाहजादा मुअज्जम आणि खानजहाँ यांना
कळविली. त्यामुळे त्याचा भाऊ सीदी खैरियत आणि स्वतः सीदी कासिम यांना वरचा
दर्जा देण्यात आला. सप्टेंबर १६७१ मध्ये आपला प्रतिनिधी मुंबईला पाठवून
दंडा राजपुरीवरील लढाईत इंग्रजांची मदत मिळावी असा शिवाजीने प्रयत्न केला.
परंतु सुरतेतील प्रमुखाने आणि कंपनीच्या सभासदांनी शिवाजीराजांना मदत
देण्याचे आश्वासन देऊ नये किंवा नाकारूही नये असे कळवले. कारण शिवाजीला
सीदीविरुद्ध मदत करणे इंग्रजांना योग्य वाटत नव्हते. तसेच शिवाजीचा दंडा
राजपुरीवरील ताबा इंग्रजांच्या मुंबई बंदरास उपद्रवकारक ठरणारा होता.
समुद्रावरून जमिनीवर हल्ला करता यावा याकरिता १६७२ च्या अखेरीस औरंगजेबाने
सुरतेहून दंडा राजपुरीच्या सहाय्याकरिता ३६ लढाऊ गलबतांचा तांडा पाठवला. या
आरमाराच्या तुकडीने शिवाजीची सर्व बंदरे व बरीच गावे उध्वस्त केली.
इ.
स. १६६३ पासून १७०७ मध्ये सीदी कासिमच्या मृत्यूपर्यंतच्या काळात सीदींचे
मराठ्यांशी सतत युद्ध होत राहिले. कधी ते मराठ्यांचा बराच भूभाग जिंकून घेत
तर कधी त्यांचा प्रदेश मराठे जिंकून घेत. तथापि अत्यंत अटीतटीने त्यांनी
जंजिरा किल्ला लढवत ठेवला होता.
इ. स. १६७३ मध्ये शिवाजी आणि सीदी या
दोघांनीही मुंबईतील इंग्रज डेप्युटी गव्हर्नर ऑजियर याने आपल्या पक्षास
सहाय्य करावे म्हणून खूप दडपण आणले होते. परंतु आपली तटस्थता कायम ठेवून
आँजियरने दोन्ही पक्षांचा विश्वास संपादन केला. मात्त्र फ्रेंचांनी ८० तोफा
आणि २,००० मण शिसे शिवाजीस विकले. डचांनी देखील सहाय्याचे आश्वासन दिले.
परंतु शिवाजी महाराज उचांवर विसंबून राहिले नाहीत. इंग्रजांशीही त्यांनी
सलोख्याचे धोरण ठेवले. सीदीवर केलेल्या अनेक हल्ल्यांत त्यांचे बरेच नुकसान
झाले होते. त्यानंतर काही काळाने (१० ऑक्टोबर रोजी) सीदीचे आरमार
पूर्वसूचना न देता मुंबई बंदरात आले. उपसागराच्या एका बाजूला पेण आणि
नागोठण्याच्या खाडीपाशी ते उतरले आणि मराठ्यांच्या प्रदेशातील अनेक गावे
त्यांनी उध्वस्त केली.
सन १६७४ मध्ये शिवाजीने आपले आरमार वाढविले व
दुसरी फौजही रायगडाहून एकदम सीदीवर आणली. तेव्हा मराठ्यांनी सीदीचे शेकडो
लोक कापून काढले, आणि जंजिऱ्यापासून गोव्यापर्यंतचा किनारा काबीज केला.
राजपुरी सीदीने घेतले होते, ते पुन्हा मराठघांकडे आले. सन १६७४ मध्ये
शिवाजीने सीदीचा पाडाव करून त्यास सुरत-पर्यंत हाकलून लावले. त्यामुळे
औरंगजेवाने सीदीस अधिक मदत देऊन पुन्हा शिवाजीच्या मुलखावर पाठविले. तो
एकदम वेंगुर्त्यास आला, परंतु विजयदुर्ग व राजपुरीतील मराठा
१२८
इतिहास
आरमाराने
त्यास हाकलून लावले (ऑक्टोबर १६७६). इकडे पेशवा मोरोपंत याने जंजिऱ्यास
वेढा घातला, तथापि सीदीला मुघलांची मदत आल्याने जंजिरा जिंकता आला नाही.
राज्याभिषेकाच्या
वेळी शिवाजीचे आरमार प्रचंड होऊन युध्दसामग्रीही चांगली होती. शिवाजीच्या
आरमाराचा पुढे संभाजीलाही चांगला उपयोग झाला. कुलाबा, विजयदुर्ग,
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व अंजनवेल येथे शिवाजीच्या गोद्या होत्या.
जंजिऱ्यासाठी मराठ्यांनी सतत झुंज दिली पण तो हाती आला नाही. कुलाबा
जलदुर्गात आरमाराचे मुख्य ठिकाण होते. नाविक दौलतखान, सीदी मिस्त्री,
मोरोपंत पिंगळे, नेताजी पालकर, रघुनाथ बल्लाळ यांनी आरमारी लढायांमध्ये
पुढाकार घेतला. भिवजी गुजर व कान्होजी आंगरे शिवाजीच्या आरमारात नोकरी करून
पुढे प्रसिद्धी पावले.
रायगडावर जून १६७४ मध्ये मोठ्या समारंभाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा झाला. रायगड महाराष्ट्राचा मानबिंदू झाला.
ऑक्टोबर
१६७८ मध्ये फार मोठ्या आरमारासह आणि अधिक सामर्थ्यवान अस्वास्वांगह
जंजिन्यावर तोफांचा मारा नव्याने पुन्हा करण्याच्या हेतूने आरमार प्रमुख
दौलतखान यास शिवाजीने पाठविले. शिवाजीने आपल्या आरमारात आणखी बाबीस शिडांची
गुरावे आणि चाळीस गलीव्हट यांची भर घातली. आपण मुंबईच्या इंग्रजांना
सीदीला तेथे आसरा देऊन पावसाळी मोसमात राहू देण्यापासून परावृत्त करू शकत
नाही व सीदीला तेथून घालवून देण्याचा आग्रह करू शकत नाही, हे लक्षात
आल्यावर संतप्त होऊन शिवाजी महाराज मुंबईच्या ११ मैल दक्षिणेकडील खांदेरीवर
गेले आणि पोर्तुगीज व इंग्रज यांच्या विरोधास न जुमानता तेथे किल्ला
बांधण्यास त्यांनी सुरुवात केली.
मराठ्यांचे खांदेरी येथील अस्तित्व
मुंबईतील इंग्रजांच्या दृष्टीने सर्वच प्रकारे अत्यंत त्रासदायक ठरणारे
होते, कारण कोणतेही जहाज खांदेरीहून दृष्टीस पडल्याशिवाय मुंबईकडे येऊ
किंवा जाऊ शकत नव्हते. खरे तर शिवाजी महाराजांची खांदेरीवर १६७२ पासूनच नजर
होती. एक अत्यंत मोक्याचे बेट म्हणून ते आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा
हेतूही होताच. त्या दिशेने त्यांनी पूर्वी काही प्रयत्नही केले होते.
सप्टेंबर १६७९ मध्ये शिवाजी महाराजांनी चार तोफा व १५० सैनिक मायनाक
भंडारीच्या हाताखाली दिले व खांदेरी बेटावर किल्ला बांधण्यास सांगितले.
तेव्हा मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने "तुम्ही ते ठिकाण सोडून जावे कारण ते
मुंबई बेटाच्या मालकीचे आहे" अशी विनंती केली. शिवाजी महाराजांचा
त्यासंबंधी आदेश नसल्याने मराठ्यांनी इंग्रजांची ही विनंती धुडकावून लावली.
त्यामुळे मराठा आरमाराने खांदेरीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला तर त्यास
विरोध करण्याचा इंग्रजांनी निर्धार केला. त्याप्रमाणे १९ सप्टेंबर रोजी
खांदेरी बेटाजवळ एक आरमारी चकमक झाली आणि त्यात इंग्रज पराभूत झाले.
लेफ्टनंट फ्रान्सिस थोर्प याने खांदेरी बेटावर उतरण्याचा एक आततायी प्रयत्न
केला, तेव्हा इतर दोन माणसांसह तो मारला गेला. कित्येकजण जखमी झाले आणि
इतरही कित्येक कैदी म्हणून बेटांवर ठेवले. लेफ्टनंटचे एक जहाज पकडले, व दोन
जहाजे खांदेरी बेटाबाहेरील खुल्या समुद्रात उभ्या असलेल्या लढाऊ गलबतांबर
निसटून गेली. अर्थातच ही गलबते
*** शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळयाचे वर्णन प्रकरण १२- प्रेक्षणीय स्थळे यात दिले आहे.
मध्ययुगीन काळ
१२९
बेटाच्या
आणखी जवळ नेणे शक्य नव्हते. दुसऱ्याच दिवशी आणखीही इंग्रज जहाजे पकडून
नेली. मार्जट गाईल्सने भीतीने कोणताही प्रतिकार केला नाही.
ऑक्टोबरच्या
सुरुवातीस खांदेरीच्या मदतीस जाण्याकरिता मराठा आरमार सज्ज झाले.
मराठ्यांचे इंग्रजांशी दुसरे युद्ध १८ ऑक्टोबर १६७९ रोजी झाले. दिवस उजाडत
असतानाच दौलतखानच्या नेतृत्वाखालील मराठा आरमार इंग्रज आरामाराच्या एका
लहानशा तुकडीवर चाल करून गेले. या तुकडीमध्ये एक वेगवान युद्धनौका, शिडांची
दोन गुरावे, तीन सिबारे, दोन मचवे मिळून एकंदरीत आठ गलबते, दोनणे युरोपियन
सैनिक, लप्कर आणि गोरे खलाशी यांचा समावेश होता. मराठे चौलच्या उत्तरेकडून
आपल्या लढाऊ जहाजातून तोफांचा मारा करीत अत्यंत वेगाने चाल करून आले.
मराठ्यांची गलबते इतक्या वेगाने चाल करून आली की, खांदेरीजवळ नांगर टाकून
असलेल्या इंग्रज जहाजांना नांगर उचलून हलण्याइतकाही वेळ मिळाला नाही.
अर्ध्या तासापेक्षाही कमी अवधीत डोव्हर नावाचे एक इंग्लिश जहाज, भयभीत
झालेल्या सार्जंट मॉलेव्हरर आणि काही इंग्रज सैनिकांसह मराठ्यांनी ओढून
नेले. इतर जहाजे बाजूलाच राहिली आणि पाच छोटया नौका रिव्हेंज का शत्रूच्या
जवळ टाकून पळून गेल्या. परंतु अत्यंत शौर्याने लढून त्या युद्धनौकेने
मराठ्यांच्या गलीव्हटना जलसमाधी दिली. त्यामुळे मराठ्यांचे आरमार रिव्हेंज
चा पाठलाग पाहून नागोठण्याच्या बांधाकडे पळाले. त्यानंतर दोन दिवसांनी
मराठ्यांची गलबते खाडीतून निघाल्ली, परंतु इंग्रज नौका पुढे चालून येत
असलेल्या पाहून पळून आली. मराठा नौदलाची साधनसामग्री इतकी अकार्यक्षम होती.
नोव्हेंबर अखेर चाळीस जहाजांचे सीदीचे आरमार इंग्रजांना खांदेरीपाशी येऊन
मिळाले आणि खांदेरी बेटावर त्यांनी दररोज तोफा डागल्या. परंतु इंग्रजांनी
शिवाजीणी जास्त संघर्ष न करण्याचे ठरविले.
सन १६८० मध्ये सीदी कासिम
आपल्या आरमारासह खांदेरीपासून मैलभर अंतरावरील उंदेरी बेटावर ३०० माणसे व
दहा मोठ्या तोफा घेऊन उतरला आणि ९ जानेवारी १६८० ला तेथे किल्ला बांधून थळ
येथील मराठ्यांच्या तोफा बंद पाडण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावर शिवाजी
महाराजांचा आरमार प्रमुख दौलतखान आरमारासह नागोठणे नदीतून समुद्रात आला
आणि सीदीला चकित करण्याच्या उद्देशाने त्याने रात्री उंदेरीवर हल्ला
चढविला. परंतु सीदीने चौलहून टेहळणी करून अत्यंत जागरूक राहिला व
दौलतखानाचे मनोरथ धुळीस मिळाले.
शिवाजीच्या राज्याचा विस्तार ठोकळ
मानाने तापी नदीपासून दक्षिणेस थेट जिजी-तंजावरपर्यंत कावेरी नदीतीरास
पोहोचला होता असे म्हणता येईल. तथापि मधेमधे दुसऱ्या राजसत्तांचे
प्रदेशखंडही बरेच होते. पोर्तुगीज, सीदी, इंग्रज या परदेशी सत्ता
महाराजांना चौथाई किवा अन्यरूपाने थोडाबहुत महसूल देत. आदिलशाही व
कुतुबशाही राज्ये महाराजांच्याच कृपेने टिकून होती. मुघलांचा निभाव
अहमदनगरच्या पुढे फारसा झालाच नव्हता. कुलावा, पुणे, नाशिक, कोल्हापूर,
वेळगाव, धारवाड, कर्नाटकचा वराच भाग शिवाजीच्या कव्जात आला होता. या
प्रदेशाचे चार प्रांत करून पश्चिम भागाची व्यवस्था अनाजी दत्तोकडे होती.
बागलाण मोरोपंत पेशव्याच्या देखरेखीखाली होता. पन्हाळगडापासून दक्षिणेकडील
प्रांतात जनार्दनपंत हणमंते व रघुनाथपंत हणमंते यांना नेमलेले होते.
शिवाजीराजांच्या राज्याचा जास्तीत जास्त वसूल सात कोटी रुपये होता.
१२५ खांदेरी व उंदेरीचा इतिहास व वर्णन प्रकरण १२- प्रेक्षणीय स्थळे यात दिलेले आहे. वाय ३५-९
१३०
इतिहास
शिवाजीने
जमिनीची मोजणी करून तिचा शेतसारा कायमचा ठरवून दिला आणि तो गोळा
करण्याकरिता सरकारी अंमलदार नेमले. जमिनीची मोजणी करून खातेदाराच्या नावे
करावयाची व सरकारी महसुलाबाबत कबुलायत लिहून घेऊन जमीन खातेदाराच्या हवाली
करावयाची, असा शिवाजीने प्रघात घातला. जमीन महसूल शेती उत्पन्नाच्या
दोनपंचमांशपेक्षा अधिक असू नये असा दंडक घातला. म्हणजे जमीनमालकास
तीनपंचमांश उत्पन्न मिळत असे. शेती हंगामानुसार तगाई कर्ज देण्याचीही तरतूद
केलेली होती.
भुलकी अधिकाऱ्यांकडे फौजदारी कामेही सोपविली होती.
ग्रामपंचायती कायम करून लोकांच्या सर्व तंट्यांचा निकाल पंचायतीमार्फत
करण्यात येई. धर्मशास्त्रानुसार न्यायदान करण्यात येई. शिवाजीराजांनी १६७८
मध्ये अनाजी दत्तो सचिवाच्या मार्फत जमीन महसुलाची व्यवस्था करून घेतली.
प्रत्येक गावास पाटील व कुळकर्णी आणि दोन-तीन गाबे मिळून एक कमाविसदार, असे
अधिकारी नेमलेले होते. कमाविसदारांबर तालुकदार किंवा तरफदार किंवा महालकरी
ठेवण्यात आला होता. प्रत्येक महालाचा वसूल नजीकच्या किल्ल्यावर नेऊन
ठेवण्यात येई. शिवाजी राजांनी देणमुख अथवा देशपांडे यांच्याकडे वंशपरंपरा
वतनदारी अधिकार ठेवले नाहीत. कोणत्याही खात्याच्या नोकरास जहागीर दिलेली
नव्हती. प्रत्येकास आपल्या कामासाठी दरमहा रोख बेतन सरकारी खजिन्यातून
देण्यात येई.
तथापि छत्रपती संभाजी शिवाजीमहाराजांचे रायगडावर ३ एप्रिल
१६८० रोजी निधन झाले. त्यानंतर २१ एप्रिल १६८० रोजी राजारामाने राज्यपदाची
सूत्रे हाती घेतली. आपला गादीवरील अधिकार असल्याने संभाजीने पन्हाळा
गडावरून रायगडाबर आक्रमण केले. दिनांक १८ जून १६८० रोजी संभाजी रायगडावर
आला व राजारामास कैद करून राज्य करू लागला. अल्पावधीत बिरोधकांचा बंदोबस्त
करून संभाजीने २० जुलै १६८० ला मंचकारोहण केले आणि १६ जानेवारी १६८१ (माघ
शुद्ध ७ शके १६०२) रोजी संभाजीराजांचा विधिपूर्वक राज्याभिषेक समारंभ
रायगडावर झाला.
संभाजी गादीवर आल्यावरही सीदीचा उपद्रव चालूच राहिला.
सीदी, गोव्याचे पोर्तुगीज व मुघल बादशहा यांच्याशी संभाजीने लढाया केल्या.
सीदीला मुघल व इंग्रजांचे पाठबळ असल्याने तो रायगडास शह देऊ शके. तथापि या
तिन्ही शंशी संभाजीने निकराचे सामने केले. त्यात त्याचे शौर्य, धाडस
स्पष्टपणे व्यक्त झाले. त्याच्या मोहिमांची ऑर्म, मनूची वगैरे लेखकांनी
भरपूर हकीकत लिहून ठेवली आहे. कोकणातले राजकारण त्याने चांगले ओळखले.
संभाजीने
उंदेरीवर हल्ला चढवला परंतु तो अयशस्वी झाला. त्याचे उट्टे काढण्याकरिता
सीदी मुंबईहून कुलाब्याच्या किनाऱ्यावर समुद्रमार्गे गेला. त्याने
कुलाब्याचा विध्वंस केला आणि तेथील प्रमुख रहिवाशांना पकडून कैद केले. त्या
कैद्यांपैकी कित्येक मुसलमानही होते. तरीही त्यांना उंदेरीस नेऊन
निर्दयपणे मारहाण केली व त्यांचे हालहाल केले. अखेर त्या कैद्यांनी १८,०००
रुपये खंडणी देण्याचे मान्य केले. सीदीने शांततेचा भंग करणारे हे जे कृत्य
केले त्याबद्दल सुरतेच्या इंग्रजांनी नापसंती दर्शविली. सीदीला प्रत्युत्तर
म्हणून सोळा महिन्यांपूर्वी त्याने चालवलेली मराठा युद्धकैद्यांची विक्री
मुंबईच्या इंग्रजांनी थांबवली होती. त्या कैद्यांची किंमत इंग्रजांनी
आपल्याला द्यावी अशी उलट मागणी सीदीने केली. सुरतच्या मुघल प्रमुखाने
इंग्रजांच्या बखारीवर हल्ला करण्यास सीदीला प्रोत्साहन दिले.
मध्ययुगीन काळ
१३१
दोन
दिवस इंग्रजांची वखार बंद ठेवण्यात आली. जहाजांवर चढवण्याकरिता आणलेला माल
वस्त्रारीच्या आवारातच पडून राहिला. त्यानंतर ऑक्टोबर १६८२ च्या अखेरीस
सीदीने मुंबई बंदरात प्रवेश केला. मुंबईच्या इंग्रज सरकारने विरोध करून
देखील त्याने मुंबई बंदरात व्यापाराकरिता आलेल्या मराठ्यांच्या सर्व
गलबतांवर हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर त्यात त्याने मुंबईच्या इंग्रजांच्या
मालकीचे एक गलबतही पकडले. त्यानंतर कुलाबा किनारपट्टीवरील एक गाव भस्मसात
करून त्याने चौलकडे प्रयाण केले. परंतु चौल शहरावरील चढाईचा प्रयत्न असफल
झाला.
सन १६८२ मध्ये संभाजीने मराठा फौजेचा एक अधिकारी दादाजी रघुनाथ
देशपांडे यास जंजिऱ्याच्या मोहिमेवर पाठवले. जंजिरा काबीज झाल्यास त्याची
अष्टप्रधान मंडळापैकी एक प्रधान म्हणून नेमणूक करण्यात येईल असे संभाजीने
आश्वासन दिले. तथापि सीदीने त्याचा पराभव करून महाडपर्यंत पाठलाग केला,
महाडचे त्याचे घर उध्वस्त करून त्याच्या माणसांस पळवून नेले. नंतर शहजादा
अकबर याच्यासह २०,००० सैन्य घेऊन संभाजी रायगडहून जंजिऱ्याला घातलेल्या
वेढघास येऊन मिळाला. तीस दिवस तोफांची सरबत्ती करून त्याने किल्ल्याची
तटबंदी जमीनदोस्त केली आणि कोंडाजी फर्जद याच्या सहाय्याने जंजिरा काबीज
करण्याची एक योजना आखली. ती योजना उघडकीस आली आणि कोंडाजीस ठार करण्यात
आले. बेटाच्या मध्यभागी एका डोंगराआड दडून राहिलेल्या सीदी खैरियतच्या
हाताखालील सैन्याने प्रतिकार सुरू केला. त्याच वेळी सीदी कासिमने
संभाजीच्या आरमाराचा धुव्वा उडविला. तेव्हा संभाजीने तेथील आठशे यार्ड रूंद
आणि ३० यार्ड खोल खाडी दगडांनी बुझवून टाकण्याचा प्रयत्न चालवला. परंतु ती
पूर्ण बुझवून होण्याआधीच मुघलांच्या घोडदळाला तोंड देण्याकरिता संभाजीस
परत फिरावे लागले.
संभाजी जंजिऱ्याच्या स्वारीहून परत गेल्यानंतर काही
काळ सीदी आपल्या आरमारासह जंजिऱ्यावर देखरेख करीत होता. या वेळी त्याचे
मुख्य कर्तव्य तिन्ही बाजूंनी संभाजीवर चाल करून येत असलेल्या मुघलांशी
सहकार्य करणे हे होते. कल्याणहून शहाबुद्दीन कोकणाकडे येत होता, गोव्याच्या
पोर्तुगिजांशी हातमिळवणी करून मुअज्जम बेळगावहून रामसेज घाटमार्गे निघाला
होता. अशा प्रकारे संभाजीची कोंडी करीत असतानाच आझमशाह हा बागलाणमध्ये
हैदोस घालून संभाजीचे लक्ष विचलित करीत होता. अशा वेळी सीदीने संभाजीच्या
राज्याला आणि सैन्याला मिळणारी रसद व मालपुरवठा पूर्णपणे तोडून त्याची सर्व
बाजूंनी कोंडी केली. संभाजी दंडा राजपुरी सोडून गेल्यानंतर दादाजी
रघुनाथने जंजिरा आणि मुख्य प्रदेश यामधील खाडी भरून काढण्याचे प्रयत्न
सोडून दिले. जेव्हा सीदी कासिम मुंबईला जाण्याकरिता निघाला तेव्हा दादाजीने
आपले सैनिक जमवून बेटावर हल्ला चढवला, तथापि दोनशे सैनिक गमावून त्याला
पराभूत व्हावे लागले.
. शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शेतसाऱ्याची
पद्धती बंद करून संभाजीने पूर्वीचीच चौथाई आणि अन्यायकारक शेतसाऱ्याची
पद्धती सुरू केली. त्यामुळे राज्यातील लोक नाराज झाले.
संभाजीने बंड
करणारा शहजादा अकबर यास आसरा दिल्यामुळे मुघल आरमार मराठ्यांच्या किनारी
प्रदेशावर हल्ला करून विध्वंस करू लागले. संभाजीने उत्तर भारत व मुघल सत्ता
हस्तगत करण्याच्या आपल्या मोहिमेत सहकार्य करावे, पाठबळ द्यावे अशी शहजादा
अकबराची इच्छा होती. परंतु संभाजीने आपले मुख्य ध्येय सोडून इतरत्र
हलण्याचे
१३२
इतिहास
नाकारले. सन १६८३ मध्ये संभाजीची चौलबरील
चढाई अयशस्वी झाली आणि त्यानंतरच्या वर्षात तो प्रदेश मुघल सैन्याने
बळकावला. अखेर १६८९ मध्ये रायगडाचा पाडाव झाल्यानंतर कोकणातील प्रमुख
बंदरांचा व त्या प्रदेशाचा ताबा मुघलांकडे आला.
औरंगजेबाने सप्टेंबर
१६८४ मध्ये रायगडची मोहीम हाती घेतली. पहिल्या दोन्ही मोहिमांमध्ये यण न
आल्याने औरंगजेबाने संभाजीला पेचात पकडण्याचे प्रयत्न केलेत. सन १६८८ च्या
अखेरीस शिर्केने कवी कलश याचा पराभव केल्याने संभाजी त्याच्या मदतीसाठी
रायगडावरून निघाला. विशालगडला जाऊन कवी कलशास अभयदान देऊन १६८९ च्या
प्रारंभी रायगडावर परत येत असताना संगमेश्वराजवळ नावडी येथील मुक्कामी
औरंगजेबाचा सरदार शेख निजाम तथा मुकर्रबन्बान याने अचानक हल्ला करून १
फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजीस पकडले. औरंगजेबाने ११ मार्च १६८९ रोजी बहू
कोरेगाव येथे संभाजीचा वध केला. दरम्यान ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम
सिंहासनावर बसला. औरंगजेबाच्या आज्ञेनुसार आसदखानाचा मुलगा ईतिकदखान
(झुल्फिकारखान) याने २५ मार्च रोजी रायगडास वेढा घातला. दरम्यान राजाराम
रायगडावरून गुप्तरीत्या प्रतापगडावर गेला. आठ महिने वेढा घालूनही उपयोग न
झाल्याने ईतिकदखानाने गडावरील सुर्याजी पिसाळ यास बाईची देशमुखी देण्याचे
आमिष दाखवून फितूर केले आणि अभेद्य असा रायगड ३ नोव्हेंबर १६८९ रोजी
मुघलांच्या ताब्यात गेला.
कान्होजी आंगरे : तुकोजी सकपाळ हा आंगरे
कुटुंबातील अग्रणी मनुष्य होय. तुकोजीने शहाजीच्या एका सरदाराच्या मुलीशी
विवाह केला होता. आणि त्यास पुरब नावाचा मुलगाही होता. पुरवचा मुलगा
कान्होजी असे सांगण्यात येते. कान्होजीस आंगरे हे नाव पुण्यापासून सहा
मैलावरील मावळ प्रांतातील आंगरवाडी या नावावरून मिळाले. त्याचे मूळ आडनाव
सकपाळ होते.
अत्यंत पराक्रमी, धैर्यवान, कार्यक्षम नेता म्हणून
कान्होजीने आपली योग्यता दाखविली. परकीय देशांची गलबते लुटून वावणकोर ते
मुंबईपर्यंतची सर्व गावे, शहरे लुटून त्याने ती जिंकली. अलिबागजवळील कुलाबा
किल्ला हे त्याने आपले प्रमुख केंद्र बनवले आणि मुवर्णदुर्ग तमेच
रत्नागिरीजवळील विजयदुर्ग येथे आपला आरमारी तळ बनवला.
कान्होजीच्या
मोहिमेचे मुख्य ध्येय संभाजीच्या हत्येनंतरच्या संघर्षात सीदीने बळकावलेला
मराठा प्रदेश पुन्हा मिळविणे हे होते. ज्या परकीय सत्ता आंगरेच्या आज्ञा
पाळण्याचे नाकारतील त्या आपल्या व्यापारावर आक्रमणाचा धोका ओढवून घेतील असे
त्याने' घोषित केले.
पन्नास वर्षाच्या सरबेलीच्या कारकिर्दीत
आंगऱ्यांनी मराठ्यांचे सागरी सामर्थ्य खूप वाढवले आणि मुघलांचे वर्चस्व
जवळजवळ निष्प्रभ केले. उरलेल्या लहान सत्तांनी तर आंगऱ्यांचे वर्चस्व मान्य
केले आणि त्यांचे अधिकारात शांततेने राहिले.
सन १६९९ मध्ये सीदीने
मराठ्यांचा पराभव केला व दंडा राजपुरी जिंकून घेतले. त्याबद्दल औरंगजेबाने
सीदीला बक्षिसादाखल रायगड किल्ला भेट दिला. त्याच वर्षी काही विपरीत सागरी
घटनांमुळे सोदी आणि पोर्तुगिजांनी आंगरेंच्या विरोधात मुघलांशी
रायगडचा इतिहास प्रकरण १२- प्रेक्षणीय स्थळे यात दिलेला आहे.
मध्ययुगीन काळ
१३३
सलोखा
केला. परंतु कान्होजीने या त्रयीचा पराभव केला. सागरगड आणि त्याच्या जवळचा
प्रदेश जिंकून घेतला. पराजित विरोधकांना कान्होजीने पुढील अटी
स्वीकारण्यास भाग पाडले :- कुलाबा, सागरगड आणि खांदेरीच्या महसुलापैकी भाग
आंगरेंना देण्यात यावा, भाग मुधलांना, संपूर्ण राजकोटचा महसूल तसेच चौलचा
बालेकिल्ला आंगरेंच्या मालकीचा व्हावा, चौलचा महसूल आंगरे आणि मुघलांमध्ये
समसमान विभागला जावा, आणि अलिबागजवळील परहूर या गावाचे उत्पन्न मीदीला
देण्यात यावे.
अशा प्रकारे सीदी आणि मुघलांना आंगरेच्या सामर्थ्याचा
तडाखा बसला. दि. १४ जानेवारी १७०० रोजी मुंबईतील इंग्रजांच्या वखारीने नींद
करून ठेवली की, अलीकडे सीदीच्या मराठ्यांशी काही जोरदार चकमकी झाल्या.
मराठे अत्यंत सामर्थ्यवान असून त्यांच्यापाशी ८,००० घोडदळ व १२,००० पायदळ
होते. मराठ्यांनी दंडा राजपुरीच्या परिसरातील गावे भस्मसात केली. त्यामुळे
परस्परांचे पुष्कळ नुकसान झाले. सीदी-मराठ्यांमधील युद्ध सतत चालू राहिले.
दि. २ एप्रिल १७०१ रोजीची नोंद आहे की, अद्याप कान्होजी आंगरे आणि
सीदीमध्ये समझोता निर्माण झालेला नाही. अलीकडे झालेल्या चकमकीमध्ये सीदीचा
मोठा पराभव झाला होता. सीदीने आपल्या जखमी सैनिकांवर उपचार करण्याकरिता
अत्यंत तातडीने एका सर्जनला पाठवण्यावाचत कळवले होते.
सागरी सामर्थ्य आणखी वाढल्यामुळे कान्होजीने आपल्या परवान्याशिवाय पश्चिम समुद्रात फिरणाऱ्या गलबतांना अटकाव करण्यास सुरुवात केली.
इ.
स. १७०७ ते १७१० या काळात राजारामाची विधवा पत्नी महाराणी ताराबाई हिने
शाहूणी संघर्ष केला. शाहूविरुद्धच्या संघर्षात तिने कान्होजी आंगरेची मुंबई
ते सावंतवाडी-पर्यतच्या मराठा राज्याच्या किनारपट्टीचा प्रमुख म्हणून
नेमणूक केली. तसेच राजमाची आणि भिवंडीच्या उत्तरेकडील काही प्रदेश व कल्याण
प्रदेशाचेही अधिकार कान्होजी आंगरे यास दिले.
सन १७१३ मध्ये कोकणच्या
अंतर्गत मुलुखाचे रक्षण करण्याकरिता आणि आंगऱ्याचे सामर्थ्य रोखण्याकरिता
शाहूने पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले. पेशवा आपल्यावर चालून येत आहे
हे वृत्त समजताच आंगरे त्यास सामोरे गेला व पेशव्याचा पराभव करून त्यास कैद
केले. कान्होजीने लोहगड आणि राजमाची किल्ले जिक्न घेतले आणि सातान्याकडे
कूच करण्याची तयारी चालवली. शाहूचे उपलब्ध असलेले सर्व सैन्य एकत्र आणून
बाळाजी विश्वनाथच्या नेतृत्वाखाली आंगरेवर पाठविण्यात आले. कान्होजीची
क्षमता, धडाडी आणि साधने लक्षात घेऊन छत्रपती शाहूचा पक्ष स्वीकारणे कसे
चांगले आहे है बाळाजीने कान्होजीस पटवून दिले, तसेच शाहशी मैत्री केली असता
दोन्ही पक्षांचा (आंगरे व शाहू) कसा लाभ होणार आहे याची ग्वाही देऊन
कान्होजी आंगरेस आपल्यात सामील केले. बाळाजीने सुचविले की, जर आंगरेने
बहिरोपंतास मुक्त केले, कोल्हापूरच्या संभाजीशी मैत्री तोडली, शाहू
छत्रपतीशी मैत्री केली आणि राजमाचीव्यतिरिक्त त्याने जिंकून घेतलेले सर्व
किल्ले शाहूला परत केले, तर कान्होजीला दहा किल्ले, देवगड ते खांदेरीपर्यत
कोकणातील सोळा किल्ले व उभारलेली गावे देण्यात येतील आणि मराठी आरमाराचे
प्रमुख पद आणि सरखेल हा मानाचा किताब देण्यात येईल. कान्होजी आंगरेने सर्व
मान्य केले. श्रीवर्धन आणि इतर काही महत्वाची आंगरेता देण्यात आलेली ठिकाणे
सीदीच्या ताब्यात होती, त्यामुळे या तहापाठोपाठ सीदी आणि आंगऱ्यांच्या
शत्रुत्वाचे पुन्हा लढाईत
१३४
इतिहास
पर्यवसन झाले.
परंतु या वेळी पेशवा आंगन्यांच्या मदतीस आल्यामुळे सीदीला शरणागती पत्करावी
लागली. सन १७१४ मध्ये मराठे व सीदी यांच्यात परस्परात सामंजस्य जोपासले
जावे, अधिकार आणि उत्पन्न इत्यादींची समसमान विभागणी व्हावी, अशा आशयाचा एक
तहनामा मान्य करण्यात आला. यामुळे कान्होजीला पुरेशी स्वायत्तता मिळाली.
त्याने आपल्या कारभाराचे मुख्य केंद्र रत्नागिरीच्या ४८ कि. मी. दक्षिणेस
बिजयदुर्ग या बळकट किल्ल्यावर स्थापन केले. त्याची लढाऊ गलबते समुद्रात
फेरफटका करून देखरेख करीत असत. मुंबई ते गोवा दरम्यानचा समुद्र किनारा
त्याच्या ताब्यात होता.
सन १७१४ च्या तहानंतर कान्होजीचे छत्रपती गाहूशी
संबंध अत्यंत स्नेहपूर्ण व आदरपूर्ण झाले. शाहूणी केलेल्या मैत्रीमुळे
त्याची प्रतिष्ठा व सामर्थ्य वाढले. खांदेरी, कुलाबा आणि घेरिया येथे आपले
वस्तान बसविल्यावर पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील आपले शेजारी इंग्रज, सीदी व
पोर्तुगीज यांच्यावर वचक बसवणे त्याला शक्य झाले. पाश्चिमात्य शक्तींना
आंगरे उघड विरोध करू लागला. आंगरेचे वाढते बळ रोखणे त्यांच्या
शक्ती-बाहेरचे झाले. म्हणून इंग्रजांनी आंगरेशी करार केला. त्यानुसार
इंग्रज व्यापाऱ्यांनी कर भरले असता आंगऱ्याच्या बंदरात त्यांना व्यापार
करण्यास परवानगी देण्यात यावी व त्या बदल्यात मुंबईच्या गव्हर्नरने कंपनीने
प्रमाणित केलेल्या व्यापाऱ्यांच्या जहाजांना परवाने द्यावेत आणि
आंगऱ्याच्या माणसांना मुंबईत सुविधा व सवलती देण्यात याव्यात असे ठरले.
परंतु
इंग्रजांशी करण्यात आलेला हा करार थोडाच काळ टिकला. मुंबईचा गव्हर्नर
चार्लस बून याने आपले लढाऊ नौदल सुसज्ज केले आणि सीदींच्या प्रमुखाशी युद्ध
करण्याचे आरंभिले. परकीयांच्या सागरी हालचालीवर सतत नजर ठेवून असणाऱ्या
कान्होजीने या संधीचा फायदा घेऊन इंग्रजांच्या तीन व्यापारी जहाजांचा ताबा
घेतला. अखेर १७जून १७१८ रोजी युद्धाची घोषणा करण्यात आली. घेरियाविरुद्धची
इंग्रजांची मोहीम अत्यंत लज्जास्पद व पराजयाची ठरली.
याच सुमारास
पोर्तुगिजांच्या सामर्थ्यांचा -हास आणि कोकणातून मुघल आधिपत्याचे होऊ
लागलेले उच्चाटन यामुळे कान्होजीचे महत्त्व आणखी वाढले. कान्होजीच्या
आरमारामध्ये १५० ते २०० टन ओझे वाहू शकणारी गुराबे व गलबते होती. त्या
जहाजांबर सहा आणि नऊ पीडी तोफा आणि त्याच्या मुख्य फाळक्यावर नऊ किंवा बारा
पींडी तोफा बसवलेल्या होत्या. गॅलिव्हटमध्ये चक्रावर लहान तोफा बसवलेल्या
असत. ही सर्व गलबते ४० ते ५० भक्कम वल्ह्यांच्या सहाय्याने चालत.
आरमाराच्या एका ताफ्यामध्ये अशा प्रकारची ८ ते १० गुरावे आणि ४० ते ५०
गलबते असत.
कान्होजीच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी पोर्तुगिजांचे
सहकार्य मिळवून आंगरेचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न चालविला. दिनांक २०
ऑगस्ट १७२१ रोजी कुलाब्यावर एकत्रितपणे हल्ला करण्याचा दोघांनी करार केला.
ठरावानुसार कुलाबा जिकला गेला तर तो पोर्तुगिजांच्या ताब्यात राहावा व
घेरिया इंग्रजांस मिळावा असे ठरले. आपल्या शत्रूनी चालविलेल्या या गुप्त
मसलतीची बातमी लवकरच कान्होजीला समजली. त्याने कुलाबा किल्ल्यामध्ये अधिक
रसद आणि शस्त्रास्त्रे पाठवली व शाहू छत्रपतीला मदत पाठविण्यासाठी विनंती
केली. दि. २९ नोव्हेंबर रोजी मुंबईहून इंग्रजांच्या आरमाराचा ताफा
मध्ययुगीन काळ
१३५
निघून
चौलजवळ येऊन थांबलेल्या पोर्तुगिजांना मिळाला. चौल आणि अलिबाग यामधील
सुमारे १६ कि. मी. जागा गर्द झाडीने व्यापलेली होती. त्यामुळे कुंडलिका नदी
ओलांडून अवजड तोफांसह कुलाव्याकडे कूच करण्यास आंगरेच्या सैन्याला सुमारे
पंधरा दिवस उशीर झाला. हा मिळालेला अवधी पिलाजी जाधव आणि बाजीराव पेशवे
यांना कोकण खिंडीमधून घोडदळ पाठविण्यास पुरेसा होता. त्यामुळे जेव्हा
इंग्रज-पोर्तुगिजांचे संयुक्त दल १२ डिसेंबर रोजी कुलाब्यापाशी आले तेव्हा
आपल्यापेक्षा संख्याबळाने अधिक अशा मराठा घोडदळाशी सामना करण्याच्या घोर
संकटात आपण आहोत असे त्यांना दिसून आले. मॅथ्युज नामक एक पोर्तुगीज अधिकारी
इंग्रज अधिकाऱ्याबरोबर युद्धक्षेत्राची पहाणी करत असताना अचानक एका मराठा
घोडेस्वाराने एका झुडुपाआडून त्याच्यावर भाला फेकला आणि त्याच्या टोकाने
मॅथ्युज जखमी झाला.
वेळेचा अधिक अपव्यय न करता मराठ्घांवर चढाई करणे
इंग्रज व पोर्तुगिजांना आवश्यक बाटून एका लहान इंग्रज पथकाने किल्ल्याच्या
भितीवर अत्यंत चपळाईने चढाई केली. त्याचवेळी बाजीराव पेशव्याने
पोर्तुगिजांच्या सैन्यावर चढाई करून त्यांना पळवून लावले. कर्नल
श्रेथवेटच्या इंग्रज पथकावर दगडांचा मारा करण्यात आला, आणि जेव्हा
पोर्तुगीज सेना पळत सुटली तेव्हा मागे राहिलेल्या इंग्रज पथकास धमकी देऊन
माघार घेण्यास भाग पाडण्यात आल्यावर मैदानातील सर्व तोफा, शस्त्रास्त्रांचा
खूप मोठा साठा मराठ्यांच्या हाती लागला. पोर्तुगिजांनी बाजीराव पेशव्याशी
१० जानेवारी १७२२ रोजी सलोख्याचा व शांततेचा तह केला. इंग्रज-पोर्तुगीज
संयुक्त दलात फूट पडली आणि प्रत्येकजण दुसऱ्यावर दोषारोप करू लागला. मात्र
बाजीरावाने दोन्ही पक्षांना सन्माननीय तहनामा प्रस्तुत केला. दि. १२
जानेवारी १७२२ रोजी पोर्तुगिजांनी तो त्वरित मंजूर केला आणि अशा प्रकारे
इंग्रज आणि पोर्तुगिजांमधील मैत्री कोणतेही ध्येय साध्य न होता तुटली.
मराठे-इंग्रजांची
युद्धे चालूच राहिली. जेव्हा कान्होजीवर माघार घेण्याची वेळ येई तेव्हा तो
तडजोडीचे धोरण स्वीकारीत असे आणि शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा दाखवित
असे. अशा प्रकारचा एक प्रयत्न १७२४ मध्ये कान्होजीने मुंबईचा गव्हर्नर
डब्ल्यू. फिप्स याला मैत्रीपूर्ण पत्त्र पाठवून केला. सन १७२४ मध्ये सात
नाविक गलबते, तोफांचा मारा करणारी दोन गलबते आणि सैन्याचे एक पथक यासह
आलेल्या डचांचा प्रतिकार करण्यास कान्होजीचे विजयदुर्गचे सैन्य सरसावले.
तेथे कान्होजीने बिजय संपादन केल्यामुळे त्याला अधिकच वळ चढले. त्याने
बहुमोल किमतीच्या मालाने भरलेले कंपनीचे जहाज हस्तगत केले.
दि. ४ जुलै
१७२९ रोजी अल्प आजारानंतर कान्होजी मरण पावला. ग्रोसने कान्होजीचे बर्णन
कृष्णवर्णी, धिप्पाड, बलदंड असे केले आहे. कान्होजीचे डोळे अत्यंत चमकदार
पण चेहरा अगदी उग्र व रुक्ष होता. हाताखालच्या अधिकाऱ्यांशी आणि सैनिकांशी
त्याची बर्तणूक उदार आणि मोकळेपणाची होती. इंग्रज गव्हर्नरांशी त्याचा
पत्रव्यवहार वाचल्या-वर दिसते की, त्याने इंग्रजांशी शांततेची इच्छा अनेकदा
प्रकट केली, परंतु इंग्रजांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला.
आंगरे व पेशवे
: कान्होजीस दोन औरस आणि चार अनौरस असे सहा पुत्र होते (सेखोजी, संभाजी हे
औरस व तुळाजी, मानाजी, घोंडाजी आणि येसाजी हे चार अनौरस). कान्होजीनंतर
सेखोजी व संभाजी या औरस मुलांनी त्याच्या मालमत्तेची वाटणी केली.
१३६
इतिहास
ज्येष्ठ
मुलगा सेखोजी याने स्वतःला कुलाबा परिसरात स्थिर केले तर धाकटधा संभाजीने
रत्नागिरीजवळील विजयदुर्गला सत्ता स्थापन केली. विभागणीमुळे आंगऱ्यांचे
सामर्थ्य पुष्कळच कमी झाले. सन १७३१ मध्ये कुलाब्याचा प्रमुख मेखोजी हा
चिमाजी अप्पाला जंजिऱ्यावरील चढाईत मदत करावयास गेला असताना मुघल सरदार
गाझीखान याने उत्तर चौल प्रांतात आपले बस्तान बसवून कुल्लाव्याचा पुष्कळ
भाग जिंकून बेचिराख करून टाकला. पेशवे आणि सेखोजीने जंजिन्याहून परत येऊन
एकत्रपणे गाझीखानावर चढाई केली व पराभव करून त्याला कैद केले. चौलचा राजकोट
किल्ला मुघलांचे आश्रयस्थान होते ते नष्ट केले. जंजिऱ्याविरुद्धची मोहीम
मात्र अयशस्वी ठरली. सुरुलखान सीदीने त्याच्या प्रदेशाचे रक्षण तर केलेच
शिवाय आक्रमक पवित्रा घेऊन शाहूच्या मुलखाचे खूप नुकसान केले. तरी देखील
परिस्थितीचे भान ठेवून त्याने सामोपचाराचे धोरण स्वीकारले आणि रायगड आपल्या
ताब्यात ठेवून तळा, घोसाळगड, निजामपूर, घोडेगाव, बिरवाडी आणि रोहा-माणगाव,
दंडा राजपुरीचा अर्धा प्रदेश पेशव्याच्या ताब्यात दिला.
मराठ्यांच्या
आक्रमणापासून जरी सीदी टिकून राहिला तरी त्याच्या समुद्रावरील सामर्थ्यास
उतरती कळा लागली होती. त्याचे आरमार मराठी आरमाराशी करण्याइतके तुल्यबळ
राहिले नव्हते. सामना
सीत्रीकडील रायगड परत मिळविण्याची शाहूची इच्छा
होती, तर पेशव्यांचे मूळ स्थान मुरुड मराठा मुलखात घेण्याची पेशव्याची
इच्छा होती. म्हणून सीदी मराठ्यांच्या डोळयात सलत होता. म्हणून बाजीराव आणि
फत्तेसिंग जंजिऱ्यावर चढाई करण्याकरिता गेले. कान्होजीच्या मधुराबाई आणि
लक्ष्मीबाई या विधवा स्त्रियांनीही सहकार्य केले. पुढील काही आठवड्यांतच
बिरवाडी, तळा, घोसाळगड ही ठिकाणे मराठ्यांनी जिंकून घेतली. पंतप्रतिनिधीनी
रायगड जिंकून या यशात मानाचा तुरा रोवला. मराठ्यांनी समुद्रावरून आणि
जमिनीवरून चढवलेला हल्ला इतका जोराचा होता की, आपली मालकी आतापावेतो टिकवून
राहिलेल्या सीदीने जंजिऱ्याचा संपूर्ण ताबा सीदी रहमानला देण्याचे मान्य
केले. सीदी रहमान पेशव्याचा मांडलिक झाला आणि मुकाटयाने दक्षिणेकडे निघून
गेला. सीदीच्या प्रदेशातील अर्ध उत्पन्न मराठ्यांना देणे रहमानला भाग पडले.
याच
सुमारास सेखोजी आंगरे २८ ऑगस्ट १७३३ रोजी मरण पावला. त्याच्यानंतर त्याचे
भाऊ संभाजी आणि मानाजी यांनी सत्तेसाठी भांडण गुरू केले. परिणामतः
मराठ्यांच्या मोहिमेची तीव्रता थोडी कमी झाली. मात्र त्यानंतर पुन्हा काही
काळाने पेशव्याचा भाऊ चिमाजी अप्पाने सीदीविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली
आणि १७३६ मध्ये रेवसजवळ सीदी सात मारला गेला. हे युद्ध फेब्रुवारी १७३३
पासून मे १७३६ पर्यंत सुमारे तीन वर्षे चालले. यात यशही मराठ्यांच्या
बाटघास आले. परंतु आंगरेंच्या कौटुंबिक कलहामुळे तसेच आपल्या अनुयायांना
योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या हालचाली एकजुटीने घडवून आणण्यात माहू
यशस्वी न झाल्यामुळे सौदीला जंजिन्याहून आणि गोवळकोटहून पूर्णतः घालवून
देण्याचे मराठ्यांचे ध्येय सफल झाले नाही.
सेखोजीच्या मृत्यूनंतर त्याचा
भाऊ संभाजी हा त्याचा उत्तराधिकारी झाला. त्याने आपला सावत्र भाऊ तुळाजीसह
सुवर्णदुर्गला राहणे पसंत करून दुसरे दोघे सावन भाऊ येसाजी व मानाजी यांना
कुलाब्यात ठेवले. परंतु मानाजीचे संभाजी व येसाजीशी न पटल्याने तो
रेवदंड्यास पोर्तुगिजांकडे गेला. पण तत्पूर्वी त्याने कुलाबा किल्ला जिंकला
मध्ययुगीन काळ
१३७
होता.
नंतर पेशव्याच्या सहाय्याने त्याने येसाजीस कैद करून अलिबागला ठेवले. पण
येसाजी निसटून पेशव्याकडेच परत गेला. तेथे दोघांमध्ये समेट होऊन मानाजीने
त्यास दरमहा १० खंडी भात व ४०० रुपये देण्याचे कबूल करून रेवदंड्यास
पाठविले. याशिवाय संभाजीच्या कारवायांनाही आळा घालून छत्रपती शाहूशी त्याने
सख्य केले व सीवीकडून अंजनवेलचा किल्ला जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सीदीला नमवून त्याने रेवसला आपले बस्तान बसविले. परंतु यावेळी
इंग्रजांनी त्याचे पारिपत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी
सीदीची मदत घेतली. कुलाबा किल्ला जमिनदोस्त करून कुलाब्याचे उत्पन्न
दोघांमध्ये सारखे विभागण्याचे ठरले. परंतु यावेळी संभाजी आंगरे बरचढ होऊन
त्याने विजयदुर्गजवळ इंग्रजांचे डर्बी हे किमती मालाने भरलेले जहाज,
शस्त्रारतांनी भरलेली रिस्टोरेशन ही नौका व इतर लहान लहान गलबते ताब्यात
घेतली.
सन १७३८ मध्ये मानाजीस कुलाब्यातून काढून टाकण्याच्या हेतूने
संभाजी अलिबागेस आला. परंतु इंग्रजांनी संभाजीचे आरमारी सामर्थ्य कमी
व्हावे म्हणून मानाजीस मदत देउ. केली. एवढेच नव्हे तर पेशव्यानेही त्यास
मदतीचा हात पुढे केला. मानाजीने त्याबदल्यात पेशथ्याला सालीना ७,००० रुपये
खंडणी आणि कोटलीगड व राजमाची देण्याचे ठरले. मानाजीस वरील मदतीशिवाय
इंग्रजांनी लढाऊ गलबतेही पाठविली. त्यामुळे संभाजीम राजपुरीच्या खाडीत
आश्रय घेणे भाग पडले. परंतु तरीही संभाजीने इंग्रज जहाजांवर छापे घालण्यात
यश मिळविले व संभाजीने इंग्रज जहाजांना दिलेले परवाने जवळ बाळगूनच
इंग्रजांनी समुद्रात व्यापार करावा व वार्षिक दोन लाख रुपये खंडणी द्यावी
असे सूचित केले. परंतु इंग्रजांनी ही सूचना फेटाळून लावली. त्यामुळे त्याने
इंग्रजांची जहाजे पकडून ठेवून घारापुरी व कारंजा बेटाचा ताबा घेतला.
पुढच्याच वर्षी म्हणजे १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने वसईच्या पोर्तुगिजांच्या
आरमाराचा मानाजीच्या मदतीने धुव्वा उडविला. यावेळी पेशवे व गोव्याचे
व्हॉईसरॉय यांच्यात शांतता करार घडवून आणण्यात इंग्रजांनी पुढाकार घेतला.
सन
१७४० मध्ये संभाजीने तुळाजीच्या मदतीने पुन्हा मानाजीच्या प्रदेशावर हल्ला
करून अलिबाग, थळ व सागरगड जिंकून घेतले. त्यामुळे मानाजीने इंग्रज व
पेशव्याच्या मदतीने उलट प्रतिकार करून तुळाजीस जेरबंद केले व संभाजीस
सुवर्णदुर्गावर पिटाळून लावले.
दरम्यान पेशव्याचे अधिकारी कुलाबा हस्तगत
करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे मानाजीस समजले. त्यामुळे त्याने संभाजीशी
एक तात्पुरता करार केला. परंतु याच दरम्यान बाजीराव पेशव्याचा मृत्यू
झाल्याने (१७४०) त्या गोंधळात संभाजीने आपली सत्ता रत्नागिरी, दाभोळ आणि
सावंतवाडीचा काही प्रदेश येथपर्यंत वाढविली. पुढे १२ जानेवारी १७४२ मध्ये
संभाजी आंगरे मरण पावल्यावर त्याचा सावत्र भाऊ तुळाजी उत्तराधिकारी बनला.
तुळाजीच्या आरमारात प्रत्येकी ४०० टनांची आठ गलबते होती.
या काळात
मानाजी आंगरे व पेशवे यांच्यात काही कारणाने वितुष्ट आले. त्यामुळे पेशवे व
सौदी यांच्यातील सख्य बाढले. याचा फायदा घेऊन सीदीने एक शक्तीशाली आरमार
कुलाब्यावर धाडले. परंतु याच अवधीत रामजी महादेव बिवलकर याने मानाजी व
पेशवे यांच्यात दिलजमाई घडवून आणली. त्यामुळे मानाजीस योग्यवेळी पेशव्याची
मदत मिळून त्याने सीदीला अलिबागच्या उत्तरेकडे थळ व नागाव दरम्यान गाठून
त्याचा
मध्ययुगीन काळ
१३७
होता. नंतर पेशव्याच्या सहाय्याने
त्याने येसाजीस कैद करून अलिबागला ठेवले. पण येसाजी निसटून पेशव्याकडेच परत
गेला. तेथे दोघांमध्ये समेट होऊन मानाजीने त्यास दरमहा १० खंडी भात व ४००
रुपये देण्याचे कबूल करून रेवदंड्यास पाठविले. याशिवाय संभाजीच्या
कारवायांनाही आळा घालून छत्रपती शाहूशी त्याने सख्य केले व सीवीकडून
अंजनवेलचा किल्ला जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीदीला नमवून
त्याने रेवसला आपले बस्तान बसविले. परंतु यावेळी इंग्रजांनी त्याचे
पारिपत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सीदीची मदत घेतली.
कुलाबा किल्ला जमिनदोस्त करून कुलाब्याचे उत्पन्न दोघांमध्ये सारखे
विभागण्याचे ठरले. परंतु यावेळी संभाजी आंगरे बरचढ होऊन त्याने
विजयदुर्गजवळ इंग्रजांचे डर्बी हे किमती मालाने भरलेले जहाज, शस्त्रारतांनी
भरलेली रिस्टोरेशन ही नौका व इतर लहान लहान गलबते ताब्यात घेतली.
सन
१७३८ मध्ये मानाजीस कुलाब्यातून काढून टाकण्याच्या हेतूने संभाजी अलिबागेस
आला. परंतु इंग्रजांनी संभाजीचे आरमारी सामर्थ्य कमी व्हावे म्हणून मानाजीस
मदत देउ. केली. एवढेच नव्हे तर पेशव्यानेही त्यास मदतीचा हात पुढे केला.
मानाजीने त्याबदल्यात पेशथ्याला सालीना ७,००० रुपये खंडणी आणि कोटलीगड व
राजमाची देण्याचे ठरले. मानाजीस वरील मदतीशिवाय इंग्रजांनी लढाऊ गलबतेही
पाठविली. त्यामुळे संभाजीम राजपुरीच्या खाडीत आश्रय घेणे भाग पडले. परंतु
तरीही संभाजीने इंग्रज जहाजांवर छापे घालण्यात यश मिळविले व संभाजीने
इंग्रज जहाजांना दिलेले परवाने जवळ बाळगूनच इंग्रजांनी समुद्रात व्यापार
करावा व वार्षिक दोन लाख रुपये खंडणी द्यावी असे सूचित केले. परंतु
इंग्रजांनी ही सूचना फेटाळून लावली. त्यामुळे त्याने इंग्रजांची जहाजे
पकडून ठेवून घारापुरी व कारंजा बेटाचा ताबा घेतला. पुढच्याच वर्षी म्हणजे
१७३९ मध्ये चिमाजी अप्पाने वसईच्या पोर्तुगिजांच्या आरमाराचा मानाजीच्या
मदतीने धुव्वा उडविला. यावेळी पेशवे व गोव्याचे व्हॉईसरॉय यांच्यात शांतता
करार घडवून आणण्यात इंग्रजांनी पुढाकार घेतला.
सन १७४० मध्ये संभाजीने
तुळाजीच्या मदतीने पुन्हा मानाजीच्या प्रदेशावर हल्ला करून अलिबाग, थळ व
सागरगड जिंकून घेतले. त्यामुळे मानाजीने इंग्रज व पेशव्याच्या मदतीने उलट
प्रतिकार करून तुळाजीस जेरबंद केले व संभाजीस सुवर्णदुर्गावर पिटाळून
लावले.
दरम्यान पेशव्याचे अधिकारी कुलाबा हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत
आहेत असे मानाजीस समजले. त्यामुळे त्याने संभाजीशी एक तात्पुरता करार केला.
परंतु याच दरम्यान बाजीराव पेशव्याचा मृत्यू झाल्याने (१७४०) त्या गोंधळात
संभाजीने आपली सत्ता रत्नागिरी, दाभोळ आणि सावंतवाडीचा काही प्रदेश
येथपर्यंत वाढविली. पुढे १२ जानेवारी १७४२ मध्ये संभाजी आंगरे मरण
पावल्यावर त्याचा सावत्र भाऊ तुळाजी उत्तराधिकारी बनला. तुळाजीच्या आरमारात
प्रत्येकी ४०० टनांची आठ गलबते होती.
या काळात मानाजी आंगरे व पेशवे
यांच्यात काही कारणाने वितुष्ट आले. त्यामुळे पेशवे व सौदी यांच्यातील सख्य
बाढले. याचा फायदा घेऊन सीदीने एक शक्तीशाली आरमार कुलाब्यावर धाडले.
परंतु याच अवधीत रामजी महादेव बिवलकर याने मानाजी व पेशवे यांच्यात दिलजमाई
घडवून आणली. त्यामुळे मानाजीस योग्यवेळी पेशव्याची मदत मिळून त्याने
सीदीला अलिबागच्या उत्तरेकडे थळ व नागाव दरम्यान गाठून त्याचा
१३८
इतिहास
पूर्ण
पराभव केला. मात्र १७४९ मध्ये तुळाजी आंगरे कभाडोर जेम्सच्या आरमारी
ताफ्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात घेरियानजीक पराभूत झाला.
तुळाजीच्या
आरमारी दलात कित्येक लढाऊ गलबते, दक्ष अशी ६८ गलबते व पन्नास तोफा होत्या.
फेब्रुवारी १७५४ मध्ये त्याने पुन्हा डचांच्या तीन गलबतांवर चढाई करून
त्यातील दोन मोठी गलबते जाळून टाकली व तिसरे पळवून नेले. या काळात तुळाजीने
कित्येक गलबते नव्याने बांधली.
सेखोजी आंगरेच्या मरणानंतर शाहू व पेशवे
यांनी आंगरे बंधु संभाजी व मानाजी यांच्यात समेट घडवून आणण्याचे धोरण
अवलंबिले होते. त्यासाठी त्यांनी आंगरेंची सत्ता विभागून संभाजीला सरखेल व
मानाजीस वझारतमाव किताब देऊन अनुक्रमे विजयदुर्ग व कुलाबा येथे ठेवले होते.
परंतु हा वाद पूर्णपणे मिटला नाही.
यानंतर संभाजीच्या मरणानंतर सत्तेवर
आलेल्या तुळाजीने चांगला पराक्रम गाजवून परकीय शक्तींना दहशत बसविली होती.
शिवाय शाहूच्या निधनानंतर तो पेशव्यालाही मानेनासा झाला. त्यामुळे तुळाजीस
आपल्या सत्तेखाली ठेवण्यासाठी पेशव्याने इंग्रजांची मदत घेतली.
दक्षिणेत
मानाजी आंगरे निजामाविरुद्ध पेशव्याला मदत करण्यात गुंतला असताना सीत्रीने
त्याच्या मुलखास वेढा घातला. दक्षिण कोकणातून परत आल्यावर १७५८ मध्ये
मानाजीने आपल्या मुलखातून सीदीस पिटाळून लावले, परंतु दंडा राजपुरीवर चढाई
करण्याच्या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला. मानाजीचा मृत्यू २३ सप्टेंबर १७५८
रोजी झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत आपला भाऊ धोंडजीच्या मदतीने राज्य
संभाळीत असतानाही मानाजीने उत्पन्न वाढवून आपल्या प्रदेशाची प्रगती केली.
सन
१७५८ मध्ये मानाजी आंगरेच्या निधनानंतर त्याचा मुलगा रघुजी अधिकारावर आला.
त्यानंतर सीदीने रघुजीच्या प्रदेशावर हल्ले करून अनेक मंदिरांची मोडतोड
करून अनेक गावे वेचिराख केली. परंतु रघुजीने पेशब्याच्या मदतीने सीदीला
हटवण्यात यश मिळवले. त्याने सीदीच्या खांदेरी व उंदेरी बेटावरील दुर्गावर
चढाई केली आणि घनघोर युद्धानंतर २८ जानेवारी १७५९ रोजी किल्ला सर केला.
पेशव्याने केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी किल्ला पेशव्याला नजर केला.
उंदेरीचे नामकरण जयदुर्ग असे करण्यात आले. मुरुडजवळील कांसा किल्ला किंवा
पद्मदुर्ग हा देखील २१ फेब्रुवारी १७५९ रोजी सर झाला. सदाशिवराव भाऊला जर
उत्तरेत जावे लागले नसते तर अशाच प्रकारे जंजिराही जिंकला असता. इतर आंगरे
मंडळीपेक्षा रघुजी व्यापारी जहाजांवर छापे घालण्यात अधिक सतर्क होता. शिवाय
तो एक चांगला राज्यकर्ता होता. आपल्या प्रदेशाची भरभराट व्हावी याकरिता
त्याने चौल, आक्षी, थळ आणि पश्चिम किनाऱ्यावरील इतरही गावांमध्ये मिठागरे
करण्यास प्रोत्साहन दिले. सन १७७१ मध्ये अलिबागला भेट देणाऱ्या फोर्बसला
आढळले की, आपला राजवाडा, तिजोरी, तबेले, उद्याने ही सर्वबं मालमत्ता अलिबाग
शहरात असतानाही रघुजी कुलाबा बेटावरील जलदुर्गात वास्तव्य करून होता. तो
अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आणि राजासारखे कुलीन आचारविचारांचा होता. तो
पेशव्याला सालीना दोन लक्ष रुपये खंडणी देत असे. मराठा सैन्याला तो उत्तम
सैनिक पुरवित असे. त्याचा प्रदेश चांगला भरभराटीस आलेला होता. त्या
प्रदेशात नापीक
मध्ययुगीन काळ
१३९
खडकाळ भूमी होती, परंतु
तेथील सपाट प्रदेशात कष्टाळू शेतकरी राहात असत. त्याच्या प्रदेशात अनेक
भटके प्रवासी आणि वैलांचे कळप असत. कुलाबा आणि रोहह्यामधील चौल नदीच्या
खोऱ्यामध्ये दाट बस्ती असून तेथे शेती हा मोठा व्यवसाय होता. अलिबागचा
प्रदेश नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि सुपीक होता.
रघुजी १७९३ मध्ये मरण पावला. त्याच्या मागे त्याची पत्नी आनंदीबाई (पूर्वाश्रमीची
भोसले
परिवारातील स्त्री), मानाजी आणि कान्होजी हे दोघे अल्पवयीन मुलगे आणि
जयसिंग नावाचा बयात आलेला अनौरस मुलगा एबढा परिवार होता. जर्यासंगाने लहान
मानाजीला रघुजीचा वारस नेमून तो प्रौढ होईपर्यंत पुणे दरबारच्या
आदेशाप्रमाणे कारभार सांभाळण्याचे ठरवून स्वतः कुलाब्याचा कारभारी झाला.
परंतु आनंदीबाईला आपल्या मुलावर जयसिंगाचा प्रभाव पाहून मत्सर वाटला आणि
तिने जयसिंगाचा काटा काढण्याचा बेत आखला. हा बेत कानी येताच जयसिंगाने तिला
अटक केली आणि तिच्या दोघा सल्लागारांचा वध केला, कटातील चौघांना कैदेत
टाकले व भोसले परिवारातील सर्वांना कुलाब्यातून सीमापार केले. यानंतर
पेशव्याने आपल्या वतीने माधब हरी फडके आणि जिवाजी बल्लाळ यांना पुन्हा
कारभार सुरळीतपणे प्रस्थापित करून दोन्ही पक्षांत समेट करण्यासाठी पाठवले.
कुलाब्याला आल्यानंतर त्यांनी मानाजीचे अधिकारपद कायम ठेवून पेशव्याच्या
संपूर्ण पाठिंब्याने पूर्ववत व्यवस्था चालू ठेवण्याची व्यवस्था केली आणि
आंगरेंच्या घरातील महिलांनी कारभारात मुळीच ढवळाढवळ करू नये अशी त्यांना
ताकीद देण्यात आली.
पेशव्याकडून मदत मिळेल हा आशाबाद फोल ठरल्यामुळे
आनंदीबाईने सैन्य एकत्र केले व कुलाबा किल्ल्यास वेढा देऊन किल्ला जिंकला.
तिने जयसिंगास कैदेत ठेवले आणि त्याच्या प्रमुख सल्लागारास ठार केले. चार
महिन्यानंतर जयसिंग कैदेतून निसटला. त्याने अनुयायी जमवून अलिबागमधील
हिराकोटला वेढा दिला. आनंदीबाईने वेढा घालणाऱ्यांवर सैन्य पाठविले आणि एका
घनघोर लढाईमध्ये जयसिंग इतका पराभूत झाला की, अखेर तो पुण्याला पळाला.
जयसिंगाच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी सकवारबाई हिने थोडे सैन्य जमवले आणि
नागोठणे काबीज करण्यात ती यशस्वी झाली. आपल्या पत्नीच्या यशाची वार्ता ऐकून
जयसिंग पुण्याहून परत येऊन त्याने अनेक लढाया जिंकल्या आणि चौलजवळ शतू
सैन्याचा इतका दारुण पराभव केला की, मानाजी आपल्या थोडक्या अनुयायांसह
महाडला पळून गेला. आनंदीबाई छळ होऊन मरण पावली. जयसिंगाने अलिबागवर चढाई
करून हिराकोट, सागरगड आणि खांदेरीचे किल्ले जिंकून घेतले.
पेशव्याने
मानाजीला मदत करण्याचे दिलेले आश्वासन कानी येताच जर्यासंगाने दौलतराव
शिद्याचा सरदार बाबुराव याच्याकडे मदतीकरिता अर्ज केला. बाबुराव हा
जर्यासगाचा नातलग होता. आंगरे घराण्याचा प्रमुख कान्होजी याचा अनौरस पुत्र
येसाजी याचा बाबुराव हा मुलगा होता. प्रथम बाबुरावाने जयसिंगाच्या मदतीला
येण्याचे मान्य केले. परंतु तो शिदेशी अधिक बांधलेला असल्यामुळे त्याने अशी
योजना आखली की, ज्यामुळे कुलाब्याचा ताबा घेण्याच्या त्याच्या प्रयत्नास
पेशव्याचा पाठिंबा मिळेल. ही मसलत मनाशी योजून बाबुराव अलिबागकडे निघाला
आणि जयसिंगाशी एक भांडण उकरून काढले. दौलतराव शिंदे आणि त्याचा सेनाधिकारी
हरिपंत यांच्या मदतीने त्याने हिराकोट काबीज केला. आणि विश्वासघात करून
मानाजी, कान्होजी आणि जर्यासंग यांना पकडले. पुन्हा एकदा जयसिंगाची पत्नी
सकवारबाई पतीच्या मदतीस आली. तिने
१४०
इतिहास
खांदेरीचा किल्ला
जिंकून घेतला. मन १७९९ मध्ये मानाजी आपल्या भाऊ कान्होजी याच्यासह पुण्यास
पळून गेला होता, तो काही अनुयायी जमवून परत आला. परंतु चौल आणि नागोठणे या
दोन्ही ठिकाणी पराभूत होऊन मानाजी व कान्होजीस पुन्हा कैद करण्यात आले.
बाबुराव आता निबंध प्रमुख अधिकारी बनला होता. त्याला दुसऱ्या बाजीराव
पेशव्याने कुलाब्याचा शासक म्हणून कायम केले. त्यानंतर लगेचच त्याने
सकवारबाईकडून खांदेरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला.
या पराभवानंतर बाबुरावाने सकवारबाईचा पती जयसिंग अलिबागला तिची वाट पाहतो
आहे, असा खोटा निरोप पाठवून सकवारवाईस अलिबागला येण्यास आग्रह केला. या
कारस्थानास बळी पडून सकवारबाईने खांदेरी सोडली. तिच्या गैरहजेरीत
वाबुरावाने खांदेरी जिंकून सकवारबाईला पती व मुलांसह अटक केली. बाबुरावाने
जयसिंगला ठार केले आणि सकवारबाईला तिच्या मुलांसह कैदेत ठेवले. जयसिंगाचा
थोरला मुलगा मुरारजी मुंबईला पळून गेला आणि १८०७ मध्ये २,००० सैन्य जमवून
अलिबाग किल्ला, हिराकोट आणि सागरगड जिंकून घेतले. परंतु बाबुरावाने
सागरीमागनि इंग्रजांची व जमिनीवरून पेशव्याची मदत मिळविली. तसेच
मुरारजीकडील काही अधिकाऱ्यांना लाच देऊन मुरारजीवर विजय मिळवला.
मुरारजीच्या प्रमुख साथीदारांपैकी काहींना फाशी दिले किंवा त्यांचा
सागरगडवरून कडेलोट केला.
सन १८१३ मध्ये बाबुराव आंगरे मरण पावला. नंतर
एक बर्ष त्याच्या विधवा पत्नीने कारभार सांभाळला. त्यानंतर मानाजीचा
कुलाब्याच्या प्रमुख पदावरील अधिकार पेशव्याने मान्य केला आणि मदत म्हणून
खांदेरी बेट आणि सालीना १० हजार महसुलाची २० गावे मानाजीस देण्यात आली.
तथापि गैरकारभारामुळे कुलाब्याचे एवढे नुकसान झाले की, त्याचे सालीना
उत्पन्न तीन लाख रुपयांनी घटले. सन १८१७ मध्ये मानाजी आंगरे मरण पावला.
दरम्यान
दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पाडाव करून इंग्रजांनी मराठेशाहीचा अंत केला.
अजिक्य असा रायगड १० मे १८१८ रोजी इंग्रजांचा सेनाधिकारी प्रॉथर याने
जिंकून घेतला आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा
अस्त झाला. १२०
आंगरे व इंग्रज : मानाजीनंतर त्याचा चौदा वर्षाचा मुलगा
रघुजी याने कारभार हाती घेतला. तो अल्पवयीन असताना राज्याची व्यवस्था
विनायक परशुराम बिवलकर याने सांभाळली. रघुजी सज्ञान झाल्यावर विवलकराचा
तिरस्कार करीत असला तरी तो त्याच्या वर्चस्वातून मुक्त होऊ शकत नव्हता.
कारण बिबलकरने राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना आपल्या बाजूस वळविले व त्यांना
आपल्या नियंत्रणात ठेवले होते. सन १८२१ मध्ये बाबुरावाची विधवा काशीबाई
हिने, भारतात सत्तारूढ झालेल्या, ब्रिटिश सरकारला आपला मुलगा फत्तेसिंग
याचा कुलाब्यावरील अधिकार राखण्यास पाठिंबा द्यावा असा अर्ज केला. परंतु
ब्रिटिश सरकारने निर्णय घेतला की, पेशव्याने मानाजीला पाठिंबा देऊन
बाबुरावाच्या कुटुंबियांचा कुलाब्यावरील हक्क रद्द ठरवला असल्यामुळे हा
प्रश्न पुन्हा उपस्थित करणे शक्य नाही. जून १८२२ मध्ये एका करारान्वये
कुलाब्याचा शासन प्रमुख आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील संबंध कायम करण्यात
आले. या करारानुसार ब्रिटिशांचे श्रेष्ठत्व आणि शासनावरील अधिकार मान्य
करण्यात आला. जहागीरदार आणि इनामदारांना त्यांच्या जमिनींच्या मालकीचे
स्पष्ट आश्वासन देण्यात आले. रघुजीचा कारभार बिवलकरच्या
१० रायगडच्या पाडावाचा इतिहास प्रकरण १२- प्रेक्षणीय स्थळे यात दिला आहे.
मध्ययुगीन काळ
१४१
प्रभावाखाली
असताना अत्यंत जुलुमी होता. त्यामुळे पुढेही बराच काळ त्या जुलमाची
"अंगारकाचे राज्य म्हणजे वाईट दृष्टी असणाऱ्या मंगळ ग्रहासारखे हानीकारक"
अशी लोक आठवण काढत असत. दि. २६ डिसेंबर १८३८ रोजी रघुजी मरण पावला.
त्यानंतर कुलाब्याच्या वारसा हक्काचा प्रश्न उपस्थित झाला. आंगरे
परिवारातील एका मुलास इंग्रज सरकारने कान्होजी दुसरा या नावाने ६
फेब्रुवारी १८३९ रोजी मान्यता दिली. तो वारस अल्पवयीन असल्याने इंग्रजांनी
बिवलकरलाच कारभारी नेमले. तथापि कान्होजी दुसरा २१ मार्च १८३९ रोजी मरण
पावल्यावर आंगरे गादीला वारस उरला नाही, असे कारण पुढे करून इंग्रजांनी
कुलाबा संस्थान खालसा करण्याची संधी साधली. रघुजीच्या विधवांनी दत्तक
घेण्याची परवानगी मागितली. तथापि इंग्रजांनी नकार दिला. कंपनी सरकारचे
कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांनी गव्हर्नर जनरलला ३० डिसेंबर १८४३ रोजी
पाठविलेल्या खलित्यानुसार कुलाबा संस्थान खालसा करण्यात आले.
मृत कुलाबा
प्रमुखाची सर्व मालमत्ता नेहमीच्या रीतीरिवाजानुसार व नियमांनुसार हयात
कुटुंबियांमध्ये वाटून देण्यात यावी आणि कुलाब्याच्या उत्पन्नातून योग्य
असे पेन्शन ज्यांचा योग्य अधिकार असेल अशा व्यक्तींना देण्यात यावे असे
ठरले. ब्रिटिश सरकारचे नियम आणि शासन कुलाव्यात लागू करताना म्थानिक
मतांचा, लोकांच्या इच्छेचा कोणत्याही प्रकारे अपमान करण्यात येणार नाही अशी
गव्हर्नर जनरलने ग्वाही दिली. रघुजीच्या तीन विधवा बायकांना सालीना २८,०००
रुपये पेन्शन ठरविण्यात आले. पैकी थोरल्या विधवा कमलाबाईस १२,००० रुपये
आणि धाकट्या दोघी अंबिकाबाई आणि यशोदाबाई यांना उरलेले १६,००० रुपये समान
विभागून देण्यात आले. जे. एम. डेव्हिस याची तेथील पोलिटिकल
सुपरिन्टेन्डेन्ट म्हणून नेमणूक करण्यात आली.
शेजारील प्रदेशात प्रचारात
असलेल्या महसूल व्यवस्थेसारखीच महसूल व्यवस्था कुलाब्यात प्रचारात आणावी,
अनिष्ट करांचे निर्मूलन करावे, ब्रिटिशांचे नियम आणि सागरी दर प्रस्थापित
करण्यात यावेत, जमिनीवरील आणि वस्तूंच्या ने-आण करण्यावरील कर काढून
टाकण्यात यावेत, तसेच गावागावातील सीमेवर असणारे कर काढून टाकावेत आणि
इंग्रजांचा भिठावरील कर आकारण्यात यावा असे त्यास आदेश दिले.
कुलाब्यात
ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यापासून तेथील गैरप्रकार बंद झाले. उंदेरीच्या
भूमिगत अंधारकोठड्यांचा राज्याचे तुरुंग म्हणून केला जाणारा वापर बंद झाला
आणि व्यभिचाराबद्दल दोषी ठरविण्यात आलेल्या महिलांना पूर्वी राज्यात गुलाम
म्हणून नोकरीस ठेवले जाई, त्या प्रथेचेही उच्चाटन झाले. सन १८४६ मध्ये
कुलाबा किल्ल्यात ज्या वास्तूंमध्ये आंगरे वास्तव्य करीत असत, त्यांचा
इंग्रज सरकारने लिलाव करून वासलात लावली.
सन १८५३ मध्ये दुसऱ्या रघुजीची
विधवा यशोदाबाई हिने मानाजी नामक मुलगा दत्तक घेतला आणि आंगऱ्यांच्या
वैयक्तिक मालमत्तेवर आणि इनामांवर आपला हक्क सांगितला. तथापि ६ जानेवारी
१८६० च्या पत्रानुसार सरकारने यास परवानगी नाकारली. ही बाब इनाम कमिशनपुढे
निर्णयाकरिता मांडण्यात आली. परंतु कमिशनचा निर्णय अनुकूल असूनही
इंग्रजांनी तो अस्वीकृत केला. पुढे मे १८८२ मध्ये यशोदाबाईने पुन्हा
प्रयत्न केला. तथापि त्यातही तिला यश आले नाही. दिनांक १८ फेब्रुवारी १८८४
च्या
*** कुलाबा जिल्हा निमितीचा इतिहास प्रकरण १- भूगोल व प्रकरण ९- प्रशासन
यात दिलेला आहे.
१४२
इतिहास
पत्त्राद्वारे
सरकारने तिला असे कळविले की, तिला मिळणाऱ्या सालोना १०,००० रुपयांत वाढ
करण्यास सवळ कारण नाही. परंतु त्यापैकी ७,२०० रुपये आंगरे कुटुंबियांच्या
मालमत्तेचे प्रतिक मानून तिच्या मृत्यूनंतर ती रक्कम तिच्या दत्तक मुलास
अखेरच्या कुलाबा प्रमुखाची वैयक्तिक मालमत्ता म्हणून चालू ठेवण्यास मान्यता
दिली. त्यानंतर थोड्याच काळात यशोदाबाईचे निधन झाले. आपल्या मालमत्तेचे
रक्षण करण्याकरिता ती आयुष्यभर झगडत राहिली. मात्र दत्तक पुत्राला ७,२००
रुपये मिळत राहतील या क्षुल्लक दिलाशावरच तिला समाधान मानावे लागले. परंतु
दुर्दैवाने तेही घडावयाचे नव्हते. त्यातून न्यायालयीन तंटा निर्माण झाला.
शेवटी जिजाबाईला बारस म्हणून घोषित करण्यात आले.
जंजिन्याच्या सीदींची
अखेरची बर्षे जंजिन्याच्या सीदींचे मराठ्यांशी क्वचितच सख्य असे.
जंजिऱ्यावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्यात पेशवे देखील सफल झाले नाहीत.
सीदींच्या अंतर्गत कारभारात इंग्रजांनी हस्तक्षेप करण्याचे शक्यतोवर टाळले.
परंतु १८१८ पासून इंग्रजी राजवट कायम झाल्यावर सीदींविरुद्धच्या
तक्रारींची इंग्रज दखल घेऊ लागले. जंजिरेकरांची टाकसाळ होती. त्यातून
अपकृष्ट प्रतीची नाणीही काढली जात. सन १८३४ मध्ये आपल्या अधिकारांचे प्रतीक
म्हणून इंग्रजांनी सीदीची टाकसाळ बंद केली व जंजिरेकरांची नाणी रद्दबातल
ठरविली. सावकाशपणे इंग्रजांनी सीदी नबाबाला नमवून आपले स्वामित्व मान्य
करायला लावले. नबाब आपल्या मानमरातवांना चिकटून राहिले तरी १८३४ पासून ते
सार्वभौम इंग्रजांचे मांडलिक बनले. इ. स. १८६७ मध्ये जंजिऱ्याचा नबाव आणि
तेथील सरदार यांच्यामधील मतभेद इतके तीव्र झाले की, या गुन्ह्यांकरिता एक
स्वतंत्र न्यायालय जंजिन्याच्या सीदीने निर्माण करावे असे मुंबई सरकारने
सुचविले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८६९ मध्ये नबाबाला त्याच्या
अन्यायकारी वर्तणुकीमुळे पदच्युत करण्यात आले आणि काही मर्यादित अधिकार
सोपविलेल्या इंग्रज रेसिडेंट अधिकाऱ्याची राज्यकारभार पाहण्याकरिता नेमणूक
करण्यात आली. इ. स. १८७० मध्ये इंग्लंडच्या राजपुवाजवळ आपली राजनिष्ठा
व्यक्त करण्याकरिता आणि गमावलेला अधिकार पुन्हा प्राप्त करण्याची आशा मनाशी
वाळगून नवाब मुंबईस आला होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत नागरी कायदा
विस्कळीत झाला. तसेच महसूल गोळा करण्यातील अव्यवस्थेमुळे खूप गैरप्रकार
घडले. हिंदूंशी पक्षपात व गैरकारभारामुळे रागावलेल्या नागरिकांनी, तसेच
त्याने सरदारांचे अधिकार डावलल्यामुळे संतप्त झालेल्या सरदारांनी बंड केले व
जंजिन्याचा किल्ला बळकावला. परंतु नबाबाने इंग्रजांशी करारनामा केल्याने
त्याला प्रमुख पद चालू ठेवता आले. करारनाम्यानुसार नवाबाने आपल्या सरकारची
ब्रिटिश सरकारच्या सल्ल्याप्रमाणे पुनर्रचना करावी, पोलीस प्रशासन नियुक्त
करावे आणि महमूलबिषयक एक निश्चित अशी नियमावली ठरविण्यात यावी असे ठरले.
कुलाबा जिल्हाधिकारी संस्थानाचा राजकीय प्रतिनिधी म्हणून देखरेख करू लागला.
इ.
स. १८७६ मध्ये नबावाने तंबाखू विक्रीवरील आपली मक्तेदारी सोडून दिली.
समुद्रमार्गाने राज्य सोडून जाणाऱ्या प्रवाशांवरील कर आकारणे बंद केले आणि
मुंबई-जंजिरा दरम्यान आगबोटींची ये-जा वाहतूक व्हावी अशी योजना केली.
***
जंजिऱ्यातील घडामोडींचा तपशील कुलाबा गॅझेटिअरच्या १८८३ व १९६४ च्या
आवृत्तीमध्ये दिलेला असल्याने येथे त्याची पुनरावृत्ती केली नाही.
मध्ययुगीन काळ
१४३
संस्थानातील
इनाम दिलेल्या गावांव्यतिरिक्त इतर जमीन नबाबाच्या मालकीची होती. तरी
त्याने आपल्या हक्कांनुसार वहिवाट करण्याला काही पारंपरिक मर्यादा असत.
तथापि या मर्यादा ओलांडून, शेतसारा रीतसर भरणाऱ्या जमीनदारांनाही नबाब
त्रास देत असे अशा तक्रारी होत्या. जमा झालेल्या महसुलातील मोठा हिस्सा
हक्क आणि अनुदानात खर्च होत असे. शिवाय हक्कांची व्यवस्थित नोंद केलेली
नव्हती आणि कोणत्याही नियमाशिवाय जुने हक्क रद्द करून नवे हक्क मंजूर केले
जात होते. आर्थिक व्यवहार अतिशय दुरावस्थेला गेले होते. न्यायव्यवस्था तर
नाममात्र होती. नवाबाच्या मर्जीतील अधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या तक्रारींची
दाद घेतली जात नव्हती. सार्वजनिक हिताची कामे, पाणीपुरवठा व्यवस्था अथवा
नागरी सुविधा नव्हत्या. रस्ते चांगले नव्हते. निष्काळजीपणे चाललेली
वृक्षतोड जंगले नष्ट करीत होती. शासकीय अधिकारी अत्यंत भ्रष्ट आणि
अकार्यक्षम होते. यावर उपाय म्हणून सन १८७८ मध्ये कारभाऱ्याची नियुक्ती
करून त्याला न्यायविषयक अधिकार देण्यात आले होते. मात्र १८८३ मध्ये नवीन
नबाबाने सूत्रे हाती घेतल्यावर संस्थानात माध्यमिक शाळा उघडली, चित्रकलेचे
वर्ग सुरू केले आणि शारीरिक शिक्षणास उत्तेजन दिले. मुरुडमधील जंगले साफ
करण्यात आली आणि दळणवळणाकरिता रस्ते बांधण्यात आले. सन १८९२ मध्ये
व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स हा बंधारा शहराला पाण्याचा पुरवठा
करण्याकरिता बांधला. लवकरच संस्थानात काही सोयी अस्तित्वात आल्या व स्थानिक
स्वराज्य संस्था सुरू करण्यात आल्या.
आधुनिक काळ
एकोणिसाव्या
शतकाच्या मध्यापासून सत्तर-ऐशी वर्षांचा रायगड जिल्ह्याचा इतिहास म्हणजे
ब्रिटिश राजवटीमुळे निर्माण झालेल्या नवसंस्कारांच्या
क्रिया-प्रतिक्रियांचा प्रारंभव विस्ताराचा इतिहास होय. नवीन राजवटीमुळे
येथील जीवनात बरेच काही घडून आले, भिन्न प्रकारच्या प्रेरणा निर्माण
झाल्या. सन १८३९ मध्ये कुलाबा प्रदेश ब्रिटिशांकडे आल्यावर काही वर्षात
विविध क्रिया-प्रतिक्रियांचे संस्करण सुरू झाले. म्हणूनच या पुढील कालखंडास
जिल्ह्याचा आधुनिक कालखंड असे मानता येईल. परकीय सत्ता स्वार्थ-परायण
असल्याकारणाने, राज्यकर्त्यांनी आपले प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे
टाकल्याने व बऱ्याच वेळा येथील जुन्याच जीवनमूल्यांचा पुरस्कार केल्याने
येथे आमूलाग्र बदल घडणे असंभव होते. ब्रिटिशांनी बदल केला तो स्वतःच्या
हितरक्षणासाठी. म्हणून येथील जुन्या जीवनाला तडे गेले. तथापि वैभवसंपन्नता
आली नाही. जागृती आली, पण ती अर्धवट. धडपड मात्र वाढली. या धडपडीत कधी
पाश्चिमात्य पद्धतीचे अनुकरण होते, तर कधी संघर्ष होता आणि क्वचित प्रसंगी
समन्वय देखील.
वैचारिक जागृती: क्रिया-प्रतिक्रियांच्या या काळात रायगड
नजीकच्या मुंबईमध्ये नवीन विचार प्रवर्तक सभा संस्था उदयास आल्यात.
तत्त्वप्रचारासाठी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी १८४४ मध्ये मानवधर्मसभा
नावाची संस्था काढली. यातूनच १८४८ मध्ये परमहंस सभा निर्माण झाली. ही
संस्था लोप पावल्यावर १८६७ मध्ये प्रार्थना समाज या नावाने ब्राह्मोसमाजाची
एक शाखा स्थापन झाली. धार्मिक जागृतीव्यतिरिक्त प्रार्थना
१५० आधुनिक काळ यावरील लेखन डॉ. कि. का. चौधरी, कार्यकारी संपादक व सचिव, महाराष्ट्र गॅझेटिअर, यांनी केलेले आहे.
१२ कुलाबा जिल्ह्याची निर्मिती १८६९ मध्ये करण्यात आली.
१४४
इतिहास
समाजाने महिला शिक्षण व पुनर्विवाहासाठी आचार विचार प्रवर्तन केले आणि समतेची बीजे पेरली.
महात्मा
जोतीराव फुले याच काळातील बहुजनसमाजातील अव्वल जागृतीचे प्रतीक होते.
गोपाळ हरि देशमुख तथा लोकहितवादी यांचा महात्मा फुले यांच्या कार्याला
पाठिंबा होता. फुलेंनी स्त्रीशिक्षण, अस्पृश्यांना शिक्षण, पुनर्विवाहास
उत्तेजन, तसेच बहुजन-समाजाची सर्वांगिण उन्नती यासाठी तळमळीने क्रांतिकारक
पावले टाकली. त्यांनी १८७३ मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने
जनजागृतीचे कार्य अंगीकारले. महाडला काही दिवस वास्तव्य असलेले विष्णु
भिकाजी गोखले तथा विप्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५-१८७१) यांनी ग्रिस्ती धर्म
प्रचारकांविरुद्ध जोरदार प्रचार तर केलाच, परंतु सामाजिक विषमतेविरुद्ध कडक
टीका करून सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार केला. १३१
एकोणिसाव्या
शतकाचा पूर्वार्ध प्राधान्याने सामाजिक व वैचारिक जागृतीया होता. मात्र
१८५० नंतरच्या कालखंडात सामाजिक सुधारणांच्या जोडीला अमलेले धार्मिक आंदोलन
मागे पडून त्याची जागा राजकीय विचाराने घेतली. ब्रिटिशांबद्दलच्या
तक्रारीत सूर वाढत होता आणि वेळप्रसंगी मरकारवर निर्भीड टीकाही. ममकालीन
मराठी वर्तमानपत्रांतून प्रकट झालेल्या संपादकांच्या वृत्तीत जी निर्भय,
स्पष्ट, स्वतंत्र व बाणेदार वृत्ती आढळते तिचे अग्रदूत म्हणून पेणच्या
गोविद विठ्ठल कुंटे तथा भाऊ महाजन (१८१५-१८९०) यांचा उल्लेख करता येईल.
मराठी भाषेतील प्रभाकर नामक वर्तमानपत्र मुंबईत काढून (२४ ऑक्टोबर १८४१
रोजी पहिला अंक) त्यांनी १८६२ पर्यंत चालविले. तत्कालीन पुरोगामी
महाराष्ट्रीयांच्या या मुखपत्रात ब्रिटिश राज्यकारभारावर प्रथमच टीकेला
प्रारंभ झाला. "हिंदुस्थानातून द्रव्य जाते ते बंद झाल्याशिवाय देशात वरी
गत नाही", "इंग्रज अंमलदार हजारो रुपये पगार खाऊनही लक्षावधी रुपये लाच
खातात" अशा प्रकारची तिखट विधाने प्रभाकर मधून येऊ लागली. भाऊ महाजन
पुरोगामी विचारांचे असून मडी व सामाजिक बंधनांना त्यांनी तीव्र विरोध करून
विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. राष्ट्रीय वृत्तीच्या भाऊंनी
तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्वाची माहिती १८५४ पासून सुरू
झालेल्या ज्ञानदर्शन वैमासिकातून मराठी लोकांना दिली. याच कालखंडात
अलिबागच्या सत्यसदन वृत्तपत्रानेही काही काळ कार्य केले.
धर्माधार देऊन
अस्पृश्यता नष्ट करण्याचा आग्रह धरणारांमध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी होते.
त्या काळी स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करून स्त्रीशिक्षण, घटस्फोटाचा अधिकार व
पुविवाहाचे त्यांनी समर्थन केले. सन १८६७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या
विष्णुबुवांच्या सुखदायक राज्यप्रकरणी निबंध या पुस्तिकेची त्याच साली
प्रसिद्ध झालेल्या कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल या महान ग्रंथाबरोबर तुलना
करण्याचा अनेकांना मोह होतो. इतके
* रा. श्री. जोग. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड चौथा, पृ. ५८-५९.
कित्ता, पृ. ६०.
११० कित्ता, पू. ६१.
११५
कित्ता, पृ. ६५, १८६-८७. विश्वनाथ नारायण मंडलिकांनी १८६४ मध्ये प्रथम
फक्त इंग्रजीतून काढलेल्या नेटिव ओपिनिअन (१८६४) पत्त्रकाने नेटिव लोकांचे
मत राज्यारूढ इंग्रजांच्या कानावर घालण्याचे ध्येय समोर ठेवले. प्रतिष्ठा व
वजनदारपणा असलेल्या या पत्रकाची इंग्रजांना दखल घ्यावी लागे.
आधुनिक काळ
१४५
मात्र
खरे की, विष्णुबुवांची काही मते त्यांच्या काळाच्या संदर्भात पाहिली तर
फार पुरोगामी वाटतात. उत्पादनाची सर्व मुख्य साधने सरकारी मालकीची असावीत व
राजाने सर्वांना शिक्षण आणि कामधंदा देण्याची व्यवस्था करावी अशी त्यांची
मते फार पुरोगामी होती." या निबंधाचे इंग्रजीत भाषांतर करून विष्णुबुवांनी
त्याच्या प्रती ब्रिटिश मंत्रिमंडळ व पार्लमेंट आणि इंग्लंडमधील
वर्तमानपत्रे तसेच विचारवंतांकडे पाठविल्यावर त्यांचा इंग्लंडला चांगला
परिचय झाला. लंडनच्या इलस्ट्रेटेड लंडन न्यूज ने बुवांचा हिंदुस्थानातील एक
वैचारिक क्रांतिकारक असा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांची माहिती व
छायाचित्र छापले. रायगडचे सुपुत्त्र नारायण सदाशिव मराठे तथा स्वामी
केवलानंद सरस्वती (१८७७-१९५५) हे सुद्धा धर्मसुधारक व परिवर्तनवादी
समाजसुधारक होते. आंतरजातीय विवाह व सहभोजन, अस्पृश्यता निवारण, जाती बंधने
नष्ट करणे आणि सर्व हिंदू प्रजेला बेदाधिकार देणे याचा त्यांनी पुरस्कार
केला. सन १९३३ मध्ये महात्मा गांधींनी येरवडा कारागृहात अस्पृश्यता निवारण
चळवळीसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी बोलावलेल्या परिषदेत नारायण मराठे
सहभागी झाले होते.
अठराशे सत्तावनच्या उठावाचे पुढारी महाराष्ट्रीय असले
तरी जिल्ह्यातील जनता उठावापासून सामान्यतः अलिप्त राहिली होती. मात्र
वरसईचे वेदशास्त्र संपन्न विष्णुभट बाळकृष्णभट गोडसे (१८२७-१९०६) यांनी
१८५७ चा झाशीचा संग्राम समक्ष पाहिला. गोडसे झाशीची राणी लक्ष्मीबाईकडे
काही दिवस असताना हा संग्राम सुरू झाला होता. तेथून परत आल्यावर २४
वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या माझा प्रवास या रोचक प्रवास वर्णनात
संग्रामाच्या आठवणी लिहून ठेवल्या.
प्रथम १८६७ मध्ये सुरू झालेल्या पुना
असोसिएशनचे पुनर्घटन करून १८७० मध्ये पुना सार्वजनिक सभा स्थापन झाली.
सार्वजनिक सभेच्या रूपाने जनतेवरील सरकारी अन्यायाचे परिमार्जन करून
घेण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले. अर्जविनंतींचा उपयोग होत
नसल्याने ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोषाची भावना निर्माण करण्यासाठी ही सभा
महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पुढे आली. सभेचे कार्यकर्ते ग्रामीण भागातही
बैठका भरवून जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देत. ब्रिटिशांविरुद्ध
असंतोष निर्माण करण्यासाठी सार्वजनिक सभेने जमीन महसूल आकारणीमध्ये होणारा
अन्याय हा विषय हाती घेतला. सभेच्या निर्मितीनंतर १८७१ मध्ये रायगड
जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला, १८७५ व १८७६ मध्ये महापुराने अतोनात नुकसान
झाले आणि १८७८-७९ च्या हिवाळघात टोळधाडीचा मोठा फटका बसला. या कारणांमुळे
दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली आणि स्वाभाविकपणे पुना सार्वजनिक सभेला
सरकारविरुद्ध असंतोष भडकवण्याची चांगली संधी प्राप्त झाली. त्यानुसार
सार्वजनिक सभेचे वक्ते रायगड जिल्ह्यामध्ये फिरू लागले आणि जनजागृती करू
लागले. सन १८७५ चे दख्खनचे दंगे यांचाही जनमानसावर प्रभाव पडला.
सरकारविरुद्ध असंतोषाची भावना वाढू लागली. दख्खनच्या दंग्यांमुळे सरकारलाही
शेतकऱ्यांच्या कर्जनिवारणविषयक गरजांकडे लक्ष देणे भाग पडले. त्यानुसार
सरकारने १८७९ मध्ये डेक्कन अॅग्रिकल्चरिस्टस रिलिफ अॅक्ट पास केला.
१२६ य. दि. फडके, विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड १, १९८९, पृ. ४७.
११०
नारायण सदाशिव मराठे अलिबाग तालुक्यातील सुडकोली गावचे होते. १९३४ मध्ये
त्यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू धार्मिक विधी व संस्कार यात सुधारणा
करण्यासाठी धर्मनिर्णय महामंडळ स्थापन झाले.
वाय ३५-१०
१४६
इतिहास
खोती
वतन अधिनियम दुरुस्ती एका बाजूला जनतेतील असंतोष व दुसऱ्या बाजूला
खोतांकडून शेतकऱ्यांचे होणारे शोषण असे प्रश्न सरकारसमोर उभे राहिले. मुंबई
शासनाने खोती पद्धतीला नियमित स्वरूप देऊन खोत आणि शेत कसणाऱ्या रयतेचे
परस्पर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. बरेच खोत पेशवे काळापासून सनदाधारक
होते. खोताई मध्ययुगीन काळाच्याही पूर्वीपासून अस्तित्वात असून कोकणात
लोकवसाहत कमी असल्याने उजाड गावे वसविण्याचे किंवा जंगल तोडून वसाहत
करण्याचे काम खोतांनी केले असा त्यांचा दावा होता. खोतांच्या मालकी
हक्कांविषयी एकोणिसाव्या शतकात मधूनमधून वाद निर्माण होत असत. इंग्रज
शासनाच्या दृष्टीने खोत जमीनमालक नसून महसूल संकलन करणारा मध्यस्थ
(रेव्हेन्यू फार्मर) होता. शासनाच्या धोरणाविरुद्ध कुलाबा व रत्नागिरी
जिल्ह्यांतील अनेक खोतांनी न्यायालयात दावे चालविले. खोत व रयतेचे संबंध
नियमित करण्यासाठी मुंबई शासनाने १८७९ मध्ये एक विधेयक तयार केले. आश्चर्य
म्हणजे समकालीन परिस्थितीनुरूप लोकमान्य टिळकांना सदरहू विधेयकाच्या
विरुद्ध उभे राहून त्यांना शासनाकडे अपील करावे लागले होते. तथापि विधेयक
१८८० मध्ये पास झाले.
रावसाहेब मंडलिकांच्या प्रयत्नाने सरकार व खोत
यांच्यात तडजोड झाली. सन १८८० च्या खोती वतन अधिनियमाने वेळोवेळी शेतसारा
वाढविण्याचा अधिकार शासनाला मिळाला आणि खोती गावचा सरकारने ठरविलेला सर्व
सारा खोतांनी दिला पाहिजे अशी तरतूद करण्यात आली. या अधिनियमाने कुणब्यांचे
चार गट पडले. पहिल्या दोन गटांतील धारेकऱ्यांकडून खोतास उत्पन्नाचा अर्धा
भाग (चांगल्या जमिनीतील) किंवा १/३ भाग (वरकस जमिनीतील) घेता येत नसे.
तिसऱ्या गटातील कायमच्या किंवा जुन्या कुळांकडून मात्र अर्धेल किंवा
तिर्धेल घेता येत असे. चौथ्या गटातील उपरी कुळांकडून खोतास कमीजास्त
प्रमाणात उत्पन्न घेता येत असे. सरकारने ठरविलेला सारा अर्धेल, तिर्धेल
किंवा सरकारने ठरविलेल्या दरापेक्षा जास्त असल्यास खोतांना पदरचे पैसे
भरावे लागत. अन्यथा त्यांची वतने जप्त केली जात असत. खोतीच्या हक्कांबाबत
खोत व सरकार यांच्यात बऱ्याच वेळेस बाद निर्माण होत असत. टिळकांसारख्या
राष्ट्रवादी पुढाऱ्यांना देखील या प्रश्नात खोतांच्या बाजूने लक्ष घालावे
लागे.
मुंबई शासनाने १९०३ मध्ये खोती अधिनियम दुरुस्ती करणारे विधेयक
राजपत्त्रात प्रसिद्ध केले. खोती पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी या प्रसंगी
बरेच आक्षेप घेतले. खोती बहिबाट कुलाला हितावह आहे असे मानणारेही बरेच
होते. काही सूचनांचा स्वीकार करून शासनाने १९०४ मध्ये खोती अधिनियम अमलात
आणला. या अधिनियमानुसार कुळांनी पिकाचा काही भाग शेतसारा म्हणून धान्य
रूपाने खोतास देण्याऐवजी रोकड रकमेच्या रूपाने देण्यास परवानगी मिळाली.
त्यामुळे शेतमालाचे भाव अधिक असत तेव्हा ठरलेली साऱ्याची रक्कम दिल्यानंतर
शेतमाल अधिक भावाने विकून आलेल्या पैशांचा काही भाग कुळांच्या वाट्याला येत
असे. म्हणजे अधिक भावाचा फायदा खोतास न मिळता कुळास मिळत असे. कुळ
कर्जबाजारी असल्यास अर्थातच तो फायदा सावकाराला मिळत असे. तरी सुद्धा १९०४
ची सुधारणा कुळांना बरीच हितावह ठरली. सन १८९९ मध्ये कुलाबा व ठाणे
जिल्ह्यांमध्ये स्वतः शेती न कसणाऱ्या मंडळीकडे ४५ ते
१२८ रिचर्ड कॅशमन, दि मिथ ऑफ दि लोकमान्य टिळक अॅण्ड मास पोलिटिक्स इन
महाराष्ट्र, १९७५, १. ४१-४२.
आधुनिक काळ
१४७
५५
टक्के जमीन होती. त्यामुळे बहुतांश प्रजा भूमिहीन किवा अल्पभूधारक होती.
या पार्श्वभूमीवर १९०४ चा अधिनियम महत्त्वाचा होता. पुढे पहिल्या
महायुद्धाच्या काळात व नंतरही १९२२ पर्यंत धान्याच्या किमती वाढल्यामुळे
कुळांना धान्याच्या रूपाने खंड देण्यापेक्षा तो पैशामध्ये देणे किफायतशीर
झाले. अर्थातच खोतांना धान्य रूपाने खंड घेण्यातच अधिक फायदा होता. आपले
हितरक्षण करण्यासाठी पेण तालुक्यातील आगरी जातीच्या कुळांनी खोतांविरुद्ध
असहकार व बहिष्कार करण्याचे शस्त्र हाती घेतले. धान्य रूपाने खंड मागणाऱ्या
मालकांच्या जमिनी कसण्यास आगरी कुळांनी नकार दिला. म्हणून शेकडो एकर जमीन
लागवडीविना पडीत राहिली. अखेर तडजोड झाल्याने आगरी कुळांनी बहिष्कार मागे
घेतला. १९२० च्या राजकीय असहकार आंदोलनाचे हे कृषी अर्थव्यवस्थेवर पडलेले
पडसाद होते.
सन १९२१-१९२९ या कालावधीत कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांतील
खोतांविरुद्ध त्यांच्या कुळांनी केलेल्या तक्रारींना मुंबई विधिमंडळात वाचा
फोडण्यात आली होती. त्यानुसार शासनाने तक्रारींची चौकशी करून कुळांच्या
हक्कांचे संरक्षण करण्याच्या हेतूने नवीन आदेश अमलात आणले. तथापि लोती
पद्धती नष्ट करण्याचा आपला विचार नसल्याचे शासनाने जाहीर केले. शासनाच्या
या निर्णयाने समाधान न झाल्याने मुंबईच्या सोशल सब्हिस लीगने पाहणी करून
खोती पद्धती नष्ट करणे हा एकमेव तोडगा असल्याचे प्रतिपादन केले. तथापि
कुलावा व रत्नागिरी जिल्ह्यांच्या काँग्रेस समित्यांवर खोतांचा प्रभाव
असल्याने खोती नष्ट करण्यासाठी त्यांनी अनुमती दिली नाही. प्रांतिक
विधि-मंडळाची १९३७ ची निवडणूक लढवताना खोती पद्धती नष्ट करण्याचे आश्वासन
महाराष्ट्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेले होते. तथापि १९३७ मध्ये
अधिकारारूढ झालेल्या बाळ गंगाधर खेर यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाला इच्छा
असूनही खोतांच्या दडपणामुळे निवडणूक आश्वासनाची परिपूर्ती करणे शक्य झाले
नाही. कुलाबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुढारी व चरीच्या (अलिबाग तालुका)
शेतकरी सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे नारायण नागूजी पाटील यांनी खोती मुक्ती
आंदोलनासाठी बरेच काम केले. अनेक ठिकाणी सभा घेऊन त्यांनी खोतीविरुद्ध
जनजागृती केली. अखेर १९४९ मध्ये दुसऱ्या खेर मंत्रिमंडळाने खोती पद्धती
नष्ट केली.
दुष्काळ निवारण व राष्ट्रीय जागृती पुणे सार्वजनिक सभेने सुरू केलेल्या १८७५-
१८७६
च्या दुष्काळविषयक मोहिमेनंतर १८९६ च्या दुष्काळात, दुष्काळ निवारण
कार्यासाठी सार्वजनिक सभेने मोठी मोहीम काढली. ऑक्टोबर १८९६ पासून एप्रिल
१८९७ पर्यंत सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांनी कोकण भाग पिंजून काढला.
डिसेंबर १८९६ मध्ये सार्वजनिक सभेच्या दुष्काळ समितीचे एक सचिव अच्युत
सीताराम साठे यांनी पनवेल, पेण, रोहा, गोरेगाव, नागोठणे व रेवदंडा येथे
शेतकन्यांच्या सभा आयोजित करून दुष्काळ निवारण्याच्या निमित्ताने
राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करण्याचा चंग बांधला. साठे व त्यांचे
सहकारी पिकांची स्थिती, दुष्काळाची तीव्रता, सरकारी निवारण कार्याचे
स्वरूप, शेतसाऱ्यात सूट याबाबतची रयतेची मागणी व त्यास प्राप्त झालेला
प्रतिसाद यांचा सभांद्वारे आढावा घेत असत. सभेचे प्रचारक रयतेला सांगत की,
फॅमीन कोड नामक संहितेनुसार शेतसाऱ्यात सूट मिळण्याची कायदेशीर तरतूद
असल्याने गावकन्यांनी मामलेदाराकडे सूट मिळण्यासाठी अर्ज करावेत. अशिक्षित
रयतेसाठी सार्वजनिक
*** कॅशमन, पूर्वोक्त, पृ. १२७.
१४८
इतिहास
सभेचे
पुढारी वासुदेव गणेश जोशी यांनी अर्जाचा नमुना छापून प्रसारित केला.
टिळकांनी तर फॅमीन कोडच्या सहा हजार प्रती मराठीत छापून वाटण्याची व्यवस्था
केली होती.
दुष्काळ निवारणाच्या निमित्ताने सार्वजनिक सभेने उभारलेल्या
सरकारविरोधी आंदोलनाने शासकीय अधिकारी संत्रस्त झाले होते. कुलाबा जिल्हा
दंडाधिकाऱ्याचा याबावतचा गोपनीय अहवाल अत्यंत बोलका आहे. तो म्हणतो:-
सार्वजनिक सभेचे या जिल्ह्यातील कार्य अत्यंत खोडसाळपणाचे असून
प्रचाराद्वारे रयतेत अभूतपूर्व प्रक्षोभ व असंतोष निर्माण करण्यात येत आहे.
रयतेच्या भावना भडकविण्यात येत आहेत. लोककल्याण व लोकहित बुद्धीच्या
नावाखाली राजकीय स्वरूपाचा राजद्रोह सभांमधून पसरविण्यात येत आहे. जमीन
महसूल व अबकारी कराचे सरकारी उत्पन्न घटवून कायद्याचे उल्लंघन करण्यास
लोकांना प्रवृत्त करण्यात येत आहे. गरीब रयतेबाबत सरकार निर्दयपणे व
कठोरपणे बागते असे चित्र उभारून कायदा उघडपणे झुगारून लावण्याम रयतेला
उत्तेजन देत आहे.
नोकरशाहीचा सार्वजनिक सभेवरील राग इतका वाढला होता की,
अच्युत सीताराम साठेंच्या एका सभेभोवती सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याने गोळीबार
करण्याच्या पवित्र्यात तीनशे सुसज्ज पोलिसांचे कडे केले होते. साठेंना
व्यासपीठावरून खाली खेचण्याचाही सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याचा मनोदय होता.
तथापि आपल्या तीन तासांच्या भाषणात साठेंनी पोलिसांना आगळिक करण्याची संधी
दिली नाही. मात्र त्याच आठवड्यात साठे व गोविंद विनायक आपटे यांना
शेतकऱ्यांच्या बोले येथील सभेनंतर अटक करण्यात आली. आपटे व साठे लोकांना
सांगत होते की, लोकांच्या अर्जविनंत्यांना नोकरशाही दाद देत नसल्याने
लोकांनी जंगलविषयक कायदा व अवकारी नियमांचे उल्लंघन करून जंगलातून इमारती व
जळाऊ लाकूड कापून आणावे व ताडी काढून घ्यावी. या ओघात सार्वजनिक सभेच्या
पुढाऱ्यांवर भरलेल्या खटल्यात साठेंची सुटका झाली. परंतु आपटेंना
न्यायालयाने एक वर्षाची सजा व दोनशे रुपये दंड ठोठावला. केसरो च्या २९
डिसेंबर १८९६ च्या वृत्तानुसार सार्वजनिक सभेची साराबंदी चळवळ खूप यशस्वी
झाली. साठेंच्या सभांना हजारो शेतकरी येत. त्यात ब्राह्मण खोत, कास्तकार,
आदिवासी, कोळी व इतर जातींचे शेतकरी असत. राष्ट्रवाद्यांच्या भूमिकेतून हे
यश नाटघमय होते. लोकांच्या अपेक्षा वाढीस लागल्या व ते साराबंदीस अनुकूल
झाले. बऱ्याच ठिकाणी दौऱ्यावरील जिल्हाधिकाऱ्याच्या गावाजवळील तंबूवर
रयतेचे लोंढे येऊन शेतसाऱ्यात सूट मिळण्यासाठी मागणी करू लागले.
सार्वजनिक
सभेच्या मोहिमेस यश मिळण्याचे एक कारण असे होते की, शेतकऱ्यांच्या स्थानिक
संघटना सभेच्या पुढाऱ्यांना सक्रिय मदत करीत व बैठका आयोजित करून
प्रचार-पत्नके वाटत असत. कुलाबा जिल्ह्यातील खोतसुद्धा शेतसाऱ्यात घाऊक सूट
मिळाल्याखेरीज सारा भरण्यास तयार नसत रामजी लक्ष्मण घरत व अलिबाग तालुका
असोसिएशन याबाबत आघाडीवर होते. नागावची "सभा" देखील या आंदोलनात सक्रिय भाग
घेत होती.
१० कित्ता, पृ. १२९.
बॉम्बे पोलीस अॅबस्ट्रॅक्ट ऑफ इन्टेलिजन्स, १९ डिसेंबर १८९६, परि. १७४६.
*** कॅशमन, पूर्वोक्त, पृ. १३०-३१०
*** कुलाबा जिल्हाधिकाऱ्याचे मध्यवर्ती महसूल विभागाच्या आयुक्तास पत्न, ११५ जुलै १८९७.
" बॉम्बे पोलीस अॅबस्ट्रॅक्ट ऑफ इन्टेलिजन्स, ९ नोव्हेंबर १८९६, परि. १५६७.
आधुनिक काळ
१४९
सन
१८८० च्या दशकात स्थापन झालेली अलिबाग तालुका असोसिएशन स्थानिक
जमीनधारकांची संघटना होती. जमाबंदीद्वारे वाढ केलेल्या महसुलास विरोध
करण्या-साठी ही संघटना स्थापन झालेली होती. १८९३ ते १८९५ दरम्यान महसूल
वाढीचा विषय मुंबई शासनाच्या विचाराधीन असताना अलिबाग असोसिएशनने पुणे
सार्वजनिक सभा, वर्तमानपत्रे आणि मुंबई प्रांतिक विधान परिषदेत जोरदार
मोहीम उघडली होती. असोसिएशनचे पुढारी रामजी घरत टाइम्स ऑफ इंडिया व इतर
वर्तमानपत्रांमधून लेख लिहून लोकांना जागृत करीत होते. महसूल वाढ व रयतेचे
होणारे हाल यावर घरत यांनी १८९६ मध्ये एक पुस्तकही प्रकाशित केले होते. घरत
मुंबईचे असून त्यांची अलिबाग तालुक्यात जमीन होती. ते बॉम्बे प्रेसिडेन्सी
असोसिएशनच्या समितीचे सभासद असल्याने खेडूतांच्या संघटना उभारण्यात
त्यांना बरेच काम करता आले. पनवेल तालुक्यातील जमीनधारकही शेतसाऱ्यात सूट
मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. या तालुक्यात माणेकशा जहांगीरशा तल्यारखान
या धनिक जमीनदाराने पुढाकार घेतला होता. तल्यारखान देखील बॉम्बे
प्रेसिडेन्सी असोसिएशनचे एक पुढारी असून शेतकरी व जमीनदारांचे हितसंबंध
जपण्यासाठी प्रयत्नशील होते. मुंबईच्या धनिक लोकांचा कुलाबा व ठाणे
जिल्ह्यांतील ग्रामीण संघटनांना मोठा हातभार लागत असे. त्यामुळे बॉम्बे
प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि पुणे सार्वजनिक सभा यांच्या कामात काही प्रमाणात
समन्वय देखील साध्य होत असे. टिळक, सार्वजनिक सभा व इतर संघटना साराबंदी
प्रकरणी जरी खूप प्रयत्नशील होत्या तरी त्यांना फारसे यश मिळाले नाही.
टिळकांची दुष्काळ मोहीम लोकप्रिय झाली तरी शासनाने महसुलाचे दर कमी केले
नाहीत. दुर्दैवाने साराबंदी मोहीम कोसळली. तथापि मोहिमेचा वस्तुनिष्ठ आढावा
घेतल्यास असे दिसते की, टिळकांची मोहीम केवळ साराबंदीसाठी नव्हती. त्यांना
माहीत होते की, शेतकरी समाजाचे परिणामकारक राजकीय जनजागरण ही एक
दीर्घकालीन प्रक्रिया होय. म्हणून अल्पावधीत त्यात पूर्ण यशप्राप्ती शक्य
नव्हती. टिळकांचा खरा हेतू जनजागृतीचे एक साधन मिळविणे हा होता. पुण्याचे
बुद्धिवादी ग्रामीण भागातही सरकारविरोधी प्रभावी मोहीम संघटित करू शकतात हे
त्यांना दाखवावयाचे होते. रयतेचा असंतोष जागृत करून तिला राजकीय प्रवाहात
आणण्याचा तो प्रयत्न होता.
मुंबईतील घटनांचे पडसाद शेजारच्या मुंबई
नगराचा एकोणिसाव्या शतकातील वेगवान विकास व प्रगती यांचा कुलाबा
जिल्ह्यातील लोकजीवनावर प्रभाव पडणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे जिल्ह्यावर
प्रभाव पाडणाऱ्या मुंबईतील काही घटनांचा थोडक्यात आढावा घेणे आवश्यक आहे.
माऊंटस्टुअर्ट एलफिन्स्टनने बांधकाम हाती घेतलेला पुण्याकडे जाणारा
बोरघाटातील रस्ता सर जॉन माल्कमच्या राजवटीत १० नोव्हेंबर १८३० रोजी खुला
करण्यात आल्याने कुलाबा जिल्ह्यातून देशाकडे होणारी वाहतूक सुलभ झाली.
मुंबईच्या अपोलो बंदरावरील वेलिंग्टन धक्का बांधून पूर्ण झाल्यावर १८१९
मध्ये मुंबईहून कुलाबा जिल्ह्यातील बंदरांशी प्रवाशी वाहतूक सुलभ झाली.
हिंदुस्थानातील पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईहून ठाण्याला
गेल्यावर ब्रिटिशांबद्दल भययुक्त आदर निर्माण होणे स्वाभाविक होते.
मुंबईहून निघालेला रेल्वेमार्ग १८५६ मध्ये कुलाबा जिल्ह्यातून पुण्याकडे
जाण्यासाठी खुला झाल्याबर वाहतूक सुविधेबरोबर इंग्रजांचा
कॅशमन, पूर्वोक्त, पृ. १३४.
१५६ कित्ता, पृ. १३५.
" बॉम्बे सिटी गॅझेटिअर, खंड २, १९०९, पृ. १४३.
१५०
इतिहास
दबदबा
वाढला. मुंबईचे एलफिन्स्टन महाविद्यालय (स्थापना १८२७), विल्सन
महा-विद्यालय (१८३६), ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज (१८४५), मुंबई विद्यापीठ
(१८५७), सेंट झोनिअर्स महाविद्यालय (१८६९) इत्यादींच्या रूपाने उच्च
विक्षणाच्या सुविधा शेजारी उपलब्ध झाल्या होत्या. सरकारने १८६६ मध्ये
बॉम्बे कोस्ट अॅन्ड रिव्हर स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन करून मुंबईपासून
मांडवा, कारंजा, रेवरा, धरमतर, उरण व उलबा पर्यंत वाफेच्या इंजिनावर
चालणान्या तरसेवा सुरू केल्या. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात म्हणजे १८६९
मध्ये सुवेझ कालवा सागरी वाहतुकीस खुला केल्यामुळे परदेशी व्यापारात मोठी
क्रांती झाली. या सर्व घटनांचा लोकजीवनावर प्रभाव पडणे अपरिहार्य होते इ.
स. १८७० मध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कार्यान्वित झाल्यावर मुंबई बंदरातून
चालणाऱ्या विदेशी वाहतुकीस सुसंघटित वळण लागले. मुंबई बंदराच्या विकासाचा
कुलाबा जिल्ह्यातील बंदरावर प्रतिकूल परिणाम होणे क्रमप्राप्तच होते.
प्राचीन काळापासून परदेशी व्यापारी बंदरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या चौल,
मांडवा, महाड, जंजिरा, श्रीवर्धन इत्याश्री बंदरांतून चालणारा व्यापार
मुंबईद्वारे होऊ लागला.
रान १८५४ मध्ये मुंबईल पहिली कापड गिरणी स्थापन
झाल्यावर पुढील काळात कापड उद्योगाचा घवघवीत विकास झाला. त्याबरोबर कुलाबा
जिल्ह्यातील आणि विशेषतः चौल-रेवदंडा येथील कुशल विणकर लोफ बेरोजगार होऊन
उपजीविकेसाठी मुंबईला येऊ लागले. सन १८८० च्या नूतन वर्षदिनी कार्यान्वित
झालेल्या प्रिन्स डॉकनंतर मुंबईत बऱ्याच गोद्या निर्माण झाल्या. मुंबईचे
औद्योगीकरण झपाट्याने झाले आणि तेथील कामगारांमध्ये कुलाबकरांचा भरणा होऊ
लागला.
वासुदेव बळवंत फडके यांचे क्रांतिकार्य
ब्रिटिश सरकारच्या
अन्यायाचे परिमार्जन करून घेण्यासाठी पुणे सार्वजनिक सभा ओरवार कार्य करीत
असल्याचा उल्लेख यापूर्वी केलेला आहे. सार्बजनिक सभेतर्फे करण्यात आलेली
जागृती, दख्खनचे दंगे, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल आणि गव्हर्नर जनरल
लॉर्ड लीटन याचे दडपशाहीचे धोरण या कारणांमुळे सुशिक्षित तरुणांमध्ये
असंतोष धुमसू लागला. पेशव्याचे घराणे मुरुडचे असल्याने जिल्ह्यात
ब्रिटिशांविरुद्ध राग धुमसत होता. शिवाय ओगरे घराण्याची राजवट संपुष्टात
आणल्याने जनतेच्या ब्रिटिशांवरील रामात भर पडली. या सर्व कारणांचा परिपोष
होऊन शिरढोणचा एक तेजस्वी तरुण बासुदेव बळवंत फडके सशस्त्र क्रांती
लढचासाठी पुढे सरसावला.
वासुदेव बळवंत फडके यांचे घराणे मूळचे कोकणातील
केळशीचे होते. फडके कुटुंब अदमासे तीन शतकांपूर्वी पनवेल आणि कर्नाळा
किल्ल्या दरम्यानच्या शिरढोण गावी येऊन राहिले. तेव्हा हा प्रदेश
मराठ्यांच्या कल्याण सुभ्यास समाविष्ट असून फडकेंचे पूर्वज सुभा प्रशासनात
अधिकारी पदावर होते. झाप्त इतिहासानुसार वासुदेव बळवंताचे आजोबा अनंतराव
फडके "किल्लेदार फडके" या नावाने ओळखले जात. कर्नाळा किल्ला इंग्रजांनी
१८१८ मध्ये जिंकून घेईपर्यंत अनंतराव कर्नाळा गड़ाचे किल्लेवार होते.
*** कित्ता, पृ. १६५.
व्ही.
एस. जोशी, वासुदेव बळवंत फबके फर्स्ट इंडियन रिबेल अगेन्स्ट ब्रिटिश रुल,
मुंबई, १९५९, ५. ७-१३. येथे नमूद करावेसे वाटते की, या किल्ल्यास शिवाजी
राजेंच्या काळापासून संरक्षणदृष्टचा फार महत्व होते. महाराणांनी
आधुनिक काळ
१५१
क्रांतीच्या
भावनेने प्रेरित झालेल्या बासुदेव बळवंत यांनी ३०० ब्राह्मण, रामोशी,
कोळी, मांग, महार व मुसलमान सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्याच्या परिसरात
राष्ट्रीय कामासाठी दरोडे घालण्याचा २० फेब्रुवारी १८७९ पासून प्रारंभ
केला. वासुदेव बळवंत मिलिटरी फायनान्स कार्यालयात कारकुनाची नोकरी करीत
असतानाच आपले पथक तयार करीत होते. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य
स्थापन करण्यासाठी जसे उपक्रम केले तसेच आपणही करावे अशी त्यांची भूमिका
होती. शिवाजीने ज्याप्रमाणे छापे घालून पैसा व शस्त्र उभारणी केली
त्याचप्रमाणे आणि त्याच प्रदेशात आपणही प्रयत्न करावा असा त्यांचा विचार
होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या पद्धतीने वासुदेव बळवंतांनी वित्त व
शस्त्रसाठा मिळविण्यासाठी उपक्रम सुरू केला. त्यांच्याबद्दल सहानुमती
असलेले बरेच जण पुण्यात होते. त्यांपैकी काही जण लुटीच्या मालाची बिनबोभाट
विल्हेवाट लावीत असत. सरकारी खजिने लुटण्यापेक्षा श्रीमंतांची घरे
लुटण्यावर त्यांचा भर होता. सरकारी बंदोबस्त व सुरक्षाव्यवस्था यांच्याशी
लढण्यासाठी पुरेशी साधनसामग्री आपल्याकडे नसल्याने वासुदेव बळवंतांनी सरकार
ऐवजी खाजगी संपत्तीच्या लुटीवर भर दिला. मे १८७९ च्या आरंभी फडकेंनी एक
घोपणापत्त्र प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी निर्वाळा दिला की, आपण जे करीत
आहोत ते खरे तर ब्रिटिश राजवटी विरुद्धच आहे. सरकारने भारतीय लोकांच्या
संपत्तीची केलेली लूट, दुष्काळामुळे झालेली हलाखीची स्थिती, करांचे बाढते
ओझे, इंग्रज अधिकान्यांचे मोठमोठे पगार इत्यादींवर झोड उठवून त्यांनी
आपल्या जाहीरनाम्यात इशारा दिला होता की, "आतापर्यंत फक्त येथील श्रीमंत
लोकांविरुद्ध चाललेली आमची मोहीम आम्ही युरोपियनांविरुद्धही सुरू करू!
युरोपियनांची सापडेल तेथे कत्तल करू आणि (१८५७ च्या बंडासारखे) दुसरे बंड
उभारू." १५१
क्रांतिवीर वासुदेव बळवंत यांना पकडून देण्यात मदत
करणाऱ्यास सरकारने ४,००० रुपयांचे मोठे बक्षीस जाहीर केले. त्याच्याने खचून
न जाता त्यांनी प्रतिघोषणा केली की, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल
याचे डोके कापून देणारास आपल्याकडून ५,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
पेशव्यांचा नवीन पंतप्रधान या नात्याने आपण ही घोषणा करीत आहोत.
पुरंदरच्या
तहानुसार औरंगजेबाला १६६५ मध्ये दिलेल्या गडांमध्ये कर्नाळघाचा समावेश
होता. पुढे १६७० मध्ये राजेंनी तो जिंकून परत घेतला. शिरढोणला
४
नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेवचा जन्म झाला व त्याला १८५५ मध्ये कल्याणच्या
प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. या शाळेला जोडून सुप्रसिद्ध मिशनरी
शिक्षणतज्ञ व थोर विद्वान डॉ. जॉन विल्सन यांनी चालविलेल्या इंग्रजी
वर्गामध्ये वासुदेवने इंग्रजी भाषा अवगत केली. बासुदेव माध्यमिक
शिक्षणासाठी चार महिने मुंबईतील जगन्नाथ शंकरशेट शाळेत गेला व तेथून
पुण्याच्या विश्रामबाग वाडद्यातील पुना हायस्कूलमध्ये दाखल झाला. हे
हायस्कूल पुना कॉलेजशी (आताचे डेक्कन कॉलेज) संलग्न होते. या शाळेतून
मॅट्रिक परीक्षेला न बसता बासुदेव बाहेर पडला. इंग्रजी लेखन चांगले
समजण्याइतकी त्याची क्षमता होती. समकालीन प्रमाणानुसार वासुदेवची इंग्रजी
शिक्षितांमध्ये गणना करता येते.
१० वि. श्री. जोशी, आद्यक्रांतिकारक बासुदेव बळवंत फडके यांचे चरित्व, दुसरी
आवृत्ती, १९७४, पृ. १४०.
१५० कित्ता, पृ. १४७.
१५२
इतिहास
वासुदेव
बळवंत व त्यांचे सहकारी दौलतराव नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार नेरे,
चिखले, पळस्पे येथे हजारों रुपयांचा ऐवज लूटण्यात आला. त्यामुळे ठाणे, पुणे
शहरांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले होते. पेशव्यांचा पुण्यातील
विश्रामबाग वाडा व बुधवार वाडा येथे लागलेल्या आगींशी (१३ मे १८७९) बासुदेव
बळवंतांच्या कारवायांचा संबंध असल्याची ब्रिटिशांना शंका होती. इतकेच
नव्हे तर मुंबईतील अँग्लो-इंडियन वर्तमानपत्रे आणि विशेषतः बॉम्बे गॅझेट
सारखी पत्रके मागणी करू लागली की, पुण्याला लष्करी अंमल जारी करण्यात यावा.
परिणामतः पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. मेजर डॅनियल हा
अधिकारी बासुदेव बळवंतांच्या मागावर होता. मावळ प्रदेशातील तळेगाव
नजीकच्या ठिसूबाई टेकडीचा आश्रय घेतलेल्या वासुदेवरावांच्या पथकाला मेजर
डॅनियलने वेढले. या चकमकीत वासुदेव बळवंतांचा शूर सहकारी दौलतराव नाईक
मारला गेला. परंतु ते मात्र त्यावेळी दुसरीकडे गेलेले होते म्हणून वाचले.
वस्तुतः पेशव्यांच्या वाड्यांना लागलेल्या आगीशी वासुदेव बळवंतांचा काहीही
संबंध नव्हता. आग लावली होती दुसऱ्याच लोकांनी. या सर्व घडामोडींचा
इंग्रजांवर इतका परिणाम झाला की, फडकेंच्या कारवायांशी न्यायमूर्ती महादेव
गोविंद रानडे यांचा संबंध असल्याच्या संशया-बरून त्यांची पुण्याहून धुळयास
बदली करण्यात आली. तेव्हापासून रानडे आणि पुणे सार्वजनिक सभेकडे इंग्रज
संशयाने बघू लागले.१
दौलतराव नाईक यांच्या निधनानंतर बासुदेव बळवंतांना
आपल्या रामोशी अनुयायांचा विश्वास वाटत नव्हता. त्यांच्या सहकार्याने आपण
यशस्वी होऊ किवा नाही याबाबत ते साशंक झाले. त्यामुळे ते गाणगापूरमार्गे
हैद्राबाद संस्थानातील श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी गेले. तेथे
त्यांनी आठवडाभर कडक अनुष्ठान केले. तथापि देव प्रसन्न होत नाही हे लक्षात
येताच आपली मान कापून देवाला वाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र हा
प्रयत्न विफल झाला. शिवाजी महाराजांनी असाच प्रयत्न केल्याची आख्यायिका
विचारात घेतल्यास महाराजांसारखेच लोकोत्तर कार्य करण्याच्या कल्पनेने
वासुदेव बळवंत कसे झपाटले होते हे दिसून येते. १७ जून १८७९ रोजी ते
गाणगापूरला परत आले व अदमासे एक हजार हत्यारबंद लोकांची फौज उभारण्याचा बेत
केला. दुर्दैवाने मेजर डॅनियलला ते गाणगापूरला असल्याची माहिती मिळाली.
गाणगापूरला त्यांचे एक सहकारी व छोकमान्य टिळकांचे मामेभाऊ रंगोपंत
मोरेश्वर महाजन राहत असत. रंगोपंतांना हैद्राबादच्या अब्दुल हक नामक
अधिकाऱ्याने (मेजर डॅनियलचा मदतगार) संशयावरून पकडले. पोलिसांनी केलेल्या
अमानुप छळामुळे रंगोपंतांनी पोलिसांना उपयोगी अशी माहिती सांगितली. लगेच
वासुदेबराव गाणगापूरहून निसटले. तथापि २० जुलै १८७९ च्या रात्री त्यांना
देवरनावडगी येथे मेजर डॅनियलने घेरले. वासुदेवरावांना ताप असल्यामुळे ते
झोपलेले होते आणि त्याचमुळे डॅनियलच्या हाती लागले.
बामुदेवरावांच्यावतीने
न्यायालयात खटला चालविण्यासाठी गणेश बासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका
यांनी वकीलपत्त्र घेतले होते. सत्र न्यायालयात त्यांचा वचाव महादेव चिमणाजी
आपटे या प्रसिद्ध कायदे पंडिताने केला. सार्वजनिक काका व आपटे यांनी
प्रयत्नांची शर्थ केली. परंतु त्यांचा उपयोग न होता वासुदेव बळवंतांना
जन्मठेप आणि काळघापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली (७ नोव्हेंबर १८७९).
एडनच्या भयानक कारावासात ते १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मरण पावले.
१५१ कॅशमन, पूर्वोक्त, पृ. ३५.
जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांची माहिती या प्रकरणाच्या शेवटी दिलेली आहे.
आधुनिक काळ
१५३
सशस्त्र
लढचाचा प्रयत्न करणारे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुढील काळात
दामोदर हरी चाफेकर व त्यांचे दोघे बंधु आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर
सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारी देशभक्तांचे स्फूर्तिस्थान बनले.
आद्यक्रांतिकारक
बासुदेव बळवंत फडके भारतातील सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणा-स्थान बनले.
बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्यासारख्या श्रेष्ठ साहित्यिकाने तर वासुदेव
बळवंतांपासून प्रेरणा घेऊन आनंदमठ ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली. वासुदेव
बळवंतांची सशस्त्र लढयाबाबतची भूमिका अस्सल राष्ट्रवाद्याची होती,
अन्यायाविरुद्ध आत्मसमर्पणास सिद्ध असलेल्या थोर देशभक्ताची होती. तत्कालीन
समाज व विचारप्रणाली या पाश्वं-भूमीवरून पाहिल्यास त्यांचे क्रांतिकार्य
अपूर्व होते.
तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल याच्या
मते सर्व सुशिक्षित चित्पावन ब्राह्मण ब्रिटिशांविरुद्ध असून वासुदेव
बळवंतांच्या बंडाचा पुणे सार्वजनिक सभेच्या प्रचार मोहिमेशी परस्पर संबंध
असावा. टेंपल म्हणतो की, १८७९ चे फडकेंचे दरोडे व सार्वजनिक सभा यांचा थेट
संबंध जोडणे शक्य नसले तरी सभेचे पुढारी त्यामागे होते. टेंपलचे म्हणणे
अगदीच चुकीचे नव्हते किंवा पूर्ण सत्यही नव्हते. पुण्याच्या पुढाऱ्यांनी
बासुदेव बळवंत फडकेंच्या कार्याचे उघड समर्थन केले नाही, परंतु काहींचा
अप्रत्यक्ष पाठिंबा होता.
शिवसमाधीचा जीर्णोद्धार व शिवाजी उत्सव (१८८५-१९२६)
रायगडावरील
शिवाजीची समाधी अत्यंत दैनावस्थेत होती. सन १८८३ पर्यंत महाराजांच्या
समाधीच्या स्मृती पुसट झालेल्या होत्या. त्या वर्षी जेम्स डग्लस नामक
ब्रिटिश अधिकाऱ्याने शिवसमाधीची दुरावस्था प्रथम उजेडात आणली. हिंदवी
स्वराज्याच्या संस्थापकाच्या समाधीवर गवत व झुडपे बाढलेली डग्लसला दिसली.
तोपर्यंत समाधी दुरुस्त करण्याचा कुणी प्रयत्नही केलेला नव्हता. रायगडावरील
धर्मशाळेची तर पार वाताहात झालेली होती. पुढील दीड-दोन वर्षांत बडोद्याचे
एक समाजसुधारक गोविंदराव बाबाजी जोशी यांनी ३ एप्रिल १८८५ रोजी रायगडला भेट
दिली. शिवसमाधीवर छत्री बांधण्याच्या कामासाठी ४५,०४६ रुपये खर्च होतील
असा त्यांनी अंदाज बांधला. १५६ तेव्हापासून समाधीच्या जीर्णोद्धाराचा विचार
पुढे आला. जेम्स डग्लसच्या लेखनाने उद्भवलेल्या हालचालीचे नेतृत्व न्या.
रानडे यांनी पत्करून २४ मे १८८५ रोजी पुणे शहरात एक जाहीर सभा बोलावली व
जीर्णोद्धाराचा प्रश्न हाती घेतला. सदरहू सभेमध्ये ठराव करण्यात आला की,
शासनाने समाधीच्या जीर्णोद्धारासाठी वित्तबळ उपलब्ध करून द्यावे. त्यानुसार
गव्हर्नर लॉर्ड रे याने या कामी काही ठराविक रक्कम देण्याचे मान्य
११४ रिचर्ड टेंपलचे लॉर्ड लीटनला पत्त्र, ३ व ९ जुलै १८७९.
जेम्स डग्लस, बुक ऑफ बॉम्बे, मुंबई, १८८३, पृ. ४३२-३३.
१५ गोविंदराव बाबाजी जोशी, रायगड किल्ल्याचे वर्णन, पुणे, १९२४, दुसरी आवृत्ती, पृ. ४९-५००
न्या. रानडेंनी राइज ऑफ दि मराठा पॉवर या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या
नेत्रदीपक कार्यावर पुढीलप्रमाणे प्रकाशझोत टाकला :-
It
was an upheaval of the whole population', which had a strong sense of
nationality, fostered by the bhakti poet-saints. By integrating the
various castes and classes in his administration, Shivaji had acted in
accord with the national spirit propagated by the poet-saints.
१५४
इतिहास
केले.
प्रारंभीच्या दुरुस्तीसाठी ५१ रुपये तीन आणे खर्च करण्यात आले व
प्रतिवर्षासाठी समाधीच्या देखभालीकरिता पाच रुपये मंजूर करण्यात आले.
समाधीच्या
पहिल्या जीणोंद्वारानंतर दहा वर्षे गेली. दि. ३० मे १८९५ रोजी औंधचे
संस्थानिक श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात एक सभा
भरविण्यात आली. सभेत असे ठरले की, छत्रपतींची समाधी दुरुस्त करून त्यावर
छत्ती उभारण्यासाठी जनतेकडून वर्गणी गोळा करण्यात यावी आणि दरवर्षी
रायगडावर महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात यात्रा. यासाठी नेमण्यात
आलेल्या मंडळाचे चिटणीस पद लोकमान्य टिळकांना देण्यात आले. न्या. रानडे
यांनी सुरू केलेले काम आता टिळकांकडे आले. टिळकांनी पुणे शहरात पुन्हा सभा
घेऊन व केसरी मधून लेख लिहून समाधीच्या जीर्णोद्धारा-साठी आणि त्यावर छत्री
उभारण्यासाठी निधी गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला. शिवाजी महाराज हे
राष्ट्रवादाचे प्रतीक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तेव्हापासून शिवाजी
उत्सव चळवळीस जोर चढला. या चळवळीद्वारे लोकमान्य टिळकांनी काँग्रेसचा
स्वराज्याचा मंत्र घरोघरी पोहोचविण्यासाठी मोहीम उघडली. या चळवळीमध्ये
सामान्य जनतेबरोबर काही संस्थानिक, जहागीरदार व काही मुसलमान व्यक्ती सामील
झाल्या. निधी गोळा करून त्याचा विनियोग करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली.
या समितीचे काम बरेच फोफावले. २९ डिसेंबर १८९५ ला पुण्यात भरलेल्या
काँग्रेस अधिवेशन प्रसंगी मुरेंद्रनाथ बॅनर्जी व मदनमोहन मालवीय यांनीही
शिवाजी महाराजांचे गुणगान केले.
शिवाजी महाराजांचा पहिला जन्मोत्सव
रायगडावर १५ एप्रिल १८९६ पासून सुरू झाला. या प्रसंगी हजारो लोक गडावर आले
होते. लोकमान्य टिळक व शिवराम महादेव परांजपे पुण्याहून रायगडावर जाऊन
महोत्सवासाठी बरेच झटले. भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर महाराजांच्या
तसबिरीचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळयासाठी कुलाब्याच्या
जिल्हाधिकाऱ्याने परवानगी नाकारली होती, म्हणून टिळकांना गव्हर्नरकडून
परवानगी मिळवावी लागली. महाडच्या लोकांनी उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग
घेतला होता. तीन दिवस धुमधडाक्यात समारंभ होऊन शिवजयंतीचा पहिला राष्ट्रीय
उत्सव संपन्न झाला. या प्रसंगी शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या
तसबिरीपुढे मशालींची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मोठ्या उत्साहात
संपन्न झालेल्या या सोहळ्घाच्या प्रसंगी भजन, कीर्तन, नृत्य, पोवाडे व
मर्दानी खेळांचे प्रदर्शन घडवून हिंदू धर्मग्रंथांचे पठण करण्यात आले.
मिठाई व नारळ वाटण्यात आले.
अल्पावधीत शिवाजी उत्सव चळवळ ही एक
राष्ट्रबादी चळवळ बनली. राष्ट्रीय विचारसरणीच्या लोकांच्चा चळवळीस चांगला
पाठिंबा मिळू लागला. परंतु सरकार मात्र चळवळीकडे संशयी दृष्टीने पाहत होते.
त्यामुळे लॉर्ड हॅरिस सारख्या अप्रिय गव्हर्नरच्या स्मारकासाठी ४०,०००
रुपये देणाऱ्या मराठी संस्थानिकांनी शिवसमाधीसाठी अत्यल्प मदत केली, काही
संस्थानिकांनी अजिबात मदत केली नाही. एप्रिल १८९६ पर्यंत चळवळीसाठी एकूण
निधी केवळ १५,००० रुपये गोळा झाला होता. राजाश्रयाच्या अभावी अकरा
वर्षाच्या कालावधीत रायगडवर फक्त तीन वेळा उत्सव साजरा करण्यात आला. पहिला
उत्सव १८९६ मध्ये झाल्यानंतर दुसरा उत्सव १९०० मध्ये झाला. त्यात महाडच्या
सर्व
१५ रेव्हेन्यू डिपार्टमेंट (आर. डी.) व्हॉल्यूम क्र. २९०/१८८६, पृ. १७३.
१९ फडके, खंड १, पूर्वोक्त, पू. ९७.
११० आर. डी. व्हॉल्यूम क्र. २७३/१८८६, पू. १६१-७४.
२६१ मराठा, २२ डिसेंबर १८९५; इंडियन स्पेक्टेंटर, १७ मे १८९६.
आधुनिक काळ
१५५
थरातील
लोकांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला. सन १९०६ मध्ये झालेल्या तिसऱ्या
उत्सवाचे अध्यक्ष तत्कालीन विधिमंडळाचे सभासद दाजी आबाजी खरे हे होते.
उत्सव मंडळास सरकारकडे वित्त सहाय्यासाठी धाव घ्यावी लागली. दाजी खरे यांनी
अर्जाद्वारे सरकारला विनंती करून शासकीय सहाय्याची विनंती केली,
महाराजांच्या समाधीवर छत्री उभारण्यासाठी परवानगी मागितली. त्यांच्या
प्रयत्नांना थोडेफार यण येऊन गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनने रायगडला समक्ष भेट
दिल्यावर (१२ जून १९०६) सरकारी मदत दिली. शिवसमाधीसाठी खरे यांनी सादर
केलेल्या योजनांमध्ये समाधीची दुरुस्ती, जगदीश्वराच्या देवळाची दुरुस्ती,
सिंहासनाच्या जागेभोवती कुंपण, गंगासागर तलावाची दुरुस्ती, महाड किंवा नाते
गावापासून बाळसुरे टेकडीच्या माथ्यापर्यंत रस्ता बांधणे, आणि ही कामे
पूर्ण झाल्यावर देखभालीसाठी तरतूद यांचा समावेश होता. तथापि सरकारने सर्व
कामांकरिता पैसे न देता फक्त समाधीवर छत्री उभारणे व गंगासागर तलाब दुरुस्त
करण्यासाठी ५,००۰ रुपये मंजूर केले. इतर बांधकामासाठी सरकारने काहीच मदत
दिली नाही.
सन १९११ मध्ये रायगड किल्ला, जगदीश्वराचे मंदिर व शिवाजी
समाधी ही शासन संरक्षित स्मारके म्हणून हिंदुस्थान सरकारने जाहीर केली.
मुंबई सरकारने मंजूर केलेल्या उपरोक्त ५,००० रुपयांचाही शिवाजी स्मारक
समिती उपयोग करू न शकल्यामुळे हे काम सरकारने हाती घेण्याचे ठरविले. इ. स.
१९२१ पर्यंत थोडे काम झाले. पण समाधीवर छत्त्री बांधणे, देवळाची दुरुस्ती व
समाधीभोवती कुंपण ही कामे राहिली. पुढे न. चिं. केळकर आणि शिवाजी स्मारक
समिती व मुंबईचे सर कावसजी जहांगीर यांनी हा प्रश्न पुन्हा हातात घेतला.
शिवाजी समितीचे १२,००० रुपये, सरकारचे ५,००० रुपये व त्यात आणखी भर घातलेले
पैसे रत्नागिरीच्या कार्यकारी अभियंत्याच्या स्वाधीन करण्यात आले व मार्च
१९२५ मध्ये सुरू झालेले काम २६ मार्च १९२६ रोजी पूर्ण झाले. अशा प्रकारे
टिळकांनी १८९५ मध्ये सुरू केलेल्या कामाची सांगता तीस वर्षांनंतर झाली. या
कामी टिळकांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कुलाबा जिल्ह्यातील
बिरवाडीचे महादेव बल्लाळ नामजोशी (१८५३-१८९६) व महाडचे शिवराम महादेव
परांजपे (१८९४-१९२९) यांचा समावेश होता.
स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रारंभ
लोकमान्य
टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या राष्ट्रबादी विचारसरणीचे बरेच चाहते
रायगड जिल्ह्यात होते. उपरोक्त महादेव बल्लाळ नामजोशी आणि क्रांतिकारी
वृत्तीचे शिवराम महादेब परांजपे टिळकांचे निकटचे सहकारी होते. टिळकांच्या
प्रत्येक आंदोलनात परांजपेंनी सक्रीय भाग घेतला. अलिबाग, पेण, महाड व पनवेल
येथे टिळक-गोखलेंच्या सभा व बैठका होत असत. टिळकांच्या बंगभंग आणि स्वदेशी
चळवळीस या जिल्ह्यात लक्षणीय प्रतिसाद मिळाला. सहा वर्षांच्या कारावासातून
सुटून आल्यानंतर सुरू केलेल्या होमरूल आंदोलनास या जिल्ह्यात चांगला
प्रतिसाद मिळाला. या चळवळीसाठी टिळकांची १९१६ मध्ये पेणला मोठी सभा झाली
होती. होमरूल आंदोलनसमयी टिळकांनी केलेल्या राष्ट्रीय जागृतीचे इष्ट परिणाम
महात्मा गांधींचे असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ आणि छोडो भारत
क्रांतिलढयाच्या समयी कुलाबा जिल्ह्यात चढत्या क्रमाने दिसून आले.
१५२ आर. डी. व्हॉल्यूम १२२/१९७७, पू. २८७-२८९, पृ. २९७-३४४.
*** पी. डब्ल्यू. डी. फाईल क्र. ७०२३/१९२४-२६.
१५६
इतिहास
पेण
हे कोकणातील पुणे असल्याचे लोकमान्य टिळक म्हणत असत. गुप्तरीत्या
राष्ट्रवादी काम करणाऱ्यांचा पेणमध्ये एक गट होता. त्याची सूत्रे नारायण
गणेश मंडलिक हालवित. सन १८९६ पासून येथे टिळक प्रणित सार्वजनिक गणेश उत्सव व
शिवजयंती उत्सव साजरा करून त्याद्वारे राष्ट्रवादी प्रचार चालत असे. येथील
तरुणांपुढे तेव्हापासूनच लोकमान्य टिळकांचा आदर्श होता. सन १९१७ मध्ये
टिळक पेणला पुन्हा आले असता त्यांच्या गाडीचे घोडे सोडून टिळकांची गाडी
लोकांनी ओढली."
सावरकर बंधुंनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संघटनेच्या
पेण, पनवेल, महाड व पोलादपूर येथे शाखा होत्या. अभिनव भारतच्या पेण शाखेचे
सूत्रधार विठोबा मराठे व त्यांचे एक नातेवाईक त्रिबक गंगाधर मराठे
यांच्याकडे पोलिसांना ब्राऊनिंग पिस्तुले मिळाली होती. वि. दा. सावरकरांनी
१९०७ मध्ये चतुर्भूज अमीनमार्फत विलायतमधून पाठविलेल्या पिस्तुलांपैकी ही
होती. पाटणकर नामक सशस्त्र लढयाच्या पुरस्कर्त्याने ती पेणला आणली होती.
ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध करण्यासाठी ही पिस्तुले वाटली जात होती.
पाटणकरांच्या कबुली जबाबाच्या आधारे पोलिसांनी पेणला धाड घातली असता चार
पिस्तुले व एक तलवार हस्तगत केली.
जॅक्सन खून खटल्याचे प्रसंगी पेण
नगरावर गुप्तचरांचा खास रोख होता. डिसेंबर १९०९ मध्ये येथे धरपकडीचे सत्र
सुरू झाले आणि अदमासे ४० आंदोलकांना पकडण्यात आले. उपरोक्त चार
पिस्तुलांपैकी दोन लिंबक गंगाधर मराठे (मास्तर) यांच्याकडून पोलिसांनी
हस्तगत केलीत. जॅक्सन प्रकरणी पाटणकरांना १५ वर्षे सक्तमजुरी आणि त्रिंबक
गंगाधर मराठेंना १० वर्षे सक्तमजुरी झाली तर विनायक पांडुरंग कोल्हटकर
पोलिसांच्या मारहाणीत नाशिकमध्ये मरण पावले. गोपाळ पांडुरंग साने हा तर
जॅक्सन प्रकरणातील पेणच्या लोकांपैकी एक आधारभूत माणूस होता. सानेंच्या
निकटचे शंकर वासुदेव गोडबोले यांना शस्त्र अधिनियमाखाली साडेतीन वर्षे
शिक्षा झाली. बाळकृष्ण शंकर करंदीकर सूत्रधारांपैकी एक होते. परंतु ते
खटल्यात सुटले. गोबिंद सदाशिव बापट (मराठी शिक्षक) या कटात असल्याने
त्यांना १५ बर्षे सक्तमजुरी झाली. विवक विनायक जोग यांचेकडे पिस्तुले
सापडल्याने त्यांना साडेतीन वर्षे सक्तमजुरी भोगावी लागली. रामकृष्ण विष्णू
जोशी कटात पूर्णपणे सामील होते, तथापि ते परागंदा झाल्याने सुटले. अभिनव
भारताचे आणखी एक सभासद पुरुषोत्तम वामन गोखले हे तर प्रतिज्ञा पत्रकावर
रक्ताने सही करणाऱ्यांपैकी एक होते. शस्त्र व काडतुसे बाळगल्याबद्दल
त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाली. नारायण सदाशिव सावंत देखील रक्ताने
सही करणाऱ्यांपैकी एक होते. गोविंदराव लिमये व घांग्रेकर यांना या प्रकरणी
पकडले होते, तथापि त्यांची सुटका झाली. रामचंद्र नारायण मंडलिक यांच्यावर
१९०८ साली राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. आपल्या विहारी पत्रकात
मंडलिकांनी इटलीतील जागृतीसंबंधी जोसेफ मॅझिनीच्या मूळ कवितेचा मराठी
अनुवाद छापल्याबद्दल हा खटला भरण्यात आला होता. वस्तुतः कवितेतील एकही शब्द
भारताबाबतचा नव्हता. या तथाकथित राजद्रोहासाठी झालेली शिक्षा भोगून ते
१९१० मध्ये तुरुंगातून सुटले व सावरकरांच्या अभिनव भारतचे सभासद झाले. सन
१९१० मध्ये ते जपानला गेले. त्यांचा सुप्रसिद्ध क्रांतिकारक शामजीकृष्ण
वर्मा यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता.
११ प. रा. दाते, पेण तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम, पेण, १९७२, पृ. ७, ९, १९, २०. १६५ कित्ता, पृ. १२, १९, ८१, ८२, १३५, १३८-४१.
आधुनिक काळ
१५७
अभिनव
भारतच्या महाड शाखेतील सभासदही बऱ्याच उलाढाली करीत असत. त्यांच्यापैकी
गणेश कृष्ण दीक्षित ब्राऊनिंग पिस्तुलने महाडच्या मामलेदारास ठार
भारण्याच्या कटात होते (तथापि कटानुसार मामलेदारास मारण्यात आले नाही).
बंदुकीच्या दारूचा साठा बाळगल्याबद्दल तुलजाराम मिठा, लालजी पुरुषोत्तम व
नाथा नारायण या गुजरांना अटक करण्यात आली. तसेच बाळकृष्ण रावजी पालवणकर
यांच्यावर खटला भरण्यात आला होता. याच प्रकरणी पेणचे गणेश काळे, गोविंद
सदाशिव बापट, लिंबक विनायक जोग, पुरुषोत्तम वामन गोखले, शंकर बासुदेब
गोडबोले, पाली (सुधागड तालुका) येथील त्र्यंबक गंगाधर मराठे इत्यादींना
शिक्षा झाल्या.
तळे गावी जन्मलेले ज्येष्ठ कादंबरीकार वामन मल्हार जोशी
(१८८२-१९४३) हे तर शिवराम महादेव परांजपे यांच्याप्रमाणेच जहाल टिळकवादी
होते. टिळकांना १९०७ च्या काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे असा आग्रह
धरण्यासाठी १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसला गेलेल्या टिळकवाद्यांमध्ये
वामनराव जोशींचा समावेश होता. कलकत्ता काँग्रेसने मान्य केलेल्या चार
सूत्री कार्यक्रमांपैकी राष्ट्रीय शिक्षणासाठी त्यांनी बरेच कार्य केले.
विश्ववृत्त मासिकाचे संपादक असताना पंडित सातवळेकरांचा "वैदिक धर्माची
तेजस्विता" (१९०८) हा लेख छापल्याबद्दल जोशींना राजद्रोहाच्या आरोपाखाली
तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. टिळकांशी असलेल्या जवळिकीमुळे
त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला हे उघड आहे. वामनरावांची राजकीय
विचारसरणी जहाल टिळकवादी असली तरी त्यांची सामाजिक विचारसरणी मात्न आगरकर
संप्रदायाची होती.
वामन मल्हार जोशींचे बंधू नारायण मल्हार जोशी
(१८७९-१९५५) यांचा मवाळ राष्ट्रवाद्यांनी मुंबईस स्थापन केलेल्या सोशल
सव्हिस लीग या संघटनेच्या कार्यात मोठा वाटा होता. नारायणराव या संघटनेचे
अनेक वर्षे सरचिटणीस होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात मुंबईत जेव्हा
जेव्हा संप झाले तेव्हा तेव्हा त्या संपामध्ये कामगारांची कड घेऊन
नारायणराव त्याबाबतची वस्तुस्थिती पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध करीत.
त्यामुळे प्रत्यक्षात कोणत्याही कामगार संघटनेचे किंवा संपाचे नेतृत्व न
करताही नारायण मल्हार जोशी यांचा १९१८ च्या सुमारास कामगारांचे पुढारी
म्हणून देशभर लौकिक पसरला. सरकारच्या सहकार्याने मालक-मजूर तंटे सोडवण्यावर
जोशीबुवांचा भर असल्यामुळे कामगार पुढारी म्हणून त्यांच्या कार्याला सरकार
दरबारी लवकर मान्यता मिळाली. त्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर १९१९ मध्ये
वॉशिंग्टनला भरलेल्या पहिल्या इन्टरनॅशनल लेबर कॉन्फरन्समध्ये भारतीय
कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ब्रिटिशांनी जोशीबुवांची नेमणूक केली.
वस्तुतः वॉशिंग्टनच्या परिषदेसाठी टिळक व बी. पी. वाडीया यांना कामगारांचे
प्रतिनिधी म्हणून पाठविण्यास कामगार पुढारी व राष्ट्रवादी मंडळींनी मागणी
केली होती. परंतु टिळक किंवा वाडीया है जहाल मतबादी असल्याकारणाने
नारायणराव जोशींना सरकारने प्रतिनिधी म्हणून पाठविले. मात्न वॉशिंग्टन
परिषदेहून परतल्यावर जोशी आयुष्यभर कामगार चळवळीत कार्यरत राहिले.
सन
१९०७ मध्ये आत्माराम महादेव आटवणे यांच्या पुढाकाराने कुलाबा जिल्हा सभेचे
अधिवेशन पनवेल येथे भरल्यापासून राष्ट्रीय जागृतीस चालना मिळालेली दिसते.
पुढील वर्षी (१९०८) खुदिराम बोस यांना फाशी दिल्याबद्दल महाडच्या माध्यमिक
शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार घातला होता. हा बहिष्कार म्हणजे
आपल्याला एक
*** फडके, खंड १, पूर्वोक्त, पृ. २४१, ३२६, ३२७, ३२८.
१५८
इतिहास
आव्हान
आहे असे शासनाला वाटले होते. त्यामुळे महाड नगरपालिकेच्या अध्यक्ष पदावर
असलेल्या जिल्हाधिकाऱ्याने शंकर विष्णू जोशी, चिंतामण रामचंद्र जोशी, केरो
कृष्ण जोशी, रामबंद्र चितामण जोशी व नारायण सदाशिव मराठे या
विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले आणि कृष्णाजी रामचंद्र डिंगणकर हा
मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला ताकीद देण्यात आली होती. तसेच सरकारविरुद्ध
विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या चार शिक्षकांना सक्त ताकीद दिली होती.
लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली तेव्हा देखील
महाडचे विद्यार्थी संपावर गेले होते. दोन्ही वेळच्या विद्यार्थी संपामुळे
शासन त्यांच्यावर रागावले होते.
जिल्हा काँग्रेस समित्यांची व्यवस्थित
घडण होण्यापूर्वी १९०७ पासून "कुलाबा जिल्हा सभा" राष्ट्रीय जागृतीत
कार्यरत होती. सभेची अधिवेशने १९०७ ते १९२० पर्यंत पनवेल, महाड, अलिबाग,
वेश्वी, कर्जत, खोपोली, पेण, गोरेगाव, चौल, उरण वगैरे ठिकाणी झाली. माधवराव
गोसावी (वकील), रामभाऊ मंडलिक, विष्णू गोबीलकर, विठ्ठल ताम्हणकर व धारप या
चळवळीत पुढाकार घेत. जिल्हा सभेला १९२१ पासून रीतसर काँग्रेस समितीचे
स्वरूप प्राप्त झाले.
असहकार आंदोलन
महात्मा गांधींनी १ ऑगस्ट १९२०
रोजी मुंबईत असहकार आंदोलनाचा प्रारंभकरताच त्याचे शेजारच्या कुलाबा
जिल्ह्यात पडसाद उमटणे स्वाभाविक होते. असहकार आंदोलनाचा एक भाग म्हणून
वकिलांनी सरकारी न्यायालयांवर बहिष्कार घालण्याचे ठरले होते. परंतु अत्यल्प
वकिलांनी वहिष्कार घातला. वकिलीचा व्यवसाय सोडून देणाऱ्या अल्पसंख्य
वकिलांमध्ये अलिबागचे माधवराव गोसावी व वामन गोविंद लिमये यांचा समावेश
होता. गोसावींनी असहकार चळवळीचा जोरदार प्रसारही केला व कारावास भोगला.
लिमयेंनी नुकतीच सुरू केलेली वकिली तर सोडलीच शिवाय सरकारी शिक्षण
संस्थांवर बहिष्कार घालण्याची मोहीम चालवून राष्ट्रीय शिक्षण शाळा काढली.
पुढील सविनय कायदेभंग आंदोलनातही भाग घेऊन त्यांनी कारावास सोसला. अलिबागचे
गांधीवादी गणेश भास्कर पंडित हे १९२० पासून काँग्रेसचे सैनिक बनले व
त्यांनी दोन वेळा कारावास पत्करला. १९९
शासकीय शाळा किया अनुदानप्राप्त
शाळांवर बहिष्कार घालून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा व
महाविद्यालयांमध्ये दाखल होण्याचे गांधीजींनी विद्यार्थ्यांना आवाहन केले
होते. असहकार आंदोलनामुळे ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले आणि नंतर
राष्ट्रीय शाळांमध्ये अध्यापनाचे काम केले अशा तरुणांमध्ये महाडचे सखाराम
जनार्दन भागवत (१९०३-१९७३) जिल्ह्यातील प्रमुख होते. हाच तरुण पुढे आचार्य
स. ज. भागवत म्हणून लौकिकास पात्र होऊन महाराष्ट्रातील महान विद्वानांमध्ये
चमकून गेला. गांधीवादाचे वैचारिक निरुपण करणारांमध्ये आचार्य शंकरराव द.
जावडेकरांच्या बरोबरीने आचार्य स. ज. भागवतांचे नाव घेतले जाते. त्यांनी
समाजवादाचा पुरस्कार करून गांधीवाद व समाजवादाची सांगड घातली.
* महाड नगरपालिका शतसांवत्सरिक महोत्सब स्मृतिभ्रंभ, १८६६-१९६६, २० नोव्हेंबर १९६६.
१९८ जनार्दन विप्णू लेलेंची दा. न. गिखरेंनी घेतलेल्या मुलाखतीचे हस्तलिखित, मार्च १९५५०
*** अलिबाग नगरपालिका शतसांवत्सरिक महोत्सव स्मृतिग्रंथ: १८६४-१९६४.
आधुनिक काळ
१५९
असहकार
आंदोलनाचा कुलाब्यात प्रसार करणाऱ्यांमध्ये शिवराम महादेव परांजपे यांनी
महत्त्वाची भूमिका बजावली. पनवेलच्या सदाशिव हरी तथा काकासाहेब गोखलेंनी
स्वदेशी वस्तू व खादी प्रसारात भाग घेतला आणि खादी विणाईसाठी हातमाग चालू
केला. ते काँग्रेसचे सक्रीय सभासद होते."
मुळशी सत्याग्रह
डिसेंबर
१९२० मध्ये भरलेल्या नागपूर काँग्रेसमध्ये न. चिं. केळकरांनी मांडलेल्या
ठरावात मुळशी सत्याग्रहाचे सूतोवाच केले होते. जलविद्युत निर्माण
केंद्रासाठी निळा व मुळा नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी बांधणार असलेल्या
धरणाखाली बऱ्याच शेत जमिनी बुडणार होत्या. शिवाय विस्थापितांच्या
पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात न आल्याने मावळ-खोऱ्यातील शेतकऱ्यांचे
अपरिमित नुकसान होणार होते. शेतकन्यांच्या हिताबाबत काहीही न करता
पुण्याच्या जिल्हाधिकान्याने १ फेब्रुवारी १९२१ रोजी धरणाच्या जागेवर
भरवलेल्या मावळघांच्या सभेत सांगितले की, मुंबईतील लाखो लोकांचे जीवन
सुखावह होण्यासाठी मुळशी पेटघातील ६,००० लोकांनी त्याग करावा. जमीनधारकांचे
पुनर्वसन करण्यात येईल किवा नुकसानभरपाई दिली जाईल, परंतु सर्वांना जमीन
देणे शक्य होणार नाही असेही बजावले. धरणाच्या कामात व्यत्यय आणणाऱ्यांवर
कारवाई केली जाईल असाही दम दिला. बहुतेक जमिनी मराठे, कुणबी व महारांच्या
मालकीच्या होत्या. सर्वांच्या भावना दुखावल्या होत्या. त्याचा प्रत्यय
जिल्हाधिकाऱ्याच्या सभेत आवळस गावच्या एका वतनदार महार शेतकऱ्याच्या
भाषणातून आला. "पुष्कळ राजे झाले पण आमची जमीन गेली नाही. सरकारने आमची
कायमची वतने बुडवून आमच्या पोटावर लाथ मारू नये, आणि इनामाची किंमत मिळाली
तरी ती किती दिवस पुरणार ?" आवळसमध्ये ब्राह्मण वस्ती बरीच होती. गावातले
एक शाळामास्तर गोखले आणि दत्तू साठे व शंकर रानडे यांनी मावळ पेटा पालथा
घातला व मावळ्यांनी एकजुटीने सत्याग्रह करावा असा प्रसार केला. आवळस
गावातून प्रथम सत्याग्रहास चालना देण्यात आली.
सत्याग्रहाची पहिली फेरी
१६ एप्रिल १९२१ रोजी आणि दुसरी फेरी १ मे १९२२ रोजी सुरू झाली. यात
सत्याग्रह समितीचे तत्कालीन अध्यक्ष शिवराम महादेव परांजपे यांना कारावासात
जावे लागले. या सत्याग्रहात सेनापती बापट यांनी मोठी कामगिरी केली. दिनांक
२ सप्टेंबर १९२२ पासून तिसरी आणि १ एप्रिल १९२३ पासून चौथी फेरी झाली. तीन
वर्षे सत्याग्रहाची मोहीम नेटाने चालवूनही शासनाने धरणाचे काम थांबविले
नाही. ज्या आवळस गावातून सत्याग्रहास प्रथम चालना देण्यात आली त्या गावासह
१५ गावांची भूमी तलावात बुडाली. टाटा कंपनी व तत्कालीन शासनाने शेतकऱ्यांना
दिलेल्या वयाच आश्वासनांची परिपूर्ती केली नाही. इतके मात्र खरे की, मुळशी
सत्याग्रह म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनात गरीब शेतकऱ्यांच्या सहभागाचा एक
नमुना होता. त्यातून सत्याग्रहींची नवीन पिढी निर्माण झाली.
*** पनवेल नगरपालिका शतसांवत्सरिक ग्रंथ, ऑगस्ट १९५७, पू. २२४.
१७ केसरी, ८ फेब्रुवारी १९२१.
१७१ फडके, खंड २, १९८९, पूर्वोक्त, पृ. १३; खंड ३, पृ. ८७.
१६०
इतिहास
स्थानिक
इतिहासाच्या दृष्टीने टिळकांची १९१८ मधील पनवेलची सभा जशी उल्लेखनीय होती,
तशाच महात्मा गांधींच्या पनवेल व महाडच्या सभा (४ मार्च १९२७) राष्ट्रीय
जागृतीच्या संदर्भात महत्त्वाच्या होत्या. कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांतील
गांधीजींचा हा दौरा यशस्वी होऊन तेथे त्यांना खूपच अनुकूल प्रतिसाद
मिळाला.
भोर संस्थानातील प्रजा आंदोलनाचा प्रारंभ
महाराष्ट्रातील
संस्थानी प्रजेच्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा प्रथम पायंडा पाडला भोर
संस्थानातील लोकांच्या नेत्यांनी. या संस्थानातील लोक अतिशय दरिद्री असून
देखील खालसा प्रदेशातील प्रजेपेक्षा त्यांना जबरदस्त कर द्यावे लागत असत.
भोरचे संस्थानिक पंतसचिव प्रत्येक बाबीवर कर लादत असत. म्हणून प्रजेच्या
हक्कांसाठी सुधागड तालुक्यातील दादासाहेब साने, बापूसाहेब लिमये, आबासाहेब
आठवले या सुशिक्षित व सुस्थितीतील मंडळींनी १९२० मध्ये मुंबईत सुधागड
तालुका सभा नामक संस्था स्थापन केली. त्यानंतर संस्थानातील शिरवळ या
तालुक्याच्या गावातील भाऊसाहेब शेटे, शंकर रघुनाथ बाळिवे, दत्तोपंत शंकर
वाळिंबे वगैरेंनी ३० डिसेंबर १९२० रोजी गावसभा स्थापन करून शिरवळच्या
पाणीपुरवठ्याचा प्रश्न हाती घेतला. तरीसुद्धा भोरच्या दरबारने पर्वा केली
नाही. त्यामुळे संस्थानातील कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
भाऊसाहेब
शेटे व दत्तोपंत वाळिंबे यांनी ६ फेब्रुवारी १९२१ रोजी पुण्यात विचित्रगड
तालुका सभा स्थापन करून शिरवळजवळ खालसा भागात या सभेचे अधिवेशन भरविले.
तरीसुद्धा प्रजेच्या मागण्यांकडे पंतसचिवांनी अजिबात लक्ष दिले नाही. इतकेच
नव्हे तर १ मे १९२१ पासून संस्थानात सभाबंदीचा कायदा अमलात आणला. त्याचा
प्रतिकार करण्यासाठी २४ मे १९२१ रोजी पुण्यात दक्षिणी संस्थान हितवर्धक सभा
स्थापन झाली आणि तिच्या वतीने बऱ्याच मंडळींनी भोर संस्थानातील सभाबंदीचा
अधिनियम मोडून भाषणे केली. या मंडळींवर खटले भरण्यात आले. तरीसुद्धा न
डगमगता वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन १३ नोव्हेंबर १९२१ रोजी पुण्यात
अखिल भोर संस्थान प्रजासभा स्थापन केली आणि २५ व २६ जानेवारी १९२२ रोजी भोर
येथे या प्रजासभेचे पहिले अधिवेशन भरविले. भोर संस्थानात प्रजा आंदोलनाचा
प्रसार करण्यात शेटे, बाळिवे, भाऊराव जगताप यांच्याप्रमाणेच दामुअण्णा
पोतनीस, गोपीनाथ पोतनीस आणि जानराव देशमुखांचा मोठा वाटा होता. भोरमधील
डोंगराळ मुलखात हिरडयाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न येत असे. भोर राजवटीने
हिरडा खरेदीची मक्तेदारी अनेक वर्षे मुंबईच्या पुरषोत्तमदास मथुरादास या
कंपनीला दिलेली होती. पहिल्या महायुद्धानंतर हिरड्याची मागणी फार
वाढल्यामुळे किमतीतही मोठी वाढ झाली होती. तथापि मक्तेदारी असलेली
पुरुषोत्तमदास मथुरादास कंपनी वाढीव किमतीचा फायदा मावळयांना मिळू देत
नव्हती. त्यामुळे प्रजासभेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार मावळयांनी
१९२२ मध्ये हिरडा गोळा करण्यास नकार दिला. हजारो मावळधांनी ४ फेब्रुवारी
१९२५ रोजी सत्याग्रह करून हिरडयाची ओझी पुण्याला वाहून नेली. या प्रकरणी
पंतसचिवांनी एक समिती नेमली, परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. उलट
उपरोक्त मक्तेदारी कंपनीने पठाण नोकर
१५१ पनवेल आणि महाडच्या
नगरपालिकांचे शतसांवत्सरिक ग्रंथ, पूर्वोक्त. टिळकांच्या पनवेलमधील सभेच्या
प्रसंगी तेथील युसुफ नूरमहंमद मास्तर यांनी पुढाकार घेतला होता.
आधुनिक काळ
१६१
लावून
मावळघांना धाकदपटशा दाखवून हिरडा गोळा करण्याचे काम चालू ठेवले. १७४ भोर
संस्थानातील पालीचे नागरिक केदारनाथ अप्पाजी कुलकर्णी प्रारंभीच्या काळातच
महात्मा गांधींचे अनुयायी झाले होते. या कुलकर्णीनी १९४२-१९४४ च्या छोडो
भारत आंदोलनात कोतवाल पथकातील भूमिगत क्रांतिकारकांना बरेच मार्गदर्शन
केले.
महाडचा सत्याग्रह
महाडच्या सत्याग्रहापूर्वी अनार्य दोष
परिहारक मंडळी नामक संस्था कार्यरत झालेली होती. मुंबई इलाख्यातील अस्पृश्य
समाजात सार्वजनिक काम करण्यासाठी ज्या संस्था स्थापन झाल्या त्यात ही
पहिली संस्था होती. सन १८९३ मध्ये जेव्हा अस्पृश्य लोकांना लष्करात भरती
होण्याची इंग्रजांनी बंदी केली तेव्हा या संस्थेने महादेव गोविंद रानडे
यांच्या सहाय्याने सरकारकडे अर्ज केला होता. १८९७ मध्ये याच संस्थेने
काँग्रेसकडे एक प्रश्नमालिका पाठविली होती. या संस्थेची सरकारने देखील दखल
घेतली होती. डॉ. भीमराव आंबेडकरांच्या मते अस्पृश्यांच्या उन्नतीची चळवळ
प्रथम सुरू करण्याचा मान या संस्थेस आणि या प्रांतास देणे क्रमप्राप्त आहे.
सत्यशोधक समाजाचे जनक महात्मा जोतिबा फुले यांचे बरेच साथीदार व अनुयायी
या संस्थेत होते. या संदर्भात आंबेडकरांनी कुलाबा जिल्ह्यातील गोपाळबुवा
बलंगकर यांचा महाडच्या भाषणात आवर्जून उल्लेख करून वलंगकरांनी लेखनाद्वारे
केलेली जागृती अनुपम असल्याचा निर्वाळा दिला.
महाड जवळच्या राबढळ गावचे
गोपाळबुवा बलंगकर १८८६ मध्ये लष्करातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी २३
ऑक्टोबर १८८८ रोजी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रसिद्ध करून
अस्पृश्यांना मनुष्यपणाचे हक्क मिळण्याची मागणी केली होती. उपरोक्त अनार्य
दोष परिहारक मंडळीची स्थापना वलंगकरांनी १८९० मध्ये केली होती. महात्मा
फुलेंचा त्यांना सहवास लाभला होता. महारांची सेनादलात भरती थांबविण्याच्या
सरकारच्या कृतीविरुद्ध वलंगकरांनीच न्या. रानडेंच्या मदतीने अर्ज केला
होता. १८९५ मध्ये पुण्यात काँग्रेस भरली तेव्हा काँग्रेसने अस्पृश्यतेच्या
प्रश्नांची दखल घ्यावी अशी वलंगकरांनी विनंती केली होती.
बाबासाहेबांच्या
दलित मुक्ती चळवळीच्या इतिहासात महाडच्या चवदार तळयाच्या सत्याग्रहाला फार
मोठे महत्त्व आहे. या घटनेचा उल्लेख 'महाडचा धर्मसंगर' असा केलेला आहे. या
घटनेत मुख्यत्वे तीन गोष्टींचा समावेश आहे- चवदार तळ्याचा सत्याग्रह,
मनुस्मृति चे दहन आणि कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन. यातून दलित
मुक्ती चळवळीचा निश्चित मार्ग लोकांच्या समोर ठेवण्यात आला व सामाजिक
समतेचे आंदोलन सुरू करण्यात आले.
अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे व
विहिरी खुल्या करण्यासंबंधीचा सी. के. बोले यांचा विधिमंडळातील १९२३ चा
ठराव सरकारनेही मान्य केलेला असला तरी प्रत्यक्षात अमलात आलेला नव्हता.
त्यानुसार ५ जानेवारी १९२४ रोजी महाड नगरपालिकेने
१० फडके, खंड ३, १९९१, पूर्वोक्त, पृ. २०६-०८.
* चांगदेव भवानराव खैरमोडे, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे चरित्र, खंड ३, १९९०, पृ. २०-२१.
* था पुस्तिकेची छपाई शिळा प्रेसवर केलेली होती.
फडके, पूर्वोक्त, खंड २, १९८९, पृ. २९९-३००.
बाय ३५-११
१६२
इतिहास
तेथील
चवदार तळे सर्वांना खुले असल्याचे जाहीर केले होते. तरीही महाडच्या
अस्पृश्यांनी तळयावर जाऊन आपला हक्क बजावला नव्हता. त्यामुळे बहिष्कृत
हितकारिणी सभेच्या वतीने कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या १९ व २० मार्च
१९२७ रोजी भरलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने समतेच्या लढयाचा बाबासाहेब
आंबेडकरांनी प्रारंभ केला.
चवदार तळे पुष्कळ जुने असले तरी ते कोणी व
केव्हा बांधले हे ज्ञात नाही. तथापि महाडला १८६६ मध्ये नगरपालिका स्थापन
झाल्यावर, १८६९ मध्ये शासनाने हे तळे नगरपालिकेकडे हस्तांतरित केले आणि
तेव्हापासून तळे सार्वजनिक असल्याचे मानले जाऊ लागले. कुलाबा
जिल्हाधिकाऱ्याने पाठविलेल्या शासकीय आदेशानुसार महाड नगरपालिकेने ५
जानेवारी १९२४ चा उपरोक्त ठराव जाहीर केला होता. डॉ. आंबेडकरांच्या
अध्यक्षतेखाली १९ व २० मार्च १९२७ रोजी भरलेल्या कुलाबा जिल्हा वहिष्कृत
परिषदेच्या अधिवेशनात ३२ (काहींच्या मते ३३) ठराव मंजूर करण्यात आले.
अस्पृश्यांची कुलाबा जिल्ह्यातील ही पहिलीच परिपद असून त्यात २५०० हून अधिक
लोक हजर होते. दलितांच्या हक्कांसाठी आपणच पुढाकार घेऊन सभा संपल्यावर
चवदार तळयावर जाऊन नगरपालिकेच्या घोषणेनुसार तळयाचे पाणी वापरण्याचा अधिकार
उपयोगात आणावा असे विषय नियामक समितीत ठरले. सभेत काही सवर्ण
पुढाऱ्यांचीही भाषणे झाली. सत्यशोधक समाजाच्या मताचा प्रसार होणे इष्ट
असल्याचे सभेत सांगण्यात आले. परिषदेच्या समारोप प्रसंगी विषय नियामक
समितीच्या ठरावानुसार सुचविण्यात आले की, चवदार तळघावर पाणी भरण्याचा
प्रघात सुरू करावा आणि सभेतील सर्वांनी अध्यक्षांसह तळयात प्रवेश करावा.
त्यानुसार परिषदेतील सर्व लोक अध्यक्षांच्या मागोमाग सभा-मंडपातून बाहेर
पडून एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महाडच्या पेठेतून शांतपणे
तळधावर गेली व तेथे पाणी घेतल्यानंतर सभामंडपाजवळ परत आली, नंतर परिषदेचे
काम संपविण्यात आले.
सत्याग्रह शांततापूर्ण पार पडल्यावर महाडमधील काही
लोकांनी खोटी दवंडी पिटून अस्पृश्य लोक बीरेश्वराच्या देवळात घुसणार अशी
वार्ता पसरवली. वस्तुतः काही लोक भोजन करीत होते तर काही भोजन आटोपून
आपापल्या गावी जाण्यास निघाले होते. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी
दलितांवर मोठा हल्ला केला. डाक बंगल्यात मुक्कामाला असलेले आंबेडकर
मामलेदाराच्या सांगण्यावरून आपल्या अनुयायांची भेट घेण्यासाठी भोजन मंडपात
आले, तेव्हा त्यांना नासधूस व जखमी झालेले सत्याग्रही दिसले.
बाबासाहेबांनाही २० मार्चची राव पोलीस संरक्षणात घालवावी लागली. दंगलीच्या
दिवशी निवासी दंडाधिकारी गावात असूनही त्याने दलितांना मारहाण
करण्याविरुद्ध कारवाई केली नाही. म्हणून पोलीस अधीक्षकाची भेट घेऊन आंबेडकर
व अनंतराव चिवेंनी दंगलखोरांविरुद्ध तक्रारी नोंदविण्याची व्यवस्था केली
आणि ते मुंबईस परतले.
अस्पृश्यांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती
घडवून आणण्यासाठी सरकारने कोणकोणते उपाय योजावेत याबाबत परिषदेत ठराव
करण्यात आले. ज्या तळळ्यावर
१७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज अॅन्ड स्पीचेस, खंड ५, १९८९, पृ. २४८-४९.
१५९ खैरमोडे, खंड ३, पूर्वोक्त, पृ. २७; प्रा. राम बिवलकर, प्रा. झुंबरलाल कांबळे, महाडचा मुक्तीसंग्राम, १९७७, पृ. २४.
१० फडके, खंड ३, पूर्वोक्त, १९९१, पृ. २५७; खैरमोडे, खंड ३, पूर्वोक्त, पू. २८-३१.
आधुनिक काळ
१६३
मुसलमानांना
पाणी भरण्याची मुभा होती तेथे दलितांना मज्जाव असणे अन्यायकारक होते.
म्हणून दलितांनाही पाणी भरण्याची मुभा असावी ही नैसर्गिक हक्काची मागणी
होती. परिषदेच्या यशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त संभाजी तुकाराम
गायकवाड (स्वागताध्यक्ष), पांडुरंग नथुराम राजभोज, रामचंद्र बाबाजी मोरे,
शिवराम गोपाळ जाधव, धोंडीराम नारायण गायकवाड, निवृत्ती तुळशीराम जाधव,
सीताराम नामदेव शिवतरकर, वाळाराम आंबेडकर, कोंडीराम श्रीराम खोलवडीकर,
सुभेदार सवादकर, शांताराम अनाजी उपशाम, आड़ेकर, भानुदास कांबळे, रामचंद्र
शिदे, तसेच काही सवर्ण पुढारी विशेषतः अनंत विनायक चित्रे, गं. नी.
सहस्त्रबुद्धे, शांताराम रघुनाथ पोतनीस, पुरुषोत्तम जोशी, तुळजाराम मेथा,
धारीया, सुरेंद्रनाथ टिपणीस, इत्यादींचा मोठा वाटा होता, मुंबईच्या सोशल
सव्हिस लिगच्या सभासदांनी बरीच कामगिरी केली. शिवाय परिषद यशस्वी करण्याचे
कामी महाडमधील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीतील तरुणांनी खूप मेहनत घेतली.
ब्राह्मण, ब्राह्मणेतर, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, गुजर व मुसलमान या
सर्वांनी अस्पृश्यांना या प्रसंगी मदत केली." तथापि सनातनी लोकांनी
सत्याग्रहानंतर विरोध केला. २१ मार्च १९२७ रोजी कर्मठ हिंदू लोकांनी एक
हजार कलश पाणी उपसून टाकून आणि तळयात पंचगव्य मिसळून वैदिक मंत्रांच्या
घोषात तळे शुद्ध करण्याचा कार्यक्रम पार पाडला. महाडच्या घटनेबाबत काही
वृत्तपत्त्रांनी विपर्यस्त प्रचार केला. याला उत्तर देण्यासाठी आंबेडकरांनी
बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक ३ एप्रिल १९२७ रोजी सुरू केले.
महाड
नगरपालिकेने चवदार तळे खुले करण्याचा आपला मूळ ठराव सत्याग्रहानंतर मागे
घेतला (४ ऑगस्ट १९२७), त्यामागे कर्मठ हिंदू लोकांचा दबाव हे कारण असावे.
नव्या प्रतिगामी ठरावास पाठिंबा असल्याचे दाखविण्यासाठी मतदारांची एक सभा
भरविण्यात आली. चवदार तळे सार्वजनिक नसून ते खाजगी मालकीचे असल्याचे आणि
अस्पृश्यांना ते वापरण्यास मनाई करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे आपला
समतेचा लढा पुढे चालविण्यासाठी अस्पृश्यांची दुसरी परिषद महाडला
भरविण्याची व सविनय कायदेभंग करण्याची आंबेडकरांनी घोषणा केली. कर्मठ
लोकांना हे कळताच त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करून मागणी केली की,
अस्पृश्यांना तळ्यावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा. त्यावर
दंडाधिकाऱ्याने अस्पृश्यांना प्रतिबंध करण्यासाठी शासन मनाई हुकूम काढणार
नाही असे स्पष्ट केले; परंतु सवर्णांना वाटल्यास त्यांनी दिवाणी दावा दाखल
करावा असे ७ डिसेंबर १९२७ रोजी महाडच्या पुढाऱ्यांना सांगितले. त्यानंतर
महाडच्या नऊ जणांनी उपन्यायाधीशापुढे दावा दाखल करून चवदार तळे खाजगी
मालकीचे असल्यामुळे अस्पृश्यांना तळयावर जाण्यास प्रतिबंध घालण्यासाठी
विनंती अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन आंबेडकर व
त्यांच्या सहकाऱ्यांना तळघावर जाण्यास प्रतिबंध केला (१४ डिसेंबर १९२७).
न्यायालयाचा मनाई हुकूम परिषदेच्या नियोजित तारखांच्या केवळ दोन-तीन दिवस
आधी आंबेडकरांना मुंबईत देण्यात आला. त्यामुळे विचारविनिमय करणे व परिषद
पुढे ढकलणे यास अवधी नसल्याकारणाने या विषयावर परिषदेमध्येच निर्णय घ्यावा
असे ठरविण्यात आले.
२८१ खैरमोडे, खंड ३, पूर्वोक्त, पृ. १६, १७, २९, ३०, ३२, ३४, ३५, ३७, ३८.
१८२ फडके, खंड ३, पूर्वोक्त, पृ. २५७.
१२ बहिष्कृत भारत, २३ डिसेंबर १९२७.
१८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खंड ५, पूर्वोक्त, पृ. २५१.
१६४
इतिहास
सत्याग्रहासाठी
आंबेडकरांनी जोरदार तयारी केली होती. सत्याग्रह समिती मुंबई व इतरत चांगला
प्रचार करीत होती. ब्राह्मणेतर पक्षाचे पाठिंबा दर्शक पत्त्रक १९ डिसेंबर
१९२७ रोजीच्या विजयी मराठा मध्ये प्रसिद्ध झाले. पुण्याचे वाबुराव गोखले व
केसरीचे दुय्यम संपादक ज. स. करंदीकर देखील ३० नोव्हेंबर १९२७ रोजी महाडला
नागरिकांची सभा भरवून लोकांना हिंदू सभेचा संदेश देऊन आले होते की,
अस्पृश्यांच्या सत्याग्रहाला विरोध करू नका. महाडच्या अस्पृश्यांवर जो
प्रसंग गुदरला होता काहीसा तसा प्रसंग चौलच्या रामेश्वर देवळात कोळी,
भंडारी, आगरी, मराठे यांना देवळाच्या गाभा-यात जाण्याच्या मनाईमुळे निर्माण
झालेला होता.
ठरल्याप्रमाणे महाडची दुसरी परिषद सत्याग्रहासाठी २५
डिसेंबर १९२७ रोजी १०,००० लोकांच्या हजेरीने भरली. मंडपात फक्त महात्मा
गांधींची एक तसबीर ठेवलेली होती. मनुस्मृति दहनविधीसाठी शृंगारलेली बेदी
तयार केलेली होती. ही परिषद केवळ चवदार तळघातील पाण्यासाठी भरलेली नसून
सामाजिक समता प्रस्थापित करणे व मानवी हक्क मिळविण्यासाठी भरली होती.
पहिल्या दिवशी जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला तसेच इतर
काही ठराव पास करण्यात आले. त्यानंतर अस्पृश्य वर्गाच्या साधुसंतांच्या
हातून मनुस्मृति ग्रंथाचा दहनविधी झाला." परिषदेतील बहुसंख्य लोक
सत्याग्रहास अनुकूल होते. दुसऱ्या दिवशीच्या सभेत डॉ. आंबेडकरांनी
सत्याग्रह करावा असा ठराव मांडला. सत्यशोधक समाज व ब्राह्मणेतर पक्षातर्फे
केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर आले होते. त्यांचीही अनुकूल भाषणे झालीत.
दरम्यान ३,८८४ लोकांनी सत्याग्रह करून कारावास पत्करण्यासाठी नावे
नोंदविली. त्यानंतर आंबेडकरांनी महाडमध्ये मुक्काम ठोकलेल्या
जिल्हाधिकाऱ्याला पत्त्राने कळविले की, मंडळींचा सत्याग्रह करण्याचा निश्चय
आहे; आपली इच्छा असल्यास आपण सभेस यावे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी, पोलीस
अधीक्षक व इतर अधिकारी आले. जिल्हाधिकाऱ्याने सभेत सांगितले की, सरकारची
दलितांच्या मागणीस सहानुभूती आहे, परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने
आणि नऊ सवर्ण नागरिकांनी हा तलाव खाजगी असल्याचा दावा केल्याने, तसेच
दिवाणी न्यायालयाने तात्पुरता मनाई हुकूम (Injunction) दिलेला
असल्याकारणाने, अस्पृश्य लोकांनी येथे सत्याग्रह करू नये. प्राप्त
परिस्थितीत अस्पृश्यांना तलावावर जाण्यास प्रतिबंध करणे आपणास भाग पडत आहे.
जिल्हाधिकाऱ्याने असेही स्पष्ट केले की, आपण दलितांविरुद्ध नाही, परंतु
सरकारच्या न्यायालयाची इभ्रत राखणे आपले कर्तव्य असल्यामुळे कोणी कायदा
मोडल्यास त्यास शिक्षा करणे भाग पडेल.
सत्याग्रहाबाबत निवडक मंडळींची
पुन्हा चर्चा झाली आणि परिषदेच्या तिसऱ्या दिवशी आंबेडकरांनी पुढील ठराव
सभेपुढे मांडलाः "जे स्पृश्य हिंदू लोक चवदार तळयाचे पाणी अस्पृश्य लोकांस
घेऊ देत नाहीत त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करण्याकरिता ही सभा बोलविण्यात
आली असता, त्याच स्पृश्य हिंदूंनी सरकारची पाठ रिघून आयत्या वेळी दिवाणी
कोर्टाचा
* अधिक माहितीसाठी खैरमोडे, पूर्वोक्त, पृ. १३८-४० पाहा.
* खैरमोडे, खंड ३, पूर्वोक्त, पू. १४०.
** कित्ता. ही मनाई देवळाच्या विश्वस्तांनी केलेली होती. त्यामुळे बहुजनसमाजाला
विश्वस्तांविरुद्ध चळवळ करावी लागली होती.
१८८ कित्ता, पृ. १६५-६८.
१०१ कित्ता, पु. १६८-७३.
आधुनिक काळ
१६५
तात्पुरता
मनाई हुकूम अस्पृश्य वर्गाच्या विरुद्ध मिळविल्यामुळे या सभेस
सरकारविरुद्ध सत्याग्रह करण्याचा प्रसंग आणला, ही गोष्ट ध्यानात घेऊन आणि
मे. कलेक्टरसाहेबांनी आपल्या भाषणात याबाबतीत सरकारचा दुराग्रह नसून, समान
हक्कांकरिता अस्पृश्यांनी चालविलेल्या झगडद्याला सरकारची पूर्ण सहानुभूती
आहे, असे भर सभेत दिलेले आश्वासन याचा विचार करून ही परिषद दिवाणी दाव्याचा
निकाल होईपर्यंत सत्याग्रह तहकूब करीत आहे." १० नंतर तलाबापर्यंत मिरवणूक
काढण्यात आली. ही परिषद यशस्वी करण्यासाठी ज्या स्पृश्य लोकांनी चांगली मदत
केली त्यांचेपैकी पुढील व्यक्तींचे आभार मानण्यात आले :- अनंत विनायक
चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, फत्तेखान मुठोलीकर, शांताराम रघुनाथ पोतनीस,
केशव देशपांडे, गं. नी. सहस्त्रबुद्धे, वामन पत्की व कमलाकर टिपणीस. महाड
परिषदेसाठी बऱ्याच महिलाही आल्या होत्या. महाराष्ट्रातील प्रत्येक
जिल्ह्यातून महाडच्या सत्याग्रहासाठी लोक आले होते. परिषदेच्या
कार्यक्रमाने महाडमध्ये बरीच लोकसंख्या असलेला चांभार समाजही जागा झाला.
परंतु त्यांनी सत्याग्रहात भाग घेतलेला दिसत नाही.
चवदार तळचाचा खटला
बरेच दिवस रेंगाळला. या दाव्यात आंबेडकर व चार महार नेत्यांना प्रतिवादी
करण्यात आले होते. शेवटी १७ मार्च १९३७ रोजी खटल्याचा निकाल मुंबई उच्च
न्यायालयाने जाहीर केला. सदर निकालात म्हटले होते की, तळचाच्या मालकीबाबत
आता वादींचे काही म्हणणे उरलेले नाही. परंतु लॅन्ड रेव्हेन्यू कोडच्या कलम
३७प्रमाणे हे तळे सरकारच्या मालकीचे होते व डिस्ट्रिक्ट म्युनिसिपल
अॅक्टप्रमाणे तळ्याची मालकी महाड नगरपालिकेकडे आहे. तळयाचा उपयोग मुसलमान
देखील करीत असल्याने फक्त सवर्णांनीच तळचाचा उपयोग करण्याचा अधिकार त्यांना
पोहोचत नाही. केवळ प्राचीन रूढीने वादीला कायदेशीर हक्क पोहोचत नाही.
शिवाय ही रूढी प्राचीन आहे असेही वादींना पुराव्यासह सिद्ध करता आले नाही.
अशा रीतीने या खटल्यात डॉ. आंबेडकर विजयी झाले. मार्च १९२७ मध्ये सुरू
झालेला हा लढा शेवटी उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मार्च १९३७ मध्ये यशस्वी
झाला.
सविनय कायदेभंग आंदोलन
जिल्ह्याबाहेरील काँग्रेसजन महाराष्ट्र
प्रांतिक काँग्रेस सविनय कायदेभंग आंदोलनाचा शुभारंभ होण्यापूर्वी
प्रचारसभा व भेटीगाठी घेण्यासाठी जिल्ह्यात फिरत होते. समितीच्या वतीने ग.
वि. केतकर, नरसिंह चिंतामण केळकर, बाळ गंगाधर खेर, हरी मोरेश्वर जोशी, डॉ.
नारायण दामोदर सावरकर आंदोलनासाठी जनमत तयार करीत होते. जिल्ह्यातील माधब
आर. गोसावी, वसंत महादेव वेदक यांनी तर आपला वकिलीचा व्यवसाय देखील सोडला व
देशकार्यासाठी वाहून घेतले. गोसावी व वेदक यांच्या जोडीला जनार्दन विष्णू
तथा भाऊसाहेब लेले, वामन गोबिंद लिमये, डी. एस. मणेरीकर आणि इतर बरेच वकील
आंदोलनाचा प्रचार करीत. अनंत वासुदेव सहस्त्रबुद्धे व हरिभाऊ जोशींनी
जागृतीसाठी बरेच प्रयत्न केले. प्रारंभीच्या काळात पनवेल येथे आंदोलनासाठी
अधिक अनुकूल वातावरण होते, तर पेणमध्ये आंदोलनाची तयारी चालू होती. अलिबाग
जवळचा
११० कित्ता, पृ. १७५-७६.
कित्ता, पू. १७९, १८२. सुरेंद्रनाथ टिपणीस महाड नगरपालिकेचे अध्यक्ष होते.
१९२ कित्ता, पू. २५९-६३.
१६६
इतिहास
सासवण्याचा
वैश्य विद्याधम आंदोलनात सामील होण्यास कटिबद्ध झाला. पुढे या आश्रमाने
धारासना सत्याग्रहासाठी स्वयंसेवक पाठविले होते. या राष्ट्रीय शाळेबाबत
महात्मा गांधींचे अनुकूल मत होते. महाडला चुनिलाल मेहता गुजर व तुळजाराम
मेहता गुजर सभा भरवीत. अलिबाग, पनवेल, महाड व पेणमध्ये वारंवार सभा घेण्यात
येत.
प्रारंभीच्या काळात जिल्ह्यातील आंदोलनास महाराष्ट्रातील
काँग्रेसजनांना चालना द्यावी लागली. तथापि सागरी किनारा लाभलेला असल्याने
या जिल्ह्यात मिठाच्या सत्याग्रहासाठी अनुकूल परिस्थिती होती. महाराष्ट्र
प्रांतिक काँग्रेस समितीने ग. वि. केतकर यांना कुलाबा जिल्ह्यातील आंदोलनास
चालना देण्यासाठी पाठविल्यावर पनवेलला सत्याग्रह समिती स्थापन करण्यात
आली. विनायक मोरेश्वर गोविलकर समितीचे अध्यक्ष निवडले गेले. त्यानुसार
रामभाऊ मंडलिक, बसंत वेदक, चिंतामणीशास्त्री जोशी, विनायक गोविलकर, त्रिबक
नारायण बेडेकर, इत्यादींनी प्रचार सभा घेतल्या. सत्याग्रह समितीच्या जोडीला
पेण येथे मिठाच्या सत्याग्रहासाठी कुलाबा जिल्ह्याचे शिविर उघडण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस समितीने रामभाऊ मंडलिकांची शिविराधिपती
म्हणून नेमणूक केली. या शिबिरात जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील
कार्यकर्ते दाखल झालेत. उल्लेखनीय बाब अशी की, चिंतामणशास्त्री जोशी व
विष्णू लक्ष्मण काणे यांची महात्मा गांधींच्या दांडी सत्याग्रहासाठी
जमनालाल बजाज यांनी निवड केली होती. पूर्वी विनोबा भावेंच्या बरोबर
बडोद्याला असलेले आचार्य ढवण व कुशाभाऊ ओक देखील दांडी यात्रेत होते.
प्रारंभीच पेणच्या शिबिरात ८६ सत्याग्रही होते.
गोविलकरांच्या जोडीला
पनवेलचे मोठे व्यापारी चापसी पुरषोत्तम सत्याग्रह समितीचे सूत्रधार होते.
पेणचे विनायक नारायण तथा दादासाहेब लिमये, पनवेलचे केशव गणेश गुप्ते, शंकर
चितामण खरे, पुरुषोत्तम गोपाळकृष्ण बापट या समितीच्या यशासाठी अनिश झटत.
अल्पावधीत बरेच तरुण व महिला आंदोलनात उतरल्या आणि सत्याग्रहींचे एक
सुसंघटित पथक पनवेलला उभे राहिले. नगरातील टेनिस क्लबचे मैदान आंदोलनाचे
केंद्र बनले. विद्यार्थी व नागरिक उत्साहाने प्रभात फेऱ्या व सत्याग्रहात
भाग घेऊ लागले.
महात्माजींनी ६ एप्रिल १९३० रोजी दांडी किनाऱ्यावर
सत्याग्रहाचा शुभारंभ केल्यावर पनवेल व पेण येथे रीतसर सत्याग्रहास प्रारंभ
झाला. दिनांक १४ एप्रिलपासून पेणला हजारोंची उपस्थिती असलेल्या सभा होऊ
लागल्या. ग. वि. केतकर, महाडचे सखाराम जनार्दन भगवत, साताऱ्याचे बुवासाहेब
गोसावी, अनंतराव कटकोळ व कमलाकर सुमंत यांच्या भाषणांनी वातावरण तापू
लागले. शेतकऱ्यांचे आंदोलनास काही वर्षांपूर्वी ज्यांनी चालना दिली होती ते
रामजी लक्ष्मण घरत शिबिरात दाखल झाले (१९ एप्रिल) रयतेने वाढीव दराने जमीन
महसूल देऊ नये यासाठी घरत यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल १९२७पासून धारावाढ
प्रतिबंधक मंडळ कार्यरत होते. ती मोहीम १९३० च्या कायदेभंग आंदोलनात
मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. दिनांक ३० एप्रिलची पेणमधील मिरवणूक दीड
मैल लांबीची होती. त्या प्रसंगी न. चिं. केळकरांनी सागराचे पाणी आटवून मीठ
तयार
१९२ के. के. चौधरी (संपा.), सोर्स मटेरिअल फॉर हिस्टरी ऑफ फ्रीडम मुव्हमेंट,
खंड ११, १९९०, पृ. ५८२-८३, ५९३-९४, ५९७.
*प. रा. दाते, पेण तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम, १९७२, पृ. २२-२३.
१५ प. रा. दाते, चिरनेर जंगल सत्याग्रह, १९७१, पृ. १३-१४.
आधुनिक काळ
१६७
केले
आणि हजारोंच्या उपस्थितीत कायदेभंग केला. त्याच दिवशी मिरवणुकीआधी मंडलिक व
केतकरांना अटक करण्यात आली होती. सखाराम जनार्दन भागवत, कमलाकर सुमंत
अनंतराव कटकोळ व बुबासाहेब गोसावी व इतर अनेकांना अल्पावधीत अटक करण्यात
आली. कारावासात जाता जाता मंडलिकांनी विनायक नारायण लिमये व जनार्दन केशव
दामले यांना शिविराधिपती व व्यबस्थापक म्हणून नियुक्त केले. रंगो वामन
लिमये व कृष्णाजी पांडुरंग साठे यांच्या मालमत्ता शासनाने जप्त केल्या."
पोलीस
गुप्तचरांच्या १९ एप्रिल १९३० च्या अहवालानुसार पेण हे आंदोलनाचे केंद्र
बनले होते. तेथे दररोज हजारोंच्या उपस्थितीत सभा होत. एप्रिल २६ च्या
गुप्तचर अहवालानुसार पनवेलला मिठाच्या अधिनियमांचा मोठ्या प्रमाणात भंग
झाला. जनार्दन विष्णू लेले, डी. एस. मणेरीकर व जी. व्ही. लिमये अलिबागमध्ये
आंदोलन तीव्र करण्यात कार्यरत होते. आंदोलनाची तीव्रता महाड आणि
माणगावमध्येही वाढत असल्याने पोलिसांनी प्रतिबंधक उपाययोजना वाढविण्याच्या
योजना आखल्या. दिनांक ४-५ मे १९३० च्या मध्यरात्री गांधीजींना अटक करण्यात
आल्याने लोकक्षोभ वाढला. सर्वत्र सरकारचा निषेध होऊ लागला. तेव्हापासून
सविनय कायदेभंग आंदोलन जिल्हाभर पसरले. मीठ अधिनियमांचा भंग करण्यावर
काँग्रेसने भर देऊन आंदोलन व्यापक केले. तोपावेतो बरेच पुढारी अटकेत पडले
होते. मे महिन्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची, त्यांना
उधारीवर वस्तू न विकण्याची मोहीम सुरू झाली. मे १९३० च्या दुसऱ्या
आठवड्यापासून जिल्ह्याबाहेरचे प्रचारक फारसे येत नसत, तरी स्थानिक लोकांनी
सत्याग्रहाचा नित्याचा कार्यक्रम अखंड चालू ठेवला आणि दररोज सभा व
मिरवणुकांवर भर देण्याचे धोरण अमलात आणले. उरण-जसईसारख्या भागातही
सत्याग्रहाचे जोरदार वारे वाहत होते. या महिन्याच्या मध्यानंतर काही
ठिकाणच्या चळवळी जरा थंडावल्या, परंतु महाडची चळवळ अधिक तीव्र बनली.
मिठाच्या सत्याग्रहास पावसाच्या आगमनानंतर ओहोटी लागली व मे महिना अखेरीस
मीठ निर्मिती बंद करावी लागली. त्यामुळे सत्याग्रहाच्या धोरणात बदल करून
शासकीय कर्मचाऱ्यांवरील बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार आणि विदेशी कापड व
दारूच्या दुकानांवर निरोधने करण्यावर भर देण्यात आला.
विदेशी कापड व
मद्यावर बहिष्कार घातल्याने व स्वयंसेवक दुकानांपुढे अखंड पहारा देत
राहिल्याने दुकानदारांचे तर नुकसान झालेच पण त्यापेक्षा सरकारचा अबकारी
करांचा महसूल बुडाला. लाखो रुपयांच्चा सरकारी महसूल बुडाला. निरोधने व
बहिष्कारामध्ये तरुण व महिला पुढाकार घेत.
स्वातंत्र्य आंदोलनाने
प्रभावित होऊन जिल्हा स्कूल बोर्डाने आपल्या शाळांच्या इमारतींवर तिरंगा
झेंडा फडकवण्याचे धैर्य दाखविले. काही नगरपालिकांनीही बोर्डाचे अनुकरण
१९ ५ दाते, पेण तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम, पृ. २३-२५.
चौधरी (संपा.), पूर्वोक्त, पू. ६०२, ६१३, ६२९, ६३०, ६३३, ६४५, ६६०, ६७१.
१९८
दाते, पेण तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम, पृ. २६, २७. जनार्दन केशव
दामले, विनायक नारायण लिमये, परशराम रामचंद्र दाते, गणेश रघुनाथ लिमये,
यमुना मुकुंद लिमये, गणपत लिमये, नारायण दांडेकर, तात्या पटवर्धन, बगाराम
गुजर, हिरु म्हात्रे, रघुनाथ धोंडो सावंत, नारायण हजारे, गोविंद गायकवाड,
लक्ष्मीदास गुजर, इत्यादींना निरोधनांसाठी पोलिसांनी पकडले तर अनेकांना
सक्तमजुरी किंवा दंड करण्यात आला.
१६८
इतिहास
केले.
सर्व धर्मांचे लोक सत्याग्रहात कमी अधिक प्रमाणात सहभागी झाले. मुंबईतील
जमिअत-उल-उलेमा या राष्ट्रवादी संघटनेचा प्रतिनिधी आल्याने पनवेलचे
मुसलमानही आंदोलनात सामील झालेत. पोलीस गुप्तचरांच्या २८ जूनच्या
अहवालानुसार जिल्ह्यातील आंदोलन बरेच व्यापक व तीव्र झाले. मीठ निर्मिती
बंद पडल्यामुळे बन विषयक अधिनियमांचे उल्लंघन करण्यासाठी जंगल सत्याग्रहाची
योजना हाती घेणे भाग पडले. पनवेल, अलिबाग व महाडचे व्यापारी वित्तबळाची
मदत करीत. २६ जून १९३० रोजी महाडमध्ये सायमन कमिशनच्या अहवालाचा जाहीर सभेत
धिक्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील जंगल सत्याग्रह प्रथम अलिबाग
तालुक्यात सुरू होऊन नंतर पनवेल, महाड व पेण तालुक्यांमध्ये पसरला.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात जंगल सत्याग्रहासाठी अलिबागला प्रशिक्षण शिविर
स्थापन करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील सत्याग्रहींना प्रशिक्षण दिले
जात असे. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र अलिबागला गेले व तेथून वातावरण
निर्मिती करण्यात आली. दिनांक १९ जुलैच्या पोलीस गुप्तचरांच्या नोंदीनुसार
दिसते की, आंदोलन निश्चितपणे लोकप्रिय होत असून कोणत्याही क्षणी सरकारला
अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार. ऑगस्टच्या २ तारखेचा अहवाल
म्हणतो की, सविनय कायदेभंगाची विचारप्रणाली व्यापक प्रमाणात पसरत आहे.
बहिष्काराची भीती दाखवून पोलीस पाटलांचे राजीनामे मागण्याच्या मोहिमेस बरेच
यश येऊन बऱ्याच पाटलांनी राजीनामे दिले. या कामीही अलिबाग तालुका आघाडीवर
होता. आगरी लोकांचा आंदोलनास वाढता पाठिंबा इंग्रज शासनास चिंतेची बाब वाटत
होती.
विनायक लिमये, वेडेकर, विनायक नीलकंठ उपाध्ये स्वयंसेवकांना
मार्गदर्शन करीत. प्रत्येक शहर व मोठ्या वेडयांमध्ये प्रभात फेन्यांचा जोर
वाढला. महाडमध्ये पुष्कळ काँग्रेसजनांना अटकेत टाकले असल्याने सरकार विरोधी
भावना प्रक्षुब्ध झालेल्या होत्या. बहुसंख्य गावांमध्ये स्वयंसेवक
स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी कापडावर बहिष्कार, मद्यपान बंदी व जंगल
सत्याग्रहावर भाषणे करीत. २०
अलिबाग तालुक्यातील तिनवीरे गावी २००
खेडुतांनी समारंभपूर्वक पहिला जंगल सत्याग्रह केला १६ ऑगस्ट रोजी. त्या
दिवसापासून २३ ऑगस्टपर्यंत या तालुक्यात सहा ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला.
काँग्रेस सभासद नोंदण्याची मोहीम उघडण्यात आली. एकटचा पनवेल शहरात २,०००
लोक काँग्रेसचे रीतसर सभासद झालेत. आगरी मंडळी उत्साहाने भाग घेत.
प्रारंभीच्या लहान सत्याग्रहानंतर ८ सप्टेंबरला कल्हे, चिरनेर व चावणे गावी
मोठे जंगल सत्याग्रह करण्यात आलेत. कल्हेच्या जंगलात तीन हजारांबर
सत्याग्रहींनी कायदेभंग केला.
चौधरी (संपा.), पूर्वोक्त, पू. ६८३, ६९१.
कित्ता, पृ. ७२७.
२०१ कित्ता, पृ. ७४१, ७६४, ७६८, ७९१, ८०३.
२०१ कित्ता, पृ. ७४१, ७६४, ८०३.
५०
कित्ता, पृ. ८०५, ८२३, ८३६, ८७१. कल्हेचा हा सत्याग्रह रामकृष्ण विश्वनाथ
आपटेंच्या तर चिरनेरचा रामकृष्ण गणेश आपटेंच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
(दाते, चिरनेर जंगल सत्याग्रह, पु. २०).
१६८
इतिहास
केले.
सर्व धर्मांचे लोक सत्याग्रहात कमी अधिक प्रमाणात सहभागी झाले. मुंबईतील
जमिअत-उल-उलेमा या राष्ट्रवादी संघटनेचा प्रतिनिधी आल्याने पनवेलचे
मुसलमानही आंदोलनात सामील झालेत. पोलीस गुप्तचरांच्या २८ जूनच्या
अहवालानुसार जिल्ह्यातील आंदोलन बरेच व्यापक व तीव्र झाले. मीठ निर्मिती
बंद पडल्यामुळे बन विषयक अधिनियमांचे उल्लंघन करण्यासाठी जंगल सत्याग्रहाची
योजना हाती घेणे भाग पडले. पनवेल, अलिबाग व महाडचे व्यापारी वित्तबळाची
मदत करीत. २६ जून १९३० रोजी महाडमध्ये सायमन कमिशनच्या अहवालाचा जाहीर सभेत
धिक्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील जंगल सत्याग्रह प्रथम अलिबाग
तालुक्यात सुरू होऊन नंतर पनवेल, महाड व पेण तालुक्यांमध्ये पसरला.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात जंगल सत्याग्रहासाठी अलिबागला प्रशिक्षण शिविर
स्थापन करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील सत्याग्रहींना प्रशिक्षण दिले
जात असे. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र अलिबागला गेले व तेथून वातावरण
निर्मिती करण्यात आली. दिनांक १९ जुलैच्या पोलीस गुप्तचरांच्या नोंदीनुसार
दिसते की, आंदोलन निश्चितपणे लोकप्रिय होत असून कोणत्याही क्षणी सरकारला
अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार. ऑगस्टच्या २ तारखेचा अहवाल
म्हणतो की, सविनय कायदेभंगाची विचारप्रणाली व्यापक प्रमाणात पसरत आहे.
बहिष्काराची भीती दाखवून पोलीस पाटलांचे राजीनामे मागण्याच्या मोहिमेस बरेच
यश येऊन बऱ्याच पाटलांनी राजीनामे दिले. या कामीही अलिबाग तालुका आघाडीवर
होता. आगरी लोकांचा आंदोलनास वाढता पाठिंबा इंग्रज शासनास चिंतेची बाब वाटत
होती.
विनायक लिमये, वेडेकर, विनायक नीलकंठ उपाध्ये स्वयंसेवकांना
मार्गदर्शन करीत. प्रत्येक शहर व मोठ्या वेडयांमध्ये प्रभात फेन्यांचा जोर
वाढला. महाडमध्ये पुष्कळ काँग्रेसजनांना अटकेत टाकले असल्याने सरकार विरोधी
भावना प्रक्षुब्ध झालेल्या होत्या. बहुसंख्य गावांमध्ये स्वयंसेवक
स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी कापडावर बहिष्कार, मद्यपान बंदी व जंगल
सत्याग्रहावर भाषणे करीत. २०
अलिबाग तालुक्यातील तिनवीरे गावी २००
खेडुतांनी समारंभपूर्वक पहिला जंगल सत्याग्रह केला १६ ऑगस्ट रोजी. त्या
दिवसापासून २३ ऑगस्टपर्यंत या तालुक्यात सहा ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला.
काँग्रेस सभासद नोंदण्याची मोहीम उघडण्यात आली. एकटचा पनवेल शहरात २,०००
लोक काँग्रेसचे रीतसर सभासद झालेत. आगरी मंडळी उत्साहाने भाग घेत.
प्रारंभीच्या लहान सत्याग्रहानंतर ८ सप्टेंबरला कल्हे, चिरनेर व चावणे गावी
मोठे जंगल सत्याग्रह करण्यात आलेत. कल्हेच्या जंगलात तीन हजारांबर
सत्याग्रहींनी कायदेभंग केला.
चौधरी (संपा.), पूर्वोक्त, पू. ६८३, ६९१.
कित्ता, पृ. ७२७.
२०१ कित्ता, पृ. ७४१, ७६४, ७६८, ७९१, ८०३.
२०१ कित्ता, पृ. ७४१, ७६४, ८०३.
५०
कित्ता, पृ. ८०५, ८२३, ८३६, ८७१. कल्हेचा हा सत्याग्रह रामकृष्ण विश्वनाथ
आपटेंच्या तर चिरनेरचा रामकृष्ण गणेश आपटेंच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
(दाते, चिरनेर जंगल सत्याग्रह, पु. २०).
आधुनिक काळ
१६९
सत्याग्रहाचे
निमित्ताने जातिभेद नष्ट करण्याचेही प्रयत्न करण्यात येत. त्यामुळे
ब्राह्मणां-बरोबर कुणबी, मराठे, आगरी, सी. के. पी. व गुजर लोक सत्याग्रहात
उत्साहाने भाग घेत. बरेच वकील, डॉक्टर व व्यापारी स्वयंसेवकांना आर्थिक मदत
करीत.
चिरनेर जंगल सत्याग्रह: सविनय कायदेभंग आंदोलनाच्या अंतर्गत झालेला चिरनेर
जंगल
सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्रातील १९३०-१९३३ च्या स्वातंत्र्य समरातील एक
महत्त्वाचे उपाख्यान होय. या सत्याग्रहाची प्रसिद्धी भारतभर पसरली.
चिरनेरच्या समरा-मध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्या शेतकरी, आगरी व आदिवासीचे
बलिदान प्रेरणादायक होते. पोलिसांनी चिरनेरला केलेल्या बेछूट कारवाईमुळे
ब्रिटिश सरकार देखील गोंधळात पडले होते. पनवेल नगरापासून २२.५ कि. मी.
अंतरावर असलेल्या चिरनेरपासून दीड कि. मी. अंतरावरील अक्कादेवीच्या
डोंगरावर हा सत्याग्रह २५ सप्टेंबर १९३० रोजी करण्यात आला. दिनांक ८
सप्टेंबरच्या पहिल्या चिरनेर सत्याग्रहानंतरचा हा दुसरा सत्याग्रह होता.
ऐतिहासिक महत्त्व आलेला चिरनेर सत्याग्रह २५ सप्टेंबरचा. या सत्याग्रहात
अदमासे ५,००० ते ६,००० लोकांनी भाग घेतला व त्यांच्यापैकी सात जण देशासाठी
हुतात्मा झालेत. सात स्वातंत्र्य आंदोलकांव्यतिरिक्त पाच शासकीय
कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात प्राण गमावले. बळी पडलेल्यांमध्ये काही २०-२२
वर्षांचे तरुण होते. शिवाय ३८ जण भीषण जखमी झाले. काहींचे तर हातपाय कापून
टाकावे लागले होते." घटनास्थळी दुसऱ्या दिवशी पोहोचलेले जिल्हा दंडाधिकारी व
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना अक्कादेवीच्या समरभूमीचे भयंकर
स्वरूप पहावयास मिळाले. तेथे दोन मृतदेह तेव्हाही पडलेले होते, तर जवळच्या
भात शेतावर दोन देह उघड्यावर होते. सर्व देखावा भयानक होता.
शासनाने
चिरनेर गोळीबार प्रकरणी केलेली अधिकारी पातळीवरील चौकशी संदिग्ध व पक्षपाती
असल्याकारणाने सर्व जनमानसात शासनावर राग धुमसत होता, संशयाचे वातावरण
पसरले होते. वस्तुनिष्ठ चौकशीसाठी लोक व वर्तमानपत्रे मागणी करीत होते.
त्यानुसार पुण्याच्या सार्वजनिक सभेने पुढाकार घेऊन चिरनेर गोळीबार चौकशी
समिती नेमली. समितीचे सर्व सभासद भिन्न राजकीय मतांचे व जातींचे असून
स्वतंत्र वृत्तीचे होते. ही चौकशी समिती शासनाला अडचणीत आणणारे सत्य शोधून
शासकीय अधि-काऱ्यांनाही उघडे पाडेल या भीतीने उपविभागीय दंडाधिकाऱ्याने
आदेश काढला की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १४४ च्या कलमान्वये चौकशी
समितीच्या कोणाही सभासदाने
२०४ उपविभागीय दंडाधिकाऱ्याचा जिल्हा
दंडाधिकाऱ्यास अहवाल, १३ ऑक्टोबर १९३०. सात हुतात्म्यांची सरकारी दप्तरातील
नावे अशी रघुनाथ मोरेश्वर न्हावी, आनंदा माया पाटील, धाकू गवल्या फोफेरकर,
परशुराम रामा, आलू बेमटचा म्हात्रे, रामा बामा आणि हसुराम बुधाजी. चिरनेर
सत्याग्रहातील सर्व हुतात्म्यांची यादी या प्रकरणाच्या शेवटी दिली आहे.
२०० उपविभागीय दंडाधिकाऱ्याचा उपरोक्त अहवाल.
२०६
बॉम्बे क्रॉनिकल, २४ ऑक्टोबर १९३०, या समितीचे अध्यक्ष बें. जमनादास मेहता
असून स्मॉल कॉज कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश हुसेन वी. तय्यबजी, बॅ.
एम. सी. छगला, डॉ. मोतीराम बा. वेलकर, नारायण नागूजी पाटील, पुण्याचे एल.
आर. गोखले व नारायणराव आर. गुंजाळ हे सभासद होते. माधवराव व्ही. गोडबोले
समितीचे सचिव होते.
१७०
इतिहास
पनवेल तालुका व उरण
महाल भागात गोळीबार प्रकरणाची मौखिक अथवा इतर प्रकारे चौकशी करण्यास येऊ
नये. आपल्या मनाई हुकुमाच्या समर्थनार्थ या दंडाधिकाऱ्याने कारण पुढे केले
की, या प्रकरणी अशासकीय समितीने चौकशी केल्यास पोलिसांच्या कायदेशीर कामात
व्यत्यय येईल. समितीला पनवेल व उरण भागात चौकशीसाठी जाण्यास दोन
महिनेपर्यंत बंदी करण्यात आली होती. समितीचा हेतू चिरनेर प्रकरणाची
वस्तुस्थिती शोधून काढून जनतेपुढे सत्य ठेवण्याचा होता. शिवाय सर्वच सभासद
विश्वसनीय होते. म्हणून केसरी वर्तमानपत्राने शासकीय मनाई हुकुमाविरुद्ध
आवाज उठविला होता.
पनवेल-उरण भागात चौकशी समितीला बंदी असल्यामुळे
समितीचे कामकाज मुंबईत सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या दालनात चालविण्यात
आले. चौकशीचे कामकाज जनतेला खुले होते. विशेष म्हणजे मुंबई शासन, महसूल
आयुक्त व कुलाबा जिल्हाधिकारी यांनीही आपले साक्षीदार समितीसमोर पाठवावे व
शासनाने आपलीही बाजू मांडावी तसेच समितीच्या साक्षीदारांची उलट तपासणी
करावी अशीही पत्त्रे समितीने संबंधितांना पाठविली होती. तथापि शासनाने
त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले व शासनातर्फे कोणालाच पाठविण्यात आले नाही.
साक्षीदारांची उलट तपासणी करण्यास्तव आपला प्रतिनिधी पाठविण्याबाबत वार
असोसिएशनलाही समितीकडून विनंती करण्यात आली होती.
मुंबई प्रांतिक
काँग्रेस समितीच्या सहाय्याने चौकशी समितीचे काम सुरू झाले. चौकशी
समितीपुढे आलेली माहिती आणि अस्सल सरकारी कागदपत्रांचा आधार घेऊन चिरनेर
प्रकरणाची वस्तुस्थिती खाली देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चिरनेर
सत्याग्रहापूर्वी मुंबई प्रांतिक काँग्रेसच्या युद्धमंडळाच्या
आकृतिबंधानुरूप चिरनेर सत्याग्रह मंडळ निर्माण करून सेवादल देखील उभारले
होते. स्वयंसेवकांना सत्याग्रहाचे प्रशिक्षण दिलेले होते. सरकारच्या अबकारी
कर कार्यालयाच्या दंडेलीविरुद्ध मंडळाने आंदोलन उभारले होते. तसेच वन
विभागाच्या अधिनियमांमुळे लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला
होता. सरकारविरुद्ध जनमत जागृत करण्यासाठी गांधी सप्ताह, राष्ट्रीय सप्ताह,
बहिष्कार सप्ताह, शेतकरी सप्ताह साजरे करण्यात आलेत. सत्याग्रह पत्रिका
आणि शेतकरी आठवडा पत्रिका प्रकाशित करून आंदोलनास लोकांचा पाठिंबा
मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येत. सरकारी यंत्रणाही आंदोलनविरोधी प्रचारात
कमी नव्हती. स्थानिक काँग्रेसजन मात्र सत्याग्रह शांततापूर्ण झाला पाहिजे
यासाठी प्रयत्नशील होते. पनवेल तालुका काँग्रेस समितीने २५ सप्टेंबरच्या
सत्याग्रहासाठी आधीच जनमत जागृत करून ठेवले होते. चिरनेर सत्याग्रहाचे
प्रमुख नेते होते त्र्यंबक नारायण बेडेकर, केशव गणेश गुप्ते व वसंत बेदक.
या समितीने जंगल सत्याग्रहाबाबतची योजना जाहीर करून २४ सप्टेंबरला थाळी
पिटून सत्याग्रहाची घोषणा केली होती. चिरनेर जवळील अक्कादेवीच्या
डोंगरावरील संरक्षित जंगलात भजन करीत जाऊन बनविषयक अधिनियमांचे उल्लंघन
करून गवत व लाकूडफाटा कापून आणणे हा मुख्य कार्यक्रम
२०० केसरी, ४ नोव्हेंबर १९३०.
२०
मुंबई महानगरपालिकेचे सभासद तळपदे यांच्या साक्षीने कामास प्रारंभ झाला.
मुंबई प्रांतिक काँग्रेस समितीच्या विनंतीवरून तळपदे यांनी काँग्रेस
समितीचे सर्वाधिकारी प्रभाकर गुप्ते, त्यांचे वडील केशव गणेश गुप्ते आणि
इतर अनेक लोकांकडून माहिती मिळविली होती.
आधुनिक काळ
१७१
होता.
गांधीजींच्या सूत्रानुसारच सत्याग्रह करण्याची योजना होती. सत्याग्रहाबाबत
लोकांमध्ये कमालीचे औत्सुक्य होते, तर सत्याग्रह दडपण्यासाठी शासकीय
यंत्रणा आणि पोलीस निरीक्षक कटिबद्ध होता. तरी सुद्धा दंगा होईल असा
काँग्रेस स्वयंसेवकांचा अंदाज नव्हता. पनवेलचा मामलेदार व पोलीस निरीक्षक
यांनाही दंगा होईल अशी कल्पना नव्हती. किंबहुना सत्याग्रह शांततेत पार
पाडावा यासाठी काँग्रेस नेत्यांनी खास खबरदारी घेतली होती.
सत्याग्रहाचे
दिवशी सभोवतालच्या गावांमधून आबालवृद्ध, शेतकरी माळावर जमले. पोलीस
निरीक्षक व मामलेदार २० २० पोलिसांसह हजर होते. बरोबर तलाठी व वन विभागातील
कर्मचारी होते. पाच-सहा हजारांचा जमाव सत्याग्रहाच्या निर्धाराने जमलेला
होता. अकारण अटक टाळण्यासाठी भाषणे न करता तीन वाजता सत्याग्रहाचा
प्रारंभकेला. अदमासे ३०० सत्याग्रहींनी गवत कापण्यास, झाडांच्या फांद्या
तोडण्यास सुरुवात करताच "जंगल का कायदा तोड दिया" अशा घोषणा करण्यात आल्या.
तेव्हा टेकडीवर २,००० लोक असावेत. सत्याग्रही डोंगर चढू लागल्यावर पोलीस
निरीक्षक काही पोलिसांना बरोबर घेऊन त्यांच्या पाठोपाठ गेला. त्याने
पायथ्याशी चार-पाच सत्याग्रहींना अटक केली व वर जाताना आणखी काहींना अटक
केली. सत्याग्रहींनी अटकेस मुळीच आढेवेढे घेतले नाहीत. अटक करण्यात आलेल्या
सर्व सत्याग्रहींनी अटकेचा प्रतिकार न करताही त्यांच्यापैकी काहींना
पोलिसांनी हातकड्या घातल्यावर मात्र त्या काढून टाकण्यासाठी निरीक्षकाला
काँग्रेसजनांनी विनंती केली. तथापि त्याने विनंती अमान्य तर केलीच शिवाय
विनंती करणाऱ्यांना लाठीचे तडाखे दिले. सत्याग्रहींनी पुन्हा बिनवले की,
आंदोलकांना विनाकारण प्रक्षुब्ध करू नये. इतक्यात एक स्वयंसेवक खाली जाऊन
त्याने लाठीमाराची बातमी मामलेदारास सांगितली. त्यानुसार मामलेदार काय झाले
ते पाहण्यासाठी डोंगरांवर गेला आणि हातकड्या काढून टाकण्याबाबत पोलीस
निरीक्षकाला सांगू लागला. या बाबीवरून या दोघा अधिकाऱ्यांमध्ये वादावादी
झाली. पोलीस निरीक्षकाने अनिच्छेने हातकड्या काढून टाकल्यावर मामलेदार,
निरीक्षक व काही पोलीस हवालदार खाली गेले. निरीक्षक मात्र गुरगुरत होता.
ही
मंडळी खाली आल्यावर टेकडीवर अचानक गोळीबार झाला. हा आवाज ऐकल्यावर
मामलेदाराने खालूनच विचारले की, गोळीबाराचा आदेश कोणी दिला. परंतु इतक्यात
मामलेदारालाच एक गोळी लागून तो कोसळला. पोलिसांच्या नंतरच्या दोन
गोळयां-पैकी एक वन विभागाच्या कर्मचाऱ्यास लागली. काही साक्षीदारांनी चौकशी
समिती व न्यायालयासमोर दिलेल्या साक्षीवरून दिसते की, खालून पोलीस
निरीक्षकाने पोलिसांना इशारा केल्यानुसार त्यांनी गोळीबार केला.
निरीक्षकानेच गोळीबाराचा आदेश दिल्याचा सत्याग्रहींचा समज झाला. तरी देखील
गोळीबारामुळे प्रक्षुब्ध झालेल्या लोकांपासून निरीक्षकाला वाचविण्यासाठी
त्याला केशव गुप्तेंसह काही सत्याग्रहींनी झुडुपामध्ये लपवून
२० हा
निरीक्षक सातारा जिल्ह्यातील आंदोलन व सोलापूरच्या झेंडा सत्याग्रह
प्रकरणापासून दडपशाहीसाठी प्रसिद्ध होता. कुलाब्यात त्याची नव्यानेच बदली
करण्यात आली होती.
२१० मामलेदार केशव महादेव जोशी याला निरीक्षकाच्या हेकेखोर स्वभावाची जाणीव असल्याने तो स्वतः हजर राहिला होता.
१२११ त्याचे नाव नारायण खरे.
१७२
इतिहास
ठेवले.
साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारापूर्वी लोक शांत होते. पण
निरीक्षकाने खूण केल्यावर पोलिसांनी गोळीबार केला असे त्यांचे म्हणणे होते.
घटनास्थळी हजर असलेल्या देश सेविका संघाच्या बिमल गुप्तेंनी (सर्वाधिकारी
प्रभाकर गुप्तेंची बहीण) उपरोक्त माहितीस दुजोरा दिला. गोळीबारात बळी
पडलेल्या मामलेदाराजवळच त्या होत्या. गोळीबारापूर्वी पोलिसांनी लोकांना
इशारा दिला नव्हता. हे सर्व घडत असताना पोलीस निरीक्षक गणवेषातच होता. जमाव
त्याला ठार मारील या भीतीने काँग्रेसचे गुप्ते व इतरांनी त्याला खादी कपडे
घालून संरक्षण दिले. मरणासन्न झालेल्या मामलेदाराला वाचविण्याचा
सत्याग्रहींनी खूप प्रयत्न केला, तथापि त्याचे तात्काळ निधन झाले.
गोळीबारानंतर देखील पोलिसांनी इकडे तिकडे पळणाऱ्या लोकांवर बेछूटपणे गोळया झाडल्या. त्यात काही मरण पावले आणि बरेच जखमी झाले.
मात्र
पोलीस निरीक्षकाने टाइम्स ऑफ इंडिया च्या वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत
स्पष्ट कबूल केले की, काँग्रेस आंदोलकांनी अटक करून घेण्याला खळखळ केली
नाही; किंबहुना मामलेदार व आपल्याभोवती कडे करून दोघांना संरक्षण देण्याचा
प्रयत्न केला. आपला गणवेष काढून बचावार्थ आपल्याला खादीचे कपडे घातल्याचेही
त्याने मान्य केले. त्याच्या हकीकतीवरून दिसते की, सशस्त्र पोलिसांनी
शिस्त पालन न करता बिनाआदेण गोळीबार केला, व गोळीबार सुरू केल्यावर
थांबविला नाही आणि सर्व काडतुसे संपविली शिवाय घाबरून पळत सुटून पोलिसांनी
स्वतःचे वर्तन हास्यास्पद करून घेतले.
दिनांक २५ सप्टेंबरला सुमारे ४
वाजता गोळीबार झाला तरी २६ तारखेच्या ८-३० पर्यंत जखमी झालेल्यांची सरकारी
यंत्रणेने दखल घेतली नव्हती. उलट काँग्रेसच्या शुश्रुषा पथकाच्या कामात
पोलिसांनी अडचणी निर्माण केल्या. बहुतेक जखमींना कमरेच्यावर गोळया
लागलेल्या असल्याचे मुंबई काँग्रेसच्या तळपदेंनी सांगितले. मुंबईतील
काँग्रेसच्या रुग्णालयाने चिरनेरच्या जखमींची शुश्रुषा करण्यात मोलाचे
कार्य केले.
प्रत्यक्ष जंगल सत्याग्रह शांततापूर्ण पार पडला होता. तथापि
पोलीस निरीक्षकाचा आततायीपणा व पोलिसांचा आक्रमकपणा यामुळे लोक संतापले व
त्यांनी आपला राग आपल्या पद्धतीने व्यक्त केला.
चिरनेर खटल्याची
प्रारंभिक तयारी अलिबागला करण्यात आली. तथापि खटला अलिबाग सत्र न्यायालयात न
चालवता ठाणे सत्र न्यायालयापुढे चालवावा असा निर्णय सरकारने उच्च
न्यायालयाकडून मिळविला होता. सरकारने काँग्रेसवरच हिंसाचाराचा आरोप केला.
मरण पावलेले सात जण पोलिसांच्या गोळयांनी मरण पावले नसून इतर कारणांमुळे
गेले असा सरकारचा युक्तिवाद होता. सर्वचे सर्व ४७ आरोपी पनवेल, चिरनेर आणि
जवळच्या गावातील होते.
२११ मामलेदाराला पोलीस निरीक्षकाने गोळी मारली
असे काही साक्षीदारांनी सांगितले. पहा दाते, चिरनेर जंगल सत्याग्रह, पृ.
३९-४०. पोलीस निरीक्षकाच्या गोळीने मामलेदार मारला गेल्याचा आरोप
न्यायालयासमोरही
आला होता. परंतु सरकारी पक्षाने त्याचे खंडन केले होते.
आधुनिक काळ
१७३
चिरनेर
खटल्यातील आरोपींचा न्यायालयात बचाव करण्यासाठी व मरण पावलेल्या किंवा
जखमी झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी मुंबईत चिरनेर
बचाव मदतकार्य समिती स्थापन करण्यात आली.
महात्मा गांधी-आर्यावन
करारानंतर हिंसाचाराचा आरोप नसलेल्या सर्व काँग्रेस राजकीय बंदीवानांना
सर्वक्षमा (Amnesty) करून सोडण्यात आले होते. त्यानुसार चिरनेर खटला काढून
घेण्यात यावा व चिरनेरच्या बंदीवानांना मुक्त करण्यात यावे असे स्वतः
महात्मा गांधींनी १७ मार्च १९३१ रोजी मुंबईतील आझाद मैदानावरील सभेत
सरकारला आवाहन केले. पुणे सार्वजनिक सभेनेही सर्वच्या सर्व म्हणजे ४७
जणांना सर्व-क्षमेचा लाभ द्यावा असे आवाहन केले. सत्त्र न्यायालयापुढे ही
बाब मांडण्यात आली. तथापि न्यायालयाने निकाल देताना म्हटले की,
गांधी-आर्यावन कराराचा विचार न्याया-लयाला करता येणार नाही, पण सरकारने
विचार करून ज्यांना कराराचा फायदा देणे शवय आहे त्यांना तो द्यावा.
न्यायालयाच्या ज्युरीने सर्व आरोपींना निर्दोष ठरविले. तथापि सत्र
न्यायाधीशाने ४७ पैकी १८ आरोपींना निर्दोष तर २९ जणांना दोषी ठरविले.
त्यापैकी चौघांवर शासकीय कर्मचाऱ्यांचा वध केल्याचा आरोप ठेवून हे प्रकरण
उच्च न्यायालयाकडे निर्देशासाठी (Reference) पाठविले. तथापि उच्च
न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्देश फेटाळला. या खटल्याला नेहमीचे
फौजदारी स्वरूप न राहता सरकार विरुद्ध लोक असे स्वरूप आलेले होते.
चिरनेर
सत्याग्रहात बळी पडलेले सत्याग्रही व सरकारी कर्मचारी यांचे स्मारक चिरनेर
गावठाणात खाजगी जागेवर उभारण्यात आले. विशेष म्हणजे मरण पावलेला मामलेदार व
चार सरकारी कर्मचारी हे स्वराज्याचे स्वयंसेवक असल्याचे काँग्रेसने मानले
होते. म्हणूनच हुतात्म्यांमध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश केलेला
होता. तथापि जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार चिरनेर स्मारक नष्ट करण्यात
आले. ११५ सन १९३७मध्ये प्रांतिक स्वायत्ततेच्या योजनेखाली काँग्रेस
मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाल्यावर चिरनेर स्मारक उभारणीचा विषय पुढे आला. हे
स्मारक म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनातील एक प्रेरणास्थान असल्यामुळे त्यास
फार महत्त्व आले. म्हणून शासनाने नष्ट केलेल्या पहिल्या
२१२ बॉम्बे
क्रॉनिकल, ७ जानेवारी १९३१, फ्री प्रेस जर्नल, २८ नोव्हेंबर १९३१ या
समितीला कन्हैयालाल मुन्शी, बाळ गंगाधर खेर, लालजी नारायणजी, नारायणलाल
बन्सीलाल, लक्ष्मण बळवंत भोपटकर, नगीनदास मास्टर, पेनवेलचे भाऊसाहेब
पुराणिक, एस. सी. जोशी आणि हरी मोरेश्वर जोशी यांनी मोलाचे सहाय्य केले.
खटल्याच्या कामी दादासाहेब करंदीकर, डॉ. आंबेडकर, एच. सी. कोयाजी, दिघे,
बॅ. व्ही. आर. करंदीकर, के. एन. धारप, आर. बी. वैशंपायन, बी. आर. दामले,
व्ही. ए. रेगे, के. आर. गोडबोले, एस. ए. तेंडूलकर, करमरकर, गाठे, गुप्ते,
जी. आर. श्रींगारपुरे, शंकरराव पत्की, वगैरेंनी मोठी मदत केली. हरी
मोरेश्वर जोशींना तर चिरनेर प्रकरणी चांगले काम केल्याबद्दल राजद्रोहाच्या
आरोपाखाली कारावास पत्करावा लागला.
२१० फ्री प्रेस जर्नल, २८ नोव्हेंबर १९३१.
२१९ कुलाबा जिल्हा दंडाधिकाऱ्याचा साप्ताहिक अहबाल, ७ जानेवारी १९३२: जिल्हा दंडाधिकाऱ्याचा ४ जून १९३२ चा आदेश.
१७४
इतिहास
स्मारकाचे दगड गोळा करून नवीन मिनार बांधण्यात आला व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे ३ जानेवारी १९३९ रोजी अनावरण करण्यात आले.
सविनय
कायदेभंग आंदोलन पुढे चालू चिरनेर गोळीबारामुळे दवून न जाता आंदोलन चालूच
राहिले. वकील, जमीनदार व व्यापारी यांचा संपूर्ण पाठिंबा असल्याने व
काँग्रेस युवा शाखा उघडून स्वयंसेवकांना सैनिकी प्रशिक्षण दिले जात
असल्याने जिल्हा काँग्रेस समिती जोमाने काम करीत होती. म्हणून
जिल्हाधिकाऱ्याने "अनलॉफुल असोसिएशन ऑडिनन्स" लागू करून जिल्हा काँग्रेस
समिती व पनवेल, अलिबाग, कर्जत, पेण, उरण, महाड येथील तालुका समित्या आणि
सत्याग्रह मंडळांवर बंदी घातली. शिवाय अलिबाग, पेण व महाडची सत्याग्रह
शिबिरे, रोह्याचा देश सेवा संघ हे क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट अॅक्टखाली
बेकायदा ठरविले. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर बहिष्कार घालण्याची नवीन
मोहीम सुरू झाली. अलिबाग तालुक्यातील वन्याच पोलीस पाटलांनी राजीनामे दिले.
आगरी लोकांचा आंदोलनातील सहभाग वाढला. साराबंदीच्या मोहिमेत आगरी अग्रेसर
होते. वन कायदे पूर्णपणे निष्प्रभ करण्यात आल्याचे डी. एस. पी. ला देखील
मान्य करावे लागले. महाड व पोलादपुरची व्यापारी संघटना व रोह्याचा देश सेवा
संघ या संघटना बेकायदेशीर ठरविल्या तरी त्या शेतकऱ्यांमध्ये शासनविरोधी
असंतोष निर्माण करीत होत्या. जिल्ह्यात १९०८ चा क्रिमिनल लॉ अमेन्डमेन्ट
अॅक्ट नोव्हेंबर, १९३० मध्ये लागू करण्यात आला. तरी महाड, माणगाव, पोलादपूर
तालुक्यांतील गुजरांनी चालविलेल्या साराबंदी आंदोलनाने शासकीय यंत्रणेस
चांगलाच हादरा दिला.
दिनांक २६ जानेवारी १९३१ पासून काँग्रेसने सविनय
कायदेभंग आंदोलन स्थगित केले. गांधीजी व काँग्रेस कार्यकारी समितीच्या
सभासदांना २५-२६ जानेवारीला बंधमुक्त केल्यावर गांधी-आयर्विन करार झाला व
आयर्विनच्या प्रयत्नानुसार लंडनमध्ये आणखी एक गोलमेज परिपद भरविण्यात आली.
परंतु हितसंबंधी आणि पक्षीय व पंथीय राजकारण करणाऱ्या काँग्रेसेतर
नेत्यांमुळे गोलमेज परिषदेला यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळात आंदोलन
स्थगित केलेले असले तरी काँग्रेसजन जनजागृतीचे कार्य करीतच होते. महाड,
निजामपूर, पेण इत्यादी ठिकाणी काहींना अटकही झाली. अशा परिस्थितीत
आर्यावनच्या ठिकाणी कडवा नोकरशहा असलेला लॉर्ड विलिंग्डन व्हाईसरॉय पदावर
विराजमान झाला.
सविनय कायदेभंग आंदोलनाचा पुनरारंभ गोलमेज परिषदेहून
गांधीजींचे मुंबई बंदरात आगमन होण्यापूर्वीच लॉर्ड विलिंग्डनने काँग्रेसचे
आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करून ठेवली. जुन्या
वटहुकुमांबरोबर नवीन वटहुकूम तयार ठेवलेत. गांधीजींनी आंदोलनास प्रारंभ
केल्यास त्यांना अटक करून अंदमान अथवा एडन येथे स्थलांतरित करण्याची सूचना
मुंबई शासनाने केंद्राला केली होती. जवाहरलाल नेहरू व खान अब्दुल गफारखान
यांना तर गांधीजींच्या मुंबईतील आगमनापूर्वीच कारावासात टाकले होते. सुभाष
बाबू व सरदार पटेलांनी देखील पुढील चळवळीची तयारी करून
२१५ बॉम्बे क्रॉनिकल, ४ जानेवारी १९३९.
२१७ होम डिपार्टमेंट स्पेशल बँच, फाईल क्र. ७५० (४०) डी (ए), १९३०.
२१८ कित्ता.
२१९ कित्ता.
२० मुंबई शासनाचा केंद्र सरकारला पाठविलेला गोपनीय पाक्षिक अहवाल, १९३१.
आधुनिक काळ
१७५
ठेवली
होती. प्राप्त परिस्थितीत आंदोलन अटळ झाले होते. म्हणून महात्माजींनी
आठवडा-भराच्या अल्पावकाशात कायदेभंग आंदोलनाच्या पुनरारंभासाठी सिद्धता
करून ठेवली.
दिनांक ४ जानेवारी १९३२ रोजी पहाटे गांधीजींना मणिभवनात अटक
करताच मुंबई पाठोपाठ रायगड जिल्ह्यात आंदोलन पसरले. आंदोलनाच्या तीन दिवस
आधी महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस परिषदेचे पनवेलला अधिवेशन भरले होते.
त्यातील १,५०० प्रतिनिधीमध्ये मुंबई शहर व उपनगर, पुणे, पूर्व खानदेश
(आताचा जळगाव), पश्चिम खानदेश (धुळे), सोलापूर जिल्ह्यांमधील व वन्हाड
प्रदेशामधील काँग्रेस नेत्यांचा समावेश होता. आंदोलनाचा पुनरारंभ हाच
परिषदेपुढील मुख्य विषय होता. त्या आधी मुभाषचंद्र बोस स्वदेशी
प्रदर्शनाच्या निमित्ताने पनवेलला येऊन गेलेले होते.
करून जिल्ह्यातील
आंदोलनाचा प्रारंभ प्रचारपत्रके, प्रभात फेच्या व भापणांनी काहीसा थंडपणे
झाला. वटहुकुमांखाली आंदोलकांना अटक केल्याने बरेच कार्यकर्ते गुप्तपणे
हालचाली करू लागले. शासनाने मात्र क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट अॅक्ट, इमर्जन्सी
पॉवर्स ऑडिनन्स, स्पेशल पॉवर्स ऑडिनन्स १९३२, बॉम्बे स्पेशल (इमर्जन्सी)
पॉवर्स अॅक्ट १९३२, १९३० चे ऑडिनन्स नंबर २ व १० आणि इतर अध्यादेश व
आदेशांची अंमलबजावणी काँग्रेसजनांची धरपकड, प्रचारपत्रकांवरील बंदी व
धाकदपटणा सुरू केला. शासनाने १९३०-३१ पेक्षा १९३२-१९३३ मध्ये अधिक आक्रमक
पवित्रा घेऊन दडपशाहीचे धोरण अमलात आणले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा
प्रतिकार प्रखर होता. तर शासन सुडबुद्धीच्या उपाययोजनांनी झपाटले होते.
इतकेच नव्हे तर सरकारी अधिकारी अध्यादेश व दडपे-गिरीच्या उपाययोजनेचे
समर्थन करण्यासाठी आपणास अनुकूल असलेल्या नागरिकांच्या सभा घेत.
काँग्रेसबर
बंदी होती तरीही आंदोलन चालूच राहिले. मुंबईतील कार्यकर्त्यांच्या
मार्गदर्शनामुळे पनवेलचे आंदोलन सर्वाधिक प्रखर बनत गेले. त्याखालोखाल
पेणचा क्रमांक होता. पेणचे कुलाबा समाचार हे वर्तमानपत्त्र संपादक अटकेत
असूनही प्रभावी प्रचार करीत होते. पेण खालोखाल महाड, अलिबाग, कर्जत,
माणगाव, उरण व खालापूरला आंदोलनाचा जोर होता. सासवण्याचा वैश्य विद्याश्रम
बरेच प्रचार कार्य करीत होता. खुले आंदोलन धोक्याचे असल्यामुळे लोकांना
गुप्त कारवाया करणे भाग पडले. काही लोकांनी कारावासात जाण्याआधी आपली
मालमत्ताही विकली. २२ फेब्रुवारी १९३२ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस दिन,
गांधी दिन इत्यादी प्रसंग साजरे करण्यात आले. नेत्यांच्या अटकेनंतर
सरकारच्या निषेध सभा घेण्यात येत. मुंबई प्रांतिक व महाराष्ट्र प्रांतिकचे
प्रचारक स्थानिक काँग्रेसजनांना मार्गदर्शन करीत. ठिकठिकाणी काँग्रेसने
सर्वाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून ठेवल्या होत्या. एक सर्वाधिकारी पकडला
गेल्यावर दुसरा त्याची जागा घेई. सरकार, जमीनदार, खोत व सावकारांविरुद्ध
शेतकऱ्यांना आंदोलनास प्रवृत्त करण्यात येई. वेणला विदेशी कापडाची होळी
करण्यात आली. एप्रिल १९३२ मध्ये दडपशाही करणान्या सरकारी वटहुकुमांविरुद्ध
निषेध मोहीम उघडण्यात आली. पेणमध्ये पोलिसांनी अनेकांच्या
*** बॉम्बे प्रेसिडेन्सी पोलीस अॅबस्ट्रॅक्ट ऑफ इंटेलिजन्स, जानेवारी १९३२.
*** होम डिपार्टमेंट स्पेशल ब्रँच, फाईल क्रमांक ८०० (१४) बी, १९३२.
२२१ होम डिपार्टमेंट स्पेशल बॅच, फाईल क्रमांक ८०० (७४) २०, साप्ताहिक अहवाल, १९३२-१९३४.
२२० कित्ता, ६ मार्च १९३२.
२२५ कित्ता, २ एप्रिल १९३२.
१७६
इतिहास
घरांच्या
झडत्या घेतल्या असता त्यात प्रचार साहित्याची सामग्री पोलिसांना मिळत असे
महाडहून निघालेली कुलाबा काँग्रेस पत्रिका जून १९३२ मध्ये पोलिसांच्या हाती
पडली. मुसलमान युवकही आंदोलनात मोठी कामगिरी करीत. तरुण मुली, वयस्कर
महिला व विधवा महिलाही मागे नव्हत्या. महाडच्या विरेश्वर मंदिरातही स्वदेशी
प्रचारकांच्या बैठका होत. लोकांच्या आर्थिक विकासासाठी स्वदेशी असा ठामपणे
प्रचार करीत.
रायगड जिल्ह्यातून सीमापार केलेले दत्तात्रय कुंटे
गुप्तपणे मुंबईतून जिल्ह्यातील आंदोलकांशी संपर्क ठेवून होते. मुंबईत ते
नवाकाळ मध्ये रायगडमधील आंदोलनाबाबवत लिहित असत. त्यामुळे त्यांना मुंबईत
अटक करून पनवेलमध्ये खटला भरण्यासाठी आणले. तथापि पॅरोलवर असताना ते फरारी
आल्यावर त्यांना वन्हाडात अचलपूरला पकडण्यात आले. रामभाऊ मंडलिक व एम. आर.
गोसावींना कारावासातून मुक्त केल्यावरही दररोज पोलीसठाणे अथवा चावडीवर
हजेरी लावावी लागे. २१९
जिल्ह्यातील आंदोलनाची तीव्रता ऑगस्ट १९३२
अखेरपासून खूपच कमी झाली. मात्र काँग्रेसजनांना अटक करण्याचे सत्र
पोलिसांनी जून १९३३ पर्यंत चालू ठेवले होते. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील
मंडलिकांसारख्या प्रतिमहकारबादी काँग्रेसजनांचा गट फेब्रुवारी १९३३ च्या
प्रारंभापासूनच आंदोलन पूर्ण स्थगित करण्याची मागणी करीत होता. काँग्रेस
अध्यक्षांनी आंदोलन स्थगित केल्यावर जिल्ह्यातील आंदोलन थांबविण्यात आले.
सविनय
कायदेभंग आंदोलनाची महत्त्वाची फलश्रुती म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात
झालेला लोकांचा सहभाग होय. पूर्वी केवळ पाश्चिमात्य विद्या प्राप्त केलेले
पांढरपेशा
२२५ कित्ता, १६ एप्रिल आणि १२ जून १९३२.
२१७ कित्ता, ३० मे १९३२.
२२८ कित्ता, २६ जून, ३ जुलै व ७ ऑगस्ट १९३२.
*१९ मराठा, ११ डिसेंबर १९३२.
रामभाऊ मंडलिकांचे काँग्रेस अध्यक्ष माधव श्रीहरी अणेंना पत्र, १ फेब्रुवारी १९३३.
***
रायगड जिल्ह्यातील सविनय कायदेभंग आंदोलनात भाग घेतलेल्या शेकडो
काँग्रेसजनांची सरकारी गुप्त कागदपत्रांत नोंद आहे. त्यापैकी पुढील नावे
वारंवार आढळून येतात. ही यादी अपूर्ण असून केवळ प्रतिकात्मक आहे. विनायक
मोरेश्वर गोविलकर, बसंत महादेव वेदक, रामचंद्र नारायण मंडलिक, विष्णू
नारायण मंडलिक, विनायक नारायण लिमये, दत्तात्रय काशिनाथ कुंटे, मखाराम
जनार्दन भागवत, त्रिबक नारायण बेडेकर, विष्णू त्रिबक ठोसर, परणराम रामचंद्र
दाते, जनार्दन विष्णू लेले, दत्तात्रय शंकर गोडबोले, नारायण लक्ष्मण
आघारकर, चुनिलाल कालिदास गुजर, तुळजाराम मेथा गुजर, जगन्नाथ खळे, आत्माराम
महादेव आटवणे, पितांबर गोकुळ मेहता, केशव गणेश गुप्ते, प्रभाकर केशय
गुप्ते, विमल गुप्ते, जनार्दन केशव दामले, विठ्ठल कृष्णा गुजर, सर्वोत्तम
महाले, दामोदर मोकाशी, वामन गोविंद लिमये, एम. आर. गोसावी, यशवंत
द्वारकानाथ देशमुख, श्रीधर भोईर, चापसी पुरषोत्तम ठक्कर, ही मोरेश्वर जोशी,
गणपत रघुनाथ लिमये, नथू पोशा म्हात्रे, कुंडलिक जोमा पाटील, प्रभाकर गणेश
प्रधान, मोतीराम रामचंद्र म्हात्रे, तुकाराम गवत्या पाटील, दामा गणू पाटील,
तुकाराम पानसरे, दामोदर पटवर्धन, मधुसुदन शंकर चिटणीस, नरहर शृंगारपुरे,
विष्णू दिनकर पेंडसे, गणेश साठे, नबू रामचंद्र मोडक.
आधुनिक काळ
११७७
वर्गातील
लोक आंदोलनात सहभागी होत असत. तथापि १९३०-१९३३ च्या आंदोलनात शेतकरी,
शेतमजूर व इतर व्यवसायांचे लोक अधिक प्रमाणात सहभागी झालेत. शेतकऱ्यांच्या
प्रश्नांना वाचा फुटली. साराबंदीसारखी मोहीम गरीब लोकांपर्यंत पोहोचली.
खोत, सावकार व धनिकांनाही आपले मार्ग बदलावे लागले. गांधीजींच्या
आवाहनानुसार अस्पृश्यता निवारणास लोक अनुकूल होऊ लागले. उदाहरणार्थ,
अलिबागला १९ सप्टेंबर १९३२ रोजी ७०० सवर्ण व अस्पृश्यांनी सत्यनारायणाची
महापूजा एकत्र केली. याच महिन्यात अशा महापूजा उरण, कर्जत, रोहा व महाडला
देखील झाल्या. उन्हेरे सारख्या गावी (पेण तालुका) महात्मा गांधींच्या
आवाहनानुसार अस्पृश्यता निवारणासाठी जाहीर सभा झाली. भोर संस्थानाच्या
प्रमुखांनी शाळा, धर्मशाळा, न्यायालय व चावडचा अस्पृश्यांना खुल्या केल्या.
पोयनाडला अस्पृश्यांसाठी बिहीर खुली केली. महिलांचा अभूतपूर्व सहभाग ही
सविनय कायदेभंग आंदोलनाची भाणखी एक विशेषता होती.
व्यक्तिगत सत्याग्रह
नोव्हेंबर
१९४० पासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत सत्याग्रह करण्यात आला.
१९३०-१९३३ च्या सविनय कायदेभंग आंदोलनातील बऱ्याच काँग्रेसजनांनी या
सत्या-ग्रहात भाग घेतला व कारावास पत्करला. हा सत्याग्रह गांधीजींनी
निर्धारित केलेल्या पद्धती-नुसारच करावयाचा असल्याने त्यासाठी
सत्याग्रहींची निवड करण्यात येत असे. काही व्यक्तींनी दोनदा तीनदा कारावास
पत्करला. प्रभाकर सदाशिव तथा साने गुरुजी यांच्या-सारखा गांधीवादी रायगड
जिल्ह्यात सत्याग्रहाचे वातावरण निर्माण करीत असताना पेण येथे पकडला गेला.
भोर राजवटीखालील पाली परिसरात देखील खालसा मुलखा-प्रमाणे सत्याग्रहाचे
वातावरण होते. पालीचे गोविंद रामचंद्र तथा बापूसाहेब लिमये यांचे-सारखे
सत्याग्रही खालसा मुलखात आंदोलनासाठी येत. लिमयेंना उन्हेरे येथे
सत्याग्रहासाठी अटक केली होती. जिल्ह्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी
सत्याग्रह करून काराबास पत्करला. भारतातील पहिले व्यक्तिगत सत्याग्रही
विनोबा भावे गागोद्याचे होते.
२११ होम डिपार्टमेंट स्पेशल ब्रँच, फाईल क्रमांक ८०० (७४) २०, साप्ताहिक अहवाल, ३ जुलै व ७ ऑगस्ट १९३२.
२११ होम डिपार्टमेंट स्पेशल ब्रँच, फाईल क्र. १०२० (५) सी (१९).
*** कित्ता. गोविंद रामचंद्र लिमयेंचा येथे प्रतिकात्मक म्हणून उल्लेख केला आहे.
*** त्यांच्यापैकी काही सत्याग्रहींची नावे पुढे दिली आहेत :-
गोविंद
रामचंद्र लिमये, दत्तात्रय काशिनाथ कुंटे, एन. पी. ठोसर, विनायक नारायण
लिमये, परशराम रामचंद्र दाते, जनार्दन विष्णू लेले, आचार्य जगन्नाथ ढवण,
विनायक मोरेश्वर गोविलकर, सर्वोत्तम पांडुरंग महाले, विवक नारायण
बेडेकर,
भाऊसाहेब नेने, धारकर, चिंतामणशास्त्री जोशी, वसंत वेदक, तुळजाराम मेहता,
चुनिलाल मेहता, चापशी पुरषोत्तम ठक्कर, मालू कुशावा पादीर, भाऊसाहेब राऊत,
अप्पा गोरे, कुलकर्णी (रोह्याचे शिक्षक), आबा पन्हाळे, डाऊर (उरणचे), गणपत
लिमये, हरिभाऊ महाजन, ग. भा. पंडित, म्हात्रे, तुकाराम सावळाराम पानसरे,
गजानन यज्ञेश्वर म्हसकर, पितांबर गोकुळ मेहता, धुंडिराज विनायक वैद्य,
सीताराम विश्वनाथ टिळक (जिल्हा
काँग्रेस समितीचे अध्यक्ष), दगडू मालू तळेगावकर, रमाबाई सर्वोत्तम महाले.
वाम ३५-१२
१७८
इतिहास
छोडो भारत आंदोलन
छोडो
भारत आंदोलनाची काँग्रेस समाजवाद्यांनी मांडलेली मूळ कल्पना प्रथम स्वीकृत
केली महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेलांनी. क्रिप्स योजनेची विफलता,
व्यक्तिगत सत्याग्रहाचे अपयश आणि जपानची महायुद्धातील जोरदार आगेकूच या
कारणांनी गांधीजींनी भारताच्या विमोचनासाठी निर्णायक लढा देण्याचा निर्धार
केला. सेवाग्रामला झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत गांधीजींचा
छोडो भारत ठराव नऊ दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर १४ जुलै १९४२ रोजी संमत
झाला. सेवाग्रामच्या ठरावास "वर्धा ठराव" म्हटले जाते.
वर्धा ठरावावर ५
ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेस कार्यकारिणीने मुंबईत पुनर्विचार करून त्यास
अंतिम स्वरूप दिले. अंतिम स्वरूप प्राप्त झालेला कार्यकारिणीचा ठराव ५
ऑगस्ट रोजीच जाहीर करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ७-८
ऑगस्टच्या अधिवेशनापूर्वीच छोडो भारत ठराव जाहीर करण्याचा हेतू असा होता
की, इंग्रज सरकारला अपप्रचार करण्यास संधी मिळू नये. गोवालिया टैंक
मैदानावर ७-८ ऑगस्टला अखिल भारतीय काँग्रेस समितीने कोणतीही दुरुस्ती न
करता छोडो भारत ठराव संमत केला. मुंबई शासन व केंद्र सरकारच्या
पूर्वनियोजित धोरणानुसार महात्मा गांधींना मुंबईत ९ ऑगस्टच्या पहाटेपूर्वी
अटक करण्यात आली व काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सभासदांवर व मुंबई
राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांवर झडप घालण्यात आली.
महात्मा गांधी
आणि काँग्रेस श्रेष्ठींना अटक झाल्यावर कुलाबा जिल्हा काँग्रेसची मंडळी
गुप्तपणे मुंबईतील खेतवाडीत जमली व त्यांनी आपापल्या पद्धतीने आंदोलन चालू
ठेवावे असे ठरविले. बहुतेक सर्व नेते भूमिगत झालेत, काही मुंबईत राहिलेत पण
बहुसंख्य जिल्ह्यात गुप्तपणे परतलेत. श्रेष्ठींना अटक केल्याचे वृत्त ९
ऑगस्टच्या दुपारपर्यंत पनवेल, पेण, अलिबाग, कर्जत, महाड, उरण इत्यादी भागात
वणव्यासारखे पसरले. मुंबई नगरातील आंदोलनाच्या बातम्या व विशेषतः ९
ऑगस्टच्या शिवाजी पार्कवरील अभूतपूर्व घटनांचे वृत्त कुलाबा जिल्ह्यात
अल्पावधीतच पोहोचले.
कुलाबा जिल्हा काँग्रेस अंतर्गत काँग्रेसच्या
अधिकृत कार्यक्रमाशी बांधीलकी असलेले काँग्रेसजन तसेच काँग्रेस समाजबादी
कार्यकर्ते होते. काँग्रेस समाजवादी पक्ष मूळ काँग्रेस-मध्ये विलीन करण्यात
आला तरी देखील हा समाजवादी गट आपल्या विचारसरणीनुसार आंदोलन चालविण्यास
कटिबद्ध होता. आंदोलनाचा प्रारंभ झाल्यावर सरकारने दडपशाही मूरू केल्याने
सामान्य जनता देखील सरकारच्या विरोधात गेली. म्हणून अल्पावधीत आंदोलक
भूमिगत झाले आणि घातपाती कारवाया करण्यास प्रारंभ झाला. दिनांक ९-१०
ऑगस्टला आंदोलनाचा प्रारंभ होताच जिल्ह्यातील दूरसंचरण व्यवस्था विस्कळित
करण्यावर स्वातंत्र्य सैनिकांनी लक्ष केंद्रित केले. मुंबईपासून पुणे,
दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व केरळपर्यंतचे
दूरसंचरण या जिल्ह्यातून होत असल्याने ही यंत्रणा विस्कळित करण्यावर
काँग्रेसने पहिल्यापासून जोर दिला. दक्षिण भारताशी असलेल्या मुख्य दूरसंचरण
व्यवस्थेच्या संरक्षणासाठी सरकारनेही बरीच तजवीज केली होती. तरी देखील
काँग्रेसला या कामी वरेच यश मिळाले. कुलाबा जिल्ह्याच्या पश्चिम भागातून
चालणारे दूरसंचरण विस्कळित करण्यात काँग्रेसला प्रारंभापासून मोठे यश
मिळाले. जिल्हा पोलीस अधीक्षकाने गोपनीय अहवालात स्पष्ट कबुली दिली की,
१३-१४ ऑगस्ट पासूनच जिल्ह्या-तील सर्व तारायंत्र व्यवस्था पूर्णपणे कोलमडली
असून जिल्हा मुख्यालय अलिबाग येथून
आधुनिक काळ
१७९
किंवा
अलिबागला पाठवायचे सर्व तार संदेश पोस्टाने मुंबईमार्गे पाठवावे लागत.
मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेलला १६ ऑगस्टला दुपारी झालेल्या गंभीर
घटनांबाबत पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकाऱ्याला १७ ऑगस्टच्या
सायंकाळपावेतो काहीच वार्ता कळ शकली नाही. पोलीस अधीक्षक लिहितो की, पनवेल
घटनेची वार्ता अलिबागला समजली ती पनवेल मामलेदारांचा शिपाई समक्ष आल्यावर
आणि या बातमीची सत्यता पटली १८ ऑगस्टला. तारायंव निकामी झाल्यामुळे
बरिष्ठांना माहिती पुरवण्यासाठी खास दूत पाठवावे लागत. परिणामतः पनवेलच्या
बंदोबस्तासाठी पोलीस दल घेऊन जाण्यास पोलीस अधीक्षकाला अदमासे ६० तास
लागले."
जिल्ह्यातील दूरसंचरण व दळणवळण बंद झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक
आपली व्यथा सप्टेंबरमधील महाड बंडाचा अहवाल पाठवितानाही व्यक्त करतो.
तेव्हा देखील संपूर्ण जिल्ह्यातील तारायंत्र बंद होते. महाड व खोपोलीकडे
अलिबागहून जाणाऱ्या रस्त्यांवर दगड, तोडलेली आहे व लाकडे ठेवून अडथळे
निर्माण करून पुलांची नासधूस करून ठेवली होती. म्हणून पोलिसांना कारवाई
करणे दुरापास्त झाले होते. दळणवळणाच्या अभावी पोलीस मंत्रणा हतबल झाली
होती.""
महादेवभाई देसाई यांचे पुण्यात निधन झाल्याची बातमी १६ ऑगस्टला
दुपारी १२ वाजता पनवेलला पोहोचताच तेथील वातावरण फार तापले. पनवेलचे चापसी
पुरषोत्तम ठक्कर यांनी दुखवट्याची सभा साडेतीन वाजता घेऊन सरकारविरुद्ध
जनमत जागृत केले व सरकारी इमारतीचा ताबा घेतला, इमारतीवर तिरंगा झेंडा
फडकवला. ही बातमी शहरा-तील पोलीस ठाण्यावर पोहोचण्यास एक तास लागला.
मामलेदाराला वृत्त समजले तथापि तो आपल्या घराबाहेर न पडता त्याने पोलिसांना
हवी तशी कारवाई करण्याचा निरोप पाठविला. तालुका दंडाधिकारी म्हणून त्याने
आदेश तर काढला नाहीच परंतु खास सूचनाही दिली नाही. पोलीस घटनास्थळी
येण्यापूर्वीच सभा आटोपली व जमाव मोर्चाने पुढे निघाला होता. नजीकच्या
तळोजा गावी गेलेल्या अधिकाऱ्याला बोलवण्यासाठी पोलीस ठाण्यातून दूत पाठवावा
लागला. अधिकारी आपल्या पथकासह पनवेलला आल्या-नंतरही लोकांचा मोर्चा
अडविण्यात पोलिसांना यश आले नाही. छोडो भारतच्या घोष-वाक्याने प्रेरित
झालेले विद्यार्थी, मजूर व व्यापारी यांच्या जमावाने पोलिसांना चकविले.
जमावाने काही पोलिसांना गणवेष, पट्टा व पगडी फेकून देण्यास सांगण्यासही कमी
केले नाही. जमावाला सामोरे जाण्यास स्थानिक पोलीस तयार तर नव्हतेच पण
त्यांनी निसटून पोलीस ठाण्यात आश्रय घेतला. अस्वस्थ झालेला पोलीस अधीक्षक
पनवेलला ६० तासांनी पोहोचल्यावर त्याने डिफेन्स ऑफ इंडिया रूल ५६ (४) खाली
नेत्यांना अटक करून खटले भरले. तथापि अशा कारवाईचा लोक हताळ पाळून निषेध
करीत. त्यानुसार चापसी ठक्कर सारख्या काँग्रेस नेत्यास सहा जणांसह
सिद्धापराधी ठरवून शिक्षा ठोठाव ल्याचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये हरताळ
पाळण्यात आला. आपल्या पोलीस दलासह पोलीस अधीक्षकाला पनवेलमध्ये ठाण मांडून
बसावे लागले.""
२२६ होम डिपार्टमेंट स्पेशल बँच, फाईल क्रमांक १११० (६)-ए- (२०), १९४२, पोलीस अधीक्षकाचे पोलीस महानिरीक्षकास पत्र, १९ ऑगस्ट १९४२.
**० कित्ता, पोलीस अधीक्षकाचा तार संदेश.
२२८ कित्ता, पोलीस अधीक्षकाचे पोलीस महानिरीक्षकास पत्र, १९ ऑगस्ट १९४२०
१८०
इतिहास
प्रारंभापासूनच
विद्यार्थी आंदोलनात उतरले होते. पनवेल, पेण व अलिबागच्या हाय-स्कूलचे
विद्यार्थी- मुले व मुली देखील आंदोलनात सक्रीय भाग घेत. ही मुले-मुली
गुप्त कारवायांद्वारे जनमत तयार करीत. उदाहरणार्थ, अलिबागच्या तरुणांनी
बीचवर सभा घेऊन उघड आंदोलनाचाही पवित्रा घेतला. मोर्चा काढल्याबद्दल या
प्रसंगी सात विद्यार्थ्यांना डिफेन्स ऑफ इंडिया रूल ५६ (४) खाली सक्त मजुरी
झाली. अलिबागचे राष्ट्रतेज पाठिंबा देत होते. ठकूताई आगाशे, सरस्वती
लिमये, दुर्गा लिमये व तारा रेड्डी यांनी सक्रिय भाग घेतला.
पेणमध्ये
विनायक नारायण लिमये व त्यांचे बंधु डॉ. मुकुंद लिमये यांच्या घरी गुप्त
खलबते चालत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येई. त्यांचे घर जणु काय
काँग्रेस हाऊस बनले होते. त्यांच्यावर पोलिसांची कडक नजर होती. यथावकाश
आपल्या काही कुटुंबियांसह त्यांना अटक करण्यात आली. पनवेल व महाडचे धनिक व
व्यापारी आंदोलनासाठी पैसे देत. सर्व जातीचे लोक आंदोलनास मदत करीत.
उदाहरणार्थ, पेण जवळील वाशीचे महार तारायंत्र तोडण्यात सामील असल्याचे
पोलिसांना आढळले. त्यांचेपैकी चार महार कार्य-कर्त्यांवर खटलाही भरण्यात
आला. आंदोलन जसे सरकारविरुद्ध होते तसे सरकारला मदत करणाऱ्यांविरुद्धही
होते. काँग्रेसला विरोध करणान्या अशाच एका व्यापाऱ्याच्या पेण गावाबाहेरील
घासलेटच्या गुदामास आंदोलकांनी आग लावली. त्यांचा उद्देश त्या व्यापाऱ्याचे
नुकसान करणे हा नसून सरकारला आव्हान देणे हा होता. माणगाव तालुक्यातील
आंदोलनाचे सूत्रसंचालन खरवली सारख्या दुर्गम गावातून चालत असे. तेथील खादी
भांडारात आंदोलकांचे केंद्र होते. खरवलीच्या ६०० शेतकऱ्यांनी धडक मोर्चा
काढून शासन यंत्रणेला आव्हान देण्यासही कमी केले नाही.
स्वातंत्र्य
आंदोलनासाठी वित्तबळाची गरज होती. म्हणून सुखवस्तू लोकांच्या वरसई गावातील
एका श्रीमंत सावकाराच्या घरी आंदोलकांनी डाका घालून राष्ट्रीय कार्यासाठी
सहा हजारावर रुपये हस्तगत केले. या डाक्याचा हेतू चोरी करणे हा नसून
राष्ट्रीय आंदोलना-साठी निधी गोळा करण्याचा होता है शासनालाही माहीत झाले.
छोडो
भारत आंदोलन एकसमयावच्छेदेकरून जिल्हाभर पसरवण्यासाठी ठिकठिकाणी भूमिगत
संघटना उभारलेली असल्याची पोलिसांना शंका होती. भूमिगत संघटनेचे मुख्यालय
मुंबईत होते. गजानन यज्ञेश्वर म्हसकर, दत्तात्रय काशिनाथ कुंटे, आचार्य
जगन्नाथ गणपत ढवण, दिगंबर विनायक तथा नाना पुरोहित आणि विठ्ठल लक्ष्मण
कोतवाल कुलाबा जिल्ह्यातील भूमिगत आंदोलनाचे पुढारी होते. कुंटे मुंबईतून
मार्गदर्शन करीत. जगन्नाथ ढवण यांचा भाऊ वाळण खुर्द गावाचा पोलीस पाटील
असून महाड तालुक्यातील आंदोलनाची खलबते त्यांच्या घरी चालत. म्हसकर व ढवण
यांनी आंदोलनासाठी तालुका नेते नेमून बिरवाडीच्या नाना पुरोहितांकडे महाड
तालुक्याची जबाबदारी सोपविली. विठ्ठलराव कोतवाल यांनी कर्जत तालुक्याची
जबाबदारी घेतली. माणगाव तालुक्याची
२२१ कित्ता, पोलीस अधीक्षकाचे जिल्हा दंडाधिकाऱ्यास पत्न, २४ ऑगस्ट १९४२.
कित्ता, ९ सप्टेंबर १९४२.
***
कित्ता, ९ सप्टेंबर १९४२. या मोचति शंकर गोपिनाथ गांधी, रामा महाडिक व
वैद्य हे प्रमुख होते (दिगंबर विनायक पुरोहितांची मुलाखत, १६ जून १९९२).
*** सासवण्याचे म्हसकर यांनी राष्ट्रीय चळवळीसाठी बाहून घेतले, तर गणेश भास्कर पंडितांचे कामही उल्लेखनीय होते.
आधुनिक काळ
१८१.
सूत्रे
खरवलीच्या खादी केंद्रातून हलविण्यात येत." पनवेलमध्ये वेदक हे जुने
काँग्रेसजन कार्यरत होते. कर्जत, नेरळ, बदलापूर, वांगणी, माथेरान परिसरातील
बीजतारा आणि अंबरनाथपासून कर्जत, खंडाळधापर्यंतचा लोहमार्ग विस्कळित
करण्याची कामगिरी कोतवालांनी उचलली होती. सर्व गटांचे काम स्वतंत्त्ररीत्या
चाले.
महाडचे बंड छोडो भारत आंदोलनाचे उद्दिष्ट नोकरशाहीचे मनोधैर्य
खच्ची करून संपूर्ण शासन यंत्रणा खिळखिळी करून इंग्रजांना राज्य करणे अशक्य
करून ठेवणे हे होते. त्याचा एक भाग म्हणून महाडला मोठे बंड उभारण्याचा
काँग्रेस समाजवादी गटाचा उपक्रम होता. महाडला समांतर शासन यंत्रणा स्थापन
करावयाची होती. म्हणून नाना पुरोहितांनी या उपक्रमाला साजेशी पूर्वतयारी
अदमासे १० ऑगस्ट १९४२ पासून सुरू केली. मोठे आंदोलन उभारण्यासाठी महाडची
निवड करण्यास तशीच कारणे होती. सन १९३८ पासून काँग्रेस समाजवादी मंडळी
शेतकरी आंदोलन चालवित होती. सन १९४१ मध्ये बिरवाडीला पुरोहितांनी शेतकरी
परिपद भरविल्यापासून या आंदोलनास बरीच गती मिळाली. व्यापक आंदोलनात शेतकरी व
शेतमजुरांचा सहभाग आवश्यक असल्याने समाजवाद्यांनी जमीनदार व कुळे
यांच्यातील संघर्ष वाढविला होता. खोती पद्धतीवरून काही जमीनदार खोत आणि
कुळांमध्ये अनेक दशकांपासून तणाव निर्माण होत. या पार्श्वभूमीचा काँग्रेस
समाजवाद्यांनी उपयोग करून १९४२ च्या प्रारंभापासून जमीन-दारांच्याविरुद्ध
आणि पर्यायाने सरकारविरुद्ध जनमत तयार केले होते. बिरवाडीच्या शेतकरी
परिषदेपासून सरकारविरुद्ध खूप असंतोष भडकला होता. गुप्त प्रचार पत्रकेही
काढली जात. महाडच्या बंडाआधी अशाच प्रचार पत्त्रकांसाठी महाडच्या एका
व्यक्तीला डिफेन्स ऑफ इंडिया अधिनियमाखाली शिक्षाही झाली (७ सप्टेंबर
१९४२). तथापि सरकारच्या कारवाईचा त्याच दिवशी महाडमध्ये जाहीर निषेधही झाला
होता. या निषेध प्रकरणी सरकारने सात जणांना शिक्षा ठोठावली होती.
पुण्याचे
दहा जण खडकवासला व भोरच्या संस्थानी भागातून पायी चालत बाळण खुर्द गावी २५
ऑगस्टचे सुमारास आले होते. खरे तर नाना पुरोहित गुप्तरीत्या हालचाली करीत
असल्याची पोलिसांना पूर्वकल्पना होती. तथापि या हालचालींमधून एवढे मोठे
आंदोलन उभे राहील हा त्यांना अंदाज आला नाही. तरी देखील पोलिसांनी
बिरवाडीवर छापा घातला, परंतु पुरोहित हाती लागले नाहीत.
दिनांक १
सप्टेंबर १९४२ रोजी काँग्रेस समाजवादी गटाची पुण्यात बैठक झाली व महाड
मोर्चासाठी १० सप्टेंबर हा दिवस ठरविण्यात आला. पुण्याहून राष्ट्र
सेवादलाचे निवडक कार्यकर्ते पाठविण्याचे ठरले. मोर्चाच्या चार दिवस आधी
बिरवाडी व शेलटोली गावांच्या दरम्यान एक छावणी उभारण्यात आली. याची बातमी
पोलिसांना समजल्याचे कळताच कार्यकर्ते तेथून निसटले. नंतर बाळण खुर्दला
छावणी उघडण्यात आली. पुण्याचे
*** होम डिपार्टमेंट स्पेशल बँच, फाईल क्रमांक १११० (६)-ए- (२०), १९४२.
*" पुरोहितांची मुलाखत. शेतकरी चळवळीची म्हणजे खोती निर्मूलनाची सुरुवात
सुरेंद्रनाथ टिपणिसांनी माणगावला शेतकरी परिषद भरविल्यापासून झाली होती.
होम डिपार्टमेंट स्पेशल बँच, फाईल क्रमांक १११० (६)-ए- (२०), १९४२, ११ सप्टेंबर १९४२ चा अहवाल.
२४६ कित्ता, जिल्हा दंडाधिकाऱ्याचे गृह सचिवास पत्त्र, ११ सप्टेंबर १९४२.
१८२
इतिहास
स्वयंसेवकही
तेथे आले. दिनांक ९ सप्टेंबरच्या रात्री सर्व आंदोलक बाळण खुर्दच्या
छावणीवर जमा आल्यावर डोंगरी पायवाटेने ते मध्यरात्री शैलटोलीस पोहोचले.
आणखी काही शेतकरी तेथे सामील झाले. नाना पुरोहितांच्या नेतृत्वाखाली
नजीकच्या खैरट गावाहून मोर्चा मध्यरात्री निघून पहाटे ४ वाजता नडगावला
पोहोचला. तेथे थोडी विश्रांती घेतल्यायर सर्व लोक पुढे निघाले. नडगाव-शेडाव
जवळ एका वसमधून अवल कारकून जाताना दिसताच त्याला लोकांनी खाली उतरवले.
थोड्या अंतरावर मंडल निरीक्षक, बेलीफ व एक शिपाई दिसताच त्यांनाही पकडून
मोर्चात सामील करून घेतले. या चार शासकीय कर्मचाऱ्यांना खादीचा पोषाख घालून
व तिरंगा झेंडा हाती घेऊन मोर्चापुढे चालण्यास भाग पाडले.
समोर तिरंगा
झेंडा, हातात काठ्या, खांद्यावर कांबळ व डोक्यावर गांधी टोप्या घातलेली ही
कृषक सेना शासन यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी निघाली होती. कुलाबा जिल्हा
दंडाधिकाऱ्याच्या मते मोर्चाचे स्वरूप सशस्त्र कृषक सेनेसारखे होते. ("To
all appearances the mob was like an armed peasant rising ").***
मोर्चाने
प्रथम डाकघर ताब्यात घेऊन कागदपत्रांची होळी केली, परंतु त्यांना पोस्टाची
तिजोरी फोडता आली नाही. तारायंत्र मात्र निकामी करून टाकले. महाडच्या
मिलिटरी भरती अधिकाऱ्याच्या कार्यालयाची मोडतोड केली. इतक्यात २५ लाठीधारी
पोलीस घेऊन फौजदार आला व त्याने जमावावर लाठीमार मुरू केला. लाठीमाराचा
आंदोलकांनीही प्रतिकार केला. त्यामुळे काही पोलीस जखमी होऊन खाली पडले व
बाकीचे पळून गेले. जमावाने फौजदाराला ताब्यात घेऊन त्याला खादी टोपी घालून
मोर्चाच्या अग्रभागी चालण्यास सांगितले. मोर्चा विठोबा मंदिराजवळ आल्यावर
पोलिसांनी भयंकर गोळीबार सुरू केला. गोळीबारात नथू दौलत टेकावले, अर्जुन
कानू भोई, वसंत बळवंत दाते व कमलाकर विठ्ठल दांडेकर हे स्वातंत्र्य सैनिक
हुतात्मा झाले. मोर्चाच्या अग्रभागी असलेला अवल कारकूनही गोळीबारात बळी
पडला. या शासकीय कर्मचाऱ्याला पोलिसांनी अनव-धानाने ठार केले. दरम्यान
जमावाने पोलिसांकडील सर्व (६) बंदुका हिसकून घेतल्या व त्यांना निशस्त्र
केले. अल्पावकाशात पोलीस निरीक्षक पिस्तूल रोखून सरसावला. परंतु जमावाने
पोलिसांकडून हिसकून घेतलेल्या बंदुका त्याच्यावर रोखताच तो पळून गेला. पुढे
महाडचा मामलेदार मोर्चाजवळ आला, परंतु मोच्र्याच्या पुढाऱ्यांपुढे त्याने
शरणागती पत्करली.
अल्पावधीत पोलिसांची एक सशस्त्र तुकडी माणगावहून
महाडला आली. त्यांनी गांधार नाध्यापासून गोळीबार करण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या या नवीन तुकडीला तोंड देणे कठीण असल्याने नाना पुरोहितांनी
मोर्चा पांगविला. सर्व लोक आडमार्गाने निघून गेले. स्वतः पुरोहित देखील
भूमिगत झाले. पोलिसांनी धरपकडीचे सत्र सुरू केले. मोर्चात सामील
२१७राम
बिवलकर, नाना पुरोहित एका क्रांतिकारकाची जीवनकथा, १९७४, पृ. १२-१४.
मोर्चात प्रामुख्याने बिरवाडी, शेलटोली, खैरट, सावनी, दहिवड, वाळण खुर्द,
वाळण बुद्रुक, देवघर, छत्री निजामपूर, वारंगी, माटवण, वाघोली व बोरगावचे
खेडूत होते.
** होम डिपार्टमेंट स्पेशल बँच्च, फाईल क्रमांक १११० (६)-ए- (२०), १९४२, जिल्हा दंडाधिकाऱ्याचे गृह सचिवास पत्र, ११ सप्टेंबर १९४२.
आधुनिक काळ
१८३
नसलेल्या
लोकांनाही पोलिसांनी पकडले, कारण खरे आंदोलक तोपावेतो भूमिगत झालेले होते.
पुरोहितांवर दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. परंतु ते हाती लागले
नाहीत. पुढे ते पुणे, मुंबई, कराची, लाहोर, बनारस इत्यादी ठिकाणी भूमिगत
राहिले.
जिल्हाधिकाऱ्याला हे वृत्त रात्री मुंबईत समजले. त्यानंतर
त्याने पुण्याहून सेनादलाची मागणी केली. अलिबागला समक्ष जाऊन बंडाची बातमी
देण्याची कामगिरी सब-पोलीस प्रॉसिक्यूटर, एक कारकून व पशुवैद्याने केली.
कारकुनाने एक खाजगी मोटरगाडी मिळवून दासगावला गेला. तथापि तेथील तारायंत्र
निकामी झालेले असल्याने माणगावच्या मामले-दाराकडे गेला. रोहयाच्या
मामलेदारासही नागोठणे पोलीसठाण्यातर्फे बातमी पोहोचवली. कारकून माणगावहून
धरमतर व पुढे अलिबागला पोहोचला. मुंबई शासनाने या कारकुनाला
कर्तव्यनिष्ठेसाठी अब्बल कारकून पदी खास पदोन्नती, रोख बक्षिस आणि इतर
फायदे देऊन त्याचा जाहीर गौरव केला.
मोर्चात ५०० लोक सहभागी होते. एकूण
१४१ जणांबर डिफेन्स ऑफ इंडिया रूल व भारतीय दंड संहितेखाली माणगाव
दंडाधिकाऱ्यापुढे खटला भरण्यात आला. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस समितीने
तयार केलेल्या क्रांतिकारी कार्यक्रमाचा तपशील असलेले एक पत्त्रक पोलिसांना
महाडमध्ये सापडले. क्रांतिकारांना काही कातकरी आदि-वासींनीही मदत केल्याचे
पोलिसांना आढळले. पुण्याहून आलेले भूमिगत आंदोलक भोर संस्थानी भागात
निसटले,
बंडानंतर महाड परिसरात शासनाने सेनाबलाच्या सहाय्याने दहशत
निर्माण केली. त्याचा एक भाग म्हणून हवाई दलाची तीन विमाने महाड शहरावर
घिरट्या घालत होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी अधिक पोलिसांची
मागणी केली.
महाड बंडाचा सूड घेण्याच्या हेतूने शासनाने या परिसरातील
गावांवर एकूण ३५,००० रुपयांचा सामूहिक दंड ठोठावला. त्यापैकी महाड शहराकडून
२०,००० रुपये, विरबाडीतून ७,०००, वाळण खुर्द २,०००, बाळण बुद्रुक १,०००,
आणि शेलटोली, माटवण, खैरट, दहिवड, सावनी, छत्त्री निजामपूर, वारंगी,
बाधोली, देवघर व बोरगाव या दहा गावांकडून महाड बंडाचा मुख्य खटला ठाणे
सत्त्र न्यायालयाच्या मते महाड मोर्चाचा उद्देश प्रत्येकी ५०० रुपये
सक्तीने वसूल केले. न्यायालयापुढे चालविण्यात आला. सत्त्र
**बिवलकर, पूर्वोक्त, पृ. १५-३७; पुरोहितांची मुलाखत.
होम डिपार्टमेन्ट स्पेशल बँच, फाईल क्रमांक एस. डी. ५-३०५५, जिल्हा-धिकान्याचे गृह सचिवास पत्र, ५ ऑक्टोबर १९४२.
**"महाड मोच्र्य्यातील प्रमुख व्यक्तींची नावे खाली दिली आहेत:-
महाडचे
चुनीलाल मिठा शेठ, सुंदरराम मिठा शेठ, बाळकुभाई बुटाला, परशुराम मधूर शेठ,
जयराम रघुनाथ उपाध्ये, तात्या जोशी व कृष्णा हेळेकर; बिरवाडीचे नाना
पुरोहित, तुकाराम सावंत, गणू सावंत, तुकाराम उंबरकर, भिवा खेतल, भिबा
तटकरे, विठ्ठल चांभार, लक्ष्मण अण्णाजी तरे, पांडुरंग खाशाबा देशमुख; वाळण
खुर्दचे धोंडू पाटील, सखाराम भगत, भिवा नारायण पवार, माधव शेठ ढवण,
कोंडिराम उत्तेक व गणेश जाधव आणि बाळण बुद्रुकचे बाळकू शेठ वाणी, सखाराम
पाटील इत्यादी.
पोलीस अधीक्षकाचे पोलीस महानिरीक्षकास पत्त्र, २५ सप्टेंबर १९४२.
२५ होम डिपार्टमेन्ट स्पेशल बँच, फाईल क्रमांक १११० (८) बी (१६), १९४२.
१८४
इतिहास
सरकारच्या
निरंकुश सत्तेला आव्हान देणे असा होता. तसेच सशस्त्र आंदोलकांनी सरकारशी
उधडपणे मुकाबला केला. म्हणून न्यायालयाने आरोपीना सक्त मजुरीच्या प्रदीर्घ
मुदतीच्या शिक्षा दिल्या. जबर शिक्षांचे समर्थन करताना न्यायालयाने म्हटले
की, पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले, फौजदारास व मामलेदारास बांधून मोर्चाच्या
अग्रभागी चालण्यास भाग पाडले आणि अवल कारकुनास खादी पोषाख घालून काँग्रेसचा
झेंडा घेऊन मोर्चाच्या पुढे चालण्यास भाग पाडले आणि आंदोलकांनी बेडर
वृत्ती दाखविली, या कारणांनी आरोपी कठोर शिक्षांना पात्र आहेत. इतर
संशयितांवरील खटला महाड व माणगावच्या न्यायालयापुढे चालला. महाड प्रकरणाची
केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतल्याने हे प्रकरण १९४२ च्या स्पेशल क्रिमिनल
कोर्टस ऑडिनन्स नंबर २ खाली विशेष न्याया-धीशाकडे सोपविले. क्रिमिनल
कोर्टापुढील खटला चालू असतानाच उपरोक्त वटहुकूम रद्दबातल ठरल्याने केंद्र
सरकारने नवीन वटहुकूम (१९४३ चा ऑडिनन्स नंबर १९) जारी केला.
विठ्ठल
लक्ष्मण कोतवाल आणि भूमिगत आंदोलन विठ्ठल लक्ष्मण तथा भाई कोतवालांनी छोडो
भारत आंदोलनात महान योगदान देऊन आत्मबलिदान केले. इंग्रजांशी लढता लढता बीर
मरण पत्करून जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी स्फूर्ती दिली.
भाई कोतवाल काँग्रेस समाजवादी विचारप्रणालीचे पुरस्कर्ते असून त्यांचा
पुणे-मुंबईच्या काँग्रेस समाजवादी नेत्यांशी संपर्क होता. अण्णासाहेब
सहस्त्रबुद्धे, स्वामी आनंद व केदारनाथ अप्पाजी कुलकर्णी (पालीचे) त्यांचे
सदुपदेशक होते. कोतवाल माथेरान-नेरळ-कर्जत परिसरातील गावांमध्ये सुप्रसिद्ध
होते. मुंबई शासनाने एका गोपनीय अहवालात भाई कोतवालांचा "मॅन ऑफ दि पीपल"
असा उल्लेख केला आहे.
छोडो भारत आंदोलनाचा प्रारंभ होण्यापूर्वी युसुफ
मेहेरअलींच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात काँग्रेस समाजवादी युवकांची जी
गुप्त बैठक झाली त्यात भाई कोतवाल होते. आंदोलनाचा प्रारंभ झाल्यावर
साम्राज्यवाद्यांचा युद्ध-प्रयत्न कसा हाणून पाडावयाचा त्याबाबतचा एक
आराखडा या बैठकीत तयार करण्यात आला. लोहमार्ग उखडून मालगाड्या पाडणे, वीज
पुरवठा बंद पाडणे याचा त्यात समावेश होता. मुंबई व पुणे शहरांचा वीज पुरवठा
बंद करण्यासाठी कुलाबा जिल्ह्यातील भिरा, भिवपुरी व खोपोली बीज
केंद्रांपासूनच्या बीजवाहिनी तारांचे पायलॉन पाडण्याचा या योजनेत अंतर्भाव
होता. ही कामगिरी कोतवालांनी स्वीकारली.
कित्ता, ठाणे सत्र न्यायाधीश आर. डी. शिदे यांचे २३ ऑक्टोबर १९४३ चे निकालपत्र.
कित्ता.
हरिभाऊ
धोंडोपंत भडसावळेंची मुलाखत, २ जून १९९२. कोतवाल माथेरानचे असून (जन्म १
डिसेंबर १९१२) १९४१ पासून कर्जतला वकिली करीत. त्यांनी माथेरान नगरपरिषदेचे
सभासद म्हणून व कर्जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळा-द्वारे सामाजिक कार्य
देखील केले होते.
* मुंबई शासनाचा केंद्र सरकारला पाठविलेला गोपनीय पाक्षिक अहवाल, जानेवारी १९४३ चा पहिला पंधरवडा.
रामलाल श्रीवास्तव, हुतात्मा कोतवाल स्वातंत्र्य समरातील एक पर्व, १९७५, पृ. ९-१० (प्रस्तावना).
आधुनिक काळ
१८५
प्रारंभापासूनच
भाई कोतवाल भूमिगत झाले आणि मुंबईला जलविद्युत पुरवठा करणारी कुलाबा
जिल्ह्यातील वीज केंद्र व वीजतारा खंडित करण्यासाठी त्यांनी भूमिगत संघटना
उभारली. मुंबईतील भूमिगत संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांनी
स्थानिक संघटनेची बांधणी केली. एक "आझाद दस्ता" स्थापन करून त्यांनी
राष्ट्र सेवादलाच्या प्रणालीनुसार आत्मसमर्पणासाठी तत्पर असलेल्यांचे पथक
उभारले. कोतवालांनी कर्जत तालुक्याची जबाबदारी घेतली होती. कर्जत व्यतिरिवत
कल्याण तालुक्यातही कोतवाल कार्यरत होते. या परिसरातील बीजतारा व त्यांचे
पायलॉन कापणे आणि अंबरनाथपासून खंडाळ्धापर्यतचा लोहमार्ग विस्कळित करण्याची
कामगिरी त्यांनी हाती घेतली. कोतवालांच्या आझाद दस्त्यात गोमाजी रामा
पाटील, हिराजी पाटील, हरिभाऊ भडसावळे, आर. बी. पोफळे यांच्यासारखे धाडसी
आंदोलक होते.
भाई कोतवालांनी गांधीजींच्या तत्त्वांना धक्का न लावता
घातपाती काम केले. अहिंसेवर श्रद्धा असली तरी साम्राज्यवादी इंग्रज सरकारला
राज्य करणे अशक्य करण्याचे काँग्रेसचे ध्येय असल्याने घातपाती कारवायांचा
मार्ग अनुसरला. त्यासाठी कोतवालांनी आझाद-दस्ता मधील स्वातंत्र्य
आंदोलकांना शस्त्रे पुरविली. त्यांचे साथीदार पोलिसांच्या बंदुका हस्तगत
करीत, हिसकून घेत. भूमिगत कामासाठी त्यांना मुंबईतील काँग्रेसच्या गुप्त
केंद्राकडून वित्तबल मिळत असे. बहुजनसमाजात त्यांच्याविषयी सद्भावना तर
होतीच शिवाय जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या सैनिकांना ते सढळ हाताने पैसे
पुरवित. म्हणून कोतवालांमागे भक्कम संघटना होती. गुप्तवार्ता अन्वेषण
अधिकारी पहिल्या-पासून त्यांच्या मागावर असले तरी अंधारात चाचपडत होते.
कालांतराने गुप्तचरांना थोडी थोडी माहिती मिळू लागली. शेवटी गुप्तचरांना
त्यांचा ठावठिकाणा लागला तोही द्रव्यलोभी खबऱ्यांमुळेच.
भाई कोतवाल व
गोमाजी पाटलांचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला शासनाने प्रत्येकी ५,००० रुपयांचे
बक्षिस लावले होते. पायलॉनच्या घातपाती कामात त्यांना वाघाचा पाडा म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणचे कातकरी मदत करीत. मानिवलीचे गोमाजी रामा पाटील व
त्यांचा मुलगा हिराजी आणि आर. बी. पोफळे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत.
कर्जत-खंडाळा लोहमार्गावरील घाटातील क्रमांक ९ चा बोगदा उडवून रेल्वे
दळणवळण बंद करण्याची त्यांची धाडशी योजना होती. त्यासाठी जवळच्या धाक जंगल
भागातील दोन-तीनशे खेडूत त्यांनी संघटित केले होते. घातपाताव्यतिरिक्त
सरकारला कर वा
२५९ कित्ता.
२५० याशिवाय रामलाल बन्सिलाल श्रीवास्तव,
भास्कर शंकर पिपळे, शरद यशवंत जकातदार, दत्तात्रय नागप्पा पै, पांडुरंग
सदाशिव भोळे, भास्कर तांबट, राघो नागो भगत, हरी नारायण देशमुख, रघुनाथ
देशमुख, काशिनाथ मराणे, भाऊ विठू पाटील, गणपत भाऊजी देशमुख, जगन्नाथ केशव
क्षीरसागर, बाबू भाऊ क्षीरसागर, बंडोबा क्षीरसागर, धोंडू केशव देसाई,
मारुती गणपत कोळी, डॉ. चिटणीस, दगडू खूपचंद शहा, यशवंत सदाशिव देहेरकर,
गजानन नाईक, राईलकर, इत्यादी ५०-६० स्वातंत्र्य सैनिक होते. यातील काही जण
घात-पाती कारवायांचे नियोजन करीत तर काही आंदोलनासाठी सामग्री तयार करीत.
(हरिभाऊ भडसावळे यांची मुलाखत, २ जून १९९२).
१८६
इतिहास
शेतसारा न भरण्याची मोहीमही त्यांनी चालविली आणि शेतकऱ्यांना मोहिमेत सामील करून घेतले.
कुलाबा
जिल्ह्यात अदमासे १९५ किलोमीटर लांबीच्या मुख्य वीजवाहिनी तारा होत्या.
त्यापैकी बराच भाग कोतवालांच्या कार्यकक्षेत होता. वीजतारा अथवा पायलॉन
कापणे व लोहमार्ग विस्कळित करण्यासाठी कोतवालांनी तीन पथके उभारून
त्यांच्या स्वतःच्या पथकाकडे उत्तर व ईशान्य कर्जत तालुका होता. गोमाजी
रामा पाटलांकडे आग्नेय आणि दक्षिण कर्जत तर पोफळेच्या पथकाकडे नेरळ तळेगाव
भाग सोपविला होता. पोफळेंच्या पथकातील २५ सशस्त्र स्वातंत्र्य सैनिकांनी
नेरळ-माथेरान लोहमार्गावरील जुम्मापट्टी स्थानकातील संरक्षित दारुगोळा
कोठार लुटून बंदुकीची दारु, फ्यूज तारा आणि स्फोटक द्रथ्ये आंदोलन
कार्यासाठी हस्तगत केली होती. या लुटीच्या वेळी काहींनी युरोपियन पोपाख
घातला होता. या धाडसी कारवाईने गासन देखील सचित झाले होते.
सप्टेंबरच्या
प्रारंभी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्याने जिल्हाधिकान्यास सांगितलेल्या
हकीकतीवरून वांगणी जवळील घातपात पूर्वनियोजित असून जाणकार तंत्रज्ञांनीच
केला असावा. पायलॉन कापल्याने कंपनीचे बरेच नुकसानही (४,००० रुपयांवर)
झाले. म्हणून पायलॉनच्या संरक्षणासाठी सुरक्षा दल तैनात करणे शासनाला भाग
पडले. तरी संरक्षण व्यवस्थेला दाद न देता कोतवालांचे सहकारी अधिकाधिक
घातपात करू लागले. ऑक्टोबरच्या १० तारखेला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पायलॉन
कापण्यात आले. गुप्तचरांच्या अंदाजानुसार दोन मुख्य घातपाती पथके असावीत.
शासनाला ही बाब चिंताजनक बाटत होती. कारण पुणे-मुंबईचा वीज पुरवठा खंडित
झाल्यास शासनाच्या युद्ध-प्रयत्नांना बाधा येऊन जनता व कारखानदारांचे मनोबल
कमकुवत झाले असते. एका सशस्त्र पथकाचा २८ ऑक्टोबरला पायलॉन कापण्याचा
प्रयत्न यशस्वी झाला असता तर मुंबईत त्याचे वाईट परिणाम झाले असते. मात्र
पुढच्याच दिवशी जी. आय. पी. रेल्वेचा बीजतारांचा महत्वाचा पायलॉन जमीनदोस्त
करण्यात आला. या दिवशी कल्याणजवळचे चोला वीज केंद्र बंद पडले असते तर
रेल्वे बाहतूक पूर्ण बंद पडली असती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी
शासनाने बीजप्रवाह व लोहमार्गावरील घातपातांची जवाबदारी नजीकच्या गावातील
खेडुतांवर टाकून त्यांना गस्त पथके काढण्यास फर्माविले. शिवाय
मुंबई-कल्याण-पुणे, कल्याण-भुसावळ व मुंबई-सुरत मार्गाच्या संरक्षणासाठी
मिलिटरी पथके तैनात केलीत.
शासकीय मुरक्षा यंत्रणा वाढत असली तरी
घातपातही वाढत राहिला. म्हणून शासनाने गाव-गस्त पथके व पोलीस आणि
सेनादलाव्यतिरिक्त उत्तम शस्त्रांनी सुसज्ज
१२११ होम डिपार्टमेन्ट स्पेशल बँच, फाईल क्रमांक (३७)-१, १९४२-४३, १ डिसेंबर १९४२ चा अहवाल.
कित्ता, १० डिसेंबर १९४२ च्या कर्जत परिषदेचा अहवाल.
होम डिपार्टमेन्ट स्पेशल बेंच, फाईल क्रमांक एस. डी. ५-२७९४, १० सप्टेंबर १९४२.
"मुंबई शासनाचा गोपनीय पाक्षिक अहवाल, ऑक्टोबर १९४२ चा पहिला पंधरवडा. खरे तर वर सांगितल्याप्रमाणे घातपात करणारी तीन पथके होती.
*** मुंबई शासनाचा गोपनीय पाक्षिक अहवाल, ऑक्टोबर १९४२ चा दुसरा पंधरवडा.
आधुनिक काळ
१८७
अशी
गव्हर्नरची खास युरोपियन बॉडीगार्ड सेना नेरळ, वांगणी, बदलापूर व अंबरनाथ
भागात तैनात केली. तरी देखील २० व २५ नोव्हेंबर दरम्यान आंदोलकांनी तीन
धाडसी हल्ले करून पायलॉन कापण्याचे प्रयत्न केलेतच. स्वातंत्र्य सैनिक
प्राणपणाने गनिमी लढाई करीत. अंबरनाथजवळील पायलॉनच्या संरक्षणासाठी
ठेवलेल्या पोलीस चौकीवर ४ डिसेंबरला १०० आंदोलकांच्या सशस्त्र पथकाने हल्ला
करून पाच बंदुका व गोळीबाराची सामग्री हिसकून घेतली. आंदोलकांनी सुरक्षा
दलागी निकराचा लढा दिला. या गंभीर प्रकरणाने शासन चितेत पडले आणि खास
रेल्वे गाडीने अजमेर रेजिमेन्टच्या चार पलटणी अंबरनाथ व कर्जतला पाठविल्या.
राज्याच्या पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि गव्हर्नरला या प्रकरणी खास
लक्ष घालावे लागले. नेरळजवळील मानिवली गाव परिसरात भूमिगत आंदोलकांचे
केंद्र होते. तथापि मुरक्षा दलाला कोणालाही पकडणे शक्य झाले नाही. अतिरिक्त
गृह सचिवाने रेल्वे दूरध्वनीवरून गुप्तचरांना दिलेल्या गोपनीय सूचनांची
बातमी भूमिगत पुढा-यांना समजली, म्हणून सुरक्षा दलाचे प्रयास वाया गेले.
शासनाला करता आले फक्त आपल्या शक्तीचे प्रदर्शन. लोकांना जरब बसावी म्हणून
कर्जत गावात सेनादलाने संचलन केले. तथापि कर्जतच्या दोन पलटणीना धोका
असल्याने लवकरच त्या अंबरनाथला स्थलांतरित कराव्या लागल्या. गुप्तचरांची
फार कुचंबणा होत असे. जनतेकडून त्यांना कोणतेही सहकार्य किवा माहिती मिळत
नसे. कुणीही तोंड उघडत नसे. या उलट लोक पोलिसांच्या हालचालींची माहिती
भूमिगत नेत्यांना पुरवित. शासनाच्या दृष्टीने ही फार मोठी अडचण होती.
सशस्त्र पोलिसांबरील हल्ल्याने ठाणे व कुलाबा जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक तर
फारव गोंधळून गेले होते. लोकांच्या सहकार्याअभावी त्यांचे प्रयत्न विफल
होत असत." कर्जतला सेना अधिकारी व बरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन वेळा
परिषदा घेण्यात आल्या. बीजतारांच्या संरक्षणासाठी भिरा-धारावी वीजमार्गावर
७१ गाव-गस्त पथके ठेवलीत, खोपोली-परळवर ४०, भिवपुरी-धाराबीवर २० आणि
भिवपुरी-खोपोलीवर २९ पथके तैनात केलीत. शिवाय १२ पोलीस पथके आणि सेनादल
होतेच. तरी देखील भूमिगत आंदोलक सुरक्षा अधिकाऱ्यांना हुलकावण्या देत. Ha
खंडाळा
घाटात मालगाडी पाडून लोहमार्ग बंद पाडण्याचाही भाई कोतवालांनी प्रयत्न
केला. पायलॉन कापण्याच्या कामी त्यांना काही शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील
मदत केली. मदत करणारांमध्ये वीज कंपनीचेही कर्मचारी असत.
डिसेंबरच्या
शेवटच्या दिवसापर्यंत कोतवालांच्या मार्गदर्शनाखाली भूमिगत आंदोलन चालू
राहिले. परंतु चुकीच्या माणसाच्या चांगलेपणावर विश्वास ठेवून त्याच्या हाती
चिठ्ठी दिल्यामुळे सरकारी यंत्रणेस फावले. ती चिठ्ठी मिळालेल्या
द्रव्यलोभी खबऱ्यांनी ३१ डिसेंबर १९४२ रोजी ठाणे पोलिसांन। भाई कोतवालांची
माहिती सांगून त्यांच्या सिद्धगडावरील गुप्त आश्रयस्थानी नेण्याची तयारी
दर्शविली. या संधीचा
२९६ कित्ता, नोव्हेंबर १९४२ चा पहिला व दुसरा पंधरवडा.
२५० होम डिपार्टमेन्ट स्पेशल बँच, फाईल क्रमांक १११० (३७)-१, १९४२-४३.
२६८ कित्ता.
२९९ शशिकांत तु. चव्हाण, भारतीय स्वातंत्र्य समरातील झुंझार क्रांतीवीर हुतात्मा भाई कोतवाल, १९८९, पृ. ५८.
कित्ता, प्रस्तावना.
१८८
इतिहास
उपयोग
करून ठाण्याचा उप जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निवडक
सशस्त्र दलासह १ जानेवारी १९४३ ला आडमार्गाने निघाले. एकोणसाठ किलोमीटरची
जंगली भागातून रपेट करीत ते २ जानेवारीला सकाळी ६-१५ वाजता बोरवाडी जवळील
सिद्धगड किल्ल्याजवळ पोहोचले. पुढील बाट बिकट असल्याने वरील अधिकारी
आठजणांसह कोतवालांच्या आश्रयस्थानी पोहोचले. पथकातील सर्व जण बेसावध असताना
पोलिसांनी हिराजीला टिपले. कोतवालांची नेमबाजी चांगली होती. तथापि
काडतुसांचा साठा असलेला साथीदार जवळ नसल्याने त्यांना गोळीबारास
प्रत्युत्तर देता आले नाही. काही साथीदार झोपलेले होते. अशा परिस्थितीत
सहाय्यक अधीक्षकाने कोतवालांच्या सहकाऱ्यांना घेरले आणि उप अधीक्षकाने
कोतवालांवर गोळचा झाडल्या. या गोळीबारात भाई कोतवाल व हिराजी पाटलांना वीर
मरण आले. हिराजीचे वडील गोमाजी पाटील व इतर सहकारी पकडले गेले. या कारवाईत
पोलिसांना बराच दारुगोळा व शस्त्रे मिळाली.
वीर कोतवाल व हिराजीला
हौतात्म्य प्राप्त झालेले घटनास्थळ कर्जत, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व पुणे
जिल्ह्यातील खेड तालुक्यांच्या सीमेवरील वालिवरे गावापासून ६.४ कि. मी.
अंतरावर सिद्धगडावर आहे. कोतवाल व हिराजी ८-९ दिवस बालिवरे गावातील
'चौद्याचा दरा" येथे राहत असून ते ठिकाण कर्जतपासून ५६ कि. मी. आहे.
कोतवालांच्या हौतात्म्यस्थळी कुलाबा, ठाणे व पुणे जिल्ह्यांच्या सीमा एकत्र
येतात.
सामर्थ्यशाली इंग्रज सरकार खिळखिळे करण्याची महत्त्वाकांक्षा
बाळगणाऱ्या झंझावाती तरी गांधीवादीच राहिलेल्या भाई कोतवालांचा अशा प्रकारे
अंत झाला. त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलिसांनी भयानक हाल केले. २९ जणांवर
खटला भरण्यात आला. कोतवाल केस म्हणून हा खटला चालविण्यात आला. तथापि
त्यांच्या पथकाचे काम पुढे चालू राहिले व शासनाच्या आशा फोल ठरल्या.
अल्पावधीत श्रीवास्तव आणि हरिभाऊ भडसावळेसारख्या सहका-यांनी कोतवाल पथकाचे
पुनर्संघटन करून घातपात पुन्हा चालू केले. रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने
विलक्षण महत्त्व असलेल्या लोहमार्गावरील मुंबईजवळच्या पारसिक बोगद्यानजीक
घातपात करून वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न या पथकाने केला. या पथकाचा
सातान्याच्या प्रतिसरकार भूमिगतांशी परस्पर संबंध होता. प्रतिसरकारचे
पुढारी इकडे येत. एकमेकांना मदत करीत. याचा प्रत्यय बीर कोतवालांच्या
पहिल्या पुण्यतिथीच्या वेळी आला. पुण्यतिथीच्या दोन दिवस आधी
पुण्या-मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बीजतारांचे मुख्य पाच पायलॉन एकाच
दिवशी कापून हाहाःकार उडवून देण्याची भूमिगतांनी योजना आखली. त्यानुसार या
पथकाने शेडंग, सुकेली खिंड व लोणावळचा-जवळील पायलॉन एकाच वेळी कापले व २९
जानेवारी १९४४ च्या रात्री ८ वाजता मुंबई व पुणे ही शहरे काळोखात बुडाली.
या नगरांमध्ये बराच वेळ वीज नव्हती. अशा प्रकारे बीर कोतवालांची पहिली
पुण्यतिथी त्यांच्या अनुयायींनी साजरी केली. भडसावळे-
१०२ श्रीवास्तव, पूर्वोक्त, पृ. ६८-६९.
*** जिल्हा पोलीस अधीक्षकाचा २ जानेवारी १९४३ चा अहवाल.
कर्जत तालुका दंडाधिकाऱ्याचा शासनास अहवाल, ८ जानेवारी १९ ४३.
***
हरिभाऊ भडसावळेंची मुलाखत. शेडंगच्या कारवाईचे मुख्य भडसावळे होते.
उन्हेरेजवळील सुकेली खिंडीजवळील पायलॉन कापला राजाभाऊ चांदोरकरांच्या
पथकाने. लोणावळयाजवळच्या घातपाताचे मुख्य होते पांडुरंग भोळे व दगडू खूपचंद
शहा.
आधुनिक काळ
१८९
श्रीवास्तव पथकाच्या भूमिगत
कारवाया कुलावाव्यतिरिक्त मुंबई व उपनगर भागातही चालू होत्या.
स्फोटकांमध्ये पिक्रिक अॅसिडचा उपयोग करून त्यांनी पश्चिम रेल्वेवरील
गोरेगाव स्थानकाजवळ दोन रूळ वाकवून मार्ग बंद केला. युद्ध सामग्रीचे
उत्पादन करणाऱ्या गोरेगावजवळील एक्सेल कारखान्यातून त्यांना रासायनिक
पदार्थ व सामग्री मिळत असे. या शिवाय डहाणू जवळही त्यांनी घातपात करून
सेनादलाच्या सामग्रीस आग लावली. या पथकातील आरोपींच्या खटल्याचे कामकाज
ठाणे सत्र न्यायालयात चालू असताना कोर्ट दालनाच्या छतावर त्यांनी टाईम
बॉम्बचा स्फोट घडवून आणण्याचेही धाडस केले. छोडो भारत आंदोलनातील
महाराष्ट्रामधील हा बहुधा शेवटचा बॉम्ब-स्फोट असावा असा दावा केला जातो.
कुलाबा
जिल्ह्यात १९४२ ते १९४४ पर्यंत झालेल्या घातपातांची यादी वरीच मोठी आहे.
त्यात आंदोलनास विरोध करणाऱ्या संस्थांच्या शाळांना आग लावणे, नेरळ व
भिवपुरी आणि बदलापूर व वांगणी दरम्यान रेल्वे गाड्यांचा वीज प्रवाह तोडणे,
पेणच्या न्यायालयास आग लावणे, डाकघरे जाळणे अशा प्रकारच्या कारवायांचा
समावेश होता. कोप्रोली, मानिवली, वांगणी, बदलापूर, आंबिवली भागातील बऱ्याच
घटनांचाही त्यात समावेश होता. महाड व पनवेलच्या माध्यमिक शाळा आंदोलकांनी
जाळून टाकल्या. साराबंदीची मोहीम गुप्तपणे चालवून सरकारी महसूल घटबिला.
संस्थानांचे
विलिनीकरण छोडो भारत आंदोलनानंतर स्वातंत्र्य प्राप्ती जवळ आल्याने
जिल्ह्यातील जंजिरा व भोर संस्थानांखालील प्रदेश स्वतंत्र भारतात विलीन
करून तेथील प्रजाजनांनाही भारतवासीयांप्रमाणे स्वराज्य मिळण्यासाठी मोहीम
सुरू करण्यात आली. जंजिरेकरांची १९४६ च्या उत्तरार्धात मुंबईत एक परिषद
भरविण्यात आली व प्रजापरिषद नावाची संघटना सुरू करण्यात आली. प्रजापरिषदेचे
पहिले अधिवेशन श्रीवर्धन तालुक्यातील दिवे-आगरला न. वि. गाडगिळांच्या
अध्यक्षतेखाली भरले. दुसरे अधिवेशन शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली
मुरुडला भरले. भोर संस्थानातील प्रजाजनांनीही प्रजापरिषद निर्माण करून
आपल्या स्वातंत्र्याकरिता जोरदार मागणी केली. दि. वि. पुरोहित, गोविंद
लिमये, राजाभाऊ चांदोरकर, दत्तात्रय काशिनाथ कुंटे, मोहन धारिया, भडसावळे,
सदाशिव बागाईतकर वगैरे मंडळींनी जंजिरा व भोर संस्थाने विलीन करण्यासाठी
मोहीम चालविली.
जंजिरा संस्थानात मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन हे तालुके
असून हे संस्थान दोन बेटांच्या मुरुडचे व दुसरे म्हसळा आणि श्रीवर्धनचे.
एका बाजूस समुद्र त्यामुळे संस्थानाचा जमिनीवरून संपर्क फक्त गोरेगावच्या
एका त्यावर कडक पहारा असे. जंजिरा किल्ल्यात नबाबाचे लष्कर स्वरूपात होते--
एक बेट व तीन बाजूंनी खाडी. पुलावरून होऊ शकतो. व दारुगोळा होता. नबाबाचा
राजवाडा मुरुडला होता.
भारत स्वतंत्र झाल्यावर हिंदुस्थानातील बरीच
संस्थाने भारतात विलीन झाली होती. तथापि जंजिरा संस्थानचा सीदी नबाब
पाकिस्तानात विलीन होण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यामुळे नवावाविरुद्ध
आंदोलन करणे हाच मार्ग होता. प्राप्त परिस्थितीत नाना पुरोहितांनी लोकांचे
नेतेपद स्वीकारून जन आंदोलन उभारले. यापूर्वी म्हणजे १९४२
२० कित्ता.
द. का. कुंटे, वाटचाल, पृ. ७७, ७९, ८०.
१९०
इतिहास
मध्ये
पुरोहितांनी बाळंद भागातील लोकांचा मामलेदार कार्यालयावर मोर्चा नेला होता
तेव्हा संस्थानी पोलिसांच्या गोळीबारात ४-५ जण मारले गेले होते.
जानेवारी
१९८८ च्या शेवटच्या आठवडयात संस्थान विलिनीकरणासाठी बाळंद खोरे व मुंबईतून
काही मंडळी घेऊन नाना पुरोहितांनी गोरेगाव व म्हसळा दरम्यान असलेल्या
खामगावच्या जंगलात तळ दिला. सोबत इंडियन नॅशनल आर्मीचे जवान व अधिकारी
देखील होते. प्रथम म्हसळा व नंतर श्रीवर्धन काबीज करण्याचे ठरले. म्हसळयात
नवाबाचे १,००० हत्यारबंद पोलीस होते. म्हणून म्हसळ्यावर स्वारी
करण्यापूर्वी मोहन धारिया यांना सामोपचाराची बोलणी करण्यासाठी पुढे
पाठविले. परंतु धारियांना परत येण्यास उशीर झाल्याने व त्यांच्या खुनाच्या
अफवेमुळे स्वातंत्र्य सैनिकांचा हत्यारबंद मोर्चा म्हसळचास गेला. मात्र
मोर्चाच्या नेत्यांनी नवावाच्या पोलिसांचे नीतिधैर्य खच्ची करून ठेवल्याने
पोलिसांनी बंदुकी टाकल्यात. या परिस्थितीत स्वातंव्य आंदोलकांनी मामलेदार
कार्यालयाच्या संरक्षक पोलिसांना निशस्त्र केले. त्यामुळे मामलेदाराने
मुकाटचाने कोषा-गाराच्या चाव्या व कागदपत्रांचा ताबा म्वातंत्र्य
सैनिकांकडे सोपविला. अशा प्रकारे म्हसळा तालुका स्वतंत्र होऊन त्याचा
कारभार स्वातंत्र्य सैनिक चालवू लागले. सैनिकांचा जथा पुढे श्रीवर्धनला
गेल्यावर तेथेही मामलेदार शरण आला. म्हसळा व श्रीवर्धनवर स्वातंत्र्य
सैनिकांनी प्रशासक नियुक्त केले.
दिनांक ३० जानेवारी १९८८ रोजी महात्मा
गांधींची हत्या झाल्याने स्वाभाविकपणे सर्व कार्यकर्ते विचलित झालेत. अशा
दुःखद परिस्थितीत त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम स्थगित
ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. म्हसळा व श्रीवर्धन मुक्त झाल्यामुळे व
मुरुडही ताव्यातून जाण्याची खात्री पटल्यामुळे नबाब ३१ जानेवारीला मुंबईला
गेला व मुख्य मंत्री बा. गं. खेरांना भेटून सामीलनाम्यावर सही करायला तयार
झाला. अणा प्रकारे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले. त्यामुळे
मुख्यमंत्र्यांनी आंदोलन थांबवि ण्यास सांगितले आणि कुलाबा जिल्हाधिकाऱ्यास
मुरुडचे मुख्य प्रशासक म्हणून नियुक्त केले. त्यानुसार ५ फेब्रुवारी १९४८
रोजी पुरोहितांनी प्रशासनाचे मुख्य प्रशासकाकडे हस्तांतर केले. आपल्याकडील
आठवडेभराच्या सत्ताकाळात स्वातंत्र्य सैनिकांनी चोख कारभार केला.
मराठ्यांना जिंकता न आलेला जंजिरा जनआंदोलनाने स्वतंत्र केला.
गोवा
मुक्ती आंदोलन: भारत स्वतंत्र होताच कुलाबा जिल्ह्याला स्वराज्य मिळाले.
त्या पाठोपाठ जंजिरा व भोर संस्थानांनाही स्वातंव्य प्राप्त झाले. तथापि
नानासाहेब पुरोहित व त्यांच्या सहकाऱ्यांनी जानेवारी १९८८ मध्ये आखलेला
गोवा मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम वर सांगितल्याप्रमाणे त्यांना स्थगित
ठेवावा लागला होता. ऐतिहासिक व भौगोलिक कोकणाचा भाग असलेला गोवा प्रदेश
पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिला. त्यामुळे गोवा मुक्तीसाठी पुन्हा आंदोलन
करावे लागले. या आंदोलनात कुलाबा जिल्ह्यातील तुळशीराम बाळकृष्ण हिरवे तथा
हिरवे गुरुजी आणि शेषनाथ नानाभाई पितळे तथा शेषनाथ वाडेकर यांनी हौतात्म्य
पत्करले, तर इतर अनेकांनी या आंदोलनात सक्रिय भाग घेतला. गोवा मुक्ती
आंदोलनात या जिल्ह्याचा सहभाग खचितच महत्त्वाचा होता.
*** भडसावळेंना
म्हसळ्याचे तर चांदोरकरांना श्रीवर्धनचे प्रशासक नियुक्त करण्यात आले.
संस्थानाचे पंतप्रधान पद पुरोहितांकडे ठेवण्यात आले.
२०८ श्रीवास्तव, पूर्वोक्त, पृ. १८३-१८६; विवलकर, पूर्वोक्त, पू. ४९-५७.
नागाव
नागाव : (अलिबाग ता. १८० ३५' उ., ७२°५०′ पू.) भरभराटीला आलेले हे गाव अलिबागच्या ईशान्येस ७ कि. मी. आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या रमणीय बागा, लहान मोठ्या पोखरणींनी आणि मंदिरांनी नटलेले व शांत वातावरणाचे गाव असून येथील वस्ती सुशिक्षित आहे. कोकण किनाऱ्यावरील नारळ सुपारीच्या बागायतीची विशेषता येथे दिसते. नागावचे मूळनाव नामग्राम असावे. गावातील एका वाडीत नागांच्या आकृती खोदलेले अनेक दगड आहेत. तथापि त्याचा ग्रामनामाशी निश्चित संबंध काय आहे हे सांगता येत नाही. शिवकाळात नागावला बरीच वस्ती असावी हे १६७४-७५ मधील स्थानिक लोकांची आडनावे व आताच्या लोकांच्या आडनावांतील साधर्म्यावरून वाटते. आंगरे काळात नागाव महालातील वस्ती नागावला एकवटलेली होती. येथे नागेश्वर, भीमेश्वर, बंकनाथ, नारायण, महालक्ष्मी, कोलाई तथा ग्रामदेवता, गणपती व योगेश्वरी मंदिरे आहेत.नागेश्वर मंदिर: हे मंदिर शिवकाळातील असावे. कारण त्याचा जीर्णोद्धार ६ जानेवारी १७७२ रोजी राघोजी आंगरे सरखेल याने केला. मंदिराजवळ १७७३ मध्ये राघोजी आंगरेने एक तळे बांधले आहे. त्याच्या सर्व बाजू चिरेबंदी व तांबडघा दगडाच्या आहेत. नागेश्वराची यात्रा चैत्र शुद्ध पौणिमेला भरते.
भीमेश्वरः हे शिवकालीन मंदिर असून त्याचा १७५८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासाठी पेशव्याचा भाऊ सदाशिवरावभाऊ याची भार्या पार्वतीबाईकडून पैसे मिळविण्यात आले होते. पार्वतीबाई नागावच्या कोल्हटकराची कन्या होती. विठोबा लोंढे याने मंदिरासमोर जीर्णोद्धारानंतर दीपमाळ बांधली. मंदिरासमोरील पुष्करणी १७६४ मध्ये नारंभट रिसबूडने बांधली. येथे दोन फूट चार इंच लांब व दीड फूट रुंद दगडावर शके १२८८ तील २८ ओळींचा संस्कृत शिलालेख आहे. मंदिरात रामनवमीचा उत्सव होतो.
वंकनाथ : हे मंदिर केशव महाजन याने १७६०-६१ मध्ये बांधले. अहिल्याबाई होळकरने १७९० मध्ये मंदिराची दुरुस्ती केली. जेथे मंदिर आहे तेथे जुनी मशीद होती असे म्हणतात परंतु ती कोसळली होती. त्यामुळे मंदिराच्या दक्षिणेस तळघाच्या काठावर महाजनने मशीदही बांधली.
कोलाई तथा ग्रामदेवता : नागावची सर्वात जुनी देवता म्हणून हे मंदिर सर्वात जुने असावे. तथापि शिकालीन असल्याबद्दल संशय नाही. कारण १८२९-३० मध्ये मंदिर मोडकळीस आल्यामुळे नवीन मंदिर बांधण्यात आले.
बेने इस्रायली मंदिर : नागावात सध्याच्या माध्यमिक शाळेजवळ ईशान्येकडील भागास मशीद भाग म्हणतात. काही शतकापूर्वी तेथे इशायली लोकांचे मंदिर होते. त्याच्या पडक्या भिती अजूनही आढळतात.
नागावात जुने तळे असून ते पाथरलीचे तळे म्हणून ओळखले जाते. हे तळे कान्होजी आंगरेने बांधून घेतले. नागावच्या सीमेवर कस नदीचा समुद्राशी संगम होतो. ती जागा स्थानिक तीर्थक्षेत्र समजले जाते. तेथे वामन द्वादशीस भाविक तीर्थस्नान करतात. समुद्रकिनाऱ्यास लागून ग्रामपंचायतीने सुरूच्या झाडांची मोठी लागवड केली असून हे ठिकाण पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
नागोठणे
नागोठणे : (रोहा ता., १८० ३०' उ., ७३० ०५' पू.) हे बंदर दाट झाडी असलेल्या डोंगरात अंबा नदीच्या उजव्या किनाऱ्यावर व नागोठणे खाडीच्या मुखापासून ३८.६२ कि. मी. वर आहे. ते पेणच्या दक्षिणेस २४.१४ कि. मी. तर मुंबईच्या आग्नेयेस ६४. ३७कि. मी. आहे. मागील शतकाच्या अखेरपर्यंत धरमतर नागोठणे जलवाहतुकीच्या मार्गावरून तांदूळ, मीठ व मासे यांची वाहतूक चाले. इ. स. १९५८ मध्ये धरमतर खाडीवर पूल (लांबी ३९७ मी., रुंदी ६.७१ मी., उंची १७ मी.) झाल्याने हा मार्ग बंद पडला. इ. स. १९१४-१५ पर्यंत धरमतर ते नागोठणे स्टीम बोटींद्वारेही वाहतूक चाले. पुढे डिझेलवर चालणाऱ्या बोटींच्या प्रसारामुळे ही सेवा बंद पडली. विशेष प्रसंगी मुंबई ते महाबळेश्वर प्रवासी येथून जात असत. बंदरात गाळ साचल्याने आता जलवाहतूक कमी होते. प्रवासी येथून जात असत. बंदरात गाळ साचल्याने आता जलवाहतूक कमी होते.गुजरातच्या महमूद बेगडाने १४९५ चे सुमारास नागोठण्याला लष्करी तळ उभारून चौलवर सैन्य पाठविले. सन १५३० मध्ये नागोठण्यावर गुजरातची सत्ता होती. सुलतानाचा पराभव करून हे ठिकाण पोर्तुगिजांनी हस्तगत केले. परंतु त्यांनी त्याचा ताबा निजामशहाकडे दिला. नागोठणे १६३६ पर्यंत निजामशाहीकडे होते. तदनंतर मुघलांनी अहमदनगरच्या ताब्यातील कोकणचा भाग हस्तगत करून विजापूरच्या स्वाधीन केला. पुढे दहा वर्षानंतर तो भाग शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. ऑगिल्बी या लेखकाने १६७० मध्ये नागोठण्याचा उल्लेख गुजरातच्या दक्षिण टोकाकडील शहर व उतारपेठ असा केला असून १६७५ मध्ये फायरने त्यास मागठन (Magatan) असे म्हटले आहे. इंग्रज व पेशव्यांमधील १७३९ च्या तहात नेगोठन (Negotan) असा उल्लेख आढळतो. सन १८१८ मध्ये नागोठणे पेणपेक्षा कमी भरभराटीचे गाव होते.
नागोठण्याच्या नैऋत्येस अदमासे एक कि. मी. वरील मुसलमानकालीन पूल हे येथील आकर्षण असून तो १४६.३० मीटर लांब, ५.७९ मीटर उंच व २.९२ मीटर रुंद आहे. पुलाचा अरुंदपणा ही एक विशेषता होय. पुलाची मुख्य कमान २.२३ मीटर आहे. तो १५८० मध्ये चौलच्या काझी बलाउद्दीनने तीन लाख रुपये खर्चुन बांधला असे म्हणतात. कोंसारी खिडीतून निजामशाही सैन्याची आगेकूच सुलभ होण्यासाठी हा पूल बांधला असावा. २२ नागोठण्यात इंडियन पेट्रोकेमिकल्स या उपक्रमाद्वारे वायू विभाजन (गॅस क्रॅकर) प्रकल्प १४ जून १९९० पासून कार्यान्वित झालेला असल्यामुळे या भागाचा कायापालट झाला आहे
१२१ कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ९०३-०४.
अक्षी
अक्षी : (अलिबाग ता., १८० ३५' उ., ७२० ५०′ पू.) हे अलिबागच्या दक्षिणेला सुमारे पाच कि. मी. वर वसलेले सदाहरित खेडे आहे. अक्षी, नागाव आणि रेवदंडा हा बागांचा व नारळी-पोफळीच्या वनाचा पट्टा समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे १३ कि. मी. पसरलेला आहे. गावातील घरे नारळी-पोफळीच्या दाट छायेत वसलेली असून येथील समुद्र किनाऱ्यावर कोळघांची मोठी वसाहत आहे. या गावात साखरखाडीच्या दक्षिणेला सुमारे १.२१४ हेक्टर क्षेत्रफळ असलेला एक जुना तलाव (खोली ४.२६७ मीटर) आहे. हल्ली तलावात गाळ साचल्यामुळे तलाव आटतो. गावात कालिकादेवी व सोमेश्वर महादेवाची जुनी देवळे आहेत. या परिसरात कोकण शिलाहारवंशीय नृपती केशीदेवरायची आणि देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेवचा असे दोन शिलालेख सापडले आहेत.
केशीदेवरायचा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून तो शके ९३४, प्रधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), सुक्रे-शुक्रवार, १६ मे इसवी सन १०१२ या तिथीचा आहे." या शिलालेखात केशीदेवराय-कोकण शिलाहार नृपती, भइर्जु सेणुई महाप्रधान व लुनया-लेख कोरणारा या व्यक्तिनामांचा समावेश आहे. लेखाचा सारांश-कोकणचा राजा चक्रवर्ती केशीदेवराय याचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दान दिले हे नमूद करण्याचा आहे. या लेखाचा शेवट शापात्मक वचनांनी झाला आहे. मराठी भाषेतील उपलब्ध लेखांतील हा पहिला शिलालेख होय असे पुरातत्त्वज्ञ शं. गो. तुळपुळे यांचे मत आहे.
यादव नृपती रामचंद्रदेव याचा शिलालेख संस्कृत व मराठी मिश्र भाषेतील असून देवनागरी लिपीतील आहे. तो शके १२१३ (गत बर्ष), खर संवत्सर, चैत्र शुद्ध ८, शुक्रवार, ९ मार्च इसवी सन १२९१ या तिथीचा आहे. लेखात रामचंद्रदेव यादव नृपती, जाईदेव-यादव नृपतीचा मांडलिक, आणि इश्वरदेव क्षत्निय-जाईदेवाचा दान देणारा पुत्र या व्यक्ति-नामांचा समावेश आहे. लेखाचा सारांश यादव नृपती रामचंद्रदेव याचा मांडलिक जाईदेव याचा पुन इश्वरदेव क्षत्रिय याने उपरोक्त तिथिला देवीला एक गद्याण दान दिले हे नमूद करणे आहे." या दोन्ही शिलालेखांवर चंद्र व सूर्याच्या प्रतिमा आहेत.
सोमेश्वराच्या देवळाजवळ चितशोमणेश्वराचेही जुने देऊळ आहे. गावात सिद्धिविनायकाचे एक देऊळ असून ते बापूजी सिध्दिविनायक मंदिर या नावाने ओळखले जाते. समुद्रकिनाऱ्यास लागून पीराचा दर्गा असून त्याचा नुकताच जीर्णोध्दार केला आहे. तेथे पौष पौर्णिमेला उरूस भरतो.
अंतोरे
अंतोरे : (पेण ता., १८० ४५' उ., ७३० ०५' पू.) गाव पेणपासून २.४ कि. मी. वरील भोगावती खाडीवरील जुने बंदर आहे. चालुक्य राजा अनंतदेव याने बसविलेले आहे. भरतीच्या वेळी सात टनी तर मोठ्या भरतीच्या वेळी ४० टनी बोटी खाडीतून अंतोऱ्यापर्यंत येऊ शकतात. अंतोऱ्याच्या पलीकडे मात्र फक्त लहान होड्या जातात. प्राचीन काळी अंतोऱ्यासे बंदर म्हणून फार महत्त्व होते. परंतु धरमतर बंदराच्या विकासामुळे अंतोऱ्याचे महत्त्व कमी झाले आहे.
मो. ग. दीक्षित यांच्या मते शके ११३२, प्रभव संवत्सरचा आहे. शां. भा. देव, महाराष्ट्र व गोवे शिलालेख ताम्रपटांची संदर्भ सूची, पृ. ३४-३५.
गोरेगाव
गोरेगाव : (माणगाव ता., १८० ०५' उ., ७३० १५' पू.) घोडेगाव म्हणून प्राचीन काळी प्रसिद्ध असलेले हे बंदर दासगांवच्या वायव्येस ९.६५ कि. मी. वर व घोड (गोद) आणि काळ नद्यांच्या संगमाच्या दक्षिणेस ३.२१ कि. मी. वर आहे. प्राचीन काळी हे व्यापारी बंदर होते. परंतु कालांतराने येथील सागरी वाहतूक अत्यंत कमी झाली. टॉलेमीने (इ. स. १५०) गोरेगावचा उल्लेख हिप्पोकुरा (घोडेकुला) असा केला असून बालीपाटणा व हिप्पोकुरा हे सैमुल्ला म्हणजे चौलच्या दक्षिणेस असल्याचे नमूद केले आहे. बालीपाटणा हे पालेपट्टण (पाले नगर) म्हणजेच महाडच्या ३ कि. मी. वर बौद्ध लेणी असलेले पाले असावे, तर हिप्पोकुरा हे साष्टी म्हणजे सालसेटीमधील घोडबंदर असावे. परंतु घोडेगावला असलेल्या नौकानयनाच्या सोयीवरून तेच आताचे गोरेगाव असावे. इ. स. १७१८ पर्यंत घोडेगाव स्थानिक उप विभागाचे मुख्यालय होते. त्यानंतर होजींनी ते पेशव्यांच्या स्वाधीन केले. सन १८२६ मध्ये घोडेगाव हे पुण्याहून देव व कुंभा घाटांमार्गे जाणाऱ्या मार्गावरील प्रमुख ठिकाण होते.गोरेगावच्या उत्तरेकडील एका टेकडीवर अदमासे ८२५ वर्षापूर्वी बांधलेले मल्लिकार्जुन अथवा सिद्धेश्वराचे मंदिर असून त्यातील लिग स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. इ. स. १९०४ मध्ये (शके १८२६) गोविंदशास्त्री रानडे यांनी पंचमुखी गायत्री मंदिर बांधले. हे शाक्त संप्रदायाचे देऊळ जागृत स्थान असल्याचे मानतात. गायत्री देवीची मूर्ती संगमरवरी असून ती जयपूर येथून आणली. देवीच्या पंचमुखातील मधली आदिमाया,
*८८ अॅबट, इंडियन अॅटोक्वरी, खंड २०, १८९१, पृ. १२१..
उजव्या बाजूस गणपती, ब्रह्मदेव व डाव्या बाजूस शंकर व विष्णुचे मुख आहे. देवीच्या गाभाऱ्यात बाराहातांचा विद्याधरगणेश आहे. गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची, मांडी घातलेली, पंचधातूची, अर्धनरनारीश्वर स्वरूपाची आहे. भारतात अशी ही एकमेव मूर्ती आहे असे म्हणतात. या देवळात वेदान्तावरील अंदाजे १,००० ग्रंथ असलेली वेद पाठशाळा होती. येथे वैशाख शुद्ध सप्तमीला व नवरात्रात यात्रा भरते. देवळासमोर दीपमाळ असून जवळच छोट्याशा गाभाऱ्यात प्रवळाचा गणपती आहे. त्याची जयंती वैशाख शुद्ध पौर्णिमेला साजरी करतात. येथे अदमासे २२५ वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर असून ते शिल्पकलेचा चांगला नमुना आहे. त्यातील खांबावरील कोरीव काम उत्कृष्ट आहे. गावाच्या उत्तरेस प्रसिद्ध मुसलमान पीर दाऊद मलिकचा दर्गा आहे. येथे गाव तलाव, विष्णु तलाव व राम तलाब है पुरातन काळातील तलाव आहेत. त्यातील पाण्याच्या सोयीमुळे गोरेगाव व जवळच्या वाकी आणि हुर्डी गावांमध्ये मराठा फौजा मुक्काम करीत असत. त्यामुळे गावात देसाई, पोतदार वगैरे अधिकाऱ्यांची कुटुंबे स्थायिक झालेली आहेत. प्रसिद्ध मराठी साहित्यिक वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालय बांधलेले आहे.
चौल-रेवदंडा
चौल व रेवदंडा (१८० ३३' उ., ७३० ००' पू.) हे वृक्षराजींच्या गर्द छायेत विसावलेले व नारळ-पोफळींच्या बागात लपलेले आणि समुद्र किनाऱ्याने आलिगिलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण अलिबागच्या दक्षिणेस १८ कि. मी. अंतरावर आहे. तसेच ते रोहा शहराकडून पश्चिमाभिमुख वाहणाऱ्या कुंडलिका नदी तथा रोहा खाडीच्या उजव्या म्हणजे उत्तर किनाऱ्याच्या पश्चिम टोकावर आहे. चौल व रेवदंडा ही लागून असलेली स्वतंत्र दोन गावे आहेत. त्यांचा इतिहास सारखा असल्याने एकत्रित माहिती दिली आहे. आता आगरकोट हे रेवदंड्यांच्या आगरकोट जलदुर्गातील स्वतंत्र गाव आहे. त्याचीही माहिती यात समाविष्ट आहे. मुंबईहून लाँचने रेवस व तेथून बसने अलिबागमार्गे चौल-रेवदंड्यास (४२) जाता येते. याशिवाय मुंबई-पनवेल-पेण-अलिबागमार्गे (१२६) व मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली-पेण-अलिबागमार्गे (७८) तसेच खोपोली-पाली-नागोठणेमार्गे चौलला (१००) जाता येते. कोकण रेल्वेमार्गावरील पेण (४८), नागोठणे (५०) व रोहा (४०) या स्थानकांहून चौल-रेवदंड्यास जाता येते.
*** चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या अधिक माहितीस्तव याच ग्रंथातील प्रकरण २-इतिहास पहावे.
१९७कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ७१५.
इतिहास :
ज्ञात इतिहासावरून इ. स. १३० पासून १७८६ पर्यंत चौल हे सतत ऐतिहासिक घटनांचे केंद्र व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रसिद्ध बंदर होते. चौलचे प्राचीनत्व इसवी सनपूर्व १२०० पर्यंत नेता येते. त्याकाळी या स्थानास चंपावती व रेवतीक्षेत म्हणत असावेत. खरे पाहता निसर्गरम्यता व ऐतिहासिक घटना या दोहोंच्या वावतीत जुळ्या भावंडाप्रमाणे चौल व रेवदंडा गावांची जवळीक आहे. प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा प्रभाव एकाच वेळी या दोन्ही ठिकाणांवर होत होता. म्हणूनच या दोन्ही ठिकाणांच्या ऐतिहासिक घटनांची माहिती पुढे एकत्रित दिली असून तेथील सध्याच्या महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची व अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक अवशेषांची माहिती स्वतंत्र दिली आहे. येथील बरेच ऐतिहासिक अवशेष नष्ट होण्याची कारणे नमूद करणे आवश्यक आहे. जुन्या काळच्या इमारती लाकडी असल्याने कालौघात त्यो नष्ट झाल्या. हिंदूंच्या जुन्या दगडी इमारती चौलवरील मुसलमानी अमदानीत व रेवदंड्यातील पोर्तुगीज काळी नष्ट झाल्या. मुसलमान व पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी नंतर बांधलेल्या इमारतींना चुना जास्त लावल्याने जुन्या अवशेषांचे भाग ओळखता येत नाहीत. चौल व्यापारी केंद्र असल्याने त्यास राजधानीऐवजी बाजार व यात्रेप्रमाणेच महत्त्व होते. अनेकदा झालेल्या लढाया, लुटालूट व जाळपोळीमुळेही जुन्या इमारती नष्ट झाल्या. सध्या चौल आणि रेवदंडा येथे नारळ पोफळीच्या बागा झाल्यामुळे ऐतिहासिक काळातील उरल्यासुरल्या वास्तूंचे अवशेष नष्ट झाले. तसेच पुरावशेषांचे दगड भिती बांधण्यासाठी लोकांनी नेल्याने बहुसंख्य पुरावशेष नष्ट झालेत. काही दगड मूळच्या ठिकाणांपासून इतस्ततः विखुरले आहेत. ऐतिहासिक काळात सध्याच्या चौलचा अप्पर चेऊल, नॉर्थ चेऊल, सिटी ऑफ दि मूर्ख व मुसलमान चेऊल व रेवदंडयाचा लोबर चेऊल, साउथ चेऊल, पोर्तुगीज चेऊल असे उल्लेख आढळतात.
चंपावती व रेवतीक्षेत्र या नावांनी गुजरातमध्ये श्रीकृष्ण राज्य करीत होता त्या पौराणिक काळाशी स्थानिक लोक चौलचा संबंध जोडतात. चंपावती हे नाव चंपा नावाच्या झाडापासून, मासे पकडण्यासाठी उपयोगात असलेल्या चंपा नावाच्या जाळयापासून किंवा चंपा नावाच्या राजावरून पडले असावे असे द कुन्हा या पोर्तुगीज लेखकाने लिहिले आहे. तेथे चंपावती देवीचे देऊळही दाखवतात. तसेच रेवतीक्षेत्न हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम याच्या रेवती या पत्नीच्या नावावरून पडले असावे असे म्हणतात. पुरातन काळी या शहरात सोळा लक्ष इमारती, ३६० मंदिरे व. ३६० तळी होती व ते १६ पाखाड्यांमध्ये विभागले होते. यापैकी दोड, दखवाड व मुरड या पाखाड्या मिळून पोर्तुगीज चेऊल झाले असे द कुन्हा म्हणतो.
** कंसातील आकडे किलोमीटरचे आहेत.
केलेले उल्लेख दिलेले आहेत. त्यात प्रामुख्याने चेमूल, तिमूल्ल, सिमूल्ल, सेमूल्ल,
कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पू. ७१६ वर चौलचे विविध लेखकांनी विविधपणे सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमूली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चैल, चौले इत्यादी उल्लेख इ. स. १३० पासून निरनिराळ्या प्रवासी लेखकांनी केलेले दिसतात. हे सर्व मूळ नावाचे अपभ्रंश असून विद्यमान लेखनात चौल हेच ग्रामनाम गृहित धरले आहे.
२०० कित्ता, पृ. ७१७, तळटीप.
वाय ३५-४
चौल हे टॉलेमीने इ. स. १५० मध्ये वर्णन केलेले वसईची खाडी व पालेपट्टण किंवा महाड यामधील Symulla किवा Timulla हे भूशिर आणि बाजारपेठ असावी. या ठिकाणाहून अॅलेक्झांड्रियास गेलेल्या लोकांकडूनच पश्चिम भारताची माहिती आपणास मिळाली असे टॉलेमी नमूद करतो. याच सुमारास (सन १३०) कान्हेरी लेण्यातील दोन शिलालेखांत Chemula असा उल्लेख असून तेथे राहणाऱ्या दोघा भावांनी विहारास देणग्या दिल्याचा त्यात उल्लेख आहे. इ. स. २४७ मध्ये पेरिप्लस नामक प्रवास वर्णनात Semulla ही कल्याणच्या दक्षिणेस असलेली पहिली स्थानिक बाजारपेठ असा उल्लेख आहे. पाचव्या शतकात पुन्हा कान्हेरी लेण्यातील एका शिलालेखात चेमूल असा उल्लेख आहे. इ. स. ५२५ मध्ये एक ग्रीक व्यापारी व भिक्षुने कल्याण व मलबार या बंदरांदरम्यान व्यापारात अग्रेसर असलेले Sibor असा चौलचा उल्लेख केला आहे. तर इ. स. ६४० मध्ये चिनी प्रवासी हिएन-त्सँग याने याच संदर्भात चौलचा Tchi-Mo-Lo असा उल्लेख केला आहे. अल मसूदी (सन ९१५), मुहलहीबू (९४२), अल इस्तसिल (९५०), इब्त होकल (९७६) अल विरुनी (१०३०) आणि जल इड्रिसी (११५३) हे अरब प्रवासी चौलचा सैमूर किंवा जयमूर असा उल्लेख करतात. अरब प्रवासी मसूदी याने इ. स. ९१५ मध्ये सैमूरला भेट दिली तेव्हा तेथे कोकण शिलाहारांच्या (इ. स. ८२० ते १२६०) उत्तरेकडील शाखेचा पाचवा स्थानिक राजपुत्र झंझ राज्य करीत होता. इ. स. ९७० मध्ये सैमूर हे मोठे व सुरक्षित शहर असून तेथे आंबे, नारळ, कांदे व भाताचे पीक भरपूर होते असे प्रवाशांनी वर्णन केले आहे. तेथे हिंदूंशिवाय मुसलमानही मोठ्या संख्येने राहात होते. त्यापैकी काही स्थानिक, काही सिराफ, ओमान, बसरा व बगदादहून आले होते. बरेच जण धनिक व्यापारी होते. त्यांची भाषा लारी म्हणजे गुजराथी होती. याशिवाय ग्रिश्चन, ज्यू व पारशीही होते.
इ. स. १०९४ मध्ये चौदावा शिलाहार राजा अनंतदेवाच्या ताम्रपटात चेमुर्लीचा शुरपारक (सोपारा) आणि श्रिस्थानक (ठाणे) या बंदरांसारखे बंदर असल्याचा उल्लेख केला आहे. बाराव्या शतकात चौल हे मेंदी व नारळाची खूप झाडे असलेले व सभोवतालच्या टेकड्यांवर सुवासिक वनस्पती असलेले चांगले बांधलेले शहर होते असा उल्लेख आढळतो. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांनी चौल माहिमच्या राजाकडून जिंकून घेतले. इ. स. १३१२ मध्ये यादवांकडे असलेले हे ठिकाण व कोकणातील त्यांची इतर प्रमुख केंद्रे अलाउद्दीन खलजीचा (१२९७-१३१५) सरदार मलिक काफूर याने शंकरदेव यादव यास ठार मारून आपल्या आधिपत्याखाली आणली. त्यानंतर अल्पावधीसाठी चौल विजयनगर राज्यात समाविष्ट होते. त्यानंतर ते बहमनींकडे गेले. इ. स. १३५७ मध्ये बहमनी राज्यातील चौल एक महत्त्वाचे शहर होते. पहिल्या अलाउद्दीन बहमनीचा (१३४७-१३५८) पुतण्या मुहम्मद या न्यायी व दयाळू राजाने येथे अनाथांकरिता शाळा काढल्या होत्या. तसेच दुष्काळ पडला तेव्हा त्वरित धान्य वाटपासाठी जी केंद्रे स्थापन केली होती त्यापैकी चौल येथे एक केंद्र होते. इ. स. १३८० मध्ये फेरिश्तान' चौलचा बहमनी राज्यातील एक मोठे शहर व मुख्य बंदर असा उल्लेख केला आहे. सन १३९८ मध्येही चौल हे कोकणातील प्रमुख बंदर होते. फिरुन (१३९७-१४२२) या बहमनी राजाने जगातील विविध देशांतून खास माल आणि बुद्धिमान माणसे आणण्यासाठी चौल येथून जहाजे पाठविली होती. सन १४७० मध्ये रशियन प्रवासी अचनासिअस निकितीन चौलचा चिवील असा उल्लेख करतो. मात्न त्याने चौलच्या व्यापाराविषयी तसेच वैभवाविषयी नमूद केले नाही. निकितीनच्या भेटीनंतर काही वर्षांनी चौल बहमनींकडून अहमदनगरच्या निजामशाहीच्या (१४९६-१६००) आधिपत्याखाली गेले. त्या काळात चौलची प्रमुख बंदर म्हणून चांगली देखभाल ठेवली होती. वर्षमा (१५०३-१५०८) याने चौलचे लढवय्ये लोक, तटबंदी, उत्पादन, व्यापार व सुबत्तेचे फार सुंदर वर्णन केले आहे.
२०९ अधिक माहितीसाठी कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पू. ७१७-१९ पहावे
चाल-श्ववका
सन १५०५ मध्ये पोर्तुगिजांचे चौलमध्ये पदार्पण झाले. इजिप्त व गुजरातचे सुलतान आपल्याला हिंदी महासागरातून हुसकावून लावणार हे समजल्यावरून सर्व मुसलमान आपले शक्तू आहेत असे त्यांना वाटू लागले. त्याप्रमाणे पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा मुलगा डॉम लोरेंको ड अल्मेडा या तरुण नौसेनाधिकाऱ्याने सर्व मुसलमान जहाजांवर हल्ला चढवून त्याचे बरेच नुकसान केले. पोर्तुगिजांची ताकद पाहून अहमदनगरच्या राजाने शरणागती पत्करून बंदराच्या व जहाजांच्या संरक्षणार्थ पोर्तुगिजांना सालिना ६०० पौंड (२,००० सुवर्ण परदाव) देण्याचे मान्य केले. सन १५०८ च्या शेवटी अमीर हुसेनच्या (पसियन) आधिपत्याखाली इजिप्तचे नौदल व दीवचा गुजरात गव्हर्नर मलिक ईआज यांनी एकत्रितपणे पोर्तुगिजांवर हल्ला केला. या युद्धात पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा मुलगा डॉम अल्मेडा मारला गेला. मात्र लगेच दुसऱ्या वर्षी फेब्रुवारी १५०९ मध्ये दीव येथे इजिपंहुच्या नौदलाचा पराभव केल्यामुळे पोर्तुगिजांचा विजय होऊन समुद्रावरील त्यांचे प्रभुत्व सिद्ध झाले. एप्रिल १५०९ मध्ये पोर्तुगीज व्हॉइसरॉयने चौलला भेट दिली व ठरल्याप्रमाणे अहमदनगरच्या बुरहान निजाम शहाने (१५०८-१५५३) सालिना ६०० पौंड देऊन आपल्या व्यापारी जहाजांचे व चौल बंदराचे संरक्षण करण्याच्या अटीवर पोर्तुगिजांशी तह केला. पोर्तुगिजांनी बंदराचे काळजीपूर्वक संरक्षण केले व व्यापारही वाढवला. सन १५१४ मध्ये वारबोसा या प्रवासी इतिहासकाराने चौलला भेट दिली. तेव्हा तेथे अहमदनगरच्या राजाचा मांडलिक सत्ताधारी होता. प्रदेश सुव्यवस्थित ठेवून व खंडणी वसूल करून तो राजास देत असे. त्याच्चे पोर्तुगिजांशी व इतर लोकांशीही चांगले संबंध होते. चौल येथे गोव्याच्या कॅप्टनने नेमलेला अडत्या राहत असे व तो गोव्यात तसेच पोर्तुगीज आरमारास लागणाऱ्या मालाचा पुरवठा करीत असे.
बारबोसाने वर्णन केल्याप्रमाणे चौल त्या काळी फार मोठे शहर नव्हते. भिती बांधिव परंतु गवताने शाकारलेली घरे होती. पावसाळयात गावात जास्त लोक राहत नसत. पावसाळा संपताच डिसेंबरच्या सुरुवातीस व्यापारी लोक माल घेऊन मोठ्या संख्येने येत. त्या अगोदर ते गावापासून अलीकडे ५ कि. मी. थांबत. डिसेंबर ते मार्च या कालावधीत चौल अतिशय गजबजलेले असे. या कालावधीत व्यापारी लोक बैलांच्या पाठीवर पखालीतून माल आणीत. सुरत व गोव्या दरम्यान चौल हे सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. समुद्रमार्गे पर्शियन आखात आणि अरेबियात नारळ मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जात असत व तेथून प्रामुख्याने खजूर व घोडे आयात करीत. दक्षिणेस मलबार, गोवा व उत्तरेस गुजरातबरोबर व्यापार होत असे. बराचसा व्यापार मलबारी जहाजांतून होत असे. मलबारहून नारळ, सुपारी, मसाल्याचे पदार्थ, औषधे, ताडसाखर, कुरुंदाचा चूर आणीत व तो अंतरभागात तसेच गुजरातमध्ये पाठविला जात असे. चौलहून मलवारी बोटीतून गहू, भाजीपाला, कडधान्ये, तांदूळ, तीळ, तिळाचे तेल, तलम रेशमी कापड, सुती कापड नेत. तलम रेशमी तसेच सुती कापड दीवमार्गे अरेबिया व पशियालाही जात असे.
१० स्टॅनलेचा बारबोसा, १६, २८, ३१, ४२, ६८.
सन १५१६ मध्ये अहमदनगरचा बुरहान निजाम शहा (१५०८-१५५३) याने पोर्तुगिजांना रेवदंडा येथे वखार बांधण्यास परवानगी देऊन चौल बंदरात पूर्वपिक्षा जास्त मोकळीक दिली. सन १५२१ मध्ये विजापूरच्या आरमाराने चौल जाळले व पोर्तुगिजांचा पराभव झाला तरी बुरहान पोर्तुगिजांशी मिन्नत्वानेच राहिला. इतकेच नव्हे तर त्याने प्रामुख्याने घोड्यांचा पुरवठा सुरक्षितपणे होण्यासाठी तसेच इतर हेतूने लोअर चेऊलला (रेवदंडा) त्यांना किल्ला बांधण्यास परवानगी देऊन उत्तेजन दिले. मात्र चौलचा मुसलमान प्रांताधिकारी शेख मुहमदने विश्वासघात केला व दीवचा गुजरात प्रांताधिकारी मलिक ईआझने नदीच्या पलीकडे तीन महिने मुक्काम ठोकून बांधकामात अडथळे आणले. तरी देखील शेवटी किल्ल्याचे बांधकाम १५२४ मध्ये पूर्ण केले. सन १५२८ मध्ये गुजरात आरमाराने काही जहाजांच्या मदतीने चौलवर हल्ला केला. परंतु तो पोर्तुगीज व अहमदनगरच्या निजामाने एकत्रितपणे परतवून लावला. सन १५२९ मध्ये वैरभाव वाढून पुन्हा गुजरातच्या सैन्याने चौल लुटले. गुजरातचा राजा बहादुरशहाने (१५२६-१५३६) बुरहान निजाम शहाचा पराभव करून त्यास गुजरातचे प्रभुत्व मानावयास भाग पाडले. गुजरात राजाच्या प्रभावामुळे निजामाने पोर्तुगिजांशी भांडण सुरू करून बराच त्रास दिला. बहादूर शहाच्या मृत्यूनंतर बुरहान निजाम शहा व पोर्तुगीज यांची पुन्हा मैत्री सुरू झाली. परिणामी या काळात (१५३८) चौल एक फार मोठे प्रसिद्ध शहर आणि पूर्वेकडील प्रदेशातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. सन १५४५ मध्ये गुजरातच्या सैन्याने दीववर कठीण प्रसंग आणला असता दीवला चौलच्या लोकांनी स्वतःहून मदत केली होती. त्यानंतर १५५७ पर्यंत चौल येथे शांततामय जीवन होते. २०३
बुरहान निजाम शहाच्या मृत्यूनंतर हुसेन निजाम शहाने (१५५३-१५६५) राज्यारोहण केले तेव्हा पोर्तुगिजांना रेवदंड्चाजवळच असलेला कोरलईचा भाग सोडून देण्यास सांगितले. परंतु हुसेनने त्यास न जुमानता उलट पोर्तुगिजांनी तो भाग ताब्यात घेऊ नये म्हणून तेथे एक भक्कम किल्ला बांधण्यासाठी त्याने आपले उत्कृष्ट अधिकारी पाठविले. त्यांच्यात युरोपात काम केलेला व विजापूर येथील ब्राँझची भव्य तोफ ज्याने तयार केली होती, त्या आशिया मायनरमधील चुलाबी रुपीखान नावाचा अधिकारी होता. पोर्तुगिजांनीही प्रतिकार करण्याची तयारी केली. परंतु अल्पशा लढाईनंतर दोघांत समझोता होऊन कोरलई येथे किल्ला बांधू नये असे ठरले. सन १५७० मध्ये अहमदनगरचा मूर्तजा निजाम शहा व विजापूरचा सुलतान एक होऊन त्यांनी १६ फेब्रुवारी १५७१ रोजी पोर्तुगीज चौलला वेढा घातला. साडेचार महिने वेढा होता. शेवटी २९ जून १५७१ रोजी मोठा हल्ला होऊन अहमदनगरच्या शहास शांततेचा तह करून माघार घ्यावी लागली. यानंतर १५७७ मध्ये पोर्तुगिजांनी रेवदंडा किल्ल्याच्या संरक्षणार्थ दक्षिण किनाऱ्यावर भक्कम तटबंदी बांधली. या काळात चौलने भरभराटीचा शिरोबिंदू गाठला होता. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांपैकी तांबडा समुद्र, ओर्मुज इत्यादी ठिकाणांची सर्वाधिक गलबते चौलला येत असत.
सन १५८३ मध्ये एका डच प्रवाशाने चौलचे वर्णन तटबंदी असलेले, चांगले बंदर व व्यापारासाठी प्रसिद्ध शहर असे केले आहे. खंबायत, सिंध, बंगाल, ओर्मुज, मस्कत आणि तांबडा समुद्राकडच्या व्यापाऱ्यांना ते सुपरिचित होते. तेथील व्यापारी श्रीमंत असून त्यांच्या मालकीची जहाजेही होती. तांदूळ, वाटाणे, डाळी, लोणी, तेल व नारळाचे अमाप उत्पश्न होते. खंबायत व गुजरातमधील व्यापारी तेथे स्थायिक झाले होते व ते विशेषतः हिरे-माणिकांचा व्यापार करीत. आसपास राहणारे स्थानिक लोक रेशीम तयार करीत. चीनहून आयात केलेल्या कच्च्या रेशमापासून लांब झगे, महिलांचे व श्रीमंती थाटाचे कपडे तयार करीत.
अधिक माहितीसाठी कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पू. ७२३-२४ पहावे.
याशिवाय विविध शैलीचे बिछाने, खुर्चा, नक्षीदार पेटचा व कपाटेही करीत. येथील हवा चांगली आरोग्यदायी असल्याचेही त्याने वर्णन केले आहे. सन १५८६ मध्ये व्हेनिसहून आलेला प्रवासी सीझर फ्रेडरिक याने बंदराच्या तोंडाशी सर्व बाजूंनी मजबूत भितीने सुरक्षित असलेले पोर्तुगीज शहर (रेवदंडा) आणि नदीच्या मुखापासून सुमारे २.४२ कि. मी. अंतरावर असलेले मूर किंवा मुसलमान शहर (चौल) या दोन शहरांचा उल्लेख केला असून ती दोन्ही मोठी व्यापारी बंदरे होती असे नमूद केले आहे. या बंदरात भारतीय किनाऱ्यावरून नारळ, मसाल्याचे पदार्थ व औषधे तसेच पोर्तुगाल, मक्का व चीनमधून सॅन्डल, रेशीम व रेशमी वस्त्रे, मखमल, शेंदरी रंगाचे कापड, चिनी मातीची भांडी इत्यादी वस्तू आयात केल्या जात होत्या. तसेच येथून लोखंड, बोरॅक्स, हिंग, धान्य, नीळ, अफू, विविध प्रकारचे रेशीम आणि शुभ्र व छापील रंगीत सुती कापड व कपडे भारतातील इतर ठिकाणी आणि मलाका, चीन, ओर्मुज, पूर्व आफ्रिका, पोर्तुगालकडे निर्यात केल्या जात होत्या. चौलच्या आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर रेशमी कापड विणीत. काचेचे मणी तयार करून मोठ्या प्रमाणात आफिकेत पाठवीत.
इ. स. १५९२ मध्ये (काही पोर्तुगीज अभ्यासकांच्या मते १५९४ मध्ये) अहमदनगरचा बुरहान निजाम दुसरा (१५९०-१५९४) याचे पोर्तुगीज व्हॉइसरॉयशी मतभेद झाल्याने त्याने चीलवर सेना पाठवून कोरलई येथे किल्ला बांधण्याचा हुकूम केला. किल्ला बांधून झाल्यावर त्याच्या सैन्याने नदीपलीकडून पोर्तुगिजांना उपद्रव केला तसेच पोर्तुगीज किल्ल्याच्या भितीवर तोफांचा भडीमार केला. पोर्तुगिजांनीही प्रतिकार चालू ठेवला. शेवटी ४ सप्टेंबर १५९४ रोजी अल्वारोद अब्रांचेस या पोर्तुगीज गव्हर्नरने १,५०० पोर्तुगीज सैनिक व विश्वसनीय स्थानिक लोकांसह कोरलईच्या काठावर लहान लहान होड्यांतून पोहोचण्यात यश मिळविले व सुदैवाने हात दिल्याने किल्ल्याच्या दरवाजासमोर एका हत्तीचा मृतदेह ठेवून शेवटी किल्ला जिंकला. यामुळे स्थानिक लोकांचे पोर्तुगिजांकडे वजन वाढले. त्याचा त्यांना फायदाही मिळाला. पोर्तुगिजांनी त्यांना नागरी अधिकार व आपल्या इच्छेनुसार न्यायदानासाठी न्यायाधीश निवडण्याचा हक्क दिला.
फ्रेंच प्रवासी फॅन्कॉइस पायरार्ड (Francois Pyrard) (१६०१-१६०८) यानेही पोर्तुगीज चौलचा (रेवदंडा) उल्लेख चांगले हवामान, अतिशय सुबत्ता असलेले व्यापारी केंद्र व संरक्षणदृष्टया मजबूत असे शहर असा केला आहे. तर अप्पर चेऊल येथे अतिशय कुशल व मेहनती कारागीर होते. ते चिनी पद्धतीची कपाटे, पलंग व फर्निचर बनवून त्यास लाखेचे बहुरंगी रोंगण करीत. शिवाय तेथे मोठ्या प्रमाणावर विणकाम उद्योग चालत असे. सुंदर सुती कापड तसेच चिनी रेशमी कापडापेक्षाही उत्तम रेशमी कापड तयार करीत असल्याचेही पायरार्डने नमूद केले आहे.
सन १६०० मध्ये अहमदनगरची निजामशाही बुडाल्यानंतर अप्पर चेऊल अकबर बादशहाच्या ताब्यात गेले. त्यावेळी त्यास मामले मुर्तजाबाद असे म्हणत. सन १६०३ मध्ये मलिक अंबरने अहमदनगरच्या निजामशाहीचा बरा भाग दुसरा मुर्तजा निजामशाह याच्यासाठी जिंकून परत घेतला. परंतु त्याची सत्ता चौलच्या २५.७५ कि. मी. पलीकडे जाऊ शकली नाही. मुघलांकडून परत घेतलेल्या या शहरावर काही काळ एका प्रांताधिकाऱ्याची (मलिक) सत्ता राहिली. पायरार्डच्या निरीक्षणानुसार मलिकची पोर्तुगिजांशी चांगली मैत्री होती. पोर्तुगिजांच्या उतरत्या काळातही चौलची भरभराट असून व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीपूर्व तेथे मोठचा इमारती बांधलेल्या होत्या.
सतराव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगिजांची समुद्रावरील सत्ता उचांकडे गेल्याचे परिणाम दिसू लागले. सन १६०९ मध्ये अप्पर चेऊलच्या गव्हर्नरने पोर्तुगिजांविरुद्ध समुद्रात मोहीम करण्यास सुरुवात केली. सन १६१२ मध्ये मुघलांनी चौलच्या आजूबाजूचा प्रदेश उध्वस्त करून चौलला वेढा दिला. मात्न तो उठविण्यासाठी पोर्तुगिजांना फार मोठी किंमत द्यावी लागली. नंतर आलेल्या हुषार व लोकप्रिय पोर्तुगीज गव्हर्नरने चौलला काही काळ स्थैर्य व सौख्य प्राप्त करून दिले. त्याने मुघल व दुसरा मुर्तजा निजामशाह यांच्याबरोबर तह केला. या काळात मलिक अंबरने अप्पर चेऊल परत घेतले. त्याने १६१५ मध्ये पोर्तुगिजांशी तह करून इंग्रज व डचांना चौल येथे स्थायिक होऊ देऊ नये असे ठरले. सन १६१७ मध्ये नव्याने तह होऊन त्याप्रमाणे दोन्ही शहरांतील बागा पोर्तुगिजांकडे असाव्यात असे ठरले.
मार्च-एप्रिल १६२३ आणि नोव्हेंबर-डिसेंबर १६२५ मध्ये इटालियन प्रवाशी पैट्रो डेला वेल्ल याने चौलला भेटी दिल्या. पोर्तुगीज वसाहतीच्या आग्नेयेस असलेले कॅथेड्रल किल्ल्याच्या भितीच्या आत नव्हते असे त्याने म्हटले आहे. त्याकाळी तेथे जाण्यासाठी इटालियन प्रवाशाने दोन मार्गांचे वर्णन केले आहे:- नारळ-पोफळीच्या बागा व दाट झाडीतून जमिनीवरून असलेला लांबचा एक मार्ग वा जाडीच्या आत गेलेल्या बाजूने भरतीच्या वेळी लहानशा होड्यांतून व भरती नसेल तेव्हा माणसांच्या खांद्यावर बसून जाण्याचा दुसरा मार्ग. दुसऱ्या मार्गाने गेल्यावर पलीकडच्या काठावर बाजार होता व त्यात सर्व जीवनावश्यक वस्तू मिळत. जवळच हिंदूंची व मुसलमानांचीही बस्ती होती. बाजार व दुकानांच्या पलीकडे उंच नारळ-पोफळीच्या बागांतून विखुरलेली घरे होती. बाजारापासून जवळच पायऱ्या असलेला नवेनगर तलाव होता. बाजार व नदीकाठादरम्यान मुसलमान लोक राहत होते. त्याशिवाय जकातघर, न्यायालय आणि इतर सरकारी इमारती होत्या. बाजारास लागूनच गर्द झाडीत बहुसंख्येने हिंदू लोक राहत होते. तेथे त्यांची बरीच मंदिरे होती. त्यांत जगदंबा, अमृतेश्वर, नारायणाची मंदिरे महत्त्वाची होती. सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले रामेश्वराचे मंदिर बाजारापासून बरेच दूर पोर्तुगीज चौलकडे (रेवदंडा) जाणाऱ्या रस्त्याला लागून दाट लोकवस्तीच्या भागात रहात होते.
सन १६३१ मध्ये विजापूरच्या आदिलशाहाने अप्पर चेऊलचा ताबा घेतला. परंतु लगेच त्याने ते मुघलांस दिले. सन १६३६ मध्ये मुघल बादशहाने विजापूरशी तह करून कोकणातील सर्व प्रदेश विजापूरकरास दिला. मात्र अप्पर चेऊल जास्त काळ विजापूरकरांकडे राहिले नाही. सन १६५७-५८ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अप्पर चौल जिंकले असावे. काही भाग मात्र पोर्तुगिजांकडे होता. पोर्तुगिजांचा ऱ्हास झाल्याने व १६६५-१६६६ मध्ये इंग्रज मुंबईत स्थायिक झाल्याने पोर्तुगीज चेऊलची (रेवदंडा) भरभराट व व्यापार संपुष्टात आला. सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांकडे रायगडावर निघालेला ब्रिटिश वकील ऑक्झंडन पोर्तुगीज चौल (रेवदंडा) येथे राहिला होता. तो प्रदेश शिवाजी महाराज व मुघलांतील लढायांमुळे उध्वस्त झाल्याचे त्याने नमूद केले आहे. तेथे मराठा सुभेदाराचे ठिकाण असून तो नागोठणे, पेण, थळ व मुंबईसमोरील प्रदेशावर देखरेख करीत असे.
चौलला १६६८ पर्यंत विणकाम भरभराटीत चालू होते. परंतु त्यानंतर उद्योगास मिळणारे संरक्षण कमी झाले. त्याचा फायदा मुंबईस मिळाला. चौलच्या रेशीम विणकर व कुशल
*** अधिक माहितीसाठी कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ७१७-३३. पहावे.
कारागिरांनी मुंबईत स्थायिक व्हावे म्हणून त्यांना इंग्रजांनी प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी मुंबईत रस्ता बांधला व इतर सोयी उपलब्ध केल्या. परिणामी चौलचे बरेच सोनार, विणकर, सुतार मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे मुंबईतील वंशज मूळ गावावरून चेऊली या नावाने ओळखले जातात.
सन १६८१ मध्ये सिदीने अप्पर चेऊल लूटले. पोर्तुगिजांनी त्याला विरोध केला नाही म्हणून संतापलेल्या संभाजीने पोर्तुगीज चेऊलला (रेवदंडा) वेढा दिला. परंतु पोर्तुगिजांच्या तोफांचा मारा व संरक्षित भिंतीपुढे त्याचा टिकाव लागला नाही व शेवटी २४ डिसेंबर १६८३ रोजी वेढा उठविणे भाग पडले. मात्र मराठ्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे पोर्तुगिजांना संरक्षणासाठी भित व दुर्गरक्षक सेना सतत सज्ज ठेवावी लागे. सन १७३९ मध्ये वसई मराठघांच्या ताब्यात गेल्यानंतर पोर्तुगिजांना चौल ताब्यात ठेवणे अशक्य झाले. त्यांनी चौल व कोरलई किल्ला इंग्रजांना दिला. वसईच्या लढाईपूर्वी इंग्रजांचे पोर्तुगिजांशी संख्य नसले तरी त्यांनी पोर्तुगिजांना पैशांची मदत केली होती. मराठ्यांच्या विजयाच्या धडकीने इंग्रजांनी बाळाजी बाजीराव पेशव्याबरोबर ७ सप्टेंबर १७४० रोजी तह करून चौल व रेवदंडा ही दोन्ही स्थळे मराठ्यांना दिली. मात्र मराठ्यांच्या असलात चौलला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले नाही. सन १७५० च्या सुमारास ग्रोसच्या मते चौलला डचांची व्यापारी वखार होती. पुढे फ्रेंचांना चौल बंदराचा मुक्तपणे वापर करण्याची परवानगी मिळाली. १९ जानेवारी १७७८ रोजी करार होऊन चौल येथे फ्रेंचांना सैन्य व तोफखाना ठेवण्यास परवानगी दिली व १७८६ मध्ये चौल फ्रेंचांना देण्याच्या दृष्टीने परवान्याचे नूतनीकरण केले.
पनवेल
पनवेल : (तालुका मुख्यालय, १८० ५८' उ., ७३० १२' पू.) पनवेल शहर मुंबईहून ठाणे मार्गे ६८ कि. मी. व खाडी पूल मार्गे ४७ कि. मी. अंतरावर मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर आहे. शहास ऐतिहासिक महत्त्व असून पूर्वी बऱ्यापैकी बंदर होते. तथापि आता फक्त भरतीच्या वेळी शिडाच्या लहान होड्या पनवेलपर्यंत जातात. सन १९६५ मध्ये पनवेल लोहमागनि दिवा मार्गे प्रथम मुंबईला जोडले गेले व १९८९ मध्ये लोहमार्ग रोह्यापर्यंत वाढविण्यात आला. रस्ते व रेल्वे वाहतुकीमुळे बंदराचे महत्त्व कमी होऊन येथील मोठे तलाव, बंदरावरील धक्का, बैल-गाडधांची जाके बनविण्याचा उद्योग हेच बंदराच्या प्राचीन व्यापाराचे अवशेष उरले आहेत.
सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार व यादव वंशातील राजांच्या राजवटी उत्तर कोकणावर होऊन गेल्या. पनवेल चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या प्रारंभी गुजरातच्या सुलतानाच्या अमलाखाली होते. मिरत-इ-अहमबी अनुसार गुजरातच्या सुलतानास पनवेल बंदरापासून महसूल प्राप्त होत असे. इ. स. १५७० मध्ये युरोपियनांचे व्यापारी बंदर असा पनवेलचा उल्लेख आढळतो. सन १६३७ मध्ये पनवेलचा भाग आदिलखानाच्या कल्याणच्या सुभेदाराच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी कल्याण प्रांत जिंकून पनवेल घेतले असे दिसते. सन १६७३ नंतर सीदीचा पाडाव करण्यास शिवाजीने आपल्या आरमाराचे सरदार दर्यासारंग व दौलतखान यांना पनवेलला पाठविले होते. येथे शिवाजीचे लहानसे आरमारी ठाणे होते असे ज्ञानकोशकार केतकरांनी नमूद केलेले आहे. काही काळ पनवेलचा राज्यकारभार कर्नाळा किल्ल्यावरून चालत असावा. वाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण नियतकालिकातील एका लेखावरून दिसते की, इंग्रजी अमलाचे प्रारंभी मुंबई शहराचे दक्षिणेशी दळणवळण पनवेलमार्गेच चालत असे. पेशवाईच्या अखेरीस इंग्रज व मराठे यांच्या राज्याच्या सीमेवर हे गाव असल्याने त्यांच्यात येथे वारंवार झटापटी होत असत. सन १७७९ मध्ये राघोबा दादाला पाठिंबा देण्यासाठी कर्नल इगरटनच्या नेतृत्वाखाली इंग्रज फौजेची एक तुकडी मुंबईहून पनवेलला गेली. पुढे या तुकडीचा कार्ले येथे मराठधांबरोबर झालेल्या चकमकीत पराभव होऊन कॅप्टन स्टुअर्ट ठार झाला. दोन वर्षांनी १७८१ मध्ये जनरल गोडार्डने पनवेलहून रसद आणण्यासाठी कर्नल ब्राऊनला पाठविले. परंतु त्याचा परशुरामभाऊ पटवर्धनाने पनवेलला
पनवेलला पराभव करून जनरल गोडार्डचा पुढील डाव उधळून लावला. सन १८०४ मध्ये लॉर्ड व्हॅलेंटियाने पनवेलचे वर्णन अतिशय गजबजलेले शहर असे केले आहे. सन १८१७ मध्ये येथे ७०० पेंढाऱ्यांशी इंग्रजांची लढाई झाली. सन १८१८ मध्ये कर्नाळा इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा पनवेलमध्ये थोडेफार इंग्रज सैन्य ठेवण्यात आले होते. नाना फडणिसाच्या एका पत्नीचे वास्तव्य इंग्रजांच्या आश्रयाने काही दिवस पनवेलला होते.
वसईचा वेढा उठवून चिमाजी अप्पा परतत असता त्याचा तळ पनवेलला होता. सन १८१० मध्ये सर जेम्स मॅकिन्टोशने पनवेलचा उल्लेख खाडीच्या काठावर वसलेले अरण्यमय खेडे असा केलेला आहे. सन १८१८ मध्ये येथे ज्या भागात इंग्रजी फौजेची तुकडी ठेवण्यात आली होती त्या भागास आजही कॅम्प असे संबोधण्यात येते. सन १९३२० मध्ये पनवेल एक व्यापारी ठिकाण असल्याचा उल्लेख आढळतो. सन १८२५ मध्ये विशप हेबर याने पनवेलला मंदिर, दर्गा, प्रवाशांसाठी विश्रामगृह, एक पोर्तुगीज व एक पारशी पांयशाळा असून ते निसर्गरम्य ठिकाण असल्याचे नमूद केले आहे. सन १८६२ मध्ये ते गजबजलेले शहर होते.
दिनांक १ सप्टेंवर १८५२ रोजी नगरपालिकेची स्थापना झाली. पनवेल हे नाव केव्हा पडले याबाबत निश्चित माहिती मिळत नसली तरी पुरातनकाळी नाग लोकांचे राज्य असताना
*** महाराष्ट्र स्टेट गॅझेटिअर हिस्टरी मेडिव्हल पिरियड, १९७२, पृ. १५१.
या शहराचे नाव पवनपल्ली होते. यादवांनी हा भाग जिंकला तेव्हा पष्यवेला म्हणजे समुद्रकाठचे व्यापारी गाव असे नाव दिले असावे व त्याचा अपभ्रंश पनवेल झाला असावा, असा अंदाज एका अभ्यासकाने केला आहे. सन १६३७ मध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या ताब्यात पनवेलचा भाग होता तेव्हा या बंदरास बाबल अथवा पावळ म्हणत.
पनवेलमध्ये अनेक मंदिरे, दर्गे, मशीदी व एक बेने इश्यायली सायनॅगॉग आहे. विरूपाक्ष महादेव, बल्लाळेश्वर महादेव व राम मंदिर (दास मारुती मंदिर) ही देवळे जुनी असून ती वाळाजी कृष्ण वापट यांनी बांधलेली आहेत. विरूपाक्ष मंदिर १८७५ च्या सुमारास बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धार १८८४ मध्ये विठोवा खंडाप्पा गुळवे यांनी केला. येथे श्रावणात उत्सव होतो व भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस देवाची पालखी निघते. राम मंदिरातील रामाच्या समोरील दास मारुतीच्या मूर्तीची स्थापना दत्तात्रय गणेश भिडे यांनी केली. बल्लाळेश्वर व राम मंदिरात दरवर्षी महाशिवरात्न, रामनवमी व हनुमान जयंती उत्सव साजरे केले जातात. शहराच्या वायव्येस देवाळे तळयाजवळील हजरत पीर करमअलीशाह च्युस्टी वानवाचा जुना दर्गा त्याचा मुलगा खाजा मोअज्जमशाह याने १७४७ मध्ये (११६६ हिजरी) बांधला. दर्याच्या उत्तरे-कडील भितीचे आतील बाजूस युसुफ नावाच्या कवीने पक्षियन भाषेत कोरलेला शिलालेख आहे. या शिलालेखाचा अर्थ "स्वर्गसुख देणारा हा दर्गा ईश्वरभक्त पैगंबरवासी करमअलीशाह याच्याकरिता मुअज्जिज शाह याने बांधला" असा आहे. वास्तुशिल्पाच्या दृष्टीने दर्गा नमुनेदार आहे. पूर्वी दर्त्याच्या चारही बाजूला तीन तीन कमानी होत्या. त्या १९०७ मध्ये पाहून १९११ मध्ये पाच पाच बांधल्या. दर्यामध्ये एकूण आठ थडगी आहेत. येथे दरवर्षी माघ महिन्यात मोठा उरूस भरतो. येथील खाडीत १६८२ मध्ये छत्रपती संभाजीने सीदीच्या स्वाऱ्यांपासून बचावासाठी बांधलेल्या लहान किल्ल्याचे अवशेष दिसतात. जुम्मा मशीद अदमासे ३६० वर्षांपूर्वी बांधलेली असून तिचे नाव पूर्वी सर्फइतमाँम मसजिदूल मावा होते.
किल्ल्याचे अवशेष दिसतात. जुम्मा मशीद अदमासे ३६० वर्षांपूर्वी बांधलेली असून तिचे नाव पूर्वी सर्फइतमाँम मसजिदूल मावा होते.
गावातील वडाळे तळे बाळाजीपंत बापट, इस्रायल (विश्राळे) तळे मुंबईचा व्यापारी करमसी हंसराज, कृष्णाळे तलाव कृष्णावाई वापट, देवाळे तळे नाखोदे रोगे व बाळाजी वापट यांनी वांधलेले आहेत. शिवाय लेंडाळे व दुदोळे तलाव होते. पनवेलमधील चार धर्मशाळांपैकी रामजीची धर्मशाळा सकलतसिंग खोडेसिंग जमादार यांनी, वडाळा तलावावरील धर्मशाळा बाळाजीपंत बापट यांनी, वाझे मोहल्ल्यातील धर्मशाळा बळवंत गणेश ओझे यांनी, तर इद्यायल (विश्वाळे) तलावाजवळील धर्मशाळा करमसी हंसराज यांनी बांधली आहे. सन १८७२ मध्ये स्थापन झालेला धूतपापेश्वर आयुर्वेदीय औषधी कारखाना सर्वात जुना आहे. १२८
कोरलई
कोरलई : (मुरुड ता., १८० ३०' उ., ७२० ५०′ पू., उंची ८२.६० मी.) रेवदंडा गावासमोर रोहा लाडीच्या डाव्या किनाऱ्यावर कोरलई हा जलदुर्ग आहे. जलदुर्गाच्या दक्षिणेस कोरलई तथा कोराले गाव आहे. येथे खिश्चनांची वस्ती अधिक होती. इतिहासकार मेर्न, द कुन्दा, घेवेनॉट, दो कुटो, अंतोनो बोकारो, फेरिश्ता इत्यादींनी कोरलईचे वर्णन लिहून ठेवले आहे.
इतिहास : हा दुर्ग सोळाव्या शतकात युरोपियन लोकांना चौलचा रॉक या नावाने माहीत होता. सन १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरले तथा कोरलईचा अधिकारी दियोग लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली असता पोर्तुगिजांनी चौल (रेवदंडा) खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या कोरलईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का (त्रुसाची बातेरी किवा बाह्यकोट) बांधला." किल्ल्याची ही सर्वात खालची बाजू समुद्रसपाटीला आहे. तिला सांता क्रूज किंवा कुसाची बातेरी असेही म्हणतात. या खाडीच्या मुखाशी असलेल्या खंबायत नौदलाने (गुजरात नौदल) या बाह्यकोटावर लवकरच हल्ला केला, परंतु पोर्तुगिजांच्या कोरलई शिबंदीस चौलहून कुमक मिळाल्याने गुजराती सैन्याचे मोठे नुकसान होऊन पळ काढावां लागला. सन १५५३ मध्ये बुरहान निजामशहा मरण पावला. त्यानंतर सुमारे चार-पाचः वर्षे तेथे गादीवरून यादवी चालली. तिचा फायदा उठवावा या हेतूने पोर्तुगिजांनी अहमदनगरकडे कोरलाई पोर्तुगिजांना अभ्यर्पित करण्याची मागणी केली. परंतु त्यावेळी अहमदनगरच्या गादीवर आलेल्या हुसेन निजामशहाने ही मागणी साफ धुडकावून लावली व त्याने पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने १५५८ मध्ये रुपीखान आणि मौलाना शहामहमद उस्ताद यांना सैन्य व तोफखाना देऊन रेवदंडधास पाठविले. २१ सोबत त्याने कॉरलई दुर्गास भक्कम तटबंदी बांधण्यासाठी निष्णात स्थापत्यविशारद पाठविले. पोर्तुगिजांनी त्यास विरोध केला. पोर्तुगिजांशी झालेल्या वल्पशा चकमकीनंतर पोर्तुगिजांनी निजामशहाशी तह केला व त्यानुसार किल्ल्यास तटबंदी नसावी असे ठरले. नंतर हा धक्का किंवा बाह्यकोट मुसलमानांनी पाहून टाकला. परंतु पोर्तुगीज नोंदीनुसार अगदी शेवटच्या उत्तर टोकावर असलेला लहान लाकडी शिश्चन क्रुस मुसलमान सैनिक कापू शकले नाहीत. किवा त्यांचे हत्ती त्यास तुडवू शकले नाहीत. मुर्तझा निजामशहा (१५६५-१५८८) याने पोर्तुगिजांवर चाल करून चौल किल्ल्यास वेढा घातला होता. निजामशाही अधिकारी व पोर्तुगिजांत पत्त्रव्यवहार सुरू झाल्याने मुर्तझा निजामशहाने तो बेढा उठविला. मुर्तझा निझामशहा नंतर मीरान हुसेनशहा हा अल्पकाळ गादीवर राहिला.
कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२८ वरील तळटिप क्र. ३. जेमेली कॅरेरी (Gemelli Careri) आपल्या चचिल चौथा या पुस्तकात पृ. २०० वर लिहितो की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगिजांना ३०० पशियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने जणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. भारतात दुर्लभ असलेले हे घोडे त्यास आदिलखानाशी लढाईत वापरावयाचे होते.
१२११ कित्ता, पृ. ३२८; द कुन्हाज चौल, पू. ३५.
***
भ. ग. कुंटे, अहमदनगरची निजामशाही (बुरहाने मासीर - लेखक संय्यद अलीच्या फारशी ग्रंथाचा सर वुल्सले हेग याचा इंग्रजी अनुवाद व या इंग्रजी
अनुवादाचा मराठी अनुवाद), पृ. १२०.
कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२८. परंतु बुरहाने मासीर (लेखक सय्यद अली) नुसार हुसेन निजामशहाने सैन्य व तोफखाना रेवदंड्यास पाठविला. पोर्तुगिजांना ही बातमी लागताच त्यांनी आपला वकील निजामशहाकडे पाठविला आणि आपल्या कृत्यकर्माची क्षमा मागितली. यापुढे अशी चूक होणार नाही असे कळविले. पोर्तुगिजांचा निरोप मिळाल्यावर निजामशहाने आपले सैन्य परत. बोलविले.
किंत्ता, पू. ३२८.
त्यानंतर गादीवर आलेला दुसरा बुरहान निजामशहा (१५९०-१५९४) याचा पोर्तुगिजांवर राग होता. त्यावेळी अहमदनगरचा तोफखाना रुपीखानाच्या ताब्यात होता. दुसऱ्या बुरहान निजामशहाने सर्व जड तोफखाना रेवदंडचास हलविला. बुरहान निजामशहा पोर्तुगिजांशी लढाईच्या मोहिमेवर असताना १५९२ मध्ये कोरलईच्या टेकडीवर बुरहान दुर्ग नामक अभूतपूर्व भक्कम असा पूर्ण किल्ला बांधला व तेथून त्याने खाडीपलीकडील रेवदंडा किल्ल्याची बरीच तटबंदी उध्वस्त केली. दिनांक ४ सप्टेंबर १५९४ रोजी पोर्तुगिजांना चौल-रेवदंडा भागातील अहमदनगर राजवटीच्या ताब्यातील कोरलई बाजार उध्वस्त करून तिचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी वसई व साष्टीवरून मोठी कुमक मिळाली. चौलचा एक पोर्तुगीज कप्तान १,५०० पोर्तुगीज व बच्पुच स्थानिक विश्वासू सैनिकांसह (एकूण ४,००० सैनिक) लहान नावांनी खाडी पार करून कोरलई किनाऱ्यावर उतरला. त्यावेळी किल्ल्याबाहेर ताजस्तान आणि अण्णेराव हे आपल्या फौजेसह तयार होते. त्यांच्यावर पहिला हल्ला होताच त्यांनी किल्ल्याकडे पळ काढला. दिनांक १३ सप्टेंबर १५९४ च्या रात्री झालेल्या चकमकीत मुसलमानांना कोरलई दुर्गाच्या बाह्यकोटापर्यंत खदेडून लावले. यात अहमदनगर सेनेचा साफ पराभव झाला. नेर्नच्या माहितीनुसार कोटाच्या दरवाजात हत्ती मरून पडल्यामुळे तो बंद झाला. वरून पडणारे दुर्गरक्षकही पोर्तुगिजांची वाट अडवत होते. यातून मार्ग काढून पोर्तुगिजांना प्रवेश करावा लागला. या लढाईत पोर्तुगिजांकडून अँटोनिओ नावाचा फान्सिस्कन पाद्रीही लढत होता." तो ठार झाल्यामुळे रागावलेल्या पोर्तुगिजांनी दुसऱ्या दरवाजापर्यंत धडक मारली. या दरवाजातही घोडा मरून पडल्याने आतील दुर्गरक्षकांना तो बंद करता आला नाही. पोर्तुगिजांनी दुर्गाच्या अंतर्भागात प्रवेश "केला आणि कत्तलीस सुरुवात केली. या गोंधळामुळे किल्ल्यातील सरदार फरहादखान, १९ असदखान आणि इतर अमीर झोपेतून जागे झाले. परंतु प्रतिकाराची कोणतीच तयारी त्यांना करता आली नाही. या लढाईत १,००० मुसलमान मारले गेले तर पोर्तुगिजांचे केवळ २१ सैनिक कामी आले व ५० जखमी झाले. त्याशिवाय पोर्तुगिजांना भरपूर दारूगोळा, घोडे, पाच हत्ती, ७७ तोफा आणि लहानसहान शस्त्रांचे कोठार हाती लागले. फरहादखान,
त्याची बायको व मुलगी कैद झाली. त्याच्या बायकोस दंड भरून सोडविण्यात आले. परंतु फरहादखान व त्याच्या मुलीस बाटवून चिश्चन करण्यात आले. तथापि जखमी फरहादखान काही दिवसातच मरण पावला. चौलला त्याचे मोठ्या इतमानाने दफन करण्यात आले. या किल्ल्याच्या रक्षणासाठी पोर्तुगिजांजवळ पुरेसे सेनादल नसल्यामुळे त्यांनी उत्तरेकडील सांता क्रूज बातेरीचा भाग व टेकडीच्या माथ्यावरील तटबंदी (बालेकिल्ला) सोडून बाकीचा भाग उध्वस्त केला.
१२५ कुंटे, अहमदनगरची निजामशाही, पृ. १२००
१२६ या पराभवाचा उल्लेख सय्यद अली बुरहाने मासीर मध्ये करीत नाही, परंतु फेरिश्ता मात्न करतो, फेरिश्ता, भाग २, पृ. ३०४, (कुंटे, अहमदनगरची निजामशाही, पृ. २७९ वरील तळटिप यात चुकून १५९३ असा उल्लेख असावा.)
कुलाबा गॅझेटिअर, १८८३, ५. ३२९.
१२८ कित्ता, पृ. ३२९.
१२१ कित्ता, पृ. ३२९ नुसार फत्तेहखान तर फेरिश्ता (कुंटे, अहमदनगरची निजामशाही, पृ. २७९.) नुसार फरहादखान.
कित्ता, पृ. ३२९. तथापि फेरिश्तानुसार दहाबारा हजार मुसलमान मारले गेले (कुंटे अहमदनगरची निजामशाही, पृ. २७९).
१९ नेने, इंडियन अॅटिक्वरी, खंड २, पृ. १८२; कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२९.
पोर्तुगिजांनी किल्ला उध्वस्त करण्याआधी दो फुटो याने किल्ल्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे." " हा किल्ला फारच भव्य असून त्यावर फक्त जमिनीच्याच बाजूने हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र व खाडी यांच्यामधून एक खंदक खणलेला असून फक्त त्याच्यावरील पुलावरूनच आत प्रवेश करता येतो. हा पूल उडवून टाकला की, किल्ला अगदी अभेद्य आहे. खंदकाच्या आत भक्कम भित बांधलेली होती. या भितीत दोन मोठ्या बुरुजांतून असलेल्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर एक मोठा ब्राँझचा सिह हाँ.जा. त्याखाली 'माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही' (None passes me but fights) अशी अक्षरे आहेत.
किल्ल्याच्या माथ्यावर मध्यवर्ती बालेकिल्ला असून त्याच्या शिखरावर एक गरूड पक्षी काढलेला आहे. तेथे 'माझ्या तावडीतून माशांबेरीज कुणाचीच सुटका नाही' (None passes me but flies) असे दर्पोक्तियुक्त वचन कोरलेले ." अधिक माहिती १८८३ च्या कुलाबा गॅझेटिअर मध्ये आहे. देण्यात आलेली असल्यामुळे तिची येथे पुनरावृत्ती केलेली नाही.
ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजीने चौलबरोबरच कोरलई घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने तळागडचा हवालदार सुभानजी माणकर यास कोरलईवर पाठवून किल्ल्याची कोंडी केली. सन १७३९ मध्ये चिमाजी व पोर्तुगीज यांच्यात वसईचा तह झाल्यावर पहिला बाजीराव व पोर्तुगीज अधिकारी इंचवर्ड यांची १४ जानेवारी १७४० ला भेट झाली. त्यांच्या वाटाघाटीनंतर ७ सप्टेंबर १७४० ला झालेल्या तहानुसार नोव्हेंबर १७४० ला चौल व कोरलई किल्ले पोर्तुगिजांकडून मराठघांना मिळाले." कोरलईचा महत्त्वाचा जलदुर्ग पेशव्यांच्या हाती येताच त्याचा तावा कुलाबकर आंगरेकडे देण्यात आला. आंगरेने तेथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलली. सन १८१८ मध्ये पेशवाई समाप्त झाल्यावर इतर किल्ल्यांबरोबरच कोरलई दुर्ग इंग्रजांच्या ताब्यात गेला. दिनांक ६ जून १८१८ ला (शके १७४०, ज्येष्ठ शुद्ध २) या किल्ल्यावर इंग्रजांचे निशाण चहले.
६ जून १८१८ ला (शके १७४०, ज्येष्ठ शुद्ध २) या किल्ल्यावर इंग्रजांचे निशाण जडले. या किल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी ८६१.९७ मी. आणि दक्षिणोत्तर रुंदी २७.१२ मी. व तटभितीची उंची १.५२ मी. आहे. किल्ल्यावरून मारा करण्यासाठी तभितीला गोळी-बारासाठी ३०५ जंगी आहेत. किल्ल्यास एकूण ११ दरवाजे असून त्यापैकी चार बाहेरच्या तटबंदीस व सात आतील बाजूस आहेत. मुख्य प्रवेशद्वार उत्तरेस असून अजूनही सुस्थितीत आहे. त्यावर पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहे. किल्ल्याच्या पश्चिम टोकाजवळ घोड्यांची पागा सुस्थितीत आहे. उत्तर टोकास बांधलेला धक्का अजून शाबूत आहे. येथे सपाट मैदान आहे. येथील बुरुजावर तीन तोफा आहेत. थोडे वर चढल्यावर पहिला दोन बुरुजांचा दरवाजा व त्यानंतर दुसरा दोन बुरुजांचा दरवाजा लागतो. त्यावर S. FRAXAVER अशी अक्षरे आहेत. या दरवाजातून आत गेल्यावर तिसरा मोठा दरवाजा लागतो. त्याच्या कमानीची लांबी सुमारे ६.७१ मी. असून त्यातून पुढे गेल्यानंतर सर्वसाधारण किल्ल्याचा मध्यभाग येतो. हा बालेकिल्ल्याचा भाग असून येथील सांत बुरुजांपैकी पाच बुरुजांना सॅम थिओगो,
११२ कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२९-३३ (नेनं, पूर्वोक्त, पृ. १८१).
१२ सरदेसाई, मराठी रियासत, खंड २, (सुधारित आवृत्ती), १९८९, पृ. ५१.
११० कित्ता, खंड ३, १९८९, पृ. ५५३.
१२५ दा. गो. ढबू, कुलाबकर आंग्रे सरखेल आंग्रे घराण्याचा इतिहास, पू. ३६८.
*** अवळसकर, आंगरेकालीन अष्टागर, पू. ९९ वरील टिप्पणी क्र. ७१७.
सॅम फान्सिस्को झेविअर, सॅम पेद्रो, सॅम इग्नॅसिओ आणि सॅम फिलिप या पोर्तुगीज संतांची नावे होती. मराठ्चांनी किल्ला काबीज केल्यानंतर १७४० मध्ये बुरुजांची नावे पुढीलप्रमाणे बदलली:- पुसत्ती, गणेश, पश्चिम देवी, चौबुरजी, राम व पान. सध्या एकाही नावाची खूण दिसत नाही. यानंतर लागणाऱ्या चौथ्या दरवाजाच्या समोर एक खड्डा असून त्याच्या बांधिव दगडी भिती दिसतात. तेथे पावसाचे पाणी साठविण्यासाठी बांधिव हौद असावा. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. डाव्या बाजूला पडझड झालेल्या इमारतीचे अवशेष असावेत. पाण्याच्या टाक्याजवळ महादेवाचे अलीकडच्या काळातील मंदिर आहे. टाक्यातील पाणी दुर्गाच्या खाली दक्षिण बाजूला असलेल्या दीपस्तंभामध्ये नेले आहे.
पाण्याच्या टाक्यापासून पुढे गेल्यानंतर किल्ल्याचे उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पोर्तुगीज भाषेतील एक शिलालेख भग्नावस्थेत पडलेला आहे. दक्षिणेकडे पडझड झालेल्या इमारतीचे अवशेष आहेत. यानंतर चॅपलची इमारत लागते. इमारतीचा पुढील भाग ढासळलेला आहे. छत्त मात्र अजून शिल्लक आहे. चॅपलच्या पाठीमागे राजवाडयाच्या धाटणीची इमारत लागते. या मुस्लिम वास्तुशैलीच्या इमारतीला एक मजला आहे. इमारतीचे दगडी बांधकाम अजून सुस्थितीत आहे. ही इमारत मुसलमानी अमदानीत बांधकाम केलेल्या वास्तूवर पोर्तुगिजांनी बांधली असावी. इमारतीच्या पाठीमागे उजव्या तटबंदीच्या आतील बाजूस कमानीचे अर्धवट अवशेष आहळून येतात, तसेच कमानीच्या समोर मोठ्या दगडी चौयऱ्याच्या पूर्व बाजूच्या भितीचे अवशेष दिसतात. यावरून हे अनुमान करता येते. ही इमारत बहुधा सेनापतीच्या निवासासाठी असावी. इमारतीच्या पाठीमागे बरीच मोकळी जागा आहे. येथे उजव्या (दक्षिण) वाजूला मंदिरांचे अवशेष आहेत. ही मंदिरे मराठ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर वांधलेली आहेत. त्यात गणेश मंदिर (३.६४ x ४.८६ मी.), मांजरादेवी (२१.२८ ९.२२ मी.) व वेदिकादेवी मंदिर (६.३८ ४ ४.८६ मी.) यांचा समावेश आहे. परंतु एकाही मंदिरात सध्या मूर्ती नाही.
मंदिराच्या भितीचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याच्या अगदी पूर्व टोकाला अजून-सुद्धा भक्कम तटबंदी असून त्याला दोन बुरूज आहेत. तटबंदीच्या खाली दक्षिणेकडील जमिनीच्या बाजूने होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून तेथे खंदक असून त्यावर लाकडी पूल होता. सध्या पूल अस्तित्वात नाही.
कोरलई किल्ल्यावर तीन पोर्तुगीज शिलालेख आहेत. पैकी फक्त किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या दरवाजावर खालीलप्रमाणे आठ ओळींचा शिलालेख वाचता येतो.
(1) ESTE CASTELO MANDO V. FAZER
(2) OVIZORI. DA INDIA DO FELIPHE
(3) MZSE DNOV BRODE 1646 ANOS 9
(4) SENDOCAPCTAO DE CHAVL. FE
(5) RNAO DE MIRANDA E RIQEAS DA
(6) CABOV SENE MAIO DE 1880 SENDO
(7) CAPITAO DE SAPRACACRIS TOVAO
(8) DABREV DAZEVEDO.
११० कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३३२, तळटिप.
११८ गॅझेटिअर कार्यालयाने फेब्रुवारी १९९२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार.
सन १८८३ मध्ये प्रकाशित कुलाबा गॅझेटिअर मध्ये (पृ. ३३१-३२) त्याचा खालील-प्रमाणे इंग्रजी अनुवाद केलेला आहे :-
"This castle was commanded to be built by the Viceroy of India D. Fellipe Mascarenhas in November of the year 1646, Fernao Miranda Henriques being Captain of Chaul, and was finished in May 1680, Christovao d Abreu, d' Azevedo being Captain of this fort. "
या शिलालेखावर मध्यभागी क्रूसाचे चिन्ह, ढाल व पोर्तुगीज तारे (quines) आहेत. बाकी दोन शिलालेखांपैकी एक प्रमुख प्रवेशद्वारावर व दुसरा किल्ल्यातील चॅपलच्या पुजास्थानाचे वर आहे. हे दोन्ही शिलालेख वाचता येत नाहीत.
कोकणच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास आपल्याला रंजक माहिती मिळते अगदी पुराणकाळी गोकर्ण ते कन्याकुमारीपर्यतचा पश्चिम किनाऱ्याचा भाग परशुराम 1ने आपला परशु समुदात फेकून निर्माण केला. अशी अख्यायिका आहे. त्यावरून कोकणची व्यासी कन्याकुमारीपर्यंत होती असे म्हणतात. सह्यादी खंड आणि मंगेश माहात्म्य था पंचात देखील सत्रकोकणचे वर्णन आढळते.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनान्यावरील लांबट आकाराच्या पट्टीस कोकण अशी भौगोलिक संज्ञा आहे. त्यालाच प्राचीन काळी 'अपरांत' म्हटले जात असे. बौध्द वाडमय आणि मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखात 'अपरांत' सेनेचे उल्लेख आढळतात. या दुसऱ्या शतकामध्ये होवून गेलेल्या ग्रीक पेटीत टोलेगी यानेही कोकणवा उल्लेख केल्याचे आले होते. त्याने ही माहिती कोकण किना-यावर सक र करणाच्या ग्रीक व्यापा-याकडून घेतली होती. त्याशिवाय अन्य एका ग्रीक पंडीताने लिहिलेल्या 'पेरीप्लस ऑफ द इरिषाकन सी' म्हणजेच तांबड्या समुद्राच्या सफरी' या पंचातील उल्लेखांवरून त्यांनी वर्णन केलेल गाव सोपारा, चौल, गोरेगाव, महाड, गुहागर असावेत वाव आहे. दोन्ही असे म्हणायला ग्रीक पंडितांच्या ग्रंथामध्ये कोकणचे उत्तर कोकण (लारिका) आणि उत्तर कोकणची जमीन समुद्रालगत जास्त डोंगराळ आहे सावित्री नदीला बिलगणाऱ्या चार उपनद्यांच्या काठावरील प्रदेश मोकळा व पिके देणारा आहे. ह्या नद्या लहान व बेडवावाकडया वाहणाऱ्या आहेत. समुद्रात मिळण्या अगोदरच या नद्यांची बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ३६० मैलाच्या कोकण पट्ट्याला निसगनि भरभरून दिले आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे संकल्प अनेकांनी केले आहेत. ते पुर्णत्वास जावून कोकणला गतवैभव प्राप्त होईल अशी सर्वांनाच आशा वाटते.
आंबोलीघाट, करूळघाट आर्दीचा समावेश आहे. कोकणातील बहुतेक नद्या पश्चिमेकडे वाहतू कोकणच्या बहुतेक भागाला लागून समुद्र किनारा आहे. समुद्राच्या पाण्यावरून किना-याकडे रोज नाहत असतात. त्यामुळे या भागातील हवा वर्षभर सौम्य असते. हवेत पाण्याची वाफ जास्त असते म्हणून हवा दमट असते, दुपारी अंगाला घाम फुटती पर्यायाने काम करायला तरतरी वाटत नाही. इथूनच कोकणची भूरचना त्याच्या एका बाजूस पर्वतराजी त्यातील दऱ्या खोऱ्या त्यांची समशितोष्ण हवा या सर्व गोष्टींचा परिणाम कोकणी माणसाच्या
प्राचीन कोकण संज्ञेची प्राचीनता इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंत मागे जाते. हेच काय त्यानंतर सात वाहन, शक, शत्रपांच्या कोरीव लेखातूनही अपरांत प्रदेशाचे उल्लेख आढळतात.
मौर्य सम्राट अशोकाचे कोकणावर राज्य होते. त्यावेळेपासून म्हणजेच इ. स. चौथ्या शतकापासून कोकणचा संगतवार इतिहास उपलब्ध आहे. त्यावेळी, कोकण या देशाची राजधानी सोपारा (जि. ठाणे) येथे होते. तसा उल्लेख सध्याही अशोकाच्या भग्न शिलालेखात सापडतो. हा शिलालेख सोपारा येथे आजही पाहायला मिळतो.
ख्रिस्त पूर्व कालापासून कोकणचा इजिप्त, अरबस्थान, पार्शिया, ग्रीक आदी देशांशी व्यापार चालत असे. इ. स. दक्षिण कोकण (आरिका) असे दोन भाग केल्याचा उल्लेख आढळतो. एका पंथात दक्षिण कोकणात अरबांच्या चाचेगिरीच्या फारच त्रास होतो असे नमूद करण्यात आले आहे.
ठाणे व रायगड हे उत्तर कोकणात मोडणारे जिल्हे तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणात मोडणारे जिल्हे आहे. कोकणच्या भूप्रदेशाचा एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वताची उंच उंचच शिखरे त्यामध्ये कोकण प्रदेश बसला आहे. उंच डोंगरात व समुद्र किनारी अति आर्द्रता व अति प्रर्जन्यसृष्टी यांचा मिलाप आढळतो बाणकोटच्या खाडीने कोकणचा दक्षिण भाग कोकणापासून विभागला गेला आहे.
पात्रे सुकी पडतात. पावसाळ्यात या नद्यांना पुर येतो. उन्हाळयात या नद्यांची पात्रे कोरडी पडतात. कोकणातील उंच उंच पर्वतावर अनेक दुर्गम किल्ले आहेत. चहुकडे घनदाट अरण्ये आहेत. सपाट जागी उस, नारळी, पोफळी पाने फळे इत्यादी गजबजलेला सुदर प्रदेश आहे. असे इ. स. १४७० च्या सुमारास कोकणच्या स्वारीवर गेलेल्या बहामणींचा शुर सरदार महमद गावाण याने लिहून ठेवले आहे.
सह्याद्री पर्वतांच्या भितांडात दमणपासून गोव्यापर्यंत अनेक खिंडी आहे. त्यातून जाणाऱ्या वाटांना घाट म्हणतात. पार घाट, माळसेज, दिवे, रामघाट, कुंभारघाट, नाणेघाट, थळघाट, भोरघाट, बालाघाट, झालेला आहे.
इ. स. च्या सुरूवातीस सात वाहन राजांची सत्ता होती. त्यांची पहिली राजधानी पैठण होती. सात वाहन घराण्यात पहिला राजा शिमुक होऊन गेला. त्याचा काळ ख्रिस्तपूर्व २३२ सुमाराचा असावा. त्याच्या कारकिर्दीत सात वाहन साम्राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकचा काही भाग मोडत होता. त्याचा नातू सातकर्णी त्याचे राजे इ. स. पूर्वी १६८ च्या सुमारास कोकण, नाशिक, खानदेश ते भंडाऱ्यापर्यंत पसरले होते. त्याशिवाय याच घराण्यातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा इ. स. पूर्व १२४ च्या सुमारास होऊन गेला त्याचेही कोकणावर राज्य होते. त्याचे काही नाणी ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे सापडली. त्यावर त्याचे राज्य दक्षिणेत पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत पसरले होते. हे स्पष्ट होते. गौतमी पुत्र सातकर्णी याच्या आईचे नाव राझी गौतमी बलश्री व मुलाचे नाव वशिष्ठी पुत्र श्री फुलुयावी होते. जो इ. स. पूर्व १३१ च्या सुमारास सातकर्णी राज्यावर बसला. त्याने सुमारे २४ वर्षे राज्य केले. कार्ले व कान्हेरी येथील लेण्यात त्याचे लेख सापडले. त्यावरून त्याचे राज्य कोकणात होते हे दिसून येते.
क्रमशः
स्वभावावर
सजाता सामंत
अशी ही कोकणाच्या निर्मितीची आख्यायिका कथ अशी
सह्याद्रीमुळे समुदसपाटीची पश्चिम किनारपट्टी आणि उंचीवरचे पठार विभक्त झाले. पश्चिम किनारपट्टी कोकण म्हणून ओळखली जाउ लागली. तळकोकण, उत्तर कोकण असाही भेद दाखवला जाउ लागला. किनारपट्टीचे कोकण आणि दख्खनचे पठार म्हणजे देश यात मुलभुत फरक आहे. कोकणचा इतिहास बराचसा एकसंध तर देशावरच्या भुभागाचा इतिहास मात्र बराच विवीध परंपरा सांगणारा, त्यामुळे कोकणात शिरण्यापुर्वी या चिंचोळ्या भुभागाची एतिहासिक पार्श्वभुमी समजून घेणे अगत्याचे आहे.
कोकणाला प्रदीर्घ इतिहास आहे. अस कोकणाभिमानी म्हणतात, पण सुरवातीच्या इतिहासात आख्यायिका आणि लोककथा यांचे भारुड अधिक, त्यासुध्दा पोथीबध्द ! पोथ्यांंमध्येही पाठभेदच अधिक. एकीचा दुसरीशी ताळमेळ नाही. त्या पोथ्याही किती शिल्लक राहील्या आहेत ? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्यासुध्द नाहीत. कोकणातील गावा-गावला वास्तविक मोठा इतिहास आहे, पण ऐतिहासिक साधनांची अशी हि दैना. त्यामुळे आख्यायिका गोळा करतानाही दमछाक व्हावी. अर्थात कोकणचा जुना इतिहास गोळा करताना दमछाक कमी होण्यासाठी अगदी काही मोजक्या अभ्यासकांचे श्रम सार्थकी लागते आहेत. ऑर्थर क्रॉफर्ड या ब्रिटीश सनदी अधिकार्याने 'लिजेन्ड ऑफ कोकण लिहून (प्रथम प्रकाशन १९०९ कोकणवासीयांवर खुप उपकार करुन ठेवले आहेत.त्याच प्रकारचे लक्षणीय कार्य रेव्हरण्ड अलेक्झांडर किड नैर्न ( 'हिस्टरी ऑफ कोकण', १८९४) आणि कर्सन डाकून्हा ( नोट्स ऑन द हिस्टरी अॅण्ड अॅन्टिक्विटीज ऑफ चौल अँड बसिन १७७६ ) यांनी केले.आहे. अगदी वेगळ्या म्हणजे भाषेच्या अंगाने जाणारे कार्य रेव्ह ए. मॅनवेअरींग (मराठी प्रॉव्हर्बज १८९९) यानं आहे.
कोकण ही परशुरामाची भूमी मानली जाते. परशुरामाबरतच्या आख्यायिका दंतकथा म्हणा हवं तर तरी एकत्र कुठं आहेत? ऑर्थर क्रॉफर्डने चिपळुणच्या एका नामवंत ब्राह्मणाच्या मदतीने या काही एकत्र तरी केल्या. हिंदुल्हनात सरकारी नोकरीसाठी आलेल्या ऑर्थर क्रॉफर्डचा चिपळुणशी अनेक वर्ष संबंध आला. संस्कृत शिकग्याच्या प्रयत्नात असताना त्याचा राघोबा महादेवराव या चित्पावन ब्राह्मणाशी सलोखा झाला वयाची साठी उलटलेला राघोबा प्रकांडपडित तर होताच पण पिढीजात वारशाने आलेल्या अनेक पोथ्या त्याच्याकडे होत्या,.आपल्या संग्रहातली एकही पदेवी तो द्यायता वा विकायला तयार नव्हता. वास्तविक क्रॉफर्डला तो संग्रह विकत घेऊन एशियाटिक लायब्ररीसारख्या सार्वजनिक ग्रंथालयाला घायचा होता त्यासाठी मोठी किंमत मोजायला तो तयार होता, पण वाडवडिलार्जित ठेवा कोणाकडे सुपुर्द करायला राघोबा तयार नव्हता. क्रॉफर्डचं सारं लक्ष त्या संग्रहातल्या एका पोथीकडे होते. त्या पोथीत चित्पावनाची खरी आख्यायिका नमुद केली होती म्हणे. १८१२ मध्ये पुण्याला एका देशस्थ ब्राह्मणानं ती प्रसिद्ध केली होती, अस क्रॉफर्ड लिहितेो. परशुरामानं समुद्रकिनारी निश्चेष्ट पडलेल्या अरबांच्या प्रेतांमध्ये जीव टाकून चित्पावनांची निर्मिती केली, अशो काहीशी ती दंतकथा आहे.
बाजीराव पेशव्यांनी त्या पोथीच्या सर्व प्रति जाळून टाकण्याचा हुकुम सोडला होता. अश्या प्रक्षिप्त वागमयातील पोथी राघोबा भट हा क्रॉफर्डच्या हाती थोडीच लागु देणार होता. कारण हि पोथी जवळ बाळगणान्यास देहातांची सजा होती. इ.स. १८८७ मध्ये राघोबा भटाने संन्यास घेतला, परंतु दोनच वर्षातच त्याचे निधन झाले. चिपळूण जवळ परशुराम पर्वतावरच त्याचे दहन झाले, अस क्रॉफर्डने लिहीले आहे. त्याच्याजवळ असलेल्या वाडवडीलोपार्जित ठेव्याचे पुढे काय झाले कळायला मार्ग तरी काय ? संन्यासी होण्यापुर्वी आपल्या जवळच्या पोथ्या क्रॉफर्डला राघोबा भटाने मोठ्याने एकेक करुन वाचून दाखवल्या. क्रॉफर्डने राघोबा भट वाचत असताना टिपण काढली. अन त्या टिपणाच्या सह्याने 'लिजेण्डस ऑफ कोकण' हे पुस्तक जुळवल. त्यातील एकेक दंतकथा वाचताना आज गंमत वाटते. पोथीत टाकलेली कथा सांगण्याची हतोटी विलक्षण होती. आणि क्रॉफर्डने ज्या आंग्ल भाषेत राघोबा भटाबरोबरचा संवाद लिहून काढला. ती पध्दतही विलक्षण. ज्या तात्कालिन ब्रिटीशा वाचकांनी क्रॉफर्डचे पुस्तक वाचल त्यांना या अदभुत कहाण्या कितपत रुचल्या हे कळायला मार्ग नाही. पण ज्या आंग्ल भाषाप्रवीण एतद्देशीयांनी कहाण्या इंग्रजीतून वाचल्या असतील त्यांना परकीय भाषेत आपले वागमय कस न्यावे याचे दाखले मिळाले असणार हे निश्चित. क्रॉफर्डने गोळ्या केलेल्या आख्यायिकांपैकी कोकणनिर्मितीची कथा अशी.
प्रभु श्रीराम -लक्ष्मण या बंधूना उत्तरेकडच्या बर्फाच्छादीत पर्वतराजीवर राहून कंटाळा आल्याने त्यांनी समुद्राच्या राज्यात - कोकण किनारपट्टीकडे प्रस्थान केले. एका दमात प्रथम नासिक अन् नंतर सह्यपर्वतराजीपर्यंत त्यांनी मजल मारली. वाईजवळ नीरा अन् कृष्णा या दोन नद्यांमधलं पाणी प्यायला ते थांबले असतील तेवढंच. सारा दैवी मामला। अस आपल्याला वाटेल. पण या दंतकथेत तसे नसते. राघोबा भटानं सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचे मनुष्यावतारात रुपांतर झाले कि दैवी व्यक्तींनाही मानवी सुख- दुख सोसावी लागतात. .when the gods assume human form they are subject to human ills
सहाद्री कसा व कुठून उतरायचा याचा विचार राम-लक्ष्मण करत राहिले. पूर्वी दोनदा त्यांनी कुम्भालों घाट उतरला होता. पण दोन्ही वेळी त्यांना त्रास झाला होता नवीनच एखादा मार्ग शोधून काढू या, लक्ष्मणार्थ म्हणणं ! राम-लक्ष्मणाची चर्चा त्यांच्या भोवतालच्या वृक्षराजीवर बसलेल्या वासरांनी ऐकली त्याला सर्वात वृद्ध कनर झाडावरून खाली उतरला. दोन बंधूच्या समोर उभा राहून म्हणाला ' आम्ही परशुरामाचे पूजक आहोत आम्ही तुम्हाला मार्ग दाखवत चिपळुणपर्यंत नेउन पोहचवू. पण दिवसाढवळ्या रात्री राक्षसांची भिती भिती वाटते. ' राम-लक्ष्मणांनी विचारलं, तुम्ही राक्षसांना भिता ? ते काही चालायचं नाही. आपण लढू ना त्यांच्याशी ! लक्ष्मणा माझ्या धनुष्याला नवा प्रत्यंचा लावून घे. उद्या पहाटेच आपण घाट उतरायला लागू'
राघोबा भटानं क्रॉफर्डला थाप ठोकली की 'तुम्हाला माहीतीच आहे घाट एक हजार फूट तरी उताराचा आहे', क्रॉफर्डने राघोबा भटाची रेवडी उडवली, 'थापा मारु नका राघोबा भट, घाट फक्त चारशे फुटांचा आहे.' राघोबा भटाने लगेच माघार घेतली. भलंभलं असो ! पण उंचावरून स्वच्छ आकाश असेल तेव्हा चाळीस मैलांचा टापु नजरेत येतो. उत्तरेकडच्या दाभोळ, महिपतगड इथल्या समुद्रातली शिडं छोट्या-छोट्या माशांइतकी दिसतात, तर दक्षिणेकडे मुल्ला घाटातनं बाहेर आल्यासारखा भैरुगड दिसतो. पण ते जाऊ दे, मी पोथीच वाचून दाखवतो कमा' असा दोघांचा संवाद कहाणी-कथनात खुमारी आणतो.
राम-लक्ष्मण 'देशावरच होते. मग त्यांना समुद्र दिसणार तरी कसा? ते सह्यकड्यापासून पंधरा कोस दूर असल्याने कराडलाच निद्राधीन झाले. सूर्य समुद्रात डुबला मारं जग झोपलं. निसर्ग झोपला. पशु झोपले, चंद्र मात्र उगवला सारं जग झोपले तरी तीन पुबह जागीच होती चंद्राने आपल्या प्रवासात राम -लक्ष्मणाची जोडी निद्रिस्त अवस्थेत पाहिली. काही काळ गेला अन् घुबडांना कशाची तरी चाहुल लागाती त्यांनी ओरडायला मुरुवात केली. त्वरित जाग आलेल्या रामानं लगेच हातात धनुष्यबाण घेतला लक्ष्मणाला हाक मारली,
राक्षस आले रे आले ! ढाला, भाला आण लवकर ! लक्ष्मणाला काय झाले ते कळेना. कोणीही दिसत तर नव्हतच. पण स्वच्छ, निरभ्र आकाशात अचानक ढग जमा झालेले त्याला दिसले. पश्चिमेकडून ते येत होते. त्यांच्या पाठोपाठ एक वादळ आलं. त्याच्या मागोमाग चिडलेला समुद्रदेव उभा। भत्या मोठ्या लाटा उठत्या, दोन्ही बंधूंना त्या लाटांनी अक्षरशः भिकबून टाकलं समुद्रदेव हातात भला मोठा शंख घेऊन उभा होता त्याच्याभोवती मोठाले माने आणि अक्राळविकात जलवर, लाटा उठत, फुटत, त्यानुसार जलवर वर-खाली होत होते.'इथे काय करत आहात ? माझ्या भूमीवर तुमचं आक्रमण ? राम-लक्ष्मण ना तुम्ही ? एवढेसे तर आहात. निधून जा इथून, नाहीतर पाण्याच्या तळाशी पोहोचवीन तुम्हाला'. समुद्रदेवानं दटावून साँगितले. राम काहीच बोलला नाही त्यानं एक मोठा खडक उबलता अन् अचूक त्याच्या दिशेनं फेकला समुद्रदेवाच्या तोंडाशी असलेल्या शंखाचा त्या खडकाचा चक्काचुर केला. समुद्रदेवाचा पारा चढला ''लढाई करायची। दुःखीचा शेवट करायचाय ठिक आहे. उद्याची सकाळ ठरवीत या जलजगताचा नियंता कोण? राम महागाला,' एकदम मान्य'. प्रभु श्रीरामाने धनुष्याला स्पर्श करताच समुद्रदेवाने आपल्या दोन्ही हातातील समुद्रातील सागरवेल सर्व दिशेन फेकली. अहो आश्चर्य ! वीज कडाडल्याचा आवाज झाला. पर्वताच्या शिखराचे तुकडे झाले पृथ्वीच्या उदरातून जणू पाण्याची कारंजी उडाली. त्यात समुद्रदेव लुप्त झाला. उद्या, उद्या असा ध्वनी मात्र काही काळ येत राहिला श्रीराम मात्र निश्चल अढळ आत्मविश्वासात उभे होते. अजिक्य अशा धनुष्यबाणाचे बळ ते जाणून होते.
लक्ष्मण घाबरून मूच्छित पडला होता. त्याला जागे करून दोघेही कराडला परतले - विश्रांतीसाठी ! दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यासाठी रामाने धनुष्याला नवी प्रत्यंचा लावून तयारी करून ठेवली वानरांकडून बागही तयार करविते. पुन्हा सूर्य अस्ताला गेला. जग निद्रिस्त झालं. पशुपक्षी विश्रांती घेऊ लागले, भुंगे अन् घुबड तेवढे जागृत अवस्थेत होते.
समुद्रदेवाला आपण कोणाला आव्हान दिले आहे याची कल्पना होती. त्यानं भरपुर तयारी केली. पाठीवर पडून संथ पाण्यावर तरंगत तो काय काय करावं ? या विचारात पहुडला असताना त्याला भुंग्याचे गुणगुनणे एकु आले. संधी प्रकाशात भुंगे पाण्याशी जवळीक साधतात अन् मग टयून बसलेले जलचर त्यांना खाऊन टाकतात. अशा एका भुंग्याला मासा टपकन खायच्या बेतात असताना ममुद्रदेवानं त्याला सावध करुन वाचवले आणि हाताच्या तळव्यावर त्याचे पंख सुकविण्यासाठी त्याला ठेवले. प्राण वाचवल्याच्या आनंदात तो नाचू-बागडू लागला कपटकारस्थानात प्रवीण असलेल्या समुद्रदेवाच्या मनात मात्र भलत्याच विचारांचे थैमान बालू होतं.
'तुझे प्राण वाचवल्याबद्दल तू माझा ऋणी आहेस म्हणतोस नाः मग तुझे शब्द खरे करून दाखव ! प्रभु रामाच्या कळपात जा. जवळच आहे. माझे मार्गदर्शक तुला ती जागा दाखवतील. त्याचे धनुष्य कोठे ठेवले आहे हे ही दाखवती. इतरही कीटक तिथे उडत असतीलच. तुला फक्त एवढे करायचे आहे कि धनुष्याच्या आतल्या बाजुला जाउन बसायचे आणि त्या लाकडी धनुष्याला पोखरत सुटायचं अगदी सकाळपर्यंत पोखरायचं. कळलं ना। बपू या तरी तू ऋण कस फेडतोस ते? हे तू केलं नाहीस तर मात्र तुझा अंत ठरलेलाच आहे असे समझ.
भुंग्यानं आपलं काम नाइलाजानं पण चोख केले. कोणालाही काही कळले नाही. घुबडांना काहीतरी आवाज येत होता, पण नक्की कशाचा ? ते समजले नाही.
सकाळी राम-लक्ष्मण अन् समुद्रदेव समोरासमोर उभे ठाकले. राम-लक्ष्मण उंचावरच्या कड्याच्या टोकाला तर समुद्रदेव एकदम तळाला धुंग्यानं आपले काम एकदम चोख केल्याचे समुद्रदेवाला कळाले होतेच. प्रभु रामाला मात्र ते माहिती नव्हते. त्याने हाती धनुष्य घेतलं अन् प्रत्यंचा लावली.' कशाला आलात पुन्हा ? माझ्या हातून पराभव स्विकारायला ? हरलात तर माझ्या लाटा तुम्हाला जलसमाधी देणार हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रच काय, पण श्रीलंकेपर्यंत सारा प्रदेश मी गिळून टाकणार '- इति समुद्रदेव.
' माहिती आहे . जिंकलास तर ना ?'श्रीराम
प्रभुरामानं प्रत्यंचा ओढली त्याक्षणी धनुष्यातून कडकड आवाज झाला. धनुष्याचे दोन तुकडे झाले पण ते इतके सामर्थ्यशाली होते कि त्यातून निघालेला बाण समुद्राच्या छातीत घुसला. नंतर राम लक्ष्मण जिथे उभे होते तिथून अठरा कोस म्हणजे छत्तीस मैल जाउन पडला. जखमी समुद्रदेव हटला. जमिनीवर प्रचंड उलथापालथ झाली. , ज्वालामुखी फुटले. लाव्हारस पसरला आणि राखरांगोळी झाली.
रामेश्वर : चौलच्या १५ पाखाड्यांपैकी "भोरसी" पाखाडीत हे मंदिर आहे. ते केव्हा
व
कोणी बांधले याचा उल्लेख मिळत नाही, पण मंदिराची दुरुस्ती अनेकदा झाल्याचे
आंगरेकालीन उल्लेख आहेत. ऑक्टोबर १७४१ रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर
श्रीभगवान स्वरूप श्रीनिवास दीक्षितबाबा नावाच्या गृहस्थाने या मंदिराचा
जीर्णोध्दार केला. त्यासाठी लागलेले द्रव्य नानासाहेब पेशवे व मानाजी आंगरे
सरखेल यांनी पुरविले. मात्र त्यांचे हातून काम पुरे झाले नव्हते. कपलातं
करणे, रंग देणे इत्यादी किरकोळ कामे राहिली, ती विसाजीपंत सरसुभेदारने
१७६९-७० मध्ये पुरी करून नंदीजवळ दीपमाळ व तुळसीवृंदावन बांधले. मार्च १८१६
मध्ये रामेश्वर मंदिराचा नगारखाना बांधण्याचे काम सुरू झाले.
मंदिरासमोरच्या पुष्करणीची दुरुस्ती मार्च १८३८ मध्ये झाली. त्यावेळी उत्तर
व दक्षिण बाजूच्या दुरुस्तीस ५०० रुपये खर्च झाले. रामेश्वर मंदिराजवळ
आणखी दोन लहान मंदिरे आहेत. पेशव्यांचा सेनापती हरिपंत फडके याचा मुलगा
माधवराम हरि १७९४ मध्ये अनेक दिवस रेवदंड्यात होता. रामेश्वर मंदिराच्या
पूर्वेस शेणवी लोकांनी बांधलेल्या नारायण मंदिराचा त्याने जीर्णोद्धार
केला.
महाशिवरात्रीला रामेश्वरला पाच दिवस यात्ना भरत असे.
मंदिरात देणग्या देण्याची पूर्वापार पद्धती आढळते. त्यांचे काही नमुने
असे:- ७४, ६५ किलोग्रॅमची पंचरसी शाळुंका व ४.६७ कि. ग्रॅ. चा नागफणा अर्पण
केला, ८.९१ कि. ग्रॅ. रुप्याचा पंचमुखी मुखवटा व दुसऱ्या बाजीराव
पेशव्याने ऑगस्ट १८१७ पूर्वी रामेश्वरास अर्पण केलेला नंदादीप. मंदिराच्या
सभागृहात अग्निकुंड व पर्जन्यकुंड आहेत. रामेश्वराच्या मूर्तीसमोर सभागृहात
अग्निकुंड, उत्तरेस नारायणाच्या मूर्तीसमोर कमानीखाली पर्जन्यकुंड आणि
दक्षिणेसः गणपतीच्या मूर्तीसमोर वायुकुंड आहे. ज्यावेळी हवेतील उष्मा
नाहीसा होतो त्यावेळेस अग्निकुंड उघडतात, बारा पडतो तेव्हा वायुकुंड उघडतात
आणि पाऊस पडत नाही तेव्हा पर्जन्यकुंड उघडतात. प्रत्येक कुंड साधारण १.२२
मीटर चौरसाकृती आहे. कुंडाच्या वेदिका पूर्वी बऱ्याच खाली होत्या. सन १७४१
मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा जमीन चढविली व वेदिकेची वर बांधणी
करून कुंडांची मूळची उंची वाढविली. पर्जन्यकुंड उघडल्याचे बरेच जुने दाखले
मिळतात. जून १७३१ मध्ये पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून सेखोजी आंगरेने
पर्जन्यकुंड उघडल्याचा दाखला मिळतो व कुंड उघडल्यावर पर्जन्यवृष्टी
झाल्याचे म्हणतात. सन १८७६ व १९४१ मधील अवर्षणाचे वेळीही पर्जन्यकुंड
उघडल्याचे म्हणतात.
पूर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा
गाभारा सुमारे ४.४२४४.४२ मीटर असून मध्यभागी १.५० मीटर लांब रुंद व
जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्न्याने मढवलेली असून मध्यभागी १.५० मीटर
लांब रुंद व जमिनीपासून थोडी उच पितळी पत्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या
मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खड्डयात स्वयंभू मानलेले
शिवस्वरूप आहे. गाभाऱ्यात संगमरवरी फरशी आहे. गाभाऱ्याच्या जमिनीपासून
सुमारे ७.६२ मीटर उंच असलेल्या शिखरांचे व संपूर्ण गाभाऱ्याचे बांधकाम दगडी
आहे. गाभाऱ्याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर
असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या इमारतीपुढील भाग
मोठा असून त्यास सभामंडप म्हणतात. याच मंडपात वर वर्णन केलेली तीन कुंडे
आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपातं उभे राहिले असता उजव्या म्हणजे
उत्तर बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या
बाजूच्या कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे तर
मध्यभागी अग्निकुंड आहे. गाभाऱ्याबाहेरील जागेत तसेच सभामंडपात शहाबादी
फरशी आहे. उपरोक्त तीनही कुंडे सध्या या फरशीखाली आहेत. सभामंडपात प्रवेश
करण्यासाठी दर्शनी भितीत मध्यभागी मोठा दरवाजा आहे. घडीव दगडात बांधलेले हे
मंदिर हेमाडपंती पद्धतीसारखे वाटते. बांधकाम करताना लोखंडी चापात दगड
बसविले आहेत. रामेश्वर मंदिराच्या उत्तरेस एक कि. मी. अंतरावर पूर्वाभिमुख
असलेल्या मुखरीच्या गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे.
एकविरा भगवती देवी :
हे चौलचे दुसरे प्रसिद्ध मंदिर असून आंगरेंच्या उत्तर कालात या
मंदिराचा अनेकदा किल्ल्यासारखा उपयोग केल्याचे दिसून येते. एकविरा भगवतीने
या
मंदिराचा अनेकदा किल्ल्यासारखा उपयोग केल्याचे दिसून येते. एकविरा भगवतीने
आंगऱ्यांच्या दुसऱ्या यादवीत बराच रक्तपात पाहिला. सन १७९६ मध्ये मानाजी व
जयसिंगराव आंगरे यांच्यातील तुंबळ युद्धात मानाजीचा बीमोड झाला. भगवती
देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असून मंदिर संपूर्णपणे लाकडी व कौलारू आहे.
मंडपात पाच लाकडी खांबांच्या दोन रांगा असून पश्चिमेकडील शेवटच्या दोन
खांबांच्या मध्ये लहान शिखर असलेली गाभाऱ्याची स्वतंत्र इमारत आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७३, फाल्गुन शु. ७ (इ. स. १७५२) रोजी
सुरू केले असे गाभाऱ्याच्या दरवाजाच्या बरील बाजूच्या तुळईवर पाच संस्कृत
वाक्यांत कोरले आहे. देवीचा उत्सव नवरात्रात होतो. पूर्वी फार मोठी यात्रा
भरत असे.
शीतलादेवीचे मंदिर :
चौल नाक्यापासून दोन किलोमीटर
असलेले शीतलादेवीचे मंदिर पुरातन असून अजूनही फार प्रसिद्ध आहे. देवीचे
स्थान जागृत समजले जाते. पूर्वीची स्थिती लक्षात घेता हे मंदिर चौलच्या
दक्षिणेस खाडीजवळ बांधले होते परंतु आता जवळपासची खाडी भरून बरीच जमीन
वाढली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार १७५९ मध्ये केला. आंगरे घराण्याची या
देवतेवर दृढ भक्ती होती.
पूर्वीचे आंगरेकालीन लाकडी व कौलारू मंदिर
पाडले असून त्याच जागेवर २७ मार्च १९९० रोजी गुढी पाडव्याच्या
शुभमुहुर्तावर नवीन सिमेंट काँक्रीटचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
ऑक्टोबर १९९० मधील सर्वेक्षणापर्यंत बरेच काम झालेले आढळले. पूर्वाभिमुख
मुख्य प्रवेशद्वाराशिवाय उत्तर व दक्षिण बाजूसही प्रत्येकी एक प्रवेशद्वार
आहे. मुख्य प्रवेशद्वार व सभामंडपावर एक एक कळस असून सभामंडपावरील कळस
जास्त उंच असेल. गाभाऱ्यात देवीची मूर्ती मूळच्या ठिकाणीच स्थानापन्न आहे.
सातारा, पुणे व रत्नागिरीकडूनही बरेच भाविक दर्शनासाठी येतात.
महाकाली मंदिर
शीतलादेवीचे दर्शन घेऊन एकविरा भगवती मंदिराकडे जाताना मध्येच त्वष्ठा कासार ज्ञाती संस्थान, रेवदंडा, यांचे महाकाली मंदिर लागते. या मंदिराचेही जीर्णोद्धाराचे काम चालू असून शीतलादेवी मंदिराशी तुलना करता ही इमारत बरीच मोठी आहे. मे महिन्यात देवीची यात्रा भरते.
दत्त मंदिर, भोवाळे :
चौल नाक्यावरून दोन कि. मी. अंतरावर डोंगर माथ्यावरील दत्त मंदिर फार
जुने नसले तरी दत्तभक्तांचे जागृत श्रद्धास्थान तसेच एक निसर्गरम्य ठिकाणं
आहे. मार्च-एप्रिल १८१० मध्ये या डोंगरावर एक दत्तभक्त गोसावी राहत होता.
एके दिवशी त्याने दत्ताच्या पादुका पूर्वीच्या जागेवरून आपल्या मठीत आणून
ठेवल्या. मार्च-एप्रिल १८३१ मध्ये दगडी दीपमाळ बांधण्यात आली. डिसेंबर १८३४
मध्ये रेवदंड्याच्या गोविंद वाडकर नावाच्या कोळी गृहस्थाने पादुकांच्या
भोवताली प्रदक्षिणा मार्ग बांधून वर कळस बांधला. पुढे १८४३, १८४७ व १८५२
मध्ये अनुक्रमे मंडप, घरे व पायऱ्या बांधण्यात आल्या. दिनांक २८ नोव्हेंबर
१८५७ रोजी पाषाणाची निमुखी दत्तमूर्ती पादुकांच्या शेजारी बसविण्यात आली.
अदमासे साडेसातशे पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला स्वामी समर्थ
अक्कलकोट निवासी मठ आहे. त्याचा १९८८ मध्ये जीर्णोद्धार झाला. त्यानंतर
क्रमाने सभागृह, समाधी सत्चित् आनंद साधना कुटी, पाठारे क्षत्रिय पाचकळशी
लोकांचे हरेराम विश्रामधाम, धुनीमंदिर व जवळच दत्तगुरुच्या संगमरवरी पादुका
असलेला औदुंबर मठ आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील माई जानकीबाई व
हनुमानदासबाबा मठात बऱ्याच मूर्ती पाहावयास मिळतात. या ठिकाणावरून
नारळीपोफळीच्या बागांतून दडलेले चौल-रेवदंडधाचे दृश्य व भोवाळे गाव व
भोवाळघाचे तळे स्पष्ट दिसते. सांप्रतचे आधुनिक पद्धतीचे सिमेंट काँक्रीटचे
दत्त मंदिर १९५६-५७ साली अस्तित्वात आले. देवालयाच्या आकर्षक कमानीपासून
गाभाऱ्यापर्यंत आकर्षक जिना आहे. वर गाभाऱ्यासमोर मोकळी जागा असून समोरच्या
खांबाला आडव्या बांधलेल्या नवसाच्या घंटा तसेच भितीवर देणगीदाराचे
संगमरवरी नामफलक आहेत. मंदिरातील पाषाणाची दत्तमूर्ती त्रिमुखी व सहा
हातांची आहे. मूर्तीच्या डाव्या वाजूच्या कोपऱ्यात दर्शनी भागावर लेख
कोरलेल्या चौकोनी काळया दगडावर सुबक पादुका कोरलेल्या आहेत. दरवर्षी
मार्गशीर्ष पौणिमेपासून संकष्टी चतुर्थीपर्यंत दत्तजयंतीचा उत्सव साजरा
होतो. तेव्हा फार मोठी यात्त्रा भरते. दत्तजयंतीच्या दिवशी थेरोंडा येथून
श्री. दत्तगुरुंचा चांदीचा मुखवटा पालखीतून बाजतगाजत दत्त मंदिरात आणून
देवालयातील मूर्तीवर बसवितात. पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजाच्या या पालखी
प्रथेला सुमारे नव्वद वर्षे झाली. दत्त मंदिराच्या डोंगरमाथ्यावर जिल्हा
परिषदेने सुमारे तीन लाख रुपये खर्च करून नळाने पाणी पुरवठ्याची सोय केली
आहे. सन १९६५ पासून वीज उपलब्ध झाली.
हिंगुलजा :
चौल येथे
दत्तात्त्रयाप्रमाणेच पर्वतनिवासीनी देवीचेही मंदिर आहे. एका सलग खडकात
कोरलेल्या दगडी मंदिरात पार्वतीचे रूप असलेली हिंगुलजा किंवा हिंगळादेवी
आहे. तिच्या डाव्या उजव्या बाजूस आशापुरी व नवचंडी नावाच्या आणखी दोन देवी
आहेत.
दरवर्षी पौष पौणिमेला यात्रा भरते. या देवीचे प्रामुख्याने भक्त
असलेले भनसाळी लोक मुंबईहून येतात. येथे राहण्यासाठी त्यांनी निवासही
बांधले आहे. भोवतालची रम्य वनधी व डोंगरमाथ्यावरील दत्त मंदिरामुळे
श्रद्धास्थानाबरोबरच हे एक सहलीचे स्थानही बनले आहे.
या परिसरात
काही बौद्ध लेणी आहेत. डोंगरकड्यात आग्नेयेस पायथ्यापासून सुमारे ३०.४८
मीटर उंचीवर ०.९७ × १.६८ मीटरचा दरवाजा असलेले ३.३५ x १.७८ × १.६८ मीटर
लांबी, रुंदी व उंचीचे लहान लेणे आहे. बाहेर ३.३५ x १.५२ मीटरचा सज्जा असून
शेड उभारण्यासाठी भोके आहेत. या लेण्यात कसलेही कोरीवकाम किंवा लेख नाहीत.
या गुहेत लागूनच पश्चिमेस २.३१ x १०३२ ४ २.४४ मीटरचे दुसरे लेणे आहे.
समोरची बाजू तुटलेली असून व्हरांडा अरुंद आहे. दगड चांगला नसल्याने या
लेण्याचे काम अपुरे ठेवले असावे. या दोन लेण्यांप्रमाणे पश्चिम बाजूस
तितक्याच उंचीवर पश्चिमाभिमुख असलेल्या हिंगुलजा देवीच्या मंदिराकडे रस्ता
जातो. नैऋत्येकडून असलेल्या सुमारे १५८ पायऱ्या चढून गेल्यावर मंदिरात जाता
येते. वरील पायरीच्या उजव्या बाजूस दगडात कोरलेले ५.२६ ४ ४.६५ x २.०३ मीटर
आकाराचे एक लेणे आहे. त्याच्या बायव्येकडील खोदलेल्या कोपऱ्यात आशापुरी
देवी आहे. दक्षिणेकडील भितीत १.३७ × १.०२ मीटर व १.२२ मीटर चौरसाकृती
आकाराच्या दोन खोल्या आहेत. पश्चिमेकडील समोरच्या भिंतीत खिडकी आहे.
लेण्याच्या बाहेर उजव्या बाजूच्या ३० पायऱ्या चढून गेल्यावर दगडात खोदलेली
पाण्याची दोन टाकी आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीजवळ थोडे उत्तरेस
दरवाजाच्या आत हिंगुलजा देवीचे मंदिर असून त्याच्या सभोवार अरुंद मार्ग
आहे. समोरच्या मोकळया जागेवर अलीकडेच सिमेंट काँक्रीटचा सभामंडप बांधला
आहे. त्याच्या समोर (परंतु खालच्या पातळीवर) खुल्या जागेवर तुळसीवृंदावन व
दीपमाळ आहे. तेथून लांबवरचा सुंदर देखावा दिसतो. मंदिरापलीकडे जवळच ओळीने
पाच लहान बौद्ध लेणी असून एका लेण्यात अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. सात
क्रमांकाच्या लेण्याबाहेर स्तूपाचे उठावशिल्प कोरलेले आहे. त्याच्या
घडणीवरून स्तूप सन १५० मधील असावा. या लेण्याच्या पलीकडील दरवाजातून पाऊल
वाटेने टेकडीवरील दत्त मंदिरात जाता येते.
सोमेश्वर मंदिरः एकविरा
भगवती मंदिराकडून पुढे हिंगुलजा देवी, बौद्ध लेणी आणि दत्त मंदिर असलेला
डोंगर डाव्या हातास ठेवून डांबरी रस्त्याने सरळ सुमारे दोन किलोमीटर अंतर
चालून गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूस खोलगट भागात सोमेश्वर मंदिर आहे.
एकापुढे एक अशा दोन दगडी चौकोनी इमारतीपैकी मागील म्हणजेच गाभाऱ्याच्या
इमारतीवर पसरट व कमी उंचीचा गोलाकार घुमट आहे. अलीकडेच मंदिराची दुरुस्ती
केली आहे. बाह्यमंडप सुमारे ७.६२ मीटर चौकोनी असून आतून अष्टकोनी आहे.
गाभारा सुमारे ६.०९ मीटर चौकोनी असून त्याच्या भिती ३.३५ मीटर उंच आहेत.
गाभाऱ्याच्या मध्यापासून घुमटाची उंची ४.५७ मीटर आहे. गाभाऱ्यात खूप
अंधारामुळे काहीही दिसत नाही. पुढच्या मंडपापेक्षा गाभारा सुमारे १.८३ भौटर
खोलगट आहे. गाभाऱ्याकडे तोंड करून उभे राहिले असता डाव्या बाजूस
गाभाऱ्याच्या मंदिराबाहेर विहीर आहे. अलीकडे ती बरीचशी बुजली आहे. तरी तेथे
साठलेले पाणी झिरपून गाभाऱ्यात येते.
हमामखाना :
एकविरा भगवती मंदिराच्या सुमारे एक कि. मी. दक्षिणेला एक लहानसा उंचवटा व
पोखरण आहे. तेथून जवळच आग्नेयेला मुसलमानकालीन हमामखाना किंवा स्नानगृह
आहे. हमामखान्याच्या उत्तरेकडील भितीत प्रत्येकी २.८९४ २.२९४ ३.६६ मीटर
आकाराच्या कमानीयुक्त सहा ओवऱ्या असून पूर्वेकडील बाजूच्या २.७४ मीटर
रुंदीच्या दरवाजाने दोन कमानीतत ६ ११ मोटर चौकोनी प्रमख दालनात जाता येते
हे सर्व अवशेष पडझड झाली असली तरी अजून उभे आहेत. मात्न प्रमुख दालनावरील
सुमारे ९.१४ मीटर उंचीवरील घुमट पडलेला आहे. दालनाच्या मध्यभागी पूर्वी
अष्टकोनी कारंजे असावे. दालनाच्या उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूंच्या भिंतीत
कमानीयुक्त बैठकीची सोय आहे. दालनाच्या वायव्य कोपऱ्यातील वळणाच्या अरुंद
वाटेने आत गेल्यावर उत्तर बाजूस ४.८८४४.११ मीटर व दक्षिणेस ७.९२० ३.९६ मीटर
आकाराची दोन स्नानगृहे आहेत. स्नानगृहांच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर
जुन्या आसा मशिदीचे काही अवशेष आढळतात.
चौल नाक्यावरून
शीतलादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने काही अंतर गेल्यावर हमामखान्याकडे
जाण्यासाठी वळण्यापूर्वी रस्त्यालगत डाव्या बाजूस मुसलमानकालीन
हजामखान्याची कशीबशी उभी असलेली अर्धवट भित दिसते. कबरस्तान, आसा मशीद,
हमामखाना, हजामखाना इत्यादी अवशेषांवरून या परिसरात मुसलमानी राजवटीत
प्रांताधिकाऱ्याचे मुख्यालय असावे.
कलावंतीणीचा वाडा : सोमेश्वर
मंदिराकडे जाताना सुमारे २.४ कि. मी. अंतरावर दगड चुन्यात बांधलेल्या
मुसलमानी पद्धतीचा भग्नावस्थेतील कलावंतीणीचा वाडा होता. त्याचे काही अवशेष
शिल्लक आहेत. त्याच्या दर्शनी बाजूस घडीव दगडांच्या तीन शिखर असलेल्या
कमानी व तीन विटांनी बांधलेले घुमट होते. सभागृहाला तीन घुमट व दोन्ही
बाजूस दोन मोठ्या देवळया होत्या. त्याच्या पश्चिमेला ५० पावले रुंद व ७०
पावले लांब अशी चहूबाजूंनी भिती बांधलेली जागा होती. त्यापुढे १३.९५ मी. x
४.०५ मी. आकाराची मशीद होती. मशिदीमागे एक मोठे तळे होते.
राजकोट :
हमामखान्याजवळील आसा मशिदीच्या पूर्वेला थोड्या अंतरावर खाडीच्या
काठावर मुसलमानी अमदानीतील चौलचा राजकोट किल्ला आहे. सन १६३४ मध्ये
मुसलमानी चौलमध्ये किल्ला नव्हता हे इतिहास लेखक बोकारोचे विधान खरे असेल
तर हा किल्ला बहुधा विजापूरचा चौलवर ताबा असताना (१६३६-१६४६) बांधला गेला
असावा. सन १६९१ आणि १७३१ मध्ये मराठ्यांबरोबर झालेल्या युद्धांत या
किल्ल्याचा उल्लेख येतो. किल्ल्याच्या कोपऱ्यात व वरच्या बाजूस बुरूज होते.
तसेच वायव्य व नैऋत्येकडील बुरुजांना जोडणारी एक भिंत होती. मधल्या
पटांगणात एका दुमजली वाड्याचे अवशेष असून समोर कारंजे असावे. वाड्याच्या
पूर्वेकडील टोकास ओळीत असलेल्या घरांचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या बाहेरील
बाजूस खाडीच्या तोंडाशी चुन्याशिवाय बसविलेले मोठाले काळे फत्तर आहेत. ते
भूतपूर्व हिंदू राजवटीतील किल्ल्याचे अवशेष असावेत.
हा किल्ला
छत्रपती संभाजीने बांधल्याचाही उल्लेख मिळतो. २१० आंगरेंची राजवट सुरू
होण्यापूर्वी चौलच्या सुभेदाराच्या ताब्यात एक लहानसा किल्ला होता. त्याचे
नाव राजकोट. तो सन १६८३ मध्ये संभाजीने बांधला. सन १६८१ मध्ये सीदीने अप्पर
चेऊलची लूटमार केली तेव्हा पोर्तुगिजांनी त्यास विरोध केला नाही म्हणून
संभाजीने रागाने पोर्तुगीज चेऊलला म्हणजेच रेवदंड्यास वेढा दिला. मात्र
पोर्तुगिजांच्या रेवदंडा किल्ल्याच्या मजवुत संरक्षक भिती व बंदुकीच्या
माऱ्यापुढे मराठ्यांचा नाईलाज झाला. परंतु अपयशाने खचून न जाता चौलच्या
रक्षणार्थ तेथे किल्ला बांधला व आरमाराची जमवाजमव केली. तोच राजकोट किल्ला
होय. एवढे करूनही पोर्तुगीज जादा सैन्य व जहाजांची कुमक आणण्यात यशस्वी
झाले. शेवटी संभाजीला २४ डिसेंबर १६८३ रोजी वेढा उठविणे भाग पडले. सन १७१०
मध्ये कान्होजी आंगरेने सागरगडच्या पायथ्याशी नैऋत्येस ब्राह्मणगाव वसविले.
त्यावर
रेवदंड्याचे पोर्तुगीज व भंडारी सराईच्या दिवसांत रात्नसमयी अकस्मात चालून
आले. याविषयी पूर्वसूचना असलेल्या कान्होजीने त्यांची विलक्षण कत्तल केली व
इतका पाठलाग केला की, त्यांस रेवदंडा गाठणेही अशक्य लाले. चौलच्या हकीमाने
त्यांना राजकोटात आसरा देऊन त्यांचा बचाव केला. सन १७२१ मध्ये
कान्होजीच्या मदतीस आलेल्या बाजीराव महाडिकची राजकोटकडे दृष्टी गेली. सन
१७३३-३४ मध्ये शाहू व मुघल यांच्यातील कराराने राजकोट मुघलांना देण्याचे व
संभाजी आंगरेने मुघलांतर्फे अंमल करावयाचा असे ठरले. आंगरे घराण्यातील
संभाजी व थोरला मानाजी यांच्यातील पहिल्या यादवीच्या वेळी नोव्हेंबर १७३४
मध्ये मानाजीने राजकोटचा आसरा घेतला होता. याच वर्षी डिसेंबरमध्ये
पोर्तुगीज संभाजी आंगरेस सामील होऊन त्यांनी मानाजीवर चढाईसाठी राजकोटात
मोर्चे लावले. पोर्तुगीज व मानाजीची राजकोटला लढाई झाली. याच महिन्यात
संभाजी आंगरेने राजकोट घेऊन तेथील हवालदार मानाजीस सामील असल्याचे ओळखून
त्याच्या ठिकाणी आपले लोक ठेवले. एप्रिल १७३६ मध्ये कामारले येथे विजयी
झालेल्या चिमाजी अप्पाची मुघलांच्या नामधारी अमलाखाली असलेला राजकोट
मराठ्यांच्या ताब्यात आणण्याची इच्छा होती. सन १७३९ मध्ये मराठ्यांनी
राजकोटकडे पुन्हा हालचाली केल्या. दरम्यान येसाजी आंगरेनेही राजकोट
जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. राजकोट किल्ला पाडण्याचे अनेक वर्षे घाटत
असावे. जानेवारी १७४८ पध्ये पेशव्यांचा सरदार व आरमाराचा सुभेदार बाजीराव
बेलोसे याने राजकोटास मोर्चे बांधून आणि सुरुंग लावून हा किल्ला कायमचा
जमीनदोस्त केला.
आगरकोट :
निजामशाहीत रेवदंडा गाव चौलचाच
एक भाग समजला जात होता. वस्तुतः त्याकाळी चौल व रेवदंडा ही गावे एकमेकावर
अवलंबून व एकमेकास पूरक होती. तेथील ऐतिहासिक घटनांची दोन्ही गावांकरिता
स्वतंत्न नोंद घेणेही अशक्यच. म्हणूनच त्यांचा इतिहास प्रारंभी एकत्रित
दिला आहे. मान्न रेवदंड्यातील महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची तसेच
ऐतिहासिक अवशेषांची माहिती खाली स्वतंत्रपणे दिली आहे. सध्याच्या चौलपेक्षा
रेवदंड्यात, विशेषतः आगरकोटात, सोळाव्या शतकापासून ऐतिहासिक घटनांची साक्ष
देणारे बरेच पुरावे- किल्ल्याची भित, सातखणी चर्चच्या भिती, बऱ्याच
इमारतींचे पाये, वखारीच्या (फॅक्टरी) दर्शनी दरवाजाची कमान इत्यादी अजूनही
आढळतात.
सोळाव्या शतकाच्या अखेरपूर्व काळात आगरकोटात महत्त्वाच्या
इमारती बांधल्या होत्या. सन १६३४ मध्ये अँटॉनिओ बोकारोने या ठिकाणाचे बरेच
खुलासेवार वर्णन लिहिले आहे. त्यावेळी पोर्तुगीज किल्ल्यात घडीव दगडांच्या
भिती असलेल्या आवाराच्या आत त्यांचा सेनाधिकारी राहत होता. तेथे एक
तुरुंगही होता. किल्ल्यात २०० पोर्तुगीज व पन्नास स्थानिक विश्चनांची मजला
असलेली दगडी घरे होती. प्रत्येक घरात एक गुलाम असे. पूर्वी गुलाम जास्त
होते. परंतु ते नंतर चौलला गेले. आवाराच्या बाहेर काही विश्चन व इतर कुशल
कारागीर होते. तेथे दोन शस्त्रागार होते. सभोवतालच्या भितींच्या आतील
परिसरात भव्य कॅथेड्रल, रुग्णालय, सेंट पॉल जेझुइट चर्च, जेझुइट
मोनॅस्टरी, डोमिनिकन फ्रेंन्सिस्कन चर्च व ऑगस्टिनियन चर्च व मोनॅस्टरी अशा
सात धार्मिक इमारती होत्या. भिंतीच्या बाहेर सेंट सेबॅस्टियन चर्च, सेंट
जॉन पॅरिश चर्च व सदर ऑफ गॉडचे कॅपूचिन चर्च अशा तीन इमारती होत्या. या दहा
इमारतींकरिता प्रतिवर्षी सरकारातून एकूण रु. २,४४८ खर्च होत असत.
पोर्तुगीजकाळी या भागाचे वैभव खूप मोठे असावे. काळाच्या ओघात या वास्तू
नष्ट झाल्या.
बोकारोने आणखीही काही वास्तू व बुरुजांची नोंद करून ठेवली
आहे. त्यात नऊ बुरुजांचा तो उल्लेख करतो. नदीच्या बाजूकडे असलेल्या
पहिल्या बुरुजावर १८ पौंड वजनाचे दगडी गोळे मारू शकणारी कॅमेल नावाची एक
मोठी तोफ होती. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बुरुजावर फक्त वाळू भरून
ठेवली होती. चौथ्या बुरुजावर १८ पौंडी दगडी गोळा फेकणारी आणखी एक कॅमेल तोफ
व ६५ पौंडी लोखंडी गोळा फेकणारी एक तोफ अशा दोन तोफा व लहानसे
किल्ल्यासारखे वांधकाम होते. सॅम पावलोच्या समोरच्या बुरुजावरही अशीच दोन
बांधकामे होती व आतून लोखंडी आवरण असलेली पितळी सर्पाकृती तोफ होती.
तिच्यातून १६ पौंडी गोळे उडवीत. सॅम डिनिस या सहाव्या बुरुजावरून लोखंडी
तोफेतून १४ पौंडी दगडी गोळे उडवीत. येथे समुद्राकडे तोंड करून लहानशा
किल्ल्यासारखे बांधकाम होते. सातव्या बुरुजावर ४० पौंड वजनाचे गोळे फेकणारी
गरूड तोफ व प्रत्येकी ५० पौंडी वजनाचे गोळे फेकणाऱ्या दोन तोफा होत्या.
आठव्या बुरुजावर तोफा नव्हत्या. शेवटच्या नवव्या बुरुजावर २४ पौंड वजनाचे
लोखंडी गोळे फेकणारी एक तोफ होती. सन १६२५ मध्ये आग्नेय कोपरा बांधला
तेव्हा कॅथेड्रल भितीच्या बाहेर होते. मात्र १६३४ मध्ये ते भितीच्या आत
आले. सत १६३४ नंतर तटबंदीची बरीच दुरुस्ती केली. सन १६३५ मध्ये उत्तर
दरवाजा तर १६३८ मध्ये दक्षिण दरवाजा दुरुस्त केला. सन १६५६ मध्ये दक्षिण
दरवाजासमोरचे बांधकाम केले व १६८८ मध्ये वायव्येचा टॉवर बांधला.
सरासरी
६.०९ मीटर उंच व ३.६६ मी. रुंद असलेल्या गोलाकार भितीची लांबी अंदाजे २.४२
कि. मी. होती. या भितीवर बंदुकीने मारा करण्यासाठी लहान झरोके (जंगी)
असलेली १.८३ मी. उंचीची दुसरी भित होती व वर वर्णन केल्याप्रमाणे
अर्ध-वर्तुळाकार नऊ मनोरे होते. किल्ल्याचे आवार दक्षिणोत्तर व
पूर्व-पश्चिम अनुक्रमे २०१.१६८ मी. व ३०१.७५२ मी. होते. पश्चिम व
दक्षिणेकडून हल्ला होण्याची भीती नव्हती. तसेच पूर्वेकडील दलदलीच्या
प्रदेशामुळे तिकडूनही कमी भीती होती. म्हणून या तिन्ही बाजूंनी फार भव्य
मजबूतीची आवश्यकता नव्हती. भीती होती ती उत्तरेकडून. म्हणूनच त्या बाजूस
२.१३ मी. खोल व १७ पावले रुंद असा खंदक समुद्रापासून चौल खाडीच्या वायव्य
टोका-पर्यंत खणला होता.
दिनांक ५ डिसेंबर १७२८ रोजी आंद्रे रिबेरो
कुटिन्होने पोर्तुगीज चौलची म्हणजेच रेवदंड्याची कार्यालयीन तपासणी
केल्यावर लिहिलेल्या अहवालानुसार किल्ला आकाराने पंधरा वाजू असलेला व अकरा
बुरुजांचा होता. तीन ते चाळीस पौंडी ५८ तोफा, दगडांचा मारा करण्याच्या
तोफा, ६२ व्यक्तींची एक याप्रमाणे तीन कंपन्या होत्या. याशिवाय स्थानिक
मच्छीमार बोटीवाले व नारळाच्या झाडावर चढणारे होते. शहराच्या भितीच्या
बाहेर उत्तरेकडील श्रीमंत लोकवस्ती असलेल्या बाजूस संरक्षणासाठी सुरक्षित
जागा बांधून तेथे १९ तोफा, सैन्याच्या दोन कंपन्या आणि २३४ भंडारी होते.
सभोवतालचा खंदक काही
तय १९ ताफा, सन्याच्या दान कपन्या आणि २३४ भडारा
हात. सभोवतालचा खंदक काही ठिकाणी वाळूने भरला होता. कुटिन्हो याने असेही
नमूद केले आहे की, १६३४ पासून तटबंदीची इतकी दुरुस्ती झाली की, ती जणू
नव्यानेच बांधल्यासारखी आहे. पश्चिमेच्या बाजूने समुद्राच्या लाटांमुळे
झालेले नुकसान सोडता बाकी सर्व बांधकाम सुस्थितीत आहे.
सन १७३९ मध्ये
वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे जाणून
पोर्तुगिजांनी आगरकोट व कोरलई हैं दोन्ही किल्ले इंग्रजांना दिले. पुढे
अँग्लो-पोर्तुगिजांच। प्रतिनिधी कॅप्टन इंचबर्ड याच्या मध्यस्थीने १७४०
मध्ये तह होऊन चौलचा प्रदेश मराठ्यांना मिळाला व पोर्तुगीज गोव्याला गेले.
रेवदंडा
परिसरात पोर्तुगीजकालातील फॅक्टरी किंवा चौकोनी बुरुजातील कॅप्टनचे
निवासस्थान व तुरुंगाभोवतीच्या लहानशा किल्ल्याचे अवशेष तसेच जेझुइट
मोनॅस्टरी, सातखणी बुरूज, डोमिनिकन चर्च व मठी, सेंट झेवियर चॅपेल आणि या
सर्वाभोवती संरक्षणासाठी बांधलेली भित यांचे अवशेष पाहण्यास मिळतात.
रेवदंडा पेशव्यांनी घेतल्यावर (१७४०) नानासाहेब पेशव्याने हरेश्वराचे व
हनुमंताचे मंदिर बांधले. श्रीसिध्देश्वराचे मंदिर १७४० मध्ये बाबूभट नेने
पंडित याने ग्रामस्थांकडून वर्गणी मिळवून बांधले. श्रीमाधवनारायणाचे मंदिर
महादजी बल्लाळ दांडेकर याने स्वतःच्या पैशांनी बांधले. इतर मंदिरे यानंतरची
आहेत. वर नमूद केलेल्या ऐतिहासिक इमारतींच्या अवशेषांची माहिती
मंदिरे
यानंतरची आहेत. वर नमूद केलेल्या ऐतिहासिक इमारतींच्या अवशेषांची माहिती
पुढे दिली आहे. नारळीपोफळींच्या बागा, रस्ते व विविध नवीन इमारतींच्या
बांधकामामुळे इतर महत्त्वाच्या इमारतींचे अवशेष त्यांच्या मूळ ठिकाणी मिळणे
फार कठीण आहे. मोठ्या संरक्षक भितीची माहिती वर दिलेल्या आगरकोटच्या
माहितीत खुलाशाने दिली आहे.
चौकोनी बुरूज :
दक्षिण
दरवाजाच्या दोन कमानीतून आत गेल्यावर थोडेसे पूर्वेस है ठिकाण असून येथेच
पोर्तुगिजांनी १५१६ मध्ये वखार बांधली व सभोवती सुरक्षिततेसाठी १५२१-१५२४
या कालावधीत मजबूत भिती बांधल्या. पोर्तुगिजांची गोव्याबाहेरील ही सर्वात
जुनी इमारत आहे. वखारीच्या दर्शनी भागी दगडी दरवाजाची एक सुंदर कमान असून
ती शाबूत आहे. तिच्या वरच्या बाजूस मध्यभागी पोर्तुगीज बोधचिन्ह असून
त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या मानवाकृती आहेत. वरच्या बाजूस क्रॉस व थोडे
कोरीव कामही आहे. दरवाजाच्या आत पूर्व-पश्चिम सुमारे ४० पावले व
दक्षिणोत्तर सुमारे ५६ पावले जागेभोवती पूर्वी ७.६२ मीटर उंचीची भित होती व
नैऋत्येस १५.२४ मीटर उंचीचा भक्कम बुरूज होता. सध्या भिती पडलेल्या असून
बुरूज मात्र आपले अस्तित्व दाखवितो. या जागेत कप्तानाचे निवासस्थान व
तुरुंग होता. येथे आता नारळीपोफळीची बाग आहे. उत्तरेच्या मुख्य दरवाजापासून
५४.८६ मीटर दक्षिणेस व अलिबाग रस्त्याच्या पश्चिमेस जेझुइट मोनॅस्टरीच्या
भितीचे काही अवशेष आहेत.
सातखणी बुरूज :
वायव्येकडील
बुरुजाजवळील लहान दरवाजाच्या आग्नेयेस ४५.७२ मीटरवर तटबंदीच्या पश्चिमेकडील
भितीत पडलेल्या भगदाडासमोर १५३४ च्या सुमारास बांधलेल्या फ्रान्सिस्कन
इमारतीच्या मध्यभागी असलेल्या ६.०९ मीटर चौकोनी आकाराच्या सातखणी
बुरुजाच्या भितींचा सांगाडा अजून उभा आहे. पूर्वी त्यांची उंची २९.२६ मीटर
इतकी नमूद केलेली असली तरी वरच्या बाजूने भिंती पडल्यामुळे उंची कमी झालेली
आहे. बुरुजाच्या लगत भोवतालीच्या सर्व इमारती पूर्णपणे पडलेल्या असून कोठे
तरी अर्धवट भितीचे अवशेष दिसतात. या सर्व इमारती फान्सिस्कन चर्च व
मटीच्या संरक्षणार्थ वांधलेल्या होत्या. इ. स. १५७७ च्या वेढ्यात त्यांनी
फार मोठी कामगिरी बजावली होती. फ्रान्सिस्कन चर्च सेंट बारबाराच्या नावे
१५३४ मध्ये सुरू केले होते. सन १८४७ पर्यंत हे चर्च सुस्थितीत होते. इ. स.
१८५४ मध्ये त्याची बरीच पडझड झाली. इ. स. १५४९ मध्ये बांधलेले डोमिनिकन
चर्च व मठीचे काही अवशेष आहेत. सध्या त्याची एक दगडी भव्य कमान, पाठभित व
बाजूच्या भिती आहेत. खिडक्यांच्या वर पुढे आलेल्या भागावर नक्षीकाम आहे.
दक्षिणेकडील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मुख्य मोठ्या कमानीच्या
दोन्ही बाजूस उंच खिडक्या असलेल्या भितीचे अवशेष आहेत. समोर डाव्या बाजूस
घोड्यांच्या पागेची जागा आहे. समोर भव्य इमारतीचे अवशेष विखुरलेले आहेत. हे
चर्च १६३४ मध्ये सर्वात वैभवसंपन्न होते.
डोमिनिकन चर्च व मठीच्या
पूर्वेस सुमारे ४५.७२ मीटरवर लहान इमारतींचे काही अवशेष दिसतात. येथून पुढे
काही अंतर गेल्यावर उजव्या बाजूस सेंट झेवियर चॅपलचे अवशेष दिसतात.
त्याच्या दरवाजावरील एक चौकोनी दगड खाली पडला असून त्यावर लेख आहे. या
चर्चच्या दोन्ही बाजूच्या भिती शिल्लक आहेत. डोमिनिकन चर्च व सेंट झेवियर
चॅपलवरील संगमरवरी शिलालेखांवरून मध्यवर्ती पुरातत्त्व खात्याकडून त्यांचे
स्थान दर्शविणारे फलक चुकीचे लागले असल्याचे जाणवते.
आगरकोटच्या बाहेर
उत्तर दरवाजाच्या पूर्वेस मुसलमान मोहोल्ल्यात एक मशीद असून तिचे आधुनिक
पद्धतीचे मजबूत व सर्व सोयींनी युक्त बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. या
मशिदीकडे जाताना मुसलमान मोहोल्ल्याच्या अलीकडे मेरी चर्चची नवीन इमारत
आहे.
शिलालेख
१) चौलच्या उत्तरेस असलेल्या मोडकवाडी भागात
देवगिरीनृपती यादव रामचंद्रदेव कालीन (शके १२२०, विलंबी संवत्सर, चैत्र
शुद्ध ११, सोमवार, २४ मार्च, इ. स. १२९८) संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी
लिपीतील शिलालेख मिळाला. या लेखाचा अर्थ सुसंगतपणे लावता येत नाही कारण या
लेखात फक्त सुरुवातीच्या दोन व शेवटच्या दोन ओळी वाचता येतात. शेवटच्या
ओळीत शापात्मक वचन आहे.
२) किल्ल्याच्या आग्नेय बाजूस असलेल्या
कोपऱ्यावर खालच्या भितीवर १. २७ मी. x ०.६७ मी. एका लादीवर सैनिकाची
प्रतिमा कोरलेली आहे. त्याने खिस्ती योद्धघासारखा अधिकारदर्शक गणवेश,
कोटावर तलवारीचा पट्टा व डोक्यावर टोपीसारखे उघडे शिरस्त्राण परिधान केले
आहे. चेहरा तुटला आहे. या प्रतिमेखाली "EL REI DOJOAO || COARTO" व त्याचा
अर्थ किंग Dom Joao चौथा असा होतो. त्याचा काळ इ. स. १६५६ असा निश्चित करता
येईल.
३) समुद्राच्या (जुन्या बंदराच्या) बाजूने असलेल्या दरवाजावर
०.६७ मी, ४ ०.६७ मी. अशी चौरसाकृती लादी आहे. तिच्यावर एक दंड (छडी) व तीन
ताऱ्यांची प्रतिमा असून त्यामध्ये मेरीच्या, ईश्वरी अनुग्रहाची आख्यायिका
देणारा पोर्तुगीज लेख आहे:-NAER AD 1577 I SEDO || CAPITAO. ALIXADREDE ||
SOVSA FREIRE, DESTA FORTALEZA I SEFESTO || DAESTA FORTIFICASAO
ADDAADDAPRAIAHDLOMAR"
(४) किल्ल्याच्या उत्तर भितीतील दरवाजाच्या
डाव्या बाजूस ०.४५ मी. x ०.४५ मी. अशा चौरसाकृती लादीवर तुटलेला शिलालेख
आहे. या लेखाचा आशय अवर लेडी ऑफ सॉरो हिच्या संरक्षणाखाली हा दरवाजा आहे
असा आहे. पोर्तुगीज भाषेत तो "ESTA PORTA || COAROANS || DOROVE HF || SVA"
असा आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूसही एक लादी होती. ती भग्न पावली आहे.
तिच्यावर इ. स. १६३८ चा पुढील पोर्तुगीज लेख होता :- "NAER A DE || 1638
SERE || DEFICOV || ESTA PORTA. २१६
५) अलिवाग रस्त्यावरील लँड गेटच्या
बाहेरच्या बाजूने द्वारमाथ्यावर ०.७५ मी. x ०.६५ मी. लादीवर मुकुट व इतर
काही चिन्हे कोरली होती. या लादीवर शिलालेख होता तो बॉम्बे एशियाटिक
सोसायटीच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. त्याचा आशय पुढीलप्रमाणे आहे"
चेऊल किल्ल्याचा Joao de Thobar de Velasco हा कॅप्टन असताना हे काम
(किल्ल्याचे) १६३५ च्या अखेरीस व १६३६ च्या सुरुवातीस पूर्ण करण्यात आले.
सोसायटी ऑफ जिझसचे परम पिता (Father) यांना चौल शहराचे आश्रयदाते म्हणून
नेमण्यात आले." पोर्तुगीज भाषेत तो " ESTAOBRA SEFES NOREMA || TE DOANNO
635 EPRI || NCIPODE 636 SENDO CAPITA || ODESTA FORTALEZA DCH || AVL IOAO
DE THOBAR DE VE I लसूचॉइसतो
नागानाममा जाहपऊल फिल्ल्याचा Joao de
Thobar de Velasco हा कॅप्टन असताना हे काम (किल्ल्याचे) १६३५ च्या अखेरीस व
१६३६ च्या सुरुवातीस पूर्ण करण्यात आले. सोसायटी ऑफ जिझसचे परम पिता
(Father) यांना चौल शहराचे आश्रयदाते म्हणून नेमण्यात आले." पोर्तुगीज
भाषेत तो " ESTAOBRA SEFES NOREMA || TE DOANNO 635 EPRINCIPODE 636 SENDO
CAPITA || ODESTA FORTALEZA DCH || AVL IOAO DE THOBAR DE VE || LASCOESETO
MOVRORPAD ROEIRODESTACIDE OGLO || RIOZOPE SFRANCISCOXA || VIER, DACOMPA
DEIESVS, " असा आहे.
लावता येत नाही कारण या लेखात फक्त सुरुवातीच्या दोन व शेवटच्या दोन ओळी वाचता येतात. शेवटच्या ओळीत शापात्मक वचन आहे. २१
२)
किल्ल्याच्या आग्नेय बाजूस असलेल्या कोपऱ्यावर खालच्या भिंतीवर १.२७ मी. ४
०.६७ मी. एका लादीवर सैनिकाची प्रतिमा कोरलेली आहे. त्याने खिस्ती
योद्धघासारखा अधिकारदर्शक गणवेश, कोटावर तलवारीचा पट्टा व डोक्यावर
टोपीसारखे उघडे शिरस्त्राण परिधान केले आहे. चेहरा तुटला आहे. या
प्रतिमेखाली "EL REI DOJOAO || COARTO" व त्याचा अर्थ किंग Dom Joao चौथा
असा होतो. त्याचा काळ इ. स. १६५६ असा निश्चित करता येईल.
३)
समुद्राच्या (जुन्या बंदराच्या) बाजूने असलेल्या दरवाजावर ०.६७ मी. x ०.६७
मी. अशी चौरसाकृती लादी आहे. तिच्यावर एक दंड (छडी) व तीन ताऱ्यांची
प्रतिमा असून त्यामध्ये मेरीच्या ईश्वरी अनुग्रहाची आख्यायिका देणारा
पोर्तुगीज लेख आहे:-NAER AD 1577 I SEDO || CAPITAO. ALIXADREDE SOVSA
FREIRE, DESTA FORTALEZA 1 SEFESTO || DAESTA FORTIFICASAO
ADDAADDAPRAIAHDLOMAR" P
६) किल्ल्याच्या वायव्य बाजूकडील एका घराच्या
ओसरीत २.०२५ मी. x ०.९ मी. आकाराच्या लादीवर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे:-
" (SEPOLTURA) DELVIS ALVARESCA MEIO E DE SEVS ERDEIRO (S)" त्याचा
सारांश-"Luis Alvares Camillo आणि त्याच्या वारसांची समाधी" असा आहे. १९८
७)
किल्ल्याला पश्चिमेकडे लहान दरवाजा आहे. त्याच्या वायव्य वाजूस असलेल्या
पडक्या मनोऱ्यावर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे. "SENDO VR. DA INDIA FRCO.
DE TAVOR, CONDE DE AIVOR MDO. IOM DE LEMO DE BRITO FZEO ESTA ATALAIA
ASVACVSTA SENDO CAPAM, MOR DESTA CANPO NAER AD. 1688" या शिलालेखाचे डॉ. द
कुन्हा याने पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांटर केले आहे:-"When Francisco de
Tavora was Viceroy of India, Conde d'Alvor Joao deMelo de Brito
commanded this tower to be built at his expense while Chief Captain of
this Camp in the year 1688.
८) किल्ल्याच्या वायव्येकडील भितीत ०.६२५
मी. ४०.४५ मी. लादीवर वरील याजूस जिझसचा क्रॉस असलेला शिलालेख पूर्वी N. S.
da Conceicao चा संबोधला जाणारा दुर्बोध पोर्तुगीज शिलालेख आहे.- "NO ANO
DE 1721, SENDO CAPITAO, E GOVOR. DEIA FORTZA DE CHAVL ANTONIO DE S. DE
LEMOS, FIDALGO DA CAZA DE SA. MSE. QUE, DS. SP POR ORDEM QUE IEVE DO
XMO. SOR. FRANSO. JOZEPE DE SAMPO E CATRO, VREI E CAPITAO-GFRA DA INDIA
PA, LEVANTAR ESA FORTFICACAO CHAMADA N. S. DA CONCEICAO AOS 25 DE MARCO
DA DIA HE. RA. A. IMA." डॉ. द कुन्हा याने याचे इंग्रजी भाषांतर
पुढीलप्रमाणे केले:- "In 1721 when Antonio de Souza de Lemos, a nobleman
of the household of His Majesty, whom may God always guard, was Captain
and Governor of the Fortress of Chaul, under orders sent by His
Excellency Senhor Francisco JOSE de Sampaioe Castro Viceroy and Captain
General of Portuguese India, commanded that this fortification named N.
S. da Conceicao should be built on the 25th March of the abovementioned
year." २२०
९) आगरकोट मधील फ्रान्सिस्कन चर्चच्या मुख्य कमानीच्या
दरवाजावर एक कोनाडा होता. त्यात १.७७ मी. x ०.६५ मी. आकाराचा तीन तुकडे
झालेला पोर्तुगीज शिलालेख बॉम्बे एशियाटिक सोसायटीच्या वस्तुसंग्रहालयात
हलविण्यात आला आहे. पोर्तुगीज भाषेतील त्याचा मजकूर असा होता:- "CONSACRA
DA ENTERNIDA DE IOAM IV, REI, DE PORTUGAL, EMAS CORTES Q CELEBROV NO
ANNO DE 1646
FES TRIBUTARIO ASI E A SEVS REINOS O OANNVA PENCAM A
IMMACVLA DA CONCEIOAM DA VIRGEM SENHORA E COM PVBLICO IVRAMENTO PROMETEO
DEFENDER QA MESMA SENHORA ELEITA PADROEIRA DE SEV IMPEHO FOI PRESERVADA
DE TODA A MACVLA DE PECCADO ORIGINAL. EPERA QA PIEDADE PORTVGEZA
VIVESSE MANDOV ABRIR NESTA PEDRA ESTA PERPETVA LEM BRANCA NO 15 ANNO D
SEV IMPERIO E NO DE CHRISTO 1655. FESE ESTA OBRA NAEB DE 1656. " सन १८८३
मध्ये प्रकाशित कुलाबा गॅझेटिअर मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर
पुढीलप्रमाणे दिले आहे:-"Consecrated to Eternity. Dom Joao IV. King of
Portugal in the Cortes which he assembled in 1646 made himself and his
Kingdom tributary for a yearly pension to the Immaculate Conception of
the Virgin Lady. Under a public oath he promised to maintain that the
same Lady, the elect Patroness of his empire, was free from the stain of
original sin. To preserve Portuguese piety he ordered that this lasting
memorial should be carved in the 15th year of his reign and in the year
of Christ 1655. This was done in the year 1656,
१०) किल्ल्याच्या
आग्नेय कोपऱ्यात डोमिनिकन चर्च होते. मुख्य चर्चच्या दक्षिणेस एक चॅपल
होते. या पडक्या चॅपलवर एका गोलाकार भग्न दगडावर पुढील पोर्तुगीज पुसट
शिलालेख आहे :- "SEPVLTVRA D (E) (A) NTONIO ATAIDE (?) MENESES (?) E DE
SEV (S) ERDEIROS, QUE FALECEO A DEM (1) DC (?) I." त्याचा आशय :-
"Antonio Alaide Menezes" (मृत्यू १६०११) व त्याचे वारस यांची समाधी असा
आहे. १२
११) डोमिनिकन चर्चच्या पूर्वेस असलेल्या छपराच्या इमारतीस १.८
मी. x ०.७५ मी. शस्त्रांच्या प्रतिमा असलेल्या लादीवर एका देवदूताची
प्रतिमा आणि गरुडाच्या प्रतिमेवर पोर्तुगीज भाषेत I. H. S., Jesus Hominum
Salvator. (इंग्रजीत 'Jesus the Saviour of Men.') अशी अक्षरे आहेत.
गरुडाच्या भोवताली पोर्तुगीजांचे "Dominvm (est) spes mea" (इंग्रजीत 'The
Lord is my Hope') ही अक्षरे आहेत. शस्त्रांच्या खाली पोर्तुगीज भाषेतील
पुढील शिलालेख आहे :- " ESTA SEPVLTVRA HEDE MANOEL SALDAMHA, E DE SEVS
ERDEIROS QUE MORREO: A-20 DE DEZEMBRO DE (I) 636 ANOS. डॉ. द कुन्हा याने
या शिलालेखाचे पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांतर केले :-
आहेत.
शस्त्रांच्या खाली पोर्तुगीज भाषेतील पुढील शिलालेख आहे:- "ESTA SEPVLTVRA
HEDE MANOEL SALDAMHA, E DE SEVS ERDEIROS QUE MORREO: A-20 DE DEZEMBRO DE
(I) 636 ANOS, डॉ. द कुन्हा याने या शिलालेखाचे पुढीलप्रमाणे इंग्रजी
भाषांतर केले :-"This is the tomb of Manoel Saldanha and of his heirs,
who died on the 20th of December of the year 1636. "
१२) उपरोक्त
शिलालेखाजवळ आणखी एक तुटलेला शिलालेख आहे. त्याचा इंग्रजीतून आशय "(Tomb)
of Diogo Goes, and of (his heirs) died on 2nd of October of...." असा
आहे. बाकी भाग नष्ट झाला आहे. डोमिनिकन चर्चच्या सुमारे ४० मी. पूर्वेस
काही लहान लहान इमारतींचे अवशेष होते आणि त्याच्याही पुढे सुमारे ५५-६० मी.
वर आणखी काही अवशेष होते. त्यांच्या उजव्या बाजूस सुमारे ५५-६० मी.
अंतरावर सेंट झेविअर चॅपल होते. त्याच्या अवशेषांत पूर्वेस एक कमानदार
दरवाजा आहे. या दरवाजावर १.२ मी. x ०.८२ मी. आकाराच्या संगमरवरी दगडावर
पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे :-"POR HAVER MORADO NESTE LVGAR SAO
FRANCISCO XAVIER OCO PASSov AO NORTE LHE FES ESTA ERMIDA, DO GILIANES
DENRA. SENDO CAPITAO DESTO FORTALEZA, PA MEMORIA E LOVVOR DO SANCTO O
ANO DE 1640". सन १८८३ च्या कुलाबा गॅझेटिअर मध्ये पुढीलप्रमाणे इंग्रजी
भाषांतर केले आहे :-"St. Francis Xavier having lived in this place on his
way to the north, this chapel was built by Dom Gilianes Noronha Captain
of this Fort to the memory and praise of the saint in the year 1640.
२२४
१३) सराई (आताचे सुरई हे ओसाड गाव) खेडयाच्या ०.४ कि. मी. वर
पायऱ्यांची लहान विहीर आहे. तिच्यावर इ. स. १७८२ चा पुढील शिलालेख आहे:-
"श्री शक १७०४ शुभकृत नाम संवत्सरे, श्री विठ्ठल चरणी शामजी विबक प्रभू
सोपारकर, वैशाख शुद्ध १५.१२५
१४) दत्तात्रेय मंदिरात उजव्या बाजूकडील
बांधलेल्या ओट्यावर संगमरवरी दगडात पादुकांच्या जोडासह, दंड, शंख, मृदंग,
चंद्र व कमळाची प्रतिमा कोरली असून त्यावर या वस्तू देवास शके १७८७ (इ. स.
१८६५) मध्ये अर्पण केल्या असा शिलालेख आहे.
१५) दत्तात्नेय मंदिराच्या
पायऱ्या संपतात तेथे उंबराच्या झाडाचे खोड आहे. तेथे एका साधूचे घर आहे.
पायऱ्यांच्या उजव्या बाजूच्या भितीवर (parapet wall) पुढील मराठी शिलालेख
आहे "सौ. सावित्रीबाई शास्त्री, संवत १९०५, शक १७७० (इ. स. १८४८), किलक नाम
संवत्सर, कार्तिक वद्य प्रतिपद (प्रतिपदा) वरून खाली उतरताना सुमारें १००
व्या पायरीजवळच्या भितीवर पुढील मराठी शिलालेख आहे:-
"श्री.
श्रीदत्तात्रेय स्वामींच्या पादुका दासानुदास महादोबा लक्ष्मणजी शेठ सोनार
यांनी बांधले. पायऱ्या ५०, शक १७७६ (इ. स. १८५४) आनंद नाम संवत्सरे माहे
चैव शद्ध भूषण, पद्रव कमळाचा प्रातमा कोरली असून त्यावर या वस्तू देवास शके
१७८७ (इ. स. १८६५) मध्ये अर्पण केल्या असा शिलालेख आहे.
१५)
दत्तात्रेय मंदिराच्या पायऱ्या संपतात तेथे उंबराच्या झाडाचे खोड आहे. तेथे
एका साधूचे घर आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूच्या भितीवर (parapet wall)
पुहील मराठी शिलालेख आहे "सौ. सावित्रीबाई शास्त्री, संवत १९०५, शक १७७०
(इ. स. १८४८), किलक नाम संवत्सर, कार्तिक वद्य प्रतिपद (प्रतिपदा) वरून
खाली उतरताना सुमारे १०० व्या पायरीजवळच्या भितीवर पुढील मराठी शिलालेख
आहे:-"श्री. श्रीदत्तात्रेय स्वामींच्या पादुका दासानुदास महादोबा
लक्ष्मणजी शेठ सोनार यांनी बांधले. पायऱ्या ५०, शक १७७६ (इ. स. १८५४) आनंद
नाम संवत्सरे माहे चैत्र शुद्ध तृतिया वार सोम (सोमवार) श्री संवत १९१०.
१६)
दत्त मंदिराच्या वरून २४८ व्या पायरीवरही पुढील राराठी शिलालेख आहे:-"श्री
गुरु दत्तात्रेय चरणी कृष्णा नारायण शास्त्री, मुकादम, पायऱ्या पंच, शक
१७९० (इ. स. १८६८), विभू (विभव) नाम संवत्सर माहे पौष. २२८ भवाळे येथील
भगवती मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर पुढील पाच ओळींचा नागरी
संस्कृत शिलालेख आहे- "श्री गणेशाय नमः। शके १६७३ प्रजापती नाम संवत्सरे।
फाल्गुन शुद्ध सप्तम्याम् । देव्यालयस्य जीर्णोद्वारस्य । प्रारंभ कृतः
समाप्तीस्तू अंगिरा ।।" सारांश- इ. स. १७५१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार
केला.
१७) हमामखान्याच्या ०.४ कि. मी. पश्चिमेस नदीकाठी उभारलेल्या
जागेवर सोळा घुमटांची एक मशीद आहे. तिचे ११ घुमट ढासळले आहेत. तिला
ईशान्येस लागून दोन मुस्लिम कबरी आहेत. त्यांच्यावर दोन उर्दू शिलालेख आहेत
त्यातील एका कबरीवरील हिजरी ९१५ (इ. स. १५०७) चा व दुसऱ्या कबरीवरील हिजरी
१०३४ (इ. स. १६२३) चा उल्लेख आहे. दुसऱ्या कबरीवरील शिलालेख पूर्ण तुटला
आहे. पहिल्या कबरीवरील शिलालेखाचा सन १८८३ पूर्वी प्रा. रेस्टेक (Rehsteck)
यांनी पुढीलप्रमाणे ओळीनुसार इंग्रजी अनुवाद केला आहे:- " (1) Our Lord
Commands the arrangement, (2) Diligently of the Sunni Mosque, (3) With a
priest and pond.. (4) Whom we may love according to the ordinance of
Muhammad the Apostle; and in (5) Khaul we command you to prohibit
intoxication
(and) (6) Infidelity like companions (of you) (7)
our प्रो्फेट
or prepav
(8) Muhammad had striven..
(11) Mosque
(9) and (10) (15) .(date) with propriety, (12) (13) (14) .year 915 (?). "
(16)
रेस्टेक यांनी दुसऱ्या शिलालेखाचा ओळींनुसार इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे केला आहे:-
"(1)
As was the edifice of the house of God. (2) Date of mosque (3)
Handallanu (or bu or yu) (4) year 103(?)". गुलाम महंमद मुन्शी यांनी
लेखातील चौथ्या ओळीतील हिजरी वर्ष १०३४ असे लावले आहे.


No comments:
Post a Comment