Saturday, June 13, 2026

वाकाटक जामखेड्कर पुस्तक

 









राजवंश भारती : वाकाटक वंश

 

लेखक : ॲड. सुशील अत्रे

वाकाटकांची स्थापत्य व शिल्पशैली विदर्भात जागोजागी आढळून आली आहे. नगरधन, पवनार, रामटेक, मनसर, वाशीम या जागांवर ती अधिक प्रमाणात दिसतेच; पण इतरही अनेक ठिकाणी वाकाटकांच्या खाणाखुणा आपल्याला दिसून येतात. नागपूरजवळ मनसर येथे मोठ्या प्रमाणात प्रवरेश्वर शिवमंदिराचे अवशेष आहेत. रामटेकचे ‘केवल नरसिंह मंदिर’ ही तर वाकाटक संस्कृतीची मोठी खूण मानली जाते. केवळ अजिंठा लेण्यांमुळे राजा हरिषेण आणि पर्यायाने वाकाटक वंश इतिहासात अमर झाले आहेत. (saptarang latest article on Vakataka dynasty)

वाकाटक वंशाचे मराठी मुलखाशी जवळचे नाते आहे. ते सातवाहनांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी म्हणावे लागतील. वाकाटक वंशाचा कालखंड इ. स. २५० ते ५२५ असा आहे. या वंशाचा आद्यपुरुष ‘विंध्यशक्ती’ हा होता. तो मूळचा कुठला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण, विंध्य पर्वताशी संलग्न नावावरून तो मूळचा मध्य भारतातील असावा.

त्याचे राज्य नोंद घेण्याइतके मोठे नव्हते. कालखंडही इ. स. २५० ते २७० एवढाच होता. त्याचा मुलगा प्रवरसेन-१ याने मात्र बराच मोठा भूप्रदेश ताब्यात घेतला आणि राज्य दक्षिणेकडे विस्तारले. त्याने अनेक प्रकारचे यज्ञ केले. त्याने अश्वमेध यज्ञ चारवेळा केला, असा उल्लेख सापडतो. त्याची राजधानी ‘पुरिका’ अथवा ‘प्रवरपूर’ येथे होती.

हे गाव म्हणजे आजचे वर्धा जिल्ह्यातील ‘पवनार’ (विनोबा भावे यांचा आश्रम जिथे आहे ते) आहे, असे संशोधक मानतात. प्रवरसेनाने ६० वर्षे राज्य केले. प्रवरसेनाला चार मुले होती. त्यांच्यापैकी दोघांनी स्वतंत्र वंशशाखा स्थापन केल्या. त्यामुळे इ. स. ३३० पासून पुढल्या काळात वाकाटक राजवंश हा दोन स्वतंत्र नावांनी ओळखला गेला.

वत्सगुल्म शाखा :

वत्सगुल्म म्हणजेच आजचे वाशीम! प्रवरसेनाचा एक मुलगा सर्वसेन-१ याने आपला स्वतंत्र राज्यकारभार वाशीम येथून सुरू केला. सर्वसेन विद्या व कलेचा मोठा आश्रयदाता होता. स्वत: विद्वान होता. ‘हरिविजय’ या मूळ प्राकृत ग्रंथाचाही तो कर्ता होता. सातवाहनकालीन ‘गाथा सत्तसई’मध्ये काही गाथांची भर त्याने टाकली, असेही म्हणतात.

या वंशात पुढे विंध्यसेन, प्रवरसेन-२, सर्वसेन, देवसेन आणि हरिसेन तथा हरिषेण असे राजे होऊन गेले. हरिषेण हा या वंशातील सगळ्यात प्रसिद्ध राजा झाला. त्यानंतर आणखी दोन राजे अल्पकाळ होते. पण त्यांची नावे इतिहासाला निश्चित माहिती नाहीत. 

नंदीवर्धन शाखा :

नंदीवर्धन म्हणजे आजचे ‘नगरधन.’ नागपूरजवळच्या रामटेकजवळ असलेले हे गाव. प्रवरसेन-१चा मुलगा ‘गौतमीपुत्र’ हा अल्पायुषी ठरला. त्यामुळे त्याचा मुलगा, प्रवरसेनाचा नातू रुद्रसेन- १ याने आपले वेगळे राज्य स्थापन केले. या वंशाची राजधानी नंदीवर्धन येथे होती. ती नंतर पुन्हा प्रवरपूर (पवनार) ला हलवली होती.

रुद्रसेनाचा नातू, रुद्रसेन- २ हा एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. त्याचा विवाह गुप्तसम्राट चंद्रगुप्त-२ अर्थात, विक्रमादित्य याची मुलगी ‘प्रभावतीगुप्त’ हिच्याशी झाला होता. त्याचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात प्रभावतीगुप्ताने आपल्या अल्पवयीन मुलांतर्फे प्रतिनिधी म्हणून सुमारे २० वर्षे राज्य केले.

या काळात (इ. स. ३८५ ते ४०५) नंदीवर्धन वाकाटक हे जवळजवळ गुप्तांच्या अंकित होते. अनेक इतिहासकार या काळाला ‘वाकाटक-गुप्त काळ’ असेच म्हणतात. प्रभावतीची मुले दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन-२ अशी होती.

ही मुले लहान असतानाच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी आजोबा चंद्रगुप्ताने आपल्या दरबारातील एका विद्वान मंत्र्याला विदर्भात पाठवले होते. तो काही काळ रामटेकला राहिला होता. इथेच त्याने एक अजरामर संस्कृत खंडकाव्य लिहिले- ते म्हणजे ‘मेघदूत!’ त्या विद्वानाचे नाव महाकवी कालिदास!

या तीन राजपुत्रांपैकी दिवाकरचा लहान असतानाच मृत्यू झाला. दामोदर मात्र पुढे गादीवर आला. त्याच्यानंतर प्रवरसेन-२ (या शाखेतील) इ. स. ४२० च्या सुमारास राजा बनला. वाकाटक काळातील सगळ्यात जास्त ताम्रपट (सुमारे १७) याच्याच काळातील आहेत. कालिदासाच्या तालमीत तयार झालेल्या प्रवरसेनाने ‘सेतूबंध’ नावाचे मोठे काव्यही लिहिले.

ज्याची स्तुती पुढे बाणभट्टाने केली. या वंशातला अखेरचा राजा पृथ्वीषेण होता. त्याच्या मृत्यूनंतर नंदीवर्धन शाखा हरिषेणाने वत्सगुल्म शाखेत विलीन केली. वत्सगुल्म शाखेचा राजा हरिषेण त्याच्या राजकीय विजयांपेक्षा वेगळ्या कारणाने अजरामर झाला आहे. 

अजिंठा आणि वाकाटक :

वाकाटकांची स्थापत्य व शिल्पशैली विदर्भात जागोजागी आढळून आली आहे. नगरधन, पवनार, रामटेक, मनसर, वाशीम या जागांवर ती अधिक प्रमाणात दिसतेच; पण इतरही अनेक ठिकाणी वाकाटकांच्या खाणाखुणा दिसतात. नागपूरजवळ मनसर येथे प्रचंड मोठ्या प्रवरेश्वर शिवमंदिराचे अवशेष आहेत.

रामटेकचे ‘केवल नरसिंह मंदिर’ ही तर वाकाटक संस्कृतीची मोठी खूण मानली जाते. ‘केवल नरसिंह’ हे वाकाटकांचे आराध्य दैवत आहेच. पण, अलीकडच्या संशोधनात उघडकीला आलेली एक मोठी गोष्ट म्हणजे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमधले वाकाटकांचे योगदान. याचे मोठे श्रेय तपस्वी अमेरिकन संशोधक वॉल्टर स्पिंक यांना जाते.

कित्येक वर्षे ‘अजिंठा’ या एकाच विषयाला त्यांनी वाहून घेतले होते. त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केले आहे, की अजिंठा लेण्या खोदायला सातवाहन काळात सुरवात झाली असली, तरी गुंफा क्र. ९, १०, १२, १३ आणि १५-अ या सातवाहन कालीन आहेत, तर उर्वरित २५ गुंफा दुसऱ्या टप्प्यातील वाकाटक कालीन आहेत.

स्पिंक यांनी हे सिद्ध केले, की ‘शेकडो वर्षे ही लेणी खोदणे सुरू होते...’ हा गैरसमज आहे. वाकाटक नृपती हरिषेण याच्या एकट्याच्या आश्रयाखाली, त्याच्या कारकीर्दीत सुमारे इ. स. ४६० ते ४८० या वीस वर्षांमधेच दुसऱ्या टप्प्यातील २५ लेणी खोदली गेली. त्याचा महामंत्री वराहदेव याने लेणे क्र. १६ खोदून घेतले आहे.

तसा तेथील शिलालेखात उल्लेख आहे. हरिषेण इ. स. ४७७ मध्ये मरण पावला. पण लेण्यांचे काम नंतर दोन ते तीन वर्षे सुरू होते. बाकी काही विचारात घेतले नाही, तरी केवळ अजिंठा लेण्यांमुळे राजा हरिषेण आणि पर्यायाने वाकाटक वंश इतिहासात अमर आहेत.

(या लेखासाठी डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या ‘कोण होते वाकाटक?’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे.)

 

विदर्भाचे वाकाटकपूर्व सांस्कृतिक जीवन

      यापूर्वी वाकाटक राजवंशाच्या काळात त्यांच्या सभोवतालच्या प्रभावक्षेत्रात कुठल्या प्रकारच्या वास्तू बांधण्यात आल्या याचा मुख्यत्वे आढावा घेतला. त्यापाठोपाठ आत्तापर्यंत दुर्लक्षित असलेल्या नंदीवर्धन शाखेच्या काळात निर्माण झालेल्या वास्तूंचा तसेच उत्खननात मिळालेल्या पुरावस्तूंचासुद्धा आढावा घेतला. एका दृष्टीने पाहिले तर वत्सगुल्मच्या राजघराण्याचे मोठे योगदान अंजिठा असेच समजले जात होते. पण गेल्या ४० वर्षांत त्यांच्याशी संबधित असलेल्या वत्सगुल्म (वाशिम) नगरीत उत्खनने घेण्यात आली. त्यातून वास्तूविषयक तसेच इतरही काही महत्त्वाचे अवशेष म्हणजे वाकाटकांची नाणी मिळाली.

     मराठवाड्यातील भोकरदन व तेर येथील उत्खननेही समकालीन जनजीवनाच्या दृष्टीने तेथील पुरावशेषांच्या संदर्भात महत्त्वाची ठरतात. या सर्वांमध्ये भोकरदन, तेर येथील उत्खननांचा अपवाद वगळता बरेचशे अवशेष हे वास्तूरूप होते. आणि या वास्तू अपेक्षेप्रमाणे मुख्यत्वे धार्मिक होत्या. त्यामुळे बरेचसे निष्कर्षही धर्म, संप्रदाय, पंथ यांच्याच संबंधांतले होते. पण ५० वर्षांपूर्वी पौराणिक हिंदू धर्म, त्यातील दोन महत्त्वाच्या शाखा म्हणजे शैव आणि वैष्णव यांच्या आगमावर आधारित संप्रदाय आणि बौद्ध धर्म याविषयीच्या आपल्या ज्ञानात व समजुतीत बराचसा गुणात्मक फरक पडलेला आहे. त्या मानाने वाकाटकांच्या काळातील धार्मिक आणि लौकिक वाङ्मयाचा सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने व्हावयास पाहिजे तेवढा अभ्यास व संशोधन झालेले नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे.
       उत्खननामधील पुरावशेष, विटांमध्ये आणि पाषाणात बांधलेल्या मुख्यत्वे धार्मिक वास्तू व काही लौकिक वास्तू आणि तत्कालीन वाङ्मय यांच्या आधाराने वाकाटकांचे सांस्कृतिक योगदान काय होते याचा पुनर्विचार करणार आहोत. विदर्भामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या पूर्व-विदर्भ म्हणजे झाडी-मंडळ, आणि वर्धा नदीच्या पश्चिमेस असलेला वन्हाड प्रांत असे दोन भौगोलिक विभाग विदर्भात स्पष्टपणाने दिसतात. आणि त्यामुळेही त्या भागातील धार्मिक वास्तूंच्या ठेवणीत तसेच त्या निर्माण करताना अध्याहृत असलेल्या अभिरुचीतसुद्धा फरक स्पष्टपणाने दिसून येतो. नागरीकरणाची या भागात आलेली लाट ही इसवी सनापूर्वीच्या सहाव्या-सातव्या शतकांपासून आहे. आणि त्यामुळे पर्यायाने या प्रक्रियेत काय चढउतार झाले आणि त्यांचा धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर निरनिराळ्या काळात काय परिणाम झाला याचासुद्धा या सांस्कृतिक आढाव्यात उल्लेख करणे आवश्यक ठरणार आहे.

धार्मिक पार्श्वभूमी
         पुरातत्त्वाच्या दृष्टिकोनातून विदर्भाच्या धार्मिक वातावरणाचा विचार करावयाचा झाल्यास वैदिक आणि पौराणिक वाङ्मय, बौद्ध धर्मग्रंथ, उत्खनने व शिलालेख या सर्व स्रोतांचा परामर्श घ्यावा लागतो. पुरातत्त्वीय पुरावा हा काळाच्या चौकटीच्या दृष्टीने अधिक रेखीव आणि सुटसुटीत असल्याने त्याचा विचार प्रथम करणे एकूण विवेचनाच्या दृष्टीने सुलभ पडेल. इतिहासपूर्व (प्रोटोहिस्टोरिक) काळात म्हणजे प्रागैतिहास आणि लिखित इतिहास यांच्या संधिकाळात काय घडले हे पाहणे आवश्यक आहे. पुरातत्त्वाच्या परिभाषेत या ठिकाणी इसवी सन पूर्व १३००-१४०० च्या काळात ताम्र पाषाणयुगीन संस्कृती होती. आणि त्यानंतरच्या काळात पूर्व विदर्भात बृहदश्मयुगीन (मेगालिथिक) संस्कृती होती. विदर्भातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष वन्हाडात आणि पूर्व विदर्भातही मिळतात. पर्यावरणवाद्यांच्या दृष्टीने बघितले तर इसवी सन पूर्व ११०० नंतरचा काळ हा भौतिकदृष्ट्या फारसा समृद्ध नव्हता. या संदर्भात झालेली उत्खननेही संख्येने बरीच असली तरी येथील समाजपद्धती आर्थिक आणि धार्मिक जीवन हे पश्चिम महाराष्ट्रातल्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपेक्षा फार वेगळे होते असे म्हणता येणार नाही. पण ते विदर्भातले आद्य शेतकरी असून ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा प्रवेश लगतचा पश्चिम महाराष्ट्राचा भाग, मध्य प्रदेशचा भाग यांच्या प्रभावातून झाला असावा. धार्मिक जीवनाबद्दल बोलावयाचे झाल्यास, माळवा, सावळदा व जोर्वे यांच्या माध्यमातून ताम्रपाषाणयुगीन संस्कृती, वहऱ्हाडात व पूर्व विभागाच्या काही भागांत शिरली असावी हे स्पष्ट आहे. त्याचे दुसरे कारण असेही आहे, की पूर्व-विदर्भात, बृहदश्मयुगीन संस्कृतीचा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंतसुद्धा प्रभाव टिकून होता असे दिसते, तर पूर्व विदर्भात बृहदश्मयुगाच्या अगोदर एकदम नवाश्मयुगच दिसते. या दोघांच्या मध्ये एरवी दिसणाऱ्या ताम्रपाषाण युगाच्या खुणा झाडी मंडळात दिसत नाहीत. आजही या भागात, तो अरण्यप्राय असल्याने आदिवासीची वस्तीच जास्त आढळते. त्या दृष्टीने बृहदश्मयुगाच्या धार्मिक परंपरा ठळकपणे वेगळ्या असल्याचे दिसून येते. मुख्यत्वे या संस्कृतीत प्रचलित असलेली अश्मवर्तुळे ही दफनेच आहेत. गेल्या तीस वर्षांत त्या काळातल्या वस्त्यांची सुद्धा (हॅबिटेशन साइट्स) उत्खनने करण्यात आली आहेत. आणि त्यामुळे या काळातील सांस्कृतिक जीवनाची रूपरेषा अधिक ठळकपणे दिसून येते. पूर्वीच्या संशोधकांनी विदर्भातील आद्य शेतकरी म्हणूनच बृहदश्मयुगीन समाजाचा उल्लेख केला आहे. निरनिराळ्या धान्यांची ते पिकं घेत असत. अश्मवर्तुळांच्या ठिकाणांपेक्षा कायम वस्तीची किंवा गावांची ठिकाणं कमी असल्यामुळे विद्वानांत मतभेदही होते. ते असे, की हे गावात स्थायी वस्ती करून राहात होते की भटके जीवन जगत होते याचा त्यांना अंदाज येत नव्हता. धार्मिक समजुतीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ठामपणे सांगता येईल की बृहदश्म युग हा धार्मिक परंपरांच्या दृष्टीने एक प्रगत टप्पा होता. अगदी साधा फरक सांगायचा झाल्यास पुराश्मयुगापासून ते अगदी ताम्राश्मयुगापर्यंत मानव मृताचे दफन घरापासून जवळच किंवा अगदी घरातसुद्धा करत असे. त्याला मृताची भीती वाटत होती, पण ती फार नव्हती. कारण पश्चिम महाराष्ट्रात मृताचे पाय तोडून दफन करण्याची प्रथा होती. याउलट बृहदश्मयुगामध्ये स्मशान हे वेगळे असते ही कल्पना अस्तित्वात आली. गवेषकांना (एक्सप्लोर्स) असे लक्षात आले की वस्ती आणि स्मशान हे जवळ जवळ असत नाही किंवा बऱ्याच वेळा वस्ती आणि स्मशान यामध्ये पाण्याचा प्रवाह असतो. विदर्भातील बृहद्रमयुगीन समाज तांत्रिकदृष्ट्या बराच प्रगत होता. तांत्रिकदृष्ट्या खनिजापासून तांब वितळवून ओतणे हे लोखंडाच्या प्रक्रियेपेक्षा सोपे आहे. १४०० सेंटिग्रेड इतके तापमान निर्माण करणे ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत गोष्ट समजली जाते. विदर्भातील प्राचीन तंत्रज्ञान उत्कृष्ट प्रकारचे होते. तेव्हा ९६ ते ९९ टक्के इतके शुद्ध लोखंड तयार केले जात असे. उत्खननात मिळालेले तांब्याचे घोड्यांना घालावयाचे अलंकार, काश्याचे हरिणाकृती मूठ असलेले कलश, तांब्याची मूठ असलेल्या लोखंडी तलवारी, लोखंडी रिकिब आणि लगाम यावरून हे उत्तम कासार आणि कारागीर होते हे सहज लक्षात येईल. गावातील मुखियाचे दफन क्वचित प्रसंगी त्याच्या पत्नीसमवेत आणि बऱ्याच वेळा त्याच्या घोड्याबरोबर केले जात असे. त्यांची काही शेतीची अवजारेसुद्धा मिळाली आहेत. असे दिसते की समाजात लढवय्यांचा काही एक वर्ग असला पाहिजे, त्यामुळे हे भटके पशुपालन करणारे की शेतकरी या वादावर पडदा टाकून असे म्हणता येईल की या समाजातील काही भाग ग्रामजीवनात स्थिर होता, तर काही कारागिरांचा वर्ग हा नव्या खनिजांच्या शोधात आणि अवजारे विकण्यासाठी भटकत होता. परलोकाविषयीच्या त्यांच्या कल्पना निश्चित होत्या. मरणोपरांत उपयोग व्हावा म्हणून लढवय्याबरोबर त्याची शस्त्रास्त्रे त्याच्याबरोबर दफन करत असत आणि त्याचा घोडाही. काही वेळा ही दफने उकरून त्यात नवी दफने केली जात असत. याचा अर्थ ती एखाद्या

▲ पवनी येथील स्तूपाचे तंत्र आंध्रातील काही स्तूपांमध्येही आढळून येते.

कुळाची असावीत असा तर्क करता येतो. चूल-तवा (क्रॉमलेक) यांचा आजही पूजास्थाने म्हणून उपयोग केला जातो. त्यावरून पितरांच्या पूजेचादेखील त्यात समावेश होता हे स्पष्ट दिसते. कदाचित शेतकरी, कारागीर यांच्यासारखा दुसरा लक्षणीय वर्ग म्हणजे त्यांच्या पुरोहित म्हणजे भगत लोकांचा असावा. आजच्या अदिवासी जमातीचा विचार केला तर असे लक्षात येते की अगरिया हे कारागीर, गोड हे शेतकरी आणि लढवय्ये आणि बैगा हे त्यांचे पुरोहित. त्यापैकी बैगा आणि अगरिया हे भटके असतात, तर गोड हे ग्राम जीवनात स्थिर झालेले असतात. या त्रिकुटाच्या साहाय्याने विदर्भातील बृहद्रद्मयुगातील समाज कसा असेल याची सहज कल्पना करता येते.
       बृहदश्मयुगीन काळात गुंफांमधूनसुद्धा दफन करण्याची पद्धती होती. आणि चंढाळ्याच्या जंगलात मिळालेल्या सातवाहनकालीन लेख असलेल्या बौद्ध गुंफांच्या वर चुलतव्याप्रमाणेच गोलाकार छप्पर टाकल्याचे आढळून आले आहे. ते या संदर्भात उल्लेख करण्यासारखे आहे. मूलतः दफनासाठी असलेल्या काही गुंफा नंतरच्या काळात शैव गुंफा म्हणून वापरात होत्या हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे.
      वैदिक वाङ्‌मयातला विदर्भासंबंधीचा पहिला उल्लेख ब्राह्मण ग्रंथात (इस पूर्व ८०० ते १०००) आढळतो. वैदर्भी कौण्डिण्य या व्यक्तीच्या नावावरून या प्रांताला विदर्भ म्हणावयास सुरुवात झाली असे लक्षात येते तर येथील कुत्रे अत्यंत हिस्र असून इतर बलाढ्य श्वापदांवर ते हल्ला करीत अशीही आख्यायिका आहे. पार्गिटरच्या 'डिनॅस्टीज ऑफ कलि एज' या ग्रंथावरून स्पष्ट होते की येथील विदर्भया राजाचे मूळ गंगा खोऱ्यातील राजवंशाशी आहे. ऐतरेय ब्राह्मणातील उल्लेखाप्रमाणे तत्कालीन आर्यावर्ताच्या पूर्वेकडील राजांना सम्राट तर दक्षिणेकडील राजांना भोज, पश्चिमेकडील स्वराज्, तर उत्तरेकडील राजांना विराज असे बिरुद होते. विदर्भाची राजधानी कुण्डिनापूर ही महाभारत रामायणात प्रसिद्ध असून भारतीय प्रथेप्रमाणे जनपदातील लोक आणि तेथील राजा एकाच नावाने ओळखले जात असत. द्वारका म्हणजे काठेवाडातील श्रीकृष्ण आणि विदर्भराजकन्या रुक्मिणी तसेच निषधराज नल आणि विदर्भ राजकन्या दमयंती, तसेच रघुवंशातील राजा अज आणि विदर्भ राजकन्या इंदुमती यांच्या जोड्या प्राचीन वाङ्‌मयात प्रसिद्ध आहेत. नल-दमयंतीच्या महाभारतातील आख्यानावरून गंगा खोरे आणि विदर्भ यांच्यातील दळणवळणाच्या मार्गाचासुद्धा मागोवा घेता येतो. तीच बाब अयोध्येत राज्य करणारा अज आणि विदर्भ राजकन्या इंदुमती किंवा सौराष्ट्रातील श्रीकृष्ण आणि विदर्भ राजकन्या रुक्मिणी यांच्या उदाहरणावरूनसुद्धा लक्षात घेता येईल. विदर्भातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती ही उत्तरेकडल्या आणि पश्चिमेकडल्या प्रदेशांशी कशी जोडली गेलेली होती याची उकल या कथांच्या माध्यमांतून करता येते. आणि त्यामुळेच आडम (जि. नागपूर) येथे अलीकडे झालेल्या उत्खनानात आडम येथील नागरी वस्ती कमीत कमी इस पूर्व सातवे शतक इतकी जुनी आहे असा जो निष्कर्ष काढला गेला त्याचा खुलासाही या महाभारत रामायण आणि ब्राह्मण ग्रंथ यांच्या कथांतून मिळतो. वेगळ्या


▲ प्राचीन शैलगृह, व्यापारी मार्ग आणि नगरे

शब्दांत विदर्भातील इतिहास पूर्वकालीन संस्कृतीचे विश्लेषण या प्राचीन ग्रंथातील उल्लेखावरून होईल असे वाटते. आणि त्याचबरोबर या भागात तुरळकपणे का होईना उत्तर वैदिक संस्कृतीचा प्रवेश झाला हे स्पष्ट आहे. विदर्भातील पवनी (जि. भंडारा) आणि भोन (जि. बुलढाणा) दोन स्तूपांवरून गंगा खोऱ्यातील नागरीकरणाची प्रक्रिया व्यापाराच्या माध्यमातून विदर्भ आणि दंडकारण्य ओलांडून दक्षिणेत आंध्रात कशी गेली हे आपल्याला सांगता येते. पवनी येथील स्तूपाचे मूळ डॉ. शां. भा. देव आणि जगतपती जोशी या उत्खनकांच्या मते अशोकाच्या काळापर्यंत जाते. पवनी येथील हरदुलाला टेकडीच्या स्तूपामध्ये, स्तूपाच्या अंडाकृती भागात विटांचे चौकोनी कूप बांधून त्याची रचना करण्यात आली होती. पवनी येथील दुसऱ्या म्हणजे सुलेमान टेकडीच्या स्तूपात कच्च्या-पक्क्या विटांचे थर आळीपाळीने रचून स्तूप उभारण्यात आला होता. हदुलाला टेकडीच्या स्तूपाचे तंत्र हैदराबाद संस्थानमध्ये अमरावती (आंध्र प्रदेश) येथील काही स्तूपात वापरल्याचे आढळून आलेले आहे. या तंत्राचे अगदी उत्तरेतील टोक म्हणजे अफगाणिस्तामधील अगदी प्राचीन स्तूपामध्ये सुद्धा वापरल्याचे आढळून येते. त्यावरून अशी कल्पना करण्यास हरकत नाही की अफगाणिस्तानातून गंगेच्या खोऱ्यात तेथून विदर्भात आणि तिथून आंध्र प्रदेशात जाणाऱ्या व्यापारी मार्गांच्या माध्यमातूनच या तंत्राचा प्रसार बौद्ध भिक्षु आणि त्यांचे उपासक श्रेष्ठी किंवा सार्थवाह यांनी केला असावा. वेगळ्या अर्थाने रामायणात येणारी अगस्त्यासंबंधीच्या अख्यायिका गंगा खोऱ्यातील नागरीकरणाचे प्रवाह विदर्भ, दंडकारण्य मार्गे आंध्र प्रदेशात आणि नंतर चौथ्या पाचव्या शतकात इंडोनेशियामध्येसुद्धा कसे गेले हे लक्षात येते. बालीमध्ये सगळ्या ऋषीत अगस्त्य हाच अत्यंत लोकप्रिय असा ऋषी आहे. विंध्याला नमवून तो दक्षिणेत आला हे आख्यान अर्थगर्भच आहे. वेगळ्या शब्दात उत्तर वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म यांचा प्रसार इसवी सनापूर्वीच्या पाचव्या शतकापासून दळणवळणाच्या मार्गामार्फत विदर्भ आणि आंध्र प्रदेशात झाला. मनसर येथील उत्खननात सर्वात खालच्या थरांमध्ये शिवालयाच्याही अगोदरच्या काळात, कूर्मचिती म्हणजे कासवाच्या आकाराच्या व श्येन म्हणजेच ससाण्याच्या आकाराच्या चिती सापडल्या आहेत. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकामध्ये नागार्जुन कौडा येथे अवभृथ-स्नानाची (यज्ञाच्या शेवटी केले जाणारे स्नान) जागा असलेले घाट सापडले आहेत या बाबीचा उलगडा सहज होतो. या संदर्भात हेही नमूद केले पाहिजे की अशोकाचे शिलालेख उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंतच्या भागातच दक्षिणेत आढळतात. वेगळ्या शब्दात गंगेची नागर संस्कृती इसवी सनाच्या पूर्वीच्या तिसऱ्या शतकात उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात जोमाने शिरली होती. वैदिक आणखी बौद्ध धर्म हे या प्रदेशात प्रतिष्ठेने वावरत होते.
        बौद्ध धर्माचा प्रसार दख्खनमध्ये कसा झाला याचे स्पष्टीकरण देताना दख्खनमधील खनिज संपत्ती (उदा. वैरागड व गोवळकोड्याजवळच्या रत्नांच्या खाणी ज्यांचा उल्लेख वज्राकार असा येतो.) आणि रोमन व ग्रीक खलाशांच्या मार्फत अरबी समुद्रातून होणारा व्यापार आणि त्यातून आलेली समृद्धी यांच्याद्वारे केले जाते. मुनी बावरीचे शिष्य हे गोदावरीच्या किनाऱ्यावरून पैठण, अहमदनगर, खानदेश, माळवा या मार्गाने प्रयागला जाऊन पुढे श्रावस्तीला गेले आणि बुद्धांना भेटले या कथेतूनसुद्धा अशा प्रकारचे व्यापारी मार्ग होते हेच स्पष्ट झाले आहे. किंबहुना व्यापारी आणि त्यांच्याबरोबर गेलेले भिक्षु यांनी गंगा खोऱ्यातील आधुनिक शेतीचे तंत्र दख्खनमध्ये

कोल्हापूरच्या ब्रह्मगिरी येथे सापडलेली पोसायडन ही ग्रीक सागरी देवतेची मूर्ती >

आणले, आणि त्यातून झपाट्याने दख्खनचे नागरीकरण झाले असे या पुरातत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेतले म्हणजे कोकणचा किनारा आणि आतील पैठण, तेर व अडमसारखी व्यापारी ठिकाणे एकमेकांशी जोडली गेलेली होती ती रोमन साम्राज्याशी असलेल्या व्यापारी संबंधांमुळेच हेही अधोरेखित होते. या संबंधांत हे नमूद करणे आवश्यक आहे की आडम येथे रोमन सम्राटांची सोन्याची १२ नाणी सापडली आहेत. आणि या संपर्कामुळे सार्थवाह, व्यापारी आणि प्रजा मोठ्या प्रमाणावर थेरवादी बुद्धाचे अनुयायी झाले. परिणामस्वरूप या व्यापारी मार्गावर शेकड्यांनी बौद्ध गुंफा कोरल्या गेल्या. फर्ग्युसनच्या गणतीप्रमाणे हिंदुस्थानातल्या जवळजवळ हजार गुंफांच्यापैकी ६५० गुंफा दख्खनमध्ये आहेत, आणि त्यातल्या बहुतांश बौद्ध आहेत. यावरून इसवी सन पूर्व तीनशे ते इसवी सनाच्या ५०० वर्षांपर्यंत महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा किती मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला असावा हे लक्षात येते. वैदिक धर्माचे मनापासून पालन करणारे सातकर्णी आणि त्याची पत्नी नागरिका यांनी केलेल्या वाजपेयादी अनेक मोठ्या यज्ञांचा उल्लेख त्यांच्या अभिलेखातून व नाण्यांवरून सहज मिळतो. ते वैदिक धर्माचे अनुयायी असून सुद्धा नाशिक, कान्हेरी येथील त्यांच्या शिलालेखावरून व सातवाहनांचे प्रतिस्पर्धी असलेल्या क्षहरात नहपानाच्या शिलालेखांवरूनसुद्धा हे बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणावर आश्रय देत होते हे स्पष्ट होते. वेगळ्या शब्दांत अगदी पुष्करपासून ते गोदावरीच्या खो-यापर्यंतच्या भागात वैदिक आणि बौद्ध धर्म हे परस्पर सामंजस्याने वृद्धित होत होते. मौर्यांच्या पाठोपाठ राज्य करणाऱ्या वैदिक शृंग राजांच्या आश्रयाखाली भारहूत व सांची (मध्य प्रदेश) येथे बौद्ध कलेची प्रसिद्ध केंद्रे उदयाला आली. आणि त्यांचा प्रभाव विदर्भात किती होता हे मालविकाग्निमित्र या नाटकातील विदर्भ युवराजांच्या कलहाच्या उल्लेखावरून कळून येतो.

  अग्निमित्राच्या मध्यस्थीमुळे वरदा,   म्हणजे हल्लीची वर्धा नदी ही सीमा कल्पून पूर्व विदर्भ आणि वहाड (वरदा तट) असे विदर्भाचे दोन भाग करण्यात आले व त्यावर हे दोन भाऊ राज्य करू लागले असा उल्लेख आहे. त्यामुळे माळव्यातील समृद्ध बौद्ध कलेचे लोण पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात कसे आले याचा उलगडा होतो. या संदर्भात हेही लक्षात ठेवले पाहिजे की इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून शक राजे गुजरातमधून कोकणात व पठारावर आणि तिथून विदर्भमार्गे आंध्रात स्थायिक झाले. हे सर्व प्रांता-प्रांतामध्ये असलेल्या घनिष्ठ व्यापारी संबंधांमुळेच शक्य झाले. या पार्श्वभूमीवर वाकाटकांच्या राज्यकाळातील म्हणजे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापासून ते पाचव्या शतकाच्या शेवटापर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण काय होते, त्यात बदल कसे घडले हे जाणून घेणे अत्यंत मनोरंजक ठरणार आहे.

छायाचित्रे : महेश कार्ला,
सायली पलांडे-दातार

कुशाणांचे साम्राज्य

ज्याची प्राचीनता जाऊ शकते अशा वैदिक वाङ्‌मयातून हिंदू धर्माच्या उगमाचा शोध घेतला जातो. या वैदिक वाड्‌मयाची विभागणी सामान्यतः चार भागांत केली जाते. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. हे वेद म्हणजे मंत्र असलेल्या संहिताच. मंत्र हे देवतांना आवाहन करण्यासाठी व त्यांना प्रसन्न करण्यासाठी स्तुती म्हणून यज्ञात वापरले जात असत. यज्ञामधील निरनिराळ्या क्रियांचा वापर योग्य रीतीने व्हावा म्हणून यज्ञयागांच्या विवरणस्वरूप असलेल्या ब्राह्मण ग्रंथीत त्या मंत्रांचा अर्थ समजावून सांगितला आहे व ते मंत्र यज्ञातील क्रियेशी अनुरूप कसे आहेत हे समजावून सांगितले जाते. यानंतरचे आरण्यक आणि उपनिषद म्हणून प्रत्येक वेद शाखेतील ग्रंथ हे यज्ञाचा खराखुरा अर्थ काय आहे, यज्ञ करण्यामागचे आध्यात्मिक प्रयोजन काय आहे, कारण काय आहे याची चर्चा करतात. गृहस्थाश्रमातील आपली कर्तव्ये पूर्ण केल्यानंतर मोठ्या मुलावर परंपरागत यज्ञानुष्ठानाचे काम सोपवून ऋषी आणि तापस यांच्या संगतीत उरलेले आयुष्य घालवायचे व आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचा खोल विचार करायचा अशी पाश्र्वभूमी असल्यामुळे वेदांच्या या तिसऱ्या  भागास अरण्यात लिहलेले ग्रंथ म्हणून आरण्यक असे नाव पडले.
      चौथा भाग उप नि + सद् या धातूपासून उपनिषद हा शब्द तयार झाला. उपनिषदे ही जीवनाचे रहस्य गुरूने शिष्याशी झालेल्या संवादातून सांगण्याच्या स्वरूपात लिहिली गेली आहेत. त्यामुळे उपनिषद या शब्दाला फक्त अधिकारी किंवा योग्ध शिष्याला सांगितलेली गूढ विद्या असा अर्थ आहे. संहिता आणि ब्राह्मण या वेद-ग्रंथांतून यज्ञाच्या साहाय्याने या जगात आणि मृत्यूनतर स्वर्गात आनंदाने राहण्याचा मार्ग वर्णिलेला आहे. तर आरण्यक आणि उपनिषदे या ग्रंथांत अशा प्रकारचे ऐहिक आणि पारलौकिक सुख हे क्षणभंगुर असते, स्वर्गातलेही सुख हे कायमचे नसते, कारण यज्ञातून मिळालेले पुण्य हे मोजकेच असते. ते संपल्यानंतर पितृ लोकांतून परत


वाकाटक राजांनी स्थापत्य, शिल्प, चित्रकला यांना दिलेल्या उदार आश्रयाचे दृश्यस्वरूप अजंठा येथील चित्र.

पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. वेगळ्या शब्दांत यज्ञासंबंधीच्या वैदिक तत्त्वज्ञानातून हळूहळू कर्मसिद्धांत उदयास आलेला दिसतो. त्यातूनच पुनर्जन्माची कल्पना व पुनर्जन्म म्हणजेच जन्म-मृत्यू व स्वर्गातून उतरल्यानंतर पृथ्वीवर परत जन्म घेणे म्हणजे संसारचक्रात अडकणे या कल्पनेचा उदय झालेला दिसतो. आरण्यके आणि उपनिषदे या संसारचक्राचा भेद करून अक्षय पारमार्थिक सुख संसारापासून निवृत्त होऊनच मिळू शकते या कल्पनेवर भर देणारीही आहेत.


    निवृत्तिपर धर्म आणि प्रवृत्तिपर धर्म यांच्या पार्श्वभूमीवर वाकाटक वंशाचे कार्य समजून घेताना समाजातील या बदलांची नांदी, त्याहीपूर्वीची सामाजिक स्थिती आणि काळानुसार तत्त्वज्ञानात होत गेलेले बदल निवृत्तीपर ते प्रवृत्तीपर हा सारा प्रवास समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. सुरुवातीस हा सारा इतिहास फारसा रंजक वाटणारही नाही. किंवा या सान्थाचा वाकाटकांशी काय संबंध असा प्रश्नही वाचकांच्या मनात येईल. पण थोड्या संयमाने हे सारे समजून घेतलेत तर वाकाटकांचा कालखंड समजून घेताना फारसे प्रश्न पडणार नाहीत किंवा समजून घेणे सोपे जाईल. म्हणून हा सारा प्रपंच.
  उपनिषदांचा काळ हा इसवी सनपूर्व आठव्या शतकापासून ते इसवी सनपूर्व पाचव्या शतकाचा मानला जातो. जागतिक इतिहासाचा अभ्यास करणा-या युरोपीय तज्ज्ञांनी इ.स.पू. ८०० ते इ.स.पू. ३०० हा काळ धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्या दृष्टीने ग्रीस, इराण, भारत आणि चीन येथील संस्कृतींच्या संदर्भात फार महत्त्वाचा मानला आहे. त्यांच्या मते या महत्त्वाच्या काळात तत्कालीन नागरी संस्कृतीमध्ये धर्म व तत्त्वज्ञानदृष्ट्या मोठे पुनरुत्थान जगात घडून आले. ग्रीसमध्ये सॉके ठीस व त्याआधी इराणमध्ये झरतुष्ट्र, चीनमध्ये कन्फ्युशिअस आणि भारतात भगवान महावीर भगवान बुद्ध व उपनिषदांचे क्त्त्वज्ञान ही मोठी स्थित्यंतरे धडून आली. दोन स्थचकांना जोडणारा आस (अक्ष) असतो त्याप्रमाणे समाज आणि धर्मतत्त्वज्ञान यांना जोडणारा हा काळ असल्यामुळे त्याचा उल्लेख 'अॅक्सिअल एज' असा केला जातो. उपनिषदाप्रमाणेच भगवान बुद्ध व महावीर आणि इतर पाच (मंखली गौसाल, पकुध-कच्चायन, अजित केसकंबली, संजय बेलड्डि पुत्त आदी) अशा संन्याशी आचाथौनी आपले तत्वज्ञान मांडले. त्यातील भगवान बुद्ध भगवान महावीर व मख्खली गौसालपुत्त याचा आजीवक धर्म पूर्व भारतात अत्यंत लोकप्रिय झाले. बौद्ध आणि जैन धर्म हे त्यांच्या मगध (बिहार आणि उत्तर प्रदेश) या जन्मभूमीपुरतेच थांबून न राहता त्यांचा प्रसार भारतभर झाला. बौद्ध धर्म हा अशोकाच्या पुढाकारामुळे वायव्य सरहद्द प्रांत ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा ते गुजरात, राजस्थान या त्याच्या अवाढव्य साम्राज्यापुरताच मर्यादित न राहता त्याच्याच काळात श्रीलंकेपर्यंत जाऊन पोहोचला. इ. स.पू.च्या तिसऱ्या शतकापासून इसवी सनाच्या विसाव्या शतकापर्यंत श्रीलंकेच्या इतिहासात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. वसाहतवादाच्या काळात खिश्चन धर्माचा प्रसार झाला तरीसुद्धा आजही बौद्ध धर्म बळकट रीतीने तिथे ठाम उभा आहे. बौद्ध धर्माचा प्रसार उत्तरेत, मध्य अशिया, चीन, कोरिया, जपान, आग्नेय अशिया ते ब्रह्मादेशापर्यंत झाला. हे सर्व विवेचन करण्यामागचे कारण असे की, हे निवृतिपर धर्म, पूर्ण अशियामध्ये पसरले. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभाव इतका बळकट होता की, विध्यपर्वतररांगेच्या पलीकडे (दक्षिण भारत) जे नागरीकरण झाले ते जवळपास या धर्माच्या माध्यमातूनच झाले.
      भारतीय नेहमीच इतिहासाकडे पाठ वळवून असतात, स्थांना ऐतिहासिक घटनांचे गांभीर्य कधीच समजले नाही त्यामुळे त्याची साधी नोंदही त्यांनी घेतली नाही किंवा खन्या खुऱ्या अर्थाने भारताचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला नाही असाच समज होतो. याउलट युरोपमध्ये इतिहास लेखनाची परंपरा इसवी सनापूर्वीच्या दुरोडोटस या ग्रीक इतिहासकारापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळेच इतिहासलेखनाचे तंत्र व शास्त्र (हिस्ट्रीओग्राफी) हे त्यांच्या तत्वज्ञानातसुद्धा अभिप्रेत आहे. भारतीय आणि युरोपीय दृष्टिकोनातील चटकन लक्षात दिसणारा फरक हो इंग्रजी शिक्षणाची १९ व्या शतकात सुरुवात झाल्यानंतर सुशिक्षितांच्या लक्षात आला. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. भाऊ दाजी लाड यांना हे जाणवल्यामुळे त्यांच्या संशोधनात प्राचीन भारतीय इतिहासातील राजवटीचे कार्यकाळ व कालक्रम, नाणे, अभिलेख व हस्तलिखिते यांच्या साह्याने कसे पक्के करता येतील यावर त्यांनी सर्वप्रथम भर दिला. त्यांच्यामते इतिहासाकडे तोंड फिरवून वारण्याच्या भारतीयांच्या मानसिकतेचे मूळ हे हिंदू, जैन, बौद्ध धर्मात पक्क्या झालेल्या चतुर्युग अथवा तत्सम युगकल्पनेत आहे. जैन व बौद्ध धर्म ग्रंथाप्रमाणेच, महाभारत आणि रामायणलेखनाच्या काळात (इसवी सनपूर्व ६वे ते ३ रे शतक) त्या कल्पना पक्क्या झाल्या. अगोदर कृत, मग त्रेता, द्वापार आणि शेवटी कलियुग ही चार युगे मिळून एक महायुग होते. त्यानंतर सृष्टीचा लय होऊन परत सृष्टी नव्या कृतयुगात जन्माला येते. जन्म-मृत्यू, स्वर्ग अथवा नरक आणि त्यानंतर पुन्हा जन्म या पुनर्जन्माच्या कल्पनेला समांतर अशी ही कल्पना आहे. महाभारत हे द्वापार युगात झाले. या युगाच्या शेवटी कौखांचा निःपात करून युधिष्ठिर धर्मराज सिंहासनावर बसला आणि नंतर पुढे कलियुग येणार, कृत युगापासून धर्माचा हास होत होत कलियुगात फक्त एकचर्तुथांश धर्मच शिल्लक राहिल्याने सर्व सामान्य समाजामध्ये आणि कुटुंबातसुद्धा अनाचारच बोकाळणार त्यामुळे विपत्तीच्या काळात धर्माचे कसेबसे पालन करून गुजराण करायची, कुठल्याही प्रकारच्या समृद्धीची किंवा सुखासमाधानाची अपेक्षाच करावयाची नाही, अशी जणू भविष्यवाणीच केली गेली. चार वर्णांवर आधारलेला धर्म नष्ट होणार, वर्णसंकर होणार, आदर्श क्षत्रिय राजे राहणार नाहीत, वैश्य आणि शूद्रसुद्धा राजे होतील, त्यामुळे राज्यसंस्थासुद्धा विकल आणि क्षीण होतील अशी ती भविष्यवाणीच त्याने केली. यापुढे महाभारतात असे म्हटले आहे की, जनमेजयाने (पांडवांचा पणतू) केलेल्या अश्वमेधानंतर कलियुगात आता कोणीही अश्वमेध करू नये.

▲ कुशाणांची सोन्याची आणि तांब्याची नाणी जगप्रसिद्धच आहेत.

       इ.स.पू सहाव्या शतकात किंवा त्याही अगोदर आठव्या शतकात श्रमण (बौद्ध आणि जैन) धर्माचा उदय होऊन प्रसार झाला. महाभारतातील जरासंधाचा मुलगा बृहद्रथ हा शेवटचा राजा, कौख-पांडवांचे युग संपल्यानंतर यादवांनासुद्धा यादवी झाल्याने व द्वारका बुडाल्याने परत कुरुपांचाल देशात यावे लागले. येताना भिल्लांनी यादव स्त्रियांचे अपहरण करून हाहाकार उडवला. त्यामुळे इक्ष्वाकु व सूर्यकुळातील आणि सोमवंशातील मोठ मोठे राजवंश लयाला पावले. बौद्ध आणि जैन वाङ्मयात जी सोळा महाजनपदे, उत्तर भारतात विकसित झालेली आढळतात त्यातील काहीच राजवंश वैदिक धर्म पाळत असल्याचे दिसतात, त्यांच्यावर जैन आणि बौद्ध धर्माचाच मोठा पगडा झाल्याचे दिसते. महाभारतात व पुढे त्यानंतर लिहिलेल्या पुराणात कलियुगाच्या माध्यमातून प्रकट केलेली वर्णसंकर व अनाचाराची भीती ही कदाचित जैन आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराबद्दलची प्रतिक्रिया असावी. बौद्धांच्या महावस्तु-अवदान (इ.स.पू दुसऱ्या ते इसवी सन चौथ्या) व दिव्यावदान (इसवी सन तिसरे) या ग्रंथांतूनसुद्धा हल्लीच्या काळात क्षत्रियांप्रमाणेच ब्राह्मण, वैश्य, शूद्र हेसुद्धा राजे होतात अशी वस्तुस्थिती मांडलेली आढळते. या संदर्भात इसवी सनाच्या सुरुवातीला काही ज्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना घडल्या त्याविषयी विवेचन करणे आवश्यक ठरेल.
        सुप्रसिद्ध नंद घराण्याचा लय झाल्यानंतर वायव्य सरहद्द प्रांत व पंजाबात अलेक्झांडरच्या स्वारीनंतर भारतीय ग्रीक राजांनी (इंडोग्रीक) अफगाणिस्तानात सिंधमध्ये आणि पंजाबात आपापली राज्ये निर्माण केली. तर चंद्रगुप्ताच्या सहाय्याने चाणक्याने मगधात नवीन राज्य स्थापना करवून मौर्य वंशाची मुहूर्त मेढ रोवली. मौर्य या शब्दाची व्युत्पत्ती मुरा या चंद्रगुप्ताच्या आईच्या नावापासून केली जाते. मुरा या नंद राजाच्या दासीपासून झालेला मुलगा म्हणून तो मौरेय किंवा मौर्य अशी केली जाते. एका अर्थाने मौर्यसुद्धा दासीपुत्र म्हणून शूद्रच गणले गेले. त्यांतर मौर्य आणि शुंग या भरभराटीच्या काळानंतर मध्य अशियातील शक राजांनी इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकापासून सरहद्द प्रांतावर हल्ले चढवून आपली सत्ता प्रस्थापित केली. विक्रमादित्य चंद्रगुप्त या गुप्त वंशातील राजाने चौथ्या शतकाच्या शेवटी शकांचा पाडाव करेपर्यंत हे शक राजे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, विदर्भव दूरवर आंध्र प्रदेशात शिरून राजे झाले. इसवी सनाच्या सुरुवातीला मध्य अशियात युएची म्हणून चिनी लोकांना ज्ञात असलेल्या कुशाणांच्या टोळ्या मध्य अशियातून अफगाणिस्तानमार्गे मध्य भारतातून मथुरेपर्यंत येऊन पोहोचल्या, मध्य आशिया, अफगाणिस्तान व उत्तर भारत यावर इसवी सन १०० ते ३०० पर्यंत मोठे साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केले. त्यांची उत्तरेतील राजधानी पुरुषपुर म्हणजे आजचे पेशावर व दक्षिणेतली राजधानी मथुरा येथे होती. भारतीय इतिहासात मौयांनंतर अत्यंत समृद्ध असे साम्राज्य कुशाणांचे समजले जाते. यांनी पाडलेली सोन्याची नाणी जगप्रसिद्धच आहेत. सोन्याबरोबरच त्यांनी तांब्याची नाणीसुद्धा प्रचारात आणली. या नाण्यांचे वजन, आकार त्यावरील लेख, त्यावरील प्रयोजने, नाण्याच्या पुढल्या बाजूस राजाचे चित्र आणि मागील बाजूस राजाची इष्टदेवता अथवा लोकप्रिय देवता यांच्या प्रतिमा असे त्यांचे स्वरूप होते. त्यावर बुद्धाबरोबरच शिव, स्कंद, विष्णू या लोकप्रिय देवतांच्या मूर्तीसुद्धा आढळतात. त्यांच्या पूर्वी मध्य अशियात म्हणजे अफगाणिस्तान, पश्चिमेकडे सीमेवरील पार्थिया हा प्रांत व वायव्य सरहद्द प्रांत या भागात त्यांच्यापूर्वी राज्य करणाऱ्या भारतीय-ग्रीक राजांच्या नाण्यांना समोर ठेवून ही नाणी घडवली होती. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झालेला कुशाणांचा सुप्रसिद्ध राजा कनिष्क याला धार्मिक बौद्ध वाङ्‌मयात सम्राट अशोकाइतकेच महत्त्व दिले जाते. त्याचे कारण असे की, याच्याच काळात बौद्ध धर्माची महासभा आचार्य अश्वघोष याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेचे महत्त्व असे की, इथूनच बौद्ध धर्माच्या नव्या आविष्काराची म्हणजे महायान पंथाची सुरुवात झाली असे इतिहासकार मानतात. या पंथातील धर्मग्रंथ हे एरवी शिष्टमान्य असलेल्या पाली भाषेत लिहिले न जाता गांधारी या संस्कृतला जवळ असलेल्या भाषेत लिहिले गेले. पाणिनीने ज्या संस्कृत भाषेचे व्याकरण लिहिले व त्यातून जी राजमान्य संस्कृत भाषा म्हणजे अभिजात संस्कृत निर्माण झाली, त्या भाषेपेक्षा ही भाषा वेगळी असल्यामुळे, तिच्यावर स्थानिक प्राकृत भाषांचा प्रभाव असल्याने, युरोपियन संशोधकांनी तिचे वर्णन हायब्रीड संस्कृत म्हणजे प्राकृतमिश्र संस्कृत असे केले. आता असे लक्षात आले आहे की, वायव्य सरहद्द प्रांत व अफगाणिस्तान यांमधील लोकांची बोली इसवी सनपूर्व दुसरे ते इसवी सन चौथे शतक अशीच असल्याने व ती लोकांची बोली असल्याने तिला गांधारी भाषा असे नाव योग्य होईल.
     या भाषेतून व अभिजात संस्कृत भाषेत लिहिलेले धर्म व तत्त्वज्ञानावरील ग्रंथ, बौद्ध ग्रंथ हे पुढे मध्य अशिया, चीन व कोरिया आणि त्यानंतर इसवी सनाच्या सहाव्या शतकात जपानमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते तिसऱ्या शतकापर्यंत कुशाणांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्माला मोठी प्रतिष्ठा मिळून तो उत्तर भारतात आणि पूर्वेकडील देशात पसरला. याचे महत्त्वाचे कारण असे की, चीन व इराण या देशांना जोडणारा, या दोन देशांतील समृद्ध व्यापारामुळे ओळखला जाणारा रेशीम मार्ग. खरे तर हा त्या वेळचा महामार्गच होता. त्यावरील प्रदेशावर कुशाणांची पूर्ण सत्ता होती. कुशाण साम्राज्याच्या समृद्धीचे ते एक महत्त्वाचे कारण होते. त्यावरून लक्षात येईल की, इसवी सनपूर्वीच्या सहाव्या शतकापासून ते विसऱ्या शतकापर्यंत दक्षिणेत व उत्तरेतील बौद्ध धर्माच्या प्रसारात मौर्य आणि कुशाण राजवंशातील सम्राटांचा मोठा हातभार लागलेला होता.
   या पार्श्वभूमीवर भारतात प्रसिद्ध असलेल्या शक संवतांच्या उगमांचा अभ्यास करणे मनोरंजक ठरेल. भारतामध्ये अनेक संवत् पद्धती राजांनी प्रचलित केल्या, परंतु ज्यांना आज आपण शक आणि विक्रमसंवत् म्हणतो ते नेमके कोणी केले याविषयी विद्वानात मतभेद आहेत. उदाहरणार्थ विक्रम संवत् हा विक्रम नावाच्या राजाने प्रचलित केला असे समजले जाते; परंतु आख्यायिका सांगतात
   त्याप्रमाणे तो उज्जैनीत राज्य करत होता याव्यतिरिक्त तो नेमका कुठला होता, त्याचे काही शिलालेख किंवा नाणी मिळतात का, याचा शोध घेतल्यास 'नाही' असेच उत्तर द्यावे लागते. कारण इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या अगोदर त्या शकाचे नाव कृत/मालव-संवत् असे येते आणि तो माळव्यात प्रचलित होता असे दिसते. पण कृत हे कुठल्या राजाचे नाव नव्हे. आणि अशा रीतीने हा विक्रम राजा कोण होता हे इतिहासकारांना एक गूढच राहिले आहे.
       मात्र धार्मिक जैन परंपरेप्रमाणे कालदृष्ट्या त्याचे स्थान निश्चित अशा दुष्ट राजांना शासन घडवावे याचा धडा कालकाचार्यांनी घालून दिला. शकद्वीपातील (म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमेवरील असलेल्या, तत्कालीन इराणमधल्या) शहानुशाही राजांच्या साहाय्याने गर्दभिल्लाचा पराभव करून त्यांनी विक्रमादित्याला राज्यावर आणले. अशी आख्यायिका आहे. (आचार्य कालकाचार्यांची कथा इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील असल्यामुळे तेव्हा पासून विक्रमसंवत् सुरू झाला अशी धारणा झाली.) अशा रितीने धर्मावर घाला घालणाऱ्या परकीय राजांना परास्त करून धर्माची घडी बसवणारा अनेक परीने अर्थपूर्ण आहे. वैष्णव आगमात नरसिंह, वामन / त्रिवक्रम या अवतारांना विशेष महत्त्व आहे. शिल्प म्हणूनसुद्धा हे इतके प्रभावी आहे की विदर्भातील सुप्रसिद्ध कवी अनिल (आ. रा. देशपांडे) यांनी या शिल्पावर एक सुंदर काव्य रचले आहे. कलेतिहासाचे मर्म जाणणारे या शिल्पाकडे आणखी एका दृष्टीने बघतात. सुप्रसिद्ध संशोधक प्रो. डॉ. जोहाना विल्यम्स (बर्कले विद्यापीठ) यांच्या दृष्टीने हे शिल्प शक-गुप्त यांच्या संघर्षात देव प्रवृत्तींनी असुर प्रवृत्तीवर मिळवलेला विजय असा अर्थ होतो. असुरांच्या भारामुळे पृथ्वी जेव्हा समुद्रात बुडायला लागली होती त्या वेळी विष्णूने वराह अवतार घेऊन, चिखलामध्ये आपले नाक खुपसून, सुळ्यावर पृथ्वी उचलून तिचा उद्धार केला. त्याला विशेष संदर्भ असा, शक राजाने गुप्तांचा सम्राट रामगुप्त याला कचाट्यात पकडल्यानतंर तुझी महाराणी ध्रुवस्वामिनी हिला आमच्याकडे नजर म्हणून पाठव म्हणजे तुझी सुटका होईल अशी अट शकराजाने घातली. चंद्रगुप्ताचा वडीलभाऊ रामगुप्त या अटीस तयार झाला. पण हा अपमान सहन न होऊन चंद्रगुप्ताने ध्रुवस्वामिनीचा वेश घेऊन शक राजाच्या छावणीत शिरून त्या राजाचा वध केला व शेवटी रामगुप्ताला बाजूला सारून तो गुप्तांचा सम्राट म्हणून राज्यावर आला. ही कथा फार महत्त्वाची आहे. उदयगिरी येथील हे अर्थगर्भवराहशिल्प इतके लोकप्रिय झाले की दहाव्या शतकापर्यंतच्या राजांनी वराहाप्रमाणेच आपण असुर वृत्तींचा नायनाट करण्यासाठी राज्यावर बसलो आहोत हे दाखवण्यासाठी पृथ्वी-वराहाचे शिल्प आपल्या अगदी सोन्याच्या नाण्यांच्यावरसुद्धा अंकित केले आहे. विक्रमादित्य या पदवीशी धर्मोद्धाराची कल्पना अगदी जवळून निगडित झाल्यामुळे इतिहासात अनेक राजांनी विक्रमादित्य ही पदवी धारण केलेली दिसते. याचे अगदी उत्तम असून त्याअगोदर गर्दभिल्ल नावाच्या राजाला बाजूला करून तो उज्जैनी येथे राज्यावर आला अशी माहिती मिळते. हा गर्दभिल्ल राजा राज्य करत असताना राजधानीत कालकाचार्य नावाचे जैन मुनी चातुर्मासासाठी म्हणून उज्जैनीत राहत होते. त्यांच्याबरोबर भिक्षुणी असलेली त्यांची सरस्वती नावाची बहीणदेखील तेथेच होती. ती राजाच्या दृष्टीस पडल्यानतंर तिच्या सौंदर्याने मोहित होऊन त्याने आपल्या अंतःपुरात तिची खानगी केली. यतींनी राजकारणात लक्ष घालू नये अशी प्रथा असल्यामुळे युद्धात भाग घेणे अथवा त्यास प्रवृत्त करणे या गोष्टीची संन्याशांच्या बाबतीत कल्पना करणेही कठीण होते. पण सत्तेने मदांध झालेले राजे जर तुमच्या धार्मिक आचरणामध्ये आडकाठी घालत असतील तर राजकारणाचा आश्रय घेऊन, युद्धाच्या माध्यमातूनसुद्धा राजा अशी विक्रमादित्याची ओळख झाली. आणि त्यामुळेच अधर्माचे आचरण करणाऱ्या शकांचे पारिपत्य करणाऱ्या गुप्त वंशातील चंद्रगुप्त द्वितीय (इसवी सन ३८० ते ४१५) याने विक्रमादित्य ही पदवी घेतली असावी.

▲ कुशाणांच्या सुरुवातीच्या काळात चांदीची नाणी वापरात होती.

       उज्जैनीतील शकांचा पराभव केल्यानंतर चंद्रगुप्ताच्या सैन्याचा तळ काही वर्षे विदिशेतच होता. त्याच्या सैन्यातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी विदिशेजवळील उदयगिरी या पहाडावर वैष्णव व शैवधर्मीय गुंफा कोरल्या. या गुंफांतील मूर्ती, शेषशयन विष्णु, वराह अवतार, शिवलिंगे व गरुडध्वज आणि चक्रध्वज असे स्तंभ यावरून शैव व वैष्णव आगम धर्माची उपासना चंद्रगुप्ताच्या सैन्यातील मोठे अधिकारी करत असत हे स्पष्ट होते. या गुंफातील वराह अवताराचे शिल्प हे उदाहरण म्हणजे उत्तर चालुक्य कुळातील आत्ताच्या विजापूर जवळील कल्याणहून राज्य करणारा सहावा विक्रमादित्य होय. (इसवी सन १०७५ ते ११२५). या कुळात त्यापूर्वीच्या पाच राजांनी विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती यावरूनही वरील विवेचन सुस्पष्ट होईल.
       दुसरे उदाहरण शक संवताचे. पश्चिम आणि उत्तर भारतामध्ये आणि जैन परंपरेत विक्रम संवत हा जास्त लोकप्रिय आहे, तर दक्षिण भारतात, श्रीलंकेत व आग्नेय अशियात बौद्ध धर्माचा पदर धरून शक संवत लोकप्रिय झालेला दिसतो. या संवताचे मूळही इतिहास संशोधकांच्या दृष्टीने अजून एक गूढच आहे. महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणे हा शालिवाहन शक आहे. इतिहास संशोधकांच्या मते बराच काळपर्यंत शक संवत हा कुषाणांनी सुरू केला आणि कनिष्क हा इसवी सनाच्या ७८ व्या वर्षी राज्यावर आल्यापासून त्याची सुरुवात झाली असे समजले जात होते. नवीन प्राप्त झालेल्या संशोधनातील लेखावरून कनिष्क हा इसवी सनाच्या १२८ या वर्षी राज्यावर आला. उपलब्धीनुसार ऐतिहासिकदृष्ट्या हा कनिष्काने सुरू करणे अशक्य आहे. कारण अय्-खनूम (अफगाणिस्तान) येथील उत्खनित कुषाण राजाच्या प्रतिमांशी निगडित असलेल्या त्याचबरोबर हा शकसंवत असल्यामुळे तो कुषाणांऐवजी शकांनी सुरू केला असे म्हणणे तर्कदृष्ट्या जास्त सुसंगत ठरते. हाती आलेल्या नवीन संशोधनानुसार हा संवत चष्टन नावाच्या शक राजाने इसवी सन ७८ मध्ये सुरू केला असावा असे दिसते. परंतु त्याचा प्राचीनतम वापराचा पुरावा इसवी सनाच्या चौथ्या शतकात आढळतो. पण महाराष्ट्रामध्ये त्याला शालिवाहन शक म्हणण्याचे कारण असे की, परंपरेनुसार गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात नहपान या शक राजाचा नायनाट करून उत्तर महाराष्ट्र व कोकणामध्ये आपली सत्ता बळकट केली. आणि म्हणून तोही एका अर्थाने शकारीच म्हणजे शकांचा शत्रू आहे. त्या विजयाच्या निमित्ताने हा संवत स्थापित झाला असावा अशी ठाम श्रद्धा त्या लोकपरंपरेत दिसते. वेगळ्या अर्थाने परधर्मीयांचे आक्रमण दूर करून सातवाहनांनी स्वतःची सत्ता व धर्म प्रस्थापित केला असे सुचवीत असल्यामुळे त्याला शालिवाहन शक असे नाव रूढ झाले असावे.
     विक्रम आणि शक संवत हे दोन संवत एका अर्थाने परकीय आक्रमणापासून स्वधर्माचे संरक्षण करण्याच्या घटनांवर आधारित आहेत. आणि त्यामुळेच जैन व बौद्ध परंपरेमध्ये ते लोकप्रिय झाले असावेत अशी धारणा आहे. या लोकप्रिय संवतांविषयी असलेल्या धारणांच्या बरोबरच यापूर्वी विवेचन केलेली कलियुगातील धर्म-हासाची संकल्पनाही तितकीच महत्त्वाची असल्यामुळे आद्य इतिहासकाळातील राजवंशांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, पारंपरिक क्षत्रिय कुलांच्या व्यतिरिक्त परकीय राजे, एतद्देशीय निरनिराळ्या वर्णातील राजे व त्यांचे राजवंश प्रतिष्ठित झाल्यामुळे धर्मावर आपत्ती आल्यानंतर ब्राह्मणांनीसुद्धा धर्मसंरक्षणासाठी राजत्व पत्करल्यास ते चुकीचे नाही असा विचार रुजलेला दिसतो. मौर्य हे स्थानिक समजुतीनुसार शूद्र असले तरी त्यांच्यापाठोपाठ शेवटच्या मौर्य राजाचा वध करून ब्राह्मण पुष्यमित्र शुंग हा राजा झाला. त्याने शुंग वंशाची प्रतिष्ठापना केली. त्यापाठोपाठ आलेले कण्वही त्यांच्या नावावरून ब्राह्मण होते असे दिसते. दक्षिणेत कण्वांच्या पाठोपाठ आंध्र म्हणजेच सातवाहन राजवंश आला. ते सनातन वैदिक धर्माचे उपासक असून राणी नागनिका हिच्या शिलालेखातून वाजपेय इत्यादी अनेक श्रौत याग त्यांनी केल्याचे स्पष्ट दिसते. ते वैदिक धर्मानुयायी असले तरी समकालात लोकप्रिय असलेल्या बौद्ध धर्माला त्यांनी मोठ्या प्रमाणात आश्रय दिला.
    महामहोपाध्याय मिराशी यांच्या मते त्यांच्यापाठोपाठ विदर्भात राज्यावर आलेला मुंड वंशातील आदित्यराज हा ब्राह्मण कुळातील होता. एवढेच नव्हे तर तो अप्रत्यक्षपणे असे सुचवतो की, समकालात झालेल्या धर्म-हासाप्रमाणे त्याच्या वंशातील आदिपुरुष मुंड याने यज्ञातील पळी बाजूला टाकून हाती खड्ग धारण केले. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात व पूर्व-मध्य काळात गोव्यावर राज्य करणाऱ्या कदंब राजवंशाची कथा हाच अभिप्राय अधोरेखित करते. कदंबांचा आदिपुरुष मयुर शर्मन् हा श्रोत्रिय (वेदशास्त्रसंपन्न) ब्राह्मण होता, परंतु सीमेवरील पल्लव राजाच्या सेनाधिकाऱ्यांनी त्याचा अपमान केल्यामुळे पल्लवांच्या विरुद्ध बंडाळी करून आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या वंशजांनी धारवाड येथील पलाशिकाग्राम म्हणजे हळशी येथे आपली राजधानी इसवी सनाच्या चौथ्या शतकात वसवली. त्याच्या वंशजांनी उत्तर कर्नाटकात धारवाड, बेळगाव इथपर्यंत कुंतलदेशात आपले राज्य प्रस्थापित केले आणि त्यांचीच एक शाखा १२-१३ व्या शतकापर्यंत गोव्यात राज्य करीत होती असे दिसते. हिंदू धर्मावर किंवा वैदिक धर्मावर परकीयांचा घाला पडल्यानंतर आपण क्षात्र धर्म स्वीकारून स्वधर्माचे रक्षण केले पाहिजे ही भावना काही ब्राह्मण कुटुंबांमध्ये आद्य इतिहासकाळात प्रबळ झालेली दिसते. आणि त्यामुळेच कदाचित परंपरागत अध्ययन-अध्यापन, यजन याजन आणि दान-प्रतिग्रह अशा प्रकारचा सहा कर्तव्यांचा धर्म सोडून ब्राह्मण हे क्षात्रवृत्तीचा आश्रय करून राजे झाले असे दिसते.
   या पाश्र्वभूमीवर वाकाटकांचा आदिपुरुष विंध्यशक्ती (इसवी सन सुमारे २५० ते २७०) याने अशाच प्रकारच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात सातवाहनांच्या नंतर विदर्भामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली असावी. त्याचा उत्तराधिकारी प्रवरसेन प्रथम (इसवी सन सुमारे २७० ते ३००) याने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. पुराणातील उल्लेखानुसार या राजवंशाची पहिली राजधानी सातपुड्यातील पुरिका या नगरात असून, त्याच्या चार पुत्रांनी आपापली स्वतंत्र राज्ये त्याच्या साम्राज्यातून निर्माण केली. इतिहासाला वाकाटक वंशाच्या दोनच शाखा माहीत आहेत. वाकाटकांच्या शिलालेखावरून आणि ताम्रपटांवरून असे दिसते की, प्रवरसेनाचा नातू प्रथम रुद्रसेन याने नंदिवर्धन, (हल्लीचे नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळचे नगरधन) येथे आपली शाखा प्रस्थापित केली, तर त्याचा दुसरा मुलगा सर्वसेन याने वत्सगुल्म (म्हणजे वन्हाडातील आजचे जिल्ह्याचे ठिकाण असलेले वाशिम) येथे दुसरी शाखा प्रस्थापित केली. ज्ञात असलेल्या शिलालेखांवरून असे म्हणता येईल की इ.स. सुमारे २५० ते ५०० या अडीचशे वर्षांच्या काळात वाकाटकांच्या दोन शाखांतील नऊ पिढ्यांनी वन्हाड (पश्चिम विदर्भ) व पूर्व विदर्भात राज्य केले. यापूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे इसवी सन ३५० ते पाचशेपर्यंतचा काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ समजला जातो. असा समज होता की, गुप्त वंशाची कारकीर्द म्हणजे भारताचा सुवर्णकाळ. परंतु वाकाटक वंशातील राजांनी राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा म्हणजे स्थापत्य, शिल्प, चित्रकला व धर्म व त्यातील विविध परंपरा यांच केलेल्या योगदानामुळे आज हा सुवर्णकाळ गुप्त- वाकाटक काळ म्हणून ओळखला जातो. यापुढील लेखामध्ये या घराण्यांतील दोन शाखांच्या राजांचा इतर समकालीन राजवंशांशी कसा संबंध आला, तो कशा प्रकारचा होता आणि त्यातून वाकाटक वंशाने केलेले सांस्कृतिक योगदान हे किती महत्त्वाचे होते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कोण होते वाकाटक ?

महाकवी कालिदास महाराष्ट्रात आला आणि त्याने रामटेक येथे मेघदूत हे  खंडकाव्य लिहिले एवढीच माहिती आपल्याला असते. पण तो महाराष्ट्रात नेमका कशासाठी आला होता, हे फारच थोड्या लोकांना ठावूक आहे. गुप्त राजवंशाचा सम्राट चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य याने त्याच्या नातवांना शिक्षण देण्यासाठी त्याला उज्जयिनीहून विदर्भाच्या जंगलात पाठवले होते. चंद्रगुप्त दुसरा याचे ते नातू म्हणजेच वाकाटक राजवेशाचे नांतर झालेले राजे प्रक्स्सेन दुसरा, दिवाकरसेन आणि दामोदरसेन होय. त्यांची आई प्रभावतीगुप्ता ही गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याची कन्या होती. शकांचा निष्पात करणारा म्हणून चंद्रगुप्त दुसरा याला विक्रमादित्य उपाधी प्राप्त झाली. कालिदासाच्या तालमीत तयार झालेल्या या प्रवरसेन दुसरा याने नंतर सेतूबंध नावाचे काव्य लिहिले. त्याची स्तुती करताना बाणभट्ट म्हणतो, कीर्तीः प्रवस्सेनस्य प्रयाता कुमुदोज्वला सागरस्य परमपारम कपिसेनेव सेतूनः म्हणजेच ज्याप्रमाणे (रामाची) कपिसेना सेतूच्या सहाय्याने सागराच्या दुसऱ्या तीरावर गेली त्याचप्रमाणे कुमदाप्रमाणे उज्वल असलेली प्रवस्सेनाची कीर्ती सेतुबंध काव्याच्या माध्यमातून सागरापलीकडे गेली आहे... वाकाटक राजवंशाच्या नगरधन आणि वत्सगुल्म म्हणजेच आताचे
वाशीम अशा दोन पाती अर्थात शाखा होत्या. याच राजवंशाच्या कालखंडात आज जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे अजिंठा अस्तित्त्वात आले. ज्यांच्या कालखंडामध्ये जगातील ही सर्वोत्कृष्ट कलाकृती साकारली गेली, त्यांचा कालखंड समजून घेणे म्हणूनच क्रमप्राप्त ठरते.


वाकाटक राजवंशाचा कार्यकाळ इसवी सन सुमारे २५० ते ५२५ असा मानला जातो, त्यांच्या राज्यशासनाच्या स्पष्ट खुणा इसवी सनच्या चौथ्या शतकाच्या पहिल्या चतुर्थकापासून स्पष्ट दिसू लागतात. वाकाटकांच्या राज्याच्या समृद्धीची कल्पना त्यांच्या काळात झालेल्या कलाविष्कारातून दिसून येते पहिल्यांदा त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले ते अजिता येथील बौद्ध गुफाचे आश्रयदाते कोण होते त्याच्या शोधातून, वाकाटक राजांचा प्रधान अभात्य वहारदेव आणि मांडलिक राजा यांनी अजिंठाचे लेणे क्रमांक १६, १७ ते २१ पर्यंत लेणी खोदवून घेतल्या. हे दोघेही वाकाटक राजा हरिषेणाच्या दरबारातील होते. (४६२ ते पुढील १७ वर्षे स्थिक थिअरी) पूर्वउदधी बंगालच्या उपसागरापासून दख्खनमध्ये पश्चिमोदधीपर्यंत आणि माळव्यापासून ते कुंतल म्हणजेच धारवाडपर्यंत राज्याचा विस्तार असलेला हरिषेण हा वत्सगुल्म (वाशीम) येथील वाकाटक पातीचा राजा किंवा सम्राट असला तर प्रवरसेन हा नदिवर्धन (आताचे नगरधन) येथील मोठ्या पातीचा वंशज होता. जगातील एका बलाढ्य साम्राज्याचा पालनकर्ता होता. प्रसिद्ध गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय अथवा विक्रमादित्य हा त्याचा आजोबा होता.



    युवराज्ञी प्रभावतीगुप्ता आणि महाराज रुद्रसेन द्वितीय यांचा पुत्र म्हणजेच प्रवरसेन

मांडळ येथे १९७४-७६ च्या दरम्यान, केलेल्या उत्खननामध्ये अजितयाहूनही प्राचीन अशा वाकाटकांच्या कलाविष्काराचा, मूर्तीचा मोठा साठा आणि वाकाटकांचे तीन ताम्रपट सापडले. त्यामुळे अनेक गोष्टींना नंतर पुष्टी मिळाली. त्यातून पुढे रामटेक येथील सहा मंदिरे, ही याच राज्याच्या काळात बांधली गेली असावीत, असे लक्षात आले. मणसर येथील प्रचंड शिवमंदिरही त्याच काव्ळयातील आहे, असे लक्षात येत होते.
या शोधांच्या मध्ये प्राथमिकरित्या अभिजात कलेतिहासाला वेगळेच वळण मिळाले. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील अजिता येथील कला आणि गुप्तांची मथुरा, प्रधान आणि सारनाथ येथील बौद्ध कला यांच्यामधल्या दुव्याचा मांडळ रामटेक आणि मणसर येथील कलेमुळे शोध लागला.
    या सर्व कलाविष्काराच्या इतिहासाचा अभ्यास हा सौदर्य मीमांसेपर्यंतच सीमित न राहाता ही सर्व कला धार्मिक स्वरूपाची असल्यामुळे किंवा तिला धर्माचे अधिष्ठान असल्यामुळे, अभिजात काळातील इझमपरंपरेमध्ये घडून आलेले बदल हे का व कसे घडले याचासुद्धा मागोवा या संपन्न कलाविष्कारातून घेता येतो. अजिता येथील स्थापत्य शिल्प आणि चित्रकला हे बौद्ध कलेतील परमोच्चबिंदू आहेत. पण त्यानंतर मात्र बौद्ध कलेचा हास झाला. बौद्ध धर्माचा आश्रय कमी होत गेला. 
 तर पूर्व विदर्भातील शैव आणि वैष्ण आगमाधिष्ठित कला तिचा झपाट्याने पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात व पुढे त्याच बरोबर तमिळनाडूमध्येही झपाट्याने प्रसार झाला, हे नमूद करण्यासारखे आहे. वाकाटकांच्या कलेचा त्यांच्या काळात प्रसार पावणाऱ्या धर्म संप्रदायांचा, त्यांच्या राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर अभ्यास करणे हे या मालिकेचे प्रमुख ध्येय आहे.
हिंदू धर्मीय आपल्या धर्माचं मूळ वेदात पाहतात. वेदाच्या शेवटी आलेली उपनिषद ही चारही वेदांच्या संहितेत वर्णिलेल्या प्रवृत्तीपर धमपिक्षा वेगळी असून उपनिषदंही संसारापासून निवृत्तीचा मार्ग सांगतात. शूक इत्यादी ब्रह्मचान्यांच्या प्रमाणे लहान वयातच निवृत्तीचा मार्ग स्वीकारणारे थोडेच असतात व्यासांनाही ते जमाल नाही म्हणून हिंदू धर्मात धर्म हा धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ ब्रह्मचर्य, गृहस्थास्थम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमातून मिळवावेत असा उपदेश करतो. म्हणजेच हा मार्ग प्रवृत्ती आणि नंतर निवृत्तीचा मार्ग झाला.
संसारापासून निवृत्त झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा सामान्य माणसासाठी प्रवृत्तीतून निवृत्तीपर असा वारकरी धर्म सांगितला वैष्णव, शैव आगम यांनीही इसवी सनाच्या सुरुवातीस अनुक्रमे विष्णू आणि शिव या दोन उपास्य देवतांच्या माध्यमातून हाच मार्ग सांगितला. त्यांनाच आगमग्रंथ म्हणतात. म्हणूनच वेदांना निगम तर पांचरात्र संहिता, सातवत संहिता किंवा पाशुपत संहिता हे वैष्णव व शैव आगमाचे मुख्य ग्रंथ मानले जातात, या आगम कालखंडाचा वाकाटकांच्या कालखंडातही मोठा प्रभाव महाराष्ट्रात पाहायला मिळतो.
उत्तर हिंदुस्थानात कुशाणांच्या काळात बौद्ध व जैन धर्माचा प्रभाव होता. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व तिसन्या शतकापर्यंन ८० टक्के लोक बौद्ध होते. मध्य आशियातून शक, क्षत्रप, कुशाण आले. त्यांच्यासोबत नाणीही इथे आली. कुशाणांच्या काळात तांबे व सोन्याची नाणी प्रसिद्ध होती. समाज समृद्ध समाज होता. हिंदू समाजाचं पुनरुत्थान, त्यांच्या मूल्यांच पुनरुत्थान हे नंतर गुप्त सम्राटांच्या रूपाने झाले. नथनज्योत लाहिरी यांनी म्हटले की, अशोकाचे सर्व शिलालेख प्राकृतमध्ये आहेत. गिरनार व रुद्रदामनचे वाङ्‌मयीन मूल्य असलेलं संस्कृतमध्ये आहेत. हे अचानक कसं घडतं? संस्कृतला असे अचानक महत्त्व कसे प्राप्त होते, याचा अभ्यास करताना आपल्याला त्यावेळची सामाजिक स्थिती, राजे, सम्राट त्यांनी विविध धर्म, उपासनापद्धतीना उदारहस्ते दिलेला आश्रय आणि व्यापाराने आलेली समृद्धी यांचा अतिनिकटचा संबंध आहे, हे लक्षात येते.
वाकाटकांचा कालखंड मोठा मनोरंजक व कुतूहलजन्य आहे. एका बाजूला वैदिक धर्मामध्ये बदल घडून येत आहेत, पुराणे घडत आहेत. पाचव्या शतकामध्ये त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेले दिसते. तिसऱ्या शतकापर्यंत रामायण महाभारत यांची रचना पूर्ण झाली आहे. त्यातून नव्या प्रकारच्या हिंदू धर्माचे हुंकार पुढे येताना दिसतात, त्यात आगमाधिष्ठीत व्यवस्था महत्वाची ठरताना दिसते. आगमांनी होम हवनातील बळी नाकारले आणि त्या ऐवजी धान्य, दूध व तूप यांचा वापर केला, त्याच प्रमाणे त्यांना जात बाजूला सारून दीक्षा महत्त्वाची मानली.
 महाभारतात नारायणी उपाख्यान आहे. त्यात पांचरात्र - सातवत धर्म याबद्दल माहिती येते. सातवत हे यादवांशी संबंधित आहेत. आगम धर्माच विवेचन शेश्वर उपनिषदामध्ये येतं. तर मांडुक्य, मुंडक आणि केन यामध्ये त्याची चाहूल पाहायला मिळते.
 पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये याच काळात भक्ती तर उपनिषदांमध्ये प्रसाद हा शब्द येतो, या दोन्ही वेगळ्या कल्पना एक बाजूस विकसित होताना दिसतात, तर दुसरीकडे वेदांमध्ये नवखे समजले गेलेले शिव आणि विष्णू या दोन देवांना महत्त्व प्राप्त होऊन त्यांची तुलना ब्रह्माशी होताना दिसते, उपनिषदांच्या काळात वैदिक कर्मकांडीपासून सुरू झालेला प्रवास सातवत आणि पांचरात्र आगमांनपर्यंत पोहोचलेला दिसतो. याच विवेचन मोक्ष आणि शांती पर्वामध्ये येते. कुशाणांच्या नाण्यांवर बुद्धाबरोबर नंतर शिव व विष्णूही लोकप्रिय झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर वाकाटकांचा उदय झालेला दिसतो.

नागवंशीय राजवटीशी संबंध

वाकाटकांच्या समकालीन राजवटींमध्ये नागवंशाचे महत्त्व बरेच आहे. या नागराजांबद्दलचे काही महत्त्वाचे उल्लेख प्रवरसेनाच्या ताम्रपटातदेखील आढळतात. त्यामुळेच या नागवंशाबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वाकाट कोध्या इतिहासाची मूळ साधने मिळणे ही अगदी १८३६ मध्ये द्वितीय प्रवरसेनाचा सिवनी ताम्रपट सापडला तेव्हापासून ते मागल्या वर्षी मन्सर येथील उत्खननात डेक्कन कॉलेजच्या उत्खनन चमूस प्रवरसेनाची माता प्रभावती गुप्ता हिची राजमुद्रा सापडली तेथपर्यंत घडत आला आहे. हे लक्षात घेता वाकाटकांच्या इतिहासाची साधने यापुढेही मिळत राहतील अशी खात्री वाटते. नागपूरपासून ७५ मैलांवर असलेल्या आडम या पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन करताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिक्षण पुरातत्त्वविद् श्री. अमरेंद्रनाथ यांनाही अशीच एक नाममुद्रा सापडली. ती सातवाहनांच्या सेनापतीची होती. त्याचे वर्णन 'तो महरठी' म्हणजे मुलकी प्रशासनातील मोठा अधिकारी असेही आढळते. त्याचे नाव गौतमीपुत्र विध्यशक्ती असे असून तो कदाचित वाकाटकांचा आद्यपुरुष विध्यशक्ती असावा असे अमरेंद्रनाथ यांचे मत झाले आहे. विदर्भामध्ये वाकाटककालीन अनेक वस्तिस्थळे सापडली असून त्यांच्या उत्खननातून व गक्षेणातून (एक्सप्लोरेशेन) वाकाटकांच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे पैलू नव्याने जास्त उजेडात येण्याची शक्यता आहे. वाकाटक वेशातील राजे व त्यांचे प्रधान यांचे मिळून
आजवर जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त लेख, ताम्रपट उपलब्ध आहेत. अजिंठ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील गुंफामधील २५ पेक्षा जास्त गुफांतील चित्रांसोबत रंगवलेले लेख लक्षात घेतले तर ही संख्या शंभराहून अधिक होईल. वाशिम येथील उत्खननात वाकाटकोची काही नाणीही सापडली व गेल्या काही वर्षांत नाण्यांचा खासगी संग्रह करणान्या हौशी लोकांकडेही ही सापडल्याचे वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या व त्यावर वाचलेल्या शोधनिबंधांतून सहज लक्षात येते.

पद्मपवाया (पूर्वीचे पद्मावती) येथील उत्खननात सापडलेल्या मंदिराच्या तोरणाचा भाग

शिलालेख, ताम्रपट, मातीच्या राजमुद्रा त्यांचे ठसे, नाणी असा इतिहास साधनांचा मोठा संचय अभ्यासकांना उपलब्ध झालेला आहे. यापुढील लेखातून वाकाटक राजघराण्याशी संबंधित असलेली समकालीन इतर राजघराणी, त्यांच्याविषयी माहिती असलेली उत्खननातून अथवा ताम्रपद शिलालेखांतून मिळालेली इतिहासाची साधने यांच्या साहाय्याने त्या त्या राजघराण्यांशी वाकाटकांच्या दोन शाखांतील राजांचा संबंध कसा आला, उत्खननात किंवा संशोधनात मिळालेल्या वास्तू, शिल्प, नाणी यांच्या साहाय्याने तत्कालीन अभिजात कलांचा उदय व विकास कसा झाला, समकालीन धार्मिक व सामाजिक परिस्थितीचा त्यावरून अंदाज बांधता येतो का? हे आपण पाहणार आहोत.
    वाकाटकांच्या वंशातील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे आद्यपुरुष विध्यशक्ती याचा मुलगा प्रकरसेन (प्रथम) याने अग्निष्टोम, आप्तो र्याम, वाजपेय इ. अनेक सोमयाग केलेले असून त्याने चार अश्वमेध यज्ञसुद्धा केले होते, असे मोठ्या अभिमानाने केलेला उल्लेख आढळतो. त्याचा गौरवाने सम्राट म्हणून उल्लेख येतो. त्याची राजधानी पुरिका येथे म्हणजे सातपुड्यातील (ऋक्षवंत पर्वत) भारात होती. त्याने साठ वर्षे राज्य केले. विध्यशक्तीनंतर त्याने वाकाटकांच्या राज्याचा विस्तार बराच मोठा केलेला असावा. पुराणकार सांगतात त्याप्रमाणे त्याला चार पुत्र होते ज्यांनी वेगळ्या शाखा आणि राज्ये प्रस्थापित केली. महामहोपाध्याय मिराशी यांच्या मते स्थाचे साम्राज्य विस्तृत असावे. विदर्भाव्यतिरिक्त, दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटकपर्यंत, दक्षिण कोसल व आंध्रापर्यंत ते पसरले असावे, परंतु याविषयी कोठलाही ऐतिहासिक ठोस पुरावा देणे कठीण आहे. परंतु ज्या अर्थी त्याचे राज्य त्याच्या चार मुलीनी स्वतंत्र शाखा प्रतिष्ठित केल्या स्थावरून बरेच मोठे असावे असे म्हणण्यास हरकत नाही आणि विदर्भातील नंदिवर्धन (हल्लीचे रामटेकजवळील नगरधन) आणि वत्सगुल्म (वन्हाडातील जिल्ह्याचे ठिकाण असलेले वाशिम) या दोन ठिकाणांवरून राज्य करणाथा वाकाटकांच्या दोन शाखांचा इतिहास आपणास चांगलाच परिचित आहे.

पन्द्मपवाया येथे उत्खनात सापडलेले चौथ्या शतकातील विटांमध्ये बांधलेले मंदिर ( छायाचित्र सौजन्य - http://silentpagesindia.bl ogspot.in/ )

पुराणे म्हणतात त्याप्रमाणे प्रवरसेनास चार पुत्र होते. वाशिम शाखेच्या विध्यसेन ऊर्फ द्वितीय विध्यशक्ती (इ.स. ३५५ ते ४००) याच्या ताम्रपटातील वंशावळीवरून त्याचा पिता सर्वसेन (इसवीसन सुमारे ३३० ते ३५५) हा प्रवरसेनाचा पुत्र होता. नंदिवर्धन शाखेच्या द्वितीय प्रवरसेनाच्या ताम्रपटात दिलेल्या बंशावळीवरून प्रवरसेनाचा गौतमीपुत्र नावाचा दुसरा मुलगा होता. हा पित्याच्या मानाने अल्पायुषी असल्यामुळे त्याचा मुलगा रुद्रसेन (प्रथम) हा राज्यावर आला. गौतमीपुत्राने राज्य केले नसावे, कारण बंशातील इतर राजांप्रमाणे महाराज असे बिरुद त्याच्या नावाअगोदर किंवा नंतर जोडलेले नाही, पण मोठ्या गौरवाने महाराज श्री भवनाग या नागर्दशीय राजाचा तो नातू म्हणजे मुलीचा मुलगा (दौहित्र) असा उल्लेख करण्यात आला आहे. या राजवंशाशी घडून आलेला वैवाहिक संबंध वाकाटकांच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने बराच महत्त्वाचा असावा, कारण या श्री भवनागाचे प्रकरसेनाच्या ताम्रपटात अगोदरच्या तीन ओळींमध्ये मोठे तपशीलवार वर्णन आलेले आहे. हे नागवंशीय राजघराणे शिवभक्त असून त्यातील आध्पुरुषाने आपल्या खांद्यावर शिवलिंग वाहून नेण्याचे व्रत सतत केल्याने भगवान शंकर हे प्रसन्न झाले आणि त्यामुळे तो राज्य निर्माण करू शकला अशी त्यांची धारणा होती. त्याने शंकराच्या कृपेने राज्य निर्माण केले असले तरी या कृपेला पराक्रमाचीसुद्धा जोड होती हे दुसऱ्या विशेषणावरून सहज लक्षात येते. आपले सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी या आद्यपुरुषाने दहा अश्वमेध यज्ञ केले होते. यज्ञाशेवटी केलेल्या स्नानामुळे (अवभृथ) जशी त्यांची काया पवित्र झालेली होती, तसेच अभिषेकाच्या वेळी भागीरथी नदीतून आणलेल्या जलाने त्यांचा राज्याभिषेक केला होता असेही वर्णन आढळते. यावरून गंगा नदीकाठचा प्रदेशसुद्धा त्यांच्या राज्यात मोडत असावा असा विद्वानांचा कयास आहे.
       नाणे आणि शिलालेखांच्या अभ्यासावरून उत्तर भारतातील कुशाणांची सत्ता गंगेच्या दुआबात संपुष्टात आणण्यामध्ये नागवंशीय राजे कारणीभूत होते असे दिसते. त्यांचे नाव दर्शवते त्याप्रमाणे हे निश्चितच इक्ष्वाकु किंवा सोमवंशीय नसावेत आणि त्यांचा विस्तार गंगेच्या दुआबाच्या पलीकडे अगदी विदर्भातही झालेला होता हे भवदत्त नावाच्या भारनृपतीच्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील पौनी (जिल्हा भंडारा) येथील शिलालेखावरून स्पष्ट दिसते. गौतमीपुत्राचा आजा भवनाग याच्या तांब्याच्या नाण्यांवरून तो भारशिवांचा प्रमुख (अधिराज) होता है लक्षात येते. नाग वंशातील नऊ राजांची नाणी मध्य भारतात आणि मथुरेभोवतीच्या प्रदेशात मोठ्या संख्येने सापडली असून इसवीसनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकोत पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य भारतातील ग्वाल्हेर प्रांत यावर या नागराजांचा अंमल होता. त्यांची पश्चिमेतील राजधानी मधुरा असून दुसरी राजधानी पद्मावती (आताचे पद्मपवाया) या ठिकाणी होती. पुराणांमध्ये या राजवंशांचा उल्लेख असून मथुरा शाखेतील सात राजांच्या आणि पद्मावती शाखेतील नऊ राजांचा उल्लेख येतो. सुरुवातीच्या काळात हे कुशाण सम्राटांचे सामंत असावेत. पद्मावती येथून राज्य करणारे नाग हेच भारशिव नागवंशीय राजे होत. पद्मावती आणि आसपास सापडलेल्या भारशिव राजांच्या नाण्यांच्या अभ्यासावरून दहा राजांची नाचे लक्षात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे- भीमन्नाग, विभुनार, प्रभाकरनार, स्कंदनाग, बृहस्पतिनार, व्याधनाग, कसुनाग, देवनाग, भवनाग आणि गणपतिनाग, हे नाग राजे सुरुवातीच्या काळात जरी कुशाणांचे सामंत असले तरी यौधधांनी कुशाणांचे साम्राज्य खिळखिळे केल्यानंतर मथुरा आणि पद्मावती येथील नागवंशीय राजांनी आपले स्वातंत्र्य उद्‌द्घोषित केले असावे. वाकाटकांच्या ताम्रपटात आपल्या पूर्वजांनी दहा अश्वमेध केल्याचा जो अभिमानपूर्वक उल्लेख भवनागाच्या संदर्भात येतो, तो याच स्वातंत्र्याची घोषणा सूचित करणारा असावा.
         भवनाग हा प्रथम प्रवरसेनाचा (इसवीसन सुमारे २७० ते ३३०) समकालीन असून त्याने इसवीसन सुमारे ३०५ ते ३४० या काळात पद्मावती येथे राज्य केले असारे. त्याने प्रवरसेनाचा मुलगा गौतमीपुत्र याला आपली मुलगी विवाहात दिली, याचा यापूर्वी उल्लेख आलेलाच आहे. या संदर्भात पुराणांनी विदिशा (सांचीजवळील) येथून राज्य करणाऱ्या राजवंशांचे व राजांचे वर्णन केले आहे. त्यात विरोधी राजांची शहरे काबीज करणारा (परपुरंजय) भोगी नावाचा नागराज शेषाचा मुलगा राज्य करील, अशी भविष्यवाणी केली आहे. त्यापाठोपाठ चंद्रवंशीध सदाचंद्र इत्यादी पाच राजे राज्य करतील, असे वर्णन करून त्यानंतर तीन राजे होतील, असे म्हटले आहे. याच संदर्भात विध्यशक्तीचा मुलगा प्रवीर म्हणजे प्रवरसेन प्रथम हा पुरी आणि कांचनका या ठिकाणी राज्य करील आणि त्याचे चार मुलगे पुढे नराधिम म्हणजे सिंहासनावर बसतील, अशीही भविष्यवाणी केली आहे. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे प्रवरसेनाचा पुत्र गौतमीपुत्र हा राज्यावर बसलेला नसला तरी तो भवनागाचा दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा असे जे वर्णन आहे ते सूचक असावे. समुद्रगुप्त गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त प्रथम याचा मुलगा हा त्याच्या दिग्विजयांमुळे हिमालयापासून ते दक्षिणेतल्या दिग्विजयांमुळे प्रसिद्ध होता. त्यामुळेच प्राचीन भारतातील इतिहासातील जाते, परंतु त्याचा पिता चंद्रगुप्ताने लिच्छवीची (सध्याच्या बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बसाड) राजकुमारी कुमारदेवी हिच्याशी विवाह केल्यामुळे आणि पर्यायाने वैशाली येथील लिच्छवीशी विवाहसंबंध आल्यामुळे प्रबळ झाला आणि राज्यविस्तार करू शकला, असे जाणकार म्हणतात. चंद्रगुप्ताला आणि त्याचा मुलगा समुद्रगुप्त याला लिच्छवीच्या राज्याचा काही भारही बारसा म्हणून मिळाला असावा आणि म्हणूनच समुद्रगुप्तसुद्धा आपल्या नाण्यांवर लिच्छव्यः' असे बिरुद लावतो. प्रवरसेनाचा नातू रुद्रसेन हा स्वतःचे 'भवनाग-दौहित्र' म्हणजे भवनागाचा नातू हे जे बिरुद लावतो ते कदाचित अशाच कारणांमुळे असावे. सम्राट समुद्रगुप्ताने तीन टप्प्यांत आपले साम्राज्य स्थापन केले, गंगा दुआबातील अनेक प्रतिष्ठित राजघराण्यांचा त्याने समूळ उच्छेद केला. त्यात नागसेन इत्यादी नागराजांचाही उल्लेख आहे. दुआबात आपली सत्ता बळकट केल्यानंतर त्याने विध्य बनातील अठरा जंगलांतील (आटविक) राजांना शरण आणले आणि विध्यापलीकडे जाऊन पल्लवांच्या राज्यापर्यंत टक्कर दिली. त्याचा परिणाम असा झाला की, सिंहल (हल्लीचे श्रीलंका) द्वीपातील राजानेही मोठ्या आदराने त्याला नजराणे पाठवले, असा त्याच्या प्रशस्तीत उल्लेख येतो. या झंझावाती दिग्विजयात सातपुडा आणि विदर्भात राज्य करणाऱ्या वाकाटकांची नेमकी काय भूमिका होती याविषयी काही निश्चित पुरावा नसला तरी समुद्रगुप्ताचे आणि वाकाटकांचे संबंध तिढ्याचे नसून सलोख्याचेच असावेत असे दिसते. याचे कारण असे की, वाकाटकोच्या वंशावळीत रुद्रसेन (प्रथम) याचा महाराज म्हणून उल्लेख येतो. समुद्रगुप्ताचा मुलगा आणि उत्तराधिकारी चंद्रगुप्त द्वितीयाने वाकाटकर्वशीय पृथ्वीषेणाशी वैवाहिक संबंध जोडले. चंद्रगुप्तने कुबेर नागा नावाच्या नागवंशीय राणीची मुलगी प्रभावती गुप्ता हिचा पृथ्वीषेणाचा (सुमारे इसवीसन ३५० ते ३८५) मुलगा रुद्रसेन द्वितीय (इसवीसन ३८५ ते ३९०) याच्याशी विवाह लावून दिला
     वरील विवेचनावरून असे स्पष्ट होते की, समुद्रगुप्ताने नागवंशीय राजांचा निःपात करण्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रति या भागांत नागवंशीय राजे हे प्रभावी होते. त्यातील पद्मावती म्हणजे हल्लीचे ग्वाल्हेरजवळील पद्मपवाया येथे राज्य करणाऱ्या भवनागांशी सातपुडा आणि विदर्भातील वाकाटक वंशीय राजांशी संबंध आले. प्रसिद्ध वैदभौय संस्कृत कवी भवभूती (इसवी सन सातवे शतक) याच्या 'मालती माधव' नावाच्या नाटकावरूनही विदर्भातील कुण्डिनपूर (हल्लीचे अमरावती जिल्ल्यातील कौण्डीन्यपूर) व नागराजांची राजधानी पद्मावती या दोन शहरांमध्ये चांगले दळणवळण होते असे दिसते. नाटकाचा नायक माधव हा पारा आणि सिंधू या नद्यांच्या संगमावर वसलेल्या पद्मावती येथे शिक्षणासाठी येतो. तेथील प्रधानाच्या मालती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी विवाह करतो असे कथानक आहे. नाटकात पद्मावती आणि आसपासच्या चामुण्डादेवीचे मंदिर (कराला) व शिवदेवालय आणि मधुमती व इतर उपनद्या यांचे हृदयंगम वर्णन आलेले आहे.
     ग्वाल्हेर संस्थानातील पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन संचालक श्री. गर्दे यांनी प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक सर जॉन मार्शल यांच्या सल्ल्याने पद्मावती येथे १९१५-१६, १९२४-२५ व १९४०-४१ या सालामध्ये मोठे उत्खनन केले. या उत्खननामध्ये अनेक मूर्ती, दगडी शिल्ये, मातीची खेळणी, मणी व नाणी

मालव आणि माहिष्मती

▲ बाघ येथील गुंफा क्रमांक ४ च्या मुखमंडपातील चित्राचा काही भाग

कोसल, मेकल आणि अवंति येथील राजे नंदिवर्धन शाखेचा राजा नरेंद्रसेन याची आज्ञा शिरसावंद्य मानीत असत. त्याचा पुत्र द्वितीय पृथ्वीषेण याच्या काळातही तीच परिस्थिती चालू असावी हे नचणा आणि गंज येथील उच्चकल्प वंशातील राजे स्वतःचे वर्णन 'श्रीपृथ्वीषेण पादानुध्यात्' असे करतात, त्यावरूनही स्पष्टपणे लक्षात येते. या दोघांचा काळ इ. स. सुमारे ४४० ते इ.स. ४७० इतका मानावयास हरकत नाही, हे वर्चस्व नंतरच्या पिढीत प्रतापी हरिषेणाच्या काळातही चालू राहिले, याची ग्वाही वराहदेव आपल्या अजिंठा येथील गुंफा क्रमांक १६ च्या शिलालेख देतो. हरिषेणाचा काळ म. म. मिराशी स्थूलपणे इ. स. ४७५ ते इ.स. ५०० असा मानतात. डॉ. स्पिक यांनी वाकाटक वंशावळीचा अधिक सूक्ष्मपणे विचार केला आणि त्यातल्या त्यात अजिंठा येथील गुंफांच्या संदर्भात अधिक खोलात जाऊन विचार केला. त्यांच्या मते हरिषेण आणि त्याचा मुलगा यांचा काल इ.स. ४९०च्या पलीकडे ताणणे योग्य ठरणार नाही. ते हरिषेणाचा काळ इ. स. ४६२ ते इ. स.४७८ एवढाच मानतात. त्यासंदर्भात हेही लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्या मते अजिंठा येथील दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे सातवाहनांच्या नंतरच्या काळातील व वत्सगुल्म नृप आणि त्यांचे मांडलिक यांच्या काळातील, अजिंठा आणि घटोत्कच येथील गुंफा कोरण्याचे मुख्य काम हे सोळा वर्षांच्या आतच संपले असावे. त्यासाठीची त्यांची कारणमीमांसासुद्धा स्थापत्यशास्त्रातील निरनिराळ्या अंगांना स्पर्श करून जाते. त्यांच्या मते गुंफा खोदण्याचे काम हे पुरातत्त्वातील खड्डा खोदण्याइतकेच कालनिश्चितीच्या संदर्भात महत्त्वाचे आहे. ज्या वेळी एखादा उत्खनक जमिनीच्या पृष्ठभागापासून खड्ड्याच्या तळापर्यंत खोदत जातो, त्या वेळी तो वर्तमानातून भूतकाळात प्रवेश करत असतो. म्हणजे सगळ्यात वरचे थर हे सर्वात अर्वाचीन असतात तर शेवटचा थर हा सगळ्यात जुना असतो. डॉ. स्पिक यांच्या मते जेव्हा आपण एखादी गुंफा खोदत आत जातो, त्यावेळी गुंफेचा बाहेरचा मंडप, त्यानंतर आतले सभागृह व त्यापाठी असलेले गर्भगृह अशी विहाराची रचना लक्षात घेतली तर बाहेरचा मंडप हा सगळ्यात जुना असतो तर गर्भगृहातील प्रतिमा किंवा स्तूप हा सगळ्यात शेवटी खोदलेला भाग म्हणजे सर्वात अर्वाचीन असतो.

▲ बाघ गुंफा क्रमांक २ मधील बुद्धमूर्ती

सर्वसामान्यपणे एखादी गुंफा एकाच टप्प्यात खोदलेली असते, अशी समजूत असल्याने ती गुहा खोदायला वीसेक वर्षे लागली तरी त्या गुहेचा काल एकच आहे असे गृहीत धरून विद्वान पुढे विवेचन करतात. अजिंठा व घटोत्कच येथील गुंफा या सामान्य परिभाषेत बोलायचे झाल्यास महायानपंथीय गुंफा, कोरण्यास सुमारे दीडशे वर्षे लागली असावी असा अंदाज जेम्स बर्गेस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी व्यक्त केला होता, पण हरिषेणाचे साम्राज्य, त्याचे घटक असलेली राज्ये, राज्यकर्ते, मांडलिक राजवंश आणि त्या त्या राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे लक्षात घेतली तर अजिंठा येथील गुंफांचा काल हा अधिक नेटकेपणाने मांडता येईल, असा अंदाज डॉ. स्पिक यांनी मांडला. सुरुवातीस हरिषेणाचा काळ त्यांनी या विषयाचे संशोधन सर्व समावेशकपणे करून ठामपणाने मांडणाऱ्या म. म. मिराशीप्रमाणेच इ. स. ४७५ ते इ. स. ५०० असा गृहीत धरला होता. पण उत्तरेतील कुमारगुप्त (इ. स. ४१५ ते इ. स. ४५५) व स्कंदगुप्त (इ. स. ४५५ ते इ. स. ४६८) यांच्यानंतर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता लक्षात घेता, वाकाटकांनी गुप्त साम्राज्यातील काही भागावर आपले स्थान बळकट केले असावे, असे लक्षात आले. आणि हरिषेणानंतर अंध, मेकल, कोसल, लाट हे त्याच्या प्रभावाखालील मंडलिकांचे प्रदेश हे स्वतंत्रपणाने राज्य करू लागले हेही लक्षात आले. कोसल आणि मेकल येथे, तसेच कोकणातही इ. स. ४९० नंतर वाकाटकांचे वर्चस्व संपुष्टात आले, हे परिव्राजक, उच्चकल्प आणि त्रैकूटक राजांच्या अभिलेखांवरून लक्षात आले.


(बाघ गुंफा छायाचित्र सौजन्य rangasai.blogspot.in)

तीच गोष्ट माळव्यातही झाली असावी असे वाटते. माहिष्मती येथून राज्य करणाऱ्या महाराज सुबंधु याचा ताम्रपट धारपासून सुमारे तीस मैलांवर असलेल्या बाघ येथील बौद्ध गुंफांमध्ये सापडला. त्यात कुठल्या संवत्सरी हा ताम्रपट दिला हे स्पष्ट केले असले तरी, तो गुप्त की कलचुरी संवतामध्ये दिला हे स्पष्ट केले नसल्यामुळे संशोधकांमध्ये त्यावरून दोन पक्ष निर्माण झाले. म. म. मिराशींच्या मते तो कलचुरी-चेदी संवतामध्ये दिला असल्याने त्याचा काल इ. स. ४१३ ठरत होता, तर तो गुप्त संवतामध्ये असल्यास इ. स. ४८४ मध्ये दिला होता असा होतो. या मतभेदामुळे, बाघ येथील गुंफा या पाचव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात की सातव्या शतकात पूर्ण झाल्या याविषयीची चर्चा सुरू झाली. डॉ. कार्ल खंडालवाला यांनी बाघ गुंफांतील भित्तिचित्रांच्या शैलीवरूनही त्या गुंफा पाचव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात झाल्या असाव्यात हे ठामपणे सांगितले, म. म. मिराशींच्या मताला दुजोरा दिला. म. म. मिराशींनी महाराज सुबंधुचा ताम्रपट हा पूर्वीचा असावा, असे मांडण्याचे कारणही साहजिकच होते. कारण तो जर पाचव्या शतकातील आठव्या दशकात झाला असे मानले तर पृथ्वीषेण द्वितीय आणि हरिषेण यांचे माळवा प्रदेशावर वर्चस्व होते, या अभिलेखीय पुराव्याच्या ते विरुद्ध गेले असते.

▲ बाघ येथील गुंफा क्रमांक २ मधील एकपाषाणीय स्तूप

        या पार्श्वभूमीवर डॉ. वाल्टर स्पिक यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. बाघ येथील गुंफा या सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अगोदरपासून इंग्रज विद्वानांना माहीत होत्या. इम्पे यांनी १८५४ साली बॉम्बे बँच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटीच्या संशोधन पत्रिकेत बाघ गुंफांवर एक निबंध प्रसिद्ध केला होता. बाघनी नदीच्या किनाऱ्यावरील वालुकाश्माच्या टेकडीमध्ये या दहा गुंफा कोरलेल्या आहेत. वालुकाश्म हा दगडाचा प्रकार मऊ असल्यामुळे जर चांगल्या पोताचा (Fine Grain) असला तर बांधकामाबरोबरच शिल्पामध्येसुद्धा काम करण्यासाठी उत्कृष्ट समजला जातो. याचे उत्तम उदाहरण खजुराहो येथील मंदिरे. येथील जवळजवळ ११० फूट उंची असलेली मंदिरे आजही भक्कमपणे उभी आहेत आणि शिल्पांचे सौदर्यसुद्धा अप्रतिम आहे, पण बाघ येथील खडकामध्ये वालुकाश्माचे थर वेगवेगळे दिसतात. एवढेच नाही तर तळाशी मातीइतकाच ठिसूळ असा एक थर आहे. त्यामुळे काही गुंफांतील छताचे एक-दोन थर कोसळल्यामुळे छताचा काही भाग स्थिर करण्यासाठी अधिक वर जाऊन कारागिरी करावी लागली. डॉ. स्पिक यांनी वर्णन केल्याप्रमाणे काही ठिकाणचे खांब किंवा मूर्ती कोरीवकाम चालू असतानाच भंग पावल्यामुळे सुटे स्तंभकिंवा सुट सुट्या मूर्ती कोरून, त्या जमिनीवर छिद्रे करून बसवाव्या लागल्या. गुंफा दहा असल्या तरी गेल्या ११०० ते १२०० वर्षांत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने फर्ग्युसन यांचे वर्णन बाघ येथील चार गुंफांच्या वर जात नाही. येथील भित्तिचित्रांना इतका धोका निर्माण झाला की ती चित्रे हलवून सुरक्षित ठिकाणी ठेवावी लागली. एवढे असूनही कलासमीक्षेस वाहिलेल्या सुप्रसिद्ध 'मार्ग' या नियतकालिकाचा बाघ येथील स्थापत्यशिल्प आणि चित्रकला यांवर एक विशेषांक काढण्यात आला. प्राध्यापक मीना तालीम यांनी आधुनिक चित्रकारांनी केलेल्या बाघ येथील चित्रांच्या केलेल्या नकलांच्या साहाय्याने बाघ येथे कुठली जातके रंगवली असावीत यावर एक स्वतंत्र ग्रंथच प्रकाशित केला आहे. मोनिका झिन यांनी ईस्ट अँड वेस्ट (खंड ५१, २००१, पृष्ठे २९९ ते ३२२) या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात एक निबंध प्रसिद्ध केला. त्यांनी गुंफा क्रमांक चार आणि  पाच यांना सामाईक असलेल्या मुखमंडपाच्या मागल्या भिंतीवरील जवळजवळ ४० फूट लांब भागावर पसरलेल्या या मोठ्या चित्राचा आशय आपल्या सूक्ष्म संशोधनाच्या साहाय्याने मांधाता या चक्रवर्तीच्या जीवनातील स्वर्गक्रमाचा आहे असे सिद्ध केले. डॉ. स्पिक यांनी स्थापत्य, शिल्पकला व मूर्तिविज्ञान आणि त्यातील संकेत यांच्या साहाय्याने गुंफा क्रमांक ४, ६, ७ व इतर काही गुंफांतील भगवान बुद्धाची मुख्य मूर्ती आणि तिच्या दोहो बाजूस कोरलेल्या बुद्ध परिवारातील इतर बुद्धमूर्ती यांच्यातील साम्य ठळकपणे दाखवले आहे. त्यांनी मोठ्या बारकाईने चौकोनी तळखडा व शीर्षभाग असलेल्या स्तंभांच्या मधल्या भागावर सरळ किंवा तिरप्या जाणाऱ्या पन्हाळीच्या अलंकरणातील आणि अजिंठा येथील त्यासारख्या दिसणाऱ्या, त्यातल्या त्यात अजिंठा येथील गुंफा क्रमांक १, २ व घटोत्कच येथील स्तंभांचे स्थापत्यदृष्ट्या ठळकपणे दिसणारे साम्य लक्षात आणून दिले आहे. अजिंठा येथील विहार आणि चैत्य यांच्या आसपास असणाऱ्या नागप्रतिमांचे आणि देवकुलिकांचे सूचक अस्तित्वसुद्धा आपल्या लक्षात आणून दिले आहे. घटोत्कच येथे शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाने हाती घेतलेल्या उत्खननात एक मोठी नागराजाची प्रतिमा तीन-चार वर्षांपूर्वी सापडली हे या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाचा स्थापत्यविशेष म्हणजे बाघ व अजिंठा येथील विहारांच्या तलविन्यासात असलेले विलक्षण साम्य, उदाहरणार्थ, दोन्ही स्थळी विहाराच्या सुरुवातीस आडवा मुखमंडप त्याच्या दोन्ही अंगांना, समोर दोन स्तंभ असलेले दोन कक्ष, आतील सभागृहाच्या उजव्या डाव्या बाजूला आठ किंवा नऊ कक्ष, मागल्या भिंतीत कक्ष किंवा यक्षप्रतिमांसाठी असलेल्या देवळ्या व मध्यभागी गर्भगृह अशी मांडणी आहे. या तलविन्यासातील साम्याबरोबरच एक कळीचा मुद्दा डॉ. रिंथक यांनी असा मांडला आहे की, एरवीच्या बुद्धमूर्तीच्या शेजारील बोधिसत्त्वप्रतिमांच्या ऐवजी आता चार किंवा सहा बुद्ध हे मूर्तीभोवती परिवारात दिसतात. तसेच आणखी एक वेगळी प्रक्रिया घडताना या ठिकाणी दिसते, ती म्हणजे गर्भगृहात बाघ येथे स्तूपच आढळतात; परंतु त्याऐवजी देवकुलिकांमध्ये स्तूपाऐवजी बुद्धप्रतिमा आढळते. ही प्रक्रिया अजिंठा येथेसुद्धा अवलंबिली आहे, हे गुंफा क्रमांक १९, २६ यातील स्तूपासमोर कोरलेल्या बुद्धमूर्तीवरून लक्षात येते, तर गुंफा क्रमांक ११ मध्ये प्रदक्षिणा घालता येईल असा स्तूप होता. त्याऐवजी पार्श्वभागात फक्त बुद्धमूर्तीच दिसते. डॉ. स्पिक यांनी निवासकक्षामध्ये लाकडी दरवाजे दगडी चौकटीत कसे बसवायचे यांचा अभ्यास करून अजिंठा येथे चार प्रकारच्या लाकडी चौकटी होत्या असे दाखवून दिले आहे. त्यातील काही चौकटीची ठेवण ही बाघ येथील चौकटीशी साम्य दाखवते, त्यामुळे त्या बाघ येथील चौकटींच्या समकालीन असाव्यात असे दाखवून दिले आहे.

▲ बाघ येथील एका गुंफेचा दर्शनी भाग

वरील सर्व ऊहापोहावरून लक्षात येईल की, डॉ. स्पिंक यांना अजिंठा येथील गुंफा या मुख्यत्वे सोळा वर्षांतच घडवल्या गेल्या हे मांडण्यासाठी प्रत्येक गुंफेतील स्थापत्यघटक त्यांच्या तुलनात्मक अभ्यासातून कालनिर्णयासाठी अनेक बारीक तपशिलांचा अभ्यास करावा लागला. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर अभ्यासक बाघ येथील गुंफा या पाचव्या शतकाच्या आठव्या दशकात निर्माण झाल्या असाव्यात या निष्कर्षाला येऊन पोहोचतो. आणि त्यामुळे अजिंठा आणि बाघ यातील साम्य लक्षात घेऊन अजिंठा येथील एकूण कालखंडाचा विचार करताना मध्ये काही काळपर्यंत, म्हणजे डॉ. स्पिंक सुचवतात त्याप्रमाणे, इ. स. ४७२ ते ४७६ या काळात अजिंठा येथील कामात खंड पडल्याने तेथील स्थपती व कलाकार यांनी बाघ येथील या गुंफा रचल्या या त्यांच्या प्रमेयाचा गंभीरपणे विचार करणे भाग आहे.

▲ बाघ येथील गुंफा क्रमांक ४ च्या बाहेरील बाजूची नागराजाची प्रतिमा

माळव्यातील बाघ येथील गुंफांप्रमाणेच बु-हाणपूरजवळ फोफनार येथे सापडलेल्या सात कांस्यमूर्तीचा विचार करणे भाग आहे. या सर्व बुद्धमूर्ती साधारणपणाने एकाच ठेवणीतील आहेत. त्याखाली जाळीची नक्षी असलेल्या चौथऱ्यावरील साध्या पीठावर उभ्या असून उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात, उपरण्याप्रमाणे उजव्या खांद्यावर ठेवून पांघरलेल्या संघाटीचे (एक प्रकारचे वस्त्र) दुसरे टोक आहे. चेहऱ्याची रचना, लंबाकार कान, वर कुरळे केस आणि उष्णीष (बुद्धांच्या मस्तकावर महापुरुषाचे लक्षण दर्शविणारा उंचवटा) यामुळे समान असले तरी गाल, डोळे आणि नाक यांच्या ठेवणीत फरक आहे. काही अगदी निखळ गुप्त शैलीतील उभट चेहऱ्याच्या असून काही मूर्तीमध्ये चेहरा चौकोनी व गाल फुगीर आहेत. दुसरे एक समान वैशिष्ट्य म्हणजे सिरपूर येथील बौद्ध आणि जैन मूर्तीप्रमाणे काळ्या बुब्बुळाभोवतीचा भाग चांदीचा पातळ थर देऊन पांढरा केला आहे. संघाटी आणि अधोवस्त्र हे सारनाथ येथल्याप्रमाणे झिरझिरीत दाखवले असले तरी कमरेखालील भागावर त्रिपुंड्राच्या आकाराच्या घड्या एकाखाली एक दिसतात. सारनाथ येथील मूर्तीत वक्षस्थळापासून खालपर्यंत अर्धचंद्राकृती चुण्या पडलेल्या दिसतात. यातील एक मूर्ती अत्यंत सुंदर असून पीठावर पूर्ण विकसित अशा कमळाच्या गाभ्यावर भगवान बुद्ध उभा असून, त्याच्यावर दोन मालाधारी शिशू गंधर्वांनी छत्र धरले आहे. ती बुद्धमूर्ती सर्वात सुबक आणि देखणी असून या ध्यानाच्या बुद्धाचे चित्रण अजिंठा येथील क्रमांक १० च्या गुंफेतील बाजूच्या खांबांवर आढळून येते. प्राचीन फोफनार हे नर्मदा नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील व माळव्याच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन अनुप देशातील एक नगर असावे. माळव्यावर अधिकार गाजवणाऱ्या हरिषेणाचा या भागावरसुद्धा अंमल असावा, हे साहजिकच आहे. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक (कै.) चेतन साळी यांना तापीकाठी सापडलेल्या पक्क्या मातीच्या बुद्धमूर्तीचा उल्लेख केल्याशिवाय हे विवेचन पूर्ण होणार नाही. त्यांनी या बुद्धमूर्तीचे छायाचित्र असलेला आपला लेख 'मार्ग' या नियतकालिकात प्रसिद्ध केला. सिंहासनावर बसलेली ही छोटीशी बुद्धमूर्ती अजिंठ्यातील बुद्धमूर्तीपेक्षा सारनाथ येथील बैठ्या बुद्धमूर्तीला अधिक जवळची आहे. यावरून सहज लक्षात येते की, मथुरेपासून माळव्यामार्गे येणारा मार्ग नर्मदा व तापी ओलांडून (म्हणजे आजच्या बुऱ्हाणपूरमार्गे) अजिंठ्यास पोहोचत होता. आणि त्यामुळे आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या सर्व प्रदेशांतून होत होती, हे लक्षात येते. अजिंठा येथील गुंफा क्रमांक चारचा आश्रयदाता हा इतर गुंफांच्या आश्रयदात्याप्रमाणे मांडलिक किंवा दरबारी नसून एक श्रेष्ठी होता. त्याचे नाव माथुरक, म्हणजे तो मथुरेचा होता, हेसुद्धा हीच बाब अधोरेखित करते. फोफनार येथील बुद्धमूर्तीप्रमाणे संघाटीचे चित्रण असलेल्या बुद्धमूर्ती अजिंठा येथील अगदी शेवटच्या कालखंडात ज्याला, इंटुजिव्ह फेज असे डॉ. स्पिंक यांनी यथार्थ अभिधान दिले आहे, त्या फोफनारच्या बुद्धमूर्तीशी साम्य दाखवतात यावरूनसुद्धा या अत्यंत गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतात.  नेपोलिअन असे त्याचे वर्णन केले

कोसल आणि मेकल

नंदिवर्धन शाखेचा महाराज प्रवरसेन द्वितीय हा वाकाटक वंशातील एक अद्वितीय राजा होता यात शंका नाही. गुप्तवंशातील विक्रमादित्य चंद्रगुप्त (इ.स. ३६५ ते इ.स. ४१५) याचा तो प्रस्थापित केली. क्वचितच एखाद्या नातू, याने जवळजवळ ३० वर्ष राज्य केले (इ.स. सुमारे ४१० ते ४४०). आपल्या पूर्वजांपेक्षा कितीतरी मोठ्या प्रदेशावर त्याने आपली सत्ता राजाने ताम्रपट इतक्या मोठ्या संख्येने वितरित केले असतील. पंधरापेक्षा जास्त ताम्रपट आज त्याच्या नावावर आहेत. विदर्भाच्या पूर्वेस म्हणजे आजच्या छत्तीसगढ भागात, आणि  नर्मदेच्या पलीकडे उत्तरेत आणि पश्चिमेस गोदावरीच्या तीरापर्यंत त्याचा अंमल होता. यापूर्वी उल्लेखिल्याप्रमाणे कदाचित दुसऱ्या वाकाटक शाखेच्या अमलाखालील प्रदेशावरही अप्रत्यक्षपणे त्याचा अंमल होता.

▲ मध्यप्रदेशातील तळा येथील रूद्रशिवाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती (छायाचित्र सौजन्य travelospective.blogspot)

कदाचित याच त्याच्या अधिकारामुळे त्याचा मुलगा नरेन्द्रसेन हा स्वतःला 'कोसला मेकला-मालवाधिपतिभिः अभ्यार्चितशासनः' असे बिरुद लावून घेत असे. मेकल म्हणजे आजचा मैकल पर्वत, जिथून नर्मदा नदी उगम पावते त्या भोवतालचा प्रदेश. कोसल म्हणजे दक्षिण कोसल म्हणजे आजचे छत्तीसगढ, आणि मालव म्हणजे पूर्व आणि पश्चिम माळवा, ज्याच्या विदिशा आणि अवंति इथे राजधान्या होत्या. येथील राजे त्याच्या राजसत्तेचा, आज्ञेचा सन्मान करीत असा वरील बिरुदाचा अर्थ होतो. नरेन्द्रसेन आणि पृथ्वीषेण द्वितीय या दोघांनी मिळून तीस ते पस्तीस वर्षे राज्य केले असावे. परंतु या दोघांचा समकालीन नंदिवर्धन शाखेचा राजा हरिषेण (डॉ. स्पिक यांनी निर्धारित केलेल्या वंशावलीनुसार इ.स. सुमारे ४६२ ते इ.स. सुमारे ४७८) हा होता. त्याचाच स्पष्ट अर्थ असा की, अजिंठा येथील क्रमांक १६ गुंफेतील वराहदेवाच्या शिलालेखात वर्णन केल्याप्रमाणे कुंतल, अवंति, कोसल, त्रिकूट, लाट आणि अंध्र एवढ्या मोठ्या प्रदेशावर वर्चस्व असलेल्या हरिषेणाने सत्तेवर आल्यावर काही वर्षातच आपले साम्राज्य प्रस्थापित केलेले असावे. त्यातील अवंती आणि कोसल यावर त्याची सत्ता पृथ्वीषेणाला बाजूला सारूनच प्रस्थापित झालेली असावी. वेगळ्या शब्दात इ. स. ४४०- इ.स. ४८० या काळात आपल्या पूर्वेकडील व नर्मदेपलीकडील प्रदेशावर वाकाटकांनी आपला अधिकार पक्का केला असावा.
        सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, चंद्रगुप्त द्वितीयाचा मुलगा कुमारगुप्त याची कारकीर्द (इ.स. ४१५- इ.स. ४५५) हा गुप्तांच्या सुवर्णयुगाचा परमोच्च बिंदू समजला जातो. याचा पिता चंद्रगुप्त द्वितीय याचे वर्णन, ज्याच्या घोडदळाने चारही समुद्रांच्या पाण्याची चव घेतली आहे, असे येते. त्याचा आजा समुद्रगुप्त एवढा पराक्रमी की त्याने गंगा यमुनेच्या दोआबपलीकडील विन्ध्याचलावरील अठरा अटवी राज्ये, पूर्वेकडे गंगासागर संगम, उत्तरेकडे हिमालय, आणि पश्चिमेला पारियात्र पर्वत एवढ्या प्रदेशातील राजांना आपले अधिराजत्व मान्य करायला लावले.

▲ नचणा येथील विविध पुरातत्त्वीय स्थळांचा नकाशा व त्यापैकी पार्वती मंदिराचा तंत्रविन्यास

गंगा यमुनेच्या किनाऱ्यावरील लहानसहान संस्थानांचा निःपात करून आपल्या साम्राज्याचा गाभा निर्वेध करून टाकला. दक्षिणेत कलिंग, पल्लव राजांना आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली. त्यापलीकडील अनेक राजांना ते नजराणे पाठवतील एवढा वचक उत्पन्न झाला. चंद्रगुप्त द्वितीयाने तर वायव्येत वधू नदीच्या पैलतीरावर आपले सैन्य पोचवले. या पार्श्वभूमीवर गुप्तांचे सुवर्णयुग ही खासच अतिशयोक्ती नाही. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याचा भाचा प्रवरसेन द्वितीय आणि प्रवरसेनाचे पुत्र आणि नातू यांनी कदाचित कुमारगुप्तानंतर आपले हातपाय मैकल पर्वत, आजचा बुंदेलखंड आणि मालवा या प्रदेशात पसरले असावे. कुमारगुप्ताचा उत्तराधिकारी स्कंदगुप्त (इ.स. सुमारे ४५५-इ.स. ४६८) याच्याच काळात हुणांनी हिमालय ओलांडून काश्मीरात व त्यानंतर माळव्यात आपले प्रस्थान मांडले. भितरी शिलालेखाच्या आधारे इतिहासकार असेही मानतात की, हे परकीय आक्रमण स्कंदगुप्ताने मोठ्या निकराने परतून लावले. पण त्याचा धक्का इतका तीव्र होता की, काही इतिहासकार आलंकारिक भाषेत म्हणतात त्याप्रमाणे गुप्त साम्राज्य भंग पावले नाही तरी या काळात गुप्तसत्तेला मोठे तडे पडले होते. हुणांच्या गदारोळानंतरच त्यांना शमवण्यासाठी यशोधर्मनला पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागली. यशोधर्मन याचे राज्य धार आणि उजैन जवळ होते, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे नर्मदेच्या उगमापासून बुंदेलखंड, ज्यामध्ये समुद्रगुप्ताने ज्यावर आपली पकड घट्ट केली होती अशी अठरा राज्ये होती. त्याप्रदेशात व माळव्यात राजकीय अस्थिरता होती. तिचाच फायदा नरेन्द्रसेन, पृथ्वीषेण द्वितीय व हरिषेण या वाकाटक राजांनी घेतला असावा आणि वर उल्लेखलेली वेगळ्या प्रकारची बिरुदे धारण केली असावीत. मेकल, कोसल आणि मालव या प्रदेशात अनेक लहान लहान संस्थाने होऊन गेली. उदा. शरभपुरीय, पांडुवंशी आणि सोमवंशी. त्यांचे अनेक शिलालेख मिळतात. त्यातूनही आपली इतिहासाची वाटचाल अंधुकच राहते. या प्रदेशातील राजघराण्यांचा इतिहास इतका दुर्बोध आहे की, यातील कोणते आधी आणि कोणते नंतर याबाबत अजूनही विद्वानांचे एकमत नाही. त्यांनी आपल्या लेखात आणि ताम्रपत्रात राज्यशकाचा उल्लेख केला असला तरी तो संवत गुप्तांचा की कलचुरी-चेदींचा याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. एखाद्या वंशात एकाच नावाचे दोनतीन राजे असल्यामुळे, इतर राजवंशांशी त्या राजवंशाचे संबंध काय होते, हे मांडताना समस्या निर्माण होतात.

▲ तिगोवा मंदिरातील खांब

तरीही या प्रदेशातील उच्चकल्प महाराज आणि परिव्राजक महाराज यांच्या ताम्रपटांवरून त्यांचा गुप्तवंशाशी संबंध असावा असे लक्षात येते. त्यातील परिव्राजक महाराज हे तर स्पष्टपणाने 'गुप्तनृप राज्यभूक्तौ' असा शक वर्ष देताना उल्लेख करतात. योगायोगाची गोष्ट अशी की परिव्राजक महाराजांच्या वंशावळीतील हस्ती हा राजा (त्याच्या कारकीर्दीची ज्ञात वर्षे गुप्त संवत् १५६, १६३, १९१ आणि १९८) आणि उच्चकल्प महाराजांचा शेवटचा राजा शर्वनाथ (याच्या कारकीर्दीची ज्ञात वर्षे अज्ञात संवतात दिली आहेत ती अशी १९१, १९३, १९७ आणि २१४) त्या दोघांनी सामायिकपणे दिलेल्या शिलालेखाचा उद्देश दोन राज्यांच्या सीमा ठरवण्यासाठी उभारलेल्या स्तंभासंबंधी आहे. त्या दोघांनी जरी आपले शिलालेख गुप्त संवतात दिलेले असले तरी, उच्चकल्प राजा शर्वनाथ याचा आजा व्याघ्रदेव इ.स. ४९०च्या अगोदर झालेला असावा हे निश्चित. कारण शर्वनाथाचा पिता जयनाथ याचा ज्ञात ताम्रपट हा गुप्त संवत १७४ आहे. त्याच्या ज्ञात शेवटच्या ताम्रपटातील वर्ष १७७ आहे. याचा अर्थ असा की व्याघ्रराज याचा कार्यकाल हा इ.स. ४९०च्या अगोदर निश्चितपणाने असावा. हे सर्व विवेचन करण्याचा हेतू एवढाच की, मध्यप्रदेशातील नचणा व तेथूनच जवळ असलेल्या गंज येथे 'वाकाटकांना महाराज श्रिपृथिविषेणपादानुध्यातो व्याघ्रदेवो मातापित्रोः पुण्यात्र्थे कृतिमिति' असे दोन शिलालेख आढळतात. हे दोन्ही लेख पेटिकाशीर्ष लिपीतच म्हणजे वाकाटक सम्राट ज्या लिपीत आपले लेख लिहीत असत, त्याच लिपीत लिहिलेले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या अर्थी त्यांच्या वंशजांचे लेख हे नंतरच्या काळात गुप्तसंवतामध्ये लिहिले गेले, त्याअर्थी इ. स. ४९० नंतर वाकाटक वैशाचा तेथील प्रभाव संपुष्टात आला असावा आणि म्हणूनच आपण नचणा येथील मंदिरांच्या अवशेषांचा व इतर मूर्तीचा आढावा घेणार आहोत. नचणा येथील चटकन डोळ्यांत भरणारी दोन देवळे म्हणजे पार्वतीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर, पार्वतीच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर एक तलाव असून लाखोलोबादच्या रस्त्याने पुढे गेले म्हणजे कुमरामठ या नावाचे मंदिर रस्त्याच्या डाव्या बाजूस आहे. तिथून थोडे पुढे गेल्यानंतर रूपनीका मंदिर हे उजव्या बाजूस दिसते. त्याव्यतिरिक्त रंडी का बंगला या इमारतीतसुद्धा काही प्राचीन अवशेष आढळून येतात. कुमरामठ मंदिराच्या पूर्वेस सिद्ध का पहाड म्हणून टेकडी असून त्या टेकडीवरील एका गुंफेत गुप्तकालीन जिनमूर्ती आहेत. त्याव्यतिरिक्त विष्णु, ब्रह्मा, लकुलीश यांच्या सुट्या मूर्ती व आठ लहानशा मूर्ती असलेला एक शिल्पपटही सापडला आहे. याव्यतिरिक्त रामायणातील सहा प्रसंग कोरलेले शिल्पपटही या ठिकाणी आढळून येतात. यांचे विषय खालीलप्रमाणे आहेत.
      पहिल्याचा विषय कांचनमृगाचा शोध असून त्यानंतरच्या पटात रावण सीतेकडे भिक्षा मागण्यासाठी आलेला दाखवला आहे. तिसऱ्या पटात राम आणि लक्ष्मणाची हनुमान भेट घेत असून, चौथ्यात वाली-सुग्रीवांचे युद्ध, पाचव्यात वालीचा राम घेत असलेला वेध आणि सहाव्यात हनुमानाला रावणासमोर बांधून आणल्याचा प्रसंग आहे. त्यातील कुमरामठ येथील मध्ययुगीन इमारतीत वाकाटक-गुप्तकालीन चार दरवाजांच्या चौकटी बसवल्या आहेत. त्यावर डॉ. स्पिक यांनी छवी या अभिनंदन ग्रंथात १९७१ साली एक लेख लिहिला असून या चार चौकटी एकाच सर्वतोभद्र मंदिराच्या असून ते उच्चकल्प राजांच्या काळात बांधले असल्याचे दाखवून दिले आहे. डॉ. जोआना विल्यम्स यांच्या मते ललाटपट्टावर सूर्य परिवाराचे चित्रण असल्यामुळे व दुसऱ्या एका चौकटीवर वरच्या बाजूला भू-वराह आणि यानक नारसिंह म्हणजे हिरण्यकशीपूवर चालून जाणाऱ्या नरसिंहाचे चित्रण असल्यामुळे हे मंदिर सूर्यनारायणाचे असावे असा अंदाज व्यक्त केला आहे.
डॉ. जोआना विल्यम्स यांच्या मते सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे पार्वती मंदिर होय. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या सुप्रसिद्ध आढाव्यामध्ये यातील बऱ्याच पुरावशेषांची सर्वप्रथम नोद केली आहे. कनिंगहॅम यांनी त्या काळात छापलेल्या छायाचित्रावरून हे मंदिर किमान दोन मजली तरी होते. एका चौकोनी जोत्यावर हे मंदिर उभारले असून गर्भगृहाच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग होता. आज जरी या मार्गाच्या भिंतींचा बराचसा भाग आणि छत पूर्णपणे नाहीसे झाले असले तरी ते सांधार मंदिर होते, हे कनिंगहॅम यांच्या वृत्तान्तावरून स्पष्ट दिसते. दरवाज्याची चौकट, त्या भोवतीचा काही भाग तुटला असला तरी बरीचशी शाबूत आहे आणि त्यातील पाच शाखा स्पष्टपणे दिसतात. या काळातील पद्धतीप्रमाणे चौकट इंग्रजी अक्षर 'टी' या आकारात असून, वरच्या भागात दोन्ही बाजूला शालभंजिका आहेत. त्याच्या आतील तिसरी शाखा वरील तीन चंद्रशालांमुळे गोपुरासारखी दिसते. त्याच्या आतील दुसऱ्या शाखेवर दोन्ही बाजूस मिथुने, खाली गंगा-यमुना आणि ललाटपट्टीकेवर शिव-पार्वती व परिवार आहे, सर्वात आतील म्हणजे पहिल्या शाखेवर दोन बाजूस पद्मनाभ यक्ष असून त्यातून वर झेपावणाऱ्या दोन पद्मलतांचा संगम चौकटीच्या मध्यभागी झालेला दिसतो आणि खाली शूल धारण करणारे शूलपुरुष शेजारी असलेले द्वारपाल आहेत. आज जरी त्याचे नाव पार्वती मंदिर असले तरी ते एक शिवालय होते. आणि कदाचित शिवलिंगाऐवजी चतुर्मुख सदाशिवाची मूर्ती आतमध्ये असावी. येथे पुरातत्त्व विभागाच्या खात्याने जमा केलेल्या मूर्तीमध्ये लकुलीशाची प्रतिमा असल्यामुळे तिचीही स्थापना कोठेतरी केलेली असावी. कदाचित ती वरच्या मजल्यावरसुद्धा असेल. प्रदक्षिणामार्गाच्या भिंतीचे कठड्यासारख्या दिसणाऱ्या भागावर पर्वताकृती गुहा आणि वन्य प्राण्यांचे चित्रण आहे. त्यामुळे स्थपतीने या मंदिराची कैलासरूपात कल्पना केली असावी. प्रदक्षिणामार्गाच्या ढासळलेल्या भिंतीतसुद्धा स्तंभ शाखा असलेली तीन जालवातायने असावीत, असे म्हणण्याइतका पुरावा विखुरलेल्या अवशेषांतून प्राप्त झाला आहे. डॉ. जोआना विल्यम्स यांच्या अनुमानाप्रमाणे या मंदिरातील स्तंभजालवातायने ही शेजारच्या मंदिरात बसवलेली आढळतात.

▲ नचणा येथील पार्वती मंदिराची द्वारशाखा. (नचणा व तिगोवा मंदिर छायाचित्र सौजन्यः एआयआयएस संग्रहण)

   सापडलेल्या पुरावशेषांमध्ये खट्वांग धारण करणारा आणि भृंगारातून दुसऱ्या पात्रात जल ओतणारा गण सापडला आहे. समोरच्या महादेव मंदिरात नाग असलेले लहान जालवातायन बसवलेले आहेत. या निरनिराळ्या प्रकारच्या शिल्प प्रकारावरून तसेच शिल्प प्रयोजनावरून अभिजात आणि स्थानिक शिल्पशैलीचा इथे उत्तम मिलाफ झाल्याचे दिसून येते. आणि त्यामुळे डॉ. जोआना विल्यम्स यांच्या मते पार्वती मंदिराचा काल इ. स. सुमारे ४८० ते इ. स. ५०० इतका होतो. त्यांच्या मते याच काळात सम्राट हरिषेण हा वत्सगुल्म इथे राज्य करीत असल्याने हे मंदिर त्याच्या काळातील असावे हे मानावयास हरकत नाही. त्यांच्या मते हरिषेणाच्या अगोदर मेकल आणि मालव येथील संस्थानांवर नरेन्द्रसेन आणि द्वितीय पृथ्वीषेण यांच्या काळात हे पार्वती मंदिर बांधले गेले असावे. दोन शिलालेखांत उल्लेख केलेला व्याघ्रदेव हा द्वितीय पृथ्वीषेणाचा समकालीन होता यात शंका नाही. या संदर्भातील व्याघ्रदेवाच्या शिळेवर सुदर्शन चक्राचे चित्रण आहे ही बाब या संदर्भात सूचक आहे. डॉ. देवदत्त भांडारकर यांनी पुन्हा संपादित केलेल्या गुप्त अभिलेखांच्या खंडाच्या प्रस्तावनेत असेही नमूद केले आहे की, पंजाब आणि आसाम या दोन ठिकाणी असे चक्रमुद्रांकित, सात्वतधर्मानुयायी वैष्णवांचे शिलालेख सापडलेले आहेत. व्याघ्रदेव हा आपला सम्राट पृथ्वीषेण द्वितीय याच्याप्रमाणेच परमभागवत होता, हे या पुराव्यावरून सिद्ध होते. नचना येथील पुरातत्त्व विभागाच्या चौकीदाराच्या पडवीत ठेवलेल्या मूर्तीमध्ये एक खंडित विष्णूची प्रतिमा, कुमरामठ येथील दाराच्या चौकटीवर वराह आणि नरसिंहाची चित्रणे आणि तेथून फार दूर नसलेल्या मढिया येथील वामन मंदिरात असलेली हयग्रीवाची प्रतिमा या सर्वांवरून उच्चकल्प राजवटीत सात्वत धर्माचा प्रसार ठळकपणे झाला होता हे स्पष्टपणे दिसते. तर हल्लीचे पार्वती मंदिर, महादेव मंदिर, सदाशिवमूर्ती आणि विशेषकरून लकुलीश मूर्ती यावरून पाशुपत धर्मसुद्धा प्रतिष्ठित झाला होता हे दिसते. समकालीन तीर्थंकर मूर्तीवरून त्या भागात जैन धर्माचे उपासकसुद्धा होते हे कळते. विशेष म्हणजे वाकाटक वंशातील राजांच्या प्रमाणेच उच्चकल्प वंशातसुद्धा 'परममाहेश्वर' आणि 'परमभागवत' राजे होते हे लक्षात येते.
           या संदर्भात भुमरा येथील परिव्राजकवंशीय राजांनी दगडात बांधलेल्या शिवमंदिराचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. भुमरा येथील शिवमंदिरावर राखालदास बॅनर्जी यांनी एक प्रबंध प्रकाशित केला होता. हे मंदिर काहीसे नचना येथील पार्वतीमंदिराचा विन्यास असल्यासारखे एका चौकोनी चौथऱ्यावर असून आयताकृती पूर्वाभिमुखी असून समोर पायऱ्या त्याच्या उभयता दोन देवकुलिका यासाठी एक लहान चौथरा आहे. मध्यभागी गर्भगृह असून, तीन बाजूंनी प्रवेश करता येईल असा मंडप समोर असावा, हे लक्षात येण्याइतपत खुणा आहेत. आजतरी गर्भगृह एकमजली चौकट आहे. याकाळातील इतर मंदिरांप्रमाणे ती 'टी' या इंग्रजी अक्षराच्या आकाराची असून, ती तीन शाखांची आहे. मधल्या शाखेवर स्त्रीपुरुषांची चित्रणे असून त्यावर गोपुर रेखाटले आहे. मधल्या चन्द्रशालेच्या खाली शिवाची आवक्ष प्रतिमा असून, दोन्हीकडून विद्याधर व सिद्ध गंधर्व आकाशमार्गाने येऊन माळा अर्पण करीत आहेत असा प्रसंग कोरला आहे. चौकटीच्या तळाशी गंगा-यमुनांच्या प्रतिमा आहेत. एकूणच शिल्पशैलीवरून हे नचना येथील शिव आणि महादेव मंदिरापेक्षा नंतरच्या काळातील (म्हणजे इ. स. ५२०-५३० या काळातील) असावे, असा विद्वानांचा कयास आहे. या काळातील परिव्राजक राजे आपल्या ताम्रपटात 'गुप्तराज्यभुक्तौ' म्हणजे गुप्तांच्या राजवटीचा उल्लेख करून गुप्त संवतातच कालनिर्देश करत असल्यामुळे अर्थाअर्थी त्या कलाकृतीचा वाकाटकांच्या संदर्भात संबंध नाही. त्याचबरोबर मंदिराच्या सभोवताली सापडलेल्या आता सुट्या झालेल्या शिल्पावरून असे लक्षात येते की, मंदिरावर यम, इत्यादी  लोकपालांचे चंद्रशालांतून चित्रण केलेले दिसते. त्यावरूनही हे नंतरच्या काळातील आहे हे लक्षात येते. पण तलविन्यासाच्या दृष्टीने हे नचना येथील पार्वती मंदिराला जवळचे असल्यामुळे त्याचे इथे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील उत्खननात उघडकीस आलेल्या शिव मंदिराशी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण साम्याचा आपल्याला उल्लेख केला पाहिजे. या विटांनी बांधलेल्या मंदिरचे जोते दोन मीटर उंच असून, ते सव्वीस मीटर रुंद आणि बेचाळीस मीटर लांब आहे. येथेही चौथऱ्याच्या पुढील भागातून अंगच्या पायऱ्या असून त्यांच्या उजव्या डाव्या बाजूस भुमरा येथील मंदिराप्रमाणेच दोन देवळ्या आहेत. मंदिरातील शिवलिंग हे चौकोनी ब्रह्मभाग आणि वरील गोल रुद्रभाग अशा दोन भागात कोरले आहे. शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी, जोत्याखालील कुंडात साठवण्यासाठी एक पन्हाळ आहे. त्या पन्हाळीचा दर्शनी भाग नेहमीच्या मकराऐवजी रौद्र मानव मुखात आहे. त्याला शात्रीय परिभाषेत भूतप्रणाल असे म्हणतात. याविषयी आपले मत व्यक्त करताना डॉ. मधुसूदन ढाकी यांनी त्याची प्राचीनता इ.स. ४०० पर्यंत जाऊन शकते, असे म्हटले होते. आपणास असे म्हणता येईल की एका अर्थाने नागरा येथील विटांनी बांधलेल्या शिव मंदिराचा नकाशा डोळ्यासमोर ठेवून नंतरच्या काळात भुमरा येथील शिव मंदिर बांधले असावे.

▲ नचणा येथील पार्वती मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपात्र व शूत्रपुरुष

मध्य प्रदेशातील तिगवा येथील देवीमंदिराचा उल्लेख केल्याशिवाय कोसल-मेकला भागातील वाकाटक प्रभावित कलेचा आढावा पूर्ण होणार नाही. सर अलेक्झांडर कनिंगहम यांनी या स्थानाला भेट दिली, त्या वेळी दगडात बांधलेली गुप्त-वाकाटक काळातील मंदिरे मोठ्या संख्येने होती, हे त्यांच्या लक्षात आले. आज फक्त या मंदिरांचे चौथरेच शिल्लक आहेत. चौकशी करता कनिंगहम यांना असे सांगण्यात आले की जवळच एक लोहमार्ग टाकण्यासाठी येथील शिलांचा खडी तयार करण्यासाठी वापर करण्यात आला. आज आपणास एवढेच म्हणता येते की आर्थिकदृष्ट्या इ. स.च्या चौथ्या, पाचव्या शतकात हे एक महत्त्वाचे ठिकाण असून ते राजकीयदृष्ट्टयासुद्धा लक्षणीय असावे. हे मंदिर भुमराच काय पण नचना येथील मंदिरसंकुलापेक्षाही प्राचीन असले पाहिजे. त्याचा तलविन्यास सांची येथील स्तूपासमोरील क्रमांक १७ च्या देवालयाप्रमाणे असून समोर चार खांबांवर तोललेला, गर्भगृहाइतका रुंद असलेला उघडा मंडप, त्यापाठीमागे गर्भगृहाच्या दरवाजाची चौकट आणि भिंत, आणि मागे चौकोनी गर्भगृह अशी रचना आहे. गर्भगृहाच्या छतावर मोठ्या कमळाची चित्र असून मंडपाचे व मागल्या भिंतीतील अर्धस्तंभ हे सांची येथील देवालयातील खांबांसारखेच आहेत. खाली चौकोनी, मध्यभागी अष्टकोनी व षोडशकोनी त्यावर पूर्णघट, स्तंभशीर्षांवर चंद्रशाला व एकमेकांकडे पाठ करून उभे असलेले सिंह, मधोमध वृक्ष अशी खांबांची जडणघडण आहे. आणि त्यामुळे या मंदिरातील शिल्प आणि स्थापत्यातील शैलीमुळे तसेच अभिलेखीय पुराव्यावरून मंदिराचा काल इ.स. सुमारे ४४५-४७० असा ठरवण्यात आला आहे. दरवाजा 'टी' या इंग्रजी अक्षरासारखा आहे. सगळ्यात बाहेरची शाखा स्तंभशाखा असून वरच्या भागात शालभंजिकांचे चित्रण आहे. आतील चौकटीवर  आणि पृथ्वीषेण द्वितीय यांनी पद्मपुष्पांची चित्रणे आहेत. तेथूनच थोड्या दूर अंतरावर कुंडा येथे अशाच पण अधिक अनलंकृत अशा मंदिराचे अवशेष डॉ. देबला मित्रा यांना सापडले (इ. स. सुमारे ४७५). नंदिवर्धन शाखेचा प्रवरसेन द्वितीय आणि त्याचा पुत्र व नातू नरेंद्रसेन नर्मदेपलीकडे केलेला राज्य विस्तार लक्षात घेता, तिगवा येथील मंदिर हे वाकाटकांच्या स्थापत्यशिल्पकलेचा नमुना आहे, अशा निष्कर्षाप्रत म.म. वा. वि. मिराशी आले. कुंडा येथील मंदिराबाबतसुद्धा हेच मत आहे.

▲ सिद्ध का पहाड येथील तीर्थंकर मूर्ती

पाशुपत धर्माच्या संदर्भात तळा येथील प्राचीन कोसल राज्यात बांधलेल्या देवराणी आणि जेठाणी या दोन मंदिरांचा व आसपास सापडलेल्या एका विलक्षण रुदमूर्तीचा उल्लेख करणे भाग आहे. या मंदिरांचा काळ डखें. जोआना विल्यम्स यांच्याप्रमाणे इ.स. ४८०-इ.स.५३० असा आहे. देवराणी मंदिराचा तलविन्यास चौकोनी गर्भगृह व समोर आयताकृती मंडप असा आहे. गर्भगृहाची चौकट 'टी' या इंग्रजी अक्षराच्या आकाराची असली तरी त्यावरील शाखा आणि अलंकरण हे भरगच्च आहे. त्यामध्ये पद्मलता, रत्नमाला, पुष्पे अशी नेहमीचीच प्रयोजने असली तरी त्याचे चित्रण एका वेगळ्या ढंगात करण्यात आलेले आहे. मंडपाच्या सुरुवातीस असलेल्या स्तंभांची घडण चौकोन, अष्टकोन, त्यावर अनेक पन्हाळी कोरलेला स्तंभाचा वरचा भाग आणि शेवटी पूर्ण कलश अशी आहे. या काळात नरेंद्रसेन पृथ्वीषेण आणि हरिषेण या तिघांचेही कोसलावर अधिराज्य असल्याने दुरान्वयाने ते वाकाटक स्थापत्य आणि शिल्प यांचाच आविष्कार आहे असे म्हणता येईल. परंतु विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे येथे सफाई करताना उत्खननात सापडलेली वेगळ्या प्रकारची रुद्रशिवाची मूर्ती. या रुद्रमूर्तीचे निरनिराळे अवयव पशुरूपात कोरलेले आहेत. उदाहरणार्थ खांदे मकराप्रमाणे, हनुवटी खेकड्यासारखी, नाक सरड्याच्या आकाराचे, भुवया सापासारख्या आणि डोळे भुग्यासारखे, तर गुडघे सिंहासारखे दाखवले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस फणा उभारलेला एकेक नाग असून, शरीराच्या इतर अवयवावर शिरे कोरली असल्यामुळे हा चतुःमूर्ती किंवा अष्टमूर्ती शिवाप्रमाणे असल्यासारखा भासतो. तूर्त एवढेच नमूद करता येईल, की मांढळ इथे सापडलेल्या अष्टमूर्ती किंवा द्वादशमुख असलेल्या शिवमूर्तीसारखी शिवाविषयीची संकल्पना मूर्तिकाराच्या मनात असली पाहिजे. आणि त्या अर्थाने तळाला येथील देवराणी मंदिर येथील अनोखी शिवमूर्ती आणि मांढळ येथील शिवप्रतिमांची नाळ जुळलेली आहे असे दिसते.

response.lokprabha@expressindia.com
 

उत्तरकाळातील बौद्ध, शैव आणि वैष्णव गुंफा

महाराष्ट्र राज्याचा पुरातत्त्व विभाग आणि नागपूर विद्यापीठ यांनी पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर उत्खनन-गवेषणाचा कार्यक्रम हाती घेतला होता, हे यापूर्वीच्या लेखातून स्पष्ट झाले आहेच. मनसरवरील लेखात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणानेसुद्धा पूर्व विदर्भर्भात उत्खनने हाती घेतली आणि वाकाटकांचे पुरातत्त्व व त्याच्या जोडीने त्यांच्या कलेचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्या उत्खननांचा लक्षणीय रीतीने उपयोग झाला असे लक्षात येईल. गवेषणाचा कार्यक्रम मात्र हा, उत्खननाशी तुलना करता, निरंतर रीतीने चालू राहू शकतो, आणि तसा तो राहिला. या संदर्भात डॉ. माने आणि मी संयुक्तपणे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वाकाटककालीन गुंफांचे एक सर्वेक्षण केले. हे काम आम्ही जवळजवळ तीन वर्षे केले. आणि त्यातून जवळजवळ विसेक ठिकाणच्या गुंफांचा आम्हाला आढावा घेता आला. महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गोदिया, नागपूर, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांव्यतिरिक्त नांदेड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील गुफांचाही परामर्श घेण्याची संधी मिळाली.


▲ भटाळा गुंफा


असा प्रकल्प हाती घेण्यामागे एक आणखी वेगळाच उद्देश होता. जितक्या विपुल प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राच्या, म्हणजे सह्याद्री पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांतून, गुंफा आढळतात तितक्या विपुल प्रमाणात विदर्भाच्या डोंगराळ भागात आढळत नाहीत ही बाब बहुतांशी संशोधकांना मान्य आहे. पण एका दृष्टीने बघितले तर गुंफा कोरण्याची परंपरा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात अधिक प्राचीन आहे असे म्हणावे लागते. कारण गुंफा कोरण्याची पद्धत या भागातील आदिवासींमध्येही प्रचलित होती. आणि सांस्कृतिकक्रमदृष्ट्या ती पूर्वेतिहास काळाच्या (म्हणजे इ.स. पू. तिसऱ्या शतकाच्या) अगोदरही बृहदअश्मयुगापर्यंत पोचते. बृहदाश्मयुगीन संस्कृतींचे मूळ विदर्भर्भात जवळजवळ इ. स. पूर्वीच्या एक हजार वर्षांपर्यंत जाऊ शकते. बृहदअ हदअश्मयुगीन गुफांमध्ये त्या कोरण्यात आल्या त्यावेळी लिपिज्ञान विकसित झाले नसल्याने, आणि या गुफांचे स्थापत्य काटेकोर नसल्यानेही त्या गुंफा नेमकी कुठल्या शतकात कोरण्यात आली हे आज उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे सांगता येत नाही. बृहदअअश्मयुगीन संस्कृतीच्या अभ्यासातील एक कच्चा दुवा असा की विदर्भ जनपदाचे नागरीकरण हे इ.स.पू. पाचव्या शतकात झाल्यानंतर बृहदअश्मयुग अस्ताला गेले अशी नोद आपण करत असलो तरी बृहदअश्मयुगीन परंपरा त्या त्या आदिवासींच्या समाजात काही शतके तरी प्रचलित होत्याच. आणि त्यामुळे एखादी गुफा बृहदल अश्मयुगीन परंपरेतील असली तरी ती इ. स. पू. पाचव्या शतकानंतरचीही असू शकते.

▲ सालबर्डी गुंफेचा आराखडा

हे सर्व विवेचन करण्यामागील हेतू असा की, गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या म्हणजे ज्यांना आपण प्रागैतिहासिक म्हणू शकतो अशा गुंफांचा अभ्यास काही संशोधकांनी हाती घेतला आहे. त्यांच्या मते गुंफा कोरण्याचे तंत्र हे विदर्भात इ. स. पू. तिस-या शतकाच्या आदिवासीना अगोदरच ज्ञात असल्याने, महाराष्ट्रातील गुंफा स्थापत्याचा इतिहास लिहीत असताना ही गोष्ट ठळकपणे नौदली गेली पाहिजे. यापुढे जाऊन उत्साहाने हे संशोधक असे म्हणतात की मौर्यानंतरच्या आणि सातवाहनांच्या अगोदरच्या काळामध्ये जे शकक्षत्रप राजे विदर्भात राज्य करीत होते, त्यांनी हे गुंफा कोरण्याचे तंत्र विकसित केले आणि त्याचाच परिपाक म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध लेणी कोरण्यात आली. वेगळ्या शब्दात पश्चिम महाराष्ट्रतील समृद्ध लयन-स्थापत्याचे मूळ बृहदअश्मयुगीन गुंफांमध्ये शोधले पाहिजे. प्रस्तुतचा लेख लिहिताना हा जो दावा केला गेलेला आहे तोसुद्धा आपण तपासून पाहणार आहोत.

▲ लंकेश्वर गुंफा

आपण सर्वप्रथम विदर्भातील बौद्ध गुंफांचाच विचार करूया. सातवाहन काळातील काही गुंफा चंढाळ्याच्या जंगलात डॉ. शां. भा. देव यांना सापडल्या होत्या. स्थापत्यदृष्ट्या त्या वैशिष्ट्यपूर्ण नसल्या तरी समकालीन लिपीत गुंफांमध्ये कोरलेल्या लेखांवरून त्या इ. स. पू. पहिल्या शतकातील असाव्यात असा अंदाज करण्यात आला होता आणि तो खराही ठरला. तेथून फारसे दूर नसलेल्या पौनी येथील स्तूपामुळे या तर्काला पुष्टीही मिळाली. परंतु त्याहीपेक्षा जवळजवळ १०० वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक येथील नौदल्या गेलेल्या बौद्ध गुंफेचा मात्र या संदर्भात फारसा गाजावाजा झाला नाही. विझासन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बौद्ध गुंफेची नोद विस्तृत प्रमाणावर अलेक्झांडर कनिंगहॅमचा सहाय्यक बेगलर याने घेतली आहे. कनिंगहॅमच्या वतीने १८७३-७४ आणि १८७४-७५ या दोन वर्षांत मध्यप्रांतात केलेल्या सर्वेक्षणात या गुंफेचा उल्लेख आढळतो. या बरोबरच त्याने या गुंफेचे मानचित्रही प्रकाशित केले आहे. भांदकच्या वायव्येस दोन कि. मी. अंतरावर विझासन नावाची
टेकडी आहे. टेकडीवर थोडेसे चढून गेल्यावर खडकामध्ये कोरून काढलेला एक मार्ग, त्याच्या दोन्ही बाजूला कोरलेले कट्टे आणि भिंतीवर अवलोकितेश्वर व इतर बोधिसत्त्वांची शिल्पे कोरलेली आढळतात. पुढे चालून गेल्यानंतर, गुंफेचे प्रवेशद्वार आणि त्याच्याहीवर काही स्तूप अर्ध उठावात कोरलेले दिसून येतात. कोरलेले स्तूप आणि बोधिसत्त्वांच्या प्रतिमांवरून ही गुंफा पाचव्या शतकात कोरण्यात आली असावी असा अंदाज बांधता येतो. प्रवेशद्वारातून आत जाईपर्यंत मात्र तिचे स्थापत्य नेमके कुठल्या स्वरूपाचे असेल त्याची काहीच कल्पना करता येत नाही. हे बौद्ध मंदिर तीन गुंफांचे मिळून झालेले आहे. आणि या तिन्ही गुंफांचा प्रवेश सामाईक अशा अंगणातून होतो. मुख्य गुंफा पूर्वाभिमुख असून ती ७४ फूट खोल आहे. दक्षिणेची ३५ फूट खोल असून, उत्तरेची ४७ फूट खोल आहे. प्रत्येक गुंफेच्या शेवटी एक गाभारा असून त्यामध्ये ध्यानमुद्रेत बसलेली भगवान बुद्धाची भीमकाय मूर्ती कोरण्यात आलेली आहे. गुंफांच्या निमुळत्या तोडाशी प्रवेशद्वारे आहेत. द्वार ओलांडून गेल्यानंतर एक चिंचोळा व्हरांडा, त्यामागे विस्तीर्ण असे सभागृह, त्यानंतर अरुंद असे अंतराळ व सर्वात शेवटी गाभारा आहे. समोरचा व्हरांडा, सभागृह, अंतराळ आणि गाभारा यात कुठेही खांब नाहीत. मुख्य म्हणजे पूर्वाभिमुख गुंफेत सभागृहाच्या बाजूच्या भीतीत तीन निवासकक्ष आहेत. सभागृहांची छते कमानीच्या स्वरूपात कोरलेली आहेत हे या गुंफांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मुख्य गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळ इ. स. चौथ्या-पाचव्या शतकातील ब्राह्मी लिपीत कोरलेला एक लहानसा लेखही आढळून आला आहे. या सर्वांवरून ही गुंफा पाचव्या शतकात कोरण्यात आली असावी असे स्पष्ट होते. परंतु काही शिल्पे ही उत्तरकालीन असल्यामुळे या गुंफेचा विकास इ. स. सातव्या-आठव्या शतकापर्यंतही होत राहिला असावा, असे म्हणण्यास वाव आहे, चंढाळ्याच्या जंगलातील इ. स. पू. पहिल्या शतकात कोरलेल्या अगदी साधारण अशा भिक्षूनिवासानंतर हा अत्यंत प्रगल्भ असा गुंफास्थापत्याचा विकास कसा झाला हे सांगणे आजतरी शक्य नाही. त्याचबरोबर या अगदी वेगळ्या अशा बौद्ध गुंफेचा पश्चिम महाराष्ट्रातील समकालीन बौद्ध गुंफांशी संबंध कसा जोडायचा हेही लक्षात येत नाही. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध स्थापत्याचे मूळ विदर्भर्भात शोधले पाहिजे असा नवीन विचार मांडल्यास विंझासन येथील ही गुंफा अत्यंत वेगळी का, हेही स्पष्ट करावे लागेल.


▲ भिवकुंड गुंफा

  सालबर्डी येथील दोन बौद्ध गुंफांची पाहणी केल्यास वरील मताची आणखी खात्री पटेल. सालबर्डी हे ठिकाण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेस आठ कि. मी. वर आहे. त्या ठिकाणाला हिंदू भाविकांच्या दृष्टीने महत्त्व असून दर महाशिवरात्रीस डोगरातील एका नैसर्गिक विवरामध्ये असलेल्या शिवलिंगाच्या पूजेसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने येतात, व त्याला जत्रेचे स्वरूप येते. परंतु पुरातत्त्वदृष्ट्या इतरही गुंफांचे अवशेष या ठिकाणी डॉ. ग. का. माने, डॉ. बोरकर यांना आणि मला सापडले. यातील दोन बौद्ध गुंफांचा उल्लेख डॉ. मो. ग. दीक्षित आणि रायबहाद्दूर हिरालाल यांच्या लिखाणातून आला असला तरी यांचा अभ्यास झाला नव्हता. येथील अभ्यासावरून आमच्या लक्षात आले, की समोर ८.२ मी. ७ २.७५ मी. इतका आडवा व्हरांडा, आतमध्ये मंडप (७.७ चौ. मी.) असून त्याच्या तिन्ही बाजूला म्हणजे पूर्वेस, पश्चिमेस आणि दक्षिणेस तीन कक्ष आहेत. त्यातील दक्षिणेचा कक्ष आणि मंडप यामध्ये दरवाज्याच्या दोन्ही बाजूस दोन भित्तीगत स्तंभ (पिलॅस्टर) आहेत. सभागृहाच्या मध्यभागी ४.८ मी. ७३.९ मी. असा एक चौथरा आहे.


▲ पातूर गुंफांचा आराखडा

▲ हिरपूर येथील उत्खनन

कदाचित ही गुंफा पूर्ण झाली नसावी. कारण सभागृहाच्या दोन बाजूस असलेल्या कक्षामध्ये अथवा दक्षिणेस असलेल्या गर्भगृहात आज कोणतेही - शिल्प दिसत नाही. खांबांच्या   ठेवणीवरून आणि तलविन्यासावरून ही गुहा वाकाटककाळात कोरली गेली यात शंका नाही. बाहेरच्या तळखड्यावर अलंकरणयुक्त खांब वर स्तंभशीर्षाला लागून तरंगयुक्त दोन हस्त (बॅकेट) आहेत. व्हरांड्यातील दोन्ही बाजूला दोन कक्ष आहेत. या व्हरांड्यातील दोन खांब तसेच बाजूला असलेले दोन अर्धस्तंभ हे थेट अजिंठा येथील खांबांच्या प्रतिकृती आहेत.
      लंकेश्वर गुंफेशी तुलना करता तिथूनच थोड्या अंतरावर असलेली पंचावतार गुंफा ही पूर्ण कोरली होती. आणि त्यात मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली होती हे सहज लक्षात येते. गुंफा उत्तराभिमुख असून तिचा तलविन्यास दोन स्तंभावर तोललेला व्हरांडा (ज्याचा शिल्पशास्त्रामध्ये वीथी असा उल्लेख येतो), मागे मंडप, मंडपाच्या पूर्व-पश्चिमेस दोन खांबांनी विभक्त झालेली दोन पाखी आणि मागे गर्भगृह असा आहे. लंकेश्वर आणि पंचावतार यामधील एक लक्षणीय फरक म्हणजे व्हरांड्याला लागून बाजूला असलेले कक्ष हे लंकेश्वरातील कक्षेपेक्षा दुप्पट आकाराचे असून सभागृहातील दोन पाखी दाराच्या साहाय्याने त्यांना जोडण्यात आलेली असावीत. आणखी एक सकारात्मक फरक असा की पंचावतार गुंफेतील मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर सफेदीचे जाड थर असले तरी, व त्यावरील नक्षी सहज लक्षात येते. आणि तिचे साम्य नचणा-कुठारा येथील शिवालयाच्या चौकटीशी आहे हेही लक्षात येते. आतील गाभारा सुमारे २.५ मी. बाय २ मी. असून मुख्य मूर्ती ही श्रावस्तीच्या चमत्कारातील (महाप्रतिहार्य) बुद्ध मूर्तीप्रमाणे दोन्ही बाजूला नाग असलेल्या कमळावर बसलेली असून भूमिस्पर्श मुद्रेत तिचा उजवा हात आहे. आणि तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूस अवलोकितेश्वर आणि वज्रपाणि आहेत. इथे चक्रधर स्वामीनी निवास केलेला असल्यामुळे व महानुभाव पंथाच्या प्रथेप्रमाणे बांधलेल्या ओट्यामागे आज गाभाऱ्यातील या मूर्ती झाकल्या गेलेल्या आहेत. बुद्धमूर्ती आज शिरोविहीन आहे, परंतु बोधिसत्त्वांच्या लांच्छनांवरून तसेच भूमिस्पर्श-मुद्रेवरून वाकाटकांच्या उत्तरकाळात ही कोरली असावी हे स्पष्टपणे दिसते. या दोन्ही गुंफांच्या ठेवणीवरून जळगाव जिल्ह्यातील बानोती इथल्या बौद्ध गुंफेची आठवण येते. त्यामुळेच या गुंफांचा काल इ.स. ४७५ असे ठखण्यास हरकत नाही. 
       या काळातील शैव गुंफांचा विचार केल्यास सर्वप्रथम पातुर येथील गुंफेचा विचार केला पाहीजे. जेम्स फर्ग्यूसन आणि जेम्स बर्जेस या दोघांनीही या गुंफेची दखल घेतली आहे. पण गुंफेतील शिल्पे भग्न पावल्याने गुंफेच्या दर्शनी भागावर नामनिर्देश असलेले काही फुटकळ अभिलेख आहेत यापलीकडे त्यांना काहीही सांगता आलेले नाही. सौदरराजन यांनी 'केव्ह टेम्पल्स ऑफ द डेक्कन' या टेम्पल सर्व्हे ऑफ इंडिया या भारतीय सर्वेक्षणाने हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत दख्खनमधील बौद्धेतर गुंफांचे व्यापक सर्वेक्षण हाती घेतले व त्यावर आधारलेला छायाचित्रे व मानचित्रे समाविष्ट केलेला एक मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. परंतु त्यातही पातुर येथील गुंफांची दखल घेण्यात आली नाही. नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयातील प्राचीन शिल्पांची नोंदवहीत घेतलेली टिपणी पाहता असे लक्षात आले की तपस्यामग्न पार्वती अथवा अपर्णेचे शिल्प पातुर येथून  आणून संग्रहालयात प्रदर्शित केले आहे. पातुर येथील लेण्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता जोडगुंफापैकी डावीकडील गुंफेत पीठावर चौकोनी खोबण असून मूर्तीच्या खालच्या भागात चौकोनी दंडाची (tenant) सोय करण्यात आली असावी. पार्वतीच्या मूर्तीची तपासणी केल्यानंतर तिचा दंड त्या पीठावरील खोबणीशी मिळताजुळता आढळला. तसेच त्या गुंफेत बाजूला एका लहान कक्षामध्ये पट्टावर साताठ मूर्तीचे भग्नावशेष दिसतात. हे सप्तमातृकांचे असावेत असा तर्क करण्यासाठी जागा आहे. त्यालाच समांतर असलेल्या उत्तरेकडील गुंफेत पार्वतीऐवजी शिवलिंग प्रतिष्ठित करण्याची सोय करण्यात आलेली आहे. सप्तमातृकांना समांतर असलेल्या कक्ष आणि गाभारा असलेल्या लहान गुंफेत एक आणखी पीठ आहे, ते कदाचित कार्तिकेय आणि गणेशासाठी असावे. या जोडगुंफा आकाराने सारख्या नसल्या तरी त्यांचा तलविन्यास एकसारखा आहे. समोरचा व्हरांडा किंवा वीथी, दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ यावर तोलला आहे. मंडपाच्या सुरुवातीससुद्धा असेच दोन स्तंभआणि अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभचौकोनी असून मध्यभागी अष्टकोनी आहेत, वॉल्टर स्पिंक यांच्या समवेत जेव्हा आम्ही या दोन गुंफांची पाहणी केली; त्यांचेही असेच मत झाले की या इ. स. पाचव्या शतकाच्या मध्यास म्हणजे अजिंठा येथील गुंफांच्या १५ वर्षे अगोदर तरी कोरण्यात आल्या असाव्यात. दर्शनी भागावर असलेल्या ब्राह्मी लिपीतील फुटकळ लेखांनी वरील तर्कास पुष्टी मिळाली. त्या संदर्भात सालबर्डी येथे एका नाल्याच्या काठावर कोरलेल्या एका शैव गुंफेचे स्मरण होते. पंचावतार आणि लंकेश्वर या बौद्ध गुंफांपासून ५०० यार्ड अंतरावर ही लहानशी गुंफा कोरलेली आहे, ती एखाद्या कोनाड्यासारखी असून २.६ मी. बाय २.१ मी. अशा आकाराची असून १.५ मी. उंच आहे. आतमध्ये एका पीठावर शिवलिंग आहे. आणि दर्शनी भागावर एका द्विभुज गणेशाची मूर्ती कोरली आहे. शेजारी दुसरा कोनाडा असून त्यातसुद्धा एका शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. परंतु त्याच्या दर्शनी भागावर द्विभुज लकुलीश कोरलेला असून त्याच्या उजव्या हातात सोटा (लकूट) आणि डाव्या हातात अक्षमाला दाखवलेली आहे. शेजारी उमामहेश्वरांची मूर्ती कोरलेली आहे.
  या संदर्भात देऊळवाडा (ता. भांदक, जि. चंद्रपूर) इथल्या शैव गुंफांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. येथील दोन गुंफांमध्ये अनुक्रमे नरसिंह आणि देवी यांच्या मूर्ती प्रतिष्ठित केल्या असल्या तरी एका गुंफेत शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या गुफा निश्चितपणे वाकाटककालीन आहेत. कारण एका गुंफेत शंखलिपीत मजकूर कोरलेला असून प्रवेशद्वाराच्या एका बाजूला एक मानवाकृती कोरलेली आहे. ती निश्चितपणे वाकाटककालीन आहे.
    ज्याप्रमाणे बौद्ध आणि शैव गुंफा या काळात कोरण्यात आल्या त्याचप्रमाणे गौराळा (भांदक) येथील सप्तमातृकेची गुंफाही कोरण्यात आली आहे. गौराळा (भांदक) येथील या गुंफेच्या दर्शनी भागात शिवलिंग कोरलेले असून आत गुंफेमध्ये दोनतीन माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. गुंफा नऊ फूट लांब, पाच फूट रुंद आणि सात फूट उंच आहे. गुंफेच्या आतल्या बाजूस तिन्ही भिंतींना स्पर्श करणारे एक मोठे पीठ असून पाठच्या भिंतीस लागून मूर्ती ठेवण्यासाठी चार खोबणी केल्या आहेत. तर पूर्व आणि पश्चिमेकडील भिंतीत दोनदोन खोबणी केलेल्या आहेत. पीठाची वेदी वाकाटक काळातील वेदीप्रमाणे असून मध्यभागी उठावात गणांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

▲ विंझासन गुंफेचा आराखडा

बाहेरील बाजूस गणाची एक सुटी वाकाटककालीन मूर्तीदेखील आढळते. गुंफेतील भिंतीवर त्रिविक्रम, शेषशायी, नृवराह अशा मूर्ती अर्ध उठावात पण वेगळ्या शैलीत कोरण्यात आलेल्या आहेत. यावरुन राष्ट्रकूट काळात तिचा वैष्णव गुंफा म्हणून वापर करण्यात आला हे स्पष्ट दिसते. पण शैव गुंफांचे सप्तमातृका आणि कार्तिकेय यांच्याशी असलेले जवळचे नाते लक्षात घेता ती शाक्त गुंफा शैव तीर्थस्थानाचा भाग असावी, यात शंका नाही. ज्या लहानशा टेकडीवर ही गुंफा आहे त्यावर एक हेमाडपंती मंदिरसुद्धा असून मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर एका राजपुरुषाची सुटी प्रतिमा ठेवलेली आढळते. टेकडीला लागून असलेल्या तलावाचे गौराळा हे नावसुद्धा सूचकच आहे. गौऱ्यालय म्हणजे गौरीचे निवासस्थान. याचेच ते अपभ्रष्ट रूप आहे.
        भटाळा येथे एका ऋषींचा तलाव म्हणून ओळखला जाणाऱ्या लहानशा तलावाकाठी जवळजवळ २७ गुंफा कोरलेल्या आढळून आल्या. त्या गुंफांचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये केवल नरसिंहाच्या प्रतिमा कोरलेल्या किंवा पीठावर शिवलिंगे प्रतिष्ठित केलेली मुख्यत्वे आढळून केली. एके ठिकाणी सूर्याची प्राचीन, उभी प्रतिमासुद्धा आढळली. या सर्व गुंफा आदिवासींच्या परंपरेप्रमाणे अगदी लहान म्हणजे दोन चौ. मीटर व एक मीटर उंच ते अर्धा चौ. मीटर व तीस से. मी. उंच एवढ्याही आहेत. केवलनरसिंहाची उपासना वाकाटक काळात इतकी प्रभावी झाली होती की अशा लहान (साधारण अर्धा फूट उंचीच्या सुट्या) प्रतिमा विदर्भात अनेक ठिकाणी सापडल्या आहेत. आणि त्यामुळे ही नरसिंहाची उपासना चंद्रपूर, गडचिरोलीच्या जंगलातसुद्धा पोचली होती हे या लहान गुंफावरून सिद्ध होते.
    पौनी येथील स्तूपाचे उत्खनन दोन मौसमात (१९६९-७० ते १९७०-७१) केल्यानंतर उत्खननाचा वृत्तांत तयार करताना स्तूपाच्या दगडी कठड्यावर कोरलेल्या दानलेखांतील विशेषनामांचा अभ्यास आणि त्या निमित्ताने समकालीन धार्मिक स्थितीचा परामर्श घेण्याचे काम प्रा. शां. भा. देव यांनी माझ्यावर सोपवले होते. सालबर्डी येथील बौद्ध गुफांची त्याकाळात मला कल्पना नव्हती. याउलट वाकाटक काळातील जे काही अवशेष सापडले होते (उदा. रामटेक आणि पवनार) ते वैष्णवच होते. नंदिवर्धन शाखेतील वाकाटक राजे हे परमभागवत किंवा परममाहेश्वर असल्यामुळे व बौद्ध मूर्ती अथवा अवशेष अपवादानेच सापडत असल्यामुळे आम्ही या निष्कर्षांप्रत आलो होतो की राजे हिंदू असल्यामुळे विदर्भात बौद्ध धर्माला ओहोटी लागली असावी किंवा तो वाकाटककाळात नामशेष झाला असावा. परंतु देऊळवाडा, भिवकुंड आणि इतर ठिकाणच्या आदिवासी शैलीची छाप असलेल्या लहान गुंफांच्या स्थापत्याचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की पाशुपत आणि सात्वत संप्रदायांचा प्रसार बौद्ध धर्माचा अंगीकार केलेल्या आदिवासीमध्ये झपाट्याने झाला असावा. चंढाळा येथील बौद्ध लेणीचे छत बृहदश्मयुगीन चूलतवा स्वरूपाच्या स्मारकाप्रमाणे गोलाकार दगडी तळी ठेवून करण्यात आले होते. तर मृतांचे अवशेष ठेवण्यासाठी कोरलेल्या आदिवासीच्या गुंफाचा उपयोग शिवालय म्हणून वाकाटक काळात केल्याचे दिसून येते. वाकाटक काळात आदिवासीच्या अटवी राज्यात घडून आलेल्या नागरीकरणाचा हा परिणाम आहे असेच म्हणावे लागते. गडचिरोली येथील लक्कामेटा येथील विटांच्या वास्तू आणि भटाळा, देऊळवाडा आणि भांदक येथील नरसिंह गुंफा या नवीन परिवर्तनाच्या साक्षी आहेत असेच म्हणावे लागेल.

गडचिरोली जिल्ह्यातील उत्खनने

हैद्राबादमध्ये १९४८ साली 'पोलीस अॅक्शन' झाल्यानंतर मुंबई राज्याची पुनर्रचना झाली. राज्यातील पुराभिलेख खात्याला निजामाच्या मुलखातून अधिकारीवर्ग व अनेक संरक्षित स्मारके जोडण्यात येऊन एक नवे पुराभिलेख व पुरातत्त्व विभाग असे खाते निर्माण झाले, व ते पुरात्तत्त्वाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरले. १९६० साली राज्याची पुनर्रचना होऊन त्यात मध्य प्रांतातील विदर्भ हा नवा प्रशासकीय विभाग निर्माण झाला. त्याचबरोबर मध्यप्रांताच्या राजधानीतील, म्हणजे नागपूरमधील, १०० वर्षांहून प्राचीन असे 'मध्यवर्ती संग्रहालय' हे पुरातत्त्व विभागाचा भाग बनाले. या राज्य पुनर्रचनेचा असाही एक परिणाम मूलचेरा येथील लंबगोलाकृती बांधकामाची रचना
झाला, की नागपूर ही दुसरी राजधानी झाल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे डिसेंबर महिन्यात घेण्याची प्रथा सुरू झाली. १९७७ साली संचालक म्हणून पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी विदर्भातील आठ जिल्ल्यांचे सर्वेक्षणाचे कार्य उत्साहाने हाती घेतले. त्यातूनच रामटेक येथील वाकाटक मंदिरे, पवनार येथील शिल्पे, भांदक व आसपासच्या भागातील गुंफा, सालबर्डी, गोगाव, नगरधन, मनसर, पेच नदीवरील धोबीगोटानाला येथील पुरावशेष, पातूर येथील गुंफा या एरवी दुर्लक्षित असलेल्या पुरास्थळांचा व अवशेषांचा अभ्यास नव्याने परत हाती घेण्यात आला. त्यातून अनेक देवालये, शिल्पे, म्हणजे वाशिमला वाकाटकांची नाणीही हाती आली. विदर्भ विभागातील सहाय्यक संचालक (पुरातत्त्व), तंत्रसहाय्यक, जतन साहाय्यक व छायाचित्रकार यांच्या चमूमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मला बरेच दिवस नागपुरात रहाणे आवश्यक असल्याने अधिकारी वर्ग म्हणजे पद्माकर मुळे, वेरुळकर, दासरवार व दोन छायाचित्रकार म्हणजे भाऊ आणि जुनघरे यांच्यारी मोठ्या उत्साहाने, नव्याने लागलेल्या शोधांची चर्चा होत असे. आज मला नेमके वर्ष आठवत नाही, परंतु त्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मोठे तंग वातावरण निर्माण झाले होते. गोंड राजदेशाचा वारसा असलेल्या धर्मराव आत्राम यांना नक्षलवाद्यांनी पकडून पळवून नेले होते. नक्षलवाद्यांच्या शोधामध्ये महसूल आणि पोलीस खाते गर्क होते. अशा भीतीच्या वातावरणात सर्व शासकीय अधिकाथांना परिपत्रकाद्वारे पूर्वसूचना देण्यात आली होती, की त्यांनी ग्रामीण व त्यातल्या त्यात जंगली भागांत दौरा करताना मुलकी व पोलीस विभागाचे साहाय्य घ्यावे यावे. नागपूर कार्यालयातील त्यावेळचे तंत्र साहाय्यक बोरकर यांनी अशी बातमी आपणाली की आताच्या गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या धानोरा था गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर लक्कामेटा या ठिकाणी विटांनी बांधलेल्या, वाकाटककालीन वास्तूंचे `अवशेष एका टेकडावर आढळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मूलचेरा येथे (तालुका- चामोरोशी) आणि तेथूनच जवळ एक-दोन मैलावर विवेकानंदपूर येथेही असेच अवशेष आढळल्याने त्या ठिकाणी, नागरा येथील उत्खनन संपल्यानंतर, हे काम हाती घ्यावे, असा कार्यालयातील सर्वांचाच आग्रह होता, या नव्या बातमीमुळे त्याबद्दलचा उत्साहही वाढला होता, नब्धा परिपत्रकाप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली या भागात नक्षलवाद्यांचे प्रस्थ असल्यामुळे, चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी व पोलीस सुपरिटेंडेंट यांना, दौरा हाती घेण्याआधी, वर्दी देणे भाग होते. भेट घेतल्यानंतर जिल्हाधिका-यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले, आणि पोलीस अधीक्षकांच्या मदतीने व सल्ल्याने दौरा करा, अशी सूचना केली. पोलीस अधीक्षकांनी पर्यवेक्षकांनी अर्थातच जंगलात दौरा असल्यामुळे गणवेशातील नाही, तरी साध्या वेषातील पोलीसबरोबर असल्यास चिंता रहाणार नाही, असे सुचविले. बोरकर हे गडचिरोलीचेच मूळ रहिवासी, व त्या भागात सतम दौरा करणारे, काही झाले तरी पोलिसांना बरोबर घेऊ नका, म्हणजे नक्षलवाद्यांना आपल्याविषयी शंका येणार नाही, असे बबेरकरांचे मत. बोरकरांनी प्रथम जवळच्या वनाधिकाथांच्या घरी जाऊ व तेथून पुढे लक्कामेट्याला पोहोचण्यासाठी त्यांची मदत घेऊ, त्यांना जंगलाची पूर्ण माहिती असल्यामुळे आपण इच्छितस्थळी सुरक्षितपणे पोहोचू, असे आश्वासन दिले.

मांढळ येथील उत्खननात आढळलेले वाकाटककालिन विटांचे बांधकाम

वनाधिकाथांनी आमचे स्वागत केले आणि आपली चार विश्वासातली माणसे दिली. वनखात्याच्या कार्यालयापर्यंतचा प्रवास जीपनेच झाला. परंतु पुढे मात्र आम्ही पायीच गेलो. सुमारे तीन-चार कि. मी. चालल्यानंतर आम्हाला ते ठिकाण गवसले. विटांचे अवशेष असलेले ते टेकाड पुराणे असले तरी आम्हाला अपेक्षा होती त्याप्रमाणे ओसाड नव्हते. टेकाडावर दोन-तीन ठिकाणी आदिवासींची कुटुंबे आली होती. काही धार्मिक कार्यक्रम बालू होता. बोरकरांनी त्यांच्यापैकी एका वृद्ध माणसाला विचारले असता त्याने सांगितले की हे आमचे धार्मिक ठिकाण असून इथे पूजेसाठी आम्ही फार लांबून आलो आहोत. थोडे बारकाईने निरीक्षण केले असता बांबूच्या काड्यांना सप्तरंगाच्या पताका लावून ते झेंड्यासारखे रोवले होते. याविषयी विचारले असता तो म्हणाला, की यातील सहा झेंडे, पाच पांडव आणि त्यांची आई कुंती हिचे असून सातवा झेंडा भगवान कृष्णाचा आहे. त्यांना पूजा घातल्याने संकट, रोगराईचा नाश होतो. आणि म्हणून वर्षातून एकदा तरी आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतो. या जागेचे नाव लक्कामेटा आहे. या ठिकाणी आपली आई कुंती हिच्याबरोबर पाच पांडव इथे राहाण्यासाठी आले होते. दुष्ट दुर्योधनाने हे घर लाखेचे बांधले होते. त्याला आग लावल्यानंतर भगवान कृष्णाने त्यांना त्याहून वाचविले. झोपडी बांधताना लाखेचा वापर केल्यामुळे ही सगळी टेकडीच, झोपडी जळाल्यानंतर लाल रंगाची झाली आहे म्हणून आजही आम्ही त्याला 'लक्कामेटा' असे म्हणतो.
    विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन वास्तूंचे स्पष्टीकरण देणारी आदिवासींची कथा ऐकल्यानंतर आम्हा सर्वांनाच मौज वाटली. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'महाभारत'सारख्या महाकाव्यातील कथा आणि आख्याने आदिवासींच्या, त्यातल्या त्यात पूर्व विदर्भातील गोंड आणि इतर जमातींच्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धा यांचा भागच झाल्या आहेत. एवढेच नाही, तर हे आदिवासी त्यात पूर्णपणे समरस झाले आहेत, असे दिसते. तीजनबाईचा नागरा येथील शिवमंदिरात महाभारतातील आख्यानावर कीर्तन-निरूपणाचा संगीतमय कार्यक्रम पाहिला-ऐकल्यानंतर त्याविषयी आमची खात्री झाली होती, परंतु लक्काभेटा येथील अनुभवानंतर त्याला आणखी दुजोराच मिळाला. प्राचीन भारतीय इतिहासाची पुनर्रचना करताना पुरातत्त्वाची जोड देणे आवश्यक आहे, यात शंका नाही.
      परंतु अशी जडणघडण करताना मानववंशशास्त्राची मदत घ्यावी लागेल, हेही स्पष्ट होते. इतिहासपूर्व काळातील (प्रोटो हिस्टोरिक पीरियड) व पूर्वइतिहास काळातील (अर्जी हि स्टोरिकल पीरियड) सांस्कृतिक जीवन जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्येत एक नवी शाखाच उभारली गेली आहे. तिचे नाव आहे एथ्नो-आर्किऑलॉजी, आदिवासींच्या धार्मिक, सामाजिक, परंपरा व त्यांचा आर्थिक इतिहास जाणून घेतल्याशिवाय भारतीय समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचे आकलन होणे शक्य नाही. हीच गोष्ट लक्कामेट्यांच्या अनुभवानंतर आमच्या लक्षात नव्याने आली.
   विदर्भ या जनपदाचे नाव विद्वानांना अगदी ब्राह्मण ग्रंथाच्या काळापासून माहीत आहे. वैदर्भि कौण्डिण्य हे नाव तसेच विदर्भजनपदातील श्वान त्यीच्या निर्भय आणि आक्रमकपणासाठी प्रसिद्ध होते. येथील कौण्डिण्यपूर नगर हे रुक्मिणीच्या स्वयंवरामुळे, नलदमयंतीच्या कथेमुळे, तसेच रघुकुळातील अजराजाची पत्नी इंदुमती हिच्यामुळे रामायण-  महाभारतामध्ये सुप्रसिद्ध होते. वेगळ्या शब्दांत गंगाखोन्यातील नागरीकरणाच्या प्रक्रियेत आर्य संस्कृतीचा विन्ध्यापलीकडील जो प्रसार आहे त्यामध्ये विदर्भ हा मोठा दुवा होता. डॉ. अमरेन्द्र नाथ यांनी अडम येथे केलेल्या उत्खननामुळे विदर्भातील मानवी संस्कृतीच्या निरनिराळ्या टप्प्यांचे रेखीवपणाने चित्रण करता येते. यावरून असे लक्षात येते की प्रागैतिहासिक काळातील आंतर अश्भयुगापासून (मेसो लिथिक म्हणजे इ.स.पू. २००० व अगोदर पासून) ते सातवाहनानंतर उदयास आलेल्या महरठीच्या काळापर्यंतचा (म्हणजे इ.स. २५०) सांस्कृतिक आलेख पाच अवस्थामध्ये झाला, हे लक्षात येते. त्यातील पहिला कालखंड, यामध्ये मानवाने अजून मातीची भांडी करण्याची कला हस्तगत केलेली नहती. दुसरा कालखंड हा ताम्रपाषाणयुगाचा म्हणजे इ. स. पू. १५०० ते १००० इतका होता. तर तिसरा कालखंड हा बृहदश्मयुगाचा म्हणजे इ. स. १००० ते ५०० इतका होता. चौथा कालखंड हा मौर्यपूर्व ते मौर्यकाळाचा म्हणजे इ.स. पूर्व. ५०० ते १५० इतका होता, तर पाचवा कालखंड हा भद्र, सातवाहन आणि महरती यांच्या कारकीर्दीच्या समकालीन, म्हणजे इ.स. पू. १५० ते इ.स. २५० इतका होता. वेगळ्या शब्दात गंगाखो-यातील नागरीकरणाची प्रक्रिया जरी बरीच आधी सुरू झाली असली तरी विदर्भातील अडम येथील तिच्या पाऊलखुणा इ.स. पू. ५०० च्या आधी जात नाहीत, चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथील अशोककालीन शिलालेख हे स्पष्टपणे दाखवितो की विदर्भ हा उत्तर आंध आणि कर्नाटक याप्रमाणेच मौर्य साम्राज्याचा एक भाग होता.
     वाशिम येथील विटांच्या बांधकामातील लंबरौलाकृती रचना

पवनी येथील स्तूपावरून मौर्यकाळात विदर्भातील नागरीकरणाच्या प्रक्रियेने या भागात आपले पाय पक्के रोवले होते, ही गोष्ट स्पष्ट होते. तसेच पूर्व विदर्भ हा गंगाखोच्यातील कौशाम्बी (प्रयाग) व वाटेतील निषध देशाच्या मागे विदर्भातील कौंडिण्यपूर येथे पोहोचत होता. तेथून तो पवनी येथील बौद्ध संधाराभची वस्ती ओलांडून आजच्या चंद्रपूर गडचिरोलीतील झाडीतून (या भागातच देवटेक येथे मौर्य शिलालेख सापडला आहे) आंध्रप्रदेशात अमरावतीपर्यंत पोहोचत होता. मौर्यकाळात विदर्भ जनपद मौर्य साम्राज्याचा भाग होते, हे देवटेक (जिल्हा-चंद्रपूर) येथील शिलालेखामुळेच सिद्ध होत नाही, तर मालविकाग्निमित्र या शुगराजा अग्निमित्र याच्या चरित्रावर आधारलेल्या कालिदासाच्या नाटकावरूनही हे लक्षात येते. अग्निमित्रा (इ.स.चे २ रे शतक) च्या काळात विदर्भावर राज्य करणान्या सामंतांच्या घराण्यातील दोन राजपुत्रांनी गादीवर हक्क सांगितल्याने अग्निमित्राने सैन्य पाठवून ही बंडाळी शामवली; आणि दोघा भावात सलोखा निर्माण करून वर्धा नदीच्या पूर्वेस आणि पश्चिमेस त्यांना राज्य करावयास सांगितले. तेव्हापासूनच वरदा नदीच्या पलीकडील तटावर असल्यामुळे पश्चिम विदर्भाकडील भाग 'वरदातट' म्हणजे 'वन्हाड' म्हणून ओळखला जात असावा. तर नंतरच्या काळात पूर्व विदर्भाला तेथील धनदाट अरण्यामुळे 'झाडिमंडळ' असे नाव मिळाले. या भागातूनच अधि प्रदेशातील हिन्यांच्या खाणीसाठी मार्ग जात असल्याने महाभारतकाळात त्याला 'वजाकर' (हिन्यांची खाण) असे नाव मिळाले. हा हैद्राबाद संस्थानामधील भाग वाकाटक काळात वाशिम येथून राज्य करणाऱ्या विन्ध्यशक्ती द्वितीयाच्या (इ.स.चे ४ थे प्रपंच करण्यामागील हेतू असा की, आंध्रप्रदेश आणि गंगाखोरे यांच्यामधील दळणवळणासाठी विदर्भशतक) राज्यात मोडत होता. हा सर्व हा दुवा होता, आणि सातवाहन काळापर्यंत हा दुवा पक्का झालेला होता. या गोष्टीचे प्रत्यंतर आपल्याला विटामधील बांधकामाच् पुराव्यावरूनसुद्धा लक्षात येते. अमरावती येथील जगप्रसिद्ध स्तूपाची बांधणी एका विशिष्ट तंत्राने करण्यात आली. शक्य तितक्या कमी विटांचा वापर करून आकाराने मोठा स्तूप बांधावयाचा झाल्यास स्तूपाच्या पोटामध्ये उभ्या-आडव्या भिंती बांधून कूप तयार करावयाचे, व त्यासभोवती विटांची गोल भिंत बांधून मधले चौकोनी खड्डे माती व विटांचे भंगार टाकून ती जागा भरून काढायची या तत्त्वाचा वापर करून मौर्य-शुंगकाळात पवनी येथील दोन स्तूप बांधण्यात आले. हेच तंत्र वापरून सातवाहन काळात 'तेर' येथील स्तूप बांधण्यात आला होता. अशाच तंत्राचा वापर अमरावती (जग्गरथ्यपेट्ट) येथील स्तूपात करण्यात आला असल्याने, हे तंत्र विदर्भातूनच नात गेले असावे, असा विद्वानांचा कथास आहे. उत्तरेत वायव्य सरहद्द प्रति आणि अफगाणिस्तान येथील प्राचीन स्तूपातही हे तंत्र वापरले असल्याने, व्यापारी मार्गामार्फत हे तंत्र दक्षिणेत पोहोचले असावे. जाता जाता हे सांगावयास हरकत नाही, की महाभारताच्या सभापर्वातील धर्मराजाला निरनिराळ्या राजांनी आणलेल्या नजराण्यांच्या माहितीवरून मौर्य शुरकाळात निरनिराळ्या जनपदात तयार होणारा व्यापारी माल व तो ने-आण करणा-या सार्थवाहांचे दळणवळण याविषयी डॉ. मोतीचंद्र यांनी फारच उपयोगी असे निष्कर्ष काढले आहेत. आणि त्या निष्कर्षांना


मूलधेरा मंदिराचा आराखडा

मुलचेरा येथील लंबगोलाकृती बांधकामाची रचना


परंतु नंतरच्या काळात गावकथांनी खोदलेल्या खनुचामुळे हे अवशेष अगदी ध्वस्त स्वरूपात सापडले. त्यामानाने विवेकानंदपूर येथील विटांच्या देवळाचे अवशेष बन्या अवस्थेत सापडले असे म्हणता येईल. हे लंबगोलाकार देऊळ दक्षिणोत्तर ६.४० मी. लांब, व पूर्व-पश्चिम २.४० मी रुंद आढळले. याच्या भिंती ६५ सें.मी. इतक्या रुंद होत्या. या मंदिराचे अवशेष त्याच्या पायाच्या वर सापडलेले नाहीत. परंतु त्याच्या बांधणीचा थोडा सूक्ष्म अभ्यास केला असता असे लक्षात आले की सर्वांत खाली एका विस्तृत भागावर जांभ्या दगडाच्या मुरुमाचा एक थर घालण्यात आला होता. त्यावर मुरबाड मातीतच बसविलेले दगड, गोटे आणि चिपीच्या आणखी तीन भिती आणि त्या चिकण मुरमाड मातीत घट्ट बसवलेल्या होत्या, यावर विटांच्या तीन गोलाकार भिती रचण्यात आल्या. त्या एकात एक तीन होत्या. आतील भित ५८ से.मी. रुंद तर बाहेरील ७५ सें.मी. रुंद होती. या एकात एक असलेल्या तीन भिंतींना लहान लहान भिंती नीट जोडून कूप करण्यात आले होते आणि ते माती आणि विटकरीचा भराव टाकून भरण्यात आले होते. वेगळ्या शब्दात पवनी येथील मोठ्या स्तूपाच्या बांधकामात जे तंत्र वापरण्यात आले होते, त्याचाच मूलचेरा, विवेकानंदपूर या ठिकाणी वापर करण्यात आला होता, अशाच पायावर पुढे हे लंबगोलाकृती (ओव्हल) देवालय उभारण्यात आले होते. पाथावर निरनिराळ्या ठिकाणी खांब रोवण्यासाठी छिद्रे निर्माण केली होती. लंबगोल गर्भगृहाच्या सभोर मुखमंडप होता, अंतराळ नव्हते. अंतराळ नसलेले मंदिर बांधण्याची प्रथा मांढळ येथील बोगीहुडकीच्या व वन्हाडी तलावा वरील व देवळात यानंतरच्या काळात वापरल्याचे आपण पाहिले आहेच, मगधातील अशा प्रकारच्या प्राचीन लखगोलाकृती देवळांचा काळ विद्वानांनी इ.स. चे पहिले-दुसरे शतक इतका जुना मानलेला आहे. येथील विटांचा आकार व विटांची घडण इतर प्राचीन वाकाटक काळातील मंदिरात वापरलेल्या विटांप्रमाणेच विटांची असल्याने ही देवळे तिसथा शतकाच्या उत्तरार्धात अथवा चौथ्या शतकाच्या सुरवातीस बांधली गेली असावी आणि विदर्भातील वाकाटककालीन सर्व, प्राचीन देवळे म्हणून ती गणता येतील,
विटीच्या बांधकामात वापरलेल्या तंत्रावरून तसेच अशा प्रकारचे बांधकाम झाडीमंडळाच्या अगदी खोलवरच्या प्रदेशात आढळल्याने गंगा खोऱ्याातील नागरीकरणाची प्रक्रिया समृद्ध व्यापारी मार्गाच्या मार्फत आदिवासींच्या प्रदेशात किती प्रभावीपणाने पसरली होती, हे गडचिरोली जिल्ह्यातील उत्खननावरून सहज लक्षात येते आणि त्याचबरोबर पूर्वेतिहास काळातील सांस्कृतिक इतिहासाची जडणघडण करताना निरनिराळ्या जनपदातील आर्थिक हितसंबंध व त्यातील आदिवासींचा सहभाग या बाबींचा विचार केल्याशिवाय प्राचीन सांस्कृतिक जीवनाचे चित्रण पूर्ण होणार नाही, ही बाब अधोरेखित होते.

response.lokprabha@expressindia.com
 

मनसर आणि नगरधन येथील उत्खनने

आतापर्यंत झालेल्या उत्खननांमध्ये मनसर व  नगरधन येथील उत्खनने ही महत्त्वाची आहेत आणि वाकाटक पुरातत्त्वाच्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरणार आहेत. आणि त्यामुळेच नगरधन येथे डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाने राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन-तीन वर्षांत हाती घेतलेल्या उत्खननांसाठी त्यांचे उभयतांचे अभिनंदन करतो. प्रवरसेन द्वितीयाची माता राजा महिषी प्रभावतिगुप्ता हिची मुद्रा या उत्खननात प्राप्त झाली आहे, हे या उत्खनन कार्याचे महत्त्व अधोरेखित करते. डॉ. ए. के. शर्मा आणि जगत्पती जोशी या जोडगोळीने १९९८ ते २००४ दरम्यान केलेल्या गवेषण-उत्खननकार्यातून हिडिंबा टेकडीवर हाती घेतलेल्या कामाचे स्वरूप अनमोल आहे. पण हल्ली चालू असलेल्या गवेषण-उत्खनन कामाचे महत्त्व समजून घेण्यासाठी टी. ए. वेलस्टेड या संशोधकाने १९३४ साली मनसर येथील पुरातत्त्वीय अवशेषांचा लेखरूपाने घेतलेला आढावा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.


   वेलस्टेड यांनी १९३४ साली जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलमध्ये सादर केलेल्या शोध निबंधाचा विषय तीन भागात आकळता येईल. १) त्या काळापर्यंत वाकाटकांचे पाषाणावर कोरलेले व ताम्रपटावरील मिळून दहा लेख प्राप्त झाले होते. ज्या ठिकाणी हे लेख होते किवा सापडले होते त्यावरून वाकाटकांची राजधानी कुठे असेल याचा वेलस्टेड यांना अंदाज बांधावयाचा होता. २) बहुतांश लेखांची प्राप्तिस्थाने नर्मदेच्या दक्षिणेस व जेथून ताम्रपट वितरित केले ती ठिकाणे प्राचीन विदर्भातच असल्यानेही राजधानी नंदिवर्धनचा शोध रामटेकच्या आसपास घेण्याचे त्यांनी ठरविले. दहा लेखांपैकी चार ताम्रपट रामटेकच्या परिसरात मिळाल्याने राजधानी रामटेकजवळच असावी या तर्काला दुजोरा मिळाला. मनसरजवळील मँगनीझच्या खाणकामामुळे साडेचार फूट रुंदीचा विटात बांधलेला बारा फूट खोल कूप खाणकाम चालू असताना उघडकीस आल्याने मन्सर परिसरातील विटांच्या बांधकामाचा, काही देवळांच्या अवशेषांचा व नांदपूर येथील पुरावशेषांचा त्यांनी आढावा घेतला. ३) या निमित्ताने वाकाटकांचे मूलस्थान, त्यांची पहिली पुरिका येथील राजधानी, गुप्तराजांच्या गंगेच्या खोऱ्यातील प्रभावामुळे त्यांनी विंध्याच्या उत्तरेतून विदर्भात केलेले स्थलांतर यांविषयीच्या काशी प्रसाद जायस्वाल व इतर इतिहासकारांच्या मतांचा त्यांनी परामर्श घेतला. रामटेक परिसरातील पुरातत्त्वीय ठिकाणांच्या व तेथील पुरावशेषांच्या आढाव्यावरून ते अशा निष्कर्षाप्रत आले की आद्य पुरुष, सेनापती विध्यशक्ती (म्हणजे इ.स. सुमारे २६०-३३० या काळातील सम्राट प्रवरसेन (प्रथम) चा पिता) हा भारशिव नागांचा सेनापती व सामंत म्हणून पहिल्यापासूनच विदर्भात कार्यरत असावा. व गुप्तांच्या आक्रमणामुळे गंगा-यमुना खोऱ्यांतील नागवंश परास्त झाल्यामुळे, विध्यशक्तीचा पुत्र प्रवरसेन (प्रथम) याला कोणाचा सामंत म्हणून राहावयाची गरज राहिली नाही, व तो सार्वभौम राजा म्हणून ताब्यातील प्रदेशावर (म्हणजे नर्मदेच्या दक्षिण तीरावरील आताचा 'मध्यप्रांत' (central provinees) व विदर्भावर राज्य करू लागला. त्याची नवी राजधानीही विदर्भातच असावी. मनसर येथे व आसपास मोठ्या प्रमाणावर धार्मिक व लौकिक वास्तू असल्या तरी एकूण भौगोलिक रचनेवरून, भिवगड, घुग्गुसगड व खिंडसी येथील, चुन्याचा वापर न करता शुष्कसंधीत (dry masonry) दगडामध्ये बांधलेल्या तटबंदीसारख्या भिंतीवरून पेंचनदी व धोबी-गोटा-नाल्याच्या बेचक्यात वसवलेले आजचे नांदपूरच प्राचीन नंदिवर्धन असावे. वा. वि. मिराशी व इतर विद्वानांनी, रामटेकच्या दक्षिणेस असलेल्या, नगरधनच्या बाजूने ते नंदिवर्धन असल्याचा कौल दिला होता. पण तेथील विटांचे आकारमान, इतर गुप्त पुरास्थळी असते (१८०९०७) त्यापेक्षा कमी असल्याने, व मध्ययुगीन विटांसारखे असल्याने नांदपूरच बंदिवर्धन असावे असा त्याने निर्वाळा दिला. वेलस्टेड यांच्या मते दोन ठिकाणी उत्खनन हाती घेणे अगत्याचे ठरले. ती ठिकाणे म्हणजे नांदपूर आणि मनसर ही होत. धोबीगोटा नालापासून ते नांदपूरपर्यंत जवळ अनेक विटांच्या बांधकामाचे अवशेष विखुरलेले आढळतात. त्यातील एक बांधकाम हे राजवाड्याचेच अवशेष असावेत, तर दुसऱ्या ठिकाणी एका उंचवट्यावर दगडी शिवलिंग (पाच फूट उंच) असल्याने ते एका मोठ्या शिवालयाचे अवशेष असावेत, असे त्यांना वाटले. अशाप्रकारे अष्टकोनी विष्णुभाग न दाखविता फक्त ब्रह्मभाग आणि रुद्रभाग दाखवून घडविली असल्यास ती राष्ट्रकूटपूर्वकालीन असतात, अशा निष्कर्षाप्रत विद्वान आले आहेत. वेलस्टेड असेही सांगतात की अशी प्राचीन घडण असलेली व त्याच आकाराची शिवलिंगे ही मनसर, रामटेक परिसरात सापडलेली आहेत. रुद्रसेन द्वितीय, त्याची पट्टराणी प्रभावतीगुप्ता आणि नातू पृथ्वीषेण द्वितीय वगळता नंदिवर्धन शाखेच्या राजघराण्यातील सर्व व्यक्ती माहेश्वर म्हणजे शिवभक्त होत्या, शैव परंपरेची ही लोकप्रियता लक्षात घेता, आणखी सहा-सात शिवालये मनसर परिसरात असली, तर आश्चर्य नाही. मनसर भागातील उत्खनने :
 मनसर येथील मँगनीज खाणीमध्ये खोदकाम करीत असताना बारा फूट खोल आणि साडेचार फूट लांब-रुंद विटांचा कूप (रिंग वेल) सापडल्याचा उल्लेख वर आलेलाच आहे. त्यात तळाशी विटांनी बांधलेली लादी आढळून आली. आणि त्यावर जवळजवळ २०० मातीची भांडी एकावर एक रचून ठेवलेली असावीत. त्यापैकी एका भांड्यात राख आणि काही मानवी हाडे आढळून आली

▲ शिव-वामन

त्यामुळे ती दफनभूमीची जागा तर नाही ना, असा संशय वेलस्टेड यांना आला. पुरातत्त्वीयदृष्ट्या अर्थपूर्ण असे बांधकामाचे अवशेष तिथून थोडे दूर असलेल्या एका टेकडीवर वेलस्टेड यांना आढळून आले. या स्थळाचा ते यज्ञवेदीची जागा (अल्टार साइट) असा उल्लेख करतात. या विटांनी रचलेल्या ठिकाणाच्या मध्यभागी खोलगट जागेत जळलेल्या लाकडाचे अवशेष, आगीत जाळून लालसर झालेली माती, मातीची भांडी आणि घोड्याची हाडे सापडली. येथे पूर्वी झालेल्या भूकंपात एकावर एक रचून ठेवलेल्या भांड्यांचा चुरा होऊन त्यांच्या खापरांचा ढीग वेलस्टेड यांना आढळला. आपल्या लेखात अशी १५ निरनिराळ्या आकारांच्या भांड्यांची, एका बाहुलीची आणि वरवंट्याची छायाचित्रे त्यांनी दिली आहेत.
   या दोन स्थळांव्यतिरिक्त महत्त्वाचे टेकाड वेलस्टेड यांना मनसर तलावाच्या पूर्वेस ११ एकर एवढ्या विस्तृत जागेत आढळून आले. टेकाडाची उंची जवळजवळ ४० फूट इतकी असून गावकऱ्यांनी त्यातील बऱ्याचशा विटा चोरलेल्या होत्या. तेथील बांधकामाचा स्थूल आराखडा वेलस्टेड यांच्या लक्षात आला. टेकाडाचा वरचा भाग गोल असल्यामुळे १५५०८५ फूट लांब-रुंद असलेले हे आयताकृती बांधकाम एखाद्या बौद्ध विहाराचे असून, मध्यभागी चौथऱ्यावर स्तूप असेल असा काही पूर्वीच्या संशोधकांचा समज झाला होता. वेलस्टेड त्यावर असे भाष्य करतात, की हे एखाद्या भव्य राजवाड्याचेही अवशेष असू शकतात. त्यांनी या बांधकामाचे एक मानचित्रही (प्लान) आपल्या लेखासोबत जोडले आहे.


▲ मुद्रा (Seals) - श्री प्रवरस्य, श्री प्रभाकु, नंदिवर्धन

 बौद्ध विहाराची जागा आणि मनसर तळ्याकाठची हिडिंबा टेकडी, यामध्येही दोन लहान टेकडे त्यांना आढळली. याही काळात हिडिंबा टेकडीवर त्यांना बरीच देवळे आणि अनेक मूर्ती आणि शिल्पांचे अवशेष आढळून आले. उत्खनन हाती घेतल्यास महत्त्वाचे वास्तू अवशेष सापडतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

▲ उतारावरील देवळ्या

▲ आपण-वीथी (देवळासमोरील दुकानांची रांग)             ▲ उमा-महेश

     सन १९७५ मध्ये हिडिंबा टेकडीच्या ईशान्य उतारावर गावकऱ्यांना एक बैठी सुंदर आणि सुबक शैव मूर्ती आढळली. नागपूर विद्यापीठाचे त्यावेळचे कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते यांनी प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्वाचे प्रमुख प्रा. शां. भा. देव यांच्याबरोबर मनसरला भेट दिली. शां. भा. देव यांच्या मते ही मूर्ती 'बटुकभैरवा'ची असावी. मूर्ती एरव्ही एखाद्या धष्टपुष्ट लंबोदर अशा गणांचीच वाटली असती; परंतु एखाद्या महाराजाप्रमाणे गुडघा मुडपून बसलेल्या या देवतेच्या लांछनांवरून तसेच एका बाजूला ज्याच्या कुरळ्या जटा वळल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला कपाळ आणि चंद्र ज्याने धारण केले आहेत, तो प्रत्यक्ष शिवभैरवच असावा, असे वाटणे सहाजिकच आहे. त्याने आपला पुढील डावा हात मोठ्या ऐटीत गुडघ्यावर ठेवला असून वरच्या हातात नीलकमल धारण केले आहे. समोरच्या उजव्या हातात अक्षमाला असून खालच्या हातात रत्नांचा पुजका ठेवला आहे. लोडाला टेकून बसलेल्या या मोहक मूर्तीच्या गळ्यात मोत्याची माळ असून मध्यभागी रत्नाचे पदक आहे. आणि खांद्यावर मोत्यांचे यज्ञोपवीत आहे.

प्राचीन मनसर नकाशा

जटामुकुटावर कवटी धारण केलेली असल्यामुळे व एखाद्या गणाप्रमाणे देव ठेंगणा असल्यामुळे प्रा. देवांनी त्याची ओळख 'बटुकभैरव' अशी केली होती. डॉ. शिवराम मूर्ती यांनी मात्र आपल्या रुद्रपाठावरील मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने लिहिलेल्या पुस्तकात 'न्हस्व' या शिवाच्या बिरुदाशी मूर्तीचे वर्णन जुळत असल्याने त्याची ओळख 'हस्व-शिव' अशी पटवली आहे. १९९८ ते २००४ या काळात जगत्पती जोशी व डॉ. ए. के. शर्मा यांना हिडिंबा टेकडीच्या उत्तरेकडील उतारावर व मध्यभागी अशी दोन शिवालये उत्खननात आढळली. या दोन वाकाटककालीन मंदिरांपैकी प्रवरेश्वर-देवकूल म्हणून ज्याचा ताम्रपटात उल्लेख येतो, त्या मुख्य देवालयात प्रवरेश्वर द्वितीय (इ. स. सुमारे ४१० -४४०) याने मुख्य मूर्ती म्हणून या 'हस्व-शिवाची' प्रतिष्ठापना केली असावी, असा कयास डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

▲ लंबगोलाकृती चैत्यगृह, मनसर


कदाचित् या मूर्तीचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व विभागातील प्रप्राठक डॉ. वर्मा यांनी १९७८ मध्ये एक चाचणी उत्खनन हाती घेतले. परंतु विटांच्या काही बांधकामाव्यतिरिक्त कुठलेही महत्त्वाचे असे पुरावशेष उत्खननात हाती लागले नाहीत. हिडिंबा टेकडीच्या

रामटेक येथील वाकाटक पुरास्थळ

▲ श्येनमचिती, कूर्मचिती व पुरुषमेध

पश्चिम उतारावरील खडकावर शंख लिपित कोरलेले अभिलेख भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या केंद्र सरकारच्या खात्याने बऱ्याच वर्षांपूर्वी संरक्षित म्हणून जाहीर केले होते. जवळच उतारावर सापडलेली -हस्व-शिवाची मूर्ती त्या खात्याने दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात, एक महत्त्वाचा वाकाटक पुरावशेष म्हणून प्रदर्शित केली आहे. या परिसराचे महत्त्व ओळखून तथाकथित बौद्धविहाराचे नागपूर येथील केंद्रीय उत्खनन शाखेने शास्त्रीय उत्खननही हाती घेतले. टेकडीच्या वरील स्तूपासारख्या दिसणाऱ्या गोलाकार भागाचे उत्खनन केले असता स्तूपाच्या अंडाऐवजी कक्ष सापडल्यामुळे तेथील तीन मजली उंच वास्तू, राजवाडाच असावा अशी खात्री पटली. मध्यंतरीच्या काळात नागपूर येथील बोधिसत्त्व नागर्जुन स्मारक संस्थेचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुराई सराई हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे अधिकारी ए. के. शर्मा यांना भेटले. त्यांना त्यांनी विनंती केली की, आपण मोठ्या प्रमाणावर उत्खनन केल्यास बौद्ध स्तूपाचे अवशेष हिडिंबा टेकडीवर निश्चितच सापडतील. डॉ. शर्मा यांना या प्रकल्पाच्या महत्त्वाची कल्पना आली होती, आणि म्हणून भंतेजींना त्यांनी असा सल्ला दिला की, स्मारक संस्थेचे उद्दिष्ट, संशोधनाचा समावेश करून अधिक व्यापक केल्यास, आणि संस्थेच्या कारभारी मंडळात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे निवृत्त महानिर्देशक जगत्पती जोशी यांना सल्लागार म्हणून निमंत्रित केल्यास प्रस्तावित योजना सुरळीतपणे पार पडेल. त्यानुसार १९९८ ते २००४ या काळात हिडिंबा टेकडी व तिच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणावर जगत्पती जोशी व शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे उत्खनन आले.

करण्यात या हिडिंबा टेकडीवर घेतलेल्या पद्धतशीर उत्खननात एकूण अकरा स्तर आढळून आले. ५ ते ११ स्तरांचा कालखंड पहिला, चार आणि तीन मिळून कालखंड दुसरा, तर दोन आणि एक मिळून कालखंड तिसरा अशाप्रकारे कालखंड कल्पिण्यात आले आहेत, कालखंड पहिला हा मौर्य ते शुंग म्हणजे इ. स. पू. ३०० ते २००. कालखंड दुसरा हा सातवाहन काल म्हणजे इ. स. पू. २०० ते इ. स. २७५, कालखंड
 तिसरा म्हणजे वाकाटक काल इ. स. इ. स. २७५ ते ५५०. कालखंड चौथा हा महाविहार काल म्हणजे इ. स. ५५० ते ७००. कालखंडाची विभागणी ही त्या स्तरसमूहात सापडणाऱ्या मातीच्या भांड्याच्या प्रकारांवरून, वास्तु-शिल्पांच्या शैलीवरून आणि नाण्यांच्या आधारे करण्यात आली आहे. चौथा कालखंड हा जमिनीवर आढळलेल्या बौद्ध विहार आणि स्तूपांच्या आधारे ठरविण्यात आला आहे. डॉ. शर्माच्या मते हिडिंबा टेकडीवर कालखंड १, २ आणि ४ यांच्या दरम्यान एकूण ४ स्तूप बांधण्यात आले. यापैकी मौर्य-शुंग काळात स्तूप क्र. १ व २, सातवाहन काळात स्तूप क्र. ३, ४ थ्या म्हणजे वाकाटकोत्तर कालखंडात स्तूप क्र. ४ बांधण्यात आला. मौर्य-शुंग काळातच एक लंबगोलाकार चैत्यगृह बांधण्यात आला, आणि स्तूपाकडे जाण्यासाठी पूर्वेस एका सोपानाची रचना करण्यात आली. सातवाहन काळात राजवाडा आणि हिडिंबा टेकडी यामधल्या भागात दोन तारकाकृती शिवालये विटांत बांधण्यात आली.
    वाकाटक काळात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. सुरुवातीस वैदिक यज्ञाचा भाग म्हणून प्रवरसेन प्रथमाने श्येनचिती आणि कूर्मचिती अशा दोन चित्या विटांत बांधल्या. शर्मा यांच्या मते त्या पुरुषमेध आणि वाजपेय या यागांचा भाग म्हणून बांधल्या गेल्या असाव्यात. त्या काळातील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे दगडी पायावर विटांत उभारलेले देवालय. या पूर्वाभिमुख मुख्य देवालयाशीच संलग्न अशा लिंग प्रतिष्ठित केलेल्या लहान देवळ्या,
      मुख्य देवालयाभोवती तिन्ही दिशांना टेकडीच्या उतारावर, बांधण्यात आल्या. तसेच हवनकुंडाचीही सोय करण्यात आली. टेकडीच्या दक्षिण उत्तरावर अशा देवळ्या तीन स्तरांवर आढळतात. ध्यानासाठी असलेल्या गुंफा व निरनिराळ्या स्तरांवरील देवळ्यावर जाण्यासाठी सोपानपंक्ती रचण्यात आल्या. टेकडीवरील स्तूप १, २, ३ इथपर्यंत भक्तांना पोहोचता यावे म्हणून वेळोवेळी गरजेनुसार सोपानाची उंची वाढविण्यात आली होती. तशीच ती आता मुख्य देवळाकडे जाण्यासाठी वाढविण्यात आली. देवळाच्या वाटेवर दुतर्फा दुकाने (आपण-वीथी) होती. त्याचे अवशेषसुद्धा उत्खननात सापडले आहेत, असे डॉ. शर्मा यांचे मत आहे.
  वाकाटकोत्तर काळात सातवाहन काळातील लंबगोलाकृती चैत्यगृहाचा जीर्णोद्धार करण्यात आला. तसेच क्र. ४ चा स्तूप व ९ खोल्यांच्या विहाराची विटांत बांधणी करण्यात आली. या नवीन वास्तूंसाठी सोपानमार्गामध्ये योग्य ते बदल करण्यात आले.   मनसर येथील हिंडिंबा टेकडी आणि परिसरामधील उत्खननाची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे निरनिराळ्या कालखंडातील खापरे, मणी, लोखंडी उपकरणे आणि अवजारे शिलालेख, नाममुद्रा आणि त्यांचे ठसे त्याबरोबरच दगडी शिल्पे मिळाली. बांधकाम विटांत असून देवळाची जंघा आणि त्यावरची वास्तू आज शिल्लक नसली तरी, देवळाच्या वेदीबंधाची कल्पना करता येते. लहान देवळ्यांमधून शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यावरून तसेच लिंगपीठांच्या आकारावरून सुद्धा वास्तुविशेष लक्षात येतात. तर काही ठिकाणी काही देवळ्यांमध्ये गर्भगृहाच्या घुमटांचा भागसुद्धा शिल्लक आहे. त्याच्या बांधणीत कमानीच्या तंत्राचा वापर केलेला दिसतो. या तंत्रामध्ये त्रिकोण तयार होत असल्याने शर्मा त्यांचा ट्रायांगल (उलटा) व इन्व्हर्टेड ट्रायंगल (सुलटा) असा उल्लेख करतात. या संदर्भात हे नमूद करण्यासारखे आहे की विटांच्या बांधकामासाठी कमान तंत्राचा (आर्च टेक्निक) चा वापर भितरगाव (जि. कानपूर) या गुप्तकालीन देवालयात (इ. स. ४५०) सुद्धा करण्यात आला आहे. या सर्व पुरावशेषात मूर्तीविज्ञानदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा म्हणजे उत्खननात थरांच्या संदर्भात मिळालेल्या कीर्तिमुखासारख्या शोभेच्या शिल्पकृती गण, किन्नर, मालाधारी इत्यादींची शिल्पे, गणेश कुबेर, लज्जागौरी, शिव-पार्वती, उमा-महेश्वर यांच्या मूर्ती या रूपात मिळाला आहे. येथील उमामहेश्वराच्या मूर्ती किंवा शिवाच्या मूर्ती या उत्तर वाकाटकाच्या काळातील असल्यामुळे, त्यांच्या देखणेपणाबरोबरच वाकाटक शिल्पशैलीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणूनसुद्धा त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
   परंतु सर्वात महत्त्वाचा व अत्यंत बोलका पुरावा शिलालेखांच्या, नाममुद्रांच्या (Seals) आणि त्यांच्या ठशांच्या (सीलिंग) स्वरूपात मिळाला आहे. सापडलेले शिलालेख पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत असून ते ज्यावर लिहिले आहेत, ते शिलाखंड भग्न स्वरूपात असल्याने त्यावर लिहिलेला संस्कृत भाषेतील मजकूर अगदी त्रोटक स्वरूपात आहे. त्याचा नीट अर्थ लागत नाही. दोन नाममुद्रांपैकी 'प्रवरस्य' असा लेख झाले.

असलेली मुद्रा प्रवरसेन द्वितीयाचीच असावी. 'श्री प्रभा कु' ही मुद्रा प्रवरसेन द्वितीयाची आई व रुद्रसेन द्वितीयाची पट्टराणी प्रभावती गुप्ता हिची असावी असा कयास आहे. पण इतिहासदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या मुद्रेवर 'श्री प्रवरेश्वरस्य' असा लेख आहे. या संदर्भात हे नमूद करणे आवश्यक आहे की प्रवरसेन द्वितीयाच्या ताम्रपटात 'श्री-प्रवरेश्वर, देवकुल स्थानात्' असा व 'श्री प्रवरेश्वर ष‌ड्विशंतिः' असा दुसरा उल्लेख येतो. त्यातील पहिला उल्लेख हा उत्खननात हिडिंबा टेकडीवर मध्यभागी सापडलेल्या मुख्य देऊळ आणि त्या भोवतीच्या देवळ्यांना उद्देशून आहे. 'श्री प्रवरेश्वरस्य' अशी मुद्रा उत्खननात सापडल्यामुळे वरील तर्काला पुष्टी मिळते. दुसरा उल्लेख हा प्रवरेश्वर देवतेला उद्देशून दान दिलेल्या २६ गावांसाठी आहे. ही २६ गावे एक लहान प्रशासकीय घटकच झाली होती, असे दिसते. वरील सर्व विवेचनावरून हे लक्षात येईल की मनसर येथील तीन ठिकाणच्या उत्खननाने वाकाटकांचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने एक मोठा गुणात्मक फरक पडलेला आहे. श्री जगत्पती जोशी आणि डॉ. शर्मा यांनी आपल्या उत्खननाचा अहवाल प्रकाशित करून संशोधक वर्गास उपकृत केले आहे यात शंका नाही. त्यांनी अहवाल रूपाने सादर केलेल्या पुराव्याची अधिक खोलात जाऊन छाननी करणे गरजेचे आहे. ती केल्यानंतर व परिसरात आणखी उत्खनने केल्यानंतर निष्कर्षांच्या तपशिलात मोठे फरकही पडू शकतील. परंतु त्यामुळे अहवालाचे महत्त्व कमी होत नाही. नगरधन येथील उत्खननाचा अहवाल अद्याप प्रकाशित नाही. पण प्रभावतीगुप्तेची नाममुद्रा सापडल्याने नगरधन हेच प्राचीन नंदिवर्धन; वेलस्टेड म्हणतात त्याप्रमाणे नांदपूर नव्हे, हे मात्र पक्के

▲ मनसर येथील टेकडीवरील यज्ञवेदी स्थळ

response.lokprabha@expressindia.com
 

मांढळची वाकाटककालीन देवालयं

नागपूरच्या उमरेड तालुक्यात नागपूर शहरापासून आग्नेयेस ७५ कि. मी. अंतरावर मांढळ हे गाव आहे. ते एकदम प्रसिद्धीच्या झोकात एका वेगळ्याच कारणामुळे आले. शेतकरी आपली बचत राष्ट्रीय बचत योजनेखाली पोस्टात भरतात. 'या खेड्याने १९७४-७५ साली मोठा विक्रम केला. महाराष्ट्रातील सर्व खेड्यांमध्ये बचत म्हणून येथील गावकऱ्यांनी ठेवलेली रक्कम विक्रमी ठरली गाव मिरचीच्या उत्पादनात बरीच वर्षे अग्रेसर होते.- गाळ्या सरपंचाच्या घरी त्यांच्य निमंत्रणावरून उत्खनन शिबिरातील आम्ही सर्व जण चहासाठी गेलो होते. सरपंचांचे घर कुठे आहे, असे विचारले असता, "जिये बबंधकाम चालू असेल ते सरपंचांचे घर 'असे उत्तर मिळाले. उत्तर गमतीदार मिळाल्यामुळे "तुम्ही असे का म्हणता?" असे विचारले असता गावकऱ्याने उत्तर दिले, "त्यांच्या घरी बारा महिने बांधकामच चालू असते." नाश्ता आटोपल्यावर चहा आला, सहज काही चौकशी करावी म्हणून "या वर्षी पीकपाणी कसे आहे" असे विचारले असता "या वर्षी जरा नुकसानच झाले, असे ते म्हणाले ""किती?" म्हणून प्रतिप्रश्न केला
असता "असेल दीड दोन, लाख !' असे ते सहज म्हणाले. आमच्या लक्षात आले की आजच्याही काळात मोढळ हे गाव तितकेच समृद्ध आहे, जितके ते प्राचीन काळात होते.


... वाकाटककालीन देवालयं

     पुरातत्त्वदृष्ट्या मांढळ या गावाचे महत्त्व मात्र तिथे सापडलेल्या चार प्राचीन मूर्तीच्यामुळे अभ्यासकांच्या लक्षात आले. १९७४ साली जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याने वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. गावाच्या जवळच असलेल्या भोलाहुडकी या टेकडीवर वृक्षारोपणासाठी खड्डे खणत असतांना वालुकापाषाणात कोरलेल्या चार प्राचीन मूर्ती सापडल्या. त्यात एक अष्टमुखी आणि दुसरी चतुर्मुखी अशा शिवाच्या दोन मूर्ती होत्या. वर्तमानपत्रात त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. या मूर्ती मातीने माखलेल्या असल्या तरी, त्या कोरण्याच्या शैलीवरून गुप्तकाळातील मूर्तीशी साम्य दाखविणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या वेळचे नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व या विभागाचे प्रमुख डॉ. अजयमित्र शास्त्री यांच्यासमवेत आम्ही सर्व अध्यापक भोलहुडकीला भेट देण्यासाठी मांढळ येथे गेलो. मूर्ती स्थानिक लाल वालुकाश्मात (सॅण्ड स्टोन) कोरलेल्या होत्या. मूर्ती अष्टमूर्ती शिवाची होती. मूर्ती प्रमाणबद्ध असली तरी एखाद्या शिवगणासारखी ठेंगणी वाटत होती. अधोवस्त्र विकच्छ पद्धतीने नेसले होते. मूर्ती दोन हातांची, परंतु एक हात खांद्यापासून तुटलेला असल्यामुळे घेतलेल्या आयुधांची नीट कल्पना येत नव्हती. धडावर चार दिशांना तोंडे असली तरी प्रत्येक मांडीवर एक याप्रमाणे आणखी दोन तोंडे व उरलेल्या हाताच्या दंडावर एक, अशा रीतीने एकूण सात मुखे होती. निखळलेल्या बाहूवरसुद्धा आणखी एक तोंड असावे, असे धरले तर शिवमूर्तीवर एकूण आठ मुखे होती, हे सहज लक्षात येते. दुसरीही शिवाचीच मूर्ती होती. या मूर्तीचा गुडघ्यापासून खालचा भाग तुटलेला होता. मूर्ती चतुर्मुख. शिरावर जटा, पण त्या एका कापडी वेष्टनात बांधलेल्या. 'दोन हातापैकी' उजव्या हातात तिरपा धरलेला दण्डा. मूर्तीच्या वरून सहज हे लक्षात आले, की चेहरेपट्टी गुप्त काळातील उभट चेहऱ्यापेक्षा जास्त चौकोनी वाटत होती, पण डोळे भुवया आणि डोक्यावरील जटा ज्या रीतीने दाखविल्या होत्या त्यावरून त्या आदि-गुप्त काळातील म्हणजे चौथ्या शतकातील मूर्तीशी अधिक जवळीक दाखवितात.


      दोन मोसमांमध्ये प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व या विभागाने मांढळ येथे तीन ठिकाणी उत्खनन केले. पैकी भोलाहुडकी व बोंगीहुडकी या दोन टेकड्यांवर विटांत बांधलेली देवालये मिळाली. बोंगीहुडकीवरील देवालय एका मोठ्या (११.७० x १४.७० मीटर) अशा प्रशस्त चौथऱ्यावर बांधले असून, सांची येथील क्र. १७ च्या मंदिराप्रमाणे ते गाभारा व समोर उघडा, आडवा मण्डप (म्हणजे शिल्पशास्त्राच्या परिभाषेत समोर वीथी) असलेला आहे. या देवालयाचे वैशिष्ट्य असे की चौथरा ३२ थरांचा आहे. व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर या ठिकाणी देवालय बांधावे अशी ती जागा नाही. उंच सखल भाग असलेला आणि काही ठिकाणी सुळके असलेला तो खडक आहे. नेमक्या याच ठिकाणी देऊळ बांधण्याचे काही वेगळे कारण असावे. एकूण विन्यासावरून हे येथील सर्वात प्राचीन देऊळ असावे. १९७५-७६ आणि ७६-७७ या शेजारच्या भोलाहुडकीवरील अवशेष पाहता ते एक साधे देऊळ नसून देवालय संकुल असावे, असे वाटते. उत्खननात आणि साफसफाईत लक्षात आलेल्या अवशेषांवरून मुख्य देवळाभोवती एक कुंपणाची भिंत असावी. आग्नेयेला एक विटात बांधलेली जलद्रोणी, वायव्येस दोन कक्षही होते. ते बहुधा देवळातील अर्चकासाठी असावे. देऊळ एका अठरा मीटर लांब अशा आयत, पूर्व पश्चिमेला लांब चौथऱ्यावर होते. उत्तर व दक्षिणेस, चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. आणि एका बाजूस एका देवळीची मांडणी होती असे दिसते. ह्या देवालयातील सर्वात महत्त्वाचे अवशेष दोन प्रकारचे. एक म्हणजे चौथऱ्याच्या एका बाजूला मोकळ्या जागेत खड्डा खणून त्यात काहीशा खंडित अवस्थेतील दहा देवप्रतिमा आढळल्या. त्यातील आठ शैव-शाक्त असून, दोन वैष्णव म्हणजे एक विष्णूची खंडित आवक्ष प्रतिमा आणि दुसरी बलरामाची शिरोविहीन प्रतिमा. उरलेल्या प्रतिमा एका हातात कमळाचे फूल घेतलेली गणासारखी प्रतिमा, एक चतुर्मुख ब्रह्मा, द्वादशमुख शिव, तपस्यामग्न पार्वती (अपर्णा), सिंहासन म्हणता येईल अशा पीठाच्या चार कोपऱ्यांवर सिंह असलेली दुर्गेची प्रतिमा, नैगमेष. यातील प्रतिमाविज्ञानदृष्ट्या वर्णन न आढळणारी एकमेव प्रतिमा म्हणजे दोन बाहू व दोन मांड्यांवर मिळून चार मुखे आणि धडावर चार मुख्य दिशांना व त्यावर चार विदिशांना अशी जटाजूट असलेली शिरे. विद्यापीठाच्या संग्रहालयात या मूर्तीची नोंद 'महासदाशिव' म्हणून केलेली आहे. सदाशिव हा चार किंवा पाच शिरे असलेली महादेव. त्याला दहा हात असतात. उत्तर काळात बंगालमध्ये वीस बाहू असलेल्या सदाशिवमूर्तीची पूजा प्रचारात होती. या नेहमीच्या सदाशिवमूर्तीपेक्षा जास्त शिरे असलेली, आणि वेगळी असल्याने तिला एक नवीन कल्पित - महासदाशिव असे नाव दिले. सुप्रसिद्ध प्रतिमाल क्षणतज्ज्ञ नीलकंठ पु. जोशी यांनी मूर्तीला बारा शिरे असल्याने द्वादशज्योतिर्लिंगांना जवळ जाणारी यामागे काही तरी कल्पना असावी असे अनुमान काढले. डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी, महाभारतात 'द्वादश' असे शिवाचे बिरुद असल्याने, या मूर्तीची ओळख 'द्वादश' अशी केली. मूर्तीच्या या वेगळ्या लक्षणाची उकल गृह्यसूत्रातील शूलगव या यज्ञातील विधीमुळे होऊ शकते, असे आम्हांस वाटते. गाईगुरांमध्ये रोगाची लागण होऊन ती मृत्युमुखी पडल्यास, शरद किवा वसंत ऋतूमध्ये आर्द्रा नक्षत्रावर रुद्रशिवाला शांत करण्यासाठी हा यज्ञ करावा असे म्हटले आहे. यज्ञात बळी दिलेल्या सांडाच्या १२ आहुती रुद्रशिवाच्या १२ नावांना उद्देशून द्याव्यात, असेही म्हटले आहे. एरवी रुद्र ह्या गणदेवता असून रुद्राच्या ११ नावांचा उल्लेख येतो. त्यामुळे रुद्राला ११ हा आकडा प्रिय असून रुद्राला अभिषेक करावयाचा झाल्यास श्रावणमासात अकरा वेळा रुद्रसूक्ताचा मंत्रपाठ केला जातो. ह्यालाच हल्लीच्या भाषेत एकादशिनी (एकादशनी) असे म्हणतात. परंतु वरील शूलगव यज्ञात मात्र रुद्राच्या १२ नावांचा उल्लेख प्रथमच येतो. वाकाटकांच्या परंपरेत वैदिक यज्ञांचे अनुष्ठान अभिप्रेत असल्याने ही द्वादशमुखी मूर्ती शूलगाव यज्ञाच्या अनुष्ठानाच्या वेळी प्रतिष्ठित केली असावी असे वाटते.
        शिवाच्या वेगळ्याही काही मूर्ती येथे आढळतात. याचा वर उल्लेख आला आहेच. त्यांमध्ये अष्टमूर्ती व चतुर्मुख, काष्ठधारी लकुलीशमूर्ती यांचा अंतर्भाव आहे. त्यावर आत्ताच काही टीकाटिप्पणी करावी असे आम्हांस वाटत नाही. शिवाची आणखी एक उल्लेखनीय मूर्ती म्हणजे त्याने हातात चाप-बाण घेतलेली, डोक्यावर जटाबंध, आणि कपाळावर तिसरा डोळा असलेली रौद्र मूर्ती होय. काही जाणकारांनी वरील लक्षणांवरून तिची 'ईशान' किंवा 'त्रिपुरान्तक' अशी ओळख पटविली आहे. या संदर्भात असे म्हणता येईल, की ह्या मूर्ती घडविल्या गेल्या तो काळ (चौथ्या शतकाचा मध्य, अथवा पृथ्वीषेण प्रथम अथवा रुद्रसेन प्रथम यांचा काळ) लक्षात घेता, अजून प्रतिमाल क्षणे पोथिनिविष्ट झालेली नव्हती. आणि त्यामुळे आचार्य अथवा कलाकार यांच्या आगमपरंपरेच्या जाणिवेतून अशा प्रकारच्या आद्यमूर्ती घडल्या असाव्यात असे म्हणता येईल. राणी प्रभावतीगुप्ता, रुद्रसेन द्वितीय व पृथ्वीषेण द्वितीय यांचा अपवाद वगळता वाकाटक घराण्यातील सर्व राजे स्वतःचा उल्लेख 'परममाहेश्वर' असा करतात. यावरून ते पाशुपत संप्रदायाचे अनुयायी असावेत असे वाटते. या विचाराच्या अनुषंगाने शैव आगम-पुराणातील कथांचा आणि प्रतिमालक्षणांचा संदर्भ देऊन या महाराष्ट्रातील आद्य शैव मूर्तीची ओळख पटविली पाहिजे.


      या संदर्भात तेथील देवी मूर्तीचाही  विचार करणे आवश्यक आहे. त्यातील विशेष उल्लेखनीय मूर्ती म्हणजे तपस्यामग्न उमा-अपर्णा व सिंहासिनाधिष्ठित दुर्गा. दुर्गा महिषमर्दिनी हा अवतार मार्कण्डेय-पुराणाच्या द्वितीय चरित्रात असून महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी यापैकी सत्त्वगुणाचा आविष्कार असलेल्या महालक्ष्मीने महिषासुराचा वध केला, अशी कथा आहे. महालक्ष्मी म्हणजे तिच्याबरोबर तिचाच आविष्कार असलेल्या सप्तमातृकाही येतात. त्यांच्या मूर्ती उत्खननात मिळाल्या नसल्या तरी त्यांची पूजा दुर्गा महिषमर्दिनीबरोबर अपेक्षित आहे. उदयगिरी येथील विशालकाय वराहमूर्तीच्या शेजारी एक शिवगुंफा आहे. त्या गुंफेच्या बाह्यांगावर महिषासुरमर्दिनीची मूर्ती कोरली आहे व अंगणात सप्तमातृका व स्कन्द यांचा शिलापट्ट उघड्यावर कोरला आहे. याचा अर्थ पाशुपत संप्रदायात महिषासुरमर्दिनी आणि सप्तमातृका यांच्या पूजेचा अंतर्भाव होता. पातुर (जिल्हा-अकोला) येथील शैव गुंफेचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. गुंफेचे दोन भाग त्या कमीत कमी रुद्रसेन द्वितीयच्या असून एका भागात पीठावर तपस्यामग्न उमेची प्रतिमा असून दुसऱ्या भागात शिवलिंग व आता जीर्ण शीर्ण झालेला लांबलचक मूर्तिशिलापट्ट आहे. तो सप्तमातृकांचा असावा. यावरून मांढळ येथेही पाशुपत संप्रदायाचेच देऊळ असावे, याची खात्री पटते. सिंहासनाधिष्ठित दुर्गा ही पाशुपत संप्रदायाचाच भाग असावी परंतु सोबत मिळालेल्या नैगमेषाच्या मूर्तीमुळे या ठिकाणी लज्जागौरीची उपासनाही स्वतंत्रपणे अथवा संप्रदायाचा भाग म्हणून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ह्या संदर्भात हे नमूद करणे आवश्यक आहे, की वेरूळ येथील रामेश्वर गुंफामध्ये (क्रमांक २१) तपस्यामग्न उमा व सप्तमातृका, स्कन्दाचा सहचर नैगमेष आणि लज्जागौरी या सर्वांच्या प्रतिमा स्पष्टपणे लाकुल पाशुपत संप्रदायाशी निगडित असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शैवप्रतिमा मांढळ येथेच सापडल्या आहेत हे निश्चित! निखात प्रतिमांच्यामध्ये विष्णू आणि बलराम यांच्या प्रतिमाही महत्त्वाच्या आहेत.

▲ मांढळ येथे सापडलेले पुरावशेष

काळातील आहेत. ह्या अनुमानाला दुजोरा देणारा, आणखी एक पुरावा म्हणजे रुद्रसेन द्वितीयच्या मांढळ येथील एका शेतात सापडलेल्या ताम्रपटात त्याने श्रीमोंद (मुण्ड?) स्वामी या शेषशायी नारायणाप्रीत्यर्थ भूमिदान केल्याचे नमूद केले आहे. भोलाहुडकीवरील देवालय जर पाशुपत संप्रदायाचे म्हणजे शिवालय असेल, तर बोंगीहुडकीवरील यापूर्वी उल्लेखिलेले देवालय हे वैष्णव किंवा सात्वत संप्रदायाचे असावे असे वाटते व सापडलेल्या दोन वैष्णवमूर्ती त्या देवळात प्रतिष्ठित असाव्यात.
      मांढळ हे एक महत्त्वाचे पाशुपत आणि सात्त्वत संप्रदायाचे केंद्र होते. ह्या दोन्ही संप्रदायांना राजाश्रय होता, हे शिव देवालयाच्या जवळच सापडलेल्या तीन ताम्रपटावरून अधोरेखित होते. येथील उत्खनित खड्ड्यांच्या दुसऱ्या थरातच प्रवरसेन द्वितीय व त्याचा नातू या दोघांचे ताम्रपट एका मातीच्या करंड्यात व्यवस्थित रीतीने पुरून ठेवले होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास भोलाहुडकी आणि बोंगीहुडकीवरील देवालय शैव आणि वैष्णव संप्रदाय व कलेतिहास व प्रतिमालक्षण या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या आद्य वाकाटक शिल्पांचा जवळजवळ चार पिढ्यांचा (पृथ्वीषेण प्रथमपासून पृथ्वीषेण द्वितीयपर्यंतचा) इतिहास समजण्यासाठी मांढळ येथील पुरावशेषांचा उपयोग होणार आहे.
      मांढळ येथील देवालयांच्या विषयींचे विवेचन वहाडी तलावाच्या काठावरील शिवदेवालयाचे वर्णन केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. ह्या वहऱ्हाडी तलावाविषयीची एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. एक लग्नाचे वहऱ्हाड मुक्कामासाठी येथे थांबले असताना, तलावातील देवतेने विनंतीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी भांडी परत करण्याच्या बोलीवर दिली. नंतरही अशा प्रकारचा प्रत्यय मुक्काम करणाऱ्या मंडळींना आल्याचे स्थानिक लोक सांगतात, तलावाच्या काठावर पश्चिमाभिमुख, गाभाऱ्यात ४४.४८ सेंटिमीटरच्या चौकोनी (म्हणजे ब्रह्मकान्त) भागावर असलेले १.२२ मिटर इतके उंच शिवलिंग मिळाले. या शिवलिंगात अष्टकोनी विष्णुभाग नसल्याने हे पाचव्या शतकाच्या पूर्वीचे, याची निश्चित कल्पना होती. मंदिराचा तलविन्यास असा - गर्भगृह ८.४० x ७.२० मीटर लांब रुंद, त्यापुढे ४.६५ लांब व २.३० मीटर रुंद असुन मुखमण्डप व देवळात समोर देवळात शिरण्यासाठी दोन भिंतीमध्ये असलेला पायऱ्यांचा जिना आहे. देवालयाच्या भिंतीजवळ जवळ दिड मीटर रुंद असून उत्खननात अवशिष्ट राहिलेल्या भिंतीची उंची जवळजवळ दिड मीटर इतकी होती. ह्या शिवालयाचे वैशिष्ट्य असे की विटांच्या भिंतींना बाहेरचा थर वालुकाश्माच्या चिऱ्यांचा होता. हे देवालय वाकाटककालीन असल्याची खात्री सोबत सापडलेल्या एका प्रतिहारीच्या शिल्पावरून व दगडी भिंतीच्या एका चिऱ्यावरील वृषभशिल्पाच्या शैलीवरून पक्की झाली. समोरचा पायऱ्यांचा जिना, आणि गाभाऱ्याच्या भिंतीची, दगडी आणि विटांच्या अशा, दोन थरात केलेली विभागणी सोडली तर देवालयाचा विन्यास सांची येथील समुद्रगुप्तकालीन मंदिर क्र. १७सारखाच आहे, हे ह्या संदर्भात नमूद करणे आवश्यक आहे. व त्यामुळे हे मंदिर इ. स.च्या चौथ्या शतकाच्या मध्याइतके जुने असावे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दुसरी नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे देवळाच्या बाहेरच्या बाजूस चार कोपऱ्यांवर आणि पायऱ्यांच्या शेवटी दोन्ही बाजूस मुखमण्डपात शहाबादी फरश्यांचे तुकडे खांबासाठी तळखडे (आधार) म्हणून ठेवले आहे. याचा अर्थ असा की त्यावर उभ्या केलेल्या लाकडी खांबावर मुखमंडपाचे व कदाचित प्रदक्षिणापथाचे छप्पर असावे. शहाबादी दगडाचा वापरही सातवाहन काळातील स्थापत्य परंपरांचे सातत्य दाखवितो. मंदिराभोवती एका दगडी भिंतीचे अवशेष आढळले. ही भिंत यादवकाळात उभारलेली दिसते. यावरून निदान यादवकाळापर्यंत हे देवालय पूजेत असावे असे दिसते.
    विद्यापीठातील चमूने उत्खननाआधी मांढळ गावाची पाहणी केली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी आमच्या निदर्शनास आणले की, शाळेची इमारत मोठी करताना पायासाठी खणलेल्या खड्ड्यात अनेक पुरावशेष सापडले. त्यानंतर वसाहतीचे अवशेष ह्या ठिकाणी आहेत, हे लक्षात आल्याने उत्खननासाठी काही खड्डे खणले असता, सातवाहन काळातील नाणी, मातीची भांडी, गृहोपयोगी वस्तू व किमती खड्यांचे मणी असे अनेक पुरावशेष मिळाले व ही वस्ती वाकाटक काळात सुद्धा येथे नांदत होती, हे वरच्या थरातील अवशेषांवरून व त्यातल्यात्यात मातीच्या भांड्यावरून व रोमन बनावटीच्या झारींची नक्कल करणाऱ्या लाल झारींच्या खापरावरून लक्षात आले. मिळालेल्या नाण्यात एक क्षत्रपांचे नाणेसुद्धा सापडले.


▲ मांढळ येथे सापडलेले पुरावशेष

विष्णु

रुद्रसेन द्वितीयच्या पाचव्या राज्यसंवत्सरात दिलेला ताम्रपट हा वाकाटकांच्या राजकीय इतिहासाच्या जुळणीच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो सात्त्वत धर्माच्या विदर्भातील मुहूर्तमेढीच्या आणि प्रसाराच्या दृष्टीनेही अर्थपूर्ण आहे. त्या ताम्रपटाची सुरुवात नेहमीच्या सिद्धम् आणि दृष्टम् या शब्दांनी केली असून, देव देव म्हणजे देवांचा देव असलेल्या मोंदस्वामीच्या संदेशावरून हा ताम्रपट आम्ही देत आहोत, असे म्हटले आहे. ताम्रपटाचा उद्देश स्वतःच्या "धर्म, आयुष्य, बल, विजय, ऐश्वर्य, यात वाढ व्हावी, आणि इहपारलौकिक हितासाठी" अरग्राम नावाचे खेडे वत्सगुल्म येथील श्री आर्य सात्त्वत शाखेतील आचार्यांचा निवास असलेल्या दोन मठांना (अधिवास) नव्याने देत आहोत. येथे राहणाऱ्या स्वतःच्या अध्ययनात पूर्णपणे रमून गेलेल्या, निरनिराळ्या गोत्र आणि शाखांतील ब्राह्मणांना अग्रहारामध्ये अपेक्षित असलेल्या मर्यादा त्यांनी पाळाव्यात व तसेच त्यांना बहाल केलेल्या नियमातील सुटी आणि अधिकार त्यांनी भोगावे, असे आम्ही जाहीर करतो. ज्या देव देव मोंदस्वामीच्या आज्ञेने हे गावाचे दानपत्र देण्यात आले, त्याचे वर्णनही आरंभीच दिले आहे. "सर्व जगाचा प्रलय झाल्यानंतर त्याला व्यापून टाकणाऱ्या जलधीच्या अफाट पाण्यावर ज्याने आपले सर्व शरीर मोकळेपणाने पसरवून टाकलेले आहे, अशा नागराज अनन्ताच्या डौलाने उभारलेल्या विशाल फणांच्या छायेत जो योगनिद्रेसाठी पहुडला आहे आणि ज्याने शंखचक्र आणि खड्ग ही लांच्छने धारण केली आहेत, असा मोंदस्वामी. या वर्णनावरून हे स्पष्ट आहे, की मोंदस्वामी हे नारायणस्वरूप असलेल्या स्थानिक शेषशाई विष्णूचे नाव असावे, संपादकद्वय शास्त्री व चंद्रशेखर गुप्त यांच्या मते देवतेचे नाव जवळच असलेल्या 'मोंद' ह्या स्थलनामावरून पडले असावे. (उदा. जसे रामगिरि-स्वामिन् म्हणजे रामगिरी ह्या टेकडीवरील तिची अधिष्ठात्री देवता.) विद्वान संपादकांचे असेही मत आहे की, आजही मांढळच्या जवळ असलेले 'डोंगरमौदा' हे स्थलनाम म्हणजेच प्राचीन 'मोंद' असावे. मात्र सुचविल्याप्रमाणे शोध घेतला असता मांढळच्या आसपास किंवा डोंगरमौद्याजवळ वर वर्णन केलेली शेषशाई विष्णूची मूर्ती मिळालेली नाही. आता पुरता निष्कर्ष काढावयाचा झाल्यास वत्सलगुल्म येथील ब्राह्मणांचा वास असलेल्या आर्य सात्त्वत संप्रदायाच्या दोन मठिका व मोंदस्वामींचे देवालय हे दानपात्र देण्यापूर्वीच अस्तित्वात होत्या. दुसरे असे की वत्सगुल्म ही पश्चिम विदर्भातील वाकाटकांची राजधानी आपल्या माहितीनुसार या शाखेचे वंशजही, ते स्पष्टपणे तसा उल्लेख करीत नसले तरी, माहेश्वर संप्रदायाचेच होते, असे मानण्याइतका पुरावा उपलब्ध आहे. वाशिम येथील ८०-९० च्या दशकात राज्य पुरातत्त्व विभागाने हाती घेतलेल्या उत्खननात उघडकीस आलेली विटांची देवळेही शिवालयेच होती, असे लक्षात आले आहे. ह्याचा अर्थ असा की, कदाचित राजाश्रयाविनाही पश्चिम विदर्भात सात्त्वत धर्माची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. समकालीन गुप्त शिलालेखावरून सात्त्वत धर्माचा प्रसार उत्तरेत पंजाबात आणि पूर्वेस प्राचीन मगधापलीकडेही झाला होता, हे निश्चित! सर्व गुप्त सम्राट हे परमभागवत असल्यामुळे असे घडले असल्यास नवल नाही. परंतु दक्षिणापथातील सात्त्वत धर्माच्या अस्तित्वासंबंधीचा उल्लेख सर्वात प्राचीन आहे, हे नमूद केले पाहिजे. विदर्भातूनच पुढे हे सात्त्वत संप्रदायाचे लोण कुंतल (दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक) आणि आंध्र प्रदेशातून तामिळनाडूत गेले असावे.
      खोनिगेन (इंग्रजीमध्ये ग्रोनिंगेन) येथील प्राच्यविद्या संस्थेत संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करणारे हान्स बाक्कर हे १९९० पासून वाकाटक आणि त्यांच्या प्रतिमाविज्ञानावर (Iconology) काम करीत आहेत. राज्य पुरातत्त्व विभागाने केवल नरसिंह मंदिरात शोध लावलेल्या प्रभावतिस्वामिन्संबंधीच्या शिलालेखावर संशोधन करून आपल्या सहकाऱ्यासमवेत अनेक समाधानकारक वाचन पर्याय सुचविले. बाबरी मशिदीच्या प्रसंगानंतर राम आख्यायिकांच्यावर त्यांचे अनेक पैलू लक्षात घेऊन संशोधन करणाऱ्यांपैकी ते एक आहेत. वाकाटक राजे आणि जनमानसातील राजसंस्थे विषयीच्या कल्पना याविषयीही त्यांनी लिखाण केले आहे. मांढळ येथील रुद्रसेन द्वितीयच्या ताम्रपटाच्या निमित्ताने गुप्त-वाकाटक काळातील संप्रदाय-सहिष्णुतेविषयी त्यांनी काही विचार प्रकट केले आहेत. डॉ. मायकेल विलिस यांनी उदयगिरी येथील गुंफांवर संशोधन करून तेथील गुंफांत कोरलेल्या देवतांचा आणि पौराणिक, धार्मिक विधी आणि आचार यांचा संबंध कसा असतो, हे दाखविलेले आहे. त्यांच्या संशोधनाच्या फलितांपैकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे गुप्त सम्राट (उदा. परमभागवत चंद्रगुप्त द्वितीय) हे स्वतः वैष्णव असले तरी शैव-पाशुपत संप्रदाय, जैनधर्म व बौद्धधर्माबाबत सहिष्णू होते, एवढेच नव्हे तर या धर्मांना त्यांचा उदार आश्रय होता. विदिशेपासून ५ किमी अंतरावर असलेल्या दुर्जनपूर येथे चंद्रगुप्ताचा मोठा भाऊ रामगुप्त याने करविलेल्या तीन जैन मूर्ती सापडल्या आहेत.

▲ दोन बाहू व दोन मांड्यांवर मिळून चार मुखे आणि धडावर चार मुख्य दिशांना व त्यावर चार विदिशांना अशी जटाजूट असलेली शिरे ही अनोखी शिल्पकृती पुरातत्व तज्ज्ञांचे आजही आकर्षण आहे.


उदयगिरी येथे एक गुंफा पार्श्वनाथाची म्हणून प्रसिद्ध आहे. तर जवळच सांची येथील बौद्धविहाराला चंद्रगुप्त द्वितीयच्या एका अधिकाऱ्याने दान दिल्याविषयीचा शिलालेख आहे. हाच धागा उचलून बाक्कर यांनी वाकाटक नृपतींचासुद्धा प्रत्यक्षपणे शैव आणि सात्वत या दोन्ही संप्रदायांना उदार आश्रय होता, हे नव्याने परत सांगितले. वत्सगुल्म शाखेतील राजेही स्वतः माहेश्वर असले तरी त्यांच्या राजधानीतच सात्वत संप्रदायाच्या दोन मठिका होत्या; आणि अजिंठा येथे तर हरिषेणाचे सामंत उपेंद्रगुप्त (ऋषीकजनपद), अश्मक सामंताच्या प्रधानाचा मित्र असलेला भिक्षु व माथुरक श्रेष्ठी आणि त्याचा स्वतःचा मुख्य प्रधान वराहदेव यांनी जे बौद्धविहार निर्माण केले, ते भारतीय बौद्धकलेचेच नाही, तर त्या काळातील स्थापत्य शिल्प व चित्रकला यांचे जगातील सर्वोत्कृष्ट नमुने समजले जातात. प्रत्यक्ष लेखी पुरावा नसला तरी अजिंठा येथील लेणी क्र. १ आणि २ हरिषेणाच्याच प्रेरणेने आणि आश्रयाने कोरली गेली असावीत, अशी वॉल्टर स्पिक यांची खात्री आहे. त्यासंबंधीचा परिस्थितीजन्य पुरावाही ते सादर करतात. मांढळ येथील ताम्रपटातील पुरावा अशा प्रकारच्या युक्तिवादाला दुजोराच देतो, असे बाक्कर यांचे म्हणणे आहे. शास्त्री आणि चंद्रशेखर गुप्त यांनी केलेले मोंदस्वामिन् हे वाचन चुकीचे आहे; देवतेचे खरे नाव मुण्डस्वामिन् असे वाचले पाहिजे; मुण्डस्वामिन् म्हणजे मुण्डास्वामिन्, 'मुण्डा' हे प्रभावतीगुप्तेचे विवाहपूर्व नाव असून या नावाचा केवलनरसिंह देवालयातील शिलालेखात उल्लेख येतो, अशी काही त्यांची ठाम मते आहेत. तिच्या प्रेरणेनेच मांढळ येथे मुण्डस्वामिन्चे देवालय रुद्रसेनाने बांधले व तिचा पिता चंद्रगुप्त द्वितीय याने उदयगिरी येथे प्रस्थापित केलेली सर्व-संप्रदाय-सहिष्णुतेची नवीन राजनीती या देवालयाच्या निमित्ताने प्रभावतीगुप्तेने सुरू केली. आणि त्यामुळेच मांढळ येथे मोठ्या शिवालय संकुलामध्ये वासुदेव-संकर्षणांचे देऊळ होते, कदाचित ह्याच संकुलात मुण्डस्वामिन्चे देऊळ असावे. परंतु आज त्याचा पुरावा मात्र मिळत नाही असा कयास त्यांनी केला आहे.
        हा सर्व प्रपंच करण्याचा कारण असे की, त्या काळात संप्रदायांमध्ये तात्त्विक पातळीवर मतभेद असले तरी कलह नव्हते; वातावरण सामंजस्याचेच होते. अगदी अशोकाच्या काळापासूनच सर्वधर्मसमभावाचे धोरण भारतीय समाजात अमलात आणले गेले आहे. परंतु मध्ययुगातील सामंतशाहीचा पुरस्कार करणारे काही पुरातत्त्वज्ञ असे मानतात की, आर्थिक तंगीमुळे सामाजिक आणि राजकीय जीवन कलुषित झाले होते. आणि त्यामुळे मध्ययुगात सामाजिक विषमता, निम्न स्तरातील जातींचे शोषण आणि सांप्रदायिक तेढ यामुळे समाज ग्रस्त आणि त्रस्त झाला होता. या सर्व सामाजिक बदलाची नांदी गुप्त-वाकाटक काळातच झाली असे ते हिरिरीने मांडतात. मुंण्डस्वामीन् की मोंदस्वामीन् असे तपशिलातील फरक बाजूला ठेवला तरी, या सामंतशाहीवादी पुरातत्त्वज्ञ व इतिहासकारांनी बाक्कर यांच्या मताची दखल घ्यावी, एवढेच या निमित्ताने त्यांना सांगणे आहे.

response.lokprabha@expressindia.com

वाशीम येथील उत्खनने

महाराष्ट्र शासनाने १९७६ साली नव्यानेच पुनर्रचित केलेल्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या संचालकपदाची जाहिरात दिली होती. मी त्यावेळी नागपूर विद्यापीठात प्राचीन इतिहास संस्कृती व पुरातत्त्व विभागाचा अधिव्याख्याता म्हणून काम करीत होतो. विभागाचे प्रमुख प्रा. शां. भ. देव यांच्या सल्ल्यावरून मी त्या पदासाठी अर्ज केला, काही काळानंतर मुलाखतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे निमंत्रण आल्यावरून आम्ही साताठ उमेदवार मुंबई येथे हजर झालो. त्यावेळी लोकसेवा आयोगाचे कार्यालय हायकोर्टासमोरील बैंक ऑफ इंडियाच्या वरच्या मजल्यावर होते. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांव्यतिरिक्त विषयाचे तज्ज्ञ म्हणून प्रख्यात पुरातत्वज्ञ प्रा. ह. धी. सांकलिया व शिक्षण खात्याच्या सचिवांचे प्रतिनिधी म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे संचालक सदाशिव गोरक्षकर तिथे होते. माझा पुरातत्त्व विषयाचा अनुभव मुख्यत्वे विदर्भातीलच असल्याने प्रा. सांकलिया यांनी सुरवातीच्या काही प्रश्नानंतर मला सूचकपणे विदर्भातील इतिहासकालीन नव्या पुरास्थळाचा तुम्हाला शोध करता आला का, असा प्रश्न विचारला. प्रा. सांकळियांना काय अभिप्रेत होते, याची माला कल्पना नव्हती. १९६९-७१ साली पवनी येथील मौर्य-सातवाहन काळातील बौद्ध स्तूपाचा शोध लागला होता व विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने, भारतीथ पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नागपूर येथील उत्खनन शाखेच्या सहकार्याने काम करून बौद्ध पुरातत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे शोध लावले होते. महाराष्ट्राच्या पुराभिलेख व पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी विदर्भातील एका अत्यंत प्राचीन नगरीमध्ये शोध घेऊन विदर्भातील नागरीकरणाची प्रक्रिया शुंगमौर्यकाळाच्या पलिकडेही जाते, हे सिद्ध केले होते. शिलालेखातून माहित झालेल्या पूर्व विदर्भाची राजधानी असलेल्या प्रक्रपूरची ओळख देव आणि ढवळीकर यांच्या जोडीने १९६६-६८ च्या दरम्यान पवनार येथे केलेल्या उत्खननातून आधुनिक पवनारशी पटविली होती. येथील धाम नदीच्याकाठी असलेल्या परमधाम या विनोबाजींच्या आश्रमाच्या जवळपास असलेल्या टेकाडावरील उत्खननात वाकाटककालीन महत्त्वाचे पुरावशेष सापडले होते व जोडीला महाभारत-रामायणामधील प्रसंगावर आधारित शिल्पे व 'गंगा-भगवती' असा पेटिकाशीर्षब्राह्मीत लिहिलेला मजकूर असलेली गंगेची मूर्ती सापडल्याने वरील तर्काला बळकटी मिळाली होती. या शिल्पावर १९४८ साली म. म. मिराशी यांनी एक विस्तृत लेख इंग्रजीत लिहून पुढीलप्रमाणे तर्क व्यक्त केला होता. ही शिल्पे निश्चितपणे प्रवरसेन द्वितीयची आई, महाराणी प्रभावतीगुप्ता हिच्या आग्रहावरून राजाने बांधलेल्या श्रीरामाच्या मंदिराला शोभा देत असावीत. आपल्या विष्णुभक्तीचे निदर्शक असे परमभागवत हे बिरुद ती नेहमी आपल्या नावामध्ये लावत असे, 'रामगिरिस्वामिन्' असे बिरुद असलेल्या रामटेकवरील देवतेच्या मूतीच्या पायापाशी बसून दानपत्राची आज्ञा करण्याची प्रथा प्रवरसेन द्वितीयच्या काळात होती. ही देवता दुसरी तिसरी कुणी नसून श्रीरामच असावी असे मिराशींचे मत झाले होते. व हे मंदिर ही आपली माता प्रभावतीगुप्ता हिच्या आग्रहानुसार द्वितीय प्रवरसेनने रामटेक येथे बांधले असावे व अभिलेखातील 'रामगिरिस्वामिन पादमूलात्' या शब्दप्रयोगामुळे वर कयास व्यक्त केला, त्याप्रमाणे मूर्तीच्या पायाशी बसून तिथून दानपत्र दिले, असा अर्थ न करता शब्दशः श्रीराममंदिरात अधिष्ठानावर पूजेअर्चेसाठी ठेवलेल्या पादुकांशेजारी बसून दानपत्र दिले जात असे, असा अर्थ महामहोपाध्यांनी केला आणि रामटेक जवळील नदिवर्धन (म्हणजे हल्लीचे नगरधन) येथील पारंपरिक राजधानी हलवून ती प्रवरपुर म्हणजे हल्लीचे पवनार (जिल्हा वर्धा) इतक्या दूर नेल्याने हे नवीन राममंदिर प्रवरसेनाला बांधावे लागले असावे, असा निर्वाळा त्यांनी दिला.


वाशीम येथील १९९२ मधील उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषांचे रेखाटन.

प्रा. सांकलिया यांचा रोख या पार्श्वभूमीबरोबरच १९७५-७७दरम्यानच्या दोन मौसमात, मांढळ येथे विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननावरही होता. भी त्यांना सहजपणे असे उत्तर दिले की हो, वाशीम येथे इंगळे यांच्या शेतात व आजूबाजूला पाचसहा एकर इतक्या जागेत मला वाकाटक-सातवाहनकालीन खापरे, मणी व मातीच्या बाहुल्या असे पुरावशेष सापडले असून ते प्रसिद्ध वत्सगुल्म या नगराच्या वसतिस्थानाचे अवशेष असावेत. माझे उत्तर ऐकून प्रा. सांकळियांनी मोठा संतोष व्यक्त केला, कारण आत्तापर्यंतच्या उत्खनन सर्वेक्षणात्मक कार्यात पूर्व विदर्भावरच जास्त भर होता. पश्चिम विदर्भातील वाकाटक राजवंशाच्या अखत्यारीतील पुरास्थळांच्याकडे दुर्लक्षच झाले होते. वास्तविक पाहाता वाकाटक वंशाची कीर्ती आतापर्यंत काही अपवाद वगळता पूर्णपणे वत्सगुल्मशाखेतील सम्राट हरिषेण व त्याच्या दरबारातील सामंत अमात्य यीच्या आश्रयाखाली निर्माण झालेल्या अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेणी व तेथील भिंतीवरील चित्रांमुळेच प्राप्त झाली होती. परंतु नमूद करण्यासारखे पुरास्थळ संशोधकांना सापडले नव्हते. खरे तर, त्यादृष्टीने प्रयासच झालेला नव्हता, वत्सगुल्म या शहराचे नाव प्रथम प्रक्रसेनाचा पुत्र सर्वसेन प्रथम याने या ठिकाणी आपली राजधानी वसविण्याच्या आधीपासूनच प्रसिद्ध होते. आणि वाङ्‌मयीन वर्तुळात तर एका वेगळ्या कारणासाठीच त्याचा उल्लेख केला जात होता. त्यासंबंधीची आख्यायिका अशी की सातवाहन राजा आपल्या राणी आणि अंतःपुरातील स्त्रियांसमवेत जलक्रीडा करीत असतांना त्याने गंमत म्हणून आपल्या हाताने काहीशा वेगानेच पाण्याचे फवारे राणीच्या अंगावर उडवले. त्यामुळे किने घाबरूनच 'मोदकैः सिच्यमाने।' अशी त्याची विनवणी केली. राजाने लगबगीने आपल्या सेवकाकडून लाडवांचे ताट मागविले आणि त्यांचा वर्षाव तिच्यावर करण्यास सुरुवात केली. त्यावर राणी हसू लागली. राजाला काही कळेना, म्हणून राणीने खुलासा केला की, माझ्यावर पाण्याचा शिडकाव करू नकोस (मा उदकैः स्च्यि माम्।) असे मला म्हणायचे होते- आपल्या संस्कृतच्या अज्ञानाने राजा अतिशय लज्जित झाला. आणि लवकरात लवकर आपल्याला व्याकरणशुद्ध संस्कृत यावे म्हणून त्याने दरबारातील पंडितांमध्ये त्याला सहा महिन्यांच्या आत संस्कृत संभाषणामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी शर्त लावली. गुणाढ्य या कवीने तो विडा उचलला आणि प्रतिज्ञा केली की, सहा महिन्यांत जर असे प्राविण्य राजाला अवगत झाले नाही तर मी संस्कृत भाषा वापरणे सोडून देईन. राणी त्याकाळच्या गुजरातमधील प्रसिद्ध क्षत्रप देशातील राजकन्या होती. आणि रूद्रदामनसारखे राजे त्यांच्या संस्कृत पांडित्यासाठी प्रसिद्ध होते. तर महाराष्ट्रातील सातवाहन राजे प्राकृत भाषेतच आपला राजव्यवहार करीत. इतकेच नव्हे तर प्राकृत कवींना त्यांचा उदार आश्रय होता. हाल या सातवाहन राजाने प्राकृत भाषेतील सुभाषितांचा एक संग्रहच 'गाथाकोश' हा ग्रंथ संपादित केला होता. तोच आज 'गाथासप्तशती' म्हणून प्रसिद्ध आहे. प्राकृत भाषेचा प्रभाव जनमानसावर इतका पक्का होता की, गुणाढ्य आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही व कबूल केल्याप्रमाणे त्याला वनवास पत्करावा लागला आणि त्याने आदिवासींकडून पैशाची भाषा शिकून 'वहुकः' म्हणजे नंतरच्या काळात बृहत्कथा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या महाराष्ट्रातील आद्य महाकाव्याची रचना केली. या अप्रतिम काव्याचा आस्वाद घेण्याची समज आजूबाजूच्या पैशाची भाषकांमध्ये नसल्याने गुणाढ्याने आपल्या ग्रंथाचे एकेक पान वाचून अम्भिनारायणाला समर्पित करण्याचे ठरविले. ते काव्य मनाला इतके भिडणारे होते आणि प्रसंग इतका करुण होता की, पशुपक्ष्यादिसुद्धा अश्रू ढाळून आपला शोक व्यक्त करीत होते. आख्यायिका असे सांगते की, शिकारी दरम्यान मारलेली हरणेसुद्धा इतकी दुबळी झाली होती, की राजाच्या ताटात त्यांचे सुके मांस वाढण्याची पाळी राज्याच्या आचायावर आली. राजाला सर्व वृत्तांत समजल्यानंतर त्याने गुणाढ्याला आपलेच महाकाव्य नष्ट करण्याचा प्रकार थांबविण्याची विनती केली. मूळ पैशाची भाषेत लिहिले गेलेले हे काव्य आज उपलब्ध नाही. त्याची 'वसुदेवहिण्डी' म्हणून जैन मुनी संगदास गणिवाचक व धर्मसेन गणी यांनी केलेली माहाराष्ट्री प्राकृतमधील आवृत्ती 'बृहत्कथा श्लोक संग्रह' ही संस्कृतमधील आद्य व त्यापाठोपाठ 'कथासरित्सागर' ही क्षेमेंद्र कवीची 'बृहत्कथाभज्जिरी' अश संस्कृतमधील आकृत्या सर्वश्रुत आहेत. प्राचीन प्राकृत भाषेतील हालाची 'गाथासप्तशती' आणि गुणाढ्याची 'बृहत्कथा' या दोन्ही काव्यांची सुरुवातीच्या कविप्रर्शसेत बाणभट्टासारख्या संस्कृत महाकवींनी वाहवा केलेली आढळते. गुणाढ्य व प्राचीन क्सगुल्म म्हणजे आजच्या वाशीमचा रहिवासी. वत्सगुल्म हे विदर्भ जनपदात असल्यामुळे कालिदासाच्या रसाळ आणि सहजसुंदर अशा काव्यशैलीला 'वैदर्भी' असे नाव मिळाले. तर त्याच शैलीची प्राकृत काव्याची आदिजननी म्हणून वत्सगुल्म शहर प्रसिद्ध होते आणि आहे. या संदर्भात हे नमूद करणे आवश्यक आहे की, वाकाटक वंशाचा सर्वात प्राचीन म्हणून माहीत असलेला, सर्वसेन प्रथम याचा पुत्र द्वितीय विध्यशक्त्ती याचा ताम्रपट प्राकृतमधूनच दिला आहे.
     वत्सगुल्म शहराची ओळख आपल्याला आणखी एक वेगळ्या रितीने मिळते. ती 'वत्सगुल्म्य माहात्म्य' या ग्रंथातून, उपपुराणाशी संबंधित असलेल्या आणि उत्तर मध्ययुगात रचलेल्या या स्थलमाहात्म्यात नेहमीप्रमाणे वत्सगुल्म हे ब्रह्मा, इंद्र इत्यादी देवतांनी गौरविलेले तीर्थक्षेत्र कसे आहे, हे जनमानसावर ठसविण्यासाठी येथील मध्यमेश्वर इत्यादी देवालयांचे वर्णन आढळते. आणि त्याअर्थी हे माहात्म्य इतर स्थलमाहात्म्यीच्यापेक्षा वेगळे नाही. या क्षेत्रातील देवतांची पूजा केली असता, अथवा तीर्थकुंडात स्नान केले असता, लौकिक आयुष्यात धनधान्यसंपत्ती आणि मरणोत्तर मोक्षप्राप्ती अशा प्रकारची ठरीब, ठाशीव वर्णनेच आढळतात. परंतु एकदा चर्चेच्या ओघात वॉल्टर स्पिंक यांनी माहात्म्यातील मध्यमेश्वर देवालयाच्या नावांमागील रहस्य सांगितले.


वाशीम येथील १९९४-९५ मधील उत्खननात सापडलेल्या लाल देऊळ परिसराचे रेखाटन

मध्यमेश्वर यातील 'ईश्वर' या उपपदावरून ते शिवदेवालय असावे, असा तर्क केल्यास ते वावगे ठरणार नाही. परंतु ते शिवाचे देवालय आहे, या पलीकडे 'मध्यम' या शब्दाला विशेष अर्थ आहे. आजच्या काळात वेळेच्या दृष्टीने पुढे पाठीमागे वेळ दर्शविताना इंग्लंडमधील ग्रीनविच हे शहर जगाच्या मधोमध आहे, असे समजून वेळ सांगितली जाते. भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे उज्जयिनी व श्रीलंका यांना जोडून ती मध्यरेषा तयार होते, असे मानले जाते. ती रेषा वाशिम येथूनही जात असल्याने, त्याची खूण म्हणून शिव देवालयाला 'मध्यमेश्वर' असे नाव दिले गेले. वत्सगुल्म माहात्म्याची संहिता व भाषांतर प्रकाशित झाले असले तर या दृष्टिकोनातून या स्थलमाहात्म्याचा विचार केला गेला पाहिजे, असे मत स्पिंक यांनी प्रकट केले.
    माझ्या दृष्टीने अर्थातच सर्वप्रथम वाशिमच्या वसतिस्थानाची पुरातत्त्वीय दृष्ट्या सखोल पाहणी करून उत्खनन करणे, हीच महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यामुळे ९१ साली इंगळे यांच्या शेतात (सर्वे नं. २५६) उत्खनन केल्यानंतर, ९३ साली किल्लारी येथील भूकंप झाल्यावर लातूर जिल्ल्यातील कामांना प्राधान्य देण्यात आले होते, परंतु १९९४-९५ साली परत हे काम डॉ. साळी यांना सुपूर्द करून सुरू करण्यात आले. पवनार अथवा पवनी येथील उत्खननाप्रमाणे किंवा मनसर-नगरधन या पूर्वेकडील राजधानीतल्या प्रमाणे वाशिम येथील उत्खननात कुठलेही भब्य अवशेष उघडकीस आले नाहीत. परंतु वास्तूंचे जे अवशेष हाती आले ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अधिक जुने व अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाकाटकांची नाणी, काही नाणकशास्त्रांच्या दृष्टीने डॉ. अजयामित्र शास्त्री यांनी खासगी संग्रहातील जी नाणी बाकाटकांची म्हणून प्रसिद्ध केली ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. वाकाटकांनी ती पाडली की नाही या विषयाची शंका परंतु ती इतकी जुनी आहेत की नाहीत याविषयीसुद्धा प्रश्नचिन्ह उभे केले गेले. वाकाटकांच्या नाण्यांसारखीच नाणी वाशिम येथील उत्खननात स्तरबद्ध संदर्भात सापडल्याने हा वाद आता परत उगाळण्यात अर्थ नाही, असे वाटते.
    वाशीम येथील फुकटपुरा या भागात सर्वे नं २५६ मध्ये एक उमामहेश्वराची मूर्ती आणि विशालकाय शंखनिधीची मूर्ती होती. तसेच गावात इतरत्र एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती पडून होती. उमामहेश्वराची मूर्ती शंकर पार्वतींचे शबर-शबरीचे रुप दाखवत असून त्यांच्या पाठीमागून डोकावणारा नदीही दिसतो. ही मूर्ती आणि शंखनिधी हे अभिजात वाकाटक शैलीत नसले, तरी राष्ट्रकूटपूर्व काळातील निश्चित होते. आणि त्यामुळेच मी त्याकडे आकर्षिला गेलो होतो. ती जमीन खासगी असल्याने इंगळे यांचे 'ना हरकत' प्रमाणपत्र घेऊन उत्खननाच्या कामास सुरुवात झाली. उत्खननातील वास्तु अवशेष सापडलेल्या देवालयाच्या जोत्याखालचेच होते. देऊळ काहीसे लंबवर्तुळाकार म्हणजे (सुमारे ९ मी. बाय ८ मी.) असे असून समोर (सुमारे ६ मी. बाय ४ मी.) असा आयताकृती मंडप आहे. मंडपातून आत जाण्यासाठी मध्ये अंतराळ असून दरवाज्याची चौकट बसविण्यासाठी सुमारे ५५ सेमी इतके विस्तृत दोन ओटे आढळले. हिंदू मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठित केली असल्यास आणि आतून प्रदक्षिणा घालण्याची सोय केली असली तरी मूर्तीची जागा पाठच्या भिंतीला लागून असते. याउलट या जवळजवळ वर्तुळाकार असलेल्या विटांच्या गाभायात बरोबर मध्यभागी (म्हणजे वास्तुशास्त्राच्या परिभाषेत ब्रह्मस्थानी) एक चौरस (१.८० मीटर बाय १.८० मीटर) असा विटांचा चौथरा व चार बाजूला भद्र असलेला चौकोनी खळगा आढळला, यावरून सहजपणे असे अनुमान करता येते की, या खळग्यात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली असावी. गाभा-याच्या भितीचे एकूण ११ थर असलेली विटांची मित आढळली. त्यांपैकी ६ थर तर या आक्षेपकांच्या मनात आहेच.
      पीठाचे असून उरलेले ५ गाभायाच्या भिंतीचे होते. विटांचा आकार ४८ बाय २५ बाय ९ सेमी अथवा ४२ बाय १९ बाय ७ सेमी इतका होता, वाकाटक काळात याच आकाराच्या विटा वापरल्या जात होत्या, मंडपाच्या ईशान्य भागात काही नाणी सापडली ती अजयमित्र शास्त्री यांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या नाण्याशी साम्य दाखवितात. या वाकाटक नाण्यांच्या बरोबरच क्षेत्रप नाण्यांचे मातीचे २ साचेही मिळाले. वरील सर्व पुरावा लक्षात घेता हे वाकाटकांच्या सर्व प्राचीन देवळांपैकी एक म्हणजे विधशक्ती द्वितीयच्या काळातील असादे, असे वाटते. इंगळे यांच्या शेतापासून जवळच सुमारे ३०० मीटर अंतरावर जैनांच्या क्षेत्रपालांची शेंदूराने माखलेली मूर्ती असलेली एक देवळी आहे. स्थानिक लोक तिला 'लाल देऊळ' असे म्हणातात. १९९४-९५ च्या उत्खननात त्या ठिकाणी विटांच्या भितीच्या कुंपणात अत्यंत ध्वस्त स्वरुपात चार वास्तूंचे अवशेष सापडले. या ठिकाणीही लंबवर्तुळाकार असे अधिष्ठान काहीसे इंगळे यांच्या शेतातील देवळासारखेच आढळले. महत्वाचा फरक असा की मध्यभागी शिवलिंग ठेवण्याचा चौथरा या ठिकाणी सापडला नाही. परंतु या ठिकाणी क्षत्रपांची चांदीची नाणी सापडली. लक्षात येणारे मंदिराचे दोन वास्तुअवशेष या चौथऱ्याच्या नैऋत्येसच आढळले. त्यातील विशेष म्हणजे देवळाला लागूनच पश्चिमेस सुमारे ३ मीटर चौरस एक चौथरा असून त्यात मध्यभागी एक पाण्याचे कुंड आहे. देऊळ उत्तराभिमुख असून पुढे मंडप व मागे अष्टकोनी गाभारा आहे. त्याच्या मध्यभागी एक अष्टकोनी पीठ असून त्यावर कुठली मूर्ती असेल याचा अंदाज बांधता येत नाही. तेथे शिवलिंग निश्चितच नव्हते. कारण शिवदेवालये उत्तराभिमुखी कधीच नसतात. शिवलिंगाच्या अभिषेकजलाची पन्हाळ दाराच्या दिशेने असणे हे व्यावहारिक दृष्टीने सुद्धा गैरसोयीचेच ठरते. पाण्याचे कुंड शेजारी असल्याने कदाचित हे देवीचे ठिकाण असावे. येथील विटांचा आकार मात्र पूर्वीच्या देवळातल्यापेक्षा काहीसा कमीच आढळला ४० बाय १८ बाथ ७ सेमी अथवा ३६ बाय १६ बाय ७ सेमी इतकाही तो काही बाबतीत कमी आढळला. मात्र सर्वात वैशिष्टपूर्ण बाब अशी की, हे अष्टकोनाकृती देवालय वाकाटककालीन असल्यामुळे त्याप्रकारच्या देवळातील सर्वात प्राचीन असे मानावे लागेल. अशाच प्रकारचे, ज्याला हल्लीच्या भाषेत तारकाकृती म्हणता येईल असे देवालय मनसर येथेही सापडले असून त्यासंदर्भात आपल्याला पुढे चर्चा करता येणार आहे.
    आतापर्यंत सापडलेले वास्तुअवशेष भव्य नसले तरी वाशीम येथील दोन मौसमात केलेल्या उत्खननाने हे सिद्ध झाले आहे की वाकाटकांच्या विटांमधील स्थापत्याची प्राचीनता इ.स.च्या चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जाते. तैथेच विस्तृत उत्खनन केल्यास वाकाटकांच्या समृद्ध वारशाचे महत्वाचे धागेदोरे आपणास प्राप्त होतील.

response.lokprabha@expressindia.com

अश्मक राजवंश : बौद्ध व वैष्णव गुंफा आणि मूर्ती

    कुंडल तल राजबंशाचा विचार करताना राष्ट्रकूट राजा मानांक याने विदर्भ आणि अश्मक या जनपदांना त्रासून सोडले, अशा प्रकारचा उल्लेख त्याने आपल्या ताम्रपटात केला आहे. वत्सगुल्म शाखेचा त्याचा समकालीन द्वितीय विन्ध्यशक्ती (इ.स. सुमारे ३५५ ते ४००) याने कुंतल देशाच्या राजाचा पराभव केल्याचा उल्लेख वराहदेवाच्या अजिंठा (गुफा क्र. १६) येथील वराहदेवाच्या शिलालेखात आला आहे. अश्मक या जनपदाचा उल्लेख बौद्ध त्रिपिटकात आलेला असून, गोदावरील तीरावरील बावरी नावाच्या मुनीने शंकासमाधानासाठी आपल्या शिष्याला भगवान बुद्धाकडे पाठवले. त्यात श्रावस्तीकडे जाताना कुठकुठली जनपदे लागतात, याचा उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ असा की, इ.स. पूर्वी पाचव्या सहाव्या शतकात श्रावस्तीहून गोदावरी काठापर्यंत येण्यासाठी व्यापारी मार्ग तयार झालेला होता. अश्मकाला लागूनच पुढे मूलकाचाही उल्लेख आहे. मूलक म्हणजे पैठण आसपासचा मुलूख, अश्मक जनपदाच्या गौतमीपुत्र सातकर्णीच्या शिलालेखातसुद्धा अस्सक म्हणून उल्लेख येतो. शिलालेखातून व पुराणामधील संदभर्भावरून महामहोपाध्याय मिराशरी यांच्या मते अश्मक म्हणजे आताचा अहमदनगर व बीड या भोवतालचा प्रदेश असावा, अश्मकविषयीचा ऊहापोह अडम या (जिल्हा नागपूर) पुरातन ऐतिहासिक स्थलाचे उत्खनक डॉ. अमरेंद्र नाथ यांनीही केला आहे. त्यात त्यांनी दिनेशचंद्र सरकार आणि वा. वि. मिराशी यांच्या मतांचाही परामर्श घेतला आहे. सरकार यांच्या मते अश्मक जनपद हे वैनगंगा आणि गोदावरी यांच्या संगमाच्या जवळपास असावे.

    अश्मक जनपदाच्या अगदी सुरुवातीपासून ते यादवकाळापर्यंतच्या इतिहासावरील डॉ. सुधाकर देशमुख यांच्या पुस्तकात 'अश्मक' जनपदाच्या व्याप्तीविषयी सखोल चर्चा झाली असून त्यांच्या मते मराठवाड्यातील गोदावरीच्या दक्षिण तीरावरील नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड हे जिल्हे मिळून प्राचीन अश्मक जनपद होत असे. तर उत्तर तीरावरील जिल्हे हे मूलक जनपदात मोडत असत अश्मक जनपदातील ठळकपणे लक्षात येणारे आणि पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाचे पुरातन स्थळ म्हणजे तेर होय. त्याची प्राचीन नाव 'तगर'. तगरच्या सातवाहन राज्यातील तीस तटबंदीच्या शहरांपैकी एक, असा ग्रीक वृत्तांतात उल्लेख मिळतो. हे नेमके कुठे असावे याविषयी शंभर वर्षांपूर्वी विद्वानांत मोठा खल झाला. परंतु प्रसिद्ध संस्कृत विद्वान व लिपीतज्ज्ञ डॉ. फ्लीट यांनी दाखवून दिले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा नदीच्या काठावरील आजचे तेर म्हणजेच प्राचीन 'तगर होय. त्यापाठोपाठ झालेल्या अनेक उत्खननांतून हे नगर सातवाहन काळात किती वैभवसंपन्न होते, हे प्रत्ययास आले. डॉ. दीक्षित यांनी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून या अगोदर सुधापाषाणात (लाइम स्टोन) कोरलेली, या ठिकाणी सापडलेली शिल्पे व प्रदक्षिणापथाचे खांब हे एका मोठ्या चक्राकार स्तुपाचे भाग होते, हे दाखवून दिले आहे. डॉ. देव यांनी मराठवाडा विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे केलेल्या उत्खननात येथील तटबंदी रोमन शहराप्रमाणे लाकडाची केलेली होती, असे म्हटले आहे. पाटलीपुत्राच्या पाठोपाठ 'काष्ठदुर्ग' म्हणून ज्याचे वर्णन करता येईल, असे हे भारतातील दुसरे नगर, परंतु तेर हे जग‌द्विख्यात झाले, ते रामलिंगष्पा लामतुरे या विचक्षण कलासंग्रहकाच्या (आर्ट कलेक्टर) आयुष्यभराच्या साधनेमुळे, त्यांनी गोळा केलेल्या शेकडो पुरावशेषात किमती खड्यांचे व मातीचे मणी, हाडाच्या व हस्तीदंताच्या वस्तू, मातीची खेळणी, बाहुल्या व वस्तू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरशाची मूठ असलेली हस्तीदंताची स्त्रीमूर्ती मिळाल्या आहेत. या मूर्तीची प्रतिकृती इटलीमधील पॉम्पे येथील उत्खननात सापडल्यामुळे लंडन येथील ब्रिटिश म्यूझियमच्या अधिकाऱ्यांनासुद्धा तेरची ओळख करून घ्यावी लागली. सातवाहन काळातील आणखी काही महत्त्वाचे तेर येथील पुरावे म्हणजे तगर नगराच्या निगमाचे 'तगरे' असा लेख असलेले तांब्याचे नाणे, व्यास यांच्या शेतात उघडकीस आलेले, विटांनी बांधलेले जलकुंड, त्याच्या काठावरील मातृकेचे गजपृष्ठाकृती मंदिर, लक्ष्मीचे अलंकरण असलेली हस्तीदंती फणी आणि भातभागे यांच्या शेतातील गजपृष्ठाकृती चैत्यगृह.


छाया: सायली दातार


तेरचे हे पुरातत्त्वीय महत्त्व लक्षात घेऊन डॉ. अमोल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यातही तेर तालुक्यातील, ऐतिहासिक काळातील पुरातत्त्वीय स्थळांचा अभ्यास केला

▲ धाराशीव लेणींचे १८७५-७६ साली बर्गिस यांनी काढलेले छायाचित्र.

त्यांच्या निरीक्षणानुसार सातवाहन-वाकाटक काळानंतर मराठवाड्यातील नागरीकरणाचा जोम सहाव्या-सातव्या शतकात व नंतर काहीसा कमी झाला. मोठ्या नगरांची व्याप्ती आक्रसून गेली. तर मध्यम आकारातील गावठाणांचा विस्तार थोडा वाढला. या प्रक्रियेला प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ म. के. ढवळीकर यांनी नागरीकरणात आलेली सुस्ती किवा शिथिलीकरण असे नाव दिले आहे. (Deurbenition) प्रत्यक्ष तेर येथील त्रि-विक्रम, उत्तरेश्वर, नीलकंठेश्वर इत्यादी मंदिरे, रामलिंगप्पा लामतुरे संग्रहातील शेकड्यांनी असलेले पुरावशेष, औरंगाबाद जिल्ल्यातील भोकरधन येथील उत्खननात गुप्त वाकाटक कालखंडातील (इ.स. तिसरे ते सहावे शतक) पुरावशेष लक्षात घेता, अश्मक आणि मूलक ही जनपदे या व नंतरच्या काळात आर्थिकदृष्ट्या संपन्न होती असे दिसते. तेरपुरते बोलावयाचे झाल्यास काही विद्वान समजतात त्याप्रमाणे त्रिविक्रम मंदिर हे चालुक्य काळातील नसून वाकाटक काळातीलच असावे.
    संग्रहालयातील शहाबादी दगडात (Lime stone) कोरलेली शिरोविहीन, गदा, चक्र, शंख धारण करणारी चतुर्भुज विष्णूची मूर्ती, पक्क्या मातीतील- महिषासुरमर्दिनीची मूर्ती, हस्तिसमुदायाचे चित्रण असलेला पक्क्या मातीतील टांक व शंखापासून केलेल्या षटकोनी झाकणावर उथळपणे कोरलेली व्यक्त्तिचित्र ही वाकाटककालीन कलेचा उत्तम आविष्कार म्हणता येईल.
      परंतु सर्वात महत्त्वाचा वाकाटककालीन वास्तूंचा नमुना म्हणून उस्मानाबाद शहराजवळ असलेल्या धाराशीवच्या तथाकथित जैन गुंफा व शहराच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या चामर लेणीचा उल्लेख करता येईल, जैन लेणी गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असून चामर लेणी गावाच्या नैऋत्येस वेशीलगत एका खडकावर कोरल्या आहेत. या सर्व निझाम सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत मोडत होत्या. १९५६ नंतर महाराष्ट्र शासनाच्या राज्यसंरक्षित वास्तू आहेत. जैन लेणी पाहण्यासाठी बाराशीवच्या डोंगराच्या पठारावर पावयांनी थोडे खाली उतरून जावे लागते. पायऱ्यालगत असलेल्या घळीच्या उजव्या बाजूस चार मुख्य लेणी व डाव्या बाजूस तीन लेणी आहेत. लेणी दक्षिणाभिमुख असून पहिल्या लेणीत एक पाण्याचे टाके आणि काही मूर्ती, तसेच दहाव्या-बाराव्या शतकातील जैन मूर्ती आहेत. दुसरी लेणी सर्वात मोठी आणि भव्य आहे. परंतु टेकडीचा दगड बाईट प्रतीचा असल्याने समोरचा आडवा मंडप आणि आतला सभागृहाचा पुढील भाग यामध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. पूर्वी निझाम सरकारने साफसफाई आणि दुरुस्ती केली. पण किल्लारीच्या भूकंपानंतर महाराष्ट्राच्या पुरातत्त्व विभागाने व्यवस्थित रीतीने सफाई आणि दुरुस्ती केली. लेणीसमोरील अंगणात जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारावर लहानसे गोपूर असून त्यावर ध्यानस्थ जिनाची मूर्ती आहे. तिच्यावर दोन नाग चवऱ्या ढाळत आहेत. अंगणामध्ये उजव्या बाजूला अंगच्या दगडातून कोरलेला (Monolithic) स्तूप आहे. लेणीच्या समोरील आडवा मंडप उंच जोत्यावर आहे. वर जाण्यासाठीच्या पायऱ्यांच्या दोन्ही अंगाला नाचण्या-बागडण्याच्या आविर्भावात असलेल्या गणांची पंक्ती अर्धउठावात कोरली आहे. समोरचा नऊ फूट खोल असा आडवा मंडप बहुधा आठ खांब आणि दोन अर्थस्तंभ यावर तोलला होता. सभागृह ८० फूट चौरस असून तो ३२ खांबांवर उभा आहे. पूर्व आणि पश्चिम यांच्या मितीमधून नऊ फूट चौरस आकाराचे आठ निवासकक्ष असून मागील म्हणजे उत्तरेकडील भिंतीत मध्यभागी एका उंच चौथऱ्यावर सिंहासनाधिष्ठित पार्श्वनाथाची ध्यानस्थ मूर्ती सात फणा असलेल्या नागाच्या सावलीत अर्धपद्मासनात बसलेली आहे. दोहोबाजूस चवरीधारी राजपुरुष असून वर आकाशात दोन्ही बाजूनी हातात माळा घेऊन लहानगे गंधर्व खाली झेपावत आहेत. गाभाऱ्याच्या दुतर्फा तीन तीन निवासकक्ष असे मिळून २२ निवासकक्ष आहेत. पूर्वीच्या काव्ळी अजिंठा येथील गुंफांप्रमाणेच येथील छत व मितींवर मातीचा गिलावा देऊन त्यावर मूर्ती व वेलबुट्ट्या काढून गुफा सुशोभित केली होती, हे काही ठिकाणी अजूनही शिल्लक असलेल्या चित्रांच्या अस्पष्ट आकृतीवरून लक्षात येते. सभागृहातील आतल्या खोबाच्या ओळीत रंगवलेली जिनप्रतिमा अजूनही दिसते.
       शैलीवरून हे चित्र दहाव्या शतकातील असावे असे दिसते. क्रमांक तीनची गुंफा त्यामानाने सुस्थितीत आहे. ती हुबेहूब त्याच विन्यासावर कोरलेली असली, तरी आकाराने लहान आहे. गुंफा क्रमांक दोनप्रमाणे अंगणात शिरण्यासाठी गोपूर असलेले प्रवेशद्वार मात्र नाही. समोरचा आडवा मंडप, सहा खांब आणि दोन अर्धस्तंभांवर तोलला असून, मंडपांच्या शेवटी उजव्या हातास एक कक्ष असून तो निवासासाठी नसावा, कारण मध्यभागी प्रदक्षिणा घालता येईल असा चौथरा आहे. परंतु मूर्ती कोरावयाची राहिली आहे. आतील सभागृह ५६ फूट चौरस असून दोन्ही अंगाला पाच पाच आणि मागील भिंतीत गाभाऱ्याला दुतर्फा दौन दोन निवासकक्ष असे एकूण १४ निवासकक्ष आहेत.
      सभागृहातील २० खांब आतमध्ये एक चौकोन तयार होईल अशा रीतीने मोडले आहेत. पाठीमागल्या व पुढल्या बाजूस सहा सहा अशा दोन रांगा व त्यांना जोडणाऱ्या पूर्व पश्चिमेच्या रांगेत त्यांना जोडणारे चार चार खांब अशी रचना आहे. समोरच्या व्हरंड्यातून सभागृहात जाण्यासाठी पाच प्रवेशद्वारे आहेत. या दोन्ही गुफांत तीन प्रकारचे खांब वापरले आहेत. उदा. गुफा क्रमांक तीनमध्ये समोरच्या व्हरांड्यात दर्शनी बाजून अष्टकोनी (शास्त्रीय परिभाषेत विष्णुकान्त) प्रकारचे खांब वापरले आहेत. तर आतल्या सभामंडपात चौकोनी (म्हणजे ब्रह्माकान्त) प्रकारचे व गोल (रुद्रकान्त) प्रकारचे खांब योजले आहेत. चौकोनी खांबावर १६ कोनी गळ्यासारखा भाग असून त्याच्या वर आणि खाली वेलबुट्टींचे पट्टे व मध्यभागी कमळाची अर्धतबके आहेत. (Half lotus medallions) चौकोनी खांबांना तुळईच्या खाली तरंग असलेले हस्त (ब्रेकेट्स) आहेत. गोल खांब हे वर जाताना थोडे निमुळते होतात आणि गलस्थानावर मरकत माणिक्यपट्टीकांना लोंबत असलेल्या एकमेकांना छेद देणाऱ्या मोत्यांच्या माळा आहेत. त्यावर कुम्भ आणि कलश आहे. क्रमांक तीनच्या गुंफेत शाबूत असलेली आणखी एक नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे सज्जावर स्तंभ, सूची आणि स्तूपिका यांनी बनविलेला लांबलचक कठडा, त्यावर दोन स्तंभांनी तयार केलेल्या कोनाड्यांची रांग, दोन कोनाड्यांच्या मध्ये गण व प्रत्येक कोनाड्यात एक ध्यानस्थ जिनमूती. या सर्वावर एक सज्जांची रांग व सरतेशेवटी गण असलेल्या गवाक्षांची रांग, दगडाचे पोत अगदी हलक्या दर्जाचे असल्याने उठावात काढलेली ही सर्व शिल्पे झिजून नष्ट झाली आहेत, बर्गिस यांनी १८७५-७६ साली घेतलेल्या काही उत्कृष्ट छायाच्चित्रांमुळे आज आपण या सर्वांची कल्पना करू शकतो. या ओळीतील सर्वात शेवटची आणि पूर्वेकडील पहिली म्हणजे गुंफा क्रमांक चार ही गुफा, समोरचे मोकळे अंगण ओलांडून गेल्यानंतर आतल्या सभामंडपात तीन दारांतून प्रवेश करता येतो. मंडप सुमारे २८ चौरस फूट असून बाजूच्या दोन प्रवेशद्वारालगतच एकेक निवासकक्ष व डाव्या बाजूच्या भिंतीत गर्भगृहाला लागून आणखी एक, असे तीन निवासकक्ष आहेत. दुसऱ्या बाजूस असलेला कक्ष मधली गर्भगृहाची भिंत दूर करून गर्भगृहातच समाविष्ट केला आहे. गाभाऱ्यात चौथऱ्यावर पूर्वीच्या दोन गुफांप्रमाणेच सात फण्याच्या नागाखाली अर्धपद्मासनात बसलेली जिनमूर्ती आहे. मूर्तीसाठी उपयोगात आणलेल्या दगडात अनेक छिद्रे असल्यामुळे ती अत्यंत विदीर्ण अवस्थेत आहेत या गुंफेचे वैशिष्ट्य म्हणजे छत सपाट असले तरी प्रवेशद्वाराच्या वरच्या भागामध्ये एक अंधगवाक्ष कोरण्यात आले आहे. यावर टिप्पणी करताना बर्गिस असे म्हणतो की, अगदी जुन्नर येथील गणेश लेणीच्या शेजारच्या लेणींप्रमाणेच येथेही अंध (ब्लाइंड) गवाक्षाची योजना करण्यात आली आहे.
     घळ ओलांडून गेल्यानंतर एका पाण्याच्या टाक्यापलीकडे एक अर्धवट कोरलेली गुंफा लागते, १३ फूट बाय नऊ फूट आकाराचा कक्ष ओलांडून गेल्यानंतर दारापलीकडे एक नऊ फूट चौरस कक्ष, त्याच्या उजव्या हाताला एक सात फूट चचैौरस कक्ष व डाव्या हाताला अर्धवट कोरलेल्या कक्षाची सुरुवात अशी या गुंफेची रचना आहे. बहुधा ही गुफा निवासासाठीच वापरली जात असावी. इथून पुढे थोडेसे आम्नेवेस गेल्यानंतर गुफा क्रमांक पाच आहे. समोर नऊ फूट रुंद, ४४ फूट लांब व्हरांडा, आतील सभामंडप ४३ फूट रुंद व ३८ फूट खोल, आणि आतील गाभाऱ्यात इतर गुफांसारखी नागराजाच्या फणेच्या सावलीतील ध्यानस्थ मूर्ती आहे. गुफा अर्धवट कोरलेली, कारण मंडपातील खांबांना आकार देण्यात आलेला नाही.

▲ छाया: सायली दातार

      यानंतरची अगदी शेवटची गुंफा वैष्णव आहे. पण हिचे कामही अर्ध्यावरच सोडलेले दिसते. व्हरांड्याचे खांब मोकळे केलेले दिसतात. ही बरीच मोठी गुफा होणार होती असे दिसते ती एकूण ६० फूट लांब आहे. खांबांआडचा व्हरांडाही काहीसा कोरून झाला होता, पण पलीकडे काही नाही. जमेची बाजू एवढीच की स्तंभशीषीवरची शिल्यांची ओळ कोरून पूर्ण झाली होती. ही सर्वच शिल्पे काही आज पूर्णावस्थेत नाहीत, काही झिजून खराब झाली आहेत. पण शिल्पांचा विषय हरिवंशात वर्णिलेल्या कृष्णलीला हा आहे. काही प्रसंग आजही ओळखता येतात. वृषासुरवध, गोवर्धनोद्धार, कंसाचा दरबार इत्यादी. शिल्पे अशा रीतीने स्तंभशीर्षावर कोरणे ही पद्धत अजिंठा येथील गुंफा एकमध्ये आढळून येते. तसेच एकूण शैलीवरूनही गुफा वाकाटककालीनच वाटते
    गावाच्या दुसऱ्या टोकास असलेल्या चामर लेण्यांपैकी क्रमांक सातची गुंफा ही वाकाटककालीन वाटते. हिचा मंडप सुमारे ३० चौरस फूट असून मागे गाभारा आठ चौरस फूट. गाभाऱ्यात पीठावर मूर्ती बसवण्यासाठी खोबण आहे. दर्शनी भागात दोन अष्टकोनी स्तंभ व बाजूला दोन अर्धस्तंभ आहेत. आत मंडपात चार खांबांच्या दोन रांगा, बाजूचे चार खांब चतुररुा, आतील चारांपैकी दोन पुढील दोन १६ कोन असलेले, तर पाठीचे दोन अष्टकोनी आहेत. गाभाऱ्याच्या दाराची चौकट तीन शाखांनी युक्त असून त्यातील मधली स्तंभशाखा एकूण तल-विन्यास, व खांबांची घडण पाहता हे मंदिर वाकाटककालीन व बहुधा विष्णूचे असावे
     धाराशिव येथील पहिल्या तीन गुफा स्थापत्य व शिल्पदृष्टया महत्त्वाच्या आहेत. बर्गिसने त्यांचे परीक्षण केले त्या वेळी त्याला त्यांचा काळ एकूण शैलीवरून इ.स.चे सातवे शतक इतका जुना वाटला. आणि त्याच्या मते येथील जिनमूती त्याला तीर्थंकर पार्श्वनाथाच्याच वाटल्याने त्याने या गुंफा जैन असाव्यात असाच निर्वाळा दिला. या गुंफा जैन असाव्यात हे सुप्रसिद्ध जैन विद्वान हिरालाल जैन आणि त्या पाठोपाठ म. म. मिराशी यांनाही वाटले. हिरालाल जैन यांना तसे वाटण्यासाठी कारणही होते. कनकामरकृत करकंड्डुचरिउ, या ११ व्या शतकात रचलेल्या अपभ्रंश काव्यात तेरजवळील गुफांचा वृत्तांत आलेला आहे. या करकंडु- आख्यानाप्रमाणे सम्राट करकंडू हा दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला असताना त्याच्या सैन्याचा तळ तेर येथे पडला असता धार व शिव या नावाचे स्थानिक राजकुमार भेटावयास आले व त्यांनी जवळच्या डोंगरावरील 'हजार खांब असलेली' पार्श्वनाथ देवतेची अद्‌भुत गुंफा व जवळच असलेल्या वारुळावर नेमाने कमळाचे फूल वाहणाऱ्या एका हत्तीचा किस्सा सांगितला. राजाने कुतूहलापोटी वारुळ उकरल्यानंतर त्याला पार्श्वनाथाची प्रतिमा सापडली. पार्श्वनाथाच्या लेणीत मूर्तीखालील सिंहासनावर त्याला दगडाची मोठी गाठ दिसली. बरोबर असलेल्या स्थपतीने नाखुशी दाखवल्यानंतरही त्याने हट्टाने ती गाठ फोडायला लावली. त्या गाठेतून जलप्रवाह निधून ते लेणे त्यात नष्ट पावले. म्हणून त्याने आणखी दोन लेणी कोरविली व त्यातील एकात वारुळात सापडलेली जिनमूर्ती प्रतिष्ठित केली. करकंडूने जुन्या पार्श्वनाथ लेणीची चौकशी केली असता, त्याला असे सांगण्यात आले की नील आणि महानील या हिमालयातून निर्वासित झालेल्या दोन विद्याधरांनी हे लेणे कोरले व भगवान पार्श्वनाथाची प्रतिमा प्रतिष्ठित केली. आख्यानाचा सारांश असा की मूळ लेणे, जे हिरालाल जैन यांच्यामते आजची पडझड झालेली गुंफा क्र. दोन आहे, ते परंपरेप्रमाणे महावीराच्या काळच्या अगोदरचे म्हणजे इ.स. पू. सातवे शतक इतके जुने असावे. या आख्यानाच्या दोन स्वतंत्र कथा हरिषेण (इ.स. चे नववे शतक) या राष्ट्रकूट सम्राटाच्या दरबारातील कवीने रचलेल्या बृहत्कथाकोश या ग्रंथातही आलेल्या आहेत. यावरून ही जैन परंपरा इ.स.च्या नवव्या शतकाइतकी जुनी दिसते. हिरालाल जैन यांनी या आख्यानाचा इतिहासदृष्ट्याही विचार केला आहे. त्यांच्या मते कोकणात राज्य करणारे, राष्ट्रकूटांचे मांडलिक शिलाहार हे स्वतःला विद्याधर व तगरपुराधीश्वर असे बिरुद लावतात. त्यांचा आद्यपुरुष किंवा त्याचा वंशज तगर येथे राज्य करीत असवाना सातव्या आठव्या शतकात ही लेणी कोरण्यात आली असावीत.

छाया: एसव्हीजी

प्रसिद्ध कलेतिहासतज्ज्ञ म. के. ढवळीकर यांनी स्थापत्य-शिल्पदृष्ट्या अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की यातील बारकाव्याकडे बर्गिसखेरीज इतरांचे लक्ष गेले नाही. या मूर्ती प्रतिमालक्षणावरूनसुद्धा बुद्धाच्याच वाटतात. भगवान बुद्धाच्या डोईवर, माराने हल्ला केल्यानंतर, नाग मुचलिंदाने आपल्या फणांचे छत्र धरले होते. अशा प्रकारचे ध्यान असलेल्या मूर्ती नागार्जुनकोंडा येथे सापडल्या आहेत. आणि पहिल्या चार लेणींचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक असा मानणेच युक्त ठरेल.
ढवळीकर यांचे म्हणणे सयुक्तिक वाटते याची दुसरीही कारणे आहेत.

छाया: सायली दातार

एक म्हणजे जैन गुफांमध्ये १५ अथवा २० निवास कक्ष असलेली मंदिरे मिळत नाहीत. जैनांचे उपाश्रय गावात असत. लयन मंदिरे डोंगरात. उदा. बदामी, वेरुळ, अंकाई-टंकाई, आंजनेरी येथील गुफा, मुचलिंद नाग आणि बुद्ध यांच्या उपासनेचा एक स्वतंत्र संप्रदायच श्रीलंकेत आहे, त्याचा प्रसार आग्नेय आशियात झालेला दिसतो. सिलोनी बौद्ध भिक्षूचा एक संघ आंध्रात नागार्जुनकोंडा-अमरावती भागात होता. तेर येथील बौद्ध स्तुपावरून, त्यातील शिल्पांवरून अमरावती येथील धार्मिक परंपरांशी तेर विहाराचा घनिष्ठ संपर्क होता हे दिसते.
   सारांश असा की, ही लेणी जैन नसून बैद्धच असावीत. ज्याप्रमाणे अजिंठा येथील २६ क्रमांकाची लेणी अश्मक राजवंश आणि तेथील अमात्यांच्या प्रेरणेनेच कोरले गेले, त्याचप्रमाणे ही लेणीसुद्धा त्यांच्याच आश्रयातून निर्माण झाली असावीत. अश्मकांच्या पुढाकाराने कदाचित लेणी क्र. २१ ते २४ सुद्धा निर्माण झाली असावीद त्याचा ऊहापोह आपण अजिंठ्यावरील लेखामधूनच करणार आहोत तूर्त आपण आणखी एक निष्कर्ष काढणार आहोत की अश्मकांच्या राजाश्रयाखाली वैष्णव गुफा, मंदिरेही उभारण्यात आली होती. धाराशिव व चामर येथील लेणी आणि लामतुरे संग्राहालयातील शहाबादी पाषाणातील मूर्ती याला साक्ष आहेत

response.lokprabha@expressindia.com
 

त्रैकूटक राजवंश अणि तत्कालीन कला

आ पण गुप्तकला किंवा सातवाहनकला यांचा विचार करतो, तेव्हा फक्त त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या स्थापत्य, शिल्प व चित्रकलेचाच विचार करीत नाही, त्यात त्यांचे सरदार-दरकदार यांच्या आश्रयाने निर्माण झालेल्या कलावस्तूंचा, त्यांच्या कारकीर्दीत व त्यांचा अंमल असलेल्या प्रदेशात निर्माण झालेल्या सर्व दृश्यकलांचाही विचार करतो. गुप्त साम्राज्य किंवा सातवाहन साम्राज्य यांचा विस्तारही अवाच्या संवा होता, त्यात प्रादेशिक केंद्रे उदयास येणे अपरिहार्य होते, तसेच सम्राटाच्या वर्चस्वाखालील जनपदांतसुद्धा राजधानीतील कलाप्रवाहांचा, चोखंदळपणाचा परिणाम होणे अपरिहार्थ होते. त्यामुळे मथुरा, कौशांबी व सारनाथ ही कलाकेंद्रे गुप्तशैलीत स्वतःचे बारकावे जपत असली तरी त्यांतील एकजिनसीपणा जाणवतोच. गुप्तराजांचा गंगा-यमुनाखोथातील, साम्राज्याचा गाभ्याचा भाग वगळला तर भोवतालच्या सामंतांच्या प्रदेशांतील जनपदांत, ठळक प्रादेशिक वैशिष्ट्ये आढळली तरी, गुप्तकलेचा प्रभाव दिसतोच. त्रैकूटकांचे राजघराणे आजपासून दीडेकशे वर्षांपासून संशोधकांना माहीत असले तरी काही राजांचे योगायोगाने उघडकीस आलेले नाण्यांचे निधी (treasuretroves) आणि पाच ताम्रपट वगळता राजकीयदृष्ट्या महत्वाची इतर माहिती न मिळाल्याने भारताच्या राजकीय इतिहासांतसुद्धा त्या देशाची फारशी दखल घेण्यात आली नाही.


        कान्हेरीच्या गुंफाचे महत्व लक्षात आले परंतु प्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद डॉ. बर्ड यांनाही आपल्या प्रयत्नामुळे या राजवंशाच्या इतिहासास वेगळेच वळण लागणार याची त्या वेळेस कल्पना आली नाही. बर्ड यांना होते आणि त्यामुळे लेख अथवा नाण्यांच्या स्वरूपात एखादा ठोस पुरावा मिळाल्यास त्याच्या ते शोधात होते. त्यांना तसा तो मिळाला, एका ताम्रपटाच्या रूपाने, त्यांनी उत्सुकतेपोटी खणलेल्या (इ.स. १८३९) दगड व विठतांत बांधलेल्या एका स्तूपात. या स्तूपात अपेक्षिल्याप्रमाणे एका दगडी करड्यात हिरेमाणकांसकट रक्षा व अवशेष आणि अनपेक्षितपणे एका तांब्याच्या करंड्यांत दोन पत्रे असलेला एक ताम्रपट व दुसऱ्यात एका पायावर जुन्या अक्षरात लिहिलेली धर्मलिपी मिळाली या धर्मलिपीवरून स्पष्ट झाले की तो स्तूप विधिवत प्रतिष्ठित झालेला असून, तो आता धर्मकाय म्हणून समजला जाईल. सापडलेला स्तूप, त्यातील ताम्रपट व ताम्रपत्र, त्यावरील अभिलेख या सर्वांवर बर्ड यांनी आपला लेख एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालच्या जर्नल (१८४१, पृ. ९४-९६) मध्ये छापला. हा ताम्रपट एखाद्या राजाने दिला नसून, सिधू विषयातील कानकग्रामाच्या बुद्धरुची नावाच्या उपासकाने सर्वश्रेष्ठ श्रावक आर्य शाद्धतीपुत्राच्या स्मरणार्थ हा दैत्य पाषाण व विटांनी बांधला. हा स्तूप सागर मेरुपर्वत, सूर्य-चचंद्र आहेत तोपर्यंत शाबूत राहो. आणि देव, यक्ष, सिद्ध व विद्याधरगण, माणिभद्र, पूर्णभद्र व पाचिक हे यक्ष, आणि आर्य वज्रपाणि, वाङ्कणक आदी हा दैत्य सुखरूप राहील हे पाहोत, व प्राप्त झालेली कीर्ती मुलगा पुष्य यास मिळो, अशी इच्छाही प्रकट केली. हे कार्य त्याने त्रैकूठकांच्या भरभराटीच्या राज्यात २४५ व्या वर्षी पूर्ण केले.


         डॉ. भाऊ दाजी लाड, म. म. मिराशी, दिनेशचन्द्र सरकार, डॉ. शोभना गोखले यांपासून ते अमितेश्वर झा व दिलीप राजगोर या अलीकडल्या विद्वानांपर्यंत सर्वांनी त्रैकूटकांचा २४५ हा संवत् शालिवाहन शके की कलचुरि-चेदि संवतात आहे, याचा खल केला आहे, व त्यांचे दोन गट पडले आहेत. शकसंवत् धरला तर या राजवंशाची कारकीर्द इ.स. २८५-३६४ या काळात झाली असे मानावयास लागेल, तर कलचुरी संवत् धरल्यास इ. स. ४५७-५३३ असे मानावे लागेल, म्हणजे जवळजवळ १७० वर्षांचा फरक पडतो, पण ज्या स्तूपात तो ताम्रपट सापडला त्याच्या रचनाशैलीवरून तो इ. स. ३२३ मध्ये की इ.स. ४९४ बांधला याविषयीही खातरजमा होऊ शकते हे लक्षात घेणे आवश्यक होते. तो विचार डॉ. मेरिलीन लीज या मिशिगन विद्यापीठातील संशोधिकेने केला. पण त्याचा ऊहापोह करण्याअगोदर कलेतिहासज्ञांनी महाराष्ट्रातील बौद्ध गुफा, त्यातील स्थापत्य व शिल्प, आणि मूर्तिविज्ञान यांच्या इतिहासाची गुंफण कशी केली हे जाणून घेणे आवश्यक आहे. फर्ग्यूसन व बर्गिस हे गुफाविषयक अभ्यासाचे आद्य प्रवर्तक, त्यांनी अभ्यासाच्या, कालक्रमाच्या सोयीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील बौद्ध गुफांचे, अगोदरच्या हीनयान व नंतरच्या महायान असे वर्गीकरण केले आणि त्यांना अवगत झालेल्या बौद्ध धर्माच्या ज्ञानाच्या आधारे, गाभाऱ्यात स्तूप असेल तर ती गुफा हीनयानपंथीय व बुद्धमूर्ती असेल तर महायानापंथीय असा ठोकताळा मांडला. (वास्तविक सांप्रतच्या काळात संशोधनात वा सामान्य लेखनाही हीनयान हा शब्द वापरत नाहीत, कारण तो श्रावकयानीय थेरवादींना उद्देशून तुच्छतेने महायानी वापरत असत.) फर्ग्यूसन यांच्या आकलनाप्रमाणे, अजिता येथील गुफा क्र. ९, १०, ११, १२, १३ व ५ अ वगळता, सर्व गुफा या महायानपंथीय आणि सर्वात जुन्या. ते कुठल्याही महाराष्ट्रातील गुंफेचा वज्रयानी म्हणून उल्लेख करीत नाही. सर्वप्रथम प्रा. गुप्ते यांनी ते विशेषण वेरूळ येथील बौद्ध गुफांबाबत वापरले, त्यानंतर म. न. देशपांडे यांनी पन्हाळे-काजी येथील गुफांना उद्देशून सार्थ रीतीने वापरले. नंतरच्या पिढीतील, म्हणजे विद्या दहेजिया व नागराजू यांनी श्रावकथानीय गुफांचा खोलात जाऊन अभ्यास केला. जितका लाकडी घटकोचा वापर जास्त तितकी गुफा जुनी या ठोकताळ्यापलीकडे जाऊन, नवे निकष उपयोगात आणले. त्यांनी स्थापत्याचे घटक असलेल्या, विशेषतः स्तूप, स्तंभ यांच्या ठेवणीबरोबरच, शिल्पशैली व अक्षरांच्या वळणात होत जाणाऱ्या बदलांचाही मागोवा घेऊन गुंफांचा कालक्रम अधिक पक्का केला. त्यावरून असे लक्षात आले की, पूर्वी समजले जात होते त्याप्रमाणे सातवाहन काळानंतर गुंफा कोरण्याच्या कामात मोता खंड पडला नव्हता, कामात थोडे मोटा आले होते. हीनयान गुफांमधील या शेवटच्या गुंफा महायान गुंफांचा दुवा ठरू शकतील हे ढवळीकरांच्या 'लेट हीनयान केव्हज्' या प्रबंधामुळे, तसेच सुरेश जाधव यांच्या जुन्नर येथील गुंफांच्या अभ्यासामुळेही लक्षात आलेच होते. या सर्व प्रपंचाला प्रा. शिलगलॉफ यांच्या अजिता येथील कथनात्मक चित्रांच्या विश्लेषणामुळे आणखी एक कलाटणी मिळाली. या अगोदर, बैद्ध धर्मातील जातककथीचा उलगडा करावयाचा झाल्यास पाली आगमातील जातके स्रोत म्हणून वापरण्यात विद्वानांना संकोच वाटत नसे. एकीकडे त्या गुंफा महायान पंथाच्या म्हणून वर्गीकरण करावयाचे व त्यातील चित्रणांचे पाली ग्रंथांतून स्पष्टीकरण द्यावयाचे यांत काही 'वदतोव्याध्यात' आहे, हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. खरे तर तारा देवतेचे एक-दौन ठिकाणीच चित्रण, अवलोकितेश्वराचे, विशेषतः त्याच्या अष्टमहाभयत्राण रूपाचे विशेष चित्रण, काही चित्रणांसोबत स्गात लिहिलेले आर्य शूस्सेनाच्या जातकमालेतील श्लोक यांवरून या गुफा परिपक्व महाश्थान पंथाच्या नाहीत हे स्पष्ट होते. मुनीशचंद्र जोशींनी या गुफा सर्वास्तिवादी (हीनथानातीलच एक उपपंथ) निकायाध्या असल्याविषयी निर्वाळा दिलेलाच होता, शिलगलॉफ यांच्या अनेक वर्षांच्या साधनेमुळे जातकमालेव्यतिरिक्त सद्धर्भपुण्डरिक, दिव्यावदान इत्यादी मिश्र-संस्कृतभाषेत - म्हणजे खरे तर गांधारीत लिहिलेल्या अनेक सर्वास्तिवादी आगमधथांच्या साहाय्यानेच अजिता येथे चितारलेले प्रसंग समजू शकले. व दख्खनमधील चौथ्या ते सहाव्या शङकांतील बैद्ध धर्मविषयक संशोधनाला नवी दिशा मिळाली.
      १९७३ साली वॉल्टर स्पिक थांना वीसेक वर्षांच्या संशोधनानंतर हे लक्षात आले की मिराशींनी हरिषेणास बहाल केलेला कार्यकाळ बराच ऐसपैस आहे, तसेच अजिंठ्यासारख्या उच्च कोटीच्या कलेचा आजूबाजूच्या मुलखातील झालेल्या परिणामाचे योग्य मूल्यमापनही करणे आवश्यक होते. त्यांनी, ऋषिकराज उपेन्द्रगुप्त, सम्राटाचा मंत्री वराहदेव, श्रेष्ठी माथुरक व विशेष म्हणजे मांडलिक अश्मकराज या हरिषेणाच्या सरदार- दरकदारांचे परस्परसंबंध, काही अपूर्ण राहिलेल्या गुफा, त्या पूर्ण झाल्या तरी यजमानाची प्रशस्ति नसलेले लेख, घाईघाईने मधेच कोबलेल्या, मिथूनी कौरविलेल्या मूर्ती या बाबी लक्षात घेऊन असा निष्कर्ष काढला की इ.स. ४७८ मध्ये हरिषेणाचा मृत्यू झाला असावा व आज दिसते तेवढे कोरीव काम पूर्ण झाले असावे. त्याचा मुलगा, सर्वसेन तिसरा यानेही आठेक वर्षे कसबसे राज्य केल्यानंतर इ.स. ४८४ पर्यंत वाकाटक साम्राज्य अचानक कोसळले असावे. त्यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे हरिषेणाचे सामंत म्हणून उल्लेखिलेल्या राजांनी आपला वेगळा कारभार मांडण्यास वाकाटक साम्राज्याच्या अश अचानक विलयाच्या वेळेसच सुरुवात केली, हे स्पष्टपणे दिसते. उदा. कोसल, मेकल, मालव, आंध या प्रदेशात एकतर गुप्तांनी आपले बस्तान परत मांडले किवा नवीन राजवंश उदयाला आला. तीच गोष्ट त्रैकूटकांच्या बाबतीत घडली. दहसेनाचा मुलगा व्याधसेन याने आपले स्वातंत्र्य घोषित केले.

    हरिषेणाच्या साम्राज्याचे विस्तारवर्णन करताना त्याचा अमात्य वराहदेव कुंतल, अवंती, कलिंग, कोसल त्रिकूट, लाट आणि आंध येथील राजे त्याचे सामंत होते असे म्हणतो. त्यापैकी त्रिकूट येथील राजे त्रैकूटक हे हरिषेणाचे सामंत होते. त्यापैकी आदिपुरुष इन्द्रदत्ताचा मुलगा दहसेन याचा राज्यकाळ इ. स. ४३८ ते ४८०, व्याघ्रसेनाचा ४८० ते ४९४, असा असावा. याचा अर्थ ज्या वेळी सुबन्धुने महिष्मती येथे कलचुरी राज्याची स्थापना केली, याच सुमारास व्याधसेनाने स्वातंत्र्य पुकारले असावे. डॉ. शोभना गोखले त्यांना कोकणात माटवण येथे सापडलेल्या व्याघ्रसेनाच्या वारसीच्या ताम्रपटावरून मध्यमसेन हा सहाव्या शतकाच्या पहिल्या दशकात राज्य करीत होता. तर त्यापुढील विक्रमसेन याची कारकीर्द चौथ्या दशकात आणि नेमकेपणाने सांगावयाचे झाल्यास ५३३ पर्यंत चालू होती असे दिसते. याचा अर्थ इंद्रदत्ताची कारकीर्द लक्षात घेतल्यास ५३३ पर्यंत त्रैकूटक राजे अपरान्तावर निर्वेधपणे राज्य करीत होते, याला अपवाद फक्त हरिषेणाने दहसेनाला ४७० च्या सुमारास आपले मांडलिकत्व घेणे भाग पाडले. तेव्हापासून ते व्याघ्रसेनाने आपले स्वातंत्र्य पुकारले तेपर्यंतचा दहाएक वर्षांचा हा काळ, वराहदेवाच्या गुफा क्र. १६ मधील शिलालेखाव्यतिरिक्त याला काही दुसरा पुरावा आहे का, असा प्रश्न उपस्थित केल्यास, 'आहे' असे म्हणता येईल, कान्हेरी येथील दुसऱ्या कालखंडातील (इ. स. पाचवे सहावे शतक) गुंफांच्या स्थापत्यावर आणि शिल्पावर अजिंठा येथील कलेची दाट सावली पडल्याचे दिसते. दाराच्या चौकटी, त्यावर मध्यभागी असलेले अर्धस्तंभ (पिलास्टर) गुंफा क्र. ८९, ९० मधील वहांड्यातील आणि सभागृहातील शिल्पांची धारणी आणि त्यामागील हावभाव वाकाटकांच्या सांस्कृतिक प्रभावाचा दुसरा पुरावा शोभना गोखाले यांनी मोठ्या हिरिरीने मांडला. कान्हेरी येथील गुंफा क्र. ८७येथील स्तूपरूपी बौद्ध समाधींचा त्यांनी खोलात जाऊन अभ्यास केला. कान्हेरी येथील केअरटेकर के. एम. वाणी यांच्या साहाय्याने त्यांनी तीसापेक्षा जास्त शिलालेख हुडकून काढले व संपादित केले. गोखलेबाईंनी विशेष करून लक्षात आणून दिलेली गोष्ट म्हणजे, त्यातील बरेच लेख पेटिकाशीर्ष (बॉक्स हेडेड) वळणाच्या ब्राह्मी लिपीत लिहिले आहे. वाकाटकांचे जवळजवळ सर्व शिलालेख या लिपीतच कोरलेले आहेत. त्रैकूटकांवर हरिषेणाचे वर्चस्व होते, हे अधोरेखित करण्यासाठी आणखी एक मुद्दा विशद केला "सकुन्तलावन्ति कलिङ्ग कोसल त्रिकूटलारान्ध... जानिमान/ अशा श्लोकांमध्ये अस्पष्ट झालेली तीन अक्षरे 'परान्त' म्हणजे 'अपरान्त' अशी असावीत, असे सुचविले आहे. त्रैकूटक राजे हे अपरान्ताचे म्हणजे पूर्व दक्षिण- उत्तर कोकणाचे स्वामी असल्याचा त्यांच्या अभिलेखातून उल्लेख येतो. त्रिकूटाबरोबर अपरान्ताचा उल्लेख केल्यामुळे कोकण व सख्याद्री रांगेला लागून असलेला नाशिक अथवा कोल्हापूरसारखा पठाराचा भागही त्यांना अभिप्रेत असावा असे दिसते.
         या सर्व पार्श्वभूमीवर वॉल्टर स्पिंक यांच्या शिष्या डॉ. भेरिलिन लीज यांनी कान्हेरी येथील पाचव्या-सहाव्या शतकातील गुंफांचा विशेष अभ्यास करून प्रबंध सादर केला. "एन्सायक्लोपिडिया ऑफ इंडियन आर्किटेक्चर" या ग्रंथमालिकाचे एक सन्मान्य सहसंपादक डॉ. मधुसूदन ढाकी यांनीही आपल्या लेखनात त्रैकूटक कलेचा परामर्श घेताना या बाबींचा विचार केला आणि डॉ. सूरज पंडित हे कान्हेरी येथील गुंफांवर प्रबंध लिहीत आहेत, हे कळल्यावरून तेथील त्रैकूटक स्थापत्य व शिल्पकलेचा विशेष अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.


       डॉ. पंडित यांनी कान्हेरी येथीलच पाचव्या-सहाव्या शतकातील गुंफीचा विचार केला नाही, तर त्यांच्या प्रबंधात अपेक्षित असल्याप्रमाणे साष्टी बेट आणि भोवतालच्या गुफांमध्ये पाचव्या सहाव्या शतकातील बौद्ध वास्तूंचा आणि शिल्पकलेचासुद्धा विचार केला, त्यात लोणाड, महाकाली आणि भारठाणे येथील अवशेष महत्त्वाचे आहेत. याही पलीकडे जाऊन त्रैकूटक हे अपरान्ताचे स्वामी असल्यामुळे कुलाबा म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ल्यातील बौद्ध गुंफांचा विशेष करून महाडजवळील गांधारपाले आणि कुडा येथील गुंफांचा, त्यातल्या त्यात शिल्पांचा परामर्श घेतला. कोकणबरोबरच सह्याद्रीला लागून असलेल्या नाशिकसारख्या पठारावरील ठिकाणांचा त्यांना विचार करावा लागला कारण त्रिकूट हा पर्वत किंवा त्यावरील अनिरुद्धपुरी ही त्यांची राजधानी नेमकी कुठे होती, याविषयी अभ्यासकांत मतभेद असले तरी राजधानी कदाचित धारापुरी येथेच असल्याची शक्यता असल्याने त्रिकूट पर्वत हा नाशिकच्या आसपास कुठे तरी असावा अशी शक्यता असल्यामुळे त्यांनी कोकण साष्टीबेटे व धारापुरी, नाशिक आणि बोरघाटातील गुंफांवर आपले लक्ष केंद्रित केले. वास्तूच्या दृष्टीने कान्हेरी, महाकाली, लोणाड, महाड, नाशिक व कार्ले या स्थळांचा आणि शिल्पमूर्तीविशेषांच्या दृष्टीने मागठाणे आणि कुडा यांचा विचार केला. त्यांच्या मते कान्हेरी येथील शंभरापैकी पंचवीस गुफा त्रैकूटक कालखंडातील असून त्यातील वीस गुंफांचेच त्यांनी आपल्या ग्रंथात वर्णन केले आहे. त्रैकूटक काळातील कान्हेरी येथील गुफांची स्थापत्यवैशिष्ट्ये त्यांच्या निरीक्षणात आली, ती येणेप्रमाणे -

१) गुफेसमोर प्रशस्त अंगण व त्यावर लाकडी मंडप
२) अंगणात मितीलगत एक बाक 
३) भितीलगत परंतु किंचित आत वर छप्पर
४) गुफेत बाहेर व्हरांडा व आतमध्ये सभागृह आणि गाभारा.
५) गुंफेच्या व्हरांड्याकडे चढून जाण्यासाठी पायऱ्या व याआधी चंद्राशिळा.

वरील उल्लेखिलेल्या २५ गुफांमधील चारांच्या नोंदी (क. ९०, ८९, ३१,४१) त्याकाळचे शिल्पस्थापत्य जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
     त्यातील पाहिल्या तीन व्याघ्रसेन, दहसेन यांच्या काळातल्या (म्हणजे इ. स. ४७५ ते ५००) असून ४१ क्र. ची गुंफा इ. स. ६१० पर्यंत पूर्ण झाली असावी. गुफा क. ९० ही एक स्थापत्य तसंच मूर्तिपूजेच्या उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाची गुफा आहे. स्थापत्यदृष्ट्या ही एक पूर्वीच्या काळातल्यासारखी विहारगुंफा आहे. सभागृहाच्या पुढे मूर्तीसाठीचा गाभारा नाही. पाठीमागच्या भिंतीलगतच जवळजवळ पाच फूट उंच असलेली बैठी, बहुतकरून लाकडाची चलमूर्ती बसविण्यासाठी खोबण करण्यात आली आहे. या संदर्भात येथीलच श्रावकयानीय गुंफा क्र. ३ मधील एका वैशिष्ट्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. कार्ले येथील चैत्यगृहाखमाणे प्रशस्त आणि सुंदर अशा या चैत्यगृहात पारंपरिक पद्धतीने स्तूपाची पूजा करण्यात येत असे. परंतु संशोधकांनी नोंद केल्याप्रमाणे पूजा पद्धतीत तिथे काही फरक घडून येत होते व त्याची सुरुवात येथील ध्वजस्तंभावर ठळकपणे कोरलेल्या बैठ्या व उभ्या अशा दोन बुद्धमूर्तीवरून येते, स्तूपाऐवजी बुद्धमूर्तीच्या पूजेची ही नांदी म्हणावयास हरकत नाही. हा बदल ठळकपणे बाध (जिल्हा धार, मध्य प्रदेश) आणि अजिंठा या ठिकाणी झाल्याचा उल्लेख यापूर्वी केलेलाच आहे. अजिंठा येथील गुंफा क्र.

अकराच्या गाभाऱ्यात प्रदक्षिणा घालता येतील असा स्तूप कोरण्यात आला होता, परंतु नंतर बुद्धमूर्ती कोरण्यात आली तरी पाठच्या भागात स्तूपाचा गोलाकार कायम राहिलेला होता. चैत्यगृह क्र. १९ मध्ये तसेच २६ मध्येही स्तूपाच्या समोर स्थानक बुद्ध मूर्ती स्वतंत्रपणे कोरण्यात आली आहे. कान्हेरी येथे अशा बदलांची चाहूल इ. स. च्या दुसन्या शक्कात लागली असली, तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र पाचवे शतक उजाडावे लागले. वर वर्णिल्याप्रमाणे सभागृहाच्या पाठीच्या भिंतीवरच खोबण तयार करून लाकडी मूर्ती बसविण्यात आली असावी. दुसरा महत्वाचा विशेष म्हणजे अश प्रकारच्या पूजागारांत आगमग्रंथांचे पठण सद्धर्मपुण्डरिक हा सर्वास्तिवादी (म्हणजे पंथदृष्ट्या हीनयानी) पण महायान परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेला ग्रंथ चाळल्यास मूर्तिपूजा आणि धर्मग्रंथपठण यांना आचारविधीमध्ये महत्त्वाचे स्थान होते असे दिसते. कान्हेरी येथील त्रैकूटक गुफातील दर्शनी व्हरांड्याला लागून एक कक्ष (सेल) कोरलेला असे त्यातील कोनाड्यात ग्रंथ ठेवण्याची सोय असावी, असा सूरज पंडितांनी केलेला कयास बरोबरच आहे. कारण याच काळातील एक महत्वाची दुसरी गुफा म्हणजे दरबार लेणे (क.११) जेथे सांधिकरीत्या पठण करण्यासाठी दोन लांबलचक ओटे बांधले होते, असे दिसते व ही परंपरा वेरुळ येथील गुफा क्र. ५ मधील, तशाच प्रकारच्या वास्तुरचनेवरू नही मूलकजन्मदातसुद्धा प्रचलित होती, हे स्पष्ट दिसते. क. ९० मधील गुफेतील बुद्धमूर्ती काष्ठाची आणि चल (सुटी) होती, हा योगायोग नाही. कारण सद्धर्मपुण्डरिकाचाच आधार देऊन सूरज पंडित असा तर्क करतात, की विशेष उत्सवप्रसंगी या मूर्तीची मिरवणूकही काढण्यात येत असे. इ. स. सातव्या शतकातले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे राजा श्रीहर्ष अशा उत्सवप्रसंगी भगवान बुद्धाच्या मूर्तीची हत्तीवरून मिरवणूक काढीत असे, आणि बोधिसत्त्वाच्या जागी चवरी ढाळण्यासाठी स्वतः उभा राहत असे. भारतीय परंपरेतील रथयात्रेच्या प्रघाताच्या मुळाशी अशीच कल्पना आहे. आजही महालक्ष्मी आणि जे जुरीच्या संस्थानात विशेषप्रसंगी देवळाच्या आवारातच चलमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. या चलमूर्ती व्यतिरिक्त सभागृहाच्या तीनही भितीवर अवलोकितेश्वर, श्रावस्ती येथील महाप्रतिहार्य (श्रावस्ती मिरॅकल) भगवान बुद्ध व दोन बाजूस परिचारक असलेले बेोधिसत्त्व अशा त्रिकूटाची प्रतिमा आणि जॉन हेटिंग्टन यांनी ज्याचे वर्णन 'पञ्चजिनमण्डल' असे केले आहे, असे शिल्पपट भरगच्चपणे कोरलेले आहेत. नंतरच्या म्हणजे वजयान काळातही हे बुद्ध मंदिर तितकेच महत्त्वाचे राहिले असावे. कारण या गुंफेच्या माथ्यावर एक चौकोनी खोबण असून त्यामध्ये काम्यस्तूप (वोटिव्ह स्तूप) उभारण्याची पद्धत होती. असे काम्यस्तूप महाकाली आणि पन्हाळेकाजी येथे उभारल्याचा पुरावा आहे.
        यानंतरच्या महत्वाच्या गुंफत्र क. ८९ आणि ८१ यांचा तलविन्यास सारखाच आहे. परंतु व्हरांड्यात उजव्या बाजूला असलेला कक्ष लेणी क. ८९ मध्ये मात्र नाही, मात्र भिंतीवर श्रवस्तिमहाप्रातियाथांचे विपुल प्रमाणात चित्रण असून गुंफा क. ३१ मध्ये मूर्तीऐवजी पूजेसाठी स्तूप आहे. या सर्व गुफा पीडित यांच्या मते पाच्या शतकाच्या उत्तरार्धात दह सेना व व्याधसेन यांच्या काळात कोरल्या असाव्यात. इ. स. च्या सहाब्या शतकाच्या पहिल्या दशकात कोरलेली एक महत्वाची गुफा क्र. ४१ ही होय. गुंफेचा तलविन्यास या आधी वर्णन केलेल्या गुंफांच्या सारखाच म्हणजे मोकळे अंगण, मुखभडप, आतमध्ये सभागृह आणि गाभारा असा आहे. परंतु सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे उजव्या हाताला अंगणाच्या सुरुवातीसच एक कक्ष असून त्यात बोधिसत्त्वासहित असलेली बुद्धाची त्रिमूर्ती आहे. सर्वात लक्षणीय म्हणजे एकादशमुख अवलोकितेश्वराचीही प्रतिमा आहे. अवलोकितेश्वर म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर करुणेने नजर ठेवणारा बोधिसत्त्व होय, आपण अशीही कल्पना करू शकतो की त्याची ही दृष्टी दशदिशांत व्यापून राहिलेली आहे आणि त्यासाठीच दहा शिरांची कल्पना करण्यात आली आहे. एकादशमुख अवलोकितेश्वराचा एक स्वतंत्र संप्रदायच मध्य आशिया आणि चीनमध्ये लोकप्रिय झाला होता. अशा अवलोकितेश्वराकडून अभय प्राप्त करून घेण्यासाठी 'एकादशमुख अवलोकितेश्वर दय' अशा नावाचा धारणीमंत्रही ग्रंथीतरी आढळतो. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या अवलोकितेश्वराची जगातील ही प्राचीन प्रतिमा आहे. या सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, आज कान्हेरी म्हणून ओळखला जाणारा तत्कालीन कृष्णागिरी महाविहार हा त्या काळी बौद्ध धर्मात होणाऱ्या संक्रमणाचा व त्यातून उ‌द्भवलेल्या नवीन आचारविधी आणि प्रतिभालक्षणे यांचा मूलखोत होता.


     कान्हेरीपासून थोडे दूर पण कल्याणच्या मार्गावरील लोणाड या गावाच्या शिवारात लहानशा टेकडीवर एक गुफा आहे. समोरील अंगण ओलांडून गेल्यानंतर दोन खांब आणि अर्धस्तंभाकृती तौललेला हरांडा या मागे तीन द्वारातून प्रवेश करता येईल, असा बंदिस्त मंडप (Closed hall) आणि पलीकडे गाभाथाची योजना असावी. परंतु टेकडीच्या शिळीमध्ये असलेल्या भेगांमुळे मंडप कोरला गेला नाही. ही गुफा महत्त्वाची यासाठी की अंगणात एका बाजूला पाण्याचे टाके आणि दुसऱ्या बाजूला छज्ज्याखाली एक मोठे सुंदर शिल्प आहे. शिल्याचा विषय चटकन लक्षात येत नाही. परंतु व्हरांड्याच्या खांबावरील असलेल्या शिल्पषट्टिकेवर विश्वंतर जातकाच्या कथेतील प्रसंग लक्षात घेतले म्हणजे विश्वंतराला वनवासाला पाठविण्याचा राजाने घेतलेला निर्णय, हा या शिल्पाचा विषय असावा हे स्पष्ट होते.
    विश्वंतर जातकातील या प्रसंगाबरोबरच त्याकाळच्या संकेतानुसार हरिती आणि पाञ्यिक या मूर्ती येथे कोरलेल्या दिसतात. मंडपात जाण्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या तळाशी डोक्धावर कुंभ धारण करणारे गण दाखविलेले आहेत. कुंभ धारण करणारे गण, हरिती व पाञ्यिक आणि विश्वंतर जातकाचे चित्र, त्याचप्रमाणे शिल्पशैली ही हुबेहूब अजिंठ्याप्रमाणे आहे. त्यामुळे ही गुफा पाचव्या शतकाच्या शेवटी शेवटी कोरण्यात आली असावी. महाकाली येथील पहिल्या तीन गुंफाही त्रैकूटक काळातच कोरण्यात आल्या असाव्यात व पलीकडच्या चैत्यगृहातील भितीवरील बोधिसत्त्व शिल्पेही त्याच काळातील असावीत. या संदर्भात साष्टिबाहेरील त्रैकूटक स्थळे म्हणजे कुडा येथील चैत्यगृहात कोरलेल्या श्रवस्ती प्रतिहार्याच्या प्रतिमा आणि महाडजवळील गांधारपाले येथील पहिली गुंफाष्टी विहाराच्या स्वरूपात असून मध्यभागी स्तुपासाठी असलेल्या चौकोनी शिलाखंडाच्या समोरच्या पार्श्वभूमीवर बुद्ध प्रतिमा कोरण्यात आली आहे. बाजूच्या दोन भितींवर चवन्ऱ्या ढाळणारे बोधिसत्त्व कोरण्याचा प्रयत्न केला आहे. ही दोन्ही स्थळे त्रैकूटक काळात श्रवकयानातून बौद्ध धर्माचे बोधिसत्त्व यानात होणारे संक्रमण दाखवितात.
      स्वतः त्रैकूटक राजे हे बौद्धममनुयायी नव्हते. परंतु याआधी उल्लेख केल्याप्रमाणे सातवाहन/अभिरानंतरच्या आर्थिक पडत्या काळात सागराची किनारपट्टी त्यात अध्याह्नत बंदरे आणि दुर्ग यावर बळकट शिबंदीची व्यवस्था करून त्यांनी व्यापार उदिमाला अभय दिले होते. सारिपुत्ताच्या स्तूपात सापडलेल्या ताम्रपटात उल्लेखिल्याप्रमाणे सिंध प्रांतातील भक्तगण तसेच सार्थवाह साष्टी बेटामध्ये येऊन स्तूप आणि इतर धार्मिक स्थापत्य घडवीत होते. त्यामुळे बौद्ध धर्माला त्यांनी प्रत्यक्ष आश्रय दिला, असा एकही अभिलेख नसला तरी वाकाटक राजा हरिषेण याच्याप्रमाणेच त्यांचे प्रोत्साहन होते असे स्पष्ट दिसते. ते स्वतः परम वैष्णव होते आणि दहसेनाने अश्वमेध याग केल्याचाही उल्लेख येतो. सर्व त्रकूटक राजाच्या शिलालेखातून ब्राह्मणांना चरुबली, वैश्वदेव यासाठी सूरतेच्या आसपासच्या भागात व कोकणात भूमिदान केल्याचे उल्लेख येतात. आज रत्नागिरीच्या संग्रहात प्रदर्शित केलेली, पनवेलजवळ सापडलेली चतुर्भुज विष्णुमूर्ती या संदर्भात महत्वाची आहे. चक्र, गदा आणि शंख धारण करणारी ही लाञ्छनांच्या आणि मूर्ती घडविण्याच्या शैलीच्या दृष्टीने पश्चिमेकडील मिनमान (राजस्थान) व इतरत्र आढळणाऱ्या प्राचीन स्थानकमूर्तीशरी साम्य दाखविते. ही पाचया शतकातील म्हणजे त्रैकूटक काळातील हे निश्चित, याहूनही अधिक स्तिमित करणारी मूर्तिशिल्पे रत्नागिरीजवळ लॉजा येथे टेकाडात कोरलेली आढळतात. त्यामध्ये स्थानक चतुर्भुज विष्णु, नदीवर आरूढ झालेले उभा व शंकर आणि चक्रपाणी आणि विशेष म्हणजे द्विभुज चक्रपाणी केवलनरसिंहाची प्रतिमाही आहे. याआधी आपण पाहिल्याप्रमाणे रामटेक (जि. नागपूर), भादक व भटाळा (जिल्हा चंद्रपूर) आणि पवनार (जिल्हा वर्धा) या विदर्भातील स्थळाव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेर चौथ्या पाचव्या शतकात अशा केवलनरसिंहाच्या प्रतिमा उत्तर कर्नाटकात (हल्लीचे धारवाड व मंगलौर हे जिल्हे) म्हणजे प्राचीन कुंतलाधिपती यांच्या राज्यातच सापडल्याची माहिती होती. हे राजेही स्वतःस परमभागवत आणि वैष्णव म्हणावत असत. वाकाटक राजाप्रमाणेच ते सात्वत धर्मानुयायी होते, याचा यापूर्वीच्या लेखात उल्लेख आला आहेच, परंतु लांजा येथील त्रैकूटककालीन केवल नरसिंहाच्या शोधामुळे हरिषेणाच्या काळात सात्त्वतधर्म हा कोकणातही पोहोचला होता हे सिद्ध होते. पळसांबे (जिल्हा-कोल्हापूर) येथील एका नाल्यात मोठमोठ्या शिलाखंडामध्ये एकार मक पद्धतीने कोरलेल्या तीन मंदिरांचा आणि काही शिवलिंगांचा उल्लेख केल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही, असे आम्हांस वाटते. एकूण स्थापत्य पद्धतीवरून आणि विशेषतः खांबांच्या रचनेवरून आम्ही या निष्कर्षाप्रत आलो आहोत की या गुफा त्रैकूटकालीनच असाव्यात, याविषयी पूर्वी लेख लिहिला, त्या वेळी पळसांबे येथील गुंफा चालुक्यापूर्वकालीन आहेत, असा निर्णय घेऊन कालविषयक चर्चा तेवढ्यात आटोपती घेतली, परंतु त्रैकूटककालीन कलेचा सूरज पंडित यांनी केलेला ऊहापोह लक्षात घेता आम्ही आता बरील निष्कर्ष काढला आहे.

वेंगीचे विष्णुकुंडी

आणखी एक राजघराणे म्हणजे वाकाटकांशी घनिष्ठ संबंध असणारे वेगीचे विष्णुकुंडी होत. काही विद्वानांच्या मते अगदी प्रवरसेन प्रथम (इ.स. २७०-३३०) याच्या काळापासून अंध राजांचा आणि वाकाटकांचा संबंध आला असावा. वाशीमच्या वाकाटकांनी द्वितीय विन्ध्यशक्तीच्या काळात (इ.स. ३५५ - ४००) आंध्रातील आपले वर्चस्व कायम ठेवले असावे. पण त्यांच्या संबंधाचा अगदी स्पष्टपणाने पुरावा विष्णुकुंडी विक्रमेद्रवर्मन् द्वितीय याच्या चिक्कुल्ल ताम्रपटामधील 'माधववर्मणः प्रियप्रणप्ता विष्णुकुंडिवाकाटकवंशद्व-यालङ्कृतजन्मनः' या उल्लेखावरून मिळतो. विक्रमेद्रवर्मन् याने कंदुलपले येथून चौदाव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटात, श्रीमाधववर्मा याचा तो आवडता मुलगा असून विष्णुकुंडी आणि वाकाटक वंश यांना आपल्या जन्माने त्याने अलंकृत केल्याचा उल्लेख येतो. विक्रमेद्रवर्मा यानेच आपल्या तुंबलगुडे येथून अकराव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटात महाराज श्रीविक्रमेंद्र हा श्रीमाधववर्त्याचा प्रिय पुत्र असून त्याची आई वाकाटक कुळातील होती असा स्पष्ट उल्लेख येतो. यांनी विक्रमेद्रवर्मन् हा माधववर्मा याचा मुलगा ही गोष्ट लक्षात घेऊन तो माधववर्मा प्रथम याचा मुलगा असावा असे मत मांडले होते. परंतु चिक्कुल्ल ताम्रपटातील स्पष्ट उल्लेखामुळे तो माधववर्याचा पणतू होता हेही लक्षात आले. डॉ. एस नारायण यांनी आपल्या १९७७ साली लिहिलेल्या 'विष्णुकुंडी व त्यांचा काळ' या ग्रंथात विष्णुकुंडी घराण्याच्या सर्व ताम्रपटांचा सखोल मानत होते अभ्यास करून असे दाखवून दिले की म. म. मिराशी त्याप्रमाणे विष्णुकुंडीवंशामध्ये माधववर्मा या नावाचे दोनच राजे नसून चार राजे झाले असावेत. तसेच विक्रमेद्रवर्मा या नावाचेसुद्धा दोन राजे होऊन गेले असावेत.

▲ शिऊर येथील गुंफांमध्ये कोरलेले पूतनावधाचे शिल्प

त्यातील माधववर्मा द्वितीय याने ३७ वर्षापेक्षा जास्त राज्य केले असावे (इ.स. सुमारे ४६३-५०२). विक्रमेंद्रवर्मन् प्रथम (इ.स. सुमारे ५०२-५२७) हा मुलगा त्याला वाकाटक राजकन्येपासून झाला असावा. आणि त्यामुळेच एके ठिकाणी तो माधववर्त्याचा मुलगा आणि दुसऱ्या ठिकाणी तो माधववर्त्याचा पणतू अशा प्रकारचे उल्लेख येतात. स्वतः विक्रमेंद्रवर्मन् प्रथम याने दिलेले ताम्रपट अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. वाकाटकमहादेवीचा किंवा विष्णुकुंडी आणि वाकाटक या वंशद्वयाचा उल्लेख असलेले सर्व ताम्रपट हे विक्रमेंद्र द्वितीय याने दिलेले आहेत हे स्पष्ट आहे. त्याच्या राज्य शासनाच्या दहाव्या वर्षी चिक्कुल्ल येथून दिलेल्या ताम्रपटातून तो ताम्रपट शक ४८८ मध्ये दिलेला असल्याचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे त्याचा काल इ.स. सुमारे ५५५ ते ५७२ असावा असे ठरवताना फारसे प्रयास झाले नाहीत.
       म. म. मिराशी यांनी माधववर्त्यांचा पश्चिम महाराष्ट्राशी संबंध असावा हे मांडले, त्यालाही एक वेगळी पार्श्वभूमी होती. सातारा जिल्ह्यातील खानापूर या तालुक्याच्या ठिकाणी माधववर्मा या राजाने दिलेल्या ताम्रपटसंचातील दोन पत्रे मिळाले. त्यावर त्यांनी व य. रा. गुप्ते यांनी मिळून (एपिग्राफिया इंडिका खंड २७पृष्ठे ३१६-३१७) एक लेख प्रसिद्ध केला. या ताम्रपटसंचात मूळ तीन पत्रे असावेत. त्यातील पहिला पत्रा सुरुवातीपासूनच गहाळ असल्याने व दुसऱ्या पत्र्याचा वरचा आणि खालचा भाग तुटलेला असल्याने त्यातील दोन्ही बाजूंवरील सुरुवातीचा आणि शेवटचा मजकूर खंडित झाला होता. त्यामुळे दान देणारा महाराज श्रीमाधववर्मा हा कुठल्या घराण्यातील राजा असाही सुरुवातीस प्रश्न पडला होता. परंतु दुसऱ्या पत्र्यावरील दुसऱ्या ओळीत पुंडरीक बहुसुवर्ण आणि अकरा यज्ञ केल्याचा, तसेच तो सार्वभौम होता, सूर्याप्रमाणे तेजस्वी, ऐश्वर्याने इंद्रासारखा व चातुर्वर्ण्य आणि चतुराश्रम धर्माचा तो रक्षणकर्ता होता असेही त्याचे वर्णन आले आहे. त्यातील 'पुंडरीक बहुसुवर्ण' या वेगळ्या प्रकारच्या यज्ञ प्रकारामुळे तसेच त्याने अकरा म्हणजे अकरा अश्वमेध याग केले होते, हे लक्षात आल्यामुळे तो विष्णुकुंडी वंशातील माधववर्मा असावा असा कयास म. म. मिराशी यांनी प्रदर्शित केला व त्यावेळी विष्णुकुंडीच्या इतिहासासाठी उपलब्ध असलेल्या लेखसामग्रीवरून त्यांनी विष्णुकुंडी वंशातील राजांची वंशावळसुद्धा तयार केली व त्यात वंशातील आद्य माधववर्मा याने खानापूरचा ताम्रपट दिला असावा असे मत प्रकट केले. मिराशी यांना उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे विष्णुकुडी वंशात दोनच माधववर्मा नावाचे राजे झाले असावेत असे त्यांना वाटले. माधववर्मा प्रथम हा आंध्र प्रदेश येथील वेगी अथवा इंद्रपूर येथून राज्य करीत असताना दान दिलेल्या गावाच्या चारही बाजूस असलेल्या आजच्या सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक (रेडूरकग्राम) व मलखेड (मलखेटक) यांचा उल्लेख करताना तो वाकाटकांच्या

▲ शिऊर येथील गुंफांमधील त्रिविक्रमाची मूर्ती

वाशीम शाखेतील हरिषेणाचा समकालीन असावा (त्यांच्या मते इस ४७५ ते ५००) आणि हरिषेणाच्या मृत्यूनंतर माधववर्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार साताऱ्यापर्यंत केला असावा असा कयास बांधला.
    आपल्या वरील मताला पुष्टी देण्यासाठी त्रिकुटमलय पर्वतावर माधववर्त्याची सत्ता होती असाही विष्णुकुंडी ताम्रपटांत उल्लेख असल्यामुळे तो त्रिकूटपर्वत म्हणजे अंजनेरी ताम्रपटांत उल्लेख केलेला

▲ शिऊर येथील या गुंफा विष्णुकुंडी यांच्या काळात कोरल्या गेल्या असाव्यात

▲ शिऊर येथील गुंफांमधील वराहाची मूर्ती

सह्यह्याद्री पर्वताचा भाग असलेला नाशिकजवळील त्रिकूटपर्वत असावा असेही अनुमान त्यांनी केले. आणि त्यामुळे पश्चिमेत नाशिकपासून साताऱ्यापर्यंत इतक्या दूरवर त्याचे साम्राज्य पसरले असावे, अशी अटकळ त्यांनी बांधली. तसेच अंध, कलिंग, त्रिकूट, लाट, कोसल, मालव, कुंतल, एवढ्या प्रदेशावर सार्वभौमत्व गाजवणाऱ्या हरिषेणाचा माधववर्मा प्रथम हा मांडलिक असावा, एवढेच नसून आपली मुलगी देऊन माधववर्याशी हरिषेणाने आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले असावेत असेही मत मांडले.
   वर उल्लेख केल्याप्रमाणे विष्णुकुंडी व त्यांचे मांडलिक यांच्या अठरा ताम्रपट व शिलालेखांचा चिकित्सक अभ्यास करून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या म्हैसूर येथील प्रमुख पुराभिलेखज्ञ या कार्यालयात पुराभिलेखज्ञ या हुद्यावर काम करणाऱ्या अलमेलू श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी विष्णुकुंडी आणि त्यांचा काळ हा प्रबंध १९७७ साली प्रकाशित केला. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे विष्णुकुंडी राजवंशात इ. स. ३७५ ते इ. स. ६१२ या जवळ जवळ २५० वर्षाच्या कालखंडात आठ राजांनी राज्य केल्याचे प्रतिपादिले आहे. त्यात दोन विक्रमेद्रवर्मा, दोन गोविंदवर्मा, दोन इंद्र, व चार माधववर्मा नावाचे राजे होऊन गेल्याचे ते प्रतिपादितात.
    विष्णुकुंडी यांचे राज्य हे उत्तरेत नर्मदा, पश्चिमेस सातारा आणि दक्षिणेत पल्लवांच्या राज्यापर्यंत भिडलेले असल्यामुळे व तुलनेने या काळातील इतिहास हा बराचसा अज्ञात आणि गुंतागुंतीचा असल्याने इतिहासाची जुळवाजुळव करताना त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत असे सहज लक्षात येते. पण त्यामुळे वाकाटकवंश आणि विष्णुकुंडी यांच्या परस्पर संबंधांवर त्यांनी नव्याने प्रकाश टाकला आहे. उदा. नंदिवर्धन शाखेतील नरेन्द्रसेन व पृथ्वीषेण द्वितीय यांच्याशी, यापूर्वी उल्लेख केलेल्या मानपूर येथील राष्ट्रकूट राजांशी, वनवासी येथील कदंबांशी व वाशीम शाखेतील विन्ध्यशक्ती व्दितीय, देवसेन व त्याचा पुत्र सम्राट् हरिषेण यांच्याशी कशा प्रकारचे संबंध होते याचाही त्यांनी चिकित्सकपणे खोलवर विचार केला आहे.
       श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी नव्याने मांडलेल्या विष्णुकुंडी यांच्या राजवंशावळीत माधववर्मा द्वितीय (इ.स. सुमारे ४२२-४६६) हा वाकाटक वंशाच्या दोन शाखांतील प्रवरसेन द्वितीय (नंदिवर्धन शाखा इ.स. ४१०-४४०) व हरिषेण (इ. स. सुमारे ४६२ - ४७८ डॉ. स्पिक यांनी मांडलेल्या नवीन कालक्रमाप्रमाणेही) या दोघानाही समकालीन होता. तो कदाचित नरेद्रसेन (इ.स. सुमारे ४४० ४५५) आणि पृथ्वीषेण द्वितीय (इ. स. सुमारे ४५५ - ४७०) यांनाही समकालीन असावा. प्रो. स्पिक यांनी अजिंठा येथील व बाघ (मध्यप्रदेश) येथील गुंफांच्या संबंधात वाकाटकांच्या भोवतालच्या प्रदेशात राज्य करणाऱ्या अथवा त्यांच्या संबंधात असलेल्या राजांच्या कारकिर्दीचा विचार करून हरिषेणाचा कार्यकाल एरवी समजले जाते, त्यापेक्षा कमी कालावधीचा असावा असे मत मांडले. प्रो. स्पिक यांच्या असे लक्षात आले की हरिषेणाचे साम्राज्य कदाचित आकस्मिक रीतीने संपुष्टात आले असावे. त्याच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशाचा आणि त्यावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचा कार्यकाळ लक्षात घेतला, तसेच जुन्या राज्यावर नव्याने प्रस्थापित झालेले राजवंश लक्षात घेतले तर असाच अंदाज करावा लागतो. उदा. नर्मदेच्या पलीकडील माळव्यावर राज्य करणारे राजे त्याला अनुकूल होते. बाघ (मध्यप्रदेश) येथील गुंफांच्या संगोपनासाठी सुबंधु नावाच्या माळव्यात नव्याने उदयाला आलेल्या राजाने ताम्रपट दिल्याचे लक्षात आले. सुबंधु याचा बरवानी येथील ताम्रपट त्याने १६७ व्या संवत्सरात (+ गुप्त शकाची ३२० वर्षे = इ. स. ४८७) दिला. या ताम्रपटातील गुप्त शकातील वर्षानुसार हरिषेणाचा काल इ.स. सुमारे ४८५ च्या आसपास संपला होता असे मानावे लागते. त्रैकूटक हा दुसरा राजवंश, त्यांनीसुद्धा वाकाटकांचे वर्चस्व झुगारून त्याच सुमारासच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. (४९० मधील सूरत ताम्रपट) तसेच बाघ येथील गुंफा, म. म. मिराशी मानतात त्याप्रमाणे पाचव्या शतकातील सुरुवातीच्या काळातील नसून, अजिंठ्याच्या समकालातच निर्माण केल्या असाव्यात, हे तेथील स्थापत्य व शिल्पकलेची धाटणी लक्षात घेतल्यावर दिसून येते, हे वाल्टर स्पिक यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. तिसरा मुद्दा असा की, नंदिवर्धन शाखेचा लय हा कदाचित हरिषेणाच्या आक्रमक धोरणामुळे झाला असावा. पुणे येथील प्रभावतीगुप्ता हिच्या ताम्रपटाचा हरिहर ठोसर यांनी नव्याने विचार करून हे दाखवून दिले आहे की त्यातील सुप्रतिष्ठानविषय व दानपत्रात वर्णन केलेली गावे ही पैठणच्या आसपासच सापडतात. त्याचा सहज व सरळ अर्थ असा होतो की प्रवरसेनाने वन्हाडात राज्य करणाऱ्या वाशीम शाखेतील प्रदेशापलीकडे सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे प्रवरसेन द्वितीय याच्या काळामध्ये वत्सगुल्मशाखेतील एक अगदी कोवळ्या वयातील राजा अथवा त्यापाठोपाठ राज्यावर आलेला देवसेन हा दुर्बळ राजा असावा असे दिसते.

▲ शिऊर येथील गुंफांमधील मागील हातात शंख आणि चक्र घेतलेली विष्णूची मूर्ती

      श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन वाकाटक वंशाच्या दोन शाखांतील परस्परसंबंध कसे होते याविषयी काही नव्याने विचार मांडले आहेत. त्यांच्या मते विक्रमेद्रवर्मन् (प्रथम) याची आई, म्हणजे द्वितीय माधववर्याची पत्नी, जिचा लेखात वाकाटक महादेवी म्हणून उल्लेख केला आहे, ती नंदिवर्धन शाखेच्या प्रवरसेन द्वितीय याची मुलगी असावी. श्रीनिवास शंकरनारायणन् यांच्या मते हरिषेण याचा पिता देवसेन हा अत्यंत दुबळा राजा असून नामधारी राजा असावा. आणि त्यामुळेच नंदिवर्धन शाखेचा प्रवरसेनच विदर्भाचा खरा राजा असावा. त्याने पराक्रमी माधववर्याला आपली मुलगी देऊन संबंध बळकट केले असावेत. प्रवरसेन द्वितीय याची सून कुंतल राजकन्या अज्झितभट्टारिका ही मानपूरच्या राष्ट्रकूट वंशातील किंवा कदंब वंशातील असली, तरी ही राज्ये वाशीम शाखेच्या राज्याच्या सीमारेषेवर असल्यामुळे नंदिवर्धन शाखेचीही प्रतिस्पर्धी अथवा शत्रू होती. कुंतलांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून प्रवरसेनाने आपली आग्नेयेकडील बाजूदेखील पक्की केली होती.
        प्रवरसेनाचा मुलगा नरेंद्रसेन आणि नातू पृथ्वीषेण द्वितीय यांच्याविषयी ताम्रपटांतून आलेली बिरुदे दोन शाखांतील नाजूक संबंधांच्या दृष्टीने अतिशय सूचक आहेत असे दिसते. नरेंद्रसेनाचे वर्णन, त्याच्या राजप्रतिष्ठेचा कोसल (हल्लीचा छत्तीसगढचा भाग) मेकला (म्हणजे नर्मदा नदीच्या उगमाजवळील अमरकंटकचा प्रदेश व मालव (म्हणजे माळवा) यावर राज्य करणारे राजे आदर करीत असत, (मेकला-कोसला-मालवाभ्यर्चितशासनः) असे आले आहे. परंतु त्याचबरोबर त्याच्या राज्यलक्ष्मीचा एका बलाढ्य नातेवाईकाने अपहार केला (गुणवद्दायादापहृतवंशश्रियः) होता असा उल्लेख त्याचा वारस पृथ्वीषेण द्वितीय याच्या ताम्रपटातून येतो. आपण घराण्याच्या सत्तेवर आलेली संकटे दोनदा बाजूला सारली (द्विमग्नवंशस्योद्धर्तुः). नरेंद्रसेनाने स्वतः दिलेले ताम्रपट अथवा शिलालेख अजून तरी मिळालेला नाही. या दोन्ही राजांच्या वर्णनावरून असे दिसते की, नंदिवर्धन शाखेच्या राज्यावर परचक्र किंवा बंडाळी यांसारखी संकटे दोनदा आली होती. त्यातील एक संकट तर जवळच्या नातेवाईकामुळे ओढवले होते. ते हरिषेणामुळे आलेले असावे. आपण वर पाहिले त्याप्रमाणे देवसेन आणि त्याचा पिता यांच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन सर्व विदर्भावर द्वितीय प्रवरसेनाने आपला अधिकार प्रस्थापित केला असावा. त्यामुळे इ. स. ४६२च्या सुमारास राज्यावर आल्यानंतर हरिषेणाने खानदेशासारखा भाग आपल्या ताब्यात घेऊन (हरिषेणाचा थाळणेर ताम्रपट पहा) आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या परिस्थितीत कुंतालाधिपतीनी आणि त्यांच्याशी सख्य असलेल्या विष्णुकुंडी माधववर्त्याने आपल्या मेव्हण्याला मदत केली असावी. त्याच्या मदतीने राजपुत्र पृथ्वीषेणाने हरिषेणाचे संकट टाळले असावे. नरेंद्रसेनाने माळव्यावर आपल्या सत्तेचा दरारा बसवला होता त्यावेळेच्या संघर्षातसुद्धा माधववर्त्याने त्याला व पृथ्वीषेणाला मदत केली असावी. आपल्या ताम्रपटातून माधववर्मा आपल्या राज्याची सीमा उत्तरेत नर्मदेपर्यंत पसरली आहे असे मोठ्या अभिमानाने सांगतो. असे असूनसुद्धा नरेंद्रसेनाच्या मृत्यूनंतर पृथ्वीषेण फार काळ टिकाव धरू शकला नसेल असे ताम्रपटात उल्लेखलेल्या त्रिकूट, लाट, कुंतल, कोसल, कलिंग आणि अवंति या प्रदेशांवरील सार्वभौमत्वावरून लक्षात येते.
        वाकाटक घराण्यातील माधववर्त्यांची पत्नी ही प्रवरसेन द्वितीयाची मुलगी असावी याला श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी उधृत केलेल्या श्रीशैल स्थलमाहात्म्यातील एका कथेवरून लक्षात येते. त्या माहात्म्यात असे म्हटले आहे की चंद्रगुप्त राजाची कन्या चंद्रावती ही दररोज एक मोगऱ्याचा हार श्रीशैलस्वामीला वाहून आपली भक्ती प्रकट करत असे. राजकन्यांचा उल्लेख त्यांच्या राजघराण्यावरून करण्याचा प्रघात भारतात आहेच, यासंदर्भात विच्या पित्यावरून तिचे नाव चंद्रावती ठेवले असावे. महात्म्यकाराला येथे चंद्रगुप्त द्वितीयाची मुलगी आणि रुद्रसेन द्वितीयाची महाराणी प्रभावतीगुप्ताच अपेक्षित असावी. नंदिवर्धन आणि वाशीम शाखांमधील विसंवाद आणि त्यातून उत्त्पन्न झालेली स्पर्धा हीसुद्धा एका अर्थाने वाकाटक वंशाच्या लयाला कारणीभूत होती, असे वरील पुराव्यावरून लक्षात येते. श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी केलेली ही उकल लक्षात घेतली म्हणजे हरिषेणाच्या मृत्यूनंतर मिळालेली संधी घेऊन माधववर्त्याने आपले राज्य काही काळपर्यंत तरी साताऱ्यापर्यंत वाढवले असावे, हे खानापूरच्या ताम्रपटाच्या पुराव्यावरून पटते. आणि त्या घटनेचासुद्धा समाधानकारकपणे खुलासा करता येतो.

▲ शिऊर येथील गुंफांमधील महिषासुरमर्दिनीची मूर्ती

विष्णुकुंडी आणि वाकाटक वंशातील गुंतागुंतीच्या संबंधावर औरंगाबाद जिल्ह्यह्यातील भोकरदन येथील वैष्णव गुंफा आणि आंध्रप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या नांदेड जिल्ह्यातील शिऊर येथील वैष्णव गुंफांतील पुराव्यामुळे कसा प्रकाश पडतो, हे लक्षात येते. भोकरदन येथील सहाव्या/सातव्या शतकातील वैष्णव गुंफा ही एका लहानशा टेकाडाच्या एका बाजूस कोरलेली असून पुढे अंगण, दर्शनी भागात सहा स्तंभ, उत्तर व दक्षिण बाजूस एकेक अर्धस्तंभ, या स्तंभावलीच्या पश्चिमेस तशीच सहा स्तंभांची रांग आणि दोन अर्धस्तंभ, त्याच्या पाठीमागील बाजूस सात कक्ष असा या गुंफेचा विन्यास आहे. मधोमध असलेल्या कक्षाचा वापर गर्भगृह म्हणून होत होता, हे दरवाज्याच्या चौकटीच्या तळाशी असलेल्या द्वारापालांवरून आणि आतल्या भिंतीला लागून असलेल्या मूर्तिपीठावरून सहज लक्षात येते. गुंफा कोरण्यासाठी वापरण्यात आलेला दगड हा काही उत्तम प्रतीचा नाही; त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेकडील भिंतीवर कोरलेली शिल्पे फारशा चांगल्या अवस्थेत नाहीत. पण त्यावर कोरलेल्या ब्रह्मा आणि दुर्गा महिषमर्दिनी यांच्या बरोबरच शेषशायीविष्णु, बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिमा सहज ओळखता येतात. त्यामुळे गाभाऱ्यातील मूर्ती ही विष्णूची असावी याविषयी तिळमात्र शंका राहत नाही. खांबांची ठेवण त्यावरील नक्षी तसेच शिल्पाची धाटणी लक्षात घेता ही गुंफा कोरणाऱ्या स्थपतीची शैली ही आंध्रप्रदेशातील पूर्वी चालुक्यांच्या स्थापत्यशिल्पाशी मिळतीजुळती आहे, असे निरीक्षण के. व्ही. सौदरराजन यांनी आपल्या 'केव्ह टेम्पल्स ऑफ द डेक्कन' या प्रबंधात मांडले आहे. या गुहेमध्ये एके ठिकाणी 'उत्पातिपिडुगु' अशी अक्षरे असलेला एक लेख कोरलेला आढळतो. असा आशय असलेले लेख आंध्र प्रदेशातील पूर्वी चालुक्यांच्या सतनीकोटा, मोगलराजपुरम, अक्कण्णा-मदण्णा येथील गुंफांतून सापडले असून या लेखांतील वळणही कन्नड-तेलुगु धाटणीचे आहे.

▲ पवनार येथे सापडलेली विष्णुकुंडी राजघराण्याचे तांब्याचे नाणे

विद्वानांच्या मते हे एका शैव महंताचे बिरुद असून, अशा प्रकारे प्रवासी महंत आपली नावे यात्रेच्या दरम्यान कोरून ठेवत असत. अशाच एका शैव महान्ताने आपले बिरुद भोकरदनच्या गुहेत कोरून ठेवले असावेत.
         या संदर्भात शिऊर (जिल्हा नांदेड) येथील गुंफांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. शिऊर येथे चार गुंफा असून, त्या अपूर्ण अवस्थेत आहेत. या शिल्पांची शैली पूर्णपणे संस्कारित नाही, तर ओबडधोबड आहे. स्थपतीने गुहा कोरताना शिल्पे भिंतीऐवजी खांबांवर कोरली आहेत. शिल्पे वैष्णव असून शिल्पांची मांडणी एक विशिष्ट क्रम मनात ठेवून केलेली नाही. आत एके ठिकाणी एक शिवलिंग आणून बसवले असले तरी ते गुंफांच्या इतके जुने नक्कीच नाही. कोण्या शिवभक्ताने काही वर्षांपूर्वी ते बसवले असावे हे शिल्पांचे विषय पाहिला म्हणजे लक्षात येते. ठळकपणे नजरेत भरणारी शिल्पे आहेत ती अशी; महिषासुरमर्दिनी, लिंगोन्द्भवमूर्ती, विदरणनरसिंह, वराह व पूतनावध. विष्णूच्या तीन-चार स्थानक मूर्ती असून त्यातील हातात घेतलेल्या लक्षणांच्या क्रमावरून त्या सातव्या परिसंवादात या गुंफांचा काळ आणि त्या कुठल्या संप्रदायाशी संबंधित आहेत, याविषयी चर्चा करताना डॉ. वैशाली वेलणकर यांनी असे मत व्यक्त केले की विष्णुकुंडीचा अंमल असताना त्या कोरल्या गेल्या असाव्यात. विष्णुकुंडी हे श्रीशैलस्वामीचे परमउपासक होते हेही आपण या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे.
       महाराष्ट्रातील काही गुंफावर विष्णुकुंडींच्या स्थापत्य व शिल्पशैलीचा काही प्रभाव असावा या मताला पोषक असा आणखी एक पुरावा म्हणजे सिंहमुद्रांकित तांब्याची नाणी. प्राध्यापक शां. बा. देव व प्राध्यापक म. के. ढवळीकर यांनी पवनार येथे १९६५-६६ साली उत्खनन करून तेथील वाकाटककालीन वस्तीचा आणि अवशेषांचा विशेषकरून अभ्यास केला. नागपूर विद्यापीठाचे त्यावेळचे उपकुलगुरू डॉ. वि. भि. कोलते, म. म. वा. वि. मिराशी यांनी केलेल्या तर्काला देव आणि ढवळीकर यांनी उत्खननानंतर दुजोरा दिला. त्यांच्या मते नन्दिवर्धन शाखेच्या वाकाटकांची प्रवरपूर ही सुप्रसिद्ध राजधानी पवनार येथेच असावी. पवनार येथे एका धातुपात्रात ठेवलेला तांब्याच्या नाण्यांचा निधीही आढळला. प्रा. अजय मित्र शास्त्री यांनी या नाणेनिधीचा अभ्यास केला आणि त्यांच्या मते ती विष्णुकुंडी यांची नाणी होती. माधववर्याचा खानापूर येथील ताम्रपट, भोकरदन येथील वैष्णव गुंफा व तेथील कानडी तेलुगु लिपीतील महंताच्या बिरुदाचे नामांकन, शिऊर येथील गुंफा यांचासुद्धा वाकाटक-विष्णुकुंडी यांचे संबंध व सहाव्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास यांचा अभ्यास करताना विचार केला पाहिजे हे वरील आढावा घेतल्यानंतर सहज लक्षात येते.
शतकाच्या अगोदरच्या आहेत हे लक्षात येते. वरच्या किंवा पाठीमागील हातात चक्र आणि गदा असून पुढील डाव्या हातात शंख आहे. असा क्रम इ. स. पाचव्या शतकातील मूर्तीत आढळतो. गुंफांच्या एकूणच ठेवणीवरून तसेच प्रतिमालक्षणावरून त्या वाकाटककालीन असाव्यात, असे नांदेडचे सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ प्रभाकर देव यांचे मत झाले आहे. या सर्व गुंफा त्यातील दगडाच्या घडणीमुळे काही चांगल्या अवस्थेत नाहीत. बऱ्याच मूर्तीमधून एक आडवा किंवा तिरपा ठिसूळ थर असा आहे की त्यामुळे मूर्तीना छेद गेलेला आहे. कदाचित या कारणामुळेच काम अर्धवट राहिले असावे. एके ठिकाणी लिंगोद्भवमूर्ती असल्यामुळे चारपैकी एक गुंफा शैवसुद्धा असण्याची शक्यता आहे. विष्णूच्या प्रतिमांमधील लक्षणांच्या क्रमामुळे त्या सहाव्या शतकातील आहेत, असे मानावयास काही हरकत नाही. डेक्कन कॉलेजमधील उत्खनन चमूने एका वर्षी या ठिकाणी चाचणीचे उत्खननही केले. कारण गुंफेसमोरील शेतात त्यांना समकालीन खापरे आणि इतर पुरावशेषसुद्धा सापडले होते. एका

नागरा येथील विटांत बांधलेले शिवालय

मांढळ येथील उत्खननापाठोपाठ वाकाटकांचे विटांमधील स्थापत्य जाणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा शोध म्हणजे नागरा येथील उत्खननात प्राप्त झालेले शिवालयाचे अवशेष. या दोन ठिकाणच्या उत्खननात मिळालेल्या पुरावशेषांमधील फरक म्हणजे मांढळ येथे तीन ताम्रपट, देवतांच्या दहा मूर्ती, आणि विटांत बांधलेल्या देवळांच्या तीन जोती, तर नागरा येथे फक्त एका मोठ्या देवळाचे जोते आणि स्फटिकाची नामांकित मुद्रा या दोनच बाबी महत्त्वाच्या म्हणून सांगता येतील. संख्येने या दोन बाबी कमी असल्या, तरी कलेतिहासाच्या दृष्टीने नागरा येथील देवालयाचे अवशेष कसे आणि किती महत्त्वाचे आहे, याविषयी आपण नंतर चर्चा करणारच आहोत. परंतु नागरा येथील उत्खनन त्यात भाग घेणाऱ्या चमूच्या दृष्टीने एका वेगळ्याच कारणासाठी कायमचे लक्षात राहाण्याजोगे ठरले.

* नचना येथील पार्वती मंदिराचे प्रवेशद्वार

आम्ही जेव्हा असे ठरविले की एका चाचणी उत्खननानंतर भैरव टेकडीवर एक आयत उत्खनन करावे, त्यावेळी नागपूर मध्यवती संग्रहालयाचे अधिरक्षक पद्माकर मा. मुळे व मी असे दोघेही जण जीपने नागरा येथे पोहोचलो. नागरा हे गाव तसे लहान आहे, आणि त्याचा कारभार तेथील पंचायतीचे सरपंच पहात असे. सरपंचाला भेटणे आवश्यक होते. याचे कारण असे की टेकडीवर सुस्थितीत नसले तरी, गैरवाचे पाच पन्नास वर्षापूर्वी बांधलेले, पत्र्याचे छप्पर असलेले आणि त्याकाळातही पूजेत असलेले भैरवाचे मंदिर होते. डॉ. शां. सा. देव (प्राध्यापक, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, नागपूर विद्यापीठ) व जगत्पती जोशी, (अधीक्षक पुरातत्वविद्, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर) यांचा पवनी येथील अनुभव लक्षात घेता, स्थानिक रहिवाशांना आणि ग्रामपंचायतीला विश्वासात घेतल्याशिवाय हे उत्खनन यशस्वी होणार नव्हते. आणि म्हणूनच आम्ही (मुळे आणि मी) सरपंच यांच्यासमोर टेकडीवरील भैरव मंदिर तेथून उचलून जवळच थोड्या अंतरावर नव्याने बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. सरपंच यांनी तो प्रस्ताव मान्य केला, तो एका अलिखित अटीवर, की उत्खननाच्या कामासाठी गावातल्याच तरुणांची प्राधान्याने निवड व्हावी. सांगावयास हरकत नाही, की भैरवाची भग्नमूर्ती आमचे फोटोग्राफर कम-मॉडेलर जुनघरे यांनी मोठ्या कौशल्याने सांधली, आणि पुरातत्त्व विभागाने बांधलेल्या चौथऱ्यावर तिची प्रतिष्ठापना झाली. ही बातमी हां हां म्हणता गोंदिया शहरात पसरली आणि भाविकांनी आणि दात्यांनी सुमारे ७० हजार इतकी रक्कम खर्च करून मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. ही सावधानता दाखविण्यामागे शासनाच्या पुरातत्त्व विभागाचा काही व्यावहारिक हेतू होता.
     नागरा येथील उत्खनन हाती घेण्याआधी भैरव टेकडीची सहकाऱ्यांसमवेत मी व मुळे यांनी पाहागणी केली होती. डॉ. एम. जी. दीक्षित (निवृत्त डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ अर्काइव्हज आणि आर्किऑलोजी, महाराष्ट्र राज्य) यांच्या 'मध्यप्रदेश के पुरातत्व की रूपरेखा' या मौलिक ग्रंथात त्याचप्रमाणे सर अलेक्झॉन्डर कनिंगहॅम यांचे साहाय्यक बेग्लर यांच्या लिखाणातून नागरा येथील पुरा स्थळाचे (आर्किओलॉजिकल साइट) महत्व लक्षात आले होते. या ठिकाणी कुशाण कालीन अवशेष, विटात बांधलेले गोल कूप इ. वस्तू मिळाल्याचे ज्ञात होते व असाही अंदाज वर्तविण्यात आला होता की येथील गोलाकार टेकडीत स्तूपाचे अवशेष दडले असावेत. नागपूर येथील ऑफिसमध्ये होत आणि त्यामुळे उत्खननाविषयीची चर्चा नचना येथील पार्वती मंदिराची मागील खिडकी असताना पुरावशेष नोंदणी अधिकाऱ्याने विशेष उत्साह दाखवून आम्हा दोघांसमोर हे उत्खनन करण्याची संधी मिळाल्यास आपणास मोठा आनंद होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे संधी मिळाल्यानंतर, त्या उत्साही नवबौद्ध अधिकाऱ्याने चुनखडीची काँक्रिट लादी सापडल्याने त्या ठिकाणी बौद्ध स्तूपच असला पाहिजे, असा अहवाल पाठवला. पुरावा जरी चुकीचा असला, तरी बौद्ध स्तूप असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, सांप्रदायिक तेढीतून उत्खननास होणारा संभाव्य विरोध टाळण्यासाठी मंदिर सन्मानपूर्वक उतरवून गावकऱ्यांच्या संमतीने भैरवाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. परंतु आम्हास आश्चर्याचा सुखद धक्का बसला, की त्या ठिकाणी एक वाकाट ककालीन भव्य शिवालयाचे अवशेष सापडले. या उत्खननातून आम्हाला आणखी एक अचानक लाभ असा झाला, की ज्यामुळे आम्हाला प्राचीन भारतीय नाट्य संगीत परंपरेचे एक अनोखे दर्शन घडले, ते असे- उत्खननासाठी जायचे, म्हणजे बौद्ध भिक्षूच्याप्रमाणे, प्रत्यक्ष गावात न राहाता गावठाणापासून थोड्या अंतरावर मुक्काम करुन उत्खनन शिबिराची उभारणी करायची असा प्रधात आहे. त्यासाठी आम्ही सरपंचांना विचारले असता, त्यांनी असा सल्ला दिला की गावातील शिवमंदिरात मोठ्या ओवऱ्या आहेत,

भुमरा येथील शिवालयाचा मंडय

* नचना येथील मंदिरातील रामायणाचे दृश्य

त्यातील तीन-चार खोल्यांमध्ये तुम्ही आपला कॅम्प ठेवा. इथे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. फक्त शिवरात्रीच्या उत्सवात तिथे पाचसहा रात्री कीर्तन-भजन जोरात चालते, परंतु तुम्ही रस घेतला तर त्याचाही आनंद लुटू शकाल. वर म्हटल्याप्रमाणे अगदी अनपेक्षितपणे पाचसहा दिक्स एका छत्तीसगडी महिलेने आपल्या बोलीत गायलेल्या महाभारत - रामायणातील आख्यानांचे साउासंगीत श्रवण आणि दर्शनही घडले. छत्तीसगडी बोलीतील रसाळ काव्य, बरोबर आलेल्या वादकांच्या साथीने, हातात एकतारा घेऊन ती गात असे. तिचे गाणे इतके अभिनिवेशाचे असे, की गाण्याबरोबरच मंचाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नाचत नाचत ती निरनिराळ्या पात्रांचे संवाद स्वाभिनय फेकत जात असे. हा आमचा लाम अपूर्व होता, हे ननंतर इतरांना पटविण्यास आमचा बराच वेळ जाई. परंतु एकदा दूरदर्शनवर छत्तीसगडी लोककलेचा आविष्कार पाहताना हे लक्षात आले, की शिवरात्रीच्या यात्रेत जिने आपली कला सादर केली, ती दुसरी-तिसरी कुणी नसून संगीत-नाटक अकादमीने व राष्ट्रपतींनी पद्मा पुरस्काराने सन्मानित केलेली तीजनबाईच होती।
     नागरा येथील शिवदेवालयाचे उत्खनन दोन मोसमात पार पडले उत्खननात पणत्यांच्या खापराशिवाय दुसरी कुठलीही मातीची भांडी मिळाली नाहीत. परंतु लिखित मजकुरावर सील करण्यासाठी म्हणून वापराव्याच्या स्फटिकातील मुद्रा म्हणजे आजच्या भाषेतील मुदी किंवा मुंदी सापडली. राजघराण्यातील किवा मोठ्या पदावरची माणसे अशा प्रकारची अंगठी वापरत असत. हा आपला दूत आहे, अशी सीतेला खात्री आणि ओळख पटावी, म्हणून हनुमानाला श्रीरामाने आपली मुद्रिका दिली होती, असा रामायणात उल्लेख आला आहे. नागरा येथे सापडलेल्या अंगठीवर 'नारायणो' असे नाव कोरलेले आहे. लिपी पेटिकाशीर्ष (बॉक्स हेडेड) ब्राह्मी असल्यामुळे ती अंगठी व देऊळ हे वाकाटककाळातील असावे असे निश्चित झाले. उत्खननात आता फक्त जोत्याचाच शिल्लक असलेला भाग मिळाला तो आठ फूट उंच असून त्यावरून एकूण मंदिराच्या विन्यासा (प्लान) ची कल्पना येते. एकूण जोते १४७ फूट आठ इंच बाय ८७ फूट इतके लांब रुंद असून ते पूर्वाभिमुख आहे. पाय-यांना लागून असलेले कठडे प्रत्येकी साडेसोळा फूट रुंद असून सोपानाचा भाग जवळजवळ ४६ फूट रुंद आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर थोडा भार कुठल्याही प्रकारचे बांधकाम असल्याचे दाखवीत नाही. यावर लाकडी खांब असलेला उघडा मंडप असावा, त्यामागल्या ८७ चौ. फूट भागावर गाभारा आणि भोवतालचा प्रदक्षिणापथ असावा. गर्भगृहाच्या मध्यभागी मांढळ इथल्याप्रमाणेच खड्डा असून त्यामध्ये शिवलिंग असावे. हे शिवलिंग आम्हाला वरचा भाग भग्न असलेल्या अवस्थेत उत्खननाअगोदर टेकडीवरच मिळाले होते. गर्भगृह हे १७ फूट रुंद व १९ फूट लांब ८ इंच लांब होते. आणि त्यासमोर १० फूट ५ इंच चौरस असे अंतराळ होते. गर्भगृहाची भिंत ही १४ फूट ९ इंच जाड होती आणि त्यात नंतरच्या भिंत ही १४ फूट ९ इंच जाड होती आणि त्यात नंतरच्या काळातील मंदिरांप्रमाणेच भद्र, रथ व प्रतिरथ अशी रचना होती. मध्ययुगात म्हणजे बहुधा भोसला काळात गाभाऱ्याचा भाग लक्षात ठेवून त्यावर एक शिवमंदिर बांधले असावे, हे स्पष्ट दिसत होते. या उत्तरकालीन दगडी बबंधकामामुळे क्याच ठिकाणी जुन्या बंधकामाचे अवशेष विस्थापित झाले होते. परंतु या भोसलाकालीन मंदिराच्या अवशेषांमुळे, ते पडल्यानंतर त्यावरच बांधलेल्या गैरवाच्या अर्वाचीन मंदिरामुळे हे सिद्ध झाले, की जनमानसात हे शंकराच्या देवालयाचे स्थान आहे, ही आठवण दीड हजार वर्ष उलटून गेल्यावरही पक्की होती वरचे मंदिर आज अस्तित्वात नसले, तरी विटांच्या आकारावरून जोत्याच्या भिंतीच्या अलंकरणावरून, जोत्यावरील कोनाड्यात वापरलेल्या पन्हाळीच्या खांबावरून तसेच स्तंभशीर्षाच्या ठेवणीवरून हे मंदिर वाकाटककालीन होते याविषयी शंका राहात नाही. जोते, अगोदर वर्णन केल्यापमाणे, प्लानच्या दृष्टीने तीन भागांत कल्पिलेले आहे. समोर पायऱ्या, त्याच्या बाजूला दोन लहान देवळ्या, त्यानंतर मंडपाचा भाग, १० फुटांचे अंतराळ व ८७ फूट चौरस असा गाभारा व बहुतालचा प्रदक्षिणा मार्ग असा मंदिराचा मुख्य भाग येतो. त्यापैकी जोत्याची उत्तरेची, दक्षिणेची व पाठची भिंत सरळ रेषेत नसून त्यातसुद्धा निर्गम (प्रोजेक्शन्स) आणि प्रवेश (रेसेसेस्) योजलेले आहेत. पूर्वेचा भाग सोडल्यास दक्षिण, पश्चिम आणि उत्तर दिशांना प्रत्येकी आठ निर्गम आणि सात प्रवेश आहेत. प्रत्येक निर्गम आणि प्रवेशावर वरच्या भागात दोन खांबांवर तोललेला असा कोनाडा आहे. कोनाड्याच्या खाली वेदीबंध असून सर्वात खालच्या स्तरावर पल्लवांनी सुशोभित केलेले कुंभ आहेत. तर प्रवेशाच्या ठिकाणी निर्गमाप्रमाणेच स्तर असून ते अगदी साधे म्हणजे अनलंकृत असून एकामागे एक जातात. निर्गमाचे खांब साधे चचैौकोनी (रुचक प्रकारचे) असून ते घ्छाद्य स्तरावर विसावले आहेत. तर प्रवेशातील कोनाडे हे गोलाकार किंवा वृत्ताकार असून त्यांची रचना खाली घट आणि वर घट पल्लवाचे स्तंभशीर्ष अशी असून, खांबाचा मधला भाग पन्हाळ्यांनी (फ्ल्युटेड) सुशोभित केला आहे.

भुमरा येथील शिव मंदिराचे अवशेष


गाभाऱ्याची भित आणि जमीन यांची, आधी वर्णन केल्याप्रमाणे, मध्ययुगीन मंदिराच्या बांधकामामुळे नासधूस झालेली आहे. असे असले तरी गाभाऱ्यातील शिवलिंगाची जागा, शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या दगडी पन्हाळी (प्रणाल) मुळे निश्चित करता आली ही पन्हाळ उत्तरेच्या भितीतून बाहेर निघून अभिषेकाचे जल जमिनीवर असलेल्या एका कुंडात विसर्जित करीत असे. या पन्हाळीला हल्ली आपण 'गायमुख' असे म्हणतो. कारण या पन्हाळीच्या तोंडाला गायमुखाचा आकार दिलेला असतो. यापूर्वीच्या मंदिरात त्याऐवजी मगरीचे तोंड बसविलेले असे. त्यामुळे शिल्पशास्त्रात त्याचा उल्लेख 'मकरप्रणाल' असा केला जातो. त्याही पूर्वी म्हणजे इ. स. च्या चौथ्या ते सहाव्या शतकात मकराऐवजी एक आक्राळविक्राळ राक्षसी चेहरा, पन्हाळीसमोर लावण्याची पद्धत होती. याला शिल्पशास्त्राच्या परिभाषेत 'भूतप्रणाल' असे नाव आहे. अशाच प्रकारचे एक मजेदार भूतप्रणाल या देवळात बसविले होते. प्रसिद्ध कलेतिहासतज्ज्ञ डॉ. मधुसूदन ढाकी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे मत प्रकट केले की, हे अगदी वेगळ्या प्रकारचे प्रणाल असून याचा आकार अजिंठा येथे चित्रित केलेल्या नरव्यालासारखा असून, एकूण त्याची ठेवण व शैली लक्षात घेता, प्रणालाची व मंदिराची प्राचीनता इ. स. च्या चौथ्या शतकापर्यंतही जाऊ शकते. या भूतप्रणालावर बसविलेल्या राक्षसी चेहऱ्याच्या तोंडातून पाण्याचा प्रवाह, गंगानदीच्या प्रवाहाप्रमाणे बाहेर पडत असल्याची कल्पना करून, कलाकाराने एक गमतीदार चित्र उभे केले आहे. भूतप्रणालच्या धडाला लहान मुलाचे असावेत असे गुटगुटीत दोन हात आहेत. त्यापैकी एका हातात पाण्यातून बाहेर पडणारा मासा धरला असून भूत तो मासा तोंडात टाकण्याच्या आविर्भावात आहे. टेकडीच्या वरील पृष्ठभागावर उत्खननाअगोदर सापडलेले शिवलिंग मांढळ येथील तलावीच्या काठी असलेल्या शिवालयातील शिवलिंगाप्रमाणेच चौकोनी (ब्रह्मभाग) व वाटोळा (रुद्रभाग) अशा दोन भागांतच असल्यामुळे मंदिर वाकाटककालीन होते, अशा तर्काला पुष्टी देणारेच होते.


* भुमरा येथील शिवमंदिर परिसरात सापडलेले पुरावशेष

      कोसल आणि मालव जनषदांतील कलेचा विचार करतांना द्वितीय पृथ्वीषेणाच्या काळातील पार्वतीचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या, पाषाणी चिऱ्यात बांधलेल्या शिवमंदिराचा आपण विचार केला होता. तलविन्यासाच्या (प्लान) दृष्टीने हे मंदिर नागला येथील मंदिराच्या आकाराने लहान असले तरी तेथील शिवालयासारखेच आहे असे म्हणावयास हरकत नाही. समोरच्या सोपानमार्गाच्या बाजूंना असलेली दोन लहान मंदिरे ही नागरा येथील देवळात जास्त आहेत, पार्वती मंदिराच्या समोरचा भाग उघड्या मंडपाचा आहे, त्याला असलेल्या वामन भिंती (ड्वॉर्फ वॉल्स) अजूनही शिल्लक असून त्यावर गुहांमधून वास करणाऱ्या सिंहादी वन्य प्राण्याच्या आकृती दाखवितो पार्वती मंदिराप्रमाणेच कोरलेल्या आहेत. अलेक्झांडर कनिगहॅमने वर्णन केलेल्या, प्रदक्षिणा पथाच्या छतासाठी वापरलेल्या शिळा आज नाहीशा झाल्या असल्या तरी, प्रवासवर्णनावरून गाभा-याभोवती छत असलेला प्रदक्षिणापथ होता, हे स्पष्ट आहे. पुढील मंडपाच्या कठड्याच्या अनुसंधानाने प्रदक्षिणापथाचा कठडा आजही नचना येथील पार्वती मंदिरात अस्तित्वात आहे. तेथील गाभाऱ्यावर आणखी एक मजला होता, हेही कनिगहॅमच्या रिपोर्टमध्ये समाविष्ट केलेल्या छायाचित्रावरून स्पष्ट होते.
   नचना येथील पार्वती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले शिवालय उच्चकल्पवंशीय राजा व्याघ्र महाराज याच्या काळात म्हणजे इ. स. ४७० ते ४९० च्या दरम्यान बांधले गेले असावे उच्चकल्यवंशीय राजांच्या सीमेला लागूनच असलेल्या परिव्राजक महाराज यांच्या राज्यात आणखी एक शिवालय इ. स. च्या सहाव्या शतकाच्या सुरुवातीस हल्लीच्या 'भुमरा' (संस्थान नागोद) येथे बांधले गेले. हे शिवालय जवळजवळ पार्वती मंदिराच्या विन्यासनुरूप बांधले आहे. फक्त यात नागरा येथील शिवालयाप्रमाणेच सोपान मार्गाच्या दोहो बाजूस एकेक लहान मंदिर किंवा देव कुलिका आहे. येथील वेदीबंधही जाड्यकुंभ व घट आणि छाद्य अशा स्तरात आहे, म्हणजे ते नागरा येथील देवळाच्या जोत्याच्या वेदीबंधाशी जवळीक मोकळ्या अंगणानंतर, छत असलेला म्हणजे सांधार प्रदक्षिणापथ येथे होता. सुदैवाने प्रदक्षिणापथावरील गवाक्षात असलेली लोकपालांची आणि स्कन्द, कार्तिकेय, ब्रह्मा, गणेश यांची शिल्पे सुट्ट्या स्वरूपात का होईना, पण आजही उपलब्ध आहेत. लोकपाल/दिक्पाल यांच्या शिल्पावरून सहज लक्षात येते, की भुमरा येथील शिवालयाची रचना 'प्रासाद' या स्वरूपात करण्यात आलेली असावी, हे निश्चित। यापूर्वीच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे नचना येथील पार्वती मंदिरसुद्धा 'प्रासाद' म्हणून रचले असले तरी त्यावर चार दिशांना लोकपालांची अथवा दिक्पालांची शिल्पे योजिली नव्हती. गुहा आणि वन्यप्राण्यांमुळे, या मंदिरात शिवाचा निवास असलेल्या कैलास पर्वताचा आभास निर्माण करण्यात आलेला होता. परंतु भुमरा येथील ठळकपणे लक्षात येणारे दुसरे साम्य म्हणजे नागरा येथील शिवालयाप्रमाणेच याही ठिकाणी भूत प्रणालाची अभिषेकजल वाहून नेण्यासाठी योजना केली आहे. वरील विवेचनावरून सहज लक्षात येईल की आकाराने लहान असून दगडात बांधले असले तरी भुमरा येथील शिवालय हे नागरा येथील शिवालयाची एक प्रतिकृती व सुधारून वाढवलेली आवृत्तीच होती.

response.lokprabha@expressindia.com
 

नाते केवलनृसिंहाशी

विन्ध्यशक्तिसुतश्चापि प्रवीरो नाम विर्यवान् ।
भोक्ष्यते च समाः षष्टिं पुरीं काञ्चनकां च वै।
यक्ष्यते वाजपेयैश्च समाप्तवरदक्षिणैः। तस्य पुत्रास्तु चत्वारो भविष्यन्ति नराधिपाः ॥

     पुरणात केलेल्या या उभविष्यवाणीप्रमाणे विन्ध्यशक्तीचा पराक्रमी पुत्र प्रवीर म्हणजे वाकाटक घराण्यातील प्रवरसेन (प्रथम) हा साठ वर्षे उदिका आणि चनकाम येथे राज्य करील. भरघोस दक्षिणा देऊन हा वाजपेय यज्ञ करेल. त्याचे चार पुत्र आपली स्वतंत्र राज्ये स्थापन करतील. वाकाटकांच्या दोन्ही शाखांच्या ताम्रपटांतून या प्रवरसेनचा उल्लेख असून त्याने अनेक प्रकारचे श्रौतयाग केले होते. त्याला सम्राट ही पदवी होती असाही दुजोरा मिळतो. त्याची सम्राट ही पदवी वाजपेय याग केल्यामुळे त्याला प्राप्त झाली असली तरी आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने मोठे साम्राज्यही प्रस्थापित केले होते असा विद्वानांचा कयास आहे. यासाठी थोडीशी पार्श्वभूमीही लक्षात घेतली पाहिजे. शुंगांच्या अस्तानंतर सातवाहनांनी स्वसामर्थ्याने दक्षिणेत एवढे मोठे साम्राज्य स्थापित केले की त्यात दक्षिणेतील तिन्ही समुद्रांचा समावेश असावा असे म्हणण्यास जागा आहे. गौतमीपुत्र सातकर्णीच्या (इसवीसन दुसऱ्या शतकाचा पूर्वार्ध) काळात तर त्याच्या साम्राज्यात मध्य प्रदेशापासून आंध्र प्रदेशापर्यंत व पश्चिम महाराष्ट्र व कोकणची किनारपट्टी यांचा अंतर्भाव होत होता. यज्ञ सातकर्णीच्या शिदाचे जहाज असलेल्या नाण्यावरून तर सागरी व्यापारावर त्यांची पकड होती हे स्पष्ट होते. अमरावती येथील उभ्या बुद्धमूर्तीची नक्कल करणाऱ्या प्रतिमा आग्नेय आशियातील देशांमध्ये आणि श्रीलंकेमध्ये सापडतात यावरून त्यांचा सांस्कृतिक प्रवाह दिसून येतो. परंतु इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात सुरुवातीस या साम्राज्याला अवकळा प्राप्त झाली आणि अनेक शक, क्षत्रप इत्यादींची लहान लहान राज्ये त्याऐवजी दक्षिणेत आढळू लागली. त्यामुळे यातील बऱ्याचशा राज्यांवर प्रवरसेन (प्रथम) याने ताबा मिळवला असावा, असे म. म. मिराशी मानतात आणि भविष्यवाणी केल्याप्रमाणे नगरधन आणि वाशीम येथील शाखांच्या बरोबरच त्याच्या दुसऱ्या दोन पुत्रांनीही राज्ये स्थापन केली असावीत असा तर्क म. म. मिराशी मांडतात. त्यांच्या मते कोसल म्हणजे हल्लीच्या झारखंड राज्यात तिसऱ्या पुत्राने राज्य स्थापन केले असावे आणि चौथ्या पुत्राने दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात म्हणजे प्राचीन कुंतल देशात राज्य स्थापन केले असावे.

▲ मध्यप्रदेशातील जबलपूर येथील सिंधुराशी पर्वताच्या पूर्वेला असलेला केवलनृसिंह

नंदिवर्धन (नगरधन) आणि वत्सगुल्म (वाशीम) येथील दोन शाखांतील नऊ पिढ्यांनी मिळून विदर्भ आणि आसपासच्या मुलखावर आपली सत्ता प्रस्थापित केली, हे त्या शाखांतील राजांच्या ताम्रपट आणि शिलालेखांवरून सहज लक्षात येते. तशा प्रकारच्या इतिहासाचा स्रोत या अनुमानित दोन शाखांबद्दल नसल्याने त्यांचा राज्यविस्तार किती होता हे नेमकेपणाने सांगता येत नाही. मात्र म. म. मिराशींनी आपल्या कासोशीच्या संशोधनाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असे दिसते.
         वत्सगुल्म शाखेचा दुसरा राजा प्रवरसेनचा नातू आणि सर्वसेनाचा मुलगा विन्ध्यशक्ती याचा ताम्रपट मिळालेला असून त्यावरून नांदीकट विषय म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड जवळचा भाग त्याच्या ताब्यात होता हे स्पष्ट होते. त्याच्या दुसऱ्या एका ताम्रपटावरून हैदराबाद संस्थांमधील हिन्यांच्या खाणीच्या प्रदेशातही त्याचा अंमल होत हे दिसते. त्याच्याविषयीचा आणखी एक सूचक उल्लेख वराहदेवाच्या अजिंठा येथील लेणे क्रमांक सोळा या लेण्यातील राज्यप्रशस्तीमध्ये आहे. या शिलालेखातील सातव्या ओळीमध्ये सर्वसेनाचा मुलगा श्रीविन्ध्यशक्ती म्हणजेच द्वितीय विन्ध्यशक्ती याने कुंतल देशाच्या राजावर विजय मिळवला, असा उल्लेख येतो. म. म. मिराशी याचा असा अर्थ लावतात की प्रवरसेनच्या चौथ्या पुत्राचे जे कुंतल देशात राज्य असावे, ते गिळंकृत करून मानपूर येथून राज्य करणारा राष्ट्रकूट राजा अविधेय याने विदर्भआणि अश्मक या प्रदेशांवर राज्य प्रस्थापित केले असावे. हे सहन न होऊन विन्ध्यशक्तीने अश्मक हा प्रदेश तर मिळवलाच, परंतु कुंतलेन्द्र म्हणजे राष्ट्रकूट राजा अभिधेय याचा युद्धात पराभव केला असावा.
      कुंतल देशाशी यानंतरही वाकाटकांचे संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसते. वाकाटकांच्या नदीवर्षण शाखेतील पाचव्या पिढीतील सुप्रसिद्ध राजा प्रवस्सेन (द्वितीय) याचा पुत्र नरेन्द्रसेन याची महाराणी अजित भट्टारिका ही कुंतल देशाची राजकन्या होती, हे द्वितीय पृथ्वीषेण याच्या बालाघाट ताम्रपटातील उल्लेखावरून स्पष्ट होते. वेम्बारकवासक म्हणजे चांद्यापासून २८ मैलांवर असलेल्या वैनगंगेच्या काठावरील बेम्बळ या ठिकाणावरून दिलेल्या ताम्रपटात कुन्तालाधिपतीची कन्या महादेवी अजितभट्टारिका आणि महाराज श्री नरेंद्रसेन यांचा आपण पुत्र आहोत हे तो अभिमानाने नोंदवतो.
         म. म. मिराशी यांच्या मते द्वितीय विन्ध्यशक्तीच्या काळात म्हणजे चौथ्या शतकाच्या शेवटी जरी राष्ट्रकुट कुंतलेन्द्र आणि वाकाटक यांच्या घराण्यात वितुष्ट उत्पन्न झाले असले तरी या दोन घराण्यांत गुप्त सम्राटांमुळे समेट घडून आला असावा. आपल्याला हे माहीतच आहे की, नरेद्रसेनचा पिता प्रवस्सेन द्वितीय याची आई प्रभावतीगुप्ता ही गुप्त सम्राट द्वितीय चंद्रगुप्ताची मुलगी होती. ही अत्यंत भगवद्भक्त म्हणजे विष्णूची


श्री गोदो नृसिंहा

उपासिका असून तिच्याशी झालेल्या विवाहानंतरच तिचा पती महाराज रुद्रसेन हाही परमभागवत झाला होता. वाकाटकांच्या ताम्रपटात 'आपल्याला भगवान चक्रपाणीच्या म्हणजे श्रीविष्णूच्या प्रसादामुळे राज्यलक्ष्मीचा लाभ झाला' असा आवर्जून उल्लेख येतो. म. म. मिराशीच्या मते कुंतल देशाचे राजे आणि गुप्त सम्राट यांचे नुसते सलोख्याचेच नव्हे तर मित्रत्वाचे संबंध होते असे 'कुंतलेश्वरदौत्य' या संस्कृतमधील काव्यग्रंथावरून दिसून येते. या लघुकाव्याच्या शीर्षकावरून अनुमान करता येते त्याप्रमाणे गुप्त सम्राटांच्या दरबारातून त्यांचा दूत कुन्तलेश्वराच्या दरबारात गेला होता. तो कदाचित स्वतः त्या काव्याचा कर्ता महाकवी कालिदासच असावा. हे संपूर्ण काव्य जरी उपलब्ध नसले तरी एका श्लोकातील स्पष्ट उल्लेखामुळे कालिदासाने द्वितीय चंद्रगुप्ताला सादर केलेल्या अहवालाप्रमाणे कुंकुतलेश्वर गुप्त सम्राटावर राज्याचा सर्व भार विश्वासाने टाकून मोठ्या ऐषारामाचे आयुष्य घालवतो. यातील दुसऱ्या एका श्लोकाप्रमाणे सुरुवातीला कुतल राजाच्या दरबारात दूताकडे म्हणजे कालिदासाकडे थोडेसे दुर्लक्ष झालेले होते. त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे म्हणजे सम्राटाच्या दूताला शोभेलसे आसन देण्याची तत्परता कुन्तलाच्या दरबाराने दाखवली नाही, परंतु नंतर राजाशी झालेल्या संवादानंतर गुप्त सम्राटांवर भर टाकल्याने कुंतलेश्वर मोठ्या आनंदाने राज्य करत होता असे दिसते.
       कालिदासाच्या 'कुंतलेश्वरदौत्य' या काव्यातील पुढील उद्धृत केलेला श्लोक या दृष्टीने मोठा सूचक आहे. असकलहसितत्वात्क्षालितानीव कान्त्या। मुकुलितनयनत्वद्व्यक्तकर्णोत्पलानि । पिबति मधुसुगन्धीन्याननानि प्रियाणां । त्वयि विनिहितभारु कुन्तलानामधीशः ॥

▲ नांदेड शहरातील गोदा लक्ष्मी नृसिंह मंदिरातील केवल नृसिंहाची प्रतिमा

       याचा सारांश असा आहे की, कुन्तलांचा अधिपती म्हणजे गुप्त सम्राटावर निर्धास्तपणे अवलंबून असल्याने कुन्तलचा अधिपती आपल्या प्रिय पत्नींसमवेत मदिरेचा आस्वाद मोठ्या आनंदाने घेतो.
         अजिंठा येथील १६ क्रमांकाच्या लेणीतील शिलालेखामध्ये द्वितीय विन्ध्यशक्तीने विजय मिळवल्याचा उल्लेख आहे. व तो साताऱ्यातील हल्लीच्या माण येथून म्हणजे प्राचीन मानपूर येथून कृष्णा नदीच्या तीरावर राज्य करणाऱ्या अविधेय नावाच्या राष्ट्रकूट नावाच्या राजाला उद्देशून आहे, असे म. म. मिराशीचे मत झाले आहे. परंतु कुन्तल देश म्हणजे प्राचीन राजधानी वैजयंती (हल्लीचे बनवासी) आणि नंतर पलाशिका (धारवाड जिल्ह्यातील हालसी) इथून राज्य करणारे कदंब होत, असे सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ नीलकंठशास्त्री यांचे मत आहे. कदाचित पृथ्वीषेणाची आई अजितभट्टारिका ही कदंब कुळातील असावी असे अनेक विद्वानांचे मत झाले आहे. वाकाटकांच्या शिलालेखात कुन्तलदेशाचा आणखी एकदा उल्लेख येतो आणि तो म्हणजे वराह देवाच्यावर उल्लेख केलेल्या अजिंठा येतील १६ क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात आहे. या लेखातील राजप्रशस्तीमध्ये विन्ध्यसेनानंतर प्रवरसेन (म्हणजे वाशीम शाखेतील द्वितीय प्रवरसेन) त्याचा अगदी कोवळ्या वयात म्हणजे आठव्या वर्षी राज्यावर आलेला मुलगा (याचे नाव लेख पुसट झाल्याने नष्ट झाले आहे) त्याचा पुत्र देवसेन व त्यानंतर हरिषेण अशी वंशावळ दिलेली आहे.
       वराहदेव आपल्या सम्राटाचे सिंहाप्रमाणे प्रतापी असल्याचे वर्णन करतो आणि अठराव्या श्लोकात कुन्तल, अवंति, कोसल, त्रिकूट, लाट, आणि आंध्र हे शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजांचा तो अधिराज असावा असे सुचवले आहे. या श्लोकातील काही श्लोक, विशेषणात्मक शब्द नष्ट झाले असले तरी हरिषेणाचे या सर्व प्रदेशावर सार्वभौमत्व असावे याबाबत सर्व विद्वानांचे एकमत आहे.
           हरिषेणाने राज्यावर आल्या आल्या खानदेशातील स्थालकनगर (थाळनेर) येथून काही दाने दिली होती. विद्वानांच्या मते खानदेशच नव्हे तर नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत असे विस्तृत त्याचे साम्राज्य असावे. यातील त्रिकूट म्हणजे सह्याद्रीच्या दोन्ही उतारांवर राज्य करणारे त्रैकुटक, कोसल म्हणजे हल्लीच्या झारखंडमधील रायपूरच्या सभोवतालच्या प्रदेशावर राज्य करणारे राजे आणि आंध्र म्हणजे वेगीहून राज्य करणारे विष्णुकुंडिन यात शंका नाही. त्यांच्याशी वाकाटक राजांचे सांस्कृतिक संबंध कसे होते याविषयीच्या पुराव्यांचा आपण नंतरच्या लेखात विचार करणार आहोत. पण कुन्तल म्हणजे धारवाड, बेळगाव व दक्षिण महाराष्ट्र या प्रदेशावर राज्य करणारे कदंब राजे असावेत असा विद्वानांचा कयास आहे.

काही वर्षांपूर्वी धारवाड विश्वविद्यालयात वाकाटक राजवंश व त्यांची कला या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेलो असता प्राचीन इतिहास व पुरातत्त्व विषयाच्या संग्रहालयाला भेट दिली. त्यात रामटेक येथील बैठ्या दोन हाती केवळ नरसिंहाची प्रतिमा मला आढळली. मूर्ती विज्ञानदृष्ट्या तिचे वाकाटक मूर्तीशी साम्य तर होतेच, पण धाटणीवरून ती चालुक्यपूर्व काळातील असावी असे माझ्या लक्षात आले.
         त्यानंतर एका वर्षी मी व डॉ. वैशाली वेलणकर यांनी बेळगाव, धारवाड भागामध्ये एका आठवड्याचा दौरा हाती घेतला. याचे दुसरे कारण असे होते की, काही स्थानिक इतिहासतज्ज्ञांनी अशा ध्यानाच्या अनेक मूर्ती या भागात आढळतात, एवढेच नाही तर नरसिंहाची उपासना करणारी काही घराणी व तशा प्रकारची मंदिरे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वप्रथम बनवासी येथील मधुकेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली. आणि त्या ठिकाणी आम्हाला रामटेकच्या मूर्तीच्या मानाने लहान ठेवणीची परंतु हातामध्ये चक्र असलेली तशीच मूर्ती मिळाली.
         जाणकारांनी सांगितलेली माहिती नक्कीच विश्वसनीय होती हे आम्ही नंतर सात दिवस केलेल्या दौऱ्यात प्रचीतीस आले. नरसिंह संप्रदायाच्या एका घरातील लोकांशी बोलताना त्यांनी आपल्या घराण्यातील परंपरा पुढीलप्रमाणे सांगितली. आमचे मूळ घराणे गोदावरीच्या काठचे असून तिथूनच आम्ही ही नरसिंह उपासनेची परंपरा आणली असे आमचे वाडवडील सांगतात. त्या संदर्भात माझे असेही लक्षात आले की नांदेड येथे देवालयांचे संशोधन करताना एका यादव काळातील केवलनरसिंहाची मूर्ती आम्हाला आढळून आली. ती वाकाटक काळातील परिचित मूर्तीप्रमाणे एक गुडघा वर करून समोरच्या गुडघ्यावर हात विसावल्याप्रमाणे न दाखवता उकिडवी असून अंगाभोवती योगपट्ट गुंडाळलेली होती. परंतु मराठवाडा आणि या भागात नरसिंह उपासनेची परंपरा समान आहे हे दिसून येते.

▲ कर्नाटकातील दक्षिण कानडा जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यातील गंगानाडू येथील केवलनृसिंहाची प्रतिमा

▲ कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील कुप्पत्तुर येथील नृसिंह मंदिरातील नृसिंहाची प्रतिमा


      वर पाहिल्याप्रमाणे पांडुरंगपल्ली ताम्रपटात उल्लेखलेले राष्ट्रकूट हे कुन्तलाधिपती की वनवासीहून राज्य करणारे कदंब हे वाकाटकांच्या शिलालेखांत व ताम्रपटांत उल्लेखलेले कुन्तलेन्द्र किंवा कुन्तलाधिपती याविषयी मतमतांतरे आहेत.
       आज या सर्व पुराव्यांचा आढावा घेतला तर असे म्हणावयास हरकत नाही की शासित प्रदेशामध्ये इसवीसनाच्या पाचव्या शतकात लोकप्रिय झालेल्या नरसिंह मूर्तीची संख्या पाहता कदंब हेच पृथ्विषेणाच्या ताम्रपटात अपेक्षित असलेले कुन्तलाधिपती असावेत. रामटेक येथे नरसिंहाची दोन मंदिरे आहेत, एक केवलनरसिंहाचे तर दुसरे रुद्रनरसिंहाचे. केवलनरसिंह मंदिरात सापडलेल्या शिलालेखात प्रवरसेन द्वितीय याची आई प्रभावतीगुप्ता हिच्या स्मरणार्थ तिच्या मुलीने हे मंदिर प्रवरसेनाच्या साहाय्याने बांधले

▲ चंद्रपूर येथील गोगोबाग्राम येथील केवलनृसिंहाची प्रतिमा, आता ती नवीन मंदिरात ठेवण्यात आली आहे. (छायाचित्र सौजन्य- डॉ. अरविंद जामखेडकर)

असावे. तिचा पणतू पृथ्विषेण द्वितीय आणि प्रवस्सेन द्वितीय यांचे ताम्रपट मांधळच्या उत्खननात सापडले आहेत. उत्खननात बलराम आणि कृष्ण यांच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. एवढेच नव्हे तर प्रभावतीगुप्ता हिचा पतीश्री रुद्रसेन महाराज याचाही ताम्रपट सापडला आहे.

▲ कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील हलसी येथील वराह नृसिंह मंदिरातील दक्षिणेकडील भिंतीवर असलेला मुदा नृसिंह.

भीष्म यांनी युधिष्ठीरासह पाचही पांडवांनी 'जितं भगवता पुरुषेण' असा गजर करत आनंदाने उड्या मारल्या अशा प्रकारचा उल्लेख आला आहे. यावरून सहज लक्षात येते की महाराज रुद्रसेन याची महाराणी प्रभावतीगुप्ता, द्वितीय पृथ्विषेण आणि कदंब कुळातील काही राजे यांना प्रभावतीगुप्ता हिच्या ताम्रपटाची सुरुवात तिचा पिता परम भागवत चंद्रगुप्त द्वितीय याच्या लेखात दिसते त्याप्रमाणे 'जितं भगवता पुरुषेण' या मंगलाचरणाने झालेली आहे. तशाच प्रकारची ताम्रपटांची सुरुवात कदंब घराण्यातील ताम्रपटातदेखील दिसून येते. हे मंगलवचन विष्णूला ज्याचा उल्लेख एरवी पूजेच्या संकल्पात महापुरुष म्हणून येतो याविषयी विद्वानांमध्ये संदेह नाही. पण हे नमन पांचरात्र धर्माशी संबंधित एका आख्यानाचा भाग आहे याची कल्पना मात्र नव्हती. शांतिपर्वाच्या नारायणीय उपाख्यानामध्ये भगवान वासुदेवाचा महिमा वर्णन केल्यानंतर नारद आणि जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे सात्वत अथवा पंचरात्र धर्म. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की वाशिम शाखेच्या एका ताम्रपटात सात्वत धर्मीयांसाठी दोन मठ बांधून दिल्याचा उल्लेख आहे. अशा रीतीने वाकाटकांची नंदीवर्धन आणि वत्सगुल्म येथील भागवत धर्माचे हे लोण कदंब कुलात पर्यायाने उत्तर कर्नाटकात पोचले असावे.

▲ बसूर केवल नृसिंहाची प्रतिमा. आता ती कर्नाटकातील धारवाड विद्यापीठ संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.

      कुन्तलाधिपती हे मानपूर येथून  राज्य करत होते की वैजयन्तीहून या विवादात न पडता दक्षिण महाराष्ट्र त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यातील माण परिसरातील शिलालेखातून सात्वत धर्माच्या अस्तित्वाचे धागेदोरे अथवा केवलनरसिंहाच्या मूर्तीच्या रूपाने ठोस पुरावा मिळेल आणि तेसुद्धा वाकाटक लेखांत अभिप्रेत असलेले कुन्तलाधिपती असतील अशी आशा करूया.

response.lokprabha@expressindia.com
 

रामटेक येथील वाकाटककालीन मंदिरे

      वाकाटकांचा इतिहास व त्यांचे शासन व राक्षस युद्ध इत्यादी त्यांना आढळलेल्या प्रसंगांवरून त्यांनी असा तर्क मांडला की, वाकाटक काळात या ठिकाणी श्रीरामाचे देऊळ असावे. नंदिवर्धनाहून पवनार म्हणजे प्रवरपूर येथे प्रवरसेनाने (द्वितीय) राजधानी हलविल्यानंतर त्याची आई प्रभावती गुप्ता हिच्या गरजेमुळे रामटेक इथल्याप्रमाणे हे मंदिर त्याने बांधले असावे अशी ताँची उतरंड त्यांनी मांडली. या संदर्भात काही लेख लिहून रामायणातील काही प्रसंगांप्रमाणेच हरिवंशातील काही प्रसंग हा त्यातील काही शिल्पांचा विषय आहे हे सप्रमाण आम्ही सिद्ध केले. येथे राम मंदिर नसून शेषशायी विष्णूचे मंदिर असावे, पवनार म्हणजेच प्रवरपूर ही वाकाटकांची राजधानी नसून शिलालेखात उल्लेख केलेले पद्मनगर असावे ही बाजूही आम्ही ठामपणे मांडली. अशा रीतीने मिराशीच्या मतांना काही प्रमाणात मुरड घालावी लागली असली तरी ती शिल्पे वाकाटककालीनच आहेत असेच आमचे मत झाले. मिराशींनी वाकाटक शिल्प स्थापत्याचा जो आढावा घेतला त्यात रामटेक येथील त्रिविक्रम मूर्ती आणि त्याभोवतीचे दगडी मंदिराचे अवशेष, संभाव्य रामपादुका असलेले दुसरे मंदिर, पवनार येथील कथनात्मक शिल्पे, नचणा-कुठारा (मध्य प्रदेश) येथील पार्वतीचे मंदिर, तिगवा (मध्य प्रदेश) येथील कंकाली देवीचे मंदिर आणि अजिंठा येथील १६, १७ व १९ क्रमांकाच्या गुंफा, जिंजाळा येथील घटोत्कच गुंफा हे सर्व वत्सगुल्म आणि नंदिवर्धन शाखेच्या वाकाटकांनी प्रेरित केलेल्या कलास्थापत्यानुसार घडविण्यात आलेल्या आहेत. अजिंठा येथील लेणे क्रमांक १६ हे वराहदेवाचे लेणे आणि जिंजाळा येथील घटोत्कच लेणे या दोन्ही गुंफा एकाच व्यक्तीने कोरवून घेतल्या होत्या, हे मिराशी यांनी सिद्ध केल्यानंतर, हा धागा पकडून प्रा. वॉल्टर स्पिंक यांनी अजिंठा येथील उत्तरकालीन (म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील) गुंफा या सर्व वाकाटककालीन असून, एका पिढीत म्हणजे २५ वर्षांच्या आतच कोरण्यात आल्या असाव्यात असा मुद्दा मांडला.

रामटेक येथील केवल नरसिंहाची शेंदूरलेपन असलेली मूर्ती

नंतरच्या काळात यापुढे जाऊन हरिषेणाचा मृत्यू इ. स. ४७८ मध्ये झाला व वाकाटककालीन गुंफा आणि शिल्पे यासंबंधीचे सर्व उपक्रम अगदी अश्मक राजांचेसुद्धा - इ. स. ४८५ पर्यंतच संपुष्टात आले असे अगदी टोकाला गेल्यासारखे मत हिरिरीने मांडले. अजिंठा येथील गुंफा आणि शिल्पे कोरण्याचा कार्यक्रम व इ. स. ४८५ मध्ये खरोखरच संपुष्टात आला का? तसेच तेथील विहाराचे अस्तित्व, भिक्षूचा वावर व संबंधित बौद्ध धर्माची उपासना प्रा. स्पिंक म्हणतात त्याप्रमाणे पूर्णपणे खंडित होऊन त्यांच्या गुंफांच्या अस्तित्वाची जाणीवही एकोणिसाव्या शतकात त्यांचा पुनः शोध लागेपर्यंत लोकमानसातून पुसली गेली होती, हे त्यांचे आग्रही प्रतिपादन जसेच्या तसे स्वीकारायचे का, असे प्रश्न उपस्थित होतात. हे त्यांचे म्हणणे क्षणभर खरे मानले तर गुंफा क्रमांक २६ च्या बाहेरच्या व्हरांड्यात म्हणजे वितीमध्ये असलेल्या पूर्वराष्ट्रकूटकालीन अभिलेखाचे स्पष्टीकरण काय द्यायचे? वाकाटक नृपती हरिषेणाचा मृत्यू इ. स. ४७८ मध्ये झाला असे गृहीत धरले आणि अश्मकांनी त्याच्या दुबळ्या वारसाचा पराभव केला हेही मान्य केले तरी वाकाटक वंश खरोखरच संपूर्ण निःशेष झाला हे खरे कशावरून?


दख्खनमधील वाकाटकांच्या दोनही पात्या लयाला गेल्यानंतर सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात बदामी चालुक्यांचे घराणे उदयास आले. हूणांच्या प्रभावामुळे उत्तरेतील समृद्ध व्यापार ओहोटीस लागून खुष्कीचे व्यापारी मार्ग कुंठित झाले आणि आर्थिक सत्तेचे केंद्र चालुक्यांच्या आश्रयाने कर्नाटकातील अय्यावोळे म्हणजे आईहोळे येथे सरकले हे खरे असले तरी वाकाटक साम्राज्याचा नाश होऊन भिक्षु-विहारांची कार्यपद्धती पूर्णपणाने नामशेष झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. औरंगाबाद, नाशिक आणि वेरुळ येथे बौद्ध विहार पाच-पंचाहत्तर वर्षे निश्चितपणाने होते. राष्ट्रकूट राजवंश जसा इ.स. ९७५ नंतर पूर्णपणाने नामशेष झाला नाही, तसाच वाकाटकांचा वंश या भागात थोडी धुगधुगी ठेवून शिल्लक असेल. काही बौद्ध अनुयायी थोड्याफार प्रमाणात गुंफांमध्ये मनोहर बुद्धांचे दर्शन घेण्यासाठी येत असतील असे मानणे गैर ठरणार नाही. अजिंठा येथील गुंफा क्रमांक एकमध्ये पुलकेशीचे चित्रण आहे, आणि त्यामुळे या गुंफा इ.स.च्या सातव्या शतकातही कोरल्या जात होत्या. आणि बौद्ध संप्रदाय इ.स. सातव्या शतकात महाराष्ट्रात सबळपणे होता हेही तितक्याच टोकाचे म्हणणे आहे. या सर्व वादविवादात न पडता एवढेच म्हणता येईल की, वा. वि. मिराशी आणि स्पिंक यांनी वाकाटक कलास्थापत्याच्या कालनिश्चितीची चौकट आणि स्थापत्यशिल्प नमुन्यांचा भौगोलिक व्याप अधिक व्यापक पटावर पसरवून दाखवला. या दोघांच्या कार्याचा एक महत्त्वाचा, चांगला परिणाम म्हणजे वाकाटककालीन स्थापत्य, शिल्पे व पुरावशेष यासंबंधीच्या संशोधनाला म्हणजे गवेषण आणि उत्खननाला मोठी चालना मिळाली. हे पुढील ५० वर्षांत झालेल्या लिखाणावरून सहज स्पष्ट होईल. त्या संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रामटेक येथील सहा दगडी मंदिरांचा आणि त्यातील शिल्पांचा शोध असे म्हणता येईल. नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व विभागामध्ये अधिव्याख्याता म्हणून १९६८-७७ या काळात काम करत असताना मला उत्खनन आणि गवेषण त्याचप्रमाणे वाचन, अध्यापन आणि लिखाण याचा मोठा विस्तृत अनुभव मिळाला. तेव्हा आम्ही प्रामुख्याने बृहदश्मयुगीन शिलावर्तुळांची माहूरझरी, बोरगाव, नैकुंड येथील उत्खनने हाती घेतली व विदर्भाच्या आद्य शेतकऱ्यांचा काल निश्चित केला. तो इ.स. पूर्व ७००-८०० असा होता. पौनी (जि. भंडारा), पवनार (जि. वर्धा), भोकरदन (जि. जालना)

▲ केवल नरसिंहाची खाजगी पूजेतील छोटी प्रतिकृती

येथील उत्खननांमुळे विदर्भ-मराठवाड्यातील आद्येतिहासकालीन धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन कसे असेल आणि स्थापत्य शिल्पकलांचे स्वरूप आणि व्याप कसा होता हे लक्षात येण्यास मदत झाली. विभागाने हाती घेतलेल्या प्राचीन स्थळांच्या (खजुराहो, जबलपूर, पश्चिम महाराष्ट्रातील गुंफा) सहलीतून गुंफा आणि मंदिरे कशी बघावीत, शिल्पाच्या बाबतीत आकृतीची ठेवण, प्रमाणबद्धता आणि हावभाव कसे निस्खले पाहिजेत याची कल्पना आली. १९७० साली एम.ए. साठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन गेलो असता भग्न त्रिविक्रम शिल्प व मंदिरावशेषांबरोबरच केवलनरसिंह, गुप्तराम, भोगराम आणि वराहमंडप यांनी माझे लक्ष वेधले. गुप्तराम या दर्शनी बांधीव खांब असलेल्या गुंफेसमोर हस्त व शीर्षविरहित विष्णूची भग्न प्रतिमा आढळली. त्यामुळे मिराशी म्हणतात त्याप्रमाणे वराहाची प्रतिमा उत्तरकालीन नसून वाकाटककालीन आहे की काय, अशी शंका मनाला चाटून गेली. केवलनरसिंह मंदिराच्या दाराची चौकट बघितल्यानंतर असे लक्षात आले की, असेच यक्ष-गण भोगराम या जोडमंदिराच्या वेदीच्या भागावर ओळीत कोरलेले आहेत. आतमध्ये दरवाजाच्या चौकटीपाशी एक रेखीव मकर (मगर) कोरलेला आढळला. कमळांची तबके हुबेहूब भोगराम मंदिराच्या दर्शनी वीतीमध्ये व गाभाऱ्याच्या छतावर आढळलेली केवलनरसिंहाच्या मंदिराच्या छतावरील तबकांप्रमाणेच होती. त्यामुळे या मंदिरांचा आणि त्यावरील शिल्पांचा अधिक छडा लावला पाहिजे असे मनात आल्याने, अलेक्झांडर कनिंगहॅम, त्याचा मदतनीस बेगलर, कंपनी सरकारचा अधिकारी वेलस्टेड यांचे लिखाण डोळ्यांखालून घातले. बेगलर यांच्या रामटेक येथील भेटीला त्या काळातील हिंदू धर्माच्या प्रथेमुळे आपोआपच काही मर्यादा आल्या. त्यामुळे रामटेकच्या मध्ययुगीन गडावरील मुख्य प्रवेशद्वाराच्या पलीकडे, बेगलर हे हिंदू नसल्याने आतमध्ये जाण्यास त्यांना मज्जाव होता. साहजिकच कोटाच्या आतमधील दशस्थ मंदिर, राम-लक्ष्मण मंदिर, तेथील जलकुंड यांचे वर्णन त्यांना दिलेल्या माहितीवरून करावे लागले. कोटावरील रामझरोका या नावाने प्रसिद्ध असलेल्या खिडकीचा ते देऊळ म्हणून उल्लेख करतात त्यावरून त्यांची असहायता स्पष्ट होते. पण त्यांना केवलनरसिंह, गुप्तराम, भोगराम आणि वराहमंडप ही मंदिरे अगदी जवळून पाहता आली. राम- लक्ष्मण मंदिरे तसेच बाहेरील लेणी, नागपूरमधील भोसल्यांची संस्थानी राजवट कंपनी सरकारने संपुष्टात आणली असली तरी भोसला संस्थानाच्या ताब्यात होती. आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जात होते. दर वर्षी प्रथेप्रमाणे मंदिराच्या भिंतींना सफेदी केली जात असे. देव नवसाला पावले म्हणून नरसिंहाच्या कृपेने झालेल्या पुत्रप्राप्तीच्या आनंदात मूर्तीना लालचुटूक शेंदराचा लेप चढविला जात असे. बेगलर यांनी चौकशी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की, रामटेकवरील किल्ल्याचे लष्करी माहात्म्य संपुष्टात आले होते. पायथ्याशी असलेल्या तलावाच्या भोवती घाट आणि त्यावर भोसला शैलीवरील ओडिसी स्थापत्य कलेचा प्रभाव असणाऱ्या मराठीशाहीतील मंदिरांपेक्षा वेगळी दिसणारी मंदिरे उभारण्यात आली होती. मधूनमधून पादुका आणि समाध्या दिसत होत्या आणि रामटेकला असलेले तीर्थक्षेत्राचे माहात्म्य आणि तेथील गर्दी वाढली होती. बेगलरला असे सांगण्यात आले की, गडावरील राम-लक्ष्मण मंदिरांचा जीर्णोद्धार जानोजी भोसल्यांनी केला. याला कारण असे घडले की, भोसले बंगाल-ओरिसाच्या मोहिमेवर निघाले होते. जबलपूरच्या वाटेवर पहिला पडाव रामटेक येथे होता. जानोजी, भोसले वंशातील असल्यामुळे आणि साताराजवळचे मूळचे रहिवासी असल्यामुळे असा ग्रह होण्याचा संभव की, शिखरशिंगणापूरचा शंभूमहादेव हा त्यांचे कुलदैवत असावे. या भोसल्यांचे कुलदैवत श्रीराम आहे. आजही त्यांच्या घरी श्रीरामपंचायतन आणि चांदीची समर्थ रामदासांची मूर्ती पूजेत आहे. जानोजी भोसल्यांनी रामटेकच्या मंदिरातील रामाजवळ असा नवस केला की, यशस्वी झालो तर वनवासात श्रीरामाच्या पावलांचा स्पर्श झालेल्या या टेकडीवरील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करू, पुढील इतिहास सर्वज्ञातच आहे. भोसल्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार अतिशय मनापासून केला. मी उल्लेखलेली नरसिंह देवळाच्या भिंतीशी असलेली नक्षी, चौकटीवरील यक्षगण आणि निधी, मंडपातील वराह आणि भोगराम मंदिरातील कमळाची तबके बेगलर यांच्या निरीक्षणातून नक्की सुटली नसतील; तरीसुद्धा ही सर्व मंदिरे भोसलेकालीनच आहेत, या निर्णयाला ते पोहोचले. आणि हा समज त्रिविक्रम मूर्तीचा अपवाद वगळता १९५६ पर्यंत वा. वि. मिराशींच्या मनात होता यात शंका नाही. वराहमूर्तीवर कोणतेही शेंदराचे लेप नसले तरी ती सहाव्या शतकाच्या नंतरची असल्याचे त्यांना वाटले. रामटेक म्हणजे रामगिरी हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केल्याने, केवलनरसिंह मंदिराच्या थोडेसे अलीकडे कालिदासाचे आकर्षक स्मारकही वसंतराव नाईक यांच्या कारकीर्दीत उभारण्यात आले व कालिदासाच्या साहित्यकृतीतील प्रसंगांवर आधारित सुंदर चित्रेही तेथे लावण्यात आली. मनसर येथील हिडिंबा टेकडी व अवतीभोवतीच्या पुरावशेष व स्थापत्याबाबत वेलस्टेड याने ते वाकाटककालीन आहेत हे ठासून मांडले तरी तळ्याच्या उतारावरील शंखलिपीतील लघुअभिलेख वगळता वाकाटककालीन असे काहीच ज्ञात नव्हते. वामनशिवाची मूर्तीसुद्धा नंतर सापडली याचा उल्लेख पूर्वी आलेलाच आहे.
      १९७१ साली माझी नेदरलॅण्ड सरकारच्या फेलोशिपसाठी निवड झाली. फेलोशिप ऑक्टोबरपासून एक वर्षाच्या कालावधीची होती. हॉलंडमधील अॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटीच्या 'दक्षिण व आग्नेय आशिया पुरातत्त्व व प्राचीन कला' या विभागात प्रा. फान लोहॅवझन द लेऊ या प्रसिद्ध कलेतिहासज्ञ, प्राच्यविशारद विदुषीच्या हाताखाली अध्ययन व संशोधन करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे भारतीय, मध्य आशियाई आणि आग्नेय आशियातील कलेच्या वारशाचा काही विशिष्ट प्रदेशातील निवडक व थोड्या अवशेषांचा सखोल अभ्यास करता आला. या काळातच मी स्वस्तिक-मुद्रेवरील माझा शोधनिबंध लिहून काढला. आणि आग्नेय आशियातील विष्णुमूर्तीचा प्रतिमा विज्ञानाच्या दृष्टीने विचार करून बरीचशी सामग्री गोळा केली. या अभ्यासामुळे पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती आणि थायलंडमधील विष्णुमूर्ती यांच्यातील साम्य लक्षात आले. या वर्षभरात मी वाकाटकांच्या रामटेक येथील पुरावशेषांचा सारखा विचार करत होतो; आणि त्यासंबंधी श्रीलंकेतील प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि कलेतिहासतज्ज्ञ सेनाके भंडारनायके यांच्याशी चर्चा केली. ऑक्सफर्ड विद्यापीठाची आचार्य पदवी मिळाल्यानंतर त्यांना विश्रांतीसाठी म्हणून नागपूर येथे येण्याची मी विनंती केली होती. त्यांच्यासोबत आम्ही रामटेकला गेलो होतो.

▲ मनसर येथील बटुक शिव

      रुद्रनरसिंह, केवलनरसिंह, भोगराम ही मंदिरे आणि मंडपातील वराह हे वाकाटककालीन असावेत या माझ्या कयासाला त्यांनी जोरदार पाठिंबा दिला. पण यावरील माझे चिंतन लिखाण स्वरूपात येण्यासाठी मला १९८२ पर्यंत थांबावे लागले. तोपर्यंत मांढळ इथल्या दोन मोसमांतील (१९७४-७५ आणि १९७५-७६) उत्खननाचा अनुभव आणि तेथील शिल्पांची जाण माझ्या पाठीशी होती. श्रीअनंताचार्य इंडॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने आयोजित चर्चासत्रात केवलनरसिंह मंदिरात केलेल्या निरीक्षणांच्या आधारे मी ही बाजू मांडली. त्या सत्राचे अध्यक्ष डॉ. के. व्ही. सौदरराजन यांनी माझ्यातील तरुण संशोधकाच्या प्रयत्नांचे कौतुकच केले. पण ही मंदिरे राष्ट्रकूटकाळाच्या अगोदरची नाहीत असे मत ठामपणे व्यक्त केले. सत्र आटोपल्यानंतर ते दिल्लीस जाण्यास निघाले असताना मी त्यांना आणखी काही छायाचित्रे दिली. ते दिल्लीस पोचल्यावर, मी चौकशी केली असता त्यांनी तुझे निरीक्षण बरोबर आहे, असे सांगून ही मंदिरे वाकाटककालीन आहेत यास दुजोरा दिला. १९८३-८४ साली, अगोदरच्या अनुभवामुळे प्रोत्साहित होऊन मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक पद्माकर मुळे यांच्या साहाय्याने विशेषतः नरसिंह मंदिर जतनाचा उपक्रम हाती घेतला. रामभक्त यात्रेकरू वानरांना मोठ्या भक्तीने वागवत असल्याने त्यांचा उपद्रव न व्हावा म्हणून संस्थानाच्या रक्षकांनी वाकाटककालीन खिडक्यांच्या वर विटांच्या भिंती घातल्या होत्या. गेल्या ३०० वर्षांत दोन इंचांचा सफेदीचा थर त्यावर चढला होता. पाठीमागून जरी नरसिंहाच्या जटा आणि वस्त्र दिसत असले तरी शेंदराची जाड पुटे जमा झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने त्याची 'मंकी गॉड ऑफ महाराष्ट्र' अशी पोस्टकार्ड काढून प्रसिद्धी केली होती. तसेच आतल्या भिंतीवर चुन्याचा गिलावा केला होता. पद्माकर मुळे हे रसायनशास्त्राची पदवी असलेले अभिरक्षक होते. त्यांनी मंदिराच्या भिंती पाण्याच्या फवाऱ्याने ओल्या करून पापुद्रे खरवडून काढले. हलक्या हाताने छिन्नीने शेंदराची 'खोळ' दूर केली. ती काढायला फारसे प्रयास पडले नाहीत. आतल्या भिंतीवरील भोसलेकालीन चुन्याचा गिलावा छिन्नी वापरून हलक्या हाताने दूर करण्यात आला. त्यामुळेच मंडपाच्या खांबावरील यादवकालीन संस्कृत शिलालेख आणि या मंदिरातील मूर्तीचे नाव 'प्रभावतीस्वामिन्' असे सांगणारा प्रवरसेनाच्या काळातील कीलकशीर्ष ब्राह्मी लिपीतील विस्तृत शिलालेख - सापडला. रुद्रनरसिंहाच्या मंदिरावरील मध्ययुगीन चौकट काढली असता आतमध्ये केवलनरसिंह मंदिराच्या प्रमाणे गणप्रतिमा सापडल्या. आणि बाहेर एक भीमकाय, मनुष्याच्या ठेवणीपेक्षा मोठी अशी द्वारपालाची मूर्ती सापडली. त्यावरून व खांबावरील अलंकरणावरून ही मंदिरे आणि शिल्पे इ.स. पाचव्या शतकाच्या प्रथमार्धातील म्हणजे ४२५ ते ४४० या काळातील असावीत हे स्पष्ट झाले. विशालकाय वराहाच्या मूर्तीवरील कातडीचा नितळपणा, मूर्तीचा डौल आणि डोळे, नाक, कान कोरताना त्यात आणलेली नजाकत यामुळे ती थोड्या नंतरच्या काळातील म्हणजे पृथ्वीषेण द्वितीय याच्या काळातील असावी हे स्पष्ट झाले. या जतनकार्यामुळे व वाकाटककालीन मंदिरांच्या संख्येमुळे वाकाटककालीन स्थापत्याचे वेगळेपण लक्षात आले. अंतराळ नसलेली, समोर सभागृह व गाभाऱ्यात प्रदक्षिणापथ असलेली रुद्रनरसिंह मंदिरे, समोर अर्धा उघडा मंडप असलेले त्रिविक्रम मंदिर, गुहेच्या स्वरूपात असलेल्या गाभाऱ्यासमोर बांधीव अरुंद मुखमंडप ही स्थापत्यातील विविधता कुठल्याही गुप्त-वाकाटककालीन पुरातत्त्वीय स्थळी सापडत नाही.

▲ रामटेक येथील वराह मंदिर

केवलनरसिंहाच्या मंदिरातील भद्रासनावर, चक्र तळहाती असलेला हात उंचावलेल्या गुडघ्यावर ठेवून दिमाखात बसलेला नरसिंह हा समकालीन जगतातील सर्वश्रेष्ठ प्रतिमांपैकी एक आहे असे पद्मश्री कार्मेन बर्कसन या विदुषीचे मत का झाले हे लक्षात येते. मांढळ येथील प्रवरसेनपूर्व काळातील तपस्यामग्न पार्वती, गणमूर्ती, चतुर्मुख व अष्टमूर्तीशिवाच्या मूर्ती आणि उत्तरकालीन महिषासुरमर्दिनी आणि भद्रसनातील दुर्गा यांसारख्या पुराव्यामुळे वाकाटककलेतील निरनिराळ्या तीन किंवा चार अवस्थांचा कालक्रम कलेतिहासतज्ज्ञांना मांडण्याची संधी मिळाली. सुप्रसिद्ध कलेतिहासज्ज्ञ डॉ. आर. एन. मिश्रा यांनी आपल्या संशोधनपर लेखांतून तीन अवस्था असलेला नंदिवर्धन वाकाटक शाखेचा शिल्पांचा कालक्रमही सूचित केला.
       ए. के. शर्मा आणि जगत्पती जोशी यांनी मनसर येथील हिडिंबा टेकडी आणि परिसरातील साफसफाई आणि उत्खननात उघडकीस आलेल्या स्थापत्य, शिल्प, पुरावशेषांची कालनिश्चिती हिडिंबा टेकडीवरील ११ थरांखालील आणि भूपृष्ठावरील अवशेषांच्या संदर्भात चार कालखंडांच्या रूपात केली आहे. ते कालखंड असे; १. मौर्य काळ, २. सातवाहन काळ, ३. वाकाटक काळ आणि ४. विष्णुकुंडी काळ. यातील वाकाटककालीन स्थापत्याच्या एकमेकांपासून वेगळ्या अवस्थांचा त्यांनी विचार केलेला नाही. त्यामुळे या संदर्भात त्याची चर्चा अनावश्यक आहे. वॉल्टर स्पिंक यांच्या मते पवनार येथील शिल्पे ही वाकाटकोत्तर काळातील असावीत. तर जेरी मलान्द्रा यांच्या मते ती पूर्व-राष्ट्रकूटकालीन असावीत. आमच्या मते हस्व किंवा वामन-शिव शिल्प व हिडिंबा टेकडीवरील बरीच शैव शिल्पे ही शैलीच्या दृष्टीने पृथ्वीषेण द्वितीयाच्या नंतरच्या काळातील असावीत. त्यामुळे वाकाटक शिल्पांच्या तीन अवस्थांतील कालक्रम आम्ही पुढीलप्रमाणे सुचवतो. १) मांढळ येथील जुन्या धाटणीची मूर्तीशिल्पे : रुद्रसेन (द्वितीय) किंवा त्यापूर्वीचा काळ २) रामटेक येथील प्रौढ शैलीतील (परिपक्व) शिल्पे व पातुर येथील पार्वती : प्रवरसेन, देवसेनाचा काळ, ३) रामटेकवरील वराह, मनसर येथील काही शिल्पे : पृथ्वीषेण (द्वितीय), हरिषेणाचा काळ. कदाचित पवनार शिल्पांचा अंतर्भाव या तिसऱ्या कालखंडात करावा लागेल.
       हे विवेचन लक्षात घेता, मांढळ येथील उत्खनन व रामटेक येथील जतनकार्यात लागलेल्या शोधामुळे कलेतिहासज्ज्ञांनी अजिंठा व परिसरातील पुरावशेषांव्यतिरिक्त त्यापूर्वीची आणि नंतरची अशीही वाकाटक कलेची उदाहरणे मोठ्या प्रमाणावर सापडल्याने वाकाटक कलेतील कालक्रमाचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे अशी जाणीव तज्ज्ञांच्या मनात उत्पन्न केली. वाकाटकांच्या राज्याभोवती असलेल्या त्यांच्या सामंतांच्या प्रदेशातील किंवा त्यांच्या कलेचा प्रभाव असलेल्या मुलखातील कला व कलावशेष हे वाकाटकांच्या आणि गुप्त कलेच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतात. एवढेच नाही तर वाकाटककलेतील निरनिराळ्या तीन अवस्थांतील कलावशेषांची वैशिष्ट्ये अधिक बारकाईने कशी तपासता येतील त्यासाठीही मदत करतात असे लक्षात येईल. सारांश, रामटेक, मांढळ व मनसर येथील संशोधनामुळे वॉल्टर स्पिंक यांच्या नंतरच्या काळात वाकाटक कलेतिहासाच्या परामर्शाला वेगळे परिमाण लाभलेले आहे, यात शंका नाही.

response.lokprabha@expressindia.com


अजिंठा आणि वाकाटक

    वाकाटकांच्या स्थापत्य शिल्प व चित्रकलेच्या अभ्यासाला अजिंठ्यापासूनच सुरुवात होते. याअगोदर पूर्व विदर्भातील वाकाटकांच्या वारशाचा आपण आढावा घेतला. त्यात मुख्यत्वे मांढळ येथील विटांची देवालये, शैव, वैष्णव आणि मातृदेवतांच्या मूर्ती, त्यापाठोपाठ मनसर येथील राजवाडा, हिडिंबा टेकडीवरील देवालये, आणि या दोन मुख्य बांधकामांच्या व्यतिरिक्त वाटेतील अष्टकोनी शिवदेवालय आणि इतर स्थापत्याचा विचार केला. मांढळ येथील सहा दगडी मंदिरे, त्यातील महत्त्वाची शिल्पे म्हणजे केवल नरसिंह, रुद्र नरसिंह, त्रिविक्रमाची मूर्ती, मंडपातील वराह आणि गुप्तरामच्या गुहेजवळील विष्णू. हे सर्व बांधीव स्थापत्य व शिल्प आपापल्या परीने अजोड आहे. 

हिडिंबा टेकडीवरील प्रवरेश्वराचे विटांत बांधलेले देवालय हे गुप्त-वाकाटक काळातील स्थापत्याचा एक अद्वितीय नमुनाच म्हणावे लागेल. मनसर येथील राजवाडा नुसता भव्यच नाही तर आजूबाजूच्या बराकीच्या व्यापामुळे स्तिमितच करून सोडतो. अष्टकोनी शिवदेवालय हा तर एक वेगळाच स्थापत्यप्रकार त्या काळात समोर आलेला दिसतो. या व वाशिम येथील विटांच्या देवालयांनी नंतरच्या काळातील मध्य प्रदेशातील स्थापत्यावर आपली निश्चितच वेगळी छाप टाकलेली आहे. यापूर्वी दाखवून दिल्याप्रमाणे मांढळ येथील व हिडिंबा टेकडीवरील शिल्पे ही सारनाथ, प्रयाग, मथुरा येथील गुप्त शिल्पांचे नमुने आणि अजिंठा येथील परिपक्च शिल्प यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. अशा रीतीने विदर्भातील स्थापत्य शिल्प परंपरा कलेतिहासाच्या पुनः रचनेच्या दृष्टीने महत्त्वाची असली तरी अजिंठा येथील ठेव्याचे मोठेपण त्यामुळे मुळीच कमी होत नाही.

 क्रमांक एकच्या गुंफेचा दर्शनी भाग


         यापूर्वीही अभ्यासकांनी अजिंठा येथील स्थापत्य आणि शिल्पकलेचे निरनिराळ्या अंगांनी वर्णन केले आहे, एवढेच नाही तर त्याचे महत्त्वसुद्धा गायलेले आहे. अजिंठा येथील चित्रकलेचे नमुने यासाठी महत्त्वाचे आहेत की बाघ (मध्य प्रदेश) येथील गुंफा सोडल्यास इतकी प्राचीन इतिहासकाळातील चित्रे भारतात इतस्त्र कोठेही आढळत नाहीत. गुंफा क्रमांक ९ आणि १० च्या भिंतीवर इ.स. पूर्व पहिल्या शतकातील सर्वोत्तम कथनात्मक चित्रे आहेत. आणि ज्या कौशल्याने ती भिंतीवर चितारलेली आहेत त्याला संपूर्ण बौद्ध विश्वात जोड नाही. पण निष्ठुर निसर्ग आणि माणसाची बेपर्वाई त्यांमुळे त्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. एरवी त्या काळातील चैत्यगृहाच्या भिंतीवर चितारलेले छद्दत जातक अथवा शाम जातक हे अत्यंत प्रभावी अशा कथनात्मक चित्राचे नमुने आहेत.
     वाकाटक काळातील चित्रांविषयी बोलायचे झाल्यास गुंफा क्रमांक १७मध्ये बुद्धचरित आणि सिंहलावदान या दोन कथांचे विस्तृतपणे चित्रण केले आहे. गुंफा क्रमांक एकमधील चित्रे प्रा. वॉल्टर स्पिक म्हणतात त्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या पूर्वीच्या जन्मातील राजसपणावर आणि राजा म्हणून मोठेपणावर भर देतात, तर गुंफा क्रमांक दोनमधील चित्रांचा भर मातृत्व आणि मातृदेवता यांवर आहे. वॉल्टर स्पिक यांना असे वाटते की गुंफा क्रमांक एक ही स्वतः हरिषेणाच्या प्रेरणेतून कोरली गेली असेल तर गुंफा क्रमांक दोनचे कर्तृत्व त्याच्या महाराणीकडे द्यावे लागेल. क्रमांक १६ मधील समोरच्या व्हरांड्यातील कुवलयपीडाला आपल्या मैत्री भावनेने आपलेसे करून नतमस्तक करायला लावणारे चित्र अपूर्वच म्हटले पाहिजे. तीच गोष्ट कालचक्राबद्दलही म्हणता येईल. या सर्व चित्रित गुंफांचे छत हा एक वेगळ्या अभ्यासाचाच विषय होईल. वॉल्टर स्पिक असे म्हणतात की, या सर्व उत्तरकालीन गुंफांचे चितारी हे वाशिम आणि इतर सामंतांच्या राजधानीतूनच आले असावेत. ते राजचितारीच होते.

कमळे दिसतात. या चित्रणांचे वैशिष्ट्य असे की या कमळाच्या ताटव्याभोवती दोन चक्रवाक पक्षी आरव करणारे दाखवले आहेत. या पाठीमागली काव्यात्म कल्पना अशी की रात्रीच्या वेळी जोडीतील नर आणि मादी एकमेकांना साद घालत ताटव्याभोवती फिरत राहतात. पण ते रातांधळे असल्याने त्यांची कधीच भेट होत नाही. ही संस्कृत काव्यातील कविकल्पना मराठीमध्ये अजून चकवा या शब्दाच्या रूपाने रेंगाळली आहे. मंडपातले मुख्य खांब जरी खरे दगडाचे असले, तरी छतावरील तुळ्या आणि त्यांना छेदणाऱ्या बलया (रॅफ्टर्स) चितारलेल्या आहेत. त्या सगळ्यामध्ये असलेले चौकोन हे निरनिराळ्या लौकिक प्रसंगांनी भरलेले आहेत. नेहमीचे पशू म्हणजे घोडा, रेडा, बैल, हरणे, हत्ती किंवा त्यांची दिव्य स्वरूपे म्हणजे पंख असलेले प्राणी अथवा जलचर ज्यांचा व्याल म्हणून संस्कृत वाङ्मयात उल्लेख केला जातो, यांची चित्रणे तर आहेतच पण त्याचबरोबर कोबड्यांची झुंज, निरनिराळ्या आविर्भावात असलेले विदूषक, मद्यपानात मग्न असलेली मिथुने अशा प्रकारचे प्रसंगही चितारलेले दिसतात. वॉल्टर स्पिक यांच्यामते येथील सर्व गुफांची छते सारखी आणि सुंदर असल्यामुळे वाशिम येथील दरबारातील आणि सामंतांच्या राजधानीतील चिताऱ्यांनाच सभागृहाच्या मध्यभागी असलेल्या कमळांच्या मेडालियन (छतावर चितारलेली तबके) पाहिल्यानंतर तर प्रेक्षक अवाक होऊन जातो. चित्रे रंगवण्यापूर्वी जो मातीचा गिलावा देऊन त्यावर चुनखडीचा हात दिला आहे तो इतका बेमालूमपणे की छत हे कापडी असून वाऱ्याच्या झुळुकीने त्यावर लहरी उमटल्या आहेत असेच वाटते. या मेडालियनच्या मध्यवर्ती गोलात पूर्णपणाने फुललेले कमळ दाखवलेले असून त्याभोवतीच्या गोल कड्यांमध्ये अनुक्रमे एकापाठोपाठ उसळणाऱ्या लहरी आणि कमळाच्या वेली दाखवलेल्या आहेत. उरलेल्या चार त्रिकोणात पस्त मध्यभागी पूर्णपणाने फुललेले कमळ, चार दिशांना पाच पाकळ्यांची फुले आणि उपदिशांना बाजूने दिसणारी लवलेली

▲ १९ क्रमांकाच्या गुहेचा दर्शनी भाग

▲ गुंफा क्रमांक १७ मधील सिंहलावदानचे चित्रण

या गुहा रंगवण्यासाठी बोलावले असावे. अनेक वेळा काही नवख्या युरोपियन पर्यटकांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी. आतमध्ये व बाहेर कक्ष असलेल्या गुंफा या भिक्षूच्या निवासासाठी आहेत. असे - असता त्यातील दिवाणखाने हे अशा प्रकारच्या लौकिक चित्रांनी का Π सजवले हे समजत नाही. विचार केला तर असे वाटते की, बौद्ध भिक्षु हे सर्वसंग परित्याग करून अध्यात्म जीवन घालवत असतात. तेव्हा राजवाड्याला शोभणारी अशी विलासी चित्रणे बौद्ध गुंफात का? मधुकर केशव ढवळीकर यांनी अजंठा येथील कथनात्मक चित्रावली म्हणजे नॅरेटिव्ह पेटिंग्ज व इतर सर्व अलंकारांचा अभ्यास करून समकालीन जीवन कसे असेल याचे मोठे सुंदर वर्णन त्यांच्या 'कल्चरल हिस्ट्री फ्रॉम द पेटिंग्ज ऑफ अजंठा' या ग्रंथात केले आहे. त्यांच्या मते गुप्त-वाकाटक काळ हे भारतातले सुर्वणयुग मानल्यास तत्कालीन समृद्ध जीवनाचा यात प्रत्यय येतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकात तर त्या ठिकाणी जे प्रसंग कोरलेले आहेत त्यांमध्ये जीवनातल्या कुठल्याही पैलूला स्पर्श केला नाही असे म्हणण्यास जागाच नाही, असे मत व्यक्त केले आहे. तेथील गुंफा क्रमांक ९, १० यातील सातवाहनकालीन चित्रे, गुंफा क्रमाक १, २, १६, १७ इ. मधील वाकाटककालीन चित्रे व त्यातील लौकिक जीवनातील फरक दाखवताना इ.स.च्या दुसऱ्या शतकातून पाचव्या शतकात जाताना घरातील फर्निचर, अंगावर ल्यायलेली भूषणे आणि वस्त्र प्रावरणे, यांच्यात पडलेला फरक लक्षात आणून देऊन वाकाटककालीन जीवन हे अधिक समृद्ध होते हे अधिक स्पष्ट करून दाखवले आहे. हॉलंड येथील संशोधक बाक्कर यांच्यामते ही अशा प्रकारची विलासी चित्रणे हेच स्पष्ट करतात की हरिषेणाच्या व नंतरच्या काळात भोगवादी संस्कृतीचा प्रभाव पडल्याने व विलासी जीवनाचा अतिरेक झाल्याने, सामाजिक नैतिक जीवनाला अधोगती आली. यांच्यामते या सर्वाचा परिणाम वाकाटक साम्राज्याच्या विनाशात झाला. वेगळ्या दृष्टीने पाहिले तर वाकाटक कालामध्ये देवाधिदेव हा एखाद्या प्रतिमागृहात अथवा सौधात राहात नसल्यामुळे, किंबहुना तो नुसता मुनी नसून मुनींद्र म्हणजे मुनीमधील देवराज असल्यामुळे भगवान बुद्धाची गंधकुटी ही एखाद्या प्रासादासारखी दिसते.
      आणि अशा प्रकारच्या प्रासाद गर्भगृहात भगवान बुद्ध असल्यामुळे राजवाड्यावर शोभेशी चित्र गर्भगृहाच्या छतावर आढळली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याअगोदर उल्लेख केल्याप्रमाणे क्रमांक १, २, १६, १७ या गुंफातील भिंतीवर चितारलेली जातके, म्हणजे भगवान बुद्धाच्या जन्मजन्मांतरीच्या कथा इतक्या सुंदर रीतीने चित्रित केलेली आहेत, की पाहणारा स्तिमित होऊन जातो. उदाहरणार्थ मृगजातकात उपकार केलेला माणूस किती कृतघ्न होऊ शकतो हे लक्षात येते तर कपी जातक आणि हंस जातकामध्ये माकड किंवा हंस यासारखे पशू-पक्षी आपल्या सहकाऱ्यांविषयी काळजी दाखवताना आणि त्यांचे रक्षण करताना स्वतःच्या प्राणाचीसुद्धा पर्वा करत नाहीत हेसुद्धा लक्षात येते. काही जातक कथा महत्त्वाच्या एखाद्या प्रसंगावरूनच चित्रित केल्या जातात. उदाहरणार्थ मत्स्य जातक, तर सिंहलावदान व विश्वंतर जातक ही दोन जातककथा सभागृहाच्या एका पूर्ण भिंतीवर चितारलेल्या आढळून येतात. ही चितारताना पहिला प्रसंग व त्यानंतरचा दुसरा प्रसंग अशा कालक्रमानुसार न
चितारता काही प्रसंग भिंतीच्या वरच्या भागात तर काही तळाशी तर मुख्य प्रसंग मध्यभागी अशा वेगळ्याच शैलीने चितारलेली आहेत,

▲ अत्यंत भाविकपणे आणि रसिकतेने चितारलेली सौदरनंद.

           बुद्धचरित्र आणि सौदरनंद ही तर अत्यंत भाविकपणे आणि रसिकतेने चितारलेली आहेत. बुद्ध चरित्र हे बुद्धाच्या अगदी जन्मापासून किंबहुना स्वर्गात तो बोधिसत्व म्हणून आपल्या अवताराची वाट पाहात असतानापासून ते धर्मचक्र प्रवर्तनापर्यंतचे प्रसंग मोठ्या प्रभावीपणे चितारले आहेत. तर सुंदरी नावाच्या राजकन्येशी नुकत्याच विवाहित झालेल्या बुद्धाच्या भावाची नंदाची कथा असून, भगवान बुद्ध निग्रहपूर्वक संन्यास दीक्षा देऊन त्याची कशी परीक्षा पाहतात त्याचे प्रत्यंतर नंद कथेच्या चित्रणात येते. त्याच्या मनाविरुद्ध दिक्षा दिल्याने नंद आपल्या बायकोची आठवण काढत झुरत असतो, आणि हळूहळू भगवान बुद्ध संन्यस्त जीवनाकडे त्याला कसे घेऊन जातात याचे प्रत्ययकारी चित्रण या ठिकाणी आहे.
         अजिंठा येथील कला ही तेथील चित्रकलेमुळे इतकी प्रभावित झाली आहे की शिल्पाकडे प्रेक्षकांचे लक्ष त्या मानाने कमी जाते. असेही म्हटले जाते की गुप्तांच्या आश्रयाखाली मथुरा, प्रयाग आणि सारनाथ येथील कला केंद्रात ज्या प्रकारची शिल्पकला बहरली तिला इतरत्र कुठेही तोड नाही. अजिंठा येथे प्रसिद्ध कलेतिहासतज्ज्ञ डग्लस बॅरट यांच्यामते सारनाथ येथील उभ्या, बैठ्या अथवा निपन्न (पहुडलेल्या) बुद्धमूर्तीच्या रेखामधील जो मधाळपणा, सहज लावण्य आणि नाजूकपणा आहे, तो अजिंठा येथील जडशीळ (पॉण्डरस) मूर्तीत नाही. परंतु अजिंठा येथील मूर्ती या सारनाथ येथील बुद्धमूर्ती इतक्या सुबक व नाजूक नसल्या तरी, त्यातून ज्या प्रकारे शांतस्स व्यक्त होतो त्याचा रसिकाच्या मनावर खोल ठसा उमटतो तो वेगळाच आहे. गुंफा क्रमांक १९ च्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेले बुद्धचरित्रातील दोन प्रसंग त्यातील भावांच्या अभिव्यक्तीमुळे अतुलनीयच आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दीपंकर बुद्धाच्या समोर बुद्धाचे पाय चिखलाने माखू नयेत म्हणून आपला केशपाश ज्याने पसरून ठेवलेला असा सुमेध, त्याच्या पाठीमागे हातात फुले घेऊन उभी असलेली माळीण, हे त्या प्रसंगाचे गांभीर्य आणि वेगळेपण दाखवतात. तर दरवाजाच्या डाव्या बाजूला भगवान बुद्ध, यशोधरा आणि राहुल यांचे चित्रण आहे. शब्दशः उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या हातात भिक्षापात्र घेऊन ठाकलेल्या बुद्धासमोर यशोधरा आणि राहुल मोठ्या विस्मय आणि आदराने बघतायत. बुद्धाकडून आपला वारसा घे असे राहुलला त्याच्या मातेने निक्षून सांगितलेले असल्यामुळे ते भिक्षापात्र हेच आपले सर्वस्व आहे म्हणून ते स्वीकारणारा राहुल हाही प्रसंग तितकाच भावरम्य आहे. बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनातले हे दोन टोकाचे प्रसंग असल्यामुळे आणि

▲ गुंफा क्रमांक चारमधील अवलोकितेश्वराचे शिल्प

▲ गुंफा क्रमांक १९ मधील स्तूप

त्यातून वर कोरलेल्या मुकुटामुळे बुद्धाचे चक्रवर्तित्व सूचित केले असल्यामुळे आध्यात्मिक व काव्यात्म दृष्टीने हे दोन्ही प्रसंग फार महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळेच ते अनेक ठिकाणी शिल्पांच्या रूपाने वारंवार चित्रित केलेले आढळतात. १९ क्रमांकाच्या या गंधकुटीच्या वरच्या गवाक्षाच्या दोन बाजूस असलेले यक्ष हे शिल्पदृष्ट्या अप्रतिम आहेत. त्यांची मोजकीच पण सुंदर आभरणे (अलंकार) तसेच वस्त्रप्रावरणे आणि मस्तकाच्या एका बाजूला रुळणाऱ्या कुरळ्या केसांचा भार याव्यतिरिक्त त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे अप्रतिम आहेत. त्या मूर्ती निश्चितपणाने रंगवलेल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांचे अर्धवट मिटलेले डोळे पूर्णपणे त्यातले भाव व्यक्त करत नसले तरी रंगवल्यानंतर या प्रतिमा समकालीन शिल्पात अप्रतिम होत्या यात शंका नाही. अष्टभय-त्राण (आठ संकटातून मुक्त करणारा) अवलोकितेश्वराची सर्वात प्राचीन चित्रणे कदाचित अजिंठा येथीलच असतील. गुंफा क्रमांक पंचवीसमधले चित्रण, तेथील दगड चांगल्या पोताचा नसल्यामुळे आकर्षक वाटत नसले तरी त्याची उणीव कदाचित रंगांनी पूर्ण केली असेल. पण क्रमांक चारमधील वहांड्यात असलेले तसेच चित्रण हे अपूर्व आहे असे म्हणता येईल. क्रमांक २६ च्या गुंफेत श्रावस्ती येथील चमत्काराची शिल्पे, चैत्यगृहाच्या आतील भिंतीवर अनेक वेळा कोरलेली आहेत, पण मारविजय आणि महापरिनिर्वाण ही चैत्यगृहाच्या डाव्या भिंतीवर कोरलेली दोन शिल्पे ही शांत रसाच्या आविष्काराची वेगळ्या प्रकारची चित्रणे समकालात अजोड आहेत हे स्पष्ट आहे.
         अजंठा येथील चित्रकलेविषयी आपली मतं निरनिराळ्या प्रकारच्या आणि निरनिराळ्या खंडातील चित्ररसिकांनी वेगवेगळ्या वेळी व्यक्त केली आहेत. शिवराम मूर्ती यांच्यामते विष्णुधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रामध्ये अपेक्षित असलेली प्रमाणबद्धता आणि अष्टरसांची अभिव्यक्ती अजिंठापेक्षा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी इतक्या उत्कटपणे व्यक्त झालेली नाही. प्रसिद्ध कलामर्मज्ञ वासुदेवशरणजी अग्रवाल यांच्या मते कालिदासाला अभिप्रेत असलेली अभिजात सौदर्याची 'पुण्य' अभिव्यक्ती अजिंठा येथेच सापडेल. त्यासाठी प्रमाण म्हणून 'यदुच्यते पार्वति पापवृत्तये न रुपमित्यव्यभिचारि तद्वचः' या कालिदासाच्या वचनात अभिप्रेत असलेला सौदर्य आणि पावित्र्य यांच्या अप्रतिम संगमाचा प्रत्यय या ठिकाणी ठायी ठायी येतो. लडाखमधील आल्ची येथील बुद्धविहारातील विशाल भित्तीचित्रे पाहिल्यानंतर गुंफा स्थापत्य कलेचे मर्मज्ञ म. न. देशपांडे यांच्या तोडातून सहज उद्‌गार बाहेर पडले "अरे अजिंठ्याची चित्रकला इथपर्यंत येऊन पोहोचली तर!" मध्य आशिया, चीनमधील गुंग कांक, दुन हुवांग,

▲ २६ क्रमांकाच्या गुंफेतील श्रावस्ती मिरॅकल

येथील शिल्पे आणि चित्रे डोळे भरून पाहतानासुद्धा हेच जाणवते की भारताच्या सुवर्णयुगातील शिल्पकला आणि चित्रकला एका आगळ्या रूपात मोठ्या दिमाखाने मध्य आशिया, चीन आणि अतिपूर्वेच्या देशांत अजून वावरत आहे.
         अजिंठा येथील शिल्पकला आणि चित्रकला हे भारतीयच काय पण जागतिक कलेच्या इतिहासातील एक सोनेरी पान असेल तर येथील स्थापत्यकलेतसुद्धा स्वतःची अशी एक धाटणी आणि आकर्षकपणा आहे. अजिंठा येथे वाकाटक काळातील महत्त्वाची चैत्यगृहे दोनच आहेत. तिसरे एक भव्य चैत्यगृह ऋषिकराजाने अजिंठ्याच्या डोंगरात वरच्या बाजूस कोरावयास सुरुवात केली होती, ते कदाचित गुंफा क्रमांक १९ आणि २६ यांच्यापेक्षाही जास्त रमणीय झाले असते. पण स्थूल आराखडा कोरण्यापलीकडे काम गेलेच नाही. ते अचानक बंद पडले. क्रमांक १९ चे चैत्यगृह हे ऋषिक देशाचा स्थानिक राजा उपेंद्रगुप्त याने कोरविले आहे. विस्ताराने ते क्रमांक २६ पेक्षा बरेच लहान आहे. परंतु या मोठ्या चैत्यगृहापेक्षा ते अधिक देखणे आणि सुंदर आहे. प्रशस्तीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मुनींद्रासाठी कोरलेली ती डौलदार गंधकुटी आहे. पुढे असलेला अर्धमंडप आणि पाठीमागे असलेले गवाक्ष व त्यावरील हर्रम्यांच्या (हवेली) पंक्ती बघितल्यानंतर तो राजप्रासाद आहे याची खात्री पटते, गवाक्षाच्या भोवती समृद्धीचे प्रतीक असलेले शंखनिधी आणि पद्मनिधी मोठ्या डौलात बाजूला उभे आहेत. अगोदर वर्णन केल्याप्रमाणे मुख्य द्वाराच्या बाजूला भगवान बुद्धाच्या आयुष्यातील दोन प्रसंग शिल्परूपाने दाखवले आहेत. पाठीमागल्या बाजूने गोलाकार असलेल्या या चैत्यगृहाच्या पूजास्थानी एक स्तूप असून त्याच्या अंडभागासमोर भगवान बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. स्तूपावरील हर्मिकेच्यावर एकावर एक अशी तीन छत्रे असून ती भगवंताच्या वैराग्य, करुणा व ज्ञानाची प्रतीके आहेत. गंधकुटीच्या कमानीवर कोरलेले छत सभागृहातील खांबावर विराजमान आहे. खांबांच्या वरच्या भागात, म्हणजेच स्तंभशीर्षांवर, कार्ला व कान्हेरी येथील गंधकुटीप्रमाणे निरनिराळ्या वाहनांवर बसलेले यक्ष, गंधर्व, मुनी जणू भगवंताच्या दर्शनासाठीच येत आहेत असे दाखवलेले आहे. पण स्तूपाजवळच्या खांबाच्या ब्रेकेट्स (हस्त) वर निरनिराळी वाद्य वाजवण्यात, स्तोत्र गायनात आणि नृत्याविष्कारात मग्न असलेले भक्तगण दिसतात. या शिल्पांच्या वरून, प्रशस्तीमधल्या मुनींद्र या बुद्धाच्या वर्णानावरून हे चैत्यगृह आता प्रासादात रूपांतरित झालेले आहे असे स्पष्ट दिसते. आणि त्यामुळे महायान प्रथेत अभिप्रेत असलेली, आचार्य असंग याच्या महायानसूत्रालंकारात वर्णन केलेली पूजापद्धती येथील शिल्पांतून व्यक्त झालेली दिसते. क्रमांक २९ ची गुंफा ही ऋषीक राजाचा प्रतिस्पर्धी असलेल्या अश्मकरराजाच्या आचार्याने, स्वतः आणि अश्मक राजा दोघांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून निर्मिली आहे. त्या भव्य कुटीच्या मुखदर्शनावर (फसाड) शंखपद्मनिधीच्या ऐवजी भीमकाय बुद्धमूर्ती आहेत. या चैत्यगृहाचे अंतरंग हे तितकेच भव्य आणि मनावर छाप पाडणारे आहे. प्रदक्षिणापथाच्या भिंतीला लागून परिनिर्वाण, मारविजय आणि मोठ्या संख्येने श्रावस्ती चमत्काराची शिल्पे आहेत. त्यातील परिनिर्वाण बुद्ध आणि श्रावस्तीचा चमत्कार या शिल्पांना एक वेगळा आध्यात्मिक अर्थ प्राप्त झालेला दिसतो. कारण उत्तरलीन मध्य आशियाई व चीनमधील गुंफामधून अशा प्रकारच्या बुद्धाचे चित्रण बऱ्याच वेळा मुद्दाम केल्यासारखे वाटते. तर श्रावस्ती चमत्काराचे शिल्प इतर समकालीन महायान गुंफांच्या मध्ये महाराष्ट्रात निरपवादपणे कोरलेले आढळते. अशा रीतीने महायान  परंपरेतील गुंफांना अजिंठा येथील चैत्यगृहे आणि विहार हे आदर्शवत असल्याचे दिसतात. गर्भगृहातील स्तूपाच्या समोर गुंफा क्रमांक १९ प्रमाणेच बुद्धप्रतिमा आहे. पण स्तूपाभोवती अनेक उभ्या बुद्धमूर्तीचे चित्रण केले आहे. स्तूपाचा वरील गोलाकार भाग एरवीच उंचावर आहे, पण त्याच्या मध्यावर हंस विहरत असल्याचे दाखवल्यामुळे तो जणू काही हिमालयापेक्षाही उंच आहे असे सुचवले आहे. या व पहाडपूर (बांगलादेश) येथील स्तूपामध्ये, मला स्वतःला स्तूप विश्वरूप झाल्याची चाहूल लागलेली दिसते.
          अजिंठा येथील गुंफांच्या कालक्रमाविषयी थोडेसे विवेचन करणे प्रस्तुत होईल. क्रमांक ९, १०, १२, १३, आणि १५ अ येथील विहार आणि चैत्यगृहस्थापत्य, त्याच्या धाटणीवरून, खांबांच्या घडणीवरून सातवाहन काळातले आहे यात शंका नाही. आणि त्यामुळे उरलेल्या २५ विहार चैत्यगृहांच्या गुंफा नंतरच्या काळातील आहेत याविषयी इतिहासकारांना शंका नव्हती. फर्ग्युसन आणि बर्गिस यांच्या मते तथाकथित हीनयान आणि महायान स्थापत्य यांच्या उभारणीत बराच काळ (हियाटस) गेला होता. तो १५० वर्षांचा असावा अशी त्या दोघांची कल्पना होती. सातवाहनांच्या कारकीर्दीचा शेवट त्या काळच्या समजुतीप्रमाणे इ.स. ४०० मध्ये झाला. त्यामुळे या गुंफा कोरण्यास इ. स. ५५० मध्ये सुरुवात झाली असे फर्ग्यूसनला वाटणे साहजिक होते. आज आपणास माहीत आहे की, सातवाहनांचा शेवटचा राजा तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीस होऊन गेला. त्यात गुंफा क्रमांक एकच्या दरवाजाच्या आतील बाजूस पुलकेशी द्वितीय याला नजराणे घेऊन आलेले इराणमधील राजदूत अशा प्रसंगाचे चित्रण असावे असे काही अभ्यासकांना वाटले. त्यातच वाकाटकांचे व अजिंठा येथील शिलालेख ज्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीत मत झाले होते. नंदिवर्धन येथून राज्य करणारा प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१० ते ४४०) याचा आज्याचा देवगुप्त असा उल्लेख असल्यामुळे व या नावाचा सातव्या शतकात एक गुप्त राजा होऊन गेल्याने अजिंठा येथील कलाकृती या सातव्या शतकातल्या असाव्यात असेही काही इतिहासकारांचे मत झाले. या सर्वांवर पडदा पडला तो वा. वि. मिराशी यांच्या संशोधनामुळे. अजिंठ्याला लागूनच असलेल्या जिंजाळा येथील घटोत्कच गुंफा आणि अजिंठा येथील १७ क्रमांकाची गुंफा यांचा आश्रयदाता एकच आहे हे त्यांनी अभिलेखातील पुराव्याद्वारे सिद्ध केले. त्यामुळे अजिंठा येथील क्रमांक १७च्या गुंफेपासून सुरू होणारा स्थापत्यकलेचा पसारा हा १५० वर्षांत संपन्न झाला या मताला मोठा धक्का बसला. असे सिद्ध झाले की अजिंठा व जिंजाळा येथील सर्व गुंफांचे काम एका पिढीतच म्हणजे जवळपास २० वर्षांत पूर्ण झाले. वॉल्टर स्पिक यांनी आपल्या प्रतिभासंपन्न व अपूर्व अशा संशोधनाच्या आधारे इ.स. ४६० ते ४८० या वीस वर्षांत सर्व २५ गुंफा कोरल्या गेल्या असे ठामपणाने मांडले आहे. दशकुमारचरितातील संदर्भाच्या साहायाने या मतामध्ये त्यांनी आणखीन रंग भरले आहेत. एकूण स्थापत्य शिल्प आणि चित्रकला यांचा अजिंठा येथील विकास आणि परस्पर संबंध लक्षात घेता, गुंफा कोरण्याचे काम इ.स. ४६२ ते ४६८ या पाच वर्षांतच पूर्ण झाले. इ.स. ४६९ पासून ४७७ पर्यंत गर्भगृहातील बुद्ध प्रतिमा आणि विहार स्थापत्यामधील रंगकाम पूर्ण झाले असावे. दरवाजांच्या चौकटी आणि त्या चौकटीसाठी असलेल्या दगडी उखळी यांच्या विश्लेषणात्मक अभ्यासावरून व बाघ (धार, मध्य प्रदेश) गुंफांच्या स्थापत्य चित्रकलेच्या तुलनात्मक अध्ययनावरून ते अशाही निष्कर्षाला आले की इ.स. ४७२ ते ४७४ या काळात अजिंठा येथील कामामध्ये खंड पडला आणि येथील कलाकार हरिषेणाच्याच राज्याचा भाग असलेल्या माळव्यात स्थलांतरित झाले व त्यांनीच बाघ येथील गुंफांना आकार दिला; आणि चित्रांनी सजवले. इ.स. ४७७ मध्ये हरिषेणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दुर्बळ मुलाला सारून अश्मकांनी वाकाटक वंश संपुष्टात आणला. आणि अशा रीतीने या बौद्ध कला परंपरेला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला, नंतर फक्त पन्हाळेकाजी व वेरूळ अशा ठिकाणीच बौद्ध कलेचा आविष्कार दिसतो.


▲ हरिताची मूर्ती


स्पिक यांची ही कालक्रम ठखण्याची पद्धती अनेक अभ्यासकांना मान्य नाही. पण त्यात बराच तथ्यांश असून तिचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे हे त्यांच्या इंटूझिव फिगर्स (अप्रस्तुत असलेल्या कलाकृती) च्या विवेचनावरून स्पष्ट दिसते. अशा प्रकारच्या पाहुण्या शिल्पकृती कान्हेरी, महाकाली, कोकणातील अनेक गुंफा व नाशिक येथील गुंफांच्या मध्ये प्रकर्षाने व नियमितपणे सापडतात. स्पिक म्हणतात त्याप्रमाणे हरिषेण, त्याचे सामंत : अश्मकराज व हृषीकराज उपेंद्रगुप्त, माथुरक श्रेष्टी यासारख्या प्रतिष्ठित आणि धनवान आश्रयदात्यांचा लोप झाल्यानंतर ही पाहुणी शिल्पे ठिकठिकाणी कोरलेली आढळून येतात. ती काही वेळा भिक्षूनी अथवा साध्यासुध्या उपासकांनीच केल्याचे दिसते. एकूण असे म्हणता येईल की, हरिषेणाच्या अत्यंत उमेदीच्या काळात (इ.स. ४६२ ते ४७७) बौद्ध धर्माला समाजातील अभिजनांचा उदार आश्रय होता. तो हरिषेणाबरोबरच संपुष्टात आला. याचे कारण आर्थिक व राजकीयही असावे. कारण अहिच्छत्र म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशाच्या बरेली येथील ५०० महाजन (आर्य) हे कर्नाटकात आय्यावोळे (आत्ताचे आय्याहोळे जि. धारवाड) या ठिकाणी स्थलांतरित झाले. व बदामी येथील चालुक्यांचा त्यांच्याबरोबरच उत्कर्ष झाला. ते त्रि-महाराष्ट्रकाचे (म्हणजे कुंतल अथवा उत्तर कर्नाटक, विदर्भआणि अश्मक अथवा पश्चिम महाराष्ट्र) यात पसरलेल्या ९६ हजार खेड्यांचे मालक झाले. पाचव्या ते आठव्या शतकादरम्यानचे महत्त्वाचे कलाविष्कार मोठ्या संख्येने कर्नाटक व आंध्रात आढळतात. वाकाटकांच्या बरोबरच बौद्ध कलेचा हजारभर आयुष्य असलेला महाराष्ट्रतला कलासंसार अजिंठ्याबरोबर संपुष्टात आला.

(सर्व छायाचित्रे : विजय राव, मंजिरी भालेराव)

response.lokprabha@expressindia.com


लिहिले गेले तिचा काळ इ.स. आठवे शतक असावा असे काही विद्वानांचे

 
अजंठा येथील कथनात्मक चित्रे


अजिंठा येथील कलेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य यापूर्वी अधोरेखित करण्यात आलेले आहेच. हे असे ठिकाण आहे की जेथे स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला यांचा अभूतपूर्व संगम झालेला आढळतो. शिल्प आणि चित्रकला यांचा या ठिकाणी इतका सुंदर मेळ आहे की सारनाथच्या तुलनेने येथील शिल्पामधील काही उणेपणा दाखवल्यास असे उत्तर देता येईल की येथील मूर्ती नुसत्या पाषाणमूर्ती म्हणून बघण्याच्या नाहीत. आपण ज्याप्रमाणे दरवर्षी गणपती रंगवतो त्याप्रमाणे या रंगवलेल्या होत्या. त्यामुळे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने त्यांचे पूर्ण मूल्यांकन होऊ शकत नाही.
   चेहऱ्यावरचे भाव हे चित्रकलेतील काही अंगभूत पैलूंमुळे अधिक प्रभावीसुद्धा होऊ शकतात. एवढे मात्र ध्यानात ठेवले पाहिजे की गुंफा क्रमांक २६ येथे चित्रापेक्षा निखळ शिल्पावर जास्त भर देण्यात आला आहे. आणि हे अजंठा येथील वैशिष्ट्य वेरुळमध्ये प्रभावीपणे वापरण्यात आले असे फर्ग्यूसन यांचे मत आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिशिल्पांच्या बरोबर अलंकरणात्मक शिल्पालासुद्धा अधिक महत्त्व दिल्याचे वेरुळ येथे आढळते, असे त्यांचे मत आहे. चित्रकलेचा आस्वाद कसा घ्यावा याविषयीचे विवरण कामसूत्रावरील टीकेमध्ये आले आहे ते असे. 
     रुपभेदाः प्रमाणानि भावलावण्ययोजनम्
सादृश्यमं वर्णिका भम्गः षड्विधंम चित्रलक्षणम्

▲ प्रत्येक विहाराच्या बाहेर हारिती या यक्षीचे चित्रण असावे असा संकेत आहे.

   एखाद्या चित्राचा निकष म्हणून हे सहा घटक सांगितलेले आहेत. चित्राचा विषय असलेल्या प्राण्यांचा किंवा वस्तूंचा बांधा, प्रमाणबद्धता, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव, त्या वस्तूचे अंगभूत सौदर्य दाखवण्याचे कौशल्य, ती वस्तू आणि चितारलेली वस्तू यामध्ये असलेले साम्य आणि छाया-प्रकाश यांचा खेळ मांडण्यासाठी रंगाचा वापर हे ते सहा घटक होत. डॉ. शिवराम मूर्ती, कृष्ण देव आणि म. न. देशपांडे यांनी अजंठा येथील चित्रकलेची ही सहा लक्षणे लक्षात घेऊन बारकाईने अभ्यास केला असता त्यांच्या लक्षात आले की अजंठा येथील चित्रकाराने प्राचीन चित्रकलेचे तंत्र पूर्णपणे आत्मसात केले होते व त्या कसोटीला ते उतरले होते असे दिसते. यापूर्वीसुद्धा छतावरील निरनिराळ्या प्रकाराची प्रयोजने (मोटीफ) उदा. मदिरापानात दंग असलेली मिथुने, निरनिराळ्या प्रकारचे व्याल, शंखपद्मस्वस्तिकासारखी शुभचिन्हे यांचा वापर येथील चित्रकारांनी फार सुंदर रीतीने केलेला आहे. त्याचबरोबर पद्मपाणि आणि वज्रपाणि, प्रवचनात दंग असलेले भगवान बुद्ध, छद्दन्त जातकामधील सुप्रसिद्ध मरणोन्मुख राणी (डाइंग प्रिन्सेस), गुंफा क्रमांक १६ च्या व्हरांड्याच्या भिंतीवरील इंद्र आणि आकाशातून स्वैर विहार करणारे गंधर्व आणि अप्सरा, वलयापीड हत्ती व भगवान बुद्ध या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि सभोवतालच्या त्रस्त झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचे भाव, विश्वंतर जातकामध्ये विश्वतर आणि त्याची पत्नी आपल्या मुलासमवेत नगर सोडून जात असतानाचे नागरिकांच्या चेहऱ्यावरचे शोकाकुल भाव आणि एकूणच वातावरण, सिंहलअवदानातील राक्षसीने मारून टाकल्यानंतर जमा झालेली गिधाडे व तिथे दाटलेली भीषणता, त्याचप्रमाणे महिष जातकामध्ये कधी माकडांशी प्रेमाने खेळणारा तर कधी रागाने उसळलेला रेडा आणि घाबरलेले माकड, तसेच शिबी जातकामध्ये राजाने आपले मांस कापण्यासाठी खड़ग हातात घेतले असता त्याची विनवणी करणारी राणी हे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले म्हणजे येथील कलाकारांनी कौशल्याची कुठली परिसीमा गाठली होती हे सहज लक्षात येते. आणि त्यामुळेच भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितलेल्या शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स आणि अद्भुत या सर्व रसांचे समर्पकपणे चित्रण झाल्याचा प्रत्यय भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येतो. या सर्व रसांच्या पलीकडे असलेला व त्या सर्वांचा राजा म्हणून ज्याचे वर्णन करण्यात येते त्या शांत रसाचा प्रत्यय निरनिराळ्या जातकामधून येतो. उदा. कपि जातक, हंस जातक, विदुर पंडित जातक, मैत्रीबल जातक यामध्ये असलेले उपदेशपर प्रवचन रेखाटणारे प्रसंग. ज्यांचे बौद्ध परिभाषेमध्ये समाज असे वर्णन केले जाते. या बुद्धप्रवचन प्रसंगातसुद्धा याच शांत रसाचा प्रत्यय येतो. शांत रसाचा कळस ज्याला म्हणता येईल अशा मारधर्षण प्रसंगाच्या क्रमांक २६ या गुंफेतील शिल्पात त्याचप्रमाणे इतरत्र चितारलेल्या या प्रसंगात परिपूर्णपणे रेखाटलेला दिसतो.
        एका दृष्टीने पाहिले तर जातक कथा या बुद्धाच्या समकाळातील सामाजिक जीवनाच्या प्रतिबिंबासारख्या असल्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात घडलेले प्रसंग त्यामध्ये वर्णिले आहेत. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यात असलेल्या रागद्वेषाचे प्रसंग, त्यातून उत्पन्न होणारे संघर्ष, अथवा मानवी जीवनाला स्वाभाविक असलेल्या स्नेह, आकर्षण, प्रेम, शृंगार किंवा करुणा या स्थायी भावांचा किंवा रसांचा त्यात प्रत्यय आला असल्यास त्यामध्ये अनैसर्गिक काही आहे असे वाटत नाही. परंतु या सर्व आठ रसांच्या कल्लोळात सहसा न सापडणारा आणि आध्यात्मिकदृष्ट्या मानवी जीवनातील व्यर्थता लक्षात आल्यानंतर पस्तत्त्वाची ओढ दाखवणारा, संवेग, शम आणि वैराग्य हे ज्याचा पाया आहे अशा शांत रसाचे चित्रण अजंठा येथील चित्रकलेत प्रकर्षाने आढळून येते, आणि ते अपेक्षितही आहे. येथील चित्रित केलेले प्रसंग हे फक्त एखाद्या सहृदयाच्या रसास्वादनासाठीच नसून यांच्या परिपोषातून शांत रसाचा मार्ग दाखवणाऱ्या प्रसंगाच्या चित्रणात आहे. ही चित्रे एखाद्या आर्ट गॅलरीत मांडण्यात आलेली चित्रे नसून या चित्रांच्या दर्शनाने भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचे अनुसरण उपासक आणि भिक्षूच्यामध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे कसे होऊ शकेल या हेतूने केलेले आहे. भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचा तीन महत्त्वाच्या तत्त्वांमध्ये सारांश सांगावयाचा झाल्यास तो प्रज्ञा, शील आणि समाधी असा सांगता येईल. हा सारांश वेगळ्या रीतीनेसुद्धा इतर धर्मविचारातून प्रकट झालेला असतो. सम्यक् दर्शन, सम्यक् चारित्र्य आणि सम्यक् ज्ञान या रीतीने जैन पंथात सांगितला आहे. भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गावर पूर्ण श्रद्धा, अहिंसा, सत्य, अस्तेय, बह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचशीलाबरोबरच सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम आणि सम्यक् स्मृती यांच्या साह्याने शीलयुक्त आचरण, व सर्वोच्च ज्ञानस्वरूप असलेली प्रज्ञा, ती मिळवण्यासाठी समाधी म्हणजे मनाची एकाग्रता असे ढोबळपणे या उपदेशाचे वर्णन करता येईल. ज्या साधक व्यक्तीने मला सम्यकसंबुद्धाच्या म्हणजे परिपूर्ण ज्ञान झालेल्या बुद्धाच्या मार्गाने जायचे असा निश्चय केलेला असतो, तिला स्वतःच्या ठिकाणी दहा सद्‌गुण अंगी बाणवावे लागतात. हे गुण आपल्याकडे असावेत म्हणजे पुरे झाले अशी त्यात कल्पना नाही. या गुणांची पराकाष्ठा म्हणजे पारमी किंवा पारमीता मिळवावी अशी त्यात अपेक्षा आहे. सुमेध तापस म्हणून या त्याच्या पूर्वजन्मात शाक्य मुनीने बुद्ध दीपंकराचे दर्शन झाल्यानंतर, त्यांच्यामुळे प्रभावित होऊन मलाही अशाच प्रकारची स्थिती अनुभवयाची आहे अशी मनाशी खूणगाठ बांधली त्यावेळेपासून साधक म्हणून तो बोधिसत्व झाला. बोधिवृक्षाखाली बसल्यानंतर माराच्या (मदनाच्या) हल्ल्याची पर्वा न करता तो बोधिज्ञान मिळवतो. सुमेध तापसापासून शाक्य बुद्धापर्यंतचा हा आध्यात्मिक मार्ग पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक कल्पे (युगे) घालवावी  लागली.

▲ गुंफा क्रमांक १७ मध्ये मंडपाच्या एका संपूर्ण भिंतीवर चित्रित केलेले विश्वंतर जातक.

▲ सिंहल अवदानाच्या कथेला बौद्ध परंपरेमध्ये वेगवेगळ्या रीतीने महत्त्व आहे.

           मधल्या काळात अनेक बुद्ध होऊन गेले. आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा शाक्य मुनीने जन्मजन्मांतरी भोगलेली संकटे, कष्ट, मानपमान, दुःख यांनी खडतर झाला होता. पण या सर्व जन्मांच्या शृंखलांना जोडणारा दुवा म्हणजे दहा सद्‌गुणांचा प्रकर्ष आहे. त्याने भोगलेली सर्व दुःखे ही हे गुण बाणवण्यासाठी दिलेली किंमत आहे. या असंख्य जन्मापैकी फक्त ५४४ जन्मांच्या कथा या चुल्ल वग्गामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्यांचाच उल्लेख नेहमी जातक कथा म्हणून केला जातो. जातक म्हणजे जन्म, म्हणजे त्या त्या विशिष्ट जन्माच्या या कथा आहेत. या कथा भगवान बुद्धाने त्यांच्या शिष्यांनी किंवा इतरांनी प्रश्न विचारले असता सांगितलेल्या आहेत. यातील एका दृष्टीने मौजेची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कथांमधील महत्त्वाची पात्रे ही सिद्धार्थ गौतम म्हणजेच शाक्य बुद्ध याच्या जीवनात आलेल्या व्यक्तीच होत. उदाहरणार्थ सिद्धार्थ गौतम आणि त्याची पत्नी यशोधरा, त्याचे प्रसिद्ध शिष्य सारीपुत्र आणि मौद्गलायन, सावत्र भाऊ आनंद, चुलत भाऊ देवदत्त हीच पात्रे त्यात दिसतात. या कथांचा विशेष असा की हे एखाद्या सदगुणाचे परिपालन करीत असताना सिद्धार्थ गौतमाने त्या जन्मात दाखवलेला धीरोदात्तपणा व त्याच्या विरुद्ध प्रकर्षाने दिसून येणारा देवदत्ताचा दुर्गुण किंवा दुष्टपणा यातील विरोध स्पष्टपणे दिसावा असे चित्रण असते. हंस जातकाचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास हंसांचा राजा जर सिद्धार्थ गौतम असेल तर त्याचा प्रधान हा त्याचा आवडता भाऊ असतो. आणि त्या दोघांना पकडून राजासमोर सादर करणारा कोळी हा देवदत्त असतो. एका बाजूला भगवान बुद्ध हा त्याच्या उत्तरोत्तर जन्मात आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होऊन बुद्धपदाला पोहोचतो. त्याला साथ देणारे आनंद, सारीपुत्र हे त्याच्याबरोबर राहिल्याने किंवा त्याच्या मार्गाचे अनुसरण केल्यामुळे अर्हत् पद प्राप्ती करून घेतात, तर त्याला विरोध करणारा त्याचा मत्सर करणारा, त्याच्या लौकिक आणि आध्यात्मिक मार्गात अडथळे आणणारा देवदत्त हा सरतेशेवटी सर्वात भयंकर अशा सातव्या नरकात जाणार याची या जातक कथा पुनः पुनः श्रोत्यांना आणि दर्शकांना आठवण करून देत असतात.


त्रिपिटकामधील चर्यापिटकात,

(सर्व छायाचित्रे : विजय राव, आशुतोष बापट, सायली पलांडे दातार)

दहापैकी सात पारमीचा उल्लेख असून त्या स्पष्ट करणाऱ्या २० ते ३० कथा थोडक्यात सांगितल्या आहेत. तर जातक कथांच्या मध्ये बऱ्याच वेळा दहापैकी कुठल्या पारमीचे किंवा पारमीतेचे पालन त्या त्या जन्मात केले याचे विवरण जातकट्ठकथा या त्यावरील टीकेमध्ये आढळते. जातकट्ठकथेच्या उपो‌द्घातामध्येच हे स्पष्ट करण्यात आले आहे की एका जन्मामध्ये एखाद्याच सद्गुणाचे, पारमीतेचे पालन बोधिसत्वाने केले असे नाही. त्याच्या त्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावरून एक किंवा त्याहून जास्त पारमीतांचे पालन करण्याचा किंवा त्या सद्‌गुणांचे परिपोष करण्याचा त्याने प्रयत्न केला असेल. क्रमांक एक आणि दोन गुंफामधील जातक कथांच्या चित्रांचा अभ्यास केल्यानंतर वॉल्टर स्पिक आणि त्यांची शिष्या डॉ. लीला वूड यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या मते क्रमांक एकचे लेणे हे महाराज हरिषेणानेच कोरविले असावे, तर क्रमांक दोनचे लेणे हे हरिषेणाच्या पत्नीने म्हणजे महाराणीने कोरलेले असावे. असा निष्कर्ष काढण्यामागे त्यांनी दिलेले कारण असे आहे की, क्रमांक एकच्या गुंफेत ज्या जातक कथा कोरल्या आहेत, त्या बहुतांश सिद्धार्थ गौतम हा जेव्हा एखाद्या त्यांच्या या निरीक्षणाला परिपोषक राजघराण्यात युवराज म्हणून जन्माला येतो किंवा राजा म्हणून राज्य करतो अशा विषयावर आधारलेल्या आहेत. दुसरेही असे कारण सांगता येईल की सभामंडपातून अंतराळात ज्या दोन खांबांवरून बौद्ध उपासक गर्भगृहात जातो त्या दोन खांबांच्या सर्वात वरच्या भागात, दुसऱ्या कोणत्याही गुंफेत न आढळणारे चित्रण, म्हणजे त्या खांबांभोवती सर्वत्र राजमुकुटच कोरलेले आहेत. त्या उलट गुफा क्रमांक दोनमध्ये ज्या जातक कथा चितारण्यात आलेल्या आहेत त्यातील स्त्री पात्रांची उदात्तता अधिक दाखवण्यात येईल असे प्रसंग निवडण्यात आले. दुसरे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे एरवीसुद्धा प्रत्येक विहाराच्या बाहेर हारिती या यक्षीचे चित्रण असावे असा संकेत आहे. यापाठीमागचे कारण असे की नवजात किंवा मृत अर्भकांचे मांस चाखण्याची लालसा असलेली हारिती भगवान बुद्धांच्या उपदेशामुळे आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावामुळे हे मांस खाण्याची प्रवृत्ती आपण टाकून देत आहोत असा निश्चय जाहीर करते. आणि म्हणून भगवान बुद्ध तिला, उपाशीपोटी राहावे लागू नये म्हणून, असा वर देतात की विहारात राहणारे भिक्षु आपली भिक्षा गोळा केल्यानंतर अथवा कोणी दाता विहारामध्ये त्यांच्यासाठी आहार आणत असेल तर तो खाण्यापूर्वी आपल्या भिक्षेचा काही भाग हारितीला अर्पण करतात. वरील संकेताप्रमाण क्रमांक दोनच्या गुंफेमध्ये बाहेरच्या व्हरांड्यात हारितीचे आणि तिचा पती पांचिक याचे चित्रण आढळते. पण विहार क्रमांक दोनचे वैशिष्ट्य असे की गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या देवळीत यक्षरूप असलेल्या शंखपद्मनिधींच्या मूर्ती आहेत. तर डाव्या अंगाच्या देवळीत हारिती आणि पांचिक यांच्या मूर्ती बरोबरच हरिती आणि भगवान बुद्ध या दोघांच्यामध्ये घडून आलेल्या प्रसंगांचे प्रभावी चित्रण आहे.
           धम्मपदावरील टीकेमध्ये दहा पारमी कोणत्या याची गणना केली आहे. त्या दहा अशा, १. दान २. शील ३. नेक्खम्म ४. पञ्ञा ५. विरिय ६. खंती ७. सच्च ८. अधिट्ठाण ९. मेत्ता आणि १० उपेखा पारमी. यातील दान, शील, नेक्खम्म, खेती, सच्च या त्यातल्या त्यात अधिक लोकप्रिय असून, दानपारमीला एक वेगळेच महत्त्व आहे. दानपारमीच्या चटकन समोर येणाऱ्या कथा म्हणजे शशजातक, व्याघ्रीजातक, हस्तिजातक आणि विश्वंतरजातक. शश जातकामधील कथा अशी की बोधिसत्व शश आणि इतर प्राणी एका मुनीला आपल्याकडे भोजनासाठी निमंत्रण देतात. प्रत्येकजण आपापल्या रीतीने तयारी करतो, पण मुनीला देण्यासाठी आपल्याकडे फारसे काही नाही याची सशाला जाणीव होते. म्हणून मुनी आल्यावर पेटवलेल्या अग्नीमध्ये स्वतःचीच आहुती देऊन ते मांस मुनीला मिळेल अशी व्यवस्था तो करतो. तर व्याघ्री जातकामध्ये प्रसूतीनंतर एका वाघिणीला प्रचंड भूक लागते आणि शेवटी भूक अनावर होऊन पिलांपैकी एखाद्याला ती खाणार अशी शंका आल्याने बोधिसत्व स्वतःचे शरीर तिला खायला देतो. तर हस्ति जातकामध्ये एका वैराण प्रदेशातून प्रवास करणारे सार्थातले (तांड्यातले) लोक भुकेने आणि तहानेने व्याकूळ होतात. ते हत्तीला विचारतात की आम्ही अत्यंत व्याकूळ झालेलो आहोत, तर आम्हाला अन्नपाणी कुठे मिळेल का ? ते जवळपास कुठेही मिळणार नाही व त्यामुळे तांड्यातील या प्रवाशांना मृत्युमुखी पडावे लागेल याची खात्री झाल्यानंतर हत्ती म्हणून जन्माला आलेला बोधिसत्व त्यांना असे म्हणतो की समोर दिसणारी जी टेकडी आहे तिला वळसा घालून गेल्यास तुम्हाला एक मेलेले सावज दिसेल. त्यातून मिळालेल्या मांसरसाने तुमच्या तहानभुकेचे शमन होईल. ते प्रवासी सांगितलेल्या ठिकाणी पोहचण्याच्या अगोदरच बोधिसत्त्व हत्ती जवळच्या वाटेने त्या टेकडीवर जातो आणि त्या कड्यावरून स्वतःला खाली झोकून देतो व मरण पत्करतो. स्वतःचे प्राण झोकून देऊन आपला देह दुसऱ्याच्या स्वास्थ्यासाठी अर्पण करणे ही दानपारमीमधली पराकोटीची अवस्था समजली जाते. त्यामुळेच शशजातकाचे मोठे प्रभावी चित्रण अजंठा येथील क्रमांक दहाच्या हीनयान चित्रणामध्ये आढळून येते. तर हस्तिजातकाचे चित्रण क्रमांक १७येथील लेणीमध्ये मोठ्या प्रभावीपणे केले आहे. वाकाटककालीन चित्रणे ही आर्यशूराच्या जातक-मालेवर आधारित असल्यामुळे प्रवाशांच्या विषयी वाटणाऱ्या करुणेपोटी स्वतःचा जीव देऊन आपला देह त्यांच्या स्वाधीन करणाऱ्या हत्तीचे मनोगत बोधिसत्वाच्या मनाची ओळख करून देतात. हे मनोगत धर्मराज युधिष्ठर ज्याप्रमाणे महाभारतात व्यक्त करतो तशाच आशयाचे आहे. युधिष्ठिर म्हणतो :
नत्वहमं कामये राज्यंम नस्वर्गम नापुनर्भवम्
कामये दुःखतप्तानां प्राणिना मार्तिनाशनम्

दानपास्मीतेचे सर्वोक्तृष्ट उदाहरण गुंफा क्रमांक १७ मध्ये मंडपाच्या एका संपूर्ण भिंतीवर चित्रित केलेले विश्वंतर जातक होय. विश्वंतराची कथा अशी आहे, विश्वंतर हा युवराज. महाभारतातील उदाहरण द्यावयाचे झाल्यास तो कर्णाप्रमाणेच दानशूर. समोर आलेल्या याचकाला कधी विन्मुख होऊन परत जाण्याची कधीच पाळी आलेली नव्हती. पण त्याचा हा गुण राज्यातील जनतेला मात्र शापासारखा झाला.

▲ गुंफा क्रमांक दहा तसेच वाकाटककालीन गुंफा क्रमांक १६ मध्येही चित्रित केलेले छद्दन्त जातक

राजवाड्यात असा एक हत्ती होता की ज्याच्या पुण्याईने प्रजेला कधीही अवर्षणाच्या संकटाला सामोरे जावे लागले नाही. शेजारच्या राज्यातील काही ब्राह्मण तेथे पडलेल्या दुष्काळामुळे त्याच्याकडे येतात व मोठ्या करुणेने विश्वंतर तो हत्ती त्यांना देऊन टाकतो. आता शेजारचे संकट आपल्यावर कोसळणार या भीतीने प्रजाजन व दरबारी विश्वंतराला वनवासाची शिक्षा देण्यासाठी राजाला भाग पाडतात. एका घोडे जोडलेल्या रथानिशी विश्वंतर नगराबाहेर एका टेकडीवर राहण्यासाठी निघतो. वाटेत एक याचक त्याला घोडे मागतो म्हणून तो घोडे देऊन टाकतो, त्यानंतर रथसुद्धा. पुढे वाटचाल करता जूजक नावाचा लोभी ब्राह्मण त्याच्याकडे घरच्या कामात नोकर म्हणून उपयोगी व्हावेत यासाठी दोघा मुलांची मागणी करतो. आपली पत्नी वनात फळं तोडण्यास गेली आहे याचा फायदा घेऊन विश्वंतर ती मुलेही त्याला देऊन टाकतो. त्याच्या दानशूरपणाचा लौकिक स्वर्गात इंद्राच्या दरबारात पोहचल्यानंतर, त्याच्या परिक्षेसाठी इंद्र येतो. विश्वंतरसुद्धा आपल्या पत्नीचेसुद्धा दान करायला तयार होतो. विस्मयचकित झालेला इंद आपल्या रूपात प्रकटून त्याची वाहवा करतो आणि तुझा वनवास संपेल असा वर देतो. इकडे विश्वंतर वनवासात असताना, त्याची मुलेदेखील दान म्हणून दिली गेली आहेत हे कळल्यावर त्यांचा आजा जूजकाला सोन्याच्या मोहरा देऊन त्यांचा ताबा मिळवतो. नंतर विश्वंतर वनवासातून परत येऊन पत्नीसह युवराजपदावर आरूढ होतो. गुंफा क्रमांक १७ मध्ये विश्वंतराच्या कथेला एवढे मोठे महत्त्व का दिले याच्याविषयी विद्वानांनी चर्चा केली आहे ती अशी. विश्वंतराच्या पाठोपाठ बोधिसत्वाचा जन्म सिद्धार्थ गौतम म्हणूनच होतो. आणि त्यामुळे दानपारमीला शाक्य बुद्धाच्या आयुष्यामध्ये केवढे मोठे स्थान आहे
        हे लेखकांना आणि कलाकारांना सुचवायचे आहे असे विद्वानांना वाटते. १७ व्या लेणीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनासुद्धा असेच वाटते की अप्रत्यक्षपणे ऋषीक देशाचा राजा उपेद्रगुप्त याचीसुद्धा पुढल्या जन्मात आपल्याला बुद्धपद नाही तरी कमीत कमी अर्हततपद मिळावे अशी मनोमन इच्छा असली पाहिजे. दानपारमीला जसे वर वर्णिलेल्या तीन-चार जातककथांमधून आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे, त्याचप्रमाणे लौकिक दृष्टीने विहारसंस्था व्यवस्थित रीतीने चालावी म्हणून देखील दानपारमीचा उपयोग आहे. वैदिक व हिंदू धर्मामध्ये कुठलेही धार्मिक कार्य केल्यानंतर पुरोहिताला दक्षिणा रूपाने दान दिल्याशिवाय ते कर्म फलप्रद होत नाही अशी धारणा आहे. तसेच ब्राह्मण वर्गाला, त्याच्या ज्ञानामुळे व धार्मिक कार्यात साहाय्य करण्याचा अधिकार असल्यामुळे, तसेच यजमानाने दिलेल्या दानामुळेच त्याची उपजीविका होत असल्यामुळे त्याला दान स्वीकारण्याचा म्हणजेच प्रतिग्रहाचा अधिकार दिला आहे. लौकिक पातळीवर ब्राह्मणांच्यासारखेच ज्ञानदान आणि धार्मिक कार्यात साहाय्य अशी भूमिका असल्यामुळे, दानपारमीच्या रूपाने श्रमणसंस्थेला व विहाराला हा दान स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे असे दिसते. दानपारमीला या प्रकारचे महत्त्व दिल्यामुळे महाभारतातल्या शिबी राजाची कथासुद्धा शिबीजातकाच्या रूपाने आली आहे.
         या संदर्भात सिंहलावदानाच्या कथेचासुद्धा उल्लेख करणे आवश्यक आहे. या अवदानाचे विश्वतराइतकेच मोठे चित्रण क्रमांक १६ या गुंफेत करण्यात आले आहे. या कथेला बौद्ध परंपरेमध्ये वेगवेगळ्या रीतीने महत्त्व आहे. जातक हे जर शाक्य बुद्धाच्या जन्मजन्मीच्या कथांचे वर्णन असेल तर अवदान हे तितकेच आश्चर्यकारक पण बुद्धाऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी महात्म्याचे चरित्र असते. थेरवादी (स्थविरवादी) बौद्ध परंपरेप्रमाणे सिंहल हा भगवान बुद्धाचा समकालीन. त्याचे नाव विजय, हा एक सार्थवाह होता. समुद्रावर व्यापार करण्याच्या हेतूने तो रत्नद्वीप या बेटावर म्हणजे आजच्या श्रीलंकेला पोहोचतो. या बेटाची अशी ख्याती होती की जहाजं बुडाल्यानंतर वाचलेल्या प्रवाशांना तेथे राज्य करणाऱ्या यक्षीणी आश्रय देत, त्यांचा आदरसत्कार करीत. त्यांना आपल्या पत्नीचीसुद्धा उणीव भासू देत नसत. परंतु अशीच वाताहत झालेली नवीन माणसे किनाऱ्याला लागली की पूर्वीच्या प्रवाशांना बंदी करून यक्षीणी त्यांचे मांस खात असत. सिंहल असाच बंदीवासात जातो.


▲ हस्तिजातकाचे चित्रण क्रमांक १७

येथील लेणीमध्ये केले आहे. तो चोरून असा तपास लावतो की या बेटावर जशा मनुष्यभक्षी यक्षीणी आहेत तसाच एक वलहस्स नावाचा आकाशात भरारी घेणाऱ्य अश्वाचे रूप असलेला, यक्षदेखील आहे. आणि उडत असताना पाठोपाठ येणाऱ्या यक्षिणीच्या मोहाला बळी न पडलेल्या संकटग्रस्त बंदीना तो आपल्या पाठीवरून समुद्रापलीकडे नेतो. पण अशा अटीवर की, आपले सावज सुटू नये म्हणून सुंदर स्त्रियांचे रूप घेऊन पाठोपाठ येणाऱ्या यक्षिणीच्या मोहाला बंदी बळी पडले नाहीत तर. सिंहल या यक्षाच्या मदतीने घरी आल्यानंतर तो राजदरबारात रुजू होतो. यक्षीणीची राणी मात्र असा निश्चय करते की काही झाले तरी सिंहलाला परत आणायचेच. म्हणून ती राजदरबारात उपस्थित होते आणि राजाला सांगते की सिंहल माझा पती आहे. माझ्याबरोबर जे बाळ आहे ते त्याचेच मूल आहे. तो माझा स्वीकार करत नाही. सिंहल राजाला समजवाण्याचा प्रयत्न करतो की ही मनुष्यभक्षी राक्षसीण आहे. हिला तुम्ही थारा देऊ नका, राजा तिच्या सौदर्याच्या मोहात पडून तिला अंतःपुरात पाठवतो. राजवाड्यावर दुसऱ्या दिवशी झेप घालणाऱ्या गिधाडांमुळे लोकांच्या लक्षात येते की यक्षीणीने राजाचे सर्व कुटुंबच फस्त केले आहे. प्रजानन सिंहलाला राजा म्हणून निवडतात. सिंहल मोठ्या सैन्यानिशी आणि गलबतातून प्रवास करून रत्नद्वीप जिंकतो, आणि तिथले प्रजानन पहिला राजा म्हणून त्याला अभिषेक करतात. येथून पुढे रत्नद्वीपाचे नाव सिंहल असे होते आणि तेथे बौद्ध धर्माचा प्रसार होतो. हिच कथा थोड्या फरकाने दिव्यावदानात येते. पण त्यात मात्र सिंहल हा दुसरा कोणी नसून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमच आहे किंवा शाक्य बुद्ध आहे असे प्रतिपादन येते. ही कथा श्रीलंकेमध्ये इतकी लोकप्रिय झाली की द्वीपवंश या श्रीलंकेच्या इतिहास सांगणाऱ्या काव्यात त्याचे वर्णन तर आढळतेच, पण युएन शेंगच्या प्रवासवर्णनातदेखील आहे. धर्माच्या तुलनात्मक अध्ययनामध्ये या कथेला असे महत्त्व आहे की, नायाधम्मकःओ (ज्ञाता धर्म कथाः) या श्वेतांबर जैनांच्या नवव्या अंग ग्रंथामध्ये मांकंदिक पुत्र आख्यानामध्ये हीच कथा येते.

▲ विश्वंतर जातक

शिबिजातक आणि मांकंदिकपुत्र आख्यानामधून सहज लक्षात येते की महाभारत-रामायणात व पुराणात, जैन व बौद्ध आगम वाङ्मयात आढळणाऱ्या या कथांचे मूळ कुठल्याही एका धर्म परंपरेत नसून इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात भारताच्या निरनिराळ्या प्रांतात प्रचलित असलेल्या लोककथांच्यामध्ये आहे. बौद्ध, जैन व पौराणिक परंपरांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी थोडेफार फरक करून त्या काव्यरूपाने आणल्या व त्यांना अजरामर केले आहे.
     अजिंठा येथील एक, दोन, १६, १७ या गुंफांच्या भिंतीवर आर्यशूराच्या जातकमालेत समाविष्ट असलेल्या ३२ जातक कथा, तसेच हरिभट्टाच्या जातकमालेतील तसेच विषय असलेल्या जातक कथा फार सुंदर रीतीने चित्रित करण्यात आलेल्या आहेत. अगोदरच्या संशोधकांच्या पिढीत, त्रिपिटकामधील पाली भाषेत लिहिलेल्या जातक कथांच्या आधाराने गुंफात चितारलेल्या प्रसंगांची उकल करण्याची प्रथा होती. आणि त्यामुळेच या महायानाशी संबंधित कथा नसून हिनयानी कथा असे समजले जात होते. अजिंठा येथील दोन क्रमांकाच्या गुंफेतील रंगवलेल्या अभिलेखांच्या साहाय्याने हे लक्षात आले होते की संस्कृत भाषेत लिहिलेल्या जातकमालेतील या कथा असल्यामुळे ही चित्रणे खऱ्या अर्थाने स्थविरवादी नव्हती. म्युनिक विद्यापीठामधील प्राध्यापक शिंलगलोफ यांच्या सखोल अध्ययनामुळे असेही लक्षात आले की गांधार आणि उड्डियान भागात मूळ धरणाऱ्या संस्कृत भाषा माध्यम असलेल्या सर्वास्तिवादी निकायाशी जवळचा संबंध असलेल्या, नवीन बौद्ध विचारांशी ही चित्रणे जास्त सुसंगत आहेत. आणि त्यामुळे गुंफा क्रमांक नऊ आणि दहामध्ये चित्रित केलेल्या पाली भाषेतील जातकांपेक्षा ही चित्रणे वेगळा संदेश देतात. छद्दन्त जातक हे हीनयानी गुंफा क्रमांक दहा व त्याचप्रमाणे वाकाटककालीन गुंफा क्रमांक १६ मध्येही चित्रित केलेले आहे. परंतु यातील मुख्य पात्रे म्हणजे छद्दन्त हत्ती, बनारस्सची राणी म्हणून जन्माला आलेली त्याची प्रिय पत्नी हीच होत. ती सवती मत्सरापोटी
छ्द्दन्ताला मारण्याचा घाट घालते. परंतु या कथेतील मुख्य विषयाची मांडणी आणि त्यातून जाणारा संदेश वेगळा आहे. पाली कथेत छद्द पारध्याला क्षमा करतो एवढेच नाही तर त्याला आपले दात कापू देतो, तर जातक मालेत तो ते स्वतः कापतो असे म्हटले आहे. पाली कथेत तो मरण पावतो, तर जातक मालेच्या कथेत तो स्वतः मरत नाही. आणि बनारसच्या मरणोन्मुख राणीला तो मरत नाही हे शुभवर्तमान देऊन प्राण तिचे वाचवतो. या वाकाटककालीन चित्रणांचे महत्त्व असे की ते बौद्ध धर्माचे हिनयानाकडून महायानाकडे होणारे स्थित्यंतर स्पष्टपणे दाखवतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, सिल्क रुटवरील मध्य अशियातील बौद्ध विहारांच्या जातक चित्रणांवर आपला स्पष्ट ठसा ती उमवटतात. आणि अशा रीतीने गुप्त-वाकाटककाळातील चित्रशैलीचा परिणाम आजच्या लडाख, कझागिस्तान आणि चीनमधील सहाव्या-सातव्या चित्रकलेवर झालेला दिसून येतो. आणि या अर्थाने वाकाटक कला ही वैश्विक पातळीवर पोहोचते.

response.lokprabha@expressindia.com











 

 

 

 

 

 

 

 







 

 

 

 

 

 

 

 https://vidarbha-darshan.blogspot.com/2017/02/blog-post_28.html

Unknown

विदर्भाचा प्राचीन इतिहास :-

विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर  ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे.  'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती.

गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात.

सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश होता. सातवाहन राज्यात व्यापार होता. 'गाथा सप्तशती'हा ग्रंथ त्याच काळातला. गुणाढ्या ची 'बृहत्कथा' हि देखील त्या काळातली.

वाकाटक वंशाने प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे तीनशे वर्ष  विदर्भावर राज्य केले.ते गुप्तांचे समकालीन समजले जातात. वत्सगुल्म ( वाशीम) हि वाकाटकांची राजधानी.

त्या काळातील विदर्भाच्या भौगोलिक सीमा ह्या उत्तरेस माळवा , पूर्वेला छत्तीसगड, ओरिसाचा काही भाग  व आंध्र, पश्चिमेस मध्य व दक्षिण गुजरात राज्य व महाराष्ट्रात नाशिक  पर्यंत आणि दक्षिणेस कुंतल म्हणजे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेल्या होत्या. हेरेशनाची सत्ता तर अरबी समुद्रापर्यंत पसरली होती.

विदर्भाने सहिष्णुतेचा संस्कार जपलेला आहे. कालिदासाचे 'मेघदूत' सर्वसेनाचा 'हरिविजय' हे ग्रंथ विदर्भातच निर्मिले गेले.

मराठी भाषेला भूषणा वह ठरलेल्या महानुभावांच्या परंपरेतील गोविन्द्प्रभू हे विदर्भाचे. त्यांची अमरावती जिल्ह्यातील रुद्धीपूर, रिद्धपूर हि कर्मभूमी. ती महानुभावांची काशी समजली जाते. ते महानुभाव पंथाचे उगमस्थान. खुद्द चक्रधर स्वामींचे वास्तव्य विदर्भात रामटेक, मेहकर,लोणार, रुद्धीपूर, सालबर्डी व अमरावती सारख्या  यासारख्या ठिकाणी राहिले आहे.

शुक्राचार्य,दमन, मृदगल , जमदग्नी, मार्कांद्देय या ऋषींची स्थळे विदर्भात पयोष्णी म्हणजेच पूर्णा नदी काठची. वरदा, वसिष्ठा, विदर्भ म्हणजे वर्धा, वेणा अर्थात वैनगंगा आणि प्रणिता अर्थात पेनगंगा ह्या विदर्भातील नद्यांचे उल्लेख महाभारतापासून सापडतात.

उल्कापातामुळे तयार झालेले जागतिक ख्यातीचे लोणार सरोवर विदर्भातले. अमरावती हे मुळातले ' उमरावती' . यादवच्या पैठण आणि उमरावती या दोन  राजधाण्यापैकी एक. गणेशपुराणात वर्णन असलेले कळंब हे यवतमाळ जिल्ह्यातले.

जैनांचे पवित्र स्थान 'मुक्तागीरी' हे एलीचपूर च्या जवळ आहे. एलीचपूर हे तर 'ईल ' या जैन राजाने वसवल्याची कथा प्रचलित आहे. 'शिरपूर' हे जैनांचे पवित्र स्थानही विदर्भात आहे.

शिवाजीराजांचा तीन दिवस मुक्काम लाभलेले व त्यावेळी त्यांनी कस्तुरींचे उंट विकत घेऊन  ती कस्तुरी ज्या  मातीत टाकण्याची कथा
सांगितली जाते, ती माती विदर्भाच्या कारंजाची. मुळात ते दत्ताचे ठाणे. सिंदखेडराजा  हे  तर जीजामातेचे माहेरघर!

अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीच्या स्वारीहून परततांना एलीचपूर चा ताबा घेऊन आपला अधिकारी तेथे नेमला होता. पुढे, तो रामचंद्र देवाकडे गेला. त्याला खंडणी मात्र खिलजीकडे पाठवावी लागत होती. खिलजीचा विदर्भावर अंमल १३१८ पासून सुरु झाला.एलीचपूर हे मुसलमान शासनाचे महत्वाचे केंद्र बनले ते इंग्रजी राजवटी पर्यंत. पुढे, तुघलक घराण्याचा प्रतिनिधी उमाद उल-मुल्क हा वर्हाडात नेमला होता. ( क्रमशः )

Source - प्रदीप धामणकर, पांढरकवड़ा जि. यवतमाळ

 


वाकाटक राजघराणे

प्राचीन महाराष्ट्रात जी अत्यंत बलाढ्य व सुसमृद्ध अशी साम्राज्ये झाली त्यात वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. इ.स. २५० ते जवळपास इ.स. ५५० पर्यंत वाकाटकांनी विदर्भावर राज्य केले. या तीनशे वर्षांच्या कालावधीत वाकाटकांनी आपली सत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरा पर्यंत पसरवली. नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या मालव, मेकल व चेदी या देशांनीही त्याचे मांडलिकत्व काही काळासाठी पत्करलेले होते. 
असे हे सामर्थ्यशाली घराणे इतिहासाला १८३६ पर्यंत अज्ञात होते. इ.स. १८३६ मध्ये सिवनी येथे वाकाटक राजा द्वितीय प्रवरसेन याचा ताम्रपट सापडला व हे राजघराणे इतिहासाला ज्ञात झाले. पुराणांमध्ये मात्र वाकाटकांबद्दल काहीच लिहिलेलं नाही. त्यांचा पहिला राजा विंध्यशक्ती याचा मात्र उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. 
वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्ती पहिला याने केली. त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन हा त्याच्या नंतर राजा झाला. प्रवरसेनाच्या माघारी वाकाटकांच्या दोन शाखा महाराष्ट्रावर राज्य करू लागल्या. त्यांना ज्येष्ठ शाखा आणि वत्सगुल्म शाखा असे म्हणतात.
   वाकाटक राजांनी संस्कृत व प्राकृत या दोनही भाषांतील कवींना उदार आश्रय दिला होता. विदर्भातील वाङ्मय निर्मितीमुळे तेथील वैदर्भी रीतींना प्राधान्य प्राप्त झालेले दिसते. कलिदासासरख्या कवीने देखील यावर काव्ये केलेली आहेत. त्याने आपल्या मेघदूत या महाकाव्यात विर्दभाचे वर्णन केलेले आहे.
    वाकाटकांच्या काळात भारतीय समाजात अनेक महत्त्वाचे बदल झाले आणि त्या बदलांमध्ये वाकाटकांचा मोठा हात होता. त्यांच्या काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कुशाण कारकीर्दीत सनातन धर्मास जी उतरती कळा लागली होती ती या गुप्त व वाकाटक काळात संपून सनातन धर्म पुन्हा उभारी धरू लागला. याच काळात संस्कृत भाषेच्या व वांगमयाच्या अभीवृद्धीची चळवळ सुरू झाली. यामुळेच गुप्त नृपतींनी सुद्धा संस्कृत भाषेला राजाश्रय दिला. संस्कृतभाषे सोबतच शिल्पकला व चित्रकला यांचे पुनरुज्जीवन सुद्धा वाकाटकांच्या काळात झाले. त्याचे पूरावे त्यांच्या राज्यात असणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसते. 
   वाकाटक राजांनी केवळ विद्वानांना वा कवींना आश्रयच नव्हता दिला तर ते स्वतः सुद्धा उत्तम काव्ये व सुभाषिते रचत. वाकाटक राजांनी रचलेली हरिविजय, सेतुबंध अथवा रावणवहो ही काव्ये तर अनेक सुभाषितांचे उल्लेख आजही अनेक ठिकाणी सापडतात. वाकाटकांनी स्वतः जी काव्ये रचली त्याची प्रशंसा बाण व दण्डी या सारख्या कवींनी केलेली आहेत.
त्यांच्याच काळात अजिंठातील काही लेण्या कोरल्या गेल्या. ज्यातील विहार, चैत्य, शिल्प, चित्र यांची प्रशंसा आजही जगभरात होते आहे.
  अजिंठ्यातील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी ही वाकाटक कालीन असून ती लेणी स्थापत्य व चित्रकला या दोन्ही दृष्टींनी इतर लेण्यांपेक्षा उत्कृष्ठ आहेत. 
एकंदरीतच त्या काळातील संस्कृत भाषा, कला, वाङ्मय या सर्वांच्या पुनरुज्जीवनाचे सारे श्रेय जरी गुप्त राजांना दिले गेले असले तरी खऱ्या अर्थाने ते श्रेय वाकाटकांचेच आहे. 
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
विंध्यशक्ती पहिला
प्रथम विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा होय. याचे नाव पुराणांत तसेच अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यांमधील लेखात आलेले आहे. त्या लेखात विंध्यशक्तीचा हा द्विज म्हणजे ब्राह्मण असून त्याचे गोत्र विष्णूवृद्ध आहे असा उल्लेख आलेला आहे. त्यात विंध्यशक्ती चा 
' वाकाटकवंशकेतुः ' म्हणजे वाकाटक वंशाचे मानचिन्ह असा केलेला आहे. त्याची राजधानी ही पुरातन नगरी चनका ही होती. 
विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राजवटीमध्ये मोठ्या अधिकारावर असावा व त्यामुळेच त्याला पुढे राज्यसत्ता बळकावणे शक्य झाले असावे असे वाटते. त्याने इ.स २५० ते २७० असे राज्य केले असावे असे अनुमान आहे. पुराणांमध्ये आलेली त्याची ९६ ही कालगणना त्याच्या कारकिर्दीची नसून त्याच्या वयोमानाची असावी असे वाटते.
पुराणांच्या मते वाकाटकांचा पहिला प्रसिद्ध राजा विंध्यशक्ती होय. त्याने आपले राज्य विदिशेच्या आसपास पसरवले व वाढत वाढत साम्राज्याच्या दर्जाला पोहचवले.
अजिंठ्याच्या लेखात विंध्यशक्तीची मोठी स्तुती केलेली आहे. ' त्याने मोठ्या मोठ्या लढायांत विजय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते. तो क्रुद्ध झाला तर प्रत्यक्ष देवांनाही अनिवार्य होत असे. त्याच्या घोड्यांच्या टापांनी उडविलेल्या धुळीने आकाशात सूर्य झाकून जात असे. त्याच्या शौर्याने पराभूत झालेले शत्रू त्याच्या पुढे विनम्र होत’. एकंदरीतच विंध्याशक्ती हा एक प्रबळ राजा होता. त्याचा पराक्रमाची तुलना प्रत्यक्ष इंद्र व विष्णूशी केलेली आहे.
त्याने आपल्या कारकीर्दीत चार अश्वमेध आणि आप्तोर्यांम, बृहस्पतिसव, ज्योतिष्टोम, वाजपेयादी यज्ञ केल्याचे दिसते. 
विंध्यशक्तीच्या माघारी त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन राजा झाला. वाकाटक घराण्यातील हा सर्वात महत्त्वाचा राजा होय.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास भाग 3

#क्षत्रिय_मराठा_वाकाटक_राजवंश
-----------------------------------------------

महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश म्हणजे सातवाहन राजवंश तर या सातवाहन राजवंशाच्या 450 वर्षाच्या प्रदीर्घ राज्यकाळानंतर जेव्हा सातवाहनांची शक्ती कमी व्हायला लागली तेव्हा सातवाहनांचे अधिपथ्य झुगारून महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात उदय झाला क्षत्रिय मराठा वाकाटक राजवंशाचा. वाकाटक हळूहळू आपला राज्य विस्तार वाढवू लागले व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या आसपासच्या प्रदेशावर आपले अधिपत्य स्थापित केले.
   वाकाटक राजवंशाचा संस्थापक
#राजा_विंध्यशक्ती आहे. राजा विध्यशक्तीनेच वाकाटक साम्राज्याचा पाया रोवला वाकाटक साम्राज्याचा कार्यकाळ इसवी सन 250 ते इसवी सन 500 पर्यंत होता म्हणजे 250 वर्ष वाकाटक राजांनी संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य केले. वाकाटक साम्राज्याची मुख्य राजधानी #नंदीवर्धन होती आजच्या महाराष्ट्रातील #नागपूर जिल्ह्यातील जे #नगरधन गाव आहे हीच वाकाटक साम्राज्याची मुख्य राजधानी होती. नंतर वाकाटक राजा #प्रवरसेन_प्रथम ने राजधानीला नंदीवर्धन वरून #वत्स्यगुल्म ला स्थानांतरित केले वत्स्यगुल्म म्हणजेच आजचा #वाशिम जिल्हा.
    वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम ने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला व स्वतःला महाराज आणि सम्राट या उपाध्या धारण केल्या. प्रवरसेन प्रथम ने आपल्या कार्यकाळात 4 अश्वमेध यज्ञ व 1 वाजपेय यज्ञ केला होता.
   वाकाटक राजा #प्रथम_पृथ्वीसेन ने दक्षिणेतील #कुंतल प्रांत जिंकला व वाकटक साम्राज्यात सामील करून घेतला कुंतल म्हणजेच आजचा #कोल्हापूर जिल्हा होय. 
     वाकाटक राजा #दुसरा_रुद्रसेन चा विवाह त्या वेळचे उत्तर भारतातील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे #गुप्त_साम्राज्य तर या गुप्त साम्राज्याचा राजा #चंद्रगुप्त_प्रथम ची कन्या #प्रभावतीदेवी शी झाला. आणि या वैवाहिक संबंधामुळे वाकाटक साम्राज्याची ताकद खूप  वाढली गुप्त राजांनी नंतर जो दक्षिण दिग्विजय केला त्यामध्ये दक्षिणेतील ज्या राज्यांना जिंकल्याचा उल्लेख मिळतो त्यामध्ये वाकाटक साम्राज्याचे नाव येत नाही गुप्त राजांनी दक्षिणेतील वाकाटक साम्राज्य सोडून बाकी सर्व राज्य जिंकून घेतले होते.
    दुसऱ्या रुद्रसेनाचा प्रभावती देवीशी विवाह झाल्यानंतर फक्त 5 वर्षात मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे 15 वर्षे वाकाटक साम्राज्याचा सर्व कारभार प्रभावती देवीने सांभाळला आणि यामध्ये दुसऱ्या चंद्रगुप्ताने तिची मदत केली.
   वाकाटक राजा #हरिसेन च्या काळात त्याचा #वराहदेव नावाचा ब्राह्मण मंत्री होता. त्याने वेरूळच्या लेण्यांमध्ये अनेक मुर्त्या व भित्तीचित्र बनवले व अनेक लेण्यांचे निर्माण केले.
    वाकाटक राजा #दुसरा_रुद्रसेन ने महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये #सेतुबंध नावाचा ग्रंथ लिहिला. याच #प्राकृत_महाराष्ट्री भाषेचे रूपांतर नंतर मराठी भाषेमध्ये झाले. प्रसिद्ध संस्कृत #कवी_कालिदास याच दुसरा रुद्रसेनच्या दरबारात होते येथेच त्यांनी #मेघदूत नामक काव्य लिहिले.
   वाकाटक साम्राज्याच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. वाकटक राजांनी संस्कृत व प्राकृत महाराष्ट्री कवींना राजाश्रय दिला होता व त्यांना उत्तेजित केले होते. वाकाटक काळखंडातील काव्य आणि वांग्मय निर्मितीमध्ये #महाराष्ट्री_वैदर्भी आणि #वच्छोमी पद्धतीला प्राधान्य मिळाले. वाकटक राजांनी शिल्पकलेला देखील उत्तेजन दिले जे आज आपण अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये बघत आहोत.
   वाकाटक साम्राज्याच्या कार्यकाळात जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या अनेक लेण्यांची निर्मिती झाली त्यामध्ये त्यांची वंशावळ देखली आहे तिला #वाकाटक_वंशकेतू म्हटले जाते ती पुढे देत आहे. 
●विन्ध्यशक्ति
●प्रवरसेन प्रथम
●रुद्रसेन प्रथम
●पृथ्वीसेन प्रथम 
●रुद्रसेन द्वितीय
●प्रभावतीगुप्त
●दिवाकरसेन
●दामोदरसेन
●नरेन्द्रसेन
●पृथ्वीसेण द्वितीय 
●सर्वसेन तृतीय
●विन्ध्यसेन (विन्ध्यशक्ति द्वितीय)
●प्रवरसेन द्वितीय
●देवसेन 
●हरिसेण
    काहींनी वाकाटक राज्यांना विष्णूवृद्धी गोत्रीय ब्राह्मण घोषित केले. पण त्याचा कुठलाही समकाली पुरावा नाही आणि विष्णुवृद्ध नावाचे कुठले गोत्रही अस्तित्वात नाही. वैदिक सनातन हिंदू धर्मानुसार राजा हा फक्त क्षत्रिय असतो आणि वाकाटक भगवान श्रीकृष्णांची पत्नी विदर्भाची राजकन्या श्रीरुक्मिणी मातेच्या वंशातील होते आणि श्रीरुक्मिणी माता ही क्षत्रिय राजकन्या होती त्यामुळे वाकाटक हे क्षत्रिय मराठाच होते. आजच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळामध्ये #वकटे किंवा #वक्ते आडनावाचे लोक वाकाटकांचे वंशज आहेत.

#वाकाटक
#क्षत्रिय
#मराठा
#जय_भवानी
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#जय_महाराष्ट्र
#हर_हर_महादेव🚩

लेखक :- आशिष इंगळे पाटील.

(राज्य इतिहास व साहित्य विभाग प्रमुख मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान)


राचीन महाराष्ट्रातील राजे 

भाग १३

वाकाटक राजघराणे

प्राचीन महाराष्ट्रात जी अत्यंत बलाढ्य व सुसमृद्ध अशी साम्राज्ये झाली त्यात वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. इ.स. २५० ते जवळपास इ.स. ५५० पर्यंत वाकाटकांनी विदर्भावर राज्य केले. या तीनशे वर्षांच्या कालावधीत वाकाटकांनी आपली सत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरा पर्यंत पसरवली. नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या मालव, मेकल व चेदी या देशांनीही त्याचे मांडलिकत्व काही काळासाठी पत्करलेले होते. 
असे हे सामर्थ्यशाली घराणे इतिहासाला १८३६ पर्यंत अज्ञात होते. इ.स. १८३६ मध्ये सिवनी येथे वाकाटक राजा द्वितीय प्रवरसेन याचा ताम्रपट सापडला व हे राजघराणे इतिहासाला ज्ञात झाले. पुराणांमध्ये मात्र वाकाटकांबद्दल काहीच लिहिलेलं नाही. त्यांचा पहिला राजा विंध्यशक्ती याचा मात्र उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. 
वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्ती पहिला याने केली. त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन हा त्याच्या नंतर राजा झाला. प्रवरसेनाच्या माघारी वाकाटकांच्या दोन शाखा महाराष्ट्रावर राज्य करू लागल्या. त्यांना ज्येष्ठ शाखा आणि वत्सगुल्म शाखा असे म्हणतात.

वाकाटक राजांनी संस्कृत व प्राकृत या दोनही भाषांतील कवींना उदार आश्रय दिला होता. विदर्भातील वाङ्मय निर्मितीमुळे तेथील वैदर्भी रीतींना प्राधान्य प्राप्त झालेले दिसते. कलिदासासरख्या कवीने देखील यावर काव्ये केलेली आहेत. त्याने आपल्या मेघदूत या महाकाव्यात विर्दभाचे वर्णन केलेले आहे.
 
वाकाटकांच्या काळात भारतीय समाजात अनेक महत्त्वाचे बदल झाले आणि त्या बदलांमध्ये वाकाटकांचा मोठा हात होता. त्यांच्या काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कुशाण कारकीर्दीत सनातन धर्मास जी उतरती कळा लागली होती ती या गुप्त व वाकाटक काळात संपून सनातन धर्म पुन्हा उभारी धरू लागला. याच काळात संस्कृत भाषेच्या व वांगमयाच्या अभीवृद्धीची चळवळ सुरू झाली. यामुळेच गुप्त नृपतींनी सुद्धा संस्कृत भाषेला राजाश्रय दिला. संस्कृतभाषे सोबतच शिल्पकला व चित्रकला यांचे पुनरुज्जीवन सुद्धा वाकाटकांच्या काळात झाले. त्याचे पूरावे त्यांच्या राज्यात असणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसते. 

वाकाटक राजांनी केवळ विद्वानांना वा कवींना आश्रयच नव्हता दिला तर ते स्वतः सुद्धा उत्तम काव्ये व सुभाषिते रचत. वाकाटक राजांनी रचलेली हरिविजय, सेतुबंध अथवा रावणवहो ही काव्ये तर अनेक सुभाषितांचे उल्लेख आजही अनेक ठिकाणी सापडतात. वाकाटकांनी स्वतः जी काव्ये रचली त्याची प्रशंसा बाण व दण्डी या सारख्या कवींनी केलेली आहेत.
त्यांच्याच काळात अजिंठातील काही लेण्या कोरल्या गेल्या. ज्यातील विहार, चैत्य, शिल्प, चित्र यांची प्रशंसा आजही जगभरात होते आहे.

अजिंठ्यातील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी ही वाकाटक कालीन असून ती लेणी स्थापत्य व चित्रकला या दोन्ही दृष्टींनी इतर लेण्यांपेक्षा उत्कृष्ठ आहेत. 

एकंदरीतच त्या काळातील संस्कृत भाषा, कला, वाङ्मय या सर्वांच्या पुनरुज्जीवनाचे सारे श्रेय जरी गुप्त राजांना दिले गेले असले तरी खऱ्या अर्थाने ते श्रेय वाकाटकांचेच आहे. 

- प्राजक्ता देगांवकर

संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १४

विंध्यशक्ती पहिला

प्रथम विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा होय. याचे नाव पुराणांत तसेच अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यांमधील लेखात आलेले आहे. त्या लेखात विंध्यशक्तीचा हा द्विज म्हणजे ब्राह्मण असून त्याचे गोत्र विष्णूवृद्ध आहे असा उल्लेख आलेला आहे. त्यात विंध्यशक्ती चा 
' वाकाटकवंशकेतुः ' म्हणजे वाकाटक वंशाचे मानचिन्ह असा केलेला आहे. त्याची राजधानी ही पुरातन नगरी चनका ही होती. 

विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राजवटीमध्ये मोठ्या अधिकारावर असावा व त्यामुळेच त्याला पुढे राज्यसत्ता बळकावणे शक्य झाले असावे असे वाटते. त्याने इ.स २५० ते २७० असे राज्य केले असावे असे अनुमान आहे. पुराणांमध्ये आलेली त्याची ९६ ही कालगणना त्याच्या कारकिर्दीची नसून त्याच्या वयोमानाची असावी असे वाटते.

पुराणांच्या मते वाकाटकांचा पहिला प्रसिद्ध राजा विंध्यशक्ती होय. त्याने आपले राज्य विदिशेच्या आसपास पसरवले व वाढत वाढत साम्राज्याच्या दर्जाला पोहचवले.

अजिंठ्याच्या लेखात विंध्यशक्तीची मोठी स्तुती केलेली आहे. ' त्याने मोठ्या मोठ्या लढायांत विजय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते. तो क्रुद्ध झाला तर प्रत्यक्ष देवांनाही अनिवार्य होत असे. त्याच्या घोड्यांच्या टापांनी उडविलेल्या धुळीने आकाशात सूर्य झाकून जात असे. त्याच्या शौर्याने पराभूत झालेले शत्रू त्याच्या पुढे विनम्र होत’. एकंदरीतच विंध्याशक्ती हा एक प्रबळ राजा होता. त्याचा पराक्रमाची तुलना प्रत्यक्ष इंद्र व विष्णूशी केलेली आहे.
त्याने आपल्या कारकीर्दीत चार अश्वमेध आणि आप्तोर्यांम, बृहस्पतिसव, ज्योतिष्टोम, वाजपेयादी यज्ञ केल्याचे दिसते. 

विंध्यशक्तीच्या माघारी त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन राजा झाला. वाकाटक घराण्यातील हा सर्वात महत्त्वाचा राजा होय.

- प्राजक्ता देगांवकर
 

संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १५

प्रथम प्रवरसेन

विंध्यशक्ती नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन हा राजगादी वर बसला. हा वाकाटक वंशातील सर्वश्रेष्ठ नृपती होय. त्याने आपले राज्य सर्व दिशात पसरवले होते. प्रवरसेनाने उत्तरेत नर्मदेपर्यंत स्वारी करून पुरीका नगरी जी नागराजा दौहीत्र शिशुक याच्या ताब्यात होती ती जिंकून घेतली व तिथे आपली राजधानी वसवली. दक्षिणेत उत्तर कुंतलातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर हा भाग ही त्याच्या ताब्यात असावा तर पूर्वेस दक्षिण कोसल, कलिंग व आंध्र येथील राजांनी त्याचे वर्चस्व मान्य केले असावे. मात्र निश्चित पुराव्याअभावी प्रवरसेनाच्या साम्राज्याच्या सीमा सांगणे कठीण आहे. 

प्रवरसेन हा देखील आपल्या वडिलांनप्रमाणे वैदिकधर्माभिमानी होता. त्याने अनेक श्रौत याग केले. त्याच्या वंशजांच्या अनेक ताम्रपटात त्याने केलेल्या चार अशमेघ यज्ञांचा व सप्तसोम ( अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, व आप्तोर्याम ) यज्ञांचा उल्लेख आलेला आहे. पुराणांमध्ये त्याच्या वाजपेय यज्ञांचा व त्यात त्याने दिलेल्या बहुमूल्य दक्षिणांचा मुद्दाम निर्देश केलेला दिसतो. या वाजपेय यज्ञाच्या अनुष्ठानानंतर त्याने सम्राट ही अत्यंत मानार्ह पदवी धारण केली. दक्षिण भारतातील इतर कोणत्याही प्राचीन राजाने ही पदवी धारण केल्याचे इतिहासात नमूद नाही. 
त्याने आपल्या धर्मविजयत्वाची निदर्शक म्हणून ' धर्ममहाराज ' अशी उपाधीही धारण केली आपल्याला दिसते.

दक्षिण भारतात आपले सम्राटपद घोषित केल्यानंतर प्रवरसेनाने आपल्या उत्तर भारतातील सत्तेला बळकटी आणण्यासाठी तेथील भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडले. भारशिव हे नागवंशी असून मूळचे विदर्भातील असावेत. त्यांनी कुशाणांकडून हिंदूंना पवित्र असणारी प्रयाग व काशी ही दोन्ही धर्मक्षेत्रे आपल्या ताब्यात घेतली होती. भारशिव नृपती भवनाग याने आपली पुत्री प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र यास दिली होती. या वैवाहिक संबंधाने उत्तर भारतातील प्रबळ अश्या राजसत्तेचे पाठबळ वाकाटकांना मिळाले व त्यांची राज्यसत्ता दृढमूल होण्यास मदत झाली. 

पूराणांनूसार प्रवरसेनांने साठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर वाकाटक राज्याची चार शकले पडली. वर उल्लेखिलेला गौतमीपुत्र आधीच मरण पावल्याने त्याचा पुत्र रुद्रसेन हा गादीवर आला. त्याने उत्तर विदर्भावर पुरिका वा नंदिवर्धन ( सध्याचे नगरधन ) येथून राज्य केले. प्रवर्सनाचा दुसरा मुलगा असणाऱ्या सर्वसेन याने वत्सगुल्म ( आत्ताचे वाशिम, जी.अकोला ) येथून दक्षिण विदर्भावर राज्य केले. उर्वरित दोन पुत्र कुठे राज्य करत असावेत हे नक्की सांगता येत नसले तरी त्यापैकी एक कृष्णा नदीच्या खोऱ्यात उत्तर कुंतलवर तर दुसरा दक्षिण कुंतलवर राज्य करत असावा. मात्र या दोनही शाखांचे राज्य लवकर संपुष्टात आल्याने त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही. 

- प्राजक्ता देगांवकर


संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १६ 

प्रथम रुद्रसेन

प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र सातकर्णी हा पित्याच्या हयातीतच कालवश झाला होता. म्हणून सन ३३० च्या सुमारास प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा नातू प्रथम रुद्रसेन हा गादीवर आला. ही वाकाटकांची ज्येष्ठ शाखा होय. हा चक्रवर्ती गुप्त सम्राट समुद्रगूप्ताचा समकालीन होता. भारशिव वंशाच्या भवनाग राजाचा हा नातू असल्यामुळे त्याला भारशिवांचे खूप मोठे सहाय्य लाभलेले होते. त्याच्या वंशजांच्या लेखात याचे वर्णन ' भारशिव महाराज भवनाग याचा दौहित्र ' असा येतो. 

या राजाचा फक्त एकच शिलालेख आज पर्यंत सापडलेला आहे. 'प्राण्यांचे बंधन व हिंसा कोणीही करू नये ' अशी आज्ञा असणारा अशोकाचा शिलालेख रूद्रसेनाने वरून छिलून त्यावर आपला लेख कोरलेला आहे. लेखाचा उद्देश त्या ठिकाणी राजा रुद्रसेनाचे धर्मस्थान होते हे जाहीर करणे हा होता. रुद्रसेन हा भगवान शंकराने दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याकरिता उत्पन्न केलेल्या महाभैरवाचा भक्त होता. 

त्याकाळी नर्मदेच्या उत्तरेस अनेक राज्ये होती. त्यातील अनेक राज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेऊन आपल्या राज्यात जोडली. समुद्रगूप्ताने ज्या राज्यांचा समूळ उच्छेद केला त्यामध्ये नागदत्त, गणपती नाग व नागसेन हे नाग राजे देखील होते. त्यातील गणपती नाग हा भारशिव नृपती भवनागाचा उत्तरअधिकरी असावा. भवनाग हा रूद्रसेनाचा मातुल घराण्यातील आजोबा. समुद्रगूप्ताने या सर्व नागवंशीय राजांचे समूळ उच्चाटन केल्याने रुद्रसेनाला उत्तरेतील या राजांच्या पाठबळाला मुकावे लागले आणि त्याचे सामर्थ्य कमी झाले. 

उत्तर भारत जिंकून घेतल्यावर समुद्रगूप्त दक्षिण दिग्विजय करण्यास निघाला. त्याने दक्षिणेतील कोसल देशाचा राजा असणाऱ्या महेंद्र याचा पराभव केला. समुद्रगुप्ताच्या या विजयाने वाकाटकांच्या सामर्थ्यास मोठाच धक्का बसला. महाकांतारचा व्याघ्रराज, कुराळचा मण्टराज, पिष्टपूरचा महेंद्रगिरी या राजांनी वाकाटकांचे वर्चस्व झुगारून देऊन गुप्तांचे स्वामित्व कबूल केले. त्यामुळे वाकाटकांच्या या ज्येष्ठ शाखेचे राज्य नर्मदा नदी आणि विंध्याद्री पर्वतराजी यापूरतेच मर्यादित झाले. 
रुद्रसनाचे राज्य छोटे झाले असले तरी त्याने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले आणि बलाढ्य समुद्रगूप्तापुढे मान तुकवली नाही. 

सन ३५० च्या सुमारास प्रथम रुद्रसेनाचा पुत्र पृथ्वीषेण हा राज्यावर आला. हा देखील आपल्या वडिलांप्रमाणे शिव भक्त होता. त्याचा एकही लेख सापडलेला नाही असे असले तरी त्याचे उल्लेख त्याच्या वंशजांच्या लेखात आलेले आहेत. त्यात तो सत्य, ऋजुत्व, कारुण्य, शौर्य, विक्रम, बुद्धिमत्व, मनोनैर्मल्य इत्यादी गुणांविषयी त्याची ख्याती होती असे समजते. त्याची तुलना अजातशत्रू धर्मराजा सोबत केलेली आहे. त्यावरून त्याने कधीही परराज्यपहरणाकरिता युद्ध केले नव्हते असे म्हणता येईल. त्याने राज्य प्रसारापेक्षा आपल्या प्रजेकडे जास्त लक्ष दिले. त्याच्या काळात समुद्रगूप्ताने उत्तरेतील क्षत्रप राजांविरुद्ध युद्ध पुकारले. त्यावेळी दक्षिणेतील वाकाटकांनी सुद्धा त्याला मदत केली. गुप्त-वाकाटक युती मुळे क्षत्रपांचा सहज पाडाव झाला आणि उत्तर भारतातील गुप्तांचे राज्य निष्कंटक झाले. या प्रसंगी वाकाटकांशी घडून आलेल्या मैत्रीला चिरठायी बनवण्यासाठी चंद्रगुप्ताने आपली पुत्री प्रभावतीगुप्ता पृथ्वीषेणाचा पुत्र द्वितीय रुद्रसेन याला दिली. 
या घटनेपूर्वी पाच शतके आधी देखील शूंग काळात असाच माळवा आणि विदर्भ यांवर राज्यकरणार्या राजवंशात विवाहसंबंध आलेले होते. या पुरातन घटनेवर आधारलेले कविकुलगुरू कालिदासाचे 'मालविकाग्नीमित्र ' हे नाटक सुध्दा याच काळातील आहे. 

- प्राजक्ता देगांवकर


संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १७ 

द्वितीय प्रवरसेन

प्रथम पृथ्वीसेना नंतर त्याचा पुत्र द्वितीय रूद्रसेन राज्य करू लागला. त्याचा पिता व पितामह हे शिवोपासक होते, पण हा स्वतः मात्र चक्रपाणीचा ( विष्णू ) भक्त होता व त्याच्याच उपासनेमुळे आपल्याला राज्य प्राप्ती झाली अशी त्याची श्रद्धा होती. याचे कारण त्याची अग्रमहिषी ( पट्टराणी ) प्रभावतीगुप्ता ही विष्णू उपासक असून तिचा प्रभाव द्वितीय रुद्रसेनावर पडला असावा. तिने रामटेकच्या टेकडीवरील आपले दोन्ही ताम्रपट हे प्रबोधिनी एकादशीस उपवास करून पारण्याच्या प्रसंगी दिलेले आहेत. राज्यारोहणानंतर लगेचच द्वितीय रूद्रसेनाचा मृत्यू झाला. त्याचे दोन्ही पुत्र हे अल्पवयीन असल्याने प्रभावतीगुप्ता हीच आपला वडील पुत्र दिवाकरसेन याच्या नावाने राज्यशकट चालवत होती. तिला राज्यकारभारात मदत करण्यासाठी तिचे वडिल असणार्या समुद्रगुप्ताने अनेक कारभारी आणि मुत्सद्दी पाठवले होते, त्यामध्येच कवी कुलगुरू कालिदास ही असावा. विदर्भात असताना त्याने आपले प्रसिद्ध खंडकाव्य मेघदूत हे रचले. यातील शापित यक्ष रामगिरि जवळच्या ( आजचे रामटेक ) आश्रमात राहत होता असे वर्णन आहे. दुर्दैवाने दिवकरसेनही अल्पायुषी ठरला. त्याच्या अकाली निधनानंतर त्याचा छोटा भाऊ दामोदरसेन हा गादीवर आला. राज्यारोहणाप्रसंगी त्याने आपला सुविख्यात पूर्वज प्रवरसेन याचे नाव धारण केले. त्याने जवळपास तीस वर्षे राज्यकारभार केला. त्याच्या काळात नंदिवर्धन ही काही काळासाठी राजधानी होती मात्र नंतर त्याने प्रवरपुर हे नविन शहर वसवून या नवीन वसवलेल्या नगरीत आपली राजधानी स्थापन केली. 

द्वितीय प्रवरसेन हा शिव उपासक होता. मात्र आपल्या वैष्णव उपासक मातेच्या प्रभावतीगुप्तेच्या आज्ञेवरून त्याने भगवान रामचंद्रांच्या चरित्रावर ‘सेतुबंध’ हे काव्य रचण्यास सुरुवात केली. मात्र त्यात खूपच अडचणी येऊ लागल्या, चुका होऊ लागल्या हे त्याने स्वतः सांगितले आहे. या वेळी त्याने कालिदासाची मदत घेतली असावी. या कारणाने ते काव्य प्रवरसेनाच्या नावावर मोडत असेल तरी ते समुद्रगूप्ताच्या आज्ञेवरून कालिदासाने लिहिले असावे अशी समजूत प्रचलित झाली. तिचा उल्लेख या काव्याच्या प्रत्येक सर्गाच्या अखेरीस आढळतो. 

याच्या कारकिर्दीच्या शेवटी प्रभावतीगुप्ताचा मृत्यू झाला असावा. तिच्या स्मरणार्थ प्रवरसेन व त्याच्या बहिणीने रामटेक येथे ' प्रभावती स्वामिन ' या नावाने विष्णू ( नरसिंह) मंदिर बांधले, आणि सुदर्शन नावाचा तलाव ही खोदला. 
दुसऱ्या प्रवरसेनाच्या मृत्यू नंतर त्याचा पुत्र नरेंद्रसेन हा गादीवर आला.

- प्राजक्ता देगांवकर


संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १८ 

नरेंद्रसेन

द्वितीय प्रवरसेनानंतर त्याचा मुलगा नरेंद्रसेन हा सन ४३० च्या सुमारास गादीवर आला. त्यावेळी त्याचे वय बरेच जास्त असावे कारण त्याचा पिता असणाऱ्या द्वितीय प्रवरसेनाने दीर्घकाळ राज्य केले होते. नरेंद्रसेनाचा एकही लेख आजपर्यंत सापडलेला नाही. मात्र त्याचा पुत्र व मांडलिक राजे यांच्या लेखात त्याचे उल्लेख आलेले आहेत.

नरेंद्रसेनाने आपल्या राज्याच्या पूर्व व उत्तर दिशेस आक्रमक धोरण अवलंबिलेले दिसते. त्याचा मुलगा पृथ्वीषेण याच्या बालाघाट ताम्रपटात नरेंद्रसेनाने शौर्याने आपल्या कोसला, मेकला आणि मालव या शत्रूंचा पराभव केला होता, व या देशांचे अधिपती त्याच्या आज्ञा शिरसावंद्य मानत होते, असे वर्णन आलेले आहे. त्या काळात उत्तरेतील गुप्त राजवट ही निर्बल झाली असल्याने  त्यांची या भागांवरील पकड सैल झाली होती, याचाच फायदा नरेंद्रसेनाने घेतला व आपला राज्यविस्तार केला.
नरेंद्रसेनाचे लग्न हे कुंतल नरेशाची कन्या अज्झितभट्टरिका हीचाशी झाला होता. यावरून नरेंद्रसेनाने राज्यविस्तारासोबतच इतर राज्यांशी वैवाहिक संबंधही जोडलेले दिसतात. 

नरेंद्रसेनाच्या अखेरच्या काळात वाकाटक राज्यसत्तेवर नल राजा भगदत्तवर्मा याने प्रचंड मोठी स्वारी करून वाकाटकांचा बराचसा भाग जिंकून घेतला. त्या काळात वाकाटकांच्या घराण्याला वाईट दिवस आल्याचे स्वतः वाकाटक मान्य करतात. कारण द्वितीय पृथ्वीषेणाचा उल्लेख बालाघाट ताम्रपटात 'निमग्न वंशाचा उद्धर्ता ' असा आलेला आहे. 
नरेंद्रसेनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा द्वितीय पृथ्वीषेण हा गादीवर आला. त्याने प्रतिकूल परिस्थिती पाहून आपली राजधानी प्रवरपुराहून हलवून ती भंडारा जिल्ह्यातील आमगाव जवळ पद्मपुरी येथे नेली. तिथे आपले लष्करी सामर्थ्य वाढवून त्याने नल राजांवर आक्रमण केले आणि त्यांचे विदर्भातून संपूर्ण उच्चाटन केले. एवढेच नाही तर त्यांची राजधानी असणारी पुष्करी ही नगरी सुद्धा त्याने उध्वस्त केली.

द्वितीय पृथ्वीषेणाने पूर्वे सोबतच उत्तरेत ही आपली सत्ता दृढ केली. त्याने मेकला देशाच्या उत्तरेस असलेल्या चेदी देशापर्यंत आपले राज्य वाढवले. हे राजे आधी गुप्तांचे मांडलिक होते मात्र नंतर त्यांनी वाकाटकांचे स्वामित्व स्वीकारल्याचे दिसते. 

वाकाटक राजे हे शिवोपासक होते. याला दोनच अपवाद आहेत ते म्हणजे द्वितीय रूद्रसेन आणि हा शेवटचा राजा द्वितीय पृथ्वीषेण होय. द्वितीय पृथ्वीषेण हा स्वतः ला ' परमभागवत ' ( विष्णूचा निस्सीम भक्त) म्हणवून घेत असे. त्याचा अंत सन ४९० च्या सुमारास झाला असावा. यानंतर ज्येष्ठ शाखेचा प्रदेश वत्सगुल्म शाखेच्या हरिषेण या नृपतीच्या साम्राज्यात विलीन झाला. 

याप्रमाणे जवळपास सन ३३० ते ४९० अश्या १६० वर्षांच्या शासनानंतर वाकाटकांच्या ज्येष्ठ शाखेचा अस्त झाला. या शाखेतील राजे शुर, राज्यशासनकुशल, दानशील, वैदिकधर्माभिमानी, साहित्य आणि शिल्पादी कलांचे भोक्ते व आश्रयदाते होते. त्यांनी बांधलेली देवालये आज अस्तित्वात नसली तरी रामटेक व पवनार येथील अवशेषांवरून त्यांची भव्यता व शिल्पांची सुबकता यांची कल्पना येते. त्यांच्या काळात अनेक काव्ये निर्माण होऊन वैदर्भी रीतीला सर्वत्र मान्यता मिळाली. त्यातील कवी कुलगुरू कालिदासाचे मेघदूत हे संस्कृत महाकाव्य तर द्वितीय प्रवरसेनाचे महाराष्ट्री प्राकृतातील सेतूबंध किंवा रावणहो या काव्यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमुळे वाकाटकांच्या जेष्ठ शाखेतील राजे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे शासनकर्ते ठरले.



- प्राजक्ता देगांवकर


संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
प्राचीन महाराष्ट्रातील राजे 
भाग १९

राजा सर्वसेन

आत्तापर्यंत आपण वाकाटकांची ज्येष्ठ वा नंदिवर्धन ही शाखा बघितली, आता वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेतील काही महत्त्वाचे राजे पुढील भागात पाहू.

वत्सगूल्म शाखेची माहिती इतिहासाला तब्बल एकोणिसाव्या शतकापर्यंत नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठ्याच्या सोळा नंबरच्या लेण्यांमध्ये आहेत मात्र तो लेख अत्यंत खराब झाल्याने ती नावे बरोबर वाचता येत नव्हती. इ.स. १९३९ मध्ये वाशिम येथे ताम्रपट सापडला आणि या सर्व राजांची नावे वाचता आली. सोबतच या ताम्रपटावरून विंद्याध्री पर्वताच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी महत्त्वाची शाखा राज्य करत होती हे देखील सिद्ध झाले. 

या शाखेचा संस्थापक हा प्रथम प्रवरसेनाचा पुत्र सर्वसेन हा होता. याचे नाव अजिंठ्याच्या लेखात आणि वाशिम ताम्रपटात सुद्धा आले आहे. हा प्रवरसेनाचा धाकटा पुत्र असावा. त्याचा अंमल हा उत्तरेतील विंध्याद्री पासून, दक्षिणेत गोदावरी पर्यंत पसरलेला होता. या प्रदेशावर आपले स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी त्याला सोम नामक ब्राह्मणाचा पुत्र असणाऱ्या रवी या सचिवाने मदत केली होती. या रवीचे वंशज नंतर वत्सगूल्मच्या वाकाटकांचे कित्येक पिढ्यांपर्यंत मुख्य प्रधान झाले व त्यांची त्यांनी एकनिष्ठपणे सेवा केली. 
सर्वसेनाने आपल्या राजधानीसाठी वत्सगूल्म या प्राचीन पुण्यक्षेत्राची निवड केली. हे वत्सगुल्म म्हणजे आत्ताचे वाशिम होय. ‘ वत्सगुल्ममाहात्म्या’त म्हटले आहे की वत्स नामक ऋषींनी आपल्या आश्रमाजवळ देवांच्या गुल्मांची ( समुहांची) वस्ती करवली होती म्हणून त्याला वत्सगुल्म हे नाव पडले. वाकाटकांच्या राजवटीमध्ये वत्सगुल्म राजधानीची विद्या व संस्कृती यांचे प्रमुख केंद्र म्हणून मोठी ख्याती झाली सोबतच तेथील उत्कृष्ट प्राकृत काव्यामुळे ' वच्छोमी ' रीती सर्वत्र मान्यता पावली. 
सर्वसेनाने आपल्या वडिलांप्रमाणेच 'धर्ममहाराज ' ही पदवी धारण केलेली दिसते. त्याने ‘हरिविजय’ हे काव्य महाराष्ट्री प्राकृतात रचले होते. त्या काव्याची स्तुती संस्कृत कवी व अलंकारिक यांनी मुक्तकंठाने केलेली आहे. सर्वसेनाने सुमारे सन ३३० ते ३५५ अशी २५ वर्षे राज्य केले.  

त्याच्या माघारी विंध्यसेन हा राजगादी वर आला. याने चढाईचे धोरण स्वीकारले असावे. कारण त्याने कुंतलेशाचा पराभव केला असा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे. 
याच राजाने दिलेला वाशिम ताम्रपट हा वाकाटकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा पुरावा आहे. विंध्यसेनाने वाशिम ताम्रपट हा आपल्या कारकिर्दीच्या ३७ व्या वर्षी वत्सगुल्म राजधानी मधून दिला होता. या ताम्रपटात नंदिकोट जिल्ह्यातील एक गाव दान दिल्याचा निर्देश आहे. हे नंदिकोट म्हणजे हैद्राबाद संस्थानातील सध्याचे नांदेड होय. 
या ताम्रपटातील लेखाच्या सुरुवातीचा भाग हा राजवंशप्रशस्तीपर असून तो संस्कृत मध्ये आहे तर दानविषयक भाग हा प्राकृत मध्ये आहे. या आधील काही ताम्रपट मात्र संपूर्ण प्राकृत भाषेमध्ये कोरले गेलेले दिसतात. यावरून वाकाटक राजदरबारात संस्कृत भाषा हळू हळू मान्यता पावू लागल्याचे दिसते. 
विंध्यसेनाने आपल्या दोन्ही पूर्वजांप्रमाणे 'धर्ममहाराज ' ही पदवी धारण केली होती. विंध्यसेन हा नंदिवर्धनच्या प्रथम पृथ्वीषेणाचा समकालिन होता. 


- प्राजक्ता देगांवकर


संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
 
 

 




विदर्भातील वाकाटककालीन विटांची मंदिरे
वाकाटक हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध राजवंश. या राजवंशाच्या काळातील मंदिरांचे अवशेष मागील काही दशकांपासून विदर्भातील वेगवेगळ्या भागांत उत्खननाद्वारे उजेडात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे मिळालेल्या शिलालेखामध्ये वाकाटक नृपती पहिला रुद्रसेन याने बांधलेल्या ‘धर्मस्थानाʼबद्दलची माहिती मिळते. ‘धर्मस्थानʼ म्हणजे धार्मिक उपासनेचे स्थळ अथवा मंदिर. वाकाटककालीन मंदिरे विटांची तर आहेतच; परंतु प्रस्तर मंदिरेही आढळतात. विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन मंदिरांचे अवशेष विदर्भातील मांढळ, मुलचेरा, मनसर, नागरा व वाशिम येथे झालेल्या उत्खननात निदर्शनास आले आहेत. येथील मंदिरांचे अधिष्ठानापर्यंतचे अवशेष उपलब्ध होऊ शकले, मात्र मंदिरांच्या इतर भागांबाबत अंदाज करता आले नाहीत. असे असले तरी तत्कालीन मंदिरस्थापत्याच्या आधारे – उत्तर भारतातील गुप्तकाळातील मंदिरे – या मंदिरांच्या उर्वरित रचनेची कल्पना करता येते. त्याचप्रमाणे ही मंदिरे मंदिरस्थापत्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील, प्राथमिक (मांढळ, मुलचेरा) तसेच प्रगत अवस्थेतील (नागरा, मनसर, वाशिम) आहेत.
वाकाटककालीन मंदिराचे अवशेष, मनसर (नागपूर).
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मांढळ येथे १९७५-७७, १९८५ व १९९२ मध्ये करण्यात आलेल्या उत्खननात तीन मंदिरांचे अवशेष प्राप्त झाले. बोंगी हुडकी, भोला हुडकी व वऱ्हाडी तलाव या नावाने ही ठिकाणे ओळखली जातात. येथील पहिली दोन मंदिरे शेजारी, तर तिसरे ५०० मी. अंतरावर आहे. बोंगी हुडकी येथील मंदिररचनेत गर्भगृह व मुखमंडप असलेल्या मध्यम आकाराच्या मंदिराचे अवशेष उपलब्ध झाले. शेजारील भोला हुडकी या ठिकाणी आयताकृती ओटा असून त्याच्या अरुंद बाजू दक्षिणोत्तर आहेत. दक्षिण व उत्तरेकडे ओट्यावर जाण्यासाठी जिने आहेत. या मंदिरापुढे खाली अरुंद होत जाणारे पाच फुटांहून अधिक खोलीचे एक कुंड आहे. मंदिराजवळच पुजाऱ्यांची घरे असावीत. या सर्व वास्तूंभोवती प्राकार होता. प्राकाराच्या आत शैव व वैष्णव मूर्ती भग्नावस्थेत एकाच खड्ड्यात आढळल्या. वऱ्हाडी तलाव येथील मंदिररचनेत गर्भगृह आणि त्यात प्रवेशासाठी पायऱ्या होत्या. सोपानाला ४·४९ मी. लांबीचा कठडा आहे. कठड्याच्या उभ्या बाजूंना नंतरच्या काळात वालुकाश्म घडीव चिरे लावलेले आढळतात. ही चिऱ्यांची भिंत प्रणालकाच्या पातळीपर्यंत आहे. उत्खननादरम्यान प्रतिहारीचे व सिंहाचे शिल्प तसेच गर्भगृहात शिवलिंग सापडले. या मंदिराचा काळ इ. स. चौथे–पाचवे शतक असा ठरतो.
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे १९८७-८८ आणि १९८८-८९ या काळात झालेल्या उत्खननात दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. गावाच्या सीमेलगत असलेल्या टेकाडातील (विवेकानंदपूर) उत्खननात मंदिराच्या तलविन्यासावरून मुखमंडप व त्याला लागून गर्भगृह अशी रचना दिसून आली. या मंदिराचे पीठ बांधताना पवनी येथील स्तूपामध्ये (जगन्नाथ टेकडी) अंमलात आणलेल्या तंत्राचा प्रभाव असल्याचे दिसून आले. दुसऱ्या मंदिराचे अवशेष विशेष उल्लेखनीय नाहीत.
नागपूर जिल्ह्यातील मनसर (ता. रामटेक) येथे गावापासून पूर्वेला १ किमी. अंतरावर प्राचीन काळातील विटांनी बांधलेली चार मंदिरे हिडिंबा टेकडीच्या उत्खननात उजेडात आली (१९९८–२००८). उत्खनकांच्या मते, यांतील भव्य शिवालय व शिवमंदिर समूह ही दोन मंदिरे ही वाकाटक काळातील होत, तर दुसरी दोन मंदिरे वाकाटकपूर्व काळातील असावीत. या मंदिरांच्या गर्भगृहांचा तलविन्यास तारांकित असून इ. स. दुसऱ्या शतकातील ही सर्वांत प्राचीन मंदिरे होत.
भव्य शिवालय : या मंदिराचे अवशेष हिडिंबा टेकडीच्या माथ्यावर पश्चिमेला निदर्शनास आले. पाषाणाची पायाभरणी केलेल्या या मंदिराच्या वास्तुरचनेचे दोन टप्पे आढळतात. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरास पूर्वेकडे अर्धमंडपास (४·३०×८ मी.) प्रवेशाकरिता पायऱ्या होत्या. अर्धमंडपाच्या पश्चिमेला मंडप (६×५ मी.) व त्यालगत गर्भगृहाचे (५×५ मी.) अवशेष आढळले. हे गर्भगृह फरश्यांनी आच्छादले होते, तर फक्त मंडपाच्या जोत्याचे बांधकाम पाषाणात केले होते. गर्भगृह व मंडपाभोवती २ मी. रुंद प्रदक्षिणापथ होता. मंदिराचा वरचा भाग विटांनी बांधलेला तसेच अलंकारित केलेला असावा, असे अनुमान करण्यात आले. त्याचप्रमाणे वाकाटक काळातील शिल्पपरंपरेतील शिल्पेही उत्खननात सापडली. या मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती याच मंदिराच्या नैर्ऋत्य भागातून १९७० साली सापडलेल्या प्रख्यात शिवाची (वामनठेवणीची) असावी. तसेच हे मंदिर वाकाटक नृपती प्रवरसेन (पहिला) याने बांधले असावे, तर प्रवरसेन (दुसरा) याने आपल्या आजोबांच्या (प्रवरसेन पहिला) स्मरणार्थ याचे पुनर्नामांकन केलेले ‘प्रवरेश्वर देवकुलस्थानʼ असावे, असे अनुमान उत्खनकांनी केले आहे.
शिवमंदिर समूह : वाकाटक काळातील दुसरे विटांचे भव्य मंदिर फक्त जोत्याच्या अवशेषरूपाने हिडिंबा टेकडीच्या उत्तर-नैर्ऋत्य-पश्चिम उतारावर आढळले. या मंदिराच्या वास्तुरचनेसंदर्भात दोन टप्पे दिसून आले. टेकडीची नैसर्गिक रचना कायम राखण्याकरिता बांधलेल्या विराट भिंतीच्या साहाय्याने टेकडीच्या माथ्यावर सपाट चौथरा करून त्यावर हे मंदिर उभारले गेले. या मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिराच्या भोवती जोत्यावर लहान लहान २ मी. उंचीची प्रतिमागृहे (shrines) व त्यात देवकोष्ठे (niches) होती. ही अष्टकोनी पन्हाळीसदृश वास्तुरचना असलेली प्रतिमागृहे कौशल्यपूर्ण नियोजनातून तीन स्तरांवर निर्माण केली गेली व तेथे जाण्याकरिता पायऱ्या केल्या गेल्या. या मंदिरसमूहाची प्रतिमागृहे ऊर्ध्वरेषेत संकल्पित केली गेली. ही प्रतिमागृहे कमळाच्या कळीचा आकारात व भौमितिक त्रिकोणांचा कल्पकतेने वापर करून प्रतिमागृहांच्या शिखराचे प्रयोजन केलेले आढळते. उत्तरेकडील काही प्रतिमागृहांतून काही प्रतिमांचे भग्नावशेष मिळाले, तर पश्चिम आणि दक्षिणेकडील सोळा प्रतिमागृहांपैकी सहांमध्ये वैविध्यपूर्ण शिवलिंगे आढळून आली. पुरातत्त्वज्ञ अरविंद जामखेडकर यांच्या मते, वाकाटक काळातील ही मंदिरे पाशुपत संप्रदायाशी निगडित असावीत.
गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील भैरव टेकडीवर १९७९-८२ दरम्यान उत्खनन केले गेले. यात भव्य वेदिबंध असलेल्या जगतीमध्ये (२७×४२ मी.) पूर्वाभिमुख मंदिरात पूर्वेकडे पायऱ्यांची रचना केली होती. पीठाचा पश्चिम भाग व्यापणाऱ्या गर्भगृहाच्या (५ चौमी.) आतबाहेर जाणाऱ्या बाह्यरेषेचे काही भाग पीठाच्या थरांवरही दिसून येतात. टेकाडाच्या पृष्ठभागावर आढळलेले शिवलिंग याच मंदिरातील असल्याचे मानले जाते.
येथील मंदिररचनेमध्ये भूतप्रणाल असलेल्या गर्भगृहाव्यतिरिक्त अंतराळ व मंडपाचे अवशेष सापडले. मंडपात जाण्याकरिता पायऱ्या व त्यांच्या दोन्ही बाजूंना छोटेखानी देवळे होती. वैशिष्ट्यपूर्ण जगतीवरील वेदिबंधात खूर थराच्या वर कुंभ थर असून त्याच्यावर साध्या चौरस अर्धस्तांभानी बनलेले देवकोष्ठ आहेत. मध्यप्रदेशातील भूमरा येथील शिवमंदिराशी साधर्म्य असलेले हे मंदिर इ. स. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले असावे.
वाशिम येथे १९९१-९२ आणि १९९४-९५ या काळात झालेल्या उत्खननांत दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. यांतील पहिल्या उत्खननात फुकटपर भागात तारांकित तलविन्यास असलेले मंदिराचे १४×१२ मी. अंडाकृती आकाराचे बांधकाम निदर्शनास आले. इंग्रजीतील ‘एलʼ आकाराच्या विटांचा कौशल्यपूर्ण वापर करून मंदिराच्या पदविन्यासाचा तारांकित आकार प्राप्त केलेला आढळतो. एकूणच वास्तूच्या मधोमध अष्टकोनाकृत चौरस संरचना होती; त्यात शिवलिंग असण्याची शक्यता वर्तविली आहे. तारांकित तलविन्यास प्रकारच्या मंदिरविकासाची प्राथमिक अवस्था हे मंदिर सूचित करते.
वाशिममधील लाल देऊळ भागात झालेल्या उत्खननात (१९९४-९५) मंदिराच्या ७० मी. पूर्व-पश्चिम प्राकारालगत चार वास्तुशेष आढळले. त्यांतील एक अंडाकृती असून त्याचा तलविन्यास तारांकित असला, तरी तो बहुकोनविरहित आहे. येथील मंदिररचनेमध्ये अष्टकोनी गर्भगृह आणि आयताकार मुखमंडपाचे पुरावशेष निदर्शनास आले.
संदर्भ :
Jamkhedkar, A. P. Ed., Doshi, S. ‘Ancient Structuresʼ, Marg, Vol. 37, Bombay, 1983.
Sharma, A. K. & Joshi, Jagatpati, Excavations at Mansar, Delhi, 2015.
Singh, H. N. & Trivedi, Preety A. Eds., Mandhal Excavations (1975-77), Nagpur, 2019.
जामखेडकर, अ. प्र. ‘स्थापत्य व कला – प्रारंभिक ऐतिहासिक काळ ते यादव काळʼ, महाराष्ट्र : इतिहास – प्राचीन काळ (खंड : १, भाग : २), महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर, मुंबई, २००२.













मध्य भारत आणि दख्खनमधील प्रसिद्ध प्राचीन राजवंश. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापर्यंत वाकाटक राजवटीच्या घडामोडींचे अवलोकन गुप्त साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यातच केले जात असे. विशेषतः या काळातील कला इतिहासाचे गुप्त-वाकाटक अशा संयुक्त शीर्षकाखालीच वर्णन केले गेले. त्यामुळे वाकाटक कालखंडातील कला ही शैलीच्या दृष्टीने स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण कला होती, याची दखल घेतलेली दिसत नाही. परंतु अलीकडे झालेल्या विपुल संशोधनानंतर वाकाटक कालखंडाचे भारतीय कलाइतिहासातील योगदान समोर आले. विशेषत: काही कला प्रकारांमध्ये हा काळ जागतिक कला इतिहासात मानाने गौरविलेला आहे. उदा., अजिंठा. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला आणि इतर तत्कालीन कलाविशेषांचा विचार केला गेलेला आहे.

वाकाटककालीन वामनशिव प्रतिमा शिल्प.

इ. स. तिसर्‍या शतकाच्या मध्यावधीत वाकाटक घराण्याचे स्वतंत्र अस्तित्व मध्य भारत (दक्षिण माळवा) आणि विदर्भात स्थापित झाले. इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाकाटक प्रबळ राजसत्ता म्हणून दख्खन आणि त्या लगतच्या प्रदेशांवर राज्य करीत होते. या घराण्याच्या मुख्यत: नंदिवर्धन (नगरधन, जि. नागपूर) आणि वत्सगुल्म (वाशीम) अशा दोन प्रमुख शाखा होत्या. उपलब्ध पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे या दोन शाखांचे ऐतिहासिक अस्तित्व दिसते. वाकाटक राजसत्तेचा परमोच्च सत्ताविस्तार हा प्रवरसेन दुसरा या राजाच्या कालखंडात झाल्याचे अभिलेखीय पुराव्यांवरून स्पष्ट होते. उत्तरेकडे विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेत कुंतल (उत्तर कर्नाटक) देश, तर पूर्वेकडे दक्षिण कोसल (छत्तीसगढ) पासून पश्चिमेकडे कोकणपर्यंत त्यांच्या राज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. हा भौगोलिक विस्तार वाकाटक कालखंडातील कला समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

सातवाहन काळात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र हा सत्तेच्या केंद्रस्थानी होता. परंतु वाकाटक काळात हे सत्तेचे केंद्र पूर्व विदर्भाकडे स्थलांतरित झाल्याचे दिसते. हा प्रदेश अगदी प्रारंभिक काळापासून विविध प्रकारच्या जनजमातींच्या समुदायांनी व्यापलेला होता. या सामाजिक पार्श्वभूमीचा सुद्धा वाकाटक कलेच्या प्रारंभिक शैलीवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. वरील संक्षिप्तपणे वर्णन केलेल्या भू-राजकीय परिप्रेक्ष्यातच कलाइतिहास तज्ज्ञांनी वाकाटक कलेची निर्मिती, विस्तार व प्रभावाचा विचार केलेला आहे. वाकाटक कला आणि त्या कलेची वैशिष्ट्ये पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे : वाकाटक कलेची पार्श्वभूमी कशी तयार झाली? वाकाटक कलेची मानक वैशिष्ट्ये कोणती? वाकाटक कलेवर समकालीन इतर शैलींचा प्रभाव होता काय? वाकाटक शैलीचा वाकाटकोत्तर कालखंडात प्रभाव कसा आणि कितपत कायम राहिला? या सर्व प्रश्नांचा संक्षिप्त वेध खालीलप्रमाणे घेता येईल.

वाकाटक काळात स्थापत्य कला (लेणी व बांधीव मंदिरे), शिल्पकला, मृण्मयकला, कांस्य शिल्पकला, हस्तिदंत कला आणि चित्रकला इत्यादी कला प्रकार आढळतात. प्रारंभी शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे परिशीलन केले आहे. शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे दोन कालखंड दृग्गोचर होतात. वाकाटक काळातील कलेचा प्रारंभबिंदू म्हणून मांढळ (जि. नागपूर) येथील उत्खननात मिळालेल्या शिल्पांचा विचार करता येईल. या उत्खननात विविध देवदेवतांच्या प्रतिमा मिळाल्या. या प्रतिमा तत्कालीन प्राचीन भारताचा धार्मिक इतिहास आणि दख्खन मधील शिल्पकलेचा संपूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

वाकाटककालीन शिल्प.

सूक्ष्म अभ्यासांती मांडलेल्या निरीक्षणानुसार असे लक्षात येते की, वाकाटक कलेची वैशिष्ट्ये स्थानिक प्रेरेणेतूनच वृद्धिंगत झालेली असावी. या प्रेरणात्मक भागाची पृष्ठभूमी अमरावती, नागार्जुनकोंडा (आंध्र प्रदेश), वनवासी, कनगनहल्ली (कर्नाटक) आणि तेर (महाराष्ट्र) इ. ठिकाणी उपलब्ध झालेल्या शिल्पांवरून स्पष्ट होते. सुबक ठेंगणा बांधा, विस्तीर्ण खांदे, काहीसी जाड शरीररचना, लंब गोलाकार चेहरा, उठावदार विस्तीर्ण भाल प्रदेश, ओठाचा खालील काहीसा समोर आलेला जाडसरभाग, ठळक रेखीव डोळे, काहीसे पसरट नाक, विविध प्रकारची केशरचना (विशेषत: अगदी प्रारंभिक काळापासून कुरळ्या केसांचा अतिशय कल्पक वापर केशरचना करताना शिल्पकारांनी केलेला दिसतो), जाडेभरडे अधोवस्त्र आणि उत्तरीय, ठळक आणि मोजकेच अलंकार, आयुधे इत्यादी. या शिल्पांच्या आधारावर हे ही लक्षात येते की, तत्कालीन यक्ष प्रतिमांचा या शिल्पकलेवर प्रभाव असावा. त्यासोबतच सातवाहन-ईश्वाकु कालखंडाच्या उत्तर काळात ब्राह्मण आणि बौद्ध धर्मात आमुलाग्र बदल घडून येत होता. या बदलांमुळे विविध प्रतिमांच्या निर्मितीसाठी पोषक प्रेरणात्मक पार्श्वभूमी तयार होत होती. त्याची परमावधी आणि परिणती वाकाटक शिल्पकलेत झालेली आढळते.

मांढळ येथे मिळालेल्या प्रतिमांत अष्टमुख शिव (?), द्वादशमुख शिव (सदाशिव ?), संकर्षण (बलराम), वासुदेव (विष्णू), पार्वती, नैगमेष, देवी (दुर्गा) आणि ब्रह्मा इ. शिल्पांचा समावेश आहे. मध्य भारतात गुप्त साम्राज्याचा विस्तार होत होता. याच काळात (कुषाण/उत्तर कुषाण) सुदूर उत्तरेत मथुरेच्या आसपास आणि त्या लगतच्या प्रदेशात शिल्पकलेच्या संदर्भात आमुलाग्र बदल घडून येत होते. विविध कल्पनांचा वापर या ठिकाणी होत होता. या बरोबरच, याहीपलीकडे गांधार प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण धर्मांच्या प्रतिमा निर्मितीच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग होत होते. वरील तीन मुख्य ठिकाणी प्रयोगांशी काही अंशी स्पर्धा करेल अशा कल्पनांचा वापर वाकाटक शिल्पकलेत दिसतो. या प्रयोगांच्या आधारावरच वाकाटक शिल्पकलेची मानके तयार झालेली असावी. या शिल्पकलेचे संपूर्ण सौंदर्यशास्त्र स्थानिक असल्याचे या आधारावर स्पष्ट होते. कारण या शिल्पांशी तुलना करावी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्ण अभाव या काळात दिसतो. या काळात तयार होत असलेल्या प्रतिमानिर्मितीवर प्रारंभिक काळातील वैष्णव आणि शैव धर्मांच्या संकल्पनांचा मोठा प्रभाव असल्याचे अभ्यासकांनी निदर्शनास आणले आहे.

केवल नृसिंह शिल्प, रामटेक (नागपूर).

वाकाटक कलेचा दुसरा आणि महत्त्वाचा कालखंड प्रवरसेन दुसरा याच्या काळात सुरू झाल्याचे दिसते. या काळातील शिल्पकलेचे नमुने रामटेक, पवनार, मनसर, भद्रावती, भटाळा, पातुर, हमलापुरी, नगरधन, अजिंठा, घटोत्कच आणि सालबर्डी (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. या बदलांचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन ताम्रपत्रातील मजकुरावरसुद्धा पडल्याचे दिसते. या काळात वाकाटक शिल्पकला मोठ्या प्रमाणात कलेच्या दृष्टीने परिष्कृत झाल्याचे दिसते. आपल्या स्थानिक कलेचे सत्व न विसरता आवश्यक ते बदल या काळात केले गेले. या बदलावर याच काळात उत्तरेत आणि मध्य भारतात जे शिल्पकलेत बदल घडत होते, त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: शिल्पांची प्रमाणबद्धता, सुबक आणि रेखीव शरीर रचना. उदा., पवनार (जि. वर्धा)  येथील गंगेची प्रतिमा, गोलाकार चेहरा, सुंदर रेखीव डोळे, तलम वस्त्राचे अंकन, किंचित वाढलेले परंतु, सुबक अलंकरण उदा. मनसर येथील वामनशिव (?) प्रतिमा  इत्यादी. या काळात शिल्पांच्या विषयात सुद्धा वैविध्य आढळते. उदा., पवनार येथे खोदकामात मिळालेल्या रामायण आणि कृष्ण लीलांशी संबंधित शिल्पपट. या शिल्पांमध्ये त्या त्या देवतेच्या प्रकृतीधर्मानुसार त्यांचे दर्शन शिल्पकारांनी घडवल्याचे जाणवते. या काळातील शिल्पांमध्ये एक प्रकारचा राजस भाव प्रदर्शित होतो. त्यासोबतच देवदेवतांच्या शिल्प विषयांचे वैविध्य आणि कल्पकता पुरेपूर जपल्याचे दिसते. उपलब्ध प्रतिमांवरून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे स्थान या काळात दृढ झाल्याचे स्पष्ट होते.

या काळातील शिल्पकलेच्या परमावधीचे मानबिंदू म्हणून काही शिल्पांचा निश्चितच उल्लेख करता येईल. उदा., रामटेक येथील केवल नृसिंह/रुद्र नृसिंह, मनसर येथील वामन शिव (?) आणि पवनार येथील गंगेची प्रतिमा. ही शिल्पे वाकाटक कलेची स्वयंसिद्ध वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यास आणि समग्रपणे समजून घेण्यास पुरेशी आहेत. कलाइतिहास तज्ज्ञांनी या शिल्पांची प्रशंसा केलेली आहे. वरील उल्लेखित प्रतिमांत रामटेक येथील केवल नरसिंहाचे शिल्प वाकाटक राजवंशाच्या राजकीय प्रभाव आणि अस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.

वाकाटक काळातील शिल्पे ही मुख्यत: अग्निजन्य आणि वालुकाश्म या दोन प्रकारच्या दगडांत शिल्पांकित केली आहेत. माहुरझरी, पवनार, भोकरदन, मनसर, वाशीम आणि नगरधन आदी ठिकाणी उत्खननात उपलब्ध झालेल्या प्रतिमांत लज्जागौरी, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती इ. देवतांच्या दगडाच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. या सर्व प्रतिमा आकाराने जरी लहान असल्या, तरी शिल्पांकनाच्या दृष्टीने तत्कालीन आकाराने भव्य शिल्पांच्या प्रतिकृती वाटतात. या शिल्पांच्या आधारे प्रचलित लोकधर्मासोबतच शैव आणि वैष्णव संप्रदायाचा कसा प्रसार झाला, हे समजावून घेता येते.

अजिंठा येथील शैलगृहांमध्ये असेलेल्या शिल्पांतून बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पकलेचा वाकाटक काळात कसा विकास झाला, याचे उत्कृष्ट दिग्दर्शन होते. येथील शिल्पकला वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेच्या साहाय्याने जरी विकसित झाली असली, तरीही तिचा नंदिवर्धन शाखेशी अन्योन्य संबंध आढळतो. उत्कृष्ट उठावात कोरलेली ही शिल्पे प्रमाणबद्धता, शरीर लय आणि बोलके भाव या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. अजिंठा येथील शिल्पकलेतून होणारे बुद्धाचे विलोभनीय दर्शन वाकाटक काळातील कलेचा परमोत्कर्ष म्हणून उल्लेख केला जातो. विशेषतः बुद्धाचे महापरिनिर्वाण शिल्प बुद्धाच्या महाकारुणिक अवस्थेचे अप्रतिम भावदर्शन म्हणून भारतीय कला क्षेत्रात उदाहरण दिले जाते. याठिकाणी असलेल्या शिल्पांची प्रमाणबद्धता ही तत्कालीन चित्रकलेशी साधर्म्य आणि संवाद साधणारी आहे, असे कलातज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.

या काळात शिल्पकलेची जी वैशिष्ट्ये वृद्धिंगत होत होती, त्या वैशिष्ट्यांचा प्रभाव आणि प्रसार वाकाटकांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली असलेल्या प्रदेशासोबतच त्यांचे मांडलिक असलेल्या प्रदेशांतील शिल्पकलेवर पडलेले दिसते.  उदा., कोकण मौर्य, कदंब, नल, पांडूवंशी, सोमवंशी इ.

वाकाटक सत्तेचा अस्त झाल्यानंतर दख्खनमध्ये वनवासीचे कदंब, बदामीचे चालुक्य, दक्षिण गुजरात, कोकण, माळवा आणि उत्तर महाराष्ट्रात महिष्मतीचे कलचुरी, दक्षिण कोसलमध्ये पांडूवंशी या राजवंशाच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांत जे स्थापत्य आणि शिल्पकला निर्माण होत होती, या सर्वांवर वाकाटक कलेचा मोठा प्रभाव होता. पुढे राष्ट्रकुट काळात वाकाटक कलेच्या पार्श्वभूमीवर दख्खनमधील कलेचा विस्तार आणि प्रसार झाल्याचे दिसते.

वाकाटक काळात मृण्मय कलेचे स्वतंत्र स्थान होते. परंतु सातवाहन काळात मृण्मय कलेचे प्रयोग झाले, तसे वाकाटक काळात आढळत नाहीत. ज्या मोजक्या मृण्मय प्रतिमा पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि उत्खननांतून उपलब्ध झाल्या, त्यावरून या काळातील मृण्मय कलेचे आकलन करता येते. हाताने तद्वतच साच्यात तयार केलेल्या मृण्मय प्रतिमा या काळातील मिळतात. प्रतिमांचा विषय आणि त्यांची घडण यांवर तत्कालीन दगडी शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. उपलब्ध मृण्मय प्रतिमांत विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांची खेळणी, अलंकार, शिक्के, शिक्क्यांचे छाप, गृह सजावटीच्या वस्तू, देवदेवतांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत. विशेषतः अलीकडेच मनसर, चंदनखेडा आणि नगरधन येथे झालेल्या उत्खननांतून वाकाटककालीन उत्कृष्ट मृण्मय प्रतिमा उपलब्ध झाल्या आहेत. चंदनखेडा (जि. चंद्रपूर) येथील उत्खननात आढळलेली मृण्मय प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. साच्यात तयार केलेली ही मृण्मय प्रतिमा मूळ स्वरूपात गोलाकार असावी. या प्रतिमेत दर्शनी बाजूस हलक्या उठावात स्त्री आणि पुरुष प्रतिमेचे अंकन असून ते गंधर्व युगल असावे. कारण या अंकनात आकाशस्थ विहरण्याचे प्रतिमांकन अतिशय जिवंतपणे केले आहे. या मृण्मय प्रतिमेवर तत्कालीन चित्रकला आणि शिल्पकलेचाही प्रभाव दिसतो.

वाकाटक काळातील कांस्य शिल्पांचे फार मोजकेच पुरावे उपलब्ध आहेत. या उपलब्ध पुराव्यांमध्ये हमलापुरी (जि. नागपूर) येथे खोदकामात मिळालेल्या कांस्य शिल्पांचा उल्लेख करता येईल. या बुद्ध प्रतिमा असून तत्कालीन कांस्य शिल्पात उत्कृष्ट प्रतिमा म्हणून गणल्या जातात. कांस्य धातूच्या ओतीव प्रकाराद्वारे या प्रतिमांची निर्मिती केली आहे. या कांस्य प्रतिमा सारनाथ (उत्तर प्रदेश) आणि नालंदा (बिहार) येथे प्राप्त झालेल्या कांस्य प्रतिमांशी कलात्मक साधर्म्य दर्शवितात.

वाकाटक काळात इतर कलेच्या प्रकारांमध्ये हस्तिदंतावरील कलाकुसरीच्या वस्तू, हाडांवरील कोरीव काम यांचा उल्लेख करता येईल. या वस्तूंचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. उदा., कज्जलशलाका, सारीपाटच्या खेळातील सोंगट्या, केस विंचरण्याचा कंगवा, चाकू इत्यादी. परंतु कलात्मक दृष्ट्या विशेष उल्लेखनीय असे यांमध्ये आढळून येत नाही.

अशा प्रकारे प्रामुख्याने दोन मुख्य कालखंडात वाकाटक कलेचा विचार करता येतो. मांढळ हे प्रारंभिक काळातील, तर नंदिवर्धन (नगरधन), रामटेक, मनसर इ. ठिकाणी वाकाटक कलेच्या द्वितीय कालखंडातील शिल्पे उपलब्ध झाली. या दोन्ही कालखंडांच्या सूक्ष्म अवलोकनातून वाकाटक कलेचा अभिजाततेकडे झालेल्या प्रवासाचा समग्र अभ्यास करता येतो.

संदर्भ :

  • Bakker, Hans, The Vākātakas : An Essay in Hindu Iconology, Groningen, 1997.
  • Jamkhedkar, A. P. Eds., Gai, G. S. & Asher, M.  ‘Narrative Sculptures from Paunar : A Reappraisal’, Indian Epigraphy ; Its Bearing on the History of Art, pp. 83-86, New Delhi, 1985.
  • Sharma, A. K. & Joshi, Jagat Pati, Excavations at Mansar, Delhi, 2015.
  • Singh, H. N. & Trivedi, Preety A. Mandhal Excavation (1975-77), Nagpur, 2019.
  • Soundara Rajan, K. V. Art of South India-Deccan, Delhi, 1980.
  • Welankar, Vaishali, Vaishnavism : An Iconographic Study, 2 vols., Delhi, 2009.
  • जामखेडकर, अ. प्र. पुरासंचय (भाग १), पुणे, २०१६.
  • मिराशी, वा. वि. वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
  • मेश्राम, प्र. शा.; खोब्रागडे, प्रि. आणि गणवीर, श्रीकांत, भद्रावतीचे पुरातत्त्वीय वैभव, नागपूर, २००४.

चित्रसंदर्भ : केवल नृसिंह शिल्प, रामटेक, जि. नागपूर (डॉ. अभिजित दांडेकर यांच्या सौजन्याने).



नगरधन (Nagardhan)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर शहराच्या ईशान्येस ४० किमी. आणि रामटेकच्या दक्षिणेस ६ किमी. अंतरावर वसले आहे. येथील प्राप्त पुरातत्त्वीय अवशेष आणि अभिलेखीय संपदा लक्षात घेऊन नगरधन हे वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहर प्राचीन नंदिवर्धन असावे, अशी शक्यता पुरातत्त्वज्ञ रावबहादूर हिरालाल यांनी सर्वप्रथम व्यक्त केली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले.

वाकाटककालीन राजप्रासादाचे अवशेष, नगरधन.

इ. स. ३५० च्या दरम्यान वाकाटकसम्राट पृथिवीषेण यांनी वाकाटक साम्राज्याची राजधानी पद्मपूरवरून नंदिवर्धनला स्थलांतरित केल्याचा उल्लेख ताम्रपटातून प्राप्त होतो. वाकाटक कालखंडात नंदिवर्धनहून ११ ताम्रपट पारित केले होते. वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ताच्या राज्यकाळाच्या तेराव्या वर्षी पारित केलेल्या पुणे ताम्रपटात नंदिवर्धनचा उल्लेख सर्वप्रथम आढळून येतो. सम्राट प्रवरसेन दुसरा याच्या उत्तरार्धात राजधानी नंदिवर्धनहून प्रवरपूर (पवनार-वर्धा) येथे स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. त्या संदर्भात एकट्या दुसऱ्या प्रवरसेनाचे दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वाकाटक कालखंडांनंतरसुद्धा नल आणि राष्ट्रकूट राजवंशांनीही नंदीवर्धनवरून ताम्रपट पारित केल्याचे दिसून येते. येथे दक्षिणस्थित असलेल्या किल्ल्याचे गोंडराजवटीत बांधकाम झाले असून भोसलेराजवटीत किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय यांनी १९८०–८५ च्या दरम्यान येथे केलेल्या पुरातत्त्वीय समन्वेषणात ऐतिहासिक कालखंडातील मृद्भांडी आणि शिल्पावशेष सापडले आहेत.

वाकाटककालीन नागरी वसाहतीचे अवशेष, नगरधन.

वाकाटक ताम्रपटांत वर्णित नंदिवर्धन हेच सध्याचे नगरधन आहे, याची पुरातत्त्वीय दृष्ट्या उकल करण्यासाठी, तसेच वाकाटक कालखंडातील वसाहतीक रचना आणि नगररचनेवर प्रकाश टाकण्यासाठी नगरधनचे उत्खनन केले गेले (२०१५-१८). महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय, नागपूर विभागाचे विराग सोनटक्के, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे श्रीकांत गणवीर आणि शंतनू वैद्य यांच्या निदर्शनाखाली या स्थळाचे संयुक्तपणे विस्तृत उत्खनन केले गेले.

या प्राचीन स्थळाची व्याप्ती साधारणत: १·५ किमी. क्षेत्रात पसरली आहे. सहा सांस्कृतिक कालक्रम नगरधनच्या उत्खननातून उजेडात आले आहेत, ज्यात पहिला कालखंड प्रारंभिक लोहयुगाशी निगडित असून दुसरा मौर्य आणि सातवाहनपूर्व काळ, तिसरा सातवाहन आणि क्षत्रप काळ, चौथा वाकाटक, पाचवा पूर्वमध्ययुगीन कालखंड आणि सहावा मध्ययुगीन कालखंड आहे. या उत्खननात प्रामुख्याने काळी-तांबडी, तांबडी, लाल लेपयुक्त, काळी अशा विविध रंगांतील मृद्भांडी आणि पाणतीराकृती (टॉरपिडो) कुंभ आदी अवशेष सापडले. किल्ल्यात केलेल्या उत्खननात वाकाटक कालखंडातील भव्य भिंतीचे अवशेष सापडले, जे राजप्रासाद किंवा राजकीय आश्रयातून निर्मित भव्य वास्तूचे अवशेष असण्याची शक्यता आहे. उत्खननात नागरी वसाहतीचे पुरावे प्राप्त झाले असून घरांची रचना सामान्य आहे. प्रामुख्याने घरांचा जोता विटांनी बांधलेला आहे. भिंती कुडाच्या असून विटांनी आच्छादित केल्या होत्या. गावाच्या पश्चिमेस असलेल्या कोटेश्वर देवस्थानाजवळ वाकाटक काळातील प्राचीन बंधाऱ्याचे अवशेष आढळून आले. यावरून येथील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धतीवर प्रकाश पडतो.

सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, विष्णुकुंडीन, इंडो-ससॅनियन आणि बहमनी या राजवंशांची नाणी उत्खननात प्राप्त झाली आहेत. वाकाटक राजवंशाची नाणी स्तरीय संदर्भातून प्राप्त झाली आहेत. या उत्खननात वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ताची मुद्रा आढळून आली (२०१५-१६). ही मुद्रा सर्वांत उल्लेखनीय प्राचीन वस्तू होय. या मुद्रेवर पेटिका-शीर्ष ब्राह्मी लिपीत प्रभावती गुप्ताचे नाव लिहिले असून मुद्रेच्या वरील भागात शंखाचे अंकन केलेले आहे. घरगुती पूजेकरिता तयार केलेल्या मृण्मय लघु अर्चना देवालयाचे (terracotta miniature votive shrine) अवशेष आणि शंख, पद्म आदी धार्मिक प्रतिकांचे अंकन असणाऱ्या चौरस आकाराचे छोटे दगडी फलक या येथील महत्त्वपूर्ण प्राचीन वस्तू आहेत. नगरधनच्या उत्खननात प्राप्त धार्मिक प्रतिमांत नरसिंह, विष्णु, गणपती, योगेश्वरी, नैगमेषी, लज्जागौरी आदींच्या प्रतिमांचा प्रामुख्याने समावेश होतो.

येथील उत्खननादरम्यान ॲश्युलियन हत्यारे सापडल्याने या स्थळाची प्राचीनता प्रागैतिहासिक कालखंडापर्यंत गेली आहे. तसेच नागरी, सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनाशी संबंधित बांधकामाचे महत्त्वपूर्ण अवशेष येथे सापडले. एकूणच नगरधन येथील उत्खनन आणि समन्वेषण यांतून प्रागैतिहासिक कालखंडापासून मध्ययुगीन कालखंडापर्यंतच्या सांस्कृतिक कालक्रमाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली.

संदर्भ :

  • Joglekar, Jayendra J. ‘A Note on Acheulian Findings near Nagardhan, Nagpur District, Maharashtraʼ, Man and Environment, Vol. 42 (1), pp. 114-117, 2017.
  • Hiralal, Raibahadur, Descriptive Lists of Inscriptions in Central Provinces and Berar, Nagpur, 1916.
  • Shastri, Ajay Mitra, Vakatakas : Sources and History, New Delhi, 1997.
  • Sontakke, Virag; Ganvir, Shrikant; Vaidya, Shantanu & Joglekar, P. P. ‘Excavations at Nagardhan, Nagpur District, Maharashtra (2015-16)ʼ, History Today, Vol. 17, pp. 43-51, 2016.
  • मिराशी, वा. वि. वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
  • सोनटक्के, विराग; वैद्य, शंतनू; गणवीर, श्रीकांत ‘नगरधन, जिल्हा नागपूर येथील पुरातत्त्वीय उत्खनन (२०१५-२०१७)ʼ, संशोधन क्षितिज वार्षिकांक, नागपूर, २०१७.

समीक्षक – विराग सोनटक्के



महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा उल्लेख आहे. वत्सऋषींची तपोभूमी म्हणून ते विख्यात आहे. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषीने प्रथम स्नान केले, म्हणून त्यास ‘वासुकी नगरʼ असेही नाव मिळाले. त्या शब्दाचे अपभ्रंश रूप ‘वाशिमʼ हे मुस्लिम राजवटीत रूढ झाले असावे. वाकाटकांच्या काळात वाशिम हे साहित्यिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र होते. प्राकृत भाषेची ‘वच्छोमीʼ (वत्सगुल्मी) ही साहित्यशैली येथेच विकसित व लोकप्रिय झाली. वाकाटक राजवटीनंतर मात्र वत्सगुल्मचे महत्त्व ओसरले.

वाशिमचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि वाकाटक घराण्याच्या एका शाखेची येथे राजधानी होती. या घराण्यातील राजांनी ३३०-५५० पर्यंत सभोवतालच्या भूप्रदेशांवर राज्य केले. नवव्या शतकातील राजशेखर कवीने या शहराला विद्या, कला व संस्कृती यांचे केंद्र म्हटले आहे. येथे काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादव (१२१०-१३१८) घराण्यांची सत्ता होती. मोगल काळात (१५३०-१७५७) ते हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारित होते. पुढे मराठे, पेशवे आदी सत्तांनी हा भाग ताब्यात ठेवला.

वाकाटक नृपती दुसरा विंध्यशक्ती याचा ताम्रपट १९३९ साली सापडल्यानंतर वाशिम पुन्हा प्रकाशझोतात आले. हा ताम्रपट ‘वत्सगुल्मʼ येथून राजाच्या ३७ व्या राज्यवर्धापनवर्षी देण्यात आला होता. वत्सगुल्म म्हणजेच वाशिम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाकाटकांच्या पश्चिम शाखेची राजधानी होती. या पार्श्वभूमीवर १९९२-९३ व १९९४-९५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग, नागपूर यांच्यातर्फे येथे गवेषण, उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन फुकतपुरा येथील चामुंडेश्वरी मंदिरासमोर सर्वेक्षण क्र. २५६, श्री. इंगळे यांच्या शेतात आणि जैन क्षेत्रपालाचे आधुनिक देऊळ असलेल्या ‘लाला देऊळʼ अशा दोन ठिकाणी करण्यात आले.

श्री. इंगळे यांच्या शेतात केलेल्या उत्खननात १४×१२ मी. मापाचे अंडाकृती बांधकाम सापडले. या बांधकामासाठी भट्टीत भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. या बांधकामाच्या केंद्रस्थानी विटांनी बांधलेला चौरस असून मध्यभागी एक अष्टकोनी खळगा आहे. हा बहुधा शिवलिंगाच्या शाळुंकेला आधार देण्यासाठी असावा. प्रत्येक कोपऱ्यात तारकाकार साधण्यासाठी इंग्रजी ‘एलʼ आकाराच्या भाजक्या विटांचा वापर केलेला दिसतो. समोर मंडपाचा चौथरा आहे. याशिवाय खापरे, मणी, मातीच्या मूर्ती व इतर वस्तू, लोखंडी वस्तू तसेच वाकाटक व क्षत्रप घराण्यांची नाणी सापडली. याच ठिकाणी शेतात उमा-महेश्वराची व शंखनिधीची प्रतिमा आढळली.

१९९४-९५ मध्ये लाला देऊळ या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन ८०×८० मी.हून थोडे अधिकच मोठे होते. या उत्खननात १ मी. जाडीची प्राकाराची भिंत सापडली. ती सुमारे ७० मी. पूर्वपश्चिम धावत होती. या भिंतीला लागून इतरही काही बांधीव अवशेष सापडले. त्यांपैकी एक बांधकाम अंडाकार असून त्याच्या केंद्रभागातील अष्टकोनी बांधकाम वगळता ते  पहिल्या उत्खननात मिळालेल्या बांधकामाशी तंतोतंत मिळतेजुळते होते. या टेकाडाच्या नैऋत्येस एका साध्या तारकाकृती पायावर बेतलेले अंडाकार बांधकाम सापडले. या बांधकामाला देवकोष्ठाची रचना केली होती. तीर्थकुंडाजवळ अष्टकोनी गर्भगृह व आयताकार मुखमंडप होता. इतर अवशेषांमध्ये लघुरूप मृत्तिकास्तंभ महत्त्वाचे आहेत. हे स्तंभ विटांप्रमाणेच भट्टीत भाजलेले आहेत. त्यांचे अजिंठा येथील भित्तिचित्रांत आढळणाऱ्या खांबांशी साधर्म्य आहे. या व्यतिरिक्त तवली, तोटीचे भांडे आणि घडवंचीवरील थाळी या महत्त्वाच्या मृण्मयी वस्तू आहेत. लाल लेपन केलेल्या मृदभांड्यांची पातळ नकली आवृत्ती वाशिम येथे सापडली. तसेच येथे सापडलेल्या नाण्यांचे हमलापुरी येथील नाण्यांशी साम्य आहे.

संदर्भ :

  • Deotare, B. C.; Joshi P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra, Bhartiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
  • Sali, Chetan, ‘Vakataka Culture : Archaeological Perspectiveʼ, Sanshodhak, March, 1998.
  • जामखेडकर, अ. प. पुरासंचय भाग – १, अपरांत प्रकाशन, पुणे, २०१६

                                                                                                                                                                                                                          समीक्षक – कंचना भैसारे



भारताचा सुवर्णकालखंड... गुप्त नव्हे वाकाटक!

लोकप्रभा , विनायक परब
Published: Friday, February 6, 2015

अजिंठा लेणींचा अभ्यास करता करता भारतीय इतिहासाचे आयाम बदलून टाकणाऱ्या डॉ. वॉल्टर स्पिंक या अमेरिकी संशोधकाची खास मुलाखत-

प्रा. डॉ. वॉल्टर स्पिंक असे शब्द उच्चारले तरी जगभरातील अनेक तज्ज्ञांच्या डोक्यात अजिंठा आणि वेरुळच्या लेणींचे चित्र उमटते.. म्हणूनच तर कदाचित विकीपीडियालाही अजिंठा- वेरुळची नोंद करताना चौथ्या- पाचव्या ओळीमध्येच वॉल्टर स्पिंक यांची व त्यांच्या अतिमहत्त्वाच्या ठरलेल्या संशोधनाची दखल घ्यावी लागते.
गेली ६० वर्षे हा ८६ वर्षांचा अमेरिकन संशोधक अजिंठय़ाशी एवढा एकरूप झाला आहे की, अजिंठा परिसरातील कोणत्याही एका रेस्तरांमध्ये चक्क लुंगीवर फ्रंक सिनात्राचे गाणे ऐकत- गात त्यावर नाचतानाही नजरेस पडू शकतो. भारतावर प्रेम करणारी किंवा आपण भारताच्या जवळचे आहोत, असे भासवणारी अमेरिकन मंडळी इथे आल्यावर आपल्यालाच भारतीय भाषेत नमस्कार असे शब्द उच्चारून चकित करतात. पण गेली ६० वर्षे सातत्याने महाराष्ट्रात येणारे वॉल्टर स्पिंक आपल्याला दोन- तीन मराठी वाक्यं आणि अनेक मराठी शब्द सहज ऐकवून जातात. आताशा त्यांना मराठीही कळू लागले आहे. मांसाहारी असलेले स्पिंक गप्पांच्या ओघात म्हणतात, मी युनायटेड चिकन्स ऑफ महाराष्ट्राचा संस्थापक आहे. म्हणूनच तर अजिंठय़ाच्या ५०० किलोमीटर्स परिसरात तुम्हाला एकही कोंबडी सापडणार नाही, कारण ती मीच फस्त केलेली असते.. आता वयोमानानुसार काहीसे बारीक झालेले डोळे हे सांगताना मिश्कील मिचकावतातही. आपण मांसाहारी असल्याचा त्यांना कोण अभिमान.
१६ फेब्रुवारी १९२८ रोजी अमेरिकेत जन्मलेले वॉल्टर स्पिंक तीन भावंडांमध्ये बरोबर मधले. सध्या बोस्टन शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणावर पर्यवेक्षक अभियंता म्हणून त्यांच्या वडिलांनी काम पाहिले. याच धरण प्रकल्पामुळे त्यांनाही बाजूच्या लहानशा गावातून विस्थापित व्हावे लागले. तेव्हा शाळेत असलेल्या वॉल्टरला त्या विस्थापित होण्याचा आणि नंतर शहरी जीवन जगण्याचा तसा त्रासच झाला आणि मग त्या त्रासाला कवितेच्या रूपाने शब्दरूपही मिळाले. ती वॉल्टर स्पिंक यांनी त्यांच्या आयुष्यात लिहिलेली पहिली कविता. त्या कवितेचे गावातही कौतुक झाले. आज ८६ व्या वर्षीही ते कविता करतात. जगभरात कुठेही गेले तरी कवितेचे पुस्तक सोबत असतेच असते.
आजवरचे त्यांचे जीवन हे अनेक कलाटण्यांनी समृद्ध झाले आहे. आयुष्याला कलाटणी मिळाली की, अनेकदा माणूस अस्वस्थ होतो पण स्पिंक म्हणतात, आयुष्यात अस्वस्थतेने टोक गाठले की, कलाटणी आपोआप मिळते. स्वत:च्या जीवनाचे असे एक वेगळेच तत्त्वज्ञान असणाऱ्या स्पिंक यांनी आता भारतीय इतिहासाला एक कलाटणी देणारे संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन म्हणजे भारतीय इतिहासावरचा नवा प्रकाशझोतच आहे. त्यामुळे आता भारतीय इतिहासाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शालेय इतिहासामध्ये एक प्रश्न गाळलेल्या जागा भरण्यासाठी किंवा एका वाक्यात उत्तर देण्यासाठी अवश्य विचारला जातो; तो म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ कोणता? डोळे झाकून आपण पाठ केलेले उत्तर त्या वेळेस लिहिलेले असते ते म्हणजे गुप्त राजवंशाचा कालखंड. मात्र आता वॉल्टर स्पिंक यांनी केलेल्या संशोधनानंतर भविष्यात भारतीय इतिहासात बदल झाले आणि या प्रश्नाचे उत्तर बदलून त्या जागी वाकाटक राजवंशाचा कालखंड असे उत्तर आले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
भारतीय इतिहासाला अशा प्रकारे नवीन कलाटणी देणाऱ्या या जगद्विख्यात संशोधकाचा प्रवास जीवशास्त्रापासून सुरू झाला आणि तो आता अजिंठा- वेरुळ, घारापुरी लेणींपर्यंत पोहोचला आहे. सध्या ते मिशिगन विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शोधनिबंधांची एक मालिकाच त्यांच्या नावावर आहे. गेली २० वर्षे ते अजिंठय़ामध्येच ना नफा, ना तोटा तत्त्वावर या विषयातील अभ्यासकांसाठी एक शैक्षणिक कार्यशाळा घेतात. हा रोचक प्रवास आणि इतिहासाला कलाटणी देणारे त्यांचे संशोधन हा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या विख्यात संशोधनानिमित्त मुंबई विद्यापीठामध्ये बहि:शाल शिक्षण विभागांतर्गत नव्याने सुरू झालेल्या सेंटर फॉर आर्किऑलॉजीतर्फेमहाराष्ट्रातील पुरातत्त्व विज्ञान या विषयांतर्गत महाराष्ट्रातील लेणी या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन प्रा. डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या गौरवार्थ करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठ वगळता कोरिया, जपान, चीन, अमेरिका आदी देशांतील अनेक मान्यवर विद्यापीठांनी आजवर प्रा. स्पिंक यांच्या गौरवार्थ अनेक परिसंवाद, चर्चासत्र व कार्यशाळांचे आयोजन यापूर्वी केले आहे. मुंबईत पार पडलेल्या या परिसंवादानिमित्ताने प्रा. स्पिंक अलीकडेच मुंबईत येऊन गेले. त्या वेळेस त्यांच्या संशोधनासंदर्भात त्यांनी 'लोकप्रभा'ला दिलेली ही विशेष मुलाखत -

४ अजिंठय़ावरील या संशोधनाला सुरुवात केव्हा व कशी झाली?
- खरेतर महाविद्यलयात असताना मी जीवशास्त्राचा विद्यार्थी होतो. मला प्राणी अतिशय आवडायचे. शाळेत असतानाच मला अमेरिकेतील प्रज्ञाशोध परीक्षेत शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यानंतर प्राणिसंग्रहालयात काम मिळाले. महाविद्यालयात पहिल्या वर्षांला असतानाच लक्षात आले की, प्राण्यांवर प्रेम असणे वेगळे आणि अभ्यास वेगळा. तिथे महाविद्यालयात प्रयोगशाळा, प्राण्यांची चिरफाड असे सारे काही करावे लागत होते. मग अखेरीस जीवशास्त्राला रामराम ठोकला आणि आर्ट हिस्ट्री अर्थात कलेतिहास या विषयासाठी दुसरे महाविद्यालय गाठले.

४ युरोपिअन किंवा पाश्चत्त्य कलेतिहासाकडून मग भारताकडे वळण्याचे कारण नेमके काय होते?
- १९४९ साली मी हॉवर्ड विद्यापीठात पी.एचडी.साठी प्रवेश घेतला. तिथे बेंजामिन रोलँड यांच्याशी भेट झाली, ते भारतीय कला या विषयातील तज्ज्ञ होते. ओरिसा येथील लिंगराज मंदिरावर संशोधन सादरीकरण करण्यासाठी म्हणून पत्नीसह भुवनेश्वरला पोहोचलो १९५२ साली. इथे पोहोचलो त्या वेळेस कल्पना नव्हती की, येथील मंदिरांमध्ये विदेशी व्यक्तींना प्रवेशबंदी होती. दुसऱ्या दिवशी चक्क धोतर नेसून पोहोचलो तेव्हाही प्रवेश नाकारण्यात आला. कारण कपडे बदलून काही मी भारतीय झालो नव्हतो. अखेरीस मी सादरीकरणाचा विषय बदलला. आता जिथे आपल्याला प्रवेशबंदी होणार नाही, असा विषय निवडण्याचे ठरवले. मग मी व पत्नी दोघांनाही लक्षात आले की, भारताला दगडामध्ये खोदलेल्या लेणींची समृद्ध परंपरा आहे. त्या लेणींमध्ये कुणालाही प्रवेशबंदी नाही. मग अखेरीस दोघेही खंदगिरी- उदयगिरी या जैन लेणींकडे पोहोचलो. तिथे संशोधन करताना लक्षात आले की, त्या लेणींचा कालखंड निश्चित करताना काहीतरी घोटाळा झाला होता, निश्चित केलेल्या कालखंडापूर्वीची अशी ती लेणी होती. मग अखेरीस त्यावरच सादरीकरण केले. मग लेणींचे वेडच लागले आणि हे वेड अजिंठय़ापर्यंत आम्हाला घेऊन आले.

४ लेणींच्या कालखंड निश्चितीचे तेव्हापासून लागलेले हेच वेड मग नंतर अजिंठय़ाचा कालखंडही बदलण्यापर्यंत पोहोचले..

अजिंठय़ाचे झाले असे की, जेव्हा आयुष्यात इथे प्रथम पोहोचलो तेव्हाच या लेणींशी आपले काही जुने नाते असावे, असे वाटले. कारण माहीत नव्हते. खरे तर अजिंठा असे म्हटले की, लोकांना येथील जगप्रसिद्ध चित्रांची आठवण येते. अर्थात ही सारी चित्रे जगभरातील कुणीही प्रेमात पडावे, अशीच आहेत. पण माझे लक्ष मात्र सर्वप्रथम गेले ते येथील रचनेकडे. म्हणजे तेथे लेणींमध्ये खोदण्यात आलेले विहार, चैत्य यांच्या रचनेकडे. ती रचना पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न पिंगा घालू लागले. त्यावर मग मी काम सुरू केले. मला त्या चित्रांपेक्षाही लेणींमधील दरवाजांच्या चौकटी, त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण रचना याच अधिक खुणावत होत्या. त्या सातत्याने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताहेत, असे सतत वाटत होते.
४ लेणीच आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वाटण्यातूनच मग तुमच्या 'कलेतिहासाला असलेले मानवी अंग' या प्रसिद्ध सिद्धान्ताचा जन्म झाला का?
- हो, तसे म्हणू शकता हवे तर. गेली सुमारे ६० वर्षे मी भारतीय कलेवर संशोधन करतो आहे. त्यातही खासकरून अजिंठय़ावर. माझ्या संशोधनात असे लक्षात आले आहे की, येथील रचना नीट पाहिली. तिचा व्यवस्थित अभ्यास केला तर कालखंड निश्चितीसाठी तिचा फायदाच होतो. कारण ती रचना सुरुवातीस कशी होती. मग कोणती व कशी गरज निर्माण झाली. मग ती गरज भागविण्यासाठी त्या उपलब्ध वास्तूमध्ये कसे बदल करण्यात आले, या सर्व गोष्टी आपल्याला सहज कळत जातात. खासकरून लेणींमध्ये तर हे सहज लक्षात येते, कारण एखादी रचना ही लेणी खोदतानाच कलावंत किंवा वास्तुशिल्पीच्या मनात किंवा आरेखनात असेल तर ती लेणीमध्ये भिंतीच्या पुढे असलेल्या रचनेत पाहायला मिळते. आणि ती नंतरच्या कालखंडातील रचना असेल तर ती दगडी भिंतीच्या आतमध्ये खोदलेली दिसते. कोणते शिल्प हे भिंतीच्या पातळीच्या बाहेर आणि कोणते आत यावरून कोणती रचना आधीची व कोणती नंतर हे सहज सांगितले जाऊ शकते.
४ पण मग त्यावरून कालखंड निश्चिती कशी काय करणार? कालखंड निश्चित करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात?
- कालखंड निश्चित करताना या लेणींमध्ये असलेले शिलालेख आपल्याला मदत करतात. काही शिलालेखांमध्ये लेणी खोदलेल्या वर्षांचा थेट उल्लेख असतो. तर काही ठिकाणी हा उल्लेख अप्रत्यक्षपणे आलेला असतो. म्हणजेच अजिंठय़ाच्या बाबतीत बोलायचे तर हिरशेण राजाचा राज्याभिषेक झाल्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी असा उल्लेख एका ठिकाणी आहे. राजाचा राज्याभिषेक केव्हा झाला, त्याचे वर्ष काढले की, लेणीच्या खोदकामाचे वर्ष सहज कळू शकते. दरखेपेस त्या त्या ठिकाणी असलेले शिलालेखच तुम्हाला मदत करतात, असेही नाही. इतरत्र असलेल्या शिलालेखांमधील संदर्भही अनेकदा मदत करतात. त्याशिवाय काही वेळेस तुम्हाला लिखित स्वरूपातील काही नोंदीही मदतीच्या ठरतात.
४ अजिंठाची कालनिश्चिती तुम्ही इसवी सन ४६२ ते ४७७ अशी केली आहे. हे करताना कोणते पुरावे ग्रा धरले, त्यांची मदत कशी काय झाली?
- डॉ. वासुदेव विष्णू मिराशी या विद्वान प्राध्यापकांनी भारतीय शिलालेखांच्या संदर्भात प्रचंड महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी विविध लेणींमधील विविध भाषा आणि लिपींमधील शिलालेख वाचले व त्यांचे अर्थही लावले. त्यांनी केलेले ते अतिमहत्त्वपूर्ण काम भारत सरकारच्या आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने प्रकाशित केले आहे. हे काम आजही प्रमाण मानले जाते. त्या कामानुसार अजिंठय़ाचा कालखंड पाचवे ते सातवे शतक असा दोनशे वर्षांचा समजण्यात आला होता. अजिंठय़ावर काम करत असतानाच मला अजिंठय़ापासून १८ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या घटोत्कच लेणी पाहण्याची संधी मिळाली. तेथील एक शिलालेख पाहून मला अनेक प्रश्न पडले, माझेही डोळे उघडले. मग मी अजिंठय़ाला परत आलो. तेथील शिलालेख व अजिंठय़ाशी, तेथील संबंधित राजघराण्यांशी संबंधित सर्व शिलालेख पुन्हा नव्याने, माझ्या डोक्यातील नव्या संदर्भासह वाचले. उपलब्ध असलेल्या दंडिनच्या दशकुमारचरित्रमधील नोंदींशी त्या ताडून पाहिल्या तेव्हा माझ्या डोक्यात असलेला कालखंड मांडण्याइतके पुरावे माझ्याकडे असल्याचे लक्षात आले. लेणींमधील शिलालेखातील संदर्भ, दशकुमारचरित्रमधील संदर्भ सारे काही एकत्र जुळले आणि अशा प्रकारे मी अजिंठय़ाचा कालखंड इसवी सन ४६२ ते ४७७ आहे, हे निश्चित केले. त्या संदर्भानुसार ज्या राजा हरिषेणाच्या कालखंडात अजिंठय़ाचे सर्वाधिक महत्त्वाचे काम करण्यात आले त्याचा राज्याभिषेक इसवी सन ४६०मध्ये झाला होता. त्यामुळे शिलालेखांतील संदर्भानुसार मग हा कालखंड इसवी सन ४६२ला नेमका जुळतो.
४ अजिंठाचा इतिहासही तेवढाच रोचक असल्याचे आपण नेहमी सांगता, त्याचप्रमाणे भारताच्या इतिहासातील हाच तो सुवर्णकालखंड असल्याचे मतही आपण संशोधनातून सातत्याने मांडत आला आहात, त्यामागची कारणे काय आहेत?

- अजिंठा हे जगातील एक विलक्षण ठिकाण आहे, असे मला नेहमीच वाटत आले. केवळ मला वाटते म्हणून नाही तर उपलब्ध पुराव्यांनुसार इथला इतिहास तपासून पाहिला तर हे कुणाच्याही लक्षात येईल. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात इथे खोदकामाला सुरुवात झाली. येथील लेणींचे दोन कालखंडात विभाजन करता येते. त्यानंतरचे महत्त्वाचे काम हे पाचव्या शतकात त्यातही पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच हरिशेण राजाच्या कालखंडात झाले आहे. हरिषेणाचा पंतप्रधान वराहदेव याचा शिलालेख इथे कोरलेला आहे. या लेणी विलक्षण आहेत असे म्हणण्याचे कारण म्हणजे एकाच वेळेस इथे अश्मक, स्वत: वराहदेव आणि स्थानिक राजा उपेंद्रगुप्त यांचे लेणींचे खोदकाम सुरू होते. उपेंद्रगुप्त व अश्मक हे हरिषेणाचे मांडलिक राजे होते. सुरुवातीस सुरू असलेले अश्मकांचे लेणींचे खोदकाम हे उपेंद्रगुप्ताने थांबवले आणि त्याने अश्मकांना हाकलून लावले. लेणींचे महत्त्व सर्वाधिक वाटल्यानेच त्या वेळेस सत्ताप्रबळ असलेल्या उपेंद्रगुप्त आणि हरिषेणाचा पंतप्रधान असलेल्या वराहदेव याने स्वत: खोदण्याच्या लेणींसाठी बरोबर मधला भाग निवडला. त्यामुळे दोघांचीही लेणी बरोबर अजिंठय़ाच्या मध्यभागी नेमक्या ठिकाणावर आहेत. मात्र नंतर अश्मकांनी छुप्या पद्धतीने हरिषेणाच्या दरबारामध्ये आपली माणसे पद्धतशीरपणे घुसवली. त्यात हेरांचाही समावेश होता आणि मग त्यांनीच हरिषेणाची हत्या घडवली, असे दिसते. कारण ४७७ साली हरिषेणाचा मृत्यू अचानक झालेला दिसतो. तो अपघाती मृत्यूच होता. त्याची हत्याच झालेली असावी, असे ऐतिहासिक उपलब्ध पुराव्यांवरून लक्षात येते. कारण इसवी सन ४७८ नंतरचे इथे काहीच सापडत नाही. हरिषेणाच्या मृत्यूनंतर अजिंठय़ालाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासालाच कलाटणी मिळाली. आणि भारताच्या इतिहासातील काळ्याकुट्ट पर्वाला सुरुवात झाली. हरिषेणा बरोबरच वाकाटक राजवंशाची सत्ता संपुष्टात आली. त्याचबरोबरच अजिंठय़ाच्या वैभवात भर पडण्याची शक्यताही संपुष्टात आली.
४ वाकाटकांचा सर्वोत्तम राजा असलेल्या हरिषेणावर भारतीय इतिहास संशोधकांनी अन्यायच केल्याचा आरोप आपण सातत्याने करत आहात..
- खरेच आहे ते भारतीय इतिहास संशोधकांनी वाकाटक राजघराण्यावर आणि हरिषेणावर अन्यायच केला आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक रोमिला थापर यांनी तर गुप्त कालखंडानंतर आलेल्या वाकाटकांची आणि हरिषेणाची योग्य दखलही घेतलेली नाही. त्याला अनुल्लेखानेच मारले आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. ज्याला भारतीय इतिहास संशोधक गुप्तोत्तर कालखंड म्हणतात तो खरेतर वाकाटकांचा कालखंड होता. उपलब्ध लेखी नोंदी आणि शिलालेखांमधील संदर्भच पुराव्यादाखल पाहायचे तर संपूर्ण मध्य भारतावर त्या वेळेस वाकाटकांचे राज्य होते. त्यांच्या दोन शाखा होत्या. त्या हरिषेणाच्याच कालखंडात एकत्र आल्या व वाकाटकांचा एकछत्री अंमल सुरू झाला. तत्कालीन वत्सगुल्म आणि आजचे वाशीम ही त्यांची राजधानी होती. पश्चिम किनारपट्टीपासून ते पूर्व किनारपट्टीच्या बंगालपर्यंत त्यांचे राज्य पसरलेले होते. त्यात त्यात पश्चिम विदर्भ, अनुप, ऋषिक म्हणजे सध्याचा अजिंठय़ाचा परिसर समाविष्ट असलेले राज्य, अश्मक ज्यांचे राज्य औरंगाबाद परिसरावर होते, मध्य प्रदेशाचा माळव्याचा प्रांत आणि ओरिसा, बंगालचा परिसर, गुजरातेतील बहुतांश भाग, आंध्र देश असे वाकाटकांचे राज्य पसरलेले होते. संपूर्ण मध्य भारत महाराष्ट्रासह ज्यांच्या ताब्यात होता. एकीकडे उत्तर प्रदेशपासून ते खाली दक्षिणेतील आंध्र प्रदेशापर्यंत त्यांची सत्ता होती. महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल अशी व्याप्ती होती, त्या राजवंशाकडे भारतीय संशोधक दुर्लक्ष कसे काय करू शकतात? त्यातही त्यांना अनुल्लेखाने मारणे म्हणजे जरा अतीच झाले.
४ वाकाटकांकडे भारतीय इतिहास संशोधकांनी दुर्लक्ष केले हे खरे असले तरी अजिंठय़ाचा किंवा वाकाटकांचा कालखंड हा भारतीय इतिहासातील सुवर्ण कालखंड कसा काय ठरतो? त्याचे पुरावे कोणते?
- इतिहासातील सुवर्णयुगाचा महत्त्वाचा निकष त्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या कलेशी आणि कलाकृतीशी असतो. सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदत असतानाच सर्वोत्तम कला जन्म घेते असे आजवर जागतिक इतिहासात लक्षात आले आहे आणि सिद्धही झाले आहे. हाच महत्त्वाचा निकष लावायचा तर भारतातील सर्वोत्तम कलेचा आविष्कार म्हणजे अजिंठा. केवळ सुंदर चित्र आहेत म्हणून नव्हे तर त्या चित्रांतील ऐतिहासिक संदर्भच त्यांचे महत्त्व व सर्वोत्तम कालखंडातील त्यांचा जन्म स्पष्ट करतात. अजिंठय़ामध्ये काम करणारे कलावंत हे देशातील अतिकुशल असे कलावंत होते, हे तर कुणीच नाकारणार नाही. आपल्या आजूबाजूला जे घडत असते, दिसते त्याचेच प्रतिबिंब कलाकृतीमध्ये पडत असते. अजिंठय़ाच्या कलाकृतीमध्ये दिसणाऱ्या सर्वोत्तम वास्तुरचना त्यापूर्वीच्या कोणत्याही कलाकृतीमध्ये संपूर्ण भारतात पाहायला मिळत नाहीत. तसेच अजिंठय़ाच्या चित्रांतील दागिने, राजमुकुट हे सारे काही वेगळे होते. प्रत्यक्षात त्यासारख्या गोष्टी अस्तित्वात असल्याशिवाय त्याचे प्रतिबिंब लेणींमध्ये येत नाही, किंवा समकालीन चित्र-शिल्पांमध्ये येत नाही, असे जगभरातील कलेतिहासात सिद्ध झाले आहे. वज्रपाणी बोधिसत्वाचा राजमुकुट हा तर केवळ लोकविलक्षण कलाकृतीच आहे. याच चित्रांमध्ये आपल्याला अनेक विदेशी किंवा यवनही पाहायला मिळतात. त्यात ससेनिअनही आहेत ते नोकर-चाकर म्हणून येतात. त्यांना नोकर म्हणून ठेवणारे हे खचितच अधिक समृद्धच असले पाहिजेत. शिवाय अजिंठय़ासारखी कलाकृती निर्माण करायची तर खोऱ्यासारखा पैसा खर्च करावा लागणार. तत्कालीन स्थानिक राजा उपेंद्रगुप्त व वराहदेव यांच्या नोंदीही त्यांनी अजिंठय़ासाठी खोऱ्यासारखा पैसा खर्च केल्याचेच पुरावे देतात. म्हणजेच त्या वेळेस मध्य भारतातील वाकाटक सत्ता ही समृद्धीच्या कळसावर होती. अजिंठा हा त्या समृद्धीचा सर्वात मोठा ढळढळीत ऐतिहासिक पुरावा आहे. त्यामुळेच आता गुप्त नव्हे तर वाकाटक कालखंड म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होते, हे इतिहास संशोधकांनी मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. राजा हरिषेणाला त्याचे योग्य ते श्रेय मिळायलाच हवे. त्याच्या हत्येनंतर सर्वानीच अजिंठय़ाचे उर्वरित काम तसेच वेगात पूर्ण केले. राजाच्या हत्येनंतर डोक्यावरील टांगती तलवार केव्हा पडेल ते माहीत नाही या भीतीनेच नंतरचे काम वेगात उरकण्यात आले, त्याचे पुरावे अजिंठय़ामध्येच पाहायला मिळतात. हरिषेणाच्या मृत्यूबरोबरच सारे काही संपुष्टात आले. पूर्वी मानले जायचे की, अजिंठय़ाच्या दुसऱ्या टप्प्याची निर्मिती ५ वे ते ७ वे शतक अशी दोनशे वर्षांमध्ये झाली. पण ते चुकीचे होते. ही दुसऱ्या टप्प्यातील निर्मिती केवळ १४-१५ वर्षांमध्ये म्हणजेच इसवी सन ४६२ ते ४७७ या कालखंडात झाल्याचे आता ऐतिहासिक पुराव्याने सिद्ध झाले आहे. भारतीय इतिहास आता नव्याने लिहिण्याची गरज आहे.
४ या नव्या संशोधनामुळे इतिहासात नेमका कोणता बदल होणे अपेक्षित आहे?
- अजिंठय़ाचा कालखंड निश्चित झाल्याचा सर्वात मोठा परिणाम मुंबईजवळच्या अप्रतिम अशा घारापुरी लेणींच्या कालखंडावर झाला आहे. पूर्वी असे मानले जायचे की, त्यांची निर्मिती ही आठव्या शतकात झाली आहे. मात्र आता ऐतिहासिक सत्य व पुरावे असे सांगतात की, त्यांची निर्मिती ही अजिंठय़ानंतर सहाव्या शतकात झाली आहे. त्यांचा कालखंड आता २०० वर्षांनी अलीकडे आला आहे. ज्या कलावंतांनी अजिंठय़ाची निर्मिती केली, त्यांच्याच पुढच्या पिढीतील कलावंतांनी घारापुरीच्या लेणींचेही काम केले आहे, हे शैलीशास्त्रानुसार सिद्ध झाले आहे. घारापुरीचा सहाव्या शतकातील निर्मितीचा सिद्धांत मांडतानाही ही अशाच प्रकारे शिलालेख, ऐतिहासिक
नोंदी एकमेकांशी ताडून पाहिल्या आहेत त्यानंतरच कालखंडाची मांडणी केली.
४ भारतीय इतिहास संशोधकांनी आता यापुढे काय करण्याची गरज आहे, असे आपल्याला वाटते?
- ऐतिहासिक कालखंड निश्चित करताना केवळ उपलब्ध नोंदींवर जाऊ नका तर पुरातत्त्वीय पुरावेही ग्रा धरा. शिलालेखांचे अर्थ नव्याने लावता येत आहेत का, त्याचा शोध घ्या आणि नंतर सर्व प्रकारचे पुरावे एकत्र करून कालखंड निश्चिती करा. मग त्यातील त्रुटी आणि उणिवा कमीतकमी असतील व त्यात अचूकता अधिक असेल असे वाटते.
४ गेली ६० वर्षे अजिंठय़ावर काम केल्यानंतर अद्याप काही करावयाचे राहिले आहे, असे वाटते का?
- होय, अजिंठय़ावर मी आठ मोठे संशोधन खंड प्रकाशित केले आहेत. नवव्या खंडाचे काम सुरू आहे. पण अजिंठय़ाची व्याप्तीच एवढी जबरदस्त आहे की, अद्याप खूप काम बाकी आहे. आज वय ८६ च्या घरात आहे. तरीही अखेरच्या श्वसापर्यंत अजिंठय़ावरील संशोधनाचे काम सुरूच राहील, असे दिसते आहे.

http://www.loksatta.com/lokprabha/dr-walter-spink-1066015/


वाकाटकांचा महत्त्वपूर्ण इतिहास

|  | Updated: 28 Oct 2018, 04:00:00 AM

मोहन शिरसाटस्लग - दुर्मीळवाकाटक घराण्यातील लेखांचे संपादन व संशोधन वा वि...

मोहन शिरसाट

...

स्लग - दुर्मीळ

...

वाकाटक घराण्यातील लेखांचे संपादन व संशोधन वा. वि. मिराशी यांनी ते 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या ग्रंथात मांडले. वाकाटक घराण्याचा हा विश्लेषणयुक्त इतिहास अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे.

...

'वाशीम जिल्ह्याचा इतिहास' या ग्रंथाचे लेखन करण्यासाठी स्थानिक इतिहासाचा धांडोळा घेताना एक अत्यंत दुर्मीळ व उपयुक्त ग्रंथ हाताशी लागला. महामहोपाध्याय वासुदेव विष्णू मिराशी (वा. वि. मिराशी) यांचे 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल'. १९५७ मध्ये नागपूर विश्वविद्यालयाने हा ग्रंथ प्रकाशित केला. विश्वविद्यालयाच्या महादेव हरि वाठोडकर व्याख्यानमालेत श्री. मिराशी यांनी मराठीतून वाकाटक नृपतिंचा इतिहास मांडला. वाकाटक नृपतिंच्या शिलालेख व ताम्रपट स्वरुपातील २६ लेखांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लेखांचे वाचन, संपादन आणि विश्लेषण खुद्द मिराशींनी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनाला इतिहासअभ्यासात अनन्यसाधारण महत्त्व आजही आहे. विशेष म्हणजे १९१४ मध्ये डॉ. व्हिसेंट स्मितने प्रकाशित केलेल्या 'प्राचीन भारतीय इतिहास' या ग्रंथात वाकाटकांचा उल्लेखही नव्हता. त्यानंतरच्या ४० वर्षांत झालेल्या संशोधनाचे श्रेय श्री. वा. वि. मिराशींना आहे, पर्यायाने या ग्रंथाला आहे, असे 'पुरस्कार' या शीर्षकात पाठराखणमध्ये कुलगुरू के. तु. मंगलमूर्ती यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे वाकाटकांचे साम्राज्य नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत, तर इकडे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होते. या ग्रंथाने वाकाटक घराण्याचा इतिहास उजेडात आला. सातवाहनानंतर साधारणतः इ. स. २५० मध्ये वाकाटकांचा उदय झाला. इ. स. ५५० पर्यंत त्यांनी या प्रदेशावर अंमल केला. प्राचीन काळातील गुप्त घराणे आणि वाकाटक घराणे यांचे 'सुवर्णयुग' म्हणून ख्याती आहे. कारण याच काळात धर्म, संस्कृती, प्राकृत वाङ्मय, स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला इत्यादींचा मोठा उत्कर्ष झाला आहे. पण डॉ. स्पिंकच्या मते खरा सुवर्णकाळ म्हणजे वाकाटक काळच होय. कारण वाकाटकांच्या काळात विशाल साम्राज्य उत्पन्न होऊन शांतता प्रस्थापित झाली होती. परदेशांशी व्यापार वाढला होता. भारतीय संस्कृतीचा प्रसार इतर देशात झाला. कीर्ती दिगंतात गेली. याचा आधार म्हणजे वाकाटकांनी कोरलेले अजिंठा लेणे. लेण्यांतील स्थापत्य, शिल्प, चित्र एकूणच वैभव होते या काळात. अशा वाकाटक घराण्यातील लेखांचे संपादन व संशोधन श्री. मिराशी यांनी या ग्रंथात मांडले आहे. वाकाटक नृपतिंचे १७, मांडलिकांचे ३, वत्सगुल्म शाखेचे २ आणि अमात्यांचे ३ लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्या सर्व लेखांचे वाचनासह विश्लेषण मांडल्याने अभ्यासकांसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आताच्या इतिहास अभ्यासकांना या ग्रंथाचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येत येणार नाही. मी माझ्या इतिहासाच्या ग्रंथासाठी अनेक ग्रंथांचे संदर्भ घेतलेले आहे. त्या प्रत्येक ग्रंथकर्त्याने वाकाटकांचा इतिहास देताना 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या ग्रंथाचा संदर्भ घेतलेला आढळला.

शासनानेही महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांचे लेखन 'ऑर्कीऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' अंतर्गत अनेक खंडात प्रकाशित केले आहे. ते सर्व इंग्रजीतून उपलब्ध आहे. वाकाटक नृपतिंचा सचिव वराहदेव याने अजिंठ्याचं १६ क्रमांकाचं लेणं कोरवली. याच लेणीतील शिल्प-चित्रांनी उच्चांक गाठला आहे. जगप्रसिद्ध सर्वोत्कृष्ट लेण्यांपैकी हे एक लेणं आहे. त्यालाच लागून १७ आणि १९ क्रमांकांच्या लेण्या वाकाटकांचे मांडलिक ऋषिक (खानदेश) देशाच्या अधिपतीने कोरवून बौद्ध संघास दान केल्यात. त्याचबरोबर अजिंठ्याच्या पश्चिमेला घटोत्कच लेणी वाकाटक नृपति हरिषेण याचा मंत्री वराहदेव याने कोरविली. येथे वाकाटकांची वंशावळ शिलालेखावर कोरलेली आहे. त्यावरूनच वाकाटक घराण्याची वंशावळ जगाला माहीत झाली. हे उपयुक्त संशोधन या ग्रंथात पहिल्यांदा मांडलंय. त्यामुळेच वाकाटकांच्या संपन्न साम्राज्याला इतिहासात स्थान मिळाले आहे. वाकाटक नृपतिंच्या दोन शाखा स्थापन झाल्या. रूद्रसेनाने रामटेकजवळ नन्दिवर्धन (ज्येष्ठ शाखा), तर सध्याचे वाशीम व प्राचीन वत्सगुल्मला सर्वसेनाने राज्य स्थापन केले.

वाकाटक घराणे बौद्धउपासक, शिवोपासक आणि विष्णुउपासक अशा तिन्ही परंपरेशी तीन शतकांत संक्रमित होताना दिसते. मूळ पुरुष वाकाटक गृहपती यांनी आंध्र प्रदेशातील अमरावती गावात बौद्धांना पुण्यक्षेत्री दानकृत्य केल्याचा शिलालेख आहे. तर नंतरच्या प्रवरसेनाने वैदिक धर्माप्रमाणे ४ अश्वमेध केले. वाकाटक घराण्याचे सचिव वराहदेव यांचे घराणेसुद्धा वाकाटकांशी पिढी दर पिढी संलग्न होते. हे निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे.

वाकाटक घराणे व त्यांचा इतिहास किती वैभवशाली होता, याचे अनेक दाखले पुराव्यानिशी या ग्रंथात दिलेले आहेत. १९१२ मध्ये पुण्यात एका तांबटाच्या घरी प्रभावती गुप्तचा ताम्रपट सापडला. वाकाटक नृपति रूद्रसेन यांची ती पट्टराणी आणि उत्तरेकडील गुप्त घराण्याचे द्वितीय चंद्रगुप्त यांची ती कन्या होती. याचे संदर्भ या ग्रंथात असल्याने गुप्त आणि वाकाटक घराण्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. वाकाटकांच्या साम्राज्यात महाकवी कालिदास यांना आपली काव्य रचण्याची स्फूर्ती झाली. वाकाटक राजानेसुद्धा 'हरिविजय' व 'गाथासप्तशती'सारखे प्राकृत ग्रंथ लिहिलेत. त्यामुळेच वत्सगुल्ममधील या प्राकृत काव्याची 'वच्छोमी रीती' सर्वत्र मान्यता पावली. 'वात्सायनाचे कामसूत्र' या ग्रंथातही वत्सगुल्मचा उल्लेख आहे. मुळात संस्कृत, प्राकृत आणि पाली भाषेत पारंगत असलेले श्री. मिराशी यांनी या ग्रंथामुळे ज्ञानाचे दालनच यानंतरच्या पिढीला खुले करून दिले आहे. अजिंठ्याचे गेल्या ६० वर्षांपासूनचे अभ्यासक डॉ. वाल्टर स्पिंक यांनीसुद्धा अलीकडेच एका मुलाखतीत श्री. मिराशींच्या या संशोधन कार्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. या ग्रंथाच्या शेवटी वाकाटककालीन कलाकृतींचे छायाचित्र, ताम्रपटाची फोटोकॉपी आणि वाकाटक साम्राज्याचा नकाशा आहे, जी इतिहास अभ्यासकांसाठी मोलाची आहे.

वाकाटक राजवंश के महत्वपूर्ण GK

Q 1. वाकाटक राजवंश की स्थापना कब हुई थी?

Ans वाकाटक राजवंश की स्थापना 255 ईसा पूर्व में हुई थी.

Q 2. वाकाटक राजवंश की स्थापना किसने की थी?

Ans वाकाटक राजवंश की स्थापना विध्य्शक्ति ने की थी.

Q 3. उनके पूर्वज किसके अधीन थे?

Ans उनके पूर्वज किसके सातवाहनो थे.

Q 4. विध्य्शक्ति के बाद कोंन शासक बना था?

Ans विध्य्शक्ति के बाद प्रवरसेन प्रथम शासक बना था.

Q 5. इस राजवंश में किसने सम्राट की उपाधि धारण की था?

Ans इस राजवंश में सम्राट की प्रवरसेन प्रथम ने उपाधि धारण की था.

Q 6. किससे पता चलता है की प्रवरसेन प्रथम चार अश्वमेघ यझ किये थे?

Ans पुराण से पता चलता है की प्रवरसेन प्रथम चार अश्वमेघ यझ किये थे.

Q 7. वाकाटक को कितने भागो में बाटा गया था?

Ans वाकातटक को दो भागो में बाटा गया था.

Q 8. वाकाटक के दो भाग कोनसे थे?

Ans वाकाटक के दो भाग प्रधान शाखा,बसीं शाखा थे.

Q 9. रुद्रसेन द्वितीय का विवाह किसके साथ हुआ था?

Ans रुद्रसेन द्वितीय का विवाह प्रभावती गुप्ता साथ हुआ था.

Q 10. रुद्रसेन की म्रुत्यु कब हुई थी?

Ans रुद्रसेन की म्रुत्यु विवाह के कुछ समय बाद हुई थी.

Q 11. रुद्रसेन के बेटे कितने थे?

Ans रुद्रसेन के बेटे दो थे.

Q 12. उसके बाद कोंन शासक बना था?

Ans उसके बाद कनिस्ठ दामोदर शासक बना था.

Q 13. वाकाटक का अतिम शासक कौन था?

Ans वाकाटक का अतिम शासक पृथ्वीसिंह द्वितीय था.

Q 14. उसके बाद राज्य किसके हाथो में चला गया था?

Ans उसके बाद राज्य हरिषेण के हाथो में चला गया था.


छायाचित्राची लिंक
http://www.mediafire.com/view/518ak8qx2z0xxkc/Dashkumar-Covers-web.jpg


मी मध्ये 'दशकुमारचरितम'चे भाषांतर करायला घेतले आणि मोठ्या कष्टाने ते पूर्णही केले, त्या पुस्तकाची ही प्रस्तावना. हे भाषांतर करताना मी श्री. जॅकॉ यांच्या इंग्रजी भाषांतराचा मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यामुळे माझी फारच तारांबळ उडाली. पण मूळ संस्कृत ग्रंथ वाचायलाच लागला. त्यात एक बरे झाले, मला संस्कृत पुस्तक वाचण्यास जरा तरी जमू लागले आहे. हा जवळजवळ एक छोटासा लेखच आहे. आपल्याला हा आवडेल अशी आशा आहे. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठही मीच तयार केले, ते वर दिसतेच आहे. या मुखपृष्ठावरील छायाचित्रे मीच अजिंठ्यामध्ये काढली आहेत.

प्रस्तावना

१९०७ साली श्री. मार्क कॉलिन्स यांनी लिपझिक विद्यापीठाला एक प्रबंध सादर केला. त्याचे नाव होते ‘रघुवंश आणि दशकुमारचरितम ज्या काळात रचले गेले, त्या काळातील भौगोलिक माहिती आणि त्यावरून या दोन्ही ग्रंथांचा काळ ठरविण्याचा प्रयत्न’. यात श्री. कॉलिन यांनी दशकुमारचरितम या कांदबरीतील आठव्या प्रकरणावरून असे अनुमान काढले आहे की या काळात नागपूर व त्याच्यावरच्या भागात एक प्रबळ राज्यसत्ता होती व त्या सत्तेचे मांडलिकही बर्‍यापैकी प्रबळ होते. अर्थात या मतालाही बराच विरोध झाला. उदा. कार्ल खंडालवाला, ब्रह्मानंद देशपांडे, शिला वाईनर इत्यादींनी यात ऐतिहासिक व भौगोलिक सत्य काहीही नसून याला फक्त कादंबरीचेच महत्त्व द्यावे असे आग्रहाने प्रतिपादन केले. विरोध करणारे मातबर अभ्यासक होते, त्यामुळे त्यांच्या मतांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. पण महामहोपाध्याय श्री. मिराशी यांनी श्री. कॉलिनचे म्हणणे उचलून धरले आणि त्याला पुष्टी मिळाली अजिंठ्याचे अभ्यासक श्री. स्पिंक यांच्या अभ्यासाने. या सगळ्या अभ्यासकांचे म्हणणे होते की या आठव्या भागात वाकाटकांच्या उतरत्या काळाचे वर्णन मोठ्या खुबीने केले आहे. अर्थात तसे असावे असे आता बर्‍याच अभ्यासकांना वाटते. महामहोपाध्याय मिराशींचे मत जर ग्राह्य धरले, तर या ग्रंथावरून त्या काळातील बरीच माहिती गोळा करता येते व त्या काळातील समाजजीवनावर थोडाफार प्रकाश आपल्याला टाकता येतो. तो प्रयत्न आपण करणार आहोत, पण त्या अगोदर आचार्य दंडी कोण होते, ते एवढे प्रसिद्ध का झाले, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आचार्य दंडींनी हा ग्रंथ पल्लवांचा आत्मसंतुष्ट राजा नरसिंहवर्मन दुसरा याला शहाणपणाचे दोन शब्द सुनविण्यासाठी रचला असावा. यथा राजा तथा प्रजा या नियमानुसार प्रजेतही बेबंदशाही माजली असावी.

त्या काळात सहाव्या किंवा सातव्या शतकात आचार्य दंडी हे पल्लवांच्या दरबारी राजकवी होते. हे पद त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आले होते. हे घराणे मूळचे विदर्भाचे. त्यांचे गोत्र होते कौशिक. हे घराणे मूळचे गुजरातमधील आनंदपूर येथील. त्यांच्या कुठल्यातरी पूर्वजांनी नाशिक्यमधील अचलापुउर येथे स्थलांतर केले. याच घराण्यात आचार्य दंडींच्या आजोबांनी - ज्यांचे नाव दामोदर होते त्यांनी - जन्म घेतला. कवी भारावी यांच्यामुळे राजा विष्णुवर्धन यांच्याशी दामोदर यांची मैत्री झाली. एकदा दामोदर राजाबरोबर जंगलात शिकारीला गेले असता, त्यांना भुकेपोटी मांसभक्षण करावे लागले. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. त्या तीर्थयात्रेदरम्यान त्यांनी गंगा घराण्यातील एका राजाच्या दरबारी राजकवीची नोकरी पत्करली. काव्यावरील त्यांचे प्रभुत्व पाहून त्यांना त्या दरबारातून पल्लवांचा राजा सिंहविष्णूने त्याच्या दरबारी आमंत्रण दिले. या वेळी त्यांचे वय असेल अंदाजे वीस. श्री. दामोदरांना अनेक मुलींनंतर एक मुलगा झाला, त्याचे नाव होते वीरदत्त. हा वीरदत्त व त्याची पत्नी गौरी यांच्या पोटी श्री. दंडींनी जन्म घेतला. वयाच्या सातव्या वर्षीच दंडीचे शिक्षण सुरू झाले. दुर्दैवाने चालुक्यांनी पल्लवांवर केलेल्या आक्रमणाच्या राजकीय रणधुमाळीमुळे आचार्यांना कांची सोडणे भाग पडले. त्याच काळात त्याच्या मातापित्यांचाही मृत्यू झाला असावा. पुढील बारा वर्षे तरुण दंडीला चालुक्यांनी व्यापलेल्या स्वत:च्या देशात अज्ञातवासात काढावी लागली. त्याचे हे नष्टचर्य संपले, जेव्हा परमेश्वरवर्मन पहिला याने चालुक्यांचा राजा विक्रमादित्याचा पराभव केला तेव्हा. कांचीमध्ये पल्लवांची सत्ता परत प्रस्थापित झाल्यावर आचार्य दंडींना राजकवीचे पद परत उपभोगण्यास मिळाले व ते त्यांनी परमेश्रवरवर्मन-१ व त्याचा मुलगा नरसिंहवर्मन-२ यांच्या कारकिर्दीत उपभोगले. त्या काळातील त्यांचे मित्रही चांगलेच प्रसिद्ध पावले. उदा. ललितालय जो एक श्रेष्ठ वास्तुरचनाकार, जादूगार व कवी होता, रणमल्ल जो सेनाप्रमुखांचा मुलगा होता, मातृदत्त जो वेदांचा प्रकांडपंडित व कवी होता, देवशर्मन एक बुद्धिमान ब्राह्मण होता, जयंत, नारायण, भजनानंद, रामशर्मा इ. इ.

आचार्य दंडी हे एक बुद्धिमान कवी होते व त्यांनी कौटिल्याचे अर्थशास्त्र व वात्सायनाचे कामसूत्र यांचा विशेष अभ्यास केला होता. जेव्हा त्यांना कांची सोडावे लागले, तेव्हा त्यांनी उत्तरेत भरपूर प्रवास केला होता व तेथील जनपदांचा अभ्यासही केला होता, ज्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणातही दिसते. राजदरबारात व राजगृही त्यांची ऊठबस असायची. त्यामुळे त्यांना राजदरबारातील कामकाजांची पूर्ण कल्पना होती, तसेच काळ्या कृत्यांचीही माहिती होती. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अत्यंत खेळकर होता व अडीअडचणींकडे ते त्याच दृष्टीकोनातून पाहायचे व त्यावर मात करत असणार.
याच काळात आचार्य श्री. दंडी यांनी त्यांचे तीन ग्रंथ लिहिले. म्हणजे त्यांनी जास्त लिहिले असतील, पण आज आपल्याला त्यातील तीनच माहीत आहेत. १. अवंतीसुंदरीकथा, २. दशकुमारचरितम व ३. काव्यदर्श. नावावरून दंडी एक संन्यासी वृत्तीचा माणूस वाटण्याची शक्यता आहे. पण हा माणूस भौतिक सुखांत व जगाच्या रहाटीत गुंतून पडणारा होता. दरबारात सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती व त्याचा उपभोग तो उत्तमपणे घेत असणार. अर्थात त्याची बुद्धिमत्ता अफाट होती व अनेक टीकाकारांनी ती मान्यही केली आहे. याच्या ग्रंथांमध्ये कांचीच्या प्रदेशाचे जास्त वर्णन येत नाही, उलट विदर्भाचा त्याला बराच अभिमान असावा असे वाटते. त्याला महाराष्ट्रीचेही कौतुक होते व त्याच्या काव्यदर्श या ग्रंथामध्ये त्याने विदर्भी लिखाणशैलीचेही पोटभरून कौतुक केलेले आढळते. दशकुमारचरितमच्या प्रारंभी जे श्लोक आढळतात, त्यावरून ते विष्णूचे भक्त होते हे कळते. आजही जळगाव, धुळे, नागपूर भागात श्रीविष्णूची पूजा बर्‍यापैकी प्रचलित आहे. काही अभ्यासकांच्या मते आचार्य दंडी हे कालिदासाचे समकालीन होते. अर्थात याला ऐतिहासिक लिखित पुरावा देता येत नाही. त्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून अभ्यासकांनी हे मत मांडलेले आहे. काहींच्या मते तीन दंडी अस्तित्वात होते. अर्थात हे मत आता फारसे कोणी गृहीत धरत नाहीत. काहींच्या मते दशकुमारचरितमची पूर्वपीठिका कोणीतरी मागाहून घुसडली आहे. पूर्वपीठिका आणि इतर भागात ज्या विसंगती आढळतात, त्यांचाही या मतासाठी आधार घेण्यात येतो. दंडी, कालिदास, भवभूती यांच्या गद्य काव्यातील सारखेपणा ते साधारणत: एकाच काळातील असावेत यासाठी पुरावा म्हणून काही जण वापरतात, पण तो काही ऐतिहासिक पुरावा नाही. पण त्याकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. कविचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे.

एकदा साक्षात सरस्वतीने एका सुंदर युवतीचे रूप घेतले व ती अल्लडपणे एका चेंडूशी खेळू लागली. ते पाहून दंडी म्हणाले,
एकोपि त्रय इत भाति कंदुकोयं कान्ताया: करतलरागरक्तरक्त: ।
भूमौ तच्चरणनखांशुगौरगौर: खस्थ: सन्नयनमरीचिनीलनील:॥

याचा स्वैर अर्थ असा होतो : जेव्हा ती त्या चेंडूला तळहाताने मारते, तेव्हा तिच्या हातात एक चेंडू नसून तीन चेंडू आहेत असा भास होतो. तिच्या तळहाताची लाली त्या चेंडूचा रंग लाल करते. जमिनीवर पडल्यावर तिच्या चमकणार्‍या नखांमुळे तो पांढरा भासतो. जेव्हा तो हवेत असतो, तेव्हा तिच्या गडद निळ्याशार डोळ्यातील किरणांनी त्याचा रंग निळा निळा होतो.

आता भवभूतीची ही रचना बघा :
विदितं ननु कंदुक ते ह्रदयं प्रमदाधरसंगमलुब्ध इव।
वनिताकरतामरसाभिहत: पतित: पुनरुत्पतासि॥

अर्थ : हे कंदुका, तुझ्या ह्रदयात काय चालले आहे ते मला चांगले समजते आहे. तिच्या करकमळाच्या थपडा खात तू वारंवार जमिनीवर पडतोस, पण तिच्या अधरस्पर्शाच्या इच्छेने परत परत तिच्याकडे उसळी घेतोस.

आणि हा कालिदास :
पयोधराकारधरो हि कन्दुक: करेण रोषादभिहन्यते मुहु:।
इतीव नेत्राकृतिभीतमुत्पलं स्त्रिय: प्रसादाय पपात पादयो:॥

अर्थ : जमिनीवर आपटून परत परत वर येताना तो चेंडू तिच्या उरोजांचा आकार घेत असल्यामुळे, विस्फारलेल्या नयनांनी ती त्या चेंडूवर तिच्या करकमलांनी रागावून प्रहार करीत होती. ते पाहताच तिच्या कमलनयनांशी स्पर्धा करणारे तिच्या केसातील कमळ दचकून तिच्या पायावर पडून गयावया करू लागले.

या तिन्ही रचना पाहिल्यावर त्या एकाच काळातील असाव्यात असे कोणालाही वाटेल. म्हणजे चेंडू व त्याच्याशी खेळणारी सुंदर तरुणी यांच्यामधील नाते उलगडताना तिच्या सौंदर्याचे रसग्रहण करण्याची ही पद्धतच त्या काळात असावी. अर्थात या अर्थाची रचना आत्ताच्या काळातही कवीला सुचू शकते. मला आठवते की ही कल्पना एका इंग्लिश गाण्यातही वापरली गेली आहे. प्रो. विल्सन यांनी आचार्य दंडी यांचा काळ अकरावे शतक काही गृहीतकांवर (भोजराजाचा उल्लेख) ठरविला. पण त्यांनीच नंतर त्यांचा काळ आधीचा असावा असेही म्हटले आहे. थोडक्यात, असे काही जण सोडल्यास, सहावे शतक हा आचार्यांचा काळ असावा असे इतर सर्व जण मानतात. आपणही तेच गृहीत धरण्यास हरकत नाही. जर स्पिंक, महामहोपाध्याय मिराशी व कॉलिन्स यांचे म्हणणे खरे मानले, तर आचार्यांच्या काळाचा अभ्यास हा सहाव्या शतकातील घडामोडींचा अभ्यास ठरतो. त्यांच्या रचनेतून साहजिकच त्या काळाचे प्रतिबिंब उठले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून दशकुमारचरितम हे त्या काळातील समजजीवनावर थोडा का होईना प्रकाश टाकू शकते असे वाटते, ज्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

आचार्य दंडींच्या आधी संस्कृत भाषेतील ग्रंथ हे अलंकारिक भाषेत रचले जायचे. अर्थातच त्यामुळे त्यात थोडीशी कृत्रिमताही आहेच. आचार्य दंडींनंतर हे सगळे बदलले. त्यांची भाषा रोखठोक व मूळ मुद्द्याला हात घालणारी म्हणून वाचकांना आवडू लागली. पण आपल्याला कुठल्याही साहित्यांची तुलना करायची नसल्यामुळे यात आपण शिरायला नको. आचार्य दंडी सहाव्या शतकात होऊन गेले याला आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे दशकुमारचरितममध्ये कुठेही मुसलमानी चालीरितींचा उल्लेख नाही, ना त्यांच्या आक्रमणांचा. यवनांचा उल्लेख आहे, पण ते ग्रीक किंवा भारतातीलच यवन असावेत.

महामहोपाध्याय श्री. मिराशी यांनी त्या वेळची राजकीय परिस्थिती काय होती आणि दशकुमारचरितममध्ये आचार्य दंडी यांनी वर्णन केलेली राजकीय परिस्थिती यात लक्षणीय साम्य दाखवून, नावे जरी वेगळी असली तरी दशकुमारचरितममध्ये वाकाटकांच्या सत्तेच्या अस्ताचे वर्णन केले आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यासाठी श्री. मिराशी यांचा एक लेख वाचकांनी जरूर वाचावा.

आचार्य दंडी यांचा काळ सहाव्या शतकाच्या आसपास होता, हे आपण गृहीत धरू या. अर्थात या बाबतीत अचूक सांगणे कठीणच नव्हे, अशक्य आहे.

ज्या दहा राजकुमारांची ही कथा आहे, त्यांची नावे देणेे सोईस्कर ठरेल, म्हणजे वाचतांना वाचकांचा गोंधळ उडणार नाही.
१ राजवाहन मगधाचा राजा राजहंस याचा मुलगा.
२ सोमदत्त सत्यवर्मन याचा मुलगा.
(सत्यवर्मन सुमतीचा भाऊ व राजहंसाचा वयोवृद्ध व अनुभवी मंत्री सितावर्मन याचा मुलगा.)
३ पुष्पोद्भव रत्नोद्भवाचा मुलगा.
(रत्नोद्भव हा सुश्रुतचा भाऊ व पद्मोद्भवाचा मुलगा. पद्मोद्भव हा आणखी एक मंत्री.)
४ अपहारवर्मन मिथिलेचा राजा प्रहारवर्मन याचा मुलगा. हा राजवाहनाच्या बाजूचा होता.
५ उपहारवर्मन मिथिलेचा राजा प्रहारवर्मन याचा मुलगा. हा राजवाहनाच्या बाजूचा होता.
६ अर्थपाल कामपालाचा मुलगा,
(कामपाल हा सुमित्राचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा. धर्मपाल हा राजहंसाचा आणखी एक मंत्री)
७ प्रमती सुमतीचा मुलगा.
(सुमती हा सत्यवर्मनचा भाऊ व सितावर्मनचा मुलगा)
८ मित्रगुप्त सुमंत्राचा मुलगा.
(सुमंत्र हा कामपालाचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा)
९ मंत्रगुप्त सुमित्राचा मुलगा.
(सुमित्र हा सुमंत्राचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा)
१० विश्रुत सुश्रुताचा मुलगा.
(सुश्रुत हा रत्नोद्भवाचा भाऊ व पद्मोद्भवाचा मुलगा)

श्री. मिराशी या बाबतीत काय लिहितात ते पाहू या. (कंसातील मते प्रस्तुत लेखकाची आहेत.) -
तिसर्‍या शतकाच्या शेवटास वाकाटकांचे साम्राज्य दख्खमध्ये चांगलेच प्रस्थापित झाले होते. वाकाटकांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणता येईल अशा प्रवरसेन-१ने चार अश्वमेध व इतर प्रकारचे अनेक यज्ञ केले होत. पुराणातील उल्लेखानुसार त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या चार मुलांत वाटले गेले. थोरल्या घराण्याची सत्ता विदर्भात प्रस्थापित झाली. यांनी प्रथम रामटेकजवळील नंदीवर्धन येथे राजधानी केली होती व नंतर प्रवरपूर येथे. श्री. मिराशींनी जेव्हा हा लेख लिहिला, तेव्हा त्यांनी त्यात असे म्हटले होते की प्रवरपूर कोठे आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. (परंतु आता ते सिद्ध झाले आहे. जवळच असलेले मनसर हेच प्रवरपूर आहे, हे तेथे झालेल्या उत्खननातून समजले आहे.) दुसर्‍या म्हणजे वास्तुगुल्म शाखेने वाशिम येथून राज्य केले, तर उरलेल्या शाखांची कुठलीच माहिती उपलब्ध नाही. याच घराण्यातील पृथ्वीसेनाच्या कारकिर्दित वाकाटकांचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपर्यंत पसरले होते. या शाखेच्या नंतरच्या राजांची माहिती सध्यातरी उपलब्ध नाही.
नाव घेण्यासारखे अनेक राजे थोरल्या शाखेत होऊन गेले, पण त्यातील सगळ्यात पराक्रमी होता प्रवरसेन दुसरा. याची आई गुप्त घराण्यातील होती व यानेच प्रसिद्ध 'सेतुबंध' नावाचा ग्रंथ प्राकृत भाषेत रचला. अजिंठ्याच्या अनेक शिलालेखांतून वास्तुगुल्म शाखेतही अनेक पराक्रमी राजे होऊन गेले हे सहज समजते. यांच्यातील शेवटचा होता हरीसेन (अंदाजे ४७५-५००) हा एक पराक्रमी व आक्रमक राजा असावा. पृथ्वीसेनानंतर त्याने उत्तर विदर्भावर स्वारी करून तो प्रदेश त्याच्या राज्याला जोडला; एवढेच नाही, तर कुंतल, अवंती, कलिंग, कोसाला, त्रिकूट, लाट व आंध्र या देशांतूनही महसूल गोळा करण्यास सुरुवात केली होती. याच राजाच्या काळात अजिंठ्यातील सर्वात सुंदर अशा तीन लेण्यांची (१६, १७, व १९) व त्याच डोंगररांगेत असणार्‍या घटोत्कच लेण्यांची निर्मिती झाली. अजिंठ्यातील शिलालेखातून याचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपलीकडे, तर दक्षिणेकडे कृष्णा नदीपलीकडे पसरले होते. पूर्वेला अरबी समुद्रापर्यंत व पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. हरीसेनानंतर बहुधा ही सत्ता मोडकळीस आली असावी, कारण त्यानंतर कुठल्याही शिलालेखात वाकाटकांच्या राजांची वंशावळ उपलब्ध नाही. हे असे का झाले असावे, याची पुराणात किंवा इतिहासात काहीही माहिती उपलब्ध नाही. परंतु दशकुमारचरितमच्या आठव्या उच्छवासाचा त्या दृष्टीकोनातून अभ्यास केला, तर काय झाले असावी याची थोडीफार कल्पना येऊ शकते.

दशकुमारचरितममध्ये विदर्भाचे राजे म्हणून पुण्यवर्मन व त्याचा मुलगा अनंतवर्मन यांचा उल्लेख आला आहे, तसेच महिस्मतीचा राजा म्हणून मित्रवर्मन याचा उल्लेख आला आहे. या प्रदेशात वर्मन या नावाचा वंश राज्य करत होता, असा कुठलाही पुसटचा उल्लेखही आपल्याला पुराणात किंवा इतर साहित्यात आढळत नाही. हे वाकाटक राजेच असले पाहिजेत. (अर्थात त्यांची नावे आचार्य दंडी यांनी का बदलली? हा संशोधनाचा विषय आहे. श्री. दंडी यांनी हा ग्रंथ लिहिला, त्या वेळी वाकाटकांचा अस्त होत आला होता. कदाचित त्या वेळच्या राजाला हे रुचले नसते, म्हणून त्यांनी तसे केले असावे. कारण आठव्या प्रकरणात वर्णन केलेले वातावरण असेच काहीसे होते.)
दशकुमारचरितममध्ये अनंतवर्मनच्या अनेक मांडलिकांचा उल्लेख आला आहे. अर्थात हे त्याच्या वडिलांचेही - म्हणजे पुण्यवर्मन याचेही मांडलिक असणार. हा पुण्यवर्मन म्हणजेच प्रत्यक्षातील हरीसेन असावा. या मांडलिकांपैकी कोण होते व प्रत्यक्षात ते कोण असावेत, याचा अंदाज खालीलप्रमाणे -

१. अश्मकांचा राजा वसंतभानू : अश्मकांचे राज्य हे सातमाळ व गोदावरी नदीच्या मध्ये पसरले होते. पांडारंगपल्ली येथे सापडलेल्या ताम्रपटावर यांचा व राष्ट्रकूट मानांक यांचा उल्लेख आढळतो. अजिंठा येथील २५ क्रमांकाच्या लेण्यामध्ये एका शिलालेखात अश्मकांच्या दोन मंत्र्यांचा उल्लेख सापडतो.
२. कुंतलदेशाचा राजा अवंतिदेव : श्री. मिराशींनी अन्यत्र म्हटले आहे की हे राजे वाकाटकांच्या समकालीन होते व यांचे राज्य कृष्णा खोर्‍याच्या वरच्या बाजूला होते. श्री. मिराशींच्या मते सातारा जिल्ह्यातील माणगंगेच्या किनारी मानपूर येथे त्यांची राजधानी होती. विदर्भ व कुंतल यांच्या सीमा एकमेकांस भिडलेल्या असल्यामुळे वाकाटकांच्या वास्तुगुल्म शाखेच्या राजांशी कायम चकमकी उडत. अजिंठामधील लेणी क्र. १६मध्ये एका शिलालेखात वाकाटकांनी कुंतलावर मिळवलेल्या दोन विजयांचा उल्लेख आहे. कुंतलाचे राजे वाकाटकांचे मांडलिकत्व झुगारून देण्याची संधी शोधत असणार, जी त्यांना हरीसेनानंतर मिळाली.
३. ऋशिकाचा राजा एकविरा : हे खानदेशाचे प्राचीन नाव आहे. श्री. मिराशींनी इतरत्र असे म्हटले आहे की खानदेशात सापडलेल्या काही ताम्रपटांवरून त्या काळी तेथे मनसबदार राज्य करीत होते. सध्याच्या चाळीसगावच्या आसपास त्यांची राजधानी होती असे मानण्यास जागा आहे. अजिंठामधील लेणे क्रमांक १७मध्ये, अत्यंत खराब झालेल्या एका शिलालेखात राजांची लांबलचक वंशावळ दिली आहे, ती बहुधा या वंशाची असावी. या लेखात हरीसेनाचा उल्लेख 'राजपुत्रांमधील चंद्र' असा करण्यात आला आहे, त्यावरून हे वाकाटकांचेच एक प्रबळ सरदार असावेत असे वाटते.
४. नाशिक्यचा नागपाल : त्या काळात सध्याच्या नाशिकच्या प्रदेशात राज्य करीत असलेल्या त्रैकुटकांच्या घराण्यातील हा राजा असावा. यांच्या राज्याची उत्तर सीमा दक्षिण गुजरातच्या सीमेला भिडली होती. सुरुवातीला हे अभिरांचे मांडलिक होते, पण नंतर स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यापैकी एका राजाने अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आढळतो. व्याघ्रसेन नावाच्या यांच्या एका राजाचा हरीसेनाने पराभव केला असावा. ज्या पर्वतावरून या राजघराण्याने आपले नाव घेतले होते, तो पर्वत नाशिकच्या पश्चिमेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. काही काळापूर्वी सापडलेल्या अंजनेरी ताम्रपटात पूर्व-त्रिकूट विषय असा उल्लेख आढळतो; म्हणजे त्या काळी तेथे त्रिकूट नावाचा प्रदेश असावा, हे स्पष्ट होते व त्या पर्वताने या त्रिकूटाचे दोन भाग केले आहेत.
५. कोकणचा राजा कुमारगुप्त : कोकणचा प्राचीन इतिहास आपल्याला जरासा अनभिज्ञ आहे, कारण कोणत्याच शिलालेखात त्याचा व त्यावर राज्य करणार्‍या राजांचा स्पष्ट उल्लेख नाही. कोकणावर शकांचे व सातवाहनांचे राज्य होते. पण त्यांच्या र्‍हासानंतर त्या प्रदेशावर कोण राज्य करीत होते, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण कान्हेरीच्या स्तुपात सापडलेल्या एका ताम्रपटात ४९४ साली तेथे त्रैकूटकांचे राज्य होते असा उल्लेख आढळतो. कदाचित असे झाले असेल की कोकणाचे राज्यकर्ते आधी त्रैकूटकांचे मांडलिक असावेत आणि वाकाटकांनी त्रैकूटकांचा पराभव केल्यावर ते त्यांचे मांडलिक झाले. ही एक शक्यता आहे.
६. मुरलाचा राजा वीरसेन : हा देश कुठे असावा याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही. पण तो गोदावरीच्या किनारी कोठेतरी असावा असे मानण्यास जागा आहे.

वाकाटकांचे हे सर्व मांडलिक विदर्भाच्या पश्चिमेकडे व दक्षिणेकडे राज्य करीत होते. हरीसेनाने पूर्वेचे कलिंग, कोसला व आंध्र हे देश जिंकले होते. पण दशकुमारचरितममध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. या राजांनी वसंतभानूच्या कारस्थानात भाग घेतला नाही, हे यामागचे कारण असावे. यातील दोन तर वाकाटकांचे नातेवाईक होते. दशकुमारचरितममध्ये असा उल्लेख आला आहे की अनंतवर्मनची माता कोसलाची राजकन्या होती. कोसला म्हणजे दक्षिण कोसला किंवा छत्तीसगड. पृथ्वीसेनाच्या बालाघाट ताम्रपटात कोसलांनी वाकाटकांचे मांडलिकत्व स्वीकारले होते असा उल्लेख आहे. त्या वेळी बहुधा कोसलावर शरभपूर घराण्याचा राजा राज्य करत असावा. आंध्रावर त्या वेळी विष्णुकुंडीन घराण्याचे राज्य होते आणि तेही वाकाटकांशी एका विवाहाने जोडले गेले होते. वाकाटकांच्या एका राजकन्येशी या राज्याचा संस्थापकाचा विवाह झाला होता व ती हरीसेनाचीच वंशज होती.

या मांडलिक सरदारांच्या राज्याशिवाय दशकुमारचरितममध्ये आणखी तीन राज्यांचा उल्लेख आढळतो. उत्तरेकडे महिस्मती आणि माळवा, तर दक्षिणेकडे वनवासी. महिस्मतीबद्दलही कमी माहिती उपलब्ध आहे, पण बरवानी आणि ग्वाल्हेर येथे सापडलेल्या ताम्रपटांत 'येथे पाचव्या शतकात सुबंधू नावाचा राजा राज्य करीत होता' हे कळते. त्याच्या एका दानपत्रात कलचुरीच्या कालगणनेतील वर्ष १६७ असे दिले आहे, म्हणजे ४१६-१७ साल. हा काही वाकाटकांच्या कुळातील नव्हता. कदाचित वाकाटकांनी नंतरच्या काळात हे राज्य त्यांच्या राज्यास जोडले असावे.

माळव्याचा चंडवर्मन : माळव्यावर त्या काळी एक अत्यंत शक्तिमान राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते मंदसोरचा यशोधर्मन. यानेच हूण राजा किहिरकुलाचा पराभव केला होता. मंदसोरच्या विजयस्तंभावरील लेखात याचे राज्य हिमालयापासून दक्षिणेकडे महेंद्र पर्वतापर्यंत पसरले होते असा उल्लेख आहे.

वनवासीचा भानुवर्मन : वनवासी म्हणजे आत्ताचे कर्नाटकातील बनवासी. याचे पूर्वीचे नाव वैजयंतीही होते. ही कदंबांची राजधानी होती. कदंबांची खातरीशीर वंशावळ अजूनही उपलब्ध नाही, पण पाचव्या व सहाव्या शतकात कदंबांचे एक शक्तिमान राज्य तेथे होते हे निश्चित. या घराण्याचा शेवटचा राजा हरीवर्मन याच्या सांगोली येथे सापडलेल्या ताम्रपटाच्या आधारे याचा काळ ५२६ किंवा ५४५ असावा असे वाटते. याच्या वडिलांचे नाव होते रविवर्मन, जो दशकुमारचरितममधील भानुवर्मन असावा.
दशकुमारचरितममध्ये दख्खनमध्ये वाकाटकांच्या काळात जी परिस्थिती होती, याचे सविस्तर वर्णन आले आहे. तसेच हरीसेनानंतर कमकुवत, दुर्व्यसनी वारसाच्या काळात वाकाटकांच्या र्‍हासास सुरुवात झाली व मांडलिकांनी बंडखोरीस सुरुवात केली, याचेही वर्णन आले आहे. वाकाटकांच्या राज्यात अनागोंदी माजल्यावर अश्मकांनी भरीस घातल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी वाकाटकांच्या राज्याचे लचके तोडायला सुरुवात केली व काही मांडलिकांनी विश्वासघाताने शत्रूशी कशी हातमिळवणी केली व वाकाटकांच्या राजास ठार मारले, हा पुढील इतिहास आहे.

वरील चर्चेत आचार्य दंडी यांनी सहाव्या शतकाच्या सुरुवातीची परिस्थितीचे वर्णन केले आहे, हे स्पष्ट होते किंवा आचार्य दंडी त्याच काळात होऊन गेले असे म्हणता येते.

रचनाकाराला हिमालय माहीत असावा, कारण चारित्र्याला 'हिमाइतके स्वच्छ' अशी उपमा दिली आहे. विंध्य पर्वतातील जंगलात राजाने आश्रय घेतला, असा उल्लेख आहे; किंबहुना बरीचशी कहाणी विंध्य पर्वताच्या प्रदेशात घडली आहे. हा सध्याचा सातपुडा असावा. मलय पर्वताचा उल्लेख त्यात असलेल्या चंदनाच्या झाडांसहित आला आहे. या पर्वतावरून उत्तरेकडे वाहणारे सुगंधित थंडगार वारे प्रेमिकांना उत्तेजित करतात असा उल्लेख अनेकदा आला आहे. हा पर्वत मलबारमधील सह्यादी असावा. कैलास पर्वताचाही तपश्चर्येच्या बाबतीत उल्लेख आला आहे.

दशकुमारचरितमच्या लेखकाने प्रत्येक शहराबाहेर किंवा गावाबाहेर असलेल्या बागेचे वर्णन केले आहे. या बागेत एखादे देऊळ असायचे आणि ते बहुतेक शंकराचे असायचे. कोठेही बौद्ध किंवा जैन या धर्मांच्या देवळांविषयी किंवा मठांविषयी उल्लेख नाहीत. श्री. मिराशी म्हणतात त्याप्रमाणे ही कहाणी वाकाटकांचीच आहे हे जर खरे मानले, तर ज्यांनी अजिंठा बांधले किंवा खोदले, त्या बौद्ध धर्माच्या एकही स्थानाचा यात उल्लेख नाही, हे जरा विचित्र वाटते. प्रत्येकी एकच उल्लेख आहे, पण तो चांगला नाही.

सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक फुलांचाही उल्लेख आढळतो उदा. कण्हेर, जाई, जुई, कमळ, चंपक, जस्मिन, माधवी इ. इ. तुळशीच्या समिधा यज्ञात अर्पण करीत.

जायफळाची व अंजिराची झाडे बागेत लावलेली दिसतात. आंबा, तिलक व सिंदुवरा या झाडांचा उल्लेख आहे. तिलकाचा वृक्ष म्हणजे कुठला हे लक्षात येत नाही, पण या वृक्षाखाली सतराव्या तीर्थंकरांना साक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यांचे नाव होते कुंथुनाथजी. हा वृक्ष हस्तिनापूरच्या आसपास असलेल्या सहस्रमार जंगलात आढळतो, असा उल्लेख जैन पुराणात आढळतो. फाल्गुन महिन्यात अनंत व्रतात पुराणात सांगितल्याप्रमाणे ही फुले वाहून देवीची पूजा करतात. याचे सध्याचे प्रचलित नाव मालती असावे.

अशोकाच्या झाडाला संस्कृत साहित्यात शृंगाराच्या व प्रणयाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. हा अशोक म्हणजे सध्या दिसतो, सरळसोट वाढतो तो नसून इतर वृक्षांप्रमाणे वाढणारा व पसरणारा आहे. हा उन्हाळ्यात दाट सावली देतो व लाल नारंगी रंगाच्या फुलांनी बहरतो. हा बहरल्यावर जंगलाला आग लागली आहे असा भास लेखकाला होत आहे. आणखी एक समजूत आहे ती म्हणजे याला सुंदर स्त्रीचे पाय लागल्याशिवाय हा फुलत नाही. म्हणून वसंतोत्सवात समारंभपूर्वक हा कार्यक्रम केला जातो, त्याला अशोक-दोहद असे नाव आहे. दुर्दैवाने हा वृक्ष आता नामशेष झाला आहे.

बकुळीच्या झाडाचाही उल्लेख दशकुमारमध्ये झाला आहे. बकुळीचा वृक्ष विशाल, फुले लहान व नाजूक असतात. इतकी नाजूक की श्री. दंडी म्हणतात - ती मधमाशांच्या हालचालींनीही विसकटतात. याच्या फुलांच्या सुवासाचा घमघमाट सुटतो व वाळल्यावरही अनेक दिवस या फुलांचा वास येतो. कापूराचाही बर्‍याच वेळा उल्लेख येतो. काही वेळा तो औषध म्हणूनही आला आहे. वडांची झाडे त्यांच्या दाट सावलीसाठी मुद्दाम लावली जात असावीत, कारण ती बागेसमोर आढळतात.
चंदनाच्या झाडांचाही/जंगलांचाही उल्लेख बर्‍याच वेळा आहे. आपण समजतो की चंदनाच्या वाळलेल्या खोडालाच तो खास चंदनाचा सुवास येतो. पण ज्या ठिकाणी चंदनाची हजारो वृक्ष आहेत अशी जंगले आपण अनुभवलीच नाहीत. मला वाटते अशा चंदनाच्या जंगलात हिरव्या फांद्यांनाही हा सुवास येत असावा व वार्‍यामुळे तो घमघमाट सगळीकडे पसरत असावा.
जंगलात शबर व किराट जमातींचा उल्लेख आला आहे. ऐत्तरीय ब्राह्मणात म्हटले आहे की शबर किंवा सबर जमात ही विश्वामित्रांच्या थोरल्या पुत्राचे वंशज आहेत आणि त्यांना वाईट वागणुकीसाठी त्यांनी शाप दिला होता. अर्थात ही एक आख्यायिकाच आहे.

कडूलिंबाचा उल्लेख आहे, पण तो सांकेतिक. विड्याच्या पानांच्या/नागवेलीच्या व द्राक्षाच्या बागाही बर्‍याच असाव्यात.
वाकाटकांच्या काळात जमिनीवरून, तसेच समुद्रातूनही व्यापार होत असे. त्याच काळात रेशीममार्गावरील व्यापार जोरात होता व चीनवरून ग्रीसला निघालेले रेशीम मध्ये भारतातही उतरत असे. दशकुमारचरितममध्ये चिनी रेशमी वस्त्रे असा स्पष्ट उल्लेख दोनदा आला आहे व त्याच्या तलमपणाचेही वर्णन करण्यात आले आहे.

कमळाच्या देठांच्या तंतूपासूनही बहुधा तलम वस्त्रे विणायची पद्धत होती. सध्या केळीच्या बुंध्याच्या तंतूंपासून व आफ्रिकेत एक झाडाच्या तंतूंपासून धागा तयार करतात, ते पाहिल्यास हेही शक्य आहे असे वाटते. स्त्रिया कमरेवर कुठलेही वस्त्रे घालत नव्हत्या, कारण एका ठिकाणी स्त्रीच्या उरोजावर चमकणार्‍या अश्रूंचा उल्लेख आला आहे. स्त्रिया केसात फुले व वेण्या माळत. अजिंठाच्या चित्रातही स्त्रियांच्या केसात आपल्याला फुले (कमळाची) व वेण्या, गजरे माळलेले दिसतात. स्त्रिया सौंदर्यलेप लावीत असाही उल्लेख आहे.

बागेत तलाव असत व त्यात राजहंस, करकोचे व बदके विहार करीत असत. हत्ती विपुल असावेत, कारण जंगलात ते बर्‍याच ठिकाणी भेटत. माकडांचा व वाघांचाही उल्लेख आहेच. पोपट, कोकिळा, मोर यांचाही उल्लेख आहे. कुठल्याही कवीला चक्रवाक पक्षांचे फार अप्रूप. दशकुमारचरितममध्येही चक्रवाक पक्ष्याचा उपमांसाठी बर्‍याच वेळा उपयोग केलेला दिसतो. दोन प्रकारच्या कोंबड्यांच्या झुंजीचे वर्णन दशकुमारचरितममध्ये आले आहे. एक बलाका आणि दुसरा नारिकेल. हरणे, डुक्कर व गवे यांची शिकार करण्यात येई.

दशकुमारचरितम ज्या काळात लिहिले गेले, तेव्हा चतुर्वणाची व्यवस्था स्थिरावली होती. या व्यवस्थेबाहेरच्या जमाती जंगलात राहत. सनातन धर्माचे प्राबल्य वाढत होते व जैन आणि बौद्ध धर्मांचा बहुधा र्‍हास सुरू झाला होता. या दोन धर्मांना माझ्या मते राजांच्या राण्यांनी आश्रय दिला असल्यामुळे ते तगले. या धर्मांमध्ये संघर्ष होत असे, पण तो वैचारिक. धार्मिक यात्रांना जायची पद्धत असावे असे दिसते.

हळदकुंकू वाहून पूजा केली जाई व पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास होता असे दिसते. शंकराच्या पूजेचे वर्चस्व होते. सतीची प्रथा प्रचलित होती, पण बळजबरी नव्हती, हेही लक्षात येते. ज्योतिष, मुहूर्त यावर विश्वास होता व ज्योतिषींना मानही होता, असे दिसते. सीमान्तपूजनाचा उल्लेख दोन वेळा आला आहे, पण ते वेगवेगळ्या कारणांसाठी केलेले दिसते. देवीसमोर बळी देण्याची जंगली टोळ्यांमध्ये पद्धत होती असे दिसते. राजकुमारांच्या अभ्यासात कौटिल्याचे अर्थशास्त्र व कामांडकीचे नीतिशास्त्र यांचा अंतर्भाव होता. अंगणात पूजेच्या वेळी केळीचे खुंट बांधण्याची पद्धत त्या काळीही होती. तसेच विड्याची पाने आलेल्याला व निरोपाबरोबर देण्याची पद्धत होती. भारतीय मूर्तिशास्त्रात अवकाशात उडणार्‍या विद्याधरांच्या ज्या मूर्ती आढळतात, त्याचा प्रत्यक्ष वापर दशकुमारचरितममध्ये आचार्य दंडी यांनी केलेला दिसतो. खाली एका विद्याधराच्या मूर्तीचे चित्र दिले आहे. तसेच सुरसुंदरीचाही उल्लेख केला आहे. गणपतीची पूजा कुठल्याही कार्याच्या अगोदर करण्याची हल्लीसारखीच पद्धत होती.

विद्याधर व सुरसुंदरी : छायाचित्र (वेरूळ व कोपेश्वर मंदिर)

शहरात मदनोत्सव, वसंतोत्सव असे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येत.
जैन व बौद्ध धर्मांचा उल्लेख प्रत्येकी एकदाच आला आहे.

वाराणसीचे दुसरे नाव काशी होते व मनकर्णिका घाटावर गंगेचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ होते असा उल्लेख आहे. जरी चातुर्वण्य पद्धत असली, तरीही तिने विकृत स्वरूप धारण केलेले नव्हते. कारण ब्राह्मण कनिष्ठ जातीच्या घरांमध्ये जेवण्यास गेलेले दिसतात.

राजे-महाराजांच्या पदरी खुशमस्करे असत व आठव्या भागात अशाच एका खुशमस्कर्‍यामुळे झालेल्या गोंधळाचे वर्णन आहे. राजे अतिप्राचिन बृहद इंद्रजालाचाही करमणुकीसाठी वापर करीत व इंद्रजाल फेकणार्‍यांना दरबारात आमंत्रित करत. इंद्रजाल व मायाजाल हे साधारणत: एकाच माळेचे मणी आहेत. वशीकरणासाठी व काळ्या जादूसाठी यांचा उपयोग सुरू झाल्यामुळे ही विद्या बरीच बदनाम झाली. पण सहाशे साली ती बदनाम होती असे म्हणता येत नाही. सध्या मेस्मेरिझममध्ये किंवा भ्रम उत्पन्न करून आगगाडी गायब करणे, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा गायब करणे असे मायाजालाचे प्रयोग होतात, त्याचे मूळ येथे असावे. अर्थात हे सगळे हातचलाखीचेच प्रयोग असत व असतात हे सांगायला नकोच. जादूच्या प्रयोगाच्या वेळी डोळ्यात अंजन घालण्याचा उल्लेखही आहे.

कथाकथन हाही एक करमणुकीचा मार्ग होता असे मानण्यास जागा आहे. विशेषत: प्रवासाच्या कथा जास्त लोकप्रिय होत्या असे दिसते. माणसांना नवनवीन प्रदेशाच्या माहितीचे आकर्षण असते हेच खरे.

शहरातील गणिकांना बराच मान होता व त्या आपल्या नृत्यकलेने महाजनांची करमणूक करीत. त्यांच्या नृत्यांचा कार्यक्रम राजा आयोजित करीत. गणिकेच्या व्यवसाय बराच क्लिष्ट असावा. कारण त्या कशा तयार होत याचे सविस्तर वर्णन दशकुमारमध्ये आले आहे. एका राजकुमारीने केलेल्या कंदुकनृत्याचे सविस्तर वर्णन दशकुमारचरितममध्ये आलेले आहे, ते मुळातच वाचण्यासारखे आहे. त्यात दोन-तीन प्रकारच्या पदन्यासाचेही ते वर्णन करतात.

वाकाटकांच्या त्या काळात व्यापार-उदीम फार महत्त्वाचा मानला जाई. दशकुमारांपैकी एका नायकाचा व्यवसाय व्यापाराचा दाखविला आहे. व्यापार्‍यांची संघटना असे व व्यापार्‍यांचे तंटे त्यांच्यासमोरच सोडविले जात. एका व्यापाराचे घर सात मजली आहे असाही उल्लेख आहे. हे व्यापारी फार श्रीमंत असत. व्यापारांना मृत्युदंडापासून मुक्तता असे व हा नियम चाणक्याने केला आहे असाही दाखला आहे. व्यापारी समुद्र ओलांडूनही व्यापार करीत. कालयवनांच्या बेटावर ते जात. ते दामलिप्त नावाच्या बंगालच्या उपसागरावर असलेल्या एका बंदरात बोटीवर चढत. दशकुमारचरितममध्ये एका यवनी दर्यासारंगाचे नाव रामेषू असे दिले आहे. याचा अर्थ व उगम श्री. मोतीचंद्र यांच्या मते सीरियात आढळतो. राम = सुंदर व इशू = येशू. दशकुमारचरितममध्ये एका यवनी व्यापार्‍याचे नाव खनाति असे म्हटले आहे. हे नावही सीरियामध्ये प्रसिद्ध आहे. या व्यापारादरम्यान भेटणार्‍या सर्व परदेशी माणसांना ते यवन याच नावाने ते ओळखत - मग ते अरबी असोत किंवा चिनी किंवा ग्रीक.

प्रत्येक मोठ्या शहरात स्थानिक व्यापार्‍यांबरोबर आणखी एका जमातीचा उल्लेख आहे आणि तो म्हणजे सार्थवाह. अमरकोशामध्ये याचा अर्थ ‘व्यापारांच्या तांड्याचा पुढारी किंवा मार्गदर्शक’ असा दिला आहे. पुढे अशीही माहिती दिली आहे की हे व्यापारी स्वत: त्यात गुंतवणूक करीत. हा माणूस मोठा हिकमती, हल्लीच्या भाषेत मॅनेजमेंट गुरू, अत्यंत प्रामाणिक, धीरोदत्त, न डगमगणारा, नित्यनेमाने येणार्‍या कटकटींना न कंटाळता सामोरे जाणारा, उदार, सर्व धर्मांची माहिती असणणारा असा असे. त्याला सर्व संस्कृतींची ओळख असे. त्याला स्वत:च्या भूमीची व त्यातील अनेक जातीजमातींची माहिती असे, एवढेच नव्हे, तर परदेशी संस्कृतींचीही ओळख असे. कारण त्यांना या प्रवासादरम्यान यवन, शक, पहल्लव, यिर्‍ची इ. इ. असे अनेक प्रकारचे लोक भेटत. बंगाल उपसागरातील ताम्रलिप्ती (हल्लीचे मदिनापूर जिल्ह्यातील तमलुक. हे रूपनारायण नदीवर आहे, जी बंगालच्या उपसागराला मिळते.) ते सीरियामधील अँटिऑक, जावा बेटे ते कद्दा (मलेशिया), चोलामंडल ते अलेक्झांड्रिया व आफ्रिकेतील काही बंदरे एवढ्या प्रदेशात यांचा व्यापार चाले. सार्थवाह फक्त समुद्रातूनच व्यापार्‍यांचे तांडे घेऊन जात असे नाही, तर जमिनीवरूनही ते बर्‍याच प्रदेशात व्यापारी व त्यांचा माल घेऊन जात. अफगाणिस्थानपासून विदर्भ, दक्षिण कोसला असे व्यापारी मार्ग उपलब्ध होते. या तांड्यात व्यापार्‍यांशिवाय संतमहंत, राजनैतिक प्रतिनिधी, साधू, संन्यासी, भिख्कू, करमणूक करणारे विदूषक, कसरती करणारे, विद्यार्थी व इतर प्रवासी त्यांच्या कुटुंबकबिल्यासह असत. या सर्वांची जबाबदारी ही सार्थवाहाची असे.

पुरोहितांचे काम अर्थातच ब्राह्मण करीत. ब्राह्मणांना मानाचे स्थान असे व त्यांच्यासाठी वेगळे नियम असत. ब्राह्मणांमध्येही काही दुर्जन जन्म घेत, पण शेवटी त्यांना पश्चात्ताप होई. जुगाराचे अड्डे - ज्याला द्यूतगृहे म्हणत असत, त्यात बहुधा स्त्रियाही जुगार खेळायला जात असत. प्राण्यांच्या शर्यती व झुंजी यांचाही उल्लेख आहे. नृत्याच्या स्पर्धाही होत असत.

दशकुमारचरितममध्ये आणखी एका महत्त्वाच्या व्यवसयाचा उल्लेख झाला आहे, तो म्हणजे गुन्हेगारीचा. हिंदू कथांमध्ये, पुराणांमध्ये आपण पाहिले आहे - बर्‍याच वेळा एक राजकुमार असतो व तो पराक्रम गाजविण्यासाठी घराबाहेर पडतो, मग त्याला एक नायिका भेटते. हा राजकुमार शूर, देखणा, सद्गुणांचा पुतळा असतो व शेवटी शत्रूंचा परभव करून नायिकेला जिंकतो, अशी कहाणी असते. पण दुसर्‍या बाजूल नीच लोक असतात. खलनायक, चोर-दरोडेखोर असतात. संतांचा बुरखा पांघरून लोकांना फसविणे, त्यांची संपत्ती लुटून त्यांना देशोधडीस लावणे हा यांचा व्यवसाय असतो. शेवटी यांचा अंत दुर्दैवी असतो. अशा करामती करणारा एक नायक/खलनायक बर्‍याच कथांमध्ये वर्णन केला गेला आहे. त्याचे नाव मूलदेव. याच्या स्वभावाचे वर्णन करणे तसे अवघड आहे, कारण जरी याने चौर्यकर्माबद्दल आद्य ग्रंथ लिहिला असला, तरीही हा मूलत: अत्यंत चांगल्या स्वभावाचा आहे. कदाचित हल्लीच्या काळातील रॉबीनहूडवरून याच्या स्वभावाची थोडीफार कल्पना येऊ शकेल. थोडक्यात, गुन्हेगारांमध्ये किंवा चोरांमध्ये याला आदराचे स्थान आहे. हा आणखी दोन नावांनी पुराणात ओळखला जातो -‘मूलभद्र‘ आणि ‘कलांकुर’. याला चौसष्ट कला प्राप्त असतात, कारण त्याला त्याच्या व्यवसायात या सर्व कलांचा उपयोग करणे भाग असते. हा स्वत: गणिकेचा पुत्र असल्यामुळे याला गणिकांच्या विश्वाचा चांगलाच परिचय असावा. अट्टल जुगारी, प्रसंगावधानी व जुगाराची आव्हाने पेलणार्‍या अशा या मूलदेवाचा दशकुमारचरितममध्ये कौतुक करण्यासाठी उल्लेख आला आहे.

स्त्री-पुरुषातील संबंध मोकळे असावेत. मुलींची लग्ने लहान वयात होत होती. एका मुलीचे लग्न तेराव्या वर्षी झाल्याचा उल्लेख आहे व त्यामुळे तिच्या नवर्‍याला तिच्यात रस उरला नाही असाही उल्लेख आहे. संस्कृती पुरुषप्रधान होती. पुरुष गणिकांकडे सररास जात असत. गणिकांना समाजात मानाचे स्थान असावे. चमत्कारांवर सर्वसामान्यांचा विश्वास सहज बसत असे. कारण अनेक जणांनी याचा फायदा घेतल्याचा संदर्भ आहे.

राज्यकारभाराची पद्धत सरंजामी असे व भ्रष्टाचारास भरपूर वाव असावा असे दिसते. कारण एखादे काम होण्यासाठी सररास लाच देण्याची पद्धतच होती. ध्येय गाठण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब क्षम्य होता. पण राजाला मात्र याबाबतीत ताकीद दिलेली आढळते. मद्यपान हे सर्वसंमत असावे. पुरुष घरातही स्त्रीसमवेत मद्याची मजा लुटत. पिणार्‍याला मद्याचे दुष्परिणाम माहीत असत, पण आजच्यासारखेच तरीही मद्यपान चालत असे.

आचार्य दंडी यांनी कथानक आणि त्याची उपकथानके यांचा सुंदर मेळ घालून जो परिणाम साधला आहे, तो आपल्याला खालील गद्य काव्य वाचूनच अनुभवता येईल. आचार्य दंडींची भाषा सरळ सुंदर व जेथे पाहिजे तेथे अलंकारिक रूप घेते. यातही निसर्गात आढळणार्‍या पानाफुलांचा, पर्वतांचा, सुवासांचा व इतर वस्तूंचा ते आधार घेतात, ज्यामुळे ते काव्य आपल्याला अधिकच जवळचे वाटते. काही प्रसंगाचे वर्णन करतान ते बाण व कालिदास यांच्यासारखे अलंकार वापरतात व दुसर्‍याच क्षणी रोखठोक भाषेचा वापर करून आपल्याला जमिनीवर आणतात. हे धक्कातंत्रच म्हणायला हवे. एका झोपलेल्या राजकन्येचे वर्णन वाचण्यासारखे आहे. हे वाचल्यावर हे काव्य आहे की गद्य असा प्रश्न कोणालाही सहज पडावा. दशकुमारचरितम लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण आहे त्यातील गोष्टी. या कहाण्या सर्वसामान्य माणसांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या, पाहिलेल्या असतात. उदा. जुगार, प्रेम, विवाहबाह्य संबंध, युद्धे, कपट, कारस्थाने, बाल्य, तारुण्य, वृद्धत्व, कुरूप माणसे, सुंदर माणसे, सुंदर तरुणी, सामान्य रूपाच्या तरुणी, साधी सरळ माणसे, चोर बदमाष माणसे, देव, दानव, जन्म-पुनर्जन्म, इ.इ.

आचार्य दंडीन यांची लिहिण्याची पद्धत वेगळीच आहे. ते स्वत: एक कथा सांगतात, मग त्यातील पात्रे आत्मवृत्त कथन करतात व त्या दोन्हींचे वर्णन करताना आचार्य इतर माहिती सादर करतात. हे सर्व कथन करतान ते कोठेही रहस्य व रहस्यभेद या गोष्टींचा फायदा घेत नाहीत.

या भाषांतरात जी काही उणीव भासेल, ती माझ्या लिखाणातीलच आहे असे कबूल करून मी ही प्रस्तावना संपवितो.

वाकाटक घराणे

महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.

प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.

पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.

दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.

नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.

विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.

द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.

नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.

वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.

सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.

प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.

वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.



महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. पवनी आणि आदम या दोन ठिकाणी झालेल्या उत्खननात भुईकोट किल्ल्याच्या बांधणीचे पुरावे मिळालेले आहेत. पुढे मध्ययुगीन कालखंडात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात राजकीय घडामोडींमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणीला सुरुवात झाली. विदर्भात जवळजवळ असे एकूण ३० किल्ले आहेत. हे किल्ले दोन प्रकारांत बांधण्यात आले आहेत. यांतील काही किल्ले हे उंच टेकडीवर आहेत, ज्याला आपण गिरिदुर्ग म्हणतो तर काही किल्ले हे जमिनीवर म्हणजेच भुईकोट प्रकारात बांधलेली आहेत.

अमरावती जिल्ह्यातील गाविलगड.

मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. अंदाजे १२-१३ व्या शतकात पूर्व विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, गडबोली, राजोली, माणीकगड, सुरजागड इत्यादी ठिकाणी किल्ल्यांची बांधणी केली. किल्ल्यांच्या स्थापत्य कलेतून त्यांच्या बांधणीचा कालखंड निदर्शनास येतो. या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर नागांचे शिल्पांकन कोरलेले आहेत. त्यामुळे हे किल्ले नागवंशी राजांनी बांधले असावेत, असा समज आहे. माणीकगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला आकाराने मोठा असून त्याची तटबंदी ही फार लांबवर पसरलेली आहे. किल्ल्यातील स्तंभ, कमानी, मेहरपी अगदी सुबक अशा कलाकुसरीने बनविलेल्या आहेत. वैरागड, सुरजागड, इत्यादी किल्यांची केवळ तटबंदी शिल्लक असलेली आढळून येते.

गोंड राजवटीचा उदय इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. वैरागड, माणीकगड व सुरजागड हे किल्ले गोंडानी आपल्या ताब्यात घेऊन त्याचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख आहेत. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४००  वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले या भागात जास्त प्रमाणात आढळतात. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर ही शहरे त्यांची राजधानीची ठिकाणे होती. बल्लारशहा हा किल्ला वर्धा नदीच्या उत्तर तीरावर स्थित आहे. हा किल्ला चंद्रपूर येथील किल्ल्याच्या तुलनेत आकाराने लहान असून किल्ल्याची तटबंदी व बुरुजे मजबूत स्थितीत आहेत. आतील भागांत काही बांधकामे निदर्शनास येतात, परंतु ती मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहेत. चंद्रपूर हा किल्ला आकाराने मोठा असून या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात आधुनिक वसाहत निर्माण झाली आहे. किल्ल्याची तटबंदी व बुरुज काही भागांत सुस्थितीत आहेत.

गोंड राजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोरीव काम असलेले अतिशय सुबक प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावरील हत्तीवर आरूढ सिंहाचे शिल्पांकन हे गोंड राजवटीचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. नगरधन, देवळापार, देऊळगाव, भद्रावती, रामटेक, नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आमनेर किल्ला, महदागड किल्ला, पवनीचा किल्ला, वैरागड किल्ला, माहुरगड, अंबागद, भिवगड, गडबोली किल्ला इत्यादी गोंडकालीन किल्ल्यांचे अवशेष आज विदर्भात पाहायला मिळतात. या किल्ल्यांची आज मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून सध्या केवळ तटबंदी व प्रवेशद्वारे सुस्थितीत आहेत.

१३ व्या शतकात खिलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्रात मुस्लीम राजवटीचा उदय झाला व पश्चिम विदर्भावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. खिलजी, तुघलक आणि बहमनी राजसत्तांनी काही किल्ल्याची बांधणी केली. त्यामध्ये गाविलगड, नरनाळा, बाळापूर इत्यादी किल्ल्याचा समावेश होतो. गाविलगड हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो.

गाविलगड हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणारा जो मार्ग होता, त्या मार्गावर बांधण्यात आलेला होता. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत वेगवेगळ्या राजवटीत वाढ झाली व आतील भागांत अनेक बांधकामे केलेली आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने मशीद हे उत्तम उदाहरण आहे. याच भागात नरनाळा नावाचा किल्ला आहे. हा किल्ला दहाव्या शतकात गोंडानी बांधला, असे म्हटले जाते. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात अहमदशहा वली याच्या काळात या किल्ल्याचे नुतनीकरण झाल्याची नोंद सापडते. नंतरच्या काळात मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला.

नागपूरकर भोसल्यांनी १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक किल्ल्यांचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. त्यामध्ये नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात मुस्लीम राजवटींना सत्ता स्थापन करताना अनेक लढायांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मुस्लीम व मराठा काळातील किल्ले अतिशय मजबूत, तसेच शत्रूच्या आक्रमणापासून सावध राहण्याकरिता केलेल्या सर्व उपाययोजनांनी युक्त आहेत. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भुईकोट प्रकारातील किल्ले निदर्शनास येतात. हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. या भागावर येथील स्थानिक गोंड राजांनी राज्य केले. गोंड राजांनी सुरुवातीपासून वेगवेगळ्या काळात मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पतकरल्यामुळे फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावे लागत असे.

संदर्भ :

  • चितळे, श्रीपाद, विदर्भातील किल्ले, नागपूर, २००९.
  • राजूरकर, अ. ज. चंद्रपूरचा इतिहास, चांदा (चंद्रपूर), १९५४.

समीक्षक : सचिन जोशी

 
 

​महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती.  या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.

नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या  दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.

एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि  (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि  (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर य (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या  पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून  वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो  (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही.​ मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लं​​डन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.

नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी   त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये  वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.

संदर्भ :

  • Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980
  • Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
  • Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade- Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.

                                                                                                                                                                                                                          समीक्षक : पद्माकर प्रभुणे

 
 

वाकाटक काळातील वेशभूषा – TVAM Foundation

Anurag vaidya

वाकाटक काळातील वेशभूषा1 MIN READ

Reading Time: 5 minutes

प्राचीन महाराष्ट्रातील वाकाटक राजवंश हा भारतातील प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध राजवंश असून वाकाटकांच्या कालखंडाला ‘सुवर्णयुग’ असे संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे कारण या कालखंडामध्ये हिंदुधर्म, संस्कृत आणि प्राकृत वाड.मय(literature), तसेच शिल्प आणि स्थापत्य व चित्रकला यांचा वाकाटकांच्या कालखंडात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्कर्ष झालेला आपल्याला पहावयास मिळतो. याच वाकाटकांच्या कालखंडात परदेशी व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि या व्यापार वाढीमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार हा जगभरात झालेला आपल्याला तत्कालीन परिस्थिती वरून समजण्यास मदत होते. सगळ्या जगात प्रसिद्ध असलेली आणि आज युनेस्को वर्ल्ड हेरीटेज साईट असलेली अजिंठ्याची लेणी हि वाकाटक राजांच्या कालखंडात निर्माण झाली त्यामुळे वाकाटक राजवंशाचे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. अश्या या महत्वाच्या वाकाटक राजघराण्याच्या कालखंडात वेशभूषा कश्या पद्धतीची होती हे देखील समजून घेणे आपल्याला कुतूहलाची बाब ठरते.

महाराष्ट्रातील म्हणजेच मुख्यत्वे करून विदर्भातील असलेल्या वाकाटक राजघराण्याचे आजपर्यंत बरेच शिलालेख(Inscription) देखील मोठ्या प्रमाणात सापडलेले आपल्याला पहावयास मिळतात परंतु या शिलालेखांच्या मध्यामातून आपल्याला तत्कालीन लोकांची राहणीमान पद्धत, त्यांचे वस्त्र आणि अलंकार, केश रचना, शिरोभूषणे, शस्त्रे, घरे, भांडी, तत्कालीन वाद्ये यांची कोणतीही माहिती आपल्याला मिळत नाही यासाठी आपल्याला वाकाटकांच्या कालखंडातील वाड.मय(literature), शिल्पे आणि चित्रे यांचा अभ्यास करावा लागतो. वाकाटकांच्या कालखंडामध्ये विदर्भात विविध काव्ये रचली गेली परंतु त्यातील कालिदासाचे मेघदूत हे संस्कृत काव्य आणि प्रवरसेनाचे सेतुबंध हे प्राकृत काव्य सध्या उपलब्ध आहेत.

Vakataka Period Painting from Ajanta Caves, Aurangabad

तसेच बाकीची काव्ये हि काळानुसार नष्ट झाली असल्यामुळे कालिदास आणि प्रवरसेन यांची काव्ये खूप महत्वाची ठरतात. वाकाटक काळातील सामाजिक परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीमधील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी फार महत्वाची ठरतात. हि लेणी वाकाटक काळामध्येच कोरली होती आणि त्यामधील चित्रे देखील वाकाटक काळामध्ये काढली असल्याने आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती समजण्यासाठी मदत होते.

सुदैवाने आजही जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील हि चित्रे अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पहावयास मिळतात. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील शिल्पे आणि चित्रे यांच्यावरून आपल्याला वाकाटक काळातील स्त्री-पुरुषांच्या वस्त्रालंकरांची व्यवस्थित कल्पना करता येते. यामध्ये आपल्याला बहुतेक स्त्री पुरुष हे आखूड अन्तरीयक म्हणजेच अधोवस्त्र नेसलेले दाखवलेले आहेत. हे नेसलेले वस्त्र गुडघ्याच्या वर असल्यामुळे याला अर्धोरुक अशी संज्ञा आहे. बाणाने आपल्या हर्षचरित या वस्त्राचे वर्णन ‘प्रकटितोरुत्रिभाग’ म्हणजेच ज्याच्यामध्ये मांडीचा तृतीयांश भाग उघडा आहे असे केलेले दिसते. हे वस्त्र वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्याचे असे.

पवनार याठिकाणी  एक शिल्पपट सापडलेला आहे त्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, यांची वस्त्रे देखील याच प्रकारची आडव्या पट्ट्यांची दाखवलेली आहेत परंतु हि वस्त्रे जास्त रुंद म्हणजेच जवळपास घोट्या पर्यंत आलेली आपल्याला पहावयास मिळतात. तसेच या वस्त्राचा एक शेवट डाव्या मांडीवरून जाऊन त्याचा मागे क्च्छ म्हणजेच कासोटा होत असे. दुसरा शेवट दोन्ही मांड्याना मागून पुढून वेष्टून नंतर मागच्या बाजूला खोवून खाली शेपूट असल्यासारखा लोंबत असे. याच प्रकारच्या परिधान पद्धतीमध्ये पुढच्या भागामध्ये निऱ्या दिसत नसत परंतु पाठीमागे मात्र अधोवस्त्राचा शेवट शेपटासारखा लोंबत असे.

तसे पहायला गेले तर उत्तर भारतामध्ये अन्तरीयक नेसण्याची पद्धत हि उलटी होती. या अन्तरीयकाच्या निऱ्याचे सोगे पुढे सुटलेले असत याची उदाहरणे आपल्याला सांची आणि भरहूत येथील शिल्पांच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. तसे पहायला गेले तर अजिंठा लेणीच्या वाकाटक काळातील लेण्यामध्ये अश्या पद्धती मधल्या पुढील निऱ्या कुठेही आपल्याला  पहायला मिळत नाहीत. परंतु मागील शेपूट असल्यासारखे सोगे मात्र आपल्याला खूप ठिकाणी आढळून येतात. दक्षिणात्य लोकांच्या या परिधानपद्धतीचे गंमतीशीर वर्णन हे ‘राजतरंगिणी’ (काश्मीरचा इतिहास) लिहिणाऱ्या कल्हणाने ‘राजतरंगिणी’ या ग्रंथामध्येच केलेले आपल्याला पहायला मिळते. ‘राजतरंगिणी’ याच्यामधील वर्णन पुढीलप्रमाणे:-

क्षितीभृद्दाक्षिणात्यानां तिर्यक्त्वज्ञापनाय स: |

पुच्छं महातलस्पर्शि चक्रे कौपीनवाससि ||

अर्थ:-

दाक्षिणात्य लोक पशु आहेत हे दाखविण्याकरिता त्या काश्मीरच्या राजाने त्यांना आपल्या लुंगीचा शेवट जमिनीला स्पर्श होईल इतका लांब ठेवणे भाग पाडले.

स्त्रियांची देखील अधोवस्त्र नेसण्याची पद्धत याच तऱ्हेची होती हे आपल्याला काही चित्रांच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. काही चित्रांच्यामध्ये या स्त्रिया पाठमोऱ्या बसलेल्या किंवा उभ्या आहेत अश्या चित्रांच्या माध्यमातून खाली लोंबणाऱ्या कासोट्यावरून समजण्यास मदत होते. तसेच काही स्त्रिया या अधोवस्त्र कच्छरहित पद्धतीने नेसत असत.हे देखील आपल्याला अजिंठ्याच्या लेणीतील चित्रांच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. तसेच काही पुरुष हे सध्याच्या हाफ पँट सारखा मांड चोळणा घालीत असत आणि कटी बंधाने तो कंबरेला बंधित असे. या हाफ पँट सारख्या मांड चोळण्याला ‘चंडातक’ असे म्हणत असत. अजिंठा लेणी मधील सतरा क्रमांकाच्या लेण्यामध्ये आपल्याला उजव्या भिंतीच्या जवळ असलेल्या खांबाच्या वरील यक्ष असा ‘चंडातक’ नेसलेला आढळून येतो.

बाणाच्या हर्षचरितामधील वर्णनामधून आपल्याला तत्कालीन स्त्रिया देखील अश्या ‘चंडातक’ नेसून त्याच्यावर पायघोळ कंचुक किंवा झगा घालत असत असे दिसते. पुरुष घोड्यावर अथवा शिकारीला गेले असताना तुमान घालून त्याच्यावर पूर्ण बाह्यांचा गुडघ्यापर्यंत खाली आलेला कोट घालत असत असे आपल्याला पहावयास मिळते. अजिंठा लेणीमधील सतराव्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये मृगजातक कथेत शिकारीला गेलेल्या राजाचा पोषाख आपल्याला वरच्या वर्णनाप्रमाणे पहावयास मिळतो. तसेच असाच पोषाख हा गुप्त राजांच्या नाण्यांवर देखील आपल्याला आढळतो. तसेच काही चित्रांमध्ये नोकरांनी देखील पूर्ण बाह्यांचे अंगरखे घातलेले आढळतात.

तत्कालीन पुरुष सामन्यत: उत्तरीय वापरीत असत असे दिसते. हे उत्तरीय जानव्याप्रमाणे डाव्या खांद्यावरून आणि उजव्या काखेखालून जात असे त्यामुळे उजवा हाट पूर्णपणे मोकळा राहत असे. काही चित्रांच्यामध्ये आपल्याला हे उत्तरीय पुन: दुमडून डाव्या खांद्यावर टाकलेले आपल्याला दिसते. तसेच तत्कालीन काही लोक उत्तरीयाची पट्टी करून वैकक्षकासारखे वापरीत असत. तसेच  काही लोक हे कमरेला बांधून बद्धपरिकर होत.

म्हैसूरच्या राजदरबारात असलेल्या सर्व सेवकांनी अश्या रीतीने बद्धपरिकर होऊन राहिले पाहिजे असा नियम आजही आहे. तसेच काही लोक एकच लांब वस्त्र नेसून त्याचाच नंतर उत्तरीया सारखा उपयोग करीत असत असे चित्रांच्या वरून समजण्यास मदत होते. तसेच काही तत्कालीन पुरुष हे पूर्ण बाह्यांचा अंगरखा घालून वर उत्तरीय पांघरीत असत. अजिंठ्याच्या लेण्यातील सतरावे लेणे जर आपण नीट पाहिले तर आपल्याला लेण्यामध्ये हंस जातक कथा पहायला मिळते यामध्ये प्रधानाचा पोषाख हा वरील वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला पहावयास मिळतो.

अजिंठ्याच्या लेण्यामध्ये आपल्याला चित्रांच्यामध्ये अनेक राजा आणि राणी तसेच तत्कालीन श्रीमंत स्त्रीपुरुषांच्या शरीरांचा वरचा भाग हा अनावृत्त दाखविला आहे असेच वाटते तसेच या राजा आणि राणींच्या किंवा तत्कालीन श्रीमंत स्त्रीपुरुषांच्या दासदासी मात्र वस्त्रावृत्त पहायला मिळतात. यामध्ये समजातील वरच्या वर्गातील स्त्रीपुरुषांनी तलम वस्त्रे वापरलेली आहेत हे दाखविण्याचा हा उद्देश आहे असे समजते. संस्कृत कवींच्या काव्यांच्यामध्ये यांची वर्णने हि ‘नि:श्वासहार्य’ म्हणजेच केवळ श्वासानेही उडून जाणारी ‘निर्मोकलघुत्तर’ म्हणजेच सापाच्या कातीपेक्षा देखील तलम होती असे वर्णन आढळून येते. तसेच हि वस्त्रे वापरली असता आतमधील कूचमंडल, मांड्या, अंगाला लावलेले चंदन, वापरलेले अलंकार इत्यादी स्पष्ट दिसत असे असे वर्णन विविध काव्यांच्यामधून आढळून येते.

हाच प्रकार आपल्याला अजिंठ्याच्या चित्रांच्यामध्ये पहायला मिळतो. काही स्त्रिया आपल्या छातीवर रुंद पट्टी बांधत असत या पट्टीला ‘पयोधरपट’ असे म्हणतात. अजिंठा लेणीमधील मरणोन्मुख सुंदरीच्या चित्रामध्ये तिला पंख्याने वारा घालणाऱ्या स्त्रीने अश्या पद्धतीचा ‘पयोधरपट’ वापरलेला आपल्याला पहायला मिळतो. तसेच विश्वंतर जातकाच्या कथेमध्ये राजाच्या शेजारी जी राणी बसलेली आहे तिने देखील असाच ‘पयोधरपट’ घातलेला दाखवलेला आहे. तसेच अजिंठा लेणीच्या सोळा क्रमांकाच्या गुहेमध्ये असलेल्या चित्रात मायादेवी शुद्धोदन राजाला आपले स्वप्न सांगत आहे त्याठिकाणी एक स्त्री आपल्याला पहावयास मिळते त्या स्त्रीने चोळी घातलेली आपल्याला चित्रात पहावयास मिळते. तसेच सतराव्या लेण्यामध्ये असलेल्या विश्वांतर जातकामध्ये दान मागण्यासाठी बरेच याचक जमलेले आहेत असे दृश्य दाखवलेले आहे त्या चित्रामध्ये कडेवर मुल असलेल्या एका स्त्रीने वर रंगीत फुले असलेली चोळी किंवा अर्धबाह्यांचे जॅकीट घातलेले आपल्याला पहावयास मिळते.

याच लेण्यामध्ये आपल्याला सिंहलावदानात हल्लीच्या महाराष्ट्रातील स्त्रिया ज्याप्रमाणे खणांची हिरवी चोळी घालतात तशी चोळी घातलेली एक स्त्री देखील पहावयास मिळते. परदेशी शक तसेच कुशाण जातीच्या स्त्रिया चोळीच्या ऐवजी अर्धबाह्यांचे जॅकीट घालत असत असे चित्र आपल्याला पहावयास मिळते. मुलांची वस्त्रे नेसण्याची पद्धत हि पुरुषांच्या सारखीच असे हे सिद्धार्थ याच्या लहानपणाच्या चित्रांच्यावरून आपणास समजायला मदत होते. यामध्ये काही लहान मुलांच्या अन्तरीयाचे शेपूट आपल्याला स्पष्टपणे पहावयास मिळतात. तसेच काही मुलांनी उत्तरीयासारखा स्कार्फ आपल्या खांद्यावर टाकल्यासारखा पहावयास मिळतो.

सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध जेव्हा शाळेत शिकत असे तेव्हा त्याने पूर्ण बाह्या असलेला अंगरखा घातलेला चित्रामध्ये दाखवलेला आहे तसेच त्याच्या काही मित्रांच्या कमरेचा वरचा भाग उघडा आहे हे देखील चित्रामध्ये आपल्याला पहावयास मिळते. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध  तीन वस्त्रे वापरीत असे १) अन्तरवासक या वस्त्राला प्रसिद्ध चिनी प्रवासी युआन श्वांग निवासन असे म्हणतो तसेच हे अधोवस्त्र हे कमरेत पट्ट्याने बांधले असे. २) उत्तरासंग याचे दुसरे नाव संकक्षिका असे होते या वस्त्राचा उल्लेख बाणाने देखील केलेला आहे याचा वापर हा उत्तरीयासारखा पांघरण्यासाठी केला जात असे. ३) संघाटी किंवा लांब अंगरखा अजिंठा लेणीमध्ये आपल्याला काही ठिकाणी गौतम बुद्धाने उत्तरासंग पांघरले असल्याचे पहायला मिळते. तसेच काही ठिकाणी आपल्याला पायघोळ अंगरखा घातलेला आहे असे आपल्याला पहावयास मिळते.

अश्या प्रकारे वाकाटक कालखंडामध्ये चित्रांच्या वरून वस्त्र रचना समजण्यास अधिक मदत होते तसेच तत्कालीन कालखंडात कोणती वस्त्रे वापरली जात असत हे देखील आपल्याला तत्कालीन वाड.मय(literature) याच्यावरून समजण्यास आपल्याला मदत होते. अशीच वस्त्रपरंपरा आपल्याला काही अंशात महाराष्ट्राच्या काही भागात आजही पहायला मिळते. फक्त त्या वस्त्र परंप्रेचे स्वरूप मात्र बदलेले आपल्याला दिसते.

संदर्भग्रंथ:-

१) राजतरंगिणी (काश्मीरचा इतिहास):- कल्हण

२) अजंठा:- गुलाम याझदानी, हैद्राबाद संस्थान

३) वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ:- डॉ. वा. वि. मिराशी.

 https://tvamfoundation.com/blog/2022/03/26/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%BE/
 
 वाकाटक राजवंश हा एक प्राचीन भारतीय राजवंश होता ज्याने 3ऱ्या ते 5 व्या शतक या काळात सध्याच्या मध्य आणि पश्चिम भारताच्या काही भागांवर राज्य केले. ते कला, वास्तुकला आणि साहित्य यांच्या संरक्षणासाठी ओळखले जात होते आणि त्यांनी त्यांच्या काळात या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

वाकाटक घराण्याची इतिहास दस्तऐवजीकरण केलेला नाही, परंतु त्यांनी दख्खन प्रदेशातून राज्यविस्तार केला असे मानले जाते. राजवंशाचा संस्थापक विंध्यशक्ती होता, ज्याचा उल्लेख विविध शिलालेख मध्ये आढळतो. त्याने वत्सगुल्मा (सध्याचे महाराष्ट्रातील वाशीम) येथे राजधानीसह विदर्भात आपले राज्य स्थापन केले. विंध्यशक्ती हा वाकाटक वंशाचा पहिला राजा मानला जातो, जरी काही इतिहासकार या दाव्यावर वाद घालतात.

विंध्यशक्तीचा मुलगा प्रवरसेन पहिला (इ. स. २७०-३३०) याच्या काळात वाकाटक घराण्याला महत्त्व प्राप्त झाले. प्रवरसेन I ने राज्याचा विस्तार केला आणि इतर समकालीन शक्तींशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. ते संस्कृत साहित्य आणि काव्याच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांनी स्वतः "प्रवरसेनविलास" नावाचे प्रसिद्ध संस्कृत नाटक रचले.

वाकाटक घराण्याचा सर्वात प्रतिष्ठित शासक प्रवरसेन दुसरा (सी. ३८५-४१५) होता. त्याने राज्याच्या सीमांचा आणखी विस्तार केला आणि एक शक्तिशाली साम्राज्य स्थापन केले ज्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या भागांचा समावेश होता. प्रवरसेन II च्या कारकिर्दीत मोठ्या समृद्धीचा आणि सांस्कृतिक भरभराटीचा काळ होता. तो कला आणि साहित्याचे संरक्षक होताआणि त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध विद्वान आणि कवी आकर्षित झाले.

वाकाटक राजघराण्यातील एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांचे वास्तुशास्त्रीय योगदान. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा येथील खडक कापलेल्या बौद्ध लेण्या त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झाल्या या लेण्या बौद्ध कला आणि पौराणिक कथांचे विविध पैलू दर्शविणाऱ्या त्यांच्या उत्कृष्ट भित्तिचित्र आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत.

द्वितीय प्रवरसेनच्या मृत्यूनंतर वाकाटक राजवंशाचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला. अंतर्गत संघर्ष, प्रादेशिक विद्रोह आणि बाह्य आक्रमणांनी त्यांची शक्ती कमकुवत केली. 5 व्या शतकाच्या मध्यापर्यंत, वाकाटक राज्य मोठ्या प्रमाणावर या प्रदेशातील उदयोन्मुख शक्तींनी ग्रासित केले होते, जसे की चालुक्य आणि गुप्त.

वाकाटक राजवंशाचा इतिहास प्रामुख्याने शिलालेख, नाणी आणि तत्कालीन साहित्यकृतींद्वारे ओळखला जातो. त्यांचा वारसा, विशेषत: कला आणि वास्तुकला क्षेत्रातील, आजही भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महत्त्वपूर्ण योगदान म्हणून प्रशंसा आणि अभ्यास केला जातो

वाकाटक हा एक राजवंश होता ज्याने 3 ते 6 व्या शतकापर्यंत मध्य आणि पश्चिम भारताच्या काही भागांवर राज्य केले. त्यांची स्थापना विंध्यशक्तीने केली, ज्यांनी 250 ते 270 CE पर्यंत राज्य केले. वाकाटक हे मुळात सातवाहनांचे वंशज होते, पण ते कालांतराने स्वतंत्र झाले.

प्रवरसेन पहिला (३५५-३८०) आणि त्याचा मुलगा रुद्रसेन दुसरा (३८०-४०० सी.ई.) यांच्या राजवटीत वाकाटकांनी शिखर गाठले. त्यांच्या कारकिर्दीत, वाकाटकांनी आधुनिक काळातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील काही भागांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रदेशावर नियंत्रण ठेवले. ते कला आणि साहित्याचे संरक्षक होते आणि त्यांनी अनेक मंदिरे आणि इतर इमारतींचे काम केले.

इ.स. 5 व्या शतकात वाकाटकांचा नाश झाला आणि ते अखेरीस गुप्तांनी जिंकले. तथापि, त्यांनी एक चिरस्थायी वारसा सोडला आणि त्यांच्या कला आणि वास्तुकलेचा नंतरच्या राजवंशांवर प्रभाव पडला.


प्राचीन काळात भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यामध्ये 'वाकाटक' साम्राज्याचा अंतर्भाव करावा लागेल. वाकाटक राज्य 'विंध्यशक्ती' याने स्थापन केले आणि त्याचा मुलगा 'प्रवरसेन' याने ते राज्य सांभाळले आणि वाढवले सुद्धा!

या राजघराण्याचा मूळ पुरुष 'वाकाटक' हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख पूर्वीच्या आंध्रप्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे.

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात देखील या घराण्यातील पहिला राजपुरुष 'विंध्यशक्ती' याला ‘द्विज’ म्हटले आहे. त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते, असे दिसते.

मूलस्थान-

वाकाटक घराणे मूळचे उत्तर भारतातील होते, असे काही पंडितांचे मत आहे. झाशी जिल्ह्यात 'बागाट' नावाचे एक गाव आहे. त्याचे मूळ नाव 'वाकाट' असावे आणि तेच वाकाटकांचे मूलस्थान असावे, असे अनुमान डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांनी केले आहे. पण ते सिद्ध करण्याजोगा कोणताही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. शिवाय वाकाटकांचा एकही शिलालेख विंध्य पर्वताच्या उत्तरेला सापडलेला नाही.

कंकाली देवी मंदिर, तिगावा (जि. जबलपूर) 👇

वऱ्हांड्यातील छतावरील दंपती शिल्प, गुहा क्र. १६, अजिंठा 👇

वाकाटककांचे बहुतेक सर्व ताम्रपट विदर्भात सापडले आहेत. डॉ. वा. वि. मिराशी यांच्या मते वाकाटक घराणे मूळचे दक्षिण भारतातील होते. वाकाटक हे नाव असलेला सर्वात प्राचीन शिलालेख अमरावती जवळ असलेल्या एका स्तंभावर कोरलेला आहे. या लेखातील वाकाटक हे 'वंशनाम' नसून 'व्यक्तीनाम' आहे. त्यावरून आणि आणखी काही प्रमाणे देऊन हे घराणे दाक्षिणात्य होते, असे डॉ. मिराशी यांनी म्हटले आहे.

तथापि वाकाटकांचे मूळ स्थान कोणते हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे. पण डॉ. पु. ग. सहस्त्रबुध्दे यांच्या मते, वाकाटक राजांची कर्मभूमी कोणती होती व ते कोणत्या प्रदेशांना साम्राज्याचे भाग मानीत, या गोष्टींना अधिक महत्व आहे आणि तेच खरे निकष आहेत.

शिलालेख आणि ताम्रपटांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की, वाकाटकांच्या राज्याची स्थापना सर्वप्रथम विदर्भात झाली.

रामटेक जवळची 'नंदीवर्धन' ही त्यांची पहिली राजधानी होती तर 'वत्सगुल्म' व 'प्रवरपूर' (पवनार) ह्या नंतरच्या राजधान्या होत्या.

वाकाटकांचे मूळ राज्य नागपूर, विदर्भ, कुंतल, अश्मक व मूलक या महाराष्ट्रातील प्रदेशांवर होते आणि त्यांचे साम्राज्य माळवा, कोसल, लाट, कलिंग व आंध्र ह्या प्रदेशांवर होते.

वाकाटकांचे बहुतेक कोरीव लेख, त्यांनी बांधलेली मंदिरे व त्यांच्या राजवटीतील लेण्या महाराष्ट्रातच आहेत. त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला आश्रय देऊन त्या भाषेत स्वतः काव्यरचनाही केली. महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी होती. यावरून हे घराणे महाराष्ट्रीय होते, हे दिसून येते.

विंध्यशक्ती पहिला (इ.स. २५० ते २७०)-

'वाकाटक' वंशातला हा पहिला राजा सातवाहनांचा मोठा अधिकारी असावा आणि सातवाहनांची सत्ता क्षीण झाल्यानंतर त्याने विदर्भात स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे, असे म. म. मिराशींचे अनुमान आहे. पुराणातील वर्णनावरून तो विदिशेचा असावा, असेही अनुमान निघते. पण मिराशींच्या मते ते बरोबर नाही.

अजिंठा येथील लेखात विंध्यशक्तीच्या पराक्रमाचे खूप वर्णन केलेले असून त्याला 'वाकाटकवंशकेतू' म्हटले आहे.

काही विद्वानांच्या मते, त्याचे खरे नाव वेगळेच असून विंध्यपर्वतापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केल्यानंतर त्याचे द्योतक म्हणून त्याने 'विंध्यशक्ती' हे बिरूद धारण केले होते. पण पुराणातील वर्णनावरून हा विस्तार त्याच्या पुत्राच्या वेळी झाला, असे दिसते. वाकाटकांच्या दानपत्रात विंध्यशक्तीचे नाव नाही. त्यातील वंशावळ प्रथम प्रवरसेनापासून सुरू होते, कारण तोच साम्राज्य संस्थापक होता.

प्रवरसेन पहिला (इ स २७० ते ३३०)-

विंध्यशक्तीच्या नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन गादीवर बसला. पुराणात त्याला 'प्रवीर' म्हटले आहे. तो या वंशातील सर्वश्रेष्ठ नृपती होता. त्याने नर्मदेपर्यंत स्वारी करून 'पुरिका' ही नगरी जिंकली. ही नगरी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी होती, असे हरिवंशात म्हटले आहे. पूर्वेकडील दक्षिण कोसल, कलिंग, आंध्र आणि दक्षिणेकडील उत्तर कुंतल या प्रदेशांतील लहान-लहान राज्यांनी प्रवरसेनाचे वर्चस्व मान्य केले असावे. 'पुरिका' ही त्याची राजधानी होती.

प्रवरसेन हा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याच्या वंशजांच्या बहुतेक सर्व ताम्रपटात त्याने केलेल्या चार अश्वमेधांचा व सात सोम यागांचा उल्लेख आढळतो. त्याने 'धर्म महाराज' व 'सम्राट' या पदव्या धारण केल्या होत्या.

आपल्या साम्राज्याला बळकटी आणण्यासाठी प्रवरसेनाने नागवंशी भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडला. भारशिव नृपती भगनाग याने आपली कन्या प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र याला दिली.

प्रवरसेनाला चार पुत्र होते. ते सर्व राजे झाले. वाशीम येथील ताम्रपटात सर्वसेन याचा उल्लेख आलेला आहे. गौतमीपुत्र अगोदरच निधन पावला होता. त्याचा पुत्र रूद्रसेन हा प्रवरसेनानंतर गादीवर बसला. तो कदाचित 'पुरिका' येथून राज्य करीत असावा किंवा त्याने आपली राजधानी नंदीवर्धन (नगरधन) येथे नेली असावी. त्याची सत्ता उत्तर विदर्भावर होती. दुसरा पुत्र सर्वसेन याचे राज्य दक्षिण विदर्भावर होते. त्याची राजधानी वत्सगुल्म (वाशीम) होती. इतर दोन पुत्रांची माहिती उपलब्ध नाही.

'हरिषेण' हा वत्सगुल्म शाखेचा शेवटचा ज्ञात राजा होय. त्याच्यानंतर एक-दोन राजे होऊन गेले असावे, पण त्यांची नावे माहीत नाहीत. इ स ५५० च्या सुमारास माहीष्मतीच्या 'कलचुरी' राजाने विदर्भात राज्य स्थापन केले, असे दिसते. त्यावरून हरिषेणानंतर लवकरच वाकाटकांचे राज्य नाश पावले असावे.


'वाकाटक' हे अत्यंत शांतता प्रिय राजे होते. वाकाटकांच्या काळात विदर्भाची अत्यंत भरभराट झाली होती.

त्यांचे साम्राज्य उत्तरेत माळव्यापासून दक्षिणेत तुंगभद्रेच्या खोऱ्यापर्यंत आणि पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते.

त्यांचे राज्यशासन कार्यक्षम होतेच शिवाय राज्यात सर्वत्र शांतता, सुव्यवस्था आणि समृद्धी नांदत होती. त्यांनी न्यायाने राज्यकारभार चालवला आणि विदर्भाचे नाव उज्ज्वल केले! म्हणून त्या काळाला विदर्भाच्या प्राचीन इतिहासातील सुवर्णयुग म्हणता येईल.

त्याकाळात विदर्भात संस्कृत आणि प्राकृत वाङ्मय, कला कौशल्य व व्यापार यांना उत्तेजन मिळून विदर्भाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. (उदा. कालिदास लिखित 'मेघदूत')

वाकाटक राजांनी धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय दिल्यामुळे त्यांचा अभूतपूर्व विकास झाला. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. तसेच अनेक यज्ञ केले आणि पौराणिक धर्माचाही पुरस्कार केला.

विविध प्राण्यांचा शिल्पपट्ट, गुहा क्र. १७, अजिंठा 👇

'वाकाटक' घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घराण्यातील राजे, महाराजे यांनी केलेल्या कामांचे अनेक शिलालेख आणि ताम्रपट बनवले. विदर्भातच नव्हे तर विदर्भाच्या बाहेरही शेतात माती खोदताना किंवा घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना वाकाटकांचे ताम्रपट नागरिकांना सापडले आहेत. अजिंठ्याच्या लेण्यांमधील शिलालेखातही वाकाटकांची बरीच माहिती आहे. त्यामुळे वाकाटकांचा बराच इतिहास समोर आला आहे.

चित्रस्त्रोत: मराठी विश्वकोश

संदर्भ व माहितीस्रोत:

१. भारतीय संस्कृतिकोश खंड ८

२. मराठी विश्वकोश

 ·
फॉलो करा

वाकाटक घराणे :-

वाकाटक म्हणजे महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश…!.

या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.

राज्य संस्थापक - विंध्यशक्ती

अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.

प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.

वाकाटक राज वैभव

वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या नंदीवर्धन ( नगरधन - रामगिरी) (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते.

त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे.

पुढे या राज्याची विभागणी झाली तेव्हा दुसरी राजधानी ‘वत्सगुल्म’ म्हणजे सध्याचे वाशिम (जिल्हा वाशिम) येथे वसविण्यात आली.

स्रोत :

 ·
फॉलो करा

वाकाटक राजा प्रवरसेन (दुसरा) ह्याने ५व्या शतकात महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत रावणवहो नामक काव्याची रचना केली असे मानले जाते. रावणवहोचा मराठीत अर्थ 'रावणवध' असा होतो. ह्या काव्यरचनेस सेतुबंध असेही नाव आहे.

वत्सगुल्म (आजचे वाशिम) ही वाकाटकांची राजधानी होय. नागपूरच्या रामटेक तालुक्यात मानसर येथे उत्खननात सापडलेले ५व्या शतकातील प्राचीन प्रवरेश्वर शिव मंदिरही प्रवरसेन दुसरा ह्याने बांधलेले मानले जाते.

मानसर येथील मंदिराचे अवशेष

प्रवरेश्वर शिवलिंग


वाकाटक
----------------
सातवाहन कालानंतर उदयास आलेला हा एक बलाढ्य राजवंश.विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र(थोडासा भाग) तसेच म प्र मधील विदर्भाशी लागुन असलेला भाग यात या वंशातील राजांचे ताम्रपट,शिलालेख ई अनेक वस्तु सापडल्या. सातपुडा खालील मोठ्या भुभागावर राज्य जवळपास २७५ वर्ष अस्तित्वात होते.
१) गेल्या दशकात लागलेल्या नवीन शोधान्च्या आधारे असे दिसुन येते की वाकाटक वंशाच्या ४ शाखा होत्या: प्रवर पुर-नंदिवर्धन,वत्सगुल्म,एक अमरावती जिल्ह्यात ,एक अजुन आहे (ह्या शेवटच्या दोन्ही शाखांची माहिती अजुन तेवढी समोर आलेली नाही)
२) प्रवरपुर-नंदिवर्धन: वाकाटक मुळ पुरुष हा विन्ध्यशक्ति १. अजंता येथील गुफा क्र १६ येथे वाकाटक देवसेन चा लेख आहे त्यात पूर्ण वंशावळ आहे.ह्या लेखावरुन असे प्रतीत होते की वाकाटक हे "द्विज" ,विश्नुवृद्ध गोत्राचे होते. विन्ध्यशक्ति १ नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन १ हा राजा झाला .यास ४ पुत्र : रुद्रसेन(नंदिवर्धन)सर्वसेन(वत्सगुल्म). बाकी २ पुत्र व त्याचे राज्य कुठवर होते हे आज पुराव्या अभावी स्पष्ट नाही.रुद्रसेन १ हा प्रवरसेन चा नातू व् गौतमीपुत्र चा मुलगा होता. रुद्रसेन १>पृथ्वी सेन १>रुद्रसेन २(याचा विवाह चन्द्रगुप्त २ कन्या प्रभावती शी झाला). यास किती पुत्र होते यावर मतभेद आहेत. मिराशी ह्यानी दामोदर सेन ला प्रवरसेन २असे म्हटलेले आहे. काहींच्या मते दिवाकर,दामोदर,प्रवरसेन अशी ३ मुले होती. प्रवरसेन २ हा सर्वात बलाढ्य राजा होता,सर्वात जास्त ताम्रपट व् लेख याचेच आहेत. प्रवरसेन २>नरेंद्र सेन>पृथ्वी सेन अशी ही पुढील वंशावली.
३) वत्सगुल्म: सर्वसेन>विन्ध्यशक्ति २>?>?>देवसेन>हरिषेण>?. हरिषेण ह्याने आंध्रातिल सालंकायन वंशी राजास पदच्युत करून ते गोविंदवर्मा ह्यास दिले.ह्याचा पुत्र माधववर्मा १ चा विवाह एका वाकाटक राजकन्येशी झाला होता.
४) धर्मं: वाकाटक काली वैदिक ,जैन ,बौद्ध व् त्यांच्या अनेक शाखा अस्तिवात होत्या. आहार: लेखान्वरुन असे दिसते की या काली दूध,दही,लोणी,तूप,तांदुळ,मग,उडीद,गहू,तीळ,साखर,हरभरा,मोहरी ,कारले,गुळ,विभिन्न फळ यांच्या वापर होई.तांदुळ,गहू+जवस खिरी,तांदुलाचा भात असे पदार्थ प्रचलित होते.काही लोक (कोण हे सांगता येणार नाही पण बहुधा सैनिक व् समाजातील इतर लोक हे मांस भक्षण पण करत)
५) साहीत्य: नागार्जुन नामक एक संस्कृत ग्रंथकार याच कालात होऊन गेला. दिवाकर सेन रचित काही श्लोक हे सुदुक्ति/कर्नामृत नामक श्रीधरदास रचीत ग्रंथात आहेत. प्राकृत: सर्वसेनाचा हरिविजय,प्रवरसेन २ सेतुबंध असे ग्रंथ रचल्या गेले.

-संदर्भ: वाकाटक नृपती व् त्यांचा काल - वा वि मिराशी

वाकाटक राजवंश

वाकाटक राजवंश ( IAST : Vākāṭaka ) हा एक प्राचीन भारतीय राजवंश होता जो इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यात दख्खनमधून उदयास आला. त्यांचे राज्य उत्तरेकडील मालवा आणि गुजरातच्या दक्षिणेकडील कडांपासून दक्षिणेकडील तुंगभद्रा नदीपर्यंत तसेच पश्चिमेकडील अरबी समुद्रापासून पूर्वेकडील छत्तीसगडच्या काठापर्यंत पसरलेले असल्याचे मानले जाते. ते दख्खनमधील सातवाहनांचे सर्वात महत्वाचे उत्तराधिकारी होते आणि उत्तर भारतातील गुप्तांच्या समकालीन होते .

वाकाटक राजवंश
सुमारे  २५० - सुमारे  ५१०
भांडवलवत्सगुल्मा (आता वाशिम )
सामान्य भाषामहाराष्ट्री प्राकृत [ 2 ]
संस्कृत
धर्म
हिंदू धर्म
बौद्ध धर्म
जैन धर्म
सरकारराजेशाही
महाराजा [ 3 ] 

• २५०-२७०
विंध्यशक्ती
• २७०–३३०
प्रवरसेन पहिला
• ४८०–५१०
हरीशेना
ऐतिहासिक काळशास्त्रीय भारत

• स्थापना
सुमारे  २५०
• निष्क्रिय
इ.स.  ५१०
त्यांच्या आधी
यांच्यानंतर
पश्चिम क्षत्रप
सातवाहन राजवंश
अभिरा राजवंश
महिष्मतीच्या कालाचुरी
विष्णुकुंडिना
चालुक्य राजवंश
राजर्सितुल्यकुला
आजचा भागभारत

या घराण्याचे संस्थापक विंध्यशक्ती ( इ.स.  २५०-२७० ) यांच्याबद्दल फारसे माहिती नाही . त्यांचा मुलगा प्रवरसेन पहिला याच्या कारकिर्दीत प्रादेशिक विस्तार सुरू झाला . सामान्यतः असे मानले जाते की वाकाटक राजवंश प्रवरसेन पहिला नंतर चार शाखांमध्ये विभागला गेला. दोन शाखा ज्ञात आहेत आणि दोन अज्ञात आहेत. ज्ञात शाखा म्हणजे प्रवरपुर-नंदीवर्धन शाखा आणि वत्सगुल्म शाखा. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याने आपल्या मुलीचे लग्न वाकाटक राजघराण्याशी केले आणि त्यांच्या पाठिंब्याने चौथ्या शतकात शक क्षत्रपांकडून गुजरात जिंकला . वाकाटकांनी सोडलेली शक्तीची पोकळी दख्खन प्रदेशातील बदामीच्या चालुक्यांनी भरून काढली . [ ४ ] वाकाटक कला , वास्तुकला आणि साहित्याचे संरक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी सार्वजनिक कामे केली आणि त्यांची स्मारके एक दृश्यमान वारसा आहेत. अजिंठा लेण्यांमधील ( युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ ) दगडात कोरलेले बौद्ध विहार आणि चैत्य वाकाटक राजा हरिषेण यांच्या संरक्षणाखाली बांधले गेले .

विंध्यशक्ती

या राजवंशाचे संस्थापक विंध्यशक्ती ( इ.स.  २५०-२७० ) होते, ज्यांचे नाव विंध्यवासिनी देवीच्या नावावरून पडले आहे . या राजवंशाची उत्पत्ती कदाचित येथून झाली असावी. वाकाटकांच्या संस्थापक विंध्यशक्तीबद्दल जवळजवळ काहीही माहिती नाही. अजिंठाच्या गुहेच्या सोळाव्या शिलालेखात त्यांचे वर्णन वाकाटक घराण्याचा ध्वज आणि द्विज असे करण्यात आले आहे . या शिलालेखात असे म्हटले आहे की त्यांनी मोठ्या लढाया लढून आपल्या शक्तीत भर घातली आणि त्यांच्याकडे मोठा घोडदळ होता. परंतु या शिलालेखात त्यांच्या नावापुढे कोणताही राजेशाही उपाधी लावलेला नाही. पुराणात असे म्हटले आहे की त्यांनी ९६ वर्षे राज्य केले. त्यांना दक्षिण दख्खन, मध्य प्रदेश आणि माळवा येथे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. के.पी. जयस्वाल झाशी जिल्ह्यातील बागट हे गाव वाकाटकांचे घर असल्याचे मानतात. परंतु वाकाटकांच्या उत्तरेकडील घराण्याबद्दलच्या सिद्धांताचे खंडन केल्यानंतर, व्ही.व्ही. मिराशी असे नमूद करतात की वाकाटक नावाचा सर्वात जुना उल्लेख अमरावती येथील एका स्तंभाच्या तुकड्यावर सापडलेल्या शिलालेखात आढळतो ज्यामध्ये गृहपती (गृहस्थ) वाकाटक आणि त्याच्या दोन पत्नींच्या भेटीची नोंद आहे . हा गृहपती बहुधा विद्याशक्तीचा पूर्वज होता. पुराणांमधून असे दिसून येते की विंध्यशक्ती हा विदिशा (सध्याच्या मध्य प्रदेश राज्यात) चा शासक होता परंतु ते बरोबर मानले जात नाही. [ 5 ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

समुद्र गुप्ताच्या अलाहाबाद स्तंभ शिलालेखात रुद्र देवाची ओळख रुद्र सेना प्रथमशी असल्याचे नाकारणारे डॉ. मिराशी यांच्या मते. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले आहे की वाकाटकांची नाणी नाहीत आणि विंध्यवासाच्या उत्तरेला त्यांचे कोणतेही शिलालेख नाहीत. म्हणूनच, वाकाटकांचे दक्षिणेकडील घर योग्य आहे. तथापि, हे खरे आहे की त्यांनी यापैकी काही ठिकाणी राज्य केले आहे, कारण शिलालेख मध्य प्रदेशात उपलब्ध होते. [ उद्धरण आवश्यक ]

प्रवरसेन पहिला

पुढचा शासक प्रवरसेन पहिला (२७०-३३०) होता, ज्याने राज्याला एक महान शक्ती म्हणून राखले, तो पहिला वाकाटक शासक होता, ज्याने स्वतःला सम्राट (सार्वत्रिक शासक) म्हटले आणि नागा राजांशी युद्धे केली . तो स्वतः एक सम्राट बनला आहे, कदाचित राजवंशातील एकमेव सम्राट, ज्याच्या राज्याने उत्तर भारताचा आणि संपूर्ण दख्खनचा बराचसा भाग व्यापला होता. त्याने उत्तरेकडील नर्मदेपर्यंत आपले शस्त्र वाहून नेले आणि शिसुका नावाच्या राजाद्वारे राज्य केले जाणारे पुरिका राज्य आपल्या ताब्यात घेतले. काहीही असो, त्याने उत्तरेकडील बुंदेलखंडपासून (जरी डॉ. मिराशी हे मान्य करत नाहीत की तो नर्मदा ओलांडला आहे) दक्षिणेकडील सध्याच्या आंध्र प्रदेशापर्यंत निश्चितच राज्य केले. पुराणांमध्ये त्याला ६० वर्षांचे राज्य दिले आहे.

व्ही.व्ही. मिराशी यांच्या मते, त्यांनी उत्तर महाराष्ट्र, गुजरात किंवा कोकणात विजय मिळवला असण्याची शक्यता कमी आहे. परंतु, त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसह उत्तर कुंतलाचा काही भाग जिंकला असावा . पूर्वेला, त्यांनी दक्षिण कोसल, कलिंग आणि आंध्र येथे शस्त्रे वाहून नेली असावीत. ते वैदिक धर्माचे अनुयायी होते आणि त्यांनी अग्निष्टोम, आप्त्योर्यमा, उक्थ्य, षोडशीं, अतिरात्र, वाजपेय, बृहस्पतिसव, सद्यस्क्र आणि चार अश्वमेध यासह अनेक यज्ञ (यज्ञ) केले. पुराणानुसार वाजपेय यज्ञाच्या वेळी त्यांनी ब्राह्मणांना भरपूर दान केले. सम्राटाव्यतिरिक्त त्यांनी धर्ममहाराज ही पदवी देखील धारण केली. त्यांनी स्वतःला हरितीपुत्र म्हणून संबोधले . त्यांचे पंतप्रधान देव हे अतिशय धार्मिक आणि विद्वान ब्राह्मण होते. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की प्रवरसेन पहिला यांना चार पुत्र होते. त्याने आपल्या मुलाचे गौतमीपुत्राचे लग्न शक्तिशाली भारशिव घराण्यातील राजा भावनागच्या मुलीशी केले , जे कदाचित उपयुक्त ठरले असेल. तथापि, गौतमीपुत्र त्याच्या आधी निधन पावले आणि त्याच्यानंतर त्याचा नातू , गौतमीपुत्राचा मुलगा रुद्रसेन पहिला , गादीवर आला. त्याचा दुसरा मुलगा, सर्वसेन याने वत्सगुल्म (सध्याचे वाशिम ) येथे आपली राजधानी स्थापन केली. इतर दोन मुलांनी स्थापन केलेल्या राजवंशांबद्दल काहीही माहिती नाही. [ 6 ] [ 7 ]

वाकाटक राजवंशाच्या शाखा

सामान्यतः असे मानले जाते की प्रवरसेन पहिला नंतर वाकाटक राजघराणे चार शाखांमध्ये विभागले गेले. दोन शाखा ज्ञात आहेत आणि दोन अज्ञात आहेत. ज्ञात शाखा म्हणजे प्रवरपुर-नंदीवर्धन शाखा आणि वत्सगुल्म शाखा.

प्रवरपुरा-नंदीवर्धन शाखा

नंदीवर्धन किल्ल्याचे अवशेष

प्रवरापुरा-नंदीवर्धन शाखेने वर्धा जिल्ह्यातील प्रवरापुरा (पौनार) आणि नागपूर जिल्ह्यातील मानसर आणि नंदीवर्धन (नागर्धन) अशा विविध ठिकाणांवरून राज्य केले . या शाखेने शाही गुप्तांशी वैवाहिक संबंध ठेवले.

रुद्रसेन पहिला

नागपूरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या रामटेक टेकडीजवळील नंदीवर्धन येथून राज्य करणारा गौतमीपुत्राचा मुलगा रुद्रसेन पहिला याबद्दल फारशी माहिती नाही . आर्यावर्तच्या इतर शासकांसह अलाहाबाद स्तंभ शिलालेखात रुद्रदेवाचा उल्लेख आहे. ए.एस. अल्तेकर सारखे अनेक विद्वान रुद्रदेव हा रुद्रसेन पहिला आहे यावर सहमत नाहीत, कारण जर समुद्रगुप्ताने रुद्रसेन पहिलाचा नाश केला असता, तर त्याचा मुलगा पृथ्वीशेण पहिला गुप्त राजकुमारी ( प्रभावतीगुप्त ) हिला त्याची सून म्हणून स्वीकारेल अशी शक्यता फारच कमी आहे . दुसरे म्हणजे, नर्मदेच्या उत्तरेला रुद्रसेन पहिलाचा कोणताही शिलालेख सापडलेला नाही. रुद्रसेन पहिलाच्या कारकिर्दीचा आतापर्यंत सापडलेला एकमेव शिलालेख सध्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे सापडला आहे , म्हणून त्याची तुलना अलाहाबाद स्तंभ शिलालेखातील रुद्रदेवाशी करता येत नाही, जो आर्यावर्तचा होता. [ 8 ]

पृथ्वीशेण पहिला

रुद्रसेन पहिला नंतर त्याचा मुलगा पृथ्वीशेण पहिला (३५५-३८०) गादीवर आला आणि पृथ्वीशेण पहिला नंतर त्याचा मुलगा रुद्रसेन दुसरा गादीवर आला.

रुद्रसेन दुसरा, दिवाकरसेन आणि प्रवरसेन दुसरा

मनसर येथे प्रवरसेना द्वितीयने बांधलेल्या प्रवरेश्वर शिव मंदिराचे अवशेष

रुद्रसेन दुसरा (३८०-३८५) याने गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा (३७५-४१३/१५) याची मुलगी प्रभावतीगुप्ताशी लग्न केले असे म्हटले जाते . रामटेकच्या केवल-नरसिंह शिलालेखांवरून आता याची पुष्टी होते, जिथे असे घोषित केले आहे की राणी प्रभावतीगुप्ताची मुलगी (चा)मुंडा हिचा विवाह राजकुमार घटोत्कचगुप्त (जो कदाचित चंद्रगुप्त दुसराचा मुलगा होता) यांच्याशी झाला होता. [ 9 ]

३८५ मध्ये अतिशय कमी काळ राज्य केल्यानंतर रुद्रसेन दुसरा याने अपघाताने मृत्यू पावला, त्यानंतर प्रभावतीगुप्त (३८५-४०५) यांनी तिचे दोन पुत्र, दिवाकरसेन आणि दामोदरसेन (प्रवरसेन दुसरा) यांच्या वतीने २० वर्षे राज्यपाल म्हणून राज्य केले. या काळात वाकाटक राज्य जवळजवळ गुप्त साम्राज्याचा एक भाग होते . अनेक इतिहासकार या काळाला वाकाटक-गुप्त युग म्हणून संबोधतात. ३० वर्षांहून अधिक काळापूर्वी हे सर्वमान्य झाले असले तरी, या युक्तिवादाचा कोणताही योग्य पुरावा नाही. प्रभावती गुप्ताच्या शिलालेखात एका "देव गुप्त" चा उल्लेख आहे जो तिचे वडील आहेत आणि इतिहासकारांनी त्यांची तुलना चंद्र गुप्त दुसरा यांच्याशी केली आहे. तथापि, देव गुप्त खरोखरच चंद्र गुप्त दुसरा आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरा कोणताही स्रोत नाही. प्रवरसेन दुसरा यांनी महाराष्ट्री प्राकृतमध्ये सेतुबंध रचला . गह सत्तसाईतील काही श्लोक देखील त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी नंदीवर्धनहून राजधानी प्रवरपुरात हलवली, जी त्यांनी स्थापन केलेली एक नवीन शहर होती. त्याने त्याच्या नवीन राजधानीत रामाला समर्पित एक मंदिर बांधले . [ 10 ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

वाकाटक राजवंशातील आतापर्यंत सापडलेल्या ताम्रपटांपैकी सर्वाधिक (सातशे) शिलालेख प्रवरसेन II चे आहेत. तो कदाचित अशोक द ग्रेट नंतर प्राचीन भारतातील सर्वात जास्त नोंदवलेला शासक आहे . पहा: श्रीनंद एल. बापट, वाकाटक शासक प्रवरसेन II चे दुसरे जांब (खांडवी) ताम्रपट अनुदान (श्रावण शुद्ध १३, राजेशाही वर्ष २१), भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे अॅनल्स, खंड ९१, पृष्ठे १-३१

नरेंद्रसेना आणि पृथ्वीविशेन II

प्रवरसेन दुसरा नंतर नरेंद्रसेन (४४०-४६०) गादीवर आला, ज्यांच्या काळात वाकाटकांचा प्रभाव काही मध्य भारतीय राज्यांमध्ये पसरला. पृथ्वीशेण दुसरा, जो या वंशाचा शेवटचा ज्ञात राजा होता, त्याने सुमारे  ४६० मध्ये त्याचे वडील नरेंद्रसेन गादीवर घेतले. विष्णुकुंडिन राजा माधव वर्मा दुसरा याने त्याचा पराभव केला . ४८० मध्ये त्याच्या मृत्यूनंतर, त्याचे राज्य कदाचित वत्सगुल्म शाखेच्या हरिषेनाने आपल्या ताब्यात घेतले.

वत्सगुल्मा शाखा

अजिंठा लेणी
वाकाटक शासकांच्या वत्सगुल्म शाखेच्या संरक्षणाखाली बांधलेल्या अजिंठा लेण्या .
अजिंठा लेण्यांचे पक्ष्यांच्या नजरेतून दृश्य.
गुहा क्रमांक ९ चे प्रवेशद्वार.
अजिंठा येथील भगवान बुद्ध मूर्ती.

वत्सगुल्म शाखेची स्थापना प्रवरसेन पहिला याचा दुसरा मुलगा सर्वसेन याने त्याच्या मृत्यूनंतर केली. राजा सर्वसेनने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील सध्याच्या वाशिम येथील वत्सगुल्म हे राज्य आपली राजधानी बनवले. [ 11 ] [ अविश्वसनीय स्रोत? ] या शाखेचे राज्य असलेला प्रदेश सह्री पर्वतरांगा आणि गोदावरी नदीच्या दरम्यान होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले .

सर्वसेना

सर्वसेन (सुमारे ३३०-३५५) यांनी धर्ममहाराज ही पदवी धारण केली . त्यांना प्राकृतमध्ये 'हरिविजय' या कादंबरीचे लेखक म्हणूनही ओळखले जाते, जे कृष्णाने स्वर्गातून पारिजात वृक्ष आणल्याच्या कथेवर आधारित आहे. नंतरच्या लेखकांनी प्रशंसा केलेले हे काम हरवले आहे. त्यांना प्राकृत ' गह सत्तासाई' या अनेक श्लोकांचे लेखक म्हणूनही ओळखले जाते . त्यांच्या एका मंत्र्याचे नाव रवी होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा विंध्यसेन गादीवर आला. [ ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] [ १२ ]

विंध्यसेन

विंध्यसेन (सुमारे ३५५-४००) यांना विंध्यशक्ती दुसरा म्हणूनही ओळखले जात असे. त्यांच्या ३७ व्या कारकिर्दीत नंदिकट (सध्या नांदेड ) च्या उत्तर मार्गात (उपविभाग) वसलेल्या एका गावाच्या देणगीची नोंद असलेल्या वाशिमच्या प्रसिद्ध पाट्यांवरून त्यांची ओळख पटते . देणगीचा वंशावळ भाग संस्कृतमध्ये आणि औपचारिक भाग प्राकृतमध्ये लिहिलेला आहे. कोणत्याही वाकाटक शासकाने दिलेला हा पहिला ज्ञात भूदान आहे. त्यांनी धर्ममहाराज ही पदवी देखील धारण केली . [ १३ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] विंध्यसेनाने त्यांच्या दक्षिणेकडील शेजारी असलेल्या कुंतलाच्या शासकाचा पराभव केला. त्यांच्या एका मंत्र्याचे नाव प्रवर होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रवरसेन दुसरा गादीवर आला. [ ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

प्रवरसेन दुसरा

प्रवरसेन दुसरा ( सुमारे  ४००-४१५ ) हा पुढचा शासक होता ज्याच्याबद्दल फार कमी माहिती आहे, फक्त अजंठाच्या गुहेतील सोळाव्या शिलालेखात , ज्यामध्ये असे म्हटले आहे की तो त्याच्या उत्कृष्ट, शक्तिशाली आणि उदारमतवादी राजवटीने उदात्त झाला. तो खूप कमी काळ राज्य केल्यानंतर मरण पावला आणि त्याच्या जागी त्याचा अल्पवयीन मुलगा आला, जो त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी फक्त ८ वर्षांचा होता. गुहेतील सोळाव्या शिलालेखातून या शासकाचे नाव हरवले आहे. [ 13 ]

देवसेना

वाकाटक प्रदेशाचा अंदाजे विस्तार आणि शेजारील राज्यांचे स्थान सुमारे  ४८० इ.स. , वाकाटक राजवटीच्या शेवटी, राजा हरिषेनाच्या कारकिर्दीत , जेव्हा अजिंठ्याच्या बहुतेक लेण्या (लाल ठिपके) बांधल्या गेल्या होत्या. [ 14 ]

या अज्ञात शासकानंतर त्याचा मुलगा देवसेन ( सुमारे  ४५०-४७५ ) गादीवर आला . त्याचे प्रशासन प्रत्यक्षात त्याचे मंत्री हस्तीभोज चालवत होते. [ ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] त्याच्या कारकिर्दीत, त्याच्या एका सेवकाने  ४५८-४५९ मध्ये वाशिमजवळ सुदर्शन नावाचा तलाव खोदला . [ १३ ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

हरीशेना

हरिषेण (सुमारे ४७५-५००) हे त्यांचे वडील देवसेन यांच्यानंतर गादीवर आले. ते बौद्ध वास्तुकला, कला आणि संस्कृतीचे एक महान संरक्षक होते. जागतिक वारसा स्मारक अजिंठा लेणी हे त्यांच्या कामांचे जिवंत उदाहरण आहे. अजिंठाच्या दगडी कोरीव वास्तुशिल्पाच्या कोश-१६ शिलालेखात असे म्हटले आहे की त्यांनी उत्तरेला अवंती ( मालवा ), पूर्वेला कोसला ( छत्तीसगड ), कलिंग आणि आंध्र, पश्चिमेला लता (मध्य आणि दक्षिण गुजरात ) आणि त्रिकुट ( नाशिक जिल्हा ) आणि दक्षिणेला कुंतला (दक्षिण महाराष्ट्र) जिंकले. [ १३ ] [ १५ ] हरिषेणाचे मंत्री आणि हस्तीभोजाचे पुत्र वराहदेव यांनी अजिंठाच्या गुहेच्या सोळाव्या गुहेतील दगडी कोरीव विहाराचे उत्खनन केले. [ ११ ] [ अविश्वसनीय स्रोत? ] अजिंठा येथील तीन बौद्ध लेणी, दोन विहार - लेणी XVI आणि XVII आणि एक चैत्य - लेणी XIX हरिषेनाच्या कारकिर्दीत उत्खनन करून चित्रकला आणि शिल्पांनी सजवण्यात आली. [ 13 ] कला इतिहासकार वॉल्टर एम. स्पिंक यांच्या मते, लेणी क्रमांक 9,10,12,13 आणि 15A (संदर्भ: पृष्ठ क्रमांक 4, अजिंठा-एक संक्षिप्त इतिहास आणि मार्गदर्शक - वॉल्टर एम. स्पिंक) वगळता अजिंठ्यातील सर्व दगडात कोरलेली स्मारके हरिषेनाच्या कारकिर्दीत बांधली गेली. [ 16 ]

हरिषेणानंतर दोन शासक गादीवर आले ज्यांची नावे माहित नाहीत. राजवंशाचा शेवट अज्ञात आहे. त्यांचा कदाचित महिष्मतीच्या कलचुरीने पराभव केला असेल. [ 11 ] [ अविश्वसनीय स्रोत? ]

वंशावळ

राजवंशाच्या ऱ्हासाचे पर्यायी स्रोत

अजंता लेण्यांमध्ये गुहा १ च्या छतावर, पर्शियन पोशाखात परदेशी मान्यवर वाइन पिताना , एकतर पुलकेसिन II (६१०-६४२ इ.स.) मधील ससानियन दूतावासाचे चित्रण करते, किंवा जर ४६०-४८० इ.स. डेटिंग कायम ठेवली तर वाकाटक राजवंशातील एक शैलीचे दृश्य (छायाचित्र आणि रेखाचित्र). [ 17 ]

वाकाटक राजवंशाच्या पतनानंतर सुमारे १२५ वर्षांनी लिहिलेल्या दंडिनच्या दशकुमारचरिताच्या आठव्या उच्चवासानुसार , हरिषेणाचा मुलगा, जरी सर्व कलांमध्ये बुद्धिमान आणि पारंगत असला तरी, त्याने दंडनीती (राजनीतिक शास्त्र) चा अभ्यास दुर्लक्षित केला आणि स्वतःला सुखांच्या उपभोगासाठी समर्पित केले आणि सर्व प्रकारच्या दुर्गुणांमध्ये गुंतले. त्याची प्रजा देखील त्याच्या मागे गेली आणि एक दुष्ट आणि विकृत जीवन जगली. ही एक योग्य संधी शोधून, शेजारच्या अश्मकाच्या शासकाने त्याच्या मंत्र्याच्या मुलाला वाकाटकांच्या दरबारात पाठवले. नंतरच्याने राजाशी स्वतःला संतुष्ट केले आणि त्याच्या विकृत जीवनात त्याला भडकवले. त्याने विविध मार्गांनी त्याच्या सैन्याचा नाश केला. शेवटी, जेव्हा देश पूर्णपणे अव्यवस्थित झाला, तेव्हा अश्मकाच्या शासकाने वनवासीच्या ( उत्तर कणर जिल्ह्यातील ) कदंब शासकाला वाकाटक प्रदेशावर आक्रमण करण्यास प्रवृत्त केले. राजाने आपल्या सर्व सामंतांना बोलावले आणि वरद (वर्धा) नदीच्या काठावर शत्रूशी लढण्याचा निर्णय घेतला. शत्रूच्या सैन्याशी लढत असताना, त्याच्याच काही सामंतांनी त्याच्या मागून विश्वासघाताने हल्ला केला आणि त्याला ठार मारले. वाकाटक राजवंशाचा अंत त्याच्या मृत्यूने झाला. [ 13 ] या वस्तुस्थितीला पुष्टी देणारे कदंब राजा रविवर्मा यांच्या ५१९ च्या दावणगेरे नोंदीतील तीन ताम्रपटांचा संच देखील आहे. इतिहासकार डीसी सिरकर यांच्या मते , राजाचे अधिपत्य संपूर्ण दक्षिण भारतात उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडील तलकड (तत्कालीन पश्चिम गंगा राजधानी) जवळील कावेरी नदीपर्यंत पसरले होते आणि या भूमीतील लोक त्याचे संरक्षण शोधत होते. याचा अर्थ असा की कदंबांनी रविवर्माच्या राजवटीत (४८५-५१९ इ.स.) कदाचित ५०० नंतर कधीतरी संपूर्ण वाकाटक राज्य जिंकले आणि ते त्यांच्या प्रदेशात समाविष्ट केले. [ 18 ] [ 19 ]

नाणे

जरी वाकाटकांनी सातवाहनांची जागा घेतली, तरी त्यांनी त्यांची नाणी काढण्याची परंपरा चालू ठेवली असे दिसत नाही. आजपर्यंत, वाकाटक नाणी कधीही ओळखली गेली नाहीत किंवा सापडली नाहीत. [ 20 ]

तसेच पहा

राचीन महाराष्ट्रातील राजे

भाग २०

राजा हरिषेण

विंध्यसेनानंतर त्याचा पुत्र द्वितीय प्रवरसेन हा गादीवर आला. याच्या कारकिर्दीची फारशी माहिती मिळत नाही. अजिंठ्याच्या लेखात म्हटले आहे की हा आपल्या उत्कृष्ट व उदार राज्यशासनाने किर्तीमान झाला. त्याने सुमारे ४०० ते ४१५ पर्यंत, १५ वर्षे राज्य केले. हा निधन पावला तेव्हा याचा मुलगा केवळ आठ वर्षांचा होता. या बालराजाचे नाव अजिंठ्याच्या लेण्यातील लेखात नष्ट झाले आहे. मात्र त्याने उत्तम रीतीने राज्यकारभार केला असा उल्लेख पुढे आलेला आहे. याच्या माघारी पुत्र देवसेन हा सन ४५० च्या आसपास गादीवर आला. याचा एकच अपूर्ण ताम्रपट विदर्भात सापडलेला आहे आणि तो आज लंडनच्या ब्रिटिश म्यूझीयम मध्ये आहे. देवसेनाचा हस्तीभोज नामक अत्यंत दक्ष, विनीत आणि गुणी असा सचिव होता. देवसेनाने त्याच्यावर कारभार सोपवून स्वतः ऐशोआरामात काळ घालविला. अजिंठा आणि घटोत्कच या दोन्ही लेण्यातील लेखांमध्ये या हस्तिभोजाचे उल्लेख आलेले आहेत. तो प्रजेला अत्यंत प्रिय होता. त्याच्याकडे जाण्यास सर्वांना मुक्तद्वार असे, असे वर्णन अजिंठ्याच्या लेखात आले आहे. सन ४५० च्या सुमारास देवसेनानंतर त्याचा पुत्र हरिषेण हा गादीवर आला. हा या शाखेचा अंतिम ज्ञात राजा होय. हा शुर व महत्वकांक्षी असून त्याने आपल्या राज्याच्या सर्व दिशांस विजय प्राप्त केले. त्याच्या विजयाचे वर्णन अजिंठ्याच्या लेखात १४-१५ ओळीत आले आहे मात्र दुर्दैवाने त्याचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. उरलेल्या भागात विदर्भाच्या चारही दिशांस असलेल्या भागांचे उल्लेख येतात. ते पूढील प्रमाणे, उत्तरेस अवंती (माळवा); पूर्वेस कोसला ( छत्तीसगड), कलिंग ( ओरिसा ) व आंध्र; पश्चिमेस लाट ( मध्य व दक्षिण गुजरात ) व त्रिकुट ( नाशिक ); दक्षिणेस कुंतल ( दक्षिण महाराष्ट्र ). यावरून उत्तरेतील माळवा ते दक्षिणेस कुंतल तर पश्चिमेस अरबी समुद्रापासून ते पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत हरिषेणाची सत्ता अबाधितपणे चालत होती. हा विस्तृत प्रदेश त्याच्या अंमलाखाली होता असे दिसत नाही, परंपरे अनुसार त्या राज्यांना जिंकून त्यांना वार्षिक कारभार देण्याच्या अटीवर हरिषेणाने त्यांची राज्ये परत केली असावी. ज्येष्ठ शाखेचा प्रदेश देखील त्याने आपल्या राज्यास जोडून घेतला होता. हरिषेणाचा वराहदेव नामक सचिव होता जो हस्तिभोजाचा पुत्र होता. तोही आपल्या वडीलांप्रमाणे अत्यंत धार्मिक, उदार आणि दक्ष होता. त्यानेच अजिंठ्यातील सोळा क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले. त्यात त्याने कोरलेल्या लेखात वत्सगुल्म शाखेची बरीचशी माहिती मिळते. हरिषेण हा या शाखेचा अंतिम ज्ञात राजा होय. त्याच्या नंतर एक-दोन राजे झाले मात्र त्यांची नावेही आपल्याला माहीत नाहीत. हरिषेणानंतर लवकरच त्याच्या विस्तृत साम्राज्याचा विनाश झाला, मात्र तो कसा झाला याचे उल्लेख इतिहासांत मिळत नाहीत. वाकाटकांच्या अस्तानंतर शंभर वर्षांनी दंण्डी याने लिहिलेल्या ‘दशकुमारचरीता’त एका विदर्भाच्या नृपतीची कथा आलेली आहे तीत वर्णिलेली राजकीय परिस्थिती ही वाकाटकांच्या अंतिम काळातील दिसते. मात्र ज्या भागात ही गोष्ट आलेली आहे तो उच्छवास अपूर्ण असल्याने सुद्धा संपूर्ण माहिती मिळत नाही. मात्र काही गोष्टी स्पष्ट होतात, जसे उत्तरेस नर्मदे पासून दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत पसरलेले विशाल वाकाटक साम्राज्य हरिषेणाच्या पुत्राच्या नादानीमुळे आणि मांडलीकांच्या फितुरीमुळे कोलमडून पडले. अखेर सन ५५० च्या सुमारास माहिष्मतीच्या कलचुरी घराण्यातील राजा कृष्णराज याने विदर्भ व उत्तर महाराष्ट्र जिंकून घेतला, पूर्वेकडील कोसल, कलिंग व आंध्र यांनीही आपले स्वातंत्र्य घोषित केले तर दक्षिणेत कुंतलाधिपती राष्ट्रकूट ही हळू हळू प्रबळ होऊ लागले. अशा रीतीने सुमारे तीनशे वर्षांच्या उज्ज्वल शासनानंतर सन ५५० च्या सुमारास वाकाटकांचा वंश नामशेष झाला - प्राजक्ता देगांवकर संदर्भ १)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी २) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर ३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे





रामटेक : भारताला विदर्भाची देण

29-Mar-2026


विदर्भाच्या भूभागात, नागपूरच्या ईशान्येला सुमारे 50 किमीवर उभा असलेला रामगिरी पर्वत (आजचा रामटेक) हा केवळ रामभक्तीचा केंद्रबिंदू नाही, तर भारतीय इतिहासातील एक अद्वितीय पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक स्थळ आहे. येथे उभे राहिल्यावर जाणवते की, हा प्रदेश केवळ एका पौराणिक स्मृतीवर आधारलेला नाही; तो शतकानुशतके चालत आलेल्या राजसत्ता, धर्म, व्यापार आणि काव्यपरंपरेचा एक संगम आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या श्रीराम नवमीनिमित्ताने प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या भूमीविषयी...

रामटेक‌’ या नावाचा अर्थच सांगतो की, येथे एक संकल्प घडला. ‌‘टेक‌’ म्हणजे प्रतिज्ञा आणि पौराणिक कथेनुसार, वनवासात आलेल्या रामाने येथे ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा नायनाट करण्याची शपथ घेतली. त्यामुळे हे स्थळ संकल्पसिद्धी म्हणूनही ओळखले जाते. रामटेकला ‌‘सिंदूरगिरी‌’ हे नावही आहे. एक आख्यायिका सांगते की, येथेच विष्णूचा नरसिंह अवतार हिरण्यकश्यपुला संपवतो आणि त्याच्या रक्ताने हा डोंगर गडद लाल होतो. या नावांमध्येच या स्थळाची बहुस्तरीय पौराणिक ओळख दडलेली आहे.परंतु, रामटेकचे खरे ऐतिहासिक महत्त्व उलगडते, ते कालिदासाच्या ओळींमधून आणि वाकाटक काळाच्या शिलालेखांमधून.

‌‘मेघदूत‌’ हे कालिदासाचे (इ.स. चौथे-पाचवे शतक) सुप्रसिद्ध खंडकाव्य, ज्यात एक यक्ष, एका वर्षाच्या वनवासात रामगिरीवर राहताना, विरहाच्या वेदनेतून मेघाला आपला दूत बनवतो आणि त्याला हिमालयाच्या दिशेने पाठवतो. अनेक परंपरा आणि अभ्यास हे रामगिरी आधुनिक रामटेकशी जोडतात. येथे दरवष भरणारा ‌‘कालिदास महोत्सव‌’ हा त्याच काव्यपरंपरेचा जिवंत उत्सव आहे. संस्कृत नाटके, काव्यवाचन आणि शास्त्रीय नृत्याने भरलेला! रामगिरीच्या त्या हिरव्यागार टेकड्यांवर, पावसाळ्याच्या पहिल्या ढगांकडे पाहताना, कालिदासाच्या ओळी स्वतःच मनात घुमू लागतात, हा योगायोग नाही, ही भूमीची किमया आहे!

इसवी सन चौथ्या-पाचव्या शतकात उदयास आलेले वाकाटक साम्राज्य हे विदर्भातील एक प्रमुख राजसत्ता होते. वाकाटकांची राजधानी नंदीवर्धन (आजचे नागर्धन) रामटेकपासून केवळ सहा किमी अंतरावर होती, ज्यामुळे रामगिरी पर्वत त्यांच्या धार्मिक आणि राजकीय संकुलाचा एक अविभाज्य भाग बनला होता. हे स्थळ भारतातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे इसवी सन चौथ्या शतकापासून अखंड ऐतिहासिक विकासाचा मागोवा घेता येतो.

रामगिरीवरील सर्वांत महत्त्वाच्या पुराव्यांपैकी एक म्हणजे केवळ नरसिंह मंदिरातील वाकाटक शिलालेख. हा इसवी सन पाचव्या शतकातील शिलालेख संस्कृतमध्ये, उत्तरकालीन ब्राह्मी लिपीत, 15 ओळींमध्ये कोरलेला आहे. तो वाकाटक राजवंशाची वंशावळ आणि मंदिराच्या उभारणीची नोंद करतो. हा शिलालेख एका वाकाटक राजकन्येची-अतिभावतीची कथा सांगतो, जी आपल्या मातृकुलातील काकांशी-विदिशाचे उपराजा घटोत्कचगुप्त यांच्याशी विवाहित होती. स्कंदगुप्ताविरुद्धच्या उत्तराधिकार संघर्षात घटोत्कच पराभूत झाल्यावर, राणीचा भाऊ-वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा तिला विदर्भात परत घेऊन आला. हा शिलालेख म्हणजे केवळ एक धार्मिक दस्तऐवज नाही; तो गुप्त आणि वाकाटक घराण्यांमधील गुंतागुंतीच्या राजकीय आणि वैवाहिक संबंधांचा एक दुमळ साक्षीदार आहे.

या शिलालेखाचा पहिला अर्थ मांडण्याचे श्रेय ‌‘महाराष्ट्र पुरातत्त्व सर्वेक्षण विभागा‌’चे संचालक डॉ. ए. पी. जामखेडकर यांना जाते, ज्यांनी 1986 मध्ये तो प्रभावती गुप्ताशी जोडला. प्रभावती गुप्ता-चंद्रगुप्त दुसऱ्याची कन्या आणि वाकाटक राजा रुद्रसेन दुसऱ्याची राणी या विदर्भातील वैष्णव परंपरेच्या एक प्रमुख प्रवर्तक होत्या. त्यांनी या प्रदेशात नरसिंहाच्या उपासनेची सुरुवात केली, असे संशोधन सांगते. हे विशेष आहे, कारण वाकाटक राजे मूळतः शैव होते.

हान्स बाकर यांच्या संशोधनाने या शिलालेखाची आणखी एक महत्त्वाची परत उघडली. बाकर यांच्या मते, हा शिलालेख मूळतः विष्णूच्या त्रिविक्रम रूपाला समर्पित होता. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, शिलालेखाचा मूळ स्रोत जवळचे त्रिविक्रम मंदिर होते आणि भोसले काळातील नरसिंह मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी हा दगड तेथून इकडे आणला गेला असावा. हे निरीक्षण रामटेकच्या मंदिरसमूहाची बहुस्तरीयता आणि काळाच्या ओघात होणाऱ्या पुनर्रचनेची प्रक्रिया अधोरेखित करते.

रामगिरीवर पाचव्या शतकात पूर्व वाकाटक साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी बांधलेली पाच मंदिरे होती. केवळ नरसिंह मंदिर, त्रिविक्रम मंदिर, वराह मंदिर या सर्व मंदिरांची एकत्रित उपस्थिती सांगते की, रामटेक हे एक प्रमुख वैष्णव तीर्थक्षेत्र होते, जिथे विष्णूच्या विविध अवतारांची एकत्रित उपासना होत होती. या मंदिरांची स्थापत्यरचना पाहिली, तर त्यात प्रारंभीच्या दगडी बांधकामाचे स्पष्ट संकेत दिसतात. स्थानिक लाल वालुकाश्मामध्ये घडवलेले, साध्या मंडपांनी युक्त, अलंकारिकतेपेक्षा संरचनात्मक स्पष्टता आणि धार्मिक उद्देश यांना प्राधान्य देणारे.

मध्ययुगीन काळात रामटेक गोंड राजवटीच्या अधिपत्याखाली आला आणि नंतर मराठा राजवटीत आला. आजचे मुख्य रामाचे मंदिर (गड मंदिर) नागपूरचे मराठा राज्यकर्ते रघुजी भोसले यांनी 18व्या शतकात बांधले. उंच तटबंदी, प्रवेशद्वारांची रचना, टेकडीवरील मंदिरांची मांडणी हे सर्व मिळून एक किल्लेसदृश धार्मिक संकुल तयार करतात. परंतु, या भोसलेकालीन भव्यतेमागे वाकाटक, कलचुरी आणि त्याही पूवचे स्तर दडलेले आहेत. यात 11व्या-12व्या शतकातील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरही आहे, जे रामटेकच्या बहुधार्मिक परंपरेचे प्रतीक आहे.

मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढताना, प्रत्येक टप्प्यावर एक वेगळी अनुभूती मिळते. खालील जग मागे सरकत जाते आणि वर पोहोचल्यावर एक विस्तीर्ण, शांत दृश्य उलगडते. एका बाजूला खिंडसी सरोवराचे निळे पाणी, दुसऱ्या बाजूला विदर्भाचे सपाट पठार. ही केवळ भौतिक उंची नाही; ती एक मानसिक आणि आध्यात्मिक उंची आहे, जिथे इतिहास, पौराणिकता आणि काव्य एकत्र श्वास घेतात.

रामटेकमध्ये राम हे केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाहीत; ते एक स्मृती आहेत, एक टेक, एक संकल्प आणि त्या संकल्पाभोवती शतकानुशतके विविध राजवंश, विविध धर्मपरंपरा आणि विविध संस्कृती एकत्र विणल्या गेल्या. वाकाटक राण्यांचा उदारहस्त, कालिदासाची काव्यदृष्टी, भोसल्यांची निर्मितीशक्ती हे सारे या एका पर्वतावर एकत्र आले आणि रामगिरीला एक अद्वितीय कालगर्भ दिला.

अखेरीस, रामगिरीच्या शिखरावर उभे राहून जेव्हा आपण त्या शांत परिसराकडे पाहतो, तेव्हा जाणवते की, येथे काळ थांबत नाही; पण तो थरांमध्ये साचत जातो. प्रत्येक मंदिर, प्रत्येक शिलालेख आणि प्रत्येक पायरी ही त्या साचलेल्या काळाची साक्ष आहे. आणि त्या साक्षींच्या मधे उभे राहून, आपण एक गोष्ट हळूहळू समजून घेतो की, श्रद्धा ही केवळ भावनेत नसते; ती स्मृतीत, स्थापत्यात आणि इतिहासाच्या प्रत्येक स्तरात जिवंत असते.

- इंद्रनील बंकापुरे
7841934774




thinkmaharashtra.com

अजिंठ्यात दडलेले ऐतिहासिक रहस्य – डॉ. वॉल्टर स्पिंक (Walter Spink rewrote history of art in Ajintha Caves)

शुभा खांडेकर

अजिंठा लेण्यांची सर्वाधिक ख्याती तेथील गुहांमधील रंगीत भित्तिचित्रांसाठी आहे. त्या लेणीसमूहात तीसपैकी फक्त पाच लेणी पूर्णपणे चित्रांकित आहेत. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत. तेरा लेण्यांमध्ये रंगचित्र रेखाटनाची सुरुवात जेमतेम झाली आहे आणि पाच लेण्यांमध्ये कुंचल्याचा एक फराटादेखील उमटलेला नाही ! असे असूनसुद्धा अजिंठा लेण्यांमध्ये जो आहे तो भित्तिचित्रांचा ठेवा प्राचीन भारताच्या सुवर्णयुगाचे अपूर्व दर्शन घडवतो. चित्रांमध्ये दिसणारे विस्तीर्ण, भव्य व सुशोभित वाडे आणि प्रासाद – त्यांत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगणारे सुखासीन स्त्रीपुरुष अभिजन– त्यांची देहबोली – त्यांच्या चेहऱ्यांवरील शांत, आश्वस्त भाव– त्यांनी नेसलेली तलम, उंची वस्त्रे – त्यांनीच घातलेले वैविध्यपूर्ण व सुबक अलंकार– ओसंडून वाहणारी सुबत्ता– तेथील विलासी जनजीवनाचे… सारे काही अचंबित करणारे आहे. त्यावरून पुढील गोष्टी ठळकपणे लक्षात येतात:

एक : ही लेणी पाचव्या शतकात कोरण्यात आली तेव्हाचे ऐश्वर्य आणि भरभराट,

दोन : संगीत, नृत्य, चित्र, कला यांची व इतर कलाघटकांची कदर करणारा आणि अप्रतिम, सुंदर अभिव्यक्ती जोपासणारा तत्कालीन सुसंस्कृत समाज,

तीन : समाजाला सुखसमृद्धीचा मोकळेपणाने उपभोग उपलब्ध करून देणारी, व्यापारउदिमाने मजबूत झालेली आर्थिक स्थिती,

चार : प्रजाजनांच्या सुखरूपतेविषयी व सुरक्षिततेबाबत जागरूक असणारी स्थिर व खंबीर राजकीय शासनव्यवस्था.

एकोणीस नंबरच्या लेण्यातील कोरीव व रंगीत सजावट

           पण अजिंठ्याला केवळ भित्तिचित्रे नव्हे तर स्थापत्य आणि शिल्पकलेचाही मोठा खजिना आहे. अजिंठा लेण्यांच्या भारतीय इतिहासातील स्थानाबद्दल आणि मूल्यांकनाबद्दल पुरातत्त्वज्ञांमध्ये दोन महत्त्वाच्या प्रश्नांवरून संभ्रम होता. ते दोन प्रश्न म्हणजे ही लेणी कोणी आणि केव्हा निर्माण केली? त्या लेण्यांच्या निर्मितीस कमीत कमी दोनशे वर्षे लागली अशी विद्वानांची अंदाजात्मक समजूत होती. अजिंठा लेण्यांचा शोध एका ब्रिटिश शिकाऱ्याला निव्वळ योगायोगाने लागला. त्याला दीडशे वर्षे उलटली तरी काही कोडी उलगडत नव्हती. बहुतेक लेणी अपूर्णावस्थेत का आहेत, मोजक्याच लेण्यांमध्ये रंगीत चित्रे का आहेत, शेकडो ठिकाणी एकावर एक चढवलेल्या बुद्धमूर्ती का आहेत, या सर्व उपक्रमामागची मूळ प्रेरणा काय अशा अनेक प्रश्नांची स्पष्टीकरणे कोणाही इतिहासतज्ञाला देता येत नव्हती. अशा परिस्थितीत प्राध्यापक डॉ. वॉल्टर स्पिंक हे कला इतिहासाशी संबंधित संशोधनासाठी नेमका विषय शोधत शोधत 1952 मध्ये अजिंठ्याला येऊन ठेपले आणि त्यांनी अजिंठा हीच त्यांची कर्मभूमी निवडून फील्डवर्कची सुरुवात केली. वॉल्टर स्पिंक यांनी त्यानंतरची सहासष्ट वर्षे त्या संशोधनास वाहून घेतले. त्यांनी त्यांचे क्रांतिकारी संशोधन सात जाडजूड ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे.

सव्वीसाव्या लेण्याच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख

स्पिंक यांनी अजिंठ्याला असलेल्या (पाच सातवाहनकालीन जुनी लेणी वगळता) सुमारे पंचवीस वाकाटककालीन लेण्यांची निर्मिती अवघ्या वीस वर्षांच्या कालावधीत झाली हे सप्रमाण आणि नेमकेपणाने सिद्ध केले आहे. त्यांनी त्याच्या समर्थनार्थ विविध युक्तिवाद मांडले आहेत. त्यामुळे अजिंठ्याबद्दलच्या पारंपरिक समजुती मुळापासून उखडल्या गेल्या आणि त्या लेणीसमूहाच्या बहुपदरी विकासाचे अनेक पैलू समोर आले. स्पिंक यांची ती मांडणी ‘सुधारित लघु कालक्रम’ (short chronology) या नावाने जगप्रसिद्ध झाली. मात्र त्यांच्या त्या अभ्यासावर अधिकृत अशी टिप्पणी कोणा भारतीय इतिहास संशोधकाने केलेली नाही. स्पिंक हे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात भारतीय कलाइतिहास शिकवत असत. त्यांचे निधन 23 नोव्हेंबर 2019 रोजी वयाच्या एक्याण्णव्या वर्षी झाले. तोपर्यंत ते कार्यरत होते व वर्षातून दोन वेळा अजिंठ्याला येत. तो क्रम त्यांनी एकदाही चुकवला नाही. त्यांच्या गौरवार्थ कोरिया, जपान, चीन, अमेरिका या देशांतील मान्यवर विद्यापीठांनी परिसंवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांचे आयोजन वेळोवेळी केले आहे.

फारसे सजावट नसलेले लेणे क्रमांक अकराचे साधे प्रवेशद्वार

स्पिंक भारतात संशोधनाच्या उद्देशाने अजिंठ्याला प्रथम दाखल झाले होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी नेस्टा होती. त्यांचे गुरू बेन्जामिन रोलंड हे भारतीय कलाइतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सुरुवातीच्या पाश्चात्य विद्वानांपैकी एक होत. स्पिंक यांनी भारतात संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी बदामी, घारापुरी (एलिफंटा) व अजिंठा असा वेध घेतला. कर्नाटकात बदामी या ठिकाणी असलेली लेणी सहाव्या शतकात कोरण्यात आली असा शिलालेख तेथे आहे. तसेच, घारापुरी लेणी आठव्या शतकात निर्माण झाली अशी समजूत विद्वानांची त्या काळी होती. परंतु शिल्पशैली शास्त्राप्रमाणे बदामीची लेणी ही घारापुरी लेण्यांच्या नंतरची असण्यास हवीत असे त्यांच्या कलाइतिहास प्रशिक्षित नजरेला जाणवले आणि त्यावरून त्यांना घारापुरी लेण्यांच्या कालनिश्चितीत दोनशे वर्षांची गफलत झाली असल्याचा संशय आला. त्यांच्या त्या शंकेला दुजोरा मिळाला अजिंठ्यापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या घटोत्कच नावाच्या लेण्यात. ते लेणे वाकाटक सम्राट हरिषेण याचा प्रमुख सचिव वराहदेव याने कोरवून घेतले अशी नोंद तेथील शिलालेखात आहे. सम्राट हरिषेण पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्य करत होता. तेथील शिल्पकला आणि अजिंठ्याची शिल्पकला तंतोतंत सारखी आहे. मग घटोत्कच येथील निर्मिती पाचव्या शतकात आणि अजिंठा येथील सातव्या शतकात, हे कसे शक्य होईल?

मूर्तीला फुलांचे हार घालण्यासाठी खिळे ठोकत असत.

तो प्रश्न समजून घेण्यासाठी स्पिंक यांनी अजिंठ्याचा इंचन इंच पिंजून काढला. त्यांनी लेण्यांच्या प्रत्येक अवयवाचा कसून तपास घेतला तेव्हा त्यांना असे आढळले, की बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्तीपासून ते रंगाच्या चुकून उडालेल्या थेंबभर शिंतोड्यापर्यंत, दारे आतून बंद करण्याच्या विविध रचनांपासून खिळे (मूर्तीला फुलांचे हार घालण्यासाठी खिळे ठोकत/बसवत असत. तशी छिद्रे अजिंठ्याला अनेक मूर्तींच्या वर आहेत आणि तसे हार दाखवणारी रंगीत भित्तिचित्रेदेखील असल्यामुळे या तर्काला दुजोरा मिळतो.) ठोकण्यासाठी केलेल्या बारीक छिद्रांपर्यंत आणि बेशिस्तपणाने एकावर एक चढवलेल्या शिल्पाकृतींपासून ते रंगीत भित्तिचित्रांना झाकोळून टाकणाऱ्या धुराच्या काजळीपर्यंत… अजिंठ्याचा प्रत्येक अवयव काही तरी सांगतो. स्पिंक यांची असामान्य निरीक्षणशक्ती, त्यांची सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिलाचा अन्वयार्थ लावण्याची हातोटी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्यांची सांगड एकमेकांशी घालण्याची समावेशक दृष्टी यांमुळे अजिंठ्याची रहस्ये स्पिंक यांच्यापुढे एकापाठोपाठ एक उलगडू लागली ! त्यांच्या बारा वर्षांच्या तपश्चर्येला यश मिळाले ! त्यांनी अजिंठा लेण्यांसदर्भातील त्यांच्या सुधारित लघु कालक्रमाची मांडणी एका परिषदेत जाहीरपणे केली. त्यांच्या मांडणीसोबत भरघोस पुरावे होते. त्यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म बारकाव्यासदेखील ऐतिहासिक पुराव्याचा दर्जा देणाऱ्या नावीन्यपूर्ण संशोधनशैलीला जागतिक पातळीवर शास्त्रशुद्धतेची मान्यता लाभली. स्पिंक यांच्या संशोधनात त्यांची कलात्मक संवेदनशीलता आणि शास्त्रशुद्ध कार्यपद्धत यांचा अनोखा संगम पाहण्यास मिळतो असा जाणकारांनी अभिप्राय दिला.

स्पिंक यांनी त्यांचा सुधारित लघु कालक्रम पुढील चार भक्कम खांबांवर उभा केला आहे. 1. त्यांनी स्वतः केलेले फिल्डवर्क, 2. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महानिदेशक जेम्स बर्जेस यांनी तयार केलेले लेण्यांचे अचूक आराखडे, 3. अजिंठा आणि इतरत्र उपलब्ध असलेले शिलालेख व ताम्रपट यांचे महामहोपाध्याय वि.वा. मिराशी यांनी केलेले वाचन व लावलेला अन्वयार्थ आणि 4. दंडी याने सातव्या शतकाच्या सुमारास केलेल्या दशकुमारचरित या गद्य रचनेतील ‘विश्रुतचरित’ नावाचे शेवटचे प्रकरण. स्पिंक यांनी या चारही पुराव्यांची अचूक व अद्वितीय अशी सांगड घालून त्यांचे निष्कर्ष विद्वजगतात मांडले.

खांबावरील कोरीव सजावट (लेणे एकोणीस)

भारतीय इतिहासात गुप्त साम्राज्याच्या काळाला सुवर्णयुग मानण्याची जुनी परंपरा आहे. त्या संदर्भात स्पिंक यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनाच्या आधारे प्राचीन भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी सुचवली आहे. ती थोडक्यात अशी – एक, अजिंठा लेणी समूह हा हरिषेणाच्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत आणि त्यानंतरच्या दोन वर्षांत वेगाने घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींचा आरसा आहे व तो इतिहास जिज्ञासूला एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचता येतो. आणि दोन, इतक्या कमी काळात, युद्धाची टांगती तलवार डोक्यावर असताना इतक्या अप्रतिम सुंदर कलाकृती निर्माण करण्याची क्षमता असलेले कारागीर ज्या राजवटीत होते, ती हरिषेणाची अल्पकालीन राजवट हाच प्राचीन भारतीय सुवर्णयुगाचा कळस म्हणून ओळखला जावा. स्पिंक यांचा तो आग्रह व दावाही आहे. अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधून दिसणारे सुवर्णयुग वास्तवात प्रत्यक्ष अवतरले ते पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात, हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या अवघ्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत, असा स्पिंक यांच्या संशोधनाचा सारांश सांगता येईल.

या लेण्यांमधील एकूणएक भित्तिचित्रेही त्याच सतरा वर्षांच्या कालावधीत रेखली गेली आहेत. स्पिंक यांनी मायकेल एंजेलो (पंधरावे शतक) आणि अजिंठ्याची (पाचवे शतक) पेंटिंग्ज यांची तुलना करून अजिंठ्याची भित्तिचित्रे कलात्मक दृष्ट्या अधिक श्रेष्ठ आहेत असा निर्वाळा दिला आहे.  

विसाव्या लेण्यात डावीकडे बुद्धमूर्ती, खांबावर खाली नागराज मध्ये मिथुन त्यावर स्त्रीदेवता

स्पिंक यांच्या त्या संशोधनाने पुरातत्त्व जगतात खळबळ माजली. त्यांची मांडणी तंत्रशुद्ध आणि तर्ककठोर होती. शिवाय, त्यामुळे अजिंठ्याच्या नंतर कोरलेल्या घारापुरी इत्यादी सर्व लेण्यांचा कालक्रमदेखील त्या प्रमाणात आपोआप दोन शतकांनी छोटा झाला. शिलालेखांमधील मजकुरामुळे अजिंठ्याची निर्मिती राजकीय प्रेरणेतून झाली हे स्पिंक यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले. त्याबरोबरच ती लेणी कोणी निर्माण केली या प्रश्नाची उकलदेखील या सुधारित लघु कालक्रमामुळे निर्विवादपणे झाली. ‘केव्हा’ आणि ‘कोणी’ ही अजिंठ्याबाबतची दोन कोडी समाधानकारक रीत्या सुटली. मात्र स्पिंक यांच्या या संशोधनास भारतीय विद्यापीठांमध्ये मान्यता लाभलेली नाही. अजिंठ्याचा कालक्रम ठरवणे कठीण होते, कारण शिलालेखांमध्ये तारखा नव्हत्या. स्पिंक यांनी कलाकृती घडवण्यासाठी ‘जास्तीत जास्त वीस वर्षे’ असे ठाम पुराव्यासकट जाहीर केल्याने प्रचलित अंदाज–समजुतींना फार मोठा धक्का बसला. हे कसे शक्य आहे? हाच प्रश्न वारंवार पुढे येत राहिला, अजूनही येतो, पण बऱ्याच कमी प्रमाणात. प्रदीर्घ वादविवाद झाले.

स्पिंक यांच्या निष्कर्षांना अभ्यासपूर्वक आव्हान दिले कार्ल खंडालावाला, ब्रह्मानंद देशपांडे आणि अरविंद जामखेडकर अशा ज्येष्ठ, नामांकित आणि मातब्बर मंडळींनी. त्यांच्या विद्वत्तेचा आणि प्रामाणिक जिज्ञासेचा मान राखून स्पिंक यांनी मुख्यतः अजिंठा व जोडीला इतर, अशा सर्वांगीण पुराव्यांच्या अभ्यासाच्या आधारे या तिन्ही विद्वानांच्या प्रत्येक मुद्द्याला समर्पक उत्तर दिले. तो संपूर्ण वादविवाद प्रथम ‘पथिक’ने प्रसिद्ध केला. तो Ajanta: History and Development या स्पिंक यांच्या सातपैकी दुसऱ्या खंडात संपूर्ण प्रसिद्ध केला आहे.

अजिंठ्याचा अन्वयार्थ लावताना इतरांनी एखाद्या पुराव्यावर अधिक लक्ष देऊन दुसरीकडे दुर्लक्ष केले. उदाहरणार्थ, दंडीच्या दशकुमारचरितात ऐतिहासिक सत्य असावे असे मिराशी यांनी सांगितले असूनसुद्धा काही विद्वानांची ते मान्य करण्याची तयारी नव्हती. पण दंडीने हरिषेणाच्या मृत्यूनंतर माजलेल्या अराजकाचे जे वर्णन केले आहे त्याचे हुबेहूब मूर्त रूप अजिंठ्याला उघड्या डोळ्यांनी दिसते असे स्पिंक यांनी पुरातत्त्वज्ञांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे, वाकाटकांनी पाडलेली कोणतीही नाणी सापडलेली नसल्याने, त्या काळात नाणीच वापरात नव्हती असे काहींनी म्हटले. त्यावर स्पिंक यांनी अजिंठ्याच्या अनेक शिल्पांमध्ये आणि रंगीत भित्तिचित्रांमध्ये दाखवलेली नाणी त्यांच्या नजरेस आणून दिली. भिक्खूंच्या खोल्यांची दारे आतून बंद करण्याची यंत्रणा, ज्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते, ती कशी कशी बदलत गेली व त्यांच्या अभ्यासातून अचूक कालक्रम कसा ठरवता येतो हा त्यांचा सिद्धांत क्रांतिकारी (extraordinary) ठरला. स्पिंक यांनी स्वतःच्या प्राथमिक संशोधनामधून बिनतोड पुराव्यांचा अक्षरशः ढीग रचला आहे आणि प्रत्येक पुरावा विचारात घेऊन त्यांची एकमेकांशी सांगड घातली आहे.

स्पिंक म्हणतात, की इतिहासकारांनी वाकाटक राजघराण्यावर व विशेषत: सम्राट हरिषेण या महान सम्राटावर अन्यायच केला आहे. रोमिला थापर यांच्या प्रसिद्ध ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ या पाठ्यपुस्तकात हरिषेणाचा उल्लेखदेखील नाही याची खंत स्पिंक यांनी लेखी स्वरूपात व्यक्त करून, अधिकृत इतिहास लेखनात अजूनही किती मोठी भगदाडे आहेत याकडे लक्ष वेधले आहे.     सम्राट हरिषेण याचे अधिपत्य भारतात पूर्वेला कलिंगच्या किनारपट्टीपासून पश्चिमेला कोकणच्या किनारपट्टीपर्यंत संपूर्ण मध्य भारतावर होते हे लेण्यांमधील शिलालेखांमुळे स्पष्ट होते. हरिषेण याचा मृत्यू झाल्यानंतर, डोक्यावर युद्धाची टांगती तलवार असताना, घाईगडबडीतदेखील अत्यंत वेगाने उत्कृष्ट कलाकृतींची निर्मिती झालेली असल्याचे पुरावे अजिंठ्याला पावलोपावली दिसतात. हरिषेण याच्या सतरा वर्षांच्या कालावधीच्या शेवटास अश्मक या मांडलिक राज्याच्या धुरिणांनी कटकारस्थाने करून हरिषेणाचा आकस्मिक मृत्यू घडवून आणला. त्याच अश्मक राज्याच्या पुढाकाराने इतर मांडलिकांनी हातमिळवणी करून निर्नायकी अवस्थेतील वाकाटक साम्राज्याचे स्वामित्व झुगारून टाकले व सामूहिक बंड पुकारले. त्यानंतर प्रचंड अराजक माजले आणि अत्यल्प कालावधीत एकेकाळच्या बलाढ्य़ वाकाटक साम्राज्याच्या ठिकऱ्या उडाल्या.

वॉल्टर स्पिंक

स्पिंक हे वर्षांतून दोनदा अजिंठ्याला येत. ते विद्यार्थ्यांना अजिंठ्यालाच सुधारित लघु कालक्रम प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून शिकवत असत आणि त्याचबरोबर स्वत:च्या मूळ संशोधनाचे काम पुढे नेत असत. शिवाय, त्यांनी व्हिडिओ फिल्म्स, दोनशेहून अधिक शोधनिबंध आणि प्राचीन भारतीय कलाइतिहासावर विपुल लिखाण अशी भरगच्च साहित्यसंपदा निर्माण करून ठेवली आहे. स्पिंक यांनी प्रत्येक बारीक सारीक तपशिलाचे केलेले दस्तावेजीकरण महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासू विद्वानांसाठी तो अमूल्य ठेवा आहे.

स्पिंक हे भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन आर्किऑलॉजिकल सोसायटी, इण्टॅक अशा संस्थांचे आजीव सदस्य होते. ते त्या संस्थांच्या नियतकालिकांसाठी लिहीत असत. त्यांनी लिहिलेल्या ‘कृष्णमंडल’ आणि ‘दि अ‍ॅक्सिस ऑफ इरॉस’ या दोन ग्रंथांमधून त्यांच्या भारताबद्दलच्या आत्मीय भावनेची आणि ज्ञानाच्या व्याप्तीची व खोलीची कल्पना येते. त्यांच्या भारताशी जुळलेल्या साठ वर्षांच्या भावनिक बांधिलकीपोटी, सौंदर्यासक्त नजरेने निरखून–पारखून निवडलेल्या कलात्मक वस्तूंचे कायमस्वरूपी संग्रहालय खास त्यांच्या नावाने मिशिगन विद्यापीठात मांडण्यात आले आहे. स्पिंक यांचे भारतीय इतिहास, कलासंस्कृती यांवर आणि माणसांवर मनापासून व पराकोटीचे प्रेम होते. मिशिगन विद्यापीठातील संग्रहालय हा अजिंठ्याच्या त्या यक्षाचा योग्यच सन्मान आहे !

(फोटो क्रेडिट – सरयू कामत)

– शुभा खांडेकर 9969439986 shubhakhandekar@gmail.com

(अश्मक हे राज्य अजिंठ्याच्या दक्षिणेला, थोडेसे नैऋत्येकडे होते. सोबत मिराशीकृत नकाशा जोडला आहे. पण त्याचा राजा कोण होता याचा उल्लेख कोणत्याही शिलालेखात नाही. अजिंठ्याला लेणे क्रमांक 26 मध्ये असलेल्या या संबंधातील शिलालेखात अश्मकराजा असा शब्द वापरला आहे. त्याच्या प्रधान सचिवाचे नाव भव्विराजा असे दिले आहे; त्याची व त्याच्या मुलाची स्तुती केली आहे, पण राजाचे नाव नाही! मिराशी यांनी अश्मक राज्य हे औरंगाबादच्या भोवती होते असे सिद्ध केले. पण औरंगाबादच्या समकालीन लेण्यांमध्ये किंवा इतरत्रही अश्मकांचा एकही शिलालेख सापडलेला नाही. दंडीच्या दशकुमारचरितात अश्मकांची थेट खलनायकाची भूमिका आहे व हरिषेणाचा मृत्यू (कदाचित खून) झाल्यानंतर वाकाटकांचे साम्राज्य उलथून टाकण्यासाठी सुरुवातीच्या कटकारस्थानांपासून शेवटच्या निर्वाणीच्या युद्धापर्यंत त्यांनी काय काय केले व ज्या विश्रुताने त्यांचा अखेर बिमोड केला त्याची कहाणी: दंडीने या सर्व घडामोडींचे तपशीलवार वर्णन केले आहे.)


महाराष्ट्राची प्राचीन ‘सम्राज्ञी’ :

प्रभावती गुप्त‘

वाकाटक’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक इतिहासात क्रांती घडवणारे प्राचीन राजघराणे. या राजघराण्याच्या दोन शाखा. एक ‘नंदिवर्धन‘ (नगरधन, नागपूर) आणि दुसरी शाखा ‘वत्सगुल्म‘ (वाशीम). पूर्व विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या भागावर याच नंदिवर्धन शाखेने राज्य केले. ही शाखा तशी फार प्रबळ. सुस्थितीत उभे असणारे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर बांधणारे हे घराणे.या शाखेच्या ‘रुद्रसेन’ नावाच्या राजाबरोबर ‘प्रभावतीगुप्ता‘ चे लग्न झाले. भारताला सुवर्णयुग दाखवणारे राजघराणे म्हणजे गुप्त. प्रभावती याच घराण्यातील पराक्रमी राजा समुद्रगुप्त याची नात (चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी). वाकाटक राजवंश हा शैवधर्माचे आचरण करणारा तर गुप्त घराणे वैष्णव. परंतू, वाकाटकांच्या राजघराण्यात प्रवेश करूनही प्रभावतीगुप्तने अखेरपर्यंत वैष्णवधर्माचे पालन केले. तिला तीचे धार्मिक स्वातंत्र्य वाकाटक राजवंशाने देऊ केले होते. इसवी सन ‘चौथ्या’ शतकाच्या अखेरची ही घटना, पण ‘आधुनिक’ काळापेक्षाही प्रगत विचारसरणीचे लक्षण यातून दिसून येते.प्रभावतीचा राज्यकारभारपुढे काही काळाने तिचा नवरा ‘रुद्रसेन’ मरण पावला. तेव्हा प्रभावतीने सारा राज्यकारभार एकहाती चालवला, तोही तब्बल दहा वर्षे! हा राज्यकारभार करण्यासाठी तीने मातीचा शिक्का करून घेतला होता, ज्यावर “श्री प्रभावतीगुप्तयाः” अशी ब्राम्ही लिपीमधील अक्षरे कोरलेली आढळतात. पतीच्या निधनानंतर राजकारभार पाहण्याची ही परंपरा फार प्राचीन आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन सम्राज्ञी ‘नागणिका‘ ने पतीच्या निधनानंतर कशाप्रकारे राज्य चालवले, याचा संपूर्ण इतिहासच नाणेघाटाच्या गुहेत कोरलेल्या शिलालेखांमधून वाचायला मिळतो. या नागणिकानंतर महाराष्ट्रात प्रभावशाली महिला शासक म्हणून ‘प्रभावतीगुप्त’ ठळकपणे आपल्या नजरेस भरते.रामटेक आणि मनसर या दोन ठिकाणी वाकाटकांच्या धार्मिक विविधतेची झलक आपल्याला पाहावयास मिळते. रामटेक येथे असणारे केवल नृसिंह मंदिर, रुद्र नृसिंह मंदिर, वराह मंदिर, त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील आद्य-वैष्णवांचे ठळक उदाहरण म्हणून पाहीले जातात. केवल नृसिंह मंदिराचा इतिहास समोर येण्यामागेही एक रंजक गोष्ट दडलेली आहे. १९८२-८३ मध्ये डॉ. अरविंद जामखेडकर आणि त्यांची टीम रामटेक येथे असणाऱ्या मंदिरांची साफसफाई करण्यासाठी पोहोचले. नागपूरकर भोसले यांच्या काळात बऱ्याच मंदिरांना जिर्णोध्दाराची किनार लाभली होती. ‘मारुती मंदिराच्या’ भिंतीवरील चुन्याचा लेप काढत असताना गर्भगृहात दोन आणि मंडपात एक, असे ३ शिलालेख उजेडात आले.गर्भगृहात असणाऱ्या मारुतीच्या मूर्तीवरील शेंदूर काढला, तर त्याच्या आतमध्ये आसनस्थ नृसिंहाची मूर्ती प्रकट झाली. (वरच्या फोटोमध्ये देण्यात आलेली मूर्ती) सिंहासनावर बसलेली अशी मूर्ती याआधी पाहण्यात आली नव्हती. जवळ जवळ सहा फूट उंचीच्या नृसिंहाने सर्वांना आश्चर्यचकित केले. मंडपात असलेल्या शिलालेखाचे वाचन झाल्यानंतर हे मंदिर प्रभावतीगुप्तने बांधल्याचे समजले. हा शोध अत्यंत महत्वाचा होता. चौथ्या-पाचव्या शतकात बांधलेले हे मंदिर, गर्भगृहात असणारी प्रतिमा हे सर्वकाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-धार्मिक इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. बाजूलाच असणारे मंदिर ‘रुद्र नृसिंह’, आपल्या पतीच्या स्मरणार्थ प्रभावतीने हे मंदिर बांधले होते.महाराष्ट्रात ‘नृसिंह ‘ पूजेची सुरुवात करणारी व्यक्ती म्हणून प्रभावतीगुप्त अजरामर झाली. पूर्व महाराष्ट्रात वैष्णव पंथाचा प्रचार-प्रसार होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे प्रभावतीगुप्त. याचे धडधडीत उदाहरण म्हणजे रामटेक इथे बांधलेली मंदिरे तसेच तिच्या शिक्क्यावर असणारा शंख.. जो विष्णूच्या आयुधांपैकी एक आहे.आजच्या युगात महिला सशक्तीकरण, स्त्रीवाद, स्त्रियांना सर्वच क्षेत्रात समान अधिकार, स्त्रियांचे शिक्षण यासाठी आपण लढा देतोय.अजूनही खेडोपाडी ‘चूल’ आणि ‘मूल’ पुढे स्त्रियांचे विश्व नाही. आणि दुसरीकडे इसवी सनाच्या पाचव्या शतकात मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि कर्नाटकच्या उत्तर भागावर प्रभावतीगुप्त राज्य करत होती.तत्कालीन मध्यभारतातील अतिशय प्रभावशाली व्यक्ती म्हणून प्रभावतीगुप्तकडे पाहीले जाते. तब्बल दहा वर्षे एकहाती सत्ता राखत ताकदवान सम्राज्ञी म्हणून प्रभावतीगुप्त इतिहासाच्या पानांवर अमर झाली.आपला इतिहास भविष्य उज्वल करण्यासाठी ऐन-केन प्रकारेन वाट दाखवतो, फक्त तो मार्ग पाहण्याची, समजण्याची आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची आपली कुवत असावी.म्हणूनच प्रभावतीगुप्ताची कथा प्रत्येकाच्या कानावर घातली गेली पाहिजे.–केतन पुरी (लेखक प्रसिद्ध इतिहासअभ्यासक आहेत.)




prarang.in

प्राचीन वाकाटक वंश और अजंता गुफाओं का इतिहास


आप सभी ने गुप्त साम्राज्य के विषय में तो अवश्य ही पढ़ा या सुना होगा, किंतु क्या आप गुप्त साम्राज्य के ही समकालीन “वाकाटक” राजवंश के बारे में जानते हैं? प्राचीन भारत में “वाकाटक” नामक एक भारतीय राजवंश हुआ करता था, जिसकी उत्पत्ति तीसरी शताब्दी के मध्य में दक्कन क्षेत्र में हुई थी। इस राजवंश की स्थापना 255 ईसवी में विन्ध्यशक्ति (Vindhyashakti) द्वारा की गई थी। माना जाता है कि इस साम्राज्य का विस्तार उत्तर में मालवा और गुजरात के दक्षिणी किनारों से लेकर, दक्षिण में तुंगभद्रा नदी और पश्चिम में अरब सागर से लेकर पूर्व में छत्तीसगढ़ के किनारों तक फैला हुआ था। इस राजवंश को गुप्त साम्राज्य का समकालीन माना जाता है।

इस साम्राज्य के संस्थापक माने जाने वाले विंध्यशक्ति (250 ईसवी - 270 ईसवी) के बारे में बहुत कम जानकारी उपलब्ध है। विंध्यशक्ति के शासनकाल से संबंधित कोई भी शिलालेख या अभिलेख अब तक खोजा नहीं गया है। माना जाता है कि इस साम्राज्य के क्षेत्रों का विस्तार विंध्यशक्ति के पुत्र ‘प्रवरसेन प्रथम’ (Pravarasena I) के शासनकाल में ही शुरू हो गया था। लेकिन आमतौर पर यह माना जाता है कि प्रवरसेन प्रथम के बाद वाकाटक राजवंश चार शाखाओं में विभाजित हो गया, जिनमें से दो शाखाएँ ज्ञात (प्रवरपुर नन्दिवर्धन शाखा और वत्सगुल्म शाखा) हैं जबकि अन्य दो शाखाएं अज्ञात हैं। 
चंद्रगुप्त द्वितीय की बेटी की शादी वाकाटक शाही परिवार में हुई और उनकी मदद से, उन्होंने शक क्षत्रपों से गुजरात पर नियंत्रण कर लिया था।पुराणों में वाकाटकों को विन्ध्यक नाम से संबोधित किया गया है। वाकाटकों द्वारा ब्राह्मणों को बड़ी संख्या में दिए किए गए ताम्रपत्रों और भूमि अनुदान घोषणापत्रों के माध्यम सेउनके इतिहासके बारे मेंकाफी कुछ समझा जा सकता है । वाकाटक साम्राज्य के लोग ब्राह्मणों के “विष्णुवृद्ध गोत्र” के माने जाते थे। हालांकि उन्होंने बौद्ध धर्म का भी संरक्षण किया था। वाकाटक शासकों को कला, वास्तुकला और साहित्य के संरक्षक के रूप में भी पहचाना जाता है। सार्वजनिक कार्यों और स्मारकों के संदर्भ में उनकी विरासत ने भारतीय संस्कृति में महत्वपूर्ण योगदान दिया है।

यूनेस्को विश्व धरोहर स्थल (UNESCO World Heritage Site) ‘अजंता गुफाओं’ (की चट्टानों को काटकर बनाए गए बौद्ध विहार और चैत्य, “वाकाटक सम्राट हरिसेन” के संरक्षण में ही बनवाए गए थे। अजंता में गुफा संख्या 16, 17 और 19 चित्रकला के क्षेत्र में वाकाटक उत्कृष्टता के सर्वोत्तम उदाहरण माने जाते हैं। इन सभी में महाभिनिष्क्रमण नामक चित्रकला विशेषतौर पर दर्शनीय है। अजंता गुफाओं की गुफा संख्या 1, गौतम बुद्ध के जीवन की कुछ सबसे विस्तृत नक्काशी और मूर्तियों के लिए जानी जाती है। 
अजंता के गुफा चित्र टेम्परा (Tempera) नामक तकनीक का उपयोग करके बनाए गए थे। इनमे से अधिकांश चित्रकलाएं जातक कथाओं और बुद्ध के जीवन दर्शन के साथ-साथ सिद्धार्थ के जीवन के बुद्ध में विकसित होने के चरणों को दर्शाती हैं।वाकाटकों ने अपने अभिलेखों में प्राकृत भाषा का प्रयोग किया। वाकाटक राजा, प्रवरसेन Ⅱ (सेतुबंधकाव्य के लेखक) और सर्वसेन (हरिविजय के लेखक) प्राकृत भाषा के अनुकरणीय कवि माने जाते थे। उनके शासनकाल के दौरान, संस्कृत में वैदर्भारती नामक एक विकसित शैली प्रचलित थी, जिसकी प्रशंसा कालिदास, दंडिन और बाणभट्ट जैसे महान कवियों ने भी की थी।

वाकाटक वंश के शासकों की सूची संक्षेप में इस प्रकार है::
-विंध्यशक्ति (शासनकाल: 250 – 270 ईसवी): विंध्यशक्ति को कई वैदिक यज्ञ कराने और इस प्रकार ब्राह्मणवादी अनुष्ठानों को पुनर्जीवित करने का श्रेय दिया जाता है। हरिसेन के समय के अजंता शिलालेखों में उन्हें द्विज के रूप में वर्णित किया गया है और उनकी सैन्य उपलब्धियों के लिए उनकी प्रशंसा की गई है।
-प्रवरसेन प्रथम (शासनकाल: 270 - 330 ईसवी): प्रवरसेन विंध्यशक्ति के पुत्र और उत्तराधिकारी थे। उन्हें वाकाटकों की वास्तविक शक्ति माना जाता है, और उन्हें सम्राट, धर्म महाराजा और हरितिपुत्र की उपाधि भी प्राप्त थी। उन्होंने अश्वमेध, वाजपेय आदि वैदिक अनुष्ठान भी किये। उनकी राजधानी कंचनका (आधुनिक नचना) थी। उन्होंने अपने साम्राज्य को दक्षिण की ओर विदर्भ और दक्कन के आसपास के क्षेत्रों तक विस्तारित किया। प्रवरसेन की मृत्यु के बाद, उनका साम्राज्य उनके चार बेटों के बीच विभाजित हो गया, जिनमें से प्रत्येक ने अलग-अलग प्रांतों पर स्वतंत्र रूप से शासन किया।

अजंता गुफा : समर्पण शिलालेख

उनकी (प्रवरसेन प्रथम की) मृत्यु के बाद वाकाटक राजवंश को दो शाखाओं में विभाजित कर दिया गया- 
1.प्रवरपुर नन्दिवर्धन शाखा (नंदिवर्धन - आधुनिक नागपुर): प्रवरपुर नन्दिवर्धन शाखा के शासकों ने नर्मदा नदी और गोदावरी नदी के बीच के क्षेत्र पर शासन किया। उनकी राजधानी प्रवरपुर थी, जो अब महाराष्ट्र का पवनार शहर है। इस शाखा के सबसे महत्वपूर्ण शासक रुद्रसेन प्रथम, पृथ्वीसेन प्रथम, रुद्रसेन द्वितीय, प्रवरसेन द्वितीय, नरेंद्र सेन और पृथ्वीसेन द्वितीय थे।
2.वत्सगुल्म शाखा (आधुनिक वाशिम, अकोला जिला, महाराष्ट्र): वत्सगुल्म शाखा के शासकों ने सह्याद्रि पर्वतमाला और गोदावरी नदी के बीच के क्षेत्र पर शासन किया। उनकी राजधानी वत्सगुल्म थी, जो अब महाराष्ट्र का वाशिम शहर है। इस शाखा के सबसे महत्वपूर्ण शासक सर्वसेन, विन्ध्यशक्ति द्वितीय/विंध्य सेन, प्रवरसेन द्वितीय, देवसेना और हरिसेन थे।

हरिसेन वाकाटक वंश के सबसे महान शासक माने जाते थे। उन्होंने राजवंश की दो शाखाओं को एकजुट किया और उनके क्षेत्रों का विस्तार किया। वह कला और विज्ञान के संरक्षक भी थे और उनके शासनकाल के दौरान कई अजंता गुफाओं का निर्माण किया गया था। हरिसेन की मृत्यु के बाद वाकाटक राजवंश का पतन हो गया। उनके द्वारा शासित क्षेत्र पर अंततः 550 ईसवी तक चालुक्यों ने कब्जा कर लिया। हालांकि, उनके पतन के कारण पूरी तरह से ज्ञात नहीं हैं, लेकिन ऐसा हो सकता है कि यह सब उनके आंतरिक संघर्ष या बाहरी खतरों के कारण हुआ हो। 

संदर्भ
https://tinyurl.com/m7udjfcu 
https://tinyurl.com/ytb9wdxv 
https://tinyurl.com/4bc3tdbw




thinkmaharashtra.com

अजिंठा-वेरूळ – वेध खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून

पराग महाजनी

carasole

आजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद जामखेडकर यांच्या मनात उत्सुकता होती. त्यांचा विद्यार्थी आणि खगोल अभ्यासक म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजिंठा आणि वेरूळच्या गुंफांची रचना खगोलशास्त्रीय दृष्टीने कशी आहे यावर संशोधन होणार होते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक मयंक वाहिया यांची या कामी साथ होती. मग 21 जूनचा ‘मुहूर्त’ पाहून निघालो. 21 जून म्हणजे विष्टंभ बिंदू. सूर्य त्या दिवशी जास्तीत जास्त उत्तरेकडे सरकलेला असतो. त्यामुळे तो दिवस उत्तर गोलार्धात मोठ्यात मोठा असतो. त्या दिवसाला सर्व प्राचीन वाङ्‌मयातही खूपच महत्त्व आहे. त्या दिवशी उगवत्या सूर्याचा प्रकाश सरळ आत गुंफेत बुद्ध मूर्तीवर पडतो का, याचा शोध घ्यायचे आम्ही ठरवले.

अजिंठा – खगोलीय दृष्टिकोनातून निरीक्षणे

अजिंठा हा एकूण तीस बौद्ध गुंफांचा समुदाय आहे. त्या सर्व गुंफा दगडातून वरून खाली कोरून काढल्या आहेत. वरून पाहता तो समुदाय घोड्याच्या प्रचंड नालाप्रमाणे दिसतो. त्यापैकी पहिल्या दोन गुंफांमध्ये मुख्य मूर्तीशिवाय अनेक भित्तिचित्रे आहेत. पद्मपाणी आणि वज्रपाणी ही केवळ अप्रतिम समजली जाणारी रंगीत चित्रे तेथे पाहता येतात. अजिंठामधील ते प्रसिद्ध विहार आहेत. त्याउलट सव्वीस क्रमांकाची गुंफा प्रसिद्ध चैत्य आहे. त्या दोन गुंफा समोरासमोर आहेत. आमचे निरीक्षण तेथून सुरू झाले. “गंमत म्हणजे पहिली गुंफा 21 जूनच्या सूर्योदय रेषेशी जवळजवळ समांतर आहे, हे आमच्या ताबडतोब लक्षात आले. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी जेव्हा ती कोरली गेली तेव्हा असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी ती शून्य अंशाचा कोन करत असावी. त्याउलट तिच्या विरुद्ध दिशेत असलेले चैत्य 22 डिसेंबरच्या सूर्योदयरेषेशी खूपच समांतर आहे. हे चैत्य त्या सुमारास असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी शून्य अंशात असावे असे नवीन निरीक्षण पुढे आले. त्यामुळे मग पौर्णिमेला उगवत्या चंद्राचा प्रकाश बुद्धप्रतिमेवर पडत असावा. बौद्ध धर्मात चंद्राच्या पौर्णिमांना महत्त्व असल्यामुळे कदाचित प्राचीन भिख्खूंनी गुहांची रचना अशा प्रकारे केली असेल काय?
अजिंठाची निर्मिती करण्यास सुमारे सातशे वर्षे लागली आणि ती ख्रिस्तानंतर सुमारे पाच शतके सुरू होती. वाकाटक राजांच्या काळात तेथे कलेचे सर्वांत उंच शिखर गाठले गेले होते. जर आमची ही निरीक्षणे प्रस्थापित झाली, तर त्या काळच्या विज्ञानावर उत्तम प्रकाश पडू शकेल. तेव्हाची भूमिती, गणित, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या शाखांचा किती विकास झाला होता, याचा नवीन अंदाज आपल्याला येऊ शकेल. अजिंठाच्या सर्व गुंफांची खगोलीय दृष्टिकोनातून बारकाईने निरीक्षणे सुरू आहेत. त्यावरून पूर्ण अनुमाने निघायला एखादे वर्ष जाईल.

वेरूळ – संपात बिंदूंचे भान ठेवून निर्मिती

वेरूळ हा भारतीय कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना. वेरूळमध्ये जैन, बौद्ध आणि हिंदू असे तिन्ही धर्म गुण्यागोविंदाने नांदताना आढळतात. प्राचीन कलाकारांनी तेथे एकूण चौतीस गुंफांची निर्मिती केली. तिन्ही धर्मीयांचे अनुयायी उपासना करण्यासाठी तेथे येत असत. कातळ वरून खाली कोरत येऊन बनवलेली शिल्पे अजरामर ठरली आहेत. जैन, बौद्ध आणि हिंदू गुंफा एकमेकांच्या “खांद्याला खांदा’ लावून उभ्या आहेत. त्यांतील प्रचंड कैलास लेणे तर सर्व गुणांचा मुकुटमणी आहे. त्याची निर्मिती संपात बिंदूचे भान ठेवून केलेली आहे. तेथे शिवाची भलीमोठी पिंडी असून, भाविक तिचे पूजन करतात. जवळच ‘छोटा कैलास’ ही जैन गुंफा स्थापत्याचा उत्कृष्ट आविष्कार मानली जाते. गुंफा संपात बिंदूंशी समांतर बांधलेली आहे. त्यावर “शुकनासिका’ नावाचे छोटेखानी; पण सुंदर मंदिर आहे. सूर्य वसंत संपात किंवा शरद संपात बिंदूशी आला, की त्यातील प्रतिमेला आपल्या किरणांनी स्नान घालतो. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांत सूर्य, चंद्र आणि तारे यांना विशेष स्थान आहे. त्यामुळे आपल्या तत्त्वज्ञानात त्यांचा सतत संदर्भ येत राहतो. जगातील बहुतेक सर्व धर्मांना ती गोष्ट लागू होते. अर्थातच मग प्राचीन स्थापत्यकारांनी धर्म, पंथ आणि खगोलशास्त्र यांची सांगड घातली नसती तरच नवल! त्या काळी खगोलशास्त्राचा उल्लेख ‘ज्योतिःशास्त्र’ म्हणजे तेजःपुंज अवकाशस्थ ज्योतींचे विज्ञान असा केला जात असे. आता सामान्यतः प्रश्‍न असा पडू शकेल, की हे सर्व कशासाठी करायचे, काय गवसणार इतके प्रयत्न करून? सामान्यांना त्याचा काय फायदा? हे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. आपला समाज प्रगत होत आहे. विज्ञानाची कास धरून अनेक विषयांत प्रगती करत आहे. त्याच वेळी ‘पुराणातील वांगी पुराणात बरी’ अशी काहींची धारणा होणे शक्‍य आहे; पण ती तितकीशी बरोबर नाही, कारण प्राचीन काळी सामान्यांना समजेल, उमजेल आणि पचेल अशा शब्दांत कथांच्या स्वरूपात विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, नैतिकता अशा अनेक महत्त्वाच्या आणि विविध पैलूंवर पुराणांनी भाष्य केले. त्यांनी ग्रहणात राहू आणि केतू यांचे महत्त्व सांगितले. त्या बिंदूंना राक्षसांची उपमा दिली, ती त्या ठिकाणी सूर्यबिंबाचा र्‍हास होतो, हे सर्वसामान्यांना समजावून सांगण्यासाठी. भारतीयांना ग्रहणाचे विज्ञान पाचव्या शतकापूर्वी ज्ञात होते. पुराणांत, ब्राह्मणांत, उपनिषदांत अनेक चित्र-विचित्र गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. एकट्या मत्स्यपुराणात चौदा हजार ऋचा आहेत. त्यातील विज्ञानाला अनुसरून किती आहेत, हे शोधून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी असे संशोधन प्रयत्न आपण केलेच पाहिजेत.

संपात बिंदू आणि विष्टंभ बिंदू म्हणजे काय?

पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते, त्या वर्तुळाचा अक्ष आणि तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष एकमेकांशी 23.5 अंशांचा कोन करतात. जमिनीवरून पाहता सूर्य पृथ्वीभोवती फिरताना भासतो. तो ज्या मार्गावरून फिरतो, त्याला ‘आयनिक वृत्त’ असे म्हणतात. ते वृत्त आपल्या विषुववृत्ताशी 23.2 अंशांचा कोन करते. ती दोन वृत्ते परस्परांना फक्त दोन बिंदूंत छेदतात. त्या बिंदूंना ‘संपात बिंदू’ असे म्हणतात. त्या बिंदूंवर वर्षातून दोनदा सूर्य येतो, मग त्या दिवशी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते. ते दोन 21 मार्च आणि 21 सप्टेंबर, असे दिवस असतात. त्या दिवशी सूर्य अचूक पूर्वेला उगवतो आणि अचूक पश्‍चिमेला मावळतो. जगातील सर्व धर्मांमध्ये या दोन बिंदूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील अनेक प्राचीन वास्तू यांच्या अनुषंगाने बांधल्या आहेत. त्याला भारतही अपवाद नाही.
त्याशिवाय आणखी दोन बिंदू आपणास माहीत हवेत. आयनिक वृत्तावर फिरता फिरता सूर्य कधी जास्तीत जास्त उत्तेरकडे जातो, तर कधी जास्तीत जास्त दक्षिणेकडे. पहिला दिवस येतो 21 जून रोजी आणि दुसरा येतो 22 डिसेंबर रोजी. 21 जून रोजी असते ‘उत्तरायण’ आणि दिवस सर्वांत मोठा, तर 22 डिसेंबर रोजी असते ‘दक्षिणायन’, तेव्हा दिवस असतो सर्वांत लहान आणि रात्र मात्र सर्वांत मोठी. ‘विष्टंभ’ आणि ‘अवष्टंभ’ बिंदू म्हणतात ते हेच. ते दोन दिवस सूर्याच्या सीमा दर्शवतात. आपल्या पुराणात आणि प्राचीन वाङ्‌मयात त्यांना फार महत्त्व आहे. त्यांचाही विचार पूर्वीच्या वास्तुरचनाकारांनी केला होता आणि त्याप्रमाणे आपले तंत्रज्ञान विकसित केले होते.
खगोलशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, स्थापत्यविशारद आणि अभियंते यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अनेक विषयांतील तज्ज्ञ एकत्र आल्याशिवाय असे संशोधन शक्‍य नाही. मग संगणक, जीपीएस उपक्रम आणि आधुनिक लेसर उपकरणांच्या मदतीने सुरू झालेला शोध येत्या दशकात आपल्या ज्ञानात खूपच भर घालेल यात शंका नाही. आधुनिकतेमध्ये ‘प्राचीनता’ आणि प्राचीनतेमध्ये “आधुनिकता’ यांचा जागरूकपणे समन्वय साधणे आवश्‍यक होऊन बसले आहे. असा समन्वय भविष्यातील आपल्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ असणार आहे.
– पराग महाजनी

9881201875, 020-24380177

www.paragmahajani.com



marathimati.com

महाराष्ट्रातील प्राचीन बांधकामे (महाराष्ट्र)

संपादक


महाराष्ट्रातील प्राचीन बांधकामे

यादव सम्राटांच्या काळात हेमाडपंती बांधणीच मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्या अगोदर दक्खनमध्ये बदामीचे चालुक्य आणि उत्तरेत प्रतिहार यांनी अशा बांधणीची देवळे उभारली. महाराष्ट्रातील प्राचीन बांधकामे (Prachin Bandhkame, Maharashtra).


(छायाचित्र: महादेव मंदिर, झोडगे नाशिक)

यादव सम्राटांच्या काळात हेमाडपंती बांधणीच मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला


चुन्याचा दर्जा भरल्याशिवाय बांधलेल्या देवळांना सर्वसाधारणपणे हेमाडपंती म्हटले जाते. अशी देवळे महाराष्ट्रात यादव काळाच्या (इ. स. ११८४ - १३१०) अगोदर क्वचितच आढळतात, असे मत हेन्‍री कझिनस यांनी दक्खनच्या बांधीव स्थापत्याच्या त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात जवळजवळ शाक-अर्धशतक अगोदर नमूद केले आहे. अशा हेमाडपंती देवळाबद्दल ते पुढे असे म्हणतात, ही प्राचीन देवालये आता, अगदी निरपवादपणे खिळखिळी झाली असून जवळजवळ ढासळलेल्या अवस्थेत आहेत. ह्याला मुख्यत्वे बांधकामासाठी वापरलेला, अ‍ॅमिग्डलॉयडल/अमिग्डालाइडल (amygdaloidal) प्रकाराचा, दगडच कारणीभूत आहे.

बऱ्याच वेळा हा दगड दुसऱ्या कुठल्या जागेहून आणण्याऐवजी बांधकामाच्या जागीच खाणीतून काढला जाई. हा दगड कठिण आणि मजबूत असला तरी तो काही वेळा सदोष व भेगाळलेला असल्याने तुळई म्हणून अयोग्य ठरतो. प्राचीन हेमाडपंती देवालये पटईच्या छताची असल्याने त्यात तुळ्यांचा मोठा प्रमाणावर वापर होता. या तुळ्यावर प्रचंड बोजा असल्याने त्यांना साहजिकच तडा जात असे.

यादव सम्राटांच्या काळात हेमाडपंती बांधणीच मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्या अगोदर दक्खनमध्ये बदामीचे चालुक्य आणि उत्तरेत प्रतिहार यांनी अशा बांधणीची देवळे उभारली; आणि आपली स्वतःची अशी प्रादेशिक शैली निर्माण केली. वेरूळाच्या राष्ट्रकूटांनी (इ.स. ७५३ - ७६६ च्या सुमारास) मात्र अशी देवळे न बांधता गुंफा कोरण्यावरच भर दिला. ह्या आवडीचीच परिणती संपूर्ण देऊळच कळसापासून पायापर्यन्त डोंगरातून कोरण्यात आली. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम (इ.स. ७५७ - ७७२) याने घडविलेले कैलास लेणे हे एक अद्‌भुतच आहे. हे देऊळ महणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच नव्हे, तर एक प्रचंड शिल्पच आहे!

देऊळ बांधण्याऐवजी गुंफा कोरण्याची ही पद्धत हजार वर्षाइतक्या प्राचीन परंपरेचे उल्लंघन न करण्याच्या भीतीमुळे टिकून राहिली असे नव्हे, तर वर उल्लेखिल्याप्रमाणे त्या पाठीमागे काही व्यावहारिक कारणेही होती. चौकटीच्या दाराच्या आणि पटईच्या छताच्या स्थापत्यात वर उल्लेखिल्याप्रमाणे दक्खनचा दगड तुळई म्हणून टिकाव धरणे कठिण होते. चुन्याचा अथवा मातीचा दर्जा दगडी भिंतीत न भरता देवळे उभारण्याची पद्धत उत्तर भारतात गुप्तकाळात रुढ झाली. पण यादव काळापर्यन्त या तंत्राने महाराष्ट्रात मूळ धरले नाही.

यादवांच्याच काळात घडीव दगडांची देवळे उभारण्याचे तंत्र कसे किंवा का आले हे आज तरी सांगता येणे कठिण आहे; पण यादव सम्राटांनी, विशेषतः त्यांचा प्रधान अमात्य हेमाडि, उर्फ हेमाडपंत, याने या स्थापत्यप्रकाराला प्रोत्साहन दिले; आणि लोकानुश्रुतीप्रमाणे त्यामुळेच या स्थापत्यतंत्राला हेमाडपंती असे नाव पडले. हा वाक्‌प्रचार आता इतका रूढ झाला आहे की हेमाडपंताच्या नंतरच्याच नव्हे तर पूर्वीच्या देवळांचे वर्णन करतानासुद्धा हेमाडपंती या शब्दात केले जाते. मराठाकालात महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचे स्थापत्य तंत्र प्रचलित झाले. मंदिराचा छतापर्यन्तचा भाग दगडाचा व शिखर विटांचे, दर्जासाठी व गिलाव्यसाठी तसेच नक्षीसाठी चुन्याचा भरपूर वापर करण्यात येऊ लागला. यापेक्षा प्राचीन देवळे वेगळी असल्याने त्यांना सरसकट हेमाडपंती असे नाव देण्यात आले असावे.

रामटेक येथील यादवपूर्व मंदिरे


यादव सम्राटांनी घडीव देवळाच्या स्थापत्याला चालना दिली आणि त्याचा प्रसारही केला. पण त्यामुळे गुंफा कोरण्याची प्रथा लोप पावली नाही, ती यादवोत्तर काळातही प्रचलित असल्याचे दिसते. एक दशकाअगोदरपर्यन्त सर्वात प्राचीन हेमाडपंती देऊळ अंबरनाथचे शिवालय समजले जाई. ठाण्याचा शिलाहार राजा मुम्मुणिराज याने देवळाची डागडुजी केल्याचा इ.स. १०६० च्या शिलालेखात उल्लेख आला होता. म्हणजे त्या अगोदर वीस-पंचवीस वर्षे तरी शिवालय बांधले गेले असावे.

याचा अर्थ घडीव देवळाची महाराष्ट्रातील प्राचीनता ११ व्या शतकाच्या अगोदर जात नाही. पण गेल्या दशकात प्रस्तुत लेखकाने केलेल्या संशोधनामुळे घडीव स्थापत्याची महाराष्ट्रातील प्राचीनता बरीच मागे गेली आहे. (प्राचीन महाराष्ट्र या संज्ञेमध्ये अर्थातच कुंतल, विदर्भ आणि अश्मक म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांचा अंतर्भाव आहे). त्यांच्या प्राचीनतेमुळेच नव्हे तर शैलीच्या दृष्टीनेही हे देवालये महत्त्वाची आहेत. भारतीय कलेतिहासात अभिजात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्तकलेची केंद्रे उत्तर भारतात गुप्त सम्राटांच्या आणि त्यांच्या मांडलिकांच्या आश्रयाने उदयाला आली.

दक्खनमधील अजिंठा येथील स्थापत्य-शिल्पकला याच अभिजात परंपरेचा काहीसा वैशिष्टयपूर्ण असा फरक समजला जातो. यामधील दुवा म्हणून रामटेक येथील देवळांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय बाब आहे ती अशी की अजिंठा येथील सातवाहन काळातील १ - २ गुंफा सोडता वाकाटककातील गुंफ मुख्यत्वे हरिषेण या त्या वंशातील शेवटच्या ज्ञात राजाच्या कार्यकाळात, म्हणजे इसवी सन ४६५ - ४८५ या काळात, कोरल्या गेल्या, रामटेक येथील घडीव मंदिरे त्याहून अगोदरच्या काळातील (इ.स. सुमारे ४१५ - ४५०) आहेत. वेगळ्या शब्दात सांगायचे तर मंदिर स्थापत्याच्या इतिहासाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तथाकथित हेमाडपंती देवळांची प्राचीनता जवळजवळ सहा शतकांनी मागे रेटता येते. रामटेक येथील वाकाटककातील मंदिरे व अंबरनाथ येथील शिलाहारकालीन देवालयाच्या काळामधला कालखंड या शैलीच्या दृष्टीने जवळजवळ रिकामाच राहतो ही मात्र एक आश्चर्याचीच बाब आहे.

रामटेक येथे सुमारे पन्नास वर्षाच्या कालखंडात बांधलेल्या वाकाटककालीन ह्या देवळांना आणखी एक महत्त्व असे आहे की समकालीन गुप्त स्थापत्यापेक्षा काहीसा वेगळेपणा येथे जाणवतो. वाकाटकांच्या ज्येष्ठशाखेची राजधानी नगरधन (प्राचीन नंदिवर्धन) येथून अगदी जवळच आहे. मंदिराचे आगळेपण राजाश्रयामुळे आले असावे हे उघडच आहे. येथील वाकाटककालीन स्थपतींचे वैशिष्टय असेकी एकाच विन्यासावर सर्व देवळे न उभारता प्रत्येक वेळी काही वेगळा प्रयत्न येथील सातही प्राचीन मंदिरात आढळतो.

वराहमंडप हा येथील मंदिराचा सर्वात साधा प्रकार. त्रिविक्रम मंदिर हे त्यापेक्षा एका पायरीने पुढे आहे. गर्भगृहाला पुढे अर्ध्या भिंतीचा मंडप जोडला आहे. वराह मंडपाच्या साध्या भिंतीच्या तुलनेने ह्या अलंकृत, अर्ध्या भिंती त्यावरील वेदिका व गणांच्या आकृतीमुळे अधिक शोभिवंत वाटतात. केवल आणि रूद्र-नरसिंहाच्या मंदिरात यापेक्षा विकसित विन्यास आढळतो. नंतरच्या स्थापत्यशास्त्रातील परिभाषेत बोलावयाचे म्हणजे वराह व त्रिविक्रम हे मंडप निरंधार आहेत तर ही साधार देवालये आहेत. त्यामुळे मंडप व गर्भगृहाच्या भोवती पूर्ण भिंती असून गाभाऱ्याच्या भोवती प्रदक्षिणा घालता येते.

मंडपाच्या व गर्भगृहाच्या भिंतीवर दर्शनी बाजूला वेदिकेचे अलंकरण आहे; पण त्यात यक्षाकृती नाहीत. त्याना दर्शनी दरवाज्याच्या खांबावर जागा मिळाली आहे. रुद्र-नरसिंहाचे देऊळसुद्धा दोन मंडपाभोवतीच बांधले असले तरी त्यात थोडा वेगळेपण आहेच. या रुद्र-नरसिंहाच्या देवळापेक्षा भोगरामाचे देऊळ आणखी वेगळे आहे. त्यात लहानसा बोळ मध्ये ठेवून दोन गर्भगृहे शेजारी बांधली आहेत. त्यांना समोर एक सामयिक अंतराल असून, समोर उघडा मंडप आहे.

अलंकरणासाठी वापरलेली प्रयोजने (motifs)तसेच स्थापत्यातील फरकावरूनही ह्या गुप्त-वाकाटक-शैलीच्या व त्या काळातील वास्तू आहेत यात शंका नाही. वाकाटक सम्राट्‌ रुद्रसेन द्वितीय (इ.स. ३९५ - ४००) याची पत्नी सुप्रसिद्ध प्राकृतकवी सम्राट्‌ प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४२५ - ४५०) याची माता प्रभावतीगुप्ता हिचा एकशिलालेख केवल-नरसिंह मंदिराच्या भिंतीवर आतल्या बाजूस सापडला असून ही देवळे वाकाटक-काळात इ.स. ४०० ते ४५० च्या उभारली गेली याविषयी शंका राहत नाही. विन्यासदृष्ट्या या मंदिरसमूहाच्या विकासाचा आलेख गुप्त साम्राज्यात इतरत्र आढळत नाही आणि त्यामुळे या देवळाना गुप्त - वाकाटक - शैलीच्या स्थापत्यात आगळे महत्त्व आहे. या मंदिरसमूहातील एक देऊळ हे अर्धे घडीव व आतील भाग गुंफेसारखा कोरलेला अशा प्रकारचे आहे ही लक्षणीय गोष्ट आहे. याचा अर्थ असा की या वाकाटक स्थापत्यात दक्खनच्या गुंफा - स्थापत्याचे काही अंश समाविष्ट झाले होते.

इसवी सनाच्या चौथ्या शतकात दगडांनी बांधलेल्या वास्तूंची एक शैली नव्याने आकारास येत होती. गुप्त सम्राटांच्या आश्रयामुळे तिला चालना मिळाली व समुद्रगुप्ताच्या विजिगीषू सेनेबरोबरच तिचा सर्वत्र प्रसार झाला. विंध्य व विंध्यपादाशी असलेल्या जंगलमय प्रदेशात तिला प्रतिसाद मिळाला आणि फलस्वरूप आपल्याला एरण, नचना - कुठारा व भुमरा येथील वास्तू दिसतात. गुप्त साम्राज्यातील वास्तूशी काहीशा मिळत्या जुळत्या पूर्ण स्थाप्त्यालंकरणात स्वतःची वेगळी लकब असलेल्या वास्तू वाकाटकांच्या आश्रयाने विदर्भातील स्थपतींनी उभारल्या.

रामटेक शिवाय पवनार येथे त्या कलेचे अवशेष आता बघावयास मिळतात पवनार येथील भव्य देवालय आज उभे नसले तरी तेथील मुर्ती व शिल्पपट त्याच्या संपन्नतेची साक्ष देण्यास समर्थ आहेत उत्तरेकडील गुप्तस्थापत्याचे घटक व दक्खनमधील बौद्ध स्थापत्य यांचे बेमालूम मिश्रण घडवून आणण्यात रामटेक येथील स्थपती यशस्वी झालेले दिसतात. स्थानिक दक्खनी काळा फत्तर व वालुकापाषाण यांचा वापर यांनी रामटेक येथे मोठ्या चातुर्याने केलेला दिसतो. आधीच्या स्थापत्य नमुन्यांच्या व त्यातील घटकांच्या मिश्रणातून एक नवीन नमुना रामटेक येथे आकारास आलेला दिसतो. त्यात अभिप्रेत असलेल्या मिश्रणामुळे दक्खन व उत्तरेच्या स्थापत्याला जोडणारा दुवा असूनही दक्खनच्या स्थपतींच्या प्रतिभेचा एक आगळा आविष्कार आहे असे दिसते.

प्राचीन विटांची देवळे


पाषाणाने बांधलेल्या देवळांच्या स्थापत्य परंपरेला समांतर अशी विटांच्या देवळांचीही परंपरा होती. किंबहुना ती जास्त प्राचीन होती. लाकूड हे माध्यम सगळ्यात जास्त नाशवंत. परंतु सगळ्यात खरीखुरी प्राचीन परंपरा काष्ठस्थापत्याचीच असली पाहिजे. दक्खनमधील सुंदर सुंदर गुंफा कोरणाऱ्या पाथरवटाला सातवाहन काळात सेलवड्‍ढ (शैलवर्द्धकी, म्हणजे पाषाणमाध्यमात काम करणारा सुतार ) म्हणत. यावरुनही प्राचीन स्थापत्यात सुतार कामाला अग्रक्रम होता हे स्पष्ट होते. प्राचीन काळी विटांच्या स्थापत्यात काही महत्त्वाचे घटक लाकडाचे असत यावरून त्या माध्यमाचे व परंपरेचे महत्त्व लक्षात येते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (प्राचीन नगर) येथील त्रिविक्रमाचे मंदिर विटांच्या स्थापत्याचा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुरावा असे म्हणता येईल. ही काही एकादी भव्य वास्तू नाही. या मंदिराचा २६*१२ फूट लांबरूंद आकार गजपृष्ठाकृती (apsideal) असून दोन्ही बाजूला उतरते छप्पर व समोर बौद्ध गुंफातल्याप्रमाणे चैत्य-गवाक्ष आहे. धाटणीवरूनच या मंदिराचा काळ इसवीचे पाचवे शतक इतका सामान्यतः समजला जातो. साधारणपणे याच आकाराच्या (९*५ मीटर) गजपृष्ठाकृती चैत्यालयाचे-कारण त्यात मूर्तीऐवजी स्तुपाची स्थापना केली आहे-अवशेष तेर येथील उत्खननात सापडले आहेत. त्यांचा काळ इसवीचे दुसरे शतक इतका प्राचीन ठरविण्यात आला आहे.

त्रिविक्रम मंदिरात आज उत्तर-चालुक्य-शैलीतील त्रिविक्रमाची मूर्ती आहे. बाहेरील मंडपही त्याच काळातला असावा. या अगोदर हे मंदिर उत्खननात सापडलेल्या चैत्यालयाप्रमाणेच असावे असा काही विद्‌वानांचा कयास होता. उत्खन्नातील पुराव्यामुळे या कयासाला पुष्टी मिळाली एवढेच नव्हे, तर त्रिविक्रम मंदिराच्या रचनेचा काळ मानला जातो त्यापेक्षा पूर्वीचा असावा असेही म्हणण्यास जागा झाली आहे.

त्रिविक्रम मंदिरापेक्षा थोड्या नंतरच्या काळातली (इ.स. सहावे शतक) विटांची मंदिरे तेरमध्येच आहेत. ती म्हणजे उत्तरेश्वर आणि कालेश्वर ही होत. त्यापैकी उत्तरेश्वराचा गाभारा चौकोनी असून त्याचे शिखर दक्षिणे पद्धतीतल्याप्रमाणे चारही बाजूने पिरॅमिडप्रमाणे निमुळते होत जाणारे आहे. कुडू (गवाक्ष) हा स्थापत्य घटक आणि शिखरावर ठिकठिकाणी आढळणारे मकराच्या आकृतीचे अलंकरण यावरूनही शिखराची दक्षिणे धाटणी लक्षात येते.

पण या मंदिराचा अभ्यासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा वाटतो तो भाग म्हणजे येथील दरवाजाची लाकडी चौकट. ही आता देवळात नाही. ती स्थानिक संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. तिच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीव्यतिरिक्त इतरही पौराणिक देवत सुबक रीतीने कोरण्यात आल्या आहेत. या सुंदर शिल्पाइतकीच चौकटही महत्त्वाची आहे. त्यातून प्राचीन इष्टका आणि काष्ठ या स्थापत्याच्या दोन परंपरांचे संबंध सुस्पष्ट रीतीने ध्यानात येतात.

वाकाटक परंपरेतील नागरा (भंडारा जिल्हा) या गावाचे विटांचे देऊळ या कालखंडातील महत्त्वाच्या देवळांपैकी एक म्हणता येईल. देवळाचा आता चौथराच शिल्लक आहे; पण त्यावरून मंदिराच्या विन्यासाची कल्पना देऊ शकते. आज मंदिराचा वरचा भाग शिल्लक नसला तरी चौथऱ्याचे अलंकरण साधे पण आकर्षक आहे. चौथऱ्याची बाह्य रेषा आकर्षक वाटावी म्हणून त्यात तरंगां (Projection and recesses) ची योजना करण्यात आली आहे. त्या काळात मध्य प्रदेशात व आजूबाजूच्या परिसरात रूढ असलेले वेदिकेचे अलंकरण आहे. मंदिर बहुधा शिवाचे असावे. गाभाऱ्यातल्या शिवलिंगावरील अभिषेकाचे तीर्थ एका पाषाणाच्या पन्हाळीद्वारे एका भुतमुखातून बाहेर पडत असे. एरवीच्या मकरप्रणालीपेक्षा हे भूतमुख वेगळे असून त्यावरून मंदिराच्या प्राचीनतेला पुष्टी मिळते.

राष्ट्रकूटोत्तरकालीन स्थापत्य


बदामीचे चालुक्य स्वतःला त्रिमहाराष्ट्रकाचे- म्हणजे विदर्भ, अश्मक व कुंतलाचे अधिपती म्हणवून घेत असत. महाराष्ट्राचा राज्य म्हणून शिलालेखातला हा सर्वात प्राचीन उल्लेख. वाकाटक हे घडीव स्थापत्याचे महाराष्ट्रातील आद्य प्रणेते असले तरी त्याचा दक्खनमध्ये प्रसार करण्याचे श्रेय बदामीच्या चालुक्यांकडेच जाते. उत्तर कर्नाटकातील ऐहोळी, बदामी आणि पट्टदकल या ठिकाणी त्यांच्या आश्रयाने अनेक मंदिरे बांधाण्यत आली.

यातील बहुसंख्य मंदिरे उत्तरेतल्या म्हणजे नागर, शैलीतली असून काही द्रविडशैलीत बांधलेली व पल्लवांच्या मंदिराशी साम्य दाखविणारी आहेत. घडीव स्थापत्याप्रमाणेच कोरीव स्थापत्याला म्हणजे गुंफांना सुद्धा चालुक्यांनी तितकेच महत्त्व दिले. ऐहोळी व वेरुळ येथे काही गुंफा त्यांच्या प्रेरणेनेच कोरल्या गेल्या . हा एक योगयोगच आहे की त्यांची बहुतांशी घडीव मंदिरे आजच्या महाराष्ट्रबाहेर, तर गुंफा महाराष्ट्रात, रणराग चालुक्याच्या काळात बांधलेले (इ. स. ४८८) एक जैन मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील अळते या गावी होते. असा उल्लेख शिलालेखांतून येतो, पण आज तरी ती वास्तू दृष्टोत्पत्तीस येत नाही.

राष्ट्रकुटांच्या काळात याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली राष्ट्रकूट कृष्ण प्रथम व इतर सम्राटांच्या आश्रयाचे बऱ्याच गुंफा कोरण्यात आल्या. कृष्ण प्रथमाच्या काळात बौद्ध गुंफा कोरण्याचे काम थंडवलेले दिसते पण त्यांची जागा शैव गुंफांनी घेतलेली दिसते. कैलास लेणे अशा प्रकारच्या गुंफांचा मुकुटमणी ठरवा; पण घडीव देवळे महाराष्ट्रात अभावानेच आढळतात. महद्‌ग्राम मेहूण(आजचे जळगाव जिल्ह्यातील) या ठिकाणी उग्रदित्याचे देऊळ असल्याचा उल्लेख राष्ट्रकूट अमोघ वर्षाच्या काळातील (इ. स. ८४४) असला तरी आजपर्यन्त तरी त्या मंदिराचे अवशेष सापडलेले नाहीत.

राष्ट्रकूटांनंतर महाराष्ट्रात राज्य करणारी निरनिराळी राजघराणी कल्याणीच्या चालुक्या मांडलिक म्हणून राज्य करीत होती. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात, यादवांचा सम्राटवंश म्हणून महाराष्ट्रात उदय झाला. आणखी एक महत्त्वाचे राजघराने म्हणजे शिलाहाराचे. हेही मूळचे राष्ट्रकूटांचे मांडलिकच. परंतु नंतरच्या काळात काहीशा स्वतंत्र वृत्तीने त्यांनी कोकणात व दक्षिण महाराष्ट्रात राज्य केले. त्यांच्यातील शाखा ठाणे, बलिपत्तन (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण) व पन्हाळा (कोल्हापूर जिल्हा) येथून स्वतंत्रपणे राज्य करीत होता.

ठाण्याच्या शिलाहारांच्या आश्रयाने बांधलेले अंबरनाथ येथील शिवालय हे राष्ट्रकूटोत्तर काळातील सर्वात प्राचीन घडीव देवालय, मुम्मुणिराज शिलाहाराने (इ. स. १०४५ - १०७०) त्याची स्थापन इ. स. १०६० मध्ये केल्याचा देवळातील शिलालेख उल्लेख आहे. कदाचित, हे देऊळ त्यानेच बांधले असावे. शिवालयाच्या शिखराची बरीच पडझड झालेली असली तरी ते कुठल्या धाटणीचे आहे हे ठरविण्यासाठी लागणारी बरीच सामुग्री उपलब्ध आहे.

गाभारा आणि सभामंडप यांच्या बाह्यांगावर तरंगांची योजना केलेली असल्याने मंदिरावर ऊन-सावल्यांचा सुरेख खेळ बघावयास मिळतो. मंदिराच्या भिंतीतल्या तरंगांवर शैव आणी वैष्णव देवदेवतांच्या आख्यनांचे प्रसंग कोरलेले आहेत. नरसिंहादी दशवतारांबरोबरच विष्णूच्या चोवीस रूपांपैकी काही रूपांच्या मूर्ती आढळतात. गणेश, काली, महिषामर्दिनी या शैव परिवारातील देवतांबरोबरच शिवाच्या काही क्वचित आढळणाऱ्या लिंगोद्‌भव, यमान्तक या मूर्तीही दृष्टोत्पत्तीस येतात. सभामंडपातील खांब शिल्प व इतर अलंकरणांनी भरगच्च सुशोभित केले आहेत.

अंबरनाथच्या शिवालयाच्या अगदी समकालीन असे माळव्यातल्या उदयपुरात उदयेश्वर नावाचे मंदिर आहे. माळव्यातच मूळ असलेल्या व बहरलेल्या भूमिज-शैलीचे प्रातिनिधिक व सर्वात प्राचीन असे उदयेश्वराचे देवालय समजले जाते. अंबरनाथचे देवालय त्याच्याशी मिळतेजुळते असून भूमिज-शैलीचेच गणले जाते, नागर आणि भूमिज या दोन्ही उत्तर भारतात विकास पावलेल्या मंदिर स्थापत्याच्या शैलीपैकी भूमिज शैलीपेक्षा नागर प्राचीन मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये नागर शैलीच्या मंदिरांची बरीच उदाहरणे आढळतात.

या शैलीच्या मंदिराचे, म्हणजे प्रासादाचे, शिखर निमुळते होत जाणारे असून त्याच्या निरनिराळ्या पातळ्यांवर शिखराच्या लहानमोठ्या प्रतिकृती (शेखरी प्रकारचे शिखर) अथवा संपूर्ण शिखरावर चैत्य गवाक्षांचे पट्टेच्या पट्टे (लतिन प्रकारचे शिखर) असतात. याच्या विरुद्ध भूमिज प्रासादाच्या शिखरावर चार मुख्य दिशांना चैत्यगवाक्षांचे पट्टे असून उरलेल्या शिखरांच्या भागावर प्रत्येकी तीन किंवा पाच शिखर प्रतिकृतींच्या उतरंडी रचलेल्या आढळतात.

प्रत्येक उतरंडीत पाच, सहा शिखरांच्या प्रतिकृती (कूट) असतात उतरंडीत असलेल्या शिखरांच्या संख्येवरून तितक्या मजल्यांचे (भूमि) ते शिखर असे म्हटले जाते. भूमिज प्रासादाच्या गर्भगृहाचा आकार चौरस (चतुरस्त्र) अष्टकोनी (अष्टभद्र), किंव गोला (वृत्त) असू शकतो. भूमिज प्रासादाचे हे सर्व प्रकार मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र या प्रदेशात आढळून येतात.

माळवा ही भूमिज शैलीची जन्मभूमी असली तरी ही शैली वर उल्लेखिलेल्या इतर प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातही लोकप्रिय झाली. एवढेच नाही तर कोकणच्या शिलाहारांच्या व यादवांच्या राज्यात जी देवळे बांधली गेली ती बहुतांश चतुरस्त्र भूमिज प्रकारचीच होती. मध्य युगात प्रत्येक प्रदेशाची अशी शैली होती. भूमिज शैलीत आपले काही वैशिष्टयपूर्ण स्थापत्य घटक मिसळून महाराष्ट्राची भूमिज शैली बनली.

या भूमिज शैलीत शेकडो मंदिरे महाराष्ट्रात बांधली गेली. बलसाणे (धुळे जिल्हा) येथील मंदिर क्र.१ (इ. सनाचे ११ वे शतक), झोडगे (नाशिक जिल्हा) येथे महादेव मंदिर (इ. सनाचे १२ वे शतक), सिन्नर (नाशिक जिल्हा) येथील गोंदेश्वर मंदिर (इ.सनाचे १३ वे शतक); रतनवाडी आणि ताहाकारी (अहमदनगर जिल्हा) येथील देवालये; गुर्साला(सातारा जिल्हा) येथील, शिंगणापूर येथील शंभूमहादेव व अमृतेश्वर देवालय (बुलढाणा जिल्हा) आणि कोकमठाण (अहमदनगर जिल्हा) ही काही उल्लेखनीय उदाहरणे म्हणून सांगता येतील. कोकमठाणच्या शिवमंदिराचे वैशिष्टय असे की त्याचे शिखर विटांनी बांधले असून, घाटणीवरुन ते मूळचे असावे असे वाटते.

गोदेंश्वर हे सर्वात वेगळेआहे; कारण मुख्य देवळाभोवती चार उपदिशांना आणखी चार देवळे आहेत. थोडक्यात ते पंचायतन आहे. मुख्य देऊळ भूमिज प्रकारचे असून उरलेली नागर-लतिन प्रकारची आहेत. यावरून असे सिद्ध होते की नागर प्रासादाचे यादवकालीन महाराष्ट्रात वावडे नव्हते असे दिसते. नागर प्रासादाचे इतर तुरळक उदाहरणे सांगावयाची झाल्यास अंजनेरी (नाशिक जिल्हा) येथील १२-१३ व्या शतकातील जैन मंदिरे, धोडांबे (नाशिक जिल्हा) येथील वैष्णव मंदिर, आणि संगमेश्वर (रत्नागिरी जिल्हा) येथील मंदिरे म्हणून सांगता येतील.

खिद्रापूर येथील शिलाहार मंदिरे


खिद्रापूर येथील शिलाहारांनी उभारलेली मंदिरे ही वैशिष्टयपूर्ण आहेत. त्याचे कारण असे की महाराष्ट्रात नेहमी आढळणाऱ्या भूमिज शैलीतल्या मंदिरांपेक्षा ती वेगळि असून त्यांच्यावर कर्नाटकातील उत्तर चालुक्य कालीन स्थापत्याचा खोल ठसा उमटलेला दिसतो. उत्तरचालुक्य काळात (इ. सनाचे १० वे ते १२ वे शतक) दक्खनमध्ये द्रविड व नागरशैलीचे मिश्रन असलेली शैली प्रादुर्भूत झाली. शिलाहारकालीन स्थापत्यात उत्तरचालुक्य शैलीतल्या सारखे स्तंभकार, सभामंडपाच्या भिंतीतल्या जाळीच्या खिडक्या या स्थापत्य घटकांच, तसेच अगदी वैशिष्टयपूर्ण अशा शिल्पशैलीच अंतर्भाव झालेला आहे. उत्तरचालुक्य-शैलीतले गोल खांब तर इतके वेगळे आहेत की ते लेथवर तयार केल्याइतके सुबक आहेत. हा चालुक्य शैलीतील स्तंभकार इतका आकर्षक होता की त्याचे चौरस व गोल हे दोन्ही आकार महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित होते.

दुर्दैवाने खिद्रापूरच्या दोन्ही मंदिरांची- म्हणजे जैन आणि कोप्पेश्वर महादेव यांची शिखरे मूळचि नाहीत. ती मराठकाळात परत बांधण्यात आली. नाही तर त्यावरून या शैलीबद्दल आणखि काही निश्चित सांगता आले असते. त्यातल्या त्यात कोप्पेश्वराचे मंदिर त्याच्या सांगोपांग स्थापत्य-रचनेमुळे, भरगच्च शिल्पसौंदर्यांमुळे आणि भव्यतेमुळे चटकन लक्ष वेधुन घेते. येथल्या सगळ्यात पुढच्या खुल्या मंडपाचे (त्याला स्थानिक लोक स्वर्गमंडप म्हणतात) तर गुजरातेतील मोढरा येथल्या सूर्यमंदिरातल्या मंडपाशी विलक्षण साम्य आहे.

सिन्नर (नासिक जिल्हा) येथील सरस्वती नदीच्या काठी आलेले आयेश्वर हे महाराष्ट्रातील खरेखुरे उत्तर चालुक्य शैलीतले मंदिर म्हणता येईल स्तंभ, अंतराळाच्या छतावरच्या दिवपाल पट, द्राविड पद्धतीचे शिखर या सर्वावरून त्याचे उत्तर चालुक्य कुलगोल सहज लक्षात येते.

वैनगंगेच्या काठावरील मंदिर समूहामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील या गावास मार्कंडी हे नाव मिळाले. मंदिरांवरील शिल्पसमृद्धी, स्थापत्यदृष्ट्या मध्यप्रदेशातील कलचुरी धाटणीच्या मंदिराशी असलेले साम्य, व खुजराहो येथील धर्मपंथाशी असलेली जवळीक यामुळे या मंदिराचा वेगळेपणा सहज लक्षात येतो.

येथील मंदिरात सगळ्यात सुंदर आहे मार्कंड-ऋषीचे देऊळ खुजराहोच्या मंदिरातल्या प्रमाणे या मंदिराच्या भिंतीवर शिल्पांचे एकावर एक असे तीन आडवे पट्टे आहेत. त्यावर अनेक चित्रविचित्र व्याल आणि निरनिराळ्या वेशभूषातल्या व हावभाव दाखवणाऱ्या अप्सरा आहेत. अधूनमधून रामायण-महाभारतातील कथाप्रसंग कोरले आहेत. मंदिराच्या एरवी साध्या वाटणाऱ्या अधिष्ठानावर थोड्या थोड्या अंतरावर बसविलेल्या आम्रभंजिकांच्या मुळे आकर्षकपणा आला आहे.

अष्ट वसू, हरि-हर-पितामहार्क, सुब्रह्मण्य, विलक्षण सदाशिव यांच्या मूर्ती, तसेच दिक्‌पालांचे स्वतंत्रपणे व शक्तीसमवेत मंडपावर व गाभाऱ्यावर चित्रण ह्या मूर्तिशास्त्रविषयक तसेच सांप्रदायिक वैशिष्टयामुळेही खुजराहोच्या स्थापत्य-परंपरेला जवळ वाटतात.

बारवा आणि वीरगळ


महाराष्ट्राच्या मंदिर स्थापत्याच्या बाबतीत आढळून येणारी वैशिष्टये, इतर स्थापत्य व शिल्पप्रकारात सुद्धा आढळून येतात. हे प्रकार म्हणजे बारवा (पायऱ्यांच्या विहिरी) आणि वीरगळ होत. यांची प्राचीनता महाराष्ट्रात आठव्या शतकापर्यंत जाते.

मंदिर व त्याच्या आसपासच्या परिसराला आलेले माहात्म्य व या परिसराला भेट दिल्याने पापक्षालन होते अशी भावना यामुळे या स्थळांना तीर्थक्षेत्राचे माहात्म्य आले. त्यामुळेच अशा ठिकाणी यात्रा भरविण्याची प्रथा सुरू झाली. आणि त्यातूनच अशा स्थळी स्नानकुंडे व बारवा बांधण्याचा प्रघात सुरू झाला असावा. अशा प्रकारच्या पायाविहिरी किंवा बारवा बांधण्याची कला प्राचीन महाराष्ट्रातील स्थपतींना आज्ञात नव्हती.

चालूक्य आणि राष्ट्रकूट काळातील अशा बारवा ऐहोळी (धारवाड जिल्हा) आणि कंधार (नांदेड जिल्हा) येथे आजही वापरात आहेत. परंतु बारवा बांधण्याचा प्रघात जास्त करून यादव काळात जास्त प्रचलित झाला असावा. अशा प्रकारची यादवकालीन कुंडे किंवा बारवा अहमदनगर जिल्ह्यात खांबपिपरी येथे, धुळे जिल्ह्यात मेथी येथे, नांदेड जिल्ह्यात होट्टल येते, सोलापूर जिल्ह्यात वेळापूर येथे आणि सातारा जिल्ह्यात गुर्साला येथे दृग्गोचर होतात. बुलढाणा जिल्ह्यातील जिजामातेच्या जन्मगावी, सिंदखेडराजा येथे, अशा प्रकारच्या दोन बारवा आहेत. एक नीळकंठेश्वर मंदिराजवळ तर दुसरी हल्लीच्या गावाच्या किंचित्‌ बाहेर एका शेतात. त्यापैकी दुसरीला तर पुतळा बारव असेच नाव आहे. बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुंदर शिल्पाकृतीमुळेच तिला हे नाव देण्यात आले आहे.

देऊळ उभारताना जवळपास चांगला दगड काढता येईल अशी जागाच निवडत असत. दगड काढल्यानतर झालेल्या खानीच्या खड्ड्यात पाण्याचा जिवंत झरा लागल्यास त्याचे बारवेत रूपांतर करीत. अशा प्रकारच्या एका कुंडाचे अवशेष आजही सिन्नर येथील गोंदेश्वराच्या मंदिराजवळ दिसतात. बऱ्याच वेळा या बारवांच्या सोपानावरील विश्रामस्थाना- (landing) वर लहान लहान देवळ्या उभारलेल्या दिसतात. यातील भिंतीवर कोनाड्यातून आप्सरांची आणि देवतांची शिल्पे कोरलेली आढळतात. काही वेळा देवता शिल्पावरून ज्या भक्ताने ही बारव बांधलेली असेल त्याच्या सांप्रदाहिक ओढ्याची कल्पना येते. पुतळा बारवेत एका ठिकाणी ठळकपणे मच्छिंद्रनाथांची प्रतिमा बसविली आहे. बारव बांधणारा नाथपंथाचा असावा हे उघड आहे. आणि उत्तर काळात नाथपंथाच्या वाढत्या प्रसाराचेही ते निदर्शक आहे.

पितरांना आणि मृत योद्ध्यांना उद्देशून, स्मारक शिला उभारण्याची प्रथा पश्चिम भारतात, विशेषतः राजपुताना, गुजरात व माळवा या भागात, उगम पावली असे दिसते. गाईचे रक्षण करताना मरण पावलेल्या व योद्ध्यांना उद्देशून उभारलेल्या स्मारक शिलांचा पश्चिम भारतात गोवर्धन या नावाने तर पितरांच्या व सतींच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या स्मारकशिलांचा पालिय या नावाने उल्लेख केला जातो.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात मृत योद्ध्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या शिल्पांकित शिळांना वीरगळ म्हणतात. कोरड्या हवामानाच्या कुरणाच्या भागात साहजिकच पशुरक्षणाला अथवा गोरक्षणाला महत्त्व होते. त्यांचे रक्षण करताना सद्‌गती मिळालेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ स्मारक-शिला उभारण्याची प्रथा प्रचलित झाली. महाराष्ट्रात प्रचलित असलेले आणखी स्मारक-शिलांचे दोन प्रकार म्हणजे धारातीर्थी पडालेल्या योद्ध्यांच्या स्मरणर्थ उभारलेली वीरगळे व अशा योद्ध्यांच्या बरोबर सहगमन करणाऱ्या सतीच्या स्मरणार्थ उभारलेल्या सतीशिला, कोल्हापूरच्या टाउन हॉल म्युझियममधील वीरगळ आणि बीड (कोल्हापूर जिल्हा) येथे अशा वीरगळ आणि सतीशिलांचा प्रतिनिधिक संग्रह आहे. सागरी युद्धात मरणा पावलेल्या नाविक योद्ध्यांच्या स्मरणार्थ बोरिवलीजवळ एक्सर येथे वीरगळ आहेत. काही वेळा तर आध्यात्मिक कारणासाठी मृत्यूला समोऱ्या जाणाऱ्यांच्या स्मरणार्थही शिला उभारलेल्या दिसतात. सोपाऱ्या जवळील निर्मळ येथे बौद्ध व शैव साधूंच्या स्मरणार्थ शिळा उभारल्या आहेत.

स्मारक शिलांच आकार आणि त्यांची ठेवण या बाबतीतही गुजरात-राजस्थान भागातील परंपराचे महाराष्ट्रात अनुकरण झालेले दिसते. राजस्थानमधल्या गोवर्धन-शिळांप्रमाणेच चालुक्य व यादव-काळातील वीरगळे चुकोनी स्तंभाच्या आकाराची होती असे दिसते; तर नंतरच्या काळात गुजरातमधल्या पालियाप्रमाणे सपाट शिळा वीरगळासाठी आणि सतीसाठी वापरण्याची प्रथा पडलेली दिसते. या चौकोनी स्तंभाच्या आकाराच्या होती असे दिसते तर नंतरच्या काळात गुजरातमधल्या पालियाप्रमाणे सपाट शिळा वीरगळासाठी आणि सतीसाठी वापरण्याची प्रथा पडलेली दिसते.

या चौकोनी स्तंभाच्या आकाराच्या वीरगळावर मृतांशी संबंधित अधिकाधिक देव-देवतांची शिल्पे कोरण्यासाठी जागा होती; तर सपाट शिळांवर एकादी इष्ट-देवतांची कोरण्याची प्रथा पडली. सपाट शिळेवर कोरलेले प्रसंगही ठराविक क्रमाने येतात असे दिसते. त्यात तीन अथवा चार चौकटी असून त्यात खालून अनुक्रमे:

  • युद्ध प्रसंग
  • मृताचा चितेवर जळत असलेला, प्रसंगी सपत्नीक, देह
  • वीराचे अप्सरासह स्वर्गगमन आणि
  • परलोकात वीराकरवी इष्ट देवतेचे पूजन

अशा प्रसंगाचे चित्रण आढळते. अशा इष्ट-देवतांमध्ये बहुतकरून शिवलिड्‌गाचे, पण प्रसंगोपात महालक्ष्मी अथवा जिनाचेही चित्रण आढळते.

महाराष्ट्राचे मंदिर स्थापत्याचा विचार करता असे आढळते की त्याच्या इतिहासातील पूर्व काळात गुंफास्थापत्याचे अधिक प्राबल्य दिसते. गुप्त काळामध्ये या परिस्थितीला वेगळे वळण मिळाले. गुप्त आणि वाकाटकांच्या जवळच्या संबंधामुळे घडीव पाषाणस्थापत्याची खऱ्या अर्थाने सुरवात झाली व नंतर विकासही झाला. महाराष्ट्रात या अगोदरच्या काळापासून विटांच्या व लाकडी स्थापत्याचे नमुने होते. त्याचे काही वाकाटक काळाच्या आसपासचे नमुनेही मिळतात. चालुक्य व राष्ट्रकूट काळात काही अपवाद सोडता रचनात्मक स्थापत्याची फारशी वाढ झालेली दिसत नाही. ती वाढ उत्तर चालुक्य, शिलाहार व विशेषकरून यादवांच्या आश्रयानेच झाली.

महाराष्ट्रातील रचनात्मक स्थापत्यात दक्षीणेतील काही महत्वाच्या घटकांचे सात्मीकरण झालेले दिसते; पण ते मूलतः भूमिज शैलीचेच आहे. पुढे महाराष्ट्रात याच शैलीची वाढ झाली. आणिअसे असले तरी नागरी शैली अथवा उत्तर चालुक्यांचे किंवा कलचुरींचे स्थापत्य याचे महाराष्ट्राला वावडे नव्हते सभोतालच्या सांस्कृती प्रेरणाचे महाराष्ट्राने नेहमीच स्वागत केले आणि त्यांच्या सात्मीकरणातून आपला सांस्कृतिक आदर्श निर्माण केला. अशा प्रकारच्या प्रक्रियेतूनच तो भारताच्या इतिहासात उत्तर आणि दक्षिण यांच्या मधला एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे.

- अरविंद जामखेडकर

































No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...