Wednesday, July 20, 2022

गोव्यामधली जांभा खडकातली हिंदू लेणी - हरवाळे लेणी !

गोवा !!हे नाव उच्चारले कि सर्वांना डोळ्यासमोर निळ्याशार पाण्याचा समुद्र, शुभ्र मउ वाळुची पुळण असणारे किनारे, हे निसर्गचित्र पुर्ण व्हावे म्हणून ताडामाडांच्या गर्द हिरव्या छटा आणि त्यातून डोकावणारे रंगीबेरंगी मंदीराचे कळस आणि पांढरेशुभ्र चर्चचे कळस आणि दोन्ही मधून होणार घंटांचा नाद. याच्या जोडीला पोर्तुगीजांच्या बांधणीचे वैशिष्ट्य दाखवणारे आणि शिवकालीन इतिहासाची साक्ष सांगणारे किल्ले.मात्र या गोव्याच्या याच्या जोडीला काही अनवट ठिकाणे आहेत याची फार कमी जणांना माहिती असेल. आदिमानवाने रेखाटलेली चित्र उर्फ कातळशिल्प आणि शैवशिल्प उर्फ लेणी यांनाही आपण गोवा सहलीत भेट देउ शकतो.तर आज आपण जाणून घेणार आहोत, हरवळे लेणी.

हरवळे लेण्याचे प्रथम दर्शन

हरवळे लेणी उत्तर गोव्यातील सांक्वेलीम गावाच्या हद्दीत आहेत. या लेण्यांचे निरनिराळ्या शहरापासून अंतर असे आहे .पणजीपासून ३२ कि.मी., गोवा विमानतळापासून ४३ कि.मी. , बेळगावीपासून ८५ कि.मी., हुबळीपासून १७० कि.मी., पुण्यापासून ४२५ कि.मी. गोव्यात पूर्वापार पोर्तुगिज लोकांचा अंमल असल्यामुळे गावांची दोन नावं आहेत. हरवाळे हा स्थानिक शब्द असून Harvalem / Aravalem हा इंग्रजी शब्द या स्थानाला लागू पडतो. या परिसरात लेण्यांबरोबरच इतर पर्यटन आकर्षणे आहेत, जसे हरवळे धबधबा, रुद्रेश्वर मंदीर.
या ठिकाणी यायचे तर पणजी किंवा म्हापसा हि सोयीची ठिकाणे आहेत. जर बसने यायचे असेल तर बस सांकेव्ली गावापर्यंतच असल्यामुळे लेणी आणि धबधब्यासाठी दोन कि.मी.चालत यावे लागेल.हे टाळण्यासाठी स्वतःचे वाहन आणने किंवा भाड्याची दुचाकी किंवा चारचाकी हा पर्याय आहे. हि लेणी सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते ५ यावेळात उघडी असतात.

जांभ्या दगडातील हरवळे लेणीची ओसरी

स्थानिक लोकांच्या मते हि लेणी म्हणजे पांडवगुंफा असून पांडवानी त्यांचा अज्ञातवासाचा काळ इथे व्यतित केला असा समज आहे.अर्थातच यात काही तथ्य नाही. एकंदरीत लेण्याच्या रचनेवरुन हि हिंदु लेणी असावीत असे दिसते.उत्खनन करताना इथे गौतम बुध्द, महावीर यांच्या मुर्ती सापडल्या.

हरवळे लेण्यातील पीठ आणि त्यावर दुसर्‍या प्रकारचा बसवलेला दगड व त्यावर कोरलेला शिलालेख

अप म्हणजे पश्चिम आणि ज्या भूमीचा अंत पश्चिमेला होतो ती भूमी म्हणजे अपरांत म्हणजेच आजचं कोकण ! परशुरामाने स्वतःच्या सामर्थ्याने ढकलून तयार केलेली ही भूमी .गोव्याचा संबध तर थेट श्रीकृष्णाशी जोडण्यात येतो. भौगोलिक दृष्ट्या ही भारताच्या इतर भागांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोकण किंवा अपरांत समुद्रसपाटीला तर देश म्हणऊन ओळखला जाणारा भौगोलिक परिसर थोडा उंचावर. या दोन्ही प्रदेशात अनेक अर्थामे फरक आहेत. हवामान, जमीनीचा पोत, पिक आणि अर्थातच भौगोलिक स्थितीतील फरक जसा मृदा आणि खडक. देशावर काळा, कठीण बेसाल्ट दिसतो तर कोकणात लालसर आणि ठिसूळ दगड असा जांभा खडक मोठ्या प्रमाणात मिळतो. बेसॉल्ट खडकाशी तुलना केल्यास जांबा खडका लेणी खोदण्यासाठी किंवा मूर्ती घडवण्यासाठी फारसा उपयुक्त नाही. तरीपण गोव्यातल्या हरवाळे येथील लेणी जांभ्या दगडात कोरलेली दिसतात तरी ती खूप आकर्षक आहेत.
कोणत्याही ठिकाणी लेणी किंवा दुर्ग उभारायचे तर तिथे राहणाऱ्या लोकांना बारा महिने पाण्याची सोय व्हावी हे लक्षात घेऊनच जागेची निश्चिती केली जाते. हरवाळे इथला धबधबा गोव्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. हरवाळे येथील लेणी ह्या धबधब्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. धबधब्यातून होणारा पाण्याचा विसर्ग हा लेण्यांसमोरूनच खळखळ करत वाहत जातो.
हरवाळ्याची लेणी ही जांभा दगडाच्या एका लहानशा टेकडीत कोरलेली आहेत. ह्या लेण्यांमध्ये एकुण पाच कक्ष असून त्यात तीन प्रार्थना कक्ष आहेत. तिन्ही कक्षांमध्ये शिवलिंग सदृश्य लिंग आढळून येते.  लिंगांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर सहाव्या - सातव्या शतकातला शिलालेख आढळतो. हरवळे  लेणी क्र. २ मधील शिवलिंगावर असणारा शिलालेख. या शिलालेखाची भाषा दाक्षिणात्य वळणाची संस्कृत असून राजा आणि राजवंशाचा उल्लेख नाही. लिपीवरुन हा शिलालेख ७ व्या शतकातील असावा. या शिलालेखात 'साम्बलुरवासी रवी' असे शब्द आहेत.
शैलगृह क्र. ३ च्या गुहेत बसविलेल्या शिलेवर हा शिलालेख कोरला आहे. याची भाषा संस्कृतसून लिपीवरुन हा शिलालेख इ.स. ६ व्या शतकातील असावा असा अंदाज आहे. यात राजवंश, राजा यांचा उल्लेख नाही. याचे वाचनही 'साम्बलुरवासी रवी' असे होते.
हा लेख हरवळेच्या तीन क्रमांकाच्या गुहेतील स्तंभावर कोरला आहे.या शिलालेखाची लिपी पेटीकाशीर्षक ब्राम्ही असून लिपीवरुन हा शिलालेख इ.स. ५ व्या शतकातील असावा. याचे वाचनही 'सांबलुरवासी रवी' असे होते. याचा अर्थ सांबलुर गावाचा रहिवासी रवी असा असावा. कदाचित रवी हे सुर्यासाठीही असावे. सांबलुर गाव म्हणजे सध्याचे हरवळे असावे. या लेखावरुन आणि स्तंभाच्या सुर्यासारख्या गोल आकारावरुन इ.स. ५ व्या शतकात गोव्यात सुर्याची आराधना होत असावी.
मूर्ती पूजेमध्ये लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला आपल्या आराध्य देवतेची अचूक मूर्ती घडवता येत नसेल तर तिला लिंग स्वरूपात पूजलं जातं. मूर्तिशास्त्राचं हे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. प्राचीन काळी अनेक देवळांमध्ये तांदळा ( तांदूळ नव्हे ) स्वरूपामध्ये बऱ्याचशा देवांचे पूजन केलं जातं. अगदी सत्यनारायणाच्या पूजेतही आपण गणपती म्हणून सुपारीच मांडतो की !
ह्या लिंगांचं नीट निरीक्षण केल्यास असं आढळून येतं की ही लिंग तिथे आढळणाऱ्याच दगडांमध्ये घडवली गेली नाहीयेत. लिंगांसाठी लागणारा दगड हा दुसरीकडून आणून वैशिष्ट्यपूर्णरित्या घडवला आहे. चित्र क्रमांक चार मध्ये लिंगाच्या मध्यभागी पडणारा प्रकाश हा व्यवस्थित परावर्तित होताना दिसतो. यावरून लिंगाच्या दगडाची आणि त्याला घासून गुळगुळीत केलेल्या पोताची ( texture ) कल्पना यावी.
या लेण्यांचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जांभा खडक असल्यामुळे भिंतींवर किंवा व्हरांडयामध्ये लेख कोरणं शक्य नव्हतं. त्यामुळे लिंगासाठी वापरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दगडावरतीच शिलालेख आढळून येतात.

पावसाळ्यात नेत्रसुख देणारा हरवळे धबधबा आणि त्याचा परिसर

हरवळे लेण्याची भेट चटकन आटोपून आपण परिसरात आणखी भटकंती करु शकतो. लेण्यांपासून फक्त १.५ कि.मी.वर हरवळेचा देखणा धबधबा आहे. धबधब्याला भेट वर्षभरात केव्हाही देता येत असली, तरी पावसाळ्यातच धबधबा खरा बहरात असतो. धबधब्याच्या जवळ जाईल तसे त्याचा गंभीर नाद कानी पडतो.धबधबा बघण्यासाठी पायर्‍या आणि गॅलरी केली आहे.धबधबा जवळून बघायचा असेल तर दाट झाडीतून वाट आपल्याला धबधब्याच्या माथ्यापाशी पोहचवते.मात्र पावसाळ्यात हा परिसर निसरडा होत असल्यामुळे इथे जाणे टाळलेलेच बरे.

रुद्रेश्वर मंदीर

आपण लेणी बघून धबधब्याकडे आलो असलो तरी थेट धबधब्याकडे जाणारा एक रस्ता आहे.म्हणजे धबधब्याला भेट द्यायची तर दोन रस्ते आहेत. दुसरा रस्ता रुद्रेश्वर मंदीराकडे जातो. मंदीराच्या जवळूनच धबधब्यातून वाहणारे पाणी वाहत असते. इथे पाणी कमी असेल तर पाण्यात खेळण्याचा आणि पोहण्याचा आनंद घेता येतो.
एकंदरीत गोवा भेटीत नक्कीच भेट द्यावी असा हा परिसर आहे.
संदर्भ :-
१) महाराष्ट्र, गोवे शिलालेख-
२) https://www.cntraveller.in, https://dreamtrails.in, http://www.chaturthamiti.in, https://www.ancient-origins.net या वेबसाईट
३) राहुल अभ्यंकर यांचे लिखाण

Into caves? Here are the 4 best ones to explore in Goa

Velanie Franco

Have you been travelling all over Goa for a couple of days? Want to explore more of Goa? Well then, how about visiting some of the caves in Goa. These caves are located at different parts of Goa, and some are close to the beaches, while there are many which can be reached only after a trek. If you want to enjoy more of Goa, then you certainly shouldn't miss a visit to these caves.

Kaurati's Caves, in Candolim

Kaurati's Caves, in Candolim

knocksense.com Shifa Dutt

1. Kaurati's Caves

LOCATION: Candolim

This cave is a 15-minute walk from the Aguada Fort (Taj Resort). Although the place is a tad narrow, it is quite manageable. This place can easily be missed by tourists due to it's offbeat location. You might have to walk for a while before you reach the cave, but it's quite rewarding in the end with the beautiful scenery and amazing photo ops.

You need to be careful while treading here as the rocks are pretty slippery. So, do watch your steps! It would be good if you wear your trekking shoes, instead of flats or other shoes.

The evening views are simply amazing from here, so if you want to enjoy a bit of trekking and some good views, then this should be the stop for you.

Harvalem Caves, Sanquelim

Harvalem Caves, Sanquelim

IG Acc- @get_away_with_goans

2. Harvalem Caves

LOCATION: Sanquelim

Although a little small, these are some of the oldest caves that you will find in Goa. Harvalem Caves, or the Pandava Caves, are caves which were built during the time of the Pandavas. They are rock cut caves, and have 5 different Shiv lingas present inside.

These caves are on the way to the Harvalem waterfalls, and so you absolutely cannot miss them!

Cupa Sea Cave, Canacona

Cupa Sea Cave, Canacona

IG Acc- @yuvrajmannari

3. Cupa Sea Cave

LOCATION: Canacona

Looking to have fun in a cave? Then, the Cupa Sea Cave is just the thing for you. This cave is a hidden true gem of Goa, and is located in the Loliem Village, in Canacona Taluka, South Goa.

If you're planning on visiting these caves, it's best to go when the tide is low as the sea is connected to the caves. When there's a high tide, you will likely miss the caves. It's best to wear good trekking shoes as the route is a bit tricky.

A visit to the Cupa Sea Cave is truly an amazing experience!

Rivona Caves, South Goa

Rivona Caves, South Goa

IG Acc- @ullask.s

4. Rivona Caves

LOCATION: Ponda

Rivona caves, also known as the Pandava caves, are located about 5 km northeast of Ponda. It is believed that they were cut/dug out during the 6th or 7th century by Buddists monks.

These caves have great significance in Hindu mythology as it is said that Lord Hanuman visited this place. It is also said that there is a rock sculpture, which as made by a Buddhist monk, and is cut out of laterite stone.

Your Gateway to Goa, India

The Gomantak Times app is the best way to stay informed on anything happening in Goa. From breaking news to the top 10 restaurants to visit, GT helps you navigate your time in Goa.

Download the Gomantak Times app on your Android or IOS device.

https://www.gomantaktimes.com/my-goa/things-to-do/caves-in-goa

No comments:

Post a Comment

मनसर

प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...