संदर्भ :-
१) महाराष्ट्र शासन गॅझेटीयर
२) http://trekshitiz.com/discussionboard/_topic233.html, श्री अमित सामंत
३) https://www.ajinkyaa.com/caves-in-india/
लेणीच्या कोंदणातली त्रिंगलवाडी
जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच शके १२६६ मध्ये कोरल्याचे शिलालेखातून दिसते. गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेली ऐतिहासिक लेणी पाहिली की नवल वाटायला लागतं. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला दिसतो. लेणीचं कोंदण लाभलेल्या त्रिंगलवाडीचा प्रवास पुरातन अन् ऐतिहासिक असला तरी उपेक्षित ठरतो…
नाशिक परिसरातील वारसास्थळे जितकी पुरातन तितकी दुर्लक्षित असं समीकरण होऊ पाहत असल्याने पावलोपावली विखुरलेल्या वारसास्थळांची अवस्था पाहून अस्वस्थ व्हायला होतं. नद्यांवरचे प्राचीन घाट, यादवकालीन विहिरी व अहिल्याबाईंच्या बारव, जमीनदोस्त झालेल्या गढ्या, वाडे अन् कोनाड्यात पडून असल्यागत उभे असलेले, देह ठेवू पाहणारे गड-किल्ले, इतिहासाला पारख्या होत असलेल्या गाववेशी, परंपरेचा पदर सोडत जमिनीत गाडल्या जात असलेल्या वीरगळी, हेमाडपंती, नागर शैलीतील मोडकळीस आलेली जिह्याभरातील अनेक मंदिरे तसेच असंख्य मंदिरांमधील भग्न झालेल्या अन् सौंदर्याने ओतपोत सजलेल्या भग्न मूर्ती तसेच तपश्चर्येचा इतिहास सांगणाऱ्या असंख्य समाधींकडे, त्याच्या इतिहासाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फटका लेणीचे कोंदण व गडकिल्ल्यांच्या वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडीलाही सोसावा लागतो आहे. बौद्धांप्रमाणे जैनांनीही आपल्या धर्माच्या प्रचारार्थ देशाच्या वेगवेगळ्या भागांत जैन साधूंना पाठवत धर्मप्रसाराचे कार्य केले. जैन लेण्यांत तीर्थंकर व जैन दैवतांची शिल्पे दिसतात. मात्र, त्यातील सहजाविष्कार जाणवत नाही. त्रिंगलवाडीच्या लेणींवर बौद्ध व ब्राह्मणी लेण्यांची छाप जाणवते. मात्र त्रिंगलवाडी ग्रामस्थांच्या मते ही लेणी पांडवलेणी आहे. पांडवांनी बोटांच्या नखांनी डोंगर कोरून ही लेणी खोदल्याचे ते सांगतात अन् त्याचे वय हजारोवर्ष असल्याचे ते सांगतात.
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहून घोटीचा टोलनाका ओलांडला की, उजव्या हाता लागणारे पहिले गाव म्हणजे टाके. टाके या गावाला घोटीटाके असेही म्हटले जाते. महाराणा प्रतापांनंतर राजस्थान व उत्तर भारतातून विस्थापित झालेला आग्री समाज टाके गावात स्थिरस्थावर झाला. यांना आग्री अन् आगळी असेही म्हटले जाते. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या समाजाला वेगळे टाकले असावे, म्हणून त्यांच्या वस्तीला टाकून दिलेले गाव म्हणून टाके नाव पडले असावे, असे अर्जून आडोळे सांगतात. टाके गाव मोठे असले तरी येथे फक्त मारूतीचे एकमेव मंदिर आहे. त्यामुळे हनुमान जयंती एवढाच उत्सव गावात होतो. तर गावाला सहा वेसदेव आहेत. यात यळोबा, वाघोबा, माऊल्याआई, बडेबुवा, शंकर अन् म्हसोबा या गावाच्या रक्षणकर्ते असल्याचे पूनजा आडोळे व कोंढाजी आडोळे सांगतात. मारूती मंदिराशेजारी काही विरगळी आहेत. त्या पाहून टाकेगावातून त्रिंगलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले की पुढे बलायदुरी व त्यानंतर पारदेवी हे गाव लागते. तेथून दोन तीन किलोमीटरवर त्रिंगलवाडी धरणाच्या कवेत वसलेले गाव लागते. त्रिंगलवाडीचे वैभव अशासाठी वेगळे आहे की, त्याच्या आजूबाजूला भास्करगड, उतवड, ढोऱ्या डोंगर, वैतरणा धरणाजवळील डोंगररांगा, कसारा घाटाचा प्रदेश, कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग अन् त्रिंगलगडाचा सहवास या गावाला लाभला आहे. त्रिंगलवाडी हे गाव पत्र्याचा पाडा, तळ्याचा पाडा अन् निशाणवाडी या तीन वाड्यांनी बनलेले आहे. त्यामुळे याला त्रिंगलवाडी म्हटले गेले असावे, असे तुकाराम पारधी सांगतात. आदिवासीबहुल असलेल्या गावात ठाकूर व कोळी समाज राहतो. तळ्याच्या वाडीत गाडी लावून पाण्याने भरलेल्या तळ्याच्या डावीकडून गावाच्या आधाराला पहुडलेल्या त्रिंगलगडाकडे जाता येते. गडाच्या पायथ्याला सहा तर गडाच्या कपारीत दोन लेणी आहेत. येथे घोटीपासून इतक्या आत लेणी का बांधली असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र पूर्वी नालासोपारा-कल्याण-कसारा-अंजनेरी (नाशिक) हा व्यापारी मार्ग होता. आजही याच्या खाणाखुणा पहायला मिळतात. या व्यापाऱ्यांकडून लेणीसाठी दाने दिली जायची म्हणून येथे ही लेणी कोरलेली दिसते. इंग्रजांमुळे व पुढे धरणांमुळे या मार्गात बदल झाले. त्यामुळे व्यापारी मार्गावर त्रिंगलगड हा टेहळणीचे ठिकाण असावे. नंतरच्या काळात या टेहळणी डोंगराचा किल्ला म्हणून वापर झाला.
जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच शके १२६६ मध्ये कोरल्याचे लेणीतील शिलालेखातून दिसते. म्हणजेच ही लेणी १३ व्या शतकातील असल्याचे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. तळ्याच्या वाडीकडून डाव्या अंगाच्या पायवाटेने एक किलोमीटर शेतातून गेल्यावर गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेले अद्भुत लेण पाहिलं की नवल वाटायला लागतं. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला दिसतो. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्याअंतर्गत असल्याने परिसरात स्वच्छता दिसते; मात्र कोणताही फलक दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांना ही लेणी कोणती व तिचे महत्त्व लक्षात येत नाही. त्रिंगलगडाच्या पायथ्याजवळची मुख्य लेणी आयताकार आहे. लेणीचा व्हरांडा, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. व्हरांडा लांबलचक असून, द्वारशाखेपूर्वी छतावर सुशोभित छताच्या तुळ्या हातात हात गुंफलेल्या गण-यक्षांनी पेलल्याची शिल्प मन मोहून टाकते. हे शिल्प कसे घडविले असेल हा प्रश्न त्या कलाकारांच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम करतो. तर उजव्या बाजूला कातळात फूल कोरले आहे. छताला आधार देण्यासाठी कोरलेले खांब आता पडले असून, वरची बाजू फक्त शिल्लक आहे. त्यावर यक्ष दिसतात. व्हरांड्याच्या आतील भागात नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम करण्यासाठी जसे पाच सुशोभित चौकटी एकात एक गुंफून त्यावर नाजूक काम केले असावे. हे करताना त्या कलाकारांना हे करताना किती कालावधी लागला असेल हा प्रश्न त्यांच्या प्रतिभेचे कौतुक करतो. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा दिसते. तर द्वारपट्टीवर दोन चौकटी तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची देखणी शिल्पे आहेत. ललाटपट्टीवर खंडित झालेली गजलक्ष्मीची प्रतिमा तर प्रवेशद्वाराच्या हातील बाजूस लाकडी दरवाजांसाठी खोबणी असल्याचे दिसते. म्हणजेच लेणीला पूर्वी लाकडी दरवाजांची व्यवस्था असावी. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त आहे. लेणीच्या मुख्य मंडपाला सालंकृत असे चार स्तंभ होते. त्यापैकी फक्त एकच खांब आता शिल्लक असून, त्याच खांबावर लेणी उभी आहे. त्यावर सुंदर नक्षी आहे. उरलेल्या खांबांचा स्तंभशीर्षाचे अलंकृत हस्त (ब्रॅकेट्स) अजूनही पहायला मिळतात. त्यावरील यक्ष अजूनही लेणीला उचलून आधार देत असल्याचे पाहता येते. हा आविष्कार अनुभवण्यासारखा आहे. हे यक्ष नसते तर लेणीचा महाकाय दगड अंगावर आला असता असे वाटायला लागते. सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी नऊ चौकोनी झरोके असलेल्या दोन खिडक्या कातळात कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नक्षी कोरलेली आहे. त्रिंगलवाडीच्या लेणीत बौद्ध लेणींप्रमाणे कलेचा मुक्त आविष्कार दिसत नसला तरी जैन लेणीतील स्तंभांवरची सजावट, त्यांना दिलेले विविध आकार, छतावरची कामे, वेलबुट्टी, भौमितिक आकार जैन कलाकारांचे वैशिष्ट्य दाखवून देते. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती असून, मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे. मात्र तो आता झिजला आहे. हा शिलालेख प्राकृत संस्कृत असून, नागरी लिपीत आहे.
त्रिंगलवाडी लेणी अपूर्ण व पडक्या अवस्थेत असली तरी तिचे सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते. गडावरही दोन लेणी असून, त्याही भग्नाअवस्थेत आहेत.
ऐतिहासिक त्रिंगलगडही भग्नाअवस्थेत आहे. पडक्या वाड्याचे अवशेष, कातळातील तुटलेल्या पायऱ्या, कातळात कोरलेले प्रवेशद्वार व पाच फुटाची हनुमानाची मूर्ती, बुरजांचे अवशेष पहायला मिळतात. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही. पण १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला. हा किल्ला कोणी बांधला व त्रिंगलगडाच्या पराक्रमाच्या नोंदी मिळत नसल्या तरी हा किल्ला टेहळणी चौकची काम करीत असल्याचे दिसते. कळवण तालुक्यातील मार्केंडेय पिंपरी येथील मूळचे असलेले कवि जयराम पिंड्ये यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आलेला दिसतो.
अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |
अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥
१६८८ मध्ये मुघलांनी फितुरी घडवून हा किल्ला मराठ्यांकडून घेतला. मातब्बरखानाने औरंगजेबाला
पाठविलेल्या पत्रात त्रिंगलवाडीला वेढा घातल्याचा उल्लेख मिळतो. पेशवे काळात त्रिंगलवाडीने आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसतो, असे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. त्रिंगलवाडी ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज यावर एक रिपोर्ट लिहिला होता. यातून या गडाबद्दल चांगली माहिती मिळते. १८१८ ला पेशवाई अस्तानंतर ब्रिग्जने जे किल्ले ताब्यात घेत उद्धवस्त केले. यात त्रिंगलवाडीचाही समावेश होता. १६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या ताब्यात असल्याचे त्याने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कॅ. ब्रिग्जनेही येथील लेणीचे सौंदर्य अनुभवल्याचे त्याने म्हटले आहे.
लेणीचे कोंदण असलेल्या त्रिंगलवाडी गावचे मूळ वैभव आहे ते बोहाडे. चैत्रात निशाणवाडीत होणारे बोहाडे तिन्ही वाड्या अन् आजूबाजूंच्या गावांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. गावात संप्तश्रृगी देवी ही गावची ग्रामदैवता आहे. तर हनुमान हा संरक्षणकर्ता, असे शांताराम शेलार सांगतात. होळी, पोळा, हनुमान जयंती व दिवाळी हे उत्सव त्रिंगलवाडीकर जल्लोषात साजरे करतात. १९८२ मध्ये धरण झाल्यावर पाण्यासाठी कासावीस झालेल्या त्रिंगलवाडीला ओलावा मिळाला अन् बागायती शेतीमुळे आर्थिक स्थैर्यही मिळाले. भात, विविध डाळी, नागली ही पिके घेणारे त्रिंगलवाडीकरांना बेंजू अन् कापडनाथ ही आदिवासी वाद्ये वाजवायला आवडतात.
मात्र ऐतिहासिक वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडी विकासापासून अजूनही वंचित असून, निशाणवाडीला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे उलटूनही रस्ता अन् वीज अजूनही मिळालेली नाही. हा उपेक्षितपणा सोबत घेऊन त्रिंगलवाडीकर गावात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागताला सज्ज असते. लेणीचे कोंदण मिळाले आता विकासाचेही कोंदण मिळाले तर धन्य होऊ, अशी प्रतिक्रिया त्रिंगलवाडीकर व्यक्त करताना दिसतात. त्रिंगलवाडीच्या ऐतिहासिक वारशाला विकासाचे कोंदण लाभले तर हे लेण जगभर पोहचेल.
जैन लेणी इ.स. पाचव्या शतकापासून सापडतात हे सर्वमान्य असले तरी जैन लयनस्थापत्याची प्राचीनता इ.स. पहिल्या शतकापर्यंत जाते.जैन लेणीनिर्मिती पुढे यादव आणि सुलतानकाळातही सुरु राहिली तरी तीचा गौरवशाली कालखंड प्रथम वेरुळ येथेच दिसतो.
https://www.facebook.com/Arihantgyan/posts/1264693183671799/
गिरीलिंग डोंगरात बौद्ध, हिंदू, जैन लेणी समूह
dattatray jadhav1 |
Maharashtra Times | Updated: 21 Mar 2016, 11:05 pm
सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवरील गिरीलिंग डोंगरावर इ. स. तिसऱ्या ते तेराव्या शतकादरम्यानच्या प्राचीन बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन लेण्या आढळून आल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रात आजपर्यंत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात प्राचीन बौद्ध लेण्या सापडल्या आहेत. सांगली जिल्ह्यात बौद्ध लेण्या आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
![]()
सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवरील गिरीलिंग डोंगरावर इ. स. तिसऱ्या ते तेराव्या शतकादरम्यानच्या प्राचीन बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन लेण्या आढळून आल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रात आजपर्यंत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात प्राचीन बौद्ध लेण्या सापडल्या आहेत. सांगली जिल्ह्यात बौद्ध लेण्या आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर व सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर यांनी गेल्या वर्षभरापासून अभ्यास करून हा लेण्यांचा समूह शोधला आहे. मिरज इतिहास संशाधेन मंडळाच्या या संशोधनामुळे जिल्ह्याच्या इतिहासात भर पडली आहे. तसेच या परिसराच्या प्राचीन परंपरा उलगडण्यास यामुळे मदत होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर गिरीलिंगाचा डोंगर आहे. पूर्व-पश्चिम पसरलेल्या या डोंगरास ‘जुना पन्हाळा’ या नावानेही ओळखले जाते. या डोंगरावर मोठे पठार असून, येथे सुमारे चारशे एकर शेतजमीन आहे. प्राचीन लेखांमध्ये या डोंगराचा उल्लेख ‘वुंद्रगिरी’ असा आहे. स्थानिक लोक यास ‘उंदरोबा’ असेही म्हणतात. डोंगराच्या पश्चिमेकडील भागास ‘गिरीलिंग’ तर पूर्वेकडील डोंगरास ‘गौसिद्ध’ डोंगर असेही म्हणतात. डोंगराच्या या दोन्ही विभागांच्या सीमेवर दगडी तटबंदीसारखी रचना करण्यात आली आहे. त्याला जुन्या पन्हाळ्याचा खंदक, असे स्थानिक लोक संबोधतात. या खंदकसदृष्य रचनेमुळे पूर्वी येथे किल्ला होता, असे सांगण्यात येते. गडकोटप्रेमी व गिर्यारोहक आजवर येथील किल्लासदृष्य बांधकामाची चर्चा करीत आले आहेत. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या लेण्या आजवर दुर्लक्षित होत्या.
डोंबरावर याच ठिकाणी या लेण्यांचा समूह आढळून आला आहे. डोंगरावरील पठाराच्या बाजूस कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) या गावाच्या दिशेस तोंड करून उत्तराभिमुख चार लेण्या आहेत. तर डोंगराच्या पूर्वेकडील बेळंकी व कदमवाडी (ता. मिरज) या गावांकडे तोंड करून दक्षिणाभिमुख दोन लेण्या आहेत. येथील गिरीलिंग व गौसिद्ध या नावने ओळखल्या जाणाऱ्या दोन लेण्या ग्रामस्थांना परिचित होत्या मात्र, इतर चार लेण्यांची कोणतीही माहिती नव्हती. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांनी गेल्या वर्षभरापासून या लेण्यांचा अभ्यास केला. या लेण्या बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन लेण्या असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
अशा आहेत लेण्या
स्तुपयुक्त लेणे, बौद्ध चैत्यगृह व विहार या प्रकारातील ही लेणी आहेत. येथे बौद्ध स्तुपाचे भग्नावशेषही आढळून आले आहेत. लेण्याबरोबरच पाण्याचे टाकेही येथे आहेत. यापैकी काही लेण्यांमध्ये कोणतेच कोरीव काम अथवा शिल्पावशेष नाहीत. काही लेण्यांतील शिल्पावशेष अन्यत्र हलविण्यात आल्याचे दिसते. मिरज इतिहास संशोधन मंडळाने या लेण्याबाबत केलेल्या प्राथमिक अभ्यासात इ. स. तिसऱ्या ते पाचव्या शतकापासून तेराव्या शतकातील यादव काळापर्यंत या लेण्यांचा विकास होत गेल्याचेही समोर आले आहे. लेण्यांवर आधारीत शोधनिबंधही मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांनी काही दिवसांपूर्वी सादर केला आहे. या लेण्या शोधण्यासाठी संशोधन मंडळाचे अभ्यासक मुफीद मुजावर यांच्यासह मिरज येथील रणधीर मोरे, बेळंकी येथील शरद जाधव, खंडेराजुरी येथील रवी हजारे यांनी मदत केल्याचे मानसिंग कुमठेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात इसवी सनापूर्वीच्या लेण्या आढळतात. यात बौद्ध, शैव-वैष्णव (हिंदू) व जैन अशा तीन प्रकारच्या लेण्यांचा समावेश आहे. दक्षिण महाराष्ट्रात आजवर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात बौद्ध लेणी आढळून आली आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यात बौद्ध लेणी समूह आढळून आला नव्हता. मिरज इतिहास संशोधन मंडळाने सांगली जिल्ह्यातील दंडोबा डोंगराच्या पूर्वेस असणाऱ्या गिरीलिंग (जुना पन्हाळा) या डोंगरावर नव्याने सहा लेण्यांचा शोध लावला आहे. नव्या सहा लेण्यांच्या शोधामुळे प्राचीन इतिहासावर प्रकाश पडला आहे. सांगली जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध परंपरा उलगडण्यास मदत होणार आहे, असे असे मानसिंगराव कुमठेकर म्हणाले.
https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/cave/articleshow/51501286.cms
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे स्थानक असून तेथे काही निवडक प्रवासी गाड्या थांबतात. अंकाई आणि टंकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात. सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते, तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत. हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत. अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय. अंकाई किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१५२ फूट, तर टंकाई किल्ल्याची उंची २८०२ फूट आहे. या किल्ल्यांची चढाई सोपी असून वाट मळलेली आहे. मनमाड शहरातून कोणत्याही खासगी वाहनाने अंकाई गावात सहज पोहचता येते.

अंकाई टंकाई या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्व प्रथम या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावर मात्र या दोन किल्ल्यांवर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. खिंडीत जाण्यासाठी दोन रस्ते असून पहिली व प्रचलित वाट ही या किल्ल्यांच्या दक्षिणेकडील असलेल्या अंकाई गावातून येते. तर दुसरी वाट उत्तरेकडून मनमाड शहराच्या बाजूला असलेल्या दरवाजातून येते. या दोन्ही वाटा अंकाई टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात आणि तिथून दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी वाटा विभक्त होतात.

गड चढाईला प्रारंभ होताना पुरातत्त्व विभागाने तेथे बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात. थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूह दिसतो. एकूण दहा लेण्यांचा समूह असून ही लेणी दोन स्तरात खोदलेली आहेत. या लेण्यांचा कालखंड हा दहावे ते बारावे शतक असा आहे. येथील एका लेण्यात देवनागरी शिलालेख असून काही लेण्यांमध्ये कमळ, प्राण्यांवर आरूढ असलेल्या देवता, अप्सरा, कोरीव द्वारशाखा अशी शिल्पकला आढळून येते.

या लेण्यांपासून पुढे गडाचा पहिला दरवाजा दिसतो. हा दरवाजा पूर्वाभिमुख असून हे दोन दरवाजांचे मिळून असलेले एक संकुल आहे. बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत. आतला दुसरा दरवाजा हा पहिल्या दरवाजाशी काटकोन करून उभा आहे. हा दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. या दरवाजाची बांधणी भक्कम असून बांधकामातील लाकडी तुळया आणि दरवाजाच्या फळ्यांचे अवशेष अद्यापि दिसून येतात. या दरवाजातून आत गेल्यावर अंकाई टंकाई या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत प्रवेश होतो.
अंकाई टंकाई किल्ल्याच्या डोंगराना उत्तम ताशीव कातळ कडे लाभलेले असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासलेली नाही; परंतु या दोन्ही डोंगरांना जोडणारी खिंड मात्र सर्व बाजूंनी अतिशय उत्तम तटबंदी बांधून नीट संरक्षित केलेली आहे. तटबंदीवर संरक्षणात्मक दृष्टीने चर्या बांधलेल्या दिसतात. अंकाई किल्ल्याचे दिशेने थोडे वर चढून गेल्यावर अंकाई गावच्या दिशेला कातळाममध्ये तीन लेण्या आहेत. यांपैकी दोन गुहा पाहता येतात; परंतु तिसरी गुहा गाळाने भरलेली आहे.

खिंडीतून थोडे चढून गेल्यावर गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. हा दरवाजा देखील दोन दरवाजांचे मिळून एक संकुल आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस दोन भक्कम बांधणीचे अष्टकोनी बुरूज आहेत. यांपैकी पहिला दरवाजा हा आयताकृती चौकट आणि वरच्या बाजूस कमान अशा प्रकारचा असून आत दोन्ही बाजूंस देवड्या आहेत. पुढे आणखी एक कमानयुक्त दरवाजा आहे. पुढे उजवीकडे कातळात प्राचीन हिंदू लेणी आहेत. यांतील मुख्य लेण्यात व्हरांडा आणि एक गर्भगृह आहे. हे शैव लेणे असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपाल कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्रीशिल्पे असून यांपैकी एक शिल्प हे गंगेचे आहे. गाभाऱ्यामध्ये घारापूरी येथे असलेल्या त्रिमूर्तीसदृश सदाशिवाचे शिल्प आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते, या लेण्याचा कालखंड हा इ. स. नववे ते दहावे शतक असा आहे.

गडाचा दुसरा दरवाजा देखील संकुलातच बांधलेला आहे. यात एकूण दोन कमानयुक्त दरवाजे व मध्यभागी फक्त एक कमान अशी रचना आहे. हा दरवाजा पुर्वाभिमुख असून या दरवाजाचे संकुल म्हणजे एक छोटा बोगदा आहे. तीव्र उतारावर हा दरवाजा बांधलेला आहे. दरवाजा पार करून खड्या कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर परत दोन दरवाजांचे मिळून एकत्र असे एक संकुल लागते. यांपैकी बाहेरील दरवाजा आयताकृती आकाराचा आहे. आतील दोन्ही बाजूंस बसण्यासाठी ओटे आहेत. पुढे एक कमानयुक्त दरवाजातून बाहेर पडून किल्ल्याच्या दिशेने जावे लागते. दोन दरवाजांचे हे संकुलसुद्धा एक छोटा बोगदा आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा आणखी एक भग्न दरवाजा दिसतो. येथून पुढे कातळातून खोदलेल्या मार्गाने गेल्यावर गडाचा शेवटचा भक्कम बांधणीचा कमानयुक्त दरवाजा लागतो.
गडावर प्रवेश केल्यावर दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. भौगोलिकदृष्ट्या गडाचे बालेकिल्ला आणि माची असे दोन भाग पडतात. माचीच्या सपाट भागाचा विस्तार मोठा असून पठारावर एक छोटी टेकडी आहे, त्याला बालेकिल्ला म्हणता येईल. माचीवर प्रवेश केल्यावर तीन घुमट असलेली एक वास्तू दिसते, ती म्हणजे हमामखाना. याच्या मागील बाजूस पाण्याचे टाके असून पुढे दोन लेण्या आहेत. या लेण्यांना सीता गुंफा असे संबोधले जाते. बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या पोटात लेण्या खोदलेल्या आहेत. सध्या जास्त वापरली जाणारी लेणी म्हणजे अगस्ती ऋषि यांची गुहा. या गुहेत अगस्ती ऋषिचे मंदिर असुन हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. या गुहेच्या शेजारी थोड्या वरच्या बाजूस कड्याच्या पोटात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यास बारमाही पाणी असते व हे पाणी पिण्यायोग्य आहे. इथून पुढे गेल्यावर अंकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माची दिसते. या पठाराच्या मध्यभागी एक खडकात खोदलेले पाण्याचे तळे आहे. या तळ्याच्या मध्यभागी एक छोटी घुमटीवजा वास्तू आहे. हि अगस्ती ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात. या तळ्यास काशीतळे असे नाव आहे. रामायण काळात अगस्ती ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्यास होते, अशी आख्यायिका आहे.
तलावापासून पुढे गडाच्या पश्चिम टोकावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. आज या वास्तूच्या भिंती, कोनाडे, कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहेत. या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद आढळून येतो. पूर्वी हा एक मोठा महाल असण्याची शक्यता आहे. याच वास्तूमध्ये एका टोकाला पिराचे एक ठिकाण आहे; परंतु मूळ वास्तूशी संबंधित नाही. अंकाई किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहेत. किल्ल्याच्या टेकडीवर म्हणजे बालेकिल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळून येत नाहीत. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ, कात्रा किल्ला तसेच हदबीची शेंडी असा परिसर दिसतो.

टंकाई किल्ला पाहाण्यासाठी अंकाई किल्ला उतरून दोन्ही किल्ल्यांमधील खिंडीत परत यावे लागते. खिंडीत आल्यावर मनमाड शहराच्या बाजूला उत्तर दिशेला असलेला दरवाजा पाहता येतो. हा उत्तराभिमुख दरवाजा भक्कम बांधणीचा असून बुरुजाचा आडोसा घेऊन बांधण्यात आला आहे. टंकाई किल्ल्याच्या वाटेवर सुरुवातीला कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि काही पाण्याची टाकी दिसून येतात. थोड्या चढाईनंतर किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाची चौकट आणि कमान पुरातत्त्व विभागाने दुरुस्त केली असून (२०१९) बाजूच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत डावीकडे एक पिराचे ठिकाण आहे. मूळ बांधकामात हा पीर त्या जागेवर नसावा. टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेले आहे. या पठारावर एक तलाव असून समूहामध्ये खोदीव पाण्याची टाकी आढळून येतात. पठाराच्या मध्यावर एक यादवकालीन भग्न शिवमंदिर आहे. मंदिराच्या भिंती शाबूत असून छत मात्र नाही. गडाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व टोकावर प्रत्येकी एक बुरूज असून गडावर काही इमारतींचे अवशेष आढळून येतात.

अंकाई टंकाई हे जोड किल्ले शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात आहेत. अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो. अंकाई हा किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. शके ९७४ साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता, अशी नोंद सापडते. तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख एककाई दुर्ग असा येतो. मोगल बादशाह शाहजहान याच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खानेखानान याने हा किल्ला जिंकून घेतला (१६३५). त्या आधी दीर्घकाळ हा किल्ला अहमदनगर येथील निजामशाहीच्या ताब्यात होता. फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इ. स. १६६५ साली अंकाई किल्ला हा सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अमलाखाली होता. मोगल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे सामान साठवणुकीसाठी केला जात होता. पुढे पेशवा निजाम संघर्षात भालकी येथे तह झाला (१७५२). या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. पुढे मराठी साम्राज्याचा अस्तानंतर (१८१८) इंग्रज अधिकारी मैकडोवेल याने गडावर तोफांचा मारा केला, तेव्हा गडावरील शिबंदीही इंग्रजाना शरण गेली आणि अंकाई टंकाई हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले.
संदर्भ :
- Verma O. P. The Yadavas & their Times, Vidarbh Sanshodhan Mandal, Nagpur, 1970.
- पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २०११.
- महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, इतिहास प्राचीन काळ, खंड १, भाग २, स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, २००८.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन जैन लेणी समूह. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहराच्या पश्चिमेस सु. ६ किमी. अंतरावर बालाघाट डोंगररांगेतील एका घळीच्या दोन्ही बाजूंना एकूण सात लेणी खोदलेली आहेत. यांपैकी चार उत्तरेकडील भागात पश्चिमाभिमुख असून, तीन विरुद्ध दिशेला आहेत. या लेण्यांकडे हातला देवी मंदिराकडून पायवाटेने, तसेच शहरालगतच्या बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. लेण्यांसमोर मराठा कालखंडातील एक शिव मंदिर आहे.

आजपर्यंत अनेक विद्वानांनी या लेण्यांवर प्रकाश टाकलेला आहे. जेम्स बर्जेस यांनी १८७६ साली सर्वप्रथम या लेण्यांचे वर्णन केले. त्यांनी लेण्यांचे तलविन्यास, तसेच काही स्तंभ, दरवाजे व शिल्पांची रेखाचित्रे बनविली. त्यानंतर हिरालाल जैन (१९३६), म. के. ढवळीकर (१९६५, १९६८ व १९७३), वा. वि. मिराशी (१९७२), विराज शाह (२००८) यांनी मोलाचे संशोधनकार्य केले.

लेणे क्र. १. हे उत्तरेकडील चार लेण्यांच्या ओळीतील पश्चिम टोकाला खोदलेले एक अर्धवट लेणे असून, त्यात दोन स्तंभ व अर्धस्तंभयुक्त व्हरांडा (७.८ x २.१ मी.) व अर्धवट खोदलेला मंडप आहे. या लेण्यात सु. ११-१२व्या शतकातले एक सुटे जैन चौमुख शिल्प आहे. या लेण्याच्या पूर्वेला लेणे क्र.२ आहे. हे लेणे सर्वांत विशाल असून, तलविन्यासानुसार छतविरहित प्राकारयुक्त प्रांगण, व्हरांडा (ओवरी), स्तंभयुक्त मंडप व गर्भगृह अशी सर्वसाधारण रचना आहे. प्राकारयुक्त प्रांगणाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल कोरलेले आहेत. द्वारावर गोलाकृती भागाच्या आतील बाजूस पार्श्वनाथाची मूर्ती आहे. लेण्याच्या ओवरीत प्रवेश करताना लागणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस गण कोरलेले आहेत, तसेच प्रांगणात डाव्या बाजूला चौरस पाया असलेली एक गोलाकृती रचना आहे. व्हरांडा, सहा स्तंभ व दोन अर्धस्तंभांवर आधारलेला आहे. अर्धस्तंभाचा मध्यवर्ती भाग चौकोनाकृती असून शीर्षभाग तरंग पोटिकेसह अलंकृत आहे. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला एक खोली व पोढी असून त्यात चौरसाकृती स्तंभ तसेच जिनाचे एक शिल्प व दोन चौमुख आहेत. खोलीच्या भिंतीवर जिनांच्या दोन प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. व्हरांड्याच्या डाव्या बाजूलाही एक रिकामी खोली आहे. मंडपाच्या दर्शनी भागाची बरीच पडझड झाली असून, बर्जेस यांनी नमूद करून ठेवलेली जैनशिल्पे, चैत्य गवाक्षे व इतर अलंकृत भाग सध्या अस्तित्वात नाहीत.

या लेण्याचा मंडप सु. २४ x २४ मी. असून आत जाण्यास तीन दरवाजे होते. मंडपात ३२ स्तंभ असून त्यांपैकी २० स्तंभांनी बाहेरचा, तर १२ स्तंभांनी आतील चौक झाला आहे. मंडपाच्या तिन्ही बाजूंना एकूण २२ खोल्या (निवासस्थाने) आहेत. गर्भगृहाच्या उजवीकडील दोन खोल्या वगळता इतर सर्व रिकाम्या आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील खोलीत कायोत्सर्ग मुद्रेतील जिन कोरण्यात आलेला आहे. त्याच्या डोक्यावर तीन दलयुक्त छत्र आहेत. जवळच एक चौमुख ठेवलेला आहे. गर्भगृहातील द्वारावर तीन सपाट शाखा आहेत. या चौकोनाकृती गर्भगृहात मध्यभागी प्रदक्षिणापथयुक्त पार्श्वनाथाची अर्धपद्मासन व ध्यान मुद्रेतील सिंहासनाधिष्ठित भव्य मूर्ती कोरलेली आहे. पार्श्वनाथांच्या डोक्यावर सप्तफणाधारी नाग आहे. सिंहासनाच्या पुढील भागावर भग्न चक्र व त्याच्या दोन्ही बाजूस समोरासमोर एक-एक सिंह व दोन-दोन हरिण कोरले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस चामरधारी सेवक व मालाधारी विद्याधर आहेत. या व्यतिरिक्त या लेणीत काही सुटी शिल्पे असून, त्यामध्ये पाच चौमुख व एक पंचतीर्थिका दिसून येते. मंडपातील काही स्तंभांच्या शीर्षभागावर एका जिनासह काही भित्तिचित्रांचे अवशेष दिसून येतात.

लेणे क्र. २ च्या पूर्वेला लेणे क्र. ३ आहे. हे संपूर्ण लेणे बहुतांशी, लेणे क्र. २ सारखेच असून आकाराने थोडेसे लहान आहे. व्हरांड्यच्या स्तंभांना जोडणाऱ्या शीर्षपट्टीत चैत्यगवाक्षासह उत्कृष्ट कोरीव शिल्पे होती. ती सध्या अस्तित्वात नाहीत. व्हरांडा १८ मी. रुंद असून समोर ६ स्तंभ आणि २ अर्धस्तंभ आहेत. मंडपाचे प्रवेशद्वार पंचशाखायुक्त असून यात २० स्तंभ आहेत. मंडपात १४ खोल्या असून गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील खोलीत, मागील भिंतीत जिन कोरलेला आहे. गर्भगृह ५.७ x ५.४ मी. असून त्यात लेणे क्र. २ प्रमाणेच किंचित बदलासह पार्श्वनाथाची मूर्ती आहे.
लेणे क्र. ३ च्या बाजूला लेणे क्र. ४ आहे. यात एक खुले प्रांगण, मंडप व गर्भगृह आहे. मंडपात चार स्तंभ असून दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना दोन रिकाम्या खोल्या दिसतात. गर्भगृहात मागील भिंतीत पार्श्वनाथाची मूर्ती कोरलेली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीच्या मागे प्रदक्षिणापथ नाही. या लेण्यात सुपार्श्वनाथाची अंबिका व क्षेत्रपालायुक्त एक सुटी मूर्ती आहे. या लेण्यातही भित्तिचित्रांचे अवशेष आढळतात. यानंतर घळ पार करून लेणे क्र. ५ येथे पोहोचता येते. हे एक अर्धवट शिल्पविरहित लेणे असून दोन खोल्या अव्यवस्थितपणे खोदलेल्या आहेत.
लेणे क्र. ५ च्या उजवीकडे वरच्या बाजूला लेणे क्र. ६ स्थित आहे. हे एक अर्धवट खोदलेले लेणे असून यात व्हरांडा, मंडप आणि गर्भगृह अशी रचना दिसते. व्हरांडा पूर्णपणे खोदलेला असून तो १३.३५ मी.रुंद व २.६ मी. खोल आहे. याला समोर चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. यानंतर मंडप असून तो काही प्रमाणात खोदलेला आहे. मंडपाचा आकार १३.०५ x ११.४ मी. असून आत १० स्तंभ कोरलेले आहेत. परंतु त्यांपैकी समोरील दोनच पूर्ण झालेले दिसतात. या स्तंभांची रचना लेणे क्र. ३ मधील स्तंभांसारखीच दिसते. भिंतीच्या मागील बाजूस अर्धपद्मासनात पार्श्वनाथाची सप्तफणाधारी नाग असलेली एक मूर्ती कोरलेली आहे. सिंहासन साधारण असून आकृतीविरहित आहे. सेवकांपैकी फक्त एका चामरधारीणीचे रेखांकन पार्श्वनाथांच्या उजव्या बाजूला केलेले दिसते.
क्र. ७ चे वैष्णव पंथीय लेणे ६ व्या लेण्याच्या नैर्ऋत्येला आहे. यात केवळ १० स्तंभ व दोन अर्धस्तंभयुक्त एक व्हरांडा असून तो १८ मी. रुंद आहे. व्हरांड्याचा मागील भाग अर्धवट खोदून सोडलेला दिसतो. स्तंभांच्या वरच्या बाजूला प्रामुख्याने कृष्णलीलांचे शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत.
धाराशिव लेण्यांचा कालखंड बर्जेस यांनी इ. स. सु ६५०, नाईक यांनी. इ. स. सु ६०० ते ६५०, तर वॉल्टर स्पिंक यांनी इ. स. सु. ४८०-५०० ठरविला आहे. परंतु म. के. ढवळीकर व विराज शाह यांच्या मते तलविन्यास, स्तंभ व अलंकरण तसेच गर्भगृहातील मूर्तिशिल्प ठेवण्याची पद्धत पाहता लेणी क्र. २ व ३ चे अजिंठा येथील पाचव्या-सहाव्या शतकातील वाकाटककालीन लेणे क्र. सोळाशी साम्य वाटते.
धाराशिव लेण्यांचा इतिहास आणि वर्णन अपभ्रंश भाषेतील करकण्डचरिउ (११ वे शतक) व इ. स. ९३१-३२ मध्ये रचित बृहत्कथाकोश या संस्कृत ग्रंथात आलेले आहे.
बर्जेस यांच्या मते, धाराशिव येथील मुख्य लेणी जैन आहेत. ढवळीकरांच्या मते, लेणी क्र. १ ते ४ ही प्रथम खोदली गेली, तेव्हा ती बौद्धधर्मीय होती. नंतर नवव्या-दहाव्या शतकांत त्यांचे जैनधर्मीय लेण्यांत रूपांतर करण्यात आले असावे. वा.वि. मिराशी व विराज शाह यांनी अनेक दाखले देऊन लेणी क्र. २, ३, ४ व ६ ही जैन असल्याचे सिद्ध केले. मिराशी यांच्या मते, सिंहासनावरील चक्र व सप्तफणाधारी नाग ही वैशिष्ट्ये जैनांतही प्रचलित आहेत.
लेणे क्र. २ मधील जिनाचे भित्तिचित्र, अजिंठा लेण्यांतील गर्भगृहांत मुचलिंदबुद्ध मूर्तींचा अभाव, अजिंठ्यातील सर्व बुद्ध मूर्ती पद्मासनात, तर धाराशिव येथील शिल्पे अर्धपद्मासनात असणे, तसेच स्तूपसदृश्य रचनेचे धाराशिव येथील लेणे क्र. २ मधील स्थान (या काळात स्तूप लेण्यांबाहेर असण्याची उदाहरणे दिसत नाहीत. जे आहेत ते सुटे व आकाराने भिन्न आहेत) इत्यादी मुद्दे मांडून विराज शाह यांनी या लेणी बौद्ध नसून जैन ठरविल्या आहेत.
याशिवाय धाराशिव लेण्यांच्या नैर्ऋत्य भागात भोगावती नदीकिनारी चांभार (हिंदू लेणी) व लाचंदर लेणी आहेत.
संदर्भ :
- Fergusson, James & Burgess, James, The Cave Temples of India, London, 1880.
- Jain, Hiralal, ‘Some Fresh Light on the Dharashiva Caves and the Origin of the Shilahara Dynasty’, ABORI, XVI, p. 1-11, Pune, 1936.
- Shah, Viraj, Jaina Rock-Cut Caves in Western India, Delhi, 2008.
- ढवळीकर, म. के. ‘करकण्डचरिउतील जैन लेणी’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. १३८-४४, नागपूर, १९६५.
- ढवळीकर, म. के. ‘धाराशिव लेण्यांवर नवा प्रकाश’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. ११९-२७, नागपूर, १९६८.
- ढवळीकर, म. के. ‘धाराशिव लेणी बौद्धधर्मीय होती काय?’, भारतीय इतिहास आणि संस्कृति, पृ. ५-९, मुंबई, १९७३.
- मिराशी, वा. वि. ‘धाराशिव लेणी बौद्ध की जैन?’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, पृ. ३७-५२, नागपूर, १९७२.
दौलताबाद किल्ल्यात वेरुळपूर्व तीन जैन लेणी; लेणी विकासाच्या अभ्यासकांना महत्त्वपूर्ण ठेवा उपलब्ध झाल्याचा दावा
काही स्तंभांवर उभ्या असणाऱ्या लेणींमध्ये चुन्याची काही नक्षी दिसते. तसेच दौलताबाद किल्ल्यांमधील खंदकांपर्यंत लेणीतून जाणारा एक भुयारी मार्ग आहे
दौलताबादच्या किल्ल्यात यादवकालीन किंवा त्यापूर्व कालावधीतील तीन लेणी नव्याने सामोऱ्या आल्या आहेत. लेणीपर्यंत जाण्याचा मार्ग नसल्याने पर्यटकांना वर्षांनुवर्षे ही बाब माहीत नव्हती. गेल्यावर्षीच्या पावसात यातील काही भाग कोसळला. या लेणीमध्ये कोणतेही शिल्प नाही. काही स्तंभांवर उभ्या असणाऱ्या लेणींमध्ये चुन्याची काही नक्षी दिसते. तसेच दौलताबाद किल्ल्यांमधील खंदकांपर्यंत लेणीतून जाणारा एक भुयारी मार्ग आहे. लेणी विकासाचा टप्पा अभ्यासण्यासाठी या लेणींचा अभ्यासकांना अधिक उपयोग होईल, असे मत लेणींच्या अभ्यासक दुलारी कुरेशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
बहुतांश लेणी शिल्प स्वतंत्रपणे उभ्या केलेल्या असतात. किल्ल्यांमध्ये लेणी असण्याचा हा प्रकार यादवकालीन की यादवपूर्वकालीन याविषयी इतिहासातही संभ्रम आहेत. लेणींमध्ये शिल्प नसल्याने दौलताबाद किल्ल्यातील लेणी वेरुळपूर्व असतील असा कयास असून त्याचे संदर्भ देताना इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी म्हणाले, ‘या लेणींचे दोन संदर्भ इतिहासात वाचावयास मिळतात. पण त्याचा कालावधी कोणताही असला तरी लेणींची स्थित्यंतर व विकास याच्या अभ्यासासाठी ही लेणी महत्त्वपूर्ण ठरते. वेरुळ शिल्पाचा विकास होण्यापूर्वी जैन लेणी कोरणाऱ्या कलावंतांनी या भागात काम केले असेल. त्यामुळे यादवपूर्व काळातही हे संदर्भ असू शकतात असेही वाचण्यात आले होते. पण दौलताबाद किल्ल्यातील या लेणी जैन लेणीच आहेत.’ दौलताबाद किल्ल्यातील राजवाडय़ाजवळील तीन लेणींभोवती एवढे दिवस गवत होते. दरवर्षी पुरातत्त्व विभागातून तेथे साफसफाई होई. पण लेणीकडे जाण्यासाठी वाट नव्हती. गेल्या वर्षी लेणी समोरील भाग कोसळला.
त्या शिळा आता किल्ल्याबाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून शिळा फोडून वाहतूक केली जात आहे. देवगिरी किल्ल्यातील हे काम पूर्ण झाल्यानंतर लेणीचे छत टिकून राहावे म्हणून काही स्तंभही उभे केले जाणार आहेत. तसेच हा भाग पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. लेणींमध्ये शिल्प नसल्याने सामान्य नागरिकांपेक्षा अभ्यासकांना या लेणीचा अधिक फायदा होऊ शकतो असे मानले जात आहे.
लेण्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी
काही कमकुवत स्तंभावर पेलून धरलेल्या या लेणीमध्ये काही देवळय़ा व नक्षीकाम आहे. खंदकाकडे भुयारी मार्ग पाहणे पर्यटकांना आनंद देऊ शकेल. मात्र, तेथे पुरेशा सुविधा निर्माण करण्यावर पुरातत्त्व विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे. वेरुळ येथील जैन लेणींचा विकसित शिल्प होण्यापूर्वी केलेले काम म्हणून या लेणीकडे पाहिले जात आहे.
https://www.loksatta.com/aurangabad/three-jain-caves-at-daulatabad-fort-east-of-eluru-abn-97-2809980/
औरंगाबाद: दौलताबाद किल्ल्यावर सापडली जैन लेणी; लॉकडाऊनच्या काळात साफसफाई सुरू असताना उलगडला इतिहास
औरंगाबाद:दौलताबाद किल्ल्यावर सापडली जैन लेणी; लॉकडाऊनच्या काळात साफसफाई सुरू असताना उलगडला इतिहास

- 1000 वर्षांपूर्वी सन 1137 मध्ये यादव राजवटीत ही लेणी कोरली गेली असावी, असा अंदाज आहे.
- किल्ल्यावरील मेंढा तोफेसमोरील रंगमहालाच्या पाठीमागे दाट झाडाझुडपात ही लेणी आहेत.
दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर नव्या सात लेणी सापडल्या आहेत. यापैकी एक लेणे सुस्थितीत असून इतर पाच लेणी जमिनीखाली आहेत. एका लेण्याचे छत ढासळलेल्या अवस्थेत आहे. ही जैन लेणी असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. पुरातत्त्व विभागाच्या साफसफाईत ही लेणी आढळली. शेकडो वर्षांपासून देवगिरी किल्ल्यात दडलेली सात लेणी सापडली आहे. औरंगाबादपासून जवळच असलेल्या दाैलताबाद येथील देवगिरी किल्ला पर्यटकांसाठी सध्या बंद अाहे. या काळात पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची साफसफाई सुरू केली. याच दरम्यान शेकडो वर्षांपासून झाडाझुडपात लपलेली सात लेणी समोर आली आहेत. त्यापैकी एक लेणे सुस्थितीत असून एका लेण्याचे छत ढासळले आहे. इतर पाच लेणी जमिनीच्या खाली आहेत. इतिहासकारांच्या मते या जैन लेणी आहेत. एक हजार वर्षांपूर्वी ११३७ मध्ये यादव राजवटीत या कोरल्या गेल्या असाव्यात. किल्ल्यावरचा हा भाग सात टाकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे.
किल्ल्यावरील मेंढा तोफेच्या समोर रंगमहाल आहे. त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर जंगलासारखी झुडपे वाढलेली अाहेत. शिवाय खोल खंदकही आहे. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. अाता पर्यटकांची वर्दळ नसल्याने पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी किल्ल्यावर साफसफाई मोहीम सुरू केली आहे. हे काम सुरू असताना या ठिकाणी लेणी असल्याचे समोर अाले. तिथे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करण्याचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. याशिवाय किल्ल्याच्या परिसरात असलेल्या शाही हमाम, पुरातन मशीद, कचेरी, चिनी महल या ठिकाणी जाण्यासाठीही रस्ते तयार करण्यात येत आहेत. किल्ल्यांच्या उंच भिंतीवर उगवलेली झुडपे काढण्याचे कामदेखील सुरू आहे. दौलताबाद किल्ल्याचे संरक्षण सहायक संजय रोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र घाटे, अशोक निंभोरे, सुखदेव नीळ, गौरख बनकर, मोहंमद इजाज, पंडित वाबळे, कुशीनाथ खोसरे, सिद्धार्थ कुमार व इतर कर्मचारी या नव्या कामासाठी परिश्रम घेत आहेत.
काही इतिहासकारांच्या मते किल्ल्यावर ७० जैन मंदिरे होती. काही राजवटीत याची तुटफूट झाली. या मंदिराचे काही स्तंभ सध्या भारतमाता मंदिरात पाहायला मिळतात. लेण्यांच्या जवळ मोठमोठे रांजणही आहेत. या ठिकाणी गंधक ठेवण्याची व्यवस्था असावी. या लेण्यांना लागून खंदकातून बाहेर पडण्यासाठी एक दरवाजादेखील आहे. महादेवाच्या पिंडीचे भग्न अवशेषदेखील या ठिकाणी आहे. या लेण्यांत कलाकुसर केेलेले खाम, दरवाजे अजून शाबीत आहेत. काही भाग लेण्यांसमोरच तुटलेल्या अवस्थेत पडलेले दिसतात. येथील शाही हमाम, शाही महल, कचेरी अाता पर्यटकांना पाहता येईल अशी साेय केली जात अाहे.
रस्त्याची कामे सुरू
किल्ल्यावर
सध्या ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. पर्यटकांची गर्दी असताना अनेक
वर्षांपासून लपलेल्या जागांपर्यंत जाण्यासाठी रस्ता करणे शक्य नाही. मात्र
आता वेळ मिळाल्यामुळे आशा जागा शोधून त्या ठिकाणी पर्यटकांना जाता यावे
यासाठी रस्ता करण्याचे काम सुरू आहे. किल्ल्यावर सध्या एक बालेकिल्ला, ३००
बुरूज, तीन मंदिरे, तीन मशिदी, दोन महाल, एक मिनार, ५२ तोफा, पाच हमाम, एक
म्युझियम आहे. याची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे.
प्रवासवर्णनात उल्लेख
मध्ययुगीन
कालखंडातील जागतिक प्रवासी इब्न बतुता याच्या प्रवासवर्णनातही देवगिरी
किल्ल्यावरील लेण्यांचा उल्लेख असल्याचे इतिहासकार रफत कुरेशी सांगतात.
मोहंमद तुघलक या लेण्यांचा वापर ‘जेल’सारखा करत असे. या काळात लेण्यांमध्ये
खूप मोठे उंदीर होते. या उंदरांमुळे एका कैद्याचा मृत्यू झाला. त्यानंतर
या ठिकाणी कैदी ठेवणे बंद झाले. इतिहास अभ्यासक दुलारी कुरेशी सांगतात, ‘या
लेण्यांतील काही शिल्पे अजूनही किल्ल्यावर दिसतात. यादवांच्या शेवटच्या
काळात या लेणी कोरल्या गेल्याचा अंदाज आहे.
भटकंती – लेणी ओडिशाची

>> आशुतोष बापट
निसर्गरम्य ओडिशा म्हटले की कोणार्क, जगन्नाथपुरी आणि भुवनेश्वरची मंदिरे डोळ्यासमोर येतात. परंतु याच ओडिशा म्हणजेच प्राचीन कलिंग देशात जैन धर्माचेसुद्धा अस्तित्व होते. त्याच्या पाऊलखुणा आपल्याला त्यांच्या लयनस्थापत्यातून म्हणजेच कोरीव लेणींमधून आजही दिसून येतात. ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्येच जैन लेण्यांचा एक मोठा समूह आहे. उदयगिरी आणि खंडगिरी लेणी. अतिशय सुंदर, देखण्या आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या लेण्या आहेत. पर्यटकांसाठी तर हे एक सुंदर ठिकाण आहेच, परंतु अभ्यासकांसाठीसुद्धा हे महत्त्वाचे केंद्र आहे. इ.स.पूर्व दुसऱया शतकात इथे खारवेल या बलाढय़ सम्राटाची सत्ता होती. त्या खारवेलाचा इतिहास, त्याचे कर्तृत्व आणि त्याचे सामर्थ्य आपल्याला इथे त्यानेच कोरून ठेवलेल्या शिलालेखातून समजून येते.
भुवनेश्वरला लागूनच उदयगिरी आणि खंडगिरी या जुळ्या टेकडय़ांवरील जैन लेणी ही यासाठीच महत्त्वाची ठरतात. ही लेणी मुख्यत्वे जैन मुनींच्या निवासासाठी, तसेच प्रार्थना आणि ध्यानधारणेसाठी खोदली गेल्याचे जाणवते. लेण्यांच्या दालनांच्या दरवाज्यावर तोरणे तसेच जैन शुभचिन्हे कोरलेली दिसतात. तसेच राजदरबारातील प्रसंग, राजाची विजयी मिरवणूक, शिकारीचे प्रसंग अशी काही कथन शिल्पे या दालनांच्या दरवाज्यांवर विपुल प्रमाणात कोरलेली आहेत. इथे या जुळ्या डोंगरांवर खोदलेली विविध वैशिष्टय़पूर्ण लेणी आणि या ठिकाणी असलेला तत्कालीन राजा खारवेल याचा शिलालेख या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिलालेखाची सुरुवात ‘नमो अरिहंतनं… नमो सव सिधानं’ या जैन नमोकार मंत्रांनी केलेली आहे. 17 ओळींच्या ब्राह्मी लिपीमधील या शिलालेखात अनेक ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे. ते लक्षात यावे म्हणून सम्राट खारवेलाची माहिती आणि या लेण्यांचा इतिहास जाणून घेणे गरजेचे ठरते.
इ.स.पूर्व दुसरे शतक (अंदाजे इ.स.पू 174) हा सम्राट खारवेलाचा काळ समजला जातो. मगधच्या बलाढय़ मौर्य राजवंशाचा हा अवनतीचा काळ आहे. महाराष्ट्रात याच काळात सातवाहन राजवंशाचे राज्य होते. त्याच सुमारास ओडिशामध्ये चेदी राजवंश उदयाला आला. त्यांचे मूळस्थान चेदी जनपद म्हणजेच आताचे बुंदेलखंड हे होते. खारवेल हा याच राजवंशातला कर्तृत्ववान राजा. त्याला कलिंगचक्रवर्ती असे संबोधले जात असे. सम्राट अशोकाच्या कलिंग विजयानंतर प्रथमच खारवेलाने कलिंगला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. त्याच्या काळात कलिंगचा समुद्रमार्गे व्यापारसुद्धा खूपच बहरला होता. हिंदुस्थानभरातल्या अनेक जैन मुनींना, पंडितांना बोलावून त्याने एक धर्मसंमेलन भरवले होते. त्या प्रसंगी जैनसंघाने खारवेलाला खेमराजा, भिखुराजा व धर्मराजा अशा पदव्या बहाल केल्या.
उदयगिरी आणि खंडगिरी या शेजारीशेजारी असलेल्या टेकडय़ा आहेत. त्यातल्या उदयगिरीवर असलेल्या राणीगुंफा, हाथीगुंफा आणि गणेशगुंफा या लेण्या महत्त्वाच्या आहेत. सम्राट खारवेलाचा प्रसिद्ध शिलालेख हाथीगुंफेवरील मोठय़ा खडकावर कोरलेला आहे. राणी गुंफा म्हणजे एक सुंदर दुमजली दालन आहे. जैन मुनींसाठी बांधलेले हे वसतीगृहच आहे. प्रशस्त व्हरांडा आणि बाजूला असलेल्या लहान लहान खोल्या. इथे बऱयाच दालनांना बाहेर द्वारपाल दिसतात. मध्यवर्ती विभाग जिथे इतर दोन विभागांशी जोडला गेलेला आहे त्या कोनावर शिल्पपट पाहायला मिळतात. यामधे पशुपक्षी, फळांनी डवरलेली झाडे, आनंदाने बागडणारे हत्ती, वाद्य वाजवणाऱया सुंदऱया इत्यादि शिल्पे फारच प्रभावशाली कोरलेली आहेत.
उदयगिरी टेकडीच्या समोरच आहे खंडगिरी टेकडी. भुवनेश्वरकडून आल्यावर ही टेकडी डाव्या हाताला आहे. इथे वरती चढून जाण्यासाठी मोठय़ा पायऱया खोदलेल्या दिसतात. एका ठराविक उंचीवर गेल्यावर मग इथे गुहा खोदलेल्या दिसतात. खंडगिरीला एकूण 15 लेण्या आहेत. खंडगिरी टेकडीची उंची 123 फूट एवढी असून एका शिलालेखात याचा उल्लेख ‘खंडित गिरी’ असा आला आहे. तिथे एक इंद्रकेसरी गुहा असून त्याच्या मागे असलेल्या गुहेत 24 तीर्थंकरांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात.
z ashutosh.treks@gmail.com







No comments:
Post a Comment