Saturday, February 28, 2026

नाशिक शहरातील एतिहासिक ठिकाणे 1

 
मग कथा घेऊनि हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले,
शनिवार तीन मे, एकोणीसशे तेरा
भारतभुमीवर चलतचित्र अवतरले"

भारतीय सिनेमाचा शुभारंभ झाला, तो नाशिकचा हा स्टुडिओ.


नाशिकचे सन १८६० मधील दुर्मिळ दृष्य

तपोवन

तपोवनचा शब्दशः अर्थ ध्यान आणि तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर. पंचवटीच्या पुढे तपश्चर्येसाठी असा परिसर आहे म्हणून त्याला तपोवन असे नाव पडले. ऋषीमुनी हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करत असत. लक्ष्मण – रामाचा भाऊ – येथे राहत होता आणि त्याने शूर्पणखाचे नाक कापले होते – रावणाची बहीण. या ठिकाणी लक्ष्मण आणि हनुमानाची मंदिरे आहेत. आजही, गोदावरीचा शांतपणे वाहणारा प्रवाह, हिरवीगार झाडे आणि जंगलातील वनस्पती आणि प्राणी यांच्याशी जवळीक यामुळे ही लोकल मन मोहून टाकते.

नदीपात्रातील दगडांवर गुहेतील विदारकांना ब्रह्मा योनी म्हणतात. अगदी जवळ, कपिलतीर्थ आहे. गोदावरीच्या उजव्या तीरावर अकरा खडकाळ गुहा आहेत जिथे ऋषी-मुनी संस्कारासाठी मागे हटले असावेत. येथे गोपालकृष्ण आणि लक्ष्मी-नारायण यांची मंदिरे आहेत आणि प्रसिद्ध गोशाळा (गोशाळा) 1904 मध्ये येथे बांधण्यात आली होती. प्राचीन काळात ही भूमी भगवान रामाच्या चरणस्पर्शाने पवित्र झाली होती.

लक्ष्मण मंदिर तपोवन

नाशिक, जि. नाशिक


‘पश्चिम काशी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये ‘तपोवन’ हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक स्थळ आहे. गोदावरी आणि कपिला या नद्यांच्या पवित्र संगमावर असलेल्या तपोवन परिसरात लक्ष्मणाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की, लक्ष्मणाचे राज्यातील हे एकमेव मंदिर आहे. रावणपुत्र मेघनाथ याच्याशी युद्ध करण्यासाठी लक्ष्मणाने याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. तसेच शूर्पणखाचेही नाक आणि कान येथेच लक्ष्मणाने कापले होते.

या मंदिराची आख्यायिका अशी की शूर्पणखा ही लंकेचा राजा रावणाची बहीण होती. अनेक राक्षसांचा वध करून संपूर्ण जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या रावणाने आपली बहीण शूर्पणखा हिच्या पतीचाही वध केला होता. त्यानंतर रावणाने शूर्पणखाला आपला भाऊ खर, याच्याकडे राहायला पाठवले होते. त्यावेळी राम, लक्ष्मण आणि सीता यांचा वनवास काळ सुरू होता. त्यासाठी ते या परिसरात आले होते. तेथे रामाला पाहून शूर्पणखा त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली. शूर्पणखा ही मागील जन्मात स्वर्गातील अप्सरा होती. तिचे नाव नयनतारा होते. ती एका ऋषींच्या शापाने राक्षसी झाली होती. तिने नयनताराचे सुंदर रूप घेतले आणि मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, असे रामाला सांगितले. त्यावर रामाने आपण विवाहित असल्याचे सांगितले, पण आपला धाकटा भाऊ लक्ष्मण आहे, तू त्याच्याकडे जा, असे सांगितले. शूर्पणखाने लक्ष्मणाकडेही लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण लक्ष्मणाने तिला नकार दिला.









तेव्हा शूर्पणखाने ‘आता मी सीतेलाच मारले तर रामाशी लग्न होण्यात काहीच अडचण येणार नाही’, असे म्हणून ती सीतेला मारण्यासाठी सरसावली, त्यामुळे क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने, ‘तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे ना, थांब तुला विद्रूपच करून टाकतो’, असे म्हणत शूर्पणखाचे नाक आणि कान कापले. या घटनेनंतर या ठिकाणाचे नाव ‘नासिक’ पडले, अशी धारणा आहे. ही घटना जेथे घडली, त्याच ठिकाणी लक्ष्मणाचे हे मंदिर आहे.

मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर चार ते पाच फूट उंच एक सुंदर बैठी गणेशमूर्ती पाहायला मिळते. येथेच ग्रंथविक्री व प्रसाद विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. मंदिरासमोरील भिंतीवर, रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांची उठावचित्रे (म्युरल्स) रेखाटलेली आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गरूडशिल्प आहे. असे सांगितले जाते की, मंदिर परिसरात एक वडाचे झाड असून ते फार प्राचीन आहे. हे झाड उन्मळून पडले तरी त्याच्या मुळांपासून पुन्हा त्याची निर्मिती होते.

काहीसे उंचावर असल्याने १५ ते २० पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात स्वयंभू हनुमानाची चार फूट उंचीची मूर्ती आहे. त्याचबरोबर येथील सभामंडपाला लागून बाहेरील बाजूला लक्ष्मण शूर्पणखाचे नाक कापत आहे, असा सुबक देखावा तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या सभामंडपातून हा देखावा पाहता येतो.

मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशद्वारावर ‘श्री लक्ष्मण शेषनाग अवतार’ असे लिहिले आहे. लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार मानला जातो. त्यामुळे लक्ष्मणाची येथील मूर्ती ही पंचमुखी शेषनागासोबत आहे. एका चौथऱ्यावर अखंड दगडात कोरलेली ही मूर्ती आहे. येथेच लक्ष्मणाने वनवास काळात रामाची सेवा केली होती, त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

उपयुक्त माहिती:

  • मुंबई नाका बस स्थानकापासून ४ किमी, नाशिक रेल्वे स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वे सुविधा
  • तपोवन येथे जाण्यासाठी महापालिका बस सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

पवित्र गोदावरी

त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक

दक्षिण गंगा, गौतमी गंगा, सप्त गोदावरी, गोला, गोलाई अशी अनेक नावे धारण केलेली गोदावरी भारतातील गंगा नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. नाशिकमध्ये उगम पावलेली ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांमधून १४६५ किमीचा टप्पा पार करीत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी ही ब्रह्मविष्णूमहेशाचे स्वरूप असल्याची मान्यता आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात गोदावरीच्या व्युत्पत्तीची कथा दिली आहे. सर्व नद्यांमध्ये गोदावरी ही प्राचीन श्रेष्ठ असून तिच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो देवलोकाची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे

असे म्हटले जाते की नर्मदेच्या तीरावर तप करण्याचे श्रेय फार मोठे आहे. भागीरथीच्या काठी आलेले मरण मोक्ष मिळवून देते. कुरुक्षेत्री दान दिल्यास अनेक पटीने पुण्य प्राप्त होते. या तिन्हींचे एकत्रित पुण्य गोदावरीच्या केवळ दर्शनाने होते, असे पुराणात सांगितले आहे. महर्षी वाल्मिकींना रामायण लिहिण्याची प्रेरणा हिच्याच तीरावर झाली. विंध्य पर्वत ओलांडून आलेले महर्षी अगस्ती ऋषींसह अनेक ऋषींनी गोदावरीच्या तीरावर वास्तव्य केले होते.

या नदीच्या उगमाबाबतची आख्यायिका अशी की महर्षी गौतम ऋषी यांच्या हातून गोहत्या घडली होती. या पापातून मुक्ततेसाठी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या केली शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांनी शंकराकडे गंगेची मागणी केली, परंतु गंगा जटेतून बाहेर येण्यास तयार नव्हती. गंगेला भूतलावर अवतीर्ण करण्यासाठी शंकराने तांडव नृत्य केले. शंकराने आपल्या जटा जोराने जमिनीवर आपटून गंगेला जटेतून बाहेर काढले. ते स्थान म्हणजे आजचे ब्रह्मगिरी होय. ज्यावेळी गंगेचा उगम ब्रह्मगिरीवर झाला ती तिथी होती माघ शुद्ध दशमी. त्यावेळी गुरू सिंह राशीत होता तो दिवस होता गुरुवारचा.

नाशिकमधून गोदावरी सप्तधारांनी वाहते. तिचे हे सात प्रवाह म्हणजे गौतमी, वसिष्ठा, कौशिकी, आत्रेयी, वृद्ध गौतमी, तुल्या आणि भारद्वाजी हे होत. यामुळेच तिला सप्त गोदावरी म्हणतात. त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थाच्या बाजूला नाशिकमध्ये रामकुंडाच्या शेजारी गोदावरी मातेची मंदिरे आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीवर सुमारे १०८ कुंडे आहेत. त्यापैकी रामकुंड, कुशावर्त आदी ठिकाणी वर्षभर अनेक धार्मिक विधी केले जातात.

उत्तरेकडे गंगेला जे महत्त्व आहे तेच महत्त्व दक्षिणेकडे गोदावरीचे आहे. त्यामुळेच गोदावरीला दक्षिण गंगा, तर नाशिकला दक्षिण काशी असे म्हटले जाते. नाशिकमधील पंचवटी परिसरात अरुणावरुणा नदीचा प्रवाह गोदावरीस मिळतो. त्या संगमावर ब्रह्मदेवाने पापक्षालनासाठी तपश्चर्या केली होती, ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी शंकराने या संगमावर स्नान केले होते, श्रीरामांनी आपले वडील दशरथ यांचे श्राद्धविधीही याच ठिकाणी केले होते, असे संदर्भ अनेक ग्रंथांमध्ये आढळतात. समुद्र मंथनादरम्यान या नदीपात्रात अमृताचे काही थेंब पडल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या तीरावर दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यावेळी अनेक थोर साधू या नदीत स्नान करीत असल्याने त्यांच्या तपाची ऊर्जा या पाण्यात उतरते त्यामुळे गोदावरीत स्नान केल्याने सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा भाविकांना मिळते, असे मानले जाते.

नाशिकच्या पुढे आग्नेयेकडे वाहणाऱ्या गोदावरीला २४ किमी अंतरावर उजव्या बाजूने दारणा नदी तर तेथूनच पुढे काही अंतरावर डाव्या बाजूने कादवा नदी येऊन मिळते. त्यापुढे नाशिक जिल्हा संपून गोदावरी कोपरगाव येथे नगर जिल्ह्यात प्रवेश करते. येथून गोदावरी दक्षिणवाहिनी होते. नगर जिल्ह्यातही गोदावरीच्या तीरावर अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर मंदिर, कोकमठाण येथील प्राचीन हेमाडपंती शिव मंदिर, गुरू शुक्राचार्य मंदिर, कचेश्वर मंदिर, श्रृंगऋषी मंदिर, विभांडक ऋषी मंदिर संजीवनी पार या तीर्थांचा समावेश आहे.

अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवरून पुढे गोदावरी मराठवाड्यात प्रवेश करते. तेथे देवगड वरून वाहत आलेल्या प्रवरा नदीचा गोदावरीशी संगम होतो ते ठिकाणप्रवरासंगमम्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर ही नदी सातवाहनांची राजधानीप्रतिष्ठाननगरीम्हणजेच पैठणला येते. तेथेच जायकवाडी (नाथसागर) प्रकल्प आहे. जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण असून त्याची क्षमता २९०९ दशलक्ष घनमीटर इतकी प्रचंड आहे. या प्रकल्पाजवळ वीजनिर्मिती प्रकल्पही आहे. पुढे जालनाबीड जिल्ह्याची सीमा बनलेली गोदावरी बीड जिल्ह्यात प्रवेश करते. पांचाळेश्वर येथे याच नदीपात्रात महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यानंतर राक्षसभुवन (शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक) येथे गोदावरीच्या तीरावर दुसऱ्या बाजीरावाने निजामाविरोधात पहिली लढाई जिंकली होती, अशी नोंद आहे. सिंधफणा, रेना, वाण सरस्वती या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावलेल्या नद्या दक्षिणकडे वाहत पुढे गोदावरीस मिळतात. त्यानंतर ती पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते.

परभणी येथून पुढे शेळगाव, गंगाखेड (संत जनाबाईंचे जन्मस्थान) येथून जात असताना पुढे पूर्णा नदीला आपल्यात सामावून घेत गोदावरी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. या गोदावरीच्या तीरावर नांदेड शहरात शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांचा गुरुद्वारा आहे. त्यामुळे नांदेड हे शिखांच्या पाच पवित्र ठिकाणांपैकी एक समजले जाते. नांदेड शहराला पाणीपुरवठ्यासाठीही गोदावरीवर विष्णुपुरी बंधारा बांधण्यात आला आहे. त्यानंतर उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांचा प्रवास करत असताना महाराष्ट्रतेलंगणा राज्याच्या सीमेवरील मांजरा नदी गोदावरीला मिळते आणि गोदावरी नदी महाराष्ट्रातील सुमारे ६६८ किमीचा प्रवास संपवून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

नांदेड जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात प्रवेश केलेली गोदावरी नदी मंचेरिआलनंतर पुन्हा महाराष्ट्रात येते. गडचिरोली जिल्ह्याच्या वेशीवर गोदावरीचा प्राणहिता नदीशी संगम होतो. त्यानंतर ती तेलंगणातून पुढे जाते. पुढे काही अंतरावर तेलंगणा राज्यातील प्रवास संपवून गोदावरी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते. आंध्रात गोदावरी नदी ही पूर्व गोदावरी आणि दक्षिण गोदावरी या दोन जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. राजमहेंद्री येथे गोदावरी नदी दोन शाखेत विभागली जाते. ब्रह्मगिरीवरील जटा मंदिरातून उगम पावलेल्या या नदीचे पात्र पुढे राजमहेंद्रीला जाईपर्यंत . किमी एवढे विस्तीर्ण होत जाते. या नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ आहे ,१२,८१२ चौ. किमी इतके. अशा पद्धतीने महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना सर्वार्थाने समृद्ध करत गोदावरी बंगालच्या उपसागरात विलीन होते.

उपयुक्त माहिती:

  • गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी पर्वतावर आहे
  • नाशिकपासून ब्रह्मगिरीच्या पायथ्याचे अंतर ३० किमी 
  • त्र्यंबकेश्वरसाठी एसटी नाशिक महापालिका बस सुविधा
  • त्र्यंबकेश्वर येथे निवास न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • मूळगंगा पायरी मार्गावर खाद्यपदार्थांची दुकाने आहेत

स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता

भगूर, ता. जि. नाशिक

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत मारीत मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन’, अशी प्रतिज्ञा वयाच्या १४व्या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांनी भगूर येथील अष्टभुजा मातेसमोर केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या देवीला पुढे स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता म्हणून ओळखले जाऊ लागले.

दारणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावाला प्राचीन इतिहास आहे. पूर्वी येथे महर्षी भृगू ऋषींचे वास्तव्य होते. ते स्थापत्यशास्त्राचे तज्ज्ञ समजले जात. नाशिकमधील काळाराम मंदिर भृगूवास्तुशास्त्रानुसार बांधल्याचे मानले जाते. त्यांनी ऋग्वेद, अथर्ववेद, भृगूसंहिता, भृगू आयुर्वेदसंहिता, भृगूस्मृती (मनस्मृती), भृगू गीता (वेदान्तविषयक), भृगूसिद्धांत आणि भृगूसूत्र आदी ग्रंथ लिहिले. असे सांगितले जाते की भृगू ऋषींनी दंडकारण्यातील या परिसरात साधना केली गुरुकुल उभारले, म्हणून या परिसरालाभार्गवअसे नाव पडले होते. त्याचे पुढेभगूरझाले. भृगू ऋषींचे वास्तव्य, शिवकाळ, पेशवाईतील कर्तृत्वाच्या कहाण्या, असा वारसा भगूरला लाभला आहे. सावरकरांनी भगूरवर लिहिलेलीभार्गवही कविता गावाचे महात्म्य वर्णन करते. सशस्त्र चळवळींमुळे इंग्लंडमध्येडँबिस गावअशी भगूरची नोंद होती.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य चळवळीचे रणशिंग फुंकण्यापूर्वी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची जाहीर मागणी करणारे प्रथम भारतीय म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ओळख आहे. ‘क्रांतिसूर्यम्हणूनही त्यांना ओळखले जाते. २८ मे १८८३ रोजी भगूर या गावात विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तिथे त्यांच्या पूर्वजांचा वाडा होता. वडील जहागीरदार असल्यामुळे लहानग्या विनायकास लोकछोटे जहागीरदारअसे म्हणायचे.

सावरकर यांना आईचे छत्र फार काळ लाभले नाही. आईनंतर मोठ्या भावाची पत्नी येसू वहिनीने त्यांना आईची माया दिलीतिच्या मार्गदर्शनाखाली सावरकर शिकू लागले, कविता करू लागले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी रामायण, महाभारत या ग्रंथांसह घरात असणारी ऐतिहासिक पुस्तके वाचून काढली होती. नाशिकमधील एका स्पर्धेसाठी शिवजयंतीनिमित्त सावरकरांनी शिवरायांवर गीत लिहिले होते. त्या गीतासाठी लोकमान्य टिळकांच्या हातून त्यांना पारितोषिक मिळाले होते. तेव्हापासून त्यांनी देशकार्याला वाहून घेतले. चाफेकर बंधूंकडे पाहून त्यांनी आपणही क्रांतिकारक बनायचे, असे मनोमन ठरवले पुढे मित्र मंडळ मेळावा स्थापन केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भगूर येथील जुने घर म्हणजे सध्याचासावरकर वाडाआजही चांगल्या स्थितीत आहे. असे सांगितले जाते की विनायक सावरकर यांचे वडील दामोदर सावकरकरांच्या पणजोबांना लुटारूंना पिटाळून लावताना अष्टभुजा भवानीची मूर्ती मिळाली होती. ही देवी पुढे सावरकर कुटुंबीयांची कुलदैवत झाली. देवीला पूर्वी बोकडाचा बळी दिला जात असे. त्यामुळे देवीची मूर्ती खंडोबाच्या मंदिरात ठेवण्यात आली. मात्र, दामोदरपंतांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसारमला घरी घेऊन जाअसे या देवीने सांगितले. त्यामुळे ही मूर्ती सावरकरवाड्यात आणण्यात आली. १८९८ मध्ये झालेल्या प्लेगच्या उद्रेकानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी घरातील या देवीसमोर आपल्या साथीदारांसह देश स्वतंत्र करण्याची शपथ घेऊन स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. तेव्हापासून या अष्टभुजा देवीला स्वातंत्र्यलक्ष्मी असे म्हटले जाऊ लागले.

सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतल्यानंतर देवीसाठी बळी द्यायला ही मूर्ती पुन्हा खंडोबा मंदिरात आणण्यात आली. सावरकर वाड्यात देवी जेथे स्थानापन्न होती ते स्थान आजही तेथे पाहता येते. या देवीला स्मरून केलेलेजयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे…’ आणिने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ ही सावरकर यांची गीते प्रसिद्ध आहेत.

स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची ही मूर्ती सुंदर आहे. सध्या गावातील खंडोबा मंदिरात ती विराजमान आहे. या मंदिराच्या गर्भगृहात खंडोबा, बाणाई म्हाळसादेवी यांचे स्थान आहे, तर खालच्या बाजूला शिवपिंडी आहे. त्यांच्या मधोमध स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. या मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. पहिल्या दिवशी विधिवत पूजाअर्चा करून येथे घटस्थापना केली जाते. नवमीला सकाळी देवीस पंचामृताने आंघोळ घातली जाते. दसऱ्याच्या दिवशी अष्टभुजा देवी खंडेराव महाराज यांच्या मूर्तींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक येथून जवळच असलेल्या देवळाली कॅम्पमधील रेणुका मातेच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी जाऊन पुन्हा पालखी गावात येते. नवरात्रोत्सवात येथे शेकडो भाविक दर्शनाला येत असतात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील जुने घर आता राष्ट्रीय स्मारक झाले आहे. इंग्रजांनी हे घर ताब्यात घेऊन त्याचा लिलाव केला होता. इंग्रजांकडून मारुतीराव चव्हाण यांनी ते खरेदी केले. पुढे ते पांडुबा चव्हाण यांनी घेतले. नंतर त्यांच्याकडून केंद्र सरकारने खरेदी करून २८ मे १९९८ रोजी ते सावरकर स्मारकात रूपांतरित केले. या वाड्यामध्ये सावरकर यांचा जीवनपट दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यात सावरकरांचे जन्मस्थान, जेथे अष्टभुजा मूर्तीची स्थापना केली होती, ते देवघर आहे. याशिवाय त्यांची वंशावळ येथे दाखविली आहे

उपयुक्त माहिती:

  • नाशिक शहरापासून भगूर १७ किमी अंतरावर
  • भगूर गावात सावरकर वाडा, तर गावाच्या वेशीवर खंडोबा मंदिर
  • नाशिक, इगतपुरीहून एसटीची सुविधा
  • वाहने सावरकर वाडा मंदिराजवळ जाऊ शकतात
  • गावात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध नाही

तीर्थ ब्रह्मगिरी

जटा मंदिर / मुळगंगा मंदिर

त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

दृष्टी पडता ब्रह्मगिरी | त्यास नाही यमपुरी |

नामा म्हणे प्रदक्षिणा | त्याच्या पुण्या नाही गणना ||

संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या या ओवीतून ब्रह्मगिरी पर्वताचे महात्म्य स्पष्ट होते. पुराणकाळापासून अनेक थोर ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेल्या या पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीसह वैतरणा आणि अहिल्या या नद्यांचा उगम याच पर्वतावरून होतो. साक्षात शंकराचे वास्तव्य असलेल्या या ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि फलप्राप्ती होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

 

ब्रह्मगिरी हा सह्याद्री पर्वत रांगांमधील एक विशाल पर्वत. समुद्र सपाटीपासून त्याची उंची ४२४८ फूट आहे. महाराष्ट्रातील कळसूबाईनंतर उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा हा सुळका असल्याचे अभ्यासक सांगतात. हिमालय पर्वताने भूगर्भातून डोके वर काढले नव्हते तेव्हापासून सह्याद्री पर्वत अस्तित्वात आहे. सह्याद्रीच्या या भागास ब्रह्मगिरी असे म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वताची सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष इशान अशी पाच शिखरे आहेत. सद्योजात शिखरापासून गोदावरीचा उगम झाला, तर वामदेव, अघोर, तत्पुरुष, इशान या शिखरांपासून अनुक्रमे वैतरणा, अहिल्या, बाणगंगा, रामगंगा या नद्यांचा उगम झाला. असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीचे ज्ञान झाले ते ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी होय!

ब्रह्मगिरी पर्वताची आख्यायिका अशी की महर्षी गौतम ऋषी यांच्या हातून गोहत्या घडली होती. या पापातून मुक्ततेसाठी त्यांनी घोर तपश्चर्या केली शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांनी शंकराकडे गंगेची मागणी केली, परंतु गंगा जटेतून बाहेर येण्यास तयार नव्हती. गंगेला भूतलावर अवतीर्ण करण्यासाठी शंकराने तांडव नृत्य केले. त्यावेळी सारी पृथ्वी हादरून गेली. शंकराने आपल्या जटा जोराने जमिनीवर आपटून विश्वकल्याणासाठी गंगेला जटेतून बाहेर काढले. ते स्थान म्हणजे आजचे ब्रह्मगिरीवरील जटा मंदिर होय. ज्यावेळी गंगेचा उगम ब्रह्मगिरीवर झाला ती तिथी होती माघ शुद्ध दशमी. त्यावेळी गुरू सिंह राशीत होता तो दिवस होता गुरुवारचा. दरवर्षी या दिवशी या मंदिरात गंगावतरण उत्सव साजरा केला जातो.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, ब्रह्म आणि विष्णू यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की मी सृष्टीचा निर्माता आहे. त्यामुळे शिवमहिमा काय आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे. विष्णूने मात्र नम्रपणे सांगितले की मी शिवमहिमा जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी तपश्चर्याही केली. परंतु मला अजूनही शिवाचे पूर्ण ज्ञान झालेले नाही. यानंतर दोघांनीही शंकराचा शोध घेण्याचे ठरवले. ब्रह्माने शंकराचे मस्तक शोधावे आणि विष्णूने चरण शोधावे, असे ठरले. दोघांनी खूप शोध घेतला, पण हाती काहीच लागले नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने एक बनाव केला. त्यांनी आपल्या सामर्थ्याने एक गाय आणि फूल निर्माण केले आणि त्यांना आपल्या बाजूने साक्ष देण्यास राजी करत आपल्याला शिवाचे मस्तक सापडल्याचा दावा केला. मात्र, देवांना याबद्दल शंका वाटली. ती दूर करण्यासाठी ते थेट शिवलोकात गेले. तिथे त्यांनी शिवाची भेट घेऊन सर्व हकिगत कथन केलीत्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाचा बनाव शंकराच्या लक्षात आला. क्रोधित होऊन शंकराने ब्रह्मदेवाला शाप दिला की आजपासून पृथ्वीवर तुझी कोणीही पूजा करणार नाही. यामुळे ब्रह्मदेवालाही शंकराचा राग आला आणि त्यानेही शंकराला भूतलावर तू पर्वत होऊन राहशील, असा शाप दिला. नंतर मात्र ब्रह्मदेवाला आपली चूक उमगली. त्याने शंकराची तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्याने ब्रह्मदेवाला वचन दिले की पर्वतरूपाने पृथ्वीवर माझे वास्तव्य असेल आणि या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी असेल! त्यामुळे या पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे.

ब्रह्मगिरीची परिक्रमा पुराणकाळापासून प्रचलीत आहे. ही परिक्रमा करेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते, असे दाखलेही पुराणांमध्ये आढळतात. या पर्वतावर गहिनीनाथांचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. वडील विठ्ठलपंत यांच्यासह ज्ञानेश्वरादी भावंडे या ठिकाणी आली असता, त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांना ब्रह्मगिरीवरच गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला.

तीन प्रकारे ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. एक केवळ ब्रह्मगिरी परिक्रमा, दुसरी हरिहर ब्रह्मगिरी परिक्रमा आणि तिसरी अंजनेरी पर्वतासह ब्रह्मगिरी परिक्रमा. या तिघांमध्ये केवळ ब्रह्मगिरीची परिक्रमा सर्वात लहान आणि अधिक प्रसिद्ध आहेहा परिक्रमा मार्ग सुमारे २० ते २२ किमी एवढा असून साधारणतः ते तासांत परिक्रमा पूर्ण होते. हरिहर ब्रह्मगिरी परिक्रमा ही थोडी मोठी प्रदक्षिणा असून तिचा मार्ग साधारण ३७ किमीचा आहे. तिसरी प्रदक्षिणा ही अंजनेरीसह असून हे अंतर सुमारे ५५ ते ६० किमी आहे.

पहाटे सूर्योदयापूर्वी उठून, कुशावर्तावर स्नान करून, त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून परिक्रमेस सुरुवात केली जाते. या मार्गावर प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, रामतीर्थ, नरसिंह तीर्थ इत्यादी अनेक तीर्थे लागतात. ब्रह्मगिरी पर्वतावर जटामंदिर, ब्रह्मगिरी मंदिर मूळगंगा मंदिर अशी स्थाने आहेत. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणारे अनेक भाविक या पर्वतावर येतात. पण खऱ्या अर्थाने इथे भाविकांची गर्दी जमते ती श्रावण महिन्यात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या काळात येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात त्यातही तिसऱ्या सोमवारी, येथे अलोट गर्दी होते. या काळात ब्रह्मगिरी परिक्रमा केल्याने विशेष फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

परिक्रमेशिवाय इतर वेळीही ब्रह्मगिरी पर्वतावरीव ब्रह्मगिरी मंदिराचे दर्शन घेता येते. तेथे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ मंदिरापासून पायरी मार्ग आहे. काहीशा अवघड असलेल्या या पायरी मार्गाने ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच तास लागतात. ब्रह्मगिरी पर्वत वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पर्वतावर जायचे असेल तर वनविभागाच्या चौकीवर प्रवेश शुल्क भरून जावे लागतेया पायरी मार्गातून जाताना रस्त्यात मुक्तादेवी मंदिर आहे. पर्वतावर गेल्यानंतर काहीसे खाली उतरून ब्रह्मगिरी मंदिरात जाता येते. येथे असलेल्या छोटेखानी प्राचीन मंदिरात शिवपिंडी असून मंदिराच्या समोरील कुंडात गोमुखातून दक्षिण गंगा अर्थात गोदावरीचे पाणी वाहत असते. या परिसरातच मूळगंगा जटा मंदिर आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत भाविकांबरोबरच पर्यंटकांचीही येथे गर्दी असते.

जटा मंदिर हे येथील प्राचीन मंदिर आहे. मंदिर आकाराने लहान असून काळ्या पाषाणातील आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. याच जागेवर शंकराने गुडघ्यावर बसून आपल्या जटेतून गंगेला मुक्त करण्यासाठी येथील दगडावर जटा आपटल्या होत्या. त्या जटांच्या गुडघे जेथे टेकले होते त्या खुणा आजही या मंदिरात पाहता येतात. जटा आपटलेल्या भागातून दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीचा उगम झाल्याचे मानले जाते. येथे श्रावणात केलेला जलाभिषेक, रुद्राभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते.

जटा मंदिरापासून पायी पाच मिनिटांवरब्रह्मगिरी मंदिरआहे. ब्रह्मगिरी मंदिराच्या समोरील कुंडात गोमुखातून गंगेचे पाणी पडत असते. तेथून मूळगंगा मंदिराकडे जाता येते. मूळगंगा मंदिरात लहानसे चौकोनी कुंड आहे. हे गंगेचे मूळ प्रकटस्थान मानले जाते. या कुंडातील पाणी कधीच आटत नाही वा त्याची पातळीही कमीजास्त होत नाही. या कुंडातच काळ्या पाषाणात कोरलेली गंगा देवीची मूर्ती विराजमान आहे. येथील दगडी मंडपात गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. तेथेच बाजूला शिवपिंडी नंदी आहे. कुंडाच्या वरील बाजूस शिर नसलेली गाय आहे. तिचे शिर हे बाजूलाच असलेल्या ब्रह्मगिरी मंदिरासमोरील कुंडात असल्याचे सांगितले जाते. (आख्यायिकेनुसार गौतम ऋषींच्या हातून गायीचे शिर धडावेगळे झाले होते.) कुंडाच्या बाहेर असलेल्या तीन उंबराच्या झाडांमधून गंगा वाहते. असे सांगितले जाते की गंगा प्रकट झाल्यावर या कुंडात गौतम ऋषींनी स्नान केले होते. हीच गंगा येथून गुप्त होऊन खाली असलेल्या गंगाद्वार येथे प्रकट होते पुन्हा तेथून त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडातून नाशिक, पंचवटी, पैठण, नांदेड असे मार्गक्रमण करीत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

उपयुक्त माहिती:

  • नाशिकपासून ब्रह्मगिरीच्या पायथ्याचे अंतर ३० किमी 
  • नाशिकहून एसटी महापालिका बस सुविधा
  • खासगी वाहने थेट पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • त्र्यंबकेश्वर येथे निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • पायरी मार्गावर खाद्यपदार्थांची लहानमोठी दुकाने

tirupatitirumalainfo.com

Tapovana Lakshmi Narayan Temple-Nashik | Details

tirupatitirumalainfo

Lakshmi Narayan Temple

Sri Lakshmi Narayan Temple

It is located near the Swaminarayan bridge of Nashik in the area of Tapovana. Tapovana is a place of penance and meditation where great sages used to practice austerities. A pastime of primary significance associated with Dandakaranya is the story of the sages of Dandakaranya, who desired to experience the rasa of conjugal love with the Lord. In days gone by there were many sages in Dandakaranya. Dandakaranya is the name of the forest where Lord Ramachandra lived after being banished by His father for 14 years. At that time there were many advanced sages who were captivated by the beauty of Lord Ramachandra and who desired to become women in order to embrace the Lord. Later on, these sages appeared in Vrindavana when Krishna advented Himself there, and they were born as gopis, or girlfriends of Krishna. In this way they attained the perfection of spiritual life.

Temple photo books

Discover more

Hotel booking platform

Holy water gangajal bottles

Near temples guide

Lakshmi narayana swamy

Distance to Reach Temple:

By Train: 8.1 Kms from Nashik Railways Station.

By Bus: 4.5 kms from Nashik CBS Bus Stand.

By Flight: 18.8 kms from Nashik Airport.

Read more about Nashik Yatra

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालं तपोवन : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नाशिक नगरी. याच नाशिकमधील पंचवटी भागात तपोवन हे ठिकाण आहे. वनवास काळात प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता ह्याच तपोवनमध्ये अनेक वर्षे वास्तव्यास होते, असं पुराणात नमूद आहे. रामायणातील दंडकाअरण्य कांडचा मोठा भाग पंचवटीत घडला. लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक याच तपोवन परिसरात कापलं होतं. याच ठिकाणी रामाची कुटिया आहे. जिथं ते वास्तव्यास होते. आध्यात्मिक शांततेसाठी तपोवन आणि पंचवटी प्रसिद्ध आहे. इथं रामायणाशी संबंधित अनेक कथा आणि धार्मिक भावना जोडलेल्या आहेत. याचं भागात गोदावरी नदी आणि कपिल नदीचा संगम होतो. हा परिसर दाट झाडांनी व्यापला आहे. यात अनेक भव्य झाडं असून इथं अनेक औषधी वनस्पती आहेत. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं मानलं जाते. तपोवन या नावातच तप आणि वन आल्यानं देशभरातून येणारे साधू, महंतांच्या राहण्याची सोय तपोवन भागात केली जाते. मात्र प्रशासन साधूग्रामच्या नावाखाली येथील 1,800 झाडं तोडण्याचा घाट घालत असून याला पर्यावरण प्रेमींसह सर्वच नाशिककरांनी तीव्र विरोध करून आंदोलन उभं केलं आहे.

साधूग्रामसाठी नाशिककरांच्या श्वासावरच चालणार कुऱ्हाड?; (ETV Bharat Reporter)

तपोवनमधून नाशिकला मिळतो ऑक्सिजन : "तपोवन परिसरात वड, कडूलिंब, चिंच आणि जांभूळ यांसारखी भारतीय सावलीदार व परिसंस्थेसाठी महत्वाची वृक्षप्रजाती आहेत. तसंच औषधी वनस्पती या भागात आहेत. अनेक वृक्ष इतके जुने आणि मोठे आहेत की, त्यांना 'हेरिटेज ट्री' म्हणूनही घोषित करता येऊ शकतं. नाशिकला 25 टक्के ऑक्सिजन देणारे तपोवन हे ठिकाण आहे. या परिसरात 52 प्रकारचे पक्षी देखील आढळून आलेत. अशा वृक्षतोडीमुळं नाशिकच्या जलसाठ्यावर आणि हवेच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो," अशी भीती पर्यावरण प्रेमी अमित कुलकर्णी आणि भारती जाधव यांनी व्यक्त केली.

2017 पर्यत नो डेव्हलपमेंट झोन : "महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर साधूग्राममध्ये प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी 220 कोटींच्या निविदा मागवल्याचं स्पष्ट झालं. भविष्यातील दोन कुंभमेळ्यादरम्यान अतिक्रमण होऊ नये यासाठी हा प्रस्ताव आहे. मुळात महापालिकेचा हा प्रस्ताव नियमबाह्य आहे. तपोवन परिसरात 2017 पर्यंत ना विकास क्षेत्र अर्थात ‘नो डेव्हलपमेंट झोन’ होता. त्यानंतर महापालिकेनं 2017 मध्ये शहर विकास आराखड्यात हे क्षेत्र साधूग्राम म्हणून दाखवलं. त्याच ठिकाणी आता भारत मंडपम म्हणजेच प्रदर्शन केंद्र साकारण्यात येणार याला आमचा विरोध आहे," असं याचिकाकर्ते नितीन पंडित यांनी सांगितलं.

Nashik Tapovan tree felling

तपोवन, नाशिक

तपोवन नाशिक - तपोवन नासिक

प्रमुख मुद्दे

◉ १४ वर्षांच्या बनवास वनवासात भगवान श्री राम या ठिकाणी राहिले.
◉ कपिला आणि गोदावरी नदीच्या संगमाचे केंद्रबिंदू.
अधिक जाणून घ्या
द ज्यूस फार्म (तपोवन, नाशिक)
तपोवन नाशिक
गोदावरी

नाशिक शहरात, तपोवन हे कपिला आणि गोदावरी या दोन नद्यांचे संगमस्थान आहे. भगवान श्रीराम, माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांनी सर्वाधिक चौदा वर्षे वनवास भोगला होता.

वेळ

उघडा बंद करण्याची वेळ
प्रत्येक स्थान का अलग-अलग समय
उत्सव
राम नवमी , जन्माष्टमी , कुंभ | हे देखील वाचा: एकादशी

तपोवन नासिक हिंदी में पढ़ें

नासिक शहरामध्ये तपोवन, कपिला व गोदावरी नदीचे संगम स्थान- आसपास का ते क्षेत्र आहे, जेथे भगवान राम, माता सीता आणि भाई लक्ष्मण ने चौदह वर्षाच्या वनवासाचे सर्वोत्कृष्ट विचरण केले.

फोटो गॅलरी

पूर्ण दृश्यात फोटो
श्री लक्ष्मणजी मंदिर, जिथे त्यांची सुपनखानशी भेट होते.

श्री लक्ष्मणजी मंदिर, जिथे त्यांची सुपनखानशी भेट होते.

गोदावरी आणि कपिला या दोन नद्यांचे संगम स्थान

गोदावरी आणि कपिला या दोन नद्यांचे संगम स्थान

अधिक जाणून घ्या
नाशिक
भक्ती भारत
भक्तीभारत
तपोवनाचे केंद्रबिंदू, जिथे माता सीता नियमितपणे येतात.

तपोवनाचे केंद्रबिंदू, जिथे माता सीता नियमितपणे येतात.

श्री लांबे हनुमान मंदिर

श्री लांबे हनुमान मंदिर

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक

श्री महालक्ष्मी मंदिर

श्री महालक्ष्मी मंदिर

श्री लक्ष्मणजी मंदिर, मुख्य प्रार्थना कक्ष
अधिक जाणून घ्या
नाशिक
भक्तीभारत
आरती संग्रह पुस्तक

श्री लक्ष्मणजी मंदिर, मुख्य प्रार्थना कक्ष

पिंपळ आणि वटवृक्ष असलेले श्री लक्ष्मणजी मंदिर
अधिक जाणून घ्या
नासिक
गोदावरी नदी
गोदावरी नदी

पिंपळ आणि वटवृक्ष असलेले श्री लक्ष्मणजी मंदिर

पिंपळ आणि वटवृक्ष असलेले श्री लक्ष्मणजी मंदिर

पिंपळ आणि वटवृक्ष असलेले श्री लक्ष्मणजी मंदिर

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक
अधिक जाणून घ्या
मंत्र जाप माला
कृष्ण कथा
मंदिर दर्शन यात्रा

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक
अधिक जाणून घ्या
चालीसा पाठ संग्रह
भक्ति ॲप विकास
योग ध्यान पढें

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक

तपोवन नाशिक
अधिक जाणून घ्या
धार्मिक वस्त्र
धार्मिक कॅलेंडर
मंदिर वास्तुकला मार्गदर्शक

तपोवन नाशिक

माहिती

www-myyatradiary-com.translate.goog

Other Places to visit in Nashik - Tapovan

Arti

तपोवन हा एक असा प्रदेश आहे जो भगवान रामाच्या वनवासात त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वादित झाला होता . नंतर भिक्षू आणि ऋषींनी त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठी याचा वापर केला. तपोवनचा शब्दशः अर्थ ध्यान आणि तपश्चर्येसाठी जंगल असा होतो .

तपोवन येथील राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती

[तपोवन येथील राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती]

हिरवळीच्या मध्ये नदी आणि खडकांचा सुंदर परिसर

[हिरव्यागार प्रदेशात नदी आणि खडकांचे सुंदर वातावरण]

हिरवळीच्या मध्ये वसलेले, हे ठिकाण छान, शांत आणि मऊ वाहणारे झरे आणि खडकांसह एक निसर्गरम्य ठिकाण आहे. मला खडकांवर बसून येथे शांत वेळ घालवायला आवडते.

तपोवन येथील कपिला आणि गोदावरी नद्यांचा संगम

[तपोवन येथे कपिला आणि गोदावरी नद्यांचा संगम]

एक कपिल तीर्थ आहे जिथे ऋषींनी ध्यान केले असे मानले जाते.

कपिलतीर्थ जेथे कपिल ऋषींनी ध्यान केले - तपोवन, नाशिक

[ कपिलतीर्थ ]

मार्गदर्शकाच्या मते, ब्रह्मतीर्थ, शिवतीर्थ आणि विष्णूतीर्थ म्हणून ओळखले जाणारे ३ कुंड आहेत . ते तळाशी अरुंद मार्गांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. अग्नितीर्थ म्हणून ओळखले जाणारे आणखी एक कुंड आहे जे त्याने सांगितले की खूप खोल आहे आणि ते ते ठिकाण आहे जिथे भगवान रामाने खऱ्या सीतेला लपवले होते आणि सावली सीतेला स्वतःजवळ ठेवले होते, ज्याला नंतर रावणाने सीता गुंफातून पळवून नेले होते , जे आधीच्या पोस्टमध्ये दिसते.

विविध कुंड - ब्रह्मतीर्थ, शिवतीर्थ, विष्णुतीर्थ आणि अग्नितीर्थ तपोवन - नाशिक

[विविध कुंड - ब्रह्मतीर्थ, शिवतीर्थ, विष्णुतीर्थ आणि अग्नितीर्थ]

तपोवनच्या अगदी पलीकडे पर्णकुटी आहे असे मानले जाते की ते भगवान रामाचे झोपडी आहे.

वनवासात भगवान राम जिथे राहिले होते असे म्हटले जाते ते पर्णकुटी मंदिर

[ पर्णकुटी मंदिर ]

काही पावले पुढे गेल्यावर तुम्हाला देशातील एकमेव मंदिर दिसेल जे भगवान रामाचे भाऊ लक्ष्मण यांचे आहे .

भगवान लक्ष्मण यांचे मंदिर जिथे त्यांनी ध्यान केले - तपोवन, नाशिक

[ लक्ष्मणाचे मंदिर ]

ज्या ठिकाणी लक्ष्मणाने सुपरनाखाचे नाक कापले ते ठिकाण - तपोवन, नाशिक

[लक्ष्मणाने सुपर्णखेचे नाक कापले ते ठिकाण]

लक्ष्मणाने रावणाचा पुत्र मेघनाद याला मारण्यासाठी येथे १२ वर्षे तप केले, म्हणूनच या ठिकाणाचे नाव तपोवन पडले. याच ठिकाणी त्याने रावणाची बहीण सुपर्णखा हिचे नाक कापून गोदावरी नदीच्या पलीकडे फेकल्याचेही म्हटले जाते . त्यामुळे या शहराचे नाव नाशिक पडले, ज्याचा अर्थ नाक असा होतो.

जवळच भगवान हनुमानाची स्वयंभू (स्वतः प्रकट) मूर्ती आणि लक्ष्मणाच्या रूपात अवतार घेतलेल्या भगवान विष्णूचे आसन असलेल्या सर्प शेषनागाचे मंदिर आहे .

भगवान हनुमानाची स्वयंभू मूर्ती

[हनुमानाची मूर्ती]

लक्ष्मण अवतार घेतलेल्या भगवान विष्णूचे आसन असलेले सर्प शेषनागाचे मंदिर

[ शेषनाग मंदिर ]

नाशिकमधील इतर काही मंदिरांबद्दल वाचण्यासाठी खालील लिंक्सवर जा:-

काळाराम मंदिर, गोराराम मंदिर आणि पंचवटी बद्दल वाचण्यासाठी - येथे क्लिक करा.

सुंदरनारायण मंदिर, मुक्तिधाम मंदिर आणि नाशिकमधील इतर मंदिरांबद्दल वाचण्यासाठी - येथे क्लिक करा.

https://www-myyatradiary-com.translate.goog/2011/01/other-places-to-visit-in-nashik-tapovan.html?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc

Ancient Shiva Temple To Visit in Nashik: Naroshankar Temple

Arti

नाशिक हे भारतातील एक तीर्थक्षेत्र आहे जिथे आपल्या हिंदू पुराणातील रामायणातील असंख्य कथा कोरल्या आहेत. नाशिकमधील विविध देवी-देवतांना समर्पित असंख्य प्राचीन मंदिरांमध्ये या पुराणकथांचा प्रतिध्वनी आढळतो - त्यापैकी पंचवटी परिसरातील भगवान रामाचे काळाराम मंदिर , तपोवन , रामघाट, भगवद्गीतेच्या अध्यायांनी सजवलेले मुक्तिधाम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग  ( महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक , भगवान शिवाला समर्पित कपिलेश्वर मंदिर) हे अधिक प्रसिद्ध आहेत.

नाशिक गोदावरी नदीकडे दिसणारे नारोशंकर मंदिर

दरवर्षी, लाखो भाविक नाशिकच्या या प्रसिद्ध मंदिरांमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी गर्दी करतात. त्याच्या प्रसिद्ध मंदिरांच्या सावलीत उभे असलेले आणखी एक अतिशय जुने, सुंदर आणि ऐतिहासिकदृष्ट्या प्रमुख आणि काहीसे कमी भेट देणारे भगवान शिव यांना समर्पित मंदिर आहे - नारोशंकर मंदिर.

नरोशंकर मंदिर - एक प्रचंड कांस्य घंटा.

१७०६ ते १७७५ या काळात पेशवे राजवटीत एक शूर सैनिक सरदार नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी १७४७ मध्ये बांधलेले हे नारोशंकर मंदिर आज गोदावरी नदीच्या काठावर उभे आहे आणि येथे अनेक भाविक आणि भाविक येतात.

नाशिकच्या नारोशंकर मंदिरात प्रचंड कांस्य घंटा

मंदिराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वारावर एक घंटाघर आहे, ज्यामध्ये गोदावरी नदीच्या दिशेने दिसणाऱ्या ११ फूट उंच मंदिराच्या दर्शनी भागावर एक प्रचंड कांस्य घंटा लटकलेली आहे. ही घंटा एक महत्त्वाची राजकीय स्मृतिचिन्ह आहे जी श्रीमंत पेशवे बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने बसेनमधील पोर्तुगीज घुसखोरीचा पराभव केल्यानंतर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील वसई किल्ल्यावरून आणण्यात आली होती. ही घंटा हत्तीच्या गळ्यात लटकवून आणण्यात आली होती आणि नंतर पोर्तुगीजांवर मराठ्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी नारोशंकर यांना बक्षीस म्हणून सादर करण्यात आली.

नरोशंकर मंदिर वास्तुकला

घंटागाडी ओलांडून चालत जा आणि तुम्ही १८ व्या शतकातील या सुंदर मंदिर संकुलात प्रवेश करता, ज्याची वास्तुकला खूपच असामान्य आहे आणि 'माया' शैलीच्या स्थापत्यशैलीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. मंदिराच्या डिझाइन आणि अंमलबजावणीमध्ये तुम्हाला गुजरात आणि राजपुताना शैलीचा बराचसा वास्तुशिल्पीय प्रभाव दिसून येतो.

नारोशंकर मंदिर नाशिकचे शिखर किंवा शिखर

काळ्या दगडात बनवलेले हे मंदिर उंच व्यासपीठावर वसलेले आहे आणि बाहेरील भिंतींवर उत्कृष्ट शिल्पे आणि प्रभावी कोरीवकाम आहे. मुख्य आणि दुय्यम मंदिराचे शिखर अलंकृत आहेत आणि सिंह, हत्ती, झाडे आणि पक्षी यांसारख्या प्राण्यांच्या आकृत्या दर्शवितात.

अलंकृत नक्षीकाम नारोशंकर मंदिर नाशिक

मंदिराच्या भेगांमध्ये इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी वाढणारी तपकिरी झुडपे वास्तुकलेची शोभा आणि संरचनेची खडबडीतपणा वाढवतात, ज्यावर दुपारचा सूर्य पडतो आणि तेजस्वी रंगात परत येतो; मंदिराचा दर्शनी भाग काळानुरूप रंगलेला असतो.

प्राचीन नारोशंकर मंदिर नाशिक

आतील बाजूस, सभामंडप उत्तर भारतीय स्थापत्य शैलीचे प्रदर्शन करतो आणि सुंदर आकृतिबंध सजवतो तसेच स्तंभ, उपशिखर आणि मंदिराच्या भिंतींवर कथा आणि पुराणिक कला पसरवल्या जातात. त्याचे स्वरूप हेमाडपंथी शैलीने प्रभावित आहे.

भगवान शिव महाकाल!

मी जेव्हा गर्भगृहात प्रवेश करतो तेव्हा तिथे कोणीही नसते . मी आतल्या खोलीत असलेल्या भगवान शिवाची प्रार्थना करतो तर नंदी त्याच्या स्वामींचे रक्षण करतो, जो समोर बसलेला असतो, काही अंतरावर.

नंदी बैल नारोशंकर मंदिर नाशिक

भगवान शिव हे महाकाल आहेत, जो काळाच्या किंवा काळाच्या पडद्यांच्या पलीकडे आहे आणि नारोशंकर मंदिर हे एक मंदिर आहे जिथे हा संदेश मोठ्याने आणि स्पष्टपणे बाहेर पडतो. मी मंदिराच्या परिसरात फिरत असताना, मंदिराच्या बाहेरील भिंतीवर गुंडाळलेल्या नागाचे किंवा अक्षय नागाचे कोरीवकाम माझे लक्ष वेधून घेते. मी यापूर्वी भेट दिलेल्या असंख्य शिवमंदिरांपैकी कोणत्याही मंदिरात असे काहीही पाहिले नाही आणि ते माझे विचार जीवन (आणि मृत्यू) कडे भटकायला लावते... आपण ज्या अंतहीन चक्रात फिरतो आणि त्यामागील मुख्य उद्देश.

KAAL किंवा नागाचे नक्षीकाम केलेले नारोशंकर मंदिर नाशिक

प्रवेशद्वारावरील घंटाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कमानीच्या छत्र्यांमध्ये राजपुतानाच्या स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून येतो . खाली वाहणाऱ्या गोदावरी नदीसह भव्य कमानींनी बनलेली ही महाकाय घंटा आणि वर निळ्या आकाशाचा विरोधाभास - नारोशंकर मंदिर खरोखरच एक प्रभावी उपस्थिती दर्शवते.

नाशिकमधील प्राचीन शिवमंदिराला नक्कीच भेट द्यावी!

मंदिराच्या वेळा, पूजा आणि दर्शनाची माहिती

हे मंदिर आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ०७:०० ते रात्री ०८:०० पर्यंत खुले असते.

काळाराम मंदीर

Kalaram Mandir

काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

खंडोबा मंदीर

Khandoba Temple Deolali

हे मंदिर देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर वसलेले आहे.भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्ष जुने आहे.पौराणिक कथेनुसार मल्ल दैत्य व मणी दैत्य या दोन राक्षस बंधुशी मंदिर संबधित आहे. या दोन्ही दैत्यांनी भगवान शिवाची आराधना करुन त्यांना भुतलावर कोणीही मारु शकणार नाही, असा वर प्राप्त करुन घेतला वर प्राप्ती नंतर संत, ऋषी व निरपराध लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली.भगवान शिवाने श्री खंडोबाचा अवतार घेऊन या दोनही दैत्यांचा वध केल्यानंतर भगवान शिव या टेकडीवर विश्रामासाठी आले, म्हणुन या मंदीरास ‘विश्रामगड’ असे देखील म्हटले जाते. या टेकडीला ‘खंडोबाची टेकडी ’असे देखील म्हणतात

बालाजी मंदीर

Balaji Temple

जुन्या नाशिक शहरात गोदावरी नदी काठी जुने बालाजी मंदीर तर गंगापुर रोड जवळ सोमेश्वर मंदीरा जवळ नवीन बालाजी मंदीर आहे.श्री बालाजींच्या कृपेने प्रतिकुल ग्रहदशेत सरंक्षण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.

धर्मचक्र प्रभाव तिर्थ विल्होळी

Dhammachakra Prabha Tirth

हे स्थळ नाशिक शहरापासुन 12 कि.मि. अंतरावर मुंबईच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वर विल्होळी गाव येथे स्थित आहे.

पवित्र त्रिलोकनाथ मंदिर तीन मजली आहे. मंदीरा बाहेर सिध्दाचल ,अबु, गिरणार व सामेतशिखर यांच्या प्रतिकृती आहेत. तळमजल्यावर भगवान महावीरांची 12 फुट उंचीची मुर्ती आहे.मुर्तीच्या भोवती चार मुलनायक आहेत. मंदीरातील भगवान पाश्वर्नाथांची मुर्ती अतिशय देखणी असुन अष्टपथ महातिर्थ यांची देखील मुर्ती मंदीरात स्थापित आहे.

तपोवन

Tapowan

तपोवन म्हणजे ‘’तपस्वी लोकांचे वन’’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे.

तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता.रामायण या महाकाव्याशी हया निसर्गरम्य ठिकाणाचा संबध असुन वनवासा दरम्यान प्रभु राम,लक्ष्मण,सिता या ठिकाणची फळे ग्रहण करत होते.या ठिकाणीच रावणाची बहिण शुर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापले, यामुळे ‘’नाशिक’’ हे नाव पडले असे देखील म्हटले जाते.या पवित्र परिसरात रामपर्णकुटी,लक्ष्मीनारायण मंदिर,जनार्दनस्वामी मंदीर,अशी मंदिरे आहेत.सिंहस्थ कुंभमेळया दरम्यान हया ठिकाणी साधुंचे वास्तव्य असते..

कैलास मठ

हा आश्रम नाशिक येथील पंचवटी भागात स्थित असुन यास ‘’भक्तीधाम ‘’असे देखील म्हणले जाते.या ठिकाणी विविध देवतांची मंदीरे आहेत.

“कैलास मठ” हा जुना आश्रम असुन या ठिकाणी वेद शिकविले जातात. परमपुज्य स्वामी हदयानंद महाराज यांनी सन 1920 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. सदयस्थितीत आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंदजी स्वरस्वती येथील प्रमुख आहेत. श्रावण महिन्यात तेथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.

मुक्तिधाम

Mukti Dhamमुक्तीधाम हे नाशिक शहरात नाशिकरोड रेल्वेस्टेश्नजवळ स्थित आहे.या मंदीराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केले आहे. या मंदीराचा श्वेतरंग पवित्रता व शांतीचा संदेश देतो. येथे 12 ज्योर्तिलिंगाची प्रतिकृती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदीराच्या भिंतीवर गितेचे 18 अध्याय कोरलेले आहेत.

पंचवटी

Panchvati Godavari River

नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.

काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला ‘’पश्चिम भारताची काशी ‘’असे म्हटले जाते.

सितागुंफा

Sitagumpha

नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासुन 3 कि.मी.अंतरावर पंचवटीत सितागुंफा स्थित आहे.

वनवासा दरम्यान माता सिता येथे रहात होत्या असे म्हटले जाते.पहिल्या मुख्य गुंफेत राम,सिता व लक्ष्मण यांच्या मुर्ती असुन, दुस-या लहान गुंफेत शिवलींग आहे.माता सिता भगवान शिवाची आराधना केल्या शिवाय अन्न्‍ग्रहण करत नसल्याने त्यांचे सोईसाठी हे शिवलींग स्थापित करण्यात आले असे म्हटले जाते. या ठिकाणावरुन रावणाने भिका-याच्या वेषात सिताहरण केले.सितागुंफे समोर रामायणातील मारिच वध,सिताहरण असे देखावे लावण्यात आलेले आहेत.

श्री सोमेश्वर मंदीर

Someshwar Templeहे मंदीर नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापुर रस्त्यावर आहे.गोदावरी तीरी असलेल्या हया मंदिरात भगवान शिव व हुनुमानाची मुर्ती असुन परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे.दर्शनांनतर नदीत बोटिंग व पोहण्याचा आनंद घेता येतो. सोमेश्वर हे चित्रपटांच्या शुटींगसाठी देखील प्रसिध्द आहे.सोमेश्वरला जातांना ‘’आनंदवल्ली’’ नावाचा परिसर लागतो.या परिसराचे नांव पेशवे राघोबादादा यांचे पत्नी आनंदीबाई यांचेमुळे ठेवण्यात आले आहे.त्यांचा हया ठिकाणी काही काळ निवास होता. त्यांनी आनंदवल्ली येथे गोदावरी तिरावर नवश्यागणपतीचे आकर्षक मंदिर बांधले आहे.

गंगा गोदावरी मंदीर

Ganga Godavari Mandir

हे मंदीर रामकुंडा जवळ आहे.

हे मंदीर सन 1775 मध्ये श्रीमती गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले होते. या मंदीरात गोदावरी व भगीरथ देवांच्या मुर्ती आहेत.

हे मंदीर कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी 12 वर्षातुन एकदा उघडले जाते आणि सिंहस्थ कालावधीत 13 महिने उघडे असते. इतर 11 वर्ष हे मंदीर बंद असते.

रामकुंड

Ramkund Nashik

रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.

वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.

nashikar.com

गोदावरी मंदिर माझ नाशिक


गोदावरी मंदिर हे नाशिक शहरातील पंचवटी भागातील एक महत्त्वाचे आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर विशेषतः गोदावरी नदीच्या महत्त्वामुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे ओळखले जाते. या मंदिराचे काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

मंदिराचा इतिहास:
गोदावरी मंदिराचे निर्माण प्राचीन काळात झाले असल्याचे उल्लेख आढळतात. गोदावरी नदीला दक्षिण गंगेचे महत्त्व असून, या नदीच्या तीरावर अनेक संत-महात्म्यांनी तपश्चर्या केली आहे. असे मानले जाते की, या ठिकाणीच महर्षी गौतम यांनी प्रायश्चित्तासाठी कठोर तपस्या केली आणि त्यामुळे गोदावरी नदी प्रकट झाली. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक वातावरण निर्माण झाले आणि मंदिराची उभारणी करण्यात आली.

वास्तुकला:
गोदावरी मंदिराची वास्तुकला अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. हे मंदिर प्राचीन शिल्पकलेच्या अनोख्या नमुन्यांपैकी एक आहे. मंदिराच्या भिंतींवर विविध कोरीव नक्षीकाम दिसून येते. मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मंदिरेही आहेत, जी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात. गोदावरी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर भाविकांसाठी एक शांत आणि पवित्र स्थळ आहे.

महत्त्वाचे उत्सव:
गोदावरी मंदिरात अनेक धार्मिक सण आणि उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. त्यामध्ये कुंभमेळा हा सर्वात महत्त्वाचा सोहळा आहे. दर १२ वर्षांनी नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात लाखो भाविक गोदावरी नदीत स्नान करून पवित्र गोदावरी मंदिराचे दर्शन घेतात. याशिवाय महाशिवरात्री, कार्तिक एकादशी, रामनवमी आणि गंगा दशहरा यांसारखे उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.

सामाजिक दृष्टीकोन:
गोदावरी मंदिर हे धार्मिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. अनेक संत-महात्मे आणि साधू-संत या ठिकाणी सतत प्रवास करत असतात आणि धार्मिक उपदेश देतात. येथे गोरगरीबांना अन्नदान, धार्मिक प्रवचने आणि विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

स्थळाची माहिती:
गोदावरी मंदिर नाशिक शहराच्या पंचवटी भागात, गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. पंचवटी हा भाग धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण येथे अनेक पवित्र मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. मंदिराच्या जवळच सीतागुफा, काळाराम मंदिर, नारोशंकर मंदिर आणि रामकुंड यांसारखी ठिकाणेही आहेत, जी पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.

प्रबोधन:
गोदावरी मंदिराच्या परिसरात नियमितपणे धार्मिक प्रवचन, भजन, कीर्तन आणि यज्ञ यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिराच्या पवित्र परिसरात येऊन भक्तांना अध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळतो.
गोदावरी मंदिर हे नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. मंदिराच्या शांत आणि पवित्र वातावरणामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक समाधान मिळते. त्यामुळे हे मंदिर नाशिकमधील अवश्य भेट द्यावे असे स्थळ आहे.

दुतोंड्या मारुती

नाशिक शहर हे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांनी समृद्ध आहे. पंचवटी भागातील अनेक मंदिरांमध्ये “दुतोंड्या मारुती” हे एक अनोखे आणि श्रद्धेचे केंद्र असलेले मंदिर आहे. या मंदिरातील मारुतीची मूर्ती केवळ भक्तीचा केंद्रबिंदू नाही, तर तिच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमीही खूप रोचक आहे.

दुतोंड्या मारुतीची भव्य मूर्ती आणि तिचे महत्त्व:
दुतोंड्या मारुतीची भव्य आणि आकर्षक मूर्ती हे नाशिक शहराचे भूषण आहे. ही मूर्ती एक विशेष वैशिष्ट्य असलेली आहे, कारण तिचे दोन्ही बाजूंना चेहरे आहेत. ही मूर्ती अकरा फूट उंच असून, तिच्या निर्मितीमागे एक ऐतिहासिक आणि रोमहर्षक कथा आहे.

पूर्वी येथे असलेली मारुतीची मूर्ती केवळ साडेपाच फूट उंचीची होती. परंतु १९३९ मध्ये नाशिक शहराला भयानक पुराचा फटका बसला. या महापुरात गोदावरी नदीच्या पाण्याने संपूर्ण पंचवटी परिसर व्यापला होता. नारोशंकराच्या घंटेला पाणी लागले होते आणि सरकारवाड्याच्या तेरा पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. याच पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीलाही हानी पोहोचली.
पुरानंतर नाशिकमधील व्यायामप्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ठरविले की येथे अधिक भव्य आणि उंच मारुतीची मूर्ती उभारली जावी. हा निर्णय घेण्यामागे भक्तीबरोबरच एक ऐतिहासिक संदेश होता – संकटे येऊ शकतात, परंतु श्रद्धा आणि सामूहिक प्रयत्न यामुळे त्यावर मात करता येते.

मूर्ती निर्मितीचा प्रवास:
त्या काळात नाशिक शहरात पाथरवट समाज मूर्ती घडविण्याच्या कलेत पारंगत होता. त्यामुळे मूर्तीसाठी आबाजी दादाजी भोईर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ही मूर्ती बनवण्याचे कबूल केले, मात्र त्यासाठी अकरा फूट उंच दगड आणून देण्याची विनंती केली. हा दगड शोधणे आणि आणणे हे मोठे आव्हान होते.
पुढे काही कारणास्तव आबाजी भोईर यांच्यासोबतचा व्यवहार फिसकटला आणि मग नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार शंकर बलदेव परदेशी यांना हे काम देण्यात आले. परदेशी हे सिमेंटच्या मूर्ती बनविण्यात निष्णात होते. परंतु त्यांच्या लहरी स्वभावामुळे मूर्तीच्या कामात बराच विलंब झाला.
त्यामुळे अखेर हे काम त्यांच्याकडून काढून नथुराम दादाजी भोईर यांच्याकडे सोपविण्यात आले. नथुराम भोईर यांनी हे काम अत्यंत निष्ठेने पूर्ण केले आणि अखेर १९४२ साली या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मूर्तीची वैशिष्ट्ये:
ही मूर्ती दोन वेगवेगळ्या मूर्तिकारांनी तयार केली आहे. मूर्तीच्या पूर्वेकडील चेहरा शंकर बलदेव परदेशी यांच्या हातचा आहे, तर पश्चिमेकडील चेहरा नथुराम भोईर यांनी घडवला आहे. या मूर्तीची उंची ११ फूट आहे आणि ती सिमेंटपासून बनविण्यात आली आहे.
दुतोंड्या मारुतीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना चेहरे आहेत. त्यामुळे भाविकांना मारुतीचे दर्शन कुठल्याही बाजूने सहज मिळते. अशा प्रकारची मूर्ती विरळाच आढळते, त्यामुळे ती पाहण्यासाठी अनेक भक्त येथे येतात.

मंदिराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
दुतोंड्या मारुती मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर नाशिकच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. येथे हनुमान जयंती, रामनवमी, तसेच इतर अनेक धार्मिक सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. विशेषतः शनिवारी येथे मोठ्या संख्येने भक्त येतात आणि मारुतीरायाच्या कृपेची अनुभूती घेतात.
या मंदिराच्या परिसरात अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. स्थानिक व्यायामशाळा आणि अखाड्यांचे येथे नियमित कार्यक्रम होतात, कारण मारुती हा बलाचा आणि पराक्रमाचा देव मानला जातो.
दुतोंड्या मारुती मंदिर हे नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक अनमोल ठेवा आहे. १९३९ च्या महापुरानंतर येथील लोकांनी श्रद्धेने आणि मेहनतीने उभारलेली ही भव्य मूर्ती आजही नाशिकच्या भक्तांसाठी प्रेरणादायी आहे.
मूर्तीच्या दोन्ही बाजूंना चेहरे असल्याने तिचे वैशिष्ट्य अधिकच वाढते आणि त्यामुळे ती एक अनोखे आकर्षण ठरते. प्रत्येकाने या पवित्र स्थळाला एकदा तरी भेट द्यावी आणि दुतोंड्या मारुतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

सुंदरनारायण मंदिर

सुंदरनारायण मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी भागात स्थित एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या सुंदरनारायण रूपासाठी ओळखले जाते आणि त्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांमुळे भाविकांचे आकर्षण केंद्र आहे.

मंदिराचा इतिहास:
सुंदरनारायण मंदिराचे बांधकाम इ.स. 1756 मध्ये गंगाधर यशवंतराव यांनी केले. हे मंदिर पेशव्यांच्या काळातील महत्त्वाच्या धार्मिक स्थापत्यकलेपैकी एक मानले जाते. मंदिराच्या नावामागील कथा अशी आहे की, एका राक्षसाने या भागातील पाण्याला दूषित केले होते, त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ लागला. त्यावेळी भगवान विष्णूंनी सुंदरनारायण रूप धारण करून त्या राक्षसाचा संहार केला आणि पुन्हा पाण्याला शुद्ध केले. त्यामुळे हे मंदिर सुंदरनारायण नावाने प्रसिद्ध झाले.

वास्तुकला:
सुंदरनारायण मंदिर नागर शैलीत बांधले गेले आहे आणि त्याची रचना अतिशय सुंदर व आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभांवर कोरीव काम आढळते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांच्या अत्यंत सुंदर आणि कलात्मक मूर्ती आहेत. मंदिरातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्थापत्यशास्त्र, जे सूर्योदयाच्या वेळी विशेष महत्त्व प्राप्त करते.

सूर्यप्रकाशाचे वैशिष्ट्य:
सुंदरनारायण मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी (धुलीवंदन) पहाटेच्या वेळी सूर्योदयाच्या सुमारास सूर्यकिरण थेट मंदिरातील मूर्तींवर पडतात. हे दृश्य अत्यंत अद्भुत आणि भक्तांसाठी भक्तीभाव वाढवणारे असते.

महत्वाचे उत्सव:
सुंदरनारायण मंदिरात विविध धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. यामध्ये विशेषतः:
रामनवमी – या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि भजन आयोजित केले जातात.
कृष्ण जन्माष्टमी – भगवान विष्णूच्या अवताराच्या सन्मानार्थ मोठा उत्सव होतो.
एकादशी – विशेषतः कार्तिकी आणि आषाढी एकादशीला येथे मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात.
होळी व धुलीवंदन – या दिवशी होणारे सूर्यप्रकाशाचे दर्शन हा एक विशेष धार्मिक प्रसंग असतो.

सामाजिक दृष्टीकोन:
सुंदरनारायण मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. हे मंदिर पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी एक पवित्र स्थळ आहे. पंचवटी भागातील हे एक प्रमुख आकर्षण असून, त्याला भेट देणारे भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात. मंदिर परिसर स्वच्छ आणि भक्तांसाठी अनुकूल आहे.

स्थळाची माहिती:
सुंदरनारायण मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात, गोदावरी नदीच्या किनारी वसलेले आहे. पंचवटी हा भाग धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि पवित्र स्थळे आहेत.

प्रबोधन:
मंदिराच्या परिसरात नियमितपणे धार्मिक प्रवचने, भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक उपक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे.

निष्कर्ष:
सुंदरनारायण मंदिर हे नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याची वास्तुकला, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सूर्यप्रकाशाचे वैशिष्ट्य यामुळे हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. भाविकांसाठी हे एक आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व असलेले स्थान आहे.

श्री सिद्धेश्वर मंदिर, पंचवटी, नाशिक​

नाशिकच्या पंचवटी परिसरात वसलेले श्री सिद्धेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र शिवमंदिर आहे. घारपुरे घाटाजवळ, रामवाडी पुलाच्या कोपऱ्यावर नदीत बांधलेले एक पुरातन शंकराचे मंदिर आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.​

मंदिराचा इतिहास
श्री सिद्धेश्वर मंदिराची स्थापना नेमकी केव्हा झाली याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही, परंतु स्थानिक समजुतीनुसार हे मंदिर अनेक शतकांपूर्वी बांधले गेले आहे. पंचवटी हे रामायण काळातील एक महत्त्वाचे स्थान असून, भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात येथे वास्तव्य केले होते. या परिसरातील अनेक मंदिरे त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत.​

स्थापत्यशैली आणि वैशिष्ट्ये
श्री सिद्धेश्वर मंदिराचे स्थापत्य पारंपरिक भारतीय मंदिरशैलीत आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे, ज्यावर दररोज अभिषेक आणि पूजा केली जाते. मंदिराच्या आवारात नंदीची मूर्ती आहे, जी भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवर कोरीव काम केलेले आहे, जे प्राचीन शिल्पकलेचे उदाहरण आहे.​ मंदिराच्या आवारात मारूती, शनी देव ह्यांच्या ही मुर्ती आहेत

धार्मिक विधी आणि उत्सव
नित्यपूजा: मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती आणि अभिषेक केले जातात.​
महाशिवरात्रि: या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेकाचे आयोजन केले जाते. भक्तगण रात्रीभर जागरण करतात आणि भगवान शिवाची आराधना करतात.​
श्रावण महिना: श्रावण महिन्यात दर सोमवारी विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात. भक्तगण उपवास करून मंदिरात दर्शनासाठी येतात.​

पर्यावरणीय सौंदर्य
मंदिराच्या परिसरात शांत आणि सात्त्विक वातावरण आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर स्थित असल्यामुळे, भक्तगण येथे ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी येतात. मंदिराच्या परिसरात वृक्षराजी आणि फुलझाडे आहेत, जे परिसराला अधिक सुंदर बनवतात.​

मंदिराची स्थानिक ओळख
श्री सिद्धेश्वर मंदिर पंचवटी परिसरातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. पंचवटी हे नाशिकमधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. श्री सिद्धेश्वर मंदिर त्यापैकी एक असून, भक्तगण येथे नियमितपणे दर्शनासाठी येतात.​

निष्कर्ष
श्री सिद्धेश्वर मंदिर, पंचवटी, नाशिक हे श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या मंदिराने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचे योगदान दिले आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीपासून ते धार्मिक कार्यक्रमांपर्यंत, प्रत्येक बाबतीत हे मंदिर विशेष आहे. नाशिकला भेट देताना या मंदिराला अवश्य भेट द्या आणि त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घ्या.

श्री एकमुखी दत्त मंदिर, पंचवटी, नाशिक.

पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिकला ओळखले जाते. नाशिक मध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात गोदावरी नदीच्या किनारी वसलेले श्री एकमुखी दत्त मंदिर हे एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराला “प्रति गाणगापूर” असेही संबोधले जाते, कारण येथे श्री दत्तात्रेयाची एकमुखी मूर्ती आहे, जी अत्यंत दुर्मिळ मानली जाते.​ शेकडो नाशिककरांच श्रध्दास्थान हे मंदिर आहे. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

मंदिराचा इतिहास
या मंदिराचा इतिहास सुमारे ३५० वर्षांपूर्वीचा आहे. नाशिकचे सुप्रसिद्ध दत्त भक्त सद्गुरु बर्वे महाराज यांना स्वप्नात दत्तात्रेयांचे दर्शन झाले. त्यांच्या स्वप्नानुसार, ते गोदावरी नदीत स्नानासाठी गेले असता, त्यांच्या हातात शालूकामय (कमळाच्या देठासारखी) एकमुखी दत्त मूर्ती आली. या मूर्तीची त्यांनी गोदावरी किनारी असलेल्या एका मठात स्थापना केली, ज्याचे पुढे भव्य मंदिरात रूपांतर झाले.​

धार्मिक महत्त्व
श्री एकमुखी दत्त मंदिर हे नाशिकमधील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः दत्त जयंतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. या दिवशी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात दररोज षोडशोपचार पूजन केले जाते आणि विशेष पूजा विधींचे आयोजन केले जाते.​

स्थापत्यशैली
मंदिराचे स्थापत्य पारंपरिक असून, त्यात दगडी बांधकाम आणि लाकडी कोरीव काम आढळते. मंदिर परिसर शांत आणि सात्त्विक वातावरणाने भरलेला आहे, ज्यामुळे भक्तगण ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी येथे येतात. मंदिराच्या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात.​

उत्सव आणि कार्यक्रम
दत्त जयंती: प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते.​
पालखी सोहळा: दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरातून पालखी सोहळा काढला जातो, ज्यात हजारो भाविक सहभागी होतात.​
अन्नदान: उत्सवाच्या काळात मंदिरात अन्नदानाचे आयोजन केले जाते, ज्यात हजारो भाविकांना प्रसाद दिला जातो.​

मंदिराची स्थानिक ओळख
श्री एकमुखी दत्त मंदिर हे नाशिककरांसाठी केवळ धार्मिक स्थळ नसून, एक सांस्कृतिक केंद्रही आहे. मंदिराच्या शांत आणि सात्त्विक वातावरणामुळे भक्तगण येथे ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी येतात. मंदिराच्या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात.​

निष्कर्ष
श्री एकमुखी दत्त मंदिर, पंचवटी – नाशिक हे श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या मंदिराने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचे योगदान दिले आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीपासून ते धार्मिक कार्यक्रमांपर्यंत, प्रत्येक बाबतीत हे मंदिर विशेष आहे. नाशिकला भेट देताना या मंदिराला अवश्य भेट द्या आणि त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घ्या.​

गणेश भक्त मंडळ श्री गणपती मंदिर, मेनरोड, नाशिक

नाशिक शहरातील मेनरोडवर वसलेले गणेश भक्त मंडळ श्री गणपती मंदिर हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. या मंदिराची स्थापना इ.स. १८९१ साली झाली असून, त्याला १३२ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे.

मंदिराचा इतिहास आणि स्थापत्य
मेनरोडवरील हे मंदिर लाकडी बांधकामाचे असून, दोन मजली रचनेत मध्यभागी एक चौक आहे. मंदिराच्या दर्शनी फलकावर शके १८१३ (इ.स. १८९१) वैशाख शुद्ध त्रयोदशीला मंदिराची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे.

शास्त्रीय संगीताची परंपरा
या मंदिराची खासियत म्हणजे शास्त्रीय संगीताची अखंड परंपरा. दर गुरुवारी येथे शास्त्रीय संगीताच्या मैफिली आयोजित केल्या जातात. गणेशोत्सव आणि माघी गणेश जन्मोत्सवाच्या काळात पाच दिवसांचे विशेष संगीत महोत्सव आयोजित केले जातात.

धार्मिक विधी आणि पूजापद्धती
मंदिरात दररोज षोडशोपचार पूजन केले जाते. विशेषतः विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि एकादशीच्या दिवशी विशेष पूजांचे आयोजन केले जाते. मंदिराचे पुजारी श्री. सुहास काळे हे नियमित पूजेसाठी प्रसिद्ध आहेत.

मंदिर व्यवस्थापन
मंदिराचे व्यवस्थापन गणेश भक्त मंडळी ट्रस्टकडे आहे. सध्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सौ. उज्वला दीक्षित असून, सचिवपदी श्री. पुष्कराज कुलकर्णी कार्यरत आहेत.

सांस्कृतिक योगदान
या मंदिराने अनेक शास्त्रीय संगीतकार, गायक, वादक घडवले आहेत. मंदिरात दर गुरुवारी होणाऱ्या मैफिलींमुळे नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते.

मंदिराची स्थानिक ओळख
मेनरोडवरील हे मंदिर नाशिककरांसाठी केवळ धार्मिक स्थळ नसून, एक सांस्कृतिक केंद्रही आहे. मंदिराच्या शांत आणि सात्त्विक वातावरणामुळे भक्तगण येथे ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी येतात.

निष्कर्ष
गणेश भक्त मंडळ श्री गणपती मंदिर, मेनरोड – नाशिक हे श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या मंदिराने नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात मोलाचे योगदान दिले आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीपासून ते शास्त्रीय संगीताच्या परंपरेपर्यंत, प्रत्येक बाबतीत हे मंदिर विशेष आहे. नाशिकला भेट देताना या मंदिराला अवश्य भेट द्या आणि त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घ्या.

प्रभू श्रीराम शिल्प तपोवन, नाशिक.

नाशिकच्या तपोवन परिसरात उभारलेले प्रभू श्रीराम शिल्प हे महाराष्ट्रातील एक भव्य आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्मारक आहे. हे शिल्प नाशिकच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानले जाते.​

ऐतिहासिक पार्श्वभूमी
तपोवन हे रामायण काळातील एक महत्त्वाचे स्थान आहे. प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात येथे काही काळ वास्तव्य केले होते. या परिसरात शूर्पणखेचे नाक कापल्याचा प्रसंग घडल्याचेही सांगितले जाते. तसेच, गोदावरी आणि कपिला नद्यांचा संगमही याच ठिकाणी आहे, ज्यामुळे या स्थळाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते.​

शिल्पाची वैशिष्ट्ये
भगवान श्रीरामाची महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती नाशिक जिल्ह्यातील तपोवन येथे असून ती ७० फूट उंच आहे. या शिल्पाचा अनावरण सोहळा इस्कॉनचे श्री गौरांग प्रभुजी आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते १२ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाला. नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार श्री राहुलजी उत्तमराव ढिकले, यांच्या संकल्पनेतून ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.

उंची आणि रचना:
हे शिल्प सुमारे ७० फूट उंच आहे. या शिल्पाचे बांधकाम फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमर या आधुनिक साहित्याचा वापर करून करण्यात आले आहे, ज्यामुळे ते टिकाऊ आणि हवामान प्रतिरोधक आहे.​ शिल्पाची रचना पारंपरिक भारतीय स्थापत्यशैलीत असून, त्यावर कोरीव काम केलेले आहे. शिल्पात प्रभू श्रीराम धनुष्यबाणासह उभे आहेत, ज्यामुळे त्यांची वीरता आणि करुणा यांचे प्रतीकत्व दर्शविले जाते.​ शिल्पाच्या सभोवतालचा परिसर सुंदर उद्यानाने सजवलेला आहे, ज्यामध्ये फुलझाडे, पायवाटा आणि विश्रांतीसाठी जागा उपलब्ध आहे. या परिसरात रामायणातील विविध प्रसंगांचे चित्रण करणारे भित्तिचित्रे आणि शिल्पेही आहेत.​

स्थान आणि प्रवेश
प्रभू श्रीराम शिल्प नाशिक शहरातील तपोवन परिसरात स्थित आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. शहरातील विविध भागांमधून येथे पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध आहे.​

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
नाशिकच्या भूमीला प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचा पदस्पर्श लागला असल्याचे म्हटले जाते. नाशिक महानगरपालीकेने तपोवन मध्ये ५ एकर जागेत भव्य रामसृष्टी उद्यान निर्माण केलं आहे. तपोवन पंचवटी या भागात रामसृष्टी मध्ये प्रभू श्रीरामाचे देखणे शिल्प उभारण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास मंत्रालयाने या शिल्पासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. १० फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या शिल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. हे शिल्प केवळ एक स्थापत्यकला नसून, ते नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रभू श्रीरामाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे चित्रण या परिसरात करण्यात आले आहे, ज्यामुळे भक्तगण आणि पर्यटक यांना अध्यात्मिक अनुभव मिळतो.​

पर्यटनदृष्ट्या महत्त्व
प्रभू श्रीराम शिल्प हे नाशिकच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देतात. शिल्पाच्या सौंदर्यामुळे आणि परिसरातील शांत वातावरणामुळे हे ठिकाण छायाचित्रकार, इतिहासप्रेमी आणि धार्मिक भाविक यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.​

निष्कर्ष
प्रभू श्रीराम शिल्प, तपोवन, नाशिक हे एक अद्वितीय धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे. या शिल्पाच्या माध्यमातून नाशिकच्या धार्मिक परंपरेचे आणि स्थापत्यशिल्पकलेचे दर्शन घडते. नाशिकला भेट देताना या शिल्पाला अवश्य भेट द्या आणि त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घ्या.








नाशिकच्या गोदाकाठच्या श्री. गाडगे महाराज धर्मशाळेतील खुद्द गाडगे महाराजांच्या उपस्थितीमधील एक क्षण
नाशिकच्या पंचवटी येथील मुठे वाड्यात लोकमान्य टिळकांनी भेट दिली तेव्हाचे छायाचित्र
(सौजन्य : Uday Muthe ह्यांच्या संग्रहातून)
हे रामकुंडाचं चित्र १८९८ साली प्रकाशित "Picturesque India; a handbook for European travellers"या पुस्तकातून घेतलेलं आहे. एच. एच. स्टॅंटन या चित्रकाराने ते केलेलं आहे असं पुस्तकातून कळते. खालील उतारा पाहा.

"The various stone basins through which the river passes are called Kunds. That on the Panchawati side is Rama’s Kund, where the god was once went to bathe.

The ashes of the dead are thrown into the river from its steps.

The arched buildings, roofed over, which rise from the bed of the river, are Dharmsalas, where fakirs and pilgrims lodge. there are a great number of these scattered about on the banks.
Half a mile down the river, and across the ferry, is a hill about 200 feet high, called Sunar Ali, from which a most interesting view of the whole city, river, and temples can be obtained.

The hill close by with the square building on the top is Junagarh, or the Old Fort, which was built by Aurangzeb."



नाशिकच्या गोदातीरी धर्मशाळेत अन्नदान करताना गाडगे महाराज..!
संत गाडगे महाराज यांचा नाशिक येथील राहत्या झोपडी येथील दुर्मिळ फोटो
ठिकाण- पंचवटी
#आठवणीतलं_सर्कल !!

९० च्या दशकाच्या सुरुवातीस बऱ्याच जणांकडे टीव्ही नव्हता. त्यामुळे केबल टीव्ही असणे दूरची गोष्ट होती.!
घरातल्या झाडू खराट्यांच्या काड्यांचे धनुष्यबाण तयार करून रामायण-महाभारत मालिकांचे अनुकरण करण्याचे ते दिवस होते.
अधून मधून टीव्हीवर कस कोण जाणे, पण सिग्नल मिळायचे आणि केबलवर इंग्रजी सिनेमा लागलेला दिसायचा.
हॉलिवूड ह्या प्रकाराची ओळख झाली ती तेव्हा ! त्याकाळी किंगकाँग, टर्मिनेटर, होम अलोन पाहिलेल्या भाग्यवंतांपैकी मी एक होतो.
पाश्चिमात्य संस्कृती आणि इंग्रजी सिनेमे वाईट असतात इथपासून "तू अजून श्वशांक रेडेम्पशन पहिला नाहीस ?" या तुच्छतादर्शक प्रश्नांपर्यत आजवर वाटचाल झाली.
अशोकस्तंभावर असलेले सर्कल थिएटर हे तेव्हापासून सोबती बनले.
वडिलांना कुत्रा,मांजर असे विविध प्राणी व त्यांच्या चातुर्यकथा असलेले सिनेमे जाम आवडतात. इंग्रजी सिनेमे आवडायचं एवढंच कारण , नाहीतर इतरवेळेस हिंदी सिनेमात एखादा पोलीस इस्पेकटर असणारा नायक, इन्टर्वल पर्यंत त्याने खलनायकाचा मार खायचा नंतर हिरोने 'बदलेकी आगमध्ये' त्या खलनायकाचा साम्राज्य उध्वस्त करायचं हा एककलमी कार्यक्रम ते राबवत असतं.
या अजब वेडापायी त्यांनी 'जंजीर पासून सिंघम रिटर्म' पर्यंत अनेक सिनेमे पाहिले आहेत.
असच एकदा त्यांनी सर्कल टॉकीजला नेऊन ज्युरासिक पार्क दाखवला. पुढे 'बुडणाऱ्या जहाजाचा' तो पिकचर म्हणजे टायटॅनिक पण पाहिला.
हॉलीवूडचा पाणउतारा कसा करावा हे माझ्या पिताश्रींनी शिकवलं. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे 'मशालवाली बाई' हे मला त्यांच्याकडून शिकायला भेटले. 'अरनॉल्ड शिवाजीनगर' म्हणजे तो बॉडीबिल्डींगवाला हिरो ! असे बारसे त्यांच्याकडून व्हायचे.



सर्कलशी नाते जुळले ते ज्युरासिक पार्कपासून..! नंतर गॉडझिला, एनाकोंडा, बेब, वैगेरे सर्व प्राणिमात्रांचे सिनेमे पाहिले.
डॉ.डूलिटिल मध्ये प्राण्यांची भाषा समझणारा एडी मर्फी आणि प्रत्येक प्राण्याला बॉलिवूड स्टारच्या आवाजाची दिलेली फोडणी धमाल होती.
'जुमांजी' मधला शहरभर चाललेला प्राण्यांचा हैदोस पण कहर होता.
'बेबीज डे आउट' मधल्या चिमुकल्या पोराने केलेले किडनॅपर्सचे हाल पाहण्याजोगे होते.
पुढे नवनवीन लोकांशी ओळख होत गेली.
लॉर्ड ऑफ दि रिंग्ज, मिशन इम्पोसीबील, मॅट्रिक्स ट्रायोलॉजी, मेन इन ब्लॅक.....!!!
एकामागून एक येणाऱ्या सिरीज पुढे काय होणार ह्याची उत्सुकता वाढवत होत्या.
ब्रॅड पिट, लिओनार्डो दि कॅप्रियो, कियानू रिव्ह्ज, विल स्मिथ, निकोल किडमन, अँजेलीना जॉली, सलमा हेयेक ही नावे पाठ होत गेली.
ट्रॉय मधलं द्वंद्वयुद्ध चटका लावून जायचं. तर ओशनमधली रॉबरीपाहून मिश्किल हसू यायचं.
ख्रिस्तोफर नोलानच्या सिनेमाचा तर नोलानियन भक्त बनलो.
हॅरी पॉटरची अर्धी सिरीज हॅरीसाठी, उरलेली हर्मायनीसाठी पाहिली.
अधेमध्ये एखाद्या मित्राच्या लॅपटॉपवर "शिन्डलर्स लिस्ट' किंवा 'मॉडर्न टाईम्स' बघुन क्लासिक्स म्हणजे काय हे शिकलो.
पण या सगळ्यात सर्कलच ते सिंगल थिएटर सोडून मल्टिप्लेक्सला कधी पोहोचलो कळलचं नाही.
दीड तासांच्या सिनेमाच्या इंटर्व्हलमध्ये झटपट जाऊन पाववडा खाणे म्हणजे वेगळाच आनंद होता. (पाववडा अनेकदा कृष्णाईचा असायचा)
मल्टिप्लेक्स मधल्या 200 रुपयांच्या खोकभरून मिळालेल्या पोपकॉर्नला ती चव कधी येणार नाही.
आज ती मजा दुर्मिळ झालीय.
पडद्यावर कोलंबिया किंवा युनिव्हर्सलचा दिसणारा लोगो,
पिटातल्या प्रेक्षकांचा गलका !
जेम्स बॉण्डच्या एंट्रीला पडणाऱ्या शिट्या !
जॅक स्पॅरोच्या करामतींना मिळणारा हशा........!

खुप काही हरवत चाललंय !

©सौरभ रत्नपारखी
"मुरलीधर मंदिर"

सध्या नाशिकच्या लाडक्या गोपालकृष्णाचा उत्सव सुरु आहे.दरवर्षी उत्सवातल्या शुक्रवारी गोपालकृष्ण आपल्याला दिसतो राधेच्या रुपात.परंतु या वर्षी हे रुप आहे मंगळवारी.

मागच्या वर्षीचा शुक्रवार मला आठवतो.या दिवशी गोपालकृष्ण राधेच्या रुपात सजणार होता.सकाळपासूनच तयारी सुरु होती. दुपारी प्रत्यक्ष पोशाख करण्यास सुरुवात झाली. हळुहळु गोपालकृष्णाचे रुप राधेत बदलत गेले.
नऊवारी साडी..सौभाग्य अलंकार..काळ्याभोर केसांच्या वेणीचा शेपटा..नाकात नथ..कपाळावर चंद्रकोर.. देवाच्या सौंदर्याची परीसीमाच झाली होती आज.

संध्याकाळी मंदिरात भजन रंगले.भजने म्हणणार्यांना देवाचा अवतार समजुन त्यांची पाद्यपूजा केली गेली. कपाळावर अष्टगंध.. बुक्का.. गळ्यात फुलांचे हार घातले. सुवासिनींना हळदी कुंकू लावुन..मळवट भरुन त्यांचे पुजन केले. लहान लहान मुले राधाकृष्णाच्या वेशात इकडेतिकडे फिरत होती.देवीचा गोंधळ मांडला गेला. राधा हे देवीचेच रुप.तिची खणा नारळाने ओटी भरली.. आणि डोक्यावर बिल्वपत्र वाहीले.

खरंतर नेहमी गोपालकृष्णाला तुलसीपत्र अर्पण केले जाते. पण वर्षातले केवळ तीन दिवस त्याला बेलाचे पान वहातात. उत्सवात राधेचे रुप असताना आणि अर्धनारी नटेश्वराचे रुप असताना.आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मुरलीधर शिवाच्या रुपात असतो.त्या दिवशी बेलपान वाहीले जाते.

जन्माष्टमीचा हा उत्सव सुरु होतो पौर्णिमा झाल्यावर. पण त्याही आधी नागपंचमीला रात्री देवाला उत्सवाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. गावातील काही भजनी मंडळे..काही वंशपरंपरागत घराणी..त्यांना मानाचा बुक्का देऊन उत्सवाला आमंत्रित केले जाते.

पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष उत्सव सुरु होतो. कधी झुल्यावर..तर कधी चंद्रावर मोठ्या दिमाखात गोपालकृष्ण आपल्याला दिसतो.नाग..मोर..गरुड ह्यावरही दिसतो.

पण जन्माष्टमीला मात्र त्याचा परंपरागत पोशाख असतो.मंदिरात दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताने दिलेला फुलांचा हार देवाला घातला जातो. रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा होतो. रात्रभर भजनी मंडळांचे कार्यक्रम सुरु असतात.

दुसऱ्या दिवशी नवमीला महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.. तर दशमीला पालखी सोहळा असतो.खरंतर जन्माष्टमी झाल्यावर उत्सव संपला असे बर्याच जणांना वाटते.पण त्यानंतरही चार दिवस मंदिरात कार्यक्रम सुरुच असतात.

एकादशीला गोपालकृष्ण गुराख्याच्या वेषात असतो. अंगावर घोंगडी..हातात काठी.. आजुबाजुला गायी..हे रुप काही वेगळेच दिसते.

द्वादशी म्हणजे श्रमपरिहार. उत्सव पुर्णत्वास जाताना अनेकांनी तन..मन..धनाने मदत केलेली असते.त्यांचा सन्मान केला जातो. त्या दिवशी देवाचा नैवद्य मोठा छान असतो.लोणी.. भाकरी.. पातोड्या..कढी.. आणि शिरा असा बेत असतो.

द्वादशी म्हणजे देवाचे बारसे. सकाळी रंगीबेरंगी फुलांनी पाळणा सजवला जातो.देवाचे नामकरण केले जाते. अगदी लहान मुलामुलींना पाळण्यात घालुन गोपालकृष्णाच्या विविध नावांनी संबोधले जाते.अनेकांची एक श्रद्धा आहे. ज्यांना अपत्य होत नाही अश्या स्त्रियांना ओटी भरुन बाळकृष्ण दिला जातो. त्यांना गोपालकृष्णाच्या आशिर्वादाने संतती प्राप्त होते. रात्री काल्याचे किर्तन होऊन उत्सवाची सांगता होते.

या जन्माष्टमी उत्सवात गोपालकृष्ण विविध रुपात आपल्याला दिसतोच..पण चंपाषष्ठीला खंडेरायाच्या रुपात पण तो अधिक सुंदर दिसतो.नरसिंह जयंतीला तो नरसिंहाच्या उग्र रुपात दिसतो..तर दत्त जयंतीला अवधुत वेषात दिसतो.

नाशिककरांचा हा लाडका गोपालकृष्ण. तो कोणत्याही रुपात सुंदरच दिसतो.त्याच्या चेहर्यावरील अपार गोडवा.. ते मोहक हास्य बघताना आपण हरवुन जातो.खरंतर तो देव वाटतच नाही. तो आपल्यातलाच एक वाटतो.कधी मित्र..तर कधी सखा..कधी जोडीदार.

आता जन्माष्टमीच्या उत्सवाची सांगता झालेली असते.गोपालकाला खाऊन त्याचे पोट भरलेले असते त्याच्या चेहर्यावर एक वेगळेच समाधान असते..त्रुप्तता असते..

आणि बारकाईने पाहीलं तर तो थोडा थकलेलाही दिसतो.वेगवेगळी रुपे..सतत बदलता मेकअप.. भक्तांची गर्दी.. भजनांचा गजर..गेले पंधरा दिवस उभा राहिल्याने पायही दुखत असतीलच ना!त्यालाही आता विश्रांतीची गरज भासत असते.

आणि म्हणुनच रात्री एका चांदीच्या पात्रात गरम..कोमट पाणी घेतले जाते. त्यात अत्तर.. केशर टाकुन मग ते सुगंधित पाणी चरणांवर टाकुन ते शेकतात.थोडेसे हळुवारपणे दाबुनही दिले जातात. त्याचा शीण थोडा कमी होतो.

आणि मग होणाऱ्या शेजारतीच्या वेळी त्याच्या चेहर्यावर नेहमीचे मंद स्मित विलसत जाते.

सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८








View at Gangapur ( don't know the exact location)

Photograph taken by commercial photographer Francis frith (1850-60)

(Warning :- This and same type photograph are in Victoria and albert museum collection.
As per Victoria and Albert museum copyright rules these photographs cannot be used for commercial purposes )
तिवंधा लेन.




आज भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांचा जन्मदिवस ! भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुमूल्य योगदानामुळे त्यांच्या जन्मदिनी "अभियंता दिन" साजरा केला जातो.
विश्वेश्वऱय्या आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला १८८३ साली असिस्टंट इंजिनियर म्हणून नाशिकमध्ये कार्यरत होते.
येथील जलसिंचन क्षेत्रात देखील त्यांनी योगदान दिले होते.
नाशिकच्या जडणघडणीत त्यांचाही सहभाग असल्याने ह्या समूहाच्या वतीने त्यांना हार्दिक अभिवादन..!
देवळाली रेल्वे स्टेशन ( २१-०९-१९२५ )

पहिल्या विश्व युद्धात काम केलेले तेव्हाचे सैनिक रिचर्ड स्मिथ ह्यांनी काढलेला हा फोटो.









Kasara Ghat 1860-65
हे तैलचित्र कुठल्या घटलेल्या ऐतिहासिक क्षणाला दर्शवीत आहे??
Photo courtesy:- Mr Vinay Chumble.





नाशिक, साठ वर्षांपूर्वी...
रेव्हेन्यू कॅन्टीन (कलेक्टर आॅफइस)(ओपनिंग :-१५ अगस्ट १९६२)
नाशिकचे सर्वात जुने कॅन्टीन बोलायला हरकत नाही. माझे कुटुंब 1962 पासून ही कॅन्टीन चालवत. श्री भगवान प्रभू (माझे चुलत आजोबा) मुळ चालक. माझे वडील श्री बाबा नायक 1977 मध्ये एलआयसी कॅन्टीन (गडकरी चौक) ताब्यात घेईपर्यंत ही कॅन्टीन चालवण्यात मदतीला असतं.
आज त्या ठिकाणी शिव भोजनालय (मेहेर सिग्नल) आहे.
Photo taken on opening day :- 15 Aug 1962)
१९०६ मध्य माझा जन्म भामबुरडा ,पुणे मध्ये झाला . १९०९ मध्ये मला नासिक ला हलवले गेले , ओळखा मी कोण??
Note :- photo not in my collection anymore.

P.T.C. पोलीस ट्रेनिंग सेंटर. जे आधी पुण्यात होते. नंतर नाशिक ला हलवले गेले. भांबुर्डा-शिवाजी नगर.

नासिक मधल्या प्रमुख मंदिरांची बांधणी कोणत्या सालामध्ये झाली......!!!!










नासिक ट्राम सेवा...

सरकार वाडा वाटत नाही मात्र या प्रकारे दिसणारी दुसरी इमारत नाहीय .. कदाचित सरकार वाडाच असावा नंतर त्या इमारती मध्ये काही बदल केलेले असावेत कारण पायऱ्या व खिडक्या जवळपास सारख्या आहेत... त्यात फोटोत मेशन केलेले आहे नासिक जवळ म्हणजे नासिक मध्ये नाही असाही होतो











1860.
Photo currently in a museum.
वैतरणा डॅम






























साक्षी गणपती.. भद्रकाली.. ओम टी हाऊस च्या जवळ..
नाशिकची ग्रामदेवता .प्राचीन भद्रकाली मंदिर. 

भगवती देवी...
किती जुन्या नाशिककरांना ही मुर्ती आठवते? आणि या मागचा इतिहास...
हो. तीळभांडेश्वरी .अभिनवभारत संस्था.चित्रकला वर्ग तेथे ही देवी स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत 😊🙏🏻

ही नुसती मुर्ती नाही तर भारतीय स्वातंत्र्य इतिहासाच्या जाज्वल्य तेजाची प्रतिमा आहे..
या अभिनव भारत मधील ही देवी..
तात्याराव सावरकर आणि बंधूंनी येथेच शपथ घेतली...
या संस्थेचे जुने नाव मित्रमेळा...
इतिहासात गाजलेला ब्रा ऊन पिस्तुलाचा पाया इथे रचला गेला..
स्वातंत्र्या नंतर भारतातील.इतर ठिकाणची शाखा बंद झाली.. पण ही संस्था आज ही विसर्जित झालेली नाही..
कापरेकर सर इथेच रहात होते.. हा वाडा पण त्यांचाच होता.. याच्या शेजारीच तात्यारावांची खोली होती..
इथे अनेक सोनेरी पान लिहीली गेली.
इथले तुळशी वृंदावन याची साक्ष आहे..
हे स्मारक तात्याराव, म्हसकर, दातार शास्त्री , वर्तक, महाडिक यांनी लोक वर्गणीतून परत मिळवले जतन केले..
आज दुरावस्था आहे..
याच्या संवर्धनाची योजना , निधी मंजूर झाला आहे पण आजमितीस तरी अजुन काही हालचाल दिसत नाही..हेच खरे











सुदर्शन दिग्विजय... रथा बरोबर असतो..हा जो छोटा मुकूट आहे ना हा बालाजीचे सेवेकरी आणि वंशातील लोकांवर सेवे दरम्यान डोक्यावर आशीर्वाद म्हणून ठेवला जातो..

बालाजी आणि भूदेवींचा मुकूट
#श्रीबालाजी..

भाद्रपद कृष्ण एकादशी (इंदिरा एकादशी)..
कापड पेठेतील बालाजी मंदिरात या दिवशी विमानोत्सव. असतो..
हा श्री बालाजींचा जन्मदिवस.होय.
या दिवशी देव भूदेवींसह धरातलावर प्रकट होतात आणि आपल्या निस्सिम भक्तांना दर्शन देतात.. या दिवशी मुळ गंडकी शिळेतील वालुकामय मूर्तींना महंत सजलेल्या झोपाळ्यावर बसवून त्यांची सेवा करतात..
या दिवशी श्रीबालाजींना पंचखाद्यासह पंचपक्वान्न आणि दहीपोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो.. मग हा नैवेद्य त्याचे ताट.मुळ घरातील वंशजामध्ये पाठवला जातो.. लहानपणी आम्ही अनेकदा हा प्रसाद घेतलेला आहे..कालांतराने पिढीबदल आणि मुळ वंशज गेल्यानंतर याचे स्वरूप मर्यादित झाले आहे..
या दिवशी घराण्याचे मुळ पुरुष तिमया महाराज गोसावी यांनी रचलेली पद गायली जातात..
ब्रह्मोत्सवात पण त्यांनी लिहीलेल्या पदरचना म्हंटल्या व गायल्या जातात..
आज श्रीहरींचा धावा गायला जातो..
हरी यावे .. मज पावे...
या सर्व रचना मुळ बालाजी इतिहासात मोडी लिपीत उपलब्ध आहेत.. व याची मालकी देवस्थान ट्रस्ट आणि महंतांकडे आहे..
तिमया महाराजांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांता नुसार या मुर्ती पुष्करिणी तिर्थातून बाहेर काढल्या..आणि मग मजल दरमजल करत या मुर्ती इथे नदीकाठी या मंदिरात स्थिरावल्या.. या दरम्यान मंदिर निर्माण होण्याच्या कालावधी पर्यंत तिमया महाराज ज्या ज्या सेवेतील वंशजांच्या घरी राहिले त्या त्या ठिकाणी हा रथ थांबतो.. ती घर म्हणजे त्या वेळची मंदिरच होती..
Sunil Shirwadkar यांच्या श्रींची सेवा आणि दृकश्राव्य माध्यमातून जागे झालेले स्मृतींपटल... येथे मांडले..
व्यंकटरमणा गोविंदा .
नाशिकच्या इतिहासातील एका ऐतिहासिक मंदिराची ही तोंड ओळख..असावी हाच या मागचा हेतू आहे..
*व्यंकटेशाचा विमानोत्सव*
कधी दुष्टांच्या अत्याचाराने क्रोधीत होऊन तर कधी कोण्या भक्ताच्या आर्ततेने मन द्रवून जगत्पती नारायण या भूमीवर वारंवार अवतीर्ण होतात. त्रेतायुगात रावणाच्या त्रासाने त्रस्त होऊन ब्रह्मदेवादि सर्व देव,ऋषीमुनी,गंधर्व सिद्ध व्यंकटगिरी पर्वतावर भगवान नारायणाची आराधना करत होते. त्याच वेळी पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ देखील तिथे तप करण्यास आले. सर्वाना हरी दर्शनाची तीव्र ओढ लागली. सगळी सृष्टी जणू आर्ततेने भगवंतांचा धावा करू लागली.
*लवकर हरि यावे, मज पावे, संकट सर्व हरावे |*
*कल्याणाअद्भुत गात्रा कामीतार्थ प्रदायक व्हावे।।*
सर्वांची प्रार्थना फलद्रूप झाली .भक्तांचा धाव ऐकून हरी धावून आले. भाद्रपद वद्य एकादशीच्या दिनी दोन प्रहरी व्यंकटगिरीवर व्यंकटेश बालाजी श्रीदेवी भुदेवी सहित विमानावर बसून अवतरले.भगवंतांच्या प्रकटण्याने दशदिशा उजळून निघाल्या.देवांनी पुषवृष्टी केली,गंधर्वांनी गायन केले, अप्सरांनी नृत्य केले, ऋषीमुनींनी स्तवने गायली. रावणवधासाठी लवकरच दशरथाचा पुत्र म्हणून अवतार घेण्याचे त्यांनी वरदान दिले.आनंदित झालेल्या सर्वानी ब्रह्मदेवांच्या पुढाकाराने अश्विन प्रतिपदेपासून भगवंतांचा अलौकिक उत्सव केला.रोज विविध वाहनांवर बसवून ,विविध उपचारांनी पूजन केले. तोच ब्रह्मोत्सव !
कलियुगात जुन्नर तालुक्यातील पणसंबे इथल्या गणेशपंतांना भगवंतांच्या दर्शनाची ओढ लागली.
*वरिशामता निरमुनी अंतर शुद्धाते प्रगटावे ||*
*इह जन्मीचे जन्मांतरीचे सर्वही तुजला ठावें||*
या ओढीने तीर्थयात्रा करत फिरणाऱ्या त्यांना व्यंकटेशानी दर्शन देण्याचा दृष्टांत दिला. त्याप्रमाणे गणेशपंत ताम्रपर्णी नदीवरच्या पुष्करणी तीर्थावर सूर्याला अर्घ्य देताना त्यांच्या हातात भगवंतांची चतुर्भुज मूर्ती आली. तोही दिवस भाद्रपद वद्य एकादशीचा.पुढे गणेशमहाराजांचे पुत्र तिमय्या महाराजांनी देवांना नाशिक येथे आणून स्थापन केले. तिरुपती प्रमाणेच इथेही ब्रह्मोत्सव सुरु केला.त्यांनी देवाला मागितले कि
*वडिली आराधिली तैसे मागें नांव असावे||*
*परंपरेनें सर्वोत्कर्ष संततिने चालावे ||*
यानुसार कापडपेठेतील बालाजी मंदिरात बालाजीवाले घराण्याकडून गेली अनेक शतके पिढ्यानपिढ्या हि परंपरा अविरत सुरु आहे.
भाद्रपद एकादशीला व्यंकटेश विमानातून प्रकटले. देवांचा प्रकटदिन विमानोत्सव म्हणून साजरा केला जातो. श्री व्यंकटेश बालाजी यांची मुख्य मूर्ती श्रीदेवी आणि भूदेवींसह फुलांनी सजवलेल्या झोपळ्यात ठेवली जाते. व्यंकटेशांच्या प्रकटण्याचे आख्यान होते. शंखनाद ,नगारे ,टाळ यांच्या गजरात देवांचे प्राकट्य साजरे होते. यांनतर तिमय्या महाराजांनी रचलेला ‘लवकर हरि यावे, मज पावे, संकट सर्व हरावे ‘ हा पारंपरिक धावा म्हटला जातो. देवाला नैवेद्य दाखवून आरती होते.
या धाव्यात तिमय्या महाराजांनी म्हटल्या प्रमाणे
*वर्षोवर्षी नवरात्री उत्सवासी करवावे ।*
*नवही दिवशी नवही वहनी नवरात्री मिरवावे।*
अश्विन प्रतिपदेपासून देवाला विविध वाहनांवर बसवून ब्रह्मोत्सव साजरा केला जातो.अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होतात.धाव्यातील ‘प्रथमारंभी श्री भूसहित विमान दर्शन द्यावे’ या ओवीप्रमाणे व्यंकटेशांचा विमानोत्सव पुढे सुरु होणाऱ्या ब्रह्मोत्सवाची नांदी ठरतो.

#विनय_उवाच
विनय मधुकर जोशी
vinayjoshi23@gmail.com

दुर्गा देवी
अथवा गोंधळ्यांची देवी..
पिंपळपार . नेहरूचौक नाशिक..

या चौकात पुर्वी पाण्याची टाकी होती..अन त्या बाजुलाच एका टेकाडावर पडीक जागेत गोंधळी लोक रहायचे..
तिथे त्यांची टाकासारखी केशरी दगडातली देवी होती..
या वाड्याच्या पायरीवर हे गोंधळ जागरण करणारे लोक बसायचे..
विडा सुपारी अन मानाचे तबक घेऊन त्यांना आवताण दिले की.. ते त्याचा स्वीकार करून चौकातील या देवीपुढे आपली पहिली आरती सादर करायचे. सेवा करायचे अन मग यजमानाकडे जायचे..
लग्नाची देवक ..नव्या नवरीसाठीचे तेलफळ.. लग्नानंतरचा गोंधळ जागरण पण वाजत गाजत हे गोंधळी घेऊन पूर्वी मिरवत जायचे..
त्या वेळेसच डफ, टुणटुण, संबळ, सांबर शिंग, हलगी, वाजंत्री अन भाजा व जोडीला घंटा अन बारीक झांज या वस्तू जवळून बघितल्याचे आठवते..
आता ती गाणी काही आठवत नाहीत.. पण या चौकात आम्ही लहानपणी टिप-या खेळायला जायचो हे आठवते.. त्या वेळी बारा एक पर्यंत तरी देवीची गाणी म्हणत वाजवत हा धुडगूस चालत असे.. सगळी लहानथोर मंडळी यात सामील व्हायची..
संतोषी मातेची आरती शेवटी असायची..
या देवीची मुर्ती लहानपणी तरी आम्हाला उग्र वाटायची.
जुने नाशिक
डिंगर आळी..
एका वाड्यात असलेली ही पोपडा देवी..
किती नाशिककरांना आठवते .

गड, किल्ले, वाडे, गढ्या यांचे बांधकाम तंत्राचे माहिती पुराव्यानिशी प्रसिद्ध झालेले पुस्तक म्हणजे ‘वाडा’.

वाड्यातील बांधकाम तंत्राबाबत व त्यातील एलिमेंट्सला बोलतं करणारे ‘वाडा’ हे मराठीतील पहिले पुस्तक. गेली १७ वर्षे संशोधन व निरीक्षण करून परिश्रमपूर्वक तयार केलेले मराठा कालखंडातील ‘वाडा’ संस्कृतीचा दैदिप्यमान इतिहास ‘वाडा’ पुस्तकाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. वाडा बांधकामात आपल्या पूर्वजांनी आत्ताच्या इंजिनिअरिंगला लाजवेल असे जे तंत्रज्ञान त्याकाळी वापरले त्याचे बारकावे या पुस्तकात आहेत. पाश्च्यात संस्कृतीच्या प्रभावाखालीअसलेल्या आजच्या तरुण पिढीला आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना आपली पारंपारिक वास्तुशैली, संस्कृती आणि त्यातील राहणीमान कळावे तसेच पारंपारिक भारतीय कला, पुढच्या पिढीला आपल्या मागच्या पिढ्यांनी काय संचित ठेवले हे दाखवायचे असेल तर पुरातन वाडे पाहिले पाहिजे. त्यातील बांधकाम तंत्र अभ्यासले पाहिजे. तरच महाराष्ट्राची थोरवी कळेल. वाड्यातील अबोल एलिमेंटसंलाचं बोलतं केलेलं आहे. महाराष्ट्रातील वाडे हे महाराष्ट्राचे एक भूषण ! त्याचे अतिविशाल रूप नजरेत साठवून घ्यायला आवर्जून जातो. त्याचे ते भव्यदिव्य रूप मनात कोरले जातेही, परंतु ते रूप नेमके कसे आकाराला आले, कोणी ते आव्हान पेलले, काय काय घडले असेल ते प्रत्यक्षात साकारताना. वाड्याचा रोमांचित करणारा इतिहास मात्र आपल्याला फारसा माहीत नसतो. त्यासाठी ‘वाडा’ हे पुस्तक वाचले पाहिजे.
महाराष्ट्रातील ‘वाडा’ संस्कृती जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहेत. विदेशी पर्यटकांना वाडा संस्कृतीने आकर्षित केलेलेच आहे. जुने वाडे पाहायला त्याचे आर्किटेक्चरल पैलू अभ्यासायला स्थपती, वास्तुविशारद, इतिहासकार, अभ्यासक, पर्यटक, मूर्तिकार फोटोशूट, शुटिंगसाठी लोक वाड्याला भेटी देत असतात. वाड्याचा महादरवाजा, नगारखाना, दिवाणखाना, चौक, जोते, ओसरी, देवडी, देवघर, माळवद, कोनाडे, खुंटी, खिडक्या, रंगकाम, नक्षीकाम हे अभ्यासाचा विषय आहेत. जुन्या वाड्यांना उजाळा देऊन त्याचे आर्किटेक्चर अभ्यासक्रमात आणणे ही काळाची गरज आहे. चारशे- पाचशे वर्षांपूर्वीच्या प्रत्यक्ष बांधकामाचे साक्षीदार असलेले वाडे यांचा अभ्यासक्रमात समावेश नसणे ही मोठी शोकांतिका आहे. आपली ‘वाडा’ संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे.
‘वाडा’ हे पुस्तक काय सांगते.
* काय उद्देश असायचे वाडा बांधण्यामागे.
* कसे काढत पूर्वी क्वांटीटी व इस्टीमेट.
* का जाणवतो वाड्यात शिरल्याबरोबर उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उष्णता.
* कसे ओळखत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी दगड. व कोणता दगड कोठे वापरत.
* का करत दगडी जमीन सर्वात शेवटी.
* का वापरले आपल्या पूर्वजांनी दगडासारखे चिरस्थायी माध्यमच.
* कशी केली असतील पूर्वीची बांधकामे आत्ताच्या लेझर किरणांच्या तोडीसतोड.
* कसे टिकून आहे आजही वाड्याचे बांधकाम.
* का व कशी करत होते भूपरीक्षा.
* का घेत होते वाड्याचे जोते कमरेइतके उंच.
* का सोडत होते वाड्यात मध्यभागी मोकळी जागा.
* का लावल्या जात जोत्याला गोल रिंगा.
* बांधकामात कशाचा उपयोग करत असत पूर्वी अॅड मिक्सचर म्हणून.
* कसं व्हायचं माळवदाचे बांधकाम.
* कसे काढायचे झाडाचे वयोमान.
* का लागत नव्हती पूर्वी लाकडांना वाळवी.
* कसे टाळले जात होते पाण्याचे बाष्पीभवन.
* कशी असायची कारागिरांची कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजन.
* का पाजले जाई लाकूड कामाला बिब्ब्याचे, बेलाचे व जवसाचे तेल.
* कसे होते वाडा निर्माणाचे व्यवस्थापन.
* का आहेत मातीच्या भिंती, बुरुज आजही सुस्थितीत.
* का नाही झाले सिमेंटलाही मागे टाकेल अशा पांढऱ्या मातीवर संशोधन.
* कसे पेललेवास्तू निर्माण करण्याचे धनुष्य तत्कालीन अभियंत्यांनी.
* काय संदेश द्यायचा असेल वाड्याच्या मालकाला.
* का ओळखली जातात वाड्याची बांधकामे मेन्टेंनन्स फ्री किंवा वन टाइम कन्स्ट्रक्शन म्हणून.
* कसे राखले जायचे पाण्याचे पावित्र्य.
* कसे सांगत आपल्या डोक्यातील वाड्याची कल्पना. फोटो, थ्री डी मोडेल, थ्री डी व्हू नसताना. तेव्हांच्या लोकांनी हे कसं केलं असेल.

जेंव्हा तुम्ही “वाडा” हे पुस्तक वाचता तेंव्हा ?

· “वाडा” हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला वाडा कसा पहावा, कसा पहायला हवा ते कळते.
· वाड्यातील अबोल एलिमेंट्सचे महत्व कळते.
· वाडा आतून बाहेरून कसा पहावा ते कळते.
· आपल्या पूर्वजांनी “वाडा” बांधकामात वापरलेले तंत्रज्ञान हळूहळू आपल्या लक्षात यायला लागते.
· “वाडा” पुस्तक वाचल्यावर आपल्यालाही काही प्रश्न पडतात त्याची उत्तरे आपण स्वतः शोधायला लागतो.
· वाड्याची संरक्षण करण्याची तत्कालीन पद्धती समजते. त्याची निगा कशी राखावी हे कळते.
· आपल्या पूर्वजांनी संपादन केलेल्या ज्ञानाची, त्यांनी त्याकाळी संशोधन करून केलेल्या प्रगतीची आपणास नव्याने ओळख निर्माण होते.
· वाचक आपल्या वास्तू संस्कृतीबद्दल पुनर्विचार करू लागल्याशिवाय राहू शकत नाही.
· आपल्या पूर्वजांची किंमत आपल्याला कळायला लागते.
· नवी उमेद, नवी ऊर्जा निर्माण होते.
असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे ‘वाडा’ या पुस्तकात आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वर्तमानपत्रांनी सिंधुदुर्ग समाचार, लोकमत, प्रभात, तरुण भारत, संध्यानंद यासारख्या वर्तमान पत्रांनी तसेच प्रसाद मासिक, विकासकर्मी अभियंता मित्र या सारख्या दिवाळी अंकात देखील पुस्तकाची भरभरून स्तुती केली आहे. तसेच या पुस्तकाला तज्ञ परिक्षकांनी त्यांचे मुल्यांकन देखील केलेले आहे. पुरातत्व विभाग व अवरणेस विंग, एआर डिजिटल प्रेस मिडिया यांनी ‘लोप पावत चाललेली वाडा संस्कृती’ या विषयावर व्याख्यान त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रकाशित करत आहेत. तसेच आकाशवाणी केंद्राचे माजी मुख्य निवेदक श्री. दत्ताजी सरदेशमुख यांनी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन देखील केलेले आहे. असा हा ग्रंथ आजच घरी आणा. ते वाचा, अभ्यासा, घरच्यांना, आप्त, नातेवाईक, मित्रांना वाडा ग्रंथ भेट द्या. वाढदिवसाला बुके नव्हे तर वाडा ग्रंथ भेट द्या. आणि महाराष्ट्रातील वाड्याचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

अशा विविध विषयाची इतिहासकालीन माहिती जाणून घेण्यासाठी Vilas Koli या फेसबुक पेजला आणि युट्युब चॅनलला फॉलो करा, म्हणजे येणारी माहिती पहिल्यांदा आपल्याला मिळेल.

https://www.facebook.com/vilas.koli.353?mibextid=ZbWKwL

धन्यवाद !!
पुस्तक :- वाडा
लेखक :- विलास भि.कोळी
पुस्तकासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क :- 97630 84499
 



।। भद्रकाली ।।

प्रत्येक गावाचे म्हणून एक ग्रामदैवत असते. तसेच नाशिकचेही आहे. ती आहे ग्रामदेवता भद्रकाली. जुन्या नाशकातील तिवंधा चौकात हे मंदिर स्थित आहे. तसं पाहिलं तर हे मंदिर पुर्वी बुधवार पेठेत होते. पण मग नंतर इस्लामी आक्रमकांपासुन उपद्रव होऊ लागला.त्यामुळे मंदिराचे स्थलांतर करणे भाग पडले. तत्कालीन सरदार गणपतराव दिक्षित.. पटवर्धन यांनी त्यांच्या जागेत.. त्यांच्याच खर्चाने हे मंदिर बांधले.ही गोष्ट १७९० सालची.
मंदिराचे बांधकाम लाकडात केले असुन आक्रमकांपासुन बचाव व्हावा या उद्देशाने मंदिराला कळस बसवला नाही. पुर्वी या मंदिरात वेदांचे अध्ययन होत असे.आसपासच्या ब्राम्हण घरातील मुले उपनयन संस्कारानंतर येथे राहून वेदांचे शिक्षण घेत.त्याकाळी मंदिराला भद्रकाली मठ असे संबोधले जाई.
देवीची मुर्ती पंचधातुत घडवलेली असून ती अठरा भुजांची आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे तिचा प्रत्येक हातात शस्त्र आहे. मुर्तीच्या चेहर्यावर असलेले भाव अत्यंत विलोभनीय आहे.
मंदिरामागे राहणाऱ्या गायधनी कुटुंबाकडून येथे पुराण कथन केले जाते. ही परंपरा गेली दोनशे वर्ष अव्याहतपणे सुरु आहे. सध्या या कुटुंबातील विनायक गायधनी ही परंपरा पुढे चालवत आहे.गुढीपाडवा ते रामनवमी यांनी काळात ते रामायणाचे कथन करतात.. तर भाद्रपद महिन्यात भागवत पुराणाचे कथन करतात.
गेल्या ७०-८० वर्षापासून येथे रोज संध्याकाळी किर्तनाचा कार्यक्रम केला जातो. भद्रकाली किर्तन संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात महिना अखेरीस म्हणजे अमावस्येला गोपालकाल्याच्या प्रसादाचे वाटप होते.
नवरात्रात तर देवीची रुप अधिकच तेजस्वी दिसते. संध्याकाळी मंदिरात भारतीय बैठक अंथरली जाते. परीसरातील ब्रम्हव्रुंद यजुर्वेदाच्या संहितेचे सामुहिक पठण करतात.अष्टमीला पुजार्यांतर्फे आणि कोजागिरी पौर्णिमेला विश्वस्त मंडळातर्फे नवचंडी यागाचे आयोजन केले जाते.गल्ल्या.. वाडे सोडून गेलेली स्थानिक नाशिककर मंडळी दर्शनासाठी येतात.गावाच्या पारावर जशी पुर्वी गावकरी मंडळी जमायची..तशी येथे जमतात.. गाठीभेटी होतात..ख्यालीखुशाली विचारतात.आणि मग तेव्हा समजते..नाशिककरांच्या ह्रदयातील ग्रामदेवतेचे स्थान.
सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.
नाशिकचे अधुनिक ग्रामदैवत..
कालिका मंदिर..

अधुनिक अशासाठी म्हंटले आहे की.. पुरातन ग्रामदैवत माता भद्रकाली मंदिर आहे...

कालिकेची यात्रा.. नवरात्रोत्सव काळातील एक अविभाज्य घटक आहे.. पुर्वी हिला गावाबाहेरची देवी म्हणून संबोधले जायचे..
पहाटेपासूनच पायी देवीला अनवाणी पायाने नित्यनेमाने जाणारे लोक ..हे यात्रेचे वैशिष्ट्य..
त्याच बरोबर पाण्याने भरलेला रबरी फुगा, पिपाण्या.. आणि भिरभिर.. लहान मुलांच्या हातातील मातीची चित्र, गल्ला .. सगळ काही सांगून जायचा..
विजेचा पाळणा, गुडदाणी आणि त्या वेळेस प्रथमच अनुभवलेले भेळपुरी चाट .. हे नाविन्य असायचे..
लाल, पिवळ्या, हिरव्या पातळांनी आणि हिरव्या काकणांनी शेवंतीच्या वेणीसह मळवट भरलेल्या आया, बाया, आज्या, काक्या मावश्या म्हणजे प्रती अंबामाताच वाटायच्या..
या मंदिराच्या बाजुला एक बाग होती.. या बागेत आवळीची अनेक झाडे होती.. तिथे घरून डबे आणून आवळीभोजने व्हायची.. ही प्रथा नेमकी कधी बंद झाली माहीत नाही पण बहुधा नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि नाशिकचे रुपडे बदलले .
त्या आधीच्या काळात.. हे शहर.वेदोक्त आणि धर्मशास्त्रावर. आधारित मंत्रोच्चाराच्या संस्कारामधे वावरत होते... नाही म्हणायला नाशिककर हे आधीपासूनच अधुनिकतेची कास धरणारे आणि नवीन विचार रुजवून घेणारे सर्वसमावेशक शहर होतेच..
या मुळेच अनेक क्रांतिकारक: साहित्य संस्कृतीचा मेळ इथे छान जुळला गेला..तो कायमचाच..
देवीच्या समोर आसूड ओढणारा पोतराज, कडकलक्ष्मी, गोंधळी, जोगते, वाघ्या मुरळी .. आणि घागरी फुंकणारे.. बाया बाप्ये.. यांचे ही एक प्रकारचे आकर्षण आणि भय देखील होते...
सकाळी सकाळी दान पावल रामाच्या पारी म्हणत येणारा वासुदेव आणि साडे अकराला बरोबर येणारा पीठ मागणारा माऽई अशी हाक देत शंख फुंकून मुकाट उभा राहणारा गोसावी... हे देखील आजही तसेच आठवतात..
या सगळ्यांच्या जोरावर घरे वाडे संस्कृती आणि माणसे नांदत होती..
आज ही संस्कृती आणि ओस पडलेले वाडे. आपल्या सोबत हा वारसा नष्ट करून जमीनदोस्त होत आहेत .
कालिकामातेचे मंदीर ट्रस्ट आणि लोकसंग्रहातून उभे राहिले... पण नाशिकचा लोप पावत चाललेला इतिहास लवकरच भूतकाळात जाण्यासाठी कुठे कुठे तग धरत शेवटचे आचके देत उभा आहे ..तो कधीही राम म्हणू शकतो .. हे दरवेळी नाशिकचा नव नवीन भाग पाहतांना दिसून येते..
-वाडा ते काॅम्पलेक्स संस्कृतीत कधीच न विसरले जाणारे आनंदाचे झाड आता बोन्साय झाले आहे



शूर्पणखा:-

ही वनवासात असलेल्या सीतेला त्रास देऊ लागली आणि रामाला मोहात पाडायचा प्रयत्न करू लागली, म्हणून लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेवरून नाशिक च्या तपोवनात नाक-कान कापून तिला विद्रूप केले. स्वतःच्या या अवमानाचा सूड घेण्यासाठी हिने रावणास राम-सीता व लक्ष्मण यांविरुद्ध फितवले. त्यामुळे रावणाने सीतेस पळवून नेले आणि पुढे सारे रामायण घडले.
अशी आख्यायिका सांगितली जाते



ग्रामदैवत माता भद्रकाली
अभिनव भारत मंदिरातील स्वातंत्र्य लक्ष्मीचे १९५६ चे छायाचित्र.
सप्तशृंगी गड 58 वर्षा पुर्वीचे दुर्मिळ फोटो

१८७८ साली (१३५ वर्षांपूर्वी) नाशिकमध्ये नोकरीस असलेल्या विल्यम हौटन या ऑस्ट्रेलियन चित्रकाराने काढलेले हे गोदावरी नदीच्या पात्राचे जलरंगातले आणखी एक चित्र. हे चित्र सध्याचा बुधवारचा बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या पटांगणावरून काढले आहे. चित्राच्या मधल्या भागात मागे दिसते ते नीलकंठेश्वराचे अजूनही एकटे उभे असलेले मंदिर. त्याच्या बाजूला चित्राच्या डावीकडे आहे गोराराम मंदिर. हे मंदिर व त्याच्या पायऱ्या अजूनही आहेत. (मंदिराचा वरचा काही भाग पडला व नवा केला असला तरी जुने प्रवेशद्वार तसेच आहे) त्याच्या अलीकडे मुरलीधर कोटाचा काही भाग दिसतो. मैदानाच्या ईशान्य कोपर्यातून हे चित्र काढले असल्याने रामकुंड परिसरातली कोणतीही देवळे दिसत नाहीत. त्या भागात जे एकमेव मंदिर दिसते ते सध्या होळकर पुलाखाली असलेले शंभू मंदिर आहे. अगदी उजव्या बाजूला दिसते ते नारोशंकराचे मंदिर. त्याचा डावीकडचा घुमट व घंटेचा घुमट या चित्रात दिसतो आहे. दिसणाऱ्या नदीपात्रात कोणतीही कुंडे दिसत नाही कारण हे चित्र काढण्याच्या फक्त नऊ वर्षे आधी नाशिक जिल्ह्याची तर चौदा वर्षे आधी नगरपालिकेची स्थापना झाली होती.
हे चित्र व हौटन यांची इतर चाळीस चित्रे ब्रिटीश लायब्ररीच्या येथील इंडिया हाउसमध्ये ठेवली आहेत
पंचमुखी हनुमान मंदिर: धार्मिक अध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. तर याच नाशिकमध्ये बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा भरतो. नाशिक शहरात लहान मोठे अशी जवळपास दोन हजारहून अधिक मंदिर आहे. मंदिरची नगरी म्हणून देखील नाशिक ओळखले जाते. पंचवटी परिसरातील जुन्या आडगाव नाक्यावर अडीचशे वर्षे जुने पेशवेकालीन श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली होती. सुरुवातीला लहान असलेले या मंदिराला आता भव्य रूप प्राप्त झाले आहे. दर शनिवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते तसेच दररोज देखील नित्यनेमाने भाविक दर्शन घेत असतात.

नारोशंकर मंदिर परिसर
Enjoy
Photo taken by British soldiers returning from war 1918 .. Mostly ww1 ..
हा व्हिक्टोरीया पुलाचा फोटो आहे!खाली वहात गोदावरी येते ती रामकुन्ड/लक्षमण कुन्ड/सीता कुन्ड आश्या चौरस कुन्डातून गाड़गेमहाराज पुला खालून गोदामाई पुढेजाते!!!!


1890 drawn and engraved by John pedder
Claimed to be from 1892
Kalaram temple.




वाणीचा गड
नाशिकच्या संरचनेवर प्रश्नमंजुषा.

इंग्रजांनी बांधलेली, अजूनही सक्रिय असलेली वास्तू ओळखा.. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी पायाभरणी केली होती
Quiz on Nasik structure
Identify the structure, built by British, still active .. foundation stone laid by then Governor Lord Harriss of Bombay

*रविवार कारंजा*
आपल्या चष्म्यातून डोळे बारीक करुन तात्या पहात होते.त्यांच्या अंधुक नजरेला फारसं दिसत नव्हतं.. पण तरी त्यांना जाणवलं.जुनं काही राहीलं नाही आता इथे. तोच त्यांच्यावर बाजुने जाणाऱ्या वसंतरावांनी त्यांना ओळखलं.
"काय तात्या.. आज इकडे कुठे गावात?"
"अरे वसंता तु?
आणि इकडे कुठे काय म्हणतोस? अरे आयुष्य गेलं माझ्या या भागात."
"ते खरं..पण आता ही गर्दी.. रहदारी.. म्हणून म्हटलं"
"अरे ही यशवंत मंडई बघत होतो.काय हालत झालीय रे हिची"
"हो ना तात्या. एकेकाळी काय शान होती नाही.."
"अरे मग..नाशकातले सगळेच स्पेशालिस्ट डॉक्टर्स इथे होते. कोरडे काय..लेले काय..आहेर काय...कोपर्यावरचा तो निऑन साईनचा बोर्ड.. तळमजल्यावरचा बाटाचा शोरुम..काही काही राहीलं नाही बघ.."
"हो ना.. आणि आतला तो अपना बाजार.. नाशिकमधला मॉलच की तो.."
"हं..नको वाटतं आता गावात येणं.पण तुला एक सांगतो वसंता.. नाशिक कितीही वाढु दे.. अगदी मेट्रो सिटी..स्मार्ट सिटी होऊ दे..पण *रविवार कारंजाचं* महत्त्व कधीच कमी होणार नाही बघ.."
------------------------------------
आज खुप दिवसांनी ते दोघे भेटत होते. रमेश इथे आरके वरच देना बँकेत काम करत होता.सहा वाजता ड्युटी संपल्यावर तो घरी निघाला.गाडीला किक मारणार तोच मोबाईलची रिंग वाजली. बायकोचा फोन होता. आठवण करुन देण्यासाठी. तिनं सकाळीच काही वाण सामानाची यादी दिली होती.येताना दगडुतेलीकडुन आठवणीनं सगळं आणा असं बोललीही होती.
गाडीला किक मारणार तोच समोर नितीन. त्याचा जुना मित्र.पण आता पुण्यात स्थायिक झालेला.
"काय म्हणतोस रम्या.. झाली का ड्युटी?"
"हो.हे काय आत्ताच आलो बाहेर. तु कधी आलास?"
"मी कालच आलो.म्हटलं गावात एक चक्कर टाकावी.काय गर्दी आहे रे इथे रविवार कारंजावर."
"काही विचारु नकोस..आपला *रविवार कारंजा* आता *आरके* झालाय.."
"इथे आरं की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होता.मी बाबांबरोबर अत्तर आणायला यायचो.इथे समोरच ते छोटं दुकान होतं.ते गोरटेलेसे काळी टोपी घातलेले मालक..उभं गंध लावलेले.. मांडी घालुन बसायचे त्यांच्या बाजुला लाकडी पेटी."
"आठवलं..मग ते पेटी उघडायचे..आत ह्या अश्या अत्तराच्या बाटल्या. एका लांब काडीला ते कापुस गुंडाळायचे..आणि मग तो अत्तराच्या बाटलीत अगदी हलकेच बुडवायचे.."
"तुला सांगतो रम्या.. अरे नंतर पुण्यात मी कितीतरी अत्तरांच्या दुकानात गेलो..पण असा नजाकतीने बनवलेला फाया मला कुठेच दिसला नाही.."
"ए..अजुन एक आठवलं बघ..मी स्कॉलरशिप परीक्षा पास झालो ना...तेव्हा बाबांनी मला या समोरच्या रसिक स्टोअर्स मधुन तेव्हाच सगळ्यात महाग फाऊंटन पेन घेऊन दिलं होतं.अजुन जपुन ठेवलंय मी ते.."
"खरंय.. इथं आलं की सगळं सगळं आठवतं बघ.."
"आणि या इथे उभं राहुन आपण अननस सरबत प्यायचो..आठवतं? गाडी होती एक"
"मग..ते काय समोर आता त्यांचचं दुकान झालंय.. चल घेऊ या आपण एक एक ग्लास"
अननस सरबत पिता पिता त्यांचं एका गोष्टीवर एकमत झालं.आपल्या नाशिकचा माणुस कुठेही जावो..*रविवार कारंजा* सारखी मजा कुठेच नाही.
----------------------------------
सुरेश आज कितीतरी वर्षांनी 'पेठेत' आला होता. पहील्यांदा तर त्याला शाळा ओळखुच आली नाही.पुढच्या ग्राउंड समोरच मोठी बिल्डिंग झालेली. शाळेतुन कुठलासा दाखला त्याला घ्यायचा होता. ते काम झाले. तो बाहेर आला. ती रहदारी बघुनच तो चकित झाला. कुठे एवढी गर्दी होती तेव्हा!आजुबाजुला काही ओळखीच्या खुणा तो शोधु लागला. इथे एक हार्डवेअर दुकान होतं.. मधल्या सुट्टीत तिथं मुलं गोळा व्हायची.बाहेरच्या बाजुला एक ट्रांझिस्टर असायचा..आणि त्यावर कॉमेंट्री चालु असायची.ती ऐकायला सगळी मुलं जमायची.
कधी समोरच्या सानप भेळभत्ता मध्ये जायचो.रुपया..दोन रुपयात भत्ता मिळायचा.समोरासमोर दोन बाकडी..जाऊन बसलं की समोरच्या टेबलवर भत्ता हजर.कागदावर ठेवलेला.कधी वरतून मिठ मसाला... अजुनही ती चव त्याच्या जिभेवर होती.
एक गोष्ट त्याच्या लक्षात आली...आपण कुठेही रहात असलो तरी *रविवार कारंजा*..तिथल्या आठवणी कधीच विसरु शकत नाही.
--------------------------------
"सोनाली... ए..सोनाली.."
सोनालीनं मागे वळुन पाहीलं तर तिची मैत्रीण अंजु तिला हाक मारत होती.
"सोनाली..इकडे कुठं?"
"अगं तन्वीचं गँदरींग आहे.."
"मग?"
"मग काय मग..गँदरींग असलं की येणारचं ना आरकेवर?"
"अय्या खरंच की.. जरीवाल्याकडेच ना.आपण पण शाळेत असताना जायचो ना.मी परी झाले होते .. तेव्हा ड्रेस आणायला आपणच आलो होतो बघ."
"हो ना...अजुनही मी काही आणायचं असलं मुद्दाम गावातच येते.*आरके* वर आल्याशिवाय गावात आल्यासारखं वाटतंच नाही बघ.."
"खरंच गं..*आरके तो आरके*
------------------------------
पिंटु पुर्वी दहीपुलावर रहायचा.शाळा *आरके* वर..त्यामुळे रोज चांदीच्या गणपतीचे दर्शन व्हायचे.नंतर कॉलेजला जाताना पण *आरके* वरुनच बस पकडायचा.पण त्यापुर्वी चांदीच्या गणपतीचं दर्शन मस्ट.खुप श्रद्धा होती त्याची या गणपतीवर.
आता तो रहातो कॉलेज रोडवर.पण खास दर्शनासाठी *आरके* आला.डोळे मिटुन .. हात जोडुन गणपतीपुढे उभा होता.आणि मनाशीच म्हणत होता..
"बाप्पा.. तुला तर माहीतच आहे.. तु..तुझं हे मंदिर .हा *आरके* चा एरीया मला लहानपणापासून खुप प्रिय.याच परीसरात मी लहानाचा मोठा झालो..नाशिकच्या चालीरीती.. संस्कार माझ्यावर झाले ते याच परीसरात. आता तुझ्याकडे एकच मागणं आहे...
या स्मार्ट सिटी प्रकल्पात माझ्या या *रविवार कारंजाची*....या *आरके* ची शान अबाधित राहु दे.तिला कुठेही धक्का लागु देऊ नको.

सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८ 
Details
Nussuk ( Nasik)

DATE PRINTED: 1856.
ARTIST/CARTOGRAPHER/ENGRAVER: Engraved by J.Smith after a picture by C. Dibden from a sketch by Capt. Meadows-Taylor. Colonel Philip Meadows Taylor, CSI (25 September 1808 – 13 May 1876), an administrator in British India and a novelist, made notable contributions to public knowledge of South India.
PROVENANCE: Published by A. Fullarton & Co. in "A Gazetteer of the World", 1856. 

On 21st December 1909( today exactly 114 years), Anant Laxman Kanhere shot Jackson, the Collector of Nashik, at Vijayanand theatre. The people involved in the assassination, Kanhere, Krishnaji Gopal Karve, and Vinayak Ramchandra Deshpande, were sentenced to death by the British government.

Cut copy paste from Shri Vinaykumar Chumble's Facebook handle..

जॅक्सन आणि विजयानंद थिएटर.
उभे असलेले अनंत कान्हेरे आणि विनायक देशपांडे. बसलेले कृष्णाजी गोपाळ कर्वे (काळा कोट)
जॅक्सनचे थडगे
या प्रकारणातली वृत्तपत्रातील एक बातमी. सौजन्य डॉ. उदय कुलकर्णी.

भारतातील सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील महत्वाची मानली जाणारी घटना म्हणजे "काळाराम मंदिर सत्याग्रह".!!!
२ मार्च १९३० साली दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून सुरू झालेला हा सत्याग्रह जवळपास ५ वर्षे चालला.
आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते दादासाहेब गायकवाड यांच्यासह असंख्य दलित बांधवांनी ह्या सत्याग्रहात भाग घेतला. ! नाशिकच्या इतिहासातील हे महत्वपूर्ण पान आहे.!

(नाशिकचे काळाराम मंदिर सर्व हिंदूंना मोकळे करून द्यावे, म्हणून तेथील सनातनी लोकांस स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले पत्र)
- माझ्या सनातनी नाशिककर हिंदु बंधूंना माझे अनावृत पत्र
माझ्या सर्व हिंदु बंधूनो, आणि विशेषतः माझ्या नाशिककर धर्मबंधुनो, माझी तुम्हांस अत्यंत नम्र पण अत्यंत आग्रहाची विनंती आहे की, अगदी शक्य तितके त्वरित, अगदी आजच आपल्या पूर्वास्पृश्य हिंदु बंधूंना पंचवटीच्या श्रीराममंदिराचे देऊळ इतर स्पृश्य हिंदुबंधूप्रमाणेच उघडे करावे.
या विषयाची सांगोपांग चर्चा मी आता येथे करीत बसत नाही. ती चर्चा यथेच्छ झाली आहे. युक्तिवादाच्या किंवा शास्त्राधाराच्या बळावर मी हे पत्र लिहीत नाही तर केवळ हिंदु हिताच्या आणि प्रेमाच्या बळावर मी हें पत्र लिहीत आहे.
दुसऱ्या एखाद्या देवळाविषयीच्या वादात मी हे पत्र क्वचित् लिहिलें नसतें. अखिल हिंदु देवालये नवीं निर्माण करून तसे प्रश्न काही अंशी सुटतील. पण पंचवटीचा राम, सीतागुंफा किंवा सेतुबंध प्रभृति स्थाने यांचें एक पवित्र ऐतिहासिक महत्त्व आहे. ते इतर कोणत्याही देवळाला येणे अशक्य आहे. यास्तवच या पवित्र ऐतिहासिक स्थानांवर सर्व हिंदूंचा सारखाच विशिष्ट वारसा आहे. रायगड ही शिवरायांची राजधानी. तिथे ती अवलोकन करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीयांस जर आपण म्हणू लागलो की 'तुला नवा किल्ला बांधून देतो. तू तिथेच रायगड अशी कल्पना कर आणि समाधान मान.' तर ते हास्यास्पद होईल. कारण तें स्थानमाहात्म अप्रतिम आहे. तसेंच जिथे राम वनवासी राहिले, जिथे सीता वनवासी निवसे, जिथे कौरव पांडव लढले, गीता उपदेशिली ती ती ऐतिहासिक देवस्थानें, तीर्थे, क्षेत्रे, ही अप्रतिमच- ज्यांचे वैशिष्ट्य त्यांच्या कोणत्याही प्रतिलिपीस (Copy स) येणें शक्य नाही, तशींच सदोदित राहणार. तेव्हा आपल्या तीर्थमहात्म्यादिक ग्रंथांनी त्यांस जें अनन्य पुण्यप्रदत्व दिलें आहे त्यामुळेच ही स्थानें अखिल हिंदूंना आपण मुक्तद्वार केली पाहिजेत. त्यास दुसरी तोडच नाही.

नासिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी काळाराम मंदिर खुले करून सर्वांना प्रवेश मिळवून दिला होता. या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहास स्वा. सावरकरांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे पाठिंबा होता. म्हणूनच स्वा. सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेत असतांना त्यांनी आपले लहान बंधू डॉ. नारायणराव सावरकरांना नासिक येथे पाठवले होते.
काळाराम मंदिर येथे डॉ‌. नारायणराव सावरकर आणि त्यांचे अनुयायी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या काळाराम मंदिर लढ्यात खुल्या दिल्याने साथ दिलेली आहे.
==============================

यास्तव काय होईल ते होवो, आपण होऊन आम्ही ती स्थाने आणि या प्रसंगापुरतें ते श्रीराममंदिर आपल्या पूर्वास्पृश्य हिंदु बंधूंना मोकळे करावेंच. मी मूळचा नाशिकचा म्हणून मला नाशिक-विषयी जें अल्लड ममत्व आजन्म वाटत आले आहे. आणि मजविषयी नाशिकनेही आजवर अनेकदा जे आपुलकीचे विशेष प्रेम आणि आदर व्यक्तविला आहे, त्या प्रेमाचा आणि ममत्वाचा वशिला लावून आणि मी आबाल्य हिंद जातीस्तव आणि हिंदुस्थानास्तव जी अल्पवय सेवा करीत आलो, कसोशीत आलो आणि आज तीस वर्ष ती सेवा आपण हिंदूंचे हिताहित कशात आहे याचे जे अनुभवजन्य ज्ञान मला झाले आहे, त्या सेवेची, त्या कष्टांची आणि त्या अनुभवाची हमी देऊन मी आपणांस ही विनंती करीत आहे, हे आश्वासन देत आहे की, पंचवटीचे श्रीराममंदिर पूर्वास्पृश्य हिंदु बंधूंना इतर हिंदूप्रमाणेच अप्रतिबंधपणे उघडे करताच आपल्या हिंदू जातीची शह प्रभाव आणि जीवन अनेक पटींनी अधिकच प्रबल होईल- लेशमात्रही दुर्बळ तरी होणार नाहीच नाही!!
पूर्वांस्पृश्यांची मंदिरप्रवेशाची मागणी अत्यंत धर्म्य, न्याय्य आणि ते ज्या सत्याग्रहाच्या निकरावर आले आहेत, तो सत्याग्रह आपल्या पिढ्यान् पिढ्याच्या दुराग्रहाचाच केवळ अपरिहार्य पडसाद आहे!
#साठ_सत्तर_पिढ्या_त्यांनी_वाट_पाहिली. #आणखी_वाट_ती_त्यांनी_किती #पाहावयाची? आता आपणच ती वाट त्यांना मोकळी करून देणे एवढेच बाकी उरले आहे.
यास्तव पूर्वास्पृश्य हिंदुबंधु मंदिराशी येताच तुम्ही त्यांचे उत्कंठ प्रेमाने स्वागत करा आणि पतितपावन रामचंद्रासमोर एकत्र जाऊन आपण सर्व स्पृश्यास्पृश्य पतित दोन्ही कर जोडून झाल्या गेल्याची क्षमायाचना करा की पहा तर खरे, जातीय प्रेमाची केवढी लाट हिंदुस्थानभर उसळते ती अखिल हिंदूंच्या कंठातून निघालेल्या "हिंदुधर्मकी जय'चा अपूर्व गर्जनेने ते राममंदिर कधी दुमदुमलें नव्हते तसे दुमदुमते ते आणि त्या गर्जनेसरसे अहिंदु शत्रूंचे मानभावी जाळे तुटून त्यांच्या दुष्ट आशांची तोडे कशी काळी ठिक्कर पडतात ती!!
प्रत्यक्ष राक्षस कुळातील विभीषणादिकांना त्यांच्यात भक्ति उदय होताच अयोध्येचा आपला राजवाडा मुक्तद्वार करणारा श्रीराम त्यांच्याच जातीच्या, धर्माच्या आणि राष्ट्राच्या या परंपरागत भक्तास या पूर्वास्पृश्य हिंदु बंधूस, आपल्या देवालयाची मुक्त करण्याची सद्बुद्धि आम्ही स्पृश्य हिंदूंना देवो ही मनोभावे करुणा भाकणारा..
आपला,
ज्ञातिबंधु नि धर्मबंधु
विनायक दामोदर सावरकर
रत्नागिरी, दि. १३ मार्च १९३१
▪️संदर्भ : सावरकर - एक अभिनव दर्शन
▪️शब्दांकन - शिरीष श. पाठक, नासिक
निळकंठेश्वर मंदिर नाशिक पंचवटी येथील जीर्ण झालेला शिलालेख
सुंदर नारायण मंदीर
CBS , NDCC bank area .
Photo courtesy Chetan Rajapurkar





नाशिकच्या संस्कृती वैभवातील दर्दी रसिक प्रेक्षकांच्या आठवणींचे सोनेरी पिंपळपान..
अनेक दिग्गज कलाकारांनी येथे आपली कला सादर करुन पाडवा पहाट अजरामर केल्या आहेत..
नुकतीच 25वर्ष या वर्षी या कार्यक्रमाला झाली आहेत.. रौप्य महोत्सवी वाटचाल करुन हा पिंपळपार अनेक विक्रम करायला सज्ज झाला आहे..
ह्या पारावरच पं. भीमसेन जोशी यांची देखील मैफिल रंगली होती.
अगदी गो.ह.देशपांडे पथापर्यंत गर्दी होती.
Short Story :-
Need your comments..

Photo developed by a friend of mine from United Kingdom. All photos I am posting has been gifted to me by him . Best part is he is fond of buying old negatives and developing it.. These were marked on negative as 1940 Nasick. Later on he added colours to photos ..Enjoy.
पंचवटी मधील काळाराम मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम दिसते ती ही पाटी.हनुमानाच्या पाठीशी असलेली.त्यातलं पहिलं वाक्य मला नेहमीच आकर्षित करुन घेतं.

*क्रोध हो तो बोलो मत..शांतस्थान में जाओ..*
Kumbh Mela written 1955 written on walls , looks freshly painted.
कुंभमेळा म्हटल कि हाच फोटो बर्याच वर्षा पासुन सोशल मिडिया वर फिरतो आहे.. याच्या आधीचे किंवा नंतरचे फोटो काही जास्त बघायला मिळालेले नाहीत... कोणा कडे असल्यास टाकावेत..

१९४३
त्र्यंबकेश्वर ..
नारोशंकर मंदीराचा ईतका जुना फोटो पहिल्यांदा बघण्यात आला.




कालिका मंदिर, जुनी तांबटआळी..
व्हिक्टोरिया ब्रीज..नाशिक
14जानेवारी 1895..
अहिल्याबाई होळकर पूल..
नाबाद 129🎂
त्र्यंबक गड /ब्रम्हगिरी किल्ला नाशिक जुने चित्र
भोंसला मिलिटरी स्कूल नाशिकच्या मंदिरातील हा कोदंडधारी राम...
या रामाच्या चरणी मी आणि माझ्यासारखी असंख्य तरूण मंडळी आजवर नतमस्तक झालेली आहेत.
लक्ष्य भेद करण्यासाठी जी एकाग्रता आणि जो फोकस पाहिजे तो या मूर्तीकडे पाहून शिकता येतो. तसंच हा राम एरवी सगळीकडे सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत यांना सोबत घेऊन असतो मात्र इथे या संगमरवरी मंदिरात हा एकटाच आहे. पूर्वी भोसल्याच्या रामापर्यंत पायी जायचो आम्ही ती वाट गवतानी, काट्याकुट्यांनी भरलेली होती. वडील म्हणायचे, चला सगळेजणं आज भोसल्याच्या रामापर्यंत पायी चालत जाऊ .. आणि आम्ही जायचो. मंदिरात पोहचलो की तिथल्या संगमरवरी दगडाची शीतलता अनुभवास येत असे. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी आधी तिथे गरम पाण्यात पाय बुडवून मगच आत जाता यावे अशीच रचना केलेली होती, त्यामुळे दोन पावलं त्या कोमट पाण्यात भिजली की सुखद अनुभूती मिळे. मुख्य म्हणजे चालून थकलेल्या पावलांना फार बरं वाटत असे तेव्हा... आणि मग समोर हा कोदंडधारी राम! एकच अभेद्य लक्ष्य समोर ठेवून उभा ... एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षण कालावधीत कसं असावं याचा जणू आदर्श समोर ठेवणारा हा राम.
ही रामाची मूर्ती भोंसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान वापरलेल्या रायफल्समधील गोळ्या वितळवून त्या धातूपासून घडवलेली आहे हे हिचे वैशिष्ट्य, म्हणजे पुन्हा त्यातूनही विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाचा संदेश.
या रामाने आजवर पिढ्यानपिढ्या घडवल्या आहेत आणि आपल्या नजरेसमोर 'घडताना' पाहिल्याही आहेत.
असा हा राम ...
बोला
।। जय श्री राम ।।
- मोहिनी घारपुरे देशमुख
** लासलगाव चे राम मंदिर**
*** "अहिल्या राम "
*** होळकरांच्या राजवटीत स्थापन झालेले लासलगाव खऱ्या अर्थाने 17 व्या शतकातच परिपूर्णतेने टुमदार गाव म्हणून उभे राहिले
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या 9/12/1786 ला किल्ल्या च्या वास्तू शांती समारंभ साठी लासलगावी वास्तव्यास असल्याचे एक पत्र उपलब्ध आहे (श्री रामभाऊ लांडे ,अंबड यांच्या संग्रही) त्याचं सुमारास गावातील बारिच कामे पूर्णतःवास गेली होती त्याचं सुमारास श्री रामा चे हल्ली चे मंदिर पूर्णतःवास आले असावे ह्या बाबत लेखी असा पुरावा उपलब्ध नाही मात्र मंदिर व मूर्ती ची शेली बघता त्याला दुजोरा मिळतो की त्याच सुमारास हे पूर्ण झाले असावे
ह्या बाबत आमचे मार्गदर्शक मित्र इतिहास अभ्यासक रोहित दादा जाधव,सटाणा यांच्या बरोबर मूर्ती चे फोटो दाखवून चर्चा केली असता त्यास दुजोरा मिळाला की सदर मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात स्थापन झालेले राम मंदिर आहे
पुनःश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ई.स. 1775 च्या सुमारास अनेक ठिकाणी श्री रामा ची मंदिरा ची स्थपणा केली ते मंदिर व मूर्ती हे एका दंडकतील असत - दंडकतील म्हणजे मंदिर व मूर्ती निर्माण करण्या बाबत त्यांनी काही नियम बनवले होते त्या नियमां नुसार झालेल्या राम मूर्तिना " अहिल्या राम " म्हणून ओळखले जाते
अहिल्या रामाची सर्वात पहिली मूर्ती नासिक येथे प्राणप्रतिष्टा करण्यात आली त्या नंतर भारत भर तश्या शेकडो मूर्ती स्थपण झाल्या - - त्या पैकी च एक लासलगाव चे श्री रामा चे मंदिर आहे
लासलगावतील राम मंदिरात पूर्वी रामनवमी ला जत्रा भरत असे त्या जत्रे ला 3000 लोकांची उपस्थिती असल्याची नोंद ब्रिटिश ग्याझेट मध्ये केलेली आहे
*****"
******** संजय बिरार
लासलगाव
9822730310
माझं नाशिक माझी आयोध्या
जय श्री राम
श्री काळाराम मंदिर, १८८०

माझ्या सनातनी नाशिककर हिंदु बंधूंना माझे अनावृत पत्र

- वीर सावरकर

(नाशिकचे काळाराम मंदिर सर्व हिंदूंना मोकळे करून द्यावे म्हणून तेथील सनातनी लोकांस सावरकरांनी लिहिलेले पत्र)

माझ्या सर्व हिंदु बंधूनो, आणि विशेषतः माझ्या नाशिककर धर्मबंधूनो, माझी तुम्हांस अत्यंत नम्र पण अत्यंत आग्रहाची विनंती आहे की, अगदी शक्य तितकें त्वरित, अगदी आजच, आपल्या पूर्वास्पृश्य हिंदु बंधूंना पंचवटीच्या श्रीराममंदिराचें देऊळ इतर स्पृश्य हिंदुबंधूप्रमाणेच उघडे करावें. या विषयाची सांगोपांग चर्चा मी आता इथे करीत बसत नाही. ती चर्चा यथेच्छ झाली आहे. युक्तिवादाच्या किंवा शास्त्राधाराच्या बळावर मी हें पत्र लिहीत नाही तर केवळ हिंदु हिताच्या आणि प्रेमाच्या बळावर मी हें पत्र लिहीत आहे. दुसऱ्या एखाद्या देवळाविषयीच्या वादात मी हें पत्र क्वचित् लिहिले नसतें. अखिल हिंदु देवालयें नवीं निर्माण करून तसे प्रश्न काही अंशी सुटतील. पण पंचवटीचा राम, सीतागुंफा किंवा सेतुबंध प्रभृति स्थानें यांचें एक पवित्र ऐतिहासिकबमहत्त्व आहे. तें इतर कोणत्याही देवळाला येणें अशक्य आहे. यास्तवच या पवित्र ऐतिहासिक स्थानांवर सर्व हिंदूंचा सारखाच विशिष्ट वारसा आहे.

रायगड ही शिवरायांची राजधानी. तिथे ती अवलोकन करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीयांस जर आपण म्हणू लागलो की 'तुला नवा किल्ला बांधून देतो. तू तिथेच रायगड अशी कल्पना कर आणि समाधान मान.' तर तें हास्यास्पद होईल. कारण तें स्थानमाहात्म अप्रतिम आहे. तसेंच जिथे राम वनवासी राहिले, जिथे सीता वनवासी निवसे, जिथे कौरव पांडव लढले, गीता उपदेशिली तीं ती ऐतिहासिक देवस्थानें, तीर्थे, क्षेत्रे, ही अप्रतिमच- ज्यांचे वैशिष्ट्य त्यांच्या कोणत्याही प्रतिलिपीस (Copy स) येणें शक्य नाही, तशींच सदोदित राहणार. तेव्हा आपल्या तीर्थमहात्म्यादिक ग्रंथांनी त्यांस जें अनन्य पुण्यप्रदत्व दिले आहे त्यामुळेच हीं स्थानें अखिल हिंदूंना आपण मुक्तद्वार केली पाहिजेत. त्यास दुसरी तोडच नाही. यास्तव काय होईल ते होवो, आपण होऊन आम्हीं तीं स्थानें आणि या प्रसंगापुरतें ते श्रीराममंदिर आपल्या पूर्वास्पृश्य हिंदु बंधूंना मोकळें करावेंच.

मी मूळचा नाशिकचा म्हणून मला नाशिक-विषयी जें अल्लड ममत्व आजन्म वाटत आलें आहे, आणि मजविषयी नाशिकनेही आजवर अनेकदा जें आपुलकीचें विशेष प्रेम आणि आदर व्यक्तविला आहे, त्या प्रेमाचा आणि ममत्वाचा वशिला लावून आणि मी आबाल्य हिंदु जातीस्तव आणि हिंदुस्थानास्तव जी अल्पस्वल्प सेवा करीत आलो, कष्ट सोशीत आलो, आणि आज तीस वर्षे ती सेवा करताना आपणां हिंदूंचें हिताहित कशात आहे याचें जें अनुभवजन्य ज्ञान मला झालें आहे, त्या सेवेची, त्या कष्टांची आणि त्या अनुभवाची हमी देऊन मी आपणांस ही विनंती करीत आहे, हें आश्वासन देत आहे की, पंचवटीचें श्रीराममंदिर पूर्वास्पृश्य हिंदु बंधूंना इतर हिंदूप्रमाणेच अप्रतिबंधपणे उघडे करताच आपल्या हिंदू जातीची शक्ती, प्रभाव आणि जीवन अनेक पटींनी अधिकच प्रबल होईल- लेशमात्रही दुर्बळ तरी होणार नाहीच नाही!!

पूर्वास्पृश्यांची मंदिरप्रवेशाची मागणी अत्यंत धर्म्य, न्याय्य आणि ते ज्या सत्याग्रहाच्या निकरावर आले आहेत, तो सत्याग्रह आपल्या पिढ्यान् पिढ्याच्या दुराग्रहाचाच केवळ अपरिहार्य पडसाद आहे! साठ सत्तर पिढ्या त्यांनी वाट पाहिली. आणखी वाट ती त्यांनी किती पाहावयाची? आता आपणच ती वाट त्यांना मोकळी करून देणें एवढेच बाकी उरलें आहे.

यास्तव पूर्वास्पृश्य हिंदुबंधु मंदिराशी येताच तुम्ही त्यांचे उत्कंठ प्रेमाने स्वागत करा आणि पतितपावन रामचंद्रासमोर एकत्र जाऊन आपण सर्व स्पृश्यास्पृश्य पतित दोन्ही कर जोडून झाल्या गेल्याची क्षमायाचना करा की पहा तर खरे, जातीय प्रेमाची केवढी लाट हिंदुस्थानभर उसळते ती! अखिल हिंदूंच्या कंठातून निघालेल्या ‘हिंदुधर्मकी जय’चा अपूर्व गर्जनेने तें राममंदिर कधी दुमदुमलें नव्हतें तसें दुमदुमते ते आणि त्या गर्जनेसरसे अहिंदु शत्रूंचें मानभावी जाळें तुटून त्यांच्या दुष्ट आशांची तोंडें कशीं काळी ठिक्कर पडतात तीं!!

प्रत्यक्ष राक्षस कुळातील विभीषणादिकांना त्यांच्यात भक्ति उदय होताच अयोध्येचा आपला राजवाडा मुक्तद्वार करणारा श्रीराम त्यांच्याच जातीच्या, धर्माच्या आणि राष्ट्राच्या या परंपरागत भक्तास या पूर्वास्पृश्य हिंदु बंधूस, आपल्या देवालयाचीं द्वारेंही मुक्त करण्याची सद्बुद्धि आम्हीं स्पृश्य हिंदूंना देवो ही मनोभावे करुणा भाकणारा

आपला,
ज्ञातिबंधु नि धर्मबंधु
वि. दा. सावरकर
रत्नागिरी दि. १३-३-१९३१
सातवाहनकालीन महाराष्ट्र

लेखक: डॉ रा.श्री मोरवंचिकर

महाराष्ट्रातील संस्कृतीचा विकास ज्यांच्या पासून सुरू झाला ते राजे म्हणजे सातवाहन!महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आरंभ म्हणजेच सातवाहन कालखंड!

सातवाहन हे स्वकीय होते.येथील निवासी होते.भूमिपुत्र होते.परकियांच्या सत्तांना रोखणारे होते.

जगाच्या पटलावर महाराष्ट्राला सर्वप्रथम झळकावणारे घराणे म्हणजे सातवाहन! चारशे वर्षांची प्रदीर्घ राजवट! आंतरराष्ट्रीय व्यापारावर वर्चस्व! आर्थिक सुबत्ता, धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सामंजस्य ,साहित्य व कला क्षेत्रात असामान्य प्रगती असा हा कालावधी! सातवाहन युग हे एक सुवर्णयुग!
इतिहास,कला,स्थापत्य आदी क्षेत्रात रुची असलेल्या वाचकांसाठी अतिशय सुंदर आणि दुर्मिळ शोध ग्रंथ!
संशोधनाच्या सर्व अंगाने अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने लिहिलेला हा ग्रंथ चोखंदळ वाचक आपल्या संग्रहात ठेवतात असा हा ग्रंथ!

तिसरी सुधारित आवृत्ती

पृष्ठ:३५१ मूल्य:५००/ सवलत मूल्य:४६०/ टपाल:४०/

एकूण:५००/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

ज्ञानसाधना पुस्तकालय:9421605019

इतिहास शोधायला निघालो की इतिहास जवळच सापडतो...मात्र त्याची माहिती किंवा महत्व त्या पूर्वी आपल्याला कळलेलं नसतं.असाच काही प्रकार हा ग्रंथ वाचताना वाटतं.धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील "तेर" या गावी सातवाहनांच्या खुणा आहेत....पैठण ही असेच!

नागार्जुन सागर जेथे आहे! कधीकाळी तेथेच नागार्जुन नगर होते! नागार्जुन नावाच्या गुरूंच्या स्मृतीत विजय सातकर्णी या अखेरच्या राजाने उभारलेली ही नगरी! ज्याचे राज्य नर्मदा ते कृष्णा इतके व्यपाक होते!या राजवटीचा कालावधी तब्बल २०० वर्षांचा!

गौतमीपुत्र सातकर्णी हा जगप्रसिद्ध राजा सातवाहन कुळातील होता.सातवाहनांच्या विविध शाखांनी देशाच्या विविध भागांत राज्य केलं.त्याचाही तपशील या ग्रंथात विस्ताराने वाचायला मिळतो.

लेखकाने हा ग्रंथ फारच अभ्यासपूर्ण लिहिला आहे.अचंबित करणाऱ्या माहितीने या ग्रंथाचे पानं ओसंडून वाहत आहेत.कित्येक गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत,आपले अज्ञान उघड होत जाते.वाचक नव्यानं, नवीन माहितीने समृध्द होत जातो.

•पहिल्या प्रकरणात त्या काळातील महाराष्ट्राची भौगोलिक माहिती दिली आहे.स्थान आणि विस्तार, नद्या आणि पर्वत!सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी!

रामायण काळापासून दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागातील लोकांना पुढे बौद्ध साहित्यात(महावंश बौद्ध ग्रंथ) महारट्ट देश असा उल्लेख आहे.सम्राट अशोकाच्या शिलालेखात रठीक लोक म्हणजे महाराष्ट्रीय असा बोध होतो.सातवाहन शिलालेखात महारठी असे उल्लेख आहेत.

त्या काळातील महाराष्ट्रातील जनपद अश्मक, मुलक,अपरान्त,कुंतल, त्रिकुटविषय,ऋषिक,भोगवर्धन,विदर्भ ही जनपद होती याचा योग्य त्या संदर्भासह तपशील दिलेला आहे.यात विविध शिलालेख,बौद्ध ग्रंथ यांचा दाखला दिलेला आहे.
या काळातील सापडलेल्या नाणे,अन्य माहिती वरून भोकरदन, तेर, पैठण ही प्रसिद्ध व्यापारी केंद्र होती हे समजते.या शिवाय जुन्नर, नाशिक,कोल्हापूर, कराड यांनी ही व्यापारी केंद्र म्हणून नाव कमावलेले होते.कल्याण सारखे विकसित बंदर होते.

• दुसरे प्रकरण: सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या इतिहासाची साधने!
या प्रकरणात विविध साहित्याचा उहापोह केलेला आहे.त्यात हिंदूधर्मीय साहित्य! जैन साहित्य!बौद्ध ग्रंथ! याशिवाय परिकिय इतिवृत्ते, पुरातत्वीय साधने, अभिलेख, नाणी, आवशेष आणि स्मारके,उत्खनने,निधर्मी साहित्य आदींच्या आधाराने अतिशय सखोल अशी माहिती दिलेली आहे.

•प्रकरण तिसरे:ऐत्याहसिक जडण घडण: सातवाहनांचा कालखंड आणि त्यांचे मूलस्थान याचा तपशील यात पुरवला आहे.कालावधी मोठा आहे.यांचे स्थान महाराष्ट्र का आंध्र असा ही गुंता यात आहे.त्याचे विविध मत मतांतर यात दिलेले आहेत.

असे एकूण दहा प्रकरणे आहेत. या पुस्तकातील माहिती आणि रचना ,चित्रे खूपच तपशीलवार आहेत.हा अतिशय मौलिक असा इतिहासाचा ग्रंथ अनेक विद्वानांची मत मतांतरे व्यक्त करून जातो.यात प्रत्येकाच्या मताला स्थान दिलेलं आहे.

अशा प्रकारच्या पुस्तकांची समीक्षा किंवा परिचय करून देण्यासाठी खूप मोठा अभ्यास असावा लागतो.तसा अभ्यास नसूनही मी केलेला प्रयत्न अगदीच तोकडा आहे.

आपले वाचक या पुस्तकाचा तपशीलवार परिचय लिहून देतील असा विश्वास आहे.

लेणी संवाद
सातवाहनकालीन आंतरराष्ट्रीय व्यापार , नागरीकरण व सत्ता संघर्ष
सातवाहन काळात व्यापार वाढीला पोषक ठरलेल्या मान्सून वाऱ्याचा शोध ही पाश्चिमात्य आंतरराष्ट्रीय दळण वळणात सागरी महामार्गास भर घालणारा ठरला। सातवाहनांशी होणाऱ्या व्यापाऱ्याला विशेष गती प्राप्त झाली। इस 45 च्या सुमारास हिप्पोलसने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मौसमी वाऱ्याचा कसा विनियोग होतो हे दाखवून दिले आणि सागरी संस्कृती चा पाया घातला। या सर्व कारणांमुळे सातवाहन काळात नागरिकरणाला प्रोत्साहन मिळाले। महाराष्ट्राचे नागरीकरण हे सातवाहन संस्कृती चे आगळे वेगळे वैशिष्ट्य मानले जाते।
मान्सून वाऱ्याच्या शोधामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी ला विशेष महत्व लाभले आणि येथील बंदरे उत्पादन क्षेत्राना तथा नागरी केंद्रांना जोडली गेल्यामुळे व्यापारी वर्गाचा उदय होण्यास मदत झाली। याच वर्गानी सार्थवाह पंथाचे महाराष्ट्र भर जाळे विणले आणि पूर्वेकडील बंदरणाही दळणवळणाच्या मार्गानी जोडले। त्यांच्या काळातील मछलीपट्टम ते भडोच मार्गे प्रतिष्टान हा सर्वात मोठा महामार्ग होता म्हणजेच सातवाहनकालीन नागरीकरणाची व्याप्ती समजण्यास मदत होते।

मान्सून वाऱ्यांचा पश्चिमी व्यापारासाठी उपयोग करण्याची पद्धती रूढ झाल्यामुळे पश्चिमी किनारपट्टी चे महत्व वाढले। तसेच याच कालखंडात रोमन साम्राज्याची भरभराट होण्यास आरंभ झाला। त्यामुळे रोमन साम्राज्यात भारतीय मालास विशेषतः भिन्न प्रकारचे कापड, मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंती व चंदनाच्या वस्तू, चंदन, नाग, मोर व माकड यासारखे प्राणी आणि पक्षी यांची मागणी वाढली। परिणामी भारताला मोठा फायदा होऊ लागला। या व्यापारामध्ये दक्षिणेचा सहभाग मोठा असल्याने आणि पश्चिमी सागरातून हा व्यापार होत असल्याने या प्रदेशाचे महत्व वाढले। त्यामुळे या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी समकालीन सत्तामध्ये म्हणजेच शक-क्षत्रप व सातवाहनांमध्ये संघर्ष सुरू झाला। सातवाहन राजे या स्पर्धेत यशस्वी झाले आणि त्यांनी पाश्चिमात्य व्यापारावर प्रभुत्व प्रस्थापित केले।

सातवाहन काळात लाभलेल्या राजकीय स्थैर्यामुळे आर्थिक विकासास मोठा वाव मिळाला। हिप्पोलसने लावलेल्या मान्सून वाऱ्याच्या शोधामुळे पाश्चिमात्य व्यापाराला चालना मिळाली। बौद्ध धम्माने व्यापाऱ्यांच्या संघटना भक्कम केल्या। व्यापाऱ्यांनी पश्चिम समुद्रप्रवासाचा धोका पत्करून सातवाहन साम्राज्यातील मालाला युरोपीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली। त्यामध्ये एकाधिकार निर्माण केला। अशा प्रकारची समृद्धी महाराष्ट्राला पुनः लाभली नाही।

(संदर्भ: सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा श्री मोरवंचिकर )
सविस्तर माहितीसाठी वरील पुस्तक अभ्यासावे।

संकलन : प्रफुल्ल पुरळकर

अन्य काही महत्वाची संदर्भ ग्रंथ

१.पुस्तक:कोण होते वाकाटक
लेखक:अरविंद जामखेडकर
पृष्ठ:१८२ मोठा आकार
मूल्य:४००/
टपाल:३५/

२.
पुस्तक: वेरूळ लेणी
लेखक: मधुसूदन नरहर देशपांडे
पृष्ठ:१४४ मोठा आकार
मूल्य:२५०/
टपाल:३५/

३.
पुस्तक:महाराष्ट्रातील बौद्ध लेणी
लेखक: डॉ.सूरज अ.पंडित
पृष्ठ:२२४ मोठा आकार
मूल्य:४००/
टपाल:३५/

४.
पुस्तक:महाराष्ट्रातील बारव स्थापत्य
आणि पारंपरिक जलव्यवस्थापन
लेखक: अरुणचंद्र शं. पाठक
पृष्ठ:२५६ मोठा आकार
मूल्य:४००/
टपाल:३५/

विशेष सवलत:वरील सर्व :५ पुस्तकं एकत्रित खरेदी केल्यास:१८५०/ घरपोच मिळतील!

अधिक माहितीसाठी कृपया व्हॉट्सॲप करावे.

ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी:9421605019

पोस्ट आवडल्यास लाईक करून शेअर करावी
ही पोस्ट आपल्या अभ्यासक मित्रांना पाठवून द्यावी ही विनंती
||श्रीरामनवमी||

पुर्वी फिरायला जाणं म्हणजे एक विरंगुळा असायचा. उन्हाची काहीली कमी करायला गंगेच्या पाण्यात पाय सोडून बसण्याचा कोण आनंद असायचा.
आजच्यासारखे बाहेर फिरायला जाणं म्हणजे काही-बाही खादडायचंच असं नव्हतं.
उपमा,पोहे,मोकळी भाजणी,दडपे पोहे ,रविवारी इडली-डोसा,आप्पे, कधी कधी कुकरमध्ये रेतीत बनलेला रवा केक. काय बिशाद बाहेरच्या पदार्थांना घरात येण्याची!!
आई आमची हौशी, अनेक रुचकर पदार्थ बनवून खायला घालणे हि तिची आवड. घरात आलेला पाहुणा कधी उपाशी नाही गेला.घोटभर चहा घेतल्याशिवाय तर नाहीच नाही.
भरल्यापोटी बाहेर पडायचं ते उभा-आडवा मेनरोड कोळपायला. येता-जाता मित्र मंडळी भेटत, गप्पा-टप्पा होत पण चल नाक्यावर चहा घ्यायला,चल वडापाव खाऊया अश्या रिकवायरमेंटस् काँलेजात गेल्यावर अंगवळणी पडल्या.
पण बाहेरचे खायचेच नाही हे बंधन मात्र नव्हतं.
घराजवळच गोदामैंया असल्याने, रामनवमीचे नऊ दिवस तर रोज काळाराम मंदिरात जाणं व्हायचं.
वाड्यातले चिल्लर पार्टी, काही काँलेजमध्ये गेलेले पोरंटोरं, कधी कधी आमच्या आया अशी फौज काळारामाला निघायची. इथे ही तेच.दुतोंड्या मारुतीसारखंच रामालाही अरेतुरे जणू काही बरोबरीचाच. मंदिर जवळ असले तरी आमच्या इथून वेगवेगळ्या रस्त्यांनी जायचे. आम्ही पोरं एकात एक गुंफलेल्या जाळ्याप्रमाणे आमच्या वाड्यांतुन पार यशवंतराव पटांगणात पाच मिनिटांत पोहोचायचो.तत्पूर्वी, दुतोंड्यांच दोन्ही बाजुने दर्शन घेऊन,पायऱ्यावरुनच गोरेरामाला नमस्कार करून काळ्यारामाला पळायचं.एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की रामनवमीला फक्त काळाराम मंदिरातच जास्त गर्दी असायची गोरेरामाच्या दर्शनाला जास्त गेल्याचं आठवत नाही. पण लहानपणी
टंगट्वीस्टरचा गेम खेळतांना, काळाराम-गोराराम म्हणताना अजुनही जीभ नीट वळत नाही.
दुसरी वाट रामसेतू पुलावरून खाली उतरून.खरंतर पुलावरून जायला सरळ रस्ता असायचा पण जिना उतरून ,चप्पल हातात घेऊन,वाहत्या पाण्यातुन जातांना जी मज्जा यायची ना ती आत्ताच्या वाँटरपार्कस् मध्ये नाही. जाता जाता नारोशंकराच्या घंटेच दर्शन, मग मागच्या बाजुने सांडव्यावरच्या देवीच्या आवारातील शनी-मारुतीचं दर्शन.पटकन भीमरूपी म्हणून टाकलं की उशीर झाला तरी आई रागवणार नाही आणि मारुती पण प्रसन्न.असे आपले मनाचे मनोरे.मग देवीदर्शन. उंच बांधलेली घंटा जोपर्यंत वाजवता येत नाही तो पर्यंत दर्शन अपुरे. जाताजाता चौथऱ्यावर बांधलेले आँईलपेंटने रंगवलेले दगडी वाघ.त्यावर बसले की सर्कशीतल्या वाघावर बसल्यासारखं वाटायचं.मग उशीर होईल म्हणत पळतपळत राममंदिर. काळ्याभोर दगडांनी बांधलेले विस्तीर्ण आवारातील मंदिर बघितले की मन तृप्त व्हायचं. पायथ्याशी हनुमान मंदिरात नऊ दिवस भजन,किर्तन, गाण्याचे कार्यक्रम असायचे. शेवटच्या दिवशी ठरलेला गीतरामायणाचा कार्यक्रम हा मात्र कधी चुकवला नाही. रामाच्या मंदिरात जातांना दगडी पायऱ्या, प्रसन्न गाभारा. हातावर मिळणारा पंजीरीचा प्रसाद अजुनही डोळ्यासमोर उभं राहतं.

नंतर मात्र गंगेवर रामकुंडावर पाण्यात पाय सोडून बसणे. गांधी तलावाजवळ बसुन कागदावर भेळभत्ता,मकाजी कोंडाजीचा चिवडा किंवा तिखटमीठ लावलेली काकडी, ऊसाचा रस, असा फराळ करायचा. त्यावेळी गंगेकिनारी परिसर स्वच्छ असायचा. बिनधास्त खाली बसायला किंवा कागदावर भेळभत्ता खायला कधीच लाज वाटली नाही.एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की फिरायला जाणे यासोबतच देवदर्शन करणे, देवभक्तीची गोडी लागणे हे संस्कार नकळत लागले.
आता मात्र फिरायला जाणं म्हणजे झगमगाट असलेले माॅलस्, खिशाला चंदन लावणारं हाॅटेलींग इ.इ. असो.
त्यानंतर नेहरू गार्डन,जँक्सन गार्डनला(आताचे शिवाजी गार्डन) फिरायला जाणे. रंगीबेरंगी लाईट्स लावलेल्या कारंजाचे पाणी मुद्दाम अंगावर घेणे, रविवारी तिथे बँण्ड असायचा.लग्नाच्या वराती शिवाय इथला बँण्ड ऐकण्यात वेगळीच मजा असायची.
खुपच उशीर झाला तर कधी तरी प्रिया,सुरूची हाँटेलचा मसाला डोसा खायला जायचो. हाँटेलमध्ये शिरतानां वेगळंच फिलींग यायचं. एरव्ही पिक्चरमध्ये फक्त हाँटेलच्या आतलं दिसायचं आईबाबांसोबत जातांना फाईव्हस्टारफिलींग यायचं.पण हे कधीतरीच. नाहीतर आम्हाला गंगेवरची ओली भेळ,रगडापँटीस,पाणीपुरी हेच बाहेरचं खाणं.त्यात भर मटका कुल्फीची.कुल्फीवाला भैय्या मटक्यातुन कुल्फी काढुन,बशीत ठेवून काप करून देईपर्यंत धीर नसायचा.
पण जास्त आगाऊपणा न करता उगाचच उंच असलेल्या मटक्यात डोकवायचा प्रयत्न करायचा. मटक्याचे झाकण उघडले की दुधाळलेली थंड वाफ जाणवायची.पण हे सुद्धा कधीतरीच.
सुटट्यांमधे जर मामा आला की आमचा आईसक्रीमचा प्रोग्राम ठरलेला. भानूब्रदर्सच्या गल्लीत हो त्या गल्लीचं खरं नाव पगडबंद लेन हे खुप उशीरा कळालं. तर तिथुन साठ्येंच्या दुकानातुन आईस्क्रीमचा पाँट दर ताशी भाड्याने आणायचा. बाबा सायकलवरून मोठ्ठा बर्फ आणायचे. आईने,कस्टर्ड पावडर घालून आटवलेले दूध ,आंब्याचा रस हे मिश्रण पाँटमध्ये घालून भोवती बर्फ आणि खडे मीठ घालून पाँटच्या भोवती असलेली दांडी फिरवुन १तासानी डिशभर आईस्क्रीम हातात मिळायचे. आहाहा s s !! आनंद वर्णावा तितुका थोडाच.त्याची सर आँनलाईन आँर्डर केलेल्या फ्लेवर्ड आईस्क्रीमला नाही.
वर्षातुन एकदोन वेळा सोमेश्वर, पांडवलेणी, चांभार लेणी,
वणीची देवी, त्रंबकेश्वर,ठिकाणी जाऊन आलं की लांब गावाला गेल्यासारखं वाटायचं.
कधी कधी पाहुणे आले की पंचवटीतील सितागुंफा,रामकुंड, तपोवन कितीही वेळा गेलो तरी कंटाळा नाही यायचा.
सांगायचं एवढंच की मिळालेल्या गोष्टीत आमची पिढी सुखी-समाधानी होती. कसलाही हव्यास नव्हता. दिवाळी आणि वाढदिवसाला मिळणाऱ्या नवीन कपड्यांत आनंद असायचा.
ह्या सगळ्याची आठवण म्हणून दोनवर्षांपूर्वी आईबाबांसोबत कपालेश्वर, रामकुंडावर जाऊन आले होते.
काही महिन्यांपूर्वी पंचवटीत जाणं झालं परत येतानां कोपऱ्यात रामाचा रथ दिसला.आवर्जून पाच मिनिटं थांबुन रथाचे दर्शन घेतलं.
मनोमन रामरायाला नमस्कार केला. तसं लिहिण्यासारखे खुप काही आहे पण पुन्हा कधीतरी.आज आठवण झाली ती रामनवमीमुळे.
आज पुन्हा रामजन्म,मोठी आरती, पंजिरी-सुंठवडा,कलिंगड
(टरबुज) खरबुजाचा प्रसाद हे सगळं काळारामाच्या दगडी पायऱ्यांवर बसुन खाल्याचा भास होतोय.बघु कधी योग येतोय .
।।जय श्रीराम।।

शीतल अलका मिशाळ
ठाणे.
३०.३.२०२३






एकलहरा नाशिक
"शक्तिमान" हे शिल्प सर्वात वजनदार आणि उंच भंगार म्हणून गिनीज रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.
शिल्पकार श्री.देशपांडे .
नाशिक आणि देवळाली परिसराचा soldier's handbook मधील १९४५ सालचा नकाशा. हा नकाशा देवळालीवर अधिक फोकस केल्यामुळे नाशिकमधील काही ठिकाणांचा यात उल्लेख नाहीये, पण मूळ नाशिक शहरातील वस्ती काळ्या रंगात यात दिसून येते. जुन्या आग्रा रोडच्या पलीकडे फारच तुरळक वस्ती होती. सिडको, मेरी म्हसरूळ, द्वारका, उपनगर, सातपूर, इंदिरानगर राजीव नगर वगैरे, एरिया तर तेव्हा अस्तित्वातही नव्हते. गेल्या वीस तीस वर्षात झालेला नाशिक शहराचा विस्तार लक्षात येतो. त्र्यंबक, गंगापूर, पेठ, दिंडोरी, नाशिक पुणे रोड आणि अर्थात आग्रा रोड तेव्हाही होते. गोदावरीनंतर नासर्डी ही मुख्य नदी होती पण तेव्हाही तिचा उल्लेख नंदिनी ऐवजी नासर्डी असाच होत होता. देवळालीचा उल्लेख डिस्ट्रिक्ट असा केला आहे. देवळाली ब्रिटिशांनी कसे वसवले हे दिसून येते. पांडवलेणी आणि बाजूचा सारूळ डोंगर दिसतो. मूळ नकाशा लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत आहे
इ.स. 1869 चे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र...(Part - 1)
नारोशंकर मंदिराच्या भिंतीवर उभे राहून , पलिकडच्या तीराचे हे दृश्य ! 🙏🏻😊
टीप :- सध्याचा रामसेतू पूल अस्तित्वात न्हवता...
हा फोटो 1869 सालचा आहे. आणि व्हिक्टोरीया ब्रिज 1894-95 च्या सुमारास बांधला गेला..आणि हा त्यावेळेच्या नाशिक गावातला पहिला पुल होता..
पुल बांधुन झाल्या वर त्या पुला वरुन सुरुवातीस कोणीही जाण्यास तयार होत नव्हते.. कारण त्या वेळच्या लोकसमजूत अशी होती कि गंगा हि माता आहे. तिच्या वरुन चालत गेल्यास पाप लागते.. शेवटी तत्कालीन उपजिल्हाधिकारी यार्दी म्हणुन होते. त्याःनी असा तोडगा काढला कि पुलावर आल्यानंतर चपला डोक्यावर धरुन पुल पार करायचा..आणि पुल पार झाल्यावर परत चपला पायात घालायच्या म्हणजे पाप लागणार नाही. त्या नंतर हळुहळु लोक तयार झाले वर पुल पार करुन जाऊ लागले. पण महत्वाची गैष्ट अशी कि कैक महिने, सर्व स्त्रिया पुरुष डोक्यावर चपला घेऊन पुल पार करत होते.
त्रिरश्मी लेणीला पांडव लेणी किंवा पंडु लेणी सुद्धा म्हटले जाते.
या लेणीचे अध्ययन व निरीक्षण केल्यास आपल्याला कुठेही पांडवांची शिल्प व प्रतिमा आढळून येत नाही. मग प्रश्न पडतो की या लेणीचा उल्लेख पांडव लेणी असा का केला जातो. त्यामागे एक कारण असे आहे की, पाली प्राकृत भाषेमध्ये पिवळ्या रंगास पंडु असे म्हटले जाते. त्रिरश्मी लेणी समूह याठिकाणी असलेल्या भिक्षु संघाने पिवळ्या रंगाची वस्र म्हणजेच चिवर परिधान केलेले असायचे त्यामुळे त्यां पिवळ्या रंगाची वस्र धारण करणाऱ्या भिक्षुंना सामान्य लोक पंडु वस्रधारी म्हणतं असतं. नंतर पंडु नावाचा अपभ्रंश होऊन पांडव असा झाला. भारतीय पुरातत्त्व विभागाने निर्धारित केलेल्या टिकीटावर सुद्धा पंडु लेणी असाच उल्लेख आढळतो पण लेणी मधील शिलालेखात या लेणीचा उल्लेख तिरणहु लेणी म्हणजेच त्रिरश्मी लेणी असा आढळतो. सुर्य किरणांच्या रश्मी तीनही बाजुला पाडतात त्यामुळे या लेणीला त्रिरश्मी लेणी म्हणतात.
इ.स. 1869 चे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र...(Part - 2)
नारोशंकर मंदिराच्या भिंतीवर उभे राहून , पलिकडच्या तीराचे हे दृश्य !
मुरलीधर कोट, गोराराम मंदिर(व पायऱ्या), निळकंठेश्वर मंदिर, १७ प्राचीन कुंडांपैकी - रामगया कुंड व दशाश्वमेध कुंड येथे दिसत आहे..


दहाव्या शतकात शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थानी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकचे आत्ताचे भव्य मंदिर श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी बांधले. १७५५ साली बांधकामाला सुरुवात झाली. १७६१ साली पानिपतच्या युध्दानंतर नानासाहेब वारले. त्यानंतर सरदार नारो दामोदर यांनी बांधकाम पूर्ण केले. ३१ वर्षे लागली बांधायला. १६,००० रु. खर्च आला. १७८६ मध्ये बांधकाम संपले. पेशवेकाळात त्र्यंबकेश्वर गावाची भरभराट झाली. अनेक बांधकामे झाली. होळकरांचे फडणीस श्रीमंत रावसाहेब पारनेकर यांनी कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार केला, गोदावरीला दगडी घाट बांधला. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर उगम झालेल्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नानासाहेब पेशव्यांनी त्रिंबक सूर्याजीस ३१ ऑक्टोबर १७५९ रोजी लिहिलेले पत्र -
"श्री त्रिंबकेश्वरी किल्ल्यावरी आवदुंबरतली श्री गंगेचे कुंड आहे. त्याचा जीर्णोध्दार करून, गोमुख करावे व पार बांधावा व नंदी महादेवाची स्थापना करावयास रा. धननसेट करजे यास आज्ञा केली आहे, ते सदरहू इमारत किले मजपुरी करितील म्हणून लिंबक सुरयाजीज पत्र : कुशावर्तापासून हनुमानापर्यंत गंगेत कोणी केर, पत्रावली, उकिरडा टाकू नये, गंगा स्वच्छ असावी. ज्यांच्या घराजवळ गंगेत केर निधेल त्याचे पारिपत्य करावे. मुख्य देवालयापासून गंगेचा ओघ किती आहे तेही मोजून लेहून सविस्तर पाठवणे."
    हा फोटो २२ जानेवारी १९५० रोजीच्या The Illustrated Weekly of India साप्ताहिकातला आहे. त्र्यंबकेश्वर गावातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे दगडी घाट, मागे ब्रह्मगिरी उर्फ त्र्यंबकगड दिसत आहेत. आता हे दगडी घाट तोडून सिमेंट काँक्रीटचे पात्र केले आहे. पाणी नसलेला नाला झाला आहे. या ठिकाणी नदी बुजवून, घाट तोडून त्यावर आता मेनरोड आणि मार्केट केले आहे. मला वाटतं २००३च्या कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकला हे कामं झाले आहेत. फोटोतले वाडे अजूनही दिसतात. काल ह्या फोटोवरून काढलेले तैलचित्र टाकले होते

इ.स. १८६९ चे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र...नाशिक चे गोदावरी नदीपात्र व मंदिरे...
हा फोटो नाशिक चे प्रसिद्ध नारोशंकर मंदिराच्या तटबंदी/बुरुजावरून काढला आहे...
सर्वात जवळ दिसणारे मंदिर म्हणजे "सरदार राजेबहाद्दर" यांचे सप्तशृंगी देवी मंदिर जे "सांडव्यावरची देवी" नावाने ओळखले जाते...
इतर प्रसिद्ध मंदिरे , रामकुंड परिसर व गोपिकाबाई पेशवे यांची समाधी देखील यात दिसते...
विशेष म्हणजे , नाशिक व पंचवटी ला जोडणारा , ब्रिटिशांनी १८९४ साली बांधलेला "व्हिक्टोरिया पूल" यात दिसत नाही , यावरून स्पष्ट होते , की पूर्वकालीन फोटो आहे...
तसेच , "यशवंत देव मामलेदार समाधी मंदिर" देखील यात दिसत नाही , यावरून , यशवंत महाराज हयात असताना म्हणजेच १८८७ च्या आधीच हा फोटो आहे , हे देखील सिद्ध होते..

कोठावळे पाटील वाड्यातील नळ, कारंजे असलेले वैशिष्ट्यपूर्ण देवघर
आज संत गाडगेबाबांची १४८वी जयंती. नाशिक येथील गोदातीरावरच्या संत गाडगे महाराज धर्मशाळेत गाडगेबाबा अन्नदान करतानाचे छायाचित्र
अहिल्याबाई व्यायामशाळा, शेजारी अहिल्याबाई मंदिराचा कळस




















आजचा दिवस सर्व नाशिककरांना अभिमानास्पद वाटावा असा आहे.!!! कारण आजच्या दिवशीच कविवर्य कुसुमाग्रजांच्या अर्थात विष्णू वामन शिरवाडकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून "मराठी भाषा गौरव दिन" साजरा केला जातो.!!!
मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारी नटसम्राटसारखी नाटकं, विशाखासारखे काव्यसंग्रह हीच त्यांची ओळख नसून नाशिकच्या सामाजिक - सांस्कृतिक जडणघडणीत देखील त्यांचा मोलाचा सहभाग होता.! स्वातंत्र्यलढ्यातील १९४२ च्या "चले जाव" चळवळीत देखील त्यांचे योगदान होते तसेच काळाराम मंदिर अस्पृश्य बांधवाना खुले व्हावे यास्तव तरुणवयात त्यांनी सत्याग्रहात सहभाग नोंदविला होता.!!
आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने तात्यासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..🙏

#२८_फेब्रुवारी_१९२६

आज स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंदआबा दरेकर यांच्या ९८व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्रतापूर्वक साष्टांग दंडवत प्रणाम.
🌹🙏🏼

आबा दरेकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील नगर पोखरी या गावी स्थायिक असलेले आनंदीबाई अन् त्रिंबक दरेकर या गरीब मराठा कुटुंबात झाला. तेथुन ते नाशिकला रहायला आले. सुरुवातीसच त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. वडील गवंडीकाम तर आई घरोघरी जाऊन दळणकांडण, भांडीकुंडी घासणे अशी कामे करून मिळत असलेल्या अल्पमोलात आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे.
आई-वडिलांनी गोविंदला वयाच्या सातव्या वर्षीच मराठी शाळेत घातले. इयत्ता दुसरीत असतांना त्याला एक घातक आजार झाला. शाळेत असतांना आबांना भयंकर ताप येऊन त्या तापातच आबांचे कमरेपासून दोन्ही पाय आणि हात लुळे पडून ते कायमचे पंगू झाले. परंतु, त्यापूर्वीच आबांचे वडील चार वर्षांपूर्वी वारले होते. जवळजवळ सहा महिने गोविंदआबा अंथरुणावर खिळून होते. आबांच्या माउलीने नानातर्हेचे उपचार करून आबा दरेकर यांना त्या दुखण्यातून बाहेर काढले. मात्र आबांच्या वाट्यास कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे ते शिक्षणात मागे पडले.

कालांतराने आबादेखील आईसोबत उपजीविकेसाठी जमेल ते काम करू लागले. पतंग तयार करून विकणे असो वा दिवटीला अथवा मशालीला राॅकेलचे हिलाल गुंडाळून मिळणारे काम ते आनंदाने करीत. आबा मित्रांच्या संगतीत तमाशाचा फड, नाटके पाहण्यास जात असत. ते त्यांना खूप भावले. आपणसुद्धा नाटक लिहावे असे त्यांना वाटू लागले. 'मन्मयप्रभाव' हे नाटक लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. १८९७ यावर्षी नाशिकमध्ये प्लेगने धुमाकूळ घातला. त्याच्या एक वर्षानंतर भगुरचे जहागिरदार, सावरकर कुटुंबीय भगूरहुन नाशिकच्या नगरकर गल्लीतील श्री. वर्तक यांच्या वाड्यात राहायला आले. तेथेच सावरकर बंधू, दातार आणि वर्तक या मंडळींशी गोविंदआबांचा परिचय झाला.
सावरकरांच्या ध्येयवादाशी आबा दरेकर समरस झाल्यामुळे त्यांनी योजिलेल्या 'मित्रमेळा' या गुप्तसंस्थेत इतर सर्वांसोबत आबा दरेकरसुद्धा समरस झाले. येथुनच पुढे त्यांच्या काव्यप्रतिभेला उजाळी मिळाली. मित्रमेळाच्या बैठकीत त्यांच्या धार्मिक, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच शारीरिक विषयांवर चर्चा व्हायच्या. तात्याराव सावरकरांच्या सिंहगड आणि बाजीप्रभू यांचेवरील पोवाड्यापासून प्रेरणा घेत दरेकरआबा यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने अफजलखानाचा वधाचा पोवाडा रचला. गणेशोत्सवात तर आबांनी असंख्य पद्ये केली होती. त्या पद्यांमध्ये स्वातंत्र्याचा पाळणा, स्वातंत्र्यदेवीचा पण, साहेब नि तोंडपुजे, रावण-बिभिषन संवाद, हे घन:श्याम श्रीराम, शिवाजी-मावळे यांतील संवाद, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, यमाचा दरबार, कुठे बाळाराम, शिवाजीचा पाळणा, गीता मुरली, नमने पाहूनी स्तवने उधळा, भारता तार या काली, शिवबाचा दरबार इ. पद्ये सर्वोमुख झाली.
कवी गोविंदआबा दरेकर यांच्या अशा अनेक क्रांतिकारी पद्यांमुळे झालेली जनजागृती ब्रिटिशांच्या डोळ्यात बोचत होती.
आबा दरेकरांची.....
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना I
असा भूतकालीन सिद्धांत जाणा I
स्वराज्येछुने पाहिजे युद्ध केले I
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना I
ही कविता बाबाराव सावरकरांनी प्रकाशित केली, म्हणून बाबाराव सावरकर यांचेवर देशद्रोहाचा खटला भरून १९०९ या वर्षी अंदमानात काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी पाठवले. आपल्या या कवितेमुळे बाबारावांना शिक्षा झाली, याचे दरेकरआबांना अतोनात दुःख झाले. बाबारावांच्या शिक्षेचा सूड म्हणून पराक्रमी वीर क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात नाशिकचा तत्कालीन क्रूरकर्मा असलेला जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला. या कटात झालेल्या धरपकडीत पोलिसांनी स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंदआबा दरेकर यांनासुद्धा अटक केली. परंतु त्यांची ती अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा विचार सोडून दिला.
जॅक्सनवध कटाच्या निकालात बऱ्याच जणांना कारावासाची शिक्षा झाली. त्या गोष्टीचे आबा दरेकरांना खूप दुःख झाले. अशा या बिकट परिस्थितीत कवी आबा दरेकर शरीराने पंगू असूनदेखील #अभिनव_भारत_संस्थेची नाशिकची शाखा समर्थपणे सांभाळली.
तुरुंगात गेलेल्या आपल्या सहकारी मित्रांच्या घरच्या मंडळींना धीर देणे, त्यांच्या अडीअडचणींच्या वेळी मदत पोहोचविणे इ. कामे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने केले. बाबाराव अंदमानात असता तात्याराव सावरकरांनादेखील २५-२५ सलग अशा दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याही परिस्थितीत येसूवहिनी आणि माईंना धीर नि आधार देण्यासाठी स्वातंत्र्यकवी दरेकरआबा पुढे सरसावले.
१९२१ यावर्षी बाबाराव अन् तात्यारावांची अंदमानच्या जन्मठेपेतून सुटका झाली. या दोन्ही बंधुंच्या भेटीची आबांना तिव्र ओढ लागली. अंदमानाच्या कारावासातून सुटका होऊनसुद्धा आबा दरेकरांची बाबाराव अन् तात्यारावांशी भेट होऊ शकली नाही. अंदमानातून सुटका होताच बाबारावांना विजापूर तसेच साबरमती तुरुंगात तर तात्यारावांना रत्नागिरीच्या तुरुंगात सश्रम कारावासात ठेवले. कालांतराने तात्यांची कारावासातून सुटका होऊन काही अटींवर रत्नागिरीतच स्थानबद्धतेत ते राहू लागले. परंतु रत्नागिरीस ग्रंथज्वरीची साथ पसल्यामुळे त्यांना नाशिक येथे राहण्यास परवानगी मिळाली. नाशिकला येताच तात्याराव सावरकर आणि आबा दरेकरांची भेट झाली.
आबांचे शरीर दिवसेंदिवस क्षीण होत चालले होते. त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. शारीरिक वेदना असह्य होऊ लागल्या होत्या. त्यावेळी #अभिनव_भारत_संस्थेचे शपथबद्ध सहकारी असलेले क्रांतिकारक कृष्णाजी बळवंत महाबळ अर्थात महाबळगुरुजी, गणपती मगर, खुशालसिंह यांनी आबांचा औषधोपचार तसेच अन्य सर्व सेवा केल्या. त्या जर्जर परिस्थितीत आबांना हातांनी लिहिणे अशक्य झाले. तेव्हा आबांचे नवीन काव्ये तसेच पत्रे आबा दरेकर सांगत आणि महाबळ गुरुजी ते लिहून घेत असत.
मृत्यूपूर्वी पंधरा दिवसांआधी "सुंदर मी होणार हो, मरणाने मी जगणार" ही २१ कडव्यांची कविता त्यांनी पूर्ण केली. इतकेच काय तर मृत्यूच्या दोन दिवसांआधी देखील "गोविंदाचे करुणागान" ही कविता गोविंदआबांनी महाबळ गुरुजींकडून लिहून घेतली.
"माझ्या पांगळ्या शरीराला मृत्यू येईल, परंतु एक सुंदर देह होऊन मी माझ्या या मातृभूमीसाठी पुन: पुन: जन्म घेईन", यांवर गोविंदआबा दरेकरांचा दृढ विश्वास होता. आणि अखेर २८ फेब्रुवारी १९२६ रोजी स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंदआबा दरेकरांनी आपली जीवनयात्रा येथेच थांबविली.
महाबळ गुरुजींनी स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद आबा दरेकर यांचे अंत्यसंस्कार करून स्मशानात -
सुंदर मी होणार I आता सुंदर मी होणार I
सुंदर मी होणार I हो I मरणाने जगणार II
जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार I हो I
नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार I हो I सुंदर...
त्या पंखांनी कर्तृत्वाच्या व्योमी मी घुसणार हो II
देशहिताच्या पवनसागरी पोहाया सजणार I हो I सुंदर...
मृत्यूवर आबा दरेकरांनी लिहिलेले हे अमृतगीत म्हटले.
अशा या स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंदआबा दरेकर यांना त्यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🌹🙏🏻
II अभिनव भारत मंदिर II
II आद्य क्रांतिकारकांचे स्मारक II
🌷हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयजयकार असो🌷
|| स्वातंत्र्यलक्ष्मी की जय ||

© शिरष श. पाठक, नाशिक

▪️संदर्भ :
१. महाबळ गुरुजींच्या आत्मचरित्रातील अभिनव भारत
• लेखक - रघुनाथ प्रभाकर महाबळ
२. एकमेव अद्वितीय स्वा. सावरकर
• लेखिका - डॉ. सौ. शुभा शशांक साठे
३. स्वा. सावरकरांची प्रभावळ
• लेखक - श्रीधर रघुनाथ वर्तक
४. विविध लेख
• लेखक - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
काल सावरकरांचा आत्मार्पण दिन (२६ फेब्रुवारी). आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस. नाशकाने जगाला आणि विशेषत: मराठीला दिलेली ही दोन अनमोल रत्न. कुसुमाग्रजांनी तात्यारावांना प्रॉमिथिअसची उपमा दिली होती. (स्वर्गलोकातील अग्नी माणसासाठी पृथ्वीवर आणणारा ग्रीक पुराणातील प्रॉमिथिअस. स्वर्गलोकीची गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या भगीरथाचा ग्रीक सहोदर). कुसुमाग्रजांचे सावरकर प्रेम बेगडी, तात्कालिक किंवा कालबद्ध नाही. याचे उदाहरण म्हणून त्यांची तिळभांडेश्वराच्या बोळावरील कविता आठवते.
तिळभांडेश्वराचा बोळ म्हणजे भारतीय क्रांतिकार्याची गंगोत्री. सन १८९९ ते १९०९ दरम्यान सावरकर कुटुंबीय या ठिकाणी दहा वर्ष वास्तव्यास होते. याच ठिकाणी तात्यारावांनी अभिनव भारत संस्थेची (पूर्वश्रमीचा मित्रमेळा) स्थापना केली. इंग्रजांची जुलुमी राजवट उलथून टाकण्याच्या अनेक मसलती याच बोळात शिजल्या. त्या बोळाची आजची स्थिती पाहून कुसुमाग्रज म्हणतात :

बोळ
हाच बोळ तो-तिळभांडेश्वर आता नाव निराळे
या इकडुनि या-तिथे साचले चिखलाचे थारोळे.
पंखपिसाविण वृद्ध जटायू तसेच इथले वाडे
जीर्ण वारुळे, तयात मानव वसती हेही कोडे.
जपून टाका पाउल फारच अरुंद आहे वाट
अंधाराची शत वर्षांची त्यात इथे वहिवाट.
हाच कोपरा-हीच घरे ती-थांबा येथ जरासे
निथळत त्या भिंतींवर देखा अजुनी आर्त उसासे.
याच कोंदट्टामधून फुटल्या त्या मृत्युंजय ज्योती
धुमसत गेल्या ठिणग्या ज्यांच्या त्रिखंड पृथ्वीवरती.
काळोखावर याच पसरला असला दिव्य धुमारा
धुक्यातुनी वर तळपत आला एक तांबडा तारा.

- ऋषिकेश 'ऋषि' यांची फेसबुक पोस्ट

महाशिवरात्रीसाठी सजलेले नाशिकचे ऐतिहासिक नारोशंकर रामेश्वर महादेव मंदिर. नाशिकमधील हे मंदिर मला जरासे underrated वाटते. पेशवाईतले एक नामांकित सरदार, दिल्ली दरबारातील मराठ्यांचे एक प्रतिनिधी नारोशंकर राजेबहादूर दाणी यांनी १७४७ साली बांधले. त्याच्या प्रवेशद्वारावर नरवीर चिमाजीआप्पांनी वसईहून आणलेली पोर्तुगीज घंटा लावली. नारोशंकरांनी मालेगावचा भुईकोट किल्ला बांधला. हे एक धाडसच होते कारण सरदारांना किल्ले बांधायची परवानगी नव्हती. त्यांना राजेबहादूर हा किताब होता. नाशिकमध्ये राजेबहादूर घराणे नामांकित आहे, त्यांचा वाडा, त्यातील शाळा, तसेच राजेबहादूर लेन, राजेबहादूर हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. या नारोशंकर मंदिराला असा इतिहास असून तिथे इतर मंदिरांइतकी वर्दळ नसते. लोकांना ऐतिहासिक महत्त्व ठाऊक नाही. नारोशंकराची घंटा हे नाशिक महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे, दुतोंड्या मारुती पुराचे तर नारोशंकराची घंटा महापुराचे प्रतीक आहे. पूर्वी महापूर आल्यावर ती घंटा वाजायची असे म्हणतात. काही वर्षांपूर्वी एका समाजकंटकाने दगड मारल्यामुळे ती घंटा जाळीत बंद असते. आज लाईट लावल्यामुळे ती उठून दिसत होती.

- प्रणव कुलकर्णी

थोडीशी चुकीची दुरुस्ती.....
राजेबहाद्दर लेन मेनरोड वर जुन्या महानगर पालिकेच्या इमारतीच्या बाजूला आहे, राजेबहाद्दर हॉस्पिटल हे राजेबहाद्दर कंपाऊंड मधे महात्मा गांधी रोडवर आहे.




नाशिककरांचे श्रद्धास्थान #श्रीकपालेश्वर महादेव
महाशिवरात्रीच्या शुभेछा..!!






नारोशंकर मंदिर दर्शन...🙏🏻





द्वारपट्टीवर शिलालेख असला पाहिजे, तो आता नष्ट झाला किंवा केलेला आहे. तो वाचण्यापलीकडे आहे
इंदूर संस्थानाची कोनशिला. त्यात त्यांचे चिन्ह - सिंह, गाय, मध्ये तलवार आणि बंदूक, आणि वरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी.
















वाइन उद्योग

नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. सन् २०१३ मध्ये, संपूर्ण भारतातील ४६ वाईनरीजपैकी नाशिकमध्ये २२ वायनरी नाशिक येथे होत्या. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. आज सुमारे चाळीस छोट्या-मोठ्या वायनरी नाशिकमध्ये आहेत. या उद्योगाला आवश्यक असलेले टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत अतिरिक्त उद्योग येथे तयार होत आहेत. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते.


नाशिकमधील मंदिरे

  • काळा राम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून प्रभू रामचंद्र हे पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य त्यांना आवडल्याने त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी बांधली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे, असे सांगतात. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने भाविकांच्या मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि त्यांचे मनोविकार शून्य होतात, अशी समजूत आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.[]
  • सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीतालक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.
  • नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज तीन कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.
  • गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
  • याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत.

मठ

नाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत.

येथील कैलास मठाच्या वतीने श्री सरस्वती पुरस्कार दिला जातो.

उत्सव

नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.

सिंहस्थ कुंभ मेळा

हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.

नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल.

 
 
 

नाशिकचे प्रसिद्ध नारोशंकर मंदिर व वसई विजयाचे प्रतीक असणारी घंटा

नाशिक एक मंदिरांचे नगर,
मंत्रभूमी पासून यंत्रभूमी पर्यंतचा नाशिक नगराचा प्रवास म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रतीक होय!
नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावर पेशवे काळात अनेक मंदिरे व घाट बांधण्यात आले, कोरीव व नक्षीदार भव्यता , घाटांची प्रशस्तता हि नाशिक संस्कृतीची वैशिष्ट्ये व त्यापैकी एक नारोशंकर मंदिर।
नारोशंकर मंदिर गोदेच्याच अगदी काठावर, या मंदिरास रामेश्वर देखील म्हणतात. नाशिक मधील प्रमुख मंदिर, सगळ्यात सुंदर कलाकुसर असणारे हे मंदिर बघणे म्हणजे एक अद्भुत आनंद होय!
या मंदिराची स्थापना सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी ई. स.1747 साली केली तेव्हा या काळातील 18 लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे (या
काळात सोने सुमारे 15 रु तोळे होते) पुढे ई स 1756 साली मंदिरासमोरील नदीकाठी घाट सुमारे 60 हजार रुपये खर्च करुन बांधल्याचा उल्लेख आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरास किल्ल्यासारखी तटबंदी व घुमटाकार बुरुज आहेत एकंदरीत नदीच्या पुरापासून रक्षणासाठी हि काळजी घेतलीय. मंदिराच्या तटबंदीस पूर्व व पश्चिम द्वार असून मुख्य मंदिर पश्चिमाभिमुख आहे.या मंदिराची शैली हेमाडपंथी असून काहीशी वेसर म्हणजेच संमिश्र आहे, मंदिरास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ ,गर्भगृह असून त्यातील शिवलिंग हे नाशिक मधील सर्वात मोठे शिवलिंग आहे. मंदिरावर आत व बाहेर खूप सुंदर शिल्प आहेत, विशेषतः सभामंडपाच्या आतील छतावर सुरसुंदरी व अष्टदिक्पाल आहेत, त्यासोबतच अनेक शाक्त कापालिक पंथाची प्रतिकचिन्हे या मंदिरावर आढळतात.




नारोशंकर मंदिरावरील प्रसिद्ध घंटा
या मंदिरावरील वैशिष्ट्य म्हणजे पेशवे काळातील वसई विजय प्राप्त झाल्यावर तेथील चर्च मधील घंटा या मंदिराच्या मुख्य द्वारावर बसवली आहे,अशीच एक घंटा नाशिक जवळील जलालपुर शिव मंदिरावर आहे व भीमाशंकर , मेणवली,(वाई) येथे अशा महाकाय घंटा आहेत, नारोशंकर मंदिरावरील या घंटेवर 1721 अशी आद्याक्षरे आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या मानचिन्हामध्ये या घंटेचे चिन्ह आहे, तसेच गोदावरीला पूर आल्यावर पूर्वी या घंटेला पाणी लागले की तिचा आवाज जुन्या नाशिकच्या परिसरात पोहचत त्यावरून पुराचा अंदाज लावला जाई,आत्ता पर्यन्त 1872,1965,1973साली पाणी घंटेला लागल्याचे सांगितले जाते तर 2016 साली घंटेवरून पाणी गेले होते.
प्रा रामनाथ रावळ

 
 

तपोवनातील अज्ञात लेणीसमूह प्रकाशात

तपोवनातील गोदा-कपिला संगमावर १० अज्ञात लेणीचा समूह प्रकाशात आला आहे. या लेणी नेमक्या कोणत्या कालखंडातील, कोणी खोदल्या तसेच या लेणी बौद्ध, जैन की हिंदू आहेत, याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
caves
नाशिक : तपोवनातील गोदा-कपिला संगमावर १० अज्ञात लेणीचा समूह प्रकाशात आला आहे. या लेणी नेमक्या कोणत्या कालखंडातील, कोणी खोदल्या तसेच या लेणी बौद्ध, जैन की हिंदू आहेत, याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या लेण्यांचा अभ्यास करून त्या संरक्षित होण्याची गरज इतिहास व पुरातत्त्व अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

तपोवनातील गोदावरीच्या पलीकडील काठावर महापालिकने राम, सिता व लक्ष्मणाची प्रतिमा उभी केली आहे. ती पाहण्यासाठी भाविक हमखास तेथे जातात. मात्र, या प्रतिमेच्या समोरच गोदापात्रातील खडकात खोदलेल्या नऊ व एक अपूर्ण अशा दहा लेणीच्या रांगेकडे आतापर्यंत कोणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे या गुहा 'लेणी' असाव्यात का, कोणी बांधल्या असाव्यात, त्यांचा कालखंड कोणता हे अजूनही अज्ञात आहे. शहराच्या मध्यभागी असूनही राज्य व केंद्र पुरातत्त्व विभागाने या लेणींची आजपर्यंत दखल घेतलेली नाही. नाशिकसह राज्यभरातील अभ्यासकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले असून, या लेणींच्या अभ्यासाची गरज व्यक्त केली आहे.

नाशिकला दोन हजार वर्षांपूर्वीचा सातवाहन राजांचा लिखित इतिहास पांडवलेणी या बौद्ध लेणीच्या माध्यमातून लाभला आहे. सातवाहन, अभीर, राष्ट्रकूट, कलचुरी, चालुक्य, यादव या घराण्यांच्या इतिहासाने नाशिकला समृद्ध केलं आहे. बौद्ध लेणी प्रमाणेच नाशिक परिसरात जैन व हिंदू लेणी व असंख्य प्राचीन मंदिरे आहेत. तसेच सिंहस्थामुळे अनेक पंथ व उपपंथांच्या उपासकांचा वारसाही या शहराला लाभला आहे. याच्या खाणाखुणा शहर परिसरात पावलोपावली अनुभवायला मिळतात.

तपोवनात गोदा-कपिला संगम आहे. या संगमाला अनेक धार्मिक आख्यायिका आहेत. त्यामुळे भाविक श्रद्धेने या परिसराला भेट देतात. लेणी दुर्लक्षित आणि अज्ञात असल्याने त्या पाहण्यासाठी पर्यटकांना माहिती देणारी फलकेही येथे नसल्याचे दिसते. या परिसरात जुगारी मंडळी व जोडप्यांची गर्दी असते. लेणीच्या संरक्षणासाठी प्रयत्न होण्याची गरज असून, पुरातत्त्व विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे. पुरातत्त्व विभागाकडून आतापर्यंत झालेल्या दुर्लक्षामुळेच नाशिकच्या इतिहासाचे अनेक पैलू अजूनही अज्ञात राहिल्याचा आरोप केला जातो.

लेणी नेमक्या कशा आहेत?

गोदा-कपिला संगमावरील लाकडी पुलाखालून नदीपात्रात उतरल्यावर उजव्या हाताच्या २० फूट उंच खडकात या दहा लेणी खोदलेल्या पहायला मिळतात. पहिल्यांचा खडकावर लेणी कोरण्यासाठी आणखी केलेली दिसते. मात्र, हे काम अर्धवट आहे. त्यानंतरच्या नऊ लेणीच्या समोरचा भाग आयताकृती कोरला असून, या लेणींमध्ये कोणतेही नक्षीकाम अथवा मूर्ती नाही. दोन लेणींमध्ये सभामंडप व गर्भगृह अशी रचना दिसते. तर एका लेणी बाहेर ब्राह्मी अक्षरे कोरल्याचे दिसते; मात्र, ही अक्षरे खराब झाली आहेत. क्रमांक ९ मध्ये हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तर शेवटच्या दहाव्या क्रमांकाच्या लेणीचे एका साधूने दोन भाग केले असून, एकात ते राहतात तर दुसऱ्या भागात शिवलिंग आहे.

सर्वसाधारणपणे बौद्ध अथवा जैन लेणी या उंच टेकडीवर पहायला मिळतात. तर हिंदू पंथांच्या उपासकांचे स्थळे ही नदी काठावर असतात. तपोवनातील या गुहा सिंहस्थात येणाऱ्या साधूंसाठी त्यांच्या उपासणेसाठी खोदल्या गेल्या असाव्यात. त्या कोणत्या कालखंडात बांधल्या गेल्या हा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे या गुहांचा अभ्यास व्हायला हवा.

- गिरीष टकले, अध्यक्ष, नाशिक इतिहास संशोधन मंडळ

नाशिकमध्ये गोदापात्रात आतापर्यंत गोवर्धन व तपोवनातील संगमावर सातवाहन नाणी मिळाली आहेत. जेथे ही नाणी मिळाली आहेत त्या भागाचा सातवाहनांशी संबंध आलेला दिसतो. त्यामुळे या लेणी सातवाहनकालिन असाव्यात असे वाटते. या लेणी खोदण्याची पद्धत पांडवलेणीशी मिळती जुळती आहे.

- चेतन राजापूरकर, नाणे अभ्यासक

तपोवनातील लेणींची रचना चामर लेणीशी मिळती जुळती आहे. काही लेणींमध्ये गर्भगृह आहे. त्यामुळे या जैन लेणी असाव्यात, असे वाटते. नाशिक परिसरात जैन लेणी संख्येने अधिक आहेत.

- डॉ. जी. बी. शहा, जैन धर्माचे अभ्यासक

बौद्ध लेणींच्या प्राथमिक अवस्थेसारखी ही लेणी दिसत असून, यात सापडलेल्या धम्मालिपीतील अर्धवट शिलालेख तसेच छंनी हतोड्याचे घाव हे त्रिरश्मीवरील बुद्ध लेणींसारखेच दिसत असल्याने ही लेणी सातवाहन काळातील असल्याचे सूचित करते. या लेणीवर संशोधन करून माहिती लोकांसमोर आणावी.

- अतुल भोसेकर, बौद्ध धर्माचे अभ्यासक

तपोवनातील ही लेणी आहे की, गुहा हे या स्थळाचा अभ्यास केल्यानंतरच सांगता येईल. नाशिकला बौद्ध, जैन, हिंदू तसेच अनेक पंथांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे अभ्यासानंतर त्याचा कालखंड ठरविला जाऊ शकेल. काही अनुमान लावण्यापूर्वी या गुहांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

- डॉ. अभिजीत दांडेकर, सहायक प्राध्यापक, डेक्कन कॉलेज

तपोवनातील ही लेणी आहे हे निश्चित मात्र त्या कोणत्या कालखंडातील आहे हे, या स्थळाचा अभ्यास केल्यानंतरच सांगता येईल. नाशिकला बौद्ध, जैन, हिंदू लेण्या आहते. त्यामुळे अभ्यासानंतर त्याचा कालखंड ठरविला जाऊ शकेल. नाशिकच्या इतिहासासाठी या लेणी महत्त्वाच्या आहेत.

- डॉ. श्रीकांत प्रधान, पुरातत्त्वज्ञ
 
 
 

महाराष्ट्रातील प्रमुख राममंदिरे-श्री काळाराम मंदिर (नाशिक)

shree kalaram mandir nashik

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर निर्माणाच्या ऐतिहासिक सुवर्णयोग घटनेनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘नित्यविजयी रघुनंदन’ ही, मराठी संतसाहित्यातील रामदर्शनाची लेखमाला, जानेवारीमध्ये सुरू केली आणि आपण गेल्या 11 महिन्यांत 46 लेखांद्वारे, संत निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांपासून ते थेट आधुनिक संत गोंदवलेकर, साईबाबा यांच्या साहित्यातील परब्रह्म रामाचे व रघुवीररामाचे विविधांगी दर्शन केलेले आहे. श्रीराम भारतीय जीवनाचा सर्वोच्च आदर्श आणि सर्वाधिक भक्तजनप्रिय उपास्य देवता आहे. या श्रीरामाची महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत. त्यातील प्रमुख ऐतिहासिक अशा मंदिरांची आपण पुढील तीन-चार लेखांत माहिती घेऊया. त्यातील पहिले ऐतिहासिक मंदिर म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर...

श्री क्षेत्र पंढरपूरला ‘भूवैकुंठ’ म्हणतात, तसे श्रीक्षेत्र नाशिकला ‘दक्षिण काशी’ म्हणून भाविक भक्तांमध्ये, श्रद्धावंतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे. दक्षिणवाहिनी माता गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या या नगरीला ‘कुंभनगरी’ म्हणून हिंदू परंपरेत विशेष स्थान आहे. दर बारा वर्षांनी होणारा ‘सिंहस्थ कुंभमेळा’ ही तर नाशिकची खास ओळख. त्रेतायुगात प्रभू रामचंद्राचे वनवास काळात या ‘जनस्थान’ नगरीच्या पंचवटी भागात वास्तव्य होते. राम-सीता आणि लक्ष्मणाच्या पुनीत वास्तव्याची अनेक पदचिन्हे आजही नाशिकमध्ये विद्यमान आहेत. श्री काळाराम मंदिर त्या परममंगल पदचिन्हांपैकी एक आहे. आज जेथे भव्य, दिव्य, आकर्षक असे श्री काळाराम मंदिर विद्यमान आहे, तेथेच त्रेतायुगात वनवासकाळात लक्ष्मणाने राम-सीतेने बांधलेली पर्णकुटी होती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या काळाराम मंदिरास एक विशेष स्थान आहे. महाराष्ट्रात प्रभू रामचंद्राची अनेक मंदिरे आहेत. त्यात रामटेकचे राम-लक्ष्मण मंदिर आहे, चाफळचे समर्थ रामदास स्थापित राम मंदिर आहे, नामयोगी संत गोंदवलेकर महाराज स्थापित ‘थोरले राम मंदिर’ आणि ‘धाकटे राम मंदिर’ अशी दोन मंदिरे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेले पंढरपूरच्या महाद्वार घाटावर स्थापित राम मंदिर आहे. फलटणच्या राजे निंबाळकर स्थापित राम मंदिर आहे. पण, या सर्वांमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.
‘काळाराम’ नव्हे ‘काल’ राम
नाशिकच्या काळाराम मंदिराला फार मोठा इतिहास आहे. ‘श्री काळाराम मंदिर’ हे नाव अलीकडच्या काळात लोकरूढ झालेले नाव आहे. पूर्वी या मंदिराला ‘रघुराम मंदिर’, ‘श्री रामचंद्र संस्थान मंदिर’ म्हणून ओळखले जात होते. पण, नंतरच्या काळात पंचवटीच्या पावन परिसरात अनेक रामभक्तांनी श्रीरामाची अनेक छोटी-मोठी मंदिरे बांधून पुण्यकार्याची धन्यता प्राप्त केली. या अनेक मंदिरातील रामाच्या मूर्ती पांढर्‍या संगमरवरी असल्याने आणि मूळ रघुराम मंदिरातील, गोदावरीमध्ये मिळालेल्या राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्ती काळ्या वालुकामय पाषाणाच्या असल्याने भाविक या मंदिरास ‘श्री काळाराम मंदिर’ म्हणून ओळखू लागले व तेच नाव कालप्रवाहात रूढ झाले, असे म्हणतात. खरे तर हा ‘काळाराम’ शब्द रंगवाचक नसून, गुणवाचक आहे. तो शब्द ‘काळा’ नसून ‘काल’ (कर्दनकाळ) असा कार्यवाचक आहे. ईश्वराचे वर्णन ‘काळाग्नी’, ‘काळरूद्राग्नी’ अशा शब्दांमध्ये अनेक स्तुतीस्तोत्रामध्ये केलेले आहे. त्याअर्थाने हा ‘कालाराम’ आहे. शूर्पणखा भगिनीच्या अपमानाचा बदला घेण्यास आलेल्या राक्षस, खर, दूषण आणि 18 हजार राक्षससेनेचा प्रभू रामचंद्रांनी उग्र रूप धारण करून नायनाट केला. या उग्र रूपाला वीररूपालाच ‘काल रूप’ म्हणतात. राक्षसांसाठी राम कर्दनकाळ ठरला.
काळ्या पाषाणाचे मंदिर शिल्प : महाराष्ट्र वैभव
श्री काळाराम मंदिराच्या इतिहासाचा आढावा घेताना, आपणास इसवी सनाच्या आठव्या शतकात, या जागेवर एक लाकडी मंदिर होते असे दिसते. त्या लाकडी मंदिराचा तत्कालीन शंकराचार्यांनी जीर्णोद्धार केला आणि नव्याने विधिवत नित्योपचाराची नवी परंपरा सुरू केली. या काळात या मंदिराला ‘श्री रघुराम मंदिर’ म्हणून ओळखले जात होते. आपण आज जे काळ्या पाषाणाचे कोरीव सुंदर असे श्री काळाराम मंदिर पाहतो, ते इ. स. 1778 ते 1790 अशा बारा वर्षांच्या काळात बांधलेले आहे. पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांनी श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाईसाहेब यांच्या इच्छेनुसार या मंदिराचे बांधकाम करून घेतले. त्याकाळी त्यासाठी 32 लक्ष रुपये खर्च आला, असे इतिहासातील कागदपत्रातील नोंदीवरून कळते. नाशिकच्या ओढा या भागामध्ये सरदार रंगनाथपंत जहागीरदार होते. या मंदिर निर्माण कार्यासाठी सरदार ओढेकरांच्या पत्नीने आपली हिरेजडित नथ दान दिली होती व रामसेवेमध्ये खारुटीच्या सहभागाचे पुण्य मिळवले होते. हे मंदिर पूर्ण घडीव दगडाचे असून, हा सारा काळा पाषाण नाशिक जवळच्या डोंगरातून खोदून आणलेला आहे. अशाप्रकारे काळाराम मंदिराचे देखणे मंदिरशिल्प हे महाराष्ट्रातील पाषाण वैभव आहे.
इंद्राच्या ऐरावतालाही लाजवेल असे हे काळ्या पाषाणातील मंदिर, शिल्पकलेचा अद्वितीय, अनुपम असा देखणा आविष्कार आहे. त्र्यंबकेश्वरचे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि नाशिकचे काळाराम मंदिर या दोन्ही पाषाण शिल्पांच्या वैभवामध्ये विलक्षण साम्य आहे.
श्री काळाराम मंदिर हे पूर्वाभिमुख असून, 266 फूट लांब आणि 138 फूट रूंद आहे. मंदिराच्या भोवती भरभक्कम दगडी तटबंदी असून, चार दिशेला चार द्वारे आहेत. हे चार दरवाजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार पुरुषार्थाचे प्रतीक आहेत. प्रांगणातील तटबंदीला लागून कडेने अनेक ओवर्‍या आहेत. त्याला 84 सुंदर कमानी आहेत. त्या 84 लक्ष योनीच्या प्रतीक मानल्या जातात. सुमारे आठ-दहा पायर्‍या चढून मुख्य राममंदिरात जावे लागते. मुख्य मंदिरात 40 खांबांचा भव्य मंडप आहे. या मंडपास पूर्व, दक्षिण, उत्तर अशी तीन प्रवेशद्वारे असून, ती सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची प्रतिकरूप आहेत. मंदिराचा गाभारा अत्यंत प्रशस्त असून, गाभार्‍यात चौथर्‍यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. या मूर्ती गोदावरी नदीच्या प्रवाहात सापडलेल्या स्वयंभू मूर्ती आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, श्रीरामाचा डावा हात सरळ पायाकडे असून, उजवा हात छातीवर आहे. पायी नतमस्तक होणार्‍या श्रद्धावंताला श्रीराम छातीवर हात ठेवून रक्षणाचे अभय देत आहे. म्हणून हा काळराम ‘अभयराम’ सुद्धा आहे. मंदिरावर उंच शिखर असून, सोन्याचा कळस चढवलेला आहे.
(पुढील अंकात ः रामटेकचे राममंदिर)
 
 
https://www.evivek.com/Encyc/2024/9/2/from-Nashik-Ganesha-Darshan.html

नाशिक येथील वैशिष्ट्यपूर्ण गणेश दर्शन

विवेक मराठी    02-Sep-2024
Total Views | 190
@ अश्विनी भालेराव
ganesh festival
तीर्थस्थळांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातदेखील अनेक गणपती मंदिरे स्थित आहे. यातील अनेक मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. अनेक वैशिष्ट्यांसह धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय यातील काही गणपती आपली आभूषणे, आपल्या मूर्तिवैशिष्ट्यानेही प्रसिद्ध आहेत.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आपलासा, हवाहवासा वाटणारा देव अर्थात आपला लाडका ‘गणपती बाप्पा’. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे उपासना करतात. आपल्या मनातील गुपिते हक्काने बाप्पाला सांगतात. याच बाप्पाची संपूर्ण जगात अनेक मंदिरे आहेत.
 
 
तीर्थस्थळांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातदेखील अनेक गणपती मंदिरे स्थित आहे. यातील अनेक मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. अनेक वैशिष्ट्यांसह धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय यातील काही गणपती आपली आभूषणे, आपल्या मूर्तिवैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे नाशिकमधील ‘चांदीचा गणपती’.
 
 
नाशिकचा मानाचा गणपती म्हणून शहराच्या ‘रविवार कारंजा’ या भागात स्थित असलेला ‘चांदीचा गणपती’. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील व रविवार कारंजा परिसरातील काही जागृत देशभक्त नागरिकांनी 1917 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
 
 
बुंदेलखंडातून रविवार पेठेत आलेल्या गंगाप्रसाद हलवाई या व्यापार्‍याची लोकमान्य टिळकांवर असीम श्रद्धा होती. त्यामुळे आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती त्यांनी या मंडळाला दान केली. या देणगीतून पूर्वी शाडूची मूर्ती येथे बसवली जात असे. साल 1978-79 मध्ये शाडूची मूर्ती विसर्जित करताना अडचण होते, म्हणून मंडळ सदस्यांनी 11 किलोची चांदीची मूर्ती तयार करण्याची सूचना केली. अखेर 2008-09 साली 201 किलो भरीव चांदीच्या मूर्तीसाठी मंदिर बांधून त्यात सिद्धिविनायक गणपती मूर्तीची विधिवत स्थापना केली गेली, तर 2011-12 मध्ये भाविकांनी नवस प्राप्त झाला म्हणून दान केलेल्या सोन्यापासून विविध अलंकार बनविले. 45 तोळे सोन्याचा हिरेजडित हार, 40 तोळे कान आणि कपाळमार्गे सोंडेवरील सुवर्णाने तयार केलेले गंध, 17 तोळे सोन्याची हिरेजडित झालर श्रींसाठी तयार करण्यात आली आहे.
 

ganesh festival 
 
हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे अनेक भाविक वेगवेगळे नवस या गणपतीला करतात. ज्या भाविकांचे नवस पूर्ण होतात, ते भाविक नवसपूर्तीसाठी चांदी गणपतीला अर्पण करतात आणि त्या चांदीची भर मूर्तीमध्ये केली जाते.
 
 
नवसाला पावणारा गणपती म्हणून ‘चांदीचा गणपती’ मंदिराची सर्वश्रुत ख्याती तर आहेच; पण त्याही पलीकडे रत्नजडित चांदीच्या मूर्तीचे विशेष रूप भाविकांना भावणारे आणि भुरळ पाडणारे आहे.
 
 
आपल्या आकर्षक आणि मनोवेधक पगड्यांनी नाशिकमधल्या ‘पगडी गणेश’ गणपतीचे मंदिर सर्वश्रुत आहे. पेशवेकाळात नाशिकचा खर्‍या अर्थाने उत्कर्ष झाला. त्या काळी विशेषत: सरकारी दरबारी मानकरी, वेदशास्त्रनिपुण पंडित, वकील, तत्सम मंडळी प्रामुख्याने पगडी घालीत असत. पगडीनिर्मितीचे उद्योजक व विक्रेते यांचा परिसर म्हणून या गल्लीची ओळख ’पगडबंद लेन’ या नावाने होती. या परिसरात अतिशय कुशल, कसबी कारागीर राहत होते.
 

ganesh festival 
 
साधारणत: 1970-75 सालच्या आसपास सराफ बाजार आणि पगडबंद लेन येथील काही तरुणांच्या मनात आले की, आपल्याही भागात एक आपला हक्काचा गणपती असावा आणि त्यातही आपल्या सराफी व्यवसायाची, सोन्या-चांदीच्या बाजारपेठेची ओळख असणार्‍या आपल्या भागात ’चांदीचीच मूर्ती’ असावी. मग त्या तरुणांनी ’नगरकर लेन’च्या कोपर्‍यावर असलेल्या खेडकर वाड्याच्या ओट्यावर एक गणपती बसवला.
 
 
दरवर्षी थोडी-थोडी चांदी जमा करत काही वर्षांतच एक आकर्षक आणि विलोभनीय चांदीची गणेश मूर्ती तयार झाली. दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते मूर्तीसाठी पैसे जमवत आणि शिवाय स्वतःची भर घालत होते. काही वर्षांनी ही बाप्पाची चांदीची मूर्ती तब्बल 51 किलोची झाली होती. 2006 साली नगरकर लेन परिसरात मंदिर बांधून या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
 
 
या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या मस्तकावर असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या पगड्या आपल्याला पाहायला मिळतात. आजमितीला या मंडळाकडे 100 हून अधिक रंगीबेरंगी, अलंकारजडित आणि विविध कापड प्रकार असलेल्या, विविध जरीकाठांचा वापर केलेल्या पगड्या आहेत. या गणपतीला इतर कोणत्याही प्रकारचे मुकुट किंवा फेटे वगैरे न घालता फक्त पगडीचाच वापर केला जातो. मस्तकी पगडी धारण करणार्‍या गणपतीला मग पुढे राजेशाही थाट देत जानवं, कपाळावर असलेलं गंध यावर शुद्धीकरण सोनं चढवण्यात आलं आहे.
 

ganesh festival 
 
सहसा आपण ज्या गणपतीच्या मूर्ती पाहतो, त्या मूर्तींमध्ये बाप्पाच्या हातात शंख, मोदक किंवा दूर्वा हाती घेतलेले हात आणि आशीर्वाद देतानाचा हात आपण पाहतो; पण नाशिकमध्ये असे एक गणपती मंदिर आहे ज्या मंदिरातील बाप्पाच्या हातात जपमाळ आहे. जणू काही हा बाप्पा जगतकल्याणासाठी तप करत आहे असा भास व्हावा. हे ‘तपस्वी गणेश मंदिर’ नाशिकच्या सोमवार पेठ भागात स्थित आहे.
 
 
महाराष्ट्रात असे मोजके गणपती आहेत ज्या गणपतीच्या हातामध्ये जपमाळ आहे, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, जो धूम्रवर्ण रूपातील आणि संन्यस्त स्वरूपातील गणेश आहे.
 

ganesh festival 
 
ही तपस्वी गणेशाची अखंड संगमरवरी पाषाणातून बनवलेली सुबक मूर्ती आहे. बाप्पाला बसण्यासाठीदेखील संगमरवरीच अष्टकोनी चौरंग आहे. हातात मोदकांची रास आणि न रहावून त्यातला एक मोदक उचलून सोंडेत धरलेला हा गणपती आहे. हा गणपती म्हणजे जगतकल्याणासाठी तप करत असलेला बाप्पा. जणू दिवस-रात्र अखंडपणे तो जप करतोय. यामुळेच तपस्वी गणेशाचे रूप पाहताना भाविक नकळत समाधी अवस्थेत जातात.
 
 
आपल्या आगळ्यावेगळ्या आकाराने प्रसिद्ध असलेले नाशिकमधील एक मंदिर म्हणजे श्री ‘मोदकेश्वर गणपती मंदिर’. नाशिकचे ग्रामदैवत म्हणून मोदकेश्वर गणपतीस प्रथम मान आहे.
 
 
श्री मोदकेश्वर गणपती स्थानाविषयी पुराणात आख्यायिका आहे की, श्री गणेश अवकाशमार्गातून भ्रमण करीत असताना त्यांच्या हातातील एक मोदक खाली पडला व त्यापासून गणपती निर्माण झाला. त्यानंतर श्री गणेशभक्त ‘विलास सीताराम क्षेमकल्याणी’ यांच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी मंदिराची उभारणी केली. नयनमनोहर हुबेहूब मोदकासारखा आकार असल्याने बाप्पास ‘श्री मोदकेश्वर गणपती’ असे नाव प्रचलित झाले.
 
 
गणेशोत्सवाच्या कालावधीत श्री मोदकेश्वराला विविध वस्त्रे, अलंकार पूजाधिकारी चढवितात व मंदिराची सजावट केली जाते. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे असे श्री मोदकेश्वराचे स्वरूप दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येत असतात.
 
 
तीर्थस्थळाची ख्याती असलेल्या नाशिकमध्ये अशी अनेक प्रसिद्ध आणि धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेली मंदिरे आहेत. आपण जर कधी नाशिकमध्ये तीर्थाटन करण्यास गेला, तर आपले आगळेवेगळे वैशिष्ट्य असलेल्या या बाप्पांना आवर्जून भेट द्यावी.
 
 
 https://www-sahapedia-org.translate.goog/my-city-my-heritage-my-nashik?_x_tr_sch=http&_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc

बागेचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक हे मंदिरांचे शहर आणि दक्षिण भारतातील काशी म्हणून प्रसिद्ध आहे. " नाशिक नव टेकद्वार वसविले " (नाशिक हे नऊ शिखरांवर वसलेले आहे) ही मराठी म्हण नाशिकच्या भौगोलिक स्थानाचे योग्य वर्णन करते, जे दख्खन पठाराच्या नऊ शिखरांवर पसरलेले आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिकपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या मंदिर नगरी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते आणि नाशिक शहराच्या मध्यभागीून वाहते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त होती, ज्यामध्ये सुमारे ८५% लोकसंख्या हिंदू होती.

नाशिक शहर गोदावरीच्या दोन्ही बाजूंना वसलेले आहे. ज्या नदीवर नाशिक वसले आहे त्याचा आकार उलटा 'एस' सारखा आहे आणि प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे वळलेला आहे. या शहरात तीन मुख्य विभाग आहेत: जुने नाशिक, पंचवतीची पवित्र वस्ती, नदीच्या डाव्या किंवा पूर्व तीरावर एक मोठे ठिकाण नाही; मध्य किंवा मुसलमान नाशिक, ज्याला पूर्वी गुलशनाबाद किंवा गुलाबांचे शहर म्हटले जात असे, पंचवतीच्या उजव्या तीरावर आणि दक्षिणेस; आणि आधुनिक किंवा मराठा नाशिक, जे उजव्या तीरावर आहे, मुसलमान नाशिकच्या उत्तरेस आणि पश्चिमेस आणि पंचवतीच्या पश्चिमेस आहे.

हिंदू पौराणिक कथेनुसार, रामायण महाकाव्याचे नायक भगवान राम यांनी त्यांच्या वनवासाचा बराचसा काळ सध्याच्या नाशिकच्या पंचवटी प्रदेशात घालवला. १३-१६ व्या शतकात इस्लामिक राजवटीत मुस्लिम लोकसंख्या नदीच्या उजव्या तीरावर स्थायिक झाली. इस्लामिक काळात नाशिकच्या भूभागात कोकणीपुरा, पाठपुरा, काजीपुरा, नायकवाडीपुरा, मुलतानपुरा आणि कलापुरा असे विविध ' पुरे' जोडले गेले . या काळात शहर काजीपुरा दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, दरबार दरवाजा, बाघूर दरवाजा आणि दिल्ली दरवाजा (कुलकर्णी १९८१:१३) यासारख्या ' दारांनी' किंवा दरवाज्यांनी वेढलेले होते. या काळातील काही अवशेष अजूनही शहरात दिसतात. हिंदू आणि इस्लाम व्यतिरिक्त, २००-६०० इसवी सनाच्या दरम्यान नाशिक प्रदेशात बौद्ध धर्माचे वर्चस्व निर्माण झाले, जे 'पांडू लेणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या बौद्ध लेण्यांच्या गटावरून दिसून येते. नंतर, ११व्या-१२व्या शतकाच्या सुमारास, जैन धर्म प्रमुख झाला, जे 'चांभार लेण्यां'च्या उपस्थितीवरून स्पष्ट होते.

१७ व्या शतकात, पुण्यातील पेशव्यांनी नाशिकवर ताबा मिळवला. मुख्य बाजार रस्त्याच्या शेवटी असलेल्या पेशव्यांचा राजवाडा अलिकडच्या काळात पोलिस स्टेशन आणि सार्वजनिक ग्रंथालयात रूपांतरित करण्यात आला आहे. त्यांच्या कारकिर्दीत, नदीच्या दोन्ही काठावर अनेक मंदिरे बांधण्यात आली आणि त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या काळातील विविध वाडे किंवा ' वाडे' , ' पेठे' किंवा परिसर आणि मंदिरे अजूनही शहराच्या भूदृश्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उंचावर आहेत. नंतर, १९ व्या शतकात, नाशिक परिसर पूर्णपणे ब्रिटिश राजवटीत आला. ब्रिटिश राजवटीत शहराच्या सीमा विस्तारल्या, त्यात कलेक्टर ऑफिस, फौजदारी आणि दिवाणी न्यायालये, जमीन अभिलेख आणि महसूल कार्यालये, पोलिस मुख्यालय आणि परेड ग्राउंड यांचा समावेश झाला. हे जोड शहराच्या केंद्रापासून दूर होते, परंतु बहुतेक भागांच्या आवाक्यात होते. ब्रिटिश नियोजन संकल्पनेचे अनुसरण करून, अधिकाऱ्यांचे बंगले, बागा, रुग्णालये, शाळा आणि ग्रंथालये देखील सुरू करण्यात आली. यामुळे या भागात ब्रिटिश प्रशासन मॉडेलची अंमलबजावणी झाली. १८८२ मध्ये, नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नियुक्त करण्यात आली. [३]

वसाहतवादी काळात, शहराच्या भूदृश्याने औद्योगिक युनिट्स, नियोजित आणि अनियोजित दुकाने, निवासी इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि स्वतंत्र बंगले अशा अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला. पारंपारिकपणे, शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने धार्मिक उपक्रम आणि संबंधित व्यापारावर अवलंबून आहे. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरूंनी आखलेल्या धोरणात्मक चौकटीनुसार शहर औद्योगिकीकरण करू लागले. १९६० च्या दशकात नाशिक औद्योगिक सहकारी इस्टेट, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य गुंतवणूक महामंडळ यासारखे अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग स्थापन झाले, ज्यामुळे हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर एक प्रमुख स्थान बनले. गुंतवणूक, सिंचन योजना आणि वीज यामुळे कृषी अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली, ज्यामुळे हा प्रदेश विविध प्रकारच्या द्राक्षांचा अग्रगण्य उत्पादक बनला आणि यॉर्क आणि सुला सारख्या अनेक प्रसिद्ध वाइनरीजचे घर बनले. [4]

महाराष्ट्रातील मुंबई (१८५ किमी), पुणे (२१० किमी) आणि औरंगाबाद (१९० किमी) आणि गुजरातमधील सापुतारा (७२ किमी) आणि सुरत (२५० किमी) यासारख्या शहरांच्या जवळ असल्याने, नाशिकला पर्यटन उद्योगाचाही फायदा होतो. शहराच्या आत आणि आजूबाजूला धोडप आणि रामशेज सारखे अनेक डोंगरमाथ्यावरील किल्ले आहेत, जे ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात. या टेकड्यांवरील हिरवळीची जंगले या प्रदेशातील स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे घर आहेत. नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो . डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील काळाराम मंदिर सत्याग्रहासारख्या पद्धतशीर दडपशाहीविरुद्ध शहरात महत्त्वाच्या सामाजिक चळवळी झाल्या आहेत. आधुनिक मराठी साहित्याच्या विकासात नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने महत्त्वाची भूमिका बजावली. पैठणी आणि धातू हस्तकला यासारख्या हातमाग आणि हस्तकला शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

नाशिक हे पारंपारिक तीर्थक्षेत्र असले तरी, अलिकडच्या काळात बहुसांस्कृतिक इतिहास असलेले हे शहर जागतिक संबंधांसह आधुनिक शहरी केंद्रात विकसित झाले आहे.

 https://www.mahamtb.com/Encyc/2022/4/8/Article-On-Ram-Kshetra-Nashik.html
mahamtb.com

॥श्रीराम क्षेत्र नाशिक॥

08-Apr-2022

मोक्षपुरी नाशिक चारही युगात प्रसिद्ध आहे. वाल्मिकी रामायणातील उल्लेखाप्रमाणे महर्षी अगस्तीच्या आश्रमातून, महर्षींच्या निर्देशाप्रमाणे भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे दंडकारण्यातील गोदा तटावरील जनस्थान-पंचवटीत आले. राजा दंड व त्यांच्या दंडकारण्याची कथा पुराणांमध्ये वर्णविली आहे. तेव्हा, अशा या श्रीराम क्षेत्र नाशिकचा महिमा वर्णित करणारा हा लेख... 

भगवान श्रीराम पंचवटीला आल्यानंतर येथील गोदावरीचा प्रवाह, निसर्गसौंदर्याने नटलेला रमणीय प्रदेश पाहून मोहित झाले. वाल्मिकी रामायणात असलेले हे सुंदर वर्णन मुळाहून वाचण्यासारखे आहे. गोदातटापासून काही अंतरावर लक्ष्मण यांनी थोडी माती गोळा करून भिंत बनविली व नंतर त्यात सुंदर व बळकट असे खांब रोवून त्यावर बांबू व झाडांच्या पानांनी छप्पर तयार करून पर्णकुटी बांधली.

 पर्णकुटी बांधून झाल्यावर लक्ष्मणांनी गोदावरीच्या तिरी जाऊन स्नान केले व येताना काही फळे व कमलपुष्पे घेऊन ते पर्णशाळेत आले. शास्त्रीय विधीपूर्वक फुले - फळे देवतांना समर्पित करून त्यांनी ती वास्तू शांत केली. नंतर भगवान श्रीराम सीतेसह या आश्रमात, पर्णकुटीत प्रवेश करते झाले. पर्णकुटी पाहून भगवान लक्ष्मणांस दृढ आलिंगन देऊन म्हणाले की, “लक्ष्मणा, तू माझे मन जाणारा, कृतज्ञ आणि धर्माचे ज्ञान असणारा आहेस.” मग श्रीरामांनी सीतेसह या आश्रमात निवास केला. श्रीरामाच्या वनवास काळातील, शूर्पणखेचे नासिका छेदन, १४ हजार राक्षसांसह खर, दूषण आणि त्रिशीर या राक्षसांचा संहार, मारीच यांच्या सहकार्‍याने रावणाने सीतामाईचे अपहरण, या घटना या क्षेत्राशी संबंधित आहे.

खर, दूषण आणि त्रिशीर या तीन राक्षसांचा वध ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण आजही ‘तीवंधा’ म्हणून ओळखले जाते. यासोबत नाशिक ही क्रांतिभूमीसुद्धा आहे. स्वधर्म स्थापनेसाठी अयोध्येचे राजे प्रभू रामचंद्र वनवासकाळात या भूमीत आले. येथेच सीतामाईचे हरण झाले आणि स्वधर्म स्थापनेच्या क्रांतीला निमित्त मिळाले. चोहीकडे म्लेंच्छांचे राज्य. स्वधर्म लोप पावला होता. अशा भीषण परिस्थितीत नारायण सूर्याजीपंत ठोसर नावाचा मुलगा लग्नाच्या बोहल्यावरून ‘सावधान’ एकताच पसार होतो.

तो थेट प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत येऊन १२ वर्षे गायत्रीचे पुरश्चरण व ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तारक मंत्राचा १३ कोटी जप करून स्वधर्म स्थापनेचा शंखनाद करतो तोही याच भूमीवरून! १८९८ मधील पारतंत्र्याचा काळ. १५ वर्षांचा कोवळा विनायक, घरातील अष्टभुजा देवीच्या मूर्तीपुढे ‘शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजीन’ अशी शपथ घेतो आणि पुढे ‘अभिनव भारत’ ही क्रांती संघटना स्थापून, सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करीत बलाढ्य परकीय शक्तीला प्रचंड हादरे देणारे कार्य करतो तेही याच भूमीवरून! श्री काळाराम मंदिर अशी धारणा आहे की, जेथे प्रभू श्रीरामांची पर्णशाळा होती, त्या जागी आजचे श्री काळाराम मंदिर उभे आहे. यादव काळातसुद्धा नाशिकक्षेत्र सुप्रसिद्ध होते.

१२७८च्या सुमारास श्री चक्रधर स्वामी नाशिकला आले असता, त्यांनी श्रीरामनाथांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी तेथे एक पूर्व मुख गुहा व एक उत्तर मुख गुहा होती. त्यांनी गुहेचे दर्शन केल्याचा उल्लेखही सापडतो. पूर्वीचे जुने राम मंदिर बहुदा लाकडी सभामंडप असलेले होते व त्यातील मूर्तीसुद्धा लाकडी असल्याची माहिती मिळते. या लाकडी मंदिर बांधण्याचा कुठलाही उल्लेख-संदर्भ मिळत नाही. परंतु, समर्थांच्या काळातही हेच मंदिर असावे. येथे नित्य कीर्तन होत असे आणि गोपिकाबाई पेशवे कीर्तनात येत असत.

असेच एकदा सरदार रंगराव ओढेकर आले असता, त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय निघाला, तेव्हा आपल्या जवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून भव्य मंदिर बांधण्याचा निर्धार ओढेकरांनी व्यक्त केला आणि त्यांनी हे जीर्ण मंदिर आपल्याजवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून बांधले. त्यावेळी असलेल्या मंदिराची जागा फारच लहान असल्यामुळे सभोवतालच्या लोकांची असलेली घरे, मठ व श्रीमार्तंडाचे लहानसे देवालय घेऊन त्याऐवजी त्यांच्या मालकास मंदिराच्या आसपास घर, मठ आदी बांधून दिली, अशा रीतीने पूर्व-पश्चिम २६६ फूट लांब आणि दक्षिणोत्तर १३८ फूट रुंदीची जागा मोकळी करून तिच्याभोवती चार फूट रुंदीचा मुस्तकीम चिरेबंदी कोट बांधला आणि त्या कोटात आतील बाजूने ११ फूट रुंदीच्या यात्रेकरुंना उतरण्यासाठी धर्मशाळा म्हणजे ओवर्‍या बांधल्या.

मंदिराला कोटाचे भिंतीत पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर असे समोरासमोर चार दरवाजे असून, पूर्वेकडील दरवाजा सर्वात मोठा आहे. त्यास ‘महाद्वार’ असे म्हणतात. मंदिराच्या आवारात नैऋत्य कोपर्‍यावर जेथे पूर्वीचे जीर्ण राम मंदिर व त्यापुढे लहानसा लाकडी सभामंडप होता, तेथे भव्य देवालय बांधण्याचा विधी निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून पाषाणाची श्री गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली. मंदिराच्या वायव्य कोपर्‍यात विहीर खणून बांधली आहे. मुख्य मंदिरासमोर पूर्व-पश्चिम चिरेबंदी दगडी पाटाईचा तीन दालनी साडे ७३ फूट लांब, ३२ फूट रुंद, दहा फूट उंच, ४० खांबी असा प्रशस्त सभामंडप बांधला आहे. या सभामंडपाच्या कडेवर पश्चिमाभिमुख श्री दासमारुतीची मूर्ती उभी आहे. या सभामंडपाचा उपयोग कथा, कीर्तन, पुराण यासाठी होतो. देवळातच दोन नाथपंथीय साधूंच्या संजीवन समाध्या आहेत.

सिंहस्थ काळात नाथपंथी साधूंची झुंडी या काळाराम मंदिरात १५ दिवस निवासासाठी असते. दरवाजाने आत गाभार्‍यात प्रवेश केल्यावर समोर सिंहासन व त्यावर रौप्यमय शेष चिन्हांकित एकास एक लागून तीन प्रभावळ असून त्याखाली भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती विराजमान आहेत. गाभार्‍यावरील घुमट सर्वात उंच असून शंखाकृती आहे. यावरील कळस चार फूट उंचीचा, सहा फूट घेराचा असून तशाच घाटाचा तांब्याचा कळस कोणी गोसाव्याने बसविला होता. त्यावर नाशिक येथील प्रभाकर दिवाकर पंगेवैद्य यांनी कोणी एक मुंबईचा श्रीमंत व्यापारी जलोदर ग्रस्त होता.

त्याचा रोग बरा करून त्यांच्याकरवी सोन्याचा मुलामा देवविला, असे म्हटले जाते. असेही म्हटले जाते की, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कळसाचे काम बाकी असताना रंगराव ओढेकर यांचे जवळील संपत्ती संपत आली असता, अशावेळी त्यांच्या सुविद्य पत्नीने आपली उंची नथ मोडून कळस मढविण्याचे काम पूर्ण केले. शिखरावर हनुमान चिन्हांकित ध्वजा फडकत आहे. या देवालयासाठी लागलेले दगड नाशिकपासून तीन कोसावर असलेल्या रामसेज व बोरगड येथून आणून काम करण्यात आले आहे. या मंदिराची प्राची दिशा वेदशास्त्रसंपन्न यादव शास्त्री कायस्थ या ज्योतिष विद्वानाने इतक्या नेमकेपणाने साधून दिली आहे की, मेष व तुळ या दोन संक्रांतीस म्हणजे भूमध्य रेघेवर सूर्य येणारे दिवशी सूर्योदयाबरोबर सूर्यकिरण श्री मुखावर पडतात.

या देवालयाचे बांधकाम १७७८ मध्ये सुरू होऊन १७९० मध्ये पूर्ण झाले. या मंदिराचे काम एकंदर १२ वर्षे चालून त्या कामी २२ लाख रुपये खर्च लागला. या मंदिरास अनेक गावे इनाम असल्याची माहिती मिळते. मंदिरातील मूर्ती वालुकामय असून प्रभू श्रीरामांचा उजवा हात हृदयाशी आहे व डावा हात खाली सरळ आहे. प्रभू स्वतः निर्देश करीत आहेत की, “जो कोणी मला शरण येईल, त्याला मी हृदयाशी लावीन.” हा राम ‘आत्माराम’ आहे. या रामाची उपासना करुनच समर्थ रामदासांनी स्वधर्माचा शंखनाद केला. १७९० मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रंगराव ओढेकर यांनी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. पानिपतच्या रणसंग्रामात सरदार ओढेकर यांनी आपला देह ठेवला.

परंतु, या मंदिराच्या निमित्ताने त्यांनी आपला कीर्तीध्वज आसूर्य फडकत ठेवला आहे. मंदिरात चैत्र मासात पाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व त्याची सांगता रथोत्सवाने केली जाते. याशिवाय या हरिहर क्षेत्रात खालील वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिरे प्रसिद्ध आहे. काळाराम मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समरसतामार्च १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन पुढे तीन वर्षं चालले. भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे, साहित्यिक शांताबाई दाणी, कुसुमाग्रज अशा स्थानिक मंडळींनी हे आंदोलन चेतवत ठेवले.

अस्पृश्यता ही धर्मामुळे आली आहे, अशी समाजधारणा असल्यामुळे, धर्माचे अधिष्ठान असलेल्या, काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला, तर आपोआपच अस्पृश्यतेचा भाव समाप्त होईल. म्हणजे ज्या हिंदू धर्माच्या हृदयात श्रीरामांना स्थान आहे, ते स्थान अस्पृश्य बांधवांनाही मिळेल आणि हिंदू समाज जातपात विरहित होऊन संघटित व कुठल्याही उच्च-नीचतेची बाधा नसणारा, समतेच्या अधिष्ठानावर उभा असणारा समाज निर्माण होईल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. श्री काळाराम मंदिर (नाशिक), अंबामाता मंदिर (अमरावती), पर्वती मंदिर (पुणे) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मंदिर प्रवेशाची आंदोलने झाली.

स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील भेद रेषा संपविण्याचा मूळ उद्देश या आंदोलनामागे होता. मात्र, तत्कालीन समाजधुरिणांना व धर्ममार्तंडांना डॉ. बाबासाहेबांचे मन आणि विचार कळले नाहीत. स्वा. सावरकर, कुर्तकोटी शंकराचार्य यांचा या मंदिर प्रवेश आंदोलनाला पाठिंबा होता. मात्र, धर्माचा अर्थ न कळलेल्या सवर्णांकडून आंदोलकांवर म्हणजेच अस्पृश्य बांधवांवर दगड-गोट्यांचा वर्षाव झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे आंदोलन स्थगित केले. या घटनेला वर्ष ७५ झाल्यानंतर काळाराम मंदिरातून २००५ साली समरसता यात्रेचा प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या संघदृष्ट्या चारही प्रांतात समरसता यात्रा गेल्या.

नाशिक येथील समरसता यात्रा उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे उपस्थित होते. यावेळी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी या यात्रेप्रसंगी उपस्थित भटके-विमुक्त, अनुसूचित जाती- जमाती, ओबीसी अशा सर्व समाज घटकातील समरसता यात्रेचे कार्यकर्ते यांना मंदिराच्या गाभार्‍यात नेले व त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन केले. यावेळी महंत सुधीर महाराज म्हणाले की, “माझ्या पूर्वजांनी केलेले पाप तुम्हा सार्‍यांच्या उपस्थितीमुळे आज धुवून निघाले आहे.” हा क्षण प्रत्यक्ष अनुभवणार्‍या सर्व बांधवांच्या चेहर्‍यावर डॉ. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न संघ प्रेरणेतून साकार होत असल्याचा आनंद दिसत होता. अहिल्या राम मंदिरआसेतू हिमाचल सहस्रावधी जीर्ण व ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार व निर्माण करणार्‍या धर्म मूर्ती अहिल्याबाई होळकर यांनी नाशिक क्षेत्रीसुद्धा गोदातीरावर घाट व कुंडे निर्माण करून, अहिल्या कुंडासमोरच श्री काशिविश्वेश्वर यांचे भव्य मंदिर उभारले आहे.

मंदिराला लागूनच भव्य अहिल्याराम मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरात भगवान श्रीरामांच्या विग्रहासह प्रातःस्मरणीय अहिल्याबाईंची मूर्तीसुद्धा दर्शनीय आहे. गर्भगृहापुढे पाण्याचे कारंजे आहे. मंदिराच्या प्रारंभी भिंतीवर शिलालेख असून, त्यावर श्रीमंत महाराज होळकर सरकार इंदोर स्टेट श्री अहिल्या राम मंदिर पंचवटी नाशिक हे मंदिर पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतले व श्रींची स्थापना शके १७०८ ज्येष्ठ शुक्ल १२ गुरुवार रोजी केली, असा उल्लेख राजमुद्रेसह आहे. सरदार हिंगणे यांचे गोरेराम मंदिरदिल्ली दरबारात स्वराज्याचे यशस्वी वकील, सरदार महादेवराव हिंगणे हे नाशिकला पेशव्यांचे उपाध्याय होते.

बहुश्रुतता व अवलोकन चातुर्य तसेच, फारसी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या हिंगणे यांनी उत्तरेतील पेशव्यांनी मिळवलेल्या अनेक सरदेशमुख्या, चौथाया यांच्या अनेक भानगडींचा यशस्वी निकाल लावून दिला, असे महादेवराव भट हिंगणे यांनी १७८२ साली नाशिकला गोदावरीच्या तीरावर श्री राम मंदिराची निर्मिती केली. मंदिरात श्रीराम पंचायतन असून गणपती, देवी, शंकर, पार्वती, मारुती आदी मूर्ती आहेत. गोदेच्या काठावर दगडी पायर्‍या चढून गेल्यावर या मंदिराचे दर्शन होते. सरदार श्रीमंत मुठे गोरेराम मंदिरश्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिराजवळच सरदार श्रीमंत मुठे यांचे जवळ जवळ २०० वर्षांपूर्वीचे हे गोरेराम मंदिर आहे. हे मंदिर संपूर्णपणे सागवानी लाकडात बांधलेले असून, पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात भगवान श्रीराम लक्ष्मण सीतेसह भगवान श्रीविष्णूचे (सत्यनारायणाचे) श्री विग्रह आहे.

या मूर्ती पांढर्‍या संगमरवरी असल्याने त्यांना ‘गोरेराम’ असे म्हणतात. मंदिरात चतुर्थाश्रम घेतलेल्या पू. दिनकर गणेश मुठे, पू. गणेश रघुनाथ, मु. पू. भिकाजी मुठे या सत्पुरुषांच्या जागृत समाध्या असून, मंदिराबाहेर श्री मारुती मंदिर व काही सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. मंदिरात वेगवेगळे उत्सव होत असून, लाकडी बांधकामाची देखभाल विषयी अत्यंत काळजी घेतली जाते. बायकांचे रामनाशिक क्षेत्री नाव दरवाजा येथे ‘बायकांचे राम’ असे वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पूर्वी कोणी महिलेने केल्यामुळे ‘बायकांचा राम’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते. मंदिर साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीचे असून या मंदिरातील मूर्ती सज्जनगडावरून पालखीतून आणून येथे स्थापन केल्याचे श्री विनोद वाघमारे यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी स्त्रियांकडून या मंदिराची पूजाअर्चना होत असे. मंदिरात चैत्र पाडव्यापासून नवमीपर्यंत उत्सव व नित्य काकड आरती होत असते.

त्याचप्रमाणे महिलांचे भजन आदी कार्यक्रम होत असतो. कोदंडधारी श्रीरामनाशिकच्या सैनिकी शिक्षण देणार्‍या सुप्रसिद्ध भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात भगवान श्री रामाची कोदंडधारी मूर्ती स्थापित आहे. या मंदिरातील मूर्ती ही रामदंडी (मिलिटरी स्कूलच्या स्थानिक विद्यार्थ्यांनी) वापरलेल्या बंदुकीच्या धातू व गोळ्यापासून बनवलेली आहे. शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनविलेल्या या मूर्तीची स्थापना दि. १० एप्रिल १९८४ रोजी करण्यात आली आहे. याशिवाय अनेक छोटी-मोठी राम मंदिरे नाशिक क्षेत्री आहेत. स्वधर्म व स्वराज्य स्थापनेचा उत्कर्ष काळ उदित झाला असताना येणार्‍या प्रभू रामजन्मोत्सव - अवतरण दिनानिमित्त आत्मारामांच्या चरणी आत्मार्पण!जय श्रीराम!

- देवेंद्रनाथ नटवरलाल पंड्या 

९८२२३९९८५१

 

 https://gajawaja.in/know-kalaram-mandir-of-nasik-is-historical-closely-associated-with-sri-rama-marathi-info/
 
gajawaja.in

Kalaram Mandir : काळाराम मंदिरचा इतिहास आणि माहिती

Jyotsna Kulkarni

नाशिक भारतातील एक महत्वाचे आणि मोठे शहर आहे. शिवाय देशातील हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र देखील आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मंदिरांचे शहर म्हणून देखील नाशिकची एक ओळख आहे. अतिशय पवित्र आणि मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या या नाशिकला धार्मिक आणि ऐतिहासिक बाबतीत मोठे महत्व आहे

अतिशय प्रसन्न आणि अल्ह्हादायक वातावरण असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. अशा या नाशिकमधील एक मंदिर असतीशय मोठे आणि जगप्रसिद्ध आहे. त्या मंदिराबद्दल अनेकांना मोठे कुतूहल आणि उत्सुकता जाणून घेण्यासाठी. देशविदेशातील असंख्य पर्यटक या मंदिरात भेट देण्यासाठी येतात आणि मनशांती अनुभवतात. असे हे अतिशय सुंदर मंदिर आहे काळाराम मंदिर.

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावनभूमीमधील हे काळाराम मंदिर जगविख्यात आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मंदिराला भेट दिली. याचवर्षी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याआधी पीएम मोदींनी 11 दिवसांचे व्रत केले आणि त्याची सुरुवात नाशिकपासून आहे. प्रभू रामाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे काळाराम मंदिराविषयी अधिक माहिती सांगणार आहोत.

प्रभू रामचंद्रांचे त्यांच्या वनवासाच्या काळात नाशिकमध्ये अनेक वर्ष वास्तव्य होते. याच ठिकाणाहून देवी सीतेचे रावणाने अपहरण देखील केले. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यांच्या इथेही निवासाच्या अनेक खुणा आजही श्रीरामाच्या अस्तित्वाची साक्ष देतात. या अनेक खुणांची जपणूक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये होते. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर आहे, जे पंचवटी परिसरात वसले आहे.

Kalaram Mandir

नाशिकमध्ये रामाची अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचा आपला एक वेगळा इतिहास आणि विशेषता आहे. मात्र या सगळ्यात काळाराम मंदिराचे वैशिष्ट् आणि महती काही औरच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच, सोबतच त्याची बांधणीही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.

पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून नागर शैलीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.

संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोर असलेल्या मुख्य मंदिरातील श्रीरामाच्या चरणाकडेच पाहत आहे असे वाटते. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे.

मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्‍या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे. खास बाब म्हणजे आपण नेहमीच श्रीरामांच्या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीसोबतच त्यांच्या पायाजवळ हनुमान असतो. मात्र या मंदिरामध्ये हनुमान रामाच्या जवळ नाहीये.

मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्‍या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.

हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. तिथे आधी नागपंथीय साधू रहात. मंदिरालगत भैरवनाथ आणि गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे १७८० मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. १७९० मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखाचा खर्च आला.

 https://www.facebook.com/groups/846904253319743/
 
श्री.सुंदर नारायण मंदिर १८७०
(The British Library)
आपल्या गोदावरीचा पूर्वीचा घाट किती छान होता....
आता कुंभामेळ्या मध्ये काय करतील घाटाचे सुशोभीकरण देव जाणे...🤷🏻‍♂️
घाटला पुरातन प्रमाणे करता आलं तर बर...
 
सुंदर नारायण मंदिराकडुन होळकर पुलापर्यंत पायऱ्या होत्या .पुलाखाली अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला सुंदर दगडी घाट होता.इंग्रजांनी व्हिक्टोरिया पुल बांधायला घेतला तरी या पायऱ्यांना व घाटाला मुळीच बाधा आणली नाही.1970 पर्यंत रे सारे तसेच होते.नंतर मात्र सुधारणेच्या नावाखाली जुने बांधकाम अविचाराने सारेच तोडण्यात आले .जुने सौंदर्य लयास गेले. होळकर पुलाची ब्रिटिशकालीन कोनशीला मेकॅनिकल गेटच्या बांधकामात होत्याची नव्हती केली.नदीपात्रातील जुने खडक तोडण्यात आले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे होळकर पुलाखालून एकमुखी दत्ताच्या समोर अखंड पाण्याने खळाळत वाहणारी गोदावरी इतिहासजमा होऊन केवळ प्रदूषित पाण्याचे डबके झाली .
 
 
फोटो टाकण्यास कारण की लहानपणापासून ते आजगायत अनेक आठवणी आहेत या मंदिराच्या.....अगदीच काही दिवसांपूर्वी याच ग्रुप मध्ये त्या आपण सगळ्यांनी share ही केल्यात पण आज पर्यंत एक गोष्ट नाही कळाली की याचे नाव ढोल्या गणपती का ❓
याची काही कहाणी काही आख्यायका माहिती आहे का ❓
 सध्याच्या काळात कला आणि कल्पकतेपेक्षा अवाढव्य,अचाट,अक्रारळ-विक्राळ करून दाखवणे हे प्रस्थ फार माजले आहे.
पूर्वी घरातल्या आणि बाहेर देवळातल्या गणपतीची मूर्ती हा माफक उंचीची असायची. म्हणून त्या काळात ह्या गणपतीला बघून लोक त्याला ढोल्या गणपती म्हणायचे, असे समजते.
६४-६५ च्या काळात माझी आजी मला या बाप्पाच्या दर्शनाला न्यायची. एकदा मूर्ती कडे बघून तीला हसू आलं, पण बापाची क्षमा मागून ती म्हणली माझ्या नातवाचे बाळसे बघूनच मला तुझ्या मुर्ती कडे बघून हसू आले, असे माझी आई सांगायची. (कृपया, फक्त तात्पर्य लक्षात घ्यावे , व्यक्तिगत संदर्भ सोडून द्यावा ही विनंती)
 
 
 आहे
 
  पंचवटी परिसरात असलेली ही सर्व मंदिरे पेशव्यांच्या काळात बांधली गेली आहेत.
सुंदर नारायण मंदिर इ.स. १७५६ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी बांधले. मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. मंदिरात श्रीविष्णु म्हणजेच नारायण, देवी लक्ष्मी आणि वृंदा यांच्या मूर्ती आहेत. समोर विष्णूचे वाहन म्हणजे गरुड आहे. एका पुराणकथेनुसार वृंदेने दिलेल्या शापामुळे विष्णूचे शरीर काळे पडले होते. त्याने गोदावरी नदीमध्ये डुबकी मारल्यानंतर त्याची कांती उजळली आणि तो सुंदर झाला.
ह्या मंदिरासमोर कपालेश्वर मंदिर आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला श्रीविष्णु आणि कपालेश्वर (शंकर) म्हणजेच हरि आणि हर यांच्या भेटीचा हृद्य सोहळा इथे होतो.
सरदार रंगराव ओढेकर यांनी इ.स. १७९० मध्ये बांधलेले काळा राम मंदिर सुद्धा काळ्या पाषाणात बांधलेले आहे. वनवास काळात ह्याच ठिकाणी श्रीरामाचे वास्तव्य होते असे मानतात. विस्तीर्ण प्राकार असलेल्या ह्या मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आणि समोर हनुमंत यांच्या मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणात घडवलेल्या आहेत म्हणूनच त्याचे नाव काळा राम असे पडले. ह्या मूर्ती गोदावरीच्या पात्रात सापडल्या अशी आख्यायिका आहे.
ह्या मंदिराजवळच आणखी एक लहान मंदिर आहे. इ.स.१७८२ मध्ये माधवराव पेशवे यांचे वकील देवराव हिंगणे यांनी बांधलेले हे मंदिर गोरा राम अथवा गोरे राम मंदिर ह्या नावाने ओळखले जाते. या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे शिसवी लाकडाचे आहे.
सीता गुंफा ही एक लहानशी गुहा असून रामायण काळात रावणाने सीतामाईचे हरण ह्याच जागेतून केले असा समज आहे. ह्या गुहेत रामायणातील प्रसंग चित्रित केलेले आहेत.
नारोशंकरी घंटा ही पोर्तुगीज बनावटीची वसई चर्च मधील घंटा. वसईवरील विजयानंतर चिमाजी अप्पा पेशव्यानी ती काढून घेतली आणि हत्तीवरुन वाजत गाजत ती नाशिकला आणली. (ही घंटा वाई जवळ मेणवली येथे आहे असेही सांगितले जाते. अशा एकूण तीन घंटा आहेत असे म्हणतात. तिसरी कुठे आहे माहीत नाही)
पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांना त्यांच्या लढाईतील पराक्रमाबद्दल पेशव्यांनी ती घंटा भेट म्हणून दिली. मग राजेबहाद्दर यांनी एक शिवमंदिर बांधले आणि प्रवेशद्वारावर ती घंटा तिथे बसवली. सहा फूट व्यासाच्या ह्या घंटेचा आवाज 5 किमी. अंतरावरही ऐकू येतो असे म्हणतात.
(ही सर्व माहिती गूगल वरून संकलित केली आहे)
ह्या घंटेने मराठी भाषेला एक अलंकार बहाल केला. अतिशय उच्च स्वरात बोलणार्या स्त्रीला 'नारोशंकरी घंटा' अशी उपमा दिली जाते.
जुन्या आग्रा मुंबई रस्त्यावर कालिका मातेचे मंदिर आहे. नवरात्रामधे इथे मोठी जत्रा भरते. सकाळ संध्याकाळ तिथे दर्शनाला खूप गर्दी असायची. एरवी वर्षभर तिथे कुणी जात नव्हते. तेव्हां तिथे फारशी वस्ती नव्हती. ते मंदिर अगदी लहानसे, काहिसे विजनवासातच होते. आता मात्र त्याच्या आसपास खूप वस्ती झाली आहे. मंदिर सुद्धा मोठे झाले आहे. दसर्याच्या दिवशी गोल्फ क्लबच्या मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम असे. दहातोंडी रावणाचा पन्नास फूट उंचीचा पुतळा करुन त्याच्या पोटात फटाके भरले जायचे. एका रथातून श्रीराम आणि लक्ष्मणाचा वेष घेतलेली मुले तिथे यायची आणि एक पेटता बाण रावणावर सोडायची. धडधडून पेटणारा रावण बघायला अवघे नाशिक तिथे लोटत असे. 
 नारोशंकर मंदिराच्या तटावर चारही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण घुमट आहेत, यांचे छत सुबक अर्धगोलाकार असून महाराष्ट्रात अपवादानेच असे घुमट आढळून येतात, नासिकच्या जुन्या स्थापत्त्याची ही वेगळी ओळख सांगणारे हे काम आहे.
 
 नारोशंकर मंदिराच्या मंडपातील देवकोष्टकात ही चिन्हे कोरली आहेत, त्याचा मला अर्थबोध झाला नाही
 
 नारोशंकर मंदिराच्या गर्भगृहातील द्वार शाखेवरचे नाजूक नक्क्षीकाम. उत्तर मराठाकालिन सुबत शिल्पकलेची साक्ष देणारे
 
 अश्व आणि खांबाची सुबक नक्क्षी
 
 मराठा राजवटीतल्या वैभवशाली व स्थैच्या काळात शिल्प कला उत्कर्षावर होती याचे निदर्शक असलेला हा स्तंभ
 
 पणती पौर्णिमेला नारोशंकर मंदिराचा दिव्यांनी उजळलेला शिल्पांकीत मंडप
 
 
 
 
 श्री नारोशंकर स्थापित श्री रामेश्वर मंदिराच्या भिंतीवरील, शिवशंकराचे काळावर नियंत्रण दर्शविणारे,
"अक्षय नाग शिल्प" 🙏

  कुशावर्त तीर्थ

 कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर.



 
 
 मुरलीधर मंदिराच्या कोठा समोरचा नदी परिसर
 
 दुतोंड्या मारूती समोरचे कुंड दिव्यांनी उजळून निघालेले
 
 ऋणमुक्तेश्वर: अलिकडच्या काळात दरवर्षी काही तरी संकल्पना घेऊन मानकर्यांच्या वतिने सजावट केली जाते..
 
द्वारशाखेचे देखणे नक्षीकाम, वरच्या बाजूला मुख्यस्थानी अतिशय सुबक अशी गणेश मुर्ती
 
 मत्स्यावतार
 
 शिव तपश्चर्या,ध्यान-साधना मुख्य मंदिर.
 पेशवे सरदार नारोशंकर स्थापित श्री रामेश्वर मंदिराच्या भिंतीवरील आगळे-वेगळे सप्तश्रुंगी देवीचे प्राचीन शिल्प.
 
 सुंदर नारायण भगवान
 कपालेश्वर हरीहर रूप
 
पंचवटी नाशिक
 
 श्री त्यागेश्वर शिवमंदिर
गोदाघाट,पंचवटी-नाशिक
 
 रामकुंड परिसरातील,गोदावरीच्या काठावर,
वसलेलं पुरातन श्री निळकंठेश्वर शिवमंदिर.


 
 
 रामकुंड, गोदातीर्थ, पंचवटी-नाशिक

सूर्यस्नान व पवित्र जलतीर्थ

नाशिक म्हणजे देवदेवतांची भूमी तर पंचवटी नाशिकमधलं अतिपवित्र स्थान, स्वर्गातला प्रत्येक देव जिथे विसावला ते पंचवटी क्षेत्र, त्यामुळे नाशिक शहराची ख्याती संपूर्ण भारतभर पसरली आहे.
नाशिकचा उल्लेख सर्वप्रथम स्कंदपुराणात केला गेला, नाशिक हे स्थान पापकर्मातून सुटण्याची पहिली पायरी असेल, असे म्हटले जाते, म्हणूनच तर इथे अनेक काळापासून पदयात्रा, तीर्थयात्रा केल्या जातात,पंचवटी हे श्री रामांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले स्थान आहे, श्री रामांनी आपल्या पित्याचे,दशरथ राजाचे "अस्थी विसर्जन" याच कुंडात केले होते,तेव्हापासून इथे प्रत्येक मनुष्याचे अस्थी विसर्जन केले जाते, हिंदू धर्मानुसार प्रत्येक मनुष्य प्राण्याने या पवित्र जलकुंडात स्नान केल्यास त्याचे रोग, व्याधी दूर होतात, तसेच आत्मग्लानी, आत्मभोग,चुका, अपशब्द,पश्चाताप यापासून मुक्तता मिळवण्यासाठीचे हे स्थान आहे, या कुंडात सूर्यस्नानाला फार महत्व आहे, उगवत्या सूर्यासोबत,तसेच मावळत्या सूर्याला साक्षी मानून स्नान करणे म्हणजे, जीवन-मरणाच्या मधील यातना, दुख, पीडा, अडचणी, निराशा सोडवण्यास तो मदत करतो,
आणि जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणतो,
पवित्र रामकुंड फक्त शरीराची नाही तर,आत्म्याची शुद्धी करतं,तसे ते पापातून मुक्तता मिळवण्यासाठीचे ही मुख्य स्थान आहे,
पौराणिक अख्यायिका:-
समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश उत्पन्न झाला,देव-असुर यांच्याचं सर्वात आधी अमृत कोणाला मिळेल, यावरून वर्चस्व निर्माण झाले आणि त्याच गडबडीत कलशातुन अमृताचे काही थेंब ह्या ठिकाणी पडले, तेव्हापासून रामकुंडाचे पाणी अधिक पवित्र झाले, रामकुंड म्हणजे
श्री रामांनी 13 वर्षे जिथे वास्तव्य केले, ज्या कुंडात त्यांनी दररोज स्नान केले, श्री रामांनी निर्माण केलेले जलकुंड अर्थातच "रामकुंड".
श्रीराम म्हणजे जीवनाचा बोध सांगणारे, कर्तव्याचे,पालन करणारे त्यामुळेच जीवनाची सुरुवात जर राम असेल, तर मरतेसमयी मनुष्यदेह,हा रामात मिसळला जावा अशी जण-माणसात परंपरा आहे,श्रीरामांनी रावणाचा वध केला,
आणि रावणही शेवटी रामात मिसळून गेला, यानुसारच प्रत्येक मनुष्य शेवटी-शेवटी रामात मिसळला जातो,
मरतेसमयी राम नाव उच्चारूनचं देहाला शांती, संस्कार
दिले जातात, रामकुंडाच्या एका बाजूला अस्थी विसर्जन कुंड आहे,मनुष्य मृत झाला की, त्याची राख (अस्थी) त्या कुंडात वाहिली जाते, जेणेकरून त्या मृतात्म्याला मोक्ष मिळू शकेल, त्यामुळेच आयुष्याच्या सरतेशेवटी मनुष्य देह श्री रामांना अर्पित केला जातो, आत्म्याची परमात्म्याशी भेट म्हणजे रामकुंड होय,जिवंतपणी केलेल्या पापकर्मातून तर मृत्यूनंतर होणाऱ्या पाप-पुण्याच्या हिशोबातून मनुष्य सुटतो आणि दुसऱ्या जन्माच्या वाटचालीकडे तो इथून चालू लागतो, काही पुण्य आत्म्यांना इथून स्वर्गाची प्राप्ती होते,आणि त्याच पाप-पुण्याचा हिशोब सांगणारे हे पृथ्वीवरील पाप-पुण्य कुंड होय.
पवित्र गोदामाई आपले जलतीर्थ यां कुंडात निरंतर प्रवाहित करतं राहते, रामकुंड घाटाचे निर्माण 1996 साली करण्यात आले, रामकुंडाच्या वायव्येला अरुणा संगम , मागे सीताकुंड उर्फ अहिल्याकुंड, दक्षिणेला दुतोंड्या मारुती, हनुमान कुंड, दशाश्वामेध कुंड आहे, तर नारोशंकराच्या मंदिरासमोर रामगया कुंड आहे,
नाशिक म्हणजे प्रभू श्री रामांच्या पाऊलखुणा आणि वास्तव्याचे ठिकाण,त्यामुळे गर्व, मी पणा, अहंकार, ईर्षा, मोह, स्वार्थ यांचे हरन करणारे, तर इच्छा, पश्चाताप, प्रायश्चित्त, पापकर्म, त्याग याचे निवारण करणारे ईश्वर
आणि या सगळ्यांशी जोडला गेलेला मनुष्य.
जिथे मनुष्य आणि परमेश्वर एकत्रित येतो ते स्थान अधिक प्रिय आणि पवित्र वाटू लागते.
रामकुंडाशी एकनिष्ठ
 
 
"वसई विजयाची डंका"⚔️
प्रसिद्ध नारोशंकरांची घंटा 🔔
पंचवटी, नाशिक

श्री रामेश्वर आणि श्री भीमाशंकर येथील
भव्य घंटा.

"सरदार नारोशंकर" यांनी पेशवे "सेनापती चिमाजी अप्पा" यांच्या नेतृत्वाखाली,वसई युद्धात मोलाचे कार्य केले होते,
पोर्तुगीजांविरुद्ध पेशव्यांचा पराक्रम आणि विजयाचे प्रतीक म्हणून तिथल्या चर्चच्या 3-4 भव्य घंटा त्यांनी हत्तीवर लादून आणल्या होत्या (हत्तीच्या गळ्यात टांगून,बांधून आणल्या होत्या), परंतु या घंटा एवढ्या भव्य होत्या, की त्या लांबपर्यंत घेऊन जाणं कठीण होतं, त्यामुळे. पेशव्यांनी त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत केल्या,
त्यापैकी एक घंटा श्री भीमाशंकर मंदिर परिसरात ठेवण्यात आली, दुसरी थेट नाशिक इथे आणण्यात आली,
(सन-1739 सालचे वसईचे युद्ध), त्यानंतर ही घंटा बेवारस,अशीच पडून होती,परंतु ती कास्य धातूपासून बनलेली असल्याने सुरक्षित होती, सरदार नारोशंकर जेवढे पराक्रमी, शूरवीर सैनिक होते, तेवढेच ते देवाला मानणारे, देवपूजा करणारे होते, त्यामुळे त्यांनी युद्धासमयी वेगवेगळ्या प्रदेशांना भेटी दरम्यान अनेक पुरातन मंदिराचा अभ्यास केला होता,त्यातून बोध घेत त्यांनी सन-1745 साली श्री रामेश्वर मंदिराचे निर्माण केले सन-1747 पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु मंदिराची सुरक्षा महत्वाची होती,याकारणे मंदिराला चहूबाजूने भक्कम भिंत बांधण्यात आली व राजपूत कारागीरांनी चार पावसाळी छत्र्या सुद्धा निर्माण केल्या,घंटेसाठी दर्शनी विशिष्ट उंच जागा निवडण्यात आली,एका हाताने ह्या घंटेचा लोलक हलतही नाही,आणि देवाचे दर्शन घेण्याआधीचं प्रत्येक सामान्य माणसाने आपले शक्तीप्रदर्शन दाखवू नये,यामुळेच कदाचित ती एवढ्या उंचावर लटकवण्यात आली,त्या काळापासून ते आजपर्यंत ही घंटा गोदावरीला येणाऱ्या पुराचं संकेत देते, असं म्हटलं जातं, आणि ते खरे आहे, यां दोन्ही घंटांवर 1727 असे कोरलेले आहे, कदाचित त्या सन-1727 मध्ये निर्माण केलेल्या असाव्यात,
आज या दोन्ही घंटा वाजण्यास प्रतिबंध आहे, प्रमुख कारणं हे की,त्यांचा आवाज खूप कर्कश आहे, कानात खूप वेळ घोंगवणारा,अक्षरशः बहिरे करणारा आवाज आहे, त्याकाळी गोदावरीला पूर आल्यानंतर ही घंटा वाजली जातं असेल, म्हणजे सगळ्यांना कळेल की गोदावरीला पुर आला, याचा फक्त आज अंदाज लावता येईल,
या दोन्ही घंटांचा लोलक काढून ठेवण्यात आला आहे,
आणि असे अनेक मंदिरे आहेत जिथे लहान-लहान घंटा सुद्धा बांधून ठेवण्यात आल्या आहेत,धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या देवाची प्रार्थना करण्याआधी, आपण मंदिरातील घंटा वाजतो, मगच आत प्रवेश करतो, घंटेतुन होणारा नाद,हा तीव्र नसून,शांत असा स्वर असतो,जो थोडा वेळ कानात घुमणारा, मनावर आणि परमेश्वराच्या कानावर एक सूचनेचा प्रकाश टाकतो,(देव झोपलेला नसतो,फक्त त्यातून देवाला सूचित केले जाते,असे आपण ग्राह्य धरतो), घंटा वाजल्याने मनं विचलित होते असे काहींचे म्हणणे आहे, तर ते पूर्णपणे खरे नाही, घंटा ही नकारात्मक ऊर्जा दूर करून, सकारात्मकता, एकाग्रता, शांतता उत्पन्न करते, थोडा वेळ देवाची प्रार्थना करण्यासाठी मनात मग्न भाव आणते,असं विज्ञान सांगत,
घंटानाद म्हणजे शुभकार्याची सुरुवात, घंटानाद म्हणजे संकटासमयी इशारा देणारे साधनं, काळ,वेळ मात्र वेगवेगळा,मंदिरातील घंटा बांधून ठेवणे, लोलक काढून ठेवणे हे अपशकून, संकट,नकारात्मक येण्याची निशाणी आहे, शिवाय पवित्रता ही लोप पावते, मंदिराला जसा कळस महत्वाचा,तशी घंटा सुद्धा महत्वाची,
(पूर्वी ही घंटा ज्या चर्चमध्ये होती,तेव्हा ती मोकळा श्वास घेत होती, आज मात्र ती बंधनात आहे)
श्री रामेश्वर मंदिरातील नारोशंकरांची घंटा,दिवसातून दोन वेळा,ठराविक वेळेला वाजवली,तर एक छान उपक्रम होईल, शिवाय तिचे महत्व खूप आहे, पण ते प्रत्येकाला समजेलच असे नाही.
आज एका पुरातन मंदिरात,लोलक बांधलेली घंटा पहिली
आणि श्री नारोशंकरांच्या घंटेची आठवण आली
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 भद्रकाली मंदिर

 भद्रकाली माता मुर्ती
 

RAMKUND

रामकुंड: नाशिक मध्ये आल्याबरोबर बहुतेक भाविक सर्वात आधी रामकुंडावर येतात. त्यांना रामकुंडात पुण्या स्नान करण्याची आस असते. कारण रामकुंड पवित्र स्थान मानले जाते. या रामकुंडला लागुनच सीताकुंडसुधा आहे. अनेक भाविकांना याची माहिती NASTE. RAMKUNDA आता जरी बांधलेल्या स्वरुपात दिसत असले तरी रामायणकाळात गोदावरी नदीच्या प्रवाहाचा तो एक भाग होय. राम-सीता-लक्षुमन तपोवनातील आपल्या पर्ण कुतीकडून या ठिकाणी स्नानासाठी यायचे. म्हणून पुढील काळात रामकुंडला महत्व मिळाले. रामकुंडात जिवंत पाण्याचे झरे आहेत. कदाचित त्यामुळेच येथे मृतांच्या अस्थींचे विलीनीकरण सहजोते. भक्कम बांधणी, दगडी बांधणी रामकुंडाची आहे. रामकुंडाची बांधणी पेशवे काळापूर्वी म्हणजे इ.स. १६९६ साली झाली. तेव्हाचे एक सरदार चीत्राराव खटावकर यांनी ती केली आहे. पेशवे काळात रामकुंडाची चांगली दुरुस्ती केली गेली व अलीकडेच इ.स. २००५ मधेही त्यात सुधारणा करण्यात आली आहे. रामकुंडात पुण्यास्नानाबरोबर इतर धार्मिक विधी केले जातात.  येथे विविध भागातून पर्यटक येत असतात. या परिसरात पर्यटकांना मंदिरे दाखाविण्यासाठी अधिकृत बिल्लाधारक गाईड असतात. त्या साठी आवश्यक ती सेवा फी घेतात. संध्याकाळाच्या वेळी या ठिकाणी प्रसन्न वाटते. तसेच या परिसरात आसपास देवाची अनेक मंदिरे आहेत.  

खंडोबाची टेकडी हे नाशिक शहरातील एक महत्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. नाशिक शहराच्या जवळ देवळाली, या भारतीय सैन्याची छावनी परिसरात एका छोट्याशा टेकडी वरती वसलेले आहे. 
 खंडोबाची टेकडी चा इतिहास
 खंडोबाची टेकडी चा इतिहास हा खुप पुरातनकाली असा आसुन, हे मंदिर भगवान शंकराला अर्पण आहे आशी देखील एक आख्यायिका सांगण्यात येते. अख्यायिका नुसार हे मंदिर ५०० वर्षे जुने आसुन, भगवान शंकराने खंडोबाच्या रुपाने या ठिकाणी अवतार घेतला होता.मल्लदैत्य आणि मनिदैत्य या दोन भावांनी भगवान शिव ची आराधना करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्या कडून वरदान घेतले कि धरती वर कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही.असे वरदान प्राप्त होताच या दैत्य भावांनी धरती वरती साधुसंत व मणुष्य जातीवर अत्याचार करणे, कष्ट देणे,सुरू केले. हि गोष्ट जेव्हा भगवान शंकराला कळाली तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन स्वंय खंडोबाचा अवतार घेतला व या दैत्याचा नाश केला. व या टेकडीवर विश्राम केला. तेव्हा पासून या टेकडीला खंडोबाची टेकडी किंवा विश्राम टेकडी देखील म्हणतात. 

खंडोबाची टेकडी ची एका कथेनुसार हि देखील अख्यायिका आहे कि छत्रपती शिवाजी महाराज उत्तर दिशेला जातांना ह्या ठिकाणी विश्रामाला थांबत असे. तेव्हाच या मंदिराची त्यांनी स्थापना केली. 

मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन हे भगूरचे आमले परिवाराकडून केले जाते . 
खंडोबाची टेकडी वरील मंदिर
मंदिरात असलेली खंडोबा, म्हाळसा आणि भानू यांची मूर्ती
मंदिरपरीसरात अनेक छोटेछोटे मंदिर हि बांधण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात बांधण्यात आलेलेेे 
 साईबाबा मंदिर
खंडोबाची टेकडी वरील मंदिर च्या समोरील बाजूस एक ध्वज स्तंभ उभारण्यात आलेला आहे. 
खंडोबाची टेकडी मंदिर परिसरातील मागील कड्यावरून रोज संध्याकाळी सूर्यास्त हा स्पष्टपणे आणि मोठा दिसतो . सूर्यास्त बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते . 
खंडोबाची टेकडी  मंदिर पायत्याशी तेथील मंदिर व्यवस्थापनेने एक पार्क उभारलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही छानपैकी बसू शकतात . या ठिकाणी खूप शांतता असते 

 खंडोबाची टेकडी ची दरवर्षी डिसेंबर महिण्यात चंपाषष्टीला यात्रा भरते .त्या वेळेसअसंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात . भगवान या ठिकाणी भगवान खंडोबाची तळी भरली जाते व देवाला वांग्याची भरीत आणि बाजरीची भाकर असा नैवद्य देखील या ठिकाणी दिला जातो . 

तर एकदा अवश्य आपण या खंडोबाच्या टेकडीला भेट द्या . तुम्हाला नक्कीच आवडेल .
 
 
 

खंडोबाची टेकडी

खंडोबाची टेकडी हे ठिकाण माहित नाही असा माणूस नासिकमध्ये विरळाच! नासिकपासून १५ किमी. वरील देवळाली कॅंप भागात असलेली ही टेकडी स्वच्छ, मोकळ्या हवेमुळे व निरव शांततेमुळे प्रसिद्ध आहे. देवळालीतून निघाल्यावर काही मिनिटांतच टेकडीजवळ पोहोचायला होतं.हा संपूर्ण भाग सैन्याच्या ताब्यात असल्याने पायथ्यापाशी जवान उभे असतात. पायथ्यापाशीच डावीकडे एक तोफ दिसते. चढाईच्या सुरूवातीलाच या ठिकाणाबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्यांत या टेकडीचा विश्रामगड आणि शिवाजीमहाराजांच्या या टेकडीवरील वास्तव्याचा चुकीचा उल्लेख आहे. खरं तर विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला व महाराजांचं वास्तव्य पट्टा किल्ल्यावर होतं. असो. टेकडी चढतांना रूंद व कमी उंचीच्या पायर्‍या असल्याने दमछाकही फारशी होत नाही. टेकडीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे. माथ्यावरील घुमटाकृती खंडोबाच्या मंदिराला आटोपशीर तट आहे.




मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...



..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.



गाभार्‍यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.
http://bornphd.blogspot.com/2010/07/blog-post.html

अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...
 
 

काळाराम मंदिर

दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे.
रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच. पण त्याची बांधणीही काही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.

पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.




समस्या

  • नाशिकमधील काळाराम मंदिरा बाहेर वाहनांनी आणि किरकोळ विक्रितेच्या दुकानांचे अतिक्रमण वाढले आहे .यामुळे मंदिराचे सौंदर्य नाहीसे होत आहे .दर्शनासाठी होणारी भविकाची गर्दीला यामुळे अड़चन होते आणि आणखी कोंडी वाढती.
पंचवटी आणि सीता गुफा या ठिकाणी रिक्षावाल्याच्या रांगा असतात .यांच्या मूळे वाहतुकीची कोंडी वाढती .
काळाराम मंदिराच्या परिसरात भुरटया चोरांचा सुळसुळाट झाला आहे .यांचा त्रास भाविकांना होतो.
राम मंदिरात गर्दीचे योग्य नियोजन नाही .यामुळे नेहमी मंदिराबाहेर गर्दी असते.




उपाय
मंदिरासाठी वेगळे वाहन तळ बनवले पाहिजे .जेणेकरून मंदिराबाहेर वाहने लावली जाणार नाही .आणि मंदिराचा परिसर मोकळ राहिल .
जे किरकोळ विक्रेते आहे त्यांना  दुकानांसाठी वेगळी जागा दयावी .
रिक्षाचे वेगळे स्टैंड बनवावे .




· वाहनानसाठी बांधलेल्या तळसाठी माफक शुल्क असावे.
· मंदिराच्या परिसरात पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवावा जेणे करून चोरीचे प्रमाण कमी होईल. मंदिराची सुरक्षिता वाढेल.
· जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरा बसवावे .
· मंदिरात गर्दीचे योग्य नियोजन करावे.लोखंडाच्या रांगा बनवाव्या जेणे करून येणारे भविक हे रांगेतच मंदिरात जाऊन दर्शन घेतील.





काळाराम मंदिर हे फक्त नाशिककरांची श्रध्दस्थान नसून ते पूर्ण महाराष्ट्र आहे.काळाराम मंदिर पाहण्यासाठी विदेशातून लोक येतात.हे मंदिर नाशिकचा मान आहे त्याची प्रतिष्ठा राखणे आपले ही काम आहे.मनपाच्य उपाय योजना बरोबर आपणही मंदिराची स्वच्छता राखणे आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे.
 
 
 
 
 

घोरपडे घाट व जुने त्र्यंबकेश्वर मंदिर


१९ व्या शतकातील घोरपडे घाट हा पेशवेकालीन घाट आहे. १८३१ साली तो बांधण्यात आला.

शिवाजी पुलाजवळ मुठा नदीच्या डाव्या काठावर बांधलेली ही पायऱ्या असलेली व किल्ल्यासारखी दिसणारी छोटेखानी दगडी वास्तू आहे. दैनंदिन विधी करण्यासाठी नदीच्या काठावर बांधलेल्या या घाटाच्या मागे मंदिराचे अवशेष दिसतात. पूर्वीच्या भांबुर्डा गावात असलेला हा घाट फेब्रुवारी १८३१ मध्ये पेशवे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज दौलतराव घोरपडे यांनी बांधला. चार बुरुज, एक भक्कम भिंत, नगारखाना आणि नदीच्या दिशेने उतरून जायला पायर्‍या अशा स्वरुपाचे या घाटाचे बांधकाम होते. तटबंदीच्या भिंतीला दोन खोल्याही जोडलेल्या आहेत. इतिहासकार दत्तो वामन पोतदर यांनी या घाटाला भेट दिल्याविषयी आणि तिथे १० फेब्रुवारी १८३१ असे कोरलेल्या दगडाविषयी लिहून ठेवले आहे.

१९६१ च्या पुरात या वास्तूचा काही भाग वाहून गेले आणि शिलालेखही उद्ध्वस्त झाले. ही वास्तू अत्यंत जीर्ण झाली असली, तरी त्या ठिकाणी दोन मंदिरांचा पाया दिसतो. यापैकी एक मंदिर महादेवाचे असल्याची खात्री पटली आहे, पण दुसरे मंदिर अद्याप समजू शकलेले नाही. १७७३ ते १८१० या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या अनेक याद्यांमध्ये घोरपडे घाटावरील भांबुर्डा गावातील त्र्यंबकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. येथे मंदिरचे अवशेष असण्याची खूप शक्यता आहे. भांबुर्डा गावात पेशवाईच्या काळातील वरुडेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ही दोनच शिवमंदिरे असल्याची नोंद आहे. भांबुर्डा येथील काही वृद्ध रहिवाशांना त्र्यंबकेश्वर मंदिर अस्पष्ट आठवते आणि जुन्या काळात नागबळी पूजेसाठी त्याचा गाभारा उपयोगात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अज्ञात पायाचे संकेत मिळाले असले, तरी या गृहीतकाला पुष्टी देण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही.

पुणे तहसीलच्या नगर विकास नकाशात काही छत्र्या (स्मारके) दाखविण्यात आल्या आहेत, पण त्या कोणाच्या असाव्यात याबद्दल फारशी माहिती नाही. एक विश्वास असा आहे की, एक छत्री दौलतरावांच्या आई बयाबाई घोरपडे यांच्या सन्मानार्थ होते.

image









शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन रोडवरून बसस्टॉपच्या मागे असलेल्या नदीपात्राकडे जाणार्‍या मातीच्या रस्त्यावरून या घाटावर पोहोचता येते. दुर्दैवाने योग्य देखभालीअभावी या घाटावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बांधकामाच्या कपारींमधून झाडे उगवल्याने हे बांधकाम मोडकळीस आले आहे. सुलभ शौचालयाशेजारच्या शिवाजी पुलावरून घाटापर्यंत पोहोचण्यास अडथळा आहे. इतिहासकार मंदार लवाटे यांच्या संग्रहातील एका जुन्या छायाचित्रात सर जॉर्ज लॉईड ब्रिजच्या उभारणीदरम्यान एका छोट्या मनोर्‍याचेही अस्तित्व दाखवण्यात आले आहे. नंतर लॉईड पूलाला शिवाजी पूल असे नाव देण्यात आले.

सौजन्य: टाटा टेक्नॉलॉजीस्.

नाशकात हवं 'म्युझियम कल्चर'

Nilesh Bane यांच्याविषयी Nilesh Bane No DesignationRead More

चेतन भोसलेनाशिकमध्ये वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या एका समितीमध्ये चर्चा झाली होती. त्याचे पुढे काय झाले याबाबत मात्र आता कुणीच नक्की सांगू शकत नाही. नाशिकमध्ये अनेक पुरातन वस्तू आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी एखादे वस्तुसंग्रहालय असावे अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त नाशिककरांच्या या मागणीचा घेतलेला आढावा...पूर्वीच्या काळी संस्थानिकांनी केलेल्या संग्रहातून वस्तुसंग्रहालये निर्माण झाली. औंधचे वस्तुसंग्रहालय हे त्याचे मोठे उदाहरण आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, नागपूर, पुणे अशा मोठ्या व अन्य शहरांमध्ये असलेल्या वस्तुसंग्रहालयांमध्ये त्या त्या परिसरातील लोकसंस्कृतींचे परिपूर्ण दर्शन घडणे आवश्यक आहे. नाशिकमध्येही असे वस्तुसंग्रहालय असावे अशी मागणी आहे; परंतु त्याकडे अद्याप गंभीरपणे पाहिले गेलेले नाही. १९७० च्या दशकामध्ये वस्तुसंग्रहालयाच्या संकल्पनांमध्ये अनेक बदल घडून आले. वस्तुसंग्रहालयांनी फक्त वस्तूंचा निव्वळ संग्रह व त्यांचे जतन व लोकांशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे, असा विचारही मूळ धरू लागला. वस्तुसंग्रहालयामध्ये केवळ चित्रे, जुनी शिल्पे इत्यादींचाच नव्हे तर दैनंदिन जीवनातील कलात्मक घटकांचाही संग्रह होणे गरजेचे आहे या विचाराने वेग धरला. त्यानंतर जगभरातील प्रमुख वस्तुसंग्रहालयांमध्ये वस्तुसंग्रहालय बघायला येणाऱ्या लोकांशी अधिकाधिक सुसंवाद साधण्याची वृत्ती वाढीस लागली. दिल्ली येथील नॅशनल म्युझियम, कोलकाता येथील इंडियन म्युझियम, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने त्यानुसार पावलेही टाकली आहेत.पुरातन वस्तुसंग्रहालय अजूनही बंदचनाशिक जिल्ह्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांच्या कारकीर्दीपर्यंतच्या विविध पुरातन वास्तू आणि संग्रहित वस्तूंचा ठेवा या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत प्रादेशिक वस्तुसंग्रहालय फाळके स्मारकात तयार आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सध्या ते बंद आहे. दादासाहेब फाळके स्मारकाच्या प्रवेशद्वारावरच 'महाराष्ट्र शासन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे प्रादेशिक वस्तुसंग्रहालय' अशी पाटी पर्यटकांचे स्वागत करते. आत गेल्यावर आपल्याला अनेक पुरातन वस्तू पाहायला मिळतील या आशेवर असलेल्या पर्यटकांची मात्र साफ निराशा होते. वस्तुसंग्रहालयाची कवाडे अचानक बंद करण्यात आली आहेत. स्मारकात पुरातत्व विभागाला एक हॉल रेंटवर दिला असून त्याची संपूर्ण देखभाल याच विभागाकडे आहे. या ठिकाणी याच विभागाचे कर्मचारी कार्यरत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या संग्रहालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ते बंद आहे. काही दिवसांपूर्वी हे संग्रहालय सरकारवाडा किंवा सिडकोला हलविण्यात येणार असल्याने ते बंद असल्याचे बोलले जात होते. मात्र या संग्रहालयासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यानेच सध्या त्याला टाळे ठोकावे लागले असल्याचे पुरातत्व विभागात बोलले जात आहे. या विभागाला जर पुरेसे मनुष्यबळ मिळाले तर संग्रहालय सुरू होऊ शकेल असा आशावादही कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.पूर्वी नाशकात असलेले हे संग्रहालय २००१ मध्ये स्मारकात स्थलांतरीत करण्यात आले. स्मारकातील पुरातत्व हॉलमधील वस्तू इतरत्र हलविण्यात आल्या. प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात इतिहासकालीन चित्र, ब्रिटीशकालीन बंदुका, काडतुसे, कपडे, नाणी, मराठा व मोगल काळातील शस्त्रे, जुनी दुर्मिळ छायाचित्रे, जुने शिलालेख, छोट्या - मोठ्या जवळजवळ २५ ते ३० मूर्ती आहेत. तसेच येथे ठेवण्यात आलेली सम्राट अशोकाची तलवार पाहण्यासाठी दुरवरून पर्यटक यायचे. ही तलवार उचलण्यासाठी दोन माणसे लागायची. परंतु ती तलवार कुठे आहे याची माहिती मिळू शकली नाही. चित्रे, शिल्पे, पुरातन वस्तू जमवून मांडल्या म्हणजेच वस्तुसंग्रहालय साकारते असे नाही. सातवाहन लेण्यांच्या सान्निध्यात वाढलेल्या, विस्तारलेल्या नाशिकला स्वत:चा मोठा इतिहास आहे. नाशिकला कुंभमेळा भरतो. या शहरामध्ये अनेक मंदिरे, प्रार्थनास्थळे आहेत. तेथील लोकसंस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या सर्व बाबींचे दर्शन वस्तुसंग्रहालय उभारले गेले तर त्यात अत्यंत सुनियोजीत मांडणीतून दिसायला हवे. तरच त्याला आदर्श वस्तुसंग्रहालय म्हणता येऊ शकेल.जिल्ह्यातील इतर पुरातन ठेवा होळकर वाडा क्रांतीज्योती आहिल्याबाई होळकर यांचे वास्तव्य असलेला होळकर वाडा हा आजही दिमाखात चांदवड घाटात उभा आहे. संपूर्ण दगडी कोरीव काम केलेला हा वाडा वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना ठरला आहे. या वाड्याला घाटाच्या पायथ्याशीच पायऱ्या सुरू होतात. या पायऱ्या थेट घाटाच्या वरच्या टोकाला वाड्यापर्यंत आहेत. या वाड्यात प्रसिद्ध रेणूकादेवीचे मंदिर असून असंख्य भाविक आणि पर्यटक या ठिकाणी दर्शनाला आणि भेट द्यायला येत असतात. या वाड्याची संपूर्ण देखभाल मंदिराच्या ट्रस्टींकडे आहे. सरकारवाडासरकारवाडा पोलिस स्टेशनमुळे परिचीत असलेला हा वाडा पेशवेकालीन असल्याची कल्पना पर्यटकांना नसते. पुरातत्व विभागाच्या प्रयत्नाने आणि राज्य सरकारच्या निधीतून आज हा वाडा मूळ स्वरुपात उभा राहत आहे. या वाड्यात पूर्वी पोलिस स्टेशन होते. त्याचे स्थलांतर झाल्यानंतर आता पुरातत्व विभागाचे कार्यालय या वाड्यात आहे. या वाड्याच्या काही भागाची डागडुजी झाली असून उर्वरित भागही कुंभमेळ्याच्या आधी पूर्वीच्या रूपात येणार आहे. या वाड्याचे सर्व बांधकाम सागवानी लाकडात केलेले असून खांबांवर आकर्षक नक्षीकाम केलेले आहे. सार्वजनिक वाचनालयातील दुर्मिळ हस्तलिखिते सार्वजनिक वाचनालय (सावाना) शंभर वर्षाचा सांस्कृतीक घडामोडींचा इतिहास आहे. हे वाचनालय सुरुवातीला सरकारवाड्यात सुरू केले होते. त्याचा कार्यविस्तार लक्षात घेता शहरातील टिळक पथ येथे स्थलांतरीत करण्यात आले. सार्वजनिक वाचनालयात तब्बल १ लाखाहून अधिक पुस्तके असून दुर्मिळ धार्मिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. या ठिकाणी अत्यंत उपयोगी आणि दुर्मिळ हस्तलिखितेसुद्धा ठेवण्यात आलेली आहेत. अभ्यास किंवा त्यांचे वाचन करण्यासाठी वाचनालयातच सदस्यांना ते वाचायला दिले जाते.स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वाडा क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मगावी म्हणजेच भगूर येथे त्यांचे राहते घर पुरातत्व विभागाने जतन करून ठेवले आहे. जीर्ण आणि पडझड झालेला हा वाडा पुरातत्व विभागाने डागडुजी करून त्याला पूर्वीच्या रूपात जतन केले आहे. या ठिकाणी असंख्य पर्यटक सावरकर वाड्याला भेट द्यायला येत असतात. काही दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाने भगुर गावातील शाळेत सावरकरांच्या जीवनावर आधारीत चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन या वाड्यात मांडण्यात आलेले आहे.नाणे संशोधन केंद्र आणि संग्रहालयवस्तू विनिमय ते नाणेनिर्मिती पर्यंतचा प्रवास कसा आहे याची माहिती त्र्यंबकेश्वरमधील या संग्रहालयात दिलेली आहे. तसेच कवडी, पोवळे, मोती, शिवकालीन नाणी, शिवमुद्रा, पेशवे मुद्रा, होन इत्यादी सर्व प्रकारच्या तत्कालीन चलनांची माहिती येथे मिळते. धान्य मोजण्यासाठी वापरले जाणारे पायली या जुन्या मापापासून ते आताच्या किलो ग्रॅमपर्यंतच्या वजन, मापांचे संग्रह आणि नमुनेही येथे ठेवण्यात आले आहेत. एका केसाचे वजन मोजता येणारा वजनकाटाही येथे पाहायला मिळतो. या संग्रहालयात सात किलो वजनाएवढे सोन्याचे नाणेदेखील मांडण्यात आले आहे. या ठिकाणी नाणे संशोधन केंद्र असल्याने जिल्हा आणि राज्यात इतरत्र उत्खननात सापडलेल्या चलनाचा पूर्ण इतिहास आणि त्याचे दाखले तपासले जातात. नाशिकच्या रविवार कारंजा येथील गायधनी लेन येथे कागद गोळा करणाऱ्या मुलीला काही नाणी सापडली होती. त्यानंतर तेथे नाशिककरांना आणखी काही नाणी सापडल्यानंतर नाणे संशोधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे संशोधन करून राज्य सरकारकडे सुपूर्द केले संग्रहातून उत्पन्न - ओमप्रकाश कपोतेनाशिक-पुणे महामार्गावरील माळेगाव शासकीय औद्योगिक वसाहतीतील गारगोटी प्रदर्शनालय सुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी जमिनीच्या भूगर्भातून निघालेल्या गारगोटीवर प्रक्रिया करून, त्यांना गोंडस रूप देवून त्या प्रदर्शनात मांडल्या जातात. सिन्नर तालुक्यातीलच नव्हे तर भारतातील कुठल्याही भागातून आकर्षक असलेल्या गारगोटी खरेदी केल्या जातात. विहीर खोदताना किंवा दगडाच्या खाणीतून निघणाऱ्या गारगोटी या ठिकाणी खरेदी केल्या जातात. आकर्षक किंवा आखीवरेखीव गारगोटी हवी ती किंमत मोजून खरेदी केल्या जातात. या गारगोटीवर केमिकल प्रोसेस करून त्यांना आकर्षक रूप दिले जाते. हिऱ्यांना जसे पैलू पाडले जातात त्याच पद्धतीने गारगोटीवर प्रक्रिया करून त्यांचे मूळ रूप अधिक आकर्षक केले जात असल्याची माहिती या संग्रहालायाचे जनरल मॅनेजर एस. पाठक यांनी दिली. या संग्रहालयाला भारतातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देतात. हे केवळ संग्रहालय नसून ते गारगोटी प्रक्रिया केंद्र आहे. येथे गारगोटींचे प्रदर्शन आणि विक्री केली जाते. भारतापेक्षा परदेशात या गारगोटींना अधिक मागणी असल्याने त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...