तासगावचे गणेश मंदिर तीन टप्प्यांत पाहण्यास मिळते. सातमजली ९६ फूट उंचीचे गोपूर, भव्य सभामंडप आणि गाभारा. मुख्य मंदिर ९.४४ ७ X ८.८३ मीटर आकाराचे मुख्य मंदिर तर सभामंडप १३.७ ७ X १०.३६ मीटर आकाराचा आहे. मंदिरात प्रवेश करीत असताना लागणारे गोपूर सातमजली असून यासाठी कर्नाटकातील गदगहून आणलेल्या दगडांचा वापर करण्यात आला. कर्नाटकातील वडार समाजातील कारागिरांकडून या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या बांधकामाला तब्बल २० वर्षे लागली. १७७९ मध्ये सुरू झालेले मंदिरउभारणीचे काम १७९९ मध्ये परशुराम यांचे पुत्र अप्पाजी पटवर्धन यांनी पूर्ण केले.
या मंदिरात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. गणेशोत्सवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसात या गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. १७८५ मध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरू करण्यात आली. यासाठी पाच मजली खास रथ तयार करण्यात आला असून प्रारंभी हा रथ लोखंडाचा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या वर्षांपासून सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला.
कापूर ओढय़ाकाठी सातशे मीटर अंतरावर असलेल्या काíतकस्वामींना भेटण्यास गणेश रथातून जातो. ३० फूट लांब आणि पाचमजली रथ गणेशभक्त दोरखंडाच्या साहाय्याने ओढत नेतात. या वेळी रथातून गणेशभक्तांवर फुले, गुलाल, पेढे यांची बरसात करण्यात येते. तसेच दर संकष्टीला सायंकाळी पाच वाजता गणेशाची पालखी पश्चिमेस असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येते.
सागरेश्वराची देवभूमी:-

संदर्भ :-
वन पर्यटन : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
सांगली जिल्ह्यतील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वसले आहे. १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौरस किलोमीटर इतके आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो.म. मोहिते या वृक्ष आणि वन्यजीव प्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य त्यामुळेच वेगळं आहे. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. भरपूर पाऊस, धुक्याची दाटी, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो. विविध पक्षांचा कुंजारव, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आणि चिंब भिजण्यासाठी आतुरलेली माणसं.. मनातल्या ओढीला तृप्तीचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. येथे प्राचीन मंदिराचा समूह आहे. एकूण ४७ मंदिरे व १३ ओवऱ्या आहेत. आंघोळीचं आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी असते.
सागरेश्वर मंदिरापासून पुढे एक-दीड किलोमीटरचा यशवंत घाट ओलांडल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्या सागरेश्वर डोंगराच्या माथ्यावर आहे. देवराष्ट्र गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.
सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरडय़ा हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्ष आणि झुडपे यासोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औदुंबरसारख्या अनेक वनौषधी आहेत. सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्ष्यांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. शुष्क गवताळ झुडपी टेकडय़ांचा अधिवास असलेल्या या छोटेखानी अभयारण्यात १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सूर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवटय़ा, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावशा, पोपट, कोकीळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध रंगी पक्ष्यांचं मनोहारी दर्शन आपल्याला खूप आनंद देऊन जातं. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटतं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे यांचा हक्काचा निवारा आहे.
वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे तर वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन अॅम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी बाहेर वावर होताना आढळत नाही.
अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंटवरून नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्या पॉइंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभरवाचे मंदिर लागते. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉइंट हे अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.
कसे जाल?
मिरज रेल्वे स्थानकापासून ६० किलोमीटर, कराडपासून ३० किलोमीटर. ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर. पुणे-बंगळुर महामार्गावरील कराडपासून बससेवा उपलब्ध.
केव्हा जाल?
पावसाळा हा उत्तम कालावधी.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com
काही वर्षापूर्वी तीर्थक्षेत्रांशीच निगडीत असा प्रवास व्हायचा. तथापि अलिकडे रस्त्यांची सुविधा, वाहनांची सुविधा, पर्यटनस्थळांचा विकास यामुळे पर्यटनाची व्याप्ती वाढली आहे. उन्हाळाच्या सुट्टीपुरतं असणारं पर्यटन आता उन्हाळी पावसाळी व हिवाळी या ऋतूमध्ये सुध्दा पर्यटक पर्यटनासाठी पर्यटनस्थळी गर्दी करताना आपल्याला दिसतात.
सध्याच्या काळात विशेषत: आबालवृध्दांबरोबरच तरूणाईला वर्षा पर्यटनाची विशेष ओढ दिसून येते. सिंधुदूर्गातील आंबोली धबधबा, पन्हाळा -पावनखिंड ट्रेकिंग,अंबा फोंडा ,करूळ असे सह्याद्री पर्वतातील घाट या ठिकाणी पावसाळ्यातही मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देतात व वर्षा सहलीचा आनंद लुटतात.
सांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील सागरेश्वर मंदिरामुळे वर्षा सहलीबरोबरच श्रावणात येथे होणाऱ्या यात्रेमुळं पर्यटकांना भक्तीरसातही चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, अंगाला झोंबणारा वारा, हिरवागार शालू परिधान केलेली धरतीमाता, पक्ष्यांचा किलबिलाट, वानरसेनेच्या या झाडावरून त्या झाडावरच्या उड्या, डोंगराच्या कपारीतून वाहणारे छोटे-छोटे झरे अशा निसर्गरम्य वातारवणाचा आस्वाद सागरेश्वर परिसरात आपल्याला अनुभवता येतो. विविध प्रकारच्या पक्षांबरोबरच हरिण,सांबरांचं दर्शनही आपल्याला या ठिकाणी होतं.
सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल अशी वनसंपदा आहे. वृक्षमित्र धो. म . मोहिते यांनी या अभयारण्याच्या विकासकामी अविश्रांत परिश्रम घेतले तेथे चंदन, हावडा,बाभूळ, याही वृक्षाबरोबरच जंगली वृक्षही पहावयास मिळतात .करवंद ,बोर, या रानमेव्यांच्या जाळयाही जागो-जागी आहेत. चिमणी पोपट ,जंगली कोंबडया ,मोर -लांडोर ,कोकीळ ,पोपट,आदी पक्षीही स्वच्छंदपणे विहारताना पहावयास मिळतात.
सागरेश्वरच्या माथ्यावर पोहचल्यावर आजूबाजूचा परिसर दिसतो. खालच्या बाजूला नागमोडी वाहणारी कृष्णा नदी पर्यटकांना मोहित करते. येथील किर्लोस्कर पॉईट वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर शांतपणे डोळयात साठविता येतो. सुमारे 1हजार 87 हेक्टर क्षेत्रात या अभयारण्याचा विस्तार झाला आहे. महालगुंड ,विहार ,छत्री बंगला यासह अनेक निसर्गरम्य टिकाणे आहेत.
येथील अंतर्गत रस्ते चांगल्या पध्दतीने बनविण्यात आले आहे. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीच्या सहाय्याने या अभयारण्यातील जुन्या सर्व इमारतीची दुरूस्ती करण्यात आली आहे.याचबरोबर ठिकठिकाणी बांबूकुटी बांधण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी नव्याने उभारलेल्या बालोद्यानामुळे लहान मुलांची खेळण्याची चांगली सुविधा झाली आहे.
या अभयारण्यातील सागरेश्वर मंदिराच्या इतिहास प्राचीन आहे. या बाबतची आख्यायिका अशी आहे की,इ.स.न. पूर्व 2350 मध्ये कुंडलचे राजे सत्यवान हे होते.त्यांना ऋषीमुनींनी शाप दिला .त्यामुळे त्यांच्या अंगावर जखमा झाला. सत्यवान राजे शिकारीसाठी सागरेश्वरच्या जंगलात गेले होते. त्यांनी येथील कुंडात आंघोळ केली. आश्चर्य म्हणजे सत्यवान राजांनी येथील कुंडात आंघोळ केल्याबरोबरच त्यांच्या अंगावरील जखमा बऱ्या झाल्या. त्यानंतर सत्यवान राजांनी येथे मंदिराची उभारणी केली .यावेळी 108 पिंडी येथे निर्माण झाल्या,त्या आजही आपल्याला पहावयास मिळतात.
श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थानात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. येथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती , कार्तिकस्वामी, करकटस्वामी , काशी विश्वेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर ,भीमेश्वर, सत्यनाथ, , ओंकारेश्वर , वीरभद्रेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, नंदिकेश्वर,केदारेश्वर, ,सत्येश्वर,रामेश्वर,सिध्देश्वर ,धोपेश्वर आदी ज्योतिर्लिंगाच्या मंदिराबरोबरच इतर देवतांची मंदिरे ही आहेत. एकूण 47 मंदिरे व 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे व पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी ते केव्हाच कमी होत नाही.
दसरा व महाशिवरात्रीच्या वेळेस येथे पालखी सोहळा असतो. या पालख्या लिंगेश्वरचे दर्शन घेऊन पुन्हा सागरेश्वर येथे येतात. श्रावण महिन्यातील सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. मुंबई -पुणे याचबरोबर पंचक्रोशीतील लाखो भक्तगण सागरेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात आणि हा परिसर भक्तीरसात चिंब भिजून जातो.
या अभयारण्याचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य ... नामकरण करण्यात आले आहे. येथील किर्लोस्कर पॉइंर्ट वरून आसमंतात नजर फिरवली तर वाळवा, पलूस , खानापूर, कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर पाहता येतो. शाळेतील मुलांसाठी प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते. दर मंगळवारी हे अभयारण्य बंद असते.सागरेश्वर अभयारण्य मिरज स्टेशन पासून 60 कि.मी ,कराड ,पासून 30कि.मी तर ताकारी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 5कि.मी अंतरावर आहे.
तर अशा या निसर्गरम्य अभयारण्य आणि सागरेश्वरच्या भक्तीरसात चिंब होण्यासाठी सागरेश्वर अभयारण्याचा परिसर पावसाळयातच पालथा घालणे आनंददायी होईल यात शंका नाही. तर मग कधी येतायं सागरेश्वरला...!
सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य | थिंक महाराष्ट्र
सांगली
जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे
निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण,
वाहणारे गार वारे, हिरवागार परिसर, पक्ष्यांचे कुजन, डोंगरांमधून वाहणारे
लहानमोठे झरे असे निसर्गरम्य वातावरण सागरेश्वर परिसरात अनुभवता येते. तेथे
सातशे-आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह आहे.
त्यात सुमारे एकावन्न मंदिरे असून त्यापैकी सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर
आहे. तेथे समुद्राच्या कृपेने गंगा वास्तव्य करते अशी धारणा आहे.
त्यावरूनच त्या परिसरास सागरेश्वर असे नाव पडले. सागरेश्वर मंदिराचे
पुराणात उल्लेख आढळतात.
सागरेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर यशवंत घाट लागतो. तो एक ते दीड किलोमीटरचा घाट ओलांडल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणा-या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. घाटापुढे गेल्यानंतर देवराष्ट्रे गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो. देवराष्ट्रे हे गाव यशवंतराव चव्हाण आणि रमाबई रानडे यांचे जन्मस्थान आहे.
सागरेश्वर अभयारण्याचा विस्तार सुमारे एक हजार सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रात आहे. ते देशातील पहिले आणि महाराष्ट्रातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे. स्वातंत्र्यसैनिक-वृक्षमित्र धोंडीराम महादेव मोहिते यांनी 1970 ते 1983 या काळात अभयारण्य तयार करण्याकरता अनेक प्रयत्न केले. मोहिते यांच्या प्रयत्नांमधून 1983 साली सागरेश्वर अभयारण्य तयार करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. पूर्वी त्या परिसरात माळरान होते. मात्र मोहिते यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या वृक्षलागवडीमुळे आज तो परिसर हिरवागार दिसतो. धोंडीराम मोहिते यांच्या कार्याची दखल घेत त्यांना 1994 साली राष्ट्रपतींच्या हस्ते ‘इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरड्या हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच माकडी धायटी, घाणेरी, सालफळ आदी वृक्ष आणि झुडपे यांसोबत तेथे इतर जंगली वृक्षही पाहण्यास मिळतात. अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. तेथील वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औंदुबर सांरख्या अनेक वनौषधी आहेत. तेथे सुमारे तीस ते चाळीस प्रकारचे वृक्ष तर तीनशे प्रकारच्या वनस्पती आढळतात. अभयारण्यात चिमणी, पोपट, जंगली कोंबड्या, कोकीळ आदी पक्षी स्वच्छंदपणे विहरताना पाहण्यास मिळतात. तेथे एकूण एकशे पंचावन्न प्रकारचे पक्षी आढळतात. त्यामध्ये शहीन फालकॉन हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो. तेथे मोरांची संख्या मोठी आहे. सागरेश्वर अभयारण्य हरणांचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. तेथे आढळणारे साळिंदर, सांबर, चितळ, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस, ससे, रानमांजर इत्यादी प्राणी पर्यटकांचे खास आकर्षण आहे. सोबत धामण, नाग, मण्यार, घोरपड हे सरपटणारे प्राणी तेथे पाहता येतात.
अभयारण्यातील
सुधारणांसाठी सरकारकडून 2012 साली सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
त्यानंतर अभयारण्याच्या अंतर्गत भागातील रस्ते चांगल्या पध्दतीने बनवण्यात
आले आहेत. अभयारण्यातील सर्व जुन्या इमारतींची दुरूस्ती करण्यात आली.
ठिकठिकाणी बांबूकुटी बांधण्यात आल्या आहेत. सोबत बालोद्यान आणि ऍम्पी थिएटर
तयार करण्यात आले आहे. अभयारण्याबत येणा-या पर्यटकांना निसर्गाची माहिती
व्हावी यासाठी पंचेचाळीस लाख रुपये खर्चून ‘निसर्ग माहिती केंद्र’
उभारण्यात आले आहे. तेथे पर्यटकांना अभयारण्यातील विविध स्थळांची,
पक्ष्यांच्या विविध जातींची, झाडांची, प्राण्यांची तसेच सापांच्या विविध
जातींची माहिती दिली जाते.
अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3860 फूट उंचीवर आहे. तेथून आसमंतात नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्या पॉईंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभैरवाचे मंदिर लागते. त्याचे बांधकाम सातवाहन काळातील असल्याचे सांगण्यात येते. मंदिर कठिण बेसाल्टच्या दगडात कोरण्यात आले असून पुरातत्वदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. डोंगरपायथ्याशी असलेल्या ताकारी गावाचे ते ग्रामदैवत आहे. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉईंट हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे.
सांगलीतील वाईल्ड लाइफ फोटोग्राफर प्रदीप सुतार यांनी सागरेश्वर अभयारण्यावर एकोणीस मिनिटांची शॉर्टफिल्म तयार केली आहे. अभयारण्यातील जैवविविधता कशी विकसित होते, हे त्या फिल्ममध्ये पाहता येते. अभयारण्याच्या निर्मितीमध्ये धोंडीराम मोहिते यांचे लाभलेले योगदान, त्यांचा इतिहास इत्यादी माहिती त्या फिल्ममधून मिळते.
शाळेतील विद्यार्थ्यांना अभयारण्याच्या प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते. अभयारण्य दर मंगळवारी बंद असते.
सागरेश्वर अभयारण्य मिरज रेल्वेे स्थानकापासून साठ किलोमीटर, कराडपासून तीस किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. कराड हे पुणे – बंगळुरू महामार्गावर असून तेथून सागरेश्वर येथे पोचण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. सागरेश्वर मंदिर आणि अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर यांना भेट देण्यासाठी पावसाळ्याचा काळ अधिक चांगला! अभयारण्याचे जानेवारी 2013 मध्ये ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य’ असे नामकरण करण्यात आले आहे.
– आशुतोष गोडबोले
सागरेश्वर अभयारण्य’ निसर्गसौंदर्याचा खजिना

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि वृक्षमित्र धो. म. मोहिते, मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य म्हणून सागरेश्वरचा उल्लेख होतो. सन 1972 च्या दुष्काळात या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे अभयारण्य पर्यटक, ट्रेकिंग करणार्यांसाठी चांगले ठिकाण आहे.

वनसंपदेचा खजिना
कडेगाव, पलूस आणि वाळवा या तालुक्याच्या सीमावर्ती भागातील सह्याद्री डोंगररांगेत हे अभयारण्य आहे. त्याचे 10.84 चौ.किमी क्षेत्रफळ आहे. या परिसरात डोंगर, दर्या-खोर्यात अनेक सदाहरित वृक्षासह अनेक प्रकारची झाडे-झुडपे आणि औषधी वनस्पती आढळतात. यामध्ये साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औदुंबर, खैर, पळस, निलगीरी यासह अनेक वनऔषधींचा समावेश आहे.

पक्षी अभ्यासकांना पर्वणी
अभयारण्यात 155 प्रकारचे विविध पक्षी आढळतात. मागील काही वर्षांपासून विदेशी पक्ष्यांचा वावरही दिसून आला आहे. यात रोजीस्टरलाईन, कॉमन चिपचॉप, ब्लीचचा शरवर वट्यार, ग्रेब अॅक्टे, पॅलिड हेरियल, कॉमन सॅड पायपर, ब्लॅक विंटले स्टील्ट, कॉमन केस्ट्रल, ग्रीन सॅड पायपल, अॅसिड रंगो आणि ब्लॅक रॅडस्ट्रायटल या विदेशी पक्ष्यांचा समावेश आहे.
हरणांचे माहेरघर
अभयारण्य हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अभयारण्यात चितळ, सांबर, काळवीट आदी प्रकारची हरणे जास्त आढळतात. अभयारण्यात या प्राण्यांची घनताही जास्त आहे. आता अभयारण्यात बिबट्यांसह गव्यांचाही वावर आढळला आहे. अरण्यात ससे, कोल्हे, रानडुक्कर, साळिंदर, लांडगे, तरस, घोरपड, साप आढळतात.

भुरळ घालणारी ठिकाणे
रनशूळ पॉईंट, 3500 फूट उंच कड्याच्या कपारीवर असणारा महान गुंड, फेटा उडवी पॉईंट, किर्लोस्कर पॉईंट, मृग विहार, तरस गुहा, छत्री बंगला, लिंगेश्वर मंदिर यांचा समावेश होतो. किर्लोस्कर पॉईंट येथून कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसते.

राहण्याची उत्तम सोय
अभयारण्यात पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय आहे. यासाठी विश्रामगृह व अत्याधुनिक बांबू लॉगट आहेत.
असे येऊ शकता :
रेल्वेने : ताकारी स्टेशनपासून 5 किमी
बसने : कराडहून 33 किमी सांगलीहून : 55 किमी इस्लामपूरहून : 21 किमी
सागरेश्वराची देवभूमी

>> नीती मेहेंदळे
सांगलीतून निघणारे सगळे रस्ते एकदम रम्य आहेत. खरंच. काहीना काही गवसतंच. कधी कोळे नृसिंहपूर लागेल, तर कधी औदुंबर. कधी बाहेचा मारुती तर कधी मच्छिंद्रगड. एक रस्ता थेट नरसोबाची वाडी गाठतो, तर दुसरा हरीपूरच्या संगमाला जाऊन मिळतो. असंच सांगली-तासगाव-कराड रस्त्यावर पळूसजवळ ताकारी-दुधारी-तुपारी अशी गमतीशीर वाटणारी दुग्धमय गावं येतात. ताकारी गावातून एक रस्ता नितांतसुंदर हिरवीगार वळणं घेत अभयारण्याकडे जाताना दिसतो. या अभयारण्याचं वैशिष्टय़ म्हणजे, त्याला केवळ जैविक नव्हे तर धार्मिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय पार्श्वभूमी आहे. हरणं, रानगवे, काळविटांसाठी प्रसिद्ध असणाऱया या अभयारण्याचं नावदेखील सागरेश्वर या एका शिवमंदिरावरून दिलं गेलेलं आहे. इतकं महत्त्व दिलं गेलंय म्हणजे मंदिर तसंच विशेष आहे हे निश्चित. अभयारण्यालगत असलेलं सागरेश्वर हे निव्वळ एक मंदिर नसून चांगला विसेक मंदिरांचा समूह आहे. पूर्वी तर या भागात पन्नासेक मंदिरं होती असं गावकरी सांगतात. सागरेश्वर देवालय हे एका टेकडीचा भाग असल्याने डोंगरात भातशेती जशी टप्प्याने करतात तशी तीन -चार टप्प्यांमध्ये देवळांची मांडणी केली आहे. बारा ज्योतार्ंलगांची मंदिरंही इथे स्थापन केलेली दिसतात. सोमेश्वर, भीमेश्वर, वैजनाथ, ओंकारेश्वर आदी शिवमंदिरांचा मोठाच गोतावळा इथे दिसतो. त्यातली मोजकी जुनी मंदिरं पार सातवाहन काळात बांधली गेली, तर काही चालुक्य काळात बांधल्याचे स्थापत्य संदर्भ सापडतात. अर्थात बहुतांश सगळीच मंदिरं आता जीर्णोद्धारित आहेत. काही मंदिरांची शिखरं खूप उंच आहेत आणि त्यामानाने मुख्य मंदिराची उंची लहान दिसते. म्हणून लांबून ही बुटकी मंदिरं लक्ष वेधून घेतात. काही मंदिरांची शिखरं चक्क घुमटाकार असून त्या मध्ययुगीन मंदिरांच्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्याचा प्रभाव दिसतो. याशिवाय गणेश, देवी, आणि काही तापसांचीही मंदिरं या परिसरात आहेत. अभयारण्यात थोडय़ा उंचीवर लिंगेश्वराचं अजून एक नेटकं शिवालय आहे. आणखी कौतुक वर्णू जावं तर तसं खूप काही इथे आहे. सागरेश्वराचा हा शिवमंदिरांचा देखणा परिसर असलेलं गाव म्हणजे देवराष्ट्रे. या अनोख्या नावाच्या गावात जन्मलेली दोन थोर माणसं मला लगोलग आठवतात. एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी उपपंतप्रधान यंशवंतराव चव्हाण. त्यांचा जन्म देवराष्ट्रेमध्ये एका साध्या कुटुंबात झाला. कौटुंबिक परिस्थितीतून स्वतःला घडवण्यासाठी तसेच स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱया या महान व्यक्तीचं बालपण व्यतीत केलेलं घर या देवराष्ट्रेमध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केलं आहे.
दुसरी व्यक्ती म्हणजे श्रीमती रमाबाई रानडे. देवराष्ट्रे या लहानग्या गावात जमलेली यमुना कुर्लेकर नावाची दहा-अकरा वर्षांची चिमुरडी पोर पुढे थोर समाजसेविका, महिला शिक्षणाच्या खंद्या पुरस्कर्त्या श्रीमती रमाबाई रानडे झाल्या हे या गावासाठी केवढं अप्रूप असेल! न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंशी त्यांचा त्या काळातल्या रीतीनुसार बालविवाह झाला. लग्नाआधी शिक्षणापासून पूर्ण वंचित असलेल्या रमाबाई पुण्यात आल्यावर स्त्र्ााrशिक्षणाचं महत्त्व स्वतः समजून घेऊन स्त्र्ायांच्या शिक्षणासाठी खूप मोठं योगदान देऊन गेल्या. पुण्यातली आजही दिमाखात चालू असलेली हुजूरपागा शाळा आणि सेवासदन संस्था यांच्या त्या प्रमुख प्रणेत्या होत्या. त्यांच्या आत्मचरित्रात देवराष्ट्रे आणि सागरेश्वराचे दाखले बरेचदा आलेले दिसतात हे अजून एक कवतिकच.
किल्ल्यांचे जसे गढी/भूमीदुर्ग, अरण्यदुर्ग, जलदुर्ग, गिरीदुर्ग इत्यादी प्रकार असतात तसेच मंदिरांचेही आहेत. गावाबाहेर पूर्वी सहसा जंगल असायचं. शिवमंदिरं ही बहुतेक करून गावाबाहेर संरक्षक देवतेसारखी बांधलेली असत. ही वनातली शिवमंदिरं निर्जन परिसरामुळे थोडी दुर्लक्षित असली तरी कोलाहलविरहित असत. शिव देवता ही तशीही एकांतरम्य, म्हणून काही मंदिरं पूजेत असली तरी काहीशी उपेक्षित राहिली आहेत. सागरेश्वर हे असंच एक. पुरातत्त्व खात्याने या वारसारूपी मंदिरसमूहाकडे संवर्धनाच्या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे.
megmehen@gmail.com
बरीचशी नेहमीपेक्षा वेगळी वाटली.. एक वीरगळ , लक्ष्मी नारायणाची मूर्ती हे नेहमी सारखे होते..
परंतू विष्णूची एक नितांत सुंदर मूर्ती होती ..त्या वातावरणाशी विसंगत ..ती मूर्ती पहाताच हैदराबादच्या बिर्ला संग्रहालयामधल्या मूर्तीची आठवण झाली ..
तिथे २ शिलालेख आहेत ..


खालील चित्रामध्ये शिलालेखा वरचा कोल्हा किंवा तत्सम प्राणी दिसतो आहे.

दुसर्या शिलालेखाच्यावर एक सूर्य आणि एक चंद्र आहे

आणि २ मूर्ती आहेत ज्या ॠषी च्या आहेत म्हणून सांगितल्या जातात..
त्यांची चेहरेपट्टी आणि वेष


एक उभी मूर्ती


हा एक चेहरा एक तर खुपच अलिकडचा किंवा खूपच जुना असेल

ओवर्या ..पूर्वी यामधे पिंडी होत्या .. त्यापूर्वी रहाण्यासाठी वापरत असाव्यात.

या मांजर्या खडकात कोरल्या आहेत ..

तिथे असलेले अजून एक भग्न शिल्प

वीरगळ : येथे नेमका युद्धाचा प्रसंग नष्ट झाला आहे

गणपतीची मूर्ती नंतर 'अॅड'वलेली वाटली

दोन हत्ती : हे दोन वेग वेगळे असावेत ..दोन्हींचा आकार , कलाकुसर पाहता त्यांचा जोडा सध्याच जमवलेला दिसतोय

ही विष्णूची मूर्ती : एवढी सुंदर मूर्ती मी फक्त म्युझियम मध्येच पाहिल्या आहेत.
गाभार्यात असल्याने चोरून फोटो काढला आहे .. त्यामुळे तिच्या सौंदर्याचा
अंदाज येत नाही..केवळ या मूर्ती साठी एकदा तिथे जाउन यावे ..

हे कोणाचे चरणकमल ?

या मंदिराच्या परीसरात सर्व शिल्पे विखरून पडली आहेत.. शिलालेखाला देव समजून नारळ फोडणे सुरू आहे..
देवळाचा जीर्णोद्धार करताना डेकोरेशन कराव्या तशा मूर्ती लावल्या आहेत ..त्या मुळे मूळ क्रम , स्थिती आता कळत नाही ..
आपल्या वारशाबद्दल पुन्हा एकदा कोरडी हळहळ व्यक्त करून नाना पाटलांचे दर्शन घेतले..

आणि घराकडे निघालो ..
अवांतर : मला मुर्ती किती जुनी आहे , तिचा कालखंड , शिलालेख वाचणे यात फार काही कळत नाही. वल्ली , जयंत कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली तर आनंद होइल .
कोरीव स्तंभ चालुक्य शैलीतिल आहेत. पण शिलाहार यादवांनि हीच शैली अंगीकृत केल्याने नेमका काल ओळखणे अवघड जाते.
शिलालेखाचा दगड माझ्यामते गधेगाळ आहे. खाली दिसतोय तो कोल्हा नसून गाढव आहे. वर एखादे दान व् नंतर शापवाणी असावी. पण अर्धवटच काम आहे.नुसते आरेखन करून फ़क्त लेख कोरून उरलेले काम तसेच सोडलेले दिसते. विरगळावर सहसा शिलालेख नसतोच.
नंतरच्या मूर्ती ऋषींच्याच स्त्रीची मूर्तीबहुधा दासीची असावी. तो एक नुसता चेहराच दिसतो तसे चेहरे काही ठिकाणी पाहिलेले आहेत. पेडगावच्या बहादुरगडातील मंदिरात तसे काही चेहरे आहेत. अनाकलनीय वाटतात. काही वेळा मुखलिंगे अशा पद्धतीची पण असतात.
हे बघा तसे चेहरे, पण ही मुखलिंगे नव्हेत.
ते नुसतेच चरणकमल असलेली मूर्ती बहुधा सूर्याची असावी पण नक्की सांगता येत नाही.
बाकी सर्वांगसुंदर विष्णू मूर्ती दिवेआगरच्या रूपनारायण मंदिरात आहे. त्याची सर कशालाच नाही.
आरे ( ता.- करवीर,जि. कोल्हापूर ) येथील महादेव मंदिर आणि गुरसाळे ( ता.-खटाव जिल्हा सातारा ) येथील मंदिर या दोन मंदिरांच्या मंडपावर आणि मुख मंडपावर फासनाकार शिखरे आहेत. आधीच नमूद केलेल्या कारणामुळे मुळ शिखर फासनाकार असलेली मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. अशा मंदिरांमध्ये खालील मंदिरे उल्लेखनीय आहेत
पाटणे येथील पंचायतन संकुलातील विष्णू मंदिर हे प्राचीन फासना मंदिराचे एक उदाहरण आहे. हे एक निराळ्याच प्रकारचे पंचायतन आहे आज उपलब्ध असलेल्या अवशेषावरून मध्यभागी लंब चौकोनी मंडप, त्याच्या मागील बाजूस मंडपाला जोडून एका जवळ एक अशी तीन गर्भगृहे आणि मंडपाच्या दोन अरुंद बाजूला जोडून प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे एकूण दोन गर्भगृहे असे या पंचायतनाच्या स्वरूप असल्याचे लक्षात येते. मागील तीन गर्भगृहापैकी मधले गर्भगृह विष्णूचे असून त्यावर साधे फासणा शिखर आहे. इतर आयतनांवर हे असेच शिखर होते का ? हा संशोधनाचा विषय आहे. हेन्री कझिन्स लिखित 'मेडिव्हियल ऑफ डेक्कन' या ग्रंथात प्लेट क्रमांक मध्ये या पंचायतनाच्या मागच्या बाजुचा हा फोटो दिलेला आहे. तो पाहून याबाबत फक्त तर्क करता येणे शक्य आहे.
































No comments:
Post a Comment