https://sadanandmore.wordpress.com/reading/panipat-1/
डॉ. सदानंद मोरे
(सौ. साप्ताहिक विवेक )
पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले. या बाबतीत त्यांना उपमा फक्त फिनिक्स पक्ष्याचीच शोभेल.
इ.स. 1761 साली झालेले पानिपतचे युद्ध हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे मर्मस्थान आहे. पुष्कळ लोकांना या घटनेचे मूल्यमापन कसे करायचे याबद्दल बुचकळ्यात पडायला होते. पानिपतमध्ये झालेला पराभव इतका दारुण होता व त्यामुळे झालेले नुकसान इतके भयंकर होते की त्या पराभवाची आठवण वा उच्चारसुद्धा नकोसा वाटतो. “पानिपत होणे’ हा शब्दप्रयोग मराठी भाषेत सर्वनाश या अर्थाने रूढ झाला आहे एवढे सांगितले की या पराभवाचे गांभीर्य वेगळे सांगायची गरज नसावी. पानिपतचा पराभव ही मराठी इतिहासातील शोकांतिकाच होय. परंतु त्यामुळेच ती नीट समजावून घेणे व त्यापासून योग्य तो धडा घेणे आवश्यक ठरते. पानिपतची लढाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील अशी मोक्याची किंवा निर्णायक घटना होती की ती जिंकली असती तर मराठी सत्ता एक महासत्ता म्हणून उदयास आली असती याविषयी अधिक युक्तिवाद करण्यापेक्षा “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉन्क्वेस्ट’ या पुस्तकाचे लेखक अर्नाल्ड फ्लेचर यांचे मत उधृत करणे उचित होईल. “”पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते” असे सांगून फ्लेचर पुढे लिहितात, “”काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानावर असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता की, जेणेकरून नंतर बि”टिशांचा विजय अशक्य झाला असता.”
फ्लेचरने उल्लेखलेले काही इतिहासकारांचे मत यथार्थच आहे असे म्हणायला पुरेसा आधार आहे. दुर्दैवाने हे युद्ध मराठ्यांना जिंकता आले नाही व त्यांच्या पराभवाची अंतिम परिणती हिंदुस्थानवर बि”टिशांचा अंमल प्रस्थापित होण्यात झाली. तथापि मराठ्यांचा पराभवसुद्धा इतिहासावर प्रभाव पाडल्याशिवाय राहिला नाही हे विसरता कामा नये. हा प्रभाव कोणता व तो कसा पडला याचा शोध प्रस्तुत लेखातून घ्यायचा आहे.
मूळभूमी
सुरुवातच करायची झाली तर ती अतिप्राचीन इतिहासापासून करता येईल. ज्याला आज आपण अफगाणिस्तान म्हणतो व जो मूलतत्त्ववादी मुसलमानांच्या अतिरेकी कारवायांचे केंद्र आहे तो एकेकाळी हिंदुस्थानचा हिस्सा होता असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. प्राचीन काळी हा प्रदेश गांधार या नावाने ओळखला जाई. कौरवांची आई गांधारी व तिचा कारस्थानी भाऊ शकुनी हे याच गांधार देशातील होत. वाल्मिकी रामायणातील माहितीवरून असे दिसते की, सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवरील प्रदेशाला तेव्हा गांधार म्हणत. शैलुण नामक गंधर्वाचे वंशज तेथे राज्य करीत. तक्षशिला हे या देशाच्या राजधानीचे नाव. ही राजधानी भरताचा पुत्र तक्ष याने वसवली असाही समज आहे. एके काळी वैदिक आर्यांची असलेली ही भूमी नंतर बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र बनले. तक्षशिला येथील विद्यापीठ तर जगभर प्रसिद्ध होते. पुढे मुसलमानांच्या आक”मणांना बळी पडून हा भाग इस्लाममय झाला हे सर्वज्ञातच आहे.
परंतु तरीही अफगाणिस्तान नावाच्या राजकीय राष्ट्राचा उदय ही खूप नंतरची घटना आहे. त्यामध्ये हा प्रदेश कोणाचा याविषयी इराण आणि दिल्लीची मोगल पातशाही यांच्यात नेहमी वाद असत. मोगल बादशहांच्या दाव्याप्रमाणे काबुल आणि कंदहार हा त्यांच्या हिंदुस्थानच्या साम”ाज्याच्या एकूण बावीस सुभ्यांपैकी एक सुभा होता. त्यांचा हा दावा इराणच्या शहाला मंजूर नसल्यामुळे त्यावरून या दोन सत्तांमध्ये नेहमी लढाया व्हायच्या. शहाजहान बादशहाने दारा शुको आणि औरंगजेब या आपल्या दोन्ही मुलांकरवी हा सुभा परत जिंकून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. औरंगजेब बादशहाच्या डोक्यातूनही काबुल, कंदहारचा विचार कधी गेला नाही. शिवाजी महाराजांचा विश्वासू सेनानी नेताजी पालकर याला इस्लामची दीक्षा देऊन त्याचा कुलीखान बनवून औरंगजेबाने त्याला काबुल, कंदहारच्या लढाईवर पाठवले होते. मराठ्यांचा या भूमीशी इतका जुना संबंध आहे! अगदी अलीकडच्या काळात लढाईच्या निमित्ताने या भूमीवर जाऊन आलेल्या महाराष्ट्रीयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी यांचा समावेश होतो. ते इंग्रज-अफगाण यांच्यातील दुसऱ्या युद्धात सामील झाले होते.
तात्त्विक भूमिका
पूर्वी मराठे आणि नंतर इंग्रजांना टक्कर देऊन, मधल्या काळात सोव्हिएत रशियाला जेरीस आणून आणि आता अमेरिकेस न जुमानणारे हे अफगाण राष्ट्र ज्याने उदयास आणले व त्यामुळेच नवराष्ट्र निर्माता म्हणून ज्याची तुलना साक्षात शिवाजी महाराजांशी करण्याचा मोह इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकरांना झाला त्याच महमदशहा अब्दाली याच्याशी मराठ्यांना पानिपतवर मुकाबला करावा लागला होता. इंग”ज, रशियन व अमेरिकनांना तोंड देणारे अफगाण लोक आणि त्यांचा अब्दालीसारखा अनुभवी सेनानी यांच्याशी लढाई करून इतकेच नव्हे तर जे जवळपास जिंकण्याच्या टप्प्यात आणून अब्दालीकडून वाहवा मिळवणाऱ्या मराठ्यांच्या पराक्रमावर वेगळे भाष्य करायची गरज नाही.
मुळात मराठ्यांनी या भानगडीत पडून लक्ष बांगड्या फोडून घेण्याचा प्रसंग आणावाच का? असा प्रश्नही काही लोक उपस्थित करताना दिसतात. या लोकांना ना इतिहासाचे मर्म कळले ना मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा. मराठ्यांची तात्त्विक भूमिका तर त्यांच्या आकलनाच्या पलीकडचीच म्हणावी लागेल.
मराठ्यांच्या स्वराज्याची स्थापना शिवछत्रपतींनी केली हे आपण जाणतोच. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. समकालीन जुलमी सत्ताधाऱ्यांपासून महाराष्ट्र भूमीला मुक्त करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांना साम्राज्यतृष्णा नव्हती व ते सत्तापिपासू नव्हते. त्यामुळेच त्यांनी उत्तरेतून दक्षिणेत येऊन दक्षिणेतल्या विजापूर आणि गोवळकोंडा येथील पातशहांचा नाश करू इच्छिणाऱ्या औरंगजेबाच्या विरुद्ध दक्षिणेतल्या राज्यांचा संघ उभारून त्याचा प्रतिकार करण्याची कल्पना मांडली व गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हातमिळवणी केली. दक्षिणेत दक्षिणेतील लोकांची सत्ता असा त्यांचा आग्रह होता.
दुर्दैवाने महाराजांचा मृत्यू लवकरच ओढवल्यामुळे ही योजना नीटपणे मूर्त रूप धारण करू शकली नाही. शेवटी औरंगजेबाने या दोन्ही मुसलमानी शाह्या घशात घालायच्या त्या घातल्याच. मराठी राज्य मात्र त्याला पुरून उरले. आधी संभाजी, मग राजाराम आणि त्यानंतर ताराबाई यांनी औरंगजेबाचा यशस्वी मुकाबला केला. त्यामुळे 1707 मध्ये औरंगजेबचा अंत झाला तेव्हा मराठ्यांचे स्वराज्य वगळता सर्व दक्षिण मोंगलक्रांत झाली होती व औरंगजेबाचे स्वप्न, मराठी सत्तेचा अपवाद वगळता साकार झाले होते. दक्षिणेतल्या सुभ्यावर निजामअलीला नेमून मराठ्यांच्या मार्गात मोगलांनी एक मोठा अडथळा निर्माण करून ठेवला.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, कदाचित त्यानेच दिलेल्या सूचनांवरून मोगलांनी संभाजीपुत्र शाहू यास मुक्त करून महाराष्ट्रात पाठवले. शाहूने अर्थात आपणच राज्याचे खरे वारसदार असल्याचा दावा करून तेव्हा राज्यकारभार पाहणाऱ्या राजारामपत्नी ताराबाईंना आव्हान दिले. रामचंद्रपंत अमात्यांसारखे अपवाद वगळता बहुतेक मराठे सरदारांनी शाहूची बाजू घेतली. धनाजी जाधव आणि त्याचा हस्तक बाळाजी विश्वनाथ हे त्यांच्यातील मु”य होत. शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षाची अंतिम परिणती मराठ्यांच्या सत्तेच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन शाखा निर्माण झाल्या. कारणे काहीही असोत. पूर्वी बलाढ्य मोगली सतेला सळो की पळो करून सोडणारी ताराराणी आणि धुरंधर रामचंद्रपंत अमात्य बदलत्या परिस्थितीने निष्प्रभ ठरले. कोल्हापूर गादीकडून काही भरीव कामगिरी होऊ शकली नाही. शेवटी मराठी राज्य म्हणजे सातारची गादी असेच समीकरण प्रस्थापित झाले आणि शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर तर त्याचाही लोप होऊन सत्तेचे केंद्र कोकणातून देशावर आलेल्या भट घराण्याच्या पुणे शहरात स्थिरावले. तेव्हापासून सातारची गादी नाममात्र ठरून मराठी राज्य म्हणजे पुण्याच्या पेशव्यांचा दरबार असे नवे समीकरण पुढे आले.
पुण्याची गादी
महाराष्ट्राच्या इतिहासात एकूण पेशवाई हेच एक वादग”स्त प्रकरण होऊन बसले. काही त्यांच्या मागचे एक कारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद असल्याचे सर्वज्ञात आहेच. परंतु ब”ाह्मण इतिहासकारांच्या पोटजातींनीही त्याला हातभार लावला आहे. पण हे मुद्दे बाजूला ठेवून पाहिले तरी इतिहास शास्त्राच्या दृष्टीने उपस्थित होणारा प्रश्न म्हणजे पेशव्यांनी शिवछत्रपतींचेच धोरण पुढे चालू ठेवले की नाही हा प्रश्न निश्चितच महत्त्वाचा आहे आणि त्यातून शिवाजी महाराजांचा मोठेपणाही अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या पुढील पिढ्यांना आदर्श व अनुकरणाने ठरतील अशा अनेक गोष्टी त्यांनी निर्माण केल्या होत्या यात शंका नाही.
मात्र इतिहासाचे स्वरूप हे वाहत्या प्रवाहासारखे असल्याने त्यात एखाद्या कृतीच्या, ती कितीही आदर्श असली तरी कायमस्वरूपी आग”ह धरता येत नाही. एका काळात आदर्श ठरलेली एखादी कृती सर्वच काळात तशी राहील असे म्हणता येत नाही. आणि दुसरे असे की शेवटी शिवाजी महाराज ते शिवाजी महाराजच. त्यांनी केलेली कृती सर्वांनाच पेलेल असे नाही. अशावेळी ज्याला त्याला आपापल्या वकुबाप्रमाणे जे जमेल ते करू देणे अधिक शहाणपणाचे ठरेल. शाहूच्या ऐवजी ताराबाईंचेच राज्य कायम राहिले असते तर बरे झाले असते असे मत एरव्ही पेशवाईचा अभिमान बाळगणाऱ्या राजवाड्यांनी एकदा व्यक्त केलेले आहे. जे घडलेच नाही ते घडले असते तर काय झाले असते हा प्रश्न इतिहासात तरी मॅकमिल महत्त्वाचा ठरतो व इतिहासकाराला शेवटी प्रत्यक्षात घडले त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावे लागते.
आणि शिवाजी महाराजांच्या धोरणांची व कृतीची काटेकोर कसोटी लावायचेच ठरवले तर शिवानीतीपासून ढळण्याची सुरुवात राजाराम काळापासूनच झाली होती असे म्हणावे लागते. महाराज वतन व्यवस्थेच्या विरोधात होते. परंतु राजाराम छत्रपतींच्या कारकीर्दीत परिस्थितीच अशी निर्माण झाली की वतने दिल्याशिवाय पर्यायच उरला नाही. आणि राजारामाचे हे धोरण तेव्हा तरी फलप्रद ठरले असेच म्हणावे लागते. आता शिवनीतीपासून मागे पडलेले पाऊल ताराबाईंनाही परत पुढे नेणे शक्य नव्हते. हा परिस्थितीचाच पेच होता.
पेशवाई
दुसरा मुद्दा शाहू राजांच्या काळापासूनच मंत्री बाळाजी विश्वनाथ व नंतर बाजीराव पेशव्यांच्या पुढाकाराने मराठ्यांचे राजकारण उत्तराभिमुख झाले. त्यावरील आक्षेपाचा आहे. शेजवलकरांनी हा मुद्दा फार चांगला लावून धरला होता. त्यानुसार मराठ्यांनी अगोदर दक्षिणेतील सत्ता मजबूत करावयाची होती. विशेषत: निजामाचा बंदोबस्त करायचा होता आणि मगच उत्तरेच्या राजकारणात पडायचे होते. शेजवलकरांचे म्हणजे सैद्धांतिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. परंतु शेजवलकरच काय, कोणत्याही इतिहासकाराचे लेखन हे पश्चात बुद्धीने म्हणजे घटना घडून गेल्यानंतरचे असते. तो जेव्हा लिहीत असतो त्या काळापर्यंत विविध घटनेचे नंतरचे सर्व परिणाम घडून गेलेले असतात व त्यांच्या प्रकाशात त्या घटनेचे मूल्यमापन त्या घटनेच्या घडण्यात अंतर्भूत असलेल्या सर्व कर्त्यांपेक्षा अधिक चांगल्या रीतीने करू शकतो. पण त्या कर्त्यांना हे परिणाम केवळ कल्पनेच्या किंवा तर्काच्या पातळीवरूनच उपलब्ध असतात. त्यातील काही परिणाम तर तेव्हा अकल्पित व अतर्क्य सुद्धा असतात. तेव्हा मराठे काय किंवा पेशवे काय, कोणत्याही ऐतिहासिक कर्त्याकडे पाहण्याचा इतिहासकाराचा दृष्टिकोन सहानुभूतीचा हवा. त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याऐवजी त्याच्याकडे साक्षीदाराच्या रूपात पाहावे. एरवी इतिहासकारांना आपला कॅमेरा “टॉप अँगल’ला वर ठेवता येतो. समकालीन कितीही “क्लोज्ड’ किंवा “वाइड’ शॉट घेतला तरी त्याला टॉप अँगलचा परिणाम साधला जाणार नाही हे उघड आहे.
शिवकाळ व पेशवाईसह शाहूकाळ यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे शिवकाळात दक्षिणेस मोगली सत्तेबरोबर आणखी दोन सत्ता अस्तित्वात होत्या व प्रसंगी त्यांच्यापैकी कोणाशी तरी तह किंवा तडजोड करून दुसरीबरोबर मुकाबला करण्याचे राजकारण करता येणे शक्य होते. सत्ता सर्वत्र दिल्लीपर्यंतची सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे हे राजकारण करणे शक्य झाले नसते. दिल्लीची सत्ता असे पूर्वीसारखी प्रबळ राहिली नसेल, परंतु ती एक मध्यवर्ती सत्ता होती हे नाकारता येणार नाही. तिचे स्थानिक प्रबळ सरदार सुभेदार आपापल्या मुलुखात शेर होऊन त्यांच्यावर अंमल गाजवित होते. त्यांच्या प्रदेशात ते स्वतंत्र व स्वायत्त सत्ता उपभोगत होते हे खरे असले तरी औपचारिकपणे का होईना त्यांनी मोगल बादशाहीचे सार्वभौमत्व मान्य केले होते. अशा परिस्थितीत मराठ्यांनी काय भूमिका घ्यायला हवी होती हा प्रश्न आहे. मराठ्यांनी दिल्लीच्या मध्यवर्ती मोगल सत्तेस आव्हान देणे याचा अर्थ तिच्या अंकित असलेल्या सर्वच्या सर्व सरदार सुभेदारांना आव्हान देण्यासारखे होते व त्यामुळे ते सर्व मराठ्यांच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता होती. तसे करण्यात त्यांना राजकीय समर्थनही आपोआप प्राप्त होणार होते. दुसऱ्या बाजूने आपल्या राज्यातील प्रदेशावर राज्य करीत स्वस्थ बसणे हे मराठ्यांच्या विस्तारशील प्र”वृत्तीला मानवण्यासारखे नव्हते. त्यावर शाहू महाराजांनी काढलेल्या व्यावहारिक तोडग्याचाच कित्ता पुढे पेशव्यांनी गिरवला. मराठ्यांनी व इतर काही स्वाभिमानी स्थानिकांनी आव्हान देऊनसुद्धा दिल्लीश्वर हाच भारतवर्षाचा सर्व सत्ताधीश असतो, ही भावना भारतीय जनमानसात इतकी खिळली होती की “दिल्लीश्वरो वा जगदीश्वरों वा’ हे वचन सर्वत्र प्रमाण होऊन बसले होते. त्याला मराठ्यांचाही इलाज नव्हता. परधर्मीय मोगलांच्या जागी स्वधर्मीय मराठ्यांना सत्ताधीश म्हणून स्वीकारणे हे उत्तरेतील राजपूतादी हिंदूधर्मीय सत्ताधाऱ्यांनासुद्धा जडच गेले असते. दुसरे असे की भारतावर शतकानुशतके राज्य केलेल्या मोगल सत्ताधाऱ्यांचा मूळ इस्लामी पीळ एव्हाना कमी होऊन त्याचे बऱ्याच प्रमाणात भारतीयकरण झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य प्रजेनेही त्यांचा स्वीकार केला होता. नाहीतरी सत्ताधाऱ्याच्या जातिधर्माची चौकशी करण्यात भारतातील सर्वसामान्य लोकांना स्वारस्य नव्हतेच. राजाने आपले काम चोखपणे केले म्हणजे त्याला योग्य तो कारभार देऊन टाकणे हा त्यांचा स्वभावधर्म बनला होता. अठराव्या शतकातील मराठ्यांनी या परिस्थितीत जे केले त्याची तुलना सतराव्या शतकातील शिवछत्रपतींसार”या अपवादभूत विभूतीशी करून आपण त्यांच्यावर अन्याय करीत आहोत.
दिल्ली येथील मुगल सत्ता संपुष्टात आणून तेथील त”तावर आपणच आरूढ होण्याऐवजी या सत्तेचे संरक्षक आणि प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याचा निर्णय मराठ्यांनी घेतला तो स्वाभिमान, स्वतंत्र बाणा वगैरे आकर्षक गोष्टींशी विसंगत असला तरी राजकीय व्यवहाराशी सुसंगत होता. नवीन मंदिर बांधून त्याला नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य जुन्या मोडकळीस आलेल्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने लाभते, असे आपल्या या राजकीय भूमिकेचे समर्थन शाहू महाराजांनी केल्याचे आढळून येते. यातूनच त्यांचे “नवे करू नये, जुने मोडू नये’ हे सूत्र जन्मास आले. वस्तुत: हे महाराष्ट्राच्या हवेत तरंगणारे जुनेच सूत्र होते. “जुने करू नये नवे । सांभाळावे ज्याचे त्याने ।।” अशी त्याची अभिव्यक्ती संत तुकाराम महाराजांनी या आधीच करून ठेवली होती.
अर्थात पातशाहीचा हा पत्कर घेण्यापूर्वी आपण त्यासाठी सक्षम आहोत हे मराठ्यांनी रणमैदानावर सिद्धही करून दाखवले होते. आपल्या रक्षणासाठी मराठ्यांइतका समर्थ अशी दुसरी कोणतीही सत्ता हिंदुस्थानात नाही याची पूर्ण खात्री पटल्यावरच दिल्लीपतीने मराठ्यांना तो अधिकार देण्याचा निर्णय घेतला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बाळाजी विश्वनाथने दिल्लीच्या पातशहाकडून आणलेल्या स्वराज्याच्या सनदेची शिवछत्रपतींच्या स्वतंत्र बाण्याशी तुलना करीत तिची गुलामगिरीच्या सनदा म्हणून चेष्टा करणे सोपे आहे. पण त्यामागची भूमिका समजून घेण्याचीही आवश्यकता आहे.
बाळाजीचीच परंपरा त्याच्या मुलाने म्हणजे पहिल्या बाजीरावाने पुढे चालविली.
मोगल राजकारणातील धर्मकारण
मोगल पातशहा आणि सातारचे छत्रपती यांच्यात पेशव्यांच्या मार्फत झालेल्या करारानुसार मोगलांच्या सुभ्यांचे मराठ्यांनी संरक्षण करायचे व त्या मोबदल्यात तेथील महसूलावर चौथाईचा व सरदेशमुखीचा हक्क सांगायचा असे ठरले. काबूल आणि कंदहार हा प्रदेश मोगली सुभ्यांपैकी एक असल्यामुळे त्याचे संरक्षण हाही मराठ्यांनी पत्करलेल्या जबाबदारीचा एक भाग झाला. दरम्यान ज्या राज्याने हा सुभा ताब्यात ठेवला होता, त्या इराणच्या राज्याचा अधिपती नादिरशहा याचा अंत झाल्यावर अफगाण टोळीवाल्यांपैकीच अहमदशहा अब्दाली याला आपला अधिपती बनवून त्याच्या पराक”माच्या व नेतृत्वाच्या बळावर अफगाणांनी आपले राज्य स्वतंत्र केले. तेच अफगाणिस्तान होय. या लोकांना मराठे दुराणी अथवा गिलचे असे म्हणत. पूर्वी इराणचा हिस्सा असलेला काबुल, कंदहार आता अफगाणिस्तानच्या या नव्या राज्यात मोडू लागला व त्यामुळे त्याच्यावरून त्याचे व हिंदुस्थानातील मोगल साम”ाज्याचे वितुष्ट येणार हे उघड झाले. परंतु आता मोगली साम”ाज्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली असल्यामुळे हा सुभा अब्दालीकडून परत घेऊन तो पूर्ववत मुगल साम”ाज्याला जोडण्याचे कामही मराठ्यांच्याच माथ्यावर येणार हे उघड होते.
परंतु मामला दिसतो तेवढा साधा सरळ नव्हता. केवळ चौथाई सरदेशमुखीच्या लाभापाई स्वत: होऊन काबूल, कंदहारवर चालून जाण्याइतपत मराठे मूर्ख नक्कीच नव्हते. आणि अब्दालीसुद्धा फक्त लुटमारीसाठी हिंदुस्थानवर स्वारी करण्याऱ्यांपैकी नव्हता. राजकारणात धर्म आणल्यामुळे पुढील अनर्थ झाला.
मोगल बादशहाची बहुसंख्य प्रजा हिंदूधर्मीय असली आणि राजपुतादी अनेक राजघराणी या बादशहाची मांडलिकत्व स्वीकारून नांदत असले तरी मोगल दरबारात हिंदूंचे वर्चस्व कधीच नव्हते. मराठ्यांमुळे आता दिल्लीच्या पातशाहीच्या कारभारात हिंदूंचे वर्चस्व वाढत आहे अशा शंकेने व्याकूळ झालेल्या काही कट्टर मुसलमानांनी मराठ्यांनी नर्मदापार होऊन महाराष्ट्रात परतावे यासाठी अहमदशहा अब्दालीच्या धर्मभावनेस आवाहन करून हिंदुस्थानवर स्वारी करण्याची जणू सुपारी दिली. या कारस्थानात मुस्लीम विचारवंत व धर्मगुरू शहा वली उल्लाह हा प्रमुख असून रोहिल्यांपैकी नजीबखानाने त्याला राजकारणातील साथ दिली. अब्दालीला यात लूट तर मिळणार होतीच, परंतु धर्मरक्षणाचे पुण्यही मिळणार होते.
अब्दालीचे आव्हान स्वीकारून मराठ्यांनी दिल्लीच्या बादशाहीने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवलाच. परंतु आपण हिंदुस्थानातील पहिल्या क”माकांचे लष्करी सामर्थ्य असल्याचेही सिद्ध केले. वस्तुत: अब्दाली एक मुसलमान या नात्याने भारतावर स्वारी करून येत आहे. एवढी एकच गोष्ट उत्तरेतील हिंदूधर्मीय राजेरजवाड्यांसाठी त्याच्या विरोधात उभे राहून मराठ्यांना मदत करण्यासाठी पुढे यायला पुरेशी होती. परंतु तसे न करता अब्दालीच्या हातून मराठ्यांचा परस्पर काटा निघतोय तर निघू देत अशा स्वार्थी भावनेपोटी ते तटस्थ राहिले. मराठ्यांनी त्यांना त्रस्त केले होते हा आरोप खरा असला तरी त्याचा सूड घ्यायची ही वेळ नव्हे व योग्य पद्धती नव्हे हे समजण्याचीही त्यांची पात्रता नव्हती, असेच म्हणावे लागते.
धडा शिकवणारा पराभव
पानिपतचे प्रकरण अशा रीतीने अंगावर ओढवून घेतल्याबद्दल मराठ्यांचे कौतुक यासाठी करावयाचे की ते त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन हिंदुस्थानकडे एक राष्ट्र या नात्याने पाहिले. पानिपतचा सेनानी सदाशिवराव भाऊ याने उत्तरेतील सत्ताधीशांना पत्रे लिहून आपली भूमिका स्पष्ट करताना दिल्लीची पातशाही ही या देशातील असून अब्दाली हा परकीय शत्रू असल्याचा स्पष्ट उच्चार केला. धर्माने मुसलमान असलेल्या मोगल पातशहाच्या रक्षणासाठी हिंदूधर्मीय राजवट धावून जाते ही बाब भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना होय. आज आपण सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे बिरुद अभिमानाने मिरवतो त्याचा पाया हा अशा प्रकारे मराठ्यांनी घातला आहे. भारतात तेव्हाच्या इतर मुसलमानी सत्ताधीशांनी देशाचा विचार न करता धर्माचा विचार करून अब्दालीस सहाय्य केले तर हिंदू सत्ताधाऱ्यांनी ना धर्माचा विचार केला ना देशाचा. कधी परकीय शत्रूचा एकत्र येऊन नि:पात करू आणि नंतर आपल्यातले वाद मिटवू असे सांगणाऱ्या मराठ्यांनी महाभारतातील आपण एकशे पाच असल्याची शिकवण पुरती आत्मसात केली होती. तर भारतातील इतर सत्ताधीश धर्मांध किंवा स्वार्थांध होऊन मराठ्यांच्या खच्चीकरणात दंग होते.
पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक”मक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले. या बाबतीत त्यांना उपमा फक्त फिनिक्स पक्ष्याचीच शोभेल. मराठे नुसते उठले असे नसून त्यांनी उत्तर हिंदुस्थानात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मोगल पातशाही हातात घेऊन तिचे नियंत्रण करण्याचा अपुरा राहिलेला मराठ्यांचा मनसुबा महादजी शिंद्यांनी तडीस नेला. यावेळी उत्तरेतील धर्मांधांना व स्वार्थांधांना मदत करायला वायव्येकडून कोणी अब्दाली येणे शक्यच नव्हते. मात्र याचा अर्थ महादजीचे काम सोपे होते असा मात्र नाही. उलट यावेळी इंग”जांसारखा जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण झाला होता. त्याला अंतरावर ठेवून दिल्लीच्या त”तावर आपल्या पसंदीच्या बादशहाला बसवण्यात महादजी यशस्वी झाले. या काळात मराठ्यांनी दिल्लीचा “रिमोट कंट्रोल’ आपल्या हातात ठेवून देशाचा कारभार केला. पानिपतवर नडलेल्या शक्तींना त्यांची जागा दाखवली.
इंग”जांनी भारत देश मोगलांकडून घेतला असा जो समज आहे तो इंग”ज इतिहासकारांनी केलेला अपप्रचार आहे. त्यांनी भारत घेतला तो मराठ्यांशी लढून. दिल्लीच्या बादशहाचा ताबा मराठ्यांकडून घेणे म्हणजेच भारत जिंकणे असे हे राजकीय समीकरण होते. याचाच अर्थ असा होतो की मराठ्यांच्या धोरणाची नक्कल करूनच इंग”ज भारतावर राज्य प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले. स्वराज्याच्या सनदा शेजवलकरांना गुलामगिरीच्या सनदा वाटल्या. ते त्यांचे वाटणे पूर्णपणे प्रामाणिक होते यात काहीच संशय नाही. परंतु या सनदांमध्ये भविष्यकालीन सार्वभौम सत्तेची बीजेही होती हे विसरता कामा नये. अशीच एक बंगालच्या सुभ्याच्या दिवाणीची सनद रॉबर्ट क्लाइव्हने मिळवली व तेथेच इंग”जी राजवटीचे बीजारोपण झाले.
मराठ्यांच्या राज्याचे असे बीजारोपण 1752 मध्येच झाले होते. पानिपतच्या पराभवामुळे या बीजाचा वृक्ष होण्यात मोठाच अडथळा आणला. तोही मराठ्यांनी पार केला पण इंग”जांपुढे ते कमी पडले.
तरीही मराठ्यांच्या बलिदानामुळे भारताच्या सेक्युलरपणाचे रक्षण झाले हे कोणी विसरू नये. हा देश अफगाणांकडे गेला नाही तो केवळ मराठ्यांच्या पराक्रमामुळे, नाहीतर आज भारत तालिबानी धर्मांधांचे मोठे केंद्र ठरला असता.मराठ्यांच्या पराभवातही एक विजय लपलेला आहे.
आजचा दिनविशेष
५ नोव्हेंबर १५५६:-
पानिपतची दुसरी लढाई.
पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.
मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन आला होता. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. पराभूत सैनिकांचे शिरकाण,मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष,भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत जाणे,पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करणे अशा या मुघलांच्या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील. परंतु हुमायूं आणि अकबर यांच्या या क्रूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत २२ लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. बहुतेक वेळा तुटपुंज्या सैन्यबळावर.
६ ऑक्टोबर १५५६ रोजी मुघल सरदार तर्दी बेगचा हेमूने इतका जबरदस्त पराभव केला होता की तर्दी बेग रणांगणातून पळुन थेट काबूलच्या वाटेला लागला होता. व्यसनी,मानसिक रुग्ण असलेल्या आदिलशहा सुरीला फ़ाट्यावर मारुन हेमूने स्वत: हिंदुस्तानचा सम्राट होण्याचे ठरवले व ७ ऑक्टोबर १५५६ रोजी दिल्लीतील प्रसिद्ध पुराना किला येथे हेमूचा हिंदू पद्धतीने दिल्लीची जनता व अफ़गाण व हिंदू सैन्यासमोर राज्याभिषेक झाला.त्याने “सम्राट हेम चंद विक्रमादित्य” असे नाव धारण केले तसेच स्वत:च्या प्रतिमेच्या नाण्यांचे चलनही प्रस्थापित केले.
हेमूच्या बंगालपासून दिल्लीच्या धडकेनंतर व दिल्लीच्या कब्ज्यानंतर मोगल सैन्यात जरब बसली व बर्याच मोगल सरदारांनी गाशा गुंडाळुन काबूल येथे राजधानी स्थापून राज्य करावे असे मत व्यक्त केले परंतू बेहरामखान याने हेमूशी युद्धाचा आग्रह धरला. दिल्ली हातची गमावल्यावर १४ वर्षांचा सुल्तान जलालुद्दिनला हेमुच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी नेले होते. दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली.
बेहरामखान याने सैन्यास लढाईस प्रेरणा दिली व स्वत: मैदानापासून दूर राहीला. काही इतिहासकारांच्या मतानुसार, हेमूबद्दल प्रचंड भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव जलालुद्दिन आणि त्याचा रक्षणकर्ता बेहरामखान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. जलालुद्दिनबरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बेहरामखानचा सैन्याला आदेश होता. हेमू स्वत: हत्तीच्या पाठीवरुन सैन्याचे नेतृत्व करत होता. पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती. हेमूच्या मुख्य सैन्यातल्या हत्तींना तोंड देण्यसाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले. तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले. बाजूने आणि पिछाडीवरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रूसैन्याचा व्यूह पुरता विस्कळित झाला. पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रुसैन्यात पळापळ सुरू झाली. हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला.
तेवढ्यात शत्रूसैन्य पळत असतांना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला आणि आणखी एका बाणाने निशाण पडले. सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध. आपण जखमी झालो तर सेनापतीपदाचे नेतृत्त्व कुणी करायचे याच्या सूचनाच अस्तित्त्वात नव्हत्या. रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल. हेमू जखमी झाल्याची खबर सैन्यात पसरली व सैन्याचे अवसान गिळाले, गोंधळात सैन्य सैरावैरा पळत सुटले आणि विजयाच्या उंबरठ्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला. हेमूच्या हत्तीला बेहरामखानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून जलालुद्दिनच्या शिबिरात नेले. तिथे जलालुद्दिनला गाझी सिद्ध करण्यासाठी हेमूचे मुंडके छाटले गेले,हेमूचा शिरच्छेद केला गेला. हेमूचे मुंडके हे काबूल मध्ये तर धड दिल्लीला पाठवून टांगण्यात आले. या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूने दत्तक घेतलेल्या पुतण्यासह मारले गेले. लढाईत भाग न घेतलेला एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला. त्याचे वंशज आजही आहेत. जलालुद्दिन दिल्लीच्या तख्तावर बसला व नंतर त्याने ‘अकबर’ हे नाव धारण केले.अकबराने हेमूचा इतका धसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले. भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे शालेय पाठ्यपुस्तकलेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेखदेखील करीत नाहीत याची खंत वाटते.
सेनाप्रमुखास योग्य संरक्षण न देणे तसेच सेनापती जखमी अथवा मृत्यू पडल्यास दुसर्या सेनाप्रमुखाने (सेकंड इन कमांड) नेतृत्व हाती न घेणे हि प्रमुख चूक या युद्धात झाली व हेमूचा पराभव झाला. कदाचित त्याकाळी असे जर घडले तर स्वकीयांऐकीच एखादा सरदार सेनापतीला ठार करून आपणच सेनापती बनत असेल हीही एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कदाचित अशा सूचना निर्माणच झाल्या नसाव्यात.असो. पण पुढे इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास केल्यास कळते की शिवरायांनी या चूका वेळोवेळी टाळल्या त्यामुळे शिवरायांनी हिंदूच्या जुन्या चुकांचा किती बारकाईने अभ्यास केला होता हे कळून येते.
हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ज्याला “भारताचा नेपोलियन” या नावाने देखील ओळखले जाते. याने तब्बल २२ लढाया जिंकून सुद्धा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात दुर्दैवी पराभव पत्करावा लागल्यामुळे हेमुचे सामर्थ्य झाकोळले गेले. इतिहासामध्ये कष्ट करून आणि स्वतःच्या अंगीभूत कौशल्याने राजेपदापर्यंत पोहचलेले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक आहेत, त्यातीलच हेमू एक. हरियाणाचा हा इतका महान योद्धा, भारताच्याच नाही तर हरियाणाच्या इतिहासाच्या पानांमधून देखील गायब आहे.हरियाणा सरकारने हेमूसाठी ना कुठलं स्मारक उभारलं आहे, ना त्याचा राज्याभिषेक दिवस साजरा केला जातो ना तो शहीद झालेला दिवस कोणाच्या लक्षात असतो. ८ ऑक्टोबर १५५६ मध्ये सम्राट हेमूचा राज्याभिषेक झाला आणि ५ नोव्हेंबर १५५६ रोजी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे महिनाभर देखील तो सम्राटपदावर नव्हता. हा सर्व काळ तो सतत लढाईत गुंतलेला होता. सम्राट म्हणून जनहिताची कामे करण्यास त्याला अवधीच मिळाला नाही म्हणून कदाचित शालेय पाठ्यपुस्तक लेखकांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नसेल.असो. तो इतिहासकारांचा प्रश्न आहे. पण हे सर्व नसतानाही मुघलांना पळता भुई थोडी करून सोडणाऱ्या आणि अल्पकाळ का होईना हिंदू राज्य प्रस्थपित करणाऱ्या या दुर्लक्षित पण तितक्याच पराक्रमी “विक्रमादित्याला” मानाचा मुजरा.
आम्ही पानिपतास गेलो होतो १२ जानेवारी २०१३ रोजी...
काय काय बघितले याची यादी:
१. इब्राहिम लोदीचे थडगे. इंग्रजांनी रिस्टोअर केलेले.
२. नवग्रह मंदिर आणि त्याला लागून असलेल्या तळ्याचे विस्तीर्ण आवार. आम्ही गेलो होतो तेव्हा तळे शिल्लक नव्हते, त्या जागी पब्लिक पार्क बांधायचे काम सुरू होते. पानिपत कादंबरीत उल्लेखिलेले तळे ते हेच.
३. बूआली कलंदर दर्गा. याला पानिपत गावात कलंदर पीर असे म्हणतात. चिंचोळ्या गल्ल्यांतून तिकडे पोहोचलात की छोटासा परंतु छान दर्गा आपले स्वागत करतो. एण्ट्री केल्यावर पटांगण लागते, तिथून रफली उजवीकडे गेल्यास मुख्य जागा अर्थात समाधी लागते. त्या इमारतीत जाताना समोर ८ खांब आहेत ते नीट बघावेत, काळ्या रंगाचे आहेत. एका लायनीत २ असे प्यारलल ४ लायनीत ४ दुणे ८ आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सोनाराकडे कसोटीचा जो दगड असतो त्या दगडापासून बनलेले हे खांब आहेत. असे अन्यत्र कुठेही नाहीत असे सांगतात. हे सोडून बाकी दर्गाही प्रेक्षणीय आहे. कलाकुसर, स्थापत्य, इ. छान आहे.
३. काला आम. या झाडाच्या नावाखेरीज आजमितीस काही उरलेले नाही. त्या झाडाच्या ठिकाणी एक आंब्याचे झाड लावलेय सिंबॉलिक म्हणून. तिथेच १९७३ साली हरियाणाचे राज्यपाल असलेले तपासे म्हणून मराठी गृहस्थ होते त्यांच्या पुढाकाराने एक छोटासा चबुतरा उभारलाय, तिथे उर्दू व हिंदी व इंग्लिश भाषांत पानिपतबद्दल लिहिले आहे. काला आमच्या लाकडापासून एक कमान बनलेली आहे असे 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' नामक पुस्तकात लिहिलेले आहे. बहुधा दर्ग्यातलीच असावी, हे आम्ही गेलो त्यावेळेस माहिती नव्हते.
हा सर्व पानिपत मेमोरियलचा भाग आहे. प्रत्यक्ष मेमोरियल म्हणजे एक मोठे बांधून काढलेले पार्क आहे. मेन गावापासून ५ किमी अंतर आहे, आणि मेन रोड पासून अजून दीड किमी आत जावे लागते. मेमोरियलमध्ये तीनही लढायांची माहिती वगैरे दिलेली आहे. एक म्युझियमसदृश खोली आहे पण तिथे खास काही नाही. २०११ साली पानिपतच्या संग्रामाची २५० वी अॅनिव्हर्सरी झाली त्यानिमित्तची कोनशिला मेनरोडला एण्ट्रन्सला आहे. तिथे तत्कालीन आय ए एस अजित जोशी, तसेच पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम, इ. ची नावे आहेत.
तिथून जवळच रोडमराठा उत्सव वगैरे होत असतो दर १४ जानेवारीस अशी माहिती कळाली. आम्हांला कमान तेवढी बघावयास मिळाली, शिवाजीमहाराज आणि जिजाऊ यांची चित्रे होती आणि 'रोडमराठा उत्सव' असे काहीसे टायटल होते. रोड म्हणजे तेव्हापासून तिथे राहिलेल्या मराठ्यांचे वंशजांचे सध्याचे नाव हे माहिती असेलच.
एकुणात, पानिपत गावात बघण्यासारखे फार काही खास नाही- पण त्या स्मॄती मनात ठेवून गेलो तर असे आजिबात वाटणार नाही. काला आमच्या अगोदर रस्त्यात उगरा खेडी वगैरे बोर्ड दिसतात, एकदम कादंबरीचीच आठवण येते. तिथे गेलो असताना काला आमच्या ठिकाणी बसूनच गडकर्यांच्या 'पानिपतचा फटका' चे अभिवाचन केले होते. लय मजा आलेली. शेजवलकरांचे पानिपत १७६१ घेऊनच गेलो होतो. तिथे नकाशे काढले आणि जरा इम्याजिन केले की त्या दिवशी काय काय झाले असेल वगैरे वगैरे.....
बाकी अजूनही बरेच काही असेल तिथे, आम्ही शोध फार कै घेतला नाही. दिल्लीहून ९०-१०० किमी आहे, बसने २ तास लागतात. करोलबागेकडच्या स्टँडपासून गेलो. बहुधा कश्मीरी गेट नामक मेट्रो स्टेशनहून ते जवळच आहे. नाष्टा सेण्टर्स चांगलीयेत त्याच्या जवळ. सकाळी सकाळी छोलेभटूरे किंवा पराठे वगैरे खाऊन बसलो की टेन्शन नाय.
बाकी पानिपत गावात तरी विचारत विचारत आणि रस्त्यांवरच्या कमानी-बोर्ड पहात पायीच हिंडलो, फक्त काला आमपर्यंत तेवढी शेअर रिक्षा केली. तुमच्या सोयीप्रमाणे पहा कसे काय आहे ते.
पानिपताचं युद्ध मराठे का हरले? आणि का घडतं पानिपत?
चौदा जानेवारी….
उत्तरायण होईल, संक्रात होईल, पतंग उडवले जातील, आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालुन तोंड गोड केले जाईल.
ह्या सगळ्यात दोनशे अठ्ठावन्न वर्षांपुर्वी जे घडलं होतं, ते कोणाला आठवायची इच्छा होईल का?
“पानिपत!”
सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत!
पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली.
पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का?
का झालं होतं पानिपत? पानिपत युद्धाचे परिणाम काय काय झाले? ह्या पानिपतातुन काही शिकलो का आपण?
अफघाण योद्धा अहमदशहा अब्दाली आपल्या रानटी टोळ्यांना घेऊन चौंथ्यादा दिल्ली लुटायला येतो, तेव्हा आपल्या घरापासुन दिडहजार किलोमीटर अंतरावर जाऊन मराठे, आपल्या प्राणाची आहुती का देतात?
ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात औरंगजेबाच्या मृत्युपासुन होते, औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुघल सत्ता खिळीखिळी झाली. वजीर आणि सम्राट यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरु झाला.
मराठ्यांमध्येही यादवी युद्ध सुरु व्हावे, गादीचा संघर्ष सुरु व्हावा, ह्या हेतुने संभाजी महाराजांचे पुत्र शाहु महाराज ह्यांना १७०७ मध्ये मुघल कैदेतुन सोडुन देण्यात येते.
आपल्या पित्याचा अमानवी आणि क्रुर छळ करुन ठार मारणाऱ्या औरंगजेबाला, शाहु महाराजांनी वचन दिलेले असते, “मी मुघलांविरुद्ध कधीही लढणार नाही, उलट त्यांचे इतर शत्रुंपासुन रक्षण करेन.”
ह्यामुळे मराठी राजवटीत आतापर्यंत अष्टप्रधान मंडळातले एक मंत्री असलेले ‘पेशवे’ आता शाहु महाराजांच्या वतीने सेना आणि मोहिमा यांचे नेतृत्व करु लागतात.
हे पेशवे, बाळाजी विश्वनाथ भट, हे मुत्सद्दी होते.
राज्य चालवण्यासाठी पैसा लागतो, आणि राजाच्या तिजोरीत पैसा येतो, टॅक्स जमा करुन किंवा शत्रुकडुन खंडण्या गोळा करुन!
आणि शाहु महाराज हेच मराठी राज्याचे खरे वारसदार आहेत अशी सनद मिळवण्यासाठी आणि दख्खनच्या सहा सुभ्यांचा टॅक्स घेण्याचा अधिकारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते एक शक्कल लढवतात, दिल्लीतल्या बादशहालाच बदलुन टाकुन, आपल्याला अनुकुल असा नवा बादशहा दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची खेळी खेळतात.
ह्यासाठी एका तोतया मुघल राजकुमाराला उभे केले जाते, अंदाजे तीस हजारे सैनिकांची फौज दिल्लीकडे कुच करते, अशा रितीने पहिल्यांदा खऱ्या अर्थाने दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा प्रवेश होतो.
ह्या तीस हजार मराठी वीरांनी पहिल्यांदा सुंदर दिल्लीचे रस्ते पाहिले, इथले प्रचंड वैभव पाहिले, आणि आपणही हे सारं मिळवु शकतो, अशी उमेद त्यांच्या मनात तयार झाली.
ह्या सेनेत पेशव्यांचा एकोणीस वर्षांचा तरणाबांड मुलगा बाजीराव ही होता. त्याला दिल्लीने जणु भुरळ पाडली होती.
पुढे बाळाजी विश्वनाथांचं निधन होते आणि पेशवेपद बाजीरावांना मिळतं.
बाजीराव हे मराठ्यांच्या इतिहासातलं सोन्याचं पान आहे, मराठ्यांच्या विखुरलेल्या शक्तीला त्यांनी शत्रुविरुद्ध एकत्रित केले, त्यांच्या खांद्याला खांदा लावुन मोहिमा लढवल्या, उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला.
१७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्यांनी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७) तसेच भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अशाच छत्तीस मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया त्यांनी जिंकल्या आहेत.
त्यांचा “सक्सेस रेट” “१००%” आहे.
वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार आहे. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती, आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.
शाहूमहाराज म्हणत, ‘मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.’
पण हेच बाजीराव, शाहु महाराजांनी औरंगजेबाच्या वचनात बांधलेले असल्यामुळे म्हणा किंवा खंडणीच्या अमिषाने म्हणा, त्यांनी मुघलांवर प्रत्यक्ष आक्रमण केले नाही, आपल्या शक्तीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
ह्याबद्ल्यात एका अभद्र युतीचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांचा घास गिळण्यासाठी टपुन बसलेल्या मुघल साम्राज्याचेच मराठे संरक्षक झाले.
ह्यातुनच पुढे पानिपत घडलं!
एक वर्षांपुर्वी शत्रुवर आक्रमण करण्यासाठी निघालेलं पन्नास हजार लष्कर आणि इतर एक लाख लोकं यांचा युद्ध्याच्या मैदानात अर्ध्या दिवसात दारुण पराभव होतो, धुळधाण होते, काही तासात ते सगळे क्रुरपणे मारले जातात? कापले जातात, युद्धभुमीला रक्ताचा अभिषेक घडतो. खरचं काही तासांचं युद्ध इतका मोठा निर्णय घडवतं का?
पानिपत का घडतं?
केव्हा केव्हा घडतं असं भयानक आणि संहारक पानिपत?
- युद्ध न लढणारी, तीर्थक्षेत्र आणि देवस्थाने यांचं दर्शन करण्यासाठी निघालेल्या, हौशी लोकांची खुप मोठी संख्या सोबत असल्यामुळे मराठ्यांच्या हालचाली मंदावल्या. म्हणुन जेव्हा एसेट्स पेक्षा लायेब्लिटीज जास्त असतात, तेव्हा पानिपत घडतं!
- धर्माच्या नावावर एका क्षणात मतभेद विसरुन एक होऊन, वज्रमुठ बनवुन लढणाऱ्या शत्रुसमोर लढणारी सेना, जेव्हा एकदिलाने न लढता, जातीपातीत विभागुन लढते, उच्च नीचतेच्या विळख्यात अडकते, कर्मकांडाला नको तितके महत्व देते, तेव्हा पानिपत घडतं!
- फ्रेंच सेनापती बुसीच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इब्राहिम गाडदीने मराठ्यांच्या वतीने गोल व्युह रचला होता, त्याच्या रणनितीमुळे अब्दालीचे हजारो लोक मारले गेले, पण दुर्भाग्य! आपल्या परांपरागत गनिमी काव्याच्या सवयीमुळे, काही मराठी सरदारांनी स्वतःहुन तो गोल तोडला, आणि युद्धाचे पारडे फिरले.
म्हणुन आपल्या सेनापतीने दिलेला आदेश, सगळ्यांकडुन जशाच्या तसा पाळला जात नाही, त्या सेनेत पानिपत घडतं!
- रानटी अब्दालीचे भय असुनही, उत्तर भारतातली एकही प्रबळ सत्ता, जसे की राजपुत, जाट, बुंदेले, गुर्जर, शीख, अवधेचा नवाब ह्यापैकी कोणीही मराठ्यांच्या मदतीला आले नाही. का बरं?
कारण त्यांच्या नजरेत अब्दाली आणि मराठे सारखेच होते, अब्दालीइतके क्रुर नाही पण मराठे त्यांच्यावर वेळोवेळी आक्रमण करायचे. त्यांच्या किल्ल्यांवर तोफा डागायचे. खंडण्या उकळायचे. त्या खंडण्यांनी आपले सुंदर सुंदर महाल उभा करायचे.
थोडी शक्ती आली की आपलेच लोक, आपल्यापेक्षा दुबळया लोकांना पैशासाठी लुटु लागतात, शोषण करुन दहशत माजवतात, तेव्हा पानिपत घडतं!
- अब्दालीची ही पाचवी दिल्ली स्वारी होती, सदाशिवराव भाऊ-विश्वासराव यांची मात्र ही पहिलीच उत्तरेतली मोहीम होती. शिंदे-होळकर जरी जुने जाणते सुभेदार होते, ह्या भागात अनेक वर्ष वावरेलेले होते.
तरीही उत्तरेचा भुगोल, गंगा-यमुना-चंबळ नद्यांचे महापुर आणि अन्नरसद शत्रास्त्रांचा पुरवठा, उत्तरेत असलेले मदतीचे दोर, अब्दालीचा अघोरी रानटीपणा कसल्याही परिस्थितीचे अचुक आकलन शेवटपर्यंत मराठ्यांना झाले नाही.
मराठ्यांना एकेक नदी ओलांडायला एकेक महिना लागतो, त्याउलट अब्दाली चपळाईने यमुना ओलांडुन मराठ्यांचे मदतीचे सर्व रस्ते बंद करतो.
इथे मराठे शंभरवर्षांपुर्वीच्या मुघल फौजेसारखे वागले, थोडे फाजील आत्मविश्वासाने, आणि थोडे सुस्तावल्यासारखं! याउलट अब्दाली चपळपणे वागला, गनिमी काव्याने लढला, अगदी शिवाजी महाराजांसारखा!
अब्दालीकडे असलेल्या पाच हजारांच्या राखीव सैन्यामुळे अब्दाली हे युद्ध जिंकला. तो क्रुर होता, पण शिस्तबद्ध होता.
लढाईत मराठ्यांचा जोर असताना, मरणाच्या भितीने अब्दालीचे सैनिक पळु लागले तेव्हा अब्दालीने आपल्या सैनिकांना स्वतःच ठार मारले. ज्यामूळे त्याच्या सैन्यात मागे फिरण्याची, पळुन जाण्याची, इतर कोणाची ही हिंमत झाली नाही.
जेव्हा शत्रुचा बारकाईनं अभ्यास न करता, शत्रुपक्षाला कमी लेखुन, लढण्यासाठी निधडी छाती पुढे केली जाते, तेव्हा तेव्हा पानिपत घडते.
- सकाळी साडेअकरापर्यंत युद्धाचे परिणाम मराठ्यांच्या बाजुने असतात, मात्र पुढे क्षणाक्षणाला सामोरे जाणाऱ्या तळपत्या सुर्यामुळे डोळ्यात जाणाऱ्या किरणांमुळे मराठ्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी येते.
हे असं होवु शकतं, असं तिथल्या एक लाखांहुन अधिक लोकांपैकी एकाच्याही लक्षात आलं नाही.
अब्दालीकडे दुर्बिणी होत्या, बंदुका होत्या, उंटावरुन हलवता येतील, अशा हलक्या पण प्रचंड संहार करणाऱ्या तोफा होत्या,
याउलट मराठ्यांकडे इब्राहिम गाडदी सोडला तर बहुतांश सैन्य हे तलवार, भाला चालवणारे सैनिक होते.
मराठी लष्करामध्ये दळणवळणासाठी अवघड अशा तोफा आणि हत्ती होते, जे त्यांच्या पराजयाचे कारण बनले. आधुनिक तंत्रज्ञानासाठी आपल्याला तेव्हाही इंग्रज आणि फ्रेंचावर अवलंबुन रहावे लागायचे आणि दुर्दैवाने आजही रहावे लागते.
हजारदा वाचले असेल.
“हत्तीवर बसलेल्या विश्वासरावाला बंदुकीतुन सुटलेली एक गोळी लागते, आणि लढाईचा रंग बदलतो.“
वाळवंटात राहणाऱ्या मध्ययुगीन काळात वावरणाऱ्या अब्दालीकडे आधुनिक शस्त्रे असु शकतात मग कला, संस्कृती, विज्ञान, शास्त्रे यांच्यामध्ये रुची असणाऱ्या मराठ्यांकडे बंदुकासारखी आधुनिक शस्त्रे का नव्हती?
शस्त्रास्त्रांच्या बाबतीत शत्रु जेव्हा आपल्यापेक्षा वरचढ असतो तेव्हा ‘पानिपत’ घडते.
- विश्वासराव पेशवे पडले की मराठ्यांची सेना विखुरते, सेनापती पडला म्हणुन सैनिकांचे मनोबल खचते, जो तो स्वतःचा जीव वाचवत पळत सुटतो. पण पळत सुटले, म्हणुन ते वाचले नाहीत, युद्ध संपल्यावर त्यांचीही कत्तल झालीच.
ते सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले असते तर!…
- आपल्या लोकांपेक्षा, आपल्या मातृभुमीपेक्षा आपला जीव प्यारा वाटु लागतो, तेव्हा पानिपत घडते!
दीड लाख लोकांनी आहुती देऊन अनेक धडे आपल्याला असे शिकवले आहेत, त्यातुन आपण बोध घेणार आहोत का?
हेच पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या वीर सैनिकांना खऱ्या अर्थाने नमन ठरेल.
पानिपताच्या युद्धात नेमकं काय झालं होतं, याविषयी पुढच्या भागात!…
लेखातील मुद्द्याशी सहमत असाल तर लाईक करा,
पानिपताविषयी नवी काही माहिती असेल तर कमेंट करा,
मराठ्यांच्या शोर्य आणि इतिहासाचा अभिमान असल्यास आपापल्या फेसबुक वॉलवर शेअर करा.
धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार!
पानिपत नेमकं सुरू कधी झालं...?
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पानिपत प्रकरणाबद्दल वाचायला लागल्यानंतर हे लक्षात आले की नुसते युद्ध अभ्यासून चालणार नाही कारण पानिपतचे युद्ध होण्याची कारणे ही अनेक आहेत. पानिपत हे अटळ होते फक्त ते लांबवर ढकलेले इतकेच. पानिपतचे युद्ध होण्यास एक महत्वाची घटना कारणीभूत ठरली ती सदाशिवराव भाऊंनी केलेला कुंजपुरावरील हल्ला.
भाऊंनी दिल्ली काबीज केली आणि दिल्ली ते कुंजपुरा हा पट्टा आपल्या ताब्यात राखण्याचे प्रयत्न चालू केले. भाऊंचा इरादा असा होता की पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडून अब्दालीस घेरून त्यालामध्ये चेपायचे. अब्दालीच्या दक्षिणेस असणाऱ्या यमुना नदीने त्याचा दक्षिणेकडे येणारा मार्ग अडवला होता. त्यामुळे भाऊ यांना इकडे हालचाली करायला वाव मिळत होता.
त्यामुळे जर आग्रापासून कुंजपुरा हे गाव जर ताब्यात घेतले तर अब्दाली यमुना नदी ओलांडूच शकणार नाही अशी परिस्थिती. पूर्वेकडे असणाऱ्या गोविंदपंताना मदत पाठवून पूर्वेकडून अब्दालीवर दबाव टाकणे हा एक पर्याय भाऊंच्याकडे होता पण यमुना नदीमुळे ते शक्य नव्हते.
त्यामुळे कुंजपुरा जिंकून मग पुढे सहारणपुऱ्यावरून अब्दालीस गाठणे आणि मागे चेचणे हा मार्ग भाऊना योग्य वाटला असावा. अर्थात ही खेळी त्यांनी सर्वांच्या मतेच घेतली असावी पण यमुनेचे उतार राखण्यास थोडी ढिलाई झाल्याने बागपतला अब्दालीला खाली उतरायला वाव मिळाला हे मात्र खरे. असो, त्याबद्दल पुढे येईलच!
कुंजपुरा लढाईच्या आधी कुंजपुरा आणि दिल्ली येथील अंतरे पाहणे हे महत्वाचे ठरेल. दिल्लीपासून कुंजपुरा हे अंतर साधारण ७८ मैल होते तसेच दिल्ली ते आग्रा हे अंतर १२० मैल. अगोदरच मराठे दिल्ली ते आग्रा हे अंतर राखण्यात शर्थीचे प्रयत्न करत होते आणि त्यात आता दिल्ली ते कुंजपुरा या ७८ मैलांची भर पडली होती.
तुमच्या लक्षात येईल की बागपत हे ठिकाण दिल्ली आणि कुंजपुरा यांच्या मधेच आहे. दिल्लीपासून बागपत हे ठिकाण साधारण २० मैल आहे आणि पुढे बागपतपासून पानिपत ३४ मैल आणि पुढे कुंजपुरा अजून २४ मैल.
नेटवर शोधशोध करत असताना एक उत्तम फोटो सापडला ज्यावरून तुम्हाला नेमक्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येईल की कोणते ठिकाण कसे होते ते.

कुंजपुराला निघण्याआधी, सदाशिवराव भाऊंनी गोविंदपंतांना एक पत्र लिहिले होते ज्यातून ते त्यांची योजना काय आहे आहे याचे वर्णन करतात. हे पत्र मराठी भाषेत सरदेसाई यांनी ‘मराठी रियासत- मध्य विभाग-३’ यात छापले आहे. भाऊ लिहितात की,
“तुम्हास तिकडे मोठ्या कामास जावयाविषयी वारंवार लिहिले, परंतु अद्याप गोपाळराव गणेश व तुम्ही गेला नाहीत. (कदाचित अब्दालीवर छोटे मोठे छापे घालण्याचे काम असावे कारण गोविंदपंतांच्याकडे थोडीफार फौज होती) कोठे किरकोळ जमीदारांचे गढागाव घेत बसला, हे ठीक नाही. या उपरी लौकर तिकडे जाऊन पेशजी लिहिल्याप्रमाणे गडबड करून धुंद उडवणे. या गोष्टीस हयगय एकंदर न करणे.
यमुनेचे पाणी फार याकरिता आम्ही दिल्लीस बसणे योग्य नाही. यास्तव कुंजपुऱ्यास अब्दुसमदखानाचे पारिपत्य करावयास जात आहो. (यापुढील काही मजकूर हा दिल्लीविषयक आहे त्यामुळे तो इथे देत नाही) आम्ही कुंजपुऱ्याकडे गेलो. अब्दाली इकडे कूच करून आलीया उत्तमच झाले.
दिल्लीकडून मागे मुलुख मोकळा राहील, लढाई इकडेच पडेल. कदाचित इकडे न येता तिकडे तुमचे रोख जाहले तरी बरेच आहे. आम्ही पाठीवरी यमुना उतरून अंतर्वेदीतून येऊन त्याचे पारिपत्य करू. कुंजपुरेवाला ठरत नाही. डावा डौल होऊन दमवायच्या मुद्द्यावरी आहे. ठरला तरी मोर्चे लाऊन यथास्थितच पारिपत्य करू.
तुम्ही तिकडे सत्वर जाऊन पोहोचणे. (कुठे ते नेमके काळात नाही), केवळ छोट्या मोठ्या कामात गुंतोनी न राहणे.
गनिमी मेहनत करून, रोहिले व सुजा यांचे प्रांतात धामधूम होईल असे करणे. अब्दाली आम्हाकडेच येईल. तिकडे आला तरी पाणी आहे, तो आहे. चार रोजात कुंजपुऱ्याचे पारिपत्य करून सारंगपुराकडे उतरून नजीबखानाचे विल्हे लावून पुढे अब्दालीचे पाठीवर येउ. ऐवज लवकर येऊन पावेसा करणे.
अलीगोहारचा शिक्का दिल्लीत पडला त्याची चिठ्ठी पाठवली आहे. त्याप्रमाणे लिहून पातशहाची जरब मोडून याचे नावे करणे. लवकर जाऊन सर्व कामे यथास्थित करणे. ग्वाल्हेर आग्रा मथुरेवरून ऐवज दिल्लीस येई ते करणे. जाठ वल्लभगडास आहेत, तिकडून रसदेचा वगैरे पेच पडावयाचा नाही. त्याची फौज पुत्र हुजूर येणार. ते तेथे राहून पलीकडे पायबंद द्यावा.
तिकडून तुम्ही फौज सुद्धा जाऊन शहावरी असावे. इकडे यमुनेचे पाणी हलके होताच अब्दालीचे पारिपत्य करावे असा डौल आहे. त्याजकडून तहाचे राजकारण अद्याप आहे परंतु मळमळीत आहे, ठीक नाही. येथील मर्जीनुरूप झाल्याशिवाय तह होणार नाही.
प्रस्तुत आम्ही दिलीहून दोन मजली कुंजपुऱ्यास आलो. पुढे जाऊ. आलीगौहरचे पुत्र बाहेर काढून वलीहदी शुक्रवारचे मुहूर्ते केली. आपले तालुक्यातही शहाआलमचा गजशिक्का चालविणे. महिनाभर फौज उतरण्याजोगे पाणी होत नाही.
कुंजपुऱ्यास समदखानाचे पारिपत्य करू, अब्दाली तिकडे आला तर उत्तम, न आलीया फिरोन घेऊ. लिहिल्याप्रमाणे तुम्ही शह देणे. जाठ आपलाच आहे. वसवास नाही.”
पत्र बरेच मोठे आहे परंतु यातून बऱ्याच गोष्टी निदर्शनास येतात त्या अशा की, –
- अब्दालीसोबत लढण्यासाठी भाऊंच्याकडे एक योजना होती. पानिपत झाले हा केवळ नशीबाचा भाग. नाहीतर कुंजपुरा जिंकून वरून अब्दालीवर हल्ला करायचा भाऊंचा स्पष्ट डाव दिसून येतो.
- भाऊ अविचारी नव्हते हेसुद्धा निदर्शनास येते कारण, कुंजपुरासारखा धाडसी हल्ला करताना त्यानी अब्दाली गोविंदपंत यांच्याकडे न जाता आपल्याकडेसुद्धा येऊ शकतो आणि इकडे युद्ध होऊ शकते याचे त्यांना पूर्ण भान होते.
- भाऊ गनिमी काव्याच्या विरोधात होते असे अनेक जणांचे म्हणणे असते आणि ते पानिपतच्या पराभवातून येणे हे साहजिक आहे परंतु इथे स्वतःच भाऊ गोविंदपंताना, “गनिमी मेहनत करून” असा सल्ला देतात यावरून ते कमीतकमी गनिमी काव्याच्या विरोधात नसावे हे कळून येते.
- जाठ आपलाच आहे, वसवास नाही यावरून जाठ हे मराठ्यांच्या बाजूने असावे किंवा मराठ्यांना ते मदत करत असावेत असे वाटते.
त्यामुळे “काबिले ग्वालेरीस ठेवले नाही, मीर शाहबुदिन यांस वजिरी दिली नाही, सभागृहातील छत काढून त्याची नाणी पाडली आणि दिल्लीचा बंदोबस्त जाठांकडे दिला नाही” यावरून जाठ रुसून बसला या पानिपत बखरकार काशीरायाच्या विधानांवर पुनश्च विचार करावा लागतो.
कदाचित ‘रसद पोचण्यास जाठ तुम्हास त्रास देणार नाही’ या इशारावजा वाक्यावरून तत्कालीन लोकांमध्ये जाठ रुसला आहे अशी भावना निर्माण झाली असावी.”
सप्टेंबरमध्ये कुंजपुरा मोहीम करायची असे ठरल्यानंतर, काहींनी पुढे जाऊन सोनपत आणि बागपत अशी ठाणी हस्तगत केली. पानिपत जिंकल्यानंतर बळवंतराव मेहेंदळे भाऊ यांना लिहितो की,
“कुंजपुऱ्यास जाण्यास पानिपतपावेतो येऊन पोचले, व लोकांस तफावत आहे. नदीस पाणी आठ चार दिवस उतरावयास पाहिजेत. गिलच्यांची फौज दिल्लीजवळ पलीकडे ये काठीच आहे. कूच करून पलीकडे तीराने येणार होते. प्रस्तुत लष्करात खर्चाची निकड फारच आहे. आम्हासारख्यांनी वस्त्या मोडून खादल्या. सर्वही पेच श्रीमंतांचे प्रतापे वारतील. एक भाऊसाहेबांची हिंम्मत व लोकांवर उत्तम दृष्टी आहे, येणेकरून फत्त्तेच आहे.”
तसे बघायला गेले तर कुंजपुरा काबीज करण्यामागे मराठ्यांचे दोन हेतू होते. एक म्हणजे सध्या ज्या ठिकाणी अब्दाली आहे त्या ठिकाणी अब्दालीवर मागून हल्ला करणे शक्य होणार होते आणि दुसरे म्हणजे अब्दालीच्या स्वगृही जाण्याच्या मार्गावर अडथळे येणार होते. तसेच स्वदेशातून जी मदत त्यास रसद स्वरूपात मिळत होती त्यावर बंधने येणार होती. त्यामुळे कुंजपुरा येथील मोहीम ही अनाठयी होती असे म्हणता येणार नाही.
अब्दालीला जेव्हा ही माहिती कळली तेव्हा मात्र त्याच धाबे दणाणले आणि त्याने कुंजपुरा येथील अधिकारी असलेल्या खानास पत्र पाठवले की फौज मदतीसाठी पाठवत आहोत तर मदत येईपर्यंत टिकाव धरा. मात्र मराठ्यांच्या हाती ते पत्र लागले आणि लगेचच दोन-तीन दिवसात इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याकडून जोराचा मारा झाला आणि किल्ल्याला भगदाड पडले.
शिंदे तर दत्ताजीच्या मरणाचा बदला घेण्यासाठी त्वेषाने लढत होते. दामाजींनी किल्ल्याला पडलेल्या भगदाडातून घोडे आत घातले. त्या हर हर महादेवाच्या घोषणांतून किल्ला आणि शहर लगेचच ताब्यात आले.
कुतुबशाह आणि अब्दूस्समदखान हे मराठ्यांच्या हाती सापडले आणि दामाजीने त्यांना हत्तीवर बसवून सदाशिवरावांकडे पाठवले.
अब्दालीने केलेल्या दत्ताजीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाऊने दोघांचे मुंडके छाटण्याचा आदेश दिला. नजाबतखानाने अब्दालीसाठी ठेवलेली मोठी रसद मराठ्यांच्या हाती लागली.
पूर्वी लुटलेला जव्हेरगज नावाचा शिंद्यांचा हत्तीसुद्धा मराठ्यांच्या हाती लागला आणि दत्ताजीच्या वधाचा बदला घेतल्याचे समाधान शिंदेना मिळाले आणि मराठी सैनिकांमध्ये मोठे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

शरण आलेल्या किंवा युद्धात कैदी सापडलेल्या सैनिकांना मारण्याचा मराठ्यांचा रिवाज नव्हता. त्यामुळे शिंदे, होळकर इत्यादी सरदार भाऊंना असे करू नका असे सांगत होते परंतु भाऊंनी कुणाचेही न ऐकता या दोघांची हत्या केली.
कदाचित यामुळेच चिडून अब्दालीने जेव्हा मराठ्यांचे सैन्य त्याच्या हाती लागले तेव्हा त्यांना जिवंत नाही सोडले. त्यावेळी कसेही असले तरी ते कृत्य हे वाईटच होते आणि कदाचित त्याच क्षणाला पानिपतची खरी ठिणगी पडली असावी.
१७ ऑक्टोबर रोजी कुंजपुऱ्याचे युद्ध झाले, आणि २३ ऑक्टोबर रोजी नाना पुरंदरे याने पुण्यास पत्र लिहून कळवले की,
“दिल्लीचा बंदोबस्त करून श्रीमंत कुंजपुऱ्यास आले. अब्दालीकडील दहा हजार फौज, समदखान, कुत्बखान होते, त्यांजवर हल्ला करून झुंज झाले. मोडले, गोठ लुटला. तसेच हल्ला करून गाव घेतला. लोकांस लूट पुरती घोडा, उंट विगेरे मिळाले. दाणादुणा लष्करास मिळाला. आपल्याकडील सर्व ब्राह्मण मराठे मंडळी खुश आहेत. तुम्ही झुंजाच्या खबरी भलत्या ऐकाल. घाबरे व्हाल, मातुश्री चिंता करतील यास्तव लिहित आहे.”
कुंजपुऱ्यास जाऊ नये असे जाठ सदाशिवरावांना सांगत होता परंतु त्यांनी ते मानले नाही. कदाचित कुंजपुऱ्यावर आक्रमण न करता जर दिल्लीस राहिले असते किंवा कुंजपुऱ्यावर जाऊन परत लगेच माघारी आले असते तर कदाचित युद्धाचा प्रसंग टाळता आला असता.
पण इतिहासात जर तर ला अर्थ काहीच नसतो त्यामुळे जे झाले ते आपल्याला स्वीकारावेच लागते.
पानिपत होण्याची कारणे अनेक असली तरी कुंजपुऱ्याचे युद्ध मात्र प्रमुख कारण होते हे विसरून चालणार नाही.
हरलो नाही तर मरेपर्यंत लढलो', 'पानिपत'चा पराभव मराठ्यांचे शौर्य सांगून गेला
दिल्लीपासून सुमारे 90 किमी अंतरावरील ‘पानिपत’ या कुरक्षेत्राच्या शेजारच्या मोकळ्या मैदानावर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अफगाणिस्थानचा दुराणी बादशहा अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. देशावरचे परचक्र परतवून लावण्याच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातली एक अखंड पिढी गारद झाली. यात मराठ्यांचा दारुण पराभव झाला असला, तरीही त्यांनी दाखविलेले शौर्य जगभरात वाखाणले गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खैबरखिंड ओलांडून भारतात होणाºया परकीय आक्रमणांना कायमचा आळा बसला. १७६१नंतर येथून एकही परकीय आक्रमक भारतावर चालून आला नाही. त्यामुळे पूर्वीच्या दोन लढायांप्रमाणेच १७६१ सालच्या पनिपताच्या तिसºया लढाईतही स्वकीय सत्तेचा पराभव होऊनही, मराठ्याच्या रक्ताने शिंपलेली ही भूमी भारतीयांसाठी पुण्यभूच ठरते!
पानिपतचे तिस-या युद्धाने मराठ्यांच्या आणि एकंदरीतच भारतवर्षाच्या इतिहासाला कलाटणी दिली. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव इतका दारुण होता की, अक्षरश: पराभवाची आठवण वा उच्चारही नकोसा वाटतो. या लढाईचा उल्लेख मोठा पराभव झाल्याचा दाखल देत 'पानिपत होणे' हा शब्दप्रयोग वापरून केला जातो. पानिपतचे युद्ध मराठे हरले असले, तरी त्यांनी अब्दालीचा ज्याप्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनही मराठे परत उभे राहिले. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानावर असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता की, जेणेकरून नंतर ब्रिटिशांचा विजय अशक्य झाला असता.
हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवछत्रपतींनी केली, हे आपण जाणतोच. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. समकालीन जुलमी सत्ताधाऱ्यांपासून महाराष्ट्र भूमीला मुक्त करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांना साम्राज्यतृष्णा नव्हती व ते सत्तापिपासू नव्हते. त्यामुळेच त्यांनी उत्तरेतून दक्षिणेत येऊन दक्षिणेतल्या विजापूर आणि गोवळकोंडा येथील पातशहांचा नाश करू इच्छिणाऱ्या औरंगजेबाच्या विरुद्ध दक्षिणेतल्या राज्यांचा संघ उभारून त्याचा प्रतिकार करण्याची कल्पना मांडली. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हातमिळवणी करत दक्षिणेत दक्षिणेतील लोकांची सत्ता असा महाराजांचा आग्रह होता.
अब्दालीने १७५९मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील प्रांतांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. अब्दालीचे हे हल्ले म्हणजे त्याने सरळ सरळ मराठ्यांशी वैर पत्करल्याची ग्वाही देत होते. दिवसागणिक अहमदशहा अब्दालीचा उपद्रव वाढत चालला होता. याला वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा उत्तरेतील साम्राज्य हातून जाईल हा विचार करून 1 लाखाहून अधिकची फौज घेऊन सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पानिपताच्या दिशेने कूच केले. या फौजेला वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले, आदी सरदार येऊन मिळाले. भाऊसाहेबांनी सर्वप्रथम दिल्लीचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर कुंजपुराच्या चकमकीमध्ये मराठ्यांनी नजीम खानाच्या सैन्याला मात देत काही रसद मिळविली. याच दरम्यान, अब्दालीने बाघपत येथून यमुना ओलांडली आणि मराठ्यांचा दिल्लीशी संपर्क तोडला.
या वेळी मराठ्यांनी आपला तळ पानिपत येथे टाकला. अब्दालीने मुख्य मराठा सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणणाऱ्या गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला. या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पुरवठा ठप्प झाला आणि मराठी सैन्याची उपासमार होऊ लागली. पुढे दोन महिने दोन्ही पक्षांमध्ये लहानमोठ्या चकमकी झडतच होत्या. उपासमारीने हैराण झालेल्या सैन्यासह भाऊंसाहेबांनी अखेर स्वत:हून पहिले पाऊल उचलले. 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली. तोफखाना दलाचा प्रमुख इब्राहीम खान या गारद्याच्या तुकडीला पुढे ठेवून मराठ्यांनी गोलाच्या लढाईला प्रारंभ केला. भाऊंच्या सैन्याने मध्यातून हल्ला चढविला. अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वाट न बघता जोरदार आक्रमण केले. परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते. त्यांनी हाय खाल्ली.
बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठे रणांगणावर अजूनही वर्चस्व राखून होते. येथवर सर्व ठीक होते. असेच सुरु राहिले असते तर मराठ्यांनी पानिपतामध्ये विजय देखील संपादन केला होता, पण या क्षणी अब्दालीने त्याचे १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरुपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला. अब्दालीच्या या एका चालीमुळे दृष्टीक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला. थकल्या भागलेल्या मराठी सैन्याला नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण येऊ लागली. मराठे कधी नव्हे ते मागे हटू लागले. कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी याच निर्णायक क्षणी उठाव केला. मराठे पुरते गोंधळात पडले. ही गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी भाऊंनी आपली राखीव सेना पुढे न आणण्याची चूक केली आणि ते स्वत: हत्तीवरून उतरून अफगाण्यांना कापू लागले. लढणाऱ्या मराठी सैन्याच्या हे लक्षात आले नाही. त्यांची हत्तीकडे नजर जाताच त्यावर भाऊ न दिसल्याने त्यांना वाटले की सदाशिव भाऊ पडले.
भाऊ पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांनी आशा सोडली. अफगाण सैन्याच्या गर्दीत लढताना भाऊंना शेवटचे नाना फडणीस यांनी पाहिले होते. याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले. आपला पराभव झाला असे समजून अर्ध्याअधिक मराठी सैन्याने माघार घेतली. तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या. पण जसजशी रात्र झाली तसतसे ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या. अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचे पानिपत झाले. पानिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीम खान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमावली. जणू मराठ्यांची कर्तबगार पिढी संपुष्टात आली. यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तुत्व दाखवत पानिपताचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्याने मराठी साम्राज्याची पताका खाली आली.
इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात आपले पाय रोवले. असे हे पानिपतचे तिसरे युद्ध घडले आणि 14 जानेवारीचा हा दिवस मराठी इतिहासात काळ्याकुट्ट आठवणी सोडून गेला. पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे. पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावता आला नाही आणि तेथे त्यांचा दारुण पराभव झाला, हे जरी खरे असले तरी त्यामुळे मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही. या मराठे त्वेषाने लढले. जगाला मराठ्यांच्या शौर्याचे दर्शन घडले.
पानिपतच्या लढाईचे परिणाम?



पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे
पानिपत ची तिसरे युद्ध मराठा साम्राज्य सेनापती सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाले.
१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे दिल्लीच्या उत्तरेस सुमारे ९७ किमी अंतरावर उत्तरेत, मराठा साम्राज्याच्या एका उत्तरी मोहीम दरम्यान या युद्धाचा सुरुंग पेटला.
हे युद्ध अफगाणिस्तानचा अब्दाली आणि नजीब–उद-दौला
यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीची पातशाही टिकवण्यासाठी मराठ्यांबरोबर झाले.
ही लढाई 18 व्या शतकात लढलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्त्वाच्या
युद्ध घटनांपैकी एक मानली जाते.
पानिपत तिसरे युद्ध सैन्य संख्या
दुराणी सैन्य संख्या:
४२,००० घोडदळ
४३,००० पायदळ
१०,००० राखीव
४,००० वैयक्तिक रक्षक
तोफांच्या 120-130 तुकड्या
संपूर्ण सैन्य 100,000
मराठा
२०,००० घोडदळ
१५,००० पायदळ
१५,००० पिंडारी
२०० तोफा .
या सैन्यापाशी २,००,००० (यात्रेकरू आणि अनुयायी)
संपूर्ण सैन्य ५०,००० ते ७०,०००
पानिपत युद्ध नुकसान
दुराणी सैन्य हानी
अंदाजे २०,००० ते ३०,००० लढाऊ मृत
मराठा सैन्य हानी
युद्धामध्ये ३०,००० ते ४०,००० लढाऊ लोक मारले गेले लढाईनंतर आणखी ४०,००० – ७०,००० लोकांना कैद करून मारण्यात आले.
अहमद शाह दुराणी यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने मराठा तुकड्यावर वर्चस्व प्रस्थापित करत विजय मिळवला. सुजाचा दिवाण काशीराजच्या बखरीनुसार युद्धानंतरच्या दुसऱ्या दिवशी सुमारे ४०,००० मराठा कैद्यांना मारले गेले.
मराठ्यांचा इतिहास ही कादंबरी ग्रँट डफ यांनी हत्याकांडातून जिवंत वाचलेल्या लोकांच्या मुलाखतीतुन बनवली असुन त्यात सुद्धा एकूण १,००,००० मराठा युद्धकाळात मारले गेल्याचे लिहिलेले वाचायला मिळते.
पानिपत आधीचे मराठा साम्राज्य
बाजीराव पेशवे यांच्या काळात, गुजरात, माळवा आणि राजपुताना भाग मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला. अखेरीस, १७३७ मध्ये, बाजीरावांनी दिल्लीच्या बाहेरील मोगलांचा पराभव करत दिल्लीच्या दक्षिणेकडील मुघल प्रदेशांचे बरेचसे भाग आपल्या ताब्यात घेतले. १७५८ मध्ये पंजाबवर आक्रमण करून बाजीराव यांचा मुलगा बालाजी बाजीराव पेशवे म्हणजेच नानासाहेब यांनी मराठ्यांच्या ताब्यात असलेला प्रदेश लाहोर पर्यंतच्या सीमेवर वाढवत नेला. मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला हा शब्दप्रयोग यावरून प्रचलित आला. मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीच्या दुराणी साम्राज्यांशी प्रत्यक्षपणे पंगा घेतला. १७५९ मध्ये अब्दालीने पश्तून आणि बलूच जमातींमधून एक सैन्य उभे केले आणि पंजाबातील लहान मराठा चौक्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ते आपल्या भारतीय सहयोगींसह रोहिल्ला अफगाणांसोबत मराठ्यांविरुद्ध व्यापक युती करत मराठ्यापुढे येऊन उभे ठाकले.
पानिपत लढाई स्वारी
सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी ४५,००० ते ६०,००० दरम्यान सैन्य एकत्र केले. सुमारे २,००,००० यात्रेकरूंचा भार सांभाळत भाऊंनी उत्तरेत कूच केली. त्यातील बहुतेक यात्रेकरू ते उत्तर भारतात हिंदू पवित्र स्थळांच्या यात्रेसाठी उत्सुक होते. हेच यात्रेकरूंचे ओझे पानिपत युद्धात मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
भाऊंनी उत्तरेत कूच करत आपल्या सैन्यानिशी दिल्लीवर हल्ला करत दिल्ली
आपल्या ताब्यात घेतली. परंतु यमुनेला पुर असल्याने अब्दाली आणि।मराठा
सैन्य एकमेकांचा सामना करू शकत नव्हते. त्यात दिल्ली कायमच्या लुटमारीमुळे
भकास झाली होती. त्यामुळे मराठ्यांचा उपवास व्हायला लागला. भाऊंनी यावर उपाय काढत आपला तळ कुंजपुरा जिंकण्यासाठी हलवला. आपल्या कुशाग्र बुद्धी आणि तोफांच्या सोबतीने मराठ्यांनी कुंजपुरा आरामात जिंकला. परंतु इकडे अब्दालीच्या सैन्याने यमुनेला ओलांडले. अब्दाली ला लढा देण्यासाठी भाऊंनी माघारी वळत आपला तळ पानिपत मध्ये वळवत तिथेच ठाण मांडुन बचावात्मक पवित्रा घेऊन थांबले.
परंतु पानिपत मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे आणि रसद पुरवठा खंडामुळे
सैन्याचा उपास घडु लागला. त्यात मराठ्यांची प्रचंड हानी झाली. अखेर लढाईचा
पवित्रा घेत पेशवा सेनापती भाऊंनी पानिपत लढाईचा शंख फुंकला.
पानिपत लढाई सुरुवात
सदाशिवरावरावभाऊ पेशवे यांनी आपले सरदार मल्हारराव होळकर यांनी उजवी बाजु त्याबाजुला शिंदे सरदार आणि मध्यभागी पेशवे सैनिक अशी मांडणी करत डाव्या बाजुला दमाजी, विठ्ठल शिवदेव, यशवंत पवार व अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या लावल्या. डाव्या बाजूची कमान इब्राहिम गारदी यांनी तोफा आणि जंबुरा च्या साहाय्याने सांभाळली. सैन्याच्या पाठोपाठ यात्रेकरू आणि खाशे मंडळी होती.
इब्राहिम गारदी ने आपली मर्दुमकी दाखवत अब्दाली च्या सैन्याला खिंडार पाडले.
दुपारपर्यंत मराठ्यांनी आपली पकड मजबुत ठेवत लढाईत वर्चस्व मिळवले होते. परंतु कित्येक दिवस भुकेने व्याकुळलेले सैन्य कोलमडू लागले. त्यात काही सरदारांनी उतावळेपणा करीत ठरलेल्या योजनेविरुद्ध पाऊले टाकत नामुष्की ओढवून घेतली.
अखेरच्या टप्प्यात मराठ्यांच्या शिंदे तुकडीने नजीब वर हल्ला केला. नजीब यशस्वीरित्या एक बचावात्मक लढा देत राहिला. अफगाण सैन्याची डावी तुकडी अभेद्य राहत मध्यभागी भाऊंनी अफगाण सैन्याला भगदाड पाडले. उजवीकडचे सैन्य जवळजवळ नष्ट झाले होते.
अहमद शाह अब्दाली आपल्या तंबूतून युद्ध पाहत होता, त्याच्या डाव्या बाजूला अजूनही अखंड संरक्षण उभे होते. अब्दाली ने दुपारनंतर आपली राखीव फौज बाहेर काढत दमलेल्या मराठा सैनिकांना दमछाक करून टाकले.
पानिपत लढाई चा शेवट
सदाशिवराव भाऊ यांनी आपली मधील बाजु ढासळताना दिसत असल्याने आणि विश्वासराव लढाईत गायब झाल्याने त्यांनी हत्तीवरून उतरून स्वतः मैदानावर लढू लागले.
विश्वासराव आधीच डोक्यावर गोळी लागून मृत्युमुखी पडले होते. विश्वासरावांच्या पडण्याने मराठा सैन्य गळून पडले, तरीही भाऊ आणि त्यांचे निष्ठावंत अंगरक्षक अखेरीपर्यंत लढा देत राहिले. भाऊंनी आपले युद्धकौशल्य दाखवत अनेक अफगाणांना गारद करत युद्धभूमीत जीव सोडला. याआधीच एक बाजु सांभाळणाऱ्या होळकर यांना युद्धाच्या परिणामांची जाणीव झाली आणि त्यांनी त्यातून पळ काढत आपले सैन्य वाचवले. अखेर मराठ्यांचा या लढाईत पराभव झाला.
मल्हारराव होळकर यांनी जवळपास १५,००० सैनिक घेत ग्वाल्हेर गाठले. त्यात सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वती यांना वाचवण्यात ते यशस्वी झाले.
पानिपत लढाई नंतरचा नरसंहार
अफगाण घोडदळ व पायदळाने पानिपत च्या परिसरात फिरून वाचलेल्या मराठा सैनिक व नागरिकांना शोधून ठार मारले. पानिपत मध्ये आश्रय घेणार्या महिला आणि मुलांना गुलाम बनवून अफगाण छावणीत डांबून ठेवले. १४ वय पूर्ण असलेल्या मुलांचा त्यांच्या स्वत:च्या माता-भगिनींच्या समोर शिरच्छेद केला. युद्धात मरण पावलेल्या अफगाणिस्तानच्या सैनिकांना पानिपत आणि आसपासच्या परिसरात पुढील दिवशी वाचलेल्या मराठ्यांची कत्तली करण्याची अनुमती देण्यात आली. सुजा-उद-दौला चा दिवाण काशीराज यांच्या बखरीनुसार युद्धानंतरच्या दिवशी सुमारे ४०,००० मराठा कैद्यांची कत्तल करण्यात आली.
पानिपत नंतरचे मराठा साम्राज्य
पेशवे बालाजी बाजीराव, यांना सैन्याच्या अवस्थेबाबत माहिती नसल्याने, त्यांनी पराभवाच्या वेळी नर्मदा ओलांडली होती. परंतु विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते न सावरता पुण्याला माघारी परतले. सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूने ते पूर्णपणे खचून गेले होते त्यात २३ जुन १७६१ रोजी त्यांचे निधन झाले.
जनकोजी शिंदे यांना कैद करण्यात करण्यात आले होते आणि नंतर अत्याचार करत त्यांना मारण्यात आले. नजीबच्या आग्रहाखातर इब्राहिम खान गारदी ला अत्याचार करून अफ़ग़ान सैनिकांनी ठार केले.
पानिपत लढाई परिणाम
लढाईचा परिणाम म्हणजे उत्तरेकडील मराठांच्या विस्तारीकरणावर विपरित परिणाम झाला. पुढील काळात पेशवा माधवराव यांचे शासन आल्यावर मराठा साम्राज्य पुन्हा अस्तित्वात आले. त्यांनी १७७१ मध्ये पानिपत च्या दहा वर्षांनंतर मराठा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि रोहल्या सारख्या अफगाणिस्तानच्या बाजूने असलेल्या अफगाणिस्तरीय शक्तींना शिक्षा देण्याच्या उद्देशाने उत्तर भारतात मोठे मराठा सैन्य पाठवून दिले. पानिपत नंतर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित होण्यास यामुळे पुन्हा सुरुवात झाली. मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली. या मोहिमेतील यश पानिपतच्या दीर्घ कथेचा शेवट म्हणून ओळखला जाऊ शकतो.
©PuneriSpeaks
पानिपत | पराजयातला असामान्य विजय | Discover Maharashtra

पानिपत | पराजयातला असामान्य विजय –
पानिपत….जे नाव नुसत वाचलं/ऐकल तरी कित्येक मराठ्यांच्या(हिंदवी स्वराज्याचे सेवक मग ते कोणत्याही जाती चे असो) काळजात कुठे ना कुठे एक ठोका चुकतोच अन अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. इतकंच काय तर पानिपतचे नाव जरी उच्चारले तरी प्रत्येक मराठी माणसाच अंतर्मन अक्षरशः गदगदून येते. पानिपतच्या रणसंग्रामाची ‘सल’आज ही मराठी हृदयात लामणदिव्यासारखं मंद चिरकाल तेवत आहे. पानिपतमध्ये झालेला पराभव इतका दारुण होता व त्यामुळे झालेले नुकसान इतके भयंकर होते की त्या पराभवाची आठवण वा उच्चारनेसुद्धा काळजाचा थरकाप उडतो. ‘पानिपत होणे’ हा शब्दप्रयोग मराठी भाषेत सर्वनाश या अर्थाने रूढ झाला आहे. म्हणजेच या युद्धाची हानी आणि या पराभवाचे गांभीर्य काय आणि किती होते हे वेगळे सांगायची गरज नसावी. पानिपतचा पराभव ही मराठा आणि भारताच्या इतिहासातील खूप मोठ्ठी शोकांतिकाच होती.
पानिपतची लढाई म्हणजे भारताच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील अशी मोक्याची किंवा निर्णायक घटना होती की ती जिंकली असती तर मराठा साम्राज्याची सत्ता एक महासत्ता म्हणून उदयास आली असती. फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी इतिहासकारांच्या मते हे युद्ध जर मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानावर असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता तोही इतका की की, ब्रिटिशांचं भारतातील आक्रमण देखील मराठ्यांनी सहजच उलथवून लावलं असतं. दुर्दैवाने हे युद्ध मराठ्यांना जिंकता आले नाही व त्यांच्या पराभवाची अंतिम परिणती हिंदुस्थानवर ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्यात झाली. पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अहमद शाह अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली ज्याने मराठ्यांना हरवून देखील भारतात परत आलाच नाही किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले. अगदी १८५७ च्या उठावाच्या वेळीदेखील ब्रिटिशांना शेवटपर्यंत अडवून ठेवणारे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे या मराठा लढवय्यांना हरवूनच भारतावर सत्ता प्रस्थापित केली.
इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. हर हर महादेव ची गगनभेदी गर्जना करत मराठी सैन्य शत्रूला भिडले. रणांगणावर तलवारीच्या खणाखनीने, घोड्यांच्या खिकाळ्यानी आणि वीरांच्या घोषणांनी नुसता हाहाकार माजवला. एका प्रहारापुर्वी निपचित पडलेल्या घाटाचे रूप पार पालटून गेले.
मराठ्यांकडे बंदुका नव्हत्याच. त्यात अब्दालीचे सैन्य म्हणजे ताज्या दमाचे अफगाण पठाण. त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यापुढे तलवारीने लढणारे मराठे किती काल तग धरणार? एक एक मराठा सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा नुसता खच घाटात पसरलेला दिसू लागला. पण दत्ताजीला तर फक्त समोर येणारा अफगाण आणि त्याची मुंडी दिसत होती. त्याची तलवार विजेसारखी चालत होती. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली.
विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. अब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. नाजीब्चा गुरु कुतुबशहा ह्याला जनकोजी ने जमादाडा ने कापून काढले. ह्याच कुतुबशहा ने दत्ताजी शिंदेचा वध केला होता. सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा सख्खा चुलतभाऊ नाजाबतखान ह्यांना समाधी दिली. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले. गुलाबसिंग गुजर ह्याने अब्दाली ला सांगितले की गौरीपूरला गचका उतार आहे. अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. अब्दालीला रोकण्यात सखरोजी पाटील सातशे स्वारांच्या पथका समवेत शहीद झाला. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला.
२६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला.
मराठ्यांची उपासमार होऊ लागली. पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. अब्दालीला मराठ्यांच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते. अब्दाली ने संधी करायचा प्रयत्न केला परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले.
मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदारयांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.परंतु दुपारी मराठी सैन्यच तोफखाण्या समोर आल्यामुळे तोफखाना बंद करावा लागला.यामुळेच युद्धाचे परिणाम बदलले,म्हणजेच युद्धाने पक्ष पात केला असे म्हणायाला हरकत नाही. दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही. शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता.
मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्याअ उंटांवरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले. भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.
पानिपतावर मराठे जरी हिंदुस्थानच प्रतिनिधित्व करत असले तरी मराठे विरुद्ध अफगाणिस्तान असे युद्ध झाले. कारण, या युद्धात केवळ महाराष्ट्रातील रांगडे, शूर मराठेच लढले. त्यांच्या शौर्याने, हौतात्म्याने मराठ्यांच नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले. पानिपत च्या युध्द भूमीवर झालेल्या तीन युद्धांनी भारताचा सर्व इतिहासच बदलून टाकला कारण तिन्ही युध्दात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या महायुद्धाने हिंदुस्थानात मुघल राजवटीचा उदय झाला. दुसऱ्या युद्धात अकबराने हेमू या हिंदू राजाची हत्या करून मुघल बादशाही अधिक बळकट केली, तर तिसऱ्या आणि सर्वाधीक विध्वंसक ठरलेल्या तिसऱ्या युद्धाने महाराष्ट्रधर्माला, मराठाशाहीला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. कित्येक परदेशी इतिहासकार पानिपतावरील मराठा पराक्रमाचे गोडवे गात असताना दुर्दैवाने काही भारतीय लेखक आणि स्वयंघोषित इतिहासकार पानिपत हे मराठे आणि महाराष्ट्रावरील कलंक आणि अपयश असल्याचे मानतात.
नुसता इतिहास वाचलाय अश्या बहद्दरांना अपयश दिसेल पण ज्यांनी त्यावेळची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती समजली असेल त्यांना मात्र परभावमध्ये लपलेला मराठ्यांच्या कर्तृत्ववाचा आणि शौर्याचा मोठा विजय दिसून येईल. वास्तविक पाहता दिल्लीत मुसलमानी राजवट असताना शेकडो मैल दूर असलेल्या पुण्यावरून मराठा लष्कराला पानिपतावर जाण्याची मुळीच गरज नव्हती. खरे तर दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मुघलांची हुजरेगिरी, गुलामगिरी करणारे, त्यांच्या बाजूने लढणारे तत्कालीन राजपूत, जाट, मुस्लिम संस्थानिक, राजेरजवाड्यांची होती. दिल्लीच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या मराठ्यांना मदत न करता बिळात लपून बसणाऱ्या वर उल्लेखित सर्वांसाठी पानिपत हे कलंक आहे. या भूमीचे अन्न खाल्लेला, तिच्यावर पोसला गेलेला रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी मराठ्यांच्या राष्ट्रधर्माची बाजू न घेता आपल्या धर्माची तळी उचलून धरत देशाशी बेइमानी केली. त्यामुळे पानिपतचा कलंक हा मराठ्यांवर नव्हे, तर या सर्व बेइमानांवर आहे. पानिपतावर मराठे प्राणाची आहुती देत असताना महाराष्ट्र वगळता उर्वरित हिंदुस्थानातील तथाकथित ‘पराक्रमी’ राजे-महाराजे, संस्थानिक गंमत पाहत होते. धर्माने मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाचे राज्य शाबूत ठेवण्यासाठी लाखभर मराठ्यांनी मैदानावर जिवाची जी होळी खेळली, त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही.
अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली, भारतातील बेइमान नजीबखान रोहिला आणि अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी हे युद्ध धर्मासाठी लढले. मोगल बादशहाची बहुसंख्य प्रजा हिंदूधर्मीय असली तरी मोगल दरबारात हिंदूंचे वर्चस्व कधीच नव्हते. मराठ्यांमुळे आता दिल्लीच्या पातशाहीच्या कारभारात हिंदूंचे वर्चस्व वाढत आहे अशा शंकेने व्याकूळ झालेल्या काही कट्टर मुसलमानांनी मराठ्यांनी नर्मदापार होऊन महाराष्ट्रात परतावे यासाठी अहमदशहा अब्दालीच्या धर्मभावनेस आवाहन करून हिंदुस्थानवर स्वारी करण्याची जणू official सुपारी दिली. या कारस्थानात मुस्लीम विचारवंत व धर्मगुरू शहा वली उल्लाह हा प्रमुख असून रोहिल्यांपैकी नजीबखानाने त्याला राजकारणातील साथ दिली. अब्दालीला यात लूट तर मिळणार होतीच, परंतु धर्मरक्षणाचे पुण्यही मिळणार होते. परंतु, मराठ्यांनी देशासाठी युद्ध केले. कारण, मराठ्यांचे लष्कर हे अठरापगड जातींचे होते. त्यात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार शिपाई सहभागी झाले होते.
भगवा झेंड्याच्या रक्षणासाठी मुस्लिम असलेल्या इब्राहिम खान गारद्याने धर्मासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. सदाशिवराव भाऊने तर पानिपतावर अभिमन्यूप्रमाणे लढताना अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांच्या शौर्याला तोड नाही. अनेक सरदार त्यांना रणांगण सोडण्याचे सल्ले देत असताना भाऊने देशकार्यासाठी मरण पत्करण पसंत केले. शहाण्णवकुळी मराठ्यातील असे एकही घराणे नव्हते की, ज्याने पानिपतावर तलवार गाजविली नाही. शिंदे घराण्याच्या अख्ख्या एका पिढीनेच पानिपतावर हौतात्म्य पत्करले. या युद्धाचे नेतृत्व अनुभवी दत्ताजी शिंदे अथवा मल्हारराव होळकर यांच्याकडे असते तर युद्धाचा निर्णय वेगळा लागला असता. आणि या धोरणावर फक्त सदाशिवराव आणि विश्वासराव यांच्या मुळे पराभव झाला एकेरी तर्क लावून जर इतिहास मांडत असू तर पेशव्यांच्यासहित मराठा, ब्राह्मण, धनगर, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार जाती जमातींचे शिपाई यांच्या बरोबर इब्राहिम खान गारदी यांच्या देशभक्तीला आणि पराक्रमाला गालबोट लावण्यासारखे आहे.
पानिपत च्या पराभवाची कारणं तुम्ही शोधाल तेवढी मिळतील पण शौर्य आणि पराक्रमाच कौतुक करताना हात का आखडता घ्यावा. अनेक लोकांच अस म्हणण आहे कि झाला तो इतिहास होता तो इतिहासातच ठेवा आजच काय ते बोला, पण मी म्हणतो मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा ,त्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास,त्यांचे बलिदान नव्या पिढीला कसे कळणार. त्यांचे हे कार्य विसरून कसे चालेल,ह्याचा अभिमान बाळगायला हवा,त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पराभवानंतरही खचून न जाता घेतलेली गरुडझेप ह्यापासून आपण काहीतरी स्फुर्ती,प्रेरणा घ्यायला हवी. मरणासन्न अवस्थेत असून देखील दत्तोजी शिंदे यांची नजर तलवारीच्या शोधतच होती.
नजीबाने दत्तोजी च्या मानेवर जमदाडा ठेवत खोचक पणे प्रश्न विचारला “क्यू पाटील, और लडोगे?” हे ऐकताच उरलेली ताकद ऐकवतात रणशूर दत्ताजीने वाघासारखी डरकाळी फोडली, “क्यो नही, बचेंगे तो और भी लडेंगे!” एवढा जबरदस्त confidence तोही ताज्या दमाच्या अफगाणी फौजांपुढे परमुलखात जाऊन मराठी फौजांनी अतुलनीय शोर्य गाजवले आणि मराठी माणसाच्या लढवय्या बाण्याचे दर्शन शत्रूला घडवले हे नाकारून चालणार नाही. वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अनंत अडचणींना तोंड देत,हिदुंस्थानासाठी मायभूमीपासून इतक्या दूर जाऊन अगदी धीरोदात्तपणे झुंझार लढा देवून वीरगती पत्करलेल्या तरीही त्याच्या मायभूमीने वेडा ठरवलेल्या,दुर्दैवाने एका मोठ्या शोकांतिकेचा धनी बनलेल्या, पानिपत च्या रणभूमीवर आजही एखाद्या कोपरयावर विचारमग्न होउन बसलेल्या भाऊच्या मनावरील भार आपल्याला थोडा कां होईना कमी करायचा आहे, म्हणूनच कित्येक इतिहासकारांनी पानिपतचे वर्णन “पराजयातला असामान्य विजय” असे केले आहे. काळ मागे पडत राहील, पण इतिहासात पाहिलं तर मराठी माणसाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दाखवलेलं असामान्य धैर्य नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील.
लेखन व माहिती संकलन – विजयश श्रीकांत भोसले
*१४ जानेवारी १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला*
*अन्यथा आज संपूर्ण आशिया खंड, इराण ते जापान, तिबेट ते कंबोडिया भारतीय मराठा साम्राज्य असते आणि मराठी ही जगातील क्रमांक एक ची भाषा असती ! अरेबियन सम्राज्य इतिहास जमा झाले असते !*
*मराठा साम्राज्य जगातील सुप्रीम पॉवर असते ! सातारचे छत्रपती हे सम्राट अशोकानंतर सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट झाले असते ! त्यांच्या आधिपत्याखाली जगातील बहुतांश छत्रपती राजांनी मांडलिकत्व स्वीकारले असते !*
पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
*पार्श्वभूमी*
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.
युद्धाआधीच्या घडामोडी
सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्याच इतिहासकारांचे मत आहे
अब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. नाजीब्चा गुरु कुतुबशहा ह्याला जनकोजी ने जमादाडा ने कापून काढले. ह्याच कुतुबशहा ने दत्ताजी शिंदेचा वध केला होता. सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा सख्खा चुलतभाऊ नाजाबतखान ह्यांना समाधी दिली. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले. गुलाबसिंग गुजर ह्याने अब्दाली ला सांगितले की गौरीपूरला गचका उतार आहे. अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. अब्दालीला रोकण्यात सखरोजी पाटील सातशे स्वारांच्या पथका समवेत शहीद झाला. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होऊ लागली.
पानिपतची कोंडी
पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते.
अब्दाली ने संधी करायचा प्रय्त्न केला परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले.
लढाई
व्यूहरचना
मराठे रणांगणाच्या उत्तरेस थांबले होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळीत होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरुण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.
अफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसर्या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौला व शाह वली यांनी मधली कमान संभाळली.
युद्धाची सुरुवात
मराठ्यांकडील अन्नसाठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहर्यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत.
मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.परंतु दुपारी मराठी सैन्यच तोफखाण्या समोर आल्यामुळे तोफखाना बंद करावा लागला.यामुळेच युद्धाचे परिणाम बदलले,म्हणजेच युद्धाने पक्ष पात केला असे म्हणायाला हरकत नाही. दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.
अंतिम सत्र
शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्याअ उंटांवरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.
अंतर्गत उठाव
कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले.
भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.
कत्तल
मराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरुवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले.
पळणार्या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदार व घोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरीत घडले तर त्यांच्या पत्नीला म्रुत्युदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या रक्षकांसोबत पुण्याला सुखरूप पोहोचल्या.
अफगाण्यांनी दुसर्या दिवशीपण (जानेवारी १५ला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व नागरिकांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.
युद्धाचे परिणाम
मराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रूपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला.
अब्दालीचा शेवटचा विजय: या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणार्या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लूट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.
नानासाहेबांचा मृत्यु : पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.
मोगलांची दुर्दशा: पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते.
इंग्रजांचा वाढता प्रभाव: नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणार्या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणार्य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले.
शीखांची सत्ता स्थापना: पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही पंजाब त्यांच्या मालकीचा होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली.
हैदरअलीचा उदय: पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे.
माधवराव पेशव्यांचा उदय: नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या संग्रामात लढता-लढता विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसर्या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.
उभयपक्षी चुका
युद्धव्यवस्थापन
अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते.
धार्मिक कारण
यातच पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाही जास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्यावेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेउन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या योजना बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही.
राजकारणात
मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० - ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सुर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही मराठ्यांना कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला
दुराण्यांच्या चुका
मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.
या युद्धाचा प्रभाव दैनंदिन जीवनात पण दिसून येतो. हे युद्ध म्हणजे महाराष्ट्रातील जनमानसात अपयशाचे प्रतिक आहे, अनेक म्हणी यामुळे मराठीत रूढ झाल्या आहेत. उदा: ´पानिपत झाले´(खूप नुकसान झाले),हे युद्ध संक्रातीच्या दिवशी झाल्यामुळे`संक्रांत कोसळली´ (खूप मोठे संकट आले) , ´विश्चास गेला पानिपतात` अश्या अनेक म्हणी तयार झाल्या आहेत.
काहींच्या मते युद्धात मराठे हरले तरी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे मोल कमी होत नाही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.
मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – विशाल दळवी
—
३ मार्च १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांना उत्तरेमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी चालून आली. १७५० च्या दशकामध्ये मराठ्यांनी उत्तरेकडील भागात अनेक मोहिमा पार पाडल्या. त्यांनी थेट ‘अटके’पार मराठा साम्राज्य वाढविले.
थोरले बाजीरावांची कारकीर्द संपेपर्यंत मराठ्यांनी एव्हाना भारतीय सीमा ओलांडत त्या पलीकडील इस्लामी राजवटींना देखील आव्हान देण्यास सुरुवात केली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
हे पाहून मराठ्यांचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे असे या राजवटींना वाटू लागले. १७५८ साली दिल्ली काबीज करत मराठ्यांनी अप्रत्यक्षरित्या अखंड भारत आपल्या कवेत घेतला. पंजाब आणि आसपासच्या प्रांताचा कारभार सांभाळणाऱ्या तिमूर शहा दुराणी याला देखील मराठ्यांनी पळवून लावले. हा तिमूरशहा दुराणी म्हणजे अहमदशहा अब्दालीचा थोरला पुत्र होय.
ही घटना म्हणजे मुस्लीम धर्मावरील संकट मानून चवताळलेल्या अब्दालीने आपल्या १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील प्रांतांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. अब्दालीचे हे हल्ले म्हणजे त्याने सरळ सरळ मराठ्यांशी वैर पत्करल्याची ग्वाही देत होते. दिवसागणिक अहमदशहा अब्दालीचा उपद्रव वाढत चालला होता.
याला वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा उत्तरेतील साम्राज्य हातून जाईल हा विचार करून १ लाखाहून अधिकची फौज घेऊन सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पानिपताच्या दिशेने कूच केले.
या फौजेला वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले, राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट येऊन मिळाल्याने मराठ्यांची ताकद शंभर पटींनी वाढली.
या युतीने सर्वप्रथम दिल्लीवर आक्रमण केले. विश्वासरावांना दिल्लीच्या गादीवर बसवण्याचा भाऊंचा इरादा होता. पुरेशी रसद नसल्यामुळे त्यांनी दिल्ली लुटायचा आदेश दिला आणि येथे अघटीत घडले. जाट आणि शिखांनी भाऊंचा हा देश अमान्य करीत आपले सैन्य माघारी फिरवले. बरेच जण पानिपताच्या संपूर्ण नाट्यामधील ही घटना निर्णायक मानतात.
अब्दाली आणि मराठ्यांमध्ये बारीक सारीक लढाया सुरु होत्या. कुंजपुराच्या चकमकीमध्ये मराठ्यांनी अब्दालीची बरीच सेना कापून काढली आणि उर्वरित सेनेला बंदी म्हणून ताब्यात घेतले. यामुळे चिडलेल्या अब्दालीने बाघपत येथून यमुना ओलांडली. अब्दालीने यमुना ओलंडताच मराठ्यांनी आपला तळ पानिपत येथे टाकला.
पानिपत आणि सोनपत मधील संबलका येथे अब्दाली पोचताच मराठ्यांनी त्वेषाने अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविला पण इतक्यात अब्दालीची उर्वरित सेना दाखल झाली आणि मराठ्यांची ताकद कमी पडली. दोन्ही बाजूचे असंख्य सैन्य मारले गेले. या छोट्याश्या लढाईमध्ये अब्दालीला मराठ्यांची आणि मराठ्यांना अब्दालीची कुवत कळली.
पण अब्दाली स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हता. त्याने मुख्य मराठा सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणणाऱ्या गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला. या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पुरवठा ठप्प झाला आणि मराठी सैन्याची उपासमार होऊ लागली.
–
हे ही वाचा – जेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनिमाला कापून काढतात…!
–
पुढे दोन महिने दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले करतच होते. पण अजूनही मोठ्या युद्धाला सुरुवात झाली नव्हती. दिवस सरत होते आणि मराठी सैन्यासही अन्न अपुरे पडू लागले. यावर उपाय म्हणून मराठ्यांनी स्थानिकांवर हल्ले करण्यास आणि लुटमार करण्यास सुरुवात केली. या पवित्र्यामुळे स्थानिकांचा मराठी फौजांवरचा रोष वाढीस लागला.
इतक्या वेळ स्वस्थ बसलेल्या भाऊंनी अखेर स्वतःहून पहिले पाऊल उचलले. अन्नसाठा देखील जवळपास संपला होता. आता युद्ध करण्यावाचून पर्याय नव्हता. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठ्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली. मराठ्यांतर्फे प्रथम चालून गेला इब्राहीम खान!
त्याने मराठ्यांच्या साथीने अफगाण आणि रोहिल्यांना सळो की पळो करून सोडले. भाऊंनी मध्यातून हल्ला चढविला. अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वाट न बघता जोरदार आक्रमण केले. परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते. त्यांनी हाय खाल्ली.
बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठे रणांगणावर अजूनही वर्चस्व राखून होते. त्यांनी अब्दालीची सेना पार धुळीला मिळवली होती.
येथवर सर्व ठीक होते. असेच सुरु राहिले असते तर मराठ्यांनी पानिपतामध्ये विजय देखील संपादन केला होता, पण या क्षणी अब्दालीने त्याचे १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरुपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला.
अब्दालीच्या या एका चालीमुळे दृष्टीक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला. थकल्या भागलेल्या मराठी सैन्याला नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण येऊ लागली. मराठे कधी नव्हे ते मागे हटू लागले. कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी याच निर्णायक क्षणी उठाव केला. मराठे पुरते गोंधळात पडले.
ही गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी भाऊंनी आपली राखीव सेना पुढे न आणण्याची चूक केली आणि ते स्वत: हत्तीवरून उतरून अफगाण्यांना कापू लागले. लढणाऱ्या मराठी सैन्याच्या हे लक्षात आले नाही. त्यांची हत्तीकडे नजर जाताच त्यावर भाऊ न दिसल्याने त्यांना वाटले की सदाशिव भाऊ पडले.
भाऊ पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांनी आशा सोडली. अफगाण सैन्याच्या गर्दीत लढताना भाऊंना शेवटचे नाना फडणीस यांनी पाहिले होते. याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले. आपला पराभव झाला असे समजून अर्ध्याअधिक मराठी सैन्याने माघार घेतली. तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या.
पण जसजशी रात्र झाली तसतसे ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या. अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचे पानिपत झाले. पानिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमावली.
जणू मराठ्यांची कर्तबगार पिढी संपुष्टात आली आणि यानंतर मराठा साम्राज्य पुन्हा कधीही उभे राहू शकले नाही.
यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तुत्व दाखवत पानिपताचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्याने मराठी साम्राज्याची पताका खाली आली.
मुघल सत्तातर आधीच खिळखिळी झाली होती आणि आता तर एकमेव मराठे साम्राज्य देखील घायाळ वाघाप्रमाणे निपचित पडून असल्याचे पाहून इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात आपले पाय रोवले.
असे हे पानिपतचे तिसरे युद्ध घडले आणि १४ जानेवारीचा हा दिवस मराठी इतिहासात काळ्याकुट्ट आठवणी सोडून गेला. पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे.
पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावता आला नाही आणि तेथे त्यांचा दारुण पराभव झाला हे जरी खरे असले तरी त्यामुळे मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही.
खुद्द अहमद अब्दालीनेच या युद्धाबाबत लिहून ठेवले आहे,
दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदरासारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य!
मराठा सैन्याने आपल्या मातीपासून १२००-१४०० किमी दूर अंतरावर जाऊन परकीयांविरोधात तेवढाच निकराने लढा दिला जेवढा त्यांनी इतर लढायांमध्ये दिला होता. पानिपताच्या रणांगणावर जर मराठा झेंडा रोवला गेला असता तर पुढचा इतिहास मराठा साम्राज्यासाठी किती गौरवशाली असता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.
लेखक अर्नाल्ड फ्लेचर हे त्यांच्या “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉनक्वेस्ट” या पुस्तकात म्हणतात,
पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानवर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता. त्यामुळे नंतर ब्रिटिशांना भारत विजय अशक्य झाला असता.
परंतु जणू कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले आणि नशीबही! पण या पानिपताच्या युद्धामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडली ती म्हणजे अहमदशाह अब्दालीला देखील मराठा साम्राज्याविरोधात जाणे चांगलेच महाग पडले होते, त्यामुळे पुन्हा कधीही अब्दालीने किंवा वायव्येकडील कोणत्याही साम्राज्याने भारतावर आक्रमण केले नाही.
म्हणजे मराठी जरी पानिपतामध्ये हरले असले तरी त्यांनी मरता मरता जे शौर्य दाखवले त्याचे चीज झाले असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात,
कौरव – पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती!
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती!!
मराठ्यांच्या हिंमतीला एवढीच दाद देऊन चालणार नाही कारण युद्ध हरल्यावर बरचसे सैन्य जरी माघारी परतले असले तरी त्याहूनही जास्त सैन्य पानिपतामध्येच राहिले आणि आज पानिपत त्यांची कर्मभूमी झाली आहे. त्यांच्या वंशजांना रोड मराठा म्हणून ओळखले जाते.
आज २५० वर्षानंतरही ज्या भूमीत त्यांच्या पूर्वजांनी गुडघे टेकले त्याच भूमीत हे रोड मराठा समाजाचे आपले बांधव मराठी झेंडा अभिमानाने रोवून आपली छाप पाडत आहेत आणि आजही पानिपतातील मराठी सैन्याच्या पराक्रमाची ज्योत तेवत ठेवून आहेत.
पानिपतच्या युद्धानंतरही सदाशिवराव भाऊ जिवंत होते असं 'या' गावातले लोक का मानतात?
- प्रतिनिधी
- बीबीसी मराठी
पाहा व्हीडिओ : पानिपतच्या युद्धानंतरही सदाशिवराव भाऊ जिवंत होते?
14 जानेवारी 1761 पानिपत युद्धाचा स्मरणदिवस. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ कामी आल्याचा इतिहास आहे, पण हरियाणाच्या एका गावातले लोक म्हणतात की, सदाशिवराव भाऊ लढाईनंतर जिवंत होते आणि ते या गावात येऊन राहिले होते.
रोहतकजवळच्या सांघी गावातल्या त्यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन मांडलेला रिपोर्ताज.

"दोन मोती गळाले, दहा-वीस अश्रफी गेल्या, खुर्दा-रुपयांची तर गणतीच नाही…" पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याच्या झालेल्या हानीचं हे वर्णन अनेक पिढ्यांनी ऐकलं आहे.
या दोन मोत्यांपैकी एक मोती म्हणजेच पानिपत मोहिमेतले मराठा सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे. सदाशिवराव भाऊ या युद्धात कामी आले हा इतिहास महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. पण हरियाणाच्या रोहतकमधले लोक वेगळा इतिहास सांगतात.

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY
मध्यभागी सदाशिवराव भाऊ, डावीकडे इब्राहिमखान गारदी आणि पेशव्यांचे अन्य सेवक.
पानिपतपासून थोड्याच अंतरावर हरियाणातला रोहतक जिल्हा आहे. याच रोहतक जिल्ह्यात सांघी हे गाव आहे.
या गावातल्या लोकांचा असा विश्वास आहे की, युद्धानंतर सदाशिवराव भाऊ या गावात येऊन राहिले होते आणि त्यांनी याच गावात समाधी घेतली.
पाहा व्हीडिओ : सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या स्मृतिदिनी हरियाणामध्ये जत्रा
रोहतक शहरापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सांघी गावात सदाशिवराव भाऊंच्या नावाने एक आश्रम आहे. या आश्रमाचं नाव 'डेरा लाधिवाला'! या डेऱ्यातच श्री सिद्ध बाबा सदाशिवराय तथा भाऊ राव यांची 'गद्दी' आहे.
गावकरी सांगतात की...
सांघी गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की, 1761मध्ये पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या फौजेचा पराभव निश्चित झाला त्या वेळी सदाशिवराव भाऊ पेशवे जखमी अवस्थेत आपल्या घोड्यावरून युद्धभूमीतून बाहेर पडले.
जखमी आणि अर्धवट शुद्धीत ते उग्राखेडी गावात पोहोचले. तिथून ते सोनीपत जिल्ह्यातल्या मोई हुड्डा गावात आले. त्यापुढे रूखी गावात त्यांनी आसरा मागितला.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC
सांघी ग्रामस्थ मानतात हीच सदाशिवराव भाऊंची समाधी.
त्यावर त्यांना तिथल्या लोकांनी पुढे सांघी गावात जाण्याचा सल्ला दिला. या गावाजवळ पिंपळ आणि वडाची झाडं आणि घनदाट जंगल आहे. तिथे आसरा घेता येईल, असं त्यांना सांगण्यात आलं.
गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अखेर 22 जानेवारी 1761 रोजी म्हणजे पानपितपच्या युद्धानंतर आठ दिवसांनी सदाशिवराव भाऊ सांघी गावात पोहोचले. इथे त्यांना गावकऱ्यांनी आसरा दिला, असं गावातले लोक सांगतात.
श्री भाऊनाथजी की गद्दी
डेरा लाधिवाला हा भाऊसाहेबांचा मठ सांघी गावाच्या परिघावर आहे. सांघी गावही मुख्य रस्त्यापासून चांगलंच आतमध्ये आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं असलेला रस्ता गावात जातो.
गावातल्या कोणालाही डेरा लाधिवाला किंवा श्री भाऊनाथजी की गद्दी कुठे, असं विचारलं की, कोणीही रस्ता दाखवतं. गावातल्या हमरस्त्यापासून एक फाटा आत वळतो.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC
२० एकर जमिनीवर हा मठ पसरला आहे.
त्या रस्त्यावरूनही शेतात जाणारा एक छोटासा कच्चा रस्ता लागतो. त्या रस्त्यानं पुढे गेलं की, मठाचं मुख्य प्रवेशद्वार लागतं. हा मठ २० एकर जमिनीवर पसरला आहे.
पिंपळ, वड असे वृक्ष, पेरूची, कडुलिंबाची झाडं आणि आसपासची थोडीशी शेती यांच्या मध्यभागी हा मठ उभा आहे. या मठाची स्थापना भाऊसाहेबांनी केली, असं इथले लोक मानतात.

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY
पानिपतच्या युद्धाचं चित्रण.
सांघी गावचे रहिवासी आणि या गावातली भाऊरावजी की गद्दी ही कहाणी सांगत असले तरी ऐतिहासिक संदर्भ वेगळाच इतिहास सांगतात.
ऐतिहासिक संदर्भ सांगतात वेगळाच इतिहास
इतिहासकार एस. जी. सरदेसाई यांनी आपल्या 'सिलेक्शन्स ऑफ पेशवा दफ्तर' मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे २४ फेब्रुवारी १७६१ रोजी नानासाहेब पेशव्यांना काशीराजकडून आलेल्या पत्रात सदाशिवराव भाऊ आणि विश्वासरावांचे अंत्यसंस्कार झाल्याचं कळवलं होतं. नानासाहेब पेशव्यांना हे पत्र मिळालं त्यावेळी ते मजल-दरमजल करत झाशी जवळच्या पिछोडी गावापर्यंत येऊन पोचले होते, अशीही या दफ्तरात नोंद आहे.
पानिपतच्या युद्धाच्या अखेरच्या टप्प्याचं वर्णन करताना इतिहासकार एच. जी. रॉलिन्स म्हणतात, 'युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात सदाशिवराव भाऊ पेशवे आपल्या अरबी घोड्यावर स्वार झाले आणि आपल्या सैनिकांना बरोबर घेऊन उमद्या पुरुषाला शोभेल अशा वृत्तीनं आघाडीवर पोचले आणि त्यांनी वीरमरण पत्करलं. दिसेनासे होईपर्यंत ते या ओंगळ लुटारूंशी लढत होते.'

फोटो स्रोत, RAVINDRA MANJREKAR/BBC
'काला आंब'- पानिपतावर झालेल्या युद्धांचे स्मारक.
इतिहासकार काहीही म्हणाले, तरी या गावातल्या लोकांना भाऊसाहेबांच्या इथल्या वास्तव्याबाबत प्रचंड विश्वास आहे.
नाथ संप्रदायाची दीक्षा आणि समाधी
"पानिपतच्या युद्धावर आधारित अनेक मालिकांमध्ये सदाशिवराव भाऊ या युद्धात मारले गेले, असं सर्रास दाखवतात. पण ते खरं नाही. सदाशिवराव भाऊंनी या ठिकाणी वास्तव्य केलं होतं. एवढंच नाही, तर त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन मठही उभारला होता," सांघी गावचे रहिवासी राज सिंग हुड्डा सांगतात.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC
सदाशिवरावांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असं गावकरी मानतात.
या गावकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे सदाशिवराव भाऊंनी 1761मध्येच नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यासाठी ते कुरुक्षेत्राजवळच्या पेहोवा इथल्या श्रवणनाथ धाम इथे गेले होते. तिथे त्यांनी गुरू गरीब नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी प्राप्त केली.
"त्यानंतर ते पुन्हा सांघी गावात आले. 1764मध्ये त्यांनी रोहिला पठाणांच्या लुटीपासून गावाला वाचवण्यासाठी गावातल्या तरुण मुलांची फौजही बांधली. गावाभोवती खंदक खोदून त्यांनी या पठाणांचा बंदोबस्त केला. या पठाणांशी झालेल्या लढाईत त्यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी विजय मिळवला," या मठातले सध्याचे महंत सुंदरनाथ यांनी ही माहिती दिली.
या चकमकीनंतर भाऊ नाथ यांनी या ठिकाणीच समाधी घेतली. तेव्हापासून त्यांचे शिष्य या मठाची देखभाल करत आहेत. ही शिष्य परंपरा अजूनही सुरू असल्याचंही सुंदरनाथ यांनी सांगितलं.
भाऊंची अखेर : ज्ञात इतिहास काय सांगतो?
विविध ऐतिहासिक नोंदी असं सांगतात की, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने शुजानं त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी लोक पाठवले. ते भाऊशी मिळताजुळता मृतदेह परत घेऊन आले. काही मराठ्यांना तो देह दाखवला गेला. त्याच्यावरच्या जन्मखुणा आणि पूर्वीच्या काही युद्धांत झालेल्या आघातांच्या खुणांवरून तो देह भाऊंचाच असल्याचं मराठ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, VENUS PRAKASHAN/BOOKGANGA.COM
ऐतिहासिक संदर्भांमध्ये भाऊसाहेब युद्धात मरण पावले असा उल्लेख आहे.
शुजाने तो मृतदेह अब्दालीकडे पाठवला आणि अब्दालीने त्यावर योग्य अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. काशिराज आणि राजा अनूपगीर गोसावी यांनी त्या देहावर अंत्यसंस्कार केले. अशीही इतिहासात नोंद आहे.
का. ना. साने आणि गो. स. सरदेसाई या इतिहासकारांनी संकलित केलेल्या पत्रांमधून आणि याद्यांमधून सदाशिवराव भाऊंचा वध आणि शिरच्छेद केलेल्या पठाणाने सांगितलेली कहाणी सापडते.
'उंची अलंकार घालून घोड्यावर बसलेल्या एका मराठा स्वाराशी सामना झाल्यावर पठाण सैनिकांच्या एका तुकडीने अलंकारांच्या मोहाने त्याला अडवून ओळख विचारली. काही क्षणातच त्या सैनिकांत आणि त्या स्वारात झटापट झाली. संतापून एका पठाण सैनिकाने त्या मराठा स्वाराचा शिरच्छेद केला.'
ते कापलेलं शीर शुजाच्या छावणीत आल्यानंतर मराठा सैनिकांनी त्याची ओळख पटवली. ते भाऊसाहेबांचंच शीर होतं. भाऊसाहेबांच्या देहावर आधीच अंत्यसंस्कार झाले होते. दुसऱ्या दिवशी त्या शिरावर अग्निसंस्कार करण्यात आला, असा संदर्भ पेशवे दफ्तरात सापडतो.

फोटो स्रोत, ROHAN TILLU/BBC
भाऊसाहेबांनी इथेच समाधी घेतली असं गावकरी सांगतात.
माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या 13व्या दिवशी सदाशिवराव भाऊंनी समाधी घेतली, असं सुंदरनाथ यांनी सांगितलं. या दिवशी दर वर्षी समाधीच्या ठिकाणी मोठी जत्रा भरते.
समाधीच्या दिवशी अजूनही भरतो मेळा!
Skip podcast promotion and continue reading
End of podcast promotion
"लहान असल्यापासून या जत्रेला मी नेमाने जातो. गावातल्या सगळ्याच लोकांची भाऊ नाथ बाबांवर श्रद्धा आहे. नरहर विष्णु गाडगीळ म्हणजेच काकासाहेब गाडगीळ पंजाबचे राज्यपाल होते. त्या वेळी पंजाब-हरयाणा ही दोन वेगळी राज्यं झाली नव्हती. ते दर वर्षी या मेळ्याला आवर्जून हजेरी लावायचे," राज सिंग हु्ड्डा सांगतात.
या दिवशी भाऊनाथांच्या समाधीची पूजा होते. तसंच त्यांच्या वीरश्रीला वंदन करण्यासाठी कुस्त्यांचे फड लागतात, अशी माहिती हुड्डा यांनी दिली.
'विश्वास गेला पानिपतात', 'मराठ्यांचं पानिपत झालं...' ह्या म्हणी सर्रास वापरल्या जातात. एके काळी अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांच्या उत्तरेतल्या वर्चस्वाला या युद्धानंतर धक्का लागला असाही पानिपतच्या युद्धाचा उल्लेख अनेकदा आढळतो.
एका बाजूला मराठ्यांची एक अख्खी पिढी आणि त्या सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे या युद्धात मारले गेल्याचा सल इतकी शतकं महाराष्ट्राच्या मनात आहे.
पण दुसरीकडे तत्कालीन मराठा साम्राज्याच्या केंद्रापासून एक हजार मैलांहून जास्त अंतरावर असणाऱ्या या सांघी गावात आजही सदाशिवराव भाऊंचा उत्सव साजरा होतो. त्यांच्या लेखी भाऊसाहेब पेशवे युद्धात मारले गेले नव्हते. त्यांच्या गावाचं रक्षण करणारे ते बाबा भाऊनाथ महाराज होते.
BLOG: पानिपत! मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम
Premium
पानिपतचे युद्ध ही मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा आहे
Updated:

समीर जावळे
पानिपत ! आजही पानिपत म्हटलं की आपल्याला आठवते ती पानिपतची लढाई, मराठ्यांनी केलेला संघर्ष आणि शेवटी झालेला त्यांचा पराभव. मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला तरीही ते ज्या निकराने लढले त्याची गोष्ट आहे पानिपत. १४ जानेवारी १७६१ हा मराठेशाहीतल्या इतिहासातला काळा दिवस मानला जातो. मात्र त्यामुळे मराठ्यांचा पराक्रम हा तसूभरही कमी होत नाही. पानिपतची लढाई आणि त्यातला पराभव ही मराठेशाहीतली भळभळती जखम म्हणून ओळखली जात असली तरीही ती मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे. मराठ्यांनी जे शौर्य दाखवलं, ज्या त्वेषाने ते लढले त्या लढाईला २५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव यांच्यासह अनेक दिग्गजांना या लढाईत वीरमरण आलं.

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहाजणांना अटक; टोळीयुद्धात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

पुणे: नाना पेठेत टोळीयुद्धाचा भडका; आंदेकर टोळीकडून दोघांवर हल्ला, एकाची प्रकृती चिंताजनक

“त्यांचं दहशतवाद्यांवर प्रेम…” नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ टीकेनंतर विवेक अग्निहोत्रींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या धर्मामुळे…”

पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?
पानिपतच्या तीन लढाया
पहिली लढाई १५२६ साली बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाली होती. यामध्ये बाबराचा विजय झाला
दुसरी लढाई १५५६ साली हेमू आणि अकबर यांच्यात झाली. ही लढाई अकबराने जिंकली
तिसरी लढाई १७६१ मध्ये मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली ही लढाई अहमद शाह अब्दाली जिंकला
१७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरचा बराच काळ मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही. इकडे पेशवाईतला पराक्रम सुरु झाला होता. थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४० लढाया केल्या ज्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत. मराठ्यांच साम्राज्य विस्तारू लागलं. उत्तर भारतापर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या. थोरले बाजीराव यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे गादीवर बसले. १७५० च्या दशकात उत्तर भारतात मराठ्यांनी मोठमोठ्या मोहिमा काढल्या आणि तो प्रदेश जिंकून आपल्या राज्याच्या सीमा आणखी विस्तारल्या. अगदी अटकेपार झेंडे लावून त्यांनी आपला पराक्रम दाखवला. (अटक हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे.)
भारताच्या सीमा ओलांडून मराठे जाऊ लागल्याने मराठ्यांवर अंकुश ठेवायला हवा हे बाहेरील इस्लामी सत्तांना वाटू लागले. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला. ज्यानंतर मराठ्यांना रोखण्याचा चंग अहमद शाह अब्दालीने बांधला. पानिपतच्या युद्धाची नांदी याच वर्षांमध्ये आहे. १७५९ मध्ये बलुच, पश्तुन आणि अफगाणी लोकांची मोठी फौज अब्दालीने उभारली आणि मराठ्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली. अशात उत्तर भारतात काही दशकांमध्ये मिळवलेले वर्चस्व आपण गमावू शकतो हे लक्षात आल्याने पेशव्यांनी पानिपतची मोहीम नानासाहेब पेशव्यांनी आखली. या मोहिमेला सुरुवातीला रघुनाथराव जाणार होते. मात्र दरबारात त्यांनी जवळपास ८० लाखांच्या वर खजिन्याची मागणी केली. जी सदाशिवराव भाऊ यांनी धुडकावून लावली. सदाशिवराव भाऊ यांचा उल्लेख राघोबादादांनी (रघुनाथराव) बोरुबहाद्दर असा केला. कारण या मोहिमवेर जाण्याआधी सदाशिवराव भाऊ हे पेशव्यांचे हिशेबनीस म्हणून काम करत होते. राघोबादादांनी केलेला अपमान सहन न झाल्याने भर दरबारात सदाशिवराव भाऊ यांनी बोरू मोडून टाकला आणि पानिपतच्या मोहिमेसाठी सज्ज झाले. नानासाहेब पेशव्यांनीही त्यांना जाण्यास संमती दिली. त्यांच्यासोबत विश्वासरावही पानिपतच्या मोहिमेवर गेले.

१ लाखाहून मोठी फौज उभारुन सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी पानिपतकडे मोर्चा वळवला. वाटेत त्यांना होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्याही तुकड्या मिळाल्या. १७५९ ते १७६१ या कालावधीत मराठे आणि अब्दालीची फौज यांच्यात अनेकदा चकमकी झाल्या. चकमकीत ३ हजारांपेक्षा जास्त सैन्य मारलं गेलं. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते, तर अहमद शाह अब्दाली हा पानिपतच्या दक्षिणेकडे होते. मराठे आणि अब्दाली या दोघांनी एकमेकांची वाट अडवली होती. अब्दालीने तह करण्याचा प्रयत्न केला मात्र नजीबाने ते होऊ दिले नाही. इस्लामच्या नावे युद्ध झालंच पाहिजे अशी भूमिका त्याने घेतली. सदाशिवरावभाऊ यांना असे वाटत होते की तह होईल. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे मराठ्यांचा धान्यसाठा संपत आला. यामुळे युद्ध करा किंवा तह असे दोनच पर्याय उरले.

‘रसद पुरवा’ असा निरोप पुण्यात धाडून मराठे युद्धासाठी सज्ज झाले. युद्धाचा पारंपारिक पोशाख घालून मराठे युद्धाला सामोरे गेले. ते पाहून अहमद शाह अब्दालीने व्यूहरचना युद्धास सुरुवात केली. तोफखान्याने चालून आलेल्या मराठ्यांवर हल्ले सुरु केली. मात्र मराठ्यांच्या तोफांचीही ताकद जास्त होती. इब्राहिम खान गारदी मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. त्यानेही अब्दालीच्या तोफांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. युद्धाच्या सुरुवातीला मराठ्यांचा प्रभाव वाढता होता. फक्त तोफखानाच नाही तर मराठे, तिरंदाज, भालदार यांनी अफगाण आणि रोहिल्यांना कापून काढले. दुपारनंतर मराठी सैन्यच तोफांसमोर आल्याने इब्राहिम खानाला तोफखाना बंद करावा लागला. सदाशिवराव भाऊंनी अफगाणी सैन्याचा पाडाव होतो आहे हे पाहून घोडदळासह त्यांच्यावर चालून जाण्याचे आदेश दिले. मात्र अनेक घोडे उपासमारीमुळे मधेच कोसळले. जो दणका घोडदळाने केलेल्या आक्रमणातून द्यायचा होता तो तसा अफागाणी सैन्याला बसला नाही. अफगाणी सैन्याची उजवी बाजू इब्राहिम खानाने संपवली होती. मध्यभागी सदाशिवरावभाऊंचा प्रभाव होता.

मात्र मराठ्यांचे घोडदळाचे प्रयत्न असफल ठरल्याचे लक्षात येताच अब्दालीने राखीव सेना बाहेर काढली. १५ हजार कसलेले योद्धे, बंदुका आणि उंटांवर लादलेल्या छोट्या तोफा या सैन्याकडे होते. राखीव सैन्याचा प्रभाव पडतो आहे हे लक्षात आल्यावर आणखी १० हजार सैनिकांची राखीव सेना मराठ्यांवर चाल करुन गेली. दिवसभर युद्ध करुन दमलेले मराठे ताज्या दमाच्या सैनिकांना संपवण्यात कमी पडू लागले. इथेच मराठ्यांचा पराभव निश्चित झाला होता. राखीव फौज आणि उंटावरचा तोफखाना यामुळे लढाईचे चित्र काही क्षणांमध्ये बदलले. विश्वासराव मारला गेला, ज्यानंतर मराठी सैन्याने पळ काढण्यास सुरुवात केली. पळणाऱ्या मराठी सैन्यांवर आणि बुणग्यांवर अफगाणी भालदार आणि घोडदळ तुटून पडलं. जो दिसेल त्याला कापून काढण्यात आलं. अंधार होईपर्यंत शक्य तेवढ्या मराठ्यांना अफगाणी सेनेने कापून काढलं. सदाशिवराव भाऊही मारले गेले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीलाही सैनिकांची आणि बुणग्यांची कत्तल करण्यात आली. पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठ्यांची दुर्दशा करणारे ठरले. या युद्धात विश्वासराव, सदाशिवराव भाऊ, जनकोजी शिंदे, इब्राहीम खान, यशवंत पवार, तुकोजी शिंदे ही मातबर मंडळींचा या युद्धात मृत्यू झाला. मराठ्यांची एक कर्ती पिढीच या युद्धाने संपवली. दोन मोती गळाले, २७ मोहरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही असं पानिपतच्या पराभवाचं वर्णन केलं जातं. मराठेशाहीच्या इतिहासातली ही भळभळती जखम पानिपत या नावाने ओळखली जाते. आजही दिवस आठवताना आपण हळहळतो.
समीर जावळे
sameer.jawale@indianexpress.com
कथा.. पानिपतच्या मराठा युद्धकैद्यांची!
पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वषेर्ं उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : ‘दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत र्अधकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते.’
पानिपतचे युद्ध कसे लढले गेले याविषयी इतिहासात सविस्तर माहिती उपलब्ध आहे; परंतु त्यानंतर मराठी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. या युद्धकैद्यांचा पानिपतानंतरचा प्रवास व त्यांच्या वंशजांची सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती इतिहासाचा एक हौशी संशोधक म्हणून फेसबुकच्या माध्यमातून आणि पानिपतावरील युद्धकैद्यांच्या वंशजांबरोबर केलेल्या संभाषणातून मला मिळाली.

सासरच्या छळामुळे उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

गाझापट्टीत युद्धाचा भडका; ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलचा प्रतिहल्ला; ३०० मृत्यू, हजारो जखमी

पुणे: नाना पेठेत टोळीयुद्धाचा भडका; आंदेकर टोळीकडून दोघांवर हल्ला, एकाची प्रकृती चिंताजनक

वसाहतवाद विरोधी लढा सुरूच राहणार आहे…
पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पश्चिम पंजाब (पाकिस्तान) ओलांडल्यानंतर बलुचिस्तान प्रांतातील डेरा बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता. या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सन्य ठेवण्यासाठी आíथक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सन्य पुरविण्याच्या बदल्यात आíथक मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आíथक घबाड पदरात पडले नव्हते. त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन िखडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.
पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.
या युद्धकैद्यांपैकी बुगटी, र्मी, मझारी, रायसानी व गुरचानी इत्यादी बलोच जमातींमध्ये मराठा उपजमात आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाचा रास्त अभिमान आहे. या उपजमातींपकी फक्त बुगटी मराठय़ांविषयीची माहिती उपलब्ध आहे. बुगटी जमातीतील मराठय़ांचे तीन प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे-
बहुसंख्य मराठा युद्धकैदी हे काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आज हा समाज त्या- त्या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो. उदा. काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा वगरे. आज हा वर्ग समस्त बुगटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के आहे. या वर्गाला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. परंतु १९४४ मध्ये नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे मुख्य सरदार) यांनी मराठय़ांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. १९४४ पर्यंत या मराठा वर्गाला प्रचंड शारीरिक कष्ट व हलाखीचे दिवस काढावे लागले. १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे. बुगटी मालक (आका) आणि त्यांचे मराठा गुलाम यांचे संबंध बऱ्यापकी जिव्हाळ्याचे होते. बुगटी मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे मराठी गुलामांची देखभाल करीत असे. नियमाला ज्याप्रमाणे अपवाद असतो, त्याप्रमाणे काही बुगटी मालक क्रूरसुद्धा होते व ते मराठा गुलामांना अतिशय वाईट पद्धतीने वागवीत असत असे सांगितले जाते.
प्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा विरोधाभासी कायदाही अस्तित्वात होता.
१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वष्रे गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना होती. अलीकडच्या काळात मात्र हळूहळू हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.
१९६० नंतर या समाजाने अन्य बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात बरीच आघाडी घेतली. कारण बाकीचा बुगटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीतच अडकून पडलेला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तसेच ‘सुई पेट्रोलियम कंपनी’त बहुसंख्येने या मराठा समाजाने आपले बस्तान बसविले. बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर १९५० च्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई येथे सुरू करण्यात आली. सुरुवातीला कामगार, फोरमन म्हणून मराठा समाजाला तिथे कामे मिळाली आणि हळूहळू त्यांच्यापकी काहीजण मॅनेजर, सुपरवायझर अशा पदांवरदेखील पोहोचले. आज हा मराठा समाज काळाशी जमवून घेत स्वत:च्या कर्तृत्वावर प्रगती करतो आहे व सुखात नांदतो आहे, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.
दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत.
इतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.
शाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती महाराष्ट्रात जरी आज लुप्त होत आल्या असल्या (केवळ काही ग्रामीण भागातच टिकून असल्या) तरी साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत. त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते.
तिसरे- दरुरग मराठा! बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो.
या तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे. १९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे.
सध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.
१९६० च्या दशकात सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या ‘टायगर्स ऑफ बलुचिस्तान’ या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे. मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.
१९९० च्या दशकात जेव्हा िहदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा नाना पाटेकर ‘मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं’ हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘द ग्रेट मराठा’ ही िहदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.
बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध िहदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे.
मात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे त्यांना मराठी भाषा, त्यांच्या पूर्वजांची नावे आणि इथल्या मूळ गावाचे नाव याबद्दल काहीच ज्ञात नाही.
एकंदरीने पानिपतावरील युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती. बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांना १८५ वष्रे त्यामुळे गुलामगिरीत दिवस काढावे लागले. आजवरच्या त्यांच्या पिढय़ांतील मराठय़ांची संख्या ही पानिपतात शहीद झालेल्या मराठा सनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल.
बुगटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या (र्मी, रायसानी वगरे) मराठा समाजाची आज काय स्थिती आहे, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. बलुचिस्तानात उन्हाळ्यात पारा ५०० से. च्या वर जातो. धुळीची मोठी वादळेही वारंवार होत असतात. अशा खडतर प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढय़ांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सहय़ाद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आजची बुगटी मराठय़ांची पिढी सुखात आहे. भारतातील मराठी समाजाने त्यांची दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
सध्या बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानी लष्कराच्या
अमलाखाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधही सध्या तितकेसे चांगले
नाहीत. त्यामुळे बुगटी मराठा समाजाशी संबंध प्रस्तापित करणे तितकेसे सोपे
नाही. भारतातील मराठी समाज या बुगटी बांधवांचे निश्चितच देणे लागतो यात
दुमत नाही. जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील
केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सनिक व
सरदार लढले होते. मराठीजन व महाराष्ट्र सरकार यांना या समाजाबद्दल माहिती
मिळावी, या हेतूने केलेला हा लेखप्रपंच. भविष्यात आपल्यापासून दुरावलेल्या
या मराठीजनांसाठी आपल्याला थोडेबहुत काहीतरी करण्याची इच्छा व्हावी, हीच
त्यामागची अपेक्षा.
आनंद शिंदे
पानिपतच्या तिन्ही लढाया पानिपत या ठिकाणीच का झाल्या?
पानिपतच्या तिन्ही लढाया पानिपत या ठिकाणीच का झाल्या?
पानिपतमध्ये तीन युद्धे झाली आणि त्यानंतर प्रत्येकवेळी दिल्ली आणि भारत यांचे भविष्य निश्चित झाले.
लोधी आणि बाबर यांच्यात झालेल्या पहिल्या युद्धाच्या वेळी. बाबरचे तोफखाना निर्णायक होते म्हणून मोठ्या सैन्यानेसुद्धा तोफांचा आवाज आला की लोधीचे स्वत: चे सैनिक हत्ती घाबरले आणि उलट दिशेने पळत सुटल्यामुळे स्वत: च्या हत्तीखाली मारले गेले. दुसरे युद्ध अकबरमध्ये झाले आणि हेमू विक्रमादित्य आणि अकबर विजयी झाला. तिसरे युद्ध मराठा आणि अब्दाली मध्ये झाले आणि मराठे हरले.
१. भारतावर मुख्य हल्ला दिल्लीवर होता, दिल्ली ही दिल्लीची सर्वात महत्वाचा भाग आहे, ज्याची दिली वर सत्ता , त्यांच्या भारतावर अधिकार . अगदी महाभारत
… (आणखी)संपूर्ण भारतावर राज्य होत असलेल्या बहुतांश घटनांमध्ये दिल्ली ही शक्तीचे केंद्र आहे. भारत व्यापणे; दिल्लीला पराभूत करणे आवश्यक आहे. पानीपत हे सर्वात जवळचे स्थान आहे. पानिपत दिल्लीच्या उत्तरेस ९० किमी अंतरावर स्थित हिंदु कुश पर्वतरांगेकडे जाण्याच्या मार्गावर आहे. बाहेरच्या प्रांतातून जसे की काबूल, कंधाहार, अफगाणिस्तान, ढाका, पेशावर अशा ठिकाणाहून भारतात प्रवेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग ग्रँड ट्रंक रोड जो आशिया खंडातील तसेच भारतीय उपखंडातील सर्वात जुना रस्ता आहे जो जवळपास २,५०० वर्षांपासून चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळापासून अस्तित्वात आहे. हा दळणवळणासाठी महत्वाचा मार्ग होता कारण याच मार्गावरून दिल्
… (आणखी)१) या मागील पहिले कारण म्हणजे पानीपत चे भौगोलिक स्थान.पानिपत चे मैदान दिल्ली पासून जास्तीत जास्त १३० किमी अंतरावर आहे.वर दाखवलेल्या चित्रामध्ये हरियाणा राज्यात निळ्या रंगात (डॉट) जो भाग दिसत आहे ते आहे पानीपत आणि त्याखालोखाल एका मोठ्या गोल मध्ये स्टार असलेली ती जागा म्हणजे दिल्ली.
२)जर भारतावर विजय प्राप्त करावयाचा असेल तर दिल्ली ताब्यात यायला हवी कारण हिंदुस्तान चा बादशहा दिल्लीतून शासन चालवत असे.
३)उत्तरेकडील पंजाब मधील मुघल आक्रमण करणारे येताच राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी पानीपत हा जिंकण्यासाठी जवळ जवळ शेवटचा प्रदेश होता.
४)या मैदानावर विजय मिळवणाऱ्या ला भांडवलाकडे जाणे सोपे होते.
५) मोठ
… (आणखी)मी असं गृहीत धरतो की तुम्ही अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपत येथे झालेल्या युध्दाबद्दल बोलत आहात.
पानिपत वर मराठे युद्ध हरले ही खूप महत्वाची गोष्ट होती. जर तुम्ही अहमदशहा अब्दालीचा नानासाहेबांशी झालेला पत्रव्यवहार पाहिलात तर हे तुम्हाला दिसून येईल की पानिपत वरची हार ही मराठ्यांसाठी काही शरमेची गोष्ट नव्हती. अजूनसुद्धा आपण आपली मान उंचावू शकतो.
होय, आपण युद्ध हरलो, ३०-३५००० सैन्य मारलं गेलं, परंतु अब्दालीने सुद्धा तेव्हढच गमवलं. अब्दाली एवढा दुर्बल झाला होता की युद्धानंतर एकही अफगाण खैबर खिंड ओलांडून भारतात येऊ शकला नाही.
म्हणून तसं पहायचं झालं तर हा पराभव मराठ्यांसाठी, भारतासाठी एकप्रकार
… (आणखी)🏇🏇पानिपत लडाई हि मराठा साम्राज्यास अविस्मरणीय आणि असामान्य वळण देणारी होती कारणे पुढील प्रमाणे :-🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
त्या दिवशी दिनांक:-
१४ जानेवारी हा दिवस म्हणजे पानिपतची तिसरी लढाई बद्दल महत्वपूर्ण दिवस.
&
&
🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇कारण पानिपत ची तिसरी लढाई जर मराठे जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदर अलीचा उदय झाला असता.
&
🎯मराठा वंशावळ:-
&
🎯 एतिहासिक युद्ध:-
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳कदाचित दिल्लीवर त्यावेळी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता.⛳⛳⛳⛳⛳
& ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳वीर मराठा:-
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
पानिपत येथे झालेल्या 3 संस्मरणीय लढाया.
✍ ■ पहिली लढाई (२१ एप्रिल १५२६):-
बाबर आणि इब्राहिम लोधी दरम्यान
विजयी :- बाबर
✍■ दुसरी लढाई (५ नोव्हे
… (आणखी)बाप जाद्याने सुरू ठेवलेली यशा चा यशस्वी method मुलांनी मात्र आजी च्या सांगण्यावरून बदलली.
रावू ऊत्तरेत जाऊन बिघडला. यवनी मस्तानी स घेऊन आला. ब्राम्हण धर्मा बुडविला. असे म्हणून नातवंडा स आजी राधा बाई म्हणाल्या . तुम्ही उत्तरेत जाऊन बिघडू नका. जो बाजीराव आपल्या सोबत ताज्या दमाचे रिकामे घोडे यांची तरतूद मोहिमेत ठिकठिकाणी करत असे . त्या बाजी च्या पुत्रांना मात्र मोहिमेत बायका सोबत नेण्याचा सल्ला वजा आदेश च मिळाला. पेशव्यांनी सोबत बायका घेतल्या. सरदारांनी सुद्धा सोबत बायका घेतल्या. सैनिकां च्या बायका बाजार बुणगे पण सोबत आले. बिजली चा वेग असलेल्या बाजी चे वंशज मात्र त्यांची परंपरा पाळू शकले नाही.
जे ल
… (आणखी)पानिपत १५२६ आणि १५५६
अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेले तिसरे पानिपत युद्ध संदर्भासहित वर्णन करायला जावं तर खूप सविस्तर उत्तर होईल म्हणून मी इकडे ते युद्ध वगळून पहिल्या दोन्ही पानिपत युद्धांबद्दल लिहिणार आहे.
पानिपत - १ = २१ एप्रिल १५२६
पानिपतचे पाहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम खान लोदी यांच्यात झाले. बाबरने १५१९ मध्ये हिंदुस्तानवर पहिली स्वारी केली. पुढे पाच वर्षांनी १५२४ मध्ये दौलतखानने(पंजाबचा सुभेदार) दिल्ली च्या सुल्तानाविरुद्ध लढण्यासाठी बाबरला मदतीचा हात मागितला. हिंदुस्थान काबीज करण्याची बाबरची महत्वकांक्षा ही जुनीच होती.परंतु पुढे दौलतखान बाबरला सोडून गेला आणि बाबरला सुद्धा काबूलला
… (आणखी)पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. हे शहर दिल्ली पासून ९० किलोमीटरवर असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.
या शहराचे संदर्भ महाभारतातही आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणीमध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मिती केली. त्यांपैकी एक शहर होते पांडुप्रस्थ. तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेली तीन युद्धे. या
… (आणखी)इतिहासात अनेक प्रश्न कायमचे अनुत्तरित राहतात. काही जुनी कागद पत्रे अकल्पितपणे मिळाल्यास काही घटनांवर प्रकाश पडतो; त्याच वेळेस नवे प्रश्नही उभे राहतात.
पाजीपात चे महायुद्ध ही एक फार मोठी घटना आहे. तिला अनेकानेक गुंतागुंतीचे पदर आहेत.
कुठल्याही एकाच पुस्तकात त्या युद्धाची सर्व माहिती मिळणे कठीण. रियासतकार सरदेसाईची मराठा रियासत वाचा. मी वाचायचा प्र्यत्न केला; पण मला ते पुस्तक वाचने झेपले नाही.
विश्वास पाटील ह्यांची पानीपत कादंबरी आहे. पण ती वाचताना दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. इतिहासाला धरून लिहिलेली असली तरी ती कादंबरी आहे. कादंबरी म्हटले की थोडा मीठ मसाला येणारच. शिवाय हल्ली ते बरेच वादग्रस्त झाल
… (आणखी)नाही. खालील घटनांव्दारे ते सिद्ध होते.
पानिपत मध्ये विजय मिळाल्यानंतर अब्दाली दिल्लीत आला. तेथे गेल्यावर त्याने खालील गोष्टी केल्या.
मराठ्यांनी पानिपत चे युद्ध होण्यापुर्वी नेमलेला दिल्लीचा बादशहा अली गोव्हर यालाच दिल्लीचा बादशहा म्हणून नेमले.
वजीर म्हणून शुजाउदौला याची नेमणूक केली.
मराठ्यांनाच दिल्लीचे संरक्षक म्हणून कायम केल.
यावेळी अब्दालीने पेशव्यांना पत्र लिहीले की,
तुम्हास आम्ही दिल्लीचे संरक्षक म्हणून कायम करत आहोत. ह्या युद्धा बद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.
अब्दाली याने सवाई माधवसिह याला एक पत्र पाठवले होते. या पत्रात अब्दालीने पानिपत च्या युद्धाचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतो की,
त्या दिवशी
… (आणखी)… (आणखी)पानिपतच्या युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारीं
पानिपत युध्दात मराठे शौर्याने लढले पण मराठ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले याचे मुख्य कारण म्हणजे मराठ्यांच्याच सैन्यातील काही सरदारांनी आणि मित्रराज्यानी माघार घेतली. तर काही तटस्थ राहिले.
राजपूत राजे जोधपूरचा बीजेसिंग आणि जयपूरचा माधोसिंग तटस्थ राहिले कारण मराठ्यांच्या उदयाआधी मुघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी राजपूत राजांवर होती. १७३४ च्या करारानंतर ती मराठ्यांकडे आली. त्यानुसार पेशव्यांना मुघल साम्राज्यात चौथा हिस्सा आणि सरदेशमुखीचा हक्क मिळाला. हीच गोष्ट त्यांना डाचत होती आणि अब्दाली मुळे मराठ्यांवर वचक बसवता येईल असे त्यांना वाटले म्हणून या राजांनी मराठ्यांना साथ दिली नाही.
सुरजमल जाट
… (आणखी)भारतावर आक्रमण करणारे गनीम हे बहुतांशी खैबर खिंडीतून उतरून दिल्लीकडे यायचे. त्यांना दिल्ली बाहेर थोपवण्याच्या दृष्टीने पानिपत हे सोयीचे असावे असे वाटते. पानिपत हा सपाट मैदानी प्रदेश आहे. आमने सामने लढाई करायला हा भाग सोयीस्कर आहे.
लक्षात घ्या, महाभारत युद्ध देखील पानिपतच्या जवळ कुरुक्षेत्र इथे झाले होते. त्याचेही कारण सपाट मैदान हेच असावे.
P.S. पानिपतच्या तिसऱ्या लढाईची परिस्थिती थोडी वेगळी होती. अब्दालीचा खैबर खिंडीकडे जायचा मार्ग मराठ्यांनी रोखून धरला होता. आणि मराठ्यांचा दक्खन कडे जायचा मार्ग अब्दालीने रोखला होता. या दोन्ही फौजा पानिपतच्या आसपास खड्या होत्या. त्यामुळे पानिपत हीच रणभूमी ठरली.
जी युद्धे पानिपतच्या परिसरात झाली, त्या युद्धांना पुढे 'पानिपतचे युद्ध' असे नाव पडले. दिल्ली हे सत्ताकेंद्र असल्यामुळे - अनेक वेळा आक्रमण / रक्षण करण्यासाठी होणाऱ्या सैन्यांच्या हालचाली - त्या शहराच्या परिघात शे-पन्नास कोसांच्या अंतरांवर झाल्या. दोन तीन शतकांत तीन वेळा अशा आल्या की अशा प्रतिस्पर्धी सैन्यांची गाठ पानिपत येथे पडली.
म्हणून ती युद्धे पानिपत येथे झाली. "यापुढचे युद्ध पानिपत येथे लढायचे" असे ठरवून झाली नाहीत.
दिल्लीच्या परिघात हालचाली करणारी सैन्ये इतक्या वेळा त्याच परिसरात कशामुळे एकत्र आली? याचे उत्तर बहुधा -
- आक्रमणे येण्याची दिशा, आणि
- दिल्लीकडून त्या दिशेला जाताना यमुना ओलांडण्याची स
भारता वर स्वारी करणारे खैबर खिंडीतून आल्यावर दिल्ली कडे जाताना पानिपत हाच मैदानी भाग लागतो. त्यामुळे पानिपतची पहिली व दुसरी लढाई येथे झाली.
या उलट परिस्थिती पानिपत च्या तिसऱ्या युध्दाच्या वेळी होती. सदाशिव भाऊ हे दिल्ली जिऺकून पुढे आले होते आणि अब्दाली ला परत जायचे होते. दोघांनी एकमेकाऺचा रस्ता रोखला होता त्यामुळे युध्द पानिपत येथेच घडले.
आपल्या प्रश्नांबाबत जास्त संदर्भ नाहीत किंवा ते माझ्या वाचण्यात नसतील आले. तरी पण थोडा विचार करून अंदाजे उत्तर लिहण्याच प्रयत्न करतो.
आपल्याडे, तलवार, कट्यार, दांडपट्टा, समशेर असे शस्त्र होते. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपला तोफखाना त्याचा प्रमुख इब्राहिमखान गारदी होते.
युद्ध सामग्री कोठे असेल अथवा त्याच काय झालं असेल :
१. आपल्या तलवारी व अनेक शस्त्र तिथे असलेल्या रोहिंग्या व राजपूत जे अब्दालीच्या गटात लढत होते त्यांच्या शिपायांनी घेतले असतील. कारण युद्ध संपल्यावर शत्रू कडील खजिना, सुस्थितीतील घोडे, हत्ती, अश्या गोष्टी लुटणे हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे शस्त्र हे लुटली गेली असतील.
२. प्रमुख म्हणजे आ
… (आणखी)2 उत्तरे लपविली गेली आहेत
(का?)
'पानिपता' चा इतिहास
हिंदुस्तान
!! पानिपत !!
पानिपतच्या युद्धावेळीचा प्रसंग
" पानिपतच्या युद्धावेळीचा प्रसंग "
पानिपत -
- पानिपत
भारताच्या हरियाना राज्यातील एक शहर आहे.
- हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.
इतिहास -
- या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते पांडुप्रस्थ तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.
- इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की हि युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.
पानिपतचे पहिले युद्ध -
- १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधीआणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.
पानिपतचे दुसरे युद्ध -
- १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
पानिपतचे तिसरे युद्ध -
- बुधवार, १५ जानेवारी , ई.स.१७६१ रोजी मराठे सदाशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
सदाशिवरावभाऊ
पानिपतचा नकाशा
माधवराव पेशवा
पानिपत...विजयाइतकाच सन्मानदायक पराजय!
पानिपत...विजयाइतकाच सन्मानदायक पराजय! - त्र्यं. शं. शेजवलकर
- साधा क्रिकेटचा सामना हरण्यापासून निवडणुकीत झालेल्या पराभवापर्यंत अनेक ठिकाणी ' पानिपत झाले ' हा वाक्प्रचार सहजपणे वापरला जातो. पण इतिहासाची पाने नीट अभ्यासली की कळते की पानिपतावर जे घडले तो फक्त पराभव नव्हता, तर त्यात भविष्यातल्या राष्ट्रनिर्मितीची बीजे रोवलेली होती. हा मुद्दा पटवून देताना थोर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी या लढाईचे केलेले विश्लेषण त्यांच्याच शब्दात.....................
- पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला आणि तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली ; पण ती तात्कालिकच होती. या पराभवाचे परिणाम आपणांस सर्वस्वी मारक होतील, असे त्यांस त्या काळी वाटलेले दिसत नाही. अखिल हिंदुस्थानच्या कल्याण्याच्या दृष्टिने विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव, नैतिकदृष्ट्या मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते.
- इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहासाभ्यासकाने संशोधनकालापूर्वीच लिहिले की, '' पानिपताची लढाईसुद्धां मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे ! मराठे ' सर्व हिंदी लोकांसाठींच हिंदुस्थान ' या ध्येयासाठी लढले ! पण दिल्ली, अयोध्या व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीश मात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले ! आणि जरी मराठ्यांचा या युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदां परत गेले ते हिंदी राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी पुनः कधी दिल्लीस आले नाहीत !''
- प्रिन्सिपॉल रॉलिन्सन काशीराजाच्या बखरीच्या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, '' विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासांतील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो ; आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासांत त्यांच्या फौजेने राष्ट्रांतील सर्व उत्तम शिलेदारंसह पानिपताच्या घनघोर रणक्षेत्रांत आपल्या देशाच्या व धर्माच्या वै-यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल !
- ज्या सेनापतीला जय मिळतो त्याने सर्वात कमी चुका केल्या असे समजले जाते. पण वेलिंग्टन व नेपोलियन या दोघांनीहि वॉटर्लूच्या लढाईत घोडचुका केल्याचे जे नमूद आहे, त्यांच्या दशांशाहि चुका भाऊसाहेबांच्या हातून घडल्या नव्हत्या. भाऊच्या पराजयाचे कारण तो वाईट सेनानी होता हे नसून, त्याचा प्रतिस्पर्धी त्याहून जास्त चांगला सेनापति होता, हेच आहे. ’’
- वरील मते त्या त्या संदर्भात खरीच वाटण्यासारखी आहेत. पण तो आपल्या वादाचा विषय नव्हे. अहमदशहा अबदालीसारख्या अडचणीत टाकणा-या शत्रूशी कलागत टाळण्यातच मराठ्यांचे शहाणपण दिसून आले असते. पानिपताला अफगाणांचा पराभव होता तरी मराठ्यांना त्यापासून फार थोडा लाभ होता. डोंगराळ व ओसाड अफगाणिस्तानवर स्वारी करून तेथे राज्य करण्याचा हेतू कोणीच धरला नसता. घराजवळचे व दक्षिणेतले याहून जास्त महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याचे टाकून सिंधु नदीवर जाऊन ठाकण्याचे मराठ्यांना काहीच कारण नव्हते ; पण मराठ्यांच्या राज्यातील सर्वात मोठा दोष या वेळी तरी त्यांच्या अज्ञानाचा होता.
- सदाशिवरावभाऊ हा तत्कालीन मराठ्यांतील सर्वात जास्त कार्यक्षम, हुशार, तडफदार पुरुष मानला जात होता ; पण त्याचे दोन दोष इंग्रज वकील स्पेन्सर याने पानिपतापूर्वी चार वर्षे ओळखले होते. ते म्हणजे सबुरी नसणे व अतिरिक्त हाव. इंग्रज वकिलाने सांगितलेला सबुरी नसण्याचा दुर्गुण अज्ञानजन्य होता, असे आम्हाला वाटते. पेशव्यांची, किंबहुना, सर्व मराठ्यांची शिक्षणपद्धती अत्यंत तोकडी होती. सर्व हिंदुस्थानाचे राज्य झपाटण्यास जे उद्युक्त झाले होते, त्यांना तत्कालीन इंग्रजांइतकेही हिंदुस्थानाच्या भूगोलाचे ज्ञान होते, असे दिसत नाही.
- युरोपात हिंदुस्थानाच्या आकाराचे स्वरूप चित्ररूपाने दाखविणारे जे नकाशे शतकापूर्वीच फैलावले होते, ते पेशव्यांनी पाहिलेले किंवा ऐकिलेलेसुद्धा नसावेत. भरतखंडात मुंबई, मद्रास किंवा कलकत्ता या एकमेकांपासून फार दूर असणा-या एकटाच इंग्रज एकसमयावच्छेदेकरून कसा उमटतो, याची कल्पना नकाशांच्या अभावी मराठ्यांस नव्हती. त्यामुळे ही मराठी राज्याच्या गळ्याभोवती एकच सलग तांत ओढली जात आहे, याची जाणीव त्यांस झाली नाही.
- तीच गोष्ट अबदालीच्या सामर्थ्याची. फारसी भाषेच्या संपर्कामुळे रूमशाम ही नावे मराठी उच्चारीत ; पण त्यांना या ठिकाणांचा भौगोलिक बोध मुळीत होत नव्हता. अखबारनविसांची येणारी फारशी बातमीपत्रे ते ऐकत ; पण मराठवाड्यांतील आपले गाव सोडून कधीच बाहेर न गेलेल्या विद्वान पुरुषासह समुद्राची खरी कल्पना जशी येऊ शकत नाही, तशीच पेशव्यांना आशिया खंडाची किंवा जगाची कल्पना करता येत नव्हती, असे त्यांच्या लिखाणावरून व आचरणावरून स्पष्ट दिसते.
- ज्ञानाचे कार्य डोक्याची तरतरी घडवून आणू शकत नाही. कै. राजवाड्यांनी आपल्या प्रस्तावनेत पेशव्यांजवळ नकाशे होते असे जे म्हटले आहे, त्याला त्यांनी पुरावा दिलेला नाही व आम्हासही तो कोठे आढळला नाही. मराठे तह करून मुलखाच्या वाटण्या करीत, यावरून त्यांच्याजवळ नकाशे होते असे गृहीत धरणे धाडसाचे आहे. हिंदुस्थानातील महालांच्या उत्पन्नांच्या व गावांच्या याद्या मोगली याद्यांवरून उतरलेल्या मराठ्यांजवळ होत्या ; पण त्यावरून अगदी स्थूल स्वरुपाचा नकाशाही कोणाला काढता आला नसता...............................
- आपले चालू भारत ज्या प्रदेशांचे बनले आहे ते प्रदेश मराठ्यांनी आपल्या खंडणीखाली आणलेले आहेत. या उलट जो प्रदेश आता पाकिस्तानकडे गेला आहे त्यात मराठ्यांचे पाऊल पडले नव्हते, असे दिसून येते. याची जाणीव भाजलेल्या लोकांस आता अकल्पितपणे होतांना आढळते. मराठे जेथे जेथे गेले तेथील दबलेल्या हिंदूंची मुसलमानांच्या भीतीतून सुटका त्यांनी केली. हे एक प्रकारचे नैतिक पुनरुत्थानच होते.
- बंगाली इतिहासकार मराठ्यांच्या स्वा-यांचे वास्तविक रहस्य न ओळखता, या बरगी लोकांनी आपल्या बंगभूमीत अनर्थ घडविला, अशी केवढीही हाकाटी करोत, पण त्यांनी विसरू नये की , जो बंगाल रघूजी भोसल्याचा व भास्कर राम कोल्हटकराच्या बारगीर शिलेदारांनी लुटला, तेवढाच आज स्वतंत्र भारतात सामील झाला आहे ! याची जाणीव ज्ञानलवदुर्विदग्ध लेखकांना नसली तरी पूर्व बंगालमधून पळून आलेल्या त्यांच्या दुर्दैवी बांधवांना आज तीव्रतेने भासते.
- आमचे स्नेही नागपूरचे सरदार गुजर यांनी याबाबत एक गोष्ट आम्हास सांगितली, ती अशी - काही वर्षांमागे नागपुरास अखिल भारतीय शिक्षक परिषदेचे अधिवेशन झाले. ते झाल्यानंतर एक दिवस काही बंगाली शिक्षक मुद्दाम रिक्षा करून नागपुरात प्रत्येकाला विचारीत चालले की “ येथे रघूजी भोसले कोठे राहतात ?” पण त्यांना धड कोणी सांगेना. पुढे गुजरांशी त्यांची गाठ पडली ; तेव्हा ते या पाहुण्यांबरोबर भोसल्यांचे आधुनिक दत्तक वारस गावाबाहेर सकरद-यात रहात असतात तेथे गेले.
- प्रस्तुत भोसले पंचाऐंशी वर्षाचे बहिरे व जवळजवळ आंधळे झालेत असे होते. त्यांच्याजवळ जाऊन हे बी.ए., बी.टी. शिक्षक मोठ्याने विचारू लागले की “ तुम्ही भोसल्यांनी ( म्हणजे तुमच्या पूर्वजांनी ) गंगा ओलांडून आमच्या पूर्व बंगल्यांत येण्याचा आळस कां केलात, ते आम्हास सांगा. तुमच्या या न येण्यामुळेच तेथील मुसलमान मस्त राहून त्यांनी आतां आम्हांस आमचा देश सोडण्यास लविले !” यावर त्यांतील एक अक्षरही न समजणारे आमचे रघूजी भोसले काय बोलणार ! त्यांनी “ आम्हांस हे काही कळत नाही. तुम्ही गावातील दुस-या कोणा जाणत्यास हे विचारा ” असे उत्तर, मोठ्या रागाने व त्वेषाने विचारणा-या सुशिक्षित बंगल्यास दिले.
- या सज्जन बंगाल्यांस खरोखरीच असे वाटत होते, की त्यांच्या प्रदेशात मराठे जाते तर आजचा दुर्धर प्रसंग त्यांच्यावर ओढवला नसता ! आणि आम्हासही त्यांचा भाव बेडकाच्या डरकाळ्या फोडणा-या क्षुद्र बंगाली इतिहासकारांपेक्षा सत्याला जास्त धरून वाटतो ! मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान तुडविले असेल, लुटले असेल, दुस-याही अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी पाचशे वर्षाच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदु प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहाण्यास उदाहरण घालून दिले होते.
- हिंदुस्थानातील मुसलमानी राज्ययंत्र त्यांनी इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदारास हांकून द्यावे व स्वतःचे राज्य स्थापावे. या कामांत त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती ! इतर प्रांतातील लोकांत हे लोण जाऊन पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखरी शोककथा होय, पानिपताचा पराभव नव्हे.
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता
- रोहन टिल्लू
- बीबीसी मराठी

फोटो स्रोत, Twitter / @DuttSanjay
पानिपत सिनेमाचं पोस्टर
'मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम', असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला. पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का हरलं?
याची कारणं शोधणं महत्त्वाचं आहे. आजही या प्रदेशात गेलं, की पानिपतमधले स्थानिकही या युद्धाबद्दल माहिती देतात.
या युद्धात मराठा सैन्य शौर्यानं लढलं, पण अखेर त्यांचा पराभव झाला. या पराभवामागची नेमकी कारणं काय, पाहू या!
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
निसर्ग शत्रू ठरला!
कुंजपुऱ्यावरून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या मराठा सैन्याने नोव्हेंबर 1760मध्ये पानिपतमध्ये तळ ठोकला. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने उत्तरेत कडाक्याच्या थंडीचे असतात.
इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "मराठा सैन्य दक्षिणेतून मोहिमेला निघालं, तेव्हा 1760चा जानेवारी महिना संपत आला असल्याने गरम कपडे वगैरे काहीच घेण्यात आले नव्हते. त्यामुळे मराठे उत्तरेच्या थंडीत गारठून गेले होते."
मोहिमेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पानिपतच्या आसपासच्या गावांमधली झाडंही शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे सरपणाला लाकडं मिळणं मराठा फौजेला कठीण झालं होतं. परिणामी मराठा सैन्याचे हाल होत होते, असं अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये नमूद केलं आहे.
"त्या उलट अफगाण सैनिकांचा पेहराव मात्र थंडीचा सामना करण्यासाठी योग्य होता. अफगाण सैनिक अंगावर चामड्याच्या कोटासारखा पोशाख करायचे. थंडीपासून रक्षण करण्यासाठी हा पोशाख योग्य होता," असं बलकवडे यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Google MAPS
इथे झालं पानिपतचं युद्ध... गूगल मॅपमध्ये सध्याचं पानिपत
सूर्य माथ्यावर आला आणि...
या युद्धात सूर्याची दिशा निर्णायक होती, असं अनेक इतिहासकार मानतात. अयोद्धेचा नवाब शुजा उद्दौला याच्या छावणीत असलेल्या काशीराज पंडितानंही याबाबत लिहून ठेवलं आहे.
मराठे पानिपतावरून दिल्लीकडे म्हणजेच दक्षिण दिशेला चालले होते. सकाळी नऊपासून सुरू झालेल्या या युद्धात दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आणि मराठा सैन्याच्या डोळ्यांवर, डोक्यावर तिरीप येऊ लागली. त्यामुळे मराठे हवालदिल झाले.
"मराठा सैन्याला पाण्याची भ्रांत होती, त्यातच सूर्य माथ्यावर आल्यानं ते आणखीनच हैराण झाले," बलकवडे यांनी या युद्धातली सूर्याची निर्णायक भूमिका स्पष्ट केली.
बखरकारांनी याचं वर्णन 'भानामती' असं केलं आहे. मराठा सैनिक भानामती झाल्यासारखे पाण्यासाठी कासावीस झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली, असं वर्णन भाऊसाहेबांच्या बखरीतही केलं आहे.

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY
पानिपतच्या युद्धाचा चित्ररूप पट
व्यूहरचना आणि प्रत्यक्ष युद्ध
पानिपत आणि आसपासचा मैदानी, सपाट मुलूख लक्षात घेता इथे मराठ्यांचा गनिमी कावा चालणार नाही, हे ओळखून मराठ्यांनी गोलाची लढाई करण्याचं धोरण अवलंबलं होतं.
गोलाची लढाई म्हणजे तोफखाना पुढे ठेवून त्याच्या मागे घोडदळ आणि पायदळ यांचा गोल करून पुढे सरकत जाणं. पांडुरंग बलकवडे यांच्यानुसार, अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठा फौजेला नव्हती.
युद्धाला तोंड फुटल्यावर इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याने अब्दालीच्या मधल्या फळीचं कंबरडं मोडलं होतं. मात्र त्याच वेळी विठ्ठलपंत विंचुरकरांच्या तुकडीने गोल मोडला आणि रोहिल्यांच्या दिशेने धाव घेतली.
"तोफखान्यासमोर आपलंच सैन्य आलेलं बघून इब्राहिमखानाने तोफखान्याचा मारा बंद केला. याचा फायदा अब्दालीने घेतला आणि उंटांवरच्या आपल्या हलक्या तोफा पुढे करत मराठ्यांना भाजून काढलं," बलकवडे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY
सदाशिवराव भाऊ पेशवे आणि इब्राहिमखान गारदी
अंबारी रिकामी दिसली आणि...
भारतातल्या राजांची युद्धादरम्यानची सवय म्हणजे, सगळ्यांत उंच हत्तीवरच्या अंबारीत बसून सैन्याचं नेतृत्त्व करायचं! या सवयीबद्दल नादिरशहा यानंही टीका केली होती.
'The Army of Indian Mughals' या पुस्तकात W. आयर्विन यांनी नादिरशहाच्या पत्राचा दाखला देत म्हटलं आहे, "हिंदुस्तानच्या राजांचा हा अजब परिपाठ आहे. युद्धात ते हत्तीवरून येतात आणि शत्रूचं निशाण बनतात."
"विश्वासरावांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडल्यावर सदाशिवराव भाऊ अंबारीतून उतरले आणि त्यांनी घोड्यावर मांड ठोकली. अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि सैन्याने कच खाल्ली," असं बलकवडे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, National Library of France
अहमदशहा अब्दाली
राखीव सैन्य आणि भाडोत्री सैनिक
याबाबत रूईया महाविद्यालयातल्या इतिहासाच्या प्राध्यापक मोहसीना मुकादम यांनी अब्दालीच्या राखीव सैन्यावर प्रकाश टाकला. त्या सांगतात, "मराठ्यांना दख्खनकडे जायचं असल्यानं त्यांचं सगळं सैन्य एकत्र निघालं होतं. अब्दालीने मात्र 10 हजारांचं राखीव दल ठेवलं होतं. मराठ्यांचं पारडं जड झाल्यावर त्याने अचानक हे दहा हजार सैनिक रणात उतरवले. दमलेल्या मराठ्यांना या ताज्या दमाच्या सैनिकांचा मुकाबला करणं कठीण झालं."
"तसंच अब्दालीच्या फौजेतले भाडोत्री सैनिक पळून जायला लागल्यावर त्यांना मारून पुन्हा युद्धभूमीकडे वळवण्याचं काम केलं जात होतं. ते भाडोत्री सैनिक असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं."
याउलट मराठा सैन्यात काही सरदारांनीच युद्धातून काढता पाय घेतला आणि त्यांच्याबरोबर अनेक सैनिक पळायला लागल्याचं निरीक्षण मुकादम नोंदवतात.

फोटो स्रोत, RAVINDRA MANJAREKAR/BBC
पानिपतची युद्धभूमी म्हणजेच काला आम्बचा परिसर
राजपूत, जाट आणि इतरांची बघ्याची भूमिका
हिंदुपदपातशाहीच्या रक्षणासाठी पेशव्यांनी ही मोहीम आखल्याचं ऐतिहासिक दाखल्यांमधून स्पष्ट होतं. पण त्यांना इतर राजपूत राजे, सुरजमल जाट, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला यांची साथ लाभली नाही, हादेखील इतिहास आहे.
याबाबत बलकवडे म्हणतात की, "मराठ्यांच्या उदयाआधी मुघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी राजपूत राजांवर होती. 1734च्या अहमदिया करारानंतर ती मराठ्यांकडे आली. त्यानुसार पेशव्यांना मुघल साम्राज्यात चौथाई आणि सरदेशमुखीचा हक्क मिळाला."
"हीच बाब राजपूतांना डाचत होती. अब्दालीकडून मराठ्यांच्या वर्चस्वाला शह बसला, तर त्यांनाही ते हवंच होतं. त्यामुळेच जोधपूरचा बीजेसिंग आणि जयपूरचा माधोसिंग हे दोघंही तटस्थ राहिले," बलकवडे यांनी पुष्टी जोडली.
"सुरजमल जाटाने आग्रा आणि अजमेर यांचा ताबा मागितला. अब्दालीच्या पाडावानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मराठ्यांनी सांगितल्यावर जाटही मराठ्यांची साथ सोडून गेला," बलकवडे म्हणाले.
शुजा उद्दौलाला दिल्लीची वजिरी हवी होती. त्याबाबतही काहीच निर्णय झाला नाही, म्हणून तोदेखील आपल्या सैन्यासह अब्दालीला सामील झाला. शुजा अब्दालीकडे जाणं, हे युद्धात निर्णायक ठरलं, असं मोहसिना मुकादम सांगतात.

फोटो स्रोत, ALASTAIR GRANT/AFP/GETTY IMAGES
पानिपतानंतर उत्तरेतल्या मराठा वर्चस्वाला धक्का लागला असं म्हटलं जातं.
बाजारबुणगे आणि यात्रेकरू
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of podcast promotion
अब्दालीच्या फौजा सड्या फौजा होत्या. त्याउलट मराठा फौजेबरोबर यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू, व्यापारी आणि कुटुंबकबिला असे सुमारे 30-40 हजार बिनलढाऊ लोक होते.
या लोकांच्या खाण्यापिण्याची सोय करताना मराठा सैन्याचं कंबरडं मोडलं होतं. तसंच खजिन्याची कमतरताही भेडसावत होती, यावर मोहसिना मुकादम प्रकाश टाकतात.
मराठी फौजेचा वेग आणि या बाजारबुणग्यांचा वेग यांच्यात प्रचंड तफावत असल्याने फौजेला या लोकांच्या वेगाशी बरोबरी करत आगेकूच करावी लागत होती. तसंच प्रत्यक्ष युद्धाच्या आधीही तीर्थयात्रेसारख्या गोष्टींमुळे फौजेला वेगवान हालचाली करणं अशक्य झालं, असं बलकवडे यांनी स्पष्ट केलं.
कारणं काहीही असली, तरी पानिपतच्या युद्धातल्या पराभवामुळे मराठा साम्राज्याचं कंबरडं मोडलं. मराठ्यांचा उत्तरेकडचा दबदबा अचानक नाहीसा झाला. मोठ्या संख्येने मराठा सैनिक पानिपतावर मारले गेल्यानं पेशव्यांची सामरी ताकद कमकुवत झाली.
पानिपतच्या पराभवानंतर उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांना दबदबा निर्माण करण्यासाठी 12 वर्षं वाट बघावी लागली. महादजी शिंदे यांनी 1773-74 मध्ये उत्तरेत पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही, तर भारताच्या इतिहासाचीही दिशा बदलली.
तुम्ही हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
पानिपतच्या लढाया : हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया. हे स्थळ दिल्लीच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर आहे.
पेशव्यांकडे बातमीदारांची पत्रे येऊ लागली की, वेळ आणीबाणीची आली आहे हिंदुस्थानातील आपला अंमल उठला, अबदाली दिल्लीस येऊन पोहोचला आणि त्याने पंजाब, दिल्ली प्रदेश व्यापला. दुआब, आग्रा व राजस्थानातील सर्व राजेरजवाड्यांकडे त्याचे वकील रवाना झाले. आतापर्यंत केलेली सर्व कमाई फुकट गेली. रोहिले अबदालीस सामील झाले. शिंदे-होळकरांचा पाडाव झाल्यापासून आपल्या फौजांनी धीर सोडला आहे आणि शत्रूला गर्व चढला आहे. उत्तरेत जी बिकट समस्या निर्माण झाली, त्यांची चर्चा करण्याकरिता पेशव्याने आपल्या सरदारांना बोलाविले. एक आठवडामर ऊहापोह होऊन असे ठरले की, सदाशिवरावभाऊने उत्तरेत जाऊन शत्रूचा परिहार करावा. तेरा हजार निवडक हुजरात, बारा हजार सरदारांची फौज, इब्राहीमखान गारदीने तयार केलेले पाश्चात्त्य पद्धतीने लढणारे आठ हजार पायदळ आणि जंगी तोफखाना घेऊन १६ मार्च १७६० रोजी भाऊ विश्वासरावासह उत्तरेची वाट चालू लागला. १२ एप्रिलला विश्वासरावासह त्याने नर्मदा ओलांडली आणि उत्तरेतील हिंदू, राजपूत, जाट, बुंदेले तसेच राजेरजवाडे आणि मुसलमान नबाब, अमीर-उमराव या सर्वांना बादशाहीच्या रक्षणार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले.
दिल्ली घेतल्याने मराठ्यांचा दरारा वाढला खरा पण वास्तविक काही फायदा त्यांच्या पदरात पडला नाही. थोडी कुचंबणाच झाली. गेली दोन-चार वर्षे चाललेल्या दोन्ही फौजांच्या हालचालीत राजधानी आणि भोवतालचा प्रदेश अगदी धुऊन निघाला होता दंग्यामुळे साल मजकूरचा ऐवज येईना संस्थानिक खंडणी देईनात सावकार परागंदा झाले कर्ज मिळेनासे झाले आणि इकडे भाऊचा खर्च तर बेसुमार वाढला. मोहीम सुरू झाल्यापासून दहा महिन्यांत पाऊण कोटीपर्यंत खर्च झाला आणि भाऊच्या हाती जेमतेम बावीस लाखपर्यंत रक्कम येऊन पोहोचली.
वाटाघाटीतून काही निष्पन्न होईना आणि नदीचे पाणी उतरण्यास अद्याप महिना होता. फौजेची तर आबाळ होत चालली. ही कोंडी फोडावयाची कशी याचा विचार करता, दिल्लीपासून १२० किमी. उत्तरेस, यमुनेच्या पश्चिम किनार्यावर असलेल्या अबदालीच्या कुंजपुरा ठाण्यावर हल्ला करण्याचे भाऊने ठरविले. कुंजपुरा लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे ठाणे होते. अफगाण फौजांच्या उपयोगासाठी कुंजपुर्याच्या किल्ल्यात दहा हजार खंडी धान्य, चार-पाच हजार घोडी, दारूगोळा इ. सामग्री साठविण्यात आली होती. ८ ऑक्टोबर रोजी मराठी फौजांनी दिल्ली सोडली. १७ तारखेस इब्राहीमखानाच्या तोफांच्या मार्याने किल्ल्याच्या तटास खिंडार पाडले व त्यातून मराठी फौज आत घुसली. तेथे झालेल्या धुमश्चक्रीत मोमीनखान व किल्लेदार नजाबतखान आणि चार हजार रोहिले मारले गेले. ठाण्यांतील सर्व सामग्री मराठ्यांच्या ताब्यात आली. विशेषतः धान्याची कोठारे हातात आल्यामुळे मराठी फौजेचा हुरूप वाढला. दुसर्या दिवशी मराठा छावणीत दसरा मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. तथापि शत्रुच्या कारवाया चालूच होत्या.
अबदाली मोठा अनुभावी आणि कुशल सेनानी होता. त्याने आपली फौज थोडी मागे घेतली आणि परिस्थितीचे निरीक्षण चालविले. सुरुवातीला त्याच्या फौजेत रसदेची व्यवस्था नव्हती त्यामुळे साहजिकच धान्याची महर्गता वाढली. गिलच्यांच्या लष्करातील या बातम्या भाऊकडे येत होत्या. त्याचा अर्थ त्याने वेगळाच केला. १ नोव्हेंबर रोजी भाऊने गोविंदपंतास लिहिले, ‘फार आवळून चालतात, काही लांबवू देत नाहीत. चाळीस-पन्नास कोस धावतात ते नाही. दाणा दोनअडीच शेर गिलच्यांच्या लष्करात आहे. हिंमत फार आहे. यास गिळणार’. सेनापतीची ही आत्मविश्वासाची भावना इतरांच्या पत्रांतही व्यक्त होते. मराठी फौजेत असलेला कृष्ण जोशी यासंबंधी आपल्या भावास तपशीलवार लिहितो. या पत्रात दोन्ही बाजूंकडील एकूण परिस्थितीचे सम्यक दर्शन घडते.
बुधवार, पौष शुद्ध अष्टमी (१४ जानेवरी १७६१) रोजी मराठी फौजा पानिपतची छावणी सोडून बाहेर पडल्या. इब्राहीमखान गार्दीने मसलत सुचविली होती की, ‘गोल किंवा बुरुज बांधून, मध्ये बुणगे घालावे, भोवताली तोफखाना वाटून द्यावा, चहुंकडून चार सरदार मातबर देऊन जिकडील तिकडे बाजू वाटून द्यावी. कोस-दोन कोस लढत भिडत दिल्लीस जाऊन पोहोचावे’ पण आयत्या वेळी रात्री हा मनसबा केला होता तो राहिला.

2. Majumdar, R. C. Ed. The Maratha Supremacy. Bombay. 1977.
3. Shejwalkar, T. S. Panipat 1761. Poona. 1946.











No comments:
Post a Comment