३ डिसेंबर २०२३ रोजी पालघर येथील मनोर किल्ला पाहिला.
*इतिहास* प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्यावर आपले राज्य स्थापन केले. त्याच काळात मनोर किल्ला बांधण्यात आला असावा. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा परीसर घेतला तेंव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला असावा. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ याकाळात मोरोपंताना ६००० ची फौज देउन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात मनोर किल्ला स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगिज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये हा गड पोर्तुगीज कडून जिंकून घेतला. इ.स. १८१७ मधे ब्रिटिश अधिकारी गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने हा गड जिंकला.
मुंबईकडून येत असल्यास मुंबई अहमदाबाद महामार्गावर वैतरणा नदीचा पूल ओलांडल्यावर मनोर गाव लागते. हे गाव हायवेच्या दोन्ही बाजूला पसरले आहे. हायवे वरून डाव्या हाताला मनोर गावात शिरल्यानंतर एक किलोमीटर वर डाव्या हाताला वळावे लागते. तेथून चारशे ते पाचशे मीटर वर पुन्हा डाव्या हाताला ही अशी बोळ लागते. ही बोळ थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाते.
किल्ला जास्त उंचीवर नसला तरी छोट्याशा टेकडीवर असावा. आजूबाजूला वाढलेली वस्ती पाहून ते कदाचित जाणवत नाही.
किल्ल्याला पूर्णपणे रानटी झाडांचा विळखा बसलेला दिसत होते आणि किल्ल्यावरील बरेच से अवशेष हे त्याखाली झाकून गेले होते. किल्ल्याचे हालत फार बिकट आहे आणि अवशेष ही नामशेष होत चालले आहे. संवर्धनाची अत्यंत गरज आहे.
किल्ल्याच्या आजूबाजूला मानवी वस्ती फारच वाढलेली दिसत होती आणि त्यांनी सुद्धा ह्या किल्ल्याचे रक्षण किवा जोपासना करण्या ऐवजी नुकसानच केलेले दिसत आहे.
किल्ल्यावर फेरफटका मारत असताना पूर्व दिशेला उचावर्ती एक चौथरा दिसला. हा कदाचित किल्ल्यावरील किल्लेदाराचा वाडा असावा.
वाड्याच्या चौथ्यावरून पूर्व दिशेला वैतरणा नदीचे मनमोहक दृश्य दिसत होते. पण ते सुद्धा बऱ्यापैकी वाढलेल्या जंगली झाडांमुळे झाकले गेले होते. कदाचित येथून वैतरणा नदीत उतरायला मार्ग असावा आणि हा किल्ला एक बंदर म्हणून सुद्धा वापरला गेलेला असावा.
किल्ल्यावरती दोन मिनिटे सुद्धा एका ठिकाणी उभे रहावले जात नव्हते कारण डासानी अक्षरशः उच्छाद मांडला होता.
१७३७ सालापासून १७३९ सालापर्यंत वीर चिमाजी अप्पांनी आप्पांनी पोर्तुगीजांना उत्तर कोकणातून उखडून टाकण्याच्या मोहिमेत हा किल्ला सुद्धा त्यांनी जिंकून घेतला असणारच. कारण मराठ्यांनी डहाणूपासून ते वसई पर्यंत सर्वच किल्ले पोर्तुगीजांकडून घेतले. त्यामुळे उत्तर कोकणातील पोर्तुगीजांचे स्वामित्व पूर्णपणे नेस्तनाबूत होऊन तेथे मराठ्यांची सत्ता स्थापन झाली. कोण जाणे जर मराठ्यांनी ही मोहीम पोर्तुगीजांविरुद्ध काढली नसती तर मुघलांन सोबतच कदाचित पोर्तुगीज सुद्धा या देशात बळावले असते आणि भारताचा इतिहास अजून विचित्र दिसला असता. मराठ्यांचा हिंदुस्तान विजय इतिहासाचे छोटेसे दर्शन देणारा हा किल्ला आज आपला शेवटचा घटका मोजत आहे हे नक्की आणि संवर्धनाची अत्यंत गरज आहे.
मनोर चा किल्ला पाहून झाल्यावर आमचे मोर्चे वळले शिरगाव बीच कडे. शिरगाव बीच येथे जायला मनोर वरूनच पालघर कडे जावे व पालघर वरून पुढे पुढे गेल्यावर एक रस्ता डाव्या हाताला जातो. तो रस्ता थेट शिरगाव बीच पर्यंत जातो.
पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर धर्मछळ आणि बाटवा बाटवी सुरू केली होती .
अंजुरकर नाईकांनी पेशव्यांना पत्र लिहून विनंती केली की इथला धर्म वाचवा .
थोरल्या बाजीरावांची चिमाजी आप्पांना वसई वर धाडले . मोठी लढाई झाली आणि पोर्तुगीज नमले .

No comments:
Post a Comment