Sunday, September 25, 2022

पेंडूरवासीयांनो सावधान ! जैन लेणी पुरातत्व विभाग नेणार रत्नागिरीच्या संग्रहालयात"

किशोर राणे  | सिंधुदुर्ग 

कोकणावर अनेक आक्रमणे झाली मात्र आदिम काळातल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारे साक्षीदार उन -वारा -पाऊस झेलत ठाण मांडून उभे आहेत.हजारो वर्षापूर्वीचा तेजोमय इतिहास दाखविणाºया मुर्तीशास्त्राचा वारसा जपणारा ठेवाच आता संकटात सापडला आहे.हा ठेवा जिल्हाबाहेर नेण्याचा घाट घातला जात आहे. जो पर्यटन सिंधुदुर्गच्या मुळावरच येणारा आहे. मालवण तालुक्यातील पेंडुर गावात सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या अनेक मुर्त्यां उघड्यावर पडलेल्या असल्याने त्यांना संरक्षित करण्यासाठी पुरातत्व विभागाने त्यांना जिल्हा बाहेर संग्रहालयात नेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.रत्नागिरीच्या थिबा पॅलेसमध्ये आता हा ठेवा कडीकुलुपात बंदिस्त होईल.यासाठीची कार्यवाही सुरूही झाली असून जिल्हाबाहेर या मुर्त्या गेल्या तर त्या पुन्हा जिल्ह्यात आणणे अवघड असल्याने तातडीने जिल्हावासीयांनी सावध व्हायला हवे. पेंडूर येथील मुर्त्यांचा वारसा याच गावात जतन आणि संवर्धन व्हायला हवा. या गावचा प्रगल्भ इतिहास ,हजार वर्षापुर्वीचा प्राचिन ठेवा गावातच जपायला हवा. विनाविलंब या मुर्त्या आणि शिल्प जिल्ह्यातच संरक्षित करण्यासाठी जिल्हावासीयांनी पुढाकार घ्यायला हवा. तसेच सिंधुदुर्गातच तातडीने संग्रहालय व्हायला हवे.यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी व्हावी अशी अपेक्षा इतिहासप्रेमी करत आहेत.






सिंधुदुर्गात आदीम काळातील मानव संस्कृतीच्या पाऊलखुणा मिळतानाच कातळ शिल्प आणि कोकणचे मुर्तीशास्त्र थक्क करणारे आहे. अनेक भागातील प्राचिन शिल्प, हजारो वर्षापुर्वीच्या मुर्त्यांचा ठेवा जपला जायला हवा. यासाठी तो संरक्षित व्हायलाच हवा. हजार वर्षे या मूर्ती ऊन वारा पाऊस खात उभ्या आहेत या भूमीवर त्यांचा इतिहास कोरला गेलेला आहे येथे असलेल्या संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे या भागातच या मुर्त्या सुरक्षित होणे गरजेचे आहे. पर्यटन सिंधुदुर्गातून हा ठेवा बाहेर तर गेला ते जिल्हाचे मोठे नुकसान होणार आहे.पेंडूर येथील सातेरी देवी मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या जैन व हिंदू मूर्ती संरक्षित करण्यासाठी पुरातत्व विभागाने पाऊले उचलली आहेत. या मूर्ती सुरक्षित होणे काळाची गरज आहे मात्र अनेक वर्षापासून भग्नावस्थेत असलेल्या मूर्ती पुरातत्वीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. या अनुषंगाने पुरातत्व विभागाचे रत्नागिरी येथील सहाय्यक संचालक वि.पु.वाहणे यांच्या पथकाने १६ डिसेंबर रोजी पेंडूर येथील मुर्तींची पाहणी करून येथून मूर्ती उचलण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भातील परवानगीसाठी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि पेंडूर प्रशासक/ग्रामसेवक यांना कळविले आहे. महाराष्ट्र प्राचिन स्मारके, पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० मधील कलम २५ (१) नुसार परवानगी मागताना महाराष्ट्र शासन संग्रहालयात या मुर्त्या हलविण्याची प्रयोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे संग्रहालय रत्नागिरी येथील थिबा पॅलेस येथे आहे. या पुर्वी जिल्ह्यातून अनेक भागातील पुरातत्व ठेवा या संग्रहालयात नेण्यात आला आहे. गड किल्ल्यावरच्या मुर्त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.<br />

यामुळे दिवसेन दिवस सिंधुदुर्गचा ठेवा कमी होत जाणे पर्यटन सिंधुदुर्गच्या प्राचिन अस्मितेवरच घाला घालणारा ठरत आहे. या पार्श्वभुमिवर जैन संस्कृतीचा मोठा इतिहास असलेला हा अमुल्य ठेवा गावातच जपण्यासाठी पेंडूरवासीयांबरोबरच जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा. या मुर्ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात घेण्यास परवानगी न देता या मुर्ती आपणच संरक्षित करत असल्याची हमी द्यायला हवी अशी भुमिका इतिहासप्रेमी घेत आहेत.

जिल्ह्यात प्राचिन वस्तुसंग्रहालय व्हायला हवेच!

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात वस्तुसंग्रहालय असावे ही मागणी आम्ही कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने करत आलो आहोत. अनेक गावांमधील मंदिराबाहेर विरगळ इतस्तत: विखुरलेले पहायला मिळतात ते विरगळ इतिहासाचा मोठा ठेवा आहे. तो मंदीरामध्ये, धर्मशाळांमध्ये फिक्स सिमेंट मध्ये बसवून संरक्षित करायला हवा. पश्चिमघाट देवस्थान कमिटी आणि शासनाचे बांधकाम खात्या कडून या कामासाठी सहकार्य हवे. मंदिर व्यवस्थापन, लोकवर्गणीतूनही सुद्धा हे काम सहज शक्य होणारे आहे. जिल्हावासीयांनी हा ठेवा जपण्यासाठी प्रगल्भपणे प्रयत्न करायला हवा.हा आपल्या सिंधुदुर्गचा अनोखा वारसा आहे. तो वारसा जपला तर मुर्ती शास्त्र पर्यटनात सिंधुदुर्गचे नाव मोठे असेल. यापुर्वी जिल्ह्यातील खुप मुर्ती चोरीस गेल्या आहेत. पेंडूरची लेणी ही पेंडुरमध्येच रहायला हवीत मात्र ती उन वाºयापासूनही संरक्षित व्हायला हवीत.यासाठी गाववासीयांनी जागृत व्हायला हवे. आमचा प्रयत्नही तसाच आहे. कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग व गिर्यारोहण असोशिऐशन सिंधुदुर्ग व शिवप्रेमी ग्रुप संस्था सर्व घटकांना मदत करेलच आमचे सहकारी संस्थेचे सचिव प्रा.सुरेश पाटील,डॉ.कमलेश चव्हाण,डॉ.लिंगवत सर,डॉ.गणेश मर्गज,रहा नाईक सहकार्य करतीलच

प्रकाश नारकर, अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद,सिंधुदुर्ग

वृक्षवेलींनी वेढलेली कोण आहे ही माता?

<p style="text-align: justify;">पेंडुर परिसरातील चौदा मुर्ती आणि शिल्प पुरातत्व विभागाच्या नोंदीत असून या मुर्तीचा प्राचिन इतिहास लक्षात घ्यायला हवा. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी कोकणाच्या या भूभागावर शिलाहार राजांचा अंमल होता. शिलाहार काळात सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैन धर्म खºया अर्थाने मूळ धरू लागला. त्यांच्या राज्यात जैनधर्मियांना मानाचे स्थान होते. जैनधर्म मानणाºया शिलाहार राजा श्वम्मियर याने शके ७८५ (इ.स. १०६३-६४) च्या सुमारास बलिपत्तन म्हणजे आजचे खारेपाटण येथे आपली राजधानी वसवली होती, याची साक्ष देणारी नेमीनाथ व चंद्रप्रभू नावांची जैन मंदिरे सुख नदीच्या काठावर उभी आहेत.पेंडूर येथील देऊळवाडीतील श्रीदेवी मंदिराच्या मागील बाजूस सुमारे पंधराशे पंचवीस चौरस मीटर परिसरात वृक्षवेलींनी वेढलेल्या परिस्थितीत हे जैन मंदिर होते. साफसफाई केल्यानंतर चिºयांचे बांधकाम असलेला गाभारा, सभामंडपाचे जोते आणि चौदा मूर्ती असा मोठा ऐतिहासिक ठेवा सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची मूर्तीकला व तत्कालीन जैन संस्कृतीचे दर्शन घडते.येथे जैन तीर्थंकराची मूर्ती असून बाजूला चवºया ढाळणाºया दासीची प्रतिमा आहे. समोरच जमिनीवर हत्तीच्या मुखाचे कोरीव काम असलेले भग्न आसन व मूर्तीच्या मानेमागची प्रभावळ भग्न झालेली असून गाभाºयाबाहेर यक्ष व शासनदेवी यांच्या मूर्ती आहेत. शिवाय भगवान वर्धमान महावीर यांची मोठी मूर्ती व पादुकाही आहेत. या पादुका काहीशा भग्न असून जवळच अंबिका किंवा आम्रा (मांडीवर लहान मुलं घेतलेली स्त्रीमूर्ती) हिची मूर्ती आहे.सध्या या मुर्तीला वृक्षवेलींनी वेढलेली असून हीच मुर्ती पुरातत्व विभाग तातडीने संग्रहालयात नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.सध्या वृक्षवेलींनी या मुर्तीला वेढलेले असल्याने चोरांना ते पळविता आलेली नाही. मुर्तीशास्त्रातील ही मुर्ती म्हणजे सिंधुदुर्गचा अनोखा ठेवा आहे.याखेरीज मस्तक नसलेली पार्श्वनाथाची व सर्वानुभूते, मातंग गोमेधा वगैरेंच्या मूर्ती आहेत, तर मंदिराच्या बाहेर व्याघ्रसदृश्य प्राण्याची व अगदी तशाच प्राण्यावर आरूढ झालेल्या देवीची अशा दोन मूर्ती आहेत. त्यांपैकी व्याघ्रसदृश्य प्राण्यावर आरूढ झालेली रक्षक देवतेची मूर्ती अर्धी-अधिक जमिनीत गेलेली आहे. पेंडूर येथील स्थानिक लोक या मूर्तींपैकी अंबिकेच्या मूर्तीला डंकिनी व देवदूताला शांकिनी या नावांनी संबोधतात. ग्रामस्थांकडून असे कळते की,पूर्वी या जागी विशिष्ट प्रकारच्या विटा व नक्षीदार खांब होते, पण ते खांब इंग्रजांनी आपल्याबरोबर नेल्याचे सांगीतले जाते. किमान एक हजार वर्षांपूर्वी पेंडूर गावात एक देखणे जैन मंदिर उभे होते याची साक्ष देत आज हे भग्नावशेष पडलेले आहेत. याखेरीज डांबरी रस्त्यालगत एका जैन धर्मगुरूची समाधी आहे. त्याला स्थानिक लोक स्वामींची समाधी म्हणतात. जैन मंदिरातील मूर्ती आज ऊन, वारा व पाऊस यांचा मारा सहन करीत अगदी उघड्यावर आहेत.त्यांना संरक्षित करायलाच हवे.

No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...