(या प्रकरणाचे मूळ इंग्रजी लेखन डॉ. एस.जे. मंगलम् (प्राध्यापक, पुरातत्व विभाग, डेअकन महाविद्यालय, पुणे) यांनी केलेले असून त्याचा मराठी अनुवाद डॉ. हरिहर ठोसर (निवृत्त प्रपाठक, इतिहास विभाग प्रमुख, एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई) यानी केला आहे.)
कर्नाटकातील इतिहास संशोधक श्री नृसिंहमूर्ती यांनी देवगिरीचे यादव या सर्वमान्य राजवंशाचा उल्लेख देवगिरीचे सेऊण असा केला आहे.' त्यांच्या मते यादव हे नाव पौराणिक असून ते होयसळ, बंगालचे सेन इत्यादी तसेच दक्षिण भारतातील अनेक मध्ययुगीन राजवंशांनी आपल्या घराण्यासाठी उपयोगात आणले आहे. तर सेऊण हे नाव या वंशाचा संस्थापक सेऊणचंद्र याच्या नावाशी संबंधित असून कल्याणचे चालुक्य, काकतीय आणि होयसळांनी त्यांना या नावाने संबोधले आहे. असे असले तरी देवगिरीचे याद्व स्वतःचा उल्लेख सेऊण न करतास यादद्ववंशीय असाच करतात आणि हेच नामभिधान बहुतांशी सर्व इतिहासकारांनी मान्य केले आहे. स्वाभाविकपणे देवगिरीचे यादव यांच्या नावाने हा राजवंश नौदद्वण्यात आला आहे.
हेमाद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात यादवांची संपूर्ण वंशावळ आणि इतिहास नमूद करण्यात आलेला असून या वंशाची उत्पत्ती चंद्रापासून दाखविण्यात आलेली आहे. सुबाहुचा पुत्र दृढपहार हा या वंशाचा मूळ पुरुष द्वारावती (द्वारका, गुजरात) येथून दक्षिणेत आला व राज्य स्थापून श्रीनगर (सिन्नर, जिल्हा नाशिक) ही त्याने आपली राजधानी म्हणून निवडली असे वर्णन हेमादीने पुढे केले आहे. जिनप्रभासुरीकृत नाशिककल्पाचा प्रभाव असलेल्या यादवांच्या काही कोरीव लेखात दृढप्रहार हा द्वारावतीहून येऊन चंद्रादिव्यपूर (चांदवड, जिल्हा नाशिक) येथे स्थायिक झाल्याचे वर्णन आढळते. या कोरीव लेखानुसार दृढपहाराचा मुलगा पहिला सेऊणचंद्र याने सिदिनगर (सिन्नर, जिल्हा नाशिक) भागातील सेऊणपूर इथे आपली राजधानी स्थलांतरित केली. डॉ. श्रीनिवास रित्ती दृढप्रहार आणि त्याचे द्वारके हुन झालेले स्थलांतर अनैतिहासिक असल्याचे मानतात. ते सेऊणचंद्राने सेऊणपूर इथे राजधानी स्थापन करण्याची घटना ऐतिहासिक मानतात, कारण नंतरच्या काळातील सेऊणचंद्राचे वर्णन सेऊणपुरवराधीश्वर असे करण्यात आल्याचा ते दाखला देतात. त्यामुळे काही इतिहासकारांना दृढपहाराच्या ऐतिहासिकतेविषयी शंका असून पहिला सेऊणचंद्र हाच यादव राजवंशाचा संस्थापक असल्याचा ते दावा करतात.
यादवांच्या प्रांरंभीच्या काळातील राजधान्या सिन्नर आणि चांदवड तसेच नंतरच्या काळातील राजधानी देवगिरी (दौलताबाद जिल्हा औरंगाबाद) या सर्व महाराष्ट्रातील असून देस्वील नरसिंह मूर्ती आणि श्रीनिवास रित्ती यादवांना महाराष्ट्रीय मानत नाहीत. यादव रानांची नावे, कानडी राजघराण्याशी असलेले त्यांचे सोयरसंबंध, कुंतल आणि कर्नाट देशाचे शासक ही त्यांची पदवी आणि कानडी भाषेतील त्यांचे बहुतेक कोरीव लेख इत्यादी पुराव्यावरून यादव हे मूळचे कानडी मुलस्वातील होत असा त्यांचा दावा आहे. परंतु या दाव्यात फारचे तथ्य नाही. कारण यादव साम्राज्याचा विस्तार लक्षात घेतल्यास त्यात संपूर्ण महाराष्ट्र समाविष्ट असून कर्नाटकाचा केवळ उत्तर भाग त्यात होता. महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाचे विशेष महत्त्व आहे कारण मराठी कला आणि संस्कृतीच्या जडणघडणीत यादवांचे अतिशय महत्त्वाचे योगदान असल्याबद्दल महाराष्ट्रीयांना यादवांविषयी अभिमान वाटतो.
यादवांच्या उपलब्ध वंशावळीत अनेक गुंतागुंती आहेत. यादवांच्या अखेरच्या राजाचा मंत्री असलेल्या हेमाद्रीने या वंशाचा निर्माता असलेल्या चंद्रापासून आपला आश्रयदाता असलेल्या महादेवापर्यतच्या राजांची सविस्तर वंशावळ दिली आहे. त्याने यासाठी पारंपरिक साधनांचा आधार घेतलेला असल्यामुळे परस्परांशी प्रत्यक्ष कसलाही संबंध नसलेल्या पुरुषांची नावे या वंशावळीत आलेली आहेत. ही वंशावळ कोरीव लेखातील माहितीशी विसंगत आहे. एवढेच नव्हे तर विविध कोरीव लेखातील माहिती देखील परस्पराशी जुळत नाही. असे असूनही विविध संशोधकांनी केलेल्या कामामुळे या वंशाचे स्पष्ट चित्र रेखाटणे शक्य झाले आहे.
या वंशावळी पहिल्या सेऊणचंद्रापासून सुरू होतात. सेऊणचंद्राचा राज्यकाल इ. स. ८३७ ते ८६० असा गृहीत धरण्यात आलेला आहे. सेऊणचंद्रापासूनच्या त्याच्या उत्तराधिकायांनी साडेतीनशे वर्षापर्यंत म्हणजे ९ व्या शतकाच्या मध्यापासून बाराव्या शतकाच्या अस्वेरपर्यंत अगोदर राष्ट्रकूटांवे व त्यानंतर कल्याणच्या चालुक्यांचे मांडलिक म्हणून आपल्या प्रदेशाचे शासन चालविले. शेवटी कल्याणच्या चालुक्यांचा शेवट करून त्यांनी आपल्या सार्वभौमत्वाची द्वाही फिरविली.
पहिला सेऊणचंद्र (इ.स. ८३७ ते ८६०): हेमाद्रीची प्रशस्ती तसेच कळस बुद्रुक आणि संगमनेर" ताम्रपटातील वंशावळीत पहिला सेऊणचंद्र हाव या वंशाचा मूळ पुरुष असल्याचा उल्लेख असून त्याच्या नावावरून त्याच्या राज्याचा सेऊणदेश असा उल्लेख करण्यात आला आहे. तिसऱ्या भिल्लमाच्या देवळाली ताम्रपटानुसार सेऊणचंद्राने सिदिनेर भागात सेऊणपूर शहर वसविले." सेऊणचंद्राच्या राज्यकालाची निश्चिती त्याचा चौथा वंशज वद्दिग" आणि वदिगाचा स्वामी राष्ट्रकूट तिसरा कृष्ण (इ.स. ९३९ ते९६७) यांच्यातील समकालीनत्वावर आधारलेली आहे. प्रत्येक राजाचा राज्यकाल सरासरी २५ वर्षे गृहित धरल्यास सेऊणचंद्राचा राज्यकाल इ.स. ८३७ ते ८६० असा येतो. याचा अर्थ राष्ट्रकूट पहिला अमोधवर्ष याचा सेऊणचंद्र मांडलिक होता
सेऊणचंद्राचे पहिले तीन उत्तराधिकारी अनुक्रमे पहिला धाडियप्पा, पहिला भिल्लम आणि राजुगी यांच्या राजकीय जीवनाविषयी माहिती उपलब्ध नाही. राजुगीचा उत्तराधिकारी पहिला वद्दिम हा असून त्याच्या विषयीची माहिती उपरिनिर्दिष्ट संगमनेर ताम्रपटात देण्यात आलेली आहे. त्यानुसार वद्दिगाना विवाह महानृप धोप्पा याच्या कन्येशी झाला होता. कीलहॉर्न यांच्या मते धोरप्पा हे ध्रुव या संस्कृत नावाचे अपभ्रष्ट रूप असून त्या नावाचा राष्ट्रकूट तिसऱ्या कृष्णाचा एक भाऊ होता." यावरून असा तर्क करण्यात येतो की वद्दिग हा कृष्णाचा पिता तिसरा अमोघवर्ष याचा समकालीन आणि मांडलिक असावा. तिसऱ्या अमोघवर्षाचे मूळ नाव वद्दिग असेच होते. दोघांच्या नामसादृश्यावरून या दोघात निक टचे संबंध असल्याचे जाणवते. वद्दिगाचा राज्यकाल इ.स. ९३७ ते ९७० असा गृहीत धरण्यात आला आहे.
दूसरा भिल्लम (इ.स. १७० ते १००७): आपल्या राज्यकालाच्या सुरुवातीलाच भिल्लमाला दक्षिणेतील बदलत्या राजकीय स्थितीचा सामना करावा लागला. तिसऱ्या कृष्णाच्या कारकिर्दीनंतर राष्ट्रकूटांच्या सत्तेची घसरण सुरू झाली व लवकरच दुसऱ्या तैलाने या राजवटीचा शेवट करून दक्षिणेत चालुक्य सत्तेवी पुनर्स्थापना केली. संगमनेर ताम्रपटानुसार दुसऱ्या भिल्लमाने कल्याणच्या चालुक्यांची अधिसत्ता स्वीकारली. सेऊणदेश हा कल्याण चालुक्य राज्याच्या उत्तरसीमेवर व परमार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे दुसऱ्या तैलाच्या परमारांविरु द्धच्या मोहिमेत दुसया भिल्लमास भाग घ्यावा लागला. त्यामुळे परमार मुंजाच्या तैलाकडून झालेल्या पराभवात दुसऱ्या भिल्लमाचा महत्त्वाचा वाटा होता. भिल्लमाची राणी लक्ष्मी उर्फ लच्छि अव्वा ही उत्तर कोकणचा शिलाहार राजा झंझ यानी कन्या होती." ती एक कर्तबगार प्रशासक होती. दुसया भिल्लमाचा व लक्ष्मीचा मुलगा वेसुमी (इ.स. १००७ ते १०१०) हा अकाली निधन पावल्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा तिसरा भिल्लम याला राज्यावर बसवून लक्ष्मीने राजपालिका म्हणून यशस्वीपणे राज्यकारभार चालविल्याची माहिती दुसऱ्या सेऊणचंदाच्या वसई ताम्रपटावरून मिळते."
तिसरा भिल्लम (इ.स. १०१० ते १०७४): कल्याणच्या चालुक्यांच्या कोरीव लेस्वातील माहितीवरून तिसऱ्याया भिल्लमाने चालुक्यांचे स्वामित्व मान्य करण्यास नकार देऊन बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. चालुक्य जयसिंह आणि पहिल्या सोमेश्वराच्या" काही कोरीव लेखात काही चालुक्य सेनानींना भिल्लमदिशापट्ट (भिल्लमाचा पराभव करणारा) आणि सेऊणदिशापट्ट (सेऊणदेशाचा विजेता) या पदव्या देऊन गौरविण्यात आलेले दिसते. पहिला सोमेश्वर हा शक्तिशाली असून देखील त्याने तिसऱ्या भिल्लमाच्या औद्धत्याबद्दल त्याला शासन करण्याऐवजी त्याचे सामर्थ्य आपल्या बाजूस वळविण्याच्या दृष्टीने आपली बहीण अव्वलादेवी हिचा तिसऱ्या भिल्लमाशी विवाहसंबंध जुळविला. त्यामुळे पुढील काळात तिसऱ्या भिल्लमाने आपली सर्व शक्ती चालुक्यांच्या पाठीशी उभी केली.
तिसऱ्या भिल्लमाचा ज्येष्ठपुत्र दुसरा वद्दिग हा अकाली निधन पावल्यामुळे व त्याचा मुलगा दुसरा सेऊणचंद्र अल्पवयीन असल्यामुळे धाकटा पुत्र दुसरा वेसुगी राज्यावर आला. त्याने इ.स. १०१५ ते १०६८ अशी तेरा वर्षे राज्य केले.
दुसरा सेऊणचंद (इ.स. १०६८ ते १०८०) : दुसया वेसुगीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा चौथा भिल्लम याने राज्याचा स्वरा वारसदार असलेल्या दुसया सेऊणचंद्राचा हक्क डावलून काही काळ मादी बळकावली. परंतु दुसया सेऊणचंद्राने चौथ्या भिल्लमाचा पराभव करून त्याचे अल्पकालीन शासन संपविले व राज्याचा ताबा मिळविला." सत्ता मिळविण्यासाठी सेऊणवंदाने कोल्हापूरचा शिलाहार राजा पहिला भोज यानी मदत घेतली असावी. कारण मंडरादित्याच्या कोल्हापूर ताम्रपटात भोजाने भिल्लमास ठार केल्याचा उल्लेख आलेला आहे.
दुसरा सेऊणचंद्र राज्यावर आला त्यावेळी यादवांचे अधिपती असलेल्या चालुक्य दुसरा सोमेश्वर आणि त्याचा भाऊ सहावा विक्रमादित्य यांच्यात गृहयुद्ध सुरू होते. सेऊणचंद्राने सहाव्या विक्रमादित्याचा पक्ष घेतला. शेवटी या संघर्षात विक्रमादित्याचा विजय होऊन त्याला राज्यप्राप्ती झाल्याचा फार मोठा लाभसेऊणचंद्रास मिळाला. विक्रमादित्याने सेऊणचंद्रास नर्मदा नदी पर्यचा प्रदेश बहाल केला. त्यामुळे सेऊणचंद्राची प्रतिष्ठा आणि वैभव या दोन्हीत भर पडली. त्याचा देवळाली ताम्रपट आणि हेमाद्रीची प्रशस्ती या दोन्ही साधनातून वरील घटनेस दुजोरा मिळतो.
ऐरम्मदेव (इ.स. १०८० ते १११०) : दुसया सेऊणचंद्रानंतर त्याचा ज्येष्ठपुत्र ऐरम्मदेव हा उत्तराधिकारी झाला. ऐरम्मदेवाने आपल्या पित्याच्या कारकिर्दीत चालुक्य दुसऱ्या सोमेश्वराचा पराभव करून सहाव्या विक्रमादित्यास चालुक्य सिंहासन प्राप्त करून दिले होते. त्यामुळे सेऊणचंद्राप्रमाणे ऐरम्मदेवावर देखील विक्रमादित्याचा वरदहस्त चालू राहिला व यादव राज्याचा विस्तार नर्मदेपर्यंत झाल्याची माहिती ऐरम्मदेवाच्या अश्वी ताम्रपटावरून मिळते."
पहिला सिंघण (इ.स. १११० ते ११४४) : ऐम्मदेवानंतर त्याचा धाकटा भाऊ पहिला सिंघण हा उत्तराधिकारी झाला. हेमाद्रीने त्याला सिंहराज म्हटले आहे. कर्नाटकाच्या धारवाड जिल्ह्यातील होन्नती येथील शिलालेखात सिंघणाने महामंडलेश्वर हे बिरुद धारण केले असून सहाव्या विक्रमादित्याचा सामंत म्हणून सेऊणदेश आणि पलियंडा ४००० या प्रदेशांचे प्रशासन चालवीत असल्याची नोंद केली आहे. पलियंडा म्हणजे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका मुख्यालय परांडा होय. इ.स. ११२४ मधील शिलालेखाचे उपलब्धी स्थान होन्नती हे पलियंडा ४००० मधील १२ गावांचा समावेश असलेल्या प्रशासकीय विभागाचे मुख्यालय होते. कर्नाटकाच्या धारवाड जिल्ह्यापर्यंत यादवांचे अधिकारक्षेत्र कसे पोवले हे समजण्यास मार्ग नाही. पहिल्या सिंधणाच्या कोरीव लेखात त्याने कर्नाट, गुर्जर आणि पांड्यांचा पराभव
केल्याचे वर्णन आढळते. हे त्याने स्वतंत्रपणे प्राप्त केलेले विजय नसून आपला स्वामी सहावा विक्रमादित्य याच्या वतीने केले असावेत व त्याचे बक्षीस म्हणून विक्रमादित्याने सिंघणास पलियंडा ४००० हा प्रदेश देऊन त्याच्या राज्याचा दक्षिणेकडे विस्तार केला असावा.
हेमाद्रीने आपल्या यादव वंश प्रशस्तीत सिंघणाने लांजीपुराहून कर्पूरतिलक नावाचा हत्ती आणून विक्रमादित्यास भेट दिला व त्याच्या कर्पूरवर्णकांतीत भर घातली असे विधान केले आहे. हे लॉजिपूर म्हणजे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील आजचे लांजी हे गाव होय. यावरून असे दिसते की लांजीचा शासक मध्य प्रदेशातील रत्नपूरच्या कलचुरींचा मांडलिक असून त्याने सेऊणदेशावर किंवा चालुक्यांच्या प्रदेशावर आक्रमण केले व सिंघणाने त्याला धडा शिकवून त्याच्याकडून हत्तीचा नजराणा मिळविला व तो विक्रमादित्यास भेट देऊन त्याला आणस्वी संतुष्ट केले. पहिल्या सिंघणास ३७ वर्षाचा राज्यकाल लाभल्यामुळे सहावा विक्रमादित्य, तिसरा सोमेश्वर आणि दुसरा जगदेक मल्ल या तीन चालुक्य सम्राटांना तो सामंत होता हे त्याच्या इ.स. ११४२ मधील अंजनेरी येथील शिलालेखातील माहितीवरून स्पष्ट होते. हीच त्याच्या कारकिर्दीची शेवटची ज्ञात तारीख असून त्यानंतर २-३ वर्षे तो राज्यावर असावा. त्याच्यानंतर त्याचा मुलगा मल्लुगी राज्यावर आला.
पहिला मल्लुगी (इ.स. ११४४ ते ११५०): मल्लुगीने पर्णस्वेट जिंकल्याची माहिती यादवांच्या कोरीव लेखात आली असून काही संशोधकांनी पर्णस्वेटाची निश्चिती धुळे जिल्ह्यातील पानस्वेडशी केली आहे. परंतु हा प्रदेश यादव राज्यात समाविष्ट असल्यामुळे ही निश्चिती बरोबर नसल्याचे मत काही संशोधकांनी व्यक्त केले असून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड हा पर्णरवेटचा पर्याय सुचविलेला असून तो अधिक संयुक्तिक वाटतो.
पहिल्या मल्लुगीनंतर इ.स. ११७० मध्ये त्याचा मुलगा अमरगांगेय हा राज्यावर आला. हेमाद्रीच्या प्रशस्तीनुसार अमरगांगेयानंतर त्याचा मुलगा गोविंदराजाची कारकीर्द झाली. या दोघांच्या कारकिर्दी अल्पकालीन असून घटनाशून्य होत्या. गोविंदराजानंतर पहिल्या मल्लुमीचा मुलगा अमरमल्लगी उर्फ दुसरा मल्लुमी हा राज्यावर आला.
दुसरा मल्लुमी (इ.स. ११४४ ते ११६५): सहाव्या विक्रमादित्याच्या नंतरच्या काळात चालुक्य सत्तेला लागलेली घसरण दुसया मल्लुगीच्या काळात शिगेला पोचली. बिज्जल कलचुरीने या परिस्थितीचा लाभघेऊन तिसया तैलास पदच्युत करून सत्ता बळकावली. याद्वासारख्या चालुक्य सामंतांनी या परिस्थितीचा लाभ घेणे स्वाभाविक होते. दुसऱ्या मल्लुगीने बिज्जल कलचुरीच्या सतेस आव्हान दिले. दुस-या बाजूस काकतीयांच्या प्रदेशावर आक्रमण केले. परंतु काकतीय रुद्रदेवाच्या अनकोडा येथील शिलालेखानुसार त्याने मल्लगीचा पराभव केला. कल्याणच्या चालुक्य सत्तेचा अंत आणि कलचुरींचे अल्पकालीन सत्ताग्रहण यामुळे अस्थिर झालेल्या परिस्थितीचा मल्लुगीने फायदा घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसला तरी एक दशकानंतर पाचव्या भिल्लमाला यादव राज्य स्थापनेत जे यश लाभले त्याची पार्श्वभूमी दुसऱ्या मल्लुगीने तयार केली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
हेमाद्रीच्या प्रशस्तीनुसार दुसत्या मल्लुगीनंतर त्याचा मुलगा कलिय बल्लाळ हा इ.स. ११६७ मध्ये राज्यावर आला. कलिय बल्लाळाच्या अल्पशा कारकिर्दीनंतर त्याचा मुलगा (याचे नाव ज्ञात नाही) त्याचा उत्तराधिकारी झाला, परंतु बल्लाळाचा धाकटा भाऊ पाचवा भिल्लम याने त्याला पदच्युत करून गादीचा ताबा घेतला. भिल्लम हा पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी असून त्याने यादव वंशाव्या सार्वभौम राज्याची स्थापना केली.
पाचवा भिल्लम (इ.स. ११७३ ते ११९२) कल्याणन्या चालुक्यांची सत्ता स्विळरिवळी झालेली असल्यामुळे पाचव्या भिल्लमाला आपले राजकीय वर्चस्व वाढविण्याची संधी मिळाली, परंतु तरीही परिस्थिती त्याला पूर्णपणे अनुकूल नव्हती. कारण दक्षिणेकडून होयसळ आणि पूर्वेकडून काकतीय हे चालुक्यांचे पूर्वीचे मांडलिक यांच्या प्रदेशावर स्वाया करीत होते. चालुक्य आणि कलचुरीच्या पाठराख्यांनीही त्यांच्या सत्तेच्या पुनर्स्थापनेचे प्रयत्न चालूच ठेवले होते. त्यामुळे महत्त्वाकांक्षी भिल्लमाला या सर्वावर मात करून आपले उद्दिष्ट साध्य करावयाचे होते. आपल्या शत्रूविरु द्धना त्याचा संघर्ष जवळ जवळ १० वर्षापर्यंत चाललेला होता व त्यात यशापयशाचे अनेक चढउतार त्याला बघावे लागले. या काळातील लढायांची क्रमवार अशी माहिती उपलब्ध नाही. हेमाद्री आणि जल्हण" यांनी भिल्लमाच्या दिग्विजयांचे वर्णन काव्यात्मक पद्धतीने केले आहे. त्यांचा क्रम पुढीलप्रमाणे ठरविला जाऊ शकतो: पुण्याजवळील श्रीवर्धनवर ताबा, प्रत्यंडक (उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा किल्ल्यावर) विजय, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील तिसया बिज्जल कलचुरीचा पराभव, चालुक्यांची राजधानी कल्याणवर ताबा, होयसळांच्या उत्तरेकडे होणाया वाटचालीस घातलेला पायबंद, कलचुरी मल्लुगीचा पराभव, चालुक्य चौथा सोमेश्वर याचा सेनापती मुंजे यावर केलेली मात, काकतीय प्रतापरुद्रदेव उर्फ बभ्रु याचा पराभव आणि हैहेय सेनानी मल्ल याच्यावर केलेली मात.
भिल्लमाने कलचुरींचा केलेला पराभव त्याच्यापेक्षा चालुक्य चौथा सोमेश्वर याला अधिक फायदेशीर ठरला. कारण इ.स. ११८३-८४ मध्ये चौथा सोमेश्वराने चालुक्य सत्तेची पुनस्र्थापना केली व उपया कलचुरींना आपले स्वामित्व स्वीकारण्यास भाग पाडले. पुढील काळात चौथ्या सोमेश्वराने आपली स्थिती मजबूत केली आणि पाचव्या भिल्लमाच्या सैन्याचा अनेक आघाड्यावर पराभव केला. परंतु भिल्लमाने आपली बाजू सावरून धरली आणि चौथा सोमेश्वर सत्तेवर असताना आपल्या राज्यात स्वतंत्रपणे राज्यकारभार चालविला. त्याने आपल्या दस्तैवजातील कालोल्लेख आपल्या राज्यारोहण वर्षात लिहिण्याची प्रथा सुरू केली. परंतु त्यात एकवाक्यता नसून इ.स. ११८४ ते ११८७ या चार वर्षाच्या नोंदी त्यात आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे चौथा सोमेश्वर राज्यावर असताना भिल्लमाने स्वतंत्र होण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला व सोमेश्वराने त्यात बाधा निर्माण केली. इ.स. ११८६ नंतर मात्र पाचवा भिल्लम हा स्वतंत्र व सार्वभौम शासक झाला.
स्वतंत्र आणि सार्वभौम यादव राज्याची घोषणा केल्यानंतर देखील भिल्लमाला अनेक अंतर्गत आणि बाह्रा शत्रूचा मुकाबला करावा लागला. चालुक्यांचे सामंत असलेल्या कदंब, सिंद, हैहेय आणि इतर प्रमुखांनी भिल्लमाचे स्वामित्व स्वीकारण्यास नकार दिला. होयसळ बल्लाळाच्या रुपाने एका बलाढ्य शत्रूशी भिल्लमाला सतत संघर्ष करावा लागला. है हेय हे चालुक्यांचे सामंत म्हणून कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका छोट्या प्रांताचे प्रशासन चालवीत होते. चालुक्य सत्तेच्या अस्तानंतर ते आपल्या प्रांताचे स्वतंत्र शासक बनले. जल्हणाने भिल्लमाकडून पराभूत झालेल्या ज्या मल्लाचा उल्लेख केला आहे तो बहुधा या हैहेय वंशातील होता. आपल्या कोरीव लेखात या मल्लाने भिल्लमावर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. * भिल्लमाला या हैहेयांचा कायम पराभव करणे शक्य झाले नाही व शेवटी ते काम त्याचा नातू सिंघण यास करावे लागले.
कोकणाव्यतिरिक्त महाराष्ट्राचा सर्व भाग आपल्या अमलाखाली आणून भिल्लमाने पूर्वीच्या चालुक्य राज्याच्या अर्ध्या भागावर आपले संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले व त्यानंतर दक्षिणेकडून सतत होणाऱ्या होयसळांच्या आक्रमणास पायबंद घालण्याचे काम त्याने हाती घेतले. इ.स. ११८९ च्या अस्वेरीस भिल्लमाने अन्निगेरीपर्यतचा कर्नाटकातील धारवाड जिल्हयातील प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तेथून त्याने दक्षिणेकडे कूच करून होयसळ बल्लाळाच्या सैन्यावर हल्ला केला. बेलहोळ प्रांतातील सोरातूर येथे दोघात घनघोर लढाई झाली. होयसळ बल्लाळाच्या कोरीव लेखानुसार या लढाईत त्याने भिल्लमाचा संपूर्ण पराभव करून त्याला माघार घेण्यास भाग पाडले." या कोरीव लेस्वात पाचवा भिल्लम लढाईत मारला गेल्याचा देखील उल्लेख आहे. परंतु तो सत्यावर आधारित नाही. कारण सोरातूरच्या लढाईनंतर म्हणजे इ.स. ११८९ नंतर किमान दोन वर्षे भिल्लम जिवंत असल्याचा पुरावा उपलब्ध आहे.
कारकिर्दीच्या शेवटी स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्याचे समाधान भिल्लमास मिळाले. भोवतालच्या राजकीय अस्थिरतेचा पूर्ण लाभ उठवून सामंतपदी असलेल्या घराण्यास त्याने स्वतंत्र व सार्वभौम राजवंशाचा दर्जा प्राप्त करून दिला. सैनिकी सामर्थ्याच्या बळावर त्याने उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस मलप्रभा नदीपर्यंतचा प्रदेश त्याने आपल्या राज्यात समाविष्ट करण्यात यश मिळविले. कोकण सोडून आजचा संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकांचा उत्तर भाग यादव राज्यात आणण्यात भिल्लमाचात महत्त्वाचा सहभाग होता.
पहिला जैतुगी (इ.स. ११९२ ते १२००) : जैतुगीच्या कोरीव लेखात राज्यारोहणाच्या संदर्भात इ.स. ११९१ पासून ११९६ पर्यंतचे वेगवेगळे कालोल्लेख आळळतात." शेवटचे वर्ष चुकीचे असून जैतुगीचे राज्यारोहण इ.स. ११९१ मध्ये झाले. प्रारंभीची काही वर्षे पाचव्या भिल्लमासह त्याने प्रशासनात भाग घेतला असे मानले जाते. जैतुगीने भिल्लमाच्या तुलनेत कमी सैनिकी विजय प्राप्त केले. होयसळ बल्लाळाच्या इ.स. ११९७मधील एका कोरीव लेखात त्याने जैतुगीचा पराभव करून लक्कुंडीवर ताबा मिळविल्याचा उल्लेख आहे. पाचव्या भिल्लमाने कर्नाटकातील मलप्रभा नदीपर्यंतचा प्रदेश जिंकल्याची नोंद आहे. जैतुगीने बहुधा मलप्रभा ओलांडून लक्कंडीचा परिसर जिंकण्याचा प्रयत्न केला व होयसळ बल्लाळाने तो हाणून पाडला असावा असे यावरून सूचित होते.
जैतुगीचा पूर्वेकडील समकालीन राजा काकतीय स्वद्र होता. राज्याचा पश्चिमेकडे विस्तार करण्याच्या दृष्टीने तो प्रयत्नशील होता. होयसळ बल्लाळाने जैतुगीचा पराभव केला त्याचवेळी काकतीयांनी सरहद्दीवरील यादवांच्या प्रदेशावर आक्रमण केले. जैतुगीने या प्रयत्नास चोख उत्तर दिले. हेमाद्रीने या संदर्भात यादव प्रशस्तीत असे वर्णन केले आहे की, जैतुगीने समरांगणावर जो नरमेध केला त्यात कित्येक राजांच्या आहुती पडल्या, तैलंग देशाधिप रुद्र याचे वैभव नष्ट केले. या वर्णनावरून भांडारकर यांनी असा तर्क केला की जैतुगीने रुद्रदेवास ठार केले." रुद्रदेवाच्या कारकिर्दीचे शेवटचे ज्ञात वर्ष इ.स. ११९६ असल्यावरून जैतुगी व काकतीय यांच्यातील लढाई या वर्षात झाली असावी असे इतिहासकार मानतात.
काकतीय रुद्रदेवाचा उत्तराधिकारी व भाऊ महादेव याने आपल्या भावाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी यादव राज्यावर आक्रमण करून खुद्द देवगिरीस वेढा घातला. या स्वारीचे वर्णन काकतीय गणपती देवाच्या एका कोरीव लेखात आढळते. बीदर येथील एका शिलालेखात देखील त्याच्या या स्वारीतील पराक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. गणपतीच्या आणखी एका कोरीव लेखानुसार महादेव या लढाईत ठार झाला. यादवांच्या कोरीव लेस्वात देखील जैतुगीने काकतीय महादेवास ठार केल्याची व त्याचा मुलगा गणपती यास अटक करून नंतर त्यास सोडून दिल्याची नोंद आढळते." ही घटना इ.स. ११९९ च्या पूर्वी घडली असावी, कारण त्यावर्षी गणपतीचे राज्यारोहण झाले. जैतुगीने काकतीयांचा दोन वेळा पराभव केल्यामुळे त्याचा प्रभाव वाढला. महादेव काकतीयाचा पुत्र गणपती याची सुटका करून व त्याला राज्यावर बसवून जैतुनीने मनाचा मोठेपणा दाखविला. यामुळे कोकतीयाच्या शिलालेखात जैतुगीची मुक्तकंठाने स्तुती करण्यात आली आहे.
हेमाद्रीने देवगिरी नगर वसविण्याचे श्रेय पाचव्या भिल्लमास दिले आहे." परंतु त्याचे वास्तव्य देवगिरीस असल्याचा एक ही पुरावा उपलब्ध नाही. याउलट त्याच्या कोरीव लेस्वात तडवलगे (तडवलगा, जिल्हा बिजापूर, कर्नाटक) हे त्याचे वास्तव्य स्थान दास्वविण्यात आले आहे." यावरून अशी शक्यता व्यक्त केली जाते की, तडवलगा इथे भिल्लमाचे प्रारंभीच्या काळात वास्तव्य होते व राज्याच्या विस्तारानंतर देवगिरीचे भौगोलिक वैशिष्ट्य लक्षात घेऊन तेथे राजधानी करण्याच्या दृष्टीने बांधकाम हाती घेतले. हे काम भिल्लमाचा वारस जैतुगीने पूर्ण केले व आपली राजधानी तेथे हलविली.
दुसरा सिंघण (इ.स. ११२०० ते१२४७): जैतुगीनंतर त्याचा मुलगा दुसरा सिंघण देवगिरीच्या सिंहासनावर विराजमान झाला. तो यादव राजवंशातील सिंह म्हणून ओळखला जातो. त्याच्या कारकिर्दीत यादव सत्तेने वैभव कळसाला पोहोचले. त्याच्या राज्यारोहणकालाच्या बाबतीत देखील कोरीव लेखात परस्पर विसंगत माहिती आढळते. इ.स. ११९८ पासून १२१४ पर्यंतची वर्षे त्याच्या राज्यकालाच्या प्रारंभीची वर्षे असल्याने उल्लेख आढळतात. परंतु बहुतेक कोरीव लेखात इ.स. १२०० हे सिंघणाने पहिले राज्यवर्ष असल्याचे दास्ववितात. ओ.पी. वर्मा यांच्या मते इ.स. १२०० ते १२१० हा सिंघणाचा युवराजपदाचा काळ असून १२१० मध्ये त्याचे राज्यारोहण झाले." असे मानून सिंघणाचा राज्यकाल इ.स. १२१० ते १२४७ असा गृहीत धरला आहे.
राज्यारोहणानंतर सुरुवातीची काही वर्षे सिंघणने आपली सैन्यशक्ती मजबूत करण्यात व्यतीत केली व होयसळाद्वारे आपला पिता आणि पितामह यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी योग्य संधीची तो वाट पाहू लागला. हंगलवा कदंब कामदेव" याच्याशी लढण्यात होयसळ बल्लाळ गुंतला असताना इ.स. १२०६ मध्ये सिंघणाने त्याच्यावर स्वारी केली आणि फारसे कष्ट न घेता धारवाड पर्यंतचा प्रदेश त्याने जिंकला. तेथून त्याने जलद गतीने कूच करून एडेडोरनाडू पादाक्रांत केला आणि त्या पाठोपाठ त्याने सैन्य बलारी विभागात दास्वल झाले." बल्लाळाने यादव सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु सिंघणाच्या बलाढ्य सैन्यासमोर त्याचा निभाव लागू न शकल्यामुळे त्याचे एकामागोमाग एक प्रदेश यादव सैन्याने व्यापले.
इ.स. १२१२ मधील शिमोगा जिल्ह्यातील एका शिलालेखानुसार बंडलिकेवर धाड घालून तेथून अमाप संपती लुटली. होयसळांचा सेनापती बनक याच्यासह असंख्य होयसळ सैनिक या लढाईत मारले गेले. इ.स. १२१७ मध्ये सिंघणाने होयसळ राज्यावर आणस्वी एक स्वारी केली व शिमोगा परिसरातील नवीन प्रदेश पादाक्रांत केला." अशाप्रकारे इ.स. १२२० मध्ये होयसळ बल्लाळाच्या मृत्यूपर्यंत सिंघणाने शिमोगा आणि बल्लारी जिल्ह्यातील होयसळांचा प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडला.
इ.स. १२२० मध्ये होयसळ नरसिंह हा बल्लाळाचा उत्तराधिकारी बनला. त्याच्या काळातील काही कोरीव लेखात होयसळ सैन्याने यादवांचे सेनापती विक्र मपाल आणि पयुष यांचा पराभव केल्यानी माहिती आढळते. परंतु होयसळांची यादवाविरु द्धची ही सरशी अल्पकालीन म्हणजे इ.स. १२२५ ते १२३१ अशी सहा वर्षापुरती राहिली.
इ.स. १२३१ नंतर सिंघणाने होयसळाविरु द्ध पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. मध्यंतरीच्या काळात त्यांचे परत मिळविलेले प्रदेश यादवांनी पुन्हा जिंकले. याच काळात होयसळ नरसिंहास चोल आणि पांड्याविरु द्धच्या मौहिमात दक्षिणेत अडकून रहावे लागले. या स्थितीचा फायदा घेऊन सिंघणाने आपला नातू कृष्ण याच्या नेतृत्वास्वाली होयसळांच्या प्रदेशावर नव्याने स्वाऱ्या सुरू केल्या.
नरसिंहानंतर राज्यावर आलेल्या होयसळ सोमेश्वराने मुत्सद्दीपणाने व बारकाईने यादवांच्या स्वायऱ्यांचे निरीक्षण केले. यादव सैन्यास आपल्या प्रदेशात रोखण्याऐवजी त्याने यादवांच्या प्रदेशावर स्वारी करून पंढरपूरपर्यंत मजल मारली. पंढरपूर येथील एका शिलालेखाद्वारे त्याने विठ्ठलास दान दिले. या कोरीव लेखात त्याने आपण सार्वभौम शासक आहोत हे दाखविण्यासाठी अनेक राजबिरुदे आपल्या नावाशी जोडली. या स्वारीत त्याने यादवांचा पदेश जिंकणे हे आपले ध्येय ठेवले नव्हते, तर
यादव सैन्याने लक्ष वेधून आपल्या प्रदेशावरील त्यांच्या स्वायांना पायबंद घालणे हा त्याचा मयादित हेतू असल्याचे दिसते. परंतु याचा परिणाम उलट झाला, यादवांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला. सिंघणाचा सेनापती बोम्मिसेट्टी याने होयसळांच्या प्रदेशात दूरवर घुसून त्यांची राजधानी द्वारसमुद्र आणि इतर अनेक शहरे जाळल्याचा व पांडवनाडूने प्रशासन करणाऱ्याा होयसळांच्या कदंब सेनानीचा पराभव केल्याचा दावा केला आहे. द्वारसमुद्र जाळल्याच्या यादवांच्या दाव्याचा उपोद्बलक पुरावा नाही. परंतु इ.स. १२३९ ते १२४७ या कालावधीतील सिंधणाचे कित्येक कोरीव लेख शिमोगा परिसरात आहेत. " त्यावरून सिंघणाने सोमेश्वरावर पूर्ण मात करून त्याचा बराचसा प्रदेश जिंकल्याची प्रचिती येते.
सिंघणाने अशाप्रकारे बल्लाळ, नरसिंह आणि सोमेश्वर या तीन होयसळ राजांवर मात केली. होयसळाविरु द्धच्या मोहिमात सुरुवातीस सिंघण जातीने लक्ष घालीत असे. परंतु पुढे त्याने ही जबाबदारी आपल्या सेनापतीवर आणि आपल्या कारकिर्दीच्या अस्वेरीस आपला नातू कृष्ण याच्यावर सोपविली.
इ.स. १२१० मध्ये सिंघणाने माळव्यावर स्वारी केली. या लढाईत माळव्याचा परमार राजा सुभटवर्मा ठार झाला. त्याचा मुलगा अर्जुनवर्मन याने यादव सैन्याचा प्रतिकार केला. परंतु सिंघणाने त्याचाही पराभव केला." परमारांचा मांडलिक असलेल्या लाट किंवा दक्षिण गुजरातचा शासक चहमान सिंह हे सिंघणाचे विरोधी होते. त्यामुळे माळव्यावर चालून गेलेल्या आपल्या सैन्यासत्याने लाट देशाकडे वळविले. चहमान सिंहाने गुजरात मधील चौलुक्य राजा दुसरा भीम याची मदत मिळविली. परमारांचे सहाय्य तर त्याला होतेच. तसेच त्यांच्या इतर मांडलिकांनीही सिंहाला मदत केली. यादवांच्या विरु द्धच्या संयुक्त सैन्याचे नेतृत्व सिंह आणि त्याचा पुतण्या संस्ख यांच्याकडे होते. सिंहाने यादव सैन्याशी निकराचा लढा दिला. यादवांना एका सेनानी सरगैय्या नायक या लढाईत ठार झाल्यामुळे सिंह सिंघणास वरचढ ठरला." सिंघणाच्या विरुद्ध
गुजरातेतील संयुक्त सैन्याने जो पराक्रम केला त्याचे सविस्तर वर्णन ठहमीरा मादा मर्दानाठ"" आणि ठवसंतविलासठ" या ग्रंथात आढळते. आता आपला निभाव लागत नाही हे पाहून सिंघणाने गुजरात वरील मोहीम आटोपली. दक्षिणेत होयसळ बल्लाळाने पुन्हा आक्रमक हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे या मोहिमेत त्याला केवळ परमारावरील विजयातच समाधान मानावे लागले.
होयसळावर मात करून सिंघणाने ती मोहीम इ.स. १२७३ नंतर आपल्या सेनानींच्याकडे सुपूर्द केली. नंतर त्याने कोल्हापूरच्या शिलाहारांकडे आपले लक्ष वळविले. कारण होयसळ आणि यादवातील संघर्षात भोजाने सिंघणास मदत करण्याच्या ऐवजी आपण स्वतंत्र व सार्वभौम असल्याचे घोषित केले होते. इ.स. १२१७ मध्ये यादव सैन्याने शिलाहारांचा प्रदेश पादाक्रांत करून दुसत्या भोजाचे वास्तव्य असलेल्या पन्हाळगडास वेढा दिला. शेवटी भोजाचा पराभव करून सिंघणाने त्याला पन्हाळगडावरच कैदेत ठेवले." यापुढील काळातील कोल्हापूरच्या शिलाहाराविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. बहुधा सिंघणाने कोल्हापूरच्या शिलाहारांचा प्रदेश आपल्या राज्यात सामील करून घेतला.
कोल्हापूरहून सिंघणाने आपले सैन्य कोकणात उतरविले. यावेळी केशिराज (इ.स. १२०० ते १२४७) हा उत्तर कोकणचा शिलाहार शासक होता. अंबे येथील शिलालेखात या स्वारीच्या संदर्भात वर्णन आले आहे. केशिराजाने यादवांचे मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे सिंघणाने केशिराजास त्याने राज्य परत दिले.
दक्षिणेतील सतत मिळणाऱ्या विजयामुळे सिंघणाचा दबदबा सर्वत्र पसरला. त्याचे मनोधैर्य आणि सैनिकी सामर्थ्य वाढले. आपल्या बहुतेक शत्रूचा आणि बंडस्वोर सामंतांचा बीमोड करून दक्षिणेत आपली सत्ता स्थिर केल्यानंतर चहमान सिंह याने पूर्वी केलेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी लाट देशावर पुन्हा स्वारी करण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक ती युद्धसज्जता करून आपला पराक्रमी सेनानी स्वोलेश्वराच्या नेतृत्वास्वाली त्याने दक्षिण गुजरातवर सैन्य पाठविले.
यावेळी गुजरातवर मुस्लिम आक्रमणाचे सावट असल्यामुळे चहमान सिंहास सोळंकी किंवा गुजरातमधील इतर राजाकडून मदत मिळाली नाही. यादव सैन्यास त्याला एकाकी सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याचा पराभव झाला. लढाईत तो स्वतः आणि त्याचा भाऊ सिंधुराज हे दोघेही ठार झाले. त्याचा मुलगा संस्ख उर्फ संग्रामसिंहास स्वोलेश्वराने बंदी बनविले. नंतर सिंघणाने संग्रामसिंहास आपणाशी एकनिष्ठ राहण्याच्या अटीवर सोडून दिले व त्याला चहमान सिंहावा उत्तराधिकारी बनविले. गुजराती दस्तऐवजात देखील या सर्व घटनांना दुजोरा देण्यात आलेला आहे.
त्यानंतर सिंघणाने गुजरातमधील सोळंकीच्या प्रदेशावर आक्रमण केले. सोळंकींनी पूर्वी सिंहास मदत केली होती. परंतु यावेळी मुस्लिम आक्रमणामुळे त्यांची सत्ता खिळखिळी झाली होती. परमाराकडून त्यांना मदत मिळणे शक्य नव्हते. कारण यादवांचा अंकित असलेला चहमान संग्रामसिंह याने परमारास आपल्याकडे वळवून घेतले. सोळंकीनी आपणास यादद्वाविरु द्ध मदत न केल्याचा राग त्याच्या मनात होता. अशाप्रकारे सिंघण, संग्रामसिंह आणि परमार यांच्या संयुक्त सैन्याने चौलुक्यांच्या प्रदेशावर स्वारी केली. यावेळी उत्तरेकडून मुस्लिम आक्र मकानी चौलुक्याच्या प्रदेशावर आक्रमण केले होते. त्यामुळे चौलुक्य दुसरा श्रीम याने राजधानीचे प्रशासन वस्तुपाल नावाच्या मंत्र्याकडे सोपवून आपला सेनापती लवणप्रसाद यासह उत्तरेकडे कूच केले होते. वस्तुपालाजवळ मोजके सैन्य राहिल्यामुळे व यादवांच्या नेतृत्वास्वालील संयुक्त सैन्य आल्यामुळे त्याची अवस्था बिकट झाली. जयसिंहाव्या ठहमीरा मादा मर्दानात या काव्यात या प्रसंगाचे जे वर्णन आहे, त्याचा सारांश पुढीलप्रमाणे होय :-
यादव सैन्याचे अचानक आक्रमण झाल्यामुळे चौलुक्यांचा प्रशासक वस्तुपाल याला जबरदस्त धक्का बसलाः एवढ्या मोठ्या सैन्याचा प्रतिकार करणे अशक्य असल्यामुळे यादव आणि त्यांच्या मित्रपक्षात फूट पाडण्याची युक्ती योजिली. या कामासाठी त्याने लावण्यसिंह नावाच्या चतुर व्यक्तीची निवड केली. लावण्यसिंहाने शत्रूपक्षात फूट पाडण्याची कामगिरी निपुनग आणि सेवुग या दोन हेरांवर सोपविली.
निपुनग याने देवपालाच्या घोडदळात अश्वपालक म्हणून प्रवेश मिळविला आणि सेवुन याने सिंघणाची मर्जी संपादन केली. सेवुग याने सिंघणास असे पटवून दिले की, भीम सध्या मुस्लिम आक्रमकाविरु द्ध लढण्यात गुंतलेला असल्यामुळे त्याच्याविरु द्ध ताबडतोब कारवाई करण्याऐवजी काही काळानंतर करावी. तोपर्यंत भीमाचे सैनिकी सामर्थ्य घटलेले असल्यामुळे त्याचा सहज पराभव होऊ शकेल. सिंघणाने ही सूचना मान्य केली. या हेरांनी नंतर देवपालाचे नामचिन्ह असलेला एक घोडा चोरला व एक बनावट पत्र लिहून तो घोडा संस्वाकडे पाठविला. त्या पत्रात संस्वास त्याचा पिता आणि चुलता यांना सिंघणने ठार केल्याची व त्याचा बदला घेण्यासाठी यादव सैन्यास नष्ट करण्याची सूचना होती. ठरल्याप्रमाणे हे पत्र संस्वाऐवजी सिंघणान्या हाती पडण्याची व्यवस्थाही हेरांनी चोख केली होती. या पत्रामुळे सिंघण अतिशय संतप्त झाला. ही बातमी कळताच संस्ख त्याच्या भीतीने रणांगण सोडून पळून गेला. देवपालाला सिंघणाने शिक्षा केली. परंतु बनावट पत्रामुळे हे सर्व घडल्याचे लक्षात आल्यावर सिंघणाने देवपालाला अभय दिले. त्यामुळे त्याला निःशंकपणे परमार राज्याचा कारभार पहाणे शक्य झाले.
या घटनेनंतर सिंघणने चौलुक्यविरुद्धची मोहीम अधिक गतिमान केली. या स्वारीत झालेल्या गुजरातमधील भयानक जीवित आणि वित्ता हानीचे सविस्तर वर्णन सोमेश्वरकृत कीर्तिकौमुदी या ग्रंथात करण्यात आले आहे. कित्येक लोक आपली घरेदारे सोडून देशोधडीस लागले. सोमेश्वर पुढे म्हणतो की, अशा आणीचाणीच्या प्रसंगी चौलुक्यांच्या मारवाडमधील चार सामंतांनी बंड केल्याची बातमी लवणप्रसाद यास मिळाली. त्यामुळे त्याने यादव सैन्यास प्रतिकार करण्याचे स्थगित करून मारवाहकडे कूच केले. सिंघणाने देस्वील ही मोहीम थांबविली. युद्ध संपवून सिंघण आणि भीम चौलुक्याचा प्रतिनिधी लवणप्रसाद यांच्यात एक तह झाला. त्यानुसार दोहोंनी परस्परांच्या प्रदेशावर आक्रमण न करण्याने मान्य केले. असे दिसते की प्रदेश मिळविणे हे सिंघणाच्या या स्वारीमागील उद्दिष्ट नसून भीमाने चहमान सिंहास यादवाविरु द्ध जी मदत केली त्याचा बदला घेणे व यापुढे त्याला अशा कृत्यापासून परावृत्ता करणे हा हेतू या मागे होता.
चौलुक्य आणि यादव यांच्यातील अनाक्रमणाचा करार इ.स. १२४० पर्यंत टिकला. इ.स. १२४० मध्ये सिंघणाने आपला सेनानी खोलेश्वराचा पुत्र राम त्याच्या नेतृत्वास्वाली पुन्हा गुजरातवर स्वारी केली. यावेळी भीम जिवंत असून देखील राज्याचा कारभार अनभिषिक्त शासक म्हणून वाघेला प्रमुख विशालदेव याच्या हाती गेला होता. रामाने या लढाईत कित्येक सैनिकांना ठार केले पण शेवटी तो स्वतः मारला गेला. विशालदेवाने दक्षिणच्या ज्या राजाचा पराभव केल्याचा दावा केला आहे तो सिंघणाविषयी असावा. इ.स. १२६१ च्या एका कोरीव लेखात विशालदेवाचे वर्णन ठयादवसैन्यरुपी सागरातील वडवानलठ असे करण्यात आले आहे ते देस्वील या संदर्भातीलच होय." यादवांच्या दस्तऐवजात या स्वारीविषयी पुढील माहिती मिळत नाही. त्याअर्थी, रामाचा मृत्यू झाल्यावर सिंघणाने आपल्या सैन्यास परत बोलावले असावे.
कर्नाटकातील बनवासीच्या कदंबांनी यादवांचे सार्वभौमत्व अद्यापपर्यंत मान्य केले नव्हते. होयसळ आणि कदंब यांच्यात सतत चकमकी चालूच होत्या. बनवासीचे राज्य यादव आणि होयसळांच्या राज्यांना लागून होते. कदंबांना संरक्षण देऊन उपकृत केल्यास त्याचा उपयोग आपणास होयसळाविरुद्धच्या संघर्षात होऊ शकेल या हिशेबाने सिंघणाने कदंब राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली व त्यासाठी बनवासीत सिंघणाने आपला अधिकारी ठेवला. परंतु ही योजना यशस्वी झाली नाही. इ.स. १२३१ मध्ये सिंघणाचे अधिकारी आणि कदंब राजा यांच्यात कुरबूर सुरू झाली. इ.स. ११३८ मधील रहिहल्ली पुराभिलेस्वात सिंघणास कदंबाचा शत्रू असे बिरुद लावण्यात आले आहे." यावरून दोहोतील संबंध खूपच ताणले होते हे स्पष्ट होते. इ.स. ११३९ मध्ये सिंघणाने बनवासी येथील आपल्या अधिकाऱ्यांना कदंबास वठणीवर आणण्याचे आदेश दिले. बळाचा फारसा वापर न करताच सिंघणाने मल्लिदेव कदंबास पराभूत करून आपले स्वामित्व स्वीकारण्यास भाग पाडले.
इ.स. १२१५ मध्ये सिंघणाने के लेली कोल्हापूरवरील स्वारी, शिलाहार दुसऱ्या भोजाचा पराभव करून त्याच्या राज्याचे यादव राज्यातील सामिलीकरण हा शेजारच्या सौदत्तीच्या रट्टांना दिलेला इशारा होता. त्यामुळे त्यावेळी रट्ट दुसरा लक्ष्मीदेव हा आपण होऊन सिंघणाशी शरण गेला. परंतु यादव सैन्य उत्तरेकडील मोहिमात गुंतल्याची संधी साधून लक्ष्मीदेवाने परत स्वतंत्र शासक म्हणवून घेण्यास सुरुवात केली. आपल्या राजशासनात त्याने यादवांच्या उल्लेखाऐवजी केवळ आपल्या नावाचा उल्लेख केला. सिंघणाने आपला सेनापती बिच्चन यास रह लक्ष्मीदेवाविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश दिला. इ.स. १२२८ ते १२३८ या कालावधीत सौदत्तीवर आक्रमण करून सिंघणाने रट्ट वंशाचा शेवट केला व त्यांचे राज्य यादव साम्राज्यात समाविष्ट करून घेतले."
बेलमुतीचे सिंद हे होयसळांचे पिढीजात शत्रू होते. सिंघणाने होयसळांचा पराभव केल्याबद्दल त्यांना संतोष झाला व त्यांनी यादवांचे स्वामित्व स्वीकारले. इ.स. १७७ मध्ये सिंद तिसया ईश्वरदेवाने आपण यादवांचे मांडलिक असल्याचा उल्लेख आपल्या राजशासनात केला होता. परंतु पुढील काळात सिंघणाने ईश्वरदेवास पदच्युत करून तो प्रांत आपल्या राज्यात समाविष्ट केला व त्याचा प्रशासक म्हणून बोम्मिदेवरस याची नियुक्ती केली." त्यामुळे ईश्वरदेव आणि यादव यांच्यात संघर्ष सुरू झाला. इ.स. १२४५ पर्यंत ईश्वरदेवाने व नंतर त्याच्या मुलांनी आपले राज्य परत मिळविण्यासाठी बेलगुतीवर धाडी घातल्या.
सिंघणाचे सेनापती बप्पूल आणि श्रीधर यांनी सिंदाचा अनेक वेळा पराभव केला. सिंद वीरदेव याने तरीही आपला संघर्ष चालूच ठेवला. त्याने बेलगुत्तीवर ताबाही मिळविला. इ.स. १२४७ मधील सिंघणान्या निधनामुळे यादव सैन्यास बेलगुत्तीवरील कारवाई थांबवावी लागली.
सिंघणाचा पिता जैतुगी याच्या उपकारामुळे काकतीय गणपतीदेवास आपले स्वातंत्र्य आणि सिंहासन पुन्हा प्राप्त झाले होते याचे वर्णन वर आलेले आहेच. त्यामुळे वरंगलवे काकतीय आणि यादव सिंघण यांच्यातील संबंध सलोख्याचे होते. तरीही गणपतीदेवाने आपल्या राजशासनात यादवांचा पराभव के ल्याचा दावा केला आहे. तो बहुधा आंध्रप्रदेशातील रायलसीमा (कर्नूल, अनन्तपूर आणि कडाप्पा परिसर) येथील शासक तेलुगूचोळ टिक्क याच्याशी झालेल्या यादवांच्या संघर्षांबाबत असावा. रायलसीमा भागावर काही काळ यादवांचे वर्चस्व होते. पण टिक्क या तेलुगू-चोळ प्रमुस्वाने तो प्रदेश मुक्त केला. त्याला बहुधा काकतीय गणपतीचा छुपा पाठिंबा असावा. या व्यतिरिक्त सिंघण आणि काकतीय गणपतीदेव यांच्या प्रत्यक्ष संघर्ष उद्भवला नाही.
सिंघण हा यादव वंशातील सर्वश्रेष्ठ राजा असून त्याच्या दिग्विजयामुळे यादव राज्याचा सर्व दिशांना विस्तार झाला हे अर्थातच त्याला लाभलेल्या स्वोलेश्वरासारख्या महापराक्रमी सेनापतींच्या सेवेचे फळ होते." स्वतः सिंघण हा देस्वील एक शूर योद्धा आणि कुशल प्रशासक तर होताच, शिवाय तो साहित्य आणि संगीतादि कलांचा भोक्ता आणि आश्रयदाता होता. संगीत रत्नाकर या संगीतावरील महान ग्रंथाचा लेखक आणि संगीततज्ञ शारंगदेव हा सिंघणाच्या दरबारी आश्रित होता.
सिंघणाने आपला ज्येष्ठ पुत्र दुसरा जैतुमी याला इ.स. १२२९ मध्ये आपला उत्तराधिकारी आणि युवराज म्हणून नेमले होते." युवराज असताना त्याने सिंघणाच्या विविध स्वाऱ्यात भाग घेतला असावा. कोरीव लेस्वात जैतुगीचे कर्तृत्व, त्याचा सुस्वभाव आणि त्याच्या योग्यतेचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु तो प्रत्यक्ष राज्यावर आल्याचा उल्लेख नाही. बहुधा जैतुगी अकाली निधन पावला व त्यानंतर सिंघणाने आपल्या दुसया मुलाऐवजी आपला नातू आणि ते जैतुगीचा ज्येष्ठपुत्र कृष्ण याची आपला वारस म्हणून निवड केली. अर्जुनवाड शिलालेखात जैतुगीचा सिंघणाचा ज्येष्ठपुत्र म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्याअर्थी, सिंघणास जैतुगीशिवाय दुसरा पुत्र होता. काकतीयांच्या एका शिलालेखात सिंघणाचा पुत्र असलेल्या यादव शारंगपाणि देवाचा उल्लेख आला आहे. त्या आधारे इतिहासकार असे मानतात की सिंघणाच्या मृत्यूनंतर त्याचा दुसरा मुलगा शारंगपाणिदेव आणि नातू कृष्ण यांच्यात गादीचा तंटा सुरू झाला. या संघर्षात बहुधा इतरांच्या पाठबळावर कृष्णाने शारंगपाणीवर मात केली. त्यामुळे अपमानित शारंगपाणीने काकतीयांचा आश्रय घेतला व काकतीयांनी तो दिला.
सिंघणाच्या राजवटीचा उल्लेख असलेले कोरीव लेख इ.स. १२४७ पर्यंतचे आहेत. इ.स. १२७३ मधील कृष्णाच्या बेह ही शिलालेखात त्याच्या सातव्या राजवींची नोंद आहे. या दोन्ही पुराव्यांच्या आधारे कृष्णाने राज्यारोहण इ.स. १२४७ मध्ये झाले.
कृष्ण-कान्हरदेव (इ.स.१२४७ ते १२६१) यादवांच्या कोरीव लेखात कृष्णाचे नाव कृष्ण, कान्हरदेव आणि कंधार अशा विविध रुपात आलेले आहे. शेजारच्या राज्यांच्या बाबतीत त्याने आपल्या पितामहाचेच धोरण पुढे चालू ठेवले. राज्यावर आल्यावर प्रथम त्याने उत्तरेची मोहीम हाती घेण्याचे ठरविले. कारण सिंघणाने उत्तरेकडे अनेक स्वाया करूनही यादवांना प्रदेश विस्ताराच्या दिशेने त्याचा फारसा लाभ झाला नव्हता. तसेच सिंघणाच्या कारकिर्दीच्या अस्वेरीस यादव सेनानींना पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे या भागातील यादवांचा दबदबा कमी झाला होता. पहिल्या तीन वर्षात भरपूर तयारी करून इ.स. १२७० मध्ये त्याने माळव्यावर स्वारी केली आणि माळव्याच्या परमारावर विजय मिळविला. कृष्णाने पराभूत केलेला त्याचा समकालीन परमार राजा देवपालाचा उत्तराधिकारी जैतुगीदेव हा होता. कृष्णाच्या काळातील इ.स. १२७२ आणि १२७३ मधील कोरीव लेखात देखील त्याच्या माळव्यावरील विजयाचा उल्लेख आलेला आहे. कृष्णाच्या माळव्यावरील आक्रमणापूर्वी इ.स.१२३४ मध्ये दिल्लीच्या सुलतानांनी माळव्यावरील स्वारीच्या वेळी अनेक शहरे उध्वस्त केली होती.
माळव्यावरील विजयाने उत्साहित झालेल्या कृष्णाने तेथून गुजरातकडे आपला मोर्चा वळविला.
गुजरातमधील वाघेला राजा वीरधवलपुत्र विशालदेव याचा कृष्णाने केलेल्या पराभवाची नोंद हेमाद्रीच्या प्रशस्तीत तसेच यादवाच्या कोरीव लेस्वातही आढळते." या स्वारीत देखील प्रदेशविस्तार हे कृष्णाचे ध्येय नसून पूर्वी नर्मदेच्या लढाईत विशालदेवाने सिंघणाच्या केलेल्या पराभवाचा बदला घेणे हेच त्याचे उद्दिष्ट होय. मुस्लिम आक्रमणाने जर्जर झालेल्या उत्तरेकडील राज्यांना कृष्णाने आणस्वी विकलांग बनविले.
दक्षिणेकडील होयसळाविरु द्धच्या स्वाऱ्या कृष्णाच्या काळातही चालूच राहिल्या. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील कृष्णाच्या काळातील इ.स. १२४८ मधील एका कोरीव लेखावरून असे दिसते की माळव्यावरील स्वारीची योजना आस्वीत असताना कृष्णाने अगोदर दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली होती. या भागातील एका शिलालेखात कृष्णाचा अधिकारी मल्लसुत चामुंड याने होयसळ सोमेश्वराचा पराभव करून त्याचे गर्वहरण केल्याची नोंद आहे. या चामुंडाव्या अनेक पराक्रमावरून तो कृष्णाचा प्रमुख विश्वासू सेनानी असल्याचे जाणवते. कदाचित त्यामुळेच त्याने होयसळाविरु द्धच्या मोहिमासाठी चामुंडाची स्वास निवड केली होती. कृष्णाच्या काळात यादव सैन्याने आणस्वी दक्षिणेकडील प्रदेश मिळविल्याची माहिती या काळातील चित्रदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या कोरीव लेखावरून मिळते. याचवेळी पांडव राजा जाटवर्मन सुंदर पांडव याने होयसळाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन चोल प्रदेशातील त्यांचे मुख्य ठाणे असलेल्या कन्नानूर-कोप्पम वर ताबा मिळविला. पांड्यांच्या आक्रमणाचा मुकाबला करण्याच्या कामात होयसळ सोमेश्वरास आपली सर्व शक्ती लावावी लागल्यामुळे त्याने तूर्त यादवाविषयी नरमाईने धोरण अवलंबिले. अशाप्रकारे राजकीय स्थितीच्या दद्यावास्वाली सोमेश्वराने कृष्णाशी तह केला व त्यामुळे होयसळ आणि यादवांच्यातील संघर्ष तात्पुरता थांबला.
उत्तर आणि दक्षिण आघाड्यावरील यशामुळे कृष्णाला त्या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळाल्यावर त्याने आता आपले लक्ष इतर प्रश्नावर केंद्रित केले. रामचंद्र यादवाच्या पुरुषोत्तमपुरी ताम्रपटानुसार कृष्णाने दक्षिण कोसल किंवा छत्तीसगडच्या राजावर आपली जरब निर्माण केली. कृष्णाला ठत्रिनेत्रत्रिपुरीठ असे बिरुद लावण्यात आले आहे. त्रिपुरी ही छत्तीसगड किंवा दक्षिण कोसलची राजधानी होती. त्यावरुन कृष्णाने छत्तीसगड प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे सिद्ध होते. या प्रदेशात त्रिपुरीच्या कलचुरीची सत्ता असून जज्जलानंतर त्या राज्यात कमकुवत राजांचे शासन होते. मिराशीच्या मतानुसार कृष्णाने जज्जलाच्या उत्तराधिकायास पराभूत केले असावे.
डॉ. ग्रॅहम मोराइस यांच्यामते सिंघणाच्या मृत्यूनंतर गोव्याचा कदंब राजा तिसरा पष्ठदेव याने आपला मेहुणा रह कामदेव याच्या पाठबळावर यादवांचे स्वामित्व झुगारून दिले." कृष्णाने आपला सेनापती बिचण याला तिकडे पाठवून कदंब राजाचे बंड मोडून काढले. कोरीव लेखात कृष्णाने कोकणातील" कदंब राजाचा पराभव केल्याचा उल्लेख या संदर्भातील असावा." तसेच कामपालाच्या पराभवाचे श्रेयही कृष्णास देण्यात येते." तो कामपाल म्हणजे कदंब षष्ठदेवाचा मेहुणा रट्ट कामदेव होय." अशाप्रकारे कृष्णाने गोव्याच्या कदंबास तसेच त्यांना मदत करणाऱ्या सौदत्तीच्या रट्टास त्यांच्या बंडखोरीबद्दल शासन केले.
यादवांच्या काही कोरीव लेखात कृष्णाला चोलावर विजय संपादन केल्याचे जे श्रेय देण्यात येते ते मात्र सत्यावर आधारित नसावे."" कारण त्यावेळी चोल राज्याचा प्रमुख संपूर्ण दक्षिणेचा स्वामी म्हणून घेणारा महापराक्रमी राजा जाटवर्मन सुंदरपांडव हा होता.
कृष्णाला सर्व आघाड्यावर विजय मिळवून देण्यात व राज्याचे प्रशासन योग्य प्रकारे सांभाळण्यात त्याचे शूर सेनानी आणि कार्यक्षम मंत्री यांचे महत्त्वाचे योगदान होते. बिचण उर्फ बिचिसेठी आणि त्याचा वडील भाऊ मल्लिसेठी हे सिंघणाने अधिकारी कृष्णाच्या काळातही सेवेत होते. त्याशिवाय मल्लिसेठीचा मुलगा चाउंडसेठी आणि जनार्दन पुत्र लक्ष्मीदेव हेही त्याचे कार्यक्षम अधिकारी होते. कोरीव लेखात या सेनानींच्या पराक्रमाचे आणि यादव प्रशासनातील त्यांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती आढळते.
कृष्णाच्या कारकिर्दीत चक्रधरस्वामीनी महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केली. या पंथाचा अनुयायी नसतानाही कृष्णाला चक्रधरांविषयी नितांत आदर होता. बुलढाणा जिल्हयातील लोणार येथे चक्रधरस्वामींचे वास्तव्य असताना कृष्ण त्यांच्या दर्शनास गेला होता. चक्रधरांच्या जीवनावर आधारित लीळाचरित्रया ग्रंथात या भेटीचे वर्णन आले आहे." यादव राजाने यावेळी दक्षिणा म्हणून देऊ केलेली सोन्याची नाणी स्वीकारण्यास चक्रधरांनी नकार दिला असाही त्यात उल्लेख आहे.
कृष्णाच्या कारकिर्दीतील कोरीव लेख उत्तरेकडील विदर्भ आणि स्वानदेशापासून दक्षिणेकडे शिमोगा-चित्रदुर्ग प्रदेशापर्यतच्या विस्तीर्ण भागात सापडले आहेत. यावरून आपला पितामह सिंघण याने निर्माण केलेले विशाल राज्य कृष्णाने कायम तर राखलेच शिवाय त्यावर आपले दृढनियंत्रण वसविले. कृष्णाच्या कारकिर्दीत राजधानी देवगिरीचे वैभव वाढत गेले त्या नगराने यादवांच्या मूळ राजधानी असलेल्या दाबरावतीवर (द्वारका, गुजरात) मात केली. ३० मे इ.स. १२६१ ही कृष्णाच्या राज्यकालाची शेवटची ज्ञात तिथी होय.
महादेव (इ.स. १२६१ ते १२७१): रामचंद्राच्या ठाणे ताम्रपदानुसार कृष्णान्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ महादेव राज्यावर आला. इ.स. १२७० मधील कृष्णाच्या ममदापूर शिलालेखात महादेवाचा उल्लेख कृष्णाचा वारसदार म्हणून करण्यात आला आहे. महादेव आपल्याशी एकनिष्ठ असून आपला पुत्र रामचंद्र क्यात आल्यावर राज्याची सूत्रे त्याच्या हाती सोपवील या विश्वासावर कृष्णाने महादेवास आपला वारस म्हणून नेमले होते. इ.स. १२७० पासून कृष्णाने महादेवास प्रशासनाचे अधिकार दिले होते. तसेच अनेक मोहिमावर देस्वील महादेवाने कृष्णासह कून केले असावे.
कृष्ण आणि महादेव यांच्या निश्चित राज्यकालाविषयी यादवांच्या कोरीव लेखात परस्परविरोधी माहिती आलेली आहे. शके ११८५ मधील चौडाडमपूर शिलालेखात महादेवाच्या तिसया राज्यवर्षाचा उल्लेख आहे. आपल्या राज्यारोहणाच्या प्रसंगी इ.स. ११८२ मध्ये महादेवाने आपला काळेगाव ताम्रपट जारी केला होता. परंतु वरील उल्लेखाप्रमाणे शके ११८४ पर्यंत कृष्ण राज्यावर असल्याचेही पुरावे सापडले आहेत. याचे कारण. म्हणजे कृष्णाच्या राजवटीच्या अस्वेरीस या दोघांची संयुक्त राजवट अस्तित्वात होती. अमलानंदाच्या ठवेदान्तकल्पतरूठ या ग्रंथात या दोघांच्या संयुक्त राजवटीचा उल्लेख आढळतो. कृष्णाच्या एका कोरीव लेस्वातील ठकान्हरदेव महादेव-विजयराज्येठ या उल्लेखावरून संयुक्त राजवटीस पुष्टी मिळते. य यावरून कृष्णाने या संयुक्त राजवटीस व महादेवास यादव राजबिरुदे धारण करण्यास संमती दिली होती हे स्पष्ट होते. परंतु शासनाचे संपूर्ण नियंत्रण महादेवाच्या हाती शके ११८४ किंवा इ.स. १२६१ मध्ये कृष्णाच्या मृत्यूनंतरच आले.
राज्याची सूत्रे स्वतंत्रपणे हाती घेतल्यावर पहिल्यांदा महादेवाने कोकणव्या सोमेश्वर शिलाहाराची बंडस्वोरी मोडून काढण्याचे काम हाती घेतले. हेमाद्रीच्या प्रशस्तीनुसार महादेवाने प्रचंड सैन्यासह कोकणवर स्वारी केली. यापूर्वी सिंघणाने सोमेश्वराचा पूर्वाधिकारी केशिराज याला आपले स्वामित्व स्वीकारण्यास भाग पाडले होते. परंतु सिंघणाच्या मृत्यूनंतर शिलाहारांनी परत स्वतंत्रपणे कारभार सुरू केला होता. या स्वारीतील लढाईत सोमेश्वराचा पूर्ण पराभव झाला व त्याने समुद्रातील बोटीचा आश्रय घेतला. महादेवाने आपल्या नौदलाच्या सहाय्याने त्याचा पाठलाग सुरू केला. सोमेश्वराने केलेला प्रतिकार व्यर्थ होऊन महादेवाने त्याच्या नौदलासह सोमेश्वरास समुद्रात बुडविले. अशाप्रकारे शिलाहारांच्या ताब्यातील संपूर्ण कोकणपट्टी महादेवाने यादव राज्यात सामील करून घेतली." सिंघणाने यापूर्वीच शिलाहारांच्या कोल्हापूर शास्वेचा शेवट करून त्यांचा प्रदेश यादव राज्यात समाविष्ट करून घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकाच्या संपूर्ण किनारपट्टीवर यादवांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले. बृहन्मुंबईतील बोरीवली जवळील एकसर येथे काही वीरगळ असून त्यावर सागरी युद्धाची शिल्पे कोरलेली आहेत. आळतेकर यांच्या मतानुसार हे वीरगळ महादेव आणि सोमेश्वर यांच्यातील नाविक युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सोमेश्वराच्या नौदलातील सैनिकांच्या हौतात्म्याचे स्मारक होत.
रामचंद्राच्या पैठण ताम्रपटानुसार महादेवाने युद्धात विशालदेवाचा पराभव केला." हेमाद्रीच्या प्रशस्तीत देस्वील महादेवाच्या गुर्जर आणि लाटवरील विजयाचे वर्णन करण्यात आले आहे." यावरून हे स्पष्ट होते की कोकणच्या शिलाहारांवर गुर्जरांचे राजकीय वर्चस्व होते व महादेवाने कोकणचा समावेश आपल्या राज्यात केल्यामुळे संतप्त झालेल्या गुर्जरराजा विशालदेव याने यादवाविरुद्ध सैन्य पाठविले व महादेवाने विशालदेवाच्या सैन्याचा पराभव केला. मजुमदार यांच्या मते विशालदेव हा इ.स. १२६२ मध्ये मरण पावला. त्यावरून महादेव याच्या कोकणवरील स्वारीच्या पाठोपाठ लगेच त्याने विशालदेवाचा पराभव केला असला पाहिजे.
काकतीय गणपती आणि त्याचे समकालीन यादवराने सिंघण आणि कृष्ण यांच्यातील संबंध काही अपवाद वगळता मित्रत्वाचे होते. परंतु दोन्ही घराण्यातील राज्यकर्त्याच्या बदलाबरोबर दोहोतील संबंध बिघडले. गणपतीदेवानंतर त्याची कन्या रुद्राम्मादेवी हिच्या रूपाने एक स्त्री काकतीय राजप्रमुख झाल्याची बाब महादेवास खटकली व दोघात युद्ध सुरू झाले. महादेवाने तेलुंग राजावर मिळविलेल्या विजयाचा उल्लेख हेमाद्रीने केला आहे. ठसिद्धेश्वर चरितमुठ या तेलुगु ग्रंथात देस्वील असे वर्णन आहे की, काकतीय सिंहासनावर एक स्त्री बसल्याचे पाहून परिस्थितीचा फायदा उठविण्यसाठी महादेवाने तेलुगु देशावर स्वारी केली. परंतु ती विफल करण्यात आली. याच ग्रंथात पुढे असेही म्हटले आहे की, रुद्राम्मादेवीने महादेवाचे आक्रमण आपल्या मांडलिकांच्या सहाय्याने केवळ थोपविले एवढेच नव्हे तर नंतर यादव सैन्यास पळवून लावून देवगिरीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. यात ऐतिहासिक सत्यापेक्षा अतिशयोक्ती अधिक आहे. तथापि एन. व्यंकटरमैय्या आणि एम. सोमशेस्वर शर्मा या दाक्षिणात्य इतिहासकारांनी तेलुगु वाङ्मयातील या काव्यमय वर्णनास ऐतिहासिक सत्य मानले आहे. परंतु दोन्ही राजांच्या राजशासनात या घटनेचा उल्लेख नाही. यावरून असे म्हणावे लागेल की दोन्ही राज्यात शत्रुत्व निर्माण होऊन महादेवाने काकतीय-प्रदेशावर केलेले आक्रमण काकतीयांनी निष्फळ केले.
यानंतर महादेवाने होयसळाकडे आपले लक्ष वळविले. होयसळ सोमेश्वराच्या प्रदीर्घ आजारामुळे त्याच्या राज्याचे विभाजन होऊन उत्तर भागावर ज्येष्ठपुत्र नरसिंह आणि दक्षिण भागावर धाकटा मुलगा रामनाथ यांचा ताबा होता. महादेवाने होयसळांवरील बिकट स्थितीचा लाभ घेण्यासाठी स्वारी केली. परंतु तयारीत असलेल्या होयसळ तिसया नरसिंहाने ती परतवून लावली. अर्थात दोन्ही राजवंश या मोहिमेत आपला विजय झाल्याचा दावा करतात.
महादेवाने कृष्णाकडून वारसा हक्काने मिळविलेले यादवांचे राज्य कायम तर राखलेच, शिवाय कोकणचा प्रदेश नव्याने या राज्यात सामील करून घेतला. त्याच्या राज्याच्या सीमा उत्तरेस महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपासून दक्षिणेस शिमोगा-चित्रदुर्ग परिसरापर्यंत व पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस महाराष्ट्राच्या पूर्व सीमेस भिडल्या होत्या. त्याची अल्पकालीन राजवट इ.स. १२७१ मध्ये संपुष्टात आली.
आम्मणदेव (इ.स. १२७१) : महादेवाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आम्मणदेव राज्यावर आला. कृष्णाने
महादेवास आपला वारस म्हणून नेमले त्यावेळी त्याचा मुलगा रामचंद्र अल्पवयीन होता. तो वयात आल्यानंतर महादेव त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडील असा कृष्णाचा विश्वास होता. परंतु याच्या उलट महादेवाने आम्मणदेवास आपला वारस बनविले व त्याचा राज्याभिषेक झाला. आम्मणदेवाची कारकीर्द काही महिन्यातच संपली त्यामुळे त्याचा एकही कोरीव लेख उपलब्ध नाही. रामचंद्राने आम्मणास पदच्युत करून गादी मिळविल्याचा उल्लेख त्याच्या पुरुषोतामपुरी ताम्रपटात आला आहे. महानुभाव वाङ्मयात या घटनेविषयी वेगवेगळे वृत्तांत आढळतात. उदा. लीळाचरित्रात रामचंद्राने आम्मणास पदच्युत करून त्याचे डोळे काढल्याचे वर्णन आले आहे. तर स्मृतिग्रंथात आम्मणास ठार मारून महानुभाव महंतांचा छळ केल्याचा आरोप रामचंद्रावर करण्यात आला आहे. भुवनविलासानुसार रामचंद्राने आम्मणास शिकारीवर असताना पकडले. अशाप्रकारे विविध वृत्तांत या घटनेविषयी महानुभाव ग्रंथात आढळतात. केवळ दोनच पुराभिलेखात या घटनेचा उल्लेख असून ते म्हणजे समचंद्राचे पैठण आणि पुरुषोतामपुरी ताम्रपट. आम्मणदेव हा रीतसर वारसदार नसल्यामुळे रामचंद्राने त्याला पदच्युत करून आपला रीतसर असलेला राज्यारोहणाचा हक्क प्राप्त केला असे त्यातील वर्णन आहे. हेमाद्रीच्या प्रशस्तीत आम्मणदेवाच्या नावाचा उल्लेख नाही. तो रामचंद्राचा मंत्री आणि आश्रित असल्यामुळे त्याने तो टाळण्याचे कारण समजू शकते.
रामचंद्र उर्फ रामदेव (इ.स. १२७१ ते १३१२) राजकीय कटाद्वारे रामचंद्राने आपला चुलत भाऊ आम्मण यास पदच्युत करून इ.स. १२७१ मध्ये आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याची सुत्रे हाती घेतल्याबरोबर त्याने माळवा आणि गुजरातची मोहीम हाती घेतली.
परमार जयसिंहाच्या मृत्यूनंतर इ.स.१२७० मध्ये पहिला अर्जुनवर्मन राज्यावर आला. परंतु त्याचा मंत्र्याशी बेबनाव असल्यामुळे राज्यात अव्यवस्था आणि अराजक सुरू झाले. माळव्यात हिंसाचार आणि रकतपाताचा कळस झाला. ही परिस्थिती बघून राज्यावर आल्याबरोबर रामचंद्राने माळव्यावर स्वारी केली. या स्वारीत रामचंद्राना विजय झाल्याची नोंद त्याच्या इ.स. १२७२ मधील ठाणे ताम्रपट, इ.स. १२७१ मधील पैठण ताम्रपट आणि इ.स. १२७६ मधील उदरी शिलालेखात करण्यात आली आहे. ठाणे ताम्रपटात रामचंद्राच्या गुजरात विजयाचा देखील उल्लेख आहे.
होयसळांनी यादवांचा सामंत असलेल्या कदंब कावदेव यान्या प्रदेशावर हल्ला केला आणि महादेवाच्या होयसळाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची वाट बघत असलेल्या रामचंद्राने सालूव टिक्क मदेव उर्फ टिक्कम याच्या नेतृत्वास्वाली दक्षिण मोहीम हाती घेतली. टिक्क माने होयसळांचा पराभव करून कावदेवास आपला प्रदेश परत मिळवून दिला. या विजयाने उत्साहित झालेल्या टिक्क माने दक्षिणेकडील आगेकूच चालू ठेवली आणि संतार प्रमुख बोम्मरस यावा पराभव करून त्यास यादवांचा सामंत वनविले. स्थानिक सामंत आणि प्रमुस्त अधिकायांनी केलेल्या सहकार्यामुळे टिक्क माचा आत्मविश्वास बळावला. त्याने सरळ होयसळांच्या प्रदेशात घुसून राजधानी द्वारसमुद्र जवळ असलेल्या बेलवडी किल्ल्याभोवती वेढा टाकला. होयसळास या आव्हानामुळे फार मोठा धक्का बसला. तशाही स्थितीत होयसळ सैन्याने चिक्क कोट्यनायकाच्या नेतृत्वास्वाली यादव सेनापती टिक्कम याला जोरदार लढत दिली. टिक्क माला आपल्या विजयाची स्वात्री होती व काही क्षणात द्वारसमुद्रवर ताबा मिळवू असा त्याना दावा होता. परंतु त्याच्या सैन्याला हार स्वाऊन माघार घ्यावी लागली. होयसळांच्या दस्तैवजात त्यांनी या स्वारीत यादव सैन्याची कशी त्रैधातिरपिट उडविली याचे रसभरीत व काहीसे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. याउलट यादवांच्या कोरीव लेखात टिक्क माचा द्वारसमुद्र विजय, त्याची लूट, होयसळांचे हत्ती व घोडे पकडणे आणि आपल्या विजयाचे स्मारक म्हणून तेथे लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे या स्वारीच्या फलनिष्पत्तीविषयी निश्चित अंदाज करणे कठीण आहे. परंतु १२७६ मधील या नंतरच्या काळातील कित्येक कोरीव लेखावरून शिमोगा जिल्ह्यावर यादवांची सत्ता दृढ असल्याचा संकेत मिळतो. यावरून या स्वारीत होयसळांनी यादवांचा दारुण पराभव केल्याचा दावा केला आहे. तो पूर्णपणे स्वरा नाही.
पुरुषोतामपुरी ताम्रपटात रामचंद्राने डहाळ देशाच्या राजाचा पराभव केल्याची, भांडागार येथील राजास शरण आणल्याची, वज्राकार येथील राजास पदभ्रष्ट केल्याची व गवळी राजास युद्धात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी डहाळ देश म्हणजे त्रिपुरीच्या कलचुरींचे राज्य होय. परंतु रामचंद्राने मात केलेल्या कलचुरी राजाचे नाव अज्ञात आहे. भांडागार (भंडारा जिल्हा, महाराष्ट्र) येथील राजा कोण होता हेही अस्पष्ट आहे. वास्तविक विदर्भाचा बहुतेक भाग सिंघणाच्या कारकिर्दीतच यादव राज्यात आला होता. पूर्वेकडील नागपूर-भंडारा परिसराव्या विजयाचे श्रेय रामचंद्रास द्यावे लागेल. रामटेक येथील आणि बालाघाट (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील लांजी येथील त्याचे शिलालेख याची पुष्टी करतात. """ वज्राकार म्हणजे चांदा जिल्ह्यातील वैरागढ़ होय, पण रामचंद्राने पदभ्रष्ट केलेल्या तेथील प्रमुखाचे नाव माहीत नाही. रामचंद्राने पराभूत केलेला गवळी राजा म्हणजे खानदेशातील अभीर प्रमुख असावा.
पुरुषोतामपुरी ताम्रपटात रामचंद्राच्या दिग्विजयांच्या यादीत पल्ली, कान्यकुब्ज, कैलास, माहीम, संगम आणि स्वेट इत्यादींचा समावेश आहे. पल्लीची निश्चिती अद्यापपर्यंत झालेली नसून कान्यकुब्ज आणि कैलासवरील त्याचे विजय म्हणजे केवळ कविकल्पना होय. माहीम म्हणजे मुंबईचे उपनगर माहीम असून संगम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगमेश्वर व स्वेड हे त्याच नावाने आज रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय आहे. येथील शासक है किरकोळ प्रमुख असून यादवांचे वर्चस्व न मानल्यामुळे त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्यात आली असावी.
याच ताम्रपटानुसार रामचंद्राने वाराणशी क्षेत्रास मुस्लिम राजवटीतून मुक्त करून तिथे शारंगपाणीचे मंदिर बांधले. ही घटना केव्हा घडली याची नोंद या ताम्रपटात नाही. ओ.पी. वर्मा यांच्या मतानुसार रामचंद्राने ही मोहीम हिंदूवी देवस्थाने मुस्लिम मूर्तीभंजकांपासून वाचविण्याच्या दृष्टीने हाती घेतली. तिचा काळ अल्लाउद्दिन खिलजीच्या दक्षिणेतील इ.स. १२९४ मधील आक्रमणापूर्वीचा व साधारणतः इ.स. ११८७ तेइ.स. १२९० या दरम्यानच्या काळातील असावा. कारण त्यावेळी उत्तरेस अराजक आणि गोधळाची स्थिती निर्माण झाली होती.
रामचंद्राचा काकतीयाशी देस्वील संघर्ष झाल्याचे संकेत मिळतात. अंबादेव नावाच्या काकतीयांच्या सामंताने आपल्या इ.स. १२९० मधील शिलालेखात असे नमूद केले आहे की, त्याला देवगिरीच्या राजाकडून सोने आणि जडजवाहीर भेटीच्या स्वरूपात मिळाले होते. यावरून हे स्पष्ट होते की या भेटीच्या मोबदल्यात अंबादेवाने काकतीयाऐवजी यादवांचे स्वामित्व स्वीकारले. या घटनेमुळे काकतीय राणी रुद्राम्मादेवी हिने आपला सेनापती विठ्ठल याच्या नेतृत्वास्वाली यादवांनी बळकावलेल्या प्रदेशापैकी रायचूर जवळील मानवे आणि हालुवे हे किल्ले जिंकून घेतले. तरीपाण या भागात इ.स. १९९७ पर्यंतच्या काळातील यादवांचे कोरीव लेख आढळतात. यावरून काकतीयांना यादद्वाविरुद्ध निर्णायक विजय मिळाला नव्हता असे दिसते.
यादव सैन्य काकतीयांच्या प्रदेशावरील मोहिमेत गुंतले असताना रामचंद्रास देवगिरीवर झालेल्या अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणाचा मुकाबला करावा लागला. दिल्लीचा खिलजी सुलतान जलालुद्दीन स्विलजी याचा पुतण्या अल्लाउद्दिन याने यादव राजाकडील अमाप संपतीविषयी ऐकले होते. आपल्या हेराकडून त्याला बातमी मिळाली की, यादवांचे मुख्य सैन्य दक्षिणेतील मोहिमेवर असून देवगिरी येथे मोजके सैनिक आहेत. त्यामुळे आपल्या चुलत्याच्या परवानगीशिवाय २६ फेब्रुवारी १२९६ रोजी अल्लाउद्दिन याने आपल्या कारा येथील जहागिरीतून देवगिरीस प्रयाण केले. त्यावेळी त्याच्याबरोबर फक्त चार हजार घोडेस्वार आणि दोन हजार पायदळ होते. देवगिरीजवळील लासूर इथे यादव सेनानी कान्हा याने अल्लाउद्दिनाचा प्रतिकार केला, परंतु त्याला पराभूत करून अल्लाउद्दिन देवगिरीजवळ आला. बहुतेक सैन्य युवराज पाचव्या सिंघणाच्या बरोबर मोहिमेवर असल्यामुळे रामचंद्राने उर्वरित सैन्यानिशी देवगिरीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्या मागून आणस्वी प्रचंड सैन्य येत असल्याची अल्लाउद्दिनाने पसरविलेली अफवा त्याच्या कानावर आल्यावर मात्र त्याचा धीर खवला. त्यामुळे अस्वैरीस त्याने तहाची याचना केली. अल्लाउद्दिनाने सोने, चांदी आणि जडजवाहिरांच्या रुपात प्रचंड संपतीच्या मोबदल्यात तहास मान्यता दिली. पुढे त्याने त्रास देऊ नये म्हणून रामचंद्राने आपल्या कन्येचा विवाह अल्लाउद्दिनाशी लावला असे फारशी साधनात नमूद केले आहे. प्रचंड संपत्ती, नववधु आणि वार्षिक खंडणीचे अभिवचन घेऊन २७ दिवसानंतर अल्लाउद्दिन कारास परत गेला.
तथापि, या पराभवापासून बोध घेऊन भावी काळातील आक्रमणाशी मुकाबला करण्यासाठी तयारी करण्याऐवजी किंवा मुस्लिम आक्रमकाविरुद्ध शेजारी राज्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासह संयुक्त मोर्चा बनविण्याऐवजी रामचंद्राने होयसळाविरु द्ध मोहीम हाती घेऊन वेळ, शक्ती आणि संपत्ती वाया घालविली. इ.स. १३०३ मध्ये यादव सैन्याने चित्रदुर्गापर्यंत होयसळांचा मुलुख व्यापला. होयसळ तिसया बल्लाळाने यादवांच्या ताब्यातील नाकि गुंडी किल्ला उध्वस्त करून त्यांच्यावर निर्णायक विजय मिळविला. यादवांनीही या लढाईत होयसळावर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. यावरून होयसळ आणि यादव यांच्यातील या शेवटच्या लढाईत देस्वील यादवांना फारसे यश लाभले नाही हे स्पष्ट होते.
इ.स. १३०६ पर्यंत रामचंद्र नियमितपणे दिल्लीकडे वार्षिक खंडणी पाठवीत होता. यावेळी आपला चुलता सुलतान जलालुद्दिन खिलजीचा वध करून अल्लाउद्दिन सुलतान झाला होता. परंतु त्याच्या सुरुवातीच्या उत्तरेतील लढाया यशदायी ठरल्या नव्हत्या. एवढेच नव्हे तर काकतीय प्रतापरुद्राने वरंगलवरील खिलजीचे आक्रमण परतवून लावले होते. कदाचित या पार्श्वभूमीवर रामचंद्राने खंडणी पाठविण्याचे थांबविले. इसामीने लिहून ठेवलेल्या या माहितीपेक्षा वेगळी माहिती रामचंद्राचा समकालीन मुस्लिम इतिहासकार बरनी याने नमूद केली आहे. त्यानुसार रामचंद्र सुलतानाशी एकनिष्ठ राहू इच्छित होता, परंतु युवराज तिसया सिंघणाने त्याला विरोध करून स्वंडणी पाठविण्याचे थांबविण्यास भाग पाडले. रामचंद्राने सुलतानास हे कळविले आणि आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली. त्यामुळे नंतर बंदी म्हणून.. दिल्लीला गेल्यावर देखील सुलतानाकडून त्याला चांगली वागणूक मिळाली.
अल्लाउद्दिनने ताबडतोब मलिक काफूर याला सैन्यासह देवगिरीस पाठविले. युवराज सिंघण, त्याचा भाऊ भिल्लम आणि दोन सेनानी राघव आणि रामदेव यांनी मलिक काफूरशी लढा दिला. शेवटी यादव सैन्याचा पराभव होवून रामचंद्राने शरणागती पत्करली. परंतु त्यांची मुले काही सैनिकासह निसटली. रामचंद्र आणि त्यान्या कु दुबियास मलिक काफूरने बंदी बनवून दिल्लीस नेले." अल्लाउद्दिनने रामचंद्राचा आदरसत्कार
केला आणि सहा महिन्याच्या त्याच्या वास्तव्यात त्याला योग्य त्या सर्व सुखसोयी पुरविल्या. परत येण्याअगोदर सुलतानाने रामचंद्रास त्याचे राज्य तर परत दिलेच, शिवाय नौसारीची जहागीर आणि वाटस्वर्वी म्हणून एक लाख टंक दिले. या कृपेमागे अल्लाउद्दिनचा स्वार्थ होता. पुढील काळात दक्षिणेतील आपल्या राज्यविस्तारात त्याला रामचंद्राचा उपयोग करून घ्याक्याचा होता. रामचंद्र मात्र आपले स्वातंत्र्य कायमचे गमावून बसला.
दिल्लीहून परत आल्यावर रामचंद्रास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. इ.स. १३१० मधील त्याच्या पुरुषोतामपुरी ताम्रपटात त्याच्या अनेक दिग्विजयांचे वर्णन करण्यात आले आहे. परंतु त्यातील बहुतेक अल्लाउद्दिनच्या आक्रमणापूर्वीचे असून बाकीचे त्याच्या अनुपस्थिीत बंड करणाऱ्या सामंतावरील स्वायऱ्यांच्या संदर्भातील होत.
इ.स. १३०९ मध्ये काकतीयाविरु द्धच्या मोहिमेसाठी अल्लाउद्दिनने पाठविलेल्या सैन्याचे रामचंद्राने देवगिरीस स्वागत केले व त्यांना आदरातिथ्याने वागविले. पुढे वरंगलला जाताना आपल्या राज्याच्या सरहद्दीपर्यंत या सैन्यास सर्व सुखसोयी पुरविल्या." अमीर खुश्रोच्या वृत्तातांनुसार रामचंद्राने अल्लाउद्दिनच्या होयसळाविरु द्धच्या मोहिमेत देखील अशाच प्रकारचे सहकार्य दिले.
इ.स. १३१२ च्या उत्तरार्धात रामचंद्राचे देवगिरीस निधन झाले. ठसिद्धेश्वर चरितमुठ या तेलुगु ग्रंथात असे नमूद करण्यात आले आहे की, यादव आणि काकतीयातील संघर्षाच्या वेळी प्रतापरुद्राचा सेनापती अन्नमदेव याने रामचंद्रास ठार केले. ही माहिती चुकीची आहे कारण या लढाईनंतरही काही वर्षे रामचंद्र जिवंत असल्याचे पुरावे उपलब्ध होतात.
रामचंद्र हा मराठी भाषा आणि वाङ्मयाचा पुरस्कर्ता आणि आश्रयदाता असल्यामुळे त्याच्या काळात मराठी भाषेला वाङ्मयीन भाषेचा दर्जा मिळून ती लोकप्रिय झाली. त्याचा आश्रित असलेल्या नरेंद्र कवीने ठरु विमणी स्क्यंवरठ आणि ठनागदेव चरितठ या मराठी ग्रंथांची रचना केली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचनाही त्याच्या कारकिर्दीत म्हणजे इ.स. १२९० मध्ये केली. यादव वंशातील रामचंद्र हा शेवटचा श्रेष्ठ राजा होता. त्याच्या कारकिर्दीतच इ.स. १२९६ मधील अल्लाउद्दिनच्या देवगिरीवरील स्वारीपासून यादव राजवैभवाचा हास सुरू झाला. दुर्देवाने रामचंद्राने मुस्लिम आक्रमणामुळे होणारे राजकीय आणि धार्मिक परिणाम लक्षात घेतले नाहीत. उत्तरेकडील शेजारी राज्यावर वारंवार तुर्काची आक्रमणे चालू असताना तो गाफिल राहिला. अल्लाउद्दिनची पहिली स्वारी झाल्यानंतरही तो बेफिकीर राहिला. एवढेच नव्हे तर या आक्रमकांना रोखण्याऐवजी त्याने काकतीय आणि होयसळाविरु द्धच्या त्यांच्या मोहिमांत तुर्काना मदत करून दक्षिणेतील हिंदू राज्यांच्या नाशास मदत केली.
तिसरा सिंघण (इ.स. १३१२) रामचंद्राच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा तिसरा सिंघण राज्यावर आला. त्याचे नाव विविध साधनात विविध प्रकारे (सिंघण, शंकर, संगम) लिहिण्यात आले आहे. अल्लाउद्दिनच्या आक्रमणास युवराज असलेल्या सिंघणाने प्रतिकार केल्याचा उल्लेख वर आला आहेच. राज्यावर आल्यावर-त्याने खंडणी पाठविणे थांबवून दिल्लीच्या सुलतानाचे वर्चस्व झुगारून दिले. त्यामुळे अल्लाउद्दिनने सिंघणास वठणीवर आणण्यासाठी मलिक काफूरला सैन्यासह पुन्हा देवगिरीस पाठविले. इसामीच्या वृत्तांतानुसार सिंघण देवगिरी सोडून पळून गेला. परंतु फरिश्ता म्हणतो की, सिंघणाने निकराची झुंज दिली व त्यात तो ठार झाला. हे स्वरे असले पाहिजे, कारण सिंधण हा स्वाभिमानी होता, तसेच नंतर त्याच्याविषयी काहीच माहिती मिळत नाही. मलिक काफूर काही काळ देवगिरीस राहिला. त्याने या नगरास दक्षिणेतील मुस्लिम सत्तेचे पहिले केंद्र बनविले.
अल्लाउद्दिनच्या आजाराची बातमी आल्यामुळे इ.स. १३१७ मध्ये मलिक काफूरने देवगिरी ऐन-उल-मुल्कच्या हाती सोपवून दिल्लीस प्रयाण केले. इ.स. १३१६ मध्ये अल्लाउद्दिनच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या तख्तासाठी तंटा सुरू होऊन शेवटी त्याचा तिसरा मुलगा मुबारक स्वान सुलतान झाला. या गोधळाचा फायदा घेऊन अनेक हिंदू राजे स्वतंत्र झाले. मुबारक खिलजीने ऐन-उल-मुल्क यास देवगिरीहून दिल्लीस परत बोलावले. रामचंद्राचा जामात हरपालदेव याने या संधीचा लाभ घेऊन मंत्री राघव याच्या सहाय्याने देवगिरीचे राजपद आपल्याकडे घेऊन दिल्ली सल्तनतीविरु द्ध बंड केले. मुबारक खिलजीने इ.स. १२१८ मध्ये देवगिरीवर स्वारी करून राघवास पराभूत केले व जवळच्या डोंगरावर आश्रय घेतलेल्या हरपालदेवास पकडून ठार केले. त्यानंतर मलिक यास्वलस्ती याची मुबारक खिलजीने देवगिरीचा सुभेदार म्हणून नेमणूक केली.
संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी भरावी असे त्याचे रुपडे. शिवरायांची राजधानी रायगडी हलवली जाण्यापूर्वी सभासद बखरीत म्हटल्यानुसार “दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच.” अशी प्रत्यक्ष रायगडाशी तुलना ज्याच्या नशिबात होती तो हा देवगिरी. ह्या देवगिरी प्रांताने इतिहासाच्या दोन हजार वर्षांत अत्यंत भरभराटीचा काळ पहिला. इसवीसनपूर्व काळापासून चालत आलेले सातवाहन राज्य,इथल्याच पैठणचे. नंतरच्या काळात वेरूळ आणि औरंगाबाद लेण्यांच्या निमित्ताने राष्ट्रकुट राजांनी ह्या प्रदेशाला सौंदर्य दिलं. पुढे चालून यादव काळात हा उभा देवगिरी,यादवांची राजधानी बनून राहिला. तद्नंतर उत्तरेकडून झालेलं इस्लामी आक्रमण इथल्या इतिहासाला कलाटणी देऊन गेलं.इतिहासात वेडा तुघलक म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद बिन तुघलकाने तर अख्या भारताची राजधानी थेट दिल्लीहून इथवर हलवली.अन नंतर मुघल काळात दक्षिणविजयाच्या महत्वकांक्षा घेऊन आलेला औरंगजेब तो आला अन आजही आपल्या नावाची छाप ठेऊन आहे.
पण ह्या सर्व उतरा आणि चढाव पाहिलेल्या,हजारो वर्षांत व्यापार-राजकारण-कला-स्थापत्य आदि अनेक मार्गांनी आपला तो तो काळ सजवून घेतलेल्या ह्या देवगिरी प्रांतात एक महत्वाचा कालखंड ठरला तो म्हणजे यादव काळ. सुमारे दीडशे वर्षांच्या आसपास देवगिरीवरून आपला राज्यकारभार हाकणारे देवगिरीचे यादव राजे शेवटी मात्र उत्तरेकडून झालेल्या इस्लामी आक्रमणाला बळी पडले आणि या प्रांतावर असलेला सुमारे हजारावर वर्षे जुना स्वकीयांचा अंमल संपुष्टात येण्याला सुरुवात झाली. याच यादव काळाचा छोटासा आढावा म्हणून हा लेख.
सुरुवातीचा यादव काळ
मुळात यादव म्हणजे यदु वंशी राजे. थेट भगवान श्रीकृष्ण यांचा वंश, हा उत्तरेत वाढला. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात हे उत्तर भारतातील यादव दक्षिणेत येऊन राज्य करू लागले असावेत असा कयास बांधला जातो परंतु ह्याबाबतचे सबळ पुरावे मिळत नाहीत. या यादवांचा सुरुवातीचा काळ म्हणजे ‘सेऊणदेश’ म्हणजे आजचा खान्देश. थोडक्यात नाशिक आणि देवगिरीच्या आसपासच्या प्रदेशात या यादवांचे छोटेखानी राज्य असावे. सुरुवातीच्या काळात यादव हे तत्कालीन दख्खनचे प्रशासक राष्ट्रकुट राजांचे सामंत होते. राष्ट्रकुटांच्या गुर्जर आणि प्रतीहार साम्राज्यांसोबत झालेल्या युद्धांत अमोघवर्ष (प्रथम) आणि कृष्ण (द्वितीय) या राष्ट्रकुट राजांना यादव साम्राज्याचे दृढप्रहर आणि सेउणचंद्र यांनी मदत केली. त्या बदल्यात त्यांना ‘सेउणदेश’ चा काही प्रदेश बक्षीस देण्यात आला होता. पैकी दृढप्रहर ऐवजी सेउणचंद्र हाच मूळ यादव साम्राज्याचा संस्थापक असावा यावरून थोडा गोंधळ आहे. यादवांनी आपली राजधानी नाशिक च्या ईशान्येस चंदोरी येथे उभी केली मात्र हेमाडपंताच्या व्रतखंडात सेउणचंद्राची राजधानी श्रीनगर (सिन्नर) असल्याचे सांगितले आहे. दृढप्रहराने इसवीसन ८६० ते ८८० च्या काळात आणि सेउणचंद्राने इसवीसन ८८० ते ९०० ह्या काळात ह्या प्रदेशावर राज्य केले. मात्र त्यांच्या अधिपत्याखाली असलेला प्रदेश हा आजच्या नाशिक जिल्ह्यापेक्षाही लहान होता. या नंतरच्या काळात धडीयप्पा (प्रथम), भिल्लम (प्रथम) आणि राजीग हे यादव राजे होऊन गेले. इसवीसन ९०० ते ९५० च्या काळात ह्यांनी राज्य केले. पुढील काळात वाडीग्गा , भिल्लम (दुसरा), वाडूगी, वेसुगी, सेउणचंद्र (दुसरा), एरमदेव, सिंहराज, मल्लुगी अशा बऱ्याच यादव राजांचा उल्लेख इतिहासात आहे. यातील बहुतांश नावे ही रामकृष्ण भांडारकर यांच्या The Early History of Dekkan आणि हेमाडपंताच्या बखरीद्वारे मिळतात. परंतु ह्यात नंतरच्या काळात आलेला भिल्लम (पाचवा) इथून यादव साम्राज्याची खरी कारकीर्द सुरु होते. भांडारकर यांच्या म्हणण्यांनुसार दृढप्रहर ते भिल्लम पाचवा यांदरम्यान सुमारे २३ यादव राज्यकर्ते होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे हे एकाच पिढीचे (म्हणजे भाऊ) असल्यामुळे खूप साऱ्या पिढ्यांचा काळ गेला नाही. राष्ट्रकुट साम्राज्याकडून चालुक्यांचा पराभव झाला तेव्हापासून सुमारे ४३७ वर्ष यादव राज्य करत होते. त्यामुळेच दख्खनच्या इतिहासात यादव काळाचे महत्त्व वाढते.
Genealogy Of Yadavas as given By R.G Bhandarkar
भिल्लमचा उदय आणि देवगिरीची पायाभरणी
बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लम ने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले. भिल्लमाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा (हा किल्ला बीड किंवा आसपासच्या प्रदेशात असावा) किल्ला घेऊन. आणि तदनंतर प्रत्यंडगड (उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा गाव आहे तेथील परांडा किल्ला) वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल. स्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खन चा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला. याच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ चालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा.
अशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.
तिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खनविजया करिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग,गुट्टी,बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला. ह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११९८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही. भिल्लमाचा असा दारूण अंत झालेला असला तरी एक त्याला पराभूत राजा म्हणविता येणार नाही. कारण एक योद्धा म्हणून भिल्लमाने स्वतःचे असे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. ते स्वतःच्या हिमतीवर उभे केले होते. उत्तरेत त्याने थेट मारवाड पर्यंत छापेमारी करून दाखवली होती. आणि एका चाणाक्ष बुद्धिमत्तेने योग्यवेळी चालून जाऊन त्याने होयसळ राजांची दख्खन ताब्यात घेण्याची योजना धुळीस मिळवली होती. त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.
जैतुगी
भिल्लमाच्या मृत्यू पश्चात् त्याचा मुलगा जैतुगी हा इसवी सन ११९१ मध्ये सत्तेवर आला. अत्यंत संकटाच्या वेळी सत्तेवर येऊन देखील त्याने तत्काळ तयारी करून होयसळ साम्राज्यापासून सीमा सुरक्षित केल्या व कृष्णा नदी ही होयसळ आणि यादव साम्राज्याची सीमा ठरवली गेली. पूर्वीच्या चालुक्यांचे सामंत असलेले काकतीय घराणे देखील हळूहळू डोके वर काढू लागले. भिल्लमच्या मृत्यूचा फायदा उठवत काकतीय राजा रुद्र ह्याने आपला भाऊ महादेव ह्यास यादव साम्राज्यावर मोहिमेत पाठवले. इसवी सन ११९४ च्या काळात होयसळ साम्राज्याबरोबर शांती प्रस्थापित झाल्यानंतर जैतुगीने थेट काकतीय साम्राज्यावर आक्रमण केले व त्यात राजा रुद्र मारला गेला तर त्याचा भाऊ महादेवचा मुलगा गणपती हा युद्धात पकडला गेला. महादेवने काही काळ चोख प्रतीउत्तर दिले मात्र तो देखील काही काळात मारला गेला. पुढच्या काळात संपूर्ण काकतीय प्रदेशावर जैतुगी यादवाचे नियंत्रण होते मात्र त्याने हिंदूधर्माच्या शिकवणीनुसार युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेल्या गणपतीस इसवीसन ११९८ मध्ये पुन्हा काकतीय साम्राज्याच्या गादीवर बसवले व पुढे संपूर्ण काळ यादवांचे पाईक म्हणून राहण्याचे वचन घेतले. जैतुगीच्या कार्यकाळाचा शेवट नेमका कधी झाला ह्याबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्र सरकारच्या गझेट मध्ये ती १२१० मानली आहे.
सिंघणदेव
यादव साम्राज्याची धुरा सांभाळणारा पुढचा राज्यकर्ता म्हणजे जैतुगीचा मुलगा सिंघण. इसवी सन १२१० ते १२४७ च्या काळात हा सत्तेवर होता. लहानपणापासूनच प्रदीर्घ काळ राजकुमार होण्याचा अनुभव असल्याने सिंघण निश्चितच कुशल राज्यकर्ता होता. अन ते त्याच्या कारकिर्दीकडे पाहून लक्षात येतेच. यादव सम्राटांपैकी सर्वात बलवान आणि कुशल राज्यकर्ता म्हणून सिंघणचे नाव घेता येईल. त्याला वापरले गेलेले ‘प्रौढप्रतापचक्रवर्ती’ हे विशेषण योग्य ठरते. सिंघण हा सत्तेवर येण्यापुर्वीच त्याने १२०६ च्या काळात होयसळ बल्लाळचा त्याने पराभव केला होता आणि विजापूर प्रांताचा बराचसा भाग त्याने जिंकून घेतला.सत्तेवर येताच त्याने पुनः होयसळ साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरु करून धारवाड, अनंतपुर, बेल्लारी, चित्तलदुर्ग, शिमोगा आदी प्रदेश जिंकून घेतला. कोल्हापूरचे शिलाहार राजे भोज हे यादवांचे पाईक होते मात्र तेथील राजा भोज ह्याने देखील आता यादव सत्तेविरोधात बंडाचे निशाण उगारले. त्यामुळे होयसळाविरुद्धची मोहीम पूर्ण होताच सिंघणदेव ने इसवी सन १२१७ मध्ये कोल्हापूर वर आक्रमण करून ताब्यात घेतले. तेथील राजा भोज जवळच असलेल्या परनाळा (पन्हाळा) किल्यावर पळून जाताच सिंघणने पन्हाळा देखील ताब्यात घेतला, राजा भोजला ताब्यात घेतले आणि त्याचे राज्य ताब्यात घेतले. ह्यानंतरच्या यादव घराण्यातील नोंदीनुसार सिंघणच्या एका सेनापतीने अंबाबाई मंदिरा समोर दरवाजा उभा केल्याचा उल्लेख आढळतो. कोल्हापूर येथून जवळच असलेल्या सौदत्ती मधील रट्टा वंशीय साम्राज्याचा अंत देखील सिंघणने करविला. पुढच्या काळात सिंघणदेवने माळवा आणि गुजरात वर आक्रमण केले आणि तेथील परमार वंशीय साम्राज्यावर ताबा मिळवला. इसवी सन १२२० मध्ये केलेल्या आक्रमणात सिंघणला भरूचवर ताबा मिळवण्यात यश आले आणि बहुतांश गुजरात प्रदेशावर त्याचे नियंत्रण आले. पुढे झालेल्या अनेक मोहिमांत सिंघणने उत्तरेतल्या बहुतांश प्रदेशावर ताबा मिळवला आणि आपल्या नियंत्रणाखाली आणले.
सिंघणदेवच्या काळात यादव सत्तेने आपला सर्वोच्च यशस्वी काळ पाहिला. दक्षिणेतील होयसळ,काकतीय,चालुक्य किंवा मावळ,परमार यांपैकी कुणीही यादव साम्राज्याला विरोध करण्याची हिम्मत दाखवू शकला नाही आणि देवगिरीचे यादव, सिंघणदेवच्या काळात दख्खनचे मुख्य नियंत्रक बनून राहिले. उत्तरेस भरूच ते जबलपूर अशी नर्मदा नदी सीमा बनली. संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातचा काही भाग, आंध्रचा उत्तर भाग, महाराष्ट्र आणि म्हैसूरच्या उत्तरेचा प्रदेश हा देवगिरीच्या छताखाली नियंत्रित झाला आणि यादव हे एकमेव दख्खनचे राजे बनले. परंतु हे करत असताना सिंघणने काही महत्वाच्या चुका केल्या ज्यामुळे दख्खनचा पुढे येणारा सर्व इतिहास बदलला असता. उत्तरेतील मावळ, परमार, लता आदी साम्राज्ये इस्लामी आक्रमणांना तोंड देत असताना, अख्ख्या दख्खनवर नियंत्रण असणारे यादव आपल्या इतर शेजाऱ्यांना सामील होऊन इस्लामी आक्रमणाला सहज थोपवून,परतवून लावू शकले असते. पण दख्खन विजयाची महत्वाकांक्षा असलेल्या सिंघणने उत्तरेतील साम्राज्यांना इस्लामी आक्रमणा विरोधात मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच हल्ले करून त्यांना नुकसान करण्याची घोडचूक केली. अन दख्खनच्या इतिहासात पुनश्चः एकदा भयंकर उलथापालथ घडवून येण्याचा मार्ग मोकळा झाला. इसवी सन १२४६ च्या सुमारास सिंघणदेवचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा कृष्णदेव सत्तेवर आला.
कृष्णदेव
कृष्णदेव हा इसवी सन १२४६ पासून १२६० च्या दरम्यान सत्तेवर होता. कृष्णदेव सत्तेवर येताच त्याने उत्तरेतील परमार साम्राज्यावर पुनःश्च आक्रमण केले. इसवी सन १२३५ मध्ये इल्तुमश च्या आक्रमणामुळे आधीच भिलसा आणि उज्जयिनी प्रांत गमावून खिळखिळे झालेल्या परमार राजा जैतुगीदेववर आक्रमण करून कृष्णदेवने परमार साम्राज्य ताब्यात घेतले. परमारांना साठ देऊन उत्तरेकडून होत असलेल्या इस्लामी आक्रमणा विरोधात मोर्चा काढण्याऐवजी परमारांवरच आक्रमण करण्याचा कृष्णदेवचा निर्णय दुर्दैवी होता. त्यामुळे दख्खनचे राजे म्हणून उदयाला आलेले यादव साम्राज्य अशा चुकांमुळेच पुढील काळात क्षणार्धात कोसळण्याची वेळ ओढवून घेऊ लागले. परामर साम्राज्य ताब्यात घेतल्या नंतर कृष्णदेव ने गुजरातवर हल्ला करून दक्षिण गुजरातचा प्रदेश ताब्यात घेतला. ह्या नंतर १२६० मध्ये कृष्णदेवचा मृत्यू झाला.
महादेव
कृष्णदेवच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रामचंद्र हा लहान असल्या कारणाने कृष्णदेवचा भाऊ महादेव हा सत्तेवर आला. याने उत्तर कोकणातील शिलाहार साम्राज्यावर ताबा मिळवला. काकतीय साम्राज्यातील गणपती ह्या राजाच्या मृत्यूनंतर त्याची कन्या रुद्रम्बा ही सत्तेवर आली, त्यावेळी काकतीय साम्राज्यावर महादेवने प्रहार करून काकतीय सैन्यातील काही हत्ती पळवून नेले.
ह्याच महादेव राजाच्या पदरी असलेला मंत्री म्हणजे हेमाद्री अर्थात हेमाडपंत. ह्याच हेमाडपंताने व्रत-खंड, प्रसती, चतुर्वर्गचिंतामणि यांसारख्या ग्रंथांची निर्मिती केली. दख्खनच्या पठारावर होत असलेल्या ज्वारीच्या पिकाचा जनक म्हणून हेमाडपंताचे नाव घेतले जाते. आणखी महत्वाची कार्ये म्हणजे हेमाडपंताने मोडी लिपी वापरात आणून प्रचलित केली. सोबतच महाराष्ट्रात आढळणाऱ्या अनेक पुरातन मंदिरांपैकी ‘हेमाडपंती’ मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बांधकामाची विशिष्ट पद्धत म्हणजे चुना न भरता दगडे एकमेकांना जोडण्याची पद्धत हेमाडपंताने प्रचलित केली.
अम्मना
महादेवच्या मृत्यूनंतर आधी म्हटल्याप्रमाणे कृष्णदेवचा मुलगा रामचंद्र हा सत्तेवर येणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता महादेवचा मुलगा अम्मान हा सत्तेवर आला. परंतु आता बराच वयात आलेला रामचंद्रदेव हा खरा सत्तेचा अधिकारी ठरत असल्याने महादेवच्या मंत्रीमंडळातील बहुमतांशी सरदारांचा कल रामचंद्रकडे होता. त्यात ऐन तरुण वयात असलेल्या अम्मानला संगीत व नृत्याची विशेष आवड होती. ह्याचाच फायदा घेत, अम्मानाच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याबाहेर गेलेला रामचंद्र आपल्या काही विशेष व खात्रीतल्या सहकाऱ्यांसह नाट्यकाराचा वेश घेऊन देवगिरीच्या किल्ल्यात दाखल झाला व अम्मनाच्या दरबारात येऊन कला सादर करण्याच्या बहाण्याने त्याने थेट दरबारात अम्मनाला ताब्यात घेऊन कैद केले व मंत्रीमंडळातील इतर सरदारांच्या मदतीने स्वतःला पुन्हा सत्तेवर आणले.
रामचंद्रदेव
आपल्या चुलत भावाने मिळवलेली सत्ता परत घेऊन इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रामचंद्र इसवी सन १२७१ मध्ये सत्तेवर आला. रामचंद्रने पुन्हा एकदा उत्तरेतील माळवा आणि परमार साम्राज्यावर आक्रमण करून सहज त्यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिणेकडेच्या होयसळ साम्राज्यावर आक्रमण करून त्यांच्या राजधानी पर्यंत मजल मारली. परंतु पुन्हा झालेल्या प्रतिकारामुळे रामचंद्रच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर १२८६ ते १२९० च्या दरम्यान, रामचंद्रदेव यादवने ईशान्येला साम्राज्य विस्तार करण्याची योजना आखली आणि त्या नुसार आजचा चंद्रपूर भंडारा च्या पलीकडील प्रदेश जिंकून घेत जबलपूर जवळील त्रिपुरी देखील ताब्यात घेतले. एका शिलालेखानुसार यादव राजा रामचंद्रने बनारस (वाराणशी) वर ताबा मिळवल्याचा उल्लेख आहे मात्र तो ताबा फार कल टिकून राहू शकला नाही. जलालुद्दीन खिलजीच्या शक्ती पुढे रामचंद्रला माघार घ्यावी लागली आणि त्याचे सैन्य दक्षिणेत परतले. मात्र ह्या वाराणशी मोहिमेदरम्यान एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे तिथून जवळच असलेला माणिकपूरचा सरदार अल्लाउद्दिन खिलजीच्या सुभेदारीला पोहोचलेली झळ. रामचंद्रच्या स्वारी आणि चापेमारी मुळे अल्लाउद्दीनच्या क्षेत्रालाही हानी पोहोचली असावी ह्यातूनच बहुदा अल्लाउद्दीन ने दक्षिणेवर,विशेषतः यादव साम्राज्याकडून बदला घेण्याचे ठरवले असावे. रामचंद्रदेवचा काळ म्हणजे अनेकविध साहित्य निपुणांनी नटला आहे. महादेव यादवच्या पदरी असलेला हेमाडपंत रामचंद्रदेवच्या पदरी देखील होता. रामचंद्रदेव रायाच्या काळातच संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अन ह्याच काळ अनेक महानुभाव संत उदयास आले.
इस्लामी शक्तींचा दख्खनेत प्रवेश आणि यादव साम्राज्याचा अंत
इस्लामी शक्तींचा उत्तरेतला प्रभाव वाढू लागला आणि सुमारे शंभर वर्ष जुन्या यादव साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. तेराव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत उत्तरेतल्या चालुक्य,परमार आदी साम्राज्याचा होत असलेला विनाश पाहून हीचं वेळ आपल्यावर देखील येईल आणि आपण त्यासाठी तयार राहावे असा विचार दुर्दैवाने यादव सम्राटाने केला नाही. उलट आधीच खिळखिळी झालेल्या आपल्या शेजारी साम्राज्यांशी दोन हात करून त्यांच्या विनाश घडवण्यात भागीदारी मिळवली. आपल्या शेजारी राष्ट्रांशी मित्रत्व पत्करून परकीय सत्तेला आव्हान देण्याचे आणि आपल्या सर्वांचीच साम्राज्ये सुरक्षित करण्याचे पर्याय असताना यादव साम्राज्यासारख्या बलाढ्य शक्तीने अगदी उलट काम केले. त्यामुळे इस्लामी शक्तींना एक एक करत सर्वच राष्ट्रांचा विनाश करणे सहज शक्य झाले. यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला. देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले. देवगिरीच्या पडावा होण्या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते. रामचंद्र किल्ल्याच्या वेढ्यात अडकला असताना माघारी खिलजीच्या सैन्या सोबत अधिक मोठे सैन्य दाखल होते आहे असे त्याला दिसून आले. ते खिलजीचे वाढीव सैन्य असावे आणि आता खिलजीची ताकद अधिक वाढली तर आपले काही खरे नाही असा कयास रामचंद्रने बांधला आणि तत्काळ शरण गेला. परंतु किल्ल्याची द्वारे उघडल्यानंतर रामचंद्रच्या लक्षात आले की मागून येत असलेले सैन्य म्हणजे त्याचाच मुलगा शंकरदेव हा होता. परंतु हे केवळ आख्यायिका असून ह्याला कुठलाही आधार नाही. पुढे आयुष्यभर अल्लाउद्दिन खिलजी चा पाइक बनून राहिलल्या रामचंद्रचा मृत्यू इसवीसन १३११ मध्ये झाला. मधल्या काळात शंकरदेवने पुनःश्च खिलजी विरुद्ध उठाव केल्याने रामचंद्रला दिल्लीत अटक करवून नेण्यात आले खरे पण तेथे खिलजीने त्यास सन्मानाची वागणूक दिली.
शंकरदेव
रामचंद्रच्या मृत्युनंतर शंकरदेव सत्तेवर आला. शंकरदेव हा आपल्या पित्याच्या अत्यंत विरुद्ध स्वभावाचा होता. रामचंद्रने अगदी अलगद पत्करलेले पाईकत्व त्याला अजिबात मान्य नव्हते आणि तो सदैव खिलजीचा विरोध करू लागला. त्याने देवगिरीला पुन्हा स्वतंत्र करण्याची घोषणा केली. हे एक मोठे धाडसच होते आणि ते योग्यही असले तरी देवगिरी चे यादव साम्राज्य अत्यंत कमकुवत बनले होते. शंकरदेवने पुन्हा उठाव करताच अल्लाउद्दिन खिलजी ने मलिक काफुरला दख्खनेत धाडले. मलिक काफुर ने शंकरदेवची हत्या करून यादवांना अस्ताला नेले अन यादव साम्राज्य केवळ नावाला उरले. यादव सत्तेचा सूर्यास्त. इसवी सन १३१५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी चा मृत्यू होताच मलिक काफुर दिल्ली कडे परत निघून गेला अन त्याचा फायदा उचलावा म्हणून रामचंद्रचा जावई हरपालदेव आणि राघव नामक एक सरदार ह्यांनी पुनः यादव सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीच्या सत्तेवर नव्याने आलेलं कुतुब मुबारक शाह ने १३१८ मध्ये देवगिरीकडे कूच करून हरपालदेवला ताब्यात घेतले व त्याला फासावर लटकवले अन अशाप्रकारे दख्खनच्या एक बलाढ्य साम्राज्याचा सूर्यास्त झाला कायमचा.
ह्या यादव इतिहासात विशेष नमूद करावे ते म्हणजे एका छोट्या,स्वतःच्या हिम्मतीवर निर्माण केलेल्या पाचव्या भिल्लमाच्या यादव साम्राज्याने दख्खनसम्राट होण्याचे स्वप्न पाहिले,आपल्या इतर बलाढ्य प्रतीस्पर्ध्यांना मात देत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले देखील मात्र आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करत असतानाच बदलत्या काळाची कास धरत,वेळ पडेल तसे राजकारणाची गणितं बदलत अस्तित्व टिकवून ठेवणे यादवांना जमले नाही आणि एका हिंदू साम्राज्याचा दुर्दैवी अंत झाला. – आशुतोष म्हैसेकर
हा लेख दैनिक सामना (संभाजीनगर आवृत्ती) द्वारा प्रकाशित दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.
टिपण: वरील लेखात भिल्लम च्या कारकिर्दीबद्दल दिलेल्या माहितीत काही बदल केला आहे. त्याचा संदर्भ ‘मिसळपाव’ कट्ट्यावरील प्रचेतस ह्यांच्या सूचनेनुसार. बाह्य दुवा
यादवांची वंशावळ राजस्थान येथील ब्रम्हभट राधाकिशन रामचरऩ किशनगड,महाबीर काँलनी सावतसर वार्ड नं.44 जि.अजमेर,राजस्थान पीन-305801
वर भिल्लमाने श्रीवर्धन आणि प्रचंडगड घेतल्याचे उल्लेख आलेत. त्यातले श्रीवर्धन म्हणजे श्रीवर्धन बंदर नव्हे किंवा राजमाची- श्रीवर्धन हा किल्लाही नव्हे. पाचव्या भिल्लमाच्या वेळी उत्तर कोकणावर शिलाहार अपरादित्याची राजवट होती. त्याचे त्यावेळचे समुद्राधिप, कोंकणचक्रवर्ती अशी बिरुदे असलेले कित्येक लेख उपलब्ध आहेत. हे श्रीवर्धन म्हणजे बीड नजीकची एखादा गढीवजा भुईकोट किल्ला असावा. महानुभाव पंथाच्या एका ओवीत बीड जवळच्या श्रीवर्धनचे कुणीतरी एक संत असा उल्लेख आहे. स्थानपोथीत कदाचित नक्की स्थान मिळू शकेल. स्थानपोथी मजकडे आहे,सवडीने बघून सांगतो.
वर उल्लेख केलेला प्रत्यांडकगड म्हणजे प्रचंडगड किंवा तोरणा नव्हे, शिवाजी महाराजांनी मूळचे तोरणा हे नाव बदलून प्रचंडगड असे केले. लेखात उल्लेखलेला प्रत्यंडकगड म्हणजे उस्मानाबादजवळचा बळकट किल्ला परांडा हा होय. भिल्लमाची बहुतेक सर्वच कारकीर्द ही प्रामुख्याने मराठवाड्यात गेली.
रत्नागिरी प्रदेशाशी भिल्लमचा काही संबंध होता का? की मराठवाडा वा पश्चिम महाराष्ट्रातल्या रत्नगिरी नामे कुण्या किल्ल्याशी संबंध आहे?
रत्नागिरीवर दक्षिण कोकण शिलाहारांची राजवट होती पण ती ११ व्या शतकात संपली हा भाग परत चालुक्यांच्या ताब्यात गेला. त्यांनी इथे कोणीतरी सामंत नेमला तो कोण ते नेमकं ठाऊक नाही. पण पाचवा भिल्लम कधीही रत्नागिरीपर्यंत पोहोचला नाही. त्याचे राजकीय कर्तृत्व बीड, सोलापूर, उस्मानाबाद , उत्तर कर्नाटकापर्यंत मर्यादित राहिले. कोकण प्रांतात यादवांचा शिरकाव झाला तो सिंघण दुसरा ह्याच्या कारकिर्दीत. सिंघणाने शिलाहार भोज दुसरा ह्याचा खिद्रापूरजवळ पराभव करून कोल्हापूर शिलाहार राजवट संपवली तर त्याचा मुलगा कृष्णदेव यादव याचे राजवटीत महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहाराचा समुद्री युद्धात पराभव करून उत्तर कोकण शिलाहार संपवले. उरलासुरला कोंकण प्रांत नंतर रामचंद्रदेव यादवाने काबीज केला.
यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज समजत. यादव शासक राष्ट्रकूट व चालुक्य यांचे सामंत होते.
त्या वंशाचा संस्थापक दृढप्रहार होता. त्याने व त्याचा पुत्र सेऊणचंद्र (इसवी सन ८८० – ९००) यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व राष्ट्रकूट सत्तेतील अराजकाचा फायदा घेऊन निर्माण केले. पाचवा भिल्लम (११७३ – ११९२) याने स्वतंत्र यादव सत्तेची स्थापना केली. त्याने त्याची राजधानी सोमेश्वर चौथा या चालुक्य शासकाचा पराभव करून देवगिरी (दौलताबाद) येथे स्थापन केली. भिल्लमच्या मृत्यूनंतर पहिला जैतुगी व दुसरा सिंघण (सिंघणदेव इसवी सन १२०० – १२४७) सत्तेवर आले. दुसरा सिंघण याच्या काळात यादव सत्ता परमोत्कर्षास पोचली. सिंघणाने उत्तरेस गुजराथचे चालुक्य व माळव्याचे परमार यांच्या विरूद्ध आक्रमणे केली. संगीततज्ज्ञ ‘सारंगदेव’ त्याच्या दरबारी होता. त्याने ‘संगीतरत्नाकर’ हा ग्रंथ लिहिला. सिंघणदेवने त्याच्या ग्रंथावर टीका लिहिली होती. ज्योतिषी चांगदेव हाही त्याच्या आश्रयास होता.
सिंघणानंतर कृष्ण (१२४७ -१२६१) व महादेव (१२६१ -१२७१) हे राजे होऊन गेले. ते कला-साहित्याचे भोक्ते होते. त्यानंतर रामचंद्र ऊर्फ रामदेवराय (इसवी सन १२७१ -१३१२) सत्ताधीश बनला. त्याचवेळेस अल्लाउद्दिन खिलजी याने गुजराथ व माळवा येथील मोहीम हाती घेतली. त्याने दक्षिण मोहीम काढून होयसळांचाही पराभव केला. त्याने १२९४ मध्ये देवगिरीवर स्वारी करून संपत्ती लटून नेली. खिलजीच्या सैन्याने मलिक कफूरच्या नेतृत्वाखाली देवगिरीवर पुन्हा आक्रमण केले. रामदेवराय याच्यानंतर तिसरा सिंघण/शंकर (इसवी सन १३१२) सत्तेत आला. त्याने खिलजींचे आधिपत्य अमान्य केल्याने खिलजींनी पुन्हा त्याच्यावर आक्रमण केले व सिंघणाला ठार केले. त्यानंतर रामचंद्रदेवाचा जावई हरपालदेव गादीवर आला. पण मुबारक खिलजीने त्याचा पराभव करून यादवांची राजवट (१३१८) संपुष्टात आणली.
यादवकालीन राजतंत्रावर राष्ट्रकूट व चालुक्य यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा प्रभाव होता. यादव शासकांनी पृथ्वीवल्लभ, श्रीवल्लभ, चक्रवर्ती अशा मोठमोठ्या पदव्या धारण केलेल्या दिसतात.
यादवकाळात कृषी, उद्योग व व्यापार यांचा विकास झाला. पैठण, ब्रह्मपुरी, तेर, चौल, दौलताबाद ही महत्त्वाची व्यापारी व उत्पादन केंद्रे होती. शेतीची मालकी व्यक्तिगत असली तरी तीवर नियंत्रण गावाचे असे. अल्लाउद्दिन खिलजीच्या दक्षिणेतील स्वाऱ्यांमुळे उत्तरेशी संपर्कात वाढ झाली.
यादव कालात मराठीत लिखित साहित्य निर्माण होऊ लागले. गोरक्षनाथांच्या ‘अमरनाथ संवादा’पासून त्याची सुरुवात झाली. हेमाद्रीचे ‘चुर्वर्ग चिंतामणी’, ज्ञानेश्वरांचे ‘अमृतानुभव’ व महानुभाव वाङ्मय हे यादव काळातील साहित्य. मुकुंदराजने लिहिलेल्या ‘विवेकसिंधू’तून मराठी साहित्याचा प्रवाह सुरू झाला. महानुभाव पंथाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. यादवांनी मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरला. वारकरी व महानुभाव या दोन पंथांबरोबरच जैन, नाथ, लिंगायत हे पंथ त्याकाळी महाराष्ट्रात रुजले. यादव काळात देवगिरी, पैठण, नाशिक ही विद्याकेंद्रे होती. शिक्षणाचे माध्यम संस्कृत असे. समाजात कर्मकांडांचे प्राबल्य वाढले होते.
हेमाडपंथी पद्धतीच्या बांधकामांना यादव काळात सुरुवात झाली. महादेव मंदिर (परळी), जबरेश्वर (फलटण), गोंडेश्वर (सिन्नर), महादेव मंदिर (झोडगे) इत्यादी मंदिरांत हेमाडपंथी तंत्राचा वापर झालेला दिसतो. त्या मंदिरांच्या बांधकामात चुना अथवा माती वापरली गेली नाही.
देवगिरी यादवांच्या राज्यकाळात वैभवाच्या शिखरावर होते. मार्को पोलोने इसवी सनाच्या तेराव्या शतकातील देवगिरीचे व्यापारी वैभव लिहून ठेवले आहे. त्या काळी ते नगर सर्व प्रकारच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. तेथे जवाहराचा व्यापार विशेष चालत असे. हिरे-माणकांना पैलू पाडण्याचे आणि सोन्या-चांदीच्या व इतर कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे काम तेथे चाले. त्या वेळी अन्यत्र न मिळणाऱ्या अपूर्वाईच्या वस्तू मिळवण्यासाठी लोक मुद्दाम देवगिरीला येत असत (गोविंदप्रभू चरित्र २९३). देवगिरीजवळ वेरूळच्या रस्त्यावर कागजपुरा हे हातकागद बनवण्याचे केंद्र आहे. पोथ्या लिहिण्यासाठी गेली तीन-चार शतके वापरला जाणारा दौलताबादी कागद तेथे तयार होतो.
देवगिरी ही यादवांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असली तरी तेथील किल्ला मात्र यादवांच्या उदयापूर्वी राष्ट्रकुट राजा कृष्ण याने बांधलेला आहे.
(आधार – महाराष्ट्र वार्षिकी, भारतीय संस्कृतिकोश)
भारतात राजा होण्याचा हक्क हा प्राचीन काळापासून वंशपरंपरेने होता. धृतराष्ट्र ज्येष्ठ पुत्र असूनही अंध असल्याने राजा होण्यास अपात्र, साहजिकच पांडू राजा झाला आणि वंशपरंपरेने पांडूच्या मुलांचा हक्क राहतो. हे अगदी मध्ययुगीन राजवटीत देखील दिसते. दोन उदाहरणे देतो. पुलकेशी पहिला ह्याच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा किर्तीवर्मन राजा झाला, त्याच्या मृत्युसमयी किर्तीवर्मनचा पुत्र एरेय (पुलकेशी दुसरा) हा अल्पवयीन असल्याने त्याचा काका मंगलेश (किर्तीवर्मनचा धाकटा मुलगा ) हा राजा झाला व साहिजकच मंगलेशाने त्याच्या स्वतःच्या पुत्रास युवराज घोषित केले मात्र वंशपरंपरेने एरेयाचा हक्क अबाधित असल्याने त्याने सामंतांच्या पाठिंब्याने मंगलेशास त्याच्या पुत्रांसह बुडवले.
यादव राज्यात देखील असेच घडले, कृष्णाच्या मृत्यूनंतर रामचंद्रदेव यादव अल्पवयीन असल्याने महादेव राजा झाला, महादेवाच्या मृत्यूनंतर रामदेवरायास राज्य देण्याऐवजी महादेवाचा पुत्र आमणदेव सत्तेवर आला. रामदेवाने बंड करून आमणाचे डोळे काढले आणि स्वतःचा राज्यहक्क मिळवला.
अर्थात सत्तेवरून कुरघोड्या फार प्राचीन काळात होत्या. आपल्या प्राचीन राजवटी जितक्या चांगल्या रंगवल्या जातात तितक्या त्या नव्हता, बहुतेकांचे सत्तांतर रक्तरंजितच असे.
. देवगिरीचे यादव
1. प्रस्तावना : महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेची स्थापना होण्यापूर्वी यादवांची राजवट होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या प्रांतातील मध्यपूर्वकालीन राजकीय स्थित्यंतरात यादव राजवटीला अनन्य साधारण महत्व आहे. इ. स. च्या नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकाच्या - प्रारंभीच्या काळापर्यंत यादवांची राजवट होती. (इ.स. ८३५-१३१८) यादवांची एकूण कारकिर्द ४७३ वर्षाची आहे. प्रारंभीचे यादव राजे हे राष्ट्रकूटांचे चालुक्यांचे मांडलिक होते. भिल्लम-V याने मांडलिकत्व झिडकारुन स्वतंत्र राज्य स्थापन केले. पाऊणे पाचशे वर्षांच्या काळात यादवांनी दक्षिण भारतात एक स्वतंत्र राज्याची निर्मिती केली. उत्तर आणि दक्षिण भारताच्या दरम्यान यादवांचे साम्राज्य होते. यादवांचे साम्राज्य हे हिंदु साम्राज्य होते. यादवांच्या साम्राज्याच्या पराभवानंतर आसपास ६५० वर्षे यादवांच्या साम्राज्याचा प्रदेश मुस्लिम अधिपत्याखाली राहिला (इ.स. १३१८-१९४८).
II. यादव राज्य सीमा : यादवांचा प्रथम राजा सुबाहु यास मानण्यात येते. सुबाहुचा पुत्र दृढप्रहार हा दक्षिणेत श्रीनगर येथे राहत असल्याचे यादव कालीन साधनात वर्णन आहे. दृढप्रहारचा पुत्र सेऊणचंद्र याने सेऊणपूर नगराची स्थापना केली. सेऊणपूर नाशिकच्या दक्षिणेस गोदावरीच्या दोन्ही काठच्या प्रदेशाला सेऊणदेश असे म्हणतात प्रदेशास सिन्नर, सिंदीनेर अशी नावे आहेत. यादवांची देवगिरी ही नवी राजधानी होती. देवगिरीची स्थापना होण्याअगोदर यादवांचे राज्य गोदावरीच्या काठी, नाशिक, सिन्नरच्या प्रदेशात होते.
प्रस्तावना
यादव वंश
राज्य स्थापना
यादवांचे राज्य
यादव घराणे-साधने
यादववंश राजे
यादवांच्या सत्तेचा वास्तविक संस्थापक भिल्लम-पासून ते रामचंद्रदेव यादवापर्यंत यादवांच्या साम्राज्याच्या सीमा ह्या विस्तारत राहिल्या. यादवांच्या साम्राज्यात उत्तर-पश्चिमेला नर्मदा नदीपर्यंत, उत्तर-पूर्वेला नागपूर-भंडारा पर्यंत, दक्षिणेला करनूलपर्यंत, पश्चिमेला सागर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश होता. आजच्या सीमाक्षेत्रांचा विचा केला तर यादवांचे साम्राज्य गुजरात मध्यप्रदेशचा काही भाग, पूर्वेला आंध्रप्रदेशाचे कार जिल्हे, दक्षिणेला कर्नाटकातील बेल्लारी, बेळगांव, धारवाड, बनवासीचा भाग होता यादवांच्या साम्राज्याच्या दक्षिणेला होयसळांचे, पश्चिमेला काकतीयांचे, उत्तरेला परमारचि - गुजरात चालुक्यांचे राज्य होते.
III. यादव उत्पत्ती : आजच्या कर्नाटकाच्या प्रदेशात म्हैसूरच्या संस्थानात हलेबीह अथवा द्वारसमुद्र येथे होयसळांची सत्ता होती. होयसळांनी चालुक्यांच्या दुर्बलतेतून साम्राज्य निर्माण केले. याचवेळी महाराष्ट्रातही यादवांनी आपली सत्ता चालुक्य आणि कलचूरीच्या साम्राज्यावर निर्माण केली. यादवांनी स्थापन केलीली सत्ता यादव वंशाचे साम्राज्य हाह्या नावाने ओळखली गेली. यादव हे दक्षिणेत केंव्हा आले, महासामंत केव्हा बनले याबद्दल अनेक विचार प्रवाह आहेत. यादववंशातील शासक स्वतःला श्रीकृष्ण यादवाच्या वंशातील असे मानतात. दक्षिण भारतात यादवांच्या दोन शाखा होत्या. होयसळ यादव आणि श्रीनगरचे (सिन्नर) यादव. मथुरा ह्या ठिकाणी यादव श्रीकृष्णाच्या अधिपासूनचे होते. जरासंघाच्या त्रासापासून वैतागुन श्रीकृष्णाने मथुरेचा त्याग केला व द्वारसमुह ह्याठिकाणी निवास केला. श्रीकृष्णाच्या नंतर यादवांनी स्थलांतर केले. स्थलांतरीत यादवापैकी होयसळ आणि श्रीनगरचे यादव हे एक होते. होयसळांच्या यादवांनी आपल्या नावामागे पदव्यात यादव कुलांचे स्मरण व्हावे म्हणून 'द्वारसमुद्रचे होयसळ' असे नाव दिल्याचे दिसते. हेमाद्रीने 'चतुवर्गचिंतामणी' ह्या ग्रंथात वृत्तखंडात 'यादवा' बद्दल माहिती दिली आहे.
IV. यादव नांव कसे पडले : नाशिक-नगर दरम्यानच्या प्रदेशाला 'सेऊ नदेश' असे म्हणतात. 'सेऊणदेश' हे प्रादेशिक नाम आहे. सेऊनचंद्रावरुण 'सेऊनदेश' हे नाव पडले. ह्यावरुन सेऊन हे नाव पडले. सेऊन ते भिल्लम-V पर्यंतच्या राजांचा उल्लेख यादव असा सेउनवंशीयांनी धारण केले. चतुवर्गचिंतामणीच्या वृत्तखंडात हेमाद्रीने सेऊन वंशीयांचा उल्लेखयेण्याऐवजी 'सेऊन वंशीय' असा येतो. 'सेऊन' हे नांव देवगिरी ही राजधानी होईपर्यंत 'यादव' असा केला. भिल्लम-V पासून सेऊन वंशीयांना यादव नावाने ओळखण्यात येवू लागले. हेमाद्रीने वृत्तखंडात यादव वंशीयांच्या वंश तालिकात पौराणिक ५५ राजांची तर ऐतिहासिक १६ राजांची यादी दिली आहे. उत्तरकालीन देवगिरीच्या यादवांच्या राजांत मुल्लगि राजापासूनचा उल्लेख केलेला आहे. पौराणिक ५५+ ऐतिहासिक १६ अशा ७१ राजांचा सेऊनवंशी तर यादववंशी राजांत ८ राजांचा उल्लेख येतो. सेऊन कालिन यादव आणि देवगिरीकालिन यादव असे वर्गीकरण डॉ. रा. गो. भांडारकरांनी Early History of the Deccan ह्या ग्रंथात केले आहे. यदुवंशीय कृष्ण घराण्यातील नावावरुन 'यादव' हे नांव पडले. सेऊन यादववंशात दृढप्रहार ते भिल्लम-V, तर देवगिरी यादवांत भिल्लम- V ते हरपालदेव यांचा समावेश होतो.
V. यादवांचा कालखंड : यादवांच्या राजवटीचा कालखंड ४७३ वर्षाचा आहे. यादवांच्या सत्तेचा उदय सेऊनचंद्रापासून मानला जातो. सेऊनचंद्राचा कालखंड इ. स. ८३५-६० हा होता. सुबाहूपुत्र - दृढप्रहार व दृढप्रहारपुत्र सेऊ नचंद्र होत. यादवांचे सेऊ नवंशीय राजे राष्ट्रकूटसमकालीन व अधिन होते. राष्ट्रकूटांची सत्ता कल्याणीच्या चालुक्यांनी पराभूत केली. कल्याणीच्या चालुक्याच्या अधिन यादवांनी राज्य केले. कल्याणीचे चालुक्याचा पराभव झाल्यानंतर यादवांनी स्वतंत्रपणे राजकारभार केला. भिल्लम-V ने इ. स. ११८७ ला यादवांची स्वतंत्र सत्ता स्थापन केली. प्रारंभी यादव राष्ट्रकूट आणि नंतर चालुक्यांच्या अधिन होते. चालुक्यानंतर स्वतंत्र पध्दतीने यादवांनी राज्य केले.
VI. यादव घराण्याची साधने यादवांची राजवट केवळ राजकीय दृष्टयाच श्रेष्ठ होती असे नाही. यादवांच्या काळात अनेक क्षेत्रात साहित्याची निर्मिती झाली. यादव घराण्याबद्दल माहिती देणाऱ्या पुरातत्वीय साधनात यादवांच्या नृपतीने दिलेली ताम्रपटांची संख्या जास्त आहे. यादवांचे शिलालेख ही आहेत. शिवाय यादवांच्या काळात बांधली गेलेली हेमाडपंथी मंदिरे आणि मंदिरावरची द्वारलेख हे होत. साहित्यीक साधनांत यादवांनी स्थानिक भाषेचा, प्राकृतचा पुरस्कार केला. यादवांच्या काळातील साहित्य हे संस्कृतमध्ये आहे. प्राकृताच्या हिनत्वामुळे या काळातील साधने संस्कृतात आहेत पण जनसामान्यांच्या पाठिंब्यामुळे साहित्य मराठीत निर्माण झाले. हेमाद्री, ज्ञानेश्वर, म्हाईमभट्ट, शार्डगदेवांचे साहित्य हे या काळाबद्दल माहिती देणारे मुख्य साधन आहेत.
VII. यादवसत्तेची स्थापनाः यदुवंशीय यादव कुळातील सुबाहूचा मुलगा दृढप्रहार याने ९ व्या शतकाच्या प्रारंभीला चंद्रापूर किल्ला ताब्यात घेतला व राजधानी बनवली. चंद्रापूर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील चांदोर होय. दृढप्रहाराचा मुलगा सेऊनचंद्र याने सेऊनपूर हे नगर स्थापन केले. चंद्रापूरहून राजधानी सेऊनपूर-सिन्नर येथे स्थापन झाली. औरंगाबाद ते नाशिक दरम्यानच्या प्रदेशाला 'सेऊनदेश' म्हणतात.
सेऊनचंद्रानंतर यादवांचा राजा वङिग हा राष्ट्रकूट श्रेष्ठनृपती कृष्ण-1 यांचा मांडलिक होता. वङिगचा पुत्र भिल्लम-II याचा विवाह राष्ट्रकूट नृपतींनी आपल्या मुलीशी लावला प्रारंभीचे यादव राजे हे राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. वङिग आणि राष्ट्रकूट नरेशांचे नात्र ए मांडलिक-शासक असतांनाही व शारिरीक संबंधाचे असतांनाही वङिगकने चालुक्याचे मांडलिकत्व स्वीकारले. चालुक्य प्रबळ बनल्याचे हे एक कारण होते. राष्ट्रकुटांच्या दुर्बलतेबरोबः चालुक्यांच्या सत्तेचा उदय झाला. तैलप चालुक्याने दोन शतकानंतर चालुक्य सत्ता के पुनर्स्थापित केली. तैलप चालुक्याने इ.स. ९७२ च्या दरम्यान राष्ट्रकूट राजा कर्कचा पराभव स केला. राष्ट्रकूटांची मान्यखेट ही राजधानी चालुक्यांनी जिंकली. चालुक्यांच्या विजयामुळे ल राष्ट्रकूटांचे मांडलिक यादव हे चालुक्यांचे मांडलिक बनले. चालुक्यांनी राष्ट्रकूटांचा पराभव तव केल्यानंतर गंग, पाण्ड्य, चोलांचा पराभव केला. चालुक्य प्रबळ होताच परमारांनी चालुक्यावर स्व आक्रमण केले. परमार शासक वाकपती मंजू याने चालुक्यावर आक्रमण केले. चालुक्य आणि चालुक्यांचे मांडलिक यादवांनी परमारांचा पराभव गोदावरी काठी केला. म्हणून चालुक्यांनी भिल्लम यादव-III यांच्याशी वैवाहिक संबंध स्थापन केले. प्रवरा नदीच्या परिसरातील यादवांनी चालुक्यांचे मांडलिक म्हणून राज्यकारभार केला. चालुक्यांनी इ.स. १०६८-७६ ह्या काळात चोलांच्या विरोधात मोहीम काढली असतांना चोलांच्या प्रबळ साम्राज्य सेनेविरूध्द चालुक्य नरेशाला यादवांचा शासक सेउनचंद्र-II व त्यांच्या मुलांना परमेश्वरदेवाने साह्य देवून चोलांवर विजय मिळवून दिला. चालुक्यांचा सम्राट विक्रमादित्य-VI ह्याने प्रदीर्घकाळ राज्य केले. विक्रमादित्य- VI आणि जयसिंह ह्या दोन भावातील सत्ता स्पर्धामुळे चालुक्यांचे साम्राज्य नष्ट झाले. दुर्बल वारसदार तैलप तृ. रुद्र चालुक्यांचा राजा बनला. तैलप तृ. चालुक्यांचा बिज्जल कलचूरी हा प्रबळ व सामर्थ्यवान सेनापती असल्याने राजाला स्थलांतर करावे लागले व आश्रयार्थ फिरावे लागले. इ. स. ११६२ ला बिज्जल कलचूरीने स्वतःला शासक म्हणून घोषीत केले. चालुक्यांची सत्ता कलचूरींच्या हातात गेली. इ. स. ११८३ ला कलचूरीची सत्ता संपली. २३ वर्षे कलचूरींनी राज्य केले. कलचूरींचा प्रथम शासक बिज्जल तर शेवटचा सिंघण हा होय. कलचूरीच्या सत्तेच्या काळात देवगिरीच्या परिसरातील यादव वंशीय मलुग्गीने कलचूरीच्या विरोधकांना एकत्र करुन सत्ता स्थापन केली.
VIII. यादव वंशातील राजे :
A. भिल्लम यादव- इ. स. १९८४-१९९१: मल्लुगीनंतर भिल्लम-V वा सत्तेवर आला. देवगिरी यादव वंशातील वास्तविक संस्थापक भिल्लम-V हा होय. कलचूरीचा या पराभव करुन भिल्लमने सत्ता स्थापन केली. कलचूरींचा पराभव यादवांनी तर चालुक्यांच्या दर वारसदारांचा पराभव होयसळांनी केला. चालुक्य आणि कलचूरी यांचा अस्त हा यादवांच्या सत्तेच्या उदयाचे मुख्य कारण होय. याशिवाय यादवांची सत्ता स्थापन होण्यामागे यादवांचे अधिन शासक म्हणून केलेले कार्य, चालुक्यांची दुर्बल राजवट, चालुक्य सत्ताधिशांतील नरेस्पर्धा, कलचूरींची अल्प राजवट, भिल्लम-V ची धडाडी, शौर्य, मुस्तद्दीपणा हे कारणे
B. भिल्लम-V चे कार्य भिल्लम-V ने इ. स. ११८३ ला कलचूरींचा पराभव केला. इ. स. ११८७ ला आपली राजधानी देवगिरी-दौलताबाद येथे आणली व दक्षिणेचा भः सम्राट म्हणून राज्याभिषेक करुन घेतला. भिल्लम-V यास पेयिय, मयिदेव, जैत्रसिंह आणि लक्खण सारख्या सेनापर्तीनी साह्य दिले. भिल्लमाने चालूक्यांच्या राजधान्या कल्याणी आणि भिः तर्दवाडी यावर विजय मिळविला. भिल्लमाने चालुक्यांवरील विजयानंतर उत्तर भारतावर कस्वारी केली. अंग-वंगचा प्रदेश जिंकला. भिल्लम-V ने उत्तर भारताप्रमाणे द. भारतावर ही कस्वारी केली. दक्षिण भारतात यादवांचे प्रतिस्पर्धी होयसळ होते. वीरबल्लाळ होयसळाने गूः भिल्लम-V च्या स्वारीचा प्रतिकार केला. यादवांनी होयसळांचा गदंग हा प्रदेश ताब्यात च्या घेतला. यादवांच्या सेनेचे नेतृत्व भिल्लम-V चा पुत्र जैत्रपालने केले. जैत्रपाल आणि होयसळात लक्कुंडीचे युध्द झाले. होयसळांनी लक्कुंडीच्या युध्दात यादवांचा पराभव केला.
C. जैत्रपाल - इ.स. १९९१-१२१०ः लक्कुंडीच्या युध्दात जैत्रपालाचा पराभव वीरबल्लाळ होयसळाने केला होता. बेल्लारीच्या परिसरात यादवांची सत्ता प्रास्थापित झालेली होती. कर्नाळ-तुंगभद्रा-कृष्णा नदीच्या परिसरात होयसळाप्रमाणेच यादवांचे प्रतिस्पर्धी वारंगळचे काकतीय होते. काकतीयांचा राजा रुद्र ह्यांच्याविरूध्द जैत्रपालने मोहीम काढली. रुद्र, रुद्राचा पुत्र महादेव यांच्याशी जैत्रपालचा संघर्ष झाला. महादेव काकतीयाचा संघर्षात मृत्यू होवून महादेवाचा मुलगा गणपती ह्याला जैत्रपालाने कैद केले. काकतीयांच्या गादीवर जैत्रपालाने कांही काळानंतर गणपतीला कैद बसवले. जैत्रपालाचा महाप्रधान पारिसशेट्टी हा होता.
जैत्रपालाने केवळ युध्द विजय मिळविले नाहीत तर अनेक विद्वजनांना आश्रय दिला. जैत्रपालाच्या दरबारात प्रसिध्द ज्योतिषाचार्य भास्कराचार्याचा मुलगा लक्ष्मीधर होता. लक्ष्मीधर प्रसिध्द कवी व वेदपारंगत होता. जैत्रपालाला उपदेश देण्यासाठी मुकुंदराजांनी 'विवेकसिंधू' ची रचना केली. विवेकसिंधूत जैत्रपालाने लोकांना भ्रष्ट केले म्हणून ब्रह्मोपदेशाचे वर्णन देण्यात आले आहे.
D. सिंघण- इ. स. १२१०-१२४७ : जैत्रपालानंतर त्याचा पुत्र सिंघण हा सत्तेवर आला. यादवांच्या साम्राज्यातील प्रदेश होयसळांनी जिंकला होता. कृष्णा आणि मलप्रभा नद्या दरम्यानचा प्रदेश सिंघनाने होयसळांकडून परत प्राप्त करुन घेतला. होयसळांच्या प्रदेशातील
होयसळांचे मांडलीक सिंघणने पराभूत केले. बनवासींची राजधानी बल्लीग्राम जिंकली इ. स. १२१३ श्रीरंग पट्टनम्वर विजय मिळविला. इ. स. १२१८ ला कोल्हापूरच्या शिलाहारां राजा भोजचा पराभव सिंघणने केला. कोल्हापूरच्या शिलाहारांचा अस्त इ. स. १२१८ ला F. सिंघण यादवाने केला. कोल्हापूर-कऱ्हाडचा प्रदेश यादवांनी जिंकला. कोल्हापूरचे शिलाहा घराणे समाप्त केले.
उत्तर भारतात माळव्याच्या प्रदेशात सिंघणाने विजय मिळवले. माळव्याच्या प्रदेशातील परमारांची सत्ता, लाट, वाघेलांची सत्ता सिंघणाने पराभूत केली. सिंघणदेवाचा हो सेनापती खोलेश्वर होता. खोलेश्वरानेच हा विजय सिंघणला मिळवून दिला. उत्तर भारतात माळव्याच्या प्रदेशात सेनापती खोलेश्वराने तर दक्षिण भारतात सिंघणचा दुसरा सेनापती बीचनने विजय मिळविला. सिंघणदेवाने उत्तर आणि दक्षिणेला विजय मिळविले. विजय मिळालेले प्रदेश आपल्या अधिकाऱ्याच्या अधिनाच्या हातात ठेवून केंद्रीय पध्दतीने राज्यप केले. कोल्हापूर-कहऱ्हाड-कोकण, रत्नागिरी, धारवाड, बीड, परभणी, वऱ्हाड आणि खानदेश हा प्रदेश देवगिरीच्या साम्राज्यात सिंघणाने मिळवला. ३५-३७ वर्षाच्या काळात G साम्राज्यविस्ताराबरोबर साम्राज्याच्या दृढीकरणावर सिंघन यादवांनी भर दिला.
E. कृष्ण- इ. स. १२४७-६०: सिंघणाचा मुलगा जैतुगी हा शिक्षणानंतर शासक बनला. केल पण राज्यरोहणानंतर अल्प दिवसातच त्याचा मृत्यू झाल्याने जैतुगीचा पुत्र कृष्ण सत्तेवर हो आला. कृष्ण हा कन्हर, कंधर, कन्हार अथवा कंधरराज ह्या नावाने ही ओळखला जातो. ख कृष्ण राजाचा राजसत्ताक गुरु सोमेश्वर देव हा होता व दंड शासक बीसनदेव होता. लक्ष्मीदेव मि कृष्णाचा मंत्री होता. लक्ष्मणदेवाचा मुलगा जल्हण होता. जल्हण जालना येथील राजा य होता. जल्हण नावावरुनच जालना हे नाव पडले असावे. राजा कृष्ण हा पराक्रमी होता. प उत्तर भारतात सत्ता प्रस्थापित व्हावी ह्यासाठी माळवा ताब्यात असला पाहिजे, माळव्याच्या य प्राप्तीने उत्तर भारत ताब्यात येतो व दक्षिण भारताचे रक्षण होते हे धोरण यादव शासक सिंघणाचे होते. ह्याच धोरणाचा पुरस्कार कृष्णाने केला. माळव्याचा शासक परमार जगतुंगचा पराभव केला व माळवा जिंकला. परमारांच्या दुर्बल सत्तेमुळे माळवा यादवांच्या ताब्यात आला. ह्यावेळी उत्तर भारतात सुलतान बल्बन होता. बल्बनने माळव्यावर आक्रमण करुन माळवा ताब्यात घेतला. सिंघणाच्या काळात माळव्याचा असणारा प्रदेशच कृष्णच्या काळात ही कायम राहिला. कृष्णने परमारावरील विजयानंतर कोकण आणि कर्नाटकावर विजय मिळवले व साम्राज्य वाढवले. कृष्णाच्या दरबारात जल्हण हा प्रसिध्द मंत्री होता.जल्हणच्या आश्रयार्थ भानपंडिताने 'सुक्तिमुक्तावली' हा ग्रंथ इ.स. १२५७ ला रचला. शंकराचार्याच्या वेदांतसूत्रभाष्यावर अमलानंदाची 'वेदान्तकल्पतरु' ही टीका आहे. वेदान्तकल्पतरुंवर वाचस्पति मिश्राची टीका यादवांच्याच काळात लिहिली गेली. श्रीकृष्ण आणि महानुभव पंथ संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांची भेट म्हाईमभट्टकृत लिळाचरित्रानुसार लोणार याठिकाणी झाली असे मानले जाते.
F. महादेव-इ.स. १२६०-७१: जैत्रपालाला श्रीकृष्ण आणि महादेव ही दोन मुले होती. श्रीकृष्ण इ.स. १२६० ला मृत्यू पावल्यानंतर इ.स. १२६०-७१ ह्या काळात श्रीकृष्णाचा भाऊ महादेव हा सत्तेवर आला. महादेवाने सत्ता हातात घेतली त्यावेळी काकतीयांच्या गादीवर गणपती होयसळाची मुलगी रुद्रामा, माळव्याच्या गादीवर अरुण वर्मा परमार, होयसळाच्या गादीवर नरसिंह तीसरा होते. होयसळाच्या गादीवर असणारा राजा अल्पवयस्क होता, तर काकतीयांच्या गादीवर रुद्राम्मा सत्तेवर असल्याने महादेवाने आक्रमण केले नाही. उत्तर कोकणच्या सोमेश्वरचा पराभव केला व शिलाहारांचे कोकणातून राजकीय अस्तित्व संपले. इ. स. १२७१ ला महादेवाच्या मृत्यूनंतर महादेवाचा मुलगा आमण हा राजा बनला पण कृष्णचा मुलगा रामचंद्रदेव हा गादीचा वारस ठरल्याने रामचंद्रदेव इ. स. १२७१ ला - राजा बनला.
-G. रामचंद्रदेव-इ.स. १२७१-१३०९: यादव घराण्यातील श्रेष्ठ शासकांत रामचंद्रदेवाचा उल्लेख होतो. रामचंद्रदेव यादवाने इ.स. १२७१ साली सत्ता हस्तगत केल्यानंतर राज्याभिषेक केला. सत्ता हातात घेतल्यानंतर यादवांच्या सत्तेच्या उत्तरेला माळवा, दक्षिणेला व पूर्वेला - होयसळ व काकतीयांवर स्वारी केली. माळव्याचा शासक अरुण, काकतीयांची राणी - रुद्राम्मा, होयसळांचा राजा नरसिंह-III चा पराभव केला. होयसळांवर प्रारंभीक विजय = मिळवले पण १२७६ इ. स. च्या होयसळ यादवांच्या बेळवाडी ता. हसनाबादच्या युध्दात यादवांच्या सेनापतीचा व सैन्याचा पराभव झाला. इ. स. १२७६-I, इ.स. १२८८-V अशा - पाच स्वाऱ्या केल्या. इ. स. १२९४ ला यादवांच्या सत्तेवर अल्लाउद्दीनची स्वारी झाल्याने - यादवांचे प्रतिस्पर्धी होयसळ ही यादवांवर इ.स. १३०५ ला चालून आले. रामचंद्रदेव - यादवाच्याच दरबारी प्रधानमंत्री हेमाद्री हा होता. रामचंद्रदेव यादवाच्या होयसळावरील ५ - स्वाऱ्यामुळे यादव माळवा आणि माळव्याच्या उत्तरेकडील राजकीय घडामोडीपासून अलिप्त - राहिले. उत्तर भारतातील अल्लाउद्दीनच्या घडामोडी, मनसूबे, स्वाऱ्या व हेतू यापासून - रामचंद्रदेव अनभिज्ञ राहिला. दक्षिण भारतातील हिंदू शासकांच्या संघटनाऐवजी परस्परावर - स्वाऱ्या होत राहिल्याने यादवांवर इ. स. १२९४ ला अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर - स्वारी केली. सल्तनती सैन्य आणि सल्तनतपादशाह त्याची रणनिती, हेतू, अकस्मात - आक्रमण, विशाल फौज, कूटनिती, देवगिरीचा वेढा ह्यामुळे अल्लाउद्दीन यादवांवर विजय मिळवू शकला. अल्लाउद्दीनच्या विजयाची कारणे शोधतांना सैन्याची मानसिकता - अल्लाउद्दीन जाणून होता. ८,००० सैन्याच्या जोरावर परमूलखात विजय मिळवण्यासाठी - अल्लाउद्दीनने युक्तीने विजय मिळविले. देवगिरी सारख्या गिरीदुर्गावर विजय मिळवता येणे शक्य नाही हे अल्लाउद्दीन जाणून होता तरी अल्लाउद्दीनने देवगिरी किल्ला वेढला. किल्ल्या रामचंद्रदेव असतांना किल्ला वेढणे व वेढलेल्या किल्ल्याच्या रक्षणार्थ आलेल्या रामचंद्र यादवांचा मुलगा शंकरदेव व त्याच्या सैन्याचा पराभव करणे हे शक्यप्राय वाटत नाही प अल्लाउद्दीनने मुत्सद्दीपणाने, बादशाह जल्लाउद्दीन खिलजीचे बलाढ्य सैन्य मदतीस आहे, या अफवेमुळे आणि शंकरदेवाचा पाडाव करण्यासाठी अल्लाउद्दीनने देवगिरील वेढा देताना राखीव ठेवलेली फौज ऐनवेळी शंकरदेवाकडून अल्लाउद्दीनचा पराभव हो असताना मदतीला येणे हा योगायोगाचा नव्हे तर नियोजनाचाच एक भाग होता. राखीः फौजेला यादव सैन्याने बादशाहची विशाल राखीव फौज समजून शस्त्र त्यागने अल्लाउद्दीनच्या विजयाचे मुख्य कारण आहे. अल्लाउद्दीनवर किल्ल्यातून रामचंद्रदेवाच होणारा प्रतिकार आणि वेढ्याच्या बाह्य बाजूने शंकरदेवाचा प्रतिकार असतांना अल्लाउद्दीनः मिळविलेला विजय विलक्षण होता. दक्षिण भारतातील देवगिरी हे प्रथम राज्य होते जेई इस्लाम आक्रमणाला बळी पडले. देवगिरीसारखा अजिंक्य किल्ला रामचंद्रदेवाप अल्लाउद्दीनच्या हाती देणे यामागे एक कारण होते. देवगिरीचा किल्ला जरी दुर्गम, अभेद्य अजिंक्य असला तरी देवगिरीवरील अन्नधान्याच्या साठ्याअभावी उपासमार झाल्याने रामचंद्रदेवाने किल्ला सोडला कारण किल्ल्यातील कोठारात अन्नाच्या ऐवजी मीठांच्य पोत्यांचा भरणा होता. त्यामुळे यादव-खिलजी तह घडला. यादवांच्याकडून खिलजील ६०० मण सोने + ७ मण मोती + २ मण रत्न + १,००० मण रुपे + ४,००० गाठी रेशमंत वस्त्र मिळाली. एलिचपूर अथवा अचलपूर (परतवाडा जि. अमरावती) हे स्थान खिलजीला देण्यात आले. दरवर्षी यादवांनी खंडणी देणे मान्य केले. अल्लाउद्दीनने देवगिरीचा विजय च मिळविल्यानंतर दिल्लीकडे जातांना जलालुद्दीन खिलजीची भेट घेतली. जलालुद्दीन क खिलजीचा मृत्यू झाला व अल्लाउद्दीन सुलतान बनला. अल्लाउद्दीनचा श्रेष्ठ सेनापती मलिक काफुरने इ. स. १३०७ ला रामचंद्रदेव यादवावर खंडणी न दिल्याकारणाने आक्रमण केले व रामचंद्र यादवाला कैद बनवले. दिल्ली येथे पाठवण्यात आले. रामचंद्रदेव यादवाच्या मुलीशी अल्लाउद्दीनने आपल्या मुलाचा विवाह लावला. इ. स. १३०९ ला दक्षिणेत मलिक काफूर है स्वारीवर आला.
H. शंकर देव-इ.स. १३०९-१२ : रामचंद्र देव यादवानंतर शंकरदेव इ. स. १३०९ ला सत्तेवर आला. शंकरदेवाने खिलर्जीला खंडणी देण्याचे बंद केल्याने अलाउद्दीन खिलजीने हे मलिक काफुरला दक्षिण स्वारीवर पाठवले. शंकरदेवाचा पराभव झाला. शंकरदेव युध्दात मारला गेला. अल्लाउद्दीननंतर मलिक काफरने अल्पवयस्क मुबारिज नावाच्या अल्लाउद्दीनच्या मूलाला गादीवर बसवले. दरबारात अल्लाउद्दीनच्या मुलाच्या विरोधातील गटात आणि काफरमध्ये संघर्ष प्रारंभ होताच खिलजीच्या दक्षिण भारतातील साम्राज्यातील विरोधकांनीही सत्ता हस्तगत केल्या. रामचंद्रदेव यादवांचा जावाई हरपालदेव सत्तेवर आला म्हणून मुबारिझने स्वतः इ. स. १३१८ ला दक्षिणेवर स्वारी केली. हरपाल देवाचा पराभव केला व दक्षिणेतील यादवांचे राज्य समाप्त झाले. (१३१८ इ. स.)
यादव सत्तेच्या पराभवाची कारणे :
देवगिरीच्या यादवांची सत्ता इ.स. ११७८-१३१८ काळात होती. भिल्लम-V ने सत्ता स्थापन केली व हरपाल देवाच्या हत्येनंतर इ. स. १३१८ ला सत्ता नष्ट झाली. यादवांच्या सत्तेच्या ऱ्हासाची कारणे :
१. रामचंद्रदेव यादवावरील अल्लाउद्दीनची इ. स. १२९४ ची स्वारी: अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिण भारतावर इ.स. १२९४ ला स्वारी केली. माळवा आणि माळव्यातील राजकीय घडामोडीमुळे अल्लाउद्दीन माळवा व तद्नंतर दक्षिणेत उतरला. एलिचपूर येथे पोहचला. एलिचपूर ते औरंगाबाद मार्गक्रमण करुन अल्लाउद्दीनने देवगिरीला वेढा दिला. रामचंद्रदेव यादवाने देवगिरी किल्ल्याचा आश्रय घेतला. देवगिरीचा प्रदेश जिंकला. किल्ला आणि प्रदेश केवळ ८,००० सैन्न्याच्या साह्याने जिंकला. रामचंद्रदेव यादव पराभूत झाला. त्याने खंडणी देणे मान्य केले.
२. अल्लाउद्दीन खिलजीचे तंत्र : अल्लाउद्दीनने दिल्ली ते देवगिरीपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. देवगिरीसारखा भक्कम किल्ला वेढला. देवगिरी सारखा किल्ला जिंकणे शक्य नाही अथवा लढवणे शक्य नाही हे अल्लाउद्दीन जाणत होता. शिवाय किल्ला वेढा चालू असतांना आतून व बाह्यबाजूने होणारा प्रतिकार लक्षात घेता शंकर देवाचा पराभव करण्यासाठी अल्लाउद्दीनने राखीव तुकडी ठेवली. उत्तरेतून सैन्याची कूमक येत आहे असे भासवले ह्या युध्द कौशल्याने यादवांचा पाडाव अल्लाउद्दीनला करता आला.
३. एकाकी यादवांचे राज्य राष्ट्रकूट चालुक्यांच्या अस्तानंतर यादवांच्या सत्तेचा उदय झाला. उत्तर व दक्षिण कोकणातील शिलाहार, वारंगळचे काकतीय, द्वारसमुद्रचे होयसळ, कोकण-गोवा परिसरातील कदंब, उत्तर भागातील माळव्याचे परमार सत्तांशी यादवांशी सत्ता स्पर्धा होती. परस्परांशी सततच्या संघर्षामुळे ह्या सत्तात एकी नव्हती. यादवांचे राज्य ह्या सर्वापेक्षा प्रबळ होते, पण इतरांच्या संघटीत रुपात यादवांचे राज्य निश्चितच लहान होते. यादवांशी शत्रूत्व ह्या दृष्टीने सर्व सत्तांनी अल्लाउद्दीनच्या स्वारी वेळी तटस्थता स्विकारली. यादवांचे राज्य एकाकी राहिल्याने पराभव झाला.
४. होयसंळाशी सततचा संघर्ष : द्वारसमुद्रचे होयसळ ही दक्षिण भारतातील यादवांच्या समकालीन असणारी राजसत्ता होती. यादव आणि होयसळ यांच्यातील पारस्पारिक शत्रूत्वामुळे, सततच्या परस्परावरील आक्रमणामुळे यादवांची सत्ता क्षीण बनली. यादव रामचंद्रदेवाने होयसळावर इ. स. १२७६, १२७६-८४, १२८४, १२८६, १२८८ अशा स्वाऱ्या केल्या. यादवांनी होयसळांशी केलेल्या संघर्षामुळे यादव कमकुवत ठरले. ३. १२९४ ला यादवांवर अल्लाउद्दीनने स्वारी केली त्यावेळी होयसळांनी ना प्रतिहार ना निती स्वीकारली. उलट परत्वे इ. स. १३०५ ला देवगिरीच्या यादवांच्या दुर्बलतेचा फार घेवून आक्रमण केले व प्रदेश जिंकला. यादवांच्या दक्षिणेतील लक्षामुळे यादवांचे भारताकडे आणि राजकीय घडामोडीकडे दुर्लक्ष झाले. माळवा आणि माळव्यात्र उत्तरेकडील राजकीय हालचालींशी यादव अनभिज्ञ राहिले. परिणाम अल्लाउद्दीन माळव एलिचपूर मार्गे दाखल झाला तरी यादवांचे लक्ष होयसळ प्रदेशाकडेच होते.
५. मुस्लिम आक्रमण : दक्षिण भारतावर आक्रमण करणारा प्रथम मुस्लिम शासक म्हणून अल्लाउद्दीनचा उल्लेख केला जातो. यादवांची सत्ता ह्या आक्रमणाला बळी पडण प्रथम सत्ता होती. स्थानिक शत्रू अनेक असतांना दक्षिणेतील एका हिंदू सत्तेचा पराभस्थानिक शासकाकडून न होता, मुस्लिम शासकाकडून आणि तो ही एका परर्की शासकाकडून झाला. एका परकीय सत्ते पूढे रामचंद्रदेव यादव, शंकरदेव, हरपाळदेव यांच निभाव लागला नाही. परकीय सत्तेचा पराभव करण्याइतपत बळ यादवात आढळले नाह यादव युध्दनीतीत मुस्लिम आक्रमकांपेक्षा हिंदू कमी पडले. मुस्लिम आक्रमण आि आक्रमककारी तुलनेत यादवांपेक्षा निश्चितच श्रेष्ठ होते.
६. देवगिरी किल्ला परिस्थिती: भौगोलिक दृष्टया विचार केला तर देवगिरी भारताचे मध्य होय. किल्ला हा प्रबळ, अभेद्य आणि नैसर्गिक दृष्टया सुरक्षीत होता. ६० फूट उंच असणारा किल्ला, किल्ल्याचे तट तासल्याप्रमाणे असतांना ही अल्लाउद्दीनने इ. स १२९४ ला देवगिरीला वेढा दिला. त्यावेळी किल्ला अन्नधान्य आणि पाण्याच्या साठ्या सुरक्षीत आहे. म्हणूनच रामचंद्रदेवाने किल्ल्यातून अल्लाउद्दीनला प्रतिकार केला पर कोठारातील पोती धान्याची नाहीत मीठाची आहेत हे जाणताच व सैनिक उपासमारीने मृत पावताच शरणागती पत्करली व तह केला.
इ. स. ८३५-१३१८ ह्या ४७३ वर्षात यादवांनी राज्य केले. ४७३ वर्षांच्या यादवांच्य राजवटीत २७ शासक झाले. अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा सेनापती मलिक काफ यांच्या स्वाऱ्यामुळे देवगिरीचे साम्राज्य दुर्बल आणि पराभूत झाले. रामदेवरावाचा जावाई हारपाळदेवचा पराभव दिल्लीचा सुलतान मुबारकशाहने खुश्रुखानला दक्षिणेत पाठवून घडवून आणला. खुश्रूखानने हरपाळदेवाचा वध केला. देवगिरीचे साम्राज्य नष्ट झाले. अनेक इतिहासकारांनी यादवांच्या साम्राज्याच्या ऱ्हासाची कारण परंपरा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंच्या मते यादवकाळ हा सुख, समृध्दी आणि संपत्तीचा काळ होता. ऐश्वर्यामुळे विलास निर्माण झाला आणि त्यामुळे यादवांचे राज्य नष्ट झाले.
७. अल्पसंतुष्ठ-अज्ञानी समाज समाजात किंबहुना साम्राज्यात संपन्नता होती पण समाजाची मनोवृत्ती ही अल्पसंतुष्टीची होती. यादवांच्या काळात साहित्य आणि संस्कृती रक्षणासाठी विपुल लिखाण झाले पण बहुतांश समाज हा अज्ञानी होता. यादवांच्या साम्राज्यातील ठराविक वर्गात ज्ञानसंपदा होती. बहुतांश वर्ग हा साहित्यापासून अलिप्त होता. समृध्दी-संपन्नता ह्या घटकापासून ग्रामीण समाज अनभिज्ञ होता.
८. घराण्यांच्या राजवटी: महाराष्ट्रातील प्रथम एक देशीय राज्य सातवाहनांनी स्थापन केले. महाराष्ट्रात त्यापूर्वी मौर्य, शुंग व कण्व यांची सत्ता होती. सातवाहनानंतर राष्ट्रकूट-चालुक्य व त्यानंतर राष्ट्रकूटांची राजवट होती. चालुक्य आणि राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर यादवांची सत्ता निर्माण झाली. महाराष्ट्रात सातवाहन ते यादवकालीन राजवटी ह्या घराणेशाही पध्दती होत्या. यादवसत्ता ही घराणेशाही प्रमाणेच होती. ह्या राजवटीतील अनेक कर्तबगार शासकांनी आपल्या ध्येयवादाच्या जोरावर साम्राज्याची निर्मिती केली, धर्माचा प्रसार केला पण हा ध्येयवाद, पराक्रम हा ठराविक राजापुरताच होता. सर्वसामान्य जनता अथवा वर्ग हा दैनंदिन जीवनातील उदरनिर्वाहाच्या साधनांबद्दल चिंतीत नव्हता. त्यामुळे पराक्रम आणि शौर्य हे ठराविक वर्गापुरतेच राहिल्याने यादवांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाला.
९. धार्मिकतेला अधिक महत्व : यादवांचे साम्राज्य हिंदूधर्मिय होते. राजे हे हिंदू अभिमानी होते. वैदिक धर्म, नाथपंथ, महानुभावपंथ, दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय इ. संप्रदाय उदयाला आले. यादवांचे राजे आणि त्यांचे प्रधान हे पांडित्यवादी होते. समाजातील व्यक्ती आणि राजपुरुष हा धार्मिक कार्यात राहिला. हेमाद्रीपंथाने वर्षाकाठी २,५०० वृत्तवैकल्प सांगितली. अशा वृत्तवैकल्पात व्यक्ति व्यस्त राहिला. पांडित्यपणामुळे क्षात्रवृत्तीचा ऱ्हास झाला. आर्थिक मनोवृत्तीमुळे राज्यरक्षणाकडे दूर्लक्ष झाले.
१०. मुस्लिम धर्मियांची आक्रमकता : इस्लामधर्म शासक अल्लाउद्दीन आणि त्याच्या नंतरच्या शासकांनी व सेनापतींनी देवगिरीवर आक्रमण केले. राजकीय आक्रमणाबरोबर दक्षिणेत धर्माचा प्रसारही इस्लाम धर्मियांनी केला. इस्लाम धर्माच्या कट्टरतेबरोबर दक्षिणेत १३ व १४ व्या शतकात दक्षिणेत सुफींनी प्रसार केला. यादवकालीन समाज इस्लाम आणि सुफींच्या संघटीत कार्यामुळे दुभंगला गेला. समाज या संघटीत कार्याच्या तुलनेत गाफील राहिला.
११. तत्कालीन कारणः रामदेवराव यादव : रामदेवराव यादवाचे साम्राज्य क्षेत्र मोठे होते. साम्राज्याच्या रक्षणासाठी विशाल सेनाही होती. विशाल सेना असल्याकारणाने सैन्यात शिस्त राहिली नाही. उत्कृष्ठ साम्राज्य, सेना, राजा असतांनाही आणि विशेषतः देवगिरीचा किल्ला अभेद्य असतानाही साम्राज्याचा ऱ्हास रामदेवराय याच्यामुळे झाला. रामदेवरायाचे प्रारंभीचे कार्य श्रेष्ठ होते. रामदेवरावाने उत्तरकाळात सत्ता आणि अधिकार प्रधानाच्या हातात दिले. शासक राज्याधिकार इतरांच्या हातात देवून पांडित्य वृत्तीकडे झुकला. शासकाकडे असणारी मुत्सद्दी त्यांच्यात राहिली नाही. त्यामुळे अल्लाउद्दीनपुढे शरणागती पत्करली. एवढेच नाहीतर नंतरच्या स्वाऱ्यात शासकांनी आणि उत्तराधिकाऱ्यांनी ही आक्रमकांना सहकार्य दिले, नजराने दिले एवढेच नाही तर यादवांच्याच शाखेपैकी संबंधीत असणाऱ्या होयसळांच्या साम्राज्याचे मार्ग दाखविले. रामदेवरावाच्या काळात प्रांताच्या अधिकाऱ्यांनी केंद्रसत्तेपासून अलिप्तता स्विकारली. केंद्र-प्रांत यांच्यात प्रांताधिकारी है साम्राज्याचे आधारस्तंभ होते तेच कोसळल्याने साम्राज्य -हास पावले.
रामचंद्र यादवांचा तळेगाव ढमढेरे शिलालेख
Discover Maharashtra
5–6 minutes
रामचंद्र यादवांचा तळेगाव ढमढेरे शिलालेख –
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे नावाचे एक ऐतिहासिक गाव आहे. या गावात काही वर्षांपूर्वी बांधकाम करत असताना एक तळेगाव ढमढेरे शिलालेख असलेला गधेगाळ सापडला. वरच्या भागात चंद्र, सूर्य प्रतिमा मधल्या भागात शिलालेख आणि शेवटी गाढवाचा स्त्रीशी संकर असे याचे स्वरूप आहे.या संदर्भातील बातमी दैनिक सकाळ आणि दैनिक दिव्य मराठी व इतर प्रमुख मराठी या वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. बातमीतील माहिती नुसार हा शिलालेख मंदिर निर्माण आणि देखभाली संदर्भातील आहे. याचे वाचन केले असता तो स्थानिक कराशी संबंधित असल्याचे लक्षात आले. या शिलालेखाचे मी केलेले वाचन असे-
१.स्वस्ति श्री शके१२३५ प्रमा २.दी संवकर स्रवण सुधा ३.१५ भौमे आद्येह श्रीमत प्रौ ४.ढ प्रताप चक्रवर्ती श्री रा ५.मचंद्रदेवराज्ये वीजयो ६.दई माहामंडलेस्वर श्रीसा ७.मरस दुधवडी देस परनेर ८.संबंध तलेगौ दाई नायक द्यापरे ९.ब्राह्मणासी उडेआचाकरूसा १०.डिला हा धर्मु प्रतीपाली तेआसि ११.भले होआ नमनि धरी ते हा १२.ची ऐ मा ऐ गाढो मंगल माहे श्री
शिलालेखाची पूर्व प्रसिद्धी – स्थानिक मराठी वृत्तपत्रे
शिलालेखाची भाषा व लिपी – शिलालेख देवनागरी लिपीत असून मराठी, कन्नड आणि संस्कृत भाषेतील शब्द यात आलेले आहेत. ण या अक्षराचे वळण मोठ्या लिपीतील इंग्रजी H अक्षराला मधोमध विभागल्या नंतर दिसणाऱ्या आकारा सारखे आहे
शिलालेखाचा काळ – शिलालेखाची मिती शके १२३५, प्रमादी संवत्सर, श्रावण शुद्ध १५ , भौम अशी दिली आहे. पिले जंत्रीनुसार ही तारीख इंग्रजी ०७ ऑगस्ट १३१३, वार मंगळवार अशी येते.
शिलालेखाचा अर्थ – शालिवाहन शकाच्या १२३५व्या वर्षी प्रमादी संवत्सरात श्रावण शुद्ध १५ म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीमत प्रौढ प्रताप चक्रवर्ती श्री रामचंद्र देवाचा विजय असो. दुधवडी देशाचा महामंडलेश्वर सामरस याचा सेवक दाईनायक याने आज्ञा केली की दुधवडी देशातील संबंध पारनेर सह तळेगावातील जनतेने ब्राह्मणास साडी साठी कर द्यावा. ही आज्ञा पाळणाऱ्याचे चांगले होईल जो मानणार नाही त्याचा आईला गाढव.
चर्चा – शिलालेखा संदर्भात जी बातमी प्रकाशित झाली होती त्यानुसार – शिलालेखाचा काळ शके १२३५ प्रभादीनाम संवत्सरे म्हणजेच इ. स. १३१३ असा आहे. लेखात रामदेवराय यादवाचा ‘प्रताप चक्रवर्ती रामचंद्रदेव’ असा उल्लेख आहे. रामचंद्र यादवांचा महामंडलेश्वर म्हणजे स्थानिक प्रांत अधिकारी सामळ सदू तसेच स्थानिक पारनेर संघाचा कारभारी गोदाजी नाईकाचा उल्लेख आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर रक्षणासाठी लोकाज्ञा स्वरूपात हा शिलालेख कोरलेला आहे. इतिहासातील नोंदींवरून यादवांचा पराभव १२९४ मध्ये झाला असला तरी १३१३ पर्यंत पुणे व परिसरात यादवांचीच सत्ता होती, हे स्पष्ट होते. तसेच शासन व्यवस्थेतील अधिकारांची उतरंड व नावेही समजतात.
सामरस , दाई नायक – शिलालेखात उल्लेखित व्यक्ती महामंडलेश्वर सामळ सदू असे नसून सामरस असे आहे. यात आणखी एका व्यक्तीचे नाव येते तो म्हणजे दाई नायक .याचे चुकीचे वाचन गोदाई नायक असे दिले आहे. दाई हा स्त्री वाचक शब्द असून दाई नायक ही एक स्त्री असू शकते. लीळा चरित्रात माहादाइसा असा उल्लेख येतो. याची फोड महा दाई सा अशी करता येते. यादवांच्या इतर लेखातही दंड नायक, देसाई नायक अशा अधिकाऱ्याचा उल्लेख येतो.
दुधवडी देश – रामचंद्र यादवांचा काळ इसवी सन १३११ पर्यंत मानला जातो. या शिलालेखा नुसार पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे आणि परिसरावर १३१३ पर्यंत त्यांचीच सत्ता असल्याचे दिसते. यात दुधवडी देशाचा उल्लेख येतो. या नावाचे गाव मात्र सध्या आढळत नाही. यादवांच्या लेखात माणदेश, केज देश, अंबे देश अशी नावे आता पर्यंत आलेली आहेत. सांगली जिल्ह्यात दुधोंडी नावाचे गाव आहे. परंतु प्रादेशिक सलगता विचारात घेतली तर दुधवडी हे दुधोंडी संभवत नाही. सातारा जिल्ह्यातील प्रदेशाला माणदेश असे नाव असून सेऊण देश आणि माण देश यांच्या दरम्यान दुधवडी देश येत असावा अशी शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दुधोडी नावाचे गाव आहे. या गावच्या परिसरात कोळवडी, थेरवडी , बेनवडी इ. नावाची गावे आहेत. दुधोडी हेच दुधवडी देशाचे मुख्यालय असावे. दुधोडी हे दुधवडीचे अपभ्रष्ट रूप आहे. भीमा नदीच्या उत्तरेकडील अगदी पारनेर पर्यंतचा बराच मोठा प्रदेश दुधवडी देशात समाविष्ट असावा . देशाचा विस्तार हा ३० ते ४० चौरस मैल असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. दुधवडी देशाचा विस्तार पाहता हे मत योग्य वाटत नाही. देश हा कमीत कमी ३००० ते ४००० चौरस मैल एवढा विस्तीर्ण विभाग असावा.
संघंध की संबंध? लेखाच्या आठव्या ओळीत संबंध हा शब्द येतो. यातील ब या अक्षराचे वळण हे आधुनिक घ सारखे असल्याने ते चुकून संघंध असे वाचले गेले असावे. यादवकाळात संघ हा प्रादेशिक विभाग असल्याचे आढळत नाही. यादव कृष्ण देवाच्या ( शके ११८०) कान्हेगाव लेखात ‘ खंधार देस संमंध ‘ असा उल्लेख येतो. येथेही हा संबंध म्हणजे संपूर्ण असाच अर्थ निघतो.
ब्राह्मणासी उडेआचा करू साडिला- शक ११९३ मध्ये आमण देवास पदच्युत करून रामचंद्र यादव सत्तेवर आला. त्यामुळे लोकमत मिळवण्यासाठी त्याने ब्राह्मणांना अग्रहारे देण्यास सुरुवात केली असावी. लीळा चरित्रात (लीळा क्रमांक ६) नवी अघ्ररें: ब्राह्मणासी नवीया वृत्ती दिधलिया : मा: चणेचि पिकति असा उल्लेख येतो. ( देवगिरीचे यादव, ब्रह्मानंद देशपांडे, पृष्ठ १५०) हीच पद्धत पुढे बराच काळ चालू असल्याचे दिसते. रामचंद्र यादवाचा महामंडलेश्वर सामरस याचा सेवक दाई नायक याने पारनेर सह तळे गावातील जनतेला आज्ञा केली की जनतेने ब्राह्मणांना उडे म्हणजेच साडी साठी कर द्यावा. यासाठी उडे आचा करू असा शब्दप्रयोग केला आहे. कन्नड भाषेत उडिगे म्हणजे कमरे भोवती नेसावायचे वस्त्र असा अर्थ होतो.( कन्नड – मराठी शब्दकोश, पृष्ठ ७३) याचे मराठी बोली भाषेतील रूप उडे असे असावे. म्हणजेच ब्राह्मणांना वस्त्रासाठी कर द्यावा असे यात म्हटले आहे. यात पुढे साडीला असाही उल्लेख आहे.
® सतीश भि. सोनवणे टीप – हा लेख इतरत्र कोठे प्रसिद्ध असल्यास कळवावे
रामचंद्रदेव यादव याचा पूर येथील 'गद्धेगाळ'
महाराष्ट्रामध्ये आपल्याला जागोजागी इतिहासाच्या पाउलखुणा या विखुरलेल्या आढळून येतात. यामध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष, वीरगळ, प्राचीन देवी देवतांच्या मूर्ती, तसेच गद्धेगाळ असे विविध काळातील अवशेष हे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये पाहायला मिळतात. असाच एक महत्वाचा गद्धेगाळ हा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या 'पूर' गावामध्ये नारायणेश्वर मंदिराच्या इथे होता. सध्या हे प्राचीन काळातील 'पूर' गाव नारायणपूर म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. सध्या हे 'नारायणपूर' गाव एकमुखी दत्ताचे फार प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनलेले आहे. किमान ८०० वर्षे जुने असलेले 'पूर' गावातील 'नारायणेश्वराचे' यादवकालीन मंदिर अत्यंत सुरेख आहे. भूमिज स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे. याच यादवकाळातील 'नारायणेश्वर' मंदिराच्या बाहेर एक गद्धेगाळ होता. नंतरच्या काळामध्ये हा गद्धेगाळ 'भारत इतिहास संशोधक मंडळात' आणला आणि त्याचे जतन केले गेले तसेच त्याच्यावरील शिलालेखाचे वाचन हे थोर संशोधक 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांनी गद्धेगाळाचे वाचन केले आहे. सध्या रामचंद्रदेव यादव याचा 'पूर' येथील 'गद्धेगाळ' हा 'भारत इतिहास संशोधक मंडळ येथे व्यवस्थित रीतीने जतन करून ठेवण्यात आलेला आहे.
रामचंद्रदेव यादव याचा पूर येथील 'गद्धेगाळ'
ज्या दगडावर हा शिलालेख कोरलेला आहे त्याची उंची हि २ १/२ (अडीच) फुट असून जाडी हि ५ इंच आहे आणि रुंदी हि वरून खालील बाजूस ९, १२ आणि ९ अशी आहे. लेखाच्या वरच्या डाव्या बाजूस चंद्र आणि उजव्या बाजूस सूर्य काढलेले आपल्याला बघायला मिळतात. तसेच या शिलालेखाच्या पहिल्या नऊ ओळी सलग आहेत असे आपल्याला पाहायला मिळते. तसेच शेवटच्या दोन ओळींचे गद्धेगाळाच्या गाढवाच्या कानांंनी दोन भाग झालेले आहेत. मुळातच दगड खडबडीत असल्यामुळे गद्धेगाळावरील अक्षरे उठून दिसते नाहीत. तसेच बरीच वर्षे गद्धेगाळ हा उन वारा पाउस यामध्ये पडून होता त्यामुळे ती अक्षरे फिकट झालेली आहेत. गद्धेगाळावरील लेखाचे स्वरूप हे १२ व्या १३ व्या शतकातील यादवांच्या इतर देवनागरी लेखांंच्याप्रमाणेच आहे. पहिल्या ४ ते ५ ओळीतील अक्षरांचे वळण जितके रेखीव आहे तितके बाकीच्या ओळींमध्ये आपल्याला ते पाहायला मिळत नाही. या गद्धेगाळाच्या शिलालेखाची भाषा हि मराठी आहे. यामध्ये लेखाचा काळ हा शक् १२०७ पार्थिव संवत्सर अश्विनादौ असा दिलेला आहे. या शिलालेखामध्ये वार दिला नसल्याने मिती समजत नाही.
गद्धेगाळावर डाव्या बाजूस चंद्र आणि उजव्या बाजूस सूर्य काढलेले आपल्याला बघायला मिळतात.
उन वारा पाउस ह्या सगळ्याचा मारा बसल्यामुळे लेखाची अक्षरे पुसट झालेली आहेत. जी अक्षरे हि 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांनी वाचली त्यामध्ये श्रीमत्प्रौढप्रतापचक्रवर्ती रामचंद्र देव, दफ्तरखान्यावरील मुख्य हेमाडीपंडित, सेनापति किंवा न्यायाधीश बोईदेव (?) स्रीपत पभुण (?) नायक, आणि रामचंद्रदेव यांचे उल्लेख दिसून येतात. 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुधा रामचंद्र देवाला काहीतरी इनाम करून दिल्याबद्दलचे हे दानपत्र असावे. या शिलालेखाचा ठसा घेता येत नसल्यामुळे प्रत्यक्ष पाहून जेवढी अक्षरे 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांना वाचता आले तसे त्यांनी त्याचे वाचन दिलेले आहे ते पुढीलप्रमाणे:- १) स्वस्ति स्री सकू १२०७ २) वर्षे प(पा) र्थिव सवछरे ३) आस्विन (ना) दौ अद्येह स्री ४) मप्रौ (त्प्रौ) ढप्रतापचक्रव ५) र्ती स्रीरामच (चं) द्रदेवविजय ६) राज्योदै तदपादपदुमोपजिवि स ७) कळकर्णा (रणा) धिप...हेमाडि पंडि ८) तो | त बोंंइ -- दंडनायक | स्रिपत प (प्र) मु (भू ?) ९) णेंं नायक | रामचंद्रदेवोंं नाडिती जीवि... १०) ळक कुळ... ... ११) ... ...सोडि ... ...
शिलालेख आणि गाढव आणि स्त्रीचा संकर असलेले शिल्प.
रामचंद्रदेव यादव याचा 'पूर' येथील 'गद्धेगाळ' हा नक्कीच महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचा ठरतो. ह्या गद्धेगाळावरील शिलालेख तुम्हाला पहायचा असेल तर भारत इतिहास संशोधक मंडळात हा गद्धेगाळ अत्यंत व्यवस्थित रीतीने जतन केलेला आहे. शिलालेखाचा ठसा फोटोद्वारे कॉम्प्युटरवर बनवायचा केलेला हा प्रयत्न यामध्ये शिलालेखातील काही अक्षरे दिसून येत आहेत.
No comments:
Post a Comment