Saturday, September 26, 2026

शिलाहार घराणे

 १: शिलाहार राजवंश

(या प्रकरणाचे मूळ इंग्रजी लेखन डॉ. एस.जे. मंगलम् (प्राध्यापक, पुरातत्व विभाग, डेक्कन महाविद्यालय, पुणे) यांनी केलेले असून त्याचा मराठी अनुवाद डॉ. हरिहर ठोसर (निवृत्ता प्रपाठक, इतिहास विभाग प्रमुख, एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई) यांनी केला आहे.) शिलाहार या वंशनामाच्या व्युत्पत्तीविषयी अशी आख्यायिका आहे की, गरुड रोज एक सर्प भक्षण करीत असे. त्यासाठी रोज एक नाग शिळेवर पडून गरुडाचे भक्ष्य म्हणजे आहार बनत असे. एके दिवशी हे भक्ष्य होण्यासाठी शंखचूड नागाची पाळी आली असताना विद्याधर राजकुमार जिमुतवाहन याने आपण स्वतः गरुडाचे भक्ष्य होऊन नागाचे प्राण वाचविले. जिमुतवाहन शिळेवरील गरुडाचा आहार बनला. त्यावरून त्याच्या वंशास ठशिलाहारठ हे नाव प्राप्त झाले.' या आख्यायिकेत ऐतिहासिकता असण्याची शक्यता फारच कमी. कारण या काळातील बहुतेक राजवंश आपली उत्पत्ती देवी किंवा पौराणिक पुरुषापासून झाल्याचे दावे करतात.
          महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या संलग्न प्रदेशात शिलाहार वंशाच्या ज्या अनेक शाखा होत्या त्यापैकी पश्चिम किनारपट्टीवर शासन करणाऱ्या तीन प्रमुख शाखा होत्या. पहिली शाखा उत्तर कोकणातील शिलाहारांची असून त्यांच्या राज्यात मुंबई, ठाणे, आणि रायगड जिल्ह्यांतील प्रदेशाचा समावेश होता. दुसरी शाखा दक्षिण कोकणच्या शिलाहारांची असून त्यांच्या राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याचा समावेश होता. तिसरी शास्वा कोल्हापूरच्या शिलाहारांची असून त्यांच्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा व कर्नाटकातील बेळगाव जिल्हयांचा समावेश होता. एकूण महाराष्ट्राच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टी व त्यालगतचा भाग हेच त्यांचे कार्यक्षेत्र राहिले.
           शिलाहार वंशाच्या या तिन्ही शास्वा जिमुतवाहनास आपला मूळ पुरुष मानतात व उत्तर कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार तगरपूर हे आपले मूलस्थान मानतात. तगर हे प्राचीन काळातील ऐतिहासिक महत्त्वाचे नगर असून टॉलेमी आणि पेरिप्लस या ग्रीक ग्रंथात त्याचा उल्लेख आला आहे. तगर म्हणजे सध्याचे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्हयातील तेर होय. ज्याअर्थी, शिलाहार राजे ठतगरपुरवराधीश्वरठ हे बिरुद लावतात त्याअर्थी, मूळचे ते तेरचे शासक होते हे स्पष्ट होते. या वंशातील राजांची नावे कानडी पद्धतीची असल्यावरून तसेच त्यांची बिरुदे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नावातील पदान्त कानडी वळणाने असल्यावरून शिलाहार हे मूळचे कन्नड भाषी असल्याचे इतिहासकार मानतात. उत्तर कोकणवर शिलाहारांची सत्ता प्रस्थापित होण्याच्या पूर्वी बदामीचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने हा प्रदेश
जिंकलेला असल्यामुळे त्यावर कन्नड भाषी असलेल्या चालुक्यांचे शासन होते." त्यामुळे कोकण हा मूळचा मराठी भाषी प्रदेश असून ही शिलाहारांच्या राजशासनात कानडी भाषेतील नावे आणि संज्ञा आढळतात." दक्षिण कोकणच्या शिलाहारांचे कोरीव लेख मात्र संस्कृतमध्ये असून त्यात कानडी शब्दांचे मिश्रण फार कमी आहे. याउलट कोल्हापूर परिसर कर्नाटकाशी लागून असल्यामुळे या शाखेच्या कोरीव लेखात कानडी शब्दांचा व भाषेचा मुक्तपणे वापर झालेला आहे. महाराष्ट्रात राज्य केलेल्या शिलाहारांच्या तीन प्रमुख शास्वांचा इतिहास पुढीलप्रमाणे होय.

उत्तर कोकाणचे शिलाहार

उत्तर कोकणच्या शिलाहारांना राष्ट्रकू टांकडून त्या प्रदेशाचे मांडलिक म्हणून सत्ता प्राप्त झाली. राष्ट्र‌कुटांच्या उद्यापूर्वी बदामीच्या चालुक्यांचे सामंत येथील सत्ताधीश होते. दुसया पुलकेशीने कोकणच्या मौर्याच्या सत्तेचा शेवट केल्यानंतर काही काळ या प्रदेशाचे प्रशासन आपल्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली ठेवले होते. त्यावेळी बहुधा नाशिक हे चालुक्यांच्या प्रांतिक प्रशासकाने मुख्यालय होते. दुसया पुलकेशीचा उत्तराधिकारी पहिला विक्रमादित्य याने आपला भाऊ धराश्रय जयसिंह याची नाशिक विभागाचा प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. जयसिंहाने लाट किंवा दक्षिण गुजरात जिंकून तेथील प्रशासक म्हणून आपला ज्येष्ठपुत्र श्रयाश्रय शिलादित्य याची नियुक्ती केली व उत्तर कोकणचे प्रशासन धाकटा पुत्र मंगलरस याच्याकडे सोपविले. त्याचे इ.स. ६९१, ७३१ आणि ७३२ मधील तीन ताम्रपट प्राप्त झाले आहेत. मंगलरसाच्या कारकिर्दीच्या अखेरीस राष्ट्र‌कूट दन्तिदुर्गाने उत्तर कोकण जिंकून तेथील प्रशासक म्हणून अनिरुद्ध याची नियुक्ती केली.
       पहिला कपर्दिन : यानंतरचा कोकणचा शासक शिलाहार पहिला कपर्दिन हा असून तो राष्ट्रकूट तिसरा गोविंद (इ.स. ७९३ ते ८१४) याचा समकालीन होता. कपर्दिन याने तिसऱ्या गोविंदासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली व त्याचे बक्षीस म्हणून गोविंदाने कपर्दिनला उत्तर कोकणचा शासक बनविले असे मानले जाते.' उत्तर कोकणात मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश असून कोकण-१४०० हे त्याचे पारंपरिक नाव होते.
       कपर्दिनच्या नंतर पुल्लशक्ती हा राज्यावर आला. कान्हेरी येथील त्याच्या शिलालेखातील कालोल्लेख अस्पष्ट आहे. तथापि, कीलहॉर्न यांनी शके ७६५ असे त्याचे वाचन केले आहे व म.म..वा.वि. मिराशी यांनी देखील ते बरोबर असल्याचे म्हटले आहे." या शिलालेखात पुल्लशक्तीने आपला उल्लेख ठमहासामन्तठ असा केला असून राष्ट्रकूट पहिला अमोघवर्ष याच्याकडून आपल्याला कोकणचे राज्य प्राप्त झाल्याचे त्याने विधान केले आहे." पुल्लशक्ती नंतर दुसरा उर्फ लघु कपर्दिन हा कोकणचा शासक बनला. अरिकेसरीच्या ठाणे ताम्रपटानुसार दुसरा कपर्दिन राज्यावर आला तेव्हा अल्पवयीन होता, आणि तरीही त्याचा शत्रूवर वचक होता, कान्हेरी येथील लेण्यात त्याच्या काळातील इ. स. ८५४ आणि ८७८ मधील दोन शिलालेख प्राप्त झाले असून त्याद्वारे त्याने कान्हेरी येथील बौद्ध विहारास कायम स्वरुपाची देणगी दिल्याची नोंद केली आहे."
      दुसऱ्या कपर्दिनच्या नंतर त्याचा पुत्र वप्पुक्कन हा राज्यावर आला. त्याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजा दुसरा कृष्ण याने उत्तर कोकणातील संयान मंडल (हल्लीच्या दक्षिण गुजरातमधील बलसाड जिल्हयातील संजानचा परिसर) या भागावर अरब प्रमुख मधुमती उर्फ महम्मद याची सामंत म्हणून नियुक्ती केली. महम्मद त्याचा मुलगा शहरियार आणि नातू सुबक्त हे इ.स. ९७४ मध्ये झालेल्या राष्ट्र‌कूट सत्तेच्या अस्खेरपर्यंत संजान मंडळाचे प्रशासक होते. राष्ट्रकूटांच्या पतनानंतर शिलाहार अपराजित याने या अरब प्रशासकाना पराभूत करून संजान मंडल आपल्या राज्यात समाविष्ट केले."
       शिलाहार झंझ हा वप्पुकनाचा उत्तराधिकारी होता. तो शैव पंथाचा अनुयायी असून त्याने शिवाची बारा मंदिरे बांधली होती, परंतु सध्या त्यातील एकही अस्तित्वात नाही." झंझानंतर त्याचा धाकटा भाऊ गोग्गिराज राज्यावर आला. त्यानंतर गोग्गिराजाचा मुलगा वज्जड याची अल्पकालीन कारकीर्द झाली. वज्जडानंतर त्याचा भाऊ छ‌द्वैदेव हा उत्तर कोकणचा शासक बनला. त्याच्या कारकिर्दीची माहिती त्याच्या एकमेव प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातील उपलब्ध ताम्रपटावरून मिळते." त्याचे नाव शिलाहारांच्या राजवंशावळीत समाविष्ट नसल्यामुळे त्याने राज्य बळकाविले असावे असे इतिहासकार मानतात.
       अपराजित: छ‌द्वैदेवानंतर त्याचा पुतण्या व वज्जडाचा पुत्र अपराजित हा शिलाहार नृपती बनला. त्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील राष्ट्रकूट राजवट संपुष्टात येऊन दुसरा तैल चालुक्य हा सत्ताधीश झाला. परंतु अपराजिताने आपल्या राजशासनात कल्याणच्या चालुक्यांऐवजी राष्ट्र‌कुटांना आपले स्वामी मानून त्यांची वंशावळ नमूद केली. यावरून चालुक्यांचे स्वामित्व त्याने मान्य केले नव्हते ते स्पष्ट होते. आपण स्वतंत्र आणि सार्वभौम शासक आहोत हे दास्वविण्यासाठी त्याने पश्चिम समुद्राधिपती आणि मांडलिक त्रिनेत्र अशी बिरुदे धारण केली. तसेच त्याने अनेक दिग्विजय प्राप्त केले. संजानव्या अस्व शासकास पराभूत करून तो प्रदेश जिंकल्याचा वर उल्लेख आलेला आहेच. त्याशिवाय त्याने देशावरील पुणे, दक्षिणेकडील चिपळूण, संगमेश्वर आणि गोवा हे प्रदेश जिंकून संपूर्ण कोकणची किनारपट्टी आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्याच्या राज्याच्या सीमा उत्तरेस दक्षिण गुजरात, दक्षिणेस गोवा, पश्चिमेस अस्वीसमुद्र तर पूर्वेस याद्व भिल्लमाच्या राज्याशी म्हणजे स्वानदेशशी भिडल्या होत्या.
       अपराजिताने केलेला आपल्या प्रदेशाचा विस्तार, त्याने धारण केलेले स्वतंत्र राज्याची बिरुदे, परमारांशी त्याने जोडलेले मित्रत्व आणि चालुक्यांच्या सार्वभौमत्वास न मानण्याची त्याची वृत्ती या बाबी लक्षात घेऊन त्याला धडा शिकविण्यासाठी दुसऱ्या तैलाचा युवराज सत्याश्रय याने कोकणवर स्वारी केली. चालुक्य सैन्याचा प्रचंड सागर एका बाजूस आणि दुसऱ्या बाजूस असलेल्या पश्चिम सागराच्या कात्रीत अडकल्यामुळे अपराजिताने सत्याश्रयाशी शरणागती पत्करली व १ हत्तींची खंडणी देऊन त्याने चालुक्यांचे सार्वभौमत्व स्वीकारले. परंतु सत्याश्रयाची पाठ वळताच त्याने आपला पवित्रा बदलला आणि इ.स. १०१० मधील आपल्या मृत्यूपर्यंत त्याने चालुक्यांना आव्हान देणे चालूच ठेवले. अपराजितानंतर त्याचा पुत्र दुसरा वज्जड हा राज्यावर आला. त्याच्या राजकीय जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. बहुधा त्याच्या कन्येचा विवाह हंगल येथील कदंब प्रमुख छट्टदेव ह्याच्याशी झाला होता."
      दुसया वज्जडानंतर त्याचा धाकटा भाऊ अरिकेसरी उर्फ पहिला केशिदेव हा कोकणचा शासक बनला. युवराज असताना त्याने परमार सिंधुराजा बरोबर त्याच्या छत्तीसगड आणि सौराष्ट्रातील मोहिमात भाग घेतला होता." परंतु त्याच्या कारकिर्दीत परमार भोजाने कोकणवर स्वारी केली आणि काही काळपर्यंत त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु अरिकेसरीचा पुतण्या छित्ताराज याने परमारांच्या वर्चस्वातून लौकरच आपला प्रदेश मुक्त केला. मध्यन्तरी इ.स. १०२४ मध्ये चालुक्य जयसिंहाने दक्षिण कोकणावर स्वारी करून तेथील शिलाहारांना आपले स्वामित्व स्वीकारण्यास भाग पाडले." तेथून उत्तर कोकणात येण्याचा त्याचा विचार होता पण तो फलद्रुप झाला नाही. इ.स. १०२६ मधील आपल्या कोरीव लेखात छित्ताराजाने चालुक्यांचा उल्लेख केलेला नाही.
      अरिकेसरीनंतर त्याचा पुतण्या छितराज हा इ.स. १०१६ च्या सुमारास राज्यावर आला. छित्ताराजाचा पितामह अपराजित याने आपल्या प्रदेशावर केलेल्या आक्रमणाचा बदला घेण्यासाठी गोव्याचा कदंब षष्टदेव याने छित्ताराजाच्या कारकिर्दीत कोकणवर स्वारी केली. त्याने आपल्या स्वारीत कोकणसहित अनेक प्रदेश जिंकले व तेथील शासकाकडून खंडण्या वसूल केल्या. छित्तारानासही कदंबांचे श्रेष्ठत्व मान्य करून आपला प्रदेश ताब्यात ठेवणे शक्य झाले. त्याचवेळी कोल्हापूरचा शिलाहार राजा गौक याने दक्षिण कोकणवर स्वारी करून तो प्रदेश जिंकला.  छित्तराज हा विद्या आणि कलांचा भोवत्ता आणि आश्रयदाता होता. त्याने कल्याणजवळील अंबरनाथ येथील शिवमंदिराच्या बांधकामास प्रारंभ केला. उदद्यसुंदरीकथा या काव्याचा कर्ता कवि सोढल याला छित्ताराजाने आश्रय दिला व ठकविप्रदीपठ ही उपाधी बहाल करून त्याचा गौरव केला.
       नागार्जुन हा छित्ताराजाचा धाकटा भाऊ त्याचा उत्तराधिकारी बनला. चालुक्यांचे सार्वभौमत्व न स्वीकारण्याचे आपल्या पूर्वजांचे धोरण त्याने पुढे चालू ठेवले व स्वतः स गौरविण्यासाठी नरेंद्र नागार्जुन आणि कोड-सहस्त्रार्जुन ही बिरुदे धारण केली. त्याने इ.स. १०३७ ते १०४७ या काळात राज्य केले. वर वर्णन केल्याप्रमाणे चालुक्य सत्याश्रयाने शिलाहार अपराजिताचा पराभव केल्यानंतरही त्याने व त्याच्या वंशजांनी चालुक्यांची अधिसत्ता स्वीकारली नव्हती. चालुक्य पहिला सोमेश्वर याने शिलाहारांना कायमचा धडा शिकविण्यासाठी कोकण मोहीम हाती घेण्याचे ठरविले. आपले इतर मांडलिक असलेले काकतीय, यादव, हैहेय आणि कदंब यांच्या सहाय्याने त्याने इ.स. १०४७ मध्ये कोकणवर स्वारी केली. या लढाईत नागार्जुन धारातीर्थी पडला. सोमेश्वराने नागार्जुनाचा धाकटा भाऊ मुम्मुनिराज याला आपला मांडलिक म्हणून कोकणचे राज्य बहाल केले.
       मुम्मुनीने छित्ताराजाद्धारा बांधलेल्या अंबरनाथ येथील मंदिराच्या पूजा-अर्वेसाठी गावे दान दिली. कमकुवत झालेल्या शिलाहारांना मुम्मुनीच्या काळात चालुक्यांचे स्वामित्व आणि कदंबांचे श्रेष्ठत्व स्वीकारावे लागले. त्याचा फायदा घेऊन संजान येथील शिलाहारांच्या अंकित असलेल्या मोढ बिज्जलाने त्यांची बिरुदे धारण करून बंडस्वोरी केली. त्यामुळे इ.स. १०७३ मध्ये मुम्मुनीने बिज्जलाकडून संजानचा कारभार काढून घेतला.
       इ.स. १०७० मध्ये मुम्मुनीचा मृत्यू झाला व त्यापाठोपाठ त्याचा मुलगा व नागार्जुनाचा मुलगा अनंतपाल यांच्यात वारसा हक्काबाबत वाद सुरू झाला. शेवटी अनंतपालाचा विजय होऊन तो सत्ताधीश झाला. त्याने पश्चिम समुद्राधिपती आणि संपूर्ण कोकणचा स्वामी ही बिरुदे धारण केली." अनन्तपालाच्या कारकिर्दीच्या अस्वेरीस गोव्याचा कदंब पहिला जयकेशी याने कोकणवर स्वारी केली. अनन्तपालास ठार करून कोकणचा समावेश आपल्या राज्यात केला. लवकरच अनन्तपालाचा उत्तराधिकारी पहिला अपरादित्य याने कदं‌बांचा पराभव करून आपले पैत्रक राज्य त्यांच्या दास्यत्तवातून मुक्त केल्याचे वर्णन अपरादित्याच्या वडवली ताम्रपटात आढळते.
         अपरादित्य हा स्वतः विद्वान असून याज्ञवल्क्य स्मृतीवरील अपरार्क टीका नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. अपरादित्याने इतर समकालीन राजांच्या दरबारात आपले प्रतिनिधी पाठविण्याची प्रथा सुरू केली. मंख कवीच्या ठश्रीकंठचरितठ या ग्रंथात अपरादित्याने काश्मीरच्या राजाकडे तेजकंठ नावाचा राज प्रतिनिधी पाठविल्याची माहिती देण्यात आली आहे. या तेजकंठाने अपरादित्य लिखित अपरार्क टीका काश्मीरमध्ये लोकमान्य बनविली. अपरादित्यानंतर हरिपालदेव हा त्याचा उत्तराधिकारी झाला. ठाणे परिसरात उपलब्ध झालेल्या त्याच्या कोरीव लेखावरून हरिपालदेवाने इ.स. ११४८ ते ११५५ या काळात राज्य केल्याची माहिती मिळते. * विशेष म्हणजे त्याच्या काळातील कोरीव लेखात पहिल्यांदा संस्कृतबरोबर मराठीचा वापर केल्याचे दिसून येते.
         शिलाहार मल्लिकार्जुन हा हरिपालदेवाचा उत्तराधिकारी होता. त्याच्या काळातील दोन कोरीव लेखात त्याच्याविषयी माहिती नमूद करण्यात आली आहे. पहिल्या आलेखात त्याने प्रणालक प्रांताचा उद‌ण्डाधिपतीठ म्हणून सुपथ्य्याची नियुक्ती तर दुस्त्यात एका शिवमंदिराचा जीर्णोद्वार याविषयी नोंद करण्यात आलेली आहे. हेमचंद्र रचित ठकुमारपालचरितठ आणि मेरुत्तांग विरचित उपबंध चिंतामणीठ या ग्रंथातील माहितीनुसार गुजरातचा सोळंकी राजा कुमारपाल याने मल्लिकार्जुनाच्या काळात कोकणवर स्वारी केली. मिराशी यांच्या मतानुसार मेरुत्तुंगाने या युद्धाचे व त्यामागील कारणांचे जे वर्णन केले आहे ते विश्वास ठेवण्यायोग्य वाटत नाही. या युद्धात शिलाहारांचा पराभव होऊन मल्लिकार्जुन यास रणांगणावर वीरगती प्राप्त झाली.
    मल्लिकार्जुनाचा उत्तराधिकारी दुसरा अपरादित्य याच्या राजशासनात त्याच्या नावाबरोबर महाराजाधिराज आणि कोकण चक्रवर्ती अशी सार्वभौम शासकाची बिरुदे लावलेली आढळतात. यावरून त्याने सोलंकीच्या दास्यत्वातून आपले राज्य मुक्त केले असे मानले जाते. दुसऱ्या अपरादित्यानंतर दुसरा अनंतदेव याची अल्पकालीन (इ.स. ११९८ ते १२००) कारकीर्द झाल्यानंतर दुसरा केशिदेव हा कोकणचा राजा झाला. त्याच्या कोरीव लेखावरून त्याला प्रदीर्घ अशी पंचेचाळीस वर्षाची कारकीर्द लाभली. (इ.स. १२०० ते १२४७) यादव नरेश दुसरा सिंघण याने पराभूत केलेला व मांडलिक म्हणून आपले राज्य परत मिळविणारा केशी म्हणने शिलाहार दुसरा केशिदेव होय असे इतिहासकार मानतात.
        तिसरा अनंतदेव हा दुसऱ्या केशिदेवाचा उत्तराधिकारी असून त्याच्या काळातील एकमेव कोरीव लेख दिवे-आगर येथील इ.स. १२७४ मधील शिलालेख होय. तिसया अनंतदेवाचा उत्तराधिकारी सोमेश्वर हा उत्तर कोकणच्या शिलाहार शास्वेतील अखेरचा शासक ठरला. राज्यावर आल्यावर त्याने महाराजाधिराज आणि कोकण चक्रवर्ती ही सार्वभौम निदर्शक बिरुदे लावली व यादवांचे अधिपत्य अमान्य केले. त्यामुळे यादव नरेश कृष्ण (इ.स. १२४७ ते १२६१) याने सेनापती मल्ल याच्या नेतृत्वाखाली कोकणवर स्वारी केली. परंतु त्याला फारसे यश प्राप्त झाले नाही. यादव महादेव याने हस्तिदलाच्या संरक्षणास्वाली प्रचंड सैन्यासह पुन्हा कोकणवर स्वारी केली. सोमेश्वराचा पराभव होऊन त्याने समुद्राचा आश्रय घेतला. परंतु महादेवाने त्याचा पाठलाग करून सोमेश्वरास समुद्रात बुडविले. इ.स. १२६७ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने उत्तर कोकणच्या शिलाहारांची ४५० वर्षाची राजवट संपुष्टात आणली. महादेवाने अच्युत नासकाची प्रातिक प्रशासक पदावर नियुक्ती केली व तेव्हापासून कोकण हा यादव राज्याचा एक प्रांत बनला.
     पुरी किंवा घारापुरी (मुंबई जवळील एलिफन्टा बेट) शिलाहारांची पारंभीच्या काळातील राजधानी होती. चालुक्य सत्याश्रयाच्या आक्रमणाच्या वेळी ते नगर उध्वस्त झाले. त्यामुळे अपराजिताने राजधानी ठाण्यास हलविली. शिलाहार राजवटीच्या अस्वेरपर्यंत ठाणे हीच शिलाहारांची राजधानी होती. शिलाहारांनी मराठी भाषेला राजभाषा बनविले. त्यांच्या राजवटीचा कायमचा ठसा कोकणच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीवर उमटला आहे.

दक्षिण कोकणचे शिलाहार
        राष्ट्रकूट पहिल्या कृष्णाने दक्षिण कोकण जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट करून दक्षिण कोकणच्या शिलाहार शाखेचा संस्थापक सणफुल्ल याची त्या प्रांताचा प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सणफुल्लाचा नववा वंशज रट्टराज याने आपल्या राजशासनात कृष्णाने आपल्या पूर्वजांवर केलेल्या कृपेचा आवर्जून उल्लेख केला आहे. इ.स. ९८८ मधील अवसरावा पट्टणकुडी ताम्रपट, इ.स. १०१० मधील बलिपट्टण ताम्रपट या तीन कोरीव लेखांद्वारे या शाखेचा इतिहास उपलब्ध होतो. त्या साधनांच्या आधारे म.म.वा.वि. मिराशी यांनी दक्षिण कोकणच्या शिलाहारांची वंशावळ आणि त्यांची कालगणना पुढील प्रमाणे निश्चित केली आहे.

सणफुल्ल (इ.स. ७६५ ते ७८७)


रट्टराज (इ.स.९९५ ते१०२४)

      राष्ट्र‌कूट पहिल्या कृष्णराजाचा मांडलिक म्हणून सणफुल्ल हा सह्यादि आणि अरबी समुद्रामधील गोवा व त्यालगतच्या प्रांतांचे प्रशासन चालवित होता. त्याचा उत्तराधिकारी धम्मियार याने बलिपट्टण (बलियतान) हे शहर वसविल्याची माहिती वरील ताम्रपटात आढळते. परंतु ग्रीक लेखक टॉलेमीने आपल्या ग्रंथात या नगराचा उल्लेख केला आहे. तसेच वराहमिहिराच्या बृहत्संहितेतही याची नोंद आढळून येते. त्यामुळे असे मानले जाते की, अगोदर अस्तित्वात असलेल्या या नगरास तटबंदी बांधून धम्मियाराने ते आपल्या राजधानीसाठी निवडले. वा. वि. मिराशी यांच्या मते बलिपट्टण म्हणजे आजचे रत्नागिरी जिल्हयातील स्वारेपाटण असून रट्टराज शिलाहाराचा एक ताम्रपट येथे प्राप्त झालेला आहे. धम्मियाराने गोव्यास लागून असलेला दक्षिण कोकणचा प्रदेश जिंकला व त्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने त्याने स्वारेपाटणला आपली राजधानी स्थलांतरित केली असे मानले जाते. धम्मियाराचा उत्तराधिकारी अय्यपराज याने आक्रमक धोरणाचा अवलंब करून चंद्रपूर जिंकले. चंद्रपूर ही गोव्याची राजधानी असून आज ते चांदोर या नावाने ओळखले जाते. यावरून असे स्पष्ट होते की, सणफुल्लाच्या कारकिर्दीच्या अस्वेरीस शत्रूनी चंद्रपूर जिंकले होते व त्यामुळे धम्मियाराला आपली राजधानी बलिपट्टण येथे हलवावी लागली होती. अय्यपराजाने त्या अपमानाचा बदला घेतला व प्राप्त झालेल्या पैतृक राज्याचा विस्तार केला.
          रट्टराजाच्या ताम्रपटानुसार पहिला अवसर हा अय्यपराजाचा उत्तराधिकारी होता. परंतु बहुधा अनवधानाने त्याचे नाव पट्टणकुडी ताम्रपटातील शिलाहारांच्या वंशावळीत देण्याचे राहून गेले असावे. अवसर याने राजनीतीचा सखोल अभ्यास केला होता. त्याच्यानंतर आदित्यवर्मन आणि दुसरा अवसर हे या शाखेतील शासक होऊन गेले. दुसया अवसराने चेमूल्य आणि चंद्रपूर येथील राजांना सहाय्य केल्याचे वर्णन या शाखेच्या कोरीव लेखात आढळते. यातील चेमूल्य म्हणजे टॉलेमीच्या ग्रंथातील सेमूल्ल असून त्याची निश्चिती मुंबईच्या दक्षिणेस ५० किलोमीटर अंतरावर असणाया रायगड जिल्ह्यातील चौल बंद्राशी करण्यात आलेली आहे. दुसया अवसराने सैनिकी सहाय्य केलेला तिथला शासक बहुधा उत्तर कोकणचा शिलाहार राजा वप्पुवन याचा मांडलिक असावा. वप्पुवन हा अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन चौलच्या प्रमुखाने त्याच्याविरु द्ध बंड केले व याकामी दुसया अक्सराने त्याला सहाय्य केले असावे असे इतिहासकार मानतात. दुसऱ्या अवसराने आपल्या या कृत्याद्वारे उत्तर कोकणवर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असे दिसते. दुसया अवसराने ज्या चंद्रपूरच्या राजाला संरक्षण दिले तो अय्यपराजाने पराभूत करून आपला मांडलिक बनविलेल्या चंद्रपूरच्या शासकाचा वंशज असावा. या काळात चंद्रपूर ही गोव्याच्या कदंबांची राजधानी होती. अय्यप्पाने प्रतिष्ठापीत केलेला गोव्याचा कदंब राजा म्हणजे या शाखेचा संस्थापक कण्टकाचार्य असावा असे मत मिराशी यांनी व्यक्त केले आहे. द दुसया अवसरानंतर राज्यावर आलेल्या त्याचा पुत्र इंद्रराज याने दानधर्म करून आपली कारकीर्द आनंदात व्यतित केली. त्याच्यानंतर राज्यावर आलेला इंद्रराजाचा पुत्र भीम हा महापराक्रमी होता. त्याने चंद्रमंडल (गोवा परिसर) जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केले. या बाबतीत भीमाने आपला पितामह दुसरा अवसर याच्या विपरित धोरण स्वीकारले. मिराशींच्या मतानुसार भीमाच्या आक्रमणाची झळ बसलेला कदंब राजा बहुधा षष्टदेव किंवा त्याचा उत्तराधिकारी गुहल्ल असावा.
        भीमाचा उत्तराधिकारी तिसरा अवसर हा बुद्धिमान, शूर, देखणा असून विद्वानांचा चाहता आणि आश्रयदाता होता. इ.स. ९८८ मध्ये त्याने जारी केलेल्या पट्टणकुडी ताम्रपटाच्या अगोदर १७ वर्षे राष्ट्र‌कूट सत्तेवा अस्त होऊन दुसऱ्या तैलाने आपल्या घराण्याची सत्ता प्रस्थापित केलेली असताना देखील अवसराने चालुक्यांचे सार्वभौमत्व मान्य करण्याऐवजी राष्ट्र‌कूट घराण्याची वंशावळ या ताम्रपटाच्या सुरुवातीला नमूद करून त्यांच्याशी आपली निष्ठा व्यक्त केली होती. त्याच्यानंतर इ.स. ९९५ च्या सुमारास रट्टरान राज्यावर आला. त्याच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत कल्याण चालुक्यांनी आपले स्वामित्व मान्य न करणाऱ्या बंडखोरांविरु द्ध मोहीम उघडून त्यांना अंकित केले होते. ही जाणीव ठेऊन रट्टराजाने आपल्या स्वारेपाटण ताम्रपटात चालुक्य सत्याश्रय याच्या नावाचा उल्लेख आपला अधिपती म्हणून केला.
         सत्याश्रयाच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या पाचव्या विक्रमादित्याच्या नेमस्त स्वभावाचा व चौल आणि चालुक्य यांच्यातील संघर्षांचा फायदा घेऊन रट्टराजाने पुन्हा चालुक्यांचे अधिपत्य झुगारून दिले. चालुक्य जयसिंहाने राज्यावर आल्यावर दक्षिण कोकणवर स्वारी करून रट्टराजाचा पूर्ण पराभव केला. त्याचे पुढे काय झाले याची कुठे नौद आढळत नाही. अशा रीतीने दक्षिण कोकणावरील शिलाहारांची राजवट एकाएकी संपुष्टात आली. जयसिंहाच्या या विजयाचे वर्णन त्याच्या इ.स. १०१४ मधील मिरज ताम्रपटात सविस्तर आले आहे. त्यावेळी जयसिंहाने कोल्हापूर येथे आपली छावणी टाकली होती. तेथूनच हा ताम्रपट जारी करण्यात आला होता. अशा रीतीने दक्षिण कोकणच्या शिलाहारांनी इ.स. ७६५ ते १०२४ पर्यंत म्हणजे जवळपास अडीच शतके या प्रदेशावर राज्य केले. काही वेळा त्यांनी उत्तर कोकणातील चौल आणि गोव्यातील चंद्रपूर हे प्रदेश जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता. राष्ट्रकूटांचे एकनिष्ठ मांडलिक म्हणून त्यांनी राज्याचा उपभोग घेतला. परंतु कल्याणच्या चालुक्यांविरु द्ध त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे शेवटी त्यांना आपले राज्य गमवावे लागले. जयसिंह चालुक्याने त्यानंतर काही काळ कोल्हापूरच्या शिलाहाराकडे दक्षिण कोकणचे शासन सोपविले होते, पण पुढे तो प्रदेश गोव्याच्या कदंबांच्या स्वाधीन करण्यात आला. कारण गोव्याचे कदंब हे चालुक्य सहावा विक्रमादित्य यावे सोयरे असल्यामुळे त्यांचा कदंबावर वरदहस्त होता. त्यामुळे यापुढील काळात दक्षिण कोकण किंवा कोकण ९०० हा प्रदेश वंशपरंपरेने गोव्याच्या कदंबाकडे राहिला.

कोल्हापूरचे शिलाहार
       कोल्हापूरचे शिलाहार ही दक्षिणेतील शिलाहार राजवंशाची तिसरी शाखा असून त्यांच्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याचा समावेश होता. प्राचीन काळी हा भाग कुंतलदेश या नावाने ओळखला जात असून तो कृष्णा स्वोयावा वरील भाग होता. इ.स. च्या चौथ्या शतकाच्या मध्यास कुंतल देशावर मानपूरच्या राष्ट्रकूट राजवंशाचे शासन होते. राष्ट्रकूट मानाङ्‌क हा या राजवंशाचा संस्थापक असून आपल्या नावावरून ओळखल्या जाणाऱ्या मानपूर या नगराची त्याने आपल्या राजधानीसाठी निवड केली. मानपूर हे सध्याचे सातारा जिल्ह्यातील माण-असून एका तालुक्याचे नाव होय. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्याशी या राजवंशाचे मित्रत्वाचे संबंध असून नंतर या राष्ट्र‌कुटांनी वाकाटकांचे स्वामित्व स्वीकारले होते. सातव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात चालुक्य दुसरा पुलकेशी याच्याद्वारे पराभूत होईपर्यंत कुंतल देश मानपूरच्या राष्ट्र‌कुटांच्या शासनाखाली होता." यापुढील काळात आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत कुंतल देशावर बदामीच्या चालुक्यांचे शासन होते. आठव्या शतकाच्या मध्यापासून दहाव्या शतकाच्या आठव्या दशकापर्यंत तेथे मालखेडच्या राष्ट्रकुटांचे शासन होते.
          राष्ट्र‌कुटांच्या आमदनीत कुंतल देशाचे प्रशासन कोणाकडे सोपविले होते याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु कोरीव लेस्वातील माहितीनुसार या भागावर सिंद प्रमुखांचे शासन असावे असे दिसते. हे सिंद शासक आपला ठकरहाटपुरवराधीश्वरठ असा उल्लेख करतात. यावरून कन्हाड, जिल्हा सातारा येथून हे सिंद या प्रदेशाचे प्रशासन चालवित होते हे स्पष्ट होते. महासामन्त सिंद आदित्यवर्मन याचा इ.स. ९६५ मधील अपूर्ण ताम्रपट सापडला असून त्यात पुण्याच्या पश्चिमेस २७ कि. मी. अंतरावर इंद्रायणी नदीच्या कामवरील किन्ही या गावाच्या दानाची नोंद आढळते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सिंद शासकाचा इ.स. १०११ मधील आणस्वी एक ताम्रपट उपलब्ध झाला आहे. यावरून म. म. मिराशी यांनी असे विधान केले आहे की, कराड येथून सिंद प्रशासकांनी या भागाचे प्रशासन अकराव्या शतकापर्यंत चालविले होते."
       या नंतरच्या काळात सिंदांचे कोरीव लेख या भागात आढळत नाहीत. उलट कोल्हापूर शास्वेतील प्रारंभीचे शिलाहार राजे क-हाड येथे वास्तव्य करून असल्याची माहिती या शास्वेच्या कोरीव लेखात आढळते. मारसिंहाव्या मिरज ताम्रपटात त्याचा पूर्वज शिलाहार दुसरा जतिग हा महापराक्रमी असून त्याने अनेक शत्रूचा पराभव करून त्यांचे प्रदेश जिंकल्याची नोंद आहे. यावरून दुसऱ्या जतिगाने या भागावरील सिंदांचे प्रशासन संपवून तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली हे स्पष्ट होते. त्याची प्रांरभीच्या काळातील राजधानी कन्हाड होती.
       उत्तर आणि दक्षिण कोकणच्या शिलाहार शास्वांप्रमाणे या शास्वेतील राजे जीमुतवाहनास आपल्या वंशाचा मूळ पुरुष मानत असून ठतगरपुरवराधीश्वरस्ठ हे पारंपरिक बिरुद लावतात. परंतु त्यांन्यात जवळचे नाते असल्याचा पुरावा आढळत नाही. आपल्या वंशास देवी महालक्ष्मीच्या कृपेने राज्यप्राप्ती झाली अशी त्यांची श्रद्धा होती. या शास्वेच्या तीन राजधान्या असल्याचे उल्लेख त्यांच्या कोरीव लेखात आढळतात. यापैकी पहिली राजधानी प्रणालक किंवा पद्मनाल (कोल्हापूरच्या उत्तरेस २० कि.मी. अंतरावर असलेला पन्हाळगड) दुसरी क्षुल्लकपुर म्हणजे सध्याचे कोल्हापूर व तिसरी वलिवाड किंवा वलयवाड (कोल्हापूरच्या पूर्वेस १० कि.मी. अंतरावर असले वळिवडे) ही होय. परंतु या तीन राजधान्या होण्यापूर्वी दुसऱ्या जतिगाच्या काळात कन्हाड ही या शाखेवी राजधानी असल्याची माहिती बिल्हण कवीच्या विक्रमांक देव चरितावरून मिळते. यात सहाव्या विक्रमादित्याचा सासरा व त्याची राणी चंद्रलेखा हिचा पिता कहाडनिवासी शिलाहार प्रमुख असल्याचे वर्णन आले आहे. त्याचे नाजे बिल्हणाने दिलेले नाही. परंतु काळाचा विचार करता तो दुसया जतिगाचा नातू मारसिंह (इ.स. १०५० ते १०७५) असावा. मारसिंहाचा पिता गोङ्ङ्क याने इ.स. ९८० मधील मिरज ताम्रपट कन्हाड येथून जारी केला होता. सहावा विक्रमादित्य आणि चंद्रलेखा यांच्या स्वंयवर विवाहानंतर केव्हा तरी या शास्वेची राजधानी क-हाडहून कोल्हापूरास हलविण्यात आली. तरीही पुढील काळातील काही शिलाहारांचे वास्तव्यस्थान क-हाड हेच होते. या शाखेवी राजवंशावळ पुढीलप्रमाणे आहे. ज्याअर्थी, मारसिंहाच्या मिरज ताम्रपटानुसार शके ९८० (इ.स. १०५८) ही या राजवंशाची सर्वात पूर्वीची ज्ञात तिथी आहे आणि मारसिंह हा या शाखेचा मूळ पुरुष पहिल्या जतिगाचा पाचवा वंशज आहे. त्याअर्थी पहिला जतिग आणि त्याचे नजीकचे वंशज राष्ट्र‌कुटांच्या काळात होऊन गेले. परंतु कोकणच्या शिलाहाराप्रमाणे ते आपणास राष्ट्र‌कुटांचे मांडलिक मानीत नसत.
      तथापि या शाखेतील सुरुवातीच्या प्रमुखांचे राष्ट्र‌कुटांशी सोयरे संबंध असून त्यांच्या राज्यातील काही प्रांतांचे ते प्रशासन चालवित असावेत. शिलाहार पहिला जतिग हा तलकडचा पश्चिम गंग राजा पेर्माडी उर्फ मारसिंह याचा मामा होता. हा मारसिंह राष्ट्रकूट सम्राट तिसया कृष्णाचा मेव्हणा बुदुग याचा पुत्र होता. मारसिंहाने तिसया कृष्णाच्या अनेक मौहिमात सक्रीय भाग घेतला होता. तसेच अखेरच्या वेळी राष्ट्र‌कूट सत्तेवे रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. जतिग शिलाहारास मारसिंहाने राष्ट्र‌कूट कृष्णाकडून शिमोगा जिल्हयातील एका प्रांताच्या प्रशासनाचे अधिकार मिळवून दिले होते." शिलाहार गणुरादित्य याच्या कोल्हापूर येथील कोरीव लेखात पहिल्या जतिगाचे वर्णन गोमंथ दुर्गाचा अधिपती म्हणून करण्यात आले आहे. गोमंथ या नावाची एक टेकडी कर्नाटकाच्या शिमोगा जिल्हयात आहे. यावरून जतिग हा राष्ट्र‌कुटांच्या प्रशासकीय सेवेत असावा असे दिसते. यापेक्षा त्याच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. त्याचे उत्तराधिकारी नसिवर्मन आणि चंद्रराजांच्या राजकीय जीवनाविषयी देस्वील फारशी माहिती आढळत नाही.
        शिलाहार दुसरा जर्निंग याने सिंदांचा पराभव करून दक्षिण महाराष्ट्रावर आपली सत्ता प्रस्थापित केली व आपली राजधानी म्हणून त्याने क-हाडची निवड केली. त्यानंतर त्याने कोल्हापूर जवळील पन्हाळगड जिंकून आपल्या राज्याचा दक्षिणेकडे आणस्वी विस्तार केला. कल्याणच्या चालुक्यांच्या वर्चस्वाखालील हे प्रदेश त्याला जिंकणे शक्य झाले कारण त्यावेळी चालुक्य राज्यावर दक्षिणेकडून चोलांचे व उत्तरेकडून परमारांचे हल्ले चालू होते. यावेळी त्याने चालुक्यांना सहाय्य करून बदल्यात हे प्रदेश मिळविले असावेत. कारण त्याचा उत्तराधिकारी गुहल याच्यावर चालुक्य सत्याश्रयाची कृपा होती." हेमचंद्राच्या द्वाश्रयकाव्यानुसार इ.स. ९९७ ते इ.स. १००८ या काळात राज्यावर असलेल्या गुजरातचा चौलुक्य राजा चामुंडराज यान्याकडे कोल्हापूर नरेशाने उत्कृष्ट माणकांचा नजराणा पाठविला होता." या काळात शिलाहार दुसरा जतिग हाच कोल्हापूरचा राजा होता. जतिगाने बहुधा आपले राजकीय स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने मैत्रीचे प्रतीक म्हणून हा नजराणा पाठविला असावा.
वर उल्लेख केलेल्या मारसिंहाच्या मिरज ताम्रपटात दुसऱ्या जतिमाचा मुलगा व उत्तराधिकारी गोड्क हा करहाट, कुंडि, मिरिजदेश आणि कोकणचा बराच मोठा भाग यावर राज्य करीत असल्याचे वर्णन आले आहे. यावरून त्याच्या राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि लगतचा दक्षिण कोकणचा काही भाग आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्हा समाविष्ट होता असे दिसते. कल्याणचा चालुक्य राजा दुसरा जयसिंह याच्या इ.स. १०२४ मधील मिरज ताम्रपटानुसार त्याने आपल्या दक्षिण कोकणच्या स्वारीच्या वेळी कोल्हापूर येथे आपली छावणी टाकली होती, आणि रट्टरानाचा पराभव करून दक्षिण कोकण जिंकले होते. या स्वारीत गोड्‌काने जयसिंहास सहाय्य केले असावे, त्याचे बक्षीस म्हणून जयसिंहाने काही काळ दक्षिण कोकण गोड्‌काच्या ताब्यात दिले असावे. यापुढील काळात कोल्हापूरच्या शिलाहारांनी कल्याणच्या चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते.
       गंडरादित्याच्या ताळले ताम्रपटात पहिला गुहल आणि कीर्तिराज हे मोड्‌काने भाऊ असून शासक असल्याचे वर्णन आले आहे. त्याचप्रमाणे विजयादित्याच्या कोल्हापूर ताम्रपटात गोड्‌काचा तिसरा भाऊ चंद्रादित्याचा उल्लेख आला आहे." हे तिन्ही भाऊ राजे असल्याचा उल्लेख असल्यामुळे मिराशी यांनी असे विधान केले आहे की त्यांनी प्रांतिक प्रशासक म्हणून विविध भागांचे शासन चालविले असावे. गोड्‌काचा उत्तराधिकारी-त्याचा मुलगा मारसिंह असल्याची माहिती त्याच्या इ.स. १०७८ मधील मिरज ताम्रपटावरून मिळते. त्याने स्वतःस महामंडलेश्वर म्हटले आहे. परंतु आपल्या सार्वभौम शासकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.
        मारसिंहाच्या काळात चालुक्य सोमेश्वराच्या विरु द्ध राजराज चोल याने निकराचा हल्ला चढविला होता. आपल्या पूर्वजांप्रमाणे चालुक्यांचा सामंत म्हणून मारसिंहाने सोमेश्वरास या चोल आक्रमणाचा प्रतिकार करण्याच्या कामी सर्वतोपरी मदत केली. चोल सैन्याने गंगावाडीवर स्वारी करून तो प्रदेश पादाक्रांत केला व वाटेतील अनेक शहरे जाळून उध्वस्त करून कोप्पमच्या किल्ल्याला वेळा दिला. पहिल्या सोमेश्वराने चोल सैन्याचा शर्थीने प्रतिकार केला व या लढाईत खुद्द राजराज चोल ठार झाला. परंतु राजराजाचा मुलगा राजेंद्र चोल याने संक टावर मात करून मुसंडी मारली व चालुक्य सैन्याचा पराभव करून विजय खेचून घेतला. विजयी राजेंद्र चोल कोप्पम येथे आपला विजयस्तंभ उभारूनच राजधानीस परतला. पराभूत पहिल्या सोमेश्वराने बहुधा आपला सामंत शिलाहार मारसिंह याच्या ताब्यात असलेल्या दक्षिण कोकणात आश्रय घेतला असावा. चोल सैन्य परत गेल्यावर सोमेश्वराने आपला गेलेला प्रदेश परत मिळविला. त्यामुळे दोन्ही पक्ष आपल्या विजयाचा दावा करतात.
       शके १०६७ मधील शिलाहार विजयादित्याच्या कोल्हापूर शिलालेखानुसार मारसिंहास पाच पुत्र होते. त्यांच्यापैकी काहींना प्रांतिक प्रशासक म्हणून नेमण्यात आले तर काही राज्यावर आले. बिल्हणाच्या विक्रमांक देव चरितात चालुक्य विक्रमादित्य सहाव्या आणि चंद्रलेखा उर्फ चंदलादेवी या शिलाहार राजकन्येच्या स्वयंवर विवाहाचे वर्णन आले आहे. त्यात त्याने चंदलादेवी असामान्य रुपवती, विदूषी आणि विविध कलात पारंगत असल्याचे म्हटले आहे. तिचा पिता कोण होता याचा त्याने उल्लेख केलेला नाही परंतु काळाचा विचार करता, तो शिलाहार मारसिंहच असला पाहिजे.
      दुसरा गुहल हा मारसिंहाचा ज्येष्ठपुत्र त्याचा उत्तराधिकारी झाला. त्याचा राज्यकाल इ.स. १०७४ ते १०८५ असा होता. त्याच्या राज्यकाळातील एकही कोरीव लेख उपलब्ध नाही. मारसिंहाचा दुसरा मुलगा गोड्क हा राज्यावर आला नाही. कारण विजयादित्याचा वरील कोल्हापूर शिलालेख वगळता शिलाहारांच्या कोणत्याही कोरीव लेस्वात याविषयी नोंद आढळत नाही."
      शिलाहारांच्या बहुतेक कोरीव लेखात दुसऱ्या गुहलानंतर पहिल्या भोजदेवाचे नाव आढळते. तो पराक्रमी आणि महत्वाकांक्षी होता. गंडरादित्याच्या शके १०३७ मधील कोल्हापूर ताम्रपटात त्याच्या काही दिग्विजयांचे वर्णन आढळते." तो चालुक्य सहाव्या विक्रमादित्याचा विश्वासू आणि एकनिष्ठ मांडलिक असून त्याने कदंब दुसरा शातिवर्मन याला पराभूत करण्यात कोंगलाचा (अज्ञात शत्रू) शेवट करण्यात, बिज्जलाचछ (हा बहुधा पहिल्या सोमेश्वराचा मंगळवेढा येथील कलचुरी सामंत असावा) बंड मोडून काढण्यात आणि अज्ञात अशा कोक्कलाचा शेवट करण्याच्या कामात विक्रमादित्याला सहाय्य केले. भोजाचे इतर पराक्रम म्हणजे वेणुग्रामाचे दहन, कुरंजच्या गोविंदाचा नाश, कोकणविजय आणि भिल्लमानी सुटका होत. वेणुग्राम म्हणजे सध्याचे बेळगाव असून ते सौदत्तीच्या रट्टाच्या प्रदेशात होते, तर गोविंद हा खानदेशातील मौर्य वंशातील सामंत होता." कोकणचा राजा म्हणजे उत्तर कोकणचा शिलाहार सामंत अनंतपाल होय. भिल्लम हा चालुक्यांचा यादव वंशीय सामंत होता. याशिवाय येलबुर्ग येथील सिंदांचा देखील भोजाने पराभव केला होता. सततच्या विजयामुळे भोजाची महत्वाकांक्षा वाढत गेली व त्याने आपला स्वामी चालुक्य सहावा विक्रमादित्य याच्याविरुद्ध बंड केले. इ.स. १०८९ व ११०० मध्ये त्याची आणि विक्रमादित्याची लढाई होऊन शेवटच्या लढाईत भोज मारला गेला. त्याने इ.स. १०८७ ते ११०० या काळात राज्य केले.
         भोजानंतर त्याचा भाऊ बल्लाळ याने इ.स. ११०० ते ११०८ याकालावधीत राज्य केले. मारसिंहाचा सर्वांत धाकटा मुलगा गंडरादित्य हा बल्लाळाचा उत्तराधिकारी असून तो इ.स. ११०८ च्या सुमारास राज्यावर आला. ताळले ताम्रपटानुसार इ.स. १११० ही गंडरादित्याच्या कारकिर्दीची सर्वात अगोदरची ज्ञात तिथी होय. कोल्हापूरच्या शिलाहारांच्या ताब्यातील वंशपारंपारिक प्रदेशाशिवाय भोजाने शातिवर्मन कदंबाचा पराभव करून जिंकलेला दक्षिण कोकण देखील मंडरादित्याच्या राज्यात समाविष्ट होता. चालुक्य सहावा विक्रमादित्य हा गणुरादित्याचा अधिपती असून त्याने आपल्या या शिलाहार मांडलिकास निः शंकमल्ल (निर्भिड पैलवान) या बिरुदाने गौरविले होते. खुद्द मंडरादित्याच्या कोरीव लेखात त्याचे लोक कल्याणकारी कार्य, लोकोपयोगी योजना आणि सर्व धर्माविषयीचा आदरभाव याविषयीची प्रशस्ती असून त्याने हिंदू, बौद्ध आणि जैन देवतांची मंदिरे बांधून त्यांच्या चरितार्थासाठी भूमिदाने दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
       शिलाहार दुसरा भोज याने आपल्या एका कोरीव लेखात आपला पितामह गंडरादित्य याने स्थानक किंवा ठाण्याच्या राजाला त्याची गेलेली सत्ता परत मिळवून दिल्याचा उल्लेख केला आहे. हे वर्णन गोव्याचा कदंब दुसरा जयकेशी याने केलेल्या उत्तर कोकणवरील स्वारीच्या व तीत आपले राज्य गमाविलेल्या पहिल्या अपरादित्याने मदतीसाठी गंडरादित्यास केलेल्या विनंतीच्या संदर्भातील असावे. चोलांच्या आक्रमणाच्यावेळी आपल्या चालुक्य अधिपतीच्या मदतीसाठी गंडरादित्याने आपला सामंत निंबदेवरस यास सैन्यासह पाठविले होते.
        गंडरादित्यानंतर त्याचा उत्तराधिकारी विजयादित्य हा इ.स. ११३८ च्या सुमारास राज्यावर आला. कारण शके १०६१ मधील एक सांबी येथील शिलालेखात पाडेवाल जिन हा लढाईत मारला गेल्याचा उल्लेख असून त्यावेळी विजयादित्याचे शासन असल्याची नोंद करण्यात आली आहे. ही तिथी २९ जानेवारी ११३९ या दिवशी येते. यावरून विजयादित्याची कारकीर्द ११३८ मध्ये सुरू झाली हे स्पष्ट होते.
         विजयादित्याच्या राज्यकाळात कल्याणच्या चालुक्य सत्तेला उतरती कळा लागली होती. सहाव्या विक्रमादित्याचे आक्रमक धोरण आणि एकतंत्री कारभार यामुळे चालुक्यांचे अनेक मांडलिक दुस्वावले गेले होते. त्यामुळे त्याचे उत्तराधिकारी तिसरा सोमेश्वर, दुसरा जगदेक मल्ल, तिसरा तैल आणि चौथा सोमेश्वर यांना बंडखोर सामंतांनी सर्व बाजूंनी घेरून त्रस्त केले. कोल्हापूरच्या शिलाहारांनी देस्वील या परिस्थितीचा फायदा घेतला. कारण तिसया तैलाविरु द्धच्या बंडात बिज्जल कलचुरीस सामील झालेल्या चालुक्य सामंतात शिलाहार विजयादित्याचा समावेश होता.
         बिज्जल कलचुरी आणि कोल्हापूरचे शिलाहार यांच्यातील संबंध पुढे बिनसले. विजयादित्याने बिज्जलास आपला स्वामी मानण्यास नकार दिला व आपण स्वतंत्र आणि सार्वभौम शासक असल्याची घोषणा केली. विजयादित्य बिज्जलाने बोलावले असताना देखील दरबारात हजर झाला नाही. त्यामुळे बिज्जलाने विजयादित्याविरुद्ध मोहीम हाती घेतली. या लढाईत बिज्जल कलचुरीचा विजय झाल्याचे बिज्जल चरित या ग्रंथात म्हटले आहे तर शिलाहार विजयादित्याच्या खिद्रापूर येथील शिलालेखात त्याने आपला सेनापती बोप्पन याच्या बिज्जलाला पराभूत केल्याबद्दल गौरव केला आहे.
         विजयादित्याने ठाणे आणि गोवा येथील राजांना त्यांची गेलेली सत्ता परत मिळवून दिल्याची माहिती शिलाहारांच्या दस्तैवजात आढळते. यापैकी ठाण्याचा शिलाहार पहिला अपरादित्य याला करण्यात आलेली मदत मंडरादित्याच्या राज्यकालातील असून तिचा उल्लेख वर आला आहे. गोव्याचा पुनस्थापित केलेला शासक बहुधा कदंब विजयादित्य उर्फ विष्णुचित हा असावा कारण कलचुरी आहवमल्लाने त्याच्या राज्यावर आक्रमण केले होते.
        विजयादित्यानंतर दुसरा भोज हा त्याचा उत्तराधिकारी झाला. तो या राजवंशातील शेवटचा आणि सर्वात पराक्रमी राजा होता. आपल्या शौर्याबद्दल त्याने वीर भोज ही उपाधी प्राप्त केली होती.
        भोजाच्या काही कोरीव लेखात जरी त्याचा उल्लेख महामंडलेश्वर म्हणून आला असला तरी तो पारंपारिक असून इतर साधनातील त्याच्या सार्वभौमत्व दर्शक बिरुदावरून तो स्वतंत्र आणि सार्वभौम शासक बनला होता हे स्पष्ट होते. कारण सोमदेवाने जैनेंद्र व्याकरणावरील आपल्या ठशब्दार्णव चंद्रिकाठ या टीका ग्रंथात भोजाला राजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक आणि पश्चिम चक्रवर्ती अशा सार्वभौम राजाच्या बिरुदावलीने गौरविले आहे. देवगिरीचे यादव दक्षिणेत सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यात आणि शिलाहार भोजात संघर्ष अटळ होता. यादवनरेश दुसया सिंघणाने शिलाहारांच्या प्रदेशावर स्वारी केली. दोन्ही सैन्यात खिद्रापूरजवळ निकराची लढाई होऊन शिलाहारांचा तीत केवळ पराभवच झाला असे नव्हे, तर दुसरा भोज पकडला गेला. सिंघणाने पन्हाळगड जिंकून भोजास तिथे बंदिवासात ठेवले.
अशा प्रकारे इ.स. १२१२ च्या सुमारास याद‌वांनी कोल्हापूरच्या शिलाहार वंशाचा शेवट करून तो प्रदेश आपल्या राज्यात सामिल करून त्याच्या प्रशासनाची जबाबदारी आपल्या प्रांतिक प्रशासनाकडे सोपविली.



शिलाहार घराणे

  एक मध्ययुगीन राजघराणे. शिलाहारांची तीन घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. एक, उत्तर कोकणात ठाणे व कुलाबा ह्या जिल्ह्यांवर राज्य करीत होते. त्यात १,४०० गावांचा समावेश होता, अशी सांप्रदायिक समजूत होती. या घराण्याला उत्तर कोकणचे शिलाहार म्हणतात. त्यांची राजधानी पुरी (सध्याची कुलाबा जिल्ह्यातील राजपुरी किंवा दंडा राजपुरी) येथे होती. अरबी समुद्रावर या घराण्याचे वर्चस्व होते. त्यातील काहींनी ‘पश्चिम समुद्र चक्रवर्ती’ ही पदवी धारण केली होती.

शिलाहारांचे दुसरे घराणे दक्षिण कोकणात (याला सप्तकोकण म्हणत) राज्य करीत होते. त्यांची राजधानी बलिपत्तन (सध्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण) येथे होती.

शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव ह्या जिल्ह्यांचा काही भाग ह्या प्रदेशांवर राज्य करीत होते. त्यांची राजधानी वळिवाड येथे होती. हे कोल्हापूच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी. वर असलेले वळवडे असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे आता राधानगरीत रूपांतर झाले आहे. काही जुन्या लेखांत कोल्हापूर आणि प्रणालक (पन्हाळा किल्ला) यांचाही राजधानी म्हणून उल्लेख येतो, तर काहींच्या मते कोल्हापूरच्या पूर्वेकडील वळिवडे हे विद्यमान खेडे त्यांच्या राजशिबिराचे स्थान असण्याची शक्यता आहे.

ही तिन्ही घराणी आपणास विद्याधर जीमूतवाहनाचे वंशज म्हणवीत. या जीमूतवाहनाने एका नागाला वाचविण्याकरिता स्वतःचा देह एका शिलेवर बसून गरुडाला अर्पण केला होता म्हणून या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे नाव पडले, ही आख्यायिका शिलाहारांच्या लेखात सापडते.

उत्तर कोकण आणि कोल्हापूर-सातारा या जिल्ह्यांतील प्रदेशांवर राज्य करणारे शिलाहार आपले वर्णन ‘तगरपुरवराधीश्वर’ असे करतात. तेव्हा ते मूळचे तगरनगराहून आले होते, हे उघड आहे. हे तगर मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर होय, हे आता निश्चित झाले आहे. ह्याचा उल्लेख महत्त्वाची बाजारपेठ म्हणून टॉलेमी याच्या ग्रंथात आणि पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या प्राचीन ग्रीक ग्रंथात येतो. शिलाहार कानडी-भाषी होते असे दिसते कारण त्यांच्या ताम्रपटात राजांनी धारण केलेली ‘मलगलण्ड’, ‘गण्डरगण्ड’, ‘विल्लविडेङ्ग’  यांसारखी कानडी बिरुदे आढळतात.

उत्तर कोकणच्या शिलाहार घराण्याचा मूळ पुरुष पहिला कपर्दी (कार. सु. ८००–८२५) याने राष्ट्रकूट सम्राट तिसरा गोविंद याला उत्तर कोकणात राष्ट्रकुटांची सत्ता पसरविण्यास मदत केली असावी म्हणून गोविंदाने तो प्रदेश जिंकल्यावर येथे मांडलिक म्हणून कपर्दीची नेमणूक केली. उत्तर कोकणाला त्याच्या नावावरून ‘कपर्दिद्वीप’ किंवा ‘कवडीद्वीप’ म्हणत. हे घराणे उत्तर कोकणात सु. ८०० पासून १२६५ पर्यंत म्हणजे सु. साडेचारशे वर्षे राज्य करीत होते. तेथे यांच्या सोळा पिढ्या झाल्या.

कपर्दीनंतर तिसऱ्या पिढीतल्या वप्पुवन्न राजाच्या (कार. सु. ८८०–९१०) काळात राष्ट्रकूट सम्राट द्वितीय कृष्ण याने ठाणे जिल्ह्याचा उत्तर भाग मधुमती (मुहम्मद) या मुसलमान सामंताच्या ताब्यात दिला. तेथे त्याच्या तीन पिढ्या राज्य करीत होत्या. त्यांची राजधानी संयान (डहाणू तालुक्यातील संजान) येथे होती. ही दोन्ही घराणी राष्ट्रकूट सम्राटांचीच मांडलिक होती पण त्यांच्यात वारंवार खटके उडत, असे दिसते. इ. स. ९७४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुटांच्या पतनानंतर शिलाहार अपराजिताने त्यांचा उच्छेद करून त्यांचा प्रदेश खालसा केला.

हे घराणे शेवटपर्यंत राष्ट्रकूट सम्राटांशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या पतनानंतर अपराजिताने (कार. सु. ९७५–१०१०) उत्तरकालीन चालुक्य सम्राट तैलपापुढे मान न वाकवता आपल्या स्वातंत्र्याच्या निदर्शक अशा ‘पश्चिमसमुद्राधिपति’ आणि ‘मांडलिकत्रिनेत्र’ अशा पदव्या धारण केल्या. पुणक (पुणे), संगमेश्वर व चिपळूण जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याची सीमा दक्षिण कोकणात व घाटावर नेली. त्याच्या ताम्रपटात त्याच्या राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : उत्तरेस लाट (दक्षिण व मध्य गुजरात), दक्षिणेस चंद्रपूर (गोव्यातील चांदोर), पश्चिमेस समुद्र व पूर्वेस यादव भिल्लमाच्या खानदेशातील राज्यापर्यंत. त्याने माळव्याचा परमार नृपती सिंधुराज याच्या च्छत्तीसगडातील स्वारीत आपला पुत्र पाठवून त्यास साहाय्य केले होते, असे पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरित काव्यावरून दिसते.

चालुक्यांना अपराजिताचे सामर्थ्य सहन होणे शक्य नव्हते. तैलपाचा पुत्र सत्याश्रय ह्याने त्याच्या प्रदेशावर स्वारी करून त्याला त्याच्या पुरी राजधानीत कोंडले. कर्नाटक कवी रन्न म्हणतो, ‘एका बाजूस सत्याश्रयाची सेना व दुसऱ्या बाजूस समुद्र यांच्या कैचीत सापडल्यामुळे अपराजिताची अवस्था जिची दोन्ही टोके जळत आहेत, अशा काठीवरील किड्यासारखी झाली’. नंतर शिलाहारांना चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले पण ते परमार भोजाला सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर स्वारी करून शिलाहार अरिकेसरी ऊर्फ केशिदेव याचा पराभव केला. त्यानिमित्त त्याने इ. स. १०२० मध्ये दिलेले दोन ताम्रपट सापडले आहेत.

अपराजितानंतर त्याचे छित्तराज, नागार्जुन व मुम्मुणिराज असे तीन पुत्र एकामागून एक गादीवर आले. छित्तराजाच्या कारकिर्दीत कदंब नृपती षष्ठदेव याने कवडीद्वीप जिंकले. तसेच कोल्हापूरच्या गोंक राजानेही अपराजिताचा पराभव करून ‘कोंकणाधिपति’ अशी पदवी धारण केली. छित्तराजाने अंबरनाथ येथील शिवालय बांधण्यास प्रारंभ केला. ते मुम्मुणीने पूर्ण केले. तेथे त्याचा सन १०६० चा शिलालेख सापडला आहे.

मुम्मुणीच्या कारकिर्दीत शिलाहार आणि कदंब यांचा वैवाहिक संबंध जळून आला. मुम्मुणीने (कार. सु. १०४५–७०) कदंब द्वितीय षष्ठदेव याचे स्वागत करून त्याला आपली कन्या अर्पण केली. मुम्मुणीच्या नंतर गूहल्लाने उत्तर कोकणावर स्वारी केली. यात त्याला कोणा एका मुसलमान अधिपतीचे साहाय्य झालेले दिसते. त्याने देश उद्ध्वस्त करून देवब्राह्मणांचा छळ केला पण पुढे नागार्जुनाचा मुलगा अनंतदेव याने यवन आक्रमकांना हाकून लावले.

अम्रेश्वर मंदिराच्या भिंतीवरील शिलाहारकालीन शिल्पे, अंबरनाथ, जि. ठाणे.
अम्रेश्वर मंदिराच्या भिंतीवरील शिलाहारकालीन शिल्पे, अंबरनाथ, जि. ठाणे.

अनंतदेव (सु. १०७०–१११०) ह्याच्या कारकिर्दीत अखेरीस कदंब दुसरा जयकेशी याने पुन्हा उत्तर कोकणावर स्वारी करून तेथील राजाला ठार केले आणि तो प्रदेश आपल्या राज्यात सामील केला. इ. स. ११२५–२६ च्या नरेंद्र येथील शिलालेखात जयकेशीचा ‘कवडीद्वीपाधिपति’ म्हणून उल्लेख आहे पण पहिल्या अपरादित्याने लवकरच आपल्या देशाला कदंबांच्या मगरमिठीतून सोडविले.

अपरादित्याने दूरच्या काश्मिरातही तेजःकंठ यास आपला वकील नेमले. तेथे त्याने याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरादित्याच्या अपरार्कानामक टीकेचा प्रचार केला.


यानंतरचा उल्लेखनीय शिलाहार नृपती मल्लिकार्जुन (कार. सु. ११५५–७०) हा होय. याच्या कारकिर्दीत गुजरातच्या चालुक्य कुमारपालाने कोकणावर स्वारी करून मल्लिकार्जुनाला ठार मारले आणि कोकण प्रदेश आपल्या राज्यास जोडला पण दुसऱ्या अपरादित्याने (कार. सु. ११७०–९५) तो परत मिळवून ‘महाराजाधिराज’ व ‘कोंकणचक्रवर्ती’ अशा स्वातंत्र्यनिदर्शक पदव्या धारण केल्या.

शेवटचा शिलाहार नृपती सोमेश्वर (कार. सु. १२५५–६५) यानेही याच पदव्या घेतल्या होत्या. त्याच्या काळी देवगिरीच्या यादवांची सत्ता वृद्धिंगत होत होती. त्यांना शिलाहारांच्या या पदव्या सहन होणे शक्य नव्हते. यादव सम्राट कृष्ण याने आपला सेनापती मल्ल यास कोकणावर स्वारी करण्यास पाठविले होते. त्याने विजय मिळविला असे म्हणतात पण यादवांचा फायदा झालेला दिसत नाही. नंतर कृष्णाचा भाऊ महादेव याने पुन्हा युद्धास सुरुवात करून गजसेनेसह कोंकणावर स्वारी केली. सोमेश्वराने जमिनीवर पराभव पावल्यावर समुद्राचा आश्रय घेतला पण तेथेही महादेवाने त्याचा पाठलाग करून त्याला जलसमाधी दिली. या प्रसंगाचे शिल्प बृहन्मुंबईत बोरिवली येथे सापडले आहे. हे युद्ध सु. १२६५ मध्ये झाले असावे. यानंतर यादवांनी आपला अधिकारी अच्युत यास कोंकणावर राज्यपाल म्हणून नेमले. त्याचा इ. स. १२७२ चा लेख मिळाला आहे.

शिलाहारांचे दुसरे घराणे दक्षिण कोकणात कार्यरत होते. आठव्या शतकाच्या द्वितीयार्धात राष्ट्रकूट नृपती पहिला कृष्ण याने दक्षिण कोकण जिंकून तेथे शिलाहारवंशी सणफुल्ल (कार. सु. ७६५–८५) याची प्रशासक म्हणून नेमणूक केली. या घरण्याच्या अकरा पिढ्या या प्रदेशावर राज्य करीत होत्या. प्रथम त्यांची राजधानी चंद्रपूर (दक्षिण गोवे प्रांतातील चांदोर) येथे होती. सणफुल्लाचा पुत्र धम्मियर याने बहुधा चंद्रपुरावर शत्रूचे आक्रमण झाल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बलिपत्तन नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. यातील काही राजांनी उत्तर कोकणच्या शिलाहारांशी व गोव्यातील कदंबांशी युद्ध करून विजय मिळविले होते.

हे शिलाहार आपले सम्राट राष्ट्रकूट यांच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले पण उत्तरकालीन चालुक्य सत्याश्रय याच्या कारकिर्दीत या घराण्याचा शेवटचा ज्ञात पुरुष रट्टराज (कार. सु. ९९५–१०२४) याला चालुक्यांचे स्वामित्व मान्य करावे लागले. पुढे चालुक्यांची सत्ता दुर्बल होताच त्याने त्यांचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला. नंतर गादीवर आलेल्या चालुक्य सम्राट जयसिंहाने या बंडखोर मांडलिकाचा उच्छेद करून त्याचे राज्य खालसा केले. दक्षिण कोकण जिंकल्यावर कोल्हापूर येथे तळ असताना जयसिंहाने दिलेला ताम्रपट १०२४ सालचा आहे. तेव्हा हे घराणे इ. स. सु. ७६५ ते १०२४ पर्यंत म्हणजे सु. अडीचशे वर्षे राज्य करीत होते.

शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव या जिल्ह्यांतील काही प्रदेशांवर राज्य करीत होते. काही जुन्या लेखांत कोल्हापूरचे ‘क्षुल्लकपुर’ असे नाव येते. या शाखेची इष्टदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी ही होती. तिचा वरप्रसाद आपणास प्राप्त झाला आहे, असे या शाखेचे राजे आपल्या ताम्रपटांत अभिमानाने सांगतात. हे घराणे राष्ट्रकुटांच्या पडत्या काळात उदयास आले म्हणून इतर शाखांप्रमाणे ते आपल्या आरंभीच्या ताम्रपटांत त्यांची वंशावळ देत नाहीत.

या शाखेचा मूळ पुरुष पहिला जगित हा इ. स. ९४० च्या सुमारास उदयास आला असावा पण तो व त्याचे दोन वंशज यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. या राजांपैकी काहींनी पांड्य राजांप्रमाणे आपल्या भावांस राजपदवीसह प्रांताधिपती केलेले दिसते. तेव्हा वंशवळीत त्यांची नावे आलेली असली, तरी ते एकाच काळी राज्य करीत होते.

सहावा विक्रमादित्य (कार. १०७६–११२६) याच्या काळात या घराण्याचा चालुक्य सम्राटांशी वैवाहिक संबंध जुळून आला. काश्मिरी राजकवी ⇨ बिल्हणाने विक्रमांकदेवचरितात विद्याधर (शिलाहार) राजकन्या चंद्रलेखा हिने करहाट (कऱ्हाड) येथे स्वयंवरात सहाव्या विक्रमादित्याला वरले असे वर्णन केले आहे. ते ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय नाही. सौंदर्याबद्दल तिची ख्याती दूरच्या काश्मीरपर्यंत पसरली होती. काश्मीरनृपती हर्ष याने कर्णाट राजा पर्मांडी (सहावा विक्रमादित्य) याच्या चंदला (चंद्रलेखा) राणीचे चित्र पाहिले, तेव्हा तो तिच्या सौंदर्याने वेडा झाला असे काश्मिरी कवी ⇨ कल्हणाने वर्णिले आहे. तिच्या पित्याचे नाव राजतरंगिणीत दिले नाही पण तो शिलाहार नृपती मारसिंह (कार. सु. १०५०–७५) असावा.

यानंतर या वंशातील उल्लेखनीय राजा गंडरादित्य (कार. सु. ११०५–४०) हा होता. विक्रमादित्याने त्याला ‘निःशंकमल्ल’ अशी पदवी दिली होती. याचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. त्याने इरुकुडी गावाजवळ गण्डसमुद्रनामक विशाल तलाव बांधून त्याच्या काठावर हिंदू, बौद्ध व जैन या तिन्ही धर्मांची देवळे बांधली होती. त्याचा पुत्र विजयादित्य (कार. सु. ११४०–७५) याने उत्तर कोकणचा राजा पहिला अपरादित्य याला त्याची गादी मिळवून देण्यास साहाय्य केले होते. विजयादित्याने कलचुरी बिज्जल यालाही चालुक्यांचा पराभव करून त्यांचे राज्य बळकाविण्यात मदत केली होती.


विजयादित्याचा पुत्र दुसरा भोज (कार. सु. ११७५–१२१२) हा या शाखेचा शेवटचा राजा होय. याला त्याच्या शौर्यामुळे ‘वीरभोज’ असे म्हणत. याने ‘राजाधिराज’, ‘परमेश्वर’, ‘पश्चिमचक्रवर्ती’ अशा सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. हे त्या काळी प्रबळ झालेल्या देवगिरीच्या यादवांना सहण होणे शक्य नव्हते. यादव नृपती ⇨ सिंघण (कार. १२१०–४६) याने त्याच्या राज्यावर स्वारी करून प्रणालक दुर्गाला (पन्हाळा किल्ल्याला) वेढा घातला आणि तो काबीज करून भोजाला त्याच किल्ल्यावर बंदीत टाकले. भोजाचा पराभव १२१२ च्या सुमारास झाला असावा. यानंतर यादवांच्या अधिकाऱ्यांचे लेख कोल्हापूर प्रदेशात मिळू लागतात. [→ भोज, दुसरा शिलाहार].

मिराशी, वा. वि.

सेविकांसह विष्णुप्रतिमा, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
सेविकांसह विष्णुप्रतिमा, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.

इतर प्राचीन भारतीय राजांप्रमाणे शिलाहारांनी धर्म, विद्या व कला यांना आश्रय दिला होता. दक्षिण कोकणच्या रट्टराजाने मध्य भारतातून आलेल्या मत्तमयूर पंथाच्या शैव आचार्यास ग्रामदान दिले होते. इतर शाखेच्या राजांचाही हिंदू व जैन धर्मास आश्रय होता. त्यांनी अनेक देवळे बांधली होती. त्यांतील काही अंबरनाथ, पेल्हार, कोल्हापूर व वाळकेश्वर येथे अद्यापि विद्यमान आहेत. कोल्हापूरच्या शिलाहारांनी महालक्ष्मीच्या पूजेअर्चेकरिता काही दाने दिली होती. तसेच जैन तीर्थंकरांच्या बस्तीकरिताही आणि जैन मुनींच्या योगक्षेमाकरिताही काही भूमी दिली होती.

शिलाहारांचा विद्येसही आश्रय होता. शिलाहार नृपती पहिल्या अपरादित्याने याज्ञवल्क्यस्मृतीवर अपरार्का टीका लिहिली होती. तिचा दूरच्या काश्मिरातही प्रसार झाला. छित्तराजाच्या व त्याच्या भावांच्या आश्रयास असलेल्या सोड्ढलाने उदयसुन्दरीकथा लिहिली होती. तीत शिलाहारांच्या दरबारी असलेल्या जैन व इतर अनेक कवींची नावे उदा., चंदनाचार्य, विजयसिंहाचार्य, महाकीर्ती, इंद्र इ. आली आहेत. जैनेंद्र व्याकरणातील शब्दार्णवचन्द्रिका ग्रंथाचा कर्ता सोमदेव हा कोल्हापूरच्या भोजाच्या आश्रयास होता.

कोल्हापूरच्या शिलाहारांनी बांधलेल्या अनेक मंदिरांपैकी खिद्रापूर (कोप्पेश्वर व ऋषभनाथ) आणि अंबरनाथ (शिव-अम्रेश्वर) येथील मंदिरे वास्तुशिल्पदृष्ट्या प्रसिद्ध आहेत. अंबरनाथ येथील शिवमंदिर हे तारकाकृती विधानाचे असून नागरशैलीतील भूमिज उपशैलीत बांधले आहे. गर्भगृह, अंतराल व सभागृह हे मंदिराचे तीन भाग असून शिखर पडले आहे. कीर्तिमुखे, गजरथ व नरथर हे अधिष्ठानात प्रतीकात्मक दर्शविले आहेत. सभामंडप व अंतराल यांची विताने (छत) समताल व करोटक पद्धतीची कलाकुसरयुक्त असून मधोमध कमळाकृती रचनाबंध आहे. बाहेरील भिंतीवर पूर्वेकडील कोनाड्यात उभी त्रिमूर्ती, उत्तरेकडे महाकाली, दक्षिणेकडे अष्टभुजानृत्या चंडिकादेवी या प्रमुख मूर्ती असून इतरत्र ब्रह्मा, तांडवनृत्यातील शिव, शिवपार्वती, गरुडारूढ विष्णू यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथील विलोभनीय शालभंजिका, यक्षी व सुरसुंदरी यांची संभ्रमविभ्रम अवस्थांतील शिल्पे रेखीव, प्रमाणबद्ध आणि कमनीय आहेत.

भिंतीवरील (पश्चिम बाजू) स्त्री-शिल्पे, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
भिंतीवरील (पश्चिम बाजू) स्त्री-शिल्पे, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.

कोल्हापूरच्या आग्नेयीकडील खिद्रापूर गावात असलेले कोप्पेश्वर मंदिर बाराव्या शतकातील असून चालुक्य वास्तुशैलीत बांधले असून त्याचे विधान तारकाकृती आहे. शिखराचे बांधकाम अपुरेच आहे. याच्या अधिष्ठानावर देवतारूढ अशा ९५ हत्तींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. बाहेरच्या भिंतींवर शिल्पपट्टांत व तीरशिल्पांत अनेक मूर्ती आढळतात. त्यांत शैवमूर्तींचे प्रमाण जास्त आहे. मूर्ती रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. अष्टदिक्पालांच्या दांपत्य-मूर्ती स्वर्गमंडपात आढळतात. मंदिराच्या भिंतीवरील विविध आकर्षक अवस्थांतील मदनिकांच्या रेखीव शिल्पांतून तत्कालीन केश-वेषभूषा आणि अलंकार यांचे मनोज्ञ दर्शन घडते. या मूर्तिसंभारात आलिंगन-चुंबनापासून संभोगापर्यंतची काही दृश्ये आहेत. त्यामुळे दक्षिणेचे ‘छोटे खजुराहो’ असा त्याचा उल्लेख करतात. दुसऱ्या ऋषभनाथ मंदिरातील श्रुतदेवता लक्षवेधक आहे.

संदर्भ : १. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.

           २. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४.

देशपांडे, सु. र.

 

शिलाहार हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागांतील राजघराणे होते. इ.स. ९ वे ते १३ वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार राजे तगरपूरवराधीश्वर असे बिरूद लावीत.

घराणी

शिलाहार वंशची तीन घराणी होती.

  1. उत्तर कोकणचे शिलाहार
  2. दक्षिण कोकणचे शिलाहार
  3. कोल्हापूरचे शिलाहार

ही तिन्ही घराणी स्वतःला विद्याधर जीमूतवाहन याचे वंशज मानत. जीमूतवाहनाने एका नागाला वाचवण्याकरिता आपला देह एका दगडावर (शिलेवर) बसून गरुडाला अर्पण केला होता. म्हणून त्याच्या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे.

उत्तर कोकणचे शिलाहार

उतर कोकणचे शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई,रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी 'पुरी' म्हणजेच आताचे रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी होय. कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय.

उत्तर कोकणचे शिलाहार शासक

शासककालखंड (इ.स.)
कपर्दी प्रथम८००-८२५
पुल्लशक्ती८२५-८५०
कपर्दी द्वितीय८५०-८८०
वप्पूवन्न८८०-९१०
झंझ९१०-९३०
गोग्गीराज९३०-९४५
वज्जड प्रथम९४५-९६५
छद्वीदेव९६५-९७५
अपराजित९७५-१०१०
वज्जड द्वितीय१०१०-१०१५
अरीकेसरी१०१५-१०२२
छित्तराज१०२२-१०३५
नागार्जुन१०३५-१०४५
मुम्मिनीराज१०४५-१०७०
अनंतदेव प्रथम१०७०-११२७
अपरादित्य प्रथम११२७-११४८
हरीपालदेव११४८-११५५
मल्लिकार्जुन११५५-११७०
अपरादित्य द्वितीय११७०-११९७
अनंतदेव द्वितीय११९७-१२००
केशीदेव द्वितीय१२००-१२४५
अनंतदेव तृतीय१२४५-१२५५
सोमेश्वर१२५५-१२६५

दक्षिण कोकणचे शिलाहार

दक्षिण कोकणचे शिलाहार हे सध्याच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इ. दक्षिणी कोकण प्रदेशात राज्य करत होते. त्यांची राजधानी वलीपट्टण म्हणजेच आत्ताचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण होय. सणफुल्ल हा यांचा मूळपुरुष होता.

दक्षिण कोकणचे शिलाहार शासक

शासककालखंड (इ.स.)
सणफुल्ल७६५-७९५
धम्मियर७९५-८२०
ऐयपराज८२०-८४५
अवसर प्रथम८४५-८७०
आदित्यवर्मा८७०-८९५
अवसर द्वितीय८९५-९२०
इंद्रराज९२०-९४५
भीम९४५-९७०
अवसर तृतीय९७०-९९५
रठ्ठराज९९५-१०२०

कोल्हापूरचे शिलाहार

कोल्हापूरचे शिलाहार हे सध्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव इ. प्रदेशांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी वळीवडे (वळवडे /राधानगरी), कोल्हापूर, प्रणालक (पन्हाळा) या ठिकाणांवर होती. जतिग हा त्यांचा मूळ पुरुष होता.

कोल्हापूरचे शिलाहार शासक

शासककालखंड(इ.स.)
जतिग प्रथम९४०-९६०
न्यायवर्मा९६०-९८०
चंद्र९८०-१०००
जतिक द्वितीय१०००-१०२०
गोंक१०२०-१०५०
गुहल प्रथम-
कीर्तिराज-
चंद्रादित्य-
मारसिंह१०५०-१०७५
गुहल द्वितीय१०७५-१०८५
भोज प्रथम१०८५-११००
बल्लाळ११००-११०८
गोंक द्वितीय-
गंडारादित्य प्रथम११०८-११३८
विजयादित्य प्रथम११३८-११७५
भोज द्वितीय११७५-१२१२

लय

देवगिरीचे सिंघण यादव यांनी शिलाहारांचा पराभव केला.

शिलाहारांवरील मराठी पुस्तके

  • शिलाहार कालीन नगरी दिवे आगर (निर्मला गोखले)

 उत्तर कोकणातील शिलाहार राजवंश


राष्ट्र्कुट नृपती तृतीय गोविंदाने आपला सेनापती व मांडलिक कपर्दी शिलाहारास चालुक्यांविरूद्ध मोहिमेत साथ दिल्याबद्दल उत्तर कोकणाचे मांडलिक बनवले. हा कपर्दी म्हणजे उत्तर कोकण शिलाहार सत्तेचा पहिला राजा. या घराण्याने उत्तर कोकणावर तब्बल 350 वर्षे राज्य केले.
उत्तर कोकणातील शिलाहार राजवंश
उत्तर कोकणाचा इतिहास शिलाहारांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. उत्तर कोकणास किंवा राजधानी पुरीस त्याकाळी कपर्दीद्वीप किंवा कवडीद्वीप असेही म्हणत व राजधानी अर्थात पुरी (मुंबई) हीच होती. शिलाहारांची एकूण तीन घराणी होती एक म्हणजे आपले उत्तर कोकण शिलाहार (ठाणे, कुलाबा, मुंबई), दुसरे दक्षिण कोकण शिलाहार हे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये राज्य करीत होते आणि तिसरे घराणे कोल्हापूरचे शिलाहार. यांच्या घराण्याच्या उगमाची कथासुद्धा नागांचा कोकणाशी संदर्भ दाखवते. ही तिन्ही घराणी आपणास विद्याधर राजा जीमूतवाहनाचे वंशज म्हणवीत. या जीमूतवाहनाने एका नागाला वाचविण्याकरिता स्वत:चा देह एका शिलेवर बसून गरूडाला अर्पण केला होता; म्हणून या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरूडाचा आहार) असे नाव पडले, ही आख्यायिका शिलाहारांच्या लेखात सापडते.

कपर्दीनंतर तिसर्‍या पिढीतल्या वप्पुसन्न राजाच्या (काळ. सु. 880-910) काळात राष्ट्रकूट सम्राट द्वितीय कृष्ण याने ठाणे जिल्ह्राचा उत्तर भाग मधुमती (मुहम्मद) या मुसलमान सामंताच्या ताब्यात दिला. तेथे त्याच्या तीन पिढ्या राज्य करीत होत्या. त्यांची राजधानी संयान (डहाणू तालुक्यातील संजान) येथे होती. ही दोन्ही घराणी राष्ट्रकूट सम्राटांचीच मांडलिक होती; पण त्यांच्यात वारंवार खटके उडत, असे दिसते. इ.स. 974 मध्ये झालेल्या राष्ट्रकुटांच्या पतनानंतर शिलाहार अपराजिताने त्यांचा उच्छेद करून त्यांचा प्रदेश खालसा केला. हे घराणे शेवटपर्यंत राष्ट्रकूट सम्राटांशी एकनिष्ठ राहिले. मात्र राष्ट्रकुटांच्या पतनानंतर अपराजिताने उत्तरकालीन चालुक्य सम्राट तैलपापुढे मान न वाकवता आपल्या स्वातंत्र्याच्या निदर्शक अशा "पश्चिमसमुद्राधिपति' आणि "मांडलिकत्रिनेत्र' अशा पदव्या धारण केल्या. पुणक (पुणे), संगमेश्वर व चिपळूण जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याची सीमा दक्षिण कोकणात व घाटावर नेली. त्याच्या ताम्रपटात त्याच्या राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : उत्तरेस लाट (दक्षिण व मध्य गुजरात), दक्षिणेस चंद्रपूर (गोव्यातील चांदोर), पश्चिमेस समुद्र व पूर्वेस यादव भिल्लमाच्या खानदेशातील राज्यापर्यंत. त्याने मावळच्या नृपती सिंधुराज याच्या छत्तीसगडातील स्वारीत आपला पुत्र पाठवून त्यास साहाय्य केले होते, असे पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरित काव्यावरून दिसते.

चालुक्यांना अपराजिताचे सामथ्र्य सहन होणे शक्य नव्हते. तैलपाचा पुत्र सत्याश्रय याने त्याच्या प्रदेशावर स्वारी करून अपराजित राजास त्याच्या पुरी राजधानीत कोंडले. "एका बाजूस सत्याश्रयाची सेना व दुसर्‍या बाजूस समुद्रातले बेट पुरी यांच्या कैचीत सापडल्यामुळे अपराजिताची अवस्था जिची दोन्ही टोके जळत आहेत, अशा काठीवरील किड्यासारखी झाली'. नंतर अपराजिताला चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले; या मानहानीनंतर अपराजित फार काळ जगू शकला नाही.  अपराजिताच्या मागून त्याचा पुत्र द्वितीय वज्जड गादीवर आला. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ अरिकेसरी उर्फ केशिदेव गादीवर आला. अरिकेसरीने चालुक्यांचे स्वामित्व मान्य केले पण ते भोजाला सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर स्वारी करून शिलाहार अरिकेसरी ऊर्फ केशिदेव याचा पराभव केला. अरिकेसरीनंतर त्याचे छित्तराज, नागार्जुन व मुम्मुणिराज असे तीन भाऊ एकामागून एक गादीवर आले.

छित्तराजाच्या कारकीर्दीत कदंब नृपती षष्ठदेव याने कवडीद्वीप जिंकले. तसेच कोल्हापूरच्या गोंक राजानेही अपराजितचा पराभव करून "कोकणाधिपति' अशी पदवी धारण केली. छित्तराजाने अंबरनाथ येथील शिवालय बांधण्यास प्रारंभ केला. ते मुम्मुणीने पूर्ण केले. तेथे त्याचा सन 1060 चा शिलालेख सापडला आहे. मुम्मुणीच्या कारकीर्दीत शिलाहार आणि कदंब यांचा वैवाहिक संबंध जुळून आला. मुम्मुणीने (सन 1045-70) कदंब द्वितीय षष्ठदेव याचे स्वागत करून त्याला आपली कन्या अर्पण केली. मुम्मुणीच्या नंतर गूहल्लाने उत्तर कोकणावर स्वारी केली. यात त्याला कोणा एक अरब मुस्लिम अधिपतीचे साहाय्य झालेले दिसते. त्याने देश उद्ध्वस्त करून कोकणातल्या जनतेचा छळ केला; पण पुढे नागार्जुनाचा मुलगा अनंतदेव याने यवन आक्रमकांना हाकलून लावले. अनंतदेव राजाचा ताम्रपट खारेपाटण येथे सापडला असून त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्ठींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल, ठाणे व सोपारा या बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. ही करमाफी फक्त त्यांनाच नव्हे तर त्यांचे पुत्र आणि नातू श्रेष्ठी पनम, श्रेष्ठी कुडकल, श्रेष्ठी मलय आणि इतर अनेक लोकांनासुद्धा लागू होती. अनंतपालाच्या कारकीर्दीच्या अखेरीस शिलाहारांचा परत गोव्याच्या कदंबाशी झगडा उत्पन्न झाला. या झगड्यात कदंब नृपती जयकेशी याने उत्तर कोकणावर स्वारी करून अनंतदेवास ठार मारले आणि उत्तर कोकण आपल्या ताब्यात घेतले.

अनंतदेवाचा मुलगा अपरादित्य यांच्या काळात मोठी दैन्यावस्था आली होती. कदंबाच्या स्वारीच्या वेळी आजूबाजूचे मांडलिक त्यास जाऊन मिळाले यामध्ये काही अरब मांडलिकांचासुद्धा समावेश होता. एका शिलालेखामध्ये त्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे "छित्तुक नामक असुराने कोकणावर स्वारी केली, त्यावेळी मांडलिक त्याला जाऊन मिळाले. धर्माचा नाश झाला, वृद्धांचा छळ झाला. प्रजाजन जिर्णशिर्णी झाले व राष्ट्राची कीर्ती धुळीला मिळाली. तथापि न डगमगता अपरादित्य घोड्यावर स्वार होऊन एकटा रणांगणात घुसला आणि आपल्या बाहुबलाच्या आणि तरवारीच्या योगे त्याने शत्रूचा नि:पात केला" अपरादित्य हा अतिशय पराक्रमी व न्यायी राजा होता. आणि सर्व कलांचा अधीपति होता. तो स्वत: लेखक असून त्याने याज्ञवल्क्य स्मृतीवर "अपारर्कटिका' नामक ग्रंथ लिहिला होता जो आजही काश्मिरमध्ये प्रमाण मानला जातो. अपरादित्याने आपले वकील तत्कालिन राजांच्या दरबारी नेमले होते. मंखाच्या श्रीकंठचरितामध्ये अपरादित्याने काश्मिरच्या जयसिंग दरबारी नेमलेल्या तेज:कंठ या दुताचा उल्लेख आहे. मंखाने आपले श्रीकंठचरित काव्य सादर केले. तेव्हा कुंकणाधिपती अपरादित्याचा दूत म्हणून तेज:कंठ हा उपस्थित होता. अपरादित्यानंतर त्याचे दोन पुत्र मल्लिकार्जुन व हरिपाल गादीवर आले. या काळात कुमारपाल चालुक्याची स्वारी कोकणावर झाली असल्याचे दिसून येते. यानंतर द्वितीय अपरादित्य, द्वितीय केशिदेवराय आणि शेवटी सोमेश्वर गादीवर आला. सोमे•ार हा उत्तर कोकण शाखेचा शेवटचा शिलाहार.

याच्या काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता प्रबळ होत होती. यादव नृपती कृष्ण याने उत्तर कोकणावर स्वारी केली होती मात्र यादवांना फार काही फायदा झाला नसल्याचे दिसून येते. मात्र कृष्णाचा लहान भाऊ महादेव याने परत एकदा कोकण मोहीम उघडली आणि मोठ्या हत्तींच्या तांड्यासह कोकणावर हल्ला केला. प्रथम महादेवाने स्थानक म्हणजे ठाणे या राजधानीवर हल्ला केला येथे सोमेश्वराचा पराभव होऊ लागल्याचे दिसू लागताच त्याने समुद्रात स्थित असलेल्या पुरीचा म्हणजे मुंबईचा आसरा घेतला. जी शिलाहारांची पूर्वीची राजधानी होती मात्र तिची भौगोलिक रचना ही (द्वीपांची) बेटांची असल्याने शत्रूने हल्ला केल्यास निसटण्यासाठी मार्ग उपलब्ध होत नसत. कारण ती तीनही बाजूने समुद्राने वेष्टित होती तिला शिलाहारांनी दुसरी राजधानी बनवले होते. सोमेश्वराने पुरीचा आश्रय घेतल्यावर झालेल्या तुंबळ सागरी युद्धात सोमेश्वर जहाजासहीत बुडून मरण पावला व तब्बल चारशे वर्षे कोकणावर राज्य केलेले शिलाहार साम्राज्य नष्ट झाले. शिलाहारांनी कोकणाचा सर्वांगीण विकास केला. येथे सध्या दिसून येणारी अनेक मंदिरे ही शिलाहारकालिन आहेत. शिलाहारांनी बौद्ध, जैनांसहित सर्व पंथांना उदार आसरा दिला.

शिलाहार राजवंश आणि गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट

 

मल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख

शिलाहार राजा हरिपालदेव याच्यानंतर सत्तेवर आलेल्या मल्लिकार्जुन याचे चिपळूण (शके १०७८) आणि वसई (शके १०८३) असे दोन शिलालेख उपलब्ध आहेत. हे दोन्ही शिलालेख गद्धेगाळ स्वरूपात आहेत.

मल्लिकार्जुन याचा शिलालेख असलेली गद्धेगाळ वसई येथे मिळालेली आहे. या शिलालेखाची पहिली नोंद बॉम्बे गॅझेटियरमध्ये (खंड १ – भाग २, पान क्र २०) करण्यात आलेली आहे. त्यानंतर डॉ. सांकलिया आणि एस. सी. उपाध्याय यांनी एपिग्राफिया इंडिकामध्ये (खंड २३, पान क्र २७४) ठस्याशिवाय या शिलालेखाचे संपादन केले. वा. वि. मिराशी यांनी १९७७ साली शिलाहारांवर लिहिलेल्या पुस्तकात या शिलालेखाचा ठसा दिलेला आहे. सद्यस्थितीत हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आहे.

शिळा ४६.९९ सेंमी रुंद आणि १०३.९७ सेंमी उंच आहे. शीर्षभागात चंद्रसूर्य आहेत. चंद्रसूर्याच्या खाली असलेल्या चौकोनात दोन व्यक्ती आणि एक मोठे व एक लहान अशी दोन शिवलिंग दाखवली आहेत. मोठे शिवलिंग उंच साळुंखेवर स्थापन केले आहे. या दोन्ही व्यक्ती स्त्रिया असाव्यात असे त्यांच्या केसरचनेवरून वाटते. या दोन्ही स्त्रियांनी/व्यक्तींनी आपले हात शिवलिंगावर ठेवले आहेत.

लेखाची भाषा संस्कृत असून नागरी लिपीत कोरलेला आहे. लेख कोरणाऱ्या व्यक्तीने हा लेख अत्यंत निष्काळजीपणे कोरला आहे. तसेच लेख कोरताना दान दिलेल्या तिथीचा वार बुधवारऐवजी सोमवार कोरला आहे. कोरणाऱ्या व्यक्तीकडून ही चूक का झाली हे कळत नाही.

शिलालेखाचा ठसा

वाचन

सिद्ध | स्वस्ति | सकु संवत १०८३ (वृ)षसयसरान्तर्गत
पुष्ये मासि व दि १५ सोमदिने || सूर्ज पर्व्वणि
अद्येह समधिगताशेषपंचमहासब्द महासामंता
धिपतितगरपुरपरमेश्वर | श्रीसीलाहारनरेंद्र
इत्यादिसम(स्त)रा(जा)वलीविराजितश्रीमल्लिकार्जुनदेव
राज्ये | महासांधिविग्रहिकप्रभाकरनायको श्री
करणे प्रथमस्थपाटिमहाप्रधानश्रीअणतपैप्रभा द्विती
यस्थपाटिअमुक | सत्यपालतु काले प्रवर्तमाने सती
राजगुरुश्रीवे(द)सिव | भोप(क)व्यमसिव | विवेक (मूलो)
गुणपलवौघ: || संपतिसाप: स च कीर्तिपु(ष्प) स्त्रे(य:)फले
ज(या)चककल्प(वृक्ष:) श्रीभोपकव्यमसिवो विभाति || ताभ्यां च पु
रु(ष)भ्यां स जीर्नोधारो | कारित महदुगिव झासुत: | लाष
णवङ्गकेन (कृ)त: …. प्रसादेन | ता(भ्यं) गुरुकुले
(वा)पी च …. कटष(डी)विषयंत:पाती | पटालकस | लो
नवाटको | लाषण उवाझाय दत: | तथा धमादा(य:) तप: सौखा
(य) संप(प्र)दत | जश्च वुरुष: | एतत्पाल्यते वाप: तपि स धणं ल
(भ)ते ….न केनापि प्रति: विजानीथ | यस्तु परिपथी (भ)वत
तस्य माता गदभेन

भाषांतर

सिद्धी असो. वृष संवत्सर शके १०८३, सोमवार पौष वद्य अमावस्या या दिवशी सूर्यग्रहणानिमित्त, पंचमहाशब्द, महासामंताधिपती, तगरपूरपरमेश्वर इ. राजबिरुदे लावणाऱ्या शिलाहार राजा मल्लिकार्जुन याच्या कार्यकाळात, तसेच महासंधिविग्रहिक प्रभाकरनायक, मुख्य खजीनदार महाप्रधान अनंतपैप्रभू आणि दुय्यम खजिनदार अमुक, राजगुरु वेदशिव आणि भोपक व्योमशिव हे मंत्रिमंडळात कार्यरत असताना…यानंतर यानंतर भोपक व्योमशिव स्तुती केलेली आहे. हा भोपक याचना करणाऱ्यांसाठी कल्पवृक्ष आहे, त्या कल्पवृक्षाची पाने म्हणजे त्याचे सद्गुण, फांद्या म्हणजे संपत्ती, प्रसिद्धी म्हणजे फुले आणि अध्यात्मिकता म्हणजे झाडाला लागलेली फुले आणि तो कोणताही भेदभाव पाळत नाही अशा स्वरूपात भोपक व्योमशिव याची स्तुति केलेली आहे. या दोघांनी शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धाराचे काम महदुगिव झा याचा मुलगा लशण वंगक याने पूर्ण केले. तसेच या दोघांनी आपल्या गुरूच्या निवासस्थानाजवळ विहीर खणली. त्याचबरोबर लशण उपाध्याय याला कटषडी विषयातील पटालकस विभागातील लोणवाटक हे गाव दान करण्यात आले.

हे दान जो सांभाळून ठेवेल त्याला ऐश्वर्य प्राप्त होईल. कोणीही ह्या दानाला विरोध करू नये. या दानात जो अडथळा आणेल त्याच्या आईला गाढव……..

लेखात तगर, लोणवाटक, कटषडी व पटालकस या चार स्थानांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी लोणवाटक म्हणजे भिवंडी तालुक्यातील लोणाड हे गाव असावे. कटषडी व पटालकस या दोन गावांच्या बाबतीत ठोस माहिती उपलब्ध नाही आणि तगर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे सर्वमान्य आहे.

भोपक व्योमशिव, अनंतपैप्रभू व अमुक यांचे इतर शिलालेखातील उल्लेख

अपरादित्य दुसरा याच्या लोणाड (शके ११०६) व परळ (शके ११०८) या दोन शिलालेखात भोपक व्योमशिव याचा राजगुरु म्हणून उल्लेख आलेला आहे. तसेच मल्लिकार्जुनाच्या वसई शिलालेखाशिवाय महाप्रधान अनंतपैप्रभू व अमुक यांचा उल्लेख अपरादित्य दुसरा याच्या काळातील परळ शिलालेखात (शके ११०८) पण करण्यात आलेला आहे.

संदर्भ

  • Corpus Inscriptionum Indicarum, Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)

शिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे

सह्याद्रीत भटकंती करताना नाशिक ते जुन्नर या भागात उगम पावणाऱ्या नद्यांच्या उगमस्थानाजवळ शिवभक्त शिलाहार राजा झंज याने बारा शंकराची मंदिरे बांधली ही आख्यायिका ऐकायला मिळते. पण खरोखर ही मंदिरे झंज राजाने बांधली आहेत का? शिलाहार राजांच्या आजपर्यंत उपलब्ध असलेल्या विविध शिलालेख आणि ताम्रपट यांच्याद्वारे झंज आणि त्याने बांधलेल्या (?) शिवमंदिराचा आढावा ह्या लेखाद्वारे घेऊया.

राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा (शके ७१५-७३६) याच्या काळात राष्ट्रकुट घराण्याचे मांडलिक म्हणून शिलाहारांचा उदय झाला. उत्तर कोकणातील शिलाहार राजघराण्यातील राजा वप्पूवन्न याचा मुलगा झंज. राजा वप्पूवन्न यांच्यानंतर झंज सत्तेवर आला.

झंजाच्या आधी व छित्तराजापर्यंत होऊन गेलेले शिलाहार राजे

झंज राजाचा राज्यकाल किती होता सांगणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे. आजपर्यंत झंज राजाचा कोणताही शिलालेख किंवा ताम्रपट अभ्यासासाठी उपलब्ध झालेला नाही आहे. झंज राजाचा कोणताही पुराभिलेखीय पुरावा (शिलालेख/ताम्रपट) नसल्यामुळे त्याच्या काळातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी किंवा त्याच्या राज्यकाळात त्याने बांधलेल्या मंदिरांची माहिती मिळू शकत नाही.

शिलाहार राजघराण्यातील कपर्दी पहिला, वप्पूवन्न, झंज, गोग्गी, वज्जड पहिला आणि वज्जड दुसरा या राजांचा कोणताही पुराभिलेखीय पुरावा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यकाळाबद्दल निश्चित सांगता येत नाही. असे असले तरी अ. स. आळतेकर यांनी शके ८३२-८५२ हा झंज राजाचा कार्यकाळ निश्चित केला आहे. वि. वा. मिराशी यांनी शिलाहार राजांवर लिहिलेल्या पुस्तकात अ. स. आळतेकर यांनी झंज राज्याचा सांगितलेलाच कार्यकाळ नमूद केला आहे.

अरब इतिहासकार आणि भूगोलतज्ञ अल मसुदी याने आपल्या प्रवासवर्णनात सन ९१६ मध्ये शिलाहारांसंदर्भात पुढीलप्रमाणे नोंद करून ठेवली आहे. “सामूर (चौल) येथे राज्य करणाऱ्या राजाचे नाव झंज (Djandja) असे आहे.”

झंज राजाच्या काळात त्याचे राज्य कुठून कुठपर्यंत पसरले होते ह्याची निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे. पुरी येथील राष्ट्रकुट राजघराण्याचे “महामंडलेश्वर” अशी उपाधी लावून शिलाहारांनी उत्तर कोकणावर श्रीस्थानक (आताचे ठाणे) ह्या आपल्या राजधानीतून राज्य केले.

झंज राजाच्या मंदिराबद्दल इतिहासकारांनी शिलाहार राजा छित्तराजा याच्या नंतर सत्तेवर आलेल्या राजांच्या निवडक शिलालेख आणि ताम्रपटांचा विचार केलेला दिसून येतो. सन १८८० मध्ये के. टी. तेलंग यांनी खारेपाटण येथील राजा अनंतदेव याचा प्रकाशित केलेला ताम्रपट अ. स. आळतेकर यांनी संदर्भ म्हणून वापरला आहे. तर वि. वा. मिराशी यांनी शिलाहार राजघराण्याच्या शिलालेखांवर आधारित पुस्तकात “त्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी स्वतःच्या नावाने शिवाची १२ मंदिरे बांधली. पण ती आता नष्ट झाली असावीत.” असे विधान केले आहे. पण ह्या विधानाला मिराशी यांनी कोणताही पुरावा दिला नाही आहे.

मंदिर प्रकरणाची सुरुवात

झंज राजाने बांधली म्हणून ज्या मंदिरांचा उल्लेख केला जातो, ती मंदिरे पुढीलप्रमाणे.

०१. गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक (अहिल्यातीर्थानजीक असलेले भग्न शिवालय)
०२. वाकी नदी, त्रिंगलवाडी, जिल्हा नाशिक
०३. बाम नदी, बेलगांव, जिल्हा नाशिक
०४. धारणा नदी, तऱ्हेळे, जिल्हा नाशिक
०५. कडवा नदी, टाकेद, जिल्हा नाशिक
०६. प्रवरा नदी, रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०७. मुळा नदी, हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०८. पुष्पावती नदी, खिरेश्वर, नागेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
०९. कुकडी नदी, पूर, कुकडेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१०. मीना नदी, पारुंडे, ब्रम्ह्नाथ मंदिर, जिल्हा पुणे
११. घोड नदी, वचपे, सिध्देश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१२. भीमा नदी, भोरगिरी येथील शिवमंदिर, भोरगिरी, जिल्हा पुणे

वरील मंदिरांची यादी बघितल्यास यातील एकही मंदिर उत्तर कोकणात नाही आहे. ही सगळी मंदिरे घाटमाथ्यावर आहेत.

झंज राजाच्या मंदिरासाठी शिलाहार राजा अपरादित्य याचा पन्हाळे (ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी) ताम्रपटात असलेल्या श्लोकाचा संदर्भ दिला जातो. पण पन्हाळे ताम्रपट अपरादित्य राजाने दिलेलाच नाही आणि संदर्भासाठी दिलेला श्लोक पण अर्धवट आहे. “घ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानी” ह्याचा अर्थ आहे “झंजाने स्वतःच्या नावाने शंकराची बारा मंदिरे उभारली. हि मंदिरे म्हणजे धार्मिक वृत्तीच्या माणसांसाठी स्वर्गात जाणारी पहिली पायरी असेल.” ह्या संपूर्ण श्लोकात फक्त मंदिरांचा उल्लेख आहे. मंदिरे कोणती हे सांगितलेले नाही.

ताम्रपटातून आढळणारे झंजाचे आणि मंदिरांचे उल्लेख

छद्वैदेव याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स) शके ८७० या काळातील ताम्रपट आहे. झंज राजाचा उल्लेख असलेला पहिलाच ताम्रपट म्हणून हा महत्त्वाचा ताम्रपट आहे. या ताम्रपटात झंजाचे वर्णन करणारा श्लोक आहे. “झंज: सकलगुनौघै: संपहो (न्नो) गीयते जगत्यनिशं| आखंडल इव तस्मादभवत्सां (ग्रामिकैर्) गुणै (वि)दित:” याचा अर्थ आहे “त्याच्यापासून झंज ज्याची संपूर्ण जगात प्रशंसा केली जात होती, त्याच्याकडे अनेक गुणवत्ता होत्या. युध्दकौशल्यामध्ये तो इंद्रासारखाच निपुण आहे.” छद्वैदेव याने झंज राजाची तुलना इंद्राबरोबर केली आहे. परंतु त्याने कोणत्याही मंदिरांचा उल्लेख केलेला नाही आहे. तसेच छद्वैदेव नंतर सत्तेवर आलेल्या कोणत्याही शिलाहार राजाने छद्वैदेव याचा उल्लेख केलेला नाही आहे. तसेच झंज राजानंतर गोग्गी आणि गोग्गीनंतर छद्वैदेव सत्तेवर आले. याचाच अर्थ झंज आणि छद्वैदेव यांच्यामध्ये कमीतकमी साधारणपणे ३० वर्षांचे अंतर असावे. तसेच झंज व छद्वैदेव यांचे नाते आजोबा-नातू असे होते.

छद्वैदेव राजानंतर त्याचा भाचा अपराजित सत्तेवर आला आणि याच्याच राज्यकाळात ताम्रपटांचा मसुदा निश्चित करण्यात आला. अपराजित याचे शके ९१५ मधील दोन ताम्रपट जंजिरा येथे सापडले आहेत आणि दोन्ही ताम्रपटात झंजाबद्दल वर्णन करणारे श्लोक सारखेच आहेत. जंजिरा ताम्रपटात “झंजनामा सुतस्तस्माद्वप्पुन्नादभूदसौ । उदितोदितता येन वंशस्य प्रकटिकृता ||२०|| चतुरश्चतुरारा स्योपि नकृत्स्नान्गदितुंगुणान् । स(श)रद भ्रसितान्यस्याचतुरास्ये तु का कथा ||२१|| तस्यानुजो निजभुजोर्ज्जितारि: श्रीगोग्गीराज इह श्रीझंजराणकगुणान्दधानस्त्यागा भ्दुजङविजयीर्म्मडिझंजनामा ||२२||” असे झंजाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ आहे “वपुवन्नापासून जन्माला आलेल्या मुलाचे नाव झंज होते आणि त्याने घराण्याचे नाव उच्चपदाला नेले. तसेच त्याच्याकडे असलेल्या चांगल्या गुणांची बरोबरी ब्रम्हदेवसुध्दा करू शकत नाही. झंजानंतर गादीवर आलेल्या त्याच्या धाकट्या भावाकडे म्हणजे गोग्गीकडे सुध्दा त्याच्या मोठ्या भावासारखेच चांगले गुण आहेत. म्हणून त्याला “इर्मडी झंज” किंवा “तरुण झंज” अशी उपाधी दिली आहे.” या श्लोकात सुध्दा कोणत्याही मंदिरांचा उल्लेख आलेला नाही.

अपराजित यांच्या शके ९१९ मधील भदना ताम्रपटात “वपुवन्नापासून जन्माला आलेल्या मुलाचे नाव झंज होते आणि त्याने घराण्याचे नाव उच्चपदाला नेले” अश्या अर्थाचा श्लोक आहे. इथे पण कुठेही मंदिराचा उल्लेख आलेला नाही.

अपराजितनंतर सत्तेवर आलेल्या अरीकेशरी (वज्जड दुसरा याचा भाऊ आणि छित्तराजा याचा काका) राजाचा एकमेव ताम्रपट शके ९३९ मधील असून तो ठाणे येथे सापडला. या ताम्रपटात झंजाचे वर्णन “त्याचा मुलगा (वप्पुवन्नाचा) झंज हा पराक्रमी होता” असे केलेले आहे.

अरीकेशरी नंतर त्याचा भाचा छित्तराजा सत्तेवर आला. याचे आत्तापर्यंत ७ ताम्रपट उपलब्ध झालेले आहेत. शिलाहार घराण्यातील हा एकमेव राजा ज्याचे एवढे ताम्रपट उपलब्ध आहेत. झंज राजाने बांधलेल्या शिवमंदिराचा पहिल्यांदा उल्लेख असणारा छित्तराजा याच्या राज्यकाळातील पहिला ताम्रपट कल्याण येथे सापडला. या ताम्रपटाचा काळ शके ९४१ असा आहे. या ताम्रपटात मंदिरासाठी पुढील श्लोकरचना आहे. “शंभोर्यो द्वादशापि व्यरचयदचिरात्कीर्तनानिस्वना म्ना सोपानानीव मन्ये प्रणत तनुभृतां स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां” याचा अर्थ आहे “त्याने शंकराची बारा मंदिरे बांधली आणि ती त्याच्या नावाने ओळखली जाऊ लागली. धार्मिक वृत्तीच्या माणसांसाठी ती मंदिरे म्हणजे स्वर्गात जाणारी पहिली पायरी असेल.” छित्तराजाच्या भोईघर (शके ९४६) च्या ताम्रपटात फक्त “स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां” फक्त एवढाच उल्लेख आहे. भोईघर ताम्रपट गहाळ झालेला असल्यामुळे संपूर्ण श्लोक उपलब्ध नाही आहे. पण हा श्लोक झंज राजाशीच निगडीत असावा असे मिराशी यांचे मत आहे. छित्तराजाचा पनवेल ताम्रपट (शके ९४७) काळातील आहे. ह्या ताम्रपटाच्या फक्त एकाच पत्र्याच्या फोटो उपलब्ध आहे. इतर पत्रे गहाळ झालेले असल्यामुळे ह्या ताम्रपटातील झंजाचे वर्णन माहिती नाही. छित्तराजाच्या भांडूप (शके ९४८) व दिवे आगार (शके ९४९) या ताम्रपटात अनुक्रमे “श्रीझंज इत्यभवदस्य सुत:” (त्याचा मुलगा (वप्पुवन्नाचा) पराक्रमी झंज होता आणि “श्रीझंजराजस्ततोभूत्” (त्याच्यानंतर झंजराजा होता) असे झंजराजाचे वर्णन आले आहे. छित्तराजाच्या भोईघर, भांडूप व दिवेआगार ताम्रपटात मंदिराचा उल्लेख आलेला नाही. पुन्हा मंदिरांचा उल्लेख एकदम शके ९५६ काळातील व सध्या बर्लिन येथे असलेल्या ताम्रपटात मिळतो. बर्लिन ताम्रपटात “तस्माज्जातस्तनूजो रजनिकर इवानदिताशेषलोक श्लाघ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानीव मन्ये प्रणत तनुभृ तां स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां” अशा स्वरूपाचे झंज राजा व त्याच्या मंदिरांचे वर्णन आले आहे. या श्लोकाचा अर्थ “त्याचा (वप्पुवन्नाचा) कौतुकास्पद मुलगा पराक्रमी झंज सत्तेवर आला. चंद्र आकाशात आल्यानंतर जसा लोकांना आनंद लोकांना होतो, तसाच आनंद झंज सत्तेवर आल्यानंतर लोकांना झाला. सूर्य जसा अंधार दूर करतो तसाच अंधकार त्याने दूर केला. त्याने स्वतःच्या नावाने शंकराची बारा मंदिरे उभारली. ही मंदिरे म्हणजे धार्मिक वृत्तीच्या माणसांसाठी स्वर्गात जाणारी पहिली पायरी असेल.” चिंचणी ताम्रपट (शके ९५६) छित्तराजाचा मांडलिक चामुंड राजा याचा असल्यामुळे त्या ताम्रपटात झंजाचा उल्लेख नाही आहे.

छित्तराजा याचा बर्लिन ताम्रपट

नागार्जुन राजा ठाणे (९६१), मुम्मुणी ठाणे (९७०), मुम्मुणी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय (९७१), अनंतदेव खारेपाटण (१०१६), महाकुमार केशिदेव ठाणे (१०४२), अपरादित्य वडवली (१०४९), विक्रमादित्य पन्हाळे (१०६१) आणि मल्लिकार्जुन पन्हाळे (१०७३) या नंतरच्या सर्व ताम्रपटात छित्तराजाने झंज राजाबद्दल व मंदिरांबद्दल बर्लिन ताम्रपटात लिहिलेलाच श्लोक लिहिलेला आहे.

झंज राजाने बांधलेल्या मंदिरासाठी ज्या अपरादित्य राजाच्या पन्हाळे ताम्रपटाचा आधार घेतला जातो असा कोणताही ताम्रपट ह्या राजाचा नाही. अपरादित्य राजाचा वडवली ताम्रपट आहे आणि पन्हाळे ताम्रपट एक नसून दोन आहेत. त्यापैकी पहिला ताम्रपट विक्रमादित्य (शके १०६१) व दुसरा ताम्रपट मल्लिकार्जुन (शके १०७३) या राजाचा आहे. तसेच ज्या श्लोकाचा संदर्भ दिला जातो, तो अर्धवट आहे. पूर्ण श्लोक: तस्माज्जातस्तनूजो रजनिकर इवानदिताशेषलोक श्लाघ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानीव मन्ये प्रणत तनुभृ तां स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां. हा संपूर्ण श्लोक सद्यस्थितीत बर्लिनमध्ये असलेल्या छित्तराजाच्या शके ९५६ च्या ताम्रपटात आधीच आला आहे.

वरील ताम्रपटांचा अभ्यास केल्यानंतर छित्तराजाच्या कल्याण व बर्लिन ताम्रपटात पहिल्यांदा झंज राजाचे नाव शिवमंदीरांशी जोडले गेलेले दिसते. जर झंज राजाने शंकराची मंदिरे बांधली असती तर त्याचा उल्लेख झंजानंतर सत्तेवर आलेल्या गोग्गी किंवा छद्वैदेव यांनी नक्कीच केला असता. पण झंज राजानंतर साधारणपणे ८९ वर्षानंतर सत्तेवर आलेल्या छित्तराजा याने केलेला आहे. छित्तराजाच्या आधीच्या राजांनी ताम्रपटात झंज राजाने बांधलेल्या शंकराच्या मंदिराविषयी काहीच भाष्य का केलेले नाही ह्याचे समाधानकारक उत्तर मिळणे सध्यातरी कठीण आहे.

जर झंजाने मंदिर ताम्रपटातील नोंदीनुसार शंकराची मंदिरे बांधली असतील तर त्याची नोंद झंजानंतर सत्तेवर आलेल्या गोग्गी आणि छद्वैदेव यांनी का नाही घेतली.

जर झंज राजाच्या काळात ह्या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असे मानले आणि ही मंदिरे त्याच्या कार्यकालात पूर्ण न होता नंतरच्या राजांच्या कार्यकालात पूर्ण झाली असे मानले, तर त्या राजांनी शिलालेख नोंदून ठेवले असते. उदा. अंबरनाथ शिवमंदिरातील राजा मम्मुनी याचा शिलालेख. छित्तराजा हा पण मोठा शिवभक्त होता. त्याने अंबरनाथ येथील प्रसिध्द भूमिज शैलीतील शिवमंदिर बांधायला सुरुवात केली. पण ते मंदिर छित्तराजाच्या कारकि‍र्दीत पूर्ण न होता मम्मुनी राजाच्या कार्यकालात पूर्ण झाले. तर अंबरनाथ मंदिरात तश्या अर्थाचा शिलालेख कोरून ठेवला आहे. या शिलालेखात हे मंदिर छित्तराजा याने बांधायला सुरुवात केले आणि मम्मुनी याच्या काळात काही अधिकाऱ्यांनी मंदिराचे काम पूर्ण केले असे नमूद केले आहे. ह्या शिलालेखाचा काळ शके ९८२, शुक्रवार ९ आणि श्रावण महिना आहे. मंदिराचे काम ज्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले त्यांची नावे सुध्दा दिलेली आहेत. उदा. महामात्य बिंबपैय, महाप्रधान नागनैय इ.

शिलाहार राजांनी मंदिरे बांधली आणि त्या मंदिरांसंदर्भात त्यांनी शिलालेख पण कोरून ठेवले आहेत. त्या शिलालेखांमध्ये मंदिराचे नाव, काळ, मंदिराला जमीन दान दिली असेल तर त्याचे उल्लेख, मंदिर कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाले इ. अनेक संदर्भ वाचायला मिळतात. उदा. १) लोणाड येथील अपरादित्य दुसरा याच्या शके ११०६ मधील गध्देगाळीवर कोरलेल्या शिलालेखात “व्योमेश्वर” मंदिराचा उल्लेख आहे. लोणाड गावात शिलाहारकालीन मंदिर आहे आणि तो शिलालेख ह्याच मंदिरासंदर्भात असावा. २) चौधरपाड्यातील केशीदेव दुसरा याच्या शके ११६१ काळातील शिलालेखात “श्रीषोंपेश्वर” असा मंदिराचा उल्लेख आला आहे.

मंदिर की कीर्तन?

वरील सर्व ताम्रपटात मंदिराऐवजी ‘कीर्तन’ हा शब्द वापरला आहे. तर कीर्तन म्हणजे नक्की काय? हा प्रश्न वाचकांना पडू शकतो. झंज राजाने बारा शिवकीर्तन बांधली असे वरील ताम्रपटात वाचायला मिळते. दिनेशचंद्र सरकार यांच्या मते “कीर्तने म्हणजे एखाद्या राजाच्या नावामुळे प्रसिध्द झालेले मंदिर अथवा वास्तू. शिलाहारराजांच्या समकालीन असलेल्या इतर राजांच्या ताम्रपटांमध्ये कीर्तन हा शब्द आलेला आहे.

झंज राजाने बांधली म्हणून जी बारा मंदिरे सांगितली जातात, त्यापैकी फक्त हरिश्चंद्रेश्वर, अमृतेश्वर आणि नागेश्वर हीच तीन मंदिरे मूळ रुपात आहेत. बाकीची मंदिरे धरणाच्या पाण्यात गेलेली आहेत किंवा त्यांचे आधुनिकीकरण झालेले आहे. मंदिराची शैली ओळखण्यासाठी मंदिराचे शिखर महत्त्वपूर्ण ठरते. हरिश्चंद्रेश्वर मंदिर नागर शैलीत, अमृतेश्वर मंदिर भूमिज शैलीत आणि नागेश्वर मंदिर फांसणा शैलीत आहेत. कुकडेश्वर मंदिराचा शिखर नष्ट झालेले असल्यामुळे त्याची निश्चित शैली सांगता येणार नाही. जर झंज राजाने ही मंदिरे बांधली आहेत, तर त्यांची शैली वेगवेगळी का?

तसेच झंज राजा मंदिरे बांधतो ती पण त्याच्या राजधानीपासून भरपूर लांब ठिकाणी. असे का? त्याला मंदिरे बांधायचीच असती तर ती त्याने राजधानीच्या आसपास बांधली असती. ज्या प्रदेशात ही सगळी मंदिरे आहेत तो प्रदेश झंज राजाच्या ताब्यात होता का हे पण आपल्याला माहिती नाही. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील नद्यांच्या उगमावर असलेली बारा मंदिरे झंज राजानेच बांधलेली आहेत ह्या दाव्याला आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही आहे.

संदर्भ

  • Mokashi, Rupali 2016 King Jhanja and the Legend of Shiva Temples: An Epigraphical Analysis. Research Deliberation, Vol II / Issue I (May, 2016) 8:3, pp. 25–41.
  • Kanhere, Gopal 1988 The Temples of Maharashtra. Maharashtra Information Centre, New Delhi
  • सूत्रधार मंडन विरजित प्रासाद मंडन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
  • गद्रे, प्रभाकर २०१० मंदिर स्थापत्याचा इतिहास, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर
  • Fergusson, James History of Indian and Eastern Architecture (Vol. I & II), Rupa Publications, New Delhi
 

केशिदेव दुसरा याचा चौधरपाडा शिलालेख आणि षोंपेश्वर मंदिर

कल्याण-आधारवाडी-सापे रस्त्याने उल्हास नदीवरील गांधारी पूल ओलांडल्यानंतर बापगाव नावाचे गाव आहे. गावकरी आणि अभ्यासक सोडल्यास फार कमी लोकांना बापगावला ७८० वर्षांचा इतिहास आहे याची माहिती असेल. केशिदेव दुसरा याच्या चौधरपाड्यातील शके ११६१ (सन १२३९) मधील शिलालेखात बापगाव किंवा बोपेग्रामचा पहिला उल्लेख वाचायला मिळतो.

शिलाहार राजघराण्यातील केशिदेव दुसरा बाविसावा राजा. अनंतदेव दुसरा याच्यानंतर केशिदेव दुसरा सत्तेवर आला. याचे याचे मांडवी (शके ११२५), अक्षी (शके ११३१) आणि चौधरपाडा (शके ११६१) असे तीन शिलालेख उपलब्ध आहेत.

काही वर्षांपूर्वी माळरानावर पडलेला गद्धेगाळ
(सौजन्य – डॉ. रुपाली मोकाशी)

बरीच वर्ष किंवा शतक हा शिलालेख चौधरपाड्याजवळील माळरानावर पडून होता. गावकऱ्यांना त्या शिलालेखाचे महत्त्व समजावून सांगितल्यानंतर गावात असलेल्या शिवमंदिराच्याशेजारी शिलालेखाचे जतन करून ठेवण्यात आले आहे. सन १८८२ मध्ये पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी हा शिलालेख उजेडात आणून त्याचे वाचन केले. शिलालेख २२ ओळींचा आहे. लेखाची भाषा संस्कृत आणि नागरी लिपी आहे. लेखाच्या वरील भागात चंद्र-सूर्य आणि मध्यभागी कलश आहे. शिलालेखाच्या खाली गद्धेगाळाचे शिल्प आहे.

वाचन

सिद्धम् ओं नमो विनायकाय || नमामि भुवनोत्पत्तिस्थितिसंहारकारिणं | श्रीमत्षुंपेस्व-
रं भक्तजनसर्वार्त्तिहारिणं ||१|| श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्जीमूतकेतो: कु-
ले विख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय श्रीकेशिपृथ्वीपति: | यस्यापारपवित्र-
पौरुषनिधेरालोक्य राज्यस्थिर्ति श्रीरामादिमहीभुजां भगवती धत्ते
धरा न स्मृतिं ||२|| सकसंवत् ११६१ विकारिसंवत्सरान्तर्ग्गतमाघ व दि १४
चतुर्द्दश्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणि अद्येह समस्तराजावलीसमलंकृ-
तमहाराजाधिराजकोंकणचक्रवर्त्तिश्रीकेशिदेवकल्याणवि-
जयराज्ये तथैतत्प्रसादात्समस्तराजमंडलचिंताभारं समुव्दहति
महामात्ये श्रीझंपडप्रभुमहासांधिविग्रहि के राजदेवे पंडितश्री-|
करणभांडागारे अनंतप्रभुप्रमुखेषु सत्सु एतस्मिन्काले प्रवर्त्तमाने
सति ब्रह्मपुरीग्रामदानसासनं समभिलिक्षते यथा || श्रीषोंपेश्व-
रदेवपूजनसदाव्यासक्तसर्व्वा(न्तर:) | सत्पात्रव्दिजसोमनायक व –
टो: संतानयोग्यस्थिति | श्रीब्रह्मपुरीं पुरारिभवनक्ष्माभृन्मनोहा-
रिणीं | वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: ||३|| वटुक-
नामानि कथ्यंते | सोमनायक: | सूर्य्यनायक: | गोविंदनायक: | ना(ऊ)-
नायक: | इति चत्वारो वटुका: || निर्व्वाहाव पुरारिपूजकबटुश्रेणीद्वि-
जानां सदा वो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे)सपल्ली पुरा दत्ता श्रीशि-
वरात्रि पर्व्वणी विभो: षोंपेस्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चं-
द्रार्क्कतारावधि ॥४॥ (राज्य)स्य मंत्रिणान्यैर्व्वा कर्त्तव्यं धर्म्मपालनं । धर्म-
ध्वंशे …….. नरकस्थिति ॥५॥ तथा चोक्तं पूर्वाचार्यमुनि-
भि: । सुवर्ण्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं । हरन्नरकमाप्नोति या-
(वदाभूत)संप्लवं ॥६॥ मंगलं महाश्री: । (शुभं भ)वतु ॥ लेषकपाठकयोः ॥

भाषांतर

सिद्धी असो. विनायकाचे नमन. विश्वाची उत्पत्ती, सांभाळ आणि संहार करणाऱ्या आणि सर्व भक्तांचे दु:ख दूर करणाऱ्या षोंपेश्वरासमोर मी नतमस्तक होतो. राजा अपरार्क (दुसरा) याचा मुलगा राजा केशी (देव) जो पराक्रमी विद्याधर वंशातील अमुल्य रत्न आहे आणि जीमूतवाहन वंशात सर्वपरिचित आहे. शक ११६१ विकारीन संवत्सर, शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, गुरुवार चतुर्दशी १४, माघ वद्य या दिवशी, त्याच्या आज्ञेनुसार राज्यकारभार सांभाळणारे महामात्य झंपडप्रभु, महासांधीविग्रही राजदेव पंडित, कोषाधिकारी अनंतप्रभु आणि इतर जण असताना ब्रम्हपुरी गावाचे दान दिल्याची राजाज्ञा पुढीलप्रमाणे लिहिण्यात आली आहे: षोंपेश्वराचा परमभक्त असलेल्या शूर आणि पराक्रमी केशी याने पुरारी (शिव) याचे ब्रह्मपुरी येथे भव्य आणि प्रसिद्ध मंदिराची निर्मिती केली, सोमनायक ब्राम्हणाच्या वंशजांकडे मंदिराचे हक्क अबाधित राहतील. सोमनायक, सूर्यनायक, गोविंदनायक आणि नौनायक ब्राम्हणांची नावे आहेत. पराक्रमी राजा केशी (दुसरा) याने षोंपेश्वराच्या समक्ष बोपेग्रामातील मांजसपल्लीचे दान दिले. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत आणि पुरारीचे (शिवाचे) जोपर्यंत ब्राम्हण पूजन करतील तोपर्यंत हे दान कायम राहील. हे दान सांभाळून ठेवण्याचे धर्मपालन मंत्री आणि इतरांनी करावी. हे दान नष्ट करणारा नरकात जाईल. हे आमच्या गुरुंनीं अर्थात प्राचीन ऋषीमुनींनी नमूद करून ठेवले आहे. सर्वत्र मंगलमय आणि भरभराट होऊ दे. तसेच लेखकाचे आणि वाचकाचे कल्याण व्हावे.

शिलाहार राजे शंकराचे भक्त होते. त्यामुळे इतर देवतांची स्तुती शिलालेखातून बघायला मिळत नाही. हा पहिला शिलालेख आहे ज्यात विनायकाचे (गणपती) वंदन केले आहे. लेखात सोमनायक नंतर उल्लेखलेले सूर्यनायक, गोविंदनायक आणि नौनायक हे सोमनायकचे मुलगे आहेत. कारण लेखात स्पष्ट लिहिलेले आहे सोमनायकाच्या वंशजांकडेच मंदिराचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत. लेखात बोपग्राम, ब्रह्मपुरी आणि मांजसपल्ली अशा तीन स्थळांचा उल्लेख आहे. त्यापेकी बोपग्राम म्हणजे चौधरपाड्यापासून जवळच असलेले बापगाव. बोपग्रामतील बहुदा वाडी असलेले मांजसपल्ली गाव काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. षोंपेश्वराचे मंदिर असलेले ब्रह्मपुरी म्हणजे आजचे चौधारपाडा असावे.

ज्या षोंपेश्वर मंदिराचा उल्लेख वरील शिलालेखात आहे, ते मंदिर बापगाव किंवा चौधारपाडा परिसरात होते. केशीदेवाने “श्रीब्रह्मपुरीं पुरारिभवनक्ष्माभृन्मनोहारिणीं म्हणजे ब्रह्मपुरी येथील शिवमंदिर पृथ्वीतलावरील अत्यंत मनोहारी आहे” असे कोरून ठेवले आहे. एवढे सुंदर मंदिर कधी आणि कसे नष्ट झाले ह्याचे उत्तर आज कोणाकडेच नाही आहे. मंदिर नष्ट झाले तरी मंदिराच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले भव्य शिवलिंग आणि उमा-महेश्वर मूर्ती मात्र सुस्थितीत आहेत आणि त्यांची स्थापना पाड्यातील मंदिरात करण्यात आली आहे.

उमा शंकराच्या डाव्या मांडीवर बसलेली असून तिचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आणि डाव्या हातात कमळ आहे. शिवाच्या उजव्या हातांमध्ये त्रिशूळ व माहळूंग आणि एक डावा हात उमाच्या डाव्या खांद्यावर आहे व दुसऱ्या हातात नाग आहे. उमाच्या डाव्या बाजूला गणपती आणि शिवाच्या उजव्या बाजूला मोरावर आरूढ कुमार (कार्तिकेय) आहे. शंकराच्या पायाजवळ वाहन नंदी आहे. शिवलिंग उंचीला साधारणपणे २ फूट आहे. याचे योनीपीठ चौकोनी आकाराचे आहे.

संदर्भ

  • Corpus Inscriptionum Indicarum, Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)
शिलाहारकालीन साहित्य
03/07/2019अंकुर काणे
मध्ययुगीन इतिहास
शिलाहार हे महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन राजघराणे. या राजघराण्यातील राजांनी विद्या, कला आणि साहित्य यांना उदार आश्रय दिला होता. त्यांच्या काळात अनेक उत्तमोत्तम असे ग्रंथ संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झाले. काळाच्या ओघात यांतील बहुतांश ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. यांपैकी संस्कृत कवी सोड्ढलरचित उदयसुन्दरीकथा, याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरार्कटीका आणि सोमदेवाची जैनेंद्रव्याकरणावरची शब्दार्णवचन्द्रिका हे ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच कर्णपार्याचा नेमिनाथपुराण हा कन्नड भाषेतील एकमेव ग्रंथ आज संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी आहे. शिलाहार राजांच्या दरबारी अनेक प्रतिभावान कवींना आश्रय मिळाला होता, हे त्यांच्या ताम्रपटातील भाषेचा दर्जा आणि मजकुराची सुंदर रचना यावरून लक्षात येते. परंतु त्यांची नावे अज्ञात आहेत.
कवी सोड्ढलकृत उदयसुन्दरीकथा : शिलाहार नृपती मुम्मुणिराज याचा आश्रित सोड्ढल कवी याचे हे चंपू प्रकारातील गद्य काव्य असून यात नागलोकाची राजकन्या उदयसुंदरी आणि प्रतिष्ठान म्हणजेच पैठणचा राजा मलयवाहन यांच्या लग्नाची कथा आहे. हे काव्य आठ उच्छ्वासांमध्ये रचले आहे. त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी कवीने स्वतःविषयी आणि आपल्या घराण्याविषयी माहिती दिली आहे. हर्षचरितकर्ता कवी बाण याचा या काव्यावर विशेष प्रभाव दिसून येतो. तसा उल्लेख सोड्ढलाने काव्यात केला आहे. या काव्यात अनेक समकालीन राजांचे उल्लेख असल्यामुळे याच्या रचनेचा काळ ठरवणे तुलनेने सोपे जाते. इ. स. च्या अकराव्या शतकात याची निर्मिती झाली असावी. या काव्यातील उल्लेखांवरून असे दिसते की, याची निर्मिती लाटदेश (दक्षिण गुजरात) आणि उत्तर शिलाहार राज्यांच्या सीमावर्ती भागात झाली असावी. कवीने यात समासांचा भरपूर वापर केला आहे; परंतु त्यात श्लेष नसल्यामुळे काव्य सहजसुंदर झाले आहे. कवीची सौंदर्यदृष्टी आणि अचूक निरीक्षणशक्ती काव्यातील विविध वर्णनांवरून प्रत्ययास येते. समकालीन कवी व त्यांचे काव्यग्रंथ तसेच शिलाहार नृपती मुम्मुणी याने केलेला आदरसत्कार यांचे वर्णनही या काव्यात आले आहे. आरंभीच्या चंपू काव्याचे उदाहरण म्हणून संस्कृत साहित्याच्या इतिहासात या काव्यास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरार्कटीका : या ग्रंथाचे श्रेय शिलाहार नृपती पहिला अपरादित्य किंवा अपरार्क याला देण्यात येते. ग्रंथाच्या सुरुवातीला प्रास्ताविक श्लोकात ग्रंथकर्त्याविषयी माहिती आहे. त्यात कवीने स्वतःला जीमूतवाहनाच्या वंशातील म्हणविले आहे. तसेच टीकेच्या शेवटच्या श्लोकामध्ये आलेल्या वर्णनानुसार कवी राज्यकर्त्या वर्गातला असावा, याची खात्री पटते. जीमूतवाहनाचा वंश म्हणजे शिलाहार वंश हे सर्वज्ञात आहे. तेव्हा या ग्रंथाचा कर्ता शिलाहार राजा पहिला अपरादित्य हा असण्याची दाट शक्यता आहे. अनेक इतिहासकारांचे मत असे आहे की, या ग्रंथाची निर्मिती अपरादित्याच्या दरबारातील पंडितांनी केली असावी; परंतु त्याचे श्रेय मात्र राजाला दिले गेले असावे. या ग्रंथाची निर्मिती इ. स. च्या बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झाली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. अपरार्काच्या या ग्रंथास पूर्वोक्त प्रास्ताविक श्लोकात टीका म्हटले असले, तरी ती रूढ अर्थाने टीका नसून मूळ ग्रंथाचे अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी लिहिलेला निबंध आहे, असे ग्रंथकर्त्यानेच अखेरच्या श्लोकात म्हटले आहे. अपरार्क ज्या वेळी ह्या ग्रंथाची रचना करत होता, तोपर्यंत हिंदू समाजात धार्मिक व सामाजिक बाबतींत अनेक बदल घडून आले होते. अपरार्काने याज्ञवल्क्यऋषींच्या वचनांचा सरळ अर्थ सांगितला आहे. त्यानंतर त्यावरची इतर धर्मशास्त्रकारांनी मांडलेली मतेही सांगितली आहेत आणि मग त्याविषयी स्वतःचे मत मांडले आहे. हा ग्रंथ काश्मीरमध्ये प्रमाण मानला जातो.
सोमदेवकृत शब्दार्णवचन्द्रिका : महाराष्ट्रातील शिलाहार या मध्ययुगीन वंशातील कोल्हापूर शाखेतील दुसरा शिलाहार भोज राजा याचा आश्रित कवी सोमदेव (सोमेश्वर) याने जैनेंद्र व्याकरणावरच्या गुणनंदीकृत शब्दार्णव या ग्रंथावरील शब्दार्णवचन्द्रिका ही टीका लिहिली. या ग्रंथाच्या शेवटी असा उल्लेख आढळतो की, याची रचना श्रीकोल्लापुर देशातील आजुरिका महास्थानामध्ये महामंडलेश्वर गंडरादित्याने बांधलेल्या त्रिभुवनतिलकनामक जिनालयात (वसतीत) पूर्ण केली. श्रीकोल्लापूर म्हणजे आजचे कोल्हापूर आणि त्यातील आजुरिका म्हणजे आजचे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरे गाव होय. याची रचना शिलाहार राजा वीरभोजदेवाच्या काळात इ. स. १२०५ मध्ये झाली. ग्रंथात लेखक स्वतःला तीर्थंकर महावीरांचा अनुयायी म्हणवतो. या टीकेची रचना मूलसंघाच्या माघचंद्राचा शिष्य नागचंद्र याच्या हरिचंद्र नावाच्या शिष्याकरिता केली. सोमदेवाने आपल्या ग्रंथात दिलेली उदाहरणे सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत.
कर्णपार्याकृत नेमिनाथपुराण : कोल्हापूरचे शिलाहार राजे आणि त्यांचे मांडलिक यांनी कन्नड ग्रंथकारांनासुद्धा उदार आश्रय दिला होता. या ग्रंथाची रचना कर्णपार्याने केली. हा शिलाहार राजा विजयादित्य याचा समकालीन होता. त्याने या ग्रंथात विजयादित्य आणि त्याचा पिता गंडरादित्य यांची स्तुती केली आहे. त्याने हा ग्रंथ कोल्हापूर जिल्ह्यातील हेर्ले गावात असलेल्या चंद्रप्रभ तीर्थंकर यांच्या त्रिभुवनतिलक नावाच्या मंदिरात लिहिला. या ग्रंथात वर्णिलेली एक घटना ऐतिहासिक घटनेवर आधारित असावी, असा अंदाज इतिहासकारांनी व्यक्त केला आहे. ती म्हणजे राजा विजयादित्य याने गोमंथगिरीवर स्वारी करून ते जिंकून घेतल्याची घटना. कोल्हापूरचे शिलाहार राजे कर्नाटक राज्यामधील शिमोगा जिल्ह्यातील गोमंथ येथून आले होते आणि गोमंथगिरीमधील चंद्रगुप्ती ही त्यांची राजधानी होती, असे उल्लेख मिळतात. विजयादित्याने आपल्या पूर्वजांच्या भूमीवर ताबा मिळवला म्हणून आपल्या गोमंथशैलाग्रावरील जन्मभूमीला त्याने मुक्त केले आणि स्वतः तिला विभूषित केले, असे कर्णपार्याने म्हटले आहे. त्याने या ग्रंथात त्याच्या आधी होऊन गेलेल्या अनेक आचार्यांचा आणि ग्रंथकारांचा उल्लेख केलेला आहे.
शिलाहार काळातील प्रमुख साधनांमध्ये वरील समकालीन साहित्याचा समावेश होतो. समकालीन ग्रंथांमधून त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक जीवनाविषयी अमूल्य माहिती मिळते. यामुळेच शिलाहार राजांच्या इतिहासलेखनासाठी या ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
संदर्भ :
Sharma, Sudarshan Kumar, Udaysundari Katha of Soddhala, Parimal
Publications, Delhi, 2004.
Kane, P. V. History of Dharmasastra (Ancient and mediaeval Religious and
Civil Law In India), Bhandarkar Oriental Research Insitute, Pune, 2006.
खरे, ग. ह. संपा., दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३०.
मिराशी, वासुदेव विष्णु, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९७४.








 

‘पुरी’कथेतील राजकुमारा...


⚔ ‘पुरी’कथेतील राजकुमारा...
(शोध हरवलेल्या राज्याचा, शोध इतिहासाच्या पाऊलखुणांचा)

     दहिसरला एक सदिच्छा भेट घेऊन ‘बोरीवली वेस्ट’ला जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. ज्या ठिकाणी जायचं ती वास्तू फारशी प्रसिद्ध नाही, स्थानिक लोकही त्याबाबत अनभिज्ञ. त्यामुळे फक्त “देविदास रोड, बोरीवली वेस्टला याल का?” असा प्रश्न  विचारला. हिंदीत होकारार्थी प्रतिसाद आला. आता ज्या वास्तूच्या शोधात मी निघालोय ते रिक्षावाल्याला हिंदीत सांगणं कठीण जाईल हे जाणून शांतपणे रस्ते शोधून देणाऱ्या गुगलताईंची मदत घ्यायचे ठरवले. हिरव्या झाडींमध्ये लपलेल्या बोरीवली पश्चिमेच्या दिशेने रिक्षा निघाली. यावेळेसच्या शोधमोहीमेत संसारातील एकमेव मार्गदर्शक आमच्या सौभाग्यवतीही सोबत होत्या. रिक्षाने मंडपेश्वर लेणींना वळसा घालताच आमच्या मोबाईलचे नेटवर्कही कैलासवासी झाले. आता इच्छित स्थळाचा शोध घेणे आणखिनच कठीण झाले. गुगल मॅपवर मागे एकदा ‘देविदास रोड’वरील एल.आय.सी. कॉलनीचे नाव वाचल्यासारखे आठवले. चालकाला एल.आय.सी. कॉलनीजवळ नेण्यास सांगीतले. त्यानेही ‘इधर पुछता हूँ-उधर पुछता हूँ’ करत  कॉलनीच्या फाटकापर्यंत कसंतरी पोहोचवलं.
  ‘इथपर्यंत पोचलो, आता पुढे काय?’ असा प्रश्न निर्माण झाला. इतक्यात माझ्या मोबाईलचे नेटवर्क अवतीर्ण झाले. आपल्या लक्ष्यापासून आपण किती लांब आहोत याची थोडीफार ‘आयडीया’ आली.
डाव्या बाजूला फक्त 200 मीटर! - गुगलताईंनी मृदू आवाजात माहिती पुरवली. सूचनेप्रमाणे वळलो. मुख्य रस्त्याला लागून एका शाळेच्या परिसरातून पुढे जाऊ लागलो. गुगलताईंनी दाखवलेल्या जागेत ‘क्लब अॅक्वेरिया’ नावाची गगनचुंबी इमारत. मी ज्या आठशे वर्षापूर्वीच्या वास्तूचा शोध घेत आहे ती इथे कशी असू शकेल, अशी शंका मनात डोकावली.
वीरगळांची जागा
इमारतीसमोरील सिक्युरिटीला विचारावं म्हणून पुढे जाताच दोन इमारतींच्या मध्ये वसलेल्या लहानशा वासुदेव मंदिराच्या मागे, एका कुंपणाआड मला ती ‘वास्तू’ दिसली.
(https://g.co/kgs/sTV7h4)

   वॉचमनच्या परवानगीने त्या जागेत गेलो. समोर सात-साडेसात फुट उंचीचे दोन भव्य ‘विरगळ’ उभे होते. बाजूला मूळ तेवढ्याच उंचीचे परंतु मोडतोड झाल्याने पाच फुटापर्यंत शिल्लक असलेले एक आणि कलशाचा भाग दाखवणारे दोन भग्न विरगळ दिसत होते.
शेजारच्या अत्याधुनिक  इमारतीची
 भव्यता विसरून जाऊ इतके आकर्षक आणि भव्य विरगळ सन्मानाने उभे होते. या वीरगळांना स्थानिकांनी देवत्व बहाल केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. कसेही का होईना पण या कंपाऊंडमध्ये एकूण पाच महत्त्वपूर्ण वीरगळ सुरक्षितपणे ठेवलेले आहेत, हे पाहून आनंद वाटला. यातील दोन शिल्पांवर  जमिनीवरील  युद्ध तर दोन शिल्पपटांवर नौकायुद्धाचे चित्रण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कलेच्या बाबतीत अशी अप्रतिम वीरगळ मी पाहीली नाही.
हत्तीदळ
 पायदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि नाविकदल अशा चारही दळांच्या वापराचे सूक्ष्म चित्रण यात आहे.या वीरगळांच्या देखणेपणाचा कळस म्हणजे  त्यावरील आकर्षक कलश. 
कलश
स्वर्गरोहणाचे प्रतिक असलेला कलश सुंदर अप्सरा घेऊन जात असल्याचे चित्र दिसते.  चार चौकटींमधून कोरलेले युद्धप्रसंगाचे चित्रण कल्पकता आणि कलात्मकता दोघांचाही उच्च संयोग दर्शवतो.
नौकायुद्ध
 यातील व्यक्तींची वस्त्र प्रावरणे, अलंकार, वाद्ये याबाबतीतही अतिशय बारकाईने काम केले आहे. काळाच्या ओघात वीरगळाची थोडी झीज झाली असली तरी त्याच्या मूळ सौंदर्यात आणि भव्यतेत कमीपणा आलेला नाही, हे विशेष.


इतके भव्य आणि आकर्षक वीरगळ आहेत तरी कोणाचे?

या वीरगळांची ‘पुरी’कथा आहे तरी काय?

खरं तर एखाद्या परीकथेपेक्षाही सुरस वाटू शकेल इतके या विषयावरील ऐतिहासिक संदर्भ आज उपलब्ध आहेत.
चला, या  शिल्पांबाबत थोडं अधिक जाणून घेऊया.
      मूळ  एकसार(बोरीवली पश्चिम) गावातल्या या शिल्पांवर कोणतीही तिथी किंवा कोणाचेही नाव कोरलेले नाही.
   पुरातत्ववेत्ता हेन्री कझेन्सच्या मते  शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धाचे व त्यात वीरमरण पत्करलेल्या सोमेश्वराचे शिल्पचित्रण त्यात आहे.
‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी’ या पुस्तकातदेखिल एकसारचे विरगळ सोमेश्वराचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
  या दोन्ही तज्ञांना दुजोरा देत या विरगळांचे महत्त्व सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या ‘महाराष्ट्रातील विरगळ’ या पुस्तकात खूप चांगल्या रितीने विशद केले आहे.
        या विरगळांशी संबंधित शिलाहारांची राजवट इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रात उभी राहिली. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण प्रांतात त्यांचा प्रभाव होता. खरं तर हे राजे सुरूवातीला केवळ राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक म्हणून काम पहात होते. परंतु हे मांडलिकत्व केवळ  नावापुरतेच होते. शिलाहार राजे स्वतःला महामंडलेश्वर, कोकणाधिपती, कोकणचक्रवर्ती, राजाधिराज अशा उपाध्या लावत. संपूर्ण कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य करणारे हे राजे स्वतःला विद्याधरकुलीन राजपुत्र जीमूतवाहनाचा वंशज मानत.
या शिलाहार नावामागची कथादेखिल रंजक आहे.
एका प्राचीन दंतकथेप्रमाणे जीमूतवाहनाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे एका शिळेवर बलिदान दिले होते. ह्या प्रसंगापासूनच त्यांच्या कुलाला शिलाहार (शिला-आहार) असे नाव पडले, असे मानले जाते.
     तर छत्रपती शिवाजी महाराज  वस्तूसंग्रहालयातील (जुने नाव- प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) शिलाहार राजा छद्वैदेवाच्या ताम्रपटात सिलार नावाच्या पराक्रमी वीराने परशुरामाच्या बाणापासून संत्रस्त झालेल्या समुद्राचे रक्षण केले, असा उल्लेख आहे. याच सिलाराच्या कुळाला पुढे सिलारा-सिलाहारा-शैलाहार-शिलाहार असे नाव मिळाले, असेही समजले जाते.

        शिलाहारांच्या जवळपास दहा वेगवेगळ्या शाखांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात राज्य केले. त्यापैकी महाराष्ट्रातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार ही तीन घराणी प्रभावी मानली जातात.  उत्तर कोकणचे आणि कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला तगरपुराधीश्वर असे गौरवाने म्हणवून घेत. शिलाहार राजे शैवपूजक असल्याचे त्यांनी उभारलेल्या अनेक शिवमंदिरावरून लक्षात येते. अंबरनाथचे सुप्रसिद्ध शीवमंदिरही त्यांच्याच राजवटीतील. हे राजे शांतताप्रिय असल्याचे मानले जाते. त्यांच्या राजवटीत हिंदू, बौद्ध, जैन धर्म मोकळेपणाने नांदत असल्याचे मत इतिहासतज्ञ व्यक्त करतात.  त्यांनी दिलेल्या विविध दानपत्रांमध्ये बौद्ध विहारांसाठीदेखिल तरतूद केल्याचे आढळते. आपल्या  कथेतील सोमेश्वर राजाच्या अंमलाखाली ‘अपरान्त’ म्हणजेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील जवळपास चौदाशे गावे होती. या  शिलाहारांची राजधानी श्रीस्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही होती. त्यांच्या पहिल्या राजधानीचे नाव 'पुरी' होते असे काही ताम्रपटांवरून आणि शिलालेखांवरून दिसते. काही संशोधक मुंबईजवळील घारापुरी बेट किंवा जंजिर्‍याजवळील राजापुरी हिलाच हे राजधानीचे ठिकाण मानतात. घारापुरी (Elephanta Caves) हेच राजधानीचे ठिकाण असावे हे नक्की. एकसारच्या विरगळांमध्ये मला रस असण्याचे कारणही हेच आहे. या राजवटीचा उरण परिसराशी असणारा संबंधच मला येथवर घेऊन आला.
पण मुंबई, ठाणे आणि रायगडच्या जलमार्गाने होणाऱ्या व्यापाराचा विचार करता या जलमार्गातील 
       शिलाहार राजवटीचे करंजा बेटावरील उरण नगरीशी असलेले संबंध दृढ करणारे तीन शिलालेखही सापडले आहेत. हे शिलालेख म्हणजे त्याकाळातील एक प्रकारचे चेकबुकच! उरण जवळील चांडिजे (चाणजे) गावात सापडलेल्या पहिल्या शिलालेखात अपरादित्यदेव नावाच्या शिलाहार राजाने नागुम (नागाव) गावातील आंबराई(आंबिवडी) येथील  जमिन श्रीधर नावाच्या व्यक्तीला इ.स. ११३९ मध्ये सूर्यग्रहणाच्या दिवशी दान केल्याचा उल्लेख आहे. तर याच गावात आढळलेल्या दुसऱ्या शिलालेखात ‘सोमेश्वरदेवाने’ इ.स.११८२ च्या सूर्यग्रहणाच्या दिवशी कोंथलेवाडी (काळधोंडा) येथील जमिन व काही आर्थिक मदत उत्तरेश्वर देवस्थानाला दिल्याचे संदर्भ आहेत.
आणखी एक शिलालेख उरणमधील रानवड या ठिकाणी आढळला आहे. हा शिलालेख इ.स.११८१ सालात  सोमेश्वरदेवाच्या संक्रांतीनिमित्त केलेल्या दानाचा असून, यात उरणे (उरण) व पडीवसे (पाणजे? फुंडे? पाणदिवे?) या गावांचा उल्लेख आहे.
सध्या हे तिनही शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथे पहायला मिळतील.
     सूर्यग्रहणांच्या वेळी दान देणाऱ्या या शिलाहारांच्या राजवटीला तेराव्या शतकात मात्र ग्रहण लागले. यादव राजवटीच्या रुपाने या चारशे वर्षाहूनही अधिक काळ सत्ता गाजवलेल्या शिलाहारांवर संक्रांत आली. सोमेश्वराच्या अखेरच्या युद्धाचे वर्णन हेमाद्री पंडीताने आपल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथातही केले आहे. देवगिरीच्या यादवसत्तेचा प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा युद्धात पराभव केला, परंतु उत्तर कोकणात सत्ता स्थापन करण्यात त्याला अपयश आले. पण कृष्णा राजाचा भाऊ आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादव या पराक्रमी राजाने ही मोहीम अशीच चालू ठेवली. इ.स. १२६५ मध्ये हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्यामुळे त्याने आपल्या बचावासाठी अरबी समुद्रातील घारापुरी या बेटावर आश्रय घेतला. चहूबाजूंनी पाण्याने वेढलेल्या बेटावर आपल्या आरमाराच्या साह्याने आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न सोमेश्वराने केला, मात्र महादेव यादवाने उत्तर किनार्‍यावरच्या अरब मांडलिकांची मदत घेऊन भर समुद्रातही सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य खर्‍या अर्थाने समुद्रात बुडाले. सोमेश्वराचे अग्नीसंस्कार समुद्रकाठच्या एकसार गावात करण्यात आले. या महायुद्धाचे वीरगळरुपी स्मारक याच गावात उभे राहीले. एका राजसत्तेचा अस्त झाला. परंतु शिलाहारांना मुळापासून उखडणाऱ्या आणि आपल्या खड़गाने प्रसिद्ध पावलेल्या यादव राजा महादेवाचे काय झाले?या प्रश्नाचे उत्तर कदाचित सोमेश्वराच्या कथेपेक्षाही रहस्यमय आणि रंजक असू शकेल.
  आठशे वर्ष उलटून देखिल हे वीरगळ मुंबईच्या आधुनिकीकरणाच्या विळख्यात सन्मानाने उभे आहेत. ते आपल्याला इतिहासातील काही आठवणी संकेतांच्या आधारे, खुणांच्या आधारे सांगू पाहताहेत. आपण  या खुणांना ओळखण्याचा प्रयत्न करूया, त्यात दडलेला इतिहास जाणून घेऊया.
  समोर दिसत असलेल्या खुणा डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न केला. समाजात वावरण्यासाठी अत्यावश्यक असे सेल्फीयुक्त फोटोही काढले.
  घड्याळ पाहीलं, बराच वेळ झाला होता. स्मारकांजवळून पाय निघत नव्हता, पण लोकलच्या गर्दीतून मार्ग काढण्याचा संभाव्य समरप्रसंग आठवला. वॉचमनला थँक्यू म्हणालो आणि निघालो पुढील रहस्याच्या शोधात...🏇🏻

ⓒ- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: _महाराष्ट्रातील वीरगळ-सदाशिव टेटविलकर,शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी, कुलाबा गॅझेटिअर, चतुर्वर्ग चिंतामणी- हेमाद्री पंडीत_

#वीरगळ #शिलाहार #एकसार #घारापुरी #उरण #ठाणे #तुषारकी
#Herostones #Shilahar #Eksar #Elephantacaves #Gharapuri #Uran #Thane #Tusharki
 https://tusharki.blogspot.com/search?updated-max=2018-07-04T06:56:00%2B05:30&max-results=7&start=63&by-date=false















चौधरपाडा : शिलाहार कालीन पुरातन शिलालेख

 


समाज एकसंध राहण्यासाठी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात अनेक पुरावशेष कोरलेले पहायला मिळतात . हिंदू-जैन-बुध्द धर्माशी संबंधित शिल्पकला, वीरगळ, गध्देगाळ, शिलालेख, शस्त्रास्त्रे, विविध राजवंशाची नाणी, लघुचित्रे, सिंधूसंस्कृतीशी निगडीत पुरावशेष, प्रसिध्द चित्रकारांची चित्रे इ. अनेक पूर्वेस यात बघायला मिळतात.
सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकुट, अभीर इ. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या राजवंशांपैकी अजून एक महत्त्वाचा राजवंश म्हणजे शिलाहार. उपलब्ध शिलालेखांवरून महाराष्ट्रात आणि कर्नाटकात शिलाहारांच्या दहा शाखांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य केले असे दिसून येते. त्यापैकी उत्तर कोकणचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कोल्हापूरचे शिलाहार ह्या तीन प्रमुख शाखा होत्या.हेमाडपंती कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे.
उत्तर कोकणच्या शिलाहारांचे ठाणे आणि रायगड प्रांतावर राज्य होते आणि त्यांची राजधानी श्रीस्थानक (आताचे ठाणे) होती. ठाणे, कल्याण शहरांच्या आसपास शिलाहारांचा इतिहास उलगडून सांगणारी अनेक दानपत्रे, मंदिरे पहायला मिळतात. भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
इस ८०० ते १२६५ अशा साडे चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत शिलाहार राजघराण्याने उत्तर कोकण प्रांतावर राज्य केले. या राजघराण्याचा इतिहास समजण्याकरिता या राजांनी दिलेली ताम्रपट आणि शिलालेख स्वरूपातील दानपत्रे अतिशय मूल्यवान आहेत. शिलाहार राजे शिवभक् होते. त्यांनी अप्रतिम भूमिज शैलीतील( पूर्व हेमाडपंती शैली) अनेक शिव मंदिरे बांधली. कल्याण परिसरातच खिडकाळी, लोनाड मधील रामेश्वर/लोणादित्य आणि बापगाव येथील सुम्पेश्वर हि मंदिरे शिलाहार राजांच्या काळातील. विहार येथील अनंतदेव यांची गध्देगळ, भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
बापगाव येथे माळरानात अनेक वर्षे एक प्राचीन शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडलेला होता. शिलाहार राजा दुसरा केशिदेव याने कोरविलेला हा शिलालेख आता नष्ट झालेल्या सुम्पेश्वर मंदिराबद्दल काही माहिती देतो. इतिहासात इस १८८२ मध्ये ही शीला सापडल्याची नोंद आहे. त्यावरील लेखाचे वाचन पं. भगवानलाल इंद्राजी यांनी केले होते. लेखाची भाषा संस्कृत आणि लिपी नागरी आहे. या लेखात २२ ओळी आहेत.

सिद्धम ।
अर्थ : (सिध्दी असो)
ॐनमो विनायकाय ॥
अर्थ : (विनायकास नमस्कार असो)
नमामि भुवनोत्पत्तिस्थितीसंहारकारीणं(णम्) ॥
अर्थ : (विश्वाची उत्पत्ती, संंधारण व लय यास कारणीभूत असलेला व)
श्रीमत्षुंपेश्वरंभक्तजनसर्वार्त्तिहारीणं ॥१ ॥
अर्थ : (भक्तजनांचे दुःख हरण करणा-या श्रीमत् षुपेंश्वरास नमन असो)
श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्ज्जीमूतकेतो: कुलेविख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय (य:) श्रीकेशिपृथ्वीपति: ।
अर्थ : (श्रीविद्याधर वंशाचा भूषणभूत जीमूतकेतूच्या कुळात प्रसिद्ध असलेल्या राजा अपरार्काचा पुत्र पृथ्वीपती केशीदेव)
यस्यापारपवित्रपौरुषनिधेरालोक्य राज्यस्थितिं श्रीरामादिमहिभुजां भगवती धत्तेधरा न स्मृतिं ॥२॥
अर्थ : (ज्याचे पावित्र्य अपार व अवर्णनीय आहे, व ज्याच्या पौरूषत्वाचा संचय अवलोकन करण्यासारखा आहे व ज्याच्या राज्याची समृद्धी श्रीराम आदी पराक्रमी राजांची पृथ्वीदेवतेला स्मरण करून देणारे आहे.
स(श)क संवत् ११६१ विकारीसंवत्सरांतर्गत माघ वदि १४ चतुर्द्द्श्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणीअद्येह समस्तराजावलीसमलंकृत महाराजाधिराजकोकणचक्रवर्त्ति श्रीकेशिदेवकल्याणविजयराज्ये तथैतत्प्रसात्समस्तराज्यमंडलचिंताभारं समुद्वहति ।
अर्थ : (शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी संपूर्ण राजमंडळाने सुशोभित असलेला महाराजाधिराज कोकणचक्रवर्ती श्रीकेशीदेव ज्यांचे राज्य पराक्रमी व कल्याणदायी आहे, अत्यंत प्रसन्न होऊन जो चिंता वहातो)
महामात्ये श्रीझंपडप्रभु महासांधिविग्र(हि)क राजदेवे पंडित श्रीकरणभांडागारे अनंतप्रभुप्रमुखे(षु) सत्सु एतस्मिन्काले प्रवर्तमाने
सतिब्रह्मपुरीग्रामदानसा(शा)सनं समधिलिक्ष(ख्य)ते यथा ॥
अर्थ : (महामंत्री श्रीझंडप्रभू महासंधीविग्रहक रामदेव पंडित व कोषाध्यक्ष अनंतप्रभू हे ज्याचे प्रमुख मंत्री आहेत त्या ब्रम्हपूरी या गावात हे आज्ञापत्र या काळात लिहिले गेले ते असे)
श्रीषोंपेश्वरदेव पूजनसदाव्यासक्तसर्वा(न्तरः) ।
अर्थ : (श्री षूपेंश्वर देवाच्या पूजाअर्चेत सतत रममाण असलेला)
सत्पात्रद्विज सोमनायकव (ब)टोःसंतानयो(भो)ग्यस्थितिं (तिम्)।
अर्थ : (योग्य सत्पात्र ब्राम्हण सोमनायक यास त्याच्या मुलाबाळांच्या देखभालीसाठी)
श्रीब्र्ह्मपुरीपुरारिभवनक्ष्माभृन्मनोहारिणीं।
अर्थ : (पुरातन काळात शिवाच्या वास्तव्यास योग्य असलेल्या मनोधारिणी ब्रम्हपूरी)
वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: ॥३॥
अर्थ : (जेथे शूर केशीदेव पृथ्वीपती विस्मयकारक गोष्टी करण्यात अग्रेसर असे.)
बटुकनामानि कथ्यंन्ते। सोमनायक: सुर्य्यनायक: । गोविंदनायक: । नाऊ नायक:। इति चत्वारो बटुका: ॥
अर्थ : सोमनायक, सूर्यनायक, गोविंदनायक व नावनायक अशी या चार भटांची नावे सांगितली आहेत.)
निर्व्वाहाय पुरारिपूजकबटुश्रेणी द्विजानां सदावो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे/ज)सपल्लीपुरा दत्ता श्रीशिवरात्रि पर्व्वणी विभोषोंपेश्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चंद्रार्क्कतारावधि॥४॥
अर्थ : (त्या शिवाची पूजा करणा-या बटूक थोर श्रेणी ब्राम्हण बापगावातील त्याच्या निर्वाहासाठी सर्वसीमांतर्गत मांजसपल्ली (वाडी) श्रीकेशीनरेश्वर षुंपेश्वरासमोर यावत् चंद्र दिवाकरौ स्वच्छ चांदण्या रात्री शिवरात्री दान दिला.
(राज्य)स्य मंत्रीणान्यैर्व्वा कर्तव्यं धर्म्मपालनं । धर्मध्वंशे … नरकस्थितिं ॥५॥
अर्थ : (राजमंत्र्यांना या राजपत्राचे पालन करणे हे धर्मपालन करण्यासारखे आहे असे मानले पाहिजे तसे न केल्यास ती नरकस्थिती ठरेल)
तथा चोक्तं पूर्वाचार्य्यमुनिभि: । सुवर्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं । हरन्नरकमाप्नोति या(वदाभूत) संप्लवं ॥६॥
अर्थ : एखादे सोन्याचे नाणे, एक गाय, पृथ्वीवरील भूमीचे दान केले असता ते जो परत हरण करतो किंवा ते घेण्याची इच्छा करतो त्याला निरंतर नरक प्राप्त होतो असे मुनी आचार्यांनी सांगून ठेवले आहे.
मंगलं महाश्री । (शुभं भ) वतु ॥ ले(ख)कपाठयोः ॥
अर्थ : श्रेष्ठांचे (वडीलधा-यांचे) कल्याण असो, सर्व शुभ होवो, लेखक व वाचक यांचे ही शुभ होवो.

याच्या वाचनांती काही गोष्टी ठळकपणे निदर्शनास येतात
१. हा शिलालेख म्हणजे राजाज्ञा होती.
२. राजा केशीदेव याने ब्राम्हणांना भूदान केल्याचा उल्लेख आहे.
३. शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी दानपत्र दिले.
४. या आज्ञेचा अथवा नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी नरकप्राप्ती शापवाणीचा धाक घालण्यात आला आहे.
५. ब्रम्हपूरी, बापगाव या गावांचा उल्लेख
६. सूंपेश्वर मंदिर या प्राचीन मंदिराचा उल्लेख
७. राजा केशीदेव याचे वंश व कूळ व पित्याचे नाव
८. राजा केशीदेव याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे
९. सदर शिलालेख संस्कृत भाषेत असून, लिपी नागरी आहे
१०. या शिलालेखात ६ श्लोक व २२ ओळी आहेत
याचा नेमका अर्थ स्थानिक ग्रामस्थांना माहीत नसल्यामुळे या शिळेला स्पर्श झाल्यास गावावर संकट येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. गावकऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. इतिहासकार, जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभाग, पोलिस, लोणाडचे सरपंच, पोलिस आणि स्थानिक नेते यांनी संयुंक्तपणे अनेक वर्षे काम करून जनजागृती घडवून आणली. आणि २०१४ रोजी महाशिवरात्रीला सुमेश्वर/सुम्पेश्वर मंदिराजवळ शिलालेखाची साग्रसंगीत पूजा करून लोकांना दिसेलअसा लोखंडी जाळीआड सुरक्षित स्थापना केली.
सुमेश्वर मंदिरातील शिवलिंग व शिवपार्वतीची मूर्ती पाहण्यासारखी आहे

जवळच लोणादित्य मंदिर (लोणाड) व खांडेश्वरी माता मंदिर (जानवळे) भेट देता येईल

कसे जाल? : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून पडघे गावासाठी निघून सावद नाक्यावर उतरावे. येथून डावीकडे लोणाडला जाणारा फाटा आहे. जानवळे गावाच्या कमानीतून सरळ आत गेल्यावर १.५ ते २ किमी वर चौधरपाडा गाव आहे
स्वतःचे वाहन असेल तर प्रवास सुलभ होईल

संकलक
आयशा आस्मा
९६१९९७१४९५




पांगरे बुद्रूक येथे सापडला शिलाहार कालीन शिलालेख

Discover Maharashtra

पांगरे बुद्रूक येथे सापडला शिलाहार कालीन शिलालेख –

राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक या गावात एक शिलाहारकालीन शिलालेख उजेडात आला आहे. सदर लेखाची शिळा गावातील श्री हरिहरेश्वर मंदिर परिसरात एका ओट्यावर ठेवलेली आहे . आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या लेखाचे वाचन पुण्यातील इतिहास संशोधक श्री. अनिल दुधाणे यांनी केले त्यांना श्री. अथर्व पिंगळे यांचे सहकार्य लाभले असून त्यातून तत्कालीन राजकीय व धार्मिक परिस्थितीची माहिती मिळाली आहे. पांगरे बुदृक येथील श्री हरीहरेश्वर मंदिराचा पाया शिलाहार राजाने शके १०८२ म्हणजे सन ११६० साली घातल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे . त्यामुळे राजापूर तालुक्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत झाले आहे .

शिलाहार राजा हा शिलालेख दोन ओळींचा असून देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत आहे.शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्याची अक्षरे पुसट झाली असून झिजली आहेत शिलालेखात कालोल्लेख शके १०८२ म्हणजे सन ११६० असून तो बाराव्या शतकातील दिसतो. मजकुरात एका देवाच्या पीठिका (हरिहरेश्वर मंदिराचा ) म्हणजे पाया घातल्याचा उल्लेख असून तो शिलाहार वंशातील सर्वश्रेष्ठ राजा मल्लिकार्जुन याचा आहे.तो स्वतःस सिलाहार नरेंद्र ,महासमंताधिपती, तगरपूर परमेश्वर, महामंडळेश्वर अशी बिरुदे धारण करत असे .मल्लिकार्जुन देवाची कारकीर्द सन ११५५-११६२ अशी होती. त्याचे उत्तर कोकणवर प्रणालक (पन्हालेकाजी )येथे राज्य होते त्याचे शके १०७८ चा चिपळूण (पन्हाळे)स्तंभ लेख तसेच वसई येथील शके १०८३ शिलालेख प्रसिद्ध आहेत त्याने शेजारील राज्यांवर अनेक स्वाऱ्या करून मोठा राज्यविस्तार घडवून आणला होता. या मल्लिकार्जुन देवाने मंदिराचा पाया घालून त्यास (भूदान ) काही जमीन दान केल्याचा शिलालेखात उल्लेख आहे.. लेखाच्या शीर्ष भागात शापवचन आहे मजकुरावर गधेगाळाची आकृति कोरून ते पूर्ण केलेले दिसते. मल्लिकार्जुन देवाच्या राजवटीतील हा तिसरा शिलालेख उपलब्ध झाला आहे.

शिलालेखातील मजकूर:
१. सकु १०८२ विक्रम संव
२. त्सरे पिठिका

अर्थ: शालिवाहन शके १०८२ विक्रम संवत्सर म्हणजे सन ११६० साली पीठिकेचे म्हणजे बहुधा येथील हरिहरेश्वर देवालयाच्या पायाचे बांधकाम केले होते. ते कोणी केले त्यांची माहिती लेखात नाही मात्र त्यावेळी शिलाहार राजा मल्लिकार्जुन तेथे राज्य करत होता. त्याचे पन्हाळे व वसई येथील कोरीव लेख उपलब्ध आहेत. ही नोंद नष्ट करणाऱ्यासाठी गधेगाळाच्या रूपात शापवचन अंकित करण्यात आले आहे.

शिलाहार राजांच्या काळात (इ. स. ८१० इ. स. १२६०) दगडांवर दानाचा मजकूर लिहून ते जाहीर करण्यासाठी व प्रजेला लिहिलेले नियम पाळण्यासाठी असे दगड बनवले जायचे. अश्या दगडांवर वरच्या बाजूस सूर्य व चंद्र असतात. ज्याचा अर्थ असा होतो की या शिळेवर लिहिलेला दान व नियम चंद्र व सूर्य आकाशात असे पर्यंत अबाधित राहील या अर्थाने कोरलेले असतात तर वर काही जागा मोकळी सोडलेली दिसते. काही ठिकाणी या दगडांवर शिलालेखही कोरलेले दिसतात.
गाय हे राजाचे प्रतीक असून वासरू हे प्रजेचे प्रतीक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो असे यातून संबोधले आहे. गाय म्हणजे जमीन व वासरू म्हणजे जमिनीचा उपभोग घेणारा असा अर्थ अपेक्षित असतो. यावर राजाच्या आज्ञेचे प्रतीक आणि राजसत्ता म्हणून तलवारीचे ही चित्रांकन केलेले असते.

गधेगळ म्हणजे काय ?
गधेगळ म्हणजे असा दगड ज्यावर एक स्त्री आणि तिच्या सोबत प्रणय करणारा गाढव अशी आकृती कोरलेली असते सोबत चंद्र आणि सूर्य, शिल्पात हे कोरण्याचे कारण म्हणजे यावर कोरलेले दान इनाम वैगरे जे काही आहे ते अबाधित राहो असे होय. चंद्र आणि सूर्य यांच्या मध्याभगी त्या दानाचा अथवा ती कश्यासाठी उभारली आहे त्या कारणाचा उल्लेख असलेला लेख खालील भागात शापवाणी स्वरुपात किंवा आकृती स्वरुपात कोरलेली असते.

गधेगळचा अर्थ काढायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की, ‘गधे’ म्हणजे गाढव आणि ‘गळ’ म्हणजे दगड. गधेगळ हा स्पष्ट शब्दात सांगायचं तर दिलेली शिवी, ही शिवी कशासाठी तर पूर्वीच्या काळी मंदिर किंवा गाव यांना राजाश्रय होता. बऱ्याचदा मंदिरासाठी राजाकडून जमीन दान दिली जात. या गावासाठी अथवा देवा साठी दान केलेल्या जमिनीचा कोणी दुरुपयोग करू नये अथवा त्यावर अतिक्रमण करू नये म्हणून या वर शाप लिहिलेला असतो

“जो माणूस या जमिनीचा अथवा दानाचा गैरवापर करेल त्याच्या आईला गाढव लागेल ” हा शाप वाचायला बराच विचित्र आणि किळसवाणा वाटेलही ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना हा शाप समजावा म्हणून त्या वर दगडी शिल्पे कोरली जाऊ लागली. पण त्या मागचा हेतू एवढाच कि कोणी राजाज्ञेचा भंग करू नये आणि प्रजेवर वचक राहावा

कोट
शिलाहार राजे शैवमतावलंबी होते. त्यांच्या काळात ठाण्याजवळ अंबरनाथ, उत्तरेश्वर अशा अनेक मंदिरांचे बांधकाम झाले. शिलाहार राजा झंझ याने आपल्या नावाने १२ शिवालये उभारली होती. पांगरे बुद्रुक येथील हरिहरेश्वराचे मंदिरही शिलाहार राजांच्या काळात उभारले गेलेले दिसते.:- श्री अनिल दुधाणे ,अथर्व पिंगळे

टीप :-सदर कार्यात पत्रकार श्री विनोद पवार श्री दत्तात्रय शिंदे श्री गणेश नेर्लेकर ,श्री अंजय धनावडे यांचे सहकार्य लाभले

शिलाहार राजा मल्लिकार्जुन याचा इतिहास :-
शिलाहार राजा हरिपालदेवानंतर मल्लिकार्जुन गादीवर आला. त्याचे दोन लेख सापडले आहेत. एक रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आणि दुसरा ठाणे जिल्ह्यातील वसई येथे. पहिला शक संवत् १०७८ (सन ११५६) चा असून त्यात सुप्रया नामक दण्डाधिपतीला (सेनाधिकाऱ्याला) प्रणालक देशाचा शासनकर्ता नेमल्याचा उल्लेख आहे. या लेखावरुन दक्षिण कोकण विक्रमादित्यानंतरही शिलाहारांच्या राज्यात राहिले होते, असे दिसते. बहुधा विक्रमादित्य निपुत्रिक वारला असावा आणि म्हणून दक्षिण कोकण ठाणे शाखेच्या अंमलाखाली आलेले दिसते. प्रणालक हे पूर्वोक्त प्रणाल (दापोली तालुक्यातील पन्हाळे) होय. वसईचा लेख शक संवत् १०८३ (सन ११६२) चा आहे. त्यात एका शिवालयाच्या जीर्णोद्धाराचा उल्लेख असून लखण उपाध्याय नामक ब्राह्मणाला लोणवाटक (भिवंडी तालुक्यातील लोनांड) ग्राम दान दिल्याचे सांगितले आहे.

हेमचंद्राने आपल्या ‘कुमारपालचरिता’ त’ चौलुक्य नृपति कुमारपाल याने पाठविलेल्या सैन्याशी मल्लिकार्जुनाने केलेल्या मुकाबल्याचे सविस्तर वर्णन केले आहे. मेरुतुंगानेही आपल्या ‘प्रबन्धचिन्तामणी’ त त्याचा वृत्तांत दिला आहे.’ पण तो काल्पनिक दिसतो. मेरुतुंग सांगतो की, मल्लिकार्जुनाने ‘राजपितामह’ हे बिरुद धारण केल्यामुळे कुमारपालाला चीड आली आणि त्याने अम्बड नामक आपल्या सेनापतीला कोकणावर हल्ला करण्याचा आदेश दिला. मल्लिकार्जुनाने त्याचा पराभव केला. तेव्हा खिन्न होऊन त्याने कृष्णगिरि (कान्हेरी) येथे कृष्ण वस्त्रे परिधान करुन कांही दिवस घालविले. कुमारपालाला हे समजताच त्याने सैन्याची मोठी कुमक त्याच्याकडे पाठविली. नंतर अम्बडाने मल्लिकार्जुनाचा पूर्ण पराभव केला, त्यांच्या हत्तीवर चढून त्याचा शिरच्छेद केला आणि कुमारपालाला त्याच्या राज्यसभेत वाहत्तर सामंतांच्या समक्ष त्याचे शिरकमल सादर केले. या वृत्तांतात बरीच अतिशयोक्ति दिसते. तथापि अनेक जैन ग्रंथांत उदयनाचा पुत्र अम्बड याने मल्लिकार्जुनाचा पराभव केल्याचाउल्लेख आहे खरा.’ तेजपालाच्या अबू प्रशस्तीत म्हटले आहे की परमारवंशी यशोधवलाचा पुत्र धारावर्ष रणांगणावर मोठ्या धैर्याने लढत असताना कोकण नृपतीच्या स्त्रिया नेत्रकमलांतून अश्रूचा वर्षाव करीत होत्या. या वर्णनातही पूर्वोक्त घटनेचाच उल्लेख आहे, असे काही विद्वान म्हणतात; पण हे वर्णन मोघम आहे. जयानकाच्या ‘पृथ्वीराजविजया’ त चाहमान राजकुमार सोमेश्वर याने कोकण नृपतीला कंठस्नान घातले, असे म्हटले आहे. पण हे उल्लेख कुमारपालाचा आश्रित हेमचंद्र यांच्या ‘कुमारपालचरिता’ त आढळत नाहीत. हेमचंद्र कुमारपालाचा समकालीन असल्यामुळे त्याच्या वर्णनाला विशेष महत्त्व आहे. आपल्या ‘कुमारपालचरिता’त हेमचंद्राने या युद्धाचे खालील वर्णन दिले आहे. : एकदा कुमारपाल आपल्या दरबारात बसला असता त्याचा सान्धिविग्रहिक येऊन कोकणवरील स्वारीचा वृत्तांत सांगू लागला. कुमारपालाची सेना कोकणाच्या राजधानीजवळ आली असता कोकणाधिपति तिचा प्रतिकार करण्याकरिता चालून आला. राजधानीवरचा हा हल्ला अनपेक्षित होता, असे दिसते. कारण हेमचन्द्रने वर्णन केले आहे की मल्लिकार्जुनाचे सैनिक विहीरीवर स्नान करण्याचे टाकून शत्रूचा प्रतिकार करण्याकरिता धावले. मल्लिकार्जुन मोठ्या शौर्याने लढला, त्याचे सैन्य शत्रूची फळी फोडून आत घुसले आणि क्षणभर असे वाटू लागले की कोकणाधिपति विजय होणार. पण तितक्यात गुर्जरांच्या सैन्याने एकवटून शत्रूची झुंज दिली. मल्लिकार्जुनाच्या हत्तीवर बाणांचा वर्षाव झाला. तेव्हा मल्लिकार्जुन खाली कोसळला आणि त्याच्या सैन्याची दाणादाण. झाली, आणि अशा रीतीने कुमारपाल ‘पश्चिमसमुद्राधिपति’ झाला.

हेमचन्द्राने या युद्धाच्या वर्णनात अम्बडाचा किंवा सोमेश्वराचा उल्लेख केला नाही. तसेच या युद्धात दोन चकमकी झाल्या, पहिलीत मल्लिकार्जुन विजयी आणि दुसरीत पराभूत झाला, असेही तो सांगत नाही. त्याच्या वर्णनात मल्लिकार्जुनाचे शिरकमल कुमारपालाला राजसभेत नजर केल्याचाही उल्लेख नाही. एकंदरीत त्याचा वृत्तांत जास्त विश्वसनीय वाटतो. नंतरच्या कालात या युद्धातील विजयाचे श्रेय अम्बडाला दिलेले दिसते.’ त्याला वणिक् (वनिया) म्हटले आहे. या कालात चाहमान राजकुमार सोमेश्वर अणहिलपाटण येथे राहत होता. म्हणून जयानकाने वर्णिल्याप्रमाणे त्याने या युद्धात भाग घेतला असणे शक्य आहे.

या युद्धाला कारण काय झाले ते निश्चितपणे सांगता येत नाही. मुजुमदारांनी म्हटले आहे की, या काळात कदंब होयसळाशी झगड्यात गुंतले असल्यामुळे त्यांच्याकडून धोका नव्हता. म्हणून मल्लिकार्जुनाने गुजराथवर स्वारी करण्याचे साहस केले असावे. पण हे बरोबर वाटत नाही. हेमचंद्र आणि मेरुतुंग या दोघांच्या वर्णनावरुन या युद्धात कुमारपाल हाच आक्रमक होत असे दिसते. हेमचंद्राच्या वृत्तांतावरुन तर गुर्जरांचा शिलाहारांच्या राजधनीवरचा हल्ला अगदी आकस्मिक व अनपेक्षित होता, असे दिसते. सामान्यतः शिलाहार राजे शांतताप्रेमी होते. त्यांच्या इतिहासांत त्यानी इतरांवर आक्रमण केल्याची उदाहरणे क्वचितच आढळतात. याच्या उलट कुमारपालाने अनेक आक्रमक युद्धे केली असल्याचे माहीत झाले आहे. तेव्हा त्यानेच या प्रसंगीही आक्रमक पवित्रा घेतला असावा. मेरुतुंगाने सांगितलेले त्याचे पूर्वोक्त कारण मात्र काल्पनिक दिसते.मल्लिकार्जुनानंतर द्वितीय अपरादित्याला गादी मिळाली. पण त्याचे मल्लिकार्जुन शी नेमके नाते माहित नाही.त्याचे लोनाड, ठाणे आणि परळ येथे लेख मिळाले आहेत …

संदर्भ – शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख … वा. वा. मिराशी पान 69 ते 74

माहिती व संकलन :- अनिल दुधाणे
विनोद मनोहर पवार
पत्रकार , राजापूर




शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा)


 शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा)

 पोस्तसांभार ::  https://vishwakosh.marathi.gov.in/28233/

भोज, दुसरा शिलाहार : (कार. सु. ११७५ – १२१२ ?). महाराष्ट्रातील शिलाहार या मध्ययुगीन वंशातील कोल्हापूर शाखेतील शेवटचा शूर राजा. त्याच्या जन्ममृत्यूंच्या सनांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. विजयादित्य राजाच्या रत्ना या राणीपासून झालेला मुलगा दुसरा भोज या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. तो पित्याच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या शिलाहारांच्या गादीवर आला (११७५). त्याच्या सुरुवातीच्या लेखांत ‘महामंडलेश्वर’ अशी मांडलिकपदनिदर्शक पदवी आढळते. पुढे त्याच्या पराक्रमामुळे त्यास ‘वीरभोज’ असे नाव प्राप्त झाले आणि त्याने आपले स्वातंत्र्यही उद्‌घोषित केले होते. त्याचा आश्रित सोमेश्वर (सोमदेव) मुनी याने लिहिलेल्या जैनेंद्रव्याकरणावरील शब्दार्णवचन्द्रिका या टीकात्मक ग्रंथात भोज राजाचा राजाधिराज, परमभट्टारक, पश्चिमचक्रवर्ती, परमेश्वर अशा सम्राटपददर्शक पदव्यांनी उल्लेख केलेला आढळतो. त्याच्या कारकीर्दीत कोल्हापूर, वळवडे व पन्हाळा यांचा ऋतुमानानुसार राजधान्या म्हणून उपयोग केला जात असावा कारण त्यांचा ११७९ ते १२॰५ पर्यंतच्या शिलालेखांत उल्लेख आढळतो.

भोज राजाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले, तेव्हा चालुक्य (कल्याणी) साम्राज्य मोडकळीस आले होते आणि देवगिरीच्या यादवांची सत्ता दृढ होत होती. यादव राजा ⇨सिंघण (कार. १२००-१२४६) यास भोज राजाचे स्वातंत्र्य मान्य होणे शक्य नव्हते. त्याने भोज राजावर चढाई केली. खिद्रापूरजवळ कृष्णवेणी आणि कुवेणी या नद्यांच्या संगमाजवळ भोज आणि सिंघण यांच्यात धनधोर युद्ध झाले. या युद्धात बन्नेस हा भोजाचा सेनापती मोठ्या शौर्याने लढत असता धारातीर्थी पडल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. सिंघणने पुढे प्रणालक किल्ल्याला (पन्हाळगड) वेढा धालून तो काबीज केला व भोज राजास तेथेच बंदिवासात ठेवले आणि कोल्हापूरच्या शिलाहारांचे राज्य खालसा केले. भोजाचे पुढे काय झाले, याविषयी माहिती उपलब्ध नाही.

भोज राजास गंडरादित्य नावाचा एक मुलगा होता, असे कशेळी ताम्रपटावरून ज्ञात होते परंतु त्याची अधिक माहिती मिळू शकत नाही. भोजानंतर शिलाहार राजांचे लेख आढळत नाहीत. त्यांवरून शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेचा भोज हाच शेवटचा पराक्रमी राजा असावा, हे निश्चित.

भोजाच्या कारकीर्दीतील अनेक शिलालेख सापडले असून त्यांवरून त्याचे कर्तृत्व, दातृत्व, शौर्य, नीतिनैपुण्य आदींसंबंधी माहिती मिळते. त्याने विद्या व कला यांना उदार आश्रय दिला होता. हिंदू आणि जैन मंदिरांनाही देणग्या दिल्याचा निर्देश त्याच्या शिलालेखांत आढळतो. आपल्या पूर्वजांप्रमाणे हा वैदिक व पौराणिक धर्माचा अनुयायी होता. ताम्रपटांत तो आपणास कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मीचा वरप्रसाद प्राप्त झाल्याचे सांगतो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या त्रिकाल नैवैद्याच्या व्यवस्थेसाठी कोप्परवाड या गावाची जमीन इ. स. ११९० मध्ये इनाम दिल्याचा उल्लेख आहे. त्याने विद्वान ब्राह्मणांच्या भोजनाकरिता भूमिदाने केली होती. त्याचा जैन धर्मासही आश्रय असावा. त्याच्या दुर्दैवी पराजयामुळे खिद्रापूरचे कोप्पेश्वरनामक अत्यंत सुंदर शिवमंदिर अपूर्ण राहिले आहे.


संदर्भ : १. अळतेकर, अ. स. शिलाहारांचा इतिहास, मुंबई, १९३५.

२. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४.

शेख, रुक्साना



शिलाहार : आठव्या शतकापासून पश्चिम भारतावर राष्ट्रकूटांचे मांडलिक असलेल्या तीन शिलाहार राजघराण्यांचा अंमल होता. सुमारे इ. स. ७७० ते १०२० पर्यंत दक्षिण कोकणवर पहिल्या घराण्याने, ८०० ते १२५० पर्यंत उत्तर कोकणवर दुसऱ्या घराण्याने आणि आठव्या ते दहाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सातारा, कन्हाड, कोल्हापूर व बेळगाव परिसरावर तिसऱ्या घराण्याने राज्य केले. ठाणे व कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला 'तगरपुराधीश्वर' असे बिरुद लावीत आणि गरुड हे एकच कुलचिन्ह स्वीकारीत" ही एक अर्थपूर्ण बाब वाटते.
* कित्ता, ३५, पृ. २९१-९२.
कित्ता, ३२, पृ. ६७.
* कित्ता, पु. ६८.
कित्ता, पृ. ६६.
" ए. आर. आळतेकर, "दि शिलाहाराज ऑफ वेस्टर्न इंडिया", इंडियन कल्चर, खंड २, पृ.४०२.
** कित्ता, पृ. ३९३. तगरपूर हे पैठणच्या आग्नेयेस ७५ मैल दूर असलेले तेर होय. वाय ३५-८

 

११४
इतिहास
शिलाहारांची उत्तर कोकणावरील दुसरी शाखा ठाण्याहून राज्य करीत होती. या शाखेचा संस्थापक कपर्दी (प्रथम) (इ. स. ८०० ते ८२५) हा राष्ट्रकूट नृपती गोबिंद (तृतीय) याच्या अनेक लढायांमधील श्रेष्ठ सेनापतींपैकी एक होता. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यास उत्तर कोकणची राजसत्ता बक्षिस म्हणून दिली असावी. देवगड तालुक्यातील खारेपाटणच्या शिलाहार अनंतदेवाच्या ताम्रपटात कपर्दीला शूर वीर म्हटले आहे. कपर्दी (प्रथम) चा पुत्त पुल्लशक्ती (इ. स. ८२५ ते ८५०) याच्या कान्हेरी लेण्यातील संवत् ७६५ (इ. स. ८४३-८४४) च्या शिलालेखात " महाराजाधिराज परमेश्वर पृथ्वीवल्लभ अमोघवर्ष याच्या कारकिर्दीत त्याच्या कृपेने ज्याला कोकणचे राज्य मिळाले होते त्या महासामंत कोकणवल्लभ श्री कपर्दीच्या पायांचे चितन करणारा श्री पुल्लशक्ती पुरी आदिकरून समग्र कोकणावर राज्य करीत असता असे त्याचे वर्णन केले आहे. याच लेखात पुल्लशक्तीचा अमात्य विष्णुगुप्त याने कान्हेरीच्या बौद्धसंघाला स्मरून पुढील देणगी जाहीर केली भगवान बुद्ध याला प्रसन्न करण्यासाठी २० द्रम्म, विहाराच्या दुरुस्तीकरिता ३ द्रम्म, आर्य संघातील (भिक्षुच्या) वस्त्राकरिता ५ द्रम्म आणि त्यांच्या ग्रंथांकरिता १ द्रम्म, आणि या २९ द्रम्मांच्या व्याजाकरिता त्याने ४०, ४० व १२० द्रम्मांची अक्षयनीवी (कायम स्वरूपाची ठेव) ठेवली. यावरून बौद्ध धर्माला त्याकाळीही आश्रय मिळत होता हे सिद्ध होते. बौद्ध भिक्षुच्या पुस्तकांकरिता नियमितपणे खर्च केला जात असे. यावरून त्या संघातील ग्रंथालयाची कल्पना येते. परंतु २९ द्रम्मांपैकी एकच द्रम्म ग्रंथांकरिता व २० द्रम्म बुद्धास प्रसन्न करण्याकरिता खर्च केला जात होता. यावरून केवळ श्रद्धेकरिता संघाला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य दिले जात होते हे दिसते. पण ही मोठी रक्कम निश्चित कशा प्रकारे उपयोगात आणली जात असे याचा कुठेच खुलासा होत नाही. २९ द्रम्म व्याजाकरिता २०० द्रम्म कायमची ठेव ठेवली होती. यावरून व्याजाच्या उच्च दराची कल्पना येते, परंतु भिक्षुच्या वस्त्राकरिता ५ द्रम्मांची ब्याजापोटी कायमची सोय किती भिक्षुकरिता होती याचा उल्लेख नाही. राष्ट्रकूट अमोघवर्ष (प्रथम) च्या कान्हेरी शिलालेखातही भिक्षुना बस्त्रे पुरविण्यासाठी १०० द्रम्मांची कायम देणगी दिल्याचेही नमूद केले आहे. पण त्या लेखातही भिक्षुची एकूण संख्या दिली नसल्यामुळे द्रम्मांची क्रयशक्ती समजत नाही.
पुल्लशक्तीचा पुत्र कपर्दी (द्वितीय) (इ. स. ८५०-८८०) हा देखील राष्ट्रकूट अमोघ-वर्षाचा मांडलिक होता हे अमोघवर्षाच्या शके ७७५ (इ. स. ८५३) व शके ७९९ (इ. स. ८७७-७८) च्या कान्हेरी येथील शिलालेखात नमूद केले आहे." कपर्दी (द्वितीय) च्या कारकिर्दीत दक्षिण कोकणच्या शिलाहारांनी गोवा व उत्तर कोकणच्या काही भागावर अधिपत्य मिळविले व कपदींस कलचुरी कुलातील कोक्कल याचा आश्रय घ्यावा लागला."
कपर्दी (द्वितीय) चा पुत्र बपुवन्न (इ. स. ८८०-९१०) याच्या कारकिर्दीत विशेष काही घडले नाही. परंतु त्याचा ज्येष्ठ पुत्र झंझ (इ. स. ९१० ते ९३०) हा चौल (सैमूर)
** कित्ता, पृ. ४०२-०३.
** देव, महाराष्ट्र व गोवे शिलालेख ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची, पृ. ६७.
कित्ता.
" कित्ता, पृ. ६७, ६८.
* कुलावा गॅझेटिअर, १९६४, पृ. ६७.

 

प्राचीन काळ
११५
वर राज्य करीत होता असे अरब प्रवासी अल-मसूदी इ. स. ९१६ मध्ये लिहितो. त्याने १२ शिवमंदिरे बांधली असे खारेपाटण ताम्रपटात म्हटले आहे. यावरून तो शिवभक्त होता हे सिद्ध होते. दुर्दैवाने आज त्यापैकी एकही मंदिर अस्तित्वात नाही.
यानंतर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये अवघा एकच ताम्रपट असलेला, राष्ट्रकूट नृपती कृष्णराज (तृतीय) याचा मांडलिक शिलाहार महासामंत छद्वैदेव गादीवर आला. परंतु या ताम्रपटात काळाचा कुठेच उल्लेख नाही. देवांच्या मते तो ताम्रपट अंदाजे इ. स. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धातला असावा." या ताम्रपटात छद्वै देवाने सलप्राक गावातील काही जमीन चाडदेवभट्ट नावाच्या ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख आहे. छद्वैदेवाने अंदाजे इ. स. ९६५ ते ९७५ पर्यंत राज्य केले असावे असे अनुमान करण्यास हरकत नाही.
छद्वैदेवाचा पुतण्या व उत्तराधिकारी अपराजित याचा एक ताम्रपट ठाणे जिल्ह्यातील भाडणे येथे सापडला आहे. या ताम्रपटात राष्ट्रकूट राजांची सत्ता नामशेष झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे, परंतु अपराजिताने उत्तरकालीन चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले नाही.
खारेपाटण ताम्रपटात "त्याने सहाय्यार्थ आलेल्या गोम्माचे रक्षण केले. ऐयपाला गादीवर स्थिरपणे बसविले आणि भिल्लम, अम्मण, आणि मम्बुव यांना निर्भय केले, आणि अशा रीतीने तो 'बिरुदंकराम नावाने विख्यात झाला" असा त्याचा उल्लेख केला आहे. दुर्दैवाने या ताम्रपटातील भिल्लमाखेरीज इतर राजांची ओळख पटत नाही.
अपराजिताची अनेक प्रदेशांवरील आक्रमणे, त्याचे परमारांशी सख्य, त्याची मोठमोठी बिरुदे आणि उत्तरकालीन चालुक्यांचे आधिपत्य स्वीकारण्यास नकार, इत्यादी कारणांमुळे तैलपाचा पुत्र सत्याश्रय याला राग येऊन त्याने त्याच्या राज्यावर स्वारी केली आणि त्याच्या राजधानीपर्यंतचा प्रदेश काबीज केला. अपराजिताला राजधानीतून निसटून समुद्रात आश्रय घ्यावा लागला. तैलपाचा कन्नड राजकवी रण्ण याने आपल्या इ. स. ९८२ मध्ये लिहिलेल्या गदायुद्ध किंवा साहसभीमविजय काव्यात वर्णन केले आहे की, एका बाजूने समुद्र आणि दुसऱ्या बाजूने सत्याश्रयाची सेना यांच्या कात्रीत सापडल्यामुळे दोन्ही बाजूने जळणाऱ्या काठीवर बसलेल्या कीटकाप्रमाणे अपराजिताची अवस्था होऊन तो कापू लागला.
अपराजितानंतर त्याचा पुत्न वज्जड (द्वितीय) गादीवर बसला. हनगल येथील कोरीव लेखावरून असे कळते की, कदंब राजा षष्ठदेव (द्वितीय) (इ. स. १००५ ते १०५५) याची राणी कुंडलादेवी ठाणीचा (ठाण्याचा) राजा वाच्छव्य याची कन्या होती. आळतेकरांच्या मते वाच्छव्य हा शिलाहार नृपती वज्जड (द्वितीय) असावा. वज्जडाच्या राणीचा उल्लेख छित्तराज आणि मुम्मुणिराज यांच्या ताम्रपटात आला आहे.
वज्जडानंतर त्याचा धाकटा भाऊ अरिकेसरी गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीत परमार भोज राजाने उत्तर कोकणावर स्वारी केली होती. या आक्रमणाचे कारण अज्ञात
१०० कित्ता.
*** देव, शिलालेख ताम्रपट पूर्वोक्त, पू. २७०.
१० कित्ता, पृ. २८९.
*** आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४०५, ४०६; कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ६७-६८.
*आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४०८.
१०५ कित्ता, पृ. ४०६-०७.

 

११६
इतिहास
असले तरी कोकणविजयपर्वावरील त्याचे दोन ताम्रपट (इ. स. १०२०) उपलब्ध आहेत. डॉ. आर. जी. भांडारकर यांच्या मते भोजाच्या स्वारीचा हेतू आपला चुलता मुंज याच्या तैलपाने केलेल्या बधाचा मूड घेण्याचा असावा. परंतु मिराशीच्या मते हे कारण संयुक्तिक नाही कारण यावेळी इ. स. ९७५ मधील मुंजाच्या वधानंतर ४४ वर्षांचा दीर्घ काळ लोटला होता. आळतेकरांच्या माहितीनुसार कदाचित अरिकेसरीला उत्तर-कालीन चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले असावे आणि त्याचा भोजाला राग आला असावा.
अरिकेसरीनंतर छित्तराज इ. स. १०२४ पूर्वी थोडा आधी गादीवर आला असावा. त्याचा भोईघर ताम्रपट त्याच वर्षीचा आहे. त्याच्याच काळचे इतर दोन ताम्रपट-एक त्याचा स्वतःचा बलिन म्युझियममधील ताम्रपट आणि दुसरा त्याचा मांडलिक चामुण्डराज याचा चिचणी ताम्रपट- हे दोन्ही शके ९५६ (इ. स. १०३४) चे आहेत. यावरून छित्तराजाची कारकीर्द सुमारे १०२० पासून १०३५ पर्यंत असावी.
छित्तराजाच्या कारकिर्दीत गोव्याचा कदंब राजा द्वितीय षष्ठदेव याने उत्तर कोकणावर स्वारी केली होती. पष्ठदेवाने प्रथम दक्षिण कोकण जिंकून नंतर उत्तर कोकणातील कवडीद्वीपावर स्वारी केली. त्याने आपले स्वामित्व स्वीकारण्याच्या अटीवर उत्तर कोकण छित्तराजाला परत केले.
मागे सांगितल्याप्रमाणे पहिल्या अपराजिताने संयान (संजान) मंडल अरब मांडलिका-कडून जिंकून घेतले होते. त्याचा पुत्र अरिकेसरी याने मोढ वंशी विज्जराणक नावाच्या मांडलिकाची तेथे नेमणूक केली होती. त्याचा मुलगा चामुण्डराज हा छित्तराजाच्या कारकिर्दीत त्याचा मांडलिक म्हणून तेथे राज्य करीत होता. शके ९५६ (इ. स. १०३४) च्या त्याच्या चिचणी ताम्रपटात त्याने आपल्या सम्राटाचा छित्तुराज असा उल्लेख केला आहे. चिचणी ताम्रपटात त्याने 'लाटप्राकारराज्यविध्वंसक' असे बिरुद स्वीकारल्यावरून त्याने लाट प्रदेशावर (दक्षिण गुजरात) विजय मिळवला होता असे दिसते.
छित्तराजाचा विद्या व कलांना उदार आश्रय होता. त्याने उदयसुंदरीकथा नावाच्या चंपूकाव्याचा कर्ता सोड्डल याला राजाश्रय दिला होता. अंबरनाथ येथील सुंदर आणि भव्य शिवमंदिर बांधण्यास त्याने आरंभ केला होता. पुढे त्याचा धाकटा भाऊ मुम्मुणिराज याच्या कारकिर्दीत मंदिर पूर्ण झाले. हे मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना होय.
मुम्मुणीच्या कारकिर्दीत शिलाहारांच्या सत्तेला उतरती कळा लागली. त्याला गोव्याच्या कदंबांचे स्वामित्व काही काळ मान्य करावे लागले. जेव्हा षष्ठदेव द्वितीय त्याच्या भेटीसाठी आला तेव्हा मुम्मुणीने त्याचे मोठे स्वागत केले. नरेंद्र येथील कोरीव लेखात या प्रसंगाचे पुढील वर्णन आहे" जेव्हा छद्वैदेवाच्या समुद्रावरील वैभवयुक्त विहाराची वार्ता मुम्मुणीला कळली तेव्हा तो त्याला सामोरा गेला आणि त्याला आपल्या प्रासादात बोलावून त्याने त्याचे मोठ्या आदराने स्वागत केले, आणि मोठ्या समारंभाने आपली कन्या त्याला अर्पण केली आणि जावयाला पाच लक्ष सुवर्ण नाण्यांचा अहेर केला. १०८
१०१ कित्ता, पृ. ४०८-०९.
कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ६८.
*** आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४१००

प्राचीन काळ
११७
शिलाहारांची सत्ता दुर्बल झाल्यावर संजानचे त्यांचे मोढ वंशी सामंत स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करू लागले आणि शिलाहारांची बिरुदे स्वतः धारण करू लागले. शके ९७५ (इ. स. १०५३) च्या चिचणी ताम्रपटात राजा विज्जल स्वतःचे 'तगरपुरपरमेश्वर' आणि 'शरणागतवज्ज्रपंजर' असे वर्णन करतो. ही बिरुदे उत्तर कोकणच्या शिलाहारांची होती. लवकरच मुम्मणीने या बंडखोर सामंताचा उच्छेद करून संयान मंडल (संजान) आपल्या राज्याला जोडले असे दिसते, कारण यानंतर या सामंतांचे लेख सापडले नाहीत.
आपल्या दोन वडीलभावांप्रमाणे मुम्मुणी विद्वानांचा आणि कवींचा उदार आश्रयदाता होता. सोड्डल कवीने आपली उदयसुंदरीकथा राजसभेत त्याला वाचून दाखविली. मुम्मुणीने त्या कथेची प्रशंसा करून सोड्डलाचा मोठा सन्मान केला आणि त्याला भरपूर द्रव्य अर्पण केले. त्यानंतर सोड्डल 'लाटदेशाधिपति' वत्सराज याच्या आश्रयास गेला, तरी पण त्याने आपल्या कथेत छित्तराज, नागार्जुन आणि मुम्मुणी या तिन्ही राजांनी दिलेल्या उदार आश्रयाचा व सन्मानाचा कृतज्ञतेने उल्लेख केला आहे.
मुम्मुणीच्या कारकिर्दीचा शेवट सुमारे इ. स. १०७० मध्ये झाला असावा. खारेपाटण ताम्रपटात मुम्मुणीच्या मृत्यूनंतर उत्तर कोकणात 'दायादवैरि-व्यसन' (भाऊबंदकी) उत्पन्न झाल्याचा उल्लेख आहे. तो ठाणे व कोल्हापूर येथील शिलाहारांच्याबद्दल आहे.
या झगडधात गोव्याच्या कदंबांनी मुम्मुणीच्या मुलाचा पक्ष घेतलेला दिसतो. कदंब राजा जयकेशी याने उत्तर कोकण जिंकून काही काळ आपल्या ताब्यात ठेवला असावा. कारण काही लेखांत त्याला 'कोकणाधिपति' म्हटले आहे. या युद्धात पश्चिम किनाऱ्यावरील अरब वसाहतीतील अधिकाऱ्याने कदंबांना सहाय्य केले असावे. जयकेशीच्या पणजी ताम्रपटात चेमुल्य (चौल) येथील अरब व्यापारी अलियम याच्या वसाहतीचा उल्लेख आहे. कदंबांनी काही अरबांना आपले मंत्री नेमून त्यांना ग्रामदाने दिली होती."
अनंतपालाचा (प्रथम अनंतदेव) एकच कोरीव लेख शके १०१६ (इ. स. १०९४) चा खारेपाटण ताम्रपट सापडला आहे. त्यात त्याने 'पश्चिमसमुद्राधिपति' ही पदवी धारण करून स्वतःला तो पुरीकोकणादि सबंध कोकण प्रदेशाचा अधिपती समजत होता, असे दिसते. वरील ताम्रपटात त्याने आपल्या काही मंत्र्यांच्या जहाजांना स्थानक (ठाणे), शूर्पारक (सोपारा), चेमुल्य (चौल) इत्यादी बंदरांतील जकातीची सूट दिली होती असा उल्लेख आहे.
अनंतपालाच्या कारकिर्दीच्या अखेरीस शिलाहारांचा गोव्याच्या कदंबांशी संघर्ष निर्माण झाला. कदंब राजा दुसरा जयकेशी याने उत्तर कोकणवर स्वारी केली व त्या युध्दात अनंतपाल मरण पावला. देगावे येथील लेखात जयकेशीला 'कवडीद्वीपांच्या नृपतिचा काळ' असे म्हटले आहे. नंतर जयकेशीने काही काळ कोकण आपल्या ताब्यात ठेवला असावा, कारण इ. स. ११२५ व ११२६ च्या नरेंद्र शिलालेखात चालुक्य सम्राट त्रिभुवनमल्ल (षष्ठविक्रमादित्य) याच्या काळी जयकेशी हा 'सब्बालाख कवडीद्वीपावर राज्य करत आहे' असे म्हटले आहे. जरी नरेंद्र येथील शिलालेखात जयकेशीचा 'कवडीद्वीपाचा
*** आळतेकर, पूर्वोक्त, पृ. ४११.
*** इंडिका, इंडियन हिस्टॉरिकल रिसर्च इन्स्टिटयूट: सिल्वर जुबिली व्हॉल्यूम, पृ. ८९.
*** इंडियन अॅन्टीक्वरी, ९, पू. ३५.

 ११८

इतिहास
अधिपति' असा उल्लेख आहे तरी पुढच्याच वर्षी इ. स. ११२७ मध्ये अपराकनि सबंध कोकण प्रदेश जिंकून परत मिळविला असे त्याच्या ११२७ च्या वडवली ताम्रपटावरून दिसते.
अपरादित्याला विक्रमादित्य व हरिपालदेव हे दोन पुत्र होते. आपल्या निधनानंतर राज्यात बंडाळी माजू नये म्हणून त्याने उत्तर कोकण हरिपालदेवाला व दक्षिण कोकण विक्रमादित्याला देऊन राज्याची विभागणी केली असावी. हरिपालदेबाचे तीन लेख इ. स. ११४९, ११५० व ११५३ चे सापडले आहेत. त्यावरून तो उत्तर कोकणात इ. स. ११३९ ते ११५५ पर्यंत राज्य करीत होता यात शंका नाही. हरिपालदेवाच्या कारकिर्दीपासून उत्तर कोकणच्या शिलाहारांचे शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र भाषेत आहेत.
हरिपालदेवानंतर मल्लिकार्जुन गादीवर आला. त्याचे दोन लेख रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला व ठाणे जिल्ह्यातील वसईला सापडले आहेत.
हेमचंद्राने आपल्या कुमारपालचरित ग्रंथात चौलुक्य नृपती कुमारपाल याच्या सैन्याशी मल्लिकार्जुनाने केलेल्या मुकाबल्याचे सविस्तर वर्णन केले आहे. तो लिहितो की, कुमारपाल आपल्या दरबारात बसला असता त्याचा 'सांधिविग्रहिक' येऊन कोकणावरील स्वारीचा वृत्तांत सांगू लागला. कुमारपालाची सेना कोकणच्या राजधानीजवळ आली असता कोकणाधिपती तिचा प्रतिकार करण्याकरिता चालून आला. राजधानीवरचा हा हल्ला अनपेक्षित होता कारण हेमचंद्राच्या वर्णनावरून मल्लिकार्जुनाचे सैनिक विहिरीवर स्नान करण्याचे टाकून शत्रूचा प्रतिकार करण्याकरिता धावले. मल्लिकार्जुन मोठ्या शौर्यान लढला. परंतु गुर्जरांच्या सैन्याने एकवटून मल्लिकार्जुनाच्या हत्तीवर बाणांचा वर्षाव केला. मल्लिकार्जुन खाली कोसळला आणि त्याच्या सैन्याची दाणादाण झाली. अशा रीतीने कुमारपाल 'पश्चिमसमुद्राधिपति' झाला.
मल्लिकार्जुनानंतर द्वितीय अपरादित्य गादीवर आला. त्याचे मल्लिकार्जुनाशी असलेले नाते ज्ञात नाही. परंतु त्याचे लोनाड, ठाणे आणि परळ येथे अनुक्रमे शके ११०६, ११०७आणि ११०८ चे शिलालेख सापडले आहेत. त्यापैकी एकाही शिलालेखात त्याने गुजरातच्या चालुक्यांच्या सार्वभौमत्वाचा उल्लेख केलेला नाही. उलट परळच्या लेखावरून त्याने 'महाराजाधिराज' आणि 'कोकणचक्रवर्ती' या स्वातंत्र्यनिदर्शक पदव्या धारण केलेल्या दिसतात. त्यावरून त्याने चालुक्यांचे सार्वभौमत्व थोड्याच वेळात झुगारून दिलेले दिसते. इ. स. ११७० ते ११९५ या काळात त्याने राज्य केले असावे. २५
काही वर्षापूर्वी सापडलेल्या शके ११२० (इ. स. ११९८) च्या द्वितीय अपरादित्यानंतर द्वितीय अनंतदेव गादीवर आला असावा. अपरादित्याचा मुलगा असून त्याने अल्पकाळच राज्य केले असावे. वर्षांनी शके ११२५ मध्ये द्वितीय केशिदेव राज्य करीत होता असे वसई शिलालेखावरून कदाचित हा अनंतदेव कारण यानंतर पाचच दिसते. हा केशिवेब
*** आळतेकर, पूर्वोक्त, पू. ४१२.
१११ कित्ता, पृ. ४१५.
११० कित्ता, पृ. ४१६.
१९५ कित्ता.

प्राचीन काळ
११९
द्वितीय अनंतदेवाचा भाऊ असावा. केशिदेवाच्या तीन शिलालेखांपैकी दोन इ. स. १२०३ चे व तिसरा १२३८ चा आहे.
यानंतरचा आणि उत्तर कोकणचा शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर होता. त्याचे दोन शिलालेख-शके ११८१ (इ. स. १२५९) चा उरणजवळ रानवड येथे आणि शके ११८२ (इ. स. १२६०) चा पनवेल तालुक्यातील चांजे येथे सापडले आहेत. दोन्हीही लेखांमध्ये सोमेश्वराच्या दानाचा उल्लेख आहे. पहिले दान काही ब्राह्मणांना आणि दुसरे स्थानक राजधानीतील उत्तरेश्वर देवाला दिले आहे.
सोमेश्वराच्या काळात देवगिरीच्या यादव कृष्ण राजाने (इ. स. १२४७-१२६१) मोठी सेना देऊन आपला सेनापती मल्ल याला उत्तर कोकणवर स्वारी करण्यास पाठवले. मल्लाने शिलाहार राजाचा पराभव केला. परंतु त्यामुळे यादवांचा विशेष लाभ झालेला दिसत नाही. कृष्णानंतर गादीवर आलेल्या महादेव नावाच्या त्याच्या भावाने हत्तींची मोठी सेना घेऊन उत्तर कोकणवर स्वारी केली. सोमेश्वराचा पराभव होऊन त्याने समुद्रात आश्रय घेतला. पण तेथेही महादेवाने त्याचा पाठलाग केल्यामुळे सोमेश्वर समुद्रात बुडून मरण पावला. हेमाद्रीने या घटनेचे वर्णन असे केले आहे की, सोमेश्वराने महादेवराजाच्या क्रोधाग्नीपेक्षा समुद्रातील वडवाग्नीला तोंड देणे पसंत केले.
बृहन्मुंबईतील बोरीवली स्थानकाजवळ काही बीरगळ शिलांवर एका सागरी युद्धाचे शिल्प आहे, ते या युद्धाचे असावे. त्यातील काही वीरगळांवर गजयुद्धाचे व इतर काहींवर नौकायुद्धाचे शिल्प कोरलेले आहे. त्यात जहाजांचा ताफा युद्धात गुंतलेला दिसतो. महादेव राजाच्या सैन्यात हत्तींची मोठी संख्या होती आणि या शिल्पांच्या धाटणीवरून ती १३ व्या शतकातील दिसतात. म्हणून हे शिल्प महादेव व सोमेश्वर यांच्या युद्धाचे असावे असे अनुमान पुरातत्त्वज्ञ कझेन्स यांनी केले आहे. ११८ ते संभवनीय वाटते. हे युद्ध इ. स. १२६५ मध्ये झाले असावे. त्यानंतर यादवांनी उत्तर कोकणच्या प्रशासनाकरिता अच्युत नावाच्या राज्यपालाची नेमणूक केली. त्याचा ठाणे येथील शिलालेख इ. स. १२७२ चा आहे.
शिलाहारांच्या अनेक लेखांत त्या काळच्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्थितीवर बराच प्रकाश पडतो. बहुतेक शिलाहार राजे राष्ट्रकूटांचे, चालुक्यांचे, परमारांचे किंवा कदंबांचे मांडलिक होते, तरीपण त्यांना बऱ्याच सवलती व स्वातंत्र्य होते. शिलाहारांच्या अनेक दानपत्त्रांमध्ये त्यांच्या सार्वभौम राजांचा कुठेच उल्लेख नाही. यावरून शिलाहार स्वतंत्रपणे करवसुली करीत होते.
शिलाहारांच्या राज्यात हिंदू, बौद्ध व जैन धर्म मोकळेपणाने नांदत होते. कान्हेरीला बौद्ध धर्माचे एक मुख्य केंद्र होते व त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून मदत मिळत होती. शिलाहार प्रामुख्याने शैव पंथीय होते हे त्यांच्या अंबरनाथ येथील शिवमंदिर व अनंतदेवाच्या खारेपाटण ताम्रपटातील शिवाचे उल्लेख यावरून दिसते. अपरार्काच्या एका ताम्रपटात त्याने सोमनाथ मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख आहे. रद्वराजाच्या खारेपाटण येथील लेखात शिवमंदिराबाबत जी माहिती मिळते त्यावरून मंदिरातील शिव मूर्तीची पूजा ११६ कित्ता.
१२० कित्ता, पृ. ४१७; कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ७१.
" हेन्री कझेन्स, मेडिव्हल आर्किटेक्चर इन दि डेक्कन, पृ. २१.

१२०
इतिहास
दिवसातून तीन वेळा केली जात होती व त्याकरिता एका ब्राह्मण कुटुंबाची नेमणूक केली होती. एक तेली अळेश्वर मंदिराच्या नंदादीपाला लागणाऱ्या तेलाकरिता, एक माळी दररोज पूजेला लागणाऱ्या पुष्पांकरिता, एक कुंभार मडक्याकरिता व एक धोबी देवांची व पुरोहित वर्गाची वस्त्रे धुण्याकरिता नियुक्त केला होता. त्यांच्या काळात सूर्य-चंद्र ग्रहणांना व ब्राह्मण भोजनाला महत्त्व दिले जात असे.
आर्थिक बाबतीत शिलाहारांच्या लेखात अनेक वेळा श्रेणींचा उल्लेख केला आहे. त्यांच्याकडून पैशाची देवाण-घेवाण किंवा कर्जाऊ रक्कम देणे-घेणे असे व्यवहार केले जात असत. कायम स्वरूपात ठेवलेल्या रकमेबर सतरा टक्के व्याज आकारल्याची माहिती काही लेखांमध्ये मिळते. खारेपाटण ताम्रपटानुसार मंदिराची देखरेख करणाऱ्या ब्राह्मणास चार निवर्तने (अंदाजे २० एकर) जमीन त्याच्या उपजीविकेकरिता दिली होती.



खार्डी गावात शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व उदयास

पालघर तालुक्यातील दातिवरे गावाजवळील खार्डी येथे शिलाहारकालीन गधेगळ शिलेचे अस्तित्व प्रकाशित झाले असून याच गावांमध्ये १५०० वर्षे जुने शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खार्डी गावाच्या शिलाहारकालीन पुराव्यांनी इतिहासाला नव्याने साद घातली आहे.

‘किल्ले वसई मोहीम परिवारा’ अंतर्गत गुढीपाडव्याच्या प्रसंगी खार्डी गावातील वाघ देवाची डोंगरी मंदिराच्या मागे, मालेपाडा मानपाडा यांच्या हद्दीवर शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळेचे ऐतिहासिक महत्त्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध व प्रकाशित करण्यात आले. खर्डी येथील दुर्गप्रेमी योगेश विश्वनाथ भोईर यांनी या शिलालेखाची माहिती डॉ. श्रीदत्त राऊत यांना दिल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी या शिळेचा प्रथम वेध घेण्यात आला होता.

दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौल साम्राज्यापर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती. उत्तर कोकणात शिलाहारांचा कालावधी इ.स. ८०० ते १२६५ असा सुमारे ४०० वर्षांचा मानण्यात येतो. वसई किरवली व पालघर तालुक्यातील खार्डी येथे मिळालेल्या अवशेषावरून हे साम्राज्य १२७१ पर्यंत असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. खार्डी गावातील उपलब्ध झालेला शिलालेख ११ व १२ व्या शतकातील इतिहासाची मूक पाने बोलकी करणार आहे.

या गावातील तलावामध्ये काही वर्षांपूर्वी भग्नावस्थेमधील काही मूत्र्या सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अधिक अभ्यास केल्यानंतर सुमारे पंधराशे वर्षे जुना असणाऱ्या दोन हजारहून अधिक विटा सापडले असून शिलाहार मंदिराचे अस्तित्व उदयास आले. या मंदिराची स्थाननिश्चिती झाली असल्याचे डॉ. श्रीदत्त राऊत यांनी लोकसत्तेला सांगितले.

११ व १२ व्या शतकातील इतिहास बोलका

ऐतिहासिक संदर्भाचा मागोवा घेताना दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौल साम्राज्यापर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती. ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिल्ह््याचा दक्षिण भाग व ठाणे, अलिबाग, रत्नागिरी हे तीन जिल्हे यांचा समावेश होतो. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लीकाजुर्न, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतो. उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य ४०० वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा कालावधी इ.स ८०० ते १२६५ असा मानण्यात येतो. यात प्रथम कपर्दी, पुलशक्तीपासून ते तृतीय अनंतदेव, सोमेश्वर असा समावेश होतो. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्टात आणली. किरवली येथील शिलालेख लक्षात घेता नवीन संशोधनानुसार शिलाहार राजा तिसरा अनंतदेव शके ११७० असा कालखंड पुढे जातो. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू व अवशेष पालघर प्रांतांत विखुरलेल्या आहेत.

* या शिलालेखाचा पुरातत्वीय पद्धतीने सलग २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान विविध ठसे घेण्यात आलेले असून त्याचे संशोधनपर वाचन पूर्ण करण्यात आलेले आहे. या शिलालेखाचा तपशील गॅझेटियर विभाग, विविध लेखमाला शासकीय व संशोधन त्रैमासिक माध्यमातून अभ्यासकांपर्यंत प्रसिद्ध होण्यासाठी सादर करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षात उन्ह, पाऊस, वारा या नैसर्गिक प्रभावात शेवाळ, माती, चिखल साचून हे शिलालेख पूर्णपणे दुर्लक्षित होऊन या शिळा नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.

शिलालेखाचा तपशील

८१ सेंमी उंची व ३७ सेंमी रुंदी, एकूण १० ओळी, पहिली ओळ अपूर्ण, पुढील ४ ओळी त्यातील काही मजकूर अक्षरे वाचनीय, गद्धेगाळ शिल्प स्पष्ट ३० सेंमी रुंदी २.५मीटर उंची चौकोनी, चंद्र सूर्य प्रतिमा स्पष्ट इत्यादी  बाबींचा तपशील प्रथमच सविस्तर पद्धतीने संकलित करण्यात आला आहे.








शिलाहार हे महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन राजघराणे. या राजघराण्यातील राजांनी विद्या, कला आणि साहित्य यांना उदार आश्रय दिला होता. त्यांच्या काळात अनेक उत्तमोत्तम असे ग्रंथ संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झाले. काळाच्या ओघात यांतील बहुतांश ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. यांपैकी संस्कृत कवी सोड्ढलरचित उदयसुन्दरीकथा, याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरार्कटीका आणि सोमदेवाची जैनेंद्रव्याकरणावरची शब्दार्णवचन्द्रिका हे  ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच कर्णपार्याचा नेमिनाथपुराण हा कन्नड भाषेतील एकमेव ग्रंथ आज संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी आहे. शिलाहार राजांच्या दरबारी अनेक प्रतिभावान कवींना आश्रय मिळाला होता, हे त्यांच्या ताम्रपटातील भाषेचा दर्जा आणि मजकुराची सुंदर रचना यावरून लक्षात येते. परंतु त्यांची नावे अज्ञात आहेत.
कवी सोड्ढलकृत उदयसुन्दरीकथा : शिलाहार नृपती मुम्मुणिराज याचा आश्रित  सोड्ढल कवी याचे हे चंपू प्रकारातील गद्य काव्य असून यात नागलोकाची राजकन्या उदयसुंदरी आणि प्रतिष्ठान म्हणजेच पैठणचा राजा मलयवाहन यांच्या लग्नाची कथा आहे. हे काव्य आठ उच्छ्वासांमध्ये रचले आहे. त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी कवीने स्वतःविषयी आणि आपल्या घराण्याविषयी माहिती दिली आहे. हर्षचरितकर्ता कवी बाण याचा या काव्यावर विशेष प्रभाव दिसून येतो. तसा उल्लेख सोड्ढलाने काव्यात केला आहे. या काव्यात अनेक समकालीन राजांचे उल्लेख असल्यामुळे याच्या रचनेचा काळ ठरवणे तुलनेने सोपे जाते. इ. स. च्या अकराव्या शतकात याची निर्मिती झाली असावी. या काव्यातील उल्लेखांवरून असे दिसते की, याची निर्मिती लाटदेश (दक्षिण गुजरात) आणि उत्तर शिलाहार राज्यांच्या सीमावर्ती भागात झाली असावी. कवीने यात समासांचा भरपूर वापर केला आहे; परंतु त्यात श्लेष नसल्यामुळे काव्य सहजसुंदर झाले आहे. कवीची सौंदर्यदृष्टी आणि अचूक निरीक्षणशक्ती काव्यातील विविध वर्णनांवरून प्रत्ययास येते. समकालीन कवी व त्यांचे काव्यग्रंथ तसेच  शिलाहार नृपती मुम्मुणी याने केलेला आदरसत्कार यांचे वर्णनही या काव्यात आले आहे. आरंभीच्या चंपू काव्याचे उदाहरण म्हणून संस्कृत साहित्याच्या इतिहासात या काव्यास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरार्कटीका : या ग्रंथाचे श्रेय शिलाहार नृपती पहिला अपरादित्य किंवा अपरार्क याला देण्यात येते. ग्रंथाच्या सुरुवातीला प्रास्ताविक श्लोकात ग्रंथकर्त्याविषयी माहिती आहे. त्यात कवीने स्वतःला जीमूतवाहनाच्या वंशातील म्हणविले आहे. तसेच टीकेच्या शेवटच्या श्लोकामध्ये आलेल्या वर्णनानुसार कवी राज्यकर्त्या वर्गातला असावा, याची खात्री पटते. जीमूतवाहनाचा वंश म्हणजे शिलाहार वंश हे सर्वज्ञात आहे. तेव्हा या ग्रंथाचा कर्ता शिलाहार राजा पहिला अपरादित्य हा असण्याची दाट शक्यता आहे. अनेक इतिहासकारांचे मत असे आहे की, या ग्रंथाची निर्मिती अपरादित्याच्या दरबारातील पंडितांनी केली असावी; परंतु त्याचे श्रेय मात्र राजाला दिले गेले असावे. या ग्रंथाची निर्मिती इ. स. च्या बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झाली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. अपरार्काच्या या  ग्रंथास पूर्वोक्त प्रास्ताविक श्लोकात टीका म्हटले असले, तरी ती रूढ अर्थाने टीका नसून मूळ ग्रंथाचे अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी लिहिलेला निबंध आहे, असे ग्रंथकर्त्यानेच अखेरच्या श्लोकात म्हटले आहे. अपरार्क ज्या वेळी ह्या ग्रंथाची रचना करत होता, तोपर्यंत हिंदू समाजात धार्मिक व सामाजिक बाबतींत अनेक बदल घडून आले होते. अपरार्काने याज्ञवल्क्यऋषींच्या वचनांचा सरळ अर्थ सांगितला आहे. त्यानंतर त्यावरची इतर धर्मशास्त्रकारांनी मांडलेली मतेही सांगितली आहेत आणि मग त्याविषयी स्वतःचे मत मांडले आहे. हा ग्रंथ काश्मीरमध्ये प्रमाण मानला जातो.

सोमदेवकृत शब्दार्णवचन्द्रिका : महाराष्ट्रातील शिलाहार या मध्ययुगीन वंशातील कोल्हापूर शाखेतील दुसरा शिलाहार भोज राजा याचा आश्रित कवी सोमदेव (सोमेश्वर) याने जैनेंद्र व्याकरणावरच्या गुणनंदीकृत शब्दार्णव  या ग्रंथावरील शब्दार्णवचन्द्रिका  ही टीका लिहिली. या ग्रंथाच्या शेवटी असा उल्लेख आढळतो की, याची रचना श्रीकोल्लापुर देशातील आजुरिका महास्थानामध्ये महामंडलेश्वर गंडरादित्याने बांधलेल्या त्रिभुवनतिलकनामक जिनालयात (वसतीत) पूर्ण केली. श्रीकोल्लापूर म्हणजे आजचे कोल्हापूर आणि त्यातील आजुरिका म्हणजे आजचे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरे गाव होय. याची रचना शिलाहार राजा वीरभोजदेवाच्या काळात इ. स. १२०५ मध्ये झाली. ग्रंथात लेखक स्वतःला तीर्थंकर महावीरांचा अनुयायी म्हणवतो. या टीकेची रचना मूलसंघाच्या माघचंद्राचा शिष्य नागचंद्र याच्या हरिचंद्र नावाच्या शिष्याकरिता केली. सोमदेवाने आपल्या ग्रंथात दिलेली उदाहरणे सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत.

कर्णपार्याकृत नेमिनाथपुराण : कोल्हापूरचे शिलाहार राजे आणि त्यांचे मांडलिक यांनी कन्नड ग्रंथकारांनासुद्धा उदार आश्रय दिला होता. या ग्रंथाची रचना कर्णपार्याने केली. हा शिलाहार राजा विजयादित्य याचा समकालीन होता. त्याने या ग्रंथात विजयादित्य आणि त्याचा पिता गंडरादित्य यांची स्तुती केली आहे. त्याने हा ग्रंथ कोल्हापूर जिल्ह्यातील हेर्ले गावात असलेल्या चंद्रप्रभ तीर्थंकर यांच्या त्रिभुवनतिलक नावाच्या मंदिरात लिहिला. या ग्रंथात वर्णिलेली एक घटना ऐतिहासिक घटनेवर आधारित असावी, असा अंदाज इतिहासकारांनी व्यक्त केला आहे. ती म्हणजे राजा विजयादित्य याने गोमंथगिरीवर स्वारी करून ते जिंकून घेतल्याची घटना. कोल्हापूरचे शिलाहार राजे कर्नाटक राज्यामधील शिमोगा जिल्ह्यातील गोमंथ येथून आले होते आणि गोमंथगिरीमधील चंद्रगुप्ती ही त्यांची राजधानी होती, असे उल्लेख मिळतात. विजयादित्याने आपल्या पूर्वजांच्या भूमीवर ताबा मिळवला म्हणून आपल्या गोमंथशैलाग्रावरील जन्मभूमीला त्याने मुक्त केले आणि स्वतः तिला विभूषित केले, असे कर्णपार्याने म्हटले आहे. त्याने या ग्रंथात त्याच्या आधी होऊन गेलेल्या अनेक आचार्यांचा आणि ग्रंथकारांचा उल्लेख केलेला आहे.

शिलाहार काळातील प्रमुख साधनांमध्ये वरील समकालीन साहित्याचा समावेश होतो. समकालीन ग्रंथांमधून त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक जीवनाविषयी अमूल्य माहिती मिळते. यामुळेच शिलाहार राजांच्या इतिहासलेखनासाठी या ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

संदर्भ :

  • Sharma, Sudarshan Kumar, Udaysundari Katha of Soddhala, Parimal
    Publications, Delhi, 2004.
  • Kane, P. V. History of Dharmasastra (Ancient and mediaeval Religious and
      Civil Law In India), Bhandarkar Oriental Research Insitute, Pune, 2006.
  • खरे, ग. ह. संपा., दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३०.
  • मिराशी, वासुदेव विष्णु, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९७४.

एक मध्ययुगीन राजघराणे. शिलाहार राजे मूळचे कुठले असावेत, याविषयी त्यांच्या शिलालेखांतील आणि ताम्रपटांतील उल्लेखांवरून अंदाज येऊ शकतो. शिलाहार राजांनी अनेक बिरुदे धारण केलेली होती.  त्यांपैकी ‘तगरपुरपरमेश्वरʼ आणि ‘तगरपुरवराधीश्वरʼ ही या संदर्भात उल्लेखनीय आहेत. उत्तर कोकण व कोल्हापूर-सातारा या जिल्ह्यांतील प्रदेशावर राज्य करणारे शिलाहार ‘तगरपुरवराधीश्वरʼ असे आपले वर्णन करतात. याचा अर्थ हे एकतर तगर नगरीमधले असावेत किंवा तेथे ते काही काळ राज्य करीत असावेत. अशा प्रकारची नगरविषयक बिरुदे गुप्त आणि कलचुरी राजघराण्यांच्या कोरीव लेखांत आढळून येतात. तगर म्हणजे मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेरʼ नावाचे प्राचीन स्थळ होय. येथे अतिप्राचीन काळापासूनच्या वस्तीचे अवशेष मिळालेले असून ते अतिशय भरभराटीला आलेले नगर होते, याविषयी निश्चित पुरावे आता उत्खननांतून प्राप्त झालेले आहेत.

लिखित साहित्यातसुद्धा याविषयीचे उल्लेख आढळून येतात. १० व्या शतकातील हरिषेण या कवीच्या बृहत्कथाकोश या संस्कृत ग्रंथात आणि ११ व्या शतकातील करकंडचरिउ या अपभ्रंश भाषेतील काव्यात करकंडक या अंगदेशाच्या राजासंबंधी कथा आहे. तीत काही संदर्भ मिळतात. उत्तरेतील आपले राज्य स्थिर झाल्यानंतर करकंडक राजा दक्षिणदिग्विजय करण्याकरिता निघाला. तो तेरपूर किंवा तेरापूर येथे आला. तिथे त्याला जवळच्या टेकडीवरील लेण्यांची माहिती मिळाली आणि त्या लेण्यांत त्याला पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती दिसली. टेकडीच्या माथ्यावर तशीच अजून एक मूर्ती वारुळात मिळाली. त्यांविषयी चौकशी करता राजाला असे समजले की, हिमालयातून हद्दपार केलेले नील आणि महानील हे विद्याधर तेरपूरला आले होते. त्यांना एका जैन मुनीने जैन धर्माची दीक्षा दिल्यावर त्यांनी त्या टेकडीवर लेणी कोरून त्यात पार्श्वनाथांच्या मूर्तीची स्थापना केली. ही कथा ऐकून राजानेसुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने तिथे लेणी कोरली. या कथेत सत्याचा अंश असावा. या कथेत वर्णन केलेली लेणी तेरच्या जवळ असलेली धाराशिव लेणी असावीत. तेथे सहा लेणी आहेत आणि ती दोन गटांत विभागली आहेत. एका गटात दोन, तर दुसऱ्या गटात चार लेणी आहेत. कथेत वर्णन केल्याप्रमाणे तेथे पार्श्वनाथांच्या मूर्ती आढळतात व ही लेणी विद्याधरांनी कोरली आहेत. शिलाहारांच्या काही बिरुदांमध्ये त्रिभुवननील, आहवनील आणि तगरपूरपरमेश्वर अशा बिरुदांचा उल्लेख येतो. यात तगर नगरीमध्ये नील आणि महानील यांनी राज्य केले, या समजुतीविषयीचे प्रतिबिंब पडते.

शिलाहार राजांचा उल्लेख त्यांच्या शिलालेखांत आणि ताम्रपटांत सिलार, शिलार, सियळार, शैलाहार अशा विविध प्रकारे येतो. त्यांचे ‘शिलाहारʼ असे संस्कृत रूप झाल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या कथा निर्माण झाल्या असाव्यात. महाराष्ट्रात अजूनही ‘शेलारʼ आडनावाची कुटुंबे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मध्ययुगीन इतिहासात असे आढळून येते की, आपल्या राजवंशाची उत्पत्ती प्राचीन काळच्या प्रसिद्ध वंशापासून झाल्याबाबतच्या कथा या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक तयार केल्या असाव्यात. शिलाहारांच्या उत्पत्तीची कथा हा असाच प्रकार वाटतो. शिलाहार राजे आपल्या कोरीव लेखांमध्ये ते विद्याधर नृपती जीमूतकेतू याचा पुत्र जीमूतवाहन याच्या वंशात उत्पन्न झाल्याची माहिती देतात. या जीमूतवाहनासंबंधी असे म्हटले जाते की, त्याने नागकुमार शंखचुडाला गरुडाच्या तावडीतून स्वतःचा बळी देऊन सोडवले आणि गरुडाच्या शिलेवरचा आहार झाला म्हणून याला ‘शिलाहारʼ असे नाव मिळाले. या संबंधीची मूळ कथा पैशाची भाषेतील बड्डकहा (संस्कृत रूप बृहत्कथा) या कथाग्रंथात आहे. हा ग्रंथ सातवाहनकालीन असून तो मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. त्याची संस्कृत रूपे मात्र उपलब्ध आहेत. या कथेत असे सांगितले आहे की, गरुडाने वासुकी राजाला आपल्या प्रजेतून दररोज एक सर्प देण्यास भाग पाडले होते. एक दिवस शंखचूड नावाच्या नागाची वेळ आली. तो एका शिळेवर बसून गरुडाची वाट पाहत होता. ते पाहून विद्याधर कुमार जीमूतवाहनाला वाईट वाटले. शंखचूड गोकर्णला शंकराच्या दर्शनाला गेला असताना याने त्याची जागा घेतली. गरुड जीमूतवाहनाला खाण्यासाठी घेऊन गेला. त्याला अर्धवट खाऊन झाल्यावर गरुडाला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. जीमूतवाहनाच्या बायकोच्या प्रार्थनेवरून पार्वतीने त्याला जिवंत केले आणि गरुडाने यापुढे सर्प न खाण्याचे ठरवले. ही कथा सातवाहनकालीन बृहत्कथेमध्ये असल्यामुळे असे वाटते की, सातवाहनकाळात शिलाहार वंश महत्त्वाच्या घराण्यांपैकी असावा किंवा नंतरच्या काळात ज्या अनेक कथा मूळ बृहत्कथेमध्ये घुसडण्यात आल्या, त्यांपैकी ही एक कथा असावी. मूळ ग्रंथातील कथा आणि प्रक्षिप्त भाग यांतील फरक शोधून याविषयी निश्चित विधान करता येऊ शकेल.

छ्द्वैदेव शिलाहार याच्या ताम्रपटात वंशनामाची एक वेगळी कथा दिली आहे. पण ही कथा इतर कुठल्या शिलालेखात, ताम्रपटात किंवा साहित्यात आढळत नाही. या कथेनुसार परशुरामाच्या बाणाने त्रस्त झालेल्या पश्चिम समुद्राचे ‘सिलारʼ नामक वीराने रक्षण केले, म्हणून या वंशाचे नाव ‘सिलारʼ असे पडले.

संदर्भ :

  • खरे, ग. ह. संपा., दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३०.
  • जोगळेकर, स. आ. संपा., हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२.
  • मिराशी, वासुदेव विष्णु, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९७४.
  • मोरवंचीकर,  रा. श्री. सातवाहनकालीन महाराष्ट्र, अपरांत प्रकाशन, पुणे, डिसेंबर २०१७.












No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...