Saturday, September 12, 2026

कलचुरी राजवंश

 भारतातील काही राजवंश असे आहेत, जे अगदी प्रदीर्घ काळ सत्तेवर होते; पण त्यांची विशेष दखल इतिहासाने घेतली नाही. कलचुरी वंश हा अशाच राजवंशांपैकी एक आहे. सुमारे १२०० वर्षे हा वंश भारतात कुठेना कुठे सत्तेत होता, पण त्यांच्या कोणत्याच राजाची कारकीर्द देदीप्यमान, असाधारण नव्हती. शिवाय कलचुरी राजे एकसलग असे कधी गादीवर आले नाहीत. त्यामुळे भारतीय राजवंशांचा विचार करताना ते नकळत कुठेतरी मागच्या रांगेत जातात. पु. लं.च्या भाषेत सांगायचं तर ते ‘नट’ नव्हे; तर ‘बोलट’ ठरतात...


कलचुरी वंश ‘महिष्मतीचे कलचुरी’, ‘त्रिपुरीचे कलचुरी’, ‘रत्नपूरचे कलचुरी’ आणि ‘कल्याण कलचुरी’ अशा चार शाखांमधे विभागला आहे. या चारही शाखांचा एकत्रित विचार केल्यास ते इ. स. ५५० ते १७४० एवढा काळ ठिकठिकाणी सत्तेत होते. ‘कलचुरी’ या नावाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तो संस्कृतोद्भव शब्द नाही, हे निश्चित! वा. वि. मिराशी या नावाचे पर्यायी शब्द कटच्चुरी, कलत्सुरी, कालच्चुरी, कलचुर्य असेही असल्याचे नमूद करतात. मुजूमदारांच्या व डॉ. भांडारकरांच्या मते कलचुरी हे मुळात परदेशी असावेत आणि ‘कलचुरी’ हा शब्दही तुर्की उद्गमाचा असावा. पण स्वत: कलचुरी राजे काही ताम्रपट व लेखांमध्ये स्वत:ला हैहय वंशाचे मानतात. (saptarang latest article on Kalachuri dynasty )

महिष्मतीचे कलचुरी

ही सगळ्यात जुनी शाखा आहे. यशोवर्मन आणि वाकाटक यांच्या पतनानंतर जी राजकीय पोकळी मध्य भारतात निर्माण झाली, तिचा फायदा घेऊन कृष्णराज याने इ. स. ५५० च्या आसपास महिष्मती या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. तो कलचुरी वंशातील पहिला ज्ञात राजा आहे. आता ही ‘महिष्मती’नगरी थेट पुराणकाळापासून आहे. हैहय वंशाची-कार्तवीर्य सहस्रार्जुनाची ती राजधानी होती.

ही महिष्मती म्हणजे आजचे कोणते ठिकाण, यावर बरीच मतांतरे आहेत. ती नर्मदेच्या काठी होती हे नक्की! आताचे ओंकारेश्वर, महेश्वर किंवा अमरकंटक यापैकी कोणते तरी नगर ‘महिष्मती’ असावे. या वंशाचे तीनच राजे लेखांवरून दिसतात. कृष्णराज, शंकरगण आणि बुद्धराज. बुद्धराजाचा पराभव करून चालुक्य पुलकेशीने ही शाखा संपवली. कृष्णराजाची नाणी ज्या ज्या ठिकाणी आढळून आली आहेत, ती बघता सहाव्या शतकात कोकण पट्टीवरती त्याचीच सत्ता होती, असे दिसते.

या पार्श्वभूमीवरती बहुतेक संशोधक, मुंबई जवळच्या घारापुरी लेण्यांचे श्रेय कृष्णराजाला देतात (काही जण हेच श्रेय राष्ट्रकूट अथवा चालुक्यांना देतात). घारापुरी लेण्यांमधली जगप्रसिद्ध त्रिमूर्ती ही ‘सदाशिव त्रिमूर्ती’ आहे. शंकराचीच ती तीन रूपे आहेत. ते ब्रह्मा, विष्णू, महेश नाहीत. कलचुरी राजे हे शैवपंथीय होते. त्यामुळे घारापुरी लेण्यांमधे सगळे शिवचरित्र कोरले आहे. (latest marathi news)

कर्नाटकातील गदग येथील बसवेश्वरांचा पुतळा.

कर्नाटकातील गदग येथील बसवेश्वरांचा पुतळा. esakal

त्रिपुरीचे कलचुरी

वातापी चालुक्यांच्या आक्रमणाच्या वेळी कलचुरींपैकीच एक-वामराजदेव, हा पर्याय शोधत उत्तरेकडे गेला. इ. स. ६७५ च्या सुमारास त्याने कालंजरचा गड ताब्यात घेतला आणि जबलपूर जवळील तेवर म्हणजे ‘त्रिपुरी’ या ठिकाणी नवे राज्य स्थापन केले. त्याच्या वंशातील सुमारे १५ पिढ्यांनी या भागात राज्य केले. यांना ‘चेदी कलचुरी’ असेही नाव आहे.

वामराजाचा वंशज कोकल्लदेव हा एक प्रबळ राजा होता. नंतरचा युवराजदेव हा राष्ट्रकुटांचा नातेसंबंधी व सहकारी होता. त्याने प्रतिहारांवर मिळवलेल्या विजयानंतर प्रसिद्ध संस्कृत कवी ‘राजशेखर’ युवराजदेवाच्या आश्रयाला आला. नंतरच्या पिढीतील गांगेयदेव आणि त्याचा मुलगा कर्णदेव अथवा लक्ष्मीकर्ण हे दोघेही अकराव्या शतकात अत्यंत पराक्रमी राजे होऊन गेले.

विशेषत: कर्णदेव हा संपूर्ण कलचुरी वंशातील सगळ्यात कर्तबगार राजा होता. त्याने परमार, चंदेल, पाल अशा सर्वांना युद्धात खडे चारले होते. त्याने वाराणसीला एक भव्य, बहुमजली कर्ण-मेरू मंदिर बांधले होते. प्रसिद्ध कवी ‘बिल्हण’ त्याच्या पदरी होता. लक्ष्मीकर्णाची कारकीर्द हा कलचुरींचा कळसाध्याय होता. पण नंतर इ. स. १२१० च्या सुमारास चंदेल राजांनीच त्रिपुरी ताब्यात घेऊन कलचुरींचा पाडाव केला.

रत्नपूरचे कलचुरी

त्रिपुरी कलचुरी राजा कोकल्लदेव-१ याचा एक मुलगा कलिंगराज याला वडिलांनी महाकोशल या भागाचा प्रांतपाल नेमले होते. तिथे आपला जम बसवून त्याने इ. स. १००० मध्ये वेगळे राज्य स्थापन केले. आजच्या बिलासपूर जिल्ह्यातील रत्नपूर हीच त्याची राजधानी होती आणि आजचे छत्तीसगड हे रत्नपूर कलचुरींचे राज्य होते. हे ‘छत्तीसगड’ नावसुद्धा ‘चेदिसगड’- चेदी कलचुरींचे गड या नावाचा अपभ्रंश आहे, असे इतिहास संशोधक मानतात. (latest marathi news)

एक मत असेही आहे, की कलचुरींकडे खरोखर ३६ गड होते, म्हणून छत्तीसगड! पण, असे किल्ले प्रत्यक्षात कुठेही आढळलेले नाहीत. या शाखेतील राजांनीही अनेक शतके शांततेत राज्य केले. इ. स. १७४० मध्ये नागपूरकर रघुजीराजे भोसले यांनी कलचुरींचा पूर्ण पराभव केला आणि त्यांना नागपूरचे मांडलिक बनवले. अखेरचा कलचुरी राजा, मोहनसिंग १७५८ मध्ये मरण पावला.

कल्याण कलचुरी

कलचुरी वंशाचा एक सरदार किंवा सामंत बिज्जल हा कर्नाटक प्रांतावर नेमलेला होता. त्याने इ. स. ११५७-६० च्या सुमारास तत्कालीन चालुक्य राजा तिसरा तैल याला आपल्या कह्यात घेऊन स्वत:ला ‘सम्राट’ घोषित केले. आधी त्याचे मुख्य ठाणे महाराष्ट्रात मंगळवेढ्याला होते. पण, चालुक्य राजाला पद्धतशीरपणे बाजूला केल्यावर बिज्जलाने कल्याणी किंवा ‘बसव कल्याण’ हे चालुक्यांचेच राजधानीचे ठिकाण आपल्यासाठी निश्चित केले. हा बिज्जल राजा आज आपल्याला त्याच्या मुख्य प्रधानामुळे अधिक परिचित आहे.

त्या प्रधानाचे नाव ‘बसवेश्वर.’ वीरशैव अथवा लिंगायत पंथाचे संस्थापक म्हणून इतिहासात अजरामर असलेले बसवेश्वर हे बिज्जलाचे प्रधान असण्याबरोबर तत्त्वज्ञ, कवी आणि समाजसुधारक होते. पण त्यांचे अनुयायी आणि राजा बिज्जल यांचे वितुष्ट आले आणि बसवण्णांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच झालेल्या बंडाळीत बिज्जलाची हत्या झाली. त्याचा मुलगा सोविदेव हासुद्धा लिंगायत पंथात अप्रिय ठरला. त्याच्या नंतरचे राजे अगदी अल्पकाळ सत्तेवर टिकले. नंतर कल्याणी चालुक्यांनी आपले राज्य इ. स. ११८०-८१ मध्ये कलचुरींकडून पुन्हा हिसकावून घेतले.



















कल्याणचे कलचुरी :-
     बिज्जल कलचुरी याने इ.स. ११६२ मध्ये चालुक्यांचा राजा तैलास पदच्युत करून सता प्रस्थापित केली. दोन दशकाहून अधिक काळापर्यंत चालुक्य सत्तेला लागलेल्या या ग्रहण कालात कल्याणचे राजसिंहासन बिज्जल कलचुरी आणि त्यांच्या वंशराजांच्या ताब्यात होते. कलचुरी राजवंशाचा मूळ पुरुष हैहेय कार्तवीर्य असून त्यांचे मूलस्थान मध्यप्रदेशातील महिष्मती हे होते. तेथून या वंशाचे यौद्धे विविध ठिकाणी स्थलांतरित झाले व त्यातून या राजवंशाच्या विविध शास्वा अस्तित्वात आल्या. या वंशाच्या मध्यप्रदेशातील कलंजर शास्वेतील काही लोक दक्षिणेत गेले व त्यांनी कल्याणच्या चालुक्यांची चाकरी पत्करली.
      या वंशातील जोगम कलचुरी याला चालुक्य सम्प्लव्या विक्रमादित्याने महामंडलेश्वर हे पद बहाल करून त्याच्याकडे क-हाड-४००० या मंडळाचे प्रशासन सोपविले. चालुक्य राजवंशाशी वैवाहिक संबंध झाल्यामुळे कलचुरींची प्रतिष्ठा वाढत गेली. जोगमाचा पुत्र कलचुरी पेर्माडी हा तिसया सोमेश्वराच्या कारकिर्दीत महामंडलेश्वर म्हणून तारदावाडी मंडलाचे प्रशासन चालवीत होता. पेर्माडीचा मुलगा बिज्जल हा सहाव्या-विक्रमादित्य आणि त्यानी राणी चंदलादेवी यांचा नातू होता कारण त्यांनी कन्या पेर्माडीची पत्नी आणि बिज्जलाची माता होती. सोलापूर जिल्हयातील तालुका मुख्यालय असलेले मंगळवेढे हे या कलचुरीचे वास्तव्यस्थान होते.
        पेर्माडीचा मुलगा दुसरा बिज्जल अशा प्रकारे चालुक्य जगदेकमल्ल आणि तिसरा तैल यांचा आतेभाऊ होता. कहाड- ४००० मण्डलाचा प्रशासक बिज्जल असताना त्याची आजी चंदलादेवी ही कदंबडे-३०० विभागातील वलसंग उपविभागाचे प्रशासन चालवीत होती. चालुक्यांचा मांडलिक म्हणून बिज्जलाने आपले राजकीय महत्त्व वाढविले आणि शेवटी आपल्या स्वामीचे सिंहासन बळकावून स्वतंत्र व सार्वभौम राजा बनला. इ.स. ११६२ मध्ये तो सार्वभौम राजाच्या बिरुदासह कल्याण येथून राज्य करीत होता. अनेक प्रदेश जिंकल्याचा दावा केला आहे. परंतु त्यात फारसे तथ्य नाही. कारण मुकाबला करण्यातच त्याला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागली होती. बिज्जलाने चालुक्यांचा सेनानी असताना केला होता, परंतु त्याने सत्ता बळकावल्यानंतर मात्र होयसळांनी त्याला स्वस्थपणे कारभार करू दिला नाही. बिज्जलाने पर्वत, मैदानी प्रदेश आणि समुद्रकिनारपट्टीतील एक हजार किल्ले आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. हा दावा जरी अतिशयोक्त असला तरी त्याचे सैन्य सुसज्ज असून चालुक्यांच्या ताब्यातील बहुतेक किल्ले त्याने आपल्या ताब्यात ठेवले होते.
         वीरशैव पंथाचा संस्थापक बसवेश्वर हा बिज्जलाचा आश्रित मंत्री होता. त्याने नवीन पंथाची स्थापना करून त्याचा प्रसार सुरू केला. त्यामुळे बिज्जल आणि बसवेश्वर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले व त्याचे पर्यवसान बिज्जलाच्या हत्येत झाले. ३० सप्टेंबर ११६७ ही बिज्जलाच्या कारकिर्दीची अस्वेरची ज्ञात तारीख होय. त्याने आपला पुत्र सोमेश्वर उर्फ सौविदेव याला आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले होते. त्याला त्याच्या इतर भावांनी आक्षेप घेतला होता, परंतु तो डावलून सौविदेवाने बिज्जलाच्या हयातीतच इ.स. ११६६ मध्ये आपला राज्याभिषेक करवून घेतला. किरकोळ स्वाया आणि बंडाळयांचा बीमोड या व्यतिरिक्त सौविदेवाच्या कारकिर्दीत फारशी महत्त्वाची घटना घडल्याची नोंद आढळत नाही. त्याच्या कारकिर्दीतील शेवटची ज्ञात तारीस्व ३१ जानेवारी ११७७ ही होय. सौविदेवानंतर त्याचा भाऊ संकमदेव हा २६ जून ११७७ रोजी राज्यावर आला. त्या दिवशी त्याने काही शूर सैनिकांनी बांधलेल्या बसवेश्वराच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्याने कल्याणप्रमाणे मंगळवेढा ही आपली दुसरी राजधानी बनविली.
         संकमदेवास आपल्या कारकिर्दीत त्याच्या भावांनी केलेल्या बंडाळीचा सतत सामना करावा लागला. त्याच्या भावांनी राज्याच्या विविध प्रांतात आपापली स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली होती. संकमदेवाच्या बंडखोर भावात आहवमल्ल हा प्रमुख असून त्याने रायनारायण हे सार्वभौम बिरुद धारण करून इ.स. ११७८ मध्ये आपण स्वतंत्र राजा झाल्याची घोषणा केली, तर त्याचा दुसरा भाऊ सिंघणदेव याने इ.स. ११८२ मध्ये महाराजाधिराज हे बिरुद धारण करून आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. कलचुरी राज्यातील या यादवीचा फायदा घेऊन होयसळांनी आपल्या आक्रमक कारवाया वाढविल्या. या गोधळाचा फायदा घेऊन चौथा सोमेश्वर चालुक्य याने कलचुरी सत्तेचा शेवट करून वर वर्णन केल्याप्रमाणे चालुक्य सत्तेची पुनर्स्थापना केली.






























  प्राचीन महाराष्ट्रातील राजे

भाग ३१

उर्वरित कलचुरी राजे महाप्रतापी राजा कर्णांनंतर त्याचा पुत्र यश:कर्ण हा राजा झाला. याने आपल्या राजकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आंध्र देशावर आक्रमण करून द्राक्षाराम येथे त्याने वेंगीचा चालुक्य नृपती सातवा विजयादित्य याचा पराभव केला. मात्र नंतरच्या काळात यश:कर्णाच्या ताब्यातून कानोज आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर गाहडवालांनी जिंकून घेतला. नंतरच्या काळात तर गाहडवालांनी बनारस ही जिंकून घेतले. त्यामुळे यश:कर्णाने आपली राजधानी परत त्रिपुरीस हलवली. तिथेही त्याचा तीनदा पराभव झाला. आपल्या आजोबा आणि पित्या सारखे शौर्य आणि राजनीतीकुशलता त्याच्या अंगी नव्हती यामुळेच त्याच्या कारकीर्दीत कलचुरिंची सर्वत्र पिछेहाट होऊन त्यांचे छोटेसे राज्य बघेलखंडापुरते मर्यादित राहिले. कलचुरींच्याया मुख्य शाखेचे कमी होत जाणारे तेज बघून रत्नपुर या कलचुरी राजघराण्याने त्यांचे स्वामित्व धुडकावून लावले. इथून पुढचे त्रिपुरी शाखेचे सर्वच राजे हे शक्तिहीन झालेले दिसतात. यश:कर्णांनातर त्याचा पुत्र गयाकर्ण हा गादीवर आला. त्याच्या नंतर त्याचे पुत्र नरसिंह आणि जयसिंह हे राजे होऊन गेले. त्रिपुरी शाखेचा शेवटचा ज्ञात राजा हा या जयसिंहाचा मुलगा विजयसिंह हा होय. या शेवटच्या काळात बघेलखंडाचा उत्तर भाग ही चंदेल राजांकडे गेलेला दिसतो. सोबतच मुसलमानी सत्तेचा सुद्धा शिरकाव बघेलखंडात झाला. आणि शेवटी चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हा संपूर्ण प्रदेश मुसलमानांच्या ताब्यात गेला. त्रिपुरी शाखेच्या अस्तानंतर सुद्धा अजून एक कलचुरी राजवट भारतामध्ये अस्तित्वात होती ती म्हणजे रत्नपुरचे कलचुरी. रत्नपुरच्या कलचुरी शाखेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे राजे झाले मात्र नंतर आलेल्या मुसलमान आणि यादव राजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे त्यांना आजच्या छत्तीसगढ मध्ये आपली राजधानी हलवावी लागली. तिथून त्यांनी कसाबसा अठराव्या शतकापर्यंत राज्यकारभार केला. मात्र अठराव्या शतकाच्या मध्यात मराठ्यांनी छत्तीसगढवर आक्रमण केले. तेव्हा कलचुरींच्या सर्व मंडलिक राजांनी मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले आणि अश्या रीतीने जवळपास बारा शतके भारताच्या कोणत्या ना कोणत्या भागावर राज्य करणारे कलचुरी राजघराणे अस्तास गेले. वाकाटक राजघराण्यानंतर कलचुरींनी काही काळासाठी महाराष्ट्रात राज्य केले मात्र नंतर त्यांचा महाराष्ट्रावरील ताबा कमी झालेला दिसतो, याचे मुख्य कारण म्हणजे बदामीच्या चालुक्यांचे महाराष्ट्रात वाढणारे वर्चस्व हे होय. आणि म्हणूनच पुढील भागात बदमीच्या चालुक्यांविषयी माहिती घेऊ.- प्राजक्ता देगांवकर संदर्भ १)कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी


https://sampurna-mahagatha-marathasahici.quora.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF



tvamfoundation.com

कलचुरी काळातील आर्थिक परिस्थिती – TVAM Foundation

Anurag vaidya

कलचुरी काळातील आर्थिक परिस्थिती1 min read

Reading Time: 3 minutes

कलचुरी घराण्याचे दक्षिण भारतामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दक्षिण भारतामध्ये कलचुरी घराण्याच्या ज्या शाखा होत्या त्यामध्ये महिष्मती म्हणजेच आत्ताचे महेश्वर, त्रिपुरी, सरयूपार आणि रत्नपूर अश्या शाखा आपल्याला पहायला मिळतात. या विविध शाखांच्या मुळे आपल्याला कलचुरी काळातील दक्षिण भारतातील धार्मिक, सामाजिक, आणि आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत होते. दक्षिण भारताच्या प्राचीन इतिहासात वाकाटक आणि कलचुरी हि अत्यंत महत्वाची दोन राजघराणी होऊन गेली त्यामुळे या दोन्ही राजघराण्यांची राजकीय, धार्मिक, कलाविषयक कामगिरी अत्यंत महत्वाची आहे.

कलचुरी घराणे जेव्हा दक्षिण भारतावर राज्य करत होते तेव्हा कलचुरी घराण्याचे आजपर्यंत जे शिलालेख किंवा ताम्रपट किंवा नाणी मिळाली आहेत त्यामधून आपल्याला कलचुरी राजांच्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत होते. कलचुरी राजघराण्याच्या आधी सातवाहन आणि अभिर राजघराणे जवळपास सगळ्या दक्षिण महाराष्ट्रावर राज्य करत होते यांच्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये श्रेणी किंवा कामगारांचे संघ होते असे आपल्याला पहावयास मिळते. या सगळ्यांचे संदर्भ हे आपल्याला त्यांच्या कोरीव लेखांच्यामधून मिळतात. या या व्यापाऱ्यांच्या श्रेणी नंतरच्या कालखंडात देखील चालू होत्या असे आपल्याला पहायला मिळते. या व्यापाऱ्यांच्या श्रेणींचा प्राचीन काळात    बँकांच्या सारखा उपयोग होत असे.

Image:- कलचुरी साम्राज्याच्या ताम्रपटाचे सील. Image Source:- http://www.archeolog-home.com

धनिक म्हणजे श्रीमंत लोक याच्यामध्ये पैसे ठेवून त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजाचा उपयोग हा धार्मिक कृत्यांच्यासाठी केला जावा अशी व्यवस्था करत असत. जरी राजवटी बदलल्या तरी या श्रेणी कायम राहत असत. म्हणूनच दानशूर लोक आपल्या देणग्या या सरकार दरबारी न देता या श्रेण्यांच्याकडे स्वाधीन करत असत. तसेच तत्कालीन व्यापाऱ्यांचे समान व्यवसाय करणाऱ्यांचे ‘गण’ नावाचे संघ असायचे. नगरधन येथे जो ताम्रपट सापडलेला आहे त्याच्यामध्ये माहुतांच्या गणाने ब्राम्हणाला दिलेल्या भूमिदानाचा उल्लेख आपल्याला सापडतो. या भूमिदानाच्यासाठी तत्कालीन राजाची संमती आवश्यक होती परंतु ताम्रपटाच्या मुद्रेवर त्या गणाने आपले विशिष्ट चिन्ह अंकुश आणि ‘गणद्त्ति’ म्हणजेच हे गणाचे दान आहे असे शब्द हे कोरलेले आहेत. यागोष्टीवरून त्यांचे राज्यातील महत्व आपल्याला समजण्यास मदत होते. तसेच या गणांच्या सभासदांच्या समितीला ‘समूह’ असे म्हणत असत. तसेच या समूहाच्या अध्यक्षाला ‘स्थविर’ असे म्हणत असत आणि कार्यकारी मंडळाच्या सभासदांना ‘प्रमुख’ असे संबोधत असत.

याचप्रमाणे आपल्याला इतर व्यावसायिकांचे देखील गण त्याकाळात असावेत असे वाटते. या  संबंधात इतर दक्षिण भारतीय राजवंशात आपल्याला कोरीव उल्लेख सापडतात. परंतु कलचुरींच्या बाबत असे लेख आढळून येत नाही हे आपल्याला विशेष म्हणावे लागेल. तसेच कारीलताई येथील लेखामध्ये ज्या वागुलिक आणि पायटी यांनी प्रत्येकी ५० विड्यांच्या पानांचे दान दिल्याचा उल्लेख आहे ते त्या व्यावसियकांचे गण असावेत असे वाटते. तसेच कलचुरी काळामध्ये गणांच्या मुख्यास ‘देशि’ असे म्हणत असत. तसेच बिलहरी लेखामध्ये कृषायपंचकाच्या देशिने काही दान दिल्याचा निर्देश आहे. तसेच श्रेणी आणि गण यांचे सैन्य असे. या सैन्याचा उपयोग संकटकाळी शासन  सत्तेस होत असे.

Image:- कलचुरी घराण्यातील कृष्णराजा कलचुरी याचे चांदीचे नाणे. Image Source:- https://commons.wikimedia.org/ 

कलचुरी काळातील विक्रीकर:-

कलचुरी काळामध्ये नगरांच्या मध्ये तसेच छोट्या गावांच्यामध्ये बाजारासाठी मंडपिका म्हणजेच मंडई असायची. विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तू सगळ्यात पहिल्यांदा या मंडईमध्ये नेल्या जात असे. तसेच मंडई येथे आलेल्या या वस्तूंचे मूल्यमापन होऊन विक्रीकर ठरविला जात असे. कलचुरी काळातील बाजारामध्ये वस्तू विकण्यासाठी जो परवाना म्हणून चिट्ठी दिली जात असे त्याला ‘युगा’ असे म्हणत. हि युगा चिट्ठी दिवसभर चालत असे. यासाठी शासनाला अर्ध पौर  दिला जात असे. पौर हे कलचुरी काळातील लहान नाणे होते. बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक घोड्यावर दोन पौर आणि हत्तीवर चार पौर विक्रीकर द्यावा लागत असे. बाजारांच्यामध्ये ‘विथी’ किंवा दुकानांच्या रांगा असत. तसेच कलचुरी काळामध्ये लहान दुकानांना ‘आवार’ असे म्हणत असत.

या कलचुरी काळी असलेल्या बाजारांच्या मध्ये विविध प्रकारचे जिन्नस विकायला असे. त्यामध्ये धान्य, सुपारी, विड्याची पाने मीठ, मोहरी, सुंठ, कापड अश्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला कलचुरी काळातील लेखांच्या मधून आढळून येतो.

Image:- कलचुरी घराण्यातील कृष्णराजा कलचुरी याचे तांब्याचे नाणे. Image Source:- https://www.mintageworld.com

कलचुरी काळातील वजने आणि मापे:-

कलचुरी काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मापे अस्तित्वात होती. कलचुरी काळामध्ये जिल्ह्यामध्ये जी मापे वापरली जात असत त्यांना ‘विषयमान’ असे संबोधत तसेच मोठ्या मापांना ‘बृहन्मान’ असे म्हणत असत. तसेच जमिनीच्या मापास निवर्तन असे संबोधत असत. कलचुरी यांच्या एका ताम्रपटामध्ये ‘उभयचत्वारिंशकनिवर्तनिन’ असा उल्लेख आलेला आपल्याला पहावयास मिळतो. याच्यावरून हे निवर्तन चाळीस दंड रुंद आणि चाळीस दंड लांब अश्या जमिनीचे निदर्शक होते असे समजण्यास आपल्याला मदत होते. कित्येक वेळेस जमिनीचे मोजमाप हे हलांच्या संख्येने दर्शवत असत. हल म्हणजे बैलांच्या एका जोडीने नांगरली जाईल इतकी जमीन. हि बऱ्याच वेळेस पाच एकर असे. तसेच अजून एक प्रमाण प्रचलित होते ते म्हणजे शेतामध्ये पेरण्यास आवश्यक असलेल्या बियाणांच्या वरून मोजमाप केले जात असे. याचे उदाहरण आपल्याला एका शिलालेखात मिळते त्यामध्ये ‘व्रिहिपिटकक्षेत्र’ म्हणजे शेताच्या बियाणाकरिता एक पिटक तांदळाचे भात लागे असे समजले जात असे.

अश्या प्रकारे कलचुरी कालखंडात (६ व्या ते ७ व्या शतकात) आपल्याला व्यापार होताना पहावयास मिळतो तसेच प्राचीन दक्षिण भारतातील कलचुरी राजघराण्याच्या कालखंडात आर्थिक व्यवस्था कशी होती हे देखील समजण्यास आपल्याला मदत होते.

संदर्भ:-

१) कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ:- वा. वि. मिराशी, मध्यप्रदेश शासन साहित्य परिषद, १९५६.       

https://tvamfoundation.com/blog/2022/03/26/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0/







कल्याणचे कलचुरी

बिज्जल कलचुरी याने इ.स. ११६२ मध्ये चालुक्यांचा राजा तैलास पदच्युत करून सत्ता प्रस्थापित केली. दोन दशकाहून अधिक काळापर्यंत चालुक्य सत्तेला लागलेल्या या ग्रहण कालात कल्याणचे राजसिंहासन बिज्जल कलचुरी आणि त्यांच्या वंशराजांच्या ताब्यात होते. कलचुरी राजवंशाचा मूळ पुरुष हैहेय कार्तवीर्य असून त्यांचे मूलस्थान मध्यप्रदेशातील महिष्मती हे होते. तेथून या वंशाचे यौद्धे विविध ठिकाणी स्थलांतरित झाले व त्यातून या राजवंशाच्या विविध शास्वा अस्तित्वात आल्या. या वंशाच्या मध्यप्रदेशातील कलंजर शाखेतील काही लोक दक्षिणेत गेले व त्यांनी कल्याणच्या चालुक्यांची चाकरी पत्करली.
या वंशातील जोगम कलचुरी याला चालुक्य सहाव्या विक्रमादित्याने महामंडलेश्वर हे पद बहाल करून त्याच्याकडे क-हाड-४००० या मंडळाचे प्रशासन सोपविले. चालुक्य राजवंशाशी वैवाहिक संबंध झाल्यामुळे कलचुरींची प्रतिष्ठा वाढत गेली. जोगमाचा पुत्र कलचुरी पेर्माडी हा तिसऱ्या सोमेश्वराच्या कारकिर्दीत महामंडलेश्वर म्हणून तारदावाडी मंडलाचे प्रशासन चालवीत होता. पेर्माडीचा मुलगा बिज्जल हा सहाव्या विक्रमादित्य आणि त्याची राणी चंदलादेवी यांचा नातू होता कारण त्यांची कन्या पेर्माडीची पत्नी आणि बिज्जलाची माता होती. सोलापूर जिल्हयातील तालुका मुख्यालय असलेले मंगळवेढे हे या कलचुरींचे वास्तव्यस्थान होते.
पेर्माडीवा मुलगा दुसरा बिज्जल अशा प्रकारे चालुक्य जगदेक मल्ल आणि तिसरा तैल यांचा आतेभाऊ होता. कन्हाड- ४००० मण्डलावा प्रशासक बिज्जल असताना त्यानी आजी नंदलादेवी ही कदंबडे-३०० विभागातील वलसंग उपविभागाचे प्रशासन चालवीत होती. चालुक्यांचा मांडलिक म्हणून बिज्जलाने आपले राजकीय
पेर्माडीचा मुलगा दुसरा बिज्जल अशा प्रकारे चालुक्य जगदेक मल्ल आणि तिसरा तैल यांचा आतेभाऊ होता. कहाड- ४००० मण्डलाचा प्रशासक बिज्जल असताना त्याची आजी चंदलादेवी ही कदंबडे- ३०० विभागातील वलसंग उपविभागाचे प्रशासन चालवीत होती. चालुक्यांचा मांडलिक म्हणून बिज्जलाने आपले राजकीय महत्त्व वाढविले आणि शेवटी आपल्या स्वामीचे सिंहासन बळकावून स्वतंत्र व सार्वभौम राजा बनला. इ.स. ११६२ मध्ये तो सार्वभौम राजाच्या बिरुदासह कल्याण येथून राज्य करीत होता. बिज्जलाने दूरदूरचे अनेक प्रदेश जिंकल्याचा दावा केला आहे. परंतु त्यात फारसे तथ्य नाही. कारण होयसळांच्या आक्रमणाचा मुकाबला करण्यातच त्याला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागली होती. होयसळांचा पराभव बिज्जलाने चालुक्यांचा सेनानी असताना केला होता, परंतु त्याने सत्ता बळकावल्यानंतर मात्र होयसळांनी त्याला स्वस्थपणे कारभार करू दिला नाही. बिज्जलाने पर्वत, मैदानी प्रदेश आणि समुद्र‌किनारपट्टीतील एक हजार किल्ले आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. हा दावा जरी अतिशयोक्त असला तरी त्याचे सैन्य सुसज्ज असून चालुक्यांच्या ताब्यातील बहुतेक किल्ले त्याने आपल्या ताब्यात ठेवले होते.
वीरशैव पंथाचा संस्थापक बसवेश्वर हा बिज्जलाचा आश्रित मंत्री होता. त्याने नवीन पंथाची स्थापना करून त्याचा प्रसार सुरू केला. त्यामुळे बिज्जल आणि बसवेश्वर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले व त्याचे पर्यवसान बिज्जलाच्या हत्येत झाले. ३० सप्टेंबर ११६७ ही बिज्जनाच्या कारकिर्दीची अस्वेरची ज्ञात तारीख होय. त्याने आपला पुत्र सोमेश्वर उर्फ सौविदेव याला आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले होते. त्याला त्याच्या इतर भावांनी आक्षेप घेतला होता, परंतु तो डावलून सौविदेवाने बिज्जलाच्या हयातीतच इ.स. ११६६ मध्ये आपला राज्याभिषेक करवून घेतला. किरकोळ स्वाऱ्या आणि बंडाळयांचा बीमोड या व्यतिरिक्त सोविदेवान्या कारकिर्दीत फारशी महत्त्वाची घटना घडल्याची नोंद आढळत नाही. त्याच्या कारकिर्दीतील शेवटची ज्ञात तारीस्व ३१ जानेवारी ११७७ ही होय. सोविदेवानंतर त्याचा भाऊ संकमदेव हा २६ जून ११७७ रोजी राज्यावर आला. त्या दिवशी त्याने काही शूर सैनिकांनी बांधलेल्या बसवेश्वराच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्याने कल्याणप्रमाणे मंगळवेढा ही आपली दुसरी राजधानी बनविली.
संकमदेवास आपल्या कारकिर्दीत त्याच्या भावांनी केलेल्या बंडाळीचा सतत सामना करावा लागला. त्याच्या भावांनी राज्याच्या विविध प्रांतात आपापली स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली होती. संक मदेवाच्या बंडखोर भावात आहवमल्ल हा प्रमुख असून त्याने रायनारायण हे सार्वभौम बिरुद धारण करून इ.स. ११७८ मध्ये आपण स्वतंत्र राजा झाल्याची घोषणा केली, तर त्याचा दुसरा भाऊ सिंघणदेव याने इ.स. ११८२ मध्ये महाराजाधिराज हे बिरुद धारण करून आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. कलचुरी राज्यातील या यादवीचा फायदा घेऊन होयसळांनी आपल्या आक्रमक कारवाया वाढविल्या. या गोधळाचा फायदा घेऊन चौथा सोमेश्वर चालुक्य याने कलचुरी सतेचा शेवट करून वर वर्णन केल्याप्रमाणे चालुक्य सत्तेवी पुनर्स्थापना केली.













































































No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...