२. कोकणचे मौर्य, त्रिकुट, बदामीचे चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकुट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, गुजरातचा सुलतान, पोर्तुगीज, मराठा आणि शेवटी ब्रिटीश इतक्या सगळ्या राजवटी बघिलेला भूभाग. जवळपास सर्वांसाठी फार मोक्याची जागा असल्याने महत्वाचा ते अतिमहत्वाचा.
३. अंदाजे इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातल्या बौद्ध लेणी, विहार आणि स्तूप
४. साधारण ४०० ते ८०० इ.स. मध्ये मौर्यांच्या काळात बनलेल्या हिंदू लेणी ज्या आत्ता जगप्रसिद्ध आहेत, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याने देशो-देशीचे पर्यटक ह्या लेणी पाहायला येतात.
५. ह्या हिंदू लेण्यांमधील शिवमंदिर साधारण इ.स.१५०० पर्यंत, पोर्तुगीजांनी बेटावर कब्जा करेपर्यंत वापरात होत्या, रोज पुजा-अर्चा होत असे. पोर्तुगीजांनी ह्या मंदिरांमधली पुजा बंद करवून, लेण्यांची प्रचंड नासधूस केली असं म्हटलं जातं.
६. ह्या बेटावर असलेल्या प्रचंड आकाराच्या हत्तीच्या मूर्तीला बघून पोर्तुगीजांनी बेटाला एलिफंटा असे नाव ठेवले जे आजतागायत वापरले जाते.
७. पोर्तुगीजांनी तसेच नंतर इंग्रजांनी बेटावर किल्ला बनवला आणि मुंबई बेटाच्या रक्षणासाठी तैनात ठेवला. इंग्रजांनी किल्ल्यावर ३५ फुटी २ तोफा लावलेल्या आहेत ज्या आजही चांगल्या अवस्थेत आहेत.
![]() |
| महेशाची त्रिमुखी मूर्ती |
![]() |
| कैलासपती शिव - पार्वती आणि रावण कैलास हलवतांना |
![]() |
| नटराज शिव |
![]() |
| शिव - पार्वती |
![]() |
| पुरातन गणेश रूप |
![]() |
| स्तूप टेकडीवर जाणाऱ्या जुन्या मोडकळीस आलेल्या बांधीव पायऱ्या |
![]() |
| स्तूप टेकडीवरून डावीकडे कॅनन हिलच्या पायथ्याच्या हिंदू लेणी, उजवीकडे जुही आणि स्तूप हिल वर जाणाऱ्या पायऱ्या |
![]() |
| लेणं क्रमांक ६, बौद्ध लेणं |
![]() |
| लेणी ६ च्या पुढे एक अर्धवट खोदून सोडून दिलेलं लेणं |
In Search Of The Elephanta Stupa
Elephanta Island is home to one of the finest rock-cut temples in India, and any visitor to this small island of great scenic beauty is likely to focus their attentions on the main cluster of five temples located on the western hill. But for those wishing to dig a bit deeper into the antiquity that this island has to offer, a quick look at any map of the island will give you some pointers as to where to go next.

Caves 6 and 7 are located outside the main temple complex on the opposing eastern hill, known as ‘Stupa Hill’. My previous blog post on the Elephanta Caves details how to find these two much less visited caves.
Having successfully found them, I decided it was time to get a little more adventurous and try and locate the stupa that the hill is named after. Some maps show two stupas on Elephanta island; Stupa 1 on the crest of the hill and labelled as ‘unexcavated’, and Stupa 2 down by the shore of the island labelled as ‘unexplored’. With limited time, I decided to only try and locate Stupa 1, which is dated to the 2nd century A.D.
So this blog picks up the trail from Cave 7 in my previous blog, heading north-east following a stone/rock lined path that was rapidly becoming lost in the undergrowth.


This pathway is clearly very old and soon headed into thick woodland of palms, tamarind and mango trees. I decided it was best to try and stick to the path as much as I was able to, as in all probability would take me to the location of the stupa. A modern water pipe runs parallel to the ancient path for some of the distance.
Before long I passed on my right what is marked on the map as a pond, but on other maps it is labelled as a tank. This doesn’t appear to be man made but it is a huge, and although when I visited it was dry it must have possibly served as a source of water for the inhabitants of the island in the past.

Shortly after passing this pond, the stone lined path seemed to come to an abrupt end in front of three stone cut tanks. These are also marked on the map right next to the location of the stupa. One of the tanks was home to a rotting drowned dog, so I’m afraid there are no photos of that tank !
From the tanks, if you look up you will in fact be staring straight at the Stupa 1. Although completely overgrown, the distinctive shape of the dome (anda) is plainly visible despite being untouched for some 1,700 years.

In terms of size, I would estimate that this stupa is of a similar proportions to Stupa 2 or Stupa 3 at Sanchi.
As the monument is in the declared “core archaeological zone” of Elephanta Island I wasn’t expecting it to be quite as overgrown as this. There doesn’t appear to have been any attempts to clear the stupa of vegetation or trees for many years (if ever) and this does pose a threat to the monument.
Removal of trees from archaeological sites is not always necessary, particularly if the trees are stable and relatively mature. However, for a site such as this it is utterly essential. The root growth with young trees can be rapid and quickly damage archaeological remains, especially masonry or brick built structures such as this. In addition, the act of a tree throw (when a tree blows over) can pose a significant risk to archaeological sites, as it can throw up massive root plates that damage any structures the roots have entwined themselves into.
Encircling the stupa is a band of very rough stones, from a distance I was hopeful these may be the fallen remains of a balustrade, but I couldn’t see any evidence that the stones had been worked to any great degree. Instead they appear to be the remains of a revetment, now in ruins but certainly forming a distinctive band around the monument.

I searched the area around the stupa looking for any signs of worked stone. A few rough bricks were lying around, hardly surprising as the monument is described as a brick stupa, but the only other piece of worked stone I could find was an isolated carved column not far from the stone lined path.

If you have the time and energy reserves it is well worth exploring the eastern ‘Stupa Hill’. It’s certainly a bit of an adventure, far removed from the hoards of people enjoying Caves 1-5 on the western hill, and in many respects you may feel like you’re the one discovering these monuments for the very first time.
I must admit the theme music to Indiana Jones was going around my head as I ventured into the thickly wooded hill on my quest for the Elephanta Stupa
You’re welcome to ‘Like’ or add a comment if you enjoyed this blog post. If you’d like to be notified of any new content, why not sign up by clicking the ‘Follow’ button.
If you’re interested in using any of my photography or articles please get in touch. I’m also available for any freelance work worldwide, my duffel bag is always packed ready to go…
KevinStandage1@googlemail.com
घारापुरीचे शैवलेणे
घारापुरीची लेणी ऊर्फ एलिफंटा केव्ह्ज ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्मिण्यात आली. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला.
मुंबई दर्शनमधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ.. असं असलं तरी मुंबईत नाही तर मुंबईपासून दहा कि.मी. अंतरावर समुद्रात हे स्थळ आहे. गेट वे ऑफ इंडियावरून दुरूनच नजर टाकली की समुद्राच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण अंधुक किंवा धूसर का होईना पण नजरेत भरतं. असं हे ठिकाण म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नसून घारापुरी किंवा एलिफंटा केव्हज हे होय.
एलिफंटा केव्हज्ना मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरूनच जाता येतं. गेट वे ऑफ इंडियावरून सकाळी ९ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतच बोटी उपलब्ध आहेत. एलिफंटावरून परतण्यासाठी संध्याकाळी शेवटची बोट ५ वाजता आहे.
पोहोचल्यावर दोन रस्ते दिसतात. एक गुंफाकडे जाणारा आणि दुसरा हिलवर जाणारा. गुंफेकडे जाणा-या रस्त्याने आत गेलं की आपल्याला प्रवेश शुल्क भरावं लागतं. पंधरा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे तर मोठय़ा माणसांसाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येतं. सोमवारी मात्र या गुंफा बंद असतात. थोडं पुढे गेलं की पहिलीच गुंफा दिसते. एलिफंटा लेणी समूहात एकूण ७ शैलकृत लेणी आहेत. त्यापैकी ५ शैलकृत लेणी पश्चिम टेकडीवर आहेत तर उरलेल्या दोन या पूर्वेकडील टेकडीवर आहेत.
पहिल्या क्रमांकाच्या मुख्य गुंफेत प्रवेश केल्यावर गुंफेच्या मध्यभागी असलेली महेश प्रतिमेची लेणी आपल्याला आकर्षित करते. हे शिल्प सर्व शिल्पांचा आत्मा ठरते. याची खोली ३.२ मीटर आणि रुंदी ६.५५ मीटर तर उंची ८.३ मीटर आहे. भिंतीच्या स्तंभामध्ये द्वारपालांच्या तीन भव्य मूर्ती आहेत मात्र त्या सुस्थितीत नाहीत. मुख्य महेश शिल्प म्हणजे भारतीय शिल्पकलेचा परमोच्च बिंदू समजला जातो. या कलाकृतीत सर्वत्र जटा मुकुटच आहे. डावीकडे अघोर (रुद्र) रूप आहे. त्याच्या मुकुटात साप, विंचू आणि मेलेल्या माणासाचे शिर आहे. हातात फुत्काराने फणा उभारलेला नाग, तिसरा डोळा आणि पिळदार मिशा पाहून चेह-यावरचा रुद्र भाव लक्षात येतो. म्हणूनच या मूर्तीला ‘अघोर’ किंवा ‘भैरव’ असं म्हणतात. मधला चेहरा शांत निरामय आहे. त्याला ‘तत्पुरुष महादेव’ असं म्हणतात. उजवीकडील चेहरा कोमल आणि प्रसन्न आहे. केशअलंकार आणि हातात बांगडय़ा आणि कर्णकुंडलं आहेत. यालाच ‘वामदेव’ किंवा ‘उमा’ असं समजलं जातं. या महेशमूर्तीच्या एका बाजूला गंगाधारण केलेली गंगाधरशिवाची मूर्ती असून दुस-या बाजूला शिव अर्धनारी नटेश्वराचे शिल्प आहे. गंगाधर शिल्पाच्या वरच्या बाजूला अप्सरा, गंधर्व आणि ष्टद्धr(7०)षिमुनी यांचीदेखील चितारलेली शिल्प आहेत.
मुख्य शिल्पाच्या दोन्ही बाजूला पूर्व अणि पश्चिमेला द्वारमंडप आहेत. तिथे जायला दोन प्रवेशद्वार आहेत. पश्चिम द्वारमंडपाच्या बाजूला मंदिराच्या गाभा-यात शिवलिंगाची स्थापना असून त्यांच्या भिंतीवर द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. आजूबाजूला शिव-पार्वती विवाह, अंधकासुर वध मूर्ती, महायोगी शिवा, रावण कैलास पर्वत हलवताना, शिव-पार्वती चौरस खेळताना, नटराज शिव अशी विविध शिल्प पाहायला मिळतात. या सगळ्या भव्य शिल्पाकृती पाहून आपण अक्षरश: स्तब्ध होतो.
मुख्य शिल्पापासून काहीशा अंतरावर गेल्यावर दुस-या क्रमांकाची गुंफा दिसते. तिथेही आजूबाजूला दगडात कोरलेली आणि काहीशी दुरवस्था झालेली काही शिल्प आणि शिवलिंग दिसतात. तिस-या क्रमांकाची गुंफा काहीशी मोठी असून मध्यभागी भव्य असं शिवलिंग पाहायला मिळतं. बाजूला असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या गुंफेत मध्यभागी शिवलिंग आहे तर बाजूला दोन अंधा-या खोल्याही आहेत. मात्र त्या खोल्यांमध्ये काहीच नाही. बाजूची पाचवी गुंफा जरा खोल आहे. या शैलकृत लेण्या मुख्य लेणीच्या तुलनेत सामान्य किंवा कमी अलंकृत आहेत. शेवटच्या पाचव्या गुंफेपाशी पोहोचतो तेव्हा तिथे खालच्या बाजूला मोठा तलाव दिसतो. तर समोरच्या डोंगरावर दोन लेण्या असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांकडून समजते. या बौद्ध लेण्या असून तिथे एक विशाल स्तूप, इ.स चौथ्या शतकातील काही नाणी यांच्या प्रतिमा आहेत. मात्र या लेण्या पडझडीला आल्यामुळे तिथे प्रवेश निषिद्ध आहे. या ठिकाणच्या प्रत्येक गुंफांमध्ये जी काही शिल्प कोरलेली आहेत त्यांच्यात एक कथा दडलेली आहे. ती कथा जाणून घेण्यासाठी तुम्हाला एका मार्गदर्शक (गाईड) सोबत घेणं आवश्यक आहे. याशिवाय बाहेर असलेल्या अनेक स्टॉल्सपैकी एलिफंटाची माहिती सांगणारी पुस्तिकादेखील मिळते. ती घेतली तरी तुम्हाला या लेण्या समजायला सोपं होईल. लेण्या पाहून आपण पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. तिथे एक रिसॉर्ट आहे. तिथून पुढे वर कॅनॉन हिलकडे जाण्यासाठी पाय-या दिसतात. या पाय-या चढायला कठीण आहेत. मात्र वर गेल्यावर दोन ब्रिटिशकालीन तोफा पाहायला मिळतात. तिथून घारापुरीचा संपूर्ण परिसर दिसतो. इतकंच नाही घारापुरीच्या पायथ्याशी असलेली राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदरही दिसतात. तसंच आणखी दूरवर नजर टाकलीत तर मुंबई, नाव्हा शेवा बंदर आणि अथांग पसरलेल्या सागराचं मनोहारी दृश्य दिसतं.
घारापुरीत असलेली राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदर पाहून घारापुरी हे प्राचीन काळी बंदर असल्याची जाणीव होते. ही बंदरं फार जुन्या काळातली असल्याची माहिती मिळते. आजही या बंदरांवर १६०० लोकांची वस्ती आहे. पर्यटन, शेती आणि मासेमारी हे तिथल्या लोकांचे प्रमुख व्यावसाय आहेत. या परिसराला घारापुरी हे नाव कसं पडलं याची माहिती तिथल्या स्थानिकांकडून मिळते. घारा म्हणजे गुरव आणि पुरी म्हणजे नगर. शिवमंदिरातील पूजा करणा-या पूजा-यांना पूर्वी गुरव या नावाने संबोधलं जायचं. अशा गुरव पूजा-यांची वस्ती असलेलं नगर म्हणून त्याला ‘घारापुरी’ असं नाव पडलं. इथल्या लेण्यांत शैव परंपरेतील शिल्पाकृती असल्याने गुरवांची वस्ती असणं शक्य आहे. दुसरं म्हणजे ‘घारा’ हा शब्द किल्ल्यासाठी किंवा बुलंदी तटबंदीसाठी वापरला जातो. किल्ल्यासारख्या तटबंदीची नगररचना असलेलं नगर म्हणूनही या ठिकाणाला ‘घारापुरी’ असं नाव पडलं असावं असा अंदाज बांधता येतो. मूळचं घारापुरी असलेलं हे बेट ‘एलिफंटा’ या नावानेही ओळखलं जातं. या बेटाचं एलिफंटा असं नामकरण पोर्तुगीजांनी केलं. त्यामागे एक कथा आहे. इ. स. १५३४च्या सुमारास व्यापारासाठी भारतात आलेले पोर्तुगीज राजबंदरला उतरले. तिथे फिरताना त्यांनी या लेण्यांच्या परिसरात एका हत्तीचं पाषाण शिल्प पाहिलं. त्या शिल्पाला पाहून ते ‘एलिफंटा’ असे संबोधलं, तेव्हापासून पोर्तुगीज या बेटाला ‘एलिफंटा’ असंच नाव पडलं. आणि इथल्या लेण्यांचा उल्लेख ‘एलिफंटा केव्हज’ असा करण्यात आला. ब्रिटिश राजवटीत या लेण्या एलिफंटा केव्हज या नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र आता हे हत्तीचं शिल्प या ठिकाणी नाही. हे शिल्प हल्ली मुंबईच्या जिजामाता उद्यानात स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
राहण्यासाठी खोल्या :
चालुक्य रेस्टॉरन्ट एमटीडीसी तर्फे चालविण्यात येते..कसे जावे :
मुंबई येथील 'गेट वे ऑफ इंडिया' येथुन रोज घारापुरी (एलिफंटा) गुंफा येथे जाण्यासाठी होडीची सेवा असते.विमान :
जवळील विमानतळ मुंबई आहे.रेल्वे :
जवळील रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा चर्चगेट आहे.बस :
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :
गेटवे ऑफ इंडिया , ताज हॉटेल
नकाशा : एलिफंटा लेणी
तासाभरातच घारापुरी जेट्टीवर पोहोचलो. जेट्टीपासून साधारण अर्धा किमी चालत जाऊन पोहोचल्यावर घारापुरीच्या पायर्यांपाशी पोहोचता येते. वाटेत दोन्ही बाजूंना हस्तकलेच्या वस्तूंची बरीच दुकाने आहेत. तिथे वेळ न घालवता आम्ही काही जण भराभर वरती गेलो तर काही जण मागे चहापाण्यासाठी रेंगाळत होते. पायर्यांपासून साधारण १०/१५ मिनिटांतच थेट लेण्यांच्या प्रांगणात पोहोचता येते. तिथेच पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे. अर्थात हे पाणी घारापुरीच्या लेणीतीलच एका टाक्याचे असल्याने किञ्चित अशुद्ध आहे पण नक्कीच पिण्याजोगे आहे. तिथेच लेण्यांमध्ये प्रवेशासाठी तिकिट खिडकी आहे. तिकिटे काढून आत गेलो ते थेट घारापुरी येथील जगप्रसिद्ध लेणी क्र. १ च्या पुढ्यातच.
घारापुरी ठिकाण बहुत प्राचीन. कलियान, श्रीस्थानक, सूप्पारक, चेऊल ही प्रसिद्ध बंदरे येथून जवळ. साहजिकच श्रमणांना हे बंदर बहुत सोयीचे. म्हणूनच इथे अशोककालीन बांधीव स्तूपाचे अवशेष सापडले आहेत. अशोककालानंतर पुढे जाता जाता इसवी सनाच्या दुसर्या शतकातील सातवाहन राजा श्री यज्ञ सातकर्णी याचे कारकिर्दीतील नाणी येथे सापडली आहेत. सातवाहनांच्या कारकिर्दीत येथे दोन बौद्ध गुहा कोरल्या गेल्या. साहजिकच घारापुरी बेटावर पूर्वीपासून वस्ती होती हे सिद्धच होते. त्यानंतरच्या कालखंडात घारापुरीचा उल्लेख समुद्राने वेढलेली 'पुरी' असा आढळतो. नंतरच्या काळात इथे राष्टकूट, कलचुरी, कोंकण मौर्य अशा सत्ता आलटून पालटून येत गेल्या व ह्याच सुमारास येथील शैव लेणी कोरल्या गेल्या. त्यानंतर ९ व्या/ १० व्या शतकात राष्ट्रकूटांचे मांडलिक उत्तर कोकणचे शिलाहार यांची पहिली राजधानी 'पुरी' ही होती असे काही शिलालेख आणि ताम्रपटांतून दिसते. काही संशोधक मुंबईजवळील घारापुरी बेट किंवा जंजिर्या जवळील राजापुरी हिलाच हे राजधानीचे ठिकाण मानतात. पण ठाणे जिल्ह्यातच कुठेतरी हे ठिकाण वसलेले असावे, असेही मानले जाते. यांच्या राज्यात प्रामुख्याने हल्लीच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या भूभागाचा समावेश होता. जवळपास १४०० गावे ह्यांच्या अमलाखाली होती. उत्तर कोकणातला शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर. देवगिरीच्या यादवसत्तेचा प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा पराभव केला, तरी त्याला उत्तर कोकणाचा कुठलाही प्रदेश ताब्यात मिळाला नाही. पण कृष्णाच्या भावाने आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादवाने (हा देवगिरीचा यादव सम्राट रामदेवरायाचा काका) ही मोहीम अशीच चालू ठेवली. हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्यामुळे त्याने पळून जाऊन बहुधा समुद्रवलयांकित घारापुरी येथे आश्रय घेतला. महादेव यादवाने उत्तर किनार्यावरच्या अरब मांडलिकांची मदत घेऊन भर समुद्रातही सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य खर्या अर्थाने समुद्रात बुडाले. (इ.स. १२६५).
बोरिवलीच्या एकसर गावात असणार्या एका वीरगळात जमिनीवरचे हत्तींच्या साहाय्याने केलेले युद्ध आणि समुद्रावरचे नावांच्या साहाय्याने केलेले युद्ध कोरण्यात आलेले आहे.
यानंतरच्या ४० वर्षांतच देवगिरीच्या यादवांची सत्ता मलिक काफूरने उलथवून टाकली. यानंतरचा घारापुरीचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण साधारण १४ व्या/ १५ व्या शतकात हे बेट गुजरातच्या सुलतानांच्या ताब्यात होतं. त्यांनी ते पोर्तुगीजांना १५३४ साली विकलं आणि १६६१ सालात इंग्लंडच्या चार्लस राजाला मुंबईबरोबरच घारापुरी बेट हे आंदण म्हणून मिळालं. हा मधला पोर्तुगीज अंमलाखालीन उण्यापुर्या १३० वर्षांचा कालखंड घारापुरीसाठी भयानक वेदनामय ठरला. इथल्या लेण्यांतील अतिशय देखण्या मूर्तींवर घणाचे घाव नव्हे तर सैनिकी सराव आणि त्या निमित्त्ये मूर्तीभञ्जन म्हणून बंदुकांचे आणि तोफांचे बार उडवण्यात आले आणि इथल्या मूर्ती विद्रूप केल्या गेल्या. अर्थात इथल्या कसबी कारांगीरांनी त्या इतक्या तन्मयतेने कोरलेल्या आहेत की जरी त्या आज भग्न असल्या तरी त्यांचे मूळाचे सौंदर्य अजिबात लपत नाही. आजही त्या इतक्या उठावदार, इतक्या देखण्या आहेत की त्यांच्या सुवर्णकाळात तर त्या कमालीच्या असाव्यात.
घारापुरी बेटावर एक शिलालेखही होता. पण तो वाचता न आल्यामुळे पोर्तुगीजांनी तो पोर्तुगालला पाठवला त्यानंतर तो गहाळ झाला त्यामुळे ह्या अद्भुत लेण्यांचा निर्माता कोण हे आजही एक रहस्यच आहे. अर्थात लेणी खोदण्याच्या शैलीवरून त्या ६ व्या ते ८ व्या शतकात कोरलेल्या असाव्यात. काही जण राष्ट्रकूटांना, काही जण कलचुरींना तर काही जण कोंकण मौर्यांना लेणी निर्मितीचे श्रेय देतात. घारापुरी लेणीचे वेरूळ मधील लेणी क्र. २९ अर्थात धुमार लेणे किंवा सीतेची नहाणी ह्या लेणीशी प्रचंड साम्य आहे. जणू एकाच राजवटीत ही खोदली गेली असावीत. घारापुरीचे कोरीव काम हे धुमार लेणीच्या आधी झाले असे मानले जाते. ह्या लेण्यांच्या प्रांगणातच पूर्वी भव्य असे दोन दगडी हत्ती होते त्यावरूनच पोर्तुगीजांनी ह्या बेटाला 'एलेफंटा' असे नाव दिले. ह्यातील एक हत्ती आज पूर्णपणे नष्ट झालाय तर दुसरा हत्ती मुंबैतल्या कुठल्यातरी बागेत आहे.
घारापुरीचा थोडक्यात इतिहास तर सांगून झाला. चला तर आता घारापुरी भ्रमंतीला सुरुवात करूयात.
घारापुरीचे शैवलेणी म्हणजे ५ गुहांचा समुदाय. ह्यातले सर्वात प्रसिद्ध असे हेच ते क्रमांकाचे शैवलेणे अर्थात लेणी क्र. १.
लेणी क्र. १
हे एक भले प्रचंड लेणे. ह्याची तुलना वेरूळमधल्या धुमार लेण्याशीच होऊ शकते आणि ते रास्तही आहे. प्रशस्त असा लांबरूंद सभामंडप, सभामंडपाच्या छतास तोलून धरलेले भव्य स्तंभ, सभामंडपातच उजवीकडच्या कोपर्यात एकीकडे शिवलिंग असलेले सर्वतोभद्र प्रकारचे गर्भगृह, दोन्ही कडेच्या भिंतींवर शिवाशी निगडीत असलेले पौराणिक प्रसंग कोरलेले आणि डावीकडे एकेक उपलेणे, ती उपलेणीही कोरलेलीच आणि त्यातीलच एका उपलेण्यात पाण्याचे प्रचंड टाके अशी याची रचना.
लेणीत प्रवेश करण्याच्या आधीच दोन्ही बाजूंना भव्य असे कोरलेले खडक दृष्टीस पडतात. त्यांची आमलकसदृश रचना पाहून हे स्तंभशीर्षांचे आमलक असावेत हे सहजी लक्षात येते. लेणीच्या प्रवेशद्वारात चार स्तंभ असून दोन/ तीन पायर्या चढून आपला प्रवेश लेणीत होतो.
लेणीचे प्रवेशद्वार
सभामंडपाची रचना
सभामंडप
लेणीत प्रवेश केल्यानंतरच डाव्या बाजूच्या भिंतीत एक शिल्पपट कोरलेला दिसतो. तो हा महायोगी शिव अथवा योगेश्वर शिवाचा.
महायोगी शिव.
महायोगी शिव म्हणजे ध्यानमग्न शिवाची योगी स्वरूपातली प्रतिमा.
कमलासनावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेला शिव. कमळाचा दांड्याला डावी उजवीकडे असलेले दोन नागपुरुष आधार देत आहेत. ही प्रतिमा महायान पंथाच्या ध्यानस्थ बुद्धावस्थेवरून प्रेरित आहे हे सहजी लक्षात येते. परंपरा बदलत असताना शिल्पाचे मुख्य स्वरूप तसेच राहते मात्र आजूबाजूची पात्रे बदलत जातात जसे इथे शिवाच्या डाव्या बाजूस हंसारूढ चतुर्मुखी ब्रह्मदेव, उजवे बाजूस गरूढारूढ विष्णू, अश्वारूढ सूर्य तर शिल्पपटाच्या वरच्या बाजूस गंधर्व, अप्सरा आणि ऋषी शिवाचे ध्यानमग्न रूप पाहण्यास जमले आहेत. दोळे मिटलेल्या शिवाच्या चेहर्यावर कमालीचे शांत भाव आहेत. दोन्ही हात भग्न केलेले असले तरी प्रचंड सुंदर अशी ही मूर्ती आहे.
महायोगी शिव शिल्पपट
थोडे अधिक जवळून. उजवीकडे गरूढारूढ विष्णू व त्याच्या वरचे बाजूस सूर्य आहे. तर डावीकडे वरच्या बाजूस ब्रह्मा आहे.
विष्णू, सूर्य आणि गंधर्व व अप्सरा
याच्या समोरच्याच भिंतीवर म्हणजेच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूचे भिंतीवर नटराज शिवाचा शिल्पपट कोरलेला आहे.
नटराज शिव
ही शिवाची तांडव अथवा नृत्य स्वरूपातील मूर्ती.
नृत्यमग्न अवस्थेत असलेल्या अष्ट्भुज शिवाचे नेत्र अर्धोन्मिलित आहेत. एका हातात त्याने नागबंधात अडकवलेले शस्त्र हाती घेतलेले दिसते आहे बाकी भुजा भग्न झाल्यामुळे त्या हातांमध्ये काय काय होते ते आज कळत नाही पण डमरू, त्रिशूळ, अग्नी, कपाल अशी साधने त्यांत असावीत.
इथेही शिवमूर्तीच्या डाव्या बाजूला भाला हातात धरलेला स्कंद अथवा कार्तिकेय आहे तर त्याच्या वरती परशुधारी गणेश व ब्रह्मदेव आहेत. तर उजव्या बाजूला पार्वती, गरूढारूढ विष्णू, गजारूढ इंद्र आहेत. तर वरचे बाजूस ऋषी, गंधर्व व अप्सरा आहेत.
नटराज शिव
हंसारूढ ब्रह्मा, ऋषी आणि गणेश
हे दोन्ही शिल्पपट पाहून आम्ही घारापुरीतल्या सर्वात महत्वाच्या मूर्तीकडे वळलो. ही मूर्ती म्हणजे जगद्विख्यात त्रिमुखी शिवाची अर्थात सदाशिवाची.
सदाशिव.
ह्या मूर्तीचे स्थान प्रवेशद्वाराच्या बरोबर समोरील बाजूच्या भिंतीवर आहे. दोन्ही बाजूंस स्तंभांच्या रांगा आहेत. ही मूर्ती येथील सर्वात महत्वाची असल्यामुळे येथील शिवपिंडीचे गर्भगृह हे मधोमध न ठेवता ते उजवीकडच्या कोपर्यात कोरलेले आहे.
स्तंभांच्या रांगेमधून दिसणारा सदाशिव
बरेच जण ह्या मूर्तीला ब्रह्मा, विष्णू आणि महेश समजतात पण ही तशा प्रकारची अर्थात दत्त मूर्ती नाही. कारण हे पूर्णपणे शैवलेणे आहे. ब्रह्मा, विष्णू ह्या मूर्तींना ह्या लेण्यामधील इतर शिल्पपटांत दुय्यमच स्थान दिलेले आहे.
ही सदाशिवाची मूर्ती एका चौकटीत कोरलेली आहे. चौकटीच्या दोन्ही बाजूस आधारासाठी बटू घेऊन उभे राहिलेले भव्य द्वारपाल आहेत. हे बटू म्हणजे कोणी सेवक नसून द्वारपालांची शस्त्रे आहेत. अशा प्रकारच्या मूर्तीला आयुधपुरुष म्हणतात. आणि इथले इतरही शिल्पपटांत दिसणारे द्वारपाल हे आयुधपुरुष द्वारपालच आहेत.
तर आता मुख्य मूर्तीकडे वळूयात.
ही मूर्ती प्रचंड मोठी आहे. इथे जरी प्रत्यक्ष तीन मुखे दिसत असली तरी ही मूर्ती पंचमुखी शिव अथवा सदाशिव असे मानले जाते. ही दृश्य तिन्ही मुखे शिवाच्या चेहर्यावरील तीन वेगळे भाव दाखवतात. डावीकडचे अघोर मुख, मधले तत्पुरुष मुख, उजवीकडचे वामदेव मुख ही तीन दृष्य मुखे तर चौथे सद्योजात नावाचे मुख मस्तकाच्या मागच्या भागी तर पाचवे इशानचे मुख हे वरचे बाजूस अर्थात आकाशात असल्याचे मानले जाते.
आता ह्या तीन दृश्य मुखांपैकी एकेक मुख आपण बघूयात.
अघोर
हे मुख दर्शकाच्या डावीकडे आहे. नावाप्रमाणेच हे मुख शिवाच्या रौद्र स्वरूपाचे प्रतिक आहे. शिवाच्या चेहर्यावर मिशी असून कपाळी तिसरा डोळा आहे. कानात नागरूपी कुंडल आहे तर एका हातातही त्याने नाग उचलून धरीला आहे. केश्कुरळे असून मुकुटावर कवटी कोरलेली आहे तर चेहर्यावरील भाव बेफिकीर आहेत.
अघोर मुख
तत्पुरुष
हे शिवाचे मुख अतिशय प्रसन्न भाव दर्शवतात. जटासांभारावर त्याने सालंकृत मुकुट धारण केला असून हाती मोदकसदृश असे काहीतरी फळ आहे. जणू ह्या मुखाने शिव जनांचे पालन करीत आहे.
वामदेव
हे मुख दर्शकाच्या उजवीकडे आहे. शिवाच्या डावीकडे ते असल्याने त्याला वामदेव म्हणतात हे पार्वतीचे मुख असेही मानले जाते. ह्या मुखावरील भाव अतिशय सात्विक आहेत. ह्याच्या मुकुटाची ठेवणही वेगळी असून त्याने हाती कमळ धरीले आहे.
अत्यंत देखण्या अशा ह्या सदाशिवाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर तितकेच सुरेख असे दोन शिल्पपट कोरलेले आहेत.
आता ह्यापैकी डावीकडच्या शिल्पपटाकडे आम्ही वळलो. हा अत्यंत सुंदर शिल्पपट आहे तो अर्धनारीश्वर मूर्तीचा.
अर्धनारीश्वर
अर्धनारीश्वर म्हणजे शिव आणि पार्वतीची एकत्रित मूर्ती अर्थात पुरुष आणि प्रकृती यांचे एकत्रीकरण म्हणजेच सृजनमूर्ती.
येथील मूर्ती ही अतिशय सुंदर आहे. अर्धनारीश्वराची मूर्ती त्रिभंगमुद्रेत असून चतुर्हस्त आहे. शिवाच्या अर्ध्या भागाने उभे राहण्यासाठी नंदीचा आधार घेतला असून आपले कोपर त्याच्या वशिंडावर टेकविले आहे. तर पार्वतीचा अर्धा भाग हा स्त्रीरूप असल्याने तो जास्तच कमनीय दाखवला आहे. पार्वतीने आपल्या कंबरेचाच आधार हात टेकवण्यासाठी घेतलेला आहे. शिवाच्या एका हातात नागबंधन असून पार्वती ही मात्र स्त्री असल्याकारणाने तिच्या हाती दर्पण आहे. हा आरसा बहिर्वक्र आहे कारण तत्कालीन आरसे हे काचेपासून न बनवले जाता ते शिशाचे अथवा दगड घासून घासून गुळगुळीत करून बनवलेले असत. बहिर्वक्र स्वरूपामुळे हे आरसे जास्तीत जास्त मोठी प्रतिमा दाखवू शकत. शिव-पार्वतीच्या मस्तकातील दोन्ही कर्णभूषणे भिन्न असून शिवाच्या जटाभारात अर्धचंद्र आहे तर पार्वतीने आपल्या केसांचा अंबाडा घातलेला दिसून येतो.
अर्धनारीश्वराच्या शिवाच्या डाव्या बाजूला भालाधारी स्कंद उभा आहे. त्याचे वरचे बाजूस ब्रह्मा आणि ऐरावतारूढ इंद्र आहे तर पार्वतीच्या भागाच्या उजवीकडे मकरारूढ वरूण आणि गरूडारूढ विष्णू आहे. विष्णूच्या हाती चक्र आहे. तर वरचे बाजूस गंधर्व, अप्सरा आहेत तर अर्धनारीश्वराच्या खालचे बाजूस सेवक सेविका आहेत.
अर्धनारीश्वर शिल्पपट
अर्धनारीश्वर अधिक जवळून
वरूण, विष्णू, काही दिक्पाल आणि अप्सरा
अर्धनारीश्वर शिल्पपट पाहून आम्ही सदाशिवाच्या उजव्या बाजूच्या भिंतीत असलेला शिल्पपट पाहू लागलो.
हा शिल्पपट आहे तो गंगाधर शिवमूर्तीचा अथवा गंगावतरण प्रसंगाचा.
गंगाधर शिव अथवा गंगावतरण
गंगावतरणाची कथा ही रामायणात विस्ताराने आलेली आहे. रामाचा पूर्वज इक्ष्वाकू वंशीय सगराला साठ सहस्र पुत्र होते. सगराच्या अश्वमेध यज्ञाच्या अश्वाचे हरण इंद्राद्वारे केले जाते व इंद्र तो अश्व पाताळात तप करीत बसलेया कपिलमुनींशेजारी बांधून टाकतो. स्वतःच्या ताकदीने उन्मत्त झालेले सगरपुत्र यज्ञीय अश्वाचा शोध घेण्यासाठी पृथ्वी खणत खणत पाताळात जातात. पाताळात तप करीत बसलेल्या पुराणपुरुष कपिलमुनींची तपश्चर्या सगरपुत्रांच्या खणाखणीमुळे भंग होते. आपल्या अश्व ह्या कपिलमुनींनीच चोरलेला आहे ह्या गैरसमजुतीमुळे सगरपुत्र त्यांच्या अवमान करतात क्रोधदग्ध कपिलमुनी आपल्या दृष्टीक्षेपात सर्व सगरपुत्रांचे जाळून भस्म करतात. बरेच दिवस सगरपुत्रांचा पत्ता न लागल्याने सगर आपल्या नातवास अंशुमानास आपल्या साठ सहस्त्र पुत्रांचा शोध घेण्यास सांगतात. पाताळात शोध घेता घेता आपल्या भस्मीभूत झालेल्या चुलत्यांचा शोध अंशुमानास लागतो. तिथे जलाञ्जली देण्यासाठी त्याला कोठेही जलाशय दिसत नाही. तिथेच असलेला पक्षीराज गरूड केवळ गंगेच्या पवित्र जलानेच ह्या सगरपुत्रांना मुक्ती मिळेल असे अंशुमानास सांगतो आणि तिथे सुरु होतो गंगावतरणाचा अट्टाहास. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सगरानंतर राज्यावर आलेला अंशुमान तप करतो व अंशुमानानंतर त्याचा पुत्र दिलीप तप करतो पण दोघांचे तप निष्फळ जाते. दिलीपानंतर त्याचा पुत्र भगीरथ राजगादीवर होतो. राज्यत्याग करून आपल्या पितरांना मुक्ती देण्यासाठी तो ब्रह्मदेवाचे आवाहन करण्यासाठी कठोर तप करतो. शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न होऊन गंगेला पृथ्वीवर अवतरीत होण्यासाठी सांगतात. मात्र गंगेचा स्वर्गातून येणारा प्रचंड ओघ थोपवण्यासाठी तिला मस्तकावर धारण करण्यासाठी भगवान शंकराशिवाय कोणीही समर्थ नाही असे सांगून त्यास शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सांगतात. मग भगीरथ परत शिवाचे कठोर तप करून त्यास प्रसन्न करून घेतो. शिव प्रसन्न होऊन गंगेस आपल्या मस्तकी धारण करण्यासाठी तयार होतात व गंगेचे शिवाच्या मस्तकी अवतरण होते. आपली एक जटा हळूच सोडवून शिव गंगेस पृथ्वीवर सोडतात व ती परमपाविनी गंगा भगीरथाच्या पाठोपाठ पाताळात जाऊन आपल्या पवित्र प्रवाहाने भस्मीभूत झालेल्या सगरपुत्रांचा उद्धार करते.
अशी ही गंगावतरणाची थोडक्यात कथा.
इथले गंगावतरणाचे शिल्प थोडे वेगळे आणि ओळखण्यास किञ्चित अवघड असे आहे.
शिवपार्वती त्रिभंगमुद्रेत उभे असून शिवाच्या खालचे बाजूस भगीरथ हात जोडलेल्या अवस्थेत बसून शिवाची प्रार्थना करीत आहे. शिवाच्या मस्तकावर आकाशात तीन मुख असलेली गंगा जटेत येण्यासाठी उत्सुक आहे. गंगेच्या तीन मुखांचे कारण म्हणजे तिला त्रिपथगा म्हणतात. कारण ती स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असा तीन पथांतून प्रवास करत आहे. स्वर्गातून उडी घेताना ती मंदाकिनी असते, पृथ्वीवर ती भगीरथ प्रयत्नांनी येत आहे म्हणून ती भागीरथी आहे तर पाताळात सगरपुत्रांचा उद्धार करायला जाताना ती भोगवती आहे.
आपल्या पतीच्या मस्तकी दुसरी स्त्री येत असलेली पाहून स्त्रीसुलभ मत्सरामुळे पार्वती शिवापासून दूर सरकलेली आहे. शिव पार्वती ह्या दोघांच्याही शरीराचा तोल एकमेकांच्या विरूद्ध बाजूस झुकल्यामुळे ह्या शिल्पपटाचा समतोल अतिशय सुरेखरित्या साधला गेलाय. गंगावतरणाचा हा चमत्कार बघण्यासाठी इथेही ब्रह्मा, विष्णू, गंधर्व आणि अप्सरा आलेले आहेत.
गंगावतरण. खाली उकीडवा बसलेला भगीरथ
शिव पार्वती व शिवाच्या मस्तकी प्रवाही गंगा
गंगावतरणाच्या पुढील बाजूस आहे ते कल्याणसुंदर शिवाचे शिल्प अर्थात शिवपार्वती विवाहपट
कल्याणसुंदर शिव
हा इथला एक नितांत सुंदर शिल्पपट. इथला शिवपार्वतीच्या विवाहाचा प्रसंग हा वेरूळच्या क्र. २१ मधील रामेश्वर लेणीतील शिल्पपटापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा आहे.
शिवपार्वतीच्या विवाहाचे पौरोहित्य करायला साक्षात ब्रह्मदेव आलेला आहे. तो खालती बसून विवाहसोहळ्याची मांडामांड करत आहे. पार्वतीचा पिता हिमवान आपल्या कन्येला अलगदपणे घेऊन येत आहे. हिमवानाच्या मागून अमृतकुंभ घेऊन चंद्र येत आहे. आपल्या कन्येचा पती हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्यावर कृतार्थता आहे. तर पार्वतीच्या अर्धोन्मिलित चेहर्यावर अतिव समाधान साकारले आहे. पार्वतीने आपल्या एका हाताने शिवाचा हस्त पकडलेला आहे तर शिवही समाधानात बुडून गेला आहे. शिवपार्वतीच्या अनुपम विवाहसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येथेही देवदेवता, गंधर्व, ऋषी, अप्सरा आदी आलेले आहेत.
कल्याणसुंदर शिव
हिमवान, पार्वती आणि भगवान शिव. किती सुरेख त्या भावमुद्रा
ह्या शिवाच्या अत्यंत संतुलित मूर्तीच्या समोरच शिवाची संहारमूर्ती आहे ती म्हणजे अंधकासूरवधमूर्ती
अंधकासुरवधमूर्ती
अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणार्या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याचे कातडे अंगाभोवती गुंडाळून एका हाती कपाल धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. आपल्या त्रिशुळावर उचलून धरलेल्या अंधकाचे रक्त गोळा करता यावे म्हणून हाती कपाल धारण करतो. त्या कपालाबाहेर पडणारे पडणारे रक्ताचे चुकार थेंब त्वरेने शोषून घेण्यासाठी आपल्या योगसामर्थ्याने मातृकेची (चामुंडेची) उत्पत्ती करतो.
इथली मूर्ती अतिशय प्रत्ययकारी आहे. गजासुराला फाडून त्याचे चर्म आपल्या अंगाभोवती गुंडाळून क्रोधाने दग्ध झालेल्या अष्टभुज शिवाने आपल्या एका हाती खङ्ग धारण केले आहे तर दुसर्या हाताने अत्यंत आवेशाने आपला त्रिशूळ अंधकाच्या शरीरात खुपसला आहे. हाती कपाल धरून त्यात तो अंधकाचे रक्त गोळा करीत आहे. शिवाला इतका क्रोध आलेला आहे की त्याचे डोळे जणू खोबणीबाहेर येत आहेत तर त्याचा दात त्याच्याच ओठात रूतून बाहेर आला आहे व त्याने त्याचा ओठ जणू काही फाटला आहे. शिवाच्या मुकुटावर कवटी कोरलेली असल्याने त्याचे खवळलेले रौद्र रूप विलक्षण उठावदार दिसत आहे. एका पायावर भार देत शिवाने आपला दुसरा पाय वर उचलून ठेवला आहे. पायापाशी बसलेले पार्वती, सेवक आज भग्न झाल्यामुळे दिसत नाहीत पण त्यांचे अवशेष मात्र आजही दिसतात.
अंधकासुरवधमूर्ती संपूर्ण शिल्पपट
गजचर्म, खङग, कपाल धारण केलेला व त्रिशूळावर अंधकाला उचलून धरलेला शिव
शिवाचा खवळलेला चेहरा व ओठात रूतलेला दात
अंधकासुरवधमूर्ती पाहून आम्ही आता सभामंडपाच्या डाव्या बाजूकडील म्हणजे अर्धनारीश्वराच्या डावीकडील दोन शिल्पपट पाहाण्यास गेलो. इथला एक शिल्पपट आहे तो म्हणजे उमा माहेश्वर मूर्तीचा
उमा माहेश्वर मूर्ती अथवा शिव पार्वती अक्षक्रीडा
इथली मूर्टी बरीच भग्न असून शिव पार्वती सारीपाट खेळताना दाखवले आहेत. अर्थात ह्यात सारीपाटाचा पट भग्न असल्याने दिसू शकत नाही. शिवपार्वतीची अक्षक्रीडा पाहण्यासाठी खाली शिवगण जमलेले आहेत. खाली नंदी असून पार्वतीच्या उजवीकडे स्कंद उभा आहे तर वर देव्गण, गंधर्व जमलेले आहेत. शिवाच्या खेळातील नैपुण्यामुळे अर्थात शिव सतत खेळात जिंकत असल्याने पार्वती किञ्चित चिडलेली आहे आणि शिवापासून थोडी दूर सरकलेली आहे. तर शिव एका हाताने तिचा हात पकडून तिचे आर्जव करीत आहे.
उमा माहेश्वर शिल्पपट
शिव पार्वती व स्कंद
ह्याच मूर्तीच्या विरूद्ध बाजूस शिवाची अनुग्रहमूर्ती आहे ती म्हणजे रावणानुग्रहशिवमूर्ती
रावणानुग्रहशिवमूर्ती अथवा रावणकैलासोत्थापन
कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची अक्षक्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची थोडक्यात कथा.
ह्या शिल्पपटात रावणाने कैलास पर्वत उचलून धरलेला दिसत असून त्याच्या पराक्रमामुळे शिवगण भयभीत झालेले दिसत आहेत. पार्वतीचे नुकतेच अक्षक्रीडेवरून शिवाशी भांडण झाल्यामुळे ती शिवापासून दूर सरकलेली आहे आणि त्याच सुमारास रावण तिथे येऊन कैलासास हलवण्याचा प्रयत्न करीत आहे. दूर सरकलेल्या पार्वतीला एका हाताने सावरून धरत भेदरलेल्या शिवगणांना धीर देत शंकर सस्मित मुद्रेने आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरत रावणाचे गर्वहरण करीत आहे.
रावणानुग्रहशिवमूर्ती
रावणानुग्रहशिवमूर्ती अधिक जवळून
रावणानुग्रहाचा हा भव्य शिल्पपट पाहून आम्ही ह्याच सभामंडपातील उजवीकडच्या कोपर्यात असलेले गर्भगृह पाहण्यास निघालो.
गर्भगृह
हे गर्भगृह 'सर्वतोभद्र' प्रकारचे आहे. म्हणजे हे चारही बाजूंनी मोकळे असून आत प्रवेश करण्यासाठी चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारांवर अतिशय भव्य असे आयुधपुरुष द्वारपाल असून आत शिवलिंग आहे.
सर्वतोभद्र गर्भगृह
गर्भगृहातील शिवलिंग
हे गर्भगृह पाहून आम्ही आता उजवीकडील उपलेणे पाहण्यास निघालो
उजवीकडील उपलेणे
हे उपलेणे साधे असून ह्या भागात जमिनींतर्गत खोदलेले पआण्याचे भलेमोठे टाके असून शेजारीच एक गाभारा आहे. आतमध्ये शिवलिंग असून ओसरीच्या भिंतीवर योगेश्वर शिवाची प्रतिमा कोरलेली आहे.
ओसरीतील महायोगी शिव
हे उपलेणे पाहून आम्ही आता सभामंडपाच्या डावीकडील उपलेणे बघावयास गेलो.
डावीकडील उपलेणे
हे उपलेणे मात्र भव्य आहे. पुरातत्व खात्याने येथील स्तंभांची पुनरूर्भारणी केल्याचे दिसते आहे. सभामंडप, आतमध्ये गर्भगृह. त्याच्या दोन्ही बाजूंना सिंह. शेजारीच दोन्ही बाजूंनी अनुक्रमे भैरव आणि शैव आयुधपुरुष द्वारपाल आणि त्याही पलीकडे दोन्ही बाजूंना लहानसे उपमंडप अशी याची रचना.
लेण्याच्या समोरील मोकळ्या जागेत एक प्रचंड रंगशिळा असून येथे पूर्वी नंदी उभारण्याची सोय केलेली असावी किंवा येथे शिवमूर्तीसमोर वादक आपली कलाकारी दाखवित असावेत.
उपलेण्याचा दर्शनी भाग
मध्यभागातील गर्भगृह आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सिंह
डावीकडच्या उपमंडपावर स्थित असलेला भैरव
उजवीकडील उपमंडपाच्या बाहेर असलेला शैव आयुधपुरुष
उजवीकडील उपमंडप
हा उजवीकडील उपमंडप मात्र महत्वाचा. ह्याच्या अंतर्भागात भव्य असा अष्टमातृकापट आहे. तर दोन्ही बाजूस काटकोनांत असलेल्या भिंतीवर समोरासमोर गणेश आणि स्कंद प्रतिमा आहेत.
अष्टमातृका
येथील शिल्पपटावर आठ मातृका दाखवल्या आहेत. तर त्यांच्या शेजारी गणेशसुद्धा आहे. ऐंद्राणी, वैष्णवी, ब्राह्मणी, कौमारी, वाराही, माहेश्वरी आणि चामुंडा ह्या नेहमीच्या सप्तमातृकांच्या जोडीला कधीकधी नारसिंही नामक आठवी मातृकासुद्धा दाखविली जाते ती येथे आहे. ह्या मातृका उभ्या अवस्थेत आहेत त्यांनी आपापली बाळे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचे ध्वज आहेत तर ध्वजांवर त्यांची वाहने स्थापित आहेत. अर्थात ह्या मातृका बर्याच भग्न झाल्यामुळे नीटशा ओळखू येत नाहीत पण हंसामुळे ब्राह्मणी, मोरामुळे कौमारी, गिधाडामुळे चामुंडा तर नंदीमुळे माहेश्वरी ह्या काही मातृका मात्र बर्यापैकी ओळखता येतात.
अष्टमातृकापट
शेजारील भिंतीवरील गणेश
स्कंद
अष्टमातृकांच्या उजवे बाजूस स्कंद प्रतिमा कोरलेली आहे. स्कंदाने एका हाती भाला तर दुसर्या हाती कोंबडा धारण केलेला आहे जो त्याला अग्नीने दिला आहे. स्कंदाच्या बाजूस दोन्ही बाजूस अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, शिवगण, गंधर्व व अप्सरा आहेत.
स्कंद
हे उपलेणे पाहिल्यावर घारापुरी क्र. १ चे लेणीदर्शन संपते.
ह्या थोडे पुढे गेल्यावर पुढच्या लेणी आहेत पण काही अर्धवट खोदलेल्या तर काही अगदीच साध्या. सध्या तेथे पुरातत्व खात्यातर्फे डागडुजीचे काम चालू असल्याने त्या लेणी बघायला अंतर्भागात जाता आले नाही त्यामुळे बाहेरूनच ती बघून अशतः समाधान मानून घ्यावे लागले.
लेणी क्र. २
हे लेणे खोदण्याचे काम अर्धवट राहिलेले आहे.
लेणी क्र. ३
दर्शनी भागावर असलेल्या स्तंभांमळे हे लेणे भव्य दिसते. ओसरी, गर्भगृह आणि गर्भगृहांच्या प्रवेशद्वारावर कोरलेले द्वारपाल अशी याची रचना.
लेणी क्र. ४
हे लेणे अर्धवट राहिलेले दिसते. ह्या लेणीच्या दर्शनी भागावर पण आयुधपुरुष द्वारपाल आहेत.
लेणी क्र. ४ चा दर्शनी भाग
लेणी क्र. ५
हे लेणे तर खूपच अर्धवट आणि प्रचंड पडझड झालेले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित केलेले आहे. कोरीव काम काहीही नाही.
इथे आमच्या घारापुरी लेणीदर्शनाची समाप्ती होते.
तसे बघायला घारापुरीची ही लेणी बघायला २० मिनिटे पुरेशी आहेत. पण आम्ही सर्वजण शिल्पे समजावून घेऊन पाहात असल्याने ही सर्व लेणी बघायला तब्बल अडीच तीन तास लागले.घारापुरी : महाराष्ट्रातील शैव संप्रदायी लेण्यांचे प्रसिद्ध स्थळ.मुंबईच्या पूर्वेस सु. ११ किमी. वरील एका बेटावर ही लेणी खोदली आहेत. यात पाच लेण्यांचा समूह असून तो घारापुरी या नावाने ओळखला जातो. अग्रहारपुरी या नावावरून घारापुरी हे नाव बहुतेक आले असावे. याचे प्राचीन नाव श्रीहरी होते. या बेटावरील अवाढव्य दगडी हत्तीमुळे त्यास पाश्चात्त्यांनी एलेफंटा हे नाव दिले. सध्या हा हत्ती मुंबई येथील जिजामाता उद्यानातील वस्तुसंग्रहालयाजवळ ठेवण्यात आला आहे. ते एलेफंटा व घारापुरी अशा दोन्ही नावांनी आज प्रसिद्ध आहे.
ही लेणी कोणी खोदली, यासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. शिवाय तत्संबंधी एकही लिखित पुरावा वा लेख येथील लेण्यांत उपलब्ध झाला नाही. शिल्पाकृती, त्यांची घडण, पेहराव वगैरेंवरून जेम्स बर्जेस, जेम्स फर्ग्युसन, भगवानलाल इंद्रजी वगैरे पुरातत्त्ववेत्त्यांनी ही लेणी सु. आठव्या-नवव्या शतकांत खोदलेली वा राष्ट्रकूटांची असावीत, असे अनुमान काढले आहे. येथील आकृत्या गुप्त व शक परंपरांशी निगडित असल्यामुळे चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने हर्षवर्धनाच्या पराभवानंतर ही लेणी खोदली, असेही काहींचे म्हणणे आहे. पांडवांनी अथवा बाणासुराने या गुहा खोदल्याचीही दंतकथा सांगण्यात येते. शिल्पांशिवाय येथील भिंतींवर व छतांवरही चित्रे व रंगीत नक्षीकाम असावे, असा काही तज्ञांचा कयास आहे. येथील वास्तूच्या एकूण अवशेषांवरून सहाव्या ते नवव्या शतकांतील कोकणात राज्य करणाऱ्या मौर्य-शिलहार राजांची मंगळपुरी नामक राजधानी म्हणजेच घारापूरी असावी, असेही काहींचे म्हणणे आहे. १५३४ मध्ये हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले आणि या शिल्पांस प्रसिद्धी मिळाली.
घारापुरीच्या लेण्यांचा आलेख सर्वसाधारणपणे अधिक या चिन्हासारखा आहे. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना, येथील स्तंभ आणि शिल्पे यांची रचना वेरूळच्या दुमार लेण्यासारखी आहे. तथापि येथील त्रिमूर्ती मुख्य प्रवेशद्वारासमोर नाही, ती एका स्वतंत्र गर्भगृहात आहे. तसेच स्तंभशीर्षे गोल उशीच्या आकाराची आहेत. त्यांवर अत्यंत रेखीव व प्रमाणबद्ध पन्हाळ्या कोरलेल्या आहेत.
घारापुरीतील शिल्पे त्यांच्या उदात्त भावप्रकटनाच्या दृष्टीने अद्वितीय ठरलेली आहेत. बहुतेक सर्व शिल्पे शिवाच्या जीवनाशी निगडित असून ती तत्कालीन शैवपंथीय पुनरुज्जीवनाची साक्ष देतात. प्रत्येक शिल्पाच्या मागे काहीतरी पौराणिक कथा गुंफलेली असून शिल्पज्ञाने तिचे वास्तवरूप चित्रित करण्यात प्रयत्न केला आहे. येथील मुख्य शिल्प त्रिमूर्तीचे आहे. या शिवाय अर्धनारीश्वर, गंगावतरण, शिवपार्वती विवाह, अंधकासूरवधमूर्ती, उमामहेश्वर, तांडवनृत्य, रावणानुग्रह इ. शिल्पे प्रमाणबद्धता, जोष व भावरेखाटन या दृष्टींनी विशेष उल्लेखनीय आहेत.


त्रिमूर्तीच्या शेजारी पूर्वेस अर्धनारीश्वराची मूर्ती आहे. अर्धनारीश्वर म्हणजे शिव-पुरुष आणि उमा-प्रकृती यांचा समन्वय. उजवे अंग शिवाचे व डावे उमेचे. या मूर्तीची उंची ५.१० मी. असून शंकराचा जटाभार व पार्वतीचा केशसंभार, यांना जरतारी वस्त्रात आच्छादून त्यावर जडावाचा उंच मुकुट चढविलेला आहे, असे भासते. मुकुटाच्या घडणीतून बाहेर आलेल्या उजवीकडील शंकराच्या जटा आणि डावीकडील पार्वतीच्या कुरळ्या बटा दिसतात. शंकराच्या जटांमध्ये चंद्रकला असून कानाची पाळी लांब व तीत एकच बाळी आहे, तर पार्वतीच्या कानात कर्णफुलांची जोडी दिसते. शंकराचा एक हात नंदीला आवरीत आहे, तर पार्वतीच्या दुसऱ्या हातात वर्तुळाकार दर्पण आहे. मूर्ती एक असूनही दोन्ही बाजूंनी भिन्न भाव दिसतात, तसेच साजेसी शारीरिक ठेवणही आढळते. पार्वतीचे नितंब नि स्तन तिच्या बांधेसूद स्त्रीत्वाची साक्ष देतात, तर भरदार वक्षःस्थळ व सडपातळ कटिप्रदेश शंकराच्या पुरुषत्वाचा दाखला देतात. अर्धनारीश्वराच्या मागे आणि आजूबाजूला अनेक मूर्ती आहेत. त्यांपैकी गरुडाच्या खांद्यावर बसलेला चतुर्हस्त विष्णू, दोन दासी, मकरवाहन वरुण, ब्रह्मदेव, इंद्र वगैरेंच्या मूर्ती कलात्मक आहेत.
त्रिमूर्तीच्या पश्चिमेला गंगाधर वा गंगावतरणाची एक मूर्ती आहे. ही मूर्ती ३·७५ × ५·५० मीटरच्या चौकटीत खोदलेली आहे. तीमधील शिवाची उंची सु. ५ मी. असून पार्वतीची उंची सु. ३·७५ मी. आहे. शंकराचे दोन हात मोडले आहेत. उरलेल्या दोन हातांपैकी एक बुटक्या गणाच्या मस्तकावर व दुसऱ्याची तर्जनी पार्वतीच्या हनुवटीवर आहे. शंकराच्या जटाभारावर त्रिधारी मुकुटाचे आच्छादन असून त्याच्या शिखरातून त्रिमुख स्त्रीची अर्धमूर्ती दाखविलेली आहे. ही मुखे गंगा, यमुना व सरस्वती या तीन पवित्र नद्यांची प्रतीके असावीत, असे अनुमान करण्यात येते. शंकर या भाराने किंचित कलला आहे आणि पार्वतीला जवळ घेण्याचा प्रयत्न करीत असून पार्वती लज्जेने दूर सरकण्याचा यत्न करीत आहे, असे वाटते. तिच्या कुरळ्या केसांवर मुकुट आहे नि मागे मल्याळी धर्तीचा अंबाडा बांधलेला आहे. कुंडलांपासून नूपुरापर्यंत ती अलंकारांनी नटलेली आहे व झुळझुळीत वस्त्र ल्याली आहे. तिच्या शेजारी प्रसाधन–साहित्याची मंजूषा धारण करणारी दासी उभी आहे. एकूण पार्वतीची मूर्ती त्रिभंगात असून फक्त स्कंधाकडील भाग शंकराकडे कलला आहे.
शिवपार्वतीविवाह या मूर्तीत पार्वतीची मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध व बांधेसूद असून शिवपार्वती या दोन्ही मूर्तींची बरीच मोडतोड झाली आहे. पार्वती शंकराच्या उजव्या बाजूस असून तिचा उजवा हात शंकराच्या डाव्या हातात होता, असे मूर्तींच्या ठेवणीवरून वाटते. एकूण प्रसंगावरून वेरूळ येथील रामेश्वर लेण्यातील प्रसंगाची आठवण येते. या मूर्तीला कल्याणसुंदर असे नाव दिले आहे. देखणा, दयाळू शिव प्रसन्न दिसत आहे. त्याचा एक हात कंबरेवरच्या वस्त्रावर असून दुसऱ्या हाताने तो पार्वतीला आधार देत आहे. लज्जावनतमुखी पार्वतीचे कन्यादान तिचा पिता करीत आहे तिला शिवाच्या हाती देत आहे. ब्रम्हा या मंगलप्रसंगी पुरोहित असून तो शिवाच्या डावीकडे बसला आहे. मेघमंडलातून देव हा मंगल समारंभ पहात आहेत, असे दाखविले आहे.
अंधकासुरवधमूर्तीचा खालचा भाग फुटून गेला असला, तरी एकूण सारा प्रसंग स्पष्ट दिसतो. विक्राळ शिव खडकांमधून पुढे घुसून अंधक राक्षसाला ठार करीत आहे, त्याच्या शरीरातून पडणारे रक्ताचे थेंब पकडण्यासाठी त्याने एका हातात कुंडिका धरली आहे. उजव्या हाताने शिवाने हत्तीचे कातडे धरले आहे. अंधकाचा मित्र नील याने गजरूप धारण करून शिवावर हल्ला चढविला होता. पण शिवाच्या एका सेवकाने त्यास ठार केले. एकूण या चित्रातून उग्र शिवाने यथार्थ दर्शन होते.
शिवपार्वतीविवाह मूर्तीच्या पश्चिमेकडे अंगणात डाव्या हातास एक लहानसे शिवालय आहे. दारात खुला मंडप, उत्तरेस कमलाधिष्ठित शिवमूर्तीचे शिल्प मुख्य लेण्यातील योगीश्वरासारखेच दिसते. शिवालयाच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, असून वर आकाशात विद्याधर आहेत. डावीकडे टाक्यावर आणखी एक शिवतांडवनृत्य शिल्प आहे. याची उंची सु. ३·५० मी. असून पार्वतीच्या अंगावर ठळक अलंकार आहेत. मागल्या बाजूला गरुडारूढ शंखचक्रधारी विष्णू, ऐरावतावर इंद्र आणि हंसारूढ ब्रह्मदेव आहेत. कार्तिकेय वरच्या बाजूला तर गणपती शिवाच्या उजवीकडे आहे. उजव्या हातात सोटा व डाव्या हातात हत्तीचा सुळा आहे. वीणा वाजविणारी स्त्री आणि अवकाशगामी यांच्या मूर्ती बाइकाईने पाहण्यासारख्या आहेत.
तांडवनृत्यातील मूर्ती इतकी छिन्नविच्छिन्न झालेली आहे की, तिच्या आजच्या स्वरूपावरून मूळच्या सौंदर्याची मुळीच कल्पना करता येत नाही.
येथून पूर्वीच्या द्वारमंडपात डावीकडील शिल्पांत रावणानुग्रह कथा चित्रित केली आहे. गर्वाने धुंद झालेल्या दशमुखी रावणाने आपल्या वीस हातांनी कैलासपर्वत समूळ उचलण्याचा खटाटोप आरंभलेला दिसतो पण इतक्यात शिवाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने तो जमिनीवर दाबला. त्यामुळे रावण पर्वताखाली अडकला. शिल्पात गोल खडक पुढे आलेले दिसतात ते म्हणजे कैलास. त्याखाली रावणाची मूर्ती अतिशय विच्छिन्न झालेली दिसते. शिव उंच व ऐटदार असून त्याचा तिसरा डोळा यात स्पष्ट दिसतो. शिवाचे हात तुटले आहेत एकाने त्याने पार्वतीला आधार दिला आहे, दुसऱ्या हाताने त्याने आपल्या सेवकाचे केस धरून त्याला सावरले आहे.
वरील सुप्रसिद्ध शिल्पाकृतीं व्यतिरिक्त चतुर्भुज द्वारपाल, गणेशमूर्ती, कार्तिकेय, ब्रह्मा, विष्णू वगैरेंच्या मूर्तीही नजरेत भरण्यासारख्या आहेत. मुख्य लेण्याव्यतिरिक्त उरलेल्या लेण्यांतही काही मूर्ती आहेत, परंतु त्या विशेष उल्लेखनीय नाहीत. ज्या आहेत त्यांचीही फार मोडतोड झालेली आहे.
घारापुरीतील काही शिल्पाकृती सध्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत. त्यांपैकी चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती, शांत मुद्रा व प्रमाणबद्धता या दृष्टीने उल्लेखनीय आहे. तसेच शिवाची एक भग्नमूर्ती त्याचा फक्त कटिभागच अविशिष्ट असून, शिवाबरोबर पार्वती व एक सेवक आहे. त्यांच्या पायांची घडण तर विशेष अप्रतिम आहे. गुळगुळीत पोटऱ्या व किंचित फुगलेली पावले पाहून त्यांतील जिवंतपणा मनावर ठसतो. इतर मूर्तींमध्ये नटराजाची कबंधमूर्ती व महिषासुरमर्दिनी यांचा उल्लेख करावयास हवा. लेण्याव्यतिरिक्त इतरही काही अवशेष येथे सापडले आहेत. इ. स. तिसऱ्या शतकातील विटांच्या स्तूपाचे अवशेष, अनेक शिवलिंगे, शिवमूर्तीचे भग्नावशेष, वास्तूचे पाये आणि मोठमोठ्या विटांचे तुकडे इतस्ततः विखुरलेले आहेत.
येथील साऱ्या शिल्पांची फार मोठ्या प्रमाणावर मोडतोड झालेली आहे. सतराव्या-अठराव्या शतकांत पोर्तुगीज सैनिकांनी नेमबाजीचा सराव करण्याकरिता तसेच प्रतिध्वनींची गंमत ऐकण्यासाठी अनेक शिल्पे बंदुकी व तोफा यांच्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न केली. १९३९ साली पाणी झिरपून त्रिमूर्तीचा बराच मोठा ढलपा निखळून पडला. नैसर्गिक आणि मानवी नासधुसीमुळे येथील शिल्पांच्या जतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. हवेतील आणि पाण्यातील क्षारामुळे खडक ठिसूळ बनत चालला आहे. त्याचप्रमाणे झिरपणाऱ्या पाण्यामुळे गुहांमध्ये नासधूस होत असते. याकरिता पुरातत्त्वखात्याने चिरांत दाबाने सिमेंट भरणे, पाणी जाण्याकरिता पन्हाळ्या खोदणे, वरचे छत तोलून धरण्याकरिता दगडी खांब उभारणे इ. महत्त्वाची कामे कुशलतेने हाती घेतली आहेत. अलीकडे त्रिमूर्तीमध्ये कागदाचा ओला लगदा क्षार काढण्याकरिता भरून नंतर मूर्तीवर एक रक्षक लेप दिला आहे.
संदर्भ : 1. Fergusson, J. Burgess, J. The Cave Temples of India, London, 1880.
२. जांभेकर, रामकृष्ण, अनु. एलेफंटा (घारापुरी ),मुंबई, १९५७.
३. जोगळेकर, सदाशिव आत्माराम, घारापुरी, पुणे, १९४८.
देशपांडे, सु. र.
पर्यटन ! समृद्ध संस्कृतीचा ठेवा घारापुरी लेणी
भेट द्यायची राहून गेलेल्या स्थळांच्या यादीमध्ये निदान आपल्याला अगदीच जवळ असलेले घारापुरी अर्थात एलिफन्टाचा तरी समावेश असायला नको. जगभरात मानवी संस्कृतीच्या विकासाच्या काळात भारतात आपल्याच पूर्वजांनी चितारलेल्या घारापुरीच्या भव्य गुंफा त्याकाळातील समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा सांगतानाच आपल्याला थक्क करतात.
पर्यटन म्हटल्यानंतर आपल्यासमोर विचार येतो तो परदेशातील निसर्गरम्य स्थळांचा. परदेशात गेलो, डॉलर्समध्ये पैसा खर्च केला की मग पर्यटनाचा आनंद (?) मिळतो. लहान – लहान सहलींसाठीही मोठा खर्च करून सेल्फी काढून समाजमाध्यमांवर टाकला की फिरण्याची हौस भागली, असं वाटून घेण्याचा ट्रेण्ड सध्या आला आहे. या ट्रेण्डमध्ये आपल्याच आजुबाजुच्या आणि निसर्गाने मुक्तहस्ताने समृद्धीची उधळण केलेल्या स्थळांना भेट द्यायची राहून जाते. अशाच भेट द्यायची राहून गेलेल्या स्थळांच्या यादीमध्ये निदान आपल्याला अगदीच जवळ असलेले घारापुरी अर्थात एलिफन्टाचा तरी समावेश असायला नको. जगभरात मानवी संस्कृतीच्या विकासाच्या काळात भारतात आपल्याच पूर्वजांनी चितारलेल्या घारापुरीच्या भव्य गुंफा त्याकाळातील समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा सांगतानाच आपल्याला थक्क करतात. —–चारही बाजुंनी अथांग अरबी समुद्र, मधोमध अनेक शतकांपासून आणि अनेक सत्तांमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवत दिमाखात उभे असलेले निसर्ग सौंदर्याची संपत्ती लाभलेले, त्याचबरोबर ऐतिहासीक आणि जागतिक ठेवा असलेले घारापुरी अर्थात एलिफन्टाला किमान एकदा भेट द्यायलाच हवी. एकाचवेळी नैसर्गिक सौंदर्य, इतिहासाच्या खुणा आणि जखमा अंगावर मिरवित असतानाही अबालवृद्धांना प्रेमात पाडणारंं मुंबईपासून अगदीच सहा -सात मैलांवरील हे बेट देशातीलच नव्हे लाखो विदेशी पर्यटकांना वर्षानुवर्ष आकर्षित करीत आहे. गेट – वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रातील तासभराचा आल्हाददायक प्रवास, पूर्णपणे प्रदूषणमुक्त वातावरण, पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले ग्रामस्थ, डोंगरात कोरलेल्या गुंफा, बंदरापासून गुफांपर्यंत नेण्याच्या मार्गावरील टॉय ट्रेन, उत्कृष्ट जेवण, कलाकुसरीच्या विविध वस्तू ही घारापुरीची खासीयत. शहरातील धबडग्यातून जरा निवांत श्वास घ्यायचा असेल तर घारापुरी हा उत्तम पर्याय. दरवर्षी येणारे 15 – 16 लाख पर्यटकांची गर्दी होत असतानाही निटनेटकेपणा, स्वच्छता आणि स्थानिकांनी प्रयत्नपूर्वक टिवून ठेवलेला ग्रामीण बाज हे या बेटाचे वैशिष्ट्य.
एलिफंटाचा इतिहास..समुद्रातील घारापुरी या जेमतेम सात चौरस किलोमिटरच्या लहानशा बेटावर डोंगरात कोरलेली शिव लेणी येथे आहेत. पाषाणात खोदलेल्या भव्य आकाराच्या शिल्पांसाठी ही लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी इ.स.चे 9 वे शतक ते 13 वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहे. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केली याला इथे आल्यानंतर दाद द्यायलाच हवी. या बेटाच्या नावाबाबत वेगवेगळे अंदाज आहेत. घारा म्हणजे गुरव आणि पुरी म्हणजे नगर. शिवमंदिरातील पूजा करणार्या पूजार्यांना गुरव या नावाने संबोधले जायचे. अशा गुरव पूजार्यांची वस्ती असलेलं नगर म्हणून त्याला ‘घारापुरी’ असं नाव पडलं. इथल्या लेण्यांत शैव परंपरेतील शिल्पाकृती असल्याने गुरवांची वस्ती असणं शक्य आहे. दुसरं म्हणजे ‘घारा’ हा शब्द बुलंद तटबंदीसाठी वापरला जातो. किल्ल्यासारख्या तटबंदीची नगररचना असलेलं नगर म्हणूनही या ठिकाणाला ‘घारापुरी’ असं नाव पडलं असावं असा अंदाज बांधता येतो. तर या बेटाचं पूर्वी नावा श्रीपुरी होतं, अशीही माहिती मिळते. मूळचं घारापुरी असलेलं हे बेट ‘एलिफंटा’ या नावानेही ओळखलं जातं. या बेटाचं एलिफंटा असं नामकरण पोर्तुगीजांनी केलं. त्यामागे एक कथा आहे. इ. स. 1534 च्या सुमारास व्यापारासाठी भारतात आलेले पोर्तुगीज राजबंदरला उतरले. तिथे फिरताना त्यांनी या लेण्यांच्या परिसरात एका हत्तीचं पाषाण शिल्प पाहिलं. त्या शिल्पाला पाहून ते ‘एलिफंटा’ असे संबोधलं, तेव्हापासून पोर्तुगीज या बेटाला ‘एलिफंटा’ असंच नाव पडलं. आणि इथल्या लेण्यांचा उल्लेख ‘एलिफंटा केव्हज’ असा करण्यात आला. ब्रिटिश राजवटीत या लेण्या एलिफंटा केव्हज या नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र आता हे हत्तीचं शिल्प या ठिकाणी नाही. हे शिल्प हल्ली मुंबईच्या जिजामाता उद्यानात स्थलांतरीत करण्यात आलं आहे.कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मोगल यांनी तिथे क्रमाने सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. त्याकाळात इथली लेणी उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले. शिवाजी महाराजांच्या काळात हे बेट मराठ्यांनी हस्तगत केले आणि सन 1774 मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले. सन 1987 मध्ये या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला.महत्व आणि वैशिष्ट्ये…या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव – पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध आदी दृश्ये अतिशय रमणीय आहेत. थोडक्यात या लेण्यांमध्ये साक्षात शिवाचा जीवनपटच या पाच गुफांमध्ये कोेरला गेला आहे.
मुख्य गुफा…पहिल्या क्रमांकाच्या मुख्य गुंफेत प्रवेश केल्यावर गुंफेच्या मध्यभागी असलेली महेश प्रतिमेची लेणी आकर्षित करते. हे शिल्प सर्व शिल्पांचा आत्मा ठरते. याची खोली 3.2 मीटर आणि रुंदी 6.55 मीटर तर उंची 8.3 मीटर आहे. भिंतीच्या स्तंभामध्ये द्वारपालांच्या तीन भव्य मूर्ती आहेत. मुख्य महेश शिल्प म्हणजे भारतीय शिल्पकलेचा परमोच्च बिंदू समजला जातो. या कलाकृतीत सर्वत्र जटा मुकुटच आहे. डावीकडे अघोर (रुद्र) रूप आहे. त्याच्या मुकुटात साप, विंचू आणि मेलेल्या माणासाचे शिर आहे. हातात फुत्काराने फणा उभारलेला नाग, तिसरा डोळा आणि पिळदार मिशा पाहून चेहर्यावरचा रुद्र भाव लक्षात येतो. म्हणूनच या मूर्तीला ‘अघोर’ किंवा ‘भैरव’ असं म्हणतात. मधला चेहरा शांत निरामय आहे. त्याला ‘तत्पुरुष महादेव’ असं म्हणतात. उजवीकडील चेहरा कोमल आणि प्रसन्न आहे. केशालंकार आणि हातात बांगडया आणि कर्णकुंडलं आहेत. यालाच ‘वामदेव’ किंवा ‘उमा’ असं समजलं जातं.
नटराज…घारापुरीच्या गुफांमध्ये प्रवेश करताच नटराजाचे दर्शन होते. विविध कलांचा अधिपती, कलावंतांचे आराध्य असलेल्या नटराजाच्या रुपातील शिवाचे भव्य रुप कोरलेले दिसते. भग्न झालेले हे शिल्प आजही त्याकाळातील भव्यत्वाची प्रचिती देते. नटराजाची भावमुद्रा आजही मनमोहक अशीच आहे.
रावणानुग्रह...एका लेण्यात, कैलास पर्वतावर शिव – पार्वती बसलेली असून ,रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे, असे दृश्य दिसते. शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्याच्या मुद्रेवर शांत, निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसतात. महादेव एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार देत असतानाच रावणाने उचलेला पर्वत आपल्या पायाने खाली दाबून रावणाचे गर्वहरण करीत असतानाच निर्भयतेचे आश्वासन देत आहे.
विवाह मंडल..विवाह मंडल हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल. शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने सेवा करून त्याची प्रीती संपादन केली. तिला मागणी घाल्ण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले. हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला. यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले. हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे. शिव पार्वतीच्या विवाहप्रसंगी उपस्थित ब्रह्मदेव, विविध अप्सरा, यक्ष या शिल्पात दिसतात.
इतर उल्लेखनीय शिल्पया महेशमूर्तीच्या एका बाजूला गंगाधारण केलेली गंगाधरशिवाची मूर्ती आहे. याठिकाणी भगीरथाने गंगेला प्रसन्न केल्यानंतर तिच्या प्रकोपापासून पृथ्वीला वाचविण्यासाठी शिवाची आराधना करतानाचे शिल्प आहे. शिवाच्या जटांमध्ये गंगेचा प्रपात होत असतानाचे यात दर्शविण्यात आले आहे. दुसर्या बाजूला अर्धनारी नटेश्वराचे शिल्प आहे. गंगाधर शिल्पाच्या वरच्या बाजूला अप्सरा, गंधर्व आणि ऋषिमुनी यांची शिल्प देखिल चितारलेली आहेत. मुख्य शिल्पाच्या दोन्ही बाजूला पूर्व अणि पश्चिमेला द्वारमंडप आहेत. तिथे जायला दोन प्रवेशद्वार आहेत. पश्चिम द्वारमंडपाच्या बाजूला मंदिराच्या गाभार्यात शिवलिंगाची स्थापना असून त्यांच्या भिंतीवर द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. आजूबाजूला शिव-पार्वती विवाह, अंधकासुर वध मूर्ती, महायोगी शिवा, रावण कैलास पर्वत हलवताना, शिव-पार्वती चौसर खेळताना, नटराज शिव अशी विविध शिल्प पाहायला मिळतात. या सगळ्या भव्य शिल्पाकृती पाहून आपण अक्षरश: स्तब्ध होतो.
शिवलिंग ...तिसर्या क्रमांकाची गुंफा काहीशी मोठी असून मध्यभागी भव्य असं शिवलिंग पाहायला मिळतं. बाजूला असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या गुंफेत मध्यभागी शिवलिंग आहे. बाजूची पाचवी गुंफा जरा खोल आहे. या शैलकृत लेण्या मुख्य लेणीच्या तुलनेत सामान्य किंवा कमी अलंकृत आहेत. शेवटच्या पाचव्या गुंफेपाशी खालच्या बाजूला मोठा तलाव दिसतो. तर समोरच्या डोंगरावर दोन लेण्या असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांकडून समजते. या ठिकाणच्या प्रत्येक गुंफांमध्ये जी काही शिल्प कोरलेली आहेत त्यांच्यात एक कथा दडलेली आहे.
घारापुरीनजिकचा समुद्र…घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणार्या नानाविध पक्षी – बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते. शिवाय बॅाम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा – शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीभोवती घिरट्या घालायला लागतात.
–पर्यटकांचे आकर्षण टॉय ट्रेन…घारापुरी बेटावर उतरल्यानंतर गुंफांपर्यंतच्या मार्गापर्यंत पाऊण किलोमिटर अंतरासाठी येथे एक टॉय ट्रेन आहे. बाजुला पसरलेल्या अथांग सागराच्या सोबतीने ही लहानशी ट्रेन पर्यटकांना घेऊन जाते. येथील द्रष्टे नेतृत्व राजेंद्र पडते यांनी टॉय ट्रेन 1994 मध्ये सुरु केली. ती आजही अत्यल्प दरात चालविली जाते. आजपर्यंत देशातील आणि विदेशातील अतिमहत्वाचे व्यक्ती, राजकीय पदाधिकारी, मंत्री – संत्री यांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे. लहानांसह मोठ्यांनाही निखळ आनंद देणार्या या ट्रेनची सफरसुद्धा घारापुरीचे वैशिष्ट्य आहे. साभार : vishalraje.com


















No comments:
Post a Comment