मोईंदा येथील भारतातील नदी पात्रात खोदलेली जगावेगळी तीर्थंकर जैन लेणी.
तोरणमाळ येथील नागार्जुन गुंफा :-

यादवकालीन खानदेश भाग १० | धाबादेव लेणी –
यादव मेलुगी याचा धाबादेव शिलालेख या शिलालेखाचा शोध द. रा. भट यांनी लावला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाजवळ नऊ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तेथे एक भग्न देवालय आणि काही अवशेष आहेत. त्याच लेखाची शिळा पडलेली आहे. ह्या लेखाचे संपादन आणि वाचन द. रा. भट आणि शं. गो. तुळपुळे यांनी केले आहे. संशोधक वर्ष २६ अंक एक ते चार पृष्ट ७८ ते ८० यात तसेच तुळपुळे यांचा मराठी कोरीव लेख यांनी केले आहे. लेखाची भाषा मराठी आहे. लेखात सिंघणदेवाचा पुत्र मेलुगिदेव याने कोंडव्व देवीचे मंदिर आणि वापी बांधल्याचा निर्देश आहे. हा सिंघणदेव देव म्हणजे यादव वंशातील सिंघण देव प्रथम होय. या लेखात तिथीचा स्पष्ट उल्लेख नाही कारण अक्षरे वेगळी पडली आहे. तरीही तो “सहस्र-नवसिकावरि” असे वाचल्यास त्याचा काळ इसवी सन ११६७ या लेखाची तारीख होईल.(खानदेशातील अभिलेख वैभव, ब्रम्हानंद देशपांडे)(यादवकालीन खानदेश १० | धाबादेव लेणी)
धाबादेव लेणी –
बोराडी जवळ सातपुड्याच्या पायथ्याशी दोन नाल्यांच्या संगमावर धाबादेव लेणी आहे. ही लेणी सातव्या शतकातील यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. येथील लेणी दगडावर नक्षीकाम करुन सर्व दगड एकमेकांवर रचल्याप्रमाणे ठेवले आहेत. विशेष म्हणजे हा दगड बाहेरुन आणलेला असावा कारण परीसरात अशा प्रकारचा दगड मिळत नाही. .सध्या तीन खोल्या(गाळे) शिल्लक आहेत. पुर्वी येथे १८ गाळे असावेत असे अवशेषांवरून वाटते. प्रत्येक खोली साधारण चार फुट लांब व रुंद असुन,ऊं चीसुद्धा चार फुट पर्यंत आहे. भिंतींवर नक्षीकाम असुन वेगवेगळ्या कोरीव मुर्त्या बसविलेल्या आहेत. छत चौकोणी आकाराचे असुन त्यावर वर्तुळात पानाफुलांची सुबक नक्षी काढलेली आहे. खांबाच्या वर यक्षांची मुर्ती काढलेली आहे. याठिकाणी पद्मासन अवस्थेतील गौतम बुद्ध, महावीर, महादेव, विष्णु, हनुमान, यक्ष, अशा वेगवेगळ्या सुबक कोरीव काम केलेल्या अनेक मुर्त्या आहेत. व अनेक मुर्त्या परिसरात विखुरलेल्या आहेत. अजिंठा-वेरुळ सारख्या हत्ती, माणसांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या मुर्त्यापण आहेत.
20/25 वर्षापुर्वी एक शिलालेख चांगल्या अवस्थेत होता. आज त्याचे तुकडे झाले आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी येथे अतिशय घनदाट जंगल होते. येथे येण्यासाठी रस्ताही नव्हता. काही जाणकारांच्या मते इथे तप- साधना होत असावी किंवा उत्तर-दक्षिणेकडुन येणारे धर्मसाधकांसाठी थांबण्याचे ठीकाण असावे.जवळच अतिशय निसर्गरम्य वातावरण असुन नाल्यांवर तीन-चार धबधबे आहेत. पाऊस पडल्यानंतर फेसाळणारे पांढराशुभ्र पाणी पाहुन मन आनंदित होते. यामुळे येथे पर्यटकांचा वावर वाढला आहे. सध्या ही लेणी मोडकळीस आली असुन छताच्या दगडांना तडे पडले आहेत. जर डागडुजी केली नाही तर छत पडुन लेणी अस्तित्व व इथला इतिहास नष्ट होईल. त्या काळात इथे जवळपास वस्ती असली पाहीजे शिरपूर तालुक्यातील अतिशय पुरातन, ऐतिहासिक ठेवा आहे व तो जतन झाला पाहीजे. नवादेवी, गुर्हाडपाणीचे तोरणमाळसारखे निसर्गसौंदर्य, धाबादेव लेणी, दुर्बड्याचे मुळ बिजासनी मंदीर, बिजासन अशा भागाला पर्यदनाच्या दृष्टिने महत्त्व येऊन या भागाचा विकास होऊ शकतो.
फोटो गणेश भामरे बोराडी*
कोंडव्व देवीचे मंदिर लेणीतील शिल्पांवरून ती नाथपंथी असावी असे दिसते पण काहींच्या मते ती जैन असावी.
जिंतूरच्या सहा जैन लेण्या
![]()
Pune-Ahmednagar-Parbhani- Navagarh-Jintur (480 Kms)
Jintur-Lonar-Mehekar-Karanja (216 Kms)
Karnja-Amravati--Chikhaldara (153 Kms)
Chikhaldara-Partwada-Muktagiri (44Kms)
Chikhaldara-Semadoh-Chikhaldara (50Kms)
Muktagiri-Achalpur-Akot-Shegaon (120 Kms)
Shegaon-Mehekar-SindkhedRaja-Jalna-Aurangabad- (265 Kms)
Aurangabad-Nagar-Pune (236 Kms)
JINTOOR – NEMGIRI
Type: Temple-Shri Digamber Jain Atishya Kshetra Nemgiri
Base Village: Jintur
Where: 400 Kms from Pune via Aurangabad/Jalna, 450 Kms via Parbhani
Route: Pune-Ahmednagar-Parbhani-Navagarh-Parbhani-Jintur
Time visited: October 2011
How to reach: From Jintur town Negiri hill is 4 kms away. There is road through the town but it goes through narrow lanes. Another approach is from the highway. Look for a water tank after Jintur. A narrow muddy trail goes right through an arch opposite the water tank. Follow the trail keeping Nemgiri hill on left till a crossing. Take a left road and start climbing the hill through the 2 arches to the top.
Lodging-Boarding facilities: Available at the kshetra. VIP suites are in very nice.
My Meter reading from Pune: 500 Kms
पेंडूर जैन लेणी :-
सिंधूदुर्ग
जिल्ह्यातील धामापुर तलाव आणि परिसर हा प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे.
चि.त्र्य. खानोलकर उर्फ आरती प्रभु यांच्या कोंडुरा सारख्या कांदबरीमुळे
मराठी वाचकांना आणि चानीसारख्या चित्रपटामुळे चित्रपटप्रेमींना हा परिसर
परिचित आहे. पण याच परिसरातील पेंडुर गावी जैनांचे स्थान आहे, याचा पत्ता
बहुतेकांना नसतो. सिंधुदुर्गात आदीम काळातील मानव संस्कृतीच्या पाऊलखुणा
मिळतानाच कातळ शिल्प आणि कोकणचे मुर्तीशास्त्र थक्क करणारे आहे. अनेक
भागातील प्राचिन शिल्प, हजारो वर्षापुर्वीच्या मुर्त्यांचा ठेवा जपला जायला
हवा. यासाठी तो संरक्षित व्हायलाच हवा. हजार वर्षे या मूर्ती ऊन वारा पाऊस
खात उभ्या आहेत या भूमीवर त्यांचा इतिहास कोरला गेलेला आहे. येथे असलेल्या
संस्कृतीचा एक भाग आहे.पेंडुर(तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग)मधील संकीन
आणि डंकीन या स्थळावरची शिल्प अशीच लक्ष वेधून घेतात. या मूर्तीचा मोठा
खजिना आपण जपायला हवा. या शिल्पांना बोलके करायला हवे.हजार वर्षापूर्वीचा
इतिहास आणि संस्कृतीचा भूतकाळ जागृत करायला हवा.
कोकणात अनेक
सत्तांतरे झाली आणि आपणही बदलत गेलो. कधी काळी सिंधुदुर्गात म्हणजे बाराशे
वर्षापूर्वी जैन धर्माला मानणा-या शिलाहार राजांची सत्ता कोकण प्रांतावर
होती. त्यांच्या काळात जैन संस्कृती येथे रुजली आणि वाढलीसुद्धा.. मात्र
सत्ता बदल झाला, धर्म बदल झाला आणि सिंधुदुर्गात मंदिरांची रचनाही बदलली.
येथे जैनांची असलेली धार्मिक स्थळे कालौघात नष्ट झाली;परंतु त्या
संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही आढळतात. सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी जंगलात आड
बाजूला डोंगरदऱ्यांमध्ये त्या काळातील सुरेख मूर्ती ऊन-पावसाचा मारा झेलत
आजही उभ्या आहेत. हजार – दीड हजार वर्षापूर्वीचा हा अमूल्य ठेवा जंगलात
खितपत पडला आहे.
कोकणावर अनेक आक्रमणे झाली मात्र आदिम काळातल्या
संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारे साक्षीदार उन -वारा -पाऊस झेलत ठाण मांडून
उभे आहेत. पेंडुर परिसरातील चौदा मुर्ती आणि शिल्प पुरातत्व विभागाच्या
नोंदीत असून या मुर्तीचा प्राचिन इतिहास लक्षात घ्यायला हवा. सुमारे एक
हजार वर्षांपूर्वी कोकणाच्या या भूभागावर शिलाहार राजांचा अंमल होता.
शिलाहार राजवटीत अपरांतात जैन धर्माचा प्रभाव होता. त्यांच्या राज्यात
जैनधर्मियांना मानाचे स्थान होते. आठव्या शतकात राष्ट्रकुटांनी चालुक्याचे
अधिपत्य झुगारून सत्ता स्थापन केली. राष्ट्रकुट नृपती गोविंद (तिसरा) या
राजाने उत्तर कोकणाच्या राज्यकारभाराची जबाबदारी कपर्दिस (पहिला) याच्यावर
सोपविली. ही शिलाहारांची पहिली शाखा. दक्षिण कोकणावर प्रभाव असलेल्या कृष्ण
राजाने या भागावर शिलाहार वंशातीलच सणफुल्ला याची प्रशासक म्हणून नियुक्ती
केली.
येथून शिलाहारांच्या कोकणातील कारकिर्दीला प्रारंभ झाला.
अकराव्या शतकापर्यंत शिलाहारांची दुसरी शाखा दक्षिण कोकणात म्हणजे गोवा ते
रत्नागिरी या भागावर राज्य करीत होती. त्यांची पहिली राजधानी गोव्यातील.
त्यावेळचे चंद्रपूर ऊर्फ गोपकपट्टण म्हणजे आताचे चांदोर येथे होते. त्यांनी
नंतर ही राजधानी सिंधुदुर्गातील बलिपट्टण म्हणजे खारेपाटण येथे हलविली.
शिलाहार राजा श्वम्मीयराने बलिपत्तन म्हणजे आजचे खारेपाटणमध्ये किल्ला आणि
बंदर उभारून ही राजधानी वसविली. याची साक्ष देणारी नेमीनाथ व चंद्रप्रभू
नावांची जैन मंदिरे सुख नदीच्या काठावर उभी आहेत.या राज्याचा कार्यकाल ७८५
ते ८२० या दरम्यान होता. पुढे अकराव्या शतकापर्यंत त्यांचा ब-यापैकी प्रभाव
राहिला. हे सर्व सांगायचे कारण एवढेच की, त्यांच्या राज्यादरम्यान
सहयाद्रीच्या द-या-खो-यात जैन संस्कृतीचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसार
वेगाने झाला.
याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. परंतु मुद्दा हा की,
या प्रांतात असलेल्या जैन धर्माच्या खुणा आजही पाहायला मिळतात. बुद्धोत्तर
आणि अशोकपूर्व कालखंडात जैन धर्म गोमांतकात आल्याचे मानले जाते. पुढे
उपेक्षा, परकीयांची आक्रमणे आणि नैसर्गिक प्रकोपामुळे जैनधर्मियांच्या
मूर्ती, श्रद्धास्थाने आणि वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या.
शिलाहार राजांचा प्रभाव संपल्यानंतर या धर्माचा प्रभावही ओसरत गेला.कारण
याचे आचरण सोपे नाही. ब्रह्मचर्य, आहारामधील पावित्र्य ही कठीण बाब होती.
याचा फटका जैन धर्माला बसला. परकीय शत्रूंच्या हल्ल्यात पळवापळवीच्या काळात
धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू झाले.
पेंडूर येथील
देऊळवाडीतील श्रीदेवी मंदिराच्या मागील बाजूस सुमारे पंधराशे पंचवीस चौरस
मीटर परिसरात वृक्षवेलींनी वेढलेल्या परिस्थितीत हे जैन मंदिर होते.
साफसफाई केल्यानंतर चिर्यांचे बांधकाम असलेला गाभारा, सभामंडपाचे जोते आणि
चौदा मूर्ती असा मोठा ऐतिहासिक ठेवा सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची
मूर्तीकला व तत्कालीन जैन संस्कृतीचे दर्शन घडते.येथे जैन तीर्थंकराची
मूर्ती असून बाजूला चवºया ढाळणाºया दासीची प्रतिमा आहे. समोरच जमिनीवर
हत्तीच्या मुखाचे कोरीव काम असलेले भग्न आसन व मूर्तीच्या मानेमागची
प्रभावळ भग्न झालेली असून गाभार्याबाहेर यक्ष व शासनदेवी यांच्या मूर्ती
आहेत. शिवाय भगवान वर्धमान महावीर यांची मोठी मूर्ती व पादुकाही आहेत. या
पादुका काहीशा भग्न असून जवळच अंबिका किंवा आम्रा (मांडीवर लहान मुलं
घेतलेली स्त्रीमूर्ती) हिची मूर्ती आहे.सध्या या मुर्तीला वृक्षवेलींनी
वेढलेली असून हीच मुर्ती पुरातत्व विभाग तातडीने संग्रहालयात नेण्यासाठी
प्रयत्नशील आहे.सध्या वृक्षवेलींनी या मुर्तीला वेढलेले असल्याने चोरांना
ते पळविता आलेली नाही. मुर्तीशास्त्रातील ही मुर्ती म्हणजे सिंधुदुर्गचा
अनोखा ठेवा आहे.याखेरीज मस्तक नसलेली पार्श्वनाथाची व सर्वानुभूते, मातंग
गोमेधा वगैरेंच्या मूर्ती आहेत, तर मंदिराच्या बाहेर व्याघ्रसदृश्य
प्राण्याची व अगदी तशाच प्राण्यावर आरूढ झालेल्या देवीची अशा दोन मूर्ती
आहेत. त्यांपैकी व्याघ्रसदृश्य प्राण्यावर आरूढ झालेली रक्षक देवतेची
मूर्ती अर्धी-अधिक जमिनीत गेलेली आहे. पेंडूर येथील स्थानिक लोक या
मूर्तींपैकी अंबिकेच्या मूर्तीला डंकिनी व देवदूताला शांकिनी या नावांनी
संबोधतात. ग्रामस्थांकडून असे कळते की,पूर्वी या जागी विशिष्ट प्रकारच्या
विटा व नक्षीदार खांब होते, पण ते खांब इंग्रजांनी आपल्याबरोबर नेल्याचे
सांगीतले जाते. किमान एक हजार वर्षांपूर्वी पेंडूर गावात एक देखणे जैन
मंदिर उभे होते याची साक्ष देत आज हे भग्नावशेष पडलेले आहेत. याखेरीज
डांबरी रस्त्यालगत एका जैन धर्मगुरूची समाधी आहे. त्याला स्थानिक लोक
स्वामींची समाधी म्हणतात.
सुमारे
हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या अनेक मुर्त्यां
उघड्यावर पडलेल्या असल्याने त्यांना संरक्षित करण्यासाठी पुरातत्व विभागाने
त्यांना जिल्हा बाहेर संग्रहालयात नेण्याची प्रक्रिया सुरु केली
आहे.रत्नागिरीच्या थिबा पॅलेसमध्ये आता हा ठेवा कडीकुलुपात बंदिस्त
होईल.यासाठीची कार्यवाही सुरूही झाली आहे. या पुर्वी जिल्ह्यातून अनेक
भागातील पुरातत्व ठेवा या संग्रहालयात नेण्यात आला आहे. गड किल्ल्यावरच्या
मुर्त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
वाशाळा लेणी :-

वाशाळा लेणी, वाशाळा ता.मोखाडा जि.पालघर –
महाराष्ट्राच्या सांस्कृतीक वारसामध्ये तीन प्रकारच्या वास्तू हे ठळकपणे नजरेत भरतात. लेणी,मंदिरे, आणि किल्ले. डोंगर टेकडी पर्वत खडक कोरून तयार केलेल्या गुहेला लेणी म्हणतात. भारतात आज माहित असलेल्या सुमारे १००० लेणी आहेत. महाराष्ट्रात यापैकी ९०%लेणी आहेत. महाराष्ट्रात लेनी खोदण्याचा इतिहास तसा दुसरे शतकं ते दहाव्या शतकापर्यंतचा आहे. म्हणजे सहाजिक ह्या लेण्याला नक्कीच हजार वर्षाचा इतिहास आहे. त्यापैकी ही एक वाशाळा लेणी. वाशाळा गावातील आणि पंचक्रोशीतील माणसे लेणीला वसई म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे या लेणीची शासकीय दप्तरी पुरातन खात्याकडे नोंद नसावी. काळाच्या पडद्याआड अशा शेकडो अपरीचित लेण्या ह्या सह्याद्रीच्या कुशीत समावलेल्या आहे. त्यापैकी ही एक वाशाळा लेणी.
लेणीच महत्व ना गावकऱ्यांना ना कोणाला. हे फक्त मोबाईल वर नेट चालवण्यासाठी पते खेळण्यासाठी व तंबाखू गुटखा खाऊन दगड रंगवण्यासाठी तर कोणी आपलं नाव लिहितो जगाला दाखवण्यासाठी येथे मी स्वप्निल भवारी व माझे काही गवतिल मित्र महिना अखेरीस जमेल तशी स्वच्छता करतो. दिवाळीला दीप प्रजवलीत करू दीप उस्तव साजरा करतो. या गावातील मित्र सहकार्य करतात. तसी लेणी खूप सुंदर आहे. गावाला लागूनच डोंगराच्या पायथ्याशी ही प्राचीन लेणी. मी विचारलेल्या जाणकार व्यक्ती कडून मिळालेल्या माहितीनुसार ही लेणी अर्धवट आहे…पण सुरुवात अप्रतिम केलेली दिसते.दुमजली लेणं करण्याची जी पद्धत तीच इथे वापरणार होते, येथे आपण बघितल्यनंतर अस लक्षात येते की येथे तळ मजला आणि पहिला मजला अशी रचना दिसते. जिनेच काम पण अर्धवट राहिले आहे.हे जैन लेणं आहे.आत मध्ये दोन जैन तिर्थंकरांच्या खड्गासनातील मूर्ती म्हणजे प्रतिमा उभ्या स्वरुपात आहे. जैन धर्मात
एकुण चोवीस तिर्थंकार आहेत व त्यातील दोन तीर्थकरांच्या मूर्ती असाव्यात दोन्हीही सारख्या असल्यामुळे मूर्ती नेमकी कुणाची असावी हे ओळखणे थोडे कठीण जाते.
सुरुवातीस दोन पायऱ्या त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. चौथरा केला असून बाजूलाच पाण्याचे कुंड खोदलेले आहे. त्यालाच लागून खडकात एक शंकराची छोटीसी पिंड कोरलेली आढळुन येते. आत्ता ही पिंड येथे का तयार केली असावी हे माहिती नाही . छोटेसे दर्शनी मंडप.दर्शनी भागात सुंदर दोन खांब उभे आहे.खांब अखंड नाहीत. व पाणी बाहेर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या दोन नळ्या आहेत .त्या नंतर मुख्य दरवाजावर काहीतर कोरल आहेत पण स्पष्ट दिसत नाही. तेथून आत गेले की १०बाय१५ ची गुफा आहे.
आवाज खुपच घुमतो.समोरच्या बाजूस दोन जैन मूर्ती प्रतिमा खडकावर कोरलेल्या आहेत.व कप्पे आहेत यात स्थल मूर्ती असावी. (स्थल मूर्ती म्हणजे एका जागेवरून दुसर्या जागेवर हलवू शकतो ) दोन तीन फुटलेली शिल्पे आहेत.एक शिवलिंग आहे हे नंतर ठेवला असेल .चारही कोपऱ्यात दिवे लावण्यासाठी जागा आहे. काम अर्धवट राहिल्याच्या अनेक खुणा इथे दिसतात. अर्धवट काम का सोडले या बाबत कुणालाच काही कल्पना नाही. हे एक न सुटणार कोड आहे. इथे खुप काही बघण्यासाठी नाही पण हा हजारो वर्षाचा इतिहास आहे.तो जपला पाहिजे.
या लेणी ची निर्मिती का केली असावी.
माझ्यामते नाशिक विभागात अंकाई, टकाई, इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर या भागात त्याकाळी जैन धर्मास अनकुल वातावरण होते.त्या काळात जैन लेणी व मंदिरे याची निर्मिती या भागात मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येतात .त्रिंगलवाडी ,,त्र्यंबकेश्वर जैन लेणी ,मंदिरे याचेच पुरावे देतात. त्याच काळात ही लेणी कोरली असावी. लेण्यांच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलली गोष्ट अशी की पुरातन काळी जैन तीर्थकार धर्म प्रसारासाठी फिरत असत. त्यांचा दिनचर्या पाळायचा नियम कडक असावा. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धर्म प्रसारासाठी फिरणाऱ्या तीर्थकार यांना ध्यानधारणा सहज करता यावी यासाठी अशा लेणी कोरून घेत असात.
सातवाहन काळानंतर परदेशी व्यापाराशी होणाऱ्या व्यापाराला आलेले भरभराटी ही लेणी महत्वाची ठरली. प्राचीन काळी बोईसर , कळवा, तारापूर ,डहाणू, हे महत्वाचे बदरे होती. यातून उतरणारा माल वेग वेगळे मार्गे देशावर जात असात. त्यातील एक मार्ग तांदुळवाडी किल्ला, असावा किल्ले विक्रमगड, जव्हार, भोपतगड वाशाळा लेणी, भास्कर गड, त्र्यंबक गंड , अंजनेरी नाशिक बाजारपेठ कडे जातो.
लेखन – स्वप्निल भवारी
लेणीतील मौल्यवान शिल्पे नष्ट
भोकरदन - शहराजवळील
ऐतिहासिक लेणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पूर्ण लेणी कित्येक
वर्षांपासून दर पावसाळ्यात गळत असल्याने लेणीमधील सर्व मौल्यवान शिल्प नष्ट
झाली आहेत.
जोरदार पावसाने लेणीतील अनेक शिल्प पाण्याखाली आहे.
पुरातत्व खात्याने या ठिकाणी नवीन माहितीचे फलक लावले आहे त्यात सात
खोल्याऐवजी सहाखोल्यांचा उल्लेख करण्यात आल्याने पुरातत्व विभाग या लेणी
संदर्भात किती दक्ष आहे हे सिद्ध होते.
शहराजवळील ऐतिहासिक लेणी हे
स्मारक महाराष्टÑ प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष
अधिनियम, १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
गेल्या
काही वर्षांपासून या स्मारकाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या
लेणी मधील अप्रतिम व मौल्यवान शिल्पे सततच्या पावसाने व दुर्लक्षित झाले
आहे. किंबहुना पावसाच्या पाण्याने या लेणीमधील नवव्या शतकातील शिलालेखही
गायब झाला आहे. भोकरदनची ही लेणी केळणानदीच्या डाव्या तीरावर वसलेली आहे.
भोकरदन पूर्वी प्राचीन काळात भोगवर्धन म्हणून परिचित असले तरी भोगवर्धनचा
उल्लेख सुरवातीच्या काही प्राचीन ब्राम्ही शिलालेखांमध्ये आढळतो. त्यानुसार
येथील रहिवासी धार्मिक प्रवृत्तीचे, दानकर्ते व तत्त्वज्ञानी असल्याचे
सिद्ध होते. दुहेरी दालनाच्या या लेणी असून त्यामागे सात खोल्या आहेत.
लेणीमधील मंडपातील स्तंभ सपाट असून ते भक्कम होते, परंतु गेल्या काही
वर्षात या स्तंभावरील मौल्यवान शिल्पे नष्ट झाली आहेत. उजव्या व डाव्या
भिंतीवरील पूर्ण व जुन्या काळातील शिल्पकाम खराब झाल्याचे या ठिकाणी दिसत
आहे. दरम्यान लेणीमधील सर्व शिल्पकला ज्या पद्धतीने जोपासली व काळजीने
जपायला पाहिजे होती, त्या पद्धतीच्या उलट दुर्लक्ष झाल्याने ही लेणी होती
का नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेणीमधील सर्वच भिंतीवरील
शिल्प सततच्या पावसाने जीर्ण झाले असून ते खराब झाले आहे.
सध्या
लेणीमधील सात खोल्या पावसाने गळत असून त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले
आहे. लेणीसमोरील भागात मोठ्या प्रमाणावर पाणी असून शेवाळ तयार झाले आहे.
एकू णच या ऐतिहासिक लेणीचा विचार केला तर ही लेणी आता केवळ कागदावर लेणी
दिसत असून या संदर्भात पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष घालून हा ऐतिहासिक
ठेवा जपावा, अशी मागणी होत आहे
कागदी घोडे -
भोकरदनच्या लेणीमध्ये पाणी साचत असल्याचा अहवाल तेथील कर्मचा-याने दिला
आहे. लेणीमधील शिल्पाचे पाण्या पासून सरंक्षण करणे, लेणीच्या परिसरात
साचलेले पाणी काढणे आदी कामांसदर्भातचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी मुंबर्र
येथील पुरातत्व विभागाकडे पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर येथील कामे
करण्यात येतील.’’ - एस. ए. शेख, पुरातत्व विभाग, औरंगाबाद
भोकरदनची शान गेली
- भोकरदनची ऐतिहासिक लेणी म्हणजे जिल्ह्याची ख-या अर्थाने शान होती. काही
वर्षांपासून या लेणीकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केल्याने
पर्यटकांनीदेखील याकडे पाठ फिरवली आहे. जुन्या इतिहासात, पुरातत्व
खात्याकडे या लेणीची नोंंद असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा
प्रश्न या अनुषंगाने निर्माण झाला आहे. ही लेणी आता पूर्णत: नष्ट
झाल्यासारखी असल्याने भोकरदनचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर
आहे.’’ - रमेश बिरसोने, नागरिक, भोकरदन
हजारो वर्षांचा इतिहास सांगणा-या पाषाणांना पाय फुटल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा पिंपळाची मगरमिठी ही आईच्या पदराप्रमाणे वाटते. अंबिका मातेचे हे शिल्प अष्टाच्या पदराखाली सुरक्षित आहे असे वाटू लागते. नाही तर तेही बेपत्ता झाले असते.. हे वास्तव पेंडुर कट्टा येथील भग्नावस्थेत असलेल्या पाषाणांचे!
आपल्याला सहज काही मिळालं तर त्याची किंमत नसते. अगदी असंच काहीसं सिंधुदुर्गातल्या प्राचीन इतिहासाबाबत झाले आहे. या भूमीत पावलापावलावर इतिहासाचे साक्षीदार भेटतात. काही आजही आपले अस्तित्व राखून उभे आहेत. तर काही अस्तित्वहीन झाले आहेत.
काही जमिनीखाली अनवधानाने गाडले गेले.पेंडुर (मालवणच्या) डोंगरावर अशी अनेक शिल्प होती. अप्रतिम आणि अतिप्राचीन..या शिल्पाना अलीकडच्या काळात पाय फुटले आहेत.गेल्या काही वर्षात काही शिल्प आपोआप नाहीशी झाली.हजारो वर्षापूर्वीचा हा ठेवा झाडीझुडपात खितपत पडून आहे.
पेंडुर येथील या जैनाच्या डोंगरावर अतिप्राचीन सुमारे दीड हजार वर्षापूर्वीची संकीन-डंकीनची शिल्प पाहायला मिळतात. आंबिका मातेची आठवण येते. पिंपळ आणि अष्टाच्या अजस्त्रमुळांनी मगरमिठी घातल्यानंतरही अंबिका मातेचे शिल्प आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहे.तिच्या कडेवर असलेले बाळ..ऊन-पावसाने हैरान झाले आहे. हे सगळं पाहताना मन थराथरून जाते.
अंगावर काटा उभा राहतो.हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आणि भूगोलही डोळय़ांसमोर तरळू लागतो. शिल्पकाराची नेत्रदीपक कलाकृती आणि या भूमीचा धार्मिक इतिहास मग प्रज्वलीत होतो. नजर भिर-भिरते, येथील देखण्या शिल्पकृती हजारो वर्षाचा इतिहास सांगणा-या पाषानांना पाय फुटल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा अष्टाच्या झाडाची मगरमिठी ही आईच्या पदराप्रमाणे वाटते.
अंबिका मातेचे हे शिल्प या वृक्षाच्या पदराखाली सुरक्षित आहे असे वाटू लागते. नाही तर तेही बेपत्ता झाले असते.. हे वास्तव पेंडुर कट्टा येथील सातेरी मंदिरापासून जवळ असलेल्या डोंगरावरचे आणि तेथील भग्नावस्थेत असलेल्या पाषाणांचे!
आम्हाला आमच्या इतिसाबद्दल तेवढीशी ओढ नाही.त्याची जपणूक करावी याचेही भान नाही. या उदासीनतेमुळे अनेकांचे फावले आहे. इतिहासप्रेमी म्हणणा-या मंडळींनी येथील साक्षीदारांना सहजगत्या उचलून नेले.किल्ल्यावरच्या तोफा जशा नाहीशा झाल्या तशी देवराईत असलेली पाषाणे (विरगळ) हेही नाहीसे झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राचीन पाषाणांना मोठी किंमत आहे. हे मान्य असले तरी आम्ही आमच्याकडे असलेल्या खजिन्याबाबत तेवढेसे जागरूक नाही आहोत, याचेही भान ठेवायला हवे.
कोकणात अनेक सत्तांतरे झाली आणि आपणही बदलत गेलो. कधी काळी सिंधुदुर्गात म्हणजे बाराशे वर्षापूर्वी जैन धर्माला मानणा-या शिलाहार राजांची सत्ता कोकण प्रांतावर होती. त्यांच्या काळात जैन संस्कृती येथे रुजली आणि वाढलीसुद्धा.. मात्र सत्ता बदल झाला, धर्म बदल झाला आणि सिंधुदुर्गात मंदिरांची रचनाही बदलली. येथे जैनांची असलेली धार्मिक स्थळे कालौघात नष्ट झाली;परंतु त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही आढळतात. सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी जंगलात आड बाजूला डोंगरदऱ्यांमध्ये त्या काळातील सुरेख मूर्ती ऊन-पावसाचा मारा झेलत आजही उभ्या आहेत. हजार – दीड हजार वर्षापूर्वीचा हा अमूल्य ठेवा जंगलात खितपत पडला आहे.
पेंडुर(तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग)मधील संकीन आणि डंकीन या स्थळावरची शिल्प अशीच लक्ष वेधून घेतात. या मूर्तीचा मोठा खजिना आपण जपायला हवा. या शिल्पांना बोलके करायला हवे.हजार वर्षापूर्वीचा इतिहास आणि संस्कृतीचा भूतकाळ जागृत करायला हवा.
शिलाहार राजवटीत अपरांतात जैन धर्माचा प्रभाव होता. आठव्या शतकात राष्ट्रकुटांनी चालुक्याचे अधिपत्य झुगारून सत्ता स्थापन केली. राष्ट्रकुट नृपती गोविंद (तिसरा) या राजाने उत्तर कोकणाच्या राज्यकारभाराची जबाबदारी कपर्दिस (पहिला) याच्यावर सोपविली. ही शिलाहारांची पहिली शाखा. दक्षिण कोकणावर प्रभाव असलेल्या कृष्ण राजाने या भागावर शिलाहार वंशातीलच सणफुल्ला याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
येथून शिलाहारांच्या कोकणातील कारकिर्दीला प्रारंभ झाला. अकराव्या शतकापर्यंत शिलाहारांची दुसरी शाखा दक्षिण कोकणात म्हणजे गोवा ते रत्नागिरी या भागावर राज्य करीत होती. त्यांची पहिली राजधानी गोव्यातील. त्यावेळचे चंद्रपूर ऊर्फ गोपकपट्टण म्हणजे आताचे चांदोर येथे होते. त्यांनी नंतर ही राजधानी सिंधुदुर्गातील बलिपट्टण म्हणजे खारेपाटण येथे हलविली.
शिलाहार राजा श्वम्मीयराने खारेपाटणमध्ये किल्ला आणि बंदर उभारून ही राजधानी वसविली. या राज्याचा कार्यकाल ७८५ ते ८२० या दरम्यान होता. पुढे अकराव्या शतकापर्यंत त्यांचा ब-यापैकी प्रभाव राहिला. हे सर्व सांगायचे कारण एवढेच की, त्यांच्या राज्यादरम्यान सहयाद्रीच्या द-या-खो-यात जैन संस्कृतीचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसार वेगाने झाला.
याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. परंतु मुद्दा हा की, या प्रांतात असलेल्या जैन धर्माच्या खुणा आजही पाहायला मिळतात. बुद्धोत्तर आणि अशोकपूर्व कालखंडात जैन धर्म गोमांतकात आल्याचे मानले जाते. पुढे उपेक्षा, परकीयांची आक्रमणे आणि नैसर्गिक प्रकोपामुळे जैनधर्मियांच्या मूर्ती, श्रद्धास्थाने आणि वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या.
शिलाहार राजांचा प्रभाव संपल्यानंतर या धर्माचा प्रभावही ओसरत गेला.कारण याचे आचरण सोपे नाही. ब्रह्मचर्य, आहारामधील पावित्र्य ही कठीण बाब होती. याचा फटका जैन धर्माला बसला. परकीय शत्रूंच्या हल्ल्यात पळवापळवीच्या काळात धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू झाले.
यावेळी काही मूर्ती लपविल्या गेल्या आणि काही मूर्ती अज्ञात स्थळी टाकण्यात आल्या.
सिंधुदुर्गातील पेंडुर येथील जैन धर्मियांचे प्रार्थना स्थान आणि येथील भग्न पाषाणे हा गतकाळ जागृत करतात.या पेंडुरच्या जंगल परिसरात अशी अतिप्राचीन पाषाणे लोटून टाकण्यात आली आहेत.
जिल्हयाच्या धार्मिक क्षेत्रातही जैन धर्माचा प्राचीन प्रभाव आजही जाणवतो. मसुरे, माणगाव, काळसे या गावांमध्ये जैन संस्कृतीच्या खाणाखुणा, गावऱ्हाटीत मुद्दामहून केली जाणारी जैन स्थळाची आठवण, काही ठिकाणी असलेली जैन ब्राह्मणांची मंदिरे, कट्टा येथील जैनांची विहीर, कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील मारुतीच्या मंदिरातील जैनाचा धोंडा आदी खुणा पाहायला मिळतात.
जैन धर्माचे प्रथम र्तीथकर आदिनाथ यांच्या नावाने ओळखली जाणारी काही स्थळे आणि डोंगरही जिल्हयात आहेत. या मूर्तीना ऊन, वारा, पावसाच्या मा-याबरोबरच चोरटय़ांपासून धोका आहे. कोकणात प्राचीन मूर्ती चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जैन धर्माशी संबंधित अनेक मूर्ती आज ऊन-पावसात उभ्या आहेत. त्यांचे जतन होण्याची गरज आहे. हा ठेवा खूप प्राचीन असल्याने राज्यकर्त्यांनी त्यासाठी ठाम भूमिका घेऊन धोरण ठरविणे गरजेचे आहे.
जैनांचा धोंडा
कोकणात आणि सह्याद्रीला लागून असणा-या घाटमाथ्यावर असणा-या ग्रामदैवतांच्या अनेक देवळात असे जैनाचे धोंडे दिसून येतात. याचा अर्थ कोणे एके काळी या भागात जैन मंदिरांचे मोठया प्रमाणावर सामूहिक धर्मातर झाले असा होतो. जैन मंदिरांचे परिवर्तन हिंदू मंदिरांमध्ये झाले हे खरे. पण हे परिवर्तन केवळ देवळांचेच झाले नाही, तर माणसांचेही झाले.
या भागातील जो बहुजन समाज जैन धर्म पाळत असे तो आता ब्राह्मण धर्माकडे वळला. पण त्यांच्या इच्छेनुसार देवळांमध्ये आपल्या आधीच्या धर्माची आठवण म्हणून देवळांमध्ये जैनाचा दगड त्यांनी कायम ठेवला. अनेक ग्रामदेवतांच्या ठिकाणी जैन स्थळ हे जपण्यात आले आहे.येथील संस्कृती ही आदराची आहे.कुणाला अंतर देऊ नये अशी आहे.जैन संस्कृती नाकारली तरी ती याच पद्धतीन टिकवून ठेवण्यात आली आहे.
हजारो वर्षापूर्वीचा इतिहास खुणावतोय
मालवणमधील पेंडुर येथे काही हजार वर्षापूर्वीचे जैन धर्माचे प्रार्थनास्थळ ऊन-पावसात अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहे. येथे असलेली पाषाणे वृक्ष-वेलींच्या मिठीत, अर्धी-अधिक मातीत विसावली आहेत.
पेंडुर-देऊळवाडीकडून या स्थळांपर्यंत जाण्यासाठी कच्ची वाट आहे. सुमारे पाच हजार चौरस फूट जागेत वृक्षांनी वेढलेल्या स्थितीत हे प्रार्थनास्थळ आहे. सभामंडप, गाभा-याचे अवशेष स्पष्ट दिसतात. तेथे लहान-मोठी १४ शिल्पे दृष्टीस पडतात.
(आमच्या लहानपणी या डोंगर भागात पूर्वी २५ हून अधिक शिल्प आम्ही पाहिली आहेत, असे साठोत्तरी उलटलेले पेंडुरवासीय सांगतात). या स्थानावर सध्या पार्श्वनाथ, महावीर, अंबिका किंवा आम्रा, सर्वानुभुते, यक्ष, शासनदेवी, चमधरणीदेवी, गोमेधा, हत्तींची दोन शिल्पे, अशी नावे स्थानिक सांगतात. जैन संस्कृती अभ्यासकांच्या मते ही सारी पाषाणे तीर्थकार, यक्ष यक्षिणी यांची प्रतीके आहेत.
ग्रामस्थांच्या मते पूर्वी येथे विशिष्ट प्रकारच्या विटा, नक्षीदार खांब होते. ब्रिटिश अमलाच्या वेळी हे खांब सोबत नेले. या भागाला ‘डंकिनी-शांकिनी’ नावाने ओळखले जाते.
शिल्पांसोबत सभामंडपाचे अवशेष, विखुरलेले खांबांचे दगड, अडीच-तीन फूट भिंतीचे अवशेषही पाहायला मिळतात. हत्तींची दोन आकर्षक शिल्पेही आहेत. वाघावर बसलेल्या रक्षक देवतेची मूर्ती अर्धी-अधिक जमिनीत पुरलेल्या स्थितीत आहे. आभूषणांनी नटलेली मूर्ती लक्ष वेधून घेते. मुकुट, कर्णफुले, बाहू आणे, गळयात हार असलेली ही मूर्ती ध्यानस्थ स्थितीतील आहे. ती गोमेधा देवीची मूर्ती असल्याचे सांगतात.
पेंडुरमधील ज्येष्ठ ग्रामस्थ नाना राऊळ म्हणाले, या स्थळाची मध्यंतरी काही शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या मूर्तीची शिल्पकला अजिंठा-वेरूळमधील लेण्यांशी साधम्र्य दाखविणारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. जैन धर्माचे अभ्यासक डॉ. दीपक तुपकर म्हणाले, हा ठेवा खूप प्राचीन आहे. त्याचे जतन व अभ्यास होण्याची गरज आहे. यासाठी अलीकडच्या काळात या भागातील जैन बांधवांनी वर्षातून एकदा तरी या भागात भेट देण्याचे ठरविले आहे. गाववासीयांच्या अनुमतीने या स्थळाकडे सभामंडप उभारला जाणार आहे.
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान
या मूर्तीच्या समूहात कडेवर मूल घेतलेली अंबिका किंवा आम्रा देवीची मूर्ती सर्वच धर्मातील लोकांसाठी श्रद्धास्थान बनली आहे. देवीला नवस बोलण्याची प्रथा आहे. छोटी पाळणी, बांगडया आदी नवस म्हणून देण्याची प्रथा आहे. या मूर्तीसमोर नव्याने आयुष्य सुरू करणारे नवउभयता आशीर्वादासाठी दाखल होतात.
पेंडुरच्या पाषाणांकडे अख्खा गाव नतमस्तक होतो.संसार वेलीवर अपत्य जन्मले की, उभयता पाषाणांच्या दर्शनासाठी दाखल होतात. जैन संस्कृतीतील ही यक्षिणीची मूर्ती मात्र येथील जनता या पाषाणाला आंबिका माता म्हणतात.तिची आपल्यावर कृपादृष्टी आहे.आपला संसार सुरक्षित आणि संपन्न करण्यासाठी तिचे आशीर्वाद मोलाचे आहेत अशी गाववाल्यांची श्रद्धा आहे.
या श्रद्धेतूनच एक वर्षाआड या भूमीत उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे.येथे कुणी वाद्य वाजवित नाही.कोणत्याही प्रकारे येथे मांसाहार चालत नाही.हजारो वर्षापूर्वीची जैन संस्कृती देवतांच्या रूपाने का होईना जपली जात आहे.या गावात एकही जैन बांधव वास्तव्यास नाही.जैन बांधव नसतानाही जैन संस्कृतीतील पाषाणांची पूजा करणे, येथील काही परंपरा जपणे म्हणजे कोकणचे कोकणपण समजून घेण्यासारखे आहे.
या स्थळाचे धार्मिक अधिष्ठान होणार जागृत
या गावात कुणीही जैन बांधव नसला तरी जिल्ह्यात असणा-या जैन बांधवांनी एकत्र येत. जंगलात अस्ताव्यस्त पडलेल्या या पाषाणांना एकत्रकरावेत का असे प्रयत्न सुरू केले.मात्रगाववासीयांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.यापुढे गावातील पाषाणे गावातच राहतील ती बाहेर कुणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये असे निश्चित केले.यामुळे जैन बांधवांनी येथील मूर्ती अन्यत्रहलविण्याबाबतचा निर्णय बाजूला ठेवत आता याच स्थळावर ही पाषाणे संरक्षित करताना ऊन-वारा-पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जैन बांधवांची गाववासीयांशी चर्चा सुरू आहे.
यक्षिणीची मूर्ती सुमारे साडेतीन ते चार फुटे उंचीची, तर तीर्थकारांची मूर्ती त्या तुलनेत छोटी आहे.येथील अनेक पाषाणे गायब झाली आहेत यात अप्रतिम शिल्पाचीही नोंद असावी असे वाटते.या ठिकाणी जैनांच्या अनेक समाध्या आहेत. त्यांच्या धर्म गुरूंची समाधी अगदी रस्त्यालगत आहे. त्याला स्वामीची समाधी म्हणतात.
या इतिहासाची साक्षीदार असलेला हजारो वर्षापूर्वीचा हा खजिना आजच्या पिढीला बघायला मिळतो हे भाग्यच..कोकणातील या दुर्मीळ ठेव्याचा भुतकाळ जागृत करायला हवा कारण हजारो र्वषऊन-पाऊस झेलत असणा-या या पाषाणाना वाचा कधी फुटेल याची इतिहासप्रेमी वाटत पाहत आहेत.






















































































No comments:
Post a Comment