वीरगळ
जुन्नर तालुक्यातील हातवीज या गावात ही वीरगळ आपणास पहावयास मिळते. जेव्हा आपण कांचन धबधबा पहायला हातवीज गावात पोहचता त्याच वाटेवर चहाच्या टपरीच्या पाठीमागे व महादेव मंदिरासमोर माकडलिंबुच्या झाडाजवळ ही वीरगळ आपणास पहावयास मिळते. या विरगळीत चार पाळीव प्राणी व गुराखी व्यक्तीस हिंस्त्र प्राण्याच्या तावडीतून वाचवताना एका वीराने आपला जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीला जीवदान देण्याचा प्रयत्न केला व हा वीर तेथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात वीरगतीला प्राप्त झाला अशी माहिती सांगणारा हे कोरीव शिल्प म्हणजे येथील ही वीरगळ आहे. या वीराचा इतिहास जगासमोर नेहमीच रहायला हवा म्हणून पुर्वजांनी हे शिल्पकोरुन जगाला संदेश दिला आहे. सध्या गावात याबाबत एक भाकडकथा पण ऐकायला मिळते. कदाचित ग्रामस्थांनी या वीराची वीरगाथा येणाऱ्या पिंढ्यांच्या माध्यमातून चिरंतकाळ जीवंत ठेवायची असेल तर हे शिल्प संवर्धित करायला हवे कारण हे शिल्प गावाच्या वीराचा इतिहास सांगणारे आहे.
✍️ छायाचित्र:- रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो.नं. ८३९०००८३७०






हे पूर्वीच्या काळात याचा वापर व्यायम करण्यासाठी होत होता, यांनी हाताची मनगट मजबूत होत असे .जेणे करून हातात, तलवार,झांजपट्टा,भाला.यांची पकड मजबूत होत असे ,आणि यांचे आकार वेगवेगळ्या आकार पहिला मिळतात , व तसेच मशे पकडण्यासाठी छोट्या नावा असयाच्या .त्यांना एका जागेवर स्थिर ठेवण्यासाठी पण होयचा .याला मधे दोर बांधून पाण्यात सोडत असे
किल्ले शिवनेरीच्या उत्तर पायथ्याला आढळून आले पटखेळ.
मानवीय उत्क्रांतीच्या अनेक पाऊलखुणा जुन्नर तालुक्यातील अनेक गावा गावांतील परिसरात आढळून येत आहेत. काल भटकंती दरम्यान जुन्नर शहराच्या पश्चिमेस हरणटेकडी लगत असलेल्या कातळात हा पटखेळ कोरलेला पहायला मिळाला. अतिशय सुंदर असे कोरीवकाम येथे केलेले असुन बसण्यासाठी सपाट जागा कातळात कोरलेली असून पुढे कातळ टेबलावर हा पटखेळ सुंदर पद्धतीने कोरलेला पहायला मिळतो. हजारो ग्रामस्थ या ठिकाणी भटकंतीला सकाळ संध्याकाळी जात असतात त्यांना या
मानवीय उत्क्रांतीच्या पाऊलखुणांचे आता सहज दर्शन घेता येईल.

रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०



जुन्नर तालुक्यातील जगापुढे न आलेला पिंपळगाव तर्फे नारायणगाव वाणी मळा येथील ऐतिहासिक वारसा व मानवीय उत्क्रांतीच्या पाऊलखुणा असलेला पटखेळ.
( इतिहासाच्या पाऊलखुणा)
किल्ले चावंड व इतर किल्ल्यावर असे खड्डे अशा पहावयास मिळतात कि जेथे जागा ओबडधोबड स्वरूपाची दिसून येते. मग हे खड्डे घेण्याचे कारण काय? जेव्हा मी या जागी पोहचलो तेथे खुप काही मला निरीक्षणातुन येथील विविधता व पटखेळ पहावयास मिळाले. खरेतर मला या खड्ड्यांचे पहिले उत्तर मिळाले की हे खड्डे तेथील असलेल्या
खडकाचा दर्जा पाहण्यासाठी घेण्यात येत असावेत. कारण मी जेथे आज खड्डे पाहीले ते कच्चा खडक असल्याचे दिसून आले. येथेच पुन्हा छोटे पण खड्डे घेण्यात आले होते. व याच खड्यांपासुन साधारणपणे ६० ते ७० फुट अंतरावर एक वास्तु कोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. साधारणतः ही वास्तु ४०×६० फुट लांबिची असुन या वास्तुची विविधता नक्कीच अभ्यासकरण्यायोग्य आहे. ही वास्तू निर्माण करताना कारागिराने आयताकृती खडक फोडण्याची पध्दत या ठिकाणी कशी असावी येथे स्पष्ट संकेत दिले आहेत. याचा अर्थ अग्निजन्य खडक कशा पद्धतीने फोडला जायचा याचे उत्तम उदाहरण म्हणून नक्कीच ही ऐतिहासिक वास्तू नावारूपाला येऊ शकते. ही वास्तू अवाढव्य असुन मातीत गाडली गेली आहे. तीचे खरे स्वरूप काय असावे हे तिच्यातील संपूर्ण माती काढल्यावरच अभ्यासक निश्चितच सांगू शकतील व तेव्हा येथील असलेल्या पिंपळगाव तर्फे नारायणगाव ला ऐतिहासिक वारसा प्राप्त होईल. जवळपास १० ते १५ कि.मी अंतरावर या ठिकाणापासून जवळपास असा कुठलाही कोरीव ऐतिहासिक वारसा नसल्यामुळे सध्यातरी हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे.

छायाचित्र :- श्री.रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो.नं ८३९०००८३७०
पुणे जिल्ह्याचे 'काश्मीर' अर्थात शिवजन्मभुमी जुन्नर तालुका.
विविध अविस्मरणीय पिकनिक पॉईंट.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जुन्नर तालुका म्हणजे पुणे जिल्ह्याचे 'काश्मीरच'... अनोखं निसर्गसौंदर्य, यात्रोत्सव, शिवनेरी महोत्सव, फुलोत्सव, द्राक्षमहोत्सव, पतंग महोत्सव आणि विविध ऐतिहासिक, नैसर्गिक, भौगोलिक व सांस्कृतिक गोष्टींनी समृद्ध असलेला हा तालुका म्हणजे सर्व ऋतुंमध्ये पिकनिकसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे...
हिरव्यागार वनराईच्या कुशीतून शेकडो फूट उंचावरुन फेसाळत वाहणा-या
पांढ-याशुभ्र धबधब्यांची मालिका, तेवढ्याच उंचीवर नभाकडे झेपावणारे उफराटे धबधबे,अंगाला थंडगार झोंबणारा वारा, कधी रिमझिम तर कधी तुफान कोसळणारा पाऊस आणि वारा लगेचच शुभ्र धुक्यांनी लपेटून घेतलेले रस्ते, या रस्त्यांच्या खाली उतरले तर पायाखाली अवतरतात हिरवेगार गालिचे. हे निसर्गसौंदर्य पाहत पुढे चालत असतानाच किल्ले शिवनेरी, किल्ले जीवधन, किल्ले चावंड, किल्ले निमगीरी, किल्ले हडसर, किल्ले सिंदोळा, किल्ले नारायणगड ही पवर्तराजी आपल्यातील साहसाला आणि शक्तीला आव्हान देतच आपल्या पुढय़ात उभी ठाकत़े. अशा या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल तर जुन्नर ला जायलाच हवे...ज्ञ

महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी म्हणजे एक आगळीवेगळी ओळख जुन्नर तालुक्याला आहे, सर्वाधिक पावसाचे ठिकाण नाणेघाट-घाटघर, आंबोली - दा-याघाट, दुर्गवाडी - दुर्गादेवी जुन्नर तालुक्यातच. येथील निसर्गसौंदर्य बहरते ते पावसाळ्यात पाहण्यासाठी निसर्गपर्यटकांची पावले जुन्नरची वाट धरतात...

अनेकजण फक्त नाणेघाट, आंबोली धबधबे, किल्ले शिवनेरी, लेण्याद्री,ओझर हे स्पॉट पाहून माघारी फिरतात. ढाकोबा , हटकेश्वर, उधळ्या डोंगर, शिनलोप खिंड अशी अनेक ठिकाणेही आपल्यातील साहसाला आव्हान देत उभी ठाकलेली आहेत...

महाराष्ट्रात तसे अनेक धरणे आहेत. परंतू ब्रिटिशकालीन घाटघर फडके बंधारा म्हणजे एक मानवनिर्मित अविष्कार. येडगाव धरण, वडज धरण ,चिल्हेवाडी धरण, पिंपळगाव जोगा धरण, माणिकडोह धरण व जुन्नर तालुक्यातील संगमावर पहिले बांधण्यात आलेले नेतवड धरण अशा या परिसराच्या चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आह़े. माणिकडोह धरणाच्या उजवीकडून व डाविकडुन राजूर-हडसर मार्गे पुन्हा घाटघर चावंड अशी परिक्रमा केल्यास फेसाळणारे धबधबे मनाला लुब्ध करतात.

जुन्नर पासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेले अष्टविनायक लेण्याद्री गणपती मंदिर व तेथुन जवळच असलेले ओझरचा विघ्नहर्ता तर भाविकांची पंढरीच जणू.

जुन्नर पासून जवळच असलेली हेमाडपंथी बांधणीतील श्री. क्षेत्र कुकडेश्वर, श्री क्षेत्र नागेश्वर व श्री क्षेत्र ब्रम्हनाथ ही प्राचीन मंदिरे तर अभ्यासकांची पर्वणीच. श्री क्षेत्र ब्रम्हनाथ पारूंडेचे मंदिर म्हणजे १२ वर्षांनी भरणारा तपस्वी साधूसंतांचा कुंभमेळाच.

जुन्नर तालुक्यातील सर्वात उंच शिखर हे गोद्रे गावचे हटकेश्वर आणि भिवाडे गावचा ढाकोबा. याच रांगेतच
हातवीजची दुर्गादेवी कोकणकडा, आंबोलीचा दा-याघाट, घाटघरचा नाणेघाट, अंजनावळ्याचा व-हाडी डोंगर व तळेरानची शिनलोप खिंड साहसी पर्यटकांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात.

आंबोली पासून २ किलोमीटरवर असलेले धबधबे. तर खिरेश्र्वराजवळील काळु धबधबा यांचे उंचावरुन खाली कोसळणारे पाणी डोळ्याचे पारणो फेडणारे ठरते.

आंबोली, नाणेघाट व काळु धबधब्यांबरोबरच इतर असंख्य धबधबे जुन्नर तालुक्यात पहायला मिळतात.

साहसी पर्यटकांना आव्हान देत किल्ले जीवधनच्या दक्षिणेस उभी असलेली ३५० फुट वानरलिंगि अगदी दिमाखात उभी आहे. सुमारे २२०० शे वर्षापूर्वीचा नाणेघाट, हेमाडपंथी मंदिर, ३५० गुहा आणि अनेक औषधी व दुर्मीळ वनस्पतींनी बहरलेली वनराई हे जुन्नर तालुक्याचे वैशिष्टय़ सांगता येईल़.

जूनमध्ये धो-धो कोसळणारा पाऊस आणि फेसाळणारे प्रचंड धबधबे, याच वातावरणात हिरवागार झालेल्या दुर्गादेवी, भैरवनाथ व काळुबाई देवराया भेटीसाठी आकर्षित करतात.

श्रावणात आकर्षण ठरणारे जुन्नर शहरातील पंचलिंग मंदिर, ओतूर येथील कपर्दिकेश्वर मंदिर, कुकडेश्वर मंदिर, ब्रम्हनाथ पारूंडेचे मंदिर, खिरेश्वराचे नागेश्वर मंदिर साधूसंतांच्या भेटी गजबजून जाते.

गिर्यारोहणासाठी- सात किल्ले, कोकणकड्यातील अनेक घाटवाटा खास आकर्षण बिंदू ठरतात.

साधुसंताची भूमी म्हणजे ओतुरचे चैतन्य संजीवन समाधी मंदिर, आळ्याची संतज्ञानेश्वर वेदप्रणित रेडा समाधी, आणे गावातील रंगदास स्वामी समाधी दर्शन घडते.

अष्टविनायक दर्शनातील दोन आष्टविनायके म्हणजे ओझरचा विघ्नहर्ता व लेण्याद्रीचा गिरिजात्मज येथे विराजमान झाले आहेत.

वडज, धामणखेल व नळावणे येथील खंडोबाची मंदिरे ही येथील प्राचीन काळापासून रानावनात गुरे चारणा-या इतिहासातील साक्ष म्हणुन व गुराख्याची रक्षण देवता म्हणून प्रसिद्ध आहे.

माता जिजाऊ जिर्णोध्दार मारूती मंदिर हे आजही निरगुडे येथे उभे आहे.

पिंपळवंडीचे पिंपळेश्वराचे मंदिर आजही पिंपळेश्वर ऋषींची आठवण करून देते.

पराशर ऋषींची भुमी म्हणुन जुन्नर तालुक्याला खुप मोठी ख्याती आहे.

खिरेश्र्वराजवळील अद्भुत नेढे, घाटघरचे पडिलिंग नेढे, हटकेश्वर चा नैसर्गिक पुल तर आणेघाटातील मळगंगेचा नैसर्गिक पुल भौगोलिक अविष्काराचे उत्तम उदाहरण अनुभवातून पहाता येते.

हापूसबाग येथे गोल घुमट.

हिवरे बु येथील गिब्सन औषधी गार्डन व समाधी

बारव येथील मलिकांबर जलपुरवठा योजना

खोडद गावातील उभारलेली विज्ञान पंढरी म्हणजेच खगोलीय रेडीओ दुर्बीण अर्थातच जी.एम.आर.टी प्रोजेक्ट.

नारायणगाव येथील भारतातील तमाशा पंढरी केंद्र

जुन्नर तालुक्याला अगदीच दहा लाख वर्ष भुतकाळात घेऊन जाते ते येथील टेफ्रा या भुकंपातील सापडणा-या राखेमुळे ते गाव म्हणजेच बोरी.

किल्ले शिवनेरी हे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि येथेच पायथ्याशी अवतरत असलेली शिवसृष्टी..

पाच जनन्या मांडवी,पुष्पावती, कुकडी, काळू व मीना या सरितांनी जनू येथील लेकरांच्या संगोपणाचाच विडा घेतलेला दिसतोय म्हणुनच तर पाच धरणे ही अनेक तालुक्यांची तृष्णा भागवताना दिसतात.

जुन्नर तालुका परिसर असंख्य आणि विविध रंगीबेरंगी फुलांनी पुष्पोत्सव ऑक्टोबरमध्ये बहरतो. हिमालयातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'ची अनुभूती देणारा हा फुलोत्सव पावसाळा संपत आल्यानंतर सुरु होतो़ दर सात वर्षानी फुलणारी 'कारवी' हेही इथले खास आकर्षण. निळ्या रंगाची कारवी फुलते तेव्हा जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या सात रांगा निळी शाल पांघरल्याचे अविस्मरणीय निसर्ग सौंदर्य दिसते. आणि विशेष म्हणजे येथील असंख्य फुलांनी फुलना-या पठारांना "खास" पठार म्हणुन संबोधण्यात येत आहे.
जुन्नर तालुक्यातील विविधचे गेली पाच वर्षे सतत निरीक्षण करून तो मी माजी सैनिक खोडद श्री. रमेश गणपत खरमाळे आपणापुढे "निसर्गरम्य जुन्नर तालुका" या फेसबुक पेजच्या माध्यमातून माहीती व छायाचित्रांसह मांडण्याचा प्रयत्न करत आलो आहे. आपणही मला प्रचंड असा भरभरून प्रतिसाद देत आला आहात त्याबद्दल मी निश्चितच आपला ऋणी आहे. एक विनंती निश्चित करतो की जगाच्या कोणत्याही काणाकोप-यात आपण एक पर्यटक म्हणून जात असाल तर ज्याच्या पासून आपणास आनंद मिळतो अशा या निसर्गरम्य ठिकाणांची आपण जोपासना करणे आपले निश्चितच कर्तव्य आहे व ते आपणाकडून पाळले जाईल ही सदिच्छा व्यक्त करतो.
जुन्नर तालुक्यात आपण जेंव्हा याल त्यासाठी आपणास खालील सेवा ठिक ठिकाणी उपलब्ध आहेत

*शनिवास व्यवस्था...


लेण्याद्री देवस्थान निवासस्थान.

ओझर देवस्थान निवासस्थान

जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी उभारलेली कृषीपर्यटन केंद्रे

याशिवाय खासगी रिसोर्टमध्येही निवासाची व्यवस्था होऊ शकते. पर्यटकांना टेंटमध्ये रहायचे असल्यास टेंटही उपलब्ध करुन दिले जातात.
लेखक/छायाचित्र :- रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो.नं. 8390008370
जुन्नर तालुक्यातील जगापुढे न आलेला पिंपळगाव तर्फे नारायणगाव वाणी मळा येथील ऐतिहासिक वारसा व मानवीय उत्क्रांतीच्या पाऊलखुणा असलेला पटखेळ.
( इतिहासाच्या पाऊलखुणा)
किल्ले चावंड व इतर किल्ल्यावर असे खड्डे अशा पहावयास मिळतात कि जेथे जागा ओबडधोबड स्वरूपाची दिसून येते. मग हे खड्डे घेण्याचे कारण काय? जेव्हा मी या जागी पोहचलो तेथे खुप काही मला निरीक्षणातुन येथील विविधता व पटखेळ पहावयास मिळाले. खरेतर मला या खड्ड्यांचे पहिले उत्तर मिळाले की हे खड्डे तेथील असलेल्या
खडकाचा दर्जा पाहण्यासाठी घेण्यात येत असावेत. कारण मी जेथे आज खड्डे पाहीले ते कच्चा खडक असल्याचे दिसून आले. येथेच पुन्हा छोटे पण खड्डे घेण्यात आले होते. व याच खड्यांपासुन साधारणपणे ६० ते ७० फुट अंतरावर एक वास्तु कोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. साधारणतः ही वास्तु ४०×६० फुट लांबिची असुन या वास्तुची विविधता नक्कीच अभ्यासकरण्यायोग्य आहे. ही वास्तू निर्माण करताना कारागिराने आयताकृती खडक फोडण्याची पध्दत या ठिकाणी कशी असावी येथे स्पष्ट संकेत दिले आहेत. याचा अर्थ अग्निजन्य खडक कशा पद्धतीने फोडला जायचा याचे उत्तम उदाहरण म्हणून नक्कीच ही ऐतिहासिक वास्तू नावारूपाला येऊ शकते. ही वास्तू अवाढव्य असुन मातीत गाडली गेली आहे. तीचे खरे स्वरूप काय असावे हे तिच्यातील संपूर्ण माती काढल्यावरच अभ्यासक निश्चितच सांगू शकतील व तेव्हा येथील असलेल्या पिंपळगाव तर्फे नारायणगाव ला ऐतिहासिक वारसा प्राप्त होईल. जवळपास १० ते १५ कि.मी अंतरावर या ठिकाणापासून जवळपास असा कुठलाही कोरीव ऐतिहासिक वारसा नसल्यामुळे सध्यातरी हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे.

छायाचित्र :- श्री.रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो.नं ८३९०००८३७०
डिंभे धरणातील नामशेष झालेल्या आंबेगावच्या ऐतिहासिक पाऊलखुणा दर्शविणारे जैन मंदिर.
पुणे शहरापासून भोसरी- चाकण- खेड- मंचर - घोडेगाव - डिंभे असा १०० कि.मी प्रवास
करत आपणास आंबेगावात पोहचता येते.आंबेगाव तालुक्यातील पश्र्चिम भागात "आंबेगाव" हे २० वर्षांपूर्वी सर्व संपन्न गाव होतं. उत्तम बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या गावात तालुक्यातील अनेक गावची मंडळी उपजिविकेसाठी धाव घेत. कारण आंबेगाव म्हणजे हेच तालुक्याचे एकमेव उत्तम ठिकाण होते. जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी हे गाव आजुनच वैभवसंपन्न दिसत होते. त्यात भर घातली होती ती गाव किना-यावरून खळखळ वाहणा-या घोड सरीता मातेने. अगदी पाहणाऱ्यांची दृष्ट लागावी असे हे गाव प्रत्येकाच्या नजरेत भरलेले असायचे. जे नको होतं तेच झाले व आंबेगावाला १९७८ साली नजर लागली व तालुक्याचे नाव असलेले आंबेगाव व इतर अनेक गावे येथे होणा-या धरणामुळे स्थलांतर होऊ लागली. खेळणारे चिमुकले हात, गावांतील गजबजलेल्या गल्ल्या, शाळेतील मुलांची घोकंपट्टी सर्व काही शांत होत गेले. जुनी घरे, वाडे, मंदिरे जमिनदोस्त झाली. भरभराटीला आलेले व्यवसायांची क्षणात होळी झाली. आता २००० साल उजाडले होते. धरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे दरवाजे बंद झाले होते. पावसांच्या धारा सुरू झाल्या होत्या. मेघराजाने आरोळी ठोकली होती आंबेगाव वाशीयों तुम्हाला हे गाव आता पुन्हा कधी पहायला मिळणार नाही. हां जेव्हा माझे आगमण थांबले तेव्हा तेव्हा मात्र तुमच्या डोळ्यांत मात्र पाणि असेल ते येथील ओसाड पडलेले विटांचे ढिग पाहूनच. हां पण तुम्ही माझ्यासाठी जी जैन मंदिरांच्या स्वरूपात भेट म्हणून ट्रॉफि दिली तीचा सांभाळ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल की ज्या माध्यमातून तूमचा भूतकाळ जीवंत राहील.
आज आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातील पाणीसाठा खूप कमी झाला असून पाण्याखाली गेलेले जुने आंबेगाव गावठाण व येथील जलसमाधिस्त झालेले प्रसिध्द जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडले आहे. तब्बल वीस वर्ष पाण्याखाली राहूनही हे जैन मंदिर अजूनही सुस्थितीत असून मंदिरात आत-बाहेरून असलेली कलाकुसर, कोरीव काम व नक्षीकाम आजूनही जसेच्या तसे असलेले पाहायला मिळते. पाण्याखाली गेलेल्या आंबेगाव गावठाणातील घर व वाडे यांचे ढिगारे, पुर्वजांची थडगी, तेलाचे घाणे, मंदिर व जैन मंदिर पाहता त्याकाळचे महत्वाचे व्यापारी ठिकाण असलेले आंबेगाव किती समृद्ध आसेल याचा आजही तत्काळ अंदाज येतो.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील कर्माळा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली आणण्यात व या भागातील अनेक गावांच्या पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या जल-अधिग्रहण क्षेत्रात तालुक्यातील अनेक गावे जलसमाधिस्त झाली. त्यात तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले व उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले आंबेगाव हि जलसमाधिस्त झाले.
जलसमाधिस्त झालेल्या आंबेगाव या महत्वाच्या गावातून पूर्वी आंबेगाव तालुक्याच्या पूर्ण कारभार चालत असे. येथील बाजारपेठ मोठी होती व संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिध्द होती. आजूनही जुने लोक या गावाविषयी व येथील बाजाराविषयी भरभरून आठवणी सांगतात. मात्र डिंभे धरणात पाणी साठविण्यास सुरवात झाल्यानंतर हे गाव विस्तापित करावे लागले.
या वर्षी डिंभे धरणातील पाणीसाठा खूप कमी झाला आहे. सतत कमी होत असलेल्या पाण्यामुळे धरणात गेलेल्या गावांचे आवशेष उघडे पडले आहेत. डिंभे धरणाच्या उत्तरेकडून आहुप्याकडे जाताना दूरवरूनच जुन्या आंबेगाव मधील जलसमाधिस्त झालेले अवशेष, सध्या उघडे पडलेले जैन मंदिर नजरेस पडते. आपण जसजसे मंदिराच्या जवळ जातो तसतसे आपल्याला जुन्या आंबेगावचे आवशेष ठळकपणे पाहायला मिळतात. सध्या पाणी पूर्ण कमी झाले असल्याने जैन मंदिरापर्यंत व मंदिरामधेही जाता येत आहे.
दगड विटात असलेल्या या जैन मंदिरात जैन धर्मातील श्री कल्याण पार्श्वनाथ, श्री विमलनाथ, श्री वासुपुज्य स्वामी यांनी जवळपास १०० वर्षांपूर्वी मंदिरासाठी ५१, ३१, ११ रू. जिर्णोद्धाराकरीता दिलेल्या देणग्यांचा उल्लेख मंदिराच्या पुर्व भिंतीत संगमरवरी दगडावर कोरलेल्या शिलालेखात आढळून येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प डोळ्यांचे पारणे फेडते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंच माथ्यावरील माता सरस्वतीची मूर्ती पाहताच या परीसरात माता सरस्वती अवतरल्याचा भास होतो. खांबावरील कोरीव नक्षी, छताचे गोलाकार सुरेख वर्तुळे, विविध कोरीवकाम व नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.गाभा-याच्या प्रवेशद्वारावर माता सरस्वती सोबत दोन मोरांना घेऊन विराजमान झाल्या असून जनू त्या सांगत आहे की भक्तांनो पक्षी प्राण्यांवर प्रेम करा असेच सांगत असल्याचा भास होतो. मंदिर वीस वर्षे पाण्याखाली राहूनही हि कलाकुसर आजूनही सुस्थितीत आहे. मंदिराच्या शेजारीच छोट्या परीघाची मात्र विटांमध्ये बांधकाम केलेली विहीर (बावडी/आड) पाहायला मिळते. मंदिरापासून पूर्वेकडे थोड्याच अंतरावर गाव पाणीपुरवठ्याची विटांमध्ये जुन्या शैलीत व नक्षीत सुंदर बांधकाम असलेली विहीर पाहयला मिळते. मंदिराच्या आजूबाजूला पडलेल्या घरांचे आवशेष, पडलेल्या मंदिरांचे आवशेष पाहयला मिळतात. मंदिराच्या जवळच गावाची चावडी असावी. येथे मोठ्या संखेने पाहायला मिळत असलेल्या दगडी तेलाच्या घाण्यांवरून येथील बाजारपेठेच्या विशालतेचा आजही अंदाज येतो. जैन मंदिराच्या समोरील एका पडलेल्या हिंदू मंदिरांच्या आवशेषांमध्ये ग्रामदेवता गज लक्ष्मीच्या दोन मूर्ती पडलेल्या पाहावयास मिळतात.पैकी दक्षिणेकडील मुर्ती १४-१५ व्या शतकातील मुर्ती अभ्यासक लेखक आशुतोष बापट असल्याचे सांगितले. हुबेहूब अशा मुर्ती आपणास शेजारीच असलेल्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट,निरगुडे,घंगाळदरे, शिरोली आणि किल्ले निमगिरी वर पहावयास मिळतात. उत्तरेकडील जमीनीवर पडलेली मूर्ती अलिकडच्या १७-१८ शतकातील कोरलेली असावी असे वाटते. इतरत्र जवळपास ८ दगडी कोरीव तेलाचे घाणे पडलेले असून येथे मोठ्या प्रमाणावर तेलाचा व्यापार चालत असावा असे वाटते. जैन मंदिराच्या उत्तरेकडे महादेवाचे अर्धे पडझड झालेले विटांतील मंदिर शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते. याच मंदिराच्या पुर्वेकडून गावाला विजपुरवठा करण्यात आलेले तीन लोखंडी पोल आजही हे पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील नामशेष झालेल्या गावाचा पुनर्जन्म होईल व मी पुन्हा या गावाला रोषणाईने उजाळुन काढेल या आशेवर उभे आहेत.
येथून स्थलांतरित झालेले ग्रामस्थ जेव्हा या धरणालगत रस्त्याने आहुपेकडे प्रवास करतात तेव्हा, दूरवरून दिसणारे व पाण्याच्या घटलेल्या पातळीमुळे उघडे पडलेले हे जैन मंदिर पाहून ग्रामस्थांच्या जुडलेल्या भुतकाळातील आठवणी जाग्या होतात. व या आठवणी अश्रु रूपाने वाहू लागतात त्या पुन्हा हे धरण भरण्यासाठी व आठवणिंना दफण करण्यासाठीच जणू. आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी येथील पडलेल्या मुर्तींना बाहेर काढून संवर्धन करणे आवश्यक आहे.
धन्यवाद सचिन भाऊ तोडकर व पत्नी स्वाती आपली लेख पूर्ण करण्यासाठी खुप मदत झाली.
मित्रांनो मंदिर सध्या पाहण्याची संधी नक्कीच गमावू नका.
हे वैभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील आमचा चायनलवर पाहु शकता. YouTube channel "Nisargramya Junnar Taluka" subscribe करायला विसरु नका.
शब्दांकन/ छायाचित्र शिवनेरी भुषण रमेश खरमाळे
माजी सैनिक खोडद
८३९०००८३७०
किल्ले संवर्धन संस्था - शिवाजी ट्रेल

गावातील एखादा योद्धा किंवा वीर राज्याच्या किंवा समाजाच्यासाठी शत्रूशी युद्ध करताना मृत्यूस प्राप्त झाला असेल तर गावकर्यां मार्फत त्या विराचा मोठा त्याग समजुन त्याच्या पराक्रमाचे स्मृती शिल्प उभारले जातात यालाच वीरगळ असे म्हणतात..
एकाच शिळेवर चारही बाजुंनी शिल्पांकन केलेल्या विरगळीना स्तंभ वीरगळ किंवा चतुर्भुज वीरगळ म्हणतात. एकाच गावातील चार वीर युद्धात धारातीर्थी पडलेले असल्यास किंवा एकाच विराने चार युद्धात शौर्य गाजवलेले असल्यास असे
चतुर्भुज वीरगळ उभारले जात असत.
कुकडेश्वर मंदिर परिसरात सापडलेली ही वीरगळ. अतिशय दुर्मिळ प्रकारातील असून. एकाच चतुर्भुज विरागळीवर इष्टदेवता म्हणून शिवलिंग, गणपती आणि श्री विष्णू यांच शिल्पांकन असलेल्या अश्या प्रकारच्या वीरगळी क्वचितच आढळून येतात.
४५ इंच उंच आणि १५ इंच रुंदीची विरगळ चारही बाजुंनी प्रत्येकी 3 भागात विभागलेली आहे, १. वीरमरण २. युद्ध प्रसंग ३. इष्टदेवता पूजन अश्याप्रकारचे शिल्पांकन या तिन भागावर कोरलेले आहेत. खालच्या सर्वात शेवटच्या भागात विरगतीस प्राप्त झालेला वीर आडवा दाखवलेला असून त्यावर अप्सरा सदृश्य व्यक्ती हातात हार घेतलेल्या अवस्थेत दाखवलेल्या आहेत. त्या वरील भागात युद्धाचा प्रसंग कोरलेला असून. मुख्य योद्धा समोरील शत्रूंसोबत लढत असण्याचा प्रसंग कोरलेला आहे. युद्ध पायदळ प्रकारातील असून वीर हातात तलवार घेऊन लढत आहे. शत्रू चे दोन सैनिकी हातात ढाल तलवार घेऊन वीरा सोबत युद्ध करताना आपल्याला यात बघायला मिळते.
सर्वात वरच्या भागात विर आपल्या इष्टदेवतेचे पूजन करताना दाखवलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या बाजूंच्या चौकटीत वीर शिवलिंगाची उपासना करताना दाखवलेले आहेत. या वरून हे दोन वीर शिवाचे उपासक असावेत असे अनुमान काढता येते. शिवलिंगासमोर नमस्कार मुद्रेत बसलेला वीर, त्याशेजारी नंदी, आणि समोरील बाजूस पुजारी पूजा करत असल्याचे पाहायला मिळते.
दुसऱ्या बाजूला इष्टदेवता म्हणून श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. वीर मूर्तीच्या पायाजवळ बसून आपली इष्टदेवता गणेशाला वंदन करत आहे. यावरून हा वीर श्री गणेशाचा उपासक असावा.
तिसऱ्या बाजूच्या चौकटीत श्री विष्णू ची समपद मूर्ती असून वीर मूर्तीच्या पायाजवळ नमस्कार मुद्रेत बसून आपली इष्टदेवता श्री विष्णू ला वंदन करत आहे.
अश्या प्रकारची दुर्मिळ वीरगळ अभ्यासक आणि पर्यटकांच्या नजरेतुन सुटून अशी धूळखात पडणे खरंच शोकांतिका होती. वीरगळ संवर्धनाच्या या कार्यामुळे कुकडेश्वर आणि जुन्नर च्या ऐतिहासिक खजिन्यामध्ये अजूनच भर पडलेली आहे."
: - श्रद्धा घनःश्याम हांडे- वीरगळ अभ्यास
"दुर्गवेध युवा मराठा फाउंडेशन संस्थे कडून दुर्लक्षित चतुर्भुज विरगळीला नवसंजीवनी. "
पुणे जिल्हा आणि त्यात जुन्नर तालुका म्हणजे ऐतिहासिक स्थळाचा खजिनाच आहे. जुन्नर तालुक्यातील पुर गावातील प्राचीन कुकडेश्वर शिवमंदिर मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिर आणि परिसराचा अभ्यास करताना संस्थेच्या काही सदस्यांना परिसरात एक दुर्मिळ चतुर्भुज वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत दगडांखाली पडलेली दिसली होती. चारही दिशेला वेगळी इष्टदेवता असलेले शिल्पांकंन असलेली ही अत्यंत दुर्मिळ असल्याने ह्या विरगळीची इथून काढून
लोकांना आणि पर्यटकांना दिसेल अस संवर्धन करण्यासाठी उपाय करणे गरजेचे होते. याच अनुषंगाने काल रविवार दि.०६ डिसेंबर रोजी संस्थेकडून विशेष मोहीम राबवत सदर वीरगळ दगडाखालून काढण्यात आली. सद्य स्थितीत ही वीरगळ मुख्य मंदिराच्या बाहेर उभी करून ठेवलेली आहे. संवर्धन मोहिमे अंतर्गत गावकरी आणि मंदिरातील पुजारी वीरगळ आणि त्यावरील शिल्पांबद्धल मार्गदर्शन करण्यात आले. याच वेळी अश्या शिल्पांकीत वस्तुं जपण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले गेले. येत्या काही दिवसात ही वीरगळ अजून सुरक्षित करण्याविषयी संस्थेकडून प्रयत्न करण्यात येतील.
जुन्नर : सातवाहन काळातील बाधकामातील " विट" ...
जुन्नर : सातवाहन काळातील बाधकामातील " विट" ...
------------------------------------------------------------
जुन्नर मधील सातवाहन काळात बांधकामासाठी वापरत असलेल्या ' विटा' पक्क्या भाजलेल्या असून त्या बांधकामासाठी वापरत असताना .त्या बांधकामातील भीतींच्या 'विटा ' एका वर एक जोड येणार नाही अशा साधा - मोड पद्धतीने ठेवत असत या शिवाय खालच्या 'विटा ' आडव्या तर वरच्या 'विटा उभ्या या पद्धतीने उभारल्यामुळे बांधकामातील भिंत भक्कम तयार होत असायची.
जुन्नर येथील
सातवाहन काळातील लोकवस्ती च्या स्थळातील उत्खननात आढळून येणाऱ्या विटा २१इंच लांब, ११ इंच रुंद व ३ इंच जाड असून काही ठिकाणी त्या आकाराने खूप मोठ्या म्हणजे ४२ इंच लांब, २० इंच रुंद आणि ७ इंच जाडीच्या तर काही विटा त्याहूनही मोठ्या आकाराच्या आढळून येतात.
काही शंकाकृती लहान - मोठ्या विटा जुन्नर परिसरातील सातवाहनकालीन लोक वस्तीस्थानाच्या भागातून अभ्यासक - संशोधक यांना अभ्यासक करण्यासाठी आढळलेल्या आहे. त्या गोलाकार अवशेषांच्या बांधकामासाठी अशा प्रकारच्या विटा चा वापर केल्याने गोलाकार भाग तयार होत असल्याने त्याकामासाठी अशा विटा बनविल्या जात असत . त्याचे पुरावी आजही जुन्नर परिसरातू दिसून येतात.
कुकडी नदीच्या काठावरील आगरगाव , दिल्ली पेठ, सुसरबाग, लेण्याद्री जवळील गोळेगाव , खालचा माळीवाडा येथील उत्खनात सातवाहन कालीन थरात अशा पक्क्या भाजलेल्या स्वरूपातील ' विटा' ह्या मानवी वस्तीस्थानाचा मोठ पुरावा म्हणून ओळखला जातो.
अशा प्रकारच्या विटा पैठण , कराड , नाशिक ,नेवासा, भोकरदन ,तेर इत्यादि ठिकाणच्या सातवाहन कालीन थरात मिळालेल्या आहे
जुन्नर येथील आगर गावात सन २००८ -२००९ मध्ये डेक्कन कॉलेज , पुणे पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खनामध्ये घराच्या भीतीची रचना बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सातवाहनकालीन विटांचे अवशेष पांढरी टेकडीच्या जमिनीत आढळून आले. त्यात ओबड- धोबड दगड बसून तयार केलेल्या एका घराचा ३ थराचा पाया आढळला. त्या विटांची भिंत २२ फूट लांब असलेली आढळली ही भिंत उभारताना विटांचे जोड एकावर एक येऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचे पुरावे येथील उत्खननात जुन्नर चे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांना पाहाण्यासाठी संधी मिळाली होती.तो उत्खनन चालू असलेला क्षण आजही मला आठवतो.
जुन्नर येथील दिल्ली पेठ येथे सन २०११ मध्ये केलेल्या उत्खनात भाजल्या विटांचा वापर करून एका शेजारी एक असलेली बांधकामे येथे आढळून आली असून चौरस आकाराचे उंच हौद असे वर्णन करता येईल अशी ही विटांची तीन बांधकामे असून उभ्या भिंती मध्ये त्यांना कोठेही दार नाही .मातीने सपाट केलेला तळ असलेल्या या एका हौद सदृश्य ' विट' बांधकामाची लांबी २.५ मीटर तर रुंदी १.५ मीटर , उंची ३.१५ मीटर असल्याचे आढळून आले . हि सर्व पुरातत्व उत्खनने कशी केली जातात ति मि स्वःता पाहिलेली असल्याने माझ्या सातवाहन काळातील लोकसंस्कृती अभ्यासासाठी ति उत्खनने मला महत्वपूर्ण ठरली आहे.
आगरगांव , गोळेगाव मध्ये राहणाऱ्या गृहस्थाने आपल्या घराच्या बांधकामात आधुनिक विटा व दगड यांच्या वापरा बरोबर सातवाहन काळातील विटांचाही वापर केल्याची दिसून येते. नदीकाठाची माती भात साळीच्या भुश्शात तसेच गवतात मिसळून त्यापासून विटा बनवून त्या विटा भट्टीत भाजून पक्की वीट निर्माण करून त्या विटांचा वापर स्थापत्य निर्मिती साठी केला जात असत.
----- बापूजी ताम्हाणे, जुन्नर
जिल्हा : पुणे ( महाराष्ट्र )
मों. नं. 9730862068
जुन्नरच्या भटकतीतून उलगडलेला "सटवाई" देवी च्या अभ्यासाचा शोध......
जुन्नरच्या भटकतीतून उलगडलेला "सटवाई"
देवी च्या अभ्यासाचा शोध......
---------------------------------------------------
बालकाच्या जन्मानंतर पाचवीला "सटवाई देवी" च्या पूजनाचा विधी जुन्नर परिसरातील काही खेडेगांवातील कुटुंबामधुन केला जातो. त्यासाठी बाळंतणीच्या खाटे जवळ घरातील जेवणासाठी मसाला वाटण्याचा दंगडी पाटा मांडला जातो. त्यावर नागिनीच्या पानावर सुपारी , हळकुंड, अंबट चिंच, जायफळ, नाडापुडी, दहा दंगडी गोल खंडे, वही - पेन, लोखंडी वस्तू एकांड ठेवून पूजनाचा कार्यक्रम केला जातो.
सुवर्णा मध्ये सटवाई च्या उमटवलेल्या लहान छबीचा देखील पूजनात समावेश केलेला असतो. पूजेच्या ठिकाणी कणकेच्या दिव्यात गोडेतेल घालून ते दिवे प्रज्वलित करीतात.
कुंटुंबात मुलगी जन्माला आली असल्यास पाच कुमारिकांना भोजनाचा कार्यक्रम आयोजित करतात.त्यासाठी चपाती,भात, वरण, कढी असे जेवण बनविले जाते. मुलगा जन्माला आला असल्यास पाच मुलांसाठी भोजनाचा कार्यक्रम केला जातो. पूजन झाल्यावर नाडापुडीतील दोऱ्यांमध्ये सुवर्णातील लहान छबी बांधून ती बाळाच्या मनगटावर बांधली जाते. पूजनातील लोखंडी एकांडाचा उपयोग त्या लहान बाळाला सर्दी झाल्यावर उगाळून लावण्यासाठी केला जातो.
पूजनाच्या दुसऱ्या दिवशी आई - बालकाचे उसे बदलते. पुर्ण सव्वा महिना झाल्यावर गावाच्या बाहेर जाऊन वाटेवरही अशाच पध्दतीने "सटवाई" ची पूजा केली जाते. चार ते पाच आठवड्या नंतर आई बाळाला घेऊन गावाच्या जवळ असलेल्या
"सटवाई" देवीच्या दर्शनाला जातात. श्रावणातील सोमवारी सटवाई चे पूजन करण्याची प्रथा जुन्नर परिसरात आजही चालू आहे. प्रत्येक गावाच्या जवळ पास "सटवाई" देवीचे मंदिर असते. बाळांच्या जन्माशी जोडल्या गेलेल्या प्रथा परंपरांचा अभ्यास करून त्यावर शोध प्रबंध सादर करण्यासाठी प्रख्यात विद्यापीठातील विद्यार्थी अभ्यासक मित्र अभ्यासासाठी जुन्नर परिसरात येत असतात. "सटवाई" देवी ही जुन्नर परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. जुन्नर परिसरातील काही "सटवाई" देवीची आख्यायिका या भागातील वयोवृद्ध आजही सांगत असतात.
--- बापुजी ताम्हाणे, जुन्नर ( लेण्याद्री - गोळेगांव )
जुन्नर परिसरातील प्राचीन इतिहासाचे अभ्यासक
मों. नं. 9730862068
जुन्नरचे सातवाहन काळातील " सिंह छाप " नाणे....
जुन्नरचे सातवाहन काळातील " सिंह छाप " नाणे....
-------------------------------------------------------------
जुन्नरचे सातवाहन काळातील " सिंह छाप " नाणे हे प्राचीन जुन्नरच्या सातवाहन काळातील इतिहासाचे एक ठोक साधन आहे. जुन्नरच्या सातवाहन काळातील नाण्याच्या आधाराने प्राचीन जुन्नरच्या इतिहासात दडलेल्या अनेक गोष्टी समोर येण्यास मदत होतात. जुन्नरची सातवाहन काळातील ' सिंह छाप" नाणी संशोधनासाठी अतिशय उपयुक्त आहे. जुन्नर परिसरातील निसर्ग संवर्धनाचे दोन हजार दोनशे वर्षापूर्वी देखील
जाणीवपूर्वक प्रयत्न जुन्नर परिसरात होत असल्याचे येथील लेण्यातील शिलालेखातून दिसते.प्राचीन नाणी आपल्याला निसर्गाकडे जाण्याची ऐक दिशा दाखवते. प्राचीन जुन्नरच्या सातवाहन काळातील " सिंह छाप " नाण्यातून जुन्नरच्या इतिहासाचे धागे गवसतात. प्राचीन नाण्यातून सातवाहन काळातील जणू मानव निसर्ग पूजक होता याची साक्ष समजते. " सिंह छाप" नाणे हे जुन्नर च्या सातवाहन टांकसाळीचे वैशिष्ट्य आहेत.
जुन्नरच्या सातवाहन कालीन नाण्यावरील सिह जास्त करून डावी कडे पाहात उभा दाखविला असून मुख्य म्हणजे सिंहाची आयाळ हि टिंबाटिंबाची व भरघोस असते. जुन्नरच्या सिंह छाप नाण्यावरील सिंह हा जणूकाही योध्द करण्यासाठी उभा असल्यासारखे वाटते तर सिंहाची शेपटी वर वळलेली असते. सिहाच्या तोडा पुढे ध्वज दाखविला आहे. सिंहाच्या डोक्यावरील नाण्याच्या अर्धगोलाकार भागात लेख असतो. सिंहाच्या पोटात दोन कमानीआहेत.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूस उज्जैन चिंन्ह न नंदीपाद चिन्ह असते. दोन डंबेल्स एकमेकांवर एक उभा आणि एक आडवा ठेवलेले असून त्यांच्या चारी टोकांना चार पोकळ वर्तुळे आहेत. सातवाहन काळातील नाणी शिसे, पोटीन धातूची आहेत. जुन्नर परिसरातून उपलब्ध झालेल्या नाण्यामध्ये श्री सातवाहन, श्री सातकर्णी, सिव सातकर्णी, पुलमावली, नहपान अशी नाणी मिळालेली आहेत. काही सिंह छाप नाणी मोठी - लहान आकाराची जुने भगार विकणाऱ्या लोकाच्या माध्यमातून उजाडात आली.
जुन्नरच्या सातवाहन कालीन राजघराण्यातील व्यक्तीच्या पराक्रमाचा खरा इतिहास जगाच्या समोर आलेला आहे. मला तर ही नाणी मिळवण्यासाठी खुप म्हणजे कित्येक वर्षे दिवस लागले जुने भगार वस्तू विकणारी मंडळी म्हणजे जुनी नाणी - वस्तू ही इतिहास अभ्यासासाठी ऐक महत्त्वाचा घटक आहे. माझा स्वतःचा दुर्मिळ नाणी संग्रह उभा करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर माझी पत्नी तसेच मि मोलमजुरी, हमाली, भाजीपाला विक्री मधून मला मिळालेल्या पैशातून रोजच्या घरगुती कुटुंबातील खर्चात
बचत करुन पोटाला चिमटा घेऊन हा नाणी संग्रह उभा केला.
--- बापुजी ताम्हाणे, लेण्याद्री - गोळेगांव ( जुन्नर )
मों. नं. 9730862068
जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील अवशेष...
जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील अवशेष...
----------------------------------------------------------------
जुन्नर परिसरात सातवाहन काळातील घराचे अवशेष मागील काही वर्षापूर्वी मिळालेले आहेत. जुन्नर परिसरातील आगरगांव, गोळेगाव, खालचा माळीवाडा, उदापूर, कुसूर,निरगुडे अशा प्रकारच्या गावामधून सातवाहन काळातील अवशेष उजाडात आलेले आहेत . त्यात सातवाहन कालीन घरे ( निवास ) अढळून आलेली आहेत. त्या घराच्या भाजलेल्या विटा २१ इंच लांब, ११ इंच रुंद तर ३ इंच जाड अशा तर काही ठिकाणी मोठ्या
आकाराच्या विटा आढळुन आल्या आहेत. सातवाहन काळातील घराचे खांब लाकडी असत ते खांब घराच्या भिंतीत रोवले असत. घराचे छप्पर लाकडी असत त्यावर चौकोनी किंवा आयताकृती कौले असत .कौलाच्या वरील बाजूस असलेल्या दोन छिद्रातून लोखंडी खिळे वांशावर ठोकले जात. किंव्हा झाडाच्या वेलानी छिंद्रातून वांशाना घट्ट बाधत असत. लोखंडी खिळ्यासहित अशी कौले जुन्नर परिसरातून पाहायला मिळालेली आहेत.
सातवाहन काळातील जुन्नर परिसरातील कौलांना दोन उभट पन्हाळी पाणी वाहून जायला ठेवलेल्या पाहायला मिळतात. याशिवाय कौलाच्या खालच्या भागास एक खाच असून ती शेजारच्या कौलाच्या कडेला अडकविली जात असत.कुकडी नदीच्या काठावरील माती वापरून ही कौले बनवित असत. त्यानंतर ति उन्हात वाळवून ति भट्टीत पक्की भाजून काढत असत.घराचा आकार काही ठिकाणी चौकोनी असत काही गावात सन १९५५ च्या दरम्यान १२×१५ फूट व १२×१३ फूटच्या आकाराच्या खोल्या स्थानिक अभ्यासकाना पाहायला मिळाल्या होत्या. घराचा पाया भक्कम पणे करण्यासाठी दंगड गोट्याचा वापर केलेला पाहायला मिळाला.सर्वसाधारण पणे कुकडी नदी काठची चिकण माती घराच्या गिलाव्यासाठी वापरित.घराच्या जवळ जळक्या लाकडाचा कोळसा,फुटलेल्या मातीच्या भांड्याचे काठ, जनावरांची हाडे अशी बरीच अवशेष अढळून आली आहेत.
जुन्नर परिसरात चार पाय असलेले एकसंघ दंगडात कोरून काढलेले पाटे - वरवंटे मिळालेले आहेत . त्यावर धार्मिक शुभ चिंन्ह आढळतात. अशा पाट्याचा एक शिरोभाग पुढे आल्याने वाटलेले धान्य पाट्याच्या पुढील बाजूच्या खाली ठेवलेल्या मृदचक्रातील थाळीत पडे.
धान्य दळण्यासाठी जात्याचा उपयोग प्रथमच सातवाहन काळात केला असावा. मत्र हे जाते आजच्यापेक्षा वेगळे होते. त्यांची वरची तळी उभट असून लाकडी दांडा आडवा घातला जाई व दोन स्त्रिया समोरासमोर बसून हा दांडा फिरविला जाई. हे आडव्या दांड्याचे जाते मुळचे 'रोमन ' असून त्यांच्याकडून ते जुन्नर परिसरात आले असावे. असे.जुन्नर परिसराचे प्राचीन इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे म्हणतात. हल्ली मात्र उभ्या दांड्याचे जाते असून रोमन जात्याची ती सुधारित आवृत्ती होय . जुन्नर परिसरातील सातवाहन काळात धान्य रात्रभर भिजत ठेवून सकाळी सातवाहन काळातील स्त्री सकाळच्या पाहारी लवकर उठून दंगडी पाट्यावर धान्य वाटून जाडी - भरडी भाकरी ,रोट करुन विस्त्यावर भाजीत असत . पण आडव्या दांड्याच्या जात्यामूळे ताज्या भाकऱ्या,पोळ्या जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील लोकवस्तीच्या घरातून होऊ लागल्या.
---- बापूजी ताम्हाणे, गोळेगाव - लेण्याद्री ( जुन्नर )
ता. जुन्नर, जि. पुणे.( महाराष्ट्र )
मों. नं. 9730862068
जुन्नरच्या लेणीत आढळले...... "रोमन" साम्राज्यामध्ये खेळला जाणाऱ्या पट खेळाचे पुरावे

जुन्नरच्या लेणीत आढळले......
"रोमन" साम्राज्यामध्ये खेळला जाणाऱ्या पट खेळाचे पुरावे
***********************
तुळजा लेणी गटसमुहातील लेण्याचा अभ्यास करताना लेणी नं. १३ मधील खोलीच्या सपाट पृष्ठभागावर दुर्मिळ बैठ्या खेळाचे पुरावे आढळल्याचे प्राचीन इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी सांगितले.
ताम्हाणे म्हणाले, जुन्नर परिसरातील लेण्यापैकी तुळजा लेणी गट समुहातील लेण्या प्रथम इसवी. सनाच्या पहिल्या शतकाच्या मध्यास कोरलेल्या असाव्यात. त्यापैकी लेणी नं. १३ चे दर्शनी भाग
तुटलेला असून आतील चौरस मंडपातील दोन्ही बाजूस तसेच मागील भितीच्या अंगास दगडी बाक कोरलेले आहेत. त्या लेणीचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग केला जात असत. लेणी खोलीच्या सपाट पृष्ठभागावर " रोमन" साम्राज्या मध्ये "नवकांकरी" बैठ्या खेळाचा पट खेळला जात असत अशाच प्रकारचा हा दुर्मिळ खेळाचा पट येथील लेणीत पहावयास मिळतो.
" नवकांकरी" हा संस्कृत शब्द असून त्यांचा अर्थ ९ खडे असा होतो. कन्नड मध्ये ' सालू माने अटा' तर गुजराती मध्ये ' नवकाक्री' तसेच तेलुगू मध्ये ' दादी' म्हणून ओळखला जातो. हा एक समरेखन खेळ आहे. हा बैठा खेळ पटावर दोन खेळाडूंनी खेळला जातो. खेळ खेळत असताना प्रत्येक खेळाडूला ९ प्यादे मिळतात.
" नवकांकरी " बैठा खेळ पटावरील प्रत्येक आतील चौकोनाच्या बाजूच्या मध्यभागी संबंधित बाह्य चौकोनाच्या बाजूच्या मध्यापर्यंत रेषानी जोडलेल्या तीन एकाग्र चौकोनाचा समावेश असलेल्या पटावर खेळला जातो. " नवकांकरी" खेळाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, प्रत्यक्ष खेळाडू जसा त्यात रंगतो तसेच तो खेळ पाहणारे प्रेक्षकही त्यांत तसेच रंगून जातात.
सातवाहन काळात जुन्नर - रोमचा कल्याण, भडोच,नाला - सोपारा अशा पश्चिम सम्रुद्र बंदरातील मार्गाने व्यापारी संबंध नाणेघाट ने जवळ आल्याने त्या वेळी " नवकांकरी" बैठा खेळ रोमन खलाशी खेळायचे त्यांच्या कडून हा खेळ सातवाहन कालीन जुन्नर परिसरात नाणेघाट मार्गाने आलेला असावा.
प्राचीन रोम आणि मध्ययुगीन भारत काळात " नवकांकरी" म्हणून बैठा खेळ लोकप्रिय होता. नाणेघाट मार्गाने जुन्नरच्या बाजारपेठ मध्ये व्यापारी व्यापारासाठी येत असत. व्यापारी येथील लेणीच्या परिसरात मुक्कामासाठी थांबत त्यावेळी फावला वेळ घालविण्यासाठी हा खेळ खेळावे असा विचार त्या वेळच्या व्यापारी लोकांच्या मनात आला असावा. तुळजा लेणीत खेळती हवा,भरपूर सूर्य प्रकाश येईल अशा ठिकाणी " नवकांकरी" पट खेळाच्या पटाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती बापुजी ताम्हाणे यांनी दिली.
--- बापुजी ताम्हाणे, गोळेगाव ( लेण्याद्री ) मों. नं. 9730862068
जुन्नरचा ऐतिहासिक काळातील " मैलाचा दगड".
जुन्नरचा ऐतिहासिक काळातील " मैलाचा दगड"..
-----------------------------------------------------------
जुन्नर हे शहर सातवाहन काळापासून ऐक महत्त्वाचे प्रमुख व्यापारी बाजारपेठ चे शहर म्हणून ओळखले जाते. सातवाहन काळात तसेच मध्ययुगीन काळात जुन्नरचा नाणेघाट मार्गे कल्याणला व्यापारी माल जात असे.
ब्रिटिश काळात कल्याण कडे जाणारा मार्गे हा जुन्नर ते कल्याण महत्त्वाचा म्हणून ओळखला जात असत. जुन्नर शहरातील कल्याण पेठमधील जुन्नरचे उपनगराध्यक्ष अँडव्होकेट राजेंद्र बुट्टे पाटील
यांच्या निवासस्थाना जवळच ऐक " जुना ऐतिहासीक मैलाचा दगड" रस्त्याच्या कडेला उभा आहे. त्या वैशिष्ट्यपूर्ण दगडावर एका वर्तुळाकार निळ्या तैलरंगाने स्पष्ट दिसेल अशा इंग्लिश 56 अंकात तर ५६ मराठी ,देवनागरी अंकात आकडे दिसतात.
वैशिष्ट्यपूर्ण हा दगड तळाशी जरा रुंद तर वरच्या बाजूला निमुळता होत गेलेल्या सारखा दिसतो. दगडाच्या उभ्या दुसऱ्या बाजूला वर्तुळामध्ये असणारे इंग्लिश मध्ये 1 आणि मराठी, देवनागरी अंकात १ असे आकडे आपल्याला दिसून येतात. या आकड्यांशिवाय कोणतेही आकडे किंवा अक्षरे तसेच खुणा ह्या दगडावर दिसून येत नाहीत. जुन्नर ते कल्याण हे अंतर इंग्लिश मध्ये 56 तर मराठी, देवनागरी अंकात ५६ मैल असे दाखविणाऱ्या रस्त्यावरील हा पहिला अंतरदर्शक दगड म्हणून ओळखला जातो. १ हा अंक रस्ता मार्गे दर्शविणारा असावा. अशाच प्रकारचे "मैलाचे दगड" जुन्नर जवळील पाडळी रस्त्यावर तसेच नाणेघाट, माणिकडोह जवळ आहेत. काही मैलाचे दगड रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिसावे ,त्यावरील मैलाचे अक दिसावे यासाठी अकाच्या बाजूने ऐक लहान कोनाडा कोरलेला दिसतो. त्यात रात्रीच्या वेळी दिवा पेटता ठेवत असत. कारण किती मैल प्रवास करायचा,अगर केला हे समजावे म्हणून ति सोय केलेली असावी.
---- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री ( जुन्नर )
ता. जुन्नर, जि. पुणे ( महाराष्ट्र )
मराठा " धोप" तलवार एक सर्वोत्कृष्ट हत्यार....
मराठा " धोप" तलवार एक सर्वोत्कृष्ट हत्यार.....
------------------------------------------------------------
शिवकालापूर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ असायची ती शिवाजी महाराजांनी मूठ बंद करुन घेतली एखाद्या तलवारीचा वार घसरुन खाली हातावर आला तरी हात सुरक्षित रहावा यासाठी मुठीला आवरण लावलं. त्यांच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यंत आणखी लांब शिवाजी महाराजांनी केली. पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही यांची काळजी ही घेतली आणि शत्रूच्या मोठ्यात -
मोठ्या घावणे तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था महाराजांनी करुन घेतली.
त्यासाठी तलवारीला मधून पन्हळ ठेवली .त्याचा प्रभाव इतका दिसून आला की हे हत्यार सर्व पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज त्या वेळच्या मावळ्यांनी व्यक्त केली. अशा तलवारी ला मराठा तलवार म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवाजी महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्या सारखे वाटे त्याला पर्याय म्हणून अशा प्रकारच्या तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐक प्रसंगी तलवारीच्या मुठी मागील हा गजही शत्रुच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकला जाई. ही तलवार चालवून हाताला घाम येईल तो घाम हाताच्या मुठी पर्यत जाऊन मूठ सैल होईल आणि तलवार हातातून गळून पडेल अशी शक्यता होती तेव्हा पकड एकदम मजबूत रहावी म्हणून मुठीला आतून गादीचा अस्तर लावून घेतले म्हणून मराठे सात तास सलग हत्यार चालवू शकले. अशा ह्या धोप तलवारी चा खुप वैशिष्ट्यपूर्ण माहिती अजून मोठी आहे. ह्या धोप तलवारी निर्मिती बद्दल खुप मोठा इतिहास आहे.
-- बापुजी ताम्हाणे, लेण्याद्री - गोळेगांव ( जुन्नर )
मों. नं. 9730862068
जुन्नर चे सातवाहन कालीन "सांस्कृतीक जीवन "...
जुन्नर चे सातवाहन कालीन "सांस्कृतीक जीवन "...
-----------------------------------------------------------------
जुन्नर परिसराचा दोन हजार दोनशे वर्षापूर्वी चा इतिहास भक्कम पुराव्यानिशी अभ्यासकाना लिहायचा असेल तर तो सातवाहन काळापासूनच लिहावा लागतो. सातवाहन साम्राज्यांनी जुन्नर ला भारतीय राजकारणाच्या नकाशावर मानाच प्रख्यात स्थान मिळून दिले. सातवाहन कालीन राजांनी राजकीय स्थिरता,उत्तम प्रशासन, धार्मिक सहिष्णुता तसेच जुन्नर नाणेघाट मार्गाने समुद्र बंदरातून पाश्चिमात्य देशाच्या
व्यापारास चालना दिली.
कल्याण, सोपासोपारा तसेच पश्चिम दिशेच्या समुद्र बंदरातून पाश्चिमात्य देशातून माल आयात - निर्यात केला जात असे. सातवाहन काळात जुन्नरच्या बाजारपेठेतून विविध प्रकारचे कापड, हस्तीदंती वस्तू, मसाले, पाळीव प्राणी, मोती, औषधे अशा वस्तू निर्यात केल्या जात तर काचसामान, मंद्य, मद्यंकुंभ, सोने, चांदी, नक्षीदार भांडी अशा वस्तू नाणेघाट मार्गाने जुन्नरच्या बाजारपेठ मध्ये आयात केले जात होत्या.
व्यापार, उद्योग व्यवसायामुळे सातवाहन काळात जुन्नर परिसरात नागरी करणाला चालना मिळाली होती. सातवाहन काळात लेण्याद्री जवळील सध्याचे गोळेगांव ( गवळी वाडा ) ,अगर, खालचा माळीवाडा, कुसूर, निरगुडे, सुसरबाग, उदापुर अशा प्रकारची बरीच लोकवस्ती स्थळाची गावे होती. जुन्नर ,पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर ही सातवाहन कालीन कलेची प्रमुख केंद्र होती. बांगड्या, ताईत - पँन्डल, मणी, कर्णभूषणे, असे विविध अंलकार बनवण्याची कला परिसरातील लोकांना सातवाहन काळात अवगत होती.
सातवाहन राजांनी साहित्य, कला, स्थापत्य यात भरभरुन योगदान जुन्नर परिसराला दिल्याचे दिसून येते. याच काळात जुन्नर परिसराचा मोठा विकास व विस्तार झाल्याचे त्यांच्या शिल्लक राहिलेल्या लोकसंस्कृती अवशेषावरुन दिसून येते.जुन्नर ,पैठण, नाशिक, कर्हाड, तेर, भोकरदन हि प्रख्यात नगरे सातवाहन सम्राज्याच्या व्यापारी मार्गाने ऐकमेकाना नाणेघाट व्यापारी बाजारपेठ मुळे जोडली गेली होती. त्याकाळी हा एक महत्त्वाचा व्यापारी घाट मार्ग म्हणून ओळखला जात असायचा अंतर्गत व परदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात जुन्नर मधून चालत होता.त्यावेळी जुन्नर परिसरात लेण्या, चैत्यगृह, विहार या माध्यमातून स्थापत्य कलेचा मोठा विकास झालेला होता.
--- बापुजी ताम्हाणे, जुन्नर (जिल्हा - पुणे ) महाराष्ट्र
मों. नं. 9730862068
जुन्नर परिसरातील " सातवाहन काळातील घराचे कौल "
जुन्नर परिसरातील " सातवाहन काळातील घराचे कौल "
-------------------------------------------------------------
जुन्नर परिसरातील सातवाहन कालीन घराची बांधनी पक्की होती. घर बाधकामातील विटा एकावर एक जोड येणार नाहीत अशा पध्दतीने ठेवलेल्या असत. बाधकामातील खालच्या विटा आडव्या तर वरच्या विटा उभ्या ह्या पध्दतीने असल्याने घरांची बांधनी भक्कम असायची.बाधकामातील विटा आकाराने खुप मोठ्या म्हणजे साधारणपणे २१ इंच लांब, ११ इंच रुंद ,३ इंच जाडीच्या होत्या.
जुन्नर परिसरातील गोळेगांव,
उदापुर, कुसूर,पाडळी, जुन्नर ,सुसरबाग,डिगोंरे,निरगुडे येथील सातवाहन कालीन घरांची छप्परे भिंतीत आणि जमिनीत लाकडे वासे पुरुन त्यावर आडव्या लगी ( लाकडी वासे ) टाकून तयार केली जात. आणि त्यावर एका विशिष्ट प्रकारची भाजलेल्या मातीची कौले ठेवीत असत. ति कौले साधारणपणे आयत आकाराची असून त्यांना वरच्या भागास पन्हाळ्या केलेल्या दिसून येतात. सातवाहन काळात जुन्नर परिसरात भरपूर पाऊस पडत असावा .पावसाचे पाणी झटकन निघून जाता यावे म्हणून ही व्यवस्था कौलाना केलेली असायची.
जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील घराच्या कौलांना वरच्या अंगास दोन छिंद्रे असून त्यांतून ती झाडाच्या वेलानी किंव्हा खिळ्यांनी लगीवर ( लाकडी वासे ) बाधीत किव्हा ठोकून बसवीत .कौलांना दिलेला उतार तसेच त्यांवर काढलेल्या पन्हाळी यावरुन जुन्नर परिसरात सध्या पडत असलेल्या पावसाच्या मानापेक्षा जास्त पाऊस सातवाहन काळात पडत असावा असे सिध्द होते.
अशा विशिष्ट प्रकारची भाजलेल्या मातीची कौले नाशिक, कोल्हापूर, तेर, नालासोपारा, नेवासे, पैठण आदि ठिकाणी संशोधकांना - सातवाहन कालीन इतिहास अभ्यासकाना सातवाहन कालीन वस्तीस्थळाच्या भागात पाहायला मिळाली. लेण्याद्री जवळील गोळेगांव मध्ये सातवाहन कालीन लोकवस्ती चे अवशेष आजही दिसून येतात. जुन्नर परिसरातील असंख्य लेण्यांत जे शेकडो बुध्द भिक्षु निवास ( वर्षावास) करीत असतील ,त्याच्या भिक्षेसाठी, निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या वस्त्या या प्राचीन जुन्नर परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात.
---- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री ( जुन्नर)
( प्राचीन इतिहासाचे अभ्यासक )
मों. नं. 9730862068
जुन्नर मधील लेण्यांत दुर्मीळ खेळाचे पट...
जुन्नर मधील लेण्यांत दुर्मीळ खेळाचे पट...
--------------------------------------------------------------------
जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील कोरीव लेणी गट समूहाचा अभ्यास करीत असताना काही लेणीमधील सपाट पुष्ठभागावर खोदलेल्या स्वरूपात दुर्मीळ खेळाचे पट आढळले असल्याचे जुन्नरचे प्राचीन इतिहास अभ्यासक बापुजी ताम्हाणे यांनी सांगितले.
बापुजी ताम्हाणे म्हणाले की, जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरील दक्षिण बाजूची लेणी गट समूहातील लेणी क्रमांक ५९ च्या जोड लेणीतील उजव्या
बाजूकडील खोलीतील मोठ्या मंडपात तसेच भिमाशंकर, लेण्याद्री मधील सातवाहन काळात खोदलेल्या लेणी गट समूहातील लेणीच्या खालील सपाट पुष्ठभागावर अनुक्रमे ' वाघ - बकरी व मंकाला,चौसर' सारख्या दुर्मीळ बैठ्या खेळाचे पट खोदलेले दिसून येतात.
नाणेघाट ,दाऱ्याघाट, माळशेज अशा व्यापारी मार्गाने कल्याण, सोपारा, भंडोज बंदरातून समुद्रमार्गे पश्चिमात्य देशात व्यापार होत असताना कधीतरी मध्ययुगीन काळात जुन्नरला हा बैठा खेळ त्यानी आपल्या सोबत आणला असावा. शिवनेरी किल्ला लेणी परिसरात असणारे शिपाई, व्यापारी, पहारेकरी, डोगरावर गुरे चारण्यासाठी येणारे गुराखी किंवा अन्य लोक हे खेळ खेळत असणार हे नक्कीच असावेत.
वाघ - बकरीचा हा बुध्दीबळासारखा खूप रोमांचक खेळ आहे. ह्या बैठ्या खेळात दोन खेळाडू असतात. एखाद्या खेळाडू कडे समजा ४ वाघ आहेत .आणि दुसऱ्या खेळाडू कडे समजा २० शेळ्या आहेत. वाघांच्या खेळाडू ला सर्व बकऱ्याची शिकार करावी लागते आणि बकरी खेळाडूला वाघाला अडवावे लागते. जर खेळातील खेळाडूने समजा वाघाने सर्व बकऱ्याची शिकार केली तर वाघ खेळाडू वादक विजयी होईल. जर खेळातील खेळाडू बकरीने एकत्र वाघास एखाद्या दुर्गम ठिकाणी रोखले तर शेळी खेळाडू जिकला असे समजावे.
अशा प्रकारचा बैठा पट खेळ लहानांपासून वृध्दांपर्यत सर्वानाच मनोरंजन, विरगुंळ्याची गरज त्या काळी भासत असेलच मुख्य म्हणजे हे बैठे खेळ खेळण्यासाठी लागणारी सामग्री अतिशय साधी असते.
अशा प्रकारच्या बैठे खेळाचे पट भाजे, र्काला, पातळेश्वर,रायगड, जेजूरी, सिंहगड अन्य कित्येक गड किल्ले व लेण्या ह्यामधून खोदलेले दिसतात .अशा प्रकारचे बैठे 'बाघ - बकरी व मंकाला, चौसर' खेळ वेळ घालवण्याचे व बुध्दिला चालना देण्यासाठी आजही खेडेगावातून खेळले जातात असे बापुजी ताम्हाणे, जुन्नर यानी सांगितले.
--- बापुजी ताम्हणे, गोळेगांव - लेण्याद्री ( जुन्नर )
( जुन्नर परिसरातील इतिहासाचे अभ्यासक )
मों. नं. 9730862068
जुन्नरला पाणीपुरवठा करणारे निजामकाळातील" उसासे"
जुन्नरला पाणीपुरवठा करणारे निजामकाळातील" उसासे"
-------------------------------------------------------------------
जुन्नर शहराची पाणीपुरवठा व्यवस्था निजामकाळातील होती. शिवनेरी किल्ल्याच्या जवळील पद्मावती तळे, अंधारी विहीर, बारा बावडी, कुंभार तलाव यातून विविध आकाराच्या खापराच्या पाईपलाईन द्वारे जुन्नर शहरात पाणी आणून ते शहरातील विविध पेठातून हौदात सोडविण्यात आले होते.
सन १४८५ ते १५९५ पर्यत जुन्नर शहरावर तसेच परिसरावर ,शिवनेरी किल्ल्यावर अहमदनगरच्या निजामाचा ताबा होता.
निजामशाही काळातील स्थापत्य अभियंता ' मलिक अंबर ' यांने जुन्नर शहराला ( नगराला) पाणी पुरवठा करणारी खापराची पाईपलाईन ची योजना सन १४९५ मध्ये कार्यान्वित केली होती . जुन्नर शहराचा भाग उंच - संखल आहे. जुन्नर शहरातील काही ऐतिहासिक पेठा साधारण पणे उंच भागावर आहे तर काही पेठा संखल भागावर वसलेल्या आहेत. शहरातील उंच भागातील पेठामध्ये खापराच्या पाईपलाईन द्वारे पाणी पोहचत नव्हते. उंच भागात पाणी जावे यासाठी शहरातील दहा - बारा ठिकाणी "उसासे " काढण्यात आले होते.
बऱ्याच वर्षानंतर शहरातील पाईपलाईन नादुरुस्त झाली बऱ्याच पेठातील पाईपलाईन मध्ये माती बसून पाणी यायचे बंद झाले. अशा वेळी तातडीने उपाय म्हणून रावसाहेबांनी निजाम काळातील पाईपलाईन दुरुस्त करुन पाणीपुरवठा सुरळीत केला.
---- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री ( जुन्नर )
मों. नं. 9730862068
जुन्नरची ऐतिहासिक "सौदागर घुमट"
जुन्नरची ऐतिहासिक "सौदागर घुमट"
---------------------------------------------------------
जुन्नर - शिरोली रस्त्यावर हापुसबाग परिसरात उंचवट्यावर अंदाजे ६० फूट लांब ६० फूट रूंदीची घडीव दगडी बांधणीतील चौरसाकृती वास्तू पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असते. चौरसाकृती ५० फूट उंचीच्या भितीनी त्यांच्यावर ३० फूट उंचीचे , तर २५ फूट त्रिज्येचे आकर्षक घुमट तोलून धरलेले आहेत. इमारतीच्या दर्शनी बाजूच्या भितीवर दोन टप्प्यात कमानीची रचना असून दगडात घडविलेले नक्षीदार प्रवेशद्वार आणि जाळीदार
खिडक्या आकर्षक आहेत. आतील बाजूवर फारशी भाषेतील मजकूर कोरलेला आहे. त्याचा अद्याप अर्थबोध झालेला नाही. आतमध्ये हबशी प्रमुखाच्या व त्याच्या कुटुंबीयाच्या ९ कबरी आहेत. इमारतीचे देखणेपण व वैभवावरून खास व्यक्तीच्या कबरीवर बांधलेले हे स्मारक कोण्या मोठ्या असामीचे किबहुना मलीक अंबरच्या कुटुंबापैकी कोणाचे स्मारक असण्याची शक्यता याबाबत वर्तवली जाते. सन १४९० च्या कालखंडात बहामनी सुलतानांचा सरदार मलीक अंबर याने जुन्नर परिसरात निजामशाही ची स्थापना केली होती. त्यानंतर वाढत्या साम्राज्याला सोयिस्कर अशा राजधानी साठी पुढे निजामशाहीची राजधानी नगरला नेण्यात आली. निजामशहाचा वजीर मलीक अंबर याचा संबंध सौदागर घुमट या वास्तूशी असल्याचे सागितले जाते.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने १६ लाख रूपये खर्चाचे या इमारतीच्या मजबुती करणासाठी काम केल्याचे येथील लोकानकडुन अंदाज केला जात असल्याचे समजते. ह्या वास्तूच्या संरक्षण जतनीकरणाचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाने काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. जवळपास ४०० वर्षे ऊन, वारा, पावसाच्या नैसर्गिक कालचक्राशी सामना करीत आजही तेवढ्याच दिमाखात उभी असलेली ही ऐतिहासीक वास्तू मजबुतीकरणाच्या कामानंतर अधिकच उजळून निघालेली आहे.
-- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री
ता. जुन्नर, जि. पुणे
मो. नं. 9730862068
No comments:
Post a Comment