फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जात असे. फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जबरेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे.फलटण (फलस्यठण) शहरात यादव काळात (इ.स. १००० ते १४००) हे मंदिर उभारले असावे.
श्रीराम मंदिराजवळ काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध जबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर बहुधा यादवकालीन असून, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर आकर्षक आहे. हे मंदिर एकाच प्रचंड आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. फलटण शहरात पवार गल्लीमध्ये हे मंदिर असून ते रस्त्याच्या मधोमध एक मीटर उंचीच्या जगतीवर उभे आहे. जोत्याची बाह्य रेषा मंदिराच्या बाह्यरेशी समांतर आणि थोडे अंतर राखून आहे. त्यामुळे यापुढे आलेल्या जोत्याच्या प्रदक्षिणापथासारखाही उपयोग होतो. मंदिरात जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख मंडप लागतो. मंदिर उत्तराभिमुख असून मुखमंडप, सभामंडप,अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. या मंदिराचा गर्भगृहाचा तलविण्यास सप्तरथ असून विमानावर पूर्वी विटांचे शिखर होते. आज या शिखराच्या फक्त दोन भूमीच शिल्लक आहेत. या मंदिराच्या रथप्रकारावरून हे मंदिर सप्तभूम भूमीज प्रसाद असावे असे दिसते.
उत्सेघदृष्ट्या जगती मध्ये एकावर एक असे दोन खूर आहेत. या वरच्या खुरांच्या भाग अंतर्वलीत होऊन त्यावर जो वास्तुघटक आहे त्याला छाद्य म्हणता येईल. त्यावर खूर,जाडंब आणि कुंभ हे पिठाचे घटक आहेत. त्यावर कपोतासारखा एक भाग आहे. त्यावरील भागात म्हणजे मंडोवरावर म्हणजे मंदीराच्या भिंतीवर अनुक्रमे जाडंब आणि तवंगयुक्त कुंभ, कलश, मंची, कपोत, जंगा, उदगम, भरणी ,शिरावटी आणि छाद्य हे घटक येतात. त्यावर विमानाच्या आणि मंडपाच्या शिखरास सुरुवात होते. छाद्याच्यावर कपोत आणि मंची असे आणखी दोन घटक येतात. त्यावर भूमीज शिखरांचे कूटस्तंभ येतात. मंदिराच्या भद्रांना उपागे आहेत. त्यांना प्राचीन वास्तुशास्त्रीय परिभाषेत नंदिका म्हणतात.जंगा पातळीवर मंदिराच्या पूर्व ,पश्चिम आणि दक्षिण बाजूवर देवीच्या मूर्ती आहेत. शिखर पातळीवर सर्वसाधारणपणे इतर भूमीज शिखरावर आढळते त्याप्रमाणे शिखराच्या पायालगत शूरसेनक असण्याऐवजी इथे प्रथम शिखराची प्रतिकृती असून या शूरसेनकावरील लतेचा आणि मूलमंजिरीचा भाग हा शिल्लक नाही. मंडोवराच्या जंगा भागावर स्त्री युग्मे दाखवण्यात आली आहेत. अधून मधून मिथुन मूर्तीही आहेत. बहुतांशी सलीलांतरामध्ये तपस्वी आणि व्याल दाखवले आहेत.जंगेवर एका विशिष्ट प्रकारची मूर्ती योजना आहे. चार दिक्पाल चार कोणांच्या मागील बाजूस असून उरलेले चार दिक्पाल कपिलीवर कोरलेले आहेत. मंडोवराच्या जंगा भागावर काही कथाशिल्पपट आहेत. मंडपाच्या पूर्व आणि पश्चिम भागांच्या मध्यावर अंगे आहेत. यापैकी पूर्व भागावरील अंगावर अंबिका आणि सर्वानुभूती यक्ष दाखविला आहे. तर पश्चिम भागावरील अंगावर अंबिका तिच्या वाहनासह सिंहासह दाखवली आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते.मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे.
विमानाच्या तिन्ही भद्रांवर देवता कोरल्या आहेत. पूर्वेकडील भद्रावर देवतेचे वाहन हंस असून तिचे चारही हात तुटलेले आहेत. त्यामुळे या हातामध्ये कोणती आयुधे होती याचा बोध होत नाही. दक्षिण बाजू कडील भद्रावर असणाऱ्या देवतेच्या हाती द. अ. क्रमानुसार ( तुटलेला हात ) बाण, धनुष्य ( तुटलेला हात ) आहे. या देवतेचे वाहन बैल आहे पश्चिम भद्रावरील देवतेच्या मूर्तीची खूपच मोडतोड झाली असून तिच्या पायाजवळ गरुडमूर्तीचे अवशेष आहेत.
उत्तराभिमुख असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या संपल्या की मुखमंडप लागतो. या मुखमंडपाची रुंदी नेहमी आढळणाऱ्या मुखमंडपापेक्षा जास्त आहे. अगदी नेमके वर्णन करायचे झाल्यास ही रुंदी जवळपास मंदिराच्या रुंदी इतकीच आहे. मुख्य मंडपाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन असे एकूण चार स्तंभ असून या स्तंभावर स्तंभांवर आकृती शिल्पे असून ती स्तंभांच्या उद्गम भरणी आणि शिरावटी या स्तरांवर रेललेल्या आहेत शिरावाटीवर नागफणी कोरलेले आहेत.

मंडप अष्टकोनी असून त्याचे छत करोटक प्रकारचे आहे. एकावर एक असलेल्या आणि उत्तरोत्तर निर्मूलता होत जाणाऱ्या गडीवलयानी हे छत बनलेले आहे. कोणतेही नक्षी नसलेल्या खालच्या तीन वलयानंतरची वलय आजमितीस शिल्लक नाहीत. अंतराळाच्या बाजूच्या दोन भिंतींमध्ये प्रत्येकी एक देवकोष्ट आहे. अंतराळातून गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी असलेले द्वार पंचशाखा पद्धतीचे असून हे द्वार मुखमंडपापासून मंडपात नेणाऱ्या द्वाराशी खूपच मिळते जुळते आहे. त्यावरील अत्यंत उल्लेखनीय शिल्प म्हणजे नागफणा असलेले वादक. स्तंभशाखेवर प्रतीहार अभंग स्थितीत त्याच्या वाहनासह दाखवण्यात आलेले आहेत. येथे त्यांचे वाहन हत्ती आहे. त्यांच्या हातात पाश अंकुश आणि पुष्प ही लांचणे आहेत. चौथा हात वरद मुद्रेत आहे अंतराळ आणि गर्भगृहांची छतेही करोटक पद्धतीची आहेत. उत्तरांगावर मध्यभागी पार्श्वनाथ ची मूर्ती आहे.
वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी असलेल्या शूरसेनक, दिक्पालांची योजना, आकृतीशिल्पांची शैली या वैशिठ्यावरुन तारकाकृती तलविज्ञास असलेले हे भूमिज मंदिर इ.स.च्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले गेले असावे असे वाटते. मुळात हे जैन मंदिर पार्श्वनाथ यांचे असावे.

मंडपाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूस देवकोष्टे असून त्यात आज सुट्ट्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वार पंचशाखा प्रकारचे असून त्यावर उंबऱ्याच्या वरच्या पातळीवर प्रतीहार मूर्ती आहेत. त्या दरवाज्यापासून अनुक्रमे कुंभधारक, कमलधारक आणि पाशा- अंकुश धारण करणारे प्रतीहार आहेत. त्याचप्रमाणे या शाखा आतल्या शाखेपासून बाह्यतम शाखेपर्यंत अनुक्रमे कल्पलता, गंधर्वस्तंभ, पद्मलता आणि व्याल यांनी अलंकृत केलेल्या आहेत. ललाट बिंबावर आणि त्याच्यावर असलेल्या पाच आर्थिकांमध्ये तीर्थंकर यांच्या मूर्ती आहेत. जबरेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत.
सई ताम्हणकरचा मिडियम स्पाईसी बघताना मध्येच एक फ्रेम ओळखीची वाटली. . अरेच्चा! हे तर फलटण. गेल्याच आठवड्यात होतो की आपण इथे. लाकडी कामातील श्रीरामाच्या मंदिराशेजारी अतिथिभुवन, शंकर मंडई, मुधोजी क्लब, व्हिक्टोरिया डायमंड, जूबिली ग्रंथालय यांसारख्या चौथ्या मुधोजीरावांनी बांधलेल्या लोकोपयोगी इमारती, मालोजीराजे यांच्या काळात बांधण्यात आलेली सर्व शासकीय कार्यालयांसाठीची ‘अधिकारगृह’ ही भव्य वास्तू सोबतच त्याच चौकात आहे प्राचीन जबरेश्वर महादेव मंदिर.

फलटण (पालठाण) शहरात यादव काळात (इ.स. १००० ते १४००) हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाट बिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती असुन उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे...
प्राचीन मंदिर भेट शृंखलेतील हे आतापर्यंतचे आठवे मंदिर. या अगोदर कृष्णाबाई मंदिर - जुने महाबळेश्वर, मल्लिकार्जुन मंदिर - लोणी भापकर, पांडवेश्वर- मोरगाव, सिद्धेश्वर मंदिर अकोले, सिन्नर मधील ऐश्वर्येश्वर, गोेंदेश्वर व विठ्ठलेश्वर येथे भेट दिली आहे. आपल्या माहितीत अजुन काही स्थळे असतील तर जरुर सुचवा
डॉ वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे
नाशिक
फलटण येथील जबरेश्वर मंदिर
फलटण
शहरात पवार गल्लीमध्ये हे मंदिर असून ते रस्त्याच्या मधोमध एक मीटर
उंचीच्या जगतीवर उभे आहे. जोत्याची बाह्य रेषा मंदिराच्या बाह्यरेशी समांतर
आणि थोडे अंतर राखून आहे. त्यामुळे यापुढे आलेल्या जोत्याच्या
प्रदक्षिणापथासारखाही उपयोग होतो. मंदिरात जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या
चढून गेल्यानंतर मुख मंडप लागतो मंदिर उत्तराभिमुख असून मुख मंडप सभा मंडप
अंतराळ आणि गर्भ ग्रह असा त्याचा तलविण्यास आहे. या मंदिराचा गर्भगृहाचा
तलवण्यास सप्तरत असून विमानावर पूर्वी विटांचे शिखर होते. आज या शिखराच्या
फक्त दोन भूमीत शिल्लक आहेत. या मंदिराच्या प्रथा प्रकारावरून हे मंदिर
सप्तभूम भूमीज प्रसाद असावे असे दिसते
उच्च
दृष्ट्या जगती मध्ये एकावर एक असे दोन खूर आहेत. या वरच्या खुरांच्या भाग
अंतर्वलीत होऊन त्यावर जो वास्तु घटक आहे त्याला छाद्य म्हणता येईल. टावर
खूर जाळंभ आणि कुंभ हे पिठाचे घटक आहेत. त्यावर कपूतासारखा एक भाग आहे.
त्यावरील भागात म्हणजे मंडो वरात अनुक्रमे जाडंभ आणि तवंगयुक्त कुंभ कलश
मंची कपोत जंगा उदगम भरणी शिरावटी आणि छाद्य हे घटक येतात. त्यावर
विमानाच्या आणि मंडपाच्या शिखरास सुरुवात होते. छाद्याच्यावर कपोत आणि मंची
असे आणखी दोन घटक येतात. त्यावर भूमीत शिखरांचे कूटस्तंभ येतात.
मंदिराच्या बदलांना उपागे आहेत त्यांना प्राचीन वास्तुशास्त्रीय परिभाषेत
नंदिका म्हणतात गंगा पातळीवर मंदिराच्या पूर्व पश्चिम आणि दक्षिण बाजूवर
देवीच्या मूर्ती आहेत शिखर पातळीवर सर्वसाधारणपणे इतर भूमीत शिखरावर आढळते
त्याप्रमाणे शिखराच्या पायालगत शिवसेनक असण्या ऐवजी इथे प्रथम शिखराची
प्रतिकृती असून या शिवसेना वरील नतेचा आणि मूलमंजिरीचा भाग हा शिल्लक नाही.
मंडोवराच्या जंगला भागावर स्त्री युग्मे दाखवण्यात आली आहेत. अधून मधून
मिथुन मूर्तीही आहेत. बहुतांशी सलीला अंतरामध्ये तपस्वी आणि व्याज दाखवले
आहेत. गंगेवर एका विशिष्ट प्रकारची मूर्ती योजना आहे. चार दिपाल चार
कोणाच्या मागील बाजूस असून उरलेले चार दिपाल कपिलीवर कोरलेले आहेत
मंडवराच्या जंगला भागावर काही कथा शिल्पपट आहेत. मंडपाच्या पूर्व आणि
पश्चिम भागांच्या मध्यावर अंगे आहेत. यापैकी पूर्व भागावरील अंगावर अंबिका
आणि सर्वानुभूती लक्ष दाखविला आहे तर पश्चिम भागावरील अंगावर अंबिका तिच्या
वाहनासह सिंहासह दाखवली आहे
उत्तराभिमुख असलेल्या
या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या संपल्या की मुख्य मंडप लागतो
या मुखमान मुख मंडपाची उंची नेहमी आढळणाऱ्या मुख्य मंडपापेक्षा जास्त आहे.
अगदी नेमके वर्णन करायचे झाल्यास ही रुंदी जवळपास मंदिराच्या रुंदी इतकीच
आहे. मुख्य मंडपाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन असे एकूण चार
स्तंभ असून या स्तंभावर स्तंभांवर आकृती शिल्पे असून ती स्तंभांच्या उद्गम
भरणी आणि शिरावटी या स्तरांवर रेललेल्या आहेत शिरावाटीवर नागफणी कोरलेले
आहेत.
मंडपाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूस
देवकोष्टे असून त्यात आज सुट्ट्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वार पंचशाखा
प्रकारचे असून त्यावर उंबऱ्याच्या वरच्या पातळीवर प्रतीहार मूर्ती आहेत.
त्या दरवाज्यापासून अनुक्रमे कुंभ धारक कमलधारक आणि पाशा अंकुश धारण करणारे
प्रतीहार आहेत. त्याचप्रमाणे या शाखा आतल्या शाखेपासून बाह्यतमशाखे पर्यंत
अनुक्रमे कल्प लता गंधर्वस्तंभ पद्मलता आणि व्याल यांनी अलंकृत केलेल्या
आहेत. तलाक बिंबावर आणि त्याच्यावर असलेल्या पाच आर्थिकांमध्ये तीर्थंकर
यांच्या मूर्ती आहेत.
मंडप अष्टकोनी असून त्याचे
छत करोटका प्रकारचे आहे. एकावर एक असलेल्या आणि उत्तरोत्तर निर्मूलता होत
जाणाऱ्या दगडीवलयानी हे छत बनलेले आहे कोणतेही नक्षी नसलेल्या खालच्या तीन
वलयानंतरची वलय आजमितीस शिल्लक नाहीत. अंतराळाच्या बाजूच्या दोन
भिंतींमध्ये प्रत्येकी एक देव गोष्ट आहे. अंतराळातून गर्भगृहात प्रवेश
करण्यासाठी असलेले द्वार पंच शाखा पद्धतीचे असून हे द्वार मुखमंडपापासून
मंडपात नेणाऱ्या द्वाराशी खूपच मिळते जुळते आहे. त्यावरील अत्यंत उल्लेखनीय
शिल्प म्हणजे नागफणा असलेले वादक. स्तंभशाखेवर प्रतीहार अभंग स्थितीत
त्याच्या वाहनासह दाखवण्यात आलेले आहेत. येथे त्यांचे वाहन हत्ती आहे
त्यांच्या हातात पाश अंकुश आणि पुष्प ही लांचणे आहेत. चौथा हात वरद मुद्रेत
आहे अंतराळ आणि गर्भगृहांची छतेही करोटक पद्धतीची आहेत. उत्तरांगावर
मध्यभागी पार्श्वनाथ ची मूर्ती आहे.
विमानाच्या
तिन्ही भद्रांवर देवता कोरिया आहेत. पूर्वेकडील भद्रावर देवतेचे वाहन हाऊस
असून तिचे चारही हात तुटलेले आहेत. त्यामुळे या हातामध्ये कोणती आयुधे होती
याचा बोध होत नाही. दक्षिण बाजू कडील भद्रावर असणाऱ्या देवतेच्या हाती द अ
क्रमानुसार तुटलेला हात बांध धनुष्य तुटलेला हात आहे. या देवतेचे वाहन बैल
आहे पश्चिम भद्रावरील देवतेच्या मूर्तीची खूपच मोडतोड झाली असून तिच्या
पायाजवळ गरडमूर्तीचे अवशेष आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण
ठिकाणी असलेल्या शिवसेना दीपालांची योजना आकृती शिल्पांची शैली या
वशिष्ठावरून तारखाकृती तलविज्ञास असलेले हे भूमिज मंदिर इन्साचा तेरावे
शतकाच्या उत्तरार्धात बनले गेले असावे असे वाटते. मुळात हे जैन मंदिर
पार्श्वनाथ यांचे असावे
जबरेश्वर मंदिर :-
फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जबरेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.
फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जरबेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.
जबरेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील)
जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात
महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान
चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या
मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या
मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे,
तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्यातील पिंड
चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस
असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे.
श्रीराम मंदिराजवळ काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध जबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे हेमांडपंती शैलीतील
मंदिर असून, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर आकर्षक आहे. हे मंदिर एकाच प्रचंड
आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. गाभाऱ्यातील पिंडी चौकोनी आकाराची असून, तिचे तोंड
पूर्वेकडे आहे. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना
केली. गर्भागृहात छताखाली २४ तीर्थंकरांच्या मूर्ती दिसून येतात. पिंडीवर दोन शाळुंका असून, त्यांचा आकारही
वेगळा आहे. अशा प्रकारची पिंडी सहसा कोठे आढळत नाही. गर्भागृहाचे द्वार अनेक शिल्पांनी मढविलेले असून,
मंदिरातील मूर्तीमध्ये अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच
फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मूर्ती आहे. उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी,
कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. येथील गोलाकार आकारातील सभागृह बंदिस्त आहे.
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो.
येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले
जात असे.
जाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे.
श्रीराम मंदिर
श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तीश्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती

श्रीराम मंदिर :
फलटणमधील श्रीराम मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे मंदिर २२५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा, तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरासमोर तीन दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या नयनमनोहर मूर्ती आहेत. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून, याचा शिखर व कळस अत्यंत प्रेक्षणीय आहे. श्रीराम मंदिराला लागूनच राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत. त्याच्या उत्तरेला श्रीमंत मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांनी बांधलेले दत्तात्रयाचे मंदिर आहे. फलटणमध्ये जैनधर्मीयांची वस्ती मोठी आहे. व्यापार-उदिमासोबत त्यांचा स्थानिक सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असतो. त्यांची अनेक मंदिरे या गावाची शोभा वाढवीत आहेत.
श्री चक्रपाणि प्रभूंचे "श्री आबासाहेब मंदिर", फलटण)
.jpg) |
| Shri Abasaheb Temple, Phaltan. |
फलटण शहरातील हे मंदिर श्री अप्पासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते.या आशी हे रंभाइसा याचे मंदिर म्हणून ओळखले जात होते.रंभइसा हि श्री चक्रपाणी प्रभु यांची सावत्र आई आणि मावशी होती. चक्रपाणी प्रभु यांची आई जनकाइसा होत्या. चक्रपाणी एक वर्षाचे असताना रंभइसाने त्यांना आपल्या घरी आणले.चक्रपाणी प्रभु फलटणमध्ये दहा वर्ष राहीले.
जुन्या मंदिराचे पुढे नुतनीकरण झाले.महानुभाव पंथाची जी सुंदर देवस्थान आहेत त्यापैकी एक हे फलटणचे मंदिर.हे मंदिर चक्रपाणी महाराजांचे चरणांकित स्थान मानले जाते.
.jpg) |
| Shri Abasaheb Temple, Phaltan |
|
जबरेश्वर मंदिर फलटण जिल्हा सातारा
फलटण
शहरात यादव काळात बांधलेले "जरबेश्वर मंदिर" फलटण शहरात आजही राजवाडा
आणि श्रीराम मंदिरा यांच्या समोरच रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे
हेमांडपंथी शैलीतील तारकाकृती मंदिर आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माहिती फलकानुसार जरबेश्वर हे मूळचे जैन
मंदिर आहे. मंदिराच्या बाह्य अंगावर चोवीस जैन तीर्थकरांच्या मूर्ती व गणेश
पट्टीतील जैन तीर्थंकर मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. यवनांच्या टोळधाडीत या
सुंदर मंदिराचीही तोडफोड आणि नासधूस केली आहे.
प्रत्येक
सुंदर मुर्तीचे अवयव तोडले गेले आहेत. यवनांच्या तोडफोडी नंतर हे मंदिर
ओसाड पडले होते . फलटण चे राजे चौथे मुधोजीराव निंबाळकर १८५३ - १९१६
यांनी रिकाम्या जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे
असे सांगितले जाते. मंदिरच्या बाह्य अंगावर विविध अप्रतिम शिल्प सौंदर्यने
नटलेल्या सुरसुंदरीच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाचे द्वार खूपच सुंदर आणि
कलाकुसरयुक्त आहे . मंदिरात उजव्या बाजूला देवकोष्टात विठ्ठल-रुक्मीणीची
प्रतिमा स्थापित असून मंदिरात नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्
यातील महादेवाची पिंड चौकोनी आकाराची असून खूपच सुंदर आहे.
No comments:
Post a Comment