

पाचपिंडी महादेवासमोरील दगडी गाभाऱ्यात असणारे गणपती बाप्पा आणि महादेव...

पाचनई व खिरेश्वर येथुन येणाऱ्या वाटा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एक लहानशी घुमटी असुन या घुमटीसमोर पाण्याचे लहान टाके आहे. या घुमटीत एक शिवलिंग असुन तेथेच राजा हरिश्चंद्र कावडीने पाणी भरत असल्याचे शिल्प ठेवलेले आहे. या घुमटीच्या आसपास काही स्मरणशिळा तसेच भग्न शिल्प आहेत. येथुन समोरच काही अंतरावर प्राकाराच्या आत हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर:

![]() |
हरीश्चंद्रेश्वर![]() |





![]() |

राक्षस आणि किन्नर हे सुध्दा महाकाल यांचे पूजक होते. त्यांची प्रतिकृती शेंदूर लांबवलेल्या दगडावरून दिसून येते.
![]() |
![]() |
![]() |
![]() | ||
|



![]() . ![]() |
![]() |
| भग्न अवस्थेतील मुर्त्या |
![]() |
| खांबावरील आणि ईतर नक्षीकाम |
![]() |
महाविष्णुंचे मंदिर, "महाविष्णु" नावाचा वापर करणारे अत्यंत बुद्धिमान आणि भागवत ज्ञानामध्ये पारंगत असतात. म्हणुन या ठिकाणाच्या पवित्रतेविषयी मी कल्पना करु शकतो. ![]() ![]() |
सप्ततीर्थ पुष्करणी :-

![]() |
| गुहेतील शिवलिंग |
| केदारेश्वर लेणी |
![]() |
| या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते. पाण्याची खोली साधारण छातीपर्यंत येते. |
![]() |
| केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग |

गणेश गुहा :
तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. त्या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावीत. या लयनसंकुलात एकुण तीन लेणी समुह आहेत. डोंगराच्या पुर्व टोकाकडील पहिल्या लेण्यासमोर प्रांगण असून प्रांगणाच्या पश्चिमेस छोटी पाण्याची टाकी आहे. ५.०३ मीटर लांबी असलेल्या या चौरसाकृती लेण्यात तीन बाजुंना काहीसे ठेंगणे असे सलग कट्टे आहेत. हे वैशिष्ट्य वज्रयान लेण्यात दिसून येते. या लेण्याचे प्रवेशद्वार केवळ १.२ मीटर उंचीचे असून त्यावर कोणतेही थर नाहीत. या लेण्यापासून ८ ते ९ मीटर अंतरावर दुसरे लेणे आहे.समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. या लेण्यासमोर प्रांगण असून प्रांगण संपल्यावर ७.१६ मीटर रुंदीचा मुखमंडप लागतो. या मुखमंड्पाला पुढे दोन स्तंभ असून मागील भिंतीत एक छोटे द्वार आहे. या द्वारातून आत गेल्यावर मुख्य मंडप लागतो. या मुख्यमंड्पाच्या मागील भिंतीत त्यामागे असलेल्या कक्षात जाणारे द्वार आहे. या मंडपाच्या उजव्या भिंतीत एक आणि मागील भिंतीत दोन अश्या एकुण तीन खोल्या आहेत. या तीनही खोल्यात शयन ओटे आहेत.
![]() |
या गणेश गुहेच्या आसपास असलेल्या गुहेत तसेच हरिश्चंद्रेश्वर मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या गुहेत राहण्याची सोय होते. गडाचा हा परीसर पाहुन गुहेत मुक्काम करावा.
तारामती शिखर :-

![]() |
| महाराष्ट्राचे दुस-या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर "तारामती".. (पहील्या क्रमांकाचे कळसुबाई आहे) |



![]() |
| तारामती शिखराकडे जाताना उंचावरुन दिसणारे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि पुष्करणी. |








कोकणकडा:
![]() |
| कोकणकडयाचा अंतर्वक्र भाग. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. |
![]() |
| भव्य हिमालय तुमचा आमचा ... केवळ माझा सह्यकडा ! |
![]() |
| या बाजुनेच येते नळीची वाट |



कड्यावरून अतिशय दुर्मीळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे.
"इंद्रव्रज" याचा योग येणे कठीणच...भौगोलिक आणि वातावरणातील परिस्थिती जेव्हा एकरूप होते, त्याच वेळी याचे दर्शन घडते.
ते अद्भुत दृश्य पश्चिमेस धुके आणि पूर्वेकडून सूर्यप्रकाश असला आणि रिमझिम पाऊस सुरू असला तरच दिसू शकेल. अशा विशिष्ट वेळी साईक्स घोड्यावरून रपेट मारत तेथे आला आणि त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह त्याची प्रतिमा समोरच्या गोलाकार इंद्रधनूत पाहण्यास मिळाली. तो अचंबित झाला. कडा पाहण्यासाठी मंदिरापासून पश्चिमेस दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.
कोकणकडा प्रस्तरारोहण :-
हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा हे सह्याद्रीत भ्रमंती करणार्या प्रत्येक ट्रेकरचा हळवा कोपरा. मात्र केवळ कडे, सुळके यांना दुरून पहाण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्यावर चढाई करुन त्यांच्या माथ्यावर पाउल रोवून त्या आवाहनाचा सामना करणार्या प्रस्तरारोहकांनी कोकणकड्याचे जवळपास अशक्यप्राय आव्हान स्विकारले आणि मानव जिद्दीच्या जोरावर काय करु शकतो, याचे उदाहरण घालून दिले. डोंबिवलीच्या गिरीविराज संस्थेने कोकणकडा प्रस्तरारोहण मोहीम यशस्वी पार पाडली, त्यातील हि काही छायाचित्रे.
गिर्यारोहकांनी कोकणकडा अवरोहन एकूण चार टप्प्यांत करण्यात आले. अंतर्वक्र असलेला यातला पहिला ९०० फुटांचा टप्पा हा सर्वात अवघड आणि रोमांचक मानला जातो. पुढच्या तीन टप्प्यांतील आरोहण पूर्ण केल्यानंतर खालच्या तीव्र उतार असलेल्या भागात पोहोचल्या नंतर ट्रेक करत पायथ्याशी पोहोचावे लागते. हजारो फूट दरी असल्याने उरात धडकी भरवणारा जो कोकणकडा आता पर्यंत फक्त वरुन पाहिला तो दोराच्या साह्याने चडून जाणे हा अत्यंत थरारक अनुभव असतो. कोकणकड्याचे रौद्रभीषण परंतु सुंदर रुप जवळून पहाता येते. मनातील भीतीवर मात करून केलेले गिर्यारोहणातील साहस जीवनात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देते.
हरिश्चंद्रगडावर असलेले खरे प्रश्न आणि गरज :
मध्यंतरी २०१५ साली ‘हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर धोकादायक भेग’ अशी बातमी आली.मुळात एका फोटोमध्ये लाल रेषेने दाखवलेला भाग तडा गेलाय असे दाखवले होते की जो एकूण कडय़ाच्या फार थोडा भाग म्हणता येईल आणि असे भासवण्यात येत आहे की कोकणकडा धोक्यात आहे.मुळात जी भेग दाखवली जात आहे ती कित्येक र्वष जुनी आहे. गेल्या काही वर्षांत कडय़ावरचा एक दगडही हललेला नाही. मात्र भूशास्त्रीय बदल हे अतिशय सावकाश पद्धतीने होत असतात. यामुळे आजच्या या भेगेकडे दुर्लक्ष करणे भविष्यात खूप धोकादायक ठरू शकते. कारण गडावर येणारे बहुसंख्य पर्यटक या कडय़ावरच रेंगाळत असतात. सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा आणि ५०० मीटर उंचीचा हा कोकणकडा अंतर्गोल आहे. उभ्या महाराष्ट्रात असा रौद्रभीषण कडा नाही. ती महाराष्ट्राची संपत्तीच आहे. यामुळे त्याला वाचवणे गरजेचे आहे. नैसर्गिक रचनेने बनलेला कोकणकडा आज महाराष्ट्राचे भूषण बनला पाहिजे होता. पण आज तो विद्रूप कसा दिसू शकेल आणि पैसा कसा खाता येईल या दिशेने प्रवास सुरू झाला आहे, असा संशय येतो. आतापर्यंत दोनदा कोकणकडय़ावर रेलिंग लावण्यात आले आणि कडय़ाचे सौंदर्य विद्रूप करण्यात आले. महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांनी ते बाजूला काढून ठेवले असता पुन्हा नवीन खर्च दाखवून ते पुन्हा उभे करण्यात आले. त्यानंतर मात्र ते गिर्यारोहकांनी उखडून दरीत फेकून दिले. यामागचे कारण असे की वादळी पावसात लोखंडाकडे वीज आकर्षित होते आणि त्याचे झटके गिर्यारोहकांना बसलेले आहेत.
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर दारू पिणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. कडय़ावरच्या पाटर्य़ामुळे उंदीर वाढले आहेत आणि त्यामुळे सापांची संख्यासुद्धा वाढते आहे. (या पाटर्य़ाविषयी गावकऱ्यांच्या तक्रारीवर स्थानिक आमदाराने दिलेले उत्तर असे की त्याशिवाय पर्यटन वाढणार नाही. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.) गडावरच प्लास्टिक खाऊन आसपासच्या गावामधल्या गुरांच्या संख्येवर मोठा फरक पडलेला आहे. हरिश्चंद्रेश्वर या मंदिरावर सोनकीची फुले उगवली आहेत जे त्या वास्तुरचनेसाठी अत्यंत धोकादायक आहे आणि त्याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत आहे.
हरिश्चंद्रगडाचा प्रचंड विस्तार बघता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात शिबंदी म्हणजे सैन्यबल असणार हे नक्की. इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती म्हणजे त्याप्रमाणात पाण्याची व्यवस्था हवीच. याचा अर्थ गडावर तसेच जलव्यवस्थापन हवे. सध्या जरी गडावर पाण्याची टाकी आणि पुष्करणी असली तरी आवश्यक त्याप्रमाणात पाण्याचा साठा नाही असे दिसते. याचा अर्थ अजूनही गडावर पाण्याचा साठा करण्याची व्यवस्था असणार. असाच एक तलाव हरिश्चंद्रगडावर असल्याचा अंदाज दुर्गभ्रमंती करणारे नाशिकचे श्री. प्रशांत परदेशी यांनी शोधला.त्याचा वृत्तांत त्यांच्याच शब्दात !
पुरातन बंधारा हरिश्चंद्रगडावरचा ancient water resiorvior of harishchandra fort
कातळात खोदलेली टाकी गडाच्या चहुबाजूंना असायला हवी होती, ती का नाहीत? हा प्रश्न नेहमी सतावत होता. गडाला चहुअंगांना नैसर्गिक तटबंदी असल्याने मोठ्या संरक्षणाची आणि पर्यायोने गडाच्या सुदूर भागात पाण्याच्या फार मोठ्या नियोजनाची गरज भासली नसावी? या शक्यतेवर विश्वास नव्हता, परंतू कुणाच्या सांगण्यात किंवा वाचनातही अशा व्यवस्था असल्याची माहिती मिळत नव्हती. २५ नोव्हेंबरला कोकणकड्याची उत्तर बाजु व डोंबांच्या डोंगराच्या मधल्या मार्गाने, अर्थातच प्रचलित अशा नळीच्या वाटेने नाशिक-पुणे-मुंबई अशा विविध ठिकाणच्या २० डोंगरभटक्यांनी ट्रेकसोल्सच्या झेंड्खाली एकदिवसाची छान भटकंती केली आणि अचानक एके ठिकाणी एका भल्या मोठ्या तलावाच्या अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले. एक तर या तलावाची अभ्यासकांकडे नोंद आहे की नाही याची मला काहीच माहिती नाही, परंतू ती असेल त या तलावाविषयी फार गांभीर्याने बघितले गेले नसावे, अन्यथा तो असा दुर्लक्षित राहिला नसता. असा प्राचीन तलाव, हरिश्चंद्रगडासारख्या ठिकाणी म्हणजे इतिहासातला मोठा खजिना आहे.या दोन लिखाणांच्या प्रती हाती आल्यावर त्यावर अधिक प्रकाश पडू शकेल. तुर्तास तरी असेच दिसते की, एकतर कोकडकड्यावरचा हा मोठा बशीच्या आकाराचा तलाव अभ्यासकांना, पुरातत्ववेत्त्याना एकतर ठाऊक नाही, किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भात माहिती असूनही त्याचे जतन, जिर्णोद्धार करण्याची कोणी तसदी घेतली नाही. त्यामुळे इतिहासातला अनमोल ठेवा आज अक्षरश: गाळ बनून दडला गेला आहे. त्यावरची धुळ कोणी झटकेल का?
![]() |
| सप्तीतीर्थ पुष्कर्णी...यातील चौदा विष्णू मुर्ती आता हरिश्चंद्रेश्वराच्या गुहेत अडगळी सारख्या टाकून दिल्या आहेत... |
![]() |
| हरिश्चंद्रगडावर अलिकडेच दिसणारे साधूबाबा |
रविवारचा दिवस आमच्याकरिता सह्याद्रीतल्या एका अविस्मरणीय भटकंतीचा होता. नळीच्या वाटेच्या चढाईचा प्रत्यक क्षण ह्याद्रीतल्या एका उत्तभ भटकंतीला आल्याचा आनंद पदोपदी मिळवून देत होता. खरे तर नळीच्या वाटेबद्दल जितके ऐकुन होतो, त्यामानाने ही वाट बघण्याचा योग इतका उशिरा का आला याचे माझे मलाच आश्यचर्य वाटत आहे.
![]() |
| तलावाचे मुख्यस्त्रोत असलेल्या ओढ्यावरची बंधार्याची भिंत कोसळली आहे... |
आमची कन्या गार्गी हिची पहिलीच हरिश्चंद्रगड भेट असल्याने तिला कोकणकड्याचे दिव्य दर्शन घडले. त्यानंतर आम्ही ओढ्या लगतच्या झाडाच्या सावलीत दुपारच्या जेवणाकरिता विसावलेल्या आमच्या चमूत सामिल झालो. बेलपाड्यावरून कमा पोकळा यांच्याकडून पिठलं आणि तांदळाच्या भाकरी बांधन घेतल्या होत्या, परंतू सतत पाणी पिल्यामुळे जेवण काही जात नव्हते. बाकी मंडली मात्र सफरचंद, चिक्की, खजूर, लाडू, असे विविध पदार्थ सादर करत होती. पोटपूजा आटोपून आमच्यात जे प्रथमच या ठिकाणी आले आहेत त्यांना तारामतीच्या शिखराकडे रवाना करून आम्ही आठ दहा जणांनी झाडाच्या सावलीत मस्त ताणून देण्यासाठी जमिनीला पाठ टेकवली.

बशी सारखा आकार
वेस्टर्न ट्रेकर्स संस्थेच्या प्रस्तरावरोहण मोहिमेकरिता बरेच सहभागी आले होते. आसपासच्या झोपड्यात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या मोठ्याने बोलण्यामुळे झोप काही लागत नव्हती.
पुण्याचे आर्किटेक्ट केळकर हे ईशान्य दिशेकडे गेले, परतल्यावर त्यांनी हा तलाव असावा अशी शक्यता बोलून दाखवली. समोरच्या बाजुला तलावाच्या भिंतीचे दगड बघितल्याचे त्यांनी सांगितले. लागोलाग मी व मोहिम प्रमुख डॉ. हेमंत बोरसे आम्ही चाचपणी केली तेव्हा खरोखरच ओढ्याच्या मोठ्या प्रवाहावर दोन चौकोनात तासलेल्या लंबाकृती शिळा दिसल्या. त्याच्या आजुबाजूला आणखी काही चौकानी तासलेल्या शिळा इस्तत: विखुरलेल्या दिसल्या.

कोकणकड्याकडे जाताना तारामतीच्या खालच्या पठारी भागातून आग्नेय बाजूने एक ओढ्यचा प्रवाह आहे, या प्रवाहाचे पाणी या तलावाचा मुख्य स्त्रोत आहे. याचा आकार बशी सारखा असून तळाला तो खोलगट आहे. पूर्व बाजूने दगडांची भली मोठी भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत सोडल्यास बाकी सगळे काठ हे नैसर्गिक आहेत. त्या भिंतीच्या चिरांना झाडी झुडपांनी वेढल्यामुळे ती लक्षात येत नाही.

पुरातन बंधारा मुक्कामाचे ठिकाण?
वर्तुळाकार अशा नैसर्गिक खोलकट भागाला घातलेला हा पुरातन बांध असून आसपासचे इतरही प्रवाह यात येऊन मिळतात. या भागात पावसाचे खुप जास्त प्रमाण असल्याने तो लवकर भरून त्याचे जास्तीचे पाणी त्या भिंतीवरून वाहून जाण्याची त्या काळी व्यवस्था केली असावी. गडाच्या एकुण विस्ताराच्या मानाने हा बंधारा छोटा असला तरी हरिश्चंद्रेश्वर मंदिरा समोर असलेल्या सप्ततीर्थाचा शंभरपट जास्त पाणीसाठविण्याची याची क्षमता असावी. पुरातत्व विभागाने किंवा जिज्ञासूंनी या तलावाचा अभ्यास केला तर त्याच्या पोटात दडलेल्या गाळात न जाणो कुठल्याशा जुन्या इतिहासाचे काही संदर्भ मिळू शकतील. दुर्दैवाने त्याचे महत्व न समजल्याने या ठिकाणी आता पर्यटकांचे तंबु लागतात.

मधल्या काळात वनखात्याने हरिश्चंद्रगडावर भेट देण्यासाठी येणारे लोक प्लास्टिकचा कचरा अफाट प्रमाणेवर इस्तत: फेकून पर्यावरणाची हानी करतात ही सबब सांगून गडावर रात्रीच्या मुक्कामीची बंदी घोषित केली होती. ती बंदी कधी उठविली? नियमीत व सर्व नियमांचे पालन करून ट्रेक करणार्या भटक्यांना अजून पर्यंत यांची माहिती कळविण्यात आलेली नाही. पायथ्याला मात्र सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच वेळ गडावर राहता येइल, असे दोन फलक आहेत. त्यामुळेच नळीच्या वाटेसारखी खडतर चढाई केल्यानंतर आम्ही गडावर मुक्कामाचे नियोजन केले नव्हते. आदल्या दिवशी मात्र येथे हजार लोक मुक्कामाला होते अशी माहिती मिळाली. ही संख्या किमान पाचशे तरी असावी. या सगळ्यांचे तंबु या प्राचीन बंधार्याच्या पात्रातच लागले होते हे विशेष.








कोकणकड्या लगत काही वर्षांपर्यंत या भागात कार्वीची उंच व जाड बुंधा असलेली प्रजाती बघायल मिळायची. हा बुंधा माणसाच्या मनगटा इतका जाड असायचा. यंदा ती कारवी दिसली नाही. आमची गड सोडण्याची वेळ समीप आली होती. ३-३७ वाजता हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरात पोहलो. या परिसरातली भग्न मंदिरे व पुरातत्वीय भग्नावशेषातही मन पार रमून जाते. तासभर या परिसरात व्यतित केल्यानंतर आम्ही पाचनईला पोहोचलो तेव्हा अंधार दाटला होता.
रेड बोलची कपार
पाचनई गावातून गडाची चढण चढताना अंगावर येणाऱ्या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांच्या दोन थरांच्या मध्ये लाल-हिरवी राख सापडते. तिला भौगोलिक भाषेत ‘रेड बोल’ म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले, मोठमोठ्या भेगा पडल्या, भ्रंश झाले. त्यानंतर त्या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. त्या नैसर्गिक घटना तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. सोसाट्याचा वारा, धो-धो कोसळणारा पाऊस त्यावर तुटून पडला. उन्हाचा आणि थंडीचाही त्यावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे सतत क्षरण कार्य होत राहिले. मूळचे भू-आकार पुन्हा बदलू लागले. काही पर्वतांची उंची कमी होऊ लागली आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहांनी दऱ्या खोल होत गेल्या. तेथील नव्वद टक्के झीज पावसाने केली असून, त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली!
गड परिसरातील जैवविविधता
भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर आहे. त्या बाबतीत ‘हरिश्चंद्रा’चे जंगल देशातील समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सरपटणारे प्राणी या सगळ्यांचे तेथे वैपुल्य आहे. गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासून परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.
गडाच्या माथ्यावर उत्तराभिमुख उतारावर सदाहरित जंगलाचा हिरवाजर्द पट्टा दिसतो आणि पठारावर असंख्य अल्पजीवी वनस्पती आढळतात. त्या पावसाळ्यात सजीव होतात. तेथे सुमारे पाच हजार मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळतो. पावसाळा सुरू झाला की एरवी भकास वाटणारी तेथील पठारे हिरव्या चैतन्याने बहरतात. राजतेरडे, रानतीळ, रानकांडे, रानलसूण, सोनकी, पालेचिराईत, डायसोफिलिया, सायप्रस, शेराला अशा असंख्य अल्पजीवी वनस्पती सर्वत्र डोकावू लागतात. त्यांना फुलेही अवघ्या पंधरवड्यात येऊ लागतात. पठार जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, गुलाबी अशा विविधरंगी रंगछटांनी नटून जाते. जुलै ते ऑक्टोबर या काळात पठारावर फुलोत्सवच सुरू असतो.
हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जांभूळ, रामेठा, बामणी, दिंडा, सुरुंगी, फापती, करवंद, आंबा, पळस, फणस, शाल्मली, हिरडा, पळसवेल, पांढरी आदी वृक्ष आढळतात. वृक्षांची उंची कमी असते. घनदाट वृक्षांवर चढलेल्या राक्षसी वेली आणि खाली दाट उंच गवत, हे तेथील जंगलाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी त्या लाकडांचा उपयोग नाही. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उपयुक्त नसल्याने जंगलतोडीचे प्रमाण कमी आहे. मात्र जैविकदृष्ट्या त्या वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कारवी ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती सह्याद्रीच्या माथ्यावर हजार-बाराशे मीटर उंचीवर आढळते. तिचे विपुल अस्तित्व हरिश्चंद्रगडाच्या चहुबाजूंनी आहे. ती दर सात वर्षांनी जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरते. वनस्पती फुललेल्या काळात पाहणे, ही अपूर्व आनंद देणारी घटना असते. कारवीने डोंगरउतारावरील मातीचे संधारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. गिरिभ्रमण करणाऱ्यांनाही कारवीचा मोठा आधार तीव्र चढणीच्या अवघड पायवाटेने चढत असताना असतोच. अन्यथा डोंगरउतारावरील खोल दरीकडे पाहून अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहिले नसते. कोणत्याही रस्त्याने गडावर जाताना कारवीची भेट होतेच. फुले येऊन गेल्यावर कारवी मरते. नव्या कारवीचा दरवर्षी जन्म होतो.
तारामती शिखराच्या उत्तर उतारावरील विस्तीर्ण पठारावर मोठी झाडी, झुडपे कमी असली तरी असंख्य अल्पजीवी वनस्पतींचे वसतिस्थान तेथे आहे. अभ्यासकांनी त्याबाबत अभ्यास व सर्वेक्षण केले आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या गवतामुळे आणि दिवसादेखील तालात गाणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाने भकास वाटणारे ते निर्जन पठार पावसाळ्यात चैतन्याने न्हाऊन निघते. पिवळी सोनकी फुलल्यावर सारे पठार पीतवर्णी शालू पांघरते. कळलावी, चित्रक, देवनाळ, शतावरी, पांढरी यांसारख्या दुर्मीळ औषधी वनस्पतींचा तेथे आढळ आहे.
कळसुबाई अभयारण्यात कोल्हे, रानडुकरे, तरस, भेकर, खोकड, ससे, बिबटे, रानमांजर, साळींदर व भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते शेकरू त्या परिसरात आढळतात. मात्र बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गरुड, ससाणे, खंड्या, बुलबुल, पर्वत कस्तूर, सुतार, मोर, तित्तर, पारव, घार, सुभग या पक्ष्यांचाही तेथील परिसरात वावर असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, फुरसे, घोणस, मण्यार या जातींचे विषारी साप त्या भागात आढळतात. विषारी- बिनविषारी इतर सापांचेही वास्तव्य असतेच.
संशोधन व सर्वेक्षण
गडावर पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. ३१ डिसेंबरला तर तेथे जत्रेचे स्वरूप येते.
शिलालेखांचा उल्लेख १८८४ च्या नगर जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये आढळतो. त्यात जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांचा समावेश आहे. शिलालेख वाचण्याचे काम वि. भि. कोलते, रा. चिं. ढेरे या देशी संशोधकांनी केले. त्याशिवाय म.रा. जोशी, आनंद पाळंदे, गो,नी,दांडेकर, राजेश्वर गोस्वामी, मिलिंद बोकिल आदींनी त्या गडाला भेट देऊन इतिहास, भाषा व आध्यात्मिक दृष्ट्या अभ्यासात भर घातली. ज्ञानदेवादी भावंडेदेखील तेथे येऊन गेल्याचा उल्लेख यात्रापर्वात एका लेखात आढळतो. तो लेख सुवर्णाक्षरांनीच मढवण्यात यावा अशी ‘गोनीदां’ची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
गड तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचेही आकर्षणबिंदू ठरल्याचे उपलब्ध कागदपत्रे व नोंदींवरून दिसून येते. साईक्स नावाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने तर तेथे बांधकामही केले होते. त्याचे अवशेष तेथे दिसतात. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरित्रात, ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) गडावर आल्याचा उल्लेख आहे. त्यांना गडावरच थंडी वाजून आल्याने त्यांना डोली करून खाली नेण्यात आल्याचा मजकूर त्यांच्या चरित्रात आहे.
त्याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक तेथे येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायांचे अवशेषही तेथे सापडतात.
तेथील वनस्पतीसृष्टीचे संशोधन ब्रिटिश काळापासून सुरू झाले आहे. १९०८ सालात तत्कालीन मुंबई इलाख्याचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी) वनस्पती शास्रज्ञ डॉ. कुक यांनी तेथील झाड-झाडोऱ्याचा अभ्यास केला. १९६९ मध्ये पुणे येथील वनस्पती संरक्षणालयातील डॉ.बिलोरी व डॉ. हेमाद्री या दुकलीने तेथील तीनशेतीस जातींच्या वनस्पतींची नोंद केली आहे. त्याच विभागातील डॉ. सिंग व डॉ. प्रधान यांनी १९९० मध्ये गडाला भेट देऊन अभ्यास केला. तर संगमनेर येथील संशोधक प्रा. डॉ. मोहन वामन यांनी तेथील वनस्पतीसृष्टीचा तपशीलवार अभ्यास केला आहे. तेथील वनस्पतीसृष्टीचे ते महत्त्वाचे संशोधन मानले जाते. गुणवैशिष्ट्यांनुसार विश्लेषण करताना डॉ. वामन यांनी सहाशेएकोणतीस वनस्पतींची नोंद केली आहे. त्यात देशभरातूनच नामशेष होण्याच्या मार्गावरील ऐंशी औषधी वनस्पतींचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले आहे. तर सोळा प्रकारच्या ऑर्किड जातीच्या वनस्पती त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
भीमाशंकर अभयारण्य ज्या शेकरू जातीच्या खारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे, ती शेकरू तेथील तोलारखिंड परिसरात बऱ्यापैकी संख्येने दिसून येते. इतरही विविध प्राण्यांचे वसतिस्थान येथे आहे. तेथील प्राणिसृष्टीवर हवा तेवढा अभ्यास झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे तेथील भूगर्भशास्त्राच्या अभ्यासालादेखील बराच वाव असल्याचे दिसून येते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे, पाचनई, लव्हाळी, कुमशेत, खिरेश्वर येथील आदिवासींचे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. ते लोक महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात.
भाऊसाहेब चासकर
हरिश्चंद्रगडावरील मुक्काम आणि वाढणारे पर्यटन, काही प्रश्न :-
अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर एैसपैस पसरलेला हरिश्चंद्रगड हा भटक्यांची सर्वार्थाने 'पंढरी'. वर्षानुवर्षे येथे गडकऱ्यांचा राबता अव्याहतपणे सुरू आहे. गडावर असलेला मुबलक पाणीसाठा, मुक्कामासाठी उपलब्ध गुहा, एैसपैस पसरलेली वनसंपदा, ऐतिहासिक मंदिर यामुळे बारा महिने अभ्यासक, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स यांची मांदियाळी येथे जमलेली असते. हरिश्चंद्रगडावरचा कोकणकडा म्हणजे सह्याद्रीचा अदभुत आविष्कार, पावसाळा सुरू होण्याच्या आधी कधी गडावर आले तर 'इंद्रवज्रा'चे विस्मयकारक दृश्य येथे हमखास दिसते. गडाच्या या वैशिष्ट्यांमुळे हरिश्चंद्रगडावर मुक्काम न केलेला ट्रेकर सापडणे विरळा. या गडावरचा मुक्काम म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातली एक नितांत सुंदर अनुभूती असते. नव्वदच्या दशकापर्यंत, गडावर असणारे मंदिर आणि गुहा येथे ट्रेकर्सच्या मुक्कामाची सोय होत होती. कालांतराने पर्यटकांची गर्दी वाढू लागली. तशी गडावरच्या या गुहा आणि मंदिरातील जागा अपुरी पडू लागली. तेव्हा गडावरच्या मोकळ्या जागेत तंबू लावून मुक्कामाची सोय होऊ लागली. पर्यटकांची ही गरज ओळखून गावकऱ्यांनी हे तंबू लावून देण्याची व्यवस्था केली तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या चहा, नाश्ता, जेवणाची सोय हे गावकरी करू लागले. गडावर मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची सोय आयती उपलब्ध झाल्याने पर्यटकांची गर्दी बेसुमार वाढली. मानवी गर्दी वाढल्यामुळे पर्यायाने प्लास्टिकचा कचरा वाढायला सुरवात झाली. हा कचरा इतकी वाढला की गडावरचे पाण्याचे स्रोत दूषित झाले. गडावरचे वन्यप्राणी हा परिसर सोडून गडाखाली निघून गेले. हरिश्चंद्रगडाला लागलेले हे ग्रहण दूर करण्यासाठी राजूर वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी कडक पाऊल उचलली. गडावर होणारा मोठ्या प्रमाणातील कचरा, प्लॅस्टिकचे वाढलेले धोकादायक प्रमाण, कचऱ्यामुळे गडावरील वन्यप्राण्यांचे झालेले स्थलांतर यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना मुक्कामास बंदी घालण्यात आली आहे. हरिश्चंद्रगडावर गेल्या काही वर्षात टपरीवजा हॉटेले उभी राहिली आहेत. आजमितीला सुमारे पंचवीस ते तीस हॉटेले गडावर उभी आहेत. यातून स्थानिकांना रोजगार मिळतो पण या हॉटेलात येणारे पर्यटक आणि काही प्रमाणात हॉटेल मालकही गडाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे महत्त्व जाणत नाहीत. 'नाइट आउट'च्या नावाखाली गडावर उशिरापर्यंत चालणारा धुडगूस, 'बोन फायर'च्या नावाखाली जंगलातले मोठे मोठे ओंडके जाळणे, सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक गडावर सोडून जाणे, मद्यपींची वाढती संख्या, दारूच्या फुटक्या बाटल्यांचा खच यामुळे आत्तापर्यंत या गडाच्या पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हॉटेल मालकही त्यांच्याकडून होणारा कचरा हा गडावरच जाळून त्याची विल्हेवाट लावतात. यातून पर्यावरणाची अजूनच हानी होते. गडावर इतक्या जास्त प्रमाणात कचरा साठला आहे हा कचरा गडावरून खाली नेणेसुद्धा अशक्य झाले आहे. जागतिक वारसा असलेल्या पश्चिम घाटाच्या पट्ट्यात हा भाग येत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा हा भाग आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी यांची विपुल जैवविविधता या गडाच्या परिसरात आहे. या सर्व प्रकारांचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन वनविभागाकडून उशिरा का होईना पण ही कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी गडावरील हॉटेल चालकांना या सर्व प्रकाराची कल्पना देण्यात आली होती. पण हॉटेल चालकांच्या बेफिकीरपणामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे गडावर आता यापुढे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे तसेच गडावर संध्याकाळनंतर मुक्काम करण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता गडावर येणाऱ्या पर्यटकांना एका दिवसात गड बघून खाली उतरणे भाग आहे. कचरा पर्यटकांचा, मनस्ताप डोंगरयात्रींना हरिश्चंद्रगडावर झालेला कचरा आणि त्यामुळे मुक्काम करण्यास घालण्यात आलेली बंदी हे सह्याद्रीमधल्या गडकोटांची अवस्था दाखवणारे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
-------------------------------------
हरिश्चंद्रगडावर 'अति तिथे माती' असा प्रकार घडला आहे. त्यामुळे ही बंदी कधी ना कधी घातली जाणारच होती. किल्ल्यांवर फिरताना पर्यटक आणि ट्रेकर्स या दोघांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आपण जे काही प्लास्टिक गडावर नेतो ते आपणच खाली आणायला हवा. एक ट्रेकर म्हणून या मुक्काम बंदीच्या निर्णयामुळे मी नक्कीच हळहळलो आहे पण कचऱ्याचा गंभीर प्रश्न लक्ष्यात घेता या निर्णयाशिवाय गत्यंतर नाही. सोशल मिडीयामुळे सह्याद्रीमधल्या अशा ठिकाणांचा जास्त प्रसार होतो आणि पर्यटकांची संख्या वाढते. कधी कधी ट्रेकर्स मंडळींकडूनसुद्धा उत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. रांगणा किल्ल्यावर तटाचे दगड काढून चुलीसाठी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्वतःची जबाबदारी ओळखून भटकंती करणे आवश्यक आहे.
संदर्भ :-
१) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स२) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
३) दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
४) किल्ले - गो. नी. दांडेकर
५) दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
६) ट्रेक द सह्याद्रीज- हरिश कपाडीया
७) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
८) www.trekshitiz.com हि वेबसाईट
९ ) www.durgbharari.in हि वेबसाईट
१०) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
११) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर
१२) आव्हान - आनंद पाळंदे
१३) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
१४) महाराष्ट्रातील काही ताम्रपट आणि शिलालेख:- डॉ. वि.भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९८७.
१५) ज्ञानेश्वरी:- अध्याय १८ ओवी १७८४. संत ज्ञानेश्वर महाराज.
१६) तत्वसार:- (१०२९- ३३) चांगदेव महाराज.
१७) https://www.saptahiksakal.com/sakalsaptahik-trekstory-swapnil-khot-marathiarticle-2820
१८) https://www.prasannawagh.com, https://www.misalpav.com, https://kharadpatti.wordpress.com, https://reflectedmarathi.blogspot.com, http://sahayadriratna.blogspot.com हे ब्लॉग

प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
मंदिर आणि परीसर
प्रचि ०७
. कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे. गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो.
https://www.misalpav.com/node/35965
https://www.prasannawagh.com/2017/08/harishchandragad-sadhade-ghat-khiresshwar-sahyadri-ghatwat.html

![]() |
| गडावरीक एक फुल... |
https://reflectedmarathi.blogspot.com/2014/12/blog-post.html
https://kharadpatti.wordpress.com/2012/03/21/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/
दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावरील शिलालेख'
'हरिश्चंद्रगड' येथील हे सर्व शिलालेख जर आपण नीट बघितले तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे या शिलालेखांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आपल्याला कोरलेली दिसून येतात. ह्या शिलालेखांच्या मध्ये जी व्यक्तींची नावे दिसतात ती नावे म्हणजे 'हरिश्चंद्रगड' येथे राहणारे 'योगी' किंवा 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिरात दर्शनाला आलेले 'भक्त' याबाबत कोणतीही शंका आजिबात नाही. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमध्ये क्रमांक १ आणि ४ हे शिलालेख खूप महत्वाचे आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये 'चक्रपाणी वटेश्वर' हा उल्लेख आढळतो आणि क्रमांक ४ शिलालेखात आपल्याला जे नाव दिसते ते म्हणजे 'चांगा वटेश्वर' हे अत्यंत महत्वाचे नाव दिसून येते.
प्राचीन महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचे संत होऊन गेले ते म्हणजे 'चांगा वटेश्वर'. हे 'चांगा वटेश्वर' म्हणजेच 'चांगदेव' नावाचे प्रसिद्ध संत. 'चांगदेव महाराज' यांचे गर्वहरण 'ज्ञानेश्वर' महाराजांची बहिण संत 'मुक्ताबाई' यांनी 'कोरा' असे संबोधून केले. या गर्वहरणानंतर 'ज्ञानेश्वर' महाराजांनी 'चांगदेव महाराज' यांना उद्देशून 'चांगदेव पासष्टी' हा ग्रंथ लिहिला. 'चांगदेव महाराज' यांनी लिहिलेल्या अभंगामध्ये ते स्वत:ला 'चांगा वटेश्वर' आणि 'वटेश्वर चांगा' असेच संबोधले आहे. 'चांगदेव पासष्टी' या ग्रंथामध्ये 'ज्ञानेश्वर महाराजांनी' 'चांगदेव महाराज' यांना जी ओवी लिहिली आहे ते पुढीलप्रमाणे:-
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥
चांगदेवा! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत; त्याचाच तू पुत्र आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना! तसा तू परमात्मस्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्यामाझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतींने आहे ते तू आता ऐक! ॥३७॥
या वरील ओवीमध्ये आपण नीट पाहिले तर 'चांगदेव महाराज' यांना 'वटेश्वराचा पुत्र' असे म्हटलेले आहे. तसेच संत 'मुक्ताबाई' यांच्या अभंगात देखील 'चांगदेव महाराज' यांचा उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-
संत 'मुक्ताबाई' यांनी 'चांगदेव महाराज' यांचा केलेला हा उल्लेख अत्यंत महत्वाचा ठरतो. 'तत्वसार' हा ग्रंथ स्वतः चांगदेव महाराज यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये ते स्वत:चा उल्लेख जो करतात तो पुढीलप्रमाणे:-
या अभंगावरून हे सिद्ध होते की 'वटेश्वराचा सुतु' आणि 'वटेश्वर सुत' म्हणजेच 'चांगदेव महाराज' हेच आहेत यामध्ये काही शंका उरत नाही. तसेच 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'चांगदेव महाराज' यांना 'चक्रपाणी' असे देखील संबोधलेले आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे । परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥
ओवीचा अर्थ:-
अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी(चांगदेव )यांना ज्ञाननिष्ठ (डोळस) केल्यामुळे त्यांचे आरसे(ज्ञानदेव आणि ते स्वतः) परस्परांना पाहताना आपआपसातला भेद विसरून गेले.
या ओविवरून आपल्याला हे समजून येते की 'चांगा वटेश्वर' आणि 'चक्रपाणी वटेश्वर' ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. या व्यक्ती कोणी भिन्न नाहीत हे यामधून आपल्याला समजते. 'हरिश्चंद्रगड' येथील चौथा शिलालेख जो आहे त्यामध्ये 'चांगा वटेस्वर' असा उल्लेख आलेला आहे. 'चांगा वटेस्वर' म्हणजे 'तत्वसार' ग्रंथाचे निर्माता आहेत. या तत्वसार ग्रंथाच्या शेवटी त्यांनी स्थळाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-
हरिश्चंद्र नाम पर्वतु | तेथ महादेव भक्तु
सूरसिद्धीगणींं विख्यातु | सेवेजी जो ||
हरिश्चंद्र देवता | मळगंगा सरिता ||
सर्वतीर्थ पुरविता | सप्तस्थान ||
ब्रम्हस्थळे ब्रम्ह न संडीतु | चंचळ वृक्षु अनंतु
लिंगी जग्गनाथु | महादेओ ||
ऐसा सर्वांचा समाओ | कळी संसारू दु:खाचा प्रवाहो
तो देओ मोक्षाचा उत्साओ | शनै: शनै: ||
जो तीर्थांंसि तीर्थ | केदारेसिंं तुकिताति
आणि क्षेत्रिं निर्माती | प्रबंधु हा || (तत्वसार:-१०२९- ३३)
या तत्वसार ग्रंथाच्या श्लोकामधून एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे 'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे. याच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिर आपल्याला पाहायला मिळते तसेच 'केदारेश्वर' हे मोठे शिवलिंग देखील 'हरिश्चंद्रगड' येथे आहे. एकंदरीतच 'हरिश्चंद्रगड' येथे मोठ्या प्रमाणात सिद्ध योगी हे राहात असावेत हे वरील शिलालेखांच्यावरून समजते.

'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे.
वरील शिलालेखांच्यापैकी आपण जर शिलालेख क्रमांक १ आणि शिलालेख क्रमांक ४ जर नीट पाहिले तर त्यामध्ये क्रमांक १ शिलालेखामध्ये आपल्याला 'वटेश्वरनंदनु चक्रपाणी' हे नाव आढळून येते तसेच क्रमांक ४ शिलालेखामध्ये 'वटेश्वराचा चांगा' हे नाव आढळून येते. यामधील 'चक्रपाणी' हे नाव 'चांगदेव महाराज' यांचे दुसरे नाव आहे. तसेच 'चांगा' हे नाव देखील त्यांचेच आहे असे दिसते. तसेच शिलालेख क्रमांक ३ यामध्ये 'वटेश्वर नंदनु' असे नाव दिसते. या शिलालेखात 'चक्रपाणी' याचा 'सुत' म्हणजे शिष्य असल्याचे म्हटले आहे. या शिष्याचे नाव 'विकटदेव' असे आहे. आता हा 'विकटदेव' कोण हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांचे म्हणणे आहे.
'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा आहे. हा शिलालेख देखील 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी वाचायचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी या शिलालेखाचे दोन भाग केलेले आपल्याला दिसतात पहिल्या भागाचे वाचन हे '[नि]वृत(ति) पुत्र ज्ञाना(न)देउ नाम(दे)उ' वारी हे वाक्य आहे. या वाक्यावरून मात्र हे समजते कि महाराष्ट्रातील काही मोठे संत हे देखील 'हरिश्चंद्रगड' येथे त्यांची वारी झाली असावी. यामध्ये एक गोष्ट महत्वाची बघायला पाहिजे म्हणजे आपल्याला वरील शिलालेखातील संदर्भ समजण्यास मदत होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांचे बंधू आणि गुरु हे 'निवृत्तीनाथ महाराज' हे होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'निवृत्तीनाथ महाराज' यांच्याकडूनच 'गुरुपदेश' घेतलेला होता. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरी' मध्ये पुढीलप्रमाणे लिहितात:-

ते माहेशान्वयसंभुतेंं | श्रीनिवृत्तीनाथसुतेंं | केले ज्ञानदेवें गीते | देशीकार लेणे ||१८०६|| (अध्याय १८)
ज्ञानेश्वरीमधील या वरील ओवीमध्ये आपल्याला 'निवृत्तीसुत' असा शब्द दिसतो. यामध्ये 'निवृत्तीसुत' म्हणजे 'सुत' म्हणजे 'शिष्य' या अर्थाने उपयोग केला आहे. तसेच याच अर्थाने 'चांगदेव पासष्टी' मध्ये ओवी क्रमांक ३७ मध्ये 'शिष्य' या अर्थानेच पुत्र हा शब्द वापरलेला आहे. 'चांगदेव पासष्टी' मधील ओवी क्रमांक ३७ पुढीलप्रमाणे:-
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥
यामध्ये 'तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे. म्हणून वरील 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ अत्यंत महत्वाचा आहे. तसेच वरील शिलालेख क्रमांक ५ यामध्ये 'नामदेउ' हे देखील नाव आलेले आहे. हे 'नामदेउ' म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून 'नामदेव महाराज' हे होत. या वरील शिलालेख क्रमांक ५ यावरून मात्र असे दिसते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सर्वजण 'हरिश्चंद्रगड' येथे नक्की येऊन गेले असावेत. जेव्हा हे मोठे संत 'हरिश्चंद्रगड' येथे आले असतील तेव्हा 'चांगदेव महाराज' हे देखील गडावर असतील. तसे 'हरिश्चंद्रगड' बघायला गेले तर 'हरिश्चंद्रगड' हे नाथपंथीयांचे एक महत्वाचे ठिकाण असावे. वरील शिलालेखावरून हे मात्र स्पष्ट होते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सगळेजण 'हरिश्चंद्रगड' येथे येऊन गेलेत हे नक्की. म्हणून 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा ठरतो.

तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे.
'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ मधील उत्तरार्धात जी नावे आलेली आहेत 'श्रीधरदेव' आणि 'हरीश्चंद्रदेव' ही दोन्ही नावे 'हरिश्चंद्रगडावरील' देवतांची नावे आहेत. आज 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला गणपती, शिव-पार्वती, विठ्ठल-रुक्मिणी, देवी ह्या देवता गडावर पाहायला मिळतात. तसेच शिलालेखातील 'श्रीधर' या नावामुळे गडावर एखादे 'विष्णूचे' मंदिर देखील असावे असे वाटते. दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगडावर' एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या वर जे देवकोष्ठ आहेत त्यामध्ये पूर्वी काही विष्णूमूर्ती होत्या याबाबत गो.नि.दांडेकर आपल्या 'दुर्गदर्शन' या पुस्तकात पान क्रमांक १६९ वर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-
देऊळ हेंंच गडावरलं एकटंं नवल नव्हे. आश्चर्याचा पहिला भर ओसरल्यावर मग धांंवत चहूंं दिशांना सुटलों. मंदिराचा प्राकार सोडून बाहेर पडलों, तो उजव्या तास हेमाडपंन्ती बांधणीचा एक तलाव दिसला. त्याच्या दक्षिण दिशेला काळ्या पाषाणांत बांधलेले चौदा कोनाडे, अन् अतिशय नवलाची गोष्ट अशी, की त्या चौदा नकशीदार कोनाड्यांंत चतुर्भुज विष्णूच्या चौदा मूर्ती! चारी हातांंतील आयुधांच्या जागा मात्र निरनिराळ्या.
'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ 'हरी[श्चं]द्र देवो' हा जो उल्लेख आलेला आहे तो 'हरिश्चंद्रगड' येथील गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे या 'हरीश्चंद्रदेव' यावरूनच या पर्वताचे नाव 'हरिश्चंद्रगड' असे पडले आहे. तसेच मागील एका लेखामध्ये आपण 'हरिश्चंद्रगड' याचे नाव कसे पडले याबाबत देखील आढावा घेतला तो देखील संदर्भ नक्की पाहावा.

गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे.
'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमधून अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक १, शिलालेख क्रमांक ३ आणि शिलालेख क्रमांक ४ या सर्व शिलालेखांच्यामध्ये 'वटेस्वर' या नावाचा उल्लेख आलेला दिसतो. यामध्ये शिलालेख क्रमांक ३ या लेखामध्ये 'श्री वटेस्वर शिवस्य प्रणति:' असे म्हटलेले आहे. वटेश्वर म्हणजेच शिव हे यावरून आपल्याला समजायला मदत होते. 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक २ यामध्ये 'गुहेश्वर भैरव' हे 'हरिश्चंद्रगड' येथील देवतेचे नाव असावे किंवा एखाद्या तेथे राहणाऱ्या 'भैरव' या योग्याचे देखील नाव असावे. शिलालेख क्रमांक ६ मध्ये देखील काही नावे आहेत परंतु ती नावे अस्पष्ट झाली असल्याने त्यांचा अर्थ लागत नाही.
'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ७ या शिलालेखात 'नंदनाथ' तसेच 'गयनाथ' ही नावे आलेली आहेत. तसेच शिलालेख क्रमांक ८ मध्ये 'दखिणनाथ' आणि त्यांचा शिष्य 'सकपनाथ' यांची नावे आलेली आहेत. परंतु या व्यक्ती कोण आहेत हे मात्र 'डॉ. वि. भि. कोलते' यांना हे माहिती नाही असे ते सांगतात. तसेच 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी एक अनुमान याबाबत असेही काढलेले आहे कि हे कोणी नाथसंप्रदायातील योगी आहेत हे स्पष्ट होते मात्र हे 'गयनाथ' म्हणजे गहिनीनाथ असावेत काय? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. वरील सर्व शिलालेख पाहता आपल्याला असे मात्र दिसून येते कि 'हरिश्चंद्रगड' हे नाथपंथीयांचे खूप महत्वाचे ठिकाण होते.

'हरिश्चंद्रगडावरील' या आठ शिलालेखांच्या बद्दल आपल्याला आणखी उल्लेख मिळतो तो म्हणजे 'साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची' या 'प्र. के. घाणेकर' यांनी लिहिलेल्या ८४ क्रमांकाच्या 'हरिश्चंद्रगड' या प्रकरणात पान क्रमांक ३२५ येथे आठ शिलालेख असा उल्लेख केलेला असून यामध्ये प्र.के.घाणेकर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-
याच परिसरात एकंदर आठ शिलालेख आहेत. पहिला आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्राकाराच्या दर्शनी भिंतीच्या बाहेरील प्रवेशद्वाराचे डावीकडे. दुसरा व तिसरा केदारेश्वर लेण्याच्या मधल्या दोन खांबावर मध्यभागी. चौथा आहे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरातील लेण्याच्या दर्शनी डाव्या खांबावर, तर पाचवा, सहावा, आणि सातवा तेथेच आहेत. आठवा मात्र हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूने ओट्यावरील गणेशमूर्तीच्या मागील चौकटीवर, माथ्याच्या भागात आहे. पहिल्या व चौथ्या लेखांत चांगा वटेश्वराचा म्हणजे योगी चांगदेवांचा उल्लेख आहे.

दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे ८ ते ९ लेण्या आहेत.
तसेच शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर या पुस्तकामध्ये प्र.के. घाणेकर यांनी पान क्रमांक १०६ आणि १०७ यामध्ये 'प्र. के. घाणेकर' लिहितात ते पुढीलप्रमाणे:-
एका बाजूला सुटी श्रीगणेशमूर्ती. अलीकडेच तिलाही शेंदूर लावलेला दिसतो. या देवळाच्या पूर्व व दक्षिण दिशांना डोंगर खोदुन गुहा खोदलेल्या. पश्चिम व उत्तर (थोडा भाग) प्राकार भिंत पडून गेलेली. उत्तर प्राकार भिंतीवरील बाहेरील बाजूस प्रवेशद्वाराच्या डावीकडे खूप मोठ्या अक्षराचा अतिशय महत्वाचा शिलालेख:-
चक्रपाणी वटेश्वर:नंदतु तस्य सुतु वीकटदेॐ
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यामते प्राकार भिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजव्या हातासही काही अक्षरे आहेत. पुढे प्र. के. घाणेकर लिहितात हरिश्चंद्रगडावरील शिलालेखांचे वाचन करण्याचे २-४ प्रयत्न झाले. बहुदा पहिला श्री. गो. नि. दांडेकरांचा. दुसरा 'डॉ. वि. भि. कोलते' यांचा. तिसरा प्रयत्न 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांचा. 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांनी त्यांच्या 'चक्रपाणि' या ग्रंथात 'सिद्धपीठ हरिश्चंद्र' या लेखात खूप उहापोह केला आहे. श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागील लेण्याच्या दर्शनी दोन खांबांपैकी डाव्या दगडी खांबावर डावीकडील बाजूस एक लेख आहे:-
"(चां) गा वटेस्वराचा"
असे त्या शिलालेखाचे वाचन आहे. याच खांबावर दर्शनी बाजूस आणखी तीन लेख आहेत ते असे:-
१) (नि) वृत (ति) पुत्र ज्ञाना (न) देउ नाम (दे) उ वारी स्त्रीधर देवदेउ स्त्रीहरी(श्चं)द्र देवो
२) व्वाल्लर्वाकु सिवा स्त्री मह (हे) षाजचा
३) .....देवी स्त्रीनंदनाषु (थु)वावि गयनाषु (थु)
हे तिनही लेख खुपच अस्पष्ट झालेले आहेत. त्यांचे पूर्ण वाचन करून अर्थ लावणे फार कठीण झाले आहे. या पाच शिलालेखांशिवाय आणखी एक शिलालेख हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूच्या ओट्यावर बसविलेल्या श्रीगणेशमूर्तीच्या मागील चौकटीच्या माथ्याकडील भागात आहे. 'श्री दषि (खि) णनाथ का सिष सकपनाथ' तसेच या लेखाच्या वरच्या बाजूस 'म (य) नाथ' उथळ कोरलेली अक्षरे दिसतात.

दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' आज खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे. डोंगरभटके या किल्ल्यावर येतात कोकणकड्याला भेट देतात 'इंद्रवज्र' बघण्यासाठी अनेक तास घालवतात मात्र हे शिलालेख मात्र फार कमी जण बघतात तसेच त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख यांची आज मात्र दुरवस्था झालेली त्यामुळे ते वाचता नाही आले तरी त्यांचे जतन होणे फार महत्वाचे आहे.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१) Gazetteer of The Bombay Presidency Ahmadnagar:- पान क्रमांक 718, 719, 720, 1884.
२) Notes on The Ahamadnagar Collectorate Indian Antiquery (Year V):- पान क्रमांक ११, W. F. Sinclaire.
३) Cave Temples of India:- पान क्रमांक ४७८, Fergusson James and Burges James, 1880.
४) दुर्गदर्शन प्रकरण ११ हरिश्चंद्र दुर्ग:- पान क्रमांक १७०, १७१, गो.नि.दांडेकर, मृण्मयी प्रकाशन, २००४.
५) महाराष्ट्रातील काही ताम्रपट आणि शिलालेख:- डॉ. वि.भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९८७.
६) सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी:- पान क्रमांक १३२,१३६, ओवी ३७, ओवी ६२ ,संत ज्ञानेश्वर महाराज, संपादक ह.भ.प. दत्तराज देशपांडे, सारथी प्रकाशन.
७) तत्वसार:- (१०२९- ३३) चांगदेव महाराज.
८) ज्ञानेश्वरी:- अध्याय १८ ओवी १७८४. संत ज्ञानेश्वर महाराज.
९) तीन शोधनिबंध प्रकरण तिसरे चांगदेव राउळ - एक चिंतन:- डॉ. ब्रम्हानंद देशपांडे, परिचय प्रकाशन,
१०) साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची प्रकरण ८४. हरिश्चंद्रगड:- पान क्रमांक ३२५, प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०११.
११) शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर:- पान क्रमांक १०६, १०७, प्र. कें. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २००५.
१२) चक्रपाणि:- पान क्रमांक १६५, डॉ. रा.चिं. ढेरे.

प्रचि ३२
कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य
पच्छिम घाटाचा विस्तार महाराष्ट्राच्या उत्तरेपासून थेट केरळ पर्यंत पसरलेला. त्यात कर्नाटक आणि केरळ मधील भाग हिरवाईने नटलेला, याउलट महाराष्ट्रातला सह्याद्री मात्र खडकाळ रांगडेपणाच काळकभिन्न सौंदर्य मिरवतोय. आपल्या इतिहासाशी जवळीक साधणाऱ्या सह्यकड्याने हजारो वर्ष उन-पावसाच्या अभिषेकात कितीतरी प्रसव वेदना सहन करून अनघड सुळके आणि उंचच उंच कातळ भिंतींची रचना केली आहे.
सह्याद्रीतील अशाच डोंगररांगेपैकी एक माळशेज घाट परिसर आणि दुर्गवेड्यांचा सखा हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावर सह्याद्रीचा मालक देवाधिदेव शंभूमहादेवाच दर्शन घेतल्यावर पाय आपोआप कोकणकड्याच्या दिशेने वळतात. कोकणकड्यावर लोटांगण घालून याची रौद्रता डोळ्यात साठवण्यासाठी तर झुंबड उडते. त्याची खोल भीषणता पाहून त्यातीलच काही जणांच्या मुठीची घट्ट पकड सोबतच्या संवंगड्यांच्या मनगटावर आवळली जाते. इथून दरी इतकी खोल आणि भयाण असूनही आपल्या डोळ्यात मात्र त्याच फक्त सौंदर्यच भरत. याची संपूर्ण छबी डोळ्यात साठवण्यासाठी माळशेज घाटाच्या पायथ्याखालील तळ कोकणातलं बेलपाडा गाव गाठायचं आणि रोहिदासच्या शिखरापासून ते नळीच्या वाटेपर्यंत दीड ते दोन किलोमीटरचा विस्तार असलेल्या संपूर्ण कोकणकड्याला आपल्या डोळ्यात साठवायचं.
प्रस्तरारोहकांच्या कितीतरी पिढ्या याच्यावर चढाई करण्याच स्वप्न बाळगून असतात, पण यशस्वी झालेल्यांपेक्षा अयशस्वी मोहिमांचीच संख्या जास्त आहे. अयशस्वी झालात तरी हरकत नाही, कारण यावर चढाई करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशंसेस प्राप्त आहे. कोकणकड्यावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला हवी कणखर सवंगड्यांची साथ आणि अनुभवी संघ.
महाराष्ट्रात १९८३ साली प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र (खिळे-बोल्ट) गिर्यारोहकांना अवगत झाल आणि ठाणे येथील चारूहास जोशी यांच्या गिरीविहार संस्थेने प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र वापरून जीवधनची वानरलिंगी सर केली. त्यानंतर असंख्य सुळक्यांच्या वाटा खुल्या होत गेल्या. पण कोकणकडा अजूनही आव्हानच ठरलेला. १९८५ मध्ये आयआयटी- मुंबईच्या गिर्यारोहकांनी वसंत लिमयेच्या नेतृत्वाखाली प्रथमच कोकणकडा सर केला. त्यांनी सुरुवात तर मध्यावरून केली होती पण पुढे डावीकडे सरकत ते मध्यावरून खूप दूरवरून कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचले. अद्यापही कोकणकड्याची मध्यवर्ती चढाई अभेद्यच होती. पण तत्कालीन मर्यादित उपलब्ध साहित्याच्या सहाय्याने यावर चढाई करण्याचा नुसता प्रयत्नसुद्धा कौतुकास पात्र आहे.
पण कोकणकड्यालासुद्धा पाझर फुटला आणि १९८७ मध्ये मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वाखाली 'समिट हायकर्स' आणि 'पुणे व्हेंचर्स' या मुंबई पुण्याच्या दोन संस्थांनी मिळून याच्या मध्यावरून कोकणकड्यावर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने कोकणकडा पादाक्रांत झाला. “किरण, तुमच्यासारखी क्लाईम्बिंग टीम नसल्याने कड्यावरचा २-२ रुफ (दगडी छत) असलेला भाग मला सोडून द्यावा लागला” अशी खंत मिलिंद पाठक यांनी किरण अडफडकरांकडे एका भेटी दरम्यान व्यक्त केली होती. यावरून कोकणकड्याची भव्यता आणि अवघडपणा लक्षात यावा.
मर्यादित साहित्य आणि प्रवासाची मर्यादित साधनं, यामुळे त्यांना जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ लागला. यानंतर याच मार्गावरून उपलब्ध खिळ्यांच्या सहाय्याने कोकणकडा सर करण्यासाठी प्रस्तारारोह्कांची रीघ लागली. पण त्यात अयशस्वी प्रस्तारारोह्कांचीच संख्या जास्त होती. त्यानंतरही कोकणकड्यावर खूप दुर्दैवी घटना घडत होत्या. एका संस्थेने आयोजित केलेल्या कोकणकडा रॅपलिंग दरम्यान एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली होती. २००४ साली चढाईचा प्रयत्न करताना मार्गातील जुने व कमजोर झालेले खिळे तुटल्यामुळे कल्याणमधील एका संस्थेला दोर आणि मौल्यवान सामान कड्यावरच सोडून यशस्वी माघार घेण्यास भाग पडलं होत. एका वर्षी मोठा शिलाखंड कड्यापासून विलग होऊन खाली कोसळून मार्ग आणखी खडतर बनला होता.
एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा अयशस्वी झाल्याने आम्हालाही याचे कुतूहल होतेच. २००६ साली गिरीविराजच्या मोहिमेच्या पूर्व तयारी दरम्यान जूनमध्ये याचा मागोवा घेण्याच काम आम्ही केल आणि एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा का अयशस्वी झाल्या त्याची कारण सुद्धा कळली.
कोकण कड्याच्या प्रत्यक्ष भिंतीची मध्यवर्ती उंची १८०० फुट आहे. सुरुवातीला ३०० फुटी मध्यम कातळ चढाई करावी लागते. त्यापुढे ५०० फुट तिरकस रेषेतील सोपी चढाई आणि त्यापुढे मात्र भयानक परिस्थिती आहे. कोकणकडा कशाशी खातात त्याची प्रचीती इथून यावयास लागते. ३५० फुटांची चढाई अवघड प्रकारातली. इथपर्यंत म्हणजे ११५० फुट उंचीवर पोहोचल्यावर डावीकडे सरकणारी आडव्या रेषेतली लांबलचक अर्धवर्तुळाकर परंतु अतिशय अरुंद लेज आहे, थोडस दुर्लक्षही जिवावर बेतेल. या लेजवरचा सुमारे ६५० फुट कडा हा या मार्गातला मुख्य अडसर. इथून मात्र याची भयानकता आणखी वाढते. तुमच्या शरीराचे हाल व्हायला इथूनच सुरुवात होते. त्यातही सुरूवातीच ३०० फुट अंतर पट्टीच्या प्रस्तरारोहकाला घाम फोडत. इथपर्यंत तो कसाबसा पोहोचेलही पण इथून वरची ३५० फुटी चढाई महाभयंकर. कारण इथून वरचा कडा ओव्हरहेंगच्या रूपाने सुमारे १४० ते १६० अंशाच्या कोनात असा काही बाहेर पडतो कि फक्त पाहतानाही भल्याभल्यांची तारांबळ उडावी. आजवरच्या बहुतेक मोहिमा इथूनच अयशस्वी झाल्या आहेत. या शेवटच्या टप्प्यातील मध्यभागात एकुलती एक ससाण्याची लेज आहे, पण इथेही स्वतःला दोर बांधून सर्व व्यवहार करावे लागतात. त्यामुळे इथे बेसकॅंप स्थापित करता येत नाही आणि सर्व व्यवहार माथ्यावरूनच नियंत्रित करावे लागतात. खाली पहाव तर आपण चढून आलेला रॉकपेंच दिसतच नाही आणि तिरकस ओव्हरहेंगमुळे वरचाही थांगपत्ता लागत नाही.
सुमारे १४-१५ वर्षे सर्व साहसी प्रस्तरारोहक याच मार्गाचा अवलंब करून कोकणकड्यावर झेंडा रोवत होते. आता अखंड कडाच कोसळून खाली पडल्यामुळे, मार्ग आणखी खडतर बनला होता, जवळ जवळ बंदच झाला होता. कोकणकडा परत गिर्यारोहकांची परीक्षा पाहत होता. एकतर जुन्या खिळ्यांच्या जागी नवीन खिळे ठोकणे अथवा नवीन मार्ग शोधणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्या दृष्टीने मुंबई पुण्याच्या विविध संस्थांनी प्रयत्नसुद्धा केले पण सारे विफल झाले.
नेमक्या अशाच वेळेस गिरीविराज हायकर्सचा (डोंबिवली) पुनर्जन्म झाला होता. किरण सोबतचे सुभाष पंडीयन, संजय लोकरे, सुनील लोकरे, नरेंद्र माळी आदी जुने साथीदार साथीदार निवृत्त झाल्याने जवळपास १० वर्षांचा काळ अज्ञातवासात गेला. २००२ साली संस्थेला परत उर्जितावस्था प्राप्त झाली. किरण अडफडकरांनी आशिष पालांडे, राहुल शिंदे, दिवाकर भाटवडेकर, प्रदीप म्हात्रे, योगेश सदरे आदीं तरुण मंडळींची सक्षम टीम बांधून वजीर, तावली, भैरवगड, बाण, नानाचा अंगठा आदींवर नवीनच मार्गाने चढाई करून भरपूर अनुभव नवीन टीमच्या पाठीशी गोळा केला आणि कोकणकड्याला हात घालण्याचा निर्णय घेण्यात आला, तोही कोणताही गाजावाजा न करता.
त्यासाठी दर शनिवार-रविवार तळोजा येथील पांडवकड्याला भेट देऊन १९८८ साली आम्हीच सर केलेल्या मार्गावर रुफ बोल्टिंग, लॅडर शिफ्टिंगचा कसून सराव करून घेतला. कारण कोकणकड्यावर चढाईसाठी आम्ही सर्वात अवघड मार्ग निवडला होता आणि दोन ठिकाणी १८० अंशाच्या कोनातील दोन दगडी छतांचा समावेश होता.
संस्थेची आर्थिक परिस्थिती तोळामासाच असल्याने सर्व प्रथम पैशांची जमवाजमव करावी लागणार होती. त्यावेळी ठाण्याचे चारुहास जोशी मदतीसाठी आले आणि त्यांच्या 'हिल्स अॅगण्ड ट्रेल्स' या कंपनीच्या वतीने छायाचित्रण आणि चलतचित्रणासाठी आर्थिक खर्चाचा काही भार उचलला. उर्वरित खर्चाची जबाबदारी संस्थेच्याच सभासदांनी विभागून घेतली.
२५ ऑक्टोबर, २००६ - हरिश्चंद्रगडाचा पायथा - खिरेश्वर
जवळपास वीस दिवसांचा शिधा, तंबू, स्वतः तयार केलेले २०० एक्स्पान्शन बोल्ट, दोर, इतर चढाई करण्यासाठीचे सामान घेऊन उत्साहाने भरलेली सगळी मंडळी सामानासोबत गडाच्या पायथ्याशी गोळा झाली. सामान खूपच असल्याने गावातील मंडळींकडे मदतीसाठी 'अर्थपूर्ण' विचारणा केली पण ते अवजड सामान पाहून त्यांनी काढता पाय घेतला. शेवटी आम्हीच सामान पाठीवरून वाहुन न्यायाचा निश्चय केला. तोलार खिंडीतून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारण ४-५ तास लागतात, पण आम्हाला त्या दिवशी मात्र तब्बल ९ तास लागले, यावरून आमच्याकडे असलेल्या सामानाची प्रचीती आली असेल. गडावरील शंभू महादेवच दर्शन घेऊन थेट कोकणकड्याच्या धुंद वातावरणात प्रवेश केला. आता आमच मुख्यालय इथेच असणार होत, अर्थात कॅम्प नं.१. योग्य जागा पाहून साफसफाई करून तंबू ठोकून दिले.
२७ ऑक्टोबर, २००६ (पहिला दिवस):
सकाळी लवकर उठून किरण आणि मंडळी नळीच्या वाटेने कोकणकड्याच्या पायथ्याशी पोहोचले. आज त्यांना इथे कॅम्प नं. २ ची स्थापना करायची होती. कोकणकड्याच्या पायथ्याला जाणारा शॉर्टकट शोधण्याच्या नादात सुर्य कधी डोगरापल्याड गेला ते कळलंच नाही. रात्रीचे अंधारात धडपडण्यापेक्षा नळीच्या वाटेतच उघड्यावर मुक्काम करावा लागला.
२८ ऑक्टोबर, २००६ (दुसरा दिवस)
आज कसेही करून चढाईचा मुहूर्त साधायचा होता. रात्री उघड्यावरच झोपलेलो असल्याने लवकरच जाग आली. पहिल्याच दिवशी वेळापत्रक बिघडण्याची चिन्ह दिसत होती, त्यामुळे धावतपळत तडक कोकणकड्याचा पायथा गाठला. कॅंप नं. २ ची स्थापना करून चढाईसाठी सज्ज होण्यास तरीही दुपारचे बारा वाजलेच. शेवटी आज एवढ्या वर्षांपासून हृदयाशी जपून ठेवलेला क्षण प्रत्यक्षात साकार होणार होता. अपघातविरहीत यशासाठी सह्याद्रीचा धावा केला आणि सुरुवातीला चढाईचा मार्ग सोपा असल्याने नव-प्रशिक्षित मनीष पिंपळे आणि राहुल शिंदेने या महात्वाकांक्षी मोहिमेचा श्रीगणेशा केला. आज प्रत्यक्ष चढाईसाठी वेळ कमी मिळाला. तरीही मिळालेल्या वेळात या दोघांनी सुरुवातीची ३०० फुटी साधारण चढाई पूर्ण करून दोर तिथेच बांधला आणि पुन्हा पायथ्याला कॅंप नं.२ वर परत आले.
२९ ऑक्टोबर, २००६ (तिसरा दिवस)
तिसऱ्या दिवशी दिवाकर भाटवडेकर आणि प्रकाश म्हात्रे यांनी काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून जवळपास ८५० फुट चढाई दिवसभरात केली. यातील सुरुवातीची ५०० फुट चढाई तिरकस रेषेत सोपी होती आणि त्याच्यावरील ३५० फुट चढाई थोडीशी अवघड स्वरूपातील होती. आता आम्ही ११५० फुटी रुंद लेजवर पोहोचलो होतो. खरतर आजच इथे कॅंप नं.३ ची स्थापना करायची होती पण संध्याकाळ झाल्याने परत ११५० फुट खाली पायथ्याला जाण्यास भाग पडले. चढाईचा पहिला टप्पा संपला होता पण कोकणकड्याची खरी लढाई यानंतरच सुरु होणार होती. आता पर्यंतच्या बहुतेक मोहिमा अयशस्वी का झाल्यात त्याची प्रचीती इथूनच येणार होती.
या पुढच्या मोहिमेसाठी पायथ्याला असलेल्या कॅंप नं.२ ची आवश्यकता नसल्याने त्याचा गाशा गुंडाळून प्रकाश आणि मंगेश सदरे नळीच्या वाटेने कोकणकड्यावर परत कॅंप नं.१ वर निघून गेले. तर किरण, दिवाकर, मनीष आणि राहुल काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने ११५० फुटी लेजवर पोहोचले. त्याच वेळेस पुढच्या मोहिमेची रूपरेषा ठरवण्यासाठी आशिष पालांडे आणि योगेश सदरे यांनी कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर खाली असलेल्या टीमला येऊन सामील झाले. आता पुढच्या चढाईचे नियोजन याच ११५० फुटी लेज वरून होणार होते. तंबूसाठीची जागा हेरून पुन्हा सगळे जण आशिष आणि योगेशने माथ्यावरून आणलेल्या दोरावर झुमारिंग (सुमारे ६५० फुट) करत कोकण कड्याच्या माथ्यावर म्हणजेच कॅंप नं.१ वर आले.
३१ ऑक्टोबर, २००६ (पाचवा दिवस):
अर्धी लढाई जिंकलेली असल्यामुळे उत्साहाच्या भरात पाच जणांची टीम काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर पोहोचली. या ऐसपैस लेजवर तंबू ठोकण्यासाठी आम्ही कालच जागा हेरून ठेवली होती, त्या जागेवर रात्रीच्या निवासाकरिता २ तंबू ठोकून कॅंप ३ ची स्थापना करण्यात आली. आता कृत्रिम चढाई (अर्थात खिळ्यांच्या मदतीने) सुरु होणार होती आणि आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार होती. दरम्यान जेवणखाण आणि सामान पुरवठ्यासाठी किरणने एक वेगळा नायलॉनचा दोर (६५० फुट) माथ्यापासून या ११५० फुटी लेजपर्यंत बांधून सप्लाई लाईन फॉर्म केली.
आज प्रदीप म्हात्रेने पायथ्यापासून १२०० फुट उंचीवर मुक्त चढाईचा सुंदर नमुना पेश करत जवळपास २०० फुटांची उंची गाठली. कॅंप ३ अर्थात ११५० फुटी लेजवरच मुक्काम असल्याने किरणने बांधलेल्या दोरावरूनच कॅंप १ वरून टीमसाठी जेवणपाणी पुरविण्यात आल.
०१ नोव्हेंबर, २००६ (सहावा दिवस)
आशिष आणि योगेशने, काल प्रदीपने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आरंभ केला. आता मात्र कोकणकडा आपले रंग दाखवायला लागला. दुर्दैवाने त्यांच्या मार्गात अत्यंत ठिसूळ खडक लागल्याने मारलेला खिळा (बोल्ट) केवळ हातानेच हलत होता. तरीही त्यांनी थोडा धोका पत्करून या हलणाऱ्या खिळ्यांच्या सहाय्याने चढाई चालू ठेवली पण अचानक आलेल्या संकटाने भांबावून चढाईचा वेग खूपच मंदावला.
०२ नोव्हेंबर, २००६ (सातवा दिवस):
आज प्रदीप आणि अविन्द्र म्हात्रे त्या ठिसूळ कड्याला भिडले पण त्यांचे सुद्धा ठिसूळ खडकामुळे कालच्यासारखेच हाल झाले. परिस्थिती खूपच कठीण होती. आता मात्र आमचीही इतर मोहिमांसारखीच गत होते कि काय याची शंका यायला लागली. नाईलाजाने प्रदीप आणि अविन्द्र ११५० फुटी लेजवर (कॅंप नं.३) परत आले. २ मौल्यवान दिवस वाया गेले होते, अगदीच आणिबाणीचा प्रसंग उभा ठाकला होता. वॉकीटोकीच्या साहाय्याने आलेल्या प्रसंगाची चर्चा करून किरणने कॅंप १ वरून खाली ११५० फुटी लेजवर (कॅंप ३) वर उतरण्याचा निर्णय घेतला.
०३ नोव्हेंबर, २००६ (आठवा दिवस):
आता अनुभवच कामी येणार होता आणि कॅम्पवर किरण एव्हढा प्रस्तरारोहणाचा अनुभव कोणाच्याच गाठीशी नव्हता. किरणने प्रदीपला सोबत घेतलं आणि त्या ठिसूळ कड्याला सामोरा गेला. प्रदीप साहस एकवटून अर्धवट मारलेल्या खिळ्यावर लटकून किरणला बिले देत होता. ठोकलेल्या खिळ्यावर भरोसा ठेवण्यासारखा नव्हताच, कुठल्याही क्षणी ते बाहेर येउन खाली पडण्याचीच भीती अधिक होती. ठोकलेला खिळा भसकन भिंतीच्या आत जात होता. शेवटी किरणने नवीनच युक्ती वापरली. भिंतीमध्ये छिंद्र करण्यासाठी जो पंच वापरतात, तो पंचच त्या ठिसूळ खडकात पूर्ण ठोकायचा आणि प्रदीपला सावध रहायला सांगून त्या हलत असलेल्या पंचच्या आधाराने वर सरकायचा. असे करत करत त्याने एव्हढ्या वर्षांच्या अनुभवातून कमवलेल्या शिदोरीवर दिवसभरात त्या ठिसूळ कड्यावर मात करत पालीची लेज गाठली (पालीच्या आकाराचा खडक). मग तिथेच दोर बांधून तो परत खाली ११५० फुटी लेज वर रात्रीच्या मुक्कामासाठी उतरला. ठिसूळ पॅचवर मात केल्यामुळे रात्री कॅम्पवर उत्साहाचे वातावरण होते. पण त्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी परतीच्या पावसाने आपली हजेरी लावली. संपूर्ण कॅंप पाण्याने भिजून गेला, त्यामुळे रात्र लेजवर असलेल्या एका कपारीत काढावी लागली. पुढे आठवडभर वेळी अवेळी पाऊस हजेरी लावून आमच्या सहनशक्तीचा अंत पाहत होता, त्यातच पावसामुळे वरून घरंगळत खाली पडण्याऱ्या दगडांमुळे, अपघात टाळण्यासाठी सारखी कपारीकडे धाव घ्यावी लागत होती.
०४ नोव्हेंबर, २००६ (नववा दिवस):
४ दिवसांमध्ये ११५० फुटी लेजच्या वर खिळ्यांच्या साहाय्याने साधारण ३०० फुट चढाई केली होती. आता खरी परीक्षा सुरु होणार होती कारण १४०-१६० अंशाच्या कोनातला मुख्य ओव्हरहेंग सुरु होत होता ज्यात दोन रुफ (दगडी छत) चा समावेश होता. इथूनच खूप मोहिमा अयशस्वी होऊन माघारी गेल्या आहेत. आज योगेश आणि आशिषने १५ बोल्टच्या साहाय्याने ओव्हरहेंगपर्यंत मजल मारली.
०५ नोव्हेंबर, २००६ (दहावा दिवस):
प्रदीप व दिवाकरने १६० अंशाच्या कोनात बाहेर पडलेल्या ओव्हरहेंगवर बोल्टिंगचा श्रीगणेशा केला. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करणे सगळ्यात कठीण काम. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करताना शरीर मागे फेकले जात असल्याने संपूर्ण शरीरावर अतिरिक्त भार पडतो आणि खिळा ठोकण्याचा वेगही मंदावतो.
०६ नोव्हेंबर, २००६ (अकरावा दिवस):
आशिषने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात ११ बोल्ट ठोकले.
०७ नोव्हेंबर, २००६ (बारावा दिवस):
योगेशने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात १० बोल्ट ठोकले.
०८ नोव्हेंबर, २००६ (तेरावा दिवस):
आता मार्गात पहिलं दगडी छत लागल. दगडी छत हा ओव्हरहेंगपेक्षाहि भयानक प्रकार. इथे डोक्यावर १८० अंशाच्या कोनात खिळा ठोकावा लागतो. वेदनेमुळे आपल्याला मान आहे हेच आपण विसरून जातो. जवळपास झोपूनच खिळे मारावे लागतात. पण वेदनेने शरीर गलितगात्र होऊन सुद्धा किरणने दिवसभरात छताला लटकून ९ बोल्टच्या सहाय्याने त्या ३५ फुट रुंदी असलेल्या छताचा फडशा पाडला.
किरण रूफवर (दगडी छत) हवेत अधांतरी झोपून बोल्टिंग करताना-
०९ नोव्हेंबर, २००६ (चौदावा दिवस):
प्रदीपने आज एकट्यानेच बोल्टिंग करत तब्बल १२ खिळे ठोकून तो सुद्धा शर्यतीत असल्याच दाखवून दिल.
प्रत्येक जण आता इतका तयार झाला होता कि रोज ११५० फुटी लेज वरून सुमारे ३००-४०० फुट झुमारिंग केल्यानंतर (तेही ओव्हरहेंगमुळे भिंतीपासून दीडेकशे फुट बाहेर हवेत लटकून) इच्छितस्थळी पोहोचल्यावर एकट्यानेच पंचिंग करून १०-१२ खिळे ठोकत होता. ते गरजेचही होत. तिथे वारंवार चढाईपटू बदलून वेळ वाया गेला असता. त्यात झुमारिंगला दीड दोन तास लागत होते. त्यामुळे एकट्यालाच संपूर्ण दिवस निभावून न्यावा लागत होता.
१० नोव्हेंबर, २००६ (पंधरावा दिवस):
आज किरणने चढाईला सुरुवात केली. त्याला मदतनीस म्हणून दिवाकर आणि त्याखाली दूरवर पालीच्या लेजवर प्रकाश होता. दरम्यान एक अजब प्रकार त्यांना अनुभवास आला. ओव्हरहेंगवर शेवटच्या टप्प्यात बोल्टिंग करताना अचानक प्रचंड गडगडाट होऊन धुरळ्याचे लोट जमा झाले. आसपासच काहीच दिसेनास झाल. या प्रकाराने किरण आणि दिवाकर गांगरूनच गेले. धुरळा विरताच, प्रकाश ज्या लेजवर होता त्या ठीकाणी थोड खाली एक मोठा खडक निखळून पडल्याच लक्षात आल. सुदैवाने प्रकाश सहीसलामत होता पण या पडझडीत एक भलामोठा धोंडा नेमका आमच्या अतिरीक्त दोरावर पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. झाल्याप्रकारातून सावरत एकंदर नऊ खिळे आणि एक पाचर यांच्या मदतीने किरणने दिवसभरात चढाईचा अर्धा टप्पा म्हणजेच ससाण्याची लेज गाठली. जेमतेम दीड-दोन फुट रुंद असलेल्या लेजवर असंख्य दगड तुटून पडले होते. दगड इकडे तिकडे हलवून किरण आणि दिवाकरने दोन माणसांना झोपता येईल इतकी जागा तयार करून तिथे एक खिळा ठोकून त्याला दोर बांधला आणि परत खाली ११५० फुटी लेजवर परतले. दुसऱ्या दिवसापासून ११५० फुटी लेजला राम राम करायचा होता. खरतर आजच हि लेज सोडणार होतो पण वाइंड अप अर्थात आवराआवर करण्यात वेळ गेला आणि अंधार पडल्याने सगळी काम दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली.
११ नोव्हेंबर, २००६ (सोळावा दिवस):
आज कॅंप ३ चा अर्थात ११५० फुटी लेजवरचा गाशा गुंडाळून आम्ही माथ्यावर असलेल्या कॅंप १ वर दाखल झालो. तसेच ससाण्याच्या लेजवर असलेल्या दोराचे एक टोक माथ्यावर नेऊन तिथे असलेल्या कारवीच्या झुडुपात ते टोक बांधल. यानंतरची मोहीमेच नियोजन माथ्यावरूनच करणार होतो. दुपारी योगेश आणि आशिष टायरोलीन (व्हॅली क्रॉसिंग) पद्धतीने कारवीत बांधलेल्या दोराच्या साहाय्याने ससाण्याच्या लेजवरील कॅंप ४ वर उतरले. आज वेळ खूपच कमी मिळाल्याने फक्त २० फुट चढाई होऊ शकली. आज त्यांचा मुक्काम या दीड फुट रुंद लेजवरच असल्याने संध्याकाळी दोराच्या साहाय्याने त्यांना जेवण व पाणी पुरवण्यात आले.
किरण, खेळकर मूडमध्ये
१२ नोव्हेंबर, २००६ (सतरावा दिवस):
फक्त दीड फुट रुंद लेजवर अंग अवघडून संपूर्ण रात्र काढावी लागल्याने झोप आलीच नाही. योगेशने सकाळीच चढाईला सुरुवात केली आणि दिवसभरात अथक परिश्रमाने तब्बल १८ खिळे ठोकून नवीन विक्रम केला.
दुसऱ्या दिवशी किरण, दिवाकर आणि प्रदीप कॅंप ४ (ससाण्याची लेज) वर जाणार होते, त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी संध्याकाळी प्रथम आशिषला दोराच्या सहाय्याने वरून बिले देऊन माथ्यावर खेचून घेतलं. पण या सर्व उपद्द्व्यापात रात्रीचे ८ वाजले. त्यामुळे नाईलाजाने योगेशला सलग दुसरा दिवस एकट्यालाच ससाण्याच्या लेजवर मुक्काम करावा लागणार होता. मानसिकता, सुरक्षितता, संपर्क अशा सर्वच दृष्टीने ते चुकीच होत पण नाईलाज होता. मनावर धोंडा ठेऊन ती रात्र आम्ही सर्वांनी अक्षरशः चिंतेत काढली. उजाडताच वॉकीटोकीवरून योगेशशी संपर्क करून तो सुरक्षित असल्याच कळल्यावर जीव भांड्यात पडला.
१३ नोव्हेंबर, २००६ (अठरावा दिवस):
सकाळी योगेश परत माथ्यावरच्या कॅंप १ वर येताच, प्रदीप, दिवाकर आणि किरण ससाण्याच्या लेज वर (कॅंप ४) पोहोचले. प्रदीपने चढाई सुरु केली, किरण सेकंड मेन आणि दिवाकर लेजवर. दुपारी दोनच्या सुमारास योगेशचा संदेश मिळाला 'आग्यामाशांच भलमोठ मोहोळ खालच्या (दरीच्या) बाजूला गेल आहे, तुम्हाला दिसलं का?' त्यांना काहीच कल्पना नव्हती. साडेतीनच्या सुमारास किरण दिवाकरशी बोलत असताना खाली दरीत काळ्याकभिन्न आग्यामाशांच भलमोठ मोहोळ त्यांच्याच दिशेने येत होत. किरणने, दिवाकर आणि प्रदीपला लागलीच सावध केल आणि कोणतीही हालचाल न करण्याची सूचना केली. माशा डसल्या तर त्यांच्या बचावासाठी कोणतच साधन नव्हत. डोळे मिटून, शिडीवर लटकत त्याची प्रतीक्षा करत असतानाच ते भलमोठ मोहोळ चक्क त्यांच्या शरीरावरून जाताना जाणवत होत. त्या माशांचे स्पर्श शहारून टाकणारे होते. क्षणार्धात ते मोहोळ, काळे काळे ठिपके वर वर जात नाहीसे झाले. त्यांची जवळपास बंद पडलेली हृदय परत धडधडायला लागली. एव्हढा बाका प्रसंग घडून सुद्धा प्रदीपने जबरदस्तपणे १६ खिळे ठोकलेच.
परत संध्याकाळी वर येताना एक अपघात होता होता वाचला. नेहमीप्रमाणे प्रदीपने संध्याकाळी चढाई थांबवली आणि माथ्यावर कॅंप नं. १ वर जाण्यास तयार झाला. माथ्यावरून जो दोर खाली सोडण्यात आला होता तो चढाईच्या रेषेत नव्हता. त्याचा मध्य चढाईपटूच्या डाव्या हाताला १०० फुट दूरवर होता. त्यामुळे चढाईपटूला त्या दोराच्या रेषेत येण्यासाठी एकतर स्विंग घ्यावा लागला असता, अथवा कोणीतरी त्याचा स्विंग नियंत्रीत करण जरुरी होत. सेकंड मेंन नियंत्रकाच काम करायचा. पण दुर्दैवाने किरणच्या हातून त्या दोराचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रदीपला १०० फुटांचा जोरदार स्विंग आला आणि प्रदीप हवेत हेलखावे खाऊ लागला. त्या दोरावर परत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात किरणचा हातसुद्धा चांगलाच भाजून निघाला. सुदैवाने कोणताही अपघात न होता प्रदीप सुखरूपपणे कॅंपवर पोहोचला.
१४ नोव्हेंबर, २००६ (एकोणिसावा दिवस):
चढाई पूर्णपणे आटोक्यात आली होती. आता शेवटच एक दगडी छत उरल होत. प्रस्तरारोहणातील सर्वात कठीण प्रकार. योगेश आणि आशिषने कामगिरी फत्ते करण्याचा विडा उचलला. ईथेच गिरीविराज हायकर्सच्या नावाची एक स्मरणिका ठोकण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत योगेशने १५ खिळे ठोकून त्या छताचा निकाल लावला. त्याला आता माथा एकदम आवाक्यात आला होता. आता आणखी थोडासा जोर लावून योगेश माथ्यावर पोहोचू शकत होता. जीवनात एकदाच मिळणारी संधी. कोकणकड्यावर पाय ठेवून इतिहासात आपलं नाव अजरामर करू शकत होता.
रूफवर (दगडी छत) हवेत अधांतरी बोल्टिंग करताना योगेश -
पण गिरीविराजच्या सर्व तरुण मंडळीने हा मान सह्याद्रीचा शिलेदार किरण अडफडकरांना द्यायचा हे आधीच निश्चित केले होते. म्हणून योगेशने चढाई थांबवून पुढची सूत्रे किरणच्या हाती दिली. किरणने सलग चार खिळे ठोकून शेवटची शिडी सोडली, ३५ फुटांची मुक्त चढाई करत मातीची ढेकळ आणि गवत यातून सावधपणे हालचाली करत संध्याकाळी सव्वा सहा वाजता कोकणकड्याच्या माथ्यावर पाऊल ठेवलं. आयुष्यभराच स्वप्न साकार झाल होत. कोकणकड्याच्या सर्वात अवघड आणि अभेद्य मार्गावर १७० expansion bolt च्या सहाय्याने गिरीविराज हायकर्सच नाव कोरल गेल होत.
अवांतर:
एव्हढी मोठी मोहीम यशस्वी करण्यासाठी तेव्हढीच मजबूत बेसकॅंप टीम हवी. संस्थेचे संस्थापक सदस्य सुभाष पांडीयन, कै. संजय रेडकर आणि संदीप रहाटवळ यांनी इतरांच्या मदतीने ते आव्हान लीलया पार केले. अथक शारीरिक त्रासामुळे मोहीम अर्धवट राहण्याचीच चिन्हे दिसत होती, अशा वेळेस संजय नेहमीच धाऊन आला आणि चढाईपटूना मानसिक बळ देण्याच काम सुद्धा समर्थपणे पेललं. प्रवीण घुडे, अमृता राजे, योगेश आंब्रे, जेम्स, राजेश, हर्षद यांचेही बहुमोलाचे सहकार्य लाभले.
दुखः एकाच गोष्टीच आहे कि प्रायोजक मिळून सुद्धा या मोहिमेचे योग्य प्रकारे चलतचित्रण करू शकलो नाही. तत्कालीन उपलब्ध व्हिडीओ कॅमेऱ्याने (कॅसेटवाला) याचे चलतचित्रण केले आहे, पण दुर्दैव असे कि ज्याला हे काम सोपवले होते त्याने पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर तो जो घरी गेला तो थेट मोहिमेच्या शेवटच्या दिवशी परत हजर झाला त्यामुळे चलतचित्रणाची जबाबदारी सर्व नवशिक्यानीच पार पाडली.
या मोहिमेचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे खूपस साहित्य स्वतःच तयार करण्यात आले होते, अगदी बोल्ट आणि कॅराबिनर्ससुद्धा.
आपला नम्र
गिरीविराज हायकर्स - डोंबिवली
दुपारचे साडे बारा वाजले. आम्ही हरिश्चंद्र गडासाठी सिन्नर-अकोले-राजूर-पाचनई मार्गाने निघालो. वाटेत चहा घेतला. रस्ता जरा लहान असला तरी खूप चांगला आहे. रहदारीही विशेष नव्हती. वातावरण थोडेसे ढगाळ असल्याने ऊन अजिबात जाणवत नव्हते. आजूबाजूचे डोगर, दऱ्या , नद्या, धरणाचे अडलेले पाणी यांचे देखावे असा नयनरम्य प्रवास होता.
पाणवठे
शेती
निळेशार आकाश, आणि विखुरलेले ढग
नदी
उत्तुंग डोंगर माथे
वाटेत एक वनखात्याची चौकी लागली. तेथे गाडीचे रु,१००/- व माणशी रु.३०/- भरून गडाकडे निघालो.
पाचनई गावात येऊन पोहचलो.
गावातले हनुमान मंदिर
पर्यटकांसाठी डॉर्मिटरीचीही व्यवस्था दिसली.
आदल्या दिवशीच पाचनईचे 'हॉटेल कोकणकडा' चे मालक श्री भास्करभाऊ यांचेशी संपर्क साधला होता. त्यांनी माहिती पत्रक, पार्किंगचे लोकेशन इ. ची माहिती पाठवली होती.
त्यानुसार त्यांच्या घरापुढील अंगणात येऊन पोहचलो. स्वत: भास्करभाऊ नव्हते पण घरच्यांनी व्यवस्थित स्वागत केले. फोन लागत नव्हता त्यामुळे आम्ही थोड्याच वेळात पोहचतो आहे व जेवणार आहोत हे सांगू शकलो नव्हतो. पण भूक लागली आहे सांगताच चूल पेटवून पटकन चार भाकरी टाकल्या.
कुतूहल म्हणून मी त्यांच्या घरात फिरूनही आले. जुळ्या मुलांसाठी एकसारखे कपडे आपण नेहमी बघतो इथे दिड वर्षाच्या मुलींसाठी दोन एकसारखे झोके बांधलेले दिसले.
पिठले तयारच होते. पिठलं भाकरी खाल्ली. मिळालेल्या वेळात फोन चार्ज करून घेतले . (नवीन फोन गाडीत असलेल्या चार्जरवर चार्ज होत नव्हता). आता पुढील २४ तास वीज नसल्याने फोन चार्ज करता येणार नव्हता तसेच नेटवर्कही असणार नव्हते. पण फोटोंसाठी फोन वापरावाच लागणार होता तो मात्र जपून. मोजकेच सामान बरोबर घेतले. तरी सुद्धा पाठीवरच्या पिशव्यांव्यतिरिक्त सतरंजी, स्वतःचे पांघरून वगैरे अशा दोन तीन पिशव्या घेऊन गड चढणे आम्हाला कठीण होते. पण सकुबाईने सर्व सामान उचलले आणि आमची काळजी मिटली. आमचा वाटाड्याही तीच होती आणि गडावर आमची सर्व व्यवस्थाही तीच पाहणार होती.
चढाईला सुरुवात करता करता चार वाजले.
प्रवेशद्वार
अजून ताज्या दमाचे असल्याने चढाई सोपी वाटत होती.
आता मात्र थोडा दम लागायला लागला
सखुबाई मात्र खांद्यावर, पाठीवर पिशव्या लटकावून, डोक्यावरच्या पिशवीचा तोल सांभाळत झरझर चालत होती आणि काही अंतर पुढे जाऊन परत आमची वाट बघत थांबत होती.
रस्ता कठीण होत चालला.
हा तर अगदीच कठीण पण आता शिड्या लावल्याने थोडा सोपा
काही ठिकाणी कठडे आहेत.
कातळावर सुंदर चित्र काढली आहेत.
संध्याकाळ व्हायला लागली . डोंगरमाथ्यांना सोन्याची झळाळी आली.
नदी पार करण्यासाठीअसलेला पूल. सध्या नदीला पाणी नसल्याने खालूनच जाता येते.
एका सपाट भागात पोहचलो
हरिश्चंद्रेश्वर मंदिर टप्प्यात आले
मंदिरापर्यंत पोहचता पोहचता अंधार पडायला सुरुवात झाली. मंदिर उद्या
सकाळी परत येतांना बघा. सकूबाईची सूचना आली. आम्हाला वाटले आम्ही पोहचलो पण
नाही. आमचा कॅम्प कोंकण कड्यावर होता. मंदिराच्या बाजूनेच कड्याला जायचा
मार्ग आहे.
अजून जवळपास एक तासाची चढाई करायची होती. थोड्याच वेळात काळोख झाला. सोबत टॉर्च होते म्हणून बरे. धडपडत कसेबसे मुक्कामी पोहचलो. सकुबाईने पटकन चहाचे आधण चुलीवर चढवले.
आज आठवड्याचा मधला दिवस असल्याने पर्यटक नव्हते. माळावर फक्त दोन तंबू
लागलेले दिसत होते. सकुबाईचे हॉटेल म्हणा, घर म्हणा किंवा झोपडी म्हणा जे
काही होते ते प्रशस्त होते. तुम्ही म्हटला तर तंबू लावू पण आज गर्दी नाही
त्यामुळे घरातच झोपला तरी चालेल असं सांगितल्याने आम्ही घरातच झोपायचे
ठरवले.
रात्रीचं जेवण तयार होईपर्यंत थोडं झोपडीच्या बाहेर येऊन बसलो. मस्त गार वारा सुटला होता. जास्त वेळ मात्र बसवले नाही. परत घरात आलो आणि जेवायला बसलो.
दुपारपासून शहरी जीवनाचा संपर्क तुटला आहे. आज केक नाही, महागडे हॉटेल नाही, चमचमीत जेवण नाही, आरामदायी बिछानाही नाही पण आकाशात डोक्यावर अष्टमीचा चंद्र आणि त्याच्यापासून थोडेसेच अंतर राखून गुरुही ढगांच्या पुंजक्यातून डोकावून पाहत आहेत, चंद्राचा मंद शीतल प्रकाश आहे, चुलीवरचे अस्सल ग्रामीण जेवण आहे, झोपायला सारवलेल्या जमिनीवर चटई अंथरलेली आहे यापेक्षा चांगले वातावरण लग्नाचा वाढदिवस साजरा करायला कायअसू शकते.
चला ,आता झोपायला जातो आम्ही. पुन्हा भेटू लवकरच उर्वरित सहलीच्या निमित्ताने. शुभ रात्री!
क्रमशः




































































































































































































No comments:
Post a Comment