Thursday, December 1, 2022

सुनील जंगम यांचे निसर्ग होम स्टे

   फॅमिली गेटटुगेदर करायचे आहे ? त्याचबरोबर पिकनिकची धमाल, मजाही पाहिजे ? घरापासून फार लांब नको आणि फेमस स्पॉटही जवळ हवेत ! अहो, मग वरी डोन्ट. आम्ही आहोत ना, आपल्या मदतील. तर गाईज चला अलिबागला. या सर्व अटीत बसणार्या आमच्या होम स्टेचा जरुर विचार करा. 
     अलिबाग ! एक नवे हॉट टुरीस्ट डेस्टीनेशन. मुंबई, पुण्यापासून आणि महाराष्ट्रातील इतर शहरापासून उत्तम कनेक्टीव्हिटी असलेला निसर्गरम्य परिसर. शहारुखखान ,दीपिला पदुकोण, रणवीर सारख्या बॉलिवुड स्टारपासून रोहित शर्मा , विराट कोहली सारख्या क्रिकेट स्टारनी सेकंड होमसाठी पसंदी दिलेला हा परिसर. या परिसरात सेकंड होम असावे असे वाटले तरी थोडे अवघड स्वप्न. मात्र याच परिसरात आपला विकेंड किंवा मोठी सुट्टी मस्तपैकी एन्जॉय करण्याची संधी चालून आलेली आहे. मुंबइच्या श्री. सुनिल जंगम यांचे चौल परिसरातील हे घर म्हणजे आपली सुट्टी मनसोक्त साजरी करण्याचे हक्काचे ठिकाण !
   अलिबाग - रेवदंडा रस्त्यावर चौल गावात डुप्लेक्स पद्धतीचा २ bhk बंगलो असून खूप उजेड आणि हवेशीर आहे. किमान तीन ते चार फॅमिलीची इथे आरामात सोय होइल. मोठ्या फॅमिली गेट टुगेदरसाठी एकदम आदर्श ठिकाण. स्वतंत्र बंगला असल्यामुळे प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको. मोठे गेट आणि किमान तीन कार पार्क होतील असे प्रशस्त आवार. ६ गुंठ्यांची वाडी. ७/८ नारळ , २५ सुपारी, फणस , चिकू , जाम, काजू , आंबे, आवळा अन् प्राजक्ता , कवठी चाफा , मोगरा , रातराणी.... भरपूर झाडे,  प्रशस्त अंगण.मुलांना मोबाइल गेम सोडून अंगणातील खेळांची ओळख इथे होइल. 
     खेळून दमलात तर अंगणात विहिर्‍ असून जाळी लावून ती सुरक्षित केली आहे.मस्त अंघोळ करुन, फ्रेश होउन अंगणात असलेल्या मोठ्या झोपाळ्यावर आरामात पडून रहायचे असेल किंवा हॅमॉकवर झुलण्याची गंमत अनुभवायची. आपली प्रायव्हसी इथे अजिबात डिस्टर्ब होणार नाही हे नक्की. हे प्रोफेशनल हॉटेल नसून आपलेपणा दाखवणारे तुमचेच घर आहे.  
    इथे राहून पाच कि.मी. परिसरात भरपुर साईट सिइंग करता येईल. शांत, निवांत आणि निसर्गरम्य असा नागावचा बीच, पोर्तुगीज बांधणीचा कोरलई किल्ला आणि पायथ्याचे लाईट हाउस, चौलचे दत्त मंदिर , रेवदंडा किल्ला , रेवदंडा समुद्र किनारा, प्राचीन रामेश्वर / शितलादेवी मंदिर , बिर्ला मंदिर, काशिद बीच १० km , मुरुड ३५ km, मुरुडला जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ला बघता येईल तसेच सुप्रसिद्द पाटील खाणावळीच्या भोजनाचा आस्वाद घेता येइल. अलिबाग शहर/ समुद्रातील किल्ला फक्त १३ km, तसेच पुढे थळला खांदेरी किल्ला आणि लाईट हाउस, किहीमचा बीच, आवास बीच, कनकेश्वर आणि सासवणेचे शिल्पकार करमरकर यांचे म्युझीयम. ज्यांना ट्रेकिंगची हौस आहे त्यांच्यासाठी सगरगड आणि रामदरणेचा किल्ला आहेच.
 एकंदरीत हे "निसर्ग" नावाचा बंगलो आपले नाव सार्थ करित आपल्या स्वागताला नेहमी सज्ज आहे. तर मंडळी वाट कसली बघताय. आजच प्लॅन करा आणि न्यु हॉट डेस्टीनेशन अलिबाग परिसरात चला.
गुगल मॅप लोकेशन -  https://maps.app.goo.gl/Zmgbe3eHcjBrgaVg7?g_st=iw
जर तुम्हाला सुध्धा हा बंगलो बुक करायचा असेल तर सुनील जंगम सरांना खालील नंबर वर संपर्क करा. 
सुनील जंगम - 93242 51065







बंगल्याचा एन्टरन्स आणि पार्किंग







गच्चीवरुन दिसणारा निसर्ग

अंगण आणि परिसर







हॉल आणि सीट आउट

 

 

बेडरुम


वॉशरुम

































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...