महाराष्ट्रात काही किल्ले हे आज केवळ नाममात्र किंवा त्यांचे अवशेष केवळ अस्तित्व दाखवण्यापुरते उरले आहेत. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे नांदेडचा किल्ला. गोदावरी नदीकाठी वसलेल्या नांदेड शहरात नदीच्या उत्तर तीरावर नंदगिरी किल्ला होता. आज या किल्ल्याचे नांदेड शहराच्या जुन्या भागात अरब गल्ली येथे गोदावरीच्या पात्रालगत काही अवशेष उरले आहेत.
नांदेडच्या इतिहासाचा विचार केल्यास नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम,इत्यादी नावाने इतिहासात प्रसिध्द असलेल हे नगर नंद वंशातील राजाने वसवलेले होते. धनानंद या नंद राजाने हा किल्ला बांधला असावा. 'नंदीतट', 'नंदीकड', 'नंदीनगर', 'नंद्याल', 'नंदीकट', 'नांदीतट', 'नांदिएड' व 'नंदीग्राम' ही नांदेडची प्रसिद्ध नावे आहेत.पैठण ही नंदवंशाची दक्षिण भारतातली राजधानी होती.तर नंदआहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. याच नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड हे आजचे नाव प्रचलित झाले. वाकाटकांच्या वत्सगुल्म (वाशीम) ताम्रपटात नांदेडला नंदितट असेही म्हटले आहे.
नांदेड हे शहर उपराजधानी आणि व्यापारी केंद्र असल्याने त्याकाळी त्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी असणार. नांदेड हा नगर किल्ला होता.सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपिठ होते.सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आहे. वाकाटक त्यानंतर चालुक्य ,राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर म्हणुन प्रसिध्द होते.त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे हा किल्ला होता. तीनशे वर्षांपूर्वी उमदतुल्ला खान, फिरोज जंग हे सुभेदार येथे वास्तव्यास होते. सय्यद अब्दुला, शादुल्लाह खान, अलिमोद्दीन खान व शाहिस्ते खान यांचा मुलगा खुदाबंद खान यांचेही किल्ल्यात सुभेदार म्हणून वास्तव्य होते. तेलंगणा सुभ्याचे सुभेदारही येथे राहत असत.सन १९३६ मध्ये या ऐतिहासिक वास्तूत मराठवाड्यातील पहिले पाणीपुरवठा पंपहाउस शुद्धीकरण केंद्रासह सुरू करण्यात आले.
नांदेड शहराच्या इतिहासाचा आढावा घेतल्यास
प्राचीन राजवंश :
इसवीसन पुर्व सहाव्या शतकाच्या सुमारास महाराष्ट्रातील विविध प्रदेश अश्मक, कुंतल, मलक, अपरांता, ऋषिक नावाने संबोधिले जाऊ लागले. नांदेड भोवतीच्या प्रदेशाचा समावेश त्याकाळी विदर्भात होत असे. या भागाची दक्षिण सीमा गोदावरी नदीपर्यंत होती. नांदेड हे नावच मुळी गोदावरीशी निगडीत आहे. नदीच्या काठावर वसलेले म्हणुन नांदीकट, नंदिकड आणि नांदीकट या संस्कृत शब्दापासुन नांदेडची व्युत्पती होते. गोदावरीच्या दोन्ही तीरावर वसलेले म्हणुन नंदीकट. नांदेडचा उत्तरेकडील नंदवंशाच्या कारकिर्दीशी संबंध असावा, “नवनंदडेरा“ यापासून नांदेड झाले असावे.
राजकीयदृष्ट्या सुमारे ४०० पेक्षा अधिक वर्षापर्यंत नांदेडचा परिसर सातवाहनांच्या साम्राज्यात होता. सातवाहनानंतर इ.स. २५० च्या सुमारास वाकाटकांनी राज्य केले. या घराण्यातील विन्ध्यशक्ती याने विदर्भात राज्य स्थापिले. व्दितीय रुद्रसेन या वाकाटक राजाची अग्रमहिषी प्रभावती गुप्त ही व्दितीय चंद्रगुप्ताची कन्या होती. प्रथम प्रवरसेन हा या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा. तो पराक्रमी होता. साहित्यिक आणि प्रजाहितदक्ष होता. याने ६० वर्षे राज्य केले. दख्खनच्या फार मोठया भागावर यांचे अधिपत्य होते. वाकाटकांनंतर दक्षिण भारताच्या कांही भागांवर राज्य करणारे घराणे “बदामीचे चालुक्य“ म्हणुन संबोधिले जाते. यांची राजधानी कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्यातील वातापी (बदामी) येथे होती म्हणुन याला “बदामीचे चालुक्य घराणे” असे म्हणतात. या घराण्याच्या लेखात नांदेडचा “नंधाल” असा उल्लेख आढळतो.
नांदेडचे परिसराचे भाग्य राष्ट्रकूटांचे काळात उजळले होते तेवढे व तसे भाग्य आजतागायत त्याच्या नशिबी आले नाही, बदामीच्या चालुक्यानंतर “लत्तलूरपुरवराधि वर” असे स्वत:ला म्हणवुन घेणार्या राष्ट्रकूटांचे राज्य आले ते सुमारे २०० वर्षे टिकले. राष्ट्रकूटांनी त्याच काळात कंधारला राजधानीचा मान मिळवुन दिला.
राष्ट्रकूटांनंतर या भागावर राज्य केले ते कल्याणीच्या चालुक्यवंशीय राजांनी, महाराष्ट्राच्या अन्य कुठल्याही प्रदेशापेक्षा नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्याशी या घराण्याचा निकटचा संबंध होता. या काळात या परिसरात कितीतरी मंदिरे उभारली गेली. पैकी होट्टल, मुखेड, खानापूर, बार्हाळी, सुगांव, एकलारे, येशगी, सगरोळी, संगम करडखेड, तडखेल इत्यादी ठिकाणच्या मंदिरांची माहिती मिळते.
कंधारपुरला राजधानी स्थापणारे राष्ट्रकूट पूढे कल्याणी चालुक्यांचे मंडलिक म्हणुन अकराव्या शतकात राहत होते. कल्याणीच्या चालुक्यांचे राज्य चालू असता या घराण्याच्या राज्यकालामुळे त्यात मध्येच खंड पडला. प्रस्तुत घराण्याला मराठवाड्याचे कलचुरी असे म्हणता येईल.
केवळ महाराष्ट्रभर नव्हे तर त्याच्या बाहेरच्या विस्तृत प्रदेशावर राज्य करणारे यादवांचे घराणे, महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाच्या उष:काली सातवाहनांचे साम्राज्य जेवढ्या मह्त्वाचे होते तेवढेच प्राचीन काळाच्या शेवटी या यादव घराण्याचे महत्त्व होते. सहाजिकच संपूर्ण नांदेड परिसर त्यांच्या अधिपत्याखाली होता. पांचव्या भिल्लमाने देवगिरी हे नगर वसलिले आणि तेथे आपली राजधानी हलविली. तेव्हांपासून मराठवाडा मह्त्वाचा ठरला. कृष्णेच्या उत्तरेकडील सारे राज्य. याच्या ताब्यात होते. रट्ट घराण्याच्या बल्लाळाची अमर्दकपूर (औंढा जि.हिंगोली) येथे राजधानी होती आणि उपराजधानी होती अराध्यपूर (अर्धापूर जि.नांदेड) येथे, या ठिकाणी बल्लाळाचा सेनापती चालुक्य याचा निवास असे.
मध्ययुगीन इतिहास :
सन.१३१८ मध्ये यादवांचे राज्य कायमचे बुडले. महाराष्ट्र मुसलमानी सत्तेचा अमंल सुरू झाला. नांदेड परिसर त्याला अपवाद नव्हता. इसवी सन. १२९६ पर्यंत नांदेड परिसरावर देवगिरीच्या यादवांचा प्रभाव होता. यादवांच्या सत्तेचे एक प्रमुख ठाणे नांदेड नजिकच्या अर्धापूरात होते. हे अर्धापूर म्हणजे यादवकालीन आराध्यपूर. १४ व्या शतकाच्या प्रारंभी घडलेल्या या राजकीय स्थित्यंतराचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आणि दख्खनच्या इतिहासावर झाले. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने राजकीय संघर्षाचे एक नवे पर्व दख्खन पठारावर झाले.
आजच्या नांदेड जिल्ह्याचा मध्ययुगीन इतिहास एकुण दख्खन पठारावरील राजकीय घडामोडीशी प्रत्यक्ष संबंध ठेवून होता. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भूप्रदेशात घडणार्या संघर्षाचे पडसाद नांदेड घेण्याअगोदर दख्खन पठारावरील राजकीय स्थित्यंतरे समजुन घेणे अगत्याचे आहे. इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत मराठवाड्याचा वरिसर म्हणजेचे महाराष्ट्रातील गोदा खोरे, संपन्न अशा राजसत्ताचे माहेरघर होते. इसवीसन पूर्व ५ व्या शतकातील अश्मक आणि मूलक ही दोन्ही महाजनपदे या परिसरातील, त्यानंतर अनुक्रमे सातवाहन, वाकाटक, पुर्वचालुक्य, राष्ट्रकुल, उत्तरचालुक्य, यादव शिलाहार, कलचुरी या राजसत्तांच्या कालखंडात या परिसराने आर्थिक संपन्नता, राजकीय स्थैर्य, प्राचिन व्यापार उदीम उपभोगली. मोठ मोठी व्यापारी शहरे इथे उदयाला आली. अप्रतिम कालाविष्कार घडविले. दर्याखो-यातून सह्याद्रीच्या कड्याकपारीतून अप्रतिम कला अविष्कार घडविले होते. या कला अविष्काराला उदार हस्ते मदत करणारे संपन्न व्यापारी इथे होते. राजघराण्याच्या कोषागारात अमित संपती होती. इथल्या संपन्नतेच्या कथा अरब व्यापार्यामार्फत सर्वदूर पसरल्या होत्या. १३ शतकात हे सारे बदलू लागले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सुरु झाला. त्याची झळ नांदेड जिल्ह्यालाही बसली. या संघर्षाबरोबरच प्रशासन व्यवस्थेतही बदल घडले, नवी सुभेदारी व्यवस्था उदयास आली. इ.स. १३४६ साली दिल्लीच्या सलतनतीने दख्खन पठारावर चार सुभे निर्मीले. नांदेडचा समावेश या सनतनती सुभ्यामध्ये झाला. नांदेड जिल्ह्याचा समावेश व-हाड आणि बिदर तरफेत झालेला होता. सफदरखान सिस्तानी हा व-हाड तरफेचा तरफदार होता. सत्तासंघर्षाचे नांदेड परिसरातील आणखी एक केंद्र होते माहुर, येथला डोंगरी किल्ला अनेक लढ्याचा साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या परिसरात खरे तर गोंडाचे राज्य होते. गोंड हे दख्खनच्या पठारावरील वनक्षेत्राचे खरे राजे, तुघलक आणि बहमनी सत्तांच्या विस्ताराला गोंडांनी सतत विरोध केला. नांदेड जिल्ह्यातील खेरलाचा गोंड राज नरसिंगदेव हा देखील अनेक वर्षे बहमनीशी लढत राहिला. महमनी सलतनतीचा वजीर महंमद गवान याने बहमनी राज्याची प्रशासकीय पुर्रचना करण्याचे काम हाती घेतले. या महंमद गवानचे लष्करी ठाणे नांदेड शहराच्या परिसरातच होते. त्याची आठवण म्हणुन आजही नांदेडमध्ये वजिराबाद नावाची वस्ती आहे. या वजीर महंमद गवानने केलेल्या प्रशासकीय सुधारणेत बहमनी राज्याचे चार तरफ रद्द करण्यात येऊन आठ नवे सुभे निर्माण करण्यांत आले. या पुनर्रचनेनुसार आजचा नांदेड जिल्हा माहुर सुभ्याचा भाग बनला. नांदेड जिल्हा आकाराला यायला लागला तो येथपासून.
महंमद गवानच्या विरुध्द राजदरबारात मात्र बरेच राजकारण घडले इ.स. १४८१ साली या राजकीय कट कारस्थानचा परिणाम वजीर महंमद गवानच्या मृत्युत झाला. त्याला देहदंड देण्यापर्यंत सलतनतीतले कटकारस्थान पोहोचंले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सगळीकडे चालु होता. १४८२ साली सुलतान महमंदशाह तिसरा बहमनी मृत्यु पावला व त्याचा १२ वर्षाचा मुलगा महमुदशाहा अल्पवयीन राजा म्हणून सत्तेवर आला. सलतनतीतील सारी सत्त कासीम बरीदने आपल्या हाती घेतली व पालनकर्ता राजा म्हणून तो कारभार पाहु लागला. नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला हा कासीम बरीदचे प्रमुख लष्करी ठाणे बनला. इसवीसन १५२६ साली तिकडे दिल जहिरुद्दीन मुहंमद बाबरने मुघल सत्तेची स्थापना केली ही मुघलसत्ताही दख्खनच्या सत्ता्संघ येऊन उतरली. अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट असलेला व-हाड सुभा आणि त्यातला नांदेड जिल्हा इ.स. १५९६ मध्ये मुघलांच्या राज्यात समाविष्ट झाला. गेली तिनशे-साडेतिनशे वर्षे चाललेला स्थानिक मुस्लीम सलतनतीचा संघर्ष संपला आणि नांदेड जिल्हा पुन्हा दिल्लीपतीच्या अधिपत्याखाली आला.
१७ व्या शतकातील नांदेड :
१७ व्या शतकातील नांदेड जिल्ह्याचा इतिहास म्हणे अहमदनगररची निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्यातल्या संघर्षाची गाथा होय. दोन आडीच दशके हा संघर्ष चालला. १६३२ साली दौलताबादही मुघलांच्या ताब्यात आले. निजामशाहीतील कंधार आणि दौलाताबाद सारखी प्रमुख लष्करी ठाणी पडल्यामुळे मुघलांचा प्रभाव वाढला. नांदेड हे सुभ्याचे प्रमुख ठिकाण झाले. नांदेडच्या किल्यातून सुभ्याचा कारभार होऊ लागला. छत्रपती शिवरायांनी सामान्य रयतेचा विश्वास जागवला. त्याना लढण्याचे सामर्थ्य दिले. सत्तेचा उपभोग स्वत:च्या स्वार्थासाठी करण्यांच्या या मध्ययुगीन कालखंडात काळाची चौकठ भेदुन लोककल्याणाचा विचार करणारे मराठी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजानी निर्मीले. मुघल-मराठा संघर्षातील लक्षणीय अशी लढाई नांदेड जिल्ह्यात झाली नसली तरी उभय पक्षाच्या पक्षाच्या फौजानी नांदेड परिसरात घोडदौड मारली. १६७० साली व-हाडवरील चढाईच्या वेळी शिवाजी महाराज नांदेडला आले होते. इ.स. १६५८ साली औरंगजेब मुघल सम्राट बनला. इ.स. १६८६ साली मुघलांनो विजापूर जिंकले. विजापुरची आदिलशाही आणि गोवलकोंड्याची कुतूबशाही या दोन सलतनतीच्या पाडवानंतर औरंगजेबाने मराठ्यावर सगळे लक्ष केंद्रीत केले. कंधारचा आपला लष्करी तळही मजबुत केला हमिदुद्दीनखान या किल्लेदाराने याच काळात कंधारच्या किल्यावर आपला तळ ठोकला, मुघल-मराठा संघर्ष तीव्रतर बनत चालला. हा संघर्ष चालू असतांना नांदेड परिसरातील सामान्य रयतेचे जीवन अत्यंत हालाखीचे झाले होते. अनेक लोक स्थालांतरीत होऊ लागले. याच काळात नांदेड मधील कांही घराणी काशी प्रयाग अशा तिर्थक्षेत्री स्थलांतरत झालेली दिसतात. १८ व्या शतकातील संघर्षही मुख्यत: मुघल आणि मराठा यांच्यातला सत्तासंघर्ष होता.
श्री गुरुगोविंद सिंघाची नांदेड भेट :
इ.स. १७०४ च्या नंतर मुघल–मराठा संघर्ष अशा वळण येऊन पोहोचला की मुघलांचा पराजय स्पष्टपणे जाणवावा. मराठ्यानी दख्खन पठारावरील आपली सारी ठाणी परत मिळवली. आजचा नांदेड जिल्हा त्याकाळातल्या नांदेड आणि माहूर जिल्ह्यात विभागलेला होता. त्यातले माहुर हे वर्हाड सुभ्यात समाविष्ट होते तर नांदेड समावेश बिदर सुभ्यात झालेला होता. नांदेडची विभागणी ३० परगण्यात आणि ९४९ गावात झाली होती तर माहूर जिल्ह्यात २० तालुके- परगणे आणि ११४१ गावं होती. राजकीय सत्तासंघर्षाच्या या धामधुमीत नांदेड शहराला अन्यनयसाधारण मह्त्व प्राप्त करुन देणारी एक लक्षणीय घटना घडली. या घटनेचे महत्व स्थानिक नांदेड पुरते मर्यादित न राहता भारतीय इतिहासात नांदेडला एक आगळे स्थान प्राप्त करुन देणारी ही घटना आहे. एका नव्या युगाचा प्रारंभ झाल्याची साक्ष नांदेड परिसर देत होता. आज पासून तीनशे वर्षापूर्वीची श्री गुरुगोविंद सिंगांची नांदेड भेट ही घटना केवळ त्यांच्या अंतकाळापुरती मर्यादत राहत नाही तर गुरु ग्रंथसाहिबच्या रुपात झालेल्या तत्वचिंतनाची ती मुहुर्तमेढ ठरते. शिखधर्मासंबंधीचे कांही मह्त्वपुर्ण हुकूम नांदेड मुक्कामाहून निघाले आहेत. त्यामुळे नांदेडला एक आगळे मह्त्व आहे. १७२४ च्या आक्टोबर महिन्यात मुघल आणि निजामी सैन्यात साखरखंडी येथे मोठी लढाई झाली. दख्खनचे सहा मुघल सुभे निजामच्या ताब्यात आले. मुघल साम्राज्याचा सुभेदार म्हणुन निजामाने दख्खनचे सुभे ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात साखरखंडी येथील लढाईतील विजयामुळे मुघलाना पराभूत करुन चिन कुलीखान निजाम-उल् मुल्कने आपले स्वतंत्र राज्यच अस्तित्वात आणले होते. या स्वतंत्र राज्याचा कारभार औरंगाबादेतुन पाहिला जाऊ लागाला. नांदेड जिल्हा आता मुघलाच्या वर्चस्वातुन बाहेर पडला आणि स्वतंत्र निजामी राज्याचा भाग बनला कालांतराने निजामी राज्याची राजधानी, हैद्राबादला स्थलांतरीत झाली.
इ.स. १७२४ मधला नांदेड जिल्हा म्हणजे नांदेड सरकार खुप विस्तृत होते. आजचा नांदेड जिल्हा,अदिलाबाद आणि निजामाबाद जिल्हा हा सारा परिसर मिळुन हे नांदेड सरकार बनले होते. या काळात इंग्रज आणि फ्रेंच व्यापारी आपल्या फौज दख्खनच्या राजकारणात उतरले होते.
आधुनिक काळ :
महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सन.१८१८ पासून आधुनिक काळाची सुरुवात मानावी लागते. या एतद्देशीय सत्तेचा अस्त होऊन पेशवाई संपुष्टात आली व ब्रिटीस राज्य स्थिरावले. इ.स. १८५३ साली इंग्रज आणि निजाम यांच्यात एक नवा करार झाला. या करारान्वये हैद्राबादच्या निजामाने आपल्या राज्यातला पन्नास लाख शेतसारा वसुल करता येण्याजोगा भूप्रदेश इंग्रजाच्या ताब्यात द्यायचे कबुल केले. त्याअन्वये सारा विदर्भ सरकार हा विभाग इंग्रजांचा बराचसा बाग आणि नांदेड परिसरातील हदगांव, माहुर, किनवट हा भाग मात्र हैद्राबाद राज्यातच राहिला. अशा प्रकारे हदगांव, माहूर, किनवट हे भाग विदर्भ सरकारातून नांदेड सरकारात दाखल झाले. नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने हा बदल लक्षणीय आहे. नबाब सालारजंगने ही गुत्तेदारी पध्दत आणि शेतसारा वसुलीच्या इतर पध्दती बंद करुन एक नवी शेतसारा पध्दत, जिल्हाबंदीपध्दती अंमलात आणली. रोव्हेन्यू सर्वे अँन्ड सेटलमेंट डिपार्टमेंट स्थापन करण्यांत आले. शेतसारा वसुलीसाठी शासकीय महसुल यंत्रणा निर्माण करण्यांत आली. १८८१ च्या दरम्यान आठ तालुक्यांचा नांदेड जिल्हा आकाराला आला आणि औरंगाबाद सुभ्याचा भाग बनला. १८८५ साली सुभेदार पद पुन्हा निर्माण झाले आणि ते १९४९ पर्यंत कायम होते. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणुन तालुकापद निर्माण झाले ते १९४९ पर्यंत कायम होते. तालुका पातळीवर तहसिलदार पद होते. जिल्हा प्रशासनात नायब तालुकदार,पेशकार, शिरस्तेदार अशी कांही पदेही होती. हैद्राबाद शहरात १८५५ साली स्टेट बँक काढण्यांत आली. अधुनिक बँकींग व्यावस्था सुरु झाली. कालातंराने निजामी राज्यातल्या कांही गावांत स्टेट बँकेच्या शाखा निघाल्या. नांदेड जिल्ह्यातील उमरी या बाजारपेठत अशीच एक शाखा उघडली गेली. हैद्राबाद राज्याची राजभाषा फार्शी होती, फार्शी शिक्षण देणारे मदरसे कांही ठिकाणी होते. १८६८ साली नांदेडलाही एक फारसी मदरसा निघाली. इ.स.१८८४ मध्ये फार्शी एेवजी उर्दुला राजभाषेचा मान मिळाला. शिक्षणाचे माध्यम उर्दु झाले. इग्रजांच्या प्रभावातुन दळणवळणाची साधने वाढली. हैद्राबाद ते वाडी पर्यंत रेल्वे सुरु झाली. इ.स. १९०० साली नांदेड या गावात रल्वे आली. हैद्राबाद-मनमाड असा मिटर गेज रेल्वे मार्ग पुर्ण झाला. आणि या रेल्वेमार्गावरील एक रेल्वे स्टेशन नांदेड गावाजवळ उभारले गेले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाचेही असेच पडसाद राज्यात उमटले. स्वामी रामानंद तिर्थानी या आंदोलनाच्या दृष्टीने संघटन कार्य सुरु केले. हैद्राबाद राजकारणाची पावले आझाद हैद्राबादच्या दिसेने पडु लागली होती. हैद्राबादच्या निजामाची भूमीकाही या वाटचालीला पुरक होती.
मुक्तिसंग्राम पर्व :
१६ ऑगस्ट १९४६ रोजी स्टेट कॉंग्रेससाची बैठक हैद्राबादला संपन्न झाली. कॉंग्रेस मधला जहाल गट प्रभावी पणे सक्रिय झाला. रझाकाराच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता जीवनमरणाचा अंतिम संघर्ष पुढे दिसत होता. १९४६ च्या अखेरीस महाराष्ट्र परिषदेचे हैद्राबाद स्टेट कॉंग्रेस मध्ये विलीणीकरण झाले. हैद्राबाद स्टेट कॉंग्रेससाचे पहिले अधिवेशन मुझीराबाद येथे १६ ते १८ जुन या काळात संपन्न झाले. स्वामी रामानंद तिर्थाची स्टेट कॉंग्रेससचे पहिले अध्यक्ष म्हणुन निवड झाली. त्यानी या अधिवेशनातच निजामाच्या आझाद हैद्राबाद विरुध्दच्या आणि प्रस्तावित स्वतंत्र भारतातल्या हैद्राबादच्या विलीनीकरणाच्या अंतिम लढ्याचे रणसिंघ फुंकले.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र होणार या पार्शभुमीवर हैद्राबादच्या निजामाने राज्यातल्या रयतेवर अनेक निर्बध लादले.सभा बंदी, भाषण बंदी, हिंदी संघराज्याच्या म्हणजेच तिरंगा झेंड्यावर बंदी अशा अनेक प्रकारच्या बंदी लादणारे फर्मान काढले गेले. स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताचा तिरंगा ध्वज हा हैद्राबाद राज्यात परकीय ध्वज ठरवला जाऊन तो ध्वज फडकवणार्याणस राजद्रोही मानले गेले. अशा अवस्थेत स्वतंत्र भारतात विलीन होऊ इच्छिणारी राज्यातली ८५% जनता अधिकाधिक अस्वस्थ होत गेली. असंतोष भडकत गेला. विलिनीकरणाच्या मागणीने उग्र अशा आंदोलनाचे रुप धारण केले.इंग्रजांनी भारतसोडुन जायचे ठरवले त्याच्या ताब्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार ही गोष्ट स्पष्ट झाली. त्याचबरोबर भारतातल्या ५६५ राजांनाही इंग्रजांनी स्वातंत्र्य द्यावयाचे ठरवले, याचा अर्थ हैद्राबादच्या निजाम उस्मान अलीला स्वातंत्र्य मिळणार होते. १५ आगस्ट १९४७ भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा या स्वातंत्र्य प्राप्तीचा निखळ आनंद नांदेड परिसरातील लोकांना उपभोगता आला नाही. सार्या हैद्राबाद राज्यातच पोलिसांचा रझाकराचा ससेमिरा चुकवत तीर फडकावण्याचे प्रयत्न झाले. तिरंगा फडकवणार्याी कार्यकर्त्याना राज्यद्रोही ठरवुन तुरुंगात डांबण्यात आले. विलिनीकरण दिन म्हणुन हा दिवस साजरा झाला.
१५ सप्टेंबर १९४७ पर्यंत राज्यभरात आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केले होते. हैद्राबाद राज्य पुरभिलेखागारातील उपलब्ध कागदपत्रातून तुरुंगात डांबलेल्या १९४८ च्या ऑगस्ट सप्टेबर महिन्यात हैद्राबाद राज्यातली परिस्थिती दिवसेन् दिवस तणावपुर्ण बनत गेली. रझाकाराचे अत्याचार वाढत गेले. १३ सप्टेंबर १९४८ या रोजी स्वतंत्र भारताच्या फौजा हैद्राबाद राज्यात शिरल्या आणि “आपरेशन पोलो” सुरु झाले. चार दिवसात हैद्राबादच्या सैन्याने शरणागती पत्कारली, हैद्राबाद सैन्याचा सेनापती अल् इद्रुसने शरणागती पत्कारली आणि हैद्राबादेत तिरंगा फडकला. नांदेडच्या अव्वल तालुकदार कार्यालयावरही तिरंगा फडकला. हळुहळु स्थित्यंतर घडु लागले. अव्वल तालुकदाराच्या जागी नांदेडलाही कलेक्टर आला. मध्ययुगीन निजामी सलतनतीच्या कारभाराचे रुपांतर अधुनिक पजासत्ताकीय यंत्रणेत होऊ लागले. प्रत्येक जिल्ह्यासाठी नागरी प्रशासक, जिल्हा पोलीस प्रमुख नेमला गेला. लष्करी प्रशासनाचा काळ संपल्यानंतर नागरी प्रशासकाच्या जागी कलेक्टर नेमले गेले.
राज्य पुनर्रचना आणि महाराष्ट्र राज्य निर्मिती :
१९२० साली अखिल भारतीय कॉंग्रेसने घटनेच्या पहिल्या मसुद्यातच भाषावार प्रांत रचनेचा विचार समाविष्ट केला होता. १९५५ साली फाजलअली अहवाल सादर झाला. व्देभाषीक मुंबई राज्य अस्तित्वात आले. हैद्राबाद राज्याचे विभाजन झाले. मराठवाडा मुंबई राज्यात समाविष्ट झाला. नांदेड जिल्ह आता हैद्राबाद राज्यातून मुंबई राज्यात समाविष्ट झाला. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मुंबई प्रांताचे विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये निर्मीली गेली.
आता नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारे मध्ययुगीन सलतनतीतले नांदेड आता झपाट्याने बदलु लागले. नंदीतटांचे नांदेड आता लहान गावठाण राहीले नाही, शहर बनले, पाहता पाहता शहराचा विस्तार घडत गेला आणि नांदेड- वाघाला महानगरपालीका अस्तित्वात आली. संपुर्ण जिल्ह्यात मिळुन एक हायस्कुल असलेल्या नांदेडात स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ स्थापन झाले. अनेक महाविद्यालये निघाली. मेडीकल, इंजिनिअरीग,लाँ,फार्मसी अशा विविध विद्याशाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये अस्तित्वात आली. नांदेड जिल्ह्याने मध्ययुगीन मागसलेपणाची कात टाकुन २१ व्या शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे.
नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने संपुर्ण देशाशी जोडलेले असल्याने येथे येण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नांदेड स्टँडहून रिक्षाने अरब गल्लीत असलेल्या किल्ल्यापर्यंत जाता येते. धार्मिक इतिहास लाभलेल्या नांदेड शहरात एक किल्लाही आहे. हे फार कुणाला माहित असेल, असे वाटत नाही. पण, ज्या नंदितटामुळे शहराला नांदेड हे नाव मिळाले, तेथील प्राचीन नंदगिरी किल्ला आवर्जून बघीतला पाहिजे. नदी काठावर शहराच्या पूर्वेस हा किल्ला आहे. तटबंदीच्या अवशेषांवरून किल्ल्याच्या क्षेत्रफळाचा अंदाज करता येतो. या किल्ल्याचे क्षेत्रफळ जवळपास २८ एकर आहे.
गोदावरी नदीच्या काठावर शहराच्या दक्षिणेला जुन्या नांदेडात उत्तर दिशेला किल्ल्याचे प्रवेशद्वार असून, नदीच्या मोठय़ा वळणाकर असलेला हा किल्ला लांबूनच आपली ओळख सांगतो. अरब गल्लीतुन दिसणाऱ्या नांदेड महानगरपालिकेने बांधलेल्या दोन टाक्यांच्या दिशेने गेल्यावर आपला किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत प्रवेश होतो. भुईकोट किल्ला असूनही किल्ल्याभोवती खंदक आढळत नाही; कारण गोदावरी नदीच्या काठावरच हा किल्ला बांधलेला असल्याने खंदकाची आवश्यकता राहिलेती नाही.
गॅझेटीयरमधील नोंदीनुसार कधीकाळी य़ा भुईकोट किल्ल्याला दुहेरी तटबंदी असुन त्यात २४ बुरुज होते. त्यापैकी १४ बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर १० बुरुज आतील तटबंदीत होते. आजमात्र किल्ल्याच्या तटबंदीत केवळ ९ बुरुज उरलेले असुन त्यापैकी किल्ल्याचे ५ बुरुज आणि तटबंदी बाहेरुन दिसतात तर उरलेले ४ बुरुज गडफेरी करताना आतील बाजूने लक्षात येतात. किल्ल्याभोवती असलेल्या दोन तटबंदीची भग्नरूपे आजही पाहावयास मिळतात. त्याच ठिकाणी नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या बांधलेल्या आहेत. त्या टाक्यांच्या दिशेने गेल्यावर किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत आपला प्रवेश होतो. किल्ल्याला सध्या सहा बुरूज असून, तीन बुरूज गोदावरी नदीच्या दिशेने तोंड करून उभे आहेत. दक्षिणेकडचा बुरूज सर्वा उंच असून, त्याला टेहळणी बुरूज म्हणून संबोधले जात असे.
इतर किल्ल्यांच्या तुलनेत हे बुरूज पायथ्याला अत्यंत डेरेदार, पसरट आणि बसके आहेत. घडीव दगडांऐवजी नैसर्गिक दगडांचा वापर करून बुरूज बांधलेले आहेत. वरचा भाग मात्र विटांनी बांधलेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडील म्हणजेच गोदावरी नदीच्या काठावरील बुरुजांची उंची जवळपास १७५ फुटांची आहे. किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे होती. प्रवेशद्वाराच्या समोर अर्धवर्तुळाकार तटमित म्हणजेच 'जीभी' असावी. प्रवेशद्वाराला लाकडी दरवाजे होते. किल्ल्यात पूर्वी भरपूर तोफा असत्या पाहिजेत. आता येथे केवळ एकच तोफ पाहावयास मिळते. किल्ल्याच्या तटबंदीतून खाली शत्रूवर बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे म्हणजेच 'जंग्या ठेवलेल्या आढळतात. या किल्ल्यातून जाणारा भुयारी मार्ग सरळ गोदावरी नदीत जातो.
आपला किल्ल्यात जेथुन प्रवेश होतो त्या ठिकाणी महानगरपालिकेने दोन सिमेंटचे छोटे बुरूज बांधलेले असुन तेथे लोखंडी दरवाजा लावलेला आहे. हा दरवाजा सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेतच उघडा असतो. या लोखंडी दरवाजातून आत आल्यावर समोरच पाण्यांच्या टाक्यांच्या बाजूला किल्ल्याची माहिती देणारा फ़लक पुरातत्व खात्याने लावला आहे. किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही नांदेड महानगरपालिकेने किल्ल्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दोन मोठया टाक्या आणि विश्रामगृह बांधून किल्ल्याची पार रया घालवली आहे. या वाटेने पुढे आल्यावर एक १५x१२x१० फ़ूट लांबीरुंदी व खोली असलेला हौद आहे. हैदराबाद निजामाच्या काळात गोदावरी नदीच्या पात्रातून पाणी या उंचीवर खेचुन येथे त्याचे शुद्धीकरण करून नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी त्याची बांधणी करण्यात आली होती. त्यासाठीची यंत्रणा खास इंग्लंडहून आणली होती. हा प्रकल्प आता बंद झाला आहे.आता या हौदाचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण केल्याने त्याचे कारंजे बनले आहे.
पुष्कर्णीच्या पुढे नदीच्या काठाने काही निजाम काळात बांधलेल्या वास्तूं व त्यांचे अवशेष आहेत. सुभेदारी महाल, नियोजनबद्ध उद्यान, कारंजे, पाण्याचा तलाव ही या किल्ल्याची वैशिष्टय़े होती. परंतु, त्यांच्या खुणाही पाहण्यास मिळत नाहीत.
ज्या महालात बसून निजामाच्या सुभेदाराने तेलंगणाच्या कारभाराची सूत्रे हाकली, तो सुभेदारी महाल आता केवळ बडा घर, पोकळ वासा बनला आहे. सात खोल्या आणि दोन ओसऱ्यांच्या या महालचे छत कोसळले आहे. लाकडी तुळया आणि वासे गायब झाले आहेत. निजामकाळाच्या अखेरीच पाणीपुरवठा अधीक्षकांचे कार्यालय असलेल्या या इमारतीतून मुघलकाळात बादशहा औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याचा मुलगा खुदाबंद खानाचे काही काळ वास्तव्य होते.१७०८च्या सुमारास उमादतुलमुल्ला खान फिरोज जंग इथला सुभेदार होता. वऱ्हाडचीही सुभेदारी त्याच्याकडेच होती. सय्यद अब्दुल्लाह, साहुल्ला खान, अलीमुद्दीन खान अशा सुभेदारांनी राज्याचा कारभार हाकलेल्या या महालाची आज चक्क हागणदारी झाली आहे. पडक्या खोल्या घाणीने भरल्या आहेत. बुरूजावरील पॅगोडाकडे जाताना डाव्या बाजूच्या खोल्यांचा इथले लोक स्वच्छतागृह म्हणून वापर करतात. त्यामुळे गोदापात्राकडे उघडणाऱ्या या महालाच्या दारांतून दुर्गंधीचे भपकारे येतात.
या वास्तू बांधताना किल्ल्याच्या मूळ वास्तू व त्यांच्या अवशेषांचा वापर केला गेला आहे. ते अवशेष ओलांडून डाव्या बाजूला पुढे गेल्यावर नदीच्या काठावर एक बुरुज आहे. .या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीतील या बुरुजावर चुना व विटांपासून बनवलेली एक मोठी छत्री होय. अशी छत्री इतर कोणत्याच किल्ल्यात आढळत नाही. बुरुजावरुन टेहळणी करणार्या टेहळ्यांचे उन पावसापासून रक्षण होण्यासाठी याची रचना केलेली असावी. या ठिकाणी बसून संपूर्ण परिसराचे निसर्गसौंदर्य पाहता येते. कदाचित ही जागा म्हणजे म्हणजे नळदुर्गाच्या किल्ल्याप्रमाणे टेहळणी बुरूज असावा.
अवशेषांच्या उजव्या बाजुला खालच्या अंगावर दुसरा बुरूज आहे. वरील बुरुजाचा भाग हा किल्ल्यातील सर्वात उंच भाग असुन तेथुन किल्ल्याचा बराचसा भाग व गोदावरीचे दुरवर पसरलेले पात्र नजरेस पडते. खालील बुरुजावर एक अखंड तोफ असुन या भागातील तटबंदी नव्याने विटांनी बांधलेली आहे.
नांदेड फोर्ट: तोफेचा तोंडाचा भाग. लोकल भुरट्या चोरांनी लोखंड काढून नेलेला प्रकार. तोफेचा आकार 4फूट आहे .लोखंडी पट्टीने बनलेली तोफ बांगडी तोफ म्हणून ओळखली जाते सदरील तोफ जंजिरा किल्ल्यात पहायला मिळतात.
तोफेचा बत्ती देण्याचा भाग आणि .त्यावर लिहिलेले अक्षर मोडल्याची खुणा नांदेड किल्ला
नंदगिरी किल्ल्यात एक उत्तम पोलादी बांगडी प्रकारातील तोफ आहे. तिची लांबी पाच फूट, तर परीघ दोन फूट आहे. तोंड फुटलेल्या अवस्थेतील ही तोफ मातीत पडलेली असून, तिला जमिनीपासून उंचावर ठेवणे गरजेचे आहे. ती सुद्धा भग्न म्हणजे तोफेचे लोखंड कुणी तरी काढून घेतल्याचे आढळते. राज्यात अनेक ठिकाणच्या तोफा चोरीला जाण्याचे प्रकार उघड होत आहेत. अशा वेळी या नंदगिरीच्या एकुलत्या एक तोफेला जपणे आवश्यक आहे. किल्यातील राजवटी पाहिलं असता किल्ल्यातील खूप काही चोरीस गेल्याचे नाकारता येणार नाही
येथुन पुढील भागात किल्ल्याचे उरलेले दोन बुरूज असुन या बुरुजांच्या शेजारीच विश्रामगृह बांधलेले आहे. यातील पहिल्या बुरुजाच्या खाली खडकात खोदलेले एक टाके असुन दगडात बांधलेले एक कोठार आहे. येथे मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने या वास्तू पटकन लक्षात येत नाही. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ला संपुर्णपणे आतबाहेर पहाण्यासाठी एक तास लागतो. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नळ आहे.
आजची दुर्दशा :-
आज किल्ल्याची चक्क हागणदारी झाली आहे. एकांतात अनेक गैरप्रकार पडक्या इमारतींतून चालतात. येथील निजामकालीन जलशुद्धीकरण प्रकल्प आज बंद असला, तरी किल्ल्याच्या आवारातील पाण्याच्या टाक्या आणि नव्याने झालेली बांधकामे, यामुळे परिसराचे ऐतिहासिक रुप हरवले आहे.
जिल्हा नियोजन समितीने लावलेला माहितीफलक फाटला आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळत आहेत. तटापर्यंत अतिक्रमणे भिडली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर झाडे उगवून, त्यांच्या मुळांनी चिरे खिळखिळे केले आहेत. महापालिकेने विकसित करायला घेतलेल्या उद्यानात वाळलेला झाडपाला आणि कचरा साचला आहे. कुंडातील कारंजी बंद पडून शेवाळ साचले आहे. इ.स. २००४ मध्ये नांदेडचे सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारा लाइट अँड म्युझिक शो आयोजित करण्यात आला होता.
राजकीय इच्छाशक्ती आणि नियोजनातील सरकारी बाबूगिरीचा दृष्टिकोन, यामुळे अजूनही हा किल्ला प्रकाशात आलेला नाही. जिल्हा प्रशासन, महापालिका, पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाने एकत्र येऊन योजना बनवल्यास नांदेडला येणारे पर्यटक किल्ल्यालाही भेट देऊ लागतील, यात शंका नाही.
Fort : Nanded fort
Location : Nanded city
Type : Land fort
District : Nanded
Route : Nanded City - Arab Galli.
After visiting Mahur we halted for the day in Nanded city. Nanded city is famous for Gurudwara , Guru Gobind Singh a guru of the Sikhs supposedly attained martyrdom in Nanded hence a Gurudwara was built here. Nanded fort is located on the banks of the Godawari river and is located in the old city. The place is known as Arab Galli and is quite filthy with very small roads to go in. The fort is now part of the water pumping station at Nanded and most of it is dilapidated. Inside the fort there are some broken structures , a bastion and a beautiful lake and some cannons.
There is no notable history of the fort or its rulers , however there are references to this fort goes back to 7th Century BC when it was ruled by the Magadh Kingdom. Nanded was under the rule of Nizam of Hyderabad too and was amalgamated into Maharashtra after the Nizams rule ended
Location : Nanded city
Type : Land fort
District : Nanded
Route : Nanded City - Arab Galli.
After visiting Mahur we halted for the day in Nanded city. Nanded city is famous for Gurudwara , Guru Gobind Singh a guru of the Sikhs supposedly attained martyrdom in Nanded hence a Gurudwara was built here. Nanded fort is located on the banks of the Godawari river and is located in the old city. The place is known as Arab Galli and is quite filthy with very small roads to go in. The fort is now part of the water pumping station at Nanded and most of it is dilapidated. Inside the fort there are some broken structures , a bastion and a beautiful lake and some cannons.
There is no notable history of the fort or its rulers , however there are references to this fort goes back to 7th Century BC when it was ruled by the Magadh Kingdom. Nanded was under the rule of Nizam of Hyderabad too and was amalgamated into Maharashtra after the Nizams rule ended
व धार्मिक इतिहास लाभलेल्या नांदेड शहरात एक किल्लाही आहे. हे फार कुणाला माहित असेल, असे वाटत नाही. पण, ज्या नंदितटामुळे शहराला नांदेड हे नाव मिळाले, तेथील प्राचीन नंदगिरी किल्ल्याची आज चक्क हागणदारी झाली आहे. एकांतात अनेक गैरप्रकार पडक्या इमारतींतून चालतात. येथील निजामकालीन जलशुद्धीकरण प्रकल्प आज बंद असला, तरी किल्ल्याच्या आवारातील पाण्याच्या टाक्या आणि नव्याने झालेली बांधकामे, यामुळे परिसराचे ऐतिहासिक रुप हरवले आहे.
इतिहास सांगतो. जुन्या नांदेडमधील अरब गल्लीतून तिकडे जाता येते. नदीच्या पात्राकडील भव्य तटबंदी आणि सहा बलदंड बुरूज एवढीच किल्ल्याची ओळख आता शिल्लक आहे.मोठा विस्तार असलेल्या किल्ल्याभोवतीच्या तटबंदीच्या चार भिंतीचे अवशेष आजही आढळतात. किल्ल्यात निजामाने १९३६ मध्ये मराठवाड्यातील पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प
उभारला.
किल्ल्याचे बुरुजही ढासळले
जिल्हा नियोजन समितीने लावलेला माहितीफलक फाटला आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळत आहेत. तटापर्यंत अतिक्रमणे भिडली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर झाडे उगवून, त्यांच्या मुळांनी चिरे खिळखिळे केले आहेत. महापालिकेने विकसित करायला घेतलेल्या उद्यानात वाळलेला झाडपाला आणि कचरा साचला आहे. कुंडातील कारंजी बंद पडून शेवाळ साचले आहे.
राजकीय इच्छाशक्तीची गरज
राजकीय इच्छाशक्ती आणि नियोजनातील सरकारी बाबूगिरीचा दृष्टिकोन, यामुळे अजूनही हा किल्ला प्रकाशात आलेला नाही. जिल्हा प्रशासन, महापालिका, पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाने एकत्र येऊन योजना बनवल्यास नांदेडला येणारे पर्यटक किल्ल्यालाही भेट देऊ लागतील, यात शंका नाही.
नंदगिरी:
गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर नंदगिरी हा किल्ला असून, प्राचीन नांदेडचा समावेश या किल्ल्यात होत असे. आता तर नांदेड हे महानगर या किल्ल्याला चोहो बाजूंनी घेरून प्रचंड अस्ताव्यस्त वाढले आहे. उत्तर भारतीय नंद घराण्याचे राज्य दक्षिणेकडे विस्तारते, तेव्हा नांदेड ही नंदांची दक्षिणेकडील उपराजधानी होती. नंदगिरी हा भुईकोट किल्ला असून, तटबंदीच्या अवशेषांवरून किल्ल्याच्या क्षेत्रफळाचा अंदाज करता येतो. या किल्ल्याचे क्षेत्रफळ जवळपास २८ एकर आहे.
किल्ल्याच्या बाह्य तटबंदीस ३३ बुरूज होते.
औरंगजेबाच्या काळात किल्ल्यामध्ये बगीचा व कारंजी निर्माण केली गेली असावी. किल्ल्यामध्ये मोगल काळात तयार केलेले पाण्याचे हौद उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत आढळतात. शिवाय राजवाडा, राजदरबार, राणी महाल, पागा, अंबरखाना, कैदखाना, किल्लेदार व अधिकाऱ्यांचे निवासस्थान इ. वास्तूही या किल्ल्यात बांधल्या गेल्या असाव्यात. त्यापैकी फक्त चार वास्तूंचे भग्नावशेष आढळतात. सध्या मात्र किल्ल्याचे मूळ स्वरूप पूर्णतः लोप पावत असून, दगडांचे भग्नावशेष किल्ल्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे जलशुद्धीकरण कार्यालय आणि मुस्लीम लोकांची वसाहत सध्या किल्ल्यात आहे.














































No comments:
Post a Comment