Tuesday, February 4, 2025

दिक्पाला, नवग्रह

 
 मुख्य मंदीराच्या बाह्य अंगावर सर्वात खाली पीठ, आम्रभंजीकांनी अलंकृत केलेला वेदीबंध, भिंतीच्या भागावर तीन जंघा पट्ट आणि कपोतालीच्या वर लतिन शिखर आहे. कोपर्यावर असणार्या शिखरावर भुमी आमलक असून मुख्य मंदीराच्या शिखरावर असे सहा भुमीआमलक दिसतात. पीठावर जाड्यकुंभ, अंतरपत्र, कणी आणि त्यावर वेदीबंध असे थर आहेत. गर्भगृहाच्या मागील हरिहरपितामहार्क तर उरलेल्या दोन भद्रावर नृत्य करणारा भैरव आणि बसलेला दशभुज सदाशिव, कोपर्यावरील पट्टावर दिकपाल आणि वसु दाखवले आहेत. तसेच कोण आणि भद्र यांच्यामधील भागात अप्सरा दाखवल्या आहेत. 

 याशिवाय इथे आणखी एक आवर्जून बघण्यासारखी गोष्ट म्हणजे व्याल. व्याल म्हणजे संयुक्त प्राणी ( hybrid) एका प्राण्याचे धड आणि दुसर्या प्राण्याचे शीर.अधीक गुण अथवा ताकद दर्शविण्यासाठी असा प्रयोग केला आहे. हे व्याल विवीध प्रकारचे आहेत.जसे नरव्याल, गजव्याल, शुकव्याल वगैरे. खजुराहोच्या मंदीरातही असे व्याल आहेत. बहुतेक संस्कृतीत कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्याल दिसतातच. जसे इजिप्तमध्ये जगप्रसिध्द स्किंफ व्यालच आहे. या मंदिरावर इतके वेगवेगळ्या प्रकारचे व्याल दाखविले आहेत कि प्रत्येक व्याल वेगळ्या प्रकारचा आणि अद्वितीय आहे. कदाचित शिल्पकाराची कल्पनाशक्ती आटली तेव्हा मधूनमधून साधू दाखवले आहेत. 

ईशान सपत्निक


ब्रह्मेशानजनार्दनार्क मूर्ती
ब्रह्मा,शिव ,विष्णू आणि सूर्य या चारही देवतांची तयार झालेली संयुक्त मूर्ती.

ईशान सपत्निक .पत्नीच्या हातात कमलनाल आहे.

स्त्री आणि माकड.सुरसुंदरी ला माकडाने विवस्त्र केले आहे.
नृत्य गणेश,अष्टभुज मूर्ती,वाद्यसंगीताची साथ देणारे गण दोन्ही बाजूला आहेत.

आलसा किंवा लीलावती
पुर्व दिशेचा अधिपती इंद्र,उजव्या पाठीमागच्या हातात वज्र आहे.सपत्निक शचि सह.वाहन हत्ती पायाशी दाखवले आहे.
एकटा ईशान-त्रिशूल,अक्षमाला,त्रिमुखी नाग,कमंडलू.
जटामुकुट, पायाशी बैल.
स्त्री-मुंगुस- साप


पत्रलेखिका

     मंदीराच्या बाह्य अंगावरील खालच्या पट्टातील कोपर्यावर दिक्पाल आणि इतर देव दाखवले आहेत तर वरच्या दोन पट्टावर व्याल आणि अप्सरा दाखवल्या आहेत.सुरसुदंरी अत्यंत सुडौक प्रमाणबध्द आणि आकर्षक आहेत. परंतु या इथे कोणाला मोहवण्यासाठी गुंतलेल्या नाहीत, तर त्या भाविकांना विवीध प्रकारच्या मोहजाळातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करतात, काम, क्रोध ,मद आदी षडरिपु त्यागून मंदीरात प्रवेश करा असे सांगणारी इथली सुरसुंदरी शिल्प अप्रतिम आहेत, त्यांची कल्पना करणार्यांना आणि साकारणार्यांना दाद द्यायला हवी. सुरसुंदरीच्या हावभावानुसार आणि वेशभुषेनुसार त्यांना विन्यासा, जया, नर्तिका, कर्पुरमंजिरी अशी वेगवेगळी नावे आहेत.


      देवदेवतांची शिल्प रौद्र आणि शांत मुद्रेत आहेत. येथे पार्वतीही दिसते आणि चंद्रीकाही दिसते. रुद्रही दिसतो आणि इश्वरही गरजेप्रमाणे रुप धारण करतो. हेच शिल्पकारांना सांगायचे असेल. प्रमुख देवतांची शिल्प देवकोष्टात दिसतात. प्रत्येक देवदेवतेच्या पायाशी वाहन कोरले आहे. त्यामुळे देवाची ओळख सहज पटते. मंदीराच्या प्रवेशद्वाराशी चित्र प्रकारची ( free standing ) दोन शिल्प आहेत. 



































































































भानुमित्राच्या नाण्यावर सूर्य

भाग ३ : सूर्य


आरंभ :
मानव जीवनांचे मूळ, प्रकाश आणि बल याचे प्रतिक तसेच नैसर्गिक शक्तीचा दृष्टिगोचर होणारा पुंज म्हणून सूर्य श्गातील अनेक प्राचीन वसाहतीत मानांचे स्थान प्राप्त करीत आला आहे. संपूर्ण आकाशाची दिवसभरांत यात्रा करणाऱ्या सूर्याची अनेक रूपें व प्रतीके कल्पिली गेली आहेत. कुठें तर त्याच्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या मंडलाकार रूपालाच प्राधान्य दिले गेले तर कुठे त्याची सारखें फिरत राहण्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन त्याचा रथ, घोडे आणि सारथी याची कल्पना केली गेली. काही ठिकाणी अंध:काराचा नाश, कमलादि पुष्पांचा विकास, मानवीय जीवनांवर पडणारा सूर्याचा प्रभाव, वगैरे सूर्याची कार्ये लक्षांत घेऊन तद्नुरूप सूर्याच्या ध्यानाची संगती लावली गेली. भारतांत आज दिसणाऱ्या सूर्योपासनेच्या मुळाशी कित्येक देशांच्या परंपरा आणि त्यांच्याशी आमची झालेली देवाण घेवाण विद्यमान आहे.
भारतांतील सूर्योपासनेची मुळे जरी वेदकाळापर्यंत जात असली तरी कुषाणाच्या राजवटीपासून तिने निराळी वळणें घेतली आहेत. गुप्तकाळांत ही उपासना सौर मत या नावाने पसरली, व पुढें पंचदेवोपासनेत हिला स्थान मिळून शिव, विष्णू, शक्ती आणि गणपतीप्रमाणें नित्य पूजेंत सूर्याचेही विशिष्ट स्थान निर्माण झाले. कोणत्याह पंचायतनांत ज्या देवांचे पंचायतन असेल तो मधे व इतर देव चार बाजूला असतात. सूर्य पंचायतनांत अर्थात्व सूर्य मर्धे व शंकर, देवी, विष्णू आणि गणपती चारी दिशांना असतात. अशीच मंदिराची रचना असल्यास ते संपूर्ण मंदिर पंचायतन मंदिर म्हटले जाते, अस्तु.
सूर्योपासनेची मुख्य प्रतीकें दोन होत मंडळ आणि मूर्ती! पुढे या दोन्हीचें संमिश्रण झाले व 'मंडल-मूर्ति' तयार झाली. हिचे दोन प्रकार दिसतात; एक तर मंडळांत संपूर्ण मूर्तीचे अंकन व दुसरे मंडळांत फक्त मानव मुखांचे अंकन यापैकी मानव मुखाचा प्रकार बराच पुढे अस्तित्वांत आला.

मंडळ :
किरणावलीने युक्त असे सूर्याचे रूप आपण प्रत्यक्षच पाहतो. तेथे कल्पनेचा शिरकाव होण्याचे कारण नाही. भारतांचे प्राचीनतम सूर्य प्रतीक हेच होय. त्रग्वेदांत याचा उल्लेख आहे व शतपथ ब्राह्मणांत असें विधान आहे की स्थंडिलावर सूर्याचा प्रतिनिधी म्हणून सोन्याचा तुकडा ठेवावा. सांबउपपुराणकार अर्से सांगतात कीं सुरुवातीला सूर्याची प्रतिमा ठेवीत नसून मंडलातच त्याचे पूजन केले जात असे. ज्या प्रमाणें आकाशात सूर्य मंडल विद्यमान असते त्याचप्रमाणें ज्यासक त्याची प्रतिकृती निर्माण करून घेत असत. त्यानंतर विश्वकर्याने जेव्हा पुरुषाकृती सूर्य घडविला, तेव्हा मंदिरांत आणि घरोघरी प्रतिमा स्थापन होऊ लागल्या.
वाङ्‌मयात मिळणाऱ्या या उल्लेखांचा पाठ पुरावा नाणीही करतात. ठोकीव नाण्यांना (Punch marked coins)

३५२

आपल्या देशांतील सर्वांत जुनी नाणी समजतात. या नाण्यावर अनपवादरूपाने एक चक्रचिन्ह दिसते ते सूर्याच प्र म्हणून मानले जाते. त्याचप्रमाणे 'बडार चकाला' ही दुसरे सूर्य चिन्ह समजतात. ठोकीय नाण्यावर सूर्य विवाचे अंकन पावाल जनपदाच्या मित्र वंशातील सूर्यमित्र व भानुमित्राच्या नाण्यावर मिळते. येथे वेदिकेने आवृत एका दि किरणावली सगट सूर्यबिंब दाखविले आहे. (रे. चि. पान २८३)
कमळालाही सूर्याचे प्रतीक मानतात. त्याच्या विकासाशी सूर्याचा संबंध, किरणावलि वेष्टित सूर्य बिंबाशी त्याची समानता, देवमूर्तीचे प्रभामंडल म्हणून पूर्ण विकसित कमळाचे अंकन वगैरे कित्येक मुद्दे या गोष्टीची सार्थकता पटवितात डॉ. बॅनर्जी यांच्या मतें जुन्या नाण्यांवर दिसणारे कमळ हे सूर्याचेच द्योतक होय.

मूर्ती :
सांबपुराणाचे स्पष्ट मत आहे कीं मूर्ती ही नंतर आली. भविष्य पुराणांत याची सोपपत्तिक कथा आहे. श्रीकृष्णांना मुलगा सांब याला कुष्ट झाले. ते लवकर बरे होईना. त्याच सुमारास शाकद्वीपात अग्नी आणि सूर्य यांच्या उपासकांत काही तंटा झाला व त्यामुळे सूर्योपासक मगांना भारताचा आश्रय घ्यावा लागला. या मगांनी (बांना आपल्या वाड्‌मयात मन ब्राह्मण असे म्हटले आहे.) सांबाच्या रोगांवर उपाय म्हणून सूर्योपासनेचे विधान सांगितले व त्याप्रमाणें सांब रोगमुक्त झाला. महाभारतांत शाकद्वीपाच्या एका जनपदाला मग असे नांव दिले आहे. इथल्याच आचार्यांना 'मग' ही संज्ञा मिळणे शक्य आहे. हे ही संभवते कीं देवांचा मुख्य शिल्पी विश्वकर्मा किंवा त्वष्टा मंग प्रदेशाचाच रहिवासी असेल, पुराणांच्या माहितीप्रमाणे त्वष्ट्याची मुलगी संज्ञा ही सूर्याला दिली होती व संज्ञेच्या इच्छेप्रमाणे प्रखर आणि बेडोल अशा तिच्या पतीला त्वष्ट्याने करवतीवर तासून सुबक आणि सहन करण्यास योग्य असे केले होते. तासण्याचे काम गुडघ्यापर्यंत आल्यानंतर सूर्याला ते सहन करवेना. तो काकुळतीला आला तेव्हा त्वष्ट्याने गुढघ्याखाली त्याचा देह अपूज्य ठरवून पाय तसेंच राहू दिले पण त्यांना झाकून टाकले,' त्वष्टा आणि सूर्य याची माहिती देणारी ही कथा मार्कण्डेय पुराणांत मिळते. साम्ब उपपुराणातील कथेशी हिची संगती बसविल्यांस हे उघड दिसते की सूर्याला सुंदर अर्थात् भारतीय डोळ्यांना पटेल असा बनविण्यात विश्वकर्त्यांचा चांगलाच हात होता. 'विश्वकर्माशिल्प' नावाच्या ग्रंथात सूर्य प्रतिमा घडविण्याबद्दल विस्तृत माहिती आहे." पण तेथे पायांविषयी स्वतंत्र असा उल्लेख दिसत नाही. सूर्याचे पाय गुढघ्याच्याखाली लपविण्यांबद्दल बृहत्संहितेंत स्पष्ट विधान आहे." सूर्याच्या पायाविषयी चर्चेचे सूत्र पुनः आपल्याला हाती घ्यावयाचे आहे.

सुरुवातीची सूर्यशिल्पे :
वाङ्मयीन पृष्ठभूमीशी येथवर परिचय प्राप्त करून घेतल्यानंतर आतां सूर्य शिल्पांकडे वळू. भारतीय कलेत सूर्य प्रतिमा शुंगकाळांपासून मिळू लागतात. बुद्धगयेच्या (बिहार) एका वेदिका स्तंभावर तो रथारूढ दिसतो." तसाच अनंत गुंफेच्या (ओडिसा) द्वारांबरही, तो आढळतो. या प्रतिमा भारतीय धर्तीच्या आहेत."
सुमारे याच काळाच्या दरम्यान भारतीय ग्रीक राजे प्लेटो आणि फिलॉक्सिनॉस यांच्या नाण्यांवर 'हेलिओस' नावाने सूर्याचे दर्शन होते." सूर्यवाचक हेलिऑस शब्द उघडच ग्रीक आहे पण केव्हातरी त्याने 'हेली' हे रूप धारण करून संस्कृत भाषेत प्रवेश मिळविला." प्लेटोच्या चांदीच्या नाण्यावर चार घोड्यांच्या रथांत बसलेला सूर्य आहे. भारतीय ग्रीक (Indo-Bactrian) राजांचा काळ सुमारे २५६ इ.पू. ते ५० इ.पू. मानतात. याच काळांतील बुद्धगयेच्या सूर्यरवाला चार घोडे जुंपलेले आहेत. सारथी दिसत नाही. पण धनुष्याला बाण लावलेल्या उषा आणि प्रत्यूषा या दोन स्त्रिया मात्र दिसतात. रथाची चाके दिसत नाहीत.

३५३

वा काळात दक्षिणेतही रथारूढ सूर्याचे अंकन आरंभ झाले होते. भाजा येथील लेण्यांत एका विशालकाय राक्षसाला जाणारा चार घोड्यांचा सूर्य रथ दिसतो." येथे देखील सूर्याच्या दोन्ही सेविका उषा प्रत्यूष ? व रथाची दोन पाहता येतात पण सारथी मात्र नदारत आहे. लक्षांत ठेवण्यासारखा मुद्दा महणजे असा प्रत्यय विद्यालयात खुबीने सूर्याचा अधोभाग रथात लपविला आहे व या प्रमाणे सूर्याचे पाय दाखवावे की न दाखवावे या प्रश्नांला विली आहे.
ग्रीक कलाकारांचे अनुसरण करून सुरुवातीला भारतीयांनी चार घोड्याच्या रथांत सूर्याला दाखविणे सुरू केले आताचे शक्य आहे, पण शक कुषाणांच्या बरोबर जी शाकद्वीपीय संस्कृति आणि सूर्यमूर्ती भारतात आली तिने मात्र प्रतिमा सात आश्चर्यजनक खळबळ उडवून दिली व दोन्ही पद्धतीचे संमिश्रण झाल्यासारखे दिसू लागले.

कुषाण कालीन सूर्य प्रतिमा (चित्र १४३) :
मधुरेच्या परिसरात या काळच्या सूर्य प्रतिमा बऱ्याच मिळाल्या आहेत. एकट्या मधुरेच्या संग्रहालयांतच १९७४ नया सुरुवातीपर्यंत पंधरा सूर्य प्रतिमा असल्याची नोंद केली गेली आहे. या सर्व प्रतिमांत सं.सं. १२.२६९ ही मूर्ती कदाचित सर्वांत जुनी असावी असा कयास आहे. हिच्यांत कुषाण सूर्याची इतर वैशिष्ट्ये तर आहेतच पण सर्वांत रशच्चाची गोष्ट म्हणजे ही की हिच्या पायशिळेवर इराणी धर्तीचे अग्निकुंडही कोरलेले आहे. शाकद्वीपांत (शकस्थान = मौस्तान - इराण) सूर्य आणि अग्ग्री उपासकांचे भांडण झाले होते हे आम्ही वर नमूद केले आहे. त्यापैकी जे सूर्योपासक भारतात आले त्यांच्यातील कोणी बुद्धिमान पुरुषाने अग्निपेक्षा सूर्य वरचढ आहे हे दाखविण्याकरिता सूर्याच्या पायाशी अधिकुंड दाखविले असावे असा तर्क करता येतो. पुढे जसा जसा काळ लोटत गेला हा प्रासंगिक विवाद थंड झाला व त्याबरोबरच सूर्याच्या पायाखालून अग्निकुंडही बाजूला झाले.
'यथा देहे तथा देवे' या न्यायाने इराणी मगांचा आराध्य सूर्य त्यांच्याच प्रमाणे असावा हे योग्य होते. सर्वत्र कुशणकालीन सूर्य मूर्तीत दिसणारा परदेशी वेष कुषाणोत्तर कालांत 'उदीच्य वेष' असे नाव घेऊन आपल्या वाङ्मयांत समाविष्ट झाला." सूर्य प्रतिमेच्या विकासाचे अध्ययन करण्याच्या दृष्टीने वर उल्लेखिलेल्या प्रतिमेची (म.सं.सं. १२, २६१) अधोलिखित वैशिष्ट्ये लक्षांत घेण्यांसारखी आहेत -
१) बसकी टोपी : या प्रतिमेत दिसणारी सूर्याची बसकी टोपी पुढे दिसत नाही. तिच्या जागी पागोटे (ल.सं.सं.बी २०८) किंवा बसका मुगुट (ल.सं.सं. जे. ६६८) आला. सूर्याला तुरेदार मुगुट मात्र अजून दिसलेला नाही.
२) मिशा आणि ऊर्णा चिन्ह: काही सूर्य प्रतिमांत दिसणारी ही चिन्हें (ल.सं.सं.जे. ६६८ वम.सं.सं. १२.२५९) सूर्य प्रतिमेची वैशिष्ट्ये नसून कुषाण प्रतिमांची शैलिगत वैशिष्ट्ये होत. ही विष्णू, बुद्ध, वगैरे मूर्तीतही दिसतात. पुढे ती लुप्त होतात.
३) गळ्यातील कंठा आणि मणी: सूर्याला 'दिनमणि' म्हणतात. त्यांच्या प्रतीकांत सूर्यकांतमणी आणि स्फटिक हे बहुमूल्य पाषाण मुख्य आहेत. सूर्य व त्याने वृष्णींना दिलेल्या स्यमन्तक मण्याचा पौराणिक वाह्मयांत बऱ्याच ठिकाणी उल्लेख आढळतो. " जणु की काय सूर्याचा मण्याशी असलेला जवळचा संबंध दाखविण्याकरिता अधिकांश प्रतिमांत त्याच्या गळ्यात मणी ओवलेला कंठा दिसतो.

३५४

४) कमळ आणि सुरा सूर्याचा कमळाशी नैसर्गिक संबंध असल्यामुळे कदाचित कमळाला सूर्याचे प्रतीक होण्याचा मान मिळाला." मधुरेच्या प्रारंभिक कुषाण कालीन मूर्तीत सूर्याच्या उजव्या हातांत कमळाची कली असून डाव्यात सुरा आहे (म.सं.सं. १२.२६९). दुसऱ्या समकालीन प्रकारात दोन्ही हातांत कमळाच्या अर्धविकसित कळ्याच दिसतात (रे. चि. पांच १. पांच ५). गुप्त काळात पोचताच उत्तर भारतात या कल्या पूर्ण उमलतात व त्यांना सूर्य प्रतिमेची स्थायी लक्षणे होण्याचा मान मिळतो (रे.चि. पाच २, पाच ९). कुचाम काळातील सुरा पुढे तलवारीत बदलतो (चित्र १४४).
कुषाणकालीन सुरा आणि पद्म अग्निपुराणांत खड्‌गधारी आणि पद्मधारी सूर्याच्या रूपांत आढळतात. त्याच पुराणांत या उल्लेखाच्या काही श्लोक अगोदर दुसऱ्याही प्रकाराची 'द्विपद्यधृकू' या शब्दात नोंद आढळते. (चित्र १४४) मत्स्यपुराणाप्रमाणें सूर्याची ही दोन्ही कमळे त्याच्या खांद्यावर टेकलेली असावीत." सूर्याची तलवार बृहत्संहितेस मान्य आहे, इतर लक्षणग्रंथ तिला फारसे महत्व देत नाहीत.
५ ) लांब कोट आणि पट्टा (चित्र १४४) कुषाण काळांतील हे वैशिष्ट्ये निराळ्या रूपाने पुढेही टिकून होते. 'चोलक', 'कवच', 'कञ्चुक'", वगैरे नांवाने ओळखला जाणाऱ्या सूर्याच्या कोटाची सुरुवात इसवी सनांच्या प्रारंभिक शतकांपासूनच झालेली दिसते.
तीच स्थिती त्याने कमरेत बांधलेल्या प‌ट्ट्याचीही आहे. गुप्तकाळात याचे रूप बदलते व विष्णुधर्मोत्तरपुराण त्याला 'रशना' व 'यवीयाङ्ङ्ग' अशी नांवे देते."
६) जोडे : उत्तरभारतांतील सूर्य प्रतिमाचे डोळ्यात भरण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पायातील गुडध्यापर्यंतचे उंच जोडे होत. भारतीय पावित्र्याच्या चौकटीत जोडे बसत नाहीत, जोडे घालून सन्मान्य व्यक्तींच्या समोर जाणें, मंदिरांत शिरणें किंवा पूजन करणें अशिष्टपणाचे लक्षण समजतात. घरात जोड्यांचा प्रवेश फक्त बाहेरच्या खोलीपर्यंत असतो. मग देवघरांत त्याचा पूर्ण मज्जाव असला तर काय आश्चर्य! पण सूर्य प्रतिमा मात्र त्याला अपवाद आहेत. येथे सूर्याच्या व त्याच्या अनुचरांच्या पायांत जोडे असतात. अर्थात् सूर्याची पूजा जोडे घालून करीत किंवा त्याच्या मंदिरांत जोड्यांना मुभा असे असं मात्र नाही.
सूर्यप्रतिमेंतील जोडे हे तिच्या मूळ देशाची आठवण आहे. उत्तर पश्चिम भारतातील सुरुवातीच्या स्कंद, फॅरो, ऑरडोक्शो, वगैरे प्रतिमा जोडे घातलेल्याच आहेत, भारताच्या अंगणात शिरताना त्यांना आपले जोडे काढून ठेवावे लागले पण त्या दृष्टीने सूर्याचे जोडे मात्र जबरदस्त ठरले. भारतीय कलेने त्याचा स्वीकार केला पण भारतीय वाड्मयाने मात्र जोडे हे नांव दिले नाही. सूर्याचे उघडे पाय न दाखविणे हे लक्ष्य ठरून त्याचे खालील पर्याय काढले गेले :
१) बृहत्संहितेने सूर्याला पायापासून जंघेपर्यंत 'गूढ' अंकित करावे असे विधान केले.
२) विष्णुधर्मोत्तरपुराण सूर्यप्रतिमेच्या रूपकाला स्पष्ट करताना असह्य तेजामुळे सूर्याला 'गूढ मात्र दाखवावा असे सांगते.
३) याच पुराणांत सूर्याला रथांत दाखवावा असें विधान आहे. तात्पर्य आपोआपच त्याचे पाय झाकले जातील"
(चित्र १४५).

३५५

४) मत्स्यपुराणांप्रमाणें सूर्याचे पाय तेज किंवा प्रकाशात लपलेले असावेत. अर्थातच डोळे दिपतील व पाय दिसू शकणार नाहीत."
५) मार्कंडेयपुराण सूर्याच्या पायांना अपूज्य ठरवते.
६) महाभारताच्या एका कथेप्रमाणे जोड्यांच्या उपयोगाचा संबंध सूर्याशी आहे. जमदग्नी ऋषीच्या शापापासून स्वतःला वाचविण्याकरिता सूर्याने ऋषीपत्नी रेणुकेला जोडे आणि छत्री या दोन वस्तू दिल्या."
७) रथ : सूर्य प्रतिमेत रथालाही विशेष महत्त्व आहे. आकाशाचा हा चिरप्रवासी रथांत असूनच गगनमंडळाचे
परिभ्रमण करीत असतो अशी दृढ कल्पना आहे. कुषाणगुप्तकालीन एका प्रतिमेंत (म.सं.सं.डी. ४६) भारतीय
पद्धतीने सूर्याचे अंकन करताना त्याला प्रभामण्डळाने आवृत, खांद्यावर दोन लहानगे पंख असलेला व घोड्यांच्या रथांत बसलेला दाखविला आहे."
सूर्याचा चार घोड्यांचा रथ (quadriga) भारतीय ग्रीक राजा प्लेटो यांच्या नाण्यांवरही दिसतो. मथुरेच्या प्रारंभिक सूर्य प्रतिमांत सर्वत्र सूर्याला पूर्णपणें रथांत बसलेला तर दाखवीत नाहीत पण आसनाच्या आजुबाजूस दोन किंवा चार घोडे दाखवून रथाच्या उपस्थितीचा संकेत मात्र केलेला असतो. (म.सं.सं.डी. ४६, ल.सं.सं.बी. २०८) सूर्याच्या रथाचे सहा पोडे किंवा उच्चश्रवा नांवाच्या सातमुखी घोड्याची कल्पना बऱ्याच नंतरची आहे. गुप्तकाळांत ती विशेष लोकप्रिय दिसत नाही.
सूर्यरथाला एकच चाक असावे असें आज मानले जाते. कुषाण कालीन प्रतिमेत चाकें दिसत नाहीत. एका कुषाणगुप्तकालीन प्रतिमेत (म.सं.सं.डी. ४६) रथाच्या मधोमध चाकासारखी एक वस्तु दिसते, पण रथाचे आख आणि जू यांना जोडणारा हा गोल दांडा असू शकेल.

सूर्य व त्याच्या राशी :
सूर्याबरोबर त्याच्या राशीचे अंकन सर्व प्रथम गुप्तकाळांत आढळते. उदयगिरी येथे मिळालेल्या स्तंभ शीर्षावर सिंहाच्या पायाखाली धनु, मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह अशा राशी आहेत. कन्या, तुला आणि वृश्चिक आता तुटल्या आहेत. प्रत्येक राशीमध्ये एक एक सूर्य प्रतिमा आहे. हे बारा आदित्य होत. (चित्र १५२)
एरण येथील वराहाच्या गळ्यात दिसणाऱ्या कंठ्यात राशी कोरलेल्या आहेत. येथे ही राशी बरोबर सूर्य आहे. या राशी मानव रूपांत असून डोक्याचे ठिकाणी मात्र बऱ्याचदा पशूची आकृति दिसते.
मध्यकाळांत राशींचे अंकन करताना ही पद्धत सुटली, व त्या ठिकाणी आता प्रतीकें आली. हैद्राबादच्या संग्रहालयात काकतीय काळाचे एक सूर्य पीठ आहे त्यावर अशा प्रकारचे राशीचे अंकन आहे."

सूर्य परिवार :
विष्णुधर्मोत्तर पुराणांप्रमाणें सूर्याचा परिवार बराच मोठा आहे." स्वतः सूर्य, दंड घेतलेला दंड व लेखणी आणि दौत घेतलेला पिंगल हे दोन मुख्य सेवक, सिंहध्वज, यम रेवंत व दोन मनु असे चार मुलगे; राज्ञी, रिक्षुभा, छाया व सुवर्चसा अशा चार बायका, अरुण हा सारथी; गायत्री, उष्णिक्, अनुष्टुप्, बृहती, पंक्ति, त्रिष्टुप् आणि जगती हे सप्तछंदात्मक

३५६

सात घोडे, भोवती फिरणारे इतर ग्रह, शरसंधान करणाऱ्या उषा आणि प्रत्यूषा या दोन देवी, इत्यादिकांचा मेळावा सूर्य परिवार म्हणून गाजतो. या बरोबरच स्तवन करणारे ऋषि, रथिकाबिंबातील देव, वगैरे असतात ते वेगळेच.
सूर्यमूर्तीचा एवढा मोठा पसारा सुरुवातीला मुळीच दिसत नाही. परदेशी प्रभावाने भारावलेल्या कुषाण प्रतिमा सारथि देखिल नसतो. सूर्य एकटाच असतो. मग तो रथांत असो असानावर बसलेला असो किंवा उभा असो. कलेत उभा सूर्य कमी दिसतो. पेशावर येथून मिळालेल्या धातु करंडकांवर तसेच कुषाण राजांच्या नाण्यावर तो उबा आढळतो.
बुद्धगयेतील शुंगकालीन प्रतिमेत उषा प्रत्यूषा आणि भाजे येथील शिल्पांत अंधाराचे प्रतीक राक्षस परिवा देवतांत दिसतात. येथे दोन बायकाही आहेत पण त्या शरसंधान मात्र करीत नाहीत.
गुप्तकालातील सूर्याच्या बऱ्याचशा स्थानक मूर्ती दंड व पिंगला बरोबर आहेत. चंद्राच्या जोडीला रथारूढ़ सूर्य से दिसतो (ल.सं.सं.बी. २२३, कोपरा), मांडी घालून बसल्यामुळे त्याचे पाय लपले आहेत व हातात खांद्यावर टेकलनों कमळे आहेत. येथे घोडे मात्र सात आहेत. तसेच उषा प्रत्यूषा परिवार देवतांच्या रूपांत दिसतात (चित्र १४५).
छत्र :
महाभारतांतील आख्यनांप्रमाणें रेणुकेला जोड्याबरोबर सूर्यानं छत्रीही दिली होती. बुद्धगया भाजे, तथा लालभारत स्तंभावरील सूर्यावर छत्र प्रामुख्याने दिसते, पण पुढच्या शिल्पांत मात्र त्याचा अनिवार्य संबंध दिसत नाही.

काबुल येथील सूर्य प्रतिमा" :
गुप्तकालीन प्रतिमांचा विचार करीत असतांना अफगाणिस्तानांतील या मूर्तीचाही उल्लेख आवश्यक आहे. संगमरी दगडाच्या या मूर्तीत सूर्य रथांवर आरुढ आहे. आजुबाजूला दंड व पिंगल असून पायांखाली सारथी आहे. मात्र पोडे दोनव आहेत, व प्रभामंडलांचाही पूर्ण अभाव आहे. हात तुटलेले असल्यामुळे आयुधांविषयी काहीच सांगवत नाही. डॉ. अग्रवालांच्या मतांप्रमाणे या प्रतिमेवर ससानी कलेची छाप आहे.

अहिच्छत्रा येथील रथारूढ सूर्याचे प्रतीक :
अहिच्छत्रेचा हा मृफलक अपवाद स्वरूपच म्हणावा लागेल. येथे वर्तुळाकार बिंबात सात देवींनी युक्त एकचक्र रथ दाखविला आहे. मुळांत या सातीजणी अभय मुद्रेत असाव्यात. स्वतः सूर्याचे दृश्यमान असे कोणतेही इतर चिन्न नाही. 'सात' या आकड्याचा संबंध सूर्याशी जवळचा आहे. उदाहरणार्थ रथाचे सात घोडे, किरणांतील सात रंग, सप्तमी ही सूर्याची तिथी इत्यादि.

अलंकरणांत सूर्य :
कुषाणकाळांत सूर्य इतका लोकप्रिय होता की दागिन्यांत देखील त्याच्या मूर्तीचा उपयोग करीत. या काळातील एक स्त्रीच्या मस्तकांवर बिंदीसारखा सीमंतफलक म्हणून दागिना आहे. यावर रथारूढ सूर्य कोरलेला आहे. (ल.सस ४६.८०)

३५७

मध्यकालीन वाङ्मयांत सूर्य :
पुराणवाङ्मयांत व इतरत्र सूर्याबद्दल बरीच माहिती मिळते. उपपुराणांतही तिची साठवण आहे. तो सर्व विषय येथे मांडणे शक्य नाही. फक्त एक उदाहरण म्हणून कूर्मपुराणांतील काही माहिती येथे देतो." ही गुप्त किंवा गुप्तोत्तम काळांत संकलित झाली असावी.
सूर्य नेहमी इतरांना देत असतो म्हणून त्याला 'आदित्य' म्हणतात. 'आदानात् नित्यम् आदित्यः' सूर्य आपल्या हजार नाड्यांनी नदी, विहिरी, समुद्र, वगैरेंना पाणी देतो. याच नाड्या शीत, वर्षा आणि उष्मा देतात. सूर्यांमुळे मनुष्यांना औषधे, पितरांना स्वधा आणि देवांना अमृत मिळते. कूर्मपुराणानें बारा आदित्य आणि त्यांचे महिने यांची यादी दिली आहे, पण ती अग्निपुराण किंवा देवतामूर्तीप्रकरण यापेक्षा भिन्न आहे. हे पुराण बारा आदित्य, बारा ग्रामणी, बारा राक्षस, बारा ब्राह्मण, बारा गंधर्व आणि बारा अप्सरा यांना 'आदित्यव्यूह' असे नांव देते. हे सर्व क्रमाक्रमानें दोन दोन महिनें सूर्याबरोबर असतात. अप्सरा आणि गंधर्व नृत्यगायन करतात, ऋषी स्तवन करतात, ग्रामणी रथाच्या लगामा आवळतात, सर्प वहन करतात आणि राक्षस पुढे चालतात. या सर्वांची यादी खालीलप्रमाणें दिली आहे :

आदित्य १२ धाता, अर्यमा, मित्र, वरूण, शक्र, विवस्वान्, पूषा, पर्जन्य, अंशु, भग, त्वष्टा, विष्णू
ऋषि १२ पुलस्त्य, पुलह, अत्रि, वसिष्ठ, अंगिरा, भृगू, भरद्वाज, गौतम, कश्यप, ऋतू, जमदग्नी, कौशिक
ग्रामणी १२ रथकृत्, रथौजा, रथचित्र, सुबाहुक, रथस्वन्, वरुण, सुषेण, सेनजित्, तार्थ्य, अरिष्टनेमि, कृतजित्, सत्यजित्.
राक्षस १२ - हेति, प्रहेति, पौरुषेय, वध, सर्प, व्याघ्र, आप, वात, विद्युत, दिवाकर, ब्रह्मोपेत, यज्ञोपेत
द्विज १२ वासुकि, कंकनील, तक्षक, सर्वपुंगव, एलापत्र, शंखपाल, ऐरावत, धनंजय, महापद्म, कर्कोटक, कंबल, अश्वतर
गंधर्व १२ - तुंबरु, नारद, हाहा, हूहू, विश्वावसु, उग्रसेन, सुरुचि, अर्वावसु, चित्रसेन, ऊर्णायु, धृतराष्ट्र, सूर्यवर्च
अप्सरा १२ ऋतुस्थला, पुंजिकस्थला, मेनका, सहजन्या, प्रम्लोचा, अनुम्लोचा, विश्वाची, घृताची उर्वशी, पूर्वचित्ती, रंभा, तिलोत्तमा.
गुणोत्तर काळांत सूर्योपासना नक्कीच जास्त पसरली. सूर्याचे एक नांव तो आदितिचा मुलगा असल्यामुळे - आदित्य आहे. हे आदित्य बारा आहेत. प्रत्येकांची राशी, वर्ण, शक्ती व आयुधें निरनिराळी आहेत. तो तक्ता खालीलप्रमाणें देता येईल. त्याचा उपयोग करतांना हे लक्षात ठेवावे की प्रत्येक आदित्याला चार हात आहेत. दोन हातांत कमळे सर्व सामान्य आहेत. फरक फक्त मागच्या आयुधांचा आहे व त्याचीच नोंद केली आहे :

३५९

मध्यकालीन सूर्यप्रतिमा :
प्रत्यक्ष सूर्यभूतीत जरी फारशी ध्यान भिन्नता नसली तरी देश व कालाच्या दृष्टीनें तिच्या विकासाचे चित्र रेखाटता बेते. या संबंधानें खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत -
१) कमळे - गुप्तोत्तर काळातील उत्तर भारतीय प्रतिमांत सूर्याच्या प्रत्येक हातांत दीन कमळे असून त्याची देठें लहान आहेत व फुलें हातांवरच ठेवल्यासारखी दिसतात (रे.चि. पांच २) (भारत कला भवन वाराणसी सं.सं. १७९. १६०, अलाहाबाद कॅटलाग सं. २६६ इ.) पुढे ही दोन कमळे एकत्र होऊन सन्मुख दिसणारे पूर्ण उमलेले कमळ तयार होते, पण त्याला प्रत्येकी एकाधिक दांडे दिसतात (रे.चि. पांच ८) अलाहाबाद कॅटलाग सं. ३९७, ३८८ इ.). हा प्रकार राजस्थानातही दिसतो. कमळाची तिसरी अवस्था म्हणजे कमळ तसेच असते पण दांडा एकच दिसतो. हा दांडा लांब असून याला सुरेखसे वळणें असतात (अलाहाबाद कॅट. सं. ४००), बंगालच्या पालकला कृर्तीत हे वैशिष्ट्य प्रामुख्यानें दिसते" (रे.चि. पांच ७).
२) कंचुक: उत्तर गुप्तकालीन बऱ्याच प्रतिमांत हे दिसत नाही पण पुढे कित्येक ठिकाणीं सुंदर नक्षी कामांसह पुनः दिसू लागतें (चित्र १४६).
३) जोडे : किंचित आखूड (अलाहाबाद कॅट. सं. २५३) किंवा अगदी गुडघ्यापर्यंत (अलाहाबाद कॅट. ३८८). एवढ्याच फरकानें हे सर्वत्र दिसतात. कचित जुनें व जास्त आधुनिक काळचे अपवाद मात्र वगळावे लागतील.
४) परिवार देवता : सुरुवातीच्या काळांत परिवार देवता नाहीत, किंवा आहेत तर फक्त दंड पिंगल (अलाहाबाद कॅट. २५३) अथवा दोन स्त्रियांच (भा.क. भवन, वाराणसी सं.सं. १६०) दिसतात. पुढे मात्र परिवार देवतांत चांगलीच वाढ होते व काही ठिकाणी विष्णुधर्मोत्तराच्या वर्णनांचे चित्र पहाता येते. (चित्र १४५, १४६, १४८)

भाइलस्वामी :
विदिशेहून मिळालेली आणि तेथील संग्रहालयांत असलेली विक्रम संवत् ९३५ (= ई.स. ८७८) ची भाइल्लस्वामी या नांवाची अभिलिखित सूर्य मूर्ती महत्त्वाची आहे. येथे जवळजवळ संपूर्ण सूर्य परिवाराचे दर्शन घडते. पायांमध्ये महाश्वेता असलेला सूर्य उभा आहे. चौकटीच्या पाच कोनाड्यांत बाण मारणाऱ्या उषा-प्रत्यूषा, शिव, ब्रह्मा आणि डोक्यावर मधोमध योगनारायण दिसतो. पायाजवळ उजवीकडे एक सूर्य पत्नी, दंड व दुसरा अश्विनीकुमार दिसतो. सूर्याचे हात मात्र खण्डित आहेत.
- चौकटीच्या खाली दर्शनी भागावर यम, यमी, मनु वैवस्वत, मनु सावर्णी, तपती, शनी आणि यमुना आहे. यमुनेच्या पायाखाली कासव आहे. इतर मंडळी मकरावर दिसतात. (रे.चि.सू.१)
Mankodi Kirit, An Image of Bhayillaswami from Bhilsa, JISOA, N.S. X-XI, figs. 1-5,
pp. 41-45
घोड्यावर सूर्य :
बहेरामाफी (बरूती) उ.प्र. येथे मिळालेल्या पूर्व भारतीय कलेचा सूर्य कमळे घेतलेले दोन्ही हात छाती वर घेऊन धावत्या घोड्यावर उभा आहे. पायात जोडे मात्र नाहीत. (रे.चि.सू. २)

३६०

B.R. Mani, Two Seasons of Archaeological Investigations in Trans ghaghrapa 1995-97, Pragdhara 8, 1997-98, pl. 66, p. 123
काश्मीरच्या मटन (अनंतनाग) येथील मार्तंड मंदिरात घोड्यावर बसलेला सूर्य आहे. याला मिशाही आन आजुबाजूला दंड व पिंगल दिसतात.
Devala Mitra, Pandrethan, Anantpur and Martanda A.S.I., N. Delhi, 1977, pl. XVIB.p
सूर्याने घोडीच्या रूपात वावरणाऱ्या संज्ञेशी स्वतः घोड्याचे रूप घेऊन संभोग केला व त्यामुळे अश्विनीक जन्माला आले ही कथा प्रसिद्ध आहे. राणकपुरजवळ, सादडी, (पाली) राजस्थान येथील योगेश्वर मंदिरात घोड्याच्या रूपात सूर्य, घोडी संज्ञा व दोघे अश्विनीकुमार एकत्र आढळतात.
R.C.Agrawala, Association of Horsehead with Brahma, Kala VI, 1999-2000, p.14 fig. 9, p. 15
सिंहासह सूर्य :
मथुरेहून मिळालेल्या पण तूर्त अश्मोलियन म्यूझियम ऑक्सफोर्डमध्ये स्थापित सुमारे ५व्या शतकातील एका प्रतिमेत बसलेल्या सूर्याच्या आजूबाजूला घोड्यांच्या ऐवजी सिंह दिसतात. (रे.चि.सू.३)
J.C. Harle, Gupta sculpture, pl. 51, p. 44
- लॉस एंजिल्सच्या काऊंटी म्यूझियममध्ये असलेल्या एका धातूप्रतिमेत चतुर्भुज सूर्य रथांत बसला आहे. साधारण हातांत कमळे आहेत, उजव्या अतिरिक्त हातांत पाश (१) असून डाव्या हातांत सिंह अंकित असलेला ध्वज आहे
P. Pal, A Kashmir Image of the moon god, Aksaya..., fig. 2, p. 110
सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्याच्या डावीकडे सिंहध्वज असावा असे विधान विष्णुधर्मोत्तरपुराणांत आहे. (वि.घ. खखख ६८.८ पृ. ३४३ सिंहोध्वजश्च कर्तव्यस्तथा सूर्यस्य वामनः)
- सिंहासह सूर्य दक्षिण भारतात ही आढळतो
S.R. Rao, Pratima Kosha, VI, p. 276
सूर्यनारायण : काही इतर प्रकार
सूर्यनारायणाची चर्चा आपण मागे केली आहे (पान ३५१) याचे काही इतरही प्रकार आढळतात. मधुरा संग्रहालयात असलेल्या एका प्रतिमेत (सुमारे ११-१२वे शतक) उभ्या सूर्याच्या चौकटीत विष्णूच्या दहा अवतारांचे अंकन करून दोघांचे एकत्व सुचवले आहे (रे.चि.सू. ४)
Jitendra Kumar, Masterpieces of Mathura Museum 1989, pl. 38, p. 82
गुजराथ (रानीवाव, पाटन) मध्ये हा प्रकार बराच दिसतो. खोकराकोट (रोहतक) हर्याणा येथील सुमारे ९च्या शतकातील एका शिल्पात चतुर्भुज विष्णू अभय, गदा, चक्र व शंख घेऊन उभा आहे, पण गदेवर आणि चक्रावर दोन उमटलेली कमळे दाखवून सूर्याचाही संकेत केला आहे. (रे.चि.सू.५)
D. Handa, SFH., pl. 270, p. 199

३६१

झालार पाटन (झालवाड संग्रहालय) राजस्थान येथे सहाहाती देव (सुमारे ९-१०वे शतक) उभा आहे. वर, गदा, बक, व शंखासह साधारण हातांत (उजवा संडित) देठासह फुललेली कमळे आहेत. डोक्यावर सोता आहे तर आहे. बि.सू.६)
Pankaj Lata Srivastava, HJI., fig. 85, p. 117
सकासुर टेकडी, कहिलीपारा, आसाम येथून आलेल्या सुमारे ९व्या शतकातील एका धातु मूर्तीत (तूर्त गौहाटी साहालय) सूर्य कमळे घेऊन दंड-पिंगलासह रथात उभा आहे. मधल्या घोड्याच्या पाठीवर बसलेला सारधी मात्र लंगडा सदर पूर्ण पायाचा आणि पंख असलेला आहे. याला शुद्ध रूपांत गरुड म्हणता येणार नाही, पण कदाचित एवढ्याच करीना प्रतिमेवर असलेल्या लेखात देवाला 'आदित्यनारायण' असे म्हटले आहे. घोडे मात्र सात नसून फक्त पाचच दिसतात.
Dharmeswar Chutia, 'A note on Inscribed Surya Image presented in the Assam State Museum, JARS, XXX, N.S.I. April 1988, p. 50,

शिव-सूर्य :
शिव आणि सूर्य यांच्या एकत्र अंकनाची चर्चा मागे झाली आहे. (पान २९१) येथे एकाच प्रतिमेत दोघांची आयुधे एखवून हे एकत्त्व सुचवले आहे. कश्मीर कलेत एक दुसरा प्रकार आढळतो. तेथील शिल्पाच्या एका बाजूला शिवाची इतक्रीडा आणि दुसऱ्या बाजूला रथारूढ सूर्याचे अंकन आहे. दाढी मिशा असलेला सूर्य रघांत बसला आहे. येथे शर-संधान करणाऱ्या बाया ऐवजी पुरुष दिसतात. विशेष म्हणजे खाली शिवलिंगाच्या पूजनाचे दृश्य अंकित आहे. हे सुंदर शल्य तूर्त तरी बेपत्ता आहे. (रे.चि.सू.७)
Mieaela Soar, 'Siva and Parvati at play, Backgammon in Ancient India. The Art of play Ed. Andra Tapsfield Marg Publication 58, No. 2 December 2006, pl. 5, 6 on p. 47,48,49, pp. 45-56

आदित्य-वराह :
ज्ञानप्रवाह संग्रहालय, वाराणसी येथे एक गुप्तकालीन छोटेसे शिल्प आहे. त्यांत उजवीकडे तोंड करून नृवराह उभा आहे, पण त्याच्या दोन्ही हातांत कमळे असून पायांत जोडे ही आहेत. पायाजवळ बऱ्याच झिजलेल्या दोन मानवाकृती आहेत. हे दंड व पिंगल असू शकतात, आमच्या पाहण्यांत अशाप्रकारचे हे एकमेव शिल्प आहे (रे.चि.सू.८)
वराहाचा सूर्याशी संबंध वाङ्‌मयात ही आढळतो. महाभारतांत वराहाचे एक नांव वृषाकपि असे आहे. आणि संपथब्राह्मणांत आदित्यालाही वृषाकपि हे संबोधन आहे (महाभारत १२.३३०.२४, गोपथ. २-६.१२- आधार कल्पना देसाई, Notes, Addendum, Lalitkala 12, 1992, p. 47)
N.P. Joshi, Aditya Varaha A Unique Syncretistic Image' JPRB, 10, 2006-07, pp. 71, fig. on p. 74

सूर्य-ब्रह्मा :
या दोघांचे एकीकरण अंकित करणाऱ्या चार प्रतिमा समोर आल्या आहेत. तीन खजुराहे येथील चित्रगुप्त मंदिराच्या

३६२

द्वारपट्टिकेवर आल्या आहेत. तीन खजुराहे येथील चित्रगुप्त मंदिराच्या द्वारपट्टिकेवर आहेत. सर्व चार हाताच्या साधारण हातांत कमळे, आणि इतर दोनमध्ये वरदमुद्रा आणि कमंडलू आहे. मधल्या प्रतिमेच्या डोक्यावा मृष्ट आहे बाकी दोन जटामुकुट धारण करणाऱ्या आहेत. यांची ओळख 'घाता' किंवा 'धात्रिसूर्य' म्हणून केली गेली आहे Devangana Desai, RIK., pl. 72, p. 69
चौथी प्रतिमा दीनाजपुर, बांगलादेश येथून मिळाली आहे. येथे सहा हाती सूर्य वर, अक्षमाला, अभय, कमटन आणि दोन कमळे घेऊन उभा आहे. पायाखाली धावते असे पाच घोडे दिसतात. बाकी दंड पिंगलादि आहेतच.
D.C. Bhattacharya, Iconology of Composite Images, Delhi, 1980, fig. 14. p. 20
I.N. Banerjee, DHI., pl. XLVII, 3

द्वादशादित्य : -
बारा आदित्यांची विस्तृत चर्चा आपण मागे केली आहे (पान २८८-८९) यांचे अंकन करणारी काही शिल्ये आत समोर आली आहे पण वरच्या भागाला कमळे घेतलेले अकरा आदित्य दिसतात. आयुध भेद मात्र नाही. दुसऱ्या प्रकाशात (ढाक, गुजराथ) स्थानक सूर्याच्या आजूबाजूला आणि डोक्यावर मिळून असे अकरा सूर्य आहेत. येथे ही आयुध भेर दिसत नाही. (रे.चि.सू.९)
A.L. Srivastava, A Rare Representation of Dvadasadityas' EW., 52, 2002, fig. 1-7. pp. 427-37

नेपाळच्या सूर्य प्रतिमा :
राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे असलेल्या एका नेपाळी धातुप्रतिमेत उघड्या पायाचा सूर्य उभा आहे. पायात जोडे न दाखवणे हे तिकडील काही सूर्य प्रतिमांचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
B.N. Sharma, Iconographic Parallels, H.K. Shurwami
Falicitation Volume Ed. D.M. Joshi, state Archives, Hyderabad A.D., p. 558
दुसऱ्या एका प्रतिमेत रथात उभा असलेला सूर्य पूर्ण मंडळांत अंकित केला आहे. विशेष म्हणजे सूर्याच्या घोड्यांस पंख आहेत व रथातच सूर्याच्या आजुबाजूला एक एक चतुर्भुज विष्णू उभा आहे. जरी सूर्य व विष्णूचे एकत्र अंहन दाखवण्याचा हा एक वेगळा प्रकार आहे तरी विष्णूला दोनदा का दाखवले आहे याचे उत्तर शोधावे लागेल. (१.चि.सु. १०)
Krishna Deva, Iconography of Nepal, New Delhi, 1984, pl. 71 B.

आसाममधील सूर्यशिल्पें :
कालिका पुराणाप्रमाणे ब्रह्मपुत्र नदाच्या उजव्या तटाचा मदना आणि त्रिस्रोता या नद्यांचा मधला भाग रविक्षेत्र माणूर प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र म्हणजे जवळ जवळ आजचा गोपालपाडा हा जिल्हा. सूर्याराधनेसाठी कामरूप (आसाम) देशास उत्तमस्थान मानले गेले आहे. गोपालपाडा येथून १४ किलोमीटरच्या अंतरावर सूर्य पहाड नांवाची जागा आहे. तेथे पूजनांत असलेल्या एका शिलापट्टावर बारा पाकळ्यांचे कमळ आहे. प्रत्येक पाकळीवर मांडी घालून बसलेला सूर्व व 'केंद्रात ब्रह्मदेव आहे. याला द्वादशादित्य आणि सूर्याचे एकत्र अंकन म्हणता येईल.

३६३

Biswanarayan Shastri, Sun Warship in Assam, JARS, XXXI, N.S. Nos. 1-2, 1989-p.37 ff.
कमल्लबाडी सत्र, मजूली येथून समोर आलेल्या सुमारे १९व्या शतकातील शिल्पात (गुवाहाटी संग्रहालय) मंडलगत बुद्ध आहे, पण वर मात्र पंख पसरलेला गरुड दिसतो. (रे.चि.सू.११) R.D. Chaudhary, The Sculpture of Assam, Guvahati 1987, pl. 22, p. 51 नरकासुर टेकडीच्या आदित्यनारायणाची चर्चा मागे केलीच आहे.
सूर्यपट :
काणेगाव (अल्मोडा) उत्तराखंड, येथील आदित्ययान मंदिरात एका उत्तर मध्यकालीन शिलापट्टावर भल्या मोठ्या अर्जुनांत एका घोड्याच्या रथांत बसलेला सूर्य दिसतो. विशेष म्हणजे वर्तुळाबाहेर वरच्या भागांत घोड्यांची सांत डोकी आहेत. त्याचप्रमाणे वर्तुळाच्या खाली दोन पहारेकऱ्यांच्यामध्ये अग्निकुंडासारखे अंकन आहे. सूर्याबरोबर अग्निकुंड सुरेच्या एका फार पूर्वीच्या कुषाण कालीन प्रतिमेतही विद्यमान आहे (मथुरा संग्रहालय, जी. २६९) (रे.चि.सू.१२) -डॉ. एन्. तिवारी, आदित्याथान (सूर्य मंदिर) की अप्रकाशित प्रतिमाएँ, BMA., 37 1986 P. 33 ff.

त्रिमुख सूर्य (संघाट प्रतिमा) : -
गुजराथ आणि मध्यप्रदेश या भागांत तीन तोंडे व एकाधिक हात असलेल्या 'संघाट प्रतिमा' किंवा 'मिश्र मूर्ती' मिळाल्या आहेत. देलमाल, गुजराथ, येथील मूर्तीत देव अष्टभुज असून गरुडावर बसलेला आहे. कमळे असलेले हात भग्न आहेत, त्याचप्रमाणे वैष्णव आयुधे असलेले हात ही आता उरलेले नाहीत, फक्त वर आणि कमंडलू तसेच त्रिशूल आणि सर्प ही आयुधे ब्रह्मदेव आणि शंकराचे अस्तित्त्व दाखवतात. पायाजवळ उजवीकडे हंस आणि डावीकडे बैल आहे.
J.N. Banerjee, 'Surya Aditya and Navagrahas, JISOA., XVI, 1948, pp. 87-88
मध्यप्रदेशाच्या मढिया (पन्ना) या गावांत मिळालेल्या वाड्भुज प्रतिमेत खालील उजव्या हातांत वर, डावा खंडित, रघत्या जोडीत कमळे आणि वरच्या दोन मध्ये त्रिशूळ आणि हरिण दिसतात, खाली बैल आणि गरुड दाखवून सूर्य, विष्णू आणि शिवाचे एकत्र अंकन सूचित केले आहे.
J.N. Banerjee, p. 88

सूर्य-शिव-विष्णू-ब्रह्मा:
दक्षिण भारतातील मध्यकालीन चोळ मंदिरात चौघांचे एकत्र असे अंकन अनेक ठिकाणी दिसते. उदाहरणार्थ विदंबरम् येथील नटराज मंदिराच्या पश्चिम गोपुरातील एका शिल्पात हा त्रिमुख देव उभा आहे. हातात अक्षमाला, पाश, दोन कमळे, दोन गदा, अभय आणि वर याचे दर्शन घडते. पादपीठावर मधोमध एक चाक, चार धावते घोडे आणि मांडी पालून बसलेला अरूण दिसतो.
T. Satyamurti, A Rare Sculpture of Siva-Surya, Ardhanari, Kala 6, 1999-2000, fig. 2, 0.23
[12/02, 10:38 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र

सूर्य आणि नवग्रहमंडल :
अमेरिकेत श्री विलियपटी प्रिंस यांच्या संग्रहात पालकलेचा एक सुंदर शिलापट आहे. येथे मधोमध एका गर्नुत्रांत कमळे घेतलेला रथारूढ सूर्य असून त्याच्या रथाला घोड्याऐवजी सात हंस जुंपलेले आहेत. लगाम अरूणाने साभाळ आहे. या वर्तुळाच्या भोवती रुंद असे दुसरे वर्तुळ आहे. मधल्या जागेत आठ कोनाडे आहेत. प्रत्येक कोनाड्यात डोक्यावर चन्द्रापासून आरंभ करून सर्पमुखातून निघणाऱ्या केतूपर्यंत निरनिराळ्या मुद्रेत आठग्रह दाखवले आहेत. खालच्या भागावर सहा ओळीच्या लेखांत 'ग्रह श्रीराज' प्रतिमेच्या स्थापनेचा उल्लेख आहे (रे.चि.सू.१३).
A.L. Srivastava, An unusual and combined representation of Surya and Navagrahas, Pragdhara XVI, 2005-06, pl. 51, p. 236
K.K. Thaplyal and L.M. Vahal, 'An Inscription on the stone pedestal of an icon of Luhknown Prorence Pragdhara, ibid

उत्तरभारतांतील सूर्य प्रतिमांचा आढावा :-
गुप्तोत्तर काळांत सूर्योपासना चांगलीच पसरली. कोणार्क (ओरिसा) चे सूर्य मंदिर विश्वप्रसिद्ध आहे. खजुराहो (चित्रगुप्त किंवा भरताचे मंदिर मध्यप्रदेश), ओरिसा (राजस्थान), चित्तौड (राजस्थान), मोढेऱ्यांसह गुजराथची दहा सूर्यमंदिरें, मार्तंड (मट्टन, कश्मीर), मोगलांचे वेळेपर्यंत अस्तित्वांत असलेले मुलतानचे मंदिर" ही सर्व मध्यकाळांतील सुप्रसिद्ध सूर्यतीर्थे होत. बाराव्या शतकांतील भूगोलचा अरबी विद्वान अल्-इद्रिसी जो सिसलीचा नार्मन राजा रॉजर द्वितीय (Roger II) याच्या दरबारांत होता. मुलतान येथील सूर्य प्रतिमेचे वर्णन करताना लिहितो, 'ही मूर्ती मांडी घालून बसलेल्या मनुष्याच्या आकाराची असून लाल रंगाच्या मोरक्को चामड्याप्रमाणें एका आच्छादनानें आवृत असते. काही लोक असे सांगतात की ही काष्ठप्रतिमा आहे. हिच्या दोन डोळ्यांत दोन बहुमूल्य रत्नें बसविली असून डोक्यावर जडावाचा मुगुट असतो.'
खरें म्हणजे अल्-इद्रिसी याने हा भाग इब्नहक्ल याच्या ग्रंथातून उचलला आहे. इब्तहक्ल याच्या काळांनंतर ही प्रतिमा करामित (Qaramita) याने आपल्या चढाईच्या दरम्यान तोडली, पण हिंदूंनी तिची स्थापना केली व अल्-इद्रिसी याला तें मंदिर उन्नतावस्थेत दिसले." उत्तर भारतांत स्थानक व आसन सूर्यप्रतिमा बऱ्याच सापडतात. सामान्यतः सर्वांची ठेवण सारखीच असते, मात्र बारकाईने पाहू गेल्यास बरेच फरक आढळतात.
बंगालमधे मिळणाऱ्या अधिकांश मूर्तीत सूर्याचा सेवक दंड याचे हातांत सोटा न दिसतां तलवार दिसते, तसेच दुसरा सेवक पिंगल दाढी मिशा असलेला प्रौढ दिसतो. दोघांच्याही पायांत उंच जोडे असतात. सूर्याची सामान्य वेशभूषण उदीच्यच असते पण कधी कधी कमरेंत एका ऐवजी दोन सुरे खोवलेले दिसतात. सूर्याच्या पायांखाली धावते सात घोडे, सारथी, आणि पाठशिळेवर परिवार देवता दिसतात. शरसंधान करणाऱ्या उषा-प्रत्यूषा फारच किरकोळ आकाराच्या दाखवतात.
उत्तर प्रदेशांतील सूर्यमूर्तीत कित्येकदा कमरेला डावीकडे पल्लेदार तलवार खोवलेली दिसते. दंडपिंगलांप्रमाणे काही शिल्पांत सूर्याच्या बायकाही पतीप्रमाणेंच पायांत जोडे घातलेल्या असतात. इकडे सूर्याच्या पायांमधे एक नवी परिका देवी पृथ्वी किंवा महाश्वेता उभी अगर बसलेली दिसते (चित्र १४८), त्याचप्रमाणें रथिकांबिंबातही कधी कधी सूर्याचेच

३६५

अलाहाबाद कॅट. सं. ३८८) येथेही काही शिल्पांत सात घोडे व सारथी दिसतो पण पालकलेपेक्षा त्यांचे याप्रकारचे असते. इकडील भागांतील पुढच्या प्रतिमांत सूर्याचे कवच-कंचुक सुंदर नक्षी कामाने भरलेले
देश व राजस्थानांतही थोड्या फार फरकानें सूर्य मूर्तीची सामान्य रूपरेषा हीच आहे. काही अपवाद ही, असेलोसएंजिल्स संग्रहालयांत असलेली मध्यभारतांतील सूर्याच्या धात्प्रतिमेत त्याचे पाय सपशेल उघडे कदाचित दक्षिणेचा प्रभाव म्हणता येईल. तसेच काही प्रतिमा जोड्यांनी झाकलेले पाय सोडल्यास विशुद्ध जय पोषाखांत दिसतात.

इतर देवांसह सूर्याच्या संयुक्त मूर्ती :
हा प्रकार मध्यकाळांत बराच वाढलेला दिसतो. अशा प्रकारच्या प्रमुख प्रतिमा खालील सांगता येतील :
1) सूर्व नारायण : हा चतुर्भुज असून याच्या सामान्य हातात सनाल कमळे असतात पण मागच्या हातात शंख व चक्र असते. इंदूर संग्रहालयांत मांडी घालून बसलेला प्रलंब बाहू सूर्य नारायण आहे (सं.सं. ५१-१६१५). याच्या आसनाच्या दोन्ही बाजूला एक एक धावता घोडा दाखविला आहे.
२) शिव-सूर्य : लासएंजिल्स येथील संग्रहात एका शिला खंडावर सूर्य व शंकराची संयुक्त प्रतिमा मिळते. हिलाही चार हात असून सामान्य हातात कमळे आणि पाठीमागच्या हातात त्रिशूल व साप दिसतो. पूर्ण उदीच्यवेषांत नटलेला हा देव मांडी घालून बसला आहे.
३) हरि-हर-सूर्य-पितामह " : मार्कंडेयपुराण आणि शारदातिलकतंत्रात सूर्याची तीन प्रकारची रूपें म्हणजेच ब्रह्मा विष्णु व शिव होत असे सांगितले आहे. प्रतिमा शास्त्रात हे प्रत्यक्षही दाखवितात. देवतामूर्तिप्रकरणांत या प्रकारच्या मूर्तीस हरि-हर-सूर्य-पितामह आणि अपराजितपृच्छेत हरि-हर-हिरण्यगर्भ असे म्हटले आहे. अशा मूर्तीना चारमुखं-दृश्य त्यांत सूर्याची दोन कमळे व इतर तिघांची आयुर्धे दिसतात. हरि-हर-सूर्य-पितामहाच्या मूर्ती खजुराहो व महाराष्ट्रात चांदा जिल्ह्यांत मार्कण्डेय येथे सापडल्या आहेत.

आदित्य प्रतिमा :
बारा आदित्यांच्या प्रतिमा क्वचित मिळतात असे आम्ही वर विधान केले आहे. आता पर्यंत खजुराहोच्या कलेंत देन कमळाव्यतिरिक्त घट आणि वर असलेल्या तीन मूर्ती मिळाल्या आहेत. डॉ. अवस्थी यांच्या मताप्रमाणे या धाता अति प्रथम आदित्याच्या प्रतिमा असाव्यात.
लेखकाला वाराणसी येथे प्राप्त झालेल्या चौहाती मूर्तीत कमळ घेतलेल्या हातांशिवाय मागच्या उजव्यात वरा सगट या असून डावा चक्रपुरुषाच्या डोक्यावर ठेवलेला आहे. हा एक आदित्य असावा पण ओळख पटलेली नाही. खि १५०)

दक्षिण भारतातील सूर्यप्रतिमा :
उत्तर भारतातील परंपरेत व दक्षिण भारतीय पद्धतीत सूर्यमूर्ती विषयी खालील प्रमाणें काही स्पष्ट फरक आहेत." छि १५१):
१) दक्षिणेतील सूर्याचे दोन्ही हात साधारणतः खांद्यापर्यंत उचलेले असतात. या उलट उत्तरेकडे गुप्तकाळात व त्यानंतरच्या प्रतिमांत हात फक्त कमरेशी काटकोन करण्या इतपत उचलेले असतात.
२) दक्षिणेंकडील सूर्याची कमळे अर्ध विकसित असतात.
३) दक्षिणेंत बहुतेक सूर्याला उदरबंध असतो.
४) सर्वांत मोठा फरक म्हणजे उत्तरेत सूर्याचे पाय येन केन प्रकारे झाकलेले असतात, या उलट दक्षिण भारतीय सूर्याचे पाय अगदी उघडे असतात.
५) दक्षिण भारतातही बऱ्याच ठिकाणी सूर्याच्या रथांचे सात घोडे दिसतात. पण तमिळ भागांतील प्रतिमांत साधारणपणे परिवार देवताचा अभाव असतो.
६) संपूर्ण भारतात शिल्पाच्या क्षेत्रांत सूर्याला बोडखा दाखवीत नाहीत.
७) कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रांत मिळणाऱ्या सूर्यप्रतिमाचे जुन्या चालुक्य मूर्तीशी बरेच साम्य असते.
८) शरसंधान करणाऱ्या देवी दक्षिणेंतही बऱ्याच ठिकाणी दिसतात.

***
 ३५८

आदित्य नाम
वर्ण
शक्ती
मास
राशी
उजवा
आयुर्वे
डावा
वरुण
कृष्ण
इडा
मार्गशीर्ष
मेष
चक्र
पाश
सूर्य
लाल
सुषुम्ना
पौष
वृषभ
कमंडलू
अक्षमाला
सहस्रांशु
किंचित लाल
विश्वार्चि
माघ
मिथुन
पौष्करीमाला
कमंडलू
धाता
पिवळा
इंदुसंज्ञा
फाल्गुन
कर्क
तपन
पांडरक
प्रमर्दिणी
चैत्र
सिंह
६.विता
पांढरा
प्रहर्षिनी
वैशाख
कन्या
गदा
चक्र
गभस्ति
कपिल
महाकाली
ज्येष्ठा
तुला
रवि
पीत
कपिला
आषाढ
वृश्चिक
पर्जन्य
शुकाभ
प्रबोधिनि
श्रावण
धन
१०
त्वष्टा
धवल
नीलांबरा
भाद्रपद
मकर सुव
कावळ
११
मित्र
धूम्र
घनांतस्था
आश्विन
कुंभ
सोम
शूल
१२
विष्णू
नील
अमृता
कार्तिक
मीन
चक्र
पद्म
अर्यमा
चक्र
गदा
रुद्र
अक्षमाला
वज्र
भग
शूल
चक्र
विवस्वान्
माला
त्रिशूल
पूषा
(फक्त द्विभुज)

* हा तक्ता देव मूर्तिप्रकरण (चार २२-३३) व अग्निपुराण (५१.५-१०) यांच्या आधारे तयार केला आहे. आदित्यांच्या नांवात दोन्ही ग्रंथांत फरक आहेत. शेवटली पांच नांवें अग्नीत सापडत नाहीत.
वरील बारा आदित्यांच्या बारा प्रकारच्या मूर्ती कचितच मिळतील, कोणार्क (उड़ीसा) येथे मात्र सर्व आदित्यांची वेगळी मंदिरें असल्याचा ऐकिवांत आहे.



प्रकरण ६

ब्रह्मा, अष्टदिक्पाल आणि व्यन्तरदेवता

प्रास्ताविक :-

ब्रह्मा :- 

आरंभ
   उत्तर भारतांतील ब्रह्मदेवाच्या प्रतिमा 
ब्रह्मदेवाच्या दक्षिण भारतीय मूर्ती
संयुक्त प्रतिमा, त्रिमूर्ति, दत्तात्रेय
हरि-हर-सूर्य-पितामह
दिक्पाल लक्षणें
इंद्र
अग्नी
यम
निऋती
वरुण
वायु
कुबेर
ईशान किंवा ईश
यक्ष प्रतिमा
नाग
कुषाण कालीन नागांची वैशिष्ट्ये
गरुड
कुषाण कालीन वैशिष्ट्ये
हनुमान
वर्गीकरण
नंदी, वृष
आयुधपुरुष व आयुधस्त्रिया
समुद्र
ईहामृग, किन्नर, सुपर्ण, वगैरे
हरिहरपुत्र, आर्य
***

 ब्रह्मा :-

आरंभ :

एका काळी विष्णू व शिव यांच्या प्रमाणे ब्रह्मदेवाचाही मान होता व त्याची पूजा होत असे. आनैसर्गिक बीज आणि विष्णुरूप योनी त्यांच्या संयोगाने एक सोन्याचे अंडे (हिरण्यांड) प्रगट झाले व त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली अशी एक कथा आहे. याशिवाय त्याच्या उत्पत्तीच्या आणीक ही कथा आहेत. उदाहरणार्थ कूर्म पुराणांतील कथा पहा. एकार्णवस्थितींत विष्णू झोपलेला असता त्याच्या नाभीतून विशाल कमल उत्पन्न झाले. त्यावेळी ब्रह्मदेवही तेथे आला व विष्णू आणि ब्रह्मा यांनी एकामेकांस तू कोण? असा प्रश्न केला. बोलणे वाढत गेले आणि विष्णूने ब्रह्मदेवाचे पोटांत प्रवेश केला. तेथे त्याला 'सदेवासुरमानुषम्' असे त्रैलोक्य पाहून आश्चर्य वाटले व तो ब्रह्मदेवाच्या तोंडातून बाहेर पडला. त्यानंतर ब्रह्मदेवाने विष्णूचे उदरांत प्रवेश केला. त्यालाही तेथे अनेक लोक दिसले व आदि अन्ताचा पत्ता लागला नाही. त्या बरोबरच बाहेर निघावयाचे सारे मार्गही अवरुद्ध झालेले आढळले. शेवटी तो विष्णूच्या नाभिद्वारांतून बाहेर पडला व तेथून उगवलेल्या कमळांतून प्रगट झाला. दुसऱ्या एका कथेप्रमाणे तो जल आणि आकाश तत्त्वापासून वराहरूपाने प्रगट झाला.' पुढे त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतीनी सृष्टी निर्माण केली म्हणून ब्रह्मदेव साहाजिकच जगाचा आजा झाला. यामुळेच त्याला 'पितामह' अशी संज्ञा प्राप्त आहे. धाता, प्रजापती, विधाता, कमलासन, चतुर्मुख विरिञ्चि, वगैरे त्याची इतर नांवे आहेत. कूर्मपुराणांत त्याला पहिला 'शरीरी' म्हटले आहे.'' व परामूर्ती प्रजापती, हिरण्यगर्भ, वेदार्थवेदी भगवान् व रजोगुणमय अशी त्यांची चार रूपें सांगितली आहेत.
      सृष्टी, स्थिती आणि लय या तीन कार्यात प्रथम कार्याची जिम्मेदारी ब्रह्मदेवाकडे आहे हा रजोगुणांचा प्रतीक आहे, उत्पादन करणे याचे मुख्य कार्य असल्यामुळे याने कुणाशी युद्ध करून संहार केल्याचे फारसे ऐकिवात नाही. देव आणि असुर या दोघांनाही हा वंदनीय होता. कित्येक राक्षस, असुर व दैत्य यांनी ब्रह्मदेवांची खडतर आराधना करून उत्तमोत्तम वर मिळविले होते. जवळ जवळ हा पौराणिक कथांचा क्रमच दिसतो की ब्रह्मदेवाने वर द्यायचे, वरानी असुर उन्मत्त व्हावयाचे व मग त्या वरातून पळवाट काढून विष्णूने व कधी शंकराने असुरांचा नाश करून देवांना त्यांची समृद्धि परत मिळवून द्यायची.
       ब्रह्मदेवाची पूर्वी आराधना करीत, पण पुढे त्याचे मानाचे स्थान पूजेच्या बाबतीत ढळले. त्रिदेवाच्या मधे दोघांपेक्षा को खाली देवाची पूर्वी आराधानाभिकमलांपासून उद्भूत झाल्यामुळे तो विष्णूचा भार अर्थात, त्यापेक्षा खालच्या देर्वाचा मानला जाऊ लागला. लिंगोद्भव मूर्तीच्या कथेमधे (त्रोटक कथा मागे आली आहे, पहा पान १८९) तो शिवापेक्षा खाली गेलेला दाखविला आहे शिवाय या कथेत तो खोटेही बोलताना दिसतो, शिवाचे वरचे टोक मी पाहिले

३८०

अशी सर्रास थाप तो ठोकतो. दुसऱ्या एका कथेप्रमाणें ब्रह्मदेवाला पांच डोकी होती व शिवाशी त्यांचा विरोध झाल्यामुळे शंकराने त्याचे पांचवे डोके तोडले. ती कथा अशी :
     मेरूवर बसलेल्या ब्रह्मदेवाला एकदा मी लोककर्ता म्हणून गर्व झाला. वेदांनी शंकराचा महिमा सांगितला पा ब्रह्मदेवाला ते पटेना. तेव्हा तेथे एका महाज्योतींचा प्रादुर्भाव झाला व तिच्या ज्योतिमंडळांत एक नीललोहित पुरुष प्राप् झाला. देव त्याला म्हणाला की 'माझ्या ललाटापासून तू उत्पन्न झाला आहेस, तेव्हां तू मला शरण ये.' ब्रह्मदेवाचे रे घमेण्डखोर बोलणे ऐकून तो पुरुष म्हणजे शंकर चिडला व त्याने ब्रह्मदेवाला योग्य धडा देण्यांकरिता भैरवाला पाठविले भैरवाने ब्रह्मदेवाचे पांचवे डोके तोडले. पुढे ब्रह्मदेवाने शंकराचे स्तवन केले व शंकर प्रसन्न झाला. भैरव ते कपाल घेऊन ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त म्हणून भिक्षा मागण्या करिता निघून गेला.
        तिसरी एक कथा असे सांगते की यज्ञांचे वेळी ब्रह्मदेवाने आपल्या पत्नीस पाचारण केले, पण काही कारणामुळे ती लवकर येऊ शकली नाही तेव्हा त्याने रागावून दुसरी बायको गायत्री तेथे आणून बसविली व कार्य चालू केले. साहाजिकच सावित्रीस राग आला व तिने ब्रह्मदेवाला 'अपूज्य होशील' म्हणून शाप दिला. याहीपेक्षा वरचढ कथा म्हणजे ब्रह्मदेवांपासूनच एका मुलीचा उद्भव दाखवून पुढें तो तिच्यावरच म्हणजे आपल्या मुलीवरच आसक्त झाला अतएव तो अपूज्य ठरला!
          पौराणिक वाङ्मयांतील या आणि अशाच प्रकारच्या निरनिराळ्या कथा स्पष्टपणे दाखवितात की ब्रह्मदेव आपल्या वरच्या स्थानापासून ढळला आणि अतुरास प्रोत्साहन, असत्य भाषण आणि कन्यासक्ती यामुळे तो लोकांच्या देव्हाऱ्यातून बाहेर पडला. आज शिव, विष्णू, शक्ती, गणपती व सूर्य यांचे आहेत तसा केवळ ब्रह्मदेवाचेच पोवाडे गाणारा कोणताही संप्रदाय नाही. पुष्कर (राजस्थान) खेडब्रह्म (गुजरात) वगैरे ठिकाणी ब्रह्मदेवाची मंदिरें आहेत. पण अशा स्थानाची संख्या फारच तुरळक आहे.
         पूर्वी ही स्थिती नव्हती. रामायण महाभारताच्या वेळी ब्रह्मदेवाची उपासना होती. तशीच ती नंतरही होती. ललितविस्तर आणि दिव्यावदान' या बौद्ध ग्रंथात उपास्य देवताच्या ज्या याद्या मिळतात, त्यात ब्रह्मदेवाचा उल्लेख आहे. पण एवढे मात्र खरे की पुढे ही उपासना फोफावली नाही व मध्यकाळांपर्यंतही बरीचशी अस्तंगत झाली. उत्तरेंत ब्रह्मदेवाचे स्थान शिव, शक्ती व विष्णू यांच्या प्रभावांत लुप्त झाले तर दक्षिणेंत ते कित्येक ठिकाणी ते 'ब्रह्मशास्त्या' नें म्हणाजे स्कंदाने घेतले.
       ब्रह्मदेव हा ब्राह्मण, वेदांचा स्रोत आणि यज्ञाचा पुरस्कार करणारा आहे. त्याने आपल्या चार तोंडांनी चार वेदांना प्रगट केले. (जुन्या भारतीय परंपरेप्रमाणें वेद हे अपौरुषेय असून, ते प्रगट झाले, त्यांचे कोणी निर्माण केले नाही.) त्याला चार हात असून तो कमळावर बसतो, तसें त्याचे वाहन हंस आहे. त्याच्या हातांत पुस्तक, माळा, कमंडलू, यज्ञपात्रे व वराभय मुद्रा असतात. संहाराशी त्याचा संबंध नसल्यामुळे त्याच्या हातांत शस्त्र दिसत नाही. त्याचे पोट किंचित सुटलेले व शरीर थोडे स्थूल दाखवतात. याप्रमाणें संक्षेपांत लक्षणांचा विचार करून आता प्रत्यक्ष प्रतिमांकडे वळू.

उत्तरभारतांतील ब्रह्मदेवाच्या प्रतिमा : (रे. चित्र सदतीस १)
        संग्रहालयातील एक मूती (सं. सं. १४.३८२) होय असे काही जुन्या विद्वानांचे मत होते, पण ते आतां तितकेसे ग्राह्य नाही. महन मिळालेल्या गुप्तकालीन ब्रह्मदेवाच्या दोन प्रतिमा कलकत्ता (२५१०९ रे. चित्र सदतीस २) व वाराणसी (भा.क.भ.स. ६६) याया संग्रहालयांत आहेत.

३८१

दुर्दैवानें दोन्ही बऱ्याच खंडित असल्याकारणानें त्यांच्या हात व आयुधांविषयी काहीच सांगता येत नाही. समोरून मुखें मात्र तीन दिसतात, मस्तकांवर जटाजूट आहे व गळ्यांत जानवेही आहे. दाढी दिसत नाही. दुसरा गुप्तकालीन ब्रह्मदेव देवगढच्या शेषशायी विष्णुप्रतिमेंत कमळावर बसलेला दिसतो. वरील प्रतिमांशी याचे साम्य आहे. हात फक्त दोनच असून एकात घट व दुसरा अभयमुद्रेत असावा असे दिसते.
         बंगाल व उत्तर भारताच्या इतर भागांत चतुर्भुज ब्रह्मदेवाच्या प्रतिमा जास्त दिसतात. 'आजोबा' म्हणून अंकित ब्रह्मदेव मोठ्या पोटाचा व स्थूल शरीराचा दाखवतात तसेंच मधल्या मुखांस साधी किंवा गाठ मारलेली दाढी असते. आयुधांत माळा व कमंडलू तर आहेच. त्याबरोबरच सुक् आणि सुवा किंवा पुस्तक असते. आजूबाजूस दोन स्त्रिया दिसतात त्यांना गायत्री व सावित्री असें म्हणता येईल. बंगालच्या काही प्रतिमांत एक स्त्री वीणा घेतलेली दिसते. ही सरस्वती असू शकेल. ब्रह्मदेवाचा हंस मात्र त्याचे पायाजवळ नक्कीच दिसतो.
ब्रह्मा, वेदांसह ::
      कश्मीरमध्ये मिळालेल्या ७व्या शतकातील एका सुंदर प्रतिमेत (तूर्त बर्लिन संग्रहालय) एकमुखी चार हाताचा ब्रह्मदेव उभा आहे. हातात माळा, अभयमुद्रा, दंड आणि कमंडलू आहे. विशेष म्हणजे त्याच्या पायाशी चार मानव प्रतिमा दिसतात. त्यापैकी एकाच तोंड घोड्याचे आहे, हा सामवेद आहे. उरलेले तीन ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद आहेत.
  G. Bhattacharya, Deva Caturmukha, Pancamukha, Brahma and Siva, Shastric Traditions in Indian arts, Heidelberg, 1989, p. 53
G. Bhattacharya, EBHJI, Dhaka 2000, pl. 21.3
ब्रह्मा सावित्री :
          या दोघांचे एकत्र उमामहेश्वराप्रमाणे अंकन करणाऱ्या दोन प्रतिमा झाशी, उ.प्र. च्या राणीमहाल संग्रहालयात आहेत (सुमारे १०-११वे शतक) त्रिमुख ब्रह्मा (चौथे मुख पाठीकडे असल्यामुळे अदृश्य) हंसावर सावित्रीसह आलिंगन मुद्रेत बसला आहे. एका प्रतिमेत देवाच्या डावीकडे यज्ञपात्र (सुक्/सुवा) घेतलेले व उजवीकडे काही तरी लांब वस्तू (पोथी?) घेतलेले पुरुष आढळतात. हे ब्रह्मदेवाचे आयुध पुरुष असू शकतील.
- सी.पी. २०१ व सी.बी. २०२ संख्यक या प्रतिमा बहुतेक अप्रकाशित आहेत.
ब्रह्मा-सावित्री-सरस्वती :"
    आसाममधील दोन प्रतिमात ब्रह्मदेवाबरोबर दोन स्रिया दिसतात. या अनुक्रमे सावित्री व सरस्वती असणे शक्य आहे. सावित्री व सरस्वतीचे ब्रह्मदेवाच्या डावीकडे अंकन मत्स्यपुराणांत मान्य आहे. (मत्स्य. २५९.४०-४५) दुसरे म्हणजे तेजपुर जिल्ह्यातून आलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीत पादपीठावर सात हंस दाखवले आहेत. लेखिकेच्या मताप्रमाणे आसामचा ब्रह्मदेव कालिकापुराणाच्या आधारावर आकारलेला आहे.
Parimita Deo, Iconographical study of Brahma in the art of Pragjyotisa, Kala VI, 1999-2000, pp. 81-85
हरियाणा व बिहार येथून मिळालेल्या काही शिल्पांत दर्शनी भागावर ब्रह्मा, व पाठीमागे विष्णू, स्कंद अथवा गरुडाचेही दर्शन होते.

३८२

D. Handa, Add... image of Hari-Brahma, JGSV, XLI, January-December 1-4, 1988. pp. 193-97
     सरस्वती-ब्रह्मा यांची आलिंगन प्रतिमा कमी दिसते पण अप्राप्य आहे असें मात्र नाही. उदाहरणार्थ राजा केळया संग्रहालय, पुणे येथे अशी एक मूर्ती आहे (चित्र १५४). दुसरी मूर्ती लेखकाने वाराणसीच्या 'मिसिरपोखरा' तलावाच काठी पाहिली आहे. ही मध्यकालीन असून बरीच खंडित आहे."
    स्वतंत्र रूपांशिवाय ब्रह्मदेव वैष्णव व शैव प्रतिमाच्या रथिकाबिंबाचे रूपांत, विष्णूंच्या अनंतशायी मूर्तीत तसेच शिवाच्या कल्याणसुंदर मूर्तीत आढळतो (चित्र ६२ ).
 ब्रह्मदेवाच्या दक्षिण भारतीय मूर्ती :
         दक्षिणेंत मंदिराच्या उत्तरी भागांवर ब्रह्मदेवाच्या मूर्ती आढळतात. अशी आख्यायिका आहे कीं मेरुपर्वतावर असलेल्या ब्रह्मदेवाचा कमंडलू पुरांत सापडला व तो दक्षिणेंत ज्या ठिकाणी अडकून पडला ती जागा म्हणजे कावेरीच्या तटावर असलेले कुम्भकोणम् हे स्थान होय. दक्षिणेशी ब्रह्मदेवाचा संबंध दाखविणारी दुसरी कथा अशी आहे की कंडियूर (तिरुकण्डियू, तंजावरपासून ७ मैल) येथे ब्रह्मदेवाला सरस्वती वर आसक्त झालेला पाहून शंकराने त्याचे पांचवे मस्तक तोडले."
      दक्षिण भारतांतही ब्रह्मदेव प्रथम पूज्य होता, पुढे त्याला अपूज्यत्व आले. श्री. पी. आर. श्रीनिवासन यांच्या मते इसवीसनाच्या दहाव्या शतकाच्या सुमारांस ब्रह्मदेवाची पूजा लुप्त होऊन तिचे स्थान सुब्रह्मण्याने घेतले. प्रारंभिक चोळ काळांत निर्माण झालेल्या नर्तमल्लई आणि तिरुकत्तलईच्या मंदिरात ब्रह्मदेवाला स्वतंत्र अस्तित्व होते.
     ब्रह्मदेवाच्या मूर्ती बदामी आणि एहोळेच्या कलेपासून मिळू लागतात. मुंबईच्या संग्रहालयांत असलेला बदामीचा विशाल ब्रह्मदेव चतुर्भुज असून त्याचे हातांत प्रदक्षिणाक्रमानें माळा, सुक् व घट अशा वस्तू असून डावा वरदमुद्रेत आहे. हा कमलासनावर बसला असून जवळ हंस आहे व ऋषी स्तुती करीत आहेत. एहोळेच्या प्रतिमेंत पाश किंवा मौजीबंधन हे सुकेच्या जागी दिसते. इतर आयुधं तशीच आहेत. एहोळची दुसरी प्रतिमा हंसारूढ आहे व येथें एक नवी वस्तू म्हणजे 'कूर्च' दिसते. बरेचसे ऋषी स्तवन करतांना दाखविले आहेत.
   धारवाड, सोपारा, वगैरे भागांकडे मिळणाऱ्या ब्रह्मदेवाना दाढ्या दिसतात, पण साधारणपणें दक्षिणेंत दाढीचा प्रघात फारच कमी दिसतो. (रे.चि. सदतीस ४)
     सुदूर दक्षिणेंत मिळणाऱ्या ब्रह्मदेवाच्या स्थानक व आसन प्रतिमांचा डॉ. अश्विन लिप्पी यांनी बारीक अभ्यास केला आहे. त्यांनी यांना दोन वर्गात वाटले आहे.' प्रथम वर्गातील मूर्तीना दृश्यमान अशी तीनच तोंडे असून त्याचा उजवा हात अभयमुद्रेत व डावा कट्यवलंबी किंवा मांडीवर ठेवलेला असतो. मागील हातात माळा व घट दिसतात. या वर्गात स्थानक मूर्ती जास्त आहेत. दुसऱ्या वर्गातील प्रतिमा चित्र पद्धतीच्या (carved in round) असून त्यांत ब्रह्मदेवाचे चौथे तोंडाशी पाठीकडे दाखविले आहे. पाठीमागचा उजवा अभयमुदेत आहे. पाठीमागच्या डाव्यात माळा आहे व सामान्य डावा मांडीवर उताणा ठेवला आहे. या वर्गात अलंकाराचेही बाहुल्य आहे. ब्रह्मदेवाचे साधे जानवे मुक्ता यज्ञोपवीत म्हणून झळकते व त्याच्या पायांतही अलंकार दिसतात. प्रथम वगपिक्षा दुसऱ्या वर्गाच्या प्रतिमा नक्कीच नंतरच्या आहेत. पण या कोणत्याही गटांत ब्रह्मदेवाला दाढी दिसत नाही व त्याचा हंसही आढळत नाही. या प्रतिमा ९-१० व्या शतकातल्या आहेत.

३८३
संयुक्त प्रतिमा, त्रिमूर्ती, दत्तात्रेयी :
    एकटा ब्रह्मदेव जरी अपूज्य झाला असला तरी इतरांबरोबर त्याला पूजेचा हक्क मिळत होताच. या रूपांत प्रथम त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू व शिव यांचा विचार करू. उत्तर भारतात अशा प्रकारचे पट्ट मिळतात. येथे एका ओळीत हे तिन्ही देव कोरलेले असतात (ल.सं.सं.जी ५७ चित्र १५५). खजुराहो कलेत ही अशा प्रकारचे अंकन पहावयास मिळते. यांत बहुतेक मधोमध विष्णू असून आजुबाजूला ब्रह्मदेव व शंकर आपापल्या वाहनांबरोबर असतात.
     महाराष्ट्रीय परंपरेप्रमाणे या तीन देवांचे एकत्र अंकन म्हणजे दत्तात्रेयाची प्रतिमा होय. लक्ष्मी, सरस्वती व पार्वती यांच्या चिथावणीमुळे तिन्ही देव आत्रि ऋषीची बायको अनुसूया हिच्या पावित्र्याची परीक्षा पाहण्यांकरिता तिच्या आश्रमांत गेले पण तिच्या तेजांमुळें त्यांना तान्ही मुले बनून तेथे रहावे लागले. पुढे अत्रींनी यांना त्यांची मुळ रूपे दिली पण तिघे एकत्र स्वरूपाने आत्रेयदत्त या नांवानी त्या आश्रमात राहिले. उपासनेच्या क्षेत्रांत दत्ताचा योगशास्त्राशी जवळचा संबंध आहे. दत्ताच्या प्रतिमेला तीन डोकी व सहा हात असून त्यांत माळा, कमंडलू, शंख, चक्र, त्रिशूल व डमरू अशी आयुधें असतात. काही ठिकाणी कुत्रे ही जवळ असल्याचे वर्णन आहे. दत्त प्रतिमा उत्तर भारतात फारशा दिसत नाहीत. ज्या आहेत त्यापैकी जास्त महाराष्ट्रीयांनीच स्थापन केलेल्या आहेत. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने हा संप्रदाय फारसा जुना असावा असें दिसत नाही.
हरि-हर-सूर्य-पितामह :
मध्य काळात हरि-हर-ब्रह्मदेव या बरोबरच सूर्यासही गुंफून हरि-हर-पितामह या नांवाने प्रतिमा घडविल्या जात. खजुराहोच्या कलेत अशा प्रतिमा दिसतात. अपराजितपृच्छेप्रमाणे अशा मूर्तीला चार तोंडे व आठ हात असावेत व त्यांत अनुक्रमें दोन कमळें, खट्वांग, त्रिशूल, चक्र, शंख व कमंडलू-माळा अशी आयुधें असावीत. काही प्रतिमात फक्त ब्रह्मदेव, सूर्य व शंकर दाखवितात (चित्र १५६). येथे सूर्य व नारायण यांचे एकत्व कल्पिले आहे.
दिक्पाल 
    वर आणि खाली (ऊर्ध्वाधर) अशा दोन दिशा सोडल्या तर एकूण दिशा आठ होतात. दिशेच्या अधिपतीला दिक्पाल अशी संज्ञा आहे, व त्याप्रमाणें आठ दिशाचे आठ दिक्पाल खालीलप्रमाणे आहेत
पूर्व - इंद्र,
आग्नेय अग्नी (दक्षिण पूर्व),
दक्षिण - यम,
नैऋत्य - निर्ऋति (द. पश्चिम),
पश्चिम वरूण,
वायव्य - वायू (उत्तर पश्चिम),
उत्तर - कुबेर,
ईशान्य - ईश्वर, ईश (उ. पूर्व)
       या आठ दिक्पालांपैकी इंद्र, कुबेर, अग्नी, वरुण व शंकर रूपांत ईश्वर यांची स्वतंत्र पूजा इसवीसनाच्या प्रारंभिक शतकापासून चालू होती. इंद्र, अग्नी व वरुण हे तर वेद काळातील अत्यंत श्रेष्ठ असे देव होत. पौराणिक काळांत पंचदेवोपासनेला असा जसा रंग चढत चालला तसतसे हे एका काळचे प्रमुख देव मागे पडले. व वरुणासारखे फक्त एका दिशेचे अधिपती होऊन बाजूला झाले. कुबेर व निर्ऋति हे राक्षस होत. कुबेर तर रावणाचा मोठा भाऊ होता. अर्थातच यांना पुढे देवांत स्थान मिळाले व हे दिक्पालांच्या हुद्यांवर चढले.
३८४
      दिक्पालांच्या संबंधाने हे लक्षात ठेवले पाहिजे की फार जुन्या परंपरेत यांच्या नांवात व संख्येत फरक आढ हरिवंशरित एका ठिकाणी 'दिक्पाल' म्हणून प्रजापती-पुत्रांची खालीलप्रमाणें एक यादी दिली आहे व हे राजे अबूली शासन करीत आहेत असे सांगितले आहे. ""
पूर्व             -        वैराज प्रजापतीचा मुलगा सुधन्वा
पश्चिम       -        रजस प्रजापतीचा मुलगा अच्युत किंवा केतूमान्
उत्तर         -        दुर्धर्ष प्रजापतीचा मुलगा हिरण्यरोमा
दक्षिण       -        कर्दम प्रजापतीचा मुलगा शंखपाल
जैन शास्त्राचे दशदिक्पाल थोडे निराळे आहेत. मात्र अग्नी, इंद्र, यम आणि वरुण हा गट इतरांपेक्षा जुना आहे.
बौद्धांनी चार दिशांचे अधिपती किंवा चतुर्महाराज म्हणून धृतराष्ट्र (पूर्व), विरुढक (दक्षिण), विरूपक्ष (पश्चिम) ३ वैश्रवण (उत्तर) यांची कल्पना केली आहे. पुढच्या पानावर दिलेला दिक्पालांच्या लक्षणाचा तक्ता प्रचलीत समजुतीना धरून तयार केलेला आहे. तिकडे हष्टिक्षेप करून प्रत्यक्ष प्रतिमांकडे वळू.

रेखाचित्र
१. सपत्नीक कुबेर
३८६
इंद्र :-
     इंद्राला सोम, विश्वपुरुष किंवा प्रजापती यांच्यापासून उद्भूत मानतात. वज्र आणि अङ्‌कुश ही त्याची मुख्य आयुचे होत. वृत्राला मारण्याकरिता दधिचि ऋषीच्या अस्थिपासून परंपरेला अनुसरूनच की काय पण गांधार कलेतील बौद इंद्राच्या हातांतील वज्र हे हाडांप्रमाणेच दिसते. इतरत्र मात्र वज्राचा आकार खाली आणि वर तीन टोकें असलेल्या लहानश्या दांड्याप्रमाणे झाला. ऐरावत हत्ती हे इन्द्राचे वाहन होय. उष्णीष किंवा उंच मुगुट हे इन्द्राला ओळखण्याचे दुसरे महत्त्वाचे चिह्न होय.
     पौराणिक वाङ्मयांत इन्द्र हा स्वर्गाचा अधिपती असून, सर्व देवांचा तो स्वामी आहे. तो आपल्या पदाला नेहमीच जपत असतो. पाऊस पाडणे हे इंद्राचे प्रमुख कार्य होय. एके काळी इंद्रपूजेचा बराच विस्तार होता. इंद्रध्वजोत्सव राजे लोक मोठ्या प्रमाणात करीत असत." वर्षप्रतिपदेच्या दिवशी आपण जी घरोघरी गुढी उभारतो तो प्रकार इंद्रध्वजपूजनाचे लघु संस्करण म्हणता येईल.
     आता इंद्राच्या प्रत्यक्ष प्रतिमेचे पूजन लुप्तप्राय झाले आहे, पण मध्यकालीन कलेत त्याच्या प्रतिमा मिळतात. भरपूर दागिने, पायाजवळ हत्ती व हातात सुरक्षित असले तर वज्र ही त्याची प्रमुख चिन्हें होत. तो द्विभुज आणि चतुर्भुज दोन्हीं रूपात दिसतो.
    इंद्राची बायको शची. विष्णुधर्मोत्तर पुराणांप्रमाणे त्याची प्रतिमा शचीसह आलिंगन मुद्रेत घडवावयास हवी." लखनऊ संग्रहालयांत (सं.सं.एच्. २६) असलेल्या एका प्रतिमेत इंद्र शचीसह उभा आहे व पाया जवळ ऐरावत दिसतो.
 खजुराहो येथील चंदेल कलेत शची-इंद्राच्या आलिंगन प्रतिमा विद्यमान आहेत."
       दक्षिणेंत इंद्राचे अंकन भाजे येथून मिळण्यास प्रारंभ होतो. येथे तो पागोटे घातलेला आहे. वेरूळ येथील इंद्रसभा गुंफेतील त्याची हत्तीवर बसलेली प्रतिमा 'देवराज' पदाची साक्ष पटवते. 
अग्नी :-
    वैदिक देवतांत इंद्रानंतर अग्नीचे स्थान आहे. देवांना आहार पोचविण्याचे काम अग्नीचे आहे. अग्नीच्या तीर रूपांची-गार्हपत्य, आहवनीय आणि दाक्षिणात्य-कल्पना जुनी आहे, त्याचप्रमाणे त्याला तीन आवास असलेला, तीन प्रकाश असलेला किंवा तीन तडेचा मानला आहे पण त्या वर्गीकरणाचा अग्नीच्या प्रतिमेशी संबंध नाही. कर्मकांडात आजकाल आपण अग्नीचे ज्यां मत्रांने ध्यान करतो त्यात त्याला सात हात, चार शिंगे, सात जिह्वा, दोन डोकी, तीन पाच असलेला व उजवी आणि डावीकडे क्रमाने स्वाहा आणि स्वधा अशा क्षार शिंगे, सात जिह्वा, दोन डोकी आहे. मंत्राप्रमाणे त्याच्या हातात शक्ती, अन्न, सुक्, सुवा, तोमर, पंखा आणि तुपाचे भांडे अशा वस्तू आहेत. लक्षणग्रंथ या ध्यानाची फारशी पुष्टी करीत नाहीत आणि जुन्या प्रतिमाही तशा दिसत नाहीत.
    लखनऊ (सं.सं. जे. १२३ चित्र १५७) मथुरा संग्रहालयांत (सं.सं. ४०.२८८०) आहेत. येथे अग्नीला काहीसा अंग सुटलेल्या ब्राह्मणासारखा दाखवतात, हात दोनव असतात, डोक्यावर केसांची गाठ असते व गळ्यांत का म्हणजे त्याच्या पाठीमागे दिसणारा ज्वालांचा पसारा ही होय.
३८७
      हरिवंशात नारदाची तुलना अग्नीशी करीत असताना पेटलेला (ज्वलित), डावीकडे केसाची मोठीशी गाठ असलेला (सव्यापवृत्त विपुल जटामंडल) आणि उगवत्या सूर्याप्रमाणे डोळे असणारा (बालार्क सदृशेक्षणः) अशी पढ़ें वापरली आहेत. ही कुषाण प्रतिमांना बऱ्याच अंशी लागू पडतात.
    अग्नीचा कार्तिकेयाशी संबंध असल्यामुळे कधी कधी दोघांचे बरोबरच अंकन केले जाते. कुषाणकाळाची अशी प्रतिमा मथुरेत आहे (सं.सं. ४०.२८८३) व मध्यकालांतील तोच विषयअंकित करणारी प्रतिमा सारनाथ (वाराणसी) येथील संग्रहालयांत आहे.
    अग्नीच्या मध्यकालीन मूर्ती द्विभुज आणि चतुर्भुज दोन्ही प्रकारच्या मिळतात. वर अभय मुद्रा आणि कमंडलूया त्याच्या सामान्य गोष्टी होत. खजुराहो येथील प्रतिमा प्रायः चार हाताच्या आहेत व तेथे वर/अभय या मुद्रां बरोबरच अक्षमाला, खुक्, पुस्तक आणि कमंडलू या वस्तू दिसतात. ज्वाला फारशा दिसत नाहीत.
   बंगाल व बिहार कडील प्रतिमांत अक्षमाला आणि कमंडलू यांचे प्राधान्य आहे. ज्वालामंडल भरपूर दिसते (चित्र १५८). लंबकूर्च किंवा दाढी इकडील अग्नीला बऱ्याच ठिकाणीं दाखवितात.
 अग्नीचे सामान्य वाहन मेष आहे, पण बकऱ्याशी ही त्याचा जवळचा संबंध आहे. खजुराहो येथील काही शिल्पांत त्याचे वाहन म्हणून बकराच अंकित केला आहे. २२ कधी कधी हा बकरा मानवरूपात असतो (म.सं.सं.डी. २४).
   कल्याणसुंदरमूर्तीत अग्नीचे प्रामुख्याने अंकन केले जाते. बऱ्याच ठिकाणी तो ज्वाला रूपात दिसतो पण काही शिल्पांत (उदा. भा.क्र.भ. वाराणसी सं. १७५) त्याचे मानवी मुख दाखवून ब्रह्मदेव त्यातच आहूती देत आहे असे चित्रण करतात.
 स्वाहा-अग्नीच्या आलिंगन प्रतिमा दुर्मिळ असल्या तरी तो प्रकार खजुराहो येथील कलेत पाहण्यास मिळतो. 
   दक्षिण भारतात सात हात, दोन डोकी व तीन पायांच्या प्रतिमा मिळतात. श्री. राव यांनी दिलेल्या उदाहरणांत एकीत तर मानव मुखें आहेत, पण दुसरीत मात्र अग्नीची तोंडें मनुष्याची नसून बोकडाची आहेत. दुसरे म्हणजे अग्नीचे वाहन म्हणून एका ठिकाणी मेष तर दुसऱ्या नमुन्यात बैल दाखविला आहे. रुद्र व अग्नी यांचे एकीकरण जुन्या काळापासून मान्य होते, त्याचाच हा प्रभाव दिसतो.
    मध्यकालीन कलेत अग्नीच्या काही विशेष प्रकारच्या प्रतिमा आढळतात. सारनाथ (वाराणसी) येथील पुरातत्त्व संग्रहालयातील एका शिल्पांत अग्नीच्या पायाजवळ आजूबाजूला मोर आणि कोंबडाजवळ असलेले पुरुष आहेत. हे अग्नीचे कार्तिकेयाशी सान्निध्य दाखवतात. (रे.चि.उ.१)
      K. Kumar, Some Brahmanical Sculptures in the Sarnath Museum, Bharat, V.S. Agrawala volume, B.H.U.Varanasi, 1968-71, nos. 12-14, pl. IV pp. 142-43
     ग्वाल्हेरच्या संग्रहालयांत स्थापित एका प्रतिमेत देवाच्या हातांत वरदाक्षमाला, खुसुक्, कमंडलू, आणि पोथी या वस्तू दिसतात. अग्नीचे वेदाशी असलेल्या सान्निध्याचे हे संकेत होत.
      S.K. Dikshit A Guide to the central Archaeological Museum, Gwalior, 1962, p. 53 याच संग्रहालयात असलेली दुसरी अग्नी प्रतिमा विष्णूशी नैकट्य दाखवते. येथे देवाच्या डोक्यावर मुकुट आहे,
३८८
हातांत स्वस्तिक मुद्रेसह पद्म, गदा आणि कमंडलू आहेत. त्याचबरोबर पायाशी बकरा ही आहे. या प्रतिमेला 'अफ्रिनारायाण' असे ही म्हणता येईल.
Ibid, pp. 53-54
     अग्नी आणि वृष किंवा बैलाचे साम्य दाखवणारी एका नंदीची विलक्षण प्रतिमा महाराष्ट्रात सातार जवळच्या पाटेकर येथील अधीमंदिरात आहे. येथे बसलेल्या बैलाच्या पुढच्या भागाला यातव मुख, सात हात, चार शिंगे, तीन पाय व हातांत वर, पुष्प, सुक् (?), पंखा / धनुष्य आणि अक्षमाला अशी आयुधें दिसतात. (रे.चि.उ.२).
   N.P. Joshi, A note on the Image of Agni-Vrusa, Kala, XIII, 2007-08, pp. 106-08
   हातांत धनुष्य घेतलेली सुमारे ८व्या शतकातील अग्नीची एक स्थानक मूर्ती सत्यवोलू गावातील रामलिंगेश्वर मंदिर (आंध्रप्रदेश) येथे आहे. हिला हात फक्त दोनच आहेत. डाव्यात धनुष्य असून डावा खंडित आहे.
   M. Krishna Kumar, A rare type of Image of Agni from Ramalingesvara Temple Satyavolu (A.P.) Kala XV 2009-10, pl. 1, pp. 56-60
यम :-
   अग्नी प्रमाणे यमही वैदिक देव आहे. हा सूर्य किंवा विवस्वान याचा मुलगा आणि यमी-पुराणातील यमुना-हिचा भाऊ. स्वतः प्रथम मरून दुसऱ्याला मृत्युची वाट दाखविणारा हा देव धर्माचे ही प्रतीक मानला गेला आहे. दक्षिण दिशेचा हा अधिपती असून याच्या प्रधानाचे नाव चित्रगुप्त असे आहे. शाम व शबल हे याचे दोन कुत्रे आहेत. पौराणिक मान्यतेप्रमाणे प्राण्यांना इहलोकातून परलोकांत नेणे, त्याच्या पाप पुण्याचा झाडा घेणे व त्यांना योग्य तो दंड देणे ही यमधर्माची कार्ये होत. सावित्री सत्यवानाच्या कथेत यमाचे कार्य व स्वरूप याचे चांगले चित्रण आहे.
    यमाची मुख्य लक्षणें म्हणजे त्याचे हातांतील दंड व पाश आणि वाहन महिष ही होत. विष्णुधर्मोत्तर पुराणाप्रमाणे दण्ड, खड्ग, त्रिशूल आणि अक्षमाला ही त्याची आयुधे आहेत. खजुराहो येथे त्याला चतुर्भुज दाखविला असून तेथे कुक्कुट, डमरू, कपाळ, घंटा, वगैरे आयुधं दिसतात पण त्यांना फारसा शास्त्रीय आधार उपलब्ध नाही. साधारणपणे यम हा द्विभुज व दंडधर दिसतो (चित्र १५९).
दक्षिणेच्या मार्कंडेयानुग्रह किंवा कालारि प्रतिमेत यम दिसतो.
निर्ऋति :-
    निर्ऋतिचे नांव ऋग्वेदांत आढळते पण पुढे त्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. हा राक्षस कुलातील असून कूर्मपुराणांने शंकराची एक विभूती असें याचे वर्णन केले आहे." आगमानुसार याचे मनुष्य हे वाहन आहे, पण विष्णुधर्मोला मात्र याचे वाहन गाढव होय असें सांगते." याच ग्रंथांप्रमाणे देवी, कृष्णांगी कृष्ण वदना आणि कृष्ण पाशा अरण निऋतीच्या चार बायका सांगितल्या आहे, पण खरे म्हणजे ही एकीचीच तीन विशेषणें दिसतात.
   निर्मतीच्या प्रतिमा खजुराहोत बऱ्याच मिळतात इतरत्र त्या अगदी मोजक्या आहेत. खजुराहो येथे झा दिक्पालांप्रमाणे हा ही चार हाताचाच दाखविला आहे व हातात खड्ग, नरमुंड, उमा, आहेत, सुरा, साप, खेटक पुस्तक, वगैरे वस्तू आपल्या रुचिप्रमाणे दिल्या आहेत. याची विकराल आणि सौम्य अपारू कमळ, सूची मुखे दिसतात.
३८९
जवळच त्याचे वाहन मनुष्यही असतो, काही शिल्पात मनुष्याचे ऐवजी कुत्रा दिसतो.
दक्षिणेंतील नरवाहन निऋतीचे चित्र श्री. राव यांनी आपल्या ग्रंथात दिले आहे. 
वरुण :-
     वैदिक देवता संघांत इन्द्र-अग्नि-वरुण ही त्रयी प्रसिद्ध आहे. पौराणिक काळात जसे इन्द्र व अग्नीचे स्थान ढळले तिच गती वरुणाचीही झाली. आता तो फक्त 'यादसांपति' (जल जंतूंचा स्वामी) जसें नाव धारण करून पश्चिम दिशेचा अधिपती म्हणून राहिला आहे. नरसिंहपुराणांप्रमाणें अदितीचा मध्यमपुत्र वरुण हा बारा आदित्यांपैकी 'मध्यम' होय. पश्चिम समुद्राच्या पलीकडे असलेली विश्वावती याची नगरी आहे. आज वरुणांचा असा कोणताही संप्रदाय नसून त्याचे पूजन फक्त कर्मकांडापर्यंत सीमित राहिले आहे. त्यात देखील वरुणाची प्रतिमा घडवीत नसून कलशावर त्याचे आवाहन होते.
    पौराणिक परंपरेप्रमाणे पाश हे वरुणाचे मुख्य आयुध आणि मगर हे वाहन. त्याला ओळखण्याची हीच दोन प्रमुख चिन्हें होत. विष्णूधर्मोत्तरपुराणांप्रमाणे हा किंचित सुटलेला आणि मोत्यादिकांचे दागिनें घालणारा असावा.
    वरुणाच्या मध्यकाळातील प्रतिमाच जास्त मिळतात. लखनऊ संग्रहालयांत असलेला वरूण हा चतुर्भुज असून मगरांवर बसलेला आहे. पण चारी हात खंडित असल्यामुळे आयुधायिकांविषयी काहीच सांगता येत नाही (ल.सं.सं.जी. २०४). खजुराहो येथील अधिकांश वरुण प्रतिमा चतुर्भुज आहेत व त्यांत वरदाभय मुद्रंशिवाय कमल, पाश, पुस्तक, मकर, केतु, वगैरे वस्तू दिसतात. भारत कला भवन, वाराणसी येथील प्रतिमेंत (चित्र १६०) वर, पाश, कमळ व घट घेतलेला आहे.
   मुंबईच्या संग्रहालयांत वरुणांची एक सुंदर सपत्नीक प्रतिमा आहे (सं.सं. बीबीआएएस् ७५). याच्या उजव्या हातातील वस्तू स्पष्ट नाही, डावा मांडीवर आहे. हा मगरावर बसलेला आहे. त्याच मगरावर पाठीशी त्याची पत्नी उजव्या हातात आपल्या स्वामीचे आयुध म्हणजे पाश घेऊन बसली आहे (रे.चि. सदतीस ५).
वायू  :-
       वायव्य दिशेचा अधिपती वायू हा जीवनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असला तरी प्रतिमाशास्त्र आणि उपासना या क्षेत्रात फारच किरकोळ आहे. पौराणिक काळात दुसरा पाण्डव भीम आणि रामदूत हनुमान यांचे जनकत्व वायुकडे गेले. आज वायूची मंदिरें किंवा त्याची उपासना कोठेही नाही.
    असें जरी असले तरी कुषाण काळात त्याची उपासना रूढ असावी, अन्यथा शिव, सूर्य, चंद्र, स्कंद, वगैरे देवांप्रमाणे त्याला नाण्यावर 'ओएडो' किंवा वात या नावाखाली स्थान मिळाले नसते. कुषाण नाण्यावर दिसणारा वायू हात उंच करून धावताना दिसतो. त्याचा चेहरा उग्र असून केस उभं असतात. या प्रतिमा हरिवंशातील वर्णनाची आठवण करवितात जेथें वायूला 'उत्तमभूत', 'अशरीरी', 'आकाश' आणि 'शीघ्रग' अशी नावें दिली आहे." गती हेच वायूचे खरे चित्रण होय.
    मूर्तीच्या क्षेत्रांत वायूचे अंकन मध्यकाळात व तेही दिक्पालांचे प्रसंगीच दिसते. खजुराहोत इतर दिक्पालांप्रमाणें वायूच्याही चौभुजी प्रतिमा आहेत व त्याच्या हातात ध्वज, पुस्तक, कमळाची कळी अक्षमाला व कमंडलू या वस्तू आपल्या रुचिप्रमाणें दिल्या आहेत. 
३९०
कुबेर
      उत्तर दिशेचा दिक्पाल काही ठिकाणी सोमाला मानले आहे व काही ठिकाणी कुबेराला. कुबेर हा वैश्रवण वा नावानेही प्रसिद्ध आहे. विशेषतः, बौद्धांनी हे नाव जास्त उचलून धरले. पुलस्त्य ऋषीचा मुलगा विश्रवा आणि विश्रव्याचा वैश्रवण अशी याची व्युत्पत्ती आहे. वैश्रवण कुबेराचे नाव अथर्ववेदांत येते. हा मूळचा राक्षस, पण याने शंकराचे सख्यन्च मिळविले व त्याबरोबरच याला उत्तर दिशेचे अधिपत्य, अलका नांवाची नगरी आणि सर्व यक्षांचे स्वामित्व मिळाले. पहिल्यांदा हा लंकेत रहात असे पण देवसंस्कृतीकडे याचा कल असल्याने रावणाने याला तेथून हुसकावले व हा उत्तरेत अलकेत राहू लागला.
     बौद्धांनी दिक्पालांचे ठिकाणी जी चातु महाराजांची कल्पना केली आहे त्यांत उत्तरेचा स्वामी यक्षाचा राजा वैश्रवण हाच मानला आहे. कुबेर शब्दाचा अर्थ आहे 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' वाईट अथवा बेडोल शरीराचा तो कुबेर!! यामुळे याच्या प्रतिमेची कल्पना करीत असतांना पोट सुटलेल्या स्थूलकाय पुरुषाची मूर्ती समोर आली असावी. रामायणांत तर त्याला 'एकाक्ष' ही म्हटले आहे. पण मूर्तीत मात्र त्याला तसे दाखवीत नाहीत. कुबेर हा धनपती आहे. तेव्हा त्याला शेटजीचे रूप देणे शास्त्रोचित ठरले असावे, कारण कुषाणकालीन कुबेर हा गळ्यांत कंठा, कानांत कुंडले व डोक्यावर पगडी घातलेल्या ढेबर पोट्या शेटा सारखा हातात मुंगसाची पिशवी (नकुल नकुलक= नकुली = पिशवी, कसा) घेतलेला दाखवितात. शेटजीना पायी चालणे कठिणच ते नेहमीच भोयांनी उचललेल्या पालखी व मेण्यात बसणार. कुबेराच्या वाच वैशिष्ट्यांमुळे त्याला नरवाहन अशी संज्ञा मिळाली. मध्यकालीन काही प्रतिमांत त्याला नरवाहनच दाखविला आहे.
     कुषाणकाळांत कुबेराच्या परंपरेत ग्रीकदेव बेकस यांच्या परंपरेचे मिश्रण झालेले दिसते. बेकस हा मद्याचा देव, अर्थात् धनपती कुबेराजवळ मद्याचे अनुष्ठान असणें मुळीच अस्वाभाविक नव्हते. कुबेराच्या काही कुषाणकालौर प्रतिमांत त्याचे हातात मद्याचा पेलाही असतो. (रे.चि. तेहतीस १८) थोडक्यात कुषाण कालीन कुबेर प्रतिमांची -मुख्यतः मथुरेत - खालील वैशिष्ट्ये सांगता येतील-
१) कुबेर हा लंबोदर व तुंदिल वपु असून त्याने डोक्यावर पागोटें किंवा तुरेदार मुगुट, कानांत कुंडले व गळ्यात कंठा घातलेला असतो.
२) पहिल्या प्रकारांत त्याचा उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्यांत मुंगुसाच्या आकाराचा पैशांचा कसा असतो. दुसऱ्या व जास्त सामान्य प्रकारांत त्याच्या एका हातात मद्याचा पेला व दुसऱ्यांत कसा असतो (म.सं.सी. २५, २६, ३१ वगैरे).
३) कुबेराच्या बायकोचे नांव भद्रा. बौद्ध परिसरांत ही हारिती म्हणून ओळखली जाते. काही प्रतिमांत ही कुबेराबरोबर बसलेली असते. तिच्या एका हातात कमळ व मांडीवर मूल असते.
४) कुराबरोबर तस्वीरले अंकन सक्तिसांगतच होय. काही शिल्पात (म. सं. सं. सी. ३०) कुबेर, लक्ष्मी व भा एकाच ओळीत बसलेले दिसतात. येथे लक्ष्मीच्या हातात कमळ व म.स.सी. ३०) कुबेरचा पेला दिसतो
५) एका प्रतिमेत कुबेर संगीताचाही रस घेताना दिसतो (म.सं.सं. १८.१५३८):
३९१
६) कुबेराचे कोणत्याही प्रकाराचें वाहन दिसत नाही. थोडक्यात म्हणजे कुषाण काळचा मथुरेचा कुबेर हा विलासी धनिकाचे खरे चित्र उभे करतो.
     कुबेराचे पूजन व मंदिरें पतंजलीच्या काळांपासून म्हणजे कुषाणांच्या पूर्वी पासूनच अस्तित्वांत होती." ललितविस्तराच्या यादीत पूजनीय देवतांत वैश्रवणांचे नांव आहेच व मथुरेत प्रचुर संख्येत मिळणाऱ्या त्याच्या प्रतिमाही या गोष्टीची साक्ष देतात.
      गुप्तकाळांत मथुराकलेंत कुबेराच्या प्रतिमांचा आकडा रोडावलेला दिसतो, पण ज्या एकट्या (म.सं.सं. १५.१११८) किंवा सपत्नीक (म.सं.सं. १५.९९१) प्रतिमा आहेत त्यांची घडण जुन्या धर्तीवरच झालेली आहे. सुमारे सातव्या शतकांतील कुबेराची एक सुंदर प्रतिमा अल्हाबादच्या पभोसा गांवातून मिळाली आहे (ल.सं.सं.जी ५६, चित्र - १६१). पूर्वी प्रमाणेच येथे ही तो नरवाहन नसून त्याचे हातात एक वाटी आणि मुंगुसाची पिशवी आहेत. कुषाणमूर्तीतील मद्यचषकाची जागा येथे वाटीने घेतली आहे. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची नवी वस्तू म्हणजे कुबेराच्या पायाखाली ठेवलेले दोन घट होत. हे घट तोंडापर्यंत भरलेले असून कुबेराजवळच्या निधीचे प्रातिनिध्य करतात. ५०
     येथेच बौद्ध कुबेर, ज्याला जंभल असे म्हणतात, आणि ब्राह्मण धर्माचा कुबेर यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे, व तो फरक घागरी ठेवण्याच्या पद्धतींतच आहे. जंभलाच्या पायाजवळील घागर लवंडलेली असते, व तिच्यातून रत्नादि बाहेर पडत असतात, या उलट ब्राह्मण कुबेराच्या पायांजवळ भरलेल्या घागरी सरळ ठेवलेल्या असतात. मुंगुसाची पिशवी दोघांच्याही जवळ असते.
    मध्यकालीन कलेंत कुबेराच्या द्विभुज प्रतिमा तर मिळतातच, पण त्याबरोबर चतुर्भुज प्रतिमा दिसू लागतात. द्विभुज प्रतिमांत तो बहुतेक पिशवी व पात्र घेतलेला असतो (अल्हाबाद कॅट. सं. २५६). त्यांच्या आजुबाजूस दोन सेविकाही दाखवितात, पैकी एकीच्या हातात मद्याचा घट असतो तर कुठे ती कुबेराच्या पेल्यात मद्य ओतीत असते. (रे.चि. अडतीस १) खजुराहोकलेत चतुर्भुज प्रतिमा बऱ्याच दिसतात. येथे पिशवी व पेल्या शिवाय कमळ, गदा, अक्षमाला, फळ, पुस्तक, वगैरे वस्तूही कुबेराजवळ आढळतात. ५२ खजुराहो येथे भद्रा किंवा ऋद्धी व कुबेर याची आलिंगन प्रतिमाही मिळते. एका दुसऱ्या मूर्तीत कुबेराची परिवार देवता म्हणून हाथ जोडून बसलेला मानवाकार हत्ती दिसतो. ते त्यांचे वाहन असणे संभव आहे. तसेच घागरीच्या बाबतींतही काही शिल्पात ब्राह्मण व बौद्ध परंपरांचे संमिश्रण आहे. एका शिल्पांत कुबेराचे पायाजवळ तीन घागरी ठेवलेल्या मिळतात. पैकी दोन उभ्या आहेत आणि एक लवंडलेली दिसते. लवंडलेल्या घागरींचा प्रकार शक्ती गणेशाच्या काही मूर्तीत ही दिसतो (राणी दुर्गावती संग्रहालय, जबलपुर, सं. १३३).
   दक्षिणेंत उत्तरेच्या मानाने कुबेराचे अंकन कमी दिसते. ऐहोळे येथील कलेत दिक्पालांच्या ओळीत तो दिसतो, पण येथे त्याचे वाहन घोडा आहे. 
कुबेर, सूर्य, कुबेरचंद्र : -
खजुराहो व काही इतर ठिकाणी कुबेर आणि सूर्य यांच्या संयुक्त प्रतिमा मिळतात. चार हाती देवाच्या हातांत कमळे आणि पिशवी (नकुलक) दिसते, त्याचप्रमाणे राजस्थान मधून कुबेर व चंद्राच्या संयुक्त प्रतिमा समोर आल्या आहेत. मेनाल येथील शिल्पांत देव चतुर्भुज आहे, पण जहाजपुर येथून मिळालेल्या मूर्तीत तो द्विभुज आहे मस्तकामागे चंद्रकोर आणि हातांत पिशवी आहे.
३९२
- आर.सी. अग्रवाल, 'चंद्रकुबेर व सूर्य कुबेर प्रतिमाएँ', एक असाधारण अभिव्यक्ति', वैचारिकी, भारतीय विद्या मंदिर शोध संस्थान, बीकानेर. २४.३, अक्टुबर-दिसंबर, २००८, पृ.२८.
नाग कथा :-
     सोख (मथुरा) येथून मिळालेल्या एका कुषाण कालीन शिलापट्टावर एक नागकथेचे सुंदर दृश्य कोरले आहे. मधोमध नागराज आणि त्याची राणी उच्चासन वर बसलेले आहेत. मागे उजवीकडे छत्र चामर घेतलेल्या नागिणी आणि नाग सेवक आहेत. डावीकडे अर्थात् राजा राणीच्या समोर सात जण भेटीला आलेले दिसतात. समोरच्या माणसाच्या हातांत एक लांब वस्त्राचे टोक आहे व त्याचे दुसरे टोक नागराजाच्या डाव्या हातांपर्यंत आहे. इतर मंडळीमध्ये साताशिवाय चार मुलें ही आहेत. या संपूर्ण दृश्याची पार्श्वभूमी अजून उकललेली नाही. (रे.चि.उ. ३).
    Herbert Hartel, Excavations at Sonkh, Berlin 1993, illustration on p. 420, discussion on pp. 429-30
ईशान किंवा ईश
   हे शिवाचेच स्वरूप असल्यामुळे या प्रतिमा एकट्या उभ्या शंकरासारख्याच दिसतात. जवळच त्याचे वाहन बैलही असतें.
यक्ष :-
     प्राचीन वाङ्मयांत भूत, किन्नर, राक्षस, गंधर्व, किम्पुरुष, नाग, दानव, इत्यादि बरोबरच यक्षांचा उल्लेख मिळतो. वेद, ब्राह्मण, उपनिषदें, सूत्र, पौराणिक वाङ्मय, जातकादि पालिग्रंथ, जैनांचे आगम साहित्य व संस्कृत कथासरित्सागरादि काव्यकथाग्रंथांत यक्षांचे उल्लेख इतस्ततः पसरलेले आहेत. आज जरी यक्षपूजा उघडपणे मावळली असली तरी निरनिराळ्या प्रांतात लोकोपासनेच्या रूपाने ती आज ही आसेतु हिमाचत प्रचलित आहे. समर्थांनी आपल्या दासबोधांत प्रसंगोपात्त रूपाने ठिकठिकाणी महाराष्ट्रांतील लोकदैवतांचा याद्या दिल्या आहेत. त्यात जाखमाता (यक्षिणीमाता), जखिणी, झोटिंग, वेताळ, मानविणी, सटी, वीरेदेव, मुंज्या, वगैरे पैकी कित्येक जुन्या यक्षमंडळीची नवी संस्करणें आहेत. उत्तरप्रदेशांतील वीर, ब्रह्मा, वगैरे लोकदैवते याच कोटीतील आहेत. अस्तु
     यक्षाला पालीत यक्ख व प्राकृतांत जक्ख म्हटले आहे. यक्षाच्या उत्पत्तिविषयी थोडा मतभेद आहे. रामायणांप्रमाणे जलाच्या संरक्षणासाठी प्रजापतीने विशिष्ट सृष्टी निर्माण केली व त्यांना आज्ञा दिली, 'रक्षध्वम्'. त्यापैकी काहीनी सांगितले 'रक्षामः' व काहींनी उत्तर दिले 'यक्षामः'. 'रक्षामः' म्हणणारे राक्षस, 'यक्षमः' म्हणणारे यक्ष झाले. अर्थात् यक्ष आणि राक्षस यांचा गोतावळा एकच होय. ५८
    जुन्या काळापासूनच यक्षाच्या दोन प्रकारच्या स्वरूपाची कल्पना केली गेली होती. एक रूप अत्यंत सुंदर अद्भुज सामर्थ्यवान व लोकांचे कल्याण करणारे असे मानले जात असे तर दुसरे रूपांत " बटबटीत डोळे, पसरलेले तोंड, आखुड माण्ड्या, सुटलेले पोट, अशा भयंकर देहाची कल्पना केली जात असे. प्रथम अर्थात अग्नी, इंद्र, कृष्ण बलराम, स्कंद, वगैरे देवांना यक्ष या नावाने संबोधित केले आहे." यक्षांप्रमाणेच यक्षिणी देखील फारच सामर्थ्य असणाऱ्या सुंदर व मायेत पटु अशा स्त्रिया समजल्या जात. बरोबरच याच अर्थात 'यक्षिणीची कांडी' हा मराठीचा वाक्प्रचार आजही रूढ आहे. जुन्या वाङ्मयांत लक्ष्मी, एकानंशा, वगैरे देवी व ताटके सारख्या मायाविनींना यक्षिणी म्हटलेले आहे.

३९४

    आपल्या दुसच्या रूपात विकृत असल्यामुळे यक्ष हैं हास्याचे आलंबनही मानले गेले. वामनपुराणांत अशी कथा के की यक्ष पंचालिकाने शंकराची जांभई आणि उन्माद या दोन गोष्टी आपल्यावर ओढून घेतल्या व लोकांना हसविणा होण्यांचा वर मिळविला."
    यक्षांच्या मंदिरांना किंवा 'स्थानांना' यक्षायतन किंवा यक्षस्थान म्हणत. चौरस्त्यावर त्यांचे पूजन करीत. यक्ष हे लोकदैवत असल्यामुळे ब्राह्मण, बौद्ध व जैन तिन्ही धर्मात यांचा सहज प्रवेश होता. एवढेच की महाविलयनपद्धतीप्रमाणे तिन्हीं धर्मात यांना उपदेवतांचेच स्थान मिळत गेले. ब्राह्मण धर्माप्रमाणे यक्षांचा तांडा कुबेराचे अधिकारात होता. बौद्ध परंपरेप्रमाणे चार महाराज (राज शब्द हा यक्षाचाच पर्यायवाची होता) 'चातु महाराज' या नांवानी चार दिशांचे अधिपती मानले गेले आहेत." जैनांत तीर्घ‌ङ्कराचे शासन देव म्हणून कित्येक यक्ष विद्यमान आहेत. यक्षांचा सुळसुळाट गुप्तकाळांपासून कमी व्हायला लागतो.
यक्षांसंबंधी एवढी पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आता त्यांच्या प्रतिमाकडे वळू.

यक्ष प्रतिमा :-
     यक्षांच्या दोन प्रकारच्या स्वरूपांविषयी वर चर्चा केली आहेच. मूर्तिकारांनी तोच क्रम उचलणे स्वाभाविक आहे. प्रथम प्रकारचे यक्ष व यक्षिणी देव कोटीत जात असल्यामुळे त्यांना भव्य, उत्तम पोषाख घातलेले व साधारण लोकांना एकदम प्रभावित करतील असे दाखविणे योग्य होते. इसवीसनांपूर्वी सुमारे तिसऱ्या ते पहिल्या शतकांत उत्तर भारतात भल्या मोठमोठ्या यक्ष व यक्षिणीच्या प्रतिमा विखुरलेल्या होत्या (र.चि. एकोणचाळीस १-२). शतकानुशतके यांचे परंपरागत पूजन होत असे, या यक्षपूजनाने लोकाच्या मनांची इतकी जबरदस्त पकड घेतली होती, कि आजच्या शतकांत संग्रहालयात ठेवण्याकरिता म्हणून यक्षमूर्ती हलविल्या नंतर देखील मथुरेच्या परखम नांवाच्या गावी अजूनही त्या यक्षानिमित्त 'जात' किंवा यात्रा भरते. आजपर्यंत एकूण मोठ्या आकाराच्या अंशा चोवीस यक्षमूर्ती आपणांस मिळाल्या आहेत. निरनिराळ्या संग्रहालयांत असणाऱ्या किंवा मूल स्थानांवर उभ्या या विशाल प्रतिमा शिवाय कित्येक अजून अज्ञात असण्याची दांडगी शक्यता आहे. या चोवीस पैकी एकच सोपारा येथे मिळालेली आहे. या यक्ष व यक्षिणी प्रतिमांची खालील वैशिष्ट्ये लक्षांत घेण्यांसारखी आहेत :
१) सर्वच प्रतिमा आकाराने भव्य, पूर्ण परिपुष्ट व बलशाली दिसतात.
२) डोक्यावर केसांची भली मोठी गाठ किंवा पागोटे, गळ्यात जाडसर नक्षीदार कंठा, कानांत भारी कुंडले, दंडावर अंगद, कायबंधनाने आवळलेले नेसूचे धोतर हा यक्षाचा व निराळ्या प्रकारचे दागिने, सुंदरशी वेणी व वस्त्र हा यक्षिणीचा पोषाख दिसतो.
३) या प्रतिमा 'चित्र शैलीच्या' अर्थात पुढून व पाठीमागूनही कोरलेल्या असतात.
४) यक्षिणी द्विभुजच असतात बहुतेक यक्षांच्या हातात पिशवी असते. ही समृद्धी, धन, ऐश्वर्य, वगैरेचा संकेत करते, काहीं यक्षाजवळ शंख असतो. या शिवाय कमरेला लहानशी सुरी ही खोवलेली असते. (पहा ग्वाल्हेर संग्रहालय, मणिभद्र यक्ष लखनऊ संग्रहालय, पलवल यक्ष, विदिशा यक्ष (रे.चि. एकोणचाळीस १) नोह यक्ष, वगैरे).

३९५

५) या पैकी कित्येक मणिभद्र यक्षाच्या प्रतिमा आहेत. हा कुबेराचा मित्र व तसाच प्रभावशाली होता.
    वरील चोवीस तर मोठे यक्ष आहेत जे कलिंग देशापासून शूर्पारक क्षेत्रांपर्यंत पसरलेले होते. याशिवाय मुंबई, मथुरा, लखनऊ, अलाहाबाद, कलकत्ता वगैरे संग्रहालयांत ठेवलेल्या लहान आकाराच्या यक्ष यक्षिणी वेगळ्याच आहेत. यामध्ये घण्टाकर्ण (म.सं.सं. १५.५९०), शंकुकर्ण (म.सं.सं.जे २), मुद्गरपाणि (म.सं.सं.सी. १), मणिभद्र (म.सं.सं.सी.१) वगैरे विशिष्ट यक्ष पाहता येतात.
      दुसऱ्या प्रकारचे अर्थात् बटबटीत डोळ्यांचे व बेडोल आकाराचे यक्ष देव कोटीतले नव्हते (रे. चि. एकोणचाळीस ३). याचा उपयोग सेवकांच्या, परिवारदेवताच्या किंवा अलंकरणाच्या रूपाने केलेला आढळतो. भारवहन करणे हे ही यक्षांचे एक प्रमुख कार्य होय. सांचीस्तूपाच्या एका द्वारावर एक भारवाही यक्ष डोक्यावर उचललेल्या अत्यंत कष्टी झालेला दिसत आहे.
     प्रथम प्रकारच्या यक्ष प्रतिमा त्यावेळच्या शिष्ट पुरुषांना डोळ्यासमोर ठेवून घडविल्या होत्या व पुढे त्यांच्याच धर्तीवर बोधिसत्व, विष्णू, शिव, कार्तिकेय, वगैरे देवाच्या प्रतिमा आकारल्या गेल्या.
      गुप्तकाळ व त्याच्यापुढे यक्षांचे हे रूप तर मावळले, पण सेवाकार्य करण्याकरिता काही खुजी माणसें काढली जाऊ लागली व त्यांना कीचक, वामनक, अशी नांवे मिळाली. छत्र, विड्याचा करंडा, फुलांचा हारा, खाद्यात्रांची ताटें वगैरेसारख्या वस्तू उचलण्याकरितां या वामनकांचा वापर केलेला दिसतो.

नाग :- 
     भारतीय लोकधर्माचे नागपूजन हे एक जुनें रूप आहे. नागांचा उत्सव 'नागमह' या नांवानें ओळखला जात असे. आज जरी हजारो वर्षे उलटून गेली असली तरी नागाची पकड अजून ढीली झालेली नाही, तिची रूपें मात्र किती तरी बदलत गेली. यक्षपूजेंप्रमाणेंच नागपूजेचाही जैन, ब्राह्मण व बौद्ध धर्माशी दाट समन्वय झाला; व याची फलश्रुती म्हणून यांना प्रत्येक धर्मात उपदेवतांची पण महत्त्वाची स्थानें मिळाली. यक्षांचा शिष्ट संमत संप्रदायांशी झगडा झाल्याचे दिसत नाही, पण नागांचे मात्र बरेच झगडे झाले आहेत. कृष्णाने केलेला कालिया नागाचा पराभव, गरुड व नागांचे वैर, तक्षकाचा परीक्षिताशी संबंध, जनमेजयाचा नागयज्ञ व त्यांत नागांचा संहार अशी कितीतरी उदाहरणे मिळतील, अशीच उदाहरणें बौद्ध व जैन कथांतही आढळतात, पण या सर्वांची फलश्रुती नागांचा पाडाव व त्यांचे आर्य दैवतांच्या छत्राखाली येणें याच रूपांत समोर आली.
     नाग हे सर्पपूजक मानव असावेत असे फर्ग्यूसन आणि ओल्डहॅम यांचे मत आहे." मुळांत सर्प हे त्यांचे वंशचिन्ह, पण पुढे त्यांचे नाग किंवा साप याच्याशी तादात्म्य झाले. मूर्तिशास्त्रांत हे तादात्म्य स्पष्ट दिसते. नागाशी संबंध असलेल्या देवांना मानव रूपांसह नागरूपांत दाखविण्याची पद्धत इसवीसनाच्या कमीत कमी दोन शतकें आधीपासून होती. भरहून, सांची, अमरावती, वगैरे ठिकाणच्या कलाकृतींत सर्पफण असलेले नाग किंवा नागस्त्रिया किती तरी दिसतात. मधुरा हे कुषाण काळांत नागपूजेचे एक मोठे केंद्र होते. मधुरेजवळ सोंख येथे डॉ. हर्बट हर्टल यांनी जे उत्खनन केले त्यांत तेथे कुषाणकाळांत एक सुंदर नागमंदिर असल्याचा भक्कम पुरावा हाती आला आहे. हे नाग मंदिर विटांचे असून अर्धलंब वर्तुळाकार होते. येथून उत्कृष्ट नागशिल्पेही मिळाली आहेत."
३९७
कुषाणकालीन नागांची वैशिष्ट्ये : -
 कुषाणकाळांत मिळणाऱ्या नागमूर्तीची खालील वैशिष्ट्ये डोळ्यांत भरण्यांसारखी आहेत :
१) पुरुषाकार नागांच्या पाठीमागे सर्पाची वेटोळी, किंवा उभा साप दाखवितात. ह्या सापाची कणा छत्रासारखी मस्तकांवर उभारलेली असते. (रे.चि. चाळीस १,३,४)
२) पाठीमागे अंकित केलेल्या सर्वांचे शरीरांवर आभोगांवर निरनिराळ्या आकाराचे खवले दाखवतात (रे. चि. चाळीस ५). तसेच त्याच्या फणेवर स्वस्तिकादि अष्टमंगल चिन्हें आणि तोंडाबाहेर सळसळणाऱ्या जिभा दाखवितात६७ (चित्र १६२). नागांचे 'लेलिहः' हे नांव या सळसळणाऱ्या जिभांकडे किंवा सळसळणाऱ्या गतीकडे संकेत करते.
३) मस्तकांवर दिसणाऱ्या सर्प फणांची संख्या त्या पुरुषांच्या किंवा स्त्रियेच्या सामाजिक हुद्यांवर अवलंबून असते. सामान्य नागांना एकच फणा असते, पण वरच्या नागांना तीन, पांच, किंवा सात फणांचा क्रम असतो. वाङ्मयांत शेषाच्या सहस्रफणा सांगितल्या आहेत.
४) नागांना त्याच्या ध्यानवैशिष्ट्यांप्रमाणे दोन किंवा चार हात असतात.
५) नागांचा पाण्याशी जवळचा संबंध आहे. पुष्कळदा त्याच्या हातांत घट व जवळ कमळ दिसते. कुषाणकाळांतील कित्येक नाग प्रतिमा पुष्करिणी किंवा तलावाचे काठांवर स्थापित होत्या."
६) सोंख येथील उत्खननांत मिळालेल्या एका नाग प्रतिर्मेत मानव मुखाच्या पाठीमागें नागफणा न दाखवता पुरते मुखच सर्पाचे दाखवून खालचा भाग पुरुषाचा आहे. याच्या हातांत एक गुंडाळलेली पोथी आहे. शेषनागाचा व्याकरण शास्त्राशी असलेला संबंध प्रसिद्ध आहे. (म.सं.सं.एस्.ओ. ४ ३२७)
          कुषाणकाळानंतर मिळणाऱ्या नागप्रतिमांत वरील बरीचशी वैशिष्ट्ये लुप्त होतात. मानवाकार प्रतिमेत आतां फक्त मस्तकाच्या मागील सर्पफणा तेवढी दिसते. मध्यकाळांतही तशीच स्थिती असते. वेटोळी घातलेला नैसर्गिक साप बराच दिसतो. भारतीय मूर्तिशास्त्रांत विशेष करून मध्यकाळाचे सुमारांस सर्पकुंडले, सर्पयज्ञोपवीत, सर्पाड्द, सर्पवलये, सर्पमेखला, सर्पाचे केशबंधन, सर्पाचा पाश, हातांत घेतलेले साप, त्रिशूळावर गुंडाळलेले सर्प, मूर्तीतील प्रभावळीच्या टोकांवर सर्प रूपांनी नागांचे दर्शन होत असते. एकाच दगडावर कोरलेल्या नाग-नागीण शिल्पांस दक्षिणेत 'नाग-कल' असे म्हणतात."

गरुड  :-
      आज गरुड हा विष्णूचे वाहन म्हणून प्रसिद्ध आहे, पण कलेत विष्णुमूर्तीचे दर्शन घडण्याच्या कदाचित आधीच गरुडाचे आगमन, झालेले होते. महाभारतांप्रमाणें वजनदार वस्तूंना घेऊन उडणारा तो गरुड अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे.
       सूर्याच्या घोड्याचा रंग कोणता या पैजेंत नागांच्या षडयंत्रामुळे विनता हिला नागमाता कद्रूचे दास्य पत्करावे लागले. दास्यातून सुटण्याची अट स्वर्गातून अमृतकुंभ आणून नागांस द्यावा अशी होती. विनता ही पक्षी कुळाची जननी

३९८

    होती. हिला पुढे कश्यपांपासून अत्यंत तेजस्वी व पराक्रमी असा गरुड नांवाचा मुलगा झाला. जन्मांपासूनच याने सर्वत वैर बाळगले पण आईला दास्यांतून मुक्त करण्यांकरितां नागांना अमृत सुलभ करून देणे जरूर होते. तेवढ्यासाटी क इंद्रादिदेवाशी युद्ध झाले. देव हरले, शेवट तडजोड अशी झाली की गरुडाने अमृतकुंभ नागांचे हवाली करावा, बच् इंद्रादिदेवानसि भूत लागण्याच्या आतच इंद्राने तो पळवावा. नागांना अमृतघट मिळाल्यामुळे विनतेची सुटका झाली तो दर्भावर ठेवला असतांनाच इंद्राने संधी साधून पळवला व नागांच्या तोंडाला पार्ने पुसली.
विष्णूचेही प्रथम गरुडांशी युद्ध झाले व शेवटी सामोपचारांत विष्णूने त्याला आपल्या ध्वजावर स्थान दिले व गरुद्वारे विष्णूचे वाहन होणें पत्करले.
       या साहित्यिक पार्श्वभूमीच्या आधारावर गरुड प्रतिमांचा विचार करू, गरुडांचे वर्णन करीत असतांना हरिवंश असे सांगतो की काश्यप गरुडाला खग असून सुद्धा शिखा व चूडा होती. सुंदर पंख हेच त्याचे वस्त्र होते व तो कानांत नेहमी सोन्याची कुण्डलें घालीत असे. हरिवंशाचे हे वर्णन कुषाणकालीन गरुडांना बरेच लागू पडते. कुषाण गरुड प्रतिमांची खालील वैशिष्ट्ये नोंद करण्यासारखी आहेत.

कुषाणकालीन वैशिष्ट्ये :-
       १) पक्षी रूपांत असून देखील गरुडांचे दोन्ही कान व त्याच्यातील कुंडले दिसतात. (चित्र १६३)
      २) काही शिल्पांत त्याचे पंजे हातांसारखे दाखविले आहेत. ज्यात त्यानें सर्प रूपांत नाग, अथवा मानव सर्पिणीचे रूपांत नाग स्त्रीला धरले आहे. (ल.सं.सं. ५९.१७०, म.सं.सं ४१.२९१५ चित्र १६४) गरुडाच्या चोचीतील सर्प हरिवंशातही वर्णित आहे, पण सर्पिणीसाठी मात्र वाङ्‌मयीन आधार हाती आलेला नाही.
      ३) सर्प आणि गरुडाचे वैर कुषाण कलाकारांनी काही ठिकाणी फारच खुबीने दाखविले आहे (ल.सं.सं.जे. ५४७ एकेचाळीस १).
      ४) या काळांत गरुडाला मोरासारखा तुरा (शिखा किंवा चूडा) ही दाखविला आहे. (चित्र १६३)
      गुप्तनाण्यांवरील गरुड पक्षी रूपांतच पंख पसरलेला (विततपक्ष) असतो. गुप्त राजे परम भागवत असल्यामुळे त्यांनी आपल्या नाण्यांवर गरुड बराच वापरला आहे. मूर्तिकलेत मात्र गरुडाचे रूप बदलले दिसते. देवगढ़ (उत्तरप्रदेश) येथील गजेन्द्रमोक्षाच्या दृश्यात विष्णूचा गरुड पंख असलेल्या मनुष्याच्या रूपात आहे.
        विष्णुधर्मोत्तरपुराणांप्रमाणे मनुष्य रूपात असलेल्या गरुडाचे अणकुचीदार नाक असावे. त्याला चार हात असून एकटा असला तर त्याच्या हातात छत्र व कुंभ असावा व दोन अंजलि मुद्रेत जोडलेले असावेत; पाठीवर विष्णू असल्यास छत्र व कुंभ असू नयेत. त्या दोन हातानें त्याने विष्णूंचे पाय धरावेत. श्रीतत्त्वन्निधीप्रमाणें मात्र तो दोनच हाताचा असावा.
        उत्तर भारतातील बऱ्याचशा गरुड प्रतिमा दोनच हाताच्या असून टोकदार नाक, पसरलेले किंवा मिटलेले पंख व भरपूर दागिने ही त्याची वैशिष्ट्ये दिसतात. कधी कधी त्याच्या हातांत सर्प दिसतो. महाभारतातील उद्योगपर्वाच्या एका कर्थेप्रमाणे विष्णु व इंद्राच्या सांगण्यावरून गरुडाने सुमुख नांवाच्या एका सर्पाला सदैव आपल्या हातात ठेवण्यांचे कबूल केले होते. नेपाळ कलेत बऱ्याचशा गरुड प्रतिमा उजव्या पायाची खुरमांडी घालून नमस्कार मुद्रेत बसलेल्या आढळतात. हात दोनच असतात व गळ्यात भला मोठा साप असतो. नाक मात्र कित्येक ठिकाणी विशेष अणकुचीदार न दाखवितां ते

३९९

साधारण माणसासारखेच असते. त्याचे एक कारण हे ही असू शकेल की कित्येकदा विष्णुभक्त राजाच स्वतःला नमस्कार मुद्रेत विष्णू समोर गरुडाचे रूपांत अंकित करवीत असे. उदाहरणार्थ हाडीगाऊ येथील गरुड म्हणजे गुप्त राजा अनुपरम हा आहे. तसेच लिच्छवी राजा मानदेव हा चांगुनारायण येथील गरुडाचे रूपात आढळतो.
वृषार्ध गरुड :
       राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे असलेल्या सुमारे ९००इ.स. च्या एका खंडित शिल्पात जालीढ मुदेत असलेला एक द्विभुज पुरुष दिसतो. हाथ खंडित आहेत, उजवा वर उचलेला होता, विशेष म्हणजे याच्या डोक्यावर उजव्या बाजूला जटाजूट आणि डाव्या भागावर मुकुट आहे. या शिल्पाची ओळख हरिहराच्या संयुक्त मूर्तीप्रमाणे दोघांच्या वाहनांचे संयुक्तरूप 'वृषार्ध गरुड' अशी करण्यात आली आहे (रे.चि.उ.४). - ईशान शिव गुरु पद्धतीत याचा उल्लेख आढळतो.
     P.K. Agarawala, A composite figure of Garuda and Vrsa BMA., 51-52, 1993, p. 39 ff. दक्षिणेत द्विभुज आणि चतुर्भुज दोन्ही प्रकारचे मानव गरुड दिसतात. बादामी येधील जाड बांध्याचा गरुड उजव्या हातात सर्प घेऊन आहे, बंगलोर संग्रहालयांतील विष्णु प्रतिमेत असलेला गरुड चतुर्भुज असून त्याने मागच्या दोन हाताने विष्णूचे पाय सावरले आहेत. पण सामान्य दोन हातांत अमृत कुंभ धरलेला आहे. राष्ट्रकूट राजांच्या ताम्रपटांबरोबर मिळालेल्या राजमुद्रेत सर्प घेतलेला मनुष्याकृती गरुड दिसतो. हे राजे स्वतःच्या गरुड लांछनाचा उल्लेख करतांना आढळतात.
वैष्णव मंदिरांत विशेष करून महाराष्ट्रात देवाच्या द्वाराचे आजुबाजूला गरुड व हनुमंत स्थापित करण्यांची पद्धत आहे. येथे गरुड दोनच हाताचा असून नमस्कार मुद्रेत बसलेला किंवा उभा असतो (चित्र १६५).

हनुमान :-
         सीतेचा शोध लाऊन लंकेची राखरांगोळी करणारा हनुमान आज आसेतुहिमाचल प्रसिद्धी पावला आहे. दास्य भक्तीचा आचार्य, मल्लांचे उपास्य, प्रेत व पिशाच्च बार्धेपासून सोडविणारा, तांत्रिकांचे एक दैवत अशा अनेक रूपात मारुती हा भारतीयांचा कंठमणी झाला आहे. जवळ जवळ प्रत्येक गावांत एखाद्या पिंपळाखाली शेंदूर फासलेला मारुतिराय असतोच. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी हनुमंतोपासनेला समर्थांनी चांगला उजाळा दिला, त्याचप्रमाणे उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमंतोपासनेचा भरपूर प्रचार केला.
       हनुमंताचा उल्लेख रामायणांत विपुल रूपाने येत असला तरी त्याची उपासना फार जुनी असल्याची ग्वाही मूर्तिशास्त्र देत नाही. ज्याप्रमाणें गुप्तकाळांत रामाच्या स्वतंत्र प्रतिमा मिळत नाहीत त्याचप्रमाणें मारुतीच्याही मूर्तीचा अभावच दिसतो.
        पौराणिक क्षेत्राकडे वळल्यास मारुतीच्या पित्याचे नांव केसरी आणि आईचे अंजनी असे दिसते. पुत्रांकरिता अंजनी शिवाचे आराधना करीत बसली असतां तिच्या ऑजळीत आकाशात उडणाऱ्या एका घारीने पायस पिंड टाकला. हा पायसपिंड म्हणजे राजा दशरथाचे पुत्र कामेष्टी यज्ञ करून पुत्र प्राप्तिस्तव मिळविलेल्या पायसातील भाग होता. कैकयीने तो खाण्यास उशीर केल्यामुळे घारीने तो पळविला. पण तिच्या चोचीतून तो सुटला आणि अंजनीला मिळाला, अंजनीने

४०१

       हो भक्षण केला आणि अकराव्या रुद्राने मारुतीच्या रूपाने तिच्या पोटी अवतार घेतला. पुढे अंजनीचा हा प्रबल पराक्रमी आणि महा बुद्धिमान मुलगा, सुग्रीवाचा मंत्री या नात्याने रामाला मिळाला व नंतर रामाकडेच राहिला. हा चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहे.
       मास्तीची प्रतिमा सुमारे ८-९ व्या शतकांपासून मिळू लागते. अशी एक खंडित प्रतिमा लखनऊ संग्रहालयात अहे (सं.सं. ५१.८७). आज ही मूर्ती खंडित असली तरी मुळात ही फारच सुंदर असली पाहिजे. कीर्तिमुखाच्या अलंकरणाने अलंकृत केश, गळ्यातील वनमाला आणि छातीवरील श्रीवत्स चिन्ह या उल्ले‌खनीय वस्तू होत. हनुमंताच्या अभिलिखित प्रतिमांत खजुराहो (म.प्र.) येथून हर्ष संवत् ३१६-सन् ९२२ ची मिळालेली मूर्ती जुनी म्हणून महत्त्वाची आहे. दुसरे उदाहरण म्हणून हरसोद अभिलेखाचे (वि.सं. १२५५= सन् १९९८) देता येईल ज्यात एका व्यापाऱ्याने हनुमानाची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. उत्तर भारतात कलचुरी आणि चन्देल (रे. चि. एकेचाळीस ३) राजवंशाच्च्या नाण्यांवर हनुमान दिसतो. दक्षिणेत यादव, कदंब आणि होयसाळ यांचे हनुमान हे राजचिन्ह होते. पांड्याच्या नाण्यांवर तो आढळतो (रे.चि. एकेचाळीस ५, ६). विशेष म्हणजे अर्काटचा नवाब महम्मद अली वलजा याने ही 'हनुमान' चिन्हाचा वापर केला होता. सुमारे बाराव्या शतकांतील हनुमंताची खंडित मूर्ती अल्हाबादच्या संग्रहालयात आहे (अल्हाबाद कॅट. सं. २३४). येथें मारुतीचे तोंड पसरलेले असून डावा हात अर्धवट मूठ वळून छातीशी ठेवला आहे. याच्या कमरेत एक सुरा ही खोवलेला आहे.
वर्गीकरण :
       नंतरच्या काळांत मारुतीच्या बऱ्याच मूर्ती मिळतात. दक्षिणेंत हा आंजनेय या नावाने पूजला जातो. हनुमत्प्रतिमांचे वर्गीकरण खालीलप्रमाणें करता येईल.
१) वीरमारुती - एका हातात गदा व दुसऱ्या हातात द्रोणागिरी घेऊन उड्डाण करणारा मारुती. मारुतीच्या प्रतिमेचा हा सर्व साधारण प्रकार आहे. यांत थोडे फार फरक ही आढळतात. कुठें याच्या पायाखाली राक्षस असतात, तर कुठे भरत खालून बाण मारीत असतो.
२) वीरमारुती (दुसरा प्रकार) डाव्या हातात गदा घेतलेल्या मारुतीने उजवा हात जणु की काय थप्पड मारण्याकरिता उगारलेला दिसतो.
३) वीरहनुमान (तिसरा प्रकार) यात मारुतीच्या उजव्या हातात गदा, डाव्यात कमळ व खांद्यावर राम लक्ष्मण असतात.
४) दासमारुती - रामासमोर हात जोडून उभा असलेला मारुती. येथे नमस्कार मुद्रेत जोडलेल्या हातातच गदाही लोंबताना दिसते. नागपूरला हा मारुती बऱ्याच ठिकाणी दिसतो.
५) द्रोणाचल नेत असताना भरताकडून बाण मारला जाणारा मारुती (रे. चि. एकेचाळीस ७).
६) पंचमुखी मारुति - मारुतीची ही स्वतंत्र प्रतिमा पांच तोंडाची असून तांत्रिक पूजेसाठी वैध आहे.
पाच मुखे असलेल्या हनुमंताच्या प्रतिमा गुजराथ, राजस्थान, वगैरे भागांतून मिळाल्या आहेत. ही पाच तोंडे म्हणजे मुख्य वानरमुख सोडून वराह, घोडा, सिंह आणि गरुडाची असतात. हात मात्र कधी चार तर कधी आठ दिसतात.

४०४

P.C. Bhargave, South Intan Bronzes from Rajasthan, research XVI, XV, 1995 P60
(स्त्री) या मुसिक रूपाने पंचात कभी कभी तो चाहानाचा असून त्याच्या माच्या
काही प्रतिमा हनुमंताचा संगीत संबंध दाखवतात तैतिल करोडदेवता का मंदिर' यूवा कोर्ट क येथील एका धातुपतिमेत दोन हाताचा एक भोलेपन आहे. (रे. चि.३.५).
PC. Bhargava, Ibid, pl. XILL, p. 60
अफजलपुर (सर) म.प्र.सुभायकालातील पंखाखवले आहेत.
-के. सी. पांडेय, हमारा मंदसोर जिला २००६५.२९क्षिण भारतीय शिल्पात काही किणी मा हातात शिवलिंग दिसले, रामेश्वरस्थस्थल पुराणांप्रमाणे रामाने शिवल आणण्याचे काम सांगितले होते.
G. Sethuraman, Rameshvaram Temple, Madural, 1998, p. 175

नंदी, वृष :-
        शिव आणि त्याचा बैल याचा संबंध त्यापासून दिसतो. काही अपवादात्मक उदाहरणे व तर शिवाचे वाहन बैल होय असे सर्वांना आहे. सिंधुभ्यामोठेवाड असलेला बैल शंकराशी संबंधित होता किया नाही हे जरी थोडे विवादास्पद असले तरी यांच्या काळात येता येता बैलाचा शिवाशी संबंध चांगल झाला होता व तो तसाच आजपर्यंत आहे. शिवाबरोबर बैल नाण्यावर दिसतो मातीच्या शावर दिसतो व मूर्तिकले दिसतोच दिसतो (रे. चि. बावीस १२.४८).
    ह्या वृषाची स्थापना शिवलिंगासमोर करतात समोर बसलेल्या पिंडीची पूजा साधारणपणे आहे, त्यामुळे आसेतुहिमाचल शिवाचे मंदिरात सभामंडपात असलेला बैल हा अवश्य दिसतो.
     आज आपण शंकराच्या बैलालानंदी या नांवाने ओखतो व वाङ्मयातही तसे प्रयोग आहे ठेवले पाहिजे की शिवाच्या एका प्रसिद्ध गणांचे नांव नंदी होतेपुराणात्यात व चार हात असून क मुगुटांवर चंद्र आहे. त्याच्या बायकोचे नांव सुयशा होय. शंकराचे जवळच यांचे पूजन करावयाचे असते राधा हा वारमुख आहे."
   शिवपुराणांत शंकराच्या वृषाची नंदीबैलाची कथा विस्ताराने दिलेली आहे. हा सिलीचा मुला

४०४

      शंकराचे वाहन झाला. कूर्मपुराणांप्रमाणे शिलाद ऋषीला भूमी नांगरत असतांना शंकराच्या कृपेने हा मुलगा मिळाला याचे नांव नंदी. याने शिवाची आराधना केली व गणांचे आधिपत्य मिळवले, शंकरानेच मरुताच्या मुलीशी याचा विदार करून दिला. कलेच्या क्षेत्रांत नंदीची दोन रूपें दिसतात. एक तर पूर्ण बैलाचे व दुसरे बैलाचे तोंड असलेल्या मनुष्याच बैलाच्या रूपात तो जरी दक्षिणेत व उत्तरेत उभय सामान्य असला तरी दक्षिण भारतीय कलेत त्यांच्या मूर्तीचा जसा विका झाला आणि शेवटी नीटनेटके आणि भव्य असे रूप मिळाले, तसे उत्तरेत मिळाले नाही.
श्री. ढाकी यांनी दक्षिण भारतीय नंदी वृषाचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांच्या म्हणण्यांप्रमाणे तेथे नंदीचे अंकन खालील तीन प्रकाराने केले जाते :
१) द्राविड मंदिरात अर्धमंडपाच्या तो बहुतेक बाहेर दिसतो, जागा नसलीच तर त्याला आत घेतात.
२) मंदिर शिल्पांत विमानाच्या वरच्या तळावर चारी कोपऱ्यांना शैव मंदिरांचे प्रतीक म्हणून तो दिसतो.
३) महाबलीपुरम् येथील समुद्रतटांवर असलेल्या मंदिरात तो मंदिरांचे आवारावर (प्राकारांवर) अलंकरण म्हणून ओळीने बसविलेला असतो.
      उत्तरेपेक्षा दक्षिण भारतातील नंदी प्रतिमा फार भव्य असतात. या प्रतिमांचा तौलनिक दृष्टीने अभ्यास केल्यास असे दिसते कीं पल्लव कलेंत आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत नंदीला अगदीच नेमके दागिने घालीत, काही शिल्पांत तर ते मुळीच घातलेले नाहीत. सुमारे ८०० ते ९५० च्या दरम्यान गळ्यातील माळा वगैरे आल्या. दहाव्या शतकाच्या मध्यांत त्याच्या गळ्यातील सर्वांत मोठी माळा वाशिंडांला वळसा देत घातली जात असे (चित्र १६७). सुमारे १०७० च्या जवळ पास गळ्यातील माळांबरोबरच गुडघ्यातील व पायातील दागिने ही आले; अणि बाराव्या शतकांच्या मध्यापर्यंत पोचता पोचता शिवाचा बैल आंगभर दागिन्यांनी नटलेला दिसू लागला." मैसूरच्या चामुंडी पर्वतावरचा जगप्रसिद्ध नंदी तर गळ्यांत शिवलिंगही घालून आहे (चित्र १६८) बसवप्पा किंवा बसवाचार्य या नावाने ओळखला जाणारा शैवाचार्य नंदीचा अवतार समजतात. तिकडे बसव हे वृषाचेच नाव आहे ज्यात ब्रह्मा, सदाशिव व विष्णू या तिघांच्या आद्याक्षराचा समावेश झालेला आहे.
         दक्षिणेत मानवरूपांत नंदी शंकरासारखा दिसतो व अधिकार नंदी या नांवाने सपत्नीक शिवमंदिरात असतो." उत्तरेत वृषभाचे तोंड असलेला हा आपल्या पत्नीसह आलिंगन मुद्रेत उभा दिसतो. अष्टभुजा (जिल्हा मिर्जापूर, उत्तर प्रदेश) मंदिरांतून अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिमा मिळाल्या आहेत. त्यापैकी काही लखनऊच्या संग्रहालयात (ल.सं.सं.जी. ३८५) तर काही वाराणसीच्या संस्कृत विश्वविद्यालयाच्या संग्रहालयात आहेत. (चित्र १६९)

आयुधपुरुष व आयुधस्त्रिया :-
      मागील पृष्ठात वेळोवेळी आयुधपुरुषाची चर्चा आलेली आहे, येथे साकल्याने त्यांचा संक्षिप्त आढावा घेतो. विष्णुधर्मोत्तर आणि उत्तरकामिकागमांत वज्र, दंड, खड्ग, पाश, अंकुश, त्रिशूल, पद्म, चक्र, गदा आणि तसेच शंख, भिन्दी (भिन्दीपाल), शर, धनू, यांना मानवाकारात दाखविण्यांबद्दल विधान केले आहे." यात गदा, शक्ती, धनुष्य यांना स्त्रीरूपांत व इतर पुरुषरूपांत दाखवावे असेही सांगितले आहे. मुख्य पुरुषाचे बाजूला आयुधपुरुषाचे स्थान असे ही गोष्ट महाभारतांतील एका उल्लेखानेही सिद्ध होते. अर्जुनाला पाशुपत अस्त्र मिळताच ते 'अग्नीप्रमाणे दैदीप्यमान रूपानें मूर्तिमान होऊन त्याच्या बाजूला (पाश्वें) स्थित झाले' हे वर्णन या दृष्टीनें महत्त्वाचे आहे. "

४०५

कलेत आयुधांचे मानव रूपांत अंकन गुप्तकाळांपासून प्रारंभ झाले व नंतरही ते चालू होते. दक्षिणेपेक्षा उत्तर भारतीय कलेत आयुध पुरुष जास्त दिसतात. मध्यकाळातील शिल्पात एक नवा पायंडा पडलेला दिसतो. तो असा की मुख्य शिल्प किंवा श्रीमूर्ती जर देवीची असेल तर पुरुष रूपांत दाखवली जाणारी आयुधे ही स्त्री रूपांतच दाखवावीत. उदाहरणार्थ महिषमर्दिनी दुर्गेच्या काही प्रतिमांत बाणाचा भाता घेतलेली स्त्री दिसते (भा.क.भ. वाराणसी, सं.सं. १७७, १५३). या उलट मनवा (उ.प्र.) येथून मिळालेल्या विष्णूत हे कार्य करणारा पुरुष आहे. त्याला आपण 'बाण पुरुष' म्हणू शकतो. हीच गोष्ट त्रिशूलाबद्दलही आहे. त्रिशूल पुरुष शंकराबरोबर आढळतो तर त्रिशूल बाहिनी स्त्री कनौजहून मिळालेल्या देवी शिल्पांत आढळते (ल.सं.सं. ५५.२८७रे. चि. आठ १). आजपर्यंत एकूण आपल्याला खालील आयुधे पुरुष किंवा स्त्रीरूपांत मिळाली आहेत :
१) गदा : एक अपवाद वगळल्यास स्त्रीरूपांत (र.चि. सात ४).
२) चक्र : पुरुष रूपांत (रे.चि. सात ६)
३) शंख: पुरुष रूपांत, पण कचित स्त्री रूपांत (चित्र १७०)
४) पद्म: पुरुष रूपांत, पण कमीच
५) खड्ग: पुरुष रूपांत, कमीच विशेष करून देवगढच्या अनन्तशायी प्रतिमेत (रे.चि. नऊ २)
६) त्रिशुल : पुरुष रूपांत (र.चि. आठ २, ६) पण सिंहवाहिनी देवीच्या हातात एका शिल्पांत स्त्री रूपांत." (रे.चि. आठ १) याशिवाय दक्षिण भारतीय धातुप्रतिमांतही त्रिशूलाच्या मध्यभागांत त्रिशूल देवी आढळते."
७) खट्वांग : पुरुष रूपांत, (रे.चि. नऊ १) पण मोजक्या शिल्पांतच दिसते.
८) शक्ती : कार्तिकेय प्रतिमांत ही स्त्री रूपांत दिसते. (रे.चि. आठ ७)
९) धनुष्य आणि बाण: शास्त्रीय विधानाप्रमाणें स्त्री रूपांत व बाण पुरुष रूपांत असावयास पाहिजे, पण मनवा (सीतापूर जिल्हा उत्तर प्रदेश) येथून मिळालेल्या एका विश्वरूप विष्णूच्या प्रतिमेत दोघेही पुरुष रूपातच दाखविले आहेत. (रे.चि. आठ ४,५)
१०) वज्र : काही विद्वानांच्या मते राजा माउएस (Maues) च्या नाण्यांवर वज्रपुरुष दिसतो. पण हे विधान स्वीकारतांना लक्षांत असू द्यावे की हा राजा बराच आधीचा आहे. वेरुळ येथील बौद्ध लेण्यांत वज्रपाणीचा आयुधपुरुष म्हणून वज्र पुरुष दिसतो. (या माहितीसाठी लेखक नागपूर विद्यापीठाचे डॉ. जी. बी. देगलूरकर यांचा आभारी आहे.)

समुद्र :-
     उत्तर भारतात कित्येक ठिकाणी मध्यकालीन मंदिराच्या उंबऱ्यांच्या खालच्या बाजूस पायशिळेवर दोन दोन पुरुष सर्व अलंकार घालून हातात घागरी घेऊन बहुतेक मगरावर बसलेले दिसतात. (रे.चि. बेचाळीस १) हे चार पुरुष म्हणजे चार समुद्र होत. ते गर्भगृहांतील देवाचे पाय धुण्यास उपस्थित झालेले असतात. मानरूपी चार समुद्रांचा उल्लेख हरिवंशात आढळतो. हे चार समुद्र म्हणजे दधि, क्षीर, लवण आणि मधु समुद्र असावेत. कालिदासाने पृथ्वीचे वर्णन करतांना देखील 'चतुस्समुद्रांतसलीलमेखला' असे शब्द घातले आहेत. शिलालेखांत ही असे वर्णन आढळते.

 ४०६

इहामृग, किन्नर, सुपर्ण वगैरे :-
     कित्येक शिल्पांत अर्धा मानव अर्घा पशु अथवा अर्घा मनुष्य तर अर्धा पक्षी, अथवा पशूत पक्ष्याचे किंवा पक्ष्यांत पशूचे मिश्रण केलेले दिसते. शुंग कुषाण कलेत हे खूपच आढळतात. पुढे मात्र रोडावत जातात या काल्पनिक जीवाना इहामृग, कित्रर, सुपर्ण, वगैरे नावांनी ओळखतात (रे.चि. चाळीस १-३).

हरिहर पुत्र, आर्य :-
      मागे हरिहराचे विवेचन करीत असताना मोहिनीचे रूप घेतलेल्या विष्णूच्या पाठीमागे शंकर लागला या कथेचा उल्लेख केलेला आहे (पान १४९) द्रविड परंपरेप्रमाणे त्या उभयतांच्या संयोगापासून जो पुत्र झाला त्याला मल्याळम मुलुखाचे स्वामित्व मिळाले. हा हरिहर पुत्र, आर्य, ऐय्यनार, किंवा शास्ता या नांवाने प्रसिद्ध आहे. उत्तरेला मुळीच माहीत नसलेला हा देव मल्याळी लोकांचा लाडका आहे. ज्याप्रमाणे तमिळ देशांत सुब्रह्मण्याची भरपूर मंदिरें आहेत. त्याचप्रमाणे मल्याळम् देशाच्या प्रत्येक शैव किंवा वैष्णव मंदिरात शास्ता असतोच.      
     आगमग्रन्थांप्रमाणे शास्त्याला चार हात असून सामान्य हात अभय आणि वरद मुद्रेत असावेत आणि मागच्या हातात खड्ग व ढाल ही आयुधे द्यावीत काहीच्या मते तो फक्त दोनच हाताचा असावा व त्याच्या हातात वाकलेली काठी (तमिळ-शेण्डु) आणि फळे व पार्ने असावीत. हा मांडी घालून बसलेला किंवा सुखासनात असावा. शास्त्याच्या प्रतिमा अर्थातच त्याच भागांत मिळतात, पण नुकतीच त्याची एक प्रतिमा वाराणसीत दक्षिण भारतीय लोकांनी स्थापित केली आहे.

देवपट्ट/तीर्थपट्ट :-
      साधारणपणे आपण शिल्पांत एकट्या दुकट्या किंवा वाहन, सेवक, गंधर्व, व इतर परिकर मूर्तीसह उत्कीर्ण अशा मोठ्या लहान प्रतिमा आपण पाहतो. याशिवाय नवग्रह, सप्तमातृका, दशावतार वगैरेचे सामूहिक अंकन करणारे शिलापट्ट ही दिसतात. या सर्वां व्यतिरिक्त शिल्पांत एक वेगळा प्रकार ही आढळतो. येथे संपूर्ण तीर्थाचे प्रातिनिधिक अंकन हा मुख्य विषय असतो. क्वचित थोडे विषय परिवर्तन ही आढळते. अशा पट्टाची आपण येथे संक्षिप्त चर्चा करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट अशी की वाराणसी पट्टाशिवाय इतरांची फक्त एक एकच शिल्पेंसमोर आली आहेत. असो.

वाराणसीपट्ट :-
       मध्यप्रदेशातून मिळालेला सुमारे ११-१२ शतकांतील हा चौकोनी शिलापट्ट ग्वाल्हेरच्या गूजरीमहाल संग्रहालयांत होता. तो आतां भोपाळ संग्रहालयात गेला आहे असे ऐकतो (रे.चि.दे.१) हा आडव्या रेषेत चार भागांत विभागलेला आहे. मधोमध खालून वर जाणारी एक नदी आहे. ही गंगा, गंगेचे नदी रूपात अंकन इतरत्र आढळत नाही. पटाच्या अगदीवर किंवा वरून पहिल्या भागात ओळीने १४ शिवलिंगे आहेत. वरून दुसऱ्या भागांत नदीच्या उजव्या बाजूला सात सूर्य, डाव्या बाजूला दोन उपासकांसह प्रलंब पादासनांत बसलेला शिव असून उरलेला भाग पुनः दोन आडव्या भागांत वाटलेला आहे. वर पाच चौकोनी शाळुकांत प्रत्येकी पाच अशी एकूण २५ लिंगे आहेत. खाली काही देवमूर्ती आहेत. वरून तिसऱ्या भागांत गंगेच्या उजवीकडे सहा विष्णू आहेत. डावीकडे ललितासनांत बसलेली देवी हातांत दंड घेऊन बसलेला पुरुष आणि त्या पलीकडे पुनः सहा विष्णू आहेत. अगदी खालच्या भागात पाच गणपती, बसलेले स्रीपुरुष व कलश, माळा घेतलेले सेवक दिसतात. नदीत मगर, मासा, कासव वगैरे जलचर आहेत.

४०८

        भुवनदेवाचायनि आपल्या अपराजितपूच्छा या ग्रंथात (अपरा. ७४.२०-२५ पा. १८४-८५) 'पट्टशाला वाराणर्मा या नांवाने वाराणसीच्या अंकनाची चर्चा करीत असे विधान केले आहे की अशा पट्टाचे पूजन केल्यास प्रत्यक्ष गंगास्नान कात्याचे पुण्य मिळून मोक्षप्राप्ती होते. या उल्लेखाचा आधार घेऊन स्कंद पुराणांतील काशीखंडात नमूद केलेल्या याश क्रमांतील देवतांचा तुलनात्मक विचार केला तर या शिलापट्टाचा बराचसा उलगडा होतो.
         पहिली १४ लिंगे काशीतील १४ 'सिद्धलिंगे' किंवा 'महालिंगे' आहेत. यांच्या चार याद्या मिळतात. पाच शाळुंकातील २५लिंगे शंकराच्या 'पञ्चविंशति तत्त्वात्मा' या नांवाची सार्थकता दाखवतात. सात सूर्य हे काशीतील बारा आदित्यांचे प्रतिनिधी असावेत. त्याचप्रमाणे १२विष्णू हे तेथील आदिकेशवादि बारा केशव आणि पाच गणपती तेथील पंच विनायक आहेत. यांच्या ही पाच याद्या मिळतात. अपराजितपृच्छेप्रमाणे गंगेच्याजवळ बसलेली देवी स्वतः वाराणसी आहे. काशी खंडात हिला 'विग्रहवनी वाराणसी' असे संबोधन आहे. तिच्याजवळ दंडपाणी शिवाचे स्थान युक्तिसंगत आहे (रे.वि.दे. १-३)
        वाराणसीचे शिलापट्टीय अंकन पुण्यप्रद ठरल्यानंतर असे पट इतरत्र ही निर्माण होत असावेत हा तर्क क्रमप्राप्त आहे. व तो खरा ही ठरतो. स्थूल रूपाने या देवताच्या बरोबर इतर ही देवतांचे अंकन करणारे दोन पट झाशी येथे राणीमहाल संग्रहालयांत आहेत. यांत 'वाराणसी' आहे. पण गंगा 'नदी' मात्र नाही. (रे.चि.दे. २,३) एवढेच नव्हे तर वाराणसी पटाला आधार घेऊन पण केन्द्रीय देवतेचे मात्र परिवर्तन दाखवणारे इतर ही काही पट तयार करीत असत असे दिसते. कालंजर (बांदा) उ.प्र. येथील 'वैकुंठ पट्ट' (रे. चि.दे.४) लखनऊ संग्रहालयात असलेला फक्त अर्धा असा विष्णूपट्ट, विदिशा संग्रहालयांत विद्यमान एक खंडित पट्ट अशी काही उदाहरणे दाखवता येतील. (रे.चि.दे.४)
N.P. Joshi, Varanasi Silapattas and Somilar slabs in Medi...... sculptures of Central India, S.S. II, 1989, pp. 143 ff.

त्रिपुरी पट्ट :-
      जबलपुर, मध्यप्रदेश जवळील त्रिपुरी या नर्मदातटावरील क्षेत्राचे अंकन करणारा हा पट देखील अशाच प्रकारचा आहे. पटाच्या तीन बाजूला धावणारी नर्मदा व तिच्यातच तिची लहानशी मूर्ती देखील आहे. मुख्य दोन अंधकासुराचा वध करणारा शिव 'अंधकासुरवध मूर्ती' च्या रूपांत आहे. नर्मदेच्या नागमोडी प्रवाहांत सहा शिवलिंगे आणि खाली आडव्या रेषेत विभागलेल्या पाच भागांत विष्णू, नंदीवर उमामहेश्वर, देवी, गणपती, दिक्पाल, नाग, वगैरेची अंकने आहेत. (र.चि.दे.५)
V.S. Pathak and S.K.Sullerey, Tripuri Tirtha-patta, a sculptures mythical representation of Tripuri, Art of Kalachuris
For illustration - P.K. Agrawala, Dr. XXXIX, 2, 1977, pl. 14, p. 151

प्रयागपट्ट :-
   मध्यभारतांत मिळालेल्या (तूर्त ब्रिटिश म्यूझियम, लंडन) सुमारे ९-१० व्या शतकाचा हा पट महत्त्वाचा आहे (रे.चि.दे.६) यांत मुख्य आकृती एका सुंदर मत्स्याची आहे. मत्स्याच्या पाठीवर एक स्थंडिल आणि त्यावर शंकराची घट घेतलेली आवक्षमूर्ती आहे. तिच्या डोक्यावर शिवलिंगाचा भाग दिसतो. हे लिंग एका विशाल झाडाखाली आहे. हा वटवृक्ष असावा, कारण शिवाचे आणि वडाच्या झाडाचे जवळचे संबंध आहेत. लिंगाच्या आजुबाजूला सेवक, सेविका दिसतात. लिंगाच्या डावीकडे एक भला मोठा त्रिशूळ उभा आहे. झाडावर एक पुरुष चलायमान स्थितीत दिसतो.
४०९

      सवाबीच पुनः त्रिशूळाच्या टोकावर झेप घेणारी अधोमुख आकृती दिसते. अर्थात् झाडावरून विशूळावर उडी टाकून आत्महत्या करण्याचे हे उघड दृश्य आहे. या अंकनासगट सम्पूर्ण पट आठ आडव्या भागात वरून विशळावर उदी चाकान प्रिरनिराळे देवादिक विद्यमान आहेत. यांत शेषशायी विष्णु, अग्री, बाळासह मातृका, कुंभोदर यक्ष, वायू, बसलेला तपस्वी, सूर्य, ऋषी, कुबेर, पंख पसरलेला गरुड, यज्ञ वराह, आठ नाग, समुद्र, वगैरेचा समावेश आहे. अगदी खालच्या भागांत डाव्या टोकाला दोन सारखे घट आहेत, पण त्यापैकी एकावर सर्प दिसतो.
एकूण या शिलापट्टावर अंकित असलेली दृश्यें प्रमुख मत्स्य व इतर देवतासंघ याचा परस्पर कार्यकारणभाव समजून लेण्यांस पुराणाची मदत घेणे अपरिहार्य आहे. त्याची एक किल्ली आत्महत्येच्या दृश्यात आहे. सामान्यतः आत्महत्या कारणे हे घोर पाप मानले जाते, पण त्याला प्रयागक्षेत्र हे अपवाद आहे. तेथे अग्रीत प्रवेश करून, झाडावरून उडी टाकून, पाण्यात प्रवेश करून, वगैरे पाच प्रकाराने देहत्याग करणे पुण्यकार्य समजतात. तेथे असलेल्या अक्षयवटावरून उड़ी ठाकणे (भृगुपतन) या प्रकाराचे येथे अंकन आहे. मत्स्याचा आणि प्रयाग क्षेत्राचा संबंध सांगणारी कथा स्कंदपुराणाच्या वैष्णव खंडात (स्कंद वैष्णव., १३.२४-४८) आणि पद्मपुराणांत (पद्य, उत्तरखंड, अध्याय ९१-९२) आहे. संक्षेपात विष्णूने मत्स्यावतार घेतला, शंखासुराचा वध केला व त्यानंतर बदरीवनाला जाऊन त्याने ऋषीगणांना समुद्रांत हरवलेले वेद शोधून त्यासह प्रयागला येण्यांस सांगितले, व स्वतः देखील तेथे गेला. ठरल्याप्रमाणे वेदांचा संग्रह करून यज्ञासह सर्व प्रयागला आले. संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाने तेथे 'प्रकृष्टयागा'ची व्यवस्था केली म्हणून या क्षेत्राला 'प्रजापतिक्षेत्र' किंवा 'प्रयाग' अशी नांवे मिळाली. वर दिसणारा पंख पसरलेला गरुड आणि खाली डाव्या टोकावर असलेले दोन घट यांचा संबंध गरुडाने आपल्या आईला विनतेलस कद्रूच्या दास्यातून सोडवण्यासाठी स्वर्गातून आणलेला अमृतकुंभ व नंतर नरागांना तो मिळू नये एवढ्यासाठी इन्द्राने तो पळवून त्याचे ठिकाणी विषकुंभ ठेवण्याच्या कथेशी आहे (पद्म. सृष्टी., अध्याय ४९, महाभारत, आदि, अध्याय ३४, वगैरे) प्रयाग क्षेत्राचे अंकन करणारा दुसरा पट्ट आमच्या पाहण्यात नाही. (रे.चि.दे.६)
-नी.पु. जोशी, 'तीर्थावतार पट्ट के रूप में प्रयाग का अंकन',
प्राग्धारा, १,१९९०-९१, पृ.१५-२१, चित्र १-७.
N.P. Joshi Aksaya....... pp. 203-12

अंतरिक्ष / व्योमपट्ट :-

धुबेला संग्रहालय (छतरपुर), म.प्र. येथे असलेला सुमारे १०-११व्या शतकातील हा पट्ट अगदी निराळ्या स्वरूपाचा आहे. येथे कोणत्याही तीर्थाची मांडणी नसून आकाशातील देवतांचे वर्तुळाकार अंकन आहे. मूळ दगड चौकोनी आहे. पण त्याचा वरील डावा कोपरा तुटलेला आहे. मधोमध एक पोकळ गोल भोक असून त्याच्या भोवताल एक रूंद वर्तुळ आहे. याच वर्तुळात स्थूल रूपाने तीन रांगात आकाशांत प्रत्यक्ष दिसणारे, तसेच अप्रत्यक्ष पण पुराणादिकांत उल्लेख असलेले देवतागण दाखवले आहेत. यांत मेषादि दहा राशी, सूर्यासह नवग्रह, बैलाचे तोंड असलेले आठ वसू, दोघे अश्विनी कुमार, स्पष्टपणे ओळखता येतात. ध्रुव आणि त्याच्या भोवती फिरणारे सप्तर्षी ही दिसतात. या शिवाय खाली नमूद केलेल्या काही अंकनांची तकनि संगती लावता येते. केंद्रात असलेली शून्याकार पोकळी. ही आकाशाची द्योतक असावी, कारण आकाश म्हणजे संपूर्ण पोकळी. शिवाय आकाशाचे 'शून्य' असेही एक नाव आहे.

४१०

भला मोठा शंख : -
    पंचमहाभूतांपैकी आकाश हे प्रथम भूत असून 'शब्द' ही त्याची तन्मात्रा आहे. शब्द किंवा ध्वनी या तन्मात्रेचा द्योतक हा शंख वाटतो. तसा शंखाचा आकाशाशी प्रत्यक्ष संबंध नाही.
त्रिशंकु :-
       नमस्कार मुद्रेत बसलेल्या दोन स्रियांच्यामध्ये पाठमोरा बसलेल्या पुरुषाला 'त्रिशंकु' म्हणता येईल. वाल्मीकीय रामायणांत त्रिशंकुची कथा आहे. (वा.रा., बाल.अ.६) इक्ष्वाकु वंशातील या राजाला विश्वामित्राने आपल्या तपसार्मथ्याने सदेह स्वर्गाला पाठवले. इंद्र रागावला व देव त्याला खाली लोटू लागले. विश्वामित्राने त्याला तेथे तसेच थांबवले व स्वतः प्रतिसृष्टी निर्माण करू लागला. आतां देव घाबरले, तडजोडीची भाषा सुरु झाली. शेवटी विश्वामित्राने तोपर्यंत केलेली प्रतिसृष्टी तशीच राहील व त्रिशंकुही तशाच रूपात पण देवत्वाच्या सन्मानासह स्वर्गात राहील. या अटीवर तडजोड झाली. या कथेच्या आधारावर लोटला जाणारा म्हणून पाठमोरा, पण देवस्त्रियांकडून नमस्कृत दिसणाऱ्या या पुरुषाला 'त्रिशंकु' म्हणून ओळखता येईल.

तीन मानव पाउलें : -
       यांना ओळखण्याचे दोन पर्याय देता येतील. एक तर ऋग्वेदांतील पुरुष सूक्तांत (ऋ. १०.९०.३) म्हटल्याप्रमाणे विराट् पुरुषाची 'दिव' येथे असणारी तीन पाउलें (त्रिपाद तीन चतुर्थांश भाग = पर्यायाने पाउलें) असावीत. दुसरे समाधान खगोल शाखाच्या आधारे देता येईल. या शास्रात 'श्रवण' नक्षत्राचे रूप 'एका ओळीत उभी माणसाची तीन पाउलें' असे दाखवतात (गुणाकारमुळे, तारों भरा आकाश, दिल्ली, २००४, पान ७४ नक्षत्रांच्या आकृती).

छोट्या वर्तुळाभोवती सात पुरुष :-
       हे ध्रुवाभोवती फिरणारे सप्तर्षी असावेत. हा ध्रुव म्हटला तर ही उत्तर दिशा ठरते. व येथून वर डावीकडे म्हणजे पूर्वेकडे सूर्य (इतर आठ ग्रहांसह) आढळतो.
      या व्योयपट्टातील इतर अंकनाची संयुक्तिक ओळख पटलेली नाही, पण खाली मोठ्या वर्तुळाबाहेर दिसणारे नमस्कारात बसलेले दोघे जण दिसतात. अर्थात् हा पट्ट पूजनीय व वंदनीय असा आहे.
           वाङ्मयाकडे वळलो तर विष्णुधर्मोत्तर पुराणांत (वि.ध. खखख.७५.१-९) 'सर्वदेवमय' अशा 'व्योमरूपा'चे वर्णन असून त्याची पूजा म्हणजे सर्व 'चराचरा'ची पूजा असून ती 'सर्वकामाना (इच्छाना) पूर्ण करणारी आहे. असे असले तरी त्या व्योमस्वरूपाचा आपल्या व्योमपट्टाशी जोडता येणार नाही. कारण दोघांचे आकार व मांडणी अगदी वेगळी आहे. फक्त एवढेच म्हणता येईल की या पुराणाच्या काळापासून (सुमारे ६-७वे शतक) व्योमाकाराचे निर्माण व त्याचे पूजन लोकमान्य होते.
- देवपट्टांसंबधी इतर विस्तृत माहितीसाठी पहा-
     N.P. Joshi, A Less Known Chapter of Medieval Hindu Iconography, Eastern Approaches, Ed. T.S. Maxwell, New Delhi, 1992, pp. 130-40

***
टिपा आणि संदर्भ

ब्रह्मा, दिक्पाल, यक्ष, नाग, इत्यादि

१ ) EHI., II, pt. 2. p. 501: DHI., p. 514 Sivaramamurti 3, pp. 35 पूर्य पू. ९. ९-२८ पान ३१-३२
१' ) कूर्म पू. ४, ३८ पान १९-२०
२ ) कूर्म.उ. ३१, २-३३, पान २९५-६
३ ) ललितविस्तर VIII p. 84 ब्रह्म
४ ) दिव्यावदान, २.७, मैत्रकन्यकावदान, पान ४९४; अंगविंज्जा, अध्याय २६, पान १५८ - बं. भा; सद्धर्मपुण्डरीक Mithila Institute, Darbhanga, 1960, परिवर्त २३ पान २४७ - ब्रह्मरूप
५ ) Kalekar 6
६ ) EHI., II, pt. 2, pp. 501 onwards; Lippe 1
७ )  Lippe 1, p. 31
८ ) Lippe 1, p. 42
९ ) Lippe 1, Figs 1-7 and 8-11
१० )  EHI., II, pt. 2. p. 501
११) अपराजितपृच्छा २१३-३०-३१, पान ५४५
११' हरिवंश ४, १८.२१ पान १९
१२ EHI., II, pt. 2, pp. 516-21; अवस्थी १, पार्ने २०३-१० Sivaramamurti 3, pp. 22-23
१३ VSA., 1, इन्द्रमह, pp. 28-42
१४ विष्णुधर्मोत्तर तीन ५०.२-५; मत्स्य २५९-६६-९
१५ अवस्थी १, पान २०९
१६    Bulletin of the Prince of Walse Museum. Bombay, No. 1. pp 15-21 Fig. 6
१७   Louis, 1, PI 152
१८ EHI., II, pt. pp. 521-53; Avasthi 1, pp. 210-16
१९ सप्तहस्तश्चतुश्शृंगः सप्तजिह्ववो द्विशीर्षकः
त्रिपादप्रसन्नः वदनः सुखासीनः शुचिस्मितः ।।
स्वाहां तु दक्षिणे पार्श्वे देवीं वामे स्वधां तथा
बिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं सुचं सुवम् ।।
तोमरं व्यजनं मामैर्धूतपात्रं च धारयन् ।
मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महोजसः ।।
धूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चिः सर्वकामदः
आत्माभिमुखमासिनः एवं रूपो हुताशनः ।।
२० ) महा., हरिवंश, हरिवशंपर्व, ५४.७, पान २०३
२१ अवस्थी १, पान २११

 ४१२

२२ तेच, पान २१४
२३ तेच, पान २१६
२४ EHI., 11, pt. 2, PI. CLII. faceing p. 524
२५ PI. CLIII, P. 524
२६   EHI., II, pt. 2; p 525 Avasthi 1, pp. 216-19
२७   विष्णुधर्मोत्तर तीन ५१७-१४; बृहत्संहिता, ५७.५७ अपराजितपृच्छा २१३-११, पान ५४४
२८ अवस्थी १, पान २१८
२९   तेच भरतपूर संग्रहालयांत (सं.सं. ५१/६०) कुक्कुट व खट्ट्टांग घेतलेला चौभुजयम आहे.
३०  EHI., II, pt. 2, pp. 527-29 Avasthi 1, pp. 219-23
३०'    कूर्म. पु. ३०.७-११ पान २१२ निऋतिः सर्व रक्षसाम्
३१    EHI., II, pt. 2 p. 527 पण त्याच ग्रंथांत अन्यत्र नित्रऋतीच्या डावीकडे उंट असल्याचे सांगितले आहे. 
      विष्णुधर्मोत्तर, तीन ५७. १-५
      मत्स्य २६०-१६ नरयुक्तम्ः
      रूपमंडन २.३४ पान ११ श्वानारूढश्च राक्षसः
३२  विष्णुधर्मोत्तर तीन ५७.३
३३  Avasthi 1, p. 221
३४   उदाहरणार्थ भरतपूर संग्रहालय (राजस्थान) सं. सं. X येथील निऋति चौहातांचा असून त्याचे जवळ मुण्ड, खड्ग व ढाल आहेत.
३५  अवस्थी १, दान २२३
३६  EHI., II, pt. 2, PI. CLIV, Fig. 2
३७   तेच, पार्ने ५२९-३२; अवस्थी १, पार्ने २२४-२७
३७  नरसिंहपुराण, ६.१२-१८, पान १८
३८  विष्णुधर्मोत्तर तीन ५२.१-२०; बृहत्संहिता, ५७.५७. मत्स्य, २६०.१७-१८
३९  अवस्थी १, पान २२५; भारतकलाभवन वाराणसी, (सं.सं. २०७६८)
४०   EHI., II pt. 2, p. 532; Avasthi 1, p. 227
४१   महा., हरिवंश, हरिवंशपर्व ३४.२९, पान २४४; वायुप्रतिमा लक्षणग्रंथात मत्स्य, २६०.१८; अग्नि ५१.१५
     विष्णुधर्मोत्तर तीन ५८.१-५
४२  अक्स्थी १, पान २२९; भरतपूर संग्रहालयांतही वायूची चौहाती प्रतिमा आहे. (सं.सं. ८/४७)
४३   EHI., II, pt. 2, pp. 533 Avasthi 1; pp 232
४४    VSA., 1, p. 128
४५   वा. रामायण, उत्तर १३.३०, पान १४८८
४६   महाभारत वन, २७५.३, पान १७१६
४७  Joshi 4, Pl. 40; Pl. 69
४८  DHI., p. 338


४१३

४९ ) ललितविस्तर, ८ पान ८४
५० )  विष्णुधर्मोत्तर तीन ५६.६.... पादयोः। शंखपद्यनिधीकार्यों स्वरूपौ निधीसंस्थितौ ।।।
५१ )  कुबेर प्रतिमांच्या लक्षणांकरितां पहा मत्स्य. २६०.२०-२२ अग्मि, ५१.१५; बृहत्संहिता, ५७.५७; विष्णुधर्मोत्तर ५३. १-१२; वामनपुराण, ९.१८; अपराजितपृच्छा, २१३.१५ पान ५४५
५२ ) अवस्थी १, पानें २३२-३३
५३ ) तेच, पान २३६
५४ ) अवस्थी १, पान २३५
५५ Gupte 2, p. 79
५६ ) यक्षांबद्दल माहितीसाठी पहा Coomaraswamy A.K., Yaksas, Pts 1 and 2 1929, 1931; Motichandra, Some aspects of Yaksa Worship, Bulletin of the Prince of Walse Museum, Bombay, 1952-53, no. 3 pp, 43-62; VSA., 1, pp 118-43; VSA., 3, pp. 146-54 इत्यादि
५७ ) उदाहरणार्थ दासबोध ४, ५, २६
५८ ) VSA., 1, p. 119
५९ ) दिव्यावदान, ३५ सुरूपः, पान ८६ यक्षरूपमात्मानमभिनिर्माय विकृतकरचरण नयः दिव्यावदान, ८ सुप्रिया, पान ७४ - महाभयांचे मूळयक्ष, प्रेत, पिशाच्च, कुम्भाण्डादि; आर्यशूर, जातकमाला, दरभंगा १९६९, पान ४४-रौद्राप्रकृतिः पान ४६ दंष्ट्राकराल बदनानि रौद्र नयनानि इत्यादि अग्निपुराण ५०.३८ पान ९६; पद्यपुराण उत्तर १२८.१३५-३६ पान ४५९- दुष्टजन्तु
६० ) VSA., 1 pp. 120-22; Harivamsa, Visnu, 108-37-38, p 650
६१ ) वामनपुराण ६.४६-५५
६२ )  VSA 1, p. 128; हे चातूमहाराजिक देव म्हणजे उत्तरेला वैश्रवण, पूर्वेकडे धृतराष्ट्र, दक्षिणेकडे विरूढक आणि पश्चिमेला विरूपाक्ष हे होत. ललित विस्तर (२४, त्रपूष भल्लिक परिवर्त, पान २८२-८५) ही रचना खालीलप्रमाणे दाखविली आहे -

पूर्व

उत्तर

धनिष्ठा, रेवती,

दक्षिण

पश्चिम

नक्षत्र

कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा

मघा, हस्त, चित्रा,

स्वाति, विशाखा,

अनुराधा, ज्येष्ठा,

दोन फाल्गुनी

चैत्य

चापल

पद्म

पर्वत-अष्टांग

देवकुमारिका ८

जयंती, विजयंती, सिद्धार्धा, अपराजिता नंदोत्तरा, नन्दिसेना, नंदिनी, नंदवर्धिनी

श्रियामति, यशमति,

अलंबुषा, मिश्रकेशी,

सूउत्थिता, सुप्रथमा,

एकादशा, नवनामी,

सुप्रबुद्धा, सुखावहा

अधिपती

कुबेर + सूर्य

विरूढक + यम

विरुपाक्ष + वरुण

मूळ, श्रवण, अभिजित,

दोन आषाढा

यशप्राप्ता, यशोधरा,

पुंडरीका, अरुणा,

शीता, कृष्णा, द्रौपदी

अश्विनी, भरणी,

शतभिषा, पूर्वा, उत्तरा

पर्वत-गंधमादन

इला, सुरा, पृथ्वी,

पद्मावती, आशा,

श्रद्धा, हिरी, शिरी

कुबेर + मणिभद्र

 ४१४

६३ या यक्षमूर्ति खालील होत

१- मणिभद्र यक्ष, परखम, मथुरा (म.सं.सं.सी. १)
२- यक्षप्रतिमा, बरोद, मथुरा (म.सं.सं.सी. २३)
३- मनसादेवी, मधुरा (म.सं.सं. ७२.१)
४- यक्षमूर्ति, मथुरा (म.सं.सं.ई. ९)
५ - यक्षमूर्ति, सोपारा, राष्ट्रीय संग्रहालय, नयी दिल्ली
६ यक्षमूर्ति, राजघाट, भारतकला भवन, वाराणसी
७ यक्षमूर्ति, कौशाम्बी, अलाहाबाद संग्रहालय
८- यक्षप्रतिमा, नोह, राजस्थान
९-१० यक्षप्रतिमा, पटना, इण्डियन म्युझियम, कलकत्ता
११ - यक्षप्रतिमा, नोह, राजस्थान (दुसरी मूर्ति)
१२- यक्षप्रतिमा, बिरावी, भरतपूर संग्रहालय, राजस्थान
१३ - मणिभद्र यक्ष, पवाया, गूजरीमहाल, ग्वाल्हेर
१४- यक्षप्रतिमा, पलवल, (ल.सं.सं.ओ. १०७ )
१५ यक्षप्रतिमा, भीटा (ल.सं.सं. ५६.३९४)
१६ - यक्षीप्रतिमा, विदिशा, इण्डियन म्युझिकल, कलकत्ता
१७ - यक्षीप्रतिमा, दीदारगंज, पटना संग्रहालय
१८- यक्षीप्रतिमा, विदिशा, विदिशा संग्रहालय म.प्र.
१९ - यक्षप्रतिमा, विदिशा, विदिशा संग्रहालय म.प्र.
२० - यक्षप्रतिमा, शिशुपालगढ, उडीसा
२१ - यक्षप्रतिमा, अहिच्छत्रा, उ.प्र.
२२ - यक्षप्रतिमा, आमीन, कुरुक्षेत्र
२३ - यक्षप्रतिमा, पडरौना उ.प्र. (ल.सं.सं. ५५.२८८)
२४- यक्षप्रतिमा, प्रतापगढ, उ.प्र. (अल्हाबाद संग्रहालय)
    वरील यक्षमूर्तीच्या विस्तृत संदर्भाकरिता पहा जोशी २, पार्ने ५०-५१ टीपा.
६४ ) नागांबद्दल माहीतीसाठी पहा VSA., I, pp. 68-75; VSA., 3, pp. 299-303; Sen A, Animal Motifs is Ancient Indian Art. Calcutta 1972 Chapter IV pp. 41-53; इत्यादि
६५ )   Sin A., Animal Motifs etc. p. 43
६६ )  Hartal 3
६७ ) Joshi 25
६८ महा., आदि. २७.१५ पान ९७
६९ उदाहरणार्थ छडगाव येथून मिळालेली अभिलिखित नागप्रतिमा (म.सं.सं.सी. १३) नागं प्रतिष्ठापयतः पुष्करिण्यां स्वका (की) याम्


४१५

७० ) दक्षिणेतील नागामूर्ती करितां पहा EHI., II, pt. 2. pp. 554-58 
७०' )   महा., आदि. ३०.७ पान १०३ गुरुमादाय उड्डीनः इति गरुडः
७१ ) EHI., I, pt. 1, pp. 283-7
७२ )  तेच p. 284
७३ ) महा., हरिवंश, हरिवंशपर्व, ४४.४१-४४, पान १६४; ४८.४, पान १७९
७४ ) Sivaramamurti, 3, PI. XIIC
७५ ) विष्णुधर्मोत्तर, तीन ५४.३-९
७६ ) EHI., I, Pt. 1, p. 286 ont
७७ ) महा., उद्योग. १०५ ३१-३२, पान २३४२
७८ ) Slussar 1. p. 130 Fig. 21; p. 137 Figs 26, 28
७८' )  EHI., I, pt. 1, PI. LXXX IV, facing p. 287
७८" ) Gai G.S. On the Seals of the Rastrakotas, Dr. Mirashi Felicitation Volume, Nagpur, 1965, pp. 388-90
७८" ) " या माहितीकरिता पहा Lallanji Gopal, The Date of Krsi Parasara, Journal of Indian History, Golden Jubiles Volume, University of Keral, 1973, p. 155 (उद्धृत - Guide to Khajuraho, p. 11. आणि Indian Antiquary, XX, p. 312, V, II)
७८"")  Saltore B.A., विजयनगर संस्थापकांसंबंधी मतमतांतरें, विजयनगर स्मारक ग्रंथ, पुणे १९३६-३७ पान ३९
७९ ) कालेकर ५
८० ) Thaper 1, PI. XVI - Hanumana and also PI. XVII
८१ )  रा.सं. लखनऊ, नाणी क्रमसंख्या ७०७१, ७०७२ पाण्डय नाणी
८२ ) EHI., II, pt. 2, p. 460
८२) तेच, पान ४५८ लिंगपुराण पूर्वार्ध अध्याय ४३-४४, पार्ने ११७-१२२
८४ ) वा. रामायण उत्तर. १६.८-१४, पान. १४९४; स्कंदात याच्या वानरमुखाचा उल्लेख आहे. स्कंद माहेश्वर ८.६६-८२, पान ३९ या पुराणांप्रमाणें हनुमान हा नंदीचा अवतार आहे. (तेच ८.१००, प.न.४०)
८४" ) कूर्म., उ., ४३.१९-४२, पार्ने ३४६-४७
८५ ) Dhake M.,
८६) तेच
८७ ) EHI., II, pt. 2, p.460
८७") अंकुश हे ही एक प्रमुख शस्त्र असावे. एकबाणी रामाप्रमाणें नाशिक गुफा लेखांत पुलुमावीला 'एकांकुश' असे संबोधन आहे. Sircar 1, no. 86, p. 198 एककुसस. एक धनुधरस, एक सूरस, एक ब्रह्मणस, etc.
८८ ) EHI., I, pt. 2, Appendix C, pp. 77-78
८८") महा., वन., ४०, २४, पान १०६६

४१६

८९   Sivaramamurti, 2, Pl. 64, b. p. 41
९०    Srivastava V.N., Some Interesting Early Mediaeval Images etc., BMA., B. p. 48.
   Fig. 2
९१    Sivaramamurti, 2, Pl. 65a
९२     उदाहरणार्थ हरीहरमूर्ति, ब्रिटीश म्युझियम, लंडन, सं.सं. १८७२, ७-१, ७५
९३   DHI., p. 9
९४    हरिवंश ८६.२९ (पुणे प्रत. सं. वैद्य) पान ३३
९५ पहा, कुमारगुप्त व बंधुवर्मा यांचा मंदसोर अभिलेख, Sircar 1, no. 21, p. 293
• चतुस्समुद्रान्त विलोल मेखलाम्....
९६ जैनाच्या 'रायपसेणियसुत्त' या ग्रंथात यांची एक मोठी यादी दिलेली आहे. पहा ७६.५ टीका; VSA. 3; p. पान ८६, ९३-९७ 'ईहामृग' शब्द वाल्मीकीय रामायण सुंदर ९.१३ पान ८८०
९७    EHI., II, pt. 2, pp. 485-92

***

प्रास्ताविक भाग : २ बौद्धप्रतिमा

आरंभ
सुरुवातीची बौद्ध प्रतीकें
पांढरा हत्ती
कमळ
घोडा
बोधिवृक्ष
वज्रासन
गंधकुटी
भिक्षापात्र
उष्णीष
प्रभामंडल
धर्मचक्र
पदचिन्हें
त्रिरत्न
स्तूप
बुद्धप्रतिमेचे आगमन
बुद्धप्रतिमा निर्माणाचे आधार
कुषाणकालीन बुद्धप्रतिमेची वैशिष्ट्यें
गुप्तकालीन बुद्धप्रतिमा व तिची वैशिष्ट्यें
लक्षणग्रंथांत बुद्ध
बुद्धप्रतिमेच्या मुद्रा

मध्यकालीन बुद्ध प्रतिमा

बौद्ध देवता संघ
भारतीय मूर्तिशास्त्र
ध्यानीबुद्ध
बोधिसत्त्व
मानुषी बुद्ध
देवी
ध्यानीबुद्ध आणि त्यांच्या देवता
प्रसिद्ध बौद्धमंत्र

अवलोकितेश्वर
षडक्षरी लोकेश्वर
सिंहनाद लोकेश्वर
खसर्पण लोकेश्वर
लोकनाथ
नीलकण्ठ
सुखावती लोकेश्वर
ध्यानी बुद्धांपासून उद्भुत देव आणि देवी
कुरुकुल्ला
हयग्रीव
हेरुक
यमारि
जांगुली
प्रज्ञापारमिता
वसुधारा
मारिची
उष्णीषविजया
वज्रवाराही
खदिरावणी तारा

बौद्ध प्रतिमा

भाग : २

आरंभ :
     जैनांप्रमाणे वेदप्रामाण्यांवर मुळीच विश्वास न ठेवणारा दुसरा प्रमुख नास्तिक धर्म बौद्ध धर्म होय. या धर्माची मुहूर्तमेढ शाक्यकुलोत्पन्न गौतम बुद्धाने सुमारे अडीचहजार वर्षापूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथे रोवली व तेथून तो धर्म पुढे भारतभर आणि भारताच्या बाहेर पसरला. बुद्ध स्वतः मूर्तीची पूजा करीत नसे, ईश्वराच्या अस्तित्त्वाचा त्याने कधीच पाठपुरावा केला नाही. 'तुम्ही स्वतःचे दीपक स्वतःच व्हा आणि स्वतःलाच शरण जा' असा त्याचा उद्घोष असे. त्यामुळे बौद्ध धर्माच्या उदयाचे वेळी प्रतिमेला मुळीच स्थान नव्हते.
    बुद्धाच्या जीवनकाळांतच बौद्धमनांत सुधारणेचे अंकुर फुटू लागले, फक्त त्याच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वांमुळे ते दबत राहिले. बुद्धाच्या मृत्यूनंतर (सुमारे इ.पू ४८३) मगधाचा राजा अजातशत्रु याच्यावेळी भिक्षु आनंदाच्या खाली बौद्धाची प्रथम सभा (संगीती) भरली, व बौद्धवाङ्‌मयाला दृढरूप दिले गेले. पुढे दुसरी सभा वैशालीत रेवतभिक्षूच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. येथूनच सुधारणावादी बौद्धांचा 'महासांघिक' या नांवाने एक फाटा फुटला. बुद्ध प्रतिमेच्या निर्माणांत महासांघिकाचा फार मोठा वाटा आहे. बौद्धांची तिसरी संगीती मौर्य सम्राट अशोक याने भरविली. येथे जुन्या मताचा पुनः विजय झाला व 'थेरवादा' ला राजाश्रय मिळाला. चौथी आणि महत्त्वाची बौद्ध संगीती कुषाण राजा कनिष्क याचे काळांत कश्मीर मध्ये कुंडलवन येथे झाली. वसुमित्र हा अध्यक्ष होता. यावेळी थेरवादाचे पारडे उलटले व स्पष्टपणे बौद्ध मत दोन भागांत विभक्त झाले. थेरवादाला हीनयान म्हणून तिरस्कृत करण्यात आले व सुधारणावादी बौद्ध स्वतःला महायानी म्हणवू लागले. हळूहळू महायानाची पकड तीव्र होऊ लागली व हीनयानाला दक्षिणेकडे आसरा पहावा लागला.
    भाविक व भाबड्या लोकांच्या मनांची पकड घेण्यास सनातनी बौद्धांचा शून्यवाद लंगडा पडला, तसाच पुढे नागार्जुनाचा विज्ञानवादही प्रभावहीन होऊ लागला, तेव्हा महासुखवादाचे नवे तत्त्व जोडले गेले. या महासुखवादांतून वज्रयानाचा जन्म झाला व बौद्धांच्या देवता संघाचा फार मोठा विस्तार झाला.
सुरूवातीची बौद्ध प्रतीकें :
     बौद्धमताच्या स्थापनेपासून बुद्धाची मूर्ती प्रत्यक्षांत येण्याचे दरम्यान सुमारे वर्षाचा काळ गेला या काळांत बौद्धांच्या आराधनेचे मुख्य केंद्र बुद्ध तर होताच, पण निर्वाण प्राप्त झालेल्या निराकाराला पुनःसाकार करून प्रत्यक्ष समोर उभे करण्याची कल्पना बळावली नव्हती. पण त्या बरोबरच निराकाराची शून्यांत कल्पना करून त्याची आराधना करणे

४४६

 लोकांना शक्य नव्हते. साहाजिकच बुद्धाकरिता प्रतीकाचा शोध होऊ लागला. बुद्धाचे प्रतिनिधित्त्व करण्याकरिता समो येऊ पाहणारी प्रतीकें शक्य तितकी बुद्धाच्या जवळची हवी होती. अर्थात् प्रत्यक्ष शरीर किंवा शरीराचे पांचभौतिक काय असणार? या दृष्टीनें 'स्तूप' हे सर्वोत्तम प्रतीक होऊ शकत होते, व ते झालेही; पण स्तूपाचा सम्बन्ध बुद्धाच्या मृत्यूशी होता. साहजिकच भाविक मनाल सर्वतितकासा सुखकर नव्हता. अशा परिस्थितीत बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू व विशिष्ट घटनांचे समा देणाऱ्या वस्तू बुद्धाची उत्तम प्रतीकें समजली गेली. एकदा प्रतीकें ठरल्यानंतर मग बुद्धाची उपासना, बुद्धाच्या सामीपाल कल्पना, बुद्ध चरित्रांचे कलेंत अंकन वगैरे गोष्टी सोप्या झाल्या. भरहूत व सांचीच्या स्तूपांवर जेथे बुद्ध कथांचे चित्रा आहे, ती स्थळें बारकाईने पाहिल्यास हे चटकन लक्षात येईल की गोष्टीची मांडणी करीत असतांना जेथे बुद्धाच्च अंकनाची आवश्यकता भासत असे तेथे बुद्धाचे कोणते तरी प्रतीक आणून ठेवीत असत. बुद्धमूर्ती अस्तित्त्वांत येईपर्यंत सर्वत्र हीच पद्धत अवलंबिली जात असे. हिचे पडसाद समकालीन शिलालेखांतून देखील उमटलेले दिसतात. तेथे आढळणारी काही प्रतीक नामें पहा-
अ) शरीर - पात्रांत ठेवलेले पांचभौतिक अवशेष म्हणजे धातु करंडक'.
आ) (मृग्याधिराजस्य) अश्मा सिंहशिखर युक्त शिलास्तंभ.
इ) धातू - देहावशेष.
ई) छत्रयष्टि- दंड आणि छत्र
उ) यठि प्रतिठन (यष्टि प्रतिष्ठान) - स्तंभ आणि त्याच्या खालचा भाग.
या काळात मूर्तिकलेत मान्यता पावलेली बुद्ध प्रतीकें निम्नांकित होती-
१) पांढरा हत्ती - महामायेच्या गर्भात ज्यावेळी तथागताने प्रवेश केला त्यावेळी तिला स्वप्नांत पांढरा हत्ती दिसला होता, त्यामुळे हा हत्ती बुद्ध जन्माचे प्रतीक झाला.
२) कमळ - जन्म झाल्या बरोबर बुद्ध सात पावलें चालला आणि प्रत्येक पावलाखाली कमळ उगवले म्हणून कमळालाही तो सन्मान मिळाला.
३) घोडा - तपश्चर्या करण्याकरिता बुद्धाने-कुमार सिद्धार्थाने घोड्यावर बसून गृहत्याग केला. म्हणून ऐश्वर्याने नटलेला घोडा 'महाभिनिष्क्रमणां'चे प्रतीक झाला. छत्रादि
४) बोधिवृक्ष (रे.चि. चव्वेचाळीस. २)- बुद्धगया येथे पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थाला बुद्धत्वाची प्राप्ति होऊन तो बुद्ध झाला म्हणून कठडा लावून सुरक्षित केलेले पिंपळाचे झाड संबोधी प्राप्तीचे प्रतीक झाले.' ह्या प्रतीकाला अर्थातच फार महत्त्व मिळाले, बोधि वृक्षाला चौथरा आणि सबोधी प्राशिवाय छत्र ध्वज, माळा, वस्त्रे, वगैरेंनी अलंकृत तर करीतच पण कुठे कुठे बोधिवृक्षाच्या भोवताल विशिष्ट प्रकाराची वास्तूरी उभी करीव व जिल्ला 'बोधिगृह' असे म्हणत. जुन्या कलाकृतीत बोधिगृहाची बरीच उदाहरणे मिळतात (रे.चि. पंचेचाळीस ४).

४४७

५) वज्रासन (रे.चि. चव्वेचाळीस. ७) - बोधिवृक्षांखाली ज्या चौथऱ्यावर किंवा आसनांवर बसून बुद्धाने तप केले त्याला वज्रासन असे म्हणतात. बुद्धगयेत संबोधीची प्राप्ती ही घटना दाखविणे असल्यास काही ठिकाणी बोधिवृक्ष व त्याखाली वज्रासन अशी दोन प्रतीकें वापरतात.
६) गंधकुटी - बुद्धाचे निवासस्थान किंवा त्याची झोपडी गंधकुटी या नावाने ओळखली जात असे. सांची व भरहूत येथील कलेत गंधकुटीचे अंकन दिसते.'
७) भिक्षापात्र- बुद्धाचा भिक्षा मागण्याचा वाडगा किंवा कटोरा (रे.चि. चव्वेचाळीस७).
८) उष्णीष- बुद्धाचे पूर्वाश्रमातील पागोटें. माथुरी कलाकृतीत एका कोनाड्यांत सुंदर उष्णीष ठेवलेले दिसते (म.सं.सं. ५६.४२४५) (रे.चि. चव्वेचाळीस ५).
९) प्रभामंडल (रे.चि. चव्वेचाळीस. ४) बुद्धमस्तकाच्या पाठीमागे दिसणारी त्याची अलौकिक प्रभा. प्रभामंडल बुद्धाचे प्रतीक म्हणून ही वापरीत असत. याचा वापर फक्त मथुरेच्याच कुषाण व कुषाणपूर्वीच्या कलाकृतींत दिसतो. इतरत्र लेखकाला तो आढळलेला नाही (उदा. म.सं.सं. ३६.२६६३, के. १,७२.५).
१०) धर्मचक्र (रे.चि. चव्वेचाळीस. ३) बुद्धाच्या धर्मप्रतिपादन कार्याला 'धर्मचक्र प्रवर्तन' अर्थात 'धर्मरूपी चाकाला गति देणं' असे म्हणत. ज्याप्रमाणें एका चक्रवर्ती राजाचे चक्र (शासन किंवा सैन्य बल) अबाधित रूपानें संचार करीत असते त्याचप्रमाणें बुद्धानें प्रवर्तित केलेल्या चक्राची ही गती अबाधित असते अशी बौद्ध मान्यता आहे हे धर्मचक्र वाराणसी जवळ विपुल संख्येत मृग असलेल्या 'मृगदाव' अथवा 'इसिपतन' (ऋषिपतन = सारनाथ) येथे सुरू झाले म्हणून या घटनेचे प्रतीक दोन हरिणांमध्ये ठेवलेले धर्मचक्र मानले गेले. बुद्धच प्रत्यक्ष धर्म स्वरूप असल्यामुळे चक्राला बुद्धाचे प्रतीक होण्याचा सन्मान मिळाला. "
११) पदचिन्हें - बुद्धाच्या पावलांचे ठसे हे ही बुद्ध प्रतीक म्हणून समजत. '"
१२) त्रिरत्न (रे.चि. चव्वेचाळीस. ६, पंचेचाळीस. ३) बुद्ध, धर्म व संघ अशी तीन रत्नें बौद्ध धर्माचे तीन आधार होत. या तिघांचे प्रतीक म्हणून त्रिशूळासारखे तीन टोके असलेले एक चिन्ह 'त्रिरत्न' चिन्ह या नावाने बुद्ध, मांगल्य, पावित्र्य, वगैरेचे द्योतक चिन्ह म्हणून बौद्ध कलेत दुमदुमत असते.
१३) स्तूप- आज जरी स्तूप या वास्तूचा संबंध फक्त जैन व मुख्यतः बौद्ध धर्माशी जोडला जातो तरी मुळांत स्तूपाची कल्पना बुद्धाच्या पूर्वीपासून चालत आली होती. महापरिनिर्वाणसूत्रांत स्वतः बुद्धानेंच तथागत, सम्यक्संबुद्ध, तथागताचा श्रावक किंवा शिष्य आणि चक्रवर्ती हे चौघे 'स्तूपार्ह' म्हणजे स्तूपांस योग्य आहेत असे सांगितले आहे. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मते यज्ञीय युपांचेच मूर्त्यन्तर रूप हे होय.
       सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे स्तूप एका बहुमान्य व आदरणीय अशा मृताची समाधी आहे. उत्तरक्रियेनंतर उरलेले पांच भौतिक अवशेष गोळा करावयाचे, ते एका घागरीत, पेटाऱ्यात किंवा करंड्यात ठेवायचे (अवशेष धातू, अवशेषाचा करंडा = धातुकरंडक) आणि त्याच्यावर एक वास्तू उभी करावयाची. हा स्तूपाचा मूळचा खाक्या आहे. सुरुवातीचे स्तूप मातीचे असत, नंतर त्यांना विटा चुन्यानें आवृत करू लागले व त्यानंतर त्यावर दगडाचे आवरण तयार करण्याची पद्धत सुरू झाली.

४४८
        स्तूपाचा मुख्य भाग अंड, त्याच्या वर दिसणारे दोन किंवा तीन कंगोरे (मेधि, मेखला) वरच्या टोकांवर कठड्याने आवृत असलेली चौकोनी जागा (हर्मिका), लांब दांड्यांवर बसविलेली एक, तीन, पांच किंवा सात छत्रे (छत्रयष्टी), स्तूपाला प्रदक्षिणा करण्याकरिता असलेला रस्ता (प्रदक्षिणापथ), रस्त्याच्या चहूबाजूला असलेला कठडा (वेष्टनी) आणि फाटकें (द्वारतोरण), ही स्तूप शिल्पाची प्रमुख अंगें होत (रे.चि. पंचेचाळीस. १).
       स्तूप मुळांत बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक मानला जात असे, पण त्याला इतके जास्त पावित्र्य मिळाले की तो बुद्धाचा ही प्रतीक सुरुवातीलाच नव्हे तर पुढच्याही काळांत मानला गेला व ज्याप्रमाणे देवमूर्तीची प्रतिष्ठा करणे महान पुण्याचे कार्य समजतात तसेच स्तूप बनविणें, स्तूपाला दगड, धातू, वगैरेनी आवृत करणें, स्तूपाचे पूजन, वंदनादि करणें ही सर्व उपासनेची अंगें झाली.
       प्रत्येक स्तूपांत पांचभौतिक अवशेषांचा धातुकरंडक ठेवणे कधीच शक्य नव्हते, म्हणून स्तूपांचे तीन प्रकार कल्पिले गेले-
१) शारीरिक स्तूप- ज्यात शरीर धातू असतात.
२) पारिभोगिक स्तूप- बुद्धाच्या परिभोगात असलेल्या वस्तू (उष्णीव, पात्र, वज्रासन, वगैरे) वर बांधलेले स्तूप, आणि
३) उद्देशिक स्तूप-बुद्ध किंवा पूर्वकालीन बुद्ध यांच्या स्मृतीत तयार केलेले स्तूप. मध्यकाळांत हा तिसरा प्रकार बराच वाढला. पवित्र बौद्ध तीर्थावर गेले असता दगडाचे लहान लहान स्तूप (पूजेचे स्तूप votive stupa) बांधण्याची पद्धत सर्रास सुरू झाली (चित्र-१९२). नेपाळी आणि तिब्बती धातुकलेत देवपूजेत ठेवण्यांकरिता धातूचे छोटे छोटे स्तूप पाहता येतात.

बुद्धप्रतिमेचे आगमन :-
     निरनिराळ्या प्रतीकांचे पूजन करण्याचे विधान बौद्ध धर्मात पूर्वीपासूनच होते. पण बुद्धाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती, त्यामुळे इसवी सनाच्या सुरूवातीपर्यंत जरी प्रतीक पूजन शिगेला पोचलेले असले तरी आता प्रत्यक्ष मूर्तीचा अभाव तीव्रतेने बोचू लागला, त्याला कारणेही तशीच घडत होती. या काळांचे पूर्वीपासूनच मथुरा क्षेत्रांत भागवत संप्रदायाची मुळें रुजू लागली होती व 'भक्ति' सिद्धांताचा प्रसार होत होता. महाक्षत्रप षोडाशांचे वेळी कृष्णबल-रामादि पंचवींरांच्या प्रतिमा व त्यांची मंदिरें ही अस्तित्वांत आली होती. विदिशेत विष्णूचे मंदिर असून ग्रीकांसारखे परकीय लोकही त्या देवाची भक्ती करू लागले होते. इतकेच नव्हे तर दुसऱ्या नास्तिक मतांच्या अनुयायी लोकांत देखील तीर्थंकरांच्या प्रतिमा हळुहळू वर येत होत्या अशा स्थितीत सुधारणावादी बौद्धांना आपल्या कडील तो अभाव दूर करणे इष्ट वाटल्यास नवल नाही. पण जुन्या विचारधारेला डावलून कोणतेही नवे क्रांतिकारी परिवर्तन करावयाचे झाल्यास कोणीही धार्मिक आचार्य फक्त आपल्या नैतिक बळावर ते करू शकत नाही, त्याला सत्तेचाही पूर्ण पाठिंबा लागतो. महासांघिक बौद्धांना सत्तेचा हवा असलेला पाठिंबा कुषाण राजा कनिष्क यांचेकडून मिळाला असे दिसते. कनिष्काने जेव्हा इतर प्रभावशाली देवतांप्रमाणे आपल्या नाण्यावर बुद्धालाही स्थान देण्याचा निर्णय घेतला असेल, त्याक्षणी बुद्ध प्रतिमेचा अभाव तीव्रतर रूपानें बोचला असला पाहिजे. राजाज्ञेचे पाठबळ मिळताच महासांघिक बौद्धांच्या प्रेरणेने कुषाण राज्याच्या उत्तर व दक्षिणेतील, गांधार आणि मथुरा कलाशैलींचे पंडित बुद्ध प्रतिमा निर्माण करण्यास पुढे सरसावले,

४४९

व दोन्ही ठिकाणी बुद्धाची मूर्ती अस्तित्वांत आली. आता हा वादाचा विषय आहे कीं बुद्धाची प्रथम प्रतिमा गांधार कलेत बनली, का ती घडविण्यांचा मान मथुरा कलेकडे जातो.
   या वादाच्या साधक बाधक कारणांची येथे चर्चा न करता एवढेच सांगतो की बुद्धाची प्रथम मूर्ती 'बोधिसत्व' या नांवाखाली मथुरेच्या कलाकारांनी घडविली असे समजण्याकडे सध्या विद्वांनाचा कल आहे. सारनाथ (वाराणसी) येथे भिक्षु बल यानें बोधिसत्व नांव असलेली विशाल बुद्धप्रतिमा कनिष्काच्या तिसऱ्या राज्य संवत्सरांत प्रतिष्ठित केली. सुरुवातीच्या बुद्ध प्रतिमांना बोधिसत्व असे संबोधित केल्यामुळे सुधारणावादी बौद्धांनी एकाच दगडानें दोन पक्षी मारले. जुन्या मतांप्रमाणे बुद्धाला साकार रूप तर दिले नाही, पण भक्ती करण्याकरिता बोधिसत्व या गोड नांवाखाली बुद्धाचे साकार प्रतीक लोकांसमोर उभे करून दिले. बुद्ध हा बुद्धत्व प्राप्त करण्यांपूर्वी बोधिसत्वच होता.
बुद्धप्रतिमा निर्माणाचे आधार
    मथुरेत उभ्या बुद्धाची मूर्ती समकालीन यक्ष प्रतिमांना डोळ्यांसमोर ठेऊन घडविली गेली. बसलेल्या बुद्धाची प्रतिमा कदाचित भरहुत कलेत दिसणाऱ्या दीर्घतापसी याच्या मूर्तीला पाहून तयार झाली असेल. विद्वानांच्या मतें काही आयागपट्टांवर दिसणारी तीर्थकराची प्रतिमा तिचा आधार असू शकते.
       बुद्धाचे केस निदान-कथेच्या वर्णनांस अनुसरून दाखविले असावेत. काही प्रतिमांत बुद्ध मुंडित आहे तर काहींत केसांचे एकच पेड शंखाच्या वरच्या टोकांप्रमाणें डोक्यांवर फिरवून बांधले आहे. डॉ. लोहुझेन बाईचे मत या बाबतीत असे आहे की अगदी प्रारंभी अर्थात गांधार कलेचे लोण इकडे पोचण्याच्या अगोदरची पद्धत म्हणजे 'कपर्दिन्' पद्धतीची केशरचना होय. गांधार कलेत नागमोडी वळणाचे केस दाखवीत. मथुरेच्या कलाकरांनी त्या पद्धतीची नक्कल करण्याचा प्रयत्न म्हणून अर्धचंद्राच्या आकाराच्या पंक्तीच (notched hair) तयार केल्या. ही पद्धत पहिल्या शतकाच्या शेवटी आणि दुसऱ्याच्या प्रारंभी रूढ होती. त्याच्या पुढची पायरी म्हणजे कुरळ केस दाखविणे ही होय." नागमोडी वळणाच्या केसांच्या बाबतीत बाईंचे मत सांभाळून स्वीकारले पाहिजे कारण अशा वळणांच्या केसांचा बुद्ध मथुरेच्या कुषाणकलेतही मिळाला आहे (म.सं.सं. २९.१९४५) असो. उत्तर कुषाण काळांत अंगुष्ठमात्र कुरळ केस दाखवू लागले. बुद्धाच्या प्रभामंडळाचा उगम कुषाण नाण्यावर दिसणाऱ्या इराणी देवतांच्या प्रभामंडळांत असावा. चीवर, संघाटी, वगैरे बौद्ध वस्त्रे व ती धारण करण्याची पद्धत समकालीन भिक्षूपासून उचलली असेल. विनयपिटकांतही याचे विस्तृत वर्णन मिळते.
     गांधार कलेत जो बुद्ध तयार झाला त्याला बाळसे मात्र ग्रीक कलेकडून आले. त्याचे केस, मिशा, वस्त्र पांघरण्याची पद्धत, वगैरेत पूर्ण भारतीयत्व दिसत नाही. गांधार बुद्ध उभे असले तर नेहमी अभय मुद्रेत असतात. बसलेले असले तर अभय, ध्यान व धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेत दिसतात. भूमिस्पर्शमुद्रेचे दर्शन क्वचितच होते. वरदमुद्रेचा तर पूर्ण अभाव आहे.

कुषाणकालीन बुद्धप्रतिमेची वैशिष्ट्ये :
     याप्रमाणे धर्माचार्य, लोकप्रवृत्ती आणि शासकीय पाठबळ या तिघांच्या संयोगाने जी बुद्धप्रतिमा निर्माण झाली तिची ठळक लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
१) मस्तक मुंडित असणे किंवा उष्णीषावर शंख अथवा कौडीप्रमाणे केसाची वळणदार रचना (कपर्द). बुद्धाच्या
बाबतीत उष्णीष शब्दाचा अर्थ नेहमीप्रमाणे 'पागोटें' हा घ्यावयाचा नाही. ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांपैकी एक" निसर्गतः प्राप्त झालेले विशेष लक्षण होय.

४५०

२) अशाच प्रकारचे दुसरे लक्षण म्हणजे ऊर्णा किंवा दोन भुवयांच्या मधोमध असलेले कुंकवासारखे वर्तुळाकार चिन्ह 'ललित विस्तरां' प्रमाणें मारपराजयाचे वेळी बोधिसत्व सिद्धार्थाच्या ऊर्णेतून एक ज्योत निघाली होती व तिच्च्यामुळे माराचे महाल कंपित झाले होते. कुषाणकालीन बुद्धमूर्तीत हे ऊर्णा चिन्ह अनपवाद रूपाने असते. एका शिल्पांत (म.सं.सं.ए. २७) ऊर्णा चिन्हांचे ठिकाणी एक खळगा आहे. उघड आहे की या जागी मुळांत किंवा नंतरच्या काळात ऊर्णेतून प्रगट होणाऱ्या प्रकाशाचे प्रतीक म्हणून एखादे रत्न बसविलेले असावे.
३) बुद्धाचे विशाल व विस्तीर्ण वक्षस्थल एक खांदा साधारणपणे डावा-वस्त्रानें आवृत्त असणे (एकांसमुत्तरासंगंकृत्वा).
४) उजवा हात खांद्यापर्यंत अभय मुद्रेत उचललेला असणे व डावा हात उभ्या प्रतिमांत वस्त्रांत पकडून किंवा मूठ वळून कमरेजवळ असणे. बसलेल्या बुद्ध मूर्तीत तो मांडीवी ठेवलेला असतो (चित्र-१८९ पहिला बुद्ध).
५) अंगाला चिकटलेली पण डाव्या खांद्यावर आणि खालच्या भागाला बऱ्याचशा सुरकुत्या असलेली वर्षे.
६) नेसूच्या वस्त्राला आवळून ठेवण्यासाठी कमरे भोवती गांठ मारून गुंडाळलेली अरुंद पट्टी किंवा 'कायबंधन' याचा सर्रास वापर.
७) पूर्ण उघडलेले डोळे आणि मुखांवर हलके स्मित.
८) तोंडावर आनंद, करुणा व चिरंतन शांती यासारख्या भावनांच्या अंकनांपेक्षा शारीरिक भाव-भंगिमेचे जास्त नैसर्गिक अंकन.
९) दोन्ही पाय सरळ आणि तांठ असणे. काही शिल्पांत दोन पावलांच्यामध्यें कमळ-कलिकांचा गुच्छ, सिंह, बोधिसत्व मैत्रेय (म.सं.सं. ३८.२७९८, सारनाथ बोधिसत्व, लसं.सं. ओ.७१) व क्वचित एक स्त्री प्रतिमा अंकित केलेली दिसते.१७
१०) नागमोडी कांठ (हस्तिनख) असलेले प्रभामंडळ (चित्र-१८९).
११) तळहात व तळपायावर मंगलचिन्हांचे अंकन.
गुप्तकालीन बुद्धप्रतिमा व तिची वैशिष्ट्यें: (चित्रे-१९०-९१)
     गुप्तकाळ हा उत्तर भारतात भारतीय कलेचा उत्कर्ष काळ होता. या समयाची उत्कृष्ट शिल्पें मथुरा कलेंत निर्माण झाली. त्यापैकी काही बुद्धप्रतिमा अनिवार्य रूपाने उल्लेखनीय आहेत (उदा० म सं.सं.ए. ५, ल.सं.सं.बी. १०, राष्ट्रपति भवन दिल्ली येथील बुद्धमूर्ती, कसिया (उत्तरप्रदेश) येथील झोपलेली विशाल बुद्ध प्रतिमा). असें जरी असले तरी या काळात एकमेव उत्कृष्ट कलाकेंद्र होण्याचा मथुरेचा सन्मान वाराणसी जवळील सारनाथ या बौद्ध केंद्राने वाटून घेतला, नव्हे त्याने मधुरेवर कुरघोडी करण्यास प्रारंभ प्रवर्तन मुद्रेत बसलेला बुद्ध (सारनाथ संग्रहालय) भारताची एक अमर कलाकृती म्हणून स्वीकार केला जातो. या शिवाय या संग्रहालयांत किती तरी गुप्तकालीन बुद्ध शिल्पें विद्यमान आहेत. या बुद्धप्रतिमांची अधोलिखित वैशिष्ट्यें डोळ्यात भरण्यांसारखी आहेत 

४५१

१) अलौकिक शांती, असीम करुणा आणि प्रसन्न स्मिताचे दर्जेदार अंकन.
२) मृदू आणि सडपातळ अंगकाठी;
३) वस्त्रांचा तलमपणा आणि पारदर्शक असण्यांचा गुण.
४) वस्त्रांच्या बारीक पण भरपूर सुरकुत्यांचे नैसर्गिक अंकन. कुषाणकाळात वस्त्रांच्या सुरकुत्या टाकीने खोदून काढलेल्या दिसतात, या उलट गुप्तकालीन सुरकुत्या भरीव प्रकारच्या असतात.
५) अलंकृत प्रभामंडळ. कुषाणकाळांतील प्रभामंडळांस फक्त नागमोडी अलंकरणाचीच किनार दिसते, पण आता मात्र त्याबरोबरच पत्रावली, हारयष्टी, फुलांचा वेल, उमललेले कमळ, मगर, स्वस्तिक, वगैरे किती तरी अलंकरणांची गुंफण दिसते.
६) आता बुद्धाच्या डोक्यावर अंगुष्ठप्रमाण कुरळ केस बहुतेक सर्वत्र दिसतात, मनकुवर (उत्तरप्रदेश) येथून मिळालेली बुद्धप्रतिमा (ल.सं.सं.ओ.७०) या नियमाला अपवाद आहे (चित्र-१९०).
७) कुषाणकर्लेत दिसणाऱ्या ऊर्णा चिन्हाची अनिवार्यता आता संपुष्टज्ञ आली. आता फक्त मोजक्या मूर्तीतच ऊर्णा दिसते.
८) अभयमुद्रेत असणारा बुद्धाचा उजवा हात आता खांद्यापासून खाली येऊन कमरेशी काटकोन करीत स्थिर होतो.
९) दोन्हीं पायांच्यामध्ये दिसणारी अलंकरणें गुप्तकाळांत डोळ्याआड होतात.
१०) कानांची लांबी वाढणें, भुवयांची जास्त वाक असलेली लांबट ठेवण, अर्धवट उघडे डोळे, किंचित जाड ओठ व ओठांच्या टोकाला दिसणारे खळगे (सृक्का, सृक्किणी) गुप्तकालीन बुद्धमुखाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत.
११) तसेच तळहातांवरही काही उल्लेखनीय परिवर्तनें झाली. आता हाताची पांचही बोटें जरी समोरून वेगळी भासत असली तरी मधून ती एकमेकांना चिकटलेली असतात, लक्षणग्रंथांत या अभिप्रायाला 'जालाङ्गुलि' असे म्हटले आहे.
१२) तळहातांवर दिसणारी धर्मचक्रादि मंगल चिन्हें गुप्त होऊन त्याऐवजी सामुद्रिक रेखा झळकू लागतात.

लक्षणग्रंथांत बुद्ध : -
    बुद्धप्रतिमेंबद्दल बौद्ध ग्रंथांत अर्थातच विपुल चर्चा आहे. तिच्या अस्तित्वाचे वाङमयीन उल्लेख दिव्यावदानासारख्या कथाग्रंथात भरपूर सापडतात." तेथे क्रकुच्छंदासारख्या मानुषी बुद्धाच्या माणसाएवढ्या उंच 'काय प्रमाणिक' मूर्तीचाही उल्लेख आहे." तथागत बिंबाला सुगंधित पाण्याने स्नान घालणे दिव्यावदानांतील महायान सूत्राला स्वीकार्य आहे." अवदान शतकांत महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी समलंकृत, ऐशी अनुव्यंजनानी विराजित आणि सहस्रसूर्याप्रमाणे असलेल्या प्रभेने सुशोभित बुद्धाच्या ध्यानांचा उल्लेख आहे."
     बृहत्संहितेत पद्मांकित कर चरण असलेल्या 'सुनीच केश' (अर्थात आखूड व उभे नसलेले केस) यांनी सुशोभित आणि पद्मासनांत बसलेल्या प्रसन्न मूर्ती बुद्धाचे वर्णन आहे."
     अग्निपुराण तो गोरा, लांबकानाचा, वस्त्र नेसलेला, ऊर्ध्वपद्यांवर बसलेला आणि वरदाभय मुद्रेत हात असलेला असावा असें सांगते.

४५२

रूपमंडनांप्रमाणे तो भगवी वर्षे नेसलेला, ध्यानस्थ, द्विभुज आणि ऊर्ध्वपाणिक (हात वर उचलेले) असावा. २५
बुद्धप्रतिमेच्या मुद्रा :
साधारणपणें बुद्धमूर्ती खालील मुद्रांत दिसतात-
१) ध्यान मुद्रा - मांडी घालून बसलेला, दोन्ही हात बेंबी जवळ, पंजे एकावर एक ठेवलेले (चित्र-१९४).
२) धर्मचक्रप्रवर्तन मुद्रा- मांडी, विशिष्ट मुद्रेत दोन्ही हात छाती जवळ जुळवलेले. यांत बोटांची ठेवण विशेष लक्ष देण्यासारखी असते (चित्र१९६).
३) भूमिस्पर्श मुद्रा- मांडी, डावा हात मांडीवर, उपड्या पण उजव्या हाताने भूमिस्पर्श (चित्र-१९५).
४) वरदाभय- उभा, किंवा बसलेला, उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा वरद मुद्रेत. या दोन्ही मुद्रा बरोबर असतातच अशातला भाग नाही. कधी कधी उजवा हात अभय मुद्रेत असतो तर डाव्या हातात भिक्षापात्र असते. (चित्र-२१०).
५) महानिर्वाणमुद्रा - दोन शालवृक्षांच्या मध्ये शय्येवर उजवा हात डोक्याखाली घेऊन त्याच कुशीवर निजलेला बुद्ध. या मुद्रेतच त्याने महानिर्वाण प्राप्त केले.
मध्यकालीन बुद्धप्रतिमा :
     गुप्तकाळाच्या शेवटल्या चरणांत ओदंतपुरी, नालंद आणि विक्रमशिलेच्या नांवानें बौद्ध कलेची विख्यात केंद्रे बिहार व बंगालमध्यें स्थापित झाली. येथे साहजिकच निरनिराळ्या रूपांत अनेक बुद्ध प्रतिमा तयार झाल्या, खाक्या साधारणपणें जुनाच होता. मात्र काही शिल्पांत नोंद करण्यासारखी निराळी रूपें समोर आली. ठळक प्रकार येणेप्रमाणें-
क) दोन्ही पाय समोर सोडून उच्चासनावर बसलेला (प्रलम्बपादासन) बुद्ध (ल.सं.सं.जी.८६).
ख) डोक्यावर मुगुट घातलेला बुद्ध- साधारण पद्धत अशी असते की मुगुटादि अलंकार घातलेल्या प्रतिमा बोधिसत्त्वांच्या आणि चीवर संघाटी असलेल्या पण अलंकार विहीन अशा मूर्ती बुद्धाच्या असतात. पण काही शिल्पांत (उदा०चित्र १९६ ल.सं.सं.ओ. २८९) मुगुट घातलेले बुद्ध दाखविले आहेत २६ मुगुट घातलेला  बुद्ध बंगाल, बिहार, आणि वाराणसीच्या मध्यकालीन कलेत (८-१२ वे शतक). कश्मीरमध्यें अखनूर आणि उष्कर येथे (८-९वे शतक) आणि त्याचप्रमाणे मध्यप्रदेशांत तेवर आणि तिगोवा येथे आढळतो पण त्यापूर्वी सुमारे ७व्या शतकात तो अफगाणिस्तानात बामीयान आणि फोंडुकीस्तान येथे दिसतो. यापद्धतीचा प्रारंभकार्ले येथील लेणी संख्या श्यांत पाहता येतो. तेथें सिंहासनांवर बसलेल्या व जटा उष्णीष असलेल्या बुद्धाचे डोक्यावर दोन आकाशचारी देव मुगुट धरून उभे आहेत, असेच दुसरे अंकन अजिंठा येथील एकोणीसाव्या लेण्यात आहे. येथे उभ्या बुद्धाचे डोक्यावर आकाशसंचारी दोन बुटके मुगुट धरून आहेत. वीतरागी अथवा सर्वसंग परित्याग केलेल्या बुद्धाला मुगुट किंवा अलंकार घातलेला दाखविणे कितपत रास्त आहे ही शंका येथे उद्भवते. कुमारस्वामी यांच्या मते हे 'संभोगकाय' किंवा बुद्धाच्या दैवी रूपाचे अंकन होय. पार्थिव बुद्धाचे द्योतक 'रूपकाय' किंवा 'निर्माणकाय' स्वरूपात तो चीवर संघाटी घातलेला भिक्षु दिसतो. काहींच्या मतें मुगुट घातलेला बुद्ध महायानमतवाद्यांचा देव होय पण हे मत सर्वमान्य नाही. दुसरा पक्ष याचे खंडन करून 

४५३

असे दाखवितो की बुद्धमूर्तीचा हा प्रकार हीनयानाचा पुरस्कार करणाऱ्या कंबोडिया, सयाम आणि लाओस या देशात ही सापडतो. २६
ग) कित्येक शिल्पांत बुद्धाचे पाठशिळेवर आजुबाजूला स्तूप दाखविण्यांची पद्धत सुरू (ल.सं.सं. ६६.९६) झालेली दिसते.
बौद्ध देवतासंघ
      महासांघिकासारख्या सुधारणावादी बौद्धांनी इतरत्र पसरत असलेल्या भक्तित्तत्त्वांनी अनुप्रेरित होऊन आपल्या येथे बुद्धमूर्ती घडविली व तिचा प्रचार सुरू केला. त्याबरोबरच बौद्ध देवतांच्या प्रतिमांची ही मुहूर्तमेढ रोवली गेली. बौद्ध कथांच्या अंकनात ब्रह्मा, शक्र (इंद्र), मार (कामदेव), नाग, वगैरे तर होते पण त्यानंतर बोधिसत्व, अवलोकितेश्वर, ध्यानीबुद्ध, मानुषीबुद्ध, वगैरेचाही उदय होऊ लागला. बौद्धदेवतासंघाची रचना खालीलप्रमाणे कल्पिली गेली. विवेचनाला आरंभ करण्यापूर्वी एक सूचना द्यावीशी वाटते की बौद्धधर्माचा निरनिराळ्या देशात प्रसार झाल्यामुळे येथे देश व काळाचा प्रभाव ही भरपूर पडला आहे. निरनिराळ्या विचारसरणीमुळे निरनिराळ्या देवता समोर आलेल्या आहेत. त्याचे परस्पर संबंध सर्वत्र स्थिर आहेतच असा भाग नाही. त्यामुळे सुरुवातीच्या विद्यार्थ्यास समजावयास सोपे जाईल अशा पद्धतीने येथे या विषयाची मांडणी केली आहे. अर्थात्च बारीक सारीक सैद्धांतिक भेदोपभेद या सर्वांना येथे बाजूला ठेवले आहे.
      ध्यानी बुद्ध - साधारणपणें ठोकळ विचारांकरिता संपूर्ण सृष्टीचे मूळ उगम स्थान म्हणून विश्वपित्याच्या रूपानें आदिबुद्ध व विश्वमातेच्या रूपाने आदिप्रज्ञा किंवा प्रज्ञा पारमिता यांची काहीशी पुरुष आणि प्रकृतीसारखी कल्पना केलेली आहे. २७ या जोडप्यापासून ध्यानी बुद्धांची २८ उत्पत्ती झाली. हे पांच आहेत. पांचही जण नेहमीच ध्यान स्थितीत असतात व जगाच्या कोणत्याही व्यापारात ते भाग घेत नाहीत. पुढील पानावर दाखविलेल्या तक्त्यांत त्यांच्या दिशा, प्रतिनिधितत्त्वें व त्यापासून उद्भूत होणारे गुण किंवा तन्मात्रा स्पष्ट केल्या आहेत. हे ध्यानी बुद्ध स्वतंत्र असे मध्यकालीन कलेत क्वचितच अंकित केले जातात. ते पांचाच्या गटात बोधिसत्व मूर्तीच्या पाठशिळेवर अथवा स्वतंत्र रूपानें स्वतःशी संबधित देवतांच्या मुगुटांवर दिसतात, किंवा त्यांच्या पाठशिळेवरही त्यांचे सर्वांचे अंकन केले जाते. पांचाचा गट असला तर देवतेच्या पितृस्थानांवर असलेला ध्यानी बुद्ध केन्द्रात असून चार आजूबाजूला असतात हे पांचही जण नेहमी वज्रासनांत दिसतात. त्यांची वाहनें व चिन्हें खालील प्रमाणे होत-

ध्यानीबुद्ध

वाहन

डोक्यांवरील चिन्ह

वर्ग

शक्ति

वैरोचन

भयंकर सर्प

चक्र


वज्रधात्वीश्वरी

(dragon)

अक्षोम्य

हत्ती

वज्र




लोचना

रत्नसंभव

सिंह

रत्न

मामकी

अमिताभ

मोर

कमळ

पाण्डरा

अमोघसिद्धी

गरुड

विश्ववज्र

तारा

(दुहेरीवज्र)

४५४

उत्तरभारतीय कलेंत ध्यानीबुद्ध कुषाण काळापासूनच दिसू लागतात. काही बोधिसत्वं प्रतिमांच्या मस्तकावर यांच्यापैकी काहीचे उदाहरणार्थ, अमोघसिद्धी (ल.सं.सं.बी.८२, म. सं.२३.६७), व रत्नसंभव (म.सं.सं.२९.१९४४) दर्शन होते (चित्र-१९७), गेल्यावर्षी मधुरेच्या संग्रहालयांत गोविंदनगर येथून मिळालेले बुद्धाच्या मूर्तीचे एक कुषाणकालीन अभिलिखित पादपीठ आले आहे. या अभिलेखांत पादपीठावर स्थापन केलेल्या बुद्धप्रतिमेस 'अमिताभ' असे नांव दिले आहे. यावरून हे संभवते की इसवीसनाच्या सुरूवातीच्या शतकात ध्यानीबुद्धांच्या स्वतंत्र प्रतिमा घडवीत असावेत. दुसरे असे की या पादपीठावर दिसणाऱ्या पावलाच्या डाव्या बाजूस 'कमळ' आहे. शक्य आहे की अमिताभाचा कमळाशी संबंध या काळापासूनच रूढ झाला असेल. ध्यानीबुद्धाच्या वर दाखविलेल्या पांच शक्ती फारशा लोकप्रिय झालेल्या दिसत नाहीत.
बोधिसत्त्व :
     ध्यानीबुद्ध निरंतर ध्यानावस्थेत असल्यामुळे जगव्यापाराच्या दृष्टीने काहीच करीत नाहीत. त्यांच्या वतीने तो व्यापार करण्यांसाठी प्रत्येकी एका क्रियाशील बोधिसत्वाची योजना केली गेली. कलेंत कुषाणकाळापासूनच मैत्रेयादि बोधिसत्वाचे चित्रण मिळू लागते. डोक्यावर ध्यानी बुद्ध अमोघसिद्धी असलेल्या मैत्रेयाचे सुंदर अंकन एका कुषाणकालीन वेदिका स्तंभांवर केलेले आहे (ल.सं.सं.बी. ८२ चित्र-१९७). मैत्रेय बोधिसत्व" हा अभयमुद्रेत असतो व त्याच्या हातात घट असतो. बोधिसत्व हे नेहमीच अलंकारांनी मंडित असतात.
       हे लक्षांत घेणे जरूरी आहे की काही शिल्पांत पांचच्या ऐवजी आठ बोधिसत्वांचा गट असतो. येथे मूळ पांचापैकी रत्नपाणि आणि विश्वपाणि यांना न दाखवता यांच्याऐवजी आकाशगर्भ, क्षितिगर्भ, सर्वनिर्वाण-विष्काम्भिन्, मंजुश्री आणि मैत्रेय अशा पांच नव्यांची योजना केली जाते. यापैकी मानुषी बुद्धांच्या रूपानें मैत्रेयाचे पूर्वीपासूनच अस्तित्व होते, चार मात्र नवे आले. या चौघापैकी सर्वांत जास्त महत्त्व मंजुश्रीला मिळाले.
     बोधिसत्व हे क्रमाने सृष्टीचा व्यापार सांभाळतात, कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपांत विलीन होतात. हे आपला व्यापार मानुषी बुद्धाच्या मदतीने संपन्न करीत असतात.
मानुषी बुद्ध :
    हे बुद्धावतार होत. हीनयान आणि महायान दोन्ही मतें भूतकाळाच्या चोवीस बुद्धांची कल्पना करतात, व प्रत्येकाचा स्वतंत्र बोधिवृक्षही कल्पिलेला आहे. यापैकी महायानमत शेवटल्या सातांना 'मानुषी बुद्ध' असे नांव देते. आठवा मानुषी बुद्ध मैत्रैय हा शेवटला असून भविष्य काळांत होणारा बुद्ध आहे.
   बौद्ध मतांप्रमाणे आजपर्यंत तीन युगें संपून अवलोकितेश्वराचे हे चौथे सृजन आहे. या युगाचा मानुषीबुद्ध शाक्य मुनी गौतम बुद्ध हा होय. त्याच्या निर्वाणानंतर चार हजार वर्षांनी विश्वपाणी बोधिसत्व पांचवे सृजन करील व त्यावेळी मैत्रेय हा मानुषीबुद्ध होईल.
देवी :
    बौद्ध देवतासंघात देवी असंख्य आहेत व कोण कुणाची शक्ती आहे हे ठरविणे फारच गुंतागुंतीचे आहे. महत्त्वाच्या

४५५

    देवींची स्थानें बोधिसत्वांइतकीच वरची आहेत. त्याही बोधिसत्वांसारख्याच ध्यानी बुद्धांपासून उद्भूत आहेत. बौद्ध देवीपैकी सर्वात महत्त्वपूर्ण देवी तारा ही आहे. अमोघसिद्धीची पत्नी वगळली - कारण ती या तारेपेक्षा भिन्त्र आहे -तर तारा पांच रंगाच्या आहेत व प्रत्येक एक एक बोधिसत्वाशी संबद्ध आहे. पुढील पानावर दिलेला तक्ता देवतासंघाचे स्पष्ट चित्र दाखवतो.
वरील तक्त्यांत दाखविलेल्या महत्त्वाच्या देवी आणि बोधिसत्वादि देवां व्यक्तिरिक्त सरस्वती सारख्या काही देवी आपले वेगळे स्थान टिकवून आहेत. वरील वर्गाच्या देवतानंतर दुसरा वर्ग संरक्षण करणाऱ्या देवांचा आहे. यांत यमान्तक, जम्भल, हेवज्र, हेरुक, महामाया, संवर, कालचक्र आणि पंचरक्षा यांची गणना होते.
त्यानंतर क्रमाने धर्मपाल नांवाचा देवसमुदाय आहे. या गटांत कुबेर, यम, हयग्रीव, यमान्तक, वगैरे क्रूर तोंडाचे देव येतात.
शेवटला वर्ग आचार्यांचा आहे. यांत सोळा महास्थविर, नागार्जुन आणि पद्मसंभव हे श्रेष्ठ होत. कुबेर पत्नी हारिती हिची मोजणी याच वर्गात करतात.
  याशिवाय डाकिनी, पिशाच, भैरवादिकांचे समुदाय बौद्ध देवतासंघात भाऊगर्दी करतात ती वेगळीच. त्यांची संख्या व रूपें अनंत आणि अकल्पनीय आहेत. एवढ्याकरिता प्रस्तृत विवेचनाच्या दृष्टीने या सर्व देवतांना दुरूनच नमस्कार करून त्यातील फक्त ठळक मूर्तीचे जरा जवळून दर्शन घेण्यांचा प्रयत्न करू.

प्रसिद्ध बौद्धमंत्र :
     मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने या मंत्राचे काहीच महत्त्व नसले तरी त्याची नोंद घेणे आवश्यक आहे कारण बौद्ध कलाकृतीवर तो बऱ्याचदा आढळतो. तो मंत्र असा :
ये धर्मा हेतुप्रभवा हेतुं तेषां तथागतो-
ह्यवदत्तेषां च यो निरोधः एवमवादीत् महाश्रमणः ।।
"सर्व धर्माचे एक कारण असते. ते कारण तथागताने स्पष्ट केले आहे. त्या कारणाचा विरोध देखील स्पष्ट केला आहे. हाच महाश्रमणाचा सिद्धांत होय."
हा महामंत्र अनेक मूर्तीच्या पायशिळेवर, पाठीमागे, स्तूपावर किंवा इतरही ठिकाणी कोरलेला असतो (उदा०चित्र-१९३).

अवलोकितेश्वर :
    बोधिसत्त्व गटांपैकी हा देव बौद्धांत बराच लोकप्रिय आहे. याचे नामपर्याय म्हणजे अवलोकित, लोकनाथ, लोकेश्वर हे होत. परमदयालु (महाकारूणिक) असणें हा त्याचा मुख्य गुण आहे. अवलोकितेश्वराचे सुमारे १०८ प्रकार कल्पिले आहेत. अवलोकितेश्वरांच्या लोकप्रियतेचे एक कारण असेही आहे की ध्यानीबुद्ध अमिताभ आणि पांडरेपासून उद्भूत हा चालू कल्पाचा म्हणजे भद्रकल्पाचा बोधिसत्त्व आहे, व स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून तो सर्वांच्या सुखांकरिता निरंतर झटत असतो. याची काही प्रमुख रूपें खालीलप्रमाणे होत.

४५६

१) षडक्षरी लोकेश्वर वर्ण श्वेत, चार हात पैकी समोरचे दोन नमस्कारमुद्रेत, मागच्या हातांत मात्रा कमळ, आजुबाजूला मणिधर आणि षडक्षरी महाविद्या. याच्या प्रतिमा गुप्तकाळापासूनच मिळू लाग पुढे ही बऱ्याच दिसतात (चित्र-१९९).

ध्यानी बुद्ध आणि त्यांच्या देवता

ध्यानीबुद्ध

वर्ण

दिशा

प्रातिनिधिक तत्त्व

तन्मात्रा

मुद्रा

बोधिसत्व

मानुषी बुद्ध

वैरोचन

पांढरा मध्य

आकाश शब्द

उत्तरबोधी किंवा धर्मचक्र प्रवर्तन

सामन्तभद्र

क्रकुच्छन्द

स्वेतताश उष्मीष-विजया, जांगुलीतामा मारीची

अक्षोम्य

निळा

पूर्व

स्पर्श

भूमिस्पर्श

वज्रपाणि

कनकमुनि

नीलतारा, एकबदा

वायू

रत्नसंभव

पिवळा

दक्षिण

अग्नी

रूप

वरद रत्नपाणि

काश्यप

पीततारा, वसुधारा,

वद्वताग

अमिताभ

लाल

पश्चिम जल

रस

ध्यान समाहित

अव लोकितेश्वर

गौतम

रक्ततारा कुरुकुल्ला सीतातपत्र

भुकुटी हरिततारा पर्णशबरी

अमोघसिद्धी

हिरवा

उत्तर पृथ्वी

गंध

अभय

विश्वपाणि

मैत्रेय
२) सिंहनादलोकेश्व": पांढरा, महाराज-लीला आसन, वाहन सिंह, हा दागिने घातलेला नसतो. याच्या उजवीकडे साप गुंडाळलेला त्रिशूळ आणि डावीकडे कमळांवर ठेवलेली तलवार असावी. सिंहनादाच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात. पण एक सर्वोकृष्ट शिल्प म्हणून महोब्याहून मिळालेल्या प्रतिमेकडे बोट दाखविता येईल (ल.सं.सं. ओ २२४) (चित्र-२०२). काही वर्षांपूर्वी पोस्टखात्याने आपल्या तिकीटांकरिता ही प्रतिमा वापरल्याचे वाचकांस स्मरत असेल.
३) खसर्पण लोकेश्वर : पांढरा, चिन्ह कमळ, वरदमुद्रा, आसन ललित किंवा अर्घपर्यंक, आजूबाजूला तारा, सुधनकुमार, भुकुटी आणि हयग्रीव. महायापी मतांत हा बराच नांवाजलेला असून कित्येक संग्रहालयांत याच्या प्रतिमा दिसतात (चित्र-२००). वर उल्लेखिलेल्या चार देवता बरोबर असणे या लोकेश्वराचे वैशिष्ट्य होय. याची तारा हिरव्या रंगाची असून सुधनकुमार हा पुस्तक घेतलेला राजकुमार असतो. चार हात असलेल्या

४५७

भुकटीच्या डोक्यावर जटामुकुट व हातांत त्रिदंड (त्रिशूळ) कमंडलू, व माळा असते. हयग्रीव हा बुटगा, लंबोदर आणि उग्र चेहऱ्याचा असून त्याच्या हातांत दंड असतो.
४) लोकनाथ : रंग पांढरा, चिन्ह कमळ व वरदमुद्रा. याला बहुतेक एकटा किंवा तारा व हयग्रीव यांच्या बरोबर दाखवतात. खसर्पण आणि लोकनाथ यांचे बरेच साम्य आहे, मुख्य फरक हा दिसतो कीं खसर्पणांबरोबर चौघे जण असतात आणि लोकनाथाबरोबर फक्त दोघे. लोकनाथाची एक उत्कृष्ट गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ (वाराणसी) येथील संग्रहालयांत आहे (सं.सं.बी. (डी) १).
५) नीलकंठ : रंग पिवळा, वज्रपर्यंङकासन, समाधिमुद्रा, चिन्ह रत्नपात्र, आजुबाजूला दोन साप, हा दागिने घातलेला नसतो. उघडच आहे की हे शंकराचे बौद्ध संस्करण होय. चराचराला वाचविण्यांसाठी शंकराने समुद्रातून निघालेल्या विषाचे प्राशन केले व नंतर त्याला पोटांत न जाऊ देतां गळ्यात साठवून ठेवले व त्यामुळे तो नीलकंठ झाला ही ब्राह्मण धर्मातील कथा सर्वश्रुत आहेच.
नीलकंठ हा ध्यानीबुद्ध अमिताभ याचे पासून उद्भूत आहे. याची गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ संग्रहालयांत आहे. (चित्र-२०१)४०
६) सुखावती लोकेश्वर : तीनमुखें, सहा हात, ललितासन, बरोबर शक्ती (तारा), रंग पांढरा, हा नेपाळमध्ये फार लोकप्रिय आहे. तिकडील कलेत याच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात, इतरत्र मात्र फारशा दिसत नाहीत.
ध्यानीबुद्धांपासून उद्भूत देव आणि देवी :
   येथेही आपणांस ठळक देवतांपर्यंतच सीमित रहावे लागेल. प्रस्तुत विवेचनाचा क्रम खालील प्रमाणें ठेऊ :
अमिताभदेवी    :    कुरुकुल्ला
अक्षोभ्य          : हयग्रीव, हेरुक, संवर, यमारि, जांगुली, पर्णशबरी, प्रज्ञापारमिता, वसुधारा.
वैरोचन           : मारीचि, उष्णीषविजया, वज्रवाराही
अमोघसिद्धी    :  खदिरावणी तारा
रत्नसंभव       : जम्भल, वसुधारा.  
१) कुरुकुल्ला : हिचे सौम्य व उग्र असे अनेक प्रकार आहेत. तांत्रिक क्रिया विशेषतः वशीकरण हिच्यामुळे सफल होते असा समज आहे. उडीसात हिचे उग्ररूपांत पूजन होते. या शवारूढ देवीचे तेथे काही अंशी चामुंडेसारखे ध्यान आहे. इतरत्र ही चतुर्भुज किंवा अष्टभुज असून सौम्य आहे. 
२) हयग्रीव : वैष्णव हयग्रीवाचे हे बौद्ध संस्करण म्हणता येईल. याचा अमिताभ आणि अक्षोभ्य या दोघांशी संबंध आहे. याला तीन डोकी, आठ हात असून चेहरा उग्र आहे. या शिवाय याची इतर ही ध्यानें आहेत. सर्वात वर असलेले घोड्याचे डोके याचे मुख्य चिन्ह आहे. नेपाळ व तिबेटकडे घोड्याचे व्यापारी याची जास्त पूजा करतात.

४५८

३) हेरुक" : बौद्ध देवसंघात हेरुक बराच लोकप्रिय आहे. हा एकटा असला तर फक्त दोन हाताचा असतो, अन्यथा यब्-युम् (माता-पितावस्था किंवा संयुक्तावस्था) मुद्रेत आपल्या शक्तीला आलिंगन देत दिसतो (चित्र-२०८). प्रज्ञा ही याची शक्ती होय. हा तिच्यासह अर्धपर्यक आसनांत नाचताना आढळतो याचा रंग निळा आणि चेहरा उग्र असतो. वज्र आणि कपाळही याची चिन्हें होत. कुठे कुठे खट्वांगही असते.
याच्या शक्तीच्या नांवाप्रमाणे याची नांवे बदलतात. चित्रसेनेसह बुद्धकपाल, डाकिनी वज्रवाराही बरोबर वज्रडाक, बुद्धडाकिनी सह महामाया, प्रज्ञावज्रवाराही बरोबर संवर प्रमाणे नावें व रूपें बदलत जातात.
४) यमारि : हे यमाचे बौद्ध संस्करण होय. यमाप्रमाणेच याचे वाहन महिष असते व याचे तोंडही महिषाचे असते. हा एकटा किंवा आपली शक्ती प्रज्ञा हिच्याबरोबर असतो. तिब्बती अनुश्रुतिप्रमाणें मंजुश्रीने बैलाचे डोके असलेल्या यमाचा तो उन्मत्त झाल्यामुळे पाडाव केला. या प्रमाणे यमारि किंवा यमान्तक हे मंजुश्रीचे रूप होय. साधनमालेत रक्तयमारि आणि कृष्णयमारि असे यमारिचे दोन प्रकार वर्णन केले आहेत.
५) जांगुली : बौद्ध संघात ही सर्पदंशापासून वाचविणारी आणि बरे करणारी देवी मानली जाते. हिचे मुख्य चिन्ह सर्प हे आहे व तेच एका रूपात तिचे वाहन ही आहे. दुसऱ्या रूपात हिच्या हातात वीणा असते.
हिचे ब्राह्मणधर्माच्या मनसेशी बरेच साम्य आहे, किंबहुना मनसेच्या एका तांत्रिक ध्यानांत तिला जांगुली हेच नांव दिले आहे.
६) प्रज्ञापारमिता : प्रज्ञापारमिता हे एका महायानी शास्त्राचे ही नांव आहे. ज्याची नागार्जुनाने नागांपासून प्राप्ती करून घेतली होती. आर्य असंग याने साधना निर्माण करून देवीचे रूप दिले. बौद्धांत या देवीचे स्थान फार वरचे आहे. हिची श्वेत आणि पीत अशी दोन रूपें वर्णिलेली आहेत वज्रपर्यकासनांत बसलेल्या या देवीचे मुख्य चिन्ह कमळावर ठेवलेली पोथी हे होय.
७) वसुधारा" : शक्तिप्रकरणांत आपण कुषाण काळातील मासे घेतलेल्या वसुधारेचा विचार केला होता ही तिच्यापेक्षा अगदी भिन्न आहे. बौद्ध संघात ही जंभलाच्या पत्नीच्या रूपाने येते. श्री. भट्टाचार्य यांच्या मतांप्रमाणें ही ध्यानीबुद्धांपेक्षा प्राचीन आहे. धान्याची लोंबी हे हिचे चिन्ह असून हिचा वर्ण पिवळा आहे. काही शिल्पांत हिच्या डोक्यावर अक्षोभ्य असतो तर काहीत रत्नसंभव, कारण दोघांशीही हिचा संबंध आहे.
८) मारीची : वैरोचनापासून उद्भूत होणाऱ्या देवतांत मारीची ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे, किंबहुना काही हिला वैरोचनाची शक्तीच मानतात. तिब्बती लामा उषा देवतेप्रमाणे हिचे सकाळी आवाहन करतात. मारीचीचा आपल्या सूर्याशी (सूर्याचे एक नांव गरीची आहेच) जवळचा संबंध आहे. सूर्य रथाच्या सात घोड्याप्रमाणें हिच्या रथाला सात डुकरें असतात. सूर्याचा सारथी अरुण हा पदविहीन आहे तर मारीचीचा सारथी राहू हा मस्तक रूप आहे. ब्राह्मण धर्मातील सूर्याचा शत्रु राहू हिचा सारथी झाला!
साधनमालेत मारीचीची सहा रूपें सांगितली आहेत, पण साधारणपणें कलेत आपल्याला जी मारीची दिसते ती सात डुकरांच्या रथांवर बसलेली, तीन तोंडे व आठ हात असलेली दिसते हे रूप 'अष्टभूजा मारीची' किंवा

४५९

'संक्षिप्त मारीची' या नावाने ओळखले जाते. मारीचीची एक सुंदर प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत आहे (सं.सं.बी. २८२ चित्र-२०३)
९) उष्णीषविजया : ही श्वेत वर्णाची असून हिला तीन तोंडे व आठ हात असतात. हिची सर्वात मोठी ओळख म्हणजे हिच्या हातांत कमलावर बसलेला बुद्ध असतो. हिची विद्यादेवी सरस्वतीशी समीपता आहे (चित्र-२०४).
१०) वज्रवाराही : ही एक डाकिनी असून हेरुकाची शक्ती आहे. या दोघांच्या संयोगावरच चक्रसंवरतंत्र आणि वज्रवाराही तंत्र यांची उभारणी झाली आहे. ही द्विभुज किंवा चतुर्भुज असते व बहुधा प्रत्यालीढ मुद्रेत दिसते. वज्र, तर्जनी आणि कपाळ ही हिची चिन्हें होत.
११) खदिरावणी तारा : बऱ्याचशा बौद्ध देवी तारा या नावाने ओळखल्या जातात. त्यातच एक खदिरावणी ही होय. हिचा रंग हिरवा असल्यामुळे हिला श्यामातारा ही म्हणतात, उत्पल हे हिचे चिन्ह आहे आणि अशोककांता व एकजटा हिच्या बरोबर विद्यमान असतात. बहुतेक हिच्या दोन्ही बाजूला कमळे दाखवितात. चंदेल कलेत तयार झालेली हिची एक सुंदर प्रतिमा महोब्याहून मिळाली आहे (चित्र-२०७).
१२) पर्णशबरी : हिचा संबंध अक्षोभ्य आणि अमोघसिद्धी या दोघांशी आहे. हिला तीन मस्तकें व सहा हात आहेत. अक्षोभ्याबरोबर हिचे मुख प्रसन्न असते पण अमोघ सिद्धी बरोबर मात्र ते क्रूर दिसते. साधनेत हिला 'पिशाची' आणि 'सर्व-मारी-प्रशमनी' म्हटले आहे. 'शीतला', 'देवी' वगैरे सारखी ही रोगराईशी संबंधित देवी दिसते.
१३) जम्भल  : जम्भलाचा संबंध अक्षोभ्य आणि रत्नसंभव या दोन ध्यानीबुद्धांशी आहे. ब्राह्मणधर्मातील धनपती कुबेराचे हे बौद्ध संस्करण आहे. रत्नसंभवाशी संबंधित असलेला जम्भल आपल्या हातात फळ आणि मुंगूस बाळगतो (चित्र-२०६). काही शिल्पांत हे मुंगूस रत्नें ओकीत असते. जंभलाचा रंग सोनेरी पिवळा असून आंगकाठी. आडवी व पोट सुटलेले असते. बसलेला असतांना त्याच्या पायाशी लवंडलेला कुंभ दिसतो. त्यामधून धनराशी बाहेर पडत असते. काही शिल्पांत याच्या अष्टदल कमलाच्या पाकळ्यावर आठ यक्ष (मणिभद्र, पूर्णभद्र, धनद, वैश्रवण, केलिमाली, चिविकुंडली, सुखेंद्र आणि चरेंद्र) हे दिसतात. जम्भल हा आपली शक्ती वसुधारा हिच्या बरोबर यब् युम् अवस्थेत ही दिसतो. जंभलाची काही इतर रूपें साधनमालेत दिलेली आहेत. त्या विस्ताराकडे आपल्याला वळता येणार नाही.
१४) पंचरक्षा : पंचरक्षास्तोत्र आणि पंचरक्षा देवता बौद्धांकडे बऱ्याच पुजल्या जात. नेपाळच्या जवळ जवळ प्रत्येक मठांत पंचरक्षा देवतांच्या प्रतिमा आहेत. यांचे पूजन खूप आयुष्य, राज्याचे संरक्षण, गावें, कुरणें यांची वृद्धी व रोगराई, दुष्काळ वगैरे संकटापासून बचाव व्हावा एवढ्या करिता केले जात असे. या पंचरक्षा म्हणजें (१) महाप्रतिसरा, (२) महासाहस्रप्रमर्दनी (३) महामंत्रानुसारिणी (४) महामायूरी व (५) महासितवती या होत.
१५) तारा : बौद्धदेवी समुदायांत तारा व तिचे प्रकार यांचा बराच गाजावाजा आहे. तारेचे सामान्य ध्यान म्हणजे उजवा हात वरद मुद्रेत असणे व डाव्यांत उत्पल असणे हे होय. रंग भेदाने या एका ध्यानाचे सात प्रकार

 ४६०

होतात. दगडासारख्या प्रतिमेत रंग नसले तर हे प्रकार देवीच्या परिवार देवतांच्या मदतीने ओळखता येतात. रंगाप्रमाणे सात प्रकार म्हणजे हरित तारा, श्वेत तारा, पीत तारा, नील तारा, व रक्त तारा असे पांच व पांढरी आणि हिरवीचा एक एक अतिरिक्त असें सात प्रकार होत.
समारोप
    बौद्ध देवतासंघाचा पसारा फार मोठा आहे. श्री. भट्टाचार्य यांनी तो कांही अंशी आटोक्यात घेऊन आपल्या ग्रंथात सम्मिलित केला आहे. येथें त्यापैकी कलेत दिसणाऱ्या काहींचे व इतर काही महत्त्वाच्या देव आणि देवी यांचे ओझरते दर्शन घडविण्यांचा प्रयत्न केला आहे. विशेष अभ्यासकांनी मूळ ग्रंथच पाहिले पाहिजेत.

***

४६१

टिपा आणि संदर्भ

बौद्ध प्रतिमा
 1. Shinkot Steatite Casket Inscription of the time of Menander. Sircar 1,14,pp.103-104; Swat Relic Vase, -Sircar 1,20, p, 109.
2. Mathura lion Capital Inscription, -Sircer 1,24,p.113,116.
3. Taxila Silver Scroll, -Sircar 1,34,p, 129
4. Sarnath Buddhist Image Inscription, Sircar 1,37-39, p 132
5. Sui Vihara Copper Plate, -Sircar 1,41, p 136
6. उदाहरणार्थ Joshi 4, pl,8
7. Coomaraswamy A.K., Early Indian Architecture-Eastern Art, Philadelphia, Bodhi-ghara, vol. II. 1930.
8. Marshall, J The Manuments of Sanchi, 1939, Pls 18; 19; Barua B, Barhut, Fig. 50, Fig 30; etc.
9. Barua B., Barhut, Fig. 45; Marshall J., The Monuments of Sanchi., Pl.34.
10. Smith, V, Jain Stupa and Other Antiqutities from Mathura Allahabad, 1901, pl. LXXII, Fig 1, SML., J. 365.
11. Joshi, 4PI. 9.
12. Takata 1, Fig., 168, 170, pieces from Amaravati.
१३. महापरिनिर्वाणसूत्र, सं. भिक्षुकित्तिमा, वि, सं. १९९८, सारनाथ, सूत्र १९५ पृ. १११-२.
14. VSA., 3,pp, 160-61. स्तूप शिल्पाच्या विस्तृत चर्चेकरिता पहा हाच ग्रंथ, पाने १५७-२१७; Sivaramamurti 4,17-26.
15. Coomaraswamy A.K, Origin of the Buddha Image, Art Bulletin ix. 4, New york 1927.pp. 42; VSA., 3pp. 285-98 Joshi 4. pp 25-29.
16. Lohuizen 4.
१७. ललितविस्तरांप्रमाणे महापुरुषाची बत्तीस लक्षणें खालील होत (ललितविस्तर. ७ पान ४४)-
१) उष्णीषशीर्षः
२) भिन्नाञ्जनमयूरकलापाभिनील वल्लित प्रदक्षिणावर्त केशः 
३) समविपुल ललाटः

४६२

४) ऊर्णा -- भुर्वोमध्ये हिमरजतप्रकाशा
५) गोपद्य नेव्रः
६) अभिनील नेव्र
७)  समचत्वारिंशहत्नः
८) अविरलदन्तः
९) शुक्लदन्तः
१०)  ब्रह्मस्वरः
११)  रसरसाग्रवान्
१२)  प्रभू तनूजिह्वः 
१३) सिंहहनुः
१४) सुसंवृत्तः स्कन्धः
१५) सप्तच्छदोच्छितांसः
१६) चितांतरांसः
१७) सूक्ष्म सुवर्ण वर्णच्छविः
१८) स्थितोऽनवनत प्रलम्बबाहुः
१९) सिंहपूर्वार्धकायः
२०) न्यग्रोध परिमण्डलः
२१) एकैकरोमः
२२) ऊर्ध्वाग्राभिप्रदक्षिणावर्त रोमाः
२३) कोशोपगत वस्तिगुह्यः
२४) सुविवर्त्ततोरुः
२५) एणेयमृगराजजङ्घ:
२६) दीर्घाङ्गुलिः
२७) आयत पाणिपादः
२८) उत्सङ्गपादः

४६३

२९ ) मृदुतरुण हस्तपादः
३०) जालाङ्गुलि हस्तपादः
३१) दीर्घाङगुलिः अधः क्रमतलयो चक्रे जाते चित्रे सहस्रारे सनेमिके सनाभिके
३२) सुप्रतिष्ठित समपादः
महापुरुष लक्षणांच्या थोड्या फार फरकानें इतरत्रही याद्या आढळतात; तसेच सामुद्रिक शास्त्रांप्रमाणे छत्र, कमळ, धनुष्य, रथ, वज्र, कासव, अंकुश, विहीर, स्वस्तिक, तोरण, सरोवर, सिंह, वृक्ष, चक्र, शंख, हत्ती, समुद्र, कलश, प्रासाद, मासा, यव, यज्ञस्तंभ, स्तूप, कमंडलू, पर्वत, चामर, दर्पण, बल, ध्वज, अभिषेक, लक्ष्मी, माळा व मोर यांना महापुरुष लक्षणें समजतात.
१७ ) प्रिंस ऑफ् वेल्स म्युझियम, मुंबई येथील हुविष्काच्या ४५ व्या वर्षी तयार झालेली बुद्धप्रतिमा; Journal of the Bombay Branch of Royal Asiatic Society (JBORS.,) XX, 1902, p. 269.
१८ ) पहा वर ११ च्या यादीत संख्या ३०
१९ ) दिव्यावदान, २१ सहसोद्गतावदान, पान १८५; २८ वीतशोकावदान, पान २७७; ३७ रुद्रायणावदान, पान ४६६,७१ सुप्रभावदान पान १७६
२०. तेच, २७ कुणालावदान, पान २७१.
२१.  तेच, ३४ दानाधिकरण महायानसूत्रम्, पान ४२६
२२. अवदानशतक ३ कुसिकावदान, पान ९ ददर्श कुसीदो भगवन्त द्वात्रिंशता महापुरुष लक्षणैः समलंकृतं
२३. बृहत्संहिता, ५७.४४. DHI; p 581
२४. अग्नि, ४९.८, पान ९३
२५. रूपमण्डन, तीन, २८, पान १४०
२६. Sengupta 3.
२६ ) Krishan Y. 1 p. 92,96, Figs 1,3.
२७. Bhattacharya B. 1, p XXVIII; Bhattasali 1, p.16
२८. तेच, पानें २-७
२९. VSA., 5
३०.  Bhattacharya B. 1, pp 8-9
३१. तेच पाने १३- १४

४६४

३२. Bhattacharya B. 1, pp. 10-14
३३. Gupte 1.p 112
३४. Bhattacharya B., 1, pp. 32-52
तेच, पान ३३
तेच, पान ३५
३७. तेच, पान ३६
३८. तेच, पान ३८
३९. Bhattacharya B.1, p.48
४०. सारनाथ संग्रहालय सं. ५१३
४१. Bhattacharya B.1, p 50
४२. तेच, पान ५५
४३. तेच, पान ६८
४४. तेच, पान ६१
४५. तेच, पान ६९
४६. तेच, पान ७८
४७. तेच, पान ८४
४८. तेच, पान ८९
४९. तेच, पान ९३
५०. तेच, पान १००
५१. तेच, पान १०३
५२. तेच, पान १०६
५३. तेच, पान १०९
५४. तेच, पान ११४
५५. तेच, पान १३२
५६. तेच, पान १३५-१४०

***














 







जैन प्रतिमा

आरंभ :
   सनातनी विचारधारेप्रमाणें वेद प्रामाण्यांवर विश्वास न ठेवणारी व्यक्ती किंवा संप्रदाय नास्तिक म्हणवितो. या दृष्टीने बौद्ध व जैन ही दोन्ही मते नास्तिकवादी आहेत. जैनमत ईश्वराच्या कर्तुमकर्तुम्न्यथाकर्तुम् सामर्थ्यावर किंवा त्याने सृष्टीचे निर्माण केले अशा गोष्टीवर विश्वास ठेवीत नाही, पण 'देववाद' जैन परिसरांच्या बाहेर आहे असेही नाही. आज जैनांत देवमूर्तिपूजनांचा चांगलाच प्रचार आहे, फरक एवढाच की काही जैनांच्या घरी प्रतिमा असल्या तरी त्याचे मुख्य पूजन, उपासना वगैरे प्रामुख्याने जैनालयांत किंवा जैन मंदिरातच होत असते.
   'जिनां'चे अनुसायी ते जैन व जिनप्रतिपादित धर्म तो जैनधर्म अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. 'जिन' हे ईश्वराचे अवतार नव्हते, पण स्वतःच्या तपश्चर्येने कामक्रोधादि विकारावर विजय मिळवून कर्ममलाला बाजूला सारून आत्म्याला निर्मळ करून घेणारे लोकोत्तर पुरुष होते. यांनाच तीर्थंकर, केवली, अर्हत्, अरिहंत, वगैरे नांवे आहेत. आदिनाथ किंवा ऋषभनाथ हा प्रथम तीर्थंकर असून त्यानंतर बावीस आणि शेवटला महावीर किंवा वर्धमान असे एकूण चोवीस तीर्थंकर या धर्माचे मुख्य स्तंभ होत. मात्र आजचा इतिहास चोवीसपैकी फक्त तीन नेमी, पार्श्वनाथ आणि महावीर यांना सत्य सृष्टीतील पुरुष समजतो. महावीराचा काळ आज पासून सुमारे २,५०० वर्षे पूर्वीचा मानतात.
   जैनमतांप्रमाणे आत्मा कर्माने बद्ध असतो. तपश्चर्या करून कर्माचा नाश करणे ही 'मुक्ती' होय. मुक्तांना 'सिद्ध' असेही म्हणतात. यांचे पूजनीय असे पांच प्रकार आहेत. सर्वांत श्रेष्ठ म्हणजे 'अर्हत' त्यानंतर 'सिद्ध', 'आचार्य', 'उपाध्याय' आणि 'साधू' असे ते पांच होत. जैन गृहस्थांना श्रावक आणि स्त्रियांना श्राविका असे म्हणतात.
जैन आणि बौद्धांचा ब्राह्मणधर्मीय प्रतिमांविषयक दृष्टीकोण :
   हे दोन्ही धर्म वेदविरोधी म्हणजे 'नास्तिक' असून मुळात मूर्तिपूजेंला मान्यता देत नव्हते. पण बदलत्या काळाबरोबर दोन्ही क्षेत्रांत मूर्तिपूजा बळावली. प्रतिमांचा पसारा वाढला आणि कलेच्या जगात अनेक प्रकारच्या जैन व बौद्ध मूर्ती झळकू लागल्या. त्यांचा संक्षिप्त आढावा आपण मागील दोन प्रकरणांत घेतला आहे. या दोन धर्मियांचा ब्राह्मण धर्मीय प्रतिमांविषयीं काय दृष्टिकोण दिसतो, याचा येथे आपण विचार करणार आहोत. प्रथम जैनांकडे वळू.
   जैन मूर्तिसंघात कुषाण काळापासूनच काही ब्राह्मण देवतांच्या प्रतिमा आढळतात. उदाहरण म्हणून मथुरेहून मिळालेली कुषाणकालीन अभिलिखित सरस्वती (मथुरा सं. जे. २४), पद्मा (राष्ट्रीय सं. दिल्ली, बी.८९), गजलक्ष्मीकडे बोट दाखवता

४२१

येईल. तीर्थंकर नेमिनाथाच्या आजुबाजूला बलराम आणि वासुदेव कृष्ण दिसतात. नवग्रहांचे ही दर्शन होते. तीर्थंकरांच्या शासन देवतामध्ये अंबिका, गोमुख यक्ष, क्षेत्रपाल, नेगमेष, यक्ष ब्रह्मा, वगैरे अन्य उदाहरणें म्हणून दाखवता येतील (J.N. Banerjee, DHI., pp.५६१-६३) या प्रकारच्या अंकनांत तीर्थकरांचे श्रेष्ठत्व स्थापन करण्यासाठी इतरांना त्यांचे उपासक, शासन देव, किंवा यक्ष या रूपांत दाखवणे जैनांच्या दृष्टीने क्रमप्राप्त होते.
   बौद्ध धर्मीय प्रतिमांत दोन दृष्टिकोण आढळतात. एकतर जैनांच्याच प्रमाणे बुद्ध किंवा बोधिसत्त्वाचे श्रेष्ठत्व सुचविण्यासाठी ब्राह्मण धर्मीय देव प्रतिमांच्या डोक्यावर किंवा आजूबाजूला बुद्धाला दाखवणे. या प्रकारांत श्रेष्ठत्वाचा संदेश आहे. हा प्रकार सूर्य लोकेश्वर, विष्णू लोकेश्वर, हरि-हर-सूर्य-बुद्ध (J.N. Banerjee, DHI., pl. XLVIII. 1,3,4 p. 554-5) ध्यानी बुद्धासहित पंचायतनलिंग, वगैरे प्रतिमांत दिसतो.
   दुसऱ्या प्रकारात मात्र फक्त श्रेष्ठत्व नसून दुर्भावना, तिरस्कार, अपमान वगैरेचे भरपूर मिश्रण दृष्टोत्पत्तीस येते. हीं प्रवृत्ती बौद्धांच्या वज्रयानी तांत्रिक प्रतिमांत स्पष्टपणे दिसते. अपराजिता व पर्णशबरी यांना गणपतीला पायाखाली दाबताना किंवा त्याला मुठीने मारताना दाखवतात, विघ्नांतक गणपतीला तुडवतो, तसेच वज्रज्वालानार्क, कालचक्र क्रमाने विष्णू, भैरव, रूद्र आणि अनंग (कामदेव) यांना पायाखाली तुडवताना व त्यांच्यावर नांचताना दिसतात. प्रसन्नतारा, त्रैलोक्य विजय, हे वज्र, मारीची, यांच्या पायाखाली इंद्र, शिव, ब्रह्मा, विष्णू, शिव-गौरी, वगैरे दिसतात. वज्रवाराही कालरात्रीला पदाक्रान्त करते. लाल तारा/ तारोद्भवकुरकुल्ला रती आणि मदनावर आरुढ असते. (रेखा चतुर्वेदी, बौद्ध संघाट प्रतिमाएँ, इतिहास दर्पण (अखिल भारतीय इतिहास संकलन योजना की शोधपत्रिका) नई दिल्ली, अंक १५ (वर्षप्रतिपदा १.२-१०, पृ. ५६-६१).

जैन कलेची सुरुवात :
     काही जैन विद्वानांच्या मतें जैन कलेचा आरंभ सिंधुसभ्यतेपासून झाला आहे, पण हे मत संप्रदाय विशेषांतच ग्राह्य मानले जाते. वाङ्मयीन उल्लेखांच्या आधारावर असे सांगणे शक्य आहे की महावीराच्या प्रतिमेचे पूजन त्याच्या जीवनांत सुरू झाले होते.' महावीराची तो असतांना केलेली प्रतिमा 'जीवंतस्वामि' प्रतिमा म्हणून ओळखली गेली, व पुढें अशा प्रकारच्या सर्व प्रतिमा याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
       जैन तीर्थंकराची सर्व प्रथम प्रतिमा बिहार मधे लोहानीपूर येथें मिळाली. पण सुरुवातीच्या या प्रतिमांची संख्या अगदीच मोजकी आहे. प्रारंभिक कुषाण काळच्या आयागपट्टांवर क्वचित तीर्थंकराचे दर्शन होत असले (चित्र १७४) तरी शुंगकालीन तीर्थंकराची स्वतंत्र प्रतिमा अद्यापि पाहण्यात आलेली नाही.
कुषाणकालीन तीर्थंकर मूर्ती :
  कुषाणकाळात विशेषतः मथुरेत तीर्थंकर प्रतिमांचा बराच भरणा झालेला दिसतो. या प्रतिमाची खालील वैशिट्ये डोळ्यांत भरतात-
१) तीर्थंकर प्रतिमा फक्त दोनच स्थितीत असतात; उभ्या किंवा मांडी घालून बसलेल्या. उभ्या स्थितीला खड्‌गासन किंवा कायोत्सर्ग मुद्रा म्हणतात आणि दुसरीला ध्यानमुद्रा (चित्र ३.१७२).
* कायोत्सर्गमुद्रा जैन-साधना-पद्धतीतील एक मुख्य अंग आहे. 'कार्योत्सर्ग शतका' प्रमाणे कायोत्सर्ग उभ्या, बसलेल्या किंवा निजलेल्या स्थितीत होत असतो, पण समर्थ मुनीनें उभ्या स्थितीतच तो करावा अशी जैन 

 ४२२

भारतीय मूर्तिशास्त्र

परंपरेची मान्यता आहे. ऋषभनाथाने उभ्यानेच कार्योत्सर्ग केला होता.
निकूडं सविसेसं वयाणुरूवं वलाणुरुवं च खाणुव्व उद्धदेहो काउसग्गं तु ठाइज्जा - कार्योत्सर्गशतक ६९
(मुनी नथमल, कायोत्सर्ग मुद्राके अंकन और जैन परंपरा, जोशी, २९)
२) तीर्थंकराचे मस्तक मुंडित असते किंवा अंगुष्ठ मात्र केसाच्या कुरळाने आच्छादित असते. याचे एकाधिक प्रकार आहेत (चित्र १७१). চাল
३) कान खांद्यापर्यंत लोंबलेले नसतात; गुप्तकालापासून ते खाली लोंबू लागतात (चित्र १७३).
४) मुखावर विशेष भाव नसतो, असलेच तर हलके स्मित असते.
५) ध्यानमुद्रेत बसलेल्या तीर्थंकरांच्या तळहातावर चक्र आणि तळपायावर त्रिरत्न आणि चक्र दिसते. याशिवाय बोटांच्या पुढच्या पेरांवर श्रीवत्सादि मंगल चिन्हें दिसतात.
६) पुरुषोत्तमत्वाचे लक्षण म्हणून तीर्थंकराच्या वक्ष स्थलांवर श्रीवत्सचिन्ह व भुवयांमधे ऊर्णा प्रामुख्याने दिसते. (रे.चि. पंचेचाळीस १, २).
७) जैन तीर्थंकर व साधू यांच्या प्रतिमा पूर्ण दिगंबर असतात, फक्त अर्धफालक संप्रदायाचे साधू याला अपवाद आहेत.
८) बसलेल्या तीर्थंकरांचे आसन कधी कधी सिंहाच्या डोक्यावर दिसते, हे त्याचे चक्रवर्ती पदांचे द्योतक होय.
९) कुषाणकालीन तीर्थंकर प्रतिमेचा एक दुसरा प्रकार म्हणजे 'सर्वतोभद्र' प्रतिमा हा होता (चित्र १७२). या प्रतिमेंत चार दिशांकडें तोंड करून उभे असलेले चार तीर्थंकर दाखवतात. बहुतेक यांच्या पैकी एक आदिनाथ आणि दुसरा पार्श्वनाथ असतो. बाकी दोन क्रमाने नेमी व महावीर असावेत असा तर्क करता येतो. मथुरेच्या प्रारंभिक कुषाण कलेतही मुख्यत्वे याच चार जिनांचे अंकन मिळते.

लाञ्छनें :
   चोवीस तीर्थंकरांच्या प्रतिमा जवळ जवळ एकसारख्याच असल्यामुळे त्यांची वेगळी ओळख पटण्याचे मुख्य साधन म्हणजे लांछन होय; पण लांछनाचा प्रारंभ सुरुवातीच्या कलेत झालेला नाही. कुषाणकाळांत आदिनाथाची ओळख त्याच्या खांद्यावर दिसणाऱ्या केसांच्या बटा, पार्श्वनाथाची डोक्यावरची सर्पफणा व नेमिनाथाची त्याच्या आजुबाजूला असलेले वासुदेव आणि बलभद्र ही होती. या चिन्हांव्यतिरिक्त प्रतिमेवर अंकित लेखांत तीर्थंकरांचे नांव असले तरच ओळख पटणे शक्य असे. अभिलेखांच्या मदतीने मथुरेच्या कुषाण कलेत आतापर्यंत खालील तीर्थंकरांची ओळख पटली आहे :
संभवनाथ (ल.सं.सं.जे.१९)
ऋषभनाथ (ल.सं.सं.जे. २६)
अरिष्टनेमी (ल.सं.सं.जे. ८)
मुनिसुव्रत (ल.सं.सं.जे. २०)
वर्धमान (ल.सं.सं.जे. ९, १४, १६, २२, ३१, ३४, ४५ वगैरे)
पार्श्वनाथ (ल.सं.सं.जे. ६७)
शांतिनाथ (ल.सं.सं.जे. २३२)
सुमतिनाथ (म.सं.सं. ४७.३३३३)

गुप्तकाळातही फारशी लांछने आलेली नाहीत, पण प्रारंभ मात्र झालेला दिसतो. राजगीर (बिहार) येथून मिळालेल्या नेमिनाथाच्या गुप्तकालीन अभिलिखित प्रतिमेच्या पायशिळेवर त्याचे लांछन 'शंख' यांचे दर्शन घडते." श्वेतांबर किंवा दिगंबर वाङ्मयात मात्र लांछनाचा उल्लेख सातव्या आठव्या शतकांपर्यंत दिसत नाही.'

गुप्तकालीन तीर्थंकर प्रतिमा :
    मथुरेपुरते बोलावयाचे झाल्यास कुषाण काळापेक्षा गुप्तकाळांतील तीर्थंकर प्रतिमांचा आकडा कमी आहे. ऊर्णाचिन्ह आता लुप्त होते, मुखांवर प्रसन्नतेची छटा दिसू लागते, कान खांद्यापर्यंत लोंबतात व प्रभामंडळाच्या अलंकरणांत वैविध्य दृष्टीगोचर होते (चित्र १७३).
    त्याचप्रमाणे परिवार देवतांचीही वाढ होते. मालाधारी गंधर्व, चामरधारी सेवक, पूजन सामग्री घेऊन उडणारे देव, वगैरे दिसू लागतात (ल.सं.सं.जे. ११८, जे ११९, ते १२१; म.सं.सं. १२.२६८, बी ६ बी ७ इत्यादि). उतरत्या गुप्तकालांपासून आठ ग्रह दिसू लागतात (म.सं.सं.बी. ७५). पुढें त्याचा आकडा नऊ होतो. तीर्थंकराची विशिष्ट शासनदेवी आणि यक्ष हे मात्र दिसत नाहीत.

कुषाणकालीन इतर जैन प्रतीकें :
    १) आयागपट्ट : (चित्रे १७४, १७६) तीर्थंकर प्रतिमांचे लोकप्रियता वाढण्याचे अगोदर जैनांचे आवडते पूजन प्रतीक दोन-सव्वादोन फूट लांबीचा वर्गाकार दगड असे. याच्यावर स्तूप, धर्मचक्र, स्वस्तिक, तीर्थंकर प्रतिमा, त्रिरत्न, अष्टमंगल चिन्हे वगैरे कोरलेली असत. अशा दगडांवरील लेखांत त्याला आयागपट्ट ही संज्ञा दिली असून तो 'पूजेकरिता बसविला गेला' अशी नोंद आढळते. मथुरेहून असे बरेच आयागपट मिळाले आहेत. (ल.सं.सं.जे. २५२ जे. २५०, जे २४८, जे २५३ इत्यादि म.सं.सं.क्यू. २) कुषाण काळानंतर यांची लोकप्रियता मावळलेली दिसते.
    २) स्तूप : कोणत्याची मान्य व वंदनीय अशा आचार्यांच्या उत्तरक्रियेनंतर त्याचे अवशिष्ट पाञ्चभौतिक अवशेष एका घटांत-धातुकरण्डकांत स्थापन करून त्यावर छत्राच्या आकाराची 'स्तूप' नावाची वास्तू उभारीत. स्तूप बांधण्यांची पद्धत जैन व बौद्ध या दोघांसही मान्य होती. दोघांतही 'स्तूप' हे उपासनेचे प्रत्यक्ष प्रतीक मानले जात असे (चित्रे १७५, १७६, १७८). बौद्धांत याला फार मान्यता मिळाली, व त्यांचे स्तूप भारतभर पसरले. त्यांच्याबद्दल पुढे पाहू. वाङ्मय आणि पुरातत्त्व यांचे आधारावर असे विधान करणे शक्य आहे की पूर्वी कोटिकापूर, पावा, पाटणा (पाटलीपुत्र). कलिंग देश, पेशावर वगैरे जागी जैन स्तूप होते, पण त्यापैकी मथुरेच्या स्तूपांइतका सुप्रसिद्ध कोणताच नव्हता." मथुरेला आज ज्या ठिकाणी कंकाली टीला म्हणून जागा आहे (आता त्या शेजारी एक महाविद्यालय उभे आहे) त्या ठिकाणी इसवीसनाच्या सुरवातीच्या शतकांत एक महास्तूप होता. येथूनच जैन धर्माची प्रारंभिक काळातील हजारो शिल्पें आपल्या हाती लागली आहेत.
    ३) चैत्य वृक्ष : बोधिवृक्षांप्रमाणे तीर्थंकरांच्या निमित्तानें काही वृक्षांना पावित्र्य मिळाले पण येथे बौद्धांप्रमाणे यांचे फार माहात्म्य वाढलेले दिसत नाही, त्याचप्रमाणें या वृर्भात वैविध्यही दिसत नाही. दक्षिणेंत तीर्थंकर

४२४

    प्रतिमेच्या डोक्यावर वृक्ष दाखविण्याची पद्धत बरेच दिवस होती, उत्तरेत ती काही शिल्पांतच दिसते. सुरुवातीच्या कलेत चैत्यवृक्षाचे अंकन कठड्याने घेरलेल्या एका झाडाच्या रूपांत केले जाते.
४) चैत्य स्तंभ : मथुरेच्या एका शुंगकलाकृतीत (चित्र १७७) जी कंकाली टीला येथूनच मिळाली आहे चैत्य स्तंभाच्या पूजनांचे दृश्य अंकित आहे. वरच्या टोकावर सिंह असलेला हा खांब कठड्याने आवृत आहे, व काही मंडळी त्याला प्रदक्षिणा करीत आहेत. (ल.सं.सं.जे. २६८) अशाच प्रकारचे चैत्यस्तंभ स्तूपाच्या अंगणांत उभारले जात. मधुरेहून मिळालेल्या एका आयागपट्टावर स्तूप व त्याच्या जवळचे चैत्य स्तंभ दिसतात (ल.सं.सं.जे. २५५).
याच स्तंभांतून मध्यकाळांत 'मानस्तंभा'चा उदय झाला. मानस्तंभांच्या वरच्या टोकांवर सर्वतोभद्र प्रतिमेप्रमाणे चार तीर्थंकर दिसतात.

चोवीस तीर्थंकर :
तीर्थकरांची साधारण चर्चा मागे झाली आहे. पुढील तक्त्यांत या चोवीस जिनांची लांछने, वर्ण, वृक्ष, वगैरे माहिती संकलित केलेली आहे." 
:
रेखा चित्र ४५


४२५

मध्यकालीन तीर्थंकर प्रतिमा :
    या काळांत जरी स्वतः तीर्थंकराच्या प्रतिमेत काही फरक झाला नाही, तरी प्रतिमेच्या सजावटीत मात्र कित्येक फरक झाले (चित्रे १७९-१८०). जैन ग्रंथात जागोजागी त्या अलंकरणादिकाचे उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ बृहत्कल्पसूत्राच्या मासकल्पप्रकृतिसूत्रांत जिनबिंबाच्या खालील अलंकरणांचा उल्लेख सापडतो.'
१) चेइयदुम (चैत्यद्रुम) : तीर्थंकराच्या मस्तकावर असलेला वृक्ष.
२) पेढ छंदग (पीठ देवच्छन्द) प्रभावळी वर असलेल्या रथिका.
३) छत्ते (छत्र): जिनांच्या मस्तकांवरील छत्र.
४) चामराओ (चामरें) : तीर्थंकराच्या आजुबाजूस उभे असलेले चामरवर यक्ष, उत्तरमध्यकाळाच्या विशेषतः दक्षिण भारतीय प्रतिमांत चामर घेतलेले यक्ष न दाखविता नुसत्याच चौऱ्या दाखवितात.
५) आसण (आसन): जिनांचे मुख्य आसन किंवा सिंहासन.
६) अन्न करणिज्जं (अन्य करणीयम्) इतर अलंकरणें जसे, दोन हरिणांच्या मधे ठेवलेले धर्मचक्र, शासन देव, नवग्रह, इत्यादि.
७) देवदुंदुभि : जिनांच्या छत्रावर एक किंवा एकाधिक देव ढोलके वाजवतांना दिसतात. कधी कधी हा देव इतका अलंकारिक असतो की त्याचे डोके व ढोलके एवढेच दिसते.
८) देव, विद्याधर वगैरे : छत्राच्या दोन्ही बाजूला हत्तीवर बसलेले इंद्रादि देव व आकाशांत माळा घेऊन उडणारे विद्याधर मध्यकाळांत बरेच दिसतात.
९) यक्ष शासनदेवी : तीर्थंकराच्या आसनाजवळ, पायशिळेवर किंवा इतरत्र त्या तीर्थंकराचा यक्ष व शासन देवी आढळते; पण हे अनिवार्य मात्र नाही.
१०) पञ्चपरमेष्ठिन् : बऱ्याचशा तीर्थंकर प्रतिमांत मुख्य जिनाच्या आजुबाजूस चार जिनासारख्या प्रतिमा दिसतात. हे पांच मिळून पंचपरमेष्ठिन् हा गट (म्हणजे अर्हत्, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू) तयार होतो.
११) दोन हरिणांच्या मधे असलेले धर्मचक्र: मूळचे हे बौद्ध प्रतीक बुद्धाने सारनाथ (वाराणसी) येथे केलेल्या धर्मचक्र प्रवर्तनांकडे संकेत करते. मध्य काळांत धर्मचक्राच्या साम्यामुळे जैनांनी ही ते उचलले.
१२) चतुविंशतिका किंवा चौबीसी (चित्र १८१) सर्व तीर्थकरांना एकत्र अंकितकरणारी प्रतिमा चतुर्विंशतिका या नावाने ओळखतात. हिच्या रचनेत साधारणतः आदिनाथ मधे आणि इतर तेवीस आजुबाजूला असतात. कारीतलाई (जि. जबलपूर म.प्र.) येथून कलचुरी काळांतील (सु. १०-११ वे शतक) बरीच जैन शिल्पे मिळाली आहेत. त्यांत आदिनाथाच्या ऐवजी पार्श्वनाथाला मधोमध दाखविणाऱ्या चतुविंशतिका आहेत.''
१३) लांछन : बहुतेक पायशिळेवर यांचे अंकन करतात.

मध्यकाळातील जैनोपासनेची इतर प्रतीकें :
   काही जैनप्रतीकांची चर्चा मागे केलीच आहे. मध्यकाळांतील इतर उल्लेखनीय प्रतीकें खालील होत :



४२८

क) अष्टमंगले' : जैनकलेंत कुषाण काळांपासून अष्टमंगलांचे चित्रण मिळते. जैनांप्रमाणे बौद्ध व ब्राह्मण धर्मातही अष्टमंगल चिन्हांना मान्यता आहे, पण त्यांच्या याद्यांत मात्र काही फरक आढळतात. जैन कलेत आयगपट्टावर दिसणारी आठ चिन्हें म्हणजे (१) माशांची जोडी (मीनयुगल) (२) स्वस्तिक (३) झाकण ठेवलेली भरलेली वाटी (शरावसंपुट) (४) श्रीवत्स (५) पूर्णघट (६) फुलाची टोपली (पुप्फ पडलग) (७) विमान (८) तिवईसह पोथी.
तिलोयपणत्ति ही यादी थोडी निराळी देते." ती अशी १) भृंगार (झारी), २) कलश ३) दर्पण ४) चामर ५) ध्वज ६) छत्र ७) व्यजन ८) सुप्रतिष्ठित (आसन).
ख) सोळास्वप्ने " जैन मान्यतेप्रमाणे शलाका पुरुषांच्या माता ते गर्भात आले असतांना मंगल स्वप्नें पाहतात. शलाका पुरुषाच्या स्तरांप्रमाणे त्यांचा आकडा बदलतो. उदाहरणार्थ तीर्थंकर माता सोळा स्वप्नें पाहते तर बलदेवाच्या आईस चारच दिसतात. तीर्थंकर मातेची सोळा स्वप्ने खालील होत :
ऐरावत, बैल, सिंह, देवी पद्मा श्री (गजलक्ष्मी), फुलांच्या दोन माळा, चंद्र, उगवता सूर्य, कमळांनी भरलेले दोन पूर्ण कुंभ, मीनमिथुन, पुष्करिणी, उसळणारा समुद्र, सिंहासन, विमान, नागेन्द्रभवन, रत्नराशी, निघूम अग्नी. कुठे कुठे जैन मंदिराच्या दारांवर ही सोळा स्वप्ने कोरलेली दिसतात.
ग) सिद्धचक्र किंवा नवदेवता : पंचपरमेष्ठी आणि सम्यक्ज्ञान, सम्यक् दर्शन, सम्यक् चरित आणि सम्यक् तप ही चार पदे असे मिळवून हे नवदेवता चक्र तयार करीत असतात. ही चक्रे जैन संघात पूजनार्थ ठेवलेली असतात.
घ) समवसरण : प्रत्येक तीर्थंकराची देशना किंवा उपदेश ऐकण्याकरिता एका विशाल स्थनांवर देव, मनुष्य, पशू, वगैरे एकत्र होत असतात व चारी दिशांकडे निर्धारित स्थानांवर बसतात. उपदेश देणारा जिन सर्वांना समान रूपानेच दिसत असतो. या विशाल स्थळाची रचना म्हणजेच समवसरणांची रचना होय. समवसरणांची प्रतीकें तयार करून पूजेंत ठेवीत असत. सर्वतोभद्रप्रतिमा (तीर्थंकर चौमुखी) आणि दिगंबर संप्रदायांत दिसणारे मानस्तंभ हे सगवसरणांपासून उचललेले सुलभ असे अभिप्राय आहेत.
जैन देव आणि देवी
      तीर्थंकर प्रतिमा नंतर त्यांचे यक्ष, शासन देवी आणि इतर प्रतिमांचा विचार करू.
     कोणताही तीर्थंकर स्वतः कोणत्याही प्रतिमेचे पूजन करीत नाही. मानवी स्वभावाप्रमाणें त्याचे अनुयायीच त्याचे पूजन करू लागतात. जैन देवता संघाचा उगम मूळ तीर्थंकर प्रतिमांपासून आहे. चोवीस तीर्थंकर, आणि प्रत्येकाचा एक यक्ष आणि एक शासन देवी असा पसारा वाढत जातो; श्वेताम्बर आणि दिगंबरांच्या मतभिन्नतेमुळे त्याचा विस्तार आणीकही मोठा होतो. हा सर्व विस्तार तक्त्याच्या रूपाने पाने ४२६-४२७ वर दाखविला आहे. याला आपण प्रथम वर्गीकरण म्हणू.
या शिवाय जैन उपास्यांचे एक दुसरेही वर्गीकरण महत्त्वाचे आहे ते खालील प्रमाणे होय".
* तीर्थंकर - ऋषभ, अजित, संभव, अभिनंदन, सुमति              २४
               पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभविष्ण

४२९

श्रेयांस, वासुपूज्य, विमल, अनंत, धर्म, शांती
कुथु, अर, मल्लि, सुव्रत, नमि, नेमि, पार्श्व, महावीर

बलभद्र -अचल, विजय, भद्र, सुप्रभ, सुदर्शन, आनंद, नंदन, पद्म, राम
चक्रवर्ती -भरत, सागर, मधवा, सनत्कुमार, शांती, कुंथ, अरह, सुभौम, प्रद्य, हरिषेण, जयसेन, ब्रह्मदत्त
वासुदेव -त्रिपृष्ठ, द्विपृष्ठ, स्वयंभू, पुरुषोत्तम, पुरुषसिंह पुरुषपुण्डरीक, दत्त, नारायण, कृष्ण
प्रतिवासुदेव - अश्वग्रीव, तारक, मेरक, मधु, निशुंभबली, प्रल्हाद, रावण, जरासंध                     ९
         एकूण शलाका पुरुष                                                                          ६३
भीमादि नारद                                                                                             ९
भीमबली इत्यादि रुद्र                                                                                   ११
बाहुबली वगैरे कामदेव                                                                                  २४
प्रत्येक तीर्थंकराचा पिता, एकूण                                                                       २४
प्रत्येक तीर्थंकराची माता, एकूण                                                                          २४
प्रतिस्वाति वगैरे कुलकार                                                                                १४

                                                                                                                      १०६
      जैन देवतासंघाचा पसारा किती मोठा आहे याची थोडीशी कल्पना देण्यांकरिता त्याचे तिसऱ्या पद्धतीचे वर्गीकरण पुढील तक्त्यांच्या रूपाने देत आहे.


४३१

या सर्वांचे विवेचन करणें हा आपला उद्देश नाही व येथे ते संभवही नाही. तेव्हां काही ठळक देव, देवी आणि यक्ष यापर्यंतच आपण स्वतःला सीमित ठेऊ.
नेगमेश किंवा हरिनेगमेशिन् २१ (चित्र १८२)
    बकऱ्याचे तोंड असलेला हा देव देवांच्या पायदळ सेनेचा मुख्य होय. ब्राह्मण जातीची स्त्री देवनंदा हिच्या गर्भातून महावीर वर्धमानाचा भ्रूण संक्रमित करून क्षत्राणी त्रिशलेच्या गर्भात पोचविण्याचे कार्य नेगमेशाने केले होते.
    कुषाणकाळी मथुरेच्या क्षेत्रात याची पूजा बरीच प्रचलित असावी. यांच्या लहान व मोठ्या आकाराच्या प्रतिमा मथुरा व लखनऊच्या संग्रहालयात आहेत (ल.सं.सं.जे. ६२६, मधुरा सं.सं. ३४.२५४७, १५.१११५). याला बकऱ्याचे तोंड असून दोन हात असतात पण हातात आयुध किंवा वाहन, वगैरे विशेष काहीच नसते. कुषाण काळानंतर मात्र हा देव एकदम दडी मारून बसतो याचे वैशिष्ट्ये म्हणजे यांच्या प्रतिमेंत अंगाखांद्यांवर लहान मुलें दिसतात. ब्राह्मण धर्मांत नेगमेशाचा संबंध कुमार किंवा कार्तिकेयाशी होता हे आपण पाहिले आहेच.
रेवती :
    जैन परंपरेप्रमाणे रेवती ही नेगमेशाची शक्ती होय. हिचे तोंड बकरीचे असते. मथुरा संग्रहालयात असलेल्या प्रतिमेत (सं.सं.ई. ४) ही मुल घेतलेली आढळते.
   नेगमेश आणि रेवती हे दोघे आपण मागे विवेचन केलेल्या कार्तिकेय व माता यांच्या गोतावळ्यातलेच वाटतात.
यक्ष :  
यक्षांविषयी थोडी चर्चा मागे झाली आहे. जैनांकडे तीर्थंकराच्या परिवार देवता म्हणून यक्ष-यक्षिणींना स्थान आहे. पुढील तक्त्याने ही गोष्ट जास्त स्पष्ट होईल.
४३६

नारायण आणि बलदेव :

बावीसावा तीर्थंकर नेमि किंवा अरिष्टनेमी याचे बरोबर नारायण आणि बलदेव हे कुषाण काळांपासूनच दिसतात (म.सं.सं. ३४.२५०२, म.सं.सं.जे. ४७, जे. ११७ वगैरे) मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने यांच्यात आणि ब्राह्मण धर्मातील नारायण किंवा विष्णु बलराम ह्यांच्यात काहीच फरक नाही. गुप्तकाळांत व मध्यकाळांतही ही जोडी अशीच दिसते (चित्र १७९).
सरस्वती :
   मथुरा येथील कंकाली टील्यातून मिळालेली जैन सरस्वतीची अभिलिखित प्रतिमा अद्वितीय आहे. कुषाण काळातील या मूर्तीचे विस्तृत वर्णन मागे झाले आहे. (पान २३६ चित्र १८३)
गजलक्ष्मी :
    कंकालीटील्यातूनच कुषाणकालीन गजलक्ष्मीच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. यांचे विवेचन शक्तीप्रकरणांत झाले आहे (पान २१९). यापैकी काही प्रतिमा जैन संप्रदायाशी संबंधित असणे शक्य आहे.
चक्रेश्वरी :
       प्रथम तीर्थंकर ऋषभ याची ही शासनयक्षी, हिच्या हातात चक्र असल्यामुळे हिला हे नांव प्राप्त झाले. हिचे वाहन गरुड होय. चक्रेश्वरी आणि चक्रेश्वरी विद्या या दोघींची ध्याने बरीच सारखी आहेत, फरक इतकाच असतो की विद्यादेवीच्या चारी हातात चक्रे असतात, चक्रेश्वरीच्या हातात अन्य आयुधें ही दिसतात. बऱ्याच ठिकाणी चक्रेश्वरी चतुर्भुजच दिसते पण त्याबरोबरच २,६,८,१०,१२,१६ आणि २० पर्यंतच्या चक्रेश्वरी प्रतिमाही पाहण्यात येतात २४ (दहा हातांची चक्रेश्वरी म.सं.सं.डी.६).
चक्र आणि गरुड यामुळे देवीच्या स्वरूपाचे ब्राह्मण धर्माच्या वैष्णवीशी थोडे फार साम्य उत्पन्न झाले आहे.
अंबिका :
        श्वेताम्बरमते ही नेमीची शासनयक्षी आहे. उत्तरभारतात हिच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात २५. लक्षण ग्रंथांप्रमाणे सिंह हिचे वाहन असून आंबा, पाश, मूल आणि अंकुश हिची मुख्य आयुधें होत. प्रत्यक्ष प्रतिमात मात्र हिची द्विभुज (ल.सं.सं.जी. ३३) आणि चतुर्भुज (ल.सं.सं.जी. ३१२) रूपें दिसतात. ही आंब्याच्या वृक्षाखाली बसलेली असून हिच्या हातात आम्रलुंबी किंवा आंब्याचा झुपका असतो.
हिचे ब्राह्मण धर्माच्या स्कंदमातेशी बरेच साम्य आहे.
पद्मावती (चित्र १८६) :
      ही पार्श्वनाथाची शासनदेवी, हिची एक ओळख म्हणजे डोक्यावरची सापाची फणा ही होय. साधारणपणे ही चतुर्भुज असते. (ल.सं.सं.जी. ३१६). पण दिगंबर परंपरेत हिची सहा आणि चोवीस हातांची ध्यानें विद्यमान आहेत. २६
सिद्धायिका :   
शेवटल्या तीर्थंकराची म्हणजे वर्धमान महावीराची ही शासन देवी चतुर्भुज असून सिंहावर बसलेली असते, पण मूल मात्र हिच्या जवळ नसते.
 ४३७

क्षेत्रपाल :
    क्षेत्रपाल हा उभय संप्रदायांना मान्य आहे. काळा वर्ण, वाकडे दांत, भयंकर मुखाकृती, बर्बर केश, पायांत खडावा, आणि हातांत मुद्गर, डमरू, अंकुश आणि कुत्रा असणे ही त्याची लक्षणे होत. आचारदिनकर वीस हाताच्या क्षेत्रपालाचा उल्लेख करतो. इतरत्रही त्यांचे उल्लेख आढळतात. कुत्रा आणि मुद्गर या त्याच्या फार जवळच्या वस्तु होत व त्या त्याला ब्राह्मण धर्माच्या कालभैरवाजवळ नेऊन बसवितात. जैन देखील त्याची गणना भैरव आणि योगिनींत करतात. मथुरा संग्रहालयात द्विभुज क्षेत्रपालाची प्रतिमा आहे (म.सं.सं. ६०.४८६). त्याच्या उजव्या हातांत दंड असून डाव्यात बरोबर चालणाऱ्या कुत्र्याच्या गळ्याला बांधलेली दोरी आहे. चेहऱ्यावर भीषणता मात्र नाही. चतुर्भुज क्षेत्रपालाच्या प्रतिमा अन्यत्र मिळाल्या आहेत.
श्रुत देवता :
     सरस्वतीच्या प्रतिमेचा वर उल्लेख झालाच आहे. श्रुतदेवींचाही विद्येशी संबंध असतो. मांडु (मध्य प्रदेश) जवळ फिरत असतांना एका मंदिरांत लेखकाला एक दगडी तुकडा पडलेला दिसला ज्यावर एका श्रुतदेवीचे चित्र जरी आता खंडितावस्थेत असले तरी तिच्या वर उचललेल्या डाव्या हातातील पुस्तक ती विद्या देवता असल्याचे पुरेसे प्रमाण आहे. पण याही पेक्षा विशेष म्हणजे तिच्या भोवताली जी कमलदलें काढलेली आहेत त्यांत सूत्रकृताङ्ग, समवायाङ्ग, वगैरे ग्रंथाचा पदसंख्येपूर्वक नामोल्लेख केलेला आहे. (चित्र १८७)२९
प्रस्तुत विषय संपविण्याच्या आधी तीन विशेष प्रकारच्या जैन प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
सवस्त्र तीर्थंकर प्रतिमा :
        साधारणपणें सर्वच तीर्थंकर प्रतिमा दिगंबर म्हणजे पूर्ण नग्न असतात, पण त्याला काही संप्रदायांत अपवाद आहेत. सुमारे दहाव्या शतकांतील मध्यभारतांत मिळालेली एक चतुर्विंशतिकी प्रतिमेत (ल.सं.सं.जे. ९४९) आदिनाथ तलम पण व्यवस्थित वस्त्र नेसलेला दाखविला आहे.
मध्यभारतांतूनच मिळालेली सुमारे बाराव्या शतकाची आदिनाथाचीच सवस्त्र प्रतिमा झुरिखच्या संग्रहालयांत आहे.
गोमटेश्वर :
      कर्नाटकांत श्रवण बेलगोला येथे चामुंडरायाने स्थापित केलेली गोमटेश्वराची जगप्रसिद्ध प्रतिमा आहे. गोमटेश्वर याची गणना तीर्थंकरांत होत नसली तरी जैन परंपरेत त्याचा मोठा सन्मान आहे. खड्गासनांत तप करणाऱ्या या महापुरुषाची एवढी तयारी झाली होती की शेजारच्या लता आणि वेली स्थाणुवत उभ्या असलेल्या त्याचा देहाला विळखा घालीत वर चढल्या. त्यामुळे गोमटेश्वराच्या प्रतिमांची ओळख तिच्या वर दाखविलेल्या लतावल्लरीने होते.
आदि मिथुन किंवा जुगलिया :
     सृष्टीला चालू करणाऱ्या आदिमिथुनाचा मान प्रत्येक धर्मात आहे. उत्तरेत अशा कित्येक प्रतिमा मिळाल्या आहेत ज्यात एका वृक्षाखाली एक जोडपें सुखासनात बसले आहे, खाली मुले खेळत आहेत, झाडावर काही ठिकाणी घोरपडीसारखा एखादा प्राणी चढत आहे आणि झाडाच्या वर बारकेसे जिनबिम्ब ही विद्यमान आहे. (चित्र १८८) हे जोडपे जुगलिया अर्थात् आदियुगल या नांवाने ओळखले जाते.
४३८

टिपा आणि संदर्भ

जैन प्रतिमा
१ Shah 1, pp. 4-5; Shah 9
२ Joshi 25
३ उदाहरणार्थ Shah 1, PI. XXXVI. Fig. 88; ल.सं.सं. J 105 या साधूंच्या पोटाकडे वळवलेल्या डाव्या हातांवर वस्त्राची एक अरुंद पट्टी अशा खुबीने टाकलेली असते की साधूची नग्नता सहज तिच्या आड लपून जाते.
४ उदाहरणार्थ Shah 9, Fig. 3
५ Shah 1, PI. VII, Fig. 18
६ Shah 9 p 6
७Joshi 27, p. 183
८ कंकाली टीला, मथुरा येथून मिळालेल्या कुषाण कालीन जैन कलाकृतीचा बराच मोठा संग्रह लखनऊ येथील राज्य संग्रहालयांत व थोडा मथुरेच्या संग्रहालयांत आहे.
९ Shah 1, pp. 65-76
१० Shah 1, p. 61
११ Gupte 1, pp. 177-78
१२ बृहत्कल्पसूत्र, मासकल्पे प्रकृतिसूत्र, १, ११, ८० भावनगर, १९३६, पान ३६६; Joshi N.P. Some Interesting Passages from Brhatkalpasutra, BMA., 8 December 1971 pp. 55 56
१३ Shah 9, pp. 8-9 १३
बालचंद्र जैन, कारीतलाई की जैन कलाकृतियाँ, पहा जोशी २९ 
१४ Shah 1, pp. 109-112
१५ तेच पान १११
१६ तेच पार्ने १०५-११२
१७तेच पार्ने ९७-१०३
१८ तेच पार्ने ८५-९५
१९ त्रिषष्ठोशलाका पुरुष चरित्र Oriental Institute, Baroda, 1962; Shah 9 p 10
१९ डॉ. हीरालाल जैन, भारतीय संस्कृति में जैनधर्म का योगदान, भोपाल, १९७२ पृ. १०
२० Bihler 1, pp. 72-74
२१ Bhattacharya 1, pp. 178-81
२२ Gupta 1, pp. 179-80
२३ तेच पाने १८१-८२
२४ Shah 6
२५ Shah 9, p. 12 अपराजितपृच्छा, २२१.३६ पान ५६८ येथे फक्त द्विभुज अम्बिकेचा उल्लेख आहे.

४३९

चतुर्भुजध्यानासाठी पहा रूपमण्डन ६. १९, पान २०८; पृ. १०१ टीप ५.
२६   Shah 9 p. 13
२७  Shah 4
२८  Shah U.P. Ksetrapala in Jain Iconography, श्री महावीर स्मृतिग्रंथ (भाग १) १९४८-४९, आगरा पृ. २२१-२६
२९   शास्त्रांच्या अशा याद्या वस्त्रांवर किंवा धातूंच्या तुकड्यांवर लिहून ठेवण्यांची पद्धत जैनांत आहे. प्रो. क्लास ब्रून यांनी लेखकाला ६ मार्च १९७४ रोजी लिहिलेल्या पत्रांत ललितपुर (उ.प्र.) येथील मंदिरात संभवतः क्षेत्रपाल मंदिरात असलेल्या अशा याद्याची नोंद केली आहे.  
     या शिळाखण्डावर डॉ. उमाकांत शहा यांचे मत नक्कीच हा जैन श्रुतस्कंध यंत्राचा तुकडा आहे. त्याच्यावर श्रुतदेवता (सरस्वतीचें चित्र) आहे. तूर्त हे सांगता येणार नाही की हे शिल्प दिगंबर परंपरेला अनुसरून आहे अथवा श्वेतांबर - लेखकाला लिहिलेले डॉ. शहाचे इंग्रजी पत्र. JISOA/181 दि. ५ नोव्हेंबर १९७४

***

बृहद्‌भारतांतील देवमूर्ती

आरंभ-
भारतीय इतिहासांच्या निरनिराळ्या कालखंडात शेजारच्या ज्या ज्या देशांशी भारताचे दळणवळण राहिले व या निमित्ताने भारतीय संस्कृती ज्या ज्या ठिकाणी पसरली ते सर्व क्षेत्र भारताच्या सांस्कृतिक दिग्विजयामुळे 'बृह‌द्भारतांत' समाविष्ट होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास अफगाणिस्थान, तिबेट, नेपाळ, चीन, ब्रह्मदेश, थायलँड, कम्बोडिया, लाओस, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया या नावाने ओळखली जाणारी जावा, बाली, सुमात्रा, वगैरे बेटें आणि श्रीलंका हे आपल्या अवती भोवतीचे सर्व देश बृहद्भारत या नावाखाली मोडतात यापैकी भारतीय राजांचे प्रत्यक्ष शासन फार थोड्या ठिकाणी व ते सुद्धा विशिष्ट कालापुरतेच मर्यादित होते, पण त्या मानाने इस्लामाच्या व्याप्तीच्या अगोदरपर्यंत हे देश बव्हंशी भारतीय तत्त्वज्ञान आणि विचार परंपरेचे अनुगामी होते. उदाहरणार्थ, दक्षिणपूर्व अशियातील अनेक राष्ट्र सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने भारताशी संबद्ध होती; पण राजकीय रूपांत मात्र त्याचे संबंध चीनशी जवळचे असत. आज देखील जरी ही राष्ट्र सार्वभौम सत्तेचा उपभोग घेत असली आणि त्यापैकी अनेकांनी इस्लामाचा स्वीकार केला असला तरी तत्तद्देशीय संस्कृतीत अजूनही भारतीयत्वाचे थोड्या बहुत प्रमाणात नक्कीच दर्शन घडते.
या सभोवारच्या भूप्रदेशांत भारतीय संस्कृतीची पाळेमुळे खोलपर्यंत गेली यांचे श्रेय एका, व्यक्तीला एका कालखंडाला किंवा भारताच्या एका भागाला देता येत नाही. भारतीय संस्कृतीचा हा वेल निरनिराळ्या कारणाने पसरत गेला. काही कारणे खालीलप्रमाणे होत :

१. अशोकाचा धर्मप्रचार :
मौर्यवंशातील सुप्रसिद्ध बौद्ध राजा अशोक याने बौद्ध मताचा प्रचार करण्याकरिता निरनिराळ्या ठिकाणी बौद्ध भिक्षु पाठविले हे सुप्रसिद्ध आहे. यवन धर्मरक्षित हा अफगाणिस्थानांकडे, आर्यधीतिक हा काश्मीरकडे, महेन्द्र आणि संघमित्रा हे लंकेकडे आणि यावप्रमाणें इतर भिक्षु वेगवेगळ्या बाजूला गेले होते.

२. व्यापार :
आपल्या मालाचा खप वाढविण्याकरता व्यापाऱ्यांचे तांडे समुद्रमागनि बाहेर जात असत, काही बऱ्याच काळपर्यंत तिकडेच राहात व आपल्या वसाहतीही कायम करीत. हे व्यापारी साहजिकच आपल्या माला बरोबर भारतीय संस्कृतीचे लोण देखील दूरपर्यंत पोचवीत. हेच लोक जेव्हा विवाहादि करून वसाहती करीत तेव्हा त्या देशाच्या मूळ संस्कृतीशी भारतीय संस्कृतीची सरमिसळ होत असे. या बाबतीत नियम असा आहे कीं असमान रूपांच्या दोन संस्कृती जवळजवळ

४६८

आल्यास श्रेष्ठ संस्कृतीचा कनिष्ठ दर्जाच्या संस्कृतिवर पगडा बसतो. बुद्धगुमासारख्या 'महानाविकांनी' निरनिश आल्यास श्रेष्ठ संस्कृतीचा कनिष्ठ व्यापितरांत भारतीय संस्कृती पसरली. पूर्वी इंडोनेशियाकडील बेटे 'दीपनों म ओळखली जात. या लोकामुळेच भारतीय नांवे, भारतीय शहरें, तीर्थे आणि नद्या, भारतीय भाषा, राहणी, रामायण महाभारतादि इतिहास ग्रंथ आणि पुराणे, भारतीय शिल्पे, वगैरे अनेक गोष्टी बृह‌द्भारतात दिसतात.
३. राजकीय संबंध आणि दिग्विजय :
संस्कृती प्रसाराचे व्यापाराइतकेच हे ही एक महत्त्वाचे कारण आहे. शासकांचे वैवाहिक संबंध, वकीलाची वे आणि दिग्विजय यामुळे लोकांचे दळणवळण वाढत गेले. मौर्य, सातवाहन आणि गुप्त राजे जवळ आरमाराची व्यवस्था होती, त्यामुळे पुष्कळांची द्वीपांतरांकडेही सहज झेप जात असे. अकराव्या शतकांतील चोळ राजांनी तर सुमात्रा आणि मलय देशात दिग्विजय संपादन केला होता. असे जरी असले तरी या नव्या वसाहतीचा मायदेशाशी प्रत्यक्ष असा राजकीय किंवा सामाजिक संबंध चिरकाळापर्यंत टिकून राहिला असावा असे वाटत नाही.
वर केलेल्या चर्चेचा निष्कर्ष एवढाच कीं बृहद्भारतात तयार झालेल्या या वसाहती फारशा राजकीय स्वरूपाच्या नसूर बऱ्याचा अंशी वैयक्तिक प्रयत्नानेच अस्तित्वात आल्या होत्या व याच्या मुळांशी धर्माचा प्रसार आणि व्यापार उदीमाची वाढ ही मुख्य कारणे होती. अशा प्रकारच्या घडामोडीचे बरेच उल्लेख जातक कथा, पुराणें, कथा सारित्सागरासारखे गोडीचे ग्रंथ, वगैरे भारतीय वाङ्मय आणि तसेच सिंहली व चिनी साहित्यात ही आढळतात. वाङ्मयीन प्रमाणांव्यतिरिक्त या निरनिराळ्या वसाहती संबंधी प्रत्यक्ष अशी बरीच सामुग्री पुरातत्त्वज्ञांकडून समोर आणली जात आहे. बृहद्-भारतातील भारतीय वसाहतीचे सुंदर असे शब्दचित्र या सामुग्रीच्या मदतीने उभे केले जाऊ शकते, पण तो एका छोट्याशा प्रकरणात आवरण्यासारखा विषय नाही. फार उंचावरून केलेल्या विहंगावलोकनाचा हा तोकडा प्रयत्न निर्भळ दुधाची तहान ताकाच्चा पुळकावणीने भागविण्यासारखाच आहे. तरी पण त्यामुळे विषयाची ओझरती कल्पना तर खचितच येईल.
आपण हिमालयाच्या पायथ्यापासून बृहद्-भारताच्या विविध देशांची प्रदक्षिणा सुरू करू.

तिबेट :
भारताच्या उत्तरेकडे स्थित असलेला त्रिविष्टप, तिबेट किंवा तिब्बत या नावाने ओळखला जाणारा हा पर्वतीय मुलुख काही वर्षांपूर्वीपर्यत अर्थात् चीनच्या कम्युनिस्टी पंखांत समावण्याच्या अगोदर पूर्णपणे स्वतंत्र होता. तेथे बौद्धधर्माचा प्रवेश होण्यापूर्वी 'बोन्' किंवा 'बोन पो' नांवाचा धर्म चालत असे. सन् ६३० ते ६४१ च्या मध्यें तत्कालीन तिब्बती राजा स्रोग्-चन्-गम्बो याने नेपाळची राजकन्या भुकुटी व चीनच्या राजाची ताइपसुंग याची-मुलगी वेन चेंग यांच्याशी विवा केले. या लग्नाचे परिणाम दूरगामी झाले व तिबेटची धार्मिक स्थिती त्यामुळे फार बदलली. नेपाळी राणीने तेथे बौद्धधर्माचे बी पेरले. हे बौद्धमत महायान संप्रदायाचा पुरस्कार करणारे असून अवतारवाद आणि भला थोरला देवतासंघ यांचा पुरस्कार करीत असे. तिबेटमध्ये या मताची स्थापना व प्रसार करण्याचे कार्य नालंदा विद्यापीठातून गेलेल्या भिक्षु पद्मसंभवाने केले. गुरु रिन्-पो-छे या नावाने प्रसिद्धी पावलेला पद्मसंभव आठव्या शतकात तिबेटी राजाचे आमंत्रण स्वीकारून तिकडे गेला होता त्याने आपल्या नवीन धर्मात जुन्या स्थानीय धर्मात मान्यता पावलेल्या भूत-प्रेतादिकांचाही समावेश करून घेतला.
पद्मसंभवाव्यतिरिक्त आचार्य शांतिरक्षित (सन्‌७४०-८०९), दीपङार श्रीज्ञान किंवा अतीश (सन् ९८२-१०५४)

४६९

बृह‌द्भारतातील देवमूर्ती :- 
बगैरे बौद्ध भिक्षु पंडितांनी तिबेटमध्ये बौद्धधर्माला बळकट केले, पण नव्याने प्रतिष्ठित झालेला हा बौद्धधर्म तथागत गौतमबुद्धाने प्रतिपादित केलेल्या मतापेक्षा निराळेच बाळसे धरत गेला व फारच जलद गतीने वज्रयान किंवा वाममार्गाकडे जाऊ लागला. भयोत्पादक गोष्टी आणि कामुकता याकडे चांगलाच कल असणाऱ्या तिबेटमध्ये मद्य, मंत्र, हटयोग आणि कामिनीला प्राधान्य देणारे वज्रयानमत लोकप्रिय होऊ लागले.
नवव्या शतकांत तिबेटने चीनचा काही भाग जिंकला व त्यामुळे तिकडे ही या धर्माचा फैलाव होऊ लागला. मंगोलांच्या आक्रमणानंतर चीनने देखील तिबेटी बौद्ध धर्माला आपला राजधर्म म्हणून स्वीकारले. या प्रमाणे भारतातून बौद्ध धर्माचा लोप झाल्यावर तिबेटमध्ये वज्रयानाच्या रूपात तो अस्तित्वात राहिला. हळुहळू या मताचे स्वरूप फार विकृत होऊ लागले व त्याचे शुद्धीकरण अपरिहार्य झाले. हे महान् कार्य चौदाव्या शतकाच्या शेवटी चोड्ङ्खपा नांवाच्या आचायनि केले. आज तिबेटचे धार्मिक संप्रदाय एकूण डिग्मपा, करग्यूत्या, गेलुक्पा वगैरे दहा शाखात विभक्त आहेत. तिबेटच्या धार्मिक विश्वासांचे चित्रण तेथील कलेत झाले आहे. जरी तेथे बौद्ध धर्माची मुहूर्तमेढ सातव्या शतकात रोवली गेली तरी तेथील कलेच्या विकासाचा मूळ स्रोत बंगालच्या पाल व सेन वंशाच्या कलेत (८ते१२ वे शतक) पहावयास सापडतो. सुरूवातीच्या कलाकृती आता दुर्मिळ आहेत पण परंपरेच पालन करण्याविषयी हे लोक फारच दक्षता बाळगीत असल्यामुळे नव्या कलाकृतीतही जुनेच कित्ते गिरवले गेले आहेत.
तिब्बती उपासना पद्धतीत मूर्ती व चित्रे किंवा 'धंका' यांना समान महत्त्व आहे, व त्यांच्या परंपरा ही सुदृढ आहेत. ही चित्रे भिंत, सुताचे किंवा रेशमी कापड, खास प्रकारचा कागद, लाकडी फळ्या वगैरेच्या 'भूमी' वर काढीत असत. आपले रंग आणि ब्रश हे स्वतःच तयार करीत. ठराविक पद्धतीने ठेवलेले बिंदू, त्यांना जोडणाऱ्या सरळ व वक्र रेखा हळुहळू परंपरांगत आकार घेत जात व देवतेचे चित्र प्रगट होत असे. या प्रसंगाने लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काश्यांच्या किंवा तांब्याच्या धातुमूर्ती साधारण लोक ही तयार करू शकत पण 'थंका' चे निर्माण मात्र विशेष प्रकारची व्रत वैकल्यें करून आलेख्य देवतेचे समाधीत प्रत्यक्ष दर्शन करण्याचा अधिकार प्राप्त झालेला लामा वर्गच करू शकत असे. या प्रकारे तयार झालेल्या चित्रांची पुनः चांगल्या मुहूर्तावर प्रतिष्ठा केली जात असे, त्याच्या पृष्ठ भागावर पवित्र मंत्र लिहीत व इतर मान्य लामा तेथे आपल्या तळव्याचे छापही उमटवीत.
तिबेटी मठ हे तेथील प्रतिमा विज्ञानाचे जिवंत कोष होत. सोने, चांदी, तांबे, कांसें, दगड, लाकूड आणि माती या निरनिराळ्या माध्यमानें प्रतिमा घडवितात. या प्रतिमा बुद्ध, बोधिसत्व, तारा, डाकिणी, यिम्, धर्मपाल, ऐतिहासिक व्यक्ति, अमानुषीय तत्त्वें, वगैरे अनेक वर्गात वाटता येतील, तसेच शांत आणि उग्र असेहि यांचे वर्गीकरण करता येईल. बोधिसत्त्वासारख्या शांत प्रकृतीच्या देवता पांच शृंगाचा मुगुट, कुंडलें, निरनिराळे दागिने, सभ्य लोकासारखी शाल, उपरणी, वगैरे वर्षे ल्यायलेल्या दिसतात. धर्मपालासारख्या उग्रदेवांच्या प्रतिमेत पांच कवट्यांचा मुगुट, सर्पाचे दागिने, कधी कधी हत्ती किंवा वाघाच्या कातड्याचा नेसण्याकरिता वापर, माणसांच्या हाडांची आभरणे, वगैरे गोष्टी प्रामुख्याने दिसतात. बुद्ध व अन्य आचार्य भिक्षुवेषांत असतात, तर या उलट खचोद्‌द्यासारख्या देवी नग्न असतात. तिब्बती देवतामध्ये तांत्रिक प्रकाराचाही सुळसुळाट आहे. एक तोंड आणि दोन हाताच्या मूर्ती साधारण कोटीतल्या होत, पण एकाधिक मस्तकें, हात, पाय तसेच वज्र, घंटा, किंवा कपालपात्र, कपालवाद्य, खट्वाङग, सुरी, परशू, वगैरे आयुधें तांत्रिक प्रकाराची द्योतक आहेत. 'यक्-युम्' स्थिती हा तिब्बती प्रतिमाचा एक दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे (चित्र २०८). यांत माता-पित्याच्या रूपांत असलेला देव आणि त्याची शक्ती संयुक्त स्थितीत अंकित केली जाते.

४७०

आचार्य पद्मसंभवाचे आदरपूर्वक स्मरण करविणारा 'ॐ मणिपोहूं' हा तिबेटचा महामंत्र आहे. तो प्रकाराने आढळतो. महायान मतानें अनुप्राणित असल्यामुळे तिबेटी देवता संघाचा पसारा फार मोठा आहे. मंजुश्री, चक्रसंवर (ब्राह्मण धर्मातील शंकराचे प्रतिरूप), गुह्यसमाज किंवा चक्रसंवराचा अवतार, यमांतक कि धर्माच्या यमाशी संबद्ध देव), वज्रसत्व किंवा आदिबुद्ध, वज्रधर, बोधिसत्त्व लोकेश्वर, विध्नान्तक, महाकाल, सच्चा किंवा वज्रयोगिनी खेचरी (संवराची शक्ती), महाकाली, तारा, दीपङ्कर श्रीज्ञान (अतिश), सोड-चन्-गम्पो (बोदा प्रवर्तक राजा), आचार्य चोडखपा आणि कित्येक धर्मपाल यांची प्रामुख्यानें गणना करावी लागेल.

नेपाळ :- 
एका मोठ्या जलाशयाला नेपाळच्या सुंदर भूमीत परिवर्तित करण्याचे श्रेय हिंदूपरंपरेप्रमाणें श्रीकृष्णांकडे व बंद परंपरे प्रमाणें बोधिसत्त्व मंजुश्रीकडे जाते. पौराणिक काळातील या घडामोडीला अर्थातच ऐतिहासिक आधार नाही, या एवढे मात्र खरे की नेपाळचा इतिहास म्हणजे सुरुवातीपासूनच हिंदूराजवंशाचा इतिहास आहे. आपणास इ. सनापू ४०० च्या अगोदरचा नेपाळचा इतिहास साकल्यानें मिळत नाही. इ. सनापूर्वी तिसऱ्या शतकांत हा मौर्य साम्राज्याचा भाग असावा. अशोक याने निश्चितपणे लुंबिनीची यात्रा केली होती. इ.सन् ३००ते ८५० च्या दरम्यान नेपालमा लिच्छवी वंशाचे राज्य होते. पण या राजांचे सन् ५०६-६४१ मध्ये तेथीलच गुप्त वंशाशी भांडण जुंपलेले होते, व त्यां कधी एकाची तर कधी दुसऱ्याची सरशी होत गेली. गुप्तांच्या काळांत नेपाळमध्ये वैष्णव धर्म बराच लोकप्रिय झाला.
सातव्या शतकांत नेपाळमध्ये यादवी माजली व या सुमारास तिबेट आणि चीन यांचाही तेथे संबंध येऊ लागला नेपाळचा भारताशी पुढच्या काळांत जास्त दाट असा आलेला संबंध म्हणजे बंगालच्य पाल आणि सेन राजवटीन होय, नेपाळच्या मध्यकालीन कलेला पालकलेची उपशाखा म्हणता येईल. बंगालकडे मुसलमानी अंमल सुरू झाल्यानंत तर इकडच्या कित्येक लोकांनी विशेषतः शिल्पी मंडळीनी नेपाळांत आश्रय घेतला व आपल्या परंपरागत कलेची साधर करीत राहिले. तिबेटकडे जाणारे दीप‌ङ्कर अतीश या सारखे बौद्ध आचार्य व पंडित जाता येतां नेपाळमध्ये मुक्काम ठोकोत असत. नेपाळ आणि भारताचे धार्मिक आणि सामाजिक संबंध मध्यकाळातच नव्हे तर आजतागायत चांगलेच ह आहेत.
नेपाळमध्यें वैष्णव, शैव आणि बौद्ध अशी तीन मतें मान्य असल्यामुळे तिकडील प्रतिमा ही बव्हंशी याच चौकटंग बसतात. मागें विष्णुप्रकरणांत आपण नेपाळमधील विष्णुप्रतिमांचा विचार केलेला आहे (पहा पार्ने १११-११४).

शैव प्रतिमा :-
लिच्छवी राजवटीत नेपाळमध्यें शैवमताला राजधर्म होण्यांचा मान मिळाला. तेथील शैव मंदिरात पशुपतिनाथ मंदिराची सर्वात जास्त मान्यता आहे. गुप्तकाळांत बांधलेल्या या मंदिराचा सन् १३४९ मध्ये बंगालचा शमसुद्दीन इलियास याने विध्वंस केला. पण सन् १३६१ मध्ये त्याचा पुनरूद्धार केला गेला. येथील पशुपतिनाथाचे चतुर्मुख सिंग परंपरेच्या धर्तीवर आहे. देवाच्या हातांत घट आणि माळा आहे.
नेपाळच्या पुढील राजवंशात ठाकुरी, आणि मल्ल राजे शैव होते. कित्येक स्वतःला 'परमशैव 'परममाहेश्रा की ब्रीदें लावीत. या प्रमाणें मुबलक राजाश्रय मिळाल्यामुळे नेपाळमध्ये शिवाचे प्रतिमा-वैविध्य दिसणे साहजिकच आहे पाषाण, धातू आणि लाकूड अशा विविध माध्यमांत तयार झालेल्या शैव प्रतिमा नेपाळमध्ये भरपूर मिळतात, रेपचा
(पापा ७५-७६) केली आहे. तसेच नेपाळच्या मंत्राचाही ओझरता उद्देख झालेला आहे (पान २०४). तेव्हां त्यांचा पुनरुच्चार न करता आपण पुढे जाऊ

शक्तिप्रतिमा : -
शक्तिप्रतिमांत पार्वती, दुर्गा व महिषमर्दिनीच्या मूर्ती बऱ्याच मिळतात विशेष नोंद करण्यासारखी प्रतिमा म्हणजे भकापूर येथील आर्ट गॅलरीत ठेवलेली आश्भुजा हरिशंकरी ही होय. समोर तीन व डोक्यावर एक मुख असलेली ही देवी राज्यांत बनमाला, उजव्या कानांत रत्नकुंडल, डाव्यांत पत्र कुंडल व सध्या असलेल्या तीन हातांत मुंड, एक लांब अशी बस्तू आणि कमळ घेऊन आहे. तिचा डावा रोज उन्नत आहे.

बौद्ध प्रतिमा :-
कलेच्या दृष्टीने नेपाळमधील बौद्ध मताला तेथे प्रचलित असलेल्या ब्राह्मण धमपिक्षा वेगळ्या चौकटीत बसविता वेणार नाही. नेपाळमध्ये महायान मताचा प्रचार वसुबन्धुने केला (सुमारे ४थे शतक), नंतर सुमारे ८व्या शतकांत शांतिरक्षित, पयसंभव, कोमजशील वगैरे बौद्ध पंडितानी तेथे वज्रयानाची मांडणी केली. या कार्याला सुमारे ११व्या शतकांत अतीश दीपङ्‌कराने फार मोठा हातभार लावला. नेपाळच्या बौद्ध प्रतिमा बव्हंशी धारणी किंवा शिल्प ग्रंथांवर आधारित आहेत. पाषाण आणि धातू ही यांची मुख्य माध्यमें होत. त्यांच्यावर अर्थातच पालकलेची चांगलीच छाप आहे, किंबहुना बऱ्याच प्रतिमा तर पाल कलाकृतीच वाटतात. विशेष म्हणजे येथील दगडीमूर्तीवरही धातु कामासारखीच नक्षी, दागदागिन्यांची घडण, कोमल भाव, वगैरे अंकित करण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. नेपाळच्या अनेक मंदिरांत आणि मठांत या प्रतिमांचे संग्रह पाहता येतात. सुरुवातीच्या नेपाळी प्रतिमा तांब्याच्या आणि काश्याच्या आहेत. पुढे तांब्याबरोबरच पितळाचाही उपयोग होऊ लागला कित्येक प्रतिमावर सोन्याचा मुलामा केलेला असतो व उत्तर मध्यकालांत त्यावर रत्ने व इतर मौल्यवान खडेही लावलेले दिसतात. बुद्धाव्यतिरिक्त, अवलोकितेश्वर, अनेक बोधिसत्व, मंजुश्री व त्याची रूपें (चित्र-२०५) तारा, उष्णीषविजया (चित्र-२०४), इन्द्र, जम्भल (चित्र२०६) वगैरे महायान मताच्या कित्येक देवता नेपाळच्या धातुकलेत आढळतात.

पूर्वेकडील देश :-
भारताच्या पूर्वेस ब्रह्मदेश, थायलँड, चीनचा भाग, मलय राज्य आणि इंडोनेशियाचा द्वीप समूह आहे. दक्षिण-पूर्व आशियातील ही राज्यें सांस्कृतिक दृष्टीने भारताशी निगडित होती. पण राजकीय रूपांत मात्र त्यांचे चीनशी फार जवळचे संबंध होते. सांस्कृतिक संबंधामुळे भारतीय उपासनाशास्त्राचा येथपर्यंत साहाजिकच विस्तार झाला. त्याचा धावता आढावा येथे प्रस्तुत करीत आहे.

ब्रह्मदेश :-
ब्रह्मदेशांत मोन किंवा तलैंग आणि प्यू या सर्वात जुन्या जाती होत्या. मोन किंवा तलैंग हे भारतात असलेल्या तेलंगणातून पूर्व-समुद्र मार्गे ब्रह्मदेशाच्या खालील भागांत वसाहत करून राहिले व नंतर ते इकडेतिकडे पसरले. बातोन ही त्यांची राजधानी. यांनी हीनयानी बौद्धमताचा अवलंब केला असावा असा तर्क आहे. दुसरी जुनी जात म्हणजे प्यू. हे तिब्बती ब्रह्मी लोक होत. प्रोम किंवा जुनें हॅम्वझा (Hmawaza) हे नगर त्यांची राजधानी होती. सुमारे सन् ८०० त

प्रोभचे राज्य संपले व यू लोकांचा इतर ब्रह्मी जातीत समावेश झाला.
या देशात बौद्ध आणि ब्राह्मण दोन्ही धर्म बरोबर नांदत होते. ही गोष्ट हम्वना येथील 'खिनबा झालेल्या खोद कामांतून मिल्लालेल्या सामुग्रीने उघड होते.
बतादेशांत बेस्वाद आणि पालिभाचे बरोबरच महायान आणि संस्कृत यांना ही आश्रय मिळाला होता. कि खोर काथांत चांदीचा मुत्यमा चढविलेला १६०२६" आकाराचा एक स्तूप मिळाला आहे. त्यावर चारी दिशास बुद्धप्रतिमा असून प्यू आणि पालिभाषेत दोन ओलीचा एक लेख ही आहे. या लेखांची अक्षरें वनवासीचे कदंब कांचीचे पठन यांच्या काळातील (५-६ वे शतक) तेलगू कानडी वळणाची आहेत. या शिवाय येथून सुमारे ७-८ शत्रुकांतील दोन सोन्याच्या बुद्धप्रतिमाही मिआल्या आहेत. गुप्रकालीन वळणाच्या पाषाणाच्या आणि काश्याच्या बुढ बौद्धधर्माचे प्राचीनत्व सहज सिद्ध करतात. बौद्ध कलेचा परम उत्कर्ष पगान येथे दिसतो. सुमारे सन् ८४९ पासून बाह अस्तित्वांश सुरुवात झालेली दिसते, पण याचे खरे महत्व सन् १०६० पासून वाढू लागले व पुढील काही वर्षात पान फका ब्रह्मदेशातच कन्हे तर संपूर्ण पूर्वेत फार मोठे बौद्ध केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले व आजही त्याचे मानाचे स्थान टिक आहे. बौद्ध मठ व मंदिरे यांची तेथे फार मोठी संख्या आहे. पगानच्या सोळा मैलाच्या परिसरांत आजदेखीत मुगों ५,२२२ स्तूप विद्यमान आहेत. त्याच प्रमाणे तेथील आनंद मंदिराचे ही स्थान फार वरचे आहे. या वर्णनावरून साहजिकर तेथील अमाप अशा प्रतिमा वैभवाची कल्पना करता येते.

शैवमत : -
ब्रह्मदेशांत हिन्दुस्थानांतून अराकान मार्गे शैवमत पोचले असावे असा साधारण समज आहे, कारण अराकान की मिळालेल्या कालचंद्र या नांवानें अंकित असलेल्या एका नाण्यांवर एका बाजूस दोन नागांकडून होत असलेली लिगपूर व दुसन्या बाजूस नंदी दिसतो. ब्रह्मदेशांत हॅम्वझा येथील खोदकामांत शैव वस्तू मिळाल्या आहेत. पगान येथील आसः संग्रहालयांत उभ्या शिवाची प्रतिमा आहे.

वैष्णवमत :-
ब्रह्मदेशाच्या परंपरेत विष्णूला एक ऋषीचे स्थान दिलेले व सिसित किंवा श्रीक्षेत्र या नगराचे निर्माण करून तो ब्रह्मलोकाला गेला असे समजतात. प्राचीन श्रीक्षेत्र म्हणजे हॅमवझा किंवा जुनें प्रोम होय. विष्णूचे महत्त्व पगानच्या बौद शासकांकडे ही होते. राजदरबारातील ब्राह्मण प्रत्येक संस्काराचे वेळी नारायणाचे पूजन करीत असत.
पगान येथील मंदिरांत एक विष्णूचे मंदिर आहे. हे अकराव्या शतकांत बांधले गेले. Nat hlaung kyaung नांवाने ओळखल्या जाणाऱ्या या वैष्णव मंदिरात गरुडावर बसलेला विष्णू, गरुडावरच पण ब्रह्मी बुद्धासारखी बचे असलेला व पद्मासनांत दिसणारा विष्णू, वराह, नरसिंह, राम, परशुराम, वामन वगैरे अवतारांच्या प्रतिमा ही विसतात.

थायलंड : -
सथाम नांवाने ओळखला जाणारा हा भूप्रदेश उत्तरी, मध्य, उत्तरपूर्वी आणि दक्षिणी अशा चार भागांत वाटलेला आहे. यापैकी प्रथम दक्षिण थायलॅण्ड वर इसवी सनांच्या सुरुवातीपासूनच भारताचा प्रभाव पडू लागला, व पुढे सहाव्या शतकांत पल्लव संस्कृतीने अनुप्राणित झालेल्या श्रीविजय साम्राज्यामुळे, नंतर ८-९ व्या शतकांत कलिंग आणि बंगालमधून व तेराव्या शतकांत लंकेकडून आलेल्या धार्मिक ओघांमुळे थायलँड मध्ये भारतीय प्रभावाने चांगलेच बाळसे धरले, कालखंडानुक्रमें धाय कलेची खालील प्रमाणे विभागणी करता येईल.
१) शुद्ध भारतीय किंवा भारतातून आलेली कला
इ. सनाच्या ५व्या शतकांपर्यंत
२) मोन-भारतीय (गुप्त)
इ. सनाचे ५-१०वे शतक
३) हिन्दू जावीय काल
इ. सनाचे ७-१२वे शतक
४) मोन-ख्मेर संक्रमण आणि ख्मेर काल
इ. सनाचे १०-१३वे शतक
५) ख्मेर-ताइ संक्रमण
इ. सनाचे १३-१४वे शतक
६) ताइ (चाइंग-सेन)
इ. सनाचे ११-१४वे शतक
७) ताइ (सुकोताइ)
इ. सनाचे १३-१४वे शतक
८) ताइ (लोपाबुरी)
इ. सनाचे १५-१७वे शतक
९) ताइ (अयुध्या)
इ. सनाचे १४-१७वे शतक
धायर्लंड मध्ये बौद्ध आणि ब्राह्मण या दोन्ही धर्माचे एकाच वेळी अस्तित्व होते, ख्मेर काळांत उभयतांना राजाश्रय होता. बऱ्याचदा आधिकाधिक रूपानें शैवधर्म ही वावरत असे. अशीच स्थिती दक्षिण पूर्वेच्या फुनान राज्यांतही होतो. याप्रमाणें जरी ही मतें सामोपचारानें एकत्र वावरत असली तरी साधारणपणे धाय लोकांवर बौद्धमताचा त्यातल्या त्यांत हीनयानी किंवा थेरवादी मतांचा विशेष पगडा बसला होता व आजही तेथे खूप प्रचार आहे.

बुद्ध प्रतिमा : -
भारतीय प्रभाव असलेल्या बुद्धप्रतिमा थायलँड मध्ये दुसऱ्या शतकांपासून मिळतात. मोन भारतीय कलेतील बुद्धमूर्तीची वैशिष्ट्य' म्हणजे कुरळे व मोठे केस, लांबट तोंड, बाहेर डोकावणाऱ्या ठळक पापण्या, हलक्या भुवया, सुरेख आंगकाठी, पारदर्शक वस्रानें आच्छादिलेले शरीर, व लिंग-चिन्हाचा अभाव ही होत. या प्रतिमांचे सारनाथ (वाराणसी) आणि अजिंठा वेधील कलेशी साम्य आहे. या मूर्ती दोन प्रकाराच्या असतात. पहिल्यात आसनांवर बसलेला बुद्ध करदाभय किंवा उपदेश अथवा तर्कमुद्रेत दोन्ही हात वर उचललेला दिसतो. दुसऱ्या प्रकारांत तो दोन्ही पाय समोर सोडून उपदेश किंवा धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेत बसलेला दिसतो.
या काळांत प्रतिमेबरोबरच धर्मचक्र, मृग किंवा बसलेले हरिण ही बौद्धप्रतिकें अस्तित्वात होती.
ख्मेरांचे वेळी (१०-१३वे शतक) बुद्ध प्रतिमेची घाटणी बदलली. प्रलम्बपादासनांत बसलेला बुद्ध दुर्मिळ झाला व त्याची जागा नागाचा वेटोळ्यावर त्याच्या फणेंखाली बसलेल्या बुद्धाने घेतली. या प्रकारात सापाचे आंग, शेपटी आणि फणा फारच सुरेख घडवीत असत. यापैकी काही प्रतिमांवर पुढे ताइ काळात ताइ लोकांनी काळ्या लाखेचा जाड भर चढवून त्याचे चेहरे आपल्यासारखें म्हणजे काहीसे मंगोली वळणाचे घडविले व त्यावर सोन्याचा सुंदर मुलामा दिला. १०
सुकोतायच्या उदयापूर्वी कमलाच्या आसनावर पद्मासनांत बसलेला बुद्ध थायलँड आणि पगानमध्ये फार लोकप्रिय होता. उजवा हात अभयमुद्रेत आणि डावा मांडीवर असलेल्या या प्रतिमांचा उद्भव भारतीय पालकलेत असावा. तसेच भूमिस्पर्शमुद्रेत बुद्ध किंवा निर्वाणस्थितीत झोपलेला बुद्ध हे प्रकार देखील चायकलेत बरेच प्रसिद्ध झाले. दुसऱ्या प्रकारच्या मूर्तीत दिव्य वाद्ये वाजविणारे हात दाखविण्याची पद्धत येथे नव्यानेच दिसते."
लाइ काळातील (१३-१७वे शतक) बुद्ध समेर बुद्धापेक्षा अगदी निराळे आहेत. चेहऱ्यावर सी-सुलभ कोमल लांबट तोड, बाकदार भुवया, लांब आणि टोकदार नाक, आवळलेले ओठ, बारीक जिवणी, जमिनीकडे पाहणते होते कुरळ्या केसाचे झुबके आणि उष्णीषांवर प्रगट होणाऱ्या अधिज्वाळेसारखे 'केतुमाला' चिन्ह (शरीरांतून प्रस्फुटित होणाना प्रभेचे प्रतीक) ही ताइ-बुद्धाची प्रमुख वैशिष्ठधे सांगता येतील (रे. चि. शेचाळीस, १,२).
चौदाव्या शतकाच्या मध्यांत थायलंडमध्ये सिंहली धेर-वादाची मतें बरीच खोल गेलेली होती, आणि पुढेत सोळाव्या शतकांपर्यंत त्याला श्रीलंकेकडून चांगले खतपाणी मिळत राहिले. पंधरा ते सतराव्या शतकांत बुद्धातिया घडविण्याकरिता धातूचा जास्त वापर करीत व शिल्पी काश्यांत सोन्याचे मिश्रण करून प्रतिमेवर उत्तम प्रकारचे पाणी देह या युगांत बुद्धाच्या लाकडी मूर्ती ही घडवीत व त्यापैकी काहीवर चांदी किंवा सोन्याचा मुलामा चढवीत असत."
ब्राह्मण धर्माच्या मूर्ती :-
इसवीसनांच्या तिसऱ्या ते सहाव्या शतकांत आजच्या मध्य-कंबोडिया, दक्षिणी सयाम आणि कोचीन चायरा का भागाला फुनान असे म्हणत. फुनानवर चौथ्या शतकाच्या शेवटी शेवटी भारतीय संस्कृतीचा चांगलाच दाट प्रभाव पडलेला होता. या भागातून ब्राह्मण धर्माच्या महत्त्वपूर्ण अशा खालील प्रतिमा मिळाल्या आहेत.
विष्णू सध्या बँकाकच्या राष्ट्रीय संग्रहालयांत असलेल्या विष्णुप्रतिमेवर प्रारंभिक पल्लवकलेची छाप विसले मुगुट उभट असून शिल्लक असलेले दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत. सामान्य उजव्यात असलेली वस्तू स्पष्ट नाही.
हरि-हर - हरिहराच्या दोन प्रतिमा ज्या कम्बोडियातून मिळाल्या आहेत, आज नोपेन संग्रहालयांत आहेत. पडण भारतीय वळणाची आहे, मात्र वस्त्राशिवाय अंगावर कोणताही दागिना नसून चारी हातांतील आयुधे खंडित आहेत.
अर्धनारीश्वर - मांडी घालून बसलेल्या अर्धनारीश्वराची ही प्रतिमा ख्मेर-पूर्व काळाची आहे व धायलँडच्या उत्तापूर्व भागांतून मिळाली आहे. आज बँकॉकच्या संग्रहालयांत असलेली ही मूर्ती द्विभुज आहे, आयुध मात्र कोणतेही अवशिर नाही.
दक्षिण धायलॅण्डमध्ये मिळालेल्या एका विष्णूची घडण तेथूनच मिळालेल्या गुप्तकालीन बुद्धापेक्षा अगदीच सिाठी आहे. या चतुर्भुज स्थानक प्रतिमेचा डावा हात तुटलेला आहे. सामान्य डाव्या हातात शंख, सामान्य उजव्यात चक्र आणि मागच्या उजव्यात गदा आहे. खांद्यापर्यंत उचललेला उजवा हात, मुगुट, कुंडलें, शंखाची पकड, वगैरे कित्येक गोष्टीत या प्रतिमेचे कुषाण विष्णूंशी साम्य आहे. (चित्र-२११).
ताइ काळांत (१३-१७वे शतक) घडविलेल्या एका शिवाचा ही ओझरता उल्लेख येथे अपरिहार्य आहे. बँकॉक संग्रहालयातील या प्रतिमेला दाढी, मिशा, तीन डोळे व दोन हात असून भरपूर दागिने व उंच मुगुट घातला आहे. कारवे प्रामुख्याने दिसत आहे. १८ लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात असलेल्या जवळ जवळ अशाच प्रकारभा शंकराच्या उजव्या हातात लहानसा त्रिशूळ असून त्याचे धोतर ही बरेच रुंद आहे.
कंबोडिया (कम्बुज) : -
थायलँड आणि कंबुज हे देश भौगोलिक दृष्टीनें व तसेच सांस्कृतिक दृष्टीनेही एकमेकांचे शेजारी आहेत. चौनच्या इतिहासांत असलेल्या नोंदीवरून तसेच चंपा देशांत मिळालेल्या अलीकडच्या एका लेखाचे आधारे असें सांगणे शक्य

 ४७५

बृह‌द्भारतातील देवमूर्ती :-
आहे की इसवीसनांच्या सुमारे प्रथम शतकांत कौंडिण्य नांवाच्या एका ब्राह्मणाने कंबुज देशांत भारतीय संस्कृतीचे लोण पोचविले." त्याने तेथील राजकन्येशी लम करून आपल्या राजवंशाची स्थापना केली. सुमारे चौथ्या शतकात भारतीय संस्कृतीच्या आधारावर श्रुतवर्मन राजाच्या राजवटीत कंबुज देशाला दृढ असे संगठित रूप प्राप्त झाले. तरीपण पूर्वर्वीपेक्षा इवल्या ते बाराव्या शतकांत कंबुज संस्कृती भारतीय रंगात जास्तच उठून दिसू लागली."
कंबुज देशांत प्रथम शैव मताचे प्राधान्य दिसते व नंतर तंत्र-प्रधान महायान बौद्ध मताचा जोर वाढलेला दिसतो. पण दक्षिण-पूर्व आशियातील इतर भागाप्रमाणे येथेही दोन्ही मते परस्पराशी संबद्ध अशीच राहिली. मूर्ति-शास्त्राच्या दृष्टीने कंबुज देशात रूड असलेल्या इतर दोन संप्रदायाचा ही उल्लेख करावयास हवा. प्रथम म्हणजे मृत राजे लोकांना त्यांच्या उपास्य देवाच्यांच रूपात अंकित करण्याची पद्धत भारतात मृत राजांचे पुतळे उभारीत, पण ते सर्व मानवीय आकारात असत. या विरुद्ध जावा, कंबोडिया, वगैरे भागांत हे पुतळे त्यांच्या प्रत्यक्ष उपास्याच्याच आकारात उभारीत. दुसरी पद्धत. शिवकैवल्य नांवाच्या ब्राह्मणाच्या उपदेशाने राजा जयवर्धन दुसरा याने सुरू केली. यांत देवराज या नांवाखाली लिंगाच्या रूपाने राज्याच्या संरक्षणांकरिता राजामध्ये असलेल्या दैवी तेजाची स्थापना केली जात असे. कंबुज शिल्पांपैकी कित्येकांच्या मुळाशी ह्या दोन पद्धती अधिष्ठित आहेत.
इण्डोनेशियाप्रमाणें कंबुज शिल्पाचाही विस्तार फार मोठा आहे. येथे ब्राह्मण आणि महायान देवतासंघाच्या जवळ जवळ प्रत्येक प्रतिमेचे दर्शन घडू शकते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही." या प्रसंगाने कंबुज शिल्पाची दोन मोठी भांडारें अंकोर थोम आणि अंकोर बाट याचा उल्लेख केलाच पाहिजे. अंकोर धोम हे शहर व तेथील मुख्य मंदिर बायोन यशोवर्मन् नांवाच्या राजानें नवव्या शतकात वसविले. येथे देवराज लिंगाची कदाचित प्रतिष्ठा केलेली असावी. मंदिराच्या बाहेरील भागावर दिसणारे विशाल मानव मुखोटे चतुर्मुख लिंगाचे किंवा महाकारूणिक लोकेश्वराचे द्योतक असणे शक्य आहे. देवराज लिंगाशिवाय बायन येथे इतरही प्रतिमा प्रतिष्ठित होत्या. त्यात शिव, विष्णू, देवींची विविध रूपें, बुद्ध, भैषज्यगुरू, कम्बुज देशाच्या प्रमुख नगर देवता वगैरेचा समावेश होतो. त्याशिवाय वैयक्तिक स्मारकांची गणना वेगळीच करावी लागेल. अंकोर धोम येथे जरी ब्राह्मण धर्माचे प्रामुख्य असले तरी परस्पर सम्बद्ध असल्यामुळे तेथे बौद्ध मंदिराचे अस्तित्व होते.
सूर्यवर्मन् दुसरा याचे कारकीर्दीत (सु. १११२-११५२ ई.) अंकोर वाटचे विशाल शिल्प उभे झाले. येथे रामायण व महाभारता व्यतिरिक्त इतर वैष्णव आणि शैव पुराणांतील घटना भिंतीवर चितारलेल्या आहेत. येथेही ब्राह्मण आणि बौद्ध धर्माची मैत्री दिसते, डॉ. कुमारस्वामीच्या मतें तेराव्या आणि चौदाव्या शतकाच्या बौद्ध शिल्पांवर बराच धाय प्रभाव आहे. २३ पंधराव्या शतकापासून तर कंबुज आणि थाय यांचे परस्पर संबंध फार दाट झाले.
कंबुज देशातील विशाल मूर्तिशिल्पात प्रामुख्याने नोपेन संग्रहालयातील हरिहर", अंकोर वाट येथील विशाल विष्णू तेथील अनंतशायी", ब्रह्मदेव, रावणानुग्रह, सर्पफणायुक्त बुद्ध", नाग", वगैरे शिल्पांचा उल्लेख करता येईल.

चम्पा (लाओस) :- 
कंबुजाच्या शेजारचा चम्पादेशही इसवीसनाच्या दुसऱ्या शतकांपासूनच भारतीय प्रभावाने अभिभूत व्हावा यात आश्चर्य ते काय? अमरावती (Quang-nam), विजय (Binh dinh), कौधर (Nhatrang), व पांडुरंग (Phanrang) ही येथील भारतीय प्रभावाची प्रमुख केंद्रे होत. इकडील शिल्पांत बुद्ध, मोठमोठाली शिवलिंगे, गणपती, शिवलिंग आणि शिव प्रतिमा सोळा हाताचा नटराज, रावणानुग्रहमूर्ती, कुबेर, ब्रह्मदेव, वायू, सूर्य, वगैरे प्रतिमाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

जावा आणि बाली: -
दक्षिणपूर्व आशिया खंडांत भारतीय संस्कृतीच्या आज जावा आणि बाली द्वीपांचे फार महत्व आहे. आज येथे असलेले या देशांचे धागेदोर अजूसही याच्या अपरिहार्य प्रभावामुळे इकडील हिंदू विचारही दिसतात आहे.
जावीय लोकपरंपरेप्रमाणे या भू-भागांत हिंदू विचारसरणीचा आरंभ अजिसक (आर्यक) केला. या व्यक्तीने नवाधर्म व नव्या सामाजिक व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली तसेच त्याने स्थीतियोि काळ मोजण्याचे कोशक ही दिले."
या भागाचा प्रारंभिक इतिहास अजून अज्ञात आहे.कपणे चौथ्या शतकापासून ऐतिहासिक पह क्रम खालील प्रमाणे लावता येईल,"
४ थे ते ८ व्या शतकाचा आरंभ
सु. ८००-८५०३.
बोरोबोटूरचे निर्माण
सु. ८६०-१५ वे शतक
पूर्व-जाना काळ
९ वे शतक
प्रभतानचे निर्माण
१० वे शतक
बालीत जावीय शासनाची आणांच्या राजवटीचा आरंभ
सु. १०१९-१०४२३.
एएलग वाचे शासन
सु. १२९३-१५०० इ १६वे शतक
मजपाहित काल
इझामाचे पदार्पण

कंबोडिया, जाजा, बाली, वगैरे भागांत उत्तर भारतांतून बौद्धधमा प्रवेश केला तसेच तेथे रक्षणकर (ब्राह्मण) धर्माचे बीजारोपण केले गेले. पण लौकरच या दोन मलाचे तेथे स्वतंत्र असे अस्तित्व सुभ होवून ती एकमेकांची पूरक मतें झाली उदाहरणार्थ बाली पुराणाप्रमाणे शिव आणि बुद्ध हे रोपे भाऊ होते. शोआणि बुद्ध धाकटा धाकट्याचा वैराग्याकडे जास्त ओढा होता. त्यामुळे शैवोपासना भक्ति' आणि बोले मोडते." बालीत काही ब्राह्मण बुद्ध-ब्राह्मण म्हणून ओळखले जातात आणि बौद्धधएकमेकां मिसळले आहेत. हे देव परस्परांची नावे देखील धारण करतात. उदाहरणार्थ पुल हाही मान्यता जपतित काळांतील (१२९३-१५०० ई.) होय.

व्यालो बुद्ध

महादेव

शिव, सूर्य (सियापत्य)
अधीच निशिळ्या दानपत्रांत बुद्ध आणि शिवाचा उद्देश होोबरच आलेय दिसतो. क्यानच्या कसो जोशी मतिं बौद्ध आहेत, तर तेथील मुख्य मावि हेच आहेतचे शिल्प प्रमुख्याने बौद्ध शल्य आहे. राजा भारताविष्णूचा अवतारात देशाच्या शतकात वाला शिव किंवा बुद्धाचे रूपांत राखविण्याची पद्धत सुरु झालो का इंडोनेशियाच्या या भागांतही दो बजे
कायोंय भाषेत महिला चंडी म्हणतात. येथे तिची संख्या फार मोठी आहे अत्यासल्याचा सागाही तितकाच विशाल आहे. प्रेबनान आणि बोरोबोर हो विशाल शिलय भांडारे आणि अन्य देशभर गवसणी घालण्यांइतकेच सुतयस्त कार्य आहे. अधी येथे मिळणाऱ्या काही उक देव प्रतिमाचा सुजबी विचार करून पुढे जाणेच योग्य ओल

बुद्ध -
लहान मोठी कित्येक बुद्धतिलेोभोवारच्या कृतीत भारतीय वळणाच्या अनेक बुद्ध प्रतिया दिसतात या भूमिदार अभय विके अथवा धर्मचकावर्तन मुरेत आढळतात. याशिवाय जागोजाग जातक कथाचेही भरपूर चित्ता आहे
इतर बौद्धप्रतिमांत लोकेकर, अशा बोधिसत्व देव आणि देवीची सुंदर शिल्पे मिळाली आहेत.
शिव- कटाविया येोधीत संग्रहालयात असलेली शिवाचा आहे. तिच्या डोक्यावर चारको दिसते. हातांतौल आयुधांत आज आणि चोरों विद्यमान आहेतलेल्या एका दुसऱ्या पाषाण प्रतिमेत मागील हातमा चौरी पोललेल्या बहुभुज शंकराच्या काद आणि नरकुंड ही विलते सम्मपद स्थित उभ्या असलेल्या या शकाच्या खाली अशीষ্ট্রকা आणि प्रणालिकेला आधार येथे महायोग स्वभावस्थ विवानो प्रतिमा विसाहे
शिवगुरु नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रतिमेोरआदिसते. बोधा सुटलेल्या शरीराच्या असतो. येथे उजव्या हातात बाजूला भला मोठा हिशूज आणि याच्या व्याधीवितेविरुच्या आणि

 ४७८

उभ्या अश्या दोन्ही प्रकारच्या प्रतिमा मिळतात" प्रतिमे बरोबरच लिंगपूजनाचाही इकडे प्रचार हो याच संदर्भात इकडे मिळणाऱ्या अगस्ति ऋषीच्या प्रतिमांचाही उल्लेख करावयास हवा. या ऋषीने विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे भारतीय संस्कृतीचा फैलाव केला हे सुप्रसिद्ध आहे. त्याचा शैत जवळचा संबंध होता. इकडे सुप्रसिद्ध असलेल्या अगस्त्यपर्व नांवाच्या ग्रंथात शैवसिद्धांताचे प्रतिपादन आहे. अगस्तीच्या मूर्ती दाढी जटा असलेल्या ऋषींच्या प्रमाणें दिसतात."
गणपती - इकडे विशेष लोकप्रिय असलेला ब्राह्मण धर्माचा दुसरा देव म्हणजे गणपती हा होय. याचे येथे प्राचीन अस्तित्व असावे असे वाटत नाही. त्याचप्रमाणे या देवाची स्वतंत्र मंदिरें ही येथे नाहीत. याच्चा प्रतिमा बहुतेक शैव मंदिराच्या कोनाड्यात दिसतात" चंडी बानोन येथून मिळालेल्या दांत, माळा, पा आणि मोदक घेतलेला बसका गणपती साधा पण सुंदर आहे." या उलट चंडी सिंगसरी येथील गणपतीका तांत्रिक मताची स्पष्ट छाप आहे हा नरमुंडांच्या राशीवर बसलेला असून त्याच्या मुगुटांत आणि कुंडलां माणसाच्या कवट्या दिसतात. हात मात्र चार असून आयुधे ही जवळ जवळ वरचीच आहेत. येथूनत मिळालेल्या एका दुसऱ्या प्रतिमेंत तो उभा आहे. नरमुंडाचे अलंकरण हातांत घातलेल्या अंगदांकर ही दिसते. हात चार असून दोन हातांत वाट्या आणि पाठीमागें परशू आणि माळा आहे. येथे पोटापेक्षा त्याचे हात आणि पायच जास्त स्थूल आहेत.
भैरव- चंडी सिंगसरी येथे असलेला भैरव कवट्यांच्या राशीवर उभा आहे." त्याचे मुख उग्र आहे आणि गळ्यात गुडघ्यापर्यंत रुळणारी मुंडमाळ आहे. कानांत कंकाल कुंडलें दिसतात. हात चार असून त्यात प्रदक्षिणा क्रमाने सुरी, त्रिशुल, डमरु आणि नृकपाल (?) अशा वस्तू आहेत. तो नाचत आहे व त्याच्यामागे कुडा उभा आहे. जावीय भैरवाचे भारतीय भैरवाशी चांगलेच साम्य आहे.
हरिहर - शिव आणि विष्णूच्या या संयुक्त प्रतिमा इकडे ही आढळतात. भारतीय परंपरेप्रमाणे हर हा उजवीकडे आणि हरि हा डावीकडे असतो, पण काही जावीय प्रतिमांत हा क्रम उलटलेला अर्थात उजवीकडे विष्णु आणि डावीकडे शिव असा असतो. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे असे की हरिहरांची भिन्नता ठळकपणे सर्वत्र न दाखविता ती फक्त तोंडाची घडण आणि पोषाखांत हलकेच दाखवतात.
विष्णु - शैवांप्रमाणेच या बेटांत वैष्णव मताचाही प्रचार होता. अकराव्या आणि बाराव्या शतकात राज्य करणारे केदिरीचे राजे स्वतःला विष्णूचा अवतार समजत. अकराव्या शतकांतील एका शिल्पांत मनुष्यरूपांत असलेल्या गरुडाचे खांद्यावर कमळावर बसलेला विष्णू दिसतो." त्याच्या मागच्या हातात चक्र ३शया असून त्याचे सामान्य दोन्ही हात ध्यानमुद्रेत ठेवल्याप्रमाणे दिसत आहेत मांडी मात्र एकच घातली आहे. व उजवा पाय खाली सोडलेला आहे. गरुडाचे पंजे पक्ष्याप्रमाणे आहेत व त्यांत त्याने दोन साप धरलेले दिसतात. विष्णूच्या अनंतशायी रूपाच्या प्रतिमाही इकडे पहावयास मिळतात."
प्रबनान येथील रामायण कथांचे अंकन आणि चंडी सुखनसारख्या मंदिरात असलेले अर्जुन विवाहादि महाभारतीय कथांचे अंकन५३ जावीय कलेची वैशिष्ट्ये आहेत. आजही जावीय संस्कृतीत महाभारत आणि रामायणाविषयी आदर आणि लोकप्रियता आहे.

४७९

ब्रह्मा :-
जावीय संस्कृतीत ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे तिघेही एकेकाळी पूजनीय होते. प्रबनान येथे त्रिमूर्तीचे मंदिरच होते. या प्रसंगाने ब्रह्मदेवाच्या एका शिल्पाचा उल्लेख येथे करण्यासारखा आहे. हे शिल्प मध्यजावात मिळालेले असून तूर्त लंडनमध्ये आहे." माळा व घट घेतलेला ब्रह्मदेव चतुर्मुख आहे. तो मांडी घातलेल्या एका पुरुषाच्या खांद्यावर आरूढ आहे. बसलेला पुरुष कोण हे नक्की सांगता येत नाही, पण त्याच्या डोक्यावर खुबीने चोचीसारखा आकार घडविला आहे. तेव्हा हा पुरुषाकृतिहंस तर नसावा अशी शंका येते.
महिषमर्दिनी दुर्गा- प्रबनान, चंडीसिंगसरी वगैरे ठिकाणी महिषाचे मर्दन करणाऱ्या अष्टभुज दुर्गेच्या सुंदर
प्रतिमा आढळतात. येथे पायाखाली पडलेल्या महिषाचे अंगावरच देवी उभी असल्याचे दाखवितात. वरील दोन्ही ठिकाणी सिंह दिसत नाही, पण भारतात सामान्यपणें न आढळणारे येथे एक वैशिष्टच दिसते. ते म्हणजे देवीच्या पायाजवळ एकीकडे नाचणारा एक बालक किंवा गण हे होय. देवीच्या हातात ढाल, शूल, धनुष्य, शंख वगैरे आयुधे दिसतात.
श्री- विशेष रूपाने भात शेतीचे संरक्षण करणारी देवी श्री या नांवाने ओळखली जाते. प्रो. गोंडा यांच्या मतें भारतीय वेष परिधान केलेली पण मूळची इंडोनेशियाची अशी ही देवी आहे. देव अंत किंवा पाताळांत राहणारा सर्प अनंतभोग याच्या एका अश्रूपासून ही उत्पन्न झाली असें मानण्यात येते. विद्याधरी किंवा अप्सरांच्या वर्गातील या देवीचा संबंध प्रेम, रोगराईपासून बचाव वगैरे कित्येक गोष्टींशी आहे. व तिज संबंधी अनेक कथाही प्रचलित आहेत जावातील काही जुन्या अंगठ्यांवर श्री चे नांव कोरलेले मिळते. बाली घेटांत हीच देवी उमा, दुर्गा, पृथ्वी नावाने ओळखली जाते. भारतीय दृष्टीनें हिच्यात अनेक देवीचे एकीकरण झालेले दिसते.
वरील शिल्पां व्यतिरिक्त प्रबनान येथील मंदिरांत इन्द्र, अग्नि, यम, बृहस्पती, सूर्य, नैऋत, वरुण, कामदेव, विश्वकर्मा, हनुमान, वायू, कार्तिकेय, सोम, कुबेर, नारद, ब्रह्मणस्पती वगैरेची ही शिल्पे सापडतात.

श्रीलंका :- 
दाशरथी रामाने ज्या लंकेवर स्वारी केली आणि रावणाचा वध करून विजय मिळविला ती लंका म्हणजे भारताच्या दक्षिणेकडे असलेले सिंहल किंवा सिलोन हे बेट होय असे जरी आज निर्विवाद रूपाने सांगता येत नसले तरी एवढे मात्र खरे की आजच्या सिंहल (श्रीलंका) बेटाशी आपले दळणवळण फार जुनें आहे. भारतांतील गंगाकाठच्या विजय नांवाच्या एका राजपुत्राने सुमारे इ. सनांपूर्वी ५व्या शतकांत सिंहलात प्रवेश करून कुवेणी नांवाच्या तेथील राजकन्येशी लग्न केले व राज्याची मुहूर्तमेढ रोवली. सुमारे एक शतकानंतर अनुराधपुराचे निर्माण झाले. देवानं-पिय तिस्स (सु. २४७-२०७३.पू.) याचे राजवटीत भारतातून सम्म्राट अशोकाची मुलें महेंद्र आणि संघमित्रा बोधिवृक्षाची फांदी आणि बुद्धाचा संदेश पेऊन श्रीलंकेत आली. पुढे दक्षिण भारतातून तामिळांची आक्रमणे सुरू झाली. पुढच्या कित्येक शतकांपर्यंत श्रीलंकेशी तमिळांची भांडणे चालत राहिली. इसवीसनांच्या आठव्या शतकांत अनुराधपुर तमिळांच्या हातात पडले व श्रीलंकेची राजधानी पोळोन्नारुव हे शहर झाले, पण लौकरच हे ही तमिळांच्या हाती पडले व श्रीलंका चोळ राज्यांचा एक भाग झाली. पुढे बाराव्या शतकात सुप्रसिद्ध राजा पराक्रमबाहू (सन् ११६४-११९७) यानें आपले स्वातंत्र्य परत मिळविले एवढेच नव्हे तर त्यानें थायलँड आणि सुमात्रा यांच्याशी संबंध जोडून दक्षिण भारतावर उलट आक्रमणेही केली. पण ही

४८०

भांडणे कधीच मिटली नाहीत व श्रीलकेची राजधानी इकडे तिकडे होत शेवटी १५९२ मध्ये कैडीत स्था श्रीलंकेचा इतिहास खालीलप्रमाणे विभागता येईल.
(१) अनुराधपुर काळ
(सु. इ.स.पू. ४५७-सन् ७५०)
(२) पोळोन्नारुव काळ (सु. ७५०-१२४०३.)
(३) उत्तरमध्यकाळ (तेराव्या शतकाच्यापुढे)

बौद्धमत :-
श्रीलंकेत महेंद्राने ज्या बौद्धधर्माची स्थापना केली तो हीनयानी किंवा थेरवादी होता व पुढेही तेथे हो प्रामुख्य राहिले, नाही म्हणावयास चोळ देशाच्या संघमित्ताने राजा महासेनाचे वेळी (३३४-३६२ इ.स.) लेखे मताचाही शिरकाव केला होता." बौद्धधर्म सिलोनी संस्कृतीचा प्राण आहे. एवढेच नव्हे तर भारताशी असलेल्या संबंधाचे ते मुख्य सूत्र आहे.
साहलिकच श्रीलंकेच्या कलाकृतीत बुद्ध व बौद्धदेवता संघाच्या प्रतिमा विपुल आहेत. काही विद्वानांच्या से श्रीलंकेत भारताचे अगोदर मानव रूपात बुद्ध प्रतिमेचे अवतरण झाले होते. येथील प्रारंभिक बुद्ध मूर्तींनी अमरावतीच्या धर्तीची आहे. अवुकन्न येथील दगडात कोरलेल्या विशाल बुद्ध प्रतिमेच्या आधारावर असे माषा की अमरावतीचा कित्ता पुढेही गिरवला जात असे. अनुराधपुर येथील आसनावर बसलेला तोळुविळ बुद्ध (वाराणसी) च्या गुप्तकालीन बुद्धाच्या वळणावर आहे. बाराव्या शतकातील बुद्ध प्रतिमात पोळोन्नास्व येथील समूहात असलेला परिनिर्वाणगत बुद्ध आणि लंकातिलक विहारातील उभा बुद्ध यांची प्रामुख्याने गणना करता येई लंकेतील धातु प्रतिमांपैकी बऱ्याच डॉ. कुमारस्वामी यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांत गुप्तकलेच्या धर्तीवर पाहानिले कोलंबो संग्रहालयातील बुद्ध, अवलोकितेश्वर आणि कुबेर (उभयता सध्या बोस्टन संग्रहालयात), पराल पाँच वज्रपाणि, लेखाविङत तारा" वगैरे प्रतिमा उल्लेखनीय आहेत.
लंकेत महायान मताला थोडीतरी जागा मिळाली, पण तंत्रमार्गीय बौद्धमताचा मात्र तेथे शिरकाव झाला आह असे वाटत नाही.

शैवमत : -
बौद्धधर्माव्यतिरिक्त शैव आणि वैष्णव मतें ही मुख्यरूपानें लंकेत सुरवातीपासूनच प्रचलित आहेत, लकेचा उपासनेत यक्ष आणि नागांना प्रामुख्य होते. पण पुढे त्याचे उपदैवतात रूपांतर झाले. सिलोनमध्ये शिवाला बरेच मात्र आहे. महाकाव्यास जमेत धरल्यास लंकापति रावण हा शिवोपासक होता हे आपणांस माहित आहे. दक्षिण भा शिवोपासना दृढमूल होती त्यामुळे व शतकानुशतक तमिळाशी आलेल्या संबंधामुळे लंकेत शिवोपासनेचा विस साहाजिकच आहे. अॅड. मपीक किंवा श्रीपद हे तेथील एक मुख्य शैवकेंद्र आहे. लंकेतील कित्येक मंदिरें शिव किया आचार्य यांच्याशी संबंधित आहेत. सीलोनचे सर्वोकृष्ट ब्राह्मण मंदिर 'दळदा मालिगाव' (शिवदेवाले नम्बर शिवाचेच मंदिर आहे."
येथील शैव प्रतिमांवर दक्षिणभारतीय छाप दिसणें क्रम प्राप्त आहे. पोळोन्नारुव येथून मिळालेल्या ताम्रम्तीत

४८१

वार्वती, वगैरे शिवाची अनेक रूपें आहेत. त्याबरोबरच सुंदर मूर्तिस्वामी, माणिवक वासगर, वगैरे शैवाचार्याच्याही प्रतिया मिळतात. या प्रतिमा द्राविडी धतींवर तयार केल्या आहेत हे स्थपती दक्षिणेचेच असल्यास नवल नाही.
शिवाबरोबर पार्वती, स्कंद, गणेश यांचे अस्तित्व क्रमानेच येते. असे मानतात की इ. सनाच्यापूर्वी प्रथम शतकांत सोनु बाने कतारगामांत स्कंदांची मंदिरें बांधली व तेव्हांपासूनच हे स्थान स्कंदपूजनाचे केंद्र झाल" गणपतीच्याही विथा लकेत मिळतात. एवढेच नव्हे तर दक्षिण भारताच्या प्रभावामुळे ग्रामदेवाच्या रूपांत व वन्त्री भागाचा अधिपती माणून अध्यनार किंवा हरि-हर पुत्र शास्ता यालाही लकेत प्रवेश मिळालेला आहे."

वैष्णवमत : -
सौलोनी मान्यतेप्रमाणें बुद्धाने विष्णूला सीलोनचा अधिपती आणि बौद्धधर्माचा संरक्षक म्हणून नेमले आहे. त्यामुळे संकेत विष्णूचे व बुद्धाचे सलोख्याचे संबंध आहेत. त्याचे धनुष्यबाण घेतलेले रूप, त्याचे दहा अवतार, त्यानें तीन पावलांत केलेला पराक्रम वगैरे गोष्टी लंकावासियांच्या परिचयाच्या आहेत. सिलोनच्या निरनिराळ्या भागांतून विष्णू, लक्ष्मी, बाळकृष्ण, वगैरे वैष्णव मूर्ती मिळाल्या आहेत."

देवी पट्टिनी : -
दक्षिण भारताचा चेर राजा सेन गुत्तुवन याने पट्टिनी देवीचे प्रथम मंदिर बांधले त्याच वेळी सिलोनमध्येही राजा गजबाहू (इ.स. १७४-१९६) यानें पट्टिनी पूजनाचा आरंभ केला. सीलोन मधून पट्टिनी देवीच्या अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. तमिळ भागांत हिला कन्नकी अम्मन या नांवाने ओळखतात. ही देवी द्विभुज असून आयुर्धे मात्र कोणतीही दिसत नाहीत.

अफगाणिस्थान :- 
आपण करीत असलेल्या भारताच्या प्रदक्षिणेचा शेवटला टप्पा अफगाणिस्थान होय. मध्यआशियाचे केंद्रस्थान असलेला हा देश प्रागैतिहासिक काळापासून भारतीय सभ्यतेला फार जवळचा होता. प्राचीन आर्यांचे हे वसतिस्थान होते व सप्प्रसिंधू या प्रसिद्ध नदीसमूहांत पंजाबच्या पाच नद्यांबरोबरच (अर्थात् वितस्ता (झेलम), असिक्नी (चनाब), परुष्णी (रावी), विपाशा (व्यास), आणि शतुद्रि (सतलज) सिंधू व कुभा (काबुल) नदीचा समावेश होत असे." यास्काचे निरुक्त, पाणिनीची अष्टाध्यायी, शतपथ ब्राह्मण आणि रामायण महाभारतादि ग्रंथ यांत अफगाणिस्थानाशी असलेल्या सांस्कृतिक साखळीचे उल्लेख सापडतात.
इसवी सनांपूर्वीच्या सुमारे सहाव्या ते पाचव्या शतकांत अफगाणिस्थानांत हखामणी साम्राज्याच्या स्थापनेबरोबर त्या देशाचे पश्चिमेशी संबंध वाढले. हखामणी राजा तिसरा डेरियस याचा मेसिडोनिया (ग्रीस) च्या अलेक्झेण्डरने धुव्वा उडवला व तेथे ग्रीक वसाहती कायम केल्या. पुढे मौर्यकाळांत अफगाणिस्थान भारतीय साम्राज्यात मोडले जाऊ लागले. ही स्थिती थोड्या फार फरकानें गुप्तकाळांपर्यंत होती. सहाव्या शतकांच्या उत्तरार्धात हा देश ब्राह्मण, बौद्ध व झोरोसियन धर्माचा संगमस्थान झाला. काही काळानंतर अरबांनी या भागात पाऊल ठेवले आणि इस्लामाच्या येण्यांबरोबर भारताशी असलेले सांस्कृतिक संबंध एक प्रकारे उधळले गेले. अफगाणिस्थानाच्या हिंदूशाही राजांनी आपले अस्तित्व टिकविण्यांचा प्रयत्न केला, पण सुमारे सन् १००० च्या आसपास ते इतिहासाच्या पोटांत गडप झाले. या वंशाचा शेवटला महत्त्वाचा राजा जयपाल हा होता त्याला गझनीच्या बादशहांकडून पराभूत व्हावे लागले.

४८२

ब्राह्मण धर्माच्या मूर्ती :

वरील विवेचनाने अफगाणिस्थानांशी आपले संबंध किती दाट होते हे स्पष्ट कळतें. इकडील धर्मात जैन धर्म कि पोचल्याचे अजून तरी फारसे ऐकिवांत नाही, पण ब्राह्मण व बौद्ध धर्माचे तिकडे अस्तित्व होते. त्याची कीच आपल्या हाती आली आहेत व सध्या तिकडे चालू असलेल्या उत्खननादि कार्यामुळे येत ही आहेत. ब्राह्मण इतर मतांपेक्षा इकडे शैवमताचा जास्त प्रसार होता. मागे शिवासंबंधी विचार करीत असतांना या गोष्टीकडे लक्ष ि गेले आहे. 'शिवप्रतिमेची देशगत वैशिष्ठधे या सदराखाली वायव्य धारेचे विवेचन करताना अफगाणिस्थानांतील चर्चा झालेली आहे. म्हणून या विषयाला पुनः हात न घालता विष्णुकडे वळतो.

विष्णू - अफगाणिस्थानांतून विष्णूच्या स्वतंत्र प्रतिमा मिळाल्याचे फारसे ऐकिवांत नाही, पण गांधार देशा वैकुंठ-विष्णूची पूजा पोचली असावी असें वाटते. कश्मीरमध्ये हा संप्रदाय बराच होता हे आरण स पाहिले आहे. संभवतः गांधार देशाच्या पश्चिमी भागातून मिळालेली पांढऱ्या संगमरवरी दगडाची वैकुल‌ लंडन येथील ब्रिटिश म्यूझियममध्ये आहे.

सूर्य- काबूल येथून 'खैर खानेह' गांवाच्या जागेतून मिळालेल्या रथारूढ पांढऱ्या सूर्य मूतींचे वर्णन मागे आने आहे (पान २८८).

ब्रह्मा - गझनी येथून मिळालेली पांढऱ्या संगमरवरी दगडाची ब्रह्मदेवाची प्रतिमा काबूल संग्रहालयांत आहे याची तीन तोंडे दिसत असून मधल्या मुखाला दाढी आहे. त्याच्या दोन्ही बाजूला सेवक व हानीगों हंस दिसतो.

गणेश व कार्तिकेय अफगाणिस्थान आणि गांधार प्रदेशांतून मिळालेल्या या देवांच्या प्रतिमांची चर्चा मो ततद्विषयक प्रकरणांत पहाणें चांगले (पार्ने २७४, २६०), त्याचप्रमाणें महिषमर्दिनी दुर्गेच्या प्रतिमेला 'पश्चिमोत्तर भारतांतील दुर्गा व सिंहवाहिनी देवी' हा परिच्छेद पहावा (पान २३५).

बौद्धमत : -
अफगाणिस्थानांत बौद्धमताची स्थापना मुख्य रूपाने मौर्य राजा अशोक यांचे वेळी झाली. पुढे भारतीय-प्रोक एक मिनँडर आणि कुषाण शासक कनिष्क व त्याचे उत्तराधिकारी यांच्या राजवटीत बौद्धांचा जास्त प्रचार झाला. इकोन बरीचशी बौद्ध केन्द्रे खैबरच्या खिंडीतून बल्ख (जुने वाल्हीक) कडे जाणाऱ्या व्यापारी मार्गाच्या कडेला किंवा जवळपास बसलेली आहेत. पर्वत कोरून लेणी तयार करण्याचा इकडे बराच प्रघात होता. त्याशिवाय अनेक स्तूप व विहारांचे निर्माण होत असे ते वेगळेच प्रतिमा घडविण्याकरिता दगड व माती बरोबरच 'स्टको' हे ही माध्यम लोकप्रिय होते. स्को म्हणजे चुना, माती घोड्याचे केस, भूस वगैरे मिसळून तयार केलेला गिलावा. अगोदर या गिलाव्याची प्रतिमा पार नंतर तिच्यावर चुन्याच्या प्लॅस्टर ने मोहकता आणित असत. या माध्यमाबरोबरच हस्तिदंताचा ही अफगाण कलाका चांगला उपयोग करीत. या प्रसंगाने बेग्राम येथून मिळालेल्या उत्कृष्ट हस्तीदंती फलकांचा उल्लेख करावयास हवा." संग्रहात बौद्ध म्हणण्यासारख्या वस्तू मिळालेल्या नाहीत हे खरे असले तरी प्रतीक चिन्हें मात्र हाती आलेली आहेत. य सर्व माध्यमाबरोबरच इकडील कलाकारानी रंगीत चित्रे तयार करण्याकरिता ब्रशांचाही बराच वापर केलेला आहे. बारिधार येथील बौद्ध लेणी व विहाराच्या भिंती आणि छतांवर बुद्ध, बोधिसत्व, अप्सरा, वगैरेची जी चित्रे काढलेली आहेत त्या
३ (

४८३

पाहून अजिंठ्याच्या चित्राची आठवण
येते.
आता अफगाणिस्थानातील काही मुख्य अशा बौद्ध शिल्पांचा थोडक्यात आढावा घेऊ. सर्वप्रथम बीमारान वेधून मिळालेल्या सुवर्णकरंडकाचा उल्लेख करावयास हवा. त्यावर इंद्र व ब्रह्मा यामध्ये उभा असलेला बुद्ध अंकित आहे. त्यानंतर बामियान येथील दोन फार मोठ्या अशा बुद्धपतिमांचा उल्लेख केला पाहिजे" त्यापैकी एक ५३ मीटर उंच असून दुसरी ३५ मीटर उंच आहे. आज ५३ मीटरचा बुद्ध फारच खंडित आहे. उत्तर कुषाणकाळांत (सुमारे ४थे ५वे शतक) निर्मित झालेल्या या उभ्या बुद्धाच्या मूर्ती तेथील स्तूपांपेक्षा जास्त महत्त्वाच्या मोजल्या जात असाल्या, येथून जवळच कक्रक (kakrak) या जागी अकरा मीटर उंच एक बुद्ध मूर्ती व कित्येक लेणी आहेत. यांचा काळ ५ते६ वे शतक समजतात.
जलालाबादजवळ हड्डा (जुनें नगरहार), येथून स्टकोचा बुद्ध व बौद्ध देवताच्या सुंदर प्रतिमा मिळाल्या आहेत. तोखारी स्थानाची जुनी राजधानी कुंडूज येथे व्हेक्सांगाच्या लिखाणाप्रमाणे हीनयानांबरोबर महायान मताचे ही संघाराम होते. येथून मिळालेल्या स्टकोच्या काही उत्कृष्ट प्रतिमा काबुलच्या संग्रहालयांत ठेवल्या आहेत.
बामियान आणि हड्डा याच्या इतकेच महत्त्वाचे तिसरे बौद्ध केंद्र म्हणजे फोंडुकीस्तान हे होय, येथून मिळालेली बुद्ध, बोधिसत्व, नाग वगैरेची शिल्पें व वास्तुकलेचे नमुने भारतांतील उत्तर गुप्त व पालकलेच्या धतींवर घडविलेले दिसतात. मुगुट घातलेला बुद्ध आणि डौलदार बांध्याचा व सुंदर दागिने घातलेला मातीचा बोधिसत्व", वगैरे येथील उल्लेखनीय शिल्पे आहेत.
यापलीकडे
भारताची प्रदक्षिणा संपली, पण भारतीय संस्कृतीच्या विस्ताराचे क्षेत्र येथे संपलेले नाही. ते उत्तरेकडे ताजीकीस्तान, चीन, कोरिया, पूर्वेकडे फिलीपाइनस् बेटे, पश्चिमेकडे अरबस्थान इराक, इरान, पूर्वी तुर्कस्थान वगैरे पर्यंत पसरलेले आहे. आतापर्यन्त या निरनिराळ्या देशांत बरेच खोदकाम झाले आहे. जुने वाड्मय प्रकाशांत आले आहे व नवे नवे शोध ही चालू आहेत. मागील पृष्ठांत आलेल्या मजकुराच्या पार्श्वभूमीवर या दूरपर्यंत पसरलेल्या भूखंडात मिळणाऱ्या देवप्रतिमांचा विकास, विवेचन, परस्परांवर पडणारे वगैरे गोष्टींचा अभ्यास फारच मनोरंजक आणि उपयोगी ठरणार आहे; पण तो सर्व भाग आपण हाती घेतलेल्या चौकटीत बसणारा नसल्यामुळे तिकडे फक्त मौन संकेत करून लेखणीला रजा देतो.

000

४८४

१. Majumder R.C.. Ancient Indian Colonisation in South East Asia, Ba pp. 6-13
2. L.L. Mehrotra, Glimpses of Indian Culture in Tibet, VCV., pp 406-7, Bhattachrya 1,
3. N.R. Banerjee, Buddhist Art of Nepal, VCV, pp. 315-88, Sharma B.N. Saiva Icons of Nepal, VCV, pp. 371-83,
4. Sharma B.N. Saiva Icons of Nepal, VCV, pp. 382
5. N. R. Banerjee, Buddhist Art of Nepal VCV pp. 385-88.
6. ASI Annual Reports 1905-6 Excavations at MyInpagan p. 132,

टिपा आणि संदर्भ
बृह‌द्भारतांतील देवमूर्ती
राहुल सांकृत्यायन, पुरातत्त्व निबंधावलि, प्रयाग, पृ. २८३-३०२;
Pranavanand Swami, Kailas Mansarovar, Calcutta 1949, Gordon, Antoinette k, Tibetan Religious Art, New york, 1952
Kramrisch Stella, 1.
Slusser and Gautamvajra, 1.
1910-11, Excavations of Hmawaza, pp 90-92,
1928-29, pp. 106-113,
1911-12 pp. 142-113,
1912-13 pp. 136-143,
May Reginald Le, The Culture of South-East Asia, London, 1954, Chapter III, Burma, pp. 44-60
Thakur Upendra, A Historical Survey of Hindu Culture in Burma, VCV., pp. 437-444 Bhise, Usha R., A Temple of Visnu in Burma, VCV pp. 445-52.
May Reginald Le, Buddhist Art in Siam, Cambridge, 1938. pp. 12-149. 7.
८. तेच, पान १५
९. तेच, पार्ने २२-३
१०. तेच, पान ७४
११. तेच, पान १०२
१२. तेच, पान ११३. Figs. 129-30
१३. तेच, पान १२४

 ४८५

१४. तेच, पान ५१ चित्र ४८
१५. तेच, पान ५१ चित्र ४६-४७
१६. तेच, पान ५१ चित्र ४९
१७. तेच, पान ४१, Hartel 2 Fig. 377 a.
१८. तेच, पान १४९, चित्र २०३
१९. तेच, पान १४९ चित्र २०४
२०. Chatterji B. R., Indian Cultural Heritage in Combodia VCV., pp. 493-4.
21. Comaraswamy, 1, p. 181
२२. तेच, पान १८५
२३. तेच, पार्ने १९२-९४
२४. तेच, चित्र ३३३
२५. वर क्रमांक २०, पृ. ४९५, चित्र १
२६. Hartel 2, Coloured Plate L, also Fig. 301 a.
२७. तेच, चित्र २७० बी
२८. तेच, चित्र २७८ ए
२९. तेच, चित्र २८५ बी
३०. तेच, रंगीत चित्र संख्या LIII.
30 Deshpande M.N., Champa-An Outpost of Indian Culture, VCV, pp. 475-80
31. Gonda J., The Presence of Hinduism in Indonesia, Aspects and Problems, VCV., p 536.
32. मुख्य आधार Trubner Henry, The Art of Greater India, The Los Angele County Museum Publication, 1950, pp. XXII-XXVI.
33. Goudriaan T., Sanskrit Text and Indian Religion in Bali, VCV, p. 561.
वर क्रमांक २१, पान ५४२
३५. तेच.
36. Swami Sadananda, Borobudur, Calutta, 1944, p. 13-15.
37. Swami Sadananda, Javadvipa, Calcutta, 1944, पान ४ समोर असलेले चित्र
38. Hartel, 2, Fig. 335
३९. पहा वर क्रमांक ३७ पान १०
४०. तेच, पान १२ समोरचे चित्र

 ४८६

४१. तेच, उभा शिवगुरु पान १२, आसनस्थ पान १०
४२. वर क्रमांक ३१, पार्ने ५४२-४३
४३. तेच, पान ५४३ वरील चित्र
४४. तेच, पान ५४८
४५. वर क्रमांक ३३, पान ८
46. Swami Sadananda, Javadwipa, Calcutta, 1954; p. 33
47. Hartel, 2, Fig., 340 b
४८. वर क्रमांक ४०, पान ३२ समोर असलेले चित्र
49. Soundar Rajan K.V., Hindu Epic and Puranic Traditions in South East Asia VCV., p. 506
50. Hartel 2, Fig. 337
५१. वर क्रमांक ४३, पान ५०५
52-53 Hartel 2, Fig. 334 b, 346
५४. तेच, चित्र ३२१
५५. वर क्रमांक ४०, पान ८ समोरचे चित्र
56. Hartel 2, Fig. 340 a.
Museum, 1978, p.33. ५६' बर्लिन संग्रहालयांत असलेल्या मधुरेच्या एका कुषाण कालीन अष्टभुजी महिषमर्दिनीच्या प्रतिमेत हा बालस किंवा गण आढळतो. येथे देवीच्या पायाखाली दिसणारे दोन सिंहही उल्लेखनीय आहेत. -Hartei,
५७. वर क्रमांक २५, पान ५४८
58. Coomaraswamy 1, pp 158-9.
59. Srivastava V.C. Hinduism in Ceylon, VCV., p. 417
६०. तेच, पान ४१९
६१. तेच, पार्ने ४१९-२०
६२. वर क्रमांक ५८, चित्र २९६
६३. तेच, चित्रे २९७-२९८
६४. तेच, चित्र २९९
६५. तेच, पान १६७
६६. Coomaraswamy 1, p. 165
६७. तेच, चित्र २४३
६८. वर क्रमांक ५९, पान ४१६
६९. तेच, पान ४१७, चित्र ४
७० तेच, पान ४१६
७१. तेच, पान ४१५-१६; Coomaraswamy 1. p. 167
७२. तेच, पान ४१६
73. Coomararwamy 1, Fig. 300
७४. प्रारम्भिक विवेचनांसाठी पहा-
Banerjee P and Agrawala R.C., Hindu Sculptures in Ancient Afganistan, VCV, pp 215-220
75. Dikshut K.N. Buddhist Centres in Afganistan, VCV., pp, 229-238
76. Hartel 2, Fig. 191
77. Hartel 2, Fig. 230, रंगीत चित्र xxxix
78. Hartel 2, Fig. 190 a
79. Hartel 2, Fig. 229 a
80. Hartel 2, Fig. 231































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...