https://trekkerjourney.blogspot.com/2018/06/gandugali-kumara-rama-fort-kummtadurg.html
कुम्मटादुर्ग / गंडगलीकुमार रामना किल्ला कर्नाटक || gandugali kumara rama fort || Kummtadurg ||
गाव : जब्बालगुडा, तालुका / जिल्हा : कोप्पल, प्रकार : गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची : 725 मिटर.
Coordinates : 15°24'37.6"N 76°22'38.5"E
रायचूर-कोप्पळ रस्त्यावर जब्बालगुडा हे गाव लागते, जब्बालगुडा हे रेल्वे स्थानक आहे.
येथून उजवीकडे डोंगर रांगेत हा कुम्मटादुर्ग म्हणजेच गंडगलीकुमार रामना किल्ला आहे.
किल्ल्याचे अगोदरचे नाव हे कुम्मटादुर्ग होते, नंतर त्याचे नामकरण शूर राजकुमार गंडगलीकुमार रामना याचा नावाने ठेवले गेले.
कच्चा मातीचा रस्ता किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जातो, येथून चढ्या वाटेने १/१.५ तासाने ट्रेक करत आपण गड माथ्यावर पोहोचतो.
गडाची तटबंधी हि डोंगर रांग उतरते तशी खाली पायथ्यापर्यंत सर्वदूर आहे. डोंगर हा अवाढ्यव पसरलेला आहे तसाच माथा सुद्धा दूरवर पसरलेला दिसून येतो, त्याचा उपयोग गड निर्मिती साठी पुरेपूर करून घेतला आहे.\
किल्ल्यामंअधे अनेक पाण्याची नैसर्गिक टाक आहेत, त्यापैकी रामा स्वामी तलाव हा क्रिस्टल क्लिअर स्वच्छ सुंदर थंडगार कधीही ना संपणार पिण्याच्या पाण्याचं स्रोत आहे, यात उतरण्यासाठी लोखंडी शिडी बसवलेली आहे.
किल्ल्यामध्ये एकूण तीन मंदिर आहेत, पहिला मंदिर मध्ये अनेक दगडी शिल्प आहेत, दुसरा मंदिर जैन बसदी ए आज उध्वस्त अवस्तेत आहे, तिसरा हनुमान मंदिर उघड्यावर रामा स्वामी तलाव जवळ आहे.
बाल्लेकिल्ला हा मध्यवर्ती आहे, त्याची तटबंधी व इमारतीचे अवशेष पाहता येतात, तसेच बाल्लेकिल्ल्याचा दगडी कमान नसलेला छोटा दरवाजा पूर्वेला आहे. या उंचीवरून सर्वदूर पसरलेला डोंगर रांगांवर पुरातन किल्ल्याचे अवशेष दिसून येतात.
कुमार रामण्णा चे वडील कंम्पलीया राया हे कुम्मटादुर्ग चे राजा होते.
कर्नाटक मध्ये विजयनगर कालावधी आधी १२९० ते १३२० हा मध्यवर्ती कालखंड गंडगलीकुमार रामना यांचा मानला जातो. शूर कुमारा रामण्णा यांनी अनेक लढाया लढल्या, प्रामुख्याने वारंगळ चे काकतीया ,होयासाला वीरबल्लाळास , मुह्हम्मद बिन तुघलक यांच्या सोबत लढलेल्या युंद्धांचा समावेश होतो.
या युद्धांपैकी तुघलक सैन्यांसबत लढत तरुण वयामध्ये शूर कुमारा रामण्णा यांचा मृत्यू झाला.
एक सुंदर अवाढव्य पसरलेला हा किल्ला अनेक लढाई युद्ध मध्ये लढलेला पाहण्यासारखं आहे.
याच किल्यावर २००६ साली कुमार रामण्णा जीवनावर वर आधारित एक कन्नड चित्रपटाचे निर्मिती झाली आहे.
आम्ही किल्ल्यावर गेलो असताना स्थानिक भाविक असा एक मित्रा समूह आला होता, त्यांचं तिथे जेवण बनवण्याचं काम चालू होत, चांगली माणसे होती, नेहमीसारखं त्यांच्याशी संवाद साधून स्थानिक माहिती घेतली.त्यांनी जेवणाचं आग्रह खूप केला परंतु दुपारचं जेवणकरून हा गड सर केला होता व पुढचा गडाकडे प्रवास वेळेचं नियोजनपूर्वक गणित चुकायला नको म्हणून इच्छा असून सुद्धा मानला आवर घालून निघालो.नाहीतर ट्रेक करून झाल्यावर निवांत पणे निसर्गाच्या सानिध्य मध्ये, डोंगर माथ्यावर थंडगार हवा वाहत असताना गरमागरम जेवण तेपण नॉन_व्हेज कोण ट्रेकर नाही म्हणेल नाही का?
हेमागुड्डा किल्ला कर्नाटक ಹೇಮಗುಡ್ಡ #Hemagudda Fort Karnatak
#हेमागुड्डा किल्ला कर्नाटक ಹೇಮಗುಡ್ಡ
गाव : हेमागुडा, तालुका : गंगावती, जिल्हा : कोप्पल, प्रकार :भुईकोट, समुद्रसपाटीपासून उंची : 520 मीटर.
Coordinates: 15°26′1″N
76°23′24″E
कर्नाटक कोप्पलपासून ३० किमी वर तर गंगावथी पासून १८ किमीवर १८ किमी वर हेमागुड्डा हा १४ व्या शतकातील किल्ला आहे.
कनकागिरी राज्याचा भाग असलेला १४ व्या शतकातील हेमागुड्डा किल्लावर पालेगार राजवटीने १५ ते १८ शतकापर्यंत राज्य केले. डोंगराळ भागामुळे हा किल्ला गुप्त असल्यासारखं आहे कारण फक्त पूर्वेकडून किल्ल्याला प्रवेश करता येतो बाकी ३ बाजूनी उंच डोंगर आहेत. या वैशिष्टमुळेच युद्ध वेळी पालेगार साठी हा किल्ला उपयोगी होता.
किल्ल्यामध्ये १५१० ते १५३३ मध्ये कनकागिरी राज्याचा दुसरा राजा उदचा नायक यानें बांधले गेलेलं दुर्गामा देवीच मोठं व पुरातन शिव पार्वती, कनकाचाला, लक्ष्मी नरसिंम्हा अशी प्रसिद्ध मंदिर आहेत.
दसरा सणाला येथे मोठा उत्सव असतो.
किल्याची तटबंधी व त्याला असणारे बुरुज मजबूत बांधणीचे आहेत, मंदिरासमोर एका डोंगरावर एका बुरुजाचे अवशेष दिसून येतात, पण बाकी वर डोंगरावर किल्ल्याचे अवशेष राहिले नाहीत.
बहादूरबंदी किल्ला कर्नाटक ಬಹದ್ದೂರ್ ಬಂಡಿ Bhadur Bandi Fort Karnatak
बहादूरबंदी किल्ला कर्नाटक ಬಹದ್ದೂರ್ ಬಂಡಿ
गाव : बहादूरबंदी, तालुका / जिल्हा : कोप्पल, प्रकार : गिरिदुर्ग , समुद्रसपाटीपासून उंची : 610 मीटर
कोप्पल पासून ५ किमी वर बहादूरबंडी गावाला लागून एका डोंगरावर बहादूरबंदी किल्ला आहे.
अगोदरचे नाव गुंतापुरा परंतु १८ व्या शतकात किल्ल्याला भले_बहादूर_बंदा असे नामकरण झाले व तेच गावाला पण नाव प्रचलित झालं.
गावातील हनुमान मंदिर मोठे आहे, त्यासमोरूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. थोडं पुढे तुटलेल्या पायरीमार्गाने आपण एका मोठ्या दगडाखाली पोहोचतो, या दगडाखाली हनुमान मूर्ती आहे.
थोडं पुढे जात नाही तोच गावातून दोन छोटी मुले, हम किला दिखाने आते है, हम आते है असं करत पुढे गड दाखवत निघाली सुद्धा.
डावीकडे दोन मोठ्या दगडाखाली गडाचे प्रवेशद्वार दिसून येत.मोठा दगडाखालून चालत पुढे जात वर नजर जाते तर दगडामधील जागा प्रकाशयोजनेसाठी उपयोगी असल्याची दिसून येते. नैसर्गिक उबलब्धता व त्याचा केलेला सुरेख कलात्कम उपयोग याने आश्चर्य वाटत.
पुढे पायऱ्याने चढता अजून एक उत्तम दरवाजा दिसतो, तिथे दिवाडी मध्ये हनुमान मूर्ती आहे.आत आलो कि एक पाण्याचं छोटा मातीने भरलेला तलाव दिसत, येथून बाल्लेकिल्ल्याची वेगळी तटबंधी दिसून येते, लांब तटबंधीला खाली दगडावर छोटे दगडासारखा बाहेर आलेलं एका ठराविक नक्षीकाम सारखं दिसत. तटबंधी उंच असून त्याला बुरुज शाबूत आहेत, जंग्या चर्या २/२ आहेत.
पुढे छोट्या पायऱ्याने आपण बुरुज व दरवाज्याकडे येतो, या दरवाजाला जाण्यासाठी एक चोर दरवाजा पूर्वेला आहे तर त्याच ओळीने पश्चिमेकडून मोठा प्रवेशद्वार आहे. चोर छुपा दरवाजातून एका दगडाखालून येणे हा अफलातून अनुभव. छुपा व मोठा दोन्ही दरवाजे समोरासमोर उघडतात, मध्ये जागा आहे.
येथे एक शिलालेख दिसून येतो.हा वाचण्यासाठी खूप लोक येन गेली असे आम्हाला गावातील छोट्या बचे कंपनीने सांगितले.
येथून आपण बाल्लेकिल्ल्याच्या मोठ्या अवाढव्य प्रवेशद्वारापाशी येतो. येथे पहारेकरांच्या देवड्या आहेत
या प्रवेशद्वाराला सुद्धा डावीकडे एक छोटा दरवाजा आहे, या छोट्या दरवाजावर एक शिलालेख कोरलेला दिसून येतो.
मुख्य माथ्यावर इमारतीचे अवशेष आहेत. किल्ला नजरेत भरता येतो व उत्तरेकडे कोप्पल चा किल्ला डोंगर दिसतो.
माथ्यावर २ तलाव , हौद , दोन मंदिर(शिवमंदिर व देवी मंदिर) व दुहेरी तटबंधी आहे.
या तटबंधी खालून दुसऱ्या तटबंधी पर्यंत अजून एक पाण्याचं मोठं टाक, बांधकामाचे अवशेष दिसून येतात.
या तटबंधील ३ चोरदरवाजे आहेत. किल्ल्यावरून खाली हुलीकेरे तलाव दिसतो
किल्ल्याला इतिहासाचे अनेक दंतकथा स्थानिकांमध्ये आहेत. किल्ला १२ या शतकातील आहे असे मानतात.
किल्ला मराठा, टिपू, ब्रिटिश असे अनेक राजवटीखालून गेला असल्यामुळे किल्ल्यावर त्याचे अनेक कलाकौशल्ल्या दिसून येत.
कोप्पल किल्ला कर्नाटक Koppal Fort Karnatak
गाव / तालुका / जिल्हा : कोप्पल, प्रकार : गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची : 680 मीटर.
Coordinates: 15°20'23"N 76°8'55"E
कर्नाटकातील कोप्पल हे तीन बाजूनी डोंगरांनी वेढलेला ऐतेहासिक महत्वपूर्ण शहर, याच डोंगरांवर आहे प्रचंड भव्य कोप्पलचा किल्ला. कोप्पलला कोपणा नगर म्हणून सुद्धा ओळखले जायचे.
देवगिरी किल्ल्यासारखं थोडं हा किल्ला साम्य जाणवतो.
शहराच्या पश्चिमेला किल्ल्यावर जाण्याची पायरीमार्ग आहे.
शहराच्या पश्चिमेला किल्ल्यावर जाण्याची पायरीमार्ग आहे.
किल्ला पुरातन आहे परंतु त्याचा इतिहास नष्ट केला गेला असावा. मराठ्यांच्या ताब्यात अगोदर हा किल्ला होता.
१७८६ मध्ये टिपू सुलतान याने पालेयागार कडून कोप्पल किल्ला हिरावून घेतला व एका फ्रेंच इंजिनिअर कडून किल्ला मजबूत करून घेतला.
पुढे मे १७९० मध्ये ब्रिटिश व निझाम सेनेने किल्ल्याला घेराव घातला.
पायऱ्याने चढत आपण किल्ला पाहतो, प्रत्येक २ मिनिटांवर अनेक दरवाजे, सज्जे, बुरुज दिसतात व त्यामधून दिसणार निरनिराळे देखावे.
गडाला 7 भव्य दिव्य दरवाजे व अनेक बुरुज आहेत. कडेला 3 तलाव,दगडाचा हुशारीने वापर करून बनवलेले व तसेच अनेक नैसर्गिक पाण्याची टाकी, 1 देवी मंदिर, एक नाग शिल्प अप्रतिम असे सर्व पाहता येतात.
गणेश, शिवमंदिर आवर्जून पाहावं अस आहे, माथ्यावर अनेक बांधकामे आहेत,
वर २ फारशी शिलालेख आहेत,
कोप्पल पासून ६ किमी वर असलेला बहादूर बंदी किल्ला दक्षिणेकडे सुंदर दिसतो
शहरात गायकवाड, माने, पवार, चव्हाण अशी सरदार मंडळी आज ही आहेत
3 तास गडफेरी साठी कमीतकमी लागतातच.
Trekkers Journey
इरकलगडा किल्ला कर्नाटक ಇರಕಲ್ ಗಡ Irakagada fort
गाव : इरकलगडा , तालुका / जिल्हा : कोपल, प्रकार : ,गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची 658 मीटर.
Coordinates: 15°28′2″N
76°13′15″E
कोपल या तालुका जिल्ह्याच्या ठिकाणापासून १२ किमी वर कोपल-कुश्तगी (स्टेट हायवे नं ३६) रस्त्यावर इरकलगडा किल्ला आहे.
इरकलगडा किल्ल्याच्या बाजूला दोन गावे आहेत, डावीकडे इरकलगडा गाव तर उजवीकडे यालामगिरा.
यालम गिरा गावातून 10 मिनिट दगडावरून चढाई करून आपण किल्ल्यावर पोहोचतो.
या गिरिदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार यालामगिरा गावच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच इरकलगडा गावभिमुख आहे..
नैसर्गिक दगडाचा पुरेपूर वापर करून बांधलेला हा अप्रतिम दुर्ग आहे,
उत्तर मुखी दरवाजा, ,2 एकर मध्ये असेल, सुसज्ज दरवाजा, बुरुज पाहण्यासारखं आहे.
प्रचंड मोठी दगडं गडात आहे, एक बांधीव टाक, एक आयताकृती टाक पाहता येत.
सुरक्षित रचना असलेला हा सैनिकी टेहळणीसाठी गड असावा असं गड पाहणीतून दिसून येत.
शिवकालीन गजेंद्रगड किल्ला कर्नाटक Gajendragad Fort karnatak
गाव / तालुका : गजेंद्रगड, जिल्हा : गडग, प्रकार : गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची 780 मीटर.
coordinates : 15.73°N 75.98°E
गजेंद्रगड चा अर्थ गजेंद्र- हत्ती, आकाशातून पाहता गजेंद्रगड शहर हे हत्तीसारखा आकाराचे दिसते म्हणून किल्लाचे व शहराचे नाव गजेंद्रगड. स्थानिक लोक या किल्ल्याला गडा म्हणतात. किल्ल्याला शिवाजी किल्ला असेही म्हणतात. कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला.
गजेंद्रगड एका उंच व वर पसरलेल्या डोंगरावर हा किल्ल्ला आहे.गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
पायरीमरागने वर आलो कि सुंदर मराठेशाही धाटणीचे मोठे बुरुज व भक्कम असे गोमुख धाटणीचा सुस्थितीत प्रवेशद्वार स्वागत करतात.
बुरुजांवर दिवड्या, दरवाजावर शरभ, शिलालेख, नागशिल्प, घोडेस्वार चित्र कोरलेले दिसून येतात.
बुरुजांच्या मधोमध सज्जा आहे, तिथे वर पायरीमार्गाने जात येत. गजेंद्रगडाच पूर्ण दर्शन येथून होत.
बुरुज व पुढे इमारतींचे अवशेष व त्यामागे एक प्रचंड मोठा बांधीव तलाव हौद, त्यावर बांधीव मोठा नंदी, हत्ती शिल्प आहेत.
हा डोंगर वर सपाट असल्याने किल्ला दूरवर पसरलेला आहे, तसेच किल्ल्याचे सर्व डोंगरावर अवशेष आहेत.
किल्ल्याची दूरवर तटबंदी प्रेक्षणीय आहे, अप्रतिम असे 15 ते २० बुरुज ,एक दर्गा, देवी मंदिर, 2 दीपमाळ, कोरीव 2 हौद किल्ल्यावर आहेत.
किल्ल्याच्या पायथ्याला घोरपडे यांचा जुना वाडा आहे.
शांतागिरी किल्ला कर्नाटक Shantagiri Fort karnatak
गाव : शांतागिरी, तालुका : रोना, जिल्हा : गडग, समुद्रसपाटीपासून उंची : ६९५ मीटर. प्रकार : गिरिदुर्ग.
coordinates :
15°49'16.5"N 75°49'16.5"E
बदामी - गजेंद्रगड रस्त्यावर बदामीपासून २३ किमी वर डावीकडे शांतागिरी गाव लागते. रस्त्यावरूनच पूर्वेकडे एका डोंगरावर तटबंधी दिसून येते.
गावात SBI बँक आहे,, त्या मागूनच रस्ता जातो गावाच्या मागे पाण्याची टाकी मागून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे, परंतु हि पायवाट बकऱ्या चरण्यासाठी जातात म्हणून आहे. तेव्हा झाडीझुडपातून गड चढताना अंगावर येणारी चढ लागतो.
१५/20 मिनिटाच्या ट्रेक ने आपण एका उध्वस्त प्रवेशद्वारातून गडप्रवेश करतो.गड हा त्रिकोणी आकाराचा आहे.
तीन बाजूला तीन बुरुज व त्रिकोणाच्या खालच्या बाजूला मधून प्रवेशद्वार अशी गडाची रचना आहे. फोटो मध्ये satelite image दिली आहे.
गडाचे तीन बुरुज पैकी दोन गोल तर मधला (त्रिकोणाचा वरचा ) बुरुज हा चौकोणी आहे. या भक्कम चौकोणी बुरुजाला जंग्या व झरोखे दिसून येतात. गड बांधकाम हे चुना ना वापरता केलं गेलं आहे.
पश्चिमेकडील बुरुज हा गोलाकार असून त्यामध्ये जाण्यासाठी थोडं कसरत करून गेलो कि बुरुज मधून १० पायऱ्या आहेत, त्याने आपण बुरुजाच्या माथ्यावर जाऊ शकतो.बुरुजावरून पूर्ण शांतिदूर्ग गाव दृष्टीक्षेपात येत.
गडाची तटबंधी खूप उंच व लांब आहे, प्रवेशद्वार नसल्याने तेवढीच फक्त थोडी तुटलेली दिसून येते बाकी पूर्ण तिन्ही बुरुजांना जोडणारी उंच भक्कम तटबंधी आपल्याला पाहायला मिळते.
तटबंधी पुढे खोल खंदक आहे.
गडामधे एक बांधीव पाण्याचं टाक आहे तिला पाण्याची मोट पाट जोडलेली दिसून येते.
चालुक्यनगरी बदामी किल्ला ಬದಾಮಿ Badami Karnatak
गाव / तालुका : बदामी, जिल्हा : बागलकोट, समुद्रसपाटीपासून उंची : ६४४ मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
coordinates : 15°55′12″N
75°40′49″E
चालुक्यनगरी बदामी हे कर्नाटक राज्यातील पर्यटक क्षेत्र तसेच climbers साठी नवनवे routes म्हणून सर्वाना नावाने तरी परिचित आहेच.
बदामीचे अगोदर नाव वातापी होते याला एक दंतकथा ही आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी आणि इल्वल असे दोघे असुरबंधू रहात होते. ते दाराशी येणाऱ्या पाहुण्यास भोजनासाठी आमंत्रित करत. मग इल्वल वातापीला मारून त्याच्या शरीरापासून बनलेले अन्न त्या पाहुण्यास खाऊ घाली. पाहुण्याने ते अन्न खाताच वातापी त्याचे पोट फाडून बाहेर येई. मग दोघे असुरबंधू त्या मृत पाहुण्यास गट्टम करत. एकदा योगायोगाने अगस्त्य ऋषी या परिसरातून जात होते. इल्वलाने त्यांना आमंत्रित केले व ठरल्याप्रमाणे वातापीच्या शरीरापासून बनलेले अन्न खाऊ घातले. मात्र अगस्त्य ऋषींनी असुरांचा डाव ओळखला व वातापी पोटात जिवंत व्हायच्या आधीच “वातापी जीर्णोSभव” असा मंत्र म्हणून ते अन्न पचवून टाकले. अशा प्रकारे वातापीचा त्याच्या भावाच्याच हस्ते मृत्यू झाला व लोकांची त्यांच्या जाचापासून सुटका झाली. अगस्त्य ऋषींनी घडवून आणलेल्या त्या वधामुळे त्या सरोवरास अगस्त्य तीर्थ असे नाव मिळाले. (कथा माहिती इंटरनेट वर विहंग यांच्या पांथस्थ ब्लॉग मध्ये वाचताना आढळली).
साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला.
सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत.
पाहण्याची ठिकाणे : इथे बदामी किल्ला, ४ गुंफा मंदिर, एक जैन मंदिर, ३ शिव मंदिर यामध्ये प्रसिद्ध मंदिर भूतनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर और दत्तात्रय मंदिर आहेत.
१) दक्षिण किल्ला
२) पुरातत्व्य संग्रहालय
3)बदामी गुंफा :चालुक्य सम्राट मंगलेसन ५७८ ई. शिलालेख, बादामी गुफ़ा सं.३ मध्ये.
4)भूतनाथ मंदिर समूह
5)मल्लिकार्जुन मंदिर समूह
6)गुफ़ा सं.३ में विष्णु मूर्ती प्रतिमा
बागलकोट किल्ला कर्नाटक Bagalkot Fort Karnatak
गाव / तालुका / जिल्हा : बागलकोट, समुद्रसपाटीपासून
उंची : ५३२ मीटर , प्रकार : किनारीभुईकोट.
Coordinates: 16.1817°N
75.6958°E
बागलकोट गावाबाहेर घाटप्रभा नदीकिनारी बागलकोट पुरातन किल्ल्याचे अवशेष आहेत.
सध्या किल्ल्याचे फक्त थोडे अवशेष शिल्लक आहेत. नदीकिनार सुरेख परंतु घाणीचे साम्राज्य आहे.
आजूबाजूच्या परिसरातील शिलालेखनुसार आधी बागलकोट चे नाव बागाडीगे होते.
बागलकोट अनेक विजयी साम्राजानी राज्य केले, विजयनगर , पेशवे ,म्हैसूर राज्य , मराठे, व नंतर १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेले.
वल्लभगड किल्ला कर्नाटक Vallabhagad Fort
गाव : हरगापूर, तालुका : हुक्केरी, जिल्हा : बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची : ८१२ मीटर, प्रकार : गिरीदुर्ग. Coordinates: 16°16'47"N
74°27'37"E
किल्ले वल्लभगड,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व ऐतिहासीक पार्श्वभूमी लाभलेला वल्लभगड. आपल्या दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे वल्लभगडावर दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या जातात.
कोल्हापूरहून बेळगावकडे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाने जाताना संकेश्वरच्या अलीकडे सुमारे ३ कि.मी. अंतरावर डावीकडे हा गड दिसतो.
हरगापूर गाव किल्ल्याचे पायथ्याचे गाव, गाव तसे किल्ल्याला लागूनच आहे. गाडीमार्ग सिमेंट रस्ता थेट मरगुबाई मंदिर जवळ नेतो. मंदिराच्या मागून किल्ल्यावर जाणारी २ मिनिटांची पायवाट आहे.
मोठे बुरुज व त्यातील एकावर चित्र काढलेले दिसून येते.गडाला प्रशस्त प्रवेशद्वार आहे, प्रवेशदारातून आत गेलं कि उजवीकडे हनुमान मंदिर आहे.
वल्लभगडावर मरगूबाई देवीचे मंदिर, हनुमान मंदिर व शिद्राया मंदिर आहे. गडाला प्रशस्त प्रवेशद्वार आहे. गडाच्या माथ्यावर चाळीस फूट खोलीची विहीर आहे. विहिरीमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे असलेला दुसरा छोटा भुयारी मार्ग किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या शिद्राया मंदिराकडे गेला आहे, असा लोकांचा समज आहे.
इतिहास :
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज व कोकणातील जंजिऱ्याचे हबशी यांच्या फौजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकणच्या व गोव्याच्या सरहद्दीजवळ असणाऱ्या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, हिक्केरी तालुक्यातील वल्लभगड, आणि सौंदत्ती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छ्त्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडावरून दुसऱ्या गडावर सांकेतिक संदेश देणे सहज शक्य होत असे
ऎतिहासीक पार्श्वभुमी लाभलेल्या या वल्लभगडाला त्याकाळात अत्यंत महत्व होते. दख्खनवर स्वारी करण्यास शिवाजी महाराज ज्यावेळी येथून गेले. त्यावेळी उठलेल्या त्यांच्या कृष्णा घोडीच्या पाऊलखुणा त्या आठवणींना उजाळा देतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच वल्लभगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख होते. या गडावर ७५ शिलेदार होते, व त्यांचे वंशज वल्लभगडावर आजही आहेत. साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी या वल्लभगडाचे पुनर्बांधणी केली.. सन १६८८ मध्ये वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ मध्ये हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती कोल्हापूरचे राजे होते. त्यानंतर १४ मे १७५३ रोजी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राज्यांनी सदाशिवराव भाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड, पारगड व कलानिधीगड हे किले जहागीर म्हणून दिले, १८४४ रोजी वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा गड काही काळ निपाणीकर तर काही काळ वंटमुरी देसाई यांच्या ताब्यात गेला. कोल्हापूर हे संस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेले असता त्यावेळी हा गड पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला.
गडावर पाहण्याची ठिकाणे.
१) गडदेवी मरगूबाईचे देऊळ २) शिवकालीन हनुमान मंदिर
३) पेशवेकालीन महादेव मंदिर ४) सिद्धेश्वर मंदिर ५) शिवकालीन विहीर
६) पेशवेकालीन हरिद्रादेवी मंदिर (किल्याच्या पायथ्याला पूर्वेला वल्लभगड गावात हे मंदिर आहे).
हुन्नर किल्ला कर्नाटक Hoonur fort karnatak
गाव :हुन्नर,तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव,समुद्रसपाटीपासून उंची 762 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
पुणे बंगळूर हायवे वर कोल्हापूर पासून ८७ किमी वर हिडकल जलाशय 3 बाजूनी पसरला आहे,
याच जलाशयाच्या एका बाजूला एका डोंगरावर हुन्नर चा किल्ला आहे. घाटप्रभा नदीवर हा जलाशय आहे.
जलाशय मोठा असल्याने गडाच्या ३ बाजूनी फक्त पाणी आहे.
जलाशय मोठा असल्याने गडाच्या ३ बाजूनी फक्त पाणी आहे.
हिडकल जलाशय राजा लखमगौडा यांनी बांधला असल्याने या जलाशयाला राजा लखमगौडा जलाशय नावाने हि ओळखतात.
गाडी रस्ता किल्ला पर्यंत जातो,खाली एक सर्किट हाऊस पर्यंत गाडी जाते तेथून 5 मिनिट मध्ये कमान नसलेल्या गोमुख दरवाजा मधून आपण गडावर प्रवेश करतो,
गोमुखी दरवाजा छान आहे त्याला 2 दिवड्या अप्रतिम आहे,
जांभ्या कातळात कोरून काढलेला हा दुर्ग, तटबंदी नैसर्गिक दगड आणि बांधीव करून मजबूत केली आहे.
2 एकर मध्ये गड आहे,1 बांधीव विहीर पाण्याचं टाकं आणि 1 प्रचंड खोल कोरीव विहीर, झेंडा निशाणी बुरुज भक्कम आहे.
पश्चिमेला छोटा गोमुख दरवाजा व बुरुज अप्रतिम आहे,
हुन्नर गाव मधील धरण मध्ये गेलेलं मंदिर, कळस पाहून मन भरून जात, तटबंदी जमिनीलगत आहे खालून छान दिसते वरून दिसत नाही.
किल्ल्यावरून दृश्य अप्रतिम आहे.गोकाक किल्ला कर्नाटक Gokak Fort Karnatak
गाव / तालुका : गोकाक, जिल्हा : बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 742 मीटर, प्रकार :गिरिदुर्ग/
कोल्हापूर पासून अवघ्या १०७ किमी असणारा कर्नाटक मधील गाव/तालुका प्रसिद्ध आहे तो त्याच्या गोकाक वॉटर फॉल्स, धागा गिरणी , हैड्रोइलेकट्रीकल पॉवर प्लांट साठी. गोकाक हे नाव हे यथे असणाऱ्या गोकी झाडापासून झालं असं म्हटलं जाते.
परंतु आधी हा आदिवासी/जंगली लोकांचं प्रदेश काळानुसार रट्टा साम्राज्य (850 Ad-1250Ad), बिजापूर सुलतानेत, टिपू सुलतान व नंतर ब्रिटिश (१८१९) यांच्या अधिपत्याखाली होत. नंतर १८५३ मध्ये एक शहर झालं.
१६ व्य शतकात काही अंतर्गत वादामुळे एक मोठी लढाई राणी अब्बक्का व गोकाक कोठवाल यामध्ये झाली.
त्याचा लढाईचा साक्षीदार असललेला गोकाक चा किल्ला शहराच्या पश्चिमेला आहे.
शहराला खेटून झोपडपट्टी चा विळखा पडलेला डोंगरावर हा गिरीदुर्ग उभा आहे, थोड्या दिवसात झोपडपट्टी गडापर्यंत गेलेली असेलच, नालायक पणा चा कळस आहेत
20 मिनिट चढाई, कोठून चढायचं हेच कळत नाही,हागणदारीतुन, झोपडपट्टी मधून डुकरांमधून रास्ता काढत,
पायवाटेने आपण वर येतो,
गडाचं प्रवेशद्वार हे नैसर्गिक दगड मध्ये बांधीव कमान असलेला दरवाजा मध्ये आहे.
मग दर्गा पुढे तटबंदी मग पुन्हा कमान नसलेला दरवाजा मग मोठा दर्गा,1 बांधीव टाक,12 एकर मध्ये गड आहे, तटबंदी चोहू बाजूने आहे पण जमिनीलगत आहे त्यामुळे वरून दिसत नाही, उत्तरेस घटप्रभा व मार्कंडेया नदी च पात्र आपल्या भोर जवळील नेकलेस पॉईंट सारख दिसत.
बेळगाव किल्ला कर्नाटक Belgaon Fort Karnatak
गाव/तालुका/जिल्हा : बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 723 मीटर, प्रकार : भुईकोट.
बेळगावचा किल्ला हा १२ व्या शतकांतील किल्ला रट्टा साम्राज्यातील बीची राजा यांनी बांधला.
आता शहराच्या मधोमध असलेला हा किल्ला काही भाग मिलिटरीच्या ताब्यात आहे.
बेळगाव किल्ल्यावर अनेक साम्राज्यांनी राज्य केले व तसे हा किल्ला बदलतही गेला, वर्चस्वासाठी झालेले स्थानिक अनेक युद्ध या किल्ल्याने पहिले.
१२०४ मध्ये किल्ला बांधला गेला
१३३६ मध्ये विजयनगर साम्राज्यामध्ये हा किल्ला गेला.
१४७४ मध्ये बहामनी सुलतानेत बिदर यांच्या ताब्यात गड गेले.
१५११ मध्ये आदिलशाही नि बेळगाव जहांगिरी बनवली
१६८६ मध्ये मुघल औरंगजेबने बिजापूर सुलतानेत ला हरवून किल्ला ताब्यात घेतला.
१७०७ मध्ये औरंगजेब मृत्यू नंतर याचा ताबा शूर मराठ्यांकडे आला.
१७७६ मध्ये म्हैसूरच्या हैदर अली ने हा किल्ला काही काळापुरता जिंकला.
नंतर पेशवा व ब्रिटिश यांनी एकत्र हैदर अली ला हरवले.
१८१८ मध्ये कित्तूरच देसाई शिवलिंगा राजू यान ब्रिटिशाना फितूर होऊन त्यांना पेशवा विरुद्ध मदत केली व पेशवान कडून हा किल्ला घेतला.
ब्रिटिशांनी बक्षिसे म्हणून कित्तूर राजू ला बेळगाव शहर व किल्ल्यावर राज्य करण्यास परवानगी दिली.
अंडाकृती आकारात असलेला हा किल्ल्याला सभोवती मोठी तटबंधी व त्याला लागून लांब व खोल अशी खंदक आहेत. खंदकापासून बुरुज हे ३२ फूट उंच होते, किल्ल्याचा आतील भाग हा ९१० मीटर लांब तर ८०० मीटर रुंद होता.
या भुईकोटला 2 दरवाजे आहेत. किल्ल्यामध्ये हिंदू, जैन व मुस्लिम कलाकुसर पुरातन वास्तूंवर दिसून येते.
किल्ल्यामध्ये प्रवेशद्वार , तटबंधी, खंदक , कमळ बस्ती, चिक्की बस्ती पुरातन वास्तू पाहण्यासारखं आहेत.
कमळ बस्ती मध्ये गेला कि मंदिरामध्ये छतावर असलेले कमळ पाहायला विसरू नका.
राजहंसगड/ येळ्ळूरचा किल्ला कर्नाटक Rajhansgad Yellur Fort karnatak
गाव : राजहंसगड/येळ्ळूर, तालुका/जिल्हा बेळगाव, समुद्रसपाटीपासून उंची 942 मीटर, प्रकार : गिरिदुर्ग.
आपल्या मराठी बेळगाव पासून अवघ्या ६ किमी वर आहे राजहंसगड म्हणजेच येळ्ळूर गड हिरव्यागार भातशेतीने भरलेला परिसरमध्ये, अगोदर राजहंसगड गाव किल्ल्यावर होते परंतु आता ते खाली स्थानांतर झाले आहे.
या किल्ल्यावर अनेक राजवटीने राज्य केले प्रामुख्याने यादवस, होयसलास, बहामनी, आदिशशी, मराठे पेशवा.
रस्ता चांगला बनवला आहे त्याने गाडी गडावर जाते.
हा किल्ला उंच असल्याने त्याचा उंचीचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बेळगाव पासून बाहेर म्हणून टेहळणीसाठी वापरला जायचं.
राजहंसगडाने ३ मोठ्या लढाया मध्ये भाग घेतला, १) पेशवा विरुद्ध सरनूरचे नवाब २)पेशवा विरुद्ध टिपू सुलतान फौज ३) राजहंसगड फौज विरुद्ध भीमगड फौज.
लढाई काळात अन्न, पाणी, बंदूक, दारुगोळा, हत्यार पुरवण्यासाठी बेळगाव किल्ला ते राजहंसगड असा भुयारी मार्ग होता
ब्रिटिश काळात या किल्ल्यावर १०० सैनिक संरक्षणासाठी ठेवले जायचे.
किल्लाच डोंगर हा ५ थरामध्ये आहे म्हणून प्रत्येक चढाई मध्ये आपल्याला किल्ल्याचे वेगवेगळे रूप दिसून येत.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला अप्रतिम मराठेशाही बुरुज, सुस्थितीत गोमुख दरवाजा आहे.
पायर्यांनी वर आलो कि लगेच समोर शिवाचे सिद्धेश्वर मंदिर लागते,
किल्ल्याला पूर्ण तटबंदीवरुन फिरत येत.
फक्त दक्षिण तटबंदी ढासळून गेलीय नाहीतर आजही लढाई साठी तयार असा गिरिदुर्ग आहे.
खखणीत 5 बुरुज, प्रेक्षणीय तटबंदी,1 बांधीव गोड पाण्याची विहीर,1 हौद, सिद्धेश्वर मंदिर अप्रतिम दुर्ग आहे, 1 एकर मध्ये असावा.





































































































































































































































No comments:
Post a Comment